अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः नववा
| ॐ नमो भगवते वासुदेवाय | | श्रीमद्भागवतमहापुराणम् | =======================================================| नवमः स्कन्ध: ---नववा स्कंध—९ | ======================================================= ||श्रीगणेशाय नमः||पूर्वी अष्टमस्कंधामध्ये मनु,मनुपुत्र इत्यादिकांच्या निरुपणाने अंतःकरणास सद्धर्म सांगितला आहे.आतां, या नवमस्कंधामध्ये सद्ध-र्माच्या योगाने शुद्धचित्त झालेल्या पुरुषांना,सूर्य व सोम यांच्या वंशातील आख्यानाच्या वर्णने करून अंतर्यामी ईश्वराची कथा,सांगितली आहे.त्यांत पहिल्या तेरा अध्यायांनी सूर्याचा वंश पुढील अकरा अध्यायांनी सोमाचा वंश वर्णन केला आहे.त्यांत पहिल्या अध्यायामध्ये तर वैवस्वत मनूच्या सुद्धूम्ननामक पुत्राच्या वंशात सोमवंशाचा प्रवेश झाला असे सांगण्याकरितां त्या सुद्धूम्नाला स्त्रीत्त्व प्राप्त झाले असे वर्णन केले आहे.||१||
| वैवस्वत मनूचा पुत्र सुद्धुम्नाची कथा भावार्थः---पूर्वी सांगितलेल्याकथाभागाचा उच्चार करून राजा प्रश्न करितो की,–--हे शुकाचार्य,सर्व चवदाही मन्वंतरे मनु,मनुपुत्र इत्यादी सहा विभागांसहित तू मला सांगितली आहेस तशीच त्या मन्वतरामध्ये केलेली अनंत पराक्रमी हरीची चरित्रेही सांगितली आहेत व ती मी श्रवणही केली आहेत.म्हणून आपण--जीवानी श्रीमद्भागवत ग्रंथ दररोज निष्काम श्रवण करावा,कारण त्यामुळे चौथा जो पुरुषार्थ मोकः तो प्राप्त होऊन जन्म--मरण निवृत्त होऊन सुखरूपता या मनुष्य-देहातच प्राप्त होते. ||१|| भावार्थ:---जो हा पूर्वीच्या कल्पामध्ये ज्ञान संपादन केले.||२|| भावार्थ:---तोच या कळपामध्ये विवस्वनाचा पुत्र होऊन वैवस्वतनामक मनु झाला असे तुझ्यापासून मी ऐकिले आहे आणि जे त्या मनुचे इक्ष्वाकूप्रभूती पुत्र झाले तेही तू मला सांगितले आहेस.||३|| हे सर्वज्ञ महाभाग,आता त्याचा वंश आणि त्या वंशात झालेल्या राजाची चरित्रे नित्य श्रवण करण्यची इच्छा करणाऱ्या आम्हास ती वर्णन कर.||४|| भावार्थ:---त्या मनूच्या वंशामध्ये जे राजे पूर्वी होऊन गेले,जे पुढे होतील व जे वर्तमान काळी झाले आहेत त्या सर्व पुण्याकीर्ती राजांची चरित्रे आम्हास कथन कर.||५|| भावार्थ:--सुत म्हणाला---हे ऋषीहो याप्रमाणे परीक्षित राजाने ब्रह्मवेत्या ऋषीच्या सभेमध्ये श्री शुकाचार्यला प्रश्न केला असता परमधर्म वेत्ता तो सर्वज्ञ शुकाचार्य म्हणाला की,------------- ||६|| भावार्थ:---श्री शुकाचार्य म्हणाला हे शत्रुतापना राजा वैवस्वत मनूच्या वंश मी मुख्यत्वेकरून तुला सांगतो तू श्रवण कर--–तो वंश, विस्ताराने वर्णन करण्यास शेकडो वर्षांनीही शक्य होणार नाही. ||७|| भावार्थ:---जो लहानमोठे प्राणीमात्राचा आत्मा परम पुरुष श्रीनारायण तोच प्रलयाचे वेळी हे जग होता म्हणजे त्याचेठीकानी हे सर्व जग लीन होते,जसे आपल्या--जीवाच्या सुषुप्तीअवस्थामध्ये जग लीन होते व पुन्हा सुषुप्तीअवस्था संपून जाग्रतअवस्था प्राप्त झाले असतां पूर्वीप्रमाणेच प्रगट होते,त्याचप्रमाणे महाप्रलयकाळात हे जग परमात्म्यात लीन होते व महाप्रलयसंपल्यानंतर तेच जग उत्पन्न होते. ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थात आपण-मात्र असतोत,त्याचप्रमाणे त्याच्याहून--परमात्म्याहून दुसरे काहीच नव्हते,तर परमात्मा असतोच, कारण तो परमात्मा निर्गुण--निराकार--अविनाशी आहे.||८|| भावार्थ:---त्या श्रीनारायानाच्या नाभीपासून प्रकाशमान असा एक कामालाच कळा उत्पन्न झाला.हे महाराजा परीक्षिते,त्या कमळाच्या कळ्यामध्ये चतुर्मुख ब्रहमदेव उत्पन्न झाला.||९|| भावार्थ:---त्याच्या मनापासून मरीची ऋषी उत्पन्न झाला,कश्यप ऋषी झाला,त्या कश्यपापासूनच दक्ष्यकन्या अदितीच्या उदरी विवस्वनामक पुत्र झाला.||१०|| भावार्थ:---हे राजा त्या विवास्वनापासून संज्ञानामक भार्येच्या उदरी श्राद्धदेवनामक मनु उत्पन्न झाला,त्या शुद्धचित्त मनुला संज्ञानामक पत्नीच्या ठिकाणी दहा पुत्र झाले.||११|| भावार्थ:----त्यांची नांवे--–इक्ष्वाकु,नृग,शर्यती,दिष्ट,धृष्ट,करुशक,नरिष्यंत,पृशध्र,नभग आणि कवी अशी होत.||१२|| भावार्थ:---आता सूर्याचा नातू जो सुध्युम्न त्याला स्त्रीत्व प्राप्त झाले असता,बुधापासून तिच्याठीकानी पुरुरवा इत्यादिक सोमवंशज राजांची प्रवृत्ती झाली हे सांगण्याकरिता प्रस्तावासहित इलेचे आख्यान सांगतात--–इक्ष्वाकुवगैरे पुत्र होण्याच्या पूर्वी पुत्ररहित अशा मनुला पुत्रप्राप्ती होण्यासाठीचा त्या मनूचा आचार्य भगवान समर्थ जो वसिष्ठ-ऋषी त्याने मित्रावरूनदेवांची एकइष्टी (पुत्र-कामेष्टी) केली.||१३|| भावार्थ:---ती चालली असता,केवळ दुधाचा आहार करून राहणारी श्रद्धानामक-मनुची-पत्नी,होत्यजवळ जाऊन त्याला वंदन करून त्याची तिने प्रार्थना केली की,हे ऋषे,मला कन्या जशी होईल त्याप्रमाणे तुम्ही यजन करावे.||१४|| भावार्थ:--- नाम अध्वर्यूने होत्यास यजन कर,असा प्रेष देऊन हवनासाठी होमद्र्व्य घेतले असता तो होता ब्राहमण एकाग्रचित होऊन, राणीने प्रार्थना केलेल्या गोष्टीचे ध्यान करीत असता,त्याने वाचेने "वषट" असा उच्चार करून मनाने "वौषट" असे ध्यान करीत यजन केले.||१५|| भावार्थ:---यजमान संकल्पाच्या विपरीत केलेल्या होत्याच्या त्या यजानाने ती इला नावांचे प्रसिध्द अशी कन्या झाली.तिला पाहून अतिसंतुष्टचित्त न झालेला मनु,वसिष्टगुरूला म्हणाला की,------------- ||१६|| भावार्थ:---हे भगवान ,ब्रह्मावेत्या तुम्ही अनुष्ठान केलेले हे कर्म,संकल्पित फलाहून विपरीत फळ देणारे कसे झाले ?हि मोठी दु:खाची गोष्ठ आहे की,मंत्राचे असे विपरीत फळ होऊ नये असे झाले असता वैदिक कर्मावरच मंत्रावरचा असलेल्या विश्वासाचा लोप होऊन सन्मार्ग नष्ठ होईल.||१७|| भावार्थ:---तुम्ही मंत्राचे स्वरूप,अर्थ व त्याचा प्रयोग जाणणारे इंद्रियाचा निग्रह करणारे व तपाच्या योगाने पाताकाचे जाळून भस्म झालेले असता,तुमच्या संकल्पाचे विपरीत फळ कसे झाले ?जसा देवाचे ठिकाणी खोटेपणा नाही तसे तुमचे ठिकाणी संकल्पाचे विपरीत फळ होऊ नये.||१८|| भावार्थ:----ते त्या मनूचे भाषण एकूण तो भगवान वशिष्ठ ऋषी,होत्साचा विपरीत संकल्प जाणून त्या श्राद्धदेव मनुला म्हणाला की,--– हे मनो तुझ्या होत्साच्या विपरीत संकल्पामुळे जरी हे तुझ्या संकल्पाचे विपरीत फळ झाले आहे तथापि मी आपल्या तपोबलाच्या योगाने तुझे सुपुत्रत्व साधीन,म्हणजे कन्येचाच पुत्र होण्याची तजवीन--व्यवस्था करीन. ||१९-२०|| भावार्थ:---हे परीक्षिते राजा,त्या मायायशस्वी भगवान वशिष्ठ ऋषीने,असा निश्चय करून,इलानामक कन्येचे पुरुषत्व संपादन करण्याच्या,इच्छेने,आदिपुरुष भगवंताची स्तुती केली.||२१|| भावार्थ:----नंतर तो भगवान हरी--ईश्वर वशिष्ठाने केलेल्या स्तुतीने संतुष्ट होऊन,त्याने त्या वसिष्ठाला,"इलानामक-कन्येला" पुरुषत्व प्राप्त होण्याचा वर दिला.योगाने ती इलाचा "सुध्युम्न-नामक" पुरुष श्रेष्ठ झाला. ||२२|| भावार्थ:---हे महाराजा,तो वीर सुध्युम्न,एकेवेळी वनामध्ये मृगया करिण्याकरिता कवच धारण करून,किती-एक प्रधानांनि युक्त होत असता,सुंदर धनुष्य तसेच परम तीक्ष्ण बाण घेऊन सिंधुदेशात उत्पन्न झालेल्या घोड्यावर बसून उत्तर दिशेकडे हरिणाच्या पाठीमागून निघून गेला.||२३||२४|| भावार्थ:---तो सुध्युम्न पुत्र,जेथे भगवान शंकर,पार्वती सहवर्तमान रममाण होत असतो त्या मेरूपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वनामध्ये प्रविष्ट झाला.||२५|| भावार्थ:--हे राजा,शत्रूचा नाश करणाऱ्या त्या सुध्युम्न-पुत्रांने त्या वनामध्ये प्रवेश करीतच त्याने,आपण स्त्री झालो असे व आपल्या घोड्याची घोडी झाली असे पाहिले.||२६|| भावार्थ:---त्याप्रमाणे त्या सुध्युम्नाच्या अनुयायी सर्व लोकांनी आपल्या पुरुषत्त्वाचे स्त्रीत्व झाले असे पाहून एकमेकाकडे पाहत असते खिन्नचीत--दु:खी झाले.||२७|| भावार्थ:---राजा म्हणालहे भगवन शुकाचार्य,असा प्रवेश होतांच स्त्रीत्वसंपादन करणारा तो देश कसा झाला होता?आपोआप तसा देश होण्याचा संभवच नाही.यास्तव कोणी त्याला शाप देऊन तसा केला होता कीं काय? या माझ्या प्रश्नाचे समाधान करावे.कारण,याची श्रवनाविषयी आम्हांस मोठा उत्साह वाटत आहे.||२८|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला:--- हे राजा,एकेवेळी महादेवाचे दर्शन घेण्याकरिता मोठे तपस्वी ऋषी,आपल्या तेजाने दशदिशा प्रकाशयुक्त करीत असता त्या वनामध्ये गेले होते. ||२९|| भावार्थ:--त्या आलेल्या ऋषींना पाहून शंकराच्या मांडीवर नग्न बसलेल्या अंबीकादेविला मोठी लज्जा प्राप्त झाली आणि तिने मोठ्या त्वरेने त्या पतीच्या अंकावरून उठून वस्त्र परिधान केले.||३०|| भावार्थ:---तेव्हा त्या ऋषींनीहि रममाण असणाऱ्या त्या शंकरपार्वतीच्या रतीप्रसंग पाहून त्या स्थलापासून निवृत्त होऊन,त्याप्रसंगाने-- रहित अशा नरनारायणाच्या आश्रमी निघून गेले. ||३१|| भावार्थ:---त्या वेळी आपल्या प्रियेचे प्रीयकरण्याच्या इच्छेने भगवान रुद्राने असे भाषण केले की,--–"जो कोणी पुरुष,या स्थानी प्रवेश करील तो निश्चयाने स्त्री होईल." ||३२|| भावार्थ:---हे राजा तो रुद्रपाश झाल्यानंतर सर्व पुरुष,वनात स्त्रीत्व प्राप्त होईल या भयाने प्रवेश करीत नाहीत.असो सुध्युम्नाची झालेली ती स्त्रीत्व पावलेल्या सेवकजनांनी युक्त असता,या वनात त्या संचार करू लागली.||३३|| भावार्थ:---नंतर अनुचरस्त्रियासहवर्तमान आपल्या आश्रमाच्या सामिपाभागी संचार करणाऱ्या त्या उत्तम स्त्रिया अवलोकन करून,चंद्राचा पुत्र अशा भगवान बुद्धाने,तिची इच्छा धरण केली. ||३४|| भावार्थ:----त्या स्त्रीनेही तो सोम्राजपुत्र बुध,आपणास पती असावा अशी इच्छा धरण केली.याप्रमाणे परस्परांच्या इच्छेने ती उभयंता दंपती झाली,नंतर त्या बुद्धाला त्या स्त्रीचे ठिकाणी पुरूरवानामक पुत्र उत्पन्न झाला.||३५|| भावार्थ:---याप्रमाणे स्त्रीत्व पावलेला मनूचा जो सुधुम्न राजा,त्याने आपल्या कुलाचा आचार्य जो वसिष्ठ त्याचे स्मरण केले असे तुम्ही ऐकिले आहे.||३६|| भावार्थ:---तेव्हा त्याचे स्मरण केल्याने वशिष्ट गुरूने तेथे येवून,त्याची स्त्रीत्व प्राप्तीरूप ती दशा पाहून कृपेने अत्यंत पिडीत असता, पुन्हा सुधुम्नाला पुरुषत्व प्राप्त व्हावे,अशा इच्छेने शंकराची स्तुती करू लागला.||३७|| भावार्थ:---हे राजा तेव्हा तो भगवान शंकर,वासिष्ठ्ने केलेल्या स्तुतीने संतुष्ठ होऊन,त्या वशिष्ठ ऋषीला संतोष उत्पन्न करीत असत आणि जो या वनात प्रविष्ट होईल तो तत्काळ स्त्री होईल अशी आपली वाणीही सत्य करीत असता असे मनाला की,--------||३८|| भावार्थ:---हे वसिष्ठा,तू पुत्र व्हावा म्हणून मनात आणलेला जो हा सुध्युम्न तो,एक महिना पुरुष होईल आणि एक महिना स्त्री होईल अशा व्यवस्थेने यथेच्छपणे पृथ्वीचे रक्षण करो. ||३९|| भावार्थ:---याप्रमाणे वाशिष्ठ्गुरूच्या अनुग्रहाने व्यवस्थेने पुरुषत्व पावोन तो सुध्युम्न राजा पुथ्वीचे पालन करू लागला.तथापि एक महिना स्त्रीत्व पावला म्हणजे तो राजा लज्जेने गुप्त राहत असे मानून त्याला सर्व प्रजा चांगला मानीत नसत.||४०|| भावार्थ:---हरे राजा त्या सुध्युम्न उत्कल,गाय आणि विमल असे तीन पुत्र झाले ते दक्षिण देशाचे अधिपती असून व धर्माविषयी प्रीती युक्त होते.आपण--जीवास निष्काम स्वधर्मांविषयी प्रीती--प्रेम असावयास पाहिजे. ||४१|| भावार्थ:---नंतर बराच काळ निघून गेला असता वृद्धदशा पावलेला भूमंडाळाचा अधिपती तो सुध्युम्न राजा,आपल्या पुरुरवानामक पुत्राला पृथिवीचा राज्यभिषेक करून,आपण तपश्चर्य करण्याकरिता वनात निघून गेला. ||४२|| १-----याप्रमाणे श्रीमदभागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधात सुर्यवंशाच्या निरुपणामध्ये सुध्युम्नस्त्रीत्वकथनरूप हा(१)पहिला अध्याय (४२) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसद्गुरुचरणार्पनमस्तु || ______________________________________________________________________________________________२-----आतां या दुसऱ्या अध्यायामध्ये,मनूच्या दहापुत्रापैकी पुत्ररहित व विरक्त अशा पृषध्र व कवि या दोन पुत्रांचे चरित्र सांगून करूषादिक पांच पुत्राचे वंश थोडक्यांत सांगितले आहेत.||२|| २--- पृषध्र इत्यादी मनूच्या पाच पुत्रांचा वंश ______________________________________________________________________________________________भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला:--–हे राजा याप्रमाणे सुध्यूम्ननामक पुत्र वनामध्ये निघून गेला असता,वैवस्वत मनूने पुत्र प्राप्त होण्याच्या इच्छेने यमुनानदीच्या तीराचे ठिकाणी शंभरवर्षेपर्यत तपश्चर्या केली. ||१|| भावार्थ:---त्या तपश्चर्येमध्ये वैवस्वत मुनुने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र देण्यास समर्थ अशा भगवान हरीचे आराधन केले.नंतर त्याच्या प्रसादाने त्या मनुला त्याच्या सारखेच पराक्रमी इक्ष्वाकूप्रभृति दहा पुत्र प्राप्त झाले.||२|| भावार्थ:---त्या दहा पुत्रापैकी पृषध्रनामक जो मनूचा तो लहानपणी अप्रबुध्द--मंद बुद्धीचा असल्यामुळे वसिष्ठगुरूने त्याला गाईच्या रक्षणाचा अधिकार दिला होता ,म्हणून तो रात्रीच्यावेळी व्याघ्रदिकापासून गाईचे रक्षण करिण्याकरिता हातात तलवार घेऊन सावधपणे जागत राहण्याचे व्रत स्वीकारून गाईचे रक्षण करीत असे. ||३|| भावार्थ:---असे असता एकेदिवशी रात्रीच्या वेळी पर्जन्य वृष्टी करीत असता व्याघ्र,गाईच्या गोठ्यात प्रविष्ठ झाला.तेव्हा त्याला पाहून बसलेल्या गाई,भयाने उठून गोठ्यामध्ये आपली दांवी तोडून घेवून जिकडेतिकडे भ्रमण करू लागल्या. ||४|| भावार्थ:---तेव्हा त्या बलवान व्याघ्राने,एका गाईला धरिली असता ती गाय भयाने विव्हल होऊन मोठ्याने आरडू लागली.तिचे अरडणे एकूण पृशध्र तिच्याजवळ धावून गेला.||५|| भावार्थ:---आणि त्याने हातात तलवार घेवून मोठ्या वेगाने जेथे मेघाच्या योगाने नक्षेत्र लोपून गेली आहेत अशा,रात्रीच्या वेळी न जाणता हा व्याघ्र आहे अशा बुद्धीने कपिला गाईचे मस्तक तोडिले.||६|| भावार्थः---तेव्हा तलवारीच्या अग्राने त्या व्याघ्रचाही एक कान तुटला होता,म्हणून तो अत्यंत भयभीत होऊन मार्गामध्ये रक्त सांडीत त्या गोठ्यातून पळून गेला.||७|| भावार्थः---नंतर शत्रुणा मारणारा तो पृशघ्र रात्रीचे ठिकाणी व्याघ्र मरण पावला असे मानीत असूनही पहाटेच्या वेळी थोडाथोडा प्रकाश पडू लागला असता,आपणच गाय मारली असे त्याच्या दृष्टोत्पत्तीस आले तेव्हा तो फार दु;खित झाला.आपणाकडून--जिवाकडून नजरचुकीने एखाद्या प्राण्याचा वध झाला असता पश्चाताप वाटावयास पाहिजे व आपण यापुढे दक्षता ठेऊन आचरण करावयास पाहिजे.||८|| भावार्थ:---याप्रमाणे अज्ञानेकरून गोवध पाप करणाऱ्या त्या पृषाध्राला,कुलाचार्य वशिष्ठ गुरूने शप दिला की,---अरे या कर्माचा योगाने तू क्षत्रियामध्ये अधम होऊन राहणार नाहीस तर तू शुद्रच होशील.म्हणून आपणाकडून--जिवाकडून कोणत्याही प्राण्यांचा वध होऊ नये,कारण त्यामुळे एका जीवाचा घात केल्याचे पाप भोगावे लागते,म्हणून कोण्याही जीवाचा वध होऊ नये,म्हणून सावध होऊन वागावे.||९|| भावार्थ:----असा कुलगुरू वासिष्ठ्ने शाप दिला असताही त्या पृशध्राने हात जोडून त्या शापच अंगीकार केला.नंतर त्या वीराने जितेंद्रिय होऊन ऋषींना प्रिय असे भागवभ्दजनरूप व्रत धारण केले.आपल्या--जीवाच्या अपराधाची शिक्षा मान्य करावयास पाहिजे.त्या पृशाध्रानें त्या शापाचा अंगीकार ऋषींना प्रिय असे भगवत-भजन केले.म्हणून आपण--जीवानी पश्चाताप होऊन सात्विक कार्य करीत राहावे.||१०|| भावार्थ:----त्याच्या योगाने आपण,सर्व भूतांचे ठिकाणी दयावान व सुखदुखदिकांचे ठिकाणी समदर्शी होऊन भक्तीच्या योगेकारून मायातीत,सर्वात्मा व विकार शून्य अशा भगवान वासुदेवाचे ठिकाणी चित्ताती एकाग्रता पावोन,||११|| भावार्थ:---विषयांचे ठिकाणी आसक्तीरहित,शांतचित्त,इंद्रियांना स्वाधीन ठेवणारा,देह्निर्वाहापुरत्या अन्नाखेरीज सर्व परिग्रह सोडून देणारा, व प्रारब्धाच्या योगानेच प्राप्त झालेल्या आहारादिकेकारुन देहाची वृत्ती चालविणारा होऊन,||१२|| भावार्थ:---परमात्म्याचे ठिकाणी आपले मन निश्चळ स्थापन करून व त्या परमानंद स्वरूपाच्या अनुभवाने तृप्त होऊन समाधान पावत असता,जड,अंध आणि बधीर यांच्यासारखी आपली आकृती धारण करीत या पृथ्वीवर संचार करावे.||१३|| भावार्थ:----अशा प्रकारच्या वृत्तीने युक्त असा तो मननशील पृशध्र,प्रारब्धकर्माचा क्षय झाला असता एकेवेळी अरण्यात जाऊन तेथे चोहोकडून लागलेल्या वणव्याच्या अग्नीत सापडून त्याच्या योगाने ज्यांचे हस्तपादादिक अवयव जळून गेले आहेत,असे असता परब्रहम स्वरूपाला पावला.आपण--जीवनी सत्संग करून स्वरूपाला प्राप्त होऊन परमात्म्याचा अनुभव घ्यावा. ||१४|| भावार्थ:---आता मनूच्या कविनामक पुत्राचाही वंश झाला नाही असे सांगतात--–वैवस्वत मनूच्या इक्ष्वाकूप्रभृती दहा पुत्रामध्ये कनिष्ठ जो कवी तो दहा बारा वर्षच्या वयामध्ये विषयांचे ठिकाणी नि:स्पृह होऊन व आपल्या बंधूसहवर्तमान राज्याचा त्याग करून वनात,प्रविष्ट झाला आणि त्याने,आपल्या चित्तामध्ये स्वप्रकाशपुराण पुरुषाचे ध्यान करून त्याच्या स्वरुपाची प्राप्ती करून घेतली.आपणही जीवानी कविप्रमाणे लहान वयामध्ये विषयांचा त्याग करून सत्संग करावा.सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||१५|| भावार्थ:---करुश्नामक मनूच्या पुत्रापासून उत्तरदेशाचे अधिपती,ब्राहमण भक्ती करणारे व धर्माचे ठिकाणी प्रीतीयुक्त असे करुश्नामक पुत्र झाला त्यापासून भुतजोती झाला व त्यापासून वसुनामक पुत्र झाला.||१७|| भावार्थ:---वसूचा पुत्र प्रतिक झाला,त्याचा पुत्र ओघावन झाला.त्यालाही ओघावांचा पुत्र व ओघवती नावाची एक कन्या झाली तिला सुदर्शन ऋषीने वरिले.||१८|| भावार्थ:---नरीष्यंतनामक मनूच्या पुत्रापासून चीत्रसेन नावाचा पुत्र झाला.त्याला रुक्ष नावाचा पुत्र झाला.त्याला रुक्ष नावाचा पुत्र झाला त्याला मिध्वान त्यापासून कुर्चा व त्याचा पुत्र इंदासेन झाला. ||१९|| भावार्थ:-----इंद्रसेनापासून वितीहोत्र होऊन त्याचा सत्यश्रवा झाला,त्याचा पुत्र उरूश्रवा होऊन त्यापासून देवदत्त झाला. ||२०|| भावार्थ:----त्यापासून अग्निवेश्नामक पुत्र झाला तो साक्षात भगवान अग्नीचा अवतार होता तोच अग्निवेश ऋषी पुढे कानीन या नावावे व जातुकर्ण या नावाने प्रख्यात झाला. ||२१|| भावार्थ:----त्यापासून अग्निवेशानामक गोत्राचे ब्राह्ममन झाले.हे राजा नरीष्यतांचा वंश तुला मी सांगितला,आता मनूचा पुत्र जो दिष्ट त्याचा वंश श्रवण कर. ||२२|| भावार्थ:----दिष्टला नाभाग नावाचा पुत्र झाला तो पुढे संगावयाच्या नाभागाहून दुसरा होय.तो कृषी करणे व गाई राखणे इत्यादी कर्माचा योगाने वैश्यत्व पावला.त्याचा पुत्र भलंदन होय.त्या भलंदना पासून वत्सप्रीति झाला.||२३|| भावार्थ:----वत्सप्रितीचा पुत्र प्रांषु,त्याचा पुत्र प्रमति होय त्या प्रमतीपासून खनित्र झाला.त्यापासून चाक्षुष झाला त्यापासून विविंशती झाला. ||२४|| भावार्थ:----विविंशतीचा पुत्र रंभ,त्याचा पुत्र खनीनेत्र,तो मोठा धार्मिक झाला.हे राझा,त्या खनीनेत्रचा पुत्र करंधमनामक झाला.||२५|| भावार्थः---त्याचा आवीशीत्-नामक पुत्र होय,त्याला मरुत नावाचा सार्वभैम पुत्र झाला. झ्या मरुत्तराजाकडून अंगीराऋषीचा पुत्र महायोगी जो संर्वऋषी त्याने यज्ञ केला.||२६|| भावार्थः---मरुत राजाचा जसा यज्ञ झाला तसा कोणत्याही दुसऱ्या राजाचा यज्ञ झाला नाही.कारण त्याने केलेल्या यज्ञामध्ये यज्ञपात्रदीक जी सामूगी होती ती सर्व सुवर्णमय होती.||२७|| भावार्थः---तसाच त्याच्या यज्ञामध्ये सोमरसाच्या प्राशनाने इंद्राला मोठा आनंद झाला व दक्षिणा यथेच्छ मिळाल्यामुळे ब्राहमण हर्ष पावले.आणि त्या यज्ञामध्ये मरुतनामक देवांचे गन अन्नादिक (वाढपी)होते व विश्वदेव सभासद होते.||२८|| भावार्थः---मरुतालादम या नावाचा पुत्र झाला ,त्याचा पुत्र राज्यवर्धन ,त्याचा पुत्र सुधुती ,त्या सुधुतीला नरनामक पुत्र झाला ||२९|| भावार्थः---त्याचा पुत्र केवल ,त्याच्यापासून बिंदूमान ,त्यापासून वेगवान त्याला बंधूनामक पुत्र झाला.त्याला पुथ्वीपती पती असा तृणबिंदू झाला.||३०|| भावार्थः---दुसऱ्यांनी स्वीकार करण्यास योग्य अशा गुणांचे स्थान अशा त्या तृणबिंदुला,इंद्राच्या अलंबुषानामक श्रेष्ठ अप्सरेने वरिले. नंतर तिच्याठीकाणी त्याला पुत्र झाले व इडविडानावाची इक कन्या झाली.||३१|| भावार्थ:---तिच्या ठिकाणी विश्रव्या ऋषीला कुबेरनामक पुत्र झाला त्या महाबुद्धिवान कुबेराने,योगोश्वर अशा त्या आपल्या पित्यापासून अंतर्धान पावण्याची उत्कृष्ट विद्या संपादन केली.||३२|| भावार्थ:----विशाल,शून्यबंधु आणि धुमकेतू हे तृणबिंदुचे पुत्र होत. त्यांमध्ये विशाल हा वंशवृद्ध करणारा राजा झाला,त्याने वैशालीनामक एक नगरी निर्माण केली.||३३|| भावार्थः---त्या विशालाचा पुत्र हेमचंसर,त्याचा पुत्र धुम्राक्ष,त्याचा पुत्र संयम,त्याचा सहदेव,त्याचा पुत्र कुशाश्रव झाला.||३४|| भावार्थः---कृशाश्वापासून सोमदत्त झाला.ज्या सोमदत्ताने आश्वमेघांच्या योगेकरून यज्ञफलदात्या पुराणपुरुषाचे आराधन करून भगवंतास शरण झाउन उत्तमप्रकारची गती मिळविली. ||३५|| भावार्थ:-----सोमद्ताचा पुत्र सुमती,त्याचा पुत्र जनमेजय हे,विशाल राजाच्या वंशात झालेले राजे तृनबिंदूचे यश वाढविणारे होत.||३६|| २-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील नवम(९)स्कंधामध्ये कृषादिवंशनिरूपणनामक हा दुसरा(२) अध्याय छेत्तीस(३६) श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||२|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________३-----आता तिसऱ्या अध्यायामध्ये स्वायंभूमनूचा तिसरा पुत्र जो शर्याति राजा त्याचा वंश सांगितलेला असून त्यांत सुकन्येचे व रेवतीचे अशी दोन आख्याने परम आश्चर्यकारक सांगितली आहेत.||३|| |३--- महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातिचा वंश ______________________________________________________________________________________________भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला--–हे राजा,मनूचा पुत्र शर्यातीनामक जो राजा तो वेदार्थाचे तत्व जाणणारा झाला.ज्याने अंगिरस ऋषीच्या सत्रामध्ये दुसरे दिवशी करावयाचे कर्म सांगितले आहे. ||१|| त्या शर्यातिची कमलपत्राक्षी सुकन्यानामक कन्या होती.एकेदिवशी त्या कन्याला बरोबर घेऊन तो शर्यती राजा,वनशोभा पाहण्याकरिता वनात जाऊन तेथे च्यवन ऋषीच्या आश्रमात सैन्यासह वर्तमान उतरला.||२|| भावार्थ:---तेथे ती सुकन्या,सख्यांसह वर्तमान वनातील वृक्षाची शोभा पाहत असता तिने एका वारुळाच्या बिलात काजव्यासारखी वारंवार प्रकाश पावणारी दोन जोती अवलोकन केले.||३|| भावार्थ:---तेव्हा दैवाने प्रेरणा केलेल्या त्या सुकन्येच्या मूढपणामुळे एका कंटकाच्या योगाने त्या दोन्ही ज्योतींचा वेध केला (त्या टोचल्या)तेव्हां त्या वारुळाच्या बिळांतून पुष्कळ रक्त स्त्रवूं लागले. ||४|| भावार्थ:----त्याचवेळी शर्यतीराज्याच्या सेनेतील लोकांचा मलमूत्र निरोध झाला,ते पाहून विस्मय पावलेला तो राजर्षी (शर्यती)आपल्या लोकांना म्हणाला की---------------||५|| भावार्थः---अहो,तुम्ही च्यवनमार्गावाच्या तर काहीं अपराध केलात नाही न ?मला तर असे खास वाटते की,आमच्या लोकांपैकी कोणीतरी त्या ऋषीच्या आश्रमाचे दुषण केले आहे,त्यावाचून असा सर्वांना एकदम उपद्रव होणार होणार नाही.||६|| भावार्थ:---असा सर्यती राजाने प्रश्न केला असता,भयाक्रांत झालेली सुकन्या पित्याला म्हणाली की---बाबा,मी कांही केले आहे.वारुळाच्या भोंकामाध्ये माझ्या दृष्टीस पडलेल्या दोन ज्योती 'त्या काय होत्या ते' न जाणणाऱ्या मी,कांट्यांने टोचल्या आहेत.||७|| भावार्थ---असे त्या कन्येचे भाषण एकूण,ज्याला भय प्राप्त झाले आहे अशा शर्यतीराजाने,वरुळामध्ये गुप्त असलेल्या च्यवन भार्गव ऋषीला हळू हळू स्तुती वगैरे करून प्रसन्न करून घेतले. ||८|| भावार्थ:----नंतर त्या च्यवनाच्या अभिप्राय जाणून राजाने ती आपली कन्या त्या ऋषीला दिली.तेव्हा कन्येला वर पाहण्याच्या दैन्यादिक क्लेश्पासून व सैनिक लोकांच्या मुलमुत्र निरोधारूप क्लेशापासून मुक्त होऊन एकाग्रचित्तानें त्या ऋषीचा निरोप घेऊन,राजा आपल्या नगरस निघून गेला.||९|| भावार्थ:---इकडे ती सुकन्या परम कोपिष्ट अशा त्या च्यवननामक पतीला पावोन सावधपणे त्याच्या अभिप्रायाला अनुसरून त्याचप्रमाणे सेवेच्या योगेकरून त्याला संतुष्ट करिती झाली.||१०|| भावार्थ:----पुढे काही काळ निघून गेला असता,एकेदिवशी त्या च्यवन भार्गवाने आपल्या आश्रमामध्ये प्राप्त झालेल्या अश्विनिकुमाराचे पूजन करून त्यांना मनाला की,--–हे अश्विनीकुमार हो,तुम्ही एखाद्याने काही प्रार्थना केली असतां ते संपादन करण्यास समर्थ आहां म्हणून मी तुमची प्रार्थना करितो की,--–अतिशय वृद्धाश्रम प्राप्त झालेल्या मला,तुम्ही तारुण्य वय द्यावेत,यज्ञामध्ये सोमपानरहित अशाही तुम्हांला मी सोमरसाचा भाग देईन;कधी चुकणार नाही.यास्तव उत्तम स्त्रियांनाही मनोहर असे मला तारुण्य वय आणि स्वरूपसौदर्य तुम्ही संपादन करावे. ||११||१२|| भावार्थ:---तेव्हा देवाचे वैध्य अशा त्या अश्विनीकुमार त्याच्या वचनाचा 'ठीक आहे असा' अंगीकार करून आपण,या सिद्धांनी निर्माण केलेल्या डोहामध्ये बुडी मारावी म्हणजे आपला हेतू पूर्ण होईल,असे सांगितले,परंतु तो च्यवनभार्गव जरेच्या योगाने अतीवृद्ध,अंगावर दिसणाऱ्या शिराणी व्याप्त,आणि वळकुट्या व अगदी पिकून गेलेले केस यांच्या योगाने विरूप दिसत असून डोहामध्ये स्वत: जावून बुडी मारल्या.||१३-१४|| भावार्थ:---नंतर त्या डोहातून एकसारखे तीन पुरुष बाहेर पडले.ते अतिसुंदर असल्यामुल्रे स्त्रियांना फार आवडणारे गळ्यामध्ये कमळाच्या माळा व कानांमध्ये कुंडले धारण करणारे उत्तम वस्त्रे परिधान करणारे व स्वरूप एकसारखे होते.||१५|| भावार्थ:----सूर्यासारखे तेज:पुंज तरुण व सारख्या वयाचे अशा त्या तीन पुरुषांना पाहुन पतिव्रता सुकन्या,त्यांमध्ये आपला पति कोणता ते न जाणत असता अश्विनिकुमारास शरण गेली म्हणजे तुम्हीच निराळे राहून माझा पती मला दाखवला अशी तिने अश्विनिकुमराची प्रार्थना केली.||१६|| भावार्थ:----तेव्हा तिच्या पतिव्रतानें संतुष्ट झालेल्या त्या अश्विनिकुमाराने त्या सुकन्येला तिचा पती दाखविला आणि नंतर त्या च्यवन भार्गव ऋषीची आज्ञा घेवून विमानाच्या योगाने स्वर्गलोकी गमन केले. ||१७|| भावार्थ:----नंतर एकेवेळी यज्ञ करण्याची तयारी करणारा शर्यती राजा येण्याकरिता च्यवनऋषीला बोलवण्यासाठी व सुकन्येलाही आणण्यासाठी च्यवनाच्या आश्रमी प्राप्त झाला.त्याने तेथे आपल्या कन्येचा उजव्या बाजूला बसलेल्या सूर्यासारखा तेज:पुंज पुरुष पाहिला.||१८|| भावार्थ:---शर्यतीराजाला पाहताच सुकन्येनें उठून वंदन केले.त्या वेळी व्यभिचार शंकेने असंतुष्ठचित्त झाल्यासारख्या तो राजा,चरणाला वंदन करणाऱ्याही त्या कन्येला आशीर्वाद न देता म्हणाला की,---------||१९|| भावार्थ:---हे जारिणी,तू हे का केलेस? फारच वाईट केलेस.मननशील,तपस्वी,व सर्वलोकांना पूज्य अशा आपल्या च्यवन भार्गव पतीला फसविले.कारण तो अतिवृद्ध असल्यामुळे आपणास योग्य नाही,असे मानून त्याचा त्याग करून ह्या कोणी एका रस्त्याने जात असलेल्या जार पुरुषाला तू सेवेन करीतेस.हर हर ! ||२०|| भावार्थ:---सत्पुरुषाच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्या तुला अशी हि विपरीत बुद्धी कशी आठवली !कारण,तू निर्लज्ज होऊन जार पुरुषाचे सेवन करीतेस,हे कर्म कुळाला दुषण लावणारे आहे.या कर्माच्या योगेकरून तू, पित्याचे--(माझे) आणि भर्त्याचे(पतीचे) कुल नरकात नेवून लोटीत आहेस !! ||२१|| भावार्थ:---याप्रमाणे भाषण करणाऱ्या पित्याला,त्याच्या शंकायुक्त वाक्याने विस्मित झालेले मंदाहास्याने युक्त अशी ती सुकन्या म्हणाली की,---"बाबा,हा माझ्या जवळ असणारा हा पुरुष तुझा जावाई च्यवनभार्गव आहे दुसरा कोणी नाही." आपण--जीवानी इतर जीवांचे बहिरंगावरून परीक्षण न करता अंतरंगावरून परीक्षण करावे,कारण बहिरंग हे बहिरंग असते व अंतरंग हे अंतरंगच असते.बहिरंग म्हणजे वस्तूचे झाकण असते व झाकणात ठेवलेली वस्तू त्याहून वेगळी असते.झाकानावरून आतल्या वस्तूचे परीक्षण करता येत नसते,त्यात फसवा होण्याचीच शक्यता अधिकच असते.त्यामुळे सत्य हे खोटे होऊ शकते व खोटे हे सत्य होऊ शकते,म्हणून वस्तुस्थिती जाणूनच परीक्षण करावे.त्यानुसार निर्णय घ्यावा--म्हणजे निश्चित मत करावे.||२२|| भावार्थ:---असे सांगून त्याला तारुण्य वय मनोहर स्वरूप कसे प्राप्त झालेन ते सर्व वृत्त तिने राजाला कळविले.तेव्हा तो राजा विस्मय युक्त होऊन अत्यंत संतोष पावला आणि त्याने कन्येला आलिंगन दिले.आपल्याबद्दल--जीवाबद्दल कांही गैर-मत झाले असेल तर आपण--जीवानी आपल्याबादालाची वस्तुस्थिती सांगावी व गैर-समज नाहीसा करून यथार्थता पटवून ध्यावे.गैर-समजुतीमुळेच ९०% संबंध बिघडत असतात व वस्तुस्थितीमुळेच १०%संबंध बिघडत असतात.म्हणून आपण ऐकमेकाबद्दलची यथार्थ म्हणजे विवेक--विचार,माहिती घेऊनच मत निश्चित करावे,तर अविवेकाने मत निश्चित करू नये.||२३|| भावार्थ:----नंतर च्यवनभार्गवाने त्या वीर शर्यती--राजाकडून सोमयाग करविला,त्यामध्ये त्याने आपल्या तपोबलाच्या योगेकरून सोमपान रहित अशाही त्या आश्विनिकुमारांना,सोमरसचा भाग दिला म्हणजे त्यांचा सोमभाग देण्यासाठी राजाकडून यजन करविले.आपण समोरच्या व्यक्तीस वचन--शब्द दिला असेल,तर त्या शब्दानुसार त्याची पूर्तता करावी.म्हणजे दिलेल्या शब्दानुसार आचरण करावे.||२४|| भावार्थ:----त्यावेळी ते सहन न होणाऱ्या शीघ्रकोपी इंद्राने त्या यजन करणाऱ्या शर्यतीला मारण्यासाठी वज्र घेतले असता,त्या च्यवनभार्गवाने वज्र धारण केलेल्या तेव्हा तो इंद्राच्या बाहूंचे स्तंभन केले. ||२५|| भावार्थ:----तेव्हा तो इंद्राचा बाहु मोकळा होण्याकरिता,'जे आश्विनीकुमार वैद्य असल्यामुळे पूर्वी सोमाहुतीने बहिष्कृत होते म्हणजे ज्यांना सोमाहुति नव्हती त्यांना,त्या दिवसापासून सर्व देवांनी सोमाहुती देण्याचे कबुल केले,तेव्हा इंद्राचा बाहु मोकळा झाला.||२६|| भावार्थ:---पुढे शर्यती-राजाला उत्तानबर्ही,आनर्त आणि भूरीशेन,असे तीन पुत्र झाले.त्यापैकी आनर्तापासुन रेवत झाला.||२७|| भावार्थ:---त्याने समुद्रामध्ये कुशस्थली-नामक नगरी (द्वारका)निर्माण करून तिच्यामध्ये राहून आनर्तादिक देशाच्या ऐश्वर्याचा उपभोग घेतला.||२८|| भावार्थ:----हे शत्रू दमना राजा,त्या रेवताला ककुद्मी ज्यांमध्ये वडील आहे उत्तम प्रकारे शंभर पुत्र झाले.तो ककुद्मी(रैवत)आपल्या रेवतीनामक कन्येला बरोबर घेवून तिला योग्य वर ब्रहमदेवाजवळ विचारण्याकरिता आपणास जाण्यास प्रतिबंध नसलेल्या ब्रहमलोकास निघून गेला.||२९|| भावार्थ:----तो तेथे गायन चालले होते म्हणून विचारण्यास सवड न झाल्यामुळे क्षणभर उगीच राहिला.आपण कोणाकडे कांही कामानिमित्य गेलेलो असुत व आपण जाण्यापूर्वी त्या ठिकाणी कार्य चालू असेल,तर ते कार्य पूर्ण होईपर्यंत आपण थांबावे व ते कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या कार्याचे प्रतिपादन करावे.||३०|| भावार्थ:---ते गाणें संपल्यावर ब्रहमदेवाला नमस्क करून,हिला योग वर कोणता आहे तो सांगावा असा त्याने प्रश्न केला.ते भाषण ऐकून भगवान ब्रहमदेवानें हास्ये करून त्यालासंगीतले की,--------------||३१|| भावार्थ:----हे राजा इकडे येते वेळी जे तु हिला वर मनात आणिले होतेस ते सर्वही काळाने नाहीसे करून टाकीले आहेत,आता त्याचे पुत्र,नातू,पणतू किवा गोत्रेंहि ऐकू येत नाहीत.||३२|| भावार्थ:----किती काळ गेला असे ?असे म्हणशील तर--–कृत,त्रेता, द्वापार आणि कली हि चार युगे सत्तावीस वेळा होऊन गेली.इतका काल निघून गेला आहे,तर आता हि कन्या कोणाला घ्यावी असे म्हणशील तर सांगतो ऐक हे राजा,तू भूमीवर जा.तेथे हल्ली नारायणाचा अंश,महाबली बलराम अवतीर्ण झाला आहे,त्या नररत्नाला हे कन्यारत्न समर्पण कर.||३३|| भावार्थः---पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता,ज्याची श्रवणेकीर्तने लोकांना पवित्र करणारी आहेत असा भूतपातक भगवान आपल्या त्या शेषरुपी अंशासहवर्तमान हल्ली कृष्ण रूपाने अवतीर्ण झाला आहे.||३४|| भावार्थः---याप्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितल असता,तो रेवत राजा,ब्रह्मदेवाला नमस्कार करून,'पूर्वीचे यक्षांच्या भयाने जिकडेतिकडे जाऊन राहिलेल्या भ्रात्यांनी टाकिलेल्या त्या आपल्या नगराला परत आला. ||३५|| तदनंतर सर्व अवयवांनी सुंदर अशी आपली कन्या बळाच्या योगाने शोभनाऱ्या त्याया बलरामास देऊन,तो रेवत राजा तपश्चर्या करण्यासाठी नरनारायनाच्या बदरीकाश्रमास निघून गेला. ||३६|| ३-----याप्रमाने श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये हा(३)तिसरा अध्याय(३६)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणाअर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________४-----आतां या चवथ्या अध्यायामध्ये वैवस्वतमनूचा नातू जो नाभाग व त्याचा पुत्र जो अंबरीष त्यांची कथा वर्णन केलेली आहे.ज्या अंबरीषापासून कृत्येचीसुद्धां शांतता झाली आहे. |४-- १—नाभाग आणि राजा अंबरिष [१]नाभाग आणि अंबरीषाची कथा ______________________________________________________________________________________________भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला:---वैवस्वत मनूचा पुत्र जो नाभाग त्याचा पुत्र जो नाभागनामक झाला.तो बहुत कालपर्यंत ब्रहमचर्यव्रत धारण करून गुरुकुलाचे ठीकाणी वास करत होता.तेव्हा हा नैष्ठिक ब्रहमचारी आहे असे मानून विभागाच्या वेळी त्याला कांहीच विभाग न ठेवता त्याच्या दुसऱ्या बंधूंनी सर्व द्रव्याचे विभाग करून घेतले.नंतर गुरुपासून विद्या शिकून विद्वान होऊन आलेल्या व आपला विभाग मागणाऱ्या त्या कनिष्ठ भ्रातला वडील बंधुंनी तुझा विभाग पिता आहे असे सांगून पित्याला त्याचे स्वाधीन केले.आपण--जीवानी आपल्या सर्व बंधूचा आपापला संपत्तीचा विभाग देऊन वाटणी करावी.तो विद्दा प्राप्त करण्यासाठी गेलेला असला तरी,परत येणारच असतो.म्हणून संपत्तीचाही विभाग ठेवावा व वडिलाची विभाग ठेवावयास पाहिजे.आपण भावाचा व वडिलांचा संपत्तीचा विभाग न ठेवल्यास स्वधर्माचे पालन न होता परधर्माचे किंवा अधर्माचे पालन होते.परधर्माचे किंवा अधर्माचे पालन केले तर पाप म्हणजेच दु:खाचे फळ भोगावे लागते.म्हणून आपण--जीवानी स्वधर्माचेच पालन करावे.||१|| | भ्रातरोsभाड़्क्त किं मह्यं भजाम पितरं तव | त्वां ममार्यास्तताभाड़्क्षुर्मा पुत्रक तदादृथा: ||२|| भावार्थः---हेच प्रश्नोत्तरांनी दाखवितात---त्यात नाभाग भ्रात्याना विचारितो की,---–हे भ्राते हो,तुम्ही माझ्यासाठी कोणता भाग ठेविला आहे !तेव्हा भ्राते म्हणाले---त्यावेळी आम्ही विसरलो परंतु आता तुला तुझ्या वाटणीबद्दल पित्याला देतो म्हणजे तू पित्यालाच आपला भाग असे समजून ग्रहण कर.तेव्हा तो पित्याजवळ जाऊन म्हणाला की, हे बाबा,वडील भ्रात्यांनी माझ्या भागाबद्दल तुमची योजना केली आहे.पिता म्हणाला--–हे पुत्रक ते त्यांनी तुला फसविण्याकरिता सांगितले आहे;त्यावर तू विश्राम ठेऊ नकोस,कारण द्रव्यासारखा मी भोगाचे साधन नाही.||२|| भावार्थः----तथापि त्यांनी भागत्वेकरून जर मला दिले आहे तर मी तुला जीविकेचा उपाय सांगतो ऐक,-----हे येथून जवळच आंगिरस ऋषी,आज द्वादशानामक सत्राला आरंभ करून बसले आहेत त्यामध्ये षडहांतील सहावे कर्म सुरु झाले असता त्याच्या अनुष्ठानांमध्ये ते विद्वान असूनही विशेष सूक्ताच्या अज्ञानामुळे मोह पावतात,तू ते जाणणारा आहेस.पित्याचे कर्तव्य हे असते की,आपल्या एखाध्या मुलावर इतर मुलांनी अन्याय केला असेल तर त्यास न्याय देऊन,त्याच्या उदार--निर्वाहाची व्यवस्था करावी.||३|| भावार्थः---यास्तव त्या महात्मा ब्राहमणांना तू विश्वेदेवांचा प्रकाश करणाऱ्या “इदमित्या,ये यज्ञेय अशा" दोन सूक्तांचा त्यांच्याकडून पाठ करीव म्हणजे ते कर्म संपल्यावर स्वर्गास जातांना आपल्या सत्रामध्ये शेष राहिलेला धन तुला देतील म्हणून तू त्यांजकडे जा.तदनंतर त्या नाभागाने पित्याने जसे सांगितले होते त्याप्रमाणे केले.नंतर सत्र संपल्यावर ते अंगिरस ऋषी सत्रामध्ये अवशेष राहिलेले द्रव्य देतील त्या नाभागाला देवून स्वर्गास निघून गेले.||४-५|| भावार्थ:---नंतर त्या द्रव्याचा नाभाग स्वीकार करू लागला असतां,एकाएकी काळभोर दृष्टी पडणारा कोणी एक पुरुष (श्रीरुद्र) उत्तर दिशेकडून येऊन,हे यज्ञभूमीवर राहिलेले द्रव्य माझे आहे असे म्हणाला--------------- ||६|| भावार्थ:----त्याचवेळी नाभाग,हे द्रव्य ऋषींनि मला दिलेले असल्यामुळे माझे आहे असे म्हणाला तेव्हा रुद्र म्हणाला की,---माझ्या आणि तुझ्या या द्रव्यानिमित्तक विवादामध्ये तुझ्या पित्यालाच प्रश्न झाला पाहिजे.यास्तव तू आपल्या पित्याला विचारून हे द्रव्य माझे किवा तुझे याचा निश्चय करून ये.असे सांगितले नभागानें पित्याजवळ जावून ते तसेच (हे द्रव्य रुद्राचे किंवा माझे असें)विचारले.||७|| भावार्थ:---तेव्हा तो पिता म्हणाला की,यज्ञभूमीवर अवशेष राहिलेले सर्व,दक्षाच्या यज्ञामध्ये ऋषींनी रुद्राचा भाग असे ठरविले आहे यास्तव तो रुद्र देव,सर्वच ग्रहन करण्याविषयी योग्य आहे,म्हणजे त्याचेच ते सर्व आहे.||८|| | नाभागस्तं प्रणम्याह तवेश किल वास्तुकम् | इत्याह मे पिता ब्रम्हन्छिरसा त्वां प्रसादये ||९|| भावार्थ:----याप्रमाणे पित्याने सांगितले असता,नाभागाने त्या रुद्राल वंदन करून भाषण केले की,--–हे ईश्वरा,हे यज्ञभूमीवर सर्व द्रव्य तुझेच आहे असे माझा पिता म्हणाला,यास्तव हे ब्राह्मणा,मी मस्तकाचे वंदन करून तुझी प्रार्थना करितो की,--–तुझे द्रव्य घेण्यास प्रवृत्त झालेला जो मी त्याच्या अपराधाची क्षमा कर.आपण--जीवानी,जर आपल्याकडून कांही अपराध झाला असेल,तर त्या अपराधाबद्दल क्षमा विनंती करून,नम्र होऊन मागावयास पाहिजे.त्यातच आपले हित साठवलेले असते.त्यामुळे आपली--जीवाची विधायक प्रगती होत असते.त्यामुळे आपणास भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुलभ होत असतो.||९|| | यत् ते पितावदद् धर्मं त्वं च सत्यं प्रभाषसे | ददामि ते मन्त्रदृशे ज्ञानं ब्रम्ह सनातनम् ||१०|| भावार्थ:---तेव्हा रुद्र म्हणाला:---ज्या आर्थी तुझ्या पित्याने तुझा पक्षपात सोडून देवून खरा धर्म सागितलं आहे आणि तुही द्रव्याच्या लोभ टाकून खरे सांगत आहेस,त्या आर्थी वेदार्थ जाणणाऱ्या तुला मी सनातन ब्रह्माचे ज्ञान देतो,म्हणजे माझ्या अनुग्रहाने तूला ब्राहमसाक्षात्कार होवो.म्हणून आपण--जीवानी सत्याचा स्वीकार करून जीवन व्यतीत करावे.सत्य हे सत्याकडे--ब्राह्मकडेच नेत असते.नाभाग सत्य बोलला म्हणून व नाभागच्या वडिलांनी सत्याचे अनुकरण केल्यामुळे रुद्र प्रसन्न झाले,व त्यांनी ब्रह्मज्ञान दिले.त्यामुळे नाभागाचे जन्म--मरण निवृत्त झाले.त्याचप्रमाणे आपणही सत्यानुसार आचरण केले तर,आपणासही संत--महात्मा भेटून ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून,त्यांच्या कृपेने व आपल्या निश्चयाने जन्म--मरण निवृत्त होईल.||१०|| भावार्थ----तसेच जे हे सत्रामध्ये अवशिष्ठ राहिलेले द्रव्य आहे तेही मी तूला दिले आहे,त्याचा तू जीविका चालविण्याकरिता स्वीकार कर, असे बोलून तो सत्यवत्सलभगवान रुद्र तेथेच अंतर्धान पावला.म्हणजेच त्यामुळे--रुद्रामुळे योग-क्षेमही झाला.नाभागच्या भावाने संपत्तीच्या विभागामध्ये अन्याय केले,पण नाभागाने त्याच्यावर केलेल्या अन्याय निमुटपणे स्वीकारला,म्हणूनच भगवंतांनी त्यावर झालेला अन्याय दूर करून त्याचे कल्याण केले,त्याचप्रमाणे आपणावर कांही अन्याय झाला असेल तर आपण तो अन्याय सहन करून जीवन व्यतीत करावे.कांही काळानंतर आपल्यावर झालेला अन्याय दूर होऊन आपले कल्याण--हित होताच असते.उदा--पंदावर झालेला अन्याय सहन केल्यामुळे त्यांचे कल्याण भगवंताने केले.||११|| भावार्थ:----जो पुरुष एकाग्र चित्ताने होऊन या आख्यायाचे सायंकाळी व प्रात:काळी स्मरण करितो तो मंत्रावेत्ता ज्ञानी होऊन परमात्मा--- संबंधी गतीला पावतो;पुन्हा संसार पावत नाही.आपण--जीवानी एकाग्र चित्ताने हे नाभागचे आख्यान श्रवण करावे,कारण त्यामुळे आपले--जीवाचे जन्म--मरण निवृत्त होऊन पुन्हा संसारास--दु:खास प्राप्त होत नाही.||१२|| भावार्थ:---आता,अंबऋषीच्या चरित्रे सांगतो---–नाभागासून उपकारशील व महाभागवत असा अंबरीष राजा झाला.ज्या अंबरीषाला दुर्वास ऋषीने याला हा अग्नि जाळून टाको असे बोलून निर्माण केलेला कृत्यारूप अग्निही स्पर्शसुद्धा करण्यास समर्थ झाला नाही.आपण अंबऋषीचे चरित्र श्रवण करावे,कारण तो राजा "उपकारशील"होता. आपण ते उपकाराशील चरित्र श्रावण केले तर त्याचा जो सदगुण उपकाराशील आपल्यात येण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे आपण "महाभागवत" होतोत.||१३|| भावार्थः—असे एकूण राजा म्हणाला हे सर्वज्ञ,ज्या अंबरीषावर प्रयोग केलेला दुर्निवारही ब्रह्मदंड,आपला पराक्रम चालविण्यास समर्थ झाला नाही,त्या बुद्धिमान अंबरीष राजर्षीचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा मी करीत आहे.||१४|| भावार्थः---श्रीशुक म्हणाले:---महाभाग्यवान अशा त्या अंबरीष-राजाला सप्तद्वीपती पृथ्वी,उपद्रवरहित संपत्ती आणि याभूमिवरील पुरुषांना अतिदुर्लभ व निरुपम असे भोगसाहीत्यरूप ऐश्वर्य प्राप्त झाले असतांही ते सर्व त्याने स्वप्नामध्ये दृष्ठी पडलेल्या पदार्थाप्रमाणे मिथ्याभूत आहे,असे मानिले.कारण तो राजा ज्याच्या-योगाने मोहांत निमग्न होतो त्या ऐश्वर्यांचा नाश आहे असे जाणणारा होता.आपण--जीवानी संत--महात्मा यांचा सत्संग केला,तर आपणास पृथ्वी व संपत्ती--ऐश्वर्य हे सर्व नाशिवंत व दु:खास कारण म्हणजेच मिथ्याभूत आहे,असे कळेल.मिथ्याभूत म्हणजे हे सर्व दिसण्यापुरते आहे,तर टीकाण्यापुरते नाही म्हणजे स्वप्नातील वस्तुसारखे आहे असा निश्चय होईल व त्यामुळे आपणास त्याचा लोभ होणार नाही.असे जर झाले तर आपण जो अविनाशी भगवंत आहे,त्याच्याकडे जाऊन त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न कृत.त्यामुळे त्याचा आपण अनुभव घेऊन,सुखरूप होउत.||१५-१६|| भावार्थः—आणि तो वासुदेव भगवंताचे ठिकाणी व त्याचे भक्त जे साधु त्यांचे ठिकाणी अशी उत्कृष्ठ भक्ती पावला होता की,--–जिच्या योगाने हे विश्व मातीच्या ढेकळांसारखे अतितुच्छ आहे असे दिसून येते.म्हणून आपण जीवानी साधूचा--महात्म्याचा सत्संग करावा,कारण त्यामुळे संसार व संसारातील विषय ठेकळांसारखे अतितुछ--निंदनीय--दु:खदायक असा निश्चय होईल.||१७|| भावार्थः---त्या राजाने,आपले मन श्रीकृष्णाच्या चरणकमालचिंतनविषयी एकाग्र केले होते.म्हणून आपण--जीवानी आपले मन विषयांकडे न लावता,भगवंताकडे लावावे.त्याने आपली भाषणें भगवंताच्या गुणानुवर्णनामध्ये योजिले होती.त्याने आपले हस्त,हरीच्या मंदिराच्या संमार्जनादिक उद्योगांचे ठिकाणी योजिले होते.त्याने आपले कर्णेंद्रिय भगवंताच्या संसारनिवर्तक कथांच्या श्रवाणाविषयी लाविले होते. आपण--जीवानी भाषण--बोलणे,उच्चार भगवंताचे नांव घेण्यातच व्यतीत करावे.आपले हाताचा विनियोग भगवंताच्या सेवेतच करावा.काणांचा विनियोग भगवंताच्या नामोच्चारत,भगवंताच्या लीला-श्रवणात,भगवंताचे स्वरूप जाणण्यातच करावा,संसारासाठी करू नये.त्याचाच आपले पारमार्थिक हित आहे.||१८|| भावार्थः—त्याने आपली दृष्टी मुक्तीदात्या त्या भगवंताच्या मूर्तीच्या व स्थानाच्या दर्शनाविषयी योजीली होती.त्याने आपले त्वगिंद्रिय, भगवद्भक्तांच्या अंगस्पर्शविषयी योजिले होते.त्याने आपले घ्राणेंद्रिय,सुंदर असा तुळशीला,त्या भगवंताच्या चरणकमलासंबंधानें प्राप्त झालेला जो सुगंध त्याचे ठिकाणी योजिले होते.त्याने रसनेंद्रिय भगवंताला निवेदन केलेल्या अन्नादिकांचा रस ग्रहण करण्याविषयीं योजिले होते.आपण--जीवानी जो मुक्तिदाता भगवंत आहे,त्या भगवंताच्या मूर्तीच्या स्थानाच्या दर्शनासाठी नेत्राद्रियांची--दृष्टी,अंगस्पर्शा-- विषयीं त्वगिंद्रिय--दृष्टी,सुगंधाविषयी सुंदर तुळशीच्यामालाविषयी घ्राणेंद्रिय-दृष्टी,अन्नादिकांचा रस ग्रहण-विषयी रसनाद्रियदृष्टी योजाव्यात.अशी दृष्टी ठेवली असता आपणास--जीवास सुखाचा अनुभव येतो.||१९|| भावार्थः—त्याने आपली गाय--इंद्रियें हरीची जी मधुरादिक क्षेत्रे व दुसरीही स्थाने त्यांचे ठिकाणी वारंवार गमन करण्यावियी लावले होते.त्याने आपले मस्तक,ऋषीकेशाच्या चरणवंदनाविषयी योजिले होते.त्याने आपले स्त्रकूचंदनादिक विषयांचे सेवन करणेंहि दास्यानिमित्ताने भगवंताचा प्रसाद घेण्याविषयी 'जशी भगवद्भक्तांचा आश्रय करणारी प्रीति होईल तशा रीतीने' चालविले होतें,विषयभोगांच्या इच्छेने नव्हते.आपण--जीवानी आपली इंद्रियें भगवंताकडे जाण्या-येण्याविषयी.आपले डोके भगवंताच्या चरणाचे दर्शन घेण्याविषयी,स्त्रकूचंदनादिक विषयांचे सेवन दास्यनिमित्ताने,भगवंताविषयी प्रेम--भक्तीनें लावावें.||२०|| भावार्थः---याप्रमाणे तो अंबरीश राजा,प्रतिदिवशी आपला कर्मसमूह,यज्ञाधिपती परमेश्वर अधोक्षज भगवंताचे ठिकाणी अर्पण करून,सर्व ठिकाणी आत्माच आहे अशी भावना करीत असता,भगवत्परायन अशा वसिष्ठादिक ब्राह्मणांनी सांगितलेल्या प्रमाणे या पृथ्वीचे रक्षण करू लागला.आपण सर्व कर्मे निष्काम भावनेने भगवंताच्या अर्पण करावे.सर्वात भगवंत असा आत्मा-भाव आपण--जीवानी ठेऊन संसार करावा.||२१|| भावार्थः—तसेच त्या राजाने आपल्या मोठ्या ऐश्वर्याने वाढविलेल्या 'प्रयाजादिक' अंगणी व दक्षिनेनी युक्त वशिष्ठ,असित गौतम इत्यादिक ऋषीकडून करविलेल्या व धन्व (मारवाड)देशामध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहाभिमुख यापुढे एका पुढे एक अशा क्रमाणे विस्तृत किलेल्या पुष्कळ अश्वमेधांच्या योगेकारून,यज्ञादिकांचे फळ देणाऱ्या भगवंताचे आराधन केले.आपण--जीवानी जो भगवंत फळ देतो त्याची निष्काम भक्ती करावी.||२२|| भावार्थ:---ज्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये वस्त्र भूषणादिक अलंकार धारण करणारे सभासद,ऋत्विज व इतर जन हविर्भाग ग्रहण करण्यासाठी प्राप्त झालेल्या देवासारखे सुंदर व निमेषरहित दिसत होते.त्यांत देव साहजिकच निमेषरहित होते आणि सदस्यादिक लोक ऐश्वर्य पाहण्याचा उत्सुकतेने निमिषरहित झाले होते. ||२३|| भावार्थ:---ज्याचा आश्रय करून राहणाऱ्या मनुष्यांनी देवांना प्रिय अशा स्वर्गलोकाचीहि मुळीच प्रर्थाना केली नाही कारण,त्यांना पुण्य कीर्ती भगवंताचे श्रवण गायन घडत असते,ते देव लोकि दुर्लभ आहे.आपणास--जीवास भगवंताचे श्रवण भक्त मृत्यू-लोकांतच घडत असते,तर स्बर्गात घडत नसते.म्हणून आपण स्वर्गात पुण्य करून जावू नये. ||२४|| भावार्थ:--- स्वर्ग-प्रार्थनेची तर शंकचू राहु दे,परंतू,आपल्या ह्रद्यामध्ये मुक्तीदात्या भगवंताला प्रत्यक्ष पाहणारे जे लोक आहेत त्यांना, सिद्धांनाही दुर्लभ अशी ऐश्वर्ये जरी प्राप्त झाली तरी स्वरूपसाक्षात्काराने तिरस्कार केली असल्यामुले हर्ष उत्पन्न करीत नाहीत.आपण--जीवानी मृत्यू लोकातील विनाशी विषयांचा व सिद्धानांही मिळालेल्या रिद्धी--सिद्धी ह्या नाशिवंत असल्यामुळे,त्यांचाही आपण--जीवांनी त्याग करावा,म्हणून त्यांच्यापासून आपणास--जीवास हर्ष--सुख प्राप्त होऊ नये.||२५|| भावार्थ:----असो याप्रमाणे तो अंबरिष राजा,भक्तियोगाने आणि तपश्चर्याने युक्त अशा स्वधर्माच्या योगाने हरीला संतुष्ट करीत असून त्याने हळूहळू या लोकींचे व परलोकींचे विषयभोगसबंधी सर्व अभिलाष सोडून दिले.आपण--जीवानी स्वधर्मानुसार निष्काम कर्म करावे व स्वधर्मानुसार निष्काम भक्ती करावी,कारण त्यामुळे भगवंत संतुष्ट होतो.भगवंत संतुष्ट झाले असता मृत्यू लोकातील व परलोकांतील विषयांविषयी वैराग्य येते.विषयांविषयी वैराग्य आले की,भगवंत साधूची--महात्म्याची भेट घालून देतो.त्यामुळे आपणास सत्संग घडतो.||२६|| भावार्थ:---तो असे की,गृहे,स्त्रीया,पुत्र,बंधु,श्रेष्ठ,गज,रथ,घोडे,शिपाई,अक्षय भांडारगृहे,इत्यादिक वस्तूंचे ठिकाणी,त्याने हि नश्वर असल्या-- मुळे पुरुषार्थरूपी नाहीत असा आपल्या बुद्धीचा निश्चय केला होता.आपण--जीवानी गृहे,स्त्रियां,पुत्र,बंधू,श्रेष्ठ,गज,रथ,घोडे,शिपाई,अक्षय भांडार-गृहे,इत्यादिक सर्व अनात्मा असल्यामुळे नश्वर आहेत.जे--जे नश्वर आहे,ते--ते दु:खास कारण आहे.म्हणून पुरुषार्थ-रूपी नसून दु:खरूप आहेत,असा निश्चय करावा. ||२७|| भावार्थ:---बरे अशा प्रकारच्या त्या राजाने शत्रु कसे जिंकले ?व राज्य निर्वह कसा केल ?अशी शंका आली असता सांगतो--- त्या राज्याच्या एकांतभक्तीभावाने संतुष्ठ झालेल्या भगवंताने,सर्व शत्रुंना भय उत्पन्न करणारे व आपल्या भक्तांचे सर्व बांजूनी रक्षण करणारे सुदर्शन चक्र त्याला दिले होते.||२८|| भावार्थः---त्याविषयी प्रसंगाने प्राप्त झालेली कथा सांगतो,---एकावेळी श्रीकृष्णाचे आराधन करण्याची इच्छा त्या अंबऋषि वीराने आपल्यासारखाच भगवदारधनरूप स्वभावाच्या भार्येसह वर्तनान,संवत्सरपर्यंत साधनद्वादशी व्रत आचरण करण्याचा नियम धारण केला.आपण--जीवानी संवत्सरपर्यंत साधनद्वादशी व्रत करावे,कारण त्यामुळे आपले निष्काम केले,तर अंत:करण शुद्ध होते किंवा सकाम केले पुण्य होते.||२९|| भावार्थः—त्याने व्रताच्या शेवटी "कार्तिकमासामध्ये सुद्ध दशमीच्या दिवशी नक्त--एक वेळेस जेवण," "एकादशीच्या दिवशी उपोषण" आणि "द्वादशीच्या दिवशी एकभुक्त--सूर्योदय होण्यापूर्वी एक वेळ जेवण करणें न त्यानंतर दिवसा कांहीच न खाने" करण्याच्या नियम स्वीकारून,द्वादशीच्या यमुनेमध्यें स्नान करून मधुवनामध्ये श्रीहरीचे पूजन केले.आपण--जीवानी याप्रमाणे नेहमीच--बाराही महिने हे व्रत याप्रमाणे नेहमीच करावे,कारण निष्काम केले तर अंत:करणाची शुद्धता होते,व सकाम केले तर पुण्य होते.||३०|| भावार्थः—ते असे की,--–चंदन पुष्पादिक सर्व उपचारांच्या समृद्धीने युक्त अशा महाभिषेक विधीने अभिषेक करून वस्त्रे,भूषणे,चंदण,पुष्पे, अर्घे,धुप,दीप इत्यादिक उपचारांनी एकाग्रचित्ताने भगवंताचे पूजन केले,तसेच सर्व विषयांविषयी निरपेक्ष अशा भगतवद्भक्त ब्राहमणाचेहि पुजन केले.आपण--जीवानी जो ब्रह्मज्ञानी पुरुष असतो,जो ब्रह्मज्ञानी असतो,त्यांनी विषयांचा त्याग केलेलाच असतो.त्यास "ब्राह्मण" असे म्हणतात.अशा ब्राह्मणाचे पूजन करावे व दान करावे,कारण तो सत्पात्र असतो.||३१-३२|| भावार्थ:---आणि त्या दानयोग्य ब्राहमणांना,ज्यांची शिंगे सुवर्णाने बांधवलेली आहेत,ज्यांचे खूरे रुप्याने मढविलेले आहेत,ज्यांच्यावर वस्त्राच्या झुली घातलेल्या आहेत,पुष्कळ दुध देणाऱ्या,सुस्वभावाच्या,प्रथम प्रसुत झालेल्या,तरुण,शिंगे पुच्छ कान व डोळे वगैरे अवयावणी सुरेख,वत्स्सहित दोहन करण्याची भांडी सुवर्णपुष्पांच्या माळा,गोंडेवगैरे अलंकारांनी युक्त अशा साठकोटी गाई,त्यांच्या घरी पाठवून दिल्या आणि त्यांना प्रथम उत्तम रुचिकर अशा षड्ररसान्नेचे यथेच्छ भोजन घालून---||३३-३४|| भावार्थः—नंतर इच्छेप्रमाणे दक्षिणा दिली असता,आपण--जीवानी यथाशक्ती वरीलप्रमाणे गाई दान कराव्यात,कारण अशा सत्पात्रास निष्काम दान देले असता अंत:करण शुद्ध होते.सकाम दान दिल्यास पुण्य प्राप्त होते.त्यांनी--सत्पात्र ब्राह्मणांनी आशीर्वाद देवून राजाला भोजन करण्याची आज्ञा दिली.आपण--जीवानी अगोदर सत्पात्रास भोजन व दक्षणा देऊन नंतर आपण--जीवांनी भोजन करावे.अगोदर किंवा बरोबर जेवण करू नये,तर त्यानंतर भोजन करावे.तेव्हा तो राजा,पारणा करण्याविषयी उद्युक्त झाला.त्याचवेळी त्याच्याजवळ भगवान दुर्वास ऋषी,साक्षात अतिथिरूपाने प्राप्त झाला.||३५|| भावार्थः—तेव्हा त्या राजाने त्या आलेल्या अतिथीला उत्थापन--उभे राहून--नम्र होऊन--आदर देवून,त्याची आसनपद्यादिकांचा योगेकारून पूजा केली आणि पायावर मस्तक ठेवून आपण येथे भोजन करावे अशी प्रथांना केली.आपण--जीवानी आपल्याकडे साधू--संत--महात्मा आले असतील तर वरीलप्रमाणे आदर-सत्कार करावा.||३६|| भावार्थः—तेव्हा त्या ऋषीने त्या राजाच्या प्रार्थनेचा अंगीकार करून तो माध्यान्हिक कृत्य करण्याकरिता निघून गेला.त्याने यमुनेच्या शुध्द उदकामध्ये ब्रहमस्वरूपाचे ध्यान करीत करीत स्वस्थपणें स्नान केले.||३७|| भावार्थः—त्यावेळी द्वादशी एक घटीकाच अवशेष राहिल्यामुळे धर्मसंकट प्राप्त झाले असता,धर्मवेत्या त्या अंबरीश राजाने ब्राहमनाबरोबर पारणेबद्दलाचा विचार चालविला.||३८|| भावार्थ:----राजा म्हणतो:--- हे विप्रहो अतिथिरूपाने आलेल्या व निमंत्रण केलेल्या ब्राह्मणास भोजन घातल्या खेरीज आपण भोजन केले असता मोठा दोष(अधर्म)आहे.तसाचा द्वादशीमध्ये पारणा झाली नाही तर व्रतवैगुण्यरूप दोष प्राप्त होणार.तस्मात जे केले असतां माझे कल्याण होईल व अधर्महि मला स्पर्श करणार नाही ते मला सांगा.आपण--जीवांनी एखादे व्रत करण्याविषयी कसे करावे याविषयी शंका येत असेल तर सत्पात्र ब्राह्मणास विचारावे,व त्यानुसार व्रत करावे,मनाने करू नये.||३९|| भावार्थ:---याप्रमाणे ब्राह्माणांबरोबर विचार करून निश्चय करितो की,--ज्याअर्थी उदक प्राशन केले असता तें भोजन केल्यासारखे व भोजन न केल्यासारखेहि वेदांनी सांगितले आहे त्याअर्थी हे विप्रहो,केवळ उदकाच्या योगानें मी व्रताची पारणा(समाप्ती)करितो.आपणही--जीवांनी अशा प्रसंगामध्ये अडचण आली असता याप्रमाणे निर्णय घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे.||४०|| भावार्थ:--याप्रमाणे निश्चय करून त्या राजर्षी अंबऋषीने उदकांचे प्राशन केले आणि हे कुरुश्रेष्ठा तो राजा,मनाने भगवंताचे चिंतन करीत असता,दुर्वास ऋषी येण्याच्या मार्ग प्रतीक्षा करीत राहिला.आपण--जीवानीन आपणाकडे संत--महात्मा येत असेल तर आपण ते येत आहेत,म्हणून त्यांची प्रतीक्षा करावी.ते येण्यापूर्वी आपण कांही सेवन न करता त्यांच्या सेवन्याविषयी पूर्व त्यति पूर्ण करावी.||४१|| भावार्थ:---नंतर माध्यमिक कर्म करून दुर्वास ऋषी यमुनेच्या तीरापासून आला असता,राजाने त्याचे अभिनंदन केले;तत्रापि त्याने योग सामर्थ्य युक्त आपल्या बुद्धीने,आपणास सोडून राजाने व्रताची पारणा केली असे जाणिले.||४२|| भावार्थ:----तेव्हा तो अत्यंत बुभुक्षित--भुकेने व्याप्त झाला होता म्हणून क्रोधाच्या आवेशाने ज्याचे शरीर थरथर कापत आहे असा भृकुटी चढविल्यामुळे वक्रमुखा झालेला तो दुर्वास ऋषी हात जोडून उभा राहिलेला राजस म्हणाला की,---||४३|| भावार्थ:----हे जनहो,आपणच स्वतंत्र असे मानणारे,संपत्तीच्या योगाने उन्मत्त झालेला,विष्णूचा अभक्त व सवभावाने क्रूर अशा या अंबऋिष राजाचा केवढा हा अन्याय पहा !||४४|| भावार्थ:---अरे,जो तू अतिथी रूपाने आलेल्या मला योगाने सत्काराने भोजनासाठी निमंत्रण करून मला भोजन न देता स्वत: भोजन केलेस त्या तुला अन्यायाचे फळ आताचा मी दाखवितो.वास्तविक पाहता संत--महात्मा ऋषी हा शांत,दयाळू असतो.तो इतरावर अन्याय करीत नसतो,इतरांना अन्यायापासून दूर ठेवीत असतो.||४५|| भावार्थ:---असे बोलून रोशने प्रदीप्त झालेल्या त्या दुर्वास ऋषीने आपली जटा उपटून जमिनीवर आपटली आणि तिच्या योगाने त्या अंबरिषला मारण्याकरिता प्रलयकालाच्या अग्निसारखा एक कृत्य केली. ||४६|| भावार्थ:----त्या हातात खड्ग घेवून अंगावर चालून येणाऱ्या व येत असतांना पायांच्या योगाने भूमीला कांपविणाऱ्या व जाज्वल्यमान अशा अतिभयंकर कृत्येला पाहूनही तो राजा,आपल्या स्थानाला किंचित सुद्धा चलन पावला नाही.||४७|| भावार्थ:---त्यावेळी पूर्वीच अंबरुषिच्या रक्षणा करिता महात्म्य पुरुषाने योजिलेले सुदर्शण नामक,त्या कृत्येला,जसा अग्नी क्रुद्ध झालेल्या सर्पाला जाळून टाकितो त्याप्रमाणे जाळून टाकिलें. ||४८|| भावार्थ:----नंतर दुर्वास ऋषी,कृत्य उत्पन्न करण्याचा आपला प्रयत्न निष्फळ झाला असे पाहून आणि ते सुदर्शन चक्र आपल्या समोर धावत येत आहे असे पाहून,भयभीत झाला आणि आपल्या प्राणाचे रक्षण करण्याच्या इच्छेने दशदिशाकडे धावू लागला.आपण--जीवांनी इतरांवर अन्याय केला तर,आपल्यावर--जीवावर अन्याय होत असतो,म्हणून आपण इतरांवर अन्य कधीच करू नये,तर इतरावांवर झालेला अन्याय दूर करण्याचा आवश्य प्रयत्न करावा.त्यातच आपले--जीवांचे हित असते. ||४९|| भावार्थ:----त्यावेळी जसा सर्पाच्या मागे उर्ध्वभागी ज्वाला पसरलेल्या वनातील प्रचंड अग्नी धावतो त्याप्रमाणे त्या धावणाऱ्या दुर्वास ऋषीच्या मागे भगवंताचे सुदर्शन चक्र धावू लागले.तेव्हा आपल्या मागे लागलेल्या त्या चक्राला पाहून भयभीत झालेला तो दुर्वास ऋषी, मेरूपर्वताच्या गुहेमध्ये प्रवेश करावा या हेतूने धावू लागला. ||५०|| भावार्थ:---याप्रमाणे धावणारा तो ऋषी,दिशा आकाश,पृथ्वी साप्त्पातले,सप्तसमुद्र,पालाकांसहित सर्वलोक व स्वर्ग इतक्याही ठिकाणी यथाशक्ती धावत गेला,परंतु जेथे तो धावत जात होता तेथे--तेथे त्याला असह्यतेज असे सुदर्शनचक्र त्याच्या दृष्टीस पडे.||५१|| भावार्थः—----नंतर त्याला जेव्हा कोठेच रक्षण मिळेना तेव्हा तो मनामध्ये फार भिऊन रक्षकाच शोध करीत ब्रहमदेवाला शरण भावार्थ:---ते एकूण ब्रहमदेव म्हणाला--–हे मुने ब्राह्मंडासह वर्तमान ह्या माझ्या स्थानाला जाळण्याची इच्छा करणाऱ्या ज्या कालरूपी विष्णूच्या भ्रुकुटीचालनेकरुनच दोनपरार्ध संज्ञक कालामध्ये होणारा जगताच्या जन्मादि व्यापाररूप क्रीडेच्या शेवटी,हे माझे स्थान नाश पावते.||५३|| भावार्थ:----याप्रमाणे ब्रहमदेवाने शंकर,दक्ष,व भृगुइत्यादिक तसेच मरीच्यादी तसेच प्रजापती,एकादश रुद्र व इंद्रादिक देव हे ज्यात मुख्य आहेत ते सर्वही आम्ही,ज्या भगवंताची आज्ञा पावोन,जसे लोकांचे हित होईल तशाप्रकारे ती आज्ञा आपल्या मस्तकी धरण करितो. यास्तव त्याच्या भक्तास द्रोह करणाऱ्या तुझे रक्षण करण्यास मी समर्थ नाही.आपण--जीव ज्यांच्या आश्रयास आहे व आपला जो आश्रय आहे,त्याच्या भक्ताच्या विरोधात कृत्य करावे का?अर्थच करू नये,करता येणारच नाही,म्हणून ब्रह्म म्हणतात की,आम्ही तुझे--दुर्वास ऋषीचे कार्य कार्यास सहकार्य करू शकत नाहीत.केलेच तर आमचा आश्रय राहणार नाही. ||५४|| भावार्थ:----याप्रमाणे ब्रहमदेवाने प्रत्याख्यान केले असता,विष्णूच्या चक्राने संतापी झालेल्या तो दुर्वास ऋषी,कैलास्वामी शंकराला शरण जावून,"विष्णूचक्रापासून तू माझे रक्षण कर" अशी प्रार्थना करू लागला. ||५५|| भावार्थ:----तेव्हां श्रीशंकर म्हणाला बा दुर्वासऋषे,ज्या ब्रह्मांडामध्ये लोकांचे अधिपती असा अभिमान बाळगणारे आम्ही भ्रमन पावतों व यांच्यासारखे दुसरेही हजारो ब्रह्मांड देह,ज्या व्यापक परमेश्वराचे ठिकाणी सृष्टीकाली उत्पन्न होतात व संहारकाली नाश पावतात, त्याच्या चक्रापासून तुझे रक्षण करण्यास आम्ही खरोखर समर्थ नाही.||५६|| भावार्थ:-----मी सनत्कुमार,नारद,भगवान ब्रहमदेव,कपिल अपांततरतम,देवल,धर्म,आसुरी,------||५७|| भावार्थ:----मरीच्यादिक ऋषी व दुसरे विद्या-तपोयोगनिष्ठ असे सर्व आम्ही,सर्वज्ञ असूनही मायेने वेष्टित असल्यामुळे ज्या भगवंताच्या मायेला जानात नाही.यांच्यापेक्षा म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा व शंकरापेक्षा भगवान विष्णू हा श्रेष्ठ आहे,म्हणून आम्हांस त्याच्याविषयी आदरभाव अधिक असल्यामुळे त्यांच्या विरोधात कार्य करण्यास असमर्थ आहोत असे सर्वांनी दुर्वास ऋषीस सांगितले.म्हणून आपण जीवांनी जे आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत,असे पाहून त्यांच्या विरोधात कोणतीही कृती करू नये,तर त्यांच्याविषयी अधिक आदरभाव ठेवावा व त्यानुसार आचरण करावे.||५८|| भावार्थ:----त्या विश्वेश्वर भगवंताचे हे सुदर्शननामकचक्र,आम्हा सर्वानांही सहन करण्यास मोठे कठीण आहे,यास्तव तू त्या भगवंतालाच शरण जा तो हरी तुझे कल्याण करील.या इतर सर्वांनी त्या दुर्वास ऋषींना भगवंताकडे जाण्याचा मार्ग सांगितला.आपणावर असा प्रसंग आला तर आपण श्रेष्ठांच्या विरोधात सहकार्य न करता,त्या श्रेष्ठांकडे आदराने पाठवावे. ||५९|| भावार्थ:----नंतर तो दुर्वास ऋषी,आपल्या रक्षणाविषयी निराश होऊन,तेथून लक्ष्मीसह वर्तमान श्रीनिवास विष्णू जेथे राह्तो,त्या वैकुंठ-- नामक भगवंताच्या स्थानास निघून गेला. ||६०|| भावार्थ:----तेथेही तो विष्णूचक्राच्या ज्वालेने पोळत असल्यामुळे कम्पयुक्त होऊन,त्या भगवंताच्या चरणमुळाचे ठिकाणी जाऊन पडला आणि म्हणाला की,--–हे विश्व रक्षका,प्रभो,अनंता,तू आता तुझ्या भक्ताच्या अपराध करणाऱ्याही माझे रक्षण कर.आपण--जीवानी आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्यापेक्षाही कनिष्ठ असलेल्यांचा अपराध केला असेल तर आपल्या अपराधाविषयी त्यांच्याकडे क्षमा मागून पश्चाताप व्यक्त करावा.यातच आपले हित आहे,यातच मानवता आहे.||६१|| भावार्थः—हे विष्णू,तुझा निरतिशय प्रभाव न जाणणारा मी तुझ्या भक्ताचा (अंबरीशाचा व तादानुयायी लोकांचा )अपराध केला आहे, त्याची निष्कृति कर,म्हणजे अपराध सहन करून माझे रक्षण कर.आणि हेच योग्य आहे.कारण ज्या तुझे नांव उच्चारिले असता, नरकातलाहि प्राणी नरकापासून मुक्त होते त्या तुला अश्यक्य काय आहे !काहीच नाही.आपण ज्यांचा अपराध केला आहे,त्यांच्याविषयी स्तुती करून अपराधाबद्दल क्षमा मागणे आपला स्वधर्म आहे.||६२|| | अहं भक्तपराधीनो ह्यस्वतन्त्र इव द्विज | साधुभिर्ग्रस्तहृद्यो भक्तैर्भक्तजनप्रियः ||६३|| भावार्थः—-भगवान म्हणाला:---हे ब्राहमणा,मी भक्त-पराधीन आहे यास्तव तुझ्या रक्षणाविषयी स्वतंत्र असल्यासारखा नाही.कारण निरपेक्ष भक्तांनी प्रेमाने माझे हृदय अगदि वश करून घेतले आहे,म्हणून ते भक्तजन मला सर्वांपेक्षाहिं प्रिय आहेत.आपण--जीवानी भगवंताची निष्काम भक्ती केली तर तो भगवंत भक्तांच्या अधीन होतो,फक्त भक्तांचे ऐकतो,तर इतरांचे म्हणजे लक्ष्मीचेही तेवढे ऐकत नाही,जेवढे निष्काम भक्तांचेच ऐकतो.म्हणून आपण--जीवांनी भगवंताची निष्कामच भक्ती करावी.आपण--जीवांनी भगवंताची सकाम भक्ती--संसारातील विषयांविषयी भक्ती केली तर आपण जीव भगवंताचे भक्त न होता संसाराचेच--विषयांचेच भक्त होतोत,असा विवेक करून लक्षात असू द्यावे व त्यानुसार भक्ती करावी.||६३|| | नाहमात्मानमाशासे मद्भक्तैः साधुभिर्विना | श्रियं चात्यन्तिकिं ब्रम्हन् येषां गतीरहं परा ||६४|| भावार्थः—हे ब्रह्मन्- ज्यांचा मी परम आश्रय आहे त्या परमविवेकी भक्तांवाचून मी आपल्या आत्म्याची आणि माझाच आश्रय करून स्थिर राहणाऱ्या लक्ष्मीचासुद्धा इच्छा करीत नाही,मग दुसऱ्याची कथा काय ? म्हणून आपण--जीवांनी जे भक्त परमाविवेकी--निष्काम भक्त आहेत ते जर धन--वैभव--मानापमान,देहसंबंधीची--पति--पत्नीची,आई--वडिलांची पुत्र--पुत्रीची त्याग त्याग करून व त्यांच्यावर प्रेम कमी करून माझ्यावर--भगवंतावर अधिक प्रेम करतात,तर मी प्राधान्य कोणास द्ध्यावे ? मी जर लक्ष्मीस प्राधाने दिले तर मला भगवंतास--सर्वज्ञ म्हणावे का ? अल्पज्ञानी म्हणावे का ? किंवा काय म्हणावे ? ||६४|| भावार्थ:---ज्या भक्तांनी,स्त्रिया,घरे,पुत्र,आप्त,प्राण,द्रव्य हा लोक व परलोक या सर्वांचा त्याग करून माचा आश्रय केला आहे,त्यांचा त्याग करण्याविषयी मी कसा बरे समर्थ होईन ! होणारच नाही.अर्थातच मी--भगवंत इतर सर्वांस कमी प्राधान्य देऊन निष्काम भक्तात अधिक प्रधाने देऊन निष्काम भक्तांच्याच अधिन होईन,तर इतरांच्या अधिन मुळीच होणार नाही.म्हणून आपण--जीवांनी जन्मो-जन्मी भगवंताचेच निष्काम ज्ञानी भक्त होऊन भगवंताचीच सेवा करावी.हे भगवंता "तुझी निष्काम सेवा घडण्यासाठी जन्मो-जन्मी तुझीच सेवा घडण्याचीच सुवर्ण संधी द्ध्यावी,अशी साष्टांग दंडवत घालून तनाने,मनाने,धनाने शरण जावे.||६५|| | मयी निर्बध्दहृदया: साधवः सामदर्षना: |वशीकुर्वन्ति मां भक्त्या सात्स्त्रियः सत्पतिं यथा ||६६|| भावार्थ:---माझे ठीकांनीआप्ले चित्त स्थिर करणारे व सर्वठिकाणी समदृष्टी ठेवणारे जे साधू ,आहेत ते जशा पतिव्रता स्त्रिया साप्त्तीला वश करितात त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने मला वश करितात ||६६|| | मत्सेवया प्रतीतं च सालोक्यादिचतुष्ट्यम | नेच्छन्ती सेवया पुर्णाः कुतोsन्यत् कालविदृतम् ||६७|| भावार्थ:---जे माझे अनन्य भक्त आहेत ते,माझ्या सेवेनेच पूर्ण मनोरथ होते ते माझ्या सेवेने प्राप्त झालेल्या,सलोकता समीपता इत्यादिक चार प्रकारच्या मुक्तीनां इच्छित नाहीत,मग काळाच्या योगाने नाश पावणाऱ्या इंद्रादि पदांला ते इच्छित नाहीत हे काय सांगावे ! आपण--जीवांनी सलोकता,समीपता,स्वरूपात:,व जन्म-मरण निवृत्त करणारी सायुज्यता मुक्तींचाही त्याग करतात,कारण सलोकता,समीपता,स्वरूपात,या तिन्ही मुक्तीत सेवा घडताच नाही,व सायुज्यता या मुक्तीत तर शरीरच मिळत नाही,म्हणून कधीच भक्ती घडत नाही,म्हणून सायुज्यता भक्तीची तर मुळीच इच्छा करीत नाही,म्हणून भगवंतांची भक्ती घडण्यासाठी जन्मो-जन्मी सेवा घडण्यासाठी कोणतीच मुक्तीची मागणी न करता भगवंताची सेवा घडण्यासाठी जन्मो--जन्मी मानव-देह मिळून निष्काम भक्तीच द्ध्यावी अशी धृढ अंत:करणपूर्वक मागणी करत आहोत.त्या मागणीची इच्छा पूर्ण करावी हि भगवंताच्या चरणी सांष्टांग दंडवत घालून प्रार्थना करीत आहे.येणारा भावी जन्म मनुष्य देहाचा मिळून ब्रह्मचारी किंवा संन्यास आश्रम अंत:करणपूर्वक मिळावा यासाठी भगवंतांच्या ठायी कोटी--कोटी--कोटी सांष्टांग दंडवत.||६७|| | साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम् | मदन्यत् ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि ||६८|| भावार्थ:---अधिक तर काय परंतु,साधु हे माझे हृदय (फार आवडणारे )आहेत आणि मी साधूचे हृदय (त्यांना फार आवडनारा)आहे.कारण ते माझ्याहून दुसरे प्रियवस्तू काहीच जाणत नाहीत तसाचा मीहि त्यांच्याहून दुसरे स्वल्पही प्रिय वस्तू जाणत नाही.म्हणून आपण--जीवानी भगवंतावरच अधिक प्रेम करावे,तर इतरांवर भगवंताइतके प्रेम करू नाते,तर कमी प्रेम करावे.तेव्हा भगवंत आपल्यावर अधिक प्रेम करतात व इतरांवर कमी प्रेम करतात. ||६८|| भावार्थ:---हे ब्राहमणा,तुला एक उपाय सांगतो तो तू श्रवण कर.हा तू कृत्य उत्पन्न केल्यामुळे,तुलाच उलट पिडा देणारा अभिचार ज्या अंबारिषपासून उत्पन्न झाला आहे,त्यालाच तू शरण जा.कारण,साधूचे ठिकाणी जे योजिले तेज ते,योजना करणाराचाच उलट अनर्थ करितो.म्हणून आपण--जीवांनी योजना याप्रमाणे करावी की,इतरांना दु:ख न देता इतरांना सुखच द्यावे,करण त्यामुळे आपणास दु:ख न मिळता सुखच मिळत असते.आपणास सुखाचीच गरज आहे,तर दु:खाची मुळीच गरज नाही.म्हणून आपण प्रथम--अगोदर इतरांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करावा,त्यानंतर इतर आपणास दु:ख न देता सुख देतील.असा विवेक करून आचरण करावे. ||६९|| | तपो विद्दा च विप्राणां निः श्रेयसकरे उभे | ते एव दुर्विनीतस्य कल्पेते कर्तुरन्यथा ||७०|| भावार्थः—हे ब्राह्मणा,तू,तप व विद्या यांनी संपन्न अशा मला(दुर्वास ऋषीला),हा अनर्थ कसा उत्पन्न झाला असे आश्चर्य मानू नकोस.कारण ब्राह्मणांना तप व विद्या हि दोन्ही अत्यंत श्रेयस्कर आहेत खरी परंतु,नीरपराधी पुरुषाचे ठिकाणी अपराध करणाऱ्या ब्राहमणाला तीच दोन्ही अनर्थकारक होतात.आपण--जीवानी तप व विद्दा यांनी संपन्न असावे,कारण ते साधन आपणा जवळ असावीच,कारण आपण ब्राह्मण त्या साधनामुळेच आहोत.ती साधने आपणाजवळ नसतील तर आपणास ब्राह्मण म्हणता येणार नाही.जसे आपण व्यापार करीत नसुत,तर आपणास व्यापारी म्हणता येईल का ? आपण शेती करीत नसाल तर आपणास शेतकरी म्हणता येईल का ? आपण सैनिक नसाल तर आपणास सैनिक म्हणता येईल का ? म्हणून आपणास--प्रत्येकास आपापल्या स्वधर्मानुसार आचरण करावे लागेल,तर परधर्माचे आचरण करता येणार नाही.जसे आपण जिल्हाधिकारी असुत तर आपणास जिल्ह्याचाच कारभार पाहता येणार,तर राज्याचा कारभार पाहता येणार नाही.जिल्हाधिकारी यांना राज्याचा कारभार पाहणे दु:खास कारण ठरणार आहे व जिल्ह्याचा कारभार पाहणे सुखास कारण ठरणार आहे.असा विवेक करून प्रत्येकाने आपापल्या स्वधर्माचे पालन करावे,तर परधर्माचे पालन करू नये.||७०|| | ब्रम्हंस्तद् गच्छ भद्रं ते नाभागतनयं नृपम् |क्षमापय महाभागं ततः शान्तिर्भविष्यति ||७१|| भावार्थः—-तस्मात हे दुर्वास मुने,तुझे कल्याण असो तू महा भाग्यशाली आशा नाभागपुत्र अंबरीश राजाजवळ जा आणि त्याची अपराध क्षमा करण्यावीषयी व आपल्या रक्षणाविषयी प्रार्थना कर,म्हणजे त्यापासून तुझ्या दुखाची निवृत्ती होईल.आपण--जीवानी ज्याचा अपराध केला असेल,त्याच्याकडेच जाऊन अपराधाची क्षमा मागावीतर इतरांकडे जाऊन मागू नये.||७१|| त्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानातील(९)नवमस्कंधमध्ये हा(४)चवथा अध्याय(७१)श्लोकांनी युक्त समाप्त झाला ||४|| ______________________________________________________________________________________________ ५-----आतां ह्या पांचव्या अध्यायामध्ये,त्या अंबरीषराजाने स्तुती करून विष्णूचक्राला प्रसन्न केले आणि प्राणसंकटापासून रक्षण केले असे त्यांचे चरित्र वर्णन केले आहे.||५|| | ५-- २--दुर्वास मुनी चरित्र [१--दुर्वासांची दु:ख निवृत्ती] ______________________________________________________________________________________________ भावार्थः—श्रीशुकाचार्य म्हणाला:---याप्रमाणे भगवंताने आज्ञा केली असता,चक्राने तृप्त झाल्यामुळे दु:खित झाल्याने दुर्वासऋषीने अंबरिष-- राजाजवळ येवून त्याचे पाय ग्रहण केले. ||१|| भावार्थः---तेह त्या अंबरिष राजाने त्या दुर्वास ऋषीला पाय धरण्याच्या उद्योग पाहून,त्या ब्राहमणाने केलेल्या पदस्पर्शाने लज्जित व त्याचे संकट पाहून कृपेने अत्यंत पिडीत असता,त्याचा मागे लागलेल्या त्या हरीच्या सुदर्शन चक्राची स्तुती करु लागला.आपण--जीवानी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीने संकट काळात पदस्पर्श किंवा कमीपणा स्वीकारला असेल तर व तो संकटाच्या साधनांची--शत्रू पक्षांची स्तुती करावी.शत्रू पक्षांची स्तुती करणे म्हणजेच आपला कमीपणा स्वीकारावा.असे जर आपले आचरण असेल तर आपले संकट निवारण होत असते.||२|| भावार्थः--अंबरीष राजा म्हणाला:--हे सुदर्शनचक्रा,तू अग्नी व तुच भगवान सूर्य असून नक्षत्राधिपती चंद्रही तुच आहेस.तसेच उदक,पृथ्वी, आकाश,वायू,शब्दादिक पांच विषय व त्याची ग्राहक श्रोत्रादिक पांच इंद्रियेही तुच आहेत म्हणजे तुझ्या शक्तीचे अग्नि इत्यादिक आपापली कार्ये करितात.||३|| भावार्थः—हे सुदर्शना,तू सहस्त्र अऱ्यांनीयुक्त,पृथ्वीची रक्षक,विष्णूला आवडणारे आणि सर्व शस्त्राच्या घात करणारे आहेस.तुला मी नमस्कार करितों.तूं या ब्राह्मणाचे कल्याण करणारे हो.आपण--जीवानी इतर व्यक्तीकडून किंवा साधनाकडून आपले कार्य करून घ्यावावयाचे असेल तर आपण--जीवानी त्यांची स्तुती करावी.||४|| | यद्दस्ती दत्तमिष्टं वा स्वधर्मो वा स्वनुष्ठित: | कुलं नो विप्रदैवं चेद् द्विजो भवतु विज्वरः ||१०|| भावार्थ:---कारण,तू धर्म ऋतू,सत्य,यज्ञारूपी,सर्व यज्ञाचा भोक्ता,लोकांच्या पालक व सर्वात्मरुपी असून तुच भगवंताचे परमार्थ रूप तेज आहेस.||५|| भावार्थ:---हे उत्तम नाभियुक्त चक्र,सर्व धर्माचे मर्यादारूप असून अधर्म शील दैत्याचे अग्निसारखे दाहक आहेस.तसेच त्रेलोक्याचे रक्षण करणारे व अत्युज्ज्वल तेजाने युक्त असून तुझा मनासारखा वेग आहे.तू अद्भुत कर्म करणारे असल्यामुळे तुझी स्तुती करण्यास कोणीही समर्थ नाही,म्हणून मी तुला केवळ वाणीने नमस्काराचे उच्चारण मात्र करितो.||६|| भावार्थ:----हे वेदवाणी पालक तुझ्या धर्ममय तेजाने भगवंताची उपासना करणाऱ्या पुरुषांच्या अज्ञानाचा नाश केला आहे आणि सुर्यादिकांनाही प्रकाश अर्पण केला आहे,आणि कार्यकारणात्मक हे चराचर जगत् तूंच प्रकाशित केलेले आहे,अशा प्रकारच्या तुझा महिमा अपार आहे.||७|| भावार्थ:---हे अपराजित सुदर्शना,श्रीहरी जेव्हा तुला सोडतो तेव्हा तू दैत्यादानवांच्या सैन्यात प्रविष्ठ होऊन त्याचे बाहु,उदारे,मांड्या, पाय,व कंठ यांचे छेदन करीत युद्धामध्ये शोभत असतोस.||८|| भावार्थ:----हे जगत रक्षक युद्धामध्ये सर्व शत्रुणा सहन करणाऱ्या तुला दुष्टांच्या भगवंताने योजिले आहे.यास्तव आमच्या कुळाला भाग्यलाभ होण्याकारीता या ब्राहमणाचे प्रारणरक्षणरूप कल्याण कर,म्हणजे तोच आमच्यावर तुझा अनुग्रह होईल;नाहीतर ब्रहमहत्या झाल्याने आमची लोकामध्ये अपकीर्ति व कुलाचा नाश वगैरे होतील.||९|| भावार्थ:----आता सर्व पुण्याच्या अर्पणाने ब्राहमणाच्या रक्षणाची प्रार्थना करितो---आमचे जर काही दान केलेले पुण्या असेल,यज्ञादिकांचे किवा स्वधर्माचरणाचे पुण्या असेल,तसेच आमचे कुळ जर ब्राह्मणांस देवासारखे पुज्यबुद्धीने मानीत असेल तर हा ब्राहमण तापरहित होओ. ||१०|| | यदि नो भगवान् प्रीत एकः सर्वगुनाश्रयः | सर्वभूतात्मभावेन द्विजो भवतु विज्वरः ||११|| भावार्थः—आणि आमचा सर्व भुताचे ठिकाणी आत्मभाव असल्यामुळे आम्हावर सर्वंगुणांचा आश्रय असा एक भगवान जर संतुष्ठ असेल तर हा ब्राहमण तापरहित होओ.||११|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणतात:--- हे राजा,याप्रमाणे शपथपूर्वक अंबरिष राजा स्तुती करीत असता,सर्वांबाजूंनी त्या दुर्वास ऋषीला दाह उत्पन्न करणारे सुदर्शन नामक विष्णूचक्र,राजाच्या याचनेनेच शांत झालें.म्हणून आपण--जीवांनी मीत्र पक्षांची किंवा शत्रू पक्षांची स्तुती किंवा श्रेष्ठांची किंवा कनिष्ठांची स्तुती केली तर आपले दु:खदायक कार्य असेल तर सुखदायक होते.असा विवेक करून निर्णय घ्यावा,कारण त्यातच आपले हित असते.||१२|| भावार्थः---नंतर सुदर्शन अग्निच्या तापाने युक्त झालेला तो दुर्वास ऋषी,तापरहित होत असता,त्या राजाला उत्तम आशीर्वाद देवून त्याची प्रशंशा करू लागला.दुर्वास ऋषी तापरहित झाल्यामुळे अंबरिष राजास शत्रू समजत असलेल्या राजाला शाप न देता आशीर्वाद देऊन त्यांची प्रशंशा करुं लागला.आपल्यावर प्रतिकूल व्यक्तीने उपकार केला असेल तर आपण त्यास अनुकूल होऊन त्यास चांगला असे समजून त्याचे हित करावे व त्याच्या उपकरातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा.||१३|| भावार्थः—आहो भगवंताच्या दासांचे महत्व आज मी पाहिले.कारण,हे राजा मी तुझा अपराध केला असताही तू मला सुखे प्राप्त होण्याची इच्छा करितोस ? आपण--जीवांनी आपला जर कोणी असराध केला असेल तरी पण मानवता या धर्मांनी त्यांचे दु:ख निवृत्त करून सुख देण्याचा प्रयत्न करावा.||१४|| भावार्थः—अहो !ज्यांनी भक्ताचे पालन करणारा भगवान हरी,मोठ्या प्रेमाने हृदयामध्ये स्थापन केला आहे,त्या महत्म्या साधूंना करण्यास अशक्य असे काय आहे ? अथवा टाकण्यास अशक्य काय आहे ?काहीच नाही.ज्या भक्तांनी भगवंताना आपल्या हृदयात स्थान देले आहे,ते महात्म्ये कोणतेही अशक्य असलेले कार्य शक्य करू शकतात.म्हणून आपण--जीवानी आपल्या हृदयात भगवंतास स्थान द्यावे,तर इतरांना व देहसंबंधीस स्थान देऊ नये.||१५|| भावार्थः---ज्या भगवंताच्या नांवाच्या श्रवण मात्रेकारूनही पुरुष पापादिकांणी रहित होतो त्या तीर्थपाद हरीच्या दासांचे कोणते बरे कर्तव्य अवशिष्ट राहते. ? आपण--जीवांनी श्रेष्ठ पुरुषांच्या नांवाचा उच्च्चार केला किंवा लीला श्रावण केले किंवा स्वरूपाचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतले तर आपला मलदोष,विक्षेप दोष व आवरण दोष निवृत्त होईल.||१६|| भावार्थ:----हे राजन ज्याचे चित्त अतिशय करुणेनेंयुक्त आहे अशा माझ्यावर अनुग्रह केला आहेस.कारण तू माझ्या आराधला पृष्ठभागी करून (त्याची गणना न करता) माझ्या प्राणाचे रक्षण केले आहेस.||१७|| | राजा तमकृताहारः प्रत्यागमनकाग्क्षया | चरणावुपसंगृह्य प्रसाद्द समभोजयत् ||१८|| भावार्थः—श्री शुकाचार्य म्हणाला:--- हे राजा ब्राहमणाचे परत येणे होईल अशा इच्छेने ज्यानें भोजन केले नाही,अश्या त्या राजाने, आलेल्या दुर्वास ऋषीचे चरण ग्रहण करून त्याला प्रसन्न करून मोठ्या प्रीतीने भोजन घातले.आपण--जीवांनी संत--महात्मा येत असतील तर त्यांच्या अगोदर आपण भोजन करू नये.आपणाकडे संत--महात्म्य आल्यानंतर आदराने त्यांची पाद्द--पूजा करून,त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करावे.त्यानंतर त्यांना प्रेमाने भोजन द्दावे.त्यानंतर त्यांना विश्रांतीची व्यवस्था करावी.||१८|| भावार्थः—त्यावेळी दुर्वास-ऋषीनें,सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे राजाने आदरपूर्वक वाढिलेले अन्न भोजन करून संतुष्ठीत झाला आणी राजाला मोठ्या आदराने म्हणाला की,--–हे राजा, 'तू आता भोजन कर'.आपण--जीवांनी राजा अंबरिष राजाने आदरपूर्वक दुर्वास ऋषींना भोजन देऊन संतुष्ठीत केले.दुर्वास ऋषींनी भोजन केल्यानंतर "तू आता भोजन कर" अशी आज्ञा दिली,त्यानंतर अंबरीषीनें भोजन केलें.आपणही आपल्या घरी संत--महात्मा यांच्या आगमनानंतर त्यांचे भोजन झाल्यानंतर त्या संत--महात्मा यांची अज्ञा दिल्यानंतर आपण त्यांचा उच्चिष्ट प्रसाद म्हणून भोजन करावे.संत--महात्मा यांच्या भोजनापूर्वी किंवा बरोबर जीवन केले तर त्यास उच्चिष्ट प्रसाद म्हणता येत नाही.असा वेवेक करून त्यांच्या भोजनानंतर उच्चिष्ट भोजन प्रसाद म्हणून सेवन करावे.||१९|| | प्रीतोsस्म्यनुगृहीतोsस्मि तव भागवतस्य वै | दर्शनस्पर्शनालापैरातिथ्येनात्ममेधसा ||२०|| भावार्थः---आणि दुसरेही म्हणाला की,--–हे राजा,सुदर्शनाची स्तुती करून माझ्या प्राणांचे रक्षण केल्याने तू माझ्यावर अनुग्रह--कृपा (आपल्यावर आलेले संकट निष्काम दूर करणे) केली आहेस,तसाचा भगवद्भक्त अशा तुझ्या,दर्शन स्पर्शन,स्पर्श,भाषण यांनी आणि परमात्म्याचे ठिकाणी निष्ठा उत्पन्न करणाऱ्या तुझ्या आतिथ्याने मी संतुष्ट झालो आहे.||२०|| | कर्मावदातमेतत् ते गायन्ति स्वः स्त्रियो मुहुः | कीर्ती परमपुन्यां च कीर्तयिष्यति भूरीयम् ||२१|| भावार्थः—हे राजा,हे तुझे शुध्द,कर्म स्वर्गावर राहणाऱ्या स्त्रिया वारंवार गायन करतील,तशीच तुझी परम पवित्र कीर्ती भूमीवर राहणारे सर्व लोक वर्णन करितील.आपण--जीवानी इतरांचे निष्काम दु:ख निवारण केले असते आपले अंत:करण शुद्ध होत असते तसेच लोक आपणहून आपल्या कीर्तीचे वर्णन करीत असतात.||२१|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणे अंबरीष यांने संतुष्ठ केलेला तो दुर्वास ऋषी,राजाची प्रशांसा करून त्याचा निरोप घेवून आकाशमार्गाने,निष्काम कर्माच्या योगाने प्राप्त होणाऱ्या ब्रहमलोकास निघून गेला.||२२|| भावार्थः—अता राजाच्या धैर्याचा अतिशय वर्णन करितो कीं,सुदर्शनाच्या भीतीने गेलेला तो दुर्वास ऋषी जोपर्यंत परत आला नाही, तोपर्यंत एक संवत्सर निघून गेला;तोपर्यंत त्याच्या दर्शनाची इच्छा करणारा राजा,केवळ उदकांचे सेवन करून राहिला होता.आपण--जीवांनी संत--महात्मा यांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या मुखातून उपदेश श्रवण करण्यासाठी ज्याप्रमाणे अंबरिष राजाने तहान--भूक यांचा विचार केला नाही,त्याप्रमाणे आपण तहान--भुकेचा विचार करू नये.||२३|| भावार्थः—नंतर दुर्वासऋषी गेला असता त्या अंबरीषाने ब्राहमणाचे भोजन झाल्यामुळे अतिपवित्र झालेले अवशिष्ट अन्न भोजन केले आणि त्याने दुर्वासऋषीने सुदर्षनापासून प्राणसंकट प्राप्त झाले त्यापासून त्याची मुक्तता झाली व तो येईपर्यंत आपणाला धैर्य धरण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले असे जाणून हे सर्व भगवंताच्या प्रभावाने घडून झाले असे जाणिले.आपण--जीवानी आपल्याकडून एखादे कार्य जे होणार नाही,ते कार्य झाले की,असे समाजावे की,हे कार्य आपल्या प्रभावाने झाले नसून भगवंताच्या प्रभावानेच झाले आहे.||२४|| भावार्थ:----याप्रकारच्या अनेक गुणांनी संपन्न अशा त्या राजाने,परमात्म्या ब्रहमरूप वासुदेवाचे ठीकाणी,आपल्या सर्वकर्मांचे अर्पण करून उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी भक्ती केली,की,जीच्यायोगाने प्राप्त झालेल्या वैराग्याने ब्रहमपदासाहित सर्व भोगांना नरक तुल्य त्याने मानिले.आपण--जीवानी ज्याप्रमाणे राजा अंबरिषनें ब्रह्मपदापर्यंत(ब्रह्मपद ईश्वरवाचक म्हणजे मायायुक्त स्वीकार आहे व ब्रह्म आत्मा--ब्रह्म अविनाशी आहे,असा पद आणि ब्रह्म--परमात्मा--चैतन्य यांत अत्यंत फरक आहे.)सर्व भोग हे नरकतुल्य--दु:खकारक मानिले,त्याप्रमाणे आपण हे सर्व पदे नरकतुल्य समजून त्यांचा त्याग करावा,कारण त्यांचा त्याग केला असता,ब्रह्म--परमात्मा यांचा अनुभव येतो.त्यामुळे आपण कायमचेच सुखरूप होतोत.आपले जे जन्म--मरण दु:खरूप आहे,त्यांचा त्याग होतो. ||२५|| भावार्थः—नंतर जितेंद्रिय अशा त्या अंबरीष राजाने,आपल्यासारखा स्वभावाचा पुत्राचा यथाविभागाने राज्य देवून,आत्मरूप वासुदेवाचे ठिकाणी मनाची धारणा करून वनात प्रवेश केला आणी नंतर तो त्रिगुणात्मक संसारापासून मुक्त झाला.आपण--जीव यदाकदाचित गृहस्थाश्रामास असाल तर आपण आपल्या पुत्राच्या ठिकाणी घर--दारा यांचा कारभार देऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार करून सत्संग करण्यासाठी संन्याशाच्या आश्रमात निवास करावा.त्यातच आपले अंतिम हित आहे.||२६|| | इत्येतत् पुण्यमाख्यानमम्बरीषस्य भूपतेः | संकीर्तयन्ननुध्यायन् भक्तो भगवतो भवेत् ||२७|| भावार्थ:---हे राजा,अशा ह्या अंबरिष राजाच्या पवित्र आख्यानाचे वर्णन करणारा किवा चिंतन करणारा पुरुष,भगवंताचा भक्त होईल. म्हणून आपण--जीवांनी अंबरिष राजाचे पवित्र व्याखान श्रवण करून भगवंताचे निष्काम भक्त व्हावे.||२७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये सात्तावीस(२७)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णर्पणामस्तु || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________ ६-----त्यांत या सहाव्या अध्यायात शशादराजापासून मांधाताराजापर्यंत वंश सांगितलेला असून मांधात्याचा जावई जो सौभरीऋषी त्याची कथा सांगितली आहे.||६|| ६--- इक्ष्वाकुच्या वंशाचे वर्णन,मान्धाता आणि सौभरी ऋषीची कथा ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,विरूप,केतुमान,आणि शंभू असे अंबरीष-ज्याचे तीन पुत्र होते,त्यांपैकी विरुपापासून पृषदश्वनामक पुत्र झाला,त्याला रथीतर पुत्र झाला.||१|| भावार्थः---तो रथीतर संततीरहित झाला असतां,त्याच्या भार्येच्या ठिकाणी संतती होण्यासाठी प्रार्थना केलेल्या अंगिराऋषीने ब्रहमतेजाने युक्त असे तीन पुत्र उत्पन्न केले.||२|| भावार्थः---हे पुत्र,रथीतराच्या स्त्रीचे ठिकाणी उत्पन्न झाल्यामुळे रथीतरगोत्राने युक्त असून अंगिराऋषीच्या वीर्यापासून झाल्यामुळे अंगिरस नामाने प्रसिद्ध होते.आणि ते पुढे,रथीतराला दुसऱ्या स्त्रीचे ठिकाणी झालेल्या पुत्रांमध्ये यांच्या वंशजांमध्ये श्रेष्ठ असून क्षत्रियधर्माने युक्त असे ब्राह्मण होते.||३|| भावार्थः---आतां अतिविस्तृत असा इक्ष्वाकुचा वंश सांगतो---हे राजा,एकवेळी वैवस्वत मनुला शिंक आली असतां,त्यावेळी त्याच्या नासिकेपासून इक्ष्वाकूनामक पुत्र झाला.त्या इक्ष्वाकुला शंभर पुत्र झाले,यांमध्ये विकुक्षी,निमी आणि दंडक हे तीन ज्येष्ठ (वडील)होत. ||४|| भावार्थः---हे राजा,बाकीच्या त्या शंभर पुत्रांमध्ये पंचवीस पुत्र,हिमाचल व विध्यांचल या दोन्ही पर्वतांच्या मधील आर्यावर्तदेशांमध्ये पूर्वेकडे समुद्रापर्यंत देशविभागाने राजे झाले,तसेच दुसरे पंचवीस पुत्र,त्याच देशांत पश्चिम दिशेकडे राजे झाले.मध्यभागी ज्येष्ठ जो विक्षुभी पुत्राला म्हणाला की,---हे विकुक्षे,तूं अरण्यांत जा आणि कांही उत्तरेकडे असे राजे झाले अशी त्या शंभर पुत्रांची व्यवस्था होती.||५|| भावार्थः---त्यांत श्रेष्ठ जो विक्षुभी त्यालाच शशाद असे नाव प्राप्त झाले.त्याचे कारण असे की,---एकेवेळी तो इक्ष्वाकु राजा,अष्टकाश्राद्धाचे निमित्त प्राप्त झाले असतां,आपल्या विक्षुभी पुत्राला म्हणाला की,---हे विक्षुभे,तूं अरण्यांत जा आणि श्रद्धा योग्य असे मांस लवकर घेऊन ये,विलंब करू नकोस.||६|| भावार्थः---तेव्हा तो वीर,बरे आहे असे म्हणून वनांत जाऊन श्रद्धाला योग्य अशा मृगांचा वध करून श्रांत व बुभुक्षित झाला.तेव्हा त्याने त्या पशुंतील एका सशाने भक्षण केले.त्यावेळी त्याला अतिरिक्त क्षुधा लागलेली असल्यामुळे,श्रद्धाकरिता मारलेला पशु आपण भक्षण करूं नये याची स्मृती राहिली नाही.||७|| भावार्थः---नंतर बाकीचे मांस त्याने पित्याला (इक्ष्वाकुला)आणून दिले.नंतर त्या इक्ष्वाकुने,मांसाचा श्रद्धोचित्त संस्कार करण्याकरिता प्रेरणा केलेली वसिष्ठ गुरु,हे मांस श्राद्धयोग्य नाही,कारण यांतील थोडेसे पूर्वी भक्षण केल्यामुळे हे उच्छिष्टदोषाने युक्त झाले आहे असे म्हणाला.||८|| भावार्थः---नंतर गुरूने सांगितलेले ते पुत्राचे कर्म जाणून इक्ष्वाकु राजाने,शास्त्रीय नियमाचा त्याग करणाऱ्या त्या विकुक्षी पुत्राला रोषाने देशांतून घालवून दिले.||९|| भावार्थः---पुढे तो इक्ष्वाकुराजा,वसिष्ठगुरु ब्राह्माणाबरोबर तत्त्वविचार करून,त्याच्या योगाने ज्ञाननिष्ठ होत असता शेवटी आपल्या देहाचा त्याग करून जे परब्रहम,त्याला पावला.||१०|| भावार्थः---याप्रमाणे इक्ष्वाकुराजा मरण पावला असतां,पुन्हा विकुक्षीने घरी येऊन पृथ्वीचे पालन केले आणि पुष्कळ यज्ञ करून हरीचे आराधन केले.पुढे तो राजा शशाद या नावाने प्रसिद्ध झाला.||११|| भावार्थः---त्या विकुक्षीचा पुत्र पुरंजय.तोच इंद्रवाह आणि कुकुत्स्थ या नावांनी लोकांमध्ये प्रसिद्ध झाला.त्याला ती नावे ज्या कर्मांनी प्राप्त झाली ती कर्मे मी तुला सांगता ऐक.||१२|| भावार्थः---एकेवेळी देवांचा दैत्यासहवर्तमान लोकांचा लय करणारा मोठा संग्राम झाला.तेव्हा दैत्यांनी जिंकलेल्या देवांनी आपले साह्य करण्याविषयी त्या पुरंजय राजाची प्रार्थना केली.||१३|| भावार्थः---तेव्हा त्याने,जर इंद्र माझे वाहन होईल तर मी त्याच्यावर बसून दैत्यांना वध करीन असा,वाहन होण्याविषयी त्याने वरीलेला इंद्र ते राजाचे वाक्य अंगीकारीना,परंतु देवदेव,प्रभू,विश्वात्मा जो विष्णू त्याच्या सांगण्यावरून इंद्र त्या राजाचे वाहन होण्याविषयी महावृषभ झाला.||१४|| भावार्थः---नंतर युद्ध करण्याची इच्छा करणारा तो पुरंजयराजा,कवच धारण करून दिव्य धनुष्य व तीक्ष्ण बाण ग्रहण करून,बंदिजनांनी स्तूयमान व सर्वातर्यामी परमात्मा तेजाने वृद्धिंगत होत असता,त्या महावृषभावर चढून त्याच्या खांद्याजवळच्या कोळ्यावर बसला आणि त्याने देवांना बरोबर घेऊन दैत्यांच्या नगराला पश्चिमेकडून वेढा घातला.||१५-१६|| भावार्थः---तेव्हां दैत्यांबरोबर त्या राजाचे,श्रवणमात्रेकरून लोकांच्या रोमांच उभे करणारे तुमुळ युद्ध झाले,त्या युद्धामध्ये त्याच्या समोर जे दैत्य प्राप्त झाले होते त्यांना,यमाचे दर्शन करविण्याकरिता त्याने बाणाच्या योगेकरून सदेहच उडविले.||२१|| भावार्थः---ज्या बलाढ्य कुवलयाश्वकाने उत्तंकऋषीचे प्रिय करण्याकरिता आपल्या पुत्रांसहवर्तमान धुंधुनामक दैत्यावर स्वारी करून त्याचा वध केला,म्हणून तो कुवलयाश्वकच धुंधुमार या नावाने प्रख्यात झाला,आणि जे एकवीसहजार त्याचे पुत्र होते ते सर्व त्या धुंधुदैत्याच्या मुखापासून निघालेल्या अग्नीने दग्ध झाले,त्यामध्ये तीनच पुत्र अवशेष राहिले.||२२-२३|| भावार्थः---हे भारता,ते तीन पुत्र दृढाश्व,कपिलाश्व आणि भद्राश्व या नावांचे होत.त्यापैकी दृढाश्वाचा पुत्र हर्यश्व,त्याचा पुत्र निकुंभ झाला.||२४|| भावार्थः---त्या निकुंभाचा बर्हनाश्व,त्याचा कृशाश्व,त्याचा सेनजित,त्याचा पुत्र युवनाश्व झाला.त्याला शंभर स्त्रिया होत्या.तथापि त्यांचे ठिकाणी त्याला अपत्य झाले नाही म्हणून तो संतानरहित असल्यामुळे खिन्नचित्त होऊन त्या शंभर स्त्रियांसहवर्तमान वनामध्ये ऋषीच्या आश्रमात गेला.ते ऋषी,त्या राजाविषयी कृपायुक्त होऊन,देवाच्या आराधनाविषयी एकाग्रचित्त असते त्या राजाला पुत्र होण्यासाठी राजाला (न कळविता)त्यांनी जिची देवता इंद्र आहे अशी पुत्रकामेष्टी केली.||२५-२६|| भावार्थः---राजा रात्रीचे ठिकाणी तृपाक्रांत असता ऋषीच्या त्या यज्ञमंडपात प्रविष्ट होऊन,तेथे निजलेल्या त्या ब्राह्माणांना पाहून त्या राजाने,त्यांना न विचारितांच त्यांनी राजपत्नीला पुत्रलाभासाठी प्राशनार्थ देण्याकरिता मंत्राने अभिमंत्रन केलेले जळ,स्वतःच प्राशन केले.||२७|| भावार्थः---नंतर उठलेल्या ब्राहमणांनी उदकाखेरीज असलेला कलश पाहून तेथे असलेल्या राजाला,हे प्रभो,कोणाचे हे कर्म? पुत्रोत्पत्ती करणारे उदक कोणी प्राशन केले?असा प्रश्न केला.||२८|| भावार्थः---नंतर ईश्वराने प्रेरणा केलेल्या राजानेच ते उदक प्राशन केले असे (त्याच्याकडूनच)जाणून त्या ऋषींनी,अहो!देवाचे बळच मुख्य आहे,पुरुषाचा प्रयत्न काहीच उपयोगी पडत नाही,असे भाषण करून ईश्वरालाच नमस्कार केला.||२९|| भावार्थः---नंतर पुत्रोत्पत्तीसमय प्राप्त झाला असतां,युवनाश्वाची उजवी कूस फाडून पुत्र झाला,केवढे हे आश्चर्य ! आणि तो पुत्र पुढे सार्वभौमराजा झाला.||३०|| भावार्थः---हा पुत्र क्षुधाक्रांत होऊन स्तनपान करण्यासाठी फारच रडत आहे,आतां हो कोणाचे दुध पिईल?असे दुःखित झालेल्या ब्राह्माणांनी भाषण केले असतां,त्या इष्टीमध्ये आराधन केलेला इंद्र,मां धाता(मला पिईल)असे म्हणाला व हे वत्सा,तूं रडू नकोस,असे त्या बालकाला सांगून त्या इंद्राने अमृताला स्त्रवणारी आपली तर्जनी त्या पुत्राच्या मुखात घातली.||३१|| भावार्थः---याप्रमाणे इंद्राने मां धाता असे म्हटल्यामुळे तो पुत्र पुढे मांधाता यानावाने प्रसिद्ध झाला.उजवी कुश फाटल्यामुळे मरणाची वेळ प्राप्त झाली असतांही त्या बालकाला पिता युवनाश्व ब्राह्माणांच्या व वेदांच्या अनुग्रहाने मरण पावला नाही.तर तो पुढे त्या वनांतच काही कालपर्यंत वास करून तपाच्या योगाने सिद्धी(मुक्ती)पावला.||३२|| भावार्थः---हे राजा,इंद्राने पुढे त्या पुत्राचे "त्रसद्द्स्यू" असे नाव ठेविले.कारण त्या मांधात्यापासून मनामध्ये दचकून गेलेले दस्यू म्हणजे दुसऱ्याला उपद्रव करणारे दुष्ट रावणादिक,फार भीत असत.||३३|| भावार्थः---नंतर तो युवनाश्वाचा पुत्र सार्वभौम मांधाता.भगवंताच्या तेजाने प्रजांच्या पालनाविषयी समर्थ होऊन सप्तद्वीपवती पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व प्रजांचे एकटाच पालन करूं लागला.||३४|| भावार्थः---तो आत्मवेत्ता असूनही त्याने पुष्कळ दक्षिणायुक्त यज्ञांनी यज्ञरूपी भगवंताचे आराधन केले.तो भगवान सर्वदेवमय,सर्वप्रकाशक,विश्वव्यापक व इंद्रियांना अगोचर असून,यज्ञांतील-चरूपुरोडाशादिक द्रव्ये,मंत्र,अनुष्ठानप्रकार,यज्ञ,यजमान, ऋत्विज,धर्म,देश व काल हि सर्व त्याची स्वरुपेच होत असा होय.||३५-३६|| भावार्थः---जेथे सूर्य उदय पावतो व जेथे अस्त पावतो तेथपर्यंत असलेले सर्व हे भूमंडळ,यौवनाश्व मांधात्याचे पालन करण्याचे स्थळ असे म्हटले आहे.||३७|| भावार्थः---त्या राजाने शशबिंदू राजाच्या बिंदूमतीनामक कन्येचे ठिकाणी "पुरुकुत्स अंबरीश आणि भक्तीयोगनिष्ठ असा मुचकुंद" हे तीन पुत्र उत्पन्न केले.||३८|| भावार्थः---आणि त्या पुरूकुत्सादिकांच्या बहिणी पंनास होत्या.त्यांनी सौभरिनामक ऋषीला पती वरिले.तो महातपस्वी सौभरी,एकेवेळी यमुनेच्या उदकामध्ये योगसामर्थ्याने निमग्न होऊन उत्कृष्ट तप करीत असतां-||३९|| भावार्थः---तेथे मैथुन करणाऱ्या एका श्रेष्ठ मत्स्याचे मैथुनसुख पाहून त्याला त्या सुखाची इच्छा झाली आणि त्या ब्राहमणाने,मांधात्या राजाजवळ जाऊन एक कन्या मागितली.||४०|| भावार्थः---तेव्हा तो मांधाताही याचे वृद्धत्व पाहून म्हणाला की,---हे ब्राह्माणा तूं स्वयंवरामध्ये कन्येच्या इच्छेप्रमाणे कन्येचे ग्रहण कर,म्हणजे तूं कन्यांच्या अंतःपुरात जाऊन तेथे माझ्या पन्नास कन्या आहेत,त्यापैकी जी कन्या स्वतांवरील तिचा तूं स्वीकार कर.तेव्हा त्या सौमरीने,आपण वृद्ध,अंगाला वळकुट्या पडलेला,केस पिकलेला व मस्तक कांपत असलेल्या आहे म्हणून मी स्त्रियांना(आपल्या कन्यांना)आवडणार नाही.असे या राजाने मनात आणून मला स्वयंवरमिषाने प्रत्युत्तर दिले आहे.||४१|| भावार्थः---बरे असो!आता मी आपल्या देहाला तसा सुंदर तयार करितो की,मी जसा देवांच्या स्त्रीयांनांही आवडेन.मग राजांच्या स्त्रियांना आवडेन हे काय सांगावें ?असा निश्चय करून त्यानें सुंदर देह धारण केला.करण तो योगी असल्यामुळे मनात आणल्याप्रमाणें करण्यास समर्थ होता.||४२|| भावार्थः---नंतर राजाच्या आज्ञेने द्वारपालाने त्या सौरभीऋषीला सर्वसमृद्धींयुक्त अशा कन्यांच्या अंतःपुरामध्ये पोहचविले असता तेथे असणाऱ्या पन्नासही राजकन्यांनी तो एकच वर वरिला.|||४३|| भावार्थः---त्यावेळी त्यावराच्या निमित्त बहिणपणाचा स्नेह टाकून,त्याचे ठिकाणी ज्याचे चित्त आसक्त झाले आहे अशा त्या पन्नासही कन्यांचा हा वर मलाच योग्य आहे तुम्हाला नाही,असा परस्पर मोठा कलह झाला.||४४|| भावार्थः---आतां त्या सौभरीच्या गृहस्थाश्रम वर्णन करितो की,त्या ऋग्वेदी सौभरी ऋषीने,बहुत मोलाच्या शय्या,आसने,वस्त्रे,भूषणे सुगंधीपदार्थांच्या उट्या,भक्षनीय उत्कृष्ट पदार्थ,सुगंधी पुष्पांच्या माळा इत्यादिकांनी अलंकृत होऊन,त्या स्त्रियांसहवर्तमान ज्याच्या अंत नाही अशा तपाच्या समृद्धीने अमोल अशी भांडीकुंडीवगैरे साहित्ये ज्यांमध्ये आहेत,उत्तम अलंकार धारण केलेल्या स्त्रिया व पुरुष ज्यांमध्ये आहेत आणि मधुर गायन करणारे पक्षी,भ्रमर व स्तुतीपाठक ज्यांमध्ये आहेत अशा गृहाचे ठिकाणी,व नानाप्रकारच्या उपवणांचे ठिकाणी आणि सुगंधयुक्त कमळाचे समुदाय ज्यांमध्ये आहेत अशा स्वच्छ उदकाच्या सरोवरांचे ठिकाणी निरंतर क्रीडा केली.||४५-४६|| भावार्थः---ज्याचे गृहस्थाश्रमसंबंधी सुख अवलोकन करून सप्तद्विपदी पृथ्वीचा अधिपती व सार्वभौम संपत्तीने युक्त अशा त्या मांधाता राजानेही विस्मययुक्त होऊन गर्वाचा त्याग केला,म्हणजे या ऋषीच्या ऐश्वर्यापुढे माझे ऐश्वर्य काहीच नाही अये मानिले.||४७|| भावार्थः---याप्रमाणे गृहाचे ठिकाणी आसक्त झालेला तो सौभरी,विषयांकडे धावणाऱ्या श्रोत्रादिक इंद्रियांनी शब्दादिक विषयांचे सेवन करीत असतांही,जसा अग्नी तुपाच्या बिंदूंनी तृप्त होत नाही त्याप्रमाणे तृप्त झाला नाही.आपण--जीवानी विषयांच्या साधनाने सुख ण मिळवता अज्ञान निवृत्त करून आपले जे स्वाभाविक ब्रह्मसुख आहे,ते मिळवण्याचा प्रयत्न करावा,कारण विषयांचे सुख क्षणिक असून अंती दु:ख देणारे आहे,तर ब्रह्म सुखरूपता हे कायमचेच सुख आहे. ||४८|| भावार्थः---तो ऋग्वेद्यांचा आचार्य सौभरी,एकेवेळी बसला असता,त्याने आपल्या मनापासूनच मत्स्यमैथूनाच्या दर्शनाने विवाहादिद्वारा उत्पन्न झालेली आपल्या तपाची हानी पाहिली.||४९|| भावार्थः---आणि आपलेच ठिकाणी म्हणला की,-काय सांगावे!हे लक हो,तपोनिष्ठ व उत्तमप्रकारची व्रते आचरण करणाऱ्या माझा केवढा हा नाश झाला पाहा! पाण्यामध्ये मत्स्याचे मैथुन दृष्टी पडल्याने मला विवाहादी प्रपंच प्राप्त होऊन बहुत काल अभ्यासाने मी ध्यानात आणलेले जे ब्रम्ह्स्वरूप होते ते सर्व माझे विसरून गेले.म्हणून आपण--जीवानी मैथुन-सुखाची शब्द आपल्या कानांनी ऐकू नये व नेत्र इंद्रियांनी पाहुं नये,कारण त्या संस्काराचे स्मरण झाले की,प्रिय आनंद प्राप्त होतो.ते आपणास मिळावे असे वाटते व त्यामुळे आपण त्यावर आपले स्वामित्व प्रस्थापित असतो,त्यामुळे आपणास मोद नांवाचा आनंद प्राप्त होतो,व त्याच विषयांचा भोग घेतला की,आपणास प्रमोद नांवाचा आनंद प्राप्त होत असतो.त्यानंतर दुसरा विषय असावा वाटतो,दुसरा मिळाल्यास तिसरा तर ---------------यामुळे सुखाची प्राप्ती न होता दु:खाचीच प्राप्ती होते.म्हणून आपण विषयांचा त्याग करून सत्संग करून अज्ञान निवृत्ती करून जीव-ब्रह्म-ऐक्य--ज्ञान प्राप्त करून व सर्व विषयांचा त्याग करून ब्रह्मसुखाचाच अनुभव घ्यावा.||५०|| भावार्थः---यास्तव मुमुक्षु पुरुषाने,सर्व प्रकारांनी मनाचा निश्चय करून,मैथुनधर्म आचरण करणाऱ्या दांपत्यांचा सहवास सोडून द्यावा,शब्दादी विषयांचे ठिकाणी आपली इंद्रिये प्रवृत्त करूं नयेत,एकट्याने संचार करून एकांतस्थली रहावे,अनंत भगवंताचे ठिकाणी आपले चित्त लावावे आणि जर संगती करणे झालीच तर ती भगवंताची उपासन करणाऱ्या साधुंच्याच ठिकाणी करावी.आपण--जीवांनी गृहस्थाश्रमी जे पुरुष आहेत,त्यांचा त्याग करावा व जे विरक्त साधू--महात्मा त्यांचीच संगती करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.असा विवेक करून एकांत--स्थळी म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म-चिंतन आहे,त्याच ठिकाणी स्वस्वरूपाचे चिंतन करावे.||५१|| भावार्थ:---विषय संगतीने दोष असा होतो की,------मी पूर्वी एकटाच तप करीत होतो,नंतर उदकामध्ये मत्स्यमैथुन पाहण्याच्या प्रसंगाने पन्नास स्त्रिया वरील्यामुळे त्यांची काळजी करणारा मी पन्नास स्वरूपाचा झालो.नंतर त्या प्रत्येक स्त्रीला शंभर शंभर पुत्र झाल्यामुळे पूत रूपाने पांच हजार स्वरूपाचा झालो.आता पुढे त्यांची संस्कारादिक कर्मे करणारा मी या लोकी व परलोकी सुख देणाऱ्या कर्मांच्या मनोरंथांचा अंत पावत नाही.कारण,मायेच्या गुणांनी माझ्या बुद्धीचे आकर्षण केल्यामुळे मी विषयभोगानेच ठीकांनी पुरुषार्थबुद्धी मानणारा झालो.म्हणून आपण विषयांपासून सावध राहावे.त्यास विषच आहे असे समजून त्यांचा त्याग करावसं.विष तर एका शरीरास मारते,तर विषय हे अनंत शरीरास पाठविण जन्म--मरण या परंपरा वाढविते.आतापर्यंत आपण त्या परंपरेत गुंतून भ्रमर करीत आहोत व आपणांस लक्षातही येत नाही.आपल्या लक्षात न येऊ देऊ देणें हेच मायेचे मुख्य कार्य--आश्चर्य आहे.म्हणून आपण मायेचे वास्तविक स्वरू जाणून तिचा त्याग--बाध करावा,व परमात्मारूप व्हावे.||५२|| भावार्थः---याप्रमाणे बहुत कालपर्यंत घरामध्ये राहणाऱ्या त्या सौभरीऋषीने पुढे विरक्त होऊन काम्य--कर्माचा त्याग करून वनामध्ये प्रवेश केला,त्यावेळी त्याच्या पतिव्रता स्त्रियानीही त्याच्या मागून वनांत गमन केले.म्हणून आपण--जीवांनी काम्या कर्मांचा त्याग करून सत्संग करावा.||५३|| भावार्थः---तेथे आत्मविचार करणाऱ्या त्या सौभरीने,शरीराला कृश वनामध्ये तीव्र तप आचरण करून,आपल्या आहवनीयादिक अग्नीसहवर्तमान जीवात्म्याच्या परमात्म्याचे ठिकाणी लय केला,म्हणजे तो मुक्त झाला.आपण सत्संग करून अज्ञान निवृत्त करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून व सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||५४|| भावार्थः---हे महाराज परीक्षिते,त्या सौमरीच्या स्त्रियाही आपल्या पतीची मोक्षप्राप्तीरूप गती पाहून त्याच्याच तपादिकांच्या सामर्थ्याने,जशा शांत झालेल्या अग्नीमध्ये त्याच्या ज्वाला लय पावतात त्या प्रमाणे त्या पतीबरोबर सहगमन करून मुक्त झाल्या.||५५|| ६-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये सौभरीचरित्रकथनरूप हा(६)सहावा अध्याय(५५)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||६|| ______________________________________________________________________________________________ ७-----आतां हा सातव्या अध्यायामध्ये,ज्यामध्ये पुरुकुत्साचे आणि हरिश्चंद्राचे उत्तम आख्यान वर्णन केलेले आहे असा मांधात्या राजाचा वंश सांगितला आहे.||७|| ७-- ३--राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्र [१--राजा त्रिशंकू आणि हरीश्चान्द्राची कथा] ______________________________________________________________________________________________ भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हनाला---हे राजा,मांधात्याच्यापुरूत्सादिक तीन पुत्रांमध्ये श्रेष्ठ जो अंबरीष पुत्र सांगितला,त्याला त्याच्या आजाने(युवनाश्वाने)पुत्रत्वाने स्वीकारिला होता.त्याला यौवनाश्वनावाचा पुत्र झाला,त्याला हारित पुत्र झाला.अंबरीष यौवनाश्व आणि हारित असे तिघेजण मांधात्याच्या प्रवराचे प्रवर्तक झाले.||१|| भावार्थ:----आतां १--"पुरुकुत्साचा--वंश" सांगण्याकरिता प्रथम त्याचा विवाह आणि पराक्रम सांगतो---नागरूपी बंधुनी जी आपली "नर्मदानामक" बहिण "पुरुकुत्सराजाला" दिली होती तिने नागराजाच्या आज्ञेने,नागांच्या गंधर्वरुपी शत्रूंना मारण्यासाठी त्या पुरुकुत्साला रसातळांत नेले होते.तेव्हा तेथे विष्णुशक्ती धारण करणाऱ्या त्या पुरुकुत्साने वध करण्यास योग्य अशा पुष्कळ गंधर्वाचा वध केला असता प्रसन्न झालेल्या नागराजापासून त्या त्या पुरुकुत्साला हे नर्मदेने पुरुकुत्साला रसातळी नेण्याचे वगैरे आख्यान स्मरण करणाऱ्या पुरुषांस सर्पापासून भय प्राप्त होणार नाही असा वर प्राप्त झाला.||२-३|| भावार्थः—"पुरुकुत्साचा पुत्र "२--त्रसद्दस्यू" झाला,त्याला "३--अनरण्यनावाचा-पुत्र" झाला,त्याचा पुत्र ४--"ह्यर्श्व",त्यापासून ५--"अरुण",त्याचा ५--"निबंधन" झाला||४|| भावार्थः---त्याचा पुत्र "६--सत्यव्रत",म्हणजेच ६--"त्रिशंकू" या नावाने प्रसिद्ध झाला कारण,सत्यव्रताकडून तीन दोष घडले होते---१---पित्याचा असंतोष,२---गुरूच्या गाईचा वध आणि आणि प्रोक्षण केल्यावाचून असलेल्या पदार्थाचे भक्षण असे तीन दोष घडले म्हणून त्या सत्यव्रतास त्रिशंकू असे नांव पडले असून त्याने ब्राहमणाच्या तप: सामर्थ्याने तो देहा सहवर्तमान स्वर्गास निघून गेला.नंतर तेथे असणाऱ्या देवानी त्याला खाली डोके व वर-पाय करून ढकलून दिला असतां पुन्हा "विश्वामित्राने" आपल्या तपोबलाने त्याचे तेथेच स्तंभन केले."तो--त्रिशंकू" अद्यापी आकाशांत दृष्टिगोचर होत आहे.||५-६|| भावार्थः---त्या त्रीशंकुचा पुत्र "७--हरिश्चंद्र" झाला.त्या हरिश्चंद्रानिमित्त परस्पर शापाने पक्षिरूप झालेल्या विश्वामित्र वसिष्ठांचे बहुत वर्षेपर्यंत युद्ध झाले,कारण पूर्वी विश्वामित्राने राजसूययज्ञाच्या दक्षिणामिषानें हरिश्चंद्राचे सर्वस्व हरण करून त्याला दु:ख दिले ते ऐकून रागावलेल्या वसिष्ठाने विश्वमित्राला,तू आडी नांवाचा पक्षी हो,असा शाप.त्यानेंही वसिष्ठाला तू बक हो असा शाप दिला होता.||७|| भावार्थः---तो हरिश्चंद्र राजा अपत्यरहित असल्यामुळे खिन्नचित्त होऊन नारदाच्या उपदेशाने वरुणाला शरण गेला की,हे प्रभो,मला पुत्र होईल तसा अनुग्रह--कृपा कर.||८|| | यदि वीरो महाराज तेनैव त्वां यजे इति | तथेति वरुणेनास्य पुत्रो जातस्तु रोहितः||९|| भावार्थः---हे महाराजा वरुणा,जर मला वीर पुत्र झाला तर त्याच पुत्र्रूपी पुरुषपशूच्या योगाने मी तुझे यजन करीन.असा त्याने नवस केला,तेव्हा वरुणाने बरे आहे असे म्हटल्यानंतर त्या हरिश्चंद्राला "८--रोहित" यानावाचा पुत्र झाला.||९|| भावार्थः---तेव्हा वरून राजाजवळ येऊन त्यास म्हणाला की,हे राजा,तुला पुत्र झाला आहे यास्तव त्याच्या योगाने तूं माझे यजन कर.तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला की,जेव्हा ह्या पशुरूप पुत्राला दहा दिवस होऊन जातील तेव्हा हा पवित्र होईल.||१०|| भावार्थः---पुढे दहा दिवस गेल्यावर पुन्हा तो वरून येऊन यजन कर असे म्हणाला.तेव्हा तो हरिश्चंद्र म्हणाला-जेव्हा पुरुषपशुला दंत उत्पन्न होतील तो पवित्र होईल.||११|| भावार्थ:---नंतर त्या पुत्रास दंत प्राप्त झाले असता पुन्हा तो वरून येऊन,दंत उत्पन्न झाले,आता यजन कर असे म्हणाला,नंतर हरिश्चंद्र,जेव्हा या पुरुषपशूचे प्रथम झालेले दांत पडतील तेव्हा हा पवित्र होईल असे म्हणाला.||१२|| भावार्थः---दांत पडले असता पुन्हा वरून येऊन पुरुषपशूचे दांत पडले,आतां माझे यजन कर अये म्हणाला.तेव्हा हरिश्चंद्र,जेव्हा पशुला पुन्हा दांत येतील तेव्हा तो पवित्र होईल असे म्हणाला.||१३|| भावार्थः---पुन्हा दांत आले असता तो वरून येऊन पुन्हा दांत आले,आतां माझे यजन कर असे म्हणाला तेव्हा पुन्हा तो हरिश्चंद्र,हे वरुणा,राजरूप पुरुषपशु जेव्हा कवचादिक धारण करून युद्ध करण्यास योग्य होईल तेव्हा तो योगाविषयी योग्य होईल असे म्हणाला.||१४|| भावार्थ:---याप्रमाणे पुत्रावर स्नेह असलेल्या व स्नेहाने स्वाधीनचित्त करून घेतलेल्या त्या राजाने,तो काळ चुकविण्याकरिता वरूनदेवाची प्रार्थना केली व त्याने त्या त्या काळाची वाट पाहिली.||१५|| | रोहितस्तदभिज्ञाय पितुः कर्म चिकीर्षितम् | प्राणप्रेप्सुर्धनुष्पाणिररण्यं प्रत्यपद्दत ||१६|| भावार्थ:---इकडे रोहीताने पित्याचे हे कर्तव्य(आपणांस पशु कल्पून वरुणाचे उजन करणे)जाणून आपले प्राण वाचविण्याच्या इच्छेने हातात धनुष्य घेऊन तो अरण्यात निघून गेला.||१६|| भावार्थ:---तेव्हा यज्ञाविषयी निराश झालेल्या वरुणाचे हरिश्चंद्राला ग्रासिले म्हणजे त्याच्या पोटांत जळोदरनामक रोग उत्पन्न केला.हे वर्तमान त्या रोहितपुत्राने अरण्यांत ऐकून तो आपल्या गावात येऊ लागला तेव्हा त्याचा इंद्राने निषेध केला की,||१७|| भावार्थ:---हे वत्सा रोहिता,तीर्थे व क्षेत्रे यांच्या सेवनाने भूमीवर पर्यटन करणे हेच पुण्यकारक आहे घरी जाऊन पशुरुपाने मरणे हे चांगले नव्हे.असे इंद्राने त्याला सांगितले असतां तो आणखी एक वर्षेपर्यंत अरण्यांतच राहिला.||१८|| | एवं द्वितये तृतीये चतुर्थे पन्चमे तथा | अभ्येत्याभेत्य स्थविरो विप्रो भूत्वाssह वृत्रहा ||१९|| भावार्थ:---याप्रमाणे दुसऱ्या,तिसऱ्या,चवथ्या व पांचव्या वर्षी तो रोहित घरी येउं लागला असतां,इंद्र वृद्धब्राहमणाच्या वेषाने त्याच्याजवळ येऊन त्याला तीर्थाटन वगैरे करण्यास सांगत असे.||१९|| भावार्थ:---नंतर पित्याच्या दयेने परवश झालेल्या त्या रोहीताने,सहावे वर्ष पुरे होईपर्यंत अरण्यांत फिरून पुढे घरी येण्याचा निश्चय केला आणि आपले मरणभय चुकविण्याकरिता वरुणाच्या यज्ञासाठी भार्गववंशात उत्पन्न झालेल्या अजिगर्ताच्या तीन पुत्रांपैकी मधल्या "शुन:शेषधनामक--पुत्राला" विकत घेऊन घरी आला.||२०|| भावार्थः---आणि त्याने पित्याला आपल्या मोबदला यज्ञाकरिता तो शुनःशेषनामक पुरुषपशु निवेदन करून वंदन केले.नंतर महायशस्वी अशा त्या हरिचंद्रराजाने पुरुषमेध यज्ञेकरून वरुणादिक देवांचे यजन केले.नंतर वरुणाच्या कृपेने उदररोगापासून मुक्त झालेला तो हरिश्चंद्र,ज्याची कथा सत्पुरुषांमध्ये वर्णन केली आहे असा झाला.त्या पुरुषमेध यज्ञामध्ये विश्वामित्रऋषी होता नावाचा ऋत्विज झाला होता,आत्मतत्त्ववेत्ता जमदग्नी ऋषी अध्वर्यू झाला होता,वसिष्टऋषी ब्रह्मा होता आणि अयास्यनामक ऋषी उद्गता होता.याप्रमाणे पुरुषेमेध यज्ञाने संतुष्ट झालेल्या इंद्राने हरिश्चंद्राला एक सुवर्णरथ अर्पण केला.||२१||२२||२३|| भावार्थः---हे राजा शून:शेपाला वध देवादिकांना कसा समंत झाला असे म्हणशील तर,शुनःशेपाला त्या यज्ञामध्ये मारिले नाही तर जिवंतच सोडून दिले आहे.ते शुनःशेपाचे माहात्म्य पुढे विश्वामित्राच्या आख्यानप्रसंगात मी तुला सांगेन.असो.पुढे भार्येसहित त्या सत्ययुक्त धैर्य पाहून||२४|| भावार्थः---अत्यंत संतुष्ट झालेल्या विश्वामित्राने त्या राजाला ज्ञानाचा उपदेश केला.त्या ज्ञानाने हरिश्चंद्राला मोक्षप्रकार सांगतात---सर्व संसार मनोमूलक असून मन हे अन्नमय आहे म्हणून राजाने अन्नशब्दवाच्य पृथ्वीच्या ठिकाणी आपल्या मनाचे ऐक्य करून त्या पृथिवीचे उदकाशी ऐक्य केले.त्या उदकाचे तेजाशी ऐक्य करून त्या तेजाचे वायूशी ऐक्य केले.त्या वायूचा आकाशांत लय करून,आकाशाचा अहंकारात व अहंकाराचा महत्त्वात लय केला.त्या महत्त्वाचे ठिकाणी ज्ञानकलेचे चिंतन करून त्या ज्ञानकलेने आत्मस्वरूपाला आवरण करणाऱ्या अज्ञानाचा निरास केला.आपण--जीवानी आपला अधिकार लय--चिंतनाचा असेल तर वरील-प्रमाणे लय चिंतन करावे.||२५-२६|| | हित्वा तां स्वेन भावेन निर्वाणसुखसंविदा | अनिर्देश्याप्रतक्र्येण तस्थौ विध्वस्तबन्धनः ||२७|| भावार्थ:---नंतर स्वरूपमुखाच्या अनुभवाने त्या ज्ञानकलेचाही त्याग करून तो हरिश्चंद्र राजा संसारबंधापासून मुक्त होऊन,दाखवून देण्यास व तर्क करण्यास अशक्य अशा आपल्या सच्चिदानंदस्वरूपाने राहिला.आपण--जीवांनी हरिश्चंद्र राजाप्रमाणे संसारबंधनातून स्वरूपमुखाच्या अनुभवाने अज्ञान निवृत्त करून जे ज्ञान झाले त्या ज्ञानकलेचाही त्याग करून सोळावी कला जो परमात्मा त्याचा अनुभव घेऊन मुक्त व्हावे.||२७|| ७-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरांतील(९)नवमस्कंधामध्ये हरिश्चंद्रोपाख्याननामक हा(७)सातवा अध्याय(२७)श्लोकांनी युक्त समाप्त झाला|| ______________________________________________________________________________________________ ८-----आतां या आठव्या अध्यायामध्ये,ज्याचे पुत्र कपिलमहामुनीची निंदा केल्यामुळे दग्ध झाले तो सगरराजा ज्या वंशात उत्पन्न झाला तो रोहीताचा वंश सांगितला आहे.||८|| ८--- ४--सगर—चरित्र व गंगावतरण--- [१—सगर—चरित्र] ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,रोहीताचा पुत्र "९---हरित",त्यापासून "१०--चंप" झाला,त्याने चंपानगरी उत्पन्न केली.त्या चंपापासून "११--सुदेव",त्याचा पुत्र "१२---विजय" झाला.||१|| भावार्थः---त्याचा पुत्र "१३---भरुक",त्यापासून "१४--वृक",त्याचा "१५--बाहुक" झाला.त्या राजाची भूमी शत्रूंनी हिरावून घेतली असता,तो आपल्या स्त्रीसहवर्तमान वनांत निघून गेला.||२|| भावार्थः---तो तेथेच वृद्ध होऊन मरण पावला असतां त्याची बरोबर सहगमन करीत होती परंतु ती गर्भिणी आहे असे ज्ञानमार्गाने समजणाऱ्या गुरु और्वऋषीने,तिचे निवारण केले.||३|| भावार्थः---पुढे तिच्या सवतीची ती गर्भिणी आहे असे जाणून सापत्नद्वेषाने तिला अन्नाबरोबर विष घातले.नंतर तो गर्भ,त्या विषासहवर्तमान उत्पन्न झाला.||४|| भावार्थः---म्हणून त्याचे "१६--सगर" असे नांव पडले.तो सगर पुढे महायशस्वी सार्वभौम राजा झाला,त्याच्या पुत्रांनी समुद्र उत्पन्न केला.ज्या सगराने,आपल्या और्वगुरूच्या आज्ञेने कितीएक ताल जंघनामक राजे,पवन (म्लेछ)शक,हैहय,व बर्बर यांना मारून टाकिले,कितीकांचे अवयव तोडून त्यांना विरूप केले.काहीएक श्मश्रू धारण करणारे,कितीएक मुक्तकेश व कित्येक अर्धमुंडीत केले.||५-६|| भावार्थः----कित्येकांना नग्न करून प्रावरणवस्त्रांचे युक्त आणि कित्येकांकडून लंगोट्या घालवून प्रावरणवस्त्ररहित केले त्या सगरराने और्वऋषीने सांगितलेल्या प्रकाराने पुष्कळ अश्वमेधांच्या योगेकरून सर्व वेदस्वरूपी व देवस्वरूपी जो आत्मा ईश्वर | सुमत्यास्तनया दृप्ताः पितुरादेशकारिणः | हयमन्वेषमाणास्ते समन्तान्न्य खनन् महीम् ||९|| भावार्थ:---सगर राजाच्या "सुमती" आणि "केशिनी" अशा दोन स्त्रिया होत्या.त्यातील "सुमतीने" पुत्र बलाने गर्वित असे "१७---| हन्यतां हन्यतां पाप इति षष्टिसस्त्रिणः | उदायुधा अभिययुरुन्मिमेष तदा मुनिः ||११|| भावार्थ:---त्यावेळी त्यांनी ईशान्य दिशेचे ठिकाणी कपिलमहामुनीच्या समोर घोडा पाहिला(तो तेथे इंद्राने बांधून ठेविला होता.)नंतर हा ऋषीच घोडा आणणारा,पापी चोर असून आतां डोळे झांकून बसला आहे,याला मारा असे बोलणारे ते साठ हजार,पुत्र हातांनी आयुधे उचलून त्याला मारण्याकरिता धावले.तेव्हा कपिल ऋषीने डोळे उघडिले.आपण--जीवांनी आपल्या समोरील जीवाचे काय कार्य आहे असे निश्चित अवलोकन करून,पुढील कृती करावी.त्या कार्याचे निश्चित अवलोकन न करता कृती केली तर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. ||१०-११|| | स्वशरीराग्निना तावन्महेन्द्रहृतचेतसः | महदव्यतीक्रमहता भस्मसदभवन् क्षणात् ||१२|| भावार्थ:---तेव्हा इंद्राने आपल्या मायेने मोहित चित्त केलेले व कपिलाच्या अपराधानेच मृतप्राय झालेले ते साठ हजारही पुत्र,ऋषीची दृष्टी पडतांच आपल्या शरीरातील अग्नीनेच एका क्षणामध्ये जाळून भस्मरूप झाले.आपण--जीवानी कोणतेही कार्य विवेकपुर्वक करावे,तर अविवेकापुर्वक करू नये.वास्तविक पाहता तो घोडा इंद्राने आपला होता,तर कपिल महामुनींनी आणला नव्हता.कपिल--महामुनींनी तो घोडा आणलेला नसतांना विनाकारण त्यांना साठ-हजार सगर-पुत्रांनी त्या कपिल महामुनींना मारण्याकरिता शस्त्रे उचलली होती व त्यांनी डोळे उघडताच साठ हजार पुत्रे जळून खाक झाली.असा अविवेकामुळे विपरीत प्रकार घडला.आपण असा अविवेक करून कोणतेही कार्य करू नये.||१२|| भावार्थ:---कोणी लोक,कपिलमहामुनीच्या कोपाग्नीने राजपुत्र दग्ध झाले असे म्हणतात त्याचे निराकरण करितो की,---सगरराजाचे पुत्र कपिलमुनीच्या कोपाने दग्ध झाले असे म्हणणे चांगले नव्हे,तर ते आपण केलेल्या अपराधानेच नष्ट झाले असे म्हंटले पाहिजे.कारण ज्याचा देह जगाला पवित्र करणारा आहे अशा शुद्धसत्त्वमूर्ती कपिलमहामुनीचा ठिकाणी क्रोध मुळीच संभवणार नाही.||१३|| भावार्थ:---ज्या कपिलमहामुनीने या लोकी,सांख्यशास्त्ररूप दृढ नौका प्रवृत्त करून ठेविली आहे;ती अशी की,जिच्या योगाने मुमुक्षु पुरुष,मृत्यूचा मार्गभूत अशा दुस्तरही भवसमुद्राला तरून जातो,त्या सर्वज्ञ परमात्मरूप कपिलमहामुनीला शत्रू मित्रादिक भेद्बुद्धी कशी बरे संभवेल? संभवनारच नाही.||१४|| भावार्थ:---असो."सगरराजाची दुसरी केशिनीनामक स्त्री" होती,तिला जो पुत्र होता त्याला लोक "१७--असमंजस" असे म्हणत असत.त्या असंमजासाचा "१८--अंशुमाननामक--पुत्र" असून तो सगर राजाच्या हिताविषयी तत्पर होता.||१५|| भावार्थ:---असमंजस म्हणून जो सांगितला तो पूर्वजन्मामध्ये योगी असून दृष्टसंगती मुळे योगमार्गापासून भ्रष्ट होऊन राजजन्मास आला होता.व त्याला पूर्वजन्मांतील वर्तनाची स्मृती राहिली होती,म्हणून तो या जन्मी दुष्ट संगती न व्हावी याकरिता लोकांमध्ये असंमजसपणा (प्रतिकूलपणा)दाखवीत असे,म्हणजे ज्ञातीना व आवडणारे निंद्यकर्म आचरण करीत असे.एकेवेळी सर्व लोकांनी आपला त्याग करावा असे मनांत आणून लोकांना भीती घालविण्यासाठी त्याने सरयू-नदिच्या कांठीं लोकांचे बालक खेळत होत त्यांना नदीमध्ये बुडवून टाकिले.आपण असंमजसारखे निन्द्द कर्म करू नये,कारण ते कर्म निषिद्ध आहे.||१६-१७|| भावार्थ:---असे करणाऱ्या पुत्राची ममता सगरराजाने सोडून देऊन त्याला नगरांतून घालवून दिले.त्याने जातेवेळी आपल्या योगसामर्थ्याने सरयूमध्ये बुडविलेल्या बालकांस पुन्हा जिवंत करवून तो नगरांतून निघून गेला.||१८|| भावार्थ:---हे राजा,त्यावेळी पुन्हा घरी आलेल्या बालकांस पाहून त्या अयोध्यानगरांत राहणारे सर्वही लोक आश्चर्य पावले आणि सगरराजाही ते बालक आले असे ऐकून,अहो!अशा सामर्थ्याचा पुत्र मी व्यर्थ घालविला असा पश्चाताप पावला.||१९|| भावार्थ:---असो.त्या सगरराजाने असंमजसाचा पुत्र जो "१९--अंशुमान" तो घोड्याचा शोध करण्याकरिता निघाला.चुलत्यांनी भूमी खनिलेल्या मार्गाने जाता जातां त्याने भस्माच्या समीपभागी घोडा पाहिला.||२०|| भावार्थ:---तेथेच बसलेल्या भगवदवताररुपी कपिलनामक मुनीला पाहून त्याला नमस्कार करून हात जोडून,विवेकवान व एकाग्रचित्त असा तो अंशुमान,त्याची स्तुती करूं लागला.||२१|| भावार्थ:---अंशुमान म्हणाला---हर भगवन,ब्रहमदेवही आपणाहून श्रेष्ठ अशा तुज परमेश्वराला अजूनही समाधीने अपरोक्षत्वेकरून पहात नाही आणि अनुमानादिक शास्त्रीय युक्तींनी परोक्षत्वेकरूनसुद्धा उत्तमप्रकारे जाणत नाही.मग त्याच्या आलीकड्चे व त्याची जी मन,शरीर,बुद्धी व सत्वादिक गुणांची कार्ये त्यांनी नानाप्रकारच्या उत्पन्न केलेल्या देव तिर्यक मनुष्यादिक सृष्टीमध्ये उत्पन्न केलेले जे अज्ञानी आम्ही ते तुला जाणण्यास समर्थ कसे होऊं?होणारच नाही.||२२|| भावार्थः---हे देहधारी प्राणी आहेत ते तुझ्या मायेने मोहतचित्त व त्रिगुणात्मक बुद्धीच्या स्वाधीन होऊन बाह्यविषयांच्याच ज्ञानाने युक्त होत असते जाग्रत्स्वप्नातील विषयांना किंवा सुषुप्तीतील अज्ञानाला मात्र पाहतात परंतु आपले ठिकाणी अंतर्यामीरूपाने असणाऱ्या तुला जाणत नाहीत.||२३|| भावार्थः---त्या तुझ्या मायेने मूढ झालेला मी,ब्राह्मादिकांनी दुर्ज्ञेय अशा तुझ्या स्वरूपाचा विचार कसा करू ?कारण,तू शुध्दज्ञानमूर्ती असल्यामुळे ज्ञानास विषय नाहीस आणि ज्याचे मायागुणांपासून झालेले भेद आणि मोह हे स्वानुभवानेच नाहीसे झालेन आहेत अशा सनंदनादिक ऋषींनीच तुझे स्वरूप चिंतन करण्यास योग्या आहे,मग तुझ्या मायागुणांनी पराभूत झालेला मी तुझे स्वरूप जाणण्यास कसा बरे समर्थ होईन ! होणारच नाही. ||२४|| | प्रशान्तमायागुणकर्मलिंग मनामरूपं सदसद्विमुक्तम् | ज्ञानोपदेशाय गृहीतदेहं नमामहे त्वां पुरुषं पुराणम् ||२५|| भावार्थ:--यास्वत हे देवा,ज्या तुजपासून मायेचे सत्वादिक गुण विश्वसृष्ट्यादिक कर्म व ब्रह्मादिक स्वरूपे उत्पन झाली आहेत,त्या कार्य-कारणरूप स्थूल-सूक्ष्मोपाधींनी रहित,देवमनुष्यादि नामारुपांनी रहित,आणि ज्ञानोपदेशाकरीता शुध्दसत्वमूर्ती अवतार धारण करणाऱ्या तुज पुराणपुरुषाला केवळ आम्ही नमस्कार करतो.||२५|| भावार्थः---हे प्रभो,हे सर्व लोक,विषयाभिलाश--विषयांविषयी आसक्ती असलेले,लोभ--जडांविषयी आसक्ती असलेले इर्षा--इतरांची उन्नती न सहन करणारे आणि हे सर्व दोषास कारण अविवेक यांनी मोहितचित्त होत असते.तुझ्या मायेने रचिलेली या लोकामध्दे गृह स्त्री इत्यादिकांचे ठिकाणी हि सत्य आहेत असे मानून आसक्त होतात.गृह,स्त्री इत्यादी जे आहेत ते सर्व सत्य आहेत असे मानणारे म्हणजेच द्वेतवादि असणारे आहेत,कारण त्यांनी वेदांत--शास्त्राचा सत्संग केलेला नाही.म्हणून आपण जीवांनी वेदांत--शास्त्राचा सत्संग करून हे सर्व मिथ्या आहेत असे जाणून अद्वेत ते सत्य आहे व त्याव्यतिरिक्त जे आहे,ते सर्व मिथ्या आहे,असे जाणून घ्यावे.||२६|| भावार्थः---हे सर्व भूतात्मारूपी--सर्व भूतांत अंतर्यामी असणारे भगवंता,आज तुझ्या कृपेने,घडून आलेल्या तुझ्या दर्शनाने विषय-वासना,कर्म आणि इंदिर्य यांचा आश्रयभूत असा आमचा मोहरूप दृढ पाश तुटून केला आहे,म्हणजे तुझ्या प्रसादाने कृतार्थ झालो आहे. म्हणून आपण--जीवांनी सत्संग करून भगवंतास जाणून त्याचा अपरोक्ष अनुभव घ्यावा.त्यामुळे आपले जन्म--मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप आहोत असा अनुभव येतो.||२७|| भावार्थ---श्री शुकाचार्य म्हणाला---हे राजा याप्रमाने ज्याचा प्रभाव वर्णन केला आहे आसा तो सर्वज्ञ कपिल मुनी,त्या अंशूमनतावर बुद्धीने अनुग्रह करून असे म्हणाला की,---------- ||२८|| | अश्वोsयं नियतां वत्स पितामहपशुस्तव | इमे पितरो दग्धा गंगाम्भोsर्हन्ति नेतरत् ||२९|| भावार्थः---श्री भगवान म्हणाला---हे वत्सा,हा घोडा तुझ्या पितामहाचा (सगर-राजाचा)यज्ञपशु आहे,तो तूं घेऊन जा.हे दग्ध झालेले तुझे चुलते.गंगेच्या उदकालाच योग्य आहेत दुसऱ्या कशाला नाहीत.म्हणजे येथे गंगा आली असता तिच्या उदकानेच यांचा उद्धार होईल दुसऱ्या कशानेही होणार नाही.||२९|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला,हे राजा,याप्रमाणे सांगणाऱ्या त्या कपिलमहामुनीला प्रदक्षिणा करून मस्तकाने केलेल्या नमस्काराने प्रसन्न करून,त्या अंशुमानाने घोडा परत आणिला.नंतर सगरराजाने त्या पशूच्या योगाने शेष राहिलेला यज्ञ समाप्त केला.आपण पूर्वजांनी घेतलेले कांही कार्य अपुरे राहिले असेल,तर आपण ते कार्य पूर्ण करणे आपले कर्तव्य असते.||३०|| भावार्थः---यानंतर यालोकीच्या व परलोकीच्या भोगेच्छाविषयी निस्पृह व अविद्यारूप बंधनरहित असा तो सगरराजा,अंशुमानाला राज्यावर स्थापन करून,और्वऋषीने सांगितलेल्या योगमार्गाने सर्वोत्कृष्ट गतीला(मोक्षाला)पावला.आपण जर गृहस्थाश्रमी असाल तर आपण आपला कारभार पुढील पिढीच्या हाथी सोपवून ज्ञानी पुरुषाच्या आश्रमात सत्संगासाठी राहावे व ज्ञान प्राप्त हरून घ्यावे. त्या ज्ञानाचा अनुभव घेऊन सर्व विषयांचा त्याग करून परमात्मारूप व्हावे. ||३१|| ८-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये सगरोपाख्यानरूप हा(८)आठवा अध्याय(३१)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||८|| ______________________________________________________________________________________________ ९-----आता यानवव्या अध्यायामध्ये,ज्याच्या भगीरथनामक नातवाने भगीरथीला पृथ्वीवर आणिले त्या अंशुमान राजाचा वंश खट्वांगराजापर्यंत वर्णन केला आहे.||९|| ९--- ४---भगीरथ-चरित्र आणि गंगावतरण--- [२---भगीरथ चरित्र आणि गंगावतरण] ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला,हे राजा,जसे सगरराजाने नातवाला राज्य देऊन तप केले त्याप्रमाणे अंशुमानानेही आपल्या पुत्राला राज्य देऊन पुष्कळ कालपर्यंत तप केले तथापि तो गंगेला भूमीवर आणण्यास समर्थ झाला नाही.नंतर कालाच्या योगाने आपणच मरण पावला.||१|| भावार्थः---त्या अंशुमानाचा पुत्र "२०---दिलीप",तोही तसेच आपल्या पुत्राला राज्य देऊन तप करीत असतां,गंगेला आणण्याविषयी असमर्थ होत असता मृत्यू पावला.त्याचा पुत्र "२१---भगीरथ" त्यानेही पुत्राला राज्य देऊन गंगेला आणण्यासाठी मोठे तप केले.||२|| | दर्शयामास तं देवी प्रसन्ना वरदास्मी ते | इत्युक्तः स्वमभिप्रायं शशंसावनतो नृपः ||३|| भावार्थः---त्या तपाने प्रसन्न झालेल्या गंगेने राजाला आपले दर्शन दिले आणि तिने मी तुला दर्शन देण्यास प्राप्त झाले आहे,असे सांगितले असतां,भगीरथ राजाने तिला वंदन करून माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तूं भूमीवर यावेस अशी प्रार्थना केली.||३|| भावार्थः---तेव्हा गंगा म्हणाली---हे राजा,स्वर्गावरून भूमीवर पडणाऱ्या माझा वेग कोण बरे धारण करील ? जर वेग धारण करणारा नसला तर मी भूमीला फोडून पाताळांत जाईन.||४|| भावार्थ:---आणि मी भूमीवर येणार नाही.कारण,भूमीवरचे लोक आपण केलेले पाप माझ्यामध्ये स्नानादिसंबंधाने घालवितील.ते पाप मी कोठे घालवावे ? हे राजा,त्या बद्दल तूं विचार कर.||५|| | साधवो न्यासिनः शान्ता ब्रम्हीष्ठा लोकपावना: | हरन्त्यघं तेsन्गसन्गात् तेष्वास्ते ह्यघभिद्धरिः ||६|| भावार्थः---भगीरथ म्हणाला,हे माते,विषयवासना सोडून देणारे,शांत,ब्रहमनिष्ठ लोकांना पवित्र करणारे सत्पुरुष,तुझ्या प्रवाहात स्नानादिक करून आपल्या अंगस्पर्शाने तुझे पाप हरण करतील.कारण,त्यांच्या पातकांच्या ह्रदयात नाश करणारा हरी जागरूक आहे.||६|| | धारयिष्यति ते वेगं रुद्रस्त्वात्मा शरीरिणाम् | यास्मिन्नोतमिदं प्रोतं विश्वं शाटीव तन्तुषु ||७|| भावार्थः---हे गंगे,ज्याचे ठिकाणी हे जग,उभ्या आडव्या तंतुमध्ये विणलेल्या पटासारखे ओतप्रोत आहे तोसर्व प्राणीमात्रांचा आत्मा रुद्र,तुझ्या वेगाचे जागरूक करील.||७|| भावार्थः---असे भागिरथीला सांगून व तिचे समंत जाणून त्या राजाने तपे करून शिव देवाला संतुष्ट केले.हे राजा,त्याच्या तपाच्या योगाने थोडक्याच कालाने शंकर संतुष्ट झाला.||८|| भावार्थः---तेव्हा भगीरथाने गंगावेग धारण करण्याविषयी त्याची प्रार्थना केली असता,सर्व लोकांचे हित करणाऱ्या त्या शिवाने,तथास्तु असे सांगून समाधानयुक्त चित्ताने,जिचे उदक हरीच्या चरणाने पवित्र झाले आहे अशा त्या गंगेला आपल्या मस्तकी धारण केले.||९|| भावार्थः---नंतर,त्या राजर्षी भगीरथाने,आपल्या चुलत्यांचे देह ज्या ठिकाणी भस्मरूप मागून पडले होते त्या ठिकाणी जगत्पावणी देशांना पवित्र करणाऱ्या त्या गंगेला नेले.||१०|| भावार्थः---त्यावेळी,वायुसारखा वेग असलेल्या रथांत बसून जाणाऱ्या भगीरथाच्या मागून जाणाऱ्या व मार्गामध्ये असलेल्या देशांना पवित्र करणाऱ्या त्या गंगेने,भस्मरूप झालेल्या सगरराजाच्या पुत्रांना भिजवून टाकिले.||११|| भावार्थ:---ज्या गंगेच्या जलस्पर्शमात्रेकरून कपिलमहामुनीचे ठिकाणी अपराधाणे जळून भस्म झालेलेही सगराचे पुत्र,केवळ देहभस्माच्या संबंधानेच जर स्वर्गाला निघून गेले तर श्रद्धेने तिचे निरंतर सेवन करणारांचे फळ काय सांगावे?म्हणून आपण--जीवांनी गंगेच्या पात्रात नेहमी स्नान करावे,कारण ती गंगा नदी पवित्र असून त्या गंगा नदीस शकारांनी आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे,म्हणून ती अधिकच पवित्र झालेली आहे.त्या गंगा नदीत पवित्र असणारे--ब्रह्मरूप असणारे महात्म्य तिला पवित्र करण्याकरिता स्नान करीत असतात.म्हणून आपण त्या गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केले तर आपणही पवित्र होतोत.||१२|| भावार्थ:---म्हणजे भस्मरूप झालेल्या देहाच्या संगानेच जर सगराचे पुत्र स्वर्गास निघून गेले तर गंगेच्या स्नानपणादिकांचे नियम धारण करणारे जे पुरुष गंगादेवीचे श्रद्धेने पूजा स्तुती नमस्कारादिकेकरून आराधन करितात ते स्वर्गाला जातील हे काय सांगावे?आपण--जीवांनी निष्काम बुद्धीने स्नान केले तर आपल्या अंत:करणात असलेला पाप निवृत्त होऊन आपले मन स्थिर होईल व अंत:करणातील अज्ञानरूपी मल निवृत्त करण्याकरिता सत्संग करण्याची आपल्यामध्ये योग्यता येईल.||१३|| भावार्थः---हे राजा,गंगेचे जे येथे स्वर्गास पोचविण्याचे माहात्म्य सांगितले ते कांही परमाश्वर्यकारक नाही.कारण ती,गंगा अनंतरुपी भगवंताच्या चरणकमलापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे संसारबंधालासुद्धा तोडून टाकणारी आहे.हि गंगा नदी भगवंताच्या चरण-कमलांपासून उत्पन्न झालेली असल्यामुळे अत्यंत पवित्र आहे.म्हणून ती आपण सर्वांना पवित्र करिते,पण आपण तिच्याकडे जाऊन तिच्या पाण्याने स्नान करावे लागेल.||१४|| भावार्थः----तो अनंत असा आहे की,ज्याचे ठिकाणी श्रद्धेने मन स्थापन करून शुद्धचित्त झालेले मुनी,टाकण्यास अशक्य अशाही देहसंबंधाचा त्याग करून तत्काळ भगवंताच्या स्वरूपाला पाविले आहेत.आपण त्या गंगा नदीत स्नान करून व तिच्याच पात्रात भगवंताच्या नामाचा उच्चार केला,भगवंताचे--व्यासकृत श्रीमद्भागवत ग्रंथ श्रवण त्यात संताची--महात्म्यांची चरित्रे,आदर्श राजांची चरित्रे, भगवंताची लीला-चरित्रे,भगवंताचे वास्तविक स्वरूप जाणून घेऊन जर अनुभव घेतला तर आपण देव--परमात्मारूप आहोत असे कळेल.||१२|| भावार्थः---भगीरथापासून "२२--श्रुतनामकपुत्र" झाला.त्या श्रुताला नाभनामक दुसरा पुत्र झाला,नंतर त्यापासून "२३--सिंधूद्वीप" झाला,त्यापासून "२४--अयुतायू" झाला||१६|| भावार्थः---त्यापासून "२५--ऋतुपुर्ण" झाला तो नलराजाचा मित्र होता.त्याने नलराजाला द्दूतशास्त्राचे रहस्य शिकवून त्यापासून अश्वशिक्षाप्रतिपादन करणारी विद्या संपादन केली.त्या ऋतुपूर्णचा पुत्र "२६--सर्वकाम" झाला.||१७|| भावार्थः---हे राजा,त्या सर्वकामापासून "२७--सुदास" झाला.त्याचा पुत्र तर दमयंतीचा पती,ज्याला मित्रसह आणि "२८--कल्माषपाद" असे लोक म्हणतात तो झाला तो एकेवेळी वसिष्ठाच्या शापेकरून बारा वर्षेपर्यंत राक्षस झाला होता त्यावेळी त्याने केलेल्या कर्माच्या योगाने पुढे तो औरसपुत्ररहित झाला.||१८|| भावार्थः---राजा म्हणाला त्या उदाराचित्त सौदास राजाला गुरूचा शाप किंनिमित्तक झाला?हे शापाचे निमित्त जाणण्याची मी इच्छा करितो,ते जर गोप्य नसेल म्हणजे सांगण्यास योग्य असेल तर सांगावे.||१९|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---सौदासराजा एकेवेळी मृगया करण्याकरिता वनांत फिरत असता त्याने एका राक्षसाचा वध केला आणि त्याच्या भावास सोडून दिले तेव्हा तो भाऊ पळून गेला.नंतर राजाने आपल्या भावास मारिले हे मनांत आणून राजाचे काहीतरी वाईट करण्याच्या इच्छेने स्वयंपाक करणाराचे रूप धारण करून तो राजाच्या घरी गेला आणि त्याने तेथे एकेवेळी भोजनाची इच्छा करणाऱ्या वसिष्ठगुरूला नरमांस शिजवून वाढिले.||२०-२१|| | परिवेक्ष्यमाणं भगवान् विलोक्याभक्ष्यमन्जसा | राजानमशपत् क्रूधौ रक्षो ह्येवं भविष्यसि ||२२|| भावार्थः---नंतर त्या सर्वज्ञ वसिष्ठाने,वाढलेले नरमांस अभक्ष्य आहे असे तत्काळ जाणिले आणि क्रुद्ध होऊन,अशा नरमांस वाढविण्याच्या दोषाने तूं राक्षसच होशील असा राजाला शाप दिला||२२|| भावार्थः---नंतर ते नरमांस वाढणे,स्वयंपाक्याने रूप धारण करणाऱ्या राक्षसाने केले,राजाने करविले नाही,असे जाणून वसिष्ठानेच आपले वाक्य खोटे न होण्यासाठी तो शाप बारावर्षापर्यंत चालेल अशी व्यवस्था केली,त्यावेळी तो राजाही ओंजळीत पाणी घेऊन वसिष्ठगुरूला शाप देण्यास उद्दुक्त झाला.||२३|| भावार्थः---तेव्हा झालेला शाप न चुकता गुरूच्या अपमानाने दुसरे अनर्थ होतील असे जाणणाऱ्या त्याच्या दमयंतीनामक भार्येने,'गुरूला शाप देऊं नका’असे राजाने निवारण केले असतां त्या राजाने दिशा,आकाश,पृथ्वी इत्यादिक सर्व स्थळे जीवमय आहेत असे पाहून शापाकरिता घेतलेले उदक तेथे टाकिले असता त्यांचा नाश होईल अशा शंकेने ते तीक्ष्ण उदक आपल्याच पायांवर टाकिले.म्हणून आपण--जीवानी गुरूविषयी कृतघ्न ण होता गुरूविषयी कृतज्ञ असावे,करण कृतज्ञ आपण असल्यास आपले हित आहे व कृतघ्न असल्यास त्यात आपलेच अहित आहे.||२४|| भावार्थः---असो,याप्रमाणे मित्ररुपी स्त्रीचे वचन सहन केल्यामुळे मित्रसहनामक असा तो राजा पुढे गुरूच्या शापाने राक्षसधर्म पावोन,पायांचे ठिकाणी काळेपणा पावला.नंतर तो राक्षसासारखा वनांत फिरत असतां एकेवेळी त्याने वनांत राहणारा एक ब्राहमण व त्याची स्त्री हि उभयंता मैथुन करीत असतां त्यावेळी अवलोकन केले.||२५|| भावार्थः---तेव्हांच क्षुधेने पिडीत झालेल्या त्या राक्षसरुपी राजाने,ब्राह्मणास भक्षण करण्यासाठी धरिले असता तेव्हा त्या ब्राहमणाची स्त्री,दीनासारखी म्हणाली की,---हे राजा,तूं साक्षात राक्षसकुलांत उत्पन्न झालेला नव्हेस तर तूं इक्ष्वाकूच्या कुळात उत्पन्न झालेल्या राजांमध्ये श्रेष्ठ,महारथी मदयंती पतीव्रतेचा पती आहेस.यास्तव,हे वीरा,तूं ब्राहमण वध रूप पाप करण्यास योग्य नाहीस.आपण जो ब्राह्मण म्हणजे आध्यात्म ज्ञानी आहे,त्याचा घात करू नये,त्याला दु:ख देऊ नये,दिल्यास आपणास ब्रह्म-हत्याचा दोष लागतो.असा विवेक करून जीवन व्यतीत करावे.||२६|| भावार्थः---तर आपल्याची इच्छा करणाऱ्या मला रती समाप्त न झालेला हा ब्राहमण पती दे.राजा,हा मनुष्य देह जीवाला सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारा आहे.आपण--जीव हा राजा म्हणजे सत्ताधीश असेल तर त्या राजाने प्रजेस धर्म,अर्थ,काम,व मोक्ष संपादन करण्यास योग्य असे वातावरण निर्मिती करून देणे कर्तव्य आहे,असे जाणून ते--ते कार्य करावे.त्याप्रमाणे ते--ते कार्य न केल्यास त्या राजाला--सत्ताधीशाला पाप--दु:ख भोगावे लागते..||२७|| | दोहोsयं मानुषो राजन् पुरुषस्याखिलार्थदः | तस्मादस्य वधो वीर सर्वार्थवध उच्यते ||२८|| भावार्थः---यास्तव हे वीरा,या ब्राह्मण-देहाचा वध करणे हे सर्व पुरुषार्थांचा वधच असे शास्त्रांत म्हटले आहे.त्यामध्ये हा ब्राहमण तर-विद्वान,तप,शील यांनी युक्त||२८|| भावार्थः---आणि सर्वभूतांचे ठिकाणी राहत असूनही अहंकारादिक गुणकार्यांनी आच्छादित झालेल्या महापुरुषसंज्ञक परब्रहमाचे,हा सर्वभूतांचा आत्मा आहे अशा भावनेने आराधन करण्याची इच्छा करणारा आहे.आपण--जीवांनी ब्राह्मण देहाचा वध करू नये,कारण सर्व पुरुषार्थांचा वध करणे असा आहे,कारण आपण जो ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष आहे,त्याचा जर आपणांकडून वध झाला तर ब्रह्महत्येचे अत्यंत दु;खास हेतू पाप लागते.असा ब्रह्मवेत्ता जीवांच्या ठिकाणी असलेले जे दोष आहेत,त्याचे ज्ञान करून देतो.त्यामुळे जीवास ज्ञान झाल्यामुळे ते जीव निष्काम धर्म-शास्त्रानुसार आचरण करतात.निष्काम उपासना--भक्ती करतात.त्यामुळे समाजामध्ये सात्विक वातावरण तयार होते व समाधान प्राप्त होते.ब्रह्म--ज्ञानी पुरुषाचा सत्संग केल्यामुळे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान प्राप्त होते.त्यामुळे जीवांचे जन्म--मरण नाहीसे होऊन सुखरूपता प्राप्त होते.अशा महात्म्याचा जर आपणाकडून वध झाला तर समाज हा दु:खच भोगेल,म्हणून या उपदेश कर्त्याचा वध केल्यामुळे समाजात अस्थिर येईल,त्यामुळे समाजाची अत्यंत हानी होईल,ती होऊ नये, म्हणून महात्म्याचा वधास कठोर शिक्षा शास्त्रात सांगितलेली आहे.जसे व्यवहारात जर सोने हरवले,तरी अहित आहे व लोखंड हरवले तरी अहित आहे.असे असले तरी सोने हरवण्यात अधिक अहित आहे व लोखंड हरवण्यात कमी अहित आहे,त्याचा प्रमाणे सामन्याचा वध केला तरी अहित आहे,व महात्म्याचा वध केला तर अधिक अहित आहे.म्हणून सामान्याचीही हत्या करू नका,पण महात्म्याची हत्या तर मुळीच करू नका,त्यामध्ये समाजाचे अधिक अहित आहे.म्हणून त्या हत्येस शास्त्राने अधिक दंड ठेवला आहे.||२९|| | सोsयं ब्रम्हर्षिवर्यस्ते राजर्षीप्रवाराद् विभो | कथमर्हति धर्मज्ञ वधं पितुरिवात्मजः ||३०|| भावार्थः---हे धर्मज्ञा विभो,तो हा ब्रहमर्षीश्रेष्ठ,तुज राजर्षी श्रेष्ठा पासून वध पावण्यास कसा योग्य होईल?तर जसा पित्यापासून पुत्र वध पावण्यास योग्य होत नाही,त्याप्रमाणे हा तुजपासून वध पावण्यास योग्य होणार नाही.म्हणून आपण--जीवानी संत--महात्मा यांचा वध करू नये,कारण ते समाजास स्वधार्मांचे प्रबोधन करता व आपणास कायमचे सुखरूप करतात.||३०|| भावार्थः---बरे साधूंना मान्य असा तूं घरी,मुक्तीसाधनाविषयी तत्पर,अध्ययनादिसंपन्न व वेदार्थाचा उपदेश करण्यास समर्थ अशा या ब्राहमणाचा वध करण्याचे मनांत कसे आणितोस?तर जसा गाईचा वध करण्याचे मनांत आणणेसुद्धा अयोग्य आहे तसे हेंही तुला अयोग्य आहे.म्हणून आपण गाईची वध करावा असे मनात येत नाही,म्हणून त्याहीपेक्षा संत--महात्म्याचा वध करावा,असे मनात येऊ नये.जे मनात येत नाही,त्याची कृतीसुद्धा होत नाही.असा विवेक-पूर्व निर्णय घ्यावा,व त्यानुसार आचरण करावे.||३१|| भावार्थः---आतां ज्याच्या वाचून मी क्षणभरसुद्धां वाचण्याची इच्छा करीत नाही तो हा ब्राहमण,जर तुला भक्षणच करावयाचा असेल तर,मेल्यासारखी झालेल्या मला पूर्वी भक्षण कर.आपण--जीवानी ती स्त्री जर त्याच्याशिवाय एक क्षणभर जिवंत रहात असेल,तर आपण त्या ब्राह्मणाचाही व त्या स्त्रीचा वध करू नये व त्यांच्या प्रेमात अंतर पाडू नये,पाडले तर आपणास तसेच फळ भविष्यात भोगावे लागेल.असा विवेक करून त्यांचा वध करू नये. ||३२|| भावार्थः---याप्रमाणे ती स्त्री दीनपणाने भाषण करीत असतां व अनाथाप्रमाणे रुदन करीत असतां,शापाने मोहित झालेल्या सौदासराजाने जसे व्याघ्र भक्षण करितो त्याप्रमाणे त्या ब्राहमणाचे भक्षण केले.सौदास-राजाने त्या ब्राह्मणाचे मांस भक्षण केले,त्याप्रमाणे आपण ब्राह्मणाचे किंवा इतर प्राणी-मात्रांचे कोणाचेच मांस भक्षण करू नये.||३३|| भावार्थः---त्यावेळी गर्भाधान करणारा आपला पती राक्षसाने भक्षण केला असे पाहून,आपणाबद्दल शोक करणाऱ्या त्या ब्राह्मणीने क्रोध युक्त होऊन,त्या राजाला असा शाप दिला की,----||३४|| | यस्माने भक्षितः पाप कामार्तायाः पतीस्त्वया | तवापि मृत्युराधानादकृतप्रज्ञ दर्शितः ||३५|| भावार्थः---हे पापाचरण करणाऱ्या दुर्बुद्धे राजा,ज्या अर्थी कामार्त--कामाची इच्छा असणारा असा माझा पती तूं भक्षण केलास त्या अर्थी तुलांही गर्भाधानापासून मी मृत्यु दर्शित केला आहे,म्हणजे जेव्हां माझा पतीसारखा तूं आपल्या स्त्रीचे ठिकाणी गर्भाधान करण्यास उद्दुक्त होशील तेव्हा तुला मृत्यू प्राप्त होईल.म्हणून आपण जीवानी निषिद्ध कर्मांचा प्रयोग इतरांवर करू नये,कारण तेच कर्म आपणास भावी जीवनांत अन्य रूपाने भोगावयास येतेच.असा विवेक करून जीवन जगावे. ||३५|| भावार्थः---याप्रमाणे मित्रसहराजाला शापून पतीलोकाला जाण्याची इच्छा करणारी ती स्त्री पतीच्या अस्थी,प्रदीप्त केलेल्या अग्नीमध्ये टाकून तेथे आपला देह पाडून सहगमनविधीने पतीला प्राप्त झालेल्या लोकाला निघून गेली.||३६|| भावार्थः---नंतर बारा वर्षे होतांच शापयुक्त झालेला तो सौदास राजा मैथुन करण्यास उद्दुक्त झाला असतां,मदयंती स्त्रीने ब्राहमण स्त्रीचा शाप जाणून त्याचे निवारण केले.||३७|| भावार्थः---त्या दिवसापासून त्याने स्त्री संभोगसुखाचा त्याग केला.याप्रमाणे ब्राहमणभक्षणामुळे झालेल्या शापाने तो संततीरहित झाला.तेव्हां त्याने प्रजा उत्पन्न करण्याकरिता प्रार्थंना केलेल्या वसिष्ठाने मदयंतिचे ठिकाणी गर्भस्थापन केले.||३८|| भावार्थः---तिने सात वर्षापर्यंत गर्भाचे धारण केले होते तरी पुत्र झाला नाही,तेव्हा वसिष्ठानेच तिचे पोट पाषाणाच्या योगाने ठेचले त्या झालेल्या पुत्राला "२८---अश्मक" असे नांव पडले.||३९|| भावार्थः---अश्मकापासून "२९---मूलक" झाला,त्याचे स्त्रियांनी (परशुरामाने निःक्षत्रिय पृथ्वी केली त्यावेळी)कवचाप्रमाने चोहोंकडून रक्षण केले,म्हणून त्याला "नारीकवच" असे नांव पडले.पुढे तो क्षत्रियकुळाचे मुळ झाला म्हणून तो मूलक या नावाने प्रसिद्ध झाला.||४०|| भावार्थः---त्यापासून "३०--दशरथ" झाला,त्यापासून "३१--ऐडविड" पुत्र झाला,त्याच्यापासून "३२--राजा-विश्वसह" झाला.त्याच्यापासून सार्वभौम असा "३३--खट्वांग" झाला.||४१|| भावार्थः---तो खट्वांगराजा,युद्धांत शत्रूंना दुर्जय होता म्हणून देवांनी आपले सहाय्य करण्याविषयी त्याची प्रार्थना केली असतां,त्याने दैत्यांचा वध केला.नंतर प्रसन्न झालेल्या देवांनी वर माग असे म्हटल्यावर तो म्हणाला की,---तुम्ही आधी माझे आयुष्य किती आहे ते सांगा,मग त्यासारखा वर मागेन.तेव्हा देव म्हणाले---तुझे आयुष्य तर भूमिलोकावर दोन घटिका आहे.ते जाणून देवांनी दिलेल्या विमानाने तो राजा,आपल्या नगरामध्ये आला आणि त्याने मन परमेश्वराचे ठिकाणी लाविले.आपण--जीवांनी आपले मन संसारात न लावता ताबोडतोब परमार्थात लावावे,कारण या वर्तमान शरीराचे आयुष्य आपणास अज्ञात आहे,म्हणून आपण आपले मन ताबोडतोब परमार्थातच लावावे.||४२|| | न मे ब्रम्हकुलात् प्राणाः कुलदैवान्न चात्मजाः | न श्रियो न मही राज्यं न दाराश्चातिवल्लभाः ||४३|| भावार्थः---त्यावेळी त्याने असा निश्चय केला की,---कुलपुज्य अशा ब्राहमण कुलापेक्षा मला पृथ्वी,राज्य,संपत्ती,स्त्रिया,पुत्र हि व प्राणसुद्धा अतिप्रिय वाटत नाहीत.आपणास परमात्माच फक्त प्रिया वाटावा,तर इतर कांहीच प्रिय वाटू नये.||४३|| भावार्थः---माझी बुद्धी बाल्यावस्थेमध्येही संकटाच्या वेळीसुद्धा अधर्माने ठिकाणी कधी रमलीच नाही.तसेच उत्तमकीर्ती भगवंतापेक्षा दुसरे काहीच वस्तू खरे,आहे असे मी पाहिले नाही.आपण--जीवानी असा निश्चय करावा की,भगवंतच फक्त खरा--सत्य आहे,तर इतर सर्व मिथ्या--दु:खदायक असे जाणून त्या सर्वांचा त्याग करावा. ||४४|| भावार्थः---जरीही त्रिभुवनेश्वर अशा देवांनी मला इच्छित वस्तू मागण्याचा वर दिला आहे तथापि भूतपालक अशा भगवंताचे ठिकाणी मन लावणारा मी,त्याला विघ्नरूप असलेल्या त्या वराला मागून घेत नाही.अमात्मा मिळणारा जो वर आहे,तो दु:खदायक असून क्षणिक म्हणजे जो विषयांचा तो विघ्नदायक म्हणजे चौथा जो पुरुषार्थ मोक्ष आहे,त्यास प्रतिबंधक आहे,म्हणून अशा प्रकारचा वर आपण--जीवांनी भगवंतानी,दिला तरी घेऊ नये,कारण तो अंती दु:खदायक आहे.||४५|| | ये विक्षिप्तेन्द्रीयधियो देवास्ते स्वहृदि स्थितम् | न विन्दन्ति प्रियं शश्वदात्मानं किमुतापरे ||४६|| भावार्थः---कारण,सात्विक म्हणून प्रसिद्ध असलेले जे देव तेहि,इंद्रिये,व बुद्धी विषयासक्त झालेली असल्यामुळे आपल्या ह्रदयामध्ये निरंतर असणाऱ्या प्रिय आत्म्या भगवंताला जाणत नाहीत.मग दुसरे राजस व तामस स्वभावाचे मनुष्यादिक जाणत नाहीत हे काय सांगावे?जे देव सात्विक आहेत,तेसुद्धा विषयात आसक्त असल्यामुळे आत्मा--परमात्मा यास जाणत नाहीत,कारण आत्मा व विषय यांचे नाते,अंधार व प्रकाश यांच्यासारखे म्हणजे जेथे विषय आहेत,तेथे आत्मा नाही व आत्मा आहे,तेथे विषय नाहीत.म्हणून सात्विक जे देव आहेत,जे स्वर्गस्थ आहेत,ते विषयांत आसक्त आहेत.त्यांच्या मानाने मनुष्यादिक आहेत,ते तर अधिक राजस व तामस आहेत,ते तर आत्मतत्त्व जणू शकत नाहीत.मनुष्यांनी जर सत्संग केला तर ते आत्मतत्त्व जाणू शकतात.त्यांनाही विषयांचा त्याग केला तर जाणू शकतात,अन्यथा नाही.||४६|| भावार्थः---यास्तव स्वभावाने आपले ठिकाणी चिकटलेला व ईश्वराच्या मायेने रचिलेल्या गंधर्वनगरासारख्या विषयांचे ठिकाणी असलेला जो संग,त्याला विश्वकर्त्या भगवंताच्या भावनेने टाकून त्याच भगवंताला मी शरण जातो.म्हणून आपण जीवांनी क्षणिक सुखाला करण असलेले व अंती दु:ख देणारे विषय आहेत,त्यांचा विवेकपूर्वक त्याग करावा,तर अविवेकानें त्याग करू नये.अविवेकाने केलेला त्याग हा क्षणिक असतो व विवेकाने केलेला त्याग हा कायमचा असतो.||४७|| भावार्थः---याप्रमाणे नारायणाने आपले ठिकाणी आकर्षण केलेल्या बुद्धीने कृतनिश्चय झालेला तो खट्वांग राजा,देहादिकांचे ठिकाणी असलेल्या अभिमानरूप अज्ञानाचा त्याग करून आत्मस्वरुपाला पावला.आपण खट्वांग राजाने विवेकपुर्वक त्याग केला,म्हणून तो मोक्षास प्राप्त झाला,त्याप्रमाणे आपणही विवेकपुर्वक त्याग केला तर मोक्षास प्राप्त होउत,यांत मुळीच शंका नाही.||४८|| | यत् तद् ब्रम्ह परं सूक्ष्ममशून्यं शून्यकल्पितम् | भगवान् वासुदेवेती यं गृणन्ति हि सात्वताः ||४९|| भावार्थः---ते आत्मस्वरूप असे की,---वेदांताचे ठिकाणी जे परब्रहम म्हणून प्रसिद्ध आहे,इंद्रियांना अगोचर असल्यामुळे ज्याची शून्यासारखी कल्पना करितात परंतु वस्तुतः हे सत्स्वरूप आहे आणि भगवद्भक्त ज्याला भगवान वासुदेव असे म्हणतात त्या आत्मस्वरुपाला तो खट्वांगराजा पावला.आपणसुद्धा ज्याप्रमाणे खट्यवांग मोक्षास प्राप्त झाला,त्याप्रमाणे आपणही चौथा जो पुरुषार्थ मोक्ष त्यास प्राप्त होऊन जन्म--मरण निवृत्त होउत,यांत मुळीच शंका नाही.||४९|| ९-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये गंगाप्राप्तदिवर्णननामक हा(९)नववा अध्याय(४९)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||९|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ______________________________________________________________________________________________ १०-----आतां ह्या दहाव्या अध्यायामध्ये खट्वांगराजाच्या वंशामध्ये श्रीरामाचा अवतार सांगितला आहे आणि त्याचे चरित्रही,रावणाला मारून परत अयोध्येत येईपर्यंत सांगितले आहे.||१०|| १०---- भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला,----हे राजा,खट्वांगापासून "३४--दीर्घबाहु' झाला,त्याच्यापासून महाकीर्तिमान "३५--रघु" झाला,त्यापासून महाराजा "३६--अज" झाला,त्यापासून "३७--दशरथ" झाला.||१|| भावार्थः---त्या दशरथाचेही,देवांनी प्रार्थना केलेला साक्षात ब्रहममय असा हा हरी भगवान आपल्या अंशांशेकरून "३८--राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न" अशानावांनी चार प्रकारे पुत्रत्व पावला.||२|| हे राजा,जरीही त्या सीतापती रामाचे चरित्र परमार्थ जाणणाऱ्या वाल्मिकी आदिक ऋषींनी तुला पुष्कळ वर्णन केले आहे आणि तूंही वारंवार श्रवण केले आहेस तथापि मीही संक्षेपाने सांगतो ते ऐक.||३|| भावार्थः---ज्याने दशरथवाक्याच्या सत्यत्वाने रक्षण करण्याकरिता राज्याचा त्याग करून,ज्यांना सीतेचा हस्तस्पर्शहि कठीण लागत असे अशा कमळासारख्या अतिसुकुमार पायांनी प्रत्येक वनामध्ये संचार केला.ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वडिलांनी देल्याल्या अज्ञाचे पालन करण्याकरिता राजसत्तेचा त्याग करून पत्नीच्या व भावाच्या आग्रहास्तव त्यांना सोबत घेऊन वनात गेला,त्याचप्रमाणे आपणही--जीवांनी आपापल्या आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे आपला स्वधर्म आहे.ज्याचा मार्ग चलताना झालेला श्रम सुग्रीव आणि लक्ष्मण यांनी दूर केला.ज्याप्रमाणे सुग्रीव व लक्षमण यांनी चालत असतांना जो श्रम प्रभू रामचंद्रांना झाला,तो श्रम यांनी दूर केला,त्याचप्रमाणे आपण--जीवांनी इअतारांना जो परिश्रम झाला असेल तो परिश्रम आपण आपल्या परीने दूर करण्याचा प्रयत्न करावा.शूर्पनखा राक्षसीने कर्ण-नासिकाछेदनाने विरूपकरण केल्यामुळे क्रुद्ध झालेल्या त्या शुर्पणखेने सितेविषयी रावणाला लोभ उत्पन्न करवून त्याजकडून सीतेचे हरण करविले असतां,तिच्या वियोगामुळे प्राप्त झालेल्या क्रोधाने चढविलेल्या भृकुटीच्या आवेशेकरूनच ज्यापासून समुद्र भिऊन गेला आहे;ज्याने समुद्राच्या प्रार्थनेने सेतू बांधिला आहे आणि जो रावणादि दुष्टरुपीअरण्याला जाळून टाकण्याविषयी अग्नीच झाला आहे तो कोसलदेशांचा राजा श्रीरामचंद्र,आमचे रक्षण करो.भगवन--रामचंद्र यांचे जर आपण निष्काम भक्त झालोत तर ते आपले रक्षण आपणहून करितात.म्हणून आपण जीवानी रामचंद्रांचे निष्काम भक्त म्हणजे भगवंत प्राप्त होण्यासाठी भक्ती करावी,तर विषयांसाठी--संसाराविषयी--संसारातील वस्तूंविषयी भक्ती करू नये,कारण विषय--संसारातील वस्तू या क्षणिक सुख व अपार दु:ख देणारे असतात.जसे अर्जुनाने भगवंत मागितला व दुर्योधनाने भगवंताचे सैन्य मागितले,म्हणून अर्जुनाचा विजय झाला व दुर्योधनाचा पराभव झाला.यावरून आपण विवेक करून भगवंत मागवा,पण संसार--विषय--संसारातील वस्तू मागू नयेत.||४|| भावार्थः---याप्रमाने संक्षेपाने सांगितलेले रामचरित्र विस्तराने सांगतो---ज्याने विश्वामित्रऋषीच्या यज्ञामध्ये लक्ष्मण पाहतच असतां,राक्षसांमध्ये श्रेष्ठ असे मारीचादिक राक्षस मारून टाकिले आहेत तो श्रीराम आमचे रक्षण करो.ज्याप्रमाणे लक्षमण यांनी जे शत्रू मारीचादिक मारिले,त्याप्रमाणे आपण--जीवांनी आपले शत्रू---जे काम,क्रोध,लोभ.मोह,मद आणि मत्सर यांना आपल्या ताब्यात घ्यावे,आपल्या ताब्यात घेतले असता,त्यांचा आपण आपणास अनुकूल उपयोग करून घेता येतो.आपण जीव त्या शत्रूच्या ताब्यात गेलोत,तर ते आपला फायदा त्यांच्यासाठी करून घेतात.असा विवेक करून त्या शातृनांना आपल्या जीवांच्या ताब्यात ठेवावे.||५|| भावार्थः---हे राजा,ज्या श्रीरामाने,सीतेच्या स्वयंवरगृही लोकांतील वीरांच्या समाजामध्ये तीनशे वाहकांनी आणीलेले फारच जड व अतिकठीण असे शंकराचे धनुष्य ग्रहण करून,सज्ज केले आणि आकर्षण करून,ते जसे बालगजाची लीला धारण करणाऱ्या हत्ती इक्षुदंडाला मध्येच मोडून टाकितो त्या प्रमाणे मध्येच मोडून टाकिले.त्याचा प्रमाणे आपण सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करावे.||६|| भावार्थः---नंतर,ज्या श्रीरामाने आपणांस योग्य अशी गुण,स्वभाव,वय,शरीर आणि सौंदर्य यांनी युक्त व जिने पूर्वी समुद्रमंथनापासून उत्पन्न होते वेळीच वक्षस्थळाचे ठिकाणी सत्कारपूर्वक स्थळ मिळविले आहे त्या सितानामक लक्ष्मीला धनुर्भंगाच्या योगाने स्वाधीन करून घेऊन,आपल्या अयोध्या नगरीमध्ये जातांना,'ज्याने पूर्वी एकवीस वेळ पृथ्वी राजबीजरहित केली होती तो' परशुराम धनुर्भंगाचा नाद ऐकून क्षोभ पावून मार्गामध्ये प्राप्त झाला असतां त्याचा वृद्धिंगत झालेला दर्प घालविला आहे तोश्रीराम,आमचे रक्षण करो.आपण--जीवांनी आपला गुण,स्वभाव,वय,शरीर,आणि सौंदर्ये यांनी युक्त होऊन लक्ष्मी--सीता प्राप्त करून घेतली,त्याचाप्रमे आपण--जीवांनी माया हि सत्संगाद्वारे मिथ्या आहे असे जाणून तीस ओळखून घ्यावे.त्या मायेस ओळखले असता तिच्यापासून दु:ख होत नाही व त्या मायेस न ओळखल्यास ती माया दु:ख देते.असे प्रभू आपले--जीवाचे रक्षण करो.||७|| भावार्थः---एकेवेळी कैकीयीला प्रसन्न झालेल्या दशरथाने तुला इच्छित असतील ते दोन वर मी देईन असे सांगितले होते,पुढे श्रीरामाला यौवराज्याभिषेक करतेवेळी,तिने भरताला राज्य आणि रामाला वनवास असे दोन वर मागितले तेव्हां सत्यरूप पाशाने परिवेष्टित झालेल्या स्त्रीवश अशाही त्या पित्याची वनवासास जाण्याची आज्ञा ज्या रामाने बहुमान पूर्वक स्वीकारिली आणि राज्यधिकार,राज-- संपत्ती प्रेमयुक्त असे माता वगैरे सुह्रज्जन व अयोध्या नगरी,यांचा जसा विरक्त झालेला योगी,आपल्या प्राणांचासुद्धा त्याग करितो त्याप्रमाणे त्याग करून सीतेसहवर्तमान वनामध्ये गमन केले.त्याचप्रमाणे आपण--जीवांनी जडसंपत्ती--धन,मान--प्रतिष्ठा,सत्ता,वैभव, देहसंबंधी असे संसारातील असलेले दु:खदायक विषय यांचा विवेकपुर्वक त्याग करावा,कारण ते दु:खदायक आहेत व वारंवार लक्षचौऱ्या-- योनीस दु:ख भोगण्यास पाठविणारे आहेत.||८|| भावार्थः---नंतर कामातुरपणाने सीतेच्या तिरस्कारविषयी प्राप्त झालेल्या शुर्पणखेचे स्वरूप ज्याने कर्णनासिकांच्या छेदनाने विरूप केले,आणि तिने पाठविलेले,तिचेच खर,त्रिशिर व दुषण हे बंधू ज्यांत मुख्य आहेत असे चवदा हजार राक्षस मारून टाकिले तो श्रीराम,हातांमध्ये असह्य धनुष्य करून संचार करीत लोकशिक्षेकरितां मोठ्या कष्टाने वनामध्ये वास करिता झाला.भगवान प्रभू रामचंद्र मृत्यू लोकांतील मानवांसाठी लोकशिक्षेकरिता--आपण आई--वडिलांचे आज्ञाचे पालन करावे,म्हणून स्वत: राजवैभवाचा त्याग करून वनात गेले.आपल्या करीतच वनातील कष्ट सहन केले.जसे आई आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठीच दररोज घरातील स्वयंपाक इत्यादी कामाचे कष्ट घेते,त्याप्रमाणे भगवंत प्रभू रामचंद्रांनी आपल्यासाठीच वनवानावासांचे कष्ट सहन केले,म्हणून आपण प्रभू रामचंद्राप्रमाणे आई--वडिलांचे नेहमीच आज्ञाचे पालन करावे.आपण आपल्या आई--वडिलांच्या आज्ञाचे पालन न केले तर आपले पुत्र आपल्या आज्ञाचे पालन करणार नाहीत.आपल्या पुत्रांनी आपल्या आज्ञाचे पालन न केले तर आपणास दु:ख होईल की सुख होईल?त्याचप्रमाणे आपण आपल्या आई--वडिलांच्या आज्ञाचे पालन न केले तर त्यांना काय वाटेल?आपणास जे होईल,तेच त्यांना होईल.म्हणजेच आपणास दु:खच होईल,तर आपल्या आई--वडिलांना दु:खच होईल.म्हणून आपण आपल्या आई--वडिलांच्या आज्ञाचे पालन करावेच.असे केले तर आई--वडिलांना सुखच मिळेल,विशेषत: ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या करीतच आई-वडिलाच्या आज्ञाचे पालन केले त्यांना तर फारच आनंद होईल व त्यामुळे ते भगवंत प्रभू रामचंद्र आपल्यावर कृपा करून त्यांचा जो निवास वैकुंठ आहे,तेथे नेऊन आपल्या सोबतच राहतील.म्हणून आपण "आई-वडिलांच्या आज्ञाचे पालन करून,त्यांचे पालन--पोषण करावे." ||९|| भावार्थः---हे राजा,नंतर शुर्पणखेचा मुखांतून सीतेची कथा ऐकील्याने कामातुर होऊन सीतेचे हरण करण्याची इच्छा करणाऱ्या परंतु आपणापासून भ्यालेल्या रावणाने आपणास आश्रमातून बाहेर काढलेल्या ज्या रामाने,शीघ्र गमन करणाऱ्या बाणाच्या योगाने त्या मारीच्याचा,जसा वीरभद्राने दक्षप्रजापतीचा वध केला त्याप्रमाणे वध केला.||१०|| भावार्थः---नंतर राक्षसांमध्ये अधम अशा रावणाने लांडग्याप्रमाणे रामलक्ष्मणांच्या असमक्ष सीता हरण केली असता,स्त्रीवियोग पावलेला तो रामचंद्र,स्त्रीसंगी पुरुषांना अशा प्रकारची दुःखपरीणामक गती प्राप्त होते असे दर्शवित असतां दुःखी पुरुषासारखा लक्ष्मणासहवर्तमान वनामध्ये संचार करूं लागला.भगवंत प्रभू रामचंद्र वास्तविक सर्वज्ञ असल्यामुळे स्त्री--पत्नी वियोगाचे दु:ख झाले नाही,पण व्यवहार्य दृष्टीकोनातून दु:ख इतरांना भासविले,म्हणजेच झाल्यासारखे दाखवले.ज्याप्रमाणे संत--महात्मा हा ज्ञानी असल्यामुळे त्यासही प्रतिकूल परिस्थितीतून वास्तविक दु:ख होत नसते,तरी पण व्यवहार--दृष्टीतून दाखवतात.||११|| भावार्थः---तेव्हा त्या रामाने आत्मप्रित्यर्थ रावणाबरोबर केलेल्या युद्धरूप कर्माने ज्याचे दाहादिक शास्त्रीयकर्म नष्ट झाले अशा जटायूनामक पक्षाचे पुत्र धर्मासारखे दहन करून,नंतर आपणास धरण्यासाठी बाहू पसरणाऱ्या कबंधाराक्षसाचा वध केला.नंतर वानरांबरोबर सख्य करून,पुढे वाली मारिला असतां,वानरांकडून सितेची गती जाणून,ब्रहमरुद्रांनी ज्याचे चरण पूजित आहेत तथापि मनुष्यलीला स्वीकारणारा तो रामचंद्र,वानरश्रेष्ठांच्या सैन्याससहवर्तमान समुद्राच्या तीरास प्राप्त झाला.||१२|| भावार्थः---तेथे रामाने त्रिरात्र उपोषण करून समुद्राची वाट पाहिली असतांही तो जेव्हा रामाजवळ आला नाही तेव्हा,ज्या रामाच्या क्रोधीलीलेने वटारलेल्या नेत्रांच्या कटाक्षपातांनेच ज्यामध्ये गादे(रेड्यासारखी एक जात )व दुसरी भयभीत झाल्या आहेत असा समुद्र, भयाने आपला घोष बंद करून पुरुष रूपाने मस्तकी पूजासामग्री ग्रहण करून,रामाच्या चरणकमलाजवळ येऊन असे म्हणाला की,-||१३|| भावार्थः----हे पूर्णब्रहमरूपा-राम,इतकावेळ पर्यंत जड्बुद्धी अशा आम्ही जाणले नाही.आतामात्र असे जाणले आहे की,ज्या तुझ्या सत्वगुणापासून देवगण.रजोगुणापासून प्रजापती आणि तमोगुणापासून भूतपति झाले आहेत तो तूं तिन्ही गुणांचा नियंता,निर्विकारी आदीपुरुष व सर्व जगांचा ईश्वर आहेस.||१४|| भावार्थः---हे वीरा रामा,जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तूं माझ्या उदकावरून लंकेमध्ये गमन कर आणि त्रैलोक्याला रडविणारा व विश्रवाऋषीचा मळरूपी अशा रावणाचा त्या सेतूजवळ येऊन तुझे दुष्कर कर्म पाहून ते तुझे यश गायन करतील.||१५|| भावार्थः---नंतर त्याचे वाक्य स्वीकारून रामाने.कपिश्रेष्ठांचा हातांनी कंपित झालेल्या शाखादिकांनी युक्त अशा अनेकप्रकारच्या पर्वतशिखरांनी त्या समुद्रावर सेतुबंधन करून बिभिषणाने दाखविलेल्या मार्गाने,सुग्रीव,नील व हनुमान हे ज्यांमध्ये प्रमुख आहेत अशा वानरांच्या सैन्यासहवर्तमान लंकेत प्रवेश केला.ती लंका पूर्वी हनुमंताने दग्ध केलेली होती.||१६|| भावार्थः---नंतर ती लंका,हत्तीच्या समुदायांनी गढूळ केलेल्या नदीसारखी,वानरश्रेष्ठांच्या सैन्याने,जीच्यामधील क्रीडास्थाने,कोठारे, जामदारखाने,मंदिरांची दारे,नगरद्वारे,सभास्थाने,वळचणी व पक्षिसंरक्षणार्थ केलेली घरे हि कोंडली गेली आहेत व जिच्याठिकाणी वेदिका (ओटी)इत्यादिक स्थाने,ध्वज,सुवर्णकुंभ व चवाटे हि मोडून पडली आहेत अशी अस्ताव्यस्त झाली.||१७|| भावार्थः---तेव्हा रावणाने ते रामसैन्याचे कृत्य पाहून,निकुंभ,कुंभ,धूम्राक्ष,दुर्मुख,देवांतक,नरांतक इत्यादिक,इंद्रजीतनामक पुत्र,प्रहास्थ,अति-- काय,विकंदन इत्यादिक सर्व राक्षसांना रामाबरोबर युद्ध करण्याकरिता,पाठवून शेवटी कुंभकर्णालाही पाठविले.||१८|| भावार्थः---तेव्हा असि,शूळ,धनुष्ये प्रास,ऋष्टी,शक्ति,बाण,तोमर आणि खड्गे यांच्या योगाने दुर्भेद्द अशा त्या राक्षसाच्या सेनेबरोबर युद्ध करण्याकरिता,श्रीरामचंद्र,सुग्रीव लक्ष्मण,हनुमान,गंधमाद,नील,अंगद,जांबवान,पनस इत्यादिकांसहवर्तमान निघाला.||१९|| भावार्थः---त्याप्रसंगी रामाचे अंगदादिक सर्व सेनापति,हत्ती,पायदळ,रथ व स्वार यांनी युक्त असलेल्या त्या रावणाच्या सैन्याबरोबर द्वंद्वयुद्धरीतीने संगत होऊन,सीतेच्या स्पर्शाने हतभाग्य झालेला रावण ज्यांचा धनी आहे त्या राक्षसांना,वृक्ष,पर्वत,गदा व बाण इत्यादिकांच्या योगेकरून प्रहार करूं लागले.||२०|| भावार्थः---नंतर राक्षसाधिपती रावण,आपल्या सैन्याचा नाश झाला असे पाहून क्रुद्ध होत असता,पुष्पक विमानामध्ये आरोहण करून,श्रीरामाबरोबर युद्ध करण्याकरिता निघाला.आणि तो मातलि-नामक इंद्राच्या सारथ्याने स्वर्गावरील रथ रामाजवळ आणिला असतां त्या तेजःपुंज रथावर विराजमान होणाऱ्या श्रीरामाला,वस्तऱ्याच्या धारेसारख्या तीक्ष्णबाणांनी प्रहार करूं लागला.||२१|| भावार्थः---त्या रावणाला श्रीराम म्हणाला---की,हे राक्षसांच्या विष्ठारुपा रावणा,जसा श्वान घरधन्याच्या असमक्ष घरांत शिरून एखादा पदार्थ हरण करितो त्याप्रमाणे ज्याअर्थी दुष्ट अशा तूं,माझ्या असमक्ष स्त्रीचा अपहार केला आहेस त्याअर्थी जसा अलंघ्य पराक्रमी काळ अधर्माचरण करणाऱ्या पुरुषाला त्याचे फळ देतो त्याप्रमाणे निर्लज्ज अशा तुला मी आज त्या निंद्दकर्माचे फळ देतो.म्हणून आपण--जीवानी निर्लज्ज असे निंद्य कर्म करू नये,कारण त्याचे दु:ख हे फळ आपणांस भोगावे लागते.||२२|| भावार्थः---अशी निंदा करणाऱ्या श्रीरामाने धनुष्याचे ठिकाणी संधान केलेला बाण सोडीला.त्या बाणाने वज्रासारखा कठोर असलेल्याही त्या रावणाच्या ह्रदयाचा भेद केला.तेव्हा तो रावण,दहामुखांनी रक्ताचे वमन करीत असता,तेथील लोक हाहाकार उच्चार करित असतां,जसा पुण्यवान पुरुष क्षीणपुण्य झाला म्हणजे स्वर्गावरून खाली पडतो त्याप्रमाणे पुष्पक विमानातून खाली पडला.आपण--जीवांनी आपल्यापेक्षा अधिक सामार्थेवान असेल तर त्यांच्याबरोबर युद्ध करू नये,तर आपल्यापेक्षा कमी सामर्थेवानाबरोबर युद्ध करावे.||२३|| भावार्थः---तदनंतर रावणाच्या मंदोरीनामक स्त्रीसहवर्तमान रोदन करणाऱ्या हजारो राक्षसी,लंकेतून बाहेर निघून,जेथे रावण पडला होता त्या स्थळी प्राप्त झाल्या.||२४|| भावार्थः---त्यांनी त्या युद्धभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणाच्या बाणांनी मरण पावलेल्या आपापल्या पतींना आलिंगन करून,आपणच आपल्या देहाला ताडन करून घेत व दुःखित असता,सुस्वर रडूं लागला.||२५|| भावार्थः---लोकांना रडविणाऱ्या हे नाथा रावणा,आम्ही लंकावासी सर्वही लोक मेल्यासारखे झालो आहो आतां शत्रूंनी पिडीत व तुझ्या योगाने रहित झालेली हि लंका (लंकेतील सर्व लोक)कोणाला बरे शरण जाईल?||२६|| भावार्थः---हे महाभाग्यवंता,कामवश झालेल्या तूं,सीतेच्या तेजाचे सामर्थ्य अशा प्रकारचे आहे हे जाणले नाहीस म्हणून त्याच्या योगाने अशा दशेला (मरणस्थितीला)प्राप्त झाला आहेस.||२७|| भावार्थः---हे कुलवंदना रावणा,तूं आम्हांला व ह्या लंकेला सीतेचा अपहारपूर्वक प्राणत्याग करून विधवा केल्या आहेस.तसाच आपला देह.गृध्रपक्ष्यांचे भक्ष्य केले आहेस व आपला जीवात्मा नरक भोगण्यास योग्य केला आहेस.||२८|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---नंतर श्रीरामाने आज्ञा केलेल्या बिभिषणाने,आपल्या मरण पावलेल्या रावणादिक सर्व बंधूचे पितृयज्ञाच्या विधानाने जे और्ध्वदेहिक कर्म सांगितले आहे ते सर्व केले.||२९|| भावार्थः---नंतर भगवान रामचंद्राने,अशोकवनांतील आश्रमामध्ये शिंशिपा वृक्षाच्या मुळाजवळ बसलेली,आपल्या वियोगदुःखित असल्यामुळे कृश झालेली अशी सीता पाहिली.||३०|| भावार्थः---आणि पराधीन असल्यामुळे दीन दिसणाऱ्या परंतु आपल्या दर्शनाने झालेल्या आनंदाच्या योगाने जिचे मुखकमल प्रफुल्लीत झाले आहे अशा त्या आपल्या प्रियतम भार्येला पाहून त्या रामाने तिच्यावर दया केली. ||३१|| भावार्थः---आणि तिला पुष्पकविमानांमध्ये बसवून,नंतर लक्ष्मण सुग्रीव व हनुमान यांनी युक्त असा राम,आपणही त्या विमानात आरूढ झाला.त्यावेळी राक्षसगणांचे आधिपत्य,कल्पपर्यंत आयुष्य व लंकेचे राज्य हि विभिषणाला देऊन त्यालाही बरोबर घेतले आणि चवदा वर्षांचे वनवासरूप व्रत पूर्ण करून तो राम,अयोध्यानगरीस जाण्याकरिता निघाला.तेव्हा मार्गामध्ये इंद्रादिक लोकपालांनीपुष्पवृष्टी करून त्याचे विमान आच्छादित केले.||३२-३३|| भावार्थः---तसेच ब्रहमदेव नारद इत्यादिकांनी आनंदाने त्याच्या चरित्रांचे गायन केले.तो महादयालू रामचंद्र,आपला भरत बंधु,गोमुत्रामध्ये शिजविलेल्या सातुच्या पिठाचे भक्षण करून वल्कलवस्त्रे व जटा धारन करून दर्भ अंथरलेल्या भूमीवर शयत करीत असता आपली वाट पाहत आहे असे ऐकून,फारच सद्गदित झाला.||३४-३५|| भावार्थः---इकडे भरत,आपला ज्येष्ठबंधू श्रीरामचंद्र अयोध्येस परत येत आहे असे ऐकून,त्याच्या पादुका मस्तकी धारण करून,श्रीरामावाचून अयोध्यानगरीत प्रवेश न करण्याच्या इराद्याने ज्या नंदिग्रामांत पर्णकुटिका करून राहिला होता तेथून पुरवासी लोक प्रधानमंडळ व पुरोहित यांसहवर्तमान आणि गायने,मृदंगादिक वाद्यांचे गजर,वेदघोष वारंवार उच्चस्वराने पठन करणारे वेदवेत्ते ब्राहमण,ज्यांच्या कांठावर सोन्याच्या रसाचे मिने(मुलामे)दिले आहेत अशा पतका,चित्रविचित्र ध्वजांनी युक्त असून उत्तमप्रकारचे घोडे जोडलेले व सोन्याने कळस बांधविलेले सुवर्ण निर्मित रथ,सुवर्णकवचे धारण करणारे योद्धे,मोठमोठे व्यापारी,श्रेष्ठ वारांगना व पायांनी चालणारे सेवक यांसहवर्तमान,महाराजाला योग्य अशी छत्रचामरादिक चिन्हे व लहान नजराणे घेऊन श्रीरामाला सामोरा गेला.||३६-३७- ३८-३९|| भावार्थः----आणि प्रेमाने आर्द्र झाली आहेत ह्रदय आणि नेत्रे ज्याची असा तो भरत,रामाच्या पुढे पादुका ठेवून पायांवर पडला आणि नंतर हात जोडून प्रेमांश्रूंनी नेत्र भरून आले आहेत असे असता,पुढे उभा राहिला.||४०|| भावार्थः---नंतर श्रीरामाने,त्या भरताला फारवेळापर्यंत आलिंगन करून नेत्रांपासून उत्पन्न झालेल्या आनंदांश्रूंनी स्नान घातले.नंतर लक्ष्मण व सीता यांसहवर्तमान त्या रामाने ब्राहमणांना व जे नमस्कार करणाऱ्यास योग्य असे कुल वृद्ध होते त्यांना स्वतां नमस्कार केला.आणि त्यावेळी सर्व प्रजांनीही श्रीरामाला वंदन केले.||४१|| भावार्थः----उत्तरकोसल देशांतील लोक,फार दिवसांनी आलेल्या श्रीरामाला पाहून,हर्षाने पुष्पवृष्टी करीत व उत्तरीय वस्त्राचे पदर नाचवीत ते नृत्य करूं लागले.||४२|| भावार्थः---आतां रामाचा अयोध्याप्रदेश सांगतो---भरताने रामाच्या पादुका घेतल्या.बिभीषन आणि सुग्रीव यांनी चामर आणि पंखा हि ग्रहण केली.मारुतीचे श्वेतच्छत्र ग्रहण केले.||४३|| भावार्थः---हे राजा,धनुष्य आणि भाते शत्रुघ्नाने घेतले,सीतेने तीर्थोदकाने भरलेला कमंडलू घेतला.अंगदाने खड्ग घेतले.जांबवाणाने सुवर्णखचित ढाल घेतली.||४४|| भावार्थः---हे राजा,त्यावेळी वारांगना स्त्रियांनी परीवेष्ठीत व बदिजनांनी स्तुती केलेला असा तो भगवान रामचंद्र,पुष्पकविमानामध्ये बसला असतां,गुरुशुक्रादिकग्रहांसहित उदय पावलेला चंद्र जसा शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला.||४५|| भावार्थः---नंतर भरतादिक भ्रात्यांनी गौरविलेला तो रामचंद्र,त्या भ्रात्यांसहवर्तमान,ध्वजादिकांनी अलंकृत केलेल्या व उत्साहयुक्त अशा नगरीमध्ये प्रविष्ट झाला.त्या नंतर त्या रामाने राजवाड्यामध्ये प्रवेश केला असतां,कैकेय्यादिक दशरथाच्या स्त्रियांनी,कौश्ल्यामातेने, वसिष्ठादिक गुरूंनी,समवयस्क लोकांनी व वयाने लहान असलेल्या लोकांनी त्याचा उत्तम सत्कार केल्यावर त्यानेही त्यांचा नमस्करादिकेकरून उलट सन्मान केला;त्याप्रमाणेच सीता व लक्ष्मण यांचाही सर्वांनी यथायोग्य सत्कार केला असतां,त्यांनीही सर्वांचा प्रतिसत्कार करून ती उभयंता राजवाड्यांत प्रविष्ठ झाली.||४६-४७|| भावार्थः---त्यावेळी त्यांच्या कौसल्यादिक माता जर जसे प्राण प्राप्त झाले असतां मूर्च्छित झालेले देह उठतात त्याप्रमाणे उठल्या आणि त्यांनी,आपापल्या पुत्रांना अंकांवर बसवून घेऊन आनंदांश्रूंनी त्यांच्यावर अभिषेक करून विरहशोकाचा त्याग केला.||४८|| भावार्थः---नंतर वसिष्ठगुरूने कुलांतील वृद्धांसहवर्तमान रामाच्या जटा मोकळ्या करून चार समुद्रांनी उदकेवगैरे आणवून त्यांच्या योगाने यथाशास्त्र रामाला राज्यभिषेक केला.||४९|| भावार्थः---याप्रमाणे शीरस्नान करणारा व उत्तमप्रकारची वस्त्रे,माळा व अलंकार धारण करणारा तो राम,वस्त्रांलंकारीदिक धारण करणाऱ्या बंधूसहवर्तमान व अलंकारादिक धारण केलेल्या धारण सीतेसहवर्तमान अतिशय शोभू लागला.||५०|| भावार्थः---नंतर भरताने नमस्कार करून प्रसन्न केलेल्या त्या श्रीरामाने राज्यसनाचा स्वीकार केला.नंतर श्रीरामचंद्राने,वर्णाच्या व आश्रमांच्या पंचमहायज्ञादिक गुणांनी युक्त व स्वधर्माविषयी तत्पर अशा आपल्या देशातील सर्व प्रजांचे,जसा पितापुत्रांचे रक्षण करतो त्याप्रमाणे रक्षण केले आणि त्या प्रजांनीही रामाला पित्यासारखा मानिला.||५१|| भावार्थः---त्यावेळी सर्व प्राणिमात्रांना सुख देणारा धर्मवेत्ता श्रीराम,राज्य करू लागला असतां,त्रेतायुग चालले होते तथापि काल कृतयुगासारखा झाला.||५२|| भावार्थः---हे भरतकुलोत्पन्ना राजा,अचिंत्य सामर्थ्याने युक्त असा तो राम,राजा झाला असतां,वने,नद्यां,पर्वत,खंडे,द्वीपे व समुद्र हि सर्वही प्रजांचे मनोरथ पूर्ण करणारी झाली.मनोव्यथा,शरीरपीडा,वृद्धपणा,ग्लानता,दुःख,शोक,भय आणि श्रम हि प्रजांना होत नाहीशी झाली आणि इच्छा न करणाऱ्या लोकांना मृत्यूसुद्धा प्राप्त होत नाहीसा झाला.कारण भगवंत प्रभू रामचंद्र यांचा सहवास त्याचा परिणाम झाला.म्हणून आपण भगवंत यांचा सहवास घडण्यासाठी भक्ती करावी.||५३-५४|| भावार्थः---एकपत्नीव्रत धारण करणारा राजा असून ऋषीसारखा आचाराने युक्त व रागलोभादिदोषरहित असा तो श्रीराम,गृहस्थाश्रमाला विदित असलेला आपला धर्म,लोकांना शिकविण्यासाठी स्वतां आचरण करूं लागला.आपण जर वक्ता असाल तर अगोदर आपण सवार्त: आचरण करा व त्यानंतर उपदेश करा.||५५|| भावार्थः---तेव्हा विनयाच्या योगाने नम्र व सूक्ष्मबुद्धीने रामाचा अभिप्राय जाणणाऱ्या अशा पतिव्रता सीतेनही अतिशयित प्रेमाने,सुस्वभावाने व लज्जेने श्रीरामाचे मन आपल्या वश करून घेतले.पत्नीने आपल्या पतिचे मन,पतिची पवित्र सेवा करून व प्रसन्न करून आपल्याकडे वश करून घ्यावे.||५६|| १०-----याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील नवम(९)स्कंधामध्ये श्रीरामचरित्रकथननामक हा दहावा(१०) अध्याय छेपान्न(५६)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१०|| ______________________________________________________________________________________________११-----आतां ह्या अकराव्या लक्ष्मणादीक बंधूसहवर्तमान जगदीश्वर रामचंद्राने,अयोध्येमध्यें राहत असतां यज्ञानुष्ठानवगैरे जे कर्म केलें त्याचे निरुपण केलें आहे.||११|| ११-- भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,त्या भगवान रामचंद्राने,वसिष्ठाला गुरू करून,उत्तम साहित्यांनी युक्त अशा यज्ञांनी आपणच सर्वदेवमय व प्रकाशमय अशा आपलें यजन--यज्ञ केलें.||१|| भावार्थः---यज्ञांच्या शेवटी त्या प्रभूनें,होत्याला पूर्वदिशेकडील भूमि दक्षिणा दिली,ब्रहमला दक्षिणेकडील व उद्गात्याला उत्तरेकडील भूमी दक्षिणा दिली.||२|| भावार्थः---त्या चारी--दिशांमध्यें जितकी म्हणून भूमि अवशिष्ट राहिली होती ती सर्व आचार्याला अर्पण केली.कारण त्या सर्व भूमंडळाचा प्रतिग्रह करण्याविषयीं निस्पृह ब्राहमणच योग्य आहे असें मानणारा तो रामचंद्र होता.प्रभू रामचंद्र यांनी यज्ञ निमित्य भरपूर दानधर्म केला.त्याचप्रमाणे आपणही आपल्या स्वसामार्थ्यानुसार दानधर्म करावा.||३|| भावार्थः---म्हणून त्या रामानें दानरूपानें सर्वस्व देऊन आपण शरीरावरील अलंकार व वस्त्रें यांसहित मात्र अवशेष राहिला.तशीच राणी सीताही सौभाग्याला कारणभूत अशा नासिकाभूषणादिक अलंकारांनी व धारण केलेल्या वस्त्रांनी अवशिष्ट राहिली.माता सीतानेसुद्धा दानधर्म भरपूर केला.त्याचप्रमाणे आपल्या पतिची पत्नी असला तर आपणही कांही कार्यानिमित्य आपल्या सावसामार्थ्यानुसार दानधर्म करावा.||४|| भावार्थः---त्यावेळीं ते होता इत्यादिक ब्राहमण,ज्याला ब्राहमणच देवांसारखे आराध्य आहेत अशा त्या रामाचें,आचारनिष्ठ पुरुषांचे ठिकाणी असलेले वात्सल्य पाहून,प्रसन्न व स्नेहार्दचित्त असते आम्ही भूमीच्या रक्षणाविषयी असमर्थ अहों म्हणून तुंच ती रक्षण कर असें सागून,त्या रामालाच सर्व भूमींचे प्रतिअर्पण करून असें म्हणाले कीं---आपण जर ब्राह्मण असला तर व आपणास यजमानाकडून जमीन किंवा अन्य वस्तू मिळाली असेल व त्या वस्तूचे रक्षण करण्यास असमर्थ असाल तर ती भूमी किवा ती वस्तू यजन-कर्त्यास परत करावी,म्हणजे आपणास लोभी वृत्ति नसावी. ||५|| भावार्थः---हे जगत्पालका भगवंता,ज्याअर्थी तूं आमच्या ह्रदयामध्ये प्रवेश करून आमचें अज्ञानतम आपल्या स्वरूपप्रकाशानें नाहीसें करीत आहेस त्याअर्थी तूं आम्हांस काय बरें दिलें नाहींस ?तर सर्वही दिलें आहेस.यज्ञ यातील ब्राह्मण मंडळी म्हणतात की,"भगवंत--प्रभू रामचंद्रा महाराजा आपण आमचे अज्ञान निवृत्त करून जीव--ब्रह्म--ऐक्य ज्ञान देऊन आमचे जन्म--मरण निवृत्त केले,यांत आपण सर्व कांही देले.त्यामानाने बाकीचे स्थूल दान गौण आहे.||६|| भावार्थः--यास्तव ज्याती बुद्धी,देश,काल व वस्तू यांच्या योगाने कुंठीत होत नाही,जे महायशस्वी पुरुषांमध्येहि अग्रगण्य आहे,ज्याचे चरण भूतद्रोहाचा त्याग करणाऱ्या मुनींनी आपल्या हृदयामध्ये स्थापन केले आहेत आणि जो ब्राहमणांचा कैवारी असून आपल्या तेजाने प्रकश मान आहे त्या तुज रामाला नमस्कार असो.||७|| भावार्थः---हे परीक्षित राजा,एकेवेळी लोक आपणांस काय म्हणतात ते जाणण्याची एचा करणाऱ्या त्या रामचंद्राने,रात्रीच्या वेळी त्या नगरीमध्ये कोणाच्याही दृष्टी न पडता गुप्तरूपाने संचार करीत असता,एका पुरुषाचे स्त्रीला उदेशून झालेले भाषण ऐकिले ते असे की,--------||८|| भावार्थः---हे स्त्रिये,परपुरुषाच्या घरी गेलेली व व्यभिचार करणारी अशा तुला,मी आपल्या घरी राहू देणारे नहीं व पोषणही करणार नाही. स्त्रीलोभ रामचंद्राने जरी सीतेने अंगीकार केला तरी मी तर तुझा पुन्हा अंगीकार करणारच नाही.आपणही--जीवानी आपल्या पत्नीचे किंवा आपल्या कुटुंबातील स्त्री असो किंवा पुरुष असो,त्यांच्या शिल--चारीत्रेवर लक्ष ठेवणे अत्यंत जरुरी असते.||९||| भावार्थः---या प्रमाणवे नाना प्रकारचे भाषण करणाऱ्या व बोध करण्यास अशक्य अशा मुर्खजनाच्या अपवादापासून भ्यालेल्या त्या श्री रामाने,अरण्यात नेऊन सोडून दिलेली ती सीता वाल्मिक ऋषीच्या आश्रमास प्राप्त झाली. ||१०|| भावार्थः---ती त्या वेळी गर्भिणी होतो.ती पुढे प्रसूती काळ प्राप्त झाला असता कुश आणि लव या नावांनी प्रख्यात असलेल्या जुळ्या दोन पुत्रास प्रसवली.ते तेथी त्या पुत्रांचे जातककर्मादिक संस्कार वाल्मिक ऋषीने केले.||११|| भावार्थः---तसेच अंगद चित्रकेतू हे दोन लक्षमणाचे पुत्र होते.तक्ष आणि पुष्कल हे दोन भरताचे पुत्र होते तसेच हे राजा,सुबाहु आणि श्रुतसेन हे दोन शत्रुघ्न पुत्र झाले.||१२|| भावार्थः---भरताने दिग्विजयाच्या वेळी कोट्यावधी गंधर्व मारून त्यांचे द्रव्य आणून ते सर्व रामाला आर्पण केले. ||१३|| भावार्थः---शत्रूघ्नानेही मधु दैत्याच्या पुत्र जो लवण नामक राक्षस त्याला मारून मधुवनामध्ये मथुरा नामक नगरी वसवली. ||१४|| भावार्थः---इकडे रामाने अरण्यात सोडिलेली सीता,गर्भिणी होती म्हणून ती प्रसूती कालापर्यंत वाल्मिक ऋषीच्या आश्रमास राहून नंतर झालेल्या कुश लव नामक दोन्ही पुत्रांना त्या वाल्मिकाच्या स्वाधीन करून श्री रामाच्या चरणांचे ध्यान करीत असता भूमीच्या विवरांत प्रविष्ठ झाली.||१५|| भावार्थः----ते वर्तमान भगवान रामचंद्रानेऐकून,शोकापासून झालेल्या दुख:श्रुंचे तो विवेक बंधूने रोधक करीत असूनही व तो ईश्वर (विषयांचे ठिकाणी आसक्त नसणारा)असुनहि तिच्या सैशील्यादि गुणांचे स्मरण करीत असल्यामुळे त्या दुख:श्रुचा निरोध करण्यास समर्थ झाला नाही.||१६|| भावार्थः----हे राजा,हे काही विशेष आश्चर्य मानण्यासारखे नव्हे.कारण,स्त्री पुरुषांची परस्पर असलेली आसक्ताता,अशा प्रकारचीच समर्थ (जितेंद्रिय)पुरुषांनाही सर्व प्रसंगी त्रास देणारी आहे,मग गृहाचे ठिकाणी आसक्तचित्त असणाऱ्या गृहस्थाला ती त्रास देईन हे काय सांगावे!म्हणून आपण संसारिक जीवन जगात असतांना ग्राहस्थाआश्रमात असतांना संसाराची--विषयांची आसक्ती होऊ नये,म्हणून विवेकपूर्व जीवन जगावे.||१७|| भावार्थः---असो;त्या प्रभू रामचंद्राने,सितात्यागाच्या पूर्वी सीतेसहवर्तमान तेराहजार वर्षपर्यंत अखंडीत अग्निहोत्र चालविले होते परंतु सीतेने विवरात प्रवेश केल्याचे वर्तमान श्रवण केल्यावर दुसरी स्त्री वगैरे न करीता ब्रह्मचार्याव्रत धारण केले.आपणही जीवानी प्रारब्धकर्माने जर पत्नीचा आपला वियोग झाला तर दुसऱ्या पत्नीचा स्वीकार न करता किंवा पतीचा व आपला वियोग झाला तर दुसऱ्या पतीचा स्वीकार न करता ब्रह्मचार्यव्रत स्वीकारून उरलेल्या काळात परमार्थच करावा.ज्याच्या-त्याच्या प्रराब्धमुळे एकमेकांचा वियोग झालेला आहे,म्हणून वियोग झाला,म्हणून बरे झाले--चांगले झाले असे मानून उरलेल्या आयुष्यात परमार्थच करावा.||१८|| भावार्थः----नंतर त्या रामाने आपल्या भक्तांचे र्ह्द्यांमध्ये,दंडकारण्यासंबंधी कंटकांनी विध्द झालेला आपला चरणपल्लव स्थापन करून निजधामास गमन केले.||१९|| भावार्थः---हे राजा,जरी कवींनी हे सेतुबंधनरूप व शस्त्रसमूहांनी रावणवधरूप श्री रामाने यश,मोठ्या वर्णन केले तथापी हे विशेष आश्चर्य मानण्यासारखे नव्हे,कारण,ज्याच्या प्रभावाशी इतरांचा प्रभाव,सारखा सुद्धा नाही मग अधिक कोठून असणार? त्याला रावणाच्या वधाविषयी वानरांची साह्य करावयाचे इष्ट होते काय? इष्ट मुळीच नव्हते,कारण तो कर्तुम--अकर्तुम व अन्यथा कर्तुम सामर्थे असल्यामुळे यास्तव,त्याने सुग्रीवदिकांचा आश्रय केला ही जशी त्याची केवळ लीलाच होय तशी हि सेतूबंधादिकही लीलाच होय.आणि हेच योग्य आहे.भगवंताच्या लीलेवरून आपण हा बोध घ्यावावायाचा आहे की,व्यवहारात जीवा-जीवास एखादे कार्य करण्याकरिता एकमेकाचे सहकार्य घ्यावाच लागते,म्हणून जीवा--जीवांना बोध घेण्यान्कारिता इतरांचे सहकार्य घेतलेले आहे,त्यांना मुळीच सहकार्याची गरज नव्हती.कारण,पृथ्वीचा भार हरण करण्याकरीता देवांनी प्रार्थना केल्यावरून श्री विष्णूने हा लीलावतार धारण केला होता.||२०|| भावार्थः---ज्याचे दिग्गजेद्रांना पट्टवस्त्रासारखें भूषणरूप म्हणजे सर्व जगामध्यें पसरून दिग्गजांपर्यंत व्यापून राहणारें पापाचा नाश करणारें व शुद्ध असें यश,युधिष्टिरादिक राजांच्या सभांमध्यें मार्कंडेयादिक ऋषि अद्यापि गायन करीत आहेत.तसेंच स्वर्गपालक देवांनी व भूमिपालक राजांनी आपल्या किरीटांनी ज्याचे चरणकमल सेवन केलें आहे त्या रघुपतीला मी शरण प्राप्त प्राप्त झालों आहे.आपणही--जीवांनी भगवंत प्रभू रामचंद्रास शरण जावावयास पाहिजे.||२१|| भावार्थः---ज्यांनी रामाच्या चरणांस स्पर्श केला,ज्यांनी रामास अवलोकन केलें,ज्यांनी रामास आसनावर बसविलें व जे रामाच्या अनुलक्षेंकरून वागत होतें ते कोसलदेशवासी सर्वही जन,जेथें योगी गमन करितात त्या स्थानास (मुक्तीस)पावले.म्हणून आपण--जीवानी भगवान प्रभू रामचंद्र यांच्या मूळ-स्वरूपाशी जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने एकरूप व्हावे.असे केले असता आपला जन्म-मरण निवृत्त होऊन सुखरूप आहोत असा अनुभव येतो.||२२|| भावार्थः---हे राजा,जो पुरुष श्रीरामाच्या चरित्राचें श्रवण करितो तो परमशांत अशा कर्मबंधापासून मुक्त होतो.म्हणून आपण--जीवांनी श्री भगवान रामचंद्र यांचे चरित्र श्रावण करावे.||२३|| भावार्थः----राजा म्हणाला,हे शुकाचार्य,तो भगवान् रामचंद्र,स्वतः कसा वागत होता व आपल्याच अंशभूत अशा भ्रात्यांचे ठिकाणी कसा वागत होता आणि त्या समर्थ रामचंद्राने ठिकाणी ते भ्रातें,सर्व प्रजा व पुरवासी जन हे कसे वागत होते,तें मला सांग. ||२४|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,त्रिभुवनाधीपती अशा त्या रामचंद्राने राजसिंहासनाचा स्वीकार केल्यानंतर लक्ष्मणादीक भ्रत्यांना दिग्विजयाला जाण्याकरीतां आज्ञा केली व ती त्यांनी स्वीकारली.नंतर त्यानें भक्त जनांस दर्शन देण्यासाठी सेवकांसहवर्तमान अयोध्यानगरीचें अवलोकन केलें.||२५|| भावार्थः---ती अशी होती की,---चंदनादिकांनी सुगंध युक्त झालेल्या उद्कांनी व हत्तीच्या मदसंबंधी बिंदुनी मार्गाने सेवन केलेली व आपला धनी प्राप्त झाला असे पाहून अत्यंत मत्त झाल्यासारखी समृद्धी झाली होती म्हणजे तिच्यातील सर्व लोक आनंदोत्साहांत निमग्न झाले होते अशी होती,कारण भगवन प्रभू रामचंद्रांचा सहवासाचा तो परिणाम होता.म्हणून आपण त्यांचा सहवास हा त्यांच्याच चरित्रातील श्रवणांनी करावा. ||२६|| भावार्थः---तशीच राज मंदिरे,गोपूर सभा,क्रीडा स्थाने व देवालय इत्यादी कांचे ठिकाणी स्थापन केलेल्या सुर्वणमय कलशांनी व पताकांनी भूषित केलेली होती. ||२७|| भावार्थः---फळांच्या घोसांनी युक्त असे सुपारीचे वृक्ष,केळीचे खांब व उंची वस्त्रांच्या पताकांनी युक्त असे ध्वज,यांनी अलंकृत केलेली आणि आरसे,वस्त्रे व पुष्पांच्या माळा यांच्या योगाने उत्साहाने तोरणे बांधीलेली होती. ||२८|| भावार्थः---त्या नगराची शोभा पाहण्याकरिता राजमार्गाने श्रीरामचंद्र गमन करीत असता,त्या ठिकाणी नगरावासी जन,त्या रामाच्या समीपभागी हातामध्ये पूजासाहित्ये ग्रहण करून प्राप्त होत असता आशीर्वाद देऊन म्हणत असत की,---हे देवा रामा,तू पूर्वी वराहरूपाने उद्धार केलेल्या ह्या पृथ्वीचे आता संरक्षण कर.||२९|| भावार्थः---त्यावेळी चवदावर्ष वनवास करून अयोध्यास आलेया श्रीरामाला पाहण्याच्या इच्छेने,कितीएक स्त्रिया व पुरुष हे,आपली घरची कामे सोडून,उपर मांड्यावर चढले आणि त्या कमलनेत्र श्रीरामाला पाहून ज्यांची नेत्रे तृप्त झाली नाहीत असे असते ते त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले.आपणही--जीवांनी प्रभू रामचंद्रावर पुष्प-वृष्टी करावी. ||३०|| भावार्थः---आता तो रामचंद्र स्वता कसा वर्तत होता ह्या प्रश्नाने उत्तर सांगतो.याप्रमाणे ती आयोध्यानगरी पाहिल्यावर त्या श्रीरामाने आपल्या राज मंदिरात प्रवेश केला.ते मंदिर,आपल्या (रामाच्या)पूर्वज अनेक राजांनी सेवन कलेले,अनंत अशा सर्व रत्नांच्या भांडार-- गृहांनी समृध्द,अमुल्य व अपरिमित वस्तूंनी युक्त आणि पोवळ्यांचे उंबरवठे असलेल्या दरवाज्यांनी,वैदूर्यमण्यांच्या स्तंभपंक्तींनी, पांचरत्नांच्या केलेल्या स्वच्छ भूमींनी व दैदीप्यमान अशा स्फटिक मण्याच्या भिंतीनी युक्त होते. ||३१|| भावार्थः---चित्रविचत्र माळांनी,ध्वज्यांच्या पतकांनी वस्त्रांच्या व रत्नसमुदायांच्या कांतींनी,चैतन्यासारखा उज्वलित मोत्यांनी रमणीय अशा भोगसाधनांनी,सुगंधकारक धुपदीपांनी व पुष्पांच्या अलंकारांनी शोभित असून भूषाणांनीही अतिशय शोभा आणणाऱ्या देवांसारख्या स्त्री-पुरुषांनी केलेले होते.||३३||३४|| भावार्थः---अशा त्या राजभवनात,स्वस्वरूपी रममाण होणाऱ्या जितेंद्रिय पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा तो भगवान रामचंद्र,स्नेहातीशयानें युक्त व प्रिय अशा सीता नामक स्त्रीसहवार्तामान रममाण झाला. ||३५|| भावार्थः---आणि सर्व मनुष्यांनी ज्याच्या चरण पल्ल्वांचे चिंतन केले आहे अशा त्या श्रीरामाने,वर्णाश्रमधर्मास विरोध न येईल अशा रीतीने बहुत संवत्सरपर्यंत यथायोग्यकाली विषयभेगांचे सेवन केले. ||३६|| ११-----याप्रमाणे श्रीमदभागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये श्रीरामचरित्रकथनरूप हा(११)अकरावा अध्याय(३६)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||११|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || श्रीसदगुरुअर्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ १२-----आतां ह्या बाराव्या अध्यायामध्यें,श्रीरामचंद्राचा पुत्र जो कुश त्याचा वंश सांगून पूर्वी सांगण्यास आरंभ केलेला शशाद राजाचा वंश पुरा केला,अशी कथा आहे.||१२|| |१२--- इक्ष्वाकूवंशाच्या अन्य राजांचे वर्णन ______________________________________________________________________________________________भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,कुशाचा "अतिथिनामक पुत्र झाला.त्यापासून "निषध",त्याचा पुत्र झाला.त्यापासून "निषध",त्याचा पुत्र "नभ",त्याचा पुत्र "पुंडरीक",त्यापासून "क्षोमधन्वा" झाला.||१|| भावार्थः---त्याचा "देवानीक",त्याची "अनीह",त्याचा पुत्र "पारीयात्र",त्याला "बल",त्याचा "स्थल",त्याला सूर्याच्या अंशापासून "व्रजनाभ" झाला||२|| भावार्थः---त्याचा पुत्र "खगण",त्याचा पुत्र "विधृति" झाला,त्यापासून "हिरण्यनाभ" झाला,तो जौमिनीचा शिष्य असून योगाचार्य म्हणून प्रसिद्ध होता.||३|| भावार्थः---ज्याचा शिष्य असलेल्या यज्ञवाल्क्य ऋषीनें,महासिद्धी देणाऱ्या व ह्रदयग्रंथीचा मेड करणार्या अध्यात्म योगाचे अध्ययन केलें आहे ||४|| भावार्थः---त्या हिरण्यनाभाचा पुत्र "पुष्य" झाला,त्यापासून "ध्रुवसंधि" झाला,त्याचा "सुदर्शनल" त्याचा "अग्निवर्ण",त्याचा शीघ्न,त्याचा पुत्र मरू झाला |||५|| भावार्थः---तो मरू राजा,योगसाधनानें मृत्यूला जिंकून कलापग्रामामध्यें तेथील कांही लोकांसहवर्तमान राहिला आहे.तो कलियुगाच्या शेवटीं नष्ट झालेल्या सुर्यवंशाला पुन्हा पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने प्रवृत्त करील. ||६|| भावार्थः---त्या मरूपासून "प्रसुश्रुत" झाला,त्याचा "संधि",त्याचा "अमर्षण",त्याचा पुत्र "महास्वान",त्यापासून "विश्वसाव्ह" झाला ||७|| भावार्थः---त्यापासून "प्रसेनजित्",नंतर त्यापासून "तक्षक" झाला.त्यापासून "बृहद्धल" झाला,त्याला तुझ्या पित्याने (अभिमन्यूने)युद्धामध्यें मारिलें ||८|| भावार्थः---हे राजे,इक्ष्वाकु राजाच्या वंशात होऊन गेले.आतां पुढे होणारे राजे सांगतो श्रावण कर.ब्रूहद्धलाचा पुत्र "बृहद्रणनामक" होईल |||९|| भावार्थ:---त्याचा "उरूक्रिय",त्याचा "वत्सवृद्ध" होईल.त्यापासून "प्रतीव्योम",त्यापासून "भानू",सून "दिवाक" तो देवेसेनेचा अधिपति होईल,||१०|| भावार्थः---त्यापासून "सहदेव",त्यापासून वीर असा "बृहद्श्च" होईल;त्याच्यापासून "भानुमान्" त्या भानुमता-पासून "प्रतीकाश्च",नंतर त्याचा पुत्र "सुप्रतीक" होईल ||११|| भावार्थ:---त्याचा पुत्र "मरूदेव" होईल.त्याचा "सूनक्षत्र",त्याचा "पुष्कर" होईल;त्याचा पुत्र "अंतरीक्ष",त्याचा पुत्र "सुतपा",त्याचा "अमित्रजित्" होईल ||१२|| भावार्थः---त्याचा "बृहद्राज",त्याचा पुत्र "बर्ही",त्यापासून "कृतंजय" होईल;त्याचा पुत्र "रनंजय",त्यापासून "संजय" होईल ||१३|| भावार्थः---त्यापासून "शक्य",त्यापासून "शुद्धोद",त्याचा पुत्र "लांगल" होईल.त्यापासून "प्रसेनजित्",त्यापासून "क्षुद्रक" होईल ||१४|| भावार्थ:----त्यापासून "रणक" होईल; त्यापासून "सुरथ" पुत्र होईल;त्यापासून "सुमित्रानामक" शेवटचा पुत्र होईल.हे बृहद्धलाच्या वंशांतील राजे होत. ||१५|| भावार्थः----इक्ष्वाकुराजाच्या वंशात झालेल्या राजांचा हा वंश,सुमित्र राजापर्यंत होईल.कारण तो सुमित्रराजाला झाला म्हणजे पुढें कलीयुगामध्यें हा "वंश--उच्छिन्न" होईल ||१६|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(९)नवमस्कंधामध्यें हा(१२)बारावा अध्याय(१६)श्लोकांनी युक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________________________१३-----आतां ह्या तेराव्या अध्यायामध्यें,जयामध्यें ब्रहमवेत्ते जनकादिक राजे झाले तो इक्ष्वाकु राजाच्याच निमिनामक पुत्राचा वंश वर्णन केला.||१३|| |१३--- निमिच्या वंशाचे वर्णन ______________________________________________________________________________________________भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,इक्ष्वाकुराजाचा पुत्र जो "निमिराजा" त्यानें सत्र करण्याचें मनांत आणून वसिष्ठ गुरुची,‘तू या सत्रांत ऋत्विज हो’अशी प्रार्थना केली.तेव्हां वसिष्ठ म्हणाला:---हे राजा तूं वरण्याच्या पूर्वीच मला इंद्राने आपल्या यज्ञांत ऋत्विज वरिलें आहे.||१|| भावार्थः---यास्तव तो इंद्राचा यज्ञ संपवून मी येतों.तोपर्यंत तूं यज्ञानुष्ठान बंद ठेऊन माझी वाट पहा.हे ऐकून निमिराजा उगीच बसला व त्या वसिष्ठानें हि इंद्राकडे जाऊन त्याचा यज्ञ चालविला.||२|| भावार्थः---इकडे आत्मानात्माविवेक संपन्न अशा त्या निमिराजाने,हें आयुष्य चंचल आहे असें जाणून वसिष्ठ गुरु येण्याच्या पूर्वीच दुसरें ऋत्विज वरून त्यांकडून सत्र करण्यास आरंभ केला.आपण--जीवानी आयुष्य चंचल आहे,असे जमाजून परी करणेही योग्य आहे,पण ते करीत असतांना,ज्यांना आपण कार्यास निमंत्रण दिलेले आहे,याचेही स्मरण ठेवावे.राजा निमिकडून वसिष्ठास न कळवताच दुसर्याकडून यज्ञ केला.राजा निमिप्रमाणे कार्य करण्याची त्वरा करावी,पण आपण जर इतरांना ते कार्य करण्यास पाचारण केलेले असेल व त्याच्या अनुउपास्थित कार्य करणे योग्य नाही,म्हणून राजा निमिकडून जो दोष घडला,तो दोष आपल्याकडून घडू नये,म्हणून विवेकपुर्वक निर्यय घेऊन कार्य करावे.||३|| भावार्थः---इतक्यात इंद्राचा यज्ञ संपवून आलेल्या वसिष्ठ गुरुनें,शिष्यानें (निमिराजाने) आपल्या आज्ञेंचे उल्लंघन केलें असें पाहून असें मानणाऱ्या त्या निमिराजाला,तुझा देह पडो असा शाप दिला.||४|| भावार्थः---ते ऐकून निमराजानेंहि,इंद्रापासून व माझ्यापासून द्रव्य मिळविण्याच्या लोभानें ‘हा देह नश्वर असल्यामुळें धर्माविषयीविलंब करू नयें असा’धर्मसिद्धांत न जाणणाऱ्या व अधर्माने वागणाऱ्या त्या वसिष्ठ गुरूला तुझ्याही देह पडो असा उलट शाप दिला.आपण--जीवानी गुरूंना शाप देऊ नये.कारण शिष्यास गुरूस शिक्षा देण्याचा मुळीच अधिकार नसते असे असले तरी गुरूंना शिष्यास शिक्षा करण्याचा अधिकार नसतो.असा विवेक करून आचरण करावे. अविवेकाने निर्णय घेऊ नये,कारण अविवेक हा दु:खास कारण आहे.||५|| भावार्थः---याप्रमाणे शाप देऊन आत्मविद्येमध्यें निपुण अशा त्या निमिराजाने आपल्या देहाचा त्याग केला तसाच आमच्या प्रपितामहानें (वसिष्ठानेंही) देहाचा त्याग करून,पुन्हा मित्रावरुणांच्या पुत्रत्वेंकरून उर्वशीचे ठिकाणी म्हणजे पूर्वी उर्वशीच्या दर्शनाने मित्रावरुण देवाचें रेत स्खलित झालें होतें,ते त्यांनी कुंभांत घालून ठेविलें होतें,त्याच्या आश्रयाने देह धरण केला. ||६|| भावार्थः---त्यावेळी निमिचा जो देह पडला,त्याला त्याच्या ऋत्विज श्रेष्ठांनी सुगंधयुक्त तैलामध्ये स्थापन करून,पुढें सत्रयाग समाप्त झाल्यावर तेथें प्राप्त झालेल्या देवांस ते ऋषि म्हणाले कीं,----||७|| भावार्थः---हे देवहो,जर तुम्ही प्रसन्न आहां व वर देण्याविषयी समर्थ अहां तर निमिराजाचा हा देह जीवंत होवो.नंतर देवांनी,बरें आहे असे म्हंटले असतां,निमि म्हणाला कीं,मला देहसंबंध नसावा,कारण मी आत्मा--परमात्मा--सुखरूप आहे.,तर देह नाही.म्हणून मला देहाची मुळीच गरज नाही,कारण देह हा दु:खास कारण आहे. ||८|| भावार्थः----कारण,मननशील असे विवेकी पुरुष,ज्या देहाचा पुनः वियोग होईल म्हणून भयभीत होऊन त्याच्या संबंधांचीच इच्छा करीत नाहीत,तर मोक्ष होण्याकरितां भगवंतांच्या चरणकमलाचे सेवन करितात.||९|| भावार्थः---यास्तव दुःख शोक व भय यांना निमित्तभूत अशा देहाला ग्रहण करण्याची इच्छा मी करीत नाहीं.जसा पाण्यात वास करणाऱ्या बाहेर सर्वठिकाणी मृत्यू प्राप्त होतो तसा देहग्रहन करणाऱ्या जीवाला सर्व योनींमध्यें मृत्यू प्राप्त होतो.कोठेहि तरणोपाय प्राप्त होत नाही.म्हणून आपण देह प्राप्त होऊ नये,म्हणून सत्संग करून जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून व सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभाग घ्यावा.परमात्म्याचा अनुभव घेतल्यानंतर कोणतेच शरीर मिळत नाही.कोणतेच शरीर न मिळाले तर आपण सुखरुपाच असतोत.म्हणून निमी राजाने देहाचा स्वीकार केला नाही,म्हणून आपण जीवानी देह मिळू नये म्हणून सत्संग करावा व ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||१०|| भावार्थः---देव म्हणाले:---हे ऋषीहो,तो निमीराजा विदेहीच असून देहधारी मनुष्यांचा नेत्रांमध्ये यथेच्छपणे वास करो.असे झालें असता,तुम्ही हा जिवंत होण्याविषयी जी प्रार्थंना केली व याने मला देहसंबंध नसावा अशी जी प्रार्थना केली,त्या दोहोंचिही सार्थकता होईल.असे देवांनी सांगतांच तो निमिराजा,मनुष्यांचा नेत्रांमध्ये स्थित असता,उघडणे,व झांकणे यांच्या प्रवर्तकत्वेंकरून राहिला आहे. ||११|| भावार्थः---आतां मरण पावलेल्याही त्या निमिराजाच्या देहापासून वंशप्रवृत्ति दाखवितो---राजा नसल्यामुळे मनुष्यांस भय प्राप्त होईल असें मानणाऱ्या महर्षींनी त्या निमिच्या देहाचे मंथन केलें.अंशापासून झाल्यामुळें "वैदेह" आणि मंथनापासून झाल्यामुळें "मिथिल" अशा तीन नावांनी प्रसिद्ध झाला.तशीच त्यानें मिथिलनामक नगरी उत्पन्न केली. ||१२-१३|| भावार्थः---हे राजा,त्या मिथिलापासून "उदावसुनामक--पुत्र" झाला,त्याचा "नंदिवर्धन" पुत्र झाला,त्याचा "सुकेतु",त्याच्याही "देवरात" झाला||१४|| भावार्थः---त्यापासून "बृहद्रथ",त्याचा "महावीर्यनामक" पुत्र झाला,त्याचा "सुधृति" झाला त्या सुदृतीचा "दृष्टकेतू",त्याचा "हर्यश्च" झाला.त्यापासून "मरू" झाला ||१५|| भावार्थः---मारुचा "प्रतिपक",त्यापासून "कृतिरथ",त्यापासून "देवमीढ",त्याचा पुत्र "विश्रुत" त्याचा "महाधृति" झाला. ||१६|| भावार्थः---त्यापासून "कृतिरात",त्यापासून "महारोमा",पुढे त्याचा पुत्र "स्वर्णरोमा" होऊन त्याचा पुत्र "हस्वरोमा" झाला. ||१७|| भावार्थ:---त्यापासून "सिरध्वज" झाला.तो यज्ञ करण्याकरीता भूमीचे कर्षण करीत असतां नांगराच्या अग्राला एक पेटी लागली ती उघडून पाहतां तिच्यामध्यें "सीता" सांपडली.म्हणून त्याला "सीरध्वज" असे नांव पडले.||१८|| भावार्थः---त्या सिरध्वजाचा पुत्र "कुशध्वज-राजा झाला"."धर्मध्वजाला" "कृतध्वज" आणि "मितध्वज" असे दोन पुत्र झा.||१९|| अर्थः---त्यापैकी कृतध्वजापासून आणि मितध्वजापासून "खांडीक्य" झाला.हे राजा,कृतध्वजाचा पुत्र जो केशीध्वज तो आत्मविद्येमध्ये निपुण होता.||२०|| भावार्थः---आणि मितध्वजाचा पुत्र जो खांडीक्य तो कर्मविदेमध्ये निपुण होता,तो केशीध्वजापासून भिवून आपल्या घरांतून पळून गेला.त्या केशीध्वजाचा पुत्र "भानुमान" झाला,त्याचा पुत्र "शतद्दुम्न" झाला.||२१|| भावार्थः---त्याचा पुत्र "शुची" होऊन त्यापासून "सन्द्वाज" झाला,संद्वाजापासून "उध्वर्केतू" झाला,त्यापासून "अज" होऊन त्याचा पुत्र "पुरुजित झाला".||२२|| भावार्थः---त्याचा "अरिष्ठनेमी",त्याचा "श्रुतायू",त्याचा "सुपार्श्वक",त्याचा "चित्ररथ" व त्याचा पुत्र "मिथिलाधिपती--क्षेमधी" झाला.||२३|| भावार्थः---तयापासून "हेमरथ" झाला,त्याचा पुत्र "सत्यरथ",त्यापासून "उपगुरु" झाला,त्यापासून "उपगुप्त" झाला,तो अग्नीच्या अंशापासून झालेला होता.||२४|| भावार्थः---नंतर त्याचा पुत्र "वस्वनंत",त्याचा "युयुध",त्याचा "सुभाषन",त्याचा "श्रुत",त्यापासून "जय",त्यापासून "विजय",त्यापासून "ऋत" पुत्र झाला||२५|| भावार्थः---त्या पुत्र "शुनक" झाला,त्यापासून "वीतहव्य",त्यापासून "धृती",त्या धृतीचा "बहुलाश्व",त्याचा "कृती" व त्या "महावशी" झाला||२६|| भावार्थ:---ह राजा,हे "मिथिलाच्या वंशांत उत्पन्न झालेले राजे" होत.हे गृहस्थाश्रम करीत असतंही यज्ञवल्क्यादिक योगेश्वरांच्या प्रसादानें ज्ञानसंपन्नअ झाल्यामुळे,आत्मानात्मविवेकाविषयी निपुण व सुखदुःख हर्षशो शीत उष्ण इत्यादिक द्वंद्वांनी मुक्त होते.म्हणून आपण--जीवांनी सत्संग मुक्त मुक्त व्हावे.म्हणजेच जन्म--मरण निवृत्त करावे.||२७|| १३-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(९)नवमस्कंधामध्यें निमिवंशवर्णननामक हा(१३)तेरावा अध्याय(२७)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुररूचरणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ १४-----आतां ह्या चवदाव्या अध्यायापासून अकरा अध्यायांनी "सोमवंशाचे" वर्णन केली आहे.ज्या वंशामध्ये पुरुरवा इत्यादिक पवित्र कीर्ती अशा राजांचे वर्णन आहे.त्यांत या चवदाव्या अध्यायांत गुरुच्या तारानामक पत्नीच्या ठिकाणीं चंद्रापासून झालेल्या बुधाला पुरुरव्या राजानें उर्वशीचे ठिकाणीं आयुप्रभृति सहा पुत्र उत्पन्न केलें.अशी कथावर्णन केली आहे.||१४|| |१४--- चंद्रवंशाचे वर्णन ______________________________________________________________________________________________भावार्थ:--श्री शुकाचार्य म्हणाला---हे राजा,आता पुढे ज्या वंशामध्ये पवित्र कीर्ती अशा पुरुरवा इत्यादिक राजांचे वर्णन केले आहे,तो परमपवित्र असा सोमाचा वंश मी तुला सांगतो श्रवण कर. ||१|| भावार्थः---सहस्त्र मस्तकांनी युक्त अशा भगवान नारायणाच्या नाभिरूप डोहारूप उत्पन झालेल्या कमलापासून ब्रहमदेव उत्पन झाला,त्यापासून सत्य,शैच,सुशील पणा इत्यादिक गुणांनी त्या ब्रहमदेवासारखा "अत्रीनामक" पुत्र झाला.||२|| भावार्थः---त्याच्या नेत्रांतील आनंदाश्रुंपासून अमृतमय असा "चंद्र" पुत्र उत्पन झाला हे मोठे आश्चर्य आहे.त्याला ब्रहमदेवाने ब्राहमण, औषधी व नक्षत्रगण त्यांचे अधिपत्य दिले.||३|| भावार्थः---नंतर त्या चंद्राने,त्रैलोक्य जिंकून राजसूयनामक यज्ञाने भगवंताचे यजन क्ले आणि गर्वयुक्त होऊन बृहस्पती तारानामक पत्नी बलात्काराने हरण केली.ज्याप्रमाणे चंद्राने बृहस्पतीची पत्नी जी तारामती बलात्काराने हरण केले,त्याप्रमाणे आपण--जीवानी इतरांच्या पत्नीचे हरण करू नये,कारण तो अधर्म--निषिद्ध कर्म असून त्या पापांचे फळ दु:ख आपणास--जीवास भोगावे लागते.||४|| भावार्थः--- नंतर बृहस्पतीने आपली पत्नी परत देण्याविषयी त्याची वारंवार याचना केली असतांही तो जेव्हा गर्वाने देईना,तेव्हा त्यानिमित्त देवांचे व दानवांचा मोठा संग्राम झाला.जेणेकरून संग्राम--युद्ध होईल असे कर्म आपण--जीवानी करू नये.||५|| भावार्थः---त्याच कारण असे की,---बृहस्पतीच्या द्वेषामुळे शुक्राचार्याने दैत्यांसह वर्तमान चंद्राचा पक्षपात स्वीकारिला.तसाच शंकराने पूर्वी अंगिरा ऋषिपासून विद्या संपादन केली होती म्हणून बृहस्पति हा त्याचा गुरुबंधू होता.त्याच्या स्नेहामुळे शंकराने सर्व भूतगणांसहवर्तमान बृहस्पतीचा पक्ष स्वीकारिला.आपण--कोणामुळे इतरांची बाजू घेऊ नये,तर आपल्यामुळेच आपली बाजू घ्यावी. ||६|| भावार्थः---आणि इंद्रही सर्वदेवगणासहवर्तमान गुरूला अनुसरला.असे झाले असता त्यावेळी त्या तारेनिमित्त झालेल्या संग्रामामध्ये देवांचा व असुरांचा पुष्कर नाश झाला.युद्धात हा अनर्थ होत असतो,म्हणून आपण--जीवानी विवेकाद्वारे मतभेद निवृत्त करावेत.||७|| भावार्थः---तथापि तारेला चंद्र देईन,म्हणून बृहस्पतीने तो वृतांत ब्रहमदेवाला कळविला असता,त्याने चंद्राची निर्भत्सना करून त्याजकडून गुरूला तारा देववली;तेव्हा ती ग्रभीने आहे असे जाणून तिला म्हटले की,--------------------||८|| भावार्थः---हे दुर्बुद्धीयुक्त तारे,तू माझी स्त्री असून तुझे ठीकाणी शत्रूंनें ग्रभस्थापन केले आहे,हे जर तू पतिव्रता असून शत्रूने केवळ बलात्काराने केले असेल तर याचवेळी तू आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्या गर्भाचा त्याग कर;म्हणजे हे सती मी तुझे शापाने भस्म करणार नाही.कारण मी तुझे ठिकाणी संतानार्थी आहे.||९|| भावार्थः---नंतर लज्जित झालेल्या त्या तारेनी गर्भाच्या त्याग केला तेव्हा त्या सुवर्णसारखा कांतीने युक्त असलेल्या पुत्राविषयी, बृहस्पती व चंद्र या उभयतांनी इच्छा धारण केली. ||१०|| भावार्थः---आणि ते दोघेही,हा पुत्र माझा आहे,तुझा नव्हे असे परस्पर उच्च्स्वराने वादविवाद करू लागले असता,देवांनी व ऋषींनी तिला हा पुत्र कोणाचा आहे ?असा प्रश्न केला असता लज्जित झालेली ती तारा काहीच उत्तर देईना. ||११|| भावार्थः---तेव्हा क्रोध युक्त झालेला पुत्रच आईला म्ह्णाला की,---हे असदूत्ते,ह्या व्यर्थ लज्जेने तू का बोलत नाहीच ?तर आपले दुष्क्रम(कोणापासून गर्भ धारण झाले आहे ते)लवकर मला सांग.||१२|| भावार्थः---असे विचारिले असतांही ती जेव्हा बोलेना तेव्हा,ब्रहमदेवाने तिला एकांती बोलावून सामोपचापूर्वक युक्तीने प्रश्र केला,तेव्हा तिने हळूच,हा पुत्र चंद्राचा आहे असे सांगितले.नंतर ते पुत्र चंद्राने ग्रहण केला. ||१३|| भावार्थः---हे राजा,नंतर त्या पुत्राचे ब्रहमदेवाने "बुध" असे नाव ठेविले.कारण,गंभीरबुद्धीने युक्त असलेला त्या पुत्राच्या योगाने चंद्राला आनंद झाला होता.||१४|| भावार्थः---त्या बुधापासून इलेचि ठिकाणी "पुरुरवानामक"" पुत्र झाला,असे मी तूला पूर्वी सांगितले आहे.त्या पुरुरव्याचे रूप,गुण, शील,संपत्ती व पराक्रम यांची इंद्राच्या सभेमध्ये,नारदाने गायन केले असता,ते देवांची अप्सरा जी उर्वशी,तिने श्रवण करून,कामबाणांनी पिडीत आता त्या पुरुरव्याच्या सभीपभागी प्राप्त झाली.आपण--जीवानी स्त्री--पुरुषांनी एकमेकांच्या नाशिवंत शरीराला न भूलता जो भगवंत अविनाशी आहे,त्यास भुलावे,कारण विनाशी शरीर अंती दु:खालाच कारण आहे,तर अविनाशी भगवंत सुखरुपतेस कारण आहे.असे आपण जर सत्संग केल्यास कळते.||१५||१६|| भावार्थः---ती उर्वशी देवी असून मनुषाकडे कशी आली असे म्हणशील तर सांगतो ऐक---तीला मित्र आणि वरूण या नांवाच्या दोन देवांचा 'तू मनुष्य धर्म पावशील' असा शाप झाला होता,म्हणुनी त्या देवांगना उर्वशीने,मदनासारखा सुंदर व पुरुष श्रेष्ठ अशा या पुरुरव्या राजाला पाहून,धैर्याचा आश्रय करून त्याच्या समीप येऊन उभी राहिली.त्या उर्वशिस देवांचा शाप नसता,तर ती पुरुरव्याच्या शरीरास भुलत नव्हती.त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांना धनाची गरज नसेल,तर त्या स्त्रियां धनवानास भुलत नाहीत,तर ज्या स्त्रियांना धन पाहिजे असते,त्याच स्त्रियां धनवानाच्या धनाला भुलतात व धनवानास भुलत नसतात.धनवानावर त्यांचे प्रेम नसते,तर धनावरवरच त्यांचे प्रेम नसते.असे आपल्या लक्षात येत नाही,कारण आपणास त्यांच्या शरीराच्या सौंदर्यांचा मोह झालेला असतो,म्हणून आपणास--जीवास असे कळत नाही.म्हणून वेवेक करून सत्संग करून कळून घ्यावे.||१७|| भावार्थः--तो राजा,त्या देवी उर्वशीला पाहून हर्षाने प्रफुल्लत नेत्र व अंगावर रोमांच धारण करीत असता मधुर वाणीने म्हणाला की,---||१८|| भावार्थः---राजा म्हणाला---हे सुंदरी,तुझे येणे फार चांगले झाले,तू येथे बसावेस,आम्ही तुझी कोणते प्रिय करावे ?तू माझ्या बरोबर रममाण हे,तुझी व माझी बहुत वर्ष पर्यंत रतीक्रीडा-होवो. ||१९|| भावार्थः--असे राजाचे भाषण ऐकून उर्वशी म्हणाली,हे सुंदरा,कोणत्या बरे स्त्रीचे मन व दृष्टि तुझ्या ठिकाणी आसक्त होणार नाही? सर्वांचीहि होतोच कारण,ज्या तुझ्या दृष्टिगोचर झालेली स्त्री,तुझ्याशी रममाण होण्याच्या इच्छेने तुझ्या जवळून दुसरे ठिकाणी जात नाही हे स्पष्ट आहे.अथवा ज्या तुझे वक्ष:स्थळ पाहतांच तुझ्याबरोबर रतीक्रीडेची इच्छा धारण करणाऱ्या स्त्रींची विवेक धैर्यादिक नाहीशीं होतात.म्हणून आपण--जीवांनी स्त्रीयांच्या मधुर--मोहक भाषणास भुलवू नये,कारण त्यांना आपल्या प्रेमाची गरज नसते,तर विषयांची गरज असते.आपल्याजवळ जर वार्ध्याकाने जर जर विषय नसेल तर,आपला त्याग करून,अन्य तरुणाकडे आकर्षित होऊन त्यांची संगती करता.त्या एका पुरुषाचा संग न करता अनेक तरुण पुरुषाचा संग करितात,म्हणून अशा स्त्रियांची संगती,कधीच करू नये.आपण विधिवत स्त्रींचा संग करून व्यभिचारिणी(अनेक पुरुषांचा संग करणारी जी स्त्री आहे,)त्या स्त्रींचा संग करू नये.||२०|| भावार्थः---आतां शाप संपल्यानंतर पुन्हा स्वर्गावर जाण्याची इच्छा करणाऱ्या त्या उर्वशीचा भाषाबंध(ठराव)सांगतात---हे सन्मान देणाऱ्या राजा,हे दोन मेंढे मी पुत्रांप्रेमाने पालन केकेले असून हे मी रक्षणाकरितां तुझ्याजवळ ठेवीतें,यांचे तूं रक्षण कर.जोपर्यत तूं यांचे रक्षण करिशील तोपर्यंतच मी देवांगना असूनही तुझ्याबरोबर रममाण होईन;नाहीं तर तुला सोडून जाईन.कारण,"रुपैादार्यादिक गुणांनी जो वर्णनीय असेल तोच आम्हां अप्सरांना पति सांगितला आहे".ज्या व्यभिचारिणी स्त्रियां आहेत,त्यांचा पती म्हणजे रुपौदार्यादिक म्हणजे रूपवान,तरुण,व धनवान जो असतो,तोच त्यांचा पती असतो,तर प्रेम करणारा त्यांचा पती नसतो.म्हणून आपण--जीवांनी अशा ज्या स्त्रियां आहेत.त्यांच्यासी कोणत्याही प्रकारे संबंध ठेऊ नये,कारण त्यांना रूप,तरुण व धन पाहिजे.या तीन वस्तू विनाशी आहेत का ? किंवा टिकाऊ आहेत ? तर या वस्तू विनाशी आहेत.म्हणजेच आपले शरीर नेहमीसाठी रूपवान,तरुण राहील का ? करण त्या शरीर प्रत्येक क्षणास नाश होत आहे,म्हणजेच रूप व तरुण राहणार नाही,म्हणून त्या रूपवान.तरुण व धनवानाच्याच शोधात असतात.म्हणून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करू नये,कारण आपल्या त्या त्याग करणारच आहेत,म्हणून ज्या प्रेम करणाऱ्या म्हणजेच ज्या विधिवत आहेत व आपण त्यांचा विधिवत म्हणून स्वीकार केलेला आहे,त्यांचाच स्वीकार करावा व व्यभिचारिणी ज्या स्त्रियां त्यांच्या नावाचा उच्चार करू नये व त्यांच्या शरीराची सावली आपल्या--जीवाच्या अंगावर पडू नये.जर त्यांची सावली आपल्या अंगावर पडली,तर स्नान करून त्यांचा त्याग करावा.||२१|| भावार्थः---आणि हे वीर,देवांचा आहार अमृत आहे व मनुष्यलोकी घृत हेंच अमृत आहे,यास्तव मी घृताचेंच भक्षण करीन,अन्नाचे भक्षण करणार नाही आणि मैथुनाखेरीज दुसऱ्या वेळीं केव्हांहि तुला नग्न पाहणार नाहिं;पाहताच निघून जाईन.हे तिचे भाषाबंध (ठराव)ऐकून ते तसेच चालविण्याचा त्या उदारचित्त पुरुरव्याने पत्कर घेतला.||२२|| भावार्थः---आणि तिच्याशी असें भाषण केलें कीं,---मनुष्यलोकाला मोह उत्पन करणारे काय हे तुझे सौंदर्य!काय हे तुझे चातुर्य!स्वतां होऊन प्राप्त झालेल्या देवभोग्य अशा तुज उर्वशीचे,कोण बंरे मनुष्य सेवन करणार नाहीं?सर्वहि सेवन करतील.राजा पुरुरव्याने त्या अशा प्रकारच्या स्त्रीचा जरी स्वीकार केला तरी पण आपण मात्र अशा स्त्रीचा स्वीकार करू नये,करण अशा स्त्रियां दु:खाला करण आहेत.||२३|| भावार्थः---असें म्हणताच ती उर्वशी त्याच्याशी रममाण होण्याविषयी सिद्ध झाली.नंतर यथायोग्य रीतीने रमविणाऱ्या त्या उर्वशीसहवर्तमान,तो पुरुषश्रेष्ठ पुरुरवा राजा,देवांचे क्रीडास्थाने अशा चित्ररथ,नंदन इत्यादिक उपवनांमध्ये यथेच्छपणें क्रीडा करू लागला.||२४|| भावार्थः---कमलातील मकरंदाप्रमाणे जिच्या अंगाचा सुवास येत आहे अशा त्या उर्वशीसहवर्तमान रममाण होणारा तो राजा,तिच्या मुखसंबंधी सुगंधाने मोहित होऊन बहुत दिवस आनंद पावला. ||२५|| भावार्थः---नंतर एके दिवसी स्वर्गाचे ठिकाणी उर्वशीला न पाहणाऱ्या इंद्राने,उर्वशीवाचून माझे स्थान अत्यंत शोभत नाही असें मानून तीला आणण्याकरीता गंधर्वास पाठविले.||२६|| भावार्थः---ते गंधर्व,मध्येरात्रीचा वेळी पराकाष्ठेचा अंधकार पडला असता भूमीवर येऊन,पुरुरव्याजवळ उर्वशीने ठेविलेल्या उर्वशीच्या दोन्ही मेंढ्यास पळवून घेऊन चालले.||२७|| भावार्थः---तेव्हा नेत असलेल्या व पुत्रांप्रमाने पालन केलेल्या त्या मेंढ्यांचे आक्रोशयुक्त रोदन श्रवण करून,ती उर्वशी पुरुरव्याला सोडून गेली.तेव्हा जाऊ इच्छिनाऱ्या तीची कठोर भाषने अशी की,---हे पुरुरव्या,नपुंसकासारखा प्रराक्रमरहित असून व्यर्थच आपणाला वीर असें मानणाऱ्या तूं निंद्द नाथाने माझा मोठा घात केला आहेस.त्या उर्वशीने अशा प्रकारच्या शब्दाने राजा पुराव्याचा अपमान करावा का?||२८|| भावार्थः---ज्या तुझ्यावर, 'हा वीर माझ्या पुत्रांचे रक्षण करील' असा विश्वास ठेवून मी नष्ट झाले.कारण,माझे माझे पुत्र चोरांनी नेले,जो तूं,रात्रीच्या वेळी स्त्रीसारखा अत्यंत भिऊन निजतोस,दिवसा मात्र पुरुषासारखा व्यवहार करितोस त्या तुला नपुंसक म्हणू नये तर म्हणावें तरी काय? केला नाही का?तो अपमान राजा पुरुराव्याने सहन करावा का? केला नाही का ?त्याप्रमाणे आपल्या जीवनात अशा स्त्रियांचा संबंध आला,तर अशाच प्रकारचे जीवन आपल्याला जगावे लागणार नाही का?जगणार नाहीत का?म्हणून आपण अशा स्त्रियांचा विवेकपुर्वक त्याग करावा.||२९|| भावार्थः---अशा भाषणरूप बाणांनी ‘जसा अंकुशांनी हत्ती विद्ध होतो त्याप्रमाणें,विद्ध झालेला तो पुरुरवा,नग्न असतांच हातात खङ्ग घेऊन,क्रोधाने रात्रीच्या वेळी गंधर्वाच्या पाठीमागून धावला.||३०|| भावार्थः---तेव्हां गंधर्वांनी मेंढ्यांना तेथेंच टाकून ते विजेसारख्या विशिष्ट कांतीने युक्त होऊन प्रकाश करूं लागले.तेव्हां मेंढ्यांना घेऊन येणाऱ्या पतीला (पुरूरव्याला)त्या उर्वशीनें नग्न अवलोकन केलें तेव्हां ती उर्वशी ‘बोली केलेल्या नियमांचा भंग झाल्यामुळे’ तत्काळ त्याचा त्याग करून निघून गेली.म्हणून आपण अशा प्रकारच्या स्त्रियांचा त्याग करावा.||३१|| भावार्थः---नंतर पुरुरवा राजाही शयनावर उर्वशीला न पहिल्यामुळें चित्तशून्य असल्यासारखा (वेड्यासारखा)झाला आणि तिच्यावर चित्त ठेऊन विव्हळ असता,‘आतां ती उर्वशी मला प्राप्त कशी होईल असा’शोक करीत उन्मत्तासारखा भूमीवर फिरुं लागला.ज्या स्त्रीने त्याग केला,तिचा त्याग करण्याचा विचार मनात यावा किंवा भोग घेण्याचा विचार मनात यावा.तिचा विचार करण्यात राजा पुरुरव्या वेद झाला.आपण--मात्र आपल्या मनातून तिचा त्याग करावा. ||३२|| भावार्थः---याप्रमाणें पृथ्वीवर फिरतांफिरतां एकेंवेळीं त्या पुरूरव्याने कुरूक्षेत्रामध्यें सरस्वती नदीच्या तीरीं,त्या उर्वशीला आणि हर्षयुक्तमुख असलेल्या तिच्या पांच सख्यांना अवलोकन करून,सूक्त रूपानें असें भाषण केले कीं,------------||३३|| भावार्थः---अहो जाये,तूं अजून माझ्यापासून उत्तम सुख न पावतां या घोर विरहदु:खामध्यें मला पाडण्यास योग्य नाहींस.यास्तव जाऊं नको.रहा.रहा.तूं व मी मिळून परस्पर आनंदकारक गोष्टी सांगू या. ||३४|| भावा र्थः---हे देवि,हा माझा सुंदर देह,तूं फार लांब टाकला आहेस,याच्यावर तुझी कृपा झाली नाहीं तर हा आतां याठिकाणीच मरून पडेल आणि याला लांडगे व गिधाड भक्षण करितील,यास्तव माझ्यावर तूं प्रसन्न हो. ||३५|| भावार्थ:---असें भाषण केलें असतां उर्वशी म्हणाली---हे राजा,तूं मरूं नकोस.कारण तूं पुरुष आहेस यास्तव धैर्य धारण कर.याठीकाणी असणारें लांडगे तुला भक्षण न करोत.मला असा बोध करीतेस तर तूंच कृपा कां करीत नाहीस,असें म्हणशील तर सांगतें ऐक---स्त्रियांचे सख्य कोठेंही स्थिर नाहीं.जसें लांडग्यांचे ह्रदय क्रूर असते तसेच स्त्रियांचे ह्र्दय क्रुर असतें.उर्वशी पुरुरव्या राजस म्हणते की,स्त्रीचे--माझे हृदय असते,त्यांना दयामाया वगैरे मुळीच नसते.असे त्या उर्वशीने सावध केल्यानंतर तिला मनात धारण करावे का?||३६|| भावार्थः---म्हणजे स्त्रिया ह्या,क्रूरस्वभावाच्या,निर्दय व क्षमाहित असून आपल्या हिताकरिता साहस कृत्य करणाऱ्या असतात,म्हणून त्या थोड्या कामाकरितांही,विश्वास पावलेल्या पतीला किंवा भावालासुद्धां ठार मारतात;मग दुसऱ्यांना मारतील हें काय सांगावें!||३७|| भावार्थः---आणि त्या स्त्रिया अज्ञपुरुषांचेठिकाणी कपटानें विश्वास दाखवितात;परंतु स्वतः स्नेहशुन्य असून व्यभिचार करणाऱ्या व नव्यानव्या पतीची इच्छा करणाऱ्या असल्यामुळें यथेच्छपणें वागतात म्हणून तूं माझे सख्य सोडून दे.असे उर्वशी समजावून सांगत आहे,तरी राजास पटत नाही,म्हणून आपण जीवाने अशा स्त्रियांचा त्यागच करावा.||३८|| भावार्थः---असें सांगितले असतांही त्या राजाची शांतता होईना म्हणून सांत्वन करिते कीं,---हे समर्था राजा,तूं धैर्य धर.आजपासून एका वर्षानंतर तूं एक रात्र माझ्यासहवर्तमान या स्थळीं वास करशील आणि तुला मजपासून दुसरिं मुलेंही होतील.यावरून त्यावेळी तिनें आपण गर्भिणी आहें असें सुचविले.||३९|| भावार्थः---नंतर ती उर्वशी गर्भिणी आहे असें जाणून तो पुरुरवा राजा,आपल्या नगरामध्यें निघून गेला.पुढें वर्ष झाल्यानंतर त्या कुरूक्षेत्रामध्यें त्यानें जाऊन तेथें पुत्रासह वर्तमान आलेली उर्वशी पाहिली आणि हर्षयुक्त होऊन तिच्या सहवर्तमान ती रात्र तेथेंच राहिला.||४०|| भावार्थः---दुसरेंदिवशी तेथून जातांना आपल्या वियोगानें व्याकूळ झालेल्या दीन अशा त्या पुरुरव्याला उर्वशी म्हणाली कीं,तूं ह्या गंधर्वांना स्तुतिवगैरे साधनांनी संतुष्ट कर म्हणजे ते गंधर्व,तुजकारणें मला देतील. ||४१|| भावार्थः---हे राजा,नंतर त्या पुरूरव्याने स्तुति केली असतां संतुष्ट झालेल्या गंधर्वांनी त्या पुरुरव्याला,‘या अग्नीचया योगानेच तूं उर्वशीलोकाच्या प्राप्तीचे साधन असें कर्म करून तेथे गेलास म्हणजे तुला उर्वशी प्राप्त होईन,अशा अभिप्रायाने त्यांनी त्याला उर्वशी नांवची एक अग्निस्थाली दिली नंतर तो राजा,त्या स्थालीलाच हि उर्वशी आहे असें मानून तिला आलिंगन करून थोडा वेळपर्यंत वनामध्ये फिरत होता.पुढें त्याने,हि उर्वशी नव्हे तर अग्निस्थाली आहे असें जाणले.||४२|| भावार्थः---नंतर त्या स्थालीला वनांमध्ये ठेऊन त्याने आपल्या घरी गमन केले आणि रात्रीचेवेळी नित्य त्या उर्वशीचे चिंतन करणाऱ्या त्या राजाच्या मनामध्ये,त्या त्रेतायुगाच्या आरंभी कर्ममार्गाने बोधक असे तीन वेद प्रकट झाले. ||४३|| भावार्थः---नंतर त्याने स्थाली ठेवण्याच्या जागी वनांत जाऊन तेथें शमीवृक्षाच्या पोटी झालेल्या अश्वत्थवृक्षाला पाहून व त्याचे ठिकाणी 'हा अग्नि आहे' असें विशेषेंकरून जाऊन त्या अश्वत्थाच्या काष्ठांच्या दोन अरणी (अग्निमंथनाची काष्ठें)करून आपणास उर्वशीलोकाची प्राप्ति व्हावी म्हणून अग्नीचे मंथन केलें.||४४|| भावार्थः---त्यांत खालची अरणी हि उर्वशी आणि वरची अरणी हा आपण पुरुरवा असें चिंतन करणाऱ्या व दोहोंच्या मध्ये असणाऱ्या काष्ठांचे पुत्रत्वेकरून चिंतन करणाऱ्या त्या समर्थ पुरुरव्याने,अग्निमंथनप्रकाशक मंत्रप्रयोगाच्या योगाने अग्निचे मंथन केले. ||४५|| भावार्थः---त्याने केलेल्या मंथनापासूनन जातवेदानामक अग्नि उत्पन झाला.तो वेदशात्राने झालेल्या आधानसंस्काराने आहवनीय,गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी या तीन नावांनी प्रसिध्द झाला.तो पुण्यलोकाला पोंचविणारा असल्यामुळे राजाने त्याला हा माझा पुत्र आहे असें मानिले. ||४६|| भावार्थः---नंतर उर्वशीलोकाची इच्छा करणाऱ्या त्या पुरुरव्याने त्या साधनभूत अग्निच्या यीगाने,यज्ञाचे फळ देणारा,सर्व देव मय जो अधोक्षज भगवान हरी त्यांचे यजन केले. ||४७|| भावार्थः---आतां ब्रह्मणादिकांना इंद्रादीक अनेक देवांच्या आराधनाने स्वर्गप्राप्तीला कारण असा जो अनादी वेदमार्ग तो तुम्ही आधुनिक असल्यासारख्या कसे वर्णन करितां असे म्हणशील तर---हे राजा पूर्वी कृतयुगामध्ये सर्व वाणीचा बीज भूत जो ओंकार तोच एक वेद होता.देवहि नारायण एकच होता,दुसरा नव्हता.तसाच लैकिक अग्नि व हंसनामक वर्ण हेही एकेकच होते.||४८|| भावार्थः---हे राजा,पुढे त्रेतायुगाच्या आरंभी तीन वेद पुरुरव्यापासुच प्रकट झाले.म्हणजे कृतयुगामध्ये बहुतकरून सर्वही लोक सत्वगुणप्रधान ध्याननिष्ठ होते,त्रेतायुगामध्येच तीन वेदांचे विभागेकरून यज्ञादिक कर्ममार्ग प्रकट झाला.असो.नंतर पुरुरव्या राजा,पुत्रत्वाने स्वीकारीलेल्या अग्निच्या योगानें गंधर्वलोकास निघून गेला.||४९|| १४-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील नवम(९)स्कंधामध्येंहा ये लोपाख्यानरूपचौदावा(१४) अध्याय ऐकोनपन्नास(४९) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१४|| ______________________________________________________________________________________________आतां हा पंधराव्या अध्यामध्ये,पुरुरव्याच्या वंशांत गाधिराजा उत्पन झाला व त्याच्या कन्येचा नातू जो परशुराम त्यानें क्रोधानें सहस्त्रार्जुणाचा वध केला हि कथा वर्णन केलेली आहे ||१|| |१५--- परशुरामांच्याकडून क्षत्रियांच्या संहार आणि विश्वमित्रांच्या वंशाची कथा ______________________________________________________________________________________________ भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,त्या पुरुरव्या राजाला उर्वशीपासून सहा पुत्र झाले.त्यांची नांवे---आयु,श्रुतायू,सत्यायु,रय, विजय,आणि जय हि होत.||१|| भावार्थ:---त्यांपैकी श्रुतायुचा पुत्र वसुमान झाला.सत्यायूपासून श्रुतंजय झाला.रयाला एक ह्या नावाचा पुत्र झाला.जयाला अमित या नावाचा पुत्र झाला.||२|| भावार्थ:---विजयाला भीम या नावाचा पुत्र झाला,त्यापासून कांचन झाला,त्यापासून होत्रक झाला,त्याला जन्हु ह्या नावाचा पुत्र झाला, त्याने सगळ्याच गंगेला ओंजळीत घेऊन प्राशन केली होती,ती पुढें त्याच्या मांडीतून बाहेर पडली म्हणून तिला जान्हवी असे नांव पडले आहे.||३|| भावार्थ:---जन्हुपासून पुरू ह्या नावाचा पुत्र झाला,त्याचा पुत्र बलाक,त्याचा पुत्र अजक,त्यापासून कुश नावाचा पुत्र झाला,त्या कुशाचेही कुशांबु,मूर्तय,वसू आणि कुशनाभ असे चार पुत्र झाले,त्यांपैकी,कुशांबु पासून गाधी ह्या नावाचा पुत्र झाला.||४|| भावार्थ:--- त्याला विश्वामित्रनामक ब्रहमर्षी पुत्र झाला हे पुढील अध्यायात येईल.आतां प्रस्तुत उपोद्धातरूपाने भृगुवंशात झालेल्या ऋचिक ऋषीचे चरित्र व त्यासंबंधने झालेला परशुरामाचा अवतार व त्याचे चरित्र सांगतो----त्या गाधिराजाची सत्यवतीनामक कन्या,ऋचिक ऋषीने विवाह करण्याकरिता मागितली असतां गाधिराजाने,आपल्या कन्येला तो वर योग्य नाही असें मानून त्या ऋचीकाला सांगीतले कीं------------- ||५|| भावार्थ:---हे ऋषे,डावा किंवा उजवा ह्या दोन्ही कानांपैकी ज्यांचा एक कान श्यामवर्ण आहे व ज्यांच्या सर्व अंगाचे ठिकाणी चंद्रासारखे तेज आहे अशा घोड्यांचे एकसहस्त्र माझ्या कन्येचे शुल्क (विवाहाचे वेळी द्यावयाचा नजराणा) द्यावे.तर मी कन्या देईन.हे सुद्धां देणे अपुरेच आहे.कारण आम्ही अतिकुलीन आहो.म्हणून आमची कन्या दुर्लभ आहे.||६|| भावार्थ:---असें सांगितले असतां,त्या गाधिराजाचे मत,‘मी योग्य नाही म्हणून दुर्लभ घोडे मागून’ मला फसविण्याचे आहे असे जाणून, तो ऋषी,वरुणाजवळ गेला आणि त्याच्यापासून ते तशाप्रकारचे घोडे मागून आणून दिले आणि त्याने त्या सत्यवती कन्येला वरिले.||७|| भावार्थ:---पुढे एकेवेळी सत्यवतीने व तिच्या आईंने आपणांस पुत्र व्हावा या इच्छेने त्या ऋषीची,प्रार्थना केली असतां,पत्नीकरीतां ब्रह्मतेजवृद्धीकारक व सासूकरिता क्षत्रियतेजवृद्धीकारक अशा दोन्हीप्रकारच्या मंत्रांनी संस्कृत असा निरनिराळा चरू शिजवून तो ऋषी स्नान करण्याकरिता नदीवर गेला.तो माघारा येण्याचे पूर्वीच ‘भार्येवर नवऱ्याचा विशेष स्नेह असतो म्हणून आपल्यापेक्षा कन्येचा चरू श्रेष्ठ आहे असे मानून’ सत्यवतीच्या आईने त्या पतिव्रता सत्यवतीची याचना केली असतां तिनें आपला ब्रहममंत्रांनी अभीमंत्रन केलेला चरू आईला दिला व आईचा क्षत्रियमंत्रांनी अभीमंत्रन केलेला चरू आपण भक्षण केला.||८||९|| भावार्थ:---नंतर स्नान करून आलेल्या त्या ऋषीने,आपल्या पत्नीने व सासूने चरू बदलून भक्षण केले हे जाणून पत्नीला म्हणाला कीं,-- हे स्त्रिये,तूं चरू बदललेस ते फार वाईट कर्म केले आहेस,म्हणून तुला पुत्र शस्त्रधारण करणारा क्रूरस्वभावाचा होईल आणि तुझा भ्राता ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ होईल.||१०|| भावार्थ:--- नंतर असें न व्हावें म्हणून सत्यवतीने प्रार्थना केलेला तो ऋचिक ऋषी, म्हणाल कीं,---असें तुझे म्हणणे आहे तर तुझा नातू तसा (शस्त्रधारी व क्रूरस्वभावाचा ) होईल.पुढे त्या 'सत्यवतीला "जगदग्नीनामक" शांतस्वभावाचा पुत्र झाला."||११|| भावार्थ:---आणि ती सत्यवती,लोकांच्या पापाचा नाश करणारी महापूण्यकारक अशी कौशिकीनामक नदी झाली म्हणजे नदिरुपाने परिणाम पावली."जमदग्नीऋषीने रेणूऋषीची "रेनुकानामक" कन्या वरिली." तिचे ठिकाणी त्या जगदग्नीपासून वसुमान इत्यादिक पुत्र झाले,त्यामध्ये जो कनिष्ठ पुत्र तो "राम (परशुराम)" या नावाने प्रख्यात झाला."परशुराम जरी ब्राह्मण कुळात जन्माला तरी खरा पिंड हा क्षत्रियांचा अंश होता म्हणून शौर्यादी गुण होते.म्हणून त्याने त्याच्या जीवनात इतर क्षत्रियांपेक्षा शौर्यादिक गुण आहे,असे जगास दाखवून क्षत्रियांचाच संहार केला.क्षत्रियांनी शौर्यांदिकच असावे असा आदर्श आचरणांत आणून दाखविला."||१२||१३|| भावार्थ:---ज्याला वासुदेव भगवंताचा अवतार व हैहयराजांच्या(सहस्त्रार्जुनादिकांच्या) कुळाचा अंत करणारा असें म्हणतात.त्या परशुरामाने हीं पृथ्वी एकविसवेळ क्षत्रियबीजरहित केली.||१४|| भावार्थ:---त्यानें क्षत्रियांनी थोडाही अपराध केला असतां तें निमित्त करून,रजोगुण व तमोगुणयांनीयुक्त,अधार्मिक,ब्राह्मणभक्ती न करणारे व पृथ्वीला भारभूत अशा त्या दर्पयुक्त क्षत्रियकुलाचा नाश करून टाकीला.||१५|| भावार्थ:---राजा म्हणाला,हे शुकाचार्य,ज्याच्या योगानें परशुरामापासून क्षत्रियाचे कुळ वारंवार नाश पावलें असा,मनांचा जय न करणाऱ्या राजांनी त्या भगवंताचा (रामाचा) कोणता अपराध केला होता?||१६|| भावार्थ:---असा प्रश्न केला असतां सहस्त्रांर्जुणानें केलेला अपराध सांगण्यासाठी त्याच्या दर्पाला कारण असलेल्या ऐश्वर्यादिकांचे वर्णन करीत श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,हैहयनामक राजांचा अथवा देशांचा अधिपती व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आशा कार्तवीर्य अर्जुनाने परिचर्यादिकांनी,नारायणाचा अवतार अशा दत्तात्रेयाचे आराधन करून,प्रसन्न झालेल्या त्यापासून,दहाहजार बाहू,शत्रुंचे ठिकाणी अजिंकपणा,अव्याहत अशीं इंद्रीयबळ,धनसंपत्ती,शरीरकांती,बुध्दिबळ,कीर्ती आणि शारीर बळ हीं मिळविली होती.||१७||१८|| भावार्थ:---तसेच योगेश्वरत्व आणि ज्याचे ठिकाणी अणिमा महिमा इत्यादिक गुण आहेत असें ऐश्वर्यही मिळवून,जसा वायुलोकांमध्ये अविच्छीन्नगती असता संचार करितो त्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये संचार करूं लागला.||१९|| भावार्थ:---एकेवेळी उत्कट मदाने युक्त असा तो सहस्त्रार्जुन कंठामध्यें रत्नखचित वैजयंती माळा धारण करून,उत्तम स्त्रियांनी परिवेष्टित होत असता नर्मदानदीच्या उदकामध्ये जलक्रीडा करीत असतां त्यानें आपल्या सहस्त्र बाहूंनी त्या नदीच्या प्रवाहाचा अवरोध करून पाणी फुगविलें.||२०|| भावार्थ:---त्यावेळी दिग्वीजयाकरीता निघालेला रावण,त्या अर्जुनाच्या नगरीच्या समीपभागी नर्मदेच्या तीरी सैन्यासह उतरून देवपूजा करीत असता,अर्जुनाने अवरोध केल्यामुळे मागे फुगत चाललेल्या उदकाने आपले शिबीर (सैन्यवगैरे उतरण्याचे स्थळ) बुडून गेले असें पाहून,त्या अर्जुनापेक्षाही आपणासच वीर असे मानणाऱ्या त्या रावणाने,त्या अर्जुनाचे ते नदी फुगविण्याचे सामर्थ्य सहन केले नाही. ||२१|| भावार्थ:---नंतर क्रीडा करणाऱ्या त्या अर्जुनाचा पराभव करण्यास प्रवृत्त झालेल्या त्या रावणाला,त्या अजुनाने स्त्रियांच्या समक्ष अनायासानें धरून महिष्मती नगरीमध्ये काहीवेळपर्यंत माकडासारखे कोंडून ठेविलें होते आणि नंतर अपमान करून सोडून दिले,तो अर्जुन एकेवेळी भयंकर अरण्यामध्ये मृगया करण्याकरिता संचार करीत असतां,सहजगत्या जमदग्निऋषीच्या आश्रमस्थानांत प्रविष्ट झाला.||२२||२३|| भावार्थ:----तेव्हां त्या तपोधन ऋषीनें,सैन्य प्रधानमंडळ व अश्वगजादिकांसहित प्राप्त झालेल्या त्या राजा अर्जुनाचा,कामधेनुच्या आश्रयानें मेजवानी वगैरे करून अलौकिक सत्कार केला.||२४|| भावार्थ:---तेव्हां हैहयरजांसहित असलेल्या व आपणच वीर असा अभिमान धारण करणाऱ्या त्या अर्जुनाने,त्या आश्रमामध्ये आपल्या ऐशवर्यापेक्षाही अतिशयित असें तें कामधेनुनें निर्माण केलेले ऋषीचे ऐश्वर्य पाहून,कामधेनुविषयी अभिलाष धारण करणाऱ्या त्यानें, ऋषीच्या आतिथ्यापासून संतोष मनिला नाही.||२५|| भावार्थ:---आणि दर्पामुळे ऋषीची कामधेणु हरण करण्याकरिता मनुष्यास आज्ञा केली.तेव्हा ते बलात्काराने आक्रोश करणाऱ्या त्या सवत्स कामधेनूला महिष्मती नगरीमध्ये घेवून गेले. ||२६|| भावार्थ:---नंतर तो अर्जुनराजा निघून गेला असतां,पूर्वी दुसरे ठिकाणी गेलेला परशुराम पित्याच्या आश्रमात प्राप्त झाला.त्याने अर्जुनराजाचे तें गोहरणरूप दुर्जनत्व ऐकून,ताडन केलेल्या सर्पाप्रमाणे क्रुद्ध झला.||२७|| भावार्थ:---आणि भयंकर कुऱ्हाड व भात्यासहित ढाल व धनुष्य ग्रहण करून जिंकण्यास अशक्य असा तो,सिंह जसा गजेन्द्रावर धावतो त्याप्रमाणे त्या अर्जुनावर धावला. ||२८|| भावार्थ:---त्यावेळीं धनुष्य धारण करणारा,बाण व परशु हिं आयुधें बाळगणारा,कृष्णाजीन वस्त्र धारण करणारा आणि सूर्यासारखे ज्यांचे तेज आहे अशा जटांनि युक्त असा तो परशुराम,वेगाने धावत येत आहे असें,नगरीमध्ये प्रवेश कनाऱ्या त्या अर्जुनाने पाहिले.||२९|| भावार्थ:--आणि त्याने त्या प्रशुरामावर हत्ती,रथ,घोडेस्वार व पायदळ यांनी व गदा,खग,बाण,ऋषी त्या,शतघ्नी आणि शक्ती या आयुधांनी अतिभयंकर असे सतरा अक्षौहिणी सैन्य पाठविले.ते त्या एकट्या भगवान परशुरामाने मारून टाकिले. ||३०|| भावार्थ:--त्या प्रसंगी,ज्याचा परशु शत्रूचा प्रहार करीत आहे व ज्याचा वेग,मनासारखा व वायुसारखा आहे तो शत्रू सैन्याचा नाश करणार राम,त्या रणभूमीचे ठिकाणी जिकडे जिकडे फिरत असे तिकडे तिकडे ज्यांचे भूज,मांड्या व कंड तुटून पडले आहेत व ज्यांचे सारथी व घोडे वगैरे वहाने मरण पावली आहेत असे हजारो वीर मरून पडत असत. ||३१|| भावार्थ:---नंतर त्या अर्जुनानेन रामाच्या कुऱ्हाडीने व बाणांनी,ज्याच्या ढाला,ध्वज व धनुष्य व देह तोडून टाकिले आहेत व जे रक्ताच्या प्रवाहाने कर्मदयुक्त झाल्या युद्धांगाणामध्ये पाडिले आहे,असे आपले सैन्य अवलोकन करून कोर्धाने आपणच युध्द करण्याकरिता प्राप्त झाला. ||३२|| भावार्थ:---नंतर हजार हस्तांनी युक्त असलेल्या त्या अर्जुनाने,पांचशे धनुषाचे ठिकाणी पांश्चे धनुष्ये आपण सोडलेल्या बाणांनी तत्क्षणीच तोडून टाकिले. ||३३|| भावार्थ:---पुन्हा आपल्या हातांनी युध्दाविषयी साधनभूत असे पर्वत व वृक्ष घेऊन वेगाने धावणाऱ्या त्या अर्जुनाचे बाहू,रामाने बलात्काराने आपल्या तीक्ष्ण धारेच्या कुऱ्हाडीने सर्पाच्या फड्या तोडून टाकल्यासारखे युद्धांमध्ये तोडून टाकिले.||३४|| भावार्थ:---नंतर ज्याचे बाहु तोडिले आहेत अशा त्या अर्जुनाचे मस्तक,पर्वतापासून शिखर तोडून पाडिल्यासारखे तोडून पाडिले.याप्रमाणे त्या अर्जुनाचा वध केला असता,त्याचे दहाहजार पुत्र होते ते भयाने युद्ध्स्थान सोडून पळून गेले.अर्जुन याचे पुत्र अर्जुनाचा वध केल्यानंतर पळून गेले.त्याचप्रमाणे आपण--जीवानी प्राप्त प्रसंगानुसार निर्णय घेऊन कार्य करावे.||३५|| भावार्थ:---नंतरशत्रू वीरांचा नाश करणाऱ्या रामाने,शत्रूंने आकर्षण केल्यामुळे फार दु:खित झालेल्या त्या सवत्स धेनूला माघारी फिरवून आपल्या आश्रमी येऊन ती पित्याला (जगदग्नीला) समर्पण केली.||३६|| भावार्थ:---आणि रामानें तें अर्जुनवधादिक केलेले आपले कर्म,पित्याला व बंधुंना वर्णन केले.तें ऐकून जगदग्नि म्हणाला कीं---||३७|| भावार्थ:---हे रामा,हे रामा,हे महाबाहो,जो तूं सर्वदेवतामय अशा अर्जुनराजाचा व्यर्थ वध केलास तें मोठे पाप केलें आहेस.म्हणून आपण-- जीवानी विनाकारण हत्या करू नये,कारण त्यामुळे हत्या किंवा विनाकारण दंड दिल्यास पाप लागते,व पापाचे आपणासच भोगावयास येते.असे विवेक करून निर्णय घ्यावा. ||३८|| भावार्थ:---बा रामा,आम्ही ब्राहमण खरोखरच क्षमेच्या योगानें पूज्यता पावलों आहों.त्या क्षमेच्या योगानेच सर्व लोकांना पूज्य जो ब्रहमदेव तोही सर्वोत्कृष्ट अशा ब्रहमस्थानास पावला आहे.आपण--जीवांनी आपापल्या स्वधर्मानुसार कार्य करावे.ब्राह्मण यांचा स्वधर्म हा आहे की,ज्ञान-दान करून कोणी आपला अपराध केला असेल,तर त्यास दंड न देता क्षमा करावी.||३९|| भावार्थ:---क्षमेच्या योगानेच ब्राह्मणकुलसंबंधी शमदमादिक तेज,सूर्याच्या कांतीसारखे प्रकाश पावत आहे;क्षमाशील पुरुषांनाच शडगुणैश्वर्य --संपन्न हरीईश्वर प्रसन्न होतो.आपण--जीवांनी जो आपला अपराध करेल,त्यास दंड न देता क्षमा करावी,कारण क्षमा या सद्-गुणामुळे शमदमादिक साधने प्राप्त होतात.त्यामुळे आपला--जीवांचा परमार्थ सुलभ होतो.||४०|| भावार्थः---हे रामा,ज्या अर्थी अभिषेकपूर्वक राज्यावर स्थापन केलेल्या राजाचा वध ब्राहमणाच्या वधापेक्षांही मोठे पाप उत्पन्न करणारा आहे त्याअर्थी,तू भगवंताचे ठिकाणी आपले चित्त ठेवून,गंगादितीरर्थांच्या सेवनानें अर्जुनवधसंबंधी पापाचा नाश कर.यदाकदाचित आपणांकडून--जीवाकडून अपराध घडला असेल तर गंगादिक तीर्थांची सेवा करावी.दान--धर्म करावा.||४१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(९)नवमस्कंधामध्ये परशुरामचरितनिरूपननामक हा(१५)पंधरावा अध्याय(४१)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१५|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||सदगुरूर्पणमस्तू.|| ______________________________________________________________________________________________ १६-----आतां सोळाव्या अध्यायामध्ये,सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्निचा वध केला असतां,परशूरामापासून वारंवार झालेला क्षत्रियांचा वध सांगितला आहे आणि विश्वमित्राचा वंशही वर्णन केला आहे.||१६|| १६--- ५—परशुराम चरित्र--- [२---परशुरामांच्याकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा] ______________________________________________________________________________________________ | पित्रोपक्षितो रामस्तथेति कुरुनन्दन | संवत्सरं तीर्थयात्रां चरित्वाssश्रममाव्रजत् ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे कुरुनंदना राजा,याप्रमाणे पित्यानें आज्ञा केलेल्या त्या परशुरामाने पित्याच्या आज्ञेचा तथास्तू असें म्हणून अंगिकार करून,एक संवत्सरपर्यत तीर्थयात्रा करून पुन्हा आश्रमास प्राप्त झाला.आपण--जीवांनी आपापल्या आई-वडिलांचे अज्ञाचे पालन करावे,कारण तो आपला अधर्म आहे. ||१|| भावार्थ:---एकेवेळी परशूरामाची माता रेणुका,पाणी आणण्याकरितां गंगेवर गेली असतां,तिने त्या गंगेमध्ये अप्सरांसहवर्तमान क्रीडा करणाऱ्या व कमलाची माळा धारण करणाऱ्या चित्ररथनामक गंधर्वास पाहिलें आणि त्याला पहात उभी राहणाऱ्या त्या रेणुकेने चित्ररथाविषयी कांही इच्छा धारण करून,होमाची वेळा निघून जात आहें हें लक्षात ठेविले नाही. ||२|| ||३|| भावार्थ:---नंतर होमकाळाची वेळ चुकली असें जाणून,जमदग्नीच्या शापापासून भ्यालेली ती रेणुका,त्वरेने येऊन आणलेला पाण्याचा कलश जमदग्नीच्या पुढे ठेऊन हात जोडून उभी राहिली.||४|| भावार्थ:----नंतर तो जमदग्नी,योगसामर्थ्याने पत्नी रेणुकेचा चित्ररथाबरोबर भोगेच्छारूप मानसिक व्यभिचार झाला असें जाणून, अतिक्रूद्ध होत असता म्हणाला कीं,---हे पुत्रहो,परपुरुषाचे ठिकाणी चित्त ठेवणाऱ्या ह्या आपल्या मातेला तुम्ही मारून टाका.असें सांगीतलेल्याहि त्या पुत्रांनी आईचा वध केला नाही.जरी वडिलांनी आईच्या अपराधामुळे शिक्षा करा म्हणजेच मारून टाका असा अज्ञा दिली,तरी पण जन्म देणारी आई असल्यामुळे पुत्रांनी त्या आईची हत्या केली नाही,कारण जन्म देणाऱ्या आईला शिक्षा किंवा हत्या करणे,अपराध आहे,म्हणून व स्वधर्म म्हणून पुत्रांनी आईची हत्या केली नाही.वास्तविक पाहता रेणुका मातेकडून अपराध झालेला असल्यामुळे पती या नात्याने शिक्षा करणे हा पित्याचा स्वधर्म ठरत असल्यामुळे त्यांनी पुत्रांना हत्या करा अशी अज्ञा दिली.पत्नी स्वधर्मानुसार अन्य पुरुष काम--वासानाविषयी मनात आणणे किंवा प्रत्यक्ष शारीरिक संबंध प्रस्थापित करणे परधर्म--अधर्म आहे.म्हणून स्त्रियांनी आपल्या मनात किंवा कृतीत परपुरुष आणू नये,त्यामुळे आपल्या पतीचा पुत्र न होता,तो परपुरुषाचा पुत्र होणारा असतो.त्या स्त्रीचा पतिव्रता धर्मांस प्रतिबंध होतो.म्हणून शास्त्रांनी पती--पत्नींना विधिवत पुत्र सांगितलेला आहे.त्यामुळे विधिवत पुत्र न होता संकर पुत्र उत्पन्न होतो,की जो विधिवत नसतो.त्या स्त्रीस मृत्युनंतर यामापुरीत गेल्यानंतर यमराज असह्य असा दंड देतो.तसेच पुरुषांनी परस्त्रीसी शारीरिक संबंध केला तर,तोही त्या पुरुषाकडून परधर्म--अधर्म होतो.त्यामुळे मृत्यूनंतर त्या पुरुषास असह्य असा दंड यमराजाकडून दिल्या जातो.असा आदर्श प्रभू रामचंद्रांनी व माता सीतांनी त्यांच्या त्यांच्या जीवनकाळात आचरणात--कृती करून आपणास दाखवला आहे.म्हणून आपण--जीवांनी त्यांचा तो आदर्श फक्त ऐकण्यासाठी नसून,त्यानुसार आचरण करण्यासाठीच आहे. वाल्मिक ऋषींनी रामायण या ग्रंथात जे अनेक प्रसंग वर्णन लिखित स्वरुपात आपणास श्रवण करून त्यानुसार आचरण करावे,म्हणूनच आहेत.फक्त श्रवणच करावे,असा त्यांचे एक टक्केहि(१ %)मनोगत नसून शंभर टक्के(१०० %)त्यानुसार आचरण करावेत असेच त्यांचे मनोगत आहे.विशेष म्हणजे फक्त भारतीयांनीच त्यानुसार आचरण करावे,असे त्यांचे व भगवंतांचे मनोगत नसून मृत्यू-लोकांतील अखिल--शंभर टक्के(१०० %) मानवांनी त्यानुसार आचरण करावेच असेच आहे.ब भारतीय संस्कृतीने अखिल मानव आपल्यासमोर ठेऊन सर्व संस्कृती निर्माण करून,त्यानुसार आचरण केलेले आहे.ग्रंथ लिखाण करून श्रवण करून आचरण करावे व आचरण केल्यास सर्व मानावांचेच महाहित आहे.||५|| | वरेण छन्दयामास प्रीतः सत्यवतीसुतः | वव्रे हतानां रामोsपी जीवितं चास्मृतिं वधे ||७|| भावार्थ:---तेव्हां त्या जमदग्नीनें,परशुरामास हाक मारून त्याला,आपल्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या भ्रात्यांच्या व मातेच्या वधाविषयी प्रेरणा केली असतां,त्या परशुरामाने भ्रात्यांचा मातेसहवर्तमान वध केला.कारण तो परशुराम,जगदग्नीचा जो स्माधीयोग व तप त्यांचा खरा प्रभाव जाणणारा होता म्हणजे जर मी भ्रात्यांला व मातेला मारिले नाही तर हा ऋषी कोपाने मला शाप देण्यास समर्थ आहे आणि जर मारिलें तर मी याची प्रार्थना केली असता त्या सर्वांनाही जीवंत करण्यासही हा समर्थ आहे वर मागून घे असें म्हणाला,तेव्हां परशुरामानेहि मारलेल्या भ्रात्यांचे व मातेचे !पुन्हां वाचणे घडावे व त्यांना आपल्या वधाविषयी स्मरण राहून नये असा वर मागून घेतला.||७|| | उत्तस्थुस्ते कुशलीनो निद्रापाय इवान्जसा | पितुर्वीदवांस्तपोविर्यं रामश्चक्रे सुहृद्वधम् ||८|| भावार्थ:---नंतर ते भ्राते व माता हि सर्व, निजून उठल्याप्रमाणे अनायासानें पुन्हा जिवंत होऊन उठली.याप्रमाणे पित्याचे तप: सामर्थ्य जाणानाऱ्या त्या परशुरामाने भ्रात्यादिकाचा वध केला. ||८|| भावार्थ:---आतां सर्व क्षत्रियांचा वध करण्याचे कारण असें की, हे राजा,परशुरामाच्या सामर्थ्याने पराभव पावून युध्दांतून पळून गेलेले जे अर्जुनाचे दहाहजार पुत्र होते ते रामानें केलेल्या आपल्या पित्याच्या वधाचे स्मरण करीत असते कोठेही सुख पावेनात. ||९|| भावार्थ:---एकेवेळी तो परशुराम आपल्या भ्रात्यांसहवर्तमान आश्रमांतून वनांत निघून गेला असतां,जमदग्नीचा वध करण्यास अवकाश मिळालेले ते अर्जुनाचे पुत्र,परशुरामाने केलेल्या आपल्या पित्याच्या वधाचे वैर,त्याच्या पित्याच्या वधाने साधावें असा हेतू धरून त्याच्या आश्रमास प्राप्त झाले.||१०|| भावार्थ:---तेव्हां अग्नीच्या होमशाळेमध्यें बसलेल्या आणि उत्तमकीर्ती भगवंताचे ठिकाणी ज्याने आपली बुद्धी स्थिर केली आहे अशा त्या जमदग्निला पाहून,त्याच्या वधरूप पापाचाच निश्चय करणाऱ्या त्यांनी त्याचा वध केला.||११|| भावार्थ:----तेव्हां दीन अशा रेनुकेनें ‘याला मारुं नको अशी’ त्यांची प्रार्थना केली असतांहि अतीक्रूरस्वभावाचे ते क्षत्रियाधम,बलात्काराने त्याचे मस्तक तोडून आपल्या नगरीत घेऊन गेले.||१२|| भावार्थ:---त्या प्रसंगी पतीच्या वियोगापासून झालेल्या दु:खानें व पतीवांचून पुढे कसे चालेल या चिंतेने पिडीत झालेली व हस्तांनी मस्तकादिकांवर प्रहार करून घेणारी ती पतिव्रता रेणुका,हे रामा,हे रामा,हे ताता,लवकर ये,अशा प्रकारेकरून उच्चस्वराने रामाला हाका मारुं लागली.||१३|| भावार्थ;---नंतर तिचा हा राम,असा दु:खितासारखा शब्द,दूर असलेल्या रामानें श्रवण करून,त्वरेने आश्रमस आला व त्यांने मृत झालेल्या पित्यास अवलोकन केले.||१४|| भावार्थ;---तेव्हा संताप,क्रोध,अपराध सहन करणें,दैन्य व शोक यांच्या वेगानें मोहित झालेल्या त्या रामाने,हे तात,हे साधो,हे धर्मिष्ठा, आम्हाला टाकून तूं स्वर्गास गेलास असा विलाप करून,संरक्षनाकरीतां त्या पित्याचा देह भ्रात्यांच्या स्वाधीन केला आणि त्याने हातात परशुग्रहण करून,क्षत्रीयकुलाचा नाश करण्याचा संकल्प केला.||१५||१६|| भावार्थ:---तदनंतर हे राजा,त्या रामानें ब्रहमघातकी राजे झाल्यामुळे जिची शोभा नाहीशी झाली आहे अशा त्या महिष्मती नगरीमध्ये जाऊन,तिच्यामध्यें त्या अधम क्षत्रियांच्या तुटलेल्या मस्तकांनि एक महापर्वत रचिला.||१७|| भावार्थ:---आणि त्या राजांच्या रक्तानें,ब्राहमणभक्ती नसणाऱ्या लोकांना भय उत्पन्न करणारी अशी भयंकर एक नदी उत्पन्न केली. आतां सर्व क्षत्रीयांच्या वधाचे कारण असें कीं,---हे राजा,क्षत्रियाचे कुळ अन्यायाने वर्तणूक करूं लागलें असतां,पित्याच्या(जमदग्निच्या) वधाचे निमित्त करून त्या समर्थ परशुरामानें एकवीसवेळा पृथिवी नि:क्षत्रिय केली आणि स्यमंतपंचकनामक देशामध्ये रक्तरूप उदकाचे पांच ऱ्हद (डोह) केले.||१८||१९|| भावार्थ:---नंतर पित्याचे ते मस्तक आणून यज्ञामध्ये पित्याच्या देहाशी संयुक्त करून,त्या परशुरामाने पुष्कळ यज्ञाच्या योगाने सर्वांतरात्मा व सर्वदेवमय अशा विष्णूंचे आराधन केले.||२०|| भावार्थ:---त्या यज्ञांमध्ये परशुरामाने होत्याला पूर्वदिशेकडील पृथ्वी दिली,ब्रह्म्याला दक्षिणदिशेकडील,अध्वर्यूला पश्चिमदिशेकडील व उद्गात्याला उत्तरदिशेकडील पृथ्वी दिली.||२१|| भावार्थ:---दुसऱ्या ऋत्विजांना आग्नेयादीक दिशांकडील भूमी देऊन कश्यपाला मधली भूमी दिली.उपद्रष्ट्याला आर्योवर्त दिला आणि सदस्यांना त्या आर्यावर्तदेशाच्या सभोवार असलेला भूमिप्रदेशयथायोग्य विभागाने दिला. ||२२|| भावार्थ:---नंतर ब्रहमदैवत्य अशा सरस्वती नदीमध्ये अवभृथस्नान केल्यामुळे ज्याची सर्व पातके निवृत्त झाली आहेत असा तो परशुराम,मेघमंडळाने रहित झालेल्या सूर्याप्रमाणे शोभू लागला.||२३|| भावार्थ:----तो जमदग्नी तर,पूर्वस्मरणाने युक्त असा आपला देह पावोन,परशुरामाने पूजित असता कश्यपादि ऋषीच्या मंडळामध्ये सातवा एक ऋषी झाला.||२४|| भावार्थ:----हे राजा,तो जमदग्निचा पुत्र कमलनेत्र भगवान् परशूरामहि,पुढे येणाऱ्या सावर्णीनामक मन्वंतरमध्ये वेदाची प्रवृत्ती करील, म्हणजे वेदप्रवर्तक अशा सप्तर्षीमध्ये एक ऋषी होईल. ||२५|| | आस्तेsद्दापि महेन्द्राद्रौ न्यस्तदण्ड: प्रशान्तधीः | उपगीयमानचरीतः सिद्धगन्धर्वचारणैः ||२६|| भावार्थ:---तो परशुराम,क्षत्रवधादिरूप दडाचां परित्याग करून व अत्यत शांतबुद्धीने युक्त होत असता सिद्धांनी गंधर्वानी व चरणांनि ज्याच्या चरित्र्याचे गायन केले आहे असा होऊन,महेंद्रनामक पर्वतावर अजूनही राहिला आहे. ||२६|| भावार्थ:----याप्रमाणे विश्वात्मा भगवान् हरी अशा ईश्वराने,भृगुंच्या वंशामध्ये अवतार धारण करून,पृथ्वीला अतिशय भाररुप अशा पुष्कळ राजांचा वध केला.||२७|| भावार्थ:---आता गाधीचा वंश सांगतो---हे राजा,गाधीराजापासून,प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे महातेजस्वी असा विश्वामित्रनामक पुत्र झाला.त्यांने तपाच्या योगानें आपला क्षत्रियपना टाकून ब्रहमर्षिपना मिळविला आहे.||२८|| भावार्थ:---हे राजा,त्या विश्वामित्रालाही एकशे पुत्र होते.त्यात मधला पुत्र मधुच्छदस नावाचा होता,त्यामुळे त्या सर्वांनाही मधुच्छदस असें म्हणत असत.||२९|| भावार्थ:---आतां विश्वामित्रांचे चरित्र सांगतो---विश्वामित्राने भृगुवंशांत उत्पन्न झालेल्या अजिगर्ताच्या देवरात ह्या नावाचे प्रसिध्द असलेल्या "शून:शेपनामक" पुत्राला आपला पुत्र अशा नात्यानें स्वीकारून,आपल्या शंभरही पुत्रांना म्हणाला कीं,---हे पुत्रहो,तुम्ही हा शून:शेष आपला ज्येष्ठ भ्राता मधुच्छदानामकच आहे असें माना. ||३०|| भावार्थ:---जो शून:शेप हरिश्चंद्र राजाच्या यज्ञामध्ये पुरुषपशु मारण्याकरिता आईबापांनी स्नेह टाकून विकला असता यज्ञस्तंभाचे ठिकाणी बांधून ठेविला होता तो,आपणास जिवंत सोडावे म्हणून विश्वामित्राला शरण गेला.तेव्हां त्याने उपदेश केलेल्या मंत्राने प्रजेशादीक देवांची स्तुती करून त्यांच्या कृपेने पाशबंधापासून मुक्त झाला.||३१|| भावार्थ:---ज्याचे यज्ञामध्ये देवांनी जीवंत सोडून,रक्षण केले म्हणून पुढे जो गाधिराजाच्या वंशजांमध्ये देवरात ह्या नावाने प्रसिध्द असा तपस्वी झाला तोच भृगुकुलात झालेला "शून:शेप" होय||३२|| भावार्थ:---असो.जेष्ठभ्राता म्हणून माना असें सांगीतलेले जे विश्वामित्राचे म्धुच्छदसनामक शंभर पुत्र होते त्यांपैकी एकून पन्नास वडील पुत्रांनी तें ज्येष्टत्व अंगीकारीले नाहीं.तेव्हां क्रुध्द झालेल्या विश्वामित्र ऋषीने,त्यांना,हे दुर्जन---हो, तुम्ही म्लेच्छ व्हां,असा शाप दिला.||३३|| | स होवाच मधुच्छन्दाः सार्धं पन्चाशता ततः | यन्नो भवान् संजानीते तस्मिंस्तिष्ठामहे वयम् ||३४|| भावार्थ:---नंतर पन्नास कनिष्ठ बंधुंसहवर्तमान जो मधला (पन्नासावा) मधुच्छंदा होता तो विश्वामित्राला म्हणाला कीं,---तूं पिता आम्हांपुत्रांना जे अंगीकार करण्यास सांगत आहेस त्या तुझ्या आज्ञेत आम्ही राहतो.||३४|| भावार्थ:---असें म्हणून त्यांनी मंत्रद्रष्ट्यात्या देवरातला ज्येष्ठ केलें आणि म्हणाले कीं,हे शून:शेपा,आम्ही सर्व तुझे कनिष्ट भ्राते होतो. तेव्हां प्रसन्न झालेला विश्वामित्र,त्यापुत्रांस म्हणाला कीं,---हे पुत्रहो,ज्या तुम्ही माझे पूज्यत्व स्वीकारीलेत आणि मला पुत्रवान केलात ते तुम्ही पुढे पुत्रवंत व्हा.||३५|| भावार्थ:---हे कुशीकहो,हा देवरात तुमचा कौशीकच आहे.ज्याअर्थी हा माझा पुत्र आहे त्या अर्थी आतां तुम्ही त्याला अनुसुरून वागा. विश्वामित्राला त्यापुत्रांहून दुसरेही अष्टक,हारीत,जय,क्रतुमान इत्यादिक पुत्र होते. ||३६|| भावार्थ;---याप्रमाणे कांहीएकांना शाप झाला,कित्येकांवर अनुग्रह झाला व दुसराच एक पुत्रत्वाने स्वीकारला गेला,अशा प्रकारच्या विश्वामित्राच्या पुत्रांनी तें कौशिकगोत्र नानाप्रकारचे झाले.कारण,देवराताला ज्येष्ठ मानल्यामुळे त्यांची निराळीच कल्पना झाली असल्यामुळे त्याला दुसरेच प्रवर प्राप्त झाले.||३७|| भावार्थ:---याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणातील नवम(९)स्कंधातील हा सोळावा(१६)अध्याय सदोतीस (३७)श्लोकांनी युक्त समाप्त झाला. |||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________ १७-----आतां सतराव्या अध्यायामध्ये,पुरूरव्याचा प्रथम पुत्र जो आयु त्याच्या नहुषादिक पांच पुत्रांपैकी क्षत्रवृद्धादिक चार पुत्रांच्या वंशाचे वर्णन केले आहे.||१७|| |१७--- क्षत्रवृद्ध,रजी इत्यादी राजांच्या वंशाचे वर्णन ______________________________________________________________________________________________ भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजेंद्रा,जो "पुरुरव्याचा" पुत्र "आयुनामक" सांगीतला त्याला पुढे पांच पुत्र झाले.त्यांची नावे- "नहुष", "क्षत्रवृध्द", "रजी", महापराक्रमी "रंभ" आणि "अनेना" अशीं होत त्यात प्रथम क्षत्रवृद्धाचा वंश सांगतो ऐक. "क्षत्रवृद्धाचा" पुत्र "सुहोत्र". त्याला "कश्य", "कुश" आणि "गृत्समद" असे तीन पुत्र होते.त्यांपैकी गृत्समदापासून "शुनक" झाला,त्याला ऋग्वेद्यांमध्ये श्रेष्ठ व मननशील असा "शौनक" नावाचा पुत्र झाला. ||१||२||३|| भावार्थ:----"कश्याचा" पुत्र "कशी", त्याचा पुत्र "राष्ट्र", त्याचा "दीर्घतमा", त्याचा पुत्र "धन्वंतरी" तो आयुर्वेदाचा प्रवर्तक झाला. ||४|| भावार्थ:---तो यज्ञभोक्त्या वसुदेवाचा अंश असून स्मरणमत्रेकरून रोगपिडेचा नाश करणारा होता.त्याचा पुत्र "केतुमान",त्याचा पुत्र "भीमरथ" झाला, त्यापासून "दिवोदास", त्यापासून "द्युमान" झला. हे वत्सा राजा त्यालाच प्रदर्तन असें म्हणतात आणि तोच शत्रुजित, ऋतध्वज आणि कुवलायाश्व या नावांची कथन केला आहे. त्या द्युमानापासून "अलर्कादिक" पुत्र झाला.||५||६|| भावार्थ:---हे राजा,साठ हजार वर्षे व साठ्शे वर्षे म्हणजे सासष्टहजार वर्षेपर्यंत अलर्कानेच तरूनपनांने पृथ्वीचे राज्य केले.तितक्या वर्षामध्ये त्या अलर्काहून दुसरा राजा नव्हता. ||७|| भावार्थ:---अलर्कापासून "संततीनामक" पुत्र झाला. त्याच्यापासून "मुनीथ",त्यापासून "सुकेतन", त्यापासून "धर्मकेतू" पुत्र झाला त्यापासून "सत्यकेतू" झाला. ||८|| भावार्थ:--- हे राजा,त्यापासून "धृष्टकेतू" पुत्र झाला,त्यापासून "सुकुमार" नावाचा पृथ्वीपती पुत्र झाला,त्यापासून "वितीहोत्र",त्यापासून "भर्ग",त्यापासून "भार्गभूमिनामक" पुत्र झाला||९|| भावार्थ:---हे सांगीतलेले काशीवंशापासून झालेले राजे, क्षत्रवृद्धाच्या वंशांतील जाणावे."रंभाचा" "रभस" आणि "गंभिर" असे दोन पुत्र झाले, त्या रभसापासून "आक्रीय" झाला.||१०|| भावार्थ:---त्याच्या स्त्रीचे ठिकाणी ब्राहमणकुळ झाले,आतां "अनेन्याचा" वंश ऐक. अनेन्यानेला "शुद्ध" झाला, त्यापासून "शुची", त्याचा "त्रिककूप" झाला,तोच धर्मसारथी या नावाने प्रसिध्द होता.||११|| भावार्थ:---त्यापासून "शांतरय" झाला, तो आत्मज्ञानी कृतकृत्य होता,त्यानें पुढे पुत्रोत्पादन केले नाही."रजिचे" महाबलपराक्रमी असे "पाचशें-पुत्र" होते.||१२|| भावार्थ:---त्या रजीने,देवांनी प्रार्थना केली असतां दैत्यांना मारून त्यांनी घेतलेला स्वर्ग पुन्हा इंद्राला दिला.परंतु प्रऱ्हादादिक शत्रुंपासून भ्यालेल्या इंद्राने,तो स्वर्ग पुन्हा रजीला देऊन त्याचे चरण ग्रहण करून||१३|| भावार्थ:---आपणांस अर्पण केले,म्हणजे आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावर ठेविला.पुढे रजी पिता मरण पावला असतां,त्याच्या पुत्रांनी याचना करणाऱ्या इंद्राला स्वर्ग दिला नाही. ||१४|| भावार्थ:---व ते आपणच यज्ञभागांचे ग्रहण करूं लागले.नंतर बृहस्पतीनें त्यांच्या बुद्धीभ्रंशाकरीता अभिचार विधानाने अग्नीमध्ये हवन केले असतां,इंद्राचे आधिपत्य असावें अशाप्रकारच्या बुध्दिमार्गापासून भ्रष्ट झालेल्या त्या रजीच्या सर्वही पुत्रांचा इंद्राने वध केला. त्यांतील एकही अवशेष ठेविला नाही.आतां सिंहावलोकन्यायानें "क्षत्रवृद्धाचा" वंश सांगतो- क्षत्रवृद्धाचा नातू जो "कुश" त्यापासून "प्रतीनामक" पुत्र झाला, त्यापासून "संजय" त्याचा पुत्र "जय" ||१५||१६|| भावार्थ:---त्यापासून "कृत" झाला. हे राजा, कृतावाही पुत्र "हर्यवन" झाला, त्यापासून "सहदेव", त्यापासून "हीन",त्याचा पुत्र "जयसेन", त्याचा "संकृती",त्याचा "जय" झाला, तो क्षत्रीयधर्मनिष्ठ महारथी होता.हे राजा,हे क्षत्रवृद्धाच्या वंशांत झालेले राजे सांगीतले.आतां नहुशापासून झालेला वंश श्रवण कर. ||१७|||८|| १७-----याप्रमाणे श्रीमद्भगवतनामक महापुराणातील नवम(९)स्कंधामध्ये सोमवंशवर्णनसंबंधी हा सतरावा(१७) अध्याय आठरा(१८) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१७|| ______________________________________________________________________________________________
१८-----आतां या अठराव्या अध्यायामध्ये नहुषराजाचा पुत्र जो ययाति राजा त्याची कथा सांगितली आहे.ज्याच्या पांच पुत्रांमध्ये कनिष्ठ असलेल्या पुरूने पित्याच्या जरेचे ग्रहण केले आहे.||१८|| |१८--- ६---ययाति---चरित्र---[१---ययाती चरित्र ] ______________________________________________________________________________________________ | यतीर्ययातिः संयातीरायतिर्वीयतिः कृतिः | षडिमे नहुषस्यासन्नीन्द्रियाणीव देहिनः ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला–--हे राजा,पूर्वी सांगितलेल्या नहुषाला,"यती","ययाती","संयाति","आयाती","वियति",आणि "कृती" हे सहा पुत्र होते;ते,जशी चक्षुश्रोत्रादिक सहा इंद्रिय जीवाच्या स्वाधीन असतात त्याप्रमाणे त्या नहुषाच्या स्वाधीन होते.पुत्र असे असावे की,जी पित्याच्या अज्ञेचे पालन करणारे असावेत,त्याप्रमाणे नहुष--राजाचे पुत्र होते.म्हणून आपण--जीवांनी पित्याच्या अज्ञाचे पालन करावे,हाच आपला पुत्र या नात्याने धर्म आहे.त्यासच स्वधर्म असे म्हणतात.||१|| | राज्यं नैच्छद् यतिः पित्रा दत्तं तत्परिणामवित् | यत्र प्रविष्टः पुरुष आत्मानं नावबुध्यते ||२|| भावार्थ:---त्यामध्यें यती नामक ज्येष्ठ पुत्राने नहुष पित्याने दिलेले राज्य इच्छिले नाही.कारण तो राज्याचा परिणाम अनर्थकारक आहे असे जाणणारा होता.ज्या राज्यात आसक्त झालेला पुरुष,अभिमानी होऊन आपली गती पुढे काय होईल ते जाणत नाही.म्हणून आपण--जीवांनी अनात्मा असलेले वैभव हे दु:खास जाणून त्या वैभवाचा त्याग करून संत--महात्मा यांचा सत्संग करावा. ||२|| | पितरि भ्रंशिते स्थानादिन्द्राण्या धर्षनाद् द्विजै: | प्रापितेsजगरत्वं वै ययातिरभवनृप: ||३|| भावार्थ:---पुढे नहुष पित्याला इंद्राणीच्या भोगभिलाशामुळे अगस्त्यदिक ब्राहमणांनी स्वर्गावरच्या अधिकारापासून भ्रष्ट करून अजगर-- पणास पोचविले असता "ययातीच--राजा" झाला. ||३|| | चतसृष्वादिशद् दिक्षु भ्रातृन् भ्राता यवियसः | कृतदारो जुगोपोर्वि काव्यस्य वृषपर्वण: ||४|| भावार्थ:---त्याने आपल्या संयाति प्रभृती चार कनिष्ठ भ्रात्याना चार दिशाचे ठिकाणी पृथ्वीच्या रक्षणार्थ योजिले आणि आपण, शुक्राचार्याची व वृषापर्व्यादानवाची अशा दोन कन्या आपल्या स्त्रिया करून घेऊन पृथ्वीचे पालन केले. ||४|| भावार्थ:---राजा म्हणाला:---हे शुकाचार्य,हा भगवान ब्रहमर्षी होय आणि ययाती राजा हा क्षत्रिय श्रेष्ठ होय.असे असता राजा आणि ब्राहमण यांचा हा उलटा विवाह कोणत्या कारणाने झाला ?म्हणजे क्षत्रियाची कन्या कारणपरत्वे ब्राहमणाने करावी,परंतु ब्राहमणाची कन्या क्षत्रियाने मुळीच करू नये असे असता हे कसे झाले. ||५|| भावार्थ:---श्री शुकाचार्य म्हणाला:---हे राजा,हा प्रकार ईश्वराने घडविलेला असल्यामुळे येथे प्रतीलोमता दोष नाही.याविषयी कथा सांगतो-- ऐक.एकेवेळी दानव श्रेष्ठ वृषपर्व्याची तारुण्यवयात आलेली शर्मिष्ठानामक कन्या,हजार दासींसहवर्तमान व शुक्राचार्याच्या देवयानीनामक कन्येसहवर्तमान,प्रफुल्लीत झालेल्या वृक्षांनी व्याप्त व ज्यामध्ये मधुर गायन करणारे भ्रमर आहेत अशा (स्थलविकासी कमलिनीच्या वाळवंटांनि युक्त) असलेल्या)आरामबागेमध्ये क्रीडा करावयास गेली.||६||७|| भावार्थ:---तेव्हा शर्मीष्ठादिक त्या कमललोचना कन्यांनी तलावाजवळ येऊन,आपापली वस्त्रे कडेला ठेऊन त्यामध्ये प्रवेश केला आणि एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असता क्रीडा करीत होत्या.||८|| भावार्थ:---तेव्हा त्या स्त्रीयांनी पार्वतीसहवर्तमान नंदिकेश्वरावर बसून गमन करणाऱ्या शंकरास अवलोकन करून लज्जित झाल्या आणि एकाएकी कडेला येऊन आपापली वस्त्रे परिधान केली. ||९|| भावार्थ:---तेव्हा न जानता शर्मीष्ठीने देवयानीचे वस्त्र आपले असे मानून परिधान केले.नंतर देवयानी शर्मीष्ठीने देवयानीचे वस्त्र आपले असे मानून मोठ्या क्रोधाने असे म्हणाली की,------------ ||१०|| भावार्थ:---अहो या दासीने किती अयोग्य कर्म आहे ते पहा !जशी कुत्री यज्ञामध्ये हविर्भाग ग्रहण करण्यास अयोग्य आहे त्याप्रमाणे आम्ही धारण करावयाचे वस्त्र करण्यास हि अयोग्य असून हिने आमचे वस्त्र परिधान केले आहे. ||११|| भावार्थ:---ज्या ब्राहमणांनि हे जग तपोबलाने उत्पन्न केले आहे जे परमपुरुष झाल्यामुळे श्रेष्ठ आहेत ज्यांनी या संसारामध्ये आपल्या ह्रदयामध्ये स्वप्रकाशरूप परब्रहमचे उपास्यत्वेकरून धारण केले आहे आणि ज्यांनि कल्याणकारक असा वैदिकमार्ग प्रवृत्त केला आहे आणि ज्यांना इंद्रादिक लोकपाल नमस्कार करितात व स्तुती करतात.अधिकतर काय परंतु लक्ष्मीचा आश्रयभूत व जगत्पावन असा विश्वात्मा भगवानहि ज्यांना वंदन करितो व स्तुती करितो.||१२||१३|| भावार्थ:---त्या ब्राहमणामध्येही आम्ही भृगुकुलातील म्हणजे ज्या भृगुचे पादताडनही भगवंताने सहन केले आहे,त्याच्या वंशांतील श्रेष्ठ ब्राहमण आहो.त्यातूनही हिचा पिता वृषपर्वा दैत्य,आमचा शिष्य आहे,एतावता सर्वप्रकारे हीन असलेल्या या शर्मिष्ठेने जसे त्रीवर्णहीन अनधिकारी शूद्राने ब्राहमणांनी अध्ययन करण्यास योग्य अशा वेदांचे अध्ययन करावे त्याप्रमाणे आम्ही धारन करण्यास योग्य अशा वस्त्राचे हिने धारण केले. ||१४|| भावार्थ:---याप्रमाणे तिरस्कार करणाऱ्या देवयानीला आपला अधरोष्ठ चावून तुडविलेल्या सर्पिणी प्रमाणे क्रोधाने श्वसोच्छ्स टाकणारी ती शर्मिष्ठा,म्हणाली की,---------------||१५|| भावार्थ:---हे भिक्षुकी,तू आपले वृत्त लक्षात न आणीत पुष्कळच आपली स्तुती करून घेतेस.अगे,कावळ्या प्रमाणे किंवा कुत्र्याप्रमाणे तू आपल्या पित्यासह पोट भरीण्याकरिता आमच्या घराकडे टोंकावून पाहत राहत नाहीस कां ?||१६|| भावार्थ:---अशाप्रकारच्या दुसऱ्याही कठोर भाषणांनी गुरुकन्या असल्यामुळे पूज्य अशा त्या देवयानीची निंदा करून,क्रोधाने तिने परिधान केलेले वस्त्र हिसकावून घेऊन शर्मिष्ठेने तिला कुपामध्ये ढकलून दिली.शर्मिष्ठाने आपल्या सदगुरू अशा प्रकारच्या कन्येस असे बोलणे योग्य नाही,करण ती गुरूची कन्या आहे,आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे,असे शर्मिष्ठेच्या लक्षात आले नाही.भक्तापेक्षा गुरु श्रेष्ठ असतो. पारमार्थिक सत्ता हि राजासात्तापेक्षा श्रेष्ठ असते,असा आपण विवेक करून त्यानुसार वर्तन करावे.||१७|| भावार्थ:---नंतर ती शर्मिष्ठा आपल्या घरी गेली असता मृगयेविषयी अरण्यात संचार करीत असता तृशाक्रांत झालेला ययाती राजा सहजगत्या त्या कुपाजवळ प्राप्त झाला आणि त्याने त्या कुपांत पडलेली नग्न देवयानी अवलोकन केली.||१८|| भावार्थ:---आणि तृषायुक्त झालेल्या त्या राजाने नग्न असलेल्या त्या देवयानीला परिधान करण्याकरिता आपले उत्तरीय वस्त्र देऊन हाताने तिचा हात धरून कुपातून बाहेर काढिली.||१९|| | तं वीरमाहौशनसी प्रेमनिर्भरया गिरा | राजंस्त्वया गृहीतो मे पाणिः परपुरन्जय ||२०|| | हस्तग्राहोsपरो मा भूद् गृहीतायास्त्वया हि मे | एष ईशकृतो वीर सम्बन्धो नौ न पौरुषः | यदिदं कूपलग्नाया भवतो दर्शनं मम||२१|| भावार्थ:---तेव्हा आपला उद्धार करणाऱ्या त्या ययाती राजाला शुक्राची कन्या ती देवयानी प्रेमाने पूर्ण झालेल्या वाणीने म्हणाली की,--- हे शत्रू संतापना राजा,ज्याअर्थी तू माझा हात धरिला आहेस त्याअर्थी तू ग्रहण केलेले माझा,हात ग्रहण तुझ्याहून दुसरा कोणीही न व्हावा म्हणजे तुच मला वरावेस.आता तू ब्राहमणाची कन्या व मी राजा यास्तव आमचा हा उलटा विवाह कसा होईल ?असे म्हणशील तर---हे वीरा "आमचा हा भार्यापतिरुप संबंध ईश्वरानेच केलेला आहे पुरुषाने नव्हे". ||२०||२१|| भावार्थ:---कारण कुपामध्ये पडलेला मला असंभावित जे हे तुझे दर्शन झाले ते ईश्वराच्या इच्छेवांचून नही.बरे तू एखाद्या ब्राहमणालाच वरावेस,मला वरण्याचा आग्रह का करीतेस असे म्हणशील तर---हे महापराक्रमी राजा माझा पाणी ग्रहण करणारा (पती )ब्राहमण होणार नाही.कारण पूर्वी ज्या बृहस्पतीच्या कच नामक तुझी विद्या निष्फळ होवो असा,शाप दिला होता त्याचा "तुला ब्राहमण पति होणार नाही" असा मला शाप झाला आहे. ||२२|| भावार्थ:---नंतर ययाती राजाने अशास्त्रीय असल्यामुळे आपणास न आवडणारे परंतु दैवाने प्राप्त करून दिलेले ते देवयानीचे भाषण ऐकून व तिचे ठिकाणी आसक्त झालेले आपले मन जाणून "माझे मन अधर्माचे ठिकाणी कधीच प्रवृत्त होत नाही" असा निश्चय करून तिच्या वचनाचा स्वीकार केला म्हणजे "तुझ्या पित्याने जर मला दिली तर मि तुझा अंगीकार करीन असे सांगितले".||२३|| भावार्थ:---आता शर्मिष्ठेचा संबंधहि दैवयोगानेच झाला असे दर्शवित म्हणतो---नंतर तो वीर राजा ययाती तेथुन निघून गेला असता त्या देवयानीने तेथून रोदन करीत पित्याजवळ येऊन त्याला शर्मिष्ठेने जे भिक्षुकि इत्यादिक भाषण केले होते व जे कुपांत ढकलणे वगैरे कर्म केले होते ते सर्व सांगितले.||२४|| भावार्थ:---ते ऐकून तो भगवान् शुक्राचार्य,दु:खितचीत्त होऊन पुरोहित वृत्तीची निंदा करीत व उंछवृत्तीची स्तुती करीत असता तो कन्येसहवर्तमान वृषवर्व्याच्या नगरातून निघून गेला.||२५|| भावार्थ:--- नंतर शत्रूचा जय मिळवून घ्यावा हे शुक्राचार्याच्या मनात आले आहे असे वृषवर्व्यानें जाणून मार्गामध्ये जात असलेल्या त्या शुक्राचार्याला प्रसन्न करऱ्याविषयी तो मस्तकाने त्याच्या पायावर पडला.||२६|| भावार्थ:---तेव्हा अधीक्षण क्रोध तो भगवान शुक्राचार्य आपल्या शिष्याला म्हणाला कीं,--- "हे राजा या देवयानीचा जो मनोरथ असेल तो तू पूर्ण करावास".हिला याठिकाणी टाकण्यास (उदासीन करण्यास) मी इच्छित नाही. ||२७|| | तथेत्यवस्थिते प्राह देवयानी मनोगतम् | पित्रा दत्ता यतो यास्ये सानुगा यातु मामणु ||२८|| भावार्थ:---तेव्हा तो बरे आहे असे म्हणून राहिला असता देवयानीने आपले मनोगत सांगितले की, "पित्याने दिलेली मी जेथे जाईन तेथे हि शर्मिष्ठा संख्यासहवर्तमान माझे दास्य करण्याकरिता येवो." शुक्राचार्य हे राजाचे गुरु असल्यामुळे व राजा हा शिष्य असल्यामुळे शुक्राचार्याच्या मागणीस नकार देता येत नसल्यामुळे राजांनी त्यांच्या मागणीस होकार दिला.||२८|| भावार्थ:---तव्हा शर्मिष्ठेने शुक्राचार्य गेला असता पिता वगैर सर्वांना ते महत्संकष्ट प्राप्त होणार असे पाहून आणि देवयानीचा संतोष केला असता त्याचा मोठा कार्यभाग आहे असे जाणून हजार स्त्रियासहवर्तमान दासिप्रमाणे देवयानीची शुश्रुषा करण्याचे पत्करीले. ||२९|| भावार्थ:---नंतर शुक्रचार्यने ययातीराजाला शर्मिष्ठादासी सहवर्तमान देवयाणीस अर्पण करून त्याला सांगितले की, "हे राजा शय्येठीकानी शर्मिष्ठेबरोबर तू कधीच गमन करू नकोस". ||३०|| भावार्थ:---पुढे हे राजा एकेवेळी शर्मिष्ठेने देवयानी पुत्रवती झाली असे अवलोकन करून आपण ऋतुकाल प्राप्त झाला असता आपल्या सखीचा पती अशा त्या ययाती राजाचीच अपत्यप्राप्तीकरिता संभोग करण्याविषयी प्रार्थना केली. ||३१|| भावार्थ:---याप्रमाणे अपत्य प्राप्तीसाठी राजकन्या शर्मिष्ठेने प्रार्थना केलेल्या त्या ययाती राजाने धर्म पाहून म्हणजे "ऋतुकाली अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या स्त्रीचे काम पर्ण करणे हा धर्मच आहे" असे मनात आणून शुक्राचार्याच्या भाषणाचे स्मरण करीत असताही ऋतुकाली दैवानेच प्राप्त झालेला तो संभोग आहे असे मानिले. ||३२|| | यदुं च तुर्वसुं चैव देवयानी व्यजायत | दृह्युं चानुं च पुरूं च शर्मिष्ठा वार्शपर्वणी ||३३|| भावार्थ:---असे असता दोघीपासुनहि झालेला अपत्ये अशी कि देवयानीला "यदु" व "तुर्वसू" हे दोन पुत्र झाले आणि वृषपर्व्याची कन्या जी शर्मिष्ठा तिला "द्रुह्यु", "अनु" आणि "पुरू" असे तीन पुत्र झाले. ||३३|| भावार्थ;---तेव्हा देवयानीने आपल्या पतीपासून शर्मिष्ठेला गर्भ संभव झाला असे जाणून कोपिष्ठ अशी ती क्रोधाने व्याप्त होऊन ते वर्तमान पित्याला कळवण्याकरिता पित्याच्या घरी गेली.||३४|| भावार्थ:---तेव्हा तिची प्रसन्नता इच्छिणारा ययातीराजाही त्या देवयानीच्या मागून निघाला आणि मार्गामध्ये पादस्पर्शादिकेकरून व उत्तम भाषणांनी समजून करूनही तिला प्रसन्न करून घेण्यास तो समर्थ झाला नाही.स्त्रीधर्मानुसार देवयानी राजास प्रसन्न झाली नाही.आपल्या पतीने इतर स्त्रीसी शरीर-संबंध झालेला कोणत्याच स्त्रीस सहन होत नाही,व ते स्वधर्मादृष्ट्या योग्यहि नाही.||३५|| | शुक्रस्तमाह कुपितः स्त्रीकामानृतपुरुष | त्वां जरा विशतां मन्द विरुपकरणी नृणाम् ||३६|| भावार्थ:---नंतर देवयानीने पित्याच्या घरी जाऊन तो वृतांत कळविला असता क्रुद्ध झालेला शुक्राचार्य त्या ययातीराजाला म्हणाला की,-- "हे मंदबुद्धे,स्त्रीलोभ्या,खोट्या पुरुषा,तुला मनुष्यांना विरूप करणारी जरा प्राप्त होवो".||३६|| | अतृप्तोsस्म्यद्द कामानां ब्रम्हन् दुहीतरी स्म ते | व्यत्यस्यतां यथाकामं वयसा योsभिधास्यति ||३७|| भावार्थ:---असा शुक्राचार्याचा शाप ऐकून ययाती राजा म्हणाला की,----हे ब्राहमणा तुझ्या कन्येबरोबर विषयसेवन करून अजून मी तृप्त झालो नाही,तेव्हा तुझ्या शापाने तुझ्याच कन्येचे जन्मपर्यत अनिष्ट झाले ना ?शुक्राचार्याच्या कन्याने प्रतिकूल बातमी ऐकताच शुक्राचार्यांना क्रोध आला व त्या क्रोधाच्या भारत आपण काय शाप देत आहोत असे त्यास कळले नाही,कारण क्रोध असा आपला शत्रू आहे की,आपण काय बोलत आहोत व त्या बोलण्याचा काय परिणाम होईल असे लक्षात येऊ देत नाही.म्हणून आपण--जीवांनी क्रोधाच्या भारत कान्हो न बोलता स्तब्ध बसून,भगवंताचे स्मरण करावे व क्रोध शांत झाले असता पुढील कृती करावी.तेव्हा शुक्र म्हणाला---असे जर आहे तर जो कोणी तुझा स्नेही किंवा पुत्र,तुला आपले तारुण्य देऊन तुझी जरा घेईन त्याला तू ती जरा यथेच्छ्पणें द्दावीस व त्याचे तारुण्य घेऊन विषयभोग करावास.||३७|| | इति लब्धव्यवस्थान: पुत्रं ज्येष्ठमवोचतः | यदो तात प्रतीच्छेमां जरां देहि निजं वयः ||३८|| | मातामहकृतां वत्स न तृप्तो विषयेश्वम् | वयसा भवदियेनं रंस्ये कतीपयाः समाः ||३९|| भावार्थ:---अशी अवस्था प्राप्त झाली असता जरा ग्रस्त जालेला तो ययाती राजा आपल्या नगरात येऊन यदुनामक आपल्या ज्येष्ठपुत्रास म्हणाला की,बा यदो हि तुझ्या मातामहाने केलेली जरा तू ग्रहण कर आणि आपले तारुण्य वय मला दे,हे वत्सा अजून मी विषयसेवनाविषयी तृप्त झालो नाही म्हणून तुझ्या तारुण्यवयाने काही संवत्सरपर्यत विषय सुखाचा अनुभव घेईन.आपण--जीवांनी असा विचार करावी की,आपला पुत्र आपल्यापेक्षा तरुण आहे व तरुणास विषयाभोगांची गरज पित्यापेक्षा अधिक असते,म्हणून असा प्रश्न तरुण पुत्रास करू नये.असे असले तरी,विषय हे असे असतात की,विषयांची ज्यांना आसक्ती लज्जा त्यांना लाज्ज नावांचा पदार्थ त्यांच्याजवळ मुळीच नसतो.असे ते निर्लज्ज असतात.आपण कोणासमोर कोणती मागणी करत आहोत,असे त्यांना भान नसते.त्यांची बुद्धि भर्ष्ट झालेली असते.म्हणून विषय हे दु:खास कारण असून नाशिवंत आहेत,असे समजून त्यांचा त्याग करावा.सत्संग करून विवेकाद्वारे विषयांच्या भोगत दु:ख आहे व विषयांच्या त्यागातच सुख आहे,म्हणून विषयांचा त्यागच करावा.||३८||३९|| | नोत्सहे जरसा स्थातुमन्तरा प्राप्तया तव | अविदित्वा सुखं ग्राम्यं वैतृष्णयं नैति: पुरुषः ||४०|| भावार्थ:---तेव्हा यदु म्हणाला,हे पित्या मध्येच प्राप्त होणाऱ्या तुझ्या जरेने(म्हातारपणाने)युक्त होऊन राहण्याविषयी मी इच्छित नाही. कारण विषय सुख कसे आहे ते जाणल्यावाचून त्याविषयीं पुरुष वैराग्य पावत नाही,म्हणून वैराग्य झाल्याखेरीज मी आपले तारुण्य वय देण्यास इच्छित नाही.||४०|| भावार्थ:---हे भारता राजा,नंतर ययाती पित्याने जरा घेण्याविषयी प्रेरणा केलेल्या "तुर्वसू","द्र्ह्यू" व "अनु" ह्या तीन पुत्रानींही त्याचे यदुसारखे प्रत्याख्यान केले.कारण ते पित्याच्या आज्ञेनुसार वागणे हा श्रेष्ठ धर्म आहे हे न जाणारे असून अनित्य देहाचे ठिकाणी नित्य अशी बुद्धी धरण करणारे होते.आपण--जीवानी मात्र सत्संग करून देह हा मिथ्या असून दु:ख देणारा आहे,असा निश्चय करावा.||४१|| भावार्थ:---नंतर वयाने सर्वापेक्षा लहान व विनयादिक गुणांनी सर्वापेक्षा अधिक अशा आपल्या पुरुनामक पुत्राला ययातीने प्रश्न केला की, हे वत्सा,माझी जरा घेऊन तू आपले तारुण्य मला देशील काय ? वडील भावांप्रमाणे तू माझे प्रत्याख्यान करण्यास योग्य नाही. ||४२|| | को नु लोके मनुष्येन्द्र पितुरात्मकृतः पुमान् | प्रतिकर्तुं क्षमो यस्य प्रसादाद् विन्दते परम् ||४३|| भावार्थ:---ते ऐकून पुरू म्हणाला की,हे मनुष्येंद्रा,ज्याच्या अनुग्रहाने,पुरुष ऐहिक व पारलौकिक पुरुषार्थाला पावतो,त्या आपल्या उत्पादक पित्याचा प्रत्युपकार करण्यास या लोकामध्ये कोण बरे पुरुष समर्थ आहे ?कोणीच नाही,कारण देहालाच आत्मा मानणारे लोक जास्त आहेत.म्हणून कोणीही विषयांमुळे सुख होते असे मानणारे लोक अधिक आहे. ||४३|| | उत्तमच्छिन्तित कुर्यात् प्रोक्तकारी तु मध्यमः | अधमोsश्रद्धया कुर्यादकर्तोच्चरितं पितुः ||४४|| भावार्थ:---त्यांतूनही जो पुत्र पित्याच्या मनात असलेले कार्य करितो तो "उत्तम",जो सांगितलेले तो "मध्यम",जो सांगितलेले अश्रद्धेने करितो तो "अधम" आणि जो पित्याने सांगितलेले कार्य अश्रध्देनेसुध्दा करीत नाही तो उत्तम करीत नाही तो "विष्ठेसारखा" होय. म्हणून आपण--जीवानी उत्तम पुत्र होण्याचा प्रयत्न करावा,तर अधम किंवा विष्टेसारखा पुत्र होण्याचा प्रयत्न करू नये.यासाठी सत्संग करावा.सत्संग केला असे काळात असते.||४४|| | इति प्रमुदितः पूरुः प्रत्यगृन्हाज्जरां पितुः | सोsपि तद्वयसा कामान् यथोवज्जुजुषे नृपः ||४५|| भावार्थ:---असे बोलून हर्षयुक्त झालेल्या त्या "पुरूने" आपले तारुण्य वय देऊन पित्याची जरा ग्रहण केली.नंतर हे राजा,तो ययातीराजाहि पुरूने दिलेल्या तारुण्याच्या योगेकरून सुखाने विषयांचा उपभोग करू लागला.आपण पुरूंचा आदर्श घेऊन उत्तम पुत्र होण्याचाच प्रयत्न करावा.त्यातच वास्तविक हित आहे.विषयांचा भोग घेण्यात अहित आहे.||४५|| भावार्थ:---ज्याची इंद्रिये कधीच श्रम न पावणारी (दृढ) आहेत व जो सप्तद्वीपवती पृथ्वीचा अधिपती आहे.अशा त्या ययाती राजाने उत्तम प्रकारे पित्यासारखे स्नेहाने प्रजांचे पालन करून जशी प्रीति वाटेल तशा रीतीने विषयांचे सेवन केले. ||४६|| भावार्थ:---त्यावेळी त्याला अत्यंत आवडणाऱ्या देवयोनिनेही प्रतिदिवशी अतिशय स्नेहाने,मधुर भाषणाने,शुश्रुषेने व इष्टवस्तूंच्या समर्पणाने एकांतस्थली त्या आपल्या प्रियपतीची परम प्रसन्नता संपादन केली.आपण जर एकाद्दाची पत्नी अस्सल तर ज्याप्रमाणे देवयोनीने प्रति दिवशी स्नेहाने--प्रेमाने,मधुर भाषणाने,शुश्रुशेने व इष्टवस्तूंच्या समर्पणाने म्हणजे पतीकडून कोणत्याही वस्तूची अपेक्षारहित सेवा करावी.यास "पतीच्या प्रेमाचे सेवा" असे म्हणतात,तर वस्तूंची अपेक्षा ठेऊन केलेली सेवा विषयांची असते.||४७|| भावार्थ:---नंतर त्या राजाने सर्ववेदांचे तात्पर्यभूत व सर्वदेवमय अशा यज्ञफलदात्या श्रीहरी देवाचे पुष्कळ दक्षिणा युक्त यज्ञांनी आराधन केले.||४८|| भावार्थ:---तो श्रीहरी असा की,--–जशी आकाशाचे ठिकाणी उत्पन्न झालेली मेघांची पंक्ति,केव्हांतरी भासते व केव्हांतरी भासत नाहीं, त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी ही जग,ज्यांनें निर्माण केलें असतां व्यवहारस्थितीचेवेळी जोपर्यंत इंद्रियांची प्रवृत्ति आहे तोपर्यंत,स्वप्न,माया व मनोरथ यांच्याप्रमाणे नानाप्रकारें भासते व सुषुप्तीचे वेळी इंद्रियवृत्तीचा उपराम झाला असतां मुळीच भासत नाहीं. ||४९|| भावार्थः---त्याच सर्वांतर्यामी अतिसूक्ष्म नारायण वासुदेवांचे ह्रदयाचे ठिकाणी ध्यान करून फळाकांक्षेनेंरहित,अशा त्यानें भगवंताचे आराधन केले.आपण--जीवांनी ज्याप्रमाणे ययाती राजाने निष्काम--फळाकांक्षेनेरहित सेवा केलीत्याप्रकारे आपण--जीवानी सेवा करावी,कारण अशा प्रकारची सेवा भगवंताकडे--सुखरुपतेकडे नेत असते,तर संसाराकडे--दु:खाकडे नेत नसते.||५०|| | एवं वर्षसहस्त्राणि मनःषष्ठैर्मनः सुखम् | विदधानोsपि नातृप्यत् सार्वभौमः कदिन्द्रीयै: ||५१|| भावार्थः---याप्रमाणे ज्यामध्यें मन सहावें आहे अशा विषयासक्त पांच इंद्रियांनी विषयोपभोग करीत असणाराही तो सार्वभौम ययाति राजा,तृप्त झला नाहीं.आपण--जीवानी विषयांचा मनसहित पांच इंद्रियांनी भोग घेतला तरी ज्याप्रमाणे राजा ययाती तृप्त झाला नाही,त्याचप्रमाणे आपणही--जीवही तृप्त होणार नाही,म्हणून आपण--जीवांनी विषयांचा त्याग करून परमात्मा जो सुखरूप आहे,त्याचाच भोग घ्यावा. ||५१|| १८-----याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातीलनवम(९)स्कंधातील ययातिचरितनिरूपणनामक हा अठरावा(१८)अध्याय एकावन्न(५१) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१८||" | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________ १९-----आता ह्या एकुनिसाव्या अध्यायामध्ये ययातीराजाने आपले आचरण बोकडाच्या रूपाने देवयानीला ऐकवून विरक्त होत असता मुक्ती पावला अशी कथा वर्णन कलेली आहे.||१९|| | ६---ययाती चरित्र---[२---ययातीचा गृहत्याग] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रकारेकरून स्त्रीच्याठिकाणी वश असलेला तो ययाती राजा,विषयाचा उपभोग करीत असता, भगवदाराधानाच्या प्रभावाने विषयभोगापासून विरक्त होऊन आपला विषयासक्तपना जाणून त्याने देवयानील अशी कथा सांगतली की-- ||१|| भावार्थ:---हे देवयानी,या भूमीवर ज्या कामातून गृहस्थाश्रम्याचा,वनात राहणारे जितेंद्रिय पुरुष,'अरेरे याचे कल्याण कसे होईल म्हणून' शोक करीत असतात त्या माझ्यासारख्या पुरुषाने आचरण केलेली हि गाथा श्रवण कर.||२|| भावार्थ---कोणी एक बोकडा--आपण--जीव वनामध्ये(संसारामध्ये) आपले प्रिय(विषयसेवान) कोठे होईल याचा शोध करीत फिरत असता त्याने विहिरीत--संसारात पडलेली आपल्या कर्माधीन असलेली एक बकरी--स्त्री पाहिली.||३|| भावार्थ---तेव्हा त्या कामातुर--विषयांच्या सेवानांची तीव्र इच्छा असलेली बोकडाने आपण--मनुष्य--जीवानी त्या बकरीला--स्त्रीला विहिरीतून--संसारातून बाहेर काढण्याविषयी विचार योजून विहिरीच्या काठी असलेली माती वगैरे आपल्या शिंगांच्या अग्राने--आपल्या अंगावरील वस्त्राच्या साह्याने खणून--सोडून तिला--स्त्रीला बाहेर पडण्याचा मार्ग केला.||४|| भावार्थ---नंतर त्या सुंदर बकरीने--स्त्रीने विहिरीतून बाहेर पडून त्याच बोकडाला--राजा ययातीला पती वरिले तेव्हा त्या बकरीने--स्त्रीने वरिलेल्या--पती म्हणून स्वीकारीलेल्या त्या बोकडाला--ययाती राजास पाहून,पतीची इच्छा करणाऱ्या दुसऱ्याही पुष्कळ बकऱ्यांनी--स्त्रियांनी,||५|| भावार्थ---अतिप्रिय,रतिसुख देणारा,मैथुन करण्यामध्ये निपुन व सर्व अवयवांनी पुष्ट अशा त्याच बोकडाला--राजा ययातीस वरिले.तेव्हा तो एकटाच महाबस्त--एकटाच त्या पुष्कळ बकऱ्यांना--स्त्रियांना रतीसुखाची वृद्धी करीत असता स्वत: कामरूप पिशाच्चाने--वेडेपणाने ग्रस्त--आसक्त होऊन त्यांच्याबरोबर क्रीडा करू लागला आणि त्याने आपली स्थिती पुढे काय होणार हे मूळच जाणले नाही.जो विषयांत आसक्त झालेला पुरुषांना किंवा स्त्रियांना भावी आसक्तीचा परिणाम दु:खात असतो हे कळत नाही,तर सुखच मिळते असे त्यांना वाटत असते.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून विषय हे सुखाला कारण नसून,दु:खाला करण आहेत,असे जाणून त्या विषयांच्या आसक्तीचा त्याग करून,परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||६|| भावार्थ:---त्याचा बस्ताला--एकटाच हा दुसऱ्या अतिप्रिय बकरी बरोबर क्रीडा करणारा आहे असे पाहून कुपांत पडून भ्यालेल्या व बस्ताने-एकट्याने बाहेर काढलेल्या त्या पहिल्या बकरीने--देवयानीने बस्ताचे--एकट्याचे--ययातीचे कर्म सहन केले नाही.||७|| भावार्थ:---आणि तिने--देवयानीने--स्त्रीने कपट करणारा,वरकर्मी प्रेम भासणारा,क्षणिक सख्या धारण करणारा,कामातुर व इंद्रीयांची मात्र तृप्ती करणारा अशा त्या बस्ताचा--ययातीचा--पुरुष्याचा त्याग करून दु:खित होत्साती--होऊन आपल्या पित्याकडे जावयास निघाली.||८|| भावार्थ:---तेव्हा स्त्री वश असल्यामुळे दीन असा तो बस्तहि--ययाती--पुरुष तिला प्रसन्न करून घेण्याविषयी तो समर्थ झाला नाही,कारण कोणत्याही स्त्रीस व पुरुषास आपला पती किंवा पत्नीस इतर पुरुषांचा किंवा इतर स्त्रियांना संबंध आलेला सहन होत नाही.म्हणून तो आपल्या देवायानीस प्रसन्न करू शकला नाही.म्हणून आपण--जीवांनी आपल्याच पतीचा किंवा पत्नीचा भोग घ्यावा व इतर पुरुषांचा किंवा स्त्रियांचा भोग घेऊ नये,कारण तो भोग दु:खास कारण आहे.||९|| भावार्थ:---तेथे स्वामी कोणी एक ब्राहमण होता,त्याने रागाने त्या बोकडाला--ययाती राजाला--पुरुष्याला लोंबत असणारा वृषण तोडून टाकीला,म्हणजे त्याला म्ह्तारापन देऊन स्त्री संभोग करण्यास असमर्थ केले व पुन्हा आपल्या बकरीच्या--कन्याच्या--देवयानीच्या कामोपभोगाकारीतां उपाय योजनाऱ्या त्या ब्राह्मणाने--शुक्राचार्यांने तो वृषण साधिला म्हणजे जरेचा मोबदला तारुण्य घेऊन,संभोग करण्याची शक्ती दिली.आपणास--जीवास क्रोध आसतांना कांही कार्य केले तर त्या कार्यापासून सुख न होता दु:ख होते,म्हणून आपण--जीवानी क्रोधात कोणतेही कार्य न करता,भगवंताचे नामस्मरण करावे व क्रोध निवृत्त झाल्यानंतर कार्य करावे.असे कार्य केले असता ते कार्य दु:खास कारण न होता सुखास कारण होते.||१०|| भावार्थ:---पुढे साधलेल्या वृषणाचा तो बोकडाही--राजा ययाती--आपण--जीव विहिरीत सापडलेल्या त्या बकरी--स्त्रीपासून बरोबरबहुत दिवस विषयभोग करीत असून त्या विषयांनी अजूनही तृप्त नाही.आपण या ययातीच्या उदा--विषयांचा कितीही भोग घेतला तरी तृप्ती न होता विषयांची कामना कमी होण्यापेक्षा वाढतच असते.म्हणून आपण-जीवांनी विषयांच्या भोगांचा त्याग करून विषयरहित जो परमात्मा आहे,त्याचा अनुभव घ्यावा.त्याचा अनुभव घेतला असता आपण--जीव सुखरूप होतो. ||११|| भावार्थ:---हे सुंदरी देवयानी त्या बोकडाप्रमाणे--राजा ययातीने मीही--देवयानी तुझ्या--ययातीच्या प्रेमाने वश केला जाऊन तुझ्या हावभाव रूप मायेने मोहित होत असता अजूनही आपला परमार्थ जाणत नाही.थोडक्यात स्त्री असो किंवा पुरुष असो,त्या उभयांताचा परमार्थ न होता संसारच होतो.||१२|| भावार्थ:---बरे तर पुनरपि पुष्कळ विषयसेवन करा म्हणजे मन तृप्त झाल्यावर कामाची शांतता होऊन मोहनिवृत्ती होईल असे म्हणशील तर---पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ,गहू,सोने,पशु स्त्रियां वगैरे विषय आहेत ते विषय वासनांनी ग्रस्त--आसक्त झालेल्या पुरुषाच्या मनाचा संतोष करण्याकरिता कधीही पुरे पडत नाही.म्हणून आपण--जीवानी सर्व विषयांचा त्याग करून सत्संग करून सत्संगाच्याद्वारे आपण--जीवाने चित्त परात्मारूप करावे.||१३|| | न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति | हविषा कृष्णवर्त्मैव भूय एवभिवर्धते ||१४|| भावार्थ:---कारण विषयांच्या उपभोगानें विषयभोगाची तृष्णा कधीही शांत होत नाही तर,तुपाच्या योगाने अग्नी जसा उत्तरोत्तर प्रदीप्तच होत जातो त्याप्रमाणे पुन्हा अधिकच वाढत जातो.म्हणून आपण--जीवांनी विषयांपासून इंद्रियांना आवरा म्हणजे नियंत्रित करावे.||१४|| | यदा न कुरुते भावं सर्वभूतेष्व मन्गलम् | समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः ||१५|| भावार्थ:---केव्हा संतोषपूर्वक सुख होईल असे म्हणशील तर जेव्हा---पुरुष सर्व पदार्थाचे ठिकाणी हा चांगला व हा वाईट असा भेदभाव करीत नाहीसा होतो म्हणजे विवेकाद्वारे सार व असार यांचा निवाडा करतो,तेव्हा सर्वत्र समदृष्टी ठेवनाऱ्या त्या पुरुषाला सर्वही दिशा सुखमय होतात म्हणजे कोठेही गेला तरी त्याला सुखच मिळते.म्हणून आपण--जीवांनी सत्संग करून वेवेकाद्वारे सार आणि असार यांचा निवडा करून सर्वत्र समदृष्टी ठेवावी,कारण त्यामुळे आपले--जीवांचे जीवन सुखमय होते.||१५|| | या दुस्त्यजा दुर्मतिभिर्जीर्यतो या न जीर्यते | तां तृष्णां दुःखनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत् ||१६|| भावार्थ:---जी तृष्णा अविवेकी पुरुषांना टाकण्यास अशक्य आहे वयाची हानी पावनाऱ्याही पुरुषाची जी तृष्णा जिरून जात नाही त्या अत्यंत दु:खे देणाऱ्या तृष्णेचा सुखेच्छे पुरुषाने सत्वर त्याग करावा.आपण--जीवांनी विषयांच्या तृष्णेचा त्याग करावा,कारण विषयांत सुख नसून दु:ख आहे.ज्यामुळे दु:ख अनुभवयास येते त्यांचा त्याग करावाच.असे असले तर आपण--जीव विषयांचा त्याग का करीत नाही,कारण सत्संगाचा अभाव व दु:संगाचा स्वीकार,म्हणून विषयांचा त्याग होत नाही,म्हणून सत्संग करा.सत्संग केला असता विवेकाचा उदय होईल व विवेकाच्या द्वारा असार व सारचा निवडा करता येईल,असार व सारच निवडा केला असता.असराचा त्याग होईल व साराचे स्वीकार होऊन जीवन सुखमय बनेल.||१६|| | मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा नाविवीक्तासनो भवेत् | बलवानिन्द्रियग्रामो विद्वांसमपी कर्षति ||१७|| भावार्थ:---आता स्त्रीचे सानिध्या तर सर्वथा वर्ज्य करावे.असे सांगतो---आई,बहिण व कन्या याच्याबरोबर सुद्धा एका आसनावर पुरुषाने बसू नये.कारण बलवत्तर असा इंद्रियाचा समुदाय विवेकी पुरुषालाही त्यांजकडे पाहणे कारणे इत्यादिकांविषयी प्रवृत्त करितो.आपली--जीवांची जी शरीरातील जी ज्ञानेंद्रिय इंद्रिये त्यांची धाव विषयांकडेच असते,तर स्वत:कडे--स्वता:च्या स्वस्वरूपाकडे नसते.त्यामुळे जीवाचे अहित होते म्हणजे दु:ख अनुभवयास येते.म्हणून आपण--जीवांनी इंद्रियें अंतर्मुख करून स्वस्वरूपाकडे प्रयत्नपूर्वक करावे,कारण आत्मा आंत आहे व जे दु:खदायक विषयें ते बाहेर आहेत.अंत:करण,इंद्रियें व विषय हि अपंचीकृतपंचीमहाभूतांची आहेत.म्हणून स्वाभाविक त्यांची धावा विषयांकडेच असते,म्हणून--जीव हा परमात्म्याचाच आहे,म्हणून आपली--जीवाची स्वाभाविक धाव परमात्म्याकडेच आहे.म्हणून जीव आणि अंत:करण,इंद्रियें व विषय यांची नाते--संबंध भिन्न--भिन्न आहे.यातील आत्मा--परमात्मा हा आपण--जीव आहे व अंत:करण,इंद्रियें व विषय अनात्मा आहेत.आपण--जीवांनी मागील अंत:करणातील संस्कार अनात्म्याचेच अधिक आहेत व आत्म्याचे संस्कार अल्प आहेत.म्हणून ज्याचे अधिक्य अधिक आहे,त्याचे प्राबल्य सहजच अधिक असते.अनात्म्याचा अधिक्य जरी अधिक असले,तरी अनात्मा हा जड आहे,व जीवात्मा दृष्टा--जाणणारा--कळणारा आहे.अनात्मा यांचे अधिक्य कितीही असले,तरी ते जड-म्हणजे न कळणारे आहे,व आत्मा--जीवात्मा एक असला,तरी मुख्य म्हणजे दृष्टा--जाणणारा--कळणारा आहे.जीवात्म्याच्या बाजूने दृष्टा-कळणारा हि बाजू फारच महत्वाची आहे.अनात्मा जरी अनेक असले तरी,त्यांना न कळणे हि उणीवच आहे,त्यामुळे कळणारा हा न कळणाऱ्यापेक्षा फारच श्रेष्ठ आहे.उदा--अनात्मा हे सर्व--अंत:करण,इंद्रियें,विषय व संस्कार जड म्हणजेच दगडासाराखेच आहेत.जीव हा चित्+जड =जीव आहे.म्हणून जीव हा दृष्टा--कळणारा हि बाजू फारच महत्वाची असल्यामुळे आपण--जीवांनी सत्संग करून विवेकाद्वारे शम,व दम या साधनाने मोक्ष संपादन करावा.||१७|| भावार्थ:---वारंवार विषयांचे सेवन करनाऱ्याहि माझी ह्जार वर्ष पुरी झाली तथापि त्या विषयांच्या सेवनकली त्या--त्या विषयांचे ठिकाणी तृष्णा उत्पन्न होते ती शांत होत नाही.राजा ययातीने विषयांचे सेवन एक हजार वर्षे केले,पण तृप्ती झाली नाही,म्हणून आपण जीवांनी विषयांचा भो न घेता त्याग करून सुखरूप असलेला परमात्मा,त्याचा सर्व विषयांचा त्याग करून अनुभव घेवा.त्यामुळे आपले जन्म-मरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते. ||१८|| भावार्थ:---म्हणून आता मी ह्या तृष्णाचे त्याग करून व आपले मन,ब्रम्हरूप भगवंताचे ठिकाणे स्थिर करून सुखदु:खादी द्वंद्व रहित व अहंकाररहित होऊन हरीणाप्रमाणे अरण्यांत संचार करितो.आपण--जीवांनी सर्व विषयांच्या वासनांचा त्याग करून जो परमात्मा सुखदु:खादि द्वंद्वरहित सुखरूप असलेला त्याचाच अनुभव घ्यावा.||१९|| | दृष्टं श्रुतमसद्य बुद्ध्वा नानुध्यायेन्न संविशेत् | संसृतिं चात्मनाशं च तत्र विद्वान् स आत्मदृक् ||२०|| भावार्थ:---बरे विषयवासना सोडणे हे फार दुष्कर असल्यामुळे ब्रहमाचे ठिकानि कसे स्थिर करिता येईल असे म्हणशील तर---या लोकीचे पाहिलेले व परलोकीचे ऐकीलेले सर्व विषय,तुच्छ आहेत असे जाणून,त्या विषयांच्या चिंतनानेच जन्ममरण रूप संसार प्राप्त होतो व सुखाचा नाश होत असे जाणणारा जो पुरुष,त्या दृष्टश्रुत विषयांचे चिंतन कतीत नाही उपभोगही करीत नाही तोच पुरुष,विषय वासनांचा त्याग करून आत्मदृष्टा होतो.आपण--जीवानी विषय हे तुच्छ व दु:खदायक असून त्या विषयांचा दोष जाणून,त्या विषयांचा त्याग करावा व आपण--आत्मदृष्टा आहोत असे जाणावे. ||२०|| | इत्युक्त्वा नाहुषो जायां तदीयं पूरवे वयः | दत्वा स्वां जरसं तस्मादाददे विगतस्पृहः ||२१|| भावार्थ:---या प्रकारे करून त्या ययातीराजाने देवयानीला सांगून व स्वत: विषय भोगाविषयी निरिच्छ होऊन आपल्या पुरुनामक पुत्राला त्याचे तारुण्य वय देऊन त्यापासून आपली जरा स्वीकारीली.आपण--जीवांनी ययाती राजा ज्याप्रमाणे निरिच्छा झाला,त्याचप्रमाणे आपण स्वत:विषय भोगाविषयी निरिच्छा होऊन आपल्या पुत्राला किंवा शिष्यास देऊन आश्रमाचा किंवा घराचा त्याग करावा.||२१|| भावार्थ:---नंतर त्याने आग्नेय दिशेचे ठिकाणी आपल्या ब्रूह्युनामक पुत्राला दक्षिण दिशेचे यदुपुत्राला,पश्चिम दिशेचे ठिकाणी तुर्वसुला व उत्तर दिशेचे ठिकाणी अनुला राज्याधिकार दिला. ||२२|| भावार्थ:---आणि वयाने कनिष्ट परंतु गुणांनी मोठा व सर्व प्रजानां अतिमान्य मान्य अशा "पुरूला" सर्व भूमंडळाच्या आधिपत्याविषयी अभिषेक करून व यदु प्रभृति सर्व वडील बंधूंना त्याच्या स्वाधीन ठेऊन तो राजा आपण अरण्यात निघून गेला. ||२३|| भावार्थ:---त्या ययाती राजाने हजारो वर्षे पर्यत शब्दादी विषयाचे ठिकाणी सेवन केलेले इंद्रिय सुख एका क्षणात जसा पंख फुटलेला पक्षी, बहुत दिवस सेवन केलेले आपले घरटे सोडून देतो,त्याप्रमाणे सोडून दिले.आपणही सर्व विषयांचा त्याग करून सत्संग करण्याकारोता एखाद्या आश्रमात जावे.||२४|| भावार्थ:---हे राजा तो प्रसिध्द ययाती राजा त्या वनामध्ये ज्याने सर्वसंग टाकला आहे व ज्याने आत्मसाक्षात्काराने त्रीगुणात्मक लिंगशरीराचा निरास केला आहे असा होऊन सर्व दोष रहित अशा वासुदेव नामक परब्रह्माचे ठिकाणी भगवदुपासनेच्या योगाने प्राप्त होणाऱ्या मोक्षरूप गतीला पावला.आपणही लिंग--शरीराचा बाध--तीनही काळात त्याचा अत्यंत आभाव करून व सर्वदोषरहित होऊन मी ब्रह्म आहेत असा निश्चय करावा.||२५|| भावार्थ:---देवयानीने पतीने सांगितलेली ती कथा ऐकून ते सांगणे आपली थटट्च केली आहे असे मानिले म्हणजे स्त्रीपुरुषांना परस्पर असलेल्या स्नेहापासून परिणामी एकमेकांच्या वियोगाने विव्हळपणा प्राप्त होतो म्हणून त्यांनी तो स्नेह सोडून मोक्षमार्ग स्वीकारण्याबद्दल ते सुचविलेले आहे असे मानिले.ययाती राजाने देवायानीस अशा प्रकारे--बोकड व शेळी या दृष्टांताद्वारे विषयांतील दोष सांगून व ब्रह्म हेच सुखरूप आहे,असा उपदेश करून स्नेहाचा त्याग करून मोक्ष--मार्गाचा उपदेश केलेला आहे.त्याप्रमाणे आपणही तोच उपदेश श्रवण केलेला आहे,म्हणून आपण--जीवानी विषयांचा त्याग करून ब्रह्माचा अनुभव घ्यावा,आपले--जीवाचे जन्म--मरण निवृत्त करावे.यामुळे आपली अत्यंतिक जन्माची निवृत्त होऊन परानंदाची प्राप्ती झालेली आहे.||२६|| | सा संनिवासं सुहृदां प्रपायामिव गच्छताम् | विज्ञायेश्वरतन्त्राणां मायाविरचितं प्रभोः ||२७|| | सर्वत्र संगमुत्सृज्य स्वप्नौपम्येन भार्गवी | कृष्णे मनः समावेश्य व्यधुनोल्लीन्गमात्मन: ||२८|| भावार्थ:---नंतर त्या देवयानीने परमेश्वरधिन असलेल्या पती-पुत्रादिकांचा सहवास पाणशाळेचे ठिकाणी घडलेल्या पांथस्थांच्या सहवासा-- प्रमाणे अस्थिर व प्रभूच्या मायेने रचलेल्या आहे असे जाणून सर्व प्रपंचा स्वप्न प्रमाणे मिथ्या आहे असे समजून सर्वत्र असलेली आसक्ती सोडून दिली आणि श्रीकृष्णाचे ठिकाणी आपले मन स्थापन करून आपल्या लिंग शरीराचा त्याग केला म्हणजे तिहि मुक्त झाली.आपणही--जीवांनी देह--देहसंबंधीचा त्याग करून प्रपंच हा मिथ्या आहे असा निश्चय करून आपण ब्रह्माशी एकरूप व्हावे.||२७||२८|| १९-----भावार्थ:---तिने श्रीकृष्णाचे ठिकाणी मन असे लाविले की,हे प्रभो षड्नैगुश्वर्यसंपन्न जगाचे कारण सर्वांतर्यामी रागद्वेषादीरहीत व सर्वव्यापक अशा तुज वासुदेवाला वारंवार नमस्कार असो.आपणही भगवन श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपले मन स्थिर करून लावावे. ||२९|| १९-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरणातीलनवम(९)स्कंधामध्ये ययातीचरित्रकथननामक हा एकुनिसावा(१९)अध्याय ऐकोनतीस(२९) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२९|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ २०-----आतां ह्या विसाव्या अध्यायामध्ये ययातीराजाच्या प्रसन्नतेने ज्याला राज्यासन व मोठेपणा प्राप्त झाला आहे त्या पुरूच्या वंशांत झालेल्या दुष्यंतपुत्र भरताचे यश वर्णन केले आहे.||२०|| |२०--- पुरूचा वंश,राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन. ______________________________________________________________________________________________भावार्थ:---श्री शुकाचार्य म्हणाला---हे राजा,ज्या वंशामध्ये तू झाला आहेस व जेथे क्षत्रिय वंशाचे प्रवर्तक राजर्षी व ब्राहमण वंशाचे प्रवर्तक ब्राहमण श्रेष्ठ उत्पन्न झाले आहेत तो पुरूचा वंश मी तुला सांगतो श्रवण कर. ||१|| भावार्थ:---"पुरूचा" पुत्र "जनमेजय" झाला त्याचा पुत्र "प्रचीन्वान" त्यापासून "प्रवीर" झाला त्यापासून "नमस्यू" झाला त्यापासून "चारुपद" झाला||२|| भावार्थ:---त्याचा पुत्र "सुघ्यू" झाला त्यापासून "बहुगव" हाल त्यापासून "संयाति" त्याचा "आहाम्याती" व त्या आहाम्यातीचा पुत्र "रौद्रश्च" झाला ||३|| भावार्थ:---त्या रौदाश्चाला घृताची नामक अप्सरेचे ठिकाणी जशी जगाचा आत्मभूत अशा मुख्य प्राण्याच्या स्वाधीन दहा इंद्रिये असतात त्याप्रमाणे त्याच्या स्वाधीन राहणारे–--"ऋतेयु",कुक्षयू,स्थांडीलेयू,कृतेयू,जलेयू,संततेयू,धर्मेयू,सत्येयू,व्रतेयु आणि सत्वात कनिष्ठ वनेयू असे दहा पुत्र झाले".||४||५|| भावार्थ:---त्यामध्ये "ऋतेयुपासून" "रंतीभर" झाला.हे राजा त्या रंतीभाराला–--"सुमती,"ध्रुव" "प्रतिरथ" या नावाचे तीन पुत्र झाले. त्यामध्ये अप्रतीरथाचा पुत्र "कण्व" झाला||६|| भावार्थ:---त्याला "मेघातिथी" झाला त्यापासून "प्रस्कंव" इत्यादिक ब्राहमण झाले.सुमतीचा "रेभ्य" पुत्र झाला त्याचा पुत्र "दुष्यंत" म्हणून प्रख्यात झाला.||७|| भावार्थ;---दुष्यंताला शकुंतलेचे ठिकाणी "भरत" पुत्र झाला असे सांगण्या करिता त्याचा वृतांत सांगत--–एकेवेळी दुष्यंत राजा, मृग्येविषयी वनात जाऊन सहज कण्व ऋषीच्या आश्रमात गेला.त्याने तेथे बसलेली आपल्या कांतीने आश्रमस्थानाला शोभविणारी देवाची मोहिनी शक्तीचा की,काय अशी शकुंतला नामक एक स्त्री पहिली आणि तो तत्काल काम मोहित झाला.आपण--जीवानी कोणत्याच स्त्रीला मोहित होऊ नये,कारण त्यामुळे आपली अधोगती होऊन दु:खास प्राप्त होतोत.तेव्हा किती एक परीवेष्ठीत तिच्या दर्शनाने हर्षयुक्त व ज्याचे मृगयासंबंधि श्रम निवृत्त झाले आहेत परंतु कामाने संतप्त झालेला असा तो दुष्यंतराजा,हास्य करीत मधुर वाणीनें त्या सुंदरीला म्हणाला की,-------------||८||९||१०|| भावार्थ:---हे कमलपत्राक्षि,हे मनोहरे,तुं कोणत्या जातीची कोणाची कन्या आहेस ?या निर्जन अरण्यामध्यें तुं काय करावयाचे योजलें आहेस ?||११|| भावार्थ:---हे सुमध्येमें,तूं राजकन्या आहेस असें मी स्पष्ट रीतीने जाणतो.कारण पुरुवंशामध्यें झालेल्या राजांचे चित्त अधर्माचे ठिकाणी केव्हांही रामन नाही.माझे तर चित्त,तुझे ठिकाणी आसक्त झाले आहे,तेव्हां तुं राजकन्या आहेस यात संशय नाही.||१२|| भावार्थ:---शकुंतला म्हणाली---विश्वमित्राची (क्षत्रियाचीच)कन्या मी मेनका अप्सरेचे ठिकाणी झालेली आहे.तिने स्वर्गावर जातांना् मला वनांत टाकिले आहे,हे सर्व वर्तमान भगवान् कण्व-ऋषी जाणतो,त्यापासूनच मी ऐकिले आहे.हे वीरा,तुझे आम्ही कोणतें काम करावें? आपण--जीवांनी ज्याप्रमाणे शंकुतला यांनी आपले जे चरित्र यथार्थ सांगितले तेच सांगावे,तर खोटे चरित्र आपले--जीवाचे सांगू नये.||१३|| भावार्थ:---हे कमलाक्षा,तुं सुखाचे या आश्रमामध्ये बसावेस,आम्ही केलेल्या आसनादी पूजेचा स्वीकार करावास.येथे नीवार (अरण्यांतील धान्ये )आहेत,त्या अन्नाचे भोजन करावे.जर मर्जी असेल तर वस्तीलाही रहावे. ||१४|| भावार्थ:---दुष्यंत म्हणाला,हे सुभ्रु,कुशिकाच्या वंशांत झालेल्या तुला हे,तुझे काय काम करावें ? इत्यादिक बोलणे योग्यच आहे.कारण राजांच्या कन्या,आपणच योग्य अशा पतीला वरित असतात. ||१५|| भावार्थ:---नंतर तिने,दुष्यंताचे भाषण ठीक आहे,असे म्हणून अंगिकारिले असता,देशाकालांचे विभाग जाणणाऱ्या त्या दुष्यंत राजाने गांधर्व (परस्पर संकेत रूप) विधीने,धर्माप्रमाणे शकुंतलेच्या स्वीकार केला.||१६|| भावार्थ:---नंतर अमोघवीर्य अशा त्या राजार्षीने त्या शकुंतलेचे ठिकाणी वीर्य स्थापन केले आणि दुसरे दिवशी प्रात:काली तो आपल्या नगरास निघून.पुढे प्रसुतिकली ती "शकुंतला" प्रसूत झली असता तिला "भरत" नावाचा पुत्र झाला ||१७|| भावार्थ:---तेव्हां त्या कुमारचे जात कर्मादिक योग्य संस्कार कण्व ऋषीने वनामध्येंच केले.तो बालक,बलात्काराने सिंहांना बंधन करून त्यांच्या बरोबर क्रीडा करीत असे.तो भरत बालक सिंहांना बलात्काराने बंधन करीत असे.असा तो शूर होता.त्याप्रमाणे आपण--जीवानी शूर होऊन देशभक्त होऊन देशाचे सेवा करावयाची आहे.त्यामुळे आपणास--जीवास सत्गती प्राप्ती होते. ||१८|| भावार्थ:---याप्रमाणे बाल्यावस्थेपासून अपरिमित बलपराक्रमाने युक्त अशा हरीच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या त्या कुमारला ग्रहण करून,ती सुंदरी शकुंतला,भर्त्याच्या (दुष्यंताच्या) समीप भागी प्राप्त झली असता----- ||१९|| भावार्थ:---अनिंदित अशाही त्या स्त्री पुत्रांना,लोकापवादाच्या भयाने दुष्यंत राजा जेव्हां ग्रहण करीना,तेव्हां सर्व लोकांना ऐकू येण्यासारखी आकाशामध्ये जिचा वक्ता दिसत नाही अशी वाणी उत्पन्न झाली.भगवंत सर्वांचे रक्षण करितो,या न्यायाने आकाशवाणी झाली. ||२०|| भावार्थ:---ती आसी की,जसा भात हा वायू उत्पन्न होण्याचे आधार पात्र आहे तशी माता हे पुत्र उत्पन्न होण्याचे आधार--पात्रच आहे परंतु पुत्र हा पित्याचाच होय.कारण,जो पुत्र ज्या पित्याने उत्पन्न केला तो पित्याचेच स्वरूप आहे.यास्तव हे दुष्यंता,तुं पुत्राचे पोषण कर.शकुंतलेचा अवमान करूं नकोस.||२१|| भावार्थ:---रेतद्वार वंशाची वृद्धी करणारा पुत्र,यमाच्या स्थानापासून पित्याला तारितो व या गर्भाचे धारण करणारा तुंच आहेस असे जे शकुंतलेने सांगितले ते सत्य आहे.असे आकाशवाणीनें सांगितले असतां,दुष्यंत राजाने त्या स्त्रीपुत्रांचा स्वीकार केला.||२२|| भावार्थ:---पुढे दुष्यंत पिता मरण पावला असतां,तो महाकीर्तीमान् भरतहि सप्तद्विपवती पृथ्वीचा अधिपती झाला.भूमीवर भगवदंशापासून उत्पन्न झालेल्या त्या भरताचा महिमा ऋग्वेदांत वर्णन केला आहे. ||२३|| भावार्थ:---या भरताच्या उजव्या हातावर चक्राकार रेषाचिन्ह असून याच्या दोन्ही पायांचे ठिकाणी कमलाच्या कळ्यांचे रेखाकार चिन्ह होते.महाभिषेकविधीने राज्यावर अभिषेक केलेल्या त्या सार्वभौम महासमर्थ राजाने-----||२४|| भावार्थ:---सामंतेयनामक ऋषीला पुरोहित करून,गंगेच्या तीरी अनुलोम (एकापुढे एक अशाप्रकारें पंचावन्न पवित्र अश्वमेध यज्ञ करून भगवंताचे आराधन केले.तसेच पुष्कळ द्रव्याचे दान देऊन यमुनेच्या काठीही एकापुढे एक अशाप्रकारे आठ्ठ्याह्त्तर पवित्र अश्वांचे बंधन केलें म्हणजे तितक्या अश्वमेधयज्ञांनी भगवंताचे आराधन केलें.त्या दुष्यंतपुत्र भरताचा अग्नी उत्तमगुणयुक्त स्थलाचे ठिकाणी चित झाला.ज्या अग्नीचयनाच्या स्थलाचे ठिकाणी हजार ब्राह्माणांनी त्या भरताने दिलेल्या गाई,प्रत्येकाने एकेक बद्ध (१३०८४)याप्रमाणे वाटून घेतल्या.आपण--जीवानी आर्थिक सामर्थे असेल तर निष्काम भावनेने अनेक यज्ञ करावे.||२५||२६|| भावार्थ:---त्या दौश्यंती भरताने,आपल्या रथाला तेत्तीसशे (३३००) घोडे जुंपून भूमीवर संचार केला आणि आपले ऐश्वर्य दाखवून सर्व मांडलिक राजांना आश्चर्ययुक्त करून,देवांच्याहि वैभवाला मागे टाकिले व पूज्य अशा भगवंताची प्राप्ती करून घेतली.आपण--जीवानी निष्काम सत्कर्म करून भगवंताची प्राप्ती करू घ्यावी.||२७|| भावार्थ:---त्याने मष्णार नावाच्या यज्ञ कर्मामध्ये सुवर्णाने भूषित,पांढऱ्या दातांचा व काळ्यावर्णाच्या तेरा लक्ष गेजेंद्रांने ब्राह्माणांस दान केले.आपणही--जीवानी आपापल्या सामार्थ्यांनी ब्रह्म जाणणारा किंवा शट्कर्म करणारा जो ब्राह्मण आहे,त्यास दानधर्म करावा,तर तो असा नसेल तर दानधर्म करू नये,कारण असत्पात्रास दान केल्यास दान घेणारा व दान देणारा दोघांना नरकाची प्राप्ती होते.||२८|| भावार्थ:---त्या भरताचे अद्भूत कर्म,पूर्वी होऊन गेलेल्या राजांनी केले नाही,आणि वर्तमान काळचे व पुढे होणारही राजे करणार नाहीत. जसे लोक पुण्यावाचून केवळ बाहू बळाने स्वर्ग मिळवू शकत नाहीत.त्या प्रमाणे भरताने कर्म इतरांस दुर्लभ आहे.आपणास--जीवांस राजा भारतासारखे पुण्य संपादन करता न करता आले नाही तरी आपल्या अधिकारानुसार सत्कर्म करावे.||२९|| भावार्थ;---त्या भरताने दिग्वीजयाचे विळी ब्राह्मांदिकांविषयी प्रतीकुळ अशा किरात,हून,पवन,अंध,कंक,कश,शक व हिनजातीचे तिचे राजे या सर्वास मारून टाकिलें.आपण--जीवांनी आपले परमार्थातील जे काम,क्रोध,लोभ.मोह,मद.मत्सर शत्रू यांना आपल्या--जीवांच्याताब्यात ठेवावे व त्यांचा परमार्थ करण्यासाठी उपयोग करावा.||३०|| भावार्थ:--- आणि पूर्वी जे असुर,देवांना जिंकून पाताळ लोकी जाऊन राहिलेले होते त्यांस जिंकून,त्या बलाढ्य असुरांनी ज्या देवांच्या स्त्रिया पाताळात नेल्या होत्या त्या पुन्हा परत आणिल्या.आपण--जीवांनी याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे,तो नाहीसा करून,त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.||३१|| भावार्थ:---तो भरत राजा राज्य करीत असता त्याच्या राज्यातील सर्व प्रजांना,स्वर्ग व भूमी यांनी इच्छित पदार्थांचे समर्पण केले. याप्रमाणे सत्तावीसहजार वर्षे पर्यंत त्यानें आपली आज्ञा चालविली. ||३२|| भावार्थ:---नंतर त्या सार्वभौम भरत राजाने,आपले आपले इंद्रादि लोकपालांचे ठिकाणीही प्रख्यात असलेले ऐश्चर्य,सार्वभौम संपत्ती, अस्खलित आज्ञा व प्राण हि सर्व मिथ्याभूत आहेत असा निश्चय करून त्यांपासून विरक्त होऊन भगवत्स्वरूपाच्या चिंतनानें त्याची प्राप्ती करून घेतली.आपणही--जीवांनी हे सर्व अनात्म वैभव मिथ्या आहे,असे जाणून त्यापासून विरक्त होऊन भगवंताचे चिंतन करीत--करीत चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे,परमात्म्याचा अनुभव घेतला.||३३|| भावार्थ:---हे राजा,विदर्भराजाच्या तीन कन्या व त्या भरत राजाच्या आवडत्या स्त्रिया होत्या त्यांनी आपणांस झालेल्या पुत्रांस,हे पुत्र माझ्यासारखे नाहींत असें पतीनें भाषण केल्यावरून हे पुत्र पुन्हां राजाच्या दृष्टीस पडले तर,आपल्यासारखे नाहीत बुद्धीनें राजा, आमच्यावर व्यभिचाराचा आरोप ठेऊन आमचा त्याग करील अशा भयानें,मारून टाकिलें. ||३४|| भावार्थ:---त्याप्रमाणे त्या भरताचा वंश व्यर्थ झाला असतां,पुत्रा करितां,मरूत्स्तोनामक यज्ञानें आपलें आराधन करणाऱ्या त्या राजाला प्रसन्न झालेल्या मृरुत्देवांनी "भरद्वाज" नावाचा पुत्र आणून दिला.||३५|| भावार्थ:--मरूतांना भरद्वजाची प्राप्ती कशी झाली तें सांगतो---ऐकेवेळी बृहस्पती,आपल्या उतथ्यनामक भ्रात्याच्या गर्भिणी असलेल्या ममतानामक स्त्रीचे ठिकाणी चौर्यानें मैथुन करण्यास प्रवृत्त झाला असतां,दुसऱ्या गर्भाला राहण्यास अवकाश नसल्यामुळें तिच्या उदरांत असलेल्या गर्भानें आक्रोशपुर्वक त्या बृहस्पतीचें निवारण केलें.तेव्हां क्रुद्ध झालेल्या बृह्स्पतिनें तू आंधळा हो असा त्या गर्भाला शाप देऊन बलात्कानें वीर्य स्थापन केले.त्यावेळी बृहस्पतीच्या शापाने गर्भात असलेला तो दीर्घतमा पुत्र आंधळा झाला व त्यानें बृहस्पतीचें वीर्य खोंटेची लाथ मारून योनीच्या बाहेर ढकलून दिलें.तें भूमीवर पडताच तत्काळ पुत्र झाला.||३६|| भावार्थ:--- त्या परविर्यापासून झालेल्या पुत्राचा त्याग करण्याची इच्छा करणाऱ्या व पती आपला त्याग करील अशी शंका मनांत आणणाऱ्या ममतेला देवांनी,त्या बालकांचे नांव उत्पन्न करणारा बृहस्पतीचा व ममतेचा संवाद हा एक श्लोक गायन आहे.त्यांत पुत्राचा त्याग करून जाणाऱ्या ममतेला बृहस्पति म्हणतो---हे मुढे या पुत्राचे तू पोषण कर.भ्रर्त्यापासून मी भीत आहे असे म्हणत असशील तर ---हा पुत्र माझे वीर्य व त्याचे क्षेत्र या दोहोंपासून झालेला असल्यामुळे त्याचाही आहे,म्हणून त्यापासून तुला भयशंका नाही तेव्हां ती बृहस्पतीला म्हणाली--–हे बृहस्पते,तुहि याचे पोषण कर.कारण हा तुझ्या व माझ्यापासून झालेला असल्यामुळे मीच एकटी याचे पोषण करणार नाही.असे बोलून विवाद करणारी ती उभयतां (ममता व बृहस्पती )शेवटी ज्या अर्थी ह्या पुत्राचा तेथेच त्याग करून निघून गेली त्या अर्थी हा पुत्र "भरद्वाजनामक" झाला. ||३८|| भावार्थ:---याप्रमाणे देवांनी सुचविलेल्या त्या ममतेने,व्यभिचारपासून झालेला हा पुत्र निरर्थक आहे असे मानून त्याचा केल्यावर,पुढे मरुत् देवांनी त्यांचे पोषण केले.तो हा पुत्र,भरताचा वंश व्यर्थ झाला असतां त्यांनी आणून दिला म्हणून "वितथ" या नावाने प्रसिध्द झाला.||३९|| २०-----याप्रमाणे श्रीमद्भावातनामक महापुराणामतीलनवम(९)स्कंधामध्ये भरतचरितकथनरूप हा विसावा(२०)अध्याय ऐकोणचाळीस(३९) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२०|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________२१-----आता ह्या एकविसाव्या अध्यामध्ये,ज्या व जांची कीर्ती विस्तार पावली आहे तो भरताच्या "वितथनामक--पुत्राचा" वंश वर्णन केले आहे.||२१|| |२१--- भरतवंशाचे वर्णन,राजा रंतिदेवाची कथा ______________________________________________________________________________________________भावार्थः---श्री शुकाचार्य म्हणाला---हेराजा,"विताथाचा" पुत्र "मन्यु" झाला.त्यापासून "बृह्त्क्षत्र","जय","महावीर्य","नर" आणि "गर्ग" असे पाच पुत्र झाले.त्यापैकी "नराचा" पुत्र "संकृती" झाला.||१|| भावार्थः---हे पांडूनंदना,संकृतीला "गुरु" आणि "रंतिदेव" असे पुत्र झाले.त्या मध्ये रंतिदेवाचे यश तर यालोकी व परलोकी गात असतात.||२|| भावार्थः---ते असे की,उद्दोगावाचून केवळ दैवाने पाप्त झालेल्या द्रव्याचा उपभोग करणारा,क्षुधाक्रांत असतांही जे जे प्राप्त होईल ते ते याचकांस देणारा,संध्याकालच्या किंवा दुसऱ्या दिवसाच्या भोजनाकरिता अन्नादिकांचा संग्रह न करणारा,धैर्यवान,कुटुंबासहवर्तमान क्लेश पावणारा----||३|| भावार्थः---ज्याचे कुटुंब क्लेश पावत असे व ज्याच्या शरीराचे ठिकाणी क्षुधा व तृषा यांचा योगाने कंप उत्पन झाला आहे अशा त्या रंतिदेवाचे,उदकसुद्धा प्राप्त झाल्याखेरीज खरोखर अठेचाळीस दिवस निघून गेले नंतर एकोणपन्नासाव्या दिवशी दैववशात कोणी एकाने त्याला तूप,पायस,सांजा आणि पाणी हे पदार्थ आणून दिले.नंतर भोजनकाली कुटुंबासह वर्तमान त्याने भोजन करण्याची इच्छा केली असता,कोणीएक ब्राहमण अतिथी प्राप्त झाला.||४||५|| भावार्थः---तेव्हा त्या रंतिदेवाने त्याचा आदर करून दानश्रद्धेनेयुक्त होऊन,हरीची सर्वभूतांचे ठिकाणी भावना करीत त्या अथितीला तूप,पायस,सांजा यांतील अन्न वाढिले.तेव्हा तो ब्राहमण,भोजन करून गेला.आपण--जीवांनी ज्याप्रमाणे रंतिदेवांनी आलेल्या अथितीला अन्न देऊन तृप्त केले,त्याप्रमाणे आपल्या घरी जर अथिती आला तर प्रथम अथितीला अन्न देऊन तृप्त करावे.त्यानंतर आपण आपल्याला व कुटुंबाला तृप्त करावे.||६|| भावार्थः---हे भूमीपते राजा,नंतर ब्राहमण भोजन होऊन अवशिष्ट राहिलेल्या अन्नादिकांचे आपल्या कुटुंबाकरीता विभाग करून तो रंतिदेव भोजन करणारा इतक्यात दुसरा कोणी शुद्र अतिथी प्राप्त झाला.तेव्हा कुटुंबाकरीता विभाग केलेल्याही अन्नातून पुन्हा विभाग करून ते अन्न त्या शूद्राचे ठिकाणी हरीची भावना करणाऱ्या त्याने त्याला वाढिले.||७|| भावार्थः---तो शुद्र भोजन करून निघून गेला असता,कुत्र्यांनी वेष्टित असा कोणीएक तिसरा अतिथी प्राप्त होऊन म्हणाला की,हे राजा, ह्या कुत्र्यांच्या समुदयासहित क्षुधाक्रांत असलेल्या मला अन्न दे. ||८|| भावार्थः---तेव्हाही धैर्य व भक्ती इत्यादिकांनी युक्त अशा त्या रंतिदेवाने,त्याच्या आदर करून अवशेष राहिले जे अन्न होते ते सर्व त्याला बहुमानपूर्वक देऊन,त्या कुत्र्यांना व कुत्र्यांच्या अधिपतीला नमस्कार केला.||९|| भावार्थः---नंतर पाणीमात्र उरले होते ते तरी एका पुरुषाची तृप्ती करण्यापुरतेच होते,ते कुटुंबासह प्राशन करण्याची इच्छा करणाऱ्या त्याच्याजवळ कोणीएक चांडाळ अतिथी प्राप्त झाला आणि म्ह्णाला की,----हे राजा,मज निचाला पाणी दे. ||१०|| भावार्थः---त्याची ती कंठ वाळून गेल्यामुळे मोठ्या श्रमाने उच्च्चार्लेली दीनवाणी ऐकून कृपेने अतिशय व्याप्त झालेल्या त्या रंतिदेवाने असे अमृतासारखे भाषण केले की,-----||११|| भावार्थः---मी ईश्वारापासून,अणिमादिक अष्टैश्वर्ययुक्त सर्वोत्कृष्ट गतीची इच्छा करित नाही,तसेच मोक्षाचीही इच्छा करीत नाही.तर सर्व प्राणिमात्रांच्या अंत:करणात राहून त्यांचे दु:ख प्राप्त होण्याची इच्छा करितो की,जे दु;ख मी भोगिल्यामुळे ते दु:खरहित होतात.म्हणून आपण--जीवानी इतर प्राणीमात्रांतील दु:ख नाहीसे करून,त्यानंतर आपले व कुटुंबातील देहसंबंधींचे दु:ख कमी किंवा नाहीसे करावे. ||१२|| भावार्थः---बरे दुसऱ्याचे दु;ख काय म्हणून मागतोस असे कोणी म्हणेल तर,इतरांच्या दु;खनिवृत्तीचे माझ्या दु:खाची निवृत्ती होत आहे असे सांगतो--–दोन असून वांचण्याची इच्छा करणाऱ्या प्राण्याला वाचण्यांचे कारण अशा जळाच्या अर्पणाने,माझे–क्षुधा,तृषा,अवयवांचे श्रम दैन्य,ग्लानी,शोक खेद व मोह व सर्वही निवृत्त झाले आहेत.आपली--जीवांची अशी इच्छा असावी की,इतर जीवांचे दु:ख निवृत्त झाले तर,आपले दु:ख निवृत्त व्हावे,तर इतर जीवांचे दु:ख निवृत्त न झाले तर आपलेही दु:ख निवृत्त होऊ नये.थोडक्यात प्रथम दुसऱ्यांचे दु:ख निवृत्त करून त्यानंतर आपले--जीवाचे दु:ख निवृत्त करावे,अन्यथा करू नये.||१३|| भावार्थः---असे भाषण करून,तृषेने स्वत: मरणोन्मुख झालेला परंतु स्वाभाविक करुणेनं युक्त धैर्यवान् अशा त्या रंतिदेवराजाने त्या चांडाळाला पाणी अर्पण केले.आपणही रंतिदेवाप्रमाणे प्रथम इतरांचे दु:ख निवारण करावे.||१४|| भावार्थः---तेव्हा त्या रंतिदेवराजाने त्याच्या धैर्याची परीक्षा करण्यासाठी पथम मायेने शुद्रदिरुपाने भासलेले व त्या फळाची इच्छा करणाऱ्या भक्तांना फळ देणारे जे त्रेलोक्याधिपति ब्रह्मविष्णुमहेश्वर त्यांनी आपले दर्शन दिले.रंतिदेवराजाने इतरांच्या दु:ख निवृत्तिला प्राधान्य दिले म्हणून भगवंताने त्यास दर्शन दिले.आपण जर रंतिदेव राजाप्रमाणे आचरण केले तर आपणासही भगवंत दर्शन देतील यात मुळीच शंका नाही.म्हणून आपण रंतिदेवाराजासारखे परोपकार करावा,म्हणजे भगवंत दर्शन देतीलच.||१५|| भावार्थः---तेव्हा निसंग: व नि:स्पृह अशा त्या रंतिदेवाने,वासुदेवाच्या ठिकाणी असलेल्या भक्तीने त्यांना केवळ नमस्कार करून,हात जोडून त्यांना पहात उभा राहिला,त्यांच्यापासून काहीच मागितले नाही.आपणही भगवंताना संसारातील कांहीच मागू नये,कारण भगवंत अविनाशी न देता विनाशीच देऊ शकतो,तर संत--महात्मा सत्संगाद्वारे अविनाशी परमात्म्याचे जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्रदान कारू शकतात.म्हणून आपण संत--महात्मा यांनाचाच सत्संग करून अविनाशी तत्व जे "ब्रह्म" संपादन करावे.||१६|| भावार्थः---त्याकाळी ईश्वराहून दुसऱ्या फळाची अपेक्षा न करणाऱ्या व भगवंताचेठिकाणी एकनिष्ठ अंत:करण करणाऱ्या त्या रंतिदेवाची त्रिगुणात्मक माया (सर्व संसार)स्वप्नाप्रमाणे आत्मस्वरुपीच लीन झाली म्हणजे तो जीवन्मुक्त झाला.रंतिदेवराजाप्रमाणे आपणही आचरण केले तर मोक्ष प्राप्त होऊन जन्म--मरण निवृत्त होईलच.||१७|| भावार्थः---पुढे त्या रंतिदेवाच्या समागमाने रंतिदेवाची अनुसरणारे जितके म्हणून लोक होते ते नारायणपरायण योगी झाले.||१८|| भावार्थः---गग्रापासून शिनि झाला,त्यापासून गार्ग्य झाला,तो क्षत्रीय असूनही पुढे त्याच्यापासून ब्राहमणकुळ पुत्रादिरूपाने उत्पन झाले. महाविर्यापासून दुरीतक्षनामक पुत्र झाला,त्याला त्रय्यारुणि,कवी आणि पुष्करारूणि असे तीन पुत्र झाले.ते असे की जे या क्षत्रीयवंशांत होऊनही पुढे ब्राहमण्त्व पावले.बृहत्वक्षत्राचा हस्तीनामक पुत्र झाला ज्याने हस्तीनापुर निर्माण केले.||१९||२०|| भावार्थः---त्या हस्तीचे अजमीढ,द्विमिढ आणि पुरूमीढ असे तीन पुत्र झाले.अजमीढाच्या वंशामध्ये प्रियमेधादिक ब्राह्मण झाले. अजमीढापासून दुसरा पुत्र बृहदिशु झाला,त्याचा पुत्र बृहद्धनु,त्यापासून बृह्त्काय,त्याचा पुत्र जयद्रत झाला.||२२|| भावार्थः---त्याचा पुत्र विशद,त्याचा पुत्र सेनजीत्-झाला,त्याचे रूचिराश्व दृढहनु,काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले. ||२३|| रूचिराश्वाचा पुत्र पार,त्याचा पुत्र पृथुसेन झाला.पाराचा पुत्र नीप,त्या नीपाला शंभर पुत्र झाले.||२४|| भावार्थः---त्याच निपाने कृत्वीनानक शुककन्येचेठिकाणी ब्रहमदत्तनामक पुत्र उत्पन केला त्या योगी बह्मदत्ताने विश्वक्सेन नामक पुत्र उत्पन केला. ||२५|| भावार्थः---त्या विश्वक्सेनाने जैगीव्यनामक ऋषिच्या उपदेशाने योगशास्त्र निर्माण केले.त्या विश्वक्सेनापासून उदक्स्वन झाला,त्यापासून भल्लाद झाला.हे सर्व बृह्दिशूच्या वंशांत उत्पन झाले.||२६|| भावार्थः---द्विमीढाचा पुत्र यवीनर झाला,त्याचा पुत्र कृतीमान् झाला,त्याचा पुत्र कृतीमान झाला,त्याचा सत्यधृतीनामक पुत्र झाला.दृढनेमी,त्याचा सुपार्श्व झाला.||२७|| भावार्थः---सुपाश्र्वपासून सुमति झाला,त्याचा कृती झाला,त्या कृतीने हिरण्यनाभनामक आपल्या गुरुपासून योग परच्यसामांच्या सहा संहिता संपादन कुरून,त्यांचे विभाग केले आणि त्यांचे आपल्या शिष्यांना अध्यायन करविले.त्यास नीपनामक पुत्र झाला,त्यापासून उग्रायुद्ध झाला,त्याचा क्षेम्य,त्यापासून सुवीर झाला,त्या सुविराचा रिपुंजय झाला.||२८||२९|| भावार्थः---त्यापासून बहुरथनामक पुत्र झाला.पूर्वी सांगितलेल्या पुरूमीढाला पुढे प्रजा झाली नाही.अजमीढापासून प्रियमेधादिक ब्राह्मणांचा एक व बृहदिशुप्रभृति राजांचा एक असे दोन वंश सांगितले.आता त्यांचेच वंशांतर सांगतो--- अजमीढाला निलिनीनामक स्त्रीच्याठीकानी नीलनामक पुत्र झाला,त्याल शांतीनामक पुत्र झाला.||३०|| भावार्थः---शांतीपासून सुशांती,त्याचा पुरुज,त्यापासून अर्क झाला,त्याचा पुत्र भार्म्याश्व,त्याचे सुद्रलादिक पांच पुत्र. ||३१|| भावार्थः---ते मुद्गल,यवीनर,बृहदिषु,कांपिल्य आणि संजय असे पांच पुत्र होत.त्यावेळी सभेमध्ये भर्म्याश्व म्हणाला---- हे माझे मुद्गलादिक पांच पुत्र,पांच देशांच्या रक्षणाविषयी पुरे आहेत,त्यावरून त्या पांचांना पंचाळ असे नाव प्राप्त झाले.त्यापैकी मुद्गालापासून मैाद्रल्यानामक गोत्रांचे ब्राह्मनाकुळ उत्पन्न झाले.||३२||३३|| भावार्थः---भर्म्याश्वाचा पुत्र जो मुद्रल त्यापासून दिवोदास पुत्र आणि अहल्या कन्या अशी दोन मुले झाली.त्या अहल्येचेठिकाणी गौतमऋषीपासून शतानंदनामक ऋषी झाला.||३४|| भावार्थः---त्या शतानंदाचा पुत्र सत्यधृति झाला तो धनुर्वेदामध्ये अत्यंत निपुण होता.त्याचा पुत्र शरद्वान झाला,त्या "शरद्वानाला एकेदिवशी अप्सरेचे दर्शन झाले तेव्हा कामातुर झालेल्या त्यांचे रेत चलित होऊन ते दर्भांच्या बेटावर पडले तेव्हा तत्काळ त्यापासून शुभलक्षणांची–एक पुत्र व एक कन्या अशी दोन मुले उत्पन्न झाली".||३५|| भावार्थः--- एकेवेळी त्या अरण्यांत मृगया करण्याविषयी संचर करणाऱ्या शंतनूराजाने त्यांना पाहून कृपेने त्यांना घरी आणून त्यांचे सरंक्षन केले.त्या दोघांमध्ये जो पुत्र होता तो "कृपाचार्य" होय आणि जी कन्या होती ती "कृपी" होय .ती पुढे "द्रोणाचार्याची--पत्नी" झाली.||३६|| २१-----याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणातील नवम(९)स्कंधामध्ये सोमवंशकथानांत रंतिदेवचरितनिरुपणनामक हा एकविसावा(२१)अध्याय छत्तीस(३६) श्लोकांनी समाप्त झाला.||२१|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________२२-----आतां ह्या बाविसाव्या अध्यायामध्यें दिवोदासाचा वंश सांगून,नंतर ऋक्षाच्या वंशामध्ये जरासंध,पार्थ व दुर्योधनादिक राजांचे वर्णन केले आहे.||२२|| |२२— पांचाल,कौरव आणि मगध-देशीय राजांच्या वंशाचे वर्णन ______________________________________________________________________________________________ भावार्थः---श्री शुकाचार्य म्हणाला--- हे राजा,दिवोदासापासून मित्रेयू झाला,त्याला च्यवन,सुदास सहदेव आणि सोमक असे चार पुत्र झाले. त्या पैकी सोमकाला शंभर पुत्र झाले,त्यामध्ये जंतु हा ज्येष्ठ होत व पृषत हा कनिष्ठ होता,त्या पृषताल द्रुपद झाला,त्याला द्रौपदीनामक कन्या व धुष्टद्दुम्नादिक पुत्र झाले.||१||२|| भावार्थः---धृष्टद्दुम्नापासून धृष्टकेतू झाला हे भर्म्याच्या वंशात उत्पन्न झालेले सर्वही पांचालनामक राजे होत.पूर्वी सांगितलेल्या अजमीढाला दुसरा जो ऋक्षनांवाचा पुत्र झाला त्यापासून संवरन झाला.||३|| भावार्थः---त्यापासून तपतीनामक सूर्य कन्यचे ठिकाणी कुरूक्षेतचा अधिपती "कुरुनांवाचा-पुत्र" झाला,त्या कुरुपासून परीक्षित,सुधनु,जहू आणी निराधाश्च असे चार पुत्र झाले,||४|| भावार्थः---त्यापैकी सुधनुपासून सुहोन्न झाला,त्यापासून च्यवन झाला,त्यापासून कृती झाला,त्या कृतीला उपरीचर वसू झाला,त्यापासून बुह्द्र्थ,कुशांब,मत्स्य,प्रत्यग्र आणि चेदीप हे चदिदेशाचे अधिपती पुत्र झाले.त्यापैकी बुह्द्रथापासून कुशाग्र झाला,त्याचा पुत्र ऋशभ झाला.||५||६|| भावार्थः---त्याचा पुत्र सत्यहित झाला,त्याचा पुत्र पुष्पवान झाला,त्याचा जन्हु झाला,बृहद्रथापासूनच दुसऱ्या स्त्रीचेठिकाणी एका शरीराची मधूनच विभाग झालेली दोन शकले झाली.||७|| भावार्थः---ती निर्जीव शकले आईने बाहेर टाकिली तेव्हा तेथे क्रीडा करणाऱ्या जरानामक राक्षसीने,ङग्-जीवजीवफ असे म्हणून ती एकेठीकानी सांधीली असता त्यापासून पुत्र झाला तो "जरासंधनामक" होय. ||८|| भावार्थः---त्यापासून सहदेव झाला,त्याचा सोमापी झाला,त्यापासून श्रुतश्र्वा झाला.कुरुचा पुत्र जो परीक्षित्-त्याला संतती झाली नाही.जन्हूला सुंरथ नांवाचा पुत्र झाला. ||९|| भावार्थः---त्या सुरथापासून विदुरथ झाला,त्यापासून सार्वभैनामक पुत्र झाला,त्याचा पुत्र जयसेन झाला,त्याचा पुत्र राधिक झाला त्या राधिकापासून अयुत झाला.||१०|| भावार्थः---त्यापासून क्रोधन झाला,त्याचा देवतिथि झाला,त्याचा पुत्र ऋष्य झाला,त्याला दिलीप झाला,त्यचा पुत्र १--"प्रतीप" झाला. ||११|| भावार्थः---त्याचे २--"देवापि","शंतनू" आणि "वाल्हिक" असे तीन पुत्र झाले,त्यापैकि देवापी पित्याच्या राज्याचा त्याग करून वनामध्ये निघून गेला. ||१२|| भावार्थः---म्हणून त्याचा कनिष्ठ भाऊ "शंतनूच" राजा झाला,तो पूर्वीजन्मी महाभिषनामक होता.त्याला शंतनू हे नाव पडण्याचे कारण असेकी,तो ज्या ज्या वृद्ध पुरुषाला हातांनी स्पर्श करीत असे तो तो वृद्ध पुरुष तारुण्यादशा पावत असे आणि आरोग्य पावोन उतम सुख पावत असे म्हणून त्याच कर्माच्या योगान तो "शंतनूनामक" झाला .त्याच्या राज्यामध्ये जेव्हा बारावर्षपर्यत पर्जन्यवृष्टी झाली नाही झाली नाही तेव्हा------------------||१३||१४|| भावार्थः---त्या शंतनूला ब्राह्मणांनी सांगितले की,तू ज्या अर्थी आपल्या वडील बंधूला सोडून पृथ्वीचे राज्य करितोस त्याअर्थी परिवेताच आहे म्हणून पर्जन्य पडत नाही तर नगराची व राष्ट्राची वृद्ध होण्याकरिता आपल्या वडील बंधूला सत्वर राज्य दे.||१५|| भावार्थः—असे ब्राह्मणांनी सांगितले असता त्या शंतनूराजाने वनांत जाऊन,आपल्या वडील बंधूची(देवापीची) तू राज्याचा स्वीकार कर अशी प्रार्थना केली.तो त्याच्या पूर्वीचे त्या शंतनूच्या अश्मरावनामक प्रधानाने देवापिला पाखंडी करून राज्यविषयी अनधिकारी करण्याकरीता जे ब्राहमण त्या देवापलीकडी पाठविले होते त्यांनी पाखंडमताचा आश्रय करणाऱ्या वाणीने त्याला वेदमार्गपासून भ्रष्ट केले होते म्हणून त्याने राज्याचा स्वीकार न करीता शंतनुला उलटी वेदमार्गाची निंदावचने सांगितली.त्या कारणाने त्याला पातित्यदोषाने राज्य करण्यास आरोग्यत्व प्राप्त झाले असता शंतनूचा दोष नाही म्हणून पर्जन्यवृष्टी झाली.तो देवापी हल्ली योगसाधना करून कलापग्रमामध्ये राहिला आहे. ||१६||१७|| भावार्थः---तो कलियुगामध्ये सोमवंश नष्ट झाला असता,पुन: कृतयुगादिकांचेठीकानी त्याचे स्थापन करील.बाल्हीकापासून सोमदत्त झाला त्या पासून भुरी,भूरिश्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले.पूर्वी सांगितलेल्या २--"शंतनुपासून" ब्रह्मशापाने स्त्रीत्व पावलेल्या गंगेचेठिकाणी ३---"भीष्म" झाला.तो इंदिर्यांचा निग्रह करणाऱ्या,सर्व धर्मवेत्यांमध्यें श्रेष्ठ,महाभगवद्भेतत,आत्मवेत्ता आणि विरसमुदायाचा नायक होता.ज्याने युद्धामध्ये परशुरामालाही आपल्या बलाने संतुष्ट केले.||१८||१९|| भावार्थः---त्याच २--"शंतनू"पासून दाशकन्याचे ठिकाणी म्हणजे "उपरिचर" वसुंचे पाण्यांत पडलेले वीर्य भक्षण करणाऱ्या मत्सीच्या गर्भामध्ये झालेली दाशांना सांपडलेली व त्यांनी रक्षण केल्यामुले दाश्कन्या म्हणून प्रसिद्ध असलेली जी "सत्यवती" तिचेठीकाणी ३--"चित्रांगदनामक-पुत्र" झाला.|२०|| भावार्थः---व त्याचा धाकटा भाऊ ३--"विचित्रवीर्य"ही झाला त्यापैकी चित्रांगदाला चित्रांगद नांवाच्याच गंधर्वाने युद्धामध्ये मारिले.त्या सत्यवतीच्याठिकाणी ङग्शतनुने तिचा स्वीकार करण्याचे पूर्वीच पराशरऋशिपासून साक्षात हरीचा अवतार--- ||२१|| भावार्थः---वेदांचे रक्षण करणारा कुष्णद्वैपायननामक ४--"व्यास"मुनी झाला,त्यापासून मी(शुकाचार्य) होऊन या भागवताचे अध्यन केले. त्या बादरायण व्यास भगवंताने आपल्या पैलादिक शिष्याचा त्याग करून म्हणजे त्यांना न सांगता शांत अशा मजपुत्रला(शुकाचार्यांना) सर्व वेदाचे व इतिहासाचे सार अशा या भागवताचा उपदेश केला.५--"विचित्रविर्याने" काशीराजाची भीष्माने स्वयंवरातून बलात्काराने आणीलेल्या "अंबिका: व 'आंबीलिका" नावाच्या दोन कन्या वरिल्या,त्यांचे ठिकाणी आसक्तचित्त असेलेला तो विचित्रवीर्य संतती होण्याच्या आधीचा क्षयरोगाने पिडीत होऊन मरण पावला.||२२-२३-२४|| भावार्थः---नंतर "सत्यवती"ने आज्ञा केलेल्या "व्यासा"ने अप्रज अशा आपल्या "विचित्रवीर्य",भ्रात्याच्या "अंबिका व अंबालिका" नामक स्त्रियांचे ठिकाणी अनुपमे ६--"धृतराष्ट्र" व ६--"पांडू" या पुत्रास आणि दासीचे ठिकाणी ६--"विदुरा"स उत्पन्न केले. ||२५|| भावार्थः---हे राजा,६--"धृतराष्ट्र"ला "गांधीरी"चेठीकानी "शंभर-पुत्र" व "दु:श"ला नावाची "एक--कन्य" अशी मुले झाली त्यापुत्रामध्ये ७--"दुर्योधन" हा श्रेष्ठ होता.||२६|| भावार्थः---आरण्यामध्ये झालेल्या;या किंदमनामक ऋषीच्या शापाने मैथूनाविषयी प्रतिबंध झालेल्या "पंडूराज्या"च्या "कुंतीनामक" स्त्रीचेठीकानी ७--"यम,वायू,इंद्र" यापासून ७--"युधिष्ठिर,भीमसेन,व अर्जुन" असे तीन महारथी पुत्र झाले. ||२७|| भावार्थः---तसेच पांडूराजाला दुसऱ्या--"माद्रीनामक" स्त्रीचेठीकानी ७--"अश्विनिकुमारा"पासून ७--"नकुल" आणि ७--"सहदेव" असे दोन पुत्र झाले.त्या युधिष्ठिरादिक पाचपासून द्रोपादिनामक एका स्त्रीच्या ठिकाणी पांच पुत्र तुझे(राजा परीक्षिताचे) चुलते झाले.||२८|| भावार्थः—ते युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य ७---भिमसेनापासून ८--"श्रुतसेन" ७--"अर्जुना"पासून ८--श्रुतसेन,७--नकुलापासून ८--"शतानीक" ७--"सहदेवा"पासून ८--’श्रुतकर्मा आसे झाले.तसेच युधिष्ठिरादिकांपासून दुसऱ्या स्त्रियांचेठिकाणी झालेले ७--"तेऱ्युधिष्ठीरा"पासून "पौरवी"चेठिकाणी ८--"देवक" झाला,७--भीमसेनापासून हिंडीबिचेठिकाणी ८--"घटोत्कच" झाला,तसाच त्या ७--"भीमा"पासून "कालीच" ठिकाणी ८--"सर्वगत" झाला;७--"सहदेवा"पासून "पर्वताची कन्या जी जया" तिला ८--"सुहोत्र" झाला.||२९||३०||३१|| भावार्थः---७--नकुलाला "करणेमती"ठिकाणी "निरमित्र" झाला.तसाच ७--"अर्जुना"लाही "उलुपिनायक--नागकन्ये"च्या ठिकाणी ८--"इरावननामक" पुत्र झाला आणि "मणिपूर देशाधीपतीच्या कन्येचे"ठिकाणी ८--बभ्रुवाहननामक पुत्र झाला;तो बभ्रुवाहन अर्जुनाचा पुत्र असूनही ती कन्या पुत्रिकाधर्माने(हिला जो पुत्र होईल तो माझा पुत्र अशा बोलीने)दिलेली असल्यामुळे मातामहानें (मणिपूरपतीने)घेतला. ||३१||३२|| भावार्थ:---हे राजा,तुझ पिता जो सर्व अतिरथ्यांना जिंकणारा वीर ८--अभिमन्यू तो हि ७--"अर्जुन"पासून "सुभद्रे"च्या ठिकाणी झाला.त्या ८--"अभिमन्यु"पासून "उत्तरे"च्या ठिकाणी ९--"तू--परिक्षित" झालास.||३३|| भावार्थ:----दुर्योधनादिक कौरवाचा नाश झाला असता,रागवलेल्या अश्वत्थामाच्या ब्रहमस्त्रोतेजाने दग्न झालेला आहे तू,श्रीकृष्णाच्या सामर्थ्याने जीवंतच मृत्युपासून सोडविलेला आहेस. ||३४|| भावार्थ:----बा परीक्षिते,तुझे हे महापराक्रमी १०--"जनमेजय श्रुतशेन,भीमसेन,आणि उग्रेसेन" असे चार पुत्र आहे ||३५|| भावार्थ:---- हा जनमीजेय,तक्षकापासून मरण पावलेल्या तुला जाणून क्रोधाने युक्त होईल,आणि सर्पाच्या नाश करणाऱ्या यज्ञसबंधी आग्निमध्ये सर्पाचा होम करील.||३६|| भावार्थ:---- तसाच कावषेय तुरनामक ऋषीला पुरोहित करून,आसंमतभ्दागींच्या सर्व पुथ्वीवर असणाऱ्या राजांस जिंकून अश्वमेदयंज्ञांनी भगवंताचे आराधन करील म्हणून तो आश्वमेधयाजी असा प्रसिद्धी होईल. ||३७|| भावार्थ:----त्या जनमेजयाचा पुत्र ११--"शतानीक" होईल तो याज्ञवल्क्य ऋषीपासून ऋग्वेद यर्जुवेद आणि सामवेद यांचे अध्यायनकरून कृपाचार्यापासून अस्त्रज्ञान व यज्ञ-कर्म मार्गाचे ज्ञान संपादन करून,शूनकऋषीपासून परमात्मज्ञान पावेल. ||३८|| भावार्थ:---- त्या ११--शतानीकाचा पुत्र १२--सहस्त्रानीक होईल,त्यापासुन १३--अश्वमेधज,त्यांचा १४--आसीमकृष्ण व त्याचाही पुत्र १५--निमिचक्र होईल.||३९||तो हस्तिनापुर गंगेने बुडविले असता,तेथून निघून कौशांबी नगरीमध्ये सुखाने राहील.त्याच्यापासून १६--"चित्ररथ"नामक पुत्र होईल||४०|| भावार्थ:----त्याच्यापासून १७--विष्ट्मान होईल;नंतर त्याचा पुत्र १८--भूषेनामक पुथ्वीपति होईल,त्याचा पुत्र १९--"सुनीथ",त्याचा २०--"नृचक्षु"त्यापासून २१--"सुखी-नल",------||४१|| भावार्थः---त्यापासून २२--पारिप्लव नामक पुत्र होईल,त्यापासून २३--"सुनय",त्याचा पुत्र २४--मेधावी,त्यापासून २५--"नुपंजय" त्यापासून २६--दूर्व,त्यापासून २७--"तिमि" होईल. ||४२|| भावार्थ:----तीमिपासून २८--"ब्रहद्र्थ",त्यापासून २९--"सुदास",त्यापासून ३०--"शतानीक",शतानीकापासून ३१--"दुर्दमन",त्याचा पुत्र ३२--"बहीनर" होईल.||४३|| भावार्थ:----त्याचा ३३--"दंडपाणी",त्याचा ३४--"निमी",त्याचा ३५--"क्षमकराजा" होईल,याप्रमाणे ब्राह्मणाच्या व क्षत्रियांच्या कुळांना कारणभूत असून देव आणि ऋषी यांनी सत्कार केलेला हा वंश मी तुला सांगीतला आहे.||४४|| भावार्थ:----हा वंश,"कलीयुगा"मध्ये ३६--"क्षेमकराजा"ला पावोन "समाप्ती" पावेल.आता जरासंधाच्या वंशांत पुढे होणार राजे मी तुला सांगतो.-------||४५|| भावार्थ:----१--"बृहद्रथा"पासून दुसऱ्या स्त्रीपासून एका शरीराची मधूनच विभाग झालेली दोन प्रकारची शकले झाली.तीं निर्जीव शकलें आईने बाहेर टाकिली तेव्हा तेथें क्रीडा करणाऱ्या जरानामक राक्षसीने,ङग्-जीवजीवफ असे म्हणून ती एकेठिकाणी सांधिली असतां त्यांपासून पुत्र झाला तो २--"जरासंध"नामक होय.जरासंधाच्या पुत्र जो ३--सहदेव त्याचा ४--मार्जारीनामक पुत्र होईल,त्याचा ५--श्रुतश्रवा होईल,त्याचा ६--आयुतायू त्याचा पुत्र ७--निरमित्र होईल. ||४६|| भावार्थ:----त्याचा पुत्र ८--सूनशत्र,९--सूनशत्राचा पुत्र १०--ब्रहत्सेन,त्यापासून ११--कर्मजित,त्यापासून १२--सृतजय त्याचा १३--शुचीनामक होईल.||४७|| भावार्थ:----त्यापासून १४--क्षेम,त्यापासून "सुव्रत",त्यापासून १५--"धर्मसुत्र",त्यापासून १६--शेम,त्यापासून १७--द्दमत्सेन,त्यापासून १८--सुमती,त्यापासून १९--सुबल होईल. ||४८|| भावार्थ:----त्यापासून २०--"सुनिथ",त्यापासून २१--"सत्यजीत",त्यापासून २२--"विश्वजित",व त्यापासू २३--नरीपुजय" नामक पुत्र होईल,हे सर्व बृहदरथाच्या वंशात हजार वर्षापर्यत होतील.||४९|| २२------याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुराणातील नवम(९)स्कधामधील बाविसावा(२२)अध्याय एकोनापान्नास(४९)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२२|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________|२३-----आतां ह्या तेविसाव्या अध्यायामध्ये,अनु,द्रह्यु तुर्वसू आणि यदु ह्या ययातीच्या चारही पुत्रांचा वंश अनुक्रमाने ज्यामघ राजापर्यंत सांगितला आहे. ||२३|| |२३--- यज्ञपत्न्यांवर कृपा ______________________________________________________________________________________________भावर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,ययातीचा पुत्र जो अनु त्याचे–"सभानर," "चक्षु" आणि "परोक्ष" असे तीन पुत्र झाले.त्यापैकी सभानरापासून कालनर झाला.त्याच्यापासून सृंजय झाला,||१|| भावार्थः---त्याचा पुत्र "जनमेजय",त्याचा "महाशील',त्याचा 'महामना',त्या "महामना"ला "उशीनर" आणि "तीतीक्षु" असे दोन पुत्र झाले.||२|| भावार्थः---त्यांमध्ये उशीनराचे पुत्र "शिबी","वन" "शमी" आणि "दक्ष" चार झाले.त्यांपैकी शिबी पासून "वृशादर्भ","सुवीर" "मद्र" आणि "कैकेय" या नावांचे चार पुत्र झाले.तितिक्षुपासून "रुशद्रथ",त्यापासून "हेम",त्यापासून "सुतपा" झाला त्या सुतपासून "बली" झाला||३-४|| भावार्थः---त्या पृथ्वीपती बळीच्या भार्येचे ठिकाणी "उतथ्य" पुत्र जो "दीर्घतमा" त्यापासून "अंग","वंग" "कलिंग","सुह्य" "पुंड" आणि "अंध्र" या नावांचे सहा पुत्र झाले.||५|| भावार्थः---त्यांनी आपल्या नावाने प्रसिद्ध अशा पुर्वाडीदिशांचे ठिकाणी असणारे अंगादिक सहा देश केले आहेत.त्यांपैकी अंगापासून "खनपान" झाला,त्यापासून "दिविरथ" झाला,त्यापासून "धर्मरथ" पुत्र झाला त्याला "चित्ररथ" झाला,तो पुत्र रहित होता.पुढे तो चित्ररथ रोमपाद या नावाने प्रसिद्ध झाला.त्याला,त्याचा मित्र जो चित्ररथ राजा त्याने शांतनामक आपली कन्या दत्तक दिली होती,तिला ऋषीशृंगाने वरिले||६-७|| भावार्थः---कोण हा श्यश्रुंग असे म्हणशील तर तो विभांडकऋषीपासून हरिणीचे ठिकाणी उत्पन्न झालेला होता.रोमपादराजाच्या अवर्षण पडले ऋष्यश्रुंग आपल्या देशांत येईल तर वृष्टी होईल असा तो ऋषीश्रुंग होय.||८|| अर्थः---त्याने इंद्रदेवतेची पुत्रकामेष्टी करून अनपत्य असलेल्या रोमपादराजाला संतती दिली आणि अप्रज असलेल्या "दशरथराजा"चीही ज्याने पुत्रकामेष्टी केली असतां त्याला "रामादिक"--राम,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न असे चार पुत्र झाले.||९|| भावार्थः---"रोमपादा"पासून "चतुरंग" झाला,त्याचा पुत्र "पृथूलाक्ष" झाला.||१०|| भावार्थः---त्या पृथुलाक्षाला "बृहद्रथ" "बृहत्कर्मा" आणि "बृहद्भानु" असे तीन पुत्र होते.त्यापैकी बृह्द्र्थापासुन "बृह्न्माना" झाला,त्याच्यापासून "जयद्रथ" झाला.||११|| भावार्थः---त्याला "संभूती"चे ठिकाणी "विजय" झाला,त्यापासून "धृतव्रत",त्याचा "सत्कर्मा" त्याचा "अधिरथ" झाला||१२|| भावार्थः---तो अनपत्य असून एकेवेळी गंगेच्या तीरी क्रीडा करीत असतां तेथे त्या "अधिरथा"ला कुंतीने कन्यावस्थेमध्ये आपणास झाल्यामुळे पेटीत घालून टाकिलेला "कर्णनामक-पुत्र" सांपडला त्याचेच त्याने पुत्रबुद्धीने प्रतिपालन केले त्या भूतीपुती कर्णाला "वृशसेन"नामक पुत्र झाला.||१३|| भावार्थः---ययातीचा तिसरा पुत्र जो "द्रुह्यु" त्याला "बभृनामक" पुत्र झाला त्याचा पुत्र "सेतू" त्याचा "आरब्ध" त्याचा "गांधार",त्याचा "धर्म",त्याचा "धृत" झाला,त्या धृताचा "दुर्मना" झाला,त्यापासून "प्रचेता" झाला त्या "प्रचेताला शंभर-पुत्र" झाले. ||१४-१५|| भावार्थ:---ते उत्तरदिशेला आश्रय करणारे म्लेच्छांवे अधिपती झाले."ययाती"चा द्वितीय पुत्र जो "वन्ही" झाला,त्या वन्ही पासून "भर्ग" झाला,त्यापासून "भानुमान" झाला||१६|| भावार्थः---त्याचा पुत्र "त्रीभाणु",त्याचा पुत्र "करंधम" झाला तो मोठा उदार बुद्धी होता,त्याचा पुत्र "मरुत" तो पुत्र रहित असल्यामुळे त्याने पुरूच्या वंशात झालेल्या "दुष्यांतालाच-पुत्र"करून स्विकारीले.||१७|| भावार्थः---तो "दुष्यंत" त्याचा पुत्र असूनही राज्यकामुक असल्यामुळे पुन्हां आपल्या पौरव वंशालाच अनुसरल.कारण पुरूवंशांतल्या राजानांच सिंहासनाचा अधिकार आहे.हे राजा,तुला मनुष्यांचा सर्व पापांचा नाश करणारा व महापुण्यकारक असा जो "ययाती"च्या ज्येष्ठ पुत्र "यदू"चा वंश त्याचे वर्णन करितो.कारण मनुष्याने वंशाचे श्रवण केले असतां तो सर्व पापांपासून मुक्त होतो.||१८-१९|| भावार्थः---कारण,ज्या वंशामध्ये परमात्मा भगवान मनुष्याच्या आकृतीने अवतीर्ण झाला आहे.यदुला-"सहस्त्रजीत" "क्रोष्टा","नल" आणि "रिपू" या नावांनी प्रख्यात असे चार पुत्र झाले,त्यामध्ये "सहस्त्रजीताचा" पुत्र "शतजीत" झाला,त्याचे "महाह्य" आणि "हैहय" असे तीन पुत्र झाले.||२०-२१|| भावार्थः---त्यापैकी हैहयाचा पुत्र "धर्म" त्यापासून "नेत्र" झाला,त्यापासून "कुंती" झाला,कुंतीपासून "सोहंजी" झाला,त्याचा "महिष्मान" त्याचा "भद्रसेनक" झाला.||२२|| भावार्थः---भद्रसेनाला "दुर्मद" आणि "धनक" असे दोन पुत्र झाले,धनकाचे पुत्र "कृतवीर्य","कृताग्नी","कृतवर्मा" आणि "कृतौजा" असे चार झाले.||२३|| भावार्थः---कृतविर्याला "अर्जुन" झाला,तो सप्तद्वीपांचा अधिपती झाला,त्याने हरीचा अंश अशा दत्तात्रेयाचे आराधन करून त्यापासून योगसिद्धी आणि आणि मादिक महाऐश्वर्ये मिळविली.||२४|| भावार्थः---हे राजा,कोणतेही राजे,यज्ञ दान,तप,योग,शास्त्रध्ययन,पराक्रम,जय इत्यादिकेकरून त्या कार्तवीर्य अर्जुनाची साम्यता पावनारच नाहीत.||२५|| भावार्थः---पंच्याऐंसीहजार वर्षापर्यत ज्याच्या शरीरेंद्रीयादिकांचे सामर्थ्य मुळींच कमी झालें नाही व ज्याला इच्छित वस्तू न मिळाल्याचे स्मरणही नाही,त्याने आपल्या सहा इंद्रीयांच्या अक्षय्य--निरंतर विषयांचे सेवन केलें.||२६|| भावार्थः---त्याला दहा हजार पुत्र होते त्यांतील परशुरामबरोबर झालेल्या युद्धांमध्ये पांचच आवशेष राहिले त्यांनी नावें- जयध्वज,शूरसेन, वृषभ,मधु आणि उर्जित अशीं होते.||२७|| भावार्थः---जयध्वजापासून "तालजंघ" झाला,त्यालाही जे तलजंघनामकशंभर क्षत्रियांचे कुळ होतें तें "पुत्रशत" झालें.ते अर्वऋषीच्या तेजानें संहार करून टाकिलें.||२८|| भावार्थः---त्या तलजंघनामक पुत्रामध्यें ज्येष्ठपुत्र "वितीहोत्र" होता त्याला "मधुनामक" पुत्र झाला त्याला,ज्यामध्ये "वृष्णी"नामक पुत्र ज्येष्ठ आहे असे शंभर पुत्र झाले."ज्याअर्थी "मधु","वृष्णी" व "यदु" ह्यांपासून हे कुळ प्रवृत्त झालें त्याअर्थी पुढे झालेले सर्व राजे "माधव" "वृष्णी" आणि "यादव" आशी संज्ञा पावले."यदूचा" जो "क्रोष्टा" त्यापासून "वृजिनवान" पुत्र झाला. ||२९-३०|| भावार्थः---त्यापासून "श्वाही" त्यापासून "रुशेकू",त्याचा "चित्ररथ" त्यापासून "शशबिंदू" झाला.तो महायोग,महाभोगवान,आणि सत्यसंकल्पादीगुणांनी हि महान् होता. ||३१|| भावार्थः---त्याच्या जवळ त्या त्या जातीतील श्रेष्ठ अशीं चवदा महारत्नें असून तो सार्वभौम,सर्व विजयी आणि यशस्वी होता.त्यानें आपल्या दहा हजार स्त्रियांचे ठिकाणी प्रत्येकीला लक्ष--लक्ष याप्रमाणे दहा लक्ष हजार पुत्र उत्पन्न केले त्यामध्यें "पृथेश्रवा","पृथूकीर्ती" इत्यादिक सहा पुत्र मुख्य होते त्यापैकी पृथुश्रव्याला "धर्मनामक" पृत्र झाला. ||३२||३३|| भावार्थः---त्याला "उशना" झाला त्याने शभर अश्वमेध केले, त्याचा पुत्र रूचक त्याला पुत्र रूचक, त्याला पांच पुत्र झाले त्याची नांवे सांगतो ऐकं ||३४|| भावार्थः---पुरुजित रुक्म,"रुक्मेषु", "पृथु" आणि "ज्यामध" अशीं त्यांची नांवे होतीं.त्यामध्ये ज्यामघाच्या स्त्रीचे नांव शैब्या असून ती वंध्या असल्यामुळे ज्यामघाला संतति नव्हती,त्याने स्त्रीच्या भयाने दुसऱ्या भार्येचा स्वीकार केला नाही,एकेवेळी त्याने शत्रुना जिंकून त्यांच्या घरांतून उपभोग करण्याकरीता भोज्यानामक कन्या आणिली.तेव्हा रथावर असलेल्या त्या कन्येला पाहून,क्रुध्द झालेली शैब्या पतीला म्हणाली की,---||३५||३६|| भावार्थः---हे वंचका,रथावर मी बसण्याच्या जागीं ही कोण बसविलीं आहेस?तेव्हां तिच्या भयाने ज्यामघानें ही तुझी सून आहे असें सांगितलें असतां.हास्य करणारी शैब्या पुन्हा पतीला म्हणाली की,---||३५||३६|| भावार्थः---हे वंचका,रथावर मी बसण्याच्या जागी ही कोण बसविली आहेस?तेव्हा तिच्या भयाने ज्यामघाने ही तुझी सून आहे असें सांगितले असतां.हास्य करणारी ती शैब्या पुन्हा पतीला म्हणाली की---||३७|| भावार्थः---मी वंध्या असून मला सून घडेल कशी ?तेव्हां अतिशयच भिऊन ज्यामघ म्हणाला की,---हे प्रिये,तुला जो आतां पुत्र होईल त्याला स्त्री करण्याकरीता हिचा उपयोग होईल. ||३८|| भावार्थः---असें बोलून स्त्रीच्या भयाने कांपनाऱ्या त्या राजाचे प्राण संकट अवलोकन करून,त्याने पूर्वी बहुतवेळा आधारन केलेले जे विश्वेदेव आणि पितर होते त्यांनी दयायुक्त होईन त्याच्या त्या भाषणालाच तथास्तु असे,अनुमोद्न दिले नंतर त्या देवादिकांच्या प्रसादाने व ज्यामघाने दिलेल्या प्रतिवचनाच्या मुहूर्तगुणाने रजोनिवृत्ती झालेलीही ती शैब्या गर्भिणी होईन प्रसुतीकाळी शुभलक्षणयुक्त पुत्र प्रसवली.तो विदर्भ या नांवाने प्रसिद्ध झाला,त्याने थोक्याच दिवसांत तरून होऊन शैब्येची सून म्हणून बावगलेली असलेल्या त्या कन्येला वरिले.||३९|| २३-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील नवम(९)स्कंधामध्ये हा तेविसावा(२३) अध्यायात ऐकोणचाळीस(३९)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२३|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ______________________________________________________________________________________________२४-----आता ह्या चोविसाव्या अध्यायामध्ये,विदर्भाच्या तीन पुत्रांपासून झालेले पुष्कळ वंश श्रीकृष्णाच्या व बलरामाच्या जन्मापर्यंत सांगितले आहेत.||२४|| |२४-- विदर्भाच्या वंशाचे वर्णन ______________________________________________________________________________________________भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,त्या "शैब्येचे"ठिकाणी विदर्भराजाला "कुश" आणि "क्रध" या नांवांचे दोन पुत्र व विदर्भकुळाला आनंद देणरा रोमपदनामक तिसरा पुत्र झाला ||१|| भावार्थ:----रोमपादाचा पुत्र "बभ्रू" त्या बभ्रूपासून "कृति" झाला,त्याचा पुत्र "उशिक" त्यापासून "चेदी" झाला.त्यापासून "दमघोशादीक" पुत्र झाले.||२|| भावार्थ:----क्रथाचा पुत्र "कुंति" झाला,त्याचा "धृष्टी" त्याचा "निर्वुती",त्यापासून "दशार्हनामक" पुत्र झाला,त्यापासून "व्योम" पुत्र झाला.||३|| भावार्थ:---- त्याचा "जीमूत",त्याचा "विकृति",त्याचा पुत्र "भीमरथ",त्यापासून "नवरथ" पुत्र झाला,त्यापासून "दशरथ" झाला. ||४|| भावार्थ:---- त्यापासून "शकुनि",शकुनीचा "करंभी" पुत्र झाला,त्याचा पुत्र "देवरात",त्याचा "देवशेत्र",त्याचा "मधु",त्यापासून "कुरुवश" त्यापासून "अनु" झाला.||५|| भावार्थ:----अनुचा पुत्र "पुरूहोत्र" त्याचा "आयु",त्यापासून "सात्वत:" हे राजा,त्या सात्वातला "भजमान","भजि" "दिव्य","विष्णी" "देवावृद्ध","अंधक" आणि "महाभोज" असे सात पुत्र झाले. ||६|| भावार्थ:---- हे प्रभो भजमानाला एकास्त्रीचे ठिकाणी "निम्लोचि", "किंकन' आणि "धृष्टी' असे तीन पुत्र झाले आणि दुसऱ्या स्त्रीचे ठिकाणी,'शताजीत्" "सहस्त्राजित्" आणी "आयुताजित्" असे तीन पुत्र झाले.||७|| भावार्थ:---- देवावृधाचा पुत्र "बभ्रू" झाला,त्या देवावृधबभ्रूचे असे श्लोक जन पठन करितात की,---||८|| भावार्थ:---- देवावृध व बभ्रू हे उभयंता जशा गुणांनि युक्त आहेत असे आम्ही दुरून ऐकिले होते तसेच आता प्रत्येक्षहि पहात आहो ते असे की,मनुष्यामध्ये बभ्रू हा श्रेष्ठ आहे आणि देवांवृध तर देवासारखा आहे. ||९|| भावार्थ:---- कारण बभ्रू व देवा वृद्ध या दोघांपासून उपदेश पावोन,चवदाहजार पांसष्ट पुरुष मुक्ती पावले आहेत.||१०|| भावार्थ:---- "महाभोज"हि मोठा धर्मात्मा होता,त्यांच्या वंशामध्ये "भोजनामक" राजा उत्पन्न झाला. ||११|| भावार्थ:---- हे शत्रूसंतापना राजा,वृष्णीपासून "सुमित्र",व "युधाजित्" असे दोन पुत्र झाले,त्यापैकी युधाजिताला "शिनी" आणि "अनमित्र" असे दोन पुत्र झाले,अनमित्रापासून "निम्न" झाला.||१२|| भावार्थ:----निन्मालाही,"सत्राजित" आणि "प्रसेन" असे दोन पुत्र झाले,अनमित्राला एक "शनीनामक" पुत्र झाला होता त्याला "सत्यक" झाला,त्या सत्यकाला "युयुधान" नामक (सात्यकी)पुत्र झाला त्याचा "जय" त्याचा "कुणि",त्यापासून "युगंधर" झाला अनमित्राला तिसरा "वृष्णि"नामक पुत्र होता त्यापासून "स्वफल्क" आणि "चित्ररथ" असे दोन पुत्र झाले,स्वफल्का पासून "गांदिनि"नामक स्त्रीचेठिकाणी अक्रूरासहित असे तेरा प्रमुख्यात पुत्र झाले.||१३||१४||१५|| भावार्थ:----त्या बारांची नांवे--- "आसंग","सारमेय","मृदुर","मृदुवीत्","गिरी","धर्मवृद्ध","सुकर्मा","क्षेत्रोपेक्ष","अरिमर्दन","शत्रुघ्न","गंधमाद",आणि "प्रतिबाहू" अशी होत व त्याची बहीण "सुचीरा" नामक होती. अक्रूराचे पुत्र "देववान्" आणि "उपदेव" असे दोन पुत्र झाले तसेच चित्ररथाचे पुत्र "पृथु","विदुरथ" इत्यादिक झाले. हे सर्व राजे वृष्णीच्या कुळात झाले.||१६||१७||१८|| भावार्थ:----"अंधकाला" "कुकुर" "भजमान","शुचि" आणि "कंबलबर्हिष" असे चार पुत्र झाले.त्यापैकी कुकुराचा पुत्र "वन्हि"नामक झाला,त्यापासून "विलोमा"नामक पुत्र झाला.||१९|| भावार्थ:----त्याचा "कपोतरोमा",त्याचा "अनु" झाला.त्या अनुचा तुबरुनामक गंधर्व मित्र होते.अनुपासून "अंधक" झाला त्याचा "दुंदुभि",त्याचा "अरिद्दोत" त्याचा "पुनर्वसु" झाला.||२०|| भावार्थ:----त्याला "आहूक" पुत्र आणि "आहुकी" कन्या अशी दोन मुले झाली आहुकाला "देवक" आणि "उग्रसेन" असे दोन पुत्र झाले. त्यापैकी देवकाचे पुत्र "देववाण," "उपदेव","सुदेव",आणि "देववर्धन" असे चार झाले हे नृपा,त्या चौघांच्या "धृतदेवा" इत्यादिक सात बहिणी होत्या.||२१|| २२ || भावार्थ:---त्यांची नावे--–"धृतदेवा","शांतीदेवा","उपदेवा","श्रीदेवा","देवारक्षिता","सहदेवा",आणि "देवकी" अशी होत.त्या सर्वही वसुदेवाने वरिल्या. ||२३|| भावार्थ:----उग्रसेनाचे पुत्र-"कंस" "सुनामा","न्यग्रोध","कंक" "शंकू" "राष्ट्रपाल","सृष्टी" आणि "तुष्टीमान" हे नऊ होते.||२४|| भावार्थ----तशात "कंसा","कंसवती" "कंका","शुरभू" "राष्ट्रपालिका",ह्या पाच उग्रसेनाच्या कन्या होत,ह्या वसुदेवाच्या देवभाग इत्यादीक कनिष्ठ बंधूच्या स्त्रिया होत.||२५|| भावार्थ:----पूर्वी सांगितल्या विदुरथापासून "शूर" झाला,त्यापासून "भजमान" पुत्र झाला,त्यापासून "शिनी" झाला,त्यापासून "स्वयंभोज" झाला,त्याचा पुत्र "हृदीक" झाला तो मोठा मान्य होता.||२६|| भावार्थ:----त्याचे पुत्र-"देवबाहू", "शतधनु","कृतवर्मा" आणि "देवमीढ" असे चार होते.त्यापैकी देवमिढाला "शूर" झाला,त्याची मारीषा नामक पत्नी होती||२७|| भावार्थ:----तिचेठिकाणी त्याने,खाटेपना इत्यादी दोषांनी रहित असे दहा पुत्र उत्पन्न केले(त्यांची नांवे---(वसुदेव-देवभाग,देवश्रवस, अनाक,सृंजय,श्यामककंक,शमीक,वत्सक आणि वृक" अशी होत.त्यांमध्ये ज्यांच्या जन्मकाळी देवांचे आनक(नोबदी)आणि(दुंदुभी)नगारे आपोआप वाजुं लागले म्हणून श्रीकृष्णावताराचे योग्यस्थान अशा त्या वसुदेवाला "आनकदुंदुभि" असे म्हणतात."पृथा,श्रृतदेवा श्रृतकीर्ती श्रृतश्रव आणि राजधिदेवी" ह्या शूरांच्या पांच कन्या ह्या,वसुदेवादिकांच्या बहिणी होत.त्यामध्ये "पृथा" हि,तिचा पिता जो शूर त्याने आपल्या पुत्ररहित असलेल्या "कुंतिनामक"मित्राला दत्तक दिली होती म्हणून तिचे "कुंति" असे दुसरे नांव पडले होते. ||२८||२९||३०||३१|| भावार्थ:----त्या कुंतिने,एकेवेळी आपल्या घरी आलेल्या दुर्वासऋषीला शुश्रूपादिकेंकरून--सेवा करून संतुष्ट करून त्यापासून देवांना बोलावण्याची मंत्रविद्या संपादन केली होती,तिच्या सामर्थ्याच्या परिक्षेकरिता तिने एका मंत्राचा प्रयोग करून शुद्ध अशा सूर्याला आपल्याजवळ बोलाविले.||३२|| भावार्थ:----त्याचवेळी जवळ आलेल्या त्या सूर्याला पाहून विस्मितचित्त झालेल्या तिने भाषण केले की,खरेपणाच्या परीक्षेकरिता मी या विद्देचा प्रयोग केला होता परंतू तुझ्याकडून काहीच कार्य करून घ्यावयाचे नाही,यास्तव तूं माघारे गमन करावेस व्यर्थ बोलाविल्याबद्दल माझ्या अपराधाची क्षमा कर.आपण--जीवांनी जीवांची किंवा कोणांचीच परीक्षा घेऊ नये,किंवा मंत्र सामर्थ्याची विनाकारण परीक्षा घेऊ नये,कारण विनाकारण परीक्षा घेतल्यास आपलेच अहित होते,तर मंत्र देणाराचे मुळीच अहित होत नाही.मंत्र असो किंवा अन्य कांही असो,ज्याठिकाणी अगोदर साधन आहे व नंतर साध्या,त्याठिकाणी श्रद्धा ठेवावीच लागते.आपली साधनांवर श्रद्धा नसेल,तर ते कार्य करू नये,कारण त्या साधनांचे यथार्थ फळ प्राप्त न होता विपरीत फळ प्राप्त होत असते.श्रेष्ठांना विनाकारण बोलावू नये,कारण ते विनाकारण येत नसतात,तर कार्य करण्यासाठीच येत असतात.||३३|| भावार्थ:----तेव्हा सूर्य म्हणाला की,---हे सुंदरी,माझे दर्शन सफल होणारे आहे,करिता तुझेठिकाणी पुत्ररुपी गर्भ स्थापन करीतो."मी अजून कन्या आहे असे जर मनसील तर,"---"हे सुमघ्यमे,तुझी योनी जशी विदीर्ण होणार नाही तसें मी करीन म्हणजे तो गर्भ श्रम न होता कानांतूनच बाहेर पडेल".||३४|| भावार्थ:----असे बोलून त्या सूर्याने तिचेठिकाणी गर्भ स्थापन करून स्वर्गाला गमन केले नंतर दुसरा सूर्यच कि काय!असा तेजस्वी कुमार तत्काल श्रमावांचून कर्णद्वारा उत्पन्न झाला.सूर्याच्या ठिकाणी सामार्थे असल्यामुळे तो पुत्र कर्णद्वारे सूर्यासारखाच तेजपूर्ण श्रम न होता बाहेर पडला.||३५|| भावार्थ:----तेव्हा लोकापवादापासून भिणाऱ्या त्या कुंतिने दु:खानें--दु;ख अवस्थेत त्या बालकाला पेटीत घालून नदीच्या पाण्यात सोडून दिले,पुढे त्या कुंतीला सत्यपराक्रमी अशा तुझ्या प्रपितामहाने--पंडूराजाने (पंजोबाने)वरिले.आपण--जीवांनी लोकापवाद होईल असे अधार्मिक कार्य करू नये,कारण त्यामुळे अपमान होतो व निंदेस पात्र व्हावे लागते.ते कार्य जो जीव उत्पन्न झाला,त्या कार्यामुळे विनाकारण कर्ण यास जन्मभर--जीवनभर कष्ट--दु;ख भोगावे लागले व कुंतीसही दु:ख भोगावे लागले.असा भावी जीवनाचा विवेक करून जीवन जगावे,जेणेकरून दु:ख भोगण्याचा प्रसंग येऊ नये.||३६|| भावार्थ:----श्रृतदेवेला करूश देवाचा अधिपती वृद्धशर्म्याने वरिले.तिचे ठिकाणी तर,पूर्वी सनकादिक ऋषींनी शापलेल्या भगवंताचा विजयनामक द्वारपाळ जो "दिती"चा पुत्र "हिरण्याक्ष" झाला होता,तोच "दत्तवक्त्रानामक" पुत्र उत्पन्न झाला.||३७|| भावार्थ:----श्रृतकीर्तीला कैकेय (केकयदेशाधिपती)"धृष्टकेतु"नें वरीलें तिचेठीकाणी कैकेय 'संतर्दनादिक पांच पुत्र उत्पन्न" झाले.||३८|| भावार्थ:----राजाधिदेवीचेठिकाणी "जयसेनराजा"ने,अवंतिदेशाचे अधिपती "विंद" "अनुविंद" नामक दोन पुत्र उत्पन केले;चेदिदेशांचा राजा जो "दमघोष" त्याने तिला "शिशुपाल"नाकम पुत्र झाला.त्याचा उत्पति प्रकार सप्तमस्कंधांत तुला सांगीतला आहे.असो याप्रमाणे वसुदेवाच्या बहिणीचे पति व पुत्र सांगून आंता त्या "वसुदेवाच्या नऊभावाच्या" स्त्रिया व पुत्र सांगतो---"देवभागा"ला कंसानामक स्त्रीचेठिकाणी "चित्रकेतू" आणि "बृह्ब्दल" असे दोन पुत्र झाले. ||४०|| भावार्थ:----तसेच "देवश्रव्या"ला,कंसावती स्त्रीने "सुवीर" आणि "इशुमा" असे दोन पुत्र झाले त्या प्रमाणे "आनका"पासून कंकेंचेठिकाणी "सत्यजित" आणि "पुरुजित" असे दोन पुत्र झाले. ||४१|| भावार्थ----"सृजया"ला राष्ट्रपालीचे ठिकानी "वृष","दर्मर्षण" "इत्यादीक" पुत्र झाले."श्यामका"नें शुरभूमिंचे ठिकाणी "हरिकेश" आणि "हरण्याक्ष" असे दोन पुत्र उत्पन्न केले.||४२|| भावार्थ:----तसेचं "वत्सका"नें,मिश्रकेशीनामक अप्सरेचेठिकाणी "वृकादिक" पुत्र उत्पन्न केले,दर्वार्क्षी स्त्रीचेठिकाणी "तक्ष" "पुष्करशाल" इत्यादिक पुत्र उत्पन्न केले.||४३|| भावार्थ:----"शमिका"पासून सुदामनी स्त्रीला "सुमित्र","अर्जुनपाल" "इत्यादिक" पुत्र झाले,"कंका"नें,कर्निकेची "ऋतघाम" आणि "जय" हें पुत्र उत्पन्न केले.||४४|| भावार्थ:----आतां "वसुदेवा"च्या स्त्रिया व पुत्र सांगतो--–"पौरवी","रोहिणी", "भद्रा","मंदिरा","इला" "रोचना",व "देवकी" वसुदेवाच्या "अठरा" स्त्रिया होत्या.||४५|| भावार्थ:----त्यापैकी "रोहिणी"चे ठिकाणीं "वसुदेवा"नें,"बल","गद" "सारण","दुर्मद" "विपुल","ध्रुव" या पुत्रास व "कृत" "इत्यादिक" दुसऱ्याही पुत्रास उत्पन्न केलें.||४६|| भावार्थ:----"वसुदेवा"पासून पौरवीला "सुभद्र","भद्रवाह","दिर्मदभद्र" आणि "भूत" "इत्यादिक" प्रशिद्ध असे "बारापुत्र" झाले.||४७|| भावार्थ----"नंद","उपनंद","कृतक","शूर" इत्यादिक "मंदीरे"चेपुत्र होते,"कौसल्या"नामक "वसुदेवा"ची स्त्री तर---"कुलनंद" असा केशीनामक एकच पुत्र प्रसवली.||४८|| भावार्थ----"रोचने"चेठिकाणी "हस्त" व "हमांगत" इत्यादिक पुत्र झाले,तसेच "वसुदेवानें इलानाम भार्यचेठिकाणी याद्वांमध्ये मुख्य असे उरू,वल्क दत्यादिक पुत्र उत्पन्न केले||४९|| भावार्थ:----वसुदेवाला धृतदेवेचे ठिकाणीं विपृष्ठ नामक एकच पुत्र झाला,हे राजा,वसुदेवा"च्या "शांतिदेवा"नामक भार्यला तर---"श्रम","प्रतिश्रृत" "इत्यादिक" पुत्र झाले.||५०|| भावार्थ:----"कल्प","वर्ष" "इत्यादिक" "दहाराजे"तर-वसुदेवाच्या "उपदेवेचे" पुत्र झाले,"श्रीदेव"चे तर---"वसू","हंस" "सुंवंष" "इत्यादिक" "सहा" पुत्र झाले.||५१|| भावार्थः---"देवरक्षिता"नामक भार्येला तर---"गद"इत्यादिक "नऊ-पुत्र" झाले,तसेच "वसुदेवा"ने "सहदेव"नामक भार्येच्या योगानें "पुरू","विश्रुत" "इत्यादिक--आठपुत्र",जसे साक्षात् धर्माने अष्टवसु उत्पन केले तसे उत्पन्न केले.तसेच उदारबुद्धी अशा त्या वसुदेवानें "देवकी"चेठीकाणी "आठ--पुत्र" उत्पन्न केले.||५२-५३|| भावार्थ:----ते---"कीर्तिमान्" "सुषेण","भद्रसेन" "ऋजू" "समर्दन" "भद्र' आणि 'शेषाचा अवतार संकर्षण (बलराम)"हे सात होत.||५४|| भावार्थः----आणि त्या "देवकी-वसुदेवां"चा आठवा--पुत्र स्वत:साक्षात् हरीच श्रीकृष्ण"रूपाने अवतीर्ण झाला आणि ही राजा,तुझी--राजा परीक्षिताची आजी महाभाग्यवती "सुभद्रा" हि कन्या झाली.||५५|| भावार्थः---ज्या-ज्याकालीं यालोकी खरोखर धर्माचा विनाश आणि पापाची वृद्धी होते,त्याकाली कर्तु अकर्तु अन्यथाकर्तु समर्थ असा भगवान् हरि,साधूंच्या रक्षणाने धर्मस्थापन करण्याकरितां आपला अवतार उत्पन्न करतो.||५६|| भावार्थः----हे भूमिपते,मायनियंता असंग साक्षी,व सर्वव्यापक ह्या भगवंताला,आपल्या मायेच्या विनोदांवांचून जन्मांचे किंवा कर्माचे कारण मुळीच घडत नाहीं.निर्गुण--निराकार सर्व-व्यापक असलेला जो भगवंत आहे,त्यास मायेचा आश्रय घेतल्यावाचून जन्मांचे किंवा कर्माचे कारण मुळीच घडत नाही.थोडक्यात दोघानांही एकमेकाचा आश्रय घेतल्यावाचून कांहीच करता येत नाही.माया त्याची सत्ता घेते व तो तिच्यामुळे व्यवहार करितो म्हणजेच कार्य करितो.||५७|| भावार्थः---आणि इच्छामात्राने केलेली ज्याची लीला,जीवाच्या उत्पत्तिस्थिसंहाराकरिता होत असते आणि त्याचा अनुग्रह प्राण्यांच्या जन्मादि संसारनिवत्तीनें मोक्ष प्राप्तीकरितां होत असतो;त्याला अवतार घेण्याविषयीं इच्छेवाचून दुसरें कारण आहे?कांहींच नाही.||५८|| भावार्थः---आता त्याची लीलाही भूमीवर अनुग्रह आहे असें सांगतो---राजांचे चिन्हमात्र धारण करणारे परंतू आसुरसंपत्तीनें युक्त असून अक्षौहिणीसंख्यांचा सेनांचे अधिपती जे शिशुपाल जरासंध कंस इत्यादिक त्यांनी पिडीत केलेल्या भूमीचा भार उतरण्याकरितां उद्योग करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने,बलरामासह वर्तमान इंद्रांदिदेवांनहिंही मनानें संकल्प करण्याससुद्धां अशक्य अशीं पुतना-बक-केशि-वधादिक कर्मे केली.||५९-६०|| भावार्थः---आणि कलीयुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्याकरितां दुःख शोक आणि अज्ञान यांचा नाश करणारे व धर्मादिक पुरुषार्थरूप पुण्य उत्पन्न करणारें यश विस्तृत केलें आहे.आपणही--जीवांनी धर्म,अर्थ,काम,मोक्षण संपादन करण्याकरिताच मनुष्य देहास आलो आहोत,ते कार्य करूनच आपल्या--जीवांचे सार्थक करावे,अन्य कार्य करू नये.आपण--मनुष्य देहातील जीवांनी सार्थक करून जर न घेतले तर मनुष्य देहात व कुत्र्याच्या देहात कांहीच फरक राहणार नाही असेच म्हणावे लागेल.असे शात्राकारांचे--वेदांचे, भगवंताचे,संत--महात्मा यांचे मत आहे.वेद--शास्त्र,भगवंत व संत--महात्म्य आपल्याकारीतच--मनुष्य-देहातील जीवांसाठीच आलेले आहेत.म्हणजेच ते त्यांच्यासाठी आलेले नाहीत.||६१|| भावार्थः---साधूंच्या कर्णांना अमृताप्रमाणें गोड लागणाऱ्या ज्या यशोरूप तीर्थश्रेष्ठाचेठिकाणीं श्रोत्रेंद्रिय हेंच ज्याच्या जवळ पिण्याचें साधनपात्र आह तो पुरुष,एकवारतरी आचमन करून म्हणजे थोडेंतरी श्रवण करून भगवंताच्या सौंदर्याने आकृष्टचित्त झाला असता तो,मोक्षाला प्रतिबंध करणाऱ्या कर्मवासनेचा त्याग करितो.म्हणून आपण--जीवांनी त्यांच्या उपदेशाचे आपल्या शरीराच्या कर्ण--श्रोत्रद्वारा सत्संग करून श्रवण करून चौथा पुरुषार्थ जो मोक्ष संपादन करून आपले सार्थक करावे.त्यामुळे आपले जन्म--मरण निवृत्त होऊन अत्यंतिक दु:खाची निव्तुत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होईल.सर्व जीवांची हीच इच्छा आहे,ती पूर्ण होईल. ||६२|| भावार्थः---भोज,वृष्णि अंधक,मधू शूरसेन,दशार्हक तसेच कुरु,सृंजय आणि पांडव यांनी निरंतर ज्याच्या लीला स्तविल्या आहेत त्या श्रीकृष्णाने स्नेहपूर्वक व हास्ययुक्त जें आपलें अवलोकन त्याच्यायोगानें भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या वाक्यांनी गोवर्धनद्धरणादी पराक्रमयुक्त लीलेने आणि सर्व अवयवांनी सुंदर अशा आपल्या मूर्तीने मनुष्यलोकाला आनंदयुक्त केलें आहे.म्हणून आपण--जीवांनी ज्या लीला संत--महात्मा यांनी स्तविल्या आहेत,भगवंतानी लीला केल्या आहेत,त्यांचे श्रवण करावे.आपण--जीवांनी महाकल्याण करून घ्यावे.असे हे सार्थक फक्त मनुष्य देहातच करून घेता येते. ||६३-६४|| भावार्थः---तें दाखविण्याकरतां त्याच्या मुखाची शोभा सांगतो----मकरावर कुंडलांनी सुंदर असे कर्ण व प्रकाश पावणारे गाल यांच्या योगाने सुंदर,ज्याचेठिकाणी विलासयुक्त हास्य आहे व ज्याचेठिकाणी निरंतर शोभातिशय आहे असें ज्या श्रीकृष्णाचें मुख,अनंत दृष्टींनी आदरपूर्वक आवलोकन करणाऱ्या स्त्रिया पुरुष,तृप्त झाले नाहींत.तर नेत्रांना निमेषरूप असलेलें व्यवधान सहन न करितहोत्साते,तें व्यवधान करणाऱ्या निमिवर कुपित झाले.म्हणून आपण--जीवांनी श्रद्धापूर्वक--आदरपूर्वक भगवंताचे नामस्मरण,सगुण-साकार चरित्राचे श्रवण,सगुण--निराकाराचे चरित्र श्रवण व निर्गुण-निराकाराचे स्वरूप जाणून ऐक्य करावे,त्यातच आपल्या मानवी जीवनाचे सार्थक आहे.||६५|| भावार्थः---आतां श्रीकृष्णाचे चरित्र संक्षेपाने वर्णन करितो---हे राजा,तो भगवान् श्रीकृष्ण,प्रथम मथुरेंमध्यें आपल्या चर्तृभुजरूपाने झाला आणि नंतर त्या पित्याच्या कारागृहातून गोकुळांत गेला.तेथें गोकुलवासी जणांचे धर्मादीक अर्थ वाढवीत होत्साता पूतनादीक शत्रूंना मारून पुन्हा मथुरेंत आला आणि सोळाहजार एकशें आठ स्त्रिया करून त्या प्रत्येकीचेठिकाणीं दहा दहा असे शेकडो पुत्र उत्पन्न करून आपला वेदमार्ग लोकांमध्यें प्रसिद्ध करण्याकरितां त्यानें नानाप्रकारच्या यज्ञांनी आपलेंच आराधन केलें.म्हणून आपण--जीवांनी ती चरित्रे श्रवण करावे.||६६|| भावार्थः---आणि त्या श्रीकृष्णाने कौरवांच्या व पांडवांच्या मध्यें उत्पन्न झालेल्या कलहाच्या निमित्ताने,पृथ्वीला अतिशय झालेला भार दूर करण्याकरितां युद्धांमध्ये राजांच्या सेना आपल्या दृष्टीनेच नाहीशा करून,अर्जुनाला जय मिळवून दिला आणि उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून निजधामास गमन केलें.म्हणून आपण श्रीमद्भागवत ग्रंथ श्रवण करून सार्थक करून घ्यावे.||६७|| २४-----श्रीमद्भागवतमहापुराणांतील नवम(९)स्कंधामध्यें यदुवंशानुकीर्तननामक हा चोविसावा(२४)अध्यायसदोष्ठ(६७)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||२४|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| ||इति नवम:स्कन्ध: || ------नववा स्कन्ध समाप्त.|| | ||हरि: ॐ तत्सत्||
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment