अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः दहावा उत्तरार्ध
| ॐ नमो भगवते वासुदेवाय | =================================================== l श्रीमद्भागवतमहापुराणम्
=================================================== | दशमस्कन्ध-स्कंध दहावा-१० | [उतरार्ध] ____________________________________________________________________________ |५०--- १--जरासंधाशी युध्द आणि द्वारकेची निर्मिती ---१ ____________________________________________________________________________ श्रीगणेशाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय आता ह्या पन्नासाव्या आध्यामध्ये,जरासंधाच्या भायानेच कि काय श्रीकृष्णाने समुद्रामध्ये द्वारकानगरी निर्माण करून तिच्यामध्ये आपल्या सर्व यादवांना नेले,अशी,कथा वर्णन केलेल आहे. | अस्ति:प्राप्तिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ | मृते भर्तरि दु:खार्ते ईयतु: स्म पितुर्गृहान् ||१|| अर्थः----श्रीकृष्णाने,पुतना केशीवगैरे कपटी दैत्यांना कपटाने अनायासाने जिंकिले.तो प्रकार पूर्वार्धांत सगुण आता धार्मिक म्हणविणाऱ्या जरासंधाला धर्मानेच जिंकिला तो प्रकार सांगण्याकरिता श्रीशुकाचार्य म्हणाला की,-- हे भरतकुलश्रेष्ठ राजा,अस्ति आणि प्राप्त या नांवांच्या कंसाच्या दोन स्त्रिया होत्या त्या भर्ता (कंस)मरण पावला असता,दुःखाने पिडीत होऊन पित्याच्या (जरासंधाच्या)घरी निघून गेल्या ||१|| भावार्थ:---भगवंत श्रीकृष्णांकडून वध झाल्यामुळे प्रजा सुखी झाली,पण जनस याच्या पत्न्या---अस्ती आणि प्राप्ती दु:खी झाल्या.कुमारी अवस्थेत कन्या यांना आई—वडिलाचा आश्रय असतो,लग्न झाल्यानंतर त्यांना आपल्या पतीचा आश्रय असतो,तर पतीच्या मृत्युनंतर मुले जर अज्ञानी असतील तर त्यांना पुन्हा आई—वडिलांचाच आश्रय असतो.म्हणून कंस याच्या निधनानंतर त्या आई—वडिलांच्या घरी गेल्या.त्यांना असह्य दु:ख झाले होते.म्हणून ते दु:ख नाहीसे करण्याकरिता गेल्या.||१|| अर्थः---आणि दुःखित झालेल्या त्या दोघींनी आपला पिता मगधदेशांचा राजा जो जरासंध त्याला आपल्या वैधव्याचे कारण (कृष्णचरित्र)सद्यात निवेदन केले ||२|| | स तदप्रियमाकर्ण्य शोकामर्षयुतो नृप | अयादवीं महिं कर्तुं चक्रे परममुद्दमम् ||३|| अर्थः—हे राजा,त्याने ते अप्रिय वर्तमान ऐकून,कंसाविषयी शोक आणि श्रीकृष्णाविषयी क्रोधावेश यांनी युक्त होऊन,पृथ्वी यादवरहित करण्याविषयी मोठा प्रयत्न चालविला ||३|| अर्थः—तो असा कि,--- उद्योगाने मिळविलेल्या अक्षौहिनी वीस व स्वतःच्या तीन मिळून तेवीस अक्षौहिनी सैन्य घेऊन यादवांनी राजधानी जी मथुरानागरी तिला सर्वबाजूंनी वेढा घातला ||४|| भावार्थ:---श्रीकृष्ण यांनी आपले जावाई कंस यांचा वध केला ही बातमी ऐकून जरासंध यास दु:ख झाले.दु:खाच्यापोटी क्रोध उत्पन्न झाला.त्या क्रोधात त्याने निर्णय घेतला कि पृथ्वीतलावर कोठेही यादव राहू देणार नाही.त्यामुळे त्याने युद्धाची मोठ्या आवेशाने तयारी केली.||४|| अर्थः—त्यावेळी श्रीकृष्णाने,मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या समुद्राप्रमाणे जिकडेतिकडे पसरलेले त्याचे सैन्य पाहून व त्याने नगराला वेढा घातल्यामुळे भयभीत झालेल्या स्वजनाला पाहून||५|| | चिन्तयामास भगवान् हरिः कारणमानुषः | तद्देशकालानुगुणं,स्वावतारप्रयोजनम् ||६|| अर्थ:----भूभार उतरण्याकरिता मनुष्य झालेल्या त्या भगवान श्रीहरीने,या देशीव या काळी योग्य असे आपल्या अवताराचे प्रयोजन काय आहे ? म्हणजे हे सैन्यच मारून जरासंधला सोडून द्यावा किंवा जरासंधाला मारून सौन्य हस्तगत करावे अथवा जरासंधासंहीत सर्व सैन्याचा वध करावा याबद्दल चिंतन करून निश्चय केला कि,- ||६|| अर्थः-----पृथिविला भारभूत असलेले हे सैन्यच मारून टाकावे;कारण,हे जरासंधाने आपल्या स्वाधीन असलेल्या सर्वराजांचे,शिपाई,अश्व,रथ आणि हत्ती यांनी व्याप्त असे तेवीस अक्षौहिणी संख्येचे सैन्य जमा करून तेथे आणिले आहे.जरासंधाला तर मारुं नये सोडून द्यावम्हणजे तो पुन्हा दुष्टांचे सैन्य जमा करण्याचा उद्योग करील||७-८|| भावार्थ:---- जरासंध याने तो व त्याचे मांडलिक राजे यांना सोबत घेऊन मथुरेला चोहोबाजुनी वेढा दिला.असा दिलेला वेढा भगवंतांनी पाहिला.भगवंतांनी असा विचार केला कि,आपण दुष्टांना मारण्यासाठी व सज्जनांचे संरक्षण करण्याकरिता मृत्यूलोकात मनुष्य देहात आलेलो आहोत.जरासंध दुष्ट व त्याचे मांडलिक राजेही दुष्ट आहेत.आपण सर्वांना मारून टाकावेत.असे असले तरी मांडलिक राजांना अगोदर मारावे व अरासंधास शेवटी मारावे,कारण हा पुन्हा—पुन्हा दुष्ट मांडलिक राजांना घेऊन येईल व त्यामुळे सर्व दुष्ट मांडलिक राजे मारतील व शेवटी या जरासंधास मारून टाकावे,असा विचार केला.असे योग्य नियोजन श्रीकृष्ण यांनी केले.||७—८|| | एतदर्थोsवतारोsयं भूभारहरनाय मे | संरक्षणाय साधूनां कृतोsन्येषां वधाय च ||९|| अर्थः-----याकरिताच म्हणजे भूमीचा भर हरण करण्याकरिता,साधूंच्या रक्षणाकरिता व दुष्टांच्या वधाकरिता हा मी अवतार धरण केला आहे.||९|| | अन्योsपि धर्मरक्षायै देहः संभ्रियते मया | विरामायाप्यधर्मस्य कालेः प्रभवतः क्वचित् ||१०|| अर्थः----हाच केवळ अवतार धारण केला असे नाही तर दुसरही देह ( अवतार ),धर्माच्या रक्षणाकरीता व एखादेवेळी वृद्धिगत होणार्या अधर्माच्या नाशाकरिता मला धारण करावा लागतो||१०|| अर्थ:-----याप्रकारे श्रीकुष्ण चिंतन करीत असता,त्याचवेळी सारथ्यासहवर्तमान व ध्वजकवजदी साहित्यसहवर्तमान सुर्यासारे तेज:पुंज दोन रथ,आकाशातून खाली उतरून रामकृष्णांच्या समीपभागी प्राप्त झाले.||११|| अर्थः---तशीच पुरातनाची चक्रगदादिक दिव्य आयुधे सहज अकस्मात त्या रथाबरोबर प्राप्त झाली.तेव्हा त्यांना पाहून श्रीकृष्ण भगवान्,बलरामास म्हणाल कि,-||१२|| अर्थः-----श्रीभगवान म्हणाला – हे आर्य प्रभो,तूं ज्यांचा रक्षक आहेस त्या यादवांना,जरासांधणे आपल्या सैन्याचा वेढा घातल्यामुळे केवढे हे दुःख प्राप्त झाले आहे पहा ! तुझ्याकरिता रथ आला आहे; तशीच तुला आवडणारी हि हलमुसलादिक आयुधेही आली आहेत.||१३|| अर्थः----यास्तव या रथावर बसून हे सैन्य मारून टाक आणि आपल्या यादवांचा संकटांतून उद्धार कर.करितांच आम्हा उभयताचे जन्म असून ते दृष्टांचा निग्रहद्वाराने साधूंना सुख करणारे आहे||१४|| अर्थः---यास्तव,हा तेवीस अक्षौहिणीसैन्यरूप भूमीचा भार दूर कर.याप्रमाणे पश्रस्पर मसलत करून ते रामकृष्ण,कवच धारण कयन रथारूढ झाले आणि शंखचक्रादिक आपापल्या आयुधांनी युक्त व थोड्याशा चतुरंग सैन्याने वेष्टित होऊन त्या मथुरानगरीतून बाहेर निघाले.तेव्हा ज्याचा दारूकनामक सारथी आहे अशा श्रीकृष्णाने नगराबाहेर पडतांच आपला पांचजन्यनामक शंख वाजविला||१५-१६|| अर्थः-----त्या शंखाच्या नादापासून जरासंधाच्या सैन्याच्या हृदयामध्ये भयाच्या योगाने कंप उत्पन्न झाला.तेव्हा त्या रामकृष्णाना पाहून जरासंध म्हणाला कि,- हे कृष्णां,हे पुरुषाधमा,तुज एकट्या बालकाबरोबर मी लज्जेमुळे युद्ध करण्याची इच्छा करीत नाही.हे मंदबुद्धे,हे मातुलघातकी,स्वजनांची केवळ प्रेमाने रक्षण करण्यास योग्य अशा तुजबरोबर मी युद्ध करीतच नाही; यास्तव तूं माघारा जा ||१७-१८|| अर्थः---असे कृष्णाला सांगून बलरामाला म्हणाला कि,- हे रामा,तुंला जर माझ्याबरोबर युद्ध करण्याची श्रद्धा असेल तर युद्ध कर परंतु धैर्य धारण कर.माझ्या बाणांनी छिन्नछिन्न झालेल्या देहाचा त्याग करून करून स्वर्गास जा,किंवा अच्हेददेह असल्यामुळे बलाढ्य असलास तर माझा वध कर.||१९|| भावार्थ:--- युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो.म्हणून मनुष्याने देशभक्त होऊन देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण खर्च करावे.त्यास निश्चितरूपाने स्वर्ग मिळतो.इतरांसाठी, परोपकारासाठी जर आपले जीवन व्यतीत गेले तर पुण्य होते,म्हणून स्वर्ग हा उत्तम मार्ग आहे.देह जावो अथवा राहो,देशासाठी प्राण जावो.असा निश्चय करावा.||१९|| अर्थः---श्रीभगवान म्हणाले:----हे राजा,शुप पुरुषद्ध आपली स्तुती करीत नाहीत,तर स्तुतीला कारण असलेला आपला पराक्रमच दाखवितात.यास्तव,ज्याअर्थी सन्नीपातवायू झालेल्या मरणोमुखासारखा तूं आतुर आहेस त्याअर्थी तुझे हे आत्मस्तुतीवर भाषण आंम्ही ग्रहण करीत नाही.||२०|| भावार्थ:--- जे शूर असतात,ए प्रोढी मिरवीत नसतात.प्रोढी म्हणजे फक्त वाच्यता करणे पण करिती न करणे,फक्त बोलणे पण प्रत्यक्ष कृती न करणे.असा जरासंध आहे असे भगवंत जरासंध यास म्हणतात.आपण आपली प्रोढी मिरवू नये,कारण प्रोढी मिरवणारा कृती करत नसतो,साध्यापर्यंत जात नसतो.म्हणून आपण आपला मोठेपणा वर्णन करू नये.आपण आपला मोठेपणा वर्णन न करता,कृतीने साध्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.त्यांना जग कृती पाहून आपोआपच चांगले म्हणत असते.||२०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा याप्रमाणे सांगितलेल्या त्या जरासंधाने सैन्य,रथ,ध्वज,अश्व आणि सारथी यांसहित असलेली त्या राम कृष्णाच्या समीपभागी येऊन आपल्याबलाढ्य मोठ्या सैन्याचा समुदायाने त्यांचे,जसा वारा,मेघ व धुरळा यांच्या योगाने सूर्याचे व अग्नीचे आवरण करितो त्याप्रमाणे आवरण केले||२१|| अर्थः----त्यावेळी नगरांतील उपरमाड्या,गच्चाव गोपुरे यांच्यावर चढलेल्या स्त्रिया,युद्धभूमीचेठिकाणी गरूढध्वज व तालध्वज या चिन्हांनी चिन्हित अशा रामकृष्णांच्या रथांना न पाहिल्यामुळे,शोकाने व्याप्त होऊन मूर्च्छित झाल्या||२२|| भावार्थ:--- मथुरेच्या पुरुष आणि स्त्रियांनी पहिले कि,आपल्या मथुरेस जरासंधाने अफाट सैन्याने वेढा दिलेला आहे.निश्चित आता आपला पराभव होऊन आपण जरासंधाच्या ताब्यात जातोत.दुष्टांच्या ताब्यात जाऊन दु:ख भोगावयास मिळेल,असी त्यांना भीती वाटत आहे.त्यामुळे त्यांना मूर्च्छा येऊन त्या पडल्या.सामान्य जे असतात,ज्यांना इतर विषयांचे ज्ञान नसते,असे फक्त संख्या पाहत असतात,पण गुणवत्ता पाहत असतात.म्हणून जीवांनी संख्यापेक्षा गुणांस अधिक प्राधान्य ध्यावावयास पाहिजे.तेव्हा योग्य निर्यय घेता येतो.म्हणून गुणवान होण्याचा प्रयत्न करा,अन्यथा जीवनात दु:ख भोगावे लागते.||२२|| अर्थः-----तेव्हा श्रीकृष्णांने,शत्रुसैन्यरूप मेघांच्या वारंवार होणार्या बाणरूप अतिभयंकर वृष्टीने पिडीत झालेले आपले सैन्य पाहून,देवदैत्यांनी श्रेष्ठत्वेकरून सन्मान केलेल्या आपल्या शार्गनामक श्रेष्ठ धनुष्याचा टणत्कार शब्द केला||२३|| अर्थः-----त्यावेळी गंडस्थळे फुटून गेलेले हजारो हत्ती व बाणांनी कंठ तुटलेले हजारो घोडे मरून पडले.तसेच ज्यांचे घोडे,ध्वज,सारथी व धनी मरून पडले आहेत असे हजारो रथ,छिन्नछिन्न होऊन पडले.तसेच ज्यांचे भूज,मांड्या व कंठ तुटून गेले आहेत असे लक्षवधी शिपाईहि मारून पडले.||२५|| अर्थः-----त्यावेळी भगवंताच्या बाणांनी तुटून गेलेले जे शिपाई,हत्ती व घोडे यांच्या अंगांपासून उत्पन्न झालेल्या रक्ताच्या शेंकडो नदया वाहुं लागल्या.त्या कि,- ज्यांचेठिकाणी,तुटलेले बाहू हेच सर्प व पुरुषांची मस्तके हेंच कांसव आहेत,ज्या मरण पावलेल्या हत्तीरूप द्वीपांनी व अश्वरूप सुसरींनी व्याप्त आहेत||२६|| अर्थः----ज्यांचेठिकाणी तुटलेले हात व मांड्या हे मत्स्य व मनुष्यांचे केंच हेच शेवाळ आहे,ज्या धनुश्परूप तरंगांनी व आयुधरूप करपांनी भरून गेलेल्या असून चक्ररूपी भोवऱ्यानी भयंकर आहेत,ज्यांच्यामध्ये महामण्यांचे समुदाय हेच पाषाण व भूषणे ह्याच वाळू आहेत||२७|| अर्थः----ज्या भित्र्यांना भय उत्पन्न करणाऱ्या व वीरांना परस्पर हर्ष उत्पन्न करणाऱ्या आहेत,अशा वाहुं लागल्या.याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला सैन्याचा नाश सांगून आतां बलरामाने केलेला सांगतो – ज्यांचे,शत्रूपराभव करण्याचे सामर्थ्य अपरिमित आहे अशा दुर्मद शत्रूंना मुसळाने मारून टाकणाऱ्या त्या बळरामानेंहि,अंतपरारहीत आणि समुद्रासारखे प्रवेश करण्यास अशक्य व भयंकर असे ते जरासंधाने रक्षण केलेले सैन्य क्षयाला पोचविले.हे राजा,अशाप्रकारचे जें रामकृष्णाने कर्म सांगितले ते केवळ त्या जगदीश्वरांचे खेळणेच होय.तो पराक्रम नव्हे||२८-२९|| भावार्थ:--- भगवान कृष्ण आणि बलरामदादांनी आपल्या गुणांनी जरासंधाची जी सेना समुद्राप्रमाणे दुर्गम,भयावह आणि अपार असलेली सेना आपल्या गुणांनी नष्ट करून टाकली.म्हणून आपण गुणवान होण्याचा प्रयत्न करा.गुण हा आपोआप न मिळता प्रयत्नाने मिळवावा लागतो,त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात.||२९|| अर्थः-----व ते आश्चर्यहि नव्हे.कारण,जो अनंत गुण भगवान आपल्या संकल्पमात्रेकरून त्रैलोक्याचे,उत्पत्तीस्थितीसंहार करितो त्याला शत्रूसैन्याचा निग्रह हे आश्चर्य नव्हे तथापि मनुष्याचे अनुकरण करणाऱ्या त्याचे हे कर्म आश्चर्यासारखे वर्णन केले आहे.||३०|| भावार्थ:--- भगवंत ज्यावेळेस मनुष्यरुपाणे अवतार घेतात.तेव्हा ते आपणास—मनुष्यास आदर्श घेण्यासाठी कार्य करतात.म्हणून आपण भगवंतांनी जे कार्य केले आये,ते आपणास आदर्श घेण्यासाठी केलेले आहे,.आपण त्यानुसार वागण्याचा आवश्य प्रयत्न करावा.भगवंत जीवांचे कार्य करण्यासाठी येतात.हेही बरोबर आहे,पण मनुष्यांनी भगवंतांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे वागण्यासाठीही आहे.असे जीवांनी लक्षात घेऊन धर्मानुसार वागण्याचा प्रयत्न करावा.म्हणून भगवंतांचे गुण आणि प्रयत्न घ्यावेत.जे अफाट कार्य आहे,आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे,ते कार्य कितीही प्रयत्न केला तरी घेता येत नाही.ते आपण घेऊ नये.उदा—गोवर्धन लीला,अनेकपत्नीव्रत. गोवर्धनलीला ही अतिप्रजन्यवृष्टीपासून रक्षण व्हावे म्हणून व जो रक्षण करतो त्याचेच उपकार मानून फेडण्याचा प्रयत्न करावा.हा आदर्श आपण घ्यावा म्हणून ही लीला केलेली आहे.भौमासुराने सोळाहजारएकशे स्त्रियांना विनाकारण तुरुंगात डांबून ठेवले होते.श्रीकृष्ण यांनी त्यांना तुरुंगातून सोडवले.तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्याशी कोणी विवाह केला नसता,म्हणून भगवंतांनी स्वत: त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला.आपणसुद्धा एखादी स्त्री ही कांही कारणास्तव निंदित झालेली असेल तर,पहिलीच पत्नी म्हणून निंदित स्त्रीचा स्वीकार करावा,मात्र अनेक स्त्रीचा स्वीकार करू नये,कारण तो अधर्म ठरेल.असा विवेक करून श्रेष्ठांचे अनुकरण करावे.||३०|| | जग्राह विरथं रामो जरासन्धं महाबलम् | हतानीकावशिष्टासुं सिंहः सिंहमीवौजसा ||३१|| अर्थः-----असो.नंतर,ज्याचे सैन्य मारिले आहे व ज्याचे प्राणमात्र अवशिष्ट राहिले आहेत त्या विरथी झालेल्या महाबली जरासंधाला,बलरामाने जसा सिंह,सिंहाला धरितो त्याप्रमाणे पराक्रमाने धरिले||३१|| | बध्यमानं हतारातिं पाशैर्वारुणमानुषैः | वारयामास गोविन्दस्तेन कार्यचिकीर्षया ||३२|| अर्थ:-----नंतर दुःखरहित व प्रसन्नचित्त होऊन सामोऱ्या आलेल्या मथुरावासी लोकांशी मिळून,सुत,मागध व बंदी,यांनी ज्याच्या विजयाचे गायन चालविले आहे असा तो श्रीकृष्ण नगरीत प्रवेश करण्यास निघाला.||३७|| अर्थः-----तो प्रभू नगरीत प्रवेश करीत असता शंख,दुंदुभी,नोबदी,डंके,वीणा,मुरल्या मृदंग इत्यादिक अनेक वाद्ये वाजूं लागली||३८|| अर्थः-----ती नगरी,चंदनादिकांच्या योगेकरून मार्ग सेवन केलेली,हर्ष पावलेल्या जणांनी युक्त,पताकादिकांनी अलंकृत,वेदघोषाने नादित आणि उत्सवाने जिच्यामध्ये तोरण बांधिली आहेत अशी होती||३९|| अर्थः------स्त्रियांनी फुले,दही,अक्षता व अंकुर इत्यादिकांचा वर्षाय केलेला व ज्यांची नेत्रे प्रीतीने प्रफुल्लीत झाली आहेत अशा नागरिक लोकांनी मोठ्या प्रेमाने अवलोकन केलेला तो श्रीकृष्ण त्या नगरीमध्ये,प्रविष्ट झाला.||४०|| भावार्थ:--- भगवंतांनी आपल्या गुणांनी मथुरेचा विजय संपादन केला व दु:ख घालवून सुखी केले.तसे आपण इतरांचे दु:ख घालवून सुखी करण्याचा प्रयत्न करावा. मथुरेतील स्त्रियांनी श्रीकृष्ण यांचा थाटात—माटात सत्कार केला.तसेच आपणसुद्धा इतरांनी दु:ख घालवून सुखी केले असेल तर त्यांचे उपकार मानून,ते उपकार फेडण्याचा प्रयत्न करावा.कृतघ्न न होता कृतज्ञ राहावे.कृतघ्न म्हणजे केलेल्या उपकाराची जन न ठेवता त्यांच्यावर अपकार करणारा.हा अपराध आहे,यामुळे पाप होत व पापांचे फळ दु:ख भोगावे लागते.कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जान ठेऊन,तो उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा.यामुळे पाप होत नाही म्हणजेच दु:ख होत नाही.||४०|| | आयोधनगतं वित्तमनन्तं वीरभूषणम् | यदुराजाय तत् सर्वमाहृतं प्रादिशत्प्रभुः ||४१|| अर्थः-----तेथे त्या प्रभुणे,युद्धभूमीवर पडलेले वीरांचे भूषणरूप असंख्यात जें द्रव्य आणिले ते सर्व उग्रसेन राजाला समर्पण केले.||४१|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी रानाभूमिवरून जितके धन आणले होते आणि अलंकार आणले होते,ते सर्व यादवराज उग्रसेन यांना आपणहून दिले.त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांचे कांही कार्य केले असेल तर,त्यानिमित्य आलेली सर्व सामुग्री ज्याला—त्याला देणे आपले कर्तव्य असते.असे वैराग्य आपल्याठीकानी असावयास पाहिजे.||४१|| अर्थः-----याप्रमाणे तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन जरासंध राजाने,श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या यादवासहवर्तमान सत्रावेल युद्ध केले||४२|| अर्थः-----कृष्णतेजाने युक्त असलेल्या यादवांनी,ते त्या जरासंधाचे सर्व सैन्य मारून टाकिले.याप्रमाणेच ती आपली सर्व सैन्ये मरण पावली असतां,रामकृष्णादिकांनी उपेक्षा उपेक्षा केलेला तो जरासंध राजा,आपल्या नगराप्रत निघून गेला.||४३|| भावार्थ:--- जेव्हा—जेव्हा श्रीकृष्ण जरासंधाचा पराभव करत असे तेव्हा—तेव्हा जरासंध जरासंध राजधानीकडे परत येत असे व पुन्हा—पुन्हा सैन्य—सामुर्गी घेऊन पुन्हा मथुरेस परत जाऊन युद्ध करत असे.असा तो शूर—वीर पराक्रमी राजा होता.त्याचप्रमाणे आपणसुद्धा जे योग्य सध्या हाती घेतलेले असते,त्यासाठी प्रयत्न करावा.||४३|| अर्थः-----पुढे अठरावा संग्राम व्हावयाचा तो त्याच्या पूर्वीच नारदाने पाठविलेला कालयवननामक वीर,मथुरेजवळ प्राप्त झाला.तेव्हा त्याला मथुरेतील लोकांनी अवलोकन केले.||४४|| अर्थः-----तो मनुष्यलोकाचेठिकाणी,ज्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीच योद्धा नाही असा होता; त्याने नारदापासून आपल्या बरोबरीचे योद्धे यादव आहेत असे ऐकून त्यांच्याबरोबर युद्ध करण्याकरिता तीन कोटी म्लेच्छासहवर्तमान मथुरेजवळ येऊन त्याने तिला चोहोंकडून वेढा घातला.||४५|| अर्थः------त्या कालयवनाचा पाहून बलरामाबरोबर श्रीकृष्ण चिंतन करूं लागला कि,अहो ! यादवांना दोन्हीकडून ( कालयवनापासून व जरासंधापासून ) मोठेंच दुःख प्राप्त झाले आहे.||४६|| अर्थः-----आज तर हा महाबली कालयवन आमचा निरोध करीत आहे ; आणि आज,उद्या किंवा परवा जरासंधहि प्राप्त होईल||४७|| अर्थः-----या कालयवनाबरोबर आम्ही उभयंता युद्धी करीत असता,जरासंध जर आला तर तो बलाढ्य असल्यामुळे आमच्या बांधवांना मारून टाकील किंवा आपल्या नगरमध्ये घेऊन जाईल||४८|| | तस्मादद्द विधास्यामो दुर्गं द्विपददुर्गमम् | तत्र ज्ञातीन् समाधाय यवनं घातयामहे ||४९|| अर्थः----यास्तव मनुष्यांना गमन करण्यास अशक्य असा समुद्रामध्ये एक किल्ला व त्यामध्ये एक नगर निर्माण करून तेथे ज्ञातींना ठेऊन या यवनाचा घात करवूया||४९|| भावार्थ:--- जरासंध आणि कालयवन एकाच वेळेस दोन्ही शत्रू आले तर आपणास व प्रजेस कठीण प्रसंग येईल.याकरिता अगोदर आपण मथुरावासी जे आहेत,त्यांना अन्य ठीकानी ठेवावयास पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी एक नवीन नगर स्थापन करावयास पाहिजे,जेणेकरून इतरांना त्याठिकाणी जाता येणार नाही.त्यानंतर आपण या शत्रूसी युद्ध करूत असा भगवंत श्रीकृष्णांनी विचार केला.आपणही आपल्यावर एखादे संकट आले असेल तर विचार करून कोणते कार्याचे योग्य नियोजन करावे.||४९|| | इति सम्मन्त्र्य भगवान् दुर्गं द्वादशयोजनम् | अन्तः समुद्रे नगरं कृत्स्नाद्भूतमचीकरत् ||५०|| अर्थः--- याप्रमाणे भगवंताने बळरामाबरोबर विचार करून समुद्रामध्ये किल्ला व त्यामध्ये सर्व आश्चर्यांनी युक्त असे बारा योजने विस्तीर्ण द्वारकानामक नगर विश्वकर्म्याकडून करविले||५०|| अर्थः-----ज्या नगरामध्ये विश्वकर्म्याचे ज्ञानसूचक क्रियाकौशल दिसत आहे,ते नगर,प्रत्येक घराच्या पुढच्या बाजूला राजमार्ग,मागच्या बाजूला गल्ल्या,दोन्हीकडेही आंगनी,त्याच्यामध्ये कोठारे,त्याच्याही मध्ये सुवर्णांची घरे,त्यांच्यावर उप्परमजले,त्यांच्यावर सोन्याचे कळस अशा पुष्कळ भूमिकांनी युक्त असून घरे बांधण्याच्या सोईवर पद्धतीप्रमाणे निर्माण केलेले होते||५१|| भावार्थ:--- वास्तुशात्रानुसार गांव,नगर,घराचे बांधकाम करून धर्मशात्रानुसार विधी पार पाडून त्या गावांत,नगरात,घरात रेवेश करावयास पाहिजे.असे वास्तुशात्रानुसार घरकाम—बांधकाम करून व विधी पार पाडून घरात प्रेवेश केला तर आपली आर्थिक,शारीरिक,मानसि
क प्रगती होऊन जीवन सुखमय बनते.||५१|| अर्थः------कल्पवृक्ष व कल्पलतिका ज्यांमध्ये आहेत अशा बागांनी व चित्रविचित्र उपवनांनी युक्त होते,ज्याची शिखरे सुवर्णमय आहेत अशा अतिशय उंच स्फटिकमण्यांच्या उप्परमांड्यानी व गोपुरांनी निर्माण केलेलं होते||५२|| भावार्थ:--- देवावृक्ष,पानाफुलांच्या वेळी,झाडे बगीचा करून लावावयास पाहिजे.त्यामुळे हवा शुद्ध होते व ती आपल्या आरोग्यास हितकार असते.||५२|| अर्थः-----रूपे व पितळ यांनी मिर्माण केलेल्या सुवर्णशिखरांनी भूषित अशा अश्वशाला अन्नशाला इत्यादिकांनी युक्त होते,तसेच पद्यरागमन्याच्या शिखरांनी व पाचेच्या भूमींनी युक्त असलेल्या मादिरांनी युक्त होते||५३|| अर्थः-----जेथे तेथे नगरांत व घरांत बांधलेल्या देवालयांनी व चंद्रशालांनी युक्त होते आणि ब्राम्हनादिक चारही वर्णांच्या लोकांनी व्याप्त असून यादवश्रेष्ठांच्या,राजमंदिरांनी सुशोभित होते||५४|| अर्थः----त्या नगरांत श्रीकृष्णाला महेंद्राने सुधर्मानामक सभा व पारीजातक वृक्ष हि पाठवून दिली.ज्या सुधर्मासभेमध्ये बसलेला मनुष्य,क्षुधा,तृषा,शोक,मोह इत्यादिक मनुष्यधर्मांनी युक्त होत नाही||५५|| अर्थः-----वरुणाने,ज्यांचा एक कर्ण श्यामवर्ण आहे असे सर्व शरीराने शुभ्रवर्ण व मनासारखे वेगवान घोडे पाठवून दिले; तसेच लोकपालक कुबेराने प्रश्न महापद्य इत्यादिक आठ निधी पाठविले दुसऱ्याही लोकपालांनी आपापली ऐश्वर्य पाठवून दिली.||५६|| अर्थः----जे राजा,श्रीहरी भूमीवर प्राप्त झाला असता सर्व मांडलिक राजांनी व सिद्धादिक देवांनीही भगवंताने जें जें ऐश्वर्य आपणास दिले होते ते ते सर्व आपापल्या अधिकाराची निश्चलतासिद्धी होण्याकरिता त्या हरीला प्रतीअर्पन केले||५७|| अर्थः-----असो; त्या द्वारकेमध्ये हरीने जसे कालयवनास व सजनाला नेऊन,तूं येथे राहून प्रजेचे रक्षण कर,मी कालयवनाला मारविण्याकरिता पलायन करितो,अशी बळरामासहवर्तमान मसलत करून,कमळाला||५८|| _________________________________________________________________________________________________ |५१---- २--कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा—२ __________________________________________________________________________________________________ आता ह्या एकावन्नाव्या अध्यायामध्ये तर श्रीकृष्णाने,मुचकुंदाच्या दृष्टीने कालयवनास मारविली;नंतर मुचकुंदाने स्तुति केली असता त्याच्यावर अनुग्रह केला,अशी कथा वर्णन केली आहे भावार्थ:--- कालयवन याने पहिले कि,समोरून येणारा भगवान वासूदेव आहे.त्याच्या हातात शत्र नाही.युद्धाचा नियम असा आहे कि.शत्रुजवळ शत्र असेल तर आपण शत्र आपल्या हातात घ्यावे,अन्यथा घेऊ नये.म्हणून कालयवनाने आपल्या हातात शत्र घेतले नाही.यासच धर्मयुद्ध असे म्हणतात.आपण कोठेही नियमांने वागावे.||१—५|| अर्थः---असा निश्चय करून तो कालयवन,आपणाकडे पृष्ठभाग करून धावणाऱ्या,योग्यानाही दुर्लभ अशा त्या श्रीकृष्णाला धरण्याकरिता त्याच्या मागून धाऊ लागला||६|| अर्थः---तेव्हा प्रत्येक पावलाचेठिकाणी आपणाला हातांत सापडल्यासारखे दाखविणाऱ्या श्रीहरीने,तो यवनाधिपती दूर एका पर्वताच्या गुहेमध्ये नेला||७|| | पलायनं यदुकुले जातस्य तव नोचितम् | इति क्षिपन्ननुगतो नैनं प्रापाहताशुभः ||८|| अर्थः---त्यावेळी यादुकूळामध्ये झालेल्या तुला पलायन करणे हे योग्य नाही अशी निंदा करीत मागाहून धावणाऱ्या परंतु क्षीण कर्म न झालेल्या त्या कालयवनाला श्रीकृष्णाची प्राप्ती झाली नाही ||८|| भावार्थ:---- भगवंत श्रीकृष्ण पुढे—पुढे व कालयवन त्यांच्या मोगोमाग धावू लागले.परंतु कालयवन यांची पापे अजून नष्ट न झाल्यामुळे भगवान त्यांना सापडू शकत नव्हते.भगवंतांची व आपली भेट होण्यासाठी पूर्व पुण्याई व आताचे योग्य प्रयत्न असतील तर भगवंतांची आपली भेट होऊ शकते.म्हणून आपण धर्मानुसार वागावे.||८|| अर्थः---असो --- याप्रमाणे कालयवनानेहि निंदा केली असताही भगवान् श्रीकृष्ण,त्याच्याकडून मुचुकुंदाला जागृत करण्याकरिता व मुचुकुंदाच्या दृष्टीने त्याचे भसम कारविण्याकरिता मुकाट्याने पर्वताच्या गुहेमध्ये प्रविष्ट झ्झाला.त्या कालयवनानेही त्या पर्वताच्या गुहेत प्रविष्ट होऊन,तेथे निजलेला दुसरा कोणीएक पुरुष पहिला ||९|| | नन्वसौ दूरमानीय शेते मामिह साधुवत् | इति मत्वाच्युतं मूढस्तं पदा समताडयत् ||१०|| अर्थः---आणि हा वसुदेवच मला इतक्या दर आणवून येथे साधूसारखा निजला आणि,अशा बुद्धीने त्या निजलेल्या पुरुषालाच वासुदेव असे मानून त्या मुढाने,आपल्या पायाने त्याला ताडन केले ||१०|| अर्थः---तो फारवेळ निजलेला पुरुष तडणाच्या योगाने जागृत होऊन उठला आणि हळूहळू आपले नेत्र उघडून सर्व दिशांकडे पहात असता त्याने आपल्या पार्श्वबाजूस असलेल्या त्या कालयवनास पाहिजे ||११|| | स तावत्तस्य रुष्टस्य दृष्टीपातेन भारत | देहजेनाग्निना दग्धो भस्मसादभवत् क्षणात् ||१२|| अर्थः---हे राजा,तो कालयवन,निद्राभंग झालेल्यामुळे त्या पुरुषाच्या दृष्टीपाताने प्रदीप्त झालेल्या त्याच्या देहांतील अग्नीनेच जाळून तत्काळ भस्मरूप झाला ||१२|| अर्थः---राजा म्हणाला – हे ब्राम्हन् त्या पुर्षाचे नाव काय ?तो कोणाच्या कुळांत झालेला ?कोणाचा पुत्र ?अशा पराक्रमाचा होता,की ज्याने दृष्टीमात्राने यवनाचे भासम केले व तो पुरुष कोणत्या कारणास्तव गुहेमध्ये प्रविष्ट होऊन निजला होता ?||१३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,तो इक्ष्वाकुराजाच्या कुळामध्ये झालेला मंधात्याचा पुत्र,गुणांनी थोर,ब्राम्हणांचा भक्त व धर्मयुक्त करणा मुचकुंद या नावाने प्रख्यात होता ||१४|| || भावार्थ:--- कालयवनाने लात मारल्यामुळे जागे झालेला पुरुष हा इक्ष्वाकुलातील मांधात्याचा पुत्र मुचकुंद होता.तो ब्राह्मणभक्त होता.आपणही ब्राह्मण भक्त होण्याचा प्रयत्न करावा.ब्राह्मण म्हणजे शट कर्म करणारा,ब्राह्मज्ञानाने संपन्न असलेला जो असतो त्यास “ब्राह्मण” असे म्हणतात.आपण ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करावा. अर्थः--- त्याची पूर्वी दैत्यांपासून भ्यालेलल्या इंद्रादिक देवगणांनी,आपल्या रक्षनानिमित्त याचना केली असता,त्याने बहुत काळपर्यंत त्यांचे रक्षण केले होते||१५|| अर्थः---नंतर त्यांना स्वर्गाचे रक्षण करणारा सेनापति कार्तिकस्वामी मिळाला असता,त्यांनी मुचुकुंदाला सांगितले की,-- हे राजन्,आमच्या रक्षणरूप कष्टापासून आता तू विश्रांती घे ||१६|| अर्थः-----हे वीरा,मनुष्यलोकी असलेले आपले शत्रुसाहित राज्य सोडून देऊन केवळ आमचे रक्षण करणाऱ्या तुझे सर्वही विषयभोग निवृत्त झाले आहेत||१७|| अर्थः---हे वीर,मनुष्यलोकी असलेले आपले शत्रुसाहित राज्य सोडून देऊन केवळ प्रजा कलाने चलित लेल्यामुळे आता राहिल्या नाहीत ||१८|| | कालो बलीयान् बलिनां भगवानीश्वरोsव्ययः | प्रजाः कालयते क्रीडन् पशुपालो यथा पशून् ||१९|| अर्थः------हे राजा,काल,हा सर्व बलिष्ठामध्ये हि बलवान असून अविनाशी भगवान ईश्वर आहे,तो क्रीडा करीत असतां,जसा पशुंचे रक्षण करणारा पुरुष,पशूंना इकडे तिकडे नेतो त्याप्रमाणे प्रजांची घडामोड करितो.||१९|| अर्थः---हे राजा,तुझे कल्याण होवो.तूं आतां एका मोक्षावाचून इच्छित असेल तो वर आम्हांपासून मागून घे.मोक्ष देणारा एक अविनाशी भगवान् विष्णूच आहे दुसरा कोणी नाही.||२०|| भावार्थ:--- मोक्ष देण्याचे सामर्थे फक्त भगवंत व संत—महात्मा यांच्यातच असते,आण्यात नसते.म्हणून आम्ही मोक्ष सोडून इतर कोणत्याही वरची आम्ही पूर्तता करू शकतोत.म्हणून मोक्ष सोडून इतर कांहीही मागा.आम्ही तात्पुरते सुख देऊ शकतोत,पण कायमचे सुख देऊ शकत नाही,मोक्षात कायमचे सुख असते.||१९|| अर्थः-----याप्रमाणे देवांनी सांगितलेला तो महायशस्वी मुचुकुंद राजा,देवांना वंदन करून,तो फार दिवस जागरण करून श्रम पावलेला होता म्हणून त्याने त्यांपासून निद्राच मागून घेतली.||२१|| | स्वापं यातं यस्तु मध्ये बोधयेत्त्वामचेतनः | स त्वया दृष्टमात्रस्तु भस्मीभवतु तत्क्षणात् ||२२|| अर्थः-----ती अशी की,- हे देवश्रेष्ठहो,जो कोणी पुरुष,माझ्या निद्रेचा भंग करील त्याचे तत्काळ भस्म होवो;असा त्याने वर मागितला असतां;त्यावेळी देवांनी सांगितले की,जो तुला न जाणणारा पुरुष,तू स्वतः होऊन उठण्याच्या पूर्वी निजलेल्या तुला जागृत करील,त्याच्याकडे तूं पाहिलेस की तो तत्काळ भस्मरूप होईल.असा वर मिळाल्यावर तो मुचुकुंद,त्या गुहेमध्ये प्रवेश करून देवांनी दिलेल्या निद्रेने निजला होता.||२२-२३|| अर्थः-----असो याप्रमाणे यवनाचे भस्म झाले असतां,भक्तपालक भगवान् श्रीकृष्णाने,त्या बुद्धिमान मुचकुंदाला आपले स्वरूप दाखविले.तेव्हा मुचुकुंदाने मेघासारखा श्यामवर्ण,पिवळा रेशमी पितांबर नेसलेला,वक्षःस्थळावर दक्षिनावर्ण रोमरेखेचेठिकाणी सुवर्ण रेखेसारख्या असलेलेल्या चिन्हाने युक्त,देदीप्यमान कौस्तुभाने विराजित.चतुर्भुज,पुष्कळवर्णांच्या फुलांनी निर्माण केलेल्या माळेने शोभणारा ज्याचे मुख सुंदर व प्रसन्न आहे,ज्याच्या कर्णाचे ठिकाणी मकाराकर कुंडले झळकत आहेत.जो मनुष्यलोकाला अवलोकन करण्यास योग्य आहे,ज्याचेमंद हास्य व अवलोकन सप्रेम आहे,ज्याचे वय तरून अतिमनोहर आहे,जो मत्त गजेंद्रासारखा गतीने व उदार पराक्रमाने युक्त आहे व जो दुसऱ्याने आपल्या तेजाने पराभव करण्यास अशक्य आहे अशा त्या श्रीकृष्णाला अवलोकन करून,हा अतितेजस्वी कोण आहे ? अशा शंकेने युक्त व त्याच्या तेजाने चपापल्यासारखा झालेला तो महाबुद्धीमान मुचुकुंद्र राजा,हळूहळू प्रश्न करूं लागला की,||२४-२८|| अर्थः-----मुचुकुंद म्हणाला – येथे प्राप्त झालेला तूं कोण आहेस ? या अरण्यांत,त्यामध्येही पर्वताचा प्रवेश करण्यास अशक्य अशा स्थानी,त्यातूनही फार कंटकांनी व्याप्त अशा जागी कमळपत्रासारख्या मृदू पायांनी कोण संचार करीत आहेस ? ||२९|| अर्थः-----तूं तेजस्वी पुरुषांचे मूर्तिमंत तेजच आहेस की काय ? किंवा भगवान् अग्नी आहेस ? अथवा सूर्य,चंद्र,इंद्र किंवा दुसरा कोणी लोकपाल आहेस ? ||३०|| अर्थः-----ज्याअर्थी तूं आपल्या कांतीने,दिवा जसा अंधकाराचा नाश करितो त्याप्रमाणे पर्वताच्या गुहेतील तमाचा नाश करीत आहेस,त्याअर्थी इंद्रादी देवामध्येही श्रेष्ठ जे ब्रम्ह,विष्णू महेश्वर देव त्या तिघांमध्येही पुरुषोत्तम,भगवान विष्णूच तूं आहेस असे मी मानितो||३१|| अर्थः---हे पुरुषोत्तमा,श्रवण करण्याची इच्छा करणाऱ्या आम्हांस निष्कपटपणे आपले जन्म कर्म आणि गोत्र सांगण्याजोगे वाटत असेल तर सांगावे||३२|| अर्थः------हे पुरुषश्रेष्ठा,आम्हींतर इक्ष्वाकुकुळांमध्ये उत्पन्न झालेले क्षत्रिय आहो; त्यामध्येही हे प्रभो,मी मुचुकुंद या नावांचा यौवनाश्वराजाचा पुत्र आहे.||३३|| | सोsपि भस्मीकृतो नूनमात्मीयेनैव पाप्मना | अनन्तरं भवान्छ्रीमान् लक्षितोsमित्रशातनः ||३४|| अर्थः-----तो मी,देवाच्या प्रार्थनेवरून त्यांचे रक्षण करीत असता फार वेळ झालेल्या जागरणाने श्रम पावलो आणि माझी इंद्रिये निद्रेने व्याकूळ झाली म्हणून या एकांत स्थळांचे ठिकाणी यथेच्छपणे निजलो होतो.आता कोणीएकाने मला उठविले आहे.||३४|| भावार्थ:--- मुचुकुंद म्हणतो कि,कालायावानाच्या म्हणजे त्याच्या पापामुळे तो जळला,कारण मी तर झोपेतच होतो.त्यानेच मला झोपेत लाट मारली,त्यामुळे मी जागा झालो. मी जागे होताच तो जाळून खाक झाला,कारण त्याच्या पापाने त्याला जाळून टाकले.म्हणून धर्मानुसार वागावे,त्यामुळे पाप न होता पुण्य होते.तो मेल्यानंतर भगवंत मला आपले दर्शन झाले.म्हणून भगवंतांचे दर्शन होण्यासाठी आपण धर्मानुसार आचरण करून पुण्य संपादन करावे.पुण्याचे फळ सुख असते.||३४|| अर्थः-----ज्या कोणी नका उठविले तोही आपल्याच पापाने भस्मरूप होऊन गेला आहे.नंतर शत्रूंचा नाश करणारा व श्रीमान आ तूं माझ्या दृष्टीस पडला आहेस||३५|| अर्थः-----हे भाग्यवंता,आम्हीतर सहन करण्यास अशक्य अशा तुझ्या तेजाने,चकित होऊन फार तुजकडे अवलोकन करण्यासही समर्थ होत नाही,तथापि माझ्या सारख्या देहधा ऱ्याना तूं सेवन करण्यास योग्य आहेस.||३६|| अर्थः-----याप्रमाणे त्या मुचुकुंदराजाने सत्कारपूर्वक प्रश्न केला असता तो भक्तपालक भगवान,हास्य करून,मेघाच्या नादासारख्या गंभीर वाणीने त्याप्रत म्हणाला की,||३७|| अर्थः------श्रीभगवान म्हणाला – हे राजा,माझी जन्मे,कर्मे व नामे हजारो आहेत,म्हणून मी अनंत असल्यामुळे माझ्यानेन्ही गणना करण्यास शक्य नाहीत||४०|| | अवतीर्णो यदुकुले गृह आनकदुन्दुभेः | वदन्ति वासुदेवेति वसुदेवसुतं हि माम् ||४१|| अर्थः------तथापि हे राजा,हल्लीची माझी जन्मादिक मी तुला सांगतो ती तूं मजपासून श्रवण कर.धर्माच्या संरक्षणाकरिता व पृथिविला भारभूत झालेल्या असुरांच्या नाशाकरिता ब्रम्हदेवाने पूर्वी माझी प्रार्थना केली होती,म्हणून मी यदुकुळामध्ये वसुदेवाच्या गृहाचेठिकाणी अवतीर्ण झालो आहे;मी वासुदेवाचा पुत्र झालो म्हणून मला वासुदेव असे म्हणतात.||४१-४२|| भावार्थ:--- श्रीकृष्ण म्हणतात,मी कंस,कालानेमी,प्रलंब इत्यादी जे साधुद्रोही आहेत अशा असुरांचा संहार करून मारून टाकले.म्हणून आपण कोणाचाच द्रोह करू नये.त्यातल्या--त्यात सात्विक ए साधू—महात्मा आहेत,त्यांचा तर मुळीच द्रोह करू नये.द्रोह करू नये म्हणजे त्यांच्या सात्विक कार्यास प्रतिबंध—अडथळा करू नये. जो सात्विक कार्यास अडथळा—प्रतिबंध करतो त्यास द्रोही असे म्हणतात द्रोही यांना त्यामुळे—प्रतिबंध केल्यामुळे पाप म्हणजेच पापांचे फळ दु:ख प्राप्त होते.म्हणून आपण कोणाशी,विशेषत:सात्विक कार्यास संत—महात्मा यांचा द्रोह करू नये.सात्विक कार्यास द्रोह न करता साह्य करावे.सात्विक कार्यास साह्य केल्याने सुख मिळते.||४२|| अर्थ:-----कंसरूपाने झालेला कालनेमिनामक असुर,मी मारिला आहे,तसेच धर्मवर्ती पुरुषांच्या द्वेष करणारे प्रलंबबकादिक दैत्यही मारिले आहेत.हे राजा,हा कालयवन तुझ्या तीक्ष्ण दृष्टीच्या निमित्ताने दग्ध करून टाकीला आहे.||४३|| भावार्थ:--- मुचुकुंदावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे,कारण यापूर्वी आपण फार निष्काम भक्ती केलेली आहे व याही जन्मात निष्काम भक्ती केलेली आहे.||४३|| अर्थः-----तो मी,तुझ्यावर अनुग्रह करण्याकरिता या गुहेमध्ये प्राप्त झालो आहे.पूर्वी पुष्कळ वेळ तूं मज भक्तवत्सलाचे आराधन केले होतेंस ,म्हणून,हे राजर्षे,तूं मजपासून इच्छित वर मागून घे; मी तुला सर्व विषय देतो.कारण,मला शरण आलेला कोणीही जन,पुन्हा शोक करण्यास योग्य नाही.म्हणजे इतरांनी दिलेले वर क्षीण झाले असता जसा शोक करितो तसा मला शरण आलेला पुरुष शोक करीत नाही.कारण,मीदिलेले व अक्षय असतात.||४४-४५|| भावार्थ:--- निष्काम भक्ती केल्यामुळे मी आपणास दर्शन दिले आहे.मला जो निष्काम भावाने शरण येतो,त्याला पुन्हा शोक—दु:ख भोगण्यास येत नाही.म्हणून आपण निष्काम भक्ती करून भगवंतांस शरण जावावयास पाहिजे.म्हणजे आपलेही कायमचे दु:ख निवृत्त होऊन सुखरूप हौउत.त्यासाठी विषयांचा त्याग करावा लागतो.||४४|| अर्थः-----श्रीशुकाचार्य म्हणाला – याप्रमाणे भगवंताने सांगितले असतां,त्या भाषणाच्या योगानेच अठ्ठाविसाव्या युगांत भगवान वसुदेवाच्या घरी अवतार धारण करील अशा वृद्धगर्गाच्या भाषणाचे स्मरण झालेला तो मुचुकुंद,त्या कृष्णाला हा नारायण देव आहे असे जाणून,हर्षाने परिपूर्ण झाला आणि त्याला नमस्कार करून म्हणाला की, - ||४६|| भावार्थ:--- मुचुकुंद म्हणतात कि,ज्यांना मोह आहे,त्यांना आपले दशन होत नाही.म्हणून आपण भगवंतांचे दर्शन होण्यासाठी जीवांच्या मोहाचा त्याग करावा.जीवांचा मोह केल्याने जीवांचा अनर्थ होतो.आपला अनर्थ होऊ नये म्हणून निष्काम परमार्थ करावा व भगवंतांची कृपा संपादन करावी.संसाराची आसक्ती हीच सर्व दु:खाहे मुल आहे,म्हणून संसाराची आसक्ती करू नये.संसाराची आशक्ती म्हणजे संसारच असावा वाटणे.संसारातील विषय असावे वाटणे.पुत्र—पुत्री,पती—पत्नी,मामा—मामी,मावशी—काका,आई—वडिलाच असावे वाटणे,थोडक्यात देहसंबंधीच असावेसे वाटणे.यास संसार असे म्हणतात.यासच मोह असे म्हणतात.हे सर्व स्वार्थी असतात.||४६|| अर्थः----मुचुकुंद म्हणाला – हे ईश्वरा,स्त्री आणि पुरुषअसा दोन प्रकाराचाही हा जन,तुझ्या मायेने मोहित झाला आहे,म्हणून हा संसाराचे चठिकाणी सत्यत्वदृष्टी ठेऊन परमार्थस्वरूप अशा तुझे सेवन करीत नाही;तर परस्पर फसला जाऊन सुखाच्या इच्छेने दुःखांनाच उत्पन्न करणाऱ्या गृहामध्ये आसक्त होतो||४७|| भावार्थ:---मनुष्य देह योयायोगाने जेव्हा पाप—पुण्य समान होईल तेव्हाच मनुष्यदेह मिळत असतो.असे असूनही मनुष्य पशुप्रमाणे संसारच करतो.मानवाने पशुप्रमाणे संसार करावा?मानावदेहात संसार करावा का ? पशुदेहात संसार करू नये का?मानावदेहात परमार्थ करू नये का? मनुष्य देहात आपण आलोत,ते कशासाठी आलोत हे कळून घेऊ नये का?आपण आलोत कोठून?आलोत कोठे?येथे येऊन काय करावे?मी कोण आहे?माझे काय कर्तव्य आहे?कोणाची संगती करावी? असे काकून न घेता पशुवर जीवन जातात.पशुवत जीवन जगणारे मानव आहेत का पशु?मानव देहात परमार्थ करत नाहीत,तर कोणत्या जन्मात परमार्थ करतील?||४७|| अर्थः-----आतां,विषयसुखाचा सुकारादी योनीमध्येहि संभव आहे.भगवंताचे सेवन तर मनुष्याजन्माखेरीज होत नाही,म्हणून मनुष्यजन्म प्राप्त झाले असतां जो तुम्ही भक्ती करीत नाही तो अतिमूढ आहे असे सांगतो – हे पवित्रा,तुझ्या अनुग्रहाने अनायासाने,अव्यंग व या भरतखंडरूप कर्मभूमीचेठिकाणी दुर्लभ असे मनुष्यशरीर प्राप्त झाले असतां,जो पुरुष,तुझ्या चरणाविंदाचे भजन करीत नाही,तो विषयसुखांचेठिकाणी आसक्तचित्त होऊन,जसा पशु,तृणाच्या लोभाने अंधाऱ्या विहिरीत पडतो त्याप्रमाणे गृहरूप अंधकृपांत पडतो.||४८|| भावार्थ:--- मुचुकुंद म्हणतो कि,आतापर्यंत मी राज्यलक्ष्मीच्या योगाने उन्मत्त झालो होतो.संसारातच मोहित झालो.त्यामुळे माझा आतापर्यंत वेळ व्यर्थच गेला. आपलीही स्थिती तीच आहे.मुचुकुंद निष्काम भक्त होता,पण केलेल्या कर्मांचा अंहकार येऊ नये म्हणून कमीपणाने—लीनतेने बोलत आहे.आपणही लीनतेणे बोलावे.||४८|| अर्थः-----आता हि केवळ लोकांची गती आहे असे नाही,तर माझीही गती तशीच आहे असे सांगतो – जे अजिता,मरणधर्मयुक्त देहाचेठिकाणी आत्मबुद्धी धारण करणारा,भूपति,राज्यसंपत्तीने मदांत आणि पुत्र,स्त्री,भांडारगृह व भूमी यांचे ठिकाणी अपार चिंतेने आसक्त अशा माझा हा ( आजपर्यंतचा ) काळ निष्फळ निघून गेला आहे.||४९|| अर्थः-----आतां,आपला ,मदोन्मत्तपणा सांगतो – घट किंवा भिंत यांच्यासारख्या दृश्य व जड अशा या देहाचे ठिकाणी मी राजा आहे असा अभिमान धारण करणारा मी,कालरूपी असलेल्या तुझी गणना न करीत,रथ,हत्ती,अश्व आणि पदाती यांच्या सेनाधिपतींनी युक्त होऊन भूमीवर संचार करीत असता,अत्यंत दुष्टमदाने युक्त झालो म्हणून माझा काळ निष्फळ गेला||५०|| भावार्थ:--- भगवंत,आपण जे जीव संसारात आसक्त आहेत,त्यांना आपण कालरुपणे झडप घालून पकडतात.त्यानंतर लक्ष चौऱ्याऐंसी योनीस पाठवतात.म्हणून आपण मनुष्यदेहात आल्यानंतर काळापासून नित्य सावध राहून आपला वेळ परमार्थात खर्च करावा.असे केले असता काळ आपल्यावर आक्रमण करू शकत नाही,कारण आपण भगवंतांचे निष्काम भक्त झालेलो असतोत. याकरिता मनुष्य देहात आल्यानंतर भगवंतांचे निष्काम भक्त होण्याचा प्रयत्न करावा.यातच आपले परम हित आहे.||५०|| अर्थः-----आतां,विषयासक्त होणाराचे आक्रमण तूंच करितोस असे सांगतो – हे हे कृत्य असे असे कृत्य असे असे करावयाचे याप्रकारच्या चिंतेने अतिशय मत्त झालेला,विषयाचेठिकाणी ते केव्हा प्राप्त होतील अशी आशा धरणारा आणि कदाचित् प्राप्त झाले तरी अतितृष्णेने युक्त अशा जनाला सावध असणारा कालरुपी तूं,जसा आपल्या बिळांत धान्यसंग्रहकरणाऱ्या मुशाकाला क्षुधेने,ओठांचे प्रांतभाग वाटणारा सर्प,अकस्मात गिळून टाकितो त्याप्रमाणे एकाएकी आक्रमण करितोस.||५१|| अर्थः-----आणि कालरूपी तूं व्यापलेला देह,अशाप्रकारचा होतो की,पूर्वी जिवंत अवस्थेचेठिकाणी सुवर्णाच्या अलंकारांनी भूषित अशा रथांनी किंवा मदोन्मत्त गजांनी संचार करीत असतां,ज्या देहाला राजा असे नाव प्राप्त झालेले असते तोच देह,अपरिहार्य कालरूपी तूं व्यापून टाकलास म्हणजे श्वानादिकांनी भक्षण केला तर विष्ठा,पुरून टाकीला तर कृमी आणि दग्ध केला तर भस्म या नावांस पावतो||५२|| भावार्थ:--- जरी आपल्या पराक्रमाने सर्व दिशांवर जरी विजय प्राप्त करुन घेतला व लहान राजकीय सत्ताधीस यांच्या चरणांवर नम्र होत असले तरी ते समाधानी नाहीत. स्त्रि—विषयसुखासाठी ते स्त्रियांच्या चरणांवर नम्र—नतमस्तक होतात.त्या स्त्रियांपुढे यांचे कांहीच चालत नाही.त्या स्त्रिया जसे म्हणतात तसे होकार देतात.इतले त्या विषयासाठी लाचार होतात.म्हणून यांचे जीवन दुर्दैवी आहे.आपण मात्र स्त्री—विषय सुखासाठी आसक्त—लाचार होऊ नये.तर आपले जीवन सार्थक आहे.||५२|| अर्थः-----आणि मरणाच्या पूर्वीही दिडमंडळाला जिंकून ज्यांचे कोणाबरोबरही युद्ध नाही असा आणि सिंहासनावर बसला असतां ज्याच्या बरोबरचे पूर्वीचे राजे त्याला वंदन करीत आहेत तो पुरुष,हे ईश्वरा,मैथुन हेंच केवळ ज्यामध्ये सुख आहे अशा स्त्रियांच्या मंदिरामध्ये स्त्रियांनी माकडासारखा इकडेतिकडे खेळविला जातो||५३|| भावार्थ:--- एखादा मनुष्य स्त्री--विषयभोगाचा त्याग करून आपण राजकीय सत्ताधीस व्हावे म्हणून सकाम कर्म करून दान,तप किंवा सत्कर्म करतो.थोडक्यात कोनत्या--नाकोनत्या विषयांत आसक्त होतो म्हणून त्याच्या तृष्णांची निवृत्ती होत नाही.तुष्णांच्या निवृत्ती होण्यासाठी सकाम कर्म न करता निष्काम कर्म करावे.निष्काम कर्माने अंत:कारण शुद्ध होते.अंत:कारण शुद्ध झाल्यानंतर विषयांची निवृत्ती होऊन वैराग्य उत्पन्न होऊन विषय नकोसे वाटतात.विषय नकोसे वाटल्यावर सर्व निषिद्ध विषयांचा त्याग होतो.धर्मयुक्त विषयांचा त्यागही होतो.धर्मयुक्त आवश्यक विषयांचा स्वीकार केल्या जातो.ज्ञानमार्गाकडे लागून मुक्त होऊन सुखरूप होतो.||५३|| अर्थः-----आणि त्या राज्यस्थितीच्या वेळीसुद्धां तें राजाशरीर धारण करणारा तो,पुनरपि जन्मांतरी मी इंद्र होईन किंवा असाच सार्वभौम राजा होईन अशी प्रज्वल भोगेच्छा धारण करून,ते इंद्रत्वादिक संपादन करण्याकरिता विषयभोग सोडून देतो आणि भूमिशयन,ब्रम्हचर्यव्रत इत्यादिक तपाच्या साधनांमध्ये स्थित होऊन,सार्वभौमादी पदवीला साधनभूत अशी कर्मे करितो,मिळून सुखाचा अनुभव घेण्या समर्थ होत नाही||५४|| भावार्थ:--- मुचुकुंद श्रीकृष्णास म्हणतात कि,पूर्वजन्मातील निष्काम कर्मामुळे व वर्तमान जन्मातील निष्काम कर्मामुळे संसारचक्रातून—जन्म—मृत्यूतून बाहेर पडावे व परमात्मरूप व्हावे अशी इच्छा उत्पन्न होते.त्यामुळे सत्संग करून ज्ञान मार्गाचा अवलंब करावा अशी उत्कठ इच्छा उत्पन्न होते.तो जीव संत—महात्मा यांना अनन्य शरण जातो.त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन त्यांची धर्मानुसार सेवा करतो.त्यांच्या मुखातून शात्र श्रवण करून ज्ञान प्राप्त करून घेतो.त्यामुळे त्याची बुद्धी संसारात राहत नाही,कारण सत्संगामुळे संसार हा अनात्मा असून दु:खरूप आहे असा त्याचा निश्चय होतो व परमात्मा हा आत्मा असून तो साररूप—सुखरूप आहे असा निश्चय होतो.म्हणून त्याची बुद्धी संसारात न जाता परमात्म्यात स्थिर होते.म्हणून आपण निष्काम कर्म करून सत्संग करून परमात्म्यात बुद्धी स्थिर करावी.||५४|| अर्थः-----याप्रमाणे आठ श्लोकांनी भगवंताविषयी विमुख असलेल्या जणांच्या संसाराचे स्पष्टीकरण करून आतां भक्तीने त्या संसाराच्या निवृत्तीचा क्रम सांगतो – हे अच्युता ,संसार पावणाऱ्या जनाच्या बंधाचा तुझ्या अनुग्रहाने नाश होण्याचा काळ जेव्हां प्राप्त होतो,तेव्हांच त्याला तुझ्या भक्तांचा समागम होतो आणि जेव्हा सत्मागत होतो तेव्हांच त्यांच्या उपदेशादिकेकरून साधूंनी प्राप्य व कार्यकारणांचा नियंता अशा तुझेठीकानी त्याला प्रेमलक्षणभक्ती उत्पन्न होत्ये आणि नंतर तो मुक्त होतो! ||५५|| भावार्थ:--- निष्काम कर्म केल्यामुळे आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला,कारण त्यामुळे माझे राज्याचे बंधन तुटले.राज्याविषयी मला वैराग्य उत्पन्न झाले.एकांतात जे साधना—तप करतात तेही आपल्या कृपेसाठी करतात.आपणसुद्धा कोणतीही साधना निष्काम करून सत्संग करून परमात्मरूप होण्याचाच प्रयत्न करावा.||५५|| अर्थः-----हे ईश्वरा,माझा तर सत्समागामाच्या पूर्वी अनायासानेच जो राज्यादि संबंधाचा विच्छेद झाला तो तूं माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहेस असे मी मानितो.कारण,ज्या राज्यसंबंधाचा विच्छेद होण्यासाठी,एकटयाने संचारपूर्वक तप करण्याकरिता,वनांत प्रवेश करण्याची इच्छा करणारे व विचारसंपन्न असे सार्वभौम राजेही तुझ्याजवळ प्रार्थना करीत असतात.||५६|| भावार्थ:--- मुचुकुंद भगवंतांस म्हणतात कि,भगवंत ! मला आपले फक्त चरण—आधीष्ठान—परमात्मा याशिवाय कांहीही नको,कारण आपल्यात—परमात्म्यात नाम व रूप नसून आपण सुखरूप आहात.आपण सोडून जे नाम व रूप आहे,ते दु:खरूप आहे.मला दु;खरुपता नको असून सुखरुपता पाहिजे आहे.आपणही नाम व रूपाचा त्याग करून नामरूपरहित असलेले जे चरण—अधिष्ठान--परमात्मा तोच मागवा.अन्य जे नाम व रूप आहे,ते सर्व दु:खरूप आहे त्याचा त्याग करावा.त्यातच हित आहे.||५६|| अर्थः-----याप्रमाणे विषयसेवनाचा मार्ग व भगवत्सेवेचा मार्ग सांगून,आतां वर मागून घे असे जे सांगितले होते त्याचे उत्तर सांगतो – हे विभो,हरे,अभिमान सुटलेल्याही पुरुषांनी प्रार्थना करण्यास योग्य अशा तुझ्या चरणसेवेहून दुसऱ्या वराची मी इच्छा करीत नाही.कारण,मोक्ष देणाऱ्या तुला प्रसन्न करून घेऊन,कोण बरे विवेकी पुरुष,तुझ्यापासून आपणाला बंध उत्पन्न करणारे विषयभोग मागून घेईल? कोणीच घेणार नाही.||५७|| भावार्थ:--- आपण सत्वगुण,रजोगुण आणि तमोगुण कामना सोडून,गुणातित,अद्वितीय,चित्स्वरुप,परमपुरुष अशा भगवंतांस अनन्य शरण जावे,कारण तो सुखरूप आहे, जन्म—मरण निवृत्त करणारा आहे,दु:ख घालवणारा आहे.असे कळण्याकरिता संत—महात्मा यांच्या सत्संगाने निर्गुण परमात्मा सुखरूप आहे,असे कळते.||५५|| अर्थः-----तस्मात् हे ईश्वरा,रजोगुण व तमोगुण व सत्वगुण यांच्या योगाने प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्यादिक,शत्रूमारनादिक व धर्मादिक सर्व विषयांचा त्याग करून,ज्ञानस्वरूपी,निर्गुण,निरंजन व अद्वय अशा तुज परम ईश्वराला मी शरण आलो आहे.||५८|| भावार्थ:---जीव हा अनादी काळापासून या जगात सकाम कर्मामुळे कर्मफलांच्या भोगणे किंचित सुख व अधिक दु:खाने त्रस्त झाला आहे.पन्ह—पुन्हा तीच वासना करत आहे,त्यामुळे पुन्हा—पुन्हा किंचित सुख व अधिक दु:ख भोगीत आहे.ते त्याला नको,पण कळत नाही.कळण्यासाठी सत्संग केला तर कळते,पण वळत नाही,कारण सकाम कर्म करतो.वालाण्याकरिता निष्काम कर्म करावे लागते.निष्काम कर्म केले असता,इंद्रिये ताब्यात येतात.इंद्रिये ताब्यात आले असता जे कळलेले असते,ते वळते—त्यानुसार आचरण होते.तेव्हा त्याच्या वागणुकीत परिवर्तन होते.जीवनात परिवर्तन होणे फार जरुरी आहे.म्हणून जीवाने धर्नानुसार परिवर्तन करावयास पाहिजे.परिवर्तन झाल्यानंतर जीव हा निर्भय म्हणजे त्याला भीती राहत नाही,कारण भीती ही द्वेतात असते,तर अद्वितीयात नसते.तो शोकरहित होतो,कारण जो भगवंत शोकरहित,सत्यस्वरूप आहे त्याला प्राप्त होतो.त्याला शरण जातो,अन्याला शरण जात नाही,कारण अन्य दु:खरूप आहेत.म्हणून परमात्म्यास एकरूप व्हावे.||५८|| अर्थः-----अरे,आदी विषयांचा उपभोग कर,कैवल्यतर हस्तगतच आहे.असा वरांच्या योगाने पुन्हा लोभ उत्पन्न करणाऱ्या श्रीकृष्णाची पाय धरून प्रार्थना करितो की,-- हे आश्रय देणाऱ्या,परमात्म्य,ईश्वर,या संसारामध्ये कर्मफलरूप पापांनी पिडीत,त्यांच्या वासनारूप तापांनी तापलेला,आणि ज्याचे इंद्रियरूप सहा शत्रू आशारहित झाले नाहीत असा मी,कथचीत् दैवयोगाने,सत्य अभय व शोकरहित अशा तुझ्या चरणकमळाला शरण आलो आहे,यास्तव त्या आपत्तीने व्यास असलेल्या माझे संसार दुःखापासून तू रक्षण कर||५९|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण म्हणतात कि,हे मुचुकुंदा! निष्काम कर्म नेहमी केल्यामुळे तुझी बुद्धी पवित्र आणि उच्च कोटीची झालेली आहे.आपणही निष्काम कर्म करून आपली बुद्धी पवित्र आणि उच्चतम करावयास पाहिजे.अशी बुद्धी केली असता संसाराविषयी वैराग्य येते व परमार्थाविषयी आवड—गरज उत्पन्न होते.त्यामुळे आपली बुद्धी चांचल न होता स्थिर होते.म्हणून आपण परमार्थाविषयी आवड—गरज उत्पन्न होण्यासाठी निष्काम कर्म करून बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न करा.यात हित आहे.||५९|| अर्थः-----श्रीभगवान् म्हणाला --- हे सार्वभौमा,हे महाराजा,ज्याअर्थी मी वरांनी प्रलोभित केलेल्याही तुझी बुद्धी,विषयांनी आकृष्ट झाली नाही त्या अर्थी ती तुझी बुद्धी,रागलोभादि मलरहित होऊन परमार्थदर्शनाविषयी योग्य झाली आहे ||६०|| भावार्थ:---भगवंत आपल्या रिया भक्तास विषयांचे—नाशिवंताचे प्रोलोभन दाखवतात,कारण त्यातून आपली परीक्षा घेतात.विषय—नाशिवंत देण्याचा हेतू नसतो.म्हणून असे जर प्रोलोभान दाखवले तर ते मागू नये किंवा त्यात गुंतू नये.साधकांची ती एक परीक्षा असते.परीक्षेत पास होणे आपले कर्तव्य असते,सावध--सावध--सावध.||६०|| अर्थः------जे तुला मी वरांनी प्रलोभित केले आहे ते लोकामध्ये भक्तांच्या बुद्धीला आसक्ती होत नाही हे दाखविण्याकरितांच केले आहे असे तू समज.कां म्हणशीलतर,माझेठिकाणी एकांतभक्त असलेल्या पुरुषांची बुद्धि,विषयभोग प्राप्त झाले असतांही त्यांच्या योगाने माझ्याहून निराळी विषयसक्त होत नाही ||६१|| भावार्थ:--- जे लोक भगवंतांचे प्रिय भक्त नाहीत.त्यांनी प्रणायाम केला तरी तरी त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले होईल,पण त्याने मनातल्या वासंना नष्ट होणार नाहीत. म्हणून मनातल्या वासना नष्ट होण्यासाठी निष्काम कर्मच करावे लागेल,कारण त्यामुळे अंत:करण शुद्ध होते.अंत:कारण शुद्ध झाल्याने मनात परिवर्तन होते.||६१|| | विचरस्व महीं कामं मय्यावेशीतमानसः | अस्त्वेव नित्यदा तुभ्यं भक्तिर्मय्यनपायिनी ||६२|| अर्थः------आणि हे राजा,प्राणायामादिकेकरून निरोध करण्याविषयी प्रयत्न करणाऱ्याही अभक्तांचे मन,वासनाक्षय पावलेले नसल्यामुळे पुन्हा विषयाभिमुख झालेले दिसून येते ||६२|| भावार्थ:--- जीवांनी आपल्या मनाचा विषय जड,धन,मन—प्रतिष्ठा आणि जीव न करता,परमात्मा करावा.अखंड मन—भक्ती परमात्म्याचीच असावी,अन्य नसावी.||६२|| अर्थः-----तुला तर माझेठिकाणी एकांतभक्ति सर्वदा आहेच म्हणून तुं आपल्या चित्ताचे माझेठिकाणी स्थापन करून यथेच्छपणे पृथ्वीवर संचार कर ||३६|| भावार्थ:--- स्वधर्माचे—क्षत्रियधर्माचे आचरण करत असतांना तुझ्याकडून पशुहत्या झाली.त्या पशुहत्यामुळे पाप झाले.ते पाप निवृत्तीसाठी एकग्रचित्ताने निष्काम उपासना कर,त्यामुळे ते केलेले पाप नाहीसे होईल.आपणांकडून संसारात कांही निमित्ताने अधर्म झाला व त्यामुळे पाप झाले तर निष्काम कर्म घालवून ते पाप नाहीसे करण्याचा आपण प्रयत्न करावा.त्यामुळे ते पाप नाहीसे होऊन आपले अंत:कारण शुद्ध होईल.निष्कामता म्हणजे सत्कर्म करणे,पण संसारातील कांहीच न मागणे.||६३|| | जन्मन्यनन्तरे राजन् सर्वभूतसुहृत्तमः | भूत्वा द्विजवरस्त्वं वै मामुपैष्यसी केवलम् ||६४|| अर्थः-----तू राज्यावर होतास त्यावेळी तू लोकसंरक्षणाच्या उपयोगी न पडणाऱ्या मृगयादिक व्यापारांनी प्राण्यांचा वध केला आहेस म्हणून आता तपाच्या योगाने जितेंद्रिय व माझाच आश्रय करणारा होऊन त्या पापाचा नाश कर||६४|| भावार्थ:--- भगवंतांनी त्याला भावी मनुष्य देहात सर्व प्राण्यांचा सुहृद होशील.त्यावेळेस निष्काम कर्म कार व कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नकोस.त्यानंतर तू सत्संगास प्राप्त होशील.त्यानंतर तेथे ज्ञानसंपन्न होऊन परमात्म्यासी एकरूप होऊन तुहे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होशील.आपणसुद्धा निष्काम कर्म व निष्काम उपासना करून अंत:करण शुद्ध आणि स्थिर करून,सत्संग्कारून ज्ञानमार्गास लागून परमात्म्यास एकरूप होण्याचा प्रयत्न करावा,||६४|| अर्थः-----हे राजा,तू आता असे केलेस म्हणजे पुढच्या जन्मात तू सर्वभूतांचा अत्यंत मित्र असा श्रेष्ठ ब्राम्हण होऊन परमानंदरूपी मजप्रतच पावशील ||६५|| ________________________________________________________________________________________________________________________ |५२--३--व्दारकगमन,बालारामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घरून ब्राम्हणाचे येणे—१ ________________________________________________________________________________________________________________________ आता ह्या बावन्नाव्या अध्यामध्ये जरासंधांच्या भायानेच की काय धांवणाऱ्या भगवान् श्रीकृष्णाने,द्वारकेत येऊन नंतर सुदेवब्राम्हनाणे वर्णन केलेल्या रुक्मिणीच्या निरोपाला अनुमोदन दिले,अशी कथा वर्णन केली आहे अर्थः------श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,याप्रमाणे इक्ष्वाकुकूळांत उत्पन्न झालेल्या त्या मुचुकुंद राजावर श्रीकृष्णाने अनुग्रह केला असता,तो राजा,कृष्णाला प्रदक्षिणा व नमस्कार करून,गुहेच्या मुखांतून बाहेर निघाले ||१|| भावार्थ:--- अशा प्रकारे श्रीकृष्णांनी मुचुकुंद यांच्यावर कृपा केली.भगवंत जो साधक अधिकारसंपन्न होईल,त्याच्यावर कृपा करताटच.आपण आपला अधिकार वाढवून म्हणजे निष्काम कर्म करून व निष्काम उपासना करून—अंत:करण शुद्ध व स्थिर करून भगवंतांची कृपा संपादन करण्याचा सतत प्रयत्न करावा.||१|| | स वीक्ष्य क्षुल्लकान् मर्त्यान् पशून् वीरद्वनस्पतीन् | मत्वा कलीयुगं प्राप्तं जगाम् दिशमुत्तराम् ||२|| अर्थः------नंतर तयाने लहान लहान झालेले मनुष्य,पशु वल्ली व वृक्ष पाहून कलियुग प्राप्त झाले असे जाणून,तप करण्याकरिता उत्तरदिशेकडे गमन केले||२|| अर्थः------तपाविषयी श्रद्धेने युक्त,धैर्यवान ,कोठेही आसक्तीरहित,व संशयरहित अशा त्या राजाने,आपले मन श्रीकृष्णाचेठिकाणी स्थिर करून,गंधमादनपर्वतावर प्रवेश केला.||३|| भावार्थ:--- मुचुकुंद हा तपश्चर्याने,श्रद्धेने,धैर्येने आणि अनासक्तीनेयुक्त होता.आपणाससुद्धा परमार्थ करण्यासाठी तपश्चर्या,श्रद्धा,धैर्य आणि संसाराची अनासक्ती असणे जरुरी आहे.हे सदगुण आपल्यात येण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना ही साधना केली असता हे सदगुण येतात.परमार्थ करण्यासाठी आपल्याठीकानी श्रद्धा असावी लागते,कारण श्रावण करत असतांना संशय येत असतात,ते संशय येऊ नये म्हणून श्रद्धा वक्ता यांच्यावर श्रद्धा ठेवावी लागते.वारंवार श्रवण केल्याने संशय आपोआप निवृत्त होत असतात.म्हणून श्रद्धा असणे जरुरी आहे.संस हा दु:खदायक आहे असा आपणास नित्य अनुभव आहे,पण आपण आशावर जीवन जगतोत. जगतोत.मनातील अशा कधीच—मृत्यू येईपर्यंत कधीच,कोणाचीच आजपर्यंत पूर्ण झाली नाही व पुढेही होणार नाही.ही वस्तुस्थिती आहे.अज्ञानामुळे असे कळत नाही. जेव्हा आपण साधू—संत—महात्मा यांची सत्संगती करून श्रवण करूत,तेव्हाच कळेल,अन्यथा कळणार नाही.आपले चित्त श्रीकृष्ण यांच्या ठिकाणी ठेऊन गंधमादन पर्वतावर गेला.आपण कोणतेही कार्य करत असतांना आपले चित्त भगवंतांच्या ठिकाणी ठेऊन कार्य करावे.ध्यानी—मनी भगवंतच असला पाहिजे.||३|| अर्थ:--------तेथेही तो बदरीकाश्रमामध्ये नरनारायनाच्या स्थानाप्रत पावोन,सुखदुःख,शीतउष्ण,इत्यादिक सर्वद्वान्द्वांचे सहन करून व कामक्रोधादिकांनी रहित होऊन,तपाच्या योगाने हरीचे आराधन करूं लागला ||४|| भावार्थ:--- तप करण्याकरिता तितिक्षा असणे अत्यंत जरुरी आहे.तितिक्षा म्हणजे अनुलुल—प्रतिकूल परस्थिती शांत चित्ताने सहन करण्याची योग्यता असणे त्यास तितिक्षा असे म्हणतात.उदा—ऊन—थंडी हे धर्म सहन करतांना आपले चित्त शांत असावयास पाहिजे म्हणजे त्या वातावरणात दु:ख न वाटता सुख वाटावे.असा भाव निर्माण होण्यासाठी आभ्यास करावा लागतो.असा आभ्यास करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.म्हणून आपणास साध्य पाप्त होण्यासाठी साधना करावी लागते.||४|| अर्थः---इकडे भगवान श्रीकृष्ण,यवनांनी वेढा घातलेल्या मथुरानगरीमध्ये पुन्हा येऊन,म्लेछांचे सर्व सैन्य मारून त्यांचे भुशाणादिक धन द्वारकेत नेण्याविषयी उद्युक्त झाला ||५||| अर्थः---तेव्हा श्रीकृष्णाने आज्ञा केलेले मनुष्य व त्यांनी पाठीवर गोण्या घातलेले बैल,धन नेऊ लागले असता,तेव्वीस अक्षौहिणी सैन्याचा अधीपती जरासंध,प्राप्त झाला ||६|| अर्थः------त्यावेळी हे राजा,शत्रूसैन्याचा अतिशय वेग पाहून,मनुष्यलीलेला स्वीकार करणारे ते रामकृष्ण,अतित्त्वारेने पलायन करूं लागले||७|| अर्थः------आणि नेत असलेले यवनसैन्यसंबंधी पुष्कळ द्रव्यही तेथेंच टाकून,ते वस्तुतः निर्भय होते तथापि भीतऱ्यापेक्षाही,भ्याल्यासारखे होऊन,कमलपत्रासारख्या आपल्या पायांनीच बहुत योजनेपर्यंत पळून गेले||८|| अर्थः-----ईश्वराची इयत्ता न जाणणारा जरासंधहि पळत असलेल्या त्यांना पाहून,हास्य करीत करीत त्यांना धरण्याकरिता रथ्यांच्या सैन्यासहवर्तमान त्यांच्या मागून थांबू लागला||९|| अर्थः-----ते रामकृष्ण,दूरपर्यंत पळून श्रम पावले आणि अकरा योजने उंच अशा प्रवर्षणनामक पर्वतावर चढले.ज्या पर्वतावर भगवान इंद्र बाराही महिने वृष्टी करीत असतो.||१०|| अर्थः-----हे राजा,तेव्हा जरासंधाने,ते पर्वतावर दडून राहिले असे जाणून शोध करीत असतांही त्यांचे दडण्याचे स्थान त्याला मिळाले नसल्यामुळे त्यांना जाळण्याकरीता पर्वताला सभोंवार काष्ठांनी वेष्टित केले आणि अग्नी लावून त्या पर्वताला जाळून टाकिले.||११|| अर्थः-----त्यावेळी ज्याचे तट जळूं लागले आहे,अशा अकरा योजने उंच असलेल्या त्या पर्वतावरून,रामकृष्ण वेगाने उडी मारून,जरासंधाने वेढा घातलेल्या प्रदेशाच्या पलीकडे भूमीवर खाली उतरले||१२|| अर्थः-----हे राजा,तेव्हा सैन्यासहित असलेल्या जरासंध शत्रूने न पाहिलेले ते रामकृष्ण,समुद्रच जिचा खंदक आहे अशा आपल्या द्वारकानगरीमध्ये पुन्हा प्राप्त झाला.||१३|| अर्थः------तो राजसंदही रामकृष्ण दग्ध झाले असे व्यर्थच मानीत असता,आपले मोठे सैन्य घेऊन मगधदेशांप्रत निघून गेला.||१४|| भावार्थ:--- आपला शत्रूची सर्व सत्य माहिती घेऊन नंतर खात्री करून कोणताही निर्णय घ्यावावयास पाहिजे.तसे न केले तर अहित होत असते.||१४|| | आनर्ताधिपतिः श्रीमान् रैवतो रेवतिं सुताम् | ब्रम्हणा चोदितः प्रदाद् बलायेति पुरोदितम् ||१५|| अर्थः------आतां,श्रीकृष्णाचे विवाह सांगण्याकरिता नवमस्कंधात सांगितलेल्या बलदेवाच्या विवाहाचे स्मरण करवितो – आनर्तदेशांचा अधिपती श्रीमान जो रैवत राजा त्याने,ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून आपली रेवतीनामक कन्या बलदेवाला अर्पण केली,असे पूर्वी नवमस्कंधात मी तुला सांगितले आहे||१५|| | भगवानपी गोविन्द उपयेमे कुरुद्वह | वैदर्भी भीष्मकसुतां श्रियो मात्रां स्वयंवरे ||१६|| अर्थः------हे कुरुश्रेष्ठा,भगवान श्रीकृष्णानेही,सर्वलोक पहात असतां,शिशुपालाच्या पक्षपाताने प्राप्त झालेल्या शाल्वादिक राजांचा पराभव करून,विदर्भदेशांत उत्पन्न झालेली लक्ष्मीची कला जी भीष्मकराजाची रुख्मिणीनामक कन्या तिचे,जसे गरुडाचे देवांचा पराभव करून सुधेने हरण केले त्याप्रमाणे हरण करून वरून घेतली||१६-१७|| अर्थः------राजा म्हणाला – हे भगवान,जिचे मुख सुंदर आहे त्या भीष्मकराजाच्या रुख्मिणीनामक कन्येला,श्रीकृष्ण भगवंताने युद्धांतून हरण करण्याचा जो राक्षसविधी त्याच्या योगाने वरिले असे मी ऐकिले||१८|| अर्थः-----तर हे सर्वज्ञा,जशा प्रकारचे श्रीकृष्णाने,जरासंधशाल्वादिकांना जिंकून रुख्मिणी हरण केली असेल तसे ते महापराक्रमी श्रीकृष्णाने चरित्र,मी श्रवण करण्याची इच्छा करितो.यास्तव ते मला सांग.||१९|| अर्थः---हे ब्रम्हनिष्ठा,श्रवण व पठन करणारांना पुण्यकारक,कर्नांना गोड लागणाऱ्या लोकांचे पाप घालविणाऱ्या आणि प्रतिक्षणी आश्चर्यासारख्या भासत असून नव्या नव्यासारखा वाटणाऱ्या अशा त्या श्रीकृष्णकथांच्या श्रवणाचे सार जाणणारा कोण बरे श्रोता,तृप्ती पावेल ? कोणीच पावणार नाही ||२०|| अर्थः-----श्रीशुकाचार्य म्हणला – हे राजा,विदर्भदेशांचा अधिपती,गुणांनी थोर असा भीष्मक नांवांचा एक राजा होता.त्याला पांच पुत्र आणि सर्वावयवांनी सुंदर अशी एक कन्या झाली.||२१|| अर्थः-----त्यांची नांवे – सर्वात ज्येष्ठ तो रुक्मी,रुक्मबाहू,रुक्मकेश,रुक्ममाली आणि यांची बहिण सद्रूनसंपन्न रुख्मिणी होय.||२२|| अर्थः------तिने आपल्या घरी आलेल्या घरी आलेल्या लोकांनी वर्णन केलेल्या श्रीकृष्णाचे सौंदर्य,पराक्रम,गांभीर्य,औदार्य,इत्यादिक गुण आणि संपत्ती यांचे श्रवण करून,तो श्रीकृष्णच आपणास योग्यपती आहे असे मानिले.||२३|| अर्थः------इकडे द्वारकेमध्ये श्रीकृष्णानेही आपल्या घरी आलेल्या लोकांच्य मुखांतून,बुद्धी,लक्षणे,औदार्य,स्वरूप,सुस्वभाव यांचा आश्रयभूत असलेल्या त्या रुख्मिणीचे श्रवण करून,हीच आपणाला योग्य आहे असे मानून तिला वरण्याचे मनांत आणिले.||२४|| भावार्थ:--- पहिल्यांदा १--वधूची किंवा वराची निवड करत असतांना बुद्धी,उदारता,शील आणि इतर गुण यांचा विचार करावा.त्यानंतर २—वाढू व वरांचे सौदंर्य पाहावे. त्यानंतर ३—आर्थिक परिस्थिती पहावी.मुख्य म्हणजे आपआपल्या गुणांची,सौदांर्याची व आर्थिक परिस्थितीची तुलनात्मक दृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा.||२४|| अर्थः-------असे असता व तिचे इतर बंधू त्या बहिणीला श्रीकृष्णस देण्याची इच्छा करीत असतां,हे राजा,त्यांचे निवारण करून रुक्म्याने,तिला,शिशुपालास देण्याचा निश्चय केला.||२५|| अर्थः------तो भावाचा निश्चय जाणून,तिचे श्यामवर्ण नेत्रकटाक्ष आहेत अशा त्या रुख्मिणीने,अत्यंत दु:खितचित्त होऊन श्रीकृष्णप्राप्तीच्या उपायाचा विचार केला आणि तेथे प्राप्त झालेल्या कोणीएक सुशील ब्राम्हनाजवळ पत्र देऊन त्याला त्वरित श्रीकृष्णास आणण्याकरिता पाठविले.||२६|| अर्थः------नंतर तो ब्राम्हण द्वारकेमध्ये प्राप्त होऊन तेथे असलेल्या द्वारपालांनी त्यांचा आंत प्रवेश करविला असतां,त्याने सुवर्णमय सिंहासनावर बसलेल्या जगत्कारनभूत पुरणपुरुष अशा श्रीकृष्णाला अवलोकन केले||२७|| | दृष्ट्वा ब्रम्हण्यदेवस्तमवरुह्य निजासनात् | उपवेश्यार्हयाश्चक्रे यथाssत्मानं दिवौकसः ||२८|| अर्थः--------इकडे ब्राम्हणाचा कैवारी अशा श्रीकृष्णदेवाने,त्या ब्राम्हणास अवलोकन करितांच आपल्या आसनावरून खाली उतरून,त्या ब्राम्हणाला त्या आसनावर करविले आणि जसे देव आपली ( श्रीकृष्णाची ) पूजा करितात त्याप्रमाणे त्यांची पूजा केली.||२८|| भावार्थ:---आपल्या घरी येणारे ब्राह्मण असतील किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील तर त्यांचा आदर—मन—सन्मान करून योग्यतेनुसार पाद्य—पूजा करावी.||२८|| अर्थः---त्याने मार्गातील श्रम घालविण्यासाठी थोडावेळ विश्रांती घेऊन भावार्थ:--- ब्राह्मणाचे—येणाऱ्या अतिथीची भोजन व विश्रांतीची व्यवस्था करणे आपले कर्तव्य असते.ते प्रवास करून आल्यामुळे त्यांना थकवा आलेला आसतो,म्हणून आपण त्याची धर्मानुसार सेवा करावयास पाहिजे.धर्मानुसार सेवा केली असता त्यांचा प्रवासातील थकवा कमी होऊन त्यांना समाधान प्राप्त होते.||२९|| अर्थः---श्रीकृष्ण म्हणाले:--- “हे थोर ब्राम्हण!आपले चित्त नेहमी संतुष्ट असते ना?आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचन तर येत नाही ना?||३०|| भावार्थ:---आपण त्यांचा योग—क्षेम विचारावा.त्यांच्या संतुष्टपणाविषयी विचारपूस करावी.पूर्वजांच्या धर्मांचे—रितीरिवाजांचे आपण पालन करावयास पाहिजे||३०|| अर्थ:---जे काही मिळेल त्यातच जर ब्राम्हण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो च्युत झाला नाही,तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो.||३१|| अर्थ:---असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसऱ्या लोकात वारंवार भटकावे लागेल.परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो.||३२|| भावार्थ:--- असंतुष्ट म्हणजे वासनेंची पूर्ती न झालेला जो असतो त्यास असंतुष्ट असे म्हणतात.जो मनुष्य असंतुष्ट आहे त्यास चौऱ्याऐंसी योनीत भटकून दु:ख भोगावे लागते.म्हणून असंतुष्ट जीवन जगू नये.प्रयत्न करून जे मिळेल त्यात संतुष्ट चित्ताने जीवन जगावे.आपण असंतुष्ट जीवन जरी जगलोत,तरी कोणी कांहीच देत नाही. म्हणून विनाकारण नकारात्मक वृत्तीने जीवन जगू नका,कारण मिळत नाही व त्यामुळे चौऱ्याऐंसी लाख योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून संतुष्ट राहा.||३२|| | विप्रान् स्वलाभसंतुष्टान् साधून् भूतसुहृत्तमान् | निरहन्कारीणः शान्तान् नमस्ये शिरसासकृत् ||३३|| अर्थः---सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूंमुळे जे संतुष्ट असतात,ज्यांचा स्वभाव संतांसारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परम हितैषी असतात,जे अहंकाररहित व शांत असतात,त्या ब्राम्हणांना मी सदैव मस्तक लववून नमस्कार करतो.||३३|| भावार्थ:--- विवेकी मनुष्य संतुष्ट असतो,कारण तो विवेक करून निर्णय घेत असतो.त्याच्याठीकानी दया,क्षमा आणि शांती नंदात असते.ते इतरांचे हित करतात. म्हणून आपणही विवेक करून निर्णय घ्यावा.आपल्या ठिकाणी दया,क्षमा आणि शांती हे तीन गुण आले असता आपण नेहमी संतुष्ट राहतोत.इतरांचे हित करावे.||३३|| अर्थः---हे ब्रम्ह्न!राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते ना?ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तऱ्हेने पालन होते आणि ती आनंदाने राहाते,तो राजा मला प्रिय असतो.||३४|| भावार्थ:---कुटुंबाचा मुख्य,गावाचा मुख्य,जिल्हा मुख्य,विभागाचा मुख्य,राज्याचा मुख्यदेशाचा मुख्य,जगाचा मुख्य जे सत्ताधीस आहेत,त्यांनी आपापल्या प्रजेस सुखी ठेवावे.सुखी न ठेवता दु:खी ठेवले तर जो राजसत्ताधीस आहे,त्यास यमपुरीस जाऊन दु:ख भोगुण चौऱ्याऐंसीलक्ष योनीस जाऊन दु;ख भोगावे लागते.म्हणून सत्ताधीस यांनी प्रजाजनांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे त्यांना सकाम असेल तर स्वर्गसुख मिळते,किंवा निष्काम असेल तर अंत:करण शुद्ध होऊन भगवंतांचा प्रिया भक्त होतो.केव्हाही स्वर्गसुखापेक्षा भगवंतांचा प्रिय भक्त होणे फारच महत्वाचे आहे.यावर विवेक करून निर्णय घेऊन आचरण करावे.||३४|| अर्थः---हे ब्रम्हन!आपण कोठून,कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून येथे आला आहात?जर काही विशेष गुपित नसेल,तर आम्हांला सांगा.आम्ही आपले कोणते काम करावे?||३५|| अर्थः---लीलेनेच मनुष्यरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ब्राम्हणाला असे (त्याने भगवंतांना रुक्मिणीने दिलेले सातश्लोकी पत्र दिले.नंतर श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून तो ते वाचू लागला.)||३६|| अर्थः---रुक्मिणीनीं म्हटले आहे:---“हे त्रिभुवनसुंदरा!ऐकणाऱ्याच्या कानांमार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रीविध ताप दूर करतात,तसेच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते,असे आपले गुण—सौदर्य वर्णन ऐकून,हे अच्युता!संकोच सोडून माझ्या चित्ताचे आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे.||३७|| अर्थः------आतां कुलीन कन्या असलेल्या तुला हा उद्धवपणा योग्य नाही असे म्हणशील तर हि शंका मनामध्ये आणूं नये.कारण,हे मुक्तीदात्या मनुष्यश्रेष्ठा,कुलीन,गुणांनी उदार व धैर्ययुक्त अशी कोण बरे कन्या,सत्कुलामध्ये जन्म,सुस्वभाव,सौंदर्य,चवदा विद्या व चौसष्ट कळा,तारुण्य,धनसंचय व तेज यांच्या योगाने निरुपम तयाच मनुष्यलोकांच्या मनाला रमविणारा अशा तुला,विवाहाला योग्य अशा समयी पती वरणार नाही ? तर सर्वही वरतीलाच||३८|| अर्थः-------म्हणून हे प्रभो,मी तुला पती वरिले आहे आणि आपला आत्माही तुला अर्पण केला आहे.यास्तव तूं तेथे येऊन मला आपली भार्या करून घे.हे कमळकाक्षा,जसा सिंहाच्या भागाला कोल्ह्याचे स्पर्श करूं नये त्याप्रमाणे वीर अशा तुझ्या भाग जी मी तुला शिशुपाळाने शीघ्र येऊन स्पर्श न करावा.तूं आला नाहीत किंवा विलंब लागला तर तसे होण्याचा संभव आहे||३९|| अर्थः------आतां,अनेक जन्मामध्ये केलेल्या सुकृतांच्या योगाने हेंच घडो अशी प्रार्थना करिते – मी जन्मातराचेठिकाणी पुर्त ( वापीकृपादिक ),इष्ट इत्यादिकांच्या पूजनासिकांचेकरून ब्राम्हादिकांचा नियंता भगवान जर यथाशक्ती आराधन केला असेल,तर त्याच्या योगाने प्रसन्न झालेला तो भगवान श्रीकृष्णच,येऊन माझे पाणीग्रहण करो दुसरे शिशुपाळादिक न करोत||४०|| भावार्थ:--- आपण केव्हानाकेव्हा तरी विहिरी,तलाव,परोपकार,इतर जीवनाचे दु:ख घालवून सुख देण्याचा नेहमी प्रयत्न केला असेल तर,दानधर्म,व्रत असे सत्कर्म केले असेल व देव,ब्राह्मण—संत—महात्मा यांचे पूजन केले असेल तर आपणास सुख देणारी पत्नी किंवा पती मिळू शकतो.म्हणून आपण असे सत्कर्म करावे.||४०|| अर्थः------आता तुझ्या बंधूंनी तुला शिशुपालाळा दिली असता तेथे आम्ही येऊन काय करावे? असे म्हणाल तर त्याविषयी उपाय सांगत्ये – हे अजित,दुसरे दिवशी विवाह व्हावयाचा असता तूं प्रथम गुप्तरूपानेच विदर्भदेशामध्ये येऊन,नंतर सेनापतींनी परिवेष्टित होऊन आणि शिशुपाळ जरासंध इत्यादिक राजांच्या सैन्याचा पराभव करून बलात्काराने रक्षासविधीने,पराक्रम दाखविणे हेंच जिचे मोल आहे अशा मला वरून घ्यावी||४१|| अर्थः------आता अंतःपुरामध्ये राहणाऱ्या तुझ्या हरनामध्ये तुझ्या बंधुचाही वध करण्याचा प्रसंग येईल,त्यांना न मारिता तुला कशी करावी असे म्हणाल तर उपाय सांगत्ये – या कुलांत विवाहाच्या पूर्वदिवशी कुलदेवतेच्या दर्शनाची मोठी यात्रा आहे.ज्या यात्रेमध्ये नवी कन्या,नगराच्या बाहेर असलेल्या पार्वतीच्या दर्शनाची जात असत्ये.तेव्हा अंबिकेच्या देवळातूनच माझे हरण करणे सुकर आहे.||४२|| अर्थः------याप्रमाणे आपल्या स्वीकाराविषयी भगवंताची प्रार्थना करून,असे झाले नाहीतर आपला निश्चय सांगत्ये – हे कमळाक्षा,शंकर व त्याच्यासारखे दुसरे ब्राम्हादिकही आपल्या अज्ञानाची निवृत्ती होण्याकरिता ज्या तुझ्या चरणकमळाच्या रज;कणांनी स्नान होण्याची इच्छा करितात त्या तुझा स्वीकाररूप प्रसाद जर मी पावल्ये नाही तर,उपवासादिक व्रतांनी देह झिजवून व्याकूळ झालेल्या प्राणांचा त्याग करीत.याप्रमाणेच वारंवार करीन,म्हणजे शेंकडो जन्मांनीतरी तुझा प्रसाद होईलच||४३|| | इत्येते गुह्यसन्देशा यदुदेव मयाहृता: | विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनन्तरम् ||४४|| अर्थ:---ब्राम्हण म्हणाला:---हे यदुश्रेष्ठा!रुक्मिणीचे गुप्त निरोप मी आणिले आहेत.याबद्दल तुला जे करण्यास योग्य असेल त्याचा विचार करून त्वरितच करावे.||४४|| ________________________________________________________________________________________________________________________ |५३--- २--- रुक्मिणीहरण---१-- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थः------श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,त्या श्रीकृष्णाने रुख्मीणीचा निरोप करून,आपल्या हाताने त्या ब्राम्हणाचा हात ग्रहण करून हास्य करीत करीत असे भाषण केले की, ||१|| | वैदर्भ्या: स तु सन्देशं निशम्य यदुनन्दन: |प्रगृह्य पाणिना पाणिंप्र हसन्निदमब्रवित् ||१|| | तथाहमपि तच्चितो निद्रां च न लभे निशि | वेदाहं रुक्मिणा द्वेषान्ममोद्वोहो निवारितः ||२|| अर्थः---श्रीभगवान म्हणाले:---हे ब्राम्हणश्रेष्ठा,जशी ती वैदर्भी व्याकूळचित्त झाली आहे त्याप्रमाणे मीही व्याकूळ झाल्यामुळे रात्रीची झोपसुद्धा पावत नाही.कारण,माझ्या द्वेशानेच रुक्म्याने माझा विवाह निवारण केला आहे,असे तूं न सांगितलेलेहि मी जाणत नाही||२|| अर्थः------म्हणून राजांमध्ये अधम अशा त्या शिशुपाळादिकांचा युद्धामध्ये पराभव करून,जिला मीच पतीत्वेकरून मान्य आहे व जिचे सर्व अवयव सुरेख आहेत अशा त्या रुख्मिणीला,मी जसा,वारा जळत असलेल्या काष्ठापासून अग्नीच्या ज्वालेला हरण करितो त्याप्रमाणे हरण करितो||३|| भावार्थ:--- रुक्मिणीचे माझावर प्रेम असल्यामुळे त्या राजकुमारीला लाकडातून प्रयत्न करून जसा अग्नी उत्पन्न केल्या जातो,त्याचप्रमाणे मी योग्य प्रयत्न करून तिला आणल्याशिवाय राहणार नाही.म्हणजे निश्चीतारुपणे आणेलच यात तिळमात्र शंका नाही,असा माझा निर्धार आहे.सर्व घटकात प्रेम महत्वाचे असते.||३|| अर्थः-----असे भाषण करून नंतर त्या श्रीकृष्णाने विवाहनक्षत्र परवाचे दिवशी रात्री आहे असे जाणून,सारथ्याला,हे दारूका,लवकर रथाला घोडे जोडून घेऊन ये असे सांगितले ||४|| अर्थः---त्या दारूकानेही शौब्य,सुग्रीव,मेघपुष्प आणि बलाहकर या नावांचे चार घोडे जोडलेला रथ श्रीकृष्णाचे समीपभागी आणून तो हात जोडून उभा राहिला.||५|| अर्थः------नंतर श्रीकृष्णाने,त्या ब्राम्हणाला रथावर बसवून व स्वतंही अधिपती शीघ्रगमन करणाऱ्या त्या घोड्याच्या योगेकरून,आनर्तदेशांतून एका रात्रीनेच विदर्भ देशांमध्ये गमन केले||६|| अर्थः------इकडे विदर्भ देशाचा अधिपती पुत्राच्या स्नेहाने त्याच्या स्वाधीनपनाणे वागणारा तो भीष्मक राजा ,आपली कन्या रुक्मिणी शिशुपाळाला देण्याकरिता नगरला अलंकृत करवीने ,व देवाच्या महापूजा बांधवीने इत्यादिक कर्म करू लागला . ||७|| अर्थः----त्यावेळी ज्यामध्ये , झाडलेले व सेवन केलेले मार्ग गल्ल्या व चव्हाटे आहेत असे ते नगर ,चित्रविचित्र ध्व्ज्यांचे ठिकाणी उभारलेल्या पताकांनी व जागोजागी बांधलेल्या तोरणांनी उत्तमरीतीने अलंकृत करविले होते ||८|| अर्थः-----तसेच माळा,गंध पुष्पे ,भूषणे व स्वच्छ वस्त्रे यांनी भूषित झालेल्या स्त्रीपुरुषांनी सेवन केलेले व अगुरूच्या योगाने सुगंध युक्त झालेल्या संपत्तीयुक्त घराणी युक्त होते ||९|| अर्थ:-----हे राजा,भीष्मक राजाने ,पितर देव आणि ब्राम्हण यांचे विध्युक्तावगैरे पूजन करून तसेच ब्राम्हणांना उत्तमप्रकारे भोजन घालून ब्राम्हणाकडून कन्येचे पुण्याहवाचन करविले ||१०|| भावार्थ:--- वधू पित्याने लग्नसमारंभ होण्यापूर्वी सात्विक कार्य विधीनुसार करून घ्यावे.देवता यांना संतुष्ट करावे,कारण विवाहसोहळ्यात विघ्न येत नाही.||१०|| अर्थः---तसेच विवाहसुत्र बंधन करून ,जिचे मंगल केले आहे व जिला उत्तमप्रकारे स्नान घातले आहे अशा त्या सुंदर दंत युक्त कन्येला कोरेवस्त्र नेसवून दुसरे पांघरवून उत्तम भूषनाणी भूषित केले ||११|| अर्थः---आणि त्यावेळी तिला श्रेष्ठ ब्राम्हणांनी सामवेद ,ऋग्वेद ,यजुर्वेद यांच्या मंत्रांनी अभिमंत्रण केलेले अंगारा लाऊन त्या कन्येचा रक्षण विधी केला .अथर्वणवेदातील शान्तिकल्प जाणणाऱ्या पुरोहिताने ,प्रतीकुल आसलेल्या ग्रहांच्या शान्तीकरिता अग्नीमध्ये ग्रहमुख केला .||१२|| भावार्थ:--- वेदातील मंत्र म्हणून वरासाठी रक्षणकवच केले,त्यामुळे तिला विवाहासोहाल्यात विघ्न न येत संरक्षण व्हावे म्हणून रक्षाकवचाचा विधी पार पाडला.||१२|| अर्थ:---त्यावेळी शास्त्रोक्तप्रकार जाणणारमध्ये श्रेष्ठ आशात्या भीष्मकराजाने ,ब्राम्हणांना ,सुवर्ण ,रूपे व गूळ मिसळलेले तीळ,आणि गाई यांनी दाने केली||१३|| भावार्थ:---वधू पित्याने त्या दिवशी दानधर्म योग्य संत—महात्मा जे ब्रह्मज्ञानी आहेत,त्यांना द्यावेत,कारण ते सत्पात्र असतात.असे दान केल्याने पुण्य प्राप्त होते.||१३|| अर्थः------याप्रमाणे चेदिदेशांचा अधिपती जो दमघोषनामक राजा त्याने,आपला पुत्र जो शिशुपाळ त्याच्याही विवाहाविषयी योग्य असे जे सर्व ब्राम्हणाकडून करविले.||१४|| भावार्थ:--- वरपक्षानेसुद्धा वधुपक्षाप्रमाणे सर्व विधी पार पाडला,कारण विवाहासोहळ्यात विघ्न न येत सुखाने पार पडावे.आपणसुद्धा याचप्रमाणे विधी करावा.||१४|| अर्थः-----तदनंतर सुवर्णपुष्पांच्या माळा धारण करणाऱ्या व मदाचा स्त्राव होणाऱ्या हत्तीच्या समुदायांनी,रथांनी,पडतींनी व घोडेस्वारांनी व्याप्त असलेल्या सैन्यांनी परिवेष्टित असा तो शिशुपाळ,आपल्या नगरांतून कुंडीतपुराप्रत जावयास निघाला.||१५|| अर्थः-----नंतर,तो आपल्या नगराजवळ आला असे ऐकून विदर्भदेशाधिपती भीष्मक राजाने,त्या शिशुपाळाला सामोरे जाऊन व त्याची सीमांतपूजा करून,वरास उतरण्यास योग्य जे दुसरे स्थान केलेले होते तेथे त्यास उतरविले||१६|| भावार्थ:--- वधूपक्षाने—भिष्कांने वरपित्यांचे सामोरे जाऊन स्वागत केले.आपणही तसेच वधुवराने वरपक्षांचे स्वागत करावयास पाहिजे कारण ते आपल्या गावांत वरपक्षांचे आगमन झालेले असते.वरपक्षांचे पूजनही करावयास पाहिजे.त्यांची त्यांच्या योग्यतेनुसार निवासाची,भोजनाची,इतर सर्व व्यवस्था करावयास पाहिजे.आपणही करावे.||१६|| अर्थः-----त्या कुंडीतपुरामध्ये शिशुपाळाचे पक्षपाती,रामकृष्णाचे देष्टे – शाल्व,जरासंध,दंतवक्र,विदुरथ आणि पौड्रकादिक हजारो राजे,जर बलरामादिक यादवांनी युक्त असा श्रीकृष्ण,येऊन कन्या हरण करील तर सर्व आम्ही एकत्र मिळून त्याच्याबरोबर युद्ध करूं,असा मनांत निश्चय केलेले ते सावधपने आपापल्या सर्व सैन्यांनी व वाहनांनी युक्त असते.शिशुपाळाला कन्या साधून देण्याकरिता प्राप्त झाले होत||१७-१८-१९|| अर्थः------इकडे व्दारकेमध्ये भगवान बलरामाने शत्रुपक्षपती राजांचा हा प्रयत्न एकूण ,तसेच सहय्यावाचून एकटाच श्रीकृष्ण कन्या हरण करण्या करिता गेला आहे असे एकूण ,आणि तेथे कृष्णाचा व त्या राजांचा कलह होईल अशी शंका मनात आणून ,भ्रात्या –श्रीकृष्णाचेठिकाणी जो स्नेह त्याने व्याप्त होत असता,तो गज,अश्व रथ व पदाती यांनी युक्त अशा मोठ्या सैन्यासहवर्तमान कुंडीनगराप्रत निघून गेला.||२०-२१|| भावार्थ:--- बलरामदादांना कळले कि,आपले बंधू श्रीकृष्ण एकटाच रुक्मिणीचे हरण करण्याकरता गेलेले आहे व शिशुपालादींनी संपूर्ण सेना आणि वाहने घेऊन आलेले आहेत,असे समजातच बंधूप्रेमाने त्यांचे हृदय भरून आले व लगेच चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडीनपुराकडे गेले.त्याचप्रमाणे आपणही असा किंवा कोणत्याही प्रकारचा बंधुभाव जाग्रत करून बंधूस अंकातकाळात मदन करावयास पाहिजे.आपल्यावरही पुढे चालून संकट येऊ शकते,म्हणून एकमेकासाठी बंधूभाग जाग्रत करावा.||२१|| अर्थः------इकडे जिचा कटीप्रदेश सुंदर आहे अशी रुख्मिणी सुर्योद्याचे पूर्वीचे श्रीहरीच्या आगमनाची इच्छा करीत असता,ब्राम्हणाचे माघारे येणे अजून का झाले नाही असे जाणून,त्यावेळी मनांत चिंतन करूं लागली की,- ||२२|| अर्थ:------अहो,मंदभाग्य अशा माझ्या विवाहाला एकरात्रच मध्ये राहिली आहे.अजूनही भगवान श्रीकृष्ण का येत नाही याचे कारण काय आहे ? ते मी जाणत नाही||२३|| अर्थ:------बरे माझ्या निरोप घेऊन गेलेला जो ब्राम्हण तोही अजून येत नाही,त्यापेक्षा असा तर्क होतो की,- स्तुत्यस्वरूपी त्या भगवंताने प्रथम इकडे येण्यासाठी कांही उदयो चालविला होता म्हणून त्या ब्राम्हनालाही परत पाठविले नाही.नंतर प्रस्थानाच्या वेळी कृष्णाने माझे ठिकाणी कांही उद्धटपणाचा दोष मनात आणून तो,माझ्या पाणीग्रहांनाविषयी येत नाही व त्याने ब्राम्हणास प्रत पाठविले म्हणून त्यासही येण्यास विलंब लागला||२४|| अर्थः------अथवा भाग्यहीन अशा मला,ब्रम्हदेव व महादेव हे अनुकूळ ( कार्यसाधक ) नाहीत ! तशीच हिमाचलाची कन्या,पतिव्रता रुदानी गौरी देवीही प्रतिकूल झाली आहे ! ||२५|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण आपल्याकडे न येण्याचा दोष तिने श्रीकृष्ण यांच्याकडे व अन्याकडे न लावता स्वत:कडे लावला.तसेच आपणसुद्धा इतरांना दोष न लावता,तो दोष आपल्याकडेच लावावा,कारण यामुळे आपण आपला दोष शोधून सुधारण्याचा प्रयत्न करतोत.त्यामुळे आपली वाटचाल प्रगतीकडे होते,असे निश्चितच आहे.||२५|| अर्थः------ती काळी रुख्मिणी,याप्रमाणे चिंतन करीत असतां,अजूनही कृष्ण येण्याचा काळ झाला नाही असे मानून,जिचे चित्त गोविंदाने हरण केले आहे ती,दुःखाश्रुती भरलेले नेत्र मिटून स्तब्ध राहिली||२६|| अर्थः------हे राजा,याप्रमाणे गोविंदाच्या येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या त्या रुख्मिणीला प्रिय सूचक अशी,डावी मांडी,डावा भूज व डावा नेत्र हि तिची अंगे स्फुरण पावूं लागली ||२७|| | अथ कृष्णविनिर्दिष्टः स एव द्विजसत्तमः | अन्तःपुरचरीं देवीं राजपुत्रीं ददर्श ह ||२८|| अर्थ:-----नंतर,श्रीकृष्णाने मी प्राप्त झालो असे रुख्मिणीला कळीव असे सांगून पाठविलेल्या त्याच ब्राम्हणश्रेष्ठाने अंत:पुरात राहणाऱ्या प्रकाशमान अशा त्या रुख्मिणीला अवलोकन केले.||२८|| अर्थः-----तेव्हा,ती रुख्मिणी ज्याच्या देहाची स्थिती व्यग्र नसून शांत आहे अशा हर्षयुक्त मुख असलेल्या त्या ब्राम्हणाला अवलोकन करून भगवत्परायन व कृतकार्य झालेल्या दूताचे लक्षण जाणणारी,शुद्ध हास्ययुक्त अशी ती कार्य करून आलां ना ? म्हणून विचारूं लागली||२९|| अर्थः------तेव्हा त्या रुख्मिणीला,त्या ब्राम्हणाने श्रीकृष्ण प्राप्त झाला आहे असे कळविले आणि त्या श्रीकृष्णाचीही तिच्याजवळ प्रशंसा केली,आणि रुख्मिणीला घेऊन जाणार अशाबद्दल युद्धामध्ये दुष्ट राजांना जिंकून तिला मी आणितो असे जें भगवंताने सत्य भाषण केले होतें तेंही तिला त्या ब्राम्हणाने कळविले||३०|| अर्थः-----तो श्रीकृष्ण आला असे जाणून जिचे मन हर्षयुक्त झाले आहे अशी ती रुख्मिणी,परमानंदरूप श्रीकृष्णाला आणून समर्पण करणाऱ्या या ब्राम्हणाला काय बक्षीस द्यावे ? असा विचार करीत असतां या कार्याबद्दल नमस्काराहून अन्य सर्वस्व जरी अर्पण केले तथापि ते पुरे नसून कमीच आहे असे पाहत असता,तिने त्यावेळी केवळ त्याला नमस्कारच केला आणि नंतर पुष्कळ द्रव्यही दिले.||३१|| भावार्थ:---रुक्मिणीने त्यांना—ब्राह्मणांना कांही तरी देण्याचा विचार केला,पण समोर कांहीच दिसले नाही,म्हणून नमस्कार केला.नमस्कार केला म्हणजे त्याची मनोवांच्छित इच्छा पूर्ण केली.त्याचप्रमाने आपणही एखाद्यास कांही कामानिमित्य कोठे पाठवले असेल तर त्याच्या अपेक्षेची पूर्तता करावी.||३१|| अर्थः-----त्यावेळी आपल्या कन्येला विवाहा पाहण्याविषयी उत्सुक असे रामकृष्ण प्राप्त झाले आहेत अस ऐकून भीष्मकराजा,वाद्यघोष व पूजासाहित्ये यांसहवर्तमान सामोरा गेला||३२|| भावार्थ:--- भीष्मक राजे यांनी पहिले कि,राम—कृष्ण रुक्मिणीचा विवाह—सोहळा पाहण्याकरिता आलेले आहेत,म्हणून मंगल वाद्ये वाजवीत,पुजेची सामग्री घेऊन सामोरे गेले.त्याप्रमाणे आपणही आपल्या विवाह—सोहळ्याच्या प्रसंगी किंवा अन्य कारणाने आपल्याकडे जे आलेले आहेत,त्यांचा आदर—सत्कार करावयास पाहिजे.||३२|| | मधुपर्कमुपानीय वासांसी विरजांसी सः | उपायनाभ्यभिष्टानी विधिवत् समपूजयत् ||३३|| अर्थः-----नंतर,त्या भीष्मकाणे त्यांना मधुपर्क,नवी उंची वस्त्रे व फार प्रिय असे उत्तम उत्तम वस्तूंचे नजराणे अर्पण करून,तो महाबुद्धिमान होता म्हणून श्रीकृष्ण खरोखर कन्येला वरण्याकरितांच आला आहे असे जाणून त्याने,वरपुज्येच्या विधीने त्याचे पूजन कले आणि सैन्यासहित व भृत्यादिकांसाहित त्या रामकृष्णांना,भोगसाहित्यादी समृद्धीने युक्त असे राहावयास स्थान निवेदन करून त्यांचा उत्तमप्रकारे सत्कार केला||३३-३४|| भावार्थ:--- राम—कृष्ण यांना उत्तम वस्त्रे आणि भेटवस्तू देऊन विधीपूर्वक त्यांची पूजा करण्यात आलीआपणही उत्तम वस्त्रे आणि भेटवस्तू देऊन पूजा केली.भिष्मकाने जशी सर्व व्यवस्था केली तशीच आपणही सर्व प्रकारची निवासस्थानाची राहण्याची व्यवस्था आदरसत्कार करणे आपले कर्तव्य आहे.||३३-३४|| अर्थः------याप्रमाणे अन्यही सर्व आलेल्या राजांना त्यांचा जसा पराक्रम,जसे बळ व ऐश्वर्य होते त्याप्रमाणे सर्वभोग अर्पण करून भिष्मकाने त्यांचा सत्कार केला||३५|| भावार्थ:--- आपणांकडे जे निमंत्रित आलेले आहेत,त्यांच्या अधिकारानुसार—योग्यतेनुसार त्यांची भेटवस्तू देऊन व्यवस्था करावयास पाहिजे.आदरसत्कार करावयास पाहिजे. असे असले तरी भोजन मात्र सर्वांना सारखे देणे आपले कर्तव्य आहे.भोजनात विषमता नसावी.भोजनात विषमता अधर्म—पाप—दु:ख भोगावे लागते.||३५|| अर्थः------आतां,श्रीकृष्णाचेठिकाणी पुढील कर्मांचा सूचक असा लोकांचा प्रेमा दाखवितो – श्रीकृष्ण प्राप्त झाला असे ऐकून त्या विदर्भपुरांतील लोकांनी जिकडून तिकडून श्रीकृष्णाजवळ येऊन आपल्या नेत्ररूप ओंजळीनी त्याचे मुखकमलसंबंधी अमृत प्राशन केले||३६|| अर्थः-----आणि आपणामध्येच परस्पर असे भाषण केले की,- या श्रीकृष्णाची स्त्री होण्यास रुख्मिणीच योग्य आहे,दुसरी कोणी नाही.आणि रुख्मिनीलाही ज्याचा देह स्तुत्य आहे असा हा श्रीकृष्णच पती होण्यास योग्य आहे||३७|| अर्थः------यास्तव आमचे जन्मांतरी केलेले जर काही पुण्य असेल तर त्याच्या योगाने हा त्रैलोक्याधिपती भगवान श्रीकृष्ण,संतुष्ट होऊन आम्हांवर अनुग्रह करो आणि रुख्मिणीचे पाणीग्रहन करो||३८|| अर्थ:-----याप्रमाणे प्रेमाच्या अज्ञाने तत्पर झालेले पुरवासी लोक आपआपणामध्ये भाषण करूं लागले.इकडे ती कन्या,अंतःपुरांतून शूरपुरुषांची रक्षित होत्साती अंबिकादेवीच्या देवळांत जाण्याकरिता निघाली||३९|| अर्थः-----ती उत्तमप्रकारे श्रीकृष्णाच्या चरणकमळाचे वारंवार ध्यान करीत चरणचालीनेंच भवानीदेवीचे चरणपल्लव पाहण्याकरीता निघाली.||४०|| अर्थ:----ती मौनव्रत धारण करणारी व मातृगनांनी व सख्यांनी परीवेष्टीत होती,कवचादिक धारण करणाऱ्या व आयुधे उचलून धारण करणाऱ्या शूर योध्यांनी रक्षित होतो ||४१||
अर्थः---त्यावेळी मृदंग,शंख,पनव,डंके व दुंदुभि हि वाद्ये वाजू लागली.नानाप्रकारची पुजासाहित्ये पकात्रांदिकांचे नैवेद्य,फळफळावली यांची ताटे भरून घेऊन हजारो वारांगना,माळा,गंध वस्त्रे व भूषणे यांनी अलंकृत अशा ब्राम्हणांच्या स्त्रिया,गायन करणारे गायक व वाद्ये वाजविणारे वाद्यवादक व स्तुतिवगैरे करणारे सुत,मागध व बंदी हे सर्व त्या कन्येला सर्भोवार परिवेष्टित करून निघाले ||४२||४३||४४|| | आसाद्द देवीसदनं धौतपादकराम्बुजा | उपस्पृश्य शुचिः शान्ताः प्रविवेशाम्बिकान्तिकम् ||४४|| अर्थः-----मिळून आत्मस्वरूपाचेठिकाणी अविद्येने कल्पिलेला हा अधिभूत अध्यात्म आणि आधिदैवरूप आद्यंतवान असलेला देहाभिमानच,संसाररहित अशाही प्राण्याला संसारांत पाडितो म्हणजे त्यांचे शुद्धस्वरूप प्रतीतीला येत नाहीसे होते||४५|| | नमस्ये त्वाम्बिकेsभिक्ष्णं स्वसन्तानयुतां शिवाम् | भूयात् पतीर्मे भगवान् कृष्णस्तदनुमोदताम् ||४६|| अर्थः-----त्यावेळी रुख्मिणीला आपोआप स्फुरण पावलेल्या मंत्रांचा अर्थ असा की,- हे अंबिके,आपल्या गणेशादी संततीने युक्त व मंगल रूप अशा तुला मी वारंवार नमस्कार करिते.भगवान श्रीकृष्ण माझा पती व्हावा अशाविषयी तूं अनुग्रह करावा.||४६|| भावार्थ:-----रुक्मिणीने अंबा मातेस प्रार्थना करते कि,”हे अंबा माते भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत.”आपण आपले मांगलिक कार्य होण्यासाठी प्रार्थना करावी.||४६|| अर्थः-----याप्रमाणे नमस्कारपूर्वक वराची प्रार्थना करून नंतर शुद्ध उदक,गंध,अक्षता,धूप,वस्त्रे फुलांच्या माळा,फुले,अलंकार,अनेक प्रकारचे नैवेद्य,भेट वस्तू व दुसरीही नारळवगैरे पूजासाधने आरार्तीक्य इत्यादिक निरनिराळे पदार्थ अर्पण करून रुख्मिणीचे देवीचे पूजन केले||४७|| भावार्थ:--- आपणही पाणी,गंध,अक्षता,धूप,वस्त्रे,फुलांच्या माळा,फुले,अलंकार,अनेक प्रकारांचे नैवेद्य,अनेक प्रकारांच्या भेटवस्तू आणि आरती इत्यादी सामाग्रींनी देवाची किंवा देवीची पूजा करावी.यामुळे पूजा होऊन दानही घडते.जीवनात त्यामुळे त्याग होतो.म्हणून आपण अशा प्रकारची पूजा केल्याने व धर्मानुसार आचरण केल्याने देव—देवी प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण होते.मंदिरातील पुजारी मात्र योग्य सत्पात्र असावा.सत्पात्रास दान दिल्याने देव—देवी प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतात.||४७|| अर्थः-----तसेच त्या पदार्थांना आणि मीठ,अपूप,तांदूळ,कंठसूत्र,फळ व ऊंस यांनी युक्त असलेल्या वायनाच्या समर्पणाने अशा ब्राम्हणस्त्रियांचे पूजन केले||४८|| भावार्थ:--- आपण वरील सामग्रीने तसेच मीठ,अनारसे,विडे,मंगळसूत्र,फळे आणि ऊस यांनी सौभाग्यवती—विवाहित सात्विक स्त्रियांचे पूजन करावे.यामुळे आपल्याकडून त्याग घडतो.शरीराला आवश्यक असणारे फळे,तळलेले गोड पदार्थांचे सेवन होते.त्यामुळे आरोग्याचे वर्धन होते.म्हणून देवाण—घेवाण करणे जरुरी असते.||४८|| अर्थ:-------नंतर,त्या स्त्रियांनी त्या रुख्मिणीला,देवीचा निर्माल्यादी प्रसाद देऊन आशीर्वादही दिले.तेव्हा रुख्मिणीने,देवीला व सुवासिनींना नमस्कार करून त्या निर्माल्यप्रसादादिकांचा स्वीकार केला.||४९|| भावार्थ:--- त्या सात्विक असलेल्या स्त्रियांनी रुक्मिणीस आशीर्वादपूर्वक प्रसादमाला दिली.इतरांचा आशीर्वाद मिळत असतो का? तो आशीर्वाद देवाचा,देवीचा,साधू—संतांचा—महात्म्यांचा,सात्विक स्त्रियांचा मिळत असतो.जसे व्यवहारात आपण स्थूल वस्तूंची देवाण—घेवाण करतोत.आपल्याजवळ त्यासाठी देण्यासाठी स्थूल वस्तू असावयास पाहिजे.आपल्याजवळ स्थूल वस्तू नसेल तर आपण ती वस्तू देऊ शकत नाही.त्याचप्रमाणे सत्पात्र असेल त्यांच्याकडे पुण्य असते.जसे व्यवहारात असलेल्या वस्तूची देवाण—घेवाण करता येते,त्याचप्रमाणे पुण्याची देवाण—घेवाण करता येते.त्या सात्विक संत—महात्मा किंवा पुण्यवान व्यक्ती यांच्याकडे वस्तुस्थितीने पुण्य असावे लागते.पुण्याने आशीर्वाद देता येतो.पुण्य नसेल तर आशीर्वाद देता येत नाही.पुण्य नसेल तर,दिला तरी मिळत नाही.पुण्य नसून देणारे अनेक असतात,पण पुण्यवान कमी असतात.त्यामुळे त्यावर आपला विश्वास बसत नाही.म्हणून सत्पात्र—पुण्यवान जे आहेत त्यांचाच आशीर्वाद घ्यावा.कोणाचाही घेऊ नये.पुण्य नसेल तर देणाऱ्याने आशीर्वाद देऊ नये.प्रत्यक्षात पुण्य नसले तरी मान—सन्मान—प्रतिष्ठा—धन यासाठी देतात.त्यामुळे त्यांच्याकडून अधर्म होऊन त्यांना पाप—दु:ख भोगावे लागतात.म्हणून आपण तरी सावध होऊन आपल्यात अधिकार नसेल तर देऊ नये व पापात भागीदार होऊ नये.पुण्य असेल तर आशीर्वाद देण्यास हरकत नाही.सात्विक स्त्रिया व रुक्मिणी माता देवी अंबेकेला नमस्कार करून प्रसादामाला ग्रहण करून निघाल्या.म्हणून आपण देव—देवी—साधू—संत—महात्मा व सात्विक श्रेष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. आशीर्वाद जे घेतील त्यांना धर्माशात्रानुसार आचरण केले तर मिळू शकतो.अधर्मानुसार आचरण केले तर मिळत नाही.म्हणून धर्माशात्रानुसार आचरण करावे.जसे वैद्यबुवा यांनी औषद दिले व कुपथ्यही सांगितले.आपण औषद सेवन केले पण कुपथ्याचे सेवन केले तर आजार जाणार नाही.तसे देव—देवीचा—संत—महात्मा—सात्विक श्रेष्ठांचा आपण आशीर्वाद घेतला व अधर्मानुसार—कुपथ्यानुसार आचरण केले तर आशीर्वादाचे फळ मिळणार नाही.आशीर्वाद घेऊन धर्मानुसार आचरण करावे.||४९|| अर्थ:-------नंतर मौनव्रताचा त्याग करून रत्नाच्या मुद्रीकांनी सुशोभित अशा आपल्या हाताने सखीचा हात ग्रहण करून ती रुख्मिणी,त्या अंबिकेच्या देवालयांतून बाहेर निघाली ||५०|| अर्थ:------तेव्हा तिला पाहून तेथे प्राप्त झालेले ते यशस्वी वीर,त्या रुख्मिनिच्या दर्शनापासून उत्पन्न झालेल्या मदनाने पीडित होऊन मोह पावले.ती अशी होती की,देवाची ( भगवंताची ) मायाच की काय ? अशी वीरांना मोह उत्पन्न करणारी,जिचा कटिप्रदेश कृश आहे,जिचे मुख कर्नातील कुंडलांनी शुशोभित आहे,जिला अजून रजोदर्शन प्राप्त झाले नाही,जिच्या कमरेचेठिकाणी रत्नाचा कमरपट्टा घातलेला आहे,जिचे यौवनप्रादुर्भावसूचक स्तन व्यक्त दिसूं लागले आहेत,जिचे नेत्र कुरळकेशांपासून शंका पावूनच की काय चंचळ झाले आहेत||५१|| अर्थ:------जिचे हास्य शुद्ध आहे,जिचे दंत पिकलेल्या तोंडल्यासारख्या अधरोष्ठाच्या कान्तींनी आरक्तवर्ण होऊन कुंदाच्या कल्यांसारखे भासत आहेत,जी राजहंससारखे गमन करणारी असून शब्द करणाऱ्या शोभायुक्त नुपुरांच्या कांतीने शोभत असलेल्या पावलांनी चालत आहे,अशा त्या रुख्मिणीला पाहून ते वीर मोहित झाले||५२-५३|| अर्थः------ते केवळ मोहित झाले इतकेच नाहीतर वाहणावरून खाली सुद्धा पडले असे सांगतो – तेथे प्राप्त झालेल्या हरीला गमनमिषेकरून आपली शोभा दाखविणाऱ्या त्या रुख्मिनिला अवलोकन करून,हत्ती रथ आणि आंध्र यांच्यावर आरूढ झालेले ते जरासंधादिक राजे,तिच्या सुखप्रद हास्याने व लज्जापूर्वक अवलोकाने ज्यांची चित्ते आकृष्ट झाली आहेत असे मूर्च्छित होऊन भूमीवर पडले||५४|| भावार्थ:----रुक्मिणीस देवींचा आशीर्वाद मिळाला,कारण साक्षात श्रीकृष्णांचे दर्शन तिला झाले.तिची इच्छा पूर्ण झाली,कारण श्रीकृष्ण तिच्यासाठीच आलेले होते.||५४|| अर्थः----याप्रमाणे ती रुख्मिणी,भगवंताची प्राप्ती केव्हा होईल अशी प्रतीक्षा करीत कमळांच्या कळ्यासारखी आपली पावले हळूहळू टाकीत असून डाव्या हाताच्या नखांनी आपले कुरळे केश मागे सारून,प्राप्त झालेल्या राजांकडे लज्जेने नेत्रकटाक्षांनी पाहणाऱ्या तिने अकस्मात श्रीकृष्णाला पहिले आणि त्याच्या रथाकडे जाण्यास वळली||५५|| अर्थ:-----तेव्हा श्रीकृष्णाने,रथावर चढूं इच्छिणाऱ्या त्या राजकन्येला,शिशुपाळादिक सर्व शत्रू पाहत असता रथ उभा करून तिला हात देऊन हात देऊन आपल्या गरुडध्वज चिन्हयुक्त रथावर घेतले आणि सर्व राजमंडळाला न जुमानिता बलराम आहे आहे अग्रहन्य ज्यामध्ये अशा यादवांसहवर्तमान,जसा सिंह कोल्ह्याच्या समुदायांतून आपला भाग हरण करून निर्भयपाने सावकाश निघून जातो त्याप्रमाणे श्रीकृष्ण सावकाश निघून चालला||५६|| अर्थः------तेव्हा दुरभिमान धरण करणाऱ्या व जरासंधाच्या स्वाधीन असलेल्या शत्रूंनी,कन्याहरणाच्या योगाने आपला पराभव व आपल्या यशाचा नाश झाला असे मानून त्याचे सहन केले नाही आणि आक्रोध करूं लागले की,- अहो ! केवढे आश्चर्य हे ! ज्याअर्थी धनुर्धारी अशाही आमचे यश,गोपान जसे सिंहाचे यश हरीनांनी घेऊन जावे त्याप्रमाणे हरण केले||५७|| ________________________________________________________________________________________________________________________ |५४---- १--शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह—१-- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थ:------श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,असे भाषण करणारे सर्व राजे,अत्यंत क्रोधाविष्ट झाले आणि कवचे घालून,धनुष्ये धारण करून व आपापल्या वाहनांवर बसून आपाआपल्या सैन्यांनी परीवेष्टी असत श्रीकृष्णाच्या मागाहून धाऊ लागले||१|| अर्थः-----नंतर हे राजा,ते शत्रू मागाहून येत आहेत असे पाहून ते यादवसैन्याचे अधिपती,आपापल्या धनुष्यांचे टणत्कारशब्द करून त्यांच्या संतुख उभे राहिले||२|| अर्थः------तेव्हा युद्धामध्ये निपुणे असे ते जरासंधादिक वीर,अश्वाच्या पृष्ठभागी गजाच्या स्कंधावर व रथाच्या पुढील बाजूचेठिकाणी बसून जसे मेघ पर्वताचे ठिकाणी पाण्याच्या धारा सोदितात त्याप्रमाणे बाणाचे वर्षाव करूं लागले||३|| अर्थः-----तेव्हा कोमलचित्त अशी जी रुख्मिणी पतीचे ( श्रीकृष्णाचे ) सैन्य,बाणाच्या वृष्टीनी आच्छादित झाले असे पाहून,जिचे नेत्र विव्हळ आहेत अशी होऊन सालाज्ज्पाने त्या श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहूं लागली||४|| अर्थः-----तेव्हा भगवान हास्य करून म्हणाला की, - हे सुंदरनेत्रे,तूं भिऊ नकोस.तुझ्या लोकांनी शत्रूंच्या या सैन्याचा आताचं नाश केला जाईल||५|| अर्थः-----तो इतक्यांत जरासंधांदिकांच्या त्या पराक्रमाला न सहन करणारे गदसंकर्षानादिक वीर,बाणाच्या योगेकरून त्यांचे घोडे,हत्ती व रथ यांचा संहार करूं लागले||६|| अर्थः-----त्यावेळी रथ्यांची घोडेस्वरांची व महातांची कुंडलकिरीटांसहित व मंदिल शिरपेचवगैरे शिरोष्टनंसाहित कोट्यावधी मस्तके बानादिकांनी तुटून पडली||७|| अर्थः-----खड्ग गदा व धनुष्ये यांसहवर्तमान हात,हाताचे पंजे,मांड्या व पाय हे तुटून पडले.तशीच घोडे,खेचर,हत्ती,उंट गर्दभ आणि वीर यांची मस्तके तुटून पडली||८|| अर्थः-----त्यावेळी ज्याची इच्छा करणाऱ्या यादवांनी,ज्यांच्या सैन्याचे समुदाय मारून टाकिले आहेत असे ते जरासंधादिक राजे,युद्धापासून पराडमुख होऊन पळून गेले||९|| अर्थः----ते राजे,स्त्री हिरावून नेल्यासारखा व्याकूळ झालेल्या,तेजरहित,उत्साहशून्य व मुख वाळून गेलेल्या अशा शिशुपाळत्तजवळ जाऊन म्हणाले की,||१०|| | भो भोः पुरुषशादूर्ल दौर्मनस्यमिदं त्यज | न प्रियाप्रिययो राजन् निष्ठा देहिषु दृश्यते ||११|| अर्थः---“हे पुरुषश्रेष्ठा,आपला विवाह मोडल्यामुळे प्राप्त झालेल्या या खेदाचा तूं त्याग कर.कारण हे राजा,सुख व दुःख यांचा स्थिरपणा प्राण्यांचे ठिकाणी कधीच दिसून येत नाही||११|| भावार्थ:--- जरासंध शिशुपाल यास म्हणाला कि,”हे पुरुषसिंहा ! उदासीनता सोडून दे व कार्यरत राहा.उदासीनता म्हणजे कार्य करत असतांना काय करावे व काय करू नये,असे न कळल्यामुळे झालेली तटस्थ राहणे.यास “उदासीनता” असे म्हणतात.जीवांच्या मनासारखी कोणतीच घटना घडत नाही,किंवा घडेलही,तरी पण प्रयत्न करतच राहावे.प्रयत्न करणे पुरुषार्थ आहे.उदासीन राहणे भ्याकडपणा आहे.प्रयत्न केला तर मिळण्याची शक्यता असते,मिळेल किंवा मिळणार नाही.प्रयत्न आपण करावेत.||११|| | यथा दारुमयी योषिन्नृत्यते कुहकेच्छया | एवमीश्वरतन्त्रोsयमिहते सुखदुःखयो: ||१२|| अर्थः-----जशी काष्ठाची बाहुली नाचविणाराच्या इच्छेप्रमाणे नाचत्ये त्याप्रमाणे ईश्वराच्या स्वाधीन असलेली हा जीवही,आपल्या सुखदुःखाची खटपट करितो म्हणजे सुखप्राप्तीविषयी यत्न करीत असूनही कदाचित दुःख पावतो||१२|| भावार्थ:--- प्रत्येक जीव हा कर्माच्या अधीन आहे.त्याला त्याच्या कर्मानुसार सुख—दु:खाचे फळ भगवंत देत असतो.प्रयत्न करणे जीवाच्या हातात आहे व फळ देणे ईश्वराच्या अधीन आहे.म्हणून जीवांनी अधर्मानुसार न वागता स्वधर्मानुसार आचरण करावे.स्वधार्मानुसार आचरण केल्यास सुखाचे फळ मिळत असते व अधर्मानुसार आचरण केल्यास दु:खाचे फळ मिळत असते.असे कळण्याकरिता संत—महात्मा यांहा सत्संग करून कळून घेण्याचा प्रयत्न करावा.स्वधार्मानुसार आचरण करावे.||१२|| अर्थः-----जरासंध म्हणतो – सत्रावेळ युद्धामध्ये तेवीस तेवीस अक्षौहिणी सैन्यासह युद्ध करणाराही मी,श्रीकृष्णापासून पराभव पावलो.परंतुपुढील अठरावे एक युद्ध,मी जिंकिले आहे.म्हणजे त्यावेळी मी श्रीकृष्णास पळविले||१३|| अर्थः-----तथापि ( पराजय ) किंवा जय प्राप्त झाला असतांही ) मी परमेश्वराचे प्रेरणा केलेल्या काळाने सर्वजग उपद्रव्ययुक्त केलेले आहे असे जाणून कधीही,शोक करीत नाही व हर्षही पावत नाही.आतां वीरसमुदायांच्या समुदायांचे अधिपती असेही आम्ही सर्वजग,स्वल्पसैन्यांनी युक्त अशाही श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या यादावांकडून पराभव पावलो आहो||१५|| अर्थः-----तेव्हा शत्रूंनी आपणास काल अनुकूळ झाला म्हणून यावेळी आम्हांस जिंकिले आहे परंतु जेव्हा आम्हांला काळ अनुकूळ होईल तेव्हा आम्हीही यांना जिंकून टाकू ||१६|| भावार्थ:--- ज्यांना काळ अनुकुल असतो,त्यांनी प्रयत्न केले कि त्यांना विजय—फळ मिळत असते.ज्यांच्या काळ अनुकूल नसतो,त्यांनी प्रयत्न करूनही विजय—फळ मिळत नाही.धर्मानुसार जे वागतात,त्यांना काळ अनुकूल असतो.म्हणून नेहमी धर्मानुसार आचरण करणे हे आपल्या हिताचे असते,यामुळे काळ अनुकूल असतो.||१६|| अर्थः-----याप्रमाणे जरासंधादिक मित्रांनी सात्वन केलेला तो शिशुपाळ,मरून शिल्लक राहिलेल्या आपल्या भृत्यादिकांसहवर्तमान नगरांत प्रविष्ट झत्तला आणि युद्धांत अवशेष राहिलेले ते जरासंधादिक राजेही,पुन्हा आपआपल्या नगराप्रत निघून गेले.||१७|| अर्थः-----इकडे बळी व कृष्णाचा द्वेष्ट असा रुख्मी तर आपल्या बहिणीचे श्रीकृष्णाने राक्षसविधीने हरण केले ते न सहन करीत असता एक अक्षौहिणी सेनेने परिवेष्टित होऊन,श्रीकृष्णाच्या मागून त्याला जिंकण्याकरीता धांवला||१८|| अर्थः-----त्या धावणाऱ्या पूर्वी रुक्मिणीचे हरण सहन न झाल्यामुळे अतिकृद्ध झालेल्या,कवच घातलेल्या व धनुष्य धारण केलेल्या त्या महाबळी रुक्म्याने,सर्व राजे श्रवण करीत असतां अशी प्रतिज्ञा केली की,||१९|| | अहत्वा समरे कृष्णमप्रत्युह्य च रुक्मिणीम् | कुण्डिनं न प्रवेक्ष्यामि सत्यमेतद् ब्रवीमि वः ||२०|| अर्थः------हे राजे हो ,मी युद्धामध्ये श्रीकृष्णाला मारल्यावाचून व आपली कनिष्ठ बहिण जी रुख्मिणी तिला माघारी आणल्या वाचून ,कुंडीनपुरामध्येच प्रवेश करणार नाही ,हे तुम्हाला सत्य सांगतो ||२०|| अर्थः---असे बोलून तो रथावरबसला आणि त्वरेने युक्तहोत असता सारथ्यास म्हणाला की,ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे त्याठिकाणी लवकर घोडे चालीव म्हणजे त्या कृष्णा बरोबर माझे युध्द होईल ||२१|| अर्थः---आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दृष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन.कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे.”||२२|| अर्थः---भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना “थांब!थांब”म्हणून आह्राण देऊ लागला.||२३|| अर्थः---त्याने धनुष्याची दोरी ताकतीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला.“यदुंच्या कुलकलंका!जरा थांब.कावळ्याने हविर्द्रव्य पळवावे,त्याप्रमाणे तू माझ्या बहिनिची चोरी करून कुठे पळून चाललास?अरे मुर्खा! तू मायावी आणि कपटयुद्धात कुशल आहेस.आज मी तुझा गर्व पार धुळीला मिळवतो.||२४-२५|| अर्थः---माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत,तोवरच या मुलीला सोडून दे.”तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्यांच्यावर सहा बाण सोडले.||२६|| अर्थः---तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले.शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला.तेव्हा रुक्मिने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णावर पाच बाण सोडले.||२७|| अर्थः---ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले.नंतर रुक्मीने आणखी एक धनुष्य घेतले,परंतु अच्युतांनी तेही तोडून टाकले.||२८ || अर्थः---रुक्मीने परीघ,पट्टीश,शूल,ढाल,तलवार,शक्ती,तोमर इत्यादी जी जी शास्त्रास्त्रे हातात घेतली,ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली.||२९|| अर्थः---तेव्हा संतापून रुक्मीने हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो,त्याप्रमाणे त्याने त्यांच्यावर झेप घेतली.||३०|| अर्थः---रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल-तलवारीचे तुकडे-तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली.||३१|| अर्थ---आपले पती भावाला मारू पाहात आहेत,हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकूळ झाली आणि पतींच्या चरणांवर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली.||३२|| | योगेश्वराप्रमेयात्मन् देवदेव जगत्पते | हन्तुं नार्हसी कल्याण भ्रातरं मे महाभुज ||३३ || अर्थः---“हे देवदेवा!हे जगत्पते!हे योगेश्वर!आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही.हे महापराक्रमी!हे कल्यानस्वरूप!आपण माझ्या भावाला मारू नये.”||३३|| अर्थः---श्रीशुक म्हणतातः---रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती.शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता,गळा दाटून आला होता.भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता.अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले.तेव्हा भगवंतांचे ह्र्दय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मिला मारण्याचा विचार सोडून दिला.||३४|| भावार्थ:--- श्रीकृष्णांनी रुमिनीची विनंती मान्य करून रुक्मीस मारण्याचा विचार सोडून दिला,कारण ती भावी पत्नी असल्यामुळे तिचे म्हणणे मान्य केले.भावी पूर्ण आयुष्य पत्नीच्या सोबत खालावावयाचे असते म्हणून तसा विचार करावा लागतो,जीवन—मरणाचा प्रसंग आहे,म्हणून रुक्मिणीचे विंनती मान्य करावी.आपणही जीवन जगात असतांना पत्नीची मागणी धर्मसंगत असेल मान्य करावी व अधर्मसंगत असेल तर मान्य न करता अमान्य करावी.असा विवेक करून निर्णय घ्यावा.||३४|| अर्थः---तरीसुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी-मिशांचे पाट काढून त्याला विद्रूप केले.तोपर्यंत यदुविरांनी शत्रूच्या अद्भुत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटने चुरगळून टाकतो,त्याप्रमाणे छीन्नविच्छिन्न करून टाकले.||३५|| भावार्थ:--- श्रीकृष्ण शिशुपाल यास मारणार होते,पण रुक्मिणीच्या विनंतीस मन देऊन त्यास न मारता दुपट्ट्याने बांधून,दाढी—मिशांचे पाट काढून,त्याचा अपमान केला.श्रीकृष्णांच्या सैन्यांनी त्याच्या सैन्यांचा विध्वंस केला.आपणसुद्धा पत्नीचे जीवन—मरणाचा प्रसंग असेल तर अधर्मयुक्त ऐकावे,एरव्ही धर्मानुसार ऐकावे.||३५|| अर्थ---नंतर ते लोक तेथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्याजवळ आले आणि पाहातात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे.त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची द्या आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले.नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले,||३६|| अर्थः---“हे कृष्णा!तू हे चांगले केले नाहीस.असे करणे आम्हांला शोभत नाही.आपल्या नातलगाच्या दाढी-मिशा छाटून त्याला कुरूप करणे,हा तर एक प्रकारे त्याचा वधच होय.”||३७|| | मैवास्मान् साध्व्यसूयेधा भ्रातुर्वैरूप्यचिन्तया | सुखदुःखदो न चान्योsस्ति यतः स्वकृतभुक् पुमान् ||३८|| अर्थः---त्यानंतर रुक्मीणीला उद्देशून ते म्हणाले- “हे पतिव्रते! तुझ्या भावाला विद्रूप केले,म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस.कारण जीवाला सुख-दुःख देणारे दुसरा-तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माचे फळ भोगावे लागते.”||३८|| भावार्थ:---जीवास जे सुख—दु:ख मिळतात,हे तो जसे कर्म करतो,त्यानुसार त्याला फळ मिळत असते.त्याच्याच कर्माचे फळ त्याला मिळाले.||३८|| अर्थः---नंतर श्रीकृष्णाला म्हणाले- “कृष्ण!आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध कला,तरीसुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही.त्याला सोडून दिले पाहिजे.स्वतःच्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो.मेलेल्याला पुन्हा काय मारणार?”||३९|| अर्थः---पुन्हा रुक्मीणीला म्हणाले-“हे पतिव्रते!ब्रम्हदेवांनी क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की,भावाने सुद्धा आपल्या भवाला मारावे.म्हणून हा क्षात्रधर्म अत्यंत कठोर आहे.”||४०|| भावार्थ:--- क्षत्रियधर्म कठीण आहे.युद्धात शत्रू व मित्र असे दोन पक्ष असतात.शत्रू पक्षात आपला भाऊ,मामा,काका असा कोणताही देहसंबंधी असला किंवा विद्ध्यासंबंधी असला तरी त्याला मारावेच लागते.म्हणून आम्हास रुक्मी जो भावी पत्नीचा भाऊ त्यास मारावे असे वाटले होते,पण तुझ्या प्रतिबंधामुळे तो वाचला.||४०|| अर्थः---नंतर श्रीकृष्णांना म्हणाले-“जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात,ते राज्य,पृथ्वी,पैसा,स्त्री,मान,तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचासुद्धा तिरस्कार करतात.”||४१|| भावार्थ:--- जे अभिमानी लोक असतात,ते संपत्तीच्या गर्वाने आंधळे म्हणजे त्या संपत्तीचा सदउपयोग न करता दुरउपयोग करतात.त्यामुळे ते राज्य,पृथ्वी,पैसा,स्त्री, मान,तेज किंवा कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचा सुद्धा तिरस्कार करतात—द्वेष करतात.तिरस्कार किंवा द्वेष केल्यामुळे प्रेम राहत नाही.जडापेक्षा प्रेम म्हत्वाचे आहे.तिरस्कार किंवा द्वेष यामुळे दु:ख होते तर प्रेमामुळे सुख अनुभवास येते.म्हणून तिरस्कार किंवा द्वेष न करता प्रेम करा.||४१|| अर्थः---पुन्हा ते रुक्मीणीला म्हणाले-“तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा व्देष करणारा आहे.त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे;त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानीत असलीस,तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे.||४२|| भावार्थ:--- तिरस्कार किंवा द्वेष करणारा जो असतो,तो अधर्मानुसार आचरण करणारा असतो.अधर्मानुसार जो आचरण करतो,त्यामुळे त्याला पाप लागते.पापांचे फळ दु:ख भोगावेच लागते.अधर्मानुसार आचरण करणारा जो पापिष्ट आहे,त्यास दंड—शिक्षा केली तर त्यास शिक्षा—दंड केल्यामुळे तो कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करत नाही.तिरस्कार किंवा द्वेष न केल्यामुळे अधर्म होत नाहीअधर्म न झाल्यामुळे पाप होत नाही,पाप न झाल्यामुळे दु:ख होत नाही.अधर्माने न वागता धर्मानुसार वागतो,त्यामुळे पुण्य होते.पुण्य झाल्यामुळे सुख मिळते.मनुष्यांना दु;ख नको,तर सुख हवे आहे.म्हणून धर्मानुसारच वागावे.अधर्माचा त्याग करावा.||४२|| | आत्ममोहो नृणामेष कल्प्यते देवमायया | सुहृद दुर्हुदूदासीन इति देहात्ममानिनाम् ||४३|| अर्थः---हे देवी!जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात,त्यांचाच हा आपला मित्र,हा शत्रू आणि त्रयस्थ असा मोह होतो.||४३|| भावार्थ:--- जे लोक अज्ञानी आहेत,त्यांना कुस्वर्थामुळे हा मित्र,हा शत्रू व हा त्र्ययस्त आहे असा विषम भाव उत्पन्न होतो.जेथे विषम भाव आहे,तेथे दु:ख आहे.म्हणून विषम भाव नाहीसा होण्यासाठी साधू—संत—महात्मा यांची संगती करून धर्म—अधर्म--आत्मा—आनात्मा,सम—विषम,शत्रू—मित्र सुख—दु:ख,अनुकूल—प्रतिकूल भाव समजावून घ्या.त्यानंतर कसे वागावे व कसे वागू नये असे कळेल.असे कळल्यानंतर आपण स्वधर्मानुसार आचरण करूत व अधर्मानुसार आचरण करणार नाहीत.||४३|| अर्थः---देह धारण करणाऱ्या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे.पाणी,घडा या उपाधीभेदाने जसे सूर्य चंद्र इत्यादी आणि आकाश एकच अनेक वाटतात,त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्मा भिन्न आहे,असे मानतात.||४४|| भावार्थ:---सर्वांचा सत्य म्हणजे तिन्ही काळात—भूतकाळ,वर्तमानकाळ व भविष्यकाळ,असणारा आत्मा एक आहे व शरीरे अनेक मिथ्या आहेत,मिथ्या म्हणजे दिसण्यापुरता असणारा—भासणारा व असण्यापुरता नसणारा.उदा—जसे आकाशात सूर्य एक आहे पण पाण्यात दिसणारे—भासणारे सूर्य अनेक आहेत.आकाशात दिसणारा सूर्य हा एक आपल्या व्यावहारिक उपयोगाचा आहे कि पाण्यात दिसणारे—भासणारे अनेक सूर्य व्यावहारिक उपयोगाचे आहेत?याचे उत्तर हे आहे कि,आकाशात दिसणारा एक सूर्य हा आपल्या उपयोगाचा आहे,पण पाण्यात दिसणारे—भासणारे सूर्य दिसण्यापुरते—भासण्यापुरते असून आपल्या उपयोगाचे नाहीत.मिथ्या शरीरे अनेक आहेत. एक जो आहे तो सत्य आहे व अनेक ते मिथ्या आहेत.एक जो आहे,तो सुखरूप आहे व अनेक जे आहेत ते मिथ्या आहेत.जे मिथ्या आहेत ते दु:खरूप आहेत.म्हणून जे मिथ्या आहेत,विवेकाद्वारे त्याच्यातील वासना निवृत्त करून त्याग करावा व जो सत्य भगवंत—परमात्मा यांचा विवेकाद्वारे स्वीकार करावा.हे असे कळण्याकरिता साधु —संत—महात्मा यांची संगती करून कळून घ्यावे.कळल्यानंतर त्यांचा अनुभव घ्यावा.अनुभव घेतल्यानंतर प्रत्यक्ष सुखरूपतेची अनुभूतीच येईल.||४४|| | देह आद्दन्तवानेष द्रव्यप्राणगुणात्मकः | आत्मन्यविद्द्या क्लप्तः संसारयती देहिनम् ||४५|| अर्थः---या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे.पंचमहाभूते,पंचप्राण,तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे.देहाची आज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म-मृत्युच्या फेऱ्यात अडकतो.||४५|| भावार्थ:---जो आत्मा आहे,तो सत्—चित्—आनंदरूप आहे.आत्मा अविनाशी आहे.जे शरीर आहे ते अनात्मा आहे,ते असत्—जड—दु:खरूप आहे.शरीर विनाशी आहे.शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे.ज्याला उत्पत्ती आणि नाश आहे,ते—ते दु:खरूप आहे.स्थूल शरीराची उत्पत्ती पंचमहाभूते यांच्यापासून झालेली आहे.सूक्ष्म शरीर हे अपंचीकृत पंचामहाभूते,पंचज्ञानेन्द्रिये,पंचकर्मेन्द्रिये,पंचप्राण,मन आणि बुद्धी असे सातारा तत्वापासून झालेले आहे.जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे तो जीव जन्म—मृत्युच्या फेऱ्यात अडकतो.म्हणून आपण आपले अज्ञान घालवून,ज्ञान प्राप्त करू त्याचा अनुभव घेतला असता जन्म—मृत्युच्या फेऱ्यातून सुटून मुक्त होऊन सुखरूप होतो.||४५|| अर्थः---हे साध्वी!डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात.सूर्य हेच त्यांचे कारण आहे.म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही.त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते,सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे.तर मग आत्म्याशी दुसरा असत पदार्थाचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल.||४६|| भावार्थ:--- डोळे आणि रूप दोन्ही सूर्यामुळे प्रकाशित होतात---सूर्यमुळे आपल्याला वस्तू-जग—रूप दिसते.जगाचा संयोग किंवा वियोग सूर्यास माहित नाही,तसे ब्रह्मावर जगात जरी असले तरी जगाचा संयोग किंवा वियोग त्याच्या दृष्टीने नाही.त्याप्रमाणे आपलाही—जीवात्म्याचाही जगासी संयोग—वियोग नाही असा आपण निश्चय करावा. संयोग किंवा वियोग हा अनात्मा आहे,रूपही अनात्मा आहे.परमात्मा व जीवात्मा एकच आहे.जीवात्म्यात सूक्ष्म शरीर हा अनात्मा आहे,म्हणून त्याचा बाध करावा.||४६|| अर्थः---जन्म घेने,असणे,वाढणे,बदलणे,क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात;आत्म्याचे नव्हेत.जसे कृष्णपक्षामध्ये कलांचा क्षय होतो,चंद्राचा नाही;परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचा क्षय झाला असे म्हणतात.त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात.परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात.||४७|| भावार्थ:--- १--जन्म घेणे,म्हणजे स्थूल शरीर उत्पन्न होणे.२--असणे,म्हणजे नसलेले दिसणे त्यास असणेकिंवा भासाने असे म्हणतात.३--वाढणे,म्हणजे पूर्व अवस्था न राहता तिचा स्थूल आकार वाढणे त्यास वाढणे असे म्हणतात.४--बदलने,पूर्व अवस्था न राहता तिच्यात परिवर्तन होणे त्यास बदलने असे म्हणतात.५--क्षीण होणे म्हणजे पूर्व अवस्था न राहता तिच्यात वाढ किंवा बदल झालेलो असतो तो वाढलेल्यापेक्षा किंवा बदलेल्यापेक्षा कमी होणे.त्यास क्षण होणे असे म्हणतात.आणि ६—मरणे म्हणजे नष्ट होणे—वर्तमान स्थूल शरीराचा त्याग करून अन्य स्थूल शरीर धारण करणे.अन्य स्थूल शरीर ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार ज्याला—त्याला मिळत असते. हे सर्व विकार स्थूल देहाचे आहेत.स्थूल देह आनात्मा असून दु:खरूप आहे.स्थूल देह मिळू नये म्हणून अज्ञान जे कारण शरीर आहे ते घालवून म्हणजे जीवब्रह्मऐक्य---ज्ञान प्राप्त करणे.त्या परोक्ष जीवाब्राह्मऐक्यज्ञानाने दुसरे जे सूक्ष्म शरीर आहे,त्या शरीरातील सर्व वासना नष्ट करून टाकणे.सर्व वासना नष्ट झाल्या असता जीवाब्राह्मऐक्यज्ञानाचा अनुभव येतो.जीवब्रह्मऐक्यज्ञानाचा अनुभवामुळे कोणतेच म्हणजेच परोक्ष—शाब्दिक जीवब्रह्मऐक्यज्ञानामुळे प्रयत्नाने सूक्ष्म शरीरातील वासना नष्ट झाल्यामुळे सूक्ष्म शरीर नष्ट होते.सूक्ष्म शरीर नष्ट झाल्यामुळे कारण शरीर नष्ट झाले.त्यानंतर महाकारण शरीर उत्पन्न होते.जीवब्रह्मऐक्यज्ञानाचा अनुभव आल्यानंतर ते महाकारण शरीरही नष्ट होते.तेव्हा जीवास मी परब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव येतो.तेव्हा जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन जीव सुखरूप होतो.हे विकार आत्म्याचे नाहीत,आत्मा त्या विकारापासून अलिप्त आहे.जसे कृष्ण पक्षात कलांचा क्षय होतो पण आपण कलांचा क्षय न म्हणता चंद्राचा क्षय असे म्हणतो. असे म्हणणे योग्य नाही,तर ते चूक आहे.जसे आहे तसे म्हणणे बरोबर आहे.तसे जन्म—मृत्यू हे धर्म माझे म्हणणे चूक आहे व शरीराचे म्हणणे बरोबर आहे.||४७|| अर्थः---जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही,भोगणारा,भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो.त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाच खरा समजून अनुभव घेतात.||४८|| भावार्थ:--- प्रपंच हा भासणारा आहे—मिथ्या आहे.अज्ञानी जीव हा प्रपंच मिथ्या असून सत्य सामातात.त्यामुळे दु:खास प्राप्त होतात.जसे कोणताही पदार्थ स्वनात मिथ्या—खोटा असून सत्य—खरा वाटतो.त्यामुळे स्वप्नातील भोगणारा भोक्ता,भोग्य—विषय व भोग मिथ्या असून खरा वाटल्यामुळे तो सुख किंवा दु:ख भोगतो.||४८|| अर्थः---म्हणून हे सुहास्यवदने!अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा त्याग कर.हा शोक अंतःकरणाला उदास करतो,मोहित करतो.म्हणून तत्त्वज्ञानाणे याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरुपात स्थिर हो.”||४९|| भावार्थ:--- अज्ञानामुळे मिथ्या पदार्थापासून दु:ख होते.दु:ख हेच अनुकूल—प्रतिकूल भावना निर्माण करते.त्यामुळे मोह—लोभ निर्माण होतात.म्हणून मनुष्याने तत्वज्ञानाने लोभ व मोहाचा त्याग करावा.आपले जे स्वरूप आत्मा आहे,त्यात रममाण होऊन आनंदात राहावे.देह व देहसंबंधी आपले नसून आत्मा आपण आहोत.||४९|| | एवं भगवता तन्वी रामेण प्रतीबोधीता | वैमनस्यं परित्यज्य मनो बुद्धया समादधे ||५०|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:---बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली,तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेकबुद्धीने मनाचे समाधान केले.||५०|| भावार्थ:--- बलरामदादांनी जेव्हा रुक्मीणीला असा उपदेश केला,तेव्हा तिने आपला शोक नाहीसा केला.त्याचप्रकारे आपणही देहसंबंधीतील विवेकाद्वारे मोह नाहीसा करून आत्म्यात रमावे.आत्मानंद घ्यावा,कारण तोच वास्तविक खरा आनंद आहे.विषयानंद क्षणिक असून दु:खरूप आहे,म्हणून विषयांचा त्याग करून आत्मानंद घ्यावा.||५०|| अर्थः---शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते,त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते.त्याच मनोरथ धुळीला मिळाले आपल्याला विद्रूप केले गेले,ही आठवण तो विसरू शकत नव्हता.||५१|| भावार्थ:--- युद्धामुळे शिशुपाल ऐ दु:खी झाला होता,त्याचे शरीरात फक्त प्राण शिल्लक राहिले होते.तरी त्यास पश्चाताप होत नव्हता.पूर्व स्मृती होताच होती.||५१|| अर्थः---म्हणून त्याने आपल्याला राहण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी वसवली.त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की, “दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही,”म्हणून रागाने तो तेथेच राहू लागला.||५२|| भावार्थ:--- पूर्वप्रतिज्ञान्याच्या स्मृतीमुळे तो कुंडीनपुरीत जाऊ शकत नव्हता,असा तटबाज होता.त्याने तिकडेच क्रोधाच्यापोटी भोजकट नावाचे नगर वसवून त्या नगरीत राहू लागला. क्रोध हा हानिकारक असतो.म्हणून आपण क्रोधाच्यापोटी कोणताही निर्णय घेऊ नये,घेतल्यास हानी निश्चीतारुपणे होतेच.हानी ही दु:खच देते.||५२|| अर्थः---परीक्षिता!अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजंना जिंकून रुक्मीणीला व्दारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणीग्रहन केले.||५३|| भावार्थ:--- अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मीणीला द्वारकेत आणून विधीपूर्वक तिचे पाणिग्रहण केले.त्याचप्रमाणे आपणही सर्वषडरिपूंना--- काम,क्रोध,लोह,मोह,मद आणि मत्सर यांना जिंकून आपल्या विधिवत पत्नीचे पाणिग्रहण करावे.असे केले असता आपणास ग्रुहस्थश्रमातील सुख मिळेल.||५३|| अर्थः---हे राजन! व्दारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होते.त्यामुळे तेथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला.||५४|| भावार्थ:--- आपण आपल्या परिसरातील लोकांना प्रेम दिले असेल तर आपल्या महत्वाच्या प्रसंगी त्यांना आपस्ल्याविषयी प्रेम उत्पन्न होऊन उत्सव करतात.||५४|| अर्थः---तेथील आनंदित झालेल्या स्त्री-पुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडले घातली होती.त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेल्या वधू-वरांना अनेक नजराणे आहेर म्हणून दिले.||५५|| अर्थः---त्यावेळी व्दारकेत कोठे कोठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते.ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा,वस्त्रे आणि लावल्या होत्या.पाण्याने भरलेल्या कलशांनी,अगुरु आणि धुपाच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती.||५६|| अर्थः---अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित केले होते.त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने व्दारकेतील सडका भिजल्या होत्या.प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती.||५७|| अर्थः---त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणाऱ्या कुरु,सृंजय,कैकेय,विदर्भ,यदु आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकांसमेवत आनंदोत्सव सारजा करीत होते.||५८|| अर्थः---जिकडे तिकडे रुक्मिणीहरणाचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या.||५९|| | द्वारकायामभूद् राजन् महामोदः पुरौकसाम् | रुक्मिण्या रमयोपेतं दृष्ट्वा कृष्णं श्रियः पतिम् ||६०|| अर्थः--महाराज!रुक्मिणीरूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री-पुरुषांना अत्यंत आनंद झाला.||६०|| भावार्थ:--- आपणही जर प्रेमळ पत्नीसी विवाह विधिवत केला तर आपल्या परिसरातील स्त्री—पुरुश्यांना अत्यंत आनंद होतो.म्हणून आपण प्रेमळ पत्नीसी विवाह करावा.||६०|| ________________________________________________________________________________________________________________________ |५५--- १--प्रद्धुम्नाचा जन्म आणि शंबरासुराचा वध---२-- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थः---श्रीशुक म्हणतात:----हे राजा,वासुदेवाने आश्रय केलेल्या चित्तापासून उत्पन्न झाल्यामुळे व सृष्टीला कारण असल्यामुळे वासुदेवाच्या अंश असा जो काम,तो पूर्वजन्मी रुद्राच्या क्रोधाने दग्ध झाला होता म्हणून तोच पुन्हा देह प्राप्त होण्यासाठी त्या वासुदेवरुपी श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट होऊन राहिला||१|| भावार्थ:---भगवान शंकर समाधिस्त होते,सगळ्या देवतानंत कामादेवास विनंती केली कि,”शंकारांची समाधीचा भंग कर.त्यामुळे तो कैलास पर्वताकडे जात असतांना वाटेत सर्व प्राणीमात्रात कामाचा संचार झाला.त्याने झाडावर बसून शंकरास कामाबन मारले.पाचव्या कामाबानात शंकरांच्या समाधीचा भंग झाला.समाधीचा भंग झाल्यामुळे त्यांना क्रोध आला.त्या क्रोधाच्या भरात कामदेव भस्म झाला.त्यामुळे पतीच्या वियोगामुळे राती शंकराकडे आली आणि विनंती करू लागली कि,माझ्या पतीला जीवनदान द्या.”भगवान शंकर तीस म्हणतात कि,”ज्यावेळेस भगवान कृष्ण मृत्यू लोकात अवतार धारण करतील,त्यावेळेस त्याच्यापोती तुझ्या पती जन्मास येतील,तोपर्यंत ते जिवंत पण अनंग शरीरात राहतील.” तोपर्यंत ती प्रतीक्षेत राहिली.आता तोच कामदेवाने वासुदेवांचाच आश्रय घेऊन प्रद्दूम्नरुपाने जन्मास आला.||१|| अर्थः---तोच काम,कृष्णाच्या विर्यामध्ये प्रविष्ट होत असता,रुख्मिणीच्या उदरी उत्पन्न होऊन प्रदुम्न या नावाने प्रख्यात झाला.तो सौंदर्य,आकृती,भाषण इत्यादिक सर्वगुणांनी श्रीकृष्णासारखाच होता||२|| अर्थः-----तेव्हा कामाच्या शत्रुत्त्वेकरून प्रसिद्ध असलेल्या शंबरासुराने त्या प्रदुम्नाला हा आपला शत्रू काम आहे असे नारदाच्या मुखांतून ऐकून गुप्तरूपाने त्या बालकाला दहा दिवस होण्याच्या पूर्वीच चोरून नेले आणि समुद्रामध्ये टाकून तो शंबरासुर आपल्या घरी निघून गेला||३|| अर्थः-----त्या बालकाला कोणीएका बलवान मत्स्याने गिळून टाकिले.नंतर मत्स्य मारून जीविका चालविणाऱ्या कोळ्यांनी दुसऱ्या मत्स्यासहवर्तमान मोठया जाळ्याने त्याही मत्स्याला अडकवून धरिले||४|| अर्थः-----नंतर त्या कोळ्यांनी तो महामत्स्य शंबरासुराला नजराणा म्हणून अर्पण केला.नंतर स्वयंपाक्यांनी त्या अद्भुत मत्स्याला पाकगृहामध्ये नेऊन आपल्या शस्त्राने चिरिले ||५|| अर्थः-----तेव्हा त्याच्या उदरामध्ये अद्भुत बालक पाहून त्यांनी तो मायावतीच्या स्वाधीन केला.तेव्हा हा बालक कोण आहे ? अशा शंकितचित्त झालेल्या त्या मायावतीला,नारदाने त्या बालकाचे कामदेवस्वरूपत्त्व,कृष्णापासून रुख्मिणीचेठिकाणी उत्पत्ती,शंबराणे केलेले हरण व मत्स्याच्या उदरामध्ये प्रवेश हि सर्व कथन केली||६|| अर्थः-----ती मायावती खरोखर कामाची पत्नी रतीनामक असून रुद्राच्या क्रोधाने देह जळून गेलेल्या आपल्या पतीच्या देहोत्पत्तीची वाट पाहणारी पतिव्रता होती||७|| अर्थः-----तिला शंबरासुराणे स्वयंपाक करण्याच्या कमी योजिले होते.तिने नारदाच्या मुखांतून,तो बालक कामदेव आहे असे जाणून त्याचेठिकाणी स्नेह केला||८|| अर्थः-----पुढे थोड्याच काळाने तो कृष्णपुत्र तारुण्यदशेला पावला आणि आपल्या सौदर्यादिक गुणांनी आपणाकडे पाहणाऱ्या स्त्रियांना अत्यंत मोह उत्पन्न करूं लागला||९|| अर्थः-----तेव्हा हे राजा,कमलपत्रासारखे लांबोडे ज्याचे नेत्र आहेत,आजपर्यंत लांब ज्याचे बाहू आहेत,व मनुष्यलोकामध्ये जो सुंदर आहे,अशा त्या आपल्या पतीला,लज्जायुक्त हास्याच्या योगाने कटाक्षयुक्त वक्रदृष्टीने अवलोकन करणारी ती मायावतीनामक रति,सुरतसंबंधी अभिप्रायांनी त्याचे सेवन करूं लागली ||१०|| अर्थः---तेव्हा तो भगवान म्हणालाश्रीकृष्णपुत्र,तिला म्हणाला की,-- हे मते तुझी बुद्धी विपरीत दिसत्ये,म्हणजे तू हल्ली आपला मातेचा धर्म टाकून कामातुर स्त्रीसारखी वर्तणूक करितेस हे काय ?||११|| अर्थः—तेव्हा रति म्हणाली:--तू नारायणाचा (श्रीकृष्णाच)पुत्र असून शंबरासुराने त्याच्या घरांतून आणिलेला आहेस,हे प्रभो,मी तुझी अधिकाराने प्राप्त झालेली पत्नी रति आहे आणि तूं माझा पती काम आहेस||१२|| अर्थः-----हे प्रभो,ह्या शंबरनामक दैत्याने,तुला जन्मास येऊन दहा दिवस होण्यापूर्वीच नेऊन समुद्रामध्ये टाकिले होते,तेथे तुला एका मत्स्याने गिळिले असून तो ,मत्स्य कोळ्यांनी मारून येथे शंबरासुराला नजराणा आणला होता.त्याच्या उदरांतून तूं तेथे प्राप्त झाला आहेस||१३|| अर्थः-----यास्तव त्या ह्या आपल्या शेंकडो माया जाणणाऱ्या व पराभव करण्यास अशक्य अशा दुर्जय शत्रूला,आपल्या मोह्नानादिक मायांनी मोहित करून मारून टाक||१४|| अर्थ:-----याविषयी विलंब मात्र करूं नये.कारण तुझी माता रुख्मिणी,पुत्र नाहीसा झाल्यामुळे दिन व पुत्रस्नेहाने व्याकूळ होऊन,वत्स नाहीसा होऊन शोकातूर झालेल्या गाईप्रमाणे रोदन करीत आहे||१५|| अर्थः----याप्रमाणे सांगून त्या मायावतीने महापराक्रमी अशाही त्या प्रदुम्नाला शत्रूच्या सर्वमायाचा नाश करणारी आपली महामायानामक विद्या सांगितली||१६|| अर्थः-----तेव्हा तो प्रदुम्नही शंबरासुराच्या समीप जाऊन,सहन करण्यास अशक्य अशा तिरस्कारवचनांनी त्याची निर्भत्सना करून कलह उत्पन्न करीत असता युद्ध करण्याकरिता त्यास बोलावूं लागला||१७|| अर्थ:-----त्यावेळी दुर्भाषनांनी निंदा केलेला तो शंबरासुर,पायाने ताडन केलेल्या सर्पाप्रमाणे क्रोधाने नेत्र लाल करून व हातामध्ये गदा ग्रहण करून युद्ध करण्याकरिता घरांतून बाहेर निघाला||१८|| अर्थः------आणि वेगाने गदा फिरवून महात्म्या प्रदुम्नाला मारण्याकरिता ती त्याच्या आंगावर फेंकीली आणि वज्रपात झाला असता जसा तीव्र नाद होतो त्याप्रमाणे त्याने मोठयाने गर्जना केली||१९|| अर्थः-----भगवान प्रदुम्नानेही येणाऱ्या त्या गदेचा आपल्या गदेने चुराडा करून,हे राजा क्रुद्ध झालेल्या त्याने,शंबरासुराला मारण्याकरिता आपली गदा फेंकीली||२०|| अर्थः---त्या शंबरासुरानेही मयासुराने उपदेश केलेल्या अंतर्धानादिरूप मायेचा आश्रय करून ,आकाशामध्ये स्थित होऊन ,प्रद्मुनावर शास्त्रमय वृष्टी केली ||२१|| अर्थः---तेव्हा शास्त्रवृष्टीने पिडा पावलेलाही तो रुक्मिणीचा पुत्र महारथी प्रद्धुम्ना ,सर्वदैत्यमायाचा उपमर्द करणाऱ्या आपल्या सत्वगुनात्मक महाविद्धेचा प्रयोग करू लागला ||२२||
अर्थः---नंतर पुन्हा त्या दैत्याने ,गुह्याकांच्या गंधर्वाच्या पिशाचांचा ,सर्पाच्या व राक्षसाच्या शंकोडे मायाचा प्रदुम्नावर प्रयोग केला. तेव्हा त्या कृष्णपुत्र प्रदुम्नाने त्या सर्व मापांचा नाश केला ||२३||
अर्थः---नंतर त्या प्रदुम्नाने ,तीक्ष्ण खडग उचलून त्याच्या योगाने तांबड्या मिशा ज्यांचेवर आहेत असे ते किरीतासाहित व कुंडलासाहित शंबरासुरासुराचे मस्तक ,बलात्काराने तोडून पडिले ||२४|| अर्थः---तेव्हा स्तुती करणाऱ्या देवाणी पुष्पांजलानी आच्छादित केलेल्या त्या प्रदुम्न पतीला आकाश मार्गाने स्वता गमन करणाऱ्या त्या मायावती भार्येने आकाशमार्गाने व्दारकानगरीत नेले ||२५|| अर्थः---तेव्हा हे राजा ,जणू विजेसह वर्तमान कला मेघच आकाशातून खाली उतरला कि काय असा तो प्रदुम्न ,पत्नीसह वर्तमान खाली उतरून शेकडो उत्तम स्त्रियांनी व्याप्त अशा श्रीकृष्णाच्या श्रेष्ठ अंतःपुरामध्ये प्रविस्ट झाला ||२६|| अर्थः----तेव्हा त्या मेघासारख्या शामवर्ण पिवळी भरजरीची रेशमी वस्त्रे परिधान करणाऱ्या ,आजानुबाहू ,मंदहास्ययुक्त ,सुंदर मुख आणि ज्यांचे मुखकमल काळ्या कुरळकेशारूप उत्तम अलंकुत आहे अशा त्या प्रदुम्नाला अवलोकन करून ,हा श्रीकृष्णच आहे असे मानून लज्जित झालेल्या स्त्रिया ,त्या त्या ठिकाणी लपू लागल्या ||२७-२८|| अर्थः---नंतर त्या स्त्रिया ,सावकाशपणे श्रीकृष्णाहून थोड्या विलक्षणपणाने म्हणजे याचे ठिकाणी श्रीवत्सकौस्तुभादिक नसल्यामुळे हा कृष्ण नव्हे असा निश्चय करून हर्षयुक्त व विस्मित असता त्या स्त्रीरत्नासाहित आलेल्या त्या प्रद्युम्नाजवळ प्राप्त झाल्या||२९|| अर्थः---त्याचवेळी डोळ्यांचा कडा काळसर असलेली,मधुरभाषिणी रुक्मिणी तेथे आली.तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली आणि पुत्रप्रेमाने तिच्या स्तनांतून दुध स्त्रवू लागले.||३०|| अर्थः---रुक्मिणी विचार करू लागल्या, “हे नररत्न कोण आहे?हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कोणाचा आहे?कोणत्या भाग्यवान स्त्रीने याला आपल्या गर्भामध्ये धारण केले असेल?याला ही कोण पत्नी म्हणून मिळाली आहे?||३१|| अर्थः---माझा सुद्धा लहान मुलगा हरवला होता. त्याला सुतिका गृहातूनच पळवले होते. तो जर कुठे जिवंत असेल,तर त्याचे वय आणि रूप याच्यासारखेच असेल.||३२|| अर्थः---याला श्यामसुंदरांसारखे रूप,अंगाची ठेवण, चालणे,आवाज हास्य,पाहणे हे सारे कोठून प्राप्त झाले?||३३|| अर्थः---किंवा हाच तो मुलगा असेल का,ज्याला मी गर्भामध्ये धारण केले होते.कारण मला याच्याबद्दल खूपच प्रेम वाटत आहे आणि माझा दावा हातसुद्धा लावत आहे.”||३४|| अर्थः---रुक्मिणी असा विचार करीत होती,त्याचवेळी पवित्रकीर्ती श्रीकृष्ण देवकी-वासुदेवांसह तेथे आले.||३५|| अर्थः---श्रीकृष्णांना सर्व काही माहीत होत,परंतु ते काही बोलले नाहीत.इतक्यात तेथे येऊन नारदांनी शंबरासुराने प्रद्धुम्नाचे हरण करण्यापासूनची सर्व हकीकत सांगितली.||३६|| अर्थः---नारदांच्या तोंडून या सर्व आश्चार्यात्मक घटना ऐकून श्रीकृष्णांच्या अंतःपुरातील स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि पुष्कळ वर्षेपर्यंत हरवल्यानंतर परत आलेल्या प्रद्धुन्माचे,अशा त्या प्रद्युम्नाला पाहून आनंद पावल्या ||३७|| अर्थः---देवकी,वसुदेव,श्रीकृष्ण,बलराम,रुक्मिणी व स्त्रिया हि सर्व त्या प्रदुम्नरतिरुप दंपतीना आलिंगन करून आनंद पावली ||३८|| अर्थ:---व्दारकावासी लोकांनी नाहीसा झालेला प्रदुम्न पुन्हा आला हे वर्तमान श्रवण करून ,अहो!हा बालक ,जसा मरण पावलेला पुन्हा यावा त्याप्रमाणे आला हि फार चांगली गोष्ट असे भाषण केले||३९|| अर्थ :----आतासौदर्यतीशयाने प्रदुम्नाचे वर्णन करितो –स्वरूपाने हुबेहूब श्रीकृष्णानसारख्या ज्या प्रदुम्नाचे ठिकाणी हाच आपला भार्तां आहे असी वारंवार भावना उत्पन्न झालेल्या त्यांच्या माता (कृष्णापत्नी )हि कामातुर होऊन त्यांचे एकान्तस्थली सेवन करण्याचे मनात आणीत असत ,किवा कामातुर झाल्या म्हणजे एकांती लपून राहत असत असे जे झाले ते काही ,स्मरण मात्रानेच क्षोभ कारेणाऱ्या व त्यातूनही श्रीकृष्णाच्या श्रीमूर्तीचे प्रतिबिंब (पुत्र)अशा प्रत्यक्ष दृष्टी गोचर होणार्या त्या कामरूपी प्रदुम्नाचेठिकाणी खरोखर आचर्य नाही .जर त्यांच्या मतांची अशी अवस्ता तर अन्य स्त्रिया त्याला पाहून मोहित होतील हे काय सांगावे ||४०||--------------------------||४०|| ________________________________________________________________________________________________________________________ |५६--- १--स्यमंतक मण्याची कथा,जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह.---३-- ________________________________________________________________________________________________________________________ | सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः | स्यमन्तकेनस्वयमुद्दम्य दत्तवान् ||१|| अर्थः-------श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,श्रीकृष्णाचा अपराध करणाऱ्या सानाजीताने त्या अपराधाच्या शांतीकरीता आपणच उद्योग करून स्यमंतकण्यासहवर्तमान आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णाचा अर्पण केली||१|| अर्थः---राजा म्हणाला – हे ब्रम्हनिष्ठा,सन्नाजीताने श्रीकृष्णाचा कोणता अपराध केला ? त्याला स्यमंतकमनि कोठून प्राप्त झाला होता ? आणि त्याने श्रीकृष्णाला कोणत्या कारणाने कन्या दिली ते मला सांग||२|| अर्थः----श्रीशुक म्हणाले:- सत्राजिताने अरण्यांत जाऊन सूर्याची भक्ती केली,तिच्या योगाने त्याचा पूज्य व स्वामी असाही तो सूर्य त्याला मित्रासारखा झाला होता.त्या सूर्याने त्या सत्राजिताच्या भक्तीने संतुष्ट व त्याच्यावर स्नेहयुक्त होऊन त्याला स्यमंतकनामक एक मनी दिला.||३|| अर्थः-----तेव्हा हे राजा,तो सत्राजित त्या मण्याला कंठामध्ये धरण करून त्याच्या तेजाने सूर्यासारखा प्रकाशमान होत असल्यामुळे कोणीही हा सत्राजित आहे असे न जाणलेला तो द्वारकेमध्ये प्रविष्ट झाला||४|| अर्थः-----त्या सत्राजिताला द्वारकावासी लोकांनी दुरून अवलोकन करून त्याच्या तेजाने,ज्यांच्या दृष्टी दिपावून गेल्या आहेत असे ते लोक हा सूर्य आहे अशी शंका धारण करून,फाशांनी क्रीडा करीत असणाऱ्या श्रीकृष्णाला सांगू लागले कि,||५|| अर्थः-----हे नारायणा,हे शंखचक्रगदाधरा,हे दामोधरा,हे कमलाक्षा,हे गोविंदा,हे यादवांना आनंदकारका,तुला नमस्कार असो||६|| अर्थ्ह०-----हे जगत्पते,तुला पाहण्याची इच्छा धारण करणारा हा तीक्ष्ण किरणांना सूर्य,आपल्या किरणांच्या समुदायाने मनुष्यांच्या नेत्रांना दिपावित असता येत आहे||७|| अर्थः-----हे कांही अघटीत नव्हे कारण,खरोखरच ब्रम्हादिक देवश्रेष्ठही त्रैलोक्यामध्ये तुझ्या मार्गाचा शोध करीत असतात म्हणून सांप्रतकाळी यादवांमध्ये मनुष्यावतार धारण करणाऱ्या तुला जाणून हे प्रभो,सूर्य तुझे दर्शन घेण्याकरिता येत आहे ||८|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:--- हे राजा तो येणारा कोण आहे हे तत्त्व न जाणणाऱ्या अज्ञ लोकांचे ते भाषण श्रावण करून,श्रीकृष्ण म्हणाला कि,हा सूर्यदेव नव्हे तर स्यमंतक मन्याच्या योगाने प्रकाशमान होणारा सत्राजित आहे||९|| अर्थः-----इकडे सत्राजिताने कौतुकाच्या योगाने जेथे तोरणे बांधणे वगैरे मंगले केली आहेत अशा शोभायुक्त केलेल्या आपल्या घरामध्ये प्रवेश करून ब्राम्हनांकडून देवघरामध्ये त्या मण्याचे स्थापन करविले||१०|| अर्थः------हे राजा.तो मनी दररोज सुवर्णाचे आठ भार उत्पन्न करीत असे आणि ज्याठिकाणी पूजा केलेला तो मनी असेल तेथे दुर्भिक्ष ( महागाई ) महाभारी,ग्रहपीडा,सर्पभीती,मनोदुःख,रोग आणि मायावी दैत्य इत्यादिक दुःखाची कारणे राहत नसत||११|| अर्थः-----एकेवेळी श्रीकृष्णाने अशा प्रभावाचा मनी राजाजवळ असावा हे योग्य आहे असे मनांत आणून,उग्रसेन राजाकरिता मण्याची त्या सत्राजिताजवळ याचना केली असतां,द्रव्यलोभी अशा त्याने,भगवंताच्या याचनेच्या भंग होतो हे मनांत न आणिता मनी दिला नाही यावरून भगवंताला अर्पण न करितां स्वतःच उपभोग घेतलेली सर्वानिष्टनिवर्तकाही वस्तू अनिष्टाला कारण होत्ये असे सुचविले||१२|| अर्थः-----तेंच दाखविण्याकरीता म्हणतो – मोठया कांतीने युक्त अशा त्या मण्याला एकेवेळी सत्राजिताच्या भाऊ जो प्रसेन होतो त्याने कंठामध्ये बांधून तो घोडयावर बसून वनामध्ये मृगया करण्यारिता निघून गेला||१३|| अर्थ:-----तेव्हा एका सिंहाने घोड्यासहित त्या प्रसेनाला मारून मनी होऊन पर्वतावर फिरत असता मण्याची इच्छा करणाऱ्या जांबवाणाने,त्या सिंहास मारिले||१४|| अर्थः-----त्या जांबवतांनेही,आपले राहण्याचे स्थान अशा पर्वताच्या गृहेमध्ये त्या मण्याला आपल्या मुलाचे खेळण्याचे साधन करून ठेविले.इकडे सत्राजित आपल्या भावाल ( प्रसेणाला ) न पाहता संताप पावून म्हणाला कि,- ||१५|| अर्थः-----माझा भाऊ प्रसेन,कंठामध्ये मनी धारण करून वनामध्ये गेला होता तो बहुतकरून मन्याच्या लोभाने श्रीकृष्णानेच मारिला आहे.कारण पूर्वी कृष्णाने मण्याची याचना केली असतां,तो मी नव्हता म्हणून त्याला हि संधी सांपडली आहे अशा प्रकारचे ते भाषण ऐकून द्वारकावासी लोक एकमेकांच्या कानांत हळूहळू बोलुं लागले||१६|| अर्थ:-----नंतर भाग्वंतानेही ते वचन ऐकून,आपले ठिकाणी चिकटलेले अपयश घालविण्याकरिता नगरवासी लोकांसहवर्तमान प्रसेनाच्या मार्गाचा पत्ता पाहण्याकरिता वनात गमन केले||१७|| अर्थ:-----तेव्हा वनामध्ये सिंहाने मारिलेल्या प्रसेनाला व अश्वाला क्ररुन त्या सिंहालाही पर्वताच्या पृष्ठभागी जांबवताने मारीलेला सर्व लोकांनी पहिला||१८|| अर्थः-----नंतर,बिळाला द्वारा बाहेर नागरिक लोकांना ठेऊन,एकटाच भगवान गाढ अंधकाराने व्याप्त व भयंकर अशा त्या जांबवाणाच्या बिळामध्ये प्रविष्ट झाला||१९|| अर्थः-----आणि त्या बिळामध्ये बाळकाचे खेळणे केलेला श्रेष्ठमनी स्यमंतकपाहून,तो हरण करण्याच्या इच्छेने त्या बाळकाच्या जवळ जाऊन उभा राहिला||२०|| अर्थः-----तेव्हा पूर्वी कधीच न पाहिलेल्या मनुष्यरुपी श्रीकृष्णास पाहून त्या मुलाची आई भ्याल्यासारखी ओरडली.ते ऐकून क्रुद्ध झालेला अतिबली जांबवान तेथे धांवून आला||२१|| अर्थः-----भगवंताचे सामर्थ्य न जाणणाऱ्या त्या जांबवाणाने,त्याला हा प्राकृत पुरुष आहे असे मानून व क्रुद्ध होऊन पूर्वी ( रामावतारी ) आपला स्वामी असलेल्या त्या श्रीकृष्ण भगवंताबरोबर युद्ध केले||२२|| अर्थः-----परस्परांस जिंकण्याची इच्छा करणाऱ्या त्या उभयंताचे त्या मन्याकरिता गदादिक आयुधांनी,पाषाणांनी,बाहूंनी आणि वज्रपतासारखा निष्ठुर अशा परस्पर मुष्टीप्रहारांनी अत्यंत भयंकर द्वंद्वयुद्ध झत्तले ; ते जसे मांसाकरिता श्येनपक्ष्यांचे परस्पर युद्ध होते त्याप्रमाणे रात्रंदिवस विश्रांतीरहित अठ्ठावीस दिवसपर्यंत सारखे झाले||२३-२४|| अर्थः-----तेव्हा श्रीकृष्णाच्या मुष्टीपातानी ज्यांचे काराचारानादिक अवयव व संधीबंधाने चुरून गेली आहेत ,ज्याचे धौर्य व बळी हि क्षीण झाली आहेत ,व ज्यांच्या अंगाला घर्म सुटला आहे असा तो जांबवान ,लोकांमध्ये कोण बरे हा माझ्या पेक्षा बलवत्तर आहे असे मानून विस्मित होऊन त्या श्रीकृष्णाला म्हनालाकी - ||२५|| अर्थः----सर्व भूतांचा जो प्राण त्याचे ठिकाणी जे इंद्रियबल ,अंतकरण:बल व शरीर बले ते सर्व तू आहेस असे मी जाणतो .तसे कसे होईल असे म्हणशील तर –विष्णू ,पुराणपुरुषद्ध पराक्रमशाली व सर्वांचा नियंत तुच आहेस असे जाणतो||२६|| अर्थः----तूच विश्वस्त्राष्ट्या ब्राम्हदिकांचे निमित्त असून महदादिक सृज्य पदार्थाचे उपदान कारणही तुच आहेस .नाश करणाऱ्या सर्वाच्या नियंता काळ व तासाचसर्वजीवांचा परमात्मा तू आहेस||२७|| अर्थः----ज्या आर्थी तू अशा प्रकारचा आहेस त्या अर्थी माझे इष्ट दैवत म्हणजे ज्याच्या किंचितप्रदीप्त झालेल्या रोशने फेकलेल्या कटाक्षांनी सुसरी व महात्मत्स्य हे ज्यामध्ये खवळले आहेत अशा समुद्राने लंकेत जाण्याकरिता मार्ग दिला असतंही त्याचेठिकाणी ह्या तूं आपला यशोरूप सेतू बांधिला आहेस व लंका जाळून टाकिली आहेस आणि ज्याच्या बाणांनी तुटलेली रावणाची मस्तके भूमीवर पडली आहेत तो रामचंद्र तूं आहेस असे मी जाणतो||२८|| अर्थः----- हे महाराजा,याप्रमाणे आपले स्वरूप ज्याने जाणले आहे अशा त्या जांबवनाला,देवकीपुत्र भगवान कमलाक्ष श्रीकृष्ण प्रथमतः त्याची व्यथा जाण्याकरिता सुखकारक अशा आपल्या हाताने स्पर्श करून,परमकृपेने पूर्ण होत सैन्य समूहेनावृतमान असता मेघाच्या नारदासारख्या गंभीरवाणीने म्हणाला कि, -||२९-३०|| हात शरीरावरून | मणिहेतोरीह प्राप्ता वयमृक्षते बिलम् | मिथ्याभिशापं प्रमृजन्नात्मनो मणिनामुना ||३१|| अर्थः------हे ऋक्षपते,आम्ही पुष्कळजन यादव,या स्यमंतकमन्याकरिता बिळाच्या द्वाराजवळ प्राप्त झालो असून त्यामध्ये,आपणाला प्राप्त झालेला खोटा आरोप या मण्याच्या योगाने घालविण्यासाठी मी तेथे ( बिलामध्ये ) प्राप्त झालो आहे.||३१|| अर्थः-----असे सांगितले असता हर्षाने युक्त झालेल्या त्या जांबवताने भगवंताचे पूजन करण्याकरिता मन्यासहवर्तमान आपली जांबवतीनामक कन्या श्रीकृष्णाला समर्पण केली||३२|| भावार्थ:--- अखेर शेवटी जांबवंताने आपणहून आपली मुलगी जांबवंती पत्नी म्हणून मण्यासह अर्पण केली.श्रीकृष्णांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.||३२|| अर्थः----इकडे बिळाच्या बाहेर असलेल्या जणांनी,बारा दिवसपर्यंत वाट पाहूनही बिळामध्ये प्रविष्ट झालेला कृष्णा परत आला नाही असे पाहून दुःखित होत असता,आपल्या द्वारकानगरीमध्ये निघून गेले||३३|| अर्थः-----त्यांच्या मुखांतून श्रीकृष्ण,बिळांतून अजून बाहेर आला नाही असे ऐकून,देवकी देवी,रुख्मिणी,वसुदेव,सुह्रद व सर्व ज्ञाती शोक करूं लागले||३४|| अर्थः----आणि दुःख पावलेले ते द्वारकावासी लोक,सत्राजिताला हा दुरात्मा मारुं दे असा,शाप देत असता श्रीकृष्णाची प्राप्ती होण्याकरिता भगवच्छक्ती अशा चंद्रभागानामक दुर्गादेवींचे स्त्रोत,नमस्कार व महापूजा इत्यादिकेकरून आराधन करुं लागले ||३५|| अर्थ:-----त्या आराधना करणाऱ्या,द्वरकावासी लोकांना,देवीने प्रसन्न होऊन,तुम्ही लवकरच कृष्णाला पाहाल अशा,दिलेल्या आशीर्वादासहवर्तमान स्यमंतकमणी प्राप्त झालेला व सर्वाना हर्ष उत्पन्न करणारा तो श्रीकृष्ण,जांबवतीसहित द्वारकेमध्ये प्राप्त झाला ||३६|| भावार्थ:--- द्वारकावासियांनी दुर्गादेविंची उपासना केल्यामुळे श्रीकृष्ण जांबवतीसह द्वारकेत सर्वांना आनंदित करत परत आले.उपासक जर धर्मानुसार आचरण करणारे असेल तर,देवीमाता प्रसन्न होऊन आपला संकल्प पूर्ण करते.उपासक हा जर अधार्मिक असेल तर देवी प्रसन्न होत नाही.म्हणून धर्मानुसार आचरण करावे.||३६|| अर्थः---त्या वेळी व्दाराकावासी सर्व लोक ,जसे लोकामध्ये मेलेलाही बंधुजन पुन्हा प्राप्त झात्तला असता ते आनंद युक्त होतात त्याप्रमाणे पत्नी सहवर्तमान आलेला ,व ज्याच्य कंठामध्ये स्यमंतक मनी आहे अशा श्रीकृष्णाला भेटून ,मोठ्या उत्साहाने युक्त झाले||३७|| | सत्राजितं समाहूय सभायां राजसन्निधौ | प्राप्तीं चाख्याय भगवान् मणिं तस्मै न्यवेदयत् ||३८|| अर्थः---नंतर भगवान श्री कृष्णाने ,सभेमध्ये उग्रसेन राजाच्या सानिद्धागी त्या सत्राजिताला बोलून आणून ,त्याला त्या मण्याच्या प्राप्तीचा प्रकार सांगून त्याला तो मनी अर्पण केला ||३८|| भावार्थ:--- भगवंतामुळे हा मणी हरवला नव्हता,पण भगवंतांवर आरोप आला होता.आपल्यावर आलेला आरोप नाहीसा व्हावा म्हणून भगवंतांनी तो मणी आणला व ज्याचा होता त्याला –सत्राजीतास परत केला.आपल्याकडे असा प्रसंग आला तर आपल्यावर आलेला आरोप नाहीसा करण्यासाठी ती वस्तू ज्याची आहे,त्याला प्रयत्न करून आणावी.असे केले असता इनाकरण आपल्यावर केलेला आरोप नाहीसा होईल व ज्याचा आहे त्याला देला तर परोपकार होईल.||३८|| अर्थः-----तेव्हा तो सत्राजीतही कृष्णाचेठिकाणी मिथ्यापवाद ठेवण्याच्या आपल्या अपराधाने अतिलज्जीत झाल्यामुळे खाली मुख करून पश्चाताप पावत असता,त्या सभेतून मनी घेऊन आपल्या घरी निघून गेला.||३९|| भावार्थ:---सत्राजीतास श्रीकृष्णावर आपण आरोप केला म्हणून वाईट वाटले.तो अपमानित झाला,त्याने मान खाली घातली.आपण इतरांवर विनाकारण आरोप करू नये.यामुळे अधर्म होऊन पाप लागून दु:ख भोगावे लागते.आपमान होतो.आपमान झाल्यामुळे मान खाली घालावी लागते.म्हणून असे वागणे योग्य नसते.||३९\|| अर्थः-----नंतर बलवान अशा श्रीकृष्णाबरोबर घडलेल्या विराधाने व्याकूळ झालेला तो सत्राजित,त्या आपण केलेल्या अपराधाने चिंतन करीन,तसाच मी आता हा आपला अपराध कसा घालवूं,श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न कसा बरे होईल ? ||४०|| भावार्थ:--- सत्राजीताकडून आरोप केल्याबद्दल अपराध घडला होता.बालावानाबरोबर वैर झाले होते,त्यामुळे तो भयभीत झाला होता.म्हणून आपण कोणाचा अपराध करू नये.त्यातल्यात्यात बलवानाबरोबर,श्रीमंताबरोबर,सत्ताधिशाबरोबर,संत—महात्मा यांच्याबरोबर अपराध कधीच होऊ नये.अपराध जर झाला तर क्षमा मागावी.||४०|| अर्थ:-----काय केले असतां माझे कल्याण होईल ? अदिर्घदर्शी,कृपण,मंदमति आणि द्रव्यलोभी अशा माझी लोक निंदा जशी करणार नाहीत असा उपाय कोणता करावा ? ||४१|| भावार्थ:--- आपल्याकडून अपराध घडल्यास लोक निंदा करता.आपण अदूरदर्शी न राहता दूरदर्शी असावे.दूरदर्शी म्हणजे कोणत्या प्रकारे आचरण केले म्हणजे आपल्या हिताचे परिणाम होतील व इतरांचेही हित होईल,असा अगोदर विचार करून नंतर तसे आचरण करणे यास “दूरदर्शी” असे म्हणतात.क्षुद्र विचार म्हणजे फक्त आपले हित व दुसऱ्यांचे अहित त्यास “क्षुद्र” विचार असे म्हणतात.क्षुद्र विचार करू नयेत. म्हणून व्यापक,आपले व अनेकांचे हित होईल असे विचार करावेत.आपण लोभी असू असता कामा नये,कारण लोभी मनुष्य जडास—धनास महत्व देतात.जे जडास—धनस महत्व देतात,ते प्रेमास—सुखास महत्व देत नाहीत.लोभी माणसाकडून मूर्खपणा घडत असतो.लोभी मनुष्य धनावरील भूत असतो,म्हणजे स्वत:साठी थोडेही धन खर्च करत नही,तर इतरांना तर मुळीच खर्च करत नाही.म्हणून लोभी असू नये. ||४१|| अर्थ:-----असे चिंतन करून त्याने असा निश्चय केला कि,मी त्या श्रीकृष्णाला,स्त्रियामध्ये रत्न अशी आपली कन्या देतो आणि नंतर आनंदरूपाने स्यमंतकरत्नही देतो हाच विरोधशांतीचा फार चांगला उपाय आहे,यावांचून त्या विरोधाची शांती होणार नाही||४२|| भावार्थ:--- अपराधांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्या—ना—कोणत्या प्रकारे ज्याचा अपराध घडला त्याच्या कोणत्याही प्रकारे संबंध जोडावयास पाहिजे.त्यांना मौल्यवान वस्तू देज्न व प्रेम देऊन त्यांना प्रसन्न करावयास पाहिजे.आपण कमीपणा घेऊन त्यांचा मानसन्मान वाढावयास पाहिजे.म्हणजे असता अपराधाचे परिमार्जन होते.||४२|| | एवं व्यवसितो बुद्ध्या सत्राजीत् स्वसुतां शुभाम् | मणिं च स्वयमुद्दम्य कृष्णायोपजहार ह ||४३|| अर्थ:-----याप्रमाणे बुद्धीने निश्चय करून त्या सत्राजिताने,शुभलक्षांनी संपन्न अशी आपली कन्या सत्यभामा आणि स्यमंतक मनी हि,स्वतः उद्योग करून श्रीकृष्णाला समर्पण केली||४३|| अर्थः-----कृतवर्मा,शतधन्वा इत्यादिक पुष्कळांनी याचना केलेली व सुस्वभाव,सौंदर्य औदार्य आणि गुण यांनी युक्त अशा त्या सत्यभामेला,भगवान श्रीकृष्णाने विवाहाच्या विधानाने वरिले.||४४|| अर्थ:-----तेव्हा भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाला कि,आम्हा मण्याचा स्वीकार करीत नाही.तूं सूर्याचा भक्त आहेस म्हणून तो मनी तुझ्याजवळ असूं दे.तूं अपुत्र असल्यामुळे धनादिफलांचा स्वीकार करणारे आम्हीच आहों||४५|| भावार्थ:--- आपणास समोरील व्यक्ती आपणास आपणहून देत असेल तर आपण ती वस्तू किंवा त्या वस्तू संपूर्ण न घेता कांही वस्तू उदारतेने घ्याव्यात.||४५|| ________________________________________________________________________________________________________________________ |५७---- १--स्यमंतक-हरण,शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा व्दारकेला बोलावणे---४--- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थ:------श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,एकेवेळी पांडव,लाक्षागृहातून विदुराने राखलेल्या बिळाच्या द्वाराने बाहेर निघून गेले,दग्ध झाले नाहीत,हा प्रकार ठाऊक असणाराही श्रीकृष्ण,लोकमुखाने पांडव आणि कुंती हि लाक्षागृहामध्ये दग्ध झाली असे ऐकून कुळाला योग्य जो व्यवहार ( समाचार घेणे ) त्याकरिता कुरुदेशांत असलेल्या हस्तीनापुरास बळरामासहवर्तमान निघुन्गेला||१|| भावार्थ:--- आपल्या संबंधितावर कांही संकट आले तर आपण त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन सहकार्य करणे आपला स्वधर्म आहे.||१|| अर्थः---तेथे जाऊन भीष्म,कृपाचार्य,विदुर,गांधारी आणि द्रोणाचार्यांना यांच्या भेटी घेऊन त्यांच्याच दुःखासारखे ज्यांना दुःख झाले आहे असे ते रामकृष्ण,त्यांच्याजवळ हि मोठी दुःखाची गोष्ट झाली असे म्हणाले||२|| भावार्थ:--- आपण ज्यांच्यावर संकट आलेले आहेत—दु:खी झालेले आहेत,त्यांना ज्या वस्तूची गरज आहे,आपण त्या वस्तू देणे आपला स्वधर्म आहे.मानसिक दु:ख हलके करण्याकरिता,त्यांच्या दु:खात सहभागी होऊन आपण दोन—चार गोष्टी सांगून मानसिक दु:ख कमी करून सुख देण्याचा प्रयत्न करावा.||१|| अर्थः-----हे राजा,इकडे द्वारकेमध्ये हल्ली श्रीकृष्ण येथे नाही तेव्हा सत्राजिताचा वध सहज करिता येईल अशी संधी पावून,अक्रूर आणि कृतवर्मा हे उभयंता शतधन्व्याला म्हणाले कि,तूं सत्राजितापासून मनी का ग्रहण करीत नाहीस ? ||३|| अर्थः-----तो जिवंत असता कसा आणि मनी देईल असे म्हणशील तर – ज्या सत्राजिताने आम्हांला कन्यारत्न ( सत्यभामा ) देतो अशी प्रतिज्ञा करून आमचा अनादर करून ती कृष्णाला दिली,तो सत्राजित आपल्या प्रसेन भावाप्रमाणे मारून जाईना कां,त्याला मारून टाकावा||४|| भावार्थ:--- अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शाताधान्व्यास भेद निर्माण करून कुसंगत कर्म करण्यास सांगितले--कुकर्म करण्यास उत्तेजन देणे अधर्म आहे.आपण भेद निर्माण करून कुकर्म करण्यास उत्तेजन न देता सुकर्म करण्यास उत्तेजन देणे आपल्याही हिताचे व इतरांच्या हिताचे असते.||४|| अर्थः------याप्रमाणे त्या अक्रुकृतवर्म्यांनी बुद्धीभेद केलेल्या त्या क्षीणायुषी पापी दुष्ट शतधन्वाने,मन्याच्या लोभाने त्या निजलेल्या सत्राजिताचा वध केला||५|| अर्थः------त्याने,जसा खाटिक पशूंना मारितो त्याप्रमाणे निजलेल्या सत्राजिताला मारून त्याच्या स्त्रिया रुदन करीत असतो व अनाथाप्रमाणे आक्रोश करीत असतां तो स्यमंतकमनी घेउन निघून गेला||६|| अर्थः------त्यावेळी सत्यभामाही आपला पिता,शतधन्वाने मारिला असे पाहून शोकाने वाप्त व वारंवार मुर्छांपावणारी ती हे,मी हत्त झाल्ये आहे अशा प्रकारे विलाप करूं लागली||७|| अर्थः------नंतर मृत झालेल्या पित्याला तेलाच्या हौदांत घालून ठेऊन,ती सत्यभामा हस्तीनापुरानास निघून गेली आणि दुःखित झालेल्या तिने,सर्वज्ञ अशाही श्रीकृष्णाला आपल्या पित्याच्या वधाचे वर्तमान कळविले||८|| अर्थः-----हे राजा,ते सत्राजिताने मरण ऐकून अशाही त्या रामकृष्णांनी मनुष्यलीलेला अनुसरून डोळ्यामध्ये पाणी आणून अहो काय सांगावे ! आम्हांला मोठे दुःख प्राप्त झाले असे म्हणून विलाप करूं लागले||९|| भावार्थ:--- सत्यभामा,पित्याच्या वधाचे दु:ख सांगण्याकरिता हस्तिनापुराला गेली.श्रीकृष आणि बालारामादादांना तिने वधाचा सर्व वृतांत सांगितला.वधाची बातमी ऐकून श्रीकृष आणि बलरामादादा मनुष्यासारखे रडू लागले.आपणही इतरांचे दु:ख ऐकून रडू येऊन दु:खात सहभागी होणे आपले कर्तव्य असते.त्यामुळे समोरच्याचे दु:ख कमी होते.खरोखर ही हानी आता भरून निघत नाही.जे घडू नये ते घडले असे कांही बोलून दु:खात सहभागी आपण झाले असता समोरच्याचे दु:ख कमी होते.||९|| अर्थः------नंतर सत्यभामेसह वर्तमान व बलरामासहवर्तमान श्रीकृष्ण त्या हस्तिना पुरातून व्दारकेस येवून ,शतधन्व्या पासून मनी हरणकरण्या करिताकरिता त्या शतधन्व्याला मारण्या विषयी उद्युक्त झाला||१०|| अर्थः----त्या शतधन्व्यानेही श्रीकृष्णाच्या आपल्या वधाविषयी उद्धोग जाणून ,प्राणरक्षणाच्या इच्छेने कृत्वार्म्याची साहाय्यविषयी याचना केली .तेव्हा तो कृत वारेमा म्हनाला की,||११|| अर्थः----मी ईश्वर अशारामकृष्णाला प्रतिकूल असे कर्म करणार नाही कारण,त्यांचा अपराध कोणबरे पुरुषकल्याण पावण्यास योग्य होईल ,कोणीच होणार नाही||१२|| अर्थः---ज्या कृष्णाच्या व्देशाने सेवाकाशी व बंधुशीसह वर्तमान कंस ,राज्यसंपत्ती पासून भ्रष्ट होऊन नाश पावला ,तसाच जरासंधाही सत्रावेळ युद्धामध्ये विरथ होऊन (शरीरमात्र अवशेष राहून )निघून गेला ||१३|| अर्थः---याप्रमाणे कृतवर्म्याने मी सहाय करीत नाही असे सांगितले असता ,त्या शतधन्वाने अक्रूराची सह्याय करण्याविषयी याचना केली तेव्हा तो म्हणाला की ,-ईश्वर अशा रामकृष्णाचे बळ जाणणारा कोण बरे पुरुष त्याच्या बरोबर विओरोध संपादन करीन !कोणीच करणार नाही जो भगवान ,लीलेने संकल्पमात्रेकरून हे जग उत्पन्न करितो ,रक्षण करितो व सावहार करितो .ज्याच्या चेष्टेला त्यांच्या मायेने मोहित झालेले विश्वस्त्रश्ते ब्राम्हदिकाही जाणत नाहीत.जो सात वर्षाचा बालक असता त्याने ,एकाच हाताने गोनार्धन पर्वत उचलून जसे लहान बालकाचे छत्राक (आंबले )उपटून धारण करावे त्या प्रमाणे अनायासाने धारण केला त्या षड्गुनैश्र्वार्यसंपन्न ,अद्भुत कर्मे करणाऱ्या ,अनंत सर्व कारण निर्विकारी ,आत्मरूपी ,श्री कृष्णाला वारंवार नमस्कार आसो||१४-१७|| भावार्थ:--- अक्रूर आणि कृतवर्मा याने शतधान्व्यास कुकर्मास उत्तेजन देऊन ते कर्म करण्यास भाग पाडले.जेव्हा त्या कर्माच्या अनुषंगाने शाताधान्व्यास संकट ओढवले.त्यावेळेस अक्रूर व कृतवर्मा यांने त्या शाताधान्व्यास कांहीही मदत केली नाही.दोन शब्द बोलून धीरही दिला नाही.याकरिता कुकर्म अरु नये.त्यातल्या—त्यात दुसर्यांच्या म्हणण्यानुसार तर कुकर्म मुळीच करू नये.कारण कुकर्म सांगणारे अनेक असतात,पण जेव्हा त्याबद्दल संकट ओढवतेत्यावेळेस कोणाही मदत करत नाही.म्हणून आपण कोणास कुकर्म सांगण्यास उत्तेजन देऊ नये व कोणी उत्तेजन देण्यास परावर्त झाले तर आपण कुकर्म करू नये.असा विवेक करावा.||१४—१७|| अर्थः---याप्रमाणे अक्रुरानेहि प्रत्याख्यान केलेल्या त्या शातधान्वाने तो महामानी त्यांच्या जवळ ठेऊन ,एका दिवसात शंभर योजने जाणार्या घोड्यावर बसून पळून गेला ||१८|| अर्थः---त्यावेळी हे राजा रामकृष्णहि आपल्या गरुड ध्वज रथावर मोठया वेगाने चालनाऱ्या योगेकरून ,श्वाशुराला मारणाऱ्या त्या शतधन्वाच्या मार्गे लागेल||१९|| अर्थ :----शंभर योजने मात्र जाणारा असल्यामुळे त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे अशक्त अशा मिठीला नागरीच्या उपवनांमध्ये पडलेल्या घोड्याला टाकून अत्यंत भ्यालेला तो शत धनवा पायानीच धावू लागला .कृशाही क्रोधाने त्याच्या मागे लागला||२०|| अर्थः---तेव्हा पायांनी धावणाऱ्या त्या शत धन्वाचे तीक्ष्ण चक्राने मतक तोडून ,त्याच्या पांघरलेल्या व वस्त्रमध्ये मण्याचा शोध करू लागला ,म्हणजे अक्रुराजवळ मनी आहे हे सर्वज्ञ पणामुळे ठाऊक असूनही बलरामाचे वाचन करण्यासाठी त्याने तसे केले ||२१|| भावार्थ:--- शतधन्व्याचा घोडा उपवनात कोसळ्यामुळे तो घोडा सोडून पायीच पळू लागला.भगवंतही युद्धशात्राच्या नियमानुसार पायीच पळू लागले.श्रीकृष्णांनी त्याचा पाठलाग करून सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले.त्याच्या कपड्यात स्वमंतमण्याचा शोध घेतला.याकरिता कोणास विनाकारण मारू नये व दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार तर मारूच नये.त्यामुळे आपलेच अहित होते,व दुसऱ्यांचे अहित केल्याचे पाप लागून आपणास विनाकारण दु:ख भोगावे लागते.म्हणून विवेक करून जीवन जगावे.||२१|| अर्थ :----तेव्हा त्याला मनी मिळाला नाही असा तो श्री कृष्ण ,बलरामाजवळ येऊन म्हणाला कि –शत ध्न्वला मी व्यर्थ मारिले ,त्याच्या जवळ स्यमंतक मनी नाही ||२२|| अर्थः------नंतर बलरामाने ,ह्या सर्वज्ञ कृष्णाचे हे असे कारणे मला फसविण्यासाठी आहे असे मानून गुप्त क्रोधाने कृष्णाला सांगितले कि ,शत धन्वाने कोणाजवळ तरिऊ तो मनी ठेवला आहे ,त्याचा शोध करण्यासाठी तो व्दार्केमध्ये गमन कर ||२३|| अर्थः-----मी तर,माझा अत्यंत प्रियमित्र अशा जनकराजाला पाहण्याची इच्छा करितो हे राजा,याप्रमाणे बलरामाने श्रीकृष्णाला सांगून मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला.||२४|| अर्थः-----त्या बलरामाला अपाहून संतुष्टचित्त झालेला जनक राजा,त्वरेने उठून,पूजा करण्यास योग्य अशा त्या रामाचे पाद्य,अर्घ्य,माळा,चंदन इत्यादिक उपचारांनी यथाविधी पूजन केले.||२५|| अर्थः-----नंतर प्रीतियुक्त व उदरचीत्त अशा त्या जनकाने सत्कार केलेला तो बलराम,त्या मिथिलानगरीमध्ये कांही वर्षे पर्यंत राहिला.तेव्हा अवकाश मिळाल्यामुळे त्या बलरामापासून धृतराष्ट्रपुत्र सुयोधनाने गदायुक्त शिकून घेतले||२६|| अर्थः------श्रीकृष्णाने सत्यभामेलाही फसविले असे सुचवीत म्हणतो कि,-इकडे सत्यभामेचे प्रिय करणाऱ्या त्या समर्थ श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये येऊन सत्यभामेला,शतधन्व्याला मारिले परंतु त्याच्याजवळ मणी मिळाला नाही असे सांगितले||२७|| अर्थः-----नंतर त्या श्रीकृष्णाने ज्या ज्या म्हणून क्रिया मरण पावलेल्याला परलोकाचेठिकाणी हितकारक होतात त्या त्या,सासऱ्या सत्राजिताच्या क्रिया,त्याच्या सुह्रादाकांडून करविल्या||२८|| अर्थः---अक्रूर आणि कृतवर्मा या दोघांनी,शतधन्व्याला वध ऐकून,ते मण्याचे हरण करण्याविषयी शतधन्व्याचे प्रवर्तक असल्यामुळे भयाने अत्यंत भिऊन द्वारकेपासून दुसरेठिकाणी पळून गेले.त्यांत अक्रूर कृष्णाच्या संमतानेच गेला.कृतवर्मा तर भक्तपक्षपात प्रगट करण्याचा प्रसंग येईल म्हणून उपेक्षा केलेला होता.||२९|| अर्थः-----पुढे वाराणसीमध्ये,मणी हस्तगत झालेला अक्रूर दानपती या नावाने प्रसिद्ध होऊन सुवर्णाच्या वेड्या घालून मोठया यज्ञांनी भगवंताचे आराधन करीत राहिला ||३०|| अर्थः----या मताचे दूषण करितो कि –हे राजा ,मी पूर्वी सांगितलेले जे कृष्ण महात्म्य त्याला विसरून अशा प्रकारचा कितीएक लोक उपदेश करितात ते व्दाराकेमध्ये श्रीकृष्णाच्या निवास होत आसतो केवळ अक्रूर गेल्यामुळे अरिष्ट दर्शन घडेल काय ?भगवदीच्छेवाचूनच घडणारच नाही ||३१|| अर्थ:----- पुन्हा त्यांच्या मताचेच वर्णन करितो –पूर्वी कशी देशामध्ये इंद्र वृष्टी करीत नाहीसा झाला आसता कशी देशाच्या अधिपातीने तेथे झालेल्या श्वाफल्काचा आपली गन्दिनी नामक कन्या दिली त्यानंतर काशिदेशामध्ये इंद्र वृष्टी करू लागला असे प्रसिद्ध आहे त्या स्वफल्काचाआपली गांदिनीनामक कन्या दिली त्यांनंतर काशीदेशांमध्ये इंद्र वृष्टी करूं लागला असे प्रसिद्ध आहे||३२|| अर्थः------त्या श्वफल्काचा पुत्र हा अक्रुरही त्या श्वफल्कासारख्याच सामर्थ्याला आहे म्हणून तो जेथे वास करितो येथे इंद्र वृष्टी करूं लागला असे प्रसिद्ध आहे||३३|| अर्थः-----अशाप्रकारचे अक्रुराचा महिमा प्रतिपादन करणारे वृद्धाभिमानी पुरुषाने वाक्य श्रवण करून,असे खरे परंतु एवढेच कारण नाही तर मनी गेला हेंही कारण आहे असे मानून दूतांकडून अक्रूराला आणवून श्रीकृष्ण त्यास म्हणाला - ||३४|| अर्थः-----म्हणजे आलेल्या अक्रूराची प्रथम पूजा करून तराच दुसऱ्या प्रियकारक नानाप्रकारच्या कथा सांगून,सर्व जाणणारा असल्यामुळे अक्रुराचे चित्त जाणणारा भगवान या महाभागवताला मी दिलेल्याही मण्याची अपेक्षा नाही.कारण,मी बोलाविला असता हा मन्यासहवर्तमान च आला आहे असे जाणून हास्य करून म्हणाला कि,- ||३५|| अर्थः---“हे दानशूर,बरे शतधन्वाने ठेवलेला सुंदर स्यमंतक मनी तुझ्याजवळ आहे तो आम्हाला पूर्वीच ठाऊक आहे||३६|| अर्थः-----बरे मग काय ? अस म्हणशील तर – अपुत्रक असल्यामुळे सत्राजिताच्या कन्येने ( सत्यभामेचे) पुत्र,सत्राजिताला तिलोदक व पिंड देऊन आणि ऋण असेल तर ते फेडूनर अवशेष राहिलेले धन ग्रहण करणारे आहेत||३७|| अर्थ:------तेव्हा तो मनी त्यांनी घ्यावयाचा आहे तो दुसऱ्या लोकांनी बाळगण्यास अशक्य असल्यामुळे आचारसंपन्न अशा तुझ्याजवळ असूं दे,परंतु बलराम मन्याबद्दल माझ्यावर विश्वास ठेवीत नाही,म्हणजे यानेच मनी छपवीला आहे अशी शंका मनांत आणितो||३८|| अर्थः-----यास्तव हे महाभाग्यवंता,तूं मनी दाखीव आणि बंधूच्या चित्ताचे समाधान कर.मनी नाही असे सांगूं नकोस.कारण,सुवर्णाच्या वेड्या घातलेले सतत यज्ञ तुझे हल्ली सुरु आहेत म्हणून मनी तुझ्या जवळच असल्याचे अनुमान होते.||३९|| अर्थः----याप्रमाणे सामोपचारांनी भाषण केलेल्या अक्रराने वस्त्राने झांकून ठेवलेल्या सूर्यासारखा कांतिमान तो मनी श्रीकृष्णाला दिला||४०|| अर्थ:-----तेव्हा,स्वतंत्र अशा श्रीकृष्णाने बळरामादिक बंधूंना स्यमंतकमनि दाखवून त्या मण्याच्या योगाने आपणाला प्राप्त झालेला मिथ्यापवाद घालवून पुनः हा मणी दुसऱ्यांनी बाळगण्यास अशक्य आहे इत्यादी मिषाने अक्रुरालाच अर्पण केला||४१|| भावार्थ:--- श्रीकृष्णांनी तो मणी अक्रूर याच्याकडून घेऊन आपल्या बांधवांना दाखवावून आपल्यावर आलेले आरोप नाहीसा केला व तो मणी अक्रूर यास परत केला स्वत:कडे ठेवला नाही,कारण तो त्यांचा नव्हता.त्याचप्रमाणे आपल्यावर कोणत्याही प्रसंगाच्या निमित्ताने आरोप जर आला तर तो आपण दूर करावा.तसेच आपण दुसऱ्याकडून एखादी वस्तू घेतलेली असेल तर आपले कार्य झाल्यानंतर दुसर्यांनी न मागता अगोदरच ज्याची त्याला परत करावी.आपल्याकडे ठेऊ नये. ||४१|| अर्थः-----जो तर पुरुष,भगवान ईश्वर विष्णूच्या प्रभावाने युक्त,पातकांचा नाश करणारे व पुण्यनामक अशा ह्या आख्यानाचे पठन करितो ,श्रवण करितो किंवा स्मरण करितो तो पुरुष,आपली दुष्कीर्ती व दुष्कीर्तीला मुलकारन असलेले पाप दूर करून मोक्षसुख पावतो||४२|| भावार्थ:--- सर्वशातीमान,सर्वव्यापक,भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण हे व्याख्यान सगळे पापे—दु:खे दूर करते,कारण भगवंतांनी स्वत: आचरणात आणून दाखवले.ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ होते.श्रेष्ठांचे आचरण कनिष्ठ करत असतात.म्हणून श्रेष्ठांनी धर्मानुसार व नीतीनुसार आचरण करावे लागते.त्यांनी अधर्मानुसार व अनितीनुसारच आचरणकरू नये.फक्त सांगू नये,तर अगोदर आचरण करावे व नंतर सांगावे.म्हणून वक्त्यांनी श्रीमद्भागवत ग्रंथ असो किंवा कोणताही ग्रंथ असो जे सांगितले आहे,त्याचे अगोदर आचरण करावे व नंतर सांगावे—उपदेश करावा.आपण आचरण न करता मुळीच सांगू नये.आचरण न करता सांगितले तर ऐकरांवर कांहीच परिवर्तन—बदल होत नाही.श्रोत्यांनिसुद्धा जे अगोदर आचरण करतात व नंतर सांगतात—उपदेश करतात,त्यांचेच श्रवण करावे—ऐकावे.फक्त संगणारांचे मुळीच श्रावण करू नये म्हणजे ऐकू नये,कारण कांहीच फायदा—हित—परिवर्तन—वागणुकीत बदल होत नाही.असा विवेक—विचार करून वक्ता—कथाकार व्हावे व श्रोत्यांनी—ऐकावे.||४२|| ________________________________________________________________________________________________________________________ |--५८ १---भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहाच्या कथा---५--- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थ:------श्री शुकाचार्य म्हणाला –हे राजा एकेवेळी ,नष्ट झाले म्हणून एकीलेल्या परंतु पुन्हा द्रुपदाच्या घरी सर्वांनी पाहिलेल्या अशा पांडवाना पाहण्याकरिता श्रीमान कृष्णाने ,सात्यकी वगैरे यादवसह वर्तमान इंद्रप्रस्थामध्ये गमन केले||१|| भावार्थ:---ज्यांना दु:ख झाले आहे किंवा जे दु:खाच्या प्रसंगातून वाचले आहेत, त्यांचे दु:ख कमी किना नाहीसे करण्यासाठी आपण त्या दु:खितांकडे जावावयास पाहिजे. आपण त्यांच्याकडे गेले असता,दोन--चार गोष्टी बोलले असता किंवा त्यांना ज्या वस्तूची गरज आहे,ती वस्तू त्यांना दिली असता,त्यांचे दु:ख कमी किंवा नाहीसे होत असते.त्यामुळे त्यांना सुख मिळत असते.अशा कृत्स भक्ती असे म्हणतात—परमार्थ असे म्हणतात.म्हणून दु:खितांचे दु:ख कमी—नाहीसे करून सुख द्ध्यावे.||१|| अर्थः-----तेव्हा ते शूर पांडव ,आलेल्या सर्वनियंत्या श्रीकृष्णाला अवलोकन करून ,जशी मूर्च्छित झालेली इंद्रिये प्राण आपण इत्यादी पाच प्रकारच्या भेदांनी युक्त मुक्य प्राण असता एकदम चेष्टा युक्त होतात त्याप्रमाणे एकदम उठून उभे राहतात ||२|| भावार्थ:--- श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व पांडव उठून आदरयुक्त उभे राहिले,कारण श्रीकृष्ण नातेवाईक--भगवंत—श्रेष्ठ—महात्मा होते.पांडवांनी त्यांना फक्त नातेवाईक दृष्टीतून न पाहता—भगवंत—महात्मा—श्रेष्ठ या भावनेतून पाहिले,नातेवाईक या भावनेतून पाहिले नाही.आपणही आपले कोणी नातेवाईक,संत—महात्मा असतील तर त्यांना या भावनेतून न पाहता संत—महात्मा या भावनेतून पाहावयास पाहजे.जसे प्राणवायूचा संचार झाल्यावर इंद्रिये कार्यरत होतात,तसे श्रीकृष्ण येताच पांडव आदरयुक्त भावनेने ताबोडतोब उभे राहिले.आपणांकडे संत—महात्मा आले असता आपणही आदरयुक्त भावनेने ताबोडतोब उठावयास पाहिजे.त्यात आपलेच हित असते.||२|| अर्थः-----आणि त्या राजदीकानी श्रीकृष्णला आलिंगन करून व त्याच्या असंगाने पापरहित होऊन त्यांचे सप्रेम मंद हास्याने युक्त मुख अवलोकन केले आणि आनंद पावले ||३|| अर्थः---त्यावेळी श्री कृष्णाने वडील अशा धर्म राजाच्या व भीमाच्या चरणाला वंदन करून ,बरोबरीच्या अर्जुनाला वंदन केले असता कनिष्ट असा नकुल सह्देवणी त्या श्री कृष्णाला वंदन केले ||४|| भावार्थ:--- आप कोणाकडे गेल्यानंतर प्रथम श्रेष्ठ व कनिष्टपण पाहून एकमेकांना वंदन—नमस्कार करावा.ही आपली भारतीय परंपरा आहे.||४|| अर्थः---नंतर तो श्री कृष्ण उत्तम सिहास्नाचे ठिकाणी बसला असता बहुतांची स्त्री असली तरीही निदररहित व नुकताच विवाह केलेली असल्यामुळे किंचित ल्ज्जायुक्त अशा द्रौपदी ने हळूहळू कृष्णजवळ येऊन त्याला वंदन केले ||५|| अर्थ-----जशी पांडवानी कृष्णाची पूजा केली तशीच सत्याकीचीही करून त्यला वंदन केले असता तोही आसनावर बसला ,तसेच दुसरेही यादव पांडवानी पूजित असता श्री कृष्णाच्या आसमंतात बसले ||६|| अर्थः----नंतर श्री कृष्णाने कुन्तिजवळ जाऊन तिला वंदन केले असता ,अतिस्नेहाने जिचे नेत्र पाण्याने भरून आले आहेत अशा त्या कुंतीने श्रीकृष्णास आलिंगन करून वासुदेवादिक बांधवाचे कुशल विचरिले व श्रीकृष्णाने हि सुनेसाहित त्या पित्र भगिनीला कुशल प्रश्न केला असता ||७|| अर्थः---प्रेमाने जो व्याकुळ पण त्यांच्या योगाने जिचा कंठ सग्ददित झाला आहे व जिच्या नेत्रामध्ये दु:खाश्रू प्राप्त झाली आहेत अशी ती कुंती पूर्वी झालेल्या बहुत क्लेशांचे स्मरण करीत आसता ,भक्ताचे क्लेश जनन्या करिता आपले स्वरूप दाखविणाऱ्या त्या श्री कृष्णाला म्हणाली कि ||८|| | तदैव कुशलं नोsभुत् सनाथास्ते कृता वयम् | ज्ञातीन् नः स्मरता कृष्ण भ्राता मे प्रेषितस्त्वया ||९|| अर्थः---“हे कृष्णा|,जेव्हा आम्हा बंधूचे स्मरण करणाऱ्या तू आमचा वृतांत समजण्याकरिता ,माझा भ्राता अर्जुन पाठविलास तेव्हाचा आमचे कुशल झाले आहे ,तसेच तू आम्हा अनाथाला सनाथ केले आहेस||९|| भावार्थ:--- आपण आपला संबंध श्रेष्ठांसी करावयास पाहिजे.श्रेष्ठांसी संबंध हा प्रगतीकडे नेत असतो.ते श्रेष्ठ अर्थीक,सामाजिक,धार्मिक,ज्ञानी असावेत पाहिजेत.||९|| | न तेsस्ति स्वपरभ्रान्तिर्वीश्वरस्य सुहृदात्मनः | तथापि स्मरतां शश्वत् क्लेशान् हंसी हृदि स्थितः ||१०|| अर्थः---आम्हा बंधूचे असे म्हणण्याने काय मला सुध्दा जिवासारखा मोह वर्णन करीत असे कि काय ?असे म्हणशील तर –हे कृष्णा ,जगाचा मित्र व आत्मा अशा तुला हा आपला व हा परकीय अशी भ्रांती मुळीच नाही तथापि स्मरण करणाऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये तू निरंतर राहून त्यांच्या क्लेशाचा नाश करितोस ||१०|| भावार्थ:--- आपले दु:ख नाहीसे होण्यासाठी आपण भगवंतांचे नेहमी स्मरण करावे.भगवंत आणि संत—महात्मा यांच्याकडे अपापर भाव नसतो,कारण सर्वांसी ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार आचरण करत असतात,त्यांह समभाव असतो.आपणही एकमेकासी ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार आचरण करावयास पाहिजे.आपल्यात समभाव असावा.संभवत सुख मिळत असतेतर विषम भावात दु:ख मिळत असते.सर्वांना दु:ख नको,तर सुख पाहिजे,म्हणून आपण धर्मानुसार आचरण करावे.||१०|| | किं न आचरितं श्रेयो न वेदाहमधीश्वर | योगेश्वरानां दुर्दर्शो यन्नो दृष्टः कुमेधसाम् ||११|| अर्थः---धर्मराजा म्हणाला –हे सर्वेश्वरा ज्यार्थी योगेश्वरानी पाहण्यास अशक्य अस तू विषयासक्तचित्त अशा आमचा दृस्तीगोचार झाला आहेस ज्यार्थी आम्ही काय पुण्या आचरण केले होते ,हे मी जनात नाहि ||११|| भावार्थ:--- पूर्व पुण्याईने देव—संत—महात्मा यांची भेट होत असते.म्हणून पुण्य होण्यासाठी वर्तमान शरीरात नेहमी धर्मानुसार आचरण करावयास पाहिजे.||११|| अर्थः---याप्रमाणे धर्मराजाने स्तुतीपुजादिकेकारून प्रथांना केलेला तो भगवान श्री कृष्णा ,इंद्रप्रस्थामद्धे राहणाऱ्या लोकांच्या नेत्रांना आनद उत्पन्न करीत असता ,चार मासपर्यंत सुखाने तेथे राहिला ||१२|| अर्थः---आता कालिंदीच्या दर्शनाचा प्रसंग सांगतो –एकेवेळी शत्रूपक्षाचा नाश करणाऱ्या अर्जुनाने श्री कृष्णासहवर्तमान हनुमंताची मूर्ती ध्वजावर जेथे आहे अशा रथावर बसून गांडीव नावाचे धनुष्य व ज्यातील ज्यातील बन कधीच शिन होत नाहीत असे भाते ग्रहण करून मृगया करण्या करिता बहुत अजगर व हरीण यांनी व्याप्त अशा भयंकर अरण्यामद्धे प्रवेश केला||१३-१४|| अर्थ:-----आणि त्या वनामध्ये बाणाच्या योगेकारून वाघ ,डुक्कर,महिष कळवीट,हरीण, शरभ, गवे, खड्ग, मृग, हरीण, ससे, व सळ सिंदर यांचा वध केला ||१५|| अर्थ :----- त्यामध्ये श्राध्दिक कर्माविषयी योग्य असे काही मृग ,पर्व युक्त अष्टका श्रद्धादीक कर्म प्राप्त झाले असता धर्मराजाकडे सेवकांनी पोचविले .नंतर तृषाक्रांत व श्रम पावलेल्या अर्जुन यमुनेच्या काठी गेला ||१६|| अर्थ :----तेथे त्या महारथी कृष्णार्जुनाणी यामुनेमध्ये स्नानं करून व तिचे निर्मळ उदक प्राशन करून त्या यमुनेच्या तीरी संचार करणारी ,स्वरूपाने सुंदर अशी एक कन्या अवलोकन केली ||१७|| अर्थः----तेव्हा सख्या श्री कृष्णाने पाठविलेल्या अर्जुनाने जिच्या मंड्या सुंदर आहेत ,जिचे दात सुरेख आहेत व जिचे मुख सुंदर आहे अशा त्या श्रेष्ठ स्त्रीजवळ जाऊन प्रश्न केला कि ||१८|| अर्थः----हे सुश्रोणी तू कोण कोणाची आहेस ?तू कोठून येथे आली आहेस ?बरे येथे येऊन तू काय करण्याची इच्छा करीत आहेस ?मी तर तुला पतीची इच्छा करणारी आहेस असे मानितो .यास्तव हे शोभाने ,तू हे सर्व मला कथन कर ||१९|| | अहं देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छति | विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता ||२०|| अर्थ:-----कालिंदी म्हणाली –मी सूर्य देवाची कन्या असून ,इच्छित वर देणारा श्रेष्ठ विष्णू आपणास पती मिळावा अशी इच्छा धारण करून येथे परम तप आचरण करीत राहिल्ये आहे ||२०|| अर्थः---कदाचित हाच माझी इच्छा करील अशी शंका मनात आणून म्हणत्ये कि –हे विरार्जुना ,लक्ष्मीचाहि आश्रय स्थान अशा त्या विष्णु वाचून दुसरा पती मी वरणार नाही .आता तो दुर्लभ आहे ,तो पापाने कसा प्राप्त होईल ?असे म्हणशील तर –अनाथांचा आश्रय असा तो भगवान मुकुंदाच मजवर संतुष्ट होओ ||२१|| अर्थ”---कालिंदी ह्या नावाने प्रख्यात अशी मी श्री कृष्णाचे दर्शन होईपर्यत ह्या यमुनेच्या उदकामध्ये पित्याने निर्माण केलेल्या घरात वास करीत आहे ||२२|| अर्थः---नंतर अर्जुनाने श्री कृष्णाजवळ येऊन जसे कालीदिने सांगितले होते तसे ते श्रीकृष्णाला सांगितले .तो कृष्णही आपल्या प्राप्ती करिता हि ताप करीत आहे असे पूर्वीच जाणत असल्यामुळे तिला रथावर बसवून हस्तिनापुरात धर्मराजाकडे आला ||२३|| अर्थः---आता प्रसंगाने त्यावेळचे दुसरे चरित्र सांगतो –पांडवानी आपणास राहण्याकरिता विश्वकर्म्याकडून व नाना प्रकारच्या शिल्परचनेने सुभोषित असे नगर उत्पन्न करविले ||२४|| अर्थः---आणि तेथे आपल्या पांडवाचे प्रिय करण्याच्या इच्छेने वास करणारा तो भगावन श्रीकृष्ण ,एकेवेळी अर्जुना धनुश्यादिकांचा लाभ व्हावा म्हणून अग्नीला खांडव नामक इंद्राचे देण्या करिता अर्जुनाचा सारथी झाला ||२५|| अर्थः---हे राजा नंतर खांडववन जळणारा तो संतुष्ट होऊन त्याने ,अर्जुनाला विजयी रथ गांडीव धनुष्य पणदरे घोडे ,अक्षय भाते आणि शास्त्र धरी लोकांनी अभेध्य असे कवच हि दिली ||२६|| अर्थः-----आणि तेव्हा खांडववन जळणाऱ्या अग्नीपासून रक्षण केलेल्या मयासुरानेही अर्जुनाला एक मोठी सभा निर्माण करून दिली ;ज्या सभेमध्ये दुर्योधनाला जलाचे ठिकाणी स्थलबुद्धी व स्थळाचे ठिकाणी जळबुद्धी असा दृष्टी भ्रम झाला ||२७|| | स तेन समनुज्ञात: सुहृद्भिश्चानुमोदितः | आययौ द्वारकां भूयः सात्यकिप्रमुखैर्वृतः ||२८|| अर्थः-----नंतर त्या अर्जुनाने आज्ञा केलेला व युधिष्ठिरादिक सुहृदांनी अनुमोदन दिलेले तो श्री कृष्णा ,सात्यकी प्रभृती यादवासाहित पुन्हा व्दारकेमध्ये प्राप्त झाला ||२८|| | अथोपयेमे कालिन्दिं सुपुण्यर्त्वृक्ष ऊर्जिते | वितन्वन् परमानन्दं स्वानां परममंगलम् ||२९|| अर्थ:----नंतर विवाहयोग्य असा ऋतू व नक्षत्र असलेल्या ग्रहबलादियुक्त मुहूर्ताचे ठीकानी यादवांना परम मंगल कारक असा परमानंद उत्पन्न करणाऱ्या श्रीकृष्णाने ,त्या कालिंदी बरोबर विवाह करून घेतला ||२९|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहुर्त पाहून योग्य मुहूर्तावर संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती देण्यासाठी कालिंदीचे पाणिग्रहण केले.आपणसुद्धा गुण,प्रेमळ स्वभाव पाहून योग्य स्त्रीसी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून विवाह करावा.स्त्रीचा स्वभाव सुखाला कारण असतो.||२९|| अर्थः---आता पाचवा मित्रविदेचा विवाह सांगतो –अवंती देशाचे राजे विंद आणि अनुविंद हे दुर्योधनाचे वशवर्ती असल्यामुळे त्याच्या अनुमाताने वागणारे होते त्यांनी स्वयं स्वय वरामध्ये श्रीकृष्णाला वरण्याकरिता उद्धुक्त झालेल्या आपल्या बहिणीचा तू कृष्णाला वरू नकोस असा निषेध केला ||३०|| अर्थ:----नंतर हे राजा पित्रभगिनी असलेल्या राजाधीदेवाची ककन्या अशा त्या मित्र विन्देला ,सर्व राजे पहात असतानाचा बलात्काराने श्रीकृष्णाने हरण केली||३१|| अर्थ :----आता सहावा विवाह सांगतो –हे राजा कोसालदेशाचा अधिपती अयोध्येमध्ये राहणारा नग्नजीन्नामक अतिधार्मिक राजा होता त्याच्या नावावरून नाग्नाजित या नावाने प्रसिद्ध अशी क्रांतीयुक्त सत्य नावाची त्याची कन्या होती||३२|| अर्थ:----तिला वरून घेण्या विषयी तीक्ष्णशृगानी युक्त, वीरांचा गांधसुद्धा सहन न करणारे मारक व वश करून घेण्यास अशक्य अशा सात मृत्त वृशभाना जिंकील्यावाचून कोणीही राजे समर्थ झाले नाहीत||३३|| अर्थ:----तेव्हा त्या वृशभाना जिंकणाऱ्या पुरुषालाच ती कन्या प्राप्त होणार आहे आहे असे एकूण ,यादवांचा पती श्री कृष्ण ,नोठ्या सैन्याने युक्त होऊन कोसलदेशातील त्या अयोध्या नागरी मध्ये गेला ||३४|| अर्थ:----तेव्हा तो कोसलपती नग्नजीत राजा ,आलेल्या त्या कृष्णाला पाहून ,उठून समोर गेला आणि त्याला आणून आसनपाद्दांदीक मोठ्या पूजा साधनाने त्याचे पूजन करून ,तुझ्हे चांगले येणे झाले इत्यादी वानिनेही त्यचा सत्कार केला ||३५|| अर्थ:----तेव्हा राजकन्येने त्या आलेल्या आपणास मान्य अशा लक्ष्मी पती वारला पाहून त्याची इच्छा केली आणि म्हणाली कि ,जर मी व्रतादिक नियमांनी याचे मनामध्ये चिंतन केले असेल तर हा माझा पती होओ आणि माझ्या मनोरथाना सफल करो||३६|| अर्थ:-----ज्याच्या चरणकमळाचे रज ,लक्ष्मी ,शंकर व लोक पालासाहित ब्रम्हदेव हे मस्तकी धारण करितात तो आपण केलेल्या मर्यादांचे रक्षण होण्याच्या इच्छेने ,धर्मलोप होण्याच्या वेळी लीलावतार धारण करणारा भगवान ईश्वर ,माझ्यावर कशाने बरे पावेल ?त्याने केवळ कृपेनेच माझा अंगीकार करावा||३७|| अर्थ:-----इकडे पूजा केलेल्या त्या भगवंताप्रत राजा असे म्हणाला कि –हे नारायना ,हे जगत्पते ,आत्मानदानेच पूर्ण अशा तुझे अल्प अशा मी ,कोणते काम करावे ?म्हणजे कोणत्या कर्माने तुझी प्रसन्नता होईल /त्यांची आज्ञा करावी ||३८|| अर्थ:-----श्री शुकाचार्य म्हणाला –हे राजा ,त्यावेळी आसनादिकांचा अंगीकार केलेला भगवान श्रीकृष्ण हर्षयुक्त होऊन मेघानादासारख्या गंभीरपणे मंदहास्ययुक्त असे म्हणाला कि -||३९|| अर्थ:-----हे राजेंद्रा ,आपल्या धर्माने वागणारा क्षत्रियाला याचना करणे हे कवीनि लोकात:व शस्त्रात:जरी निषिद्ध केले आहे तथापि तुझ्या बंधुत्वाने स्नेह असावा या इच्छेने तुझ्या कन्येची मी तुझ्याजवळ याचना करितो .आम्ही त्याबद्दल नजराणा वैगरे देणारा नाही||४०|| अर्थ:-----राजा म्हणाला –हे नाथा ,तुझ्याहून अधिक उत्कृष्ट असा यालोकी कन्येला इस्ट दुसरा वर कोणता आहे ?कोणाच नाही गुणांचे एकच स्थान अशा ज्या तुझ्या वक्ष स्थळावर लक्ष्मी निरंतर वास करीत आहे ||४१|| अर्थ:-----हे यादव श्रेष्ट परंतु मोठ्याला कन्या द्यावी असे आहे म्हणून तसा कन्यावर प्राप्त होण्याच्या इच्छेने ,पुरुषांच्या बालादिकांची परीक्षा होण्याकरिता आम्ही पूर्वी एक प्रतिज्ञा केली आहे ||४२|| अर्थ:-----ती कोणती असे म्हणशील तर हे वीरा ,हे सात वृषभ न शिकवलेले व दुसऱ्याच्या न होणार आहेत यांनी तर पुष्कळ राजपुत्राचा पराभव केला आहे व त्यांचे अवयव फाडून टाकले आहेत||४३|| अर्थ:-----यास्तव हे यादुनंदना ,जर यांना तू दमवून वेसनी घालशील तर हे लक्ष्मी पते ,तूच माझ्या कन्येला संमत असा वर आहेस ||४४|| अर्थ:------अशा प्रकारची प्रतिज्ञा एकूण उत्तरीय वस्त्र कमरेला बांधून सर्व करण्यास समर्थ अशा त्या श्रीकृष्णाने लीलेने बहुत स्त्रियांनीहि पुर्णरीतीने संभोग देण्यास मी योग्य होईन अशी त्या कन्येची खात्री करण्याकरिता आपली सात स्वरूपे करून त्या सात वृशभाना एकदम वेसनी घातल्या||४५|| अर्थ:-----आणि हतबल व भग्नदर्य केलेल्या त्या वृषाभांचे दाव्यानी बंधन करून बांधलेल्या त्याचे श्रीकृष्णाने जसे कष्ठमाय वृषभाचे आकर्षण करावे त्याप्रमाणे आकर्षण केले||४६|| | ततः प्रीतः सुतां राजा ददौ कृष्णाय विस्मितः | तां प्रत्युगृन्हाद् भगवान् विधिवत् सदृशिं प्रभुः ||४७|| अर्थ:----नंतर आश्चर्ययुक्त व प्रसन्नचित्त झालेल्या त्या नाग्नजित राजाने ,श्रीकृष्णाला आपली कन्या अर्पण केली .तेव्हा आपणास अनुरूप असलेल्या त्या सत्तेचा ,भगवान श्रीकृष्णाने यथाविधी विवाह करून घेतला ||४७|| भावार्थ:--- कोसल देशाचा राजा नाग्नजित त्याची कन्या नग्नजीता हिस कृष्णाबारोबा लग्न करण्याची इच्छा होती,तिने त्यासाठी तप केले होते.कोसल राजा नाग्नाजित याने या कण्यासाठी एक पण ठेवला होता.तो पण म्हणजे माजलेल्या सात बैलांच्या नाकात वेसने घालणे हा होता.यातून त्याला वर हा पराक्रमी व शूर त्यास पाहिजे होता,म्हणून त्याने हा वर ठेवला होता.श्रीकृष्ण शुरांचे शूर असल्यामुळे या पाणांचे विशेष कांही वाटले नाही.यांनी तो पण जिंकला व नाग्नाजीताचे पाणिग्रहण केले.||४७|| अर्थ:-----त्यावेळी राजस्त्रियाही कन्येला प्रीयापती श्रीकृष्ण प्राप्त झाला असे पाहून परमानंद पावल्या आणि त्यावेळी मोठा उत्साह झाला ||४८|| अर्थ:-----तो असा कि –शंक,नगारे व चौघडे हि वाद्ये वाजू लागली ,गायन युक्त वाध्य्व सुरु झाली ,ब्राम्हणाचे आशीर्वाद प्रवृत्त झाले नगरातील पुरुष व स्त्रिया आनंद युक्त होऊन त्यांनी वस्त्रे व माळां व अलंकार धारण केले ||४९|| भावार्थ:---विंद आणि अनुविंद हे अवती देशाचे राजे होते.त्यांची बहिण मित्रविंदा हिची श्रीकृष्णाबरोबर लग्न करण्याची इच्छा होती,म्हणून श्रीकृष्णांनी तिला आपल्या सामर्थ्यावर तिच्या भावांच्या विरोधात घेऊन गेले.नवरदेव व नवरी यांची जर एकमेकांबरोबर प्रेमाने—गुणाने [आर्थिक,रूप किंवा अन्य कारणाने नव्हे] लग्न करण्याची इच्छा असेल तर बाकीच्यांनी त्यांना विरोह करू नये.जीवनात प्रेमाने सुख मिळते.केवळ धनाने,केवळ रूपाने,केवळ इतर कारणाने सुख मिळत नाही.||३१|| अर्थः----त्यावेळी दान करण्यास समर्थ अशा नाग्नजित राजाने ,दहा हजार गाई आंदन दिल्लुरा ताशाचा त्यांच्या कंठामध्ये पदके आहेत व ज्यांनी उंची वस्त्रे परिदान केली अशा तीन हजार दासी दिल्या ||५०|| अर्थ:----नऊ हजार हत्ति व त्यांच्या शंभर पटीने (नऊ लक्ष )रथ ,त्यांच्या शंभर पटीने (नवू कोटी )घोडे व त्यंच्या शंभर पटीने (नवू पद्म )सेवक अर्पण केले||५१|| अर्थ:-----नंतर ज्याचे हृदय स्नेहाने आद्र झाले आहे अशा त्या कोशाल देशाधीपारी नाग्नजित राजाने ,त्या सत्या व श्रीकृष्ण या दांपत्याला रथावर बसून मोठ्या सेनेने युक्त अशा त्यांची पाठवणूक करून दिली||५२|| अर्थ:----हे श्रीकृष्णाचे प्रयाण श्रवण करून यादवांनी व त्या सात वृशभानी पूर्वी पराजित केलेल्या व तो पराजय व श्री कृष्णाने कन्या वरिली हे असहन करणाऱ्या किती एक रजनी ,कन्येला घेऊन जानाऱ्या श्री कृष्णाला मार्गाचे ठिकाणी निरोध केला ||५३|| अर्थ:-----तेव्हा बाण समूह सोडणाऱ्या त्या राजाने श्रीकृष्णाचे प्रियकर नाऱ्या गांडीवधरी अर्जुनाने ,तीक्ष्ण बाण सोडून जजर्र करून जसा सामान्य हरिणांना सिहस पालवितो त्याप्रमाणे पळविले||५४|| परीबाह्र्मुपागृहं व्दारकामेत्य सत्यया || रेमे यदुनामृषभो भगवान् देवकीसुतः ५५|| अर्थ:------नंतर यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण सासऱ्याने दिलेले ते सर्व आंदन ग्रहण करून त्या सत्येसह वर्तमान व्दारकेमध्ये येवून तिच्यासह रामनाम झाल ||५५|| श्रुतकीर्तेः सुतां भद्रामुपयेमे पितृष्वसु: | कैकेयिं भ्रातृभिर्दत्तां कृष्णः सन्तर्दनादिभिः ||५६|| अर्थः-----आता सातवा विवाह सांगतो –श्रुत्कीर्तीनामकजी पितृभगिनी तिची केकयदेशांत उत्पन्न झालेली भद्रानामक कन्या होती ,ती तिच्या संतदर्ण इत्यादिक बधुनी दिली असता श्रीकृष्णाने वरिली||५६|| सुतां च मद्राधिपतेर्लक्ष्मणां लक्षनैर्युताम् | स्वयंवरे जहारैकः स सुपर्णः सुधामिव ||५७|| भावार्थ:--- केकय देशातील आत्या श्रुतकीर्ती हीच्या भद्रा नांवाच्या कन्येसी भगवंत श्रीकृष्णांनी विवाह केला.भद्राच्या भावांनी आपणहून श्रीकृष्णांना दिली.||५७|| अर्थः----आता आठवा विवाह सांगतो –हे राजा ,तशीच मद्रदेशाधीपतीची शुभलक्षणांनी युक्त अशी लक्ष्मणानामक कन्याही जशी इंद्रदिदेवांचा तिरस्कार करून गरुडाने सुधा हरण केली तशी एकट्याचा श्री कृष्णाने स्वयवारामध्ये सर्व राजांचा तिरस्कार करून हरण केली||५७|| भावार्थ:---मद्र देशाच्या राजाची राजकन्या लक्ष्मणा ती सुलक्षणी होती.तिचे स्वयंवरामध्ये एकट्यानेच हरण करून पाणीग्रहण केले.||५७|| | अन्याश्चैवांविधा भार्याः कृष्णस्यासन् सहस्त्रशः | भौमं हत्वा तन्निरोधादाहृताश्चारुदर्शनाः ||५८|| अर्थः----याप्रमाणे रुक्मिणी ,जांबवती ,सत्यभामा ,कालिंदी मित्रविंदा ,सत्य भद्रा आणि लक्ष्मणा या पट्टराण्यांचे विवाह सांगून आता दुसऱ्याही स्तीयांचा विवाह प्रकार सांगतो ,हे राजा ,दुसऱ्याही अशा प्रकारच्या श्रीकृष्णाच्या नरकासुराला मारून त्यंच्या बधीगृहातून या श्रीकृष्णानेच आनिलेल्या हजारो सुंदर स्त्रिया होत्या ||५८|| ________________________________________________________________________________________________________________________ |५९--- १---भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह--६-- ________________________________________________________________________________________________________________________ अर्थः-----राजा म्हणाला – ज्या भौमासुराने त्या स्त्रिया कोंडून ठेविल्या होत्या तो भौमासुर भगवंताने ज्या कारणाने व जशा प्रकाराने मारिला असेल ते शार्ग्ङधन्व्या श्रीकृष्णाचे चरित्र मला कथन कर||१|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला – हेराजा,पूर्वी भौमासुराने,वरुणाचे छत्र,इंद्राची माता जी अदिती तिची कुंडलेआणि मेरूपर्वतावर असलेले इंद्राचे मनीपर्वतनामक स्थान हि बलात्काराने हरण केली होती,म्हणून तें भौमासुराचे दुर्वर्तन सत्यभामेच्या घरी भगवंताला इंद्राने कळविले.तेव्हा तिला कौतुक वाटण्याकरिता श्रीकृष्णाने तिच्या सहवर्तमान गरुडावर बसून भौमासुराच्या प्रग्ज्योतीशनामक नगरावर स्वारी केली||२|| अर्थः----गरुडावर बसून जाण्याचे कारण,ते नगर सर्वबाजूंनी असलेल्या पर्वतांच्या दुर्गांनी,तसेच जळ,अग्नि व वायू यांच्या योगाने गमन करण्यास अशक्य होते.आणि येणाऱ्या शत्रूंना आकर्षण करणाऱ्या व छेदन करण्यास अशक्य अशा मुरदैत्याच्या हजारो पाशांनी चोहोकडून वेस्टीत होते||३|| अर्थः----भगवंताने तेथे जावून गदेच्या योगाने पर्वताचे चूर्ण ,बाण सोडून शास्त्रादुर्गाचा भेद केला ,चक्राच्या योगाने अग्नि ,जळ व वायू यांचे शोषण केले ,तसेच खड्गाने मुरदैत्याचे पाश तोडून टाकले||४|| अर्थः-----शास्त्राच्या नादाने प्रवेश करण्यास प्रतिबंधक झालेल्या यंत्राचे व मुरदैत्यादिक शूरांच्या हृदयाचे विदारण केले आणि त्या गदादारी श्रीकृष्णाने ,मोठ्या गदेने तटाचा भेद केला ||५|| अर्थः---त्यावेळी व्रजपातध्वनिसारखा भयंकर झालेला तो पांचजन्यशंखाचा नाद श्रवण करून,खंदकांतील पाण्यांत निजून राहिलेला,पांच मस्तकांचा तो मूर दैत्य तेथून उठला ||६|| अर्थः----आणि प्रलयकाळाच्या सूर्याग्नीसारखा कांतिमान भयंकर व पाहण्याससुद्धा अशक्य अशा दैत्याने,त्रिशूळ उचलून आपल्या पांचमुखांनी त्रैलोक्य ग्रासुनच टाकतो कि काय अशी आपली मुखे पसरून,जसा सर्प गरुडाला मारण्याकरिता धांवतो त्याप्रमाणे तो श्रीकृष्णाला मारण्याकरिता धांवला||७|| अर्थः----आणि त्याने आपला त्रिशूळ गरगर वेगाने गरुडावर फेंकिला आणि आपल्या पांच मुखांनी गर्जना करून त्या नादाने,स्वर्ग,भूमि,आकाशव सर्वथदशा यांना भरून टाकीत ब्रम्हकटाहाला सुद्धा व्यापून टाकिले.||८|| अर्थः----तो त्रिशूळ गरुडाला मारण्यासाठी येत आहे असे पाहून श्रीकृष्णाने अतिवेगाने दोन बाणांनी त्याचे तीन तुकडे करून पाडिले आणि त्या मूरदैत्यालाही पांच मुखाचेठिकाणी पांच बाणांनी प्रहार केला.तेव्हा त्या मुरनेही क्रोधाने कृष्णावर गदा टाकिली||९|| अर्थः-----युद्धांमध्ये मी मुराने टाकिलेली गदा येत असतां श्रीकृष्णाने आपल्या गदेने तिचे हजारो तुकडे करून पाडिले.नंतर बाहू उचलून समोर धांवत येणाऱ्या त्या मूरदैत्याची पांचही मस्तके श्रीकृष्णाने लीलेने चक्राच्या योगाने तोडून टाकिली||१०|| अर्थः-----तेव्हा मस्तके तुटल्यामुळे गतप्राण झालेला तो मुरदैत्य,जसा इंद्राच्या व्रजाने शिखरे तुटलेला पर्वत भूमीवर पडतो त्याप्रमाणे खद्कांतील पाण्यांत पडला.नंतर त्याचे सात पुत्र,पित्याच्या वधाने दुःखित व उसने फेडण्याविषयी क्रोधयुक्त होऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले||११|| अर्थः----त्यांची नांवे – ताम्र,अंतरीक्ष,पवन,विभावसु,वसू,नभस्वान आणि सातवा अरुण हो होत.ते भौमासुराने आज्ञापित होत्साते आयुधे घेऊन युद्धाविषयी पिठनावांच्या सेनाधीपतीच्या पुढे करून नगरांतून निघाले||१२|| अर्थः----भयंकर अशा त्यांनी समोर येऊन श्रीकृष्णावर बाण,खड्ग,गदा,शक्ती,रुष्टी,त्रिशूळ हि आयुधे टाकिली.तेव्हा अमोघपराक्रमी श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रसमूहाचे तोडून तीलप्राय तूकड केले||१३|| अर्थः----आणि मस्तके मंड्या हात पाय व कवके तोडून टाकलेल्या त्या पिठदिकाना यमलोकास पाठवून दिले तेव्हा आपले सेनाधिपती श्रीकृष्णाच्या चक्राने व बनणे मरण पावले असेल पाहून ,ते सहन न करणारा भूमिपुत्र नरकासुर ,गंडस्थळतून माद्स्त्राव होणारे व एरावाताच्या कुलांत उत्पन्न झालेले हत्ति बरोबर घेऊन युध्द करण्यास निघाला||१४|| अर्थः----तेव्हा त्या भौमासुराने,जसा सूर्यावर विजेसाहित काळा मेघ दिसावा त्याप्रमाणे गरुडावर सत्यभामेसहित बसलेल्या श्रीकृष्णाला अवलोकन करून,त्याच्यावर शतघ्निनावांची शक्ति टाकिली,तसाच त्या भौमासुराच्या योध्यांनीही आपल्या आयुधांनी श्रीकृष्णाला एकदम प्रहार केला||१५|| अर्थः----त्यावेळी श्रीकृष्ण भगवंताने,चित्रविचित्र पिसारे असलेल्या तीक्ष्ण बाणांनी ते भौमासुराने सैन्य,ज्याचे बाहू,मांड्या,कंठ व देह तुटून गेले आहेत व ज्यामध्ये हत्ती व घोडे मरण पावले आहेत असे केले||१६|| अर्थः-----हे राजा,त्या सैन्यवधाच्या पूर्वीच जी योद्धयांनीही शस्त्रास्त्रे टाकिली होती ती,श्रीकृष्णाने तिनतीन तीक्ष्ण बाणांनी एकेक याप्रमाणे सर्वथह तोडून टाकिली,म्हणजे त्यांनी टाकलेली शस्त्रास्त्रे प्राप्त होण्याच्या पूर्वीच ते सर्व सैन्य मारून नंतर ती शस्त्रास्त्रे एकेकावर तीन तीन बाण सोडून तोडिली; हे आश्चर्य||१७|| अर्थः----असे त्वरित युद्ध करण्यास गरुडाला वेगही हेतू होता असे सुचवितो – तो भगवान,आपल्या पक्षांनी हत्तींना मारणाऱ्या गरुडाने वाहिलेला होता.त्या युद्धाचे वेळी गरुडाचे आपली चोंच पक्ष व नखे यांनी ताडन केलेले कितीएक हत्ती,अतिपिडीत झाल्यामुळे नगरामध्येच पळून गेले.त्यावेळी एकटा नरकासूरच युद्धामध्ये युद्ध करू लागला,त्या भौमासुराने,गरुडाने पिडीत करून पळविलेले आपले सैन्य पाहून त्या गरुडाला,ज्या शक्तीने व्रजालासुद्धा मागे फिरविले होते त्या शक्तीने प्रहार केला.त्याने ताडन केलेल्याही तो गरुड मालेने ताडन केलेला हत्ती जसा हलतसुद्धा नाही त्याप्रमाणे हाललासुद्धा नाही||१८-२०|| अर्थः----याप्रमाणे गरुडाचेठिकाणी व्यर्थ प्रयत्न झालेल्या त्या भौमासुराने,श्रीकृष्णाला मारण्याकरिता त्रिशूळ ग्रहण केला तो टाकण्याच्या पूर्वीच हरीने तीक्ष्णधारेच्या वज्राने हत्तीवरबसेल्या त्या नरकासुराचेमस्तक छेदन केले||२१|| अर्थः----तेव्हा कुंडासहित,सुंदर किरीटिने व भूषनांनी युक्र असे प्रकाश पावणारे ते नरकासुराने ते मस्तक,भूमीवर पडले असता शोभू लागले.त्यावेळी नरकासुराच्या संबंधीलोकांनी हाहाकार शब्द उच्चारीला,ऋषींनी साधुशब्द उच्चारीला,देव श्रेष्ठ तर श्रीकृष्णावर पुष्पवृष्टि करीत असते स्तुती करूं लागले||२२|| अर्थः----नंतर,नरकासुराची माता मूर्तीची भूमि,श्रीकृष्णाजवळ येऊन तिने,श्रीकृष्णाला रत्नमिश्रित उत्तमपुष्पांनी गुंफिलेल्या वनमालेसहवर्तमान,तापलेल्या सुवर्णाचेठिकाणी कोंदण करून बसविलेल्या रत्नांच्या योगाने देदीप्यमान अशी आदितीची कुंडले,वरुणाचे छात्र आणि मेरुपर्वतावरील मनीपर्वतरूप अधिकार हि सर्व अर्पण केली||२३|| अर्थः----नंतर,हे राजा,हात जोडून नम्रमस्तक झालेली ती भूमि,भक्तीने एकाग्र झालेल्या बुद्धीने ब्राम्हदिकांनी पूजित अशा त्या श्रीकृष्णाची स्तुती करू लागली||२४|| अर्थः---पृथ्वी म्हणाली:---हे देवदेवेश्वरा,शंखचक्रधरा,तुला नमस्कर असो.हे परमात्मन,भक्तांच्या इच्छेनुरूप स्वरूपाचा स्वीकार करणाऱ्या तुला नमस्कार असो||२५|| अर्थः----आतां ज्या मंत्राने कुंतीला पूर्वी श्रीकृष्ण प्रसन्न झाला होता त्या मंत्राने नमस्कार करिते – ज्याच्या नभीचे ठिकाणी जगत्कारणभूत कमल आहे,त्याला नमस्कार असो.ज्याच्या कंठामध्ये सत्कीर्तीमी कमलांची माळां आहे त्याला नमस्कार असो.ज्याचे नेत्र,कमलाप्रमाणे ताप शांती करणारे आहेत त्याला नमस्कार असो.ज्याचे चरण,कमळाप्रमाणे सुसेव्य आहेत त्या तुला नमस्कार असो.||२६|| अर्थः----निरतिशय ऐश्वर्याने युक्त,सर्वभूतांचा आश्रय आणि व्यापक अशा तुजकारणे नमस्कार असो.जगद्रूप,सर्वका यांच्या पूर्वीच असणारा,जगताला कारण मी माया तिचेही कारण आणि पूर्णज्ञानरुपी अशा तुजकारणे नमस्कार असो.||२७|| अर्थः----स्वतां जन्मरहित असून या जगाला उत्पन्न करणारा अशा ब्रम्हरूपी व अनंतशक्ति अशा तुजकारणे नमस्कार असो.हे स्थावरजंगमाच्या उत्पादका,हे पंचभुतांच्या उत्पादक,हे परमात्म्या तुजकारणे नमस्कार असो.||२८|| अर्थः----आता जगाच्या उत्पत्त्यादिकांचे कारण – गुण,त्याचे कारण,प्रधान ( प्रकृती ) त्याचा क्षोभक – पुरुष व तेथे निमित्त काळ असे प्रसिद्ध आहे.मी तेथे काय आहे ? असे म्हणशील तर सांगत्ये – हे प्रभो,जगत्पते,तूंच सृष्टी करण्याची इच्छा धारण केलीस म्हणजे सृष्टीकार्यविषयी उन्मुख अशा रजोगुणाचे धारण करितोस,म्हणजे रजोगुणप्रधान ब्रम्हदेव होऊन सृष्टी उत्पन्न करितोस.तसाच जगाच्या नाशाविषयी उत्कट अशा तमोगुणाचे धारण करितोस म्हणजे तमोगुणप्रधान रुद्रादीरुपी होऊन संहार करितोस.त्याप्रमाणेच जगाच्या पालनाकरिता उत्कट अशा सत्वगुणाचा स्वीकार करितोस म्हणजे सत्वगुण प्रधान विष्णावादिरूपी होऊन पालन करितोस.इतके करूनही त्या गुणांनी तूं अलिप्त आहेस.तसाच तूं काळ प्रधान व पुरुषरुपी असूनही वस्तुतः त्यांहून निराळेच आहेस||२९|| अर्थः---आतां,कार्यकारणात्मक प्रपंचाला तद्रूपपणा व त्याला सर्व प्रपंचाहून निराळेपणा सांगत्ये – हे भगवान,मी भूमि,उदक,तेज,वायू,आकाश,शब्वस्पर्शरूपरसगंध,इंद्रियांचा देवता,मन,चक्षुरादिक इंद्रिये,अहंकार आणि महतत्त्व ( बुद्धी ) अशा प्रकारचे जे चराचर जगअद्वितीय ब्रम्हरूप तुझेठीकानी प्रतीतीला येते,तो हा लोकांचा भ्रम ( बुद्धीमोहच ) आहे||३०|| अर्थः----याप्रमाणे भगवंताची स्तुती करून प्रार्थना करिते कि,- हे शरणागतदुःखनाशका,हा भगदत्तनामक त्या भौमासुराचा पुत्र,मी तुझ्या पायांवर घातला आहे,परंतु हा भ्याला आहे म्हणून तूं याचे रक्षण कर आणि सर्व दोषांची निवृत्ति करणारे आपले हस्तकमळ याच्या मस्तकी स्थापन कर||३१|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:--- हे राजा,याप्रमाणे भक्तीने नम्र झालेल्या भूमीने बाणांनी प्रार्थना केलेला भगवान श्रीकृष्ण,भगदत्ताला अभय देऊन,सर्व भोगसमृद्धींनी युक्त अशा त्या भौमासुराच्या गृहामध्ये प्रविष्ट झाला||३२||
अर्थः----तेथे,पराक्रम करून भौमासुराने राजांपासून व देवसिद्धादिकांपासून आणिलेल्या सोळा हजार एकशे कन्या होत्या त्या भगवंताने अवलोकन केल्या.||३३|| | तं प्रविष्टं स्त्रियो विक्ष्य नरवीरं विमोहीताः | मनसा वव्रीरेsभिष्टं पतिं दैवोपसादितम् ||३४|| अर्थः----तेव्हा दैवाने आपल्या समीप आणून दिलेल्या व घरामध्ये प्रविष्ट झालेल्या मनुष्यश्रेष्ठ अशा त्या श्रीकृष्णाला पाहून अत्यंत मोहित झालेल्या त्या स्त्रियांनी अति आवडणाऱ्या त्या पतीला मनाने वरिले.||३४|| भावार्थ:--- श्रीकृष्ण यांना त्या तुरुंगातील राजाकुमारींनी पाहिले.पाहताच त्या श्रीकृष यांना मोहित झाल्या. श्रीकृष्ण यांना त्यांनी विनंती केली कि,आमचा पत्नी म्हणून स्वीकार करा.श्रीकृष्णांनी त्यांची विनंती मान्य करून सोलाहजर शंभर बरोबर विवाह केला.श्रीक्रून यांनी विनंती मान्य केली,कारण त्यांना भौमासुरांनी कैदेत टाकले असल्यामुळे त्यांच्याशी कोणी विवाह केला नसता,म्हणून स्वत:च विकार केला.आपणही समाजात बहिष्कृत कोणी स्त्री असेल तर आपणास पत्नी नसेल तर अशा बहिसाकृत एकपत्नीवृत राहून स्त्रीचा स्वीकार करावा.त्यामुळे त्या स्त्रीचे जीवन उद्वस्त न होता जीवन सुखी होईल व आपणाकडूनही सामाजिक कार्य होईल.||३४|| अर्थः----ते असे कि,- हा मजकारणे पती होवो.हे माझे इच्छित ब्रम्हदेवाने सत्य करावे.अशा प्रकारच्या अभिप्रायाने प्रत्येक त्या सर्वकन्यांनी श्रीकृष्णांचेठिकाणी आपले हृद्य स्थापन केले||३५|| अर्थः----नंतर,स्नान घालविलेल्या व स्वच्छ वस्त्रे परिधान करविलेल्या त्या कन्यांना,भगवंताने पालख्यांत बसवून द्वारकेत पाठविलेल्या,तशाच रत्नदिकांनी भरलेल्या तिजोऱ्या,रथ घोडे व पुष्कळ द्रव्य हि पाठविली||३६|| अर्थः---आणि श्रीकृष्णाने,ज्यांना चार दांत आहेत व जे अतिवेगवान पांढरे असून ऐरावतच्या वंशांत झत्तलेले आहेत असे चौसष्ट हत्ती पाठविले||३७|| अर्थः----नंतर श्रीकृष्णाने ,इंद्राच्या घरी जाऊन आदितील कुंडले दिली असता ,इंद्राणीसहवर्तमान इंद्राने सत्याभामेसाहित त्या श्रीकृष्णाची पूजा केली||३८|| अर्थः---नंतर शपरत येताना सत्यभामाने सूचना केली असता श्रीकृष्णाने तेथे असलेल्या परीजातानामक वृक्षाला उपटून ,गरुडावर स्थापन करून ,व इंद्रासहित सर्व देवांना जिंकून तो वृक्ष द्वारकेत आणिला ||३९|| अर्थः---सत्यभामेच्या मंदिराजवळ बागेला अत्यंत शोभाविणारा तो पारिजातक वृक्ष त्याचा बागेत स्थापन केला .त्याच्या सुगंधाच्या आसवाविषयी लंपट असलेले भ्रमर स्वरागाव्रून त्याच्या बरोबर द्वारकेत प्राप्त झाले||४०|| अर्थः---इंद्रासहित सर्व देवांना असेब सांगितले त्यावरून इंद्राचा व श्रीकृष्णाचा संग्राम सांगितला.तेथे आपला मनोरथ पूर्ण करणाऱ्या श्रीकृष्णाबरोबर इंद्राचा कसा संग्राम झाला ? अशी शंका आली असतां म्हणतो कि,- ज्या इंद्राने आपले मस्तक नम्र करून किरीटाचया अग्रांनी चरणांना स्पर्श करून भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या त्या श्रीकृष्णाची प्रार्थना केली.पश्चात कार्यभाग झालेला इंद्र,ह्या दुःसाध्य कार्य करणाऱ्या स्वामीबरोबर विरोध करितो.अहो ! देवानांही केवढा क्रोध हा ! तेव्हा धनिकपणाला धिक्कार असो||४१|| भावार्थ:--- इंद्र हा स्वार्थी आहे.जेव्हा त्यास भगवंतांचे गरज असते,तेव्हा भगवंतांस शरण जाऊन,आपले कार्य साधून घेतो.भगवंत त्याचे अनेक वेळेस त्याच्या कार्यास मदत करतात.असा व्यवहार झाल्यानंतर इंद्र याने भगवंत यांच्यासी कृतज्ञ असावयास पाहिजे,पण इंद्र हा कृतज्ञ न राहता कृतघ्न होतो,कारण सकाम कर्म, करून पुण्य होते.त्या पुण्यामुळे स्वर्ग ही गती मिळते.सकाम कर्मामुळे काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर हे शत्रू—विकार नियंत्राणात येत नाही.हे विकार नियंत्रणात न आल्यामुळे त्या जीवाचे आचरण नियंत्रणात राहत नाही.याकरिता सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्माने अंत;करण शुद्ध होऊन कामक्रोधादी नियंत्रणात राह्तात.जे देव पुण्य करून स्वर्गात जातात त्यांना शास्त्रकार त्यांना मूर्ख म्हणतात,कारण तेथील वैभावाच्या अंहकारामुळे त्यांचा धिक्कार करतात—तुच्छ समजतात.म्हणून निष्काम परमार्थ करा.||४१|| | अथो मुहूर्त एकस्मिन् नानागारुषु ताः स्त्रियः | याथोपयेमे भगवांस्तावद्रूपधरोsव्यय: ||४२|| अर्थः----आतां,त्यांचे विवाह सांगतो – पुढे द्वारकेमध्ये गेल्यानंतर एकाच मुहूर्ताचे ठिकाणी जितक्या ( १६१०० ) त्या स्त्रिया होत्या तितक्या गृहाचेठिकाणी तितकी रूपे धारण करणाऱ्या व तितक्या देवक्यादिक बंधूजणांनी युक्त अशा श्रीकृष्णाने,त्या सर्वस्त्रियांचे पाणीग्रहन केले.||४२|| भावार्थ:--- भगवंतांनी एकाच मुहूर्तावर निरनिराळ्या भावनांमध्ये,वेगवेगळी रूपे धारण करून,एकाच वेळेस,त्या सर्व राजाकुमारींचे शात्रोक्त विधीने पाणीग्रहण केले. शात्रोक्त पद्धतीने—विधीने पाणिग्रहण मुहूर्तावर करावे.विधीला व मुहूर्ताला फार महत्व आहे,कारण तो काळ शुभ असतो.शुभ कळत विधी केला तर आपले भावी जीवन शुभ—मंगल—सुखकारक होते,म्हणून शुभ कार्यासाठी मुहूर्ताला फार महत्व आहे.मुहुर्तातच विधी पार पाडवा.तसे न झाले तर जीवनात सफलता येत नाही.||४२|| अर्थः----आतां,केवढे हे त्या स्त्रियांचे भाग्य असे सांगतो – भोग्यपदार्थांच्या समृद्धीने ज्यांच्यासारखी किंवा ज्यांच्याहून अधिक उत्तम अशी दुसरी कोणाचीच गृहे नाहीत अशा त्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांच्या गृहांमध्ये,वियोग राहित्याने,अतर्क्य कर्मे करणारा व स्वानंदाने परिपूर्ण असा तो तो श्रीकृष्ण,जसा एखादा प्राकृतजन,गृहस्थाश्रमधर्माचे आचरण करीत स्त्रियांसहवर्तमान रममाण होतो त्याप्रमाणे लक्ष्मीच्या अंशभूत असलेल्या त्या स्त्रियांसहवर्तमान रममाण झाला||४३|| अर्थः----याप्रकारेकरून ब्रम्हादिक देवही ज्याची प्राप्ति होण्याचा मार्ग जाणत नाहीत तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण,विवाह संबंधाने पती प्राप्त झाला असतां,प्रेमहास्यरहित अवलोकनपूर्वक जो नवा समागम त्याचे ठिकाणी जी विनोदाची भाषणे त्यामध्ये ज्यांना लज्जा प्राप्त होत आहेत अशा त्या स्त्रिया,निरंतर वृद्धिगत होणाऱ्या प्रीतीने त्याचेच सेवन करूं लागल्या||४४|| भावार्थ:--- ज्यांचा श्रीकृष्ण परमात्मा यांनी पत्नी म्हणून स्वीकार केला,कारण त्यांची पूर्व—जन्मातील पुण्याई व आताचे प्रयत्न यामुळे भगवंतांनी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला.म्हणू त्या श्रीकृष्णांची प्रेमाने सेवा करू लागल्या.त्यांच्यात सवती मत्सर कोठेच दिसून येत नाही,कारण त्या श्रीकृष्णांच्या भक्त होत्या.म्हणून आपण मनुष्य देहात आल्यानंतर भगवंतांचे भक्त होण्याचा प्रयत्न करावा.त्यात आपले हित आहे. अर्थः----ते असे कि,- शेंकडो दासी ज्यांच्या आहेत अशाही त्या स्त्रिया,बाहेरून आलेल्या श्रीकृष्णाला पाहून सामोरे जाने,आसन देणे,अर्घ्यदानादिकेकरून पूजा करणे,पाय धुणे,तांबुल अर्पण करणे,चरणाची शुश्रूषावगैरे करून श्रम घालविणे,चंवरी पंखा इत्यादिकांचा वारा घालणे,गंधपुष्पादिकांचे अर्पण करणे,केसांना सुवासिक तेले लाऊन विंचरणे,शय्या हातरणे व भक्ष्यभोज्यादिक पदार्थांचे समर्पण करणे,इत्यादिकेकरून त्या समर्थ पतीचे स्वतां दास्य करीत असत.||४५|| भावार्थ:--- भगवंतांच्या पत्नींना सेवा करण्यासाठी प्रत्येकीला अनेक दासी होत्या.जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या महालात येत,त्यावेळेस प्रत्येक पत्नी श्रीकृष्णांची सेवा स्वत: करत असत.त्या दासींना श्रीकृष्णांची सेवा करू देत नसत.ज्याने सेवा केली,त्याला त्या सेवेचे फळ मिळत असते,म्हणून स्वत: प्रत्येक सेवा करत असत.आपण संत—महात्मा यांची सेवा स्वत: करावी.शिष्याने श्रीगुरूंची सेवा प्रत्यक्ष करावी.भक्ताने देवाची सेवा प्रत्यक्ष करावी.पतिव्रता स्त्रीने पतीची स्वत: सेवा करावयास पाहिजे. ही सेवा फक्त मनुष्य देहात करता येते,अन्य देहात करता येत नाही.आपणास वर्तमान काळात मनुष्य देह मिळालेला आहे.म्हणू आपण भगवंतांची भक्ती करावी.||४५|| _________________________¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬¬-_________________________________________________________________________ |६०--- १-- श्रीकृष्ण-रुक्मिणी-संवाद—७--
__________________________________________________________________________________________________ | कर्हिचित् सुखमासिनं स्वतल्पस्थं जगद्गुरुम् | पतिं पर्यचरद् भैष्मी व्यजनेन सखीजनैः ||१|| अर्थः---श्रीशुक्राचार्य म्हणाला –हे राजा ,एके वेळी मंदिरामध्ये ,आपल्या पर्यकाचे ठिकाणी सुखाने बसलेल्या जगदगुरू श्रीकृष्णापतीचे साखीजानानी परिवेष्टित आशी रुक्मिणी पंख्याने वर घालून सेवन करू लागली||१|| भावार्थ:--- रुक्मिणी माता आपल्या पतीची—श्रीकृष्णांची सेवा सख्यासह करू लागली.म्हणजे सेवेच्या वेळेस सख्या सोबत होत्या.पतीला पंख्याने वारा घालू लागली. आजच्या स्त्रिया पतीची सेवा करत नाही,सेवा केली तरी स्वत: सेवा करत असतांना सख्यांना सोबत घेऊन सेवा करत नाहीत,कारण सेवेत काम विकाराचा अप्रत्यक्ष संबंध येतो,म्हणून एकांतात—एकाट्याच सेवा करतात.रुक्मिणीत काम—विकाराचा कोणत्याच प्रकारे संबंध नव्हता,म्हणून सख्या असतांना सेवा करू लागली.||१|| अर्थः---आता त्या रुक्मिनिचे श्रीकृष्णाचे टिकाणी परम प्रेम सांगण्याकरिता त्याच्या सांगितलेल्या खर्या स्वरूपाचे स्मरण करितो –जो तर ईश्वर लीलेने हे जग उत्पन्न करितो ,पालन करितो व साव्हार करितो तोच स्वत जन्मरहित असूनही आपण केलेल्या धर्ममर्यादा रक्षणाकरिता यादवामध्ये उत्पन्न झाला.||२|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण धर्म—मर्यादाचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात जन्मास आलेले आहेत.स्वत: धर्मानुसार आचरण केले.लोकांना आचरण करून दाखवले,कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करत असतात.म्हणून श्रेष्ठांनी धर्मानुसार आचरण करून जीवन जगावे.त्याचे आचरण पाहून लोक आचरण करत असतात.||२|| अर्थ----आता श्रीकृष्णाचेमंदिर कसेहोते ते सांगतोते मंदिर चकाकणाऱ्या माट्यांचे घोस लोंबत असलेल्या झालारीच्याछताने शुभोषित असून,रत्नमय दीपांनप्रकाशमान होतो .||३|| अर्थ -----बटमोगऱ्याच्या मळणी व दुसऱ्याहि अनेकप्रकारच्या सुगंधीपुष्पाणि युक्त व श्रामारांच्या समुदायाने नादयुक्त होते ,गावाक्षणच्या छिद्रातून आत प्रविष्ट झालेल्या स्वच्छ चंद्रकिरणांनी सुशोभित होते||४|| अर्थः---आरमबागामध्ये शोभित असलेल्या पारिजातक वृक्षावरून आलेल्या आतील सुगंध कारक वायुने तसेच गवाक्षातून बाहेर जात आसलेल्या आतील अगरूच्या धुपणी अतिमनोहर होते ||५|| अर्थः---हे राजा ,अशा त्या प्रसिद्ध अतर्गृहामाद्धे पर्यकावर स्थापन केलेल्या धुधाच्या फेण्यासारख्या मुरडू वशुभ्र अशा परांच्या उत्तम गादिवार आनंदाने बसलेल्या जगन्नीयत्या पतीचे रुक्मिणी सेवन करू लागली||६|| अर्थः---ते असे कि ,-आपल्या सागीच्या हातांतरुण रत्नदंडाची चावरी घेऊन तिच्या योगाने जगत्पालक अशा आपल्या पतीची वर घालून शुश्रुषा करू लागली .श्री कृष्णाच्य समीपभागी ,जिच्या आग्रहास्तामद्धे कंकणे रत्नमुद्रिका व चंवरी आहे जिच्या पायातील मणिमय नुपूरांचा शब्द होत आहे आणि ती स्वताच अत्यंत प्रकाश मान होत आहे ती रुक्मिणी ,मानिखचीत नुपुरांच्या योगाने व पदराच्या कंठाने झाकून घतलेल्या स्तनांना लावलेल्या केशराने लाल झालेल्या हाराच्या कांतीने आणि कमरेच्या ठिकाणी धारण केलेल्या बहुतमोलाच्या मेखालेने विशेष शोभू लागली||७-८|| अर्थ :----जी लक्ष्मीच मनुष्यावातर धारण करणाऱ्या भगवंताला योग्य असे आपले स्वरूप असते ,जी कधीही भगवंताचा वियोग पावत नाही ,आणि मागे कुरुळे केस ,डोहोबजुनी ककर्णामध्ये मकराकार कुंडले ,पुढे कंठामध्ये धारण केलेली पदाकादिक भूषणे ,याप्रमाणे चारी दिशाकडे सुशोभित असलेल्या जिच्या मुखावर मंदहास्य रूप अमृत विलास करीत आहे अशा त्या मूर्तिमंत लक्ष्मीला पाहून संतुष्ट झालेला भ्गाग्वान श्रीकृष्ण ,किंचित हास्य करून भाषण करु लागला कि ||९|| अर्थः---श्रीभगवान म्हणाले:---हे राजकन्ये ,इंद्रदिलोकपालासारख्या एश्वर्यानी युक्त महापराक्रमी ,धनाढ्य व सौदर्य ,औदार्य व बळ यांनी उत्कृष्ट असल्यामुळे वरावयास योग्य अशा रजनी पूर्वी तुझी इच्छा केली आहे आणि भावाने व पित्यानेही त्यांना तू दिली आहे .यास्तव याचना करणाऱ्या ,व मदनाच्या योगाने दुर्दम असलेल्या आणि स्वता प्राप्त झालेल्या त्या शिशुपालादिक राजना सोडून ,अयोग्य अशा आम्हाला तू काय म्हणून वारीलेस .||१०|| अर्थः---तुझे वडील आणि भाऊ यांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता.जे कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते,त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का वरलेस?||११|| अर्थः---हे सुंदरी! जरासंध इत्यादी राजांच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे.बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळ जवळ राजसिंहासनही आम्हांला मिळण्यासारखे नाही.||१२|| | अस्पष्टवर्त्मनां पुंसामलोकपथमियुषाम् | आस्थिताः पदविं सुभ्रुः प्रायः सीदन्ति योषितः ||१३|| अर्थः---हे सुंदरी ! आमचा मार्ग कोणता,हे सुद्धा लोकांना माहित नाही.लौलिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही ! तसेच स्त्रियांना खुषही न करणाऱ्या पुरुषांना वरणाऱ्या स्त्रियांनाबहुधा दुःखच भोगावे लागते.||१३|| भावार्थ:--- आम्ही संसारात जरी असलोत तरी आमचा मार्ग वेगळा आहे.आम्ही लौकिकाचा विशार करत नाहीत.आम्ही शात्राचा विचार करून वागणारे आहोत,पण असे संसारातील लोकांना आवडत नाही.आम्ही स्त्रियांना खुश करत नाहीत,कारण धर्मानुसार वागणारे असल्यामुळे आमच्या वागण्यावर मर्यादा पडतात.म्हनुनाम्ही तुम्हास खुश करू शकत नाहीत.म्हणून आमच्या ज्या पत्न्या होतात,त्यांना दु:ख भोगावे लागते.म्हणून मी विचार करतो कि,रुक्मिणीने पूर्ण विचार केलेला नाही.||१३|| | निष्कीश्चना वयं शश्वन्नीष्किन्चनजनाप्रीयाः | तस्मात् प्रायेन् न ह्याढ्या मां भजन्ति सुमध्यमे ||१४|| अर्थः---जे सुंदरी!आम्ही असे जवळ काही न बाळगणार!आणि जे जवळ काही बाळगत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो.यामुळेच धनवान लोक बहुधा आमच्या वाऱ्यालाही राहात नाहीत.||१४|| भावार्थ:--- श्रीकृष्ण म्हणतात कि,आही जवळ कांही ठेवत नाही.आम्ही जे जवळ कोणी कांही ठेवत नाहीत म्हणजे जे निष्काम आहेत त्यांच्यावर आम्ही प्रेम करतोत,यामुळे तुम्लालासुद्धा जवळ कांही ठेवता येत नाही.तुम्ही जवळ कांही ठेवले तर आमचे प्रेम मिळत नाही.असा आमचा स्वभाव आहे.त्यामुळे धनवान लोक आमच्या नदी लागत नाहीत.धनवान लोक आमची भक्ती करत नाही.तुम्ही तर राजाच्या कन्या आहात.राजे श्रीमंत असतात.तुम्ही असा विचार केलेला नाही.||१४|| | ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतीभवः | तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयो: क्वचीत् ||१५|| अर्थः---ज्यांच्या धन,कुळ,ऐश्वर्य,सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात,त्याचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात.श्रेष्ठ-कनिष्टांचे नव्हते.||१५|| भावार्थ:--- मैत्री किंवा विवाह होण्यासाठी ज्यांचे धन,कुळ,ऐश्वर्य,सौदंर्य आणि प्रताप या गोष्टी समान असतात,त्याच्यात मैत्री व विवाह होत असतात.ज्यांच्यात या गोष्टी समान नाहीत त्यांच्यात मैत्री व विवाह होत नसतात.जरी मैत्री व विवाह झाले तरी टिकत नसतात.मैत्री व विवाह टिकले तरी प्रेमाने टिकत नसतात.म्हणून आपण मैत्री किंवा विवाह करत असतांना आपल्या समान ज्यांचे धन,कुळ,ऐश्वर्य,सौदर्य,प्रताप,संस्कार आणि शिक्षण आहे,त्यांच्यासीच करावा,अन्यासी करू नये.||१५|| अर्थः---हे विदर्भराजकुमारी! दूरदर्शिपणा नसल्यामुळे तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस.||१६|| भावार्थ:--- विदर्भराजकुमारी! तुमच्यात दूरदर्शीपणा [म्हणजे पुढील परिणामाचा विचार न करून निर्णय घेणारा] नसल्यामुळे तुमचा निर्णय चुकला आहे,तुम्ही फसला आहात.तुम्ही जो भिक्षुक पाठवला होता,त्याने माझ्याविषयी खोटी माहिती दिलेली आहे.तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला,यात तुमची चूक झालेली आहे.म्हणून मध्यस्ती विश्वासू असावा.मी गुणहीन असून,त्याने मी फार गुणवान म्हणून सांगितले आहे.आपणही कोणताही व्यवहार करत असतांना दूरदर्शिपणाने निर्णय घ्यावा.तसेच मध्यस्ती हा विश्वासू असावा.मध्यस्ती विश्वासू नसेल,तर धोका होतो.धोका जर झाला तर अहित होत असते.म्हणून विवेकपूर्ण निर्णय घ्यावा.||१६|| | अथात्मनोsनुरुपं वै भजस्व क्षत्रियर्षभम् | येन त्वमाशिष: सत्या इहामुत्र च तवाग्रजः ||१७|| अर्थः---अजूनही तू आपल्याला अनुभव अशा श्रेष्ठ क्षत्रियाशी विवाहबद्ध हो;त्यामुळे तुझ्या इहपरलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील.||१७|| अर्थः---हे सुंदरी!तुला माहितच आहे कि,शिशुपाल,शाल्व,जरासंध,दंतवक्त्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मिसुद्धा माझा द्वेष करीत आहेत.||१८|| | तेषां वीर्यमदान्धानां दृप्तानां स्मयनुत्तये | आनितासी मया भद्रे तेजोsपहरतासताम् ||१९|| अर्थः---हे कल्याणी!सामर्थ्याने मदांध झालेल्या,गर्विष्ठ अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले.||१९|| | उदासीना वयं नूनं न स्त्र्यपत्यार्थकामुकाः | आत्मलब्ध्याssस्महे पूर्णा गेहयोर्ज्योतिरक्रियाः ||२०|| अर्थः---आम्ही खरोखरच देह व घरदार यांविषयी उदासीन आहोत.स्त्री,संतान आणि धन यांची आम्हांला आकांक्षा नाही.आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत.आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्णकाम आहोत.||२०|| भावार्थ:--- श्रीकृष्ण म्हणतात कि,आम्ही देह व घर—दार यापासून उदासीन आहोत.तसेच स्त्री,संतान आणि धन यांची आम्हास आकांक्षा नाही.आम्ही निष्क्रिय आहोत,दिवा जसा साक्षी असतो तसे आम्ही व्यवहाराचे साक्षी आहोत.आत्म्याने आम्ही परिपूर्ण आहोत.भगवंत श्रीकृष्ण जीवब्रह्मऐक्यज्ञानाच्या भूमिकेतून रुक्मिणीस बोलत आहेत.रुक्मिणीस विषयी म्हणून संबोधित आहेत.रुक्मिणीसी विनोदाची भाषा बोलत आहेत.वासविक पाहता त्यांचे बोलणे यथार्थ असून योग्य आहे.त्यांच्यासारखी भूमिका आपलीसुद्धा असावी.असी भूमीला असेल तर जन्म—मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप हौउत,अन्यथा नाही.यासाठी महात्मा यांचा सत्संग करावा.||२०|| | एतावदूक्त्वा भगवानात्मानं वल्लभामिव | मन्यमानामविश्लेषात् तद्दर्पघ्न उपारमत् ||२१|| अर्थ:---श्रीशुक म्हणतात:---श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मीणीला ‘आपणच’यांना सर्वाधिक प्रिय आहे,’असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले.||२१|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण रुक्मिणीपासून कधीच दूर जात नाहीत असे तिला वाटत असल्यामुळे तिचा गर्व हरण करण्याकरिता भगवंत तिला असे बोलत आहेत.वास्तविक पाहता भगवंत प्रत्येकीच्या जवळ राहत असत,कारण त्यांना अनेक रूपे एकाच वेळी धारण करता येत होती.भगवंत परमात्मा प्रत्येक जीवाजावालाच आहेत,पण आपल्याठीकानी अज्ञान असल्यामुळे तसे न वाटता मी एकटाच आहे असे वाटते.आपण देहास मी असे म्हणतोत.वास्तविक आपण परमात्मा आहोत.||२१|| अर्थ---आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले,तेव्हा ती भ्याली.तिचे ह्र्दय धडधडू लागले.चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळया खाऊ लागली.अखेर ती रडू लागली.||२२|| अर्थः---नखांच्या लालीम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली.डोळ्यांतील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षःस्थळे धुऊ लागले.ती मान खाली घालून उभी राहिली.अत्यंत दुःखाने तिच्या तोंडून शब्द फुटेना.||२३|| अर्थः---आत्यंतिक व्यथा,भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली,वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की,तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या.हातातील चवरी गळून पडली.बुद्धी व्याकूळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली.आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी,त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली.||२४|| अर्थः---भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की,विनोदाचे मर्म लक्षात न आलील्या रुक्मिणीला त्यांनी उठविले.तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळलेले.||२५|| अर्थः---हे राजा!भगवंतांनी तिच्या डोळ्यांतील आश्रू आणि दुःखाश्रूंनी भिजलेले स्तन पुसून आपल्या बद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या बाहूं तिला नी आलिंगन करून ,हे राजा सत्वानाचे उपाय जाणणाऱ्या त्या भक्तपालक समर्थ श्रीकृष्णाने ,थट्टेच्या बोलण्याने चित्ताला भ्रम झालेल्या ,दिनदशा पावलेल्या ,व थट्टा करण्यास अयोग्य अशा त्या एकनिष्ट पतीव्रष्टा रुक्मिणीचे कृपेने सात्वन केले.||२७-२८|| भावार्थ:--- रुक्मिणीची अवस्था पाहून भगवंतांनी तिची समजूत घातली,त्यामुळे ती सावध झाली.असेच आपणही आपल्या पत्नीची विनोद किंवा थत्त—मस्करी केली असेल तर,तीस न समजले तर समजूत घालण्याचा प्रयत्न करावा.समजूत न घातली तर गैरसमज होऊन प्रेमात अंतर पडत असते.||२८|| | मा मा वैदभ्र्यसूयेथा जाने त्वां मत्परायणाम् | त्वद्वच: श्रोतुकामेन क्ष्वेल्याssचरितमन्गने ||२९|| अर्थः---श्री भगवान म्हणाला –हे रुक्मिणी ,तू माझ्यावर विनाकारण दुःख दिले असा दोषारोप करू नकोस .तू माझ्याच आश्रयाने राहणारी आहेस असे मी समजतो तथापि हें सुंदरी,माझ्या वचनानें रागावलेली तुं काय बोलत्येस तें ऐक इच्छिणाऱ्या मी थट्टेत हेअसे भाषण केले आहे ,खरेपणाने नव्हे||२९|| अर्थः----आणि जेथे तुझा अधारोष्ट प्रनायकोपाने स्पुरण पावत आहे ,जेथे तुझे सुंदर (वाकडे )भूकुतीतट आहे असे तुझे मुख अवलोकन करण्याकरीत मी हे भाषण केले ||३०|| | अयं हि परमो लाभो गृहेषु गृहमेधिनाम् | यन्नर्मैर्नीयते यामः प्रियया भीरु भामिनि ||३१|| अर्थः----आता कालाहामध्ये कौतुक किवा सुख काय आहे ?असे म्हणशील तर –हे भित्रे स्त्रिये ,स्त्रीसह वर्तमान तात्त मस्करीच्या भाषणांनी जो काळ घालविणे हाच दुःखरूप गृहामध्ये राहणाऱ्या गृहस्थाना परम लाभ (सुखरूप फळ देणारा )आहे ,बाकी सर्व दुःखच आहे||३१|| भावार्थ:--- आपल्या कौटुंबिक जीवनांत कांही हास्य—विनोद करून आनंद लुटण्यास हरकत नाही.तरी पण त्याचा अतिरेक होणे योग्य नाही.||३१|| भावार्थ:--- आपल्य म्हणजे परमात्म्याच्या ऐश्वर्यासामान मी म्हणजे माया नाही,हे बरोबर आहे.तुम्ही सत—चित्—आनंद आहात व मी असत—जड—दु:खरूप आहे.संत—महात्मा--ज्ञानी लोक तुमची सेवा करतात,तर अज्ञानी लोक माझी सेवा करतात. तुम्ही व्यापक तर मी परोछिन्न आहे.मी असार तर तुह्मी सार आहात.||३४|| भावार्थ:--- आपण जे राजे म्हणजे तीन गुण,सत्वगुण,रजोगुण व तमोगुण यांच्या भीतीने अंत:करणात आत्म्याच्या रूपाने विराजमान आहात.आपले वैर इंद्रीयेरूपी राजासी आहे.आपण राजे नाहीत,कारण आपल्या भक्तांनी राजपद म्हणजे अज्ञानांधंकार जो लक्ष चौऱ्याऐंसी योनीस पाठवून दु:ख देणारा आहे,म्हणून त्याचा त्याग केलेला आहे.म्हणून आपण त्याचा स्वीकार करत नाहीत.आपणही परमात्म्याचेच भक्त आहोत,म्हणून गुणांचा त्याग करून आपल्या अंत:करणात परमात्म्याचा अनुभव घ्यावा.आपणही इंद्र्येरूपी जे राजे आहेत,त्यांच्याशी वैर करून त्यांना जिंकून आपण त्यांना शम—दम या साधनाद्वारे आपल्या ताब्यात घ्यावे.राजपद म्हणजे अज्ञान घालवून म्हणजेच त्याचा त्याग करून,ज्ञान प्राप्त करून परमात्म्यासी एकरूप होऊन आपले जन्म—मरण निवृत्त करून सुखरूप होणे जरुरी आहे.||३५|| भावार्थ:--- लौकीकातील पुरुषाप्रमाणे आपण वागत नाहीत,कारण मुनी—महात्मा आपल्या वेदांताचा मकरंदरस सेवन करतात.हा वेदांतरुपी मकरंद विषयीरुपी नरपशुंना कळत नाही,कारण ते अज्ञानी असतात.आपले जे भक्त आहेत,त्यांच्या क्रिया अलौकिक असतात,कारण आपल्याच किर्या अलौकिक असतात.आपले भक्त आपलेच अनुकरण करतात.आपल्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात,कारण आपण सत्—चित्—आनंदरूप आहात,म्हणून तेही सत्—चित्—आनंदरूप होतात.आपणास जन्म—मरण नाही,म्हणून तेही जन्म—मरणरहित होण्याचा प्रयत्न करता.यासाठी ते संत—महात्मा यांचा सत्संग करतात.त्यामुळे ते आपल्याशी एकरूप होतात.||३६|| भावार्थ:--- आपण स्वत:ला निश्किंचन म्हणता,कारण आपण सोडून दुसरी कोणतीच वस्तू विश्वात नाही,म्हणून आपण घरात बसू शकत नाहीत,कारण घरास आपली गवसनी आहे.ज्या देवांची पूजा सर्व लोक करता,ते देव आपली पूजा करता,म्हणजेच आपण देवांचे देव आहात—परमात्मरूप आहात.सर्व लोक पूज्य अशा त्यांना आपण प्रिया आहात आणि ते आपल्याला प्रिय आहात.धनवान लोक आपल्याला भजत नाहीत,कारण त्यांच्या ठिकाणी अंहकार असतो,म्हणून ते इंद्रीयानांच तृप्त करतात.इंद्रियांना कितीही तृप्त केले तरी त्यांची तृप्ती होत नाही,असे त्यांना काळात नाही.तरीपण ते तेच करता.शेवटी मारतात पण इंद्रियांची तृप्ती होत नाही.||३७|| | त्वं वै समस्तपुरुषार्थमयः फलात्मा यद्वान्छया सुमतयो विसृजन्ति कृत्स्नम् | | तेषां विभो समुचितो भवतः समाजः पुंस स्त्रीयाच्छ रतयो सुखदु:खिनोर्न ||३८|| भावार्थ:--- आपणच--परमात्मा चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष आणि त्यांचे त्या पुरुर्थांचे आनंदरूप फलस्वरूप आपणच आहात.म्हणजे जो आनंद तो आपलाच आहे—आपणच आहात.म्हणून जीवांनी मध्यस्तीमार्फत---विषयामार्फत आनंद न घेता प्रत्यक्ष परमात्म्याचा आनंद घ्यावा.,कारण मध्यास्तीमार्फात—विशायान्मार्फात घेतलेला आनंद क्षणी असतो व प्रत्यक्ष घेतलेला आनंद कायमस्वरूपाचा असतो.म्हणजेच जीवाच्या इच्छेनुसार असतो.आपणास आपण विचारावे कि,आनंद कसा असावा वाटतो?तर त्याचे उत्तर येईल कि,’मला—सर्वांना वाटके कि,आलेला आनंद कधीच जाऊ नये व कधीच येऊ नये.ही आपली इच्छा प्रत्यक्ष—परमात्म्याचा आनंद घेतला तरच परिपूर्ण होते.त्यासाठी मात्र मधस्तींचा---विषयांचा त्याग करावा लागतो.मधस्तींचा—विषयांचा त्याग केला कि,परमात्म्याचा आनंद मिळतो.म्हणून आपण मधस्तींचा---विषयांचा त्याग करावा.संत—महात्मा यांना असे कळलेले असते,म्हणून ते मध्यास्तीचा—विषयांचा त्याग करून प्रत्यक्ष परमात्म्यांचा अंड घेतात,म्हणून ते सुखरूप असतात.म्हणून आपण संत—महात्मा हे सेव्य आहेत व आपण सेवक आहोत असा संबंध प्रस्थापित करून त्यांची संगती करून,त्यांचा सत्संग करून ज्ञानाने कळून घेण्याचा प्रयत्न करावा.आपल्यास असे कळले असता आपण अध्यास्तीचा—विषयांचा त्याग करावा असे काळात असते व कळल्यानंतर परिणाम झाला कि मध्यस्तीचा—विषयांचा त्याग करावा वाटतो.परिणाम होण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना करावी लागते.त्यानंतर परिणाम होतो व परिणाम झाला कि त्याग होतोच.यात तिळमात्र शंका नाही.म्हणून निष्काम परमार्थ करणे अत्यंत म्हत्वाचे आहे.निष्काम यासच परमार्थ असे म्हणतात.म्हणून आपण जे लोक स्त्री—पुरुष अधर्माच्या संबंधातून आनंद घेतात,त्यांच्याशी आपण संबंध ठेवत नाहीत.म्हणजे त्यांच्यावर प्रेम—कृपा करत नाहीत.म्हणून आपण अधर्मानुसार विषयांचा संबंधापासून आनंद घेऊ नये,कारण त्यामुळे आपणास भगवंतांचे प्रेम मिळत नाही व त्यामुळे कृपाही मिळत नाही.||३८|| अर्थ:-----नारदांनी भिक्षुकांनी व्यर्थ स्तुती केलले असे जे म्हटले त्याचा परिहार करतो –ज्यांनी प्राण्याच्या पिदारूप दंड टाकीला आहे अशा म्हननशील पुरुषांनी ज्यांचा प्रभाव वर्णन्केला आहे असा तू सर्व जगताचा आत्मा आहे भक्ताचा आत्म स्वरूप देणारा आहे असे जाणूनच मी तुला वरिले आहे .याच्या योगाने तू दुवर दृष्टी न तेविता मला वारीलेस म्हटले होते त्याचाहि परिहार झाला .आता जे मी तुला वरिले ते तरी -तरी तुझ्या भृकुटीचालानापासून उत्पन्न झालेल्या काळाच्या वेगाने ज्यांचे विषय भोग नाहीस होतात त्या ब्रम्हदेव शंकर व इंद्रदिकाचाही त्याग करून तुला बुद्धी पुर्वकच वरिले आहे ,मग दुसऱ्या तुच्छ पुरुषांचा त्याग करून वरिले हे काय सांगावे||३९|| भावार्थ:--- कांही लोकांना शारीरिक व मानसिक कष्टांचा कंटाळा आल्यामुळे आपला उदार—निर्वाह करण्यासाठी भिक्षा मागतात.ती भिक्षा अन्नरूपाने,ती भिक्षा धान्य---रुपाणे,धन—पैसारुपाणे,मान---प्रतिष्ठारूपाने व ऐश्वर्यरूपाने मागतात.असे लोक भगवंतांची प्रसंशा करत नाहीत,कारण त्यांचा उध्येस जगणे—पोट भरणे हा असून जगणे म्हणजे परमाथ करणे हा उध्येस नसतो.म्हणून अशा लोकांना कोणत्याही प्रकारची भिक्षा देऊ नये.भिक्षा मागावी,पण त्या भिक्षेस मर्यादा असावी.भिक्षा ही वस्तूरुपाणे ध्यावी व घ्यावी.घन—पैसारुपाने मुळीच देऊ नये,कारण धन—पैसारुपाने दिल्यास दाट श्यकता योग्य कारणासाठी न वापरता अयोग्य कारणासाठीच वापरली जाते—विनियोग केल्या जातो.म्हणून प्रत्यक्ष जाऊन,कार्याचे स्वरूप पाहून वस्तुरूपाने दिली असता योग्य कार्य होते.उदा—आश्रमात किंवा मंदिरात बांधकाम चालू आहे, त्याठिकाणी आपण किंवा आपला प्रतिनिधी पाठवून कार्याचे स्वरूप पाहून सिमेंट,लोखंड,वाळू,दगडाची गीठठी व मजुरांची मजुरी प्रत्यक्ष व वस्तुरूपाने देण्यात यावी.असे केले असता देणारास पुण्य मिळते व योग्य कार्य करणारास पुण्य मिळते.असे न झाले तर देणारास पाप व घेणारास पाप लागते.म्हणू वस्तुरूपाने प्रत्यक्ष देणे योग्य फळाच्या दृष्टीने हिताचे आहे.क्षमाशील जे संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे,कारण ते निष्काम भक्त आहेत,ते ज्ञानी आहेत,त्यामुळे त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे,म्हणून आपले वास्तविक स्वरूप त्यांना माहित असून आपला त्यांना अनुभव आहे.परमात्म्यास जाणण्यास दुर्द्रर्शीदृष्टी असावयास पाहिजे,कारण नाम—रूपाचा त्याग केल्याशिवाय परमात्म्याची अनुभूती येत नाही.निष्काम सेवा केल्याने आपण प्रेम करतात.प्रेमाशिवाय आपली प्राप्ती होत नाही.जे निष्काम प्रेमी—जन आहेत त्यांना आपण आत्मदान करून कृपा करतात.त्यामुळे जीवांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतात.जीवांनी ब्रह्मदेव,देवराजइंद्र इत्यादींचा त्याग करून आपण परमात्म्याचे वरण—स्वीकार करावा,कारण ब्रह्मदेव असो कि इंद्र असो,तो आपले जन्म—मरण निवृत्त करू शकत नाहीत,तर फक्त परमात्माच करतो.परमात्म्यापुढे काळाचे कांहीच चालत नाही,कारण आपण काळाचे काळ आहात.म्हणून जीवांनी परमात्म्याचा स्वीकार करावा,अन्य मार्ग नाही. ||३९|| अर्थः---हे गदाग्रजा!आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात,हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही.कारण आपण केवळ आपल्या शार्गधनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत.जसा सिंह आपल्या आरोळीत वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो.||४०|| अर्थ:--- हे कमलनयना!जे माझ्या मागे लागतात,त्यांना साधारणपाने कष्टच भोगावे लागतात,असे आपण का म्हणता?प्राचीन काळी अंग,पृथू,भरत,ययाती,गय इत्यादी राजराजेश्वर आपाप ले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते,त्यांना आपलेकाह भावार्थ:--- आपल्याला—परमात्म्यास प्राप्त करून घेण्यासाठी कष्ट लागतात व संसार करण्यासाठीही कष्टच लागतात.कष्ट दोन्ही ठिकाणी आहेत,पण अधिकाशांने परमार्थ करणे हे प्रयत्नात आहे व संसार हा अधिकांशाने प्रारब्धाधीन आहे व फळाच्या दृष्टीने परमार्थात अविनाशी—कायमची सुखरुपता आहे व संसारात तात्पुरते सुखाचे फळ आहे व अंतिम दु:ख आहे.म्हणून प्रराब्धरुपाणे संसारच भोग घ्यावा व परमार्थासाठीच प्रयत्न करावेत.परमार्थ हेच जीवनाचे सार्थक आहे.||४१|| अर्थः-----आता आपणास योग्य असा दुसरा पती वर म्हणून जे सांगितले होते उत्तर असे सांगत्ये कि,आपल्या चांगल्यावाईटाचे विवेचन करण्याविषयी कुशळ व मरणधर्माने युक्त अशी स्वयंवर करणारी कोणती बरे चतुर स्त्री,सर्वगुणांचे स्थान अशा तुझ्या,जनसमुदायाला मोक्ष देणाऱ्या,लक्ष्मीचे ||४२|| भावार्थ:---आपले---परमात्माचे वर्णन संत—महात्मा यांनी केलेले आहे,आपण पाप-तापातून---आधिभैतिक,आधिदैविक व आध्यात्मिक तापातून मुक्त करणारे आहात.आपल्या हृदयात लक्ष्मीचा निवास आहे.आपल्या चरणकमलांचा म्हणजे अधिष्ठांचा---परमात्म्याचा सुगंध घेतल्यावर म्हणजे परमात्म्यांच्या सुखरुपतेचा अनुभव घेतल्यावर अनात्म्यांचा—मायेचा कोणीच स्वीकार करणार नाही.कारण ती दु:खरूप आहे व आपण सुखरूप आहात,म्हणून आपणही परमात्म्याचा स्वीकार करावा.||४२|| अर्थः---हे प्रभो! इह-परलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या,तसेच सर्वांचे आत्मा असणाऱ्या व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे.मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणाऱ्यांचा मिथ्या संसारभ्रम नाहीसा करणाऱ्या व त्यांना आपले स्वरूपसुद्धा देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे.||४३|| भावार्थ:--- आपण मृत्युलोकातील व परलोकातील आशा पूर्ण करणारे आहात.आपण सावांचे आत्मा आहात,म्हणून तुमचा स्वीकार केलेला आहे.आपणही परमात्म्याचाच स्वीकार करावा,कारण ते सुखरूप आहेत.आपणास आपापल्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागते.म्हणून आपण निष्काम परमार्थ करून परमात्म्यासी एकरूप होणे जरुरी आहे.जर आपण भगवंतांचे परमार्थ करून मोक्ष प्राप्त करून घ्यावा.भगवंतांस आपण शरण गेलोत तर ते आपले स्वरूप देऊन टाकतात.||४३|| अर्थः---हे अच्युता!हे शत्रूनाशना!घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहाणारे,बैलांप्रमाणे कामाला जुंपलेले,कुत्र्यांप्रमाने तिरस्कार सहन करणारे,बोक्यांप्रमाने हिंसक,दासाप्रमाणे सेवा करणारे.आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत.जिच्या कानांवर शंकर,ब्रम्हदेव इत्यादि देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या आपल्या कथा आल्या नसतील,तिलाच ते राजे लख लाभ होवोत.||४४|| भावार्थ:--- आपण स्त्रियांच्या अधीन न होता धर्मानुसार तिचे ऐकावे,तर अधर्मानुसार सांगितलेले कोणतेही ऐकू नये.बैलासारखे स्त्रियांचे काम ऐकू नये.कुत्र्याचा कोणीही तिरस्कार करतो,त्याचप्रमाणे संसारातील लोक आपलाही तिरस्कार करतात.दुसऱ्याची हिंसा करू नयेत्यामुळे इतरांना दु:ख होते.म्हणून दुसऱ्यांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करावा.दासस जसे जे सांगितले ते आर्य करावेच लागते.त्यास मानाने कोणतेच कार्य करता येत नाही.अशा स्वभावाचे अनेक राहे मी पाहिलेले आहेत. त्यांचा मी स्वीकार केला नाही.जे संत—महात्मा—भगवंत यांच्या कथा ऐकत नाहीत,त्यांनाच दुष्ट राजे मिळोत,पण मला आपलाच स्वीकार केलेला आहे.आपण संसारिक लोकांची संगती न करता जे पारमार्थिक आहेत,त्यांचीच संगती करून,त्याचाच सहवास करावयास पाहिजे.त्यातच आपले परम हित आहे.||४४|| अर्थः---वरून कातडे,दाढी-मिशा,रोम,नखे आणि केसांनी झाकलेले व आत मांस,हाडे,रक्त,किडे,मल-मुत्र,कफ,पित्त आणि वायू यांनी भरलेले,म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणाऱ्या या शरीराला,जिला आपल्या चरणारवींदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही अशीच मूर्ख स्त्री आपला प्रिय पती समजून भजते.||४५|| भावार्थ:--- वरून कातडे,दाढी—मिशा,रोम,नखे आणि केसांनी झालालेले व आत मांस,हाडे,रक्त,मल--मूत्र,कफ,पित्त आणि वायू यांनी भरलेले,म्हणजेच घाणीचे साम्राज्य असलेले हे स्थुल शरीर जिवंत असून मेल्यासारखे आहे,असे शरीराला मनुष्य देहात येऊन परमार्थ करत नाही अशाच स्त्रिया अज्ञानी पतीचा स्वीकार करतील.आपण मात्र,ज्यांनी सत्संग केलेला आहे,निष्काम भक्ती केलेली आहे,धर्मानुसार आचरण करत आहेत अशाच सात्विक संस्कारित पतीचा स्वीकार करावयास पाहिजे.ज्यांना संत—महात्मा यांचा सत्संग झालेला नही,निष्काम भक्ती केल्याली नाही,अशा मुडद्यांचा स्वीकार करू नये.अशा मुडद्यांच्या पती म्हणून स्वीकार करून सेवा केली तर हित न होता अहित झाल्याशिवाय राहणार नाही.त्यापेक्षा ब्रह्मचारी जीवन जागून संत—महात्मा यांची सेवा करून सत्संग केलेला-- परमार्थ केलेला त्याहून उत्तम आहे.||४५|| अर्थः---हे कमलनयना!आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली,तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे.जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता,तो सुद्धा आपला मोठा अनुग्रह आहे,असे मी मानते.||४६|| भावार्थ:--- आपण आत्माराम आहात,म्हणून आमच्याकडे आपली दृष्टी जात नसली तरी आपण परमात्म्याच्या---चरणकमलांवर दृढ प्रेम करा करावेत.जेव्हा कांही कारणास्तव आपल्याकडे सहज दृष्टी टाकली तरी,आपल्यावर त्यांचा अनुग्रह होतो.म्हणून परमात्याकडे आपली दृष्टी नेहमी असावी.त्यांची दृष्टी आपल्यावर येतेच.||४६|| अर्थः---हे मधुसुदना!एखाद्या अनुरूप वराला माळ घाल,असे आपण म्हणालात.तुमचे हे म्हणणेही मला खोटे वाटत नाही;कारण कधी कधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशीराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाने एखादीचे दुसऱ्या पुरुषावर प्रेम असू शकते.||४७|| | व्यूढायाश्चापी पुंश्चल्या मनोsभ्येति नवं नवम् | बुधोsतिं न बिभृयात् तां बिभ्रूदुभयच्युतः ||४८|| अर्थः---कुलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतर नवनवीन पुरुषांकडे ओढ घेते.बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये.तिला स्वीकारणारा पुरुष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो.||४८|| भावार्थ:--- कुलटा स्त्रीचे मन विवाह हल्यानान्तार्क नानानवीन पुरुष्याकडे जाते,कारण तिच्यावर लग्नाच्या अगोदरचे संस्कार असतात,म्हणून असे होते.त्या कुलात स्त्रीने असा विचार करावा मी आता विवाहित आहे.आता मी पतीची झाली आहे.त्याचप्रमाणे आपण संसार करू परमार्थ जरी करत असलो तरी संसाराचे स्मरण न करता सतत—सतत परमात्म्याचे स्मरण करत जावे.आपण आपण आता संसाराचे नसून आरमात्म्याचे आहोत,असा निश्चय मनात सतत—सतत असावा.बुद्धिमान पुरुषाने संसाराचा विचार मनात कधीच येऊ देऊ नये,तर सात्विक विचार सतत—सतत असावा.कधी पारमार्थिक विचार व कधी संसारिक विचार जर असेल तर संसार होत नाही व परलोकही न मिळता लक्ष चौऱ्याऐसी योनीस भटकत दु:ख भोगावे लागते.म्हणून परमार्थाच करावाअन्याकडे चित्तवृत्ती जाऊ देऊ नये.||४८|| अर्थः---श्रीकृष्ण म्हणाले:---साध्वी!राजकुमारी!तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्ट केली.तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास,तो अक्षरशः खरा आहे.||४९|| भावार्थ:--- कधी—कधी श्रीगुरुजन आपली परीक्षा घेण्यासाठी आपली चित्तवृत्ती कोठे आहे,हे पाहण्यासाठी आपल्यास कमीपणा घेऊन इतरांचे महत्व प्रतिपादन करतात.त्यावेळेस आपण आपली निष्ठा थोडीही विचलित होऊ देऊ नये हे अत्यंत म्हत्वाचे आहे.त्या कसोटीत आपली निष्ठा स्थिरच ठेवावी.||४९|| | यान् यान् कामयसे कामान् मय्यकामाय भामिनी | सन्ति ह्येकान्तभक्तायास्तव कल्याणी नित्यदा ||५०|| अर्थः---हे सुंदरी!तू माझी अनन्य भक्त आहेस.तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील,त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील.शिवाय माझ्यासंबंधीच्या कामना संसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतात.||५०|| भावार्थ:--- सदगुरूच्या कसोटीस आपण उत्तीर्ण झालोत,तर त्यांची आपल्यावर कृपा होते.त्यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते.पारमार्थिक कामना संसार—बंधनात न टाकता,त्या कामनेने सानाराची बंधन निवृत्त होते.म्हणून संसारिक कामना न करता पारमार्थिक कामना कराव्यात.||५०|| अर्थः---हे पुण्याशिले!मी तुझे पतीप्रेम आणि पतिव्रत्य चांगल्या तऱ्हेने पारखले.कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही.||५१|| भावार्थ:---श्रीकृष्ण यांनी त्यांची पत्नी रुक्मिणी माता हिचे पतीप्रेम आणि पतिव्रत चांगल्या रीतीने परीक्षा घेऊन पाहिले.रुक्मिणी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.तसे आपण भगवंत आणि संत—महात्मा यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे जरुरी आहे.त्यामुळे आपले परमकल्याण होते. आपली श्राधाकिंचीतही विचलित होऊ देऊ नये.||५१|| | ये मां भजन्ति दाम्पत्ये तपसा व्रतचर्यया | कामात्मानोsपवर्गेशं मोहिता मम मायया ||५२|| अर्थः---हे प्रिये!मी मोक्ष देणारा आहे.असे असून जे सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दांपत्यसुखाची अभिलाशा करतात,ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत,असे समजावे.||५२|| भावार्थ:--- भगवंत मोक्ष देणारे आहेत,म्हणजे कायमचे दु:ख घालवून कायमचे सुखरूप कारणाते आहेत—जन्म—मरण निवृत्त करणारे आहेत.असे असूनही बरेचजन पुण्य करून संसारातील दांपत्यसुखाची—विषयांची इच्छा करतात.त्यासाठी ते अनेक प्रकारची व्रते आचरण करून व तप करून व्यर्थ विषय—सुखात व्यय--खर्च करतात,कारण सकाम परमार्थ केल्यामुळे त्यांचा दांपत्यसुखाचा मोह निवृत्त होत नाही.याकरिता मोह निवृत्त होण्याकरिता निष्काम कर्म व निष्काम भक्ती करावी.||५२|| | मां प्राप्य मानिन्यपवर्गसम्पदं वान्छन्ति ये सम्पद एव तत्पतिम् | | ते मन्दभाग्या निरयेsपि ये नृणां मात्रात्मकत्वान्निरय: सुसंगम: ||५३|| अर्थः---हे मानिनी! मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तींचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करूनसुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात,माझी नव्हे,ते अभागीच कारण विषयसुख नरकामध्येही मिळू शकते.परंतु त्या लोकांचे मन विषयांमध्येच गुंतलेले असते.म्हणूनच त्यांना नरकात जाणे सुद्धा चांगले वाटते.||५३|| भावार्थ:--- जे विषयी लोक विषयांची आपेक्षा करून संपत्तीचीच इच्छा करतात,परमात्म्याची करत नाहीत त्यांना अभागीच म्हणावे.नरकातसुद्धा कोणत्या—ना कोणत्या विषय आहेत.म्हणून त्यांना नरकात जाणेसुद्धा चांगले वाटते.त्यांना फक्त विषय पाहिजे असतो.एवढे ते तमोगुणी असतात.म्हणून विषयांचा त्याग करावा.||५३|| अर्थः---हे गृहस्वामिनी!तू आतापर्यंत संसार-बंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आहेस,ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे.संसारासक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत.ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची कपटकारस्थाने करीत असतात,त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे.||५४|| भावार्थ:--- स्त्रियांनी जो पती सात्विक आहे,त्याचाच स्वीकार करावा,कारण सात्विक पतीची सेवा करावयास मिळते.सात्विक पतीची सेवा केल्याने पुण्य आधी मिळते. रजोगुणी पतीची सेवा केल्याने सात्विक पतीच्या सेवेपेक्षा पुण्य कमी मिळते.तमोगुणी पतीची सेवा केल्याने राजोगुणीपतीपेक्षा कमी पुण्य मिळते.म्हणून पतिचा स्वीकार करण्यापूर्वीच पतीच्या गुणाचा—स्वभावाचा विचार करुन पतीचा स्वीकार करावा.कोणत्याही एका पतीचा स्वीकार केल्यानंतर पुहा पूर्ण जीवनभर पती बदलता येत नाही.आहे त्याच पतीची जीवनभर सेवा करून सार्थक करून घेता येते.परमार्थ करता येते.पती जिवंत असून बदल्यास पुण्य मिळत नाही.असा विवेक करून जीवन जगावे.पतीची सेवा करत—करत देवाची व संत—महात्मा—सदगुरूंची सेवा करावी.वरील सर्व सेवा सकाम व निष्काम करता येते.सकाम केल्याने संसारातील विनाशी फळ मिळते.निष्काम सेवा केल्याने अंत:कारण शुद्ध होते व निष्काम भक्ती केल्याने अंत:कारण स्थिर होते.ज्ञान प्राप्त करून मोक्ष म्हणजे जन्म—मरण निवृत्त होते.||५४|| अर्थः---हे मानिनी!मला आपल्या घरामध्ये तुझ्या सारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीही दिसत नाही;कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहसाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राम्हणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास.||५५|| भावार्थ:--- पत्नीने आपल्या पतीवरच विशेष म्हणजे सर्वांपेक्षा अधिक प्रेम करावे,त्यामुळे तिला पतीचे विशेष प्रेम मिळून भौतिक सुखही मिळते.तसेच त्यामुळे तिला पुण्य---स्वर्ग किंवा अंत:करण शुद्धता हे फळ मिळते.अंत:करण शुद्धता फळ मिळाल्याने सत्संग करावा वाटतो.सत्संग केल्याने ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो.||५५|| अर्थः---तुझे हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला विद्रूप केले होते आणि अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी द्दूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला.परंतु आमच्याशी वियोग होईल,या भीतीने तू गुपचुपपणे सर्व दुःख सहन केलेस.मला एका शब्दानेसुद्धा तू बोलली नाहीस.ह्या गुणामुळेच तू मला जिंकलेस.(भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन उल्लेख केला असावा.)||५६|| भावार्थ:--- युद्धात तुझ्या भावाला विद्रूप करून सोडून दिली,तरी पण तू मना एकही शब्दाने प्रीतीकुल बोलून दु:ख दिले नाही.तसेच अनिरुद्धच्या विवाहप्रसंगी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने श्रीकृष्णांचा अपमान केल्यामुळे बलरामदादांनी रुक्मीचा वाढ केला.त्यावेळेससुद्धा एकही शब्द प्रतिकूल बोलली नाहीस,कारण रुक्मिणी पतीनिष्ठ असल्यामुळे बलरामदादांना व श्रीकृष्णांना एकही प्रतिकुल शब्द बोलली नाही.यावरून तिचे पतीप्रेम विशेष म्हणजे इतरापेक्षा अधिक दिसून येते.[भगवंत त्रीकालदर्शी असल्यामुळे त्यांनी या वधाचा भविष्यकालीन केला असावा.] पत्नी मातांनी बहीणताईंनी या रुक्मिणीच्या उदाहरणावरून असा बोध घ्यावा कि,आपणसुद्धा रुक्मिणीने जसे प्रेम दिले,असे आपणही आपल्या पतीस प्रेम ध्यावे.एकही शब्द प्रतिकूल बोलू नये.असे वागले असता पतीचेही पत्नीस विशेष प्रेम म्हणजे इतरापेक्षा अधिक मिळते.व्यवहारात देवाण—घेवाणच असते. म्हणून पत्नी व पतीने एकमेकावर विशेष प्रेम करावे.थोडक्यात ज्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार सर्वांवर प्रेम करावे.||५६|| अर्थः---माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास.परंतु माझ्या येण्याला उशीर होत आहे असे दिसेल,तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले.त्यावेळी तू आपले हे शरीर दुसऱ्या कोणासाठीही योग्य नाही,असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास.तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे.आम्ही याची परतफेड करू शकत नाही.फक्त त्याचे कौतुक करतो.||५७|| भावार्थ:--- रुमिनीचा—शिशुपाल नियोजित विवाहप्रसंगी श्रीकृष्णास रुक्मिणीस हरण करून नेण्यास थोडा विलंब झाला कि केला,त्या वेळेस,रुक्मिणीस सर्व जग असार वाटू लागले.त्यावेळेस तिने स्वत:चे शरीर सोडण्याचा निश्चय केला होता,कारण हे शरीर फक्त श्रीकृष्ण सेवेसाठीच आहे आण्यासाठी नाही.श्रीकृष्णभाव महत्वाचा आहे.म्हणून भगवंत श्रीकृष्ण म्हणतात कि,तुझा [रुक्मिणीचा] हा प्रेमभाव मी परतफेड करू शकत नाही.तुझ्या जीवनात तू तुला महत्व न देता तुझ्यापेक्षा मला [श्रीकृष्णांना] महत्व दिले,तुझ्या प्रेमाचे ओझे माझ्यावर [श्रीकृष्ण पतीवर] करून ठेवलेस.त्याचप्रमाणे सर्व माता—भगीणींनी पतीला विशेष महत्व देऊन त्यांच्या आज्ञाचे पालन करून—विशेष प्रेम देऊन जीवन जगावे.रुक्मिणीचा आदर्श आपण घेऊन,आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा.त्यात माता—भगगीणींचेच हित आहे. पतीराजांनीसुद्धा धर्मानुसार तिच्याशी आचरण करावे.शात्रांनी पती व पत्नी या दोघानाही स्वधर्मानुसार आचरण करण्यास सांगितले आहे.आपली पत्नी किंवा पती कसेही असले तरी ज्यांनी—त्यांनी आपल्या स्वधर्मानुसारच आचरण करावे,कारण ज्याला—त्याला ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार फळ मिळताच असते.म्हणून आपण तो पती असो किंवा पत्नी असो ज्यांनी—त्यांनी आपापल्या स्वधार्मांचे पालन करून प्रेमानेच जीवन जगावे.प्रेमाशिवाय जीवन जगणे म्हणजे पशुवत जीवन जगणे होय.||५७|| | एवं सौरतसंलापैर्भगवान्जगदिश्वरः | स्वरतो रमया रेमे नरलोकं विडम्बयन् ||५८|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:---जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिनिबरोबर रममाण झाले.||५८|| भावार्थ:--- श्रीकृष्ण भगवंत असून आपल्याकरिता सर्वांनी कौटुंबिक जीवन पती—पत्नीने प्रेमाने जगावे असा आपणास आचरणात आणून दाखवले आहे,म्हणून आपल्यासाठीच सांगितले आहे.म्हणून आपणही त्यांचा तो आदर्ष्याची आमलाबाजावणी करून म्हणते प्रत्यक्ष पती—पत्नी स्वर्धमाचे प्रेमाने पालन करावे.||५८|| अर्थः---जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्न्यांच्या महालांमध्येसुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत.||५९|| ________________________________________________________________________________________________________________________ |६१---- १---भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे---८--- _______________________________________________________________________________________________________________________ | एकैकशस्ता: कृष्णस्य पुत्रान् दश दशाबला: | अजीजनन्ननमव्बमान्पितुः सर्वात्मसम्पदा ||१|| अर्थ:-----श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा पूर्वी सांगितलेल्या त्या श्रीकृष्णाच्या रुख्मिण्यादिक स्त्रियांना प्रत्येकीला,स्वरूपाचे ठिकाणी असलेल्या सौंदर्यादिक सर्व संपत्तीने केवळ श्रीकृष्णाकडे असे दह दहा पुत्र झाले||१|| अर्थः-----त्या प्रत्येक स्त्रियांनी आपापल्या घरांतून कधीही दुसरेठिकाणी न जाता,सर्वदा घरीच राहणाऱ्या व संभोगादिकांविषयी तत्पर असलेल्या श्रीकृष्णाला पाहून,आपआपला देहच श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे असे मानिले.कारण,त्या स्त्रिया,श्रीकृष्ण आत्माराम आहे हे तत्व जाणणाऱ्या नव्हत्या||२|| अर्थः-----आता,त्याचे आत्मारामत्व स्पष्ट करितो – भगवंताचे कमळाच्या कळ्यासारखे सुंदर जे मुख,विस्तीर्ण जे बाहू व नेत्र,सप्रेम जी हास्यरसयुक्त अवलोकने व मनोहर जी भाषणे त्यांच्या योगेकरून अत्यंत मोहित झालेल्या त्या स्त्रिया,आपल्या अनेक विलासांनी,त्या निजानंदपरिपूर्ण श्रीकृष्णाचे मन स्वाधीन करून घेण्यास समर्थ झाल्या नाहीत||३|| अर्थः----आता,त्यांचे विलास दर्शवितो – गुप्तहास्ययुक्त कटाक्षावलोकनाने सूचित जो अभिप्राय त्याने मनोहरणशाल असलेल्या भ्रुकुटीमंडळाने फेंकलेल्या व सुरतसंबंधी मंत्रांविषयी चतुर असून कामशास्त्रांत प्रसिद्ध अशा अनेकप्रकारच्या मदनबाणांनी ज्याच्या मनाला क्षोभ करण्याविषयी सोळाहजार एकशे आठ स्त्रियाही समर्थ झाल्या नाहीत||४|| अर्थः-----याप्रमाणे ब्रम्हादिक देवही ज्याची प्राप्ती होण्याचा मार्ग जाणत नाहीत तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण,पती प्राप्त झाली असतां,निरंतर वृद्धिगत झालेल्या प्रीतीने,त्या स्त्रीयी,ज्यांमध्ये प्रेमपूर्वक हास्य,अवलोकन व व नूतनसंगमाविषयी उत्सुकता हि मुख्य आहेत अशा अनेक विलासांचे जरी सेवन केले तरी त्याचे मन वश करून घेण्यास समर्थ झाल्या नाहीत||५|| अर्थः----तर शेंकडो दासांनी युक्त अशाही त्या स्त्रिया,बाहेरून आलेल्या कृष्णाला पाहून सामोरे जाने,आसन देणे,अर्घ्यदानादिकेकरून पूजा करणे,पाय धुणे,तांबुल अर्पण करणे,चरणाची शुश्रूवगैरे करून श्रम घालविणे,चंवरी पंखा इत्यादिकांचा वारा घालणे,गंधपुष्पादिकांचे अर्पण करणे,केसांना सुवासिक तेले लाऊन विंचरणे,शय्या हातरणे व भक्ष्यमोज्यादिक पदार्थांचे समर्पण करणे इत्यादिकेकरून त्या समर्थ पतीचे स्वतां दास्य करीत असत||६|| भावार्थ:--- श्रीकृष्ण यांच्या सर्व पत्न्यांना त्यांच्या सेवेसाठी दासी असत,पण जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या महालात जात असत,तेव्हा त्या श्रीकृष्णांची सेवा दासिमार्फात न करता स्वत: करत असत,कारण पतीचे सेवा करणे पत्नीचा धर्म आहे,म्हणून त्या श्रीकृष्णांची सेवा स्वता: करत असत.त्याचप्रमाणे पतीची किंवा संत—महात्मा यांची सेवा आपल्या नौकारामार्फात न करता स्वत: करावी हा आदर्श आपण स्ग्रीकृष्णांच्या पतीनिकडून घेऊन त्यानुसार आचरण करावयास पाहिजे,कारण त्यात आपलेच हित आहे.श्रीकृष्णांची सर्व प्रकारची सेवा स्वत:करत असत.म्हणून आपण आपल्या पतीची सर्व प्रकारची सेवा स्वत: करावयास पाहिजे,त्यामुळे पतीसेवेचे फळ आपणास मिळते.आज—काल आपणास असे दिसून येत आहे कि,आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न असलेल्या हरी नौकारामार्फात तो नौकर स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांच्यामार्फत सर्व काम करून घेतले जात आहे.त्यामुळे यांना कुटुंबाची—पतीची सेवा घडत नाही.त्यामुळे पतीचेही प्रेम पाहिजे तेवढे मिळत नाही.तसेच आपल्या स्थूल—शरीराला पाहिजे तेवढे कष्ट मिळत नाहीत.त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत.त्यामुळे आपले जीवन धन असून दु:ख भोगावे लागत आहे,म्हणून पतीची सेवा स्वत: करा. त्यामुळे नौकारांची गरज पडणार नाही व आपण आजारी पडणार नाहीत.आजारी न पडल्यामुळे दु:ख न मिळता सुख मिळेल.असा विवेक करून जीवन जागा.||६|| अर्थः-----असो.दहा दहा पुत्र असलेल्या श्रीकृष्णांच्या त्या सर्व स्त्रियांमध्ये पूर्वी सांगितलेल्या ज्या रुख्मीण्यादिक आठ पट्टराण्या त्याचे प्रदुम्नादिक पुत्र मी तुला सांगतो श्रवण कर - ||७|| अर्थः---श्रीकृष्णाला रुख्मिणीचेठिकाणी,प्रघुम्न आहे मुख्य ज्यांमध्ये असे चारुदेष्ण,सुदेष्ण,पराक्रमी चारुदेह,सुचारू,चारुगुप्त,भद्रचारू,चारुचंद्र,विचारू आणि दहावा विचारू आणि दहावा चारू असे पराक्रमी पुत्र झाले; सौन्द्र्यादिक गुणांनी पित्या – ( श्रीकृष्णा ) सारखेच होते||८-९|| अर्थः---भानू,सुभानू,स्वर्भानू,भानुमान,चंद्रभानू,बृहभ्दाणु,अतिभाणु,तसाच आठवा अभिमानु- ||१०|| अर्थः------श्रीभाणु आणि प्रतीभाणु असे सत्यभामेचे दहा पुत्र होते.जांबवतीचे सांब,सुमित्र,पुरुजीत,शतजित, सहस्त्रजित,विजय,चित्रकेतू,वसुमान,द्रविड,आणि क्रतू असे दहा पुत्र होत हे सांबादिक दहादी पराक्रमादीकेकरून पित्याला मान्य होते||११-१२|| अर्थः--- वीर,चंद्र,अश्वसेन,चित्रगू,वेगवान,वृष आम,शंकू,वसु आणि तेजाने युक्त असा कुंती हे दहा नग्नजितीला पुत्र होत ||१३|| अर्थः---श्रुत,कवी,वृष,वीर,सुबाहू,भद्रा,एकल,शांती,दर्श,पूर्णमास आणि सर्वांत लहान सोमक कालिंदीचे हे दहा पुत्र होते.||१४|| अर्थः-----प्रघोष,गात्रवान,सिंह,बल,प्रबल,ऊर्ध्वग,महाशक्ती,सह,ओज आणि अपराजित हे दहा पुत्र होत||१५|| अर्थः-----वृक,हर्ष,अनिल,गृध्र,वर्धन,अन्नाद,महाश,पावन,वन्ही आणि क्षुधी हे दहा मित्रविंदेचे पुत्र होते.||१६|| अर्थः--- संग्रामजित,बृहत्सेने,शूर,प्रहारन,अरिजित,जय,सुभद्र,वाम,आणि सत्यक हे दहा भद्रेचे पुत्र होत.||१७|| अर्थः-----दिप्तीमान व ताम्रातप्त इत्यादिक दहा रोहिणीचे पुत्र होते; याप्रमाणे दुसऱ्याही सर्व स्त्रियांचे पुत्र होते.हे राजा,प्रदुन्मापासून रुख्मवतीभार्येठिकाणी महाबळी असा अनिरुद्धनामक पुत्र झाला,ती रुख्मवती भोजनकटनामक नगरामध्ये वास करणाऱ्या रुक्म्याची कन्या होय.असो,दुसऱ्याही श्रीकृष्णपुत्रांना शेंकडो स्त्रियांचेठिकाणी पुत्र व नातू कोट्यवधी झाले.कारण,कृष्णपुत्रांच्याच माता जर सोळा एकशे आठ होत्या तर मग त्यांची संतती फार होईल हे काय सांगावे ! ||१८-१९|| अर्थः---राजाने विचारले:--- हे शुकाचार्य,त्या रुक्म्याने,शत्रूच्या ( श्रीकृष्णाच्या ) ; पुत्राच्या ( प्रदुम्नाला ) आपली कन्या कशी दिली ? कारण,त्या रुक्म्याबरोबर झालेल्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने पराभव केलेला तो रुक्मी,त्या कृष्णाला मारण्याविषयी संधी पाहत होता,तेव्हा त्याच्याकडून कन्या देण्याचा असंभव आहे,यास्तव परस्पर द्वेष करणाऱ्या त्या कृष्णरुक्म्यांचा परस्पर विवाहसंबंध कसा झाला हे मला सांग||२०|| अर्थः----आता रुक्म्याचा अभिप्राय आम्ही कसा जाणावा ? असे म्हणशील तर – आपल्यासारखे योगी आहेत ते,पुढे होणाऱ्या,पूर्वी झालेल्या आणि वर्तमान काळी इंद्रियांनी अगोचर दूर असलेल्या,व मध्ये भिंतवगैरे व्यवधान असलेल्या सर्व वस्तूमात्राला प्रत्यक्ष पाहतात.यास्तव तुला न समजणारे असे कांहीच नाही म्हणून सांगावे||२१|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:--- हे राजा,त्या रुक्मवतीने स्वयंवरामध्ये साक्षात मुर्तिमान मदनच अशा त्या प्रद्दुम्नाला वरिले असता,तेथे कन्या प्राप्त होण्याच्या लोभाने आलेल्या व बलात्काराने कन्या हिरावून घेण्यासाठी युद्ध करण्या प्रवृत्त झालेल्या सर्वही राजांना त्या एकटया रथी प्रद्दुम्नाने जिंकून तिचे हरण केले||२२|| अर्थः----त्यावेळी जरीही रुक्मी,श्रीकृष्णाने अवमान केलेला व त्याच्या वैराचे वारंवार स्मरण करणारा होता तथापि आपल्या बहिणीचे ( रुक्मिणीचे ) प्रिय करावे,म्हणून त्याने,बहिणीचा पुत्र अशा त्या प्रद्दुम्नाचा कन्या दिली म्हणजे अनुमोदन दिले||२३|| अर्थ:-----आता,कृष्णाच्या सर्वही स्त्रियांना एकेक कन्या झाली व त्यांचे विवाह झाले हे सुचविन्याकरिता ज्येष्ठ कन्येला विवाह सांगतो – हे राजा,कृतवर्म्याला बलीनामक जो पुत्र त्याने नेत्रादिसौंदर्ययुक्त अशा चारूमतीनामक रुख्मिणीच्या कन्येला वरिले.||२४|| अर्थः-----कारण,हे राजा,हा बळराम,दूताचे कौशल जाणणारा नसूनही याला दूत खेळण्याचे व्यसन मोठे आहे.असे राजांनी सांगितले असतां,रुक्म्याने बळरामाला बोलावून आणून त्याच्याबरोबर फाशांनी खेळू लागला||२८|| अर्थः------तेव्हा,परिपूर्णधन स्वभावानेच आरक्तनेत्र अशा त्या बलरामाने खोटे वचन ऐकील्याने जसा समुद्र पौर्णिमेचे दिवशी लुब्ध होतो त्याप्रमाणे क्रोधाने लुब्ध होऊन क्रोधाच्या आवेशाने दहा कोटी सुवर्णमुद्रिकांचा पण लाविला.||३१|| अर्थः-----तोही पण फांसे पडण्याच्या क्रमाने बळरामाने जिंकिला.तेव्हा कपटाचा आश्रय करणाऱ्या रुक्म्याने,हे द्रव्य मीच जिंकिले आहे,याविषयी हे जवळ असणारे कालिंगादिक राजे साक्षी देतील असे म्हणाला - ||३२|| | तदाब्रविन्नभोवाणी बलेनैव जितो ग्लहः | धर्मतो वचनेनैव रुक्मी वदती वै मृषा ||३३|| अर्थः-----त्यावेळी आकाश वाणी झाली कि,हा पण फांसे पाडण्याच्या धर्माने बळरामाने जिंकिला आहे.रुक्मी तर – वचनमात्रानेच मी जिंकिले असे खोटे बोलत आहे||३३|| अर्थः-----त्या आकाशवाणीचा अनादर करून मृत्युलोकाने प्रेरित व कालिंगादिक दुष्ट राजांनी सुचविलेला तो रुक्मी त्या बळरामाचा उपहास करीत म्हणाला कि,- ||३४|| अर्थः-----तुम्ही फांशांनी दूत करण्याविषयी कुशळ नसून अरण्यांत राहणारे गोपाल आहां.माझ्यासारखे राजेच फाशांनी क्रीडा व बाणांनी युद्ध करीत असतात,तुमच्यासारखे जे पशुपाल आहेत ते करीत नाहीत||३५|| | रुक्मिनैवम धिक्षिप्तो राजभिश्चोपहासीतः | क्रुद्धः परीघमुद्दम् जघ्रे तं नृम्नसंसदी ||३६|| अर्थः-----अशा भाषणांनी रुक्म्याने तिरस्कार केलेल्या व कालिंगादिक राजांनी उपहास केलेल्या त्या बळरामाने क्रुद्ध होऊन,एक लोखंडाच्या दंड उचलून त्याच्या योगाने त्या मंगलसभेमध्येच त्या रुक्म्याला वध केला||३६|| अर्थः-----आणि जो दांत प्रकाशमान करून बळरामाला हंसला होता त्या,त्वरेने पलायन करणाऱ्या कलिंगराजाला दहाव्याच पावलाचे ठिकाणी धरून क्रुद्ध झालेल्या त्या बळरामाने त्याचे दंत पाडिले||३७|| अर्थः----दुसरेही रुक्म्याच्या पक्षाचे जे कितीएक राजे होते त्यांनाही बळरामाने त्याच परीघाने ताडन केले असता,ज्याचे बाहू.मांड्या व मस्तके छिन्न छिन्न झाली आहेत असे ते,रक्ताने भिजून व भयभीत होऊन पळून गेले||३८|| अर्थः-----हे राजा,याप्रमाणे बळरामाने मेहुण्या रुक्म्याचा वध केला असतां,श्रीकृष्णाने,रुख्मिणी व बळराम यांच्या स्नेहाचा भंग होईल या भयाने चांगले किंवा वाईट कांहीच भाषण केले नाही,म्हणजे चांगले केले असे म्हटले असतां रुक्मीणीला वाईट वाटेल व वाईट केले असे म्हटले असतां बळरामाला वाईट म्हणून कांहीच भाषण केले नाही.||३९|| अर्थः-----नंतर श्रीकृष्णाचा आश्रय असलेल्या व ज्यांचे अनिरुद्धविवाह व शत्रूवध इत्यादिक कार्यभाग सिद्ध झाले आहेत अशा त्या बळरामादिक सर्व यादवांनी,नूतन वरलेल्या चारूमतीनामक स्त्रीसहवार्तमान अनिरुद्धाला श्रेष्ठ रथांत बसवून,त्या भोजनकटनामक नगरांतून द्वारकेमध्ये गमन केले.||४०||-----------------------||४०|| __________________________________________________________________________________________________ |६२--- ३-----ऊषा-अनिरुद्ध-मिलन—१-- __________________________________________________________________________________________________ अर्थ----राजा म्हणाला –हे महायोगिन,यादव श्रेष्ठ अशा अनिरुद्धाने बाणासुराच्या उशानामक कन्येला वरिले .त्याप्रसंगी हरि आणि शंकर यांचे परस्पर भयंकर युद्ध झाले असे आम्ही ऐकिले आहे.हे सर्व चरित्र सविस्तर सांगावयास तूं समर्थ आहेस,यास्तव सांगण्याची कृपा करावी||१|| अर्थः---श्रीशुक म्हणाले:---हे राजा,ज्याने वामनरुपी श्रीहरीला भूमीचे दान केले त्या अतिउदारचित्त बलीराजाचा शंभर पुत्रांमध्ये वडील असा बाणासूरनामक पुत्र होता||२|| अर्थः-----बळीचा औरस पुत्र तो बाणासुर,निरंतर शिवभक्तीविषयी तत्पर,लोकामध्ये सन्मान पावण्यास योग्य.अतिउदारचित्त,सत्यप्रतिज्ञ आणि शंकराच्या उपासनेचे दृढ व्रत धारण करणारा होता. ||३|| अर्थः------तो पूर्वी शोणितनामक नगरामध्ये राज्य करीत असे.त्याला शंकरापासून वर प्राप्त झाल्यामुळे लोकामध्ये आराध्यत्त्वेकरून प्रसिद्ध असे जे देव सर्वही त्याच्या किंकरासारखे होऊन राहिले होते.त्याचे कारण,तो हजार बाहू असल्यामुळे एकेवेळी त्याने,शंकर तांडव नृत्य करीत असतां,आपल्या हजार बाहूंनी एकदम पुष्कळ वाद्ये वाजवून त्याला संतुष्ट केले||४|| अर्थः----तेव्हा सर्वभूतांचा अधिपती,शरण जाण्यास योग्य व भक्तवत्सल अशा त्या भगवान शंकराने,त्याला इच्छित वर मागून घे असे सांगितले असतां,त्याने त्या शंकराजवळ,तूं निरंतर माझ्या नगरीने रक्षण करीत राहा,असा वर मागून घेतला व तो त्याने त्याला दिला.||५|| अर्थः-----एकेवेळी पराक्रमाच्या योगाने दुर्मद झालेल्या त्या बाणासुराने,आपल्या पार्श्वभागाचेठिकाणी असलेल्या त्या शंकराच्या चरणकमळाला सूर्यासारख्या वर्णाच्या कीरीटाने स्पर्श करून म्हणाला कि, - ||६|| अर्थः---“हे महादेवा,सर्वप्राणीमात्रांचा गुरु आणि अपूर्ण मनोरथ असलेल्या पुरुषांचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पवृक्षच अशा तुज ईश्वराला मी नमस्कार करितो||७|| अर्थः-----तूं वरत्वेकरून जे मला हजार बहु दिले आहेस ते केवळ मला भाराकरितांच झाले आहेत;कारण,हजार बाहू धारण करणे हे युद्धाकरिता असून त्या युद्धाविषयी तर तुझ्यावांचून दुसरा माझ्याबरोबर युद्ध करणारा व बळाने माझ्यासारखा योद्धा त्रेलोक्यामध्येही मला मिळत नाही||८|| अर्थः---हे आदिदेवा!एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले कि,मी पर्वत फोडीत दिग्गजांवर चालून गेलो.परंतु तेसुद्धा मला भिऊन पळून गेले.”||९|| भावार्थ:--- आपल्याकडे असलेली सत्ता ती शारीरिक असो,आर्थिल असो,राजकीय असो;तपाची असो किंवा कोणतीही असो ती सत्ता किंवा समर्थे आपण इतरांचे दु:ख घालवून,सुख देण्यासाठी व्यतीत—खर्च करणे फारच हिताचे आहे,त्यामुळे पुण्य मिळून जीव सुखाकडे जात असतो.ती सत्ता किंवा समर्थे अधर्मानुसार व दु:ख देण्यासाठी त्या सत्तेचा किंवा समर्थेचा दूरोपयोग केला तर अधर्मामुळे पाप लागून दु:ख भोगावयास येते.अधर्माचे संस्कार होऊन पुन्हा त्यानुसार वागतो,हे अति अहित होते.||९|| | तच्छ्रुत्वा भगवान् क्रुद्धः केतुस्ते भज्यते यदा | त्वद्दर्पघ्नं भवेन्मूढ संयुगं मत्समेन ते ||१०|| अर्थ:----ते बाणासुराने भाषण श्रवण करून क्रुद्ध झालेला भगवान शंकर म्हणाला कि,- हे मूढा,जेव्हा तुझा ध्वज आपोआप मोडून तेव्हा तुझ्या गर्वाचा नाश करणारे माझ्यासारख्या योद्धयाबरोबर तुझे युद्ध होईल||१०|| अर्थः-----हे राजा,याप्रमाने शंकराने सांगितले असतां तो कुबुद्धी ( बाणासुर ) हर्षयुक्त होऊन,महादेवाने सांगितलेला आपल्या पराक्रमाचा नाशकारक ध्वजाचा भंग केव्हा होईल अशी वाट पहात होत्साता तो कुबुद्धी आपल्या गृहामध्ये प्रविष्ट झाला.||११|| अर्थः------त्याची उषानांवाची कन्या होती.तिला विवाह होण्याच्या पूर्वीच,तिने कधीहीन पाहिलेल्या व न ऐकीलेल्या सुंदर अशा अनिरुद्धाबरोबर स्वप्नामध्ये रतीसुखाचा लाभ झाला||१२|| अर्थः---स्वप्नातच तो न दिसल्याने ती म्हणाली,“नाथ!आपण कोठे आहात ?” असे म्हणताच ती जागी झाली व व्याकूळ होऊन उठून बसली.नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत,असे पाहून अतिशय लज्जित झाली.||१३|| अर्थः-----बाणासुराचा कुंभाडनामक प्रधान होता व त्याची चित्रलेखानामक कन्या असून ती उषेची सखी होती.ती आश्चर्याने युक्त होऊन त्या आपल्या सखीला विचारूं लागली कि,- ||१४|| अर्थः-----हे सुभ्रु,हे राजकन्ये,तुझे पानिग्रह्न करणारा पती मी अजून पाहीला नाही असे असून तूं येथे,हे कांत,असे म्हणून,कोणाचा शोध करितोस ? आणि तुझा मनोरथ तरी कोणत्याप्रकारचा आहे ? ||१५|| अर्थः-----तेव्हा उषा म्हणाली – हे सखी चीत्रलेखे,मी स्वप्नामध्ये,श्यामवर्ण,कमलनयन,पिंवळा पितांबर नेसलेला,पराक्रमाने शोभणाऱ्या अशा बाहूंनी युक्त व स्त्रियांच्या मनाला फार आवडणारा असा कोणीएक पुरुष अवलोकन केला.||१६|| अर्थः---त्याने मला अधरसंबंधी अमृताचे एकवेळ पान करवून पुन्हा त्याची इच्छा करणाऱ्या मला विरह्दु:खसमुद्रांत लोटून देऊन तो कोठे गेला आहे.त्या सुंदर पतीचा मो शोध करीत आहे||१७|| भावार्थ:--- आपण आपल्या मित्रांचे किंवा जे दु:खित आहेत,त्यांचे दु:ख घालवून त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.असा परमार्थ करावा.||१|| | व्यसनं तेsपकर्षामि त्रिलोक्यां यदि भाव्यते | तमानेष्ये नरं यस्ते मनोहर्ता तमादिश ||१८|| अर्थः--- असे म्हणून चित्रलेखेने काही देव,गंधर्व,सिद्ध,चरण पन्नग,विद्दाधर,यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्रे काढली.||१८|| अर्थः---मनुष्यांमध्ये तिने वृष्णिवंशातील शूरसेन,वसुदेव बलराम आणि श्रीकृष्ण यांची चित्रे काढली.नंतर प्रघुम्नाचे चित्र पाहाताच ऊषा लाजली.||२०|| | आनिरुद्धं विलीखीतं विक्ष्योषावाङ्मुखी ऱ्हीया | सोsसावसाविती प्राह स्मयमाना महीपते ||२१|| अर्थः----नंतर लिहिलेल्या अनिरुद्धाला पाहून,ह्गे राजा,त्या उषेने लज्जेने खाली मुख केले,आणि प्रीतीने हास्ययुक्त होऊन जो मी स्वप्नांत पाहिला तो हाच असे सांगितले||२१|| अर्थः-----हे राजा,चित्रलेखेने,उषेने दाखविलेला तो कृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे असे जाणून,ती योगिनी होती म्हणून त्याला आणण्याकरिता आकाशमार्गाने श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या द्वारकेस निघून गेली||२२|| अर्थः-----तेथे सुंदरपर्यंकावर निजलेल्या अनिरुद्धाला योगसिद्धीच्या आश्रयाने उचलून घेऊन पुन्हा शोणितनगरांत आली आणि तिने उषा सखीला तिचा प्रियपती दाखविला.||२३|| | सा च तं सुन्दरवरं विलोक्य मुदितानना | दुष्प्रेक्ष्ये स्वगृहे पुम्भी रेमे प्राद्दूम्निना समम् ||२४|| अर्थः----त्या उषेनेही अतिसुंदर अशा त्या अनिरुद्धाला पाहून हर्षमुखी होऊन,ती इतर पुरुषांनी पाहण्यासुद्धा अशक्य अशा आपल्या गृहामध्ये – त्याच्यासहवर्तमान क्रीडा करूं लागली||२४|| अर्थः-----नित्य जिचा स्नेह वृद्धींगत होत आहे त्या उषेने,त्याला कन्यापुरामध्ये गुप्त राखण अमोलिक वस्त्रे,माळा,सुगंधी,उट्या,धूप.दीप,आसने,सरबतांची पाने,पक्कान्नाची भोजने व अनेक प्रकारची भक्ष्ये समर्पण करून मघुर भाषणपूर्वक शुश्रूशेने त्याचा सत्कार केला असता मोहितचित्त झालेल्या त्या अनिरुद्धने आपले पुष्कळ दिवस निघून गेले हे मुळीच जाणिले नाही||२५-२६|| भावार्थ:--- स्त्रीयांनी सेवा करून,प्रेम देऊन व आज्ञाचे पालन करून आपल्या पतीस प्रसन्न करून घ्यावे.अति—तटी घालून किवा धमकीने आपलेसे करू नका कारण त्यात प्रेम नसते.पती—पत्नीत प्रेमाने जीवन जगण्यात सार्थकता आहे.प्रेमाने जीवन जगण्यात कंटाळा येत नाही तर सहवास पुन्हा—पुन्हा करावासा वाटतो.||२५—२६|| अर्थः-----असो,अनिरुद्धाने तशा प्रकारे गुप्त पणाने भोगीलेल्या,अत्यंत हर्षित असलेल्या त्या आच्छादन करण्यास अशक्य अशा गर्भधारनादिक हेतूंनी पुरुषसंपर्काराहित्यरूप कन्याव्रत नष्ट झालेल्या,त्या उषेला,द्वारपालांनी पाहिले.||२७|| अर्थः----कारण,हे राजा,हा बलराम,दूताचे कौशल जाणणारा नसूनही याला द्दूत खेळण्याचे व्यसन मोठे आहे.असे राजांनी सांगितले असतां,रुक्म्याने बळरामाला बोलावून आणून त्याच्या बरोबर फांशांनी खेळू लागला.||२८|| अर्थः-----त्या दुतामध्ये प्रथमतः बळरामाने सुवर्णाच्या शंभर मुद्रिकांचा नंतर हजार मुद्रिकांचा नंतर दहाहजार मुद्रिकांचा पण लावला.तो तिन्ही संख्येचाही पण,अनुक्रमाने कुशळपणाने फांसे टाकून रुक्म्याने जिंकिला.तेव्हा आपले दांत दाखवून कालिंगराजा बल रामाला हंसला.ते त्याचे हंसणे बलरामाने सहन केले नाही||२९|| | ततः प्रव्यथितो बाणो दुहितुः श्रुतदुषनः | त्वरितः कन्यकागारं प्राप्तोsद्राक्षिद् यदूद्वहम् ||३०|| अर्थः-----नंतर कन्येचे दुषण झाले हे वर्तमान श्रवण करून फार दुःखित झालेला तो बाणासुर,त्या स्थानापासून त्वरेने कन्येला घरी प्राप्त होऊन तेथे त्याने अनिरुद्धाला अवलोकन केले||३०|| अर्थः-----तो कामावताररुपी प्रदुम्नाचा पुत्र सर्व भुवनामध्येच सुंदर,श्यामवर्ण,पितांबर नेसलेला,कमलनयन,बलाढ्य असलेल्या बाहूंनी युक्त,कुंडलाच्या व कुरळ केसाच्या कांतीने व मंदहास्यसहित अवलोकनाणे ज्याचे मुख शोभत आहे असा,सौभाग्य चिन्हे व बहुमूल्य अलंकावगैरे धारण करून सर्वप्रकारे प्रकाश पावणाऱ्या त्या आवडत्या उषेसह वर्तमान क्रीडा करणारा,अंगसंगाने वेळी तिच्या स्तनसंबधी केशर लागलेली बटमोगरीच्या फुलांची मोठी माळ वक्षस्थळावर धारण करणारा आणि तिच्या समोर बसलेला अशा त्या अनिरुद्धाला पाहून तो बाणासुर विस्मित झाला||३१-३२|| अर्थः-----तेव्हा शस्त्रे उचलून धारण करणाऱ्या वीरांनी परिवेष्टित अशा आपल्या जवळ प्रवेश करणाऱ्या त्या बाणासुराला अवलोकन करून,त्या अनिरुद्धाने लोखंडाचा एक मोठा परीघ घेऊन मारण्याच्या इच्छेने,तो जसा दंड धारण करणारा यम उभा राहतो त्याप्रमाणे त्याच्या अग्रभागी उभा राहिला||३३|| अर्थः---आणि घरण्याच्या इच्छेने आपल्या सभोंवार येणाऱ्या त्या शास्त्रपाणी वीरांना,जसा डुकरांचा राजा,आपणास धरावयास येणाऱ्या कुत्र्यांना मारितो त्याप्रमाणे ताडन करूं लागला.तेव्हा ताडित झालेले व मस्तके मांड्या व बहु फुटून गेलेले ते वीर,त्या घरांतून बाहेर पडून जीव घेऊन पळून गेले||३४|| भावार्थ:--- उशास वाटले कि,आपणच त्याला मैत्रिणीच्या सहाय्याने उचलून आणले आहे.आपले त्याच्यावर व त्याचे माझ्यावर प्रेम आहे,म्हणून तिला फार दु:ख झाले.||३५|| ________________________________________________________________________________________________________________________ |६३-- २---श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध---९--- (१७-८-१९वार:---शनिवार पासून सुरुवात ________________________________________________________________________________________________________________________ | अपश्यतां चानिरूध्दं तद्न्धूनां च भारत | चत्वारो वार्षिका मासा व्यतीयुरूनुशोचताम् ||१|| अर्थ:-----श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,इकडे द्वारकेमध्ये अनिरुद्धाला न पाहणाऱ्या व निरंतर त्याचा शोक करणाऱ्या त्याच्या बांधवांचे ( यादवांचे )आषाढ,श्रावण,भाद्रपद व अश्विन हे चार महिने निघून गेले||१|| भावार्थ:--- अनिरुद्ध घरातून जाऊन चार महीणे झाले होते,म्हणून घरातील सर्व दु:खित झाले होते.आपण घरातून कोणी गेले असेल तर लवकर शोध लावावा.||१|| अर्थः----नंतर,नारदापासून,बाणासुराने बद्ध बद्ध केलेल्या त्या अनिरुद्धाची वार्ता,व त्याचे युद्धादिरूप कर्म ( चित्रलेखेने त्यास शोणितपुरांत नेले,त्याने उशेबरोबर क्रीडा केली,उषा गर्भिणी आहे,इत्यादिक ) श्रवण करून,त्याला सोडवून आणण्याकरिता राम व कृष्ण हे ज्यांत पुर:सर आहेत व कृष्णच ज्यांची देवता आहे असे प्रदुम्न,युयुधान गद,सांब,सारण,नंद, उपनंद व भद्र इत्यादिक यादव,बारा अक्षौहिणी सैन्य बरोबर घेऊन शोणितनामक नगराप्रत निघून गेले.आणि त्या यादवश्रेष्ठांनी बाहेरून सर्व दिशांकडून त्या बाणासुराच्या नगराला वेढा घातला||२-३-४|| अर्थः-----तेव्हा,शत्रूंनी मोडून टाकलेल्या आरामबागांनी व फोडून टाकलेल्या बुरुजांनी,उप्परमांड्यांनी व गोपुरांनी विध्वस्त झालेले ते आपले नगर अवलोक करून,क्रोधाने व्याप्त झालेला बाणासुर,बाराच अक्षौहिणी सैन्य घेऊन युद्ध करण्याकरिता नगरांतून बाहेर निघाला.||५|| अर्थः-----बाणासुराच्या साहाय्याकरिता स्कांदादिक पुत्रांसहित व प्रथामादी गणासहित भगवान रुद्र,नंदिकेश्वरावर बसून रामकृष्णाबरोबर युद्ध करूं लागला.||६|| अर्थः-----त्यावेळी कृष्णाचे व शंकराचे आश्चर्यकारक,पाहणारांच्या अंगावर रोमांच उठविणारे व निरंतर शस्त्रपात होत असलेले तुमुल युद्ध झाले.तसेच प्रदुम्न आणि स्कंद यांचे झाले कुभांड आणि कृपकर्ण या बाणासुराच्या दोन प्रधानांचे बलरामाबरोबर युद्ध झाले,सांबाचे बाणपुत्राबरोबर आणि सात्यकीचे बाणासुराबरोबर युद्ध झाले.||७-८|| अर्थः-----त्यावेळी देवांचे अधिपती ब्रम्हादिक,ऋषी,सिद्ध,चारण,गंधर्व,अप्सरा आणि यक्ष हे सर्वही सर्वही विमानांत बसून ते युद्ध पाहण्याकरिता प्राप्त झाले||९|| अर्थः-----तेव्हा,श्रीकृष्णाने शार्गधनुष्यापासून सोडलेल्या तीक्ष्ण अंगाच्या बाणांनी भूत,प्रेत,प्रमथ,गुह्यक,डाकिनी,यातुधान,वेताल,विनायक,प्रेतगन, मातृगण,पिशाच,कुष्मांड आणि ब्रम्हराक्षस या नावांच्या शंकराच्या सेवकगणांस पळवून लाविले||१०-११|| अर्थः----तेव्हा पिना कपांनी शंकराने,शार्गपाणि नानाप्रकारची अस्त्रे सोडिली असता,विस्मयरहित अशा त्या श्रीकृष्णाने त्या अस्त्राचे उलट अस्त्रांनी उपशमन केले||१२|| अर्थः----ते असे कि, - वाय्ववस्त्रावर पर्वतास्र,आग्र्यवस्त्रावर पर्जन्यास्त्र आणि पाशुपतास्त्रावर नारायनास्त्र सोडले||१३|| अर्थ-----नंतर श्रीकृष्णाने जृंभनास्त्र सोडून शंकराला जांभया देत बसण्याजोगे मोहित करून,खड्ग,गदा आणि बाण यांच्या गतीने बाणासुराच्या सेनेचा संहार केला||१४|| अर्थः---इकडे स्कंद ( षडानन ),प्रद्दुम्नाच्या बाणसमूहांनी चोहोंकडून पिडीत झाला असता,आपल्या करचनादिक अवयवांपासन रक्तस्त्राव करीत मयूरवाहनाच्या योगाने युद्धस्थानापासून पळून गेला.||१५|| अर्थः---बलरामाच्या मुसळाने ताडन केलेले कुभांड आणि कुपकर्ण हे दोघेही प्रधान मरण पावले,तेव्हा हतनाथ झालेली त्यांची सैन्ये सर्व बाजूंकडे पळू लागली||१६|| अर्थः-----याप्रमाणे आपले सैन्य जिकडे तिकडे पळत सुटले आहे असे पाहून अतिक्रुद्ध झालेला बाणासुर,समरांगणात आपल्या बरोबर युद्ध करणाऱ्या सात्यकीचा त्याग करून,श्रीकृष्णाच्या अंगावर धावून गेला.||१७|| अर्थ:------आणि युद्धामध्ये अतिगर्विष्ठ अशा त्या बाणासुराने,एकदम आपल्या पांचशे हातांनी धनुष्य घेऊन,दुसऱ्या पांचशे हातांनी प्रत्येक धनुष्यास दोन दोन याप्रमाणे हजार बाणांचे संधान केले||१८|| अर्थः-----ते बाण सोडण्याच्या पूर्वीच भगवान श्रीकृष्णाने,ती सर्व धनुष्ये तोडून टाकिली आणि सारथी,रथ व अश्व यांना मारून जयशंख वाजविला||१९|| अर्थः-----त्यावेळी त्या बाणासुराची काटेरानामक मत होती ती त्या पुत्राच्या प्राणाचे रक्षण करण्याच्या इच्छेने आपले केंस मोकळे टाकून व मग्न होऊन कृष्णाच्या पुढे उभी राहिली||२०|| अर्थः-----तेव्हा श्रीकृष्ण त्या नग्न स्त्रीला न पाहता तीर्यगमुख होऊन दुसरीकडे वळला इतक्यामध्ये विरथी झालेला व धनुष्ये तुटलेला तो बाणासुर,आपल्या शोणितनगरांत प्रविष्ट झाला||२१|| भावार्थ:--- बाणासुराच्या धर्ममाताने आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्थेत ती श्रीकृष्णासमोर येऊन उभी राहिली,त्यामुळे ती बाणासुराची धर्ममाता नग्नावस्थेत आपल्याला दिसू नये म्हणून स्वत:चे तोंड दुसरीकडे वळविले.अशा अवस्थेत बाणासुराचा रथ व धनुष्य मोडल्यामुळे तो त्याच्या नगरकडे पळाला. आपणसुद्धा नग्नावस्थेत एखादी स्त्रीचे सहज दर्शन झाले तिला आपल्या डोळ्यांनी पाहू नये.असे पाहणे अधर्म होऊन पाप होऊन त्यामुके दु:ख भोगावयास येते.||२१|| अर्थः-----इकडे श्रीकृष्णाने शंकराचा भूतगण पळविला असतां,तीन मस्तके व तीन पाय असलेला माहेश्वर ज्वर,आपल्या तापाचे दहाही दिशांना जाळीत असता,युद्ध करण्याकरिता श्रीकृष्णाच्या अंगावर धांवून आला||२२|| अर्थः-----नंतर नारायणदेवाने ( श्रीकृष्णाने ) त्याला पाहून त्याच्यावर आपला शीतज्वर सोडीला,तेव्हा माहेश्वर आणि वैष्णव असे दोघेही ज्वर युद्ध करूं लागले||२३|| | माहेश्वरः समाक्रन्दन् वैष्णवेन बलार्दितः | अलब्ध्वाभयमन्यत्र भीतो माहेश्वरो ज्वरः | | | शरणार्थी हृषीकेशं तुष्टाव प्रयतान्जलिः ||२४|| अर्थः-----त्यांमध्ये वैष्णवज्वराने बलात्काराने पिडीत केलेला महेश्वर ज्वर,मोठ्यांनी आक्रोश करीत असता,श्रीकृष्णाकडून दुसरे अभयस्थान मिळेला तेव्हा भयभत व रक्षणाची इच्छा करणारा तो महेश्वर ज्वर ) हात जोडून श्रीकृष्णाची स्तुती करूं लागला||२४|| अर्थः-----तो आपणालाच मोठा शक्तिमान असे मानून श्रीकृष्णास ताप देण्यास प्रवृत्त झाला असतां जेव्हा आपणच ताप पावला,तेव्हा त्या कृष्णाला परमेश्वर असे जाणून स्तुती करीत म्हणाला कि, - हे प्रभो,ब्रम्हदिकांचा नियंत,सर्वप्राणीमात्राना अंतर्यामीत्वेकरून प्रकाश करणारा,शुद्धचैतन्यघन अशा अनंतशक्ती तुज परमेश्वराला मी नमस्कार करितो.जगाच्या उत्पत्ती स्थितीसंहारविषयी कारण,व वेदाने तात्पर्यवृत्तीने प्रकाशित केलेले असे सर्व क्रियारहित जे ब्रम्ह ते तूंच आहेस||२५|| अर्थः-----आतां,जितके म्हणून साकार पदार्थ आहेत त्यांचेठिकाणी आम्ही पराक्रम चालवितो परंतु निराकार अशा तुझेठिकाणी कोणाचेच प्रभुत्व चालत नाही,तर तूच सर्वांचा प्रभू आहेस असे स्पष्ट करीत स्तुती करितो- गुणांचा क्षोभ करणारा काळ,त्याचे निमित्त कर्म,तेंच फलादीभिमुख होऊन प्रकट झाले म्हणजे देव,त्याचा संस्कार तो स्वभाव,त्याने युक्त असल्यामुळे सुखदुःखाचा भोक्ता जीव,शब्दादिसूक्ष्मभूतरुपी द्रव्य,शरीर,प्राण,अहंकार,अकरा इंद्रिये व पंचमहाभूते मिळून सोळा प्रकारचा विकार,त्या पृथिव्यादिकांचा समुदायरूप लिंग देह आणि त्या लिंगदेहाचा बिजांकुरांसारखा प्रवाह म्हणजे जसा बीजापासून अंकुर उत्पन्न होतो व अंकुरापासून पुन्हा बीज उत्पन्न होते त्याप्रमाणे देहापासून कर्म व कर्मापासून पुन्हा देह होतो.हि सर्वप्रकारची तुझी मायाच आहे तिचा निषेध ( निरास ) ज्याच्या स्वरूपी घडतो त्या तुज परमात्म्याला मी शरण आलो आहे||२६|| अर्थः----आतां,मज देवकी पुत्राचा असा प्रकार कोठून घडणार असे म्हणशील तर – सर्व उपाधींनी रहित असाही तूं,जशा लीलेने स्वीकार केलेल्या मत्स्यादिक अनेक अवतारांनी देवांचे पालन करितोस,त्याकरिता वर्णाश्रमधर्माचे रक्षण करितोस,त्याकरिता त्या धर्माचे आचरण करणाऱ्या साधूंचे रक्षण करितोस व त्याच्या अंगत्त्वेक्रून धर्ममार्गाचा त्याग करून हिंसाधर्माने वागणाऱ्या दैत्यादिकांचा संहार करितोस.याप्रमाणेच हाही तुझा अवतार भूमीचा भार दूर करण्याकरिता आहे,तूं कोणाचाही पुत्र नाहीस.||२७|| अर्थः-----म्हणून अज्ञानेकरून तुझ्या पराभवाविषयी प्रवृत्त होऊन संताप पावलेल्या माझे तूं रक्षण कर,प्रथम थंडी वाजून येऊन नंतर दाह करणारा,भयंकर व दुःखसह अशा तुझ्या शक्तिरूप ज्वराने मी तप्त झालो आहे,यास्तव शरण आलेल्या माझे त्यापासून तूं रक्षण कर.आतां दुसर्याला ताप देणाऱ्या तुला तापच योग्य आहे असे म्हणशील तर – जोपर्यंत विषयप्राप्तीच्या आशेने बद्ध होऊन तुझ्या चरणमुलाची सेवा करीत नाहीत तोपर्यंतच त्या प्राण्यांना ताप होणे योग्य आहे.तुझ्या सेवेविषयी प्रवृत्त झाले त्यांना तो ताप योग्य नाही.||२८|| अर्थः---श्रीभगवान म्हणाले:---“हे त्रिशिरा,तुला मी प्रसन्न झालो आहे,म्हणून माझ्या ज्वरापासून तुला प्राप्त झालेले भय नाहीसे होवो,जो पुरुष,तुझ्या व माझ्या या संवादाचे स्मरण करील त्याला तुज पासून भय प्राप्त होऊं नये||२९|| अर्थः-----याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितले असतां,तो माहेश्वर ज्वर,श्रीकृष्णाला नमस्कार करून तेथून निघून गेला.इकडे बाणासुरहि रथावर बसून युद्ध करण्याकरिता श्रीकृष्णाच्या अंगावर चालून गेला||३०|| अर्थः----तदनंतर हे राजा,परम क्रुद्ध होऊन हजार बाहुनी नानाप्रकारची आयुधे धारण करणारा तो बाणासुर,चक्र आयुध धारण करणाऱ्या श्रीकृष्णावर बाण सोडूं लागला||३१|| अर्थः----तेव्हा वारंवार अस्त्रांचा प्रयोग करणाऱ्या त्याचे बाहुं श्रीकृष्ण भगवंतेने तीक्ष्णधारेच्या चक्राने,जशा वृक्षाच्या शाखा तोडून टाकितात त्याप्रमाणे तोडून टाकिले,||३२|| अर्थः----याप्रमाणे बाणासुराचे बाहू तोडून टाकिले असता,भक्तावर द्या करणारा भगवान शंकर,पुढे होऊन चक्र धारण करणाऱ्या त्या श्रीकृष्णास,असे म्हणाला कि,||३३|| अर्थः----श्रीरुद्र म्हणाला – हे श्रीकृष्णा,तुला न जाणतां हा तुझ्याबरोबर युद्ध करितो हे कांही आश्चर्य नाही.कारण,जे शब्दरूप वेदामध्ये,वाणीला अगोचर म्हणून प्रतिपादन केलेले व सूर्यादिकांचेही प्रकाशक असे ब्रम्ह तेंच तूं आहेस.ज्या तुला शुद्ध चित्त झालेले पुरुष,आकाशासारखा व्यापून राहिलेला व सर्वदोषरहित आहेस असे पाहतात.||३४|| अर्थः----आतां,निर्गुण अशा तुझे ज्ञान तर राहूं दे,परंतु तूं लीलेने स्वीकारलेल्या ह्या ब्रम्हांडदेहाचेही ज्ञान होत नाही,असे सांगण्याकरिता विराटस्वरूपाने स्तुती करितो – ज्या तुझी नाभी आकाश आहे,मुख अग्नी आहे,रेत उदक आहे,मस्तक वर्ग आहे,कारण दिशा आहेत,चरण भूमि आहे,मन चंद्र आहे,दृष्टी सूर्य आहे,अहंकार मी शिव आहे,पोट समुद्र आहेत,बाहू इंद्र आहे.||३५|| अर्थः----ज्याची रोमे ओषधी आहेत,केंस मेघ आहेत,बुद्धी ब्रम्हदेव आहेत,शिश्न प्रजापती आहे व ज्याचे ह्रदय धर्म आहे.तो तूं सर्वलोकांनी प्रतिपादन केलेला विराडरुपी आहेत.||३६|| अर्थः-----आता सातवीती देह असलेल्या माझे नाभी वगैरे अवयव आकाशादिरूपी कसे होतील ? असे म्हणशील तर सांगतो – हे अच्युतस्वरूपा,हा तुझा श्रीकृष्णावतार,धर्माच्या रक्षणाकरिता ,जगाच्या अभ्युदयाकरिता व आमच्यावरही अनुग्रह करण्याकरिता झाला आहे.कारण,आम्ही सर्वही लोकपाळ,तूं आमचे रक्षण केलेंस तरच भूलोकादिक भुवनांचे रक्षण करितो,नाहीतर आम्ही स्वतंत्र नाही||३७|| अर्थः----स्वतंत्र ईश्वर तर तूंच आहेस.कारण,तूंच एक जाग्रतस्वप्नसुषुप्तीरूप तीन अवस्थांनी युक्त असलेल्या जीवांचा प्रकृतीभूत पुरुष,शुद्ध,स्वप्रकाशज्ञानरूप,अद्वितीय,सर्वांचे कारण व वस्तुतः करणार हित असा ईश्वर आहेस.तथापि सर्वविषयांचा प्रकाश होण्याकरिता आपल्या मायेने देवतीर्यकममनुष्यादिस्वरूपेकरून प्रतीतीला येतोस||३८|| अर्थः-----तर मग मी संसारी आहे असे म्हणशील काय ? नाही नाही,तर – हे व्यापका,जसा सूर्य आपल्या मेघरूप छायेने लोक दृष्टीने आच्छादित झाल्यासारखा दिसतो परंतु तो त्या मेघाला व मेघाच्या आड असलेल्या घटादिपदार्थांना प्रकाशित करितो.याप्रमाणे जीवांना आवरण करणाऱ्या कार्यरूप अहंकाराने जीवांच्या दृष्टीने आच्छादिक असल्यासारखा दिसणाराही तूं,स्वप्रकाश असल्यामुळे त्या देहेन्द्रीयादिक गुणांना व त्यांनी युक्त असलेल्या जीवांना प्रकाशित करितोस||३९|| अर्थः-----ज्या तुझ्या मायेने मोहितबुद्धी झालेले पुरुष,पुत्र,स्त्री,गृह इत्यादिकांचेठिकाणी आसक्त होऊन,दुःखसमुद्रामध्ये केव्हांतरी देवादियोनीत उत्पन्न होतात||४०|| भावार्थ:--- भगवंताच्या मायेने जे मोहित होतात,आशक्त होतात.ते संसारचक्रात अडकून चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगतात.म्हणून आपण सत्संग करून निष्काम कर्म व निष्काम उपासना करून ज्ञान मार्गाला मागूनमोक्ष प्राप्त करून आपले जन्म—मरण निवृत्त करून सुखरूप होण्याचा प्रयत्न करावा.||४०|| | देवदत्तमिमं लब्ध्वा नृलोकमजितेन्द्रियः | यो नद्रियेत त्वत्पादौ स शोच्यो ह्यात्मवश्चक: ||४१|| अर्थः-----यास्तव कर्माध्यक्ष अशा तूं दिलेला हा मनुष्यदेह प्राप्त झाला असतांही,रात्रंदिवस विषयासक्त असलेला जो पुरुष,तुझ्या चरणाची सेवा करीत नाही,तो आपणालाच फसवून घेणारा असल्यामुळे शोक करण्यास योग्य आहे.||४१|| भावार्थ:---आपणास मानव शरीर प्राप्त झालेले आहे.फक्त मानव शरीरात परमार्थ करता येतो,अन्य शरीरात परमार्थ करता येत नाही.म्हणून मानव शरीरात आल्यानंतर इंद्रिये व मन ताब्यात घेऊन धर्मानुसार आचरण करावयास पाहिजे.संत—महात्मा यांचा सत्संग करून निष्काम परमार्थ करावयास पाहिजे.त्यानंतर म्हणजे अंत:करण शुद्ध झाल्यानंतर जीवाब्राह्मऐक्यज्ञान प्राप्त करून घ्यावावयास पाहिजे.असे न करता अज्ञानात जीवन जगतात,त्याची अवस्था अतिशय दु:खद होते.||४१|| | यस्त्वां विसृज्यते मर्त्य आत्मानं प्रियमीश्वरम् | विपर्ययेन्द्रियार्थार्थं विषमत्त्यमृतं त्यजन् ||४२|| अर्थः-----कारण,जो मनुष्य,तुझ्याहून निराळ्या पुत्रादिक विषयाकरिता,आत्मा,प्रिय व समर्थ अशा तुझा त्याग करितो ( सेवा करीत नाही ) तो जसा पुरुष अमृत टाकून विष भक्षण करितो त्याप्रमाणे समजला पाहिजे||४२|| भावार्थ:--- परमात्मा सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत.जे लोक आत्मा सोडून अनात्मा जो संसारमध्ये रमतात,गुंततात,आशक्त होताततो अमृत सोडून विष पितो.||४२|| अर्थः-----म्हणून मी,ब्रम्हदेव,इतरदेव व शुद्धचित्त झालेले सर्व ऋषि,हे सर्वही आम्ही,आपला आत्मा,अतिप्रिय व ईश्वर अशा तुला सर्व प्रकारे शरण आहों||४३|| भावार्थ:--- सर्व संत—महात्मा विशुद्ध ऋषी सर्वत्माभावाने आपल्यालाच शरण येतात,कारण आपण सुखरूप आहात,त्या सुखरुपतेसाठी आपल्यालाच शरण येतात.म्हणून आपण—मानव देहात आलेल्या जीवांनी---संसारिक जीवांनी सर्वत्मभावाने भगवंतांस शरण जावे,कारण त्यांच्याशिवाय अन्य मार्ग नाहीच.आपणच अभय देतात.||४३|| अर्थः-----आणि संसाराचा नाश होण्याकरिता,जगताच्या उत्पत्तीस्थितीसंहारांचे कारण,सर्वठिकाणी सम,अत्यंतशांत,समानादी भेदरहित,एक जगाचे व जीवांचे अधिष्ठान,बुद्धीप्रवर्तक,सर्वात्मा व ईश्वर अशा तुझेच सेवन करितो||४४|| भावार्थ:---आपणच ब्रह्मदेव नाव धारण करून जगाची ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार उत्पत्ती करतात,आपणच विष्णूचे रूप धारण करून जगाचे ज्याच्य—त्याच्या कर्मानुसार पालन—पोषण करतात.आपणच महादेवाचे रूप धारण करून ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार संहार करतात.आपण सर्वांच्या ठाई सम दृष्टीने पाहवून त्यांच्याशी समदृष्टीने पाहून त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.आपण सर्वांत श्रेष्ठ आहात,कारण सर्व सत्ता आपल्याकडेच आहे.सर्वांच्या अंत:करणात आपणच आहात.सर्वांचे इष्टदेव आपण आहात,कारण सर्वांना सुख देणारे आपणच आहात.आपणच एक व सत्य आहात.जे अनेक आहेत,ते मिथ्या व आपल्यावर अवलंबून आहेत.त्यांना त्यांची सत्ता नसून,आपल्या सत्तेवर त्यांचे जीवन आहे.सर्वांना आधार आपलाच आहे,म्हणून आपण अधिष्ठान असून इतर सर्व अध्यस्त आहेत. संसार चक्रात सर्व अडकलेले आहेत,म्हणून जे संसार चक्रात जे अडकलेले आहेत त्यांनी भजन केले असता त्यातून भजन करणारांची सुटका होऊ शकते.म्हणून आपण भगवंतांचे भजन करावे.||४४|| अर्थः-----याप्रमाणे आपण भक्ती राहण्याची प्रार्थना करून,आतां आपल्या भक्ताचे ( बानासुराचेही ) कल्याण होण्याची इच्छा करितो हा बाणासुर माझा सेवक असल्यामुळे मला प्रिय व आवडणारा आहे,म्हणून हे देवा,मी याला अभय दिले आहे,यास्तव,जसा प्रऱ्हाचेठिकाणी तूं प्रसाद केला आहेस त्याप्रमाणे याच्यावरही तूं आपला प्रसाद कर,म्हणजे मी याला दिलेले अभयवचन सत्य होईल||४५|| भावार्थ:--- बाणाशूर हा महादेवाचा परम—प्रिया भक्त आहे,त्याचप्रमाणे आपणही भगवंतांचे भक्त होण्याचा प्रयत्न करावा.भगवंत भगवंतांची भक्ती केल्यावर भक्तास अभय—भितीरहित करतात.आपण याच्यावर कृपा करा.भगवंतांची कृपा होण्यासाठी आपण भावन्तांची भक्ती केली कि,निश्चित कृपा होते.यासाठी भक्ती करा.||४५|| | यदात्थ भगवंस्त्वं नः करवाम प्रियं तव | भवतो यद् व्यवसितं तन्मे साध्वनुमोदितम् ||४६|| अर्थः-----याप्रमाणे प्रार्थना केली असता प्रसन्न झालेला जे सांगितलेले ते तसेंच तुझे प्रिय मी करितो.आतां बहुच्छेदन केले हेंही तूं जे निश्चयाने माझ्यासारख्याबरोबर तुझा दर्प घालविणारे युद्ध होईल असे सांगितले होतेंस त्याला मी तशा रीतीनेच चांगले अनुमोदन दिले आहे.त्यांत तुझे कांहीच अनिष्ट केले नाही||४६|| भावार्थ:--- आपण जे सांगितले आहे,त्यनुअरच मी कार्य करत आहे.आपल्याला जे प्रिया आहे,तेच मी करत आहे.आपण पूर्वी जे ठरवले होते,त्यानुसार याचे हात तोडले आहेत.कार्मानुसारच मी फळ देतो.म्हणून आपण सात्विक कर्म करावे,सात्विक फळ मिळते,राजस कर्म करा,राजस फळ मिळते व तामस कर्म करा,तामसच फळ मिळते.थोडक्यात जसे कर्म कराल,तसे फळ मिळत असते.म्हणन जीवांनी सात्विक निष्काम परमार्थ करावा.सकाम कर्मांचा त्याग करावा.त्यातच आपले हित आहे.|४६|| | अवध्योsयं ममाप्येष वैरोचनिसुतोsसुरः | पन्हादाय वरो दत्तो न वध्यो मे तवान्वयः ||४७|| अर्थः-----बळीराजा,माझा भक्त असल्यामुळे त्याचा पुत्र हा असुर,मलाही मारावयाचा नाही;कारण,मी प्रऱ्हादाला तुझ्या वंशांतील पुरुषांचा वध करणार नाही असा वर दिला आहे.||४७|| अर्थः----दर्प घालविण्याकरितांच याचे बाहू मी तोडिले आहेत आणि पृथिविला भारभूत असे जें पुष्कळ सैन्य तेंही मारून टाकिले आहे||४८|| अर्थः----आता याचे चार भूज अवशिष्ट राहिले आहेत ते अजरामर होतील.तसाच हा दैत्य असूनही ज्या अर्थी तुला प्रिय झाला आहे,त्या अर्थी हा तुझ्या पार्षादांमध्ये मुख्य व कोठूनही याला भय नाही असा ( निर्भय होईल||४९|| अर्थः-----याप्रमाणे भगवंताच्या वचनाने अभय प्राप्त झाले असतां,त्या बानासुराने मस्तकाने श्रीकृष्णाला नमस्कार करून,त्याने उषा स्त्रीसहवर्तमान अनिरुद्धाला रथावर बसवून श्रीभगवान म्हणाला – हे भगवन् ( शंकरा ),मला तूं त्याठिकाणी आणिले||५०|| अर्थः-----नंतर,श्रीरुद्राने द्वारकेत जाण्याविषयी अनुमोदन दिलेला श्रीकृष्ण,आंदण दिलेल्या एक अक्षौहिणी सेनेने परिवेष्टित व उत्तम वस्त्रादिकांनी भूषित अशा त्या सपत्नीक अनिरुद्धला पुढे करून निघाला||५१|| अर्थः----नंतर द्वारकेतील लोक,सुह्र्द व ब्राम्हण यांनी सामोरे येऊन सत्कार केलेल्या त्या श्रीकृष्णाने,शंख,नगारे,दुंदुभी इत्यादिक वाद्याच्या गजरासहवर्तमान,तोरणासहित ध्वजांनी अलंकृत जिच्यामध्ये मार्गाचे व आंगण्याचे सेवनवगैरे केलेले आहे अशा त्या आपल्या द्वारकाराजधानीत प्रवेश केला.||५२|| | य एवं कृष्णविजयं शंकरेण च संयुगम् | संस्मरेत् प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजयः ||५३|| अर्थः-----हे राजा,अशा प्रकारच्या श्रीकृष्णाच्या विजयाचे व शंकराबरोबर झालेल्या युद्धाचे,जो पुरुष प्रात:काळी उठून स्मरण करील त्याला शत्रूंपासून पराजय कधीही प्राप्त होणार नाही.||५३|| भावार्थ:--- जो कोणी भगवान श्रीकृष्ण आणि शंकराचे युद्धाची कथा श्रद्ध्येने श्रवण करतो—ऐकतो,स्मरण करतो,त्याचा कधीच पराजय होत नाही,म्हणून नेहमी या कथेचे श्रवण करावे व स्मरण करावे.आपणास त्याद्वारे निश्चित विजय प्राप्त होणार.असे असे असले तरी मात्र धर्मानुसार आचरण करावे.||५३|| ________________________________________________________________________________________________________________________ |६४--- ३---नृग राजाची कथा---१--- ________________________________________________________________________________________________________________________ | एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः | विहर्तुं साम्बप्रद्दुम्नचारूभानुगदादयः ||१|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:---हे राजा,एकेवेळी सांब,प्रद्युम्न,चारुभानु,गद इत्यादिक यादवकुमार,क्रीडा करण्याकरिता उपवनामध्ये निघून गेले.||१|| अर्थः-----आणि त्या उपवनामध्ये फारवेगळपर्यंत क्रीडा करून तृषाक्रांता झालेले ते,पाण्याचा शोध करीत असतां त्याचे ठिकाणी निर्जळकुपामध्ये पडून राहिलेला एक अद्भुत प्राणी त्य्नाच्या दृष्टीस पडला||२|| | कृकलासं गिरीनिभं विक्ष्य विस्मितमानसा: | तस्य चोद्धरणे यत्नं चक्रुस्ते कृपयान्विताः ||३|| अर्थः-----त्या पर्वतासारख्या मोठ्या सरड्याला पाहून विस्मतचित्त व कृपायुक्त झालेले ते कुमार,त्याला कुपांतून बाहेर काढण्याविषयी यत्न करूं लागले||३|| भावार्थ:--- आपल्या दयाभावाने इतरांचे दु:ख नाहीसा करण्याचा प्रयत्न करावा.त्या कार्यामुळे आपणास परोपकार घडून ज्यांचे दु:ख नाहीसे केले त्यांचेही हित होते.||३|| अर्थः----ते बालक,कुपांत पडलेल्या त्या सरड्याला कातड्याला व सुताच्या फासांनी बांधून बाहेर काढूं लागले परंतु त्याला कुपांतून बाहेर काढण्याविषयी ते समर्थ नाहीत.तेव्हा त्याला बाहेर काढण्याविषयी उत्कंठीत झालेल्या त्या बालकांनी ते वर्तमान श्रीकृष्णाला कळविले||४|| भावार्थ:--- आपण हाती घेतलेले कार्य आपणांकडून होत नसेल तर आपण वरिष्ठांचे सहकार्य घेऊन ते कार्य पूर्ण करावेच.त्यामुळे आपणास परोपकार घडतो||४|| | तत्रागत्यारविन्दाक्षो भगवान् विश्वभावनः| विक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ||५|| अर्थः-----तेव्हा विश्वपालक असा तो भगवान श्रीकृष्ण,तेथे येऊन त्याला पाहून त्याने त्या सरड्याला डाव्या हाताने अनायासानेच कुपांतून बाहेर काढिले||५|| | स उत्तमश्लोककराभिमृष्टो विहाय सद्दः कृकलासरुपम् | सन्तप्तचामीकरचारूवर्णः स्वर्ग्यद्भूतालन्करणाम्बरस्त्रक् ||६|| अर्थः-----तेव्हा उत्तमश्लोक भगवंताच्या हाताने स्पर्श केलेला तो प्राणी,तत्काळ सरड्याचे स्वरूप टाकून,ज्याचा तापलेल्या सुवर्णासारखा सुंदर वर्ण आहे व ज्याने अद्भुत अलंकार,वस्त्रे व माळा धारण केल्या आहेत असा तो देवरुपी झाला||६|| अर्थः-----त्याचे सरठजन्म प्राप्त होण्याचे कारण जाणत असणाऱ्याही श्रीकृष्णाने,ते लोकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी त्याला विचारिले कि,- हे महाभाग्यवंता,अतिसुंदरस्वरूपी असा तूं कोण आहेस ? मी तर तुला देव श्रेष्ठ आहेस असे मानितो||७|| अर्थः---हे कल्याणमूर्ते,हि सरठयोनी प्राप्त होण्यास योग्य नसणाराही तूं,ह्या दशेला कोणत्या कर्माने प्राप्त झाला आहेस ? तसाच पूर्वी तूं कोण होतास ? हे सर्व तुझ्या मुखांतून ऐकण्याची इच्छा करणाऱ्या आम्हांला,सांगण्यास योग्य आहे असे जर तुला वाटत असेल तर तूं आपला वृत्तांत आम्हांस सांग.||८|| अर्थः---श्रीशुक म्हणतातः---हे राजा,याप्रमाणे अनंतमूर्ती श्रीकृष्णांने प्रश्न केलेला तो नृगराजा.सूर्यासारख्या वर्णाचा किरीट धारण केलेल्या आपल्या मस्तकाने श्रीकृष्णाला नमस्कार करून म्हणाला कि, - ||९|| | नृगो नाम नरेन्द्रोsहमिक्ष्वाकुतनयः प्रभो | दानिष्वाख्यायमानुषे यदि ते कर्णमस्पृशम् ||१०|| अर्थः---नृग म्हणाला:---हे प्रभो,मी इक्ष्वाकु पुत्र नृगनामक राजा आहे.दान करणाऱ्या लोकांच्या कथा निघाल्या असतां माझी गोष्टही तुझ्या कानांवर केव्हांतरी प्राप्त झालीच असेल||१०|| अर्थः---हे नाथा,सर्व प्राण्याच्या बुद्धीचा साक्षी आणि काळाच्या योगाने ज्याचे ज्ञान कधीच लोप पावत नाही अशा तुला न समजलेले काय बरे आहे ? कांहीच नाही.तथापि तुझ्या आज्ञेने तूं विचारलेल्याचे उत्तर मी सांगतो||११|| अर्थः----भूमीवर जितके म्हणून वाळ्वेचे कण आहेत किंवा आकाशामध्ये जितके तारागत आहेत अथवा वृष्टि होऊं लागली असतां जितक्या उदकाच्या धारा पडतात तितक्या ( असंख्यात ) गाई मी दान दिल्या आहेत||१२|| अर्थः----त्यातरी गाई,पुष्कळ दुध देणाऱ्या,प्रथम प्रसूत झालेल्या,सुस्वभाव सुंदर रूप व पुष्कळ तूप होण्याच्यावगैरे गुणांनी युक्त,कपिलवर्ण,सुवर्णाने शिंगे बांधविलेल्या,न्यायाने संपादन केलेल्या,रूपयाने खुर बांधविलेल्या,झुली,सुवर्णपुष्पांच्या माळा व अलंकार घातलेल्या व सवत्स अशा मी दिल्या आहेत.||१३|| भावार्थ:---आपण ज्या वस्तूचे दान करतो ती वस्तू चांगली असावी.उदा—गाय दान देतेवेळी १---ती गाय दुधाळ—दुध देणारी असावी,२---ती तरुण म्हणजे पहिल्या वेताची असावी.३---साध्या म्हणजे ज्या हेतूने दिलेली असते,तिच्यात ती क्षमता असावी.४---ती गाय दिसावयास सुंदर असावी,५---सुलक्षणी असावी म्हणजे गाईच्या सर्व लक्षणाने संपन्न असावी आणि कपिला म्हणजे पहिल्या वेताची असावी.आपणास जी वस्तू दान करावयाची आहे,ती वस्तू धर्मानुसार मिळवलेली असली पाहिजे—न्यायार्जीत पाहिजे.असी वस्तू दान केली तर पुण्य मिळते,असी वस्तू दान न केली तर दान करून पाप लागते.म्हणून धर्मानुसार—न्यायमार्गानुसार असावी.||१३|| अर्थः----आणि त्यातरी वैराग्यादिक गुणांनी व शांत्यादिक स्वभावांनी युक्त,कुटुंबवत्सल,सदाचारसंपन्न,तपाच्या योगाने प्रख्यात,शिष्यांना वेदांचे अध्ययन करविण्याविषयी अतिउदार,समचित्त,तरून व अलंकारांनी पूजित अशा ब्राम्हणश्रेष्ठानांच दिल्या आहेत.||१४|| भावार्थ:--- आपणास दान देण्यासाठी सत्पात्र असावा.सत्पात्र हा १--सद्गुणी—धर्मानुसार वागणारा,२--शीलसंपन्न म्हणजे चारित्रसंपन्न,३—कुटुंब—पोषण करण्यास असमर्थ असावा म्हणजे आर्थिकदृष्ट्या धनहीन असावा.४—सत्यशील म्हणजे धर्मानुसार वागणारा,सत्याने,न्यायाने वागणारा असावा,५—तपस्वी म्हणजे भगवंतांच्या नामोच्चार करून पुण्यवान,परोपकारी,उपवास--व्रत करणारा,६--वेदपाठी म्हणजे वेदाचे अध्ययन करणारा,वेदातील मंत्र मुखोद्गत करून कर्मकांड करून घेणारा,७—शिष्यांना वेदविध्या—वेदांत विद्या दान करणारा असावा म्हणजे ही विद्ध्या विक्री करणारा नसावा.८—चारित्रसंपन्न म्हणजे धर्मानुसार व नीतीनुसार वागणारा असावा.असा सत्पात्र असला व त्यास दान दिले असता पुण्य होते—निष्काम दान दिले असता अंत:करण शुद्ध होते.म्हणून सत्पात्रास दान देणे हिताचा असते.जो असत्पात्र आहे,त्यास दान देऊ नये,दिल्यास पाप—दु:ख अहित होते.म्हणून सत्पात्रासच दान देणे हिताचे आहे.असा करून निर्णय घ्यावा.असे कळण्याकरिता महात्मा यांचा सत्संग करावा.||१४|| अर्थः---केवळ गाईच दिल्या असे नाही तर,भूमि,सुवर्ण,घरे,घोडे,हत्ती,दासिंसहित कन्या,तिळांचे पर्वत,चांदी,अंथरुणे,वस्त्रे,रत्ने,भांडीकुंडी व रथ हिंही दिली आहेत,अग्निष्टोमादी यज्ञ केले,वापी कूप तळी व देवालये बांधिली,तसेच अन्नसंतर्पनही केले आहे||१५|| | कस्यचिद् द्विजमुख्यस्य भ्रष्टा गौर्मम गोधने | सम्पृक्ताविदुषा सा च मया दत्ता द्विजातये ||१६|| अर्थः----असे चालले असतां मला एक संकट प्राप्त झाले ते असे कि, - प्रतिग्रह न करणाऱ्या कोणी एका ब्राम्हणाची गाय,बांधलेल्या जाग्यावरून वत्सासह सुटून जाऊन माझ्या गोधानांत मिसळली.आणि ती हि ब्राम्हणाची आहे असे न जाणणाऱ्या मी,दुसऱ्या ब्राम्हणास दिली.||१६|| अर्थः----ती दिलेली गाय ब्राम्हण घेऊन जात असतां,तिच्या धनाने पाहून तो हि गाय माझी आहे असे त्या ब्राम्हनास म्हणाला.त्या प्ररीग्राही ब्राम्हनानेही त्याला हि गाय माझी आहे असे म्हणून मला आताचं नृगराजाने दिली असे सांगितले||१७|| अर्थः----याप्रमाणे परस्पर विवाद करणारे व स्वार्थसाधक ( माझ्या मुखांतून निर्णय होऊन गाय घेण्याविषयी उत्सुक ) ते दोन्ही ब्राम्हकन,माझ्याजवळ येऊन मला म्हणाले – त्यांत परिग्रह करणारा म्हणतो – राजा,तूं आताचं हि गाय मला दिली आहेस म्हणून हि माझी आहे,असे असतां,हा ब्राम्हण माझी म्हणतो- गाईची धनी म्हणतो - हि माझी हे लोकांत प्रसिद्ध आहे,तिचा तूं अपहार करून ब्राम्हणास दिलीस.ते दोघांच भाषण ऐकून मी व्याकूळ झालो||१८|| | अनुनितावुभौ विप्रौ धर्मकृच्छ्रगतेन वै | गवां लक्षं प्रकृष्टानां दास्याम्येषा प्रदीयताम् ||१९|| अर्थः—-आणि तेव्हा दुसऱ्याची गाय दुसऱ्यास देणे हा अपहार होय.बरे आतां ज्याची त्यास द्यावी तरी प्रतिगाह्याकडून अपहार होणार अशा दोन्हीकडून धर्मसंकटात पडलेल्या मी त्या दोन्ही ब्राम्हणाची प्रार्थना केली कि,- दुसऱ्या उत्कृष्ट लक्ष गाई तुम्हां अर्थः----तुम्ही उभयतांनी,न जाणणारा व किंकर अशा मजकर अनुग्रह करावा.गाईच्या अपहाररूप दोषाने अमंगल नरकामध्ये पडणाऱ्या माझा या निष्कृतीग्रहणरूप अनुग्रहाने करावा||२०|| अर्थः---तेव्हा गाईची धनी म्हणाला – हे राजा,जरी तूं लक्ष गाई देण्यास समर्थ आहेस तथापि गोविक्रय करणे हे निषिद्ध असल्यामुळे निष्कृतीत्वेकरून तूं दिलेले गाईचे लक्षसुद्धा मी इच्छित नाही,असे म्हणून तो आपली गाय घेऊन निघून गेला आणि प्रतिग्राहीसुद्धा,राजा लक्ष तर काय परंतु त्यावर दुसऱ्या दहा हजार गाई जरी तूं दिल्यास तथापि या गाई वाचून त्यांची मी इच्छा करीत नाही असे म्हणून तोही निघून गेला.||२१|| | एतस्मिन्नन्तरे याम्यैर्दूतैर्नीतो यमक्षक्षयम् | यमेन पृष्टस्तत्राहं देवदेव जगत्पते ||२२|| अर्थः----इतके धर्मामध्ये अंतर घडल्यामुळे मरण पावल्यावर मला यमदूतांनी यमलोकी नेले.हे देवदेवा,जगत्पते,तेथे मला यमाने विचारिले कि,- ||२२|| | पूर्वं त्वमशुभं भूक्ष्ङ् उताहो नृपते शुभम् | नान्तं दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भास्वतः ||२३|| अर्थः----हे नृपते प्रथमत: तूं काय पापाचे फळ भोगितोस ? किंवा पुण्यकर्माने फळ भोगितोस ? तुझ्या दान पुण्याला धर्मपुण्याचा व स्वर्गादी लोक प्राप्तीच्या प्रकाश पावणाऱ्या पुण्यफळाचा अंत मी पाहत नाही||२३|| अर्थः----तेव्हा मी बोलीतो कि,हे यमा,मी प्रथम पापकर्माने फळ भोगितो,तेव्हा त्या यमाने सांगितले कि,जर नीचयोनीमध्ये.हे प्रभो इतक्यांत नीच योनीमध्ये जाणाऱ्या मी आपणास सरठरुपी पाहिले||२४|| अर्थः---हे केशवा,ब्राम्हणाचा भक्त,दानशूर,तुझा दास व तुझ्या दर्शनानेच पापयुक्त झालेला अशा माझी स्मृति अजूनही नष्ट झाली नाही||२५|| भावार्थ:--- आपण जर भक्ती केली व आपल्या मनात भगवंतांच्या दर्शनाची उत्कठ इच्छा असेल तर योग्य वेळेस भेट झाल्याशिवाय राहत नाही.म्हणून धर्मानुसार वागून भक्ती करत राहावी,त्याचे फळ मिळताच असते.परमार्थात जी साधना केली जाते,ती कधीच वाया आत नाही व संसारातील मिलावेले उपयोगास येत नाही.||२५|| अर्थः----आतां दुर्घट अशा झालेल्या श्रीकृष्णदर्शनाने विस्मित होऊन आपल्या भाग्याचे अभिनंदन करितो – हे विभो,जो तूं,योगेश्वरांनीही उपनिषदरूप चक्षूने निर्मळ असलेल्या हृदयामध्ये केवळ चिंतन करण्यास योग्य असा साक्षात अधोक्षज परमात्मा आहेस तो तूं,अनेक व्यसनांची अंधबुद्धी झालेल्या माझ्या दृष्टीमार्गाला गोचर कोणत्या भाग्योद्याने झालास ?कारण,या संसारामध्ये ज्या पुरुषाच्या संसाराची समाप्ती होईल त्यालाच तूं दृश्य होतोस बाकीच्यांना दृश्य होत नाहीस||२६|| भावार्थ:--- सरडा या प्राण्यांच्या योनीस गेल्यानंतर पूव—पुण्याईने भगवंतांचे त्यास दर्शन झाले.म्हणून आपण अधर्म न करता धर्मानुसारच वागावे.||२६|| अर्थः----आतां भक्तीपरवश होऊन बहुत संबोधने देऊन म्हणतो – हे देवदेवा,हे जगनाथा,हे गोविंदा,हे पुरुषोत्तमा,हे नारायणा,हे ऋषीकेशा,हे पुण्यकीर्ते,हे अच्युता,हे अविनाशीस्वरूपा,हे प्रभो,हे कृष्णा,आतां स्वर्गलोकी गमन करणाऱ्या मला जाण्याची आज्ञा दे.कर्मवशेकरून कोठेहि असणाऱ्या माझे चित्त,तुझे चरणच ज्याचा विषय ( स्मरनीयत्वेकरून आश्रय ) आहेत असे होवो.||२७-२८|| भावार्थ:--- आपण कोठेही,कोणत्याही कार्यात असलोत तरी,आपले चित्त परमात्म्याताच असावे,अन्य विषयात नसावे,कारण विषय हे दु:खरूप आहेत.||२७—२८|| अर्थः----जातांना नमस्कार करितो – ज्याच्या योगाने सर्वजगाची उत्पत्ती झाली आहे,जो कर्ता असूनही अविकारी आहे,ज्याची अनंत अशी मायानामक शक्ति आहे,जो सर्वभूतांचा आश्रय आहे व जो इष्टा पुर्तादिक कामाचा फळदाता आहे त्या तुज कृष्णाला ( सदानंदरुपाला ) नमस्कार असो.||२९|| | इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्वा स्वमौलिना | अनुज्ञातो विमानाग्रयमारुहत् पश्यतां नृणाम् ||३०|| अर्थः-----याप्रमाणे भाषण करून त्या कृष्णाला प्रदक्षिणा करून आपल्या मस्तकाने त्याच्या चरणांना स्पर्शपूर्वक नमस्कार करून,त्याने आज्ञा दिली असतां,सर्व मनुष्यांच्या देखत प्राप्त झालेल्या श्रेष्ठ विमानांमध्ये त्याने आरोहण केले.||३०|| अर्थः----नंतर ब्राम्हणांचा कैवारी देव,धर्मात्मा,भगवान श्रीकृष्ण,राजांना शिक्षण देत असता तेथे असलेल्या लोकांना म्हणाला कि,- ||३१|| | दुर्जरं बत ब्रम्हस्वं भुक्तमग्नेर्मनागपि | तेजीयसोsपि किमुत राज्ञामीश्वरमानिनाम् ||३२|| अर्थः----हे जनहो,काय आश्चर्य सांगावे ! थोड्याही ब्रम्हस्वाचा उपभोग केला असतां ते अग्निसारखा तेजस्वी पुरुषालाही कोणत्याही उपायाने जिरले जात नाही.मग आम्ही समर्थ आहो असा व्यर्थ अभिमान धारण करणाऱ्या राजांना जिरले जाणार नाही हे काय सांगावे ! ||३२|| भावार्थ:--- जे लोक अग्नीसारखे तेजस्वी,ज्ञानी,संत—महात्मा,संन्यासी असतात त्यांच्या धनाचे अपहरण केले,त्यांचा अपमान केला,त्यांचा अपराध आपल्याकडून घडला किंवा त्यांच्या मृत्यूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला तर तर त्याचे हानिकारक—दु:खदायक फळ आपल्याला भोगावयास येते.म्हणून जे लोक तेस्जास्वी,संत,संत, महात्मा यांच्या धनाचा किंवा कोणत्याही प्रकारचा अपराध घडू नये,यासाठी दक्ष राहून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.त्यांनाच धन देण्याचा प्रयत्न करावा.||३२|| | नाहं हालाहलं मन्ये विषं यस्य प्रतिक्रियाः | ब्रम्हस्वं हि विषं प्रोक्तं नास्य प्रतिविधीर्भुवी ||३३|| अर्थ----मी तर ज्याला निवृत्तीचा उपाय आहे,त्या लोकांना जाळणाऱ्या हालाहलनामक विषाला हि विष असे मानित नाही.तर ब्राम्हणाचे द्रव्य हेंच विष आहे असे मानितो कारण,ज्याच्या निवृत्तीचा उपायच नाही.||३३|| भावार्थ:---हालाहल विष हे विष आहे,पण त्यावर उपाय आहे,परंतु ब्राह्मणाचे संत—महात्म्याचे—संन्याशाचे धन हे महान विष आहे,कारण त्यावर उपाय नाही.त्याचे दु:खरुपाणे फळ भोगावे लागते.याकरिता त्यांच्या धनाचे पाहरण करू नये किंवा त्यांचा अपराध आपल्याकडून घडू नये.याकरिता धर्मानुसार आचरण करावे.||३३|| | हिनस्ति विषमत्तारं वन्हिरद्भिः प्रशाम्यति | कुलं समूलं दहति ब्रम्हस्वारणिपावकः ||३४|| अर्थः----आता विषापेक्षा व अग्निपेक्षाही ब्रम्हस्व भयंकर आहे असे सांगतो – विष,भक्षण करणारालाच मारीते,दुसऱ्यांना मारीत नाही,अग्नि उदाकांनी शांत होतो,कदाचित त्याने वनवगैरे जाळले तर तो मुळे अवशेष ठेवितो,ब्रह्मस्वरूप अरणीपासून उत्पन्न झालेला पापरूप अग्नि तर कुळाला समूळ जाळून टाकितो||३४|| भावार्थ:---विष फक्त खाणाऱ्यांचेच प्राण घेते,आग पाण्याने विझली जाऊ शकते,पण संत—महात्मा—संन्यासी—ब्रम्हज्ञानी ब्राह्मण यांच्या अपराधाची आग जो अपराधी आहे,त्याच्या सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते म्हणजे त्यांचा सर्व प्काराचा विध्वंस करते.अधोगती करते.म्हणून त्याचा अपराध आपल्याकडून घडू नये.||३४|| | ब्रम्हस्वं दरनुज्ञातं भुक्तं हन्ति त्रिपुरुषम् | प्रसह्य तु बलाद् भुक्तं दश पूर्वान् दशापरान् ||३५|| अर्थः----ठेव ठेवलेल्या ब्राम्हणाच्या द्रव्याचा,मालकाच्या आज्ञेवांचून उपभोग केला असतां ते,तीन पुरुषांपर्यंत कुळाला अधोगतीस पोचविते आणि हटाने बलात्कार करून उपभोग केलेले द्रव्य,हरण करणाराच्या पूर्वीचे दहा,पुढचे दहा व तो एकविसावा,इतक्या पुरुषांना अधोगतीस पोचविते.||३५|| भावार्थ:--- संत—महात्मा—संन्यासी,ब्रह्मज्ञानी ब्राह्मण यांचे धन त्यांच्या पूर्ण संमतीशिवाय जरी धनाचा उपभोग घेतला तरी तीन पिढ्यांची हानी—नुकसान होते.याचा अर्थ त्यांचे धन परवानगीने—त्यांच्या संमतीने दिले तर घेऊ नये,कारण अनर्थ करतेच.बळजबरीने किंवा चोरून घेतले तर भोगानारांच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या व भविष्यकालीन—पुढच्या दहा पिढ्या यांचे अहित होते.याचा भावार्थ यांचे धनाचा कोणत्याही प्रकारे उपभोग घेऊ नये.असा विवेक करून त्यांच्याशी जीवन जगावे.||३५|| अर्थः----यास्तव राज्यलक्ष्मीने अंध झालेले जे मूर्ख राजे,नरकाला पोंचाविणाऱ्या ब्रम्हस्वाची अपेक्षा करितात ते,आपणास नरकपात होणार हे पहात नाहीत.||३६|| भावार्थ:--- अज्ञानामुळे धनाचा लोभ होतो.त्यामुळे आपण त्यांचे धन हिरायून घेतो.असे धन हडप केल्यामुळे नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते.नरकातील दु:ख भोगीतल्यानंतर लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.आपण संत—महात्मा यांही संगती करून अज्ञान निवृत्त करून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा.||३६|| अर्थः----वेदांचे दान ( अध्यापन ) करणारे,कुटुंबवत्सल आणि वृत्तीहरण झाल्यामुळे रडणारे अशा ब्राम्हणाच्या नेत्रांतून पडलेले अश्रुबिंदू जितक्या पृथिवीच्या रजःकणांना भिजवितात तितकी वर्षे पर्यंत त्या ब्राम्हणांची वृत्ती हरण प्रधानादिक,कुंभिनामक नरकामध्ये क्लेश भोगितात||३७-३८|| | स्वदत्तां परदत्तां वा ब्रम्हवृत्तिं हरेच्च यः | षष्टीवर्षसहस्त्राणि विश्ठायां जायते कृमिः ||३९|| अर्थः---आपण दिलेल्या किंवा दुसऱ्याने दिलेल्या ब्राम्हणाच्या वृत्तीने जो पुरुष हरण करितो तो,साठ हजार वर्षेपर्यंत विष्ठेमध्ये कृमी होतो,म्हणून मला ब्राम्हणाचे द्रव्य ग्रहण करण्याची इच्छा कधीच होऊं नय.ज्या धनाची इच्छा करनारे पुरुष,अल्पायुषी व राज्यापासून भ्रष्ट होतात आणि मेल्यानंतर ते दुसऱ्यांना दुःख देणारे सर्प होतात||३९-४०|| | विप्रं कृतागसमपि नैव दृह्यत मामकाः | न्घन्तं बहु शपन्तं वा नमस्कुरुत नित्यशः ||४१|| अर्थः---यास्तव हे जनहो,तुम्ही माझे आहां म्हणून तुम्हास सांगतो ऐका – अपराध करणाऱ्या,बहुत शाप वगैरे देणाऱ्या किंवा प्रसंगी ताडानाही करणाऱ्या ब्राम्हणाचा तुम्ही द्रोह कधीच करूं नका.तर त्याला निरंतर नमस्कार करीत जा||४१|| भावार्थ:--- संत—महात्मा—संन्यासी—ब्रह्मज्ञानी ब्राह्मण यांनी आपला अपराध जरी केला तरी,त्यांचा आपण अपराध किंवा द्वेष करू नये.जाणून—बुजून ते अपराध करत नाहीत.अजाणपणे अपराध होण्याची शक्यता असते.म्हणून त्यांचा तर अपराध करू नये.इतर सामान्य लोक आहेत त्यांचाही अपराध करू नये,धर्मानुसार जगावे.||४१|| | यथाहं प्रणमे विप्राननुकालं समाहितः | तथा नमत च योsन्यथा मे स दण्डभाक् ||४२|| अर्थः----जसा मी,सकाळी,दुपारी व सायंकाळी व दुसऱ्या कोणत्याही वेळी एकाग्र चित्ताने ब्राम्हणांना नमस्कार करितो त्याप्रमाणे तुम्हीही नमस्कार करा.याप्रमाणे जो न करील तो माझ्यापासून दंड पावेल||४२|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण म्हणतात कि,”मीसुद्धा संत—महात्मा संन्यासी,ब्रह्मज्ञानी ब्राह्मण यांना नमस्कार करतो—वंदन करतो,त्यांच्या म्हणण्यासुर वागतो,कारण ते जगाला निस्वार्थी भावनेतून जगाला धर्माचा उपदेश करतात,जगाला सन्मार्गाला मावतात,ज्ञान मार्गाला लावतात.माझ्यापेक्षाही महत्वाचे कार्य करतात.म्हणून त्यांच्या अंकित राहतो.भगवंत एवढी किंमत देतत,तर आं सामान्यांनी त्यांना किंमत देणे अत्यंत आपल्या हिताचे आहे.जे त्यांचा अपराध करतील,त्यांना शिक्षा करतो.”||४२|| | ब्राम्हणार्थो ह्यपहृतो हर्तारं पातयत्यधः | अजानन्तमपि ह्येनं नृगं ब्राम्हणगौरिव ||४३|| अर्थः----ब्राम्हणांचे द्रव्य हरण केले असतां ते त्या हरण करणाराला नरकांत पाडिते हे केवळ भय प्रदर्शन आहे असे नाही,तर प्रत्यक्ष आहे पहा – ती ब्राम्हनाची धेनु न जाणणाऱ्याहि या महादात्या नृगराजाला अधःपातास कारण झाली.मग जाणूनबुजून हरण केलेले ब्रम्ह्स्व त्याच्या अधःपातास कारण करणारे निरंकुंज राजे किंवा त्या राजकुळाचा आश्रय करणारे होईल ते काय सांगावे ? ||४३|| भावार्थ:---जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा नृग हा पुण्यवान असून सरडा केले.राजा नृग यांच्या मानाने आपल्याजवळ पुण्य कांहीच नाही.म्हणून आपण तर फार सावध होऊन यांच्या धनाच्या अपहारानापासून सावध होऊन जीवन जगावयास पाहिजे.आपण सावध जरी वागलो ताटी त्यात आपलेच हित आहे ,म्हणून वागवे.||४३|| अर्थः----याप्रमाणे सर्व लोकांना पवित्र करणारा व मुक्तिदाता भगवान श्रीकृष्ण,द्वारकावासी लोकांना धर्मरहस्य ऐकवून नंतर आपल्या मंदिरांत प्रविष्ट झाला||४४|| भावार्थ:--- सर्व द्वारकावासी यांना भगवंतांनी उपदेश करून पवित्र केले.आपणही आगोदर आपला अधिकार वाढवून अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावावे,कारण आपला आपण अधिकार वाढवून उपदेश करणे फारच मोलाचे कार्य आहे.यामुळे लोकांवर धर्माचे—ज्ञानाचे संस्कार होतात.त्यामुळे लोक धर्मानुसार आचरण करतात.ज्ञान प्राप्त करून त्यांचे जन्म—मरण निवृत्त होउन सुखरूप होतात.आपणास आपल्या सदगुरूंनी उपदेश केला,म्हणून आपणास तो उपदेश मिळाला.म्हणून आपण निष्काम सेवा व निष्काम भक्ती करून आपल्यावर त्या ज्ञानाचा परिणाम झाला.म्हणून आपणही पुढे आपण आपला अधिकार वाढवून तेच कार्य करून ज्ञानदान करावे.||४४|| __________________________________________________________________________________________________ |६५--- ४---श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे---१--- __________________________________________________________________________________________________ | बलभद्रः कुरुश्रेष्ठ: भगवान् रथमास्थितः | सुहृद्दिदृक्षरुत्कण्ठ: प्रययौ नन्दगोकुलम् ||१|| अर्थः-----श्रीसुकाचार्य म्हणाला –हे राजा ,एकेवेळी नंदादिक बंधूंना पाहण्याची इच्छा करणारा व त्यांचे ठिकाणी प्रेमयुक्त असा भगवान ,बलराम,रथावर बसून नंदाच्या गोकुळामध्ये निघून गेले||१|| अर्थः---तेव्हा बाहू कालपर्यंत दर्शनादिकांचा इच्छेने युक्त असलेल्या गोपनी व गोपिनी त्याला आलिंगन केले व त्या रामाने यशोदा व नंद या उभयंता मातापिताराना वंदन केले असता त्यांनी आशीर्वाद घेऊन त्यक़्न्चे अभिनंदन केले||२|| भावार्थ:--- बलरामदादांनी व्रजातील स्वजनांना भेटण्यासाठी बर्याच दिवसापासून उत्सुक होते,म्हणून ते तेथे गेले.व्रजात गेल्या—गेल्या त्यांनी माता—पित्यांना नमस्कार केला.आपणही आपल्या माता—पित्यांना दररोज सकाळी आपल्या संस्कृतीनुसार साष्टांग दंडवत करावयास पाहिजे.त्यामुळे एकमेकांना एकमेकाविषयी आत्मभाव जाग्रत राहतो.एकमेकांना एकमेकाविषयी प्रेमभाव जाग्रत राहतो.त्यांच्या माता—पित्यांनी बलरामादादांना आशीर्वाद दिला.आपणही आपल्या म्लांना—मुलींना आशीर्वाद द्यावा.||२|| | चिरं नः पाहि दार्शाह सानुजो जगदीश्वरः | इत्यारोप्यान्कमालीङ्ग्य नेत्रैः सिषीचतुर्जलैः ||३|| अर्थः----ते असे कि ,हे बलराम तू जगदीश्वर आहेस वास्तव श्रीकृष्णासहवर्तमान तू आमचे चिरकाळपर्यंत रक्षण कर .असे भाषण करून त्या याशोदानंदानी ,त्याला मांडीवर बसवून आलिंगन करून आनंदाश्रुनी त्याला अभिषेक केला||३|| भावार्थ:--- बलरामादादा आपले वय,मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटले.आपणही तसेच आपले वय,मैत्री आणि संबाधानुसार सर्वांना भेटावयास पाहिजे.||३|| अर्थ-----नंतर त्याने गोपावृद्धानाही यथाविधी वंदन केले नंतर आपले वय ,सख्य व सबंध होता त्याप्रमाणे तो सर्व गोपालाना हास्य हस्त ग्रहण आलिंगन इत्यादिकेकारून भेटून सुखाने आसनावर बसून श्रम रहित झाला असता त्याच्या सभोवार प्राप्त झालेल्या .त्याने कुशल प्रश्न करू लागले कि ||४|| ||५|| ||६|| अर्थः---हे रामा,वसुदेवादिकसर्व आमचे बांधव खुशाल आहेत ना ? बरे हे रामा,आता स्त्रिया व पुत्र यांनी युक्त झालेले तुम्ही,केव्हातरी आमचे स्मरण करीत काय ?||७|| | दिष्ट्या कंसो हतः पापो दिष्ट्या मुक्ताः सुहृज्जनाः | निहत्य निर्जित्य रिपुन् दिष्ट्या दुर्गं समाश्रिताः ||८|| अर्थः---दुराचारी कंस मरण पावला हि मोठी आनंदाची गोष्ट झाली,आमचे वसुदेवादिक सुह्रसज्जन त्याच्या सुह्रज्जनही त्याच्या उपद्रवापासून मुक्त झाले हेंही चांगले झाले,आणि कालयवनाला व जरासंधादिक शत्रूंना मारून व जिंकून द्वारकारूप किल्ल्यांत जाऊन राहिला हेंही फार चांगले झाले||८|| | गोप्यो हसन्त्यः पप्रच्छू रामसन्दर्शनादृताः | कच्चीदास्ते सुखं कृष्णः पुरस्त्रिजनवल्लभः ||९|| अर्थः---त्यावेळी रामाच्या प्रेमपूर्वक अवलोकनाने आद्र प्राप्त झालेल्या गोपी,आनंदाने हास्य करीत त्याला विचारूं लागल्या कि,आतां नगरांतील स्त्रिया आवडत असलेला तो श्रीकृष्ण द्वारकेत सुखाने वास करीत आहेना ?||९|| अर्थः---बरे तो आपल्या गोपबंधावांचे ,पित्या नंदाचे व मत यशोदेचे केव्हातरी स्मरण करितो काय ?बरे तो आपल्या आईला पाहण्याकरिता एकदातरी येईल काय ?बरे तो महापराक्रमी श्रीकृष्ण आम्ही तत्परत्वेकरून केलेल्या सेवेचा केव्हातरी स्मरान करितो काय ?||१०|| | मातरं पितरं भ्रातृन् पतीन् पुत्रान् स्वसृरपि | यदर्थे जाहिम दाशार्ह दुस्त्यजान् स्वजान् प्रभो ||११|| | ता नः सद्दः परित्यज्यः गतः संछिञसौहृद: | कथं नु तादृशं स्त्रीभिर्न श्रद्धीयेत भाषितम् ||१२|| अर्थ:-----हे दाशार्ह ,प्रभो टाकण्यास कठीण अशा भाऊ,बहिण ,माता ,पिता पती पुत्र इत्यादी स्वजनांचा ,ज्यांच्या प्रतीकर्ता आम्ही त्याग केला आहे त्या आमचा तत्काळ त्याग करून तो प्रेम्बंधान अगदी तोडून टाकून निओघून गेला .तर वतो जात असता तुम्ही त्याला प्रतिबंधक केला नाही /इत्यादिक म्हणशील तर –म,इ तुमचे उपकार फेडण्यास कधीही समर्थ होणार नाही इत्यादिक ते तसाले मनोहर भाषण स्त्रियांनी कसे बरे विश्वसनीय वाटू नये तर मानावेच म्हणून त्याने विश्वासाने आम्हास फसविले ||११|| ||१२|| अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या आम्ही तर रानटी असल्यामुळे चतुर नव्हे परंतु आता चतुर अशा पुरस्त्रीया ,चंचलप्रेम युक्त ,व कृतज्ञ अशा कृष्णाचे भाषण विश्वासाने कसे बरे ग्रहण करीत असतील ?दुसऱ्या म्हणाल्या –आमच्या सरक्याचा चित्रविचित्र कथा श्रावणाने मोहित होऊन व त्याच्या सुंदर अवलोकनाने प्रदिप्त झात्तालेल्या कामाने परवश होऊन त्याचे भाषण ग्रहण करीत असतील यात संशय नाही ||१३|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या हे गोपी ,त्या कृष्णाच्या कथेने आम्हाला काय फळ प्राप्त हुत आहे ?त्य७अच्य स्मरणाने दु:ख मात्र वाढते यास्तव दुसर्याच कथा वर्णन करा .जर त्याचा आमच्या पासून वरुनानी काळ जातो तर त्यच्या पासून आप्तावाहोई जातच आहे .परंतु त्याचा सुखाने आमचा दु;खाणे काय तो विशेष आहे ||१४|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्णांचे हसत बोलणे,सुंदर पाहणे,चालणे,प्रेमालींगण इत्यादींचे स्मरण होऊन वियोगामुळे गोपी रडू येऊ लागले.तसेच आपणास भगवंतांच्या वियोगाबद्दल रडू यावावयास पाहिजे,कधी भेट होईल—कधी दर्शन होईल याची उत्कंठा लागून त्या भगवंतांकडे मन लागावयास पाहिजे.असे झाले असता दर्शन होते.||१५|| | संकर्षणस्ताः कृष्णस्य सन्देशैर्हृदयमंगमैः | सान्त्वयामास भगवान् नानानुनयकोविदः ||१६|| अर्थः---निरनिराळ्या प्रकारे समजून घालण्यात निपुण असलेल्या भगवान बालरामांनी श्रीकृष्णांचे ह्र्दयस्पर्शी संदेश सांगून गोपींचे सांत्वन केले.||१६|| भावार्थ:--- भगवान बलरामादादांनी भगवंत श्रीकृष्णांच्या हृदयस्पर्शी संदेश सांगून गोपींचे सांत्वन केले.बलरामदादांनी विचर केला कि,श्रीकृष्णांच्या विरहाने गोपी दु;खी झालेल्या आहेत,म्हणून त्यांनी श्रीकृष्णांच्या लीलांच्या कथा सांगितल्या.श्रीकृष्ण किती प्रेमळ आहेत,आपली आठवण नेहमी—नेहमी करता असे सांगितले व आपल्या भ्तीसाही लवकर येणार आहेत,हेही सांगितले.गोपींच्या लीला त्या रुक्मिणी व इतर पत्न्यांना सांगतात असेही सांगितले,त्यामुळे त्या आनंदमग्न झाल्या.||१६|| अर्थः---नंतर तो भगवान राम,रात्रीचेठिकाणी,कृष्णाबरोबर झालेलया रसक्रीडेच्या वेळी लहान असलेल्या व उत्पन्न न झालेल्याही गोपींना रतीमुख देत असता,चैत्र व वैशाख असे दोन महिने पर्यंत त्या गोकुलामध्ये राहिला.||१७|| भावार्थ:--- बलरामदादांनी त्यांची ती दु:खद अवस्था पाहून चैत्र व वैशाख महिना तेथेच राहून त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केले.तसेच आपणसुद्धा इतरांची दु;खद अवस्था पाहून इतरांचे दु:ख घालैण्याकरिता आपला वेळ खर्च करून समाधान देण्याचा आवश्य प्रयत्न करावयास पाहिजे.यामुळे भगवंत आपले समाधान करतो.||१७|| अर्थः---तेव्हा पूर्णचंद्राच्या किरणांनी प्रकाशमान झालेल्या व चंद्रविकासी कमळीनीच्या सुगंधवायुने देवन केलेल्या यमुनेच्या उपवनामध्ये,स्त्रीगनांनी वेष्टित असा तो राम,त्यांच्या बरोबर रममाण झाला.||१८|| अर्थः---आतां त्याचा प्रभाव सांगतो – वरुणाचे रामाच्या सेवकरीता पाठविलेली,अमृताबरोबर उत्पन्न झालेली वारुणी नावांची मदिरा,वृक्षाच्या ढोलीतून खाली स्त्रवून आपल्या वासाने ते सर्व जन सुगंधयुक्त मंदिरेने प्राशन केले||१९|| अर्थः---मधुधारेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला.त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तेथे पोहचवले आणि त्यांच्यासह त्यांनी ती प्राशन केली.||२०-२१|| अर्थः----कंठामध्ये पुष्पमाळा व एकाच कानांत कुंडल धारण करणारा,स्वभावानेच मत्त असल्यासारखा दिसणारा,नवरत्नखचित व पायांपर्यंत लोंबणाऱ्या वैजयंतीनामक माळेने अलंकृत,घर्मरूप तुषारकणांनी भूषित व हास्ययुक्त असे मुखकमळ धारण करणारा तो समर्थ बळराम आपण होता तेथे जळक्रीडा करण्याकरिता यमुनानदीस बोलावूं लागला.तेव्हा हा मत्त आहे असे जाणू,आपल्या वाक्याचा अनादर करून तेथे न आलेल्या यमुनेला त्याने कुपित होऊन नांगराच्या अग्राने ( फळाने ) आकर्षण केले||२२-२३|| | पापे त्वं मामवज्ञाय यन्नायासी मयाssहुता | नेष्ये त्वां लान्गलाग्रेण शतधा कामचारिणीम् ||२४|| अर्थः---आणि म्हणाला कि,हे दुष्टे,ज्याअर्थी मी बोलविली असता तूं माझा अनादर करून नयेत नाहीस,त्याअर्थी तूं जशी माझ्या इच्छेप्रमाणे जाशील तशी तुला नांगराच्या अग्राने शेकडो प्रवाहांनी नेईन||२४|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे मर्त्सना केल्यामुळे भिऊन चकित झालेली ती यमुना नदी,देवतारूपाने पायांवर पडून त्या बलरामाप्रत असे म्हणाली कि, - ||२५|| | राम राम महाबाहो न जाने तव विक्रमम् | यस्यैकांशेन विधृता जगती जगतः पते ||२६|| अर्थः---“हे रामा !हे रामा!हे महाबाहो,मी तुझ्या पराक्रमाला विसरल्ये आहे.हे जगत्पते,ज्या तुझ्या हजार मस्तकांपैकी एका मस्तकानेच हि पृथ्वी धारण केलेली आहे||२६|| अर्थः---हे भगवान,विश्वात्मन,भक्तवत्सला,तुज भगवंताचे परम सामर्थ्य न जाणऱ्यांना परंतु आता शरण आलेल्या मला,अज्ञानेकरून झालेल्या अपराधाने सहन करून तूं सोडून देण्याची कृपा करावीस||२७|| अर्थः---याप्रमाणे प्रार्थना केलेल्या त्या भगवान बलरामाने यमुनेला सोडून दिले.नंतर त्याने स्त्रियांसहवर्तमान तिच्या उदकामध्ये प्रवेश करून,जसा गजेंद्र,हत्तींनीसहवर्तमान क्रीडा करितो त्याप्रमाणे केली||२८|| अर्थः---यथेच्छ क्रीडा करून जळांतून बाहेर पडणाऱ्या त्या बलरामाला,काळ्या वर्णाची वस्त्रे,बहुत मोलाची भूषणे व सुवर्णकमळांची माळा हि साक्षात लक्ष्मीने तेथे प्रकट होऊन दिली||२९|| अर्थः---तेव्हा निळी वस्त्रे परिधान करून व सुवर्णकमळांची माळा गळ्यांत घालून दुसऱ्याही भूषनांनी अलंकृत व चंदनादिकांच्या उट्या लावलेला तो राम,इंद्राच्या ऐरावत गजासारखा शोभूं लागला||३०|| अर्थः---हे राजा,अनंतपराक्रमी बळरामाच्या सामर्थ्याने सूचन करणारी ती यमुना नदी,अद्यापि नांगराने ओढलेल्या मार्गाने वहात असलेली खरोखरच दिसत आहे. ||३१|| | एवं सर्वा निशा याता एकेव रमतो व्रजे | रामस्याक्षिप्तचित्तस्य माधुर्यैर्व्रजयोषिताम् ||३२|| अर्थः---याप्रमाणे गोकुळ संबंधी स्त्रियांच्या विलासांनी ज्यांचे चित्त,रतीक्रीडेविषयी तत्पर झाले आहे अशागोकुळाआमध्ये रममाण होणाऱ्या त्या बळरामाच्या चैत्र व वैशाख ह्या दोन महिन्यातील सर्वही रात्री एका रात्रीसारख्या निघून गेल्या ||३२|| ______________________________________________________________________________________________________________________ |६६ पौड्रंग आणि काशिराजाचा उद्धार-----१---- ____________________________________________________________________________________ अर्थः---श्री शुकाचार्य म्हणाला – हे राजा,याप्रमाणे बळराम नंदाच्या गोकुळामध्ये गेला असतां इकडे द्वारकेमध्ये,करूषदेशाची अधिपती अज्ञ जो पौड्रक राजा त्याने,वासुदेव मी आहे असे म,मानून कृष्णाकडे दूत पाठविला||१|| अर्थः----यांचेच स्पष्टीकरण करितो – जगत्पालक भगवान वासुदेव तंच अवतीर्ण झाला आहेस याप्रमाणे अज्ञ लोकांनी प्रशंसा केलेल्या त्या पौड्रकाने आपण ऐश्वर्यादिगुणपूर्व भगवान वासुदेव आहे असे मानिले.||२|| अर्थः----आणि जसे एखाद्या अज्ञानी बालकास खेळताना दुसऱ्या बालकांनी राजा केले असता तो,आपणासच राजा मानितो त्याप्रमाणे आपणच वासुदेव आहे असे मानणाऱ्या त्या मंद बुद्धी पौड्रकाने,ज्याचे माहात्म्य ठाऊक नाही त्या श्रीकृष्णाकडे द्वारकेत दूत पाठविला.||३|| अर्थः----जो दूत,द्वारकेत येऊन,सुधर्मा सभेमध्ये बसलेल्या समर्थ कमलपत्राक्ष श्रीकृष्णाला पौड्रकाचा निरोप सांगुं लागला कि,||४|| अर्थः---पौड्रकाने वचन दूत सांगतो – भगवान वासुदेव मी एकच असून प्राण्यांवर द्या करण्याकरिता अवतीर्ण झालो आहे,दुसरा कोणी वासुदेव नाही.तूं तर खोटेंच वासुदेव हे नांव धारण करितोस,यास्तव तूं त्या नांवाचा त्याग कर||५|| अर्थः---आणि हे कृष्णा,तूं मूढपणामुळे जी आमची शंखचक्रादिक चिन्हे धारण करीत आहेस ती टाकून मला शरण ये,नाहीतर माझ्याबरोबर युद्ध करण्यास सिद्ध हो||६|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,मंदभाग्य अशा पौड्रकाने दूताने सांगितलेले ते दुर्वचन श्रवण करून,त्यावेळी सभेत बसलेले उग्रसेनादिक लोक मोठ्याने हसूं लागले||७||
अर्थः---नंतर सभेमध्ये त्या पौड्रकांनी बराच वेळ पर्यंत थट्टा चालल्यावर भगवान श्रीकृष्ण दुताला म्हणाला – तूं पौड्रकाला माझे वाक्य असे सांग कि,हे मुर्खा,ज्या धारण केलेल्या कृतीच्या चिन्हांनी तूं आपली प्रशंसा करून घेतोस ती चिन्हे मी तुजकडून टाकवितो किंवा ती मी आपली चक्रादिक चिन्हे युद्धामध्ये तुझ्यावर व तूं ज्यांच्यासहवर्तमान आपली प्रशंसा करून घेतोस त्या चिन्हावर टाकितो||८|| अर्थः---मला शरण ये असे म्हटलेले त्यांचे उत्तर हें कि,हे मूढा,ज्या मुखाने तू अशी बडबड करितोस तो तूं,मी मारिला असता आपले मुख पसरून कंक,गृध आणि वट या पक्ष्यांनी वेष्टित असता जेव्हा रणभूमीवर शयन करिशील तेव्हा तेथे फिरणाऱ्या श्वानादिकांना शरण जाशील,म्हणजे ते तुला तोडून खातील||९|| अर्थः---याप्रमाणे भगवंताने सांगितले ते निंदावचन ऐकून त्या दूताने आपल्या स्वामी पौड्रकाकडे येऊन ते सर्व निवेदन केले.त्यावेळी पौड्रक राजा,आपल्या मित्राच्या काशीनामक नगरामध्ये होता म्हणून श्रीकृष्णानेही रथावर बसून त्या कशीनगरावर स्वारी केली||१०|| अर्थः---महारथी पौड्राकनेही श्रीकृष्णाचा युद्धोयोग पाहून,दोन अक्षौहिणी सैन्य बरोबर घेऊन युद्ध करण्याकरिता त्वरेने न नगरातून बाहेर निघाला||११|| अर्थः----हे राजा,त्या पौड्रकाचा काशिराजामित्र होता म्हणून तो त्याला सहाय भूत होण्याकरिता आपल्या तीन अक्षौहिणी सैन्यासहवर्तमान त्याला करण्यास गेला.तेव्हा श्रीकृष्णाने पौड्रकाला पाहिले||१२|| अर्थः---ते असे कि,शंख,चक्र,खड्ग,गदा,शाङर्ग,श्रीवत्स इत्यादिक चिन्हांनी उपलक्षित,कौस्तुभमनी धारण करणारा,वनमालेने भूषित रेशमी पिवळभ वस्त्रे धारण करणारा,ध्वजावर कृतीचा गरुड बसविलेला,अमोलिक किरीट व अन्येही भूषणे धारण करणारा,कर्माचेठिकाणी मकराकार कुंडले स्फुरण पावणारा||१३-१४|| अर्थः----आणि जसा नृत्यस्थानाचेठिकाणी राजादिकांचा वेष धारण करणारा नट असतो त्याप्रमाणे कृतीचा आपल्यासारखा वेश स्विकारणारा अशा त्या पौड्रकाला अवलोकन करून,श्रीकृष्णाने मोठ्याने हास्य केले||१५|| अर्थः---नंतर ते शत्रू शूल,गदा,परीघ,शक्ति,ऋष्टी,ग्रास,तोमर,खड्ग,पट्टीश व बाण यांच्या योगाने श्रीकृष्णावर प्रहार करूं लागले||१६|| अर्थः----श्रीकृष्णाने तर हत्ती,रथ,घोडे व पायदळ यांनी युक्त अशा त्या पौड्रककाशीराजाच्या सैन्यास गदा,खड्ग,चक्र व बाण यांच्या योगेकरून,जसा प्रळयकाली अग्नि,जरायुजादी चतुर्विध प्रानिसमुहांना पिडीत करितो त्याप्रमाणे पिडीत करून मारून टाकिले||१७|| अर्थः----नंतर श्रीकृष्ण पौड्रकाला म्हणाला कि,- हे हे पौंड्रकाला,जी आमची अस्त्रे धारण करितोस ती टाकून दे असे जे तूं दूतमुखाने मला म्हणाला होतास ती अस्त्रे आतां तुझ्या वधाकरिता तुझ्यावर मी टाकितो||१९|| अर्थः---आणि हे मुर्खा,वासुदेव असे जे माझे नाव खोटेंच तूं धारण केले आहेस तें तुझ्या कडून टाकवितो आणि जर युद्ध इच्छित नसेल म्हणजे युद्धापासून भ्यालो असेन तर आतां तुला शरण येईन||२०|| अर्थः---याप्रमाणे भाषणाच्या योगाने त्याचा धिकार करून श्रीकृष्णाने,त्या पौड्रकाला तीक्ष्ण बाणांनी विरथ केले,आणि जसे इंद्राने व्रजाच्या योगाने पर्वताचे शिखर तोडावे त्याप्रमाणे चक्राने त्याचे मस्तक तोडून टाकिले||२१|| अर्थः---तसेंच त्याचा मित्र जो काशीराजा त्याचे मस्तक बाणांनी देहापासून तोडून ते जसा वारा,कमळाचा कळा तोडून दूर नेऊन पाडितो त्याप्रमाणे शिवनगरीमध्ये नेऊन पाडिले||२२|| अर्थः----याप्रमाणे काशिराजारहित पौड्रकाला मारून,ज्याचे कथामृत सिद्धीन गाईले आहे असा तो श्रीकृष्ण,द्वारकेमध्ये परत आला||२३|| अर्थः----हे राजा,निरंतर वैरबुद्धीने हि केलेल्या भगवंताच्या ध्यानाने ज्याचे कर्मवासनारूप बंधने नष्ट झाली आहेत असा तो पौड्रक,हरीसारखे रूप धारण करीत असता शेवटी तन्मय झाला.||२४|| अर्थः----इकडे काशीमध्ये राजाच्या दरवाज्याजवळ कुंडलासहित पडलेले तें मस्तक पाहून सर्वजण,प्रथम हे काय आहे ? म्हणून नंतर कुंडलसहित मस्तक आहे असे जाणून कोणाचे मस्तक असा संशय करूं लागले ||२५|| अर्थः----नंतर काशीपती राजानेच हे मस्तक असा निश्चय करून,त्याच्या स्त्रिया,पुत्र,बांधव व पुरवासी लोक,हे राजा,हे नाथा,हे नाथा,तूं मरण पावल्याने तुझे अनुयायी आम्ही सर्वहि मरण पावल्यासारखे झालो आहो,असे बोलत रुदन करूं लागले||२६|| अर्थः----त्या काशीराजाचा सुदक्षिणनामक पुत्र होता त्याने पित्याची उत्तरक्रिया करून,आपल्या पित्यास मारणाऱ्या श्रीकृष्णाला मारून मी पित्याच्या ऋणापासून मुक्त होईन असा,आपल्या बुद्धीने निश्चय करून,उपाध्यायासहवर्तमान तो अतिउदार सुरक्षीन,चित्ताच्या एकाग्रतेने अविमुक्तक्षेत्रामध्ये श्रीरुद्राने आराधन करूं लागला||२७-२८|| अर्थः----नंतर भगवान श्रीरुद्र संतुष्ट होऊन त्याला वर मागून घे असे म्हणाला,तेव्हा सुदक्षिनाने,आपणास इष्ट असलेला पित्याला मारणाऱ्याच्या वधाचा उपायरूप वर सांगितला||२९|| अर्थः---तेव्हा रुद्र म्हणाला – तूं ब्राम्हणासहवर्तमान,शत्रू मारण्यास सांगितलेल्या विधानाने,आपल्यामध्ये होत करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या दक्षिणाग्नीचे आराधन कर.म्हणजे तो अग्नी,ब्राम्हणभक्ती ना करणाऱ्या पुरुषावर योजीलास तर,माझ्या प्रमथादिगनांनी युक्त होऊन,तुझा संकल्प पूर्ण करील.( यावरून ब्राम्हणभक्ती करणाऱ्या श्रीकृष्णावर योजीलास तर तो विपरीत होईल हे सुचविले.) असो –याप्रमाणे आज्ञा केलेला तो सुदक्षीन,अभिचारकर्म करीत असता आहारादिक नियमाचे ग्रहण करून त्या अग्नीचे आराधन करूं लागला.||३०-३१|| अर्थः---नंतर कुंडपासून अति भयंकर मुर्तिमान अग्नि उत्पन्न झाला.तो असा कि,- ज्याची शिखा व श्मश्रू हि तापलेल्या तांब्यासारखी आहेत,ज्याची नेत्रे अंगार वमन करणारी आहेत.||३२|| अर्थः---ज्याचे मुख दाढांनी व उग्र अशा भृकुटीदंडांनी क्रूर दिसत आहे,जो आपल्या जिव्हेने खालच्या व वरच्या ओठांचे प्रांत चाटीत आहे,जो नग्न असून तीन अग्रांचे शूळ हातांत नाचवीत आहे||३३|| अर्थः---असा तो कृत्याग्नी भूतप्रथमादिक गणांनी वेष्टित होऊन दशदिशा जाळीत असता तालवृक्षासारख्या आपल्या पायांनी भूमंडाळाला कांपवित कांपवित द्वारकेस धांवला.||३४|| अर्थः---त्या येणाऱ्या अभिचार अग्नीला व्दारकावासी लोकांना अवलोकन करून ,वनाचा दाह होऊ लागला असता जसे हरीण भिऊन जातात त्या प्रमाणे सर्वहि भिऊन गेले ||३५|| अर्थः---आणि सभेमध्ये फाशिनी क्रीडा करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला ,भयातुर झालेले ते लोक ,त्रिलोकेशा या व्दाराकानगरीला जाळीत येणाऱ्या ह्या नाग्निपासून आमचे रक्षण कर अशी प्रार्थना करू लागले ||३६|| अर्थः---ती जणांची व्याकुळता पाहून तसेच त्या आपल्या भक्ताचे दुख अवलोकन करून रक्षण करणारा तो भगवान ,हास्य करून म्हणाला कि –तुम्ही अगदी भिऊ नका ,मी तुमचे रक्षण करणारा आहे||३७|| अर्थ:----नंतर,सर्वजगाच्या आंतल्या व बाहेरच्या भागाला प्रत्यक्ष पाहणाऱ्या त्या समर्थ श्रीकृष्णाने,त्या माहेश्वरी कृत्याला जाणून त्या कृत्यारूप अग्नीच्या नाशाकरिता त्याने आपल्या पार्श्वभागी असलेल्या सुदर्शननामक चक्राला आज्ञा केली||३८|| अर्थः----तेव्हा कोटीसुर्यांसारखे देदिप्यमन,प्रलयकालीन अग्नीसारखे जाल्वल्यमान व आपल्या तेजाने आकाश,दिशा,स्वर्ग व भूमि ग्रांस प्रकाश करणारे टी सुदर्शननामक विष्णूचे चक्र,त्या अग्नीला पीडा करूं लागले||३९|| अर्थः---तेव्हा हे राजा,तो कृत्यारूप अग्नि,श्रीकृष्णाच्या चक्राच्या तेजाने ताडित झाल्यामुळे भग्नमुख होऊन माघारा फिरला आणि सुदक्षिनाने आपण होऊन केलेला तो अभिचाररूप अग्नि,वाराणसीवर येऊन,त्याने ऋत्विज व इतर लोकांसहित असलेल्या त्या सुदाक्षिणाला जाळून टाकिले||४०|| अर्थः---आणि त्या कृत्यानलाच्या मागून वाराणसीत प्रविष्ट झालेले ते विष्णूचे सुदर्शन चक्र,मंचक,सभा,घरे,पेंठा,गोपुरे व त्यांच्या वरच्या माड्या व धान्यसंग्रहाची कोठारे यांनी व्याप्त व द्रव्याचे जामदारखाणे,गजशाळा,अश्वशाळा,रथशाळा व अन्नशाळा यांनी युक्त अशा त्या सर्व वाराणसीला जाळून पुनः ते विष्णूचे सुदर्शन चक्र,उदारचरित्र अशा त्या कृष्णाच्या पार्श्वभागी येऊन राहिले||४१-४२|| अर्थः---जो पुरुष,हा उत्तमश्लोक भगवंताला पराकम एकाग्रचित्तपणे श्रोत्यांना ऐकविल किंवा स्वतः श्रवण करील तो सर्वपापांसून मुक्त होईल||४३|| ____________________________________________________________________________________|६७ द्विविदाचा उद्धार----१---- ____________________________________________________________________________________अर्थः-----यमुनेच्या आकर्षणानंतर बलरामाचा व्दिविधादिक चरित्र सांगण्याचा अनुक्रम असून ते न सांगता ,त्याच्या पूर्वी झालेल्या पौद्रकावाधादिकांचे निरुपण करून आता ते सांगतो;त्यात श्रीकृष्ण चरित्र श्रावण करून पुन;रामचरित्र श्रावणकरण्याकरिता राजा म्हणाला –हे शुकाचार्य ,प्रणाम करण्यास अशक्य ,अनंत व अध्भूत कर्मे करणारा जो बलराम त्यांचे चरित्र पुन; मी श्रवण करण्याची इच्छा करितो यास्तव सर्व करण्यास समर्थ अशा रामाने ,जे दुसरे कर्म केले असेल ते मला सांग||१|| अर्थ:---श्रीसुकाचार्य म्हणाला –हे राजा व्दिद्नावाचा कोणीएक वानर होतो तो नरकासुराचा मित्र ,सुग्रीवाचा प्रधान ,मैदावान्राचा श्र्नाता असून पास्राक्रमी होते ||२|| अर्थ:तो व्दिविद वानरर,मरण पावलेल्या आपल्या नरकासुर मित्राचे रून फेडण्या करिता देशाचा नाश होईल तशा नीतीने अग्नि लावून,नगरे,गाव ,खाणी व गैल्वडे यांना जाळीत असे||३|| अर्थ:-----एखाद्या वेळी तो व्दिवीत वानर वृक्ष उपटून त्याच्या योगाने देशांचे चूर्ण करीत असे. त्यामध्ये जेथे नरकासुराला मारा श्रीकृष्ण राहतो त्या व्दार्केजवळच्या आनर्त देशात येऊन तर त्यांचे विशेषेकरून चूर्ण करीत असे||१४||दहा हजार हत्तीचे बल असलेला तो वानर,केव्हांतरी समुद्रामध्ये शिरून आपल्या बाहूंनी त्यांचे पाणी फुगवून त्याच्या योगाने समुद्रतीरी असलेल्या देशांना बुडवीत असे||५|| अर्थः---तो दुरात्मा वानर,मोठमोठ्या ऋषींच्या आश्रमांतील वृक्षांना मोडून टाकून त्यांच्या यज्ञसंबंधी आहवनीयादीक अग्नीमध्ये मुत्रपुरीशोत्सर्ग करून दुषित करीत असे.||६|| अर्थः---तो दुष्ट वानर,पर्वताच्या गुहांमध्ये,पुरुष व स्त्रिया यांना घालून त्या गुहांनी तोडे पर्वताच्या योगाने जशी कुंभारीननावांची माशी,किड्याला घरात घालून त्याचे तोड बंद करित्ये त्याप्रमाणे बंद करीत असे||७|| अर्थः---याप्रमाणे देशांना पीडा करणारा व कुलीन स्त्रियांना दुषित करणारा तो द्विशीद वानर,बलरामाने केलेले मधुर गायन श्रवण करून रैवतकपर्वतावर गेला||८|| अर्थः---त्या रैवतकाच्या उपवनाम,मध्ये यादवांचा अधिपती अशा बलरामास त्याने पाहिले.तो बलराम – कमलांची माळा धारण करणारा,सर्व अवयव फार देखणे असलेला,स्त्रियांच्या समुदायामध्ये प्रविष्ट झालेला,वारुणी मदिरा प्राशन करून गायन करणारा,मदिरेच्या मदाने विव्हळनेत्र झालेला आणि मदोन्मत गजाप्रमाणे आपल्या शरीराने प्रकाशमान होता||९-१०|| अर्थः---तो दुष्ट वानर,वृक्षांवर चढून वृक्ष हालवीत हालवीत आपण,बलरामाच्या व स्त्रियांच्या दृष्टी पडत असता,वानर जातीचा किलकिलाशब्द करू लागला||११|| अर्थः---त्या वानराला उद्भटपणा पाहून,स्वभावानेच चंचळ व ज्यांना हास्य प्रिय आहे व ज्यांना बळदेवाचा आश्रय आहे अशा तरुणी स्त्रिया,हास्य करू लागल्या||१२|| अर्थः---तेव्हा तो द्विविद वानर,बलराम पहात असता त्याचा अनादर करून,भ्रुकुटीचालन करणे.अंगावर धांवून जाणे,दांत दाखविणे इत्यादिकेकरून,त्यांना आपले गुद दाखवीत असता त्या स्त्रियांची अवज्ञा करूं लागला||१३|| अर्थः---तेव्हा प्रहार करणारामध्ये श्रेष्ठ अशा त्या बळरामाने क्रुद्ध होऊन एका पाषाणाच्या योगाने त्याला प्रहार केला असतां त्या धूर्त वानरानेंही,बलरामाला क्रोध येण्याकरिता त्याच्या पाषाणाला चुकवून त्याचा प्रद्याचा कलश पळवून नेला आणि त्याची अवज्ञा केली.||१४|| अर्थः---नंतर उद्धट अशा त्या वानराने,तो कलश फोडून स्त्रियांची वस्त्रे आकर्षण करून फाडून टाकिली.याप्रकारे मदाने विवेकशून्य झालेल्या त्या वानराने बलरामाला तुच्छ मानून असा अपकार केला||१५|| अर्थः---त्या वानराचा तो दुष्टपणा व त्याने उपद्रव्य केलेले देश पाहून क्रुद्ध झालेल्या बलरामाने,त्या शत्रूला मारण्याकरिता नांगर आणि मुसळ हि ग्रहण केली||१६|| अर्थः---तेव्हा त्या महापराक्रमी द्विविदानेही हाताने शालवृक्ष उपटून वेगाने येऊन त्या शालवृक्षाने बळरामाच्या मस्तकी प्रहार केला||१७|| अर्थः---मस्तकावर पडणाऱ्या त्या शालवृक्षाला,पर्वताप्रमाणे निश्चळ असलेल्या त्याबलरामाने हाताने धरिले आणि बलवान अशा त्या संकर्षपणाने,सुनंदनांवाच्या मुसळाने त्याला ताडन केले||१८|| अर्थः---त्यावेळी मुसळाच्या प्रहाराचे मस्तक फुटून गेलेला तो वानर,मस्तकांतून वाहणाऱ्या रक्ताच्या धारेने जसा तांबड्या कावेच्या वाहणाऱ्या ओघाने पर्वत शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला.नंतर त्या प्रचाराला न जुमानिता अत्यंत क्रुद्ध झालेल्या त्या वानराने,पुन्हा दुसरा शालवृक्ष उपटून व तो निष्पन्न करून त्याच्या योगाने मोठ्या वेगाने बलरामास प्रहार केला.त्याही शालवृक्षाचे बलरामाने शेंकडो तुकडे करून टाकिले||१९-२०|| अर्थः---नंतर त्या वानराने दुसऱ्या शालवृक्षाचे क्रोधाने बलरामास प्रहार केला.त्याचेही बलरामाने शेंकडो तुकडे केले||२१|| अर्थः---याप्रमाणे भगवान बलरामासहवर्तमान युद्ध करणाऱ्या त्या वानराने,वारंवार फेकलेले शालवृक्ष भग्न झाले असता सर्ववृक्ष उपटून ते वन निर्वृक्ष केले||२२|| अर्थः---नंतर क्रुद्ध झालेला तो वानर,बलरामावर शिळांची वृष्टि करूं लागला.ती सर्व शिळावृष्टि,मुसळ आयुध धारण करणाऱ्या त्या बलरामाने अनायासाने चूर्ण करून टाकिली ||२३|| अर्थः---तेव्हा त्या कपिश्वराने शालवृक्षासारख्या मोठ्या आपल्या हातांच्या मुठी वळून बलरामाजवळ जाऊन त्या दोन्ही मुठीनी त्याला वक्षस्थळाचेठिकाणी ताडन केले||२४|| अर्थः---बलरामानेही मुसळ व नांगर यांचा त्याग करून आपल्या हातांनी त्या वानराला कंठाच्या व बाहूंच्या मुळाचेठिकाणी ताडन केले,तेव्हा तो वानर,रक्ताचे वमन करीत भूमीवर मरून पडला||२५|| अर्थः---हे कुरुश्रेष्ठा,पडणाऱ्या त्या वानराच्या योगाने,पाण्याने युक्त असलेल्या विवरासहवर्तमान तो रेवतक पर्वत,जशी वाऱ्याने पाण्यामध्ये नौका कंपायमान होत्ये त्याप्रमाणे कंपित झाला||२६|| अर्थः---तेव्हा,बलरामावर पुष्प वृष्टि करणाऱ्या देवसिद्धऋषिश्वरांचा आकाशामध्ये यथायोग्य,जयजयकारशब्द,नमोनमः शब्द फार चांगले झाले,असा शब्द प्रवृत्त झाला||२७|| अर्थः---याप्रमाणे जगताचा नाश करणाऱ्या द्विविदवानराचा वध करून जणांनी स्तुयमान असा तो भगवान बळराम,आपल्याद्वारकानगरीमध्ये प्रविष्ट झाला||२८|| ____________________________________________________________________________________ |६८ कौरवावर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह----१---- ____________________________________________________________________________________ अर्थः---दुसरे बलरामाचे चरित्र सांगण्याकरिता श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,शत्रूंना जिंकणाऱ्या जांबवतीपुत्र सांबाने,स्वयंवरामध्ये दुर्योधनाच्या लक्ष्मणानामक कन्येचे हरण केले||१|| अर्थः---तेव्हा भीष्मादिक कौरव क्रुद्ध होऊन म्हणाले कि,- हा बालक सांग उद्धट आहे.ज्याने आम्हांला तुच्छ मानून इच्छा न करणाऱ्या कन्येचे बलात्काराने हरण केले आहे ||२|| अर्थः---यास्तव ह्या उद्धट सांबाचे बंधन करा.उग्रसेनादिक यादव आमचे काय करणार आहेत ते ? जरी रागावले तरी ते आमचे कांहीच करण्यास समर्थ नाहीत.कारण,जे आमच्या पराक्रमाने समृद्ध झालेल्या व आम्ही दिलेल्या भूमीचा उपभोग करीत आहेत,ते कांही राजे नाहीत||३|| अर्थः---आतां जर कदाचित आम्ही सांबाचा बांधून ठेविले हे ऐकून,ते यादव युद्धाकरिता येथे येतील तर भग्नदर्प होऊन,प्रानायामादिकेकरून दमविलेल्या इंद्रीयांप्रमाणे शांतता पावतील||४|| अर्थः---असा निश्चय करून कर्ण,शल,भुरी,यज्ञकेतू आणि दुर्योधन हे अनुमोदन दिलेले,त्या भीष्मासहित सहा जण,सांबाला बंधन करण्याविषयी उधुक्त झाले.||५|| अर्थः---तेव्हा त्या महारथी सांबाने,आपल्या मागून धांवणाऱ्या त्या धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनादिकास पाहून,सुंदर धनुष्य ग्रहण करून तो उलटून सिंहासारखा एकटाच उभा राहीला.||६|| अर्थः---तेव्हा ज्यामध्ये कर्ण प्रमुख आहे असे ,क्रुद्ध झालेले व त्याला धरण्याची इच्छा करणारे व त्याला उभा रहा ,असे म्हणणारे हे धनुरधारी सहवीर ,त्याच्या जवळ आले आणि त्यांनी बाबाच्या योगाने त्यास आच्छादित केले ||७|| अर्थ:----हे कुरुश्रेष्ठा ,कौरवांनी सर्व बाजूकडून ताडन केलेल्या परंतु आच्छित पराक्रमी अशा भगवंताच्या पुत्र जोसांब त्याने ,ते ताडन ,असे तुच्छमृगांनी तदन केलेल्या सिहाने ते सहन केले जात नाही त्यापार्माने सहन केले नाही ||८|| अर्थ:----तर त्या विराने सज्ज केलेल्या सुंदर धनुष्याचा टणत्कार शब्द करून न,त्या सर्व कार्नादिक सहा रथाना एकदम निरनिराळे सहा सहा बाण प्रणून प्रत्याकाला वेधून टाकिले ||९|| अर्थ:----त्या सहा सहा बाणांचा विन्योगी असा कि –प्रत्येक रथाच्या चार चार घोड्यांना चार चार बाणांनी ,एक एक रथ्याला एक एक वेधिले तेव्हा तेव्हा महाधनुर्दारी अशाही त्या कार्नादिकाना सांबाच्या त्या कर्माची प्रशंसा केली ||१०|| अर्थ:----त्या कार्नादिकांनी तर सर्वादिकाणी तर सर्वांनी मिळून एका सांबाला विरथी केले .ते असे कि –चौघांनी चार गोडे मारिले ,एकानी सारथी मारिला व सहाव्याने दानुस्या तोडिले ||११|| अर्थ:----याप्रमाणे युद्धामध्ये त्या साम्बला अतिप्रयासाने विरथ करून व बंधन करून जय पावलेले ते कौरव ,त्या पुत्राला व आपल्या दुर्योधनाच्या कन्येला ग्रहण करून हस्तिनापुरात प्रविस्थ झाले ||१२|| अर्थ:-----इकडे व्दाराकेमध्ये नारदाच्या वाक्याने ते संबाबकरून जय पावलेल्या ते कौरव ,त्या पुत्राला व आपल्या दुर्योदानाच्या कन्येला ग्रहण करून हस्तिनापुरात प्रविस्थ झाले ||१२|| अर्थः---इकडे द्वारकेमध्ये नारदाच्या वाक्याने ते सांबबंधनरूप वृत्त श्रवण करून मोठा क्रोध आलेल्या व उग्रसेन राजाने आज्ञा केलेल्या यादवांनी,कौरवाबरोबर युद्ध करण्याचा उद्योग आरंभिला||१३|| अर्थः---तेव्हा कौरवांमध्ये व यादवांमध्ये कलह नसावा अशी इच्छा करणाऱ्या व कलहसंबंधी मळ घालविणाऱ्या बलरामाने,युद्धाला जाण्यास उद्युक्त झालेल्या त्या यादवश्रेष्ठांचे सांत्वन करून,शुक्रादी ग्रहांनी युक्त असलेल्या चंदाप्रमाणे ब्राम्हणांनी व कुलवृद्ध प्रधानांनी युक्त असा तो बळराम,सूर्यासारख्या तेजःपुंज रथावर बसून,हस्तिनापुरास निघून गेला||१४-१५|| अर्थः---आणि शत्रूंच्या नगरांत प्रवेश करूं नये म्हणून हस्तिनापुराजवळ जाऊन बाहेरच्या उपवनांत उतरला आणि त्याने कौरवांचा अभिप्राय जाणण्याच्या इच्छेने घृतराष्ट्राकडे उद्धवास पाठविले||१६|| अर्थः---तेव्हा त्या उद्धवाने सभेत जाऊन,घृतराष्ट्र,भीष्म,द्रोण बाल्हिक व दुर्योधन यांस यथाविधी वंदन करून,त्यांस उपवनामध्ये बलराम आला आहे असे कळविले||१७|| अर्थः---त्यावेळी अत्यंत मित्र जो प्राप्त झाला आहे.असे ऐकून अतिआनादित झालेल्या त्या भीष्मादिकांनी,प्रथमतः त्या उद्धवाचा अर्ध्यपाद्यदिकेकरून सत्कार करून,नंतर हातांमध्ये मंगलकारक नजराणे घेऊन ते सर्वही बलरामास सामोरे गेले||१८|| अर्थः---नंतर आपल्या वयाच्या व संबंधाच्यावगैरे योग्यतेप्रमाणे आलिंगनदिकेकरून त्या बलरामास भेटून त्याला धेनु पूजासाहित्य अर्पण केले.त्यांमध्ये जे त्याच्या बळाचा प्रभाव जाणणारे होते त्यांनी बलरामास मस्तकाने नमस्कार केला||१९|| अर्थः---नंतर रामाने व त्यांनी परस्परांस कुशळ प्रश्न करून सर्व बंधू खुशाल आहे असे ऐकिल्यावर दैन्यसहित असे भाषण केले कि - ||२०|| अर्थः---सर्वराजांचा अधिपती व समर्थ अशा उग्रसेन राजाने,तुम्हांस जी आज्ञा केली आहे ती तुम्ही एकाग्रचित्ताने माझ्यापासून श्रवण करून त्याप्रमाणे लवकर करा||२१|| अर्थः---जे तुम्ही बहुतांशी,धर्मयुद्ध करणाऱ्या एका सांबाला अधर्माने जिंकून बंधन केले आहेत तो तुमचा अपराध मी,तुम्हा आम्हां बंधूचे ऐक्य असावे या इच्छेने सहन केला आहे.तरआता लवकर त्या सांबाला आणून समर्पण करा||२२|| अर्थः---याप्रमाणे पराक्रम,उत्साह व शरीरसामर्थ्य यांनी उच्छृंखल व आपल्या ईश्वरी शक्तीला योग्य असे बळरामाने बळरामाने भाषण श्रवन करून,त्या भाषणाने अत्यंत क्रुद्ध झालेले ते कौरव म्हणाले कि - ||२३|| अर्थः----आहो !चुकविण्यास अश्यक्य अशा कालगतीने केवढे हे मोठे आश्चर्या झाले !ते असे कि हल्ली पादरक्षा कीरीटाने सेवन केलेल्या मस्तकावर नमस्कार आरोहण करण्याची इच्छा करित्ये ,म्हणजे पादरक्षा स्थानीय हे यादव कीरीटाने अलंकृत अशा मास्थाकास्थानीय आम्हास आज्ञा करितात हे मोठे आचर्य आहे||२४|| अर्थः----याचाच विस्तार इच्छा करितो – हे यादव,कुंतीच्या विवाहाने आमच्याशी संलग्न झाले आहेत,म्हणून आम्ही यांस बरोबर शयन करणे,भोजन करणे इन्यादिकेकरून आमच्या बरोबरीला पोहचविले.आणि आम्हीच यांना राजसन दिले||२५|| अर्थः----चंवरी,मोरचेल,शंख,श्वेतच्छत्र.किरीट,सिंहासन व शय्या यांचा हे आमच्या उपभोग करितात||२६|| अर्थः----परंतु जसे सर्पाच्या रक्षणाकरिता पाजलेलेही दुध,पाजणाऱ्यालाच दुःखप्रद होते.त्याप्रमाने,देवाऱ्यालाच प्रतिकूल झालेल्या यादवांच्या राजचिन्हांनी आतां पुरे झाले.आता पुढे ती चिन्हे हिरावून घेतली पाहिजेत.कारण,जे आमच्या प्रसन्नतेने समृद्ध झालेले यादव,तेच आतां निर्लज्जपणे आम्हांला स्पष्ट आज्ञा करितात.काय हे आश्चर्य ||२७|| अर्थः---आतां आपला उत्कर्ष सांगतात जशी सिंहाने स्वीकारलेली वस्तू,त्याने दिल्याखेरीज मेंढा शकणार नाही त्याप्रमाणे भीष्म,द्रोण,अर्जुन इत्यादिकांनी न दिलेली वस्तू इंद्रतरी कसा बलजोरीने घेऊं शकेल ? मुळीच शकणार नाही||२८|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे यादवश्रेष्ठा,सत्कुलांत झालेले जन्म,बांधव,आणि संपत्ति यांच्या योगाने ज्यांना अतिशय मद झाला आहे.अशा त्या असभ्य कौरवांनी,याप्रमाणे बलरामाकडून कठोर भाषणे ऐकवून,हस्तिनापुरांत प्रवेश केला.||२९|| अर्थः---कौरवांचे दुष्टत्त्व पाहून व अवाच्य भाषणे श्रवण कोपाने स्ववळून भयंकरस्वरूपी झालेला तो बलराम,वारंवार हास्य करीत म्हणाला कि,-||३०|| अर्थः----धन,वडिलार्जित भूमि इत्यादिक मदांनी उच्छ्रुखळ झालेले जे दुर्जन आहेत,ते शांतीची इच्छा करीत नाहीत मारकुट्या वृषभादिकांना जसा दंडच ताळ्यावर आणितो त्याप्रमाणे त्या कौरवखळांना दंड हाच शांती करणारा आहे,सात्वन कांही शांती करणारे नाही,हे प्रसिद्ध आहे||३१|| अर्थः---अहो अत्यंत खवळलेल्या यादवांचे,व क्रुद्ध झालेल्या श्रीकृष्णाचे हळूहळू सांत्वन करून,यांच्या शांततेची इच्छा करणारा मी, येथे प्राप्त झालो आहे||३२|| अर्थः---ते मंदबुद्धी,दूरभिमानी,दुर्जन,खळ व कलह करण्याविषयी तत्पर असे हे कौरव,त्या उपकार करणाऱ्याही माझी अवज्ञा करून वारंवार दुर्भाशने बोलिले||३३|| अर्थः---त्यांतील सारांश असा कि,- इंद्रादिक लोकपालाही ज्याच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करितात तो भोज,दृष्णी व अंधक यांचा अधिपती उग्रसेन राजा,केवळ भूमीवरील राजांना आज्ञा करण्यास समर्थ नाही काय ? ||३५|| अर्थः---सर्व संपत्ति देणारी अशी लक्ष्मी,प्रत्यक्ष ज्याच्या चरणयुगुलाची उपासना करित्ये,तो लक्ष्मीपति श्रीकृष्ण,राजांच्या छत्रचामरादिक चिन्हांना योग्य नाही काय ? ||३६|| अर्थः---सर्वांनी सेवन केलेल्या गंगेच्याही तीर्थपणाला निमित्त असे ज्याचे चरणकमळरज सर्व लोकपाळावर किरीटयुक्त मस्तकांवर,धारण केले आहे.तसेच ब्रम्हदेव,शंकर,लक्ष्मी व मी ( शेष ) हे ज्याचे चरणकमळरज मस्तकी चिरकाळ धारण करितो त्या श्रीकृष्णाला सिंहासनाचा अधिकार नाही काय ?||३७|| अर्थः---कौरवांनी दिलेली भूमीची तुकडी यादव उपभोग करीत आहेत काय ? आम्ही पादरक्षा काय ? आणि हे कौरव स्वतः मस्तक काय ? ||३८|| अर्थः---अहो !मद्यादिकेकरून मत्त झाल्यासारखा ऐश्वर्याने मत्त झालेला अभिमानी पुरुषांच्या कठोर व असंगत वाणी,त्यांना शिक्षा करणारा कोण पुरुष सहन करील ? कोणीच सहन करणार नाही||३९|| अर्थः----यास्तव आज पृथ्वी निष्कौरवी करीन,असा निश्चय करून त्रैलोक्याला जळतोच कि काय असा अतिक्रुध झालेला तो बळराम,हातांमध्ये नांगर घेऊन उभा राहिला ||४०|| अर्थः---आणि क्रुद्ध झालेल्या त्या रामाने,हस्तिनापुर गंगेमध्ये पालथे पाडण्याकरिता ते दक्षिणेकडून तटाच्या खाली रोवलेल्या नांगराच्या अग्राने आकर्षण केले ||४१|| अर्थः---तेव्हा आकर्षण केल्यामुळे पाण्यातल्या गलबताप्रमाणे डळमळणारे व गंगेमध्ये पडणारे ते हस्तिनापुर पाहून,ज्यांना घाबरेपना प्राप्त झाला असे वांचन्याची इच्छा करणारे ते कौरव,लक्ष्मणेसहवर्तमान सांबाला पुढे करून,कुटुंबसहवर्तमान हात जोडून त्याच समर्थ बलरामाला शरण गेल||४२-४३|| अर्थः----आणि स्तुती करूं लागले कि,हे रामा,हे रामा,हे सर्व जगाच्या आधारा,तुझे सामर्थ्य आम्ही जाणत नाही,म्हणून अज्ञानाने मोहित असल्यामुळे कुबुद्धी अशा आमच्या अपराधांनी क्षमा करण्यास तूं समर्थ आहेस ||४४|| अर्थः---हे ईश्वरा,तूं वस्तुतः आश्रयरहित असून या जगाच्या उत्पत्ती स्थिती संहारांचा एकच कारण आहेस,म्हणून हे सर्व लोक,क्रीडा करणाऱ्या तुझी खेळण्यांची साहित्ये आहेत असे ऋषि वर्णन करितात||४५|| अर्थः----हे सहस्त्रमस्तकवंता अनंता,तूंच हे भूमंडल अनायासाने आपल्या मस्तकी धारण करितोस आणि प्रलयकालाचेवेळी आपल्या स्वरूपी सर्वजनाचा उपसंहार करून शेषपर्यंतकाचेठिकाणी शयन करणारा किंवा अवशेष राहणारा जो अद्वितीय श्रीनारायण तो तूंच आहेस||४६|| अर्थः---आतां आमच्या वर कोप धार करणे हे तुला योग्यच आहे असे सांगतात- हे भगवान सत्वगुण धारण करणाऱ्या तुझा,प्रपंचाच्या पालनाविषयी तत्पर असा हा कोप,कुमार्गाने जाणाऱ्या सर्व लोकांच्या शिक्षणाकरीता आहे,द्वेषाने किंवा मत्सराने नाही||४७|| अर्थः---हे सर्वभूतात्मरूपा,हे सर्वशक्तिधरा,हे अविनाशा,आणि जग हे ज्या तुझे कर्म आहे अशा हे विश्वकर्मन,तुला नमस्कार असो.आम्ही तुला शरण प्राप्त झालो आहे||४८|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,याप्रमाणे ज्यांचे नगर कांपत आहे अशा अत्यंत भिऊन शरण आलेल्याचा कौरवांनी प्रार्थना केलिया असता,सुप्रसन्न झालेल्या त्या बलरामाने त्यास भिऊ नका असे अभयवचन दिले||४९|| अर्थः---तेव्हा कन्येविषयी वत्सल अशा दुर्योधनाने त्या लक्ष्मणेसहित सांबाला साठ वर्षाच्या वयाचे बाराशे हत्ती आंदण दिले;एकलक्ष वीस हजार घोडे दिले,सुवर्णाने बांधविलेले सूर्यासारखे तेजपुःज सहा हजार रथ दिले व ज्यांच्या कथांमध्ये पदकवगैरे दागिने आहेत अशा हजार दासी दिल्या||५०-५१|| अर्थः--- ________________________________________________________________________________________________________________________|६९--- ५---देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे---१--- ________________________________________________________________________________________________________________________ | नरकं निहतं श्रुत्वा तथोद्वाहं च योषिताम् | कृष्णेनैकेन बव्हीनां तद् दिदृक्षुः स्म नारदः ||१|| | चित्रं बतैतदेकेन वपुषा युगपत् पृथक् | गृहेषु द्वयष्टसाहस्त्रं स्त्रिय एक उदावहत् ||२|| अर्थः-----श्री शुकाचार्य म्हणाला हे राजा ,श्रीकृष्णाने नरकासुरास मारिले व त्या एकट्या श्रीकृष्णा बरोबर पुश्कक़्ल स्त्रियांचा विवाह झाला ,हे वर्तमान नारदाने श्रावण करून श्री कृष्णाच्या त्या स्त्रियासह वर्तमान गृहस्थाश्रम दरम कसा चालला आहे ते पाहण्याची इच्छ धारण केली ||१|| अर्थ:-----ती अशी कि जो एक भगवान एका स्वरूपाने अवतीर्ण झाला त्याने एकाचा काली निरनिराळ्या गृहामध्ये सोळा हजार एकशे स्त्रियाशी विवाह करून घेतले हे मोठे आचर्य आहे ते पाहिले पाहिजे ||२|| अर्थ:----अशा उत्साहाने युक्त तो नारद ,त्या कृष्णाला पाहण्याकरिता व्दार्केमाध्रे प्राप्त झाला .ती व्दारका प्रपुल्लीत झालेल्या आराम बागमध्ये व दुसर्याही बागमध्ये असलेल्या पक्ष्यांच्या व भ्रम्रांच्या कुळणी शब्द युक्त केली होती ||३|| अर्थः-----प्रक़्पुल्ल झालेल्या इंदीवर ,अंभोज ,कल्हार ,कुमुद व उत्पल व थानावांच्या कमळणी व्याप्त अशा सरोवरामध्ये हंस व सारासपक्षांनी नादयुक्त केली होती||४|| अर्थ:-----सुवर्णाची व रत्नांची ज्यांमध्ये भांडीकुंडीवगैरे आहेत अशा पाचेच्या योगाने प्रकाश पावणाऱ्या स्फटिकांच्या व रुप्याच्या नऊ लक्ष मोठ्या राजमंदिरांनी युक्त होती ||५|| अर्थः---निरनिराळ्या गल्या,राज मार्ग,अंगणी,पेठां,भोजनगृहे,सभास्थाने व देवांची मंदिरे यांच्या योगाने सुंदर होती,सडासंमार्जन केलेले मार्ग,अंगणी गल्लया व देवड्या यांनी युक्त होत.तशीच हलणाऱ्या पताकांनी व ध्वजांनी जिच्यामध्ये उष्मा होत नसे अशी होती||६|| | तत्र षोडशभिः सद्मसहस्त्रैः समलङ्कृतम् | विवेशैकतमं शौरेः पत्नीनां भवनं महत् ||८|| अर्थः---त्या द्वारकेमध्ये,जेथे विश्वकर्माने पूर्णरीतीने आपले कौशल दर्शविले आहे व जे इंद्रादी सर्व लोकपालांनी पृजीत,सोळा हजार एकशे आठ घरांनी अलंकृत व भोगसाधनांच्या समृद्धीन युक्त आहे अशा श्रीहरीच्या अंतःपुरामध्ये,तो नारद प्रविष्ट होऊन,यांत श्रीकृष्णाच्या पत्नांच्या घरांपैकी एका मोठ्या ( रुख्मिनिच्या ) घरामध्ये प्रविष्ट झाला||७-८|| अर्थः---त्या घराचे वर्णन करितो – ते घर पोंवळ्याच्या स्तंभांनी व वैदूर्य प्राण्यांच्या मोठमोठ्या बाहालांनी बांधलेले होते.इंद्रनील मन्याच्या भीतीनी व जिची प्रभा सुर्यादिकांच्या प्रभेने कमी केली जात नाही अशा इंद्रशील मन्याच्याच भूमीने अलंकृत होते||९|| अर्थः---विश्वकर्म्याने केलेल्या व मोत्याच्या सरांच्या झालऱ्या लोंबत असलेल्या छतांनी सुशोभित होते,उत्तम मण्यांनी भूषित अशा हस्तिदंताच्या आसनांनी व पर्यकांती अलंकृत होते||१०|| अर्थः---कंठाचेठिकाणी पदके असलेल्या व उत्तम वस्त्रे परिधान करणाऱ्या दासींनी तसेच सुंदर आंगराखे.पागोटी वस्त्रे व मनीखचित कुंडले धारण करणाऱ्या सेवकपुरुषांनी अलंकृत होते||११|| अर्थः---रत्न प्रदीपसमूहांच्या कांतिनी ज्यांतील अंधकार नाहीसा झाला आहे असे व जेथे बहांकांच्या अग्रांवरील जाळीच्या आगाशावर बसलेले मयूरपक्षी,गवाक्षमार्गांनी बाहेर निघणारा आंतील अगुरुधूम पाहून,हा काळा मेघच आहे कि काय ? अशा बुद्धीने शब्द करीत होत्साते नृत्य करीत असत असे होते||१२|| अर्थः---त्या गृहांमध्ये सर्वकाळ आपल्यासारखेच ज्यांचे गुण,रूप,वय व अलंकार आहेट अशा हजार दासींनी युक्त असलेल्या व सुवर्णदंडांनी चावरी हातात घेऊन तिच्या योगाने स्वतःवारा घालणाऱ्या रुख्मिणीसहवर्तमान असलेल्या यादवपती श्रीकृष्णाला त्या नारदाने अवलोकन केले||१३|| अर्थः----त्या नारदाला पाहून सर्व धर्मपालन करणारांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णाने,रुख्मिनिच्या पर्यकावरून त्वरेने उठून,किरीटिने,सेवन केलेल्या आपल्या मस्तकाने त्याच्या चरण युगुलाला नमस्कार करून हात जोडून,त्याला आपल्या आसनावर बसविले||१४|| | तस्यावनिज्य चरणौ तदपः स्वमुर्ध्ना बिभ्रज्जगद्गुरुतरोsपि सतां पतीर्हि | | सम्पूज्य देवऋषीवर्यमृषिः पुराणो नारायणो नरासखो विधिनोदितेन | | वाण्यभिभाष्य मितयामृतमिष्ट्या तं प्राह प्रभो भगवते करवाम हे किम्||१६|| | ब्रम्हण्यदेव इति यद्गुणनाम युक्तं तस्यैव यच्चरणशौचमशेषतीर्थम्||१५|| अर्थः---ज्याचे चरणक्षालनसंबंधी गंगारूप उदक,सर्वजगाला पवित्र करणारे आहे तो भगवान स्वतः ब्रम्हदिकांमध्ये श्रेष्ठ असूनही धर्माचरण करणाऱ्या पुरुषांचा पालक असल्यामुळे त्याने सर्वांना शिक्षण लागण्याकरिता त्या नारदाच्या चरणाचे प्रक्षालन करून,ती उदके मस्तकी धारण केली? म्हणूनच ब्राम्हणाचा कैवारी देव असे यथायोग्य नांव त्याला प्राप्त झाले आहे.याप्रमाणे नराचा सखा जो पुरातन ऋषि नारयण त्याने शास्त्रोक्तविधीच्या योगेकरून देवर्षीश्रेष्ठ नारदाचे पूजन करून व अमृतासारखा मिष्ट वाणीने सत्कार करून,हे प्रभो नारदा,निजानंदाने पूर्ण अशा तुझी आम्ही कोणती शुश्रुषा करावी. ? ||१५-१६|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्णांनी चराचराचे जगात गुरु असून त्यांनी नारादांचीपाद्य पूजा केली.त्यांची पूजा केल्यानंतर पूजेचे चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले.आपणसुद्धा संत—महात्मा यांची पाद्य—पूजा करून त्यांचे चरणामृत आपल्या मस्तीकी धारण करावयास पाहिजे,कारण त्यात आपले हित आहे.||३|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण यांनी नाराडांची शात्रोक्त पद्धतीने पूजा केली.श्री कृष्णांनी नाराडांची मधुर शब्दांनी स्तुती केली.त्यांनी त्यांनास कार सेवा करावी असे विचारले.आपणही संत—महात्म्य आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सर्व प्रकारांची धर्मानेयुक्त सेवा करावयास पाहिजे,कारण त्यात आपले हित असते.||१६|| अर्थः---याप्रमाणे भाषण केले असतां,नारद म्हणाला-हे सर्व लोक नाथा,हे वेदगीता,समर्थादेवा,सर्व साधु जनाचेठिकाणी मैत्री करणे व दुसऱ्यांना पीडा करणाऱ्या खळांना दंड करणे हे तुझे ठिकाणी आश्चर्य नाही.कारण,जगाचे रक्षण व धारण यांच्या योगेकरून धर्मादी चतुर्विध पुरुषार्थसिद्धी होण्याकरीता तुझ्या हा स्वेच्छावतार आहे,असे आम्ही निःसंशय जाणत आहो.||१७|| भावार्थ:--- भगवंत परमात्मा सर्व लोकांचे स्वामी आहेत—सर्वांशी मैत्री आहे,कारण सर्व त्यांच्यामुळे आहेत.आपण दुष्टांना म्हणजे जे धर्मानुसार न वागता,अधर्मानुसार वागतात.स्वत: सत्कार्य करत नाहीत व इतरांना सत्कार्य करण्यात प्रीतीबंध करतात.इतरावर अन्याय करून त्यांच्या धार्मिक जीवनात प्रतिबंध करतात.सात्विक लोकांना सुखाने न जगू देता,दु:खित जीवन जगण्यास भाग पाडतात.त्यांना “दुष्ट” असे म्हणतात.त्यामुळे अशा दुष्ट लोकांना भगवंत अवतार धारण करून शासन देतात.दुष्ट लोकांना शासन केले असता ते इतरांना दु:ख न देता सुखाने जगू देतात.दुष्ट व सज्जन जीवांचे कल्याणासाठी मृत्यू लोकात येऊन अवतार धारण करतात.||१७|| अर्थः---हे प्रभो,संसारकृपामध्ये पडलेल्या लोकांना,त्यांतून बाहेर पडण्याविषयी आश्रय करण्यास योग्य,अगाधज्ञानसंपन्न असलेल्या ब्राम्हादिकांनीहि केवळ हृदयामध्ये चिंतन केलेले व सर्वलोकांना मोक्षफळ देणारे असे तुझे चरणयुगुळ,मी पाहिले आहे.यास्तव जरी त्याच्या दर्शनानेच मी कृतार्थ झालो आहे तथापि मला जशी निरंतर त्याची स्मृति राहील तसा माझ्यावर अनुग्रह कर म्हणजे त्याचेंच ध्यान करीत मी संचार करीन||१८|| भावार्थ:--- भगवंतांच्या चरणकमलांचे म्हणजे चरण—अधिष्ठानांचे---परमात्म्याचे दर्शन घेणारा तो भाग्यवंत आहे.ज्याचे जन्म—मरण निवृत्त झाले तो भाग्यवंत आहे. उदा—संत—महात्मा---संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर माउली.संत चोखोबा,इत्यादी.आपले चरण—अधिष्ठान—परमात्मा हा संसाररुपी विहिरीत जे सापडले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे साधन आहे.साधकांनी या या चरणांवर म्हणजे परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून सध्यापर्यंत—परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा.||१८|| | ततोsन्यदाविशद् गेहं कृष्णपत्न्याः स नारदः | योगेश्वरेश्वरस्यांग योगमायाविवित्सया ||१९|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,नंतर त्या घरांतून निघालेला नारद,योगेश्वरांचाही ईश्वर अशा त्या श्रीकृष्णाला नारदाने पाहिले,तेथेही श्रीकृष्णाने उठून सामोरे जाने,आसन देणे इत्यादिकेकरून त्या नारदाची परमभक्तीने पूजा केली आणि न जाणल्यासारखेच त्याला विचारिले कि,आपण द्वारकेमध्ये केव्हा आलां ?||१९-२०|| भावार्थ:--- आपण आपले कोणतेही कार्य करत असतांना आपल्याकडे संत—महात्मा आल्यानंतर आपण आपले जे कार्य करत होतोत,ते बंद करून संत—महात्मा यांचे स्वागत करावे,त्यांना आसनावर बसवून त्यांची पाद्य पूजा करून त्यांचे तीर्थ घ्यावे.असे केले असता आपले अंत:करण शुद्ध होते व स्थिरही होते.||१९|| अर्थः---धनपूत इत्यादिकांचेठिकाणी आसक्त असणाऱ्या आमच्यासारख्यांच्या हातून पूर्णमनोरथ अशा तुमचे काय कार्य व्हावयाचे आहे ? कांहीच नाही.तथापि हे ब्राम्हणा,कांहीतरी कार्य आम्हांस सांगून आमचे हे जन्म सफळ करावे अशी आमची प्रार्थना आहे||२१|| भावार्थ:--- स्वत: भगवंत संत—महात्मा नारदमुनींना आपली सेवा काय करू असे विचारतात.आपणही आपल्याकडे संत—महात्मा आल्यानंतर त्यांची सेवा करावयास पाहिजे,कारण,सेवेने आपले पारमार्थिक हित होत असते.संसारिक कार्याने संसार होत असतो,म्हणून आपण अधिक संसारिक कार्य न करता पारमार्थिक कार्य करावे | अथापि ब्रूहि नो ब्रम्हन् जन्मैतच्छोभनं कुरु | स तु विस्मितः उथ्याय तूष्णीमन्यदगाद् गृहम् ||२२|| अर्थ:---तेव्हा नारदाने विस्मित होऊन कांहीच उत्तर न सांगता उठून दुसऱ्या घरी प्रवेश केला.तेथेही त्याने लहान मुळांचे लालन करणाऱ्या श्रीकृष्णास अवलोकन केले ||२२|| भावार्थ:--- संत—महात्मा यांची सेवा केली असता आपला जन्म सफल होतो,म्हणून आपण संत—महात्मा यांची कायिक,वाचिक,मानसिक व आर्थिक सेवा करावी.||२२|| अर्थः---त्याहून दुसऱ्या घरामध्ये स्नानं करण्याविषयी उद्युक्त झालेल्या श्रीकृष्णास अवलोकन केले,दुसरेठिकाणी आहवनीयादीक अग्नींमध्ये होम करणाऱ्या श्रीकृष्णास पाहिले,कोठे पंचमाहयज्ञांनी देवादिकांचे आराधन करणाऱ्या श्रीकृष्णास पाहिले||२३|| अर्थः----कोंठे ब्राम्हनांस भोजन घालणाऱ्या,कोंठे ब्राह्मणभोजन होऊन राहिलेले अन्न भोजन करणाऱ्या,||२४|| अर्थः---कोठे संध्या करणाऱ्या,कोठें मौनव्रत धारण करून गायत्रीमंत्राचा जय करणाऱ्या व कोठें हातांमध्ये ढालतलवार घेऊन तलवार फिरविण्याचे मार्ग करून दाखविणाऱ्या ||२५|| अर्थः---कोठे घोड्यावर हत्तीवर व रथावर बसून संचार करणाऱ्या कोठे पर्यकावर निजलेल्या व सुतभाग बंदिनी स्तुती केलेल्या श्रीकृष्णास पाहिले ||२६|| अर्थः---कोठे उद्धावादिक प्रधानासह प्रजांच्या कल्याणाचे विचार करणाऱ्या कोत्जे मुख्य वर्गानानी परिवेष्टित होऊन जलक्रीडा करण्याविषयी तत्पर असणाऱ्या व कोठे मुख्य ब्राम्हणांना अलंकृत गाईचे दान व कोठे मंगलकारक करणाऱ्या अशा इतिहास पुराणाचे श्रावण करणाऱ्या कृष्णास पाहिले ||२७|| ||२८|| अर्थ:----एखाद्या गृहमध्ये आपल्या स्त्रीसःवार्तामान हास्यकारक कथेने कोठे सेवन करणाऱ्या व कोठे अर्थाचे व कामाचे सेवन करणाऱ्या श्रीकृष्णास पाहिले ||२९|| | ध्यायन्तमेकमासिनं पुरुषं प्रकृतेः परम् | शुश्रूषन्तं गुरुन् क्वापि कामैर्भोगैः सपर्यया ||३०|| अर्थ:----कोठे एकांती बसून ,प्रकृतीहून पार अशा पुरुषोत्तम एक आत्म्याचे ध्यान करणाऱ्या कोठे पूजा सामग्री व वस्त्र भूषनादिक विषय भोग समर्पण करून आपल्या गुरूंची ससेवा करणाऱ्या कोठ्या एखाद्याबरोबर काळ करणाऱ्या व दुसरे ठिकाणी एखाद्या बरोबर संधी करणाऱ्या व एखाद्या टिकाणी बलरामासह वर्तमान साधूच्या योग्क्षेमाचे चिंतन करणाऱ्या कृष्णास पाहिले||३०|| ||३१|| अर्थः---दुसरेजागी त्वात्यासमयी पुत्रांचे त्यांना योग्य अशा स्त्रियांबरोबर व कन्यांचे त्यांना योग्य अशा वरांबरोबर विवाह जमविण्याचे ठराव करणाऱ्या व विवाह झालेल्यांना ऐश्वर्यवगैरे देऊन संपन्न करणाऱ्या,कोठे कन्यांना सासरी पाठविणे,व जांवयांनी घरी आणणे हि करणाऱ्या,आणि कोठे मुलांचे जातकर्मादिक संस्कारमहोत्साह करणाऱ्या श्रीकृष्णास पाहिले योगेश्वरांचा ईश्वर अशा श्रीकृष्णाच्या ज्या मुलांच्या महोत्सवांना पाहून सर्वही लोक विस्मय पावले आहेत||३२-३३|| अर्थः---कोठे आपलेच अंशभूत अशा सर्व देवांचे बहुदक्षिणादियुक्त यज्ञांनी आराधन करणाऱ्या,कोठे विहिरी बांधणे,आरामबागा तयार करणे व मठवगैरे बांधणे इत्यादिकेकरून पुर्तनामक स्मार्तधर्मांचे आचरण करणाऱ्या,कोठे श्रेष्ठ श्रेष्ठ यादवांसहवर्तमान सिंधूदेशांतल्या घोडयावर बसून मृगया करणाऱ्या व त्या मृगयेमध्ये श्राद्धदिकांस योग्य अशा पशूंचा वध करणाऱ्या श्रीकृष्णास पाहिले||३४-३५|| अर्थः---कोठे प्रधानांचे व अंतःपुरादिकामध्ये असणाऱ्या त्या त्या लोकांचे अभिप्राय जाणण्याच्या इच्छेने वेषांतराने आपले चिन्ह आच्छादित करून संचार करणाऱ्या त्या योगेश्वर कृष्णास अवलोकन केले||३६|| अर्थः---याप्रमाणे मनुष्याची चेष्टा करणाऱ्या भगवंतांचे अचिंत्यशक्तिवैभव पाहून तो नारद हास्य करीत असता त्या श्रीकृष्णाला म्हणाला कीं-||३७|| अर्थः---हे योगेश्वरा.हे आत्मस्वरुपा,तुझ्या योगमाया,मायावी असलेल्या ब्रम्हादिकांनाहि जाणण्यास अशक्य आहेत खऱ्या परंतु तुझ्या चरणसेवेच्या प्रभावानें तुझ्यास्वरूपींच स्फुरण पावत आहेत असें आम्ही जाणतों.तुझें खरे तत्त्व कांही आम्हांस समजत नाहीं ||३८|| | अनुजानीही मां देव लोकांस्ते यशसाssप्लुतान् | पर्यटामि तवोद्गायन् लीलां भुवनपावनीम् ||३९|| अर्थः---आतां तुझ्या मनुष्यनाट्याने मी मोह पावलो आहे,यास्तव तूं माझी पाठवणूक कर असे सांगतो – हे देवा,ब्राम्हंडला पवित्र करणाऱ्या तुझ्या लीलेने गायन करीत तुझ्या यशाने व्याप्त झालेल्या लोकांमध्ये मी संचार करीन तशी तूं मला आज्ञा द्यावीस||३९|| | ब्रम्हन् धर्मस्य वक्ताहं कर्ता तदनुमोदिता | तच्छिक्षयँल्लोकमिममास्थितः पुत्र मा खिदः ||४०|| अर्थः--- असे नारदाचे भाषण ऐकून श्रीभगवान म्हणाला –हे नारदऋषे,मी शास्रद्वारा धर्माचा उपदेश करणारा,स्वतः आचरण करणारा,व दुसर्याला अनुमोदन देणारा आहे यास्तव लोकांना शिक्षण मिळण्याकरितांच मी हे धर्माचे आचरण करीत आहे.म्हणून हे पुत्रा नारदा,माझे उलटे भगवंताने पादप्रक्षालवगैरे केले असे मनात आणून खेद पावूं नकोस||४०|| भावार्थ:--- भगवंत धर्माचे उपदेशक आहेत.जो धर्माचा उपदेशक असतो,त्याने अगोदर स्वत: तो धर्म आचरणात आणून नंतर उपदेश करावा लागतो.जोपर्यंत आपण प्रत्यक्ष धर्मानुसार आचरण करून दाखवत नाही,त्यांना धर्माच उपदेशक होऊ नये,कारण आपण आचरण धर्मानुसार न करता उपदेश सांगितला तर त्याचा परिणाम श्रोता—ऐकानावर होत नाही.ऐकून परिणाम जर न झाला तर ऐकून उपयोग नसतो.म्हणून उपदेशक यांनी त्यानुसार अगोदर वागून नंतर सांगावा,अन्यथा सांगू नये.||४०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,याप्रमाणे अनुग्रह केलेला तो नारद,गृहस्थाश्रम्यांना पवित्र करणाऱ्या व सद्धर्माने आचरण करून दाखवणाऱ्या त्या कृष्णाला हा सर्व घरांमध्ये एकच आहे असे पाहूं लागला||४१|| अर्थः---आणि त्यावेळी अनंतपराक्रमी श्रीकृष्णाच्या अचिंत्यशक्तीच्या बळाने सामर्थ्य वारंवार पाहून तो नारदऋषि,कौतुकयुक्त व विस्मित झाला||४२|| | इत्यर्थकामधर्मेषु कृष्णेन श्रद्धीतात्मना | सम्यक् सभाजितः प्रीतस्तमेवानुस्मरन् ययौ ||४३|| अर्थः---असो.याप्रकारेकरून धर्म,अर्थ व काम यांचेठिकाणी श्रद्धायुक्तचित्त अशा श्रीकृष्णाने उत्तम सत्कार केल्यामुळे संतुष्ट झालेला तो नारद,त्याच श्रीकृष्णाचे वारंवार स्मरण करीत करीत निघून गेला||४३|| अर्थः---आतां,नारदाने पाहिलेल्या श्रीकृष्णलीलेचा संक्षेप सांगतो- हे राजा,याप्रमाणे मनुष्यरीतीला अनुसरणारा,व सर्व प्राणिमात्रांच्या उत्कर्षाकरिता नानाप्रकारच्या शक्ति ग्रहण करणारा तो नारायण श्रीकृष्ण,सोळाहजार एकशेआठ सुंदर स्त्रियांच्या सलज्ज प्रेमपूर्वक अवलोकनाने व हास्याने सेवीत असता त्यांच्या सहवर्तमान रममाण झाला||४४|| | यानीह विश्वविलयोद्भववृत्तिहेतुः | कर्माण्यनन्यविषयाणी हरिश्चकारः | | यस्त्वन्गः गायति शृणोत्यमोदते | वा भक्तिर्भवेद् भगवतिह्यपवर्गमार्गे||४५|| अर्थः---हे राजा,जगाच्या उत्पत्तीस्थितीसंहाराविषयी कारण अशा भगवान हरीने,या श्रीकृष्णवतारामध्ये दुसऱ्या पुरुषांनी करण्यास अशक्य अशी ज्जी कर्मे केली आहेत,त्यांचे जो पुरुष गायन करितो,श्रवण करितो किंवा दुसऱ्याने गायन केली असता त्यांची प्रशंसा करितो,श्रवण करितो किंवा दुसर्याने गायन केली असता त्यांची प्रशंसा करितो,त्या पुरुषाला मोक्षप्रापक अशा त्या भगवंतांचे ठिकाणी भक्ती प्राप्त होते||४५|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या,लीलांचे गायन,श्रवण स्वत: करतात व इतरांना उत्तेजन देतात,त्यांना निष्काम भावना उत्पन्न होऊन मोक्षमार्गाला लागून त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतात.याकरिता आपण स्वत: लीलांचे गायन,श्रवण करून इअरांना उत्तेजन ध्यावे.||४५|| ________________________________________________________________________________________________________________________ |७०--- भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे. ________________________________________________________________________________________________________________________ | अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान् कूजतोsशपन् | गृहीतकण्ठ्य: पतिभिर्माधव्यो विरहातुराः ||१|| अर्थः---श्रीशुक म्हणतात:---हे राजा,आता श्रीकृष्णाच्या आन्हीककृत्याचा प्रकार सांगतो ऐक प्रभावकाळ जवळ आला असतां,अनेक कृष्णमूर्तींनी कंठाचेठिकाणी आलिंगन केलेल्या कृष्णस्त्रिया,पुढे होणाऱ्या कृष्णविरहाने दुःखित होत्सात्या प्रभातकाळसूचक शब्द करून निजलेल्या कृष्णाला जागे करणाऱ्या कुकुटांना,तुझी लवकर अरणांकी असा शाप देऊं लागला||१|| अर्थः---त्यावेळी मंदारवनसंबंधी दाऱ्यांनी पुष्पांचा रस ग्रहण करण्याविषयी आसक्त झालेले भ्रमर,जुंजारव शब्द करूं लागले असतां जागृत झालेले पक्षी,स्तुतीपाठकासारखे निजलेल्या श्रीकृष्णाला जागृत करीत असता अतिशयेकरून शब्द करू लागले||२|| | मुहूर्तं तं तु वैदर्भी नामृष्यदतिशोभनम् | परिरम्भणविश्लेषात् प्रियबाह्वन्तरं गता ||३|| अर्थः---त्यावेळी प्रिय श्रीकृष्णाच्या वाहुंमध्ये असलेल्या ( कृष्णाने आलिंगन केलेल्या ) रुख्मिणीवगैरे सर्व स्त्रियांनी,आलिंगनापासून वियोग होत असल्यामुळे,स्नान पूजनादिकांस योग्य म्हणून अतिपवित्र अशाही त्या ब्रम्हमुहुर्तांवर चांगला असे मानिले नाही||३|| | ब्राम्हे मुहूर्त उत्थाय वार्युपस्पृश्य माधवः | दध्यौ प्रसञकरण आत्मानं तमसः परम् ||४|| अर्थः---श्रीकृष्णाने तर त्या ब्राम्हमुहूर्ताचे वेळी उठून हस्तपादादिकांचे प्रक्षालनपूर्वक उदकाचे आचमन करून,प्रसन्न इंद्रियांनी युक्त होऊन प्रकृतीहून पर अशा आत्म्याचे चिंतन केले||४|| | एकं स्वयंज्योतीरनन्यमव्ययं स्वसंस्थया नित्यनिरस्तकल्मषम् | | ब्रम्हाख्यमस्योद्भवनाशहेतुभिः स्वशक्तीभिर्लक्षितभावनिर्वृतीम् ||५|| अर्थः---ते असे कि,- अखंड,स्वप्रकाश,निरुपाधिक,नित्य,ज्यापासून निरंतर अविद्यादिदोष स्वरूपस्थितीने निवृत्त झाले आहेत अशा ब्रम्हनामक आपल्या स्वरूपाचे चिंतन केले||५|| अर्थः---नंतर,सत्पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा त्या श्रीकृष्णाने,शुद्ध उदकामध्ये स्नान करून व वस्त्रे परिधान करून संध्योपासनादिक कर्मसमूहाचे यथाशास्त्र आवरण केले.त्यांत श्रीकृष्णाची काण्शाखा असल्यामुळे त्याने सूर्योदयाच्या पूर्वीच अग्नीमध्ये होम करून मौनव्रताने गायत्रीव्रताने गायत्रीमंत्राचा जप केला||६|| भावार्थ:--- श्रीकृष्ण धर्मानुसार आचरण करत असत,कारण लोकांनी आपले पाहून धर्माचरण करावे हा त्यांचा मुख्य उद्ध्येस होता.म्हणून आपणही धर्मानुसार आचरण करून वागावे.विधीपूर्वक निर्मळ म्हणजे स्वच्छ आणि पवित्र म्हणजे जेथे संत—महात्मा यांच्या संबधाने व पवित्र नाद्ध्यांच्या पाण्याने स्नान करत असत.त्यामुळे आपणही निर्मम आणि पवित्र पाण्याने स्नान करावे.निर्मल आणि पवित्र पाणी ज्या नद्यांचे आहे,त्यांचा उगम हा हिमालयातून किंवा मोठ्या डोंगरातून झालेला असतो. हिमालय पर्वत किंवा डोंगर भागात त्या ठिकाणी अनेक वनस्पतीझाडे असतात.त्या वनस्पती किंवा झाडे हे औषधी असतात.त्यांच्या मुळ्याद्वारे व पानाद्वारे त्यांचा औषेधी गुणांचा संबंध या पाण्यासी येतो,त्यामुळे ते पाणी गुणकारी औषध बनते.तसेच अशा भागात संत—महात्मा यांचा संबंध आल्यामुळे ते पाणी संस्कारित होऊन पवित्र बनते.यामुळे त्या पाण्याने स्नान करावे.सर्वजन नदीच्या किनारी राहत नाहीत म्हणून दूर राहणाऱ्या लोकांनी तेथील पाणी आणून,त्या पवित्र पाण्यातील थोडासा पाण्याचा भाग आपल्या भागातील निर्मळ पाण्यात टाकून दररोज स्नान करावे.असे केले असता त्या पवित्र पाण्यासी आपल्या स्नासी संदंध येऊन आपण निर्मल आणि पवित्र बनोतात.या पद्धतीने असे स्नान करावे.त्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र दररोज परिधान करावे.दररोज संध्यावंदनादि कर्मे करावेत.त्यानंतर हवन करावे.हवन झाल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा.श्रीकृष जसा विधी दररोज करत असत,तसाच विधी आपणही करावयास पाहिजे,म्हणजे आपणही पवित्र हौउत.||६|| अर्थः---नंतर,उदय पावणाऱ्या सूर्याचे करून,आपलेच अंशभूत अशा देव,ऋषि व पितर यांचे अर्पण करून,स्वरूपसाक्षात्काने युक्त अशा त्याने,वृद्धांचे व ब्राम्हणाचे पूजन केले आणि अलंकार अर्पण केलेल्या त्या ब्राम्हणांना,ज्यांची शिंगे सुवर्णाने बंधविलेली आहेत,ज्यांच्या गळ्यांत मोत्यांच्या माळा घातलेल्या आहेत,ज्यांना उत्तम वस्त्रांच्या झुलीघातलेल्या आहेत व ज्यांचे खुर आहेत व ज्यांचे खुर रुप्याने मढविलेली आहेत अशा पुष्कळ दुध देणाऱ्या,स्वभावाने गरीब,प्रथमच प्रसूत व सवत्स अशा गाईचे एकेक बद्ध १३०८४ दररोज प्रत्येक घरी,रेशमी पटावे,कृष्णाजिने व तीळ यांसहवर्तमान दान केले||७-८-९|| | गोविप्रदेवतावृद्धगुरून् भूतानि सर्वशः | नमस्कृत्यात्मसम्भूतीर्मन्गलानि समस्पृशत्||१०|| अर्थः---नंतर,त्याने आपल्या विभूतीरूप गाई ब्राम्हण,देवता,वृद्ध,गुरु आणि सर्वभुते यांना नमस्कार करून,कपिला गाईवगैरे मंगल द्रव्यांस स्पर्श केला||१०|| भावार्थ:--- भगवंतांच्या विभूतीरूप असलेल्या गाई,ब्राह्मण,देवता,आई—वडिल,वरुष्ठ मंडळी,गुरुजन आणि सर्व प्राण्यांना वंदन करावे,कारण त्यामुळे त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो.त्यांचा आपणास आशीर्वाद मिळतो.त्यामुळे आपली प्रगती होते,म्हणून यांना प्रणाम—नमस्कार करावा.त्यात आपलेच हित असते.||१०|| अर्थः---नंतर मनुष्यलोकाला विशेषे करून भूषणभूत अशा आपणाला पितांबरादिक वस्त्रांनी,कौस्तुभादिक भूषानांनी व दिव्य अशा मलांनी व अनुलेपांनी भूषित केले||११|| | अवेक्ष्याज्यं तथाssदर्शं गोवृषद्विजदेवताः | कामांश्च सर्ववर्णानां पौरान्त:पुराचारिणाम् | | | प्रदाप्यः प्रकृतिः कामैः प्रतोष्य प्रत्यनन्दत ||१२|| अर्थः----नंतर,मंगलाकरिता घ्रुतामध्ये व आरशामध्ये आपले प्रतिबिंब पाहून,तशाच गाई,वृषभ ब्राम्हण व देवता यांचे दर्शन घेऊन नगरानमध्ये राहणाऱ्या सर्ववर्णांना व अंतःपुरांतील इच्छित पदार्थ देवून व आत्मत्यादिकांना इच्छित विषयांची संतुष्ट करून अभिनंदन केले||१२|| भावार्थ:--- सर्व लोकांच्या गरजा पूर्ण केल्यानंतर,त्यांना प्रसन्न होऊन त्यानंतर स्वत:आनंदी होत असत.आपणही दररोज कोणाचे—ना—कोणाचे दु:ख निवृत्त केल्यानंतर त्यांना प्रसन्न केल्यानंतर स्वत: आनंदी व्हावे.तोपर्यंत इतरांचे दु:ख निवृत्तीचे कार्य करत राहावे.असे केल्याने भगवंत प्रसन्न होतात व आपल्यावर कृपा करतात.||१२|| | संविभज्याग्रतो विप्रान् स्त्रक् ता म्बूलानुलेपनैः | सुहृद: प्रकृतीर्दारानुपायुङ्क्त ततः स्वयम् ||१३|| अर्थः---नंतर,श्रीकृष्णाने प्रथमतः ब्राम्हण,मित्र,प्रधान व स्त्रिया यांना माळा तांबुल व उट्यावगैरे उपभोग पदार्थांचा विभाग देऊन नंतर त्यांचा भोगाकरिता आपण स्वीकार केला||१३|| भावार्थ:--- फुलाच्या माळा,तांबुल,चंदन,इत्यादी वस्तू अगोदर संत—महात्मा—संन्यासी ज्ञानी ब्राह्मण यांना या वस्तू देत.त्यानंतर स्वजन,मंत्री आणि राण्यांना वाटप करत असत.यांना वाटप केल्यानंतर स्वत:उपयोग घेत असत.म्हणून आपणही वरीलप्रमाणे सात्विक पदार्थ वाटप करावेत व शेवटी आपण घ्यावेत.असा परमार्थ करावा.\|१३|| अर्थः---इतक्यामध्ये दारूक सारथी,सुग्रीवादिक नावांचे घोडे जोडलेला परमार्श्यकारक रथ जवळ आणून उभा करून आपण अग्रभागी प्रणाम (मुजरा ) करून उभा राहिला असतां||१४|| भावार्थ:--- स्वामीचा सेवक जो असतो,त्याने आपले जे स्वामी आहेत त्यांना आल्या—आल्या प्रणाम करून स्वामी समोर उभे राहावे,असे धर्माशात्र सांगते.||१४|| अर्थः---श्रीकृष्णाने,आपल्या हाताने त्याचे जोडलेले हात धरून,सात्यकी व उद्धव यांच्यासहवर्तमान त्या रथावर,जसा उदयपर्वतावर सूर्य आरोहण करितो त्याप्रमाणे आरोहण केले ||१५|| | ईक्षितोsन्तः पुरस्त्रीणां सव्रीडप्रेमवीक्षितैः | कृच्छ्राद् विसृष्टो निरगाज्जातहासो हरन् मनः ||१६|| अर्थः---त्यावेळी लज्जा व प्रेम यांसहित अंतःपुरांतील स्त्रियांच्या दृष्टींनी अवलोकित असता,क्षणभर हळूहळू चालविलेल्या रथांत स्थित होऊन,नंतर त्या स्त्रियांनीच अवलोकनद्वारा मोठ्या दुःखाने जावयास आज्ञा दिली असता,किंचित हास्य करून,त्याचे मन हरण करीत असता निघून गेला||१६|| अर्थः---याप्रमाणे सर्व घरांतून निरनिराळ्या रूपाने निघून नंतर एकाच रूपाने,सर्व यादवांनी परिवेष्टित होऊन तो श्रीकृष्ण,सुधर्मानामक सभेमध्ये प्रविष्ठ झाला.हे राजा,ज्या सभेमध्ये प्रविष्ठ झालेल्या पुरुषांना क्षुधा,तृषा,शोक,मोह,जरा व मृत्यू हे सहा विकार प्राप्त होत नाहीत||१७|| अर्थः---त्या सभेमध्ये उत्तम आसनावर बसलेला व मनुष्यश्रेष्ठ अशा यादवांनी परिवेष्टित झालेला तो समर्थ भगवान श्रीकृष्ण,आपल्या कांतीने दिशांताना प्रकाशयुक्त करीत असता,जसा आकाशामध्ये नक्षत्रगनांनी परिवेष्टित असलेला चंद्र,सर्वदिशांना प्रकाशयुक्त करीत शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला||१८|| अर्थः---हे राजा,त्या सभेमध्ये मौजेन थट्टेची भाषणे करणारे लोक,नानाप्रकारच्या हास्यरसांनी त्या समर्थ कृष्णाला प्रसन्न करूं लागले.तसेच नटांचे आचार्य,मृदंग,वीणा,तबले,सारंग्या,मुरल्या,झांजा व शंखयांच्या शब्दासहवर्तमान निरनिराळ्या आपापल्या समुदायांनी तांडवनृत्याच्या योगेकरून त्या भगवंताची सेवा करूं लागले,तशाच नृत्य व गायन करणाऱ्या वारागंना,आपापल्या थव्यांनी मृदंगादि वाद्यांसहवर्तमान नृत्य व गायन करूं लागल्या,तसेच सुत,मागध व बंदी हे,भगवंताची स्तुती करूं लागले||१९|| अर्थः---त्या सभेमध्ये बसलेले कितीएक ब्राम्हण,वेदमंत्राचे व्याख्यान करूं लागले,कितीएक बोलण्यामध्ये चतुर असलेले पौराणिक,पुण्ययशस्वी अशा पूर्वीच्या राजांच्या कथा कथन करूं लागले||२१|| अर्थः---याप्रमाणे प्रतिदिवशी चालत असता,हे राजा,एके दिवशी कधीही कोणी ण पाहिलेला असा एक पुरुष,सभाद्वारांत प्राप्त झाला तेव्हा,द्वारपालांनी भगवंताला कळवून त्याच्या आझेने त्या सभेमध्ये प्रवेश करविला||२२|| अर्थः---तेव्हा त्याने हात जोडून काळकर्मांचाही नियंत अशा श्रीकृष्णाला नमस्कार करून हात जोडून जरासंधाने बंदीत घातल्यामुळे राजनाजे दुःख प्राप्त झाले होते ते निवेदन केले||२३|| अर्थः---म्हणजे त्या जरासंधाच्या दिग्विजयाचेठिकाणी जे राजे नम्रता पावले नाहीत हजार आठशे राजांना गिरीव्रजनामक किल्ल्यामध्ये त्या जरासंधाने बलात्काराने रोधून ठेविले होते,त्यांचे दुःख निवेदन केले||२४|| | कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन् प्रपञभयभन्जन | वयं त्वां शरणं यामो भवभीताः पृथग्धियः ||२५|| अर्थः---आता दूताने कळविलेली राजांची विद्याप्राप्ती सांगतो-हे कृष्णा,हे अप्रमेयस्वरूपा,हे शरणागतभयनाशका,जन्ममरणादिरूप संसारापासून भ्यालेले व भेदबुद्धी धरण करणारे आम्ही तुला शरण आलो आहे||२५|| अर्थः---आता,भेदपाहणाऱ्या पुरुषाला संसारभय कसे प्राप्त होते त्याचे विवरण करीत नमस्कार करितात-या संसारामध्ये असलेला हा लोक,जोपर्यंत काम्य व निषिद्ध कर्मामध्ये अत्यंत रममाण होऊन,तूं सांगितलेल्या तुझ्या पूजनरूप आपल्या कल्याणकारक धर्मामध्ये सावध राहत नाही,तोपर्यंत जो कालरूपी बलवानतूं,याच्या वांचण्याच्या आशेलाच तत्काळ तोडून टाकितोस,त्या निरंतर सावध असणाऱ्या कालरूपी तुज भगवंताला नमस्कार असो||२६|| अर्थः----हितर लोकांची गती झाली,आम्हीतर तुझे भक्त असता आम्हांला हे दुःख कां भोगावे लागते याचे आश्चर्य वाटते.कारण,हे ईश्वरा,आपल्या भक्तांच्या रक्षणाकरीता व दुष्टांच्या निग्रहाकरिता,आपल्या संकर्षरूप अंशासहवर्तमान तूं जगदीश्वर उत्पन्न झाला आहेस असे असतां,दुसरा कोणी एखादा ( जरासंधादिक ) जर आम्हांला दुःख देत आहे,तर तो काय माझा भक्त नाश पावत नाही,मी भक्तांचे योगक्षेम चालवितो इत्यादीकतुझ्या आज्ञेचे उल्लंघन करीत आहे किंवा तूं रक्षण केलेलाही आमच्या सारखा जन,आपल्या कर्मापासून झालेले दुःख पावतोच ते आम्ही जाणत नाही,म्हणजे हे दोन्ही प्रकार आम्हांस योग्य वाटत नाहीत||२७|| अर्थः---कोणते ते दुःख असे म्हणशील तर – हे ईश्वरा,तुझ्या अनुग्रहाने निष्काम पुरुषांना मिळणारे व आपल्याच ठिकाणी असलेले जे स्वरूप सुख त्याचा त्याग करून,आम्ही स्वप्रांतील सुखासारखे व स्त्रीपुत्रादिकाच्यास्वाधीन असणारे राजसुख प्राप्त होण्याची इच्छा करितो आणि त्या करिता जेथे निरंतर भय आहे अशा प्रेतासारख्या शरीराने पुत्रदारादिकांची चिंताच केवळ धारण करितो याप्रमाणे या संसारामध्ये तुझ्या मायेने अतिदीन ( विषयासक्त ) होऊन क्लेश पावत आहों||२८|| भावार्थ:--- राज्योपाभोगाचे सुख विषयसाध्य आहे.ते क्षणभंगुर असून किंचित सुख व अपार दु:ख देणारे आहे.म्हणून विषय—सुखांचा त्याग करून परमात्म्याच्या सुखाचा अनुभव घ्यावा.जीवांच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे जीव आत्मसुख सोडून विषयांच्या सुखाकडे धावत असतो,म्हणून जीवांनी साठू—संतांची संगती करून निष्काम परमार्थ करावा,त्यामुळे अंत:करण शुद्ध व स्थिर होऊन सत्संग करून त्याद्वारे ज्ञान प्राप्त करून आत्मसुख घेण्याचा प्रयत्न करावा.||२८|| अर्थः----यास्तव,तुझ्या मायेने केलेला कर्मबंध तूंच निवृत्त कर.ज्याअर्थी तुझे चरण,शरणागताचा शोक घालविणारे आहेत ज्याअर्थी,तूंच जरासंधनामक कर्मपाशाने बद्ध झालेल्या आम्हांस त्यापासून सोडीव.आता तुम्हीच पराक्रम करून तेथून सुटा.असे म्हणशील तर दहा हजार मदोन्मत्त गजांचे बळ धरण करणाऱ्या ज्या एकट्या जरासंधांने,आम्हां राजांना,असे सिंहाने मेंढ्यांना कोंडून ठेवावे त्याप्रमाणे कोंडून ठेवावे ठेविले आहे,म्हणूनच आम्ही प्रयत्न करून त्यापासून मुक्त होण्यास समर्थ नाही||२९|| अर्थः---हे अजिता,हे चक्र उचलून धरणाऱ्या देवा,जो जरासंध,अठरावेळ तुझ्या बरोबर युद्ध झाले त्यांत सतरावेळा युद्धामध्ये तूं खरोखर त्याचा पराभव केला असतांही,अठरावे वेळी मनुष्यचेष्टेचा विनोद करणाऱ्या अनंतपराक्रमीतुज भगवंताला एकवार जिंकून गर्वयुक्त झाला आहे तो,तुझे आम्ही या नांत्याने आम्हांस फारच दुःख देत आहे,यास्तव त्याबद्दल जे योग्य असेल ते करावे||३०|| | इति मागधसंरुद्धा भवद्दर्शनकान्ग्क्षीणः | प्रपन्नाः पादमूलं ते दीनानां शं विधीयताम् ||३१|| अर्थः---राजादूत म्हणाला:---हे प्रभो,याप्रमाणे जरासंधाने कोंडलेले व व तुझ्या दर्शनाची इच्छा करणारे राजे,तुझ्या चरणमुलाप्रत शरण आले आहेत,यास्तव त्या दीनाना सुख होईल तशी तजवीज करावी||३१|| | राजदूते ब्रुवत्येवं देवर्षिः परमद्दुतिः | बिभ्रत् पिंगजटाभारं प्रादुरासीद् यथा रविः ||३२|| अर्थः---श्रीशुकदेव म्हणतात:---राजा,याप्रमाणे राजांचा दूत बोलत असता,तेथे सूर्यासारख्या परमकांतीने युक्त व पिंगटवर्ण जटाभार धारण करणारा नारदऋषि अकस्मात प्राप्त झाला||३२|| अर्थः---त्याला पाहतांच,ब्रम्हादिक सर्व लोकेश्वरांचाही पालक अशा त्या भगवान श्रीकृष्णाने,मोठ्या त्वरेने सभासदांसहवर्तमान व सेवकासहवर्तमान उठून हर्षपूर्वक मस्तकाने वंदन केले||३३|| अर्थः---नंतर,यथाशास्त्र त्याचे पूजन करून आसनाचा स्वीकार करणाऱ्या त्या नारदाला,श्रद्धेने व मधुरभाषानंनी संतुष्ट करीत भाषण केले कि,- ||३४|| अर्थः---हे नारदा,सांप्रतकाळी तिन्ही लोकांची निर्भयस्थिती आहेना ? अहो ! लोकांमध्ये पर्यटन करणाऱ्या तुजपासून आम्हांला सर्व लोकांतील वृत्तांत समजतो हा मोठाच लाभ आहे||३५|| अर्थ;---कारण,ज्यांचा कर्ता ईश्वर आहे अशा सर्वलोकांमध्ये तुला ण समजलेले असे कांहीच नाही;यास्तव हल्ली पांडवांच्या मनांत काय आहे ते तुम्हांला आम्ही विचारितो||३६|| अर्थः---याप्रमाणे सर्वज्ञानेंही अज्ञान्यसारखा जरासंधाच्या वाढा करितांच पांडवांचा आशय विचारिला असता नारद,हि देवाची माया आहे,असे जाणून म्हणाला कि,- हे समर्था सर्वव्यापका,विष्टस्त्रष्टया ब्रम्हदेवालाही मोह उत्पन्न करणारा,आपल्या विद्यादिक शक्तीच्या योगाने,सर्व प्राणीमात्रांमध्ये अंतर्यामीत्वेकरून राहणारा असून भस्माने आच्छादित झालेल्या अग्नीप्रमाणे आपल्या शक्तीनेच आपल्या तेजाने आच्छादन करून राहिलेला अशा तुज भगवंताच्या,उल्लंघन करण्यास अशक्य अशा पुष्कळ माया,मी पाहिल्या आहेत,म्हणून तूं सर्वज्ञ असून मनुष्यनात्याने,अज्ञान्यासारख्या प्रश्न करतोस हे मला आश्चर्य वाटत नाही||३७|| अर्थः---हे देवा,मिथ्याभूत असलेले हे जग,ज्या तुझ्या मायेने सर्व खरे आहे असे भासते,त्या स्वेच्छामात्रेकरून जगाला उत्पन्न करणाऱ्या तुझ्या मनातील अभिप्राय चांगल्यारीतीने जाण्याणास कोण पुरुष समर्थ आहे ? कोणीच नाही.यास्तव सर्वप्रकारे आपल्या अचिंत्यस्वरूपाचे असणाऱ्या त्या तुज भगवंताला केवळ नमस्कार असो||३८|| अर्थः---अज्ञानतमाने वेष्टित असल्यामुळे,दुःख देणाऱ्या शरीराच्या योगाने संसार पावणाऱ्या व त्याच अज्ञानाने त्या शरीरापासून मोक्षाला उपाय ण जाणणाऱ्या जीवाला,श्रवणादिकेकरून मोठा प्राप्त होण्यासाठी,ज्या तूं लीलावाताराना आपला यशोरूप दीप ||३९|| अर्थः---आतां,सर्व साक्षी अशा तुला जरी ण समजलेले काहीच नाही तथापि मनुष्यलोकाला अनुसरणाऱ्या तुला,तुझ्या पुत्र व भक्त अशा धर्मराजांच्या मनात इच्छित असलेले मी कळवितो||४०|| | यक्ष्यति त्वां मखेन्द्रेण राजसूयेन पाण्डवः | पारमेष्ठ्यकामो नृपतिस्तद् भवाननुमोदताम् ||४१|| अर्थः---सार्वभौमपणा प्राप्त होण्याची इच्छा करणारा तो पांडूपुत्र धर्मराजा,यज्ञश्रेष्ठ अशा राजसुययज्ञाच्या योगाने तुझे आराधन करण्याची इच्छा करीत आहे,त्याला तूं अनुमोदन द्यावेस||४१|| अर्थः---येथूनच अनुमोदन द्याचे असे नाही,तर तेथे जावे.कारण,हे देवा,त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये दर्शनाची इच्छा करणारे इंद्रादिक देव व यशस्वी राजे,अवश्य प्राप्त होतील||४२|| अर्थः---आणि हे सर्वही तुझ्या दर्शनादिकेकरून पवित्र होतील.कारण हे ईश्वरा,मनुष्याकृती ब्रम्हरूप अशा तुझा कथेच्या श्रवणेकरून व ध्यानेकरून चांडाळहि पवित्र होतात,मग अवलोकन व स्पर्शवगैरे करणारे पुरुष,दर्शनस्पर्शादिकेकरून पवित्र होतील हे काय सांगावे ! ||४३|| अर्थः---हे सर्वजगाच्या मंगलरूपा,ज्या तुझे,सर्वदिशांना छतासारखे भूषणरूप,व निर्मल असे यास,स्वर्ग,पाताळ व भूमी यांचेठिकाणी प्रख्यात असून जगाला पवित्र करिते,तसेच तसेच ज्या तुझे चरणोदक,स्वर्गावर मंदाकिनीरूपाने पाताळामध्ये भोगवतीरूपाने व या भूलोकी गंगारुपाने प्रसिद्ध असता त्रैलोक्याला पवित्र करिते,त्या तुझ्या प्रत्यक्ष आगमनाने सर्व मंगळ व पवित्र होईल हे काय सांगाव ! ||४४|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,त्या सभेमध्ये नारदाने सांगितलेला धर्मराजाकडील वृत्तांत श्रवण करणारे यादव,जरासंधाला जिंकण्याच्या इच्छेने,हस्तिनापुरात जाण्याबद्दल नारदाच्या भाषणाचे मान्यतेने ग्रहण करीत असता,किंचित हास्य करून,मधुर वाणीने आपला भक्त अशा उद्धवाप्रत भाषण केले कि,-||४५|| | त्वं हि नः परमं चक्षु सुहृन्मन्त्रार्थतत्ववित् | तथात्र ब्रूह्यनुष्ठेयं श्रद्दध्म: करवाम तत् ||४६|| अर्थः--श्रीकृष्ण म्हणाले:---“उद्धवा!तू माझा सुह्रद,दिव्य नेत्र आणि राजनीती चांगल्या प्रकारे जाणणारा आहेस.म्हणून या विषयी काय करावे,ते तू सांग.तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्याब सल्ल्यानुसारच आम्ही वागू.||४६|| अर्थः---उध्दवाणे पहिले की,आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला विचारीत आहेत.तेव्हा त्यांची आज्ञा शिरीधार्य मानून तो म्हणाला.||४७||---------||४७|| __________________________________________________________________________________________________ |७१--- २---श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे---१--- __________________________________________________________________________________________________ | इत्युदीरीतमाकर्ण्य देवर्षेरुद्धवोsब्रवीत् | सभ्यानां मतमाज्ञाय कृष्णस्य च महामतिः ||१|| | यदुक्तमृषिणा देव साचीव्यं यक्ष्यतस्त्वया | कार्यं पैतुष्वसेयस्य रक्षा च शरणैषिणाम् ||२|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला- हे राजा,पूर्वी सांगितल्याप्रमाणे राजसुयाकरिता गमन करावे असे नारदाचे मत,जरासंधाला जिंकून राजांचे रक्षण करावे असे सभासदांचे मत व दोन्ही करावी असे श्रीकृष्णाचे मत जाणून तो महाबुद्धीमान उद्धव म्हणाला कि,- हे देवा,यज्ञ करणाऱ्या आतेबंधू धर्मराजाचे सहाय्य करावे असे जे नारदाने सांगितले आहे ते तूं करावेस,तसेच शरण आलेल्या राजांचे रक्षणही करावेस||१-२|| अर्थः---त्यांत प्रथम राजसुयाकरिता गमन व नंतर राजांचे रक्षण करावे असे सांगतो- सर्व दिशा जिंकणाऱ्या पुरुषाने राजसुययज्ञाच्या योगेकरून यजन करावे असा विधी असल्यामुळे दिग्वीजयाच्या प्रसंगाने होणारा जो जरासंधाचा जय तो राजसुयाकरिता व शरणागतांच्या रक्षणाकरितांही राजांना होईल असे माझ्या विचारास येते||३|| अर्थः---ह्या जरासंधाच्या वधाने आमचाही मोठाच निर्भयरूप कार्यलय होईल आणि हे गोविंदा,बंदीत पडलेल्या राजांना सोडविणाऱ्या तुझे यशही प्रसिद्ध होईल||४|| अर्थः---आता,अतिउत्कंठीतपणाने लवकर जरासंधाला मारण्याची इच्छा करणाऱ्या यादवांना म्हणतो कि- तो प्रसिद्ध जरासंध राजा,बलाविषयी दहाहजार हत्तींच्या बरोबरीचा आहे.तो त्याच्या इतक्याच बळाने युक्त असलेल्या भीमावांचून,दुसऱ्या त्याच्याहून जास्ती बलाढ्य असणारानाहि मोठ्या कष्टानेसुद्धा जिंकण्यास अशक्य आहे.कारण,भीमापासूनच त्याला मृत्यू सांगितलेला आहे||५|| अर्थः---तो जरासंध,द्वंद्वयुद्धामध्येच जिंकिला पाहिजे,शेंकडो अक्षौहिणी वेढा घालून जिंकिला कामा नये.आतां तो आपले सैन्यच युद्धाला पाठवील मग त्याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध कसे होणार असे म्हणावे तर – तो ब्राम्हनभक्त आहे म्हणून ब्राम्हणांनी याचना केली असतां ती त्यांना कधीही नाही म्हणणार नाही||६|| अर्थः---यास्तव,ब्राम्हणाचा वेष धारण करणाऱ्या भीमसेनाने त्याच्याजवळ जाऊन द्वंद्वयुद्धाची भिक्षा मागावी,म्हणजे तो भीमसेनसमबली असला तरी तुझ्या सन्निधभागी त्याला मारील,यांत संदेह नाही||७|| अर्थः---आता,माझ्या सान्निध्याने काय होणार असे म्हणशील तर – रुपरहित काळस्वरूपी तुज ईश्वराचे जसे ब्रम्हदेव आणि शंकर हे,जगाच्या उत्पत्तीसंहाराविषयी केवळ निमित्तमात्र आहेत, ||८|| अर्थः---म्हणून या उपायाने तूं त्याला लवकर मारविले असतां,जरासंधाने बंदीत टाकलेल्या राजांच्या स्त्रिया,आपल्या घरांमध्ये बालकांच्या सात्वनादिकांचेवेळी महेवस्ता,तूं रडूं नकोस श्रीकृष्ण आता से करील बरे ! असे सांगूनआपल्या शत्रूचा ( जरासंधाचा ) वध आणि प्राणप्रियपतीचे सोडविणे ह्या तुझ्या कीर्तीकारक कर्माचे गायन करीत आहेत,ते तरी जशा गोपी,शंखचूडनामक तुझ्या शत्रूच्या वाधाचे व सीतामोक्षाचे गायन करितात,अथवा आम्ही यादव,जसे कंसाच्या वधाचे व देवकीवसुदेवांच्या मोक्षाचे गायन करितो त्याप्रमाणे गायन करीत आहेत ते सर्व खरे होईल ||९|| | जरासन्धवधः कृष्ण भूर्यर्थायोपकल्पते | प्रायः पाकविपाकेन तव चाभिमतः क्रतुः ||१०|| अर्थः---आणि हे कृष्णा,जरासंधाच्या वध हा,शरणागतांचे रक्षण,राजसूपयज्ञ तुझी सत्कीर्ती व भुमरनिवृत्ती इत्यादिक पुष्कळ कार्यभाग घडण्यास साधनभूत होईल व याच्या योगाने सुखसाध्य होतील.व कर्मफळांच्या परिपक्वपणाने म्हणजे राजांच्या पुण्यविपाकाने व जरासंधाच्या पापविपाकाने तुलाही हा आवडेलाच आहे.राजसुयास गेलास म्हण्काजे – ह्या सर्व गोष्टी घडून येतीलव कर्मफळांच्या ||१०|| | इत्युद्धववचो राजन् सर्वतोभद्रमच्युतम् | देवर्षीर्यदुवृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन् ||११|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,यप्राकारचे,सर्वप्रकारे कल्याणकारक व युक्तींनी पोषकतपंना असलेले ते उद्धवाने,नारदऋषि,यादवांतील प्रौढरूपव श्रीकृष्ण यांनी अत्यंत मान्य केले||११| भावार्थ:--- आपल्याला दिलेला सल्ला—मार्गदर्शन आपल्यापेक्षा कनिष्ठांनी जरी दिला व तो जर हिताचा असेल मान्य करावयास पाहिजे.||११|| अर्थः---नंतर हे राजा,देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णाने वसुदे गुरूंची आज्ञा घेऊन व बाल्रामाचीव उग्रसेन राजाचीही आज्ञा घेऊन अशा दारूकादिक सेवकांना राजसुय यज्ञास जाण्याकरिता तयारी करण्याची आज्ञा केली आणि पुत्रांसहित व सामनासहित आपल्या स्त्रियांचीही परवानगी करवून नंतर त्या गरुडध्वज श्रीकृशांने,सारथ्याने आणलेल्या आपल्या रथावर आरोहण केले||१२-१३|| अर्थः---तदनंतर,रथ,गज पायदळ व घोडेस्वर यांनी भयंकर असलेल्या सेनेने परिवेष्टित असा तो श्रीकृष्ण,म्रुदंग,नोबदी,डंके,शंख व गोमुख या वाद्यांच्या गजराने नदित झालेल्या त्या पश्चिमदिशेकडून निघाला||१४|| अर्थः---तेव्हा,त्या श्रीकृष्णपतीच्या मागून आपल्या पुत्रांसह वर्तमान,श्रेष्ठ अशी वस्त्रे,भूषणे,उट्या व माळा धारण करणाऱ्या व ढाला तलवारी धारण करणाऱ्या मनुष्यांनी संरक्षित अशा त्या पतिव्रता रुक्मिण्यादिक कृष्ण स्त्रिया,मेण्यांत,रथांत व सुदर्णाने बंधविलेल्या पालख्यांत बसून निघाल्या||१५|| अर्थः---त्यावेळी ज्यांच्या झोंपडया,वाळा मोळवगैरे तृष्णाच्या व बांबूच्या तट्याच्या निर्माण केलेल्या आहेत व ज्यांचे समान,कांबळे,पसोड्या व बांबूचे कुडवगैरे आहे,त्या सेवकलोकांच्या स्त्रिया व वारांगना,आपापले सर्व समान,बैलांवर व खटांऱ्यावर चोहोबाजूंनी घट्ट बांधून स्वतः अलंकार धारण करून,डोळ्या,उंट,बैल,टोगणे,गर्दभ,खेचर,गाडे व हत्तींनी यांच्यावर बसून निघाल्या||१६|| अर्थः---तेव्हा रथाचे घडघडाट व घोड्याचे खिकाळ्ने वगैरे तुमुळशब्दांनी युक्त असे ते सैन्य,मोठे ध्वज,पताका,छत्रे,चामरे,उत्तमप्रकारची आयुधे,भूषणे,किरीट व कवचे यांच्या योगाने जसा समुद्र,दिवसाचेवेळी सूर्याच्या किरणांनी व क्षोभ पावलेल्या मत्स्यण क्रादिकांच्या व लहरीच्या योगाने शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागले||१७|| अर्थः---याप्रमाणे जाण्यास निघाल्यानंतर श्रीकृष्णाने सत्कार करून पूजा समर्पण केलेला व श्रीकृष्णाच्या दर्शनाने सर्व इंद्रिये तृप्त झालेला तो नारदमुनी,त्या कृष्णाला राजा सुययज्ञास जाण्याचा निश्चय जाणून नमस्कार करून,त्यांचेच हृदयामध्ये धारण करीत असता आकाश मार्गाने निघून गेला||१८|| | राजदूतमुवाचेदं भगवान् प्रीणयन् गिरा | मा भैष्ट दूत वो घातयिष्यामि मागधम् ||१९|| अर्थः---नंतर भगवान राजदुताला मधुरवाणीने संतुष्ट करीत म्हणाला कि,तूं राजांस असे कळीव कि,- तुम्ही भिउं नका,तुमचे कल्याण होईल,मी जरासंधाच्या लवकरच मारवितो||१९|| अर्थः----याप्रमाणे भगवंताने सांगितले असता त्या दूताचे तेथून जाऊन राजांना भगवंताने सांगितल्याप्रमाणे सर्व कळविले.ते राजेही जरासंधापासून मुक्त होण्याची इच्छा करीत असते,भगवंताच्या दर्शनाची मार्ग प्रतीक्षा करीत राहिले||२०|| अर्थः---नंतर श्रीकृष्ण आनर्त,सौवीर,मरू,कुरक्षेत्र आणि तेथे जाताना मध्ये लागणारे पर्वत,नद्या,नगरे,गावे,गौळवाडे,खाणी इत्यादी पार करून पुढे जाऊ लागले.||२१|| अर्थः---नंतर,दृशद्धती व सरस्वती या नद्या तरून पुढे पंचाल्देश तसेच मत्स्यदेश यांचे उल्लंघन करून इंद्रप्रस्थामध्ये गमन केले||२२|| अर्थ:---तेव्हा मनुष्यांना दृष्टी पडण्यास दुर्लभ असा तो श्रीकृष्ण जवळ आला असे असे ऐकून,प्रसन्नचित्त झालेला धर्मराजा,उपाध्यायासहवर्तमान व मित्रमंडळीसहवर्तमान त्याला आणण्याकरिता नगरांतून बाहेर सामोरा निघाला||२३|| भावार्थ:--- श्रीकृष्ण जवळ येत आहेत असे समजताच युधिष्ठीर आणि संबंधी त्यांच्या स्वागतासाठी नगरच्या बाहेर गेले.आपणही तसेच श्रेष्ठांचे स्वागत करावे.||२३|| अर्थः---तो,गायनांच्या व वाद्यांच्या घोषासहवर्तमान हृषीकेश भगवंताला,जशी इंद्रिये मोठ्या आदराने मुख्यप्राणाला सामोरी जातात त्याप्रमाणे समोर केला||२४|| | दृष्ट्वा विक्लिन्नहृदयः कृष्णं स्नेहेन पाण्डवः | चिराद् दृष्टं प्रियतमं सस्वजेsथ पुनः पुनः ||२५|| अर्थः---नंतर,स्नेहाने आर्द्रचित्त झालेल्या त्या धर्मराजाने,फारवेळाने दृष्टी पडलेल्या अतिप्रिय श्रीकृष्णाला पाहून,वारंवार आलिंगन केले||२५|| भावार्थ:--- आत्मीयतेच्या---र्प्रीयतम व्यक्ती जवळ आल्या कि आनंद वाटतो.त्या आनंदाच्या भरात तो त्या व्यक्तीस आपल्या हृदयाजवळ कवटाळून आनंद घेतो.||२५|| | दोर्भ्यां परिष्वज्य रमामलालयं मुकुन्दगात्रं नृपतीर्हताशुभः | लेभे परां निर्वृतिमश्रुलोचनो हृष्यत्तनुर्विस्मृतलोकविभ्रमः ||२६|| अर्थः---लक्ष्मीचे निर्मल स्थान अशा श्रीकृष्णाच्या शरीराला बाहूंनी आलिंगन करून,ज्याचे पाप नष्ट झाले आहे.ज्याच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रु प्राप्त झाले आहेत,ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत व ज्याला लोकव्यवहाराचा विसर पडला आहे अशा तो धर्मराजा,परमसंतोष पावला||२६|| भावार्थ:--- श्रीकृष्णांना आलिंगन दिल्यामुळे युधीष्ठारांचे पाप नष्ट झाले.त्यामुळे त्याला परमानंद प्राप्त झाला.त्यास त्यामुळे मायिक प्रपंचाचे स्मरण राहिले नाही.||२६|| अर्थः---तसाच भीम,मातुळपुत्र अशा त्या श्रीकृष्णाला आलिंगन करून हास्य करीत प्रेमाच्या वेगाने आनंदाश्रूंनी पूर्णनेत्र होऊन परमानंदात निमग्न झाला; तसेच नकुल,सहदेव आणि अर्जुन तांनीही आनंदाश्रूंनी पूर्णनेत्र होऊन अत्यंत मित्र अशा श्रीकृष्णास आलिंगन केले||२७|| अर्थः---त्यांत समवयस्क असल्यामुळे अर्जुनाने त्याला केवळ आलिंगन केले,नकुलशदेवांनी आलिंगन पूर्वक वंदन केले.श्रीकृष्णानेही ब्राम्हणांना वंदन करून,वयाने अधिक असलेल्या धर्मराजादिकांस वंदन केले||२८|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना आणि कुरुवंशातील वृद्धांना नमस्कार केला.आपणही संत—महात्मा—ब्रह्मज्ञानी ब्राह्मणांना योग्यतेप्रमाणे नमस्कार करावा.||२८|| अर्थः----त्यांनी सन्मान केलेल्या श्रीकृष्णाने,सामोरे आलेल्या कुरुसंजय आणि कैकय यांचा सन्मान केला; नंतर सुत,मागध,गंधर्व,बंदी खुशामती लोक व ब्राम्हण हे सर्व एकदम मृदंग,शंख,पटह,वीणा,पनव,गोमुख इत्यादिक वाद्यांच्या गजरासहवर्तमान श्रीकृष्णाचेस्तवन व गायक करू लागले व वारांगना नृत्य करू लागल्या||२९-३०|| अर्थः----याप्रमाणे पांडवाबरोबर भेट झालेला तो पुण्यश्लोकशिखामनी भगवान श्रीकृष्ण,पांडवांनी परिवेष्टित व व सुतादिकांनी स्तुयमान असता अलंकृत झालेल्या ह्स्तीनापुरांत प्रविष्ट झाला||३१|| अर्थः----ते नगर,हत्तीच्या मदंगधयुक्त उदकांनी रस्ते भिजवलेले होते; तसेच चित्रविचित्र ध्वजांनी,सुवर्णपुष्पांच्या तोरणांनी,तसेच उदकाने तोंडोतोंड भरलेल्या पुष्पमाळादिकांनी अलंकृत केलेल्या कुभांनी,स्नांनेवगैरे नवीन वस्त्रे,भूषणे,माळांव चंदनाच्या उट्यावगैरे धारण केलेल्या पुरुषांनी व स्त्रियांनी सुशोभित होते||३२|| अर्थः----प्रत्येक घरामध्ये लाऊन ठेवलेल्या उत्तम दीपांनी व मांडून ठेवलेल्या पुष्पफळादिक पदार्थांनी युक्त होते,गावाक्षांतून बाहेर निघणाऱ्या आगरुधुपांनी मनोहर व झळकणाऱ्या पताकांनी युक्त असून मस्तकावर सुवर्ण कलश असलेल्या रुप्याच्या मोठमोठ्या शिखरांनी सुशोभित असलेल्या घरांनी दाट भरलेले होते.असे ते धर्मराजाचे नगर भगवंताने अवलोकन केले||३३|| अर्थः---तेव्हा,पुरुषांच्या नेत्रांचा आदर पूर्वक पाहण्याचा विषय असा तो श्रीकृष्ण प्राप्त झाला,हे ऐकून उत्कंठेने उठून धावतांना ज्यांच्या केशांच्या व नेसलेल्या वस्त्रांच्या गांठी सईल झाल्या आहेत,अशा तरुणी स्त्रिया,तत्काळ घरची कामे व शय्येवर निजलेले पति टाकून राजमार्गाने जाणाऱ्या त्या कृष्णाला पाहण्याकरिता निघाल्या||३४|| भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी तरुणी आपले घरातील कामे अर्धवट सोडून उत्कंठेने धावतच राजमार्गावर आल्या.त्याचप्रमाणे आपणसुद्धा संत—महात्मा यांच्या दर्शनासाठी आपले हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून दर्शन घेण्यासाठी उत्कंठेने त्वरा करावयास पाहिजे,कारण त्यांच्या दर्शनाने—उपदेशाने सात्विक संस्कार होतात.||३४|| | पृथा विलोक्य भ्रात्रेयं कृष्णं त्रिभुवनेश्वरम् | प्रीतात्मोत्थाय पर्यन्कात् सस्नुषा परिष्वजे ||३९|| अर्थः---नंतर,घरांच्या उपरमांड्यावर चढलेल्या त्या स्त्रियांनी,हत्ती,घोडे,रथ व शिवाय चतुरंगसैन्याने अगदी भरून गेलेल्या त्या राजमार्गामध्ये स्त्रियांसह वर्तमान प्राप्त झालेल्या त्या श्रीकृष्णाला पाहून,त्याच्या वर पुष्पवृष्टी केली व मनाने त्याला आलिंगन करून आनंदयुक्त आवलोकनाणेच त्याला स्वागतप्रश्न केला||३५|| अर्थः---त्यावेळी,चंद्रासहवर्तमान स्थित असलेल्या तारागणासारख्या,कृष्णासहवर्तमान स्थित असलेल्या त्या कृष्णपत्नींना मार्गामध्ये पाहून स्त्रिया म्हणाल्या कि,-ज्यांच्या नेत्रांना,सर्वमनोरथ पूर्ण करणारा हा पुरुषोत्तम,उदारहास्ययुक्त लीलावलोकनाच्या लेशाने सुख देत आहे,त्या ह्या कृष्णपत्नींनी जन्मांतरी काय बरे पुण्य केले होते !||३६|| अर्थः----असो,त्यावेळी त्या त्या मार्गाने ठिकाणी नगरवासी मोठमोठे शेटसावरकार लोक,गंधपुष्पतांबुलादिक शुभद्रव्ये हातांत घेऊन श्रीकृष्णाला सामोरे जाऊन त्याची पूजा करून निष्पाप झाले||३७|| अर्थः---नंतर घाई झालेल्या प्रफुल्लितनेत्र अशा अंतःपुरातील जणांनी प्रीतीने पुढे जाऊन सत्कार केलेला तो श्रीकृष्ण,राजमंदिरांत प्रविष्ट झाला||३८|| अर्थः---तेव्हा,आपल्या भावाचा पुत्र त्रिभुवनेश्वर श्रीकृष्ण प्राप्त झाला असे ऐकून संतुष्टचित्त झालेल्या त्या कुतीने पर्यकावरून उठून,द्रोपदीसहित पुढे जाऊन,त्याला आलिंगन केले||३९|| भावार्थ:--- आपले कोणी देहसंबधी संत--महात्मा असेल तर त्यांच्याविषयी भावना आपली संत—महात्मा असी होऊन त्यांच्याकडून संसारिक हित न घेता पारमार्थिक हित करून घ्यावावयास पाहिजे.त्यातच आपले खरे हित आहे.आपण पारमार्थिक हित आपल्यापुरते मर्यादित न ठेवारा सर्व कुटुंबाचे पारमार्थिक हित करून घ्यावे.||३९|| अर्थः---तेव्हा,आदरयुक्त अशा त्या धर्मराजाने देवदेवांचाही नियंता अशा श्रीकृष्णाला घरी आणिले असता,आनंदाने अत्यंत व्यापून गेलेल्या त्या धर्माला,श्रीकृष्णाच्या पुजेच्याही क्रमाची विस्मृती पडूं लागली||४०|| अर्थः---त्यावेळी श्रीकृष्णाने,पितृभगिनी अशा कुंतीला व गुरुस्त्रियांना वंदन केले आणि स्वातंही द्रोपदीने व सुभद्रेने अभिवांदीत झाला||४१|| अर्थः---तेव्हां कुंतीने प्रेरणा केलेल्या द्रौपदीने पतिव्रता अशी रुक्मिणी,सत्यभामा,भद्रा,जांबवती,कालिंदी,मित्रविंदा,लक्ष्मणा व नाग्नजिती यांचे व दुसऱ्या हि ज्या कृष्णस्त्रिया प्राप्त झाल्या होत्या त्या सर्वांचे वस्त्रे,माळां व कुंकुमादी सौभाग्यद्रव्ये यांच्या योगेकरून पूजन केले||४२-४३|| भावार्थ:--- द्रोपदीने वस्त्रे इत्यादिद्वारा श्रीकृष्णांच्या सर्व पट्टराण्यांचा यथायोग्य सत्कार केला.आपणही आपल्याकडे कोणी आले असता,त्यांचा यथायोग्य सत्कार करावा. सामाजिक जीवन जगत असतांना व्यवहारात देवाण—घेवाण असते.पारमार्थिक क्षेत्रात मात्र असे नसते.पारमार्थिक क्षेत्रात देवाण—घेवाण नसते तर दान असते. ||४३|| अर्थः---नंतर,धर्मराजाने सैन्य,सेवक व प्रधान यांसहित व स्त्रियांसहित श्रीकृष्णाला प्रतिदिवशी नव्यानव्या सत्कारांनी,त्याला जसे सुख वाटेल तशा रीतीने ठेऊन घेतले||४४|| भावार्थ:--- आपणाकडे जे भेटावयास येतात,त्याच्यासाठी आपण राहण्याची व इतर व्यवस्था व्यवस्थित करावयास पाहिजे.व्यवस्थित व्यवस्था करे कर्तव्य असते.||४४|| | तर्पयित्वा खाण्डवेन वन्हिं फाल्गुनसंयुतः | मोचयित्वा मयं येन राज्ञो दिव्या सभा कृता ||४५|| | उवास कतिचिन्मासान् राज्ञः प्रियचिकीर्षया | विहरन् रथमारुह्य फाल्गुनेन भटैर्वृतः ||४६|| अर्थः---एकेवेळी अर्जुनाबरोबर असलेल्या व अर्जुनाला सहायभूत झालेल्या ज्याने इंद्राच्या खांडवनामक वनाने अग्नीला तृप्त तरून तेथे जळत असलेल्या मयासुराला सोडविले.पुढे त्या मयासुराने धर्मराजाला दिव्य सभा करून दिली तो श्रीकृष्ण धर्मराजाने प्रिय करण्याच्या इच्छेने,अर्जुनाबरोबर रथावर बसून बरोबर कांही योद्धे घेऊन,संचार करीत असता कितीएकमासपर्यंत त्या ह्स्तीनापुरांमध्येच राहिला||४५-४६|| भावार्थ:--- अर्जुनाच्या बरोबर असतांना श्रीकृष्णांनी खांडव वन देऊन अग्नीला तृप्त केले होते,आणि त्यातून मयासुराला वाचवले होते,यामुळे मयासुराने युधीश्ठीरांना एक दिव्य सभागृह तयार करून दिले,कारण श्रीकृष्णने मयासुरास अग्नीपासून वाचवले होते---जीवदान मिळाले होते.म्हणून मयासुराने पांडवांना एक भव्य सभागृह तयार करून दिले. म्हणून जीवन जगात असतांना आपण उपकारी जीवन जगले पाहिजे.उपकार करणारा केव्हा—ना—केव्हा तरी उपकार फेडीत असतो.त्या उपकाराची परतफेड जा जन्मी किंवा अन्य जन्मी आपणास उपयोगी येत असते.यासाठी धर्म—शात्राचा अभ्यास करावा लागत असतो.सत्संग केला असता कळत असते.||४५|| भावार्थ:--- आपल्या संगतीने इतरास सुख मिळत असेल तर त्यांच्याजवळ राहून कांही दिवस सहवास करावयास पाहिजे.त्यामुळे आनंदात भर पडत असते.||४६|| __________________________________________________________________________________________________ |७२--- ६---पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार---१--- __________________________________________________________________________________________________ | एकदा तु सभामध्ये आस्थितो मुनिभिर्वृतः | ब्राम्हणै: क्षत्रियैर्वेश्यैर्भ्रातृभिश्च युधिष्ठिरः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,एकेवेळी सभेमध्ये सिंहासनावर बसलेला व ऋषि,ब्राम्हण क्षत्रिय,वैश्य,बंधू,आचार्य,कुळातील ज्येष्ठ,नातलग,संबंधि व परिवेष्टित असलेला धर्मराजा ते ऋषीवगैरे सर्व श्रवण करीत असता श्रीकृष्णाला हे कृष्णा,भक्तवत्सला असे संबोधन घेऊन असे म्हणाला कि,- ||१-२|| अर्थः---युधिष्ठीर म्हणाला – हे गोविंदा प्रभों,यज्ञश्रेष्ठ अशा राजसुयाच्या योगेकरून तुझ्याच पवित्र विभूती अशा इंद्रादिक देवांचे मी आराधन करण्याची इच्छा करीत आहे.ते माझ्या मनांत असलेले कार्य संपादन करण्याची तूं कृपा कर||३|| भावार्थ:--- श्रेष्ठांच्या साल्ल्याने---मार्गदर्शनाने आपण आपले कार्य करावयास पाहिजे,त्यात आपले हित होत असते.त्यांच्या सहकार्याने आपला संकल्प पूर्ण करावा.||१—२|| अर्थः---आता,हा सार्वभौम राजांचा मनोरथ तूं काय म्हणून करितोस ? असे म्हणशील तर - हे कमलनाभा,हे ईश्वरा,जे धन तुझ्या पापनाशक पादुकांचे देहाने निरंतर सेवन करितात,मनाने ध्यान करितात,व वाणीने त्यांचा प्रभाव वर्णन करितात तेच ण शुद्धचित्त होऊन संसाराचा नाश करणाऱ्या मोक्षाप्रत पावतात आणि त्यांनीच जर विषयप्राप्तीची इच्छा केली तर,त्यांना ते विषयही प्राप्त होतात.दुसऱ्या सार्वभौम राजांनाही प्राप्त होत नाहीत||४|| भावार्थ:--- भगवंतांची---परमात्म्याची जे लोक सेवा करतात,ध्यान व स्तुती करतात.त्यामुळे ते पवित्र होतात,त्यांचे पाप जाळून जाते.म्हणून आपण भगवंत—परमात्म्याची सेवा,ध्यान व स्तुती करावी.त्यामुळे आपले पाप जाळून जाते.त्यामुळे आपण संसारभयापासून सुटका होते.समजा त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली तर,ती सुद्धा पूर्ण होते.परमार्थ निष्काम भावनेने केला तर कायमचे दु:ख निवृत्त होते व सकाम भावनेने केला तर संसारातील इच्छा पूर्ण होते.परंतु जे अभक्त म्हणजे अधर्मानुसार वागत असतात मोक्षाही मिळत नाही व संसारातील इच्छाही पूर्ण न होता यमपुरीस जाऊन ड:ख भोगावे लागते.म्हणून मोक्ष किंवा संसारातील सकाम भक्ती करावी,मात्र अधर्मानुसार आचरण मात्र मुळीच करू नये,कारण यमपुरीस जाऊन तेथील दु:ख भोगल्यानंतर लक्ष चौऱ्याऐंसी योनीस दु:ख भोगावे लागते.||४|| अर्थः---तस्मात हे समर्था देवदेवा,या संसारामध्ये असलेला हा प्राण्याचा समुदाय,तुझ्या चरणकमळाच्या सेवेचे सामर्थ्य प्रत्यक्ष पाहूं दे.कर्मादिप्रधान असे जे कितीएक कौरव व संजय,भगवद्गीताला बहुमान देत नाहीत,त्यांच्या मोहाची निवृत्ती होण्याकरिता,जे तुझे सेवन करितात किंवा सेवन करीत नाहीत त्या दोन्ही प्रकारच्याही लोकांची निष्ठा ( फळ ) तूं दाखीव||५|| भावार्थ:--- जे लोक आपले भजन करतात,त्यांचे जीवन व जे लोक आपले भजन करत नाहीत,त्यांचे जीवन या दोन्ही जीवनातील फरक त्यांच्या सुख—दु:खाच्या फरकाने अनुभवास आणून दाखवा.असा अनुभवास आणून दाखवला कि प्रत्यक्ष फरक दाखवल्यामुळे लोकांना भजन न केल्यामुळे दु:ख अनुभवास येते व भजन केल्यामुळे सुख अनुभवयास येते असा दोन्हीतील फरक लक्षात आपल्यानंतर लोक भीतीच्या पोटी भजन करतात.आपण जीवन जगात असतांना असे कधी—कधी अनुभवास येते.म्हणून आपण विवेक—विचार करावा.नेहमी—नेहमी अनुभवास येत नाही,कारण आपण केलेले कर्म परिपक्व झाल्यानंतर अनुभवास येते.सगळे कर्म एकसारखे परिपक्व होत नाही.जसे सगळ्याच पिकांना एकदम—एकावेळेस फलधारणा होत नाही,त्यासाठी त्यांचा फाल्धारानेचा कालावधी भिन्न—भिन्न वेळी येतो.याचा प्रत्यक्ष अनुभव आपणास आहे.कार्मांचेही असेच होते.म्हणून जीवन जगत असतांना आपण विचार केला तर तसा अनुभव येतो.भगवंत नमुन्यादाखल तसे करतो.|उदा---नारदमुनींना पूर्व जन्मात भगवंतांनी नमुना म्हणून एकदाच दर्शन दिले व पुहा दर्शन दिले नाही,म्हणून नारदमुनींनी पुढच्या जन्मी लहान वयात भक्ती मार्गाला लागून निष्काम भक्ती करून परमात्म्याचा अनुभव घेतला.मिठावाला दुकानदार आपणास पैसा न देता मिठाईचा नमुना देतो व आपण पुन्हा मिठाई पैसा देऊन घेतोत.||५|| अर्थः---आसां,रागद्वेषादीरहितअशा माझेठिकाणी कसे हे वैषम्य घडेल असे म्हणशील तर – समदृष्टी,सर्वात्मा व स्वानंदाचा अनुभव घेणारा अशा तुज निरुपाधिक ब्रम्ह रुपाला हा आपला व हा परकीय अशी भेद बुद्धी जरी नाही तथापि जशी सर्व ठिकाणी असणाऱ्या वृक्ष कळपाची सेवा करणाऱ्या पुरुषणाचा तुजपासून सेवेच्या तारतम्याने फलप्राप्ती होत्ये यात तुझे ठिकाणी वैषम्य किवा निर्दायात्वाविक दोष मुलीचा नाहीत ||६|| भावार्थ:--- भगवंतांच्या ठाई आपपरभाव नसतो.आपपरभाव म्हणजे अधिकार सारखा असून फळ मात्र कोणास कमी व कोणास जास्त देणे त्यास अपापर भाव असे म्हणतात.आपल्या ठिकाणीसुद्धा अपापर भाव नसावा.अपापर भाव असल्यास पाप अगुण त्या पापाचे फळ दु:ख भोगावे लागते.असा विचार करून आचरण करावे.||६|| अर्थः--- श्रीभगवान म्हनाला – हे शत्रूनाशका राजा,तूं फार चांगला निश्चय केला आहेस कि,राजसुयनामक यज्ञाणुष्ठानेकरून तुझी पुण्य कारक कीर्ती सर्वलोकांमध्ये व्याप्त होईल||७|| अर्थ----हे प्रभो ऋषींना देवांना सर्व प्राणी नात्रंस व आम्हा स्वर्हदानी हा श्रेष्ठ राजसूय यज्ञ इष्ट आहे.||८|| अर्थः----येथे मी किवा दुसर्याने काय संपादन करायचे आहे ?काहीच नाही तर हा राजसूय सहज घडणार आहे यास्तव सर्व राजना जिंकून सर्व पृथ्वी स्वाधीन करून घेवून यज्ञाची सर्व सामग्री संपादन करून राजसूय यज्ञाचे अनुष्ठान कर ||९|| | एते ते भ्रातरो राजन् लोकपालांशसम्भवाः | जितोsस्म्यात्मवता तेsहं दुर्जयो योsकृतात्मभिः ||१०|| अर्थः----आता सर्व राजांचा जय वैगरे कसा होईल असे म्हणशील तर हे राजा हे तुझे भाऊ ,वायू इंद्र इत्यादिक लोकपालांच्या अशापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून यांच्या योगानेच तुला सर्व राजांचा जय सुसाध्य आहे आणि इंद्रियाचा निग्रह ण करणाऱ्या पुरुषांनी दुखणेही वश करणाऱ्या अश्यक्य अस्व्हाही मला जितेंद्रिय असलेल्या तू वश केले आहेश म्हणून तुला काहीच दुःसाध्य नाही||१०|| अर्थः----आता तुझीतर गोष्ट राहुदेचा परंतु अगदी भारीश अशाही माझ्या भक्ताचा कोणीही पराभव करण्यास समर्थ होत नाहीत असे सांगतो मीच –ज्याचा परम उपास्यदिरूप आहे त्याचा पराभव करण्यास या लोकांमध्ये कोणी देवसुद्धा आपल्या पराक्रमाने,यशाने,संपत्तीने व सैन्यादिक सामुग्रींनी समर्थ होणार नाही.मग राजा ( मनुष्य ) समर्थ होणार नाही हे काय सांगावे! ||११|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,याप्रमाणे भगवंताने सांगितलेले भाषण श्रवण करून संतुष्ट व प्रफुल्लतमुखकमळ झालेल्या त्या धर्मराजाने,श्रीकृष्णाच्या तेजाने वृद्धिगत झालेल्या आपल्या भीमादिक भ्रात्यांना दिग्विजयाविषयी योजिले||१२|| अर्थः---त्याने सृंजयवंशी वीरांसह सहदेवाला दक्षिण दिशेकडे,नकुलाला मत्स्यदेशीय विरांसह पश्चीमेकडे,अर्जुनाला केकयदेशीय विरासह उत्तरेकडे आणि भीमसेनाला मद्रदेशीय विरांसह पूर्व दिशेकडे पाठविले.||१३|| अर्थः---हे राजा,त्या भीमादिक वीरांनी,आपल्या पराक्रमाने राजांना जिंकून यज्ञ करणाऱ्या धर्मराजाला पुष्कळ धन आणून समर्पण केले||१४|| अर्थः---तेव्हा जरासंध राजा अजिंक्य आहे असे ऐकून,त्याला कसे जिंकावे असे चिंतन करणाऱ्या धर्मराजाला,सर्वांचे कारण अशा श्रीकृष्णाने,आपणास उद्धवाने भीमाने द्वंद्वयुद्धामध्ये त्याला मारावे असा जो उपाय सांगितला होता तो कळविला||१५|| | भीमसेनोsर्जुनः कृष्णो ब्रम्हलिंगधरास्त्रयः | जग्मुर्गीरिव्रजं तात बृहद्रथसुतो यतः ||१६|| अर्थः---हे राजा,नंतर भीमसेन,अर्जुन व श्रीकृष्ण हे तीघेजनही,ब्राम्हणाचे वेष घेऊन,जेथे जरासंध होता त्या गिरीव्रजनामक स्थानामध्ये निघून गेले||१६|| अर्थः---आणि ब्राम्हणाचा वेष धारण करणारे ते भीमादिक तिघेही राजे,दान करण्याच्या वेळी त्यांच्या घरी जाऊन,गृहस्थाश्रमी व ब्राम्हणभक्त अशा जरासांधाजवळ याचना करूं लागले कि.- ||१७|| अर्थः----हे राजा,आम्ही तिघेही फार दूर आलेले याचक अतिथी अहो तूं जान आणि ज्याची आम्ही इच्छा करीत आहो तें आम्हांला समर्पण कर||१८|| | किं दुर्मर्षुं तितिक्षूणां किमकार्यमसाधुभिः | किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शीनाम् ||१९|| अर्थः----आता,हे आम्ही इच्छितो असे सांगा,नाही तर भलतेच पुत्रादिक किंवा राजकिरीटनामक मागितलेत तर ते कसे द्यावे ? असे म्हणशील तर-हे राजा,जसे विषयासक्त पुरुषांना ण करावयाचे असे कांहीच नाही त्याप्रमाणे सहनशील पुरुषांना दुःसह असे काहींचना हि,अतिउदारांना ण देण्यासारखे कांहीच नाही आणि सर्वठिकाणी सारखे ब्रम्ह आहे असे पाहणारांना परकीय कोणीच नाही,म्हणून आम्ही अमुक इच्छितो असे सांगण्याचे कारण नाही||१९|| भावार्थ:--- आपल्यात सहनशीलता असेल तर सर्व कार्य होऊ शकते.म्हणून आपल्यात सहनसीलता हा सदगुण असावा.दुष्ट माणूस दुष्ट कार्य करू शकतो.दुष्टता हा दुर्गुण आहे,दुर्गुणाने दुष्टता वाढते व त्यामुळे पाप होऊन दु:ख भोगावयास येते,म्हणून दुष्टता हा दुर्गुण आहे,तो आपल्यात नसावा,असल्यास सत्कर्म करून नाहीसा करावा.उदारपणा हा सदगुण आहे.उदार सदगुण असून दानधर्म,परोपकार,सेवा असे अनेक कार्य घडतात.समदर्शी हा सदगुण आहे,त्यामुळे आपपर भाव राहत नाही.||१९|| अर्थः---आणि जो प्राणी,स्वतां समर्थ असूनही आपल्या अनित्य शरीराने,साधूंनी गायन करण्यास योगु असे शाश्वत यश संपादन करीत नाही तो निंद्य व काय हा याचा भाग्याहीणपण असा शोक करण्यासही योग्य आहे||२०|| भावार्थ:--- मनुष्य शरीर मिळून जो अविनाशी भगवंत—परमात्मा प्राप्त करून घेत नाही,त्याची शात्रसंत—महात्मा निंदा करता व समाजही निंदा करतो,म्हणून आपली निंदा करू नये म्हणून,मनुष्य शरीराला आल्यानंतर मोक्ष—परमाप्ता प्राप्त करून घ्यावा.त्यात आपले परमाहित होते.म्हणून सत्संग करून परमार्थ करावा.||२०|| अर्थ---हे राजा,हरिश्चंद्र,विश्वामित्राचे ऋण फेडण्याकरिता स्त्रीपुत्रादिक सर्व विकून,स्वतां चांडाळपणा पावला असतांही,कंटाळला नाही म्हणून अयोध्यावासी लोकांसहवर्तमान स्वर्गास निघून गेला.रंतीदेवाने,कुटुंबासहित आपणाला अठ्ठयेचाळीस दिवसपर्यंत उदकसुद्धा प्राप्त झाले नाही,असे असतांही नंतर प्राप्त झालेले अन्नोदकादिक याचकांना देऊन ब्रम्हलोकास गमन केले.मुद्रल ब्राम्हण,सहामहिनेपर्यंत कुटुंबसहित उपवास करीत असूनही प्राप्त झालेले अन्नादिक अतिथीला देऊन ब्रम्हलोकास गेला,शिबिराजा,शरण आलेल्या कपोताच्या रक्षणाकरिता आपले मां श्येनपक्ष्याला देऊन स्वर्गाला गेला बळीराजाने ब्राम्हणवेष धारण करणाऱ्या श्रीहरिला सर्वस्व देऊन त्याला द्वारपाळ केले.कपोताने,व्याधरूप अतिथीला कपोती स्त्रीसह वर्तमान आपले मांस देऊन विमानाने स्वर्गास गमन केले.व्याधाने,तया दोघांचेही सत्व पाहून स्वतां विरक्त होऊन महाप्रस्थानाने वनातील अग्नीमध्ये देह जळल्यामुळे निष्पाप होऊन||२१|| भावार्थ:--- हरिचंद्र,रंतीदेव यांनी शेतात पडलेले धान्य वेचून उदार—निर्वाह करणारे मुद्गल,शिबी,बळी,व्याध,कपोत इत्यादी पुष्कळशा व्यक्तींनी अतिथीला आपले सर्वस्व सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतले.त्याचप्रमाणे आपण आपले जे कांही आहे,ते सर्वस्व देऊन या आपल्या मानवी शरीराने अविनासी—परमामात्म पाद प्राप्त करून घेतले असता आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप हौउत.मानवी शरीर प्राप्त होऊन अविनाशी—परमात्मा पद प्राप्त करून न घेतले तर लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.याकरिता संत—महात्मा यांचा ससंग प्राप्त करून अविनाशी—परमात्म पद प्राप्त करून घ्यावे.||२१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला- हें राजा,याप्रमाणे सांगितला तो जरासंध,स्वरांनी शरीरसंबंधी अवयवांच्या ठेवींनी व धनुष्याच्या दोरीचे घट्टे पडलेल्या हातांच्या मनगटांनी,त्या भिमादिकांना हे कोणीतरी राजे आहेत व यांना मी पूर्वी कोंठेतरी ( द्रोपदीस्वयंवरादिकांचेठिकाणी ) पाहिले आहे,असे अनुमान करून विचार करूं लागला कि,-||२२|| अर्थ:---हे खरोखर राजांच्या कुळांत झालेले असून भयाने ब्राम्हणांची चिन्हे धारण करीत आहेत.यास्तव त्यांना दुरस्त्यज अशा आपल्या देहालाही त्यांनी मागितले असतां देतो||२३|| भावार्थ:--- आपल्याकडे कोणी याचक मागण्यासाठी आला असेल तर,त्याच्या मागणीनुसार आपण दानरूपाने ती वस्तू देऊन त्याची इच्छा पूर्ण करावयास पाहिजे.राजा जरासंध हा तर याचकाने मागणी केल्यास आपले शरीर ध्यावावयास तयार आहे.एवढी उदारता-त्याग आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा.त्यागात शांती असते.||२३|| अर्थः----कारण,इंद्राची संपत्ती बळीपासून हरण करण्याची इच्छा करणाऱ्या व कपटाने ब्राम्हणवेष धारण करणाऱ्या विष्णूने,ऐश्वर्यापासून भ्रष्ट केलेल्याही बळीराजाची,पवित्र,पवित्र व दशदिशांचेठिकाणी व्याप्त झालेली कीर्ती खरोखर ऐकू येत आहे.काय त्या बळीचे धैर्य तरी सांगावे ! शुक्रचार्याने निवारण केले असतांही व हा विष्णू माझे सर्वस्व हरण करील असे जाणत असतांही त्या दैत्यराज बळीने,ब्राम्हणस्वरूपी विष्णूला पृथिवीचे दान केले||२४-२५|| भावार्थ:--- राजा बळीने भगवान वामणांना दान देण्यासाठी गुरु शुक्राचार्यांनी विरोध केला,पण राजा बळीने गुरु आज्ञाचे उल्लंघन करून दान दिले.कारण,भगवान वामन सत्पात्र होते व शात्र वचन असे आहे कि,सत्पात्रास दान करावे.म्हणून गुरूच्या आज्ञाचे उल्लंघन करून दान केले.शात्र सांगते कि,जी आज्ञा शात्रानुसार आहे,त्या गुरु आज्ञाचे पालन करावे.गुरूची आज्ञा ही धर्माशात्राच्या नियमात बसत नसेल तर,त्या आज्ञाचे उल्लंघन करावे,तो धर्मच होतो.असा विवेक करून वागावे.||२५|| | जीवता ब्राम्हणार्थाय को न्वर्थः क्षत्रबन्धुना | देहेन पतमानेन नेहता विपुलं यशः ||२६|| अर्थः----प्रतिक्षणी क्षीण होणाऱ्या व ब्राम्हणाच्या कामाकरिता मोठे यश संपादन ण करिता केवळ वांचनाऱ्या या क्षत्रियदेहाने कोणते प्रयोजन सिद्ध होत आहे?कोणतेच नाही||२६|| | इत्युदारमतिः प्राह कृष्णार्जुनवृकोदरान् | हे विप्रा व्रीयतां कामो ददाम्यात्मशिरोsपि वः ||२७|| अर्थः----याप्रमाणे विचार करून उदारबुद्धी असा तो जरासंध,श्रीकृष्ण,अर्जुन व भीम यांस म्हणाला कि,-हे विप्रहो,जो तुम्हांस इच्छित पदार्थ असेल तो मागून घ्या मी आपले मस्तकही तुम्हांस आवडत असेल तर देतो||२७|| अर्थ---तेव्हा श्रीभगवान म्हणाल-हे राजेंद्रा,इच्छित असेल ते देण्याची इच्छा जर तूं करीत असशील तर तूं आम्हांला द्वंद्वयुद्ध ( दोघांनीच करायाचे युद्ध ) दे.आम्ही युद्धाची इच्छा करणारे राजे येथे प्राप्त झालो आहों अन्नाची इच्छा करणारे ब्राम्हण आम्ही नव्हे||२८|| अर्थः---हा कुंतीनंदन भीम आहे,त्याचा भाऊ हा अर्जुन आहे आणि त्या दोघांच्या मामाचा पुत्र,तुझा शत्रू कृष्ण मी आहे असे जान||२९|| | एवमावेदितो राजा जहासोच्चेः स्म मागधः | आह चार्मिषितो मन्दा युद्धं तर्ही ददामि वः ||३०|| अर्थः---याप्रमाणे भगवंताने विनंती केलेला तो जरासंध राजा,मोठ्याने हसूं लागला आणि क्रुद्ध होऊन म्हणाला कि,- हे मंदहो,जर तुम्हांला युद्धच इच्छित असेल तर ते देतो ||३०|| अर्थः----परंतु भीतरा व युद्धामध्ये विव्हलचित्त झालेला जो तूं त्या तुजबरोबर मी युद्ध करणार नाही.कारण,तूं भयाने आपल्या मथुरानगरीचा त्याच करून समुद्राला शरण गेला आहेस||३१|| भावार्थ:--- जरासंध हा शूर योद्धा असल्यामुळे जो युद्धभूमी सोडून जातो,त्याच्याबरोबर युद्ध करत नाही.कृष्णा तू भेकाड आहेस म्हणून युद्ध करत नाही.||३१|| अर्थः---हा अर्जुन तर माझ्याबरोबर युद्ध करण्यास योग्य नाही.कारण,हा वयाने माझ्याबरोबरीचा नसून बळानेही अधिक नाही व देहानेही माझ्यासारखा पुष्ट नाही.तेव्हा याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध करणे हे लज्जास्पद,निंदास्पद अकीर्तीमान आहे.भीममात्र माझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध करील.कारण,कोसमबळी आहे||३२|| भावार्थ:--- जे शूर असतात ते आपल्यापेक्षा वयाने लहान असल्यास त्याच्याबरोबर युद्ध करत नाहीत.म्हणून जरासंध शूरवीर असल्यामुळे अर्जुनाबरोबर युद्ध करत नाही. भीमसेन हा शक्तिशाली असून बलाढ्य आहे,म्हणून त्याच्याबरोबर युद्ध करतो.आज—कालच्या राज्यकर्ते जे आहेत,त्यांच्याकडे पाहिले असता असे दिसून येते कि,आपल्यापेक्षा जे कमी सामर्थ्यवान आहेत,त्यांचा भूभाग युद्ध करून त्यांच्याकडे घेत आहेत,कारण त्यांच्यावर रामायण—महाभारताचे संस्कार नाहीत.म्हणून त्यांनी रामायण—महाभारत श्रावण करून आपल्या पूर्वीच्या संस्कारात परिवर्तन करावे.त्यानंतर ते कमी सामार्थेवान जे आहेत,त्यांच्याबरोबर युद्ध करणार नाहीत.||३२|| | इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीं गदाम् | द्वितीयां स्वयमादाय निर्जगाम पुराद् बहिः ||३३|| अर्थः---असे बोलून जरासंधाने आपलीच एक मोठी जड गदा भीमाला देऊन,तशीच दुसरी गदा आपण घेऊन,नगरच्या बाहेर निघाला||३३|| भावार्थ:--- जरासंधाने आपल्याजवळील गदा भिमासेनांस दिली आणि दुसरी गदा घेऊन गदायुद्ध करू लागला.याचा भावार्थ असा आहे कि,आपल्या युद्धाचा प्रतिस्पर्धी जो असेल व त्याच्याजवळ शत्रसामुग्री जर नसेल तर ज्याच्याजवळ आहे,त्याने ती शत्रसामुग्री देऊन युद्ध सुरु करावयास पाहिजे.असे शुरांचे शौर्य आसते.||३३|| अर्थः----नंतर,उंच व सखल नसलेल्या वाळूवगैरे टाकून मऊ केलेल्या पटांगणामध्ये,युद्धाविषयी दुर्मद असे ते जरासंध व भीम उभयंता वीर,एकमेकांना भिडून व्रजतुल्य गदांनी परस्पर प्रहार करूं लागले||३४|| अर्थः---डावे व उजवे जसे होईल तशी चित्रविचित्र,मंडळे करणाऱ्या त्या उभयंताचे युद्ध,रंगभूमीवर प्राप्त झालेल्या नटाचे युद्ध जसे शोभते तसे शोभूं लागले||३५|| अर्थः---नंतर हे राजा,एकीमेकीवर टाकलेल्या गदांच्या परस्पर आघाताचे उत्पन्न झालेला चटचटाशब्द युद्ध करणाऱ्या मदांध गजांच्या दातांच्या शब्दासारखा व व्रजपाताच्या शब्दासारखा अतिभयंकर होऊ लागला||३६|| अर्थः---परस्परांच्या अंगावर बाहूबळाने मारलेल्या त्या गदा,एकमेकांच्या स्कंध,कमर,खांदे,,हात,मांड्या व बाहूंनी यांच्या पाहून,जशा अतिशय रागावून रुवीच्या वृक्षांच्या शाखांनी परस्पर युद्ध करणाऱ्या हत्तीच्या स्क्न्धादिक अवयवांवर त्यांनी मारलेल्या त्या शाखा चूर्ण होऊन जातात त्याप्रमाणे चूर्ण हिउन गेल्या||३७|| अर्थः---याप्रमाणे त्या दोघांच्याही गदा भग्न झाल्या असतां,क्रुद्ध झालेले ते मनुष्यश्रेष्ठ भीमजरासंध लोखंडासारखा स्पर्श करणाऱ्या आपल्या दृढ मुष्टींनी परस्पर ताडन करूं लागले.तेव्हा हत्तीप्रमाणे परस्पर प्रहार करणाऱ्या त्यांच्या हातांच्या चपट्यापासून उत्पन्न झालेला शब्द,मेघांवाचून होणाऱ्या व्रजपाताच्या शब्दासारखा भयंकर वाटूं लागला||३८|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे ज्यांचा अभ्यास,शरीरबळ व इंद्रियसामर्थ्य हि सारखी आहेत अशा क्षीणबळ ण होता प्रहार करणाऱ्या त्या भीमजरासंधाचे युद्ध नितुपम झाले||३९|| | एवं तयोर्महाराज युध्यतोः सप्तविंशति: | दिनानि निरगंस्तत्र सुहृद्वन्निशि तिष्ठतो: ||४०|| अर्थः---हे महाराज,याप्रमाणे युद्ध करणाऱ्या व रात्रीच्या वेळी त्या जरासंधाच्या घरी मित्रांप्रमाणे राहणाऱ्या त्या भीमजरासंधाचे सत्तावीस दिवस निघून गेले||४०|| | एकदा मातुलेयं वै प्राह राजन् वृकोदरः | न शक्तोsहं जरासन्धं निर्जेतुं युधि माधव ||४१|| अर्थः---हे राजा,एकेवेळी भीमसेन,आपल्या मामाचा पुत्र अशा श्रीकृष्णाला म्हणाला कि,- हे माधवा,युद्धामध्ये जरासंधाला जिंकण्यास मी समर्थ नाही.तेव्हा आत्ता कसे करावे? ||४१|| अर्थः---तेव्हां,त्या जरासंधाने जन्म दोन शकलांच्या रूपाने झाले आही व मरणही ती तशी दोन शकले असता होईल हे जाणणारा व जरानामक राक्षसीने ती दोन शकले सांधून केलेले आयुष्यही जाणणारा तो हरी श्रीकृष्ण,आपल्या तेजाने भीमाने बळ वाढवीत असता,पुन्हा याची शकले कशी होतील हे चिंतन करूंलागला||४२|| | सन्चीन्त्यारिवधोपायं भीमस्यामोघदर्शनः | दर्शयामास विटपं पाटयन्निवं संज्ञया ||४३|| अर्थः----नंतर अमोघज्ञानसंपन्न अशा श्रीकृष्णाने,त्याचा उपाय जाणून,एका वृक्षाची शाखा फाडून दाखवीत असता जसा मी शाखा फाडतो तसा तूं ह्या जरासंधाला फाडून टाक अशा संकेताने भीमाला शत्रूच्या वधाचा उपाय दाखविला||४३|| अर्थः---तेव्हा,महाबलिष्ठ व प्रहार करणारांमध्ये श्रेष्ठ अशा त्या भीमाने,भगवंताने सुचविलेला उपाय जाणून पायांचे ठिकाणी शत्रूला धरून भूमीवर पडिले||४४|| अर्थः---आणि त्याचा एक पाय दाबून धरून,दुसरा पाय हातांनी ग्रहण करून त्या भीमाने,जसा महाराज अनायासाने शाखेला फाडितो त्याप्रमाणे त्याला गुदद्वारापासून मस्तकापर्यंत फाडून टाकिले||४५|| अर्थः---त्यावेळी तेथे असलेल्या प्रजांनी त्याची झालेली,एकेक पाय,मांडी,अंडकोश,कंबर,पाठ,स्तन,खांदा,भुजा,डोळे,भुवया आणि कान असलेली दोन शकले अवलोकन केली||४६|| | हाहाकारो महानासीन्निहते मगधेश्वरे | पूजयामासुतर्भिमं परिरभ्य जयाच्च्युतौ ||४७|| अर्थ:----याप्रमाणे जरासंध मरण पावला असता,त्याच्या प्रजांनी केलेला मोठा हाहाकारशब्द झाला.त्यावेळी अर्जुन व श्रीकृष्ण या उभयंतांनी,भीमाला आलिंगन करून स्त्युत्याडिकेकरून त्याची प्रशंसा केली||४७|| भावार्थ:--- भीमसेनचा आणि जरासंधांच्या गदायुद्धात भीमसेनचा विजय झाला व जरासंध गतप्राण झाला.म्हणून विजयी उमेदवाराचा गौरव श्रीकृष्ण आणि अर्जुनाने केला.त्याप्रमाणे आपणही विजयी उमेदवारांचे प्रसंग आपल्या जीवनात आलेले दिसून येते.म्हणून आपणही विजयी उमेदवाराचा उत्साह वाढविण्यासाठी गौरव करावयास पाहिजे त्यांचा गौरव केला असता आपले कार्य करण्यास त्यांना बळ—समर्थे येऊन ते अधिक प्रयत्न करून विजयी होतात.त्यांच्या योग्यतेनुसार सन्मान करावा.||४७|| | सहदेवं तत्तनयं भगवान् भूतभावनः | अभ्यषिन्चदमेयात्मा मगधानां पतिं प्रभुः | | मोचयामास राजन्यान् संरुद्धा मागधेन ये ||४८|| अर्थः---कृष्णाने आलिंगन केलेला तो भीम तर – पीडारहित,स्वस्थचित्त,सुखी,व्रणरहित व बळाने व विशेष तेजाने युक्त झाला||४८|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्ण यांनी दुष्ट जरासंधाचा,अन्यायकारक राजाचा भिमसेनाकडून अंत केला.म्हणून जे राजसात्ताधीश आहेत,त्यांनी त्या सत्तेचा उपोग जनतेच्या हितासाठीच करावा.फक्त स्वत:च्या हितासाठी करू नये.आपले व सामान्य जनतेचे हित समान असावे,तर आपले हित अधिक व सामान्य जनतेचे हित कमी असा विषमभाव नसावा.थोडक्यात भ्रष्टाचार न करता सत्तेचा वापर करावा.आपण जर सत्ताधीश जेव्हा असाल,तेव्हा याचा विचार करून सत्तेचा समानभाव ठेवावा.त्यानंतर भागवत श्रीकृष्णांनी जरासंधाचा मुलगा सहदेव यास मगधापती म्हणून अभिषेक केला.भीमसेनचा विजय झाला,म्हणून भिमसेनास अभिषेक केला नाही.जरासंधांनी जे राजे लोक कैदेत टाकले होते,त्यांच्यावर झालेले अन्याय दूर करून त्यांची कैदेतून मुक्तता केली.आपणही कोणावर कोणी अन्याय केला असेल तर राज्यशासनाच्या नियमानुसार—काद्ध्यानुसार त्यांच्यावर झालेला अन्याय दूर—नाहीसा करून त्यांना न्यायाकाराक जीवन जगण्यास वातावरण निर्माण करावयास पाहिजे.||४८|| अर्थः---आता,दुष्ट वर्तणूक असल्यामुळेच हा जरासंध मारिला,राज्यलोभाने मारिला नाही,असे दर्शवितो-अप्रेयस्वरूपी अशा भूतपालक समर्थ भगवंताने,त्या जरासंधाच्या सहदेवनामक पुत्राला राज्यभिषेक करून मागधदेशांचा अधिपती केला आणि त्या जरासंधाने जे राजे कोंडून ठेविले होते त्यांना तेथून सोडविले||४९|| ________________________________________________________________________________________________________________________ |७३-- ७---जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे---१--- ________________________________________________________________________________________________________________________ | अयुते द्वे शतान्यष्टौ लीलया युधि निर्जिताः | ते निर्गता गिरीद्रोण्यां मलिना मलवाससः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,जे वीसहजार आठशे राजे जरासंधाने युद्धामध्ये युद्धामध्ये सहज जिंकून गिरीद्रोणीनामक बंदीमध्ये कोडून ठेविले होते,ते कांडून ठेवल्यामुळे क्लेश पावलेले,मुखे वळून गेलेले,क्षुधेने निर्बळ झालेले,मळकट वस्त्रे धारण केलेले व अंगावर मळ वाढलेले राजे येथून बाहेर पडले असता,त्यांनी श्रीकृष्णास अवलोकन केले.ती श्रीकृष्ण मेघासारखा श्यामवर्ण व पिवळा पितांबर नेसलेला||१-२|| अर्थः---श्रीवत्सलांछन धारण करणारा,चार बाहूंनी युक्त,कमळाच्या गाभ्यासारखे आरक्तनेत्र असलेला,सुंदर व प्रसन्नमुखाने युक्त,स्फुरण पावणाऱ्या मकराकार कुंडलांनी सुशोभित||३|| अर्थः---हातांत कमळ घेतलेला,शंख चक्रगदांनी सुशोभित व मस्तकावर किरीट गळ्यांत हार,हातांत कडीतोंडे कमरेचेठिकाणी कमरपट्टा व बाहूंचे ठिकाणी बाहूभूषणे यांच्या योगाने अलंकृत होता||४|| अर्थः---तसाच तो कंठामध्ये श्रेष्ठ कौस्तुभमनी झळकत असलेला व गळ्यापासून पायांपर्यंत लोंबत वनमालेने व्याप्त होता.अशा त्या भगवंताला नेत्रांनी जणू प्रशनच करितात कि काय,जिभेने जणू चाटता तच कि काय,नाकपुड्यांनी जणू वासच घेतात कि काय आणि बाहूंनी जणू आलिंगनच करतात कि काय अशा,त्याच्या दर्शनाने पापरहित झालेल्या त्या राजांनी हरीच्या चरणावर आपली मस्तके ठेऊन नमस्कार केले||५-६|| भावार्थ:--- कैदेत जे राजेलोक होते,भगवंत श्रीकृष्ण यांनी त्यांना कैदेतून सोडून मुक्त केले.त्यामुळे त्यांना त्या निमित्ताने भगवंत श्रीकृष्णांचे दर्शन झाले.सर्वांगाचे कान करून ते भगवंत कृष्णांचे रूप पाहू लागले.मागील जन्मातील पूर्व—पुण्य जे होते ते परिपक्व झालेले त्यांना भोगण्यास आले.म्हणून आपण नेहमी धर्मानुसार आचरण करावे,ते भोगावयास येते.भगवंत श्रीकृष्णांनी त्या राजांना आलिंगन दिल्यामुळे पापे नष्ट झाली.म्हणून आपण निष्काम परमार्थ करून त्यांचा अनुभव घ्यावा.||५—६|| अर्थः----आणि कृष्णाच्या दर्शनापासून झालेल्या आनंदाने बंदीत पडण्याचा खेद दूर झालेले ते राजे,हात जोडून त्या श्रीकृष्ण भगवंतांची वानींनी प्रशंसा करूं लागले कि,||७|| अर्थः---राजे म्हणाले-हे देवदेवेशा,हे शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या,हे अखंडस्वरूपा कृष्णा,तुला नमस्कार असो.तूं बंदीतून सोडविलेल्या व दुःखानुभवाने सर्वत्र विरक्त होऊन तुला शरण आलेल्या आम्हांस या भयंकर संसारापासूनही सोडीव`||८|| भावार्थ:--- कैदेतून सुटलेले राजांचे म्हणणे आहे कि,संसार हा घोर म्हणजे दु:खमय आहे.तो संसार दु:खमय असल्यामुळे त्याचा कंटाळा आलेला आहे,म्हणून तो संसार नको,म्हणून तो संसार आम्हास मिळू नये,म्हणून त्यापासून आमचे रक्षण करून तो संसार नाहीसा व्हावा म्हणून शरण आलेलो आहेत.||८|| अर्थः---हे नाथा,हे मधुसूदना,या जरासंधाने आम्हांस बंदीत घातले म्हणून आम्ही याजकडे वारंवार दोषदृष्टीने पहात नाही.कारण,हे विभो,जरासंधापासून आम्हा राजांचा जो राज्यश्रम झाला तो तुझा अनुग्रहच झाला असे आम्ही समजतो||९|| भावार्थ:--- जरासंधाने आम्हास कैदेत टाकल्यामुळे आमचे राजवैभव गेले.आपण आमची सोडवूनक केल्यामुळे आम्हास आपले दर्शन झाले.म्हणून आम्ही जरासंधाला दोष देत नाहीत.इतरांना दोष न देता स्वत:कडे दोष घेणे सदगुण आहे.म्हणून हा सदगुण आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करावा,त्यात आपलेच हित आहे.||९|| अर्थ:---कारण,राज्य व ऐश्वर्य यांपासून झालेल्या मदने उच्छृखल झालेला राजा,तुझ्या मायेने मोहित होऊन अनित्य असलेल्या संपत्तीना ह्या नित्य आहेत असे मानितो आणि त्यांच्या योगाने कल्याण पावत नाही||१०|| भावार्थ:--- राज ऐशार्याने अंहकाराने उन्मत्त जे होतात त्यांची परमकल्याण कधीच होत नाही.अज्ञेनामुळे ती मोहित झाल्यामुळे अनित्य—दु:खदायक अशा संपत्तीलाच मात्व देतात.संपत्तीला महत्व द्प्ल्यामुळे जीवनात ती संपत्ती मिळवण्याचाच खटाटोप करता.असा खटाटोप करता—करता आयुष्य संपल्यानंतर ती संपती त्याच्याबरोबर थोडीही संपत्ती यमपुरीस येऊ शकत नाही.म्हणून आपण अगोदरच संपत्तीचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करावा,संपत्तीचे स्वरूप हे वातविक पाहता अनित्य असून दु:ख देणारे आहे.म्हणून ती संपत्ती धर्मानुसार मिळवावी व धर्मानुसारच खर्च करावी.असा विवेक करून संत—महात्मा यांचा सत्संग करून धर्मानुसार वागावे.||१०|| अर्थ:----जसे अज्ञ बालक,मृगजळाला,हा तलाव किंवा नदी आहे असे मानितात त्याप्रमाणे अज्ञानी लोक,सृष्टीमध्ये माळा,चंदन,स्त्री इत्यादिक अनेक विकारांनी परिमाण पावलेल्या मायेलाच हा परम पुरुषार्थ आहे असे मानितात||११|| भावार्थ:--- अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाला पाणी समजतात,त्याचप्रमाणे विषयांना सत्य सुख मानतात.त्यामुळे इंद्रीयेलोलूप होतात म्हणजे इंद्रीयामार्फत विषयांचे सुख घेण्याचा प्रयत्न करतात.आवश्यक तेवढ्या---धर्मशात्रानुसार विषयांचा भोग घ्यावा,पण त्यापेक्षा अधिक घेऊ नये.त्यानुसार अधिक घेतला तर अधर्म होतो .अधर्माचे फळ लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून धर्मानुसारच विषयांचा भोग घ्यावा व सत्संगाद्वारे जीवब्रह्मज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त करून घ्यावा.||११|| अर्थ:----हे प्रभो,जे आम्ही पूर्वी राज्यस्थितीच्या वेळी लक्ष्मीच्या मदने आंधळे होऊन ह्या पृठीविला जिंकण्याच्या इच्छेने परस्पर स्पर्धा करीत होतो तसेच पुढे असणाऱ्या मृत्युमुखी तुला ण जुमानिता द्रुष्टमदाने युक्त होऊन अतिनिर्द्यपणे आपल्या प्रजानां धनादिकांसाठी मारीत होती||१२|| भावार्थ:--- जीव हा संपत्तीच्या नशेने--लोभाने आंधळा—अहंकारी होतो.अहंकारी जीवन जगता—जगता आयुष्य संपून मृत्यू समोर उभा टाकतो,पण लोभामुळे म्र्यत्यू समोर येऊन उभा टाकला आहे,हेही काळात नाही.तो म्र्य्तु येतो आणि घेऊन जातो.त्या यामाबरोबर मिळवलेली संपत्ती व ज्यांच्यासाठी मिळवली तेही येऊ शकत नाहीत.||१२|| अर्थ:----हे कृष्णा,तेच आम्ही आता गंभीर – ( न दिसणाऱ्या ) वेगाने युक्त व अपरिहार्य बलवान अशा तुझ्या शरीररुपी काळाने संपत्तीपासून नष्ट केल्यामुळे गर्वरहित होऊन तुझ्या कृपेनेच तुझ्या चरणाचे स्मरण करितो||१३|| अर्थः---म्हणून आता पुढे ते आम्ही,प्रतिक्षणी क्षीण होत जाणाऱ्या व रोगांच्या उत्पत्तीचे क्षेत्र अशा आपल्या शरीराने सेवनीय व मृगजळासारखे शीघ्र नश्वर असे राज्य मुळीच इच्छित नाही||१४|| भावार्थ:--- मृत्यू लोकातील अनात्मा तेवढा हा दु:खाला कारण आहे म्हणून आम्हाला तो नको आहे.तसेच मृत्यू लोकी असतांना सकाम कर्म करून जे पुण्य प्राप्त करून घेतले व मृत्युनंतर स्वर्ग मिळणारा तोही नको,कारण तेथील विषयांचा भो हासुद्धा क्षणभंगुर आहे,तात्पुरता आहे व अंत दु:खरूप आहे,म्हणून तोही नको आहे.||१४|| अर्थ:---यास्तव हे प्रभो,या संसारात अनेक योनीमध्ये श्रम पावणाऱ्याहि आम्हांला,तुझ्या चरणकमलांची स्मृती ज्या उपायाने लुप्त होणार नाही,तो उपाय तूं आम्हांस सांग||१५|| भावार्थ:--- आम्हास हा संसार नको,म्हणून या संसारात राहून आपल्या—परमात्म्याची सदैव आठवण—स्मरण राहावे म्हणून कांही उपाय—साधन सांगावे.||१५|| अर्थ:----वासुदेव हरी,परमात्मा व शरणगतांचे क्लेश नाहीसे करणारा व गोविंद अशा तुज कृष्णाला वारंवार नमस्कार असो.||१६|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-बा राजा जरासंधाने केलेल्या बंधनापासून मुक्त झालेल्या राजांनी याप्रमाणे स्तुती केली असतां शरणागतवत्सल व दयाळू असा तो भगवान श्रीकृष्ण,मधुरवाणीने त्यांस म्हणाला कि,-||१७|| | अद्दप्रभृति वो भूपा मय्यात्मन्यखिलेश्वरे | सुदृढा जायते भक्तिर्बाढमाशंसितं तथा ||१८|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला – हे भूपहो,तुम्ही जशी प्रार्थना केली आहे ते असे मी अंगिकारिले आहे.आजपासून तुम्हलासर्वांचा ईश्वर व आत्मा अशा माझेठिकाणी सुधृढ भक्ति उत्पन्न होवो.||१८|| भावार्थ:---भगवंत श्रीकृष्ण म्हणतात कि,कैदेतून मुक्त केलेले जे राजे आहेत,त्यांची सुदृढ भक्ती परमात्म्यावर निश्चित राहील.हा मी तुम्हास तुमच्या पूर्वकर्माच्या फलानुसार दिलेला आहे.भगवंत ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार त्याला—त्याला ते—ते फळ देत असतो.म्हणून आपण धर्मानुसार निष्काम कर्मच करत जावे.||१८|| अर्थ:---हे राजेहो,तुम्ही माझे स्मरणच करावे असा जप निश्चय केलात तो आनंदकारक आहे;तुम्ही खरे बोलणारे आहां.संपत्ती आणि ऐश्वर्य यांच्या मदाने स्वेच्छाचाररुपी जप उद्धटपणा तो मनुष्यांना मोठा उन्मादक आहे असे माझ्या पाहण्यांत आहे||१९|| भावार्थ:--- राजांनी असी मागणी केली कि,राज्य हे मृगजळासारखे असून दु:ख देणारे आहे,तेही नको,तसेच मृत्यूनंतर मिळणारे विनाशी स्वर्ग—सुखसुद्धा नको,कारण तेही दु:खदायक आहेत.आपल्या चरणकमलांची म्हणजे परमात्म्यांचीच सदैव स्मरणाची इच्छा आहे.कारण तो फक्त परमात्माच अविनासी आहे—सुखरूप आहे. ||१९|| अर्थः---ते असे कि,सहस्त्रार्जुन सार्वभौम राजा असूनही त्याने जमदग्नीची कामधेनु हरण केल्यामुळे त्यास पुत्रांसह वर्तमान परशुरामाने मारून टाकिले नहुषराजा,देवेंद्रत्व पावला असूनही त्याने,इंद्रानीच्या संभोगाकरिता ब्राम्हणाकडून पालखी वाहविली म्हणून तो त्या ब्राम्हणांच्या शापाने इंद्रपदापासून भ्रष्ट होऊन अजगरत्व पावला वेनराजाही,उन्मत्त होऊन ब्राम्हनंची निंदा करू लागला म्हणून त्यास ब्राम्हणांनी हुकारेकरूनच मारून टाकिलेरावण राक्षसाधिपती असून त्याने,सीतेचा अभिलाष केला म्हणून त्यास रामाने मारिले;नरकासूर दैत्येश्वर असून त्याने,अदितीची कुंडले हरण केली म्हणून त्याला तीच मारिले.दुसरेही पुष्कळ देवोंच,दैत्याचे व मनुष्टांचे अधिपती राजे लक्ष्मीच्या म—ने आपल्या स्थानापासून भ्रष्ट झाले आहेत||२०|| भावार्थ:--- बलाढ्य रावण इत्यादी राजे यांना सत्तेचा—वैभवाचा—ऐश्वर्याचा अंहकारामुळे—गर्वामुळे पदभ्रष्ट झाले.त्यांची सत्ता,वैभव,ऐश्वर्य कांहीच राहिले नाही.राजे लोकांना त्यांना सोडून जावे लागले.म्हणून आपण तरी सत्तेचा—वैभवाचा—ऐश्वर्याचा अंहकार धारण करू नये.सत्ता,वैभव,ऐश्वर्य असावे,पण यांचा अंहकार असू नये.अंहकार हा दु:खाला कारण आहे,पण हे असले म्हणजे बहुतेक अंहकार असतोच,म्हणून यांचाच त्याग करावा.संत-महात्मा यांचा सत्संग करून निष्काम परमार्थ करावा.||२०|| अर्थः---म्हणून तुम्ही हे उत्पन्न झालेले जे देहादिक ते सर्व नश्वर आहे असे जाणून सावधचित्त हा आणि यज्ञा याग्दिकेकारून माझे पूजन करून धर्माचे रक्षण करा ||२१|| भावार्थ:--- शरीरादि अनात्मा पदार्थ सर्व हे नाश पावणारे असून दु:खाला कारण आहेत,म्हणून जे—जे पदार्थ दु:खाला कारण आहेत त्या—त्या पदार्थाचा त्याग करावा. म्हणून आपले मन ताब्यात ठेऊन स्वधर्माप्रमाणे निष्काम कर्म व निष्काम उपासना करून जीवब्रह्माएकतेचे ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभव घ्यावा.||२१|| | सन्तन्वन्तः प्रजातन्तुन् सुखं दुःखं भवाभवौ | प्राप्तं प्राप्तं च सेवन्तो मच्चित्ता विचरिष्यथ ||२२|| अर्थ:----आणि पुत्य्रादिक संततीचा विस्तार करून व सुख ,दुख,लाभ अलाभावैगरे जे प्राप्त होईल ते ते समत्वाने सेवन करून व माझेठीकानी चित्त ठेवून कालक्रमण करा ||२२|| भावार्थ:--- जीवांनी आपल्या वंशपरंपरेचे रक्षण करण्यासाठी विधीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संतान—पुत्र उत्पन्न करावा.स्धार्मानुसार संतान—पुत्र उत्पन्न करू नये.अविधीचा पुत्र शात्राला मान्य नाही.त्यास शात्र पुत्र म्हणून मान्यता देत नाही.प्रारब्ध कर्मानुसार जन्म—मृत्यू,संसारातील सुख—दु:ख इत्यादी भोग मिळत असतात.ते भोग अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो,स्थिर मनाने स्वीकारून समाधान वृत्तीने भोगावे,कारण प्रारब्ध कोणालाच टळू शकत नाही.असा विवेक करून जगावे.||२२|| | उदासीनाश्च देहादावात्मारामा धृतव्रताः | मय्यावेश्य मनः सम्यङ् मामन्ते ब्रम्ह यास्यथ ||२३|| अर्थः---आणि देह धन पुत्रादिकाचे ठिकाणी उधासीन ,आत्मस्वरूप रामनाम व पूजा नाम्स्कार्दिक नियम धारण करणारे होऊन एकाग्र केलेले मन माझ्या स्वरूपी शापान करून राहिला म्हणजे शेवटी ब्राम्हरूपी माज्पात पाळला ||२३|| भावार्थ:--- देह आणि देहासंबंधीविषयी उदासीन राहा.उदासीन म्हणजे अनुकुलता किंवा प्रतिकूलता असो त्याविषयी सुख—दु:ख जरी झाले तरी,सुखही व दु:खही वाटू नये,कारण ते प्रारब्धाचे भोग असून टाळता येत नाहीत.म्हणून दोन्ही अवस्थेत समान भाव ठेवणे,अशा वृतीस “उदासीन अवस्था” असे म्हणतात.आपले स्वरूप हे सत्—चित्—आनंद आहे म्हणजे “मी तिन्ही काळात—भूतकाळ,वर्तमान काळ आणि भविष्य काळ,या तिन्ही काळात आहे.आपण आपल्या मनाला जर प्रश्न केला कि, “हे जीवा तुला तू फक्त वर्तमान काळातच असावे वाटते का?” जीवाचे उत्तर येते कि,’मला नेहमीसाठीच—भूतकाळ—वर्तमान काळ व भविष्य काळात असावे वाटते.”तिन्ही काळात फक्त परमात्मा आहे.त्या परमात्म्याची व आपी आवड तंतोतंत सारखीच आहे.जसे पित्यांचे व पुत्राचे रक्त तंतोतंत एकाच येते,तसे परमात्म्याचे व आपले लक्षणे तंतोतंत सारखेच आहेत.पिता—पुत्राचे रक्त एक आहे,असे केव्हा कळाले तर रक्तपेढीच्या प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर कळाले,तसे जीव हा परमात्म्याचा पुत्र आहे व परमात्मा हा पिता आहे.असे केव्हा कळेल,जेव्हा संत—महात्मा यांच्या विवेकरूप प्रयोगशाळेत कळेल.म्हणून त्या---संत—महात्मा यांच्या प्रयोगशाळेत विवेकाद्वारे सत्संग करून कळून घ्यावे व त्याचा तसा अनुभाग घ्यावा.जीव व परमात्मा एकच आहेत असे कळून आल्यानंतर तसा अनुभव येईल,जन्म—मरण निवृत्त—सुखरूप होईल.||२३|| अर्थः---श्रीशुक्राचार्य म्हणाला हे राजा याप्रमाणे जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने राजना आज्ञा करून ,त्याच्या अभ्याग स्नानादिक कर्माविषयी सेवक पुरुषांची व श्रीयांची योजना केली ||२४| अर्थः---हे राजा जरासंधाचा पुत्र सहदेव म्हणून होता त्याजकडून त्या राजस राज्योग्या अशी वस्त्रे भूषणे माळां चंदनादिकाच्या उयावैगरे देवून सत्कार करविला ||२५|| अर्थः---याप्रमाणे उत्तम स्नान करून व अलंकार धारण केल्याने त्या राजना ,त्या राजना श्रेष्ट अन्नाने भोजन घालून नंतर त्यांना दुसरेही नानाप्रकारचे ताम्बुलादिक भोग अर्पण केले ||२६|| अर्थः—तेव्हा श्रीकृष्णाने क्लेशापासून सोडविलेले व सत्कार कार्विलेले ते राजे स्वच्छ कुंडले धारण करुन ,जसे शरद ऋतूच्या शेवटी चंद्रादिक ग्रह शोभतात त्याप्रमाणे शोभू लागले||२७|| अर्थः---नंतर,मनिखचित्त सुवर्णादी भूषनांनी अशा त्या राजांना,मधुर भाषणांनी हर्षयुक्त करून व उत्तम घोडे जुंपलेल्या रथांवर बसवून,त्यांच्या देशांस पाठवून दिले||२८|| अर्थः---याप्रमाणे अतिउदारचित्त श्रीकृष्णाने संकटातून सोडविलेले ते राजे,त्याच जगत्पती श्रीकृष्णाचे ध्यान व त्याच्या कर्माचे स्मरण करीत असता आपापल्या देशी निघून गेले||२९|| भावार्थ:--- ज्यांची कैदेतून सटका केली,त्यांना त्यांचे बुद्धी परमात्म्याकडे राहील असा आसा आशीर्वाद देऊन,रथ देऊन,त्यांच्या देशाकडे पाठवले.त्यामुळे ते राजे श्रीकृष्ण यांचे चिंतन करत—करत त्यांच्या देशाला गेले.तसे आपणसुद्धा ज्यांनी आपल्यावर उपकार केले,त्यांची स्तुती करून भगवंतांचे गुण वर्णन करत आपले कार्य करावे.||२९|| अर्थः---पुढे त्यांनी ते जरासंधघातीतिक श्रीकृष्णाचे आचरण आपापल्या प्रधानास वर्णन केले आणि जशी भगवंताने आज्ञा केली होती त्याप्रमाणे सावधान राहून राज्य करूं लागले||३०|| भावार्थ:--- राजे लोकांनी भगवंत श्रीकृष्णांचा महिमा सांगितला.आपणही ज्यांनी आपले निवृत्त केले,त्यांची स्तुती सांगणे आपले कर्तव्य असते.भगवंत श्रीकृष्णांच्या आज्ञानुसार ते स्वत:चा कारभार धर्मानुसार करून प्रजेंचे दु:ख घालवून व त्यांना सुख देऊन राज्यकारभार पाहू लागले.ते प्रजांसी न्यायाने वागवू लागले.||३०|| अर्थः---याप्रमाणे भीमसेनाकडून जरासंधाला मारवून त्याच्या सहदेव पुत्राने पूजा केलेला तो भगवान श्रीकृष्ण,भीमार्जुनासहवर्तमान इंद्रप्रस्थास जावयास निघाला||३१|| भावार्थ:-भगवान श्रीकृष्ण आणि पांडव इंद्रप्रस्थाकडे गेले.तेथे इष्ट मित्र सत्वगुणी असल्यामुळे सुख व शत्रू हे नमोगुनी असल्यामुळे अतिशय दु:ख झाले.||३१|| अर्थः----नंतर शत्रू जिंकलेले ते भीमार्जुनश्रीकृष्ण इंद्रप्रस्थी जाऊन,तेथे त्यांनी आपल्या मित्रांना हर्ष उत्पन्न करण्याकरिता व शत्रूंना खेद उत्पन्न करण्याकरिता,आपापले शंख वाजविले||३२|| अर्थः---तेव्हा तो शंखाचा शब्द ऐकून संतुष्टचित्त झालेल्या इंद्रप्रस्थांनातील रहिवासिलो कांनी,जरासंध मरण पावला असे मानिले आणि धर्मराजाही पूर्णमनोरथ झाला||३३|| अर्थः---नंतर त्या भीमार्जुनश्रीकृष्णांनी,धर्मराजाला वंदन करून,आपण केलेले सर्व कर्म त्यास ऐकविले||३४|| | निशम्य धर्मराजस्तत् केशवेनानुकम्पितम् | आनन्दाश्रुकलां मुश्चन् प्रेम्णा नोवाच किन्चन ||३५|| अर्थः---तेव्हा श्रीकृष्णाने कृपा करून ते जरासंधव रूप कार्य संपादन केले असे ऐकून धर्म राजा,नेत्रांतून आनंदाश्रुंचे बिंदू सोडीत असता प्रेमाने असता सद्गती होऊन कांही वेळ पर्यंत कांहीच भाषण करण्यास समर्थ झाला तर स्तब्ध राहिले||३५|| भावार्थ:---श्रीकृष्णांनी पाडवांवर केलेली कृपा पाहून,युधिष्ठीर आनंदित झाला एवढा आनंदित झाला कि त्या आनंदामुळे त्याच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना.आपले जीवन जगत असतांना जीवनात अनुकूल बदल झाला कि समजावे कि,भगवंतांच्या कृपेमुळे झाले आहे.||३५|| __________________________________________________________________________________________________ |७४--- २---भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार---१--- __________________________________________________________________________________________________ | एवं युधीष्ठीरो राजा जरासन्धवधं विभोः | कृष्णस्य चानुभावं तं श्रुत्वा प्रीतस्तमब्रवीत् ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे धर्मराजाने,जरासंधाला वध व समर्थ कृष्णाचा तो प्रभाव ऐकून संतुष्टचित्त असता त्या श्रीकृष्णास म्हणाला कि,-||१|| अर्थः----युधिष्ठीर म्हणाला-जे त्रैलोक्याचे सनमर्गोदेष्टे ब्रम्हादिक आहेत व जे सर्वलोकांचे पालक इंद्रादिक आहेत,ते सर्व ज्या तुझे आज्ञावचन दुर्लभ असून आपल्या भाग्याने मिळाले असे मानून मानून बहुमानाने पालन करितात||२|| भावार्थ:--- भगवान परमात्म्याची ब्रह्मदेव,इंद्र आणि इतर देवता आज्ञा शिरोधार्य मानून आदराने पाळतात,कारण त्यांचे भगवान परमात्मा स्वामी आहेत.स्वामींची आज्ञा पाळणे हे त्यांची कर्तव्य आहेत,कारण भगवंत वरिष्ठ आहेत,तर ब्रह्मदेव आणि इंद्रादी कनिष्ट आहेत.श्रीसदगुरुंची आज्ञा पाळणे शिष्यांचे कर्तव्य असते.वरिष्ठांची आज्ञा पाळणे कानिष्ठांचे कर्तव्य असते. मालकाची आज्ञा पाळणे हे नौकारांचे कर्तव्य असते.गुरुजींची आज्ञा पाळणे हे विद्ध्र्यार्थ्यांचे कर्तव्य असते.माता---पित्याची आज्ञा पाळणे हे पुत्रा—पुत्रींचे कर्तव्य असते.पतीच्या आज्ञा पाळणे पत्नीचे कर्तव्य असते.सासू—सासऱ्यांच्या आज्ञाचे पालन करणे हे सुनाचे कर्तव्य असते.थोडक्यात वरिष्ठांचे आज्ञा पाळणे हे कानिष्ठांचे कर्तव्य असते,कारण ते वरिष्ठ असल्यामुळे ते अनुभवी असतात.त्यांच्या अनुभवाचा फायदा हा कनिष्ठांना मिळत असतो.म्हण्यून आपण आपल्यापेक्षा जे गुणांनी वरिष्ठ आहेत,त्यांच्या अनुभवाचा फायदा—हित होण्यासाठी आपण त्यांच्या आज्ञाचे पालन आवश्य करावेच.असा विवेक करून जगावे.||२|| अर्थः---हे व्यापका,तो कमळनेत्र तूं,स्वतां दीन असून राजे असा व्यर्थ अभिमान धारण करणाऱ्या आमचे आज्ञावचन धारण करितोस ते केवळ मनुष्यचेष्टेचे अनुकरण आहे,वस्तुतः ते तुला संभवत नाही||३|| भावार्थ:--- वैरिष्ठांना कनिष्ठांना आज्ञा देऊ नये,दिली तर अधर्म होऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपण तरी वरिष्ठांना आज्ञा देऊ नये,कारण अधर्म होतो.||३|| अर्थः---अथवा असे सूर्याचे तेज,उद्याने,अस्ताने किंवा उच्चनीचसंबंधांनी वाढत किंवा कमी होत नाही,त्याप्रमाणे एक,अद्वितीय,ब्रम्ह,परमात्मा जो तूं त्याचे तेज दुसऱ्यास आज्ञा करणे किंवा दुसऱ्याची आज्ञा पालन करणे यांच्या योगाने वाढत किंवा कमी होत नाही म्हणून तुझ्या कृपेने या सर्व गोष्टी संभवतात||४|| भावार्थ:--- जसे उदय किंवा अस्तामुळे सूर्य अधिक किंवा कमी होत नाही.त्यामुळे पृथ्वीला कांही भागात अंधार व कांही भागात प्रकाश पडत नाही,कारणे तो पृथ्वीच्या फिरण्याचा परिणाम आहे.त्याचप्रमाणे वरिष्ठांना आज्ञा कनिष्ठांना दिली तर त्या वरिष्ठांचे अहित न होता कानिष्ठांचे अहित होते.म्हणून कनिष्ठाने विवेक करावा.||४|| अर्थः---हे अजिता माधवा,तुझ्या भक्तानासुद्धा,देह व पुत्रादिकांवर मी आणि माझे अशी व इतरांवर तूं आणि तुझे अशी पशुसारखी शरीरविषयक भेदबुद्धी होत नाही मग तुला कोठून होणार ? व्हावयाचीच नाही||५|| | इत्युक्त्वा यज्ञीये काले वव्रे युक्तान् स ऋत्विजः | कृष्णानुमोदितः पार्थो ब्राम्हणान् ब्रम्हवादिनः ||६|| अर्थः---श्री शुक्राचार्य हे राजा याप्रमाणे भाषण करून श्रीकृष्णाने यज्ञ करून करण्याविषयी अनुमोदन दिल्याने या धर्मराजाने यज्ञास योग्य श काळी ब्राम्हवेत्या होता अध्वर्यू वैगरे रुतीज वरिले ||६|| अर्थ:-----त्यांची नवे वाध्व्यास भार्ध्यास सुन्मद ,गौतम ,अशीत वाशिस्त ,च्यावन कंवा मात्रेय कवच त्रिक ,विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी कृतू पैल पराशर गैर्ग वैशंपायन अथर्व कश्यप ,धौम्य परशुराम आसुरी वितीहोत्र मानुचांदा ,विर्सेना आणि अकृत वृक्षांन हि होते ||७-९|| अर्थः-----हे राजा तसेच द्रोण भीष्म कृपादिक राजे ,पुत्रासह वर्तमान धृतराष्ट्र महाबुधीमान विधुर व दुसरेही ब्राम्हण ,क्षत्रिय वैश्य बोलाविले होते ये सर्व राजे व त्याचे प्रधानादिक सर्वलोक ,यज्ञ पाहण्याकरिता उत्सुक होउन तेथे प्राप्त झाला ||१०|| ||११|| अर्थः---राजन! राजसूय यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशांतील राजे,त्यांचे मंत्री व सेवक,तसेच ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र असे सर्व वर्णांचे लोकही तेथे आले.||११|| भावार्थ:--- राजसूय यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशातील राजे,मंत्री व सेवक,तसेच ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र असे सर्व वर्णांना निमंत्रित केले.आपणही कांही धार्मिक कार्य करावयाचे असेल तर सर्वांना निमंत्रित करावयास पाहिजे,मात्र ते सर्व कोणत्याही वर्णाचे असले तरी असोत,मात्र ते त्या धर्माचे,त्या पंथाचे आणि शाकाहारी असावेत.||१२| अर्थ:---नंतर ,त्या ब्राम्हणांनी यज्ञ भूमी सुवर्णाच्या नांगरांची कर्षण करून,शुद्ध करून तेथे यथाविधीने धर्मराजाकडून यज्ञदिक्षा धारण करविली||१२|| अर्थः---जशी पूर्वी वरुणाच्या राजसुययज्ञामध्ये सुवर्णाची भांडीकुंडीवगैरे सर्व साहित्ये होती तशीच या यज्ञामध्येही होती,ब्रम्हरुद्र सहित इंद्रादिक लोकपाल,आपल्या गणांस सिद्ध आणि गंधर्व,विद्दाधर,मोठमोठे नाग,मुनी,यक्ष,राक्षस,पक्षी,किन्नर,चारण,राजे व राजपत्न्या हे सर्व,राजाच्या बोलावन्याने सर्वठिकाणांहून त्या पांडूसुत धर्मराजाच्या राजसुययज्ञामध्ये प्राप्त झाले व त्यांची कृष्णभक्त अशा त्या धर्मराजाचा तो राजसुययज्ञ विस्मय ण मानिता यथासांग मानिला||१३-१५|| अर्थः---त्यावेळी देवांसारखा तेजस्वी ऋत्विजांनी,जसे पूर्वी देवांनी वरुणाकडून यजन करविले होते तसे राजसुयविधीने त्या धर्मराजाकडून,यजन करविले||१६|| अर्थः---नंतर एकाग्रचित्त अशा त्या राजाने सोमवल्लीकंडन करण्याच्या दिवशी महाभाग ऋत्विजांचे व सभापतीचे यथाविधी पूजन करण्यास आरंभ केला||१७|| अर्थः---त्यावेळी सभासदांमध्ये अग्रपूजा करण्यास योग्य कोण ? याचा विचार करणाऱ्या सभासदांस,पुष्कळ योग्य असल्यामुळे एकाचा निश्चय करिता येईना तेव्हा सहदेव म्हणाला कि,||१८|| | अर्हति ह्यच्युतः श्रेष्ठ्यं भगवान् सात्वतां पतिः | एष वै देवताः सर्वा देशकालधनादयः ||१९|| अर्थः---हे सभासदहो,यादवांचा पति भगवान श्रीकृष्णच अग्रपूजा करण्यास योग्य आहे.कारण हा श्रीकृष्णच,सर्वदेवतारुपी व देशकालधनादिरूपी आहे||१९|| भावार्थ:--- अग्रपूजा ही सर्वांत गुणवान जो आहे,त्यांच्याकडून पूजा होणे योग्य आहे असा सहदेवांनी निर्णय करून भगवान श्रीकृष्णांचे नाव सुचवले.||१९|| अर्थः---आणि सर्व यज्ञ व जग हे ज्यांचे स्वरूप आहे,अग्नी,आहुती,मंत्र ज्ञान व उपासना हि ज्यांच्या प्राप्तीची साधने आहेत||२०|| अर्थः---तो हा सृष्टीचा पूर्वी सजातीयादी भेदरहित एकच होता,नंतर उत्पन्न झालेले हे जग यांचेच स्वरूप आहे.कारण,हे सभ्यहो,हा दुसऱ्याची अपेक्षा ण धरिता स्वतां जन्मरहित असूनही योगाने हे जग उत्पन्न करितो,पालन करितो व संहार करितो||२१|| | विविधानिह कर्माणि जनयन् यदवेक्षया | इर्हते यदयं सर्वः श्रेयो धर्मादिलक्षणम् ||२२|| अर्थः---आणि ज्याअर्थी हे सर्वही लोक,ज्याच्या अनुग्रहाने तपोयोगादिक नानाप्रकारची सत्कर्मे करून धर्मादी पुरुषार्थ साधित आहेत||२२|| | तस्मात् कृष्णाय महते दीयतां परमार्हणम् | एवं चेत् सर्वभूतानामात्मनश्चार्हनं भवेत् ||२३|| अर्थः---त्याअर्थी ह्या महात्म्या श्रीकृष्णाला उत्तम अग्रपूजा समर्पण करावी.असे केले असता सर्व जीवांची व आत्म्याचीही पूजा केल्यासारखी होईल||२३|| भावार्थ:--- सर्वाश्रेष्ठांची पूजा केली म्हणजे सर्वांची पूजा केल्यासारखे होते,म्हणून श्रीकृष्णच योग्य आहे,असा निर्णय घेण्यात आला.||२३|| अर्थः---यास्तव दिलेल्यांचे अनंत फळ मिळावे अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाने,सर्वजीनांचा अंतर्यामी,भेदबुद्धीरहित,शांत व पूर्ण अशा श्रीकृष्णालाच अग्रपूजन द्यावे||२४|| अर्थः---असे भाषण करून श्रीकृष्णाचा प्रभाव जाणणारा तो सहदेव,उगीच राहिला.ते ऐकून सर्वही श्रेष्ठ ब्राम्हण,चांगले बोलीलांस,चांगले बोलीलांस,अशी त्यांची प्रशंसा करूं लागले||२५|| अर्थः---ब्राम्हणाचे वचन ऐकून व सभासदांचा अभिप्राय जाणून संतुष्ट व प्रेमाने विव्हल झालेल्या त्या धर्मराजाने,श्रीकृष्णाची अग्रपूजा केली||२६|| भावार्थ:--- सर्वांचे मनोगत जाणून युधिष्ठीरांनी मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांची यथासंग पूजा केली,तसेच आपणसुद्धा योग्य गुणवानास पुन मान द्यावा.||२६|| अर्थः---त्याच्या चरणाचे प्रक्षालन करून लोकांना पवित्र करणारी ती उदके,भार्या,बंधू प्रधान व कुटुंब यासह वर्तमान प्रेमाने मस्तकी धारण करीत असता||२७|| भावार्थ:--- आपल्या घरी किंवा कोठेही संत—महात्मा यांचा योगायोग आला तर त्याचे चरण प्रक्षालन—पाद्य—पूजा करून ते तीर्थ अंत:करणपूर्वक आपल्या डोक्यावर व आपल्या आप्तेष्ठांच्या डोक्यावर धारण करावेत,कारण त्यामुळे सर्वांचे शरीर शुद्ध--पवित्र होते.त्यामुळे आपण पारमार्थिक साधानेकडे प्रवृत्त होऊन सार्थकता येते.||२७|| अर्थः---पिवळ्या रेशमीवस्त्रांनी व बहुत मोलाच्याभूषनांनी श्रीकृष्णाची पूजा करून,आनंदाश्रुंनी पूर्णनेत्र जाळ्यामुळे तो उत्तमप्रकारे पाहण्याससुद्धा समर्थ झाला नाही||२८|| भावार्थ:--- भगवंतांस पितान्भर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले.आपणही कांही निमित्य भगवंत—संत—महात्मा निष्काम किंवा सकाम दानधर्म करावा.वस्त्रे आणि अलंकार अर्पण केल्यानंतर युधिष्ठीर यांना अनावर आनंद झाला,तसा आपंद आपणास दानधर्म केल्यानंतर वाटावा.म्हणजेच दानधर्म अंत:करणपूर्वक करावा.||२८|| | इत्थं सभाजितं वीक्ष्य सर्वे प्रान्जलयो जनाः | नमो जयेति नेमुस्तं निपेतुः पुष्पवृष्टयः ||२९|| अर्थः---याप्रमाणे पूजा केलेल्या भगवंताला पाहून सर्वलोकांनी हात जोडून,नमोजय असे भाषण करीत त्या कृष्णाला वंदन केले.त्यावेळी श्रीकृष्णावर आकाशांतून पुष्पवृष्टी पडल्या||२९|| अर्थः---याप्रमाणे कृष्णाच्या गुणांचे वर्णन ऐकून,दमघोषाचा पुत्र शिशुपाळ,आपल्या आसनावरून उठून भगवंताचे गुणवर्णन सहन झाले नसल्यामुळे ज्याला क्रोध प्राप्त झाला आहे असे होऊन,सभेमध्ये आपला हात वर उचलून भगवंताकडून कठोर वचने ऐकवीत असता असे म्हणाला कि,-||३०|| अर्थः---काळ हा सर्व करण्यास समर्थ व कोणीही उल्लंघन करण्यास अशक्य आहे, असे महात्म्यसांगणारी जी श्रुती आहे ती यथार्थ आहे.कारण,कालपरत्त्वे ज्ञानवयोवृद्धाचिही बुद्धी बालकाच्या वाक्यांनी भ्रम पावत्ये||३१|| अर्थः----हे सभापती हो,तुम्ही सर्व हि पूजापत्र जानानार्यामध्ये श्रेष्ट आम्हा न्हाणून पूजेविषयी कृष्ण संमत आहे असे जे बालकाचे भाषण ते खरे आहे असे माणू नका||३२|| अर्थः----कारण ताप विद्या व्रते धारण करणाऱ्या ज्ञानाच्या प्रतापाने पापरहित झालेल्या ब्रम्हनिष्ठ व लोकपलानी पूज्य अशा मोठमोठ्या सभापती ऋषीच्या अनादर करून गोपाल व क्षत्रिय कुलामध्ये दुशांभूत अशा कृष्ण पुलेविषयी अशा योग येईल तर जसा कावला देवांना योग्य अशा पुरोडला योग्य होणार नाही ||३३-३४|| अर्थः---वर्ण आश्रम व कुल यांनी भ्रष्ट ,सर्वधर्मानि बहिष्कृत केले आहे ,स्वचंद आचरण करणारा व गुणहीन असा हा कृष्ण अग्रपुजेला अशा योग्य होईल ? ||३५|| अर्थः---ययाती राजाने त्याच्या कुळाला शाप दिला आहे म्हणून ते स्त्पुरुशनी बहिष्कृत केलेआहे आणि नंतर ते व्यर्थ मध्यपान करण्यात तत्पर आहे ते पूजेला कसे योग्य होईल ?||३६|| अर्थः---हे बचार यादव ब्राम्हशार्नी सेव्स्न केलेल्या माठूरडी देशाच त्याग कारेऊन वेधाद्याय्नाच्या तेजाने रहित व दुर्धर अशा समुद्राच्या आश्रय करून प्रजाना पिडा देते ||३७|| अर्थः---हे राजा इत्यादीप दुसरी पुष्कळ अभद्र भाषणे क्षीणपुण्य झालेला तो शिशुपाल बोलू लागला तेव्हा भाल्वेचे आमल ओरडणे ऐकूनही जसा सिह काहीच बोलत नाही त्याप्रमाणे भगावन श्रीकृष्णाने काहीच बाषण केले नाही ||३८|| | भगवन्नीन्दनं श्रुत्वा दुःसहं तत् सभासदः | कर्णो पिधाय निर्जग्मुः शपन्तश्चेदीपं रुषा ||३९|| अर्थः---तेव्हा भगवंताची ती दु:सह निंदा ऐकून सभासद लोक क्रोधाने शिशुपाळला हा दृष्ट दुरात्मा मरूदे असा शाप देत असता आपापले कान झाकून त्या सभेतून निघून गेला ||३९|| अर्थः---कारण भगवंताची किवा भागाव्द्भाक्ताची निन्द्द ऐकून जे मनुष्य तेथून निघून जात नाही तो पुण्यापास्डून भ्रष्ट होऊन नरकात जाऊन पडतो ||४०|| भावार्थ:--- शिशुपालाने भगवंतांची निंदा केल्यामुळे कांही लोक तेथून निघून गेले,कारण जो भगवंतांची,संत,महात्मा यांची निंदा करतो किंवा ऐकतो त्याचे असलेले पुण्य नाहीसे होऊन पाप लागते,म्हणून आपण निंदा करू नये व ऐकू नये.निदा करणारा जो आहे,त्याचा प्रतिकार करून त्याची निंदा थांबवावी.निंदा करणारास प्रतिकार करण्याचे समर्थे नसेल त्या ठिकाणाहून निघून जावे.म्हणून आपल्याकडून पाप होऊ नये व अधोगती होऊ नये म्हणून एव,संत,महात्मा यांची निंदा करू नका.||४०|| अर्थः---असो सभासद निघून गेल्यानंतर पांडव,मत्स्य,कैकेय व सृंजय हे राजे क्रुद्ध होऊन हातांत अस्त्रे घेऊन शिशुपाळाला मारण्याची इच्छा करीत होत्साते उठून उभे राहिले||४१|| अर्थः---हे राजा,तदनंतर निर्भय असा तो शिशुपाळहि सभेमध्ये कृष्णपक्षीय अशा त्या धर्मराजादिकांची भर्त्सना करीत असता,त्यांना मारण्याकरिता हातांत ढाल तलवार घेऊन उभा राहिला||४२|| भावार्थ:--- जे श्रीकृष्णांचे भक्त आहेत, शिशुपाल त्यांची निंदा करू लागला.आपण मात्र श्रीष्णांच्या भक्तांची निंदा न करता त्यांना साह्य करावे—सेवा करावी.||४२|| | तावदुत्थाय भगवान् स्वान् निर्वाय स्वयं रुषा | शिरः क्षुरान्तचक्रेण जहारापततो रिपोः ||४३|| अर्थः---इतक्यामध्ये भगवंताने विचार केला कि,-हा माझा पार्षद माझ्यासारखा बळी आहे,याला जर मी मारिले नाही तर हा या सर्वांना मारून टाकील असा विचार करून स्वतः च आसनावरून उठून आपल्या त्या पांडवादिकांचे निवारण करून क्रोधाने,वस्तऱ्यासारखा धारा असलेल्या चक्राच्या योगाने ,स्वताचा अंगावर धांवून येणाऱ्या त्या शत्रूचे मस्तक तोडून टाकिले||४३|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी भक्तांना हा प्रतिकूल वागत आहे,असे लक्षात आल्यानंतर स्वत: शिशुपालाचे डोके तीक्ष्ण धारेच्या चक्राने तोडले.आपणही साधू—संतांना--- महात्म्यांच्या प्रतिकूल वागत असेल,तर त्या संत—महात्म्यांना आपण संरक्षण द्यावे.वास्तविक शिशुपाल हा श्रीकृष्णांचा मावस—भाऊ होता,तरीपण देहसंबंधी नात्याचा विचार न करता संत—महात्मा यांचा विरोध करत आहे,म्हणून त्याचे डोके उडवून गतप्राण केले.म्हणून आपण परमार्थ करत असतांना नाते—वैकांचा विचार न करता धर्माप्रमाणे आचरण करून एक आदर्श निर्माण करून,लोकांना सन्मार्गाला लावावे.भगावतांनी स्वत:आचरण करून आदर्श निर्माण केला,तसा आपणही करून धर्म मार्ग निर्माण करावा.समाजकारण असो,राजकारण असो,धर्मकारण असो.कोणतेही कार्य असले तरी असा आदर्श आपण स्वत: आचरणात आणून इतरांना सांगावे.||४३|| अर्थः---याप्रमाणे शिशुपाळ मारला असता त्याठिकाणी मोठा कलकलाट शब्द प्रवृत्त झाला आणि त्याचे अनुयायी राजेही आपले प्राण वांचण्याची इच्छा धरून जिकडे तिकडे पळून गेले||४४|| अर्थः----त्यावेळी शिशुपाळाच्या देहांतून निघालेले जे जीवरुपी तेज ते,सर्वलोक पहात असता,जसे आकाशांतून खाली पडलेले उल्कारूप तेज,भूमीमध्ये प्रविष्ठ होते त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या देहांमध्ये प्रविष्ट झाले,म्हणजे त्याची सायुज्यता पावले||४५|| अर्थः---आता,अशा निंदकाचा वासुदेवामध्ये प्रवेश कसा झाला ?असे कोणी म्हणजे तर-हिरण्यकशिपू,रावण व शिशुपाळ या तीन जन्मांमध्ये अनुवर्तीत झालेल्या द्वेषाने खवळून गेलेल्या बुद्धीच्या योगाने भगवंताचे ध्यान करणारा तो शिशुपाळ,तन्मयता पावला म्हणजे पुन्हा वैकुंठाचेठिकाणी भगवत्पार्षद होऊन राहिला.एतावता निरंतर चिंतन असणे हेंच ध्येयरूपाचा आकार उत्पन्न होण्यास कारण होते||४६|| भावार्थ:--- शिशुपालाने पूर्व दोन व वर्तमान एक असे तीन जन्म भगवंतांसी वैरभाव करून भगवंतांसी एकरूप झाला.भगवंतांचे म्हणणे आहे कि भगवंतांचे ध्यान—स्मरण वैरभाव—शत्रुभाव,मित्रभाव,पत्नीभाव,पतीभाव,पिता—माताभाव,भक्तभाव असा कोणत्याही भावनेने भगवंतांसी संबंध केला असता व अंत—मृत्युच्या समयी त्याचेच स्मरण केले असता तो भगवंतांसी एकरूप होतो.त्याचे जन्म—मरण निवृत्त होऊन तो सुखरूप होतो.म्हणून आपण भगवंतांसी कोणताही संबंध जोडून म्रृत्यूपर्यंत त्याचे स्मरण करावे.अंत—मृत्यू होईपर्यंत त्याचेच स्मरण आपण केले असता आपण भगवंतरूप होऊन आपलेही जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.||४६|| अर्थः---नंतर,सार्वभौम अशा त्या युधिष्ठिराने सभासदांस हित ऋत्विजांना मोठी दक्षिणा दिली आणि पुंजा करण्यास असलेल्या इतरही सर्वांचे पूजन करून यथाविधी अवभृथस्नान केले||४७|| अर्थः----याप्रमाणे धर्मराजाचा राजसूय यज्ञ साधून,कुंती व पांडव यांनी राहण्याविषयी प्रार्थना केलेला तो योगेश्वरांचा ईश्वर श्रीकृष्ण,कितीएक महिने पर्यंत तेथेंच राहिला होता||४८|| | ततोsनुज्ञाप्यः राजानमनीच्छन्तमपीश्वरः | ययौ सर्भायः सामात्यः स्वपुरं देवकीसुतः ||४९|| अर्थः---नंतर,आपल्या जाण्याची इच्छा न करणार्याही धर्मराजचा निरोप घेऊन तो देवकीपुत्र श्रीकृष्ण,स्त्रियांस हवर्तमान व प्रधानासहवर्तमान आपल्या द्वारकेमध्ये निघून गेले||४९|| अर्थः---हे राजा,वैकुंठवासी जयविजयांचा सनकादिकांच्या शापाने वारंवार जे जन्म झाले तद्वीविषयक हे आख्यान मी तुला बहुत विस्तराने सांगितले आहे||५०|| अर्थ:----असो.राजसुययज्ञसंबंधी अवभृथस्थान केलेला तो धर्मराजा,ब्राम्हणांनी व क्षत्रियांनी युक्त अशा सभेमध्ये इंद्रासारखा शोभूं लागला||५१|| अर्थः---धर्म राजाने पूजा केलेले सर्वही देव,मनुष्य व प्रथमादिक गण,श्रीकृष्णाची व यज्ञाची प्रशंसा करीत,आपापल्या स्थानी निघून गेले||५२|| अर्थः---त्यावेळी,ज्याने सर्वांना आनंद करणारी व समृद्ध अशी ती युधिष्ठिराची संपत्ती पाहून सहन केली नव्हती,त्या एका कलीच्या अंशरुपी,पापाचारी व कुरुकुलनाशक अशा दुर्योधनाखेरीज सर्वांना तो यज्ञ पाहून आनद झाला||५३|| भावार्थ:--- सर्वांना हा राजसूय यज्ञ प्रसंग आपडला,पण दुर्योधन याला मात्र या प्रसंगातले कांहीच आवडले नाही,कारण हा तमोगुणी असल्यामुळे स्वार्थी होता.जे तमोगुणी व स्वार्थी असतात,त्यांना इतरांचा उत्कर्ष पाहून दु:खच होते.आपण मात्र सत्वगुणी होऊन इतरांचा उत्कर्ष पाहून सुख वाटावयास पाहिजे.सत्वगुणी बनणे हे आपल्या हिताचे असते,कारण सत्वगुण परमात्म्याकडे—सुखाकडे नेत असतो.सत्वगुण आपल्यात येण्याकरिता संत—महात्मा यांची संगती करावी लागते.||५३|| अर्थः----जो पुरुष,हे शिशुपालवधादिक विष्णूचे कर्म,जरासंधाने कोडून ठेवलेल्या राजांचा मोक्ष व यज्ञाचा म्होतसाह यांचे कीर्तन,श्रवण व स्मरण करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल||५४|| भावार्थ:--- श्रीमद्भागवत कथेतील शिशुपालवध,जरासंधवध,कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्ण लीलांचे कीर्तन करील,त्याची सर्व पापातून सुटका होईल. म्हणून आपण श्रीमद्भागवतातील कथेचे शिशुपालवध,जरासंधवध,कैदी राजांची मुक्ततेची कथा आणि पाडवांच्या यज्ञाची श्रीकृष्ण लीला यांचे कीर्तन करील म्हणजे अधिकार ----संपन्न होऊन वक्ता होऊन ज्ञानदान करेल,त्याची सर्व पापातून सुटका होऊन त्याचे जन्म—मरण निवारण होऊन सुखरूप होईल,म्हणून आपण वक्ता---कीर्तन करावे, किंवा श्रोता होऊन श्रवण करून,त्यानुसार आचरण करावे,त्याचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होईल.||५४|| ________________________________________________________________________________________________________________________ |७५-- ८---राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान—१--- ________________________________________________________________________________________________________________________ आता पंचाहत्तरावा अध्यायामध्ये राजसूययज्ञाच्या अवभृथस्नानाचा उत्साह आणि दृष्टीचे ठिकाणी भ्रम झाला असतांही,क्षमा नसल्यामुळे दुर्योधनाचा झालेला मानभंग यांचे वर्णन केले आहे ________________________________________________________________________________________________________________________अर्थः----एका दुर्योधनालाच दुःख होण्याचे कारण विचारण्यासाथक्ष राजा म्हणाला-हे ब्राम्हनन,शुकाचार्य,एक दुर्योधन वर्ज्य करून,ते तेथे मनुष्यश्रेष्ठ,राजे ऋषी व देव प्राप्त झाले होते ते सर्वही धर्मराजाचा तो राजसूय महोत्सव पाहून आनंद पावले,असे मी तुझ्याहून ऐकिले त्यांत एक दुर्योधनालाच असंतोष होण्याचे कारण काय तें सांगावे||१-२|| अर्थः---शुकाचार्य म्हणाला-हे राजा,तुझा आज मी महात्मा युधिष्ठीर त्याच्या राजसुय यज्ञामध्ये प्रेमाने बांधले त्यांचे सर्वही बांधव,यज्ञसंबंधी ती ती कामे करीत होते||३|| अर्थः---ते असे कि,भीमसेन पाकशाळेला अध्यक्ष होता,सुयोधन धनाध्यक्ष ( खजीनदार ) होता,सहदेव,लोकांच्या पूजा सन्मान वगैरे करणार होता,नकुळ अनेकप्रकारचा वस्तू संपादन करणार होता||४|| | गुरुशुश्रूषणे जिष्णुः कृष्णः पादावनेजने | परिवेषणे दृपदजा कर्णो दाने महामनाः ||५|| अर्थः---पूज्यलोकांच्या चंदनलेपनादिक शुश्रुशेविषयी अर्जुन होता,श्रीकृष्ण,पादप्रक्षालनाच्या कामावर होता.भक्ष्यभोज्यादिक पदार्थांच्या वाढण्याकडे द्रौपदी होती,अतिउदारचित्त असा कर्णदानाध्य्क्ष होता||५|| अर्थः---तसेच हे राजेंद्रा सात्यकी,विकर्ण,हार्दीक्य,विदुरादिक,बाल्हीकराजाचे पुत्र भुरी आदिक तसेच संतर्दनादिक बांधव सर्वही ते त्या महायज्ञादि अनेक कर्मांमध्ये मुखत्यार नेमिलेले असल्यामुळे,धर्मराजाचे प्रिय होण्याचे इच्छेने सांगितल्याप्रमाणे ते आपापले अधिकार करीत होते||६-७|| अर्थः---ऋत्विज,सभासद,मोठमोठे ज्ञानी व मित्र इत्यादिकांचा मधुरभाषणे अलंकार व दक्षिणा इत्यादिकेकरून सत्कार झाला असतां,तशाच शिशुपाळहि भक्तपालक श्रीकृशांच्या चरणामध्ये प्रविष्ट झाला असतां,नंतर सर्वांनी भागीरथीमध्ये अतभृथ स्नान केले||८|| अर्थः---त्या अवभृथ स्नानाच्या उत्सवामध्ये मृदंग,शंख,पणव,नोबदी,नगारे,गोमुख इत्यादिक नानाप्रकारची चित्रविचित्र वाद्ये वाजूं लागली||९|| अर्थः---त्यावेळी हर्ष पावलेल्या वारांगना नृत्य करूं लागल्या,गायकाचे समुदाय गाऊ लागले.त्यावेळी त्यांचा त्या विणा,मुरल्या व टाळांच्या मोठ्या झालेल्या ध्वनीने आकाश व्यापून टाकिले||१०|| अर्थः---त्याप्रसंगी सुवर्णपुष्पांच्या मला धरण करणारे राजे,ज्यांच्या ध्वजांची व पातकांची अग्रे चित्र विचित्र रंगांची आहेत अशा आपल्या हत्ती,रथ,घोडे व उत्तकेलेले शिपाई अशा चतुरंग सैन्यांनी वेष्टित होऊन नगराच्या बाहेर निघाले||११|| अर्थः---तसेच यदु,सृंजय,कांबोज,कुरु,केकय व कोमल या वंशांतील क्षत्रिय,हे सर्व,धर्मराजाला पुढे करून सैन्यांनी पृथिविला कांपवित होत्साते निघाले||१२|| अर्थः---तसेच सदस्य,ऋत्विज व दुसरेही श्रेष्ठ ब्राम्हण मोठ्याने वेदघोष करीत निघाले,त्यावेळी देव,ऋषी,पितर व गांधर्व हे पुष्पवृष्टी करीत स्तुती करूं लागले||१३|| अर्थः---नगरांतील पुरुष व स्त्रिया चंदनाच्या उट्या,पुष्पांच्या माळा,भूषणे व वस्त्रे यांच्या योगाने उत्तम अलंकृत होऊन अनेकप्रकारच्या रसांनी परस्पर लेपन करीत व अभिषेक करीत असता.क्रीडा करूं लागल्या||१४|| अर्थः---त्यावेळी,तेल,दूध,सुगंधित पाणी,हळद आणि दाट केशर इत्यादिकांचा योगाने पुरुषांनी लेपन केलेल्या वारांगना उलट त्या पुरुषांना लेपन करीत असतज्ञान त्या,क्रीडा करूं लागल्या||१५|| अर्थः----त्यावेळी तो उत्साह पाहण्याकरिता जशा देवांगना,उत्तम विमानामध्ये बसून आल्या होत्या तशाच राजांच्या स्त्रियांहि,योद्ध्यांनी सुरक्षित असता त्या अवभृथ स्नान करण्याकरिता रथादिकामध्ये बसून नगरांतून बाहेर भागीरथीच्या कंठी आल्या,त्या मामेभाऊ व सख्या अंगावर पाणी गोरसादिक उडवून भिजविल्या असता,लज्जायुक्त हास्याने प्रफुल्लीतमुख होऊन शोभूं लागल्या||१६|| भावार्थ:---आपण रामनवमी—रामजन्म,गोकुळ—आष्टमी—श्रीकृष्ण जन्म,किंवा संत—महात्मा यांच्या पुण्यतिथी स्मरण सोहळा किंवा भागवत—साप्ताह उत्सव किंवा अखंड हरीनाम साप्ताह असे अनेक प्रकारांचे आयोजन करत असतोत.त्या निमित्ताने पालकी मिरवणूक असते,अशा प्रसंगात सर्वांनी म्हणजे स्त्री—पुरुषांनी सहभागी होऊन आनंदा लुटावयास पाहिजे.भगवंतांचे स्मरण त्या निमित्ताने होते.आपल्यावर सात्विक संस्कार होतात.सात्विक संस्कार झाल्यामुळे आचरणात फरक दिसून येतो.||१६|| अर्थः----त्या राजस्त्रिया,जेव्हा पाणी उडविण्याच्या चर्मयंत्रांनी व तोट्यांनी आपल्या दिरांच्या व सख्यांच्या अंगावर पाणी उडवूं लागल्या तेहा त्यांची बारीक वस्त्रे अगदी भिजून गेली होती,म्हणून त्यांची शरीरे,कुंच मांड्या व मध्यप्रदेश हे व्यक्त दिसत होते आणि त्यांच्या त्या जलक्रीडेच्या अतिशय उत्सुकतेणे बांध सुटून गेलेल्या केंसांच्या बुचाडयांतून फुले गळून पडत होती,अशा प्रकारच्या सुंदर विहारांनी त्या राजस्त्रिया,कामिजनांच्या कामवासनायुक्त मनाला क्षोभ उत्पन्न करूं लागल्या||१७|| | स सम्राड् रथमारूढ: सदश्वं रुक्ममालिनम् | व्यरोचत स्वपत्नीभिः क्रियाभिः क्रतुराडिव ||१८|| अर्थः---त्यावेळी तो सार्वभौम राजा युधिष्ठीर,सुवर्णपुष्पांच्या माळांनी युक्त व उत्तम घोडे जुंपलेल्या आपल्या रथावर पत्न्यांसह आरूढ झाला असतां,तो प्रयाज अनुयाज इत्यादिक अंग क्रीयांसह मुर्तिमान प्रगत झालेला राजसुय यज्ञच कि काय असा शोभूं लागला||१८|| अर्थः---त्या ऋत्विजांनी पत्नीसंयाजनामक व अवभृथसंबंधी कर्मांचे अनुष्ठान करून आचमन केलेल्या द्रौपदीसहित गंगेमध्ये मोठ्या समारंभाने स्नान घातले||१९|| अर्थः----त्यावेळी मनुष्यांच्या दुंदुभीसहवर्तमान देवांचेही दुंदुभी वाजूं लागले आणि देवता,ऋषी,पितर व मनुष्य हे त्या युधिष्ठीरावर पुष्पवृष्टी करूं लागले||२०|| अर्थः---याप्रमाणे यजमानाने स्नान झाल्यावर ब्राम्हनादिक चारी वर्षाच्या व ब्रम्ह चाऱ्यादिक चारी आश्रमाच्या सर्व लोकांनी त्या गंगेमध्ये स्नान केले.कारण,हे अवभृथ स्नान घडले असता,ब्राम्हात्याडी महापातके करणाराही पुरुष त्या पापांपासून तकाळ मुख्त होतो||२१|| अर्थः---नंतर त्या धर्म राजाने,नवी रेशीम वस्त्रे परिधान करून इतरही अलंकार धारण केले आणि भूषणे वस्त्रेवगैरे देऊन ऋत्विज,सभासद व ब्राम्हण इत्यादिकांचा सत्कार केला.||२२|| अर्थः---तो युधिष्ठीर नारायणपरायण होता म्हणून त्या सर्वात्मक नारायणाच्या प्रीत्यर्थ त्याने बंधू,ज्ञाती,राजे,मित्र व सुह्र्द यांचे तसेच इतरही सर्व लोकांचे वारंवार सत्कार केले||२३|| अर्थः---त्यावेळी सर्व पुरुष मनिखचित कुंडले,माळा,पागोटी,आंगरखे,रेशमीकाठी वस्त्रे व बहुत मोलाचे हार धारून करून देवांसारखे देदिप्यमान झाले.तशाच सर्व स्त्रियाही,दोन्ही कानांतील कुंडलांनी व कुरळ केसांच्या समुदायाने मुखांवर तेजयुक्त असता त्या कमरेचेठिकाणी धारण केलेल्या सुवर्णमेखलेने शोभूं लागल्यास||२४|| अर्थः---हे राजा,नंतर उत्तम स्वभावाचे ऋत्विज,वेदवेत्ते सदस्य,ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र,व तेथे जे आले होते ते||२५|| अर्थः----तसेच राजे,देव,ऋषी,पितर,अनुसयांसह लोकपाल हे सर्व,दानमानांच्या योगाने धर्मराजाने सत्कृत होत असता आपापल्या स्थळी निघून गेले||२५-२६|| अर्थः---हरीभक्त अशा राजर्षी युधिष्ठिराच्या त्या राजसुयाच्या महोत्सवाची प्रशंसा करणारे लोक,जसा अमृताचे प्राशन करणारा मनुष्य,तृप्त होत नाही त्याप्रमाने तृप्त झाले नाहीत||२७|| अर्थः---त्यावेळी वियोगाने शन न करणाऱ्या धर्मराजाने,आपले मित्र,संबंध,बांधव आणि श्रीकृष्ण यांस प्रेमाने राहवून राहिला||२८|| भावार्थ:--- आपण,आपणाकडे कोणत्याही निमित्ताने कांही उत्सव,अखंड हरीनाम सप्ताह असेल,श्रीमद्भागवत सप्ताह असेल,राम जन्म उत्सव,कृष्ण जन्म उत्सव,संत—महात्मा पुण्यतिथी उत्सव अशा प्रकारचा कोणताही उत्सव असेल त्यात आपण सहभाग घेऊन आनंद लुटाव्यास पाहिजे.उत्सव पार पडल्यानंतर कांही त्या उत्सवातील गुण—दोषांची चर्चा करून सुख—दु:ख व्यक्त करण्यासाठी आपले जे आत्मीयतेचे,आप्तेष्ट,संबंधी,मित्रमंडळ आणि बांधव यांना थांबवून घेतले पाहिजेत.त्यामुळे उत्सवातील चर्चा होऊन सुख—दु:खाची देवाण—घेवाण होऊन दु:ख कमी करून व सुख वाढवून आनंदात वाढ करून आनंदाचा भोग वाढवता येते.||२८|| अर्थ:---हे राजा,त्या धर्मराजाने प्रिय करणाऱ्या भगवान श्रीकृष्णानेही,सांबादिक यादववीरांना द्वारकेत पाठवून देऊन,आपण तेथेंच राहिला||२९|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्णांनी संब इत्यादी यादावविरांना द्वाराकापुरीला पाठवले आणि स्वत: युधीश्ठीरांना आनंद देण्यासाठी ते तेथेच राहिले कारण श्रीकृष्णांच्या द्वाराकापुरीला जाण्याच्यामुले पांडवांना दु:ख होऊ लागले म्हणू त्यांचे दु:ख कमी करण्याकरिता पाण्डवाजवळ राहिले.आपणही आपल्यामुळे इतारांना दु:ख होत असेल तर त्यांचे दु:ख कमी करूनच त्यांच्याकडून आपल्या गावी जावे.इतरांचे दु:ख घालवून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करणे,यासच निष्काम भक्ती असे म्हणतात.|||२९|| | इत्थं राजा धर्मसुतो मनोरथमहावर्णवम् | सुदुस्तरं समुत्तीर्य कृष्णेनासीद् गतज्वरः ||३०|| अर्थः---याप्रमाणे धर्ममुख राजा युधिष्ठीर,इतरांनी दुस्तर अशाही राजसूय यज्ञाच्या समाप्तीच्छारूप महासमुद्राला,कृष्णरूप नावाड्याच्या आश्रयाने तरून जाऊन निश्चित झाला||३०|| भावर्थ:--- सत्कर्म करण्यासाठी संत—महात्मा यांच्या मार्गदर्शनानुसार करावे.मनाने सत्कर्म करू नये.सत्कर्म केले असता सर्व चिंता नाहीसी होऊन सुख मिळते.||३०|| अर्थः---एकेवेळी भगवद्भक्त अशा त्या युधिष्ठिराच्या अंतपुरामध्ये संपत्ती तसेच राजसूय यज्ञांचे महत्त्व पाहून व वेदपति यांच्या अनेकप्रकारच्या संपत्ती शोभत होत्या त्यांसहवर्तमान दौपदी आपल्या युधिष्ठिरादिक पतीची सेवा करीत होती.त्या संपत्तीयुक्त दौपदीवर आसक्तचित्त झालेला तो दुर्योध,आपल्या अंतःकरणामध्ये संताप पावत असे||३२|| भावार्थ:--- युधिष्ठीर यांनी सत्कर्म—राजसूय यज्ञ केला,त्यामुळे त्यांना महत्व प्राप्त झाले.असे झाल्यानंतर दुर्योधनाला द्वेष उत्पन्न झाला.दुर्योधनाने कितीही द्वेष केला तरी त्याला युधीश्ठीरानाचे महत्व कमी होणार नाही.प्रत्यक्षात दुर्योधनाचे महत्व कमी होईल.आपणही जीवन जगात असतांना एखाद्या विशिष्ट कार्यामुळे कोणाचे तरी महत्व सत्कर्म केल्यामुळे महत्व वाढते.आपलेही महत्व वाढावे असे वाटत असेल तर,आपणही कोणते तरी सत्कर्म करून आपले महत्व वाढून घेता येते.द्वेष केल्याने आपले महत्व न वाढता मात्व कमी होते.म्हणून जीवांनी कोणाचाही द्वेष करू नये,तर प्रेम अर्पण करावे.यामुळे आपण कोणाचा द्वेष न करता प्रेम अर्पण करावे.||३१|| अर्थः----आणि ज्या अंतःपुरामध्ये त्यावेळी ( दुर्योधनाची थट्टा करत्येवेळी ) नितंबाच्या भाराने हळूहळू चालत असल्यामुळे भुषनांच्या योगाने शब्द करीत असलेल्या पायांनी,शोभा असलेल्या कूचसंबंधी केशराने तांबडे झालेले हार धारण करणाऱ्या,हालत असलेल्या कुंडलांनी व केशपाशाने शोभायुक्त मुखे धारण करणाऱ्या व कृशकटी अशा श्रीकृशांच्या हजारो स्त्रिया शोभत होत्या||३३|| भावार्थ:--- मय नावाच्या दानवाने पांडवासाठी प्रसाद—राहण्याचा राजवाडा बनवला होता.तो राजवाडा ऐश्वर्याने संपन्न असल्यामुळे त्याच्याविषयी दुर्योधनाला लोभ निर्माण झाला.तसेच द्रोपाडीचे सौदर्य विशेष असल्यामुळे तिच्या सौदार्याचा मोह झाला.दुर्याधनास लोभ व मोह झाल्यामिले त्याचे अंत:कारण चंचल झाले.|||३२—३३|| अर्थः---त्या अंतःपुरामध्ये,मयासुराने निर्माण केलेल्या सभेमध्ये एकेवेळी आपल्या कनिष्ठ बंधुं सहवर्तमान व हिताहित सुचविणाऱ्या श्रीकृष्णासहवर्तमान तो सार्वभौम धर्मराजा,सुवर्णाच्या सिंहासनावर साक्षात इंद्रासारखा विराजमान होऊन,छत्रचामरादिक शोभेने सेवीत झाला असतां,बंदिजनांनी त्याची स्तुति आरंभिली||३४-३५|| अर्थः----हे राजा,त्यावेळी त्य सभेमध्ये,अभिमानी दुर्योधन,आपल्या दुःशासनादिक बंधूसहित हातामध्ये खड्ग,मस्तकी किरीट व कंठामध्ये माळा धारण करून,क्रोधाने द्वारपाळांना धमक्या देत प्रविष्ट झाला||३६|| भावार्थ:---- अभिमानी दुर्योधन हा एके दिवसी पांडवाकडे आपल्या भावासह आला.राजमहालात आल्याबरोबर दुर्योधानांनी पांडवाच्या सेवकास क्रोधाने दटावले.दुर्योधनाने पांडवाच्या सेवकास क्रोधाने दटावने योग्य नाही,कारण दुर्योधन हा अंहकारी असल्यामुळे क्रोधाने दटावले.म्हणून आपल्याला आपल्या सत्तेचा अंहकार नसावा,कारण अंहकारामुळे कोणता—ना कोणता विकार उत्पन्न होतो.विकार हा अहित करतो.म्हणून सर्व असावे,पण अंहकार नसावा.असा विवेक करून अंहकाराचा त्याग करावा.||३६|| अर्थः---तेव्हा त्याने मयासुराच्या मायेने मोहित होऊन,स्थळाचेठिकाणी हेंजळ आहे असे मानून नेसलेल्या वस्त्राच्या शेवटच्या निऱ्या पायघोळ सोडलेल्या होत्या त्यावर उचलून धरिल्या; तसाच तो जळामध्ये हे स्थळ आहे अशा भ्रमाने एकाएकी थेचकाळून पडला||३७|| भावार्थ:---- मय दानवाने राजवाड्याचे बांधकाम करीत असतांना अशी किमया केली होय्ती कि,वास्तविक पाणी असतांना पृथ्वी दिसावयाची व वास्तविक पाणी असतांना पृथ्वी दिसावयाची,यामुळे दुर्योधनास भ्रम झाला.त्यामुळे त्याने जमीन असतांना पाणी वाटल्यामुळे त्याने आपली वस्त्रे पाण्याने भिजू नये म्हणून वर केली.||३७|| अर्थः---त्याला पाहून भीम हंसला तशाच स्त्रिया व दुसरे राजेही,धर्मराजाने निवारण केले असतांही श्रीकृष्णाने कटाक्षाने अनुमोदित झाल्यामुळे हसूं लागले||३८|| भावार्थ:--- दुर्योधनास भ्रम झाल्यामुळे तो पडला.तो पडल्यामुळे भीमसेन,राण्या आणि अन्य राजे हसू लागले.सर्वांना हसण्यास श्रीकृष्ण यांची मूकसंमती व युधीष्ठीरांची संमती नव्हती,पण श्रीकृष्णांच्या समंतीमुळे सर्व हसले.श्रेष्ठांचे म्हणण्याने कनिष्ट ते कार्य करतात.म्हणून वारीष्ठान्ने असी अपमानकारक संमती देऊ नये.||३८|| अर्थः---तेव्हा तो दुर्योधन,त्या उपहासाच्या योगाने लज्जित झाला व खाली तोंड करून क्रोधाग्नीने जळत असता,आपल्या घरी जाण्याबद्द्ल राजाला आज्ञा न विचारिता सभेतून उठून हस्तिनापुरांतील आपल्या घरी निघून गेला.त्यावेळी सत्पुरुशांमध्ये पुढे होणार्या अनर्थाला सूचक असा मोठा हाहाकारशंब्द झाला आणि धर्मराजाही,खिन्न असल्यासारखा झाला,तसाच ज्याच्या दृष्टीमात्राने तो पृथिवीचा भार हरण करण्याची इच्छा करणारा भगवान श्रीकृष्णही उगीच राहिला||३९|| भावार्थ:--- दुर्योधन पडल्यामुळे त्याच अपमान झाला,त्यामुळे त्याला क्रोध आला.त्या क्रोधाच्या भरत तो परत हस्तिनापुराला गेला.आपण मात्र कोणाचा पामन झाला असेल त्यांच्याकडे पाहून त्यांचा अपमान होईल असे आचरण करू नये.आपलासुद्धा केव्हा—ना कांही अपमान होऊ शकतो व अपमान होऊ शकतो.||३९|| | एतत्तेभिहितं राजन् यत् पृष्टोsहमिह त्वया | सुयोधनस्य दौरात्म्यं राजसूये महाक्रतौ ||४०|| अर्थः---हे राजा,तूं जे मला ह्या राजसूय महायाज्ञामध्ये दुर्योधनाच्या असंतोषाचे कारण,विचारिले होतेस,ते हे दुर्योधनाचे मी तुला सांगितले आहे||४०|| याप्रमाने श्रीमद्भगवतनामक महापुरांतील दशमस्कंधाच्या उत्तरार्धात दुर्योधनभंगनिरुपणनामक हा पंचाहत्तरावा अध्याय समाप्त झाला ________________________________________________________________________________________________________________________ |७६— शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध -३३- _____________________________________________________________________________________________ आतां ह्या शहत्तराव्या यादवांच्या व शाल्वाच्या महायुद्धांत शाल्वाच्या दुमान प्रधानाच्या गदाप्रहाराने युद्धांतून प्रदुम्न निघून गेलाअसे वर्णन केले आहे ________________________________________________________________________________________________________________________ अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला- हे राजा,आता,क्रीडेकरिता मनुष्यशरीर धारण करणाऱ्या श्रीकृष्णाचे दुसरेही अद्भुतकर्म श्रवण कर की,ज्याप्रकारे त्याने शाल्वाचा वध केला आहे||१|| अर्थः---शिशुपाळाचा मित्र शाल्व,रुख्मिनिच्या विवाहामध्ये आला होता,तेव्हा यादवाबरोबर जे युद्ध झाले त्यामध्ये शाल्व,तसेच जरासंधादिक दुसरेही राजे जिंकले होत||२|| अर्थः---तेव्हा सर्व राजे श्रवण न्क्रीत असता शाल्वाने प्रतिज्ञा केली की,हे राजेहो,मी हि पृथिवी यदुकुलरहित करीन,माझा पराक्रम पाहा||३|| अर्थः----हे राजा,तो मूढ शाल्व,याप्रमाणे प्रतिज्ञा करून,प्रतिदिवशी एकवेळ मुठभर धूळ भक्षण करीत असता,प्रभू देव,शंकरांचे आराधन करूं लागला||४|| अर्थः----भगवान शंकर,त्वरित प्रसन्न होणारा असूनही त्याने,कृष्णाचा द्वेष करणाऱ्या शाल्वापाशी आपला वर व्यर्थ होणार असे मानून प्रथमतः त्याची अपेक्षा केली.पुढे एक वर्षानंतर,शरण आलेल्या त्या शाल्वला तूं वर मागून घे असे सांगितले||५|| अर्थः---तेव्हा त्या शाल्वाने,देव,दैत्य,मनुष्य,गांधर्व,सर्प व राक्षस यांना भेद करण्यास अशक्य,आपल्या इच्छेप्रमाणे जाणारे व यादवांना भय उत्पन्न करणारे असे एक विमान मागून घेतले||६|| अर्थः---तेव्हा तथास्तु असे म्हणून शंकराने शत्रूंची नगरे जिंकणाऱ्या मयासुराला आज्ञा केली आणि त्याजकडून केवळ पोलादाचे सौभनामक विमान करून शाल्वास देवविले||७|| अर्थः----तेव्हा तोशाल्व,अंधाकाराचे केवळ स्थान,शत्रूंची प्राप्त करून घेण्यास अशक्य व यथेच्छ गमन करणारे असे विमान मिळाले असता,त्या त बसून यादवांनी केलेल्या वैराचे स्मरण करीत असता त्यांच्या द्वारकानगरीत वर हल्ला करण्याकरिता निघाला||८|| अर्थः---हे राजा, तो शाल्व आपल्या,मोठ्या सेनेने द्व्रकानगरी चोहेंकडून रोधून,फळांची उपवने व फुलांच्या सर्व बागा मोडून टाकुं लागला||९|| अर्थः----तसाच नगरच्या वेशी,घरांचे दरवाजे,राजमंदिरे,उप्परमाड्या,आवरांच्या भिंती व क्रीडास्थाने मोडून टाकुं लागला,आणि त्या श्रेष्ठ सौभविमानांतून शस्त्रांच्या वृष्टीही पडूं लागल्या||१०|| अर्थः---शीला वृक्ष,वज्रपात,सर्प पाण्याच्या धारा व वाळू यांची वृष्टी होऊं लागली;प्रचंड असा वावटळीचा वारा सुटला,सर्वदिशा धुरल्याने आच्छादित झाल्या||११|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे सौभविमानाने अत्यंत पिडीत झालेलली ती कृष्णाची द्वारका नगरी,जशी त्रिपुरासुराने पिडीत केलेली पृथ्वी मुख पावेनाशी झाली होती त्याप्रमाणे मुख पावेनाशी झाली||१२|| अर्थः---त्यावेळी भगवान प्रदुम्नाने आपल्या सर्वप्रजा पिडीत झाल्या असे पाहून,सर्वांना भिउं नका असे सांगितले आणि तो महायशस्वी प्रदुम्न,रथारूढ होऊन युद्धप्रदेशावर निघाला||१३|| अर्थः---तसेच दुसरेही महाधनूर्धारी रक्षकाचे अधिपती सात्यकी,चारूदेष्ण,सांब,कनिष्ठ बंधू सहित अक्रूर,हर्दीक्य,भानुविंद,गद,शुक्र व सारण,हे सर्वही,रथ,हत्ती,घोडे व पायदळ या चतुरंग सैन्याने रक्षित असता,कवचे धारण करून युद्धाकरिता बाहेर निघाले||१४-१५|| अर्थः----नंतर शाल्वाच्या लोकांचे यादवांबरोबर जसे पूर्वी असुरांचे देवांबरोबर युद्ध झाले होये त्याप्रमाणे तुमुळ व ऐकणाऱ्या व पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर रोमांच उत्पन्न करणारे युद्ध सुरुझाले||१६|| अर्थः----तेव्हा प्रधुम्नाने आपल्या दिस्व्यास्त्रांच्या योगाने,शाल्वाच्या त्या शास्त्रवृष्टीमाया एका क्षणमात्रांत,जसा सूर्य,रात्रीसंबंधी अंधकाराचा नाश करितो त्याप्रमाणे नाहीशा करून टाकिल्या||१७|| अर्थः----आणि शाल्वाचा जो सेनाधिपती होता,याला सुवर्णाचे पिसारे व लोखंडाची अग्रे असलेल्या व ज्यांची पेरे वांकविलेली आहेत अशा पंचवीस बाणांनी वेधून टाकिले||१८|| अर्थः----नंतर शंभर बाणांनी शाल्वाचा,एकेक बाणाने त्याच्या योद्ध्यांना,दहादहा बाणांनी सर्थ्यांना आणि तीन तीन बाणांनी त्याच्या गजाश्वरथादिकांना ताडन केले||१९|| अर्थः---महात्म्या प्रदुम्नाने ते मोठे अद्भुत कर्म पाहून यादवांच्या व शाल्वाच्या सैन्यांत राहणाऱ्या सर्व वीरांनी त्य प्रदुम्नाची प्रशंसा केली||२०|| अर्थः----मयासुराने निर्माण केलेले सौभविमान,केव्हांतरी बहुत रूपांनी व केव्हांतरी एकरूपाने दिसत असे व केव्हांतरी मुळीच दिसत नसे,असे शत्रूंची तर्फ करण्यास अशक्य झाले||२१|| अर्थः---केव्हांतरी भूमीवर,केव्हा आकाशामध्ये,केव्हा पर्वताच्या शिखरावर व केव्हा पाण्यामध्ये,फिरणारे तरे सौभविमान आलातचक्रासारखे एकाजागी स्थिर राहत नाहीसे झाले||२२|| अर्थः---म्हणून ते विमान व सैनिकलोक यांसह तो शाल्व,तेथे जेथे दिसत तेथे तेथे यादवांचे प्रदुम्नादिक सेनाधिपती बाण सोडीत असत||२३|| अर्थः---ज्यांच्या स्पर्श अग्निसारखा दाहक व सूर्यप्रकाशासारखा सर्वव्यापक आहे व जे सर्पासारखे स्पर्शझाला असता मार्क आहेत अशा यादवांनी सोदिलेल्या दुःसहबाणांनी ज्यांचे सौभविमान व सैन्य पिडीत झाले आहे असा तो शाल्व घाबरून गेला||२४|| अर्थः---शाल्वाच्या सेनाधीपतीच्या शास्त्रसमूहांनी अत्यंत पिडीत झालेल्याही यादविरांनी,यालोकी यश व परलोकी सुख प्राप्त होण्याची इच्छा धारण करून,आपापले युद्धाचे ठाण सोडिले नाही||२५|| अर्थः---शाल्वाच्या प्रधान दुमाननामक,ज्याला पूर्वी प्रदुम्नाने पिडीत केले होते त्या बलवान प्रधानाने प्रदुम्नाजवळ येऊन त्याला लोखंडाच्या गदेने ताडन केले आणि जिंकिले,म्हणून मोठ्याने शब्द केला||२६|| अर्थः---तेव्हा शत्रूंना दमविनारा परंतु ज्यांचे वक्षःस्थळ गदेने भग्न झाले आहे अशा त्या प्रदुम्नाला,दारूकाचा ( कृष्णसारथ्याचा ) पुत्र धर्मवेत्त जो सारथी त्याने,लवकर युद्ध भूमीच्या बाहेर काढून नेले||२७|| अर्थः---तो प्रदुम्न प्रथम मूर्च्छित झाला होता,नंतर दोन घटीकांनी सावध होऊन सार्थ्यास म्हणाला की,- हे सुता,तूं जे मला युद्धभूमीवरएकीकडे काढीलेस हे कर्म तूं पार वाईट केलेस ||२८|| अर्थः---कारण,नापुसकासारखे (धैर्यरहित ) वित्त असलेल्या त्वां सारथ्याने,अपयश पावविलेल्या एका मजवाचून दुसरा,यादवांच्या कुलांत झालेल्या कोणीही पुरुष,युद्धांतून पळून गेलेला ऐकूं येत नाही||२९|| अर्थः---तेव्हा आता युद्धांजून प्रसिध्दपाने पलायन केलेला मी,रामकृष्ण पित्यांच्या जवळ गेलो म्हणजे त्यांनी विचारिले असता तेथे आपणास योग्य असे उत्तर काय बरे सांगुं? ||३०|| अर्थः----आणि माझ्या भावजाईहंसत हंसत मला स्पष्ट विचारतील की,- हेविरा,युद्धांत शत्रूबरोबर युद्ध करिताना तुझा व्याकूपण कसा कसा झाला ? की ज्याच्या योगाने तूं पळून गेलास तें सांग||३१|| अर्थः---सारथी म्हणाला,हे आयुष्यवंता प्रभो,मी त्र माझा धर्म जाणून हे काम केले आहे,कारण,सारथ्याने संकटांत पडलेल्या रथ्याचे रक्षण करावे आणि रथ्याने सारथ्याचे रक्षण करावे ||३२|| अर्थः---हे जाणूनच मी आपणाला युद्धांतून एकीकडे नेले आहे.याचे कारण,शत्रूने गदेच्या योगाने ताडन केल्यामुळे मूर्च्छा प्राप्त होऊन आपणाला प्राणसंकट प्राप्त झाले होते ||३३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कंधातील उत्तरार्धामध्ये शाल्वयादवयुद्धनिरुपणनामक हा शाहात्तारासा अध्याय समाप्त झाला ________________________________________________________________________________________________________________________ |७७ -- शाल्वाचा – उद्धार -३७-- ______________________________________________________________________________________________ आतां ह्या सत्याहत्तराव्या अध्यायामध्ये,श्रीकृष्णाने हस्तिनापुरतून येऊन,अनेक माया जाणणाऱ्या शाल्वाचा मारिले आणि त्याच्या सौभविमानाचेही पूर्ण केले,अशी कथा वर्णन केलेली आहे _________________________________________________________________________________________________________________________अर्थः---श्री शुकाचार्य म्हणाला हे राजा त्या प्रद्युम्नाने उदकांचे आचमन करून कवच धारण केले व हाथात धनुष्य घेर्तले व सर्थ्यास असे सांगितले की त्या द्युमान वीरच्या जवळ मला ने ||१|| अर्थः---नंतर त्याच्याजवळ नेलेल्या त्या प्रदुम्नाने आपल्या सैन्याच्या नाश करणाऱ्या त्या द्युमानाला आडवून हास्य करीत करीत आठ बाणांनी वेधिले||२|| अर्थ:-----ए असे की चार बाणांनी चार घोड्यास व एका बाणाने सर्थ्यास मारून दोन बाणांनी धनुष्य व ध्वज हि तोडिली व एका बाणाने मस्तक तोडून पडिले ||३|| अर्थ:----तसेच गड सत्यागिक व संम इत्यादिक यक़्दवहि शाल्वाचे ते सैन्य मारू लागले तेव्हा सौभाविमानात राहणारे सर्वही वर मस्तके तुतीउन समुद्रात पडू लागले अर्थ:----याप्रमाणे यादव आणि श्ल्वाचे वीर हे परस्पर युध्द करीत असतात ते त्यांचे युद्ध सत्तावीस दिवसापर्यंत तुमुळ व भयंकर झाले ||५|| अर्थ:------आता दुसऱ्या ऋषीचेआत सांगतो धर्म राजाने ब ओलाविल्यामुळे इंद्र प्रस्थामध्ये गेलेला श्री कृष्ण राजसूय यज्ञ झाला असता काही दिवस पर्यंत तेथेच राहिला होता ||६|| अर्थ:-----त्याने येथे अति भयंकर निमित्ते पोहून बलराम सह्वार्तामान मी येथे आलो तेव्हा शिशुपालाच्या पक्षपाती रजनी माझ्झ्या द्वारका नगरीच्या ख्सारोखर घात केला असेल असे मनात आणून भिशामादिक कुय्रुवृद्धाची पुत्र सहित कुंतीची व सर्व ऋषीची आज्ञा घेऊन व्दार्केत गमन केले ||७-८|| अर्थः----आणि तेथे जाऊन घात केला असेल,असेल मनांत आणून भिश्मादिक कुरुवृद्धांची,पुत्रांसहित कुंतीची व सर्व ऋषींची आज्ञा घेऊन द्वारकेस गमन केले||९|| अर्थः---हे सारथ्या,माझा रथ,शाल्वाच्या जवळ लवकर पोचींव ;हा शाल्वाराजा मोठा मायावी आहे,तथाती तूं कोणत्याही प्रकारचे भय मनांत आणू नकोस||१०|| अर्थः---याप्रमाणे सांगितलेल्या त्या दारुकाने रथावर बसून घोडे चालविले ,तेव्हा यादवांच्या व शाल्वाच्या सेनांतील वीरांनी युद्धांत प्रवेश करणाऱ्या ध्वजावर असलेल्या गरुडास पाहिले||११|| अर्थः---तेव्हा बहुशः मृत झालेल्या सैन्याचा अधिपती अशा त्या युद्धामध्ये श्रीकृष्णास पाहून त्याच्या सारथ्यावर,भयंकर नाद करणारी शक्ती सोडिली||१२|| अर्थः----तेव्हा आकाशांत उत्पन्न झालेल्या उल्केप्रमाणे सर्वदिशा प्रकाश करीत वेगाने येणाऱ्या त्या शक्तीने,श्रीकृष्णाचे बाणांच्या योगेकरून शेंकडो तुकडे करून पाडिले||१३|| अर्थः----आणि त्या शाल्वाला सोळा बाणांनी वेधून,आकाशांत भ्रमण पावणाऱ्या त्याच्या सौभविमानालाही बाणसमूहांनी,जसा सूर्य किरणांनी आकाशाला सहज वेधितो त्याप्रमाणे वेधिले||१४|| अर्थः----शाल्वानेही शार्ग्धनवा श्रीकृष्णाच्या शार्ग्ड्धनुष्यासाहित डाव्या हाताला बाणाने वेधिले असता त्या कृष्णाच्या हातांतून शर्गधधनुष्य खाली पडले,ते कोठे आश्चर्यकारक झाले||१५|| अर्थः---तेथे ते आश्चर्य पाहणाऱ्या सर्वलोकांमध्ये मोठा हाहाकार शब्द झाला तेव्हा सौभ विमानात बसून शोभणारा शाल्वाराजा,मोठी गर्जना करून श्रीकृष्णाला असे म्हणाला की.-||१६|| अर्थः----ते मूढा,जूं तूं आमच्या देखत आमच्या सख्या शिशुपाळाची स्त्री (रुख्मिणी ) हरण केली आहेस;तसाच तो आमचा सखा सभेमध्ये असावध असता,मारून टाकीला आहेस,त्या आपणांस कोणीच जिंकणारा नाहीं असे मानणाऱ्या तुला,जर माझ्यासमोर थोडा वेळ उभा राहतील तर आताचं तीक्ष्ण बाणांच्या योगाने मृत्युदेशेला पोनचविन||१७-१८|| अर्थः----याप्रमाणे सांगितले असता,श्रीभगवान म्हणाला की,- हे मंदा,तूं व्यर्थच बडबड करीत आहेस ,जवळ आलेला आपला मृत्यू पाहत नाहीस.जे शूर आहेत ते युद्धामध्ये पुष्कळ बोलून न दाखविता आपला पराक्रमच दाखवितात||१९|| अर्थः---याप्रमाणे भगवंताने भाषण करून व क्रोधादिष्ट होऊन,भयंकर वेगाने युक्त अशा गदेने कंठमुळावर त्या शाल्वास ताडन केले.तेव्हा तो रक्ताचे वमन करीत असता,कंपित झाला||२०|| अर्थः----तेव्हा गदा माघारी घेतल्यावर तो शाल्व अकस्मात अंतर्धान पावला,नंतर दोन घटीकांनी शाल्वाने पाठविलेला एक पुरुष येऊन,श्रीकृष्णाला मस्तकाने वंदन करून रडत रडत मला देवकीने पाठविले आहे असे वाक्य बोलिला||२१|| अर्थः----कशाकरिता पाठविले?त्र हे कृष्णा,हे कृष्णा,हे परापराक्रम्या,हे पितृवत्सला,जसा खाटकी ( कसाई ) पशुला मारण्याकरिता बांधून नेतो,त्याप्रमाणे तुझा पिता वसुदेवा,शाल्वाने बांधून नेला||२२|| अर्थः----हे त्याचे विप्रिय भाषण ऐकून मनुष्यस्वभावाला अशक्य,नगराच्या रक्षणाविषयी नेमलेला आणि सावध राहणारा वसुदेवविषयक स्नेहाने द्यायुक्त व खिन्नचित्त होऊन म्हणाला की,||२३|| अर्थः---देवांनी व दैत्यांनीही जिंकण्यास अशक्य,नगराच्या रक्षणाविषयी नेमलेला आणि सावध राहाणारा अशा बलरामाला जिंकून अतितुच्छ अशा शाल्वाने माझा पिता वासुदेव कासाबरे नेला !तेव्हा दैव मोठे बलवत्तर आहे ||२४|| अर्थ:----याप्रमाणे श्रीकृष्ण भाषण कारीत आहे तो इतक्यात तेथे वासुदेव की काय अशा एका पुरुषाला घेवून आला आणि तो श्रीकृषणाला अशे म्हणाला की ||२५|| अर्थः----हे मूर्ख कृष्ण ज्या करिता या संसारसागरात तू जिवंत राहिलास ,तो हा तुझा तुझा जन्म देणारा वासुदेव आहे पहा आता तुझ्या देखत याचा मी वाढ करितो जर तो समर्थ असशील तर त्याचे रक्षण कर ||२६|| अर्थः----याप्रमाणे मायावी शाल्वाने श्रीकृष्णाची निर्भात्यासना करून त्या वासुदेवाचे मस्तक खड्गाने तोडिले आणि ते घेऊन आकाशातील सौभाविमनात अव्रोहण केले ||२७|| अर्थः----त्यावेळी स्वत: सिद्धाज्ञान्वान असाही तो भगवान श्रीकृष्णा वासुदेवादिक सर्वही हि मयासुराने शिकविलेली ,शाल्वाने पसरलेली आसुरी माया आहे असे जाणिले ||२८|| अर्थ:-----जेव्हा जसा जाग्रत झालेला पुरुष स्वप्नामध्ये पाहिलेले पदार्थ पाहत नाही त्याप्रमाणे त्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने दूत पहिला नाही व वासुदेवाचे शरीरही पहिले नाही तर सौभाविमानात बसून आकाशात पिरणाऱ्या शत्रूला मात्र पहिले आणि तो श्रीकृष्ण त्यालास मारण्यास उपयुक्त झाला ||२९|| अर्थः----याप्रमाणे सांगितलेल्या पर्माताचे आता निराकरण करितो –हे राजेर्षे याप्रमाणे कितीएक पूर्व परानुसंधान न राखणारे रुश्री बोलतात परंतु बोलणे ते आपल्याच वाचनालाविरुद्ध भोते त्यांचे खरोखर स्मरण राखीत नाही म्हणजे पूर्वीच्या वाचनात श्रीकृष्णाच्या राज्सुयाकरिता बलरामासह वर्तमान इंद्र वास्थातून येवून त्याला नगराचे रक्षण करण्यास सांगितले असा त्यांच्या मनात विरोध आहे”||३०|| अर्थः----आणि हे बोलणे संभवतहि नाही.कारण,अज्ञानी पुरुश्नाचेठिकाणी संभवणारे शोक,मोह,भय व स्नेह हे कोठे ? आणि ज्याची ज्ञान,विज्ञान व ऐश्वर्ये कधीच खंडित होत नाहीत असा पूर्णनंदरुपी भगवान कोठे?||३१|| अर्थः---आणि जयाच्या चरणसेवेने वृद्धिगत झालेल्या आत्मसाक्षात्काररूप विद्येने सत्पुरुष,अनादीकालापासून असलेल्या देहात्मबुद्धीचा त्याग करून अनंत असे आत्मस्वरूपी ईश्वराचे पद पावतात त्या सर्वोत्कृष्ट व सत्पुरुषांची गति अशा भगवंताला मोह कोठून होणार ? मुळीच होणार नाही,म्हणून हे केचिन्मत खरे नव्हे||३२|| अर्थः----तर खरे इतकेच की,-अनेक शास्त्रांनी प्रहार करणाऱ्या त्या शाल्वाला,त्या अमोघपराक्रमी श्रीकृष्णाने,वेगाने सोडीलेल्या बाणांनी वेधून,त्याचे कवच धनुष्य व मस्तकावरील मनी हि छेदन केली आणि शत्रूंचे सौभनामक विमानंही फोडून टाकिले||३३|| अर्थः----तेव्हा कृष्णाच्या हस्ताने प्रेरण केलेल्या गदेने हजारो तुकडे होऊन चूर्ण झालेले ते सौभविमान समुद्राच्या पाण्यांत पडले.तेव्हा शाल्वात्या सौभविमानाचा त्याग करून भूमीवर उतरला आणि गदा उचलून मोठ्या त्वरेने कृष्णाच्या अंगावर धांवला||३४|| अर्थः----तेव्हा श्रीकृष्णाचे आपल्या अंगावर धाऊन येणाऱ्या त्या शाल्वाचा गदेसहित बाहूबाणाने तोडून टाकून,त्याच्या वधाकरिता प्रळयकालीन सूर्यासारखे अद्भुत चक्र धारण केले असता त्यावेळी तो श्रीकृष्ण,जसा सूर्यसहित उदयपर्वत शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला||३५|| अर्थः----नंतर त्याच चक्राच्या योगाने श्रीकृष्णाचे,बहुत माया जाणणाऱ्या त्या शाल्वाचे कुंडलकिरीटसहित मस्तक,जसे पूर्वी इंद्राने वज्राच्या योगाने वृत्रासुराचे मस्तक तोडून पडिले त्याप्रमाणे तोडून टाकिले.तेव्हा ते कृत्य पाहणाऱ्या शाल्वपक्षांतील मनुष्याचा मोठा हाहाकार शब्द झाला||३६|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरांतील दशमस्कंधांच्या उत्तरार्धात शाल्ववधनिरुपणनामक हा सत्यहात्तारावा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ | ७८--- ९---दंतवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातातून सुताचा वध-४०- ________________________________________________________________________________________________________________________ आता ह्या अठ्याहत्तराव्या अध्यायामध्ये,श्रीकृष्णाने,दंतवक्रविदुररथांचा वध करून,तो द्वारका नगरीत रममाण झाला आणि बलरामाने सुताचा (रोमहर्षनाचा ) वध केला,अशी कथा वर्णन केलेली आहे _________________________________________________________________________________________________________________________अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हेरजा,परलोकी गेलेल्या –शिशुपाळ,शाल्व आणि पौड्रक यांचे परोक्ष करावयाचे मित्रकृत्य करण्याकरिता एकटा,पादचारी,महाबळी हातांत गदा घेऊन चालतांना पायांनी ह्या पृथिविला कांपविणारा व अत्यंत क्रुद्ध असा तो दुर्मती दंतवक्र,कृष्णाबरोबर युद्ध करण्यास प्राप्त झाला||१-२|| अर्थः---त्या तशा क्रोधाने येणाऱ्या दंतवक्राला पाहून,श्रीकृष्णाने आपणही हातांत गदा घेऊन त्वरेने रथावरून खाली उडी टाकिली आणि मर्यादा जशी समुद्राचा प्रतिरोध करित्ये त्याप्रमाणे त्याचा प्रतिरोध केला||३|| | गदामुद्दम्य कारुषो मुकुन्दं प्राह दुर्मदः | दिष्ट्या भवानद्द मम दृष्टिपथं गतः ||४|| अर्थः---त्यावेळी मदोन्मत्त अशा त्या दंतवक्राने हातात गदा उचलून श्रीकृष्णास सांगितले की,तूं आज माझ्या दृष्टिमार्गाला प्राप्त झालास हि मोठी आनंदाची गोष्ट झाली||४|| अर्थः---हे कृष्णा,तूं जरी आमच्या मामाचा पुत्र असल्यामुळे मारण्यास योग्य नाहीस,तथापि तूं ज्या अर्थी आमच्या शिशुपाळवगैरे मित्रांचा वध केलास व मलाही मारुं इच्छितोस त्या अर्थी हे मंद आता मी ह्या वज्रासारखा गदेने तुला मारितो||५|| अर्थः---हे अज्ञा,देहांमध्ये संचार करणाऱ्या व्याधींचा जसा नाश करितात त्याप्रमाणे,मित्रवत्सल असा मी,जेव्हा तुज बंधू रुपी शत्रूला मारीन तेव्हा आपल्या मित्रांच्या ऋणापासून मुक्त होईन||६|| अर्थः---याप्रमाणे कठोर भाषणांनी जसा अंकुशाडिकेकरून हत्तीला पिडीत करितात त्याप्रमाणे श्रीकृष्णाला पिडीत करून,त्याच्या मस्तकावर गदेने ताडन केले आणि त्याने सिंहासारखा नाद केला||७|| अर्थः---गदेने ताडन केलेलाही तो यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण,युद्धामध्ये हाललासुद्धा नाही तर त्याने आपल्या मोठ्या कौमोदकिनामक गदेने त्या दंतवक्राला हृद्याचठ्ठिकाणी ताडन केले ||८|| अर्थः---तेव्हा गदेच्या प्रहाराने ज्याचे हृद्य फुटून गेले आहे असा तो दंतवक्र,मुखातून रक्ताचे वमन करीत केस व हातपाय पसरून गत प्राण होऊन भूमीवर पडला||९|| | ततः सूक्ष्मतरं ज्योतिः कृष्णमाविशदद्भुतम् | पश्यतां सर्वभूतानां यथा चैद्दवधे नृप ||१०|| अर्थः---हे राजा,जसे पूर्वी शिशुपालाच्या वधाच्यावेळी त्याचे तेज भगवत्स्वरुपामध्ये प्रविष्ट झाले होते तसेंच दंतवक्राच्या शरीरापासून बाहेर पडलेले आश्चर्यकारक अतिसूक्ष्म जीवरूपी तेजही सर्वलोक पहात असतां,कृष्णस्वरूपांत प्रविष्ट झाले||१०|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांच्या हातून दंतवक्त्राच्या मृत शैरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली.त्यांना भगवंतांकडून मृत्यू आला.ज्यांना ज्यांना भगवंतांकडून मृत्यू आला ते—ते भाग्यवान ठरले.यांची पूर्व—पुण्याई विशेस असल्यामुळे भगवंतांकडून मृत्यू आला.||१०|| अर्थः---नंतर त्या दंतवक्राभा भाऊ विदुरथ,भावाच्या शोकाने व्याप्त होऊन,त्या कृष्णाला मारण्याच्या इराद्याने हातांत ढालतलवार घेऊन क्रोधाने सुसकारे टाकीत कृष्णाच्या अंगावर धावला||११|| अर्थः----हे राजेंद्रा,तो येत आहे इतक्यांत श्रीकृष्णाच्या वस्तऱ्यासारखा धारेच्या आपल्या चक्राने,त्याचे किरीटकुंडलसहित मस्तक छेदन केले||१२|| अर्थ:---याप्रमाणे दुसर्यांनी अजेय अशा सौभविमान शाल्वराजा,दंववक्र व त्याचा भाऊ विदुरथ यांस मारून,देव आणि मनुष्य यांनी स्तुति केलेला||१३|| भावार्थ:--- दंतवक्त्राचा भाऊ विदूरथ भावाच्या मृत्यूमुळे हातात ढाल—तलवार घेऊन घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला.श्रीकृष्णांनी चक्राने त्याचे डोके उडवले.||१३|| अर्थः---मुनी,सिद्ध,गंधर्व,विद्याधर,महानाग व पितर त्यांची स्तुती करीत होते.तसेच अप्सरा,यक्ष,किन्नर चारण यांनी विजय वर्णन केलेला आणि पुष्टवृष्टीने आच्छादित केलेला असा तो श्रीकृष्ण,यादवश्रेष्ठांनी परिवेष्टित होऊन,ध्वजपताकादिक उभारून सुशोभित केलेल्या द्वारकानगरीमध्ये प्रविष्ट झाला||१४-१५|| भावार्थ:--- शाल्व,दंतवक्त्र आणि विदूरथ यांना स्वत: मारले,कारण दुसऱ्यांना ते मारत नव्हते व त्यांचे पुर्वाभाग्याच्या पूर्व—पुण्याईमुले त्यांना भगवंतांकडून मृत्यू आला. ज्यांना—ज्यांना भगवंतांकडून मृत्यू आला ते—ते भगवंत असतात.याकरिता आपण पुण्याई करून भगवंतांकडून विमान नेण्यासाठी यावे,अशी भक्ती करावी.||१३—१५|| अर्थः----याप्रमाणे योगेश्वर व जगदीश्वर असा तो भगवान श्रीकृष्ण,अनायासाने महाबलिष्ठानाही निरंतर जिंकीतोच परंतु अविवेकी पुरूशानांच एखादेवेळी जरासंधादिकांनी त्यास जिंकिले आहे असे वाटते||१६|| अर्थः---याप्रमाणे श्रीकृष्णाने पुतना राक्षसीपासून विदुरथापर्यंत दानवकुळालाचा संहार करून,नंतर तो युद्धकृत्यापासून उपराम पावला.आतां काही बलरामाचे चरित्र सांगतो-बलरामाने,कौरवांचा पांडवाबरोबर युद्ध करण्याचा उद्योग चालला आहे असे ऐकून,आपण द्वारकेत राहावे तर कोणाचातरी पक्षपात स्वीकारावा लागणार,तो न स्वीकारण्याचे मनांत आणून तो तीर्थयात्रेच्या मिषाने,द्वारकेतून निघाला||१७|| अर्थः---त्याने आपणाबरोबर ब्राम्हनांस घेऊन प्रभासतीर्थामध्ये स्नान करून तेथे अर्पन,ब्राम्हणभोजनवगैरे करून देव,ऋषी,पितर व मनुष्य यांना तृप्त केले आणि तो सरस्वतीपदीच्या उगमाकडे जावयास निघाला||१८|| अर्थः---त्याने पृथूदक,बिंदुसर,त्रीतकुप,सुदर्शन,विशाल,ब्रम्हतीर्थ,चक्रतीर्थ व पश्चिमवाहिनी सरस्वती यांची यात्रा केली||१९|| अर्थः---नंतर हे राजा,यमुनेच्या कंठी जी तीर्थे आहेत त्यांची यात्रा करून,नंतर त्याने तेथे शौनकादिक ऋषी सत्र करीत होते त्या नैमिषारण्यांत गमन केले||२०|| अर्थः---तो बळराम आला असे जाणून सहस्त्रसंवत्सरात्मक सत्राचे अनिष्ठान करणाऱ्या त्या शौनकादिक ऋषींनी आसनावरून उठून सामोरे जाऊन त्याला नमस्कार केला आणि आपले येणे झालेझाले हि फार चांगली गोष्ट झाली असे अभिनंदन करून त्याचे यथाविधी पूजन केले||२१|| अर्थः----तेव्हा परिवारासह वर्तमान पूजा केलेल्या व आसनाचा स्वीकार केलेल्या त्या बलरामाने तेथे बसलेल्या व्यासशिष्य रोम्हार्षानास पहिले ||२२|| अर्थः----आणि ज्याने आपणास उत्थापन दिले नाही वाकून नमस्कार केला नाही हातही जोडीले नाहीत आणि जो प्रती लोमाज असून त्या सर्व ब्राम्हनापेक्षाही उंच आसनावर बसला अशा त्या सुटला पाहून तो बलराम क्रुद्ध झाला ||२३|| अर्थः----आणि आपल्याच ठिकाणी असे म्हणाली की हा सुत प्रतिलोम्ज वअसूनही ह्या सर्व ब्राम्हनापेक्षा व धर्मरक्षण अस्सा आम्च्याहीपेक्षा उंच आसनावर काय म्हणून बसला आहे या आप्रद्झाने दुर्बुध्ह वाढ करण्यास योग्य आहे ||२४|| अर्थ:-----हा भगवान वेदाव्यासाचा शिष्य होऊन त्यापासून इतिहासासाहीत पुष्कळ पुराने अध्ययन करून तशीच सर्व धर्म सास्त्रेही अध्ययन करून उंच आसनावर बसला||२५|| अर्थ:----खरे आहे की –जो नातासारखा दुसर्यास फासावच्न्म्याकरिता साम्भाविताची वेश दरान करणारा अजीतेन्द्रीय अजित चित्त ,विनायार्हीत व व्यर्थ पन्दिताभिमान असतो त्याला ते शास्त्र दिकाचे अभ्यासही गुणकारक होत नाही ||२६|| अर्थः---म्हणून अशा दृस्ताच्या आलोकी मी अवतार धारण केला आहे यास्तव उत्तम वेश धार्तेन करून धर्मिष्ठात्व दाखविणारे वस्तुत धर्ममर्यादाचा भाग करणारे जे लोक आहेत ते मला व्द्द्या आहेत कारण ते अधर्मिष्ठेपेक्षाही प्रसिध्य्ह पाने अधिक पाप करणारे आहेत ||२७|| अर्थः---असे तो बागवान प्रभू बक्रम भाषण करून व्रस्थांच्या वाद्धापासून निवृत्त झालेल्याही त्याने,आवश्य होणारी गोष्ट अपरिहार्य असल्यामुळे त्या रोमहर्षला हातात असलेल्या दर्भानेच प्रहर केला ||२८|| अर्थः---यात अधार्मिक प्रतीलोम्जाचा वध केला हा अधर्म केला आहेस ||२९|| अर्थ:----आता अधार्मिक प्रतीलोमाज वाढ केला हा अधर्म कसा असे म्हणशील तर –हे यादुनंदना जोपर्यंत हे समाप्त होईल तोपर्यंत आन्हाला पुरांकात्य्ह सांगण्याकरिता या रोम्हर्षाला आम्ही ब्राम्हसन दिलेक्म होते आणि याच्या देहाला क्लेश न होतील असे आयुष्य हि दिले होते ||३०|| अर्थ:-----म्हणून हे सर्व न जाणणाऱ्याच तू ब्रम्हा वधा सारिखा याचा वाढ आचरण केला आहेस .हे लोकपवना योगेश्वर अशा तुला ब्राम्हणाचा वध करू नये असा वेधही जरी प्रयछित करिशील तर लोकांची प्रय्च्हिता विषयी प्रवृत्ती घडेल अन्यथा गाडणार नाही ||३१-३२|| अर्थ:----श्री भगवान म्हणाला ऋषीहो या रोम्हर्षाला दीर्घ आयुष्य ,बळ इंद्रिय पटुत्व व दुसरे जे काही तुम्हास अपेक्षित असेल ते सर्व मला सांगा मी आपल्या अचीत्या शक्तीच्या योगाने ते सर्व संपादन करीन ||३४|| अर्थ:----ते एकूण ऋषी म्हणाले हि राम तू सोडलेल्या श्स्त्राची तुझ्या पराक्रमाची व रोम्हर्षानाची मरणाची ज्याप्रकारे सत्यता होईल व जोपर्यंत हे सत्र आहे तोपर्यंत दीर्घ युशी व पुरांवाक्ता हो असे वाचनही जसे सत्य होईल तसे करावे ||३५|| अर्थ:-----श्रीभाग्वान्म म्हणाला –पित्याचा आत्मा हाच पुत्र रूपाने उत्पन्न होतो असे वेधाचे सांगणे आहे न्हाणून यारोम्हर्षाचा पुत्र जो उग्रश्रावा आहे तो हाच आहे असे समजा .तोच तुम्हांला पुरण सांगणारा होईल आणि आयुष्य इंद्रीय्श्क्ती व शरीरसबंध बळ यांनी तो संपन्न ,मिळून तो साक्षात न वाचल्यामुळे माझ्या असत्राची मुत्यीची व आयुष्यादिकाच्या शिद्दीने तुमच्या वाचनाचीही सत्यता होईल ||३६|| अर्थ:---हे ऋषीश्रेष्ठ हो तुमचा कोणता मनोरथ आहे तो मला सांगा म्हणजे तो मी पूर्ण करितो नंतर मजकडून ब्रम्हा दंड घेवून सुथात्येचा प्रय्च्छित न जाणनाऱ्या मला तुम्ही सर्वज्ञ आहा म्हणून जे प्रयाच्छित असेल ते विचार करून सांगा ||३७|| अर्थ:----ऋषी म्हणाले इल्वालाचा पुत्र बल्वल्नामक एक मोठा भयंकर दंव आहे तो दर पोर्मिनेस येवून आंच्या सत्राला दुषित करतो ||३८|| अर्थ:-----हे राम त्या पापी दानवाला तू मारून तक म्हणजे तेच आसामचे शुश्रूषण होईल .क्सार्ण तो आन्च्ग्या यज्ञाच्या जागी येवून पु रक्त विष्ठ मुत्र सुर व नस यांचा सर्व बाजूनी वर्षाव करीत असतो ||३९|| अर्थ:-----तद्नंतर तू एकवर्ष /एकाग्र चीत्ताने भारत खंडाला प्रदक्षिणा करून तीर्थाचे स्नान करी कृच्छाचे सेवन केलेस म्हणजे सुत वधाचा पापापासून शुध्द होशील||४०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानांच्या दशमस्कंधांतील उत्तरार्धात श्रीकृष्णसुदामसंवादनिरुपणनामक हा ऐशीवा अध्याय समाप्त झाला|”| ________________________________________________________________________________________________________________________ |७९--- बल्वलाचा उद्धार आणि बलरामांनी तीर्थयात्रा ____________________________________________________________________________________________ आता,ह्या एकून ऐंशी व्या अध्यायामध्ये,बलरामाने ब्राम्हणाच्या संतोषाकरिता बल्वलनामक दानवाचा वध करून तीर्थस्नादिकेकरून हत्येचे सुताच्या प्रायश्चित केले अशी कथा वर्णन केलेली आहे ______________________________________________________________________________________________अर्थः---शुकाचार्य म्हणाला:---हे राजा,तदनंतर पूर्णिमा पर्व प्राप्त झाले असता त्या दिवशी धुळीचा वर्षाव करणारा असा प्रचंड व भयंकर वारा वाहुं लागता जिकडेतिकडेपुवाचा दुर्गंध सुटला||१|| अर्थः---नंतर बल्वलाचे निर्माण केलेली विष्ठामुत्रादिकांची अमंगळ वृष्टी यज्ञशाळेमध्ये होऊं लागली.नंतर शूलधारण करणारा तो बल्वल दानव दिसू लागला||२|| अर्थः---तेव्हा विरघळलेल्या काजळाच्या पर्वतासारखा काळा,मोठा देह धारण करणारा,तापलेल्या तंब्यासारखी लाल शिखा व मिशा धारण करणार,दाढांच्या योगाने भयंकर व भृकुतींनी युक्त असे मुख असलेल्या त्या बल्वलास पाहून बलरामाने शत्रूसैन्याचे विदारण व दैत्यांचे दमन करणाऱ्या आपल्या मुसळांचे व नागराचे स्मरण केले.तेव्हा ती तत्काळ प्राप्त झाली||३-४|| अर्थः---तेव्हा,बलरामाने क्रुद्ध होऊन आकाशांत असलेल्या त्या ब्रम्हद्रोही वल्वलाला,नांगराच्या अग्राने ओढून मुसळाने मस्तकावर प्रहार केला||५|| अर्थः----तेव्हा मस्तक फुटून गेलेला तो बल्वळ रक्ताचे वामन करीत व पिडीत झाल्यामुळे ओरडत ,जसा इंद्राचा वज्राने फुटलेला व कामिनी लाल झालेला पर्वत पडतो त्याचप्रमाणे भूमीवर पडला ||६|| अर्थ:----याप्रमा ने त्याचा वध केला असता संतुस्त झालेल्या त्या महा भाग्यवंत ऋषींनी ,रामाची स्तुती करून व खरे आशीर्वाद देवून त्याला जसा,वृत्रांच्या वाढणे संतुस्त झालेल्या देवणी इंद्राला अभिषेक केला होता त्याप्रमाणे अभिषेक केला||७|| अर्थ:----आणि त्यांनी त्या रामाला दिव्या वस्र्ते व दिव्य भूषणे व शोभेचे स्थान व कधीच म्लान न होणारी जिची कमले आहेत अशी वैजंयती माळ अर्पण केली||८|| अर्थ:-----नंतर त्या ऋषींनी आज्ञा केलेला तो बलराम ,ब्राम्हनासः वर्तमान कौशिकी नदीजवळ येवून तिथे स्नान करून ,नंतर जेथून सरयू नदी उत्प्पण झाली आहे त्या सर्व रा जवळ आला ||९|| अर्थ:----नंतर तो बलराम सुरयुच्या कंठ कंठाने प्रीयागास येवून तेथे स्नान व देवादिकांचे तर्पण करून पुढे हरिद्वारास गेला ||१०|| अर्थ:----नंतर त्याने गोमती ,गरडी व विपाशी या नद्यांमध्ये स्नान करून शोपनामक नादामध्ये स्नान केले .नंतर गयेमध्ये अवून तेथे पितरांचे जीव्त्पितुक असल्यामुळे ब्राम्हन्भोजानादिक करून आराधन करून नांतरी गंगेच्या व समुद्राच्या समागमात स्नान केले ||११|| अर्थ:----नंतर महेंद्र पर्वतावर परशुरामाचे दर्शन घेवून व त्याला नमस्कार करून पुढे गोदावरी ,वेणी,पंप व भीमरथी या नद्या मध्ये स्नान केले ||१२|| अर्थ:-----नंतर त्या रामाने कार्तीक्स्वमिचे दर्शन घेवून शंकराचे स्नान अशा शैलपर्वतावर गमान केले तेथून त्या प्रभुणे द्रविद्देशात असलेल्या मह्पात्रीत वेकात पर्वत पाहून काम्कोशनी नदीचे स्नान करून कान्चीनगर मध्ये गमन केले नंतर नद्यात श्रेष्ठ अशा कावेरीमध्ये नसान करून पुढे जेथे श्रीहरी सन्निहित असतो अशा महापवित्र श्रीराग्म शेत्रात गमन केले ||१३-१४|| अर्थ:----नंतर हरीचे क्षेत्र अशा ऋषभपर्वाची तशीच दक्षिण मथुरेची यात्रा करुईन महापातकांचा नाश करणाऱ्या समुद्र संबंधी सेतुबधास गमन केले ||१५|| अर्थ:----तेथे त्या बलरामाने ब्राम्ह्नास दहाहजार गाई दं दिल्या पुढे तो कृतमाला व ताम्नपर्णी या नद्यामध्ये स्नान करून कुलाचल अशा मलयपर्वतावर गेला ||१६|| अर्थः---तेथे असलेल्या अगस्य ऋषीला त्याने नमस्कार करून त्याची पूजा केल्यावर त्या ऋषीने आशीर्वाद देऊन पुढे जाण्यास आज्ञा दिली असता,दक्षिणसमुद्राच्या तीरी गमन केले||१७|| अर्थः---तेथे स्नान कन्यानामक दुर्गादेवीचे दर्शन घेतले.नंतर अनंतपुरास जाऊन पुढे पंचाप्सरनामक सरोवरास गमन केले.जेथे विष्णु संनिहित आहे अशा त्या सरोवरांत स्नान करून ब्राम्हनांस दहाहजार गाई दिल्या||१८|| अर्थः---नंतर तो भगवान राम,केरलदेशांत व त्रिगर्तदेशांत जाऊन जेथे शंकरांचे सांनिध्य आहे अशा गोकर्णनामक शिवक्षेत्रास गेला||१९|| अर्थः---नंतर,द्विपाचा आश्रय करून राहणाऱ्या आर्यादेवीचे दर्शन घेऊन तो बलराम शूर्पारकनामक क्षेत्रास गेला.पुढे तापी,पयोष्णी व निर्विध्या या नद्यांत स्नान करून दंडकरण्यामध्ये जाऊन,जिच्यातीरी माहीष्णतीनामक नगरी आहे अशा नर्मदानदीजवळ गेला.तेथे स्नान करून नंतर मनुमीर्थांत स्नान करून पुन्हा प्रभत्तसक्षेत्रास प्राप्त झाला||२०-२१|| अर्थः---तेथे ब्राम्हणाच्या सांगण्यावरून कौरवपांडवाच्या युद्धांत सर्व राजे मरण पावले असे ऐकून त्याने पृथ्वीचा भार उतरला मानिले||२२|| अर्थः---नंतर तो बळराम,संग्रामामध्ये व दुर्योधन हे गदांनी परस्पर युद्ध करीत आहेत असे ऐकून,त्यांचे निवारण करण्याकरिता कुरुक्षेत्रांत गेला||२३|| अर्थः---तेव्हा युधिष्ठीर,नकुळ,सहदेव,कृष्ण व अर्जुन यांनी त्यास पाहून,नमस्कार केले आणि हा बळराम,काय सांगण्याकरिता येथे आला आहे? असा विचार करीत करीत उगीच राहिले.||२४|| अर्थः---तो बलराम,क्रोधयुक्त झालेल्या,जायची इच्छा करणाऱ्या व हातांत गदा घेऊन चित्रविचित्र मंडळे फिरणाऱ्या त्या उभयंता भीमदुर्योधनांस पाहून असे म्हणाला की,-||२५|| अर्थः---हे राजा दुर्योधना,हे वृकोदरा भीमसेना,तुम्ही उभयंता समबली वीर आहां.तुम्हांमध्ये एकाला ( भीमाला ) हा दुर्योधनापेक्षा बळाने अधिक आहे असे मी समजतो एकाला ( दुर्योधनाला ) भिमापेक्षा हा गदामापेक्षा हा गदाप्रहार करण्याच्या शिक्षाचातुर्याने अधिक आहे असे समजतो||२६|| अर्थः---म्हनुना समबली अशा तुम्हां दोघांपैकी एकाचा या युद्धांत जय किंवा पराजय होईल असे दिसत नाही,यास्तव निष्फळ असे हे तुमचे युद्ध बद्ध बंद होवो||२७|| अर्थः---हे राजा,जरीही ते बलरामाचे वाक्य त्यांनी ग्रहण केले नाही.कारण,ते एकमेकांची दुष्ट भाषणे व दुष्कर्मे वारंवार आठवून झाले होते||२८|| अर्थः---तेव्हा बळराम,ते आपले वाक्य त्यांनी ग्रहण केले नाही असे जाणून,त्यांचे दैव असे मानून पुन्हा द्वारकेस गेला:तेव्हा संतुष्ट झालेले उग्रसेनादिक ज्ञाती यादव,सामोरे जाऊन त्याला भेटले||२९|| अर्थः---याप्रमाणे तीर्थस्नानादिकेकरून सुतवधसंबंधी दोष घालवून पुन्हा नैमिशारण्यामध्ये प्राप्त झालेल्या त्या यज्ञमूर्ति बलरामाकडून,ऋषींनी आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करवून परमेश्वराचे यजन करविले||३०|| अर्थः---तेव्हा,त्या समर्थ भगवान बलरामाने,त्या ऋषींना,संशयविपर्यासदिरहित असे शुद्ध ज्ञान सांगितले ते असे की-ज्याच्या योगाने त्या ऋषींनी आत्म्याचेठिकाणी हे जग राहिले आहे,आणि जगामध्ये आत्मा व्यापून राहिला आहे,असे साक्षात अनुभवाने जाणिले||३१|| अर्थः----नंतर आपल्या रेवतीनामक पत्नीसहवर्तमान अवभृथस्नान केलेला,उत्तम वस्त्रे परिधान करून उत्तर अलंकार धारण केलेला व ज्ञाती बंधू व सुह्रद यांनी युक्त असा तो बळराम ,जसा आपल्या चंद्रिकेसहवर्तमान चंद्र शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला||३२|| अर्थः---हे राजा,महाबळी अनंत,अप्रमेय मनुष्यस्वरूपी अशा त्या बलरामाची अशा प्रकारची दुसरीही अनंत चरित्रे आहेत||३३|| अर्थः---असो:आश्चर्यकारक कर्मेकरणाऱ्या शेषावताररुपी बलरामाच्या कर्मांचे जो पुरुष,सायंकाळी व प्रात:काळी स्मरण करील तो भगवान विष्णूला अत्यंत प्रिय होईल||३४|| याप्रमाणे श्रीमद्भगवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील उत्तरार्धात बळदेवकृततीर्थयात्रीनिरूप नामक हा एकूणऐंशीवा अध्याय समाप्त झाला|| __________________________________________________________________________________________________________ |८०--- १०---सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत---१--- _________________________________________________________________________________________________________________________ आतां ह्या ऐशीव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने द्रव्याची इच्छा धारून आपल्या घरी आलेल्या सुदामदेवाची पूजा करून त्याला,गुरूच्या घरी तो व आपण वास करीत असत्येवेळची कथा विचारिली: अशी कथा आहे _________________________________________________________________________________________________________________________ | भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः | वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो ||१|| अर्थः----बलरामाची चरित्रे एकूण पुन्हा श्रीकृष्णाच्या चरित्रे विचारन्याकरिता राजा म्हणाला हे भगवान प्रभो शुकाचार्य ,मोक्ष देणाऱ्या अनंतपराक्रमी महात्म्या श्रीकृष्णाची जी दुसरी चरित्रे असतील ती ,आम्ही श्रावण करण्याची इच्छा करितो||१|| अर्थः---हे भगवान उत्तम कीर्ती श्रीकृष्णाच्या मनोहर कथा एक्वरही एकुन त्यापासून सर्ग्रही व विषयांचा शोध करिता करीत खेद पावलेला कोण बरे पुरुष,विराम पावेल ?कोणीच पावणार नाही ||२|| भावार्थ:--- जे विषयापासून दु:खी झालेले आहेत,व त्यामुळे ज्यामुळे त्यांना विषयांपासून वैराग्य झालेले आहे,असे जे अध्कारी पुरुष आहेत,त्यांना श्रीकृष्णांच्या मंगलमय लीला श्रवण करण्यास निश्चित आवड असतेच.त्याचप्रमाणे आपणास विषय हे दु:खरूप असून दु:खाला कारण आहेत,असा अनुभव आल्यामुळे आपणासही विषयांपासून वैराग्य उत्पन्न होऊन,श्रीकृष्णांच्या लीलेची आवड उत्पन्न होणे अत्यंत अरुरी आहे.म्हणून आपण नेहमी—नेहमी श्रावण केले असता विषयांचे यथार्थ स्वरूप कळून,त्यापासून वैराग्य उत्पन्न होऊन आपणास भगवंतांच्या लीला निश्चित आवडतील,यात मुळीच शंका नाही.म्हणून निष्काम परमार्थाचा प्रयत्न करावा.||२|| अर्थः---ज्या वाणीने त्या बाग्वान्ताच्या येश्व्र्यादिक गुणांचे,पुरुष उच्चारण करतो तिच वाणी सफल होय:ते भगवंताचे से वारूप कर्म करितात तेचास हाथ सफळ होत: जे स्थावरजन्ग्मामध्ये राहणाऱ्या भागवताचे स्मरण करील तेच मान सफल होय: जो त्याच्या पवित्र कथा श्रावण करितो तोच कान सफल होय : ||३|| भावार्थ:--- १---जी वाणी भगवंतांचे गुण,लीला,भजन,नामौउच्चार व स्वरूपाचे वर्णन करते करते,ती वाणी करी व यथार्थ असते.जी वाणी संसाराचे वर्णन करते ती वाणी खोटी व अयथार्थ असते.म्हणून आपण वाणीने संसाराचे वर्णन न करता भगवंतांचेच वर्णन करावे.२--संसाराची सेवा करणारे हात खोटे व अयथार्थ आहेत.म्हणून आपले सार्थक होण्यासाठी भगवंतांची जे हात सेवा करतात,जीव हे परमात्म्यांचेच आहेत असा भाव ठेऊन जे सर्व जीवांची हात सेवा करतात,तेच खरे हात होय.३--तेच खरे पाय आहेत,जे पाय भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी,साधू—संताचे—महात्म्यांचे दर्शन घेण्यासाठी जातात तेच खरे पाय आहेत.भगवंतांचे स्वरूप,गुण,लीला,भजन करण्यासाठी जे पाय जातात त्यांना खरे पाय व यथार्थ पाय असे म्हणतात.जे पाय फक्त संसाराच्या सेवेला उपयोगी येत,त्यांना खरे पाय व अयथार्थ पाय असे म्हणतात.४--जे कान भगवंतांचे नमोउच्चार ऐकते,कथा ऐकते,लीला ऐकते,गुणवर्णन ऐकते,स्वरूप ऐकते तेच खरे कान असतात,म्हणून याच कार्यासाठी कणांचा सदुपयोग करावा.संसाराच्या कथा या कानांनी ऐकू नये,फक्त या कानांनी संसाराच्याच कथा ऐकतात,ते कान खोटे व अयथार्थ आहेत.म्हणून काने खरे व अथर्थ करावे.५---जे मन भगवंतांचेच चिंतन करते,लीलांचेच स्मरण करते,नमोउच्चाराचेच स्मरण करते,स्वरुपांचेच स्मरण करते तेच मन खरे व यथार्थ असते.जे मन संसाराचेच स्मरण करते,ते मन खोटे व अयथार्थ असते.म्हणून आपण आपले मन खरे व यथार्थाच करावे.६—जी बुद्धी जगन—मिथ्या व ब्रह्म सत्य असा निर्णय घेते,त्या बुद्धीला खरी व यथार्थ मानवी.जी बुद्धी फक्त संसाराचेच निर्णय घेते,त्या बुद्धीला खोटी व अयथार्थ म्हणावे.आपण आपली बुद्धी खरी व सार्थक करावी.थोडक्यात सर्व इंद्रियांचा विषय भगवंतच करावा.||३|| अर्थः---जे स्तवर जन्मरूप भागात मूर्तीला नमस्कार करिते तेच मस्तक सफल होय ,जे भावाताचे दर्शन घेते तेच चाक्शुसफल होय: जे भागवताच्या अथवा भागवत भक्ताच्या चार्नोदाकांचे नित्य सेवन करतात तेच अवयव सफल होत ||४|| भावार्थ:--- हे जे चर म्हणजे जीव व अचर म्हणजे जड या परमात्म्याच्याच प्रतिमा आहेत—तेच परमात्म्याचेच स्वरूप आहे असे पाहतो—असे समजून नमस्कार करतो,असे समजून दर्शन करतो,तेच खरे व अयथार्थ नेत्र आहेत.हे शरीर व जे शरीराचे अवयव यांनी भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतो,तेच खरे व यथार्थ अवयव आहेत.म्हणून आपण हे मनुष्य शरीर व त्या शरीराचे अवयव आपले स्वरूप जाणण्यासाठी व त्याचा अनुभव घेण्यासाठी खर्च—व्यतीत करावे.||४|| अर्थः---सुत म्हणाला याप्रमाणे परीक्षित राजाने प्रश्न केलेला भगवान सुकाचार्य ,भगवान वासुदेवाचे ठिकाणी निमाग्र चित्त होऊन म्हनालकी||५|| अर्थः---श्रीशुकचर्य म्हणाला हे राजा श्रीकृष्णाचा कोणी एक ब्राम्हण सालाल होता तो मोठा ब्रम्हा वेत्त ,विषयांचे ठिकाणी विरक्त अत्यंत शांत चित्त ,व जेतीन्द्रीय होरा.||६|| भावार्थ:---एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता.तो मोठा पारमार्थिक वेदांत—ज्ञानी होता.वेदांत ज्ञानी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य म्हणजे संसार त्यास नको वाटत असे.वैराग्यवान असल्यामुळे त्याचे चित्त शांत—समाधानी होते.विषयांचे त्यास खरे स्वरूप कळाल्यामुळे त्याचे इंद्रिये व मन ताब्यात होते.मन ताब्यात असल्यामुळे ते मन धर्मानुसार आचरण करत असे.असा तो सात्विक ब्राह्मण होता.असा जो असतो त्यास ब्राह्मण म्हणावे.असा जो नसतो त्यास ब्राह्मण म्हणू नये.आपणही ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करावा.ब्राह्मण होण्यासाठी सर्व इंद्रिये व मन ताब्यात घ्यावे लागते,वेदांताचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते,त्यानंतर वैराग्य येते,वैराग्य आल्यानंतर चित्त शांत—समाधानी होते.संसार नको वाटतो व परमात्मा असावा वाटतो.नंतर संसाराचा त्याग होऊन परमात्म्याचा अनुभव येतो.त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होते.||६|| अर्थः---तो प्रराब्धवाशेकारून प्राप्त झालेल्या अन्नादिकाने जीविका चालवून ग्रहारमधर्माचे आचरण करीत असे .त्या मलीन वस्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हणाची स्र्तीही मळीन वस्त्र धारण करणारी पतिव्रता श्सून शुधेने क्रश झालेल्या ||७|| भावार्थ:--- सुदामा ब्राह्मण हा प्रयत्न करून संसारात जे मिळेल त्यात संतुष्ट असे.आपणसुद्धा प्रयत्न करून जे मिळेल त्यात संतुष्ट होऊन जीवन जगले असता समाधान मिळते.हे असे कळण्याकरिता सत्संग करावा लागतो.सत्संग करून श्रवण केले असता,आपल्या चित्तावर परिणाम होण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना करावी लागते.त्यामुळे अंत:कारण शुद्ध आणि स्थिर होते,त्यानंतर ज्ञानाचा परिणाम होऊन धर्मानुसार आचरण होते.त्याची पत्नी तसीच गुणवान होती.||७|| अर्थः-----एकेकाळी शुश्क्मुखा झालेली ,दारीघ्मेने पाडीत पतीचे भोग संपादन करण्यास अशक्त असल्यामुळे दुःख पावणारी व भयाने कापणारी ती पतिव्रता स्त्री,पतीजवळ जावून म्हणाली की, -||८|| अर्थः----हे ब्राम्हण वैराग्यदिगूनसंपन्न अशाही तुझा, साक्षात लक्ष्मी ब्राम्हणांचा कैवारी शरणागत वत्सल यादवश्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्ण ,सखा आहे हे मला ठाऊक आहे ||९|| अर्थ:---यास्तव हे महाग्यावंता साधूची परमगती अशा त्या श्रीकृष्णाच्या भेटीला तू जा म्हणजे दारिद्याने क्लेश पावणाऱ्या व कुटुंब वत्सल अशा तुला तो पुष्कळ धन देईल ||१०|| अर्थः---भोजचा ,वृष्णीचा ,अधंकचा अधिपती तो श्री कृष्ण हल्ली व्दार्केनाध्ये आहे त्याने तुझा सत्कार केला म्हणजे तो भोजादिक सुद्धा तुला द्रव्य देतील .तो भगवान द्रव्य देई ळ किवा नाही याबद्दल संशय धरू नये कारण तो चरण कमळाचे स्मरण करणाऱ्या पुरुषाला आपल्या स्वरुपानंधहि देतो ||११|| अर्थः---मग तो जगद्रूरु ,आपली भक्ती करणाऱ्या पुरुषाला फारशे आडणारे अर्थकाम देतो हे काय सांगावे !अशी सतीने त्या ब्राम्हणाची बहुत कोमलतेने वारवार प्रार्थना केली असता त्याने उत्तम कीर्ती भाग्वाताच्र दर्शन होईल हाच मोठा लाभ आहे ||१२|| भावार्थ:--- त्या ब्राह्मणाच्या पत्नीने जेव्हा त्यास विनंती केली कि,आपण आपले जे मित्र श्रीकृष आहेत त्यांच्या भेटीला जावे.” सुदाम ब्राह्मनानेविचार केला कि,या निमित्ताने मित्रांची भेट होईल व भगवंत श्रीकृष्णांचे दर्शन होईल,या भावनेने जाण्याविषयी होकार दिला.आपणही अधून—मधून आपल्या मित्राच्या भेटीसाठी प्रेमाने जावे,पण कांही मागणीसाठी जाऊ नये.कारण प्रेम सोडून मागण्याच्या अपेक्षाने गेले असता,मागणी पूर्ण झाली असता प्रेमात अंतर पडते.म्हणून प्रेमासाठी जावे.||१२|| अर्थः---असा विचार मनात करून कृष्ण दर्शनास्जाण्याचा निश्चय ठरविला आ नि स्त्रीला म्हणाला की हे कल्याणी ,घरात काही कृष्णाला भेट नेण्यासारखा पदार्थ असला तर दे ||१३|| भावार्थ:--- सुदाम ब्राह्मणाने मित्राकडे—भागवाण श्रीकृष्णांकडे जाण्याचा विचार केला.कोणाच्याही भेटीस जावावयाचे असेल तर धर्मशास्त्र सांगते कि,रिकाम्या हाताने भेतीस न जाता,ज्यांच्याकडे जावावयाचे आहे,त्यांना कांहीना कांही तरी वस्तू बरोबर न्यावावयास पाहिजे.म्हणून सुदान ब्राह्मण पत्नीकडे कांही वस्तीची मागणी करतात.आपणही कोणाच्या भेटीस जावावयाचे असेल तर,कांहीना—कांही वस्तू ज्यांना भेटावयास जावावयाचे असेल,तर त्यांच्यासाठी न्यावावयास पाहिजे.कारण देण्या—घेण्यातून त्या वस्तूतून प्रेम प्रगट होते.म्हणून प्रेम प्रगट होण्यासाठी कांहीना—कांही वस्तू न्यावावयास पाहिजे.शात्र सांगते कि,जगाला प्रेम अर्पावे.||१३|| अर्थः---तेव्हा त्या स्त्रीने ब्राम्हणांच्या घरातून चार मुठी पोहांचे नागून आणून ,द्स्त्राच्या चिंधीने त्यांचे गांधुली बांधून ती प्रभूला भेट दिली ||१४|| भावार्थ:--- सुदामा ब्राह्मणाच्या घरी नेण्यास वस्तू कांही नव्हती,म्हणून तिने शेजारिणीकडून थोडे पोहे आणले आणि आपल्या पतीकडे दिले.आपल्या घरी वस्तू असेल तर आपल्या घरून,वस्तू नसेल तर आपण ती वस्तू खरेदी करून किंवा शेजारानिकडून उसनवारी करुन आणून न्यावावयास पाहिजे.या वस्तूतून प्रेम प्रगट होते.||१४|| अर्थः---तेव्हा तो ब्राम्हन्श्रेस्त ते पोहे घेऊन व्दार्केस निघाला आणि मला श्रीकृष्णाचे दर्शन कसे बरे होईल ?असा विचार करीत करीत ,व्दार्केच्या रक्षणाकरिता सैन्याच्या ठेवलेल्या तीन छावण्या व त्यांच्या पुढे लागलेल्या तीउन चाव्क्य्सा उल्लंघन करून ,इतर ब्राम्हनासः वर्तमान तो ब्राम्हण श्रीकृष्ण भक्ती न करणाऱ्या लोकांनी प्रवेश करण्यास अशक्य अशा अंधकाराच्या व वृश्नीच्या घरामध्ये असलेल्या श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ घरातील एका शुभोसित घरामध्ये प्रविष्ट झालास तेव्हा तो ब्राम्हण ,ब्रम्हानंद पावल्यासारखा आनंदित झाला ||१५-१६-१७ || अर्थ:----त्या ब्राम्हणाला दुरूनच पाहू प्रियेच्या पर्यकावर बसलेल्या भगवान श्रीकृष्णाचे त्वरित उठून व साम्मोरा जाऊन हर्षाने आलिंगन केले ||१८|| अर्थः---तेव्हा आपला प्रियमित्र अस्घा त्या विप्रशीच्या अंगस्पशाने अतिआनद युक्त व तृप्त झालेल्या त्या कमलनयन भागवतने आपल्या नेत्रातून आनंद आश्रू ढाळीले||१९|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते,त्यांना समोरून बहमन येत असल्याचे दिसताच,ताबोडतोब उठून उभे राहिले आणि ब्राह्मणाकडे धावतच जाऊन आनंदाने मिठी मारून आनंदित झाले.त्याचप्रमाणे आपणही आपले मित्राची व आपली भेट झाली तर धावत जाऊन मिठी मारून आनंद व्हावावयास पाहिजे.||१८|| भावार्थ:--- प्रिय मित्र असणाऱ्या श्रेष्ठ ब्राह्मणांच्या अंगास्पर्षाने भगवंत श्रीकृष्ण अत्यंत आनंदित झाले.त्याप्रमाणे आपणही आपल्या मित्राच्या भेटीने अत्यंत आनंदित व्हावावयास पाहिजे,कारण मित्र आपल्या भ्तीस आनंदासाठीच आलेला असतो.प्रेमाने आलेल्यास प्रेमच देणे आपले कर्तव्य असते,इतर व्यवस्थाही करावी.||१९|| अर्थ:-----हे राजा ,नंतर त्या प्रिय व मित्र अशा ब्राम्हणाला पलंगावर बस्व्बून आपणच पूजा साहित्य आणून त्यासाख्याचे पाय धुवून ती उदके श्रीकृष्णाने आपण लोकोपावन असताही मस्तके धरणे केली आणि दिव्या गंध ,चंदन ,आगरु केशर यांनी त्याच्या अंगाचे लेपण केले ||२०-२१|| भावार्थ:--- मित्र आल्यानंतर त्याला श्रीकृष्णांनी स्वत: आणून पलांगावर बसवले.स्वत: पूजेचे साहित्य आणून मित्राची पूजा केली.आपणसुद्धा आपल्याकडे मित्र आल्यास आपण स्वत: त्याची पूजा करून मान—सन्मान ध्यावा.मानसंमातून प्रेम प्रगत होते.आपला मित्र हा प्रवासातून थकून आलेले आहे,म्हणून त्याची स्थूल सेवाही केली.तसीच आपलाही मित्र प्रवासातून आपल्याकडे आलेला असतो,म्हणून आपणही आपल्या मित्राची स्थूल सेवा करावयास पाहिजे.मित्र हा ब्राह्मण असल्यामुळे त्याची पूजा केलेले पाणी चरणोदक म्हणून आपल्या डोक्यास वंदन केले.आपणही तसेच करावयास पाहिजे.मित्राच्या शरीराला चंदन,केशर इत्यादी दिव्य सुगंधाची उटी लावली.कारण जे प्रवासातून येतात त्यांचे शरीर उष्ण झालेले असते,म्हणून त्यांच्या शरीराला चंदन—उटी लावल्याने शीतलता येते,कारण चंदन हे शीत असते.||२०—२१|| अर्थः---नंतर सुगंध युक्त धूप व दिव्याच्या रंग यांनी त्या मित्राचे पूजन करून ,तसेच तांबुल व गाय अर्पण करून स्वागत प्रसंन्न केले||२२|| भावार्थ:---श्रीकृष्ण यांनी मित्रास गाय दान दिली,कारण गाईचे दुध आरोग्यवर्धक असते.गाईचे मुत्र व शेण आरोग्यवर्धक असते.गाईचे वासरू बैलरूपाने शेती पिकवण्याकरिता उपयोगी येते.म्हणून गाईस शात्रकारांनी पूजनीय भावाला ठेवली आहे.म्हणून गाईस आपण वंदन करून तिच्याविषयी भावना ही कृतज्ञ असावी.कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची भावना ठेऊन ते उपहार फेडायचं प्रयत्न करणारा असा जो असतो त्यास कृतज्ञ असे म्हणतात.उदा—जीवनभर—नैसर्गिक मृत्यूयेईपर्यंत तिचे पालन—पोषण उत्तम रीतीने करणे.असे केले असता,तिचा कांही आणसी उपकार फिटतो,पूर्ण तर फितू शकत नाही.तिहे दर्शन न घेता,तिची उत्तम व्यवस्था न करता तीस जिवंत मारले असता कृतघ्नता हा दोष लागून अधर्म होतो.अधर्माचे फळ दु:ख त्यास भोगावे लागते.म्हणून आपण गाईस कृतघ्न न होता कृतज्ञ असावे.||२२|| अर्थः-----त्या वेळी जीर्ण वस्त्र धरणं करणारा,मिलेन ,दुबळी, व शिराणी व्याप्त अशा त्या ब्राम्हणाचे साक्षात रुख्मिणीने ,चेवारीचा व पंख्याचा वारा घालून सुश्रुसन केले .||२३|| भावार्थ:--- भागवंत श्रीकृष्ण यांनी सुदामांची सेवा केली.पतीची सेवा पाहून रुक्मिणी मातेने ब्राह्मण सुदामाची सेवा केली.आपणही संत-महात्मा,ज्ञानी ब्राह्मण यांची सेवा करावयास पाहिजे.कारण संत—महात्मा ज्ञानी ब्राह्मण हे धर्माचा प्रचार व प्रसार सेवा—निष्काम भावनेतून करतात.म्हणून ते पवित्र असतात,सत्पात्र असतात.||२३|| अर्थ:----तेव्हा अमल्कीर्ती अशा श्रीकृष्णाने त्या मलीन ब्रम्हनक्क्ष्ह अतिप्रीतीने सत्कार केला असे पाहून अंत पुरातील लोक असा विस्मय करू लागले की ||२४|| अर्थः---लक्ष्मीहीन ,नि डित व अ धाम अशा या अवधूत भिक्शुकाने यालोकी असे काय पुण्य केले होते?-||२५|| अर्थ:----ज्याच्या योगाने लक्ष्मी निवास व त्रिलोक्य गुरु अशा कृष्णाने ,पर्य्कावर असलेल्या लक्ष्मीचा सुद्धा त्त्याग करून ह्याला वडील भावासारखे आलिंगन दिले व ह्याचा उत्तम सन्मान केला ||२६|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण यांच्या सर्व पत्नी आश्चर्यचकित झाल्या,कारण बह्याताकारी हा सुदाम रहमान दिसण्यास साधा व गरीब वाटला.ज्यार्थी आपले पतीदेव याची पूजा करतात,त्याअर्थी हा विशेष असला पाहिजे,अशी त्यांची खात्री झाली.याचे पूर्व--पुण्य उदयास आले असावे असे म्हणतात.म्हणून आपण निष्काम धर्मानुसार आचरण करून निष्काम सत्कर्म करून पुण्य करावयास पाहिजे,कारण ते पुण्य केव्हा—ना—केव्हा आपणासच भोगावयास येत असते.असा विवेक करून जीवन जगावे.||२५-२६|| अर्थः---नंतर हे राजा ,ते सुदामा व श्रीकृष्ण उभयता,एकमेकांचे हाथ धारून पूर्वीच्या गुरूगृही राहत्या वेळी आपल्या मनोहर कथा सांगू लागले||२७|| भावार्थ:--- श्रीकृष्ण आणि सुदाम-देवांना पूर्व गुरुकुलातील जीवनाचे स्मरण होऊन चर्चा करू लागले.आपणही मित्र भेटीनंतर पूर्व स्मरण करावे.||२७|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला हे धर्मज्ञ ब्र्हम्हन गुरूला गुरुद्क्षाना देवून गुरुगृहापासून घरी येवून समावर्तन तू आपणास योग्य अशी स्त्री वारीलीस की नाही ||२८|| अर्थः----हे व्ध्वना तुझे चित्त इतर लोकांच्या चीत्तासारखे बहु ताक्रून घरामध्ये तसेच गिं भूमिय सुवर्ण इत्यादिक धनाचे ठिकाणी विषयांनी आपणाकडे ओढून घेतलेले दिसत नाहीय म्हणून तू विषयावर फारसा लंपट नाहीस असे मला पूर्वीचा समजले आहे आणि हेच विद्वान अशा तुला योग्य आहे ||२९|| भावार्थ:--- आपम्या मित्राची जरी योगायोगाने भेट न झाली तरी,अप्रत्यक्ष त्यांच्याविषयी आपण माहिती घ्यावावयास पाहिजे.त्यातून प्रेम प्रगट होते.||२९|| अर्थः-----ईश्वराच्या मायेने रचिलेल्या विश्य्वावास्नांचा त्याग करणारे कितीएक लोक म्विशायाम्ध्ये आसक्त नसूनही जसा मी लोक संग्रहकरिता कर्मे करीत आहे ||३०|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण जसे लोक शिक्षणाचे कार्य करतात,त्याचप्रमाणे आपणही सदगुरुकडे राहून जो धर्म,वेद—वेदांचा अभ्यास केलेला असतो.त्यानंतर आपणसुद्धा ते ज्ञानदान करून,धर्म प्रसार करावा.त्यामुळे धर्म—अधर्माचे ज्ञान होऊन लोक धर्माचा स्वीकार करून अधर्माचा त्याग करतात.म्हणून लोकशिक्षणाचे दान करावे.||३०|| अर्थः---हे ब्रम्हना तुझाव माझा गुरुगृहाचे ठिकाणी एका जागी वास घडला होता त्यांचे तू स्मरण करितोस काय !ज्या गुरुपासून जाणणारा ब्राम्हण ,संचाराचा अंत पावतो ||३१|| भावार्थ:--- गुरुकुलात राहिल्यानंतर सदगुरुंच्या सत्संगामुळे व सेवेमुळे जीवाब्राह्म—ऐक्य—ज्ञान होऊन आत्मज्ञान होते.त्यामुळे अज्ञान जाऊन ज्ञान होते.म्हणून आपण गुरुकुलात राहून सत्संगाद्वारे आत्मज्ञान प्राप्त करावे.त्यामुळे त्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.||३१|| अर्थः---हे त्यात आत्मज्ञान देणाऱ्या गुरुचे अत्यंत पूज्यत्व सांगण्याकरिता ,पुरुषाला तीन गुरु आहेत असे सांगतो -हे ब्राम्हना ,या सासरामध्ये पुरुषाची ज्यापासून उत्पती झाली तो पिता पहिला गुरु होय ,नंतर ब्राम्हण झालेल्या पुरुषाला सत्कर्माचा जेथून लाभ होतो म्हणजे तो उपनयन करून वेधाद्य्यान सांगतो तो दुसरा गुरु होय तो त्याला माजीश्वारासारखा पहिल्या गुरूपेक्षाही पूज्य आहे आणि सर्वही आश्रम्यांना जो ज्ञान देणारा तो तिसरा गुरु होय.तो तिसरा गुरु होय.तो साक्षात मीच आहे||३२|| भावार्थ:--- १--या जगात जन्मदाता हा प्रथम गुरु आहे.म्हणून त्यांची आपण सेवा करावयास पाहिजे.२—त्यानंतर धर्माशात्रानुसार वयाच्या आठव्या,नवव्या व दहाव्या वर्षानंतर विधीनुसार उपनयन संस्कार करणारा दुसरा गुरु असतो.ब्राह्मण,क्षत्रिय व वैशांनी उपनयन संस्कार करून घ्यावावयास पाहिजे.पण ज्याच्या—त्याच्या अज्ञानामुळे ते उपनयन संसार करत नाहीत.उपनयन न करणे हा अधर्म आहे,म्हणून प्त्यांनी—पाल्यांनी आपापल्या पुत्राचा—पाल्याचा उपनयन संस्कार करून घेतलाच पाहिजे,कारण त्याच्याशिवाय धर्माचे व परमार्थाचे ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही.तसेच शिक्षण झाल्यानंतर गृहस्थाश्रमात पदार्पण करावयाचे असेल तर विधीनुसार गृहस्थाश्रमात प्रवेश करता येत नाही.म्हणून सर्वांनी धार्मिक शिक्षणासाठी व गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी उपनयन संस्कार करणे जरुरी आहे.३—तिसरा सदगुरू हा धर्माचे व वेदांताचे ज्ञान देऊन मोक्ष देणारा हा तिसरा सदगुरू आहे.हे तिन्ही गुरु आपापल्या परीने महत्वाचे आहेत.सदगुरू—सत् चे—ब्रह्माचे ज्ञान देणारा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे,कारण त्यामुळे अनंत जन्माचे दु;ख जाऊन कायमचेच सुख मिळत असते—मोक्ष मिळत असते.या मोक्षाने जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतो.||३२|| अर्थः---हे ब्राम्हणा,या मनुष्यजन्मांत वर्णाश्रमवंताने जे पुरुष साक्षात मत्स्वरूपी अशा ज्ञान देणाऱ्या गुरूच्या उपदेशाने अनायासाने संसाररूप समुद्र तरून जातात तेच आपला कार्यभाग साधण्याविषयी मोठे बुद्धीमंत होत||३३|| भावार्थ:--- मनुष्यजन्मात आपआपल्या वर्णाश्रमानुसार जे लोक निष्काम कर्मे करून गुरूंच्या उपदेशानुसार आचरण करतात,ते परमात्म्यास प्राप्त होतात.तच खरे स्वार्थी व पारमार्थिक असतात.तेच वास्तविक परमार्थाचे जाणकार आसतात.जे लोक अधर्मानुसार वागतात व धर्मानुसार वागतात,पण सकाम म्हणजे पुण्य करून संसारातील नाशिवंत फलाचीच अपेक्षा करतात,ते जाकर नसतात,तर अज्ञानी असतात.म्हणून अज्ञानी न होता जाणकार होण्याचा प्रयत्न करा—निष्काम कर्म—परमार्थ करा.||३३|| अर्थ:---सर्व भूतांचा आत्मा असलेलाही मी,जसा गुरूच्या सेवेने संतुष्ट होतो तसा ब्रम्हचर्य,यज्ञादिक गृहस्थधर्म,तपवगैरे वानप्रस्थधर्म व उपशमवगैरे संन्यासधर्म यांच्या योगाने संतुष्ट होत नाही,म्हणून गुरुशुषुरूपेक्षा मोठा दुसरा धर्मच नाही||३४|| भावार्थ:---- संत—महात्मा सदगुरू यांच्या सेवेने परमात्मा कोणत्याही साधनापेक्षा अधिक संतुष्ट होतो,म्हणून आपण संत—महात्मा—सदगुरू या साधनेला इतर साधनेपेक्षा अधिक महत्व देणे गरजेचे—महत्वाचे असते.इतरही साधने करावीत,पण ज्यावेळेस सदगुरू सेवा असते,त्यावालेस इतर साधने न करता सदगुरू सेवाच करावी,सदगुरू आज्ञाचेच पालन करावे.ज्यावेळेस सदगुरू आज्ञेचे पालन—सेवा झाल्यानंतर आपल्या वर्णाश्रम धर्माचे म्हणजे पालन करावे.उदा—ब्रह्मचारी याचा धर्म वेदाध्ययन,गृहस्थ यांचा धर्म पंचमहयज्ञ करणे,वानप्रस्थ याचा धर्म तप करणे व संन्यासी याचा धर्म सर्वस्वत्याग करणे. या धर्माचे पालन करावे,पण संत—महात्मा—सदगुरू यांची सेवा किंवा आज्ञा आली तर अगोदर सदगुरू सेवा,आज्ञा पाळावे व ती आज्ञापालन—कर्तव्य केल्यानंतर आपापल्या वर्णाश्रामाचे कर्तव्य अरावेत.||३४|| अर्थः---हे ब्राम्हणा,आपण गुरूच्या घरी राहिलो होतो तेव्हा,एकेवेळी स्त्रीने काष्ठे आणण्याकरिता वनांत पाठविलेल्या आम्हांस दैवगतीने जो प्रसंग आला होता त्याचे तुला स्मरण आहे काय ?||३५|| अर्थः---हे द्वीजा,त्यावेळी मोठ्या अरण्यांत शिरलो असता,पाऊस पडण्याचा काळ नव्हता तरी एकदम मोठे वादळ होऊन भारी पाऊस पडला,भयंकर गर्जना होऊन विजापडूं लागल्या||३६|| अर्थः---इतक्यांत सूर्य अस्तास पावून दिशा अंधकाराने आच्छादित झाल्या.त्यावेळी सर्वस्थळ,जलमय होऊन,सखल किंवा उंच हे कांहीच समजत नाहीसे झाले||३७|| अर्थः---त्या जळमय झालेल्या वनामध्ये अतिशय वाऱ्याने व पावसाने अत्यंत पिडीत झालेले व दिशासुद्धा न जाणणारे आम्ही,व्याकूळ चित्त होऊन एकमेकांचे हात धरून व मस्तकावर लाकांदाचे मरे घेऊन,जिकडे तिकडे फिरत होतो.||३८|| अर्थः---सूर्योदय झाल्यानंतर सांदिपनीगुरु आम्ही काष्ठे आणावयास गेलो हे जाणून,आम्हा शिष्यांच्या शोध करीत आम्हांजवळ आल आणि त्याने थंडीने कान्काद्लेल्या आम्हांस पाहून भाषण केले की,||३९|| भवार्थ:--- आपले शिष्य हे सेवेला इतरत्र कोठे पाठवली असल्यास सदगुरूंनी किंवा गुरूंनी त्यांना ती सेवा करून नियोजित वेळेत परत न आले तर सदगृरूंनी किंवा गुरूंनी त्यांना शोधून परत आणण्याचे प्रयत्न करावयास पाहिजे.हे त्यांचे कर्तव्य ठरते.आपण जर सदगुरू किंवा गुरु असल्यास ही कर्तव्य पर पाडावीत.||३९|| अर्थः---अहो हे पुत्रकहो,तुम्ही आमच्याकरिता फार दुःख पावला.प्राण्यांना देह हा सर्वांपेक्षा प्रिय आहे परंतु तुम्ही त्याचही अनादर करून माझी सेवा केलीत||४०|| अर्थ:---उत्तम शिष्यांनी गुरूचा प्रत्युपकार हाच करावा की,ज्यापासून सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात त्या देहाचेसुद्धा शुद्धभक्तीने गुरूला अर्पण करावे||४१|| भावार्थ:--- सदगुरूंनी किंवा गुरूंनी आपल्यावर सुसंस्कार करण्यासाठी,विद्यादान देऊन खूप कष्ट घेतलेले असतात,म्हणून त्यांच्या त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण—शिष्यांनी विशुद्ध—निष्काम भावनेने अंत:करणपूर्वक सेवा करावयास पाहिजे.आपले सर्व शरीर,सर्व आयुष्य धर्नानुसार घालवावयास पाहिजे.त्याचे कारण हे आहे कि,त्यांनी आपणास कायमची दु:ख निवृत्त करण्याचा व कायमचे सुखरूप होण्याचे संस्कार ज्ञान दिलेले असतात,त्याद्वारे आपण सुखरूप झालेलो असतोत.||४१|| अर्थः---हे द्विजश्रेष्ठहो,मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे,तुमचे मनोरथ सफल होवोत,तुम्ही अध्ययन केलेले वेद तुम्हांस अपेक्षित फल समर्थ असोत||४२|| भावार्थ:--- सदगुरूंनी आपल्यावर संतुष्ट राहण्यासाठी त्यांची शिष्यांनी कायिक,वाचिक,मानसिक व आर्थिक सेवा करावयास पाहिजे.आपले सदगुरू जर आपल्यावर संतुष्ट झाले असतील,तर शिष्यांचे मनोरथ पूर्ण होतात.त्यामुळे आपला परलोकही सफल होतो.याकरिता आपण त्यांच्या धर्मीं आज्ञाचे पालन करावे,त्यातच हित आहे.||४२|| | इत्थंविधान्यनेकानि वसतां गुरुवेश्मसु | गुरोरनुग्रहेणैव पुमान्य पूर्णः प्रशान्तये ||४३|| अर्थः---हे ब्राम्हणा,आम्ही गुरूच्या घरी होतो तेव्हा अशा प्रकारचे पुष्कळ वृत्तांत झाले त्यांचे तुला स्मरण आहे काय ? गुरूच्या अनुग्रहेकरूनच मनुष्य पूर्णमनोरथ होऊन उत्तप्रकारची शांतता पावण्यास योग्य होतो||४३|| भावार्थ:--- सदगुरुंच्या कृपेमुळे जीव हा शांत—समाधानास प्राप्त होतो व पूर्णतेला म्हणजे मोक्षास—लक्ष चौऱ्याऐंसी योनीच्या दु:खातून मुक्त होऊन सुखरूप होतो.||४३|| अर्थः---ब्राम्हण म्हणाला की,-हे देवदेवा,हे जगद्रुरो,सत्यसंकल्प अशा तुजबरोबर ज्या आम्हांला गुरुगृहाचेठिकाणी वास घडला,त्या आम्ही कोणते बरे फळ मिळविलेले नाही ? सर्वही मिळविली आहेत||४४|| भावार्थ:---ब्राह्मण देवता सुदामदेव म्हणतात,कि आपण—श्रीकृष्ण गुरुकुलात अहंयास आलात,त्यामुळे तुमची व आमची भेट झाली.त्यामुळे प्रत्यक्ष परमात्मा यांचा आम्हास आहावास प्राप्त झाला,तेव्हाच आमच्यावन सदगुरू कृपा झाली,अनुभवास आली.आमचे परमभाग्य उदयास येऊन फळ मिळून जन्माचे सार्थक झाले.||४४|| अर्थः---हे प्रभो,कल्यानांचे उत्पत्तीक्षेत्र जे वेदमयब्रम्ह,ते ज्या तुझा जो गुरुगृहाचेठिकाणी वास ते इतर लोकांना शिक्षण देण्याकरिता अत्यंत अनुकरणमात्र आहे||४५|| भावार्थ:--- सदगुरू यांच्या मुखातून सर्व वेदांचे श्रवण झाले,त्यामुळे आम्हास आपलीही संगती घडली,आपला आपल्यासमोरच प्रत्यक्ष अनुभव आला.||४५|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांच्या उत्तरार्धात श्रीकृष्णासुदामसंवादनिरुपणनामक हा ऐंशीवा अध्याय समाप्त झाला|| _________________________________________________________________________________________________________________________ |८१--- १०---सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती---२--- _________________________________________________________________________________________________________________________ आता ह्या एक्याऐंशीव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सख्या सुदाम्याने पोहे भक्षण करून,त्याच्या आश्रमी इंद्रालाही दुर्लभ अशी संपत्ती निर्माण केली,अशी कथा वर्णन केलेली आहे _________________________________________________________________________________________________________________________अर्थः---श्रीशुक म्हणतात:---सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राम्हणांचे भक्त,संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्रीहरी अशा रीतीने त्या ब्राम्ह्णाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पागोष्टी करीत राहिले.नंतर ते आपला प्रिय मित्र जो ब्राम्हण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहात स्मित हास्य करून थट्टेने त्याला म्हणाले.||१-२|| अर्थः---श्रीकृष्ण म्हणाले:---“हे ब्रम्ह्न! तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणले आहेस?माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशीसुद्धा वस्तू अर्पण करतात,तेव्हा ती मला फार मोठी वाटते.परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिले तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही.||३|| भावार्थ:--- एखादा आत्मियेतेचा मित्र जर आपल्याकडे भेटावयास आला तर,आपणहून त्यास मला कांही आणले का? असा प्रश्न करावा.कारण जे धार्मिक लोक असतात,ते कांही—ना—कांही मित्रास घेऊन येत असतात.म्हणून आपणहून विचारावयास कांहीच हरकत नाही.जो भगवंतांचा निष्काम भक्त असतो,तोच भगवंतांस प्रिया भक्त असतो.जो सकाम भक्त असतो,तो भगवंतांचा भक्त असतो,पण प्रिय नसतो.म्हणून आपण देवाचे प्रिय भक्त,सदगुरूंचे प्रिया शिष्य,पिता यांचे प्रिय पुत्र—पुत्री,पतीचे प्रिय पत्नी,मित्राचे प्रिय मित्र होण्याचाच प्रयत्न करावा.त्यातच आपले परं हित आहे,कीजे मोक्षास कारण आहे.प्रिय असलेला हा मोक्षाकडे जात असतो.||३|| | पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति | तदहं भक्त्युपहृतमश्नामी प्रयतात्मनः ||४|| अर्थः---जो मनुष्य भक्तीने पान,फुल,फळ किंवा पाणी मला अर्पण करतो,त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीने दिलेले ते मी स्वाकारतो.”||४|| भावार्थ:--- भगवंतांस जे निष्काम भावनेने अर्पण केलेले असते,तेच अर्पण केलेले भगवंत स्वीकार करतो.सकाम भावनेने अर्पण केलेले जे असते,ते भगवंत स्वीकारीत नाही.सकाम भावनेने जे अर्पण केलेले असते,त्यामुळे संसारातील वस्तू मिळते,ती संसारातील वस्तू विनाशी असते म्हणजे क्षणिक सुख देते पण त्यामुळे भगवंत मिळत नाही.आता असा विवेक—विचार करा कि,भगवंत मिळालेला बरा कि संसारातील वस्तू मिळालेली बरी? भगवंत मिळाला कि,कायमचेच सुख व संसारातील वस्तू मिळाली कि क्षणिक सुख मिळते.असा विवेक—विचार केला असता भगवंत मिळालेला बरा व संसारातील वस्तू न मिळालेली बरी असते.म्हणून आपण निष्काम परमार्थ करून संसारातील वस्तू न मागता,भगवंतांच मागावे,याचे सहज उत्तर येते.असे सर्व कळण्याकरिता संत—महात्मा यांचा सत्संग केलेला केव्हाही बरा—हिताचा असतो.||७|| अर्थः---राजा! असे म्हटल्यावरसुद्धा त्या ब्राम्हणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाहीत.लज्जेने त्याने मान खाली घातली.||५|| अर्थः---श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात.त्यांनि ब्राम्हणाच्या येण्याचे कारण जाणूनही विचार केला कि,“याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही.||६|| अर्थः---यावेळी हा आपला मित्र पतिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून तेथे आला आहे.म्हणून देवांनासुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन.”||७|| भावार्थ:--- भगवंतांनी जाणले कि आपला हा निष्काम भक्त आहे,पण पत्नीच्या आग्रहाचे निमित्य करुण निष्काम भावनेनेच मला भेटण्यासाठी आलेला आहे. म्हणून तो माझा प्रिय भक्त आहे.म्हणून देवांना दुर्लभ म्हणजे मोक्षसुख आपण याला देऊतच,त्याशिवाय त्याच्या पत्नीचीही इच्छा पूर्ण करूत,असा विवेक भगवंतांनी मनातल्या मनात केला.याचा अर्थ वास्तविक निष्काम भक्त असेल व त्याची पत्नी किंवा पुत्र—पुत्री धर्मानुसार आचरण करणारे भाविक असतील तर निष्काम भक्तामुळे त्याच्या कुटुंबियांची इच्छा पूर्ण होते.म्हणून आपण वास्तविक निष्काम भक्त होण्याचाच प्रयत्न करावा.सकाम भक्त होण्याचा मनात संकल्प उत्पन्न होऊ देऊ नका.||७|| अर्थः---भगवान श्रीकृष्णांनी असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे ‘हे काय आहे?”असे म्हणून,स्वतःच ओढून घेतले.||८|| अर्थः---आणि म्हणाले.“प्रिय मित्र!ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस.हे पोहे केवळ मलाच नव्हे,तर सगळ्या जगाला पृप्त करतील.”||९|| भावार्थ:--- भगवंतांस भावपूर्ण वस्तू जर आपण अर्पण केली तर,त्यामुळे भगवंत त्या निष्काम भावपूर्ण वस्तूचा स्वीकार करून त्या वस्तुद्वारा स्वत: तृप्त होतोच व जगासही तृप्त करतो.त्यामुळे त्याचे---भगवंत व जग तृप्त झाल्याचे निष्काम फळ आपणास मिळते.थोडक्यात आपण सकाम न करता निष्काम परमार्थ करावा.||९|| अर्थः---असे म्हणून त्यांनी त्यातून एक मुठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मुठ भरून घेतले,तोच पतीपरायन रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला.||१०|| अर्थः---रुक्मिणी म्हणाली,“हे विश्वात्मन !माणसाला या लोकी किंवा परलोकातसुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृदि प्राप्त करण्यासाठी हे एक मुठभर पोहेसुद्धा पुरेसे आहेत.”||११|| भावार्थ:--- भक्तांचा भाव हा निष्काम असेल तर,त्या भक्ताकडून एक कणभर किंवा एक घास सेवन खूनही आपली तृप्ती होऊन त्याला सर्व प्रकारच्या समृद्धीने परिपूर्ण करू शकता.अधिक सेवन करण्याची मुळीच आवश्यकता नाही.आपण वस्तूचे तेवढे भुकेले नसून आपण भावाचे भुकेले आहात.म्हणून निष्काम भावयुक्त असावे.||११|| अर्थः---ब्राम्हण त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालातच राहिला.तेथे खाऊन-पिऊन तो इतका खूप झाला कि,आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले.||१२|| अर्थः---हे राजा! दुसऱ्या दिवशी विश्वनिर्मात्या व भक्तांना आनंद देणाऱ्या श्रीकृष्णांनी त्याला वंदन केले व त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला.नंतर तो आपल्या गावी निघाला.||१३|| भावार्थ:--- ब्राह्मण सुदाम भक्त यांना त्यांच्या गावी जाण्याकरिता,त्यांना निरोप देण्याकरिता भगवंत यांनी त्यांच्या मागोमाग गावाच्या बाहेत चालत—चालत पी—पी गेले.त्यास कारण हे होते कि इतरांचा सहवास असावा वाटत होता,पण आपापले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपापल्या गावी जावेच लागते.प्रेमापोटी ते गावाच्या बाहेर गेले.आज—काळ आपणास असे दिसून येत आहे कि,आपल्याकडे कोणीही आपल्या भेटीस आले असता,त्यांना निरोप देण्याकरिता आपण पहिल्या अथवा दुसऱ्या म्हणजेच जो असेल त्या मजल्यापासून म्हणजे आपले घर न सोडता तेथूनच निरोप,आपले हात न जोडता करतो.आपण हातवारे करत असतांना असा अर्थबोध होतो कि,भेटीला जे आले होते त्यांनी पुन्हा भेटीस येऊ नये.भारतीय संस्कृतीत एकमेकास हात जोडून नमस्कार करण्याची पद्धती आहे.हात जोडण्याच्या पद्धतीत असा अर्थ अभिप्रेत होतो कि,आपण आमच्या भेटीस असेच पुन्हा—पुन्हा येत जावे.आपण आपली संस्कृती जगात चांगली आहे,असे वाचेने म्हनातोत,पण कृतीने तसे वागत नाहीत. अशा म्हणणे ला कांही अर्थ आहे का? मुळीच अर्थ नाही,म्हणून म्हणावे व त्यानुसार आचरण करावे.आपण तरी निरोप देणाचा पूर्वपद्धतीने द्यावा.||१३|| अर्थः---ब्राम्हणाला श्रीकृष्णांकडून धन मिळाले नाही.तरीसुद्धा त्याने स्वतः काही मागितले नाही.उलट या देवदेवेश्वरासाठी आपण यःकश्चित पोहे ते काय आणले,या विचाराने तो लज्जित झाला,परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला.||१४|| भावार्थ:--- श्रीकृष्णांनी—मित्रांनी आपलेला धन दिले नाही,हे फार चांगले झाले असा मनात विचार करत तो आपल्या गावाकडे पाऊले टाकत जाऊ लागला.त्याचप्रमाणे निष्काम भक्ती करत असतांना यदाकदाचित आपली संसारिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर,भगवंतांनी आपणास संसारातील कांही तरी द्यावे असे वाटू नये.||१४|| अर्थ:---जाताना तो मनात विचार करू लागला-“अहो! ब्राम्हणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णांची ब्राम्हणभक्ती आज मी पाहिली.धन्य झालो! ज्यांच्या वक्षःस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते,त्यांनी सर्वांत दरिद्री अशा मला आपल्या ह्रदयाशी कवटाळले.||१५|| भावार्थ:--- सुदामा ब्राह्मण हा श्रीकृष्णांच्या भेटीने संतुष्ट झाला,कारण सुदाम ब्राह्मण दरिद्री व श्रीकृष्ण ऐश्वर्येसंपन्न असूनही प्रेमपूर्वक भेट झाली,याच्या आनंदात तो चालू लागला.आपणही जीवन जगत असतांना आपलेही कांही मित्र दरिद्री असू शकतात.आपणही त्यांची भेट घ्यावावयास पाहिजे.ते दरिद्री मित्र आपणाकडे न आले तर आपण त्यांना निमंत्रण देऊन बोलावयास पाहिजे,किंवा प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन निमंत्रित करावयास पाहिजे.आपण प्रत्यक्ष त्याच्या भेटीस जाऊन निमंत्रण दिल्यास, त्यांना किती आनंद मिळेल व तो आपल्याकडे आल्यानंतर आपला आदरसत्कार,आदरातीथ्ये पाहून त्यास फारच आनंद वाटेल.असा विचार पाहून वागावे.||१५|| अर्थः---कुठे मी अत्यंत पापी,दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण!,परंतु त्यांनी ‘मी केवळ ब्राम्हण’ म्हणून मला आपल्या बाहूंनी ह्रदयाशी घट्ट धरले.||१६|| भावार्थ:--- कोठे जीव---मी अत्यंत १--पापी,म्हणजे “अधर्मांनेयुक्त” वागणारा,२--दरिद्री,म्हणजे कोणतेही धन नसणारा—“धनहीन”,३--अल्पशक्तीत्व म्हणजे शक्ती--सामर्थे अल्प—थोडी असणे,त्यास “अल्पशक्तीत्व” असे म्हणतात.४—अल्पज्ञत्व म्हणजे भूतकाळाचे स्मरण नसणे,भविष्यकाळाचे ज्ञान नसणे तर कांही अंसी वर्तमानकाळाचे ज्ञान असणे,त्यास “अल्पशक्तीत्व” असे म्हणतात.५—परिच्छिन्नत्व म्हणजे मर्यादित आहे.जी वस्तू काळाने,देशाने व वस्तूने मर्यादित आहे त्यास “परिच्छिन्नत्व” असे म्हणतात.६—नानात्व म्हणजे अनेक रूपाने असते,त्यास “नानात्व” असे म्हणतात.७--परस्पराधीनत्व म्हणजे अन्यावर म्हणजे सत्तेसाठी परमात्म्यावर इतर मिथ्यासाठी जड व जीवावर अवलंबून असतो.त्यांच्याशिवाय तो आपले जीवन जगू शकत नाही.म्हणून त्यास पराधीनत्व असे म्हणतात.यासाठी आपण आपले पराधीनत्व ज्ञानाद्वारे घालवून स्वतंत्र होण्याचा मनुष्य देहातच संत—महात्मा यांच्या सत्संगाद्वारे प्राप्त करून आपले सार्थक करावे. ८---असमर्थत्व म्हणजे कोणतेही कार्य करण्यास असमर्थ असणे,त्यास “असमर्थत्व” असे म्हणतात.९—अपरोक्षत्व म्हणजे प्रत्यक्ष नसणे.आपण जे आहोत,तसे न वाटता अन्य वाटणे-भासाने त्यास “अपरोक्षत्व” असे म्हणतात.१०—अविध्योपाधीत्व म्हणजे आपल्याठिकाणी अज्ञान असणे,आपणास स्वत:चे ज्ञान नसणे,त्यास “अविध्योपाधीत्व” असे म्हणतात.हे वरील दहा धर्म जीवाचे आहेत.जीव म्हणजे १--वरील दहा धर्मासाहित जी अविद्या,२--त्या अविध्यात स्थित जे प्रतिबिंबरूप चिदाभास,३—त्याचे—जीवाचे अधिष्ठान कूटस्थ या सर्वस मिळून “जीव” असे म्हणतात.जीवापासून सुखाची अपेक्षा करू नये तर परमात्म्यापासून सुखाची अपेक्षा करावी,कारण तो वास्तविक सुखरूप आहे. वास्तविक जीव हा सुखरूप नाही,म्हणून जीवांनी परमात्म्यापासून सुखरूप होण्याचा प्रयत्न करावा.जसे पाणी व पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब,त्यास “सूर्याचे प्रतिबिंब” असे म्हणतात.या प्रक्रियात आकाशातील सूर्य सत्य आहे व पाण्यातला सूर्यरुपी प्रतीबंबित झालेला मिथ्या म्हणजे भासणारा—दिसण्यापुरता असणारा व वास्तविक नसणारा खोटा—मिथ्या आहे.म्हणून सत्य जो आकाशातला आहे,त्यास सत्य म्हणावे व पाण्यातला जो आहे त्यास भासणारा—मिथ्या—खोटा म्हणावे.मिथ्या—खोटा जो आहे,त्याच्यापासून वास्तविक प्रकाश मिळू शकत नाही,तर जो खरा—वास्तविक आहे,त्याच्यापासूनच खरा—वास्तविक प्रकाश मिळू शकतो.म्हणून आपण त्याच्यापासूनच प्रकाशाची अपेक्षा करावी.त्याचप्रमाणे आपण सुखाची अपेक्षा परमात्म्यापासून करावी,तर जीवापासून करू नये.जीवाने परमात्मरूप होण्याचा प्रयत्न करावा,तेव्हा जीव सुखरूप होईल,अन्यथा होणार नाही.आतापर्यंत आपण जीवाचे स्वरूप पाहिले.आता आपण ईश्वराचे स्वरूप पाहू या. ईश्वर म्हणजे १—सर्वशक्तिमान म्हणजे [१] कर्तुंम म्हणजे जे करता येण्यासारखे आहे ते करणे त्यास “कर्तुंम” असे म्हणतात.[२] अकर्तुम म्हणजे जे करण्यासारखे नसून ते पण करणे,त्यास “अकर्तुम” असे म्हणतात.[३]अन्यथा कर्तुंम म्हणजे विपरीत करणे,त्यास अन्यथा कर्तुंम असे म्हणतात.असे जो कार्य करतो त्यास “सर्वशक्तिमान” असे म्हणतात.असा फक्त ईश्वरच आहे आहे,अन्य कोणी नाही.२—सर्वज्ञत्व म्हणजे सर्व जाणणारा—भूतकाळ,वर्तमानकाळ व भविष्यकाळ जाणणारा जो असतो त्यास “सर्वज्ञ” असे म्हणतात.३—एकत्व म्हणजे एक असणारा जो आहे,त्यास “एक” असे म्हणतात.त्याच्याशिवाय त्याच्यासारखा दुसरा—अन्य कोणीच नाही.त्याचे कार्य दुसरा कोणी करू शकत नाही.तसेच तो एक असल्यामुळे ईश्वर कोणी होऊ शकत नाही,म्हणून तो “एक” आहे.४—व्यापकत्व म्हणजे सर्व देशात,सर्व काळात सर्व वस्तुत असणे.तो सोडून कांहीच नसणे.जसे आकाश व्यापक आहे.आकाशास,ब्रह्मांडास गवसणी ईश्वराची आहे.असा जो असतो त्यास “व्यापक” असे म्हणतात.५—स्वाधीनत्व म्हणजे त्याचे त्याला कार्य करण्यासाठी इतरांची मुळीच गरज नाही.तो स्वतंत्र आहे,असा जो आहे,त्यास “स्वाधीन” असे म्हणतात.६—समर्थत्व म्हणजे कोणतेही कार्य करण्यास समर्थ असणे.त्यास कार्य करण्यासाठी इतरांची गरज नाही.म्हणून त्यास “समर्थत्व”असे म्हणतात.७—परोक्षत्व म्हणजे जीवास ईश्वराच्या अज्ञानामुळे परोक्षत्व म्हणजे त्याचा अनुभव नसणे,त्यास “परोक्ष” असे म्हणतात.७—मायोपाधीकात्व म्हणजे मायाची उपाधी असते पण मायाची उपाधी ईश्वरास बंधन टाकू शकत नाही,कारण माया ही ईश्वराच्या ताब्यात आहे.यास मायोपाधी असे म्हणतात.हे असे वरील ईश्वराचे आठ धर्म आहेत.श्रीकृष्णांनी सुदामदेव ब्रह्मज्ञानी ब्राह्मण आसल्यामुळे त्यांना त्यांच्या हृदयास घट्ट आलीगन दिले.आपणही ब्राह्मण होण्यासाठी निष्काम कर्म करून व निष्काम उपासना करून अंत:कारण शुद्ध व स्थिर करावयास पाहिजे.त्यानंतर अधिकारसंपन्न होऊन संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र श्रावण केले असता ज्ञान होतेत्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर जीवाचे व ईश्वराचे जे धर्म आहेत,त्याचा बाध होतो.बाध म्हणजे तीनही काळात त्या धर्माचा अभाव असणे,.असे झाल्यास परमात्म्याची अनुभूती येते.असी अनुभूती येणे म्हणजे परमात्म्यासी एकरूप होणे.असे झाल्यानंतर जीव हा सुखरूप होऊन त्याचे जन्म—मरण निवृत्त होते.आपण असाच प्रयत्न करून परमात्म्यासी एकरूप होण्याचा प्रयत्न करून त्याचा अनुभव घ्यावा.म्हणजे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊत.||१६|| अर्थः---एवढेच नव्हे,तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते,त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसविले.मी थकलेलो होतो,म्हणून स्वतः त्यांच्या पट्टराणीने आपल्या हातांनी चवऱ्या धाळून मला वारा घातला.||१७|| भावार्थ:--- सुदाम ब्राह्मण यांना भगवंतांनी प्रणपिर्या रुक्मिणी ज्या पलंगावर शयन करते,त्याच पलंगावर बसवले होते,कारण तो जिवलग मित्र होता.आपणसुद्धा आपला जो मित्र प्राणप्रिय आहे,त्याबद्दल तेवढी आत्मीयता असावयास पाहिजे.त्याची स्वत:सेवा केली.||१७|| | शुश्रूषया परमया पादसंवाहनदीभिः | पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत् ||१८|| अर्थः---ब्राम्हणांना देव मानणाऱ्या देवाधिदेवांनि पाय चेपणे इत्यादी रीतीने माझी चंगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली.||१८|| अर्थः---त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग,मोक्ष,पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होय.||१९|| भावार्थ:--- भगवंतांच्या चरणांची पूजेने स्वर्ग,मोक्ष,पृथ्वी आणि रसातलातील संपत्ती व सर्व सिद्धीसुद्धा मिळतात.एवढे सामार्थे असूनसुद्धा भगवंतांनी सुदाम ब्राह्मणांची पूजा केली.त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या ज्ञानी मित्राची आदरयुक्त अंत:करणाने पूजा--सेवा करावी.||१९|| अर्थः—तरीसुद्धा ‘हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल,’असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णांनी मला थोडेसेसुद्धा धन दिले नाही.’||२०|| भावार्थ:--- सुदाम ब्राह्मण हा दरिद्री आसल्यामुळे त्यास भगवंतांनी धन दिले नाही,कारण धनाने अंहकार येतो व अंहकाराने परमार्थ होत नाही.म्हणून सुदामाचा परमार्थ व्हावा म्हणून त्यास धन दिले नाही व सुदामा त्या अपेक्षाने श्रीकृष्णाकडे आलाही नव्हता.||२०|| अर्थः---मनात असा विचार करीतच ब्राम्हण आपल्या घराजवळ येऊन पोहोचला.ते ठिकाण,सूर्य,अग्नी आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले होते.ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती,आणि त्यांमध्ये पक्ष्यांचे ठावे चिवचिवाट करीत होते.सरोवरांमध्ये कुमुदे,पांढरी,तांबडी,निळी अशी सुगंधी कमळे उमलली होती.उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तेथे वावरत होत्या.ते पाहून ब्राम्हण विचार करू लागला, “हे मी काय पाहात आहे?हे कोणाचे ठिकाण आहे?जेथे मी राहात होतो,ते हे ठिकाण असे कसे झाले?”||२१-२३|| भावार्थ:--- असा विचार करत सुदान ब्राह्मण त्याच्या घराजवळ येऊन पोहोंचला.त्याचे ते घर पहिल्यासारखे न दिसता तेजस्वी दिसले.त्यास असे वाटले कि,हे कोणाचे ठिकाण आहे?असा संभ्रम झाला.असे कसे झाल असा तो विचार करू लागला.||२१—२३|| अर्थः---तो असा विचार करीत होता,तेवढयात देवतांसारखे सुंदर स्त्री-पुरुष वाजत-गाजत,मंगल गीते गात,त्या भाग्यवान ब्राम्हणाच्या स्वागतासाठी आले.(कारण,भगवंतांनी स्वर्गातून त्यांना येथे आणले होते.)||२४|| अर्थः---पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीतच ताबडतोब घराच्या बाहेर आली.त्यावेळी ती अशी दिसत होती की,जणू कमलवनतुन आलेली लक्ष्मीच.||२५|| | पतिव्रता पतिं दृष्ट्वा प्रेमोत्कण्ठाश्रुलोचना | मिलीताक्ष्यनमद् बुद्ध्या मनसा परिषस्वजे ||२६|| अर्थः---पतीला पहाताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यांत अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तरळू लागले.ते(ते जमिनीवर पडू नयेत म्हणून) तिने आपले डोळे बंद केले.यांना वंदनच केले पाहिजे,असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिले.||२६|| भावार्थ:--- सुदामा ब्राह्मण व त्यांची पत्नी यांची एकमिकांची भेट झाल्यानंतर पत्नीच्या डोळ्यातून प्रेमामुळे आनंदाश्रू वाहू लागले,कारण त्यांच्या पत्नीस वैभव पाहिजे होते व ते वैभव मिळाले,म्हणून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळू लागले.इच्छित वस्तू प्राप्त झाले असता असे होताच असते.आपणास मात्र संत—महात्मा आपल्या घरी आल्यास आनंद वाटाया.कारण त्यामुळे सत्संग घडत असतो.||२६|| अर्थः---सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगनेप्रमाणे अत्यंत शोभणाऱ्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला.||२७|| अर्थः---तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रसादात प्रवेश केला.तो प्रसाद इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्नजडीत खांबांचा होता.||२८|| अर्थ:---हातींच्या दातांपासून बनविलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरल्या होत्या.सोन्याच्या दांडयांच्या चवऱ्या आणि पंखे तेथे ठेवलेले होते.||२९|| अर्थः---सोन्याची सिंहासने होती.त्यांच्यावर मऊमऊ गाद्या अंथरल्या होत्या.तेथे मोत्यांच्या लादी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते.||३०|| अर्थः---स्फटिकांच्या शुभ्र भिंतीवर पाचूची नक्षी होती.आणि रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते.||३१|| अर्थः---अशा प्रकारे सर्व प्रकारच्या संपत्तीची आकारण समृद्धी पाहून ब्राम्हण त्याविषयी शांतपणे विचार करू लागला.||३२|| अर्थः---तेव्हा त्याच्या लक्षात आले कि,“मी तर जन्मतःच भाग्यहीन आणि दरिद्री.त्याअर्थी या संपत्तीचे कारण परमऐश्वर्यशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षा-शिवाय दुसरे असूच शकत नाही.||३३|| भावार्थ:--- सुदामा ब्रह्मणाने विचार केला कि,श्रीकृष्ण हा सर्वज्ञ असाल्यामुळे त्याने आपल्या पत्नीच्या मनातील मनोभाव जाणून हे वैभव दिलेले आहे.सुदाम निष्काम ब्राह्मण असल्यामुळे श्रीकृष यांनी त्यांना प्रत्यक्ष कांहीच दिले नाही,पण अप्रत्यक्ष सुदामादेवाच्या पत्नीच्या भावनेनुसार वैभव दिले.ज्याच्या—त्याच्या भावनेनुसार भगवंत फळ देत असतो.आपणास जे वैभव प्राप्त झाले आहे,त्यास कारण श्रीकृष्ण आहेत हे सुदामदेव ब्राह्मणांच्या लक्षात आले.||३३|| अर्थः---ज्यांच्याकडे अनंत भोगसामग्रि आहे,असे माझे मित्र द्शार्हाधीपती भगवान,याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात.ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे,तो मेघ शेतकऱ्याच्या शेतात त्याला नकळत पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला,असे समजतो,तसे माझ्या मित्राचे आहे.||३४|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण हे भक्तांच्या मनातील भाव जाणून ज्याच्या—त्याच्या इच्छेनुसार त्याची ती—ती इच्छा पूर्ण करतात.||३४|| अर्थः---ते पुष्कळ देतात,परंतु थोडेच दिले असे समजतात.त्यांच्या भक्ताने थोडेसे काहीही करू दे,ते त्यांना फार वाटते.पहा ना! मी त्यांना फक्त एक मुठभर पोहे भेटीदाखल दिले,पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्यांच्या स्वीकार केला बरे!||३५|| भावार्थ:---भगवंत यांना आपण थोडे दिले तरी त्यांना ते जास्त—अधिक वाटते.उदा—सुदाम ब्राह्मण याने मुठभर पोहे दिले,तरी पण भगवंतांनी त्याच्या त्या मोबदल्यात सोन्याची नागरी करून दिली.आपणही थोडी भक्ती केली तरी आपणास केल्याच्या मानाने फार अधिक मिळते.म्हणून सत्कर्म करा.||३५|| अर्थः---मला जन्मोजन्मी त्यांचेच प्रेम,त्यांचेच सख्य,त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करावयास मिळो.मला संपत्ती नको,तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझे मन जडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त होवो.||३६|| भावार्थ:---आपणास भगवंतांचे प्रेम जन्मोजन्मी मिळण्यासाठी भगवंतांची निष्काम सेवा करावी व संसारातील नाशिवंत फळाची अपेक्षा न करता निष्काम सेवेचीच अपेक्षा करावी.जड—संपत्ती,वैभव,मान—प्रतिष्ठा,हे नाशिवंत फळ आहे,क्षणिक फळ देणारे आहे.म्हणून असे नाशिवंत मागू नये,कारण नाशिवंत फळ मागितले कि,ईश्वराचे प्रेम मिळत नाही,असे निश्चितच आहे.भगवंतांच्या चरणांच्या—अधिष्ठाणांच्या—परमात्म्याच्या ठिकाणी आपले मन जडावे—लागावे,असी मागणी करावी. कारण हे तत्व अविनाशी आहे—शाश्वत आहे—सुखरूप आहे.असे जे निष्काम ज्ञानी भक्त आहेत,त्यांचा जर आपण सत्संग केला तर आपणही निष्काम ज्ञानी भक्त होतोत.जसा सत्संग कला तसा परिणाम होत असतो,म्हणून निष्काम सत्संगास फार महत्व आहे.अन्याचा म्हणजे अधर्माचा,सकाम,सत्संग मुळीच नको.||३६|| अर्थः---संपत्तीचे दोष जाणणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदाने अधःपात होतो,हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला,निरनिराळ्या प्रकारची संपत्ती,राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत.||३७|| भावार्थ:---पूर्ण ज्ञान म्हणे शब्द ज्ञान झाले आहे,पण त्या शब्द ज्ञानाचा अनुभव आलेला नाही.ज्ञानाचा अनुभव येण्यासाठी वैभवाचा,विषयांचा,त्याग करावा लागतो, म्हणून भगवंत निष्काम शब्दज्ञानी जे आहेत,त्यांना वैभव—संपत्ती भगवंत देत नाही.आपण वैभव—संपत्ती मागू नये व दिली तरी घेऊ नये,कारण ज्ञानाचा अनुभव येत नाही.ज्ञानाचा अनुभव न आल्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होत नाही,त्यामुळे आपले दु:ख जाऊन सुख मिळत नाही.याकरिता संपत्ती—वैभव नसावे.||३७|| अर्थः---आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राम्हण त्यागपूर्वक,अनासक्त भावाने,आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगु लागला.कारण भगवंतांचा तो परम भक्त होता.||३८|| भावार्थ:---आपण परमार्थ करत असतांना संपत्ती व वैभवाचा त्याग करून अनासक्तभावाने म्हणजे विनाशी जो संसार आहे,त्याविषयी प्रतिकूल भावाने—नको या भावाने आपल्या पत्नीसह संसार करावा.त्यामुळे आपण भगवंतांचे परम प्रिय भक्त होऊत.आपण त्यांचे परम प्रिय भक्त झाल्यास त्यांची कृपा होते.||३८|| अर्थः---देवाधिदेव यज्ञपती भगवान श्रीहरी ब्राम्हणांना आपले प्रभू,आपले दैवत मानतात.म्हणून त्यांच्या दृष्टीने ब्राम्ह्णांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही.||३९|| भावार्थ:---निष्काम ज्ञानी--ब्राह्मण भक्त [जन्माने नाही तर कर्माने—प्रयत्नाने—अधिकाराने] त्यांना भगवंत आपले म्हणजे भगवंतांचे आराध्य दैवत मानतात.ज्ञानी ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ दुसते कोणीच नाही.म्हणून आपण ज्ञानी ब्राह्मणास महत्व ध्यावावयास पाहिजे व भगवंतांचे प्रिय ज्ञानी ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करावा.||३९|| अर्थः---अशा प्रकारे भगवंताचा प्रिय मित्र असलेल्या त्या ब्राम्हणाने जाणले कि,भगवान जरी अजिंक्य असले,तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात.हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला.ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचे स्थान प्राप्त करून घेतले.||४०|| भावार्थ:--- ज्ञानी ब्राह्मण जो आहे तो परमात्म्यास जिंकू शकतात म्हणजे त्यांच्याशी एकरूप होऊ शकतात.आपणही निष्काम ज्ञानी भक्त होऊन परमात्म्यासी एकरूप होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.म्हणून आपण परमात्म्यासी एकरूप होण्याचा प्रयत्न करून एकरूप व्हावे,कारण त्यातच आपले हित आहे.||४०|| | एतद् ब्रम्हण्यदेवस्य श्रुत्वा ब्रहण्यतां नरः | लब्धभावो भगवति कर्मबन्धाद् विमुच्यते ||४१|| अर्थः---ब्राम्हणांना आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ही ब्राम्हणभक्ती जो श्रवण करतो,त्याला भगवंतांच्या चरणांविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो.||४१|| भावार्थ:--- सुदामदेव ब्राह्मणांचे जो चारित्र श्रावण करतो,त्याला भगवंतांच्या चरणाविषयी प्रेमभाव प्रगट होतो,म्हणजेच निष्काम भाव प्रगट होतो.म्हणून आपण सुदामदेवाचे चारित्र ऐकण्याचा अंत:करणपुर्वक—भावपूर्वक प्रयत्न करावा,त्यामुळे आपलीही कर्मबंधनातून मुक्तता होऊन जन्म—मरण निवृत्त होते.||४१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील उत्तरार्धात सुदामचरित्रकथनरूप हा ऐक्याऐशीवा अध्याय समाप्त झाला|| __________________________________________________________________________________________________ |८२--- ११---श्रीकृष्ण-बलरामांशी गोप-गोपींची भेट---१--- __________________________________________________________________________________________________ आता ह्या ब्याऐंशीव्या अध्यायामध्ये सूर्यग्रहणपर्वाचेवेळी चोहोंकडून कुरुक्षेत्रांत जमलेल्या राजांनी यादवांच्या भेटी घेतल्या आणि परस्परांतकृष्णकथा वर्णन केल्या,अशी कथा वर्णन केलेली आहे _________________________________________________________________________________________________________________________ | अथैकदा द्वारवत्यां वसतो रामकुष्णयोः | सुर्योपरागः सुमहानासीत् कल्पक्षये यथा ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,नंतर ते रामकृष्ण,द्वारकेमध्ये राहत असतां एकेवेळी,जसा कल्पक्षयाच्यावेळी सूर्याला लय होऊन अंधकार पडतो त्याप्रमाणे सर्वग्रासाने अंधकार पडणारे फारच सूर्यग्रहणपर्व प्राप्त झाले||१|| अर्थः---हे राजा,ज्योतिष्यांनी सांगितलेले ते सूर्यग्रहण,ते प्राप्त होण्याच्या पूर्वीच ऐकून सर्व देशांतून मनुष्य,पुण्यसंपादन करण्याच्या इच्छेने स्यमतपंचनामक कुरुक्षेत्रांत निघून गेले||२|| भावार्थ:--- सूर्यग्रहण काळात पवित्र नदीत किंवा किनाऱ्यास निवास करून भगवंतांचे स्मरण—भजन करावयास पाहिजे.सूर्यग्रहण काळात नेहमीपेक्षा अधिक पुण्य प्राप्त होत असते.म्हणू या काळात आपण सत्कर्म करावयास पाहिजे.या काळात स्नान—दानधर्म करावयास पाहिजे.निष्कामतेणे अधिक अंत:कारण शुद्ध होते.||२|| अर्थः---ज्या कुरुक्षेत्रात शस्त्रधाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा परशुरामाने,पृथिवी निःक्षत्रिय केली त्यावेळी राजांच्या रक्तप्रवाहाने मोठे नऊ ऱ्हद उत्पन्न केले आहेत||३|| अर्थः---आणि जेथे,राजवधप्रयुक्तपापाने अलिप्त अशा हि त्या भगवंताचे यजन केले ||४|| अर्थः---असो,अतिशय पुण्यकारक त्या तीर्थयात्रेमध्ये त्या कुरुक्षेत्रांत भरतखंडांतील पुष्कळ प्रजा गेल्या होत्या तसेच हे राजा,अक्रूर,वसुदेव,आहूक,गद,प्रदुम्न,सांब इत्यादिक यादवही आपले पाप घालविण्याची इच्छा धरून त्या क्षेत्रांत गेले होते.त्यावेळी अनिरुद्ध व सेनाधिपती कृतवर्मा हे उभयंता,सुचंद्र शुक व सारण यांसहवर्तमान द्वारकेच्या रक्षणाकरिता राहिले होते||५-६|| भावार्थ:---महान तीर्थ जाऊन नामस्मरण,भजन,उपवास करावयास पाहिजे.यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते व निष्काम असेल तर अंत:कारण शुद्ध होते.||५—६|| अर्थः---तेव्हा सुवर्ण पुष्पांच्या माळा गळ्यांत घालवारे,दिव्यमाळा वस्त्रे कवचे कुंडले इत्यादिक धारण करणारे,व स्त्रियांसह वर्तमान यात्रेला निघालेले ते महातेजस्वी यादव,मार्गामध्ये विमानासारख्या रथांनी,तरंगासारखी चंचळ गति असणाऱ्या घोड्यांनी,शब्द करणाऱ्या मेघांसारख्या हत्तींनी व विद्याधरासारखे तेज असलेल्या शिपाईवगैरे मनुष्यांनी,देवांगनासह वर्तमान विमानांत बसूब जाणाऱ्या देवांसारखे शोभूं लागले||७-८|| अर्थः----त्या महाभाग्यशाली यादवांनी,एकाग्रचित्त पणे त्या तीर्थामध्ये स्नान करून उपोषण केले आणि ब्राम्हणांना वस्त्रे व माळा देऊन सुवर्णपुष्पांच्या माळा घातलेल्या गाईहि दं दिल्या.||९|| अर्थः---नंतर त्यांनी,परशुरामाने निर्माण केलेल्या डोहांकडे पुन्हा यथा विधी मोक्षस्थान करून,कृष्णाविषयी आम्हांस भक्ती असो अशा अभिप्राय ब्राम्हनांस उत्तम अन्नाचे भोजन घातले||१०|| अर्थः----नंतर ज्यांची देवता श्रीकृष्णच आहे अशा त्या यादवांनी,ब्राम्हणांची आज्ञा घेऊन आपणही भोजन केल्यावर दातट व थंड छाया असलेल्या वृक्षांखाली यथेच्छपणे डेरे राहुट्यावगैरे देऊन,कांही दिवस तेथेंच राहण्याच्या बेताने राहिले||११|| अर्थः----नंतर,हे राजा,त्या यादवांनी तेथे आलेल्या सुह्रत संबंधी राजांस पाहिले,तसेच मत्स्य,उशीन्र कौसल्व,विदर्भ,करू सृंजय,कांबोज,कैकय,मद्र,कुंती,आनर्त,केरळ,या देशांत राहणाऱ्या लोकांस व दुसऱ्याही आपल्या पक्षाकडील व शत्रूपक्षाकडील शेंकडो लोकांस पाहून अत्यंत स्नही अशा नंदादिक गोपांस व दर्शनाचा फार दिवस उत्कंठा धारण करणाऱ्या गोपिसही पाहिले||१२-१३-१४|| भावार्थ:---आपण सूर्य किंवा चंद्र ग्रहणात दानधर्म करावयास पाहिजे.या कात दानधर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते,म्हणून गोदान—गाईचेदान,सुवर्णदान,वस्त्रदान,अन्नदान इत्यादी दान करून पुण्य प्राप्त करून घ्यावावयास पाहिजे.निष्काम असेल तर अधिक अंत:करण सुद्ध करावयास पाहिजे.||१०—१२|| अर्थः---तेव्हा परस्परांच्या दर्शनाने उत्पन्न झालेल्या आनंदाच्या वेगाने अतिशय प्रफुल्लित झालेल्या हृद्यांनी व मुखकमळांनी ज्यांना शोभा आली आहे.ज्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू स्त्रवत आहेत,ज्यांच्या वाणी प्रेमाच्या योगाने सद्रदित झाल्या आहेत व ज्यांच्या अंगावर हर्षातिशयाने रोमांच उभे राहिले आहेतसे ते सर्व लोक,परस्पर दृढ आलिंगन करून आनंदांत निमग्न झाले||१५|| भावार्थ:--- सूर्य ग्रहण पर्वाच्या निमिताने एकमेकांच्या भेटी—गाठी पडल्या.सर्वांना आनंद मिळू लागला.स्नानादी सत्कार्मामुळे पुण्यही मिळू लागले.त्यांच्या आनंदास सीमा राहिली नाही,त्यामुळे त्यांना अपार आनंद मिळू लागला.आपणही सूर्यग्रहण पर्वकाळात तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नानादी साधनाचा लाभ घ्यावा.||१३—१४|| अर्थः---तशाच सर्व स्त्रियाही परस्पर एकीमेकीना पाहून अतिप्रेमाने ज्याच्या दृष्टि मंदहास्ययुक्त व निर्मळ कटाक्षयुक्त झाल्या आहेत आणि ज्याच्या नेत्रांत आनंदाश्रू प्राप्त झाले आहेत अशा त्या केशराचे लेपन केलेल्या स्तनांना,तशाप्रकारच्याच आपल्या स्तानांनी पीडन करून आलिंगन करूं अर्थः---नंतर लहान वयाच्या लोकनिओ अभिनंदन केलेल्या ते सर्व लोक वयाने अधिक असलेल्या वृद्धास वंदन करून व स्वागताचा व कुश्लाचा प्रश्न करून पर्स्पराम्ध्ये कृष्ण कथा वर्णन करू लागले ||१७|| भावार्थ:---आपण एकमेकांची भेट झाल्यानंतर एकमेकांना नमस्कार करावयास पाहिजे.मांडीत असो किंवा तीर्थक्षेत्र असो किंवा अन्य धार्मिक ठिकाण असो,त्याठिकाणी ईश्वर—देव,संत—महात्मा महात्मा यांच्या चरित्राविषयी—लीलांवीषयी चिंतन करावयास पाहिजे.संसारातील गप्पागोष्टी,अशा चर्चा करू नयेत.||१७|| अर्थः----कुंती तर आपले भाऊ बहिण त्याचे पुत्र ,आईबाप,भाऊ जाई व श्रीकृष्ण यांना अवलोकन करून त्यांच्या बरोबर प्रेम कथा वर्णन करीत असता सर्व दु:खे विसरली .||१८|| भावार्थ:--- यात्रेच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी झाल्यानंतर आपले संसारातील विषयांचा विसर पडतो.त्यामुळे धार्मिक गोष्टीची चर्चा होते.त्यामुळे आपल्याला धार्मिक गोष्टीने ज्ञानात भर पडून वाढ होते.म्हणून तीर्थयात्रेस जाने फारच हिताचे असते.संत—महात्मा यांची भेट झाल्यामुळे धर्माचे--वेदांताचे ज्ञान होते.||१८|| अर्थः---ती कुंती वसुदेवांला म्हणाली की –हे आर्या ,दादा मी तर आपले मनोरथ पूर्ण झाले नाहीत असे मानिते कारण त्य्म्ही समर्थ असूनही मला आपत्ती प्राप्त झाल्या त्यावेळी माझे स्मरण दु:ख केले नाही ||१९|| भावार्थ:--- आपल्या नातेवाईकावर जर आपत्ती—संकट आले असेल तर,आपण त्यांना भेटून,विचारपूस करून,त्यांना मदत करावयास पाहिजे.मदत असी करावी कि,केलेली मदत वापस घेयू नये,कारण वापस घेण्याच्या कराराने दिल्यास व ती मदत वापस न केल्यास आपल्या मनात त्यांच्याविषयी कटुता येते,म्हणून उसणवारी न देता लागलीच ध्यावी.आपण वस्तुरूपाने जर देऊ शकत नसलो तर धीर देऊन मानसिक समाधान करून दु:ख घालवण्याचा प्रयत्न करावा.||१९|| अर्थः----हे सुर्हाद असोत ज्ञाती असोत पुत्र किवा आईबापही असोत ते ज्यंचे दैव प्रतिकूल आहे त्या स्वजानाचेही स्मरण करीत नाही ||२०|| अर्थः---तेव्हा वासुदेव म्हणाला –हे मी ,दैवाची खेळणी अशा आम्हा मनुष्यांना तू दोष मुळीच लाऊ नकोस कारण सर्व लोक ईश्वराच्या स्वाधीन आहे तो त्याच्या प्रेरणेनेच काय्तो करतो किवा दुसऱ्या कडून करवितो .||२१|| अर्थः----हे ती प्रथांचा कंसाने अतिसाय दु;ख दिलेले सर्व आम्ही दिशेदिशेकडे पळून गेलो होतो तो आताच|पुन्हा आपल्या स्तानी प्राप्त झालो आहो.|२२|| अर्थः---श्रीशुकचर्य म्हणतात हे राज त्या प्राप्त झालेल्या कुरुम मत्स्यादिक राजाचा वासुदेव उग्रासाने इत्यादिक यादवांनी यादवांनी सत्कार केला असता ते परमानंद मूर्ति श्रीकृष्णाच्या दर्शनानदाने अत्यंत सुखावले ||२३|| अर्थः---परीक्षिता! भीष्म.,द्रोणाचार्य,धृतराष्ट्र,पुत्रांसहित गांधारी,स्त्रीसहित पांडव,कुंती,सृंजय,विदुर,कृपाचार्य,||२४|| अर्थ:-----कुंतिभोज,विराट,भीष्मक,पुरुजित,द्रुपद,शल्य,धृष्टकेतु, काशीराज,||२४|| अर्थ:---दमघोष,विशालक्ष,मीथीलानरेश,मद्रनरेश,केकयनरेश,युधामन्यु,सुशर्मा,पुत्रांसहित बाल्हीकादिक जे राजे तेथे आले होते ते लक्ष्मीचे व शोभेचे केवळ र्तःण्याचे स्थान असे श्रीकृष्णाचे शरीर पाहून व त्याच्या स्त्रिया पाहून सौदर्यातीशायाने विस्मित झाले ||२६-२७|| अर्थः---नंतर राम-कृष्णांनि उत्तम सत्कार केलेले ते राजे हर्षयुक्त होऊन भगवंताने अंगीकार केलेल्या यादवांची प्रश्न्षा करू लागले की ||२८|| अर्थः-----हे भोजपते उग्रसेने राजा या मनुष्यलोकी तुझीच आपल्या जन्माचे सार्थक करून घेतले आहे कारण ज्याचे दर्शनयोगीजनानाही दुर्लभ आहे अशा भगवान श्रीकृष्णाला तुम्ही निरंतर पाहत राहा ||२९|| भावार्थ:--- ज्यांना भगवंतांचे दर्शन होते ते जीव धन्य आहेत,कारण त्यामुळे मनुष्य जीवनाचे सार्थक होते.म्हणून जीवांनी मनुष्या देहात आल्यानंतर ईश्वराचे संत—महात्म्यांचे दर्शन घ्यावावयास पाहिजे. त्या संत—महात्म्यांचा सत्संग करून धर्माचे,वेदांताचे शिक्षण घ्यावे.त्यामुळे आपले पारलौकिक हित होते.||२९|| अर्थः----केवळ त्याचे दर्शन तुम्हास घडत आहे असे नाहीतर अत्यंत दुर्लभ असे दुसरेही पुष्कळ लाभ होत आहेत ज्यांची वेदांनी वर्णन केलेली कीर्ती ,ज्यांचे चरणक्षालनोदक व ज्यांचे वाचन रूप शास्त्र हि या सर्व जगाला पवित्र करीत आहेत आंनी कालगतीने भाग्यहीन झालेली भूमि,ज्यांच्या चरण विदाच्या स्पर्शाने उत्तम शक्ती पविन आम्हाला सर्व पदार्थ जिकडून तिकडून देत आहे||३०|| अर्थ:----त्या भगवंता बरोबर दर्शन ,स्पर्शन अनुगमन गोष्टी शय्या आसन भोजन विवह साबंध व गोत्रसबंध हे ज्याचे आहे ते तुम्ही जरी नरकाचा मार्गाचअशा घरामध्ये राहत आहा तथापि त्या तुमच्या घरामध्ये स्वर्गाची व मोक्षाची इच्छा निवृत्त करणारा भगवान विष्णु स्वत प्रगत झाला आहे म्हणून तुमचे जन्म सफल झाले आहे ||३१|| भावार्थ:---पवित्र पाणी आणि वेद या जगाला पवित्र करत असतात,म्हणून तीर्थांचे स्नान करावे व संत—महात्मा यांच्या मुखातून धर्मशात्र व वेदांत शात्रांचे श्रावण करावे.तीर्थात स्नान केल्यावर पुण्य किंवा अंतकरण शुद्ध होते व धर्माशात्राने वेदांताच्या शात्राने ज्ञान होते.आपल्या पूर्व—पुण्याईने संत—महात्मा यांची भेट झाली असता आपण त्यांची सेवा करावयास पाहिजे.त्यांच्या मुखातून धर्म व वेदांत शात्राचे श्रावण करावयास पाहिजे.त्यांचा उपयोग ज्ञानासाठी करावयास पाहिजे.||३—३१|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा नंदाराजातर तेथे श्रीकृष्ण आआडीख़ यादव प्राप्त झाले आहेत असे एकूण कृष्णदिकाच्या दर्शनाच्या गोपिसः वर्तमान त्या यादावाजवल वास करण्याच्या इच्छेने गाड्यावर घातलेल्या सामानासुमाना सह वर्तमाननाच येथे प्राप्त झाला||३२|| भावार्थ:---जेथे संत—महात्मे आले असतील तेथे आपण जाऊन त्यांना भेटावयास पाहिजे.संत—महात्मा यांच्या भेटीस जातांना कांही वस्तू भेट म्हणून न्यावावयास पाहिजे.त्यांच्या मुखातून कांही शात्र श्रावण केले असता,त्यांना आपण कांही तरी वस्तू त्यांना ध्यावावयास पाहिजे.कांही देऊन कांही घ्यावे,असा नियम आहे.||३२|| अर्थ:---त्या नंदाला पाहून हर्ष पावलेले यादव,जसा प्राण आला असतां इंद्रिये उठून त्याला सामोरी जातात त्याप्रमाणे सामोरे जाऊन,बहुतकाळाने दर्शन झाल्यामुळे भेटण्याविषयी त्वरा झालेल्या त्यांनी,त्या नंदाला दृढ आलिंगन केले||३३|| अर्थः---वसुदेव तर नंदाला आलिंगन करून संतुष्ट होऊन,कंसाने दिलेल्या क्लेशांचे व आपण पुत्र गोकुळांत ठेविले होते त्याचे स्मरण करीत असता,प्रेमाने अतिशय विव्हळ झाला||३४|| अर्थः---हे राजा,कृष्णराम तर आपले मातापिता अशा त्या यशोदानंदांना नमस्कार व आलिंगन करून,प्रेमाच्या योगाने कंठ दाटून आल्यामुळे कांहीच बोलण्यास समर्थ झाले नाहीत तर उगीच राहिले||३५|| अर्थः---तेव्हा नंदराजाने व महाभाग्यवती यशोदेने त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेऊन बाहूंनी आलिंगन केले आणि विरहशोकाचा त्याग करून नेत्रांतून आनंदाश्रू ढाळीले||३६|| अर्थः---नंतर,रोहिणी व देवकी ह्या दोघेजणी,यशोदेला आलिंगन करून,त्या यशोदेने केलेल्या पुत्रलालनादिक मैत्रीचे स्मरण करून सद्रितकंठ झालेल्या त्या म्हणाल्या की,-||३७|| अर्थः---हे वज्रेश्वरी ,यशोदे सुटण्याचे कारण झाले असताही न सुटणाऱ्या तुझ्या उभायान्त्याच्या मैत्रीला कोण बरे विसरणार आहे ?कोणीच नाही कारण इंद्राहे ऐश्वर्य प्राप्त झाले असताही य्यालोकी ज्या मैत्रीचा प्रत्य्पकार करिता येणार नाही ||३८|| अर्थः----त्ती मैत्री अशी की –हे यशोदे ज्यांनी आईबाप पहिले सुध्द नाहीत अशा ह्या आमच्या रामकृष्णपुत्रांस तुम्हाजवळ ठेविले असतां,जशा पापण्या नेत्रांचे रक्षण करितात त्याप्रमाणे तुम्ही यांचे रक्षण केले आहेत हे तुम्हां आईबापापांसूनच इच्छित असलेला खाऊ,खेळणी,वाढदिवसवगैरे उत्साह,लालन (चुंबनादिक) व पालन ,पावोन निर्भयतेने गोकुळात राहिले आहेत .खरे आहे की स्स्त्पुरुशाना हआपला व परकीय अशी भेद बुद्धी मुळीच नाही ||३९|| भावार्थ:---यशोदा व नंदाबाबांनी श्रीकृष्ण व बलरामदादांचे लहान वयापासून रक्षण व संवर्धन व उत्कर्षासाठी बरेच कष्ट घेऊन प्रेम दिले होते.नंदाबाबा व यशोदा यांच्या दृष्टीस आपला—परका असा भेदभाव नसून समभाव होता.आपणही जीवन जगात असतांना आपला—परका असा भेदभाव न ठेवता समभाव ठेवावा.||३९|| अर्थः---श्रीशुकाचर्य म्हणला –हे राजा ज्या गोपी कृष्णाला पाहण्यासाठी प्रवृत्त झालेल्या आपल्या दृष्टीनं व्यवधायक पापण्या करणाऱ्या ब्रम्हदेवाला शिव्या देत असत त्या सर्व गोपीही बहुत काळानंतर भेटलेल्या आवडत्या श्रीकृष्णाला पाहून नेत्र द्वार पाहून हृदयामध्ये प्रवेशित केलेल्या त्याला दृढ आलिंगन करून ,नित्य एकाग्र चित्त करणाऱ्या योग्यानाही दुर्लभ अशा भगवथद्रुपतेला पावल्या ||४०|| भावार्थ:--- श्रीकृष्ण यांना बऱ्याच दिवसांनी गोपींनी पाहिल्यामुळे—दृष्टी दर्शन झाल्यामुळे त्यांच्या पापण्या नैसर्गिक कारणामुळे खालीवर होत होत्या,त्यामुळे श्रीकृष्ण तेवढ्यापुरते दृष्टीआड होत असल्यामुळे बेचैन होत असत व ईश्वरास दोष देत असत.भावार्थ एवढ्या त्या भगवंतांस पहायास उत्सुक झाल्या होत्या—भावूक झाल्या होत्या.श्रीकृष्णास मनोमन आलिंगीन देऊन तन्मय होऊ लागल्या.एवढ्या त्या ध्यानमग्न झाल्या होत्या.भगवंतांचे सौंदर्ये एवढे आनंदमय असल्यामुळे त्यांची ही असी अवस्था झाली होती.त्याचप्रमाणे आपली भगवंतांविषयी अवस्था होईल.त्यासाठी आपण भगवंतांविषयी निष्काम भक्ती करून अंत:करण शुद्ध करावयास पाहिजे.त्यामुळे भगवंतांचे दर्शन होईल.दर्शन झाल्यानंतर आपणास भगवंतांचे दर्शन होण्यासाठी अधिक प्रयत्न करूत.इतके अधिक प्रयत्न करूत कि,त्या प्रयत्नाने भगवंत दर्शन देईलच.अधिक प्रयत्न करण्याचे कारण ते रूपच तेवढे आकर्षक आहे.आनंद देणारे आहे.||४०|| अर्थः----भगवान श्रीकृष्णाही आत्मभाव पावलेल्या त्या गुपिना एकीकडे भेटून दृढ आलिंगन करून व कुशल प्रश्न विचारून हास्य करीत असे भाषण केले की ||४१|| अर्थः---हे सख्यांनो आपल्या आईबापाचे वैगरे कार्य कार्र्ण्याच्या इच्छेने गोकुळात मथुरेत गेलेल्या व तेथे शत्रू पक्ष्च्या नाश विषयी आसक्तचित्त होऊन फार दिवसपर्यंत राहिलेल्या आमचे तुम्ही स्मरण करिता काय||४२|| अर्थः---बरे आम्ही अकृज्ञत (केलेले उपकार स्मरण ना करणारे ) अशी थोडी शंका मनात आणून तुम्ही आमची निंदा तर करीत नाहीना ?काय करावे भगवान प्राणिमात्राचे संयोग वियोग करितो हि गोस्त खरी आहे ||४३|| अर्थः----जसा वर,मैघपळ,तृण,कापूस व धुरळा यांचे एकत्र संयोग करून लागलेच वियोग करितो तसेच ईश्वर प्राणिमात्रांचे करितो||४४|| भावार्थ:---एकमेकांच्या संयोग किंवा वियोगास कारण,ज्याचे—त्याचे कर्म असते.म्हणून सुख किंवा दु:ख मानावयाचे कारण नाही.||४४|| | मयि भक्तिर्ही भूतानाममृततत्वाय कल्पते | दिष्ट्या यदासीन्मत्स्नेहा भवतीनां मदापनः ||४५|| अर्थः---अशा स्थितीत तुम्हांला माझ्या वियोगाने माझा अतिशय प्रेमा उत्पन्न झाला माझा स्नेह तुम्हांस प्राप्त झाला हि एक मात्र मोठी चांमगली गोष्ट झाली; कारण,माझ्या विषयीची केवळ भक्तीच उत्पन्न झाली तरी ती,प्राण्यांना मोक्ष देण्यास समर्थ होत्ये,मग माझी प्राप्ती करून देणारा माझा स्नेह तुम्हांस प्राप्त झाल हि किती चांगली गोष्ट आहे ? ||४५|| भावार्थ:--- तुमच्या पूर्व जन्मातील निष्काम भक्तीमुळे व या जन्मातील निष्काम भक्तीमुळे सुदैवाने भगवंतांचे प्रेम मिळाले आहे.तुम्हा—आम्हास भगवंतांचे प्रेम मिळाले नाही,कारण तुमचे—आमचे पूर्वजन्मातील निष्काम भक्ती व या जन्मातील निष्काम भक्ती भगवंतांचे प्रेम मिळण्यास अपुरी पडलेली आहे.म्हणून आपण या जन्मात निष्काम भक्तीचे अधिक प्रयत्न करून भगवंतांचे दर्शन घेण्याचा संकल्प करू या.माझे दर्शन झाल्यानंतर जीवास मोक्ष मिळतो.||४५|| अर्थः---आता,तूं आहेस?की ज्याला आम्ही स्नेहानेच पावूं असे म्हणाल त्र-स्त्रिया हो,जशी-पृथिवी,उदक,तेज,वायू व आकाश पंचमहाभूते,घट,सैंधव इत्यादिक पदार्थांच्या आदी,अंती,बाहेर व अंत सर्व रूपांनी आहेत त्याप्रमाणे मीही सर्व पदार्थांच्या आदी,अंती,बाहेर व अंत सर्वरूपांनी आहे||४६|| भावार्थ:---जसे पाण्यात साखर आत—बाहेर सर्व बाजूंनी व्याप्त असते,म्हणून साखरयुक्त पाणी गोड असते.त्याच्रमाणे सर्व पदार्थात परमात्मा व्याप्त असतो.म्हणून सुखरूप असतो..म्हणून तो सुखरूप---आनंदयुक्त असलेला परमात्मा प्राप्त करून त्याचा अनुभव हेऊन आनंदरूप व्हावे व जन्म—मरण निवृत्त करावे.||४६|| | एवं ह्येतानि भूतानि भूतेष्वात्माssत्मना ततः | उभयं मय्यथ परे पश्यताभातमक्षरे ||४७|| अर्थः----आता चतुर्विध भूतग्राममध्ये ,त्यचा भोक्ता आत्य्माचा आद्यातादिरूपी आहे व त्यचा सर्वव्यापकचे ठिकाणी भुते राहतात असे असता ,आम्हाला तुझी प्रप्री कोठून होणार असे म्हणाला तर –जशी घातातिक कार्ये पृथिवीव्यादिरूपी आहेत त्याचा त्याचप्रमाणे जरावायू ,स्वेदज ,अंदाज व उन्दीज हि चार प्रकारचीही शरीरे आपल्या कारणरूप पंचमहाभूता मध्येच राहतात भोक्या ,आत्म्याचे ठिकाणी राहत नाहीत आत्मा मात्र त्या भूतामध्ये भोक्तुरुपाने व्यापून आहे कारणरूपाने नाही .यास्तव भूतभौतिकरूप भोग्या व भोक्त्या आत्मा हि दोन्ही परिपूर्ण रु[ मज परब्रम्हाचे ठिकाणी भासत आहेत ,खरी नाहीत असे तुम्ही पहा म्हणजे झाले ||४७|| भावार्थ:--- परमात्मा हा जड व जीवाच्या पलीकडील नाम—रूपरहित असलेला आहे,म्हणूनच आनंदरूप आहे.म्हणून तोच प्राप्त करून घ्यावा. ||४७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे श्रीकृष्णाने आत्मतत्त्वाचा उपदेश करून बोध केलेल्या त्या गोपी,आत्मात्त्वाच्या वारंवार चिंतनाने लिंगशरीराचा नाश होऊन त्या कृष्णस्वरूपाप्रतच पावल्या||४८|| भावार्थ:--- भगवंतांनी गोपीस वेदांतांचा उपदेश केला व गोपींनी त्याचे मनन व निधीध्यासन केले---वारंवार स्मरण केले म्हणून त्यांचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंतांसी एकरूप होऊन त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप झाल्या,तसे आपणही श्रावण,मनन,निधीध्यासन करून—सतत—सतत स्मरण करून, पंचकोश नष्ट करून आणि भगवंतांसी एकरूप होऊन आपले जन्म—मरण निवृत्त करून सुखरूप होण्याचा प्रयत्न करावा.यात आपलेच परमाहित आहे.||४८|| अर्थः---आणि म्हणाल्या की,-हे कमलनाभा,अगाधबोध अशा योगेश्वरांनीही हृदयामध्ये चिंतन केलेले आणि आणि संसार रूप कुपांत पडलेल्या पुरुषांना त्यांतून निघण्याविषयी आश्रयरूप असे तुझे चरणकमळ,घरादाराचे सेवन करणाऱ्याहि आमच्या मनांत निरंतर प्रकट राहो; म्हणजे तुझ्या कृपेने आम्हांस प्राप्त झालेला हा तुझा साक्षात्कार पुन्हा घरच्या व्यासंगाने कधीही नाहीसा होऊं नये||४९|| भावार्थ:--- संसाररूपी विहिरीतून बाहेर पाडण्यासाठी आपला—परमात्म्याचा आश्रय घेतात म्हणजे आपल्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात.म्हणून आपले चरणकमल प्रपंच्यातील कामे करत असतांना आपले स्मरण राहो,एवढी आमच्यावर कृपा करावी.असी कृपा झाली असता आमचे जन्म—मरण निवृत्त होतील.||४९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील उत्तरार्धात वृष्णीगोपसंगमनामक हा ऐंशीव्या अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ |८३---- १२--भगवंतांच्या पट्टरान्यांशी द्रौपदीचा संवाद---१--- _________________________________________________________________________________________________________________________ आतां ह्या त्र्याऐंशीव्या अध्यायामध्ये,स्त्रियामध्ये कृष्णकथोत्साह प्रवृत्त झाला असता,श्रीकृष्णाच्या स्त्रियांनी,द्रौपदीला आपआपले विवाह सांगितले,अशी वर्णन केली आहे _________________________________________________________________________________________________________________________ | तथानुगृह्य भगवान् गोपीनां स गुरुर्गतिः | युधिष्ठीरमथापृच्छत् सर्वांश्च सुहृदोsव्ययम् ||१|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा गोपीना आत्मत्वाचा उपदेश करणारा गुरूव त्याची गति अशा त्या श्रीकृष्णाने त्यांनी प्रथांना केलेल्या प्रकाराला तथास्तु असे म्हणून त्याच्यावर अनुग्रह करून नंतर त्याने धर्मराजावगैरे सर्वही सुहृदांना कुशलप्रश्न केले ||१|| भावार्थ:--- गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली.आपणही निष्काम साधना करून भगवंतांची कृपा संपादन करावी.त्यामुळे आपले परम हित होते.श्रीकृष्णांनी युधिष्ठिरास आणि अन्य संबंधितांना खुशाली विचारली.आपणाहो कोण्याच्या भेटीला गेल्यानंतर संबंधीतांना खुशाली विचारावी.||१|| अर्थः---याप्रमाणे लोकनाथ श्रीकृष्णे सत्कारपूर्वक प्रश्न केलेले ते पाण्डवादिक ,त्यंच्या चरणाच्या दर्शनाने निष्पाप व हर्षितचित्त होऊन त्यसा श्रीकृष्णास म्हणाले की -||२|| अर्थः----हे प्रभो देहधार्याना देहाभिमान उत्पन्न करणारी जी अविद्या तिचा नाश करणाऱ्या व व्यास्दिक सत्पुरुषाच्या मनापासून मुखाव्दार बाहेर प्रकट झालेल्या तुझ्या चरण कमळ संबंधी कथामुताचे एखादेवेलीतरी जे पुरुष आपल्या कारणरूप पात्रांनी यथेच्छ प्राशन करितात त्यांचे अकल्याण कसे बरे होईल ?मुलीचा होणार नाही||३|| भावार्थ:--- संत—महात्मा यांच्या मुखातून जेव्हा चरणारविंदांचा मकरंद म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान बाहेर पडून जे लोक श्रावण करतात,तेव्हा त्यांचे मंगल—परम--कल्याण होते.त्यामुळे परमात्म्याचे विस्मरण न होता सतत—सतत स्मरण होते. म्हणून सतत—सतत कथामृताचे श्रवण करावे.||३|| अर्थः---यास्तव आपल्या स्वरूप प्रकाशाने ज्याचे ठिकाणी बुद्धीने केलेल्या जाग्रत्स्वप्नसुसुप्तीरूप तिन्ही अवस्था नाहीश्या झाल्या आहेत असा सर्व आनंदचारसमुदाय रूप अपरीच्चीन्न कुंठीत न होणाऱ्या चैतन्य शक्तीने ,युक्त कालच्या योगाने नाश पावू लागलेल्या वेदाच्या रक्षणा कारीता योगमायेने मनुष्यावातार धारण करणारा आणि परम हन्शीची गति अशा तुला आम्हीं नमस्कार करितो ||४|| भावार्थ:--- जागृत्ती,स्वप्न,सुषुप्ती या देहाच्या तीनही अवस्था परमात्म्यापर्यंत जात नाहीत,कारण परमात्ना आत्मा—सार—सुखरूप व नित्य आहे तर देहाच्या तीनही अवस्था या आनात्मा,असार—दु:खरूप व अनित्य आहेत.काळाच्या ओघात वेदांचा ऱ्हास होत आहे,म्हणून आपण धर्माची स्थापना करण्याकरिता व दुष्ठांचा संहार करण्याकरिता आपण मानवी अवतार धारण केलेला आहे.आपण परमात्मा स्वरूप आहात,म्हणून आपणास नमस्कार करत आहोत.आपणही नमस्कार करावा.||४|| अर्थः---श्रीशुचार्य म्हणाला –हे राजा याप्रमाणे पवित्र कीर्ती पुरुषाचा मुकुटमपी अशा त्या श्रीकृष्णाची लोक स्तुति करीत असतात त्यावेळी यादवच्या व कौरवाच्या स्त्रिया एकत्र जमून त्रैलोक्यामध्ये वर्णन केलेल्या श्रीकृष्णाच्या कथा परस्पर सांगू लागल्या त्या मी तुला वर्णन करितो श्रावण कर ||५|| भावार्थ:--- आपण एकमेकास भेटल्यानंतर संसारातील आवश्यक तेवढे बोलावे व आवश्यक बोलालाल्यानंतर भगवंताविषयी बोलावे.भगवंतांचे चारित्र,भगवंतांच्या कथा, भगवंतांच्या लीला,भगवंतांचे स्वरूप,संत—महात्मा यांची कथा--चरित्रे,याविषयीच बोलावे,ऐकावे तर इतर कांही बोलू नये व ऐकू नये.असे संस्कार असावेत.||५|| अर्थः---द्रौपदी म्हणालीः---हे रुक्मिणी ,हे भाद्रेस ,हे जाम्बवती ,हे कौशल्य ,हे सत्यभामे हे कालिंदी हे मित्र वंद हे रोहिणी ,हे लक्ष्मने हे कृष्णपत्नी हो ,तुम्ही मला हे सांगा की आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करणाऱ्या अच्युत भगवान स्व्ह्रीकृश्नाने स्वत तुमचे पाणिग्रहण कसे केले ?||६-७|| अर्थः----तेव्हा रुक्मिणी म्हणाली मलाए शिशुपालास मिळवून देनुयाकरिता जरासंधादिक राजे ,हातात धनुष्ये धारण करून सिद्ध झाले असता त्यावेळी अजेय अशा वीराच्या मस्तकावर मुकुटासारखे जुअच्या चर्नक़्चे राज:कान आहेत ,म्हणजे ज्यांनी त्यंच्या मस्तकी पाय दिले आहेत अशा श्रीकृश्नानेव ,सिह जसब बकर्याच्या समुदायातून आपला भाग घेवून जातो त्यापोरमाणे ,आपला भाग अशा मला आणिले आहे .त्या श्री निवास रूप भगवंताच्या चरणाची पूजा मला निरंतर घडो||८|| भावार्थ:--- रुक्मिणीने भगवंतांबरोबर विवाह केला,कारण भगवंतांच्या चरणांचीच सेवा मिळावी,हा तिचा उद्ध्येस होता.आपणास भगवंतांचे निष्काम भक्त होऊन रुक्मिनिपेक्षा अधिक सेवा करता येते,म्हणून आपण भगवंतांचे निष्काम भक्त होऊन चरणकमलांची सेवा करण्याचा परम लाभ घ्यावा.||८|| अर्थः---सत्यभामा म्हणालीकी,आपल्या प्रसेनबंधूचा वध झाला म्हणून संतप्तह्रदय झालेल्या माझ्या पित्या सन्नाजीताने,आंगी चिकअविलेले अपयश घालविण्याकरिता जेव्हा श्रीकृष्णाने,जांबवंताला स्यमंतक रत्न आणून तेव्हां त्याच्यावर खोटी घातलेल्या अपराधाने भ्यालेल्या त्या माझ्या-पित्याने,दुसऱ्यांस देऊं केलेल्याही मला त्या श्रीकृष्णास अर्पण केले आहे||९|| अर्थः---जांबवती म्हणाली-माझ्या पित्य जांबवंताने,हा प्रभू श्रीकृष्ण,आपला स्वामी व कुळदैवत राम आहे असे न जाणता,याच्याबराबर सत्तावीस दिवसपर्यंत युद्ध केले नंतर परीक्षा झालेल्या त्याने,हा रामच आहे असे जाणून त्याचे पाय धरिले आणि त्याला प्रसन्न करून घेऊन मण्यासहवर्तमान मला पूजनरूपत्वेकरून समर्पण केले आहे,ती मी या भगवंताची दासी आहे||१०|| अर्थः---कालिंदी म्हणाली-मला,आपल्या चरणस्पर्शाच्या इच्छेने,हि तप करीत आहे असे जाणून,ज्याने आपल्या मित्र अर्जुनाबरोबर माझ्याजवळ येऊन माझे पाणी ग्रहण केले,त्या भगवंताची घरांतील केर काढणारी दासी मी आहे||११|| भावार्थ:--- भगवंतांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून तिने तप केले,त्या तपाने भगवंत प्रसन्न झाले आणि तीस नेण्याकरिता आले व घेऊन गेले. आपणही सात्विक पती मिळावा म्हणून कांही तप—अनुष्ठान केले असता सात्विक पती मिळून त्या सात्विक पतीची सेवा करावयास मिळते.सात्विक पतीची सेवा केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते.म्हणून सात्विक गुणसंपन्न असलेले पती करावा.सात्विक पती मिळण्यासाठी सात्विक अनुष्ठान करावे .||११|| अर्थ---मित्रविंदा म्हणाली-ज्या लक्ष्मीनिवास भगवंताने,माझ्या स्वयं वरात येऊन राजांना तशाच अपकार करणाऱ्या माझ्या भावांना जिंकून,जसा सिंह श्वानाच्या झुंडीतून आपला भाग घेऊन जातो त्याप्रमाणे मला आपल्या द्वारका नगरीत नेले;त्या भगवंताला चरणाचे क्षालन करण्याचे काम मला जन्मोजन्मी घडो||१२|| भावार्थ:--- मित्राविंदाने भगवंतांचे जन्मोजन्मी चरणांची एव करण्याचे भाग्य प्राप्त व्हावे म्हणून तप—अनुष्ठान केले होते,म्हणून त्याचे फळ म्हणून भगवंतांनी तिचा स्वीकार केला.तसेच आपणसुद्धा कांही तप—अनुष्ठान करून जन्मोजन्मी सात्विक पती मिळावा म्हणून प्रयत्न करावा व सात्विक पतीची सेवा करावी.||१२|| अर्थः---सत्य म्हणाली-माझ्या पित्याने राजांच्या बळाची परीक्षा करण्याकरिता अतिशयित बळी,पराक्रमी व तीक्ष्णशिंगे धारण करणारे व वीरपुरुषांच्या दुरभिमान घालविणारे असे जे सात वृषभ बाळविले होते,त्यांना या भगवंताने मोठ्या त्वरेने दमवून,जसे बालक शेळीच्या कोकरांना बांधून ठेववितात तसे बांधून ठेविले||१३|| अर्थः---याप्रमाणे पराक्रम दाखविणे हेंच जीवे मौल्य आहे अशा मला,ज्या भगवंताने,माझ्या पित्याने दासीसहित चतुरंग सैन्य आंदण दिले ते घेऊन,मार्गात निरोध करणाऱ्या राजांस जिंकून द्वारकेस आणिले,त्याचे दास्य मला घडो||१४|| अर्थः---भद्रा म्हणाली – माझ्या पित्याने,माझे चित्त श्रीकृष्णाचे ठिकाणी आसक्त आहे असे जाणून आपल्या मामाचा पुत्र अशा त्या श्रीकृष्णाला,आपणच बोलावून आणून त्यास अक्षौहिणी सेना व संख्या यांसह वर्तमान मला अर्पण केले आहे||१५|| अर्थः---आतां,कर्मांच्या योगेकरून कोठेंही भ्रमण करीत असणाऱ्या मला जन्मजन्माचे ठिकाणी या भगवंताची चरणशुश्रुशाच घडो.कारण,जन्माला आलेल्या जीवात्म्याचे कल्याण होण्याचे साधन मुख्य तेंच आहे||१६|| अर्थः---लक्ष्मणा म्हणाली- हे द्रोपदी,नारदाने वारंवार गायन केलेले श्रीकृष्णाचे जन्म व कर्म ऐकून,अहो! लक्ष्मीनेही इंद्रादीलोकपालांना सोहून भगवंतालाच वारिले आहे,जसा पुष्कळ विचर करून,या लक्ष्मणेसारखच माझेही चित्त श्रीकृष्णाचे ठिकाणी आसक्त झाले होते||१७|| भावार्थ:--- लक्ष्मणा हिने नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांच्या लीलांचे व अवतार कार्याचे वर्णन ऐकले होते म्हणून भगवंतानाच वारले—पती म्हणून स्वीकार केला. आपणही आपणास सात्विक पती मिळावा म्हणून त्यांची वास्तविक माहिती इतराकडून ऐकूनच पती म्हणून स्वीकार करावा.असे न केले तर दुर्व्यसनी पती मिळतो. दुर्व्यसनी पती मिळाला तर आपले व मुलाबाळांचे आयुष्यभर जीवन दु:ख भोगावे लागते,म्हणून सात्विक पतीचीच निवड करावी.त्यातच आपले हित होते.||१७|| अर्थः---हे साध्वी,तेव्हा कन्येठिकाणी दयाळू अशा बृहत्सेननामक माझ्या पित्याने,माझा अभिप्राय जाणून,श्रीकृष्णाची प्राप्ती होण्याकरिता उपाय केला||१८|| अर्थः---तो असा की,हे द्रोपदी,जसा तुझ्या स्वयंवरामध्ये तुझ्या पित्याने तुला अर्जुनास देण्याच्या इच्छेने मत्स्य केला होता,तसाच माझ्या पित्यानेंहि मत्स्य केला होता.परंतु तुमचा मत्स्य केवळ बाहेरूनच आच्छादित होता,आंतून नव्हता,म्हणून आंतून खांबाजवळून वर दृष्टि आणी वर लक्ष्य असे असल्यामुळे श्रीकृष्णावाचून दुसऱ्या कोणासही भेदन करण्यास येण्यासारखा नव्हता||१९|| अर्थः---हे मत्स्ययंत्राचे करणे ऐकून,सर्व शस्त्रअस्त्रांचे तत्त्व जाणणारे हजारो राजे,आपल्या उपाध्यायांसहवर्तमान सर्वदिशांकडून माझ्या पित्याच्या नगरास प्राप्त झाले||२०|| अर्थः---त्या सर्वांचे,त्यांच्या पराक्रमाप्रमाणेच व योग्यतेप्रमाणे माझ्या पित्याने माझ्या पित्याने सत्कार केले असता,माझ्यावर चित्त ठेवणाऱ्या त्यांनी,सभेमध्ये मत्स्ययंत्रांचा भेद करण्याकरिता बाणासहित धनुष्य ग्रहण केले||२१|| अर्थः---त्यात कितीएकांनी धनुष्य हातांत घेऊन ते सज्ज करण्यास असमर्थ झाल्यामुळे तसेच टाकून दिले,कितीएक तर धनुष्य सज्य करून व त्याची दोरी मनगटापर्यंत ओढूनही पुढे सामर्थ्य नसल्यामुळे हातांतून निसटलेल्या त्याच धनुष्याने ताडित असता खाली पडले||२२|| अर्थः---जरासंध,अंबष्ठ,शिशुपाल,भीमसेन,दुर्योधन,कर्ण अशा वीरांनी धनुष्य उचलून त्यास गुण चढविला परंतु त्या लक्ष्याची स्थिती त्यास समजेना म्हणून त्यांचा प्रयत्न फुकट गेला||२३|| अर्थ:---यत्न करणाऱ्या अर्जुनाने त्र,पाण्यांत घडलेले मत्स्याचे प्रतिबिंब पाहून,त्याची स्थिती व जागा जाणून,बाणही सोडीला परंतु त्या बाणाने त्याचा भेद केला नाही,केवळ त्यास स्पर्श मात्र केला||२४|| अर्थ:---याप्रमाणे ते अभिमानी सर्व राजे,मानभंग पावून यंत्रभेद करण्यापासून निवृत्त झाले असता,भगवान श्रीकृष्णाचे धनुष्य घेऊन त्याला गुण चढवून,नंतर सहजलीलेने त्याचे ठिकाणी बापांचे संधान करून,सूर्य मध्यान्हकाळी आला असता,सर्वार्थसाधक अशा अभिजित मुहूर्तावर,पाण्यांत प्रतिबिंबात झालेल्या मत्स्याला एकवार पाहून,बाणाचेयज्ञा योगाने ते यंत्र तोडून पहिले||२५-२६|| अर्थः---त्यावेळी स्वर्गावर व भूमीवर दुंदुभी वाजूं लागले जयजयकारशब्दाने युक्त व हर्षाने विव्हळ झालेले देव,भूमीवर पुष्पवृष्टी करूं लागले||२७|| अर्थः---त्यावेळी नवी भरजरींची रेशमी दोन उत्कृष्ट वस्त्रे एक नेसून व एक पांघरून वेणीवर फुलांच्या माळा घातलेली व सलज्ज हास्ययुक्त असलेली मी,सुवर्णाने देदिप्यमान अशी रत्नाची माळ हातात घेऊन,मधुरशब्द करणारी नुपुरे घातलेल्या पायांनीच चालत त्या रंगसभास्थानामध्ये प्रविष्ट झाल्ये||२८|| अर्थः---आणि कृष्णाचे ठिकाणी आसक्तचित्त असलेल्या त्या मी,ज्याचेठिकाणी उत्कृष्ट केशभार व कुंडलांच्या कांतीने युक्त असलेले गाल चमकत आहेत असे आपले सुख वर करून,संताप घालविणाऱ्या हास्ययुक्त कटाक्षपातांनी चारी बाजूंनी बसलेल्या राजांकडे सावकाशपणे पाहात पाहात श्रीकृष्णाजवळ जाऊन आपल्या हातांतील माळ त्या श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली||२९|| अर्थः---त्याबरोबर मृदंग,पखवाज,शंख,ढोल,नगारे इत्यादी इत्यादी वाद्दे वाजू लागली.नट आणि नर्तकी नाचू लागल्या.गवई गाऊ लागले.||३०|| अर्थः---हे द्रौपदी,याप्रकारे भगवान समर्थ श्रीकृष्णाच्या मी वरिले असता,कामातुर झालेल्या व श्रीकृष्णाशी स्पर्धा करणाऱ्या मोठमोठया राजांनी,ते सहन केले नाही||३१|| अर्थ:---इतक्यांत भगवंताने,उत्कुष्ट चार घोडे जुंपलेल्या रथावर मला बसवून,आपण कवचादिक धारण केली आणि चतुर्भुज होऊन,दोन हातांनी मला आलिंगन करून व दुसऱ्या दोन हातांनी धनुष्यबाण ग्रहण करून युद्धाविषयी तयार राहिला||३२|| अर्थः---हे द्रौपदी,त्यावेळी सुवर्णाने बांधविलेला तो रथ,दारूक सारथ्याने चालविला असतां,जसा हरिणाच्या देखत सिंह आपला भाग घेऊन जातो त्याप्रमाणे सर्व राजांच्या देखत श्रीकृष्ण मला घेऊन निघाला||३३|| अर्थः---तेव्हा धनुष्ये उचलून युद्ध करण्यास तयार झालेले ते कितीएक राजे,जसे कुतरे सिंहाचा निषेध करण्याकरिता त्याच्या मागून धावतात त्याप्रमाणे मार्गामध्ये श्रीकृष्णाचा रोध करण्याकरिता त्याच्या मागून धावू लागले||३४|| अर्थः---त्यापैकी कितीएक राजे युद्धांत श्रीकृष्णाच्या शार्गधनुष्यापासून सुटलेल्या बाळसमूहांनी हात,पाय व कंठ तुटून मरूनच पडले.बाकीच्या काही एकांनी युद्ध करावयाचे सोडून देऊन पलायन केले||३५|| अर्थः---नंतर,जसा सूर्य अस्ताचलास जातो त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारकेस गेला.ती द्वारका-सूर्याला आच्छादन करणाऱ्या ध्वजा उभारून आणि विचित्र तोरणे बांधून अतिशयकरून अलंकृत केलेली असून सगळ्या पृथिवीवर व स्वर्गावर नावाजलेली होती||३७|| अर्थः---माझ्या वडिलांनी सुहृद,संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्रे,अलंकार,बिछाने,आसने आणि विविध प्रकारची सामाने देऊन सन्मानित केले.||३७|| अर्थः---भगवान सर्व प्रकारच्या संपत्तींनी परिपूर्ण होते,तरीसुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी,सर्व संपत्ती,हत्ती,रथ,घोडे तसेच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्रे समर्पण केली.||३८|| अर्थः---हे द्रौपदी,हा रुख्मिण्यादिक आम्ही आठही जणांनी,जन्मांतरी सर्वसंगणीवृत्ती,वैराग्य व तप हि आचरण केली होती,म्हणून या जन्मी,आम्ही त्या आत्माराम साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या घरच्या दासी झालो आहो||३९|| भावार्थ:--- भगवंतांच्या सर्वच पत्न्यांनी पूर्व जन्मात व वर्तमान जन्मात खूप तप केल्यामुळे भगवंतांबरोबर विवाह संपन्न झाला.त्यांचे जीवन सुखमय झाले.त्याचप्रमाणे आपले जीवन सुखी जाण्यासाठी सात्विक पती मिळण्यासाठी,द्र्व्यसनी न मिळण्यासाठी सात्विक तप,व्रत—वैकल्य,अनुष्ठान,उपवास इत्यादी सात्विक साधना करून आपल्या साध्यापर्यंत जाण्याचा आवश्य प्रयत्न करावा.असा प्रयत्न न केला तर,मग आपणास दुर्व्यसनी पती मिळेल व जन्मभर आपल्या कुटुंबातील मुलाबाळांना व आपणास भोगावयास मिळणार.याकरिता आपणही सात्विक संस्कार घेऊन,सात्विक कार्य करत राहा.सात्विक कथा,सात्विक ग्रंथांचे पारायण—श्रावण करा.||३९|| अर्थः---सोळा हजार एकशे स्त्रिया म्हणाल्या,- भौमासुराने,दिग्विजयाचेवेळी जिंकलेल्या राजांच्या आम्हां कन्यांना कोंडून ठेविले आहे असे जाणून,पूर्ण काम अशाही ज्या श्रीकृष्णाने,त्या भौमासुराला सैन्यासहवर्तमान युद्धांत मारून बंदीगृहातून सोडविले आणि संसारापासून मुक्त करविणाऱ्या आपल्या चरणकमलांचे वारंवार स्मरण करणाऱ्या त्या आमचे पानिग्रहन केले||४०|| अर्थः---हे साध्वी,आम्ही इंद्र पद सार्वभौमपद,इंद्रपद त्या दोन्ही पदांचे भौगवैभव,आनिमादी सिद्धी,ब्रम्हपद,मोक्ष किंवा सलोकता इत्यादिक मुक्ति यांची मुलीचा इच्छा करीत नाही :तर त्या भगवंताचे ब्राम्हदिकांनी सेव्ह अशा लक्ष्मीच्या स्तन संबंधी केशराने सबंध युक्त झालेले जे सर्वोत्कृष्ट चरणरज तेच मस्तकाने धारण करण्याची इच्छा करितो ||४१-४२|| अर्थः---आता अतिदुर्लभ असे चरण राज तुम्ही का इच्छिता असे म्हणशील तर भक्तवात्सल्यामुळे गाई चारणाऱ्या त्या महात्म्या चार्न्राजाला व पद्स्पर्षाला,जसे गोप गोपी ,भिल्लिणी तरून व वाल्लीसुद्धा इच्छितात त्याप्रमाणे आम्हीहि इच्छितो .येणे करून भाग्त्पर असणार्यांना ते चरणरज अतिसुंदर आहेअसे सुचविले ||४३|| | व्रजस्त्रीयो यद् वान्छन्ति पुलीन्द्दस्तृणवीरुधः | गावश्चारयतो गोपाः पादस्पर्शं महात्मनः ||४३|| भावार्थ:--- भगवंतांचे चरण स्पर्श आपणास व्हावेत म्हणून गवत,वेली,झाड—झुडपेसुद्धा अपेक्षा ठेऊन जीवन जगत असत.आपणास तर मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे,म्हणून आपणास भगवंतांची वाङमय सेवा करण्याची म्हणजे ज्ञानदानाची सेवा करावयास पाहिजे.त्यासाठी तसा प्रयत्न करावा.||४३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कदातीलउत्तरार्ध कृष्णाविवाहनिरुपणनामकहा त्र्याऐंशीवा अध्याय समाप्त झाला || _________________________________________________________________________________________________________________________
|८४--- १३---वसुदेवांचायज्ञोत्सव---१--- _________________________________________________________________________________________________________________________ आतां ह्या चवऱ्याऐशीव्या अध्यायामध्ये ऋषीचा समागम झाल्यावर वसुदेवाच्या यज्ञाचा उत्साह व संबंधिलोकांची पाठवणूकवगैरे कथा वर्णन केली आहे _________________________________________________________________________________________________________________________ | श्रीशुक उवाच:--- | श्रुत्वा पृथा सुबलपुत्र्यथ याज्ञसेनी माधव्यथ क्षितीपपत्न्य उत स्वगोयः| | कृष्णेsखिलात्मनी हरौ प्रणयानुबन्धं सर्वा विसिस्म्युरलमश्रुकलाकुलाक्ष्यः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे कुंती,गांधारी,द्रौपदी,सुभद्रा तशाच राजांच्या स्त्रिया व कृष्णाच्या भक्त अशा गोपी,यांनी रुख्मिणीवगैरे कृष्णस्त्रियांचे सर्वात्मा हरि श्रीकृष्णाचे ठिकाणी प्रेमाने पारतंत्र्य असलेले भाषण श्रवण करून,त्या सर्वही आनंदाश्रूंनी पूर्णनेत्र होऊन विस्मय पावल्या||१|| भावार्थ:--- भगवंतांच्या पत्न्या यांना भगवंतांबदल अलौकिक प्रेम होते असे कुंती,गांधारी,द्रोपदी,सुभद्रा,इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी यांनीही ऐकले. त्याचप्रमाणे ज्याच्या—त्याच्या पतीवर ज्यांच्या—त्यांच्या पत्नीचे प्रेम असावयास पाहिजे,कारण प्रेमाने सुख मिळत असते,तर प्रेम नसेल तर दु:ख मिळत असते.म्हणून प्रेम मिळण्यासाठी पती व पत्नी सात्विक असावयास पाहिजे.यासाठी लग्न—सोहळा होण्यापूर्वीच तसा विवेक करून एकमेकांचा स्वीकार करावयास पाहिजे.त्यांचे ते प्रेम ऐकून सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले.आपणाससुद्धा इतरांचे प्रेम—आनंद पाहून प्रेमाश्रू वाहू लागले पाहिजेत.यासाठी आपल्यात सत्वगुण असावयास पाहिजे.||१|| अर्थः---याप्रमाणे स्त्रियाबरोबर स्त्रिया व पुरुषाबरोबर पुरुष भाषण करीत असतां,त्या कुरुक्षेत्रामध्ये रामकृष्णांना पाहण्याच्या इच्छेने ऋषी प्राप्त झाले||२|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा यांचे दर्शन घेण्यासाठी पुष्कळसे मुनी आले होते.त्याचप्रमाणे आपणसुद्धा संत—महात्मा यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांच्याकडे जावावयास पाहिजे.त्यांच्या दर्शनाने आपला सत्वगुण वाढत असतो.सत्वगुण गुण वाढला असता प्रेमात वाढ हून सुख मिळत असते.||२|| अर्थः---त्यांची नांवे वेदव्यास,नारद,च्यवन,देवल,असित,विश्वामित्र,शतानंद,भरद्वाज,गौतम||३|| अर्थः---शिष्यांसह परशुराम,वशिष्ठ गालव,भृगू,पुलत्स्य,कश्यप,अत्री,मार्कंडेय,बृहस्पती||४|| अर्थः---द्वित, त्रित, एकत, सनक,सनंदन,सनातन,सनत्कुमार,अंगिरा,अगस्त्य,याज्ञवल्क्य तसेच वामनादिक दुसरेही ऋषी:ही होती||५|| अर्थः---त्या ऋषींना पाहतांच पांडव, श्रीकृष्ण आणि बलराम व तेथे पूर्वी बसलेले राजेवगैरे लोक होते ते सर्वही एकदम उठून त्यांनी,जगद्वंद्द अशा त्या ऋषींना नमस्कार केला||६|| भावार्थ:--- पुष्कळसे मुनीचे आगमन होताच सर्व राजे,श्रीकृष्ण आणि बलरामदादा उठून उभे राहून त्या मुनींना प्रणाम केला,कारण राजे लोक,श्रीकृष्ण आणि बलरामदादा यांच्यापेक्षा ते मुनी श्रेष्ठ होते.श्रेष्ठांचे आगमन होताच कनिष्ठांनाने उभे राहून त्यांना वंदन—नमस्कार करावयास पाहिजे,असा धर्माशात्राचा नियम आहे.श्रेष्ठांचे कनिष्ठांनी दर्शन—वंदन—प्रणाम केले असता कनिष्ठांना श्रेष्ठांकडून आशीर्वाद मिळत असतो.याकरिता आवश्य उभे राहून वंदन—प्रणाम करावे.||३—६|| अर्थ:---त्यावेळी पांडवादिक सर्वराजांनी त्यांचे,स्वागतप्रश्न,आसन,पाद्य,अर्घ्य,पुष्पमाला,धूप,चंदनादिक उट्या इत्यादिकेकरून पूजन केले तसेच बळरामासहित श्रीकृष्णानेही त्यांचे यथायोग्य पूजन केले.||७|| भावार्थ:--- त्या मुनींची सर्व राजे,श्रीकृष्ण आणि बलरामदादांनी स्वागत,आसन,पाद्य,अर्घ्य,पुष्पमाला,धूप,चंदन,इत्यादींनी विधीपूर्वक पूजा केली.श्रेष्ठांची कनिष्ठांनी स्वागत करून,आसनदेऊन,पूजेचे साहित्य घेऊन श्रद्धापुर्वक पाद्य—पूजा करावी,असा धर्माशात्राचा नियम आहे.त्यामुळे कानिष्ठांचेच परमहित होत असते.||७|| अर्थ:---नंतर सुखाने बसलेल्या त्या व्यासादिक मुनीप्रत धर्मरक्षणाकरिता अवतार धारण केलेला तो श्रीकृष्ण,ती मोठी सभा मुकाट्याने ऐकत असतां म्हणाला की,-||८|| भावार्थ:--- सभेत उपदेश—भाषण चालू असतांना अतिशय शांत चित्ताने तो उपदेश—ते भाषण शांत—चित्ताने श्रवण—ऐकावयास पाहिजे.यात श्रोत्यांचेच हित असते, कारण उपदेश कर्ता काय बोलतो,ते आपणास आपण शांत बसून श्रावण केले तर कळेल,अन्यथा कळणार नाही.न कळले तर आपले हित होणार नाही.||८|| अर्थ:---श्रीभगवान म्हणाला-अहो!आज आम्ही सफळजन्मे झालो आहों कारण,त्या जन्माचे फळ पूर्णपणे आम्ही मिळविले आहे.ते कोणते ? म्हणाल तर-देवानांही दुर्लभ असे जे तुम्हां योगेश्वरांचे दर्शन ते आम्ही मिळविले आहे||९|| भावार्थ:--- मुनींचे दर्शन झाल्यामुळे सर्व राजे आणि बलरामदादा यांच्या वतीने श्रीकृष्ण भगवंत म्हणतात कि,आम्ही मानव देहाला आल्याचे आज सार्थक झाले,कारण आपणहून श्रेष्ठ मुनी आले व त्यामुळे आमचे दर्शन झाले.त्यांच्या दर्शनाने आमचे भाग्य उदयास आले.त्यांचे दर्शन देवतांनाही मिळत नाही.||९|| अर्थ:---केवळ दर्शनच नाही तर स्पर्शादिकसुद्धां आम्हांस घडले आहेत.अहो ! केवळ तीर्थस्नानदिकांच तप असे मानणाऱ्या व प्रतिमेवरच हि देवता आहे आहे अशी दृष्टि ठेवणाऱ्या मनुष्यांना,आपले (योगेश्वराचे)दर्शन,स्वागतप्रश्न,नमस्कार व चरणपूजा इत्यादिक घडतात काय?नाहीच घडत||१०|| भावार्थ:--- ज्यांची तपश्चर्या थोडी आहे आणि त्यामुळे मूर्तीतच देव पाहणारे असे जे साधारण आहेत,त्यांना श्रेष्ठ मुनींचे दर्शन झाले,असे आम्ही भाग्यवान आहोत.श्रेष्ठ मुनींची पाद्य—पूजा करण्याचे भाग्य आम्हास मिळाले.श्रीकृष्ण कमीपणा घेऊन बोलत आहेत.तसा आपण कमीपणा घेऊन बोलावयास पाहिजे.||१०|| अर्थ:---उदकमय तीर्थे हि तीर्थे नव्हते व मृत्तिकापाषाणमय देव हे देव हे देव नव्हेत असे नाही,तर ती तीर्थ व ते देव आहेत खरे परंतु त्यांच्या व साधूच्यामध्ये पुष्कळ फरक आहे.ती तीर्थव ते देव,पुष्कळ काळपर्यंत सेवा केली असता पवित्र करितात||११|| भावार्थ:--- जे पाणी संत—महात्मा यांच्या स्नाने पवित्र होते,त्या पाण्यास तीर्थ म्हणावे.ज्या दगड—मातीच्या प्रतिमा त्या संतांच्या—मुनींच्या स्पर्शाने पुनीत होतात,त्यांना देवत्व येते,त्यामुळे संत—पुरुष खरे देव होय.म्हणून आपण तीर्थात स्नान करावे व मूर्तीत देव आहे म्हणून त्यांचे दर्शन घ्यावे.त्याहीपेक्षा महात्मा—मुनी यांची सेवा करून,त्यांच्यावर श्रेद्ध ठेऊन,त्यांच्या मुखातून उपदेश श्रवण करावा.त्यामुल्र धर्मांचे व वेदांतांचे ज्ञान होते.देवतापेक्षा मुनी श्रेष्ठ आहेत.||११|| अर्थ:---अग्नी,सूर्य,चंद्र,तारे,पृथ्वी,जल,आकाश,वायू किंवा वाणी व मन यांच्या अभिमानी देवतांची उपासना केली असतांही त्या,तूं तुझे व मी माझे अशी भेद बुद्धी धारण करणाऱ्या पुरुषत्तचे,पापमुलक अज्ञान नाहीसे करीत नाहीत आणि विवेकी पुरुष जर मुहूर्तमात्र सेवेच्याच योगाने भक्तीज्ञानादिकांचा उपदेश करून ते अज्ञान नाहीसे करितात||१२|| भावार्थ:--- अग्नी,सूर्य,चंद्र,तारे,पृथ्वी,जल,आकाश,किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेदबुद्धीरूप अज्ञानाचा नाश—बाध होत नाही,कारण यांची उपासना केली असता अंत:कारण शुद्धता होते,पण अज्ञान जात नाही.जसे पाण्याने तहानेची तृप्ती होते पण भूक शमन होत नाही,तसे अग्निदादि याने अंत:करण शुद्धता होते,पण अज्ञान जात नाही.ज्यास जे पाहिजे तेच ध्यावे लागते,अन्य देऊन चालत नाही.अज्ञान नांवाचा दोष निवृत्त होण्यासाठी महापुरुश्याचीच कृपा पाहिजे,अन्य चालत नाही.म्हणून महापुरुश्यांचे सेवा ह्कारून,श्रद्धा ठेऊनच,अधिकारी होऊनच महात्मा यांच्या मुखातूनच श्रवण करावे.||१२|| अर्थ:---यास्तव ज्या पुरुषाला,वातपित्तकफरूप तीन धातूंची युक्त अशा शवतुल्य जड शरीराचे ठिकाणी हे माझे अशी स्वकीयबुद्धी आहे,मृत्पाषानादीरूप मूर्तीचेठिकाणीच पूज्यबुद्धी आहे व उदकाचेठिकाणीच तीर्थबुद्धी आहे परंतु तत्त्ववेच्या साधूंचेठिकाणी त्या सर्वबुद्धी नाहीत.तो गाईच्या नृनादिकांची ओझी वाहणाऱ्या गर्दभासारखा (पशुतुल्य ) होय||१३|| भावार्थ:--- जो मनुष्य शरीरालाच आत्मा—मी समजतो म्हणजे आच्छादन जे आत्म्याचे शरीर आहे त्या अच्छादानास मी समजतो.जसे शरीरावरील अंगरखा—शर्ट आणि मी या दोन वस्तू भिन्न—भिन्न आहेत.या दोन वस्तूतील मी आहे कोण? याचे उत्तर आपण सहज देऊ कि मी म्हणजे शरीर आहे व अंगरखा—शर्ट म्हणजे शरीरावरील झाकण—कव्हर आहे—वरचा भाग आहे.त्याचप्रमाणे वास्तविक पाहता मी म्हणजे शरीराच्या आतील जो जीव आहे,तो मी आहे व शरीर म्हणजे अंगरखा—शर्ट आहे—आत्म्याचे शरीर हे झाकण आहे.आपण शरीराच्या आत असलेला जीव आहे,तर शरीर हे त्यावरील झाकण आहे.शरीर नसेल तर अंगरखा—शर्ट याला महत्व मुळीच नाही.तसे जीव असेल तर शरीराला महत्व आहे.जीव नसेल तर शरीराला मुळीच महत्व नाही.जीव नसेल तर शरीरास दुर्गंधी येईल.म्हणून जीव नसेल तेव्हा त्यास दुर्गधी येते म्हणून त्या शरीरास जाळून किंवा पुरून टाकले जाते.म्हणजेच शरीर झाकण आहे व त्या शरीरातील “आत्मा” मी आहे.स्त्री—पुरुष हे धर्म शरीराचे आहेत.आत्मा हा स्त्री व पुरुषही नाही.माती—लाकूड—पाषाण यांनाच देव समजतो.रस्त्याच्या बाजूस माती--लाकूड—पाषाण पडलेले असतात, त्यांना आपण देव न मानता,माती,लाकूड,पाषाणच मानातोत.त्या मातीच्या—त्या लाकडाच्या—त्या पाषाणाच्या आत देव असतो असी आपली भावना असते. त्याचप्रमाणे या शरीराच्या आत जीव असतो,त्यालाच जीव,असे म्हणावे व शरीराला शरीर असे म्हणावे.थोडक्यात वस्तुस्थिती जी आहे,त्याला तीच म्हणने योग्य आहे व वस्तुस्थिती जी आहे,त्यास तीच न समजता विपरीत समजने अयोग्य आहे.योग्य समजने गुण आहे व विपरीत समाने दोष आहे.योग्य समजने धर्म आहे व अयोग्य समजने अधर्म आहे.अधर्माने दु:ख आहे व धर्माने सुख आहे.योग्य समजने परमार्थ आहे व अयोग्य समजने संसार आहे.फक्त पाणी म्हणजे तीर्थ नाही,तर ते पाणी जेव्हा पवित्र होते,तेव्हा ते तीर्थ आहे.किरण दुकानात नारा असते तर तेच नारळ जेव्हा संत—महात्मा यांच्या स्पर्शाने प्रसाद होते.जसे व्यक्ती सामान्य आहे,पण जेव्हा देशाची सत्ताधीश होते,तेव्हा त्यांना पंत—प्रधान असे म्हणतात.जसे जिल्हाधिकारी होण्याकारीरा I.P.S.ची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते तसे पारमार्थिक ज्ञान होण्यासाठी संत—महात्मा यांचे शिष्यत्व स्वीकारून शात्रांचा अभ्यास करून,धर्मानुसार सेवा करून उत्तीर्ण व्हावे लागते.व्यवहारात—राज्यसत्तेत पंत—प्रधान हा सर्वात महत्वाचा असतो तसे पारमार्थिक सत्तेत तीर्थापेक्षा,देवापेक्षाही थोडक्यात सर्वांपेक्षा संत—महात्मा यांना महत्व अधिक असते.म्हणून जसे आपण राजकीय क्षेत्रात पंत—प्रधानाच्या सत्तेला महत्व ध्यावे,तसे पारमार्थिक सत्तेत संत—महात्मा यांच्या सत्तेला महत्व ध्यावावयास पाहिजे.||१३|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,या प्रकारचे अकुंठबुद्धी भगवान श्रीकृष्णाचे दिनपणाचे भाषण ऐकून ते ब्राम्हण त्या भाषणाचा आशय न समजल्यामुळे चकितबुद्धी होऊन स्तब्ध (निरुत्तर)राहिले||१४|| अर्थः---नंतर त्या ऋषींनी बराच वेळ विचार करून हास्य करीत त्या जगद्गुरू श्रीकृष्णाला म्हणाले कि,-कृष्णा,तूं ईश्वर असून मी तुमच्या आज्ञेनुसार वागणारा आहे असे जे म्हणतोस ते केवळ जनसंग्रहाकरिता ( सर्वलोकांनी त्याप्रमाणे वागावे हे दर्शविण्याकरिता)आहे ||१५|| अर्थः---ऋषी म्हणाले- हे प्रभो,ज्या तुझ्या मायेने विश्व स्त्राष्ट्यांचे अधिपती मरिच्यादिक ऋषी व तत्त्ववेत्त्यांमध्ये ऋषी उत्तम असे आम्हीही अत्यंत मोहित झालो आहों.म्हणजे तुझ्या अभिप्राय काय आहे ते जंत नाही कारण,जो तू मनुष्यचेष्ठेने गुप्त होऊन ईश्वर असतांही दुसऱ्याच्या सेवकासारखे आचरण करितोस,त्या तुज भगवंताचे चरित्र मोठे आश्चर्यकारक (जनावयास)फार कठीण) आहे||१६|| अर्थः---आतां त्याचे भगवत्त्व सांगतात-जो तूं आसक्तीरहित व एकटा असूनही,जशी भूमी वस्तुतः एक असूनही आपल्या कार्यरूप घटादिक पदार्थांच्या योगाने बहुत नांवे व रूपे धारण करणारी होत्ये त्याप्रमाणे तूंही आपल्या स्वरूपमात्रे करून हे जग बहुरप्रकारांनी उत्पन्न करितोस,रक्षण करितोस व संहार करितोस,तथापि मी केलेले हे माझे,अशा अहंकाराने बाध होत नाहीस.त्या तुज परिपूर्णाचे,मनुष्यत्त्व स्वीकारून ब्राम्हणाचा सन्मानवगैरे करण्याचे चरित्र केवळ अनुकरण करून दाखविलेले आहे||१७|| अर्थः---आता,त्याचा जनसंग्रह सांगतात-हे प्रभो,तूं जरी वस्तुतः प्रकृतीहून पर पुरुषोत्तम आहेस व तुला जन्मादिक विकार नाहीत तथापि तूं भक्तांच्या रक्षणाकरिता व दृष्टांच्या निग्रहाकरिता त्या त्यावेळी आपले शुध्दसत्वामक स्वरूप धारण करितोस आणि वर्णांश्रमधर्मांच्या अभिमानाने युक्त होत असता लोकशिक्षेधर्मांच्या आपल्या आचरणाने सनातन वेदमार्गाने रक्षण करितोस||१८|| अर्थ:---वेद हे तुझे शुद्ध अंतरंग स्वरूप आहे,ज्यावेदांत –तप स्वाध्याय व इंद्रियनिग्रह यांच्या योगाने कार्यरूप व त्या दोन्हीहून निराळे असे सामान्य परब्रम्ह उपलब्ध होत आहे||१९|| भावार्थ:---आपण तप,स्वाध्याय,धारणा,ध्यान आणि समाधीच्या योगाने साधना करून अंत:करण शुद्ध करावयास पाहिजे.अंतकरण शुद्ध आणि स्थिर करून,अधिकारसंपन्न होऊन संत—महात्मा यांच्या गुरुमुखातून श्रवण करून सगुण—साकार व सगुण—निराकार यांचे अधिष्ठान असलेले निर्गुण निराकार परमात्मा या परब्रह्माचा साक्षात्कार होतो.म्हणून उपदेश हा शांत चित्ताने,अधिकारारी संपन्नतेने,श्रद्धा ठेऊन,सेवा करून श्रावण करावा.||१९|| अर्थ:---तस्मात हे ब्राम्हरुपा कृष्णा,तुझ्या हृदयाचे प्रवर्तक हे ब्राम्हणकुल ते तूं,वेद प्रमांक आशा आपल्या प्राप्तीहून स्थान आहे अस जाणून,त्याचा संक्मान करितोस म्हणुनच तूं ब्राम्हणभक्तांमध्ये श्रेष्ठ गणला आहेस||२०|| भावार्थ:--- शात्रज्ञानी व अनुभवीज्ञानी हेच ब्रह्मज्ञानी वेदांना आधारभूत ब्राह्मण वेदाप्रमाण आहेत.आपल्या स्वरूपाचा त्यांना अनुभव आहे.म्हणून आपण त्यांचा सन्मान करतात.आपणही त्या अनुभवी ज्ञानी जे आहेत,त्यांचा मान--सन्मान करावयास पाहिजे.आपणही अनुभवी ब्रह्मज्ञानी जे आहेत,त्यांचेच भक्त होऊन ज्ञान संपादन करावयास पाहिजे.तसे ज्ञान संपादन करून त्या परमात्म्याचा अनुभव घ्यावा.परमात्म्याचा अनुभव घेतल्यास जन्म—मरण निवृत्त होते.||२०|| | अद्द नो जन्मसाफल्यं विद्दायास्तपसो दृशः | त्वया संगम्य सद्गत्या यदन्तः श्रेयसां परः ||२१|| अर्थः---असो.सत्पुरुषांची गती अशा तुझ्याबरोबर समागम पावेन आज आमच्या विद्येचे,तापाचे,ज्ञानाचे व जन्माचे साफल्य झाले आहे,कारण,तूं सर्व कल्याणाचा परम अवधी आहेस||२१|| भावार्थ:--- परमात्मा हेच सर्व साधनांचे अंतिम साध्य आहेत.संत—महात्मा यांचेही प्राप्तव्य म्हणजे साध्य आहेत.आपले दर्शन होऊन आज आम्हास आमचे जप,तप,विद्या आणि ज्ञान सफल झाले,कारण आजच साध्याच—परमात्म्याचा साक्षात्कार झाला.आमचा जन्म सफल झाला असे मुनी म्हणत आहेत.आपणही आपला जन्म सफल होण्यासाठी तप,विद्या आणि ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभव घेऊन जीवनाचे सार्थक करून घ्यावे.||२१|| अर्थः---त्या षडगुणैश्वर्यसंपन्न,अकुंठतबुद्धी,व योग्यामायेच्या योगाने महिमा आच्छादित असलेल्या तुज परमात्म्या श्रीकृष्णाला नमस्कार असो||२२|| भावार्थ:--- आपण भगवंतांची स्तुती करावयास पाहिजे.भगवंत स्वत:परमात्मा—ब्रह्मस्वरूप आहेत.ते नाम—रूपाचे अधिष्ठान आहेत.त्यांनी आपल्याच योगमायेने आपला महिमा झाकून टाकला आहे.म्हणजेच जीवाच्या अज्ञानामुळे ते असून दिसत नाहीत.जेहा ज्ञान प्राप्त होईल,तेव्हाच त्यांचा अनुभव आपणास येईल.||२२|| अर्थः---सर्वाचा आत्मा,सृष्ट्यादिकांचे कारण,सर्वांचा नियंता व माया रूप पडद्याने आच्छादित अशा तुला,हे तेथे असलेले राजे व तुझ्याबरोबर एकठिकाणी भोजनशयनादिक करणारे यादवही जाणत नाहीत||२३|| अर्थः---जसा निजलेला पुरुष,स्वप्रांतील पदार्थांना सत्य मानीत असून मिथ्याभूत इंद्रियाने ( मनाने ) भासलेल्या सिंहादिक स्वरूपालाच तें मी आहे असे मानितो,परंतु त्याहून रहित दुसऱ्या जाग्रदवस्थेतील देवदत्तादीरूप आपणास जाणत नाहीत||२४|| भावार्थ:--- जसे स्वप्न पदार्थ खोटे—मिथ्या असून ते आपणास स्वप्न असवस्थेत खरे वाटतात,तसेच जागृतीतील पदार्थसुद्धा खोटे—मिथ्या आहेत,पण अज्ञानामुळे खोटे—मिथ्या न वाटता सत्य वाटतात.स्वप्नातील पदार्थ जागृतीत खोटे—मिथ्या वाटतात.तसे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान झाल्यानंतर व्यवहारातील पदार्थ सत्य न वाटता खोटे—मिथ्या वाटतात.म्हणून जीवानी संत—महात्मा यांच्या सत्संगात येऊन अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||२४|| अर्थः---याप्रमाणे जाग्रदवस्थेमध्येही शब्दादिक विषयांचेठिकाणी इंद्रियप्रवृत्तीरूप मायेच्या योगाने आत्मस्मृतीच्या नाश होत असल्यामुळे श्र्वंतचित्त झालेला पुरुष,स्वाप्रादी पदार्थांसारखा मिथ्याभूत देहादीकांमध्ये असणाऱ्याहि तुज स्वात्म्याला जाणत नाहीत,तर देहालाच आत्मा असे जाणतो||२५|| भावार्थ:---वास्तविक पाहता विषयापासून सुख न मिळता इंद्रीयांच्या मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेकशक्ती नष्ट होते.त्यामुळे त्यांना असे वाटके कि,विषयांपासून सुख मिळते.म्हणून ते विषयांच्या मागेच घावतात.जसे हरीण हे मृगजळालाच पाणी समजते व त्याच्या मागेच धावते.वास्तविक पाणी नसल्यामुळे पाण्याची व त्याची भेटच होतच नाही.त्यामुळे त्याला पाणी न मिळाल्यामुळे त्यातच त्याचे त्याच्या शरीरातून प्राण निघून ते हरीण गतप्राण होते.त्याचप्रमाणे मनुष्यमात्रसुद्धा हरीणाप्रमाणेच विषयांच्या मागे सुखासाठी घावतात.विषयांपासून क्षणिक सुख मिळाल्यासारखे वाटते,पण त्या क्षणिक सुखाच्या मागे जे दु:ख असते,त्याचीच अनुभूती येते.म्हणून जीवांनी विषयांच्या मागे न घावाता अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त घालवून परमात्म्याचा सुखारुपातेचा अनुभव घ्यावा.||२५|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे त्या ऋषींनी स्तुती करून,श्रीकृष्ण धृतराष्ट्र व युधिष्ठीर यांस,जाण्याचा आज्ञा विचारून आपल्या आश्रमी जाण्याचे मनांत आणिले||२७|| अर्थः---तो ऋषीचा जाण्याचाविचार पाहून महायशस्वी वसुदेव,त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून व हातांनी त्यांचे पाय धरून एकाग्र चित्ताने त्यांस असे म्हणाला कि,-||२८|| अर्थः---वसुदेव म्हणाला-हे ऋषीहो,सर्व देवांचे राहण्याचे स्थान अशा तुम्हांला नमस्कार असो.माझे वचन ऐकण्यास आपण समर्थ आहां.ज्या कोणत्याही यथाविधी केलेल्या कर्माने मोक्षाला प्रतिबंधक असलेल्या कर्मांचा निरास होतो ते कर्म आम्हांस सांगा||२९|| भावार्थ:--- आपणाकडे जर संत—महात्मा आले असतील तर आपण त्यांना संसारिक प्रश्न न करता पारमार्थिक प्रश्न करावेत.संसारिक प्रश्न संसारिक जे लोक आहेत,त्यांना करावीत.संत—महात्मा यांना पारमार्थिक प्रश्न करून आपले अज्ञान घालवून ज्ञाना प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.त्यात आपले हित असते.||२९|| अर्थः---याप्रमाणे वसुदेवाने प्रश्न केला असता,सर्वज्ञ श्रीकृष्णाला सोडून हा आम्हांस प्रश्न करितो मनांत आणून विस्मित त्या ऋषींना,नारद म्हणाला कि –हे विप्रहो,आपल्या कृष्णपुत्राला अर्भक (अज्ञानी)असे मानून त्याला सोडून वासुदेव,आपल्या कल्यापनाचे साधन जाणण्याच्या इच्छेने जे आम्हांस विचारीत आहे ते मोठेसे आश्चर्य नाही||३०|| भावार्थ:--- वसुदेव हे श्रीकृष्णास परमात्मा न समजता मुल समजत असत.श्रीकृष वास्तविक कोण आहेत,असा त्यांचा सुद्धभाव आहे,म्हणून त्यांनी असा प्रश्न केलेला आहे.त्यात त्यांचे कांहीच गैर नाही.त्यांचा हा प्रश्न सर्वांचे कल्याण करणारा आहे.सर्वांचे कल्याण होईल,असाच प्रश्न संत—महात्मा यांना विचारावा.||३०|| अर्थः---कारण,या जागांमध्ये निरंतर सहवास असणे हे मनुष्यांच्या अविश्वासाला कारण होते,यास दृष्टांत –गंगेच्या तीरी राहणारा जन,गंगोदकाचा त्याग करून आपली शुद्धी होण्याकरिता दुसऱ्या तीर्थाच्या उदकामध्ये जात असतो||३१|| भावार्थ:--- अति परिचयात अनादर होत असतो.जसे गंगेजवळ राहणारा मानुष हा आपल्या गावाच्या गंगेत स्नान न करता दुसऱ्या तीर्थात जाऊन स्नान करत असतो.तसेच आपणास घराचा जो देहसंबंधी आहे,तो संत—महात्मा वाटत नाही,त्यामुळे त्याचा आपणास पारमार्थिक हित करून घेता येत नाही.आपण असे करता त्या देहासंबंधी संत—महात्मा असेल तर त्याचा आपले पारमार्थिक हित करून घेण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.त्यात आपलेच हित होत असते.||३१|| अर्थः---ज्याचे ज्ञान,काळाने,तसेच या जगाच्या उत्पत्तीस्थितीसंहारांनी,स्वतः पासून दुसर्यापासून व रूपांतरवगैरे होण्याच्या योगाने कधीही नाश पावत नाही||३२||| भावार्थ:--- श्रीकृष्णांचे ज्ञान जगताची उत्पत्ती,स्थिती आणि लय यामुळे नाहीसे होत नाही,कारण तो सर्वज्ञ आहे.जीवाचे ज्ञान काळाच्या गतीमुळे नष्ट होऊ शकते—स्मरण होते,कारण जीव हा अल्पज्ञ आहे.असे असले तरी पण संस्काररूपाने असते.म्हणून सात्विक संस्कार करून घ्यावावयास पाहिजे.||३२|| अर्थः---त्या विषयासक्त,कर्मे,सुखे,दु:खे,व सत्वादिक गुणांचा वारवार प्रादुर्भाव यांच्या योगाने अखंडित ज्ञानस्वरूपी अव्दितीय ईश्वराला ,पाहून इतर हा प्राकृत जन जसा सूर्याला –मेघ ,धुके व राहू यांनी आच्छादित आहे असे म्मानितो त्याप्रमाणे त्या ईश्वराच्या कार्यरूप प्राण देह इंद्रिय व अंत:करण इत्यादिकांनी तो ईश्वर ,आच्छादित आहे असे मानितो यात काही आचर्य म्हणण्यासारखे नाही ||३३|| भावार्थ:--- भगवंतांचे ज्ञान खंडित होत नाही,कारण तो सर्वज्ञ आहे.तो अद्वितीय प्रमात्मा आहे.भगवंत मृत्युलोकात मनुष्यरूपाने येतात,तेव्हा स्वत:स आपल्याच प्राण इत्यादी शक्तींनी झाकून घेतात.सामान्य जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे भगवंत,भगवंत न वाटता मनुष्य वाटतात.जसे ढग—धुके यामुळे सूर्य झाकला गेला असे वाटते—भासते,पण वास्तविक पाहता तो झाकल्या जात नाही.आपल्या दृष्टी दोषामुळे झाकल्या गेला असे वाटते—भासते.म्हणून आपण आपळे अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी संत—महात्मा यांचा सत्संग करून अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.त्यातच हित आहे.||३३|| अर्थः----हे राजा असे नारदाने संगीतल्यानंतर ते ऋषी ,वासुदेवाला संबोधन देवून तेथे जमलेले सर्व राजे व रामकृष्णहि श्रावण करीत असता असे म्हणाले कि -||३४|| | कर्मणा कर्मनिर्हार एष साधु निरूपितः | यच्छ्रद्धया यजेद् विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखैः ||३५|| अर्थः---त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंतःकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे.विव्दात लोकांनी शास्त्रारूप दृष्टीने अंत:करनाच्या शांततेव व मोक्षाचा सुलभ उपाय हचाव दाखविला आहे.तासाचा शत्रियाचा मनाला हर्ष उत्पन्न करणारा आवश्यक धर्मही हाच सांगितला आहे ||३५|| भावार्थ:---निषिद्ध कर्म करू नये.निषिद्ध कर्म न केल्यामुळे पाप होत नाही.पाप न झाल्यामुळे निषिद्ध कर्मांचे फळ भोगण्यास येत नाही.सकाम कर्म न करता,निष्काम कर्म करावे,कारण निष्काम कर्मास नाशिवंत फळ लागत नाही,तर त्या कर्माने अंत:करण शुद्ध होते.निष्काम भक्तीने अंत:कारण स्थिर होते. त्यानंतर सत्संगामुळे ज्ञान होऊन ते ज्ञान अनुभवास येते.ते ज्ञान अनुभवास आल्यामुळे संचित व क्रीयामान कर्म ज्ञानाग्नीने जळून जाते.||३५|| अर्थः---शुद्ध न्यायाने प्राप्त झालेल्या द्रव्याने श्रद्धापूर्वक जे पुरुषोत्तम भगवंताचे याजान्कारणे हाच गृहस्थाश्रमि ब्राम्हण क्षेत्रीय वैशांचा कल्याण कारण मार्ग आहे||३७|| भावार्थ:--- गृहस्थाश्रमी द्विजातींनी न्यायाने म्हणजे धर्माशात्रानुसार धन प्राप्त करून व न्यायानेच म्हणजे धर्मानुसारच व्यय—खर्च करून भगवंतांची निष्काम भक्ती करावी.यामुळे परम कल्याणाचा जो मार्ग आहे,त्याकडे जाऊन मोक्षमार्गाचा अवलंब करून त्याचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतो.||३७|| अर्थ:----हे वसुदेवा,कर्माचा अत्यंत निरास होण्यास सर्व इच्छा सुटल्या पाहिजेत,त्या सोडण्याचा प्रकार असा कि.-विचारी पुरुषाने द्रव्याच्या फलभूत यज्ञांनी व दानांनी धनाची इच्छा सोडावी.गृहस्थाश्रमास योग्य अशा विषयभोगांनी स्त्रीपुत्रादिकांची इच्छा सोडावी आणि देह मृत झाल्यावर आपणास स्वर्गादिलोक प्राप्त होण्याची इच्छा असत्ये ती,देवानाही मारणारा जो काळ तो आपल्याही सुखाचा नाश करीत असे मनांत आणून सोडून द्यावी.म्हणूनच पूर्वीच धैर्यवान पुरुष,गावांत असतानांच सर्व इच्छांना त्याग करून नंतर तपोवनांमध्ये प्रविष्ट झाले आहेत||३८|| भावार्थ:---आपल्यात वैराग्य येण्यासाठी गृहस्थाश्रमाचा त्याग करून---गृहस्थोचित भोगांचा त्याग करून वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा.त्यामुळे इहलोकातील विषयांच्या वासनांचा त्याग होतो.त्याचप्रमाणे परलोकातील विहित वासनांचा त्याग सत्संगाने विवेकाद्वारे करावा.असे केले असता सर्व विषयांचा त्याग होतो.||३८|| अर्थः---हे वासुदेव!ब्राम्हण,क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही व्दिज,देवता,ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात.यज्ञ,अध्ययन आणि संतान यांव्दारेच या ऋणांतून मुक्तता होते.यांतून मुक्त झाल्याविषयी जो संसाराचा त्याग करतो,त्याचे पतन होते.||३९|| भावार्थ:--- ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य हे द्विज जन्मास येतांना देवता,ऋषी आणि पितरांचे ऋण घेऊन येतात.ज्याच्यावर ऋण आहे,त्यांना ऋण फेडावे लागते. सत्कर्म करून--यज्ञ करून देवताचे ऋण फेडता येते,म्हणून सत्कर्म—यज्ञ करावेच.पारमार्थिक अध्ययन करून व त्यानुसार आचरण करून फेडता येते,म्हणून पारमार्थिक अध्यन करावेच.गृहस्थाश्रामांचा स्वीकार केल्यानंतर संतान—पुत्र उत्पन्न करून,पितरांचे ऋण फेडता येते.म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला असेल तर संतान--पुत्र उत्पन्न करून ते ऋण फेडावे.आपण हे तीनही ऋण न फेडले तर संसारातून मुक्त होत नाही,त्यामुळे पतन—अधोगती होते.||३९|| अर्थः---हे महामते वासुदेव ,तू तर वेदाध्ययन व पुत्रोत्पादन केले असल्यामुळे ऋषी व पितर या दोघांच्या रुनापासुना मुक्त झाला आहेस तू जगताचा ईश्वर अशा भगवान हरीचे प्रेम लक्षण भक्तीच्या योगाने पूजन केले आहेस म्हणून तो भागवान तुम्ही उभायान्त्याच्या पुत्रावाप्रात पावला आहे ||४०|| अर्थः---हे महामते वासुदेवा,तूं वर वेदाध्ययन व पुत्रोत्पादन केले असल्यामुळे ऋषी व पितर या दोघांचा ऋणापासून मुक्त झाला आहेस.कारण,तूं जगताचा ईश्वर अशा भगवान हरीचे प्रेमलक्षण भक्तीच्या योगाने पूजन केले आहेत,म्हणून तो भगवान तुम्हां उभयंताच्या पुत्रत्वाप्रत पावला आहे ||४१|| अर्थः---श्रीशुकचर्य म्हणतातः-----हे राजा ,याप्रकारचे त्या ऋषीचे भाषण ऐकून उदारचीत्त अशा त्या वसुदेवाने त्यचा ऋषींना मस्तकाने वंदन करून व प्रसन्न करून घेवून ,ऋत्विज वरिले ||४२|| अर्थ:---हे राजा ,नंतर धर्माने वारीलेल्या त्या रुत्विजनी त्या स्यमंतपंचक क्षेत्रामध्ये ,मंत्र तंत्र व हविर्भागादिक सर्व उत्तम साहित्यांनी संपन्न असे यज्ञ करवून त्या वासुदेवाकडून याजन करविले ||४३|| अर्थः----हे राजा,जेव्हा त्या यज्ञाची दीक्षा वसुदेवाने ग्रहण केली तेव्हा स्नान केलेले,उत्तमवस्त्रे परिधान केलेले व उत्तम अलंकार धारण केलेले यादव व सर्वराजे तो यज्ञ पाहण्याकरिता यज्ञ शाळेमध्ये प्राप्त पाहण्याकरिता यज्ञ शाळेमध्ये प्राप्त झाले.तशाच उंची वस्त्रे नेसलेल्या व पदकादिक भूषणे धरण करून हर्षयुक्त झालेल्या वसुदेवाच्या अठरा स्त्रियाही,हस्तामध्ये पूजनाचेवगैरे पदार्थ ग्रहण करून दीक्षाशाळेमध्ये प्रविष्ट झाल्या||४४-४५|| अर्थः---त्यावेळी मृदंग,पटह,शंख भेरी अंक इत्यादिक वाद्ये वाजूं लागल्या नत आणि नर्तकी नृत्य करू लागल्या सूर व मगध हे स्तुतिपाठ करूं लागले;कंठ असणाऱ्या गंधर्वांना आपल्या पतीसह संगीत गायन करूं लागल्या||४६|| अर्थः---त्या यज्ञांतील अभिषेकाच्या वेळी तर देवक्यादिक अठरा स्त्रियांसहवर्तमान नेत्रांमध्ये अंजन घातलेल्या व अंगाला तेल,हळद,लोनीवागैरे लावलेल्या त्या वसुदेवाला ऋत्विजांनीं अभिषेक विधीने,जसा पूर्वी जसा पूर्वी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक लेला होता त्याप्रमाणे अभिषेक केला||४७|| अर्थः---त्यावेळी यज्ञदीक्षा ग्रहण करून कृष्णाजिन पांघरलेला तो वसुदेव,पाटावे नेसून हातांत सुवर्णाची कांकणे कंठामध्ये हार,पायांत नुपुरे कानांत कुंडले व दुसरेही अलंकार धारण केलेल्या आपल्या पत्न्यासह वर्तमान अत्यंत शिभाऊ लागला|| अर्थः---हे महाराजा,रत्नाचे अलंकार व पितांबरवस्त्रे परिधान करणारे ते त्या वसुदेवाचे ऋत्विज.जसे पूर्वी इंद्राच्या यज्ञामध्ये शोभत होते त्याप्रमाणे शोभू लागले||४९|| अर्थः---त्यावेळी सर्व प्राण्यांचे स्वामी असे ते बलरामश्रीकृष्ण,आपआपल्या बंधूंनी,आपापल्याच अंशभूत पुत्रांनी शोभत होते त्याप्रमाणे शोभूं लागले||५०|| अर्थः---तेव्हा वसुदेवाने प्रत्येक यज्ञामध्ये विधियुक्त झालेल्या अग्निहोत्रादिरूप सर्व अंगासाहित ज्योतीष्टोमादिक यज्ञांनी व सौर सत्रादिक विकृत यज्ञांनी,चरूपुरोडाशादिक द्रव्ये,मंत्र व कर्मे एतत्स्वरूपी ईश्वरांचे यजन केले||५१|| अर्थः---नंतर त्या वसुदेवाने,दक्षिणा देण्याच्या वेळी अलंकार धारण केलेल्या ऋत्विजांना आपणही अलंकार धारण करून पुष्कळ द्रव्याने युक्त अशा दक्षिणा तशाच गाई,भूमी व कन्याही दिल्या||५२|| अर्थः---नंतर पत्नीसंयाज व आवभृथ यानांवांचे याग करून करून त्या महाऋत्विज,ब्राम्हणांनी यजमानाला पुढे करून परशुरामाने केलेल्या हदामध्ये स्नान केले||५३|| अर्थः---ते अवभृथ स्नान झाल्यावर उत्तम अलंकार धारण केलेल्या त्या वसुदेवाने व त्याच्या स्त्रियांनी,स्तुतिपाठ करणाऱ्या लोकांना अलंकार व वस्त्रे अर्पण केली तसेच वर्णांना व श्वानापर्यंत सर्व जीवांना अन्नदानाने तृप्त केले||५४|| अर्थः---नंतर बंधू,त्याच्या स्त्रिया,त्यांचे पुत्र,सभासद,ऋत्विज,देवांचे समुदाय,मनुष्ये,भुते,पितृगण,चारण तसेच विदर्भ कोसल,कुरु,काशी,केकप व सृंजय या देशांतील राजे या सर्वांना सन्मानार्थ मोठमोठे अहेर दिले.तेव्हा ते सद्स्यादिक सर्वही लोक.लक्ष्मीपती श्रीकृष्णाची आज्ञा ग्रहण करून यज्ञाची व त्या भगवंताची प्रशंसा करीत आपापल्या स्थानी निघून गेले||५५-५६|| अर्थः---त्यावेळी धृतराष्ट्र,विदुर,द्रोण,कुंती,युधिष्ठीर,भीमसेन,अर्जुन,नकुल,सहदेव,नारद,भगवान व्यास,तसेच सुह्र्त,संबंधी व बांधव||५७|| अर्थः---हे आपल्या बांधव यादवांना आलिंगन करून स्नेहाने सद्गदितचित्त होऊन विरहाने दुःख सहन करीत असता आपआपल्या देशी निघून गेल;तसेच जन आपापल्या स्थानी निघून गेले||५८|| अर्थ:---त्यावेळी श्रीकृष्ण,बलराम व उग्रसेन इत्यादिक यादवांनी वस्त्रादिक,मोठ्या सत्कारांनी सत्कार केलेला नंद्गोप,यादवबंधूवर प्रेमळ असल्यामुळे गोपाला सह वर्तमान कांहीदिवस पर्यंत तेथेच राहिला||५९|| अर्थ:---वासुदेव तर यज्ञविषयक मनोरथरुपी महासमुद्राला अनायासानेच तरून जाऊन,संतुष्टचित्त व संबंधीलोकांनी परिवेष्टित असता,नंदाचा हात धरून त्याला म्हणाला कि,-||६०|| अर्थः---वासुदेव म्हणाला-हे दादा नंदराजा,स्नेहनामक,जो मनुष्यांना पाश आहे तो ईश्वराचे निर्माण केलें असल्यामुळे शुरांना त्याच्या बलाने व योगिजनांना त्यांच्या ज्ञानांनेही तोडण्यास मोठा कठीण आहे,असे मी मानितो||६१|| अर्थः---कां म्हणशील तर –ज्या अर्थी केलेले उपकार न जाणणाऱ्याहि आम्हांवर,अतिश्रेष्ठ अशा तुम्ही जी हि निरुपम मैत्री केली आहेत तिचे उतराई आम्ही जरी कधीही होणार नाही तथापि ती मैत्री अजूनही तशीच आहे कमी नाही.त्याअर्थी ईश्वरानेच हा स्नेहपाश केला आहे असे वाटते||६२|| भावार्थ:--- वसुदेव मुनींना म्हणतात कि,आम्ही कृतघ्न असून म्हणजे कमीपणाची भाषा घेऊन बोलर आहेत.त्याचप्रमाणे श्रेष्ठांसमोर बोलण्याचा आपणास प्रसंग आल्यास,आपणही लीनता—नम्रता दिसण्यासाठी कमीपणाची भाषा बोलावयास पाहिजे.असे बोलले असता आपल्यात अंहकार न येता लीनता—नम्रता येते.लीनता किंवा नम्रता हा सदगुण आहे.सदगुनाने आपली उन्नती होते,म्हणून आपल्या योग्यतेपेक्षा कमीपणा घेऊन बोलावे.असे बोलणे आपल्या हिताचेच असते.मुनींची व वसुदेवाची तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर वसुदेवासी मुनींनी कोणत्याही प्रकारे संबंध करू नये,पण केले.यात आपले—मुनींचे औदार्य दिसून येते.वसुदेवाकडून मुनींना त्यांच्या अधिकारानुसार मोबदला मिळणार नाही,तरीही मुनी लोक वसुदेवासी संबंध ठेवणारच.यात मुनींचे औदार्य दिसून येते.||६२|| अर्थः---हे दादा नंदा.आम्ही पूर्वी बंदीत होतो तेव्हा बंदीत तेव्हा असमर्थ असल्यामुळे कांहीच तुमचे प्रिय केले नाही.आतां तर श्रीमदाने आंधळे डोळे झालेले आम्ही पुढे असणाऱ्याही तुम्हांस पाहत नाही||६३|| भावार्थ:---आमच्या—वसुदेवांच्या पूर्व—आयुष्यात आमच्या प्रारब्धानुसार आम्ही कंस यांनी कैदेत टाकल्यामुळे आपला सहवास न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची मदत करू शकलो नाहीत.आता आम्ही कस यांच्या कैदेतून सुटून स्वत्रंत आहोत.आता आम्ही स्वतंत्र असल्यामुळे गर्वाने आंधळे झालेलो आहोत.गर्वाने आंधळे झालेले असल्यामुळे आम्ही आपल्याकडे--मुनींकडे लक्ष देऊ शकत नाही.म्हणून आपण स्वतंत्र न राहता,धर्मांचे बंधन स्वीकारावयास पाहिजे.जीवावर कोणते—ना—कोणते बंधन असे जरुरी असते.ते बंधन उन्नतीकडे नेत असते.म्हणून आपण वरीष्ठांचे बंधन स्वीकारून आपले परमकल्याण करून घ्यावे.||६३|| अर्थः---हे मानदा,कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाला,राज्यलक्ष्मीच प्राप्त होऊं नये.कारण,तिच्या योगाने आंधळा (विवेकशून्य ) झालेला तो पुरुष,आपल्या आश्रित लोकांना किंवा बांधवानाही पहात नाही (त्यांचा प्रत्युपकार करीत नाही)||६४|| भावार्थ:--- ज्यास कायमचे दु:ख घालवून व कायमचे सुखरूप करून घ्यावावयाचे असेल तर त्याने निष्काम कर्म करावे,सकाम कर्म करू नये.सकाम कर्म केल्याने धन—संपत्ती—राज्यलक्ष्मी मिळत असते.त्यामुळे—संपत्तीमुळे आप्तेष्टांनाही विचारीत नाही.जिवापेक्षा धनला महत्व देतो,म्हणजे लोभीवृत्ती निर्माण होते.म्हणून निष्काम कर्मच करावे.निष्काम कर्माने भगवंतांची भेट होत असते.जड—धन--ऐश्वर्य हे आपल्याबरोबर येत नाही,तर देव आपल्याबरोबरच असतो.||६४|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,याप्रमाणे प्रेमतीशयाने सद्गतीत झालेला तो वसुदेव,नंदाने केलेल्या पुत्रलालनादिक मैत्रीचे स्मरण करीत असता,नेत्रांत अश्रू आणून करूं लागला||६५|| अर्थः---ते नंदराजा तर संख्या वासुदेवाच्या व रामकृष्णांच्या प्रेमाने त्यांचे प्रिय करण्याकरिता तीन महिने पर्यंत तेथेच राहिला.तो सकाळी जावयास निघाला म्हणजे आजच दोनप्रहरी जावे आणि दोनप्रहरी जावयास निघाला म्हणजे उद्या जावे असा यादवांनी सन्मानपूर्वक राहून घेतला होता||६६|| भावार्थ:--- आपल्याकडे कोणी एखादा मनुष्य—नातेवाईक कांही कारणास्तव आला असेल तर आपण त्या येणाऱ्या मनुष्यास प्रेमाने,आदरसत्काराने,आपुलकीने जिव्हाळ्याने ठेवावयास पाहिजे—वागणूक ध्यावावयास पाहिजे.त्यातच आपली माणुसकी दिसून येते.अशा रीतीने प्रेमाची आदान—प्रदान करावयास पाहिजे.||६६|| अर्थः---नंतर वासुदेव,कृष्ण,उद्धव व बलराम इत्यादिकांनी,बहुत मोलाची भूषणे,रेशमी वस्त्रे आणि अनेकप्रकारची भांडीकुंडीवगैरे देऊन गोपांसहवर्तमान तृप्त केलेला व बरोबर पुष्कळ सैन्य देऊन पाठवणूक केलेला तो नंद,त्यांनी दिलेले ते सर्व पारितोषिक (बक्षीस)घेऊन आपल्या छकडेवगैरे सामानासह निघून गेला||६७-६८|| भावार्थ:--- आपल्याकडे कांही निमित्ताने जे आलेले असतील,त्यांना वस्त्रे,अलंकार,वस्तू,देणे आपले कर्तव्य असते.यातून आपले प्रेम प्रगत होत असते.||६७|| अर्थः---त्यावेळी श्रीकृष्णाच्या चरणकमळी जडलेले चित्त पुनः माघारे फिरवून घेण्याविषयी असमर्थ व संसाराविषयी विरक्त अशी-नंदगोप,गोप व गोपी हि सर्वही ;आपल्या गोकुळांत न जाता निरंतर भगवत्संनिध्य असणाऱ्या मथूरेतच जाऊन राहिली||६९|| भावार्थ:--- नंद,गोप आणि गोपी यांचे चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झाले,त्यामुळे मथुरेला जात असतांना तेथून मन निघेना.दु:खित मनाने ते मथुरेस निघाले.आपलेही मन,जेव्हा देवांचा,संत—महात्म्याचा वियोग होण्याचा प्रसंग आला,तर दु:खित अंत:करणाने तेथून निघावयास पाहिजे.||६९|| अर्थः---याप्रमाणे सर्व बंधू आपापल्या स्थानी निघून गेले असतां,कृष्ण हीच ज्यांनी देवता आहे असे ते यादव,वर्षऋतू जवळ आला से जाणून,कृष्णाच्या आज्ञेने पुन्हा द्वारकेत निघून गेले||७०|| अर्थः---नंतर त्यांनी तेथील लोकांना तीर्थयात्रेमध्ये झालेला वासुदेवाच्या यज्ञाचा महोत्साह व संबंधीलोकांचे दर्शनवगैरे जे कांही घडले ते सर्व वर्णन केले||७१|| _________________________________________________________________________________________________________________________ | ८५--- २---श्रीभगवंतांचा वासुदेवांना ब्रम्हज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे---१--- _________________________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या पंचाऐंशीव्या अध्ययमध्यें,वसुदेवाने रामकृष्ण पुत्रांची प्रार्थना केली असता,त्यानें त्या पित्याला ज्ञान व देवकीमातेला पूर्वेमरण पावलेले पुत्र आणून दिले,अशी कथा वर्णन केली.आहे)||१|| | अथैकदाssत्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ | वसुदेवोsभिनन्द्दाह प्रीत्या संकर्षणाच्युतौ ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाले:---हे राजा,नंतर एकेवेळी वसुदेव,आपल्याजवळप्राप्त होऊन चरणाचेठिकाणी वंदन करणाऱ्या त्या रामकृष्ण पुत्रांना प्रीतीने आशीर्वादाने अभिनंदन करून भाषण करण्यास उद्युक्त झाला.||१|| अर्थः---तो पुत्राचे परमेश्वरत्वसूचक ऋषीचे भाषण ऐकून त्यांच्या ऐकीलेल्या पराक्रमांनी ते हे ईश्वर आहेत असा विश्वासयुक्त होऊन रामकृष्णांनी ओढणें देऊन म्हणाला की,-||२|| अर्थः---वसुदेव म्हणाला:---हे कृष्ण,हे महायोगीन,हे संकर्षणा,हे सनातना,तुम्हां उभयतांस या जगाचें साक्षात् स्वरूप भूत कारण जें प्रकृतीपुरुष व त्याचेही कारणरूप असें परमेश्वररूप तुम्हीं आहां,मी असें जाणतो ||३|| भावार्थ:---भगवंत श्रीकृष्ण आणि बलरामदादा दोघेही सनातन म्हणजे अनादी आहेत.तसेच जगताचे कारण असून,तेच जगताचे नियामक व ईश्वर आहेत.||३|| अर्थः---आतां कर्ताकर्म इत्यादिक अनेकप्रकारच्या कारकांनी झालेले हें जग,प्रकृतिपुरुषात्मक कसें व त्यांच्याही कारणत्वेंकरून आम्हांस ईश्वरत्व कसें?असें म्हणाल ते ज्या स्वरूपीं,ज्या कर्त्यानें ज्या साधनानें,ज्या पासून ज्या ज्या संबंधाने,ज्या करीता,जे ज्यास जसें जेव्हां,हें जग उत्पन्न होतें ती भोगेप्रकृतीचा व भोक्त्या पुरुषाचाही ईश्वर भगवान् तूच आहे.||४|| अर्थः---आता,धारण पोषण करनाराही तुच आहेस असे सांगतो हे आधोक्षजा ,हे आत्मरुपा ,आपणच उत्पन्नकेलेल्या ह्या देवतिर्यगादिरूपी नानाप्रकारच्या जगामध्ये तुच प्रवेश करून स्वता जन्मादि विकाररहित असूनही,क्रियाशक्तीरुपी जीव होऊन याचें धारण व पोषण करितोस.||५|| भावार्थ:--- भगवंत इंद्रियातीत म्हणजे त्यांना इंद्रिये नाहीत.इंद्रीयाद्वारा ते अनुभवास येत नाहीत.ते आजन्म आहेत म्हणजे त्यांना जन्म नाही.अनेक प्रकारचे जग त्यांनीच निर्माण केलेले आहे.तसेच जीवात त्यांनीच प्रवेश केलेला आहे.भगवंतच प्राण होऊन क्रीयाशक्तीवन व जीव होऊन ज्ञानशक्ती होऊन पालन—पोषण करत आहेत.थोडक्यात त्यांच्या सत्तेवर सर्व जगताचा व जीवाचा व्यवहार चाललेला आहे.म्हणून असा जो भगवंत आहे,त्यांना जाणून,त्यांचा अनुभव घ्यावा.||५|| अर्थः---आता प्रनादिकांनाचा विचित्र शक्तींनी युक्त असें जगाचें कारणतव दिसत असता,परमेश्वराला कारणत्वेकरून सर्वात्मकत्व कसे?असें म्हणशील तर-जगाला उत्पन्न करणाऱ्या प्राणादिकांच्या ज्या शक्ती आहेत त्या प्राण्यांदिकांना परतंत्रत्व असल्यामुळें त्याचे परम कारण असल्याला ईश्वराचा आहेत.म्हणजेच जशी वेधय करण्याची शक्ती बाणांची आहेशी वाटते परंतु टी बाण परतंत्र असल्यामुळे ती शक्ती त्यांची नोहें,तर पुरुषाची आहे त्याचप्रमाणे समजावे.आतां ईश्वराचें व प्राणांदिकांचे निरनिराळे स्वतंत्र आहे म्हणाले तर-ते प्राणादिक अचेतन व ईश्वर चेतन असल्यामुळे अचेतनाला चेतनच्या स्वाधीन असणे योग्य आहे.आतां प्राणादिकांस शक्ती नाहीं तर कार्य कसें घडतें?असें म्हणावें तर जसें वाऱ्याच्या शक्तीने तरूणादिकांचे चलन वळण घरते परंतु त्यांची शक्ति नोहें किंवा जशा पुरुषाच्या शक्तीनें बाणांना वेग उत्पन्न होतो,ती शक्ति बाणाची नोहें त्याचप्रमाणे चलन वळण पावणाऱ्या प्रनादिकांच्या ज्या शक्ति,त्या त्यांच्या नसून एक,सर्वज्ञ,सर्वशक्ति अशा परमेश्वराच्या आहेत||६|| भावार्थ:---परमात्म्याच्या सत्तेमुळेच—सामर्थ्यामुळेच प्राण क्रिया करतात.परमात्म्याची सत्ता—सामर्थे नसेल तर प्राणात क्रिया होणार नाही.म्हणून यात परमात्मा सत्तावान—सामर्थेवान महत्वाचा आहे व प्राण गौण आहे.जसे विजेच्या सामर्थ्यामुळेच—सत्तेमुळेच पंख्यात क्रिया करण्याचे सामर्थे आलेले आहे. विजेचे सामर्थे नसेल तर पंखा क्रिया करू शकत नाही.म्हणून यात वीज मुख्य आहे.क्रिया गौण आहे.याकरिता जो मुख्य आहे,महत्वाचा आहे,त्यास प्रथम प्राधान्य ध्यावे व त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.तो परमात्मा सुखरूप आहे,म्हणून सुखरुपतेसाठी परमात्माच जो सत्तावान आहे,त्यालाच आपलेसे करून,त्याचा अनुभव घ्यावा.||६|| अर्थः---आतां त्या प्रनादिकांचे परतंत्रत्व कसें?ते सांगतो-चंद्राची कांती,अग्नीचं तेज,सूर्याची प्रभा,नक्षत्रे व विजा यांचे स्फुरण पावणें,पर्वतांची स्थिरता व भूमीचें प्राण्यांच्या आधारत्वेंकरून वर्तन व गुंधार्ण ही सर्व वस्तुतः तुझ्याच शक्ति आहेत ||७|| भावार्थ:--- चंद्राचे चांदणे,अग्नीचे तेज,सूर्याची प्रभा,नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे,पर्वतांचे स्थैर्य,पृथ्वीची आधाराशक्ती व पृथ्वीचा गंघरूप गुण हे सर्व वास्तविक परमात्माच आहे.कारण चंद्रातील चांदणे जे आहे,अग्नीचे तेज जे आहे,सूर्याची प्रभा जी आहे,विजेचे जे चमकणे आहे,पर्वतातील स्थैर्य जे आहे,पृथ्वीची आधाराशक्ती जी आहे,व पृथ्वीतील गंधरूप गुण जो आहे,तो सर्व परमात्म्याचाच आहे.परमात्म्याची सत्ता—सामार्थे जर नसेल तर चांदरात चांदणे नाही,अग्नीत तेज नाही,सूर्यात प्रभा नाही,नक्षत्राचे आणि विजेचे चमकणे नाही,पर्वताचे स्थैर्य नाही,पृथ्वीची आधाराशक्ती नाही,पृथ्वीचा गांधृप गुण नाही,हे सर्व वास्तविक परमात्म्याचेच आहे.म्हणून सत्ता—सामार्थे महत्वाचे आहे व चंद्र,अग्नी,सूर्य,नक्षत्रे,वीज,पर्वत,पृथ्वी हे सर्व गौण आहेत.म्हणून परमात्मा प्राप्त करून घ्यावा.||७|| अर्थः---हे ईश्वरा,उदकाची तृप्त करण्याची शक्ति,वांचविण्याची शक्ति,देवत्व,उदकत्व व त्यांचा रस हे सर्व तूंच आहेस:तसेंच वायुचें जें इंद्रियसामर्थ्य,अंत:करणसामर्थ्य शरीरसामर्थ्य शरीरव्यापार व गति ही सर्व तुझ्याच शक्ति आहेत ||८|| भावार्थ:---ज्या पाण्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची जी शक्ती—समर्थे—सत्ता आहे,इंद्रियात जी शक्ती—सामार्थे—सत्ता आहे,अंत:करणात जी शक्ती—सामार्थे—सत्ता आहे,शरीरात जी शक्ती—सामार्थे—सत्ता आहे,शरीराची हाल—चाल,चालणे—फिरणे इत्यादी ज्या वायूची शक्ती—सामार्थे—सत्ता आहे,या सर्व परमात्म्याच्याच आहेत.परमात्म्याची शक्ती—सामार्थे—सत्ता नसेल हे कांहीच करू शकत नाही.जसे पंख्याचे फिरणे,दिव्याचे प्रकाश देणे,विद्धुत मोटारीचे पाणी विहिरीतून वर काढण्याचे शक्ती--सामार्थे—सत्ता,इत्यादी सर्व शक्ती—सामार्थे—सत्ता ही विजेचीच आहेत. विजेची शक्ती—सामार्थे—सत्ता नसेल तर हे कांहीच करू शकत नाहीत.म्हणून जो महत्वाचा परमात्मा आहे तो संत—महात्मा यांच्या सत्संगात श्रद्धा ठेऊन,निष्काम धर्मानुसार सेवा करून,श्रावण करून प्राप्त करावा.||८|| अर्थः---दिशांचा अवकाश व दिशा तूं आहेस आकाश व आकाशाचा आश्रय शब्दतन्मात्रा,पर पश्यंती ओंकार (मध्यमा)व वर्णपददिकांचे पृथक्करन करणारी वैखरी ह्या तुंच आहेस ||९|| अर्थः---इंद्रियांची जी विषयप्रकाश शक्ती व त्यांचे जे अधिष्ठाते देव व त्यांची जी प्रेरणा करण्याची शक्ति ती तुंच आहेस,तशीच बुद्धीची जी निश्चयातमक शक्ति व अंतःकरणाची अनुसंधान शक्ती ती तूं आहेस ||१०|| अर्थः---पंच महाभूतांचे कारण ताप्रसांहकार,इंद्रियांचे कारण राजसाहंकार,इंद्रियांच्या देवतांचे कारण सात्विक अहंकार व जीवांच्या संसाराचें कारण माया ही सर्व तूं आहेस ||११|| अर्थः---जसे नश्वर असलेल्या घटकुंडलादीक पदार्थामध्येंमृत्तिकासुवर्नादिक पदार्थ मात्र अविनाशी आहे त त्याप्रमाणे येथे असलेल्या सर्व नश्वर पदार्थामध्ये जे अविनाशी अवशेष रणारे तत्त्व आहे ते तूं आहेस||१२|| अर्थः---सत्व,रज व माझ्याहून निराळे नाहीत.ज्यावेळी हे पदार्थ तुझ्यास्वरूपी मायेने कल्पितपणे प्रीतीतीला येतात,त्याच वेळी तूं यांच्यामध्ये कारणत्वाने अनुगत आहेस असे भासते,नाहीतर निर्विकल्परूपाने तूंच अवशेष राहतोस||१४|| अर्थः---या गुणप्रवाहरूप संसारामध्ये सर्वात्मा अशा तुझी प्रपंचांतील सूक्ष्म गती न जाणाणारे अज्ञानी लोक,देहाभिमानाने केलेल्या कर्मांच्या योगाने या लोकामध्ये संसार पावत आहेत||१५|| अर्थः---याप्रमाणे त्यांचे तत्त्व निरुपण करून,आतां ते प्राप्त झाले नाही म्हणून शोक करितो-हे ईश्वरा,दैवयोगाने या लोकी दुर्लभ व इंद्रियेवगैरे कुशळ असलेले मनुष्यत्त्व प्राप्त झाले असतांही तुझ्या मायेने मोहित होऊन,आपल्या स्वार्थाविषयी असावध राहाणाऱ्या माझे,हे आयुष्य व्यर्थ निघून गेले आहे||१६|| अर्थः---तूं काय म्हणून असावध झालास असे म्हणशील तर-देहाचेठिकाणी हा मी आहे,अशा व या देहाच्या संबंधाने असलेल्या पुत्रांचेठिकाणी हे माझेच आहेत याप्रमाणे अभिमानरूप स्नेहापाशांच्या योगाने तूं हे सर्वही जग मोहित करून टाकीत आहेस||१७|| अर्थः---यास्तव तुम्ही उभयंता आमचे पुत्र नाही तर साक्षात प्रधानपुरुषांचे ईश्वर नसून पृथिविला भारभूर असलेल्या क्षत्रियांच्या संहाराकरिता अवतीर्ण झाला तसे तूं स्वतांच मला पूर्वी सांगितले आहेस||१८|| अर्थः---म्हणून हे दीनबंधो,शरणागतांचे संसाररूप भय माहीसे करणाऱ्या तुझ्या चरणकमलाप्रत आज मी शरण झालो आहे.आतां तूं अति सुखी असून व्यर्थ का संसाराला कंटाळतोस असे म्हणशील तर-इतक्या झालेल्या विषयासक्त तेणे पुरे पुरे झाले.कारण,ज्या विषयासक्तेने मला,शरीरावर आत्म बुद्धी आणि तुज परमेश्वरावर पुत्रबुद्धी उत्पन्न झाली||१९|| भावार्थ:--- आपण भगवंतांस सर्वभावाने शरण जावावयास पाहिजे,कारण परमात्मा सत्—चीत्—आनंदरूप आहे व आपणास सत् म्हणजे मी तीनही काळात—वर्तमान काळात,भविष्यकाळात व भूतकाळात असावे असे वाटते.चीत् म्हणजे ज्ञानस्वरूप—कळणारा—जाणणारा व आनंदरूपच म्हणजे सदा—नेहमी आनंद असावा.म्हणजे जसा परमात्मा सत्—चीत्—आनंदरूप आहे,त्याचप्रमाणे माझीही आवड आहे.म्हणजे परमात्मा आणि मी जीवात्मा दोघेही सारखेच आहेत,म्हणून एकच आहेत.जीवास अज्ञान असल्यामुळे तसे कळत नाही.म्हणून जीवाने सदगुरू नाथांना शरण जाऊन कळून—जाणून घेण्याचा आवश्य प्रयत्न करावा.कारण शरणगतांचे संसारभय नाहीसे करणारे सदगुरूच आहेत.आतापर्यंत इंद्रियांचे लाडकौतूक केले,पण आता यापुढे करणार नाही.आपले चुकलेले आहे.आपण चुकीची कबुली करून,आता यापुढे असी चूक करणार नाही असी क्षमा सदगुरू—भगवंत यांच्यापुढे मागून तसे आचरण करावे.दिलेला शब्द पाळावा.अज्ञान दशेमुळे आपण शरीराला आत्मा समाजाला व परमात्मा व जीवात्म्यात भेद केला.आता आम्हास यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून शरण आलो आहे,तरी कृपया आपण मला ज्ञानाचा उपदेश करावा.||१९|| अर्थः---आता मी परमेश्वर कसा?असे म्हणशील तर –हे भगवान तूं मला सुतीचे गृहाचे ठिकाणी पूर्वी जसे सांगितले आहेस कि,जेव्हा असाही मी,आपण प्रवृत्त केलेल्या धर्ममर्यादाच्या रक्षणाकरिता अवतीर्ण झालो आहे म्हणून आकशासारखा असंगहि तूं,नानाप्रकारचे अवतार धारण करितोस व सोडून देतोस,हे वेद्गीता प्रभो,सर्वव्यापक अशा तुझ्या विभूतीरूप मायेला कोण पुरुष जंत आहे?कोणीच नाही||२०|| भावार्थ:--- भगवंत अजन्मा जरी असले तरी धर्मार्यादांचे व सज्जनांचे रक्षण करण्याकरिता व दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता प्रत्येक युगात जन्मास येतात व ते कार्य करतात.आकाश जसे घटात असून त्यापासून अलिप्त राहते,त्याचाप्रमानी भागाकॅंत शरीरे धारण करून,ते कार्य करून त्या कार्यापासून अलिप्त राहतात.त्याचप्रमाणे आपणही धर्मानुसार कार्य करून,त्यापासून अलिप्त असावयास पाहिजे.त्यात आपलेच हित आहे.त्यासाठी महात्मा यांचा सत्संग करावा.||२०|| अर्थः--- श्रीशुकाचार्य म्हणाला- हे राजा,याप्रमाणे यादवांमध्ये श्रेष्ठव विनयाने नम्र अशा नम्र अशा भगवंताने,पित्याचे श्रवण करून हास्य करीत मधुर वाणीने प्रतीभाषण केले कि,-||२१|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला-हे ताता,ज्या अर्थी तुम्ही आम्हा पुत्रांना उद्देशून तत्त्वसामुदाय उत्तम प्रकारे निरुपण केला आहे त्याअर्थी हे तुमचे वचन यथार्थ आहे असे आम्ही मानितो ||२२|| अर्थः---आता हीच दृष्टी सर्व ठिकाणी धारण करावी असे सांगतो-हे यदुश्रेष्ठा ताता,मी,तुम्ही,हा बलराम,व हे द्वारकावासी सर्व लोक,किंबहुना चराचर सर्वही प्राणी,तुम्ही माझ्यासारखेच ( परब्रम्हरुपी)आहेत असे विचारपूर्वक जाणावे||२३|| भावार्थ:--- सर्व जड,जीव व ईश्वर म्हणजेच चराचर जगात हे सर्व परमात्मस्वरूप—ब्रह्मस्वरूपच आहे.हे जगात म्हणजेच नाम—रूप मिथ्या आहे व परमात्मा—ब्रह्म सत्य आहे.असी आपली धारणा होण्यासाठी संत—महात्मा यांचा सत्संग करून कळून घ्यावे,त्यासाठी अगोदरच निष्काम कर्म व निष्काम उपासना करावी.||२३|| अर्थः---जशी आकाश,वायू,तेज उदक व भूमी हि पंचमहाभूते आपणापासून उत्पन्न केलेल्या घटादि कार्यामध्ये उपधीध्मार्गानी प्रगत होणे ,नाश पावणे ,थोडेपणा बहुतपणावगैरे धर्म पावल्यासारखी वाटतात त्यप्रमाणे हा आत्माही आपण उपन्न केलेल्या गुनपारीनामात्मक महदादिक कारणांनी रचलेल्या देवमनुष्यादिक देहामध्ये उपधिधर्मानी मनुष्यदिकाचे ज्ञाच्या अविभ्र्याने ,वृक्षादिकामध्ये ज्ञानाच्या तीरोभावाने ,माशाकादिकात अल्पत्वाने व हस्यादिकात महत्वाने नानाप्रकारे भासतो परंतु हा वस्तुतः तसा नाही तर आत्मा एक असता अनेकृपानी ,स्वयाप्रकाश असता दृष्यारुपणे नित्य असता अन्यात्वाने निर्गुण असता सागुनात्वाने व व्यापक असता परिच्छिन्न रूपाने भासतो ||२४-२५|| भावार्थ:--- आत्मा हा स्वयंप्रकाश म्हणजे त्यास प्रकाश मिळण्यासाठी अन्य प्रकाशाची गरज नाही,कारण परमात्म्याच्या प्रकाशामुळे सर्व ब्रह्मांड प्रकाशित होते,म्हणून त्यास स्वयंप्रकाश असे म्हणतात.जसे सूर्यास पाहण्यासाठी अन्य प्रकाशाची गरज नसते,तर त्याच्याच प्रकाशाने तो दिसतो व जगही त्या सूर्याच्या प्रकाशाने दिसते.म्हणून लौकिक भाषे त्याला स्वयंप्रकाश असे म्हणतात.आध्यात्मिकदृष्ट्या सूर्य हा परप्रकाशित आहे,कारण त्याचा प्रकाश त्याचा नसून तो परमात्म्याचा आहे.ही खरी वास्तविकता आहे,पण अज्ञानामुळे असे काळात नाही.म्हणून हे कळण्याकरिता संत—महात्मा यांचा सत्संग करून कळून घेण्याचा प्रयत्न करावा.परमात्मा नित्य आहे,म्हणजे तो तीनही काळात म्हनज भूत काळात,वर्तमान काळात व भविष्य काळात आहे.परमात्मा निर्गुण आहे,म्हणजे त्याला स्वत:स कोणताही—सत्वगुण,रजोगुन व तमोगुण नाही.हे गुण जी माया आहे,तिचे आहेत.म्हणून परमात्मा निर्गुण आहे.मायाच्या गुणामुळे पंचमहाभूते त्यानेच निर्माण केलेली आहेत.त्यामुळे तो एक असून अनेक वाटतो.परमात्मा अनेक नसून एक आहे असे कळण्याकरिता संत—महात्मा यांचा सत्संग करून कळून घ्यावे.||२४|| भावार्थ:--- आकाश,वायू,अग्नी,पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारानारुपात म्हणजे मायात एक असून प्रगट—अप्रगट,लहान—मोठी,एक—अनेक अशा रुपात प्रगट होतात.मायामुळे---त्यांच्यामुळे आत्मा एक असून आपल्या अज्ञानामुळे उपाधीच्या भेदामुळे अंक भासतो.म्हणून अज्ञान नाहीसे करून ज्ञान प्राप्त करावे.||२५|| अर्थः---श्री शुक्राचार्य म्हणाला –हे राजा याप्रमाणे भगवंताने भोध केलेल्या त्या वसुदेवाने ते आत्म्याचे एकत्व श्रावण करून भेद्बुद्धीरहिरहित व संतुष्ठचीत्त होत्यास उगीच राहिला ||२६|| अर्थ:----हे राजा सर्व देवतारूप देवकी आपल्या पुत्राचे रामकृष्ण पुत्रांनी संदिपानगुरूच्यामरण पावलेल्या पुत्र जिवंत करून आणिला असे एकूण ,विस्मित झाली आणि कंसाने मारलेल्या आपल्या पुत्राचे स्मरण करून शोकाने नेत्रात अश्रू होत्यासी श्रीकृष्ण व बलराम य उभयताना संबोधणे देवून दीनपणे असे म्हणाली कि -३७||२८|| अर्थ:----देवकी म्हणाली –हे अचिंत्यस्वरूप रामा राम हे योगेश्वरेश्वरा कृष्ण,तुम्ही उभयंता विश्वस्त्रस्ठ्या प्रजातीचे ईश्वर आदिपुरुष आहा असे मी जाणत्ये ||२९|| अर्थ:----तूनही उभयंता,काळाच्या प्रभावाने सत्वगुणाचे विवेकधैर्यादिक कार्य नाहीसे झालेल्या ,शास्त्रीय मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या व भूमीला भारभूत अशा राजाच्या नाशाकरिता माझेठीकानी अवतीर्ण झाला आहा ||३०|| अर्थ:----हे विश्वात्म्या हे आद्या ज्या तुझ्या पुरुषरूप अंशाच्या मायारूप झालेल्या गुणाच्या अंशाने जगाच्या उत्पत्तीस्थितीसावर होतात असे प्रसिध्द तुला मी आज शरण आले आहे||३१|| भावार्थ:---आपण संत—महात्मा यांचा सत्संग करून ज्ञानाद्वारे अनेकत्वबुद्धीचा त्याग करून एकत्वबुद्धीचा स्वीकार करावा व आनंदात राहावे.||२६|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्ण योगेश्वारांचे ईश्वर आहेत.प्रजापतीचे ईश्वर आहेत.आदिपुरुष नारायण,अनादी अनंत,अजन्मा,असे परमात्मा आहेत.||२९|| भावार्थ:--- जे दुष्ट धर्मानुसार—शात्रानानुसार आचरण करत नाहीत व इतरांना सत्कर्म करू देत नाहीत,अशांना शासन—शिक्षा करण्याकरिता—दुष्टांचा संहार करण्याकरिता,सज्जनांचे रक्षण करण्याकरिता धर्मांची स्थापना करण्याकरिता मनुष्य शरीर धारण करतात.म्हणून आपण धर्मानुसार-शात्रानुअर आचरण करावे.||३०|| भावार्थ:--- आपल्यामुळेच—श्रीकृष्णांमुळे--परमात्म्यामुलेच जगाची उपत्ती,स्थिती आणि प्रलय होते.असे आपण सत्तावाव—सामार्ठेवान आहात,म्हणून आपण परमात्म्यास—श्रीकृष्णास शरण म्हणजे त्यांच्या शात्रानुसार—धर्मशात्रानुसार आचरण करणे.आपल्या स्वत:च्या मतानुसार न वागणे,यास शरण जाणे म्हणतात.||३१|| अर्थः---हे योगेश्वरेश्वराचा मारून फार वर्षे झालेल्या पुत्राला आणून देण्याविषयी सांदिपनी गुरूने आज्ञा केलेल्या तुम्ही,यमसदनापासून त्याला आणिले व गुरूला गुरुदक्षिणा दिलीत असे प्रसिद्ध आहे.तसाच माझाही मनोरथ तुम्ही पूर्ण करावा.कोणता तो मनोरथ ? असे म्हणशील तर-कंसाने मारलेल्या माझ्या पुत्रांना जर तुम्ही आणिले तरत्यांना पाहण्याची मी इच्छा करीत आहे||३२-३३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,या प्रमाणे मातेने प्रार्थना केलेल्या त्या रामकृष्णांनी ,आपल्या अचिंत्यशक्ती योगमायेला आश्रय करून,सुतलामध्ये प्रवेश केला||३४|| अर्थः---जगताचे आत्मभूत दैवत आणि आपले तर अत्यंत इष्ट दैवत अशा पतळांत प्रविष्ट झालेल्या त्या दोघा रामकृष्ण बंधूना पाहून,सुतलामध्ये प्रवेश केला||३५|| भावार्थ:---आपण भगवंत—संत—महात्मा आपल्याकडे येताच,आपण उभे राहून त्यांना आपल्या कुटुंबीयासहीत साष्टांग नमस्कार करावा.आपले हित असते.||३५|| अर्थः---आणि त्या महात्म्यारामकृष्णांना प्रीतीपुर्वक श्रेष्ठ आसन समर्पण करून त्यावर बसलेल्या त्यांच्या,ज्यांचे प्रक्षालनोद्क ब्रम्हदेवापर्यंत सर्व जगाला पवित्र करीत आहे त्या चरणाचे प्रक्षालन करून ते उदक,आपल्या परिवारासहवर्तमान मस्तकी धारण केले||३६|| भावार्थ:---श्रेष्ठ पुरुषांचे आगमन झाले असता आपण त्यांचा आदरसत्कार करून,बसण्याकरिता आसन देऊन त्यांची पाध्य—पूजा करून चरणतीर्थ सेवन करावे.||३६|| अर्थः---आणि त्या रामकृष्णाचे उत्तम वस्त्रें,भूषणे,उट्या,तांबुल,दीप,आणि अमगतासारखे तसेच आपले पुत्रपौत्रादिक कुळ,धन व देह यांच्या समर्पणाने पूजन केले||३७|| भावार्थ:--- आपण देव—संत—महात्मा यांना वस्त्रे,अलंकार,चंदन,तांबुल,दीपक,अमृतासारखे जेवण,धन व विविध सामाग्रींनी त्यांची उत्तम पूजा करावी.आपली आर्थिक परिस्थिती पाहून समर्पण करावे.आपण स्वत:स त्यांच्या चरणांवर समर्पित व्हावे म्हणजे त्याच्या अज्ञानुसार आचरण करावे.त्यात आपलेच हित असते.||३७|| अर्थः---हे राजा, नंतर तो बळीराजा, प्रेमाने द्र्वयुक्त झालेल्या आपल्या बुद्धीने भगवंताच्या चरणकमलाचे वारंवार धारण करित हो बळी म्हणाला- हे देवा, फडीच्या एकदेशी जग धरण करणाऱ्या शेषरूपी तुज बळरामाला नमस्कार असो. व जग उत्पन्न करणाऱ्या तुज कृष्णाला नमस्कार असो. सांख्यशास्त्राचे प्रवर्तक ब्रम्हरूपी व परमात्मे अशा एकरूपपी तुम्हां उभयतांना नमस्कार असो ||३८-३९|| भावार्थ:--- भगवंत सर्व जगाचे निर्माते,रक्षण कर्ते व संहार करणारे आहेत.कर्मयोग,भक्तियोग व ज्ञानयोग यांचे प्रवर्तक आहेत.याकरिता आपण निष्काम कर्म,निष्काम भक्तियोग करून व ज्ञान प्राप्त करून जीवनाचे सार्थक करावे.त्यांनाच शरण जावे व त्यांनाच नमस्कार करावाकारण त्यात परम हित आहे.||३९|| अर्थ:--- ज्या अर्थी योगेश्र्वरांच्याही दृष्टी न पडणारे तुम्ही आपल्या इच्छेने रजोगुणाच्या व तमोगुणाच्या स्वभावांनी युक्त अशा आमच्या दृष्टी पडला आहां,त्याअर्थी तुमचे दर्शन पुष्कळ जीवांना दुर्लभ असूनही तुमच्या कृपेने काही जीवांनामात्र सुलभ होते असे निश्चित झाले||४०|| भावार्थ:--- भगवंतांचे दर्शन दुर्लभ असते.आपण जरी रजोगुणी व तमोगुणी असून जर निष्काम भक्ती केली तर आपणास त्यांचे दर्शन होते.||४०|| अर्थः---आतां तुम्ही शत्रू असूनही सात्विक भक्तांपेक्षा सभाग्य आहो असे सांगतो-दैत्य,दानव इत्यादिक आम्ही व गंधर्व,सिद्ध,विद्याधर,चारण,यक्ष,रक्षा,पिशाच,भूत,प्रथमाधिपती इत्यादिक आमच्यासारखे दुसरेही जे कितीएक लोक आहेत ते साक्षात शुद्धसत्व मी व वेदमूर्ती अशा तुझेठीकानी निरंतर वैरभाव धारण करणारे आहेत त्यांमध्ये जसे कितीएक (शिशुपालादिक)पराकाष्ठेच्या वैरभक्तीने व कितीएक (गोपीवगैरे)कामभक्तीने तुझे स्वरूप पावले आहेत,तसे सत्वनिष्ठ असलेले देवही तुझे स्वरूप पावले नाहीत||४१-४३|| भावार्थ:---काहींनी वैरभावाने—शत्रुभावांनी,काहींनी मैत्रीभावांनी,काहींनी भाक्तीभावांनी,काहींनी पिताभावांनी,काहींनी माताभावांनी,थोडक्यात कोणत्याही भावांनी परमात्म्यासी संबंध जोडून भगवंतांचा ध्यास—स्मरण निरंतर करावे.निरंतर घ्यान—स्मरण केल्यास त्यास दर्शन होते.म्हणून भक्ती करावी.||४१—४३|| अर्थः---आतां सात्विकापेक्षा राजस तामस श्रेष्ठ आहेत हे मोठे आश्चर्य आहे असे म्हणावे तर-हे योगेश्वर,बहुधा योगेश्वरही तुझ्या योगमायेला हि अशा स्वरूपाची व अशा प्रकारांची आहे आहे जंत नाहीत मग आम्ही तर काय जाणणार आहो||४४|| भावार्थ:--- भगवंतांच्या चरणी म्हणजे अधिष्ठानरूपी जो परमात्मा आहे,त्याच्या ठिकाणी चित्तवृत्ती राहावयास पाहिजे,कारण परमात्मा सुखरूप आहे व आपणासही सुखाचीच गरज आहे.आपण गृहस्थाश्रामाच्या अंधाऱ्या विहिरीत म्हणजे जन्म—मरणरूपी दु:खात पडलेलो आहोत,आपणास—सर्व जीवांस दु:ख नको आहे व सुखाची गरज आहे.म्हणून आपण भगवंतांचा—परमात्म्याचा आश्रय घ्यावा.जीव हा परस्वाधीन आहे.जो परस्वाधीन असतो,त्यास आश्रयाची गरज असते.म्हणून जो आश्रय देण्यास समर्थ—स्वतंत्र आहे,त्याचाच आश्रय घ्यावा.जो परस्वाधीन व परतंत्र त्याचा आश्रय घेऊ नये.जीव हा परतंत्र आहे व परमात्मा हा स्वतंत्र आहे. म्हणून जे संत—महात्मा परमात्म्यापर्यंत पोहंचू शकतात,अशा संत—महात्माचा सत्संग करून आपले परम कल्याण करून घ्यावे.त्यातच परमहित आहे.||४५|| अर्थः---हे प्रभो,हे सर्व जीवांच्या ईश्व्राम्जे तूं सांगितले आचरण करणारा पुरुष,विधीनिषेधरूप बंधनापासून मुक्त (जीवन्मुक्त)होतो ते तूं आपले दास्य आम्हांस सांग आणि निष्पाप कर||४६|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण चराचरांचे म्हणजे जड व जीवांचे नियंते आहेत.आपण भगवंतांच्या—शात्राच्या अज्ञाचे पालन करणे हे आपल्या परामहिताचे आहे.त्यामुळे आपणांस धर्माचे व वेदांताचे ज्ञान होते.धर्माचे व वेदांतांचे ज्ञानानुसार आचरण करावे लागते.त्यामुळे आपण विधी-निषेधाच्या बंधनातून मुक्त होतोत.||४६|| अर्थः---याप्रमाणे प्रार्थना केलेला श्रीभगवान म्हणाला कि,-स्वायंभुव मन्वतारामध्ये मरीचीणाम्क प्रजापतीचे ऊर्णा-(कला)नामक स्त्रीचे ठिकाणी सहा पुत्र देव उत्पन्न झालेले होते,ते कन्या सरस्वतीबरोबर मैथुन करण्याविषयी उद्दुक्त झालेल्या पाहून हंसले||४७|| भावार्थ:---पुत्राचे कर्तव्य आहे कि,आपल्या माता—पित्यांचे मनोगत जाणून त्यांची इच्छा पूर्ण करणे.त्यांची—मत—पित्यांची इच्छा पूर्ण न केली तर ते दु:खी होतात.म्हणून त्यांचे दु:ख घालविण्यासाठी व सुखप्राप्तीसाठी त्यांची मनोकामना पूर्ण करणे.त्यामुळे माता—पित्यांचा आशीर्वाद मिळत असतो.||४७|| अर्थः---त्या परिहासरूप दुष्टकर्माच्या योगाने (ब्रम्हदेवाच्या शापाने)ते तत्काळ दैत्ययोनी पावून हिरण्यकशिपुचे पुत्र झाले होते.तथापि यद्यपि हिरण्यकशिपुचे पुत्र प्रल्हादिक सांगितले आहेत तथापि या उक्तीच्या आधाराने तेही पुत्र झाले होते असे जाणावे.तेथून ते जन्मास येतांच कंसाने मारून टाकिले.हे बळी राजा,आतां ती देवकी त्या आपल्या मेलेल्या पुत्रांच शोक घालविण्याकरीता घेऊन जातो.आईचा शोक दूर झाल्यावर शापापासून (दैत्ययोनिपासून )मुक्त होऊन सुख युक्त हो त असता देवलोकी गमन करित||५०|| अर्थः---स्मर,उदिथ.परीश्वंग पतंग,क्षुद्र भृत आणि घृणी या नावांचे हे सहाजण पुत्र माझ्या प्रसादाने पुन्हा सदिथ पावतील||५१|| अर्थः---असे बोलून त्या पुत्रांना घेऊन बळीराजाने पूजा केलेल्या त्या रामकृष्णांनी,पुन्हा द्वारकेत येऊन आईला ते पुत्र अर्पण केले||५२|| भावार्थ:--- भगवंत आणि बलरामदादा ते मुले घेऊन द्वारकेस असले व देवकीकडे सुपूर्द केले.त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनातून पुत्रास्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या.पुत्र—प्रेमाचा हा परिणाम आहे.यास प्रेम असे म्हणतात.त्या मुलांना छातीसी धरून त्यांची मस्तके हुंगु लागली व प्रेमाचा आनंद घेऊ लागली.||५३|| अर्थः---त्या बालकांना अवलोकन करतांच पुत्रांच्या स्नेहाने स्तनांतून दुध स्त्रवूं लागलेली ती देवकी,त्यांना आलिंगन करून व मांडीवर बसवून आनंदित झालेल्या त्या देवकीने त्या पुत्रांकडून स्तनपान करविले||५४|| भावार्थ:--- भगवंतांनी देवकी मातेवर मायेचा पडदा टाकला,कारण तिला पुत्रप्रेमाचा आनंद घेऊ ध्यावावायाचा होता.मायेचा पडदा टाकला नसता तर देवकिस पुत्र—प्रेमाचा आनंद लुटता आला नसता,कारण तिला भगवंतांनी ज्ञानाचा उपदेश केला होता,त्यामुळे तिचे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञानाचा परिणाम परमात्म्याची अनुभूती आली होती.भगवंतांत कर्तुंम—अकर्तुम—अन्यथा कर्तुंम शक्ती असल्यामुळे मायेचा पडदा टाकता आला.म्हणून देवकीची इच्छा पूर्ण करता आली.जीवात भगवंताइतके सामार्थे नसले तरी धर्मानुसार आपापल्या माता—पित्यांची सेवा करून,त्यांची इच्छा पूर्ण करता येते.आपण ती इच्छा पूर्ण करावी.त्यामुळे आशीर्वाद मिळतो.||५४|| अर्थः---ते पुत्रही श्रीकृष्णाने प्रोषन अवशेष राहिलेले त्या देवकीचे अमृतमय दुध प्रश्न करुन ,श्रीकृष्णाच्या अंगास्पर्षाने,ज्यांना आम्ही देव आहो असे ज्ञान झाले आहे असे होऊन ते श्रीकृष्ण,देवकी,वासुदेव,आणि बलराम यास नमस्कार करून सर्व लोक पाहत असता देवांचे स्थान अशा स्वर्गास निघून गेलो ||५५-५६|| भावार्थ:---देवकीच्या ज्या स्तनास श्रीकृष्णांनी स्तनपान केले होते,त्याच स्तनास जे बालक मृत झालेले जिवंत परत आणले होते,त्यांनी स्तनपान केले.श्रीकृष्णांचा उच्छीष्ट त्यांनी सेवन केल्यामुळे,त्यांच्या पूर्वपुण्याईने व आताच्या उच्छीष्ट सेवनाने त्यांना आत्मासाक्तकार झाला.म्हणून आपण संत—महात्मा यांच्या स्थूल जेवणाचे उच्छिष्ट सेवन केले तर अंत:कारण शुद्ध होते.त्याच संत—महात्म्याचा उपदेशरूपी—श्रवनरूपी प्रसाद सेवन केला तर आत्मसाक्षात्कार होतो.||५५|| अर्थः----हे राजा ते मेलेल्या पुत्राचे येणे व जाने पाहू अत्यंत विस्मित झालेल्या देवकीदेवणी ती अहन्ता ममतात्मक रचलेली श्रीकृष्णाची मायाचा आहे असे मानिले||५७|| --अर्थ:-----हे राजेंद्र अशप्रकरची अनंतयक्तीपरमात्म्य श्रीकृष्णाची अध्भूत चरित्रे अनंत आहेत ||५८|| अर्थ:----सुत म्हणाला –हे शौनकदीऋषीहो ,श्रीशुकाचार्यने वर्णन केलेले जगाचे पाप नाहीसे करणारे व भगवभ्दक्ताच्या करणाना उत्तम आनद देणारे हे अमृतकीर्ती भगवंताचे चरित्र,जो मनुष्य भगवंताकडे आपले चित्त ठेवून श्रावण करील किवा दुसऱ्या कडून श्रवण करवील तो मनुष्य त्या भगवंताच्या निर्भर अशा स्थानाप्रत पावलो ||५९|| भावार्थ:---अमर—ज्यांना मरण नाही असे श्रीकृष्ण यांचे चरित्र सर्व पाप मिटवणारे आहे,म्हणून आपण हे चारीत्रे पुन्हा—पुन्हा श्रवण करावेत,कारण त्यामुळे आपल्याकडून जो अधर्म होतो व त्यामुळे जे पाप होते,ते चरित्र श्रवण केल्याने पाप नष्ट होते.एवढे मात्र लक्षात असू ध्यावे कि,श्रवण करण्यापूर्वी जे पाप झालेले आहे,ते नाहीसे होईल,मात्र श्रवण झाल्यानंतर अधर्मानुसार वागू नये,तर धर्मानुसारच आचरण करावे.जो या चरित्राचे श्रवण करील किंवा ऐकविल म्हणजे वक्ता होईल,त्याचे चित्त मात्र निश्चितरूपाने भगवंतांच्या ठिकाणीच लागेल,यात तिळमात्र शंका नाही.त्यास परमात्म्याचाच अनुभव येऊन मोक्ष मिळेल.||५९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कंदधातील उत्तरार्ध जनत्रनयननिरुपणनामक हा पंचऐंशीवा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ |८६--- १४---सुभद्रा हरन _________________________________________________________________________________________________________________________ राजोवाच:--- | ब्रम्हन् वेदीतूमिच्छामः स्वसारं रामकृष्णयोहो:|यथोपयेमे विजयो या ममासित् पितामही||१|| अर्थः----देवकीला जसा मालेच्या पुत्राचा लाभ दुर्घट होता तसेच अर्जुनालाही सुभाद्रलाभ,बलराम प्रतिकूल असल्यामुळे दुर्घट होता असे मानणारा राजा प्रसंगाने प्रश्न करीत म्हणाला कि –हे शुकाचार्य ,रामकृष्णाची बहिण असून माझी आजी होती त्या सुभद्रेला अर्जुनाने ,ज्याप्रकारे वरिली असेल तो विवाह प्रकार आम्ही आपल्यापासून जाणण्याची इच्छा करितो ||१|| अर्थ:----- श्री शुकाचार्य म्हणाला हे राजा ,जय मिळविण्यास समर्थ असा अर्जुन तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वीवर पर्यटन कतीत असता प्रभास तीर्थास निघून गेला.तेथे त्याने आपल्या मामाची कन्या जी सुभद्रा तिला बलराम दुर्योधनास देणारे आहे आणि इतर वासुदेवादिक तिला दुर्योधनास देवू इच्छित नाहीत असे ऐकिले तेव्हा तिचे हरण करण्याची इच्छा करणारा तो अर्जुन,रामाला फसवण्याकरिता अतिपुज्य असा त्रिदंडी यातीवेश धारण करून व्दार्केत प्रविष्ठ झाला ||२-३|| अर्थ:---आणि स्वार्थ साधणारा तो अर्जुन तेथे पावसाळ्याचे चार महिनेपर्यंत राहिला तेव्हा कपात व्देष न जाणणाऱ्या पुरवाशी लोकांनी व रामानेही त्याचा वारंवार सत्कार केला||४|| अर्थ:----एकेवेळी बलरामाचे त्या अर्जुनाला आतीर्थ्याने निमंत्रण करून घरी आणून श्रध्दापूर्वक अन्न वधिले असता ते त्याने भोजन केले||५|| अर्थः---तेथे त्याने वीरपुरुशाचे मन हरन करणारी व तारुवयांत आलेली एक मोठी कन्या पाहिली .तुने करून प्रीतीने प्रफुल्लीतनतनेत्र झालेल्या त्याने तिच्यावर रती सुखाच्या इच्छे ने क्षोभ पावलेले आपले मन धारण केले ||६|| अर्थः---आणि ती सुभद्रादी स्त्रियांना मनांतून आवडणाऱ्या त्या अर्जुनाला पाहून त्याचेच ठिकाणी मन व दृष्टी लावून लज्जायुक्त नेत्रकटाक्षांनी त्याजकडे पाहून हंसत असता,तोच आपणास पती असावा अशी इच्छा करूं लागली||७|| अर्थः---तेव्हा केवळ त्या कन्येचे ध्यान करीत तिला हरण करण्याचा अवकाश मिळण्याची इच्छा करणारा तो अर्जुन,अतिबलवत्तर कामाने चित्तभ्रम पावल्यामुळे बलरामाने केलेल्या सत्कारानेहि सुख पावेनासा झाला||८|| अर्थः---नंतर एकेवेळी त्या कन्येला आईबापांनी (देवकीवसुदेवांनी )व श्रीकृष्णाने अनुमोदन दिलेल्या त्या महारथी अर्जुनाने,मोठ्या देवयात्रेच्या निमित्ताने रथावर बसून द्वारकेत बाहेर निघालेल्या त्या कन्येच्या रथत्तवर बसून,आपले गांडीव धनुष्य धारण करून व चोहोंकडून रोधन करणाऱ्या शुरांना पळवून,ते यादव आक्रोश करीत असता,जसा सिंह आपला भाग हर्न करितो त्याप्रमाणे त्याने त्या सुभद्रेने हरण केले||९-१०|| अर्थः---ते ऐकून,जसा पुर्निमेचे दिवशी समुद्र खळवतो त्याप्रमाणे बलराम खळळला ,परंतु श्रीकृष्णाने व दुसऱ्याही बांधवांनी पाय धरून त्यांचे सत्वान्केले असता तो शांत झाला ||११|| अर्थः---आणि नंतर हर्षयुक्त झालेल्या त्या बलरामाने त्या सुभाद्रार्जुन रुपी वधूवरांना प्रीतीने द्यावयाचा पुष्कळ वस्तू तसेच बहुतमोलाचे अलंकारवगैरे घातलेले हत्ती,रथ,अश्व,सेवक व दाशी हि पाठवून दिली .त्यावेळी यादव आणि पांडव हे सर्वही प्रीतीने हर्षित झाले ||१२|| | तां परं समनुध्यायन्नन्तरंप्रेप्सुर्जुन:|न लेभे शं भ्रमचित्त: कामेनातीबलीयसा||८|| भावार्थ:---अर्जुनाचे चित्त सुभद्रावर जडले व सुभद्राचे चित्त अर्जुनावर जडले,त्यामुळे दोघेही बेचैन झाले.त्यामुळे थोडेही शांती त्यांना---त्या दोघांना मिळेनासी झाली.विषय हे असे दु:ख देणारे असतात.म्हणून सुखासाठी विषयांची अपेक्षा न करता,सुखासाठी परमात्म्याची अपेक्षा करावी.परमात्मा सुखरुपता देतो.||८|| भावार्थ:--- देवकी,वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने अर्जुनाने सुभद्राचे अपहरण म्हणजे पळून नेले.आपण संत—महात्मा यांचा सत्संग करण्याकरिता जावे.||९|| अर्थ:----आता भक्तवत्सलयुक्त असे भगवंताचे दुसरे चरित्रे सांगत श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,श्रुतदेव या नावाने प्रशिध्ह असा एक ब्राम्हणश्रेष्ठ श्रीकृष्णाचा भक्त होता ,तो कृष्णाच्या भक्तीने पूर्णंमनोरथ ,शांत विषयसक्तीरहित व विचारवान होता ||१३|| अर्थ:---तो विदेह देशातील मिठीला नगरीमध्ये राहत असे .तो गृहस्था श्रमि असूनही उध्योगावाचून जे अन्नादिक प्राप्त होईल त्याच्याच योगाने आपले भोजनादिक सर्व निर्वाह चालवीत असे||१४|| भावार्थ:--- आपणास शांतता मिळण्यासाठी,आपला मनोरथ पूर्ण करण्यासाठी वैराग्य असावयास पाहिजे.आपल्या अंगी वैराग्य येण्यासाठी सत्संग करावा लागतो.सत्संग केल्याने विषयांचे वास्तविक स्वरूप कळते.वास्तविक स्वरूप कळल्यानंतर आपल्याठीकानी वैराग्य येते.ते विषय हे दु:खदायक आहे असे काळात असते.असे कळल्यानंतर वैराग्य येते.वैरागानंतर शांतता मिळत असते.म्हणून आपण आपल्या ठिकाणी वैराग्य येणे फार जरुरी आहे.परमार्थ करून जे मिळेल त्यावर तो समाधानी असे.आपणही धर्माप्रमाणे—न्यायमार्गाने प्रयत्न करून धन मिळवावे व मिळवलेले धन धर्मानुसार—न्याय मार्गाने खर्च—व्यय करावे.||१३—१४|| अर्थः---त्याच्या दैवाने त्याला दररोज शरीरादी निर्वाहापुरतेच अन्नादिक प्राप्त होत असे,खटपट केली असतांही अधिक प्राप्त होत नसे,म्हणून जितके प्राप्त होईल तितक्यानेच संतुष्ट राहून तो आपली नित्य नैमित्तिक कर्मे यथास्थितपणे करीत असे||१५|| | यात्रामात्रं त्वहरहर्दैवापनमत्युतः | नाधिकं तावता तुष्टः क्रीयाश्चक्रे यथोचीताः ||१५|| भावार्थ:---आपण आपल्या वर्णाश्रामानुसार योग्य ते धर्मकर्मे करावीत व त्यानुसार आपण आपला उदार—निर्वाह चालवावा.धर्मानुसार—योग्य प्रयत्न करून जे मिळेल त्यात समाधान मानून आपला जीवन कंठावे.कांहीच प्रयत्न न करता दुसऱ्याकडून आपल्या उदरनिर्वाहासाठी घेणे अधर्म आहे—पाप आहे—दु:खदायक आहे.म्हणून आपण मात्र तसे करू नये,तो अधर्म आहे.जर आपण आपले कर्म करण्याकरिता योग्य असला तर,त्यांना देणे अधर्म आहे—पाप आहे.म्हणून योग्यांना देऊ नका.||१५|| | तथा तद्राष्ट्र पालोग्ङ बहुलाश्व इति श्रुतः|मैथिलो निरहम्मान उभावप्यच्युत प्रियौ||१६|| अर्थः---हे राजा,त्या देशाचा अधिपती बहूलाश्व या नांवाने प्रसिद्ध असा राजा होता,तो जनकाच्या वंशांत झालेला असून देहादिकांचे ठिकाणी अभिमानरहित व श्रुतदेवासारखाच भगवद्भक्त होता.मिळून ते दोघेही भगवंताला प्रिय होतो||१६|| भावार्थ:--- त्याच देशाचा राजा बहुलाश्च नांवाचा राजा नीरहंकारी म्हणजे जनतेची प्रजावत पालनकर्ता होता,तरी पण त्यास त्या कर्माचा अंहकार—अभिमान नव्हता. आपणही धर्मानुसार कार्य करावे,परोपकार करावा,दुसर्यांचे दु:ख घालवूनत्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा,सामाजिक कार्ये करावे,पण त्या कार्याचा अंहकार—अभिमान येऊ देऊ नये.आपल्या कार्याची,परोपकाराची वाच्यता आपल्या मुखाने वर्णन करू नये.असे आचरण करणारास निरहंकारी असे म्हणतात.||१६|| अर्थः---त्यांच्यावर प्रसन्न असलेल्या भगवान प्रभू श्रीकृष्ण,एकेवेळी दारुकाने आनिलेल्या रथावर बसून ऋषीसहवर्तमान विदेहदेशांत निघून गेला||१७|| अर्थः---ते ऋषी-नारद,वामदेव,अत्री,वेदव्यास,परशुराम,असित,आरुणी,मी,बृहस्पती,कणव,मैत्रेय,च्यवन होते.||१८|| अर्थः---तेव्हा विदेह देश्नात जात्येवेळी मार्गामध्ये त्या त्या स्थळी प्राप्त होणाऱ्या त्या भगवंताचे हातांत पूजासाहित्य ग्रहण करणाऱ्या पुरवासी व देशवासी लोकांनी जसे गुरुशुक्रादिक ग्रन्हांसह उदय पावणाऱ्या सूर्याचे पूजन करितात त्याप्रमाणे पूजन केले||१९|| भावार्थ:---भगवंत श्रीकृष्ण आणि ऋषी प्रवासात असतांना वाटेतील ग्रामवासी या कृष्णांची व ऋषींची पूजेचे सह्यात्याने पाध्य—पूजा करत असत.त्याचप्रमाणे आपल्याही गावातून—गावाच्या जवळून जर संत—महात्म्य प्रवास करत असतांना जात असतील तर त्यांना विनंती करू,त्यांचे दर्शन घरून त्यांची पाध्य—पूजा करावयास पाहिजे.त्यांना अल्पोहर किंवा जेवण देऊन त्यांची भूक शमन करावयास पाहिजे.त्या निमित्ताने आपणास पूजा केल्याचे,अन्नदान—पाणीदान केल्याचे पुण्या प्राप्त होते.हे सत्पात्र आणि गरजवंत असतात.गरजवंतांना दान करावे असे धर्मशात्र सांगते.ज्यांना गरज नाही,अशांना दान केल्याने पाप लागते.||१९|| अर्थः---आणि हे राजा,त्यावेळी अनार्त,धन्व,कुरु—जांगल,कंक,मत्स्य,पांचाल,कुंती,मधु,केकय,कोसल,अर्ण या देशांत राहणाऱ्या लोकांनी व दुसऱ्याही देशांतील पुरुषांनी व स्त्रियांनी,आपल्या दृष्टींनी उदारहास्य व स्नेहयुक्त अवलोकन असलेले त्या श्रीकृष्णाचे मुखकमळ आदरपूर्वक अवलोकन केले||२०|| भावार्थ:---ग्रामीण भागातील लोक, भगवंत श्रीकृष्ण यांच्या प्रेमपूर्ण नजरेने आकर्षित होऊन डोळे भरून पाहत असत.त्यांचे दर्शन घेत असत.त्याप्रकारे आपणही कोठे प्रवास करत असतांना,मंदिरात प्रेवेश केल्यानंतर प्रेमपूर्ण नजरेने भगवंतांचे,संत—महात्मा यांचे दर्शन घ्यावावयास पाहिजे.त्यात आपले हित असते.||२०|| अर्थ:---तेव्हा आपल्या दर्शनाने अज्ञान नष्ट झालेल्या त्या लोकांना,अभय व तत्त्वज्ञान कृपादृष्टीने देणारा तो त्रैलोक्यपूज्य भगवान श्रीकृष्ण,दहाही दिशांचे ठिकाणी व्यापून राहिलेले,देवांनी व मनुष्यांनी गायन केलेले,शुद्ध व पापनामक असे आपले यश ऐकून असता,हळूहळू विदेह देशांत जाऊन पोंचला ||२१|| | तेभ्यः स्ववीक्षणविनष्टतमिस्त्रदृग्भ्यः क्षेमं त्रिलोकगुरुरर्थदृश्यं च यच्छ्न् | | श्रुण्वन् दिगन्त धवलं स्वयशोsशुभघ्नं गीतं सुरैर्नुभिरगाच्छनकैर्विदेहान् भावार्थ:---श्रीकृष्ण प्रवास करत असतांना—द्वारेकडे जात असतांना त्यांच्या दर्शनाने,उपदेशाने लोकांची अज्ञानादृष्टी नाहीसी करून,त्यांचे परम कल्याण करत असत.तसेच आपणसुद्धा लोकांना धर्मांचा,तत्वज्ञानाचा उपदेश करून लोकांकाचे अज्ञान नष्ट करून ज्ञानदृष्टी देणे आपण आपले कर्तव्य करावे.||२१|| अर्थः---हे राजा,तेव्हा ते विदेहदेशांतील पुरवासी व देशवासी लोक,श्रीकृष्ण प्राप्त झाला असे ऐकून व हातांत पूजासाहित्ये घेऊन त्या भगवंताला सामोरे गेले||२२|| भावार्थ:---आपल्याकडे—आपल्या गावात देव--संत—महात्मा यांचे शुभागमन झाल्यानंतर आनंदाने—अंत:करणपूर्वक पूजेचे साहित्य घेऊन,त्यांची पाध्य—पूजा करावयास पाहिजे.त्यांची पाध्य--पूजा केली म्हणजे आपणास पुण्य मिळते किंवा अंत:करण शुद्ध होते.म्हणून आपल्या हितासाठीच पाध्य—पूजा करावयास पाहिजे.||२२|| अर्थः---आणि त्या उत्तमकीर्ती भगवंताला पूर्वीच ज्यांची ऐकीलेली होती त्या नारदवामदेवादिक ऋषींना पाहून,ज्यांची नेत्रे व हृदये प्रफुल्लीत झाली आहेत अशा त्या लोकांनी,त्यांना आपल्या मस्तकी हात जोडून प्रणाम केले||२३|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्णांचे आणि मुनींचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांचे हृदय आणि चेहरे आनंदमय होत असे.भक्तांनी दर्शन घेत असतांना हात जोडावेत,डोके त्यांच्या चरणांवर—पायांवर ठेवावेत,असा दर्शन घेण्याचा नियम आहे.असे दर्शन घेतले असता,आपणास त्यांचा आशीर्वाद मिळत असतो.आपले हित होते.||२३|| अर्थः---आपल्यावर अनुग्रह करण्याकरिता तो जगद्गुरू प्राप्त झाला आहे असे मानणारे ते बहुलाश्वराजा व श्रुत्देव ब्राम्हण हे उभयंता,भगवंताच्या पायांवर पडले||२४|| अर्थः---बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनिंसह श्रीकृष्णांना आपल्या कडून आतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले.||२५|| भावार्थ:---आपण सर्वांनी देव—संत—महात्मा यांचा अतिथी सत्कार करावयास पाहिजे.प्रत्येकांनी आपल्याकडे बोलावून अतिथी सत्कार करावयास पाहिजे.||२५|| अर्थः--- त्या बहुलाश्व राजाने व श्रुतदेव ब्राम्हणाने,ब्राम्हणांसहवर्तमान दोन रूपे धारण करून,दोघांच्याही घरी प्रविष्ट झाला||२६|| अर्थः---तेव्हा वृद्धिगत झालेल्या भक्तीने हर्षितचित्त झालेल्या.आनंदाश्रूंनी नेत्र भरून आलेल्या व उदारचीत्त अशा त्या बहुलाश्व राजाने,दुराचारी लोकांना ज्यांचे नाव ऐकणेसुद्धा दूर आहे अशा परंतु कृपेने आपल्या घरी आलेल्या व आपण दिलेल्या उत्तम आसनावरून सुखाने बसलेल्या त्या ऋषींना वंदन करून व त्यांचे पाय धुऊन,लोकांना पवित्र करणारी ती चरणक्षत्तलनोदके कुटुंबसहवर्तमान मस्तकी धारण केली आणि त्या समर्थांची-गंध,पुष्पे वस्त्रे,अलंकार,धूप,दीप,अर्ध्ये गाई व वृषभ यांच्या अर्प्नाने पूजा केली ||२७-२८-२९|| अर्थः---दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळीरूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले.||२६|| अर्थः---विदेहाराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता.दुर्जनांना ज्यांचे नावसुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत,हे पाहून बहुलाश्वाने सुंदर सुंदर आसने आणवून त्यांना आरामात त्यावर बसविले.प्रेमभक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृद्य भरुन आले.नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.त्याने त्या अतिथ्यांच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केले.नंतर भगवान आणि भगवत्स्वरूप ऋषींना,गंध,पुष्पमाला,वस्त्रे,अलंकार धूप,दीप,अर्घ्य गाई,बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली.||२७—२९|| भावार्थ:---अतिथी भगवंत श्रीकृष्ण आणि मुनी यांना राजा बहुलाश्व आपल्या राजवाड्यात बोलावून,त्यांचा आदरसत्कार केला.त्यांची पाध्य—पूजा करून,त्यांना साष्टांग दंडवत घातले.पाध्य—पूजा केल्यानंतर,त्यांचे चरण—तीर्थ राजाने आपल्या डोक्यावर धारण केले.आपणही राजाने जसा आदरसत्कार करून पाध्य—पूजा केली,त्याचप्रमाणे आपणही पाध्य—पूजा करून,साष्टांग दंडवत करून त्यांचे तीर्थ डोक्यावर धारण करावयास पाहिजे.राजाने आदरसत्कार करून पाध्य—पूजा करू साष्टांग दंडवत करून चरण—तीर्थ डोक्यावर धारण केले व आपण फक्त पाहिले किंवा ऐकले व तसी कृती केली नाही तर आपणास पुण्या मिळणार नाही.म्हणून सत्कर्म पाहावे किंवा ऐकावे व त्यानुसात स्वत: त्याचप्रमाणे कृती करावी.कृती केली तर पुण्य मिळेल व कृती न केली तर पुण्य मिळणार नाही.||२७—२९|| अर्थ:---नंतर उत्तम श्रान्नाने तृप्त ब्राम्हणांना तो राजा मधुरवाणीने प्रसन्न करीत असता आपल्या माडीवर घेतलेल्या श्रीकृष्णाच्या भावार्थ:--- राजाने सर्वांची स्वत: सेवा केली,कारण सेवकाकडून केली असती तर राजास फल न मिळता सेवकास मिळाले असते,म्हणून राजाने स्वत: केली. आपणहि देव--संत—महात्मा यांची सेवा सेवकाकडुन न करत स्वत: आपणच करावी,कारण आपण स्वत: सेवा केली असता,आपनसच फल मिलते.||३०|| अर्थः---राजा म्हणालाः---हे विभो!तू सर्वजीवाचा आत्मा ,साक्षी स्वयंप्रकाश आहेस म्हणून तुआपल्या चारनकमालाचे स्मरण करनाऱ्या आमच्या दृष्टी पडला आहे||३१|| अर्थः---एकांतभक्तपेक्षा मला बलराम बंधूही ,लक्ष्मी स्त्री ,आणि ब्रम्हदेव पुर्तही प्रिया नाहीत असे जे वाचन तू सांगितले आहेस ते सत्य करण्याकरिता तू आमच्या दृष्टी गोचर झाला आहेस ||३२|| | स्ववचस्तदृतंकर्तुमस्मद् दृग्गोचरो भवान्|यदात्थैकान्तभक्तन्मे नानन्तः श्रिरजः प्रियः||३२|| अर्थः---यास्तव हि गोष्ट जाणणारा कोण बरे पुरुष ,तुझ्या चरणकमळाचा त्याग करील?कोणीच करणार नाही जो तू निश्किंचन व शांत अशा ऋषींना आपले स्वरूप सुध्द देत आहेस||३३|| भावार्थ:--- संत—महात्मा यांना जगाचे-जगातील वस्तुचे यथार्थ स्वरुप—मिथ्यात्व कळालेले असते,म्हणून ते त्या वस्तुचि अपेक्षा करत नाहीत.त्यांनी परंयच अनुभव घेतलेला असतो,कारण परमात्मा शांत—सुखरुप असतो.आपणहि जगाचे—जगातील वस्तुचे यथार्थ स्वरुप जानुन घेण्याचा प्रयत्न करावा.असे केले असत आपन जगाची अपेक्षा न करत जो परमात्मा सुखरुप आहे,तो मीळवन्याचा प्रयत्न करावा.असा सुखरुप असणारा परमात्मा याचा कोणीही त्याग करणार नाही.||३३|| | को नु त्वच्चरणाम्भोजमेवंविद् विसृजेत् पुमान् | निष्किश्चनानां शान्तानां मुनीनां यस्त्वमात्मदः||३३|| अर्थः---आणि ज्या तू यादुराज्याच्या वषात अवतार धरण करून याव संसारात देवतिर्यगाडीक योनीमध्ये उत्पन्न होऊन त्रापत्रयाचा अनुभव घेणाऱ्या जीवाला त्या तापत्रयाची शांती होण्ज्याकरिता त्रेलोक्यावर सर्व लोकांचे पाप दूर करणारे आपलें यश विस्तारिले आहेस||३४|| भावार्थ:--- जे लोक अज्ञानी आहेत,त्यांना जन्म—मृत्युच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आपण कार्य करत आहात.त्यामुळे अज्ञानी जे जीव आहेत,त्यांचा त्रीलोक्यांचा तापत्रय म्हणजे आध्यात्मिक,आधिदैव व आधिदैविक तप नाहीसे करून शांत—सुखरूप करणारे आहात.म्हणून आपणास शरण यावावयास पाहिजे.||३४|| अर्थः----त्या तुज अंकुठीतबुद्धी अतिश्न्त ताप करणाऱ्या ऋषीरुपी ,नारायण भगवान कृष्णाला नमस्कार असो ||३५|| अर्थ:---असा नमस्कार करून प्रार्थना करितो कि ,-हे व्यापक प्रभो ,तू काही दिवसापर्यंत या सर्व ऋषी सह वर्तमान आमच्या घरी राहून ,आपल्या चारांजाच्या योगाने हे निमिराजाचे कुल पवित्र कर ||३६|| भावार्थ:--- भगवंत नारायण ऋषीच्या रुपात येऊन जगातील जीवांना शांती प्रस्थापित करण्यासाठी तप करत आहेत.भगवंत जर इतरांच्या शानिसाठी तप करत आहेत,म्हणून आपण आपल्या किंवा इतरांच्या शांतीसाठी तप करावयास पाहिजे.म्हणून जीवनात “तप” महत्वाचे आहे.आपण सर्वांनी तप करावे.||३५|| अर्थः---याप्रमाणे बहुलाश्व राजाने प्रथांना केलेला लोकपालक भगवान श्रीकृष्ण,मिठीला नागरीतील पुरुषांचे व स्त्रियांचे कल्याण होत असता काही दिवसापर्यंत तेथेच राहिला ||३७|| भावार्थ:--- आपल्या भागात—आपल्या गावी—आपल्या घरी संत—महात्मा आले तर आपण त्यांना आपल्या भागात,आपल्या गावात—आपल्या घरी राहण्याचा आग्रह करावा.कारण त्यामुळे त्यांचा आपास सत्संग घडतो,त्यांची सेवा घडते.त्यांचा सत्संग केल्यामुळे धर्माचे व वेदांतांचे ज्ञान होऊन होऊन पवित्र होतोत.||३६|| भावार्थ:--- संत—महात्मा यांनी लोकांचा—भक्तांचा भाव पाहून—आग्रह पाहून प्रथानेचा स्वीकार करून त्यांना धर्मांचे व वेदांतांचे ज्ञान देऊन कल्याण करावे.||३७|| अर्थः---इतके श्रुतादेव ब्राम्ह्नही जनकराजाने आपल्या घरी प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाला व ऋषीला नमस्कार करून अत्यंत हर्षित व वस्त्राने त्यास वर घालीत नाचू लागला.||३८|| अर्थः---नंरात आणलेल्या मोलवगैरे गवताच्या चात्यावर व दाभार्दीकाच्या आसनावर त्यांना बसवून व स्वागत प्रश्नाने त्याचे अभिनंदन करून भार्येसहित त्याने मोठ्या हर्श्ने त्याच्या चरणाचे क्षालन केले||३९|| भावार्थ:---श्रुतदेव नावाच्या ज्ञानी ब्राह्मणांनी श्रीकृष्णांनी श्रीकृष्ण आणि मुनींना आपल्या घरी बोलावून त्यांना कुशान अंथरून टाकून आदरसत्कार करून बसवले. त्यांनी व त्यांच्या पत्नीनेमोठ्या आनंदाने पाध्य—पूजा करून चरण धुवून चरण—तीर्थ सेवन केले.चरण—तीर्थ सेवन केल्याने पुण्य किवा अंत:करण शुद्ध होते.||३६|| | तृणपीठबृसीष्वेतानानीतेषुपवेश्य स: | स्वागतेनाभिनन्द्याङ्घ्रीन् सभार्योsवनिजे मुदा ||३९|| अर्थः---आणि त्या महाभाग्यवान श्रुतदेवाने घर व कुटुंबसहित आपणास त्या उद्दकाने स्नान ग्घाळून घेतले तेनेकऋण व भागवच्चरानाच्या स्पर्शादिकेकारून तों अत्यंत हर्षित झाला व त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले||४०|| भावार्थ:--- पाध्य—पूजा केल्याचे चरणोदक स्वत:सह आणि आपले कुटुंबीयांवर शिपंडले.आपणही पाध्य—पूजा केल्याचे चरणोदक स्वत:सह कुटुंबीयांवर शिंपडावे, त्यामुल्र पुण्य किंवा अंत:करण शुद्ध होते,म्हणून चरण—तीर्थ घ्यावे.त्यामुळे आपली सत्गती किंवा पारमार्थिक प्रगती होते.म्हणू चरण—तीर्थ सेवन करावे.||४०|| अर्थः---नंतर त्याने,फळे गंधशुष्णादिक पूजा पदार्थ,वाल्याने गार केलेले अमृतासारखे गोड पाणी,सुगंधयुक्त मृत्तिका (कस्तुरी),तुलसी,दर्भ,कमले व सत्वगुण वर्धक अन्न यांक ह्या योगाने अनायासाने सिद्ध झालेल्या पूजेने त्या ऋषीचे आराधन केले||४१|| भावार्थ:--- सर्व सामग्रीने पूजा करून सात्विक अन्नाचे जेवण ध्यावे,कारण सात्विक अन्नाने सत्वगुण वाढतो.म्हणून आपण नेहमीसाठी सात्विक अन्न सेवन करावे.श्यकतो राजस किंवा तामस अन्न सेवन करू नये,कारण राजस किंवा तामस अन्न सेवन केल्याने रजोगुण व तमोगुण वाढतो.||४१|| अर्थः---नंतर तो श्रुत्देव मनांत तर्क करूं लागला कि,-गृहरूप अंधकूपामध्ये पडलेल्या मला,श्रीकृष्णाच्या व ज्यांचे चरणरज सर्व तीर्थाचेही दोष घालविणारे आहे व जे श्रीकृष्णाच्या मूर्तीचे निवास रूप आहेत अशा ब्राम्हणांचा समागम कोणत्या बरे पुण्याच्या योगाने झाला ?||४२|| भावार्थ:--- संत—महात्मा यांच्या चरणांची घुळ जर आपणास मिळाली कि,समजावे आपले पूर्वभाग्य उदयास आले.आपण त्या सत्संगात अधिक वाढ करण्याचा प्रयत्न करावा.आपण त्यांना अधिक दिवस आपल्याकडे थांबवून सत्संग करून आपल्या ज्ञानात वाढ करावी व त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा.||४२|| अर्थः---असो उत्तमप्रकारे आतिथ्य केलेल्या व आसनांवर सुखाने बसलेल्या त्या ऋषींच्या समोर पोष्य अशा पुत्र व स्वजनासहित प्राप्त झालेला तो श्रुतदेव,श्रीकृष्णाच्या चरणाला स्पर्श करीत असे म्हणाला कि,-||४३|| भावार्थ:--- संत—महात्मा यांची सेवा,पाध्य—पूजा किंवा सत्संग आपण एकट्याने न करता आपल्या कुटुंबीयासह,आप्तेष्टासह,शेजारीसह किव्वा इतरासः करावा,कारण सत्संग सर्वांना घडून,आपण इतरांना घडवल्याचे अधिक पुण्य प्राप्त होते.असा विवेक—विहार करून आचरण करावे,कारण त्यात आपले अधिक हित होते.||४३|| अर्थः---श्रुतदेव म्हणाला-हे प्रभो,उत्तम पुरुष असा तूं आम्हांजवळ आजच प्राप्त झालास असे नाही,तर जेव्हा आपल्या सत्वादिक शक्तींनी हे जग उत्पन्न करून त्या मध्ये आपल्या सत्तेने प्रविष्ट झाला आहेस त्याचवेळी प्राप्त झाला आहेस परंतु तुझे दर्शनमात्र केवळ आजच झाले||४४|| भावार्थ:--- भगवंतांनी आपल्या शक्तीच्याद्वारा हे जग निर्माण केले.जगात व जीवात प्रवेश केला.भगवंत आपल्या अंत:कारणात आहेत.जसे उसात साखर आहे,पण दिसत नाही.जेव्हा आपण प्रयत्न करून उसाचे रुपांतर साखरेत करूत,तेव्हा तिच्या गोडीचा अनुभव येतो,त्याचप्रमाणे संत—महात्मा यांचा सत्संग करून यांच्याद्वारे ज्ञान प्राप्त करून,त्यांचा अनुभव घेतला असता प्रत्यक्ष सुखरुपतेचा अनुभव घेऊन सुखरूप होण्याचा प्रयत्न करावा.आपण यासाठी प्रयत्न करावेत.||४४|| अर्थः---जसा निजलेला एकटाच पुरुष,आपल्या अविद्येच्या योगाने स्वप्नामध्ये,मनानेच देवतीर्यगादिरूप दुसरा उत्पन्न करून व त्यांत प्रवेश करून,नानाप्रकारे व भासतो त्याप्रमाणे तूंही या जगाला रचून त्यांत प्रवेश केल्यासारखा होऊन नावाप्रमाणे भासत आहेस||४५|| भावार्थ:--- जीवास स्वप्न पडल्यानंतर अविध्यामुळे स्वप्नात मिथ्या—खोटी स्वप्नसृर्ष्टी दिसते.जागृतीत आल्यानंतरच स्वप्नसृष्टी ही मिथ्या—खोटी आहे असे अनुभवास येते.त्यामुळे त्या स्वप्नसृष्टीचे सुख किंवा दु:खही होत नाही.त्याचप्रमाणे जीवास जागृतीत अविध्यामुळे सृष्टी खरी दिसते,पण जेव्हा आपण संत—महात्मा यांचा सत्संग केल्यानंतर ज्ञान होऊन ज्ञानाचा परिणाम झाल्यानंतर ही सृष्टी मिथ्या—खोटी आहे असे अनुभवास येते.म्हणून आपण सत्संग करावा.||४५|| | श्रुण्वतां गदतां शश्व दर्चतां त्वाभिवन्दताम्|नृणां संवदतामन्तर्ह्रदि भास्यमलातमनाम्||४६|| अर्थः---आणि जे मनुष्य निरंतर तुझे श्रवण,कीर्तन,पूजन,वंदन व परस्पर संवाद करितात त्या शुद्धचित्त पुरुषांच्याही हृदयामध्ये तूं केवळ प्रकाश मात्र पावतोस आणि मला तर दृष्टीगोचरही झाला आहेस.तेव्हा माझे मोठे भाग्य आहे||४६|| भावार्थ:--- आपण नेहमी भगवंतांच्या कथेचे श्रवण,कीर्तन,नामस्मरण,प्रेतेमीची पूजा,वंदन,परोपकार,दानधर्म करावा.त्यामुळे अंत;करण शुद्ध होते.आपापसात अध्यात्मिक चिंतन करून परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा.असे केले असता अंत:करण शुद्ध झाल्यामुळे परमात्म्याचा अनुभव येतो.||४६|| अर्थः---आता सर्वांच्या ह्रदयामध्ये असणारा मी कितीएकानांच प्रकाशित होतो व कितीएकांना प्रकाशित होत नाही हे का?असे म्हणशील तर-जरी सर्वांच्या ह्रदयामध्ये आहेस लौकिकवैदिकादिक अनेक कर्मांनी विक्षिप्तचित्त झालेल्या पुरुषांना तूं फारच दूर आहेस,आणि जरी अहंकारा दीक आत्मशक्तींनी तुझे ग्रहण होत नाही तथापि ज्यांच्या अंतःकरनामध्ये तुझ्यानादिकांचा संस्कार आहे त्यांना तूं अगदी जवळ आहेस||४७|| भावार्थ:--- ज्यांचे चित्त अज्ञानामुळे वासनांयुक्त असल्यामुळे बहिर्मुख—विषयांकडे तीव्र ओढ लागलेले असते,त्यामुळे सत्वागुणांचा अभाव व तमोगुणांचा भाव असल्यामुळे भगवंत त्यांच्या चित्तात असूनसुद्धा लांब असतात म्हणजे अनुभवयास येत नाहीत,त्यामुळे ते सुखरूप असून दु:खरूप आहेत.परंतु ज्यांच्या चित्तात सत्वगुण असल्यामुळे सदगुणी असल्यामुळे ते भगवंतांचे नामस्मरण,गुणगान,सदगुणी.परोपकारी,दानशूर,इतरांचे दु:ख नाहीसे करून सुख देण्यात तत्पर थोडक्यात निष्काम कर्म व निष्काम भक्ती करतात.संत—महात्म्याचा सत्संग करून ज्ञानसंपन्न असतात.म्हणून त्यांच्याजवळ असतात सदोदित असतात.म्हणून आपण सात्विक,सदगुणी,सत्संगी,भगवंतांचे नामस्मरण,गुनागाणी,परोपकारी,दानाशुरी,निष्काम कर्मी व निष्काम भक्ती करणारे असावेत,कारण त्यामुळे भगवंत आपल्या अंत:करणात जवळ असून जवळच असतात.यासाठी आपण भगवंतांचे प्रेमळ,निस्पृह,निष्काम भक्त प्रयत्न करून होण्याचा—राहण्याचा निरंतर प्रयत्न करावा.||४७|| अर्थः---म्हणून देहाभिमान सुटलेल्या पुरुषांना मोक्ष देणारा,देहाभिमान असणाऱ्या जीवांना आत्म्याहून निराळा संसार देणाऱ्या,महत्तत्वादिक कार्य आणि त्याचे कारण प्रकृती या दोन्ही उपाधींचा नियंता,आपल्या मायेने अलुप्तश्वर्ये आणि आपल्या आत्म्याहून मायेने दुसऱ्यांच्या ज्ञानाचे आवरण करणारा अशा तुजकारणे नमस्कार असो||४८|| भावार्थ:--- ज्यांनी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून आपला अनुभव घेतलेला आहे,असे जे आत्मतत्व जाणून अनुभव घेतला आहे,त्यांचा आपण परमात्मा आहात.म्हणून आपण सत्संग करून अज्ञान निव्रित्त करून ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यावा.म्हणजेच भगवंत आपले परमात्मा आहेत.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होउत.जे जीव अज्ञानी असून सत्संग न करता कुसंग—संसाराचा-अधर्माचा संग करतात,त्यांच्यासाठी आपण यामापुरीला पाठयून,लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख देणारे काळ—यम आहात.म्हणून जीवांनी सत्वगुण संपन्न होऊन ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यावा.भगवंतांची माया भगवंतांवर पडदा टाकू शकत नाही,कारण भगवंत ज्ञानी असून अनुभवी आहेत,म्हणून माया त्यांच्या ताब्यात आहे.मायानेच त्यांचा आश्रय घेतलेला आहे.||४८|| अर्थः---हे देवा,तो परमेश्वर तूं,तुझे दास अशा आज्ञा कर कि,तुझे दास्य आम्ही काय करावे!जोपर्यंत तुझ्र दर्शन झाले नाही तोपर्यंतच ,मनुष्यांना संसारक्लेश होतो,दर्शन झाल्यावर पुढे क्लेशांचा नाशच होतो||४९|| भावार्थ:--- आपण भगवंतांचे सेवक असावेत.भगवंतांचे सेवक झाल्यानंतर भगवंतांच्या आज्ञानुसार-धर्मशात्रानुसार व वेदांतशात्रानुसार वागावे,कारण सेवकाचे हे कर्तव्य असते कि,स्वामींच्या आज्ञानुसार आचरण करावे.असे केले असता आपल्यावर भगवंतांची कृपा होऊन आपला उद्धार होतो—दु:ख निवृत्त होते.||४९|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,असे त्या श्रुतदेवाने केलेले भाषण ऐकून,भक्तांचे दुःख हरण करणारा तो श्रीकृष्ण,आपले ठिकाणी अधिक आदर ब्राम्हणाचे ठिकाणी कमी आदर पाहून लोकसंग्रहांकरीता,माझ्यापेक्षंही ब्राम्हणाचेठिकाणी तूं विशेष श्रद्धा ठेवावीस असे त्याला सांगण्याकरिता,आपल्या हाताने त्याचा हात धरून हास्य करीत करीत त्याला म्हणाला कि,||५०|| | भगवान उवाच:---ब्रम्हंस्तेsनुग्रहार्थाय संप्राप्तान् विद्ध्यमून् मुनीन्| सच्ञन्ति मया लोकान् पुपन्तः पदरेनुभिः||५१|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला-हे ब्राम्हणा,तुझ्यावर अनुग्रह करण्याकरिता,हे ऋषी,तेथे आले आहेत असे तूं जाण.कारण हे ऋषी,ह्रदयांत असलेल्या माझ्या योगाने आपला चरणरजे करून लोकांस पवित्र करीत असता लोकांमध्ये संचार करीत असतात||५१|| अर्थः---तीर्थे,हि दर्शन स्पर्शन व पूजन यांच्या योगेकरूनहळूहळू काळाने पवित्र करितात,तेंही पवित्र करणे सत्पुरुषांच्या दर्शनेकरूनच तत्काळ होते||५२|| भावार्थ:--- देवता,पुण्य—क्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन,स्पर्श,पूजन या साधनांद्वारा सावकाश—हळू—हळू पवित्र करतात,पण संत—महात्मा दृष्टीने,स्पर्शाने,पूजनाने, सत्संगाने—ज्ञानाने सर्वांना पवित्र करतात—सर्वांना कृपा करून मोक्ष देऊन आपले जन्म—मरण निवूत्त करून सुखरूप करतात.देवता,पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे पवित्र होतात.त्यांच्याकडून पवित्र होऊन आपणास पवित्र करतात.देवता,पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे तात्पुरते सुख देतात,मात्र संत—महात्मा मोक्ष—कायमचे सुख देतात.||५२|| अर्थः---या संसारामध्ये सर्वही प्राण्यांत ब्राम्हण हा जन्ममात्रानेच श्रेष्ठ आहे,मग तो जर जप,विद्या,संतोष व माझी उपासना ह्या गुणांनी युक्त असेल तर तो श्रेष्ठ आहे हे काय सांगावे||५३|| अर्थः---हे माझे चतुर्भुज स्वरूपही मला ब्राम्हनापेक्षा अधिक प्रिय वाटत नाही कारण,ब्राम्हण सर्व वेद मयआहे आणि मी सर्ववेदमी आहे,देवांची सिद्धता वेदाच्या स्वाधीन असल्यामुळे देवमय अशा मजपेक्षंही वेदमय ब्राम्हण श्रेष्ठ आहे||५४|| अर्थः---हे माझे मत न जाणूनच गुणावर दोषारोप करणारे आणि प्रतीमादिकांवरच केवळ पूज्यबुद्धी ठेवणारे दुर्बुद्धी लोक,गुरुरूपी,आत्म रुपी व मत्स्वरूपी अशा ब्राम्हणांचा अवमान करितात||५५|| भावार्थ:--- ब्राह्मण म्हणजे षट्कर्म १—सदगुरुकडे राहून सत्संग करून जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करणारा व २—सदगुरुकडून जीवब्राह्मऐक्यज्ञान जे प्राप्त करून घेतलेले असून त्या ज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे.२--त्या ज्ञानाचे दान—ज्ञानाचा मोबदला न घेणारा,मात्र त्या शिष्याने आपणहून जर दक्षीणा दिली तर निष्कामभावाने गुरुदक्षीणा घेणारा,३----सत्कर्म निष्काम करणारा व ४---सत्कर्म निष्काम इतराकडून करून घेणारा,५—दान करणारा न ६—दान घेणारा असा जो आहे त्यास “ब्राह्मण” असे म्हणतात.असा ब्राह्मण भगवंतांस त्याच्या चतुर्भुज रूपापेक्षा प्रिय आहे.असे सदगुणसंपन्न नसेल तर तो ब्राह्मण प्रिय नाही,कारण असे ब्राह्मण वेदमय आहेत आणि मी सर्व देवमय आहे,.म्हणून आपण षट्कर्म ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करावा,कारण तोभगवंतास पीय आहे.||५५|| अर्थः---आणि ब्राम्हण हाच,सर्व ठिकाणी ईश्वर आहे अशी भवना ठेऊन,हे स्थत्तवनजंगमात्मक जग आणि याची कारणे जे महत्तत्वादिक पदार्थ आहेत ते सर्वही माझी रूपे आहेत असे आपल्या मनामध्ये धारण करितो||५६|| अर्थः---म्हणून हे ब्राम्हणा,तू ह्या सर्व ऋषीचे,हे माझे स्वरूपच आहे तशा बुद्धीने पूजन कर.असे जर त्यांचे पूजन करशील तर सक्षात मीच पूजिल्यासारखाच होईन.त्यावांचून पुष्कळ उपचारांनी पूजन केलेलाही मी पूजन केल्यासारखा होत नाही||५७|| भावार्थ:--- भगवंत आणि संत—महात्मा यांच्यात आपल्या दृष्टीने कांहीच फरक नाही.किंबुहुना भगवंतांपेक्षा संत—महात्मा अधिक श्रेष्ठ आहेत,म्हणू संत—महात्मा यांना भगवंत समजून पूजा करावयास मुळीच हरकत नाही.भगवंत आणि संत—महात्मा समोरासमोर असतांना भगवंतांची पूजा कितीही ऐश्वार्यांनी केली तरी त्या पूजेचा भगवंत स्वीकार करू शकत नाही.म्हणून संत—महात्मा यांना अधिक प्राधान्य देऊन त्यांचीच पूजा करायास पाहिजे.||५७|| | तस्माद् ब्रम्हऋषिनेतान् ब्रम्हन् मच्छ्रद्धयार्चय|एवं चेदर्चितोsस्म्यद्धा नान्यथा भुरिभूतिभिः||५७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा याप्रमाणे श्रीकृष्ण प्रभुणे आज्ञा केलेला तो श्रुतदेव ब्राम्हण,व बहुलाश्व राजा,हे कृष्णासहित त्या त्या सर्वद्विजोत्तमांना अभेद दृष्टीने आराधन करून भगवतस्वरूपास पावले||५८|| | सा इत्थं प्रभुणाssदिष्टः सहकृष्णान् द्विजोत्त्मान्|आराध्यैकात्मभावेन मैथिलश्चाप सद्गतिम्||५८|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे भक्तांची प्रीती बाळगणारा तो भगवान श्रीकृष्ण,कांही दिवसपर्यंत त्या मिथिलानगरीमध्ये राहून आपले भक्त अशा श्रुतदेवबहुलाश्वाना वेदांचा प्रवृत्तीप्रकार व ब्रम्हपरत्व सांगून पुन्हा द्वारकेस निघून गेला||५९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कंधातील सन्मार्गनिरुपण हा शाऐशीवा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ |८७--- १५---वेदस्तुती---१--- _________________________________________________________________________________________________________________________ आता ह्या सत्याऐशीव्या अध्यायामध्ये,नारायण व नारद यांच्या संवादाने वेदांनी,ईश्वराची गुणांच्या आश्रयाने निर्गुणब्रम्ह पर जी स्तुती केली तिचे वर्णन केले आहे _________________________________________________________________________________________________________________________ | ब्राम्ह्न् ब्रम्हण्यनिर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तय: | कथं चरन्ति श्रुतय:साक्षात् सदसत:परे ||१|| अर्थः----पूर्वाध्यायाती भगवान श्रीकृष्ण ,श्रूतदेव ब्राम्हण व बहुलाश्व राजा या आपल्या भक्तांना स्वता प्रमाणभूत अशा वेदाचे ब्रह्मपरत्व सांगून पुन्हा व्दारकेस गेला असे शुकाचार्याने सांगितले ते एकूण शब्दरूप वेदाचे ब्रह्मपरत्व घडणे कठीण आहे असे मानणारा राजा प्रश्न करितो राजा म्हणाला –हे व्रम्ह्निष्ठ शुकाचार्य सगुणपदार्थाचे वर्णन करणाऱ्या श्रुती कोणत्याही प्रकारे दाखविण्यास अशक्य ,निर्गुण व कार्यकानाहून पार अशा ब्रम्हाचे ठिकाणी प्रत्यक्ष कशा प्रवा होतात?याचा अभिप्राय श्रुती म्हणजे शब्द होतो त्या शब्दाची प्रवृत्ती म्हटली म्हणजे मुख्य लक्षणा आणि गौनी अशी तीन प्रकारची आहे त्यात मुख्येचे रूढी आणि यौगी असे दोन भेद आहेत .त्यत रूढी वृत्ती –ठेंगणं ,उंच इत्यादिक स्वरुपानी गाई ,ब्राम्हण इत्यादिक जातींनी किवा पांढरा,कला इत्यादिक गुणांनी दर्शित करण्यास योग्य असलेल्या वस्तूवर हे त्या वस्तूचे नाव व हि वस्तू अशा संकेताने पृवृत्त होते .ती रुधीवृत्ती अनिर्देश्या व निर्गुण अशा ब्राम्हचेठीकानी ते आपला विषय नसल्यामुळे ,पृवृत्त होत नाही.दुसरी लक्षणवृत्ती ती –पूर्वी सांगितलेल्या संज्ञासंज्ञीसंकेतानेच जसे गंगेवर नावाद्याचे घर आहे असे समजावयाचे त्याप्रमाणे सांगितलेल्या पदार्थाचे संबंधाचे प्रवृत्त होत्ये कि परब्रम्ह सर्वसबंधरहित असल्यामुळे प्रवृत्त होत नाही चवथी योगवृत्ति ,तीही वरील तिनप्रकारच्या शब्द्वृतीनी प्रतिपादन केलेल्या पद व अर्थ यांच्या किवा प्रकृती व प्रत्यय यांच्या योगाने जसे पंकात झालेले म्हणून पंकज कमाल उपगुरुशीपासून झाला म्हणून औपगाव इत्यादीस्थळी त्या त्या पंकज औपगाव इत्यादी शब्दावर पृवृत्त होत्ये तीही कार्याकारनपेक्षा पपार असंग असा ब्रम्हाचे ठिकाणी पृवृत्ती होत नाही एतावता ब्राम्हला पदार्थाच्या योग्नास्ल्यामुळे व अपदार्थाला वाक्यर्थत्वाचा योग नसल्यामुळे ब्राम्हला श्रुतीगोचारतव संभवत नाही .तेव्हा सगुनवस्तुचे प्रतिपादन करणाऱ्या श्रुती निर्गुण ब्राम्हचेठीकानी क्ष संचार करितात ||१|| भावार्थ:---ब्रह्म हे कारण आणि कार्याच्या पलीकडील आहे.कारण आणि कार्य हे नामरुपासहित आहे,तर ब्रह्म हे नामरूपारहित आहे.सत्व,राज आणि तम हे तीन गुण मायाचे आहेत,मायेला अंत आहे,म्हणून ते गुण ब्रह्माचे नाहीत.ब्रह्म हे अनंत आहे म्हणजेच त्याचा अंत नाही.वाणी आणि मनाने त्याचे वर्णन करता येत नाही,कारण ज्याला नाव व रूप आहे त्याचेच वाणी आणि मन वर्णन करू शकते.ब्रह्म यास नाव व रूप नाही,म्हणून वाणी आणि मन त्याचे वर्णन करू शकत नाही.श्रुतीं या नामारुपासहित आहेत—नामरूप हा त्यांचा विषयच आहे.ब्रह्म हे विषय नाही,म्हणून श्रुतीं ब्रह्माचे वर्णन करू शकत नाही.||१|| अर्थः---याप्रमाणे प्रश्न केलेला श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा सर्व करण्यास समर्थ व नित्य मुक्त अशा ईश्वराने प्रलयकाली आपलेठीकानी लीन झालेल्या जीवना पुन्हा यालोकी विषय भोग व जन्म्प्रभूती कर्मे प्राप्त होण्याकरिता व परलोकी स्वर्गादी उपभोग व मुक्ती मिळण्याकरिता बुद्धी ,इंद्रिय,मन व प्राण हि,उत्पन्न केली आहेत्त .जर बुद्धी इंद्रिय मन व प्राण हि उत्पन्न केली आहेत.जर बुद्धी,इंद्रिये,मन प्राण (लिंगशरीर)हि उत्पन्न केलेई असता तर जीवांना साधन नसल्यामुळे अर्थधर्मादिक प्राप्त करून घेता आले नसते,तशाच स्वरूपविचर न घडल्यामुळे मोक्षाही प्रपात झाला नसता.म्हणून ती बुद्ध्यादिक ईश्वराने उत्पन्न केली आहेत.आता निर्गुण ब्रम्हाचे ठिकाणी श्रुती कसा संचार करितात?ह्या प्रश्नाचे उत्तर,ईश्वराने बुद्ध्यादिकांची उत्पत्ती केली हे सांगण्याचा आशय,असा आहे कि,-सर्व श्रुती,ईश्वराचे व त्यापासून झालेल्या जीवांच्या धर्मादी चतुर्विध पुरुषार्थांचे वर्णन करून,तात्पर्यदिवृत्तिनी ब्राम्हपर आहेत:त्यांत कितीएक श्रुती,सगुण असूनही गुणांनी पराभूत न झालेल्या ईश्वराच्या सर्वज्ञ,सर्वशक्ती,सर्वेश्वर,सर्वनियंता,सर्वोपास्य,सर्वकर्मफलदाता,सर्व कल्याण कारक गुणांचे निद्धान,सच्चिदानंदरूप इत्यादिक धर्मांचे प्रतिपादन करितात.दुसऱ्या कितीएक श्रुती जीवांचे किचीज्ञत्वादिक धर्म सांगून त्यांच्या संसाराची निवृत्ती होण्याकरिता त्याला ते ईश्वराचे स्वरूप तूं आहेस उपदेश करितात;त्यांत तात्पदाचे व त्वंपदाचे सामानाधिकरन्,दुसऱ्या प्रक्रांनी घडत नसल्यामुळे ते,जह्दजहल्ललक्षेने ब्राम्हंचे ठिकाणी पर्यवसान पावते.म्हणून त्या जिवेश्वरैक्यप्रतिपादक श्रुती,तात्पर्यवृत्तीने ब्राम्हपरचआहेत,अस्थूल अगुण इत्यादिक निषेध करणाऱ्या श्रुतीही तत्पदार्थ शोधनाविषयी उपयुक्त असल्यामुळे त्यांचे निर्गुणाचेठिकाणी पर्यवसान आहे.उपासनेचे निरुपण करणाऱ्या श्रुतीही अंतकरणशुद्धीद्वारा ज्ञानाच्या संधानांचा उपदेश करीत असल्यामुळे त्यांचे पर्यवसान ज्ञानद्वारा परंपरासंबंधाने ब्रम्हाचे ठिकाणी आहे.सृष्टी स्थितीप्रलयाचे प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीही,सृष्ट्यादीकथनद्वारा ज्ञानवैराग्यांना साधक असल्यामुळे परंपरासंबंधाने त्याचे पर्यवसान ब्रम्हाचे ठिकाणी आहे एतावता ईश्वरापासून सृष्ट्यादिद्वाराजीवांचे चतुर्विध पुरुषार्थ वर्णन करणाऱ्या सर्व श्रुतीचे परंपरादिसंबंधाने,निषेधादी मुखाने किंवा भागलक्षनेने ब्रम्हाचे ठिकाणी पर्यवसान आहे||२|| भावार्थ:--- भगवंतांनी अखिल मानवांना---जीवांना बुद्धी,इंद्रिये,मन आणि प्राण दिले आहेत,त्यास कारण कि जीवांनी १--धर्मांनुसार आचरण करावे.धर्मानुसार आचरण केल्यास आपल्यापासून इतरांना दु:ख होत नाही व इतरांपासून आपल्याला दु:ख होत नाही.आपणास कोणापासूनच दु:ख नको,ती इच्छा पूर्ण होते.२—जीवांनी अर्थ धर्मापासून प्राप्त करून घ्यावा,कारण आपण आपला अर्थ ध्रर्मानुसार प्राप्त केल्यास इतांरावर आपल्याकडून अन्याय होत नाही.इतरांनी धर्मानुसार अर्थ प्राप्त करून घेतला तर इतरांवर अन्याय होत नाही.म्हणून सर्वांनी जर धर्मांनुसार अर्थ प्राप्त करून घेतला तर कोणावरच अन्याय होणार नाही,म्हणून धर्मांनुसार अर्थ प्राप्त करावा. काम हा धर्मानुसार प्राप्त करावा,कारण आपली कामना धर्मांनुसार प्राप्त करून घेतला,तर कोणावर बलात्कार,अन्याय होणार नाही.आपल्या धर्माशात्राने काम या विषयीचा नियम अगोदरच लिखित स्वरूपाने सांगितलेला आहे.इतरही धर्माशात्रानुसार आचरण केले तर कोणावरही बलात्कार किंवा अन्याय होणार नाही.म्हणून सर्वांनी धर्मासातानुसार कामाची इच्छा पूर्ण केली तर कोणावरच अन्याय होणार नाही.४—मोक्ष नावाचा पुरुषार्थ म्हणे कायमचे दु:ख जावो व कायमचे सुख प्राप्त व्होवो असी जी इच्छा आहे,त्यास मोक्ष असे म्हणतात.धर्म,अर्थ,काम व मोक्ष या चार पुरुर्थाची अखिल मानवाची इच्छा आहे का? या चार पुरुर्षाची इच्छा कांहीची इच्छा आहे व कांहीची नाही असे आहे का ? तर त्या प्रश्नांचे सर्वांचे उत्तर हे आहे कि,असी इच्छा सर्वांची आहे.सर्वांची जी इच्छा आहे,ती इच्छा सर्वांनी पालवी कि कांहीनी पाळावी ? अर्थातच सर्वांनीच पाळवावी,कारण यात अखिल मानवांचे हित आहे.भगवंतांनी भारतीय तत्वज्ञान—भारतीय संस्कृती हे अखिल मानवांसाठी---अखिल मानवांच्या हितासाठी सांगितलेले आहे.तात्पुरत्या सुखासाठी व कायमच्या सुखारुपातेसाठी सांगितले आहे.||२|| | सैषा ह्युपनिषद् ब्राम्ही पूर्वेषां पूर्वजैर्धृता | श्रद्धया धारयेद् यस्तां क्षेमं गच्छेदकिश्चन: ||३|| अर्थः---याविषयी अनादिसिद्ध परंपरा चालत आल्यामुळे संदेह असणे योग्य नाही;असे सांगतो-तो हा श्रुतीचे ब्रम्हपरत्व प्रतिपादन करणारा रहस्य निर्णय,पूर्वजांचेहि पूर्वज अशा सनकादिणांनी मनांत धारण केला आहे.जो पुरुष,शुष्कतर्कादिकांचा आग्रह न धरिता त्याची श्रवणादिकेकरून धारण करील तो देहदिक सर्व उपाधींचा निरास करून परमानंद स्वरूपास पावेल ||३|| भावार्थ:--- उपनिदांचे ज्ञान हे सनकादी ऋषींनी स्वीकारलेले आहे,म्हणून आपणही स्वीकारावयास पाहिजे.जो कोणी श्रद्धापूर्वक यांचे श्रावण,मनन व निदिध्यासन करील तो संसार दु:खातून मुक्त होऊन त्याचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होईल.म्हणून या तत्वज्ञानाचा स्वीकार करून मोक्ष संपादन करावा.||३|| अर्थः---हेंच सर्व श्रुतीच्या अर्थनिरपन ने विस्तराने सांगण्याकरिता इतिहास सांगतो-हे राजा,याविषयी तुला जेथे नारायणच वक्ता आहे अशा बद्रीनाथ नारायणाचा व नारद ऋषीचा इतिहास वर्णन करितो||४|| अर्थः---एकेवेळी लोकांमध्ये पर्यटन करणारा भगवद्भक्त नारद,पुरातन ऋषी नारायणाला पाहण्याकरिता त्याच्या बदरीकाश्रमास गेला होता||५|| अर्थः---- जो नारायण या भरतखंडामध्ये मनुष्यांच्या कल्याणाकरितां व मुक्तीकरितां कल्पाच्या आरंभभापासून धर्म, ज्ञान व उपशम यांनी युक्त आसे तप करीत राहिला आहे||६|| अर्थ:----हे राजा, तो नारायण, त्या आश्रमामध्ये तेथील जवळच्याच कलापनामक गांवांत राहणाऱ्या ऋशिंनीं परिवेष्टित होऊन सुखाने बसला असता, त्याला नारद ऋषींने प्रमाण करून ब्रम्हाचेठिकाणी श्रुती कशा संचार करितात हाच प्रश्न केला होता||७|| भावार्थ:---भगवान नारायण लोककल्याणासाठी व मोक्ष प्राप्तीसाठी बदरिकाश्रमात तप करत आहेत.आपणांस इतरांचे कल्याण करावयाचे असेल तर अंत:कारण शुद्ध करून व अंत:कारण स्थिर करून म्हणजेच इंद्रिये व मन ताब्यात घेऊन धर्मचा व वेदांचा उपदेश करावा.आपल्यात तप नसेल म्हणजे इंद्रिये व मन ताब्यात नसेल तर उपदेश करू नये,कारण कोणतेही कार्य करवयाचे असेल तर एक विशिष्ट अधिकार लागत असतो.तो अधिकार प्राप्त करून उपदेश करावा.||६|| अर्थः---तेव्हा भगवान नारायणाने ,त्या नारदाला सर्व ऋषी श्रावण करीत असता ,जो पूर्वीचा अतिवृद्ध जनलोक निवशी संकादिकांचा प्रश्नोत्तारणी निर्णयरूप सवड झाला होता तो कथन केला ||८|| अर्थ:----श्री भगवान म्हणाला हे ब्रम्हपुत्रा पूर्वी जनलोकामध्ये तेथे असणाऱ्या ब्रम्हदेवाच्या मानासिकपुत्र अशा सनकादिक ऋषीचे ब्र्म्हसात्र झाले||९|| अर्थः---त्यवेळी मी कोठे गेलो होतो ?असे म्हणशील तर श्रेतव्दिपाचा अधिपती जो आनिरुद्धात्म्क मी त्यचे दर्शन गेण्याकरिता जेव्हा तू तेथे गेला होतास तू जो प्रश्न आता मला केला आहेस हाच प्रश्न त्या जनलोकांमध्ये झाला होता आणि नंतर त्येथे असा उत्तम ब्रम्ह विचार झाला कि ज्यत सर्व श्रुती तात्पर्यवृत्तीने येवून गेल्या आहेत||१०|| अर्थः---आता ते सर्वज्ञ असून त्यात वक्ता कोण झाला व प्रश्न करणारा कोण झाला?असे म्हणशील तर –जरी ते चारही सनकादिक ऋषी श्स्त्रभ्यास तपाच्शार्य व स्वभाव यांनी सारखे होते आणि मित्र,शत्रू व उदासीन यामध्ये समता धरण करणारे असल्यामुळे सर्वही व्याख्यान करणार्यास समर्थ होते तथापि काहीएक कौतुकाने त्यंनी एका संद्नाला वक्ता करून बाकीचे श्रोते झाले आणि प्रश्न केला ||११|| अर्थः----तेव्हा सनदान म्हणाले हे –सनकादिक हो जेव्हा परमेश्वर आपण रचलेल्या ह्या जगाला आपल्याच शक्तीचे प्रलयकाली स्वस्वरूपी लीन करून योगनिद्रेने निजल्यासारखा राहिला होता तेव्हा त्या निद्रेचा शेवती व सृष्टीचा आरंभी त्याच्या प्रथम श्वासोच्वासापासून प्रकट झालेल्या श्रुती त्याचा परमेश्वराचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांनी त्यास जागृत करू लागल्या ||१२|| | तुल्यश्रुततपःशिलास्तुल्यस्वीयारीमध्यमाः | अपी चक्रुः प्रवचनमेकं शुश्रूषवोऽपरे ||११|| अर्थः---जसे निजलेल्या सार्वभौम राजाजवळ प्रत्काली त्याचा स्तुतिपाठ करणारे सेवक येवून प्रशस्त क्त्र्तीयुक्त पराक्रमाच्या वर्णांनी त्याला जाग्रत कार्तीतात त्याप्रमाणे श्रुतीही ईश्वराचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांनी त्याला बोद करू लागल्या ||१३|| भावार्थ:---जसे पहाटे झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी त्याचे नौकर त्याचे पराक्रम व सुयाशांचे गायन करत असतात,तसेच जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये ज्याच्या—त्याच्या कर्माप्रमाणे लीन करून आपल्या शक्तीसाहित झोपी जातो.जेव्हा ज्यांचे—त्यांचे कर्म फळ भोगण्यास परीपक्व झाल्यानंतर प्रलयाच्या शेवटी श्रुती,त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या शब्दांनी आपण अधिकारसंपन्न होऊनवेदांच्याद्वारा त्यांना जागे करावे.||१२—१३|| | जय जय जह्यजमाजित दोषगृभीतगुणां त्वमसि यदात्मना समवरुध्दसमस्तभगः | | अगजगदोकसामखिलशक्त्यवबोधाकते क्वचिदजयाऽऽ त्मना च चरतोऽनुचरेन्निगमः ||१४|| अर्थः---श्रुती म्हणतात:---ज्यांना कोणी जिंकले नाही,अशा हे परमेश्वर तू आपला उत्कर्ष वरवर प्रकट कर .कोणत्या प्रकाराने मी आपला उत्कर्ष प्रकट करावा ?से म्हणशील तर (अगजगदोकसा दोषगृभीत गुणां आजा जही)स्थावरजन्ग्मात्म्क जीवांच्या आनंदादिक गुणांचे आवरण करण्याकरिता सत्वादिक गुण ग्रहण करणारी अविद्येचा नाश कर.जशी व्यभिचारिणी स्त्री दुसऱ्या पुरुषांना फसविण्याकरीता हावभत्तवगैरे गुणांचे ग्रहण कृत्ये त्याप्रमाणे हि अविद्या,जीवांना मोहित करण्याकरिता सत्वादिक गुणाचे ग्रहण करित्ये,म्हणून इच्छा नाश कर.तर हि अविद्या माझे ठिकाणी सुद्धा आपला दोष चिकटविल यास्तव मला तरी हिच्छ नाश करण्याची शक्ती कोठे आहे?असे म्हणशील तर-(यत त्वां आत्मना समवरू द्धसमस्तभग असी )ज्याअर्थी तूं (मायेला वश करून ठेविल्यामुळे )आपल्या स्वरूपसाक्षात्कारानेच सर्व ऐश्वर्ये प्राप्त करून घेतली आहेस.आता हेजीव्च ज्ञान वैराग्यादिक साधनांनी तिचा नाश का करीनात ?असे म्हणशील तर हे सर्वशक्तीप्रकाशक ,तुच त्या जीवाचा अंतर्मामी सर्वशक्ती प्रकाशक आहेस म्हणून ते जीव ज्ञानवैराग्यादिक साधनाविषयी स्वतंत्र नाहीत मी अखंडित ज्ञानैश्वर्यादिक गुणांनी युक्त असून जीवांच्या कर्मज्ञानादिक शक्तीची प्रेरणा करून त्याच्या अविध्येचा नाश करणारा आहे याविषयी प्रमाण काय ?असे म्हणशील तर मी वेदाचा प्रमान आहे आता अशा माझा स्वरूपी वेदाची पृवृती कशी होत्ये ?असे म्हणशील तर मायेसः वर्तमान क्रीडा करणाऱ्या आणि निरंतर सत्य ,ज्ञान ,अनंत ,आनंदास एकरस रूपाने राहणाऱ्या तुझे वेद प्रतिपादन करितो||१४|| भावार्थ:--- आपली ही जी त्रीगुनात्म माया आहे,जीव हा अज्ञानावस्थातामध्ये आपल्या सत्—चित्—आनंद या स्वरूपाला आच्छादित करू बंधनात अडकलेला आहे.त्यामुळे संत—महात्मा यांनी जीवांना अधिकारसंपन्न होऊन उपदेश करावा.जीवांनी निष्काम कर्म करून व निष्काम उपासना करून,सत्संग करून मायेचा नाश करावा.मायेचा नाश—बाध केला असता त्रीयागुनात्मक बंधन नष्ट होते.संत—महात्मा यांनी अज्ञानी जिवातील निष्काम कर्म,निष्काम भक्ती व ज्ञान यांना उपदेश करून जाग्रत करावे.जसे परमात्मा हा कधी मूळ स्वरूप म्हणजे परमार्थ स्वरूपाणे राहतो,ता कधी कार्यरूपाने म्हणजे जगतरुपाने राहतो.तसे झाड हे कधी बीजरूपाने राहते,तर कधी झाडरुपाने राहते.वेद हे त्या परमात्म्याचे मुल स्वरूपाचेही वर्णन करते व जगतस्वरुपाचेही वर्णन करते.||१४|| अर्थः---आता,वेदामध्ये इंद्र ,अग्नी वायू ,सूर्य इत्यदिक देवाचे प्रतिपादन केलेले दिसते तेथे माझे प्रती पादन कोठे आहे ?असे म्हणशील तर हे दिसलेले इंद्र अग्नी इत्यादीक स्थावरजंगमात्मक सर्व जग ,ब्रम्हरूप तुच आहेस असे विद्वान लोक जाणतात .कसे म्हणशील तर –प्रलयकाली सर्वच नाश झाला असताही तुच अवशेष राहतो म्हणून .त्याचे कारण –ज्या तुज अविकारी ब्राम्हपासून जसे मुत्यीव पासून घातादिक पदार्थाचे उत्पात्तीनाश होतात त्याप्रमाणे विकारी पावणाऱ्या जगाचा उत्पात्तीनाश होतात ,तो तू जगद्रूप विवार्ताचे अधिष्ठान निर्विकारी असून उपदान कारणही आहेस म,हणून इंद्रदिकांचे प्रतिपादन करणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या वस्तुत तुझेच प्रतिपादन करितात कारण इंद्रादिक देवता तुझ्याहून निराल्या नाहीत म्हणूनच नात्रणी किवा मंत्राच्या दृष्ट्या ऋषींनी मनात आणलेली व वाचनाने उचारलेली इंदार्दिक नावचे तुझ्याचाविषयी धरण ,केली आहेत निरनिराळ्या वाज्राहास्तादिक विकारावर धरण केली कि ,भूमीवर राहणाऱ्या प्राण्यांनी कोठेही ठेवलेली पावले भूमीवर जशी भूमीचा न तेवलेली कशी होतील ?म्हणजे मृतिका पशन इत्यादिक कोणत्याही पदार्थ्वर ठेवलेलं;इ मनुष्याची पावले जशी भूमीचा आधार सोडून राहत नाहीत त्याप्रमाणे या सृष्ठीतील कोणत्याही विकाराचे वर्न्मान करणारे वाद ,परमार्थ भूत व सर्व कारण अशा तुझेच प्रतिपादन करितात ||१५|| भावार्थ:--- ज्याप्रमाणे घटादि कार्य मातीतून उत्पन्न होते व नाश झाल्यानंतर त्यातच लय पावते,त्याचप्रमाणे आपल्या परमात्मस्वरूपात कोणताही बदल न होता जीव व जगत निर्माण होते व आपल्यात प्रलय झाल्यानंतर लीन पावते आणि जीव—जगत नसते,पण परमात्मा असतो.तसे जीव हा सुषुप्तीआवस्थेत—अज्ञानावस्थेत कार्य लीन पावते,पण जीव असतो.जाग्र्तावस्थेत---ज्ञानावस्थेत जीव व जगत प्रगट रूपाने असते.जसे परमात्म्याशिवाय अन्य वस्तूच नाही,तसे माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी ती पाय पृथ्वीशिवाय कांहीच नाही.उदा—झाड असो,दगड असो,लोखंड असो,माती असो किंवा कोळसा असो हे सर्व पृथ्वीचेच रूपे आहेत.तसे झाड असो,प्राणी असो,पक्षी असो,जंतू असो,ज्वारी असो,कोणताही जीव असो,त्यात परमात्मा आहेच,दगड असो,लाकूड असो,कोणतेही जड वस्तू असो,त्यात परमात्मा आहेचपरमात्मा सोडून कांहीच नाही.जिकडे—तिकडे परमात्माच आहे,परमात्मा सोडून कांहीच नाही.असे कळून घ्यावे.||१५|| | बृहदुपलब्धमेतदवयन्त्यवशेषतया यत उदयास्तमयौ विकृतेर्मृदी वाविकृतात् | | अत ऋषयो दधुस्त्वयी मनोवचनाचरितं कथमयथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम् ||१५|| अर्थः---आता तुच सर्व श्रुतीगोचार आहेस असे साधूच्या प्रवृतीने दृढ कारीत श्रुती म्हणतात-त्रीगुंमायारूप हरिणीला खेल्विणाऱ्या सर्वकरणा ,तुच सर्व कार्न्त्वेकारून परमार्थरूप क़ाहेस असे जाणून विवेकी पुरुष सर्व लोकांच्या पापाला दूर करणाऱ्या तुझ्या कथारूप अमृतसामुद्राचे सेवन करून पापाची किवा दु:खाची निवृत्ती करितात .त५एव्ह तुझ्या कथा श्रवणा दिकेकारून सर्व संतापाची निवृत्ती होते तेव्हा जे पुन्हा तुझ्या स्वरूप स्पुरानानेचा आपल्या अन्ताकार्नाच्या रागादिक धर्माची आणि जरादिक कालधार्माची निवृत्ती करून अखंद्निन्दारूप तुझ्या स्वरूपाचे सेवन करितात त्यांच्या सर्व संतापाची निवृत्ती होत्ये हे सांगावे||१६|| भावार्थ:---भगवंतांची कथा,संत—महात्मा यांच्या कथा,भगवंतांच्या लीला,भगवंतांचे नामस्मरण श्रावण—स्मरण केले असता सर्व पाप—ताप नष्ट होतात.ज्या संत—महात्मा यांनी,त्यांना आत्मज्ञान झालेले आहे,ज्यामुळे ज्यांच्या अंत:करणातील षड-विकार नाहीसे झालेले आहेत,जन्म—मरण—तरुण—वार्धक्य दोष गेलेले आहेत आणि आपल्या अखंड आनंदस्वरुपला प्राप्त झालेले आहेत,अशा ज्ञानानुभवी संत—महात्मा यांचे पाप—ताप नाहीसे सहज होणारयात कांहीच नवल नाही.||१६|| | तय इव श्र्वसन्त्यसुभृतो यदी तेऽनुविधा महदहमदयोsण्डमसृजन् यदनुग्रहतः | | पुरुषविधोs न्वयोsत्र चरमोsन्नमयादिषु यः सदसतः परं त्वमथ यदेष्ववशेषमृतम् ||१७|| अर्थः---आता असुर्यामक ते लोक इत्यादिक कितीएक श्रुती वरील दोन श्लोकात संगीतलेले सेवन न करणाऱ्या निदा करीतात –(हे देव,असुभृत:यदि ते अनुविधा:तर्हि श्वसंती इतरथा दृतय:इव श्वसंती हे देवा,प्राणी जर तुम्ही भक्ती करणारे होतील तरच त्यांचे वाचणे सफल होईल,नाहीतर त्यांचे श्वासोच्छास लोहाराच्या भात्यांतील वायुसारखे व्यर्थ आहेत.आतां अभक्तांनाही कामादिक फल आहे असे म्हणशील तर (महदह्मादय:याद्णुग्रहत:अंडं असृजन )महत्तत्त्व व अहंकार इत्यादिक तत्वांनीही ज्या तुझ्या अनुप्रवेशाने सामर्थ्ययुक्त होऊन समष्टिव्यष्टयात्मक ब्रम्हांड उत्पन्न केले आहे,त्या परम अनुग्रह करणाऱ्या तुझे भजन न करणारांस उलटा कृतघ्नपणाचा दोष प्राप्त होऊन ते विषयभोगादिक फळही प्राप्त होत नाही.आता कशा प्रकारचा मी,उपास्य आहे असे म्हणशील तर-(य:अत्रमायिषु पुरुषविध:जो,अश्रमय,प्राणमय,मनोमय,आणि आनंदमय या पांच कोशांमध्ये त्या त्या मन्नमथादिक कोशांसारखा आकारवान म्हणजे देह,प्राण,मन,बुद्धी आणि ज्ञान या स्वरुपांनी उच्चारीला जातो तो तूं आहेस.आता चैतन्यस्वरूपी असलेल्या मला त्या त्या अन्नमयादिकांचा आकार कसा प्राप्त होतो?असे म्हणशील तर-(अन्न अन्वयया कोशांमध्ये तुझा,अग्नीचा जसा काष्ठांमध्ये अन्वय असतो तसा अन्वय आहे म्हणून तत्तदाकरता घडत्ये तर मग मला सत्यत्त्व व असंगत्त्व कसे ? असे म्हणशील तर-(चरम: )अन्नमयादिकांचे वर्णन चालले असता मब्रम्ह पुच्छ प्रतिष्ठान असा पुच्छ्त्वाने असधित्वेकरून सांगितलेला जो तो तूं आहेस.बरे तथापि अन्नमयादिकांचे अन्वय असल्यामुळे असंगत्वाची हानीच होईल असे म्हणशील तर (सदसत: परं एषु अवशेष आठ ऋत यत् मततफ त्वं मअसिफ )स्थूलसूक्ष्मरुपी अन्नमीप्राण मयादी कोशांचे साक्षी,त्यांचा अपवाद झाला असतांही अवशेष राहणारे आणि सत्यरूप जे ब्रम्ह ते तूं आहेस.मग त्या कोशांमध्ये माझा अन्वय का सांगितला?असे म्हणशील तर तुझ्या शुद्धस्वरूपाच्या निरुपणाकरीता शाखाच्नाद्रन्यायाने अन्वय सांगितला आहे||१७|| भावार्थ:--- भगवंतांची निष्काम सेवा जर मनुष्यांनी केली तर त्यांचे जीवन सफल म्हणजे त्यांना फळ मिळाले,सार्थक झाले.म्हणून जीवांनी भगवंतांची निष्काम सेवा करावी,कारण त्यामुळे त्यांचे जीवन सफल—सार्थक होते.आपण जर भगवंतांची निष्काम सेवा व उपासना न केली तर त्यांचे जीवन लोहाराच्या भात्यासारखे होय,म्हणजे निरर्थक होय.म्हणून मनुष्य जीवन निरर्थक जाऊ नये म्हणून निष्काम सेवा व निष्काम भक्ती करावी.यातच आपले सार्थक आहे.भगवंतांनी महत्तत्व,अंहकार इत्यादी जड तत्वांनी ब्रह्मांड अलिप्त होऊन रचले.आपणही आपला संसार अंहकाररहित होऊन करवा,अलीप्य्त होऊन करावा—पाहावा.पांच कोशांचे आधात आपण आहात.जसे वेलीस आधार असल्याशिवाय वाढू शकत नाही,तसे परमात्म्याचा आधार असल्याशिवाय आपण—जीव जीवन जगू शकत नाही.भगवंत हा कार्यकारानात्मक जो संसार आहे त्याच्या पलीकडील नामरुपासहित नसलेले परमात्मा आहात.जग व जीवन्चालाय झाला तरी आपण परमात्मारुपणे असणारे अनादी—अनंत आहात.आपण सत्—चीत्—आनंद स्वरूप आहात.असा जो परमात्मा आहे,त्यास सत्संगाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.||१७|| अर्थ:---आता मउदर ब्रम्हेती शार्कराक्षा उपासतेफ इत्यादिक श्रुति,ईश्वराचे ठिकाणी मनाचा प्रवेश होण्याकरिता उपासनाचे भेद सांगतात-(हे अनंत ऋषिवर्त्मसु ये कुर्यदृश: मतेफ उदर उपासते )हे अनंता,ऋषीच्या संप्रदायमार्गांमध्ये जे स्थूळदृष्टी पुरुष आहेत ते उदरांतील मणीपूरचंद्रात राहणाऱ्या ब्रम्हांचे ध्यान करितात.(आरुणय: परीसरपद्धति ह्रदय दहर मउपासतेफ )अरुणाच्या वंशांत झालेले ऋषी तर-सर्वत्र नाड्या पसरण्याचे स्थान ह्र्द्यांतील सूक्ष्मरूपाचेच ध्यान करितात.कारण.(तत:परम तव धाम शिर उदगात )त्या सूक्ष्मापासून सर्वोत्कृष्ट ज्योतिर्मर्ये असे तुझ्या प्राप्तीचे स्थान सूक्ष्मनाडीरूपे मस्तकापर्यंत वर गेले आहे.म्हणजे मूलाधारचक्रापासून ह्रदय मध्यांतून ब्रम्हरआतापर्यंत वर गेले आहे.त्याचा महिमा असा आहे कि,-(यत् समेत्य पुनः इह कृतांतमुखे न पतंती )ज्या सूक्ष्मनाडीरूप प्राप्ती झाली असता पुन्हा ह्या मृत्युच्या मुखरूप संसारात पडत नाहीत||१८|| | स्वकृतविचित्रयोनिषु विशन्नीव हेतुतया तरतमतश्र्चकास्स्यनलवत् स्वकृतानुकृति: | | अथ वितथास्वमुष्ववितथं तव धाम समं विरजाधियोsन्वयन्त्यभिवीपण्यव एकरसम् ||१९|| अर्थः---आतां ईश्वरालाही जर जिवासारखा उदराही संबंध आहे,तर कोणत्या विशेषाने त्याचे उपास्यत्व ?या शंकेचा परिहार करणाऱ्या मएको देव: सर्वभूतेषु गूढ:फ इत्यादिक श्रुति,स्तुती करितात कि,-(हे प्रभो त्वं स्वकृतबिचीत्रयोनिषु हेतुतया विशन्नीव )हे प्रभो,तूं आपणच केलेल्या उच्चनीचमध्यमरूप देवतीर्यङ्मनुष्ययोनीमध्ये उपादानत्वेकरून प्रथमच असूनही नंतर प्रवेश केल्यासारखा होऊन (स्वकृतानुकृति: तरतमत:अनलवत चकास्सि )आपणच केलेल्या त्या त्या देवादियोनीचे अनुकरण करीत असता उत्कृष्टनिकृष्टादि तारतम्याने,जर अग्नी,स्वतां तारतम्यरहित असूनही काष्ठानुसारेकरून दीर्घऱ्हस्वस्थुलादीरुपी भासतो त्याप्रमाणे भासत आहेस.(अथ अभिवीपन्यव:विरज धिय:) म्हणून यालोकी व परलोकी भोगण्यास योग्य अशा कर्मफळाने रहित झालेले निर्मळबुद्धी पुरुष,(वितथासू अमुषु अवितर्थ सम एकरस तव धाम अनव्यंती )मिथ्याभूत अशा या देवमनुष्यादिक योनीमध्ये स्त्यस्म व एकरसरुपी तुझ्या स्वरुपासच जाणतात.म्हणजे अखंडश्वर्यरुपी तुज भगवंताला,उपाधीने केलेला न्यूनाधिक भाव नसल्यामुळे तूंच उपास्य आहेस अस जाणतात||१९|| भावार्थ:--- आपण—भगवंतांनी स्वत:च निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारणाने जीवात्मारुपाणे प्रवेश केलेला आहे.जसे आकाशात सूर्य आहे व पृथ्वीवर पाणी आहे.त्या पाण्यात सूर्याने प्रतिबिंबरूपाने प्रवेश केलेला आहे.त्याचप्रमाणे सूर्यासारखा परमात्मा आहे.जमिनीवरील पाण्याप्रमाणे अंत:करण आहे.सूर्याने जसा पाण्यात प्रतिबिंबरूपाने प्रवेश केला आहे,तसाच परमात्म्याने अंत:करणात जीवरूपाने प्रवेश केलेला आहे.अग्नी जसा लाकडामुळे लहान-मोठा वाटतो, त्याचप्रमाणे त्या—त्या योनीत आपण असल्यामुळे लहान—मोठे भासतात.जसे जे पाणी निर्मळ व स्थिर झालेले आहे त्या पाण्यात सूर्याच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो.तसे ज्या संत—महात्मा यांचे अंत:करण निष्काम कर्मांमुळे व निष्काम भक्तीमुळे शुद्ध व स्थिर झालेले आहे,त्यांना आपण सत्य,सर्वत्र समान,एकरस स्वरूप अनुभवास येतात.तसे जे पाणी गढूळ व चंचल आहे त्या पाण्यात सूर्याच्या प्रतिबिंबाचा अनुभव येत नाही,तसे मात्र ज्यांचे अंत:कारण निष्काम कर्म व निष्काम भक्ती न केल्यामुळे शुद्ध न होता अशुद्ध झालेले आहे व स्थिर न होता अस्थिर—चंचल झालेले आहे त्यांना परमात्म्यांचा अनुभव येत नाही.म्हणून त्यांचे जन्म—मरण निवृत्त न होता चौऱ्याऐंसी यीणीस जाऊन दु:ख भोगावे लागत आहे.म्हणून आपण सत्संग करून निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून ज्ञान प्राप्त करून परमात्म्यांचा अनुभव घ्यावा.संत—महात्मा यांचा सत्संग हा अंहकार न येत करावा.अन्हाकार्साहित केला तर परमात्म्याचा अनुभव येत नाही.||१९|| | स्वकृतपुरेष्वमिष्वबहिरन्तरसंवरणं तव पुरुषं वदन्त्यखिलशक्तीधृतोंsशकृतम् | | इति नृगतिं विविच्य कवयो निगमावपनं भवत उपासतेsङ्घ्रीमभवं भुवि विश्र्वसिता: ||२०|| अर्थः---आता मस यश्चाय पुरुषेफ इत्यादिक श्रुति,जीव हा वस्तुतः भगवत्स्वरुपीच आहे असा बोध करीत असता त्या,अवतार धारण करणाऱ्या भगवंताच्या भजनाचा प्रकार सांगतात-(हे देव स्वकृतपुरेषु अमीषु अबहिरंतरसंवरण पुरूष अखिलशक्तीधृत:तव अंशकृतं वदंती)हे देवा,आपल्या कर्माने संपादन केलेल्या ह्या मनुष्यादिक देहांमध्ये भोकर्तृत्वेकरून असणाऱ्या परंतु कार्यकारणरूप आवरणांनी रहित अशा ह्या जीवाला,हा सर्व शक्तीचा आश्रय व पूर्णरुपी अशा तुझ्या अंशासारखा व केल्यासारखा भासत असून वस्तुतः त्वद्रुपिच आहे असे तत्त्वेवेत्ते म्हणतात.(इति नृगती विविच्य कवय:निगमावपन अभव ते अंघ्री भुवि उपासते)याप्रमाणे (जीवाच्या तत्वाचा निर्णय केल्याखेरीज परब्रम्हाची प्राप्ती होणार नाही म्हणून)जीवाच्या तत्त्वाचा शोध करून तत्त्ववेत्ते पुरुष विश्वासयुक्त असता सर्व कर्मे अर्पण करण्याचा विषय म्हणजे जेथे अर्पण केलेली सर्व कर्मे मुक्तिरूप फल देणारी होतात त्या संसारनिवर्तक चरणाचे,या भूमीवर अर्चनवंदनादिकेकरून सेवन करितात हेंच यालोकी योग्य आहे||२०|| भावार्थ:---जीवास अज्ञान असाल्यामुळे जे शरीर मिळते,ते त्याच्या कर्मानेच मिळत असते.जीवास ज्ञान प्राप्त झाल्यानंतर व त्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर “मी परमात्मा आहे असा त्यास अनुभव येतो.त्यास आपले--जीवाचे मुळ—स्वरूप कळते.त्यासाठी कर्म निष्काम भावाने भगवंतांस अर्पण करतो.निष्काम कर्म भगवंतास अर्पण केल्यानंतर संत—महात्मा यांची भेट होऊन त्यांचा सत्संग केला असता ज्ञान प्राप्त होऊन “मी ब्रह्म आहे” असा साक्षात्कार घेतात,ते सुखरूप होतात.||२०|| | दुरवगमात्मतत्त्वनिगमाय तवात्त्तनो- च्श्ररितमहामृताब्धिपरिवर्तपरिश्रमणा:| | न परील्षन्ति केचिदपवर्गमपीश्र्वर ते चरणसरोजहंस कुलसङग विसृष्ट गृहा: ||२१|| अर्थः---आता भक्ती ते तर एक अल्पसाधन आहे असे बोलणे योग्य नाही असे मानणाऱ्या कितीएक श्रुति,भक्तीने महत्त्व वर्णन करितात-(भो ईश्वर दुरवमात्मतत्वनिगमाय आत्तातनो:तव )हे ईश्वरा,दुर्बोध अशा आत्मतत्त्वाचे ज्ञान होण्याकरिता अवतार धारण करणाऱ्या तुझ्या चरित्र रूप महासामुद्रामध्ये स्नान करून श्रमरहित झालेले किती वेळ विरले भक्तिरसिक पुरुष तुझ्या चरणकमलाचे ठिकाणी हन्सासारखा रामनाम होणार्या भक्तजनांच्या कुळाशी घडलेल्या संगतीने घरादारादिकांचा त्याग करून श्रावण कीर्तनाचा निमग्न होत असता असता ,त्याचा सुखाने तृप्त झाले म्हणजे ते मोक्षाचीही इच्छा करीत नाही मग दुसर्या इंद्रपादादिकांची इच्छा काय न्हाणून करतील ?मुलीचा करणार नाही .एतावत तुझी भक्ती मुक्तीपेक्षा अधिक आहे ||२१|| भावार्थ:--- आत्मतत्व हे कळण्यास व अनुभवास येण्यासाठी अत्यंत कठीण आहे,तरी पण साधक—जिज्ञासू संत--महात्मा शम—दमादि साधनांनी म्हणजे १—शम म्हणजे सर्व वासनांचा त्याग करणे त्यास “शम” असे म्हणतात.उदा—आपल्या मनात विषयांचा भोग घ्यावा असे न येणे व इंद्रियांचा व विषयांचा संबंध अंत:कारणपूर्वक न येऊ देणे त्यास शम असे म्हणतात.सर्व वासनांचा त्याग होण्यासाठी वास्तविक वासनेचे स्वरूप काय असे श्रवणाद्वारे जाणून घेतात. विषय हे क्षणिक सुख देतात व त्यानंतर दु:खच अनुभवयास येते याचा आपणास सर्वांना अनुभव आहे.थोडक्यात विषय हे आपली जी इच्छा आहे,ती इच्छा म्हणजे आपले “कायमचे दु:ख जावो व कायमचे सुख मिलावो”असी इच्छा याच्च्चावत अखिल मानवांची आहे.ही इच्छा विषय पूर्ण करू शकत नाही,असा अखिल मानवांचा अनुभव आहे.ज्याअर्थी असी इच्छा होते,त्याअर्थी असे सुख असलेच पाहिजे.आपण जर संत—महात्मा यांचा सहवास केला तर आपली इच्छा पूर्ण होते.त्यांची संगत करून त्यांचा सत्संग केला व आपण त्यांच्या म्हणण्यासुर ऐकले तर त्यांनी दिलेल्या उपदेशानुसार आपण आचरण केले तर आपली जी इच्छा आहे,ती पूर्ण होऊ शकते.म्हणून त्यांचा सत्संग करावा.२—दम म्हणजे शब्द,स्पर्श,रूप,रस आणि गंध यांचा आणि इंद्रियांचा संबंध न येऊ देणे.मनात जरी विषयांचा भोग घेण्याची इच्छा झाली तरी आपण इंद्रियांचा व विषयांचा संबंध येऊ द्यावयाचा नाही.यास “दम”असे म्हणतात.आम या साधनापासून सुरुवात करावयास पाहिजे.३—उपरती म्हणे सर्व प्रपंच्यापासून निवृत्ती,म्हणजे संसार नको वाटणे,कारण संसारातील विषयांपासून आपल्या इच्छेची पूर्तता होत नाही.४—तितिक्षा म्हणजे अनुकूल—प्रतिकूल,सुखदु:खादी जे प्रारब्धानुसार येणारे जे धर्म आहेत,ते सहन करण्याची योग्यता.यास “तितिक्षा” असे म्हणतात.५—श्रद्धा म्हणजे ब्रह्मनिष्ठ सदगुरुंच्या त्याचप्रमाणे वेदांत—शात्र वाक्यांच्या ठिकाणी भक्ती यास “श्रद्धा” असे म्हणतात.सदगुरूंनी जो उपदेश धर्मानुसार केलेला आहे,तो आपल्याच परमाहिताचा आहे, त्यामुळे त्यानुसार वागणे—आचरण करणे.शात्रात जे आहे ते सर्व आपल्या परमहीताचेच आहे असे समजून त्यानुसार वागणे—आचरण करणे.यास श्रद्धा असे म्हणतात.६---समाधान म्हणजे सत्—चित्—आनंद असे आपले स्वरूप जाणून घेतेवेळी केलेली चित्तचि एकाग्रता.चित्ताची एकाग्रता म्हणजे आपण आपला विषय श्रावण करत असतांना अन्य—दुसरा विषय मनात न येणे त्यास चित्ताची “एकाग्रता असे म्हणतात.उदा—आपले वेदांत या विषयांचे श्रावण चालू आहे,त्यावेळेस आपल्या मनात अन्य-दुसरा विषय म्हणजे माझी आई सध्या काय करत असेल,असा विचार मनात न येणेकारण आपल्या मनात असा विचार आला कि,आपला त्याअगोदरचा विषय आहे,त्याच्याकडे लक्ष न राहता,आईच्या विषयाकडे लक्ष जाते.त्यामुळे आपले अहित होते.म्हणून एकग्र चित्त करूनच श्रावण करावे.असे अधिकारसंपन्न होऊनच श्रवण करावे.त्यात आपलेच हित असते.चित्त एकग्र ना करत श्रावण केले तर आपलेच अहित होते.साधक हगावंताचे स्मरण,लीलाकथा, चारित्र कथा,संत—महात्मा यांचे चरित्र व वेदातांचे श्रवण करतात.त्यामुळे त्या साधकांचा त्रिविध ताप नाहीसा होतो.त्या आपल्या सगुण—साकार किंवा निर्गुण साकाराची ज्ञानपूर्व व ज्ञानोत्तर भक्तीमुळे आवड निर्माण झाल्यामुळे तसे संस्कार झाल्यामुळे मोक्ष नावाचा चौथा पुरुषार्थ नको वाटून निष्काम भक्तीसाठी,आपली सेवा करण्यासाठी,आपले चरित्र व लीला,तसेच भक्तांची चरित्रे श्रवण करण्यासाठी पुन्हा जन्मास यावे असी त्यांची दृढ इच्छा होते.आपले जे निष्काम संत आहेत,त्यांची सेवा करण्यासाठी,त्यांचा सहवास होण्यासाठीत्यांच्या मुखातून शात्र श्रवण करण्यासाठी जन्मास यावे असे त्यांना वाटत असते.||२१|| | त्वदनुपं कुला यमि दमात्म सुह्रत्प्रियाव- च्चरति तथोन्मुखे त्वयि हिते प्रिये आत्मनि च | | न बत रमन्त्यहो असदूपासनयाssत्महनो यदनुशया भ्रमन्त्युरुभये कुशारीरभृत ||२२|| अर्थः---आता आराममस्य पश्यंती इत्यादिक श्रुती वारवार मोठ्याने आक्रोश करून परमात्मा ईश्वरावर प्रेम असावे असा उपदेश करितात तूझ्या सेवेविषयी उपयोगी पडणार हे शरीर ,आतमा ,प्रिय यांच्या सारखे स्वधीणपणे वागत आहे आत्मा ,प्रिय हित व संसारापासून तर्ण्याविषयी सन्मुख व उभा व सर्वप्रकारे सुसेव्य अशाही तुझे ठिकाणी प्राणी ,श्रावण कीर्तन ,सख्या इत्यादिकेकारून रमत नाहीतही मोठी दुखाची गोष्ठ आहे .रमत नाही इतकेच नाही ,तर देहादिकांच्या लालनपालनादिकेकारून ते आपला घात करून घेतात तो आत्मघात असा कि –ज्यादेहादिकांच्या ललनादीक वासना धरण करणारे जीव श्र्वसुकारादिक निद्य योनी धरण करून ,अनेक भक्तीच्या अंगात्वेकारून ध्यानाचा उपदेश करितात हे समर्थ ज्यांनी आपला प्राण ,मन व इंद्रिये हि स्वाधीन केली आहेत असे दृढ योग करणारे ऋषी ,हृदयामध्ये ज्या तुझ्या तत्वाचे चिंतन करितात ;ताशाचा तुझ्या चरणकमळाचे उत्तम प्रकारचे चिंतन करणाऱ्या आन्ही श्रुतीच्या अभिमानी देवता हि ज्या तत्वाला साम्त्वेकारून पहात आहो .तेच तुझे तत्व ,शत्रुनीही स्मरण नात्रेकारून प्राप्त घेतले आहे आणि शेषाच्या देहासारखा मृदू बहुदंडावर आसक्ती चित्त झालेल्या स्त्रिया गोपीही तेच तत्व कामेकारून पावल्या आहेत .एतावत सर्वही तुला सारखेच आहेत;म्हणजे असा तुझ्या स्मरणाचा महिमा आहे कि,जे योगी तुझी ह्रदयामध्ये उपासना करितात,ज्या आम्ही तुला अपरिच्छिन्न रूपाचे चिंतन करितात त्या सर्वांनाही ते तुझे ध्यान स्वरूपाची सारखी प्राप्ती करून देते||२३|| भावार्थ:---आपण म व बलामुष्यदेह—शरीर जर भगवंतांच्या,भगवंतांच्या भक्तासाठी व इतर जी जीव आहेत,ते सर्व भगवंतांची लेकरे आहेत असा भाव ठेऊन जर इतर जीवांची सेवा केली किंवा त्यांचे दु:ख निवारण करून सुख देण्याचा प्रयत्न केला तर ती सर्व भगवंतांचीच सेवा घडते.त्यामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. त्यामुळे हेच शरीर हितचिंतक आणि मित्र बनते.म्हणून आपण या मनुष्य देहाने—शरीराने भगवंतांचीच सेवा करावी,अन्य कांही करू नये.आपण जर असी जीवांची निष्काम सेवा केली,तर आपल्यास प्रेमाने भेटावयास बरेचसे उत्सुक असतात.म्हणून आपण भगवंतांचे निष्काम भक्त होण्याचा प्रयत्न करावा.जर आपण मनुष्य देहात—शरीरात येऊन भगवंतांच्या सेवेत न रमता देहासंबंधित रमतो—आसक्त होतोत.त्यामुळे आपली अधोगती होऊन पशु—पक्ष्यादी क्षुद्र शरीरे पाप्त होतोत.पशु—पक्ष्यादी जीवांच्या शरीरात किती अतोनात दु:ख असते,ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आयुष्यभर पहातोत.आपण भगवंतांचीच निष्काम सेवा करावी.||२२|| भावार्थ:--- योगीजन प्राण,मन,इंद्रिये यांचा निग्रह करून म्हणजे आपल्या ताब्यात घेऊन दृध योगाभ्यास करून परमात्म्याची उपासना करतात,त्याच तत्वाला तमोगुणी असलेले शस्त्रू निरंतर परमात्म्याच्या स्मरणाने त्याच तत्वाला प्राप्त होतात.स्त्रियासुद्धा नित्य स्मरण केल्यामुळे त्याच तत्वाला प्राप्त होतात.श्रुतीही परमात्मा तत्वाचे चिंतन करून नेती—नेती म्हणून स्तब्ध होतात,म्हणजे शब्दांचा त्याग करतात.थोडक्यात योगाने असो,प्रेमाने असो,द्वेषाने असो,शत्रूभावनेने असो कि अद्वितीय भावनेने असो,स्मरण—चिंतन करत--करत परमात्म्यास प्राप्त होतात.म्हणून आपणही समारं किंवा चिंतात करत परमात्म्यास प्राप्त व्हावे.||२३|| अर्थः---आता यतो वाचो निवर्तंते इत्यादिक श्रुति भगवंताचे तत्त्व दुर्ज्ञेय आहे असे सांगत होत असता त्या भक्तीचाच अंगीकार करून स्तुती करितात-हे भगवान्,या जगामध्ये पूर्वीच असणाऱ्या तुला अलीकडच्या उत्पत्तीनाशांनी युक्त असा पुरुष कोण बरे जाणत आहे?कोणीच नाही.म्हणजे पूर्वी झालेला पुरुष,नंतर झालेल्या पुरुषाचा वृत्तांत जाणत असतो,नंतर झालेला पुरुष पूर्वीच्या पुरुषाच्या वृत्तांत जंत नसतो.जसा,पिता,पुत्राच्या जन्मादिकांचा वृत्तांत जाणतो परंतु पुत्र पित्याच्या जन्मादिकांचा वृत्तांत जंत नाही.त्याप्रमाणे पूर्वसिद्ध असा तूं मात्र नंतर झालेल्या जीवांचा सर्व वृत्तांत जाणतोस;ते जीव तुझा वृत्तांत जाणत नाहीत.आता ईश्वर पूर्वसिध्द व जीव अर्वाचीन याविषयी प्रमाण सांगणाऱ्या श्रुति,जीवांना ज्ञान न होण्याचे कारण सांगतात-ज्या तुझ्यापासून ब्रम्हदेव उत्पन्न झाला आहे व त्यानंतर आध्यात्मिक व आधिदैविक असे दोन प्रकारचे देवगन उत्पन्न झाले आहेत.पुढे सर्व जीव त्यांच्या अलीकडेच आहेत.आणि-शयीत,जेव्हा तर तूं सर्व जगाचा उपसंहार करून शयन करितोस त्यावेळी तुझ्या मागाहून शयन करणाऱ्या जीवांना ज्ञानप्राप्तीचे साधनच नाही कारण त्यावेळी आकाशादिक स्थूल पदार्थ महात्वादिक सुक्ष्मपदार्थ स्थुलसुक्ष्मात्मक शरीर ,आणि त्याला निमित्त भूतकाळाचे वैष्याम्य हि मुलीचा नाहीत .तसेच त्यावेळी ,इंद्रिय प्राण व त्यांना बोध वेदापुरानादिक शास्त्रही नाही ,म्हणून त्यावेळीही जीवना तुझे ज्ञान होत नाही .याचा अभिप्राय असा कि –अलीकडच्या श्रुस्तीमध्ये उत्पन्न होऊन देहादिक उपाधीच्या योगाने तुझशी बहुत अंतर पडलेल्या व का;अवशेकारून मालीनसत्व झालेल्या जीवना ज्ञान संपादन करण्याचे सामर्थ्य नाही .आणि जेव्हा पलयकाली तुझ्या व यांच्यामध्ये फारसे अंतर नसते तेव्हाही ज्ञानाचे साधन नसल्यामुळे यांना तुझे ज्ञान घडत नाही ,MHAQNUN या जीवना ,तुला अनन्य शरण जाऊन तुझी भक्ती करावी ||२४|| भावार्थ:--- भगवान आपण अनादी—अनंत आहात.आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव व त्यानंतर आध्यात्मिक व आधिदैविक देवता उत्पन्न झाल्या.ज्यांना जन्म—मृत्यू आहेत,ते तर जीव त्यानंतरचे आहेत.यापैकी आपणास कोण जाणण्यास सामार्ह आहे ?अर्थात कोणीच नाही.ज्या वेळेस प्रलयकाळात हे सर्व विश्व आपल्यात समाविष्ट करून घेतात.असे आहे तर आपल्याला कोण जणू शकेल?अत्थातच कोणीच जणू शकत नाही.||२४|| अर्थः---आता सदेव सोम्येदमग्र आसीत |इदमग्र आआश्रीट६ इत्यादिक श्रुती ,उपदेश करणाऱ्या लोकांचेही मतभेद असल्यामुळे पुष्कळ श्रम आहेत तत्वज्ञान दुर्घट आहे असे सांगतात सृष्टीच्या पूर्वी नसलेल्याचा या जगाची उत्पत्ती झाली असे जे वैशेशादिक बोलतात ,अथवा जिवामध्ये पूर्वी नसलेल्या ब्रह्म तत्वाची योगसाधनाने उत्पत्ती होते असे जे पत्न्जालादिक बोलतात .पंच ज्ञानेद्रीय व मन हि ६ इंद्रिये ह्यांचे ६ विषय व ६ ज्ञान ,१ शरीर ,१ सुख व १ दुख अशा एकवीस प्रकारच्या दुखाचा नाश होणे हाच मोक्ष होय असे जे नैयायिक बोलतात तासाचा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात महाकाशातील घटकाशमठाकाशांसारखा भेद आहे असे जे संख्यादिक बोलतात आणि कर्माफळ सत्य आहे अशा जे मिमांषक बोलतात आणि ते निरनिराळ्या उपदेश करितात तत्वदृष्टीने उपदेश करीत नाहीत कारण ,हि सर्व्मारे आमच्या अव्दैत मताशी विरुध्द आहात .आता तो अतर्यामी आत्मा ,त्रीगुंमय आहे अशा कारणाने जो भेदाभेद मानाने तो ज्या आर्थी तुझ्या विषयांच्या अज्ञानाचे विलाषित आहे त्याअर्थी तो भेद अज्ञानाहून पलीकडच्या ज्ञानवान रुपी तुझेठीकानी मुलीचा नाही ||२५|| | सदीव मन स्त्रीवृत्त्वयि विभात्यसदा मनुजात् सदभिमृशन्त्यशेषमिदमात्म्यतयाssत्मविद: | | न हि विकृतिं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृतमनुप्रविष्टमिदमात्म तयावसित्म् ||२६|| अर्थ:-- अर्थ:---आता जर असत वस्तू उत्पन्न ओत नाही ,आणि पुरुष हे मित्र नाहीत असे होईल परंतु त्याच्या भेदाची प्रतीती तर अनुभवास येत्ये ती कशी ?असे कोणी म्हनजेल तर मअसतोधीमनोसुजतफ इत्यादिक श्रुती म्हणतात मनाच्या योगानेच वि९लस पावणारे हे त्रिगुणात्मक जग,अंतर्यामी पुरुषापर्यंत मित्त्याभूत असून अधिष्ठान रूप आत्म्याचा खरेपणा खरे असल्यासारखे भासते .आता आत्म्वेत्या पुरुषानाही हे ज्ञाग़ खरेच आहे असे भासते मग ते खोटे कसे म्हणावे ?असे कोणी म्हनाजल तर आत्म्वेता पुरुष तर भोक्तभोग्यात्मक ह्या सर्व जगाला आत्मात्वेकारुनाचा हे खरे आहे असे जनते आत्म्याहून भिन्न सत्तारूप जनात नाहीत याविषयी लोकाचार दाखवितात जसे सुवर्ण घेण्याची इच्छा करणारे लोक ,सुवर्णाचा विकार अव्स्लेल्या कुंडलादिक पदार्थाची त्याग.करीत नाहीत तर सुवर्णरुपेत्वाकारुनाचा त्यांचे ग्रहण करितात त्याप्रमाणे आत्म्याचे स्वत उपदान कारण होऊन केलेले व त्या पुरुषारूपी आत्म्याचे आत प्रवेश केलेले असे हे भोक्तभोग्यात्मक जग आत्मरुपाचा आहे असे आत्म्वेत्ता पुरुषांनी जाणिले आहे ||२६||
भावार्थ:--- परमात्म्याच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व हे त्रिगुणात्मक ब्रह्मांड झाले—भासले—नसून असल्यासारखे भासते.जसे दोरीवर साप नसून असल्यासारखा भासतो.यात दोरी सत्य व भासलेला साप असून नसल्यासारखा आहे.आत्मज्ञानी पुरुष सर्वत्र परमात्माच आहे,असी त्यांची धारणा आहे.जसे सोन्याचा दागिना सोने म्हणूनच स्वीकारला जातो.तसे आपल्यापासून—परमात्म्यापासून उत्पन्न झालले व आपण ज्यात प्रवेश केलेला आहे,असे हे जग आत्मज्ञानी निश्याने आत्मस्वरूप मानतात.म्हणून आपणही सत्संग करून,निष्काम कर्म करून.निष्काम उपासना करून ज्ञानाद्वारे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन,अनुभव घ्यावा.||२६|| अर्थः---आतां मसत्य ज्ञान नंतर ब्रम्ह इत्यादिक श्रुती भक्तीनेच ज्ञान सुलभ होत असे सांगतात हे प्रभो,तूं सर्व प्राणीमात्रांचे आश्रयस्थान आहेस असे जाणून जे पुरुष तुझे सेवन करितात,तेच पुरुष,मृत्यूचा तिरस्कार करून त्या मृत्यूचे मस्तक पायाने आक्रमण करितात,म्हणजे मृत्यूला जिंकून मोक्ष पावतात.त्यांच्या कृतार्थत्वविषयी संदेह नाहीतुझ्यावर ज्यांनी प्रेम धारण केले आहे असे ते पुरुष,आपणास पवित्र करितात व दुसऱ्यानांही भक्ती मार्गाला उपदेश करून पवित्र करून तारितात जे तुझ्याविषयी विमुख आहेत ते आपणासुद्धा पवित्र करीत नाहीत मग दुसऱ्यांस कोठून करितील.कारण,विद्वान अशाही त्या अभक्तांना तूं वेदरूप वाणीच्या योगाने,त्या त्या कर्मांच्या अधिकारत्वेक्रून,जसे दावणीचे वृषभादिक पशुंचे बंधन करितात त्याप्रमाणे बंधन करितो म्हणून तुझ्या भावार्थ:---हे चराचर परमात्म्याचे निवासस्थान आहे,असे समजून भक्त आपली सेवा करता.जिकडे—तिकडे आपणास समजून आपली भक्त सेवा करतात.त्यामुळे ते मृत्यूस जिंकून मुक्त होतात.भगवंत विद्वानांना केवळ शब्दज्ञान असल्यामुळे वेदवाणीरुपी दोरीने बांधून टाकतात,म्हणजे धर्मासात्रानुसार आचरण करण्याचे बंधन टाकतात.धर्मानुसार विषयांचे सेवन करतात,पण पूर्णतया त्यांच्याकडून विषयांचा त्याग होत नाही.त्यामुळे त्यांचे जन्म—मरण निवृत्त न होता बंधनात सापडतात. जे आत्मज्ञानी आहेत,त्यांनी संपूर्ण विषयांचा त्याग केलेला असल्यामुळे त्यांना परमात्म्याचा अनुभव येऊन जन्म—मरणातून निवृत्त होतात.म्हणून आपण पंडित होण्यापेक्षा निष्काम कर्म व निष्काम उपासना करून ज्ञानाद्वारे मुक्त होऊन जन्म—मरण निवारण करून सुखरूप व्हावे,हेच परमाहित आहे.||२७|| अर्थः---आता मअपनी पडो जवनो फैत्यादिक श्रुती भगवंताचे सुसैव्यात्व वर्णन करितात हे समर्थ ,तू स्वत दंद्रीयसाबंधारहित असून सर्व्प्रन्यांच्या इंद्रियशक्तीच्या प्रवर्तक व स्वत सिद्धज्ञानवान आहेस म्हणून जसे सेवक लोक आपल्या स्त्रियासह वर्तमान स्वामीची सेवा करितात त्याप्रमाणे इंद्रादी देव सेवा व पूज्य असे ब्राम्हदिकाही ,आपल्या अविध्येने व वेस्ठीत होत्यातेच तुला बाल;इ समर्पण करितात म्हणजे तुझी सेवा करितात आणि मनुष्यांनी दिलेला हव्याक्व्यादिरूप बळी आपण भक्षण करितात .यास दृष्टांत जसे मांडलिक ,आपल्या प्रजनी दिलेल्या कारभार ग्रहण करून सर्वभौम राजाला स्वत कारभार राजाला स्वत अर्पण करितात त्याप्रमाणे ब्र्हादिक देव बळी समर्पण करितात .ते कसे ?असे कोणी म्हन्जेल तर कालरूपी तुझ्यापासून भय पावत योजिलेले आहेत ते ,ते कर्म करितात म्हणजे तुझी आज्ञा पालन करणे हेच त्याचे बळी समर्पण होय ||२८|| भावार्थ:---परमात्म्यास इंद्रिये नाहीत,त्यामुळे त्याचा अनुभव घेण्याकरिता इंद्रियांची गरज नाही.त्याला जाणण्यासाठी इंद्रियांचा त्याग करावा लागतो,कारण तो आत्मा आहे व स्वयंप्रकाश आहे,त्याच्याशिवाय अन्य कोणी स्वयंप्रकाश नाही.त्याला इंद्रिये नसली तरी,इंद्रिये त्याच्याशिवाय जाणू शकत नाही.सर्व कार्य परमात्म्यामुलेच होतात.म्हणून मायावेष्टीत ब्रह्मदेव व सर्व देव आपली पूजा करतात.म्हणून आपण जीवांनी भगवंतांची पूजा करावयास पाहिजे.देवता जिवाकडून देलेले हव्या—कव्यादी भक्षण करता.देवता आपण नेमून देलेले कार्य भगवंतांच्या भीतीने करता.नेमून दिलेले कार्य करणे,म्हणजेच भगवंतांची पूजा करणे होय. जीव देवतेची पूजा करतात,ही पूजा करणे हाच त्यांना मिळालेला मोबदला असतो.म्हणून जीवांनीही धर्मानुसार कार्य—विधी करून आचरण करावे.||२८|| अर्थः---याप्रमाणे इंद्रियप्रवर्तक ईश्वराचे,इंद्रियपरतंत्र असलेले मनुष्य सेवन करितात असे सांगितले.आता दुसर्या मायथाग्रे:क्षुद्रा विस्फू लिंगा इत्यादिक श्रुति,इतक्याच श्रुति,इतक्याच कारणाने,प्राणी ईश्वराचे,सेवन करितात असे नाही,तर त्याच्या पासून आपण उत्पन्न झालेले असल्यामुळे त्याचे सेवन करितात असे सांगतात-(हे विमुक्त तत:परस्य तव यदि अजया उदिक्षया विहर:मभवती)हे नित्यमुक्ता ईश्वरा,पायेपेक्षा प्र असून मायेचा प्रेरक अशा तुझी जेव्हा मायेबरोबर केवळ अवलोकनमात्रेकरून क्रीडा होत्ये-(मतदा म उतथनिमित्तयुज; स्थिरचरजातय:स्युः)तेव्हा तुझ्या अवलोकननेकरूनच ज्यांची कर्मे व कर्मयुक्त लिंगशरीरे प्रगत झाली आहेत स्थावरजंगमजातीचे जीव उत्पन्न होतात.त्यांबद्दल तुझ्याठीकाणी वैषम्य मुळीच नाही.कारण,(परमस्य वियत:एव शून्यतुलां दधत:अपद्स्य मतव कश्चित नही भवेत् )परम मुळीच नाही.म्हणून त्या जीवांना तुझे सम सेवन क्राहेच योग्य आहे||२९|| भावार्थ:--- जेव्हा भगवंत मायाबरोबर क्रीडा करतात,तेव्हा ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार केवळ संकल्पानुसार कार्य करतात.मायापासून उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म शरीरांनी यूक होऊन निरनिराळ्या चराचरांना जन्म देतात.आपण निर्माण केलेल्या सृष्टीत जरी विषमता दिसत असली तरी ती विषमता आपल्यामुळे नसून ज्याच्या—त्याच्या—जीवांच्या कर्मानुसार असते.जसे आकाश हे लहान किंवा मोठे नसून ते लहानपणा किंवा मोठेपणा हा उपाधीमुळे असतो,तर आकाशामुळे नसतो. आपण--परमात्मा हा सम आहे.विशषमपणा हा नाम—रुपात आहेव ज्याच्या—त्याच्या—जीवांच्या कर्मांमुळे आहे.परमात्म्यास स्वकीय—परकीय असा भेद नाही.आपण कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही,कारण आपणास इंद्रिये नाहीत.म्हणून आपणही इंद्रीयेरहित होण्याचा प्रयत्न करावा.आपण परमात्म्यासाराखेच व्हावेत.||२९|| अर्थः--- याप्रमाणे परमात्म्यापासूनअविद्योपाधिक जीव होत:तव ते त्यांचे सेवन करितात असे सांगितले,आतां जर ते जीव फार सूक्ष्म आहेत असे मानिले तर देह व्यापक चैतन्य घडणार नाही;देहाएवढया परिमानाचे आहेत असे मानिले तर त्यांना सवयवत्त्वेकरून अनित्यत्व प्राप्त होईल तसे झाले असतां परलोकसाधनाचे व्यर्थत्व होईल म्हणून ते वस्तुतःच सर्वगत व नित्य आहेत असे कित्येक मानितात त्यांच्याही मताचे दुषण करणाऱ्या कित्येक श्रुती म्हणतात कि,-(हे ध्रुव,जीवा: यादी अपरिमिता: ध्रुवा: सर्वगता: च स्युः )हे नित्यस्वरूपा प्रभो,जीव जर वस्तुतः असंख्यात,नित्यरूप व सर्व व्यापक आहेत(तार्हे मातेषमशास्यता न इति मभावताफ नियम न सपाट तर त्यांना तुझा सारखेपणा असल्यामुळे शिक्षनियत्व नाही म्हणून तुझ्याकाफुनही त्याचे नियमन घडणार नाहि .त्यांना अनित्याय वगैरे असेल तर तूझ्याकडून नियमन घडेल ते कसे? असे म्हणशील तर-ज्या बिंबापासून ब्रह्मापासून उपादिशेकरून विकाररुपी जीवनामक प्रतिबिंब उत्पन्न झाले,ते बिंबरूप ब्रम्ह,आपल्या प्रतिबिंबरुपी जीवविकाराचे,कारणत्वाने त्याचा त्याग न करीता नियमन करणारे होईल.ते कोणते ? तर –(समम )सर्वठीकानी अनस्युत असलेले.आतां जे ते अशा मोघम शब्दांनी कां सांगतो?समजले असेल तर हे ते असे स्पष्ट सांगा,असे जर कोणी म्हणेल तर-जाणण्यात आलेल्या वस्तूला दोष असल्यामुळे,आम्ही ते जाणतो असे म्हननारांना जे बहुत करून समजलेच नाही ते यत्तच्छशब्दांनी प्रकाशित न होणारे अतर्क्य व सर्व पदार्थात व्यापून असणारे वस्तूच जीवांचे नियामा होईल||३०|| भावार्थ:---आपण भगवंत एकरस आहात,म्हणून सुखरूप आहात.जीवांनी एकरस होण्याचा प्रयत्न केल्यावर जीव सुखरूप होतो.जीव हा परमात्म्याचे कारण आहे,तर जीव कार्य आहे.कार्यापेक्षा कारण श्रेष्ठ असते.परमात्मा श्रेष्ठ असल्यामुळे नियंत्रणकर्ता आहे व जीव कनिष्ठ असल्यामुळे नियंत्रित आहे,म्हणून नियंत्रक जो आहे,त्याच्या अज्ञानुसार जो नियंत्रित आहे आचरण—वागावे लागते.म्हणून जीवांना जीवदशा नियंत्रणमुक्त होण्यासाठी परमात्मरूप व्हावे.जे लोक परमात्म्यास जाणले म्हणतात,त्या जीवांनी परमात्म्यास जाणलेले नसते.जे जाणले असे म्हणतात,त्यांची मते भिन्न—भिन्न असतात,परमात्मा तर एकरस आहे.||३०|| | न घटत उद्भव:प्रकृतिपुरुषयो रजयो- रुभययुजा भवन्त्यसुभृतो जलबुद्बु दवत् | | त्वयि ट इमे ततो विविधनामगुणै: परमे सरित इवार्णवे मधुनि लिल्युरशेषरसा ||३१|| अर्थः---आता बिंबरुपी परमात्म्यापासून जीव होतात म्हणून परमात्मा हा जीवांना नियंता आणि जीव हे नियम्य आहेत असे जर म्हणावे तर,जीवांना अनित्यपणाचा प्रसंगाने प्रतीदिवशी केलेल्या कर्मादिकांचा नाश आणि न केलेल्यांची प्राप्ती होण्याचा प्रसंग येईल आणि मोक्ष म्हणजे जीवाच्या स्वरूपाचा नाशच असे होईल.सिद्धांती तर,स्वप्रकाश व आनंदमय अशा जीवात्म्याच्या अविद्येने केलेल्या अनर्थांच्या निवृत्तीलाच मोक्ष असे म्हटले आहे तेव्हा हा विरोध आहे अशी शंका कोणी घेईल तर,अंतकरणादिक उपाधीच्या जन्मप्रनेच जीवांचे जन्म घडते वस्तुत घडत नाही असे सांगण्याकरिता शंका करितो कि,जीव रूपाने उत्पती प्रकृतीची घडत्ये किंवा पुरुषाची घडत्ये?अथवा दोघांचीही घडत्ये?प्रकृतीची घडत्ये असे म्हणावे तर जीवांना जडत्व होईल:पुरुषाची घडत्ये असे म्हणावे तर पुरुषाला विकारीतप्रसंग येईल म्हणूनच दोघांचीही घडत नाही असे सांगतो-(उभययुज असुभृतजल वूहृदवत भवंति )प्रकृती व पुरुष या दोघांचा एकमेकांवर अध्यास झाला म्हणजे त्यापासून प्राणादिक उपाधींनी युक्त असे जीव,जसे केवळ वार्याने व केवळ पाण्याने बुडबुडे होत नाहीत,तर ती दोन्ही एकत्र मिळाली म्हणजे होतात त्याप्रमाणे उत्पन्न होतात.बुडबुडे होण्याविषयी जसा वारा हे निमित्त कारण असून पाणी हे उपादानकारण आहे त्या प्रमाणे जीवांच्या उत्पत्तीविषयी प्रकृती हे निमित्त कारण असून पुरुष हे उपादानकारण आहे.एतावता प्रकृतीपुरुषाच्या ऐक्याने जीवांची उत्पत्ती होत असून एकमेवा द्वितीयं इत्यादिक श्रुतीच्या बलाने व उत्पत्तीच्या श्रवणाने जीवाचे जन्म हे औपाधिक आहे,वास्तविक नाही,असे सिद्ध होते.आता जीवांच्या ल्याचा प्रकार सांगतात-(ततः ते इमे विविध नाम पुणैः प्रमे त्वयि)जन्म वास्तविक नाही म्हणून ते हे जीव,आपल्या अनेकप्रकारच्या कार्योपाधीसह वर्तमान निरुपाधिक अशा तुझ्यामध्ये सुशुप्तीच्या व प्रळयाच्या वेळी (मधुनी अशेषरसाएव ) जसे मधामध्ये सर्वही फुलांचे रस,विशेषेकरून निरनिराळे ओळखता येत नाहीत तथापि सामान्यने ओळखता येतात त्याप्रमाणे सुषुप्तीच्या व प्रळयाच्या वेळी तुझ्यामध्ये ली पावलेले जीव,विशेषरूपाने समजण्यांत आले नाही तरी त्यांचे लिंगशरीर राहिल्यामुळे समजले जातात आणि मुक्ताच्या वेळी तर (सरीत:अर्णवे एव लिल्युनशा नद्या,समुद्रामध्ये आपल्या नामरूपांचा त्याग करून ऐक्यभावाने ली पावतात सर्व जीव निरुपाधिक अशा तुझ्याठिकाणी आपला जीवभात्त्व सोडून ऐक्यरूपाने ली पावतात||३१|| भावार्थ:---प्रकृती व पुरुष हे दोन्हीही जन्मरहित आहेत.प्रकृती जड आहे,म्हणून प्रकृतीस जन्म नाही व पुरुष हा निर्विकार आहे,म्हणून त्यास जन्म नाही.जीव हा चीत्—जड आहे,म्हणून त्याच्या शरीरास जन्म आहे.जसे वारा हा निमित्तकारण असून पाणी हे उपादानकारण असल्यामुळे त्यांच्यापासून बुडबुडे तयार होतात, त्याचप्रमाणे वारा म्हणजे प्रकृत्ती ही निमित्तकारण असून,पाणी म्हणजे परमात्मा हा उपादानकारण आहे.प्रकृत्ती व पुरुष हे दोन्ही मिळून जगाचे अभिन्न--- निमित्तोपादान कारण आहे.प्रकृति व परमात्मा यांच्यापासून जीव तयार होतो.त्यामुळे जीव हे परमकारण—उपादानकारण परमात्मा यांच्यामध्येच विलीन होतात. जसे सर्व नद्या ह्या समुद्रात विलीन होतात,त्याचप्रमाणे सर्व जीव परमात्म्यात विलीन होतात.म्हणून आपण परमात्मरूप होण्याचा प्रयत्न करावा.||३१|| अर्थः—याप्रमाणे परमेश्वरापासून जीव होतात आणि ते त्याच्या स्वाधीन पणाने कर्मे करितात व पुन्हा त्याच्या मध्येच लय पावतात असे संसारचक्रामध्ये परिश्रमन सांगितले.आता त्या संसाराच्या निवृत्ती करिता मपरीत्य भूतानिक इत्यादिक श्रुती भगवद्भाव सांगतात ह्या संसारी जीवांना तुझ्या गायेचे वारंवार जन्ममरण रूप भ्रम प्राप्त होतो असे जाणून,(सुधीय; अभ्वे त्वयि भृश भावं दधाति)विवेकी पुरुष,संसारनिवर्तक अशा तुझे ठिकाणी श्रवणकीर्तनादिकेकरून अत्यंत भक्ती करितात.बरे मग काय ?तर-( अनुवर्तत भवभय कथन म्भ्वेतफ ) तुला शरण जाऊन तुम्ही भक्ती करणाऱ्या लोकांना संसारभय कसे प्राप्त होईल?होणारच नाही.(यततव भृकुटी:त्रीनेमी अभवछरनेषु भयं सृजति )कार न,तुझा भृकुटीचालनरूप –उन्हाळा,पावसाळा व हिवाळा असे तीन भाग संवत्सरातमक काल,ज्यांचे तूं रक्षण करीत नाहीस त्यांनाच जन्ममारणादीरूप भय उत्पन्न करितो.म्हणूनच विचारी पुरुष,तुम्ही भक्ती करितात||३२|| भावार्थ:--- मायामुळे जीव संसारचक्रात—जन्म—मृत्युच्या चक्रात सापडलेला आहे.जसे वारा आहे म्हणून पाण्यात बुडबुडे आहेत.बुडबुडे हे भासमान असून उपयुक्त नाहीत,तर पाणी उपयुक्त आहे.त्याचप्रमाणे प्रकृत्ती ही वाऱ्यासारखी आहे व पाणी हे परमात्म्यासारखे आहे.म्हणून प्रकृत्ती ही भासमान आहे,म्हणून भासमान जी माया आहे,तिचा वेवेकाद्वारा त्याग करून परमात्मा जो सत्य आहे,त्याचा स्वीकार करावा.परमात्म्याचा स्वीकार केल्यामुळे संसारभय नाही.म्हणून आपण कालरूपी जो परमात्मा आहे,त्यास शरण जावे,कारण जो जीव कळस—परमात्म्यास शरण जाईल,त्यास काळाचे भय राहणार नाही.आपण परमात्म्यास शरण जावे.||३२|| अर्थः---ती भक्ती,मनाचा निग्रह केला असता होत्ये,व तो मनोनिग्रह गुरूच्या आश्रयाने घडतो म्हणून मतद्विज्ञानार्थ स गुरुमैवफ इत्यादिक श्रुती गुरूचा आश्रय करावा असे सांगतात – ( हे अज,विजितऋषीकवायुभी:अतिलोल अदांत मनस्तुरंग यतंतू ये यतंती )हे जन्मरहिता देवा,ज्यांनी आपल्या इंद्रियांचा व प्राणाचा जय केला आहे त्या योग्यंनीही वश करून घेण्यास अशक्य अशा आपल्या अति चांचल मनोरूपी घोड्यास वश करून घेण्याकरीता जे यत्न करितात (ते गुरोः चरण समवहाय उपायखिद: व्यसनशतान्विता: मस्त: ते गुरूच्या चरणांचा आश्रय न करिता दुसऱ्या उपायांमध्ये क्लेश भोगीत असते,शेंकडो विघ्नांनी पराभूत होऊन,(अकृत कर्णधरा: जलधौ एव इह संति)जसे नांवाद्याचा आश्रय न करणारे लोक,समुद्रामध्ये दुःख पावतात त्याप्रमाणे या जन्ममरणरूप संसारामध्ये दुःख पावत आहेत||३३|| भावार्थ:---ज्यांनी इंद्रिये व प्राण यांचा निग्रह केलेला आहे,म्हणजे जीवाच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न करत आहेत—ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत,पण मात्र सदगुरुंच्या चरणांना शरण गेलेले नाहीत,त्यांचा तो उतावळेपणा व अत्यंत चंचलपणा मनरूप घोड्यास ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला तरी ते ताब्यात येणार नाहीत.म्हणजे ते त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील.त्यांच्या हातात केवक कष्टच पडतील.म्हणून आपण सदगुरूचरणांना शरण जाऊन,त्यानंतर मन आणि इंद्रिये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा.सदगुरूंना शरण गेल्यास त्यांची कृपा होऊन मन आणि इंद्रिये ताब्यात येतात.जसे आपल्या घरात विजेचा प्रकाश येण्यासाठी विद्धुत तारेची जोडणी केलेली आहे,विजेचा दिवाही बसवलेला आहे,पण त्या विद्धुत तारेत वीजपुरवठा नसेल तर विद्धुत दिव्यात प्रकाश येणार नाही.त्यापार्माने आपण सदगुरूंना शरण न गेलोत तर आपले मन व इंद्रिये ताब्यात येणार नाहीत.मन व इंद्रिये ताब्यात न आले तर परमात्म्याचा प्रकाश पडणार नाही.||३३|| | विजितह्रषीकवायुभिरदान्तमनस्तुरंग य इह यतन्ति यन्तु मातिलोलमुपायखिद: | | व्यसनशतान्विता: समवहाय गुरोश्र्चरणं वानिज इवाज सन्त्यकृतकारणधराजलधौ||३३|| अर्थः---आतां –मपरिक्ष्य लोकान कमचितान इत्यादिक दुसऱ्या कितीएव श्रुती,वैराग्य सांगतात कि,-(श्रयत:सर्वरसे त्वसी आत्मनि सति )तुझी सेवा करणाऱ्या पुरुषत्तला सर्वसुखाने स्थान अशा परमानंदरुपी तुज आत्म्याचा लाभ झाला असता,(स्व जनसुतात्मदारधनधामधरासुर्थ किम )स्वजन,पुत्र,देह,स्त्री,धन,गृह,भूमी,प्राण व रथ इत्यादिक अतितुच्छ सुख साधनांनी कोणता उपयोग होणार आहे ? कोणताच नाही.(इति सत् अजाणता मिथुनत:रतये चरता नृणां ) असे परमार्थसुख न जाणणाऱ्या व स्त्रीबरोबर सांगत होऊन रतीसुखाकरीता घरामध्ये राहणाऱ्या पुरुषांना,-(स्वविहते स्वनिरस्तभगे इह को नु सुखयति ) स्वतःच नश्वर व स्वतःच गतयसा अशा या संसारामध्ये कोणता बरे स्वजनादिक अर्थ सुख देणार आहे?कोणताच नाही||३४|| भावार्थ:--- भगवंत हे रसस्वरूप आहेत.परमात्मा हा जीवाचा आश्रयदाता आहे,असे असूनही जीव हा आप्तेष्ट,पुत्र,शरीर,पत्नी,धन,घर,जमीन—जुमला,प्राण किंवा रथ यांना इत्यादींना आपला आश्रयदाता मानते.त्यामुळे भगवंत त्यांचा आश्रयदाता होत नाही.ज्ञानी जीव आश्रयदाते भगवंतांस मानतात,म्हणून त्यांचे भगवंत आश्रयदाते होतात.म्हणून आपणही अज्ञान घालवून व ज्ञान प्राप्त करून,भगवंत हेच आपले आश्रयदाते आहेत असा निश्चय करून,परमहित करावे.||३४|| अर्थः---याप्रमाणे गुरुपदेशाने आत्मतत्त्व जाणून सारासार विवेकाने विरक्त झालेल्या पुरुषाला सत्संगतीने तत्त्वसाक्षात्कार होतो याविषयी म श्रोतव्यो मंतव्य:म इत्यादिक श्रुती सदाचार सांगतात –(म य म विमद:भवत्पदा-बूजह्र्द:अघभीदंघीजला:ते उत पुरूपुण्यतीर्थसद्नानी मउपासतेफ ) जे निरंकारी,तुझ्या तुझ्या चरणकमलाचे हृदयामध्ये ध्यान करणारे व आपल्या चरनादकाने लोकांच्या पापाचा नाश करणारे ऋषी आहेत तेसुद्धा सत्यमागम होण्याकरिता भूमीवर असलेल्या बहुत पुण्याकार्क तीर्थाचे भगवंताच्या मंदिराचे भाग्वात्क्षेत्राचे श्रीतात तेथे बहुत करून सत्यामाग्म घडतो ते ऋषी ,पुन्हा पुरुषाच्या विवेक ,स्थैर्य ,धैर्य ,क्षमा दया शांती इत्यादिकांचा नाश करणाऱ्या घरांचे सेवन करीत नाही हे प्रभो,नित्यासुखारूपी तुझ आत्म्याचे ठिकाणी एकावर तरी आपले मन धरण करितात तेसुद्धा विवेकादिकांचा नाश करणाऱ्या घराचे सेवन करीत नाहीत .मग पूर्वी सांगितलेले महासमर्थ ऋषी घराचे सेवन करीत नाहीत हे काय सांगावे ?||३५|| भावार्थ:---भगवंतांच्या चरणकमळांचा म्हणजे ज्ञान मार्गाचा जे संत—महात्मा आश्रय घेतात,त्या संत—महात्म्यांच्या चरण—तीर्थाचे आपण सेवन केले तर आपले पाप नष्ट होते.म्हणून आपण संत—महात्मा यांच्या चरण तीर्थांचा व ज्ञान उपदेशरूपी सेवन करावे.यामुळे आपण अंहकाररहित होऊन मोक्ष मिळण्यास पत्र हौउत.मनुष्यांनी नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आत्म्याच्या ठिकाणी एकवेळ जरी बुद्धी अर्पण केली तरी आपल्या घर—दाराकडे व देहसंबंधीकडे जाण्याची वसना होत नाही.जसे पाचीपकवन्नाचे सेवन केल्यानंतर शिळ्या—कूजित—दुषित अन्नाकडे वासना जाणार नाही.त्याचप्रमाणे परमात्म्याचा अनुभव आल्यावर विषय जे क्षणभंगुर,दु:खदायक आहेत,देहसंबंधी दु:खरूप आहेतत्यांच्याकडे जाण्याची प्रवृत्ती होणार नाही.म्हनुन प्ररमात्म्याचा अनुभव घेतलाच पाहिजे.||३५|| | सत इदमुत्थितं सदिति चेन्ननु तर्कहतं व्यभिचरति क्व च क्व च मृषा न तथोभययुक् | | व्यवह्रतये विकल्प इषितोs न्ध परम्परया भ्रमयति भारती ट उरूवृत्ति भिरूक्थजडान् ||३६|| अर्थः---आता कितीएक श्रुती ,प्रश्नोत्तराच्या योगाने मनन पूर्वक तत्व निश्चयाचा सांगतात त्यात प्रथम प्रश्न म हा मी व हे माझे इत्यादिप्रकारे प्रतीतीला येणारे हे सर्व र्व्दैत ,सत्यरूपी आहेत कारण ब्रम्हरूप सात्यावास्तुपासून उत्पन्न झाले आहे म्हणून जे वस्तू ज्यापासून उत्पन्न होते ते तादृपिचा असते ,असे सर्वच्या पाण्यात आहे जसे सुवर्नापासून झालेल्या कुडम लाडिक वस्तू सुवरंचा असते त्याप्रमाणे असा जर मामिमासाम्काचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर हे तुमचे अनुमान विचार केला असता बाधित होते.कसे म्हनाल्तर,-तुम्ही व्देताचा सत्यावास्तुशी अभेद करू इच्छिता ,परंतु तो सिध्द कोस्र्ण्याकरिता जे तुम्ही कारण सांगितले त्यावरूनच तो सिध्द न होता उलट व्दैताचा भेद शिध्ह हो.तो असकी सात्यावास्तुपासून उतपन्न झाले बिताकेचा सांगण्याचे त्याचा सत्यावास्तुहून निराळेपणा समजून येतो आणि सत्याहून निराळे ते असत्य असे सिद्ध होते ,तेव्ह्तुमाचे ओलाने बरोबर नाही ,पुन्हा प्रश्न –आम्ही अधेड करू इच्छित नाहीत तर भेदाचा निषेद करू इच्छितो .तो असा कि व्दित स्त्याहून निराळे ते असत्या असे सिध्द होते तेव्हा पासून झाझे जे ज्यापासून होते ते त्यापासून निराळे नासरे जसे सुवर्नापासून झालेले कुंतल सुवर्नाहून निराळे नसते तसे याप्रमाने भेदाचा निषेध केल्याने भेदाच सिध्द होतोना ?याचे उत्तर जे ज्यापासून उत्पन्न होते ते पाहून भिन्न नाही हे तुमचे म्हणणे सदोदित जुळत नाही .पहा पित्यापासून झालेला पुत्र व मुद्रारा पासून झालेला घात्प्रध्वंस हे त्याहून निराळे नसतात काय ?असतातच पुन्हा प्रश्न –जी वस्तू ज्या उपदानापासून उतपन्न होत्ये ती वस्तुत्या उपदानापासून कधीच निराळी राहत नाही पिता आणि मुद्रार हे पुत्र आणि घात्प्रध्वंस याचे उपदान्कर्ण नाही ,तर निमित्त कारण आहेत म्हणून आमच्या सांगण्यात काहीच बाध होत नाही याचे दुषण रूप एखादेठीकानी कार्य खोटेच असते खोटेच असते म्ह नाजे जी वस्तू ज्या उत्पादनापासून होत्ये ती वस्तू त्या उत्पादनाहून भिन्न नसत्ये हे तुमचे अनुमान कायम राहणारे नव्हे.कारण,रज्जूरूप उपादानापासून झालेला सर्प रज्जुहून भिन्न असून,रज्जू सत्य असता तो मिथ्या असतो.तो खरा म्हणावा तर कुंद्लाचा जसा बाध होत नाही त्याप्रमाणे सर्पाचाही बाध होऊ नये तो होतो कि नाही ?होतोच.यावर पुन्हा प्रश्न-रज्जूवर भासलेल्या सर्पाला केवळ रज्जूच उपादान कारण नाही,तर त्याच्या बरोबर दुसरे अज्ञानही कारण आहे;म्हणून अज्ञानसहित रज्जूपासून झालेल्या सर्पाला मिथ्यात्व घडते,परंतु केवळ सत्य आहे.याचे दुषणरूप उत्तर-(उभयुक न कथा)द्वैतप्रपंचही,सत्यरूप ब्रम्ह आणि त्याच्या बरोबर असलेली अविद्या ह्या दोन उपादानापासून झालेला असल्यामुळे रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे व मिथ्या ठरतो;सत्य ठरत नाही.पुन्हा प्रश्न-या सांगितलेल्या कारणाने प्रयवांचे सत्यत्व न घडो परंतु दुसर्या कारणाने आम्ही प्रपचांचे सत्यत्व सिद्ध करितो.ते असे कि-हे द्वैत आहे.कारण याच्यापासून मघागरीने पाणी आणणे इत्यादीकफ कार्य भाग होतात.जे सत्य नाही त्यापासून कार्यभाग होत नाहीत,जसे शिन्पिव्र भासलेले रूपे सत्य नाही.कारण,त्यापासून कार्य भाग होत नाहीत.याचे उत्तर-(व्यवह्रतये विकल्प:इषत:)खोटया रुप्यानेही केव्हा दागिने वगैरे व्यवहार चाललेला पाहण्यांत येतो,खरेच पदार्थ सदोदित व्यवहारास पाहिजेत असे नाही,म्हणून प्रापंचिक व्यवहार चालण्याकरिता द्वैतरुपी भ्रम घ्यावा हे आम्हांस इष्ट आहे.पुन्हा प्रश्न-जी वस्तू एकेजागी खरी असत्ये तिचा दुसरे जागी दुसरे जागी आरोप होणे याला भ्रम असे म्हणतात,जसा सर्प एके जागी खरा असून त्याचा रज्जूवर आरोप होतो तो भ्रम होये;तसा ब्रम्हाचे ठिकाणी द्वैताचा भ्रम होण्यास दुसरे ठिकाणी द्वैत सत्य असलेच पाहिजे.आकाशपुष्प अगदीच खोटे आहे म्हणून त्याचा दुसरे ठिकाणी आरोप होत नाही,असे द्वैत अगदीच खोटे असते तर त्याचा ब्रम्हाचे ठिकाणी आरोप झाला नसता आणि तो तर झाला तेव्हा द्वैत सत्य अये ठरून तुमचे अद्वैतच सत्य असे सिद्ध होत नाही.यांचे खंडनरूप उत्तर-(अंधपरंपरया )अंधपरंरान्यायाने जो श्रम (आरोप )तो व्यवहार चालण्याकरीता आम्हांस इष्ट आहे,म्हणजे या वडाच्या झाडावर मी पिशाच पाहिले आहे,असे एका आंधळ्याने दुसऱ्या आन्ध्ल्यास सांगितले,त्याने तिसर्यास,त्याने च्व्ठ्यास अशा परंपरेने पिशाचाच्या ज्ञानासारखा हो निर्विवाद परिपाठ चालू असतो त्या परीपाठास अंधपरंपरान्याय असे म्हणतत.कोणताही भ्रम म्हटला म्हणजे तो पूर्व संस्काराने उत्पन्न झालेला असतो.तो श्रम,आपणांत संस्कार आहे असे सिद्ध करण्याकरिता श्रम होण्याची वस्तू (सर्पादिक)पूर्वी होती इतक्या प्रसिद्धीचा मात्र अपेक्षा बालगीते,वस्तूच्या खरेपणाची अपेक्षा बालगीत नाही,वस्तू खरी नसली तरी तिची एकदां प्रसिद्धी झाली म्हणजे तो भ्रम उत्तरोत्तर चालतोच.इंद्रियांना अगोचर असेंही ब्रम्ह,स्वप्रकाशपणाने स्फुरण पावत असल्यामुळे ,तेथे मजसा इंद्रियांना अगोचर व साक्षिमास्य आकाशांमध्ये काळेपणाचा व पालथ्या कढईच्या आक्राचा भास होतो त्याप्रमाणेच द्वैतकैफ आरोप भासणे हे योग्यच आहे;एतावताब्रम्हाचेठिकाणी अनादीकाळापासून खोटया द्वैताची जी प्रतीती चालत आली आहे तीत प्रथम प्रथम भासलेल्या द्वैतावर उत्तरोत्तर भास होण्याचा संभव आहे.द्वैताची प्रतीती होत्ये ती वस्तुतः ख्रीनासून तिच्या खरेपणाला कान,ब्राम्हची सत्तामात्र खरी आहे त्यावरून अद्वैतच सत्य असे सिद्ध होते.प्रपंचव्यवहार चालतो तो अंधपरंपरान्यायाने खोटाच चालत असल्यामुळे त्याच्या सत्येतेविषयी जो अर्थक्रियाकरीपणाचा हे तू तुझी सांगितला तो निष्फळ आहे यावर प्रश्न-अक्षय्य हवै चातुर्मास्ययाजीन सुकृत भवतीफ इत्यादिक श्रुतींनी चातुर्मास्य यज्ञ करणारास अक्षय फल प्राप्त होते असे कमल नित्य सांगितले आहे ते मिथ्या कसे होईल त्यापेक्षा वेदाने प्रतिपादन केलेले द्वैत सत्य आहे.याचे खंडन रूप उत्तर-(हे भगवन् ते भारती उरूवृत्तीभी:उक्तःजडान भ्रमयति )हे भगवंता,तुझी वेदलक्षणवाणी,गौणी व लक्षणा इत्यादिक वृत्तींच्या योगाने कमश्रद्धेच्या भाराचा दाब बसल्यामुळे मंदबुद्धी असे न म्हणावे तर-मतद्द्थेह कमचीतो लोक:क्षीयतेफ इत्यादिक दुसर्या श्रुतींशी विरोध येतो.म्हणून वेद सकाम पुरुषांकडून अंतःकरणशुद्धर्थ कर्मे करविण्याकरिता कमळाची स्तुती करून,त्यांना कर्माची आवड उत्पन्न करितो||३६|| भावार्थ:--- कारण व कार्य एकरूप असतात,असा नियम आहे.जसे जेथे दागिना असतो तेथे सोने हे असतेच,तसे जेथे जग असते,तेथे परमात्मा असतो.या नियमानुसार विश्व हे सत्तत्वापासून उत्पन्न झालेले आहे,जगाचे कारण सत्तत्व आहे,पण जग मात्र असत्—मिथ्या आहे.जसे पिता व पुत्र यांच्यात कार्य—कारण भाव आहे.पिता हा कारण आहे व पुत्र हा कार्य आहे.यात कारण व कार्य असले तरी,त्यांच्यात एकरूपता नाही.तसे परमात्मा कारण व कार्य जग असले तरी त्यांच्यात एकरूपता नाही,कारण सत् आहे व कार्य असत् आहे.कांही ठिकाणी कार्य तर काल्पनिक असते.जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले,तरी त्या ठीकानाचे कार्य साप हा काल्पनिक असतो.या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे “अज्ञान” हेही कारण आहे.त्याचप्रमाणे सत्तत्वाच्या ठिकाणी “अज्ञानाने” भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे.व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले,तरी त्यामुळे कांही बिघडत नाही.[त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारीमार्थिकतेला बाध येत नाही.कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि ही अंधपरंपरा अनादी काळापासून चालू आहे.]अशा स्थितीत कर्मफळ नित्य मानणारी वेदवाणी कर्मांवर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमती करते.वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानीत नाहीत,तर ते अज्ञानाला पात्र नसणाऱ्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्मांची लक्षणावृत्तीने प्रशंसा करते.जसे अज्ञानी—पामर जे लोक आहेत,त्यांना धर्मानुसार आचरण करावे,म्हणून कार्मफलांची आसक्ती सांगितलेली आहे.जासे बालवाडीत बालकाने शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी यावे हा शिक्षक यांचा उध्येश असतो,म्हणून त्या बालकांना गोड पदार्थ—चाकलेट किंवा बिस्कीट दिल्या जाते.म्हणजेच कर्मफळ हे चाकालेटसारखे आहे व शालीय शिक्षणासारखे धर्मानुसार आचरण करावे, म्हणून चाकलेटकडे म्हणजे धर्मफळाकडे अधिक लक्ष न देता धर्मानुसार आचरण करून मिळणाऱ्या सुखाकडे—सुखरुपतेकडे—मोक्षाकडे लक्ष ध्यावे.||३६|| अर्थ:---या प्रम्माने प्रपंचाच्या सत्यत्वाविषयी नाही असे सांगितले.आता त्याच्या असत्यत्वाविषयी यतो वा इमानि भूतानी जयांतेफ इत्यादिक सृष्टीप्रलयश्रुती प्रमाण आहेतव अनुमानही असे सांगतात-(यतइद अग्रे न आस निधनात अनु न भविष्यत )ज्याअर्थी हे जग सृष्टीच्या पूर्वी नव्हते आणि प्रख्यानंतरही राहणार नाही.(अत: अंतरा एकरसे त्वयिमृषा विभाति मएतीफ मितम)त्याअर्थी मध्यावरथेमध्येही केवळ एकरसरूप तुझ्या स्वरूपी मिथ्या रुपत्वेकरून भासते असे निश्चित आहे.(आत:द्रविणजातीविकल्पथै: उपमियते )म्हणून मृत्तिका,सुवर्ण,लोह इत्यादिक पदार्थांचा घट,कुंडल व कुदळ इत्यादिक भेदांच्या प्रकारांनी सारखेपणाने याचे निरुपण करितात.म्हणजे जशीघट,कुंडल व कुदळ इत्या दीक कार्य रुपी पदार्थाची ती ती नावे मात्र उच्चारनांत येतात परंतु मृत्तिका सुवर्ण इत्यादीकच खरी आहेत त्याप्रमाणे आकाशादिक कार्ये हि नावे मात्र असून ब्रम्हरूपच सत्य आहे.एतावता या प्रपंचाच्या खरेपणाविषयी प्रमाण नसून खोटेपणाविषयी पुष्कळ प्रमाणे असल्यामुळे (विततमनोविलास ऋत इति अवयन्ति अबुधाव्यर्थ आणि मनोवलीसमात्र अशा या या प्रपंचाला जे कोणी पुरुष,खरा आहे असे मानतात ते अज्ञानी होत.याविषयी असे अनुमान करावे कि,हे द्वैत सत्य नाही,कारण,हे आदी व अंती राहत नाही,विकारी आहे आणि दृश्य आहे म्हणून,जे आदी व अंती असत्ये,विकारी व दृश्य नसत्ये ती सत्य आहे.जसा आत्मा द्वैताच्या आदी व अंती असतो,विकारी व दृश्य नाही म्हणून सत्य आहे||३७|| भावार्थ:--- जसे हे भासणारे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि महाप्रलायानंतरही भासणार नाही व आता वर्मानकालातही अज्ञानामुळे भासणार,म्हणजे वास्तविक ते नाही,तसे भ्रमाने भासणारा साप भासण्याच्या पूर्वीही नाही व भाविष्यकालातही दिसणार नाही व आता वर्तमानकालातही नाही,तर केवळ अज्ञानामुळे भासत आहे.अज्ञान—भ्रम नाहीसा झाला कि जग किंवा साप दिसणार नाही,तर परमात्माच—दोरीच अनुभवला येणार.म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेल्या घडा—माट—रांजण इत्यादी कार्यद्रव्यांची उपमा दिलेली आहे.जसे घडा म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार व नाव असलेली मातीच,तसे जग—विश्व म्हणजे विशिष्ट आकार व नाव असलेला परमात्माच—एकमेवाद्वितीय परब्रह्मच आहे.जीवांच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे—न कळल्यामुळे परमात्मा यास जग—विश्व म्हणतात. त्यामुळे जीवास सुख न मिळता दु:ख अनुभवास येत आहेम्हणून अज्ञान निवृत्त करून,ज्ञान प्राप्त करावे.त्यामुळे दु:ख जाते व सुख—सुखारुपता मिळते.||३७|| अर्थः---आतां जर प्रपंच म्हणून मुळीच नाही,असे म्हटले तर त्या मिथ्याभूत प्रपंचाशी चैतन्याचा संबंधाचा लेशही नाही असे सिद्ध होईल असे झाले म्हणजे मग जीवाने तरी काय आहे कि, ज्याच्या योगाने आर पावतो,किंवा ईश्वराचे तरी काय मोठे पुण्य आहे कि,ज्याच्या योगाने तो नित्यमुक्त आहे आणि त्यावेळी कर्म कांडाचा तरी विषय काय ?अशी शंका आली असता मद्वा सुपर्णाफ इत्यादिक श्रुती जीवेश्वरांचा विशेष सांगतात-(हे प्रभो स:यत अजया अजां अनुशयीत )हे प्रभो,तो जीव,जेव्हा तुझ्या मायेने मोहित होऊन आपल्या अविद्येला आलिंगन करितो तेव्हा (गुनान जुषन तदनुसरुपता मनुषनफ अपेतभग: मृत्युं भजति)देहेंद्रीयादिक जी गुनकार्ये त्यांना हे आपले स्वरूपच आहे असे मानीत असता व नंतर त्या देहेंद्रियाकांच्या धर्मांनी युक्त होत असता आपल्या आनंदादिक गुणांचे आवरण पावून जन्ममरनादीरूप संसार पावतो,त्याच्या करितांच कर्मकांडाची अपेक्षा आहे.आणि (आत्तभग: त्वं उत अहि:त्वचं इव तां जहासि )नित्यप्राप्तैश्वर्य असां तूं तर,जसा सर्प आपणावर असलेल्या त्वचेचा (कांतीचा )हि चांगली आहे व माझी असा अभिमान धारण करीत नाही त्याप्रमाणेच त्या मही मायेची चांगली आहे अशा बुद्धीनेच स्वीकार करीत नाहीस तर तिची उपक्षांस करितोस आणि (अपरिमेयभग:अष्टगुणिते मह्सी महियसे )अपरिमित ऐश्वर्याने युक्त होत असता,अनिमादिक अष्टैश्वर्यांनी युक्त अशा सर्वोत्कृष्ट ऐश्वर्याचेठिकाणी पूज्य होतोस म्हणूनच नित्ययुक्त आहेस||३८|| भावार्थ:---जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे “देह मी व देहसंबंधी माझे”असी दृढ भावना झाली आहे.जन्म—जन्मांतरी हेच संस्कार त्याच्या सोबत आहेत. त्यामुळे मुळचे नित्य म्हणजे तिन्ही काळात—भूतकाळात,वर्मानकालात व भविष्यकाळात असणारे,शुद्ध म्हणजे नाम—रूपरहित असणारे जे रूप,बुद्धादी म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण असणारे,लोप पावते.त्यामुळे जन्म—मृत्युच्या चक्रात सापडून,सुखाची अनुभूती न येता दु:खाची अनुभूती येते.संत—महात्मा—भगवंत थोडक्यात ज्ञानी लोक माया दु:खप्रद आहे म्हणून तिचा त्याग करतात.मायापासून मिळणारे सुख ओकारीसारखे वाटते,म्हणून तिचा त्याग करतात.भगवंत ज्ञानी असल्यामुळे त्याचे ऐश्वर्य नित्य त्याच्या सोबतच असते.म्हणून आपण अज्ञानी न राहता निष्काम सेवा करून व निष्काम भक्ती करून,त्यानंतर ज्ञान मार्गाचा स्वीकार करावा.||३८|| अर्थः---या प्रमाणे सांगितलेल्या साधनसमुदायाने जे भगवंताचे सेवन करितात ते मृत्यूला तरून जातात व इतर लोक संसार पावतात असे सांगितले.आता जे बाह्यसंगतीचा त्याग करून भगवंताची प्राप्ती होत नाही व या लोकी सुखही मिळत नाही तर निंद्ययोनी प्राप्त होतात म्हणून त्यांचा शोक करीत मकामान य: कामयतेफ इत्यादिक श्रुती म्हणतात कि,-(हे भगवान म्येफ यतय:ह्रदि कामजटा:यदि न संमुद्दरांती )हे भगवंत जे सर्व संगम परित्यागपूर्वक सन्यासी होऊनही आपल्या ह्रदयामध्ये असणार्या काम वासनांना जर उप्तुताकीत नाहीत तर त्या –(असतां ह्रदि गत:मत्वंफ अस्मृतकंठमनी:एव दुरधिगम:) दुष्ट संन्याशांच्या ह्रदयामध्ये असलेल्याही तूं,जसा कंठामध्ये असलेलाही मनी विस्मरण झाले असता प्राप्त होत नाही.त्याप्रमाणे होत नाहीस.इतकेच नाही तर त्या –(असुतृपयोगिना उभयत:अपि असुखं )इंद्रियांची तृप्ती करण्याविषयी तत्पर असलेल्या दांभिक योग्यांना या लोकी व प्र लोकी दुःखच प्राप्त होते म्हणजे त्यांना लोकांना प्रसन्न राखणे,धन मिळविणेवगैरे क्लेश न चुकल्याचे व भोगांचे वैभव लोकांमध्ये प्रगट होण्याच्या ब दुःख आणि तुझ्या स्वरूपाची प्राप्ती न झालेल्या अविद्यामुक्त पुरुषाला,सांगितलेल्या वरनाश्रमधर्माचे उल्लंघन झाल्यामुळे तुझ्यापासून प्राप्त होणाऱ्या दंडरूप नरकप्राप्तीचे परलोकी दुःख प्राप्त होते||३९|| भावार्थ:---अज्ञानी लोकांनी योगी होऊन जर विषयांचा त्याग न केला तर भगवंत त्यांना सापडत नाही.म्हणून परमार्थ करणारांनी विषयांचा त्याग करणे अत्यंत जरुरी आहे.जसे आपले स्थूल शरीर जिवंत ठेवावयाचे असेल तर हवा,पाणी व अन्नाची अत्यंत गरज आहे,तसे आपणास परमार्थ करावयाचा असेल तर विषयांचा त्याग करणे अत्यंत जरुरी आहे,म्हणून आपण तरी विषयांचा त्याग आवश्य करावा.जीवननिर्वाहक तेवढा विषयांचा स्वीकार करवा,इतर विषयांचा त्याग करावा.जे लोक विषयांचा त्याग न करता भोग घेतात,त्यांना जन्मभर दु:खच भोगावे लागते.मृत्युनंतर लक्षचौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून जीवांनी वास्तविक आपले स्वरूप काय आहे,ते समजावून घेतले पाहिजेत.वास्तविक स्वरूप समजून न घेतले तर अधर्मानुसार आचरण होते--दु;ख भोगावे लागते.||३९| अर्थः---आता संन्याशाला काहीच कर्तव्य नाही.तो सुखाच्या उपभोगाने केवळ आपल्या प्रारब्धकर्माचा क्षय करितो,मग त्याला या लोकी व परलोकी सुख नाही अशी कि त्याचा निंदा करितो,आणि ब्र्म्हत्वमहिमाही मोठा सांगितला आहे.असे कोणी म्हणले तर त्याविषयी सांगतात कि,-(हे सगुण त्वदवगमी भवदुत्थशुभाशुभयो:गुनविगुनान्वयान न वेत्ति)हे षड्गुनैश्वर्य तूझे ज्ञान झाले आहे तो पुरुश,कमल लदात्या तुज ईश्वरापासून प्रकटीत झालेल्या आपल्या प्राचीन पुण्यपापांच्या फ्ल्भूत सुख दुःखांना मुळीच जंत नाही.(तर्हि देहभृतां गिरश्च मन वेत्तिफ)आणि त्यावेळी देहाभिमानी लोकांच्या प्रवृत्तीनिवृत्तीकारक असलेल्या विधिनिषेधरूप वाणीही,जंत नाही,म्हणजे देहाभिमान सुटल्यामुळे त्याला कार्याचा किंवा अकार्याला संबंध राहत नाही.आणि हे योग्यच आहे.(यत:मनुजै: अनुयुगं गीतपरंपरया अन्वहं श्रवणभृत:त्वं अपवर्गनति: मभवसीफ )कारण,मनुष्याने प्रत्येक युगामध्ये प्रकट होणार्या सांप्रदायाप्रमाणे प्रतिदिवशी श्रवणाच्या योगाने चित्तामध्ये धारण केलेला तूं,त्यांना मोक्षगती रूप होतोस.म्ह्न्जेअसे तात्पर्य कि,ज्या पुरुषांना तत्त्वज्ञान झाले आहे त्यांना कर्माधीकाराची शंकाच नाही.आणि जे निरंतर तुझ्या श्रवणादिकांविषयी तत्पर आहेत त्यांनाही तुझ्या स्वरूपाची प्राप्ती होत असल्यामुळे विधिनिषेधांचा बाध नाही,इतर दांभिक योग साधन दाखवून विषयलंपट असणार्या पुरुषांना इहलोकी व परलोकीही सुख प्राप्त होत नाही||४०|| भावार्थ:---ज्या संत—महात्मा यांनी आत्मानुभूती घेतलेली आहे,त्यामुळे त्यांना पाप—पुण्यादी फळाची जाणीव होत नाही,कारण हे पाप आणि पुण्य प्रारब्धानुसार भोगावयास आलेले असतात.भोगणे त्या कर्मांचा नाश होतो,असे त्यांना ज्ञान असते.त्यामुळे दु:ख जरी आले तरी त्याची तीव्रता कमी होते.त्यामुळे त्यांना विधी—निषेध हे नियम लागू होत नाही.असे असले तरी,श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करत असतात,म्हणून विधीनुसार आचरण करून निषिद्ध कर्मांचा त्याग करतात. याकरिता आपण ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.ज्या मनुष्यांनी प्रत्येक युगामध्ये संत—महात्मा यांचा सत्संग केलेला असतो व परमात्म्यांचा अनुभव घेतलेला असतो.त्यांनी—संत—महात्मा यांनी परमात्म्यास आपल्या शुद्ध करणात प्रतिष्ठित केलेले असते,म्हणून त्यांना मोक्ष प्राप्त झालेला असतो.||४०|| अर्थः---आता तुझे स्वरूप जाणणारा पुरुष सुख:दुखे व विधिनिषेध जनात नाही असे सांगितले तेथे दुज्ञेय म्हणून संगीतालेले जे तुझे स्वरूप ते कसे जनता येईल ?अशी शंका आली असता खरे आहे परंतु तुझा महिमा मनिला व मानला अगोचर असल्यामुळे त्या महिम्याचे अवशीयेत्वे करूनच ज्ञान समजावयाचे असे दर्शवित मायदुर्ध्व गार्गी दिवाफ इत्यादिक श्रुतींनी प्रतिपादन केअपारीमित महिमा सांगतात हे भगवान स्वर्गादिकाचे अधिपती ब्राम्हदिकाही तुझ्या अंतप्रात पावत नाही ब्राम्हदिकाची तर गोष्ठ राहुध्या परंतु सर्वज्ञ असा तापल्या न्ताप्रात पाव नाहीस :कारण तुझा अंतच नाही म्हणून तर मग सर्वज्ञ पण व सर्वशक्ती कशी ?तर जो अंत नाहीच तो जाणला नाही म्हणून सर्वाज्ञापानाची किवा प्राप्त झाला नाही म्हणून सर्व शक्तीमानपनाची हानी तोट नाही कारण ,सशाचे शिंग नाहीच ते जाणले नाही म्हणून सर्ज्ञेची ची किवा मिळाले नाही म्हणून शक्तीवैभवाची हानी होत नाही आता माझे अनंतव्त कसे ?असे म्हणशील तर जसे आकाशामध्ये वायूच्या योगाने राजकन परिश्रमान पावतात त्याप्रमाणे ज्या तुझ्यामध्ये उत्तरोत्त दशगुणित अधिक असलेल्या पृठीयादिक सात आवक़्र्नसहित ब्राम्हन्दाचे समूह कालचक्राच्या योगाने एकदम परीभ्रमन पावतात असे नाही केवढे हे आचर्य (हेमायस्मातफ भावन्निता श्रुतय अतनीरसेने त्वयि लातिं ) म्हणूनच तुझे ठिकाणी निशेधामुखाने तुझेठीकानी तत्पर्यवृत्तीने सफल होतात म्हणजे अवधी वाचून निषेध संभवत नाही म्हणून अवधीभूत तुझेर्ठीकानी निषेध मुखाने पर्यवसान पावोन सफल होतात ||४१|| भावार्थ:--- भगवंत,स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपती आपल्याला ओळखू शकले नाहीत,आपणसुद्धा आपला थांगापणा लागला नाही,तर इतरांना आपला थांगपांग लागणे शक्यच नाही. जसे हवेत धुळीचे काण अनंत असतात,त्याचप्रमाणे आपल्यात [तुमच्यात] सातआवरणासहित ब्रह्मांडे असंख्य आहेत.आम्ही म्हणजे श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरुपाचे वर्णन करू शकले नाही.नेती—नेती म्हणत आम्ही सतब्ध झलो आहोत—मौन पाळले आहे.जसे एखादा पदार्थाची चव कसी आहे,त्या चवीचे वर्णन करू शकत नाही.अखेरशेवती आपण तो जर पदार्थ सेवन केला तर,त्या पदार्थाची चव कळेल.सेवन केल्यानंतर सेवन करणारास त्या पदार्थाच्या चवीचा अनुभव येईल.सेवन करणारा जो कर्ता आहे,तोही त्या पदार्थाचे वर्णन करू शकत नाही व म्हणेल कि तुम्हीसुद्धा या पदार्थाचे सेवन करा.सेवन केल्यानंतर त्याची चव कळेल असे कळणार नाही.याचा अर्थ असा होतो कि पदार्थाच्या चवीचे वर्णन करता येणार नाही,त्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो.त्याचप्रमाणे परमात्म्याचे वर्णन करता येत नाही,त्याचा अनुभवच घ्यावा लागतो.वेद,शात्र,पंडित असा कोणीही वरण करू शकत नाही.कारण तो शब्दांच्या पलीकडील आहे.तो इंरुयातीत आहे.म्हणून नामरूपराहिताचे नामरूपरहित होऊनच अनुभव घ्यावा लागतो.विषय हे सुद्धा नामरुपासहित आहेत,म्हणून त्यांचाही त्याग करावा लागतो,तेव्हा अनुभव येतो.||४१|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला –हे नारदा याप्रमाणे ब्रम्हदेवाच्या सनकादिक पुत्रांनी संनदानाणे वर्णन केलेल्या वेदास्तुतीरूप आत्मतत्वाचे निरुपण ऐकून आत्म्याचे तत्व जाणल्यामुळे कृतकृत्य झालेल्या व त्यांनी नंतर गुरुबुद्धीने त्या त्या सानाद्नाने पूजन केले ||४२|| भावार्थ:--- सनकादी ऋषींनी आत्मा ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरुपाला जाणले.त्याचप्रमाणे आपणसुद्धा आत्मा आणि ब्रह्म यांचा उपदेश ऐकून ब्रह्मस्वरुपाला जाणून घ्यावे.जाणून घेतले असता आपले जन्म—मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप होउत.उपदेश श्रावण केल्यानंतर श्रोत्यांनी वक्त्याची पूजा करावी,कारण त्यांनी आपलेला उपदेश केलेला असतो.त्यांनी आपल्यावर उपकार केलेले असतात.त्या उपकरातून ऋण उतराईसाठी पूजा व दक्षणा देऊन जन्मभर उपकाराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सेवा करावी.त्यांनी जर आपणास उपदेश करून कृपा केली नसती तर आपण कृत्य—कृत्य झलो नसतोत.||४२|| | इत्येतद् ब्रह्मणः पुत्र आश्रुत्यात्मानुशासानम् | सनन्दनमथनर्चुः सिद्धा ज्ञात्वाss त्मनो गतिम् ||४२|| अर्थः--सृष्टीच्याआरंभी उत्पन्न झालेल्या व आकाशगामी अशात्या महात्म्य सनकादिक ऋषींनी,असा हा सर्वश्रुतीचा पुराणांचा व उपनिषदांचा तात्पर्य रूप रस कढीला आहे||४३|| | इत्याशेषसमाम्नायपुराणोपनिषद्रसः | समुदधृतः पूर्वजातैर्व्योमयानैर्महात्मभि ||४३|| अर्थः---हे ब्रम्हपुत्रा नारदा ,युही,मनुष्याच्या वासनांचे भस्म करणारें हे ब्रम्ह्नीरूपण, श्राध्देनें मनात धरण करून भूमीवर ज्र्थे तुझी जाण्याची इच्छा असेल तेथे संचार ||४४|| भावार्थ:--- ब्रह्म—विद्या ग्रहण करण्यासाठी आपण अधिकारसंपन्न होऊन ग्रहण करावी.त्यासाठी मुख्य श्रद्धा असावी.श्रद्धा नसेल तर ब्रह्मविध्या ग्रहण होत नाही. ब्रह्मविद्ध्या ही वासनांना भस्म करून टाकते.वासना नष्ट झाल्याशिवाय परमात्म्याचा अनुभव येत नाही.म्हणून सर्व विद्ध्यात ब्रह्मविद्ध्या श्रेष्ठ आहे.||४४|| अर्थः---श्रीशुक म्हणतात;--परीक्षिता संयमी,ज्ञानी.पूर्ण काम आणि नैष्टिक ब्रम्हचारी आशा नारदांनी भगवान नारायनांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले.||४५|| अर्थः---नारद म्हणाले:---भगवन! परम पवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांनी नमस्कार असो.आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता.||४६|| अर्थः---नारदांनी अशा प्रकारे आदिऋषींनी आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्षात पिता असलेल्या कृष्णव्दैपायनांच्या आश्रमाकडे ते गेले.||४७|| अर्थः---व्यासांनी त्यांचा यथोचीट सत्कार केला.आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते,ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले.||४८|| अर्थः---हे राजा,आम्हांला जो तूं,प्रश्न केला होतास ते,ज्याप्रकारे अनिर्देश्य व निर्गुण ब्रम्हाचे ठिकाणी श्रुतींनी प्रवृत्ती होत्ये असे सर्व मी तुला वर्णन केले आहे||४९|| | योsस्योत्प्रेक्षक अदिमध्यनिधने योsव्यक्तजीवे श्र्वरो य:सृष्टेवदमनुप्रविश्य ऋषिणा चक्रे पुर: शास्ति ता: | | सुप्त:कुलायं यथा तं कैवल्य निरस्त योनिमभयं ध्यायेदजस्त्रं हरिम्||५०|| अर्थः---आता सर्व वेदवस्तुतीचा अर्थ संक्षेपाने सांगतो-जो भगवान,आपल्या स्वरूपामध्ये निजलेल्या जीवांना सर्व पुरुषार्थांची सिद्धी होण्याकरिता या जगाचे उत्पत्तीस्थितीसंहार करण्याचा विचार करितो:जो या जगाच्या आरंभी मध्ये व शेवटी राहतो जो;प्रकृती व पुरुष यांचे उपदान कारण आहे;ज्याने,हे ब्रम्हांड उत्पन्न व त्यामध्ये अंतर्यामीरूपाने प्रवेश करून जीवांना भोग प्राप्त होण्याकरिता निरनिराळी शरीरे उत्पन्न केली आहेत;जो जीवांना भोग देऊन त्या शरीरांचे रक्षण करितो आणि ज्याची प्राप्ती झाली असता,चरणमुलांवर वारंवार दंडासारखे प्रणामवगैरे करून उपासना करणारा हा जीव,जसा गाढ निजलेला पुरुष आपल्या शरीराचे अनिसंधान राखीत नाही तर त्याचा त्याग करितो त्याप्रमाणे कार्य कारण अविद्येचे अनुसंधान न राखितां त्या करितो,त्या भयनिवर्तक व अखंडस्वरूपस्थितीने माया रूप मुलकारणाचा निरास करणाऱ्या भगवान हरीचे निरंतर ध्यान करावे||५०|| भावार्थ:----भगवंत या विश्वाचा संकल्प करतात.विश्वाच्या अगोदर,विश्व उत्पन्न झाल्यानंतर भगवंत असतात,विश्वाच्या महाप्रलयकाळानंतर भगवंत असतात.थोडक्यात भगवंत नित्य आहे,तर जग हे अनित्य आहे.जगताला आधार भगवंतांचाच आहे.प्रकृती आणि जीव यांचे भगवंत स्वामी आहेत,कारण सर्व सत्ता भगवंतांचीच आहे.ज्याची सत्ता असते ते स्वामी असतात.म्हणून आपण ज्याची सत्ता आहे,त्यांचच आश्रय घ्यावा,त्यांनाच शरण जावे.म्हणून तेच प्रकृती आणि जीवात प्रवेश करतात.शरीरे तेच निर्माण करून त्यांच्यावर तेच नियंत्रण करतात.जसे गाढ झोपी गेल्यावर शरीराचे अनुसंधान सुटते,तसे भगवंतांची प्राप्ती झाल्यावर मायेतून जीव मुक्त होतो.म्हणून नेहमी भगवंतांचे चिंतन करत राहावे.त्यत जीवाचे परमाहित होऊन जीव मोक्षास प्राप्त होतो.||५०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामकमहापुरानांतील दशमस्कंधाच्या उत्तरार्धात वेदस्तुतीनिरुपणनामक हा सत्याऐशीवा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ |८८ १६---शिवांचेसंकटमोचन---१- | _________________________________________________________________________________________________________________________ आतां ह्या अठ्ठ्याऐंशीच्या अध्यायामध्ये,विष्णुभक्ताला मोक्ष प्राप्त होतो आणि दुसऱ्या देवतांच्या भक्तांना ऐश्वर्ये प्राप्त होतात अशी कथा वर्णन केलेली आहे अर्थः---श्रीहरी भक्तांना मुक्ति देतो असे सांगितलेले ऐकून राजा म्हणाला की,- हे शुकाचार्य,देव असुर व मनुष्य यामध्ये जे लोक,विषयभोगांचा तिरस्कार करणाऱ्या शंकरांचे आराधन करितात तेच बहुतकरून धनी व विषयभोग करणारे होतात,आणि लक्ष्मीच्या पति व सर्वभोगयुक्त अशा श्रीहरीचे जे आराधन करितात ते दरिद्री व भोगरहित होतात याचे कारण काय ? ||१|| अर्थः---हे जाणण्याची आम्ही इच्छा करितो,कारण याबद्दल आम्हांला मोठा संदेह आहे,विरुद्ध स्वभाव असलेल्या हरिहरांच्या भक्तांना विरुद्ध फळ प्राप्त होते ऐश्वर्य टाकणाऱ्या शंकराच्या भक्तांना दारिद्र्य व्हावे व ऐश्वर्य स्वीकारणाऱ्या श्रीविष्णूचा भक्तांना ऐश्वर्य मिळवीत ते तसे न होता विपरीत फल प्राप्त होते याचे कारण काय?||२|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हनाला- हे राजा,निरंतर आनंदरुपी असाही ईश्वर,जेव्हा आपल्या शक्तीने ( प्रकृतीने ) युक्त होतो तिच्या सत्वादिक गुणांनी युक्त होऊन ब्रम्हा,विष्णु व शंकर अशी तीन नांवे धार करितो.सात्विक,राजस व तामस असा तीनप्रकारचा अहंकार आहे||३|| अर्थ:---त्यापासून १ मन १० इंद्रिये महाभूते असे सोळा विकार व दिशा,वायू,सूर्य इत्यादिक देवता उत्पन्न झाल्या आहेत.त्यांत अहंकाराच्या सत्वादिक तीन गुणांपैकी रजोगुणाच्या अंश ब्रम्हदेवामध्ये अधिक आहे,सत्वगुणाचा विष्णुमध्ये आणि तमोगुणाचा अंश शिवामध्ये अधिक आहे.म्हणून जो मनुष्य ज्या अधिक गुणयुक्त देवाचे भजन त्याला त्या गुणांच्या संबंधी विभूती प्राप्त होतात||४|| | हरीर्ही निर्गुण:साक्षात् पुरुष: प्रकृते: पर:| स सर्वदृगुप द्रष्टा तं भजन्निर्गुणो भवेत् ||५|| अर्थ:---याप्रकारे विष्णुभक्तांना सत्वगुणसंबंधी विभूती प्राप्त होतात त्यांमध्येहि सत्वगुण शांतरूप असल्यामुळे आणि हरी हा साक्षात भगवान सर्वांचा साक्षी,सर्वज्ञ,प्रकृतिहून परमपुरुष आणि निर्गुणरुपी असल्यामुळे त्याचे भक्त निर्गुण होतात,तेथे असे तत्त्व जाणावे की,आत्मवस्तूला गुणांच्या संबंधाने त्यांच्या धर्मांच्या योगायोगांनी बिंब व प्रतिबिंब अशी दोन रूपे घडतात.सत्व,रज व तप हे गुण स्वभावाने शांत,घोर व मूढ आहेत.विष्णु,ब्रम्हा,व शिव यांचा वस्तुतः फारसा भेद नसतांही गुणधर्मांनी अंशतः भेद होतो.त्यांत सत्वगुणात्मक विष्णूचा शांत धम असल्यामुळे त्याला विशेष व मूढता ह्या प्राप्त होत नाहीत.ब्रम्हदेव व शंकर यांना त्या प्राप्त होतात आणि इतर गुणांच्या उपमर्दाने त्यांच्या अंशांचा भेद होतो.म्हणून पूर्णत्वरूपी विष्णूची बुद्धी मोक्षकारक व स्वतः आनंदमय असून अंशतः ऐश्वर्ये देणारीही आहे.ब्रम्ह रुद्रादिकांचे अंशतः सेवन करणाऱ्या लोकांना ऐश्वर्य प्राप्त होतात व अनंयत ऐक्यरुपाने सेवन करणाऱ्या लोकांना काही काळाने मोक्षही प्राप्त होतो.असे जाणूनच त्यात्या जागी सत्वमूर्तिपासून कल्याने होतात सत्व हि ज्याची प्रिय मूर्ति आहे इत्यदिक सांगितले आहे.यावरून कांहीच गैर असतां त्यांच्यात्यांच्या भक्तांना जो कलह आहे तो केवळ मोहमात्र आहे||५|| भावार्थ:---भगवंत प्रकृतीच्या—मायाच्या पलीकडील नाम-रुपरहित परमात्मा आहेत.ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंत;करणाचे स्वामी असून साक्षी म्हणजे असून निर्विकाररूपाने असणारे—विकारी नसणारे असे जे असतात त्यांना साक्षी असे म्हणतात.जो त्यांचे म्हणजे निर्विकारी असणाराचे भजन करतो तीसुद्धा त्यांचासरखाच निर्विकारी परमात्मरूप होतो.म्हणून आपण त्यांचे भजन करून गुणातीत होण्याचा प्रयत्न करावा.||५|| अर्थः---आता हा प्रकार भगवंतानेच सांगितला आहे असे सांगतो-हे राजा,अश्वमेध यज्ञ होऊन गेल्यावर तुझ्या आज्या धर्मराजाने श्रीकृष्णभगवंतापासून धर्मांचे श्रवण करीत असता,त्या पूर्णज्ञानी श्रीकृष्णाला जें तूं मला विचारिलेंस हेंच विचारिले||६|| अर्थः---तेव्हा ज्याने मनुष्यांच्या कल्याणाकरिता यदूच्या कुळांत अवतार धारण केला तो प्रभू संतुष्ट होऊन,श्रवण करण्याची इच्छा करणाऱ्या त्या युधिष्ठिराला म्हणाला की,||७|| | यस्याहम नुगृहणमि हरीष्ये तद्धनं शनै:|ततोsधनं त्यजन्त्यस्य स्वजना दुःखदु:खितम्||८|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला-ज्या मनुष्याला करण्याची इच्छा होत्ये परंतु वासनेच्या प्राबल्याने तो विषयत्याग करू शकत नाही आणि त्यांचा भोग करतानाही क्लेश पावतो त्याच्यावर अनुग्रह करण्याकरिता मी हळूहळू त्याचे धन सर्व हरण करितो.नंतर निर्धन व दुःखपरंपरेने ग्रस्त झालेल्या त्याला त्याचे संबंधी लोक सोडून देतात||८|| भावार्थ:--- भगवंत ज्यांच्यावर कृपा करतात,त्यांचे हळू—हळू धन काढून घेतो.धन काढून घेतल्यामुळे त्याची लोभवृत्ती नाहीसी होते.जेव्हा तो निर्धन होतो,तेव्हा त्याचे बांधव दु:खाकुल झालेले त्यास सोडून देतात,कारण बांधव यांना धन पाहिजे असते.धनाच्या आशेने ते आपणास विचारीत असतात,म्हणून आपण देवावर प्रेम करावे.प्रेमाने देव आपलासा होत असतो,तर धनाने जीव आपलेसे होतात.||८|| | स यदा वितथोद्दोगो निर्विण्ण: स्याद् धनेहया |मत्परै:कृतमैत्रस्य करिष्ये मदनुग्रहम्||९|| अर्थः---तो भक्त पुन्हा कदाचित बंधूलोकांच्या आग्रहाने धन मिळविण्यास प्रवृत्त झाला असतांही,माझ्या अनुग्रहाने त्याचे सर्व उद्योग व्यर्थ होतात.मग तो विरक्त होऊन माझ्या भक्ताबरोबर मैत्री करितो.तेव्हा मी त्याच्यावर अनुग्रह करितो||९|| भावार्थ:---यदाकदाचित तो भक्त धन मिळवण्याचा प्रयत्न करत असेल,तर त्याचे प्रयत्न निष्फळ करतो.कितीही प्रयत्न करून धन न मिळाले तर,भगवंतांच्या भक्तांसी मैत्री करतो,तेव्हा भगवंत त्याच्यावर कृपा करतात.आपण धन न मिळवता भगवंतांची कृपा संपादन करावी.||९|| | तद्ब्रम्ह परमं सूक्ष्मं चिन्मात्रं सदनन्तकम् |अतो मां सुदुराराध्यं हित्वान्यान्भजते जन||१०|| अर्थः---तो अनुग्रह हा की-चैतन्यमात्र,सत्य,अनंत व सूक्ष्म जे परब्रम्ह त्याची त्याला प्राप्ती होत्ये.याप्रकारे माझे आराधन करण्याचे फार कठीण आहे.म्हणून लोक माझा त्याग करून इतर देवांचे सेवन करितात.||१०|| भावार्थ:--- आपणास भगवंतांच्या कृपेने परम सूक्ष्म,अनंत,सच्चिदानंद—स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते.यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना करणे अत्यंत जरुरी आहे,त्यासाठी इशायांचा त्याग करावा लागतो.जड—धन—मान—प्रतिष्ठा देहसंबंधीचा त्याग करावा लागतो.विषयांचा व देहासंबंधीचा त्याग करणे अत्यंत कठीण असते.जेव्हा आपण संत—महात्मा यांचा सत्संग श्रद्धेने करूत,तेव्हा वैराग्य येऊन विषयांचा व देहासंबंधीचा त्याग होऊ शकतो.प्रयत्नाची पराकाष्ट करावी लागते.परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही.याकरिता योग्य प्रयत्न करा.भगवंतांचा—परमात्म्याचा हा मार्ग दिसावयास कठीण जरी असला तरी अंती फळास उत्तमौत्तम म्हणजे सर्व दु:ख कायमचे निवृत्त होऊन सर्व कायमचे सुखरूप होण्याचा मार्ग आहे.म्हणून पुरुषोत्तम भगवंत जो आहे तोच मिळवण्याचा प्रयत्न करावा.इतर देवतेची उपासना मार्ग सोपा आहे,पण तात्पुरते दु:ख निवृत्त व तात्पुरते सुख मिळण्याचा मार्ग आहे.अंती दु:खच भोगावे लागते.देवतेची भक्ती न करता परमात्मा मिळावा.||१०|| | ततस्त आशु तोषेभ्यो लब्धराज्य श्रीयोद्धता: | मत्ता:प्रमत्ता वरदान विस्मरन्त्यवजानते ||११|| अर्थ:---आणि ते लोक,लवकर प्रसन्न होणाऱ्या त्या देवांपासून राज्यलक्ष्मी पावेन उद्भत,गर्विष्ठ व असावध होऊन,आपणास वर देणाऱ्या त्य देवांसही विसरतात आणि त्याचा अपमान करितात||११|| भावार्थ:--- सकाम भक्तांना इतर देवता लौकर प्रसन्न होतात.त्यामुळे देवतेकडून राज्य,वैभव,इत्यादी नाशिवंत मिळते,कारण जे नाशिवंत असते,ते—ते तात्पुरते असते.नाशिवंत वैभव,धन उन्मत्तपणा –अंहकारपणा उत्पन्न करते,त्यामुळे अधिक अधर्मपणा वाढून पाप निर्माण करून दु:खाचे फळ देतो.अंहकार वाढल्यामुळे ज्या देवतांनी,आपणास वर दिलेला असतो त्यांचा विसर पडून,त्यांच्याविषयी कृतघ्न्पणाची भावना निर्माण होते.त्यामुळे त्यांची आपल्यावर अवकृपा होते.त्यांची अवकृपा झाल्यानंतर आपणास वारंवार दु:ख भोगावयास येते.||११|| | शापप्रसादयोरीशा ब्रम्ह विष्णु शिवादय:| सद्द:शाप प्रसादोsगङ शिवो ब्रम्हा न चाच्युत ||१२|| अर्थः---हेंच इतिहासाने स्पष्ट करण्याकरिता श्रीशुकाचार्य म्हणाला-राजा,ब्रम्हा,विष्णु व शंकर इत्यादिक देव शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ आहेत,परंतु ब्रम्हा व शंकर हे दोन देव,लवकर प्रसन्न होतात व शापही लवकरच देतात,विष्णु लवकर प्रसन्न होत नाही व शापही देत नाही||१२|| भावार्थ:--- ब्रह्मदेवविष्णू आणि महादेव शाप व वर देतात,पण यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर शाप आणि वर देतात,परंतु विष्णू लवकर वरही देत नाहीत व लवकर शापही देत नाहीत.म्हणून आपण वेविकाअंती विष्णू हेच योग्य आहेत असे वाटते.असे असले तरी ज्यांनी—त्यांनी आपआपल्या अधिकारानुसार निर्णय घेऊन त्यानुसार ठरवावे.कारण भावानुसार—श्रेद्धेनुसार फळ मिळत असते.||१२|| अर्थः---याविषयी हा पुरातन इतिहास सांगतात की,-महादेवाने वृकासुराला वर देऊन,तो स्वतःच संकटात पडला,ते असे की,-लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे ?||१४|| | स आह देवं गिरीशमुपाधावाशु सिद्ध्यसि | योsल्पाभ्यांगुणदोषा भ्या माशु तुष्यति कुप्यति ||१५|| अर्थः---तेव्हा नारद म्हणाला की,-तूं महादेवाला शरण जा,म्हणजे लवकर तुला सिद्धी प्राप्त होईल.जो महादेव थोड्याच आराधानाने लवकर प्रसन्न होतो थोड्याच अप्रधानाने लवकर कोप पावतो||१५|| अर्थः---ज्या शंकराने,स्तुतिपाठकासारखे आपले स्तवनन करणाऱ्या रावणाला व बाणासुराला प्रसन्न होऊन,त्यांना निरुपम ऐश्वर्ये दिला व त्यापासूनच मोठे संकट पावला रावणाने त्याचाच कैलास पर्वत उपटला व बानासुराने त्यास नगराचा रक्षण करूं लागला||१६-१७|| अर्थः---याप्रमाणे प्रतिदिवशी हवन करीत असतांही सहादिवसपर्यंत देवाचे दर्शन झाले नाही तेव्हा सातवे दिवशी त्या वृकासुराने खिन्न होऊन मप्रेरन किंवा कार्य साधीन अशा निश्चयाने त्या कुंडातीत स्नान केल्यामुळे ओले केंस असलेले आपले आपले मस्तक आपल्याच शास्त्राने तोडण्यास उधुक्त झाला||१८|| अर्थः---तेव्हा परमदयाळू अशा त्या शंकराने त्या केदारकुन्डांतील अग्नीच आहे की काय असा प्रकाश पावत आपल्या बाहूंनी त्याचे धरिले आणि,जसे आम्ही,कोणी एखादा दुःखाने गांजून आत्मघात करूं लागला म्हणजे त्यांचे निवारण करितो त्याप्रमाणे मस्तक तोडण्यापासून त्याचे निवारण केले.तेव्हा तो दैत्य,त्या शंकरांच्या स्पर्शेकरूनच पुन्हा परिपूर्णदेह झाला||१९|| अर्थः---तेव्हा शंकर त्याला म्हणाला की,-हे वृकासुराला,पुरे पुरे,आतां मस्तक तोडण्याचे प्रयोजन नाही,तूं माझ्यापासून वर माघून घे.जसा तुझा मनोरथ असेल तसा मी तुला वर देतो.मी तर आलेल्या भक्तांना केवळ जळमात्रेकरुनही प्रसन्न होतो असे असतां तूं विनाकारण आपल्या देहाला दुःख देत आहेस||२०|| अर्थः---याप्रमाणे सांगितलेल्या त्या वृकासुराने,प्राणीमात्रांना भयंकर वर असा मागितला की,मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याने तत्काळ मरावे||२१|| अर्थ:---हे महाराजा,ते त्याचे वचन ऐकून भगवान रुद्र खिन्न झाल्यासारखा होऊन हास्य करून,सर्पाला जसे दुध पाजावे त्या प्रमाणे त्या दैत्याला बरे आहे असे म्हणून वरदान दिले||२२|| अर्थ:---याप्रमाणे शिवाने सांगितलेला तो दैत्य,खरोखर गौरीचे हरण करण्याविषयी उत्सुक होऊन,शिवाने सांगितलेले खरे किंवा खोटे याची परीक्षा करण्याकरिता त्या शंभूंच्या मस्तकावरच आपला हात ठेवण्याचा उद्योग करूं लागला,तो तेव्हा तो शंकर आपण केलेल्या वरदानापासून आपणच भय पावला||२३|| भावार्थ:--- महादेवांनी आपल्या भक्तास विचार करून वर न दिल्यामुळे भयभीत होण्याची वेळ आली.म्हणून आपण कोणास अंगलट येण्याचे आश्वासन देऊ नये,दिल्यास दु:खास सामोरे जावे लागते.महादेव एवढे समर्थ असून असे तर मग आपले कसे याचा विचार करावा.||२३|| अर्थ:---आणि तो दैत्य पाठीमागे लागलेला,भयाभीत झालेला व थरथर कांपणारा तो शंकर,स्वर्ग भूमि आणि दिशा यांच्या शेवटापर्यंत धावून नंतर उत्तरेकडे धावूं लागला||२४|| अर्थ:---त्यावेळी ब्रम्हादिक देवही ते शंकरांचे भय निवृत्त होण्याचा उपाय न जाणत होत्साते उगीच राहिले.नंतर तो शंकर,अंधकाराच्या पलीकडे प्रकाश पावणाऱ्या श्वेतदीपास जाऊन पोंचला||२५|| | यत्र नारायण:साक्षान्न्यासिनां परमा गति:| शान्तानां न्यस्तदण्डानां यतो नावर्तते गत: ||२६|| अर्थ:---जेथे शांत आणि सर्वांना अभय देणाऱ्या संन्यासी लोकांची परमगती असा नारायण रहात आहे आणि जेथे गेलेला प्राणी पुन्हा संसारदुःखांत पडत नाही||२६|| अर्थः---दुःख हरण करणाऱ्या भगवान नारायणाने त्या तशा प्रकारच्या दुःखी असलेल्या शंकराला दुरूनच पाहून,आपल्या योगमायाशक्तीने ब्रम्हचारी बटूचा वेश धारण करून,त्याच्या समोर प्राप्त झाला||२७|| भावार्थ:---अखेरशेवटी भगवाण विष्णूकडे गेल्यानंतर भगवान शंकरांना आधार मिळाला व भगवान विष्णू त्यावर उपाय करू लागले.||२७|| अर्थः---मेखला,कृष्णजीन,दंडकाष्ठ व रुद्राक्षांची माळा यांनी युक्त,तेजाने अग्निसारखा प्रकाश पावणारा व हातांत दर्भमुष्ठी धारण करणारा तो बटू,अगदी नम्र असल्यासारखा त्याला वंदन करून म्हणाला की,-||२८|| | शाकुनेय भवान् व्यक्तं श्रान्त:किं दूरमागता:| क्षणं विश्रम्यतां पुंस आत्मायं सर्वकामधुक्||२९|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला-हे शकूनिपुत्रा,तूं खरोखर थकल्यासारखा दिसत आहेस.फार लांब आला आहेस काय ? क्षणभर विश्रांती घ्यावीस,कारण,पुरुषाचा हा देह सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे याला फार श्रम देऊन उपयोग नाही||२९|| भावार्थ:---मनुष्याने अधिक काम केले कि त्याच्या शरीराला थकवा येतो,त्यासाठी त्या शरीराला विश्रांतीची गरज असते.म्हणून आपणही थकवा आल्यानंतर पुढील कार्य व्यवस्थित होण्यासाठी विश्रांती घ्यावावयास पाहिजे.हे शरीरच सर्व सुख उपभोगण्यांचे साधन आहे.सर्व सुख म्हणजे एकदा सुख मिळाल्यानंतर वर्तमानकाळात सुख व भविष्यकालातही सुखच मिळणे अन्य कांही म्हणजे अजिबात दु:ख मिळू नये.त्याला सर्व सुख असे म्हणतात.त्यासाठी सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून व त्या परमात्म्याचा अनुभव आला कि सर्व सुख मिळते.तात्पुरते सुख हे नाशिवंत विषयांपासून मिळत असते.जसे वर्षा ऋतूत वाऱ्याच्याद्वारे ढगावर ढग आदळले कि,त्यांच्या एकमेकांच्या घर्षणाने वीज उत्पन्न होते.ती वीज कांही क्षणच असते व कांही क्षणात अंधार पडतो त्याचप्रमाणे कोणत्याही विषयांपासून कांही क्षण आनंद मिळतो व त्यानंतर कांही क्षणात दुडू:खाची अनुभूती येते.जीवास मात्र कायमचाच आनंद असावा वाटतो.जीवाची ती इच्छा परमात्म्याचा अनुभवानंतर पूर्ण होते.म्हणून जीवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी सत्संगाद्वारे संत—महात्मा यांची संगती करून ज्ञानाद्वारे परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२९|| अर्थः---हे प्रभो,तूं कोणते कार्य मनांत आणले आहेस ? ते जर आम्हांस श्रवण करण्यास योग्य असेल तर सांग.कारण,हा लोक सहाय घेतलेल्या पुरुषांसहवर्तमानच आपले स्वार्थ साधित असतो.म्हणून तूं आपला आशय आम्हांस सांग,आम्ही तुझे सहाय करूं||३०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे भगवंताने जणुं अमृताचा वर्षाव करणारेच की काय अशा वचनाने प्रश्न केलेला तो वृकासूरक्षणभर घेऊन गतश्रम झाला आणि त्याने पूर्वी आपण तपश्चर्या वगैरे केलेलं सर्व वर्तमान त्या बटूला सांगितले||३१|| अर्थः----ते ऐकून श्रीभगवान म्हणाला की,-तूं सांगतोस असे जर आहे त्र त्या रुद्राचे वरदानरूप वाक्य खरे आहे असे,आम्ही मुळीच मानीत नाही.कारण,जो रुद्र,दक्षाच्या शापाने पिशाचत्व पावला आहे आणि प्रेतांचा व पिशाचांचा राजा झाला आहे.||३२|| अर्थः---हे दानवेन्द्रा,त्या जगद्गुरू शंकराविषयी तुला जर विश्वास वाटत असेल त्र हे वृकासुरा,तूं आदी लवकर आपल्याच मस्तकी हात ठेवून त्या वचनाचा प्रत्यय पहा||३३|| | यदि वस्तत्र विश्रम्भो दानवेन्द्र जगद्गुरौ | तर्हयाङगशु स्वशिरसी हस्तं न्यस्य प्रतीयताम्||३३|| अर्थः---आणि हे दानवोत्तमा,जर कोणत्याहिप्रकारे त्या शंभूचे वचन असत्य झाले तर खोटे बोलणाऱ्या त्याला तूं मारून टाक,म्हणजे पुन्हा असे तो खोटे भाषण करणार नाही ||३४|| | इत्थं भगवतश्र्चीत्रैर्वचोभिः स सुपेशलैः | भिन्नधीर्विस्मृतः शीर्ष्णि स्वहस्तं कुमतीर्व्यधात् ||३५|| अर्थः---याप्रकारे विचित्र व अतिकोमल अशा भगवंताच्या वचनांनी चलितबुद्धी झालेल्या त्या वृकासुराने विसरून आपला हात आपल्याच मस्तकावर स्थापन केला||३५|| अर्थ----नंतर तत्काल जणुं वज्रानेच तडित झाला की काय असा तो दैत्य,मस्तक फुटून पडला त्यावेळी देवांनी स्वर्गलोकी जयजयकारशब्द,चांगले झाले असा शब्द व नमःशब्द उच्चारिला||३६|| | मुमुचुः पुष्पवर्षाणि हते पापे वृकासुरे | देवर्षीपितृगन्धर्वा मोचीतः संकाटाच्छिवः ||३७|| अर्थः-----अस्पो तो पापी वाक्रसुर मरन पावला असता देव ,ऋषी ,पितर ,व गंधर्व यांनी पुष्पांचा वर्षाव केला याप्रमाणे भागवतने शिवला संकटातून सोडविलेले आहे||३७|| भावार्थ:--- सदगुरूंची कृपा असेल तर कोणतेही संकट टळून जाते,मात्र ती निष्ठा अपार पाहिजे.जसे संसारात धन पाहिजे त्याचप्राणे परमार्थात श्रद्धा असावयास पाहिजे.ती श्रद्धा बोलण्यासारखी नसून अंत:करणपूर्वक असली पाहिजे.म्हणून आपणात श्रद्धा असावयास पाहिजे.||३७|| | मुक्तं गिरीशमभ्याह भगवान् पुरुषोत्तमः | अहो देव महादेव पापोऽयं स्वेन पाप्मना ||३८|| | हतः को नु महत्स्वीश जन्तुर्वैं कृतकिल्बिशः |क्षेमी स्यात् किमु विश्र्वेशे कृतागस्को जगद्गुरौ ||३९|| अर्थः-----संकटातून मुक्त झालेल्या शंकराला तो भगवान पुरुषोत्तम म्हणाला की अहो देवा हे महादेव ,हा पापी दैत्य आपल्याच पापाने ,मारला गेला आहे हे ईश्वर तुझ्या महत्म्या भक्ताचाही अपराध करणारा कोण बरे प्राणी सुखी होईल ?कोणीच नाही मग जगत्पुज्या अशा तुज विश्वेश्वराचा अपराध करणारा प्राणी सुखी होणार नाही हे काय सांगावे ||३८-३९|| भावार्थ:--- आपण जर दुष्टपणा केला कि,त्यामुळे पाप होते व ते आपण आपणास नष्ट करते,म्हणून आपण पापकर्म कधीच करू नये.आपण त्यातल्या—त्यात संत—महापुरुष्यांचा तर कधीच अपराध करू नये.आपल्याकडून जर अपराध घडला तर आपणास त्यामुळे दु:खच भोगावे लागल.म्हणून आपण अधर्मानुसार कधीच वागू नये,कारण कर्ता तो भोक्ता असतो,म्हणून पापाचे कर्ते न होता पुण्याचे कर्ते व्हावे.||३८—३९|| | य एवमव्याकृतशक्त्युदन्वतः परस्य साक्षात् परमात्मनो हरेः | | गिरित्रमोक्षं कथयेच्छ्रुनोति वा विमुच्यते संस्मृती भिस्तथारीभिः ||४०|| अर्थः---जो पुरुष ,मना;ला व वाणीला अगोचर असणाऱ्या शक्तीचा समुद्र व मायेहून पार ,अशा साक्षात्त परमात्म्याचा भगवंताने ,महादेवाला संकटातून सोडविले हे चरित्र श्रवण करितो अथवा कथन करितो तो जन्म मरण रूप संसाराला कारणभूत अशा काम्बंधापासून व शत्रूपासून मुक्त होतो ||४०|| भावार्थ:--- शिवाचे संकटमोचन कथा जो श्रावण करतो किंवा सांगतो,तो श्रोता व वक्ता दोघेही जन्म—मृत्युच्या भयापासून मक्त होतात.||४०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील उत्तरार्धामध्ये रुद्रमोक्षनामक हा अठ्ठ्याऐशीवा अध्याय समाप्त झाला ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |८९ १७---भृगूकडून तीन देवांची परीक्षा---१--- __________________________________________________________________________________________________ | सरस्वत्यास्तटे राजन्नृषयः सत्रमासत |वितर्कः समभूत्तेषां त्रिष्वधीशेषु को महान् ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,सरस्वती नदीच्या कांठी ऋषी लोकसत्र करीत होते.तेथे त्यांच्यात ब्रम्हविष्णूरुद्रांमध्ये कोणता देव महान आहे ? असा संशय उत्पन्न झाला ब्रम्हदेवाचा||१|| अर्थः---ते महत्त्व जाणण्याच्या इच्छेने त्या ऋषींनी त्या महत्त्वाचा ज्ञानाकरिता ब्रम्हदेवाना पुत्रा अशा भृगुऋषीला पाठविले.तो भृगुऋषी,परीक्षा करण्याकरिता प्रथम ब्रम्हदेवाच्या सभेमध्ये गेला||२|| अर्थः:---त्याने ब्रम्हदेवापाशी सत्वगुण आहे किंवा नाही याची परीक्षा करण्याकरिता त्याला नमस्कार किंवा त्याची स्तुतीवगैरे मुळीच केली नाही.तेव्हा भगवान ब्रम्हदेव,याने आपला अपमान केला असे जाणून आपल्याच तेजाने देदीप्यमान असता त्या भृगुवर क्रुद्ध झाला||३|| अर्थः---नंतर त्या समर्थ ब्रम्हदेवाने आपल्या मनामध्ये पुत्रावरच क्रोध उत्पन्न झाला असे जाणून विवेकयुक्त बुद्धीने त्याचे,जसा एखाद्या समर्थ पुरुष,अग्नीपासून झालेल्या उकानेच अग्नीची शांतता त्याप्रमाणे पुत्रावर दृष्टीदेऊनच क्रोधाने उपशमन केले||४|| भावार्थ:---आपणास तर क्रोध येऊ नये,आला तर विवेकबुद्धीने शांत करण्याचा प्रयत्न करावा,कारण क्रोधात घेतलेला निर्णय हा अहित करत असतो.||४|| अर्थः---नंतर तो भृगुकैलासपर्वतावर गेला,तेव्हा महेश्वरदेवाने तो आपला भाऊ भृगुऋषी आला आहे असे जाणून हर्षाने उठून त्याला आलिंगन करण्याविषयी उदुक्त झाला,तेव्हा त्या भृगुने,तूंचीतभस्मादी धारण करून,आपला शुद्ध मार्ग सोडून,अमंगळपणाने वागणारा आहेस यास्तव मला शिवूं नकोस,असे भाषण केले असतां,तो शंकर क्रुद्ध झाला आणि नेत्र लाल करून हाताने शूळ उचलून त्याला मारण्याविषयी उदुक्त झाला||५-६|| अर्थः---तेव्हा पार्वतीने पायांवर पडून मधुरवाणीने त्या शंकरांचे सांत्वन केले,नंतर भृगऋषी,जेथे जनार्दन भगवान विष्णू राहतो त्या वैकुंठास निघून गेला||७|| | शयानं श्रिय उत्संगे पदा वक्षस्यताडयत् | तत उत्थाय भगवान् सह लक्ष्म्यां सतां गतिः ||८|| | स्वतल्पादवरूह्याथ ननाम शिरसा मुनिम् | आह ते स्वागतं ब्रम्हन् निषीदात्रासने क्षणम् | | अजानतामागतान् वः क्षन्तुमर्हथ नः प्रभो ||९|| अर्थः---तेथे लक्ष्मीच्या मांडीवर मस्तक ठेऊन निजलेल्या श्रीविष्णूच्या वक्षस्थळावर त्याने ताडन केले.नंतर साधूंची गती असा तो भगवान लक्ष्मीसहवर्तमान जागृत होऊन||८|| अर्थः---आपल्या पर्याकावरून खाली उतरला आणि मस्तकाने त्या ऋषीला वंदन करून म्हणाला कि,-हे ब्राम्हणा,तुझी आला हि फार चांगली गोष्ट झाली.क्षणभर या पर्यंकावर बसावे हे प्रभो आलेल्या तुम्हांस न जाणणाऱ्या आमच्या अपराधांची क्षमा करण्यास तुझी समर्थ आहां||९|| भावार्थ:--- भगवान विष्णू त्यांच्या पत्नी लक्ष्मीदेवी यांच्या मांडीवर त्यांचे डोके ठेऊन विश्रांती घेत होते.अचानक भृगु त्यांच्याकडे आले.त्यांनी--भृगूमुनींनी त्यांच्याकडे—भगवान विष्णूकडे येताच भगवान विष्णूंच्या वक्ष:स्थालावर लाथ मारली.भगावान विष्णूंच्या वक्ष:स्थलावर भृगू मुनींनी लाथ मारली तरी भगवान आपल्याकडून भृगू मुनींचे स्वागत करण्यास फक्त विलंब झाला म्हणून,गुन्हा झाला असे मान्य करून क्षमा मागतात.भगवंत विष्णूंनी आजूनही ती लाथ मारल्याची निशाणी—खून—चिन्ह आपल्या अंगावर आदर—मान—सन्मान म्हणून धारण केलेले आहे.आपणाकडून संत—महात्मा यांचा किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठांचा अपराध—गन्हा जर झाला असेल तर आपण त्यांची अपराध—गुन्हा कबुल करून नम्रतेने क्षमा मागावयास पाहिजे,कारण भगवंत यांच्यापेक्षा भृगू मुनी श्रेष्ठ आहेत. किंवा आपल्यापेक्षा माता—पिता,इतर कोणी श्रेष्ठ असतात,त्यांचा अपराध—गुन्हा नम्रतेने काबुल करून क्षमा मागावयास पाहिजे.त्यात आपलेच हित असते.त्यानंतर भगवान भक्तवत्सल विष्णू आपल्या पत्नीसहीत—लक्ष्मीसहित उठून पलंगावरून खाली उतरले आणि मुनीना त्यांनी नमस्कार केला.त्यानंतर भगवान विष्णू भृगू मुनींना म्हणतात कि,”ब्राह्मण! आपल स्वागत असो.या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या,कारण आपण प्रवास केलेला असल्यामुळे थकलेले आहात.महर्षे!आपण आल्या—आल्या मी आपले स्वागत करू शकलो नाही,कारण आपण आल्या—आल्या मी आपणास पाहू शकलो नाही.यामुळे मी आपला अपराधी आहे.त्या अपराधाची मला क्षमा करावी.” आपल्याकडून—गुन्हा श्रेष्ठांचा झाला असेल तर आपण नम्रतेने क्षमा मागावयास पाहिजे.त्यात आपलेच हित असते.||८—९|| | अतीव कोमलौ तात चरणौ ते महामुने | इत्युक्त्वा विप्रचरणौ मर्दयन् स्वेन पाणिना ||१०|| अर्थः---बा महामुने,तुझे चरण फारच मुदू असून त्यांना फार श्रम झाले आहेत.असे बोलून आपल्या हाताने त्या ब्राम्हणांच्या चरणाचे संमार्द्न करीत तो विष्णू म्हणाला कि,-||१०|| भावार्थ:--- भगवंत भृगु मुनींची नम्रतेने क्षमा मागून,त्यांच्याच पायांना कांही त्रास झाला असेल म्हणून त्यांच्या चरणांची सेवा करतात,कारण आल्या—आल्या त्यांचे स्वागत केले असते तर,त्यांचा अपराध झाला नसता.त्यामुळे त्यांनी लाथ मारली नसती,व लाथ मरणी नसती तर,त्यांच्या पायांना कांही त्रास झाला नसता,म्हणून पायांची सेवा केली.आपणाकडून संत—महात्मा यांचा किंवा श्रेष्ठांचा अपराध—गुन्हा झाल्यास—त्यांना आपल्यामुळे कांही दु:ख झाल्यास आपण त्यांचे दु:ख कमी किंवा नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे त्यास्न्चे दु:ख कमी किंवा नाहीसे करण्यात प्रयत्न करावा किंवा सेवा करावी.||१०|| अर्थ:---हे ब्राम्हणा,तू तीर्थानीही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणोदकाने लोकांसहित मला व माझ्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकपालांना पवित्र कर||११|| अर्थ:---हे भगवन,आज मी लक्ष्मीचे निरंतर राहण्याचे स्थान झालो आहे,कारण,तुझ्या चरणस्पर्शाने निष्पाप झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी स्थिर राहील||१२|| भावार्थ:---संत—महात्मा—मुनी यांच्या स्पर्शाने भगवंत हे पवित्र होऊन लक्ष्मी नित्य वक्ष:स्थळावर निवास करते तर आपण अज्ञानी जीवावर तर संत—महात्मा—मुनी यांच्या स्पर्शाने आपण पवित्र होऊन,त्यांच्या मुखातून शात्र श्रवण केल्यामुळे ज्ञान होऊन आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप हौउत,.||१२|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे श्रीविष्णू भाषण करीत असतां,त्याच्या गंभीरवाणीने सुख पावलेला व संतुष्ट झालेला भृगुऋषी,भक्तीने सद्गतीकंठ होऊन उगींच राहिला व त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू गळूं लागले||१३|| भावार्थ:--- संत—महात्मा—मुनी यांना प्रसन्न करून घ्यावावयाचे असेल त्यांना आपण स्वत: कमीपणा—नम्रपणा घेऊन,त्यांना मोठेपणा देऊन आचरण करावयास पाहिजे.संत—महात्मा—मुनी यांच्याकडून अपराध—गुन्हा जरी झाला तरी आपण त्या अपराधाकडे—त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून त्यांची धर्मानुसार सेवा करावयास पाहिजे.आपली त्यांच्यावरील श्रद्धा किंचितही विचलित होऊ देऊ नये.आपला तो नम्रपणा पाहून—ऐकून ते अतिशय आनंदित होऊन प्रसन्न होतात.||१३|| अर्थ:---हे राजा,त्या भृगुने,पुन्हा त्या ब्रम्ह्वेत्या ऋषीच्या सत्रामध्ये येऊन त्यांना आपण अनुभव घेतलेले ब्रम्हादिक तिन्ही देवांचे वर्तन वर्णन केले||१४|| अर्थ:---ते ऐकून नंतर भगवंताचा नम्रपणा ऐकील्याने आश्चर्ययुक्त व संशयरहित झालेल्या त्या ऋषींनी,मोठ्या अपराधाच्या वेळीही निर्विकारी अशा विष्णूलाच फार मोठा असे मानिले.ते असे कि,-तेथे अभय आहे||१५|| भावार्थ:---सर्व देवात भगवंत विष्णूच सर्वश्रेष्ठ आहेत असे सर्वांच्या अनुभवास आले,कारण तेच शांत,अभय देणारे आहेत,असे सर्वांना वाटू लागले.भगवंत विष्णुकडून साक्षात आठ प्रकारचे ऐश्र्वर्य म्हणजे यश,श्री,औदार्य,ज्ञान,वैराग्य,ऐश्वर्य,धर्म आणि क्षमा आहेत.म्हणून आपण त्यांनाच प्रसन्न करून घ्यावेत. अर्थः---ज्यापासून धर्म प्रवृत्त होतो,ज्यापासून साक्षात्कारात्मक ज्ञान व त्याने असे वैराग्य उत्पन्न होते,ज्यापासून आनिमादिक आठ प्रकारचे ऐश्वर्य अ अंतःकरणाचा मल घालविणारे यश प्राप्त होते,||१६|| | मुनीनां न्यस्तदण्डानां शान्तानां समचेतसाम् | अकिंचनानां साधूनां यमाहुः परमां गतिम्य ||१७|| अर्थः---ज्याला,सर्वांना अभय देणाऱ्या,शांत,समचित्त,अकिंचन परोपकारी व मननशील अशा साधूंची परमगति असे म्हणतात||१७|| भावार्थ:--- भगवंत हे शांत,म्हणजे अनुकुलता असो किंवा प्रतिकूलता असो या विषम परस्थितीत शांत असतात.म्हणून त्यांचा तो सदगुण आपल्यात येण्यासाठी त्यांची निष्काम भक्ती केली असता तो सदगुण आपल्यात निश्चित येतो.समचित्त,म्हणजे सर्वांना ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार त्या कर्मांचे फळ समचित्त भावाने देतात,त्यात विषमपणा ठेवीत नाहीत.नि:स्पृह म्हणजे स्वत:साठी कोणतीच अपेक्षा ठेवीन नाहीत.त्यांनी शात्र निर्माण केलेले आहेत.धर्मासात्रानुसार आचरण करा असे म्हणतात.आपण धर्मशात्रानुसार आचरण केल्यास त्याचा फायदा आपणास सुखारुपता मिळतो.शात्र निर्माण केले,त्याचा ते मोबदला घेत नाहीत.आपण शात्रानुसार आचरण केले तर आपले अभय--भितीरहित होतोत.सर्व फायदा आपलाच आहे.म्हणून आपण त्यांची निष्काम भक्ती करावयास पाहिजे.म्हणून आपले सर्व हित होण्यासाठी आपण सर्वांनी भगवंतांचा आश्रय घ्यावावयास पाहिजे.परमात्माच आपले साध्य ठरवून अविनाशी सुखारुपता प्राप्त करून घ्यावी.||१७|| अर्थः---ज्याची सत्वगुण हि प्रियमुर्ती आहे,ज्याचे ब्राम्हण हे इष्टदैवत आहेत आणि शांत,निष्काम व विचारणवान लोक हे,ज्याचे सेवन करितात||१८|| भावार्थ:--- सत्वगुण ही भगवंतांची प्रिय मूर्ती आहे.म्हणजे त्यांना सत्वगुण—सत्वगुणी मनुष्य आवडतात,सत्वगुणात सुख मिळत असते.भगवंत सुखरूप असून,जीवासही सुखाच आवडते.म्हणून आपण सत्वगुणी होण्याचा प्रयत्न करावा.भगवंतांस षट्कर्म करणारा व अपोरक्षी ब्रह्मज्ञानी प्रिय आहे.म्हणून आपण सत्संग करून अपोरक्षी ब्रह्मज्ञानी याच मनुष्यदेहात होण्याचा प्रयत्न करावा.म्हणून जे निष्काम,शांत आणि वेवेकसंपन्न—सार—असार याचा विचार करून वागणारे लोक भगवंतांस आवडतात,म्हणून आपण विवेकी—विचारी होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.आपल्यात निष्काम,शांत आणि वेवेकसंपन्न झाल्यास भजन करूत.||१८|| अर्थः---त्या भगवंताच्याच जरी गुणमय मायेने उत्पन्न केलेल्या राक्षस,असुर व देव तीनप्रकारच्या मूर्ती आहेत तरी,असुर व देव ह्या तीनप्रकारच्या मूर्ती आहेत तरी,त्याची ती सत्वगुणात्मक विष्णूमूर्तीच पुरुषार्थ प्राप्त होण्याचे साधन आहे||१९|| भावार्थ:--- भगवंतांच्या गुणमय मायापासून जरी राक्षस,असुर आणि देवता उत्पन्न झाल्या असल्या तरी म्हणजेच तमोगुण,रजोगुण व सत्वागुणापांसून उत्पन्न झाले असले तरी सत्वगुण हा सुखाला कारणीभूत आसल्यामुळे भगवंतांस सत्वगुण आवडतो,म्हणून आपण सत्वगुणी होण्याचा प्रयत्न करावा.सत्वागुणा मुळेच भगवंत प्राप्त होतात व आपण सुखरूप होतात.याकरिता सत्वगुण वाढण्यासाठी सत्संग करावा लागतो.सत्संग केल्यास सत्वगुण प्राप्त होतो.||१९|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,मनुष्यांचा संशय घालविण्याकरिता असा निश्चय करून सरस्वतीनदीच्या तीरी राहणारे ते ब्राम्हण,भगवंताच्या चरणकमलाच्या सेवेने मुक्तिप्रत पावले||२०|| भावार्थ:--- आपण भगवंतांच्या चरणकमलांची निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून अधिष्ठान जो परमात्मा त्यांचे जीवाब्राह्मऐक्यज्ञान सत्संग करून प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाचा अनुभव घेतला असता परमपद म्हणजेच मोक्ष—जन्म—मरण परंपरा नष्ट होऊन कायमचे दु:ख जाऊन कायमचे सुख प्राप्त होते.||२०|| अर्थ:---सुत म्हणतात:---पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्तीकथा जन्म-मृत्युरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे.श्रीशुकदेवांच्या मुखारविंदाचा सुंगंध असलेले हे अमृत आहे.जन्म-मरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचे निरंतर पाण करतो,त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो.||२१|| भावार्थ:--- श्रीमद्भागवतातील ही रमणीय कीर्तीकथा आपले संसारातील जन्म—मृत्यूरूप संसार—दु:खमय भयअवस्था नाहीसी करणारी आहे.श्रीव्यासांच्या व श्रीशुकांच्या मुख्राविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे.ज्ञानरूपी अमृत कायमचे दु:ख घालवून कायमचे सुख सुख देणते आहे,तर स्वर्गातील अमृत तात्पुरते दु:ख घालवून सुख देणारे आहे.म्हणून स्वर्गातील अमृताचे सेवन न करता ज्ञानामृत सेवन करून परमआनंदाचा अनुभव घ्यावा.आपणास परमपद प्राप्त होते.||२१|| अर्थः----असो पूर्वी सांगितलेला विष्णू भगवान श्रीकृष्णच आहे असे दर्शविण्याकरिता दुसरे आख्यान सांगतो-श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,एकेवेळी द्वारकेमध्ये कोणी एक ब्राम्हणाच्या स्त्रीचा पुत्र जन्म पावून भूमीला स्पर्श होतांच तत्काळ मरण पावला||२२|| अर्थः----तेव्हा पुत्र शोकाने व्याकूळ झालेल्या व दिनचीत्त अशा त्या ब्राम्हणाने त्या मेलेल्या पुत्राचे प्रेत उचलून दरवाज्यामध्ये ठेविले आणि तो विलाप करीत असे म्हणाला कि,-||२३|| | ब्रम्हाद्विष: शठधियो लुब्धस्य विषयात्मनः | क्षत्रबन्धो: कर्मदोषात् पन्चत्वं मे गतोर्भक: ||२४|| अर्थः---पुत्र मरण पावलायाचा माझ्याकडे कांही दोष नाही तर ब्राम्हणांचा द्वेष,कृतनबुद्धी,विषयलंपट व लोभी अशा राज्याच्या कर्मदोषानेच हा माझा पुत्र मरण पावतात||२४-२५|| अर्थः---याप्रमाणेच त्या ब्राम्हणाने दुसरा,तिसरा,इत्यादिक आठ पर्यंत पुत्र उत्पन्न होतांच मरण पावले असतां,त्याची प्रेते पुर्वतात राजाच्या दरवाज्यात ठेऊन ती राजांची निन्दारूप गाथा गायन केली||२६|| अर्थः---नंतर ऐकदिवशी नववा पुत्र मरण पावला असतां,कृष्णाजवळ बसलेल्या ब्रजुनाने ती ब्राम्हणाने रडत गाईलेली गाथा ऐकून तो अर्जुन एकांती त्या ब्राम्हणास म्हणाला कि,-||२७|| अर्थः---हे ब्राम्हण तू का उगीच व्यर्थ रडतोस तू जेथे राहतोस व्दारकेमध्ये धुनुर्वारी असा एखादा सामान्यही राजा मुळीच नाही मग ब्राम्हणाचा कैवारी शूर राजा नाही हे काय सांगावे !हे यादव तर यज्ञामध्ये जमलेल्या ब्राम्हनसारखे (भोजनशाली)होण्यास योग्य आहेत||२८|| अर्थः--जे क्षत्रिय जावत असतां,धन स्त्री व पुत्र यांच्या वियोगाने ब्राम्हण शोक करितात ते क्षत्रिय,राजाच्या वर्षाने नटासारखे आपले प्राण पोषण करण्याकरिता वांचेतात||२९|| | अहं प्रजा वां भगवन् रक्षिष्ये दिनयोरिह | अनिस्तीर्णप्रतिज्ञोsग्निं प्रवेक्ष्ये हतकल्मषः ||३०|| अर्थ:---आतां,मी कांही दिवसपर्यंत येथेच राहून,दिन अशा बलराम,श्रीकृष्ण,धनुर्धाऱ्यामध्ये श्रेष्ठ प्रद्दुम्न आणि अप्रतीरथ असा अनिरुद्ध हेही समर्थ झाले नाहीत||३०-३१|| अर्थ:---हे जगदीश्वरांनीही दुष्कर असलेले कर्म तूं आपल्या मूर्ख पणामुळे कसे बरे करूं इच्छितोस ? यास्तवत्या तुझ्या बोलण्याचा मुळीच विश्वास धरीत नाही||३२|| अर्थः---अर्जुन म्हणाला-मी बलराम नाही आहे,श्रीकृष्ण नाही आहे व प्रदुम्नही नाही आहे तर,ज्याचे –गांडीवनामक वीर आहे||३३|| अर्थ:---हे ब्राम्हणा,युद्धामध्ये शंकरालाही संतुष्ट करणाऱ्या पराक्रमाचा तूं अवमान करूं नकोस.हे प्रभो,प्रसंगी युद्धामध्ये मृत्यूलाही जिंकून तुझ्या प्रजेला घेऊन येईन||३४|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे अर्जुनाने विश्वास उतोंन केलेला तो ब्राम्हण,संतुष्ट होऊन अर्जुनाला पराक्रम लोकांना वर्णन करीत आपल्या घरी निघून गेला||३५|| अर्थः---पुढे कांही काळाने स्त्रीचा प्रसूतीकाळ जवळ आला असतां,चिंतेने व्याकूळ झालेल्या त्या ब्राम्हणश्रेष्ठाने,अर्जुनाला,आतां माझ्या प्रजेचे रक्षण कर,असे सांगितले||३६|| अर्थः---तेव्हा त्या अर्जुनाने,शुद्ध उदकाचे आचमन करून,शंकराला नमस्कार करून व दिव्य अस्त्रांचे स्मरण करून,सज्य केलेले गांडीव धनुष्य हातांत ग्रहण केले||३७|| अर्थः---आणि त्या अर्जुनाने अनेकप्रकारच्या अस्त्रमंत्राचा प्रयोग केलेल्या बाणांनी ते बाळतिनीचे घर सर्व बाजूंनी रोधून टाकिले.ते असे कि,आडवे,तर व खाली बाण सोडून त्या घराला बाणांचा पिंजरा केला||३८|| अर्थः---नंतर त्या ब्राम्हणाच्या स्त्रीला पुत्र झाला.तो वारंवार रडत असतां एकाएकी शरीरासह आकाशमार्गान गुप्त झाला,म्हणजे त्याचे प्रेतसुद्धा मुळीच दिसत नाहीसे झाले||३९||तेव्हा तो ब्राम्हण,श्रीकृष्णाच्या संनिध अर्जुनाची निंदा करीत म्हणाला कि,-अहो माझा तरी केवढा हा मूर्ख पणा !पहा,ज्या मी,नपुंसक अशा ह्या अर्जुनाचे व्यर्थ बडबडीचे भाषण विश्वासाने खरे मानिले आहे||४०|| अर्थः---यास्तव खोटे बोलणाऱ्या अर्जुनाला धिक्कार असो,आत्मस्तुती करणाऱ्या त्याच्या गांडीव धनुष्याला धिक्कार असो,जो दुर्बुद्धी अर्जुन,दुसरेठिकाणी नेलेल्या माझ्या मुलाला आपल्या मुर्खपनाने आणण्यची इच्छ करीत आहे||४१-४२|| अर्थः---याप्रमाणे तो ब्राम्हणश्रेष्ठ निंदा करती असता,अर्जुनाने पाहिले कडे जाण्याच्या आपल्या विद्येच्या स्वीकार करून,जेथे भगवान यमराजा राहत असतो त्या संयमनी नामक नगरीमध्ये गेला||४३|| अर्थः---तेथे ब्राम्हणाच्या पुत्र कोठे त्याच्या दृष्टीं पडला नाही म्हणून तेथून इंद्राच्या नगरीमध्ये गेला,तेथेही ब्राम्हणाचा पुत्र मिळाला नाही म्हणून शास्त्र उचलून अग्नी,निर्ऋति,सोम,वायू आणि तरून यांच्या नगऱ्यामध्ये जाऊन पुढे पातळ स्वर्ग व दुसरेही सर्व स्थाने शोधून पहिली परंतु कोठेंही त्याला ब्राम्हणाचा पुत्र प्राप्त झाला नाही.नंतर खोटी प्रतिज्ञा झालेला तो अर्जुन,अग्नीमध्ये प्रवेश करूं लागला,तेव्हा अनेकप्रकारच्या युक्तिनी अग्निप्रवेश करण्याचा निषेध करणाऱ्या श्रीकृष्णाने त्यास सांगितले कि,-||४४-४५|| अर्थः---अर्जुना,मी तुला ब्राम्हणाचा पुत्र दाखवितो,तूं आपणच आपली अवज्ञा करून घेउं नकोस,जे लोक,आता तुझी निंदा करीत आहेत तेच आमची निर्मळ कीर्ती स्थापन करितील||४६|| अर्थः---याप्रमाणे भाषण करून तो भगवान श्रीकृष्ण,अर्जुनासहवर्तमान दिव्य अशा आपल्या रथावर बसूब पश्चिदिशेकडे जावयास निघाला||४७|| अर्थः---सात पर्वते असलेली सात द्वीपे,सात समुद्र,तसाच लोकालोक पर्वत यांचे उल्लंघन करून त्याच्या पलीकडे सूर्याचा प्रकाश नसल्यामुळेफनिबिड असलेल्या अंधकारामध्ये प्रवेश केला||४८|| अर्थः---हे भरतश्रेष्ठा राजा,त्या दाट अंधकारामध्ये श्रीकृष्णाने शैब्य,सुग्रीव,मेघपूष्ण आणि बलाहक या नावांचे चारही घोडे पुढे चालत नाहीसे झाले||४९|| अर्थः---त्यांना पाहून महायोगेश्वरांचाही ईश्वर अशा त्या भगवान श्रीकृष्णाचे सहस्त्र सूर्यासारखा प्रकाश असलेले आपले सुदर्शन चक्र पुढे सोडिले||५०|| अर्थः---तेव्हा मनासारखा वेग असलेले ते सुदर्शन चक्र,प्रवेश करण्यास अशक्य व अत्यंत भयंकर अशा त्या प्रकृतीकार्यरूप अपार अंधकराचे,आपल्या मोठ्या तेजाने विदारण करीत,गुणापासून सुटलेला रामाचा बाण जसा रावणाच्या सेनेमध्ये प्रविष्ट झाला त्याप्रमाणे त्या अंधकारामध्ये प्रविष्ट झाले||५१|| अर्थः---तेव्हा चक्राच्या मागाहून झालेल्या द्वाराने जाता जाता पुढे त्या अंधकाराच्या पलीकडे ज्याचा अंत नाही व पार नाही असे व्यापून राहणारे भगवंताचे तेज त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडले,तेव्हा त्याने दिपवून गेलेले आपले दोन्ही नेत्र मिटले||५२|| अर्थः---नंतर ते कृष्णार्जुन,प्रचंड वायुने कंपायमान होणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी सुशोभित अशा उदकामध्ये प्रविष्ट होऊन,तेथे त्यांनी मोठ्या प्रकाशाने युक्त व प्रकाश पावणाऱ्या हजारो मणिमय स्तंभांनी सुशोभित असे एक अद्भुत घर (महाकालपूर)अवलोकन केले||५३|| अर्थः---आणि तेथे अतिभयंकर,आश्चर्यकारक,मस्तकावरील हजार फड्यांचे ठिकाणी असलेल्या देदीप्यमान मण्यांच्या कांतींनी शोभणारा,दोन हजार भयंकर नेत्रे असलेला,कैलासपर्वतासारखा पांढरा,व ज्याचा कंठ व जिव्हा हि काळी आहेत अशा शेषास पहिले||५४|| अर्थः---आणि त्याच्या शरीररुपी सुखकारक आसनावर बसलेल्या महाप्राप्ती पुरुशोत्तमोत्तम भगवंतास पहिले,तो भगवान –दाट असलेल्या मेघासारखा श्यामवर्ण,व्यापक पिवळा पितांबर नेसलेला.प्रसन्नमुख,सुंदर व दीर्घनेत्र असलेला,बहुत मोलाच्या मनी मुदायांनी जडित अशा किरीताच्या व कुंडलांच्या कांतीने चमकणाऱ्या असंख्यात कुरळ केसांनी युक्त,लांब व सुंदर अशा आठ भुजा धारण करणारा,आणि कंठामध्ये कौस्तुभ मनी,वक्षस्थळावर श्रीवत्सलांछन व पायांपर्यंत लोंबणाऱ्या वनमाळेने युक्त होता||५५-५६|| अर्थः---तसाच सुनंद,नंद इतय्दिक आपल्या पर्शादांची,मुर्तिमान असलेल्या सुदर्शनादिक आयुधांनी,पुष्टी,लक्ष्मी.कीर्ती माया व सर्व सिद्धी यांनी सेवन केलेला असून तो ब्रह्मादिकांचा अधिपती होता||५७|| अर्थः---त्या जन्मरहित अशा भूमानामक भगवंताला श्रीकृष्णाने वंदन केले व त्याच्या दर्शनाने भयाभीत झालेल्या अर्जुनानेही त्यास वंदन केले आणि ते दोघेजानही त्याच्या पुढे हात जोडून उभे राहिले.तेव्हा ईश्वरांचेही ईश्वर असा तो भूमा भगवान,हास्य करून गंभीरपणाने त्या कृष्णार्जुनाने म्हणाला कि,-||५८|| अर्थः---कीर्त्याजया कीर्ती सहितया अजया अखिल ब्राम्हणाच्या पुत्र आपल्या जवळ आणिले आहेत,पृथ्वीवर धर्माच्या रक्षणाकरिता तुम्ही दोघेही माझ्या अंशाने प्रगट झाला आहां,यास्तव आता पृथ्वीला भारभूत असलेल्या दैत्यांना लवकरच मारून पुन्हा येथे माझ्यावर या ||५९|| अर्थः---तुम्ही दोघेही श्रेष्ठ नरनारायण ऋषी असून पूर्णमनोरथ आहां तथापि जगाच्या रक्षणाकरिता लोकसंग्रहार्थ धर्मांचे आचरण करा||६०|| भावार्थ:--- भगवंतांचे स्वरूप असलेले शेष नारायणांना नर—अर्जुन व नारायण म्हणजे विष्णू यांच्या दर्शनांची इच्छा झाले,ते आपल्याकडे यावेत,म्हणून ही कौताकाने लीला केली.दर्शन घेऊन,ती मुले सर्व परत केली.त्या मुलांना घेऊन द्वाकेत ब्राहाणांकडे आले व ती बालके त्या ब्राह्मणास देऊन टाकली.||५९|| | पूर्णकामावपि युवा नरनारायणावृषी | धर्ममाचरतां स्थित्यै ऋषभौ लोकसंग्रहम् ||६०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे त्या भूमा भगवंताने आज्ञा केलेले ते कृष्णार्जुन ,बरे आहे असे म्हणून,त्याची आज्ञा स्वीकारून त्या भूमा भगवंताला नमस्कार करून व ब्राम्हणाचे पुत्र घेऊन हर्ष युक्त असता ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने माघारे द्वारकेस आले आणि आणि त्यांनी जसे पूर्वीचे रूप वय होते त्याप्रमाणे कोठे लहान असलेल्या ब्राम्हणाच्या पुत्रांस आणून समर्पण केले||६१-६२|| भावार्थ:--- भगवंत नर—नारायणांना म्हणतात कि,”तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात.तरीपण जगाच्या कल्याणासाठी व त्यामुळे धर्मांचे शिक्षण देण्यासाठी आपण मृत्यू लोकात गेलेले आहात.शेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करत असतात,म्हणून धर्मानुसार आचरण करून धर्मांचा उपदेश करा.लोक हे आपण अनुकरण केले तर त्याप्रमाणे वागत असतात.आपण धर्मांचे अनुकरण न करता फक्त उपदेश केला तर लोक धर्माचे आचरण करत नाही.म्हणून संत—महात्मा यांणी धर्मानुसार आचरण करून उपदेश करावा.फक्त शब्दज्ञानी न होता,त्याप्रमाणे अनुभवी ज्ञानी होऊन धर्मांचा उपदेश करा.||६०|| अर्थः---विष्णूचे ते महाकालपूररूप स्थान पाहून परम आश्चर्य पावलेल्या अर्जुनाने,मनुष्यांच्या जो कांही पराक्रम आहे तो सर्वही श्रीकृष्णाच्या कृपेनेच प्राप्त झालेला आहे असे मानिले||६३|| अर्थः---याप्रमाणे असे अनेकप्रकारचे पराक्रम या भूलोकी,करून दाखविणाऱ्या श्रीकृष्णाने संसारसंबंधी विषयांचे सेवन केले आणि पुष्कळ दक्षिणायुक्त यज्ञांनी देवादिकांचे आराधन केले||६४|| | इतीदृशान्यनेकानि विर्याणीह प्रदर्शयन् | बुभुजे विषयान् ग्राम्यानीजे चात्यूर्जीतैर्मखैः ||६४|| अर्थः---सर्वामध्ये श्रेष्ठत्त्व पावलेल्या त्या भगवंताने,इंद्र जसा योग्यकाळी लोकांवर जलाची वृष्टी करितो त्याप्रमाणे ब्राम्हनादिक प्रजांवर त्यांची इच्छित सर्व मनोरथांचा योग्य काळी वर्षाव केला||६५|| अर्थः---आणि कितीएक अद्धार्मिकराजांना स्वता मारून व कित्येकांना अर्जुनादिकाकडून मारवून युधिष्ठीर इत्यादिक धार्मिक राजाच्या द्वराने अनायासाने धर्माची प्रवृत्ती केली||६६|| भावार्थ:---भगवंत श्रीकृष्ण यांनी कांही अधर्मी राजांना स्वत: मारले व बऱ्याचशा अधर्मी राजांना इतराकडून मारले.असा रीतीने अधर्मी राजांना नष्ट केले.दुष्टांचा संहार केला.धर्माप्रमाणे आचरण करून धर्मांची स्थापना केली.आपणही—संत—महात्मा यांनी धर्मांनुसार आचरण करून धर्मांचा उपदेश व प्रसार करावा.||६६|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानांच्या दशमस्कंधातील उत्तरार्धात द्विजपुत्रानयननामक हा एकूणनव्वादावा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________________________ ९०--- २---मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे.---१--- _________________________________________________________________________________________________________________________ अर्थ:---आता श्रीकृष्णाची विभूती संक्षेपाने दर्शवित श्रीशुक्रचार्य म्हणाला –हे राजा सर्व संपत्तिनी समृध्द ,श्रेष्ठ यादवांनी सेवन केलेली फिल झाडाच्याच बागणी व फलयुक्त वृक्षांच्या उपवनानी संपन्न ,प्रफुल्लीत झालेल्या वृक्षांच्या रंगावर संचार करणाऱ्या भ्रमारणी व पक्षांनी सर्व बाजूनी श्ब्द्युत केलेली आणि वस्त्रे अलंकार वगैरे धारण करणाऱ्या नूतन तारुण्याची तेजी असल्या वव आपापल्या मालामध्ये चेंडू वगैरे खेळण्याची साहित्य घेवून खेळताना विजसाराख्या चमकणाऱ्या स्त्रियांनी युक्त व मदस्त्राव होत असलेल्यामादोमद ,हत्ती अलंकार धन केलेल्र वीर घोडे व सुवर्णाने बंधाविलेले असल्यामुळे चमकणारे रथ यांची जीच्यातील मार्गात दररोज गर्दी होत असे .अशा आपल्या व्दारका नगरीमध्ये शुखाने राहणारा व सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना एकाचा आवडणारा अशा त्या लक्ष्मीपती भगवान श्री कृष्णाने ,त्या स्त्रियांच्या महास्मभूद्धीयाक्त घरामध्ये तितकी सुंदर रूपे धरण करून क्रीडा केली ||१-२-३-४-५|| अर्थः---त्या सर्व गराच्या आरामबागत जे तलाव होते त्यांची उदके त्यात प्रफुल्लीत झालेली –उत्पले ,काहारे,कुमुंडे,व कमले यांच्या सुगंधाने सुवासिक झाली होती त्या सर्व तलावाच्या काठी पक्षांचे समुदाय शब्द करीत होते ||६|| अर्थ:---त्या तलावातील उदकात प्रवेश करून महावैभवयुक्त अशा त्या श्रीकृष्णाने,स्त्रियांनी अलीन्गीत व त्याच्या कुचासाबंधी केशराने लिप्तशरीरे होऊन क्रीडा केली ||७|| अर्थ:----त्यावेळी प्रेमाने मृदंग पानाव ,चौघडे व विना वाजविणाऱ्या गंधर्वांनी त्याच्या यशाचे गायन केले सुत माघाद व बंधीजन यांनी स्तुती केली ||८|| अर्थ:---त्यावेळी हास्य करणाऱ्या त्या स्त्रियांनी पाण्याच्या व रंगाच्या पिचकार्या मरुइन्न भिजविलेल्या त्या स्त्रिया ,कृष्णाच्या हातातील पिचकार्या काढून घेण्याच्या इच्छेने कृष्णाजवळ आल्या व त्याला दृढ आलिंगन करून त्यायोगाने प्राप्त झालेल्या मदनोत्साहनिमित्त हर्षाने प्रफुल्लीतमुख असता त्या शोभू लागल्या ||१०|| अर्थ:----स्त्रियांच्या कुचासंबंधी केशराने ज्याची मला लिप्त झाली आहे ,क्रीडेच्या घाईने ज्याच्या केशबंध सुटून गेला आहे अशा तो श्रीकृष्ण हि ,स्वत वरवर त्या स्त्रियांना उलट भिज्विला असता ,हत्तीनिनी परिवेष्टित असलेल्या गजेंद्र जसा क्रीडा करितो त्याप्रमाणे त्याप्रनाने क्रीडा करू लागल्या ||११|| अर्थ:-----त्यावेळी नटना ,नातीना व गायानाव्बर व वाड्यावर जीविका चालविणाऱ्या लोकांना श्रीकृष्नाणे व त्याच्या क्रीडेकरिता जी स्वत वस्त्रे व भूषण धारण केलेली होती ती बक्शिश दिली||१२|| अर्थ:----याप्रमाणे क्रीडा करणाऱ्या श्रीकृष्णाची गती ,भाषण ,अवलोकन ,मंदहास्य थट्टा मस्करी व आलिंगन यांच्या योगाने त्या स्त्रीयाच्या बुद्धी अगदी तन्मय झाल्या ||१३|| अर्थ:----अशा प्रकारे श्रीकृष्णाकडे चित्त जडलेल्या त्या स्त्रियांनी कृष्णाचे सानिध्य नसतेवेवेळी मौनव्रत धारण करून त्या कमलनेत्राचे चिंतन करीत अनम्त्तासारखी जी अनन्वित भाषणे केली आहेत ती मी तुला सांगतो श्रावण कर ||१४|| अर्थ:----स्त्रिया म्हणाल्या –हे टिटवी ,या जगात रात्रीच्या वेळी जाग्रदवस्थेतील सर्व व्यापार सोडून देवून श्रीकृष्ण निजला असता निद्ररहित अशी तू त्याच्या निद्रेच्या भंग करीत होत्याती ओरडतेस ,निजत नाहीस ,हे तुला योग्य नाही .हे सखी ,आमच्या सारखीच तुही श्रीकृष्णाचे हस्यारहित उदार जे लीलावलोकन त्याच्या योगाने अगदी चित्त वेधून गेली आहेस कि काय ?||१५|| अर्थ:---हे चाक्रवाकी ,रात्रीच्या वेळी तू आपले डोळे मिटून का राहिला राहिला आहेस आणि करुणस्वराने तू हक मारीत आहेस तेव्हा तुझा पती तुला दिसत नाहीसा झाला आहे कि काय?किवा आमच्या सारखीच तुही श्रीकृष्णाचे दास्यत्व पावोन त्या कृष्णाच्या पायावर भक्तांनी वालीलेल्या फुलांची मला आपल्या केशपाशाने धारण करण्याची इच्छा करितेस कि काय ||१६|| अर्थ:---अरे हे समुद्रा,झोप न आलेल्या व अवलोचन जागरण झालेल्या अनिवार्य दशेला तुही पावला आहेस कि काय ?मोठी दुखाची गोष्ट आझे कि ,श्रीकृष्णाने आमच्या बरोबर संभोग करून आमची कूचक्मकुमादिक चिन्हे हरण केल्या मुलेअषा आम्ही खिन्न झालो आहो तासाचा कौस्तुभादिक चिन्हे हरण केलेल्या तू खिन्न दिसत आहेस ||१७|| अर्थ:----हे चंद्र ,तू बलवत्तर क्षयरोग ग्रस्त झाला आहेस म्हणूनच क्षीण होऊन कान्तिनी अंधकाराचा नाश करीत नाहीस .तेव्हा आमच्या सारखाच मलयसंबंधी वाऱ्या,आम्ही तुझे वाईट काय बरे केले आहे ?कि ज्याच्या योगाने तू श्रीकृष्णाच्या काताक्षणी अत्यंत भिन्न झालेल्या आमच्या हृदयामध्ये कामाची प्रेरणा करितोस ||१९|| अर्थ:----हे सुंदर मेघा ,खरोखर श्रीकृष्णाचा मित्र आहे .कारण ताप हरण करणे ,शामत्व इत्यादिक भगवंताचे गुण तुझे ठिकाणी दिसत आहेत .म्हणूनच तू आमाच्या सारखा त्याच्या प्रेमाने बद्ध होऊन श्रीवत्सलांच्छनाचे व्यान करी आहेस कि काय ?तू आमच्या सारखाच त्याच्या दर्शनादिकाविषयी अतिशय उत्कंठीत व प्रेमाने आद्र चित्त असता ,त्याचे वरवर स्मरण करून अश्रूच्या धरव सोडीत आहेस अरे त्याच्या बरोबर तू सख्या काय म्हणून केलेस ?कारण त्याची संगती विरक्ताना सुख देणारी तरी,संसारी लोकांना दुख देणारी आहे ||२०|| अर्थ:----हे मुंजालकंठ कोकिला ,तू मेलेल्यानाही संजीवन करणाऱ्या ह्या कोणाल वाणीने मला प्रियवद श्रीकृष्णाच्या शब्दासारखेचा शब्द बोलून दाखवीत आहेस ,तर आम्ही आता असे सांगा कि –मी तुझे प्रिय काय करू ||२१|| अर्थ:----हे उदारबुद्धे पर्वता,तू हलत नाहीस व बोलताही नाहीस त्याअर्थी काहीतरी मोठ्या गहन अर्थाचे चिंतन करीत आहेस ,तर आता जशा श्रीकृष्णाचे चरण स्तनावर द्झारण करण्याची इच्छा करितो तसा तुही आपल्या स्तनासारख्या शिखरांनी भगवंताचे चरण करण्याची इच्छा करीत आहेस का ?जर असे असेल तर तुलाही आमच्या सारखीच अवस्था प्राप्त झाली असेल ||२२|| अर्थ:----हे समुद्रपत्नी नद्या हो जशा आम्ही श्रीकृष्णाच्या कृपाकटाक्षाना न पावोन त्याने हृदय चोरून नेल्या मुले फारच कृश होऊन गेलो आहो ,तशा तुम्हीही सांप्रत ग्रीष्म्रऋतूमध्ये आपल्या इष्टपती समुद्राचे जल मेघाव्दरा न पावोन ज्याचे डोह शुष्क होऊन गेले आहेत व ज्यांची अमलशोभा निगुन गेली आहे अशा फारच कृश झाला आहा मिळून तुमचा पती समुद्र मेधाव्दरा अमृतवृष्टीने तुम्हास आनंद देत नाही त्ये पाहून आम्हास फार वाईट वाटते ||२३|| भावार्थ:--- जो ज्ञानी ब्राह्मणद्रोही म्हणजे अशा ब्राह्मणाचा अपराध करणारा,कृतघ्न असणारा,सत्ताधीश धूर्त म्हणजे स्वत:पुरते पाहणारा,लोभी म्हणजे जड,धन,मान,प्रतिष्ठा यात जो आसक्त—असावा वाटणारा---झालेला आहे,त्यास “लोभी” असे म्हणतात.विषयांच्यात आसक्त म्हणजे विषयचपासूनच सुख असावे वाटते असा जो आहे त्यास “पामर” असे म्हणतात.असे सत्ताधीशात दोशी असल्यामुळे त्या ब्राह्मणाच्या बालकाचा मृत्यू झाला.म्हणून सत्ताधीश हे ब्राह्मणद्रोही नसावेत,तर ते ब्राह्मणद्रोही नसावेत,कारण त्यांनी धर्मासात्राचा व वेदांतशात्राचा अभ्यास केलेला असतो.त्यामुळे ते आपले मार्गदर्शक असतात.त्यांचा जर आपण द्रोह केला तर आपणास धर्मांचे व वेदांत—सहाराचे ज्ञान होणार नाही.त्यामुळे आपले जीवन दु:खमय होईल.याकरिता त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन मार्गदशन घ्यावे.||२४|| अर्थ:---त्याचवेळी तेथे दैवाने आलेल्या हंसाला हा दूत आहे अशी कल्पना करून म्हणाल्या हे हंसा तू आलास हि फार चांगली गोष्ट झाली तू येथे बैस आणि दुध पी,तू हंसा,तू कृष्णाची कथा आम्हास संग .तू कृष्णाचा दूत होऊन आलास हे आंम्ही जाणतो,अरे श्रीकृष्ण खुशाल आहेना?कृष्णाने तुझ्यासारखी प्रेमवती स्त्री ह्या गृहस्थाश्रमात मी कोठे पाहत नाही असे जे पूर्वी आम्हास सांगितले होते त्याचे आता क्षनिकाक्षिक्स करणारा तो कृष्ण स्प्ररण ,तरी करितो काय ?स्मरण करूनच त्याने मला पाठविले आहे असे MHANASHIUL तर हे क्षुद्राच्या दूत आम्ही त्याच्या जवळ कशाकरिता यावे ?कामसुखाकरिता तो तुम्हास बोलवीत आहे असे म्हणशील तर –त्यालाच तू बोलाव .बरे आहे म्हणून निघाल्यासारखा त्यला पाहून पुन्हा म्हणाल्या कि –जी आम्हास फसवून एकटीच त्या कृष्णाचे सेवन कारिते ,त्या लाक्ष्मिवाचून त्याला एलाडे बोलाव ती त्याचे ठिकाणी एकनिष्ठ आहे तिला डून देता येईल ?असे म्हणशील तर –आम्हा स्त्रियामध्ये तिचा एकनिष्ठ आहे काय आम्ही नाहीका ,एकनिष्ठ ?||२४-२५|| अर्थ:----त्यचे कृष्णावर असे प्रेम असणे हे आश्चर्य नाही .कारण अनेक पुरुषांनी अनेकप्रकारच्या गीतांनी अनेकप्रकारे गायन केलेल्या त्या कृष्णाचे केवळ श्रावण झाले तरी जोस्त्रीयांचे मन बलात्काराने हरण करितो.पण त्याला साक्षात पाहणाऱ्या स्त्रियांचे मन तो आकर्षण करील हे पुन्हा काय सांगावे?||२६|| अर्थः---ज्या स्त्रियांनी जगद्गुरू भगवंताचे पतीबुद्धीने चरणश्रुषुषतदिकेकरून प्रेमाने सेवन केले,त्या स्त्रियांच्या तपाचे आमच्या हातून वर्णन कसे होऊं शकेल?||२७|| अर्थ:---याप्रमाणे सत्पुरुषाची गती अशा भगवान श्रीकृश्नाच्ने वेदोक्त दर्माचे वारंवार आचरण करून घर हे धर्म ,अर्थ आणि काम यांचे स्थान आहे असे दर्शविले ||२८|| अर्थ:----गृहस्थाश्रमाच्या परम्धार्माचे सेवन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया सोळा हजार एकशे आठ होत्या ||२९|| अर्थ:----हे राजा ,स्त्रियामध्ये रत्नभूत अशा त्या स्त्रियांपैकी रुक्मिणी आदिक्ज आठ पट्टराण्या ,त्या मी तुला पूर्वी सांगितलेल्या आहेत व त्याचे त्यांचे पुत्रही अनुक्रमाने सांगितले आहेत ||३०|| अर्थ:---ह्या आठहून दुसऱ्याही जितक्या १६१०० श्रीकृष्णाच्या स्त्रिया होत्या त्या प्रत्येकीचेठीकानीही त्या सत्य संकल्प ईश्वर श्रीकृष्णाने दहा दहा पुत्र उत्पन्न केले मिळून श्रीकृष्णाचे पुत्र १६१०८० होते ||३१|| अर्थ:---त्या महापराक्रमी पुत्र मध्ये आठरा पुत्र महारथी व मोठे यशस्वी होते त्याची नवे मी तुला सांगतो ,श्रावण कर ||३२|| अर्थ:---१प्रद्युम्न ,२अनिरुध्ह, ३दिप्तीमान, ४ भानू, ५ सायं ६मधु ,७ब्रह्द्भानु, ८चित्रभानु ,९वृक,१० अरुण||३३|| अर्थ:----११पुष्कर ,१२देवबाहु,१३स्रुतदेव,१४सुनंदन,१५चित्रबहु,१६विरुप,१७कदि ,आणि १८न्यग्रोध हि होते ||३४|| अर्थ:----हे राजेंद्र भगवंताच्या ह्या सर्व पुत्रामध्येही रुक्मिणीचा प्रथम पुत्र जो महारथी प्रद्युम्न ,तो रूपाने व गुनानीही पित्य सारखाच होता ||३५|| अर्थ:----त्या महाराथ्याने रुक्म्याची क्म्या रुक्मावती वरिली .तिच्यापासून त्याला दहाहजार हत्तीचे बाल असणारा अनिरुद्धनामक पुरता झाला ||३६|| अर्थ:---रुक्म्याच्या मुलीचा मुलगा अशा त्या अनेही रुक्म्याच्या मुलाची मुलगी वरिली .नंतर त्याला तीचेठीकानी वाज्रानामक पुत्र उत्पन्न झाला मुसळाच्या निमित्ताने झालेल्या यादवच्या संहारपासून भगवंताचे अवशेष राखिले होते ||३७|| अर्थ:---त्या वाज्रापासून प्रतीबाहू झाला,त्या सुबाहुपासून शान्त्सेन झाला,त्यचा पुत्र श्रुतीसेन झाला ||३८|| अर्थ:---ह्या कुलामध्ये कोणीही निर्धन ,अल्पायु ,अल्पपराक्रमी,व ब्राम्हणाचे अभक्त असे झाले नाहीत ||३९|| अर्थ:----हे राजा ,यादुवांशात उत्पन्न झालेल्या व प्रख्यात कर्मे करणाऱ्या पुरुषांची संख्या लाखोवार्षानीही करण्यास अशक्य आहे ||४०|| अर्थ:---कारण ,यादुकुळातील अपरिमिती बालकांना विद्या शिकविणारे गुरु तीन कोटी हजार आठशे (३०००८८००)होते असे ऐकण्यात आहे ||४१|| अर्थ:---मग महात्म्या यादवांची संख्या कोण कर शकेल ?जेथे आयुताच्या आयुतलक्षासह्वार्मान तो उग्रसेन राजा राज्य करीत होता ||४२|| अर्थ:----पूर्वी अमृतप्रप्तीसाठीन देव्दैत्यचा संग्राम झाला ,तेथे जे अतिभयंकर दैत्य मारले गेले होते ते प्रत्येक ,बहुत रूपांनी मनुष्यामध्ये उत्पन्न होऊन गर्विष्ठ होत्साते प्रजाना दु:ख देवू लागले म्हणून ||४३|| अर्थ:---हे राजा त्याच्या नाश करिता हरीने आज्ञा केलेले देव ,यादवाकुळात प्रकट झाले असून त्यांनी एकशे एक (१०१)कुळे होती ||४४|| अर्थ:----त्या कुलना प्रभूत्वेकरून मान्य असा भगवान श्रीकृष्णाच होता .जे यादव त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वागणारे होते ते सर्वही धन ‘बळ इत्यादिकेकारून वृद्धी पावले ||४५|| अर्थ:---आता त्यांचे दु:ख विसरण्याचा प्रकार सांगतो –कृष्णाचे ठीकानी चित्त जडलेल्या त्या यादवांनी ,निजणे,फिरणे,बसने,बोलणे,खेळणे,व स्नान करणे इत्यादी कर्मामध्ये तत्पर असलेल्या देहाचे सुद्धा भान राखले नाही ,मग ते अन्य सव दुखे विसरले हे काय सांगावे !||४६|| अर्थ:---आता कृष्ण कीर्तीचे जे सर्वतीर्थत्तमत्व व श्रीकृष्णाचे जे सर्वदेवोत्त्मत्व व ती आचर्य कारक नाहीत ,असे सांगतो हे राजा ,यापूर्वी भागवताचे चरणक्षलनोदक जी गंगा तिचा सर्वाहून मोठे तीर्थ होते आता तर यादावामध्ये जे श्रीकृष्णाचे कीर्तीरूप तीर्थ उत्पन्न झाले ते त्या गंगा पेक्षा सर्वत्र सुलभ व अधिक सामर्थ्यायुक्त असल्यामुळे त्यने ते गंगारूप तीर्थ अल्प करून सोडिले ज्या श्रीकृष्णाच्या परम दयाळूत्वामध्ये शत्रू हे सर्वही सायुज्यमुक्ती पावले,जी आपणास प्राप्त होण्याकरिता ब्राम्हदिकांचा प्रयत्न चालला आहे ती कोणासही प्राप्त न होणारी परिपूर्ण लक्ष्मी,ज्या श्रीकृष्णाच्या आश्रयाने राहिली आहे,ज्यांचे नांव श्रवण केले असता किंवा उच्चारिले असतां ते सर्व प्रकारच्या अमंगलपानाचा नाश करिते,व ज्याने अनेक ऋषींच्या वंशांमध्ये धर्माची प्रवृत्ती केली आहे,त्या कालमुर्ती व चक्रायुध धारण करणाऱ्या श्रीकृष्णाचे हे पृथिवीचा भार हर्न करणे आचार्यकारक नाही म्हणजे सर्वसहार कालमुर्ती व चाक्रयुद्ध विशेषेकरून अनंत प्रभावाचे चक्र धारण करणाऱ्या श्रीकृष्णास हे कृत्य कतीसे आहे ?काहीच नाही ||४७|| अर्थ:----देवाकीचेठीकानी जन्माला असे वर्णन मात्र इलेला परंतु वस्तुतः जन्मरहित ,इच्छामात्राने अधर्म घालविण्यासाठी समर्थ असूनही क्रीडेकरिता आपल्या बहूनि अधर्म दूर करणारा ,अधिकाराची अपेक्षा न धरता वृदावानातील स्थावरजंगम जीओवाच्या सासरदुखाच्या नाश करणारा आणि सुंदर मंदहास्य्युक्त श्रीमुखाने गोकुळवासी व नागर्वाशी ,स्त्रियांना भागेव्दरा मोक्ष देणारा असा तो जगन्निवास भगवान श्रीकृष्ण ,श्रेष्ठ यादवांनी सेवीत असता उत्कर्ष पावत आहे ||४८|| अर्थ:---याप्रमाणे आपल्या वेदिक्त धर्माच्या रक्षणाकरिता त्याच्या कार्माच्याप्रसंगी मात्स्यदिक अनेक अवतार धारण करणारा परंतु त्यात विशेषकरून यादावश्रेष्ठ श्रीकृष्ण श यया परमात्म्याची मनुष्यावातर रूप चेष्ठेचे अनुकरण करणारी असून जीवाच्या कर्मबंधना तोडून टाकणारी जी कर्मे आहेत ती या श्रीकृष्णाच्या चरणाचे ठिकाणी आसक्तीच्या इच्छा करणाऱ्या पुरुशाने अवश्य श्रावण करावी||४९|| अर्थ:---- म्हणजे श्रीकृष्णाच्या सुंदर काठच्या श्रवनकीर्तनासह चिंतनाने प्रतिक्षणी व्रुधीगत झालेल्या त्या आस्क्तीनेचा मनुष्य काळाच्या दुस्तर वेगाची शांतता करणाऱ्या त्यच्या लोकास तो लोक इतका दुर्लभ आहे कि मोठे मोठे रजेहि त्याच्या अभिलाशाने आपल्या र्राज्यादिकाच्या त्याग करून श्रावनदी साधनांचा अनुष्ठानाकरिता गावातून निघून वनात गेले आहेत ||५०|| भावार्थ:--- ज्याच्या राज्यात ज्ञानी ब्राह्मण धन,स्त्री व पुत्राच्या वियोगामुळे दु:खी होतात, त्यांना सत्ताधीस म्हणून राहण्याचा अधिकार नाही.त्यांनी त्या पदाचा त्याग करावा.ते फक्त पोट भरण्यासाठी सत्ताधीश झालेले आहे.म्हणून सत्ताधीशांनी ज्ञानी ब्राह्मणांना धन—मान—प्रतिष्ठ व स्त्रीचे—सर्वांचे संरक्षण करावे.||२९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कांधांतील उत्तरार्धात कृष्णक्रीडानिरुपणनामक नव्वदाव अध्याय समाप्त झाला||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| इति दशमस्कन्धोत्तरार्ध: | | श्रीकृष्णार्पणमस्तु | | ||हरी:ॐतत्सत|| | ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment