अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः सातवा
| ॐ नमो भगवते वासुदेवाय l श्रीमद्भागवतमहापुराण | =============================================================== | सप्तम स्कंध: (सातवा स्कंध:) | =============================================================== | ||श्री गणेशाय नमः|| | |१---आतां या स्कंधामध्ये पंधरा अध्यायानी ऊतीचे(जीवाच्या त्या त्या कर्मानुसार होणाऱ्या वासनांचे) वर्णन केले आहे.त्यंत पहिल्या दहा अध्यायांनी हिरण्यकशिपु व त्याचा पुत्र प्रल्हाद यांची बुद्धी निरनिराळी असल्यामुळे सज्जनांचा कोप आणि कृपा यांच्या योगाने उत्पन्न झालेल्या वासनांचा भेद सांगितला आहे व कर्माच्या योगाने चित्तशुद्धी झाली म्हणजे जीवाला सद्वासना उत्पन्न होते म्हणून पुढच्या पाच अध्यायांनी धर्मनिर्णय केला आहे.ह्या पंधरा अध्यायांपैकी पहिल्या अध्यायांत आपल्या विष्णूभक्त पुत्राचेठिकाणी हिरण्यकशिपुचा ब्राह्माणाच्या शापामुळे घडलेला विरोध सांगितला आहे.||१|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---राजा म्हणाला:---हे ब्राह्मन्,सर्वभूताचेठिकाणी हित करणारा,त्यांना आवडणारा व त्याचेठीकानी समदृष्टी ठेवणारा अशा भगवंताने इंद्राच्या पक्षपाताने केवळ शत्रूप्रमाणे दैत्याचा वध स्वत: कसा केला ? ||१|| भावार्थ:---कारण साक्षात् परमानंदस्वरूपी अशा ह्या विष्णूला देवापासून काही कार्यभाग करून घ्यावयाचा नसल्यामुळे,देवांवर त्यांची प्रीती संभवत नाही,व असुरांपासून त्याला भीती नसल्यामुळे त्यांच्याशी त्याचा द्वेष असण्याचाहि संभव नाही.||२|| भावार्थ:---असे असता हे महाभाग्यवंता,देवावर अनुग्रह व दैत्याच्या निग्रह त्याने केलेला दिसतो म्हणून श्रीनारायनाच्या गुणांविषयी आम्हाला हा मोठा संशय उत्पन्न झाला आहे तो तू दूर करावास.||३|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे महाराजा,ज्यामध्ये,अतिशय पुण्यकारक आणि ईश्वरभक्तीची वृद्धी करणारे भगवद्भक्त प्रल्हादाचे महात्म्य नारदादि ऋषींना गायन केले आहे त्या अद्भुत हरिचरित्राविषयी तू फार उत्तम प्रश्न केलास,तस्मात् व्यासमुनीला नमस्कार करून मी आता हरिकथा कथन करण्यास आरंभ करितो.||४-५|| भावार्थ:---हे राजा,मायातीत,निर्गुण,जन्मादिविकारशून्य देहेंद्रियारहित असाही भगवान,आपल्या मायेच्या सत्वादी गुणामध्ये प्रवेश करून देवदैत्यामध्ये परस्पर असलेल्या बाध्यबाधक धर्माला कारण झाला आहे.ज्या परमात्म्याने मायाचा स्वीकार करून त्या मायाच्याच सत्व-गुण,रजो-गुण,व तमो-गुणाचा स्वीकार करून देव--दैत्याच्या बाध्य-बाधक धर्माचे "कार्य" झाला नाही,तर"कारण"झाला.म्हणून आपण--- जीवानी बाध्य-बाधक धर्माचा--कार्याचा त्याग करून कारण व्हावे.||६|| भावार्थ:---आता सत्वादिगुण जर स्वत: ईश्वराचेठीकानी असतील तर प्राकृतपुरुषाप्रमाणे तोहि विषमबुद्धी होईल परंतु तो प्रकार मुळीच नाही असे सांगतात----हे राजा,सत्व,रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत,परमात्म्याचे मुळीच नाहीत.कारण गुणांमध्ये ईश्वराचा प्रवेश,"काळामुळे" होतो असे सांगतात---हे राजा,त्या सत्वादिगुणांचा ऱ्हास किंवा वृद्धी एकदम घडत नाहीत.||७|| भावार्थ:---सत्वगुणाच्या जयकाली परमात्मा त्या काळाला अनुकूल होवून देव आणि ऋषी ह्यांच्या देहामध्ये प्रविष्ठ होवून त्यांना वाढवितो,तसाच रजोगुणाच्या जयकाली यक्ष व राक्षस ह्यांच्या देहामध्ये प्रविष्ठ होवून त्यांना वाढवितो.||८|| भावार्थ:---आता,समपदार्थ असूनही निमित्तभेदामुळे त्याचेठीकानी वैषम्य प्राप्त होते ह्याविषयी दृष्टांत--- पूर्वक सांगतात की,---जसे अग्नी,उदक व आकाशवगैरे पदार्थ,काष्ठ,जलपात्र व घटादिकाचेठीकानी त्यांच्या त्यांच्या सारखे अनेकरूपांनी भासतात त्याचप्रमाणे भगवानही देवाधीदेवाचेठिकाणी भासमान होतो परंतु जसे अग्नीवगैरे काष्ठादिकाचेठिकाणी भिन्नत्वाने अनुभवास येतात तसा मात्र तो अनुभवास येत नाही.परंतु,एवढ्यावरून तो नाहीच असेही म्हणता येत नाही.कारण,सुर्यकांतामध्ये अग्नी प्रत्यक्ष दिसत नसूनही दाहशक्तीच्या अनुभवाने जसा त्याठिकाणी तो आहे असे समजावे अथवा वायू दृष्टीगोचर नसूनही गंधाचा अनुभव आला म्हणजे जसे त्याचे ज्ञान होते त्याचप्रमाणे सृष्ट्यादि कार्ये अनुभवास आली म्हणजे निपुण लोक,विचार करून व स्वभाव,काळ आणि कर्म
इत्यादिवादांचा निषेध करून,आपलेठिकानीच असलेल्या परमात्म्याला जाणतात.म्हणून आपण--जीवानी दृष्टी-गोचर परमात्मा नसला तरी तो कार्यावरून आहे,असे जाणून--निश्चय करून जाणून अनुभव घ्यावा.||९|| भावार्थ:---असो.याप्रमाणे मायागुणांच्या योगानेच हे ईश्वराचेठिकाणी वैषम्य भासते ते स्वाभाविक नाही असे सांगितले.आतां,गुणांच्या अधीन असल्यामुळे ईश्वराला अनीश्वरपणा प्राप्त होईल तर सांगतात की,--जेव्हा जीवाच्या भोगाकरिता परमेश्वराला शरीरे उत्पन्न करण्याची इच्छा होते तेव्हां तो साम्यावस्थेमध्ये असलेल्या रजोगुणाला आपल्याला मायेच्या योगाने निराळा करून त्याची वृद्धि करितो,तशीच जेव्हां त्याला चित्रविचित्र शरीरांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा होते तेव्हा सत्त्वगुणाला निराळा करून त्याची वृद्धि करितो आणि जेव्हा क्रिडेचा उपसंहार करण्याची तशीच इच्छा होते तेव्हा तो विश्वाच्या संहार करण्याकरितां तमोगुणाला पृथक करून त्याची वृद्धी करितो.याप्रमाणे ईश्वर आपल्या--जीवाच्या कर्मानुसार त्या--त्या जीवाला त्याप्रमाणे ती--ती फळे देतो.||१०|| भावार्थः---आतां जेव्हा आणि तेव्हा ह्या कालबोधक शब्दांवरून ईश्वर काळाधीन आहे असे भासते त्याचे निवारण करीत ईश्वर प्रकृतीच्या व पुरुषाच्याहि अधीन नाही असे सांगतात---हे नरेंद्रा,निमित्तभूत असलेल्या प्रकृतिपुरुषांच्या योगाने सृष्टयादिक सकल व्यापार करणारा हा ईश्वर,प्रकृतिपुरुषांना साहाय्य असल्यामुळे त्यांचा आश्रयभूत अशा कालाला आपण स्वतःच उत्पन्न करितो.तो काल,ईश्वरचेष्टारूप असल्यामुळे ईश्वराला कालाधीनपणा नाही.परंतु हे सांगण्याचा प्रस्तुतविषयाशी काय संबंध आहे? अस म्हणशील तर---हे राजा,जो काल आहे तो सत्वगुणांची वृद्धी करितो म्हणून त्याचा नियंता हा महाकीर्तिमान देवप्रिय ईश्वरही सत्गुणप्रधान अशा देवसमुदायाची वृद्धी करितो आणि रजोगुण तमोगुणप्रधान असे देवांचे शत्रु जे असुर त्यांचा वध करितो.सारांश,कालशक्तीमुळे क्षुभित झालेल्या गुणामध्ये असलेले वैषम्य,त्याचा अधिष्ठाता जो ईश्वर त्याचेठिकाणी सांनिध्यामुळे स्फुरण पावते.||११|| भावार्थः---असो.ह्याप्रमाणे भगवंताच्या गुणांविषयी प्राप्त झालेला राजाचा संशय दूर करून आतां ईश्वराने त्या काली त्या हिरण्याक्षहिरण्यकशिपूचा जो वध केला तो देवांच्या पक्षपाताने केला नाही,तर ब्रह्मशापामुळे दैत्ययोनी पावलेल्या त्या आपल्या द्वारपालांवर अनुग्रह करण्याकरितांच त्यांचा वध केले.हे सांगण्याच्या आशयाने इतिहास कथन करितात की,---हे राजा,ईश्वर द्वेषादिशून्य असतांही त्याने दैत्यांचा वध केला ह्याविषयी राजसूयनामक महाक्रतुमध्ये पूर्वी युधिष्ठिराने प्रश्न केला असतां देवर्षी नारदाने प्रीतीने त्याला इतिहास सांगितला आहे तो असा की,----------------------------||१२|| भावार्थः--राजससूयनामक महाक्रतुमध्ये भगवान वासुदेवाचेठिकाणी शिशुपालालाप्राप्त झालेले अतिआश्चर्य- कारक सायुज्य अवलोकन करून,पांडूपुत्र धर्मराजाच्या मनाला आश्चर्य वाटले तेव्हा सर्व मुनि ऐकत असतां यज्ञामध्ये त्या धर्मराजाने तेथे बसलेल्या देवर्षी नारदमुनीला असा प्रश्न केला की,----||१३-१४|| भावार्थः---युधिष्ठिर म्हणाला---अहो नारदमुनि,हा शिशुपाल श्रीकृष्णाला द्वेष करीत असून त्याला मायातीत अशा वासुदेवरूप तत्त्वामध्ये,एकनिष्ठ भक्तांनाही दुर्लभ अशी सायुज्यमुक्ति प्राप्त झाली हे अत्यंत आश्चर्य आहे!||१५|| भावार्थः---तस्मात् हे मुने,आम्हां सर्वांनाही हे जाणण्याची इच्छा आहे,कारण,भगवन्-निंदेमुळे वेनराजाला ब्राहमणांनी नरकात पाडिले,त्याचप्रमाणे यालाही नरकप्राप्ती व्हावयाची असती.||१६|| भावार्थ:---कारण,दमघोशाचा पुत्र पापी शिशुपाल तसाच त्याचा कनिष्ठ बंधू दुर्बुद्धी दंतवक्र हे दोघेही अगदी बाल्यावस्थेमध्ये कोमल(बोबडे)शब्द उच्चारू लागल्यापासून तो आतापर्यंत भगवान गोविंदाशी मत्सरबुद्धीने गाली--शिव्या प्रदान--देत--करीत आहेत.||१७|| भावार्थ:---म्हणून अपक्षयशून्य अशा ब्रह्मस्वरूप श्रीविष्णूची वारंवार निंदा करणाऱ्या यांच्या जिव्हेवर कुष्ट न उठता व ते स्वत: घोर नरकामध्ये प्रविष्ठ न होता त्या दुर्लभस्वरूप भगवंताचेठिकाणी सर्वसमक्ष अनायासाने त्यांचा लय कसा झाला?हे अवलोकन करून,वायुने भ्रमण पावणाऱ्या दिपज्वले--- प्रमाणे माझी बुद्धी भ्रमण करीत आहे.कारण,हे आश्चर्य आहे!यास्तव ह्याविषयी हेतु काय आहे ते तू सर्वज्ञाने कथन करावे.||१८-१९-२०|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,धर्मराजाचे ते भाषण श्रवण करून भगवान नारद ऋषी संतुष्ट झाला आणि सर्वसभा श्रवण करीत असता,त्या धर्मराजाला संबोधन देवून कथन सांगू लागला की,------------------||२१|| भावार्थ:---अहो,भगवन्-निंदकाला अवश्य नरक प्राप्त होतो असे म्हणण्यामध्ये तुझा अभिप्राय काय आहे ? निंदा केली असता ईश्वराला पीडा झाल्यामुळे त्याच्या क्रोधाने निंदकाला नरक प्राप्त होतो असे तुला वाटते किंवा पीडावगैरे जरी होत नाही तथापि सुरापानदिकाप्रमाणे निषिद्ध असलेल्या भगवन्निंदेच्या आचरणापासून उत्पन्न झालेल्या दोषानेच नरकप्राप्ती होते असे तुझे मत आहे ? बरे निंदेमुळे भगवंताला पिडा होते,असे जर म्हणावे तर पिडादिक होण्यास देहाभिमाने केलेली निंदादिकच कारणें आहेत आणि ईश्वराच्या-ठिकाणी देहाभिमानाचावगैरे गंधहि नाहीं,तस्मात्-त्याला पीडा होत असेल शंका-- सुद्धा नको,असें सांगण्याच्या अभिप्रायाने नारद म्हणाला की,---हे राजा,निंदा,स्तुती,सत्कार आणि तिरस्कार ह्यंचे ज्ञान होण्याकरिता प्रकृतीच्या अविवेकाने--अज्ञानाने शरीराची रचना झाली आहे.म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे अज्ञान व अभिमान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||२२|| भावार्थ:---हे राजा,त्याच्या--अज्ञानाने व अभिमानाने प्राण्यांना जसे त्याविषयी अहंताममतारूप--देह मी आहे व देहसंबंधी माझे आहेत असे वैषम्य उत्पन्न होते आणि त्या वैषम्याने ताडन व निंदा म्हणजे मारण्याच्या योगाने हिंसा व निंदेच्यायोगाने पिडा हि होतात आणि ज्या देहाचेठिकानी हा अभिमान अतिदृढ झालेला असतो त्या देहाचा वध झाला म्हणजे प्राण्यांना वध केल्याचे पाप लागते तसे ईश्वरास लागत नाही.कारण,तो सर्वांचा आत्मा अद्वितीय असल्यामुळे त्याचेठीकानी प्राण्यासारख्या अभिमान नाही व तो परमात्मा दैत्याच्या हिताकरिता त्यांना दंड करीत असतो म्हणून त्याला हिंसादोष कशाने लागणार ? लागावयाचाच नाही.म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे अज्ञान व अभिमान निवृत्त करून सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव त्यामुळे आपली जीवदशा निवृत्त होऊन परमात्मारूप--सुखरूपतेचा अनुभव येतो.||२३-२४|| भावार्थः---असो.जर म्हणावे तर पिडादिक होण्यास देहाभिमानाने केलेली निंदादिकच वैषम्य नाही त्याअर्थी जो पुरुष कोणत्या तरी उपायाने त्या भगवंताचे ध्यान करितो,त्याचे ध्यानाच्याच योगाने निंदादिकृत पातक नाहीसे होऊन त्याला सायुज्य प्राप्त होणे योग्य आहे अशा आशयाने नारद म्हणतो की,----हे राजा,ह्याकरिता वैरानुबंध,निर्वैर भक्तियोग,भय,स्नेह अथवा काम ह्यांपैकी कोणत्याही उपायाने ईश्वराचेठिकाणी मन लावावे.आपला--जीवाचा विषय भगवंत असावा,निमित्य कोणतेही असले तरी चालते."निमित्य--गौण" आहे.निमित्य महत्वाचे नसून "विषय" महत्वाचे कारण आहे.कारण ह्या उपायांनी मन लागले असतां पुरुषाला ईश्वरव्यतिरिक्त वस्तु अगदी दिसेनाशी होते.भगवंत महत्वाचा असल्यामुळे,"भगवंताशिवाय--परमात्म्याशिवाय" इतर वस्तू दिसत नाही.सगळीकडे भगवंत--परमात्माच आहे,अशी अनुभूती येते.||२५|| भावार्थ:---आता त्या उपयामध्येहि--निर्वैर,भक्तियोग,भय,स्नेह,यापेक्षा "वैरानुबंध--श्रेष्ठ' आहे अशा अभिप्रायाने म्हणतो की,---हे राजा,वैरानुबंधाच्या योगाने जसा मानव तन्मय होवून जातो तसा भक्तियोगाने होत नाही,असा माझ्या(शुकाचार्यांच्या,)बुद्धीचा निश्चय केला आहे.||२६|| भावार्थ:---कारण,जसा ‘कुंभारिण’या नावाच्या भ्रमराने भिंतीवर घर बांधून ठेविलेला कीटक द्वेष व भय यांच्या योगाने निरंतर त्याचे स्मरण करीत असल्यामुळे त्याच्या स्वरूपास पावतो त्याप्रमाणेच मायेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या भगवान सदानंदरूप ईश्वराचेठिकाणी वैरभाव धारण करून त्याचे वारंवार चिंतन करणारे कितीएक प्राणी निष्पाप होवून त्याच्या स्वरूपास प्राप्त झाले आहेत.||२७-२८|| भावार्थ:---हे राजा,काम,द्वेष,भय,स्नेह अथवा भक्ती ह्या साधनांनी ईश्वराचेठिकाणी मन लावून व त्या कामादिनिमित्तक पातकांचे निरसन करून पुष्कळ लोक त्याच्या सायुज्यगतीला प्राप्त झाले आहेत.||२९|| भावार्थ:---ते येणेप्रमानेच-कामाच्या योगाने गोपी,भयामुळे कंस,द्वेशाने शिशुपालक-प्रभृती राजे,संबंधाने यादव,स्नेहामुळे तुम्ही आणि हे धर्मराज,भक्तीने,आम्ही त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो आहो.||३०|| भावार्थ:---तर मग वेनराजाला ब्राहमणांनी कशाकरिता नरकामध्ये पाडिला असे म्हणशील तर त्याला भगवंताचे तीव्र ध्यान न घडल्यामुळे त्याचे पातकच फलद्रूप झाले असे सांगतो--–हे राजा भयादिकांना श्रीहरीचे चिंतन करणाऱ्या वर सांगितलेल्या पाचांपैकी वेनराजा कोणीहि नव्हता,म्हणून त्याची तशी गती झाली.असो.कोणत्यातरी उपायाने कृष्णाचेठिकाणी मन लावावे,हा महत्वाचा भाग आहे.||३१|| भावार्थ:---ह्याप्रमाणे इतिहाससंबंधी उपोद्धात कथन करून,श्रीकृष्णाचेठिकाणी शिशुपालाचे वैर असण्याचे कारण काय,?हे समजण्यासाठी तो इतिहास कथन करितात की,---हे पांडुपुत्र,शिशुपाल आणि दंतवक्त्र हे जे तुम्हा पांडवांचे माऊसभाऊ ते विष्णुच्या पार्षदगणांपैकी मुख्य असून ब्राह्माणांच्या शापामुळे वैकुंठस्थानापासून च्युत झाले होते.||३२|| भावार्थः---युधिष्ठिर म्हणाला---हे मुने,हरिदासांचाहि पराभव करणारा असा कोणाचा व कसला शाप झाला ? अहो,हा शाप मला तर अविश्वसनीय असल्यासारिखा भासतो.कारण,श्रीहरीच्या एकनिष्ठ भक्तांना जन्म प्राप्त होणे म्हटले असंभवनीय आहे.||३३|| भावार्थः---आणि त्यांना जन्महेतुभूत असे प्राकृत,देह,इंद्रिये व प्राण हे मुळीच नसून त्याचे देह शुद्धसत्त्वमय आहेत व ते वैकुंठपुरीमध्ये वास करीत असतां त्यांनाही प्राकृतदेहांचा संबंध झाला असे ज्यामध्ये आहे ते हे आख्यान तुम्ही आम्हांला कथन करा.||३४|| भावार्थः---नारद म्हणाला---हे राजा,एकेवेळी ब्रह्मदेवाचे चार पुत्र जे सनत्कुमार,सनक,सनंदन आणि सनातन,ते त्रैलोक्यामध्ये संचार करीत करीत भगवर्छिने--भगवंताच्या दर्शनाच्या--भेटीच्या इच्छेने वैकुंठा-- मध्ये गेले.||३५|| भावार्थः---मरीचीप्रभृति पूर्वजांच्याहि आधि उत्पन्न झालेले ते मुनि,नग्न असून पांच सहा वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते म्हणून दोघां द्वारपालांनी त्यांस बालक असे समजून आंत जाण्याविषयी प्रतिबंध केला.||३६|| भावार्थः---तेव्हा क्रुद्ध झालेल्या त्यांनी त्या द्वारपालास असा शाप दिला की,तुम्ही रजोगुण व तमोगुण ह्यांनी रहित अशा मधुसुदनाच्या चरणासमीप नुसता वास करण्यासहि योग्य नाही,मग त्याची सेवा करण्यास योग्य कोठून असणार ? ह्याकरीता हे मूढहो,तुम्ही पापिष्ठ अशा असुरयोनीप्रत सत्वर निघून चला.||३७|| भावार्थः---असा शाप देतांच जेव्हा ते स्वस्थानापासून भ्रष्ट होऊं लागले तेव्हां त्या दयालु मुनींनी पुन्हा त्यांना असे सांगितले की,तुमचे तीन जन्म झाले म्हणजे हा शाप समाप्त होऊन तुम्हांला पुन्हा स्वस्थानाची प्राप्ती होईल.||३८|| भावार्थः---नंतर ते दोघे द्वारपाल,दैत्य आणि दानव ह्यांना पूज्य असे दितीचे पुत्र झाले.त्यांत "हिरण्यकशिपू" हा ज्येष्ठ असून "हिरण्याक्ष" हा त्यापेक्षा कनिष्ठ होता.||३९|| भावार्थः---श्रीहरीने नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपुचा वध केला आणि पृथ्वीचा उद्धार करण्याकरितां वराहरूप धारण करणाऱ्या त्या श्रीहरीने हिरण्याक्षाचाहि वध केला.||४०|| भावार्थः---आत हिरण्यकशिपुचा वध करण्यास कारण काय ? म्हणून विचारशील तर तर---हे राजा,हिरण्यकशिपुचे केशवप्रिय अशा आपल्या प्रल्हादनामक पुत्राचा वध करण्याची इच्छा धारून त्यास मृत्यू प्राप्त होण्याकरितां नानाप्रकारच्या यातना केल्या.||४१|| भावार्थः---परंतु प्रल्हाद,सर्वत्र सबाह्याभ्यंतरीं व्यापक ब्रह्मच आहे असे पाहणारा,सर्वभूतांचा आत्मभूत, द्वेषादिशून्य आणि ईश्वराच्या तेजाने व्याप्त असल्यामुळे,शस्त्रास्त्रप्रहारादिकांनीही त्यांचा वध करण्यास हिरण्यकशिपू समर्थ झाला नाही.||४२|| भावार्थः---नंतर दुसऱ्या जन्मी ते उभयंता विश्रवानामक ऋषीचे पुत्र केशिनीनामक स्त्रीचेठिकाणी "रावण" आणि "कुंभकर्ण" ह्या नावांनी प्रसिध्द असे सर्वलोकांना पिडा देणारे राक्षस झाले.||४३|| भावार्थ:---तेंव्हाही भगवंताने ब्राह्मणशापापासून त्यांना मुक्त करण्याकरिता रघुवंशामध्ये रामावतार धारण करून त्यांचा वध केला.हे प्रभो त्या भगवान रामाचा पराक्रम तू मार्कंडेय ऋषीच्या मुखापासून श्रवण करशील,ह्याकरीत मी तुला इथे सांगत नाही.||४४|| भावार्थ:---असो.पुढे तेच रावणकुंभकर्ण तिसऱ्या जन्मी क्षत्रिय होवून तुझे माऊसबंधू 'शिशुपाल' आणि 'दंतवक्त्र' झाले आणि श्रीकृष्णाच्या चक्राने निष्पाप होवून सांप्रतकालीच ब्राहमणशापापासून मुक्त झाले.||४५|| भावार्थ:---ह्याप्रमाणे ते विष्णूपार्षद "वैरानुबंधामुळे" घडलेल्या तीव्र ध्यानाने अच्युतरूपी होवून पुनरपि पूर्ववत श्रीहरीच्या पार्श्वभागी निघून गेला.भगवंत प्राप्त होण्यास "वैर"बंधानास कारण घडले.||४६|| भावार्थ:---युधिष्ठीर म्हणाला---हे भगवान्,महात्म्या प्रियपुत्राचेठिकाणी हिरण्यकाशिपुला द्वेष करण्यास व त्या प्रल्हादाचे अच्युताचेठिकाणी एकचित्तत्व होण्यास कारण काय झाले ? हे तू मला सांग.||४७|| १-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्तम(७)स्कंधापैकी हिरण्यकशिपुजन्मथिननामक हा पहिला(१) अध्याय छेचाळीस श्लोकांनी समाप्त झाला.||१|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीगुरुचरणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |२-----आतां या दुसऱ्या अध्यायामध्ये,हिरण्यकशिपूने,विष्णूंचेठिकाणी असलेल्या रोषामुळे दानवांकडून लोकांचा नाश करवून विष्णून मारिलेल्या आपल्या भ्रात्यांच्या पुत्रादिकांचे इतिहासांनी सांत्वन केले अशी कथा वर्णन केलेली आहे.||२|| ___________________________________________________________________________________________ भावार्थः---त्यांत प्रथमतः भगवंताचा द्वेषच पुत्रद्वेषाला कारण झाला असे सांगण्याच्या अभिप्रायाने नारद म्हणाला की,---हे राजा,ह्याप्रमाणे देवपक्षपाताने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरीने,भ्रात्यांच्या (हिरण्याक्षाचा)वध केला असतां रोषाने व शोकाने हिरण्यकशिपू अगदी संतप्त झाला.||१|| भावार्थः---क्रोधामुळे ज्याच्या शरीराला कंप सुटला आहे,ज्याने अधरोष्ठ चावला आहे,जो कोपाने अत्यंत प्रज्वलित झालेल्या नेत्रांनी कोपाग्निधुमानेच धूम्रवर्ण झालेले अवलोकन करीत आहेत आणि भयंकर दाढांनी युक्त असलेल्या उग्रदृष्टिमुळे ज्याचे भृकुटीयुक्त मुख अवलोकन करण्यासही अशक्य झाले आहे असा तो हिरण्यकशिपू,सभेमध्ये दानवांना असे म्हणाला की,---||२-३|| भावार्थः---हे शकूनप्रभृति दैत्यदानव हो,द्विमुर्धन,हे त्र्यक्षा,हे शंबरा,हे ह्याग्रीवा,हे पाका,हे इल्वला,हे विप्रचित्ते आणि हे प्रलोम्या तुम्ही सर्वजण माझे वचन श्रवण करा व विलंब न करितां सत्वर त्याप्रमाणे आचरण करा.||४-५|| भावार्थः---अहो,"ज्याप्रमाणे क्रयविक्रयास योग्य अशा सुवर्णादि वस्तू व्यवहार करणाऱ्या पुरुषामध्ये इकडे-तिकडे हिंडत असतात त्याचप्रमाणे जीवहि जनकांचे(आई-बापाचे)ठिकाणी हिंडत असतो"म्हणून आपण--जीव,मुख्य-रूपाने देहसंबंधेचे नसून "परमात्म्याचे" आहोत,तर गौणरूपाने "देहसंबंधीचे" आहोत. ||६|| भावार्थ:---ह्याप्रमाणे कर्माच्या योगाने जीव कसा भ्रमण करीत असतो हे दृष्टांताने,सांगून एका जन्मामध्येहि होणारा संबंध पुरुषाचेठिकाणी अनित्यच दृष्टीस पडतो."जोपर्यंत ज्या वस्तूचा ज्या पुरुषाशी संबंध असतो तोपर्यंतच त्या वस्तूचेठिकाणी त्या पुरुषाचे ममत्व असते" व 'तीच वस्तू,विकणे किंवा बक्षीस देणेवगैरे कारणांनी दुसऱ्याकडे गेली म्हणजे तिच्यावरील त्याचे ममत्व नाहीसे होते".||७|| भावार्थ:---ह्याप्रमाणेच पित्रादिसंबंधाला प्राप्त झालेला "नित्य व वस्तुत: अहंकाररहित असा तो जीव",ज्या पित्रादिकांचेठिकाणी जोपर्यंत विद्दामान असतो तोपर्यंतच त्याच्या त्या पित्रादिकाचे त्याचेठिकाणी "स्वत्व" असते.म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे देहसंबंधीचे--पित्रादिकांचे "स्वत्वाचा त्याग" करून परमात्म्याचे--आपल्याच स्वरुपाचे स्वत्व स्वीकारावे.म्हणजेच अंत:करणाचा बाध करून जीव हाच परमात्मा आहे असा निश्चय करावा.||८|| भावार्थ:---आता,जीव नित्य आहे हे सिध्द करण्याकरिता म्हणतो की,---हा जीव नित्य आहे.कारण,हा अविनाशी व जन्मादिरहित आहे.हाच स्वप्रकाश असल्यामुळे जन्मादिकाणी युक्त असलेल्या देहादिकाचा आश्रय आहे."देह" हा "प्रकाश्य" आहे व "मी--जीव" हा "प्रकाशक" आहे.हा--जीव समर्थ असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनी आपणासच विश्वरूपाने उत्पन्न करितो.||९|| भावार्थ:---हा जीवाला अतिप्रीय,अथवा अप्रिय,किंवा स्वकीय अथवा परकीय असा कोणीच नाही.कारण,हित आणि अहित करणाऱ्या मित्रादिकांच्या सर्वविचित्रबुद्धीचा जीव हा साक्षी असल्यामुळे असंग आहे,तस्मात सुहृदांनी युक्त हो आणि शोकसंतप्त झालेल्या सुहृदांनी व बांधवांना अवलोकन कर,असे तुझे म्हणणे बरोबर नाही,कारण देह हा सुहृदांनी युक्त आहे,आणि देहच हा शोक--दु:खी आहे,तर वस्तुस्थितीने मी--आत्मा सुखरूप आहे.मी--जीव आणि परमात्मा एकच आहोत.||१०|| भावार्थ:---आता ‘भोगांचा उपभोग घे’इत्यादिक जे म्हणालास त्याबद्दल सांगतो ऐक--–हा जीवात्मा,स्वतंत्रकारण व कार्य ह्यांचा साक्षी आणि उदासीनासारख्या सर्वत्र स्थित असल्यामुळे सुख,दु:ख व राज्यादिक कर्मफल ह्यांचा स्विकार करीत नाही,कारण यास्तव मी--जीव सुखरूप आहे,अशा प्रकारे माझा व तुमचा काहीच संबंध नसल्यामुळे तुम्ही मजविषयी शोक करू नये.||११|| भावार्थः---तस्मात् हि माझी मसलत ऐका आणि जेथे जेथे द्विज,गाई,वेद,वर्णाश्रम व वर्णाश्रमविहित कर्मे असतील त्या त्या देशाप्रत जाऊन तुम्ही आगी लावा जीविका घालविणारे वृक्ष तोडून टाका,कारण माझ्याठीकानी--जीवाच्याठिकाणी द्विज,गाई,वेद,वर्णाश्रम व वर्णाश्रमविहित कर्मे यांचा माझा संबंध कोणत्याही प्रकारे नाही.करण मी--जीवात्मा स्वयं-प्रकाश आहे.||१२|| भावार्थः---अशी आपल्या स्वामीने केलेली आज्ञा आदरपूर्वक शिरसा मान्य करून ते हिंसाप्रिय दानव,त्याप्रमाणे प्रजाजनांची हिंसा करूं लागले.||१३|| भावार्थः---हेराजा,शहरे,गांव,बागा,शेते,आरामस्थाने,ऋषीचेआश्रम,खाणी,शेतकऱ्यांची घरे,डोंगरांच्या पायथ्याशी असलेली खेडी,गुराख्यांच्या झोपड्या आणि नगरे हि त्या दानवांनी जाळून टाकिली.||१४|| भावार्थः---कांहीजणांनी खोरी कुदळी घेऊन पुल,कोट आणि वेशी पाडिल्या,कांहींनी हातामध्ये कुऱ्हाडी घेऊन जीविकेला साधनभूत असलेले वृक्ष तोडिले आणि कांहीजणांनी जळक्या लाकडांनी लोकांची घरे जाळिली.||१५|| भावार्थः---ह्याप्रमाणे दैत्यराज हिरण्यकशिपुचे आज्ञाधारक ते दैत्य,वारंवार लोकांना उपद्रव करूं लागले असतां,यज्ञभागसंबंधी हविर्भाग नाहीसा झाल्याने देव स्वर्गाचा त्याग करून गुप्तरितीने भूमीवर संचार करूं लागले.||१६|| भावार्थः---असो.ह्याप्रमाणे दानव,प्रजाजनांची हिंसा करित असतां,स्वतः स्वर्गाचे राज्य प्राप्त करून घेण्याकरितां तप करण्याची इच्छा करणाऱ्या हिरण्यकशिपुने प्रथमतः काय केले ते सांगण्याच्या अभिप्रायाने नारद म्हणतो की,---भातृमरणामुळे दुःखित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या हिरण्याक्ष भ्रात्याला तिलांजलीवगैरे देऊन त्याच्या पुत्रांचे सांत्वन केले.||१७|| भावार्थः---हे लोकनाथा धर्मराजा,देश व काल जाणणारा ते हिरण्यकशिपू,मधुरवाणीने-शकुनी,शंबर,धृष्ट,भूतासंतापणवृक,कालनाभ, हरिष्मश्रू शकुनि,शंबर,धृष्ट,भूतसंतापण,वृक,कालनाभ,महानाभ,हरिश्मश्रू आणि उत्कच ह्यांना आणि त्यांच्या रुषाभानुनामक मातेला व आपल्या दितीमातेला असे म्हणाला की,--------------------||१८-१९|| भावार्थः---हिरण्यकशिपू म्हणाला---हे आई माते,हे वहिनी आणि हे पुत्रहो,वीर हिरण्याक्षाकरितां शोक करणे तुम्हांला योग्य नाही,कारण,शत्रूच्या संमुख जो वध स्तुल्य असल्यामुळे शुरांना इष्टच आहे.युद्ध--भूमीमध्ये शूर-पुरुषांना मृत्यू येणे आनंदाचीच घटना आहे,करण मृत्यू पावलेला शूर--वीर स्वर्ग-लोकास जाऊन तेथे सुख भोगीत असतो.म्हणून शोक-दु:ख करू नका.||२०|| भावार्थः---आतां त्याचा वध स्तुल्य असो.परंतु तो आमचा बंधू तर गेलाच की नाही,असे म्हणशील तर---हे सुव्रते माते,पाणशाळेमध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांचा सहवास क्षणिक असतो त्याचप्रमाणे ह्या मृत्युलोकी माता व पुत्र इत्यादिकांचा सहवास क्षणिक असतो.कारण,दैवयोगाने--प्रारब्ध कर्मामुळे प्राणी एकत्र संयुक्त होतात व पुनरपि आपापल्या कर्मामुळे--प्रराब्ध कर्मा भोगून क्षय-झाल्यामुळे वियुक्त--विभक्त होतात. ||२१|| भावार्थः---ह्याप्रमाणे,लौकिकदृष्टीने शोक निवारण करून तात्विक दृष्टीने निवारण करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की,---हे माते मृत्यूरहित,अपक्षय शून्य,निर्मल,सर्वगत-व्यापक आणि सर्वज्ञ असा मी--आत्मा आहे.कारण,तो देहादिकांहून भिन्न आहे.म्हणून देहादिक हे मृत--मारणारे,कृश--सडपातळ,मलिन--अशुद्ध,वियुक्त--वेगळे,आणि अज्ञ--न कळणारे--न जाणणारे--जड आहेत,म्हणून असे समजून शोक--दु:ख करणे योग्य नाही.आतां,जर असे आहे तर त्याला संसार कसा प्राप्त होतो असा प्रश्न करिशील तर---हे माते,हा आत्मा आपल्या अविद्दामुळे मोहित होऊन सुखदुःखादिकांचा विशेषेकरून स्वीकार करीत असल्यामुळे शरीरे धारण करितो.सारांश,त्याला लिंगशरीररूप जो उपाधि प्राप्त झाला आहे तोच संसार होय.आपण--जीव लिंग-शरीराच्या अज्ञानामुळे--उपाधीमुळे संसारास प्राप्त झालो आहोत,म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे अंत:करण आणि अंत:करणाचे धर्म माझे नाहीत,व मी परमात्मा--ब्रह्म आहे,असा निश्चय करावा.||२२|| भावार्थः---आतां ह्याचेच दृष्टांतपूर्वक विवरण करितो की,---हे माते जसे उपाधीयुक्त वस्तूचेठिकाणी भासमान होतात अथवा ग्राहक वस्तूचे धर्म जसे ग्राह्यवस्तूचेठिकाणी भासमान होतात,म्हणजे ज्याप्रमाणे उदक हालत असल्यामुळे त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले वृक्षही हालत आहेत असे दिसते अथवा ज्याप्रमाणे नेत्राला भ्रमण झाल्यामुळे पृथ्वी हालल्या सारखी दिसते,त्याप्रमाणे हे भद्रे गुणांच्या योगाने मनाने भ्रमण झाले म्हणजे आत्मा वस्तुतः परिपूर्ण असून त्या मनाची साम्यता पावतो आणि वस्तुः देहादिसंबंधरहित असतांही तो देहधारी असल्यासारखा दिसतो.म्हणून आपण--जीव देहसंबंधरहित असून मी--जीव देहधारी आहे,असे भासते,वस्तुस्थितीचा विवेक केला असता मी भासमान असलेला नसून--मी प्रतिबिंबित नसून बिंब--परमात्मा आहे,असा निश्चय करावा.जसे मी आरशातला--प्रतिबिंबित झालेलो आहे की,मुखरूपी--बिंब आहे ? त्याचे उत्तर आपणास अनुभवाने असे कळेल की,आरशात असलेले--दिसलेले--भासलेले,मिथ्या--प्रतिबिंबित--खोटे आहे व मुखस्थानी असलेला वास्तविक--खरा आहे,त्याप्रमाणे मी ज्याचे--परमात्म्याचे--बिंब-स्थानी असलेला--वास्तविक सत्य--खरा आहे,व जीवात्मा हा अंत:करण-रुपी असलेल्या आरशात भासणारा--प्रतिबिंबित असलेला मिथ्या--खोटा आहे.असा सत्संगाद्वारे विवेक करून निश्चय करावा.||२३-२४|| भावार्थः---म्हणून वस्तुतः देहादिसंबंध नसतांही त्याविषयी देहाभिमान असणे,प्रियवस्तूशी वियोग,अप्रिय वस्तूंशी संयोग,कर्म,अनेक,योनीमध्ये प्रवेश,नंतर उत्पत्ती,विनाश नानाप्रकारचा शोक अविवेक,चिंता आणि विवेकाची विस्मृती इत्यादी हे सर्व धर्म,आत्म्यारुहून अगदी निराळे असल्यामुळे त्यांचा आत्मस्वरुपाशी--जीवात्म्याशी मुळीच संभव नाही.||२५-२६|| भावार्थ:---असो.शोकाचे कारण नसून तुम्ही हा व्यर्थ शोक करीत आहां ह्या विषयीही कोण एका मृतपुरुषाचे स्त्रीपुत्रादिक प्राप्त आणि यम ह्यांचा हा संवादरूप पुरातन इतिहास लोक सांगत असतात तो तुम्ही श्रवण करा.---------------------||२७|| भावार्थ:---अहो,उशीनरदेशामध्ये ‘सुयज्ञ’म्हणून प्रसिध्द असा एक राजा होता.त्याचा शत्रूंनी युद्धामध्ये वध केला असता,त्याचे सर्व नातलग त्याच्या सभोवती शोक करीत बसले होते.||२८|| भावार्थ:---हे माते,त्याच्या रत्नमय कवचाचे तुकडे तुकडे होवून गेले होते,शरीरावरील भूषणे,व माळा गळून गेल्या होत्या,बाणांनी हृद्य विदीर्ण झाले होते व सर्वांग रक्ताने भरून तो भूमीवर पडला होता,त्याचे केस अस्ताव्यस्त झाले होते,डोळे फुटले होते,आवेशामुळे त्याने आपला ओठ चावला होता,त्याचे मुखकमल धुळीने भरले होते त्याचे आयुध व भुजा हि युद्धामध्ये चीनन भिन्न झाली होती.||२९-३०|| भावार्थ:---याप्रमाणे प्रारब्धकर्मामुळे तशा स्थितीमध्ये असलेला जो आपला भर्ता उशीनर देशाचा राजा त्याला अवलोकन करून राण्या दु:खित झाल्या आणि हे नाथा,आमचा सर्वस्वी घात झाला असे म्हणून वारंवार हातानी उर बडवून घेत असता त्याच्या पायाजवळ शोक करीत पडल्या.||३१|| भावार्थ:---नंतर उच्चस्वराने रोदन करता करता स्तनांवरील केशराने आरक्तवर्ण झालेल्या अश्रुनी त्या आपल्या प्रिय भर्त्याचे चरणकमल सिंचन करीत असता,केस मोकळे टाकून व अलंकाराचा त्याग करून लोकांना शोक उत्पन्न करीत करीत आक्रोशपूर्वक विलाप करू लागल्या की,-------------------||३२|| भावार्थ:---हे प्राणप्रिया प्रभो,ज्या विधात्याने,आमच्या दृष्टीनांही अगोचर होण्याची दशा तुला आणिली आहे तो खरोखर निर्दय आहे.कारण,तू पूर्वी उशीनर देशातील लोकांचीउपजीविका चालविणारा राजा असता सांप्रतकाळी त्या विधात्याने तुला ज्याच्या शोकाची वृद्धी करणारा केला आहे.||२३|| भावार्थ:---हे भूपते,कृतज्ञ आणि सर्वोत्कृष्ट सुहृद अशा तुजवाचून आम्ही कसे बरे राहावे ?तस्मात् हे विरा ज्याठिकाणी तू जावयास निघाला आहेस त्याठिकाणी तुझ्या चरणकमलांची सेवा करणाऱ्या आम्हांलाही आपल्यामागेमागे येण्यास आज्ञा दे.||३४|| भावार्थ:---ह्याप्रमाणे आपल्या मृत-पतीला आलिंगन देवून दाह करण्यास त्याला नेण्याची इच्छा न करता त्या स्त्रिया ह्याप्रकारे विलाप करीत बसल्या असता,रवी--सूर्य अस्ताचलास गेला.||३५||भावार्थ:---इकडे यमाने आपल्या पुरीमध्ये असतांनाच त्या मृतपुरुषाच्या बंधूने रोदन श्रवण केले आणि बालकाचे रूप धारण करून आपण स्वत: तेथे आला त्यांना म्हणाला----||३६|| भावार्थ:---यम--बालकाचे रूप धारण करणारा म्हणाला---अहो काय आश्चर्य हे!अरे आमच्यापेक्षा वयाने अधिक असून लोकांचा जन्ममरणादि प्रकार अवलोकन करीत असतांही ह्यांना अतिशय मोह प्राप्त झाला आहे.तो असा की,आपणहि मरण-धर्माने युक्त असून ज्या अव्यक्त रूपापासून हा प्राणी जन्मास आला तेथेच गेला असतां हे व्यर्थ शोक करीत आहेत.जो जीव जन्मास येतो,त्यास मरण-धर्म येताच असतो,हा निसर्गाचा नियमाच आहे,म्हणून त्या मरण-धर्माबद्दल मुळीच रडू--दु:ख करू नये.आपण कितीही रडले--दु:ख व्यक्त केले,तरी तो जीवात्मा परत येईल का ? येणारच नाही.म्हणून आपण--जीवानी रडू--दु;ख करू नये.||३७|| भावार्थ:---अहो,ह्या संसारामध्ये ज्यांना माता-पितर सोडून गेले आहेत असे आम्ही,दुर्बल असूनही लांडग्यांनीवगैरे भक्षण न केले असून,ज्याने गर्भामध्ये रक्षण केले तोच सर्वत्र आमचे रक्षण करील असे समजून आपल्या रक्षणाची आम्ही चिंता करीत नाही.तस्मात्,सर्वापेक्षा आम्ही धन्य आहो.वास्तविक पाहता आपले--जीवाचे रक्षण करणारा आपल्या--जीवाच्या कर्माद्वारा भगवंतच आहे,यापूर्वी त्याच भगवंताने आपले रक्षण आपल्या--जीवाच्या कर्माद्वारा रक्षण करणारा आहे व पुढेही आपल्या कर्माद्वारा भगवंतच रक्षण करणारा आहे.म्हूनन आपण--जीवानी रक्षणाची काळजी करण्याची गरज नाही,तर विहित कर्म करण्याची व निषिद्ध कर्मे न करण्याची गरज आहे,तीच आपण काळजी करावी.||३८|| भावार्थ:---आता,ईश्वर आमचे रक्षण करितो ह्यामध्ये काही एक प्रयोजन नसूनही त्याची केवळ क्रीडाच आहे असे सांगतो की,-----हे अबलांनो,जो ईश्वर स्वत: नाशरहित असून स्वच्छेने हे विश्व उत्पन्न करितो,याचे रक्षण करितो व याचा संहारही करितो त्या ईश्वराचे चराचर विश्व क्रीडासाधन आहे असे म्हणतात.म्हणूनच तो त्याचे पालन व संहार करण्यास समर्थ आहे.||३९|| भावार्थ:---आतां,पालन आणि संहार करण्याविषयी ईश्वराचे सामर्थ्य दर्शवितो की,---मार्गामध्येही पडलेली वस्तु ईश्वराने रक्षित असतां तशीच राहते तिला कोणी नेत नाही व ईश्वराने ज्या वस्तूंची उपेक्षा केली ती गृहामध्ये असली तरी नाहीशी होते त्याप्रमानेच एकदा पुरुष अनाथ असूनही ईश्वराने त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां,तो वनामध्येही जिवंत राहतोच आणि ईश्वराने ज्याची उपेक्षा केली तो पुरुष,गृहामध्ये रक्षित असूनही जगत नाही.याचे कारण तरी आपले--जीवाचे कर्मच आहे.तर अन्य कोणी नाही,असेच दिसून येत आहे. ||४०|| भावार्थः---असो.येथपर्यंत आत्म्याला जन्ममरणादिकांचा अंगीकार करून तो ईश्वराधीन असल्यामुळे शोक करणे योग्य नाही असे सांगितले.आतां देहांनाच जन्मवगैरे असून आत्म्याला मुळीच नाहीत असे सांगतो---हे अबलांनो,सर्व देह स्वकारणभूत लिंगशरीरापासून झालेल्या नानाप्रकारच्या कर्मांमुळे त्या त्या काळी उत्पन्न होतात व नाशही पावतात परंतु आत्मा हा त्या वेळी देहामध्ये असूनही त्याहून अत्यंत विलक्षण असल्यामुळे--सत्य असल्यामुळे त्याच्या--लिंग-शरीराच्या म्हणून स्थूल--शरीराच्या जन्मादि धर्मांनी बद्ध होत नाही,करण जीवात्मा हा परमात्म्याचा आहे व परमात्मा सुखरूप आहे.देह हा देहसंबंधीचा आहे,म्हणून देह जन्मास येतो व देहच मरतो.आपण त्या देहाहून वेगळे असून सुखरूप आहोत.||४१|| भावार्थः---आहे असे अनुभवास येत नाही,असे म्हणाल तर---हे स्त्रियांनो,ज्याप्रमाणे अत्यंत अविवेकी पुरुषाने आपले म्हणून मानिलेलेही घर त्याचाहून निराळे असते त्याचप्रमाणे अविवेकाने आपले म्हणून भासत असलेले हे पुरुषाचे शरीर,भौतिक (पंचमहाभूतात्मक)असून दृष्टिगोचर होत असल्यामुळे अभौतिक आणि द्रष्टा--जीवात्म्याहून अशा पुरुषापासून वस्तुतः शरीर पृथकच--वेगळे आहे आणि जसे उदकापासून झालेले बुडबुडे,पृथ्वीपासून झालेले घट व तेजापासून झालेले कुंडलादिक अलंकार हे नाश पावतात त्याप्रमाणे त्या तिन्ही भूतांच्या परमाणूनी उत्पन्न झालेला देहच काळामुळे विकारयुक्त होऊन नाश पावतो,तर आत्मा नाश पावत नाही.आपण देह नसून आत्मा आहोत,देह हा नाशिवंत--दु:खरूप आहे,तर आत्मा हा अविनाशी--सुखरूप आहे.||४२|| भावार्थः---आतां,दोन वस्तू एकेठिकाणी असूनही त्या परस्पर भिन्न असतात हे दृष्टांतपूर्वक सांगतो----जसा अग्नि,काष्ठामध्ये असतांही प्रकाशकरूपाने व दाहकरूपाने निराळाच अनुभवास येतो आणि जसा देहगतही वायू मुख व नासिका इत्यादि स्थानांमध्ये निराळाच प्रतीतीला येतो,तसा आत्मा देहामध्ये असूनही त्याहून भिन्न आहे.आत्मा देहामध्ये असतानाही त्याचेठिकाणी देहधर्म मुळीच नसतात,ह्यास दृष्टांत---जसे आकाश सर्वचठिकाणी असूनही कोठे लिप्त होत नाही,कारण ज्याच्याशी म्हणजे वायूशी, तेजाशी,पाण्याशी,पृथ्वीशी,लिप्त होत नाही,म्हणजे परिणाम--बदल--विकारी होत नाही.त्याप्रमाणे आत्मा देहेंद्रियादि सर्वगुणांच्या आश्रयाने असतांहि त्याहून निराळाच आहे.देह हा इंद्रियांचा विषय आहे,तर आत्मा हा इंद्रियांचा विषय नाही.जे-जे इंद्रियांचे विषय आहेत,ते--ते नाशिवंत असून दु:ख देणारे आहेत.जे--जे आहे,पण इंद्रियांचा विषय नसून सुखरूप आहे,म्हणून आपण जे--जे इंद्रियांचा विषय आहेत,त्यांचा त्याग करून जे-जे आहे,पण इंद्रियांचा विषय नाहीत अशा परमात्म्याच स्वीकार करून सुखरुपतेचा अनुभव घ्यावा,करण आपण--जीव परमात्म्याचे आहोत--सुखरूप आहोत.||४३|| भावार्थः---आणि त्यांतूनही,हे मुढहो,ज्याकरीतां तुम्ही शोक करीत आहां,तो हा तुमचा भर्ता--देह--सुयज्ञ तर येथे शयन करीत आहेच,तस्मात,तुम्ही कशाकरितां व्यर्थ शोक करीत आहां ? बरे,ह्या वेळेपर्यंत हा बोललेले ऐकत असून नंतर उत्तरही देत असे आणि आतां त्यांतील कांहीच--जीवात्मा दृष्टीस पडत नाही,ह्यावरून हा मरण पावला असे समजून आम्ही शोक करितो असे म्हणाल तर---पूर्वीही तो--जीवात्मा तुम्हांला दृष्टिगोचर होत नव्हता,ह्यास्तव त्याच्याकरितां शोक करणे योग्य नाही.असे सांगतो--ह्याठिकाणी जो--जीवात्मा श्रवण करीत होता तो--जीवात्मा सुयज्ञ कधीही दृष्टिगोचर होणार नाही.म्हणजेच आपण दृष्टी--गोचर असणारे नसून--देह नसून,जो दृष्टी-गोचर नसणारा,पण असणारा जीवात्मा,जो परमात्म्याचा आहे,तोच आपण आहोत.असा जो आहे,तो कधीच मारणारा नाही.म्हणून जो आपण--जीवात्मा आहोत,तो मरत नसतो,तर दिसणारा आहे,पण मरणारा आहे,तो--देह--शरीर तर समोरच आहे.असे आहे तर आपण का रडता हेच कळत नाही,म्हणून आपण रडू नये.||४४|| भावार्थः---आतां,मुख व नासिका ह्या द्वारांनी संचार करणारा प्राण श्रोता व वक्ता प्रत्यक्ष दिसतच आहे असे म्हणावे तर---प्राण हा श्रोता व वक्ता नाही,कारण,तो अचेतन आहे असे सांगतो----सर्व इंद्रियांच्या चेष्टांना कारण असल्यामुळे मोठा मुख्य असा जरी हा प्राण आहे तथापि ह्या देहांतील श्रोता व वक्ता हा नव्हे,बरे तर मग श्रोता आणि वक्त कोण?असे म्हणाल तर---हे स्त्रियांनो,इंद्रियांच्या योगाने त्यांचे विषय जाणणारा जो आत्मा तो तर,प्राण व देह ह्या दोनही अचेतन वस्तूंहून वेगळा सचेतन--चैतन्य आहे.चैतन्य तर व्यापक आहे.आपण तर स्वत:स साडेतीन हाताचा जे शरीर आहे,त्यास मी समजत,तर तुमच्या समोरच आहे.असा असता आपण का रडत आहात,असे कांहीच कळत नाही व आपणही सांगत नाहीत,असे हे आश्चर्य आहे.||४५|| भावार्थः---बरे जर आत्मा सचेतन असून प्राण व देह ह्यांच्याहून भिन्न आहे तर ‘मी कृश आहे’स्थूल आहे,काणा आहे अथवा बहिरा आहे’इत्यादी देह धर्माचा अनुभव त्याला कसा येत असे म्हणालात तर----हे स्त्रीयांनो,तो सर्वव्यापीच आत्मा भुते,इंद्रिये,व मन ह्यांच्या योगाने लक्षित होणाऱ्या बऱ्या वाईट देहाचा स्विकार करितो म्हणजे त्या देहांना,मीच आहे असे मानितो.परंतु तो त्याच्याहून निराळा आहे तर मग त्या देहापासून त्याचा मोक्ष कसा होता?असे म्हणाल तर---हे अबलांनो,आपल्या विवेक बलाच्या योगाने "त्या" "स्वीकाराचाही" तो "त्याग" करितो हे अगदी अनुभव सिध्द आहे.म्हणजेच आपणच--जीवात्मा अविवेकाच्या बलाने स्वीकार--विषयांचा भोगही घेतो व विवेकाच्या बलाने विषयांचा त्यागही करितो.म्हणून आपण--जीवानी वेवेकी होऊन सत्संगाच्याद्वारे ज्ञान प्राप्त करून त्या परमात्म्याचा अनुभव घेऊन सुखरूप होऊन जे दु:खदायक संसार--जन्म-मरण निवृत्त करावे. ||४६|| भावार्थ:---आता विवेक झाल्यानंतरही आहारादी कर्माचेठिकाणी प्रवृत्ती होय असल्यामुळे बंध होणारच असे म्हणावे तर जोपर्यंत आत्म्याला लिंगशरीराचा अभिमान असतो तोपर्यंत त्याचे ते कर्म बंधाला कारण होते व त्यापासून देहधर्माचे भोक्तृत्व प्राप्त होवून क्लेश पावतात लिंगशरीराचाविषयाचा अभिमान निवृत्त झाल्यानंतर असा प्रकार घडत नाही.कारण,हा देहधर्म भोक्तृत्वरूप विपर्यय मायेने होत असतो तो वस्तुत: खरा नाही.म्हणून आपण--जीवानी माया हीच कल्पित असल्यामुळे तिचे कार्यही कल्पित आहे.जे--जे कल्पित आहे,ते--ते सत्य आहे असे मानले तर तेही दु:खाला करण आहे.म्हणून माया व माया-कार्य मिथ्या आहे असा निर्णय करून मायाचा व माया कार्याचा त्याग करावा व ब्रह्म सत्य आहे,त्याचा स्वीकार करावा,कारण जे सत्य आहे.ते सुखरूप आहे.||४७|| भावार्थः---आता सुखदुःखादिक आणि त्यांची साधने हि सर्व सत्यरूपाने जर अनुभवास येत आहेत तर ती मायामय कशी?आणि त्यांतूनही पुष्कळ वादी लोक ती सत्यच आहेत असे म्हणतात,अशी शंका घ्याल-तर हे स्त्रियांनो सुःखदुःखादिक गुण कार्ये खरी आहेत असे मानणे व म्हणणे हा अगदी व्यर्थ अभिमान होय.कारण,जाग्रदवस्थेमध्ये मनोरथाने प्राप्त होणारे राज्यादि सुख अथवा स्वप्नामवस्थेमध्ये प्राप्त होणारे स्त्रिसंभोगादि सुख जसे वस्तुतः खरे नाही तसेच व्यवाहारातील--जाग्रदावास्थेतील वस्तुत: सर्व खरे नाही ते सर्व इंद्रियजन्य सुखही वस्तुतः खरे नाही.म्हणून त्याचा--कल्पिताचा त्यागच करून जो "परमात्मा-सत्य" आहे,त्याचा अनुभव घ्यावा.||४८|| भावार्थः---तस्मात् आत्मा नित्य असून देह अनित्य आहे असे जाणणारे लोक आत्म्याविषयी अथवा देहाविषयी ह्या संसारामध्ये शोक करीत नाहीत.आतां ह्याप्रमाणे उपदेश करणेसुद्धां शोक करीत असतांना दृष्टिस पडतात,असे म्हणाल तर---हे अबलांनो,त्या शोक करणाऱ्याचा स्वभाव निवृत्त करणे अशक्य आहे म्हणजे ज्ञान दृढ झाल्यावांचून त्यांचा स्वभाव निवृत्त होत नाही.म्हणून आपण जीवानी सत्संग करून व ज्ञान दृढ करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.त्यामुळे आपला--जीवाचा पूर्व संस्कारात परिवर्तन होऊन "मी ब्रह्म आहे",हे संस्कार दृढ होतात.||४९|| भावार्थः---असो.स्वतः मरणधर्माने असूनही इतरांकरितो शोक करीत आहेत असे जे सांगितले त्याविषयी एक ऐतिहासिक गोष्ट सांगतो---हे स्त्रीयांनो,पक्ष्यांना मारणारा असा कोणीएक व्याध--पारधी,अरण्यामध्ये ईश्वराने निर्माण केला होता.तो जेथे जेथे ते पक्षी असत तेथे तेथे (धान्यकणादिकांनी)त्यांना लोभ उत्पन्न करीत असे आणि जाळे पसरून त्यांना धरीत असे.म्हणून आपणास धान्य--जड वस्तूचा लोभ नसावा,कारण त्यामुळे आसक्ती होते व हीच आसक्ती बंधानास कारण होऊन जन्म--मरणास पाठविते.||५०|| भावार्थः---एकदां एक कुलिंग या नावांच्या पक्ष्यांचे जोडपे त्याठिकाणी संचार करीत असतांना त्या व्याधाच्या दृष्टीस पडले.तेव्हा त्या उभयतांपैकी कुलिंगाला त्याने धान्यवगैरे पसरलेले दाखवून एकाएकी मोहित केले.||५१|| भावार्थः---नंतर कालाने प्रेरित झालेली ती कुलिंगपक्ष्याची भार्या जाळ्याच्या दोऱ्यामध्ये अडकली असतां ती तशाप्रकारच्या संकटात सापडून अगदी दीन झाली आहे असे कुलिंगपक्ष्याने अवलोकन करून,तो अत्यंत दुःखित झाला आणि तिला सोडण्याविषयी असमर्थ असल्याने अगदी दीन होऊन प्रेमामुळे एका वृक्षाच्या शाखेवर बसून,विलाप करूं लागला की,-------||५२|| भावार्थः---अहो ! हा निर्दय ब्रहमदेव,सर्वप्रकारे दयेस पात्र व मज दीनाकरितां शोक करणाऱ्या हा माझ्या दीन स्त्रीला नेऊन काय बरे करणार आहे ! अरेरे ! भार्येवांचून वांचत असल्यामुळे दीन होऊन दुःखाने जिवंत राहणाऱ्या ह्या माझ्या अर्ध्यादेहाचे आता मला काय बरे प्रयोजन आहे?ह्यास्तव आतां तो ब्रहमदेव मलाही खुशाल नेवो.आपण--जीवानी मात्र असे न करता विवेकाद्वारे असे निश्चित करावे की,दैवयोगाने पत्नी मृत्यूस पावली आहे,म्हणून बरे झाले,तिच्या दैवयोगाने तीस मृत्यू आलेला आहे.यानंतर पत्नी या उपाधीचा त्याग झालेला आहे,म्हणून यापुढे मी उर्वरित आयुष्य पारमार्थिक कार्यातच खर्च करून सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून जन्म--मरण निवारण करीन असा संकल्प करून जीवन व्यतीत करावे.||५४|| भावार्थः---हे परमेश्वरा ! जे माझे दुर्देवी पुत्र (खाण्याकरितां)घरट्यामध्ये मातेची वाट पाहत आहेत त्यांना पंखसुद्धां फुटलेल्या मातृहीन बालकांचे मी आतां पोषण कसे बरे करूं ? प्रत्येक जीव हा आपापले प्रारब्ध कर्म घेऊनच जन्मास आलेला असतो,असे निश्चितच आहे.इतरांच्या कर्मावर कोणीच जीवन जगात नसतो.असा विवेक करून प्रत्येक मानव--मात्रांनी सत्संग करावा.||५५|| भावार्थः---ह्याप्रमाणे प्रियेच्या वियोगाने व्याकुळ झाल्यामुळे अश्रूंनी कंठ दाटून येऊन विलाप करीत बसणाऱ्या त्या कुलिंगपक्ष्याला,काळाने प्रेरणा केलेल्या त्याच पक्षिघातक्याने,दडून बसून दुरूनच बाण मारिला.||५६|| भावार्थः---असो.हे मूढस्त्रियांनो,त्या पक्ष्याप्रमाणेच आपला मृत्यू न जाणून शेकडो वर्षे जरी तुम्ही शोक करीत बसलां तथापि हा पति तुम्हांला प्राप्त होणार नाही.त्याचप्रमाणे तुम्हां स्त्रीयांनासुद्धा काळ नेण्याकरिता कधी येईल असे सांगता येत नाही व पतीही परत येणार नाही,हे तर निश्चित आहे,म्हणून दु:ख करीत न बसता आपापल्या कार्यास प्रवृत्त व्हावे.आपणही--जीवानी आपापल्या पारमार्थिक कार्यास प्रवृत्त व्हावे. ||५७|| भावार्थः---हिरण्यकशिपू म्हणाला---हे माते,ह्याप्रमाणे यमरुपी--बालक भाषण करीत असतां त्या सुयज्ञराजाचे सर्व नातलग,मनामध्ये विस्मित झाले आणि हे सर्व जगत अनित्य असून मिथ्यारूपानेच प्रकट झाले आहे असे माणू लागले.आपणही--जीवानी सत्संगाच्याद्वारा हे सर्व जगत मिथ्या आहे असे जाणून व तेच दु:खास करण आहे समजून त्याचा विवेकपुर्वक त्याग करावा.||५८|| भावार्थः---असो.यमधर्म,हे आख्यान सांगून त्याचठिकाणी गुप्त झाला व त्या नातेवाईकांनीहि सुयज्ञाचे परलोकप्राप्तीविषयी करावयाचे जे (दाहादिक)कर्म ते सर्व केले.||५९|| भावार्थः---तस्मात् आपल्याकरितां म्हणजे देहाविषयी--अमात्म्यांविषयी व दुसऱ्याकरितां म्हणजे दुसऱ्यांच्या देहाविषयी--अनात्म्यांविषयी तुम्ही--आपण--जीवानी मुळीच शोक करूं करू नये,कारण स्वपराभिमानारूप म्हणजे स्व म्हणजे आपले मूळ स्वरूप परमात्मा व पर म्हणजे अनात्मा यांचा अभिमान धारण करू नये.असे असले तरी अज्ञानामुळे प्राणिमात्रांचा आत्मा कोण व इतर कोण आणि तसाच ह्या संसारामध्ये स्वकीय परकीय कोण आहे?याचे आपणास ज्ञान नसते,म्हणून आपण सत्संगाद्वारे विवेक करून जाणून घ्यावे.त्यातील अनात्म्याचा त्याग करून म्हणजे नामरूपाचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा,कारण सर्वत्र परमात्माच एकच आहे.||६०|| भावार्थः---नारद म्हणाला-हे धर्म राजा,ह्याप्रमाने दैत्याधिपती हिरण्यकशिपुचे भाषण सुनेसहवर्तमान दितीने श्रवण करून,एकाक्षणामध्ये पुत्रशोकाचा त्याग केला आणि तिने आपले मन तत्त्व स्वरूपाचे ठिकाणी लाविले||६१|| २---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्त(७)स्कंधापैकी हिरण्याक्षपुत्रादिकसांत्वनाम-नामक हा (२)दुसरा अध्याय एकष्ट(६१)श्लोकांनितुक्त समाप्त झाला.||२|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ ३—--आता या तिसऱ्या अध्यायामध्ये हिरण्यकशिपूच्या तपने सर्व जगत संतप्त झाले असे पाहून ब्रहमदेव विस्मित होऊन तेथे आला.तेव्हा हिरण्यकशिपूने त्याची आदरपूर्वक स्तुती केली असता,त्याने त्याला वरदान दिले अशी कथा वर्णन केली आहे.||३|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---असो,ह्याप्रमाणे साधूची हिंसा करण्याकरिता दानवांना आज्ञा देवून व तत्वनिरुपणाने बंधूचा शोक निवारण करून,हिरण्यकशिपूने काय केले ते सांगण्याकरिता नारद म्हणाला:---हे राजा एकवेळी हिरण्यकशिपूने आपण,अजिंक्य,अजरामर प्रतीपक्षशून्य आणि अद्वितीय प्रभू व्हावे असे मनात आणिले.ज्याप्रमाणे हिराकाशिपुने मनात आणिले,त्याप्रमाणे आपण मनात आणू नये,तर ते म्हणजे आपणच अद्वितीय ब्रह्म व्हावे,कारण अद्वितीय ब्रह्म एकच असून व्यापक आहोत व आपण त्याचे अंशि असून तो अंश आहे म्हणजेच अंशीचाच अंश असतो--अंशी आणि अंश एकच असतो.||१|| भावार्थ:---आणि त्याने मंदरपर्वताच्या दरीमध्ये बाहू वर करून आकाशाकडे दृष्टी ठेऊन आणि एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहुन अतिभयंकर तप केले.||२|| भावार्थ:---त्यावेळी तो,प्रलयकालचा सूर्य जसा शोभत असतो त्याप्रमाणेच जटाच्या कांतीने शोभू लागला.याप्रमाणे तो तप करू लागला असता,पूर्वी गुप्तरीतीने भूमीवर संचार करीत असलेले देव,फिरून आपापल्या स्थानावर गेले.||३|| भावार्थ:---अंतर त्याच्या मस्तकातून धुरासहवर्तमान निघालेला तपोमय अग्नि,सर्वत्र पसरून त्याने,वरती व मध्य असलेले सर्व लोक संतप्त केले.||४|| भावार्थ:---तेव्हा नद्दा व समुद्र क्षुब्ध होवून गेले,द्विपे व पर्वत हयासहवर्तमान भूमि कंपित होऊ लागली,तेव्हा ग्रहासहवर्तमान नक्षत्रे गळून पडू लागली आणि दशदिशा प्रज्वलित होवू लागल्या.||५|| भावार्थ:---नंतर त्या अग्निने तप्त झालेले देव स्वर्गाचा त्याग करून ब्रहमलोकाप्रत गेले आणि ब्रह्मदेवाला विज्ञप्ति--विशेष-रूपाने सांगू लागले की,---हे जगत्पते देवाधिदेवा,दैत्यश्रेष्ठ हिरण्यकाशिपूच्या तपाने संतप्त झाल्यामुळे आम्ही स्वर्गावर राहण्यास समर्थ नाही.तस्मात,हे महात्म्या सर्वाधिपते,तुझी पूजा करणाऱ्या लोकाचा जोपर्यत नाश नाही,तोपर्यत जर तुला वाटत असेल तर त्याचे तू निवारण कर.आपण आपल्या आश्रित जर कोणी असतील व त्यांच्यावर कांही संकट आले असेल तर आपल्या स्वधीकारानुसार आपण--जीवानी त्यांच्यावर आलेले संकट टाळावे.||६-७|| भावार्थ:--ह्याप्रमाने लोकांना होत असलेला उपद्रव विदित करून हिरण्यकशिपूविषयी ब्रहमदेवाच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करण्याकरिता त्याचा संकल्प कथन करतात की,---हे जगदिशा,दुश्वर,तप करण्याऱ्या त्या हिरण्यकशिपूचा संकल्प तुम्हांला ठाऊक आहे नाही काय ? नि:संशय ठाऊक आहे, तथापि आम्ही निवेदन करितो तो श्रवण करावा.आपण--जीवानी समोरच्याचे कांही म्हणणे असेल तर आपण श्रवण--ऐकावे व स्वधर्मानुसार निवारण करावे किंवा स्वीकारावे.||८|| भावार्थ:---हे ईश्वरा,त्याने असे मनामध्ये आणिले आहे की,---तप व योग ह्याच्या निष्ठेने चराचार--चर व अचर विश्व उत्पन करू,ब्रहमदेव ज्याप्रमाणे सर्वस्थानांपेक्षा श्रेष्ठ अशा आपल्या सत्यलोकरूप स्थानावर बसला आहे,तसा मीही तप व योग ह्यांच्या दिवसानुदिवस वृद्धिंगत होणाऱ्या समाधीच्या योगाने ते स्थान आपल्याला प्राप्त करून घेईन.आता,अतिदीर्घायुषी ब्रह्मदेवाने तपश्चर्येने प्राप्त करू घेतलेले स्थान दुसऱ्याला कसे प्राप्त करू घेता येईल?अशी शंका तर मुळीच नको.कारण,---अल्पायु असल्यामुळे देहाला जरी वारंवार मृत्यू प्राप्त झाला तथापि काळ व आत्मा हे दोघेही नित्य असल्यामुळे अनेक जन्माच्या योगाने तपश्चर्या करून ते पद मी प्राप्त करून घेईनच.हिरण्यकश्यपू अज्ञानी आहे म्हणून असा विचार करत आहे.आपण मात्र असा विचार करूच नये.||९-१०|| भावार्थः---आणि तपोबलाच्या योगाने पूर्वीपेक्षां हे जगत मी अगदी विपरीत करीन,म्हणजे ब्रह्मचर्यव्रतादिक पुण्यकर्म करणारांस नरकादि दुःखेच भोगावयास लावीन व विषयासक्त असून पापकर्म करणारास स्वर्गसुखांचा उपभोग घ्यावयास लावीन आणि स्वर्ग हे असुरांचे स्थान आणि नरक हे देवांचे स्थान असे विपरीत करून मी आपणास सत्यलोकाची प्राप्ति करून घेईन.कारण,अवांतरकल्पाच्या अंती कालाने नाश पावणाऱ्या वैष्णवादि इतर स्थानांनी मल काय करावयाचे आहे?वास्तविक पाहता असे घडणे शक्य नाही,करण ईश्वर एक आहे व तो सर्वज्ञ आहे.ईश्वराशिवाय असा बदल दुसरा करू शकत नाही.हिराण्यकशिपू कर्मठ--तपी--सकाम आहे,म्हणून अज्ञानी आहे,म्हणून असे विचार करीत आहे.आपण--जीवनी त्याच्यासारखा मुळीच विचार करू नये.||११|| भावार्थ:---असो.हे त्रैलोक्याधिपते,ह्याप्रमाणे तुझे स्थान हरण करण्याविषयी त्याचा निश्चय झालेला आम्ही श्रवण केला आहे,म्हणूनच हा मोठे तप करीत बसला आहे.तस्मात् त्याविषयी जे योग्य असेल ते तूं स्वतःच सत्वर कर.||१२|| भावार्थः---तुझा स्थानापासून भ्रंश झाला असतां साधूंचे फारच अनिष्ट होणार आहे ह्याकरीता आम्ही अगदी शोक करीत आहो.कारण,हे जगदीशा ब्रह्मदेवा तुझे आसनावर बसून अधिकार चालविणे हे,द्विज व गाई ह्यांच्या उत्पत्ति,सुख,ऐश्वर्य,क्षेम आणि उत्कर्ष ह्यांना कारण आहे.||१३|| भावार्थः---हे राजा,ह्याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाची देवांनी प्रार्थना केली असतां,भृगु दक्ष इत्यादि प्रजाधिपतीनी परिवेष्टित असलेला तो ब्रह्मदेव,त्या दैत्याधिपती हिरण्यकशिपुच्या आश्रमाप्रत निघून गेला.||१४|| भावार्थः---तो तेथे मुग्यांनी ज्याच्या शरीरातील मेद त्वचा,मांस आणि रक्त हि अगदी खाऊन टाकिली आहेत व जो अंगावर वाढलेल्या वारुळे,तृन आणि वेळू ह्यांनी आच्छादित झाला आहे त्या हिरण्यकशिपुला प्रथमतः ब्रह्मदेवाने अवलोकन केले नाही.||१५|| भावार्थः---नंतर मेघांनी आच्छादित झालेल्या सूर्याप्रमाणे वारूळादिकांनी आच्छादित असलेला व तपाच्या योगाने लोकांना त्रास देणारा,अशा त्या हिरण्यकशिपुला अवलोकन करून,ब्रह्मदेव विस्मित झाला आणि हंसत हंसत त्याला म्हणाला की,--------------||१६|| ब्राह्मदेव म्हणाला:–--हे कश्यपपुत्रा हिरण्यकशिपो,तुझे कल्याण असो तपाच्या योगाणे तू कृत्यार्थ झाला आहेस,ह्याकरिता आतां ऊठ ऊठ,मी तुला वर देण्याकरिता येथे प्राप्त झालो आहे.तर तू मजपासून इच्छित वर मागून घे.||१७|| भावार्थ:---हे मी तुझे मोठेच अभ्दूत धैर्य अवलोकन केले.कारण,अरे वनमाक्षिकांनी देह भक्षण केलेल्या तुझे प्राण,केवळ अस्थींच आश्रय करून राहिले आहेत.||१८|| भावार्थ:---असे तप पूर्वीच्या ऋषींनी कधींच केले नाहीं व पुढेंही कोणी करणार नाहींत.कारण,उदकाचेसुद्धां प्राशन सोडून कोण बरे पुरुष,देवमानाने शंभर वर्षेपर्यंत प्राणाचे धारण करील?कोणीच करणार नाही.||१९|| भावार्थ:---हे दितिपुत्रा,मनोनिग्रह केलेल्या जनांनाही करण्यास दुष्कर असा निश्चय करून तपोनिष्ठ झालेल्या तू मला केवळ जिंकिले आहेस.||२०|| भावार्थ:---यास्तव हे असुरश्रेष्ठा,तुझे सर्व मनोरथ मी परिपूर्ण करितो,कारण,तुज मनुष्याला मज देवाचे झालेले दर्शन निष्फल होणार नाही.||२१|| भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराजा,असे भाषण करून ब्रम्हदेवाने अमोघ सामर्थ्याने युक्त अशा आपल्या दिव्य कमंडलूतील जलाने,मुंग्यांनी भक्षण केलेल्या हिरण्यकशिपूच्या त्या देहावर प्रोक्षण--अभिमंत्रित पाणी शीपडले.||२२|| भावार्थ:---तें प्रोक्षण होतांच तो हिरण्यकशिपू,मानसीक-शक्ती,इंद्रिय-शक्ती व शारीरिक-शक्ती,ह्यांनी युक्त होऊन सर्व अवयवांनी संपन्न,वज्रासारखा दृढशरीरी,तरुण व तापलेल्या सुवर्णासारख्या कांतीने युक्त होत असता,जसा कष्टापासून अग्नि प्रकट होतो त्याप्रमाणे वेळवांनी आच्छादित झालेल्या वारुळापासून तो बाहेर निघाला.||२३|| भावार्थ:---आणि आकाशामध्ये असलेल्या ब्रहमदेवाला अवलोकन करून,त्याच्या दर्शनाने आनंदयुक्त झाला आणि त्याने,त्याला भूमीवर साष्टांग नमस्कार घातला.||२४|| भावार्थ:---नंतर उठून त्याच्या नेत्रामध्ये हर्षाने आनंदाश्रू प्राप्त झाले आहेत व शरीरावर रोमांच उठले आहेत असा तो हिरण्यकशिपू,हात जोडून नम्रपणे,दृष्टीने ब्रहमदेवाकडे अवलोकन करीत करीत गग्दद्वानीने ब्रहमदेवाची स्तुती करू लागला.||२५|| भावार्थ:---हिरण्यकशिपू म्हणाला:---कल्पाच्या अंती कालाने निर्माण केलेल्या प्रकृतिगुणरूप निबिड अंधकाराने व्याप्त झालेले हे जग,ज्या स्वयंप्रकाश ईश्वराने,आपल्या प्रकाशने अभिव्यक्त केले आहे आणि जो त्रिगुणात्मक अशा आपल्या स्वरूपाने ह्या विश्वाची उत्पत्ती,स्थिती व लय करितो त्य रज सत्व व तम ह्यांच्या आश्रयभूत महात्म्या परमेश्वराला नमस्कार असो.||२६-२७|| भावार्थ:---ह्याठिकाणी स्वप्रकाशत्व,जगत्प्रकाशकत्व,जगत्कारणत्व,जगज्जजन्मादिकर्तुत्व,महत्व आणि परमेश्वरतत्व असे जे ब्रम्हदेवाचे सहप्रकारचे महात्म्य वर्णन केले आहे,त्याच्याच चार श्लोकांनी सविस्तर प्रतिपादन करीत नमस्कार करितो की,जो आद्द आहे,जो आद्द--अगोदर म्हणजे जग व जीवाच्या पूर्वी सर्वाचे कारण--परमात्मा आहे,ज्याचे--परमात्म्याच ज्ञान--स्वयंप्रकाश आहे आणि विज्ञान--जगत्प्रकाशकत्व--जगाचे प्रकाशन करतो हे स्वरूप आहे,व ज्याला प्राण,इंद्रिये,मन आणि बुद्धी ह्या विकारांनी कार्याचा आकार प्राप्त होतो त्या तुला नमस्कार असो.ह्या श्लोकामध्ये ज्ञान आणि विज्ञान ह्या पदांनी स्वप्रकाशत्व व जगत्प्रकाशत्व दर्शविले,बीजाय ह्या पदाने "निमित्तकारणत्व-- व श्लोकाच्या उत्तरार्धाने उपादान-करणात्व दर्शिविले आहे."परमात्मा"हा "विवर्तउपादान-कारण" आहे व "माया हि "परिणामी--उपादानकारण" आहे.निमित्तकारणत्व--परमात्मा,उपादान कारणत्व मायाचा स्वीकार करून जगत उत्पन्न करतो.म्हणजेच परमात्मा जगाचा विवर्तोपादनकारण आहे.(अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाववान्-व अन्याथारूप आहे.)व माया हि जगताची उपादानकारण आहे.म्हणजेच माया परिणामीकारण आहे. (उपादानाच्या समान स्वभाववान आणि अन्याथारूप आहे.)||२८|| भावार्थः---आतां महत्व जगत्स्त्रष्टतत्त्व आणि ईश्वरत्व आणि सविस्तर दर्शविण्याकरितां स्तुति करितो की,---हे विधात्या,तूंच सूत्रात्मारूप मुख्य प्राण्याच्या योगाने स्थावरजंगमात्मक विश्वाचे नियमन करीत असल्यामुळे प्रजांचा व त्यांच्या चित्त,चेतना,मन आणि इंद्रिये ह्यांचाहि पति आहेस व तूंच महत्तत्त्वरुपी असल्यामुळे आकाशादी भुते,शब्दादि विषय आणि तत्संबंधी वासना ह्यांचा उत्पादक आहेस.||२९|| भावार्थः---आता,तूंच यज्ञाचा प्रवर्तक आणि भूतांचा अंतर्यामी असल्यामुळे जगत्पालकही तूंच आहेस असे दर्शवितो जेथे होता अध्वर्यु इत्यादिक चार ऋत्विज असतात त्या यज्ञकर्माचे प्रतिपादन करणाऱ्या वेदत्रयरूपाने तूंच अग्निष्होमादि सात यज्ञाचा विस्तार करितोस व प्राण्यांचा आत्मा आणि अंतर्यामी तसाच कालाने व देशाने अंतपाररहित असा अनादि अखंड व सर्वज्ञ तूंच आहेस.||३०|| भावार्थः---आतां,काळरूप असल्यामुळे संहार करणारा तूंच आहेस हे दर्शवितो---निमेशरहित असा तूंच कालरूपी होऊन त्या कालाचा लवादिक अवयवांनी जणांचे आयुष्य नाहीसे करितोस परंतु वस्तुतः तूं,ज्ञानरूप अपरिच्छिन्न,परमेश्वर आणि जन्मशून्य असल्यामुळे निर्विकार आहेस,आणि दुसरे असे की,जीव लोकच कर्मवश असल्यामुळे जन्मादिविकारांनी युक्त होतो परंतु तूं तर त्या जीवलोकांचा नियंता असल्यामुळे त्याच्या जीवनाचे कारण आहेस.||३१|| भावार्थः---(आतां,तुझ्याहून जर कांही व्यतिरिक्त वस्तू असले तर त्यापासून तुला जन्मादी विकार व पराधीनता असण्याचा संभव येईल परंतु तसा प्रकार मुळीच नाही हे सांगतो---हे देवा,स्थावर अथवा जंगम असे कोणतेही कारण अथवा कार्य तुझ्याहून व्यतिरिक्त नाही.बरे,माझे ज्ञान करून देणारे शास्त्र माझ्याहून वेगळे आहे,असी म्हणशील तर---हे विधात्या,विद्या आणि कला ह्या सर्व तुझ्याच तनु आहेत.कारण,हिरण्यरूप ब्रह्मांड तुझ्या गर्भामध्ये असून तूं त्रिगुणात्मक मायेहून निराळा ब्रह्मरूप आहेस.||३२|| भावार्थः---आतां,ब्रह्मांडशरीरी असा मी जीव असल्यामुळे मला ब्राह्मणत्व आणि ब्रह्मांडगर्भत्ववगैरे कोठून असणार?असे म्हणशील तर---हे सर्वव्यापका,हे ब्रह्मांड,तुझे स्थूल शरीर आहे व त्याच्या योगाने तूं इंद्रिये,प्राण व मन ह्यांच्या विषयांचा उपभोग घेता आहेस हे सत्य आहे.परंतु आपल्या स्वरूपी स्थित असूनच तूं त्या विषयांचा उपभोग घेत आहेस;म्हणून उपाधिशुन्य ब्रह्मरूप व पुराणपुरुष असा तूंच आहेस.||३३|| भावार्थः---आतां,ब्रह्मत्व व पुराणपुरुषत्व हि दोन्ही एकाचेठिकाणी कशी संभवतील ?असे म्हणशील तर---हे अनंता,ज्याने आपल्या अव्यक्तरूपाने हे सर्व जग व्यापून टाकिले आहे आणि ज्याचे ऐश्वर्य,विद्या व माया ह्यांनी युक्त असल्यामुळे अचिंत्य आहे त्या तुला नमस्कार असो.||३४|| भावार्थः---हे वरदोत्तमा,तूं जर मला पाहिजे असलेले वर देत असलास तर हे प्रभो,तूं उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये.||३५|| भावार्थः---त्याचप्रमाणे घराच्या आंत अथवा बाहेर,दिवसा अथवा रात्री,तूं उत्पन्न केलेल्या प्राण्यांहून दुसऱ्या प्राण्यांपासून,भूमीवर अथवा आकाशामध्ये,मनुष्य,मृग,असुर,देव,महानाग आणि आणखीही ज्या काही सचेतन अथवा अचेतन वस्तू असतील त्यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊं नये.तसेच ज्याप्रमाणे तुझा महिमा आहे त्याप्रमाणे माझा असून मला युद्धामध्ये कोणी प्रतिपक्षी नसावा,सर्व प्राण्यांचा अधिपति मी एकटाच असावे आणि तप व योग ह्याच्या योगाने प्रभावशाली अशा लोकांचे जे अनिमादि ऐश्वर्य कधीही नाश पावत नाही ते मला प्राप्त व्हावे,हे वर तूं मला दे.||३६-३७|| ३-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणातील सप्तम(७)स्कंधापैकी हिरण्यकशिपूरयाचननामक हा तिसरा(३) अध्याय सदोतीस (३७) श्लोकांनी समाप्त झाला.||३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |४--- हिरण्यकशिपुचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन. ____________________________________________________________________________________________ भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्याप्रमाणे हिरण्यकशिपुने ब्रह्मदेवापाशी वर मागितले असतां,त्याच्या तपाने प्रसन्न झालेल्या त्या ब्रह्मदेवाने अत्यंत दुर्लभ असेही ते वर त्याला दिले.||१|| भावार्थः---ब्रह्मदेव म्हणाला---बा दैत्यराजा,तूं जे मजपाशी वर मागत आहेस ते हे पुरुषांना प्राप्त होण्यास दुर्लभ आहेत तथापि हे दैत्यश्रेष्ठा अशाही त्या वरास मी तुला देतो.||२|| भावार्थः---असे म्हणून त्याने वर दिले असतां,ज्याचा अनुग्रह कधीच निष्फळ होत नाही अशा त्या भगवान ब्रह्मदेवाची असुरश्रेष्ठ हिरण्यकशिपुने पूजा केली व मरीच्यादी प्रजापती स्तुति करीत असता तो ब्रह्मदेव स्वस्थानापरत निघून गेला.||३|| भावार्थः---ह्याप्रमाणे वर प्राप्त झालेला तो दैत्य सुवर्णासारिखे तेजःपुंज शरीर धारण करून,आपल्या भ्रात्याच्या वधाचे स्मरण करीत असता भगवंताचेठिकाणी द्वेष करूं लागला.||४|| भावार्थः---त्या जगद्विजयी महादैत्याने सर्वदिशा,तिन्ही लोक,देव असुर व मानव त्यांचे राजे,गंधर्व,गरुड,नाग,सिद्ध, चारण,विद्याधर, ऋषि,पितृगणाधीपती,मनु,यक्ष,राक्षस व पिशाच ह्यांचे अधिपती,प्रेते,व भुते ह्यांचे स्वामी आणि सर्व प्राण्यांचे अधिपति ह्या सर्वांना जिंकून वश करून घेतले व तेजासहवर्तमान लोकपालांची स्थाने हरण केली.||५-६-७|| भावार्थः---नंतर तो हिरण्यकशिपु देवांच्या क्रीडावन संबंधी शोभेने युक्त अशा स्वर्गलोकावर अधिष्ठित होऊन,तेथे विश्वकर्म्याने निर्माण केलेले,त्रैलोक्यलक्ष्मीने केवळ वस्तीस्थान आणि सर्वसमृद्धीनी युक्त अशा इंद्राच्या गृहामध्ये वास करूं लागला.||८|| भावार्थः---आतां,(ते महेंद्राचे गृह कसे होते ते सांगतात)हे धर्मराजा---जेथे पोवळ्याच्या जीन्यांनी युक्त अशा पाचेच्या जागा आहेत,स्फटिक मण्याच्या भिंती आहेत,वैडूर्यमण्यांच्या स्तंभपंक्ति आहेत.||९|| भावार्थः---जेथे चित्रविचित्र चांदवे लाविलेले आहेत,पद्मराग मण्यांची आसने ठेविलेली आहेत,आणि जेथे सभोवार मोत्यांचे सर लोंबत असलेल्या हस्तिदंती दुधाच्या फेसासारख्या मृदू अशा शय्या आहेत.||१०|| भावार्थः---जेथे रुणझुण वाजणाऱ्या तोरड्यांनी ठिकठीकाणी शब्द करीत संचार करणाऱ्या देवांगना रत्नमय भूमीमध्ये (प्रतिबिंबित झालेले)आपले सुंदर मुख अवलोकन करीत असतात.||११|| भावार्थः---त्या इंद्राच्या मंदिरामध्ये,इच्छितमनोरथ परिपूर्ण होत असल्यामुळे प्रसन्नचित्त होणारा,महाबलाढ्य,सर्वलोकांस पराजित करून त्रैलोक्याचे राज्य एकटाच करणारा आणि अतिशय कडक आज्ञाधारी असल्यामुळे अत्यंत ताप पावलेल्याही देवादिकांनी चरणद्वयाचेठिकाणी अभिवंदन केलेला असा तो दैत्यराज "हिरण्यकशिपू" रममाण होऊं लागला||१२|| भावार्थः---हे राजा तेव्हा उग्ररंधाने युक्त अशा सुरेने जो मत्त झाला आहे,ज्याचे नेत्र धुंद होऊन आरक्त झाले आहेत आणि जो तेज,मनःसामर्थ्य,शरीरसामर्थ्य आणि इंद्रियसामर्थ्य ह्याचा आश्रय आहे अशा त्या हिरण्यकशिपुची,ब्रह्मा,विष्णू,व महेश्वर ह्या तीन देवावांचून इतर सर्व लोकपालांनी हाताने नजराणे अर्पण करून सेवा केली.||१३|| भावार्थः---ती अशी की,---हे पंडूपुत्रा,स्वसामर्थ्याने महेंद्राच्या आसनावर बसलेल्या त्या हिरण्यकशिपुच्या गुणाचे विश्वासू,तुंबरू आणि मी इत्यादिक सर्वांनी गायन केले व गंधर्व,सिद्ध,ऋषि,विद्याधर आणि अप्सरा ह्यांनी वारंवार त्याची स्तुति केली.||१४|| भावार्थः---पुढे तोच हिरण्यकशिपू वर्णाश्रमनिष्ठ बहुदक्षिनायुक्त यज्ञांच्या योगाने आराधन केला असता,आपल्या तेजाने सर्वांचे हविर्भाग ग्रह करूं लागला.||१५|| भावार्थः---त्याच्या राज्याचे वेळी सप्तदीपवती नांगरल्यावांचुनच पिंकू लागली,स्वर्गलोक त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण करू लागला आणि अंतरिक्षलोक नानाप्रकारच्या आश्चर्यकारक वस्तू उत्पन्न करण्याचे स्थान झाला.||१६|| भावार्थ:---त्याचप्रमाणे त्याला खारे पाणी,सुरा घृत,उसाचा रस,दही,दुध आणि गोड पाणी,ह्यांचे सात समुद्र नद्यासहवर्तमान लाटांच्या योगाने रत्नसमूहांना आणून देऊ लागले,सर्व पर्वत आपापल्या खोऱ्यातील जाग्यांनी त्याच्याकरिता क्रीडास्थाने सिद्ध करून ठेऊ,सर्व ऋतूमध्ये वृक्ष पुष्पफलादिक पदार्थ त्याला देऊ लागले आणि तो एकटाच सर्व लोकपालांचे भिन्नभिन्न प्रकारचे(वृष्टी करणे,दहन करणे,शोषण करणे,इत्यादिक)गुण धारण करू लागला.||१७-१८|| भावार्थ:---ह्याप्रमाणे तो दिग्विजयी व एकटाच राजा झालेला हिरण्यकशिपू प्रिय विषयांचा यथेच्छ उपभोग घेत असता,जितेंद्रिय नसल्यामुळे तृप्त झाला नाही.आपण--जीवानी मन व इंद्रिये ताब्यात घेतले असता,विषयांची तृप्ती होऊन मनात समाधान प्राप्त होते.||१९|| भावार्थ:---असो ह्याप्रमाणे ब्राह्मणाचा(सनकादिकांचा)शाप झाल्यामुळे ऐश्वर्याने मत्त व गर्विष्ठ होवून शास्त्राविरूद्ध वर्तन करणाऱ्या त्या हिरण्यकशिपूचा एकाहत्तर(७१)युगापैकी काही अधिक इतका मोठा काळ निघून गेला.||२०|| भावार्थ:---आशाप्रकारे त्या हिरण्यकशिपूच्या उग्रदंडाने,पालकासहवर्तमान अत्यंत उद्वीग्न झालेले सर्व लोक,दुसरा कोणीही रक्षक नसल्यामुळे अच्युत भगवंताला शरण गेले.||२१|| भावार्थ:---आणि महाले की,---शांत आणि निर्मलचित्त असे संन्याशी लोक ज्या स्थानी गेले असता ते पुन्हा संसारात माघारे येत नाहीत व ज्या स्थानी सकल दु:खहर्ता,परमात्मा ईश्वर राहतो त्या स्थानाला आमचा नमस्कार असो.||२२|| भावार्थ:---अशा रीतीने नमस्कार करून ज्यांची बाह्येंद्रियें--श्रोत्र,त्वचा,चक्षु,जिव्हा,घ्राण व मन ह्यांचे संयमन--आपल्या जीवाच्या ताब्यात घेतल--केले आहे,ज्यांच्या अंत:करणातील रागादि--काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर अशा प्रकारचे मल--पापांची वासना नाहीसे झालो आहेत,ज्यांच्या बुद्धीच्या एकाग्रता--स्थिर झाल्या आहेत,ज्यांनी निद्रेचाहि त्याग केला आहे आणि जे वायू भक्षण करून निर्वाह करीत आहेत असे ते देव हृषीकेशाची स्तुती करीत असता,||२३|| भावार्थ:---त्यांनी साधूंना अभय देणारी आणि मेघासारख्या गंभीरशब्दाने युक्त असल्यामुळे दशदिशा नादीत करणारी अशी वृक्तृरहित आकाशवाणी ऐकिली.||२४|| भावार्थ:---ती अशी की,---हे सुरश्रेष्ठ हो,तुम्ही भिऊ नका,तुम्हसार्वांचे कल्याण असो.कारण,प्राण्यांना माझे श्रवण केले असता,ते,त्यांच्या सर्व कल्याणस कारण होते.आपण--जीवानी सत्संग केला असता अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान प्राप्त होते.||२५|| भावार्थ:---हे देवहो ह्या,दैत्या-धर्माचे दुर्जनत्व मी जाणिले आहे व मी त्याचा वधहि करणार आहे,परंतु तुम्ही काही कालावधीची प्रतीक्षा करा.म्हणून आपण--जीवानी दुर्जनत्व हा दोष असल्यामुळे त्याचा त्याग करून सात्विकता आणावी.सात्विकता हा गुण आहे व परम्यातकडे नेण्यास साह्य करतो.||२६|| भावार्थ:---अहो,देव,गाई,ब्राहमण,साधू,धर्म,आणि मी ह्यांचेठीकानी जेव्हा पुरुषाचा द्वेष उत्पन्न होतो तेव्हा तो पुरुष,लवकरच नाश पावतो.म्हणून आपण साधू--महात्मा यांचा द्वेष कधीच न करता सेवा करावी.||२७|| भावार्थ:---आता देवादिकांबरोबर हा द्वेष करीत असताही ब्रहमदेवाच्या वराने जरी हा प्रबल झाल्यामुळे ह्यांचा नाश होत नाही असे म्हणाल तर---हे सुरश्रेष्ठहो,कदाचित देवादिकांबारोबर केलेलाही द्वेष मला सहन होतो परंतु माझ्या भक्ताशी केलेला द्वेष मला सहन होत नाही,करण ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.म्हणून आपण भगवद्भक्त व्हावे.यास्तव वैररहित आणि अत्यंत शांत अशा आपल्या महात्म्या प्रल्हाद पुत्राशी जेव्हा द्रोह करू लागले तेव्हा ब्रहमदेवाच्या वराने जरी हा प्रबल आहे तथापि मी ह्याचा वध करीन.||२८|| भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्याप्रमाणे जगद्गुरू परमात्म्याने आकाशवाणी सांगितले असता,त्याला नमस्कार करून त्या स्तुतीपासून निवृत्त झाले आणि ईश्वरवचनाने निर्भय होवून त्या असुराचा वध झालाच असे त्यांनी मानिले.||२९|| भावार्थ:---आता,तो द्वेष कसा झाला हे सांगण्याकरिता प्रथमत: वयाने सर्वापेक्षा लहान असून गुणांनी मोठा होता.कारण,तो सत्पुरुषांचा उपासक,ब्राह्मणभक्त,शिलसंपन्न,सत्यवादी,जितेद्रिये,आत्म्याप्रमाणे सर्वभूतांचा एकच प्रिय व हितेच्छु,दासाप्रमाणे श्रेष्ठजणांच्या चरणी नम्र,पित्याप्र-- माणे दीनवार प्रेम करणारा,आपल्या बरोबरीच्यावर भ्रात्याप्रमाणे प्रीती करणारा,गुरुंचे ठिकाणी ईश्वरबुद्धीने वागणारा,विद्या,वित्त,सौंदर्य आणि उत्तम जन्म,ह्यांनी युक्त असूनही मन गर्व ह्यांनीरहित,संकटे प्राप्त झाली असताही मनामध्ये उद्विग्न न होणारा,परमात्म्यावाचून इतर सर्व मिथ्या आहे असे समजत असल्यामुळे या लोकीच्या व परलोकीच्या विषयाविषयी निस्पृह,इंद्रिये,प्राण,शरीर,आणिबुद्धी ह्यांना वश लेलेला,मत्सरादिक असुरभावानेरहित आणि असुर असूनही विषयवासना शांत असलेला असा होता.म्हणून आपण--जीवानी भक्त प्रल्हादासारखे सदगुण आपल्यात आणण्याचा सत्संग करून प्रयत्न करावा.||३०-३१-३२-३३|| भावार्थ:---हे राजा ईश्वराचेठीकानी असलेले गुण जसे कधी लुप्त होत नाहीत त्याप्रमाणे त्या प्रल्हादाच्या- ठिकाणी असलेल्या मोठ्या गुणांचे विवेक जन वारंवार ग्रहण करीत असतात ते अद्यापि झाकून जात नाहीत.||३४|| भावार्थ:---हे राजा,तुझ्यासारखे विष्णूभक्त त्या प्रल्हादाची प्रशंसा करतील यांत आश्चर्य नाही,परंतु त्या असुरांचे शत्रू जे देव तेही,भरसभेमध्ये साधुजनांच्या कथा निघाल्या असता ज्या ज्या प्रल्हादाची उपमा देत असतात.||३५|| भावार्थः---त्या प्रल्हादाचे असंख्यात गुणांनी भूषित असे माहात्म्य मी तुला थोडक्यांत केवळ दिक्प्रदर्शनाने सुचवितो,---कारण ज्याला भगवान वासुदेवाचेठिकाणी स्वाभाविक प्रीती प्राप्त झाली होती.||३६|| भावार्थः---ती अशी की,---हे धर्मराजा,तो अगदी बालक असतानांच कृष्णरूप पिशाचाने त्याचे मन घेरून टाकिले असल्यामुळे ते चित्त,त्या कृष्णाचेठिकाणी एकसारखे लागले होते म्हणून तो,क्रीडासाधनाचाहि त्याग करून सर्वदा कृष्णचिंतन करीत असे.म्हणून आपण--जीवनी भगवंताचे चिंतन निरंतर करावे. त्याने हे जग,अशाप्रकारचे (विषयासक्त)आहे हे जाणलेच नाही.विषयांत सुख नसून दु:ख आहे म्हणून त्याला विषयांविषयी वैराग्य होते.यावरून त्याची लोकामध्ये त्याची वृत्ति जडासारखी भासत होती.||३७|| भावार्थः---तो बसता असतां,हिंडत असतां,भोजन करीत असतां,शयन करीत असतां,उदकवगैरे प्राशन करीत असता,आणि भाषण करीत असतां,त्या प्रल्हादाने त्या आसनादि पदार्थासंबंधी गुणदोषांचे अनुसंधान राखिले नव्हते,कारण,त्याचे गोविंदाने आपल्याशी अगदी एकीकरण केले होते.आपण--जीवानी भगवंताशी अनुसंधान निरंतर ठेवावे.||३८|| भावार्थः---केव्हा तरी भगवच्चिंतनाने त्याचे अंतःकरण क्षुब्ध झाले म्हणजे तो रोदन करीत असे,केव्हांतरी भगवच्चिंतनाने आनंद झाला म्हणजे तो हास्य करीत असे व कधीकधी उच्चस्वराने भगवंताच्या गुणांचे गायन करीत असे.आपणही भक्त प्रळादासारखी साधना करावी आपला विषय भगवंत असावा.||३९|| भावार्थः---कधीकधी तो मोठ्याने (हे हरे,प्रभो इत्यादिक)गर्जना करी,केव्हांतरी निर्भीड होऊन नृत्य करी,आणि एखादे वेळी ईश्वरचिंतनामध्ये अगदी गढून गेला म्हणजे अन्य तन्मय होऊन भगवंताच्या लीलांचे स्वतःच अनुकरण करी.आपणही भक्त प्रल्हादासारखीच साधना करावे.||४०|| भावार्थः---केव्हां केव्हां भगवत्स्वरूपी लीन होऊन गेल्यामुळे तो सुखामध्ये निमग्न होऊन,त्याच्या शरीरांवर रोमांच उठत असत आणि स्थिरप्रेमापासून आनंदाश्रूंनी युक्त झाल्यामुळे त्याचे नेत्र किंचित मिटले असत,तेव्हां तो कांहीएक न बोलतां स्वस्थ राहत असे.||४१|| भावार्थः---याप्रमाणे तो निःसंग अशा साधूंच्या समागमाने प्राप्त झालेली दुसऱ्या पुरुषाच्याहि मनाला शांत करीत असे.आपणही इतरांना उपदेश करून शांत करण्याचा प्रयत्न करावा.||४२|| भावार्थः---असो हे राजा,ह्याप्रमाणे महाभगवद्भक्त,महाभाग्यशाली आणि महात्मा असा जो आपला पुत्र प्रल्हाद त्याचेठिकाणी हिरण्यकशिपू द्रोह करूं लागला.आपण--जीवानी जे सात्विक आहेत,त्यांच्याशी द्रोह न करता सख्य करावे.||४३|| भावार्थः---ह्याप्रमाणे नारदाने भाषण श्रवण करून अतिविस्मक झाल्यामुळे पूर्वी प्रथम अध्यायांच्या अंती विचारलेल्याच विषयाचा धर्मराजा पुन्हा प्रश्न करितो की,---हे सुव्रता देवर्षे,शुद्ध आणि साधू असा जो आपला पुत्र प्रल्हाद त्याच्याशी पित्याने द्रोह केला हे (आश्चर्य)आम्ही तुजपासून (सविस्तर जाणण्याची इच्छा करितो.)||४४|| भावार्थः---कारण,आपले पुत्र जरी आपणास प्रतिकूल असले तथापि त्यांचे पिते,पुत्रवत्सल असल्यामुळे, केवळ शिक्षणार्थ भाषणानेच त्यांचा तिरस्कार करितात,परंतु शत्रूप्रमाणे त्यांच्याशी द्रोह कधीही करीत नाहीत.आपण--जीवानी देहासंबंधीशी द्रोह न करता त्यांच्याशी सख्य करून सात्विक संस्कार करावेत.त्यांना सदगुरू भक्त,देवभक्त.देशभक्त,समाज-सेवक भक्त करण्याचा प्रयत्न करावा,तर संसारिक विषयी भक्त करू नका,करण त्यात आपलेही अहित व त्यांचेही अहित असते.||४५|| भावार्थः---तेव्हा ज्यांचे पिता हेंच दैवत व जे कामक्रोधरहित असून आपणास अनुकूल आहेत त्या प्रल्हादसारिख्या पुत्रांशी,तर पिते द्रोह करीत नाहीत हे काय सांगावे?तस्मात,प्रभो ब्रह्मनिष्ठ,हिरण्यकशपु पित्याने स्वपुत्र प्रल्हादाच्या वदार्थ द्वेस केला असून त्यापासुन तो वध न होता,तो द्वेष उलटा त्या हिरण्यकशिपुच्याच मरणास कारण झाला हे मोठे आश्चर्य आहे?यास्तव ह्याचे तूं निराकरण करावे.म्हणून आपण जे सात्विक संस्कारित जीव आहेत,त्यांचा द्वेष न करता प्रेम करावे.||४६|| ४-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्तम(७)स्कंधापैकी हिरण्यकशिपूकृत त्रैलोक्यपीडा---वर्णननामक हा चवथा(४) अध्याय छेहचाळीस(४६)श्लोकांनी समाप्त झाला.||४|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |५-----आतां पाचव्या अध्यायामध्ये,गुरुपासून केलेल्या अध्यानाचा त्याग करून विष्णूची स्तुति करण्यामध्ये रात झालेल्या प्रल्हाद-पुत्राला,हत्ती व सर्प इत्यादिकांच्या योगाने मारविण्यास प्रवृत्त झालेल्या हिरण्यकशिपू,ते करण्यास कारण झाला नाही,अशी कथा वर्णन केली आहे.||५|| ५----- हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न ____________________________________________________________________________________________ भावार्थः---त्यामध्ये प्रथमतः प्रल्हादाने केलेली भगवंताची भक्ति,हिरण्यकशिपुला प्रल्हादाचा द्वेष करण्यास कारण झाली असे सांगण्याच्या अभिप्रायाने नारद म्हणाला:---हे धर्मराजा,भगवान शुक्राचार्याला असुरांनी आपला पुरोहित केला होता म्हणून त्याचे शंडामर्क नामक दोन पुत्र दैत्यराज हिरण्यकशिपूच्या गृहासमीप वास करीत होते.||१|| भावार्थः---राजाने आपला प्रल्हाद बालक,नीतीशास्त्रामध्ये निपुण असतांही तो अज्ञानी आहे असे समजून त्या शंडामर्कांकडे पाठविला असतां,त्यांनी पढविल्यास योग्य असे राजनीवगैरे विषय,असुरबालकांसह वर्तमान त्याल पढविले.||२|| भावार्थः---त्या गुरु-गृहि गुरूने जे दंडनीतीशास्त्र सांगितले ते प्रल्हादाने श्रवण केले व पठणही केले.परंतु,हा स्वतः मी व आणि हा दुसरा अशाप्रकारच्या जो मिथ्याभिमान तोच त्या नीतीशास्त्राचा आश्रय असल्यामुळे त्याला ते मनापासून चांगले वाटले नाही.आपणासही--जीवास स्वत: मी वेगळा व दुसरा वेगळा अशा प्रकारची द्वेत-बुद्धि भक्त प्रल्हादास आवडली नाही,करण द्वेत तेथे भीती असते व अद्वैत तेथे सुख असते.म्हणू आपणास--जीवास द्वैत बुद्धि ण आवडता भक्त प्रळादासारकी अद्वैत बुद्धीच आवडावी,कारण तेथे सुख असते.||३|| भावार्थः---ह्याप्रमाणे चालले असतां,हे पांडूपुत्रा धर्मराजा,एकेदिवशी दैत्यराज हिरण्यकाशिपुने, आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन हे वत्सा काय चांगले वाटते ते सांग विचारिले.||४|| भावार्थः---तेव्हा प्रल्हाद म्हणाला---हे दैत्यश्रेष्ठा,मी व माझे ह्या मिथ्याभिमानामुळे सर्वदा अत्यंत उद्विग्नमति झालेल्या देहधारी प्राण्यांनी अंधकुपांप्रमाणे मोहकारक व आपल्या अधःपाताला कारण अशा गृहाचा त्याग करावा आणि वनामध्ये जाऊन श्रीहरिला भजावे हे मला चांगले वाटते.आपणास--जीवास भक्त प्रल्हादास जसे वाटते तसेच वाटावे.म्हणून आपण--जीवानी देहसंबंधी व घरादिकांचा त्याग करून सत्संग करावा.आपला विषय भगवंत असावा.||५|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,शत्रुरूपी विष्णूचेठीकांनी अत्यंत निष्ठायुक्त असलेली ती पुत्राची भाषणे श्रवण करून,त्या दैत्याने हास्य केले आणि म्हणाला की,---अहो,शत्रूच्या पक्षाकडे ज्यांची मति आहे ते लोक,बालकांची बुद्धी विपरीत करून टाकितात.||६|| भावार्थः---हे शंडामर्कहो,दुसरा वेश धारण करून गुप्तरीतीने संचार करणारे विष्णूपक्षपाती ब्राह्मण,ह्याच्या बुद्धीला जसा भेद न करितील तशाप्रकारच्या चांगल्या बंदोबस्ताने तुम्ही आपल्या घरी ह्याबालकाचे रक्षण ठेवावे.||७|| भावार्थः---नंतर आपल्या घरी पोहोचलेल्या प्रल्हादाला त्या दैत्य पुरोहितांची हाक मारून त्याची प्रशंसा केली आणि मृदूभाषणपूर्वक सामोपचाराने त्याला असे विचारिले की,-------------||८|| भावार्थः---बाळा प्रल्हादा,तुझे कल्याण असो.जे आम्ही तुला विचारित आहो,ते तूं खरे सांग,खोटे सांगू नकोस.असे,या बालकांना सोडून तुझ्याच बुद्धीला हा विपर्यास कोठून झाला?||९|| भावार्थः---हे कुलवंदना,दुसऱ्यांनी तुझ्या बुद्धीला भेद केला आहे अथवा तो आपोआपच झाला आहे हे तूं आंम्हा श्रवण करण्याची इच्छा करणाऱ्या गुरुंना कथन कर.||१०|| भावार्थः---हे भाषण करून,अहो तुम्ही मायेने मोहित होऊन उगील मला आपल्या भलभलत्या शंका करीत अहां,अशा आशयाने प्रथमत:प्रल्हाद म्हणाला-----अहो ! मी व दुसरा असा मिथ्या अभिमान ज्याच्या मायेने केलेला आहे,वास्तविक नाही,व तो त्याच्या मायेने बुद्धीला मोह पडलेल्या तुम्हासारिख्या पुरुषांचेठिकाणीच दृष्टीस पडतो,त्या भगवंताला नमस्कार असो.||११|| भावार्थः---त्यानंतर अरे हे काय बडबडतोस ?तुझ्या बुद्धीला विपर्यास कोणी केला ते सांग असे दटावून विचारिले असतां,त्या भगवंताच्या प्रसादानेच झाला,असे सांगतो---तो भगवान जेव्हा पुरुषांना अनुकूल होतो तेव्हां,हा वेगळा व मी वेगळा अशी अविवेकी पशुसारखी मिथ्याभूत असलेली संसारविषयक बुद्धि,भेद पावते,म्हणजे ती भेदरहित होऊन आत्मनिष्ठ होते.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून भेदरहित व्हावे,करण भेदरहीतात सुख आहे.||१२|| भावार्थः---(आतां)वास्तविक पाहूं गेले असतां भेद नाहीच हे दर्शविण्यासाठी म्हणतो की,-)त्या ह्या परमात्म्यानेच अविवेकी लोक,हा मी परका आहे असे निरुपण करितात आणि असे होणे हेंच योग्य आहे.कारण,त्या परमात्म्याची लीला दुर्घट आहे,त्याला जाणण्याविषयी ब्रह्मादिक वेदवादीसुद्धां मोह पावतात हा परमात्माच माझ्या बुद्धीचा भेद करीत आहे.||१३|| भावार्थः---आतां,परमात्मा जर निर्विकार आहे तर तो बुद्धींचा भेद करितो हे म्हणणे योग्य कसे होईल?असे म्हणाल तर---हे ब्रह्मन,ज्याप्रमाणे लोकचुंबकासमीप लोह,आपण होऊन भ्रमण करूं लागले त्याप्रमाणे चक्रपाणी श्रीहरीच्या समीप माझे चित्त,कांही एक अवर्णनीय दैव योगाने विपर्यास पावते.||१४|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,एवढेच त्या ब्राह्मणाला सांगून तो महाबुद्धिमान प्रल्हाद स्तब्ध राहिला.तेव्हा तो अविवेकी राजसेवक ब्राह्मण,क्रुद्ध होऊन व त्याची निर्भत्सना करून म्हणाला------||१५|| भावार्थः---अरे,हा आम्हांला अपयश देणारा आहे यास्तव एक चाबूक आणा,ह्या दुर्बुद्धी कुलांगाराला सामदानादिक चार उपायांमध्ये चवथा उपाय जो दंड तोच शास्त्रविहित आहे.||१६|| भावार्थः---अहो,काय सांगावे ! दैत्यरूप चंदनवृक्षांच्या वनामध्ये हा कंटवृक्षाप्रमाणे उत्पन्न झाला आहे तो असा कि,दैत्यरूप चंदनवृक्षाची मुळे तोडून टाकण्यास तयार असलेल्या विष्णूरूप कुऱ्हाडीला हा बालकच दांडा झाला आहे.||१७|| भावार्थः---असो.ह्याप्रमाणे तर्जनादी नानाप्रकारच्या उपायांनी त्या प्रल्हादास भय दाखवून त्या ब्राह्मणाने त्याला धर्म,अर्थ व काम हयंचे प्रतिपादन करणारे शास्त्रच पढविले.||१८|| भावार्थः---नंतर,जाणण्यास योग्य असे सामदानादिक चारही उपाय ह्याला समजले असे जाणून,गुरूने त्यास मातेकडून अभ्यंगपूर्वक स्नान घालविले आणि तिलकादिकांनी अलंकृत करून दैत्यराज हिरण्यकशिपूला परमानंद झाला.||२०|| भावार्थः---हे युधिष्ठिरा,स्वाभाविक प्रसन्नमुख असलेल्या त्या पुत्राला,हिरण्यकशिपूने अंगार घेऊन त्याचे मस्तकी अवघ्राण केले आणि अश्रूबिंदूंनी त्याला सिंचन करीत असे भाषण केले की,-------------||२१|| भावार्थः---हिरण्यकशिपू म्हणाला---बा दीर्घायुप्रल्हादा,ह्या वेळपर्यंत गुरुपासून जे तूं शिकलास असशील त्यांपैकी कांही चांगले अध्ययन केलेले आणि श्रेष्ठ असेल ते तूं मला सांग.||२२|| भावार्थः---प्रल्हाद म्हणाला---हे ताता,विष्णूचे श्रवण,कर्तन,स्मरण,पादसेवन,पूजन,वंदन,कर्माचे अर्पण,सख्य आणि स्वशरीराचे समर्पण ह्या नवलक्षणांनी युक्त अशी भगवान विष्णूचेठिकाणी अर्पण केलेली भक्ति,ज्याच्या योगाने साक्षात उत्पन्न होते तेच "उत्तमअध्ययन" असे मी समजतो.तशाप्रकारचे अध्ययन शिक्षण ह्या गुरुपासून आम्हांला मुळीच प्राप्त झाले नाही.म्हणून आपण--जीवानी"जगण्याचे-- ज्ञान" व जे "ज्ञान--उत्तम" आहे.तेही प्राप्त करून घ्यावे.||२३-२४|| भावार्थः---ह्याप्रमाणे हे पुत्राचे भाषण श्रवण करून,क्रोधाच्या योगाने हिरण्यकशिपुचा अधरोष्ठ स्फुरण पावू लागला आणि त्या वेळी तो गुरुपुत्राला असे म्हणाला की,----------------||२५|| भावार्थः---हे ब्राह्मणाधमा,हे तूं काय केलेस?मी काय अपराध केला?असे म्हणशील तर---हे दुर्मते,माझ्या प्रतिपक्षाचा आश्रय करणाऱ्या तूं दुष्टाने मला न जुमानिता ज्याच्यामध्ये कांही अर्थ नाही असे तूं ह्या बालकाला शिकविले आहेस.||२६|| भावार्थः---असो मित्रत्वाने वागत असूनही तुझे आचरण आमच्या विरुद्ध झाले हे कांही मोठे असंभवनीय नाही.कारण,ज्याची मैत्री कपटयुक्त असते असे तुम्हांसारखे कपटवेश धारण करून संचार करणारे दुर्जन,ह्या लोकामध्ये आहेत आणि जसा पातकीजणांना नरक भोगानंतरसुद्धा रोगाचा उद्भव होतो त्याप्रमाणे वरकर्मी सज्जनासारख्या वागणाऱ्या त्या दुर्जनाच्या अंतर्यामीहि असलेला द्वेष,कालांतराने उदयास येतो.||२७|| भावार्थः---गुरुपुत्र म्हणाला---हे इंद्रशत्रो,हा तुझा पुत्र जे सांगत आहे,ते त्याला मी पढविलेले नाही व दुसऱ्याही कोणी पढविलेले नाही.तर हि ह्याची स्वाभाविकच बुद्धि आहे.तस्मात्,हे राजा आपला क्रोध आवरून धर,आमच्या भलताच दोषारोप करूं नकोस.||२८|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्याप्रमाणे गुरूने प्रत्युत्तर दिले असतां,तो असुर हिरण्यकशिपू, पुन्हा आपल्या पुत्राला असे म्हणाला की,---हे अभद्रा,गुरुवाक्यापासून जर हि दुष्टमति तुला प्राप्त झाली नाही तर कोठून प्राप्त झाली?||२९|| भावार्थः---हे पित्याचे भाषण श्रवण करून,असूंद्या हि वार्ता,तुम्हांसारख्या विषयासक्त जनांना ह्याविषयी अधिकार नाही,अशा अभिप्रायाने प्रल्हाद भाषण करितो की,---ज्यांनी गृहसौख्याविषयीच निरंतर चिंता चाललेली असते त्या विषयांपासून उपराम--निवृत्ती--त्याग न पावलेल्या व इंद्रियांच्या योगाने संसारामध्ये प्रवेश करून वारंवार विषयांचे सेवन करणाऱ्या पुरुषांची बुद्धि,दुसऱ्यापासून स्वतःपासून अथवा परस्परांच्या योगाने श्रीकृष्णाचेठिकाणी कधीही आसक्त होत नाही.ज्यांचा विषय संसार--विषय असतो,त्यांचा विषय भगवंत नसतो व ज्यांचा विषय भगवंत असतो त्यांचा विषय संसार--विषय नसतो.म्हणून आपण आपला विषय संसार--विषय न करता भगवंत करावा,करण भगवंत सुखरूप आहे,तर संसार--विषय दु:खरूप आहेत.||३०|| भावार्थः---आतां,श्रीकृष्ण परमानंदस्वरूप असल्यामुळे ते लोकसुद्धां तत्परच कां नसावेत अशी शंका घ्यावी तर हे त्यांचे अज्ञान होय असे सांगतो---ज्यांची अंतःकरणे विषयाविषय झाली आहेत ते लोक,स्वतःचेचठिकाणी पुरुषार्थ आहे असे समजणाऱ्या लोकांनी जाणण्यास योग्य अशा श्रीविष्णूला जाणत नाहीत.आतां,गुरूच्या उपदेशाने ते विष्णूला जाणतील असे म्हणावे तर हे ताता,बाह्यविषयांच्या ठिकाणी परमार्थ बुद्धि धारण करणाऱ्यानाच गुरु असे समजण्याच्या त्यांचा स्वभाव असल्यामुळे,जसे आंधळ्यानी नेलेले आंधळे,मार्ग न जाणतां खड्यामध्ये पडतात त्याप्रमाणे तेहि ब्राह्मणादिसंज्ञारूप बहुत दाव्यांनी युक्त असलेल्या ईश्वराच या वेदवाणीरूप दावणीचेठिकाणी काम्यकर्माच्या योगाने बद्धच होतात.म्हणून आपण जीवानी "सकामकर्म" न करता,"निष्कामकर्म" करावे,कारण त्यामुळे चित्त शुद्ध होते व ते चित्त परमात्म्याकडे--सुखरुपतेकडे नेते.||३१|| भावार्थः---आतां,अद्वितीय,चीदकेरस,सर्वभूतांचेठिकाणी गुप्तरितीने असणारा,सर्वव्यापी आणि सर्वभूतांचा अंतरात्मा असा ईश्वर आहे इत्यादि श्रुतींनी प्रतिपादिक असलेल्या विष्णूला ते कसे जाणत नाहीत व संसारामध्ये तरी कोणत्या कारणामुळे त्यांचा प्रवेश होतो,असे म्हणावे तर---हे ताता,ज्यांचा विषयसंबंधी अभिमान अगदी निरस्त--नाहीसा झाला आहे,त्या अत्यंत पूज्य पुरुषांच्या चरणरजांचाअभिषेक जो पर्यंत ह्यांनी संपादन केला नाही तो पर्यंत,श्रुतिवाक्यांनी उत्पन झालेलीसुद्धां ह्यांची बुद्धि,भगवंताच्या चरणी रत होत नाही;म्हणजे असंभावनादी दोषांच्या योगाने विघात--नष्ट पावते.कारण,संसाराची निवृत्ति होणे हेच त्या बुद्धिने फळ होय.एतावता महात्म्यांच्या अनुग्रहावाचून--कृपेवांचून त्या गृहासक्त--घरातच व घरासंबंधीतच आसक्त असणाऱ्यां मनुष्यांना निश्चयेकरून तत्त्वज्ञान होत नाही व मोक्षही प्राप्त होत नाही.म्हणून आपण-जीवानी घरसंबंधी व देहसंबंधीची आसक्तीचा सत्संग करून त्याग करावा.||३२|| भावार्थ:---इतके बोलून स्वस्थ बसलेल्या पुत्राला,विवेकशून्य असलेल्या अंतःकरणाने युक्त अशा त्या हिरण्यकशिपूने क्रोधामुळे आपल्या मांडीवरून भूतलावर लोटून दिले.म्हणून आपण--जीवानी,जरी पुत्राचा अपराध असला तरी पित्याने मांडीवर घेतलेल्या पुत्रास जमिनीवर ढकलून देऊ नये,कारण पुत्र हा पित्यापेक्षा अज्ञानी असतो.नियमाने भगवत भक्त प्रल्हाद पुत्राचा तर अपराध नव्हता.||३३|| भावार्थ:---आणि असा असाहिष्णुता व क्रोध ह्यांनी व्याप्त झाल्यामुळे ज्याचे नेत्र आरक्तवर्ण झाले आहेत असा तो हिरण्यकशिपू म्हणाला की,---हे राक्षसहो,ह्याला येथून लवकर बाहेर काढा आणि ह्याचा वध करा.कारण,हा वधास योग्य आहे.आपण--जीवानी पुत्राचा जरी अपराध असला तरी त्याचा वद्ध करू नये,कारण आपणास पुत्र हवा होता,म्हणून उत्पन्न केलेला आहे.आपल्या पुत्राचा आपणच वध करणे स्वधर्म नसून परधर्म आहे.त्यामुळे आपणास पुत्र वधाचे पाप भोगावे लागते.आपणास मनुष्य वधाचे पाप मनुष्य देहातच "मनुष्य--वध" म्हणूनच भोगावे लागते.असा विवेक करून मनुष्य-देहाची हत्या कधीच करू नये,कारण मनुष्य हा पुन्हा--पुन्हा लवकर मिळत आही.नियमाने कोणत्याही जीवाच्या शरीरचा वध करू नये,कारण आपला--जीवाचा वध ज्या शरीरात केला,त्याच शरीराचा वध त्या शरीरातच होतो.||३४|| भावार्थ:---आता हा वध्य कसा असे म्हणालात तर---हे राक्षसहो,सुहृदांना टाकून हा अधम पुत्र,ज्याअर्थी पितृव्यघातकी विष्णूच्या चरणाचे एखाद्या दासाप्रमाणे अर्चन करितो त्याअर्थी माझ्या भ्रात्याचा घात करणारा हाच विष्णू आहे,म्हणून वध करण्यास योग्य आहे.||३५|| भावार्थ:---अरे,विष्णूने तरी ह्या अविश्वसनीय दुष्टाचा कशा करिता स्वीकार केला आहे?अहो!ज्याने पांचवर्षाचा असतांनाच त्याग करण्यास अश्यक्य अशा मातापितरांचेठिकाणी असलेल्या स्नेहाचासुद्धा त्याग केला आहे तो तो हा कृतघ्नविष्णूचे तरी काय हित करणार आहे ?||३६|| भावार्थ:---आतां कसा झाला तरी हा आपला पुत्र आहे?तेव्हा ह्याचा वध कसा करावा?असे म्हणशील तर---हे राक्षसहो,जसे औषध परिणामी हितकारक असते,त्याप्रमाणेच एकदा परकीसुद्धा जर आपला हित-- कारक असेल तर तो आपले अपत्यच समजला पाहिजे आणि आपला औरस पुत्र असला तरी जर अहित करणारा असेल तर त्याला रोगाप्रमाणे आपला शत्रू समजले पाहिजे फार तर काय,प्रेमस्थानभूत अशा आपत्यादिकांची तर गोष्ट राहुद्याच परंतु,आपल्या शरीराचाही एकादा अवयव जर आपले हित करणारा नसेल तर तो तोडून टाकावा.कारण,तेवढ्याच त्याग केला असता,बाकीचे शरीर सुखाने वाचते.||३७|| भावार्थ:---तस्मात्,भोजन,शयन आणि आसन इत्यादी सर्व उपायांनी म्हणजे भोजनादिकांचेठिकाणी विषप्रयोग करून,ह्यांचा वध करा.कारण,विषयासक्त झालेले इंद्रिये जसे मुनीला शत्रुवत असते,त्याचप्रमाणेच पुत्रवेश धारण करणारा हा माझा शत्रूच आहे.||३८|| भावार्थ:---असो.तीक्ष्णद्रष्टा,भयंकर सुखे,आणि आरक्तवर्ण अशा श्मश्रू व नेंस ह्यांनी युक्त असलेल्या त्या राक्षसांना,स्वामी हिरण्यकशिपूने,अशी आज्ञा केली असता,त्यांनी हातामध्ये शुले धारण केली.||३९|| भावार्थ:---आणि भयंकर गर्जना करणाऱ्या व तोडा,मारा असे म्हणणाऱ्या त्या राक्षसांनी,शुलांच्या योगाने स्वस्थ बसलेल्या त्या प्रल्हादाला सर्व मर्माचेठिकाणी प्रहार केले.||४०|| भावार्थ:---परंतु,दैवहीन पुरुषाचे जसे मोठमोठेहि उद्योग व्यर्थ जातात त्याप्रमाणे प्रल्हादाचेठिकाणी केलेले त्या राक्षसदिकांचे प्रहार निष्फल झाले.कारण,त्याने आपले मन निर्विकार,निर्विषय,निरतिशय,ऐश्वार्यांनी युक्त आणि शास्त्रादिकांचाही नियंत अशा परमेश्वराच्या ठिकाणी लावले होते.आपण--जीवानी आपले मन निर्विकार--विकाररहित,निर्विषय--विषयरहित,निरतिशय--अमर्यादयुक्त असा परमात्मा आणि ईश्वर यांच्या ठिकाणी लावावे,कारण तो परमात्मा सुखरूप आहे.तर जो संसार विकारी,विषयी,मर्यादित,आणि जीवाच्या ठिकाणी लाऊ नये,कारण संसार दु:खरूप आहे.||४१|| भावार्थ:---हे युधिष्ठीरा ह्याप्रमाणे त्या प्रल्हादाचेठिकाणी दैत्याचा मारण्याविषयीचा प्रयत्न निष्फळ झाला असता,दैत्यराज हिरण्यकशिपूला फारच शंका उत्पन्न झाली व अत्यंत आग्रहपूर्वक त्याने त्याच्या वधा-- विषयी उपाय योजिले.||४२|| भावार्थ:---ते असे की,----दिग्गजांच्या पायाखाली तुडविणे,मोठमोठ्या सर्पाकडून दंश करविणे,कृत्यादी अभिचारांनी मारविणे,पर्वत शिखरादिकापासून खाली लोटून देणे,नानाप्रकारच्या उपायांनी घात करविणे,खड्यामध्ये घालून आच्छादित करणे,विषप्रयोग करणे,उपवास घालणे,थंडीमध्ये ठेवणे,वाऱ्यामध्ये बसविणे,अग्नीमध्ये टाकणे,पाण्यामध्ये बुडविणे आणि त्याच्यावर पर्वत फेकणे इत्यादी अनेकवेळा योजिलेल्या उपायांनी जेव्हा तो असुर,आपल्या निष्पाप पुत्रास मारण्यास समर्थ झाला नाही व त्याचा वध करण्यास जेव्हा त्याला काहीच उपाय सुचेनासा झाला तेव्हा तो अत्यंत चिंताग्रस्त होऊन मनामध्ये म्हणाला की,-----||४३-४४|| भावार्थ:---अहो,मी ह्याला पुष्कळ वाईट-वाईट भाषण केले,तसेच नानाप्रकारचे द्रोह व अभिचारादि निंद्यधर्म ह्यांच्या योगाने ह्याच्या वधाचे उपायही योजिले.परंतु,त्यांपासून हा आपल्याच सामर्थ्याने मुक्त झाला.हा बालक शून:शेपाप्रमाणे म्हणजे अजीगर्ताचा मध्यमपुत्र जो शून:लेप त्याला आईबापांनी हरिश्चंद्र राजस विकले असता,जसा त्याने आईबापाचा अपकार मनात धरून त्यांचा शत्रू असलेल्या विश्वमित्राचा आश्रय करून,दुसरे गोत्र पावला,त्याप्रमाणे माझे शत्रुत्व विसणारा नाही.||४६|| भावार्थ:---अहो काय सांगावे?ह्याचा प्रभाव अपरिमित असल्यामुळे ह्याला कोणापासूनहि भय नाही,हा अमर आहे.तस्मात,ह्यांच्याच विरोधामुळे नि:संशय मला मृत्यू प्राप्त होईल,नाही तर मुळीच प्राप्त होणार नाही.||४७|| भावार्थ:---असो.अशा प्रकारच्या चिंतेने किंचित निस्तेज होऊन एकांतस्थळी खाली मन घालून बसलेल्या त्या हिरण्यकशिपूला,शुक्राचार्याचे पुत्र शंडामार्ग असे म्हणले की,------------------||४८|| भावार्थ:---हे प्रभो,भ्रुकुटीच्या चलनानेच ज्यांतील सर्व लोकपाल भयभीत झाले आहेत असे हे त्रैलोक्य, ज्याअर्थी तू एकट्याने जिंकले आहेस त्याअर्थी तुला चिंतास्पद असे म्हणशील तर---हे राजा,बालकांची वर्तणूक मुळीच गुणदोषांला विषय होत नाही.आपण--जीवानी भक्त प्रल्हादासारखी गुण-दोषरहित अवस्था प्राप्त करून घ्यावी,कारण परमात्मा गुण-दोषरहित आहे.जो गुण-दोषरहित आहे,तो सुखरूप आहे.||४९|| भावार्थ:---तथापि हे असुरश्रेष्ठा शुक्राचार्य गुरु,तपश्चर्या पुरी करून माघारा येईपर्यंत,हा भयभीत होऊन पळून वगैरे न जाईल अशारितीने तू याला वरूनपाशांनी बंधन करून ठेव.कारण,वय आणि महत्सेवा ह्यांच्या योगाने पुरुषाची बुद्धी चांगली होते.आपण--जीवानी महत्सेवा--संत-महात्मा-ईश्वर--सात्विक--सेवा करावी,करण ती सेवा परमात्म्याकडे नेते--सुखरूपतेकडे--जन्म-मरणनिवारणकडे नेते,तर विषयांची--संसाराची सेवा करू नये,कारण ती सेवा संसाराकडे--दु:खाकडे,जन्म--मरणाकडे नेते.||५०|| भावार्थ:---ह्याप्रमाणे गुरुपुत्राने केलेल्या भाषणाचा ठीक आहे म्हणून अंगीकार करून,हिरण्यकशिपूने असे भाषण केले की,--हे गुरुपुत्राहो,गृह्स्थाश्रमी राजाचे जे धर्म आहेत तेच तुम्ही ह्याला--प्रल्हादाला शिकवावे.||५१|| भावार्थ:---हे धर्मराज,नंतर त्या शंडाकर्मानी विनययुक्त आणि नम्र अशा प्रल्हादाला अनुक्रमाने धर्म,अर्थ काम हेच निरंतर पढविले.||५२|| भावार्थः---परंतु,गुरूंनी आपल्याला यथासांग शिकवलेले जे धर्म,अर्थ व काम ते त्याने चांगले असे मानिले नाहीत.कारण ति शिक्षा रागद्वेषादी द्वांद्वांनी विषयांचेठिकाणी रममाण होणाऱ्या पुरुषांनीमात्र चांगली म्हणून वर्णन केलेली होती,सत्पुरुषांनी वर्णन केलेली नव्हती.म्हणून आपण--जीवानी धर्म,अर्थ,काम हे पुरुषार्थ प्रवृत्तीपर--संसारापर आहेत आहेत,तर मोक्ष नावाचा चौथा पुरुषार्थ हा निवृत्तीपर असून परमात्म्याकडे--सुखारुपातेकडे नेणारे आहेत,म्हणून आपण निवृत्तपर असलेला चौथा पुरुषार्थाच स्वीकार करावा,की जो भक्त-प्रल्हादानी स्वीकारलेला आहे.तो उपदेश जन्म--मरण निवृत्त करणारा आहे.||५३|| भावार्थः---तेव्हा त्यांची जन्ममरणरूप स्थित जाणणाऱ्या त्या महाज्ञांनी प्रल्हादाने,मधुरवाणीने त्यांनाच उलट आपल्या जवळ बोलाविले आणि त्यांचा उपहास केल्यासारिखे करून कृपेने त्यांप्रत भाषण केले.||५५|| भावार्थः---हे राजेंद्रा,ते बालक असल्यामुळे रागद्वेषादी द्वंद्वांनी विषयासक्त झालेल्या पुरुषांच्या उपदेशांनी व आचरणांनी त्यांची बुद्धि दुषित झाली नव्हती म्हणून प्रल्हादाच्या भाषणाच्या गौरवामुळे त्या सर्वांनी क्रीडासाधनभूत पदार्थांचा त्याग केला व आपले अंतःकरण आणि दृष्टि त्याच्याकडे लाऊन ते त्याच्या सभोवती बसले असतां,दयालु व हितकारी अशा त्या महाभगवद्भक्त प्रल्हाद असुरांने त्यांना उपदेश केला.म्हणून आपणास--जीवास उपदेश करण्याचा अधिकार असेल तर--आपली योग्यता असेल तर आपण--जीवानी जे जीव अज्ञानी आहेत,त्यांचे अज्ञान निवृत्त करण्याकरिता उपदेश--जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा करून सदगुरुंच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न आवश्य करावा,कारण आपल्या--जीवाच्या अज्ञान अवस्थेत आपल्या सदगुरूंनी आपल्यासाठी केलेलाच असतो.म्हणून आपणही आवश्य उपदेश करणे हा आपला--जीवाचा स्वधर्म आहे.||५६-५७|| ५-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्तम(७)स्कंधातील प्रल्हाद-वधोपायवर्णननामक हा पांचवा(५) अध्याय सत्तावन(५७)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||५|| | |||श्रीकृष्णाअर्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________६--- आता ह्या सहाव्या अध्यायामध्ये,गृहामध्ये गुरु व्यग्र झाला असता प्रल्हादाने दैत्य बालकावर कृपाकरून नारदांनी सांगितलेल्या परमतत्वाचा त्यांना उपदेश केला हि कथा वर्णन केलेली आहे.त्यामध्ये प्रथमतः निरर्थक कर्मे व भाषणे ह्यांच्या योगाने आयुष्याचा व्यय होतो हे न जाणणाऱ्या त्या बालकांचा,धर्मात्म्या प्रल्हादाने कृपापूर्वक भागवतधर्माचे कथन केले आहे.||६|| ६----- प्रल्हादाचा असुर---बालकांना उपदेश ____________________________________________________________________________________________ भावार्थः---प्रल्हाद म्हणाला---हे बालक हो,ज्ञानीपुरुषाने ह्या मनुष्यजन्मामध्येंच व त्यांहूनही अगदी कौमारावास्थेमध्येंच आचरण करावे,कारण हा अविनाशी असून सुखस्वरूप आहे,तर सकाम--धर्मांचे आचरण करू नये.कारण,हा विनाशी असून दु:खस्वरूप आहे.मनुष्यजन्मच दुर्लभ--प्राप्त होण्यास कठीण असून पुरुषार्थप्रद आहे व त्यांतून तो--मनुष्य-देह अशाश्वत आहे--शाश्वत नाही,म्हणजे या स्थूल-देहास कधी मरण येणार हे कळत नाही,म्हणून आपण कौमारावस्थेपासूनच सत्संग करावा.म्हणजे थोडक्यात ब्रह्माचारी हे व्रत स्वीकारून करावा,कारण ब्रह्मचारी अवस्था हि एकट्याचीच असते--असंग असते.||१|| भावार्थ:---आता ह्या मनुष्यजन्मामध्ये भागवतधर्माचेच आचरण करावे,हे चार श्लोकांनी उपपादन करितो -ह्या मनुष्यजन्मामध्ये विष्णूच्या चरणाप्रत शरण जाणे हेच पुरुषाला योग्य आहे.कारण,हा विष्णूच सर्व भूतांचा आत्मा--अंतर्यामी,ईश्वर,प्रिय आणि हितकारी आहे.म्हणून जो सर्वांचा हितकारी आहे त्यालाच शरण जावे,कारण सर्वांचा जो असतो,तो भेद करीत नसतो.जो कांहीचा असतो व कांहीचा नसतो,तो भेद करीत असतो,तो सर्वांचे कल्याण करीत नसतो.म्हणून आपण जो सर्वांचा आहे,त्याला शरण जावे.||२|| भावार्थ:---आता विषयभोग प्राप्त होण्याचा उद्योग कसा सोडवा असे म्हणाला तर हे दैत्याहो,जसे प्राण्यांना आयास न करिता पुर्वकर्मानेच दु:ख प्राप्त होते त्याप्रमाणेच देहाच्या योगाने इंद्रियसंबंधी सुखही सर्वयोनीमध्ये दैवयोगाने--प्रारब्ध-योगानेच प्राप्त होते.||३|| भावार्थ:---म्हणून त्याच्याकरिता--दैव-योगाकरिता--प्रारब्ध-योगाकरिता प्रयत्न करू नये.कारण प्रयासेकरून ---प्रयत्न करून केवळ आयुष्याचा व्यय मात्र होतो.काहीच फल प्राप्त होत नाही.जसा मुकुंदाच्या चरणकमलाची सेवा करणारा पुरुष,परमानंदरूप क्षेम--सुखास पावतो तसा विषयसुखार्थ प्रयत्न करणारा पुरुष,क्षेम--सुखास प्राप्त होत नाही,तर दु:खास प्राप्त होतो.||४|| भावार्थ:---ह्यास्तव संसारामध्ये प्राप्त झालेल्या विवेकी पुरुषाने जोपर्यंत सर्वांगानी परिपूर्ण असलेल्या आपल्या शरीराचा नाश झाला नाही तोपर्यंत लवकरच कल्याणकारी प्रयत्न करवा.संसारामध्ये म्हणजेच जन्म-मरणरुपी संसारमध्ये प्राप्त झालेल्या विवेकी-पुरुष्याने जोपर्यंत सर्वांगानी परिपूर्ण असलेल्या आपल्या स्थूल--शरीराचा नाश झाला नाही म्हणजे या शरीरातून प्राण निघून गेला नाही,तोपर्यंत जन्म-मरणरूपी--संसार सत्संगाद्वारे निवृत्त करावा.त्यामुळे आपल्या--जीवाच्या अत्यंतिक दु:खाची निवृत्त करून परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी.म्हणजेच चौथा जो पुरुषार्थ मोक्ष आहे,तो प्राप्त करून घ्यावा,करण मनुष्य--योनी सोडून इतर ज्या योनी--देवता--योनी,इतर जे प्राणीमात्र पशु--पक्षादी आहेत,त्या योनीत प्राप्त करता येत नाही.फक्त मनुष्य देहातच व मृत्यू लोकातच संसार--जन्म--मरण निवृत्त करता येतो व इतर योनीत फक्त संसारच करता येतो.म्हणून जेथे जे करता येते,तेथेच तेच करावे,अन्य करू नये.अन्य केल्यास दु:खच प्राप्त होते,तर सुख प्राप्त होत नाही.||५|| भावार्थ:---अहो,पुरुषाचे आयुष्य आदी मूळ शंभरवर्षे,त्यातील अर्धे इंद्रियग्रह न करणाऱ्या पुरुषाचे व्यर्थ जाते.कारण,तो पुरुष,रात्रीचेठिकाणी निद्रात्मक अज्ञानामध्ये निमग्न होवून निजून राहतो||६|| भावार्थ:---तसेच बाल्यावस्थेमध्ये अज्ञानी असल्यामुळे दहावर्षे,कौमारावस्थेमध्ये खेळत असल्यामुळे दहावर्षे,मिळून विस-वर्षे आणि वृद्धावस्थेमध्ये जरेने शरीर ग्रस्त होवून असक्त झाल्यामुळे विसवर्षे असे एकून चाळीस वर्षे आयुष्य फुकटच जाते.मानव--शरीराची साठ वर्षे परमार्थ करण्यासाठी शिल्लक राहतात.म्हणून त्या राहिलेल्या साठ वर्षे फक्त सत्संगच करावा,अन्य कांहीच करू नये. ||७|| भावार्थ:---आणि बाकीचे आयुष्य,प्रबल मोहाने व दु:खाणी चोहोकडून परिपूर्ण अशा कामाच्या योगाने गृहामध्ये आसक्त झालेल्या त्या प्रमत्त पुरुषाचे व्यर्थ जाते.म्हणून आपण--जीवानी गृह व गृहसंबंधी व देह व देहसंबंधी जे आहेत,त्यांची आसक्ती म्हणजे फक्त तेच कार्य करू नये.तर त्यांची आसक्ती सोडून पारमार्थिक कार्य करावे.||८|| भावार्थ:---आता यौवनावस्थेमध्ये पुरुष जरी गृहासक्त असला तथापि नंतर विरक्त होवून क्षेम मार्गाचे अवलंबन करील(असे म्हणावे तर ते असंभवनिय आहे असे दर्श दर्शवीत असता कौमारवस्थेमध्येच भागवत धर्माचे आचरण केले पाहिजे असे प्रतिपादन करितो)हे दैत्य हो,इंद्रियदमन केलेला असा कोण बरे पुरुष,गृहामध्ये आसक्त झालेल्या व स्नेहरूप दृढ पाशांनी बद्ध झालेल्या आपल्या स्वत:ची सुटका करण्यास समर्थ होईल?कोणीच होणार नाही.म्हणून गृहस्थाश्रमापुर्वीच म्हणजे कौमारेवास्थामध्येच मन आणि इंद्रिये ताब्यात घेऊन म्हणजेच अधिकारसंपन्न होऊन साधू--महात्मा यांचा सत्संग करावा.||९|| भावार्थ:---तसाच ज्या द्रव्याला चोर सेवक आणि वाणी हे अतिप्रिय अशा आपल्या प्राणांनीसुद्धां विकत घेतात,म्हणजे प्राणाची हानिसुद्धा पतकरून मिळविण्याचा प्रयत्न करितात--प्राणास कष्ट देतात.म्हणजेच प्राणापेक्षा द्रव्यास अधिक किंमत देतात.व त्या प्राणापेक्षांही प्रिय असलेल्या द्रव्याची इच्छा कोण बरे पुरुष,सोडून देईल?कोणीच देणार नाही.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून विवेक केला तर आपणच आपणास प्रिय आहोत,आपणापेक्षा इतर आपणास कोणीच प्रिय नाही.असे आहे म्हणून आपण--जीवानी आपणास--जो परमात्मा आपणच आहोत,त्यासच प्राप्त करून घ्यावे.परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी जे--जे साधने आहेत,त्याच्यासाठीच--आपल्यासाठीच--परमात्म्यासाठीच खर्च करावे,तर अन्यासाठी--संसारासाठी खर्च करू नये. ||१०|| भावार्थ:---जसा कोश नावांचा कीटक आपणाला हितकारक असे घर निर्माण करीत असता,शेवटी आपणास त्याहून बाहेर पडण्यासही मार्ग ठेवीत नाही,त्याप्रमाणे विषयांची इच्छा तृप्त न झाल्यामुळे लोभाने स्वत:च्या बंधास कारण होणारी कर्मे करणारा जो पुरुष,पुत्रकलत्रदिकांचे ठिकाणी अनुरक्त चित्त असल्यामुळे त्याच्या स्नेहरूप पाशाने बद्ध होवून राहतो तो पुरुष,दयायुक्त अशा प्रिय भार्येचा एकांतस्थळी घडलेला संग,तिच्या बरोबर झालेली मनोहर व हितकारक भाषणें,सुहृदांचेठिकाणी असलेली संगती,मधुर शब्द उच्चारणाऱ्या स्त्रियांची--बायकांची संगती,पुत्र,सासरी असलेल्या त्या मनोहर कन्या,भ्राते,भगिनी,वृद्धावस्थेमुळे दीन झालेले मातापितर,सुंदर आणि पुष्कळ अशा सामानांनी युक्त असलेली घरे,कुलपरंपरेने आलेल्या वृत्ती,पशुसमुदाय आणि भृत्यगण ह्या सर्वांचे स्मरण करील असता,ह्या सर्वांचा त्याग करण्यास कसा बरे समर्थ होईल?होणारच नाही.आपणास--जीवास अज्ञान नावाचा दोष असल्यामुळे आपले हित जो संसार दु:खरूप आहे,तोच सुखास कारण असे वाटत असल्यामुळे त्यांच्यातच आसक्त--रममाण होतो,म्हणून ते दु:खदायक असूनसुद्धा सुखदायक वाटतो.म्हणून आपण--जीवानी संत--महात्मा यांचा सत्संग केला असता,संसाराचे व संसारातील वस्तूचे तसेच देहाचे व देहसंबंधीचे यथार्थ--जसे आहे,तसे स्वरूप कळते.यांचे जसे आहे,तसे स्वरूप कळले असता त्यांचे अनित्यत्व कळल्यामुळे वैराग्य उत्पन्न होऊन त्याग करतो.तसेच आपणास--जीवास सत्संग केल्यामुळे परमात्मा याचे यथार्थ स्वरूप कळल्यामुळे सर्व विषयांचा त्याग करून सुखस्वरूप असलेला परमात्मा याचा अनुभव घेतो.त्यामुळे आपले जन्म--मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होते.||११||१२||१३|| भावार्थ:---आता दुरंत मोहपणा तो कसा तो सांगतो---हे असुरबालक हो,संसारी पुरुष प्रमत्त--आसक्त असतां,कुटुंबाच्या पोषणार्थ आपल्या आयुष्याचा क्षय होत आहे व आपण पुरुषार्थाला मुकलो आहे हे जाणत नाही व सर्वकाळी आणि सर्वठिकाणी तापत्रयाने दुख: पावत असूनही कुटुंबामध्ये रममाण होत असल्यामुळे त्याला त्या कुटुंबामध्ये दु:ख आहे असे वाटत नाही.म्हणून आपण साधू--महात्म्याचा सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून कळून घ्यावे.त्यानंतर आपणास--जीवास कळते की संसार हा दु:खरूप आहे व परमात्मा हा सुखरूप आहे.||१४|| भावार्थ:---अहो फारतर काय परंतु,आपले--जीवाचे चित्त इतरांच्या द्रव्याचेठिकाणी संलग्न झालेले असले तर आपण--जीव परवित्त--इतरांचे द्रव्य हरण करणाऱ्या आपणास--जीवास परलोकी नरकरूप व इहलोकी राजदंडादिरूप दुःख भोगावे लागते,हे जाणत असूनही जितेंद्रिय नसल्यामुळे व आपल्याठीकानी--जीवाच्याठीकानी द्रव्याभिलाषाची शांति झाली नसल्यामुळे आपण--जीव परवित्त--इतरांचे द्रव्य हरण करितोच.म्हणून आपण--जीवानी इतरांचे द्रव्य हरण न करिता आपल्या--जिवाच्या स्वधर्मांनुसार धन प्रयत्न करून घ्यावे व त्यानुसार स्वखर्च करावा.असे केले तर आपणास नरकावस्था प्राप्त न होता दु:ख भोगावे लागणार नाही व मृत्युलोकांतील राजदंड जो दु:खदायक असलेला तोही भोगावा लागणार नाही.असे सर्व कळण्याकरिता साधू--महात्मा यांचा सत्संग करावा व त्यानुसार आचरण करावे.||१५|| भावार्थः---असो ह्याप्रमाणे गृहादिकांचेठिकाणी आसक्त असलेल्या पुरुषाला वैराग्य वगैरे होण्याचा संभव नाही असे सात श्लोकांनी उपपादन केले त्याचा उपसंहार करितो-हे दानवहो,ह्याप्रमाणे कुटुंबपोषण करणारा विद्वान पुरुषही निश्चयेकरून आत्मज्ञानाविषयी समर्थ होत नाही तर अत्यंत मूढजनांप्रमाणे तो विद्वानसुद्धां गृहादिकांचे ठिकाणीच आसक्ति करूं लागतो,कारण,हे माझे व हे दुसऱ्याचे असा भिन्नभाव त्याचेठिकाणी वास करीत असतो||१६|| भावार्थः---असे सांगून आतां कौमारावस्थामध्येच भागवतधर्माचे आचरण करावे ह्याचा हेतूदर्शनपूर्वक उपसंहार करितो की,---हे दैत्यहो,ज्याअर्थी आपल्यात--जीवात विषयांचेठिकाणी अत्यंत लंपट--आसक्ती--विषय असावेतच हि तीव्र भावना आणि नेत्रकटाक्षामध्ये मदन--कामासक्ती आहे व ज्याच्यासंबंधाने शृंखलेप्रमाणे बंधास कारण अशी पुत्रपौत्रादि संपत्ती प्राप्त होते त्या स्त्रियांबरोबर क्रीडा करण्यांकरीता वानराप्रमाणे अतिलंपट--विषयांत अति आसक्त--विषय भोगण्यासाठी असावेतच अशी तीव्र भावना असे आपण--जीव,कोणत्याहि ठिकाणी व कोणत्याहि काली आपली स्वतःची सुटका करून घेण्यास समर्थ होत नाही त्याअर्थी आपण--जीव विषयांचेच ठिकाणी आसक्त असणाऱ्या दैत्यांचा संग सोडून देऊन,आदिदेवनारायणाला--परमात्म्याला जो सुखरूप आहे,त्यास सत्वर शरण जावे.कारण,सर्वसंग परित्याग केलेल्या विवेकी पुरूषांनीही त्याच्याच मोक्षत्वेकरून स्वीकार केला आहे.आपण--जीव कनिष्ट आहोत व साधू--संत--महात्मा हे श्रेष्ठ आहेत,म्हणून कनिष्ठांनी--आपण--जीवानी श्रेष्ठांचे अनुकरण करावे,कारण त्यात आपले परम--हित--सुखरुपता आहे.ती सुखरूपता आपणास--जीवास हवी आहे.||१७-१८|| भावार्थ:---आतां,आम्हां बालकांच्या हातून त्याची सेवा होणे अवश्य आहे,असे म्हणाल तर----हे दैत्यपुत्रहो,भगवान अच्युत सर्वभूतांचा आत्मा--अंतर्यामी व ब्रह्माडांमध्ये सर्वत्र सिद्ध असल्यामुळे त्याला प्रसन्न करून घेणाऱ्या पुरुषाला फारसा प्रयास पडत नाही,कारण तो आपल्या--जीवाच्या अंत:करणातच--जवळच आहे,इतरत्र--दूर जाण्याची मुळीच गरज नाही,म्हणून प्रयास--कष्ट पडत नाही.म्हणून आपण सत्संग करून प्राप्त करून अनुभव घ्यावा. ||१९|| भावार्थः---आतां,अच्युत सर्वभूतांचा आत्मा व सर्वत्र सिद्ध आहे हे कशावरून,असे म्हणाल तर हे बालक हो,वृक्षपाषाणादिकांपासून तो ब्रहमदेवापर्यंत असलेल्या लहानथोर जीवांमध्ये,पंचभुतांपासून झालेल्या अचेतन घटपटादिक पदार्थांमध्ये,आकाशादि पंचमहाभूतांमध्येच सत्वादिगुणांमध्ये,मायेमध्ये व गुणांचे विकार अशा महत्तत्तवादिकांमध्ये--म्हणजेच मायाच्या कार्यामध्ये ब्रह्मस्वरूप,सर्वांतर्यामी--सर्वांच्या अंत:करणात परमात्मा,अचिंत्य--ज्याचे मनाच्याद्वारे शब्दाने शब्दाने वर्णन करता येत नाही,तर त्याचा विषयांतीत होऊन अनुभवच घ्यावा लागतो.ऐश्वर्यांनी म्हणजे यश,श्री,औदार्य,ज्ञान,वैराग्य,ऐश्वर्य-युक्त आणि अपक्षयादि-विकारशून्य असा एकच ईश्वर भासत आहे.||२०-२१|| भावार्थ:---बरे,तर मग द्रष्टा व दृश्य आणि भोक्ता व भोग्य इत्यादिक कसा घडतो असे म्हणाल तर---हे मित्रहो,केवल अनुभवात्मक आनंदस्वरूपी जो ईश्वर तो स्वतः भेदरहित व निर्देश करण्यास अशक्य असूनही,अंतर्यामी द्रष्ट्याच्या स्वरूपाने व्यापकत्वेकरून--व्यापक व योग्य अशा देहादिदृश्याचया स्वरूपाने व्याप्यत्वेकरून--मार्यादेकारून जाणावयास योग्य आहे तथापि त्याने--परमात्म्याने गुणमय सृष्टि उत्पन्न करणाऱ्या मायेच्या योगाने आपले ऐश्वर्य आच्छादित करून टाकिले आहे म्हणून तो सर्वत्र असतांही त्याचे सर्व ठिकाणी सर्वज्ञत्वादिक गुण उपलब्ध होत नाहीत.||२२-२३|| भावार्थ:---यास्तव तुम्ही असुरस्वभावाचा त्याग करून,जिच्यायोगाने अधोक्षज भगवान संतुष्ट होतो तीसर्वभूतांचेठीकांनी दया आणि मैत्री धारण करा||२४|| भावार्थ:---बरे भगवान संतुष्ट झालां असतां काय फळ प्राप्त होते असे म्हणाल तर---तो आदिपुरुष भगवान अनंत संतुष्ट झालां असतां,काय बरे दुर्लभ आहे?काहीच नाही,यास्तव गुणपरिणामरूप दैवानेच अनायासाने आपोआप प्राप्त होणारे जे धर्मादी पुरुषार्थ ते आचरण करून त्यांच्यायोगाने आम्हांला काय करावयाचे आहे व मोक्षाची इच्छा करून तरी काय उपयोग आहे?कारण,भगवच्चरनसंबंधी ज्ञान--अमृताचे सेवन करणाऱ्या आम्हांस त्या मोक्षाची इच्छा करून तरी काय करावयाचे आहे?काहीच नाही,करण आम्ही परमात्माच,सत्-चित्-आनंद,अद्वेतच,सुखरुपच आहोत.||२५|| भावार्थ:---(आता धर्मादिक जर पुरुषार्थ नाहीत तर गुरूंनी तरी ते वेदोक्त असल्यामुळे सत्य आहेत असे कसे प्रतिपादन केले,असे म्हणाल तर)हे असुरहो,धर्म,अर्थ व काम म्हणून जो त्रिवर्ग सांगितला आहे व त्याकरितां आत्मविद्या,कर्मविद्या,तर्कशास्त्र,दंडनिती व नानाप्रकारची जी जीविका साधने आहेत ते हे सर्व,वेदामध्ये सांगितले आहे परंतु ते जर अंतर्यामी परमपुरुष भगवंतास स्वात्मनिवेदन करण्याविषयी साधनभूत असेल तरच त्याला मी सत्य मानितो,नाही तर ते असत्यच आहे.सर्व साधने अनात्मच आहे,तर परमात्मा साधनातीत आहे.||२६|| भावार्थ:---आतां,आपल्या भाषणावर त्यांचा विश्वास बसावा ह्याकरीता त्यांना गुरुसंप्रदाय कथन करण्याच्या अभिप्रायाने पुनरपि प्रल्हाद करितो की,हे दैत्यपुत्रहो,निर्मल व दुर्लभ असे जे हे ते पूर्वी ज्याचा नर हा सखा आहे अशा नारायणाने खरोखर नारदाला सांगितले होते.आतां जेथे नारद श्रोता तेथे आम्हांसारख्यांचा अधिकार कोठून असणार अशी हि तुझी शंका घेऊ नका.कारण,सर्वसंग परित्याग केलेल्या एकनिष्ठ भगवद्भक्तांच्या चरणकमलांच्या रजःकणांचे ज्या प्राण्यांना स्नान झाले आहे त्या सर्वांनाही ते ज्ञानप्राप्त होते,उत्तम पुरुषांनाच होते असा नियम नाही.आपण--जीवानी भगवद्भक्तांचा अधिकार-संपन्न होऊन,सत्संग केला असता सर्वांनाही ज्ञान प्राप्त होते.||२७|| भावार्थ:---म्हणूनच मी सुद्धां अनुभवपर्यंत हे ज्ञान व शुद्ध असा भागवत धर्म हे दोन्ही प्रकार,भगवंताचे दर्शन होणाऱ्या नारदापासून श्रवण केले आहेत.म्हणून आपण--जीवानी परमात्म्याचा अनुभव येईपर्यंत सत्संग करावा.परमात्म्याचा अनुभव आल्यानंतरच जन्म--मरण निवृत्त होते.||२८|| भावार्थ:---असो,ह्याप्रमाणे प्रल्हादाने केलेले भाषण श्रवण करून अत्यंत विस्मित झालेले ते दैत्यपुत्र म्हणाले की,---हे प्रल्हादा,ह्या गुरुपुत्रावाचून तुला व आम्हांला दुसरा गुरु मुळीच माहित नाही.आतां ह्यांच्याजवळ येण्यापूर्वीच मी नारदासमीप गेलो होतो असे म्हणशील तर---आपण अगदी लहान होतो तेव्हांपासूनच हे आपले गुरु आहेत,तेव्हा येथून इतरठिकाणी कोठेतरी तूं गेला होतस हे संभवत नाही.||२९|| भावार्थ:---आता,तो नारदामुनी येथे आला होता असे म्हणावे तर,तेही संभवत नाही.कारण-अंतःपुरामध्ये असलेल्या बालकाला महात्म्यांचा समागम होणे दुर्घट आहे तस्मात हे प्रियदर्शना प्रल्हादा,तुझ्या वचनावर आमचा विश्वास बसण्यास जर कांही योग्य कारण असेल तर ते सांगून तूं आमचा संशय दूर कर.||३०|| ६---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणातील सप्तम(७)स्कंधापैकी प्रल्हादकृत तत्त्वोपदेशकथननामक हा सहावा(६) अध्याय तीस(३०)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |७-----आतां या सातव्या अध्यायामध्ये,प्रल्हादाने,आपण मातेच्या गर्भामध्ये असतांना आपणास नारदापासून हे श्रवण केले असे सांगण्यासाठी बुद्धिमान् प्रल्हादाने सोळा(१६)श्लोकांनी त्याची प्रस्तावकथा सांगितली आहे.||७|| |७----- मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन. ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्याप्रमाणे महाभगवद्भक्त प्रल्हादाला दैत्यपुत्रांनी प्रश्न केला असतां,विस्मययुक्त असलेल्या दैत्यपुत्रांना माझ्या उपदेशाने स्मरण करीत असतां तो प्रल्हाद म्हणाला की,-------------------------||१|| भावार्थ:---प्रल्हाद म्हणाला---हे दैत्यपुत्रहो,आमचा पिता (हिरण्यकशिपू)तप करण्याकरितां मंदरपर्वतावर गेला असतां,जसा मुंग्या सर्पाला भक्षण करतात त्याप्रमाणे लोकांना अतिशय ताप देणाऱ्या ह्या पाप्याला त्याच्या पापानेच भक्षण केले हे फार चांगले झाले,म्हणून आपण--जीवानी पाप न करता निष्काम पुण्य करावे.असे हर्षपूर्वक भाषण करणाऱ्या इंद्रादी देवांनी,दानानां--बरोबर युद्ध करण्याकरितां मोठा उद्योग आरंभिला.||२-३|| भावार्थ:---तेव्हा तो त्यांचा अतिपराक्रमांचा उद्योग अवलोकन करून,सर्वही असुरांचे सेनापती,भयभीत झाले आणि देवांनी वध्यमान--वध करण्यास योग्य असे ते आपल्या स्त्रियां,पुत्र,मित्र,आप्त,गृहे,पशु आणि भोगसाधनभूत पदार्थ ह्यांच्याकडे लक्ष न देतां त्यांचा त्याग करून,आपल्या प्राणांचे रक्षण होण्याची इच्छा धारण करून दश--दिशांकडे पळून गेले.आपणास--जीवास आपला जीव प्रिय असतो,तर इतर प्रिय नसतात.इतर प्रिय वाटत असले तरी स्वत:साठीच प्रिय असतात.म्हणून स्त्रियां,पुत्र,मित्र,आप्त,ग्रह, पशु,सोडून पळून गेले.||४-५|| भावार्थ:---त्यावेळी विजयेच्छू-देवानी राजवाडा लुटून त्यांतील सर्व द्रव्यांचा अपहार केला.इंद्राने तर राजाची पट्टराणी माझी माता जी कयाधू,तिचे ग्रहण करून घेऊन चालला.||६|| भावार्थ:---तेव्हां मार्गामध्ये कुररी-पक्षिणीप्रमाणे भयाने उद्विग्न होऊन रोदन करीत असलेल्या तिला--कयाधू-मातेला त्याठिकाणी अकस्मात प्राप्त झालेल्या नारदाने अवलोकन करून,तिला घेऊन जाणाऱ्या इंद्राला असे सांगितले की,हे देवेंद्रा,ह्या निरपराधी स्त्रीला घेऊन जाणे हे तुला योग्य नाही.हे महाभाग्यवंता,तूं इला सोड-सोड.कारण,हि पतिव्रता असून परस्त्री आहे.आपण--जीवानी निरपराधी परस्त्रीस बळेच आपल्याकडे किंवा इतरत्र नेऊ नये.आपण--जीवानी नेल्यास तो अपराध ठरत असतो.||७-८|| भावार्थ:---तेव्हा इंद्र म्हणाला---हे देवर्षे,हिच्या कुक्षीमध्ये देवदृष्टी हिरण्यकशिपूचे,सहन करण्यास अत्यंत अश्यक्य असे वीर्य(गर्भरूपाने वाढत)आहे;ह्यास्तव हिला प्रसूत होईपर्यंत असूं दे.नंतर हिच्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राचा वध केल्यावर मी हिला सोडून देईल.||९|| भावार्थ:---नारद म्हणाला:---हे इंद्र,हा हिचा गर्भ,साक्षात भगवान् अनंताचा सेवक,बलाढ्य,निर्दोष,आपल्याच गुणांनी मोठा आणि महाभगवतभक्त असल्यामुळे तुझ्या हातून मरण पावनार नाही.आपण--जीवानी इंद्राप्रमाणे कोणत्याही जीवास--त्यातल्यात्यात भगवद्भक्तास मारण्याचे आपल्या--जीवाच्या मनातही येऊ नये,तर प्रत्यक्ष कृती तर करू नये.||१०|| भावार्थ:---ह्याप्रमाणे नारदाने सांगितले असता इंद्राने त्या नारदाच्या वचनाला मान देवून,तिला सोडून दिले आणि तिच्या पोटी असणारा भगवद्भक्त जो मी त्याच्याभक्तीने तिला प्रदक्षिणा करून स्वर्गाप्रत गमन केले.||११|| भावार्थ:---नंतर तो देवर्षी माझ्या मातेला आपल्या आश्रमाप्रत घेवून गेला आणि तिचे आश्वासन करून, "हे वत्स तुझा भर्ता तपश्चर्या करून माघारा येईपर्यंत तू ह्या आश्रमामध्ये खुशाल रहा,"असे म्हणाला.आपणही--जीवानी निराश्रित असलेली स्त्री किंवा पुरुष असेल तर आपण त्यांना आश्रय देणे हा आपला स्वधर्म--मानव--धर्म आहे.||१२|| भावार्थ:---तेव्हा तिनेही--कयाधू-मातेनेही ठीक आहे असे म्हणत तो दैत्याधिपती हिरण्यकशिपू जोपर्यंत घोरतपापासून निवृत्त झाला नाही तोपर्यंत ती कयाधू नारदांच्या सामिपभागी निर्भयपाने राहिली.||१३|| भावार्थ:---आणि त्या गर्भिणी पतिव्रतेने आपली इच्छेने(पति घरी आल्यानंतर)प्रसूती व्हावी यासठी व तोपर्यंत आपल्या गर्भाचे संरक्षण व्हावे यासठी परमभक्तीने त्या आश्रमामध्ये नारदऋषीची सेवा केली.आपण जरा निराश्रित असून जर इतरांचा आश्रय घेतला असेल तर निराभिमान होऊन तेथील सेवा आपणहून करणे आपला--जीवाचा स्वधर्म आहे.||१४|| भावार्थ:---तेव्हा त्या दयाळू समर्थ ऋषीने,तिच्या शोकाची निवृत्ती होण्याकरिता व माझ्याही उद्देशाने धर्माचे भक्तिरूप व तत्व आत्मानात्मविवेकरूप निर्मल ज्ञान ह्या दोहोंचा तिला उपदेश केला.ज्या निराश्रित व्यक्तीस आपण आश्रय देलेला आहे,तिचे दु:ख निवारण करणे आपला स्वधर्म आहे.त्या निराश्रित व्यक्तीचा अधिकार पाहून निष्काम कर्माचा किंवा निष्काम भक्तीचा किंवा जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा उपदेश करावा.||१५|| भावार्थ:---परंतु पुष्कळ काळ लोटल्यामुळे व जातीने स्त्री असल्यामुळे माझ्या मातेचे ते ज्ञान वैराग्य विसरून गेले आणि मजवर ऋषीचा अनुग्रह असल्यामुळे अध्यापिसुद्धा मला त्याची विस्मृती पडत नाही,म्हणजे स्मरण आहे.म्हणून आपण--जीवानी उपदेशाची विस्मृती होऊ नये,म्हणून निरंतर चिंतन--आभ्यास करावा व विस्मरण ण होऊ देता स्मरणात असू ध्यावे. ||१६|| भावार्थ:---आता,तुम्ही जर माझ्या भाषणावर विश्वास ठेवाल तुम्हालासुद्धा ती दोन्ही प्राप्त होतील.आपणास--जीवास परमार्थ करण्यासाठी श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक असते,कारण साधन अगोदर आहे,व साध्य नंतर आहे.जशी मला श्रद्धेने,देहादिकांचेठीकानी असलेल्या अहंकाराचा नाश करण्याविषयी निपुण बुद्धी प्राप्त झाली आहे,तशीच स्त्रिया व बालक ह्यांनीही प्राप्त होणार आहे.म्हणून आपण वेदांताचा उपदेश श्रद्धायुक्त अंत:कारणाने श्रवण करावा.||१७|| भावार्थ:---आता ती मति कोणती असे म्हणाल तर नारदाने सांगितलेल्या देहात्मविवेकप्रकार तुम्हास सांगतो ऐका---हे मित्रहो,नानाप्रकारे विकार उत्पन्न करण्यास समर्थ अशा काळाच्या योगाने,वृक्ष असताना जसे त्याच्या फलांनाच उत्पन्न होणे,असणे,वाढणे,परिणाम पावणे,संकोचित होणे नाश पावणे हे सहा विकार दिसून येतात,ते त्या फलांच्या आधारभूत वृक्षाला दिसून येत नाहीत.||१८|| भावार्थ:---ह्याप्रमाणे देहधर्म कथन करून आत्मा त्याहून विलक्षण असल्यामुळे तो देहाहून भिन्न आहे असे दर्शिविले.आता आत्मधर्माच्या योगानेच तो भेद स्पष्ट करून आपल्या मित्रांनी अहंकारादिकांचा त्याग करावा अशा अशयाने भाषण करितो की-हे दैत्यपुत्रहो,आत्मा तर नित्य--तीनही काळात--भूतकाळात,वर्तमानकाळात व भविष्यकाळात असणारा,अपक्षयरहित--षड-विकाररहित,शुद्ध--मलरहित, अद्वितेय--एक,शरीरांना जाणणारा असा दृष्टा--ज्ञाता,परमात्मा हा आश्रय आहे व जग व जीव आश्रित आहेत,क्रियाशून्य--परमात्म्यात क्रीय नाही,करण तो एकच आहे,स्वयंप्रकाश ज्याच्यामुळे इतर पदार्थ प्रकाशित होतात व त्याला प्रकाशित होण्यासाठी इतरांची गरज नाही,त्यास स्वयं-प्रकाश असे म्हणतात,सर्वांचा--अनात्मा पदार्थच उत्पादक--आश्रय,सर्वव्यापक--आकाशास त्याची गवसणी आहे म्हणजे आकाशापेक्षाही व्यापक आहे,अलिप्त--सर्वांबरोबर राहणे,पण सर्वांचा परिणाम न होऊ देने,आणि अवेष्टित--झाकण-रहित,कारण सर्वांपेक्षा व्यापक आहे,म्हणून झाकल्या जात नाही.||१९|| भावार्थ:---ह्यास्तव विवेक उत्पन्न करण्यास समर्थ अशा ह्या आत्म्याच्या बारा लक्षणांनी तो,देहाहून भिन्न असे जाणणाऱ्या पुरुषाने देहादिकाचेठिकाणी "मी व माझे" अशा प्रकारच्या असलेल्या मोहजन्य मिथ्याबुद्धीचा त्याग करावा||२०|| भावार्थ:---आता,आत्मा देहाहून भिन्न असे जरी पुरुषाला ज्ञान झाले तथापि अहंकारादिकांचा त्याग करण्यास त्याला प्रत्यक्ष अनुभवाने ब्रहमात्वाची प्राप्ती झाली पाहिजे ती कशी होते ते दृष्टांतपूर्वक दाखवितो की,---हे असुरबालकहो,सुवर्णाच्या खाणीमध्ये चकचकणाऱ्या स्वर्णकणांनी युक्त असलेल्या पाषाणाचेठिकाणी,सुवर्ण काढण्याचे उपाय जाणणारा सोनार जसे भट्टीवगैरे लावून त्या पाषाणातील सुवर्ण प्राप्त करून घेतो त्याचप्रमाणे देहरूप क्षेत्राचेठिकाणी आध्यात्मज्ञानी पुरुष आत्मप्रप्तीच्या उपायांनी म्हणजे सत्संगाच्याद्वारे विवेक करून असारांचा त्याग करून साररूपी ब्रहमत्त्व प्राप्त करून घेतो.||२१|| भावार्थ:---आता आध्यात्मज्ञानरूप आत्मप्राप्तीचा उपाय सांगतो---मुलप्रकृती--माया व मायाकार्य---महत्तत्व,अहंकार,शब्द,स्पर्श,रूप,रस आणि गंध ह्या आठ प्रकृती आहेत;सत्व,रज,तम,हे तीन प्रकृतीचे गुण आहेत;श्रोत्र,त्वचा, नेत्र,जिव्हा,नासिका,पायु--गुद,उपस्थ,हस्त,पाद--पाय वाणी आणि मन हि अकरा इंद्रिये व पृथ्वी, आप,तेज वायू आणि आकाश हि पंच-महाभूते मिळून सोळा विकार--बदलणारे आहेत.व ह्या सर्वांच्या ठिकाणी सर्वांचे साक्षित्वेकरून व्यापून असणारा एक आत्मा आहे असे कपिलप्रभृती आचार्यांनी सांगितले आहे.ह्या अज्ञानमुळे अंत:करण हि उपाधी म्हणून जीवदशेच प्राप्त झालेला आहे. ["(परमात्मा--)कूटस्थ + अंत:करण = जीवात्मा."] म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे "अंत:करण हि उपाधी मिथ्या आहे,व ब्रह्म हेच सत्य आहे असा निश्चय करावा.यामुळे जीवदशा निवृत्त होते.||२२|| भावार्थ:---असो.देह तर प्रकृत्यादी सर्व समुदायात्मक असून स्थावर--वृक्षाकादिक--अचर आणि जंगम--मनुष्यादिक चर असणारे असा दोन प्रकारचा आहे ह्या देहाम्ध्येच नेति नेति आत्मा गंधवान होत नाही,रसवान होत नाही अशा प्रकाराने,आत्मव्यातिरिक्त जे पृथिव्यादिक-वस्तू अनात्मा आहेत,त्याचा निरास करून त्याहून निराळा असणाऱ्या त्या प्रत्यगात्म्याचे--जीवात्म्याचे शोधन करून घ्यावे.||२३|| भावार्थ:---ते असे की,----जसे मण्यांच्या माळेमध्ये सूत्र सर्वमण्यांत शिरून व्यापून राहते तसे आत्म्याचे सर्वत्र व्यापून असणे हा "अन्वय--असनेपणा" आणि ते एकच सूत्र जसे प्रत्येक मण्याहून निराळे असते तसा आत्म्याचा सर्व वस्तूहून "व्यतिरेक--निराळेपणा" होय,या दोहोंनी होणारा जो विवेक त्याने शुध्द झालेल्या मनाच्या योगाने जगाच्या उत्पत्ती-स्थिती-संहाराच्या अनुसंधानेकरून एकाग्रपणे विचार करणाऱ्या पुरुषांनी त्या परमात्म्याचा शोध केला असता त्याचे ज्ञान होते.म्हणून आपण--जीवानी तत्- तत्वं वस्तूचे शोधन करून--त्यांच्या वाचार्थ पदातील वाच्यार्थाचा त्याग करून त्यांतील लक्षर्थाचा साक्षात्कार अनुभव घ्यावा.||२४|| भावार्थ:---(आतां,शोध करण्याचा प्रकार दोन श्लोकांनी सांगतो---)हे दैत्यपुत्रहो,बुद्धीच्या जागरण,स्वप्न आणि सुषुप्ती अशा तीन वृत्ति आहेत,वृत्ति ह्या अनात्मा आहेत व ज्याच्या--परमात्म्याच्या योगाने अनुभव येतो तो आत्मा हा अवस्थात्रयाचा साक्षी परमपुरुष होय.||२५|| भावार्थः---ह्यास्तव पुष्पधर्मरूप सुगंधाच्या---अध्यास्ताच्या योगाने,त्यांना आश्रयभूत असलेला वायू हा अध्यास्थाचे अधिष्ठान आहे,असे जसे जाणला जाते त्याप्रमाणे,आत्म्याचे धर्म नव्हेत म्हणून त्याग केलेले,कर्मापासून उत्पन्न झालेले व त्रिगुणात्मक असे जे हे जाग्रदादिक--हे अनात्मा आहेत जे बुद्धीने परिणामरूप भेद त्यांनी आत्म्याचे स्वरूप जाणावे म्हणजे आत्मा वस्तुतः जाग्रदादिक अवस्थांहून निराळा असून त्यांत व्यापून असल्यामुळे त्या अवस्थांनी युक्त असल्यासारखा भासतो,पण अवस्थावान नसतो असे समजावे.म्हणजेच त्या अनात्म्याहून आत्मा भिन्न आहे,असे समजावे.||२६|| भावार्थः---आतां पुष्पोपाधिकही सुगंध विवेकज्ञानाने जसा वायूपासून निवृत्त होतो तसा संसार आत्म्यापासून निवृत्त कां होत नाही?अशी शंका घ्याल तर---हे दैत्यपुत्रहो,संसार हा बुद्धीच्या गुणांनी व कर्मांनी निबद्ध असल्यामुळे तो बुद्धीच्या द्वारानेच पुरुषाला प्राप्त होतो;स्वतः प्राप्त होत नाही व तो अज्ञानमूलक आहे ह्यास्तव तो व्यर्थ असून स्वप्नाप्रमाणे मानिला आहे.वायूचा गंधद्रव्याशी संबंध वास्तविक असल्यामुळे तो दृष्टांत बरोबर नाही,तर एकदेशी आहे असे जाणावे.||२७|| भावार्थः---तस्मात,त्रिगुणात्मक कर्मांच्या बीजाला(अज्ञानाला)जाळून टाकणारा व बुद्धीच्या जाग्रदाद्दवस्थारूप प्रवाहाचा नाश करणारा असा भक्तियोग आपण--जीवांनी करावा.||२८|| भावार्थः---ह्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकार सांगून त्या ज्ञानाला साधनभूत असे नारदानेच सांगितलेले धर्मांचे तत्त्व सांगतो---हे मित्रहो,देहादिकांचे ठिकाणी असलेला अध्यास निवृत्त,करण्याविषयी जे हजारो उपाय आहेत त्यांमध्ये,ज्या यथासांग अनुष्ठान केलेल्या धर्मांच्या योगाने भगवान ईश्वराचेठिकाणी साक्षात प्रीती उत्पन्न होते तो हा भक्तियोगच उपाय आहे असे भगवंताने सांगितले आहे.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्तियोग करावा,सकाम भक्तियोग करू नये.सकाम भक्तियोग हा संसार आहे.जो संसार आहे,तो दु:खरूप आहे.आपणास दु:ख नको,तर सुखरूपता हवी आहे.||२९|| भावार्थः---तो--निष्काम भक्ती योग हा तरी गुरूची शुश्रुष,प्रेम,प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंचे भगवंताला किंवा भगवद्भक्तांना समर्पण करणे,निष्काम केलेला भक्तियोग भगवंतास किंवा निष्काम भक्तास--संतास--माहात्म्यास समर्पण करावा,म्हणजे त्याच्या मोबदल्यात संसारातील कोणताही विषयांची मागणी करू नये,कारण संसार दु:खरूप आहे.निष्कपट म्हणजे कामनारहित भक्तांचा संग,ईश्वराधन भगवत्कथेचेठिकाणी---श्रद्धा,म्हणजे विश्वास भगवंताच्या-गुणकर्माचे कीर्तन,त्याच्या चरणकमलांचे ध्यान,त्याच्या मूर्तीचे दर्शन व पूजा वगैरे करणे आणि सर्वभूतांचे ठिकाणी दुःखहर्ता भगवान ईश्वर वास करीत आहे असे मनामध्ये आणून त्यांचे जे जे मनोरथ असतील ते ते पूर्ण करून त्यांना यथायोग्य मान देणे यांच्या योगेकरून घडतो.म्हणून आपण--जीवानी भगवंताचे ध्यान,मूर्तीचे दर्शन,मूर्तीची पूजा, सर्व भूतांत भगवंताचा वास आहे,असा निश्चय,म्हणून जीवांचे दु:ख निवारण करणे,जीवांचे मनोरथ पूर्ण करणे,जीवांना सुख देणे,जीवांना मान--प्रतिष्ठा देणे.याप्रमाणें आपण--जीवानी कार्य करावे.||३०-३१-३२|| भावार्थः---असो.आपण-जीवानी काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सरादि असे षड्रिपू-सहा शत्रू जिंकून ईश्वराचे--ठिकाणी अशी निष्काम भक्ति करावी की,जिच्या योगाने वासुदेव भगवंताचेठिकाणी आपल्याला--जीवाला प्रीती उत्पन्न होते.याप्रमाणे निष्काम भक्ती केल्याने प्रेम उत्पन्न झाल्याने सत्संग करून त्याद्वाराने ज्ञान होऊन,त्या परमात्म्याचा अनुभव येतो.||३३|| भावार्थ:---आता भगवंताचेठिकाणी उत्पन्न झालेल्या प्रीतीची लक्षणे कथन करितो की,---हे दैत्य-पुत्रहो, भगवंताचे इतरांचेठिकाणी नसणारे जे भक्तवात्सल्यादिक गुण,तशीच त्याने स्वच्छेने धारण केलेल्या रामकृष्णादि मूर्तींनी केलेली जी लौकिकचेष्ठारूप कर्मे व रावणवधादिक पराक्रम त्यांचे श्रवण करून,जेव्हा अतिहर्षाने शरीरावर रोमांच उठून,नेत्रामध्ये आनंदाश्रु येतात सग्ददित कंठ होऊन,पुरुष उच्च स्वराने गायन करितो,व नृत्य करितो,तसाच जेव्हा पिशाचाने झपाटल्यासारीखा होऊन कधीकधी हसतो,विलाप करितो,भगवंताचे ध्यान करितो,लोकांना वंदन करितो आणि केव्हाकेव्हां भगवंताचेठिकाणी बुद्धी लीन झाल्यामुळे निर्लज्ज होवून वारंवार श्वास टाकीत हे हरे,हे जगत्पते व हे नारायणा असा उच्चार करितो.||३४-३५|| भावार्थ:---तेंव्हा तो भक्तियोगनिष्ट पुरुष अतिवेगाने अशा त्या उत्कृष्ठ भक्तियोगाने ज्याचे,संसारास बीजभूत असे अज्ञान आणि वासना हि,जळून गेली आहेत,ज्याचे मन व शरीर हि,भगवंताच्या चिंतनाने त्या लीलांचे अनुकरण करू लागली आहेत व ज्यांची पुण्यपापादीरूप सर्व बंधने तुटून गेली आहेत असे असता,भगवत्स्वरूपाप्रत पावतो.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या ठिकाणी निष्काम प्रीती--प्रेम करावे.वरील वर्णन केल्याप्रमाणे निष्काम भक्ती करावी.त्यामुळे आपल्या--जीवाच्या ठिकाणी असलेल्या असलेले अज्ञान आणि वासना जळून जातात,करण परमात्मा अनुभव आल्यामुळे सर्व संचित कर्म जळून जाते.आपले--जीवाचे प्रारब्ध कर्म हे भोगून संपते तसेच वर्तमान शरीराकडून होणारे वर्तमान क्रियमान कर्म आपणास न लागता आपल---जीवाची जो सेवा करितो त्यास पुण्य प्राप्त होते व जो निंदा करितो,त्यास पाप लागते,यामुळे त्याचे कोणतेच कर्म शिल्लक न राहिल्यामुळे पुन्हा शरीर प्राप्त न होता आपण--जीव परमात्मारूप असतो---म्हणजे सुखरूप असतो.||३६|| भावार्थ:---आता ह्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती झाली असता,फळ काय?असे विचारलं तर----हे मित्रहो,मनाने होणारा जो अधोक्षज भगवंताचा स्पर्श,तोच इहलोकी अशुद्ध अंत:करणाने युक्त असलेल्या पुरुषाच्या संसारचक्राचा नाश करणारा होय व तेच ब्रह्माच्याठिकाणी मोक्षरूप सुख होय असे ज्ञानीजन म्हणतात.म्हणून तुम्ही आपल्या हृद्याचेठिकाणी असलेल्या अंतर्यामी ईश्वराचे भजन करा.म्हणजे अंतर्यामी जो निर्गुण-निराकार असलेला त्यास सत्संग करून त्याद्वारे जाणून,त्याचाच अनुभव घ्यावा--म्हणजेच आपले--जीवाचे व परमात्मा एक आहे असे जाणून त्याचाच अनुभव घ्यावा. ||३७|| भावार्थ:---आता भक्ती होणे हे अशक्य आहे असेही माणू नये कारण,हे असुर-बलाकहो,आपल्या स्वत:चा सखा व आकाशाप्रमाणे आपल्या हृदयामध्ये वास करणारा असा तो श्रीहरी त्याच्या उपसनेविषयी कोणता बरे अति प्रयास आहे?व असे असता विषयसुख संपादन करून तरी काय करावयाचे आहे?कारण, श्वासुकरादिक सर्वही प्राणी विषयोसुक्त--विषयांनी युक्त असतात ह्यास्तव आपणही विषयसुखाविषयी तत्पर झालो असता त्याच्यासारखेच--विषयांनी युक्त प्राणी होणार.म्हणून आपण जीवानी विषयांचा भोग न घेता त्याग करावा,कारण विषय हे दु:खरुपच आहेत.जसे आपण लिंबाच्या झाडाचा पाला हा कडूरूपच आहे,तर ऊसाची साखर गोडरूपच आहे,म्हणून आपण लिंबाच्या झाडाचा जो पाला आहे,त्याचा त्यागच करावा व ऊसाची साखर जी आहे,तिचा भोगच घ्यावा.कारण दु:ख नको,तर सुखरूपता पाहिजे आहे.||३८|| भावार्थ:---द्रव्य,कलत्र,पशु,पुत्रादीसंबंधी जन,गृहे,भूमी,गजशाला भोगसाधनभूत पदार्थाच्या आणि सर्वप्रकारचे अर्थ व काम हे,नश्वर असून त्यांतही ज्यांचे आयुष्य क्षणभंगुर आहे अशा मर्त्यजणांचे,कितीसे प्रिय करणार आहेत?कांहीच करणार नाहीत.तेव्हा त्यांचे संपादन करणे हे निरर्थक आहे.नाशिवंत पदार्थ हे नश्वर असून क्षण-भंगुर आहेत,म्हणून आपण त्यांचे संसारिक हित करू शकत नाही,म्हणून आपण आपले जी देहसंबंधी आहेत व जड--धन जे आहेत,त्या जीवांना पारमार्थिक कार्यास प्रवृत्त करून,ते धन पारमार्थिक कार्यात खर्च--व्यय करावे.त्यातच आपले व देहसंबंधीचे परम हित आहे,तर संसार करण्यात परम--अहित--परम--दु:खरूप आहे.||३९|| भावार्थ:---ह्याचप्रमाणे यज्ञयागादिकांनी प्राप्त झालेले जे हे स्वर्गादी लोक तेही विनाशी व पुण्यादितारत्म्याने सातीशय स्पर्धादियुक्त असल्यामुळे निर्मल नाहीत.तस्मात,ज्याचेठीकानी पाहिलेले अथवा एकीलेले दुषण मुळीच नाही,त्या सर्वोत्कृष्ठ ईश्वराचेच तुम्ही आत्मप्राप्ती होण्याकरिता एकनिष्ठ भक्तीने सेवन करा.म्हणून आपण--जीवानी सर्वोत्कृष्ठ ईश्वर याचीच निष्काम भक्ती करावी.||४०|| भावार्थ:---आणि दुसरे असे की,---आपणासच विद्वान असे मानणारा पुरुष,जी वस्तू प्राप्त होण्याचा संकल्प करून या लोकी कर्म करितो त्याला संकल्पित कर्माचे फळ विपरीत अवश्य प्राप्त होते.आपण--जीवानी स्वत:स विद्वान असे माणू नये,तर इतरांनी आपणास विद्वान म्हणावे,आपल्या मुखातून आपल्या गुणांचे वर्णन करू नये,कारण त्यामुळे अहंकार उत्पन्न होऊन आपली--जीवाची प्रगती होत नाही,त्यामुळे आपले--जीवाचे अहित होते.आपणास--जीवास आपण--जीवानी केलेल्या कर्माचे विपरीत--संसारच प्राप्त होतो,तर संसाराची निवृत्ती होत नाही.जसे आपण शारीरिक कर्म न करता धष्ट--पुष्ट पदार्थाचे सेवन केले असता शरीर धष्ट--पुष्ट न होता शरीर क्षण होते,म्हणून आपण शारीरिक परिश्रम करून धष्ट--पुष्ट पदार्थ सेवन करावे.||४१|| भावार्थ:---ते असे की,---सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी एतदर्थ या लोकी कर्म करणाऱ्या पुरुषाचा संकल्प असतो.परंतु,जो पूर्वी निरिच्छ असल्यामुळे सुखाने असतो तोच इच्छा करू लागला म्हणजे तिच्या योगाने सर्वदा दु:ख पावतो.म्हणून आपण--जीवानी विषयांचा संकल्प करू नये,केल्यास विषयांची पुरती व्हावीम्हणून प्रयत्न करितो.त्यामुळे आपणास--जीवास दु:खाचीच अनुभूती येते.||४२|| भावार्थ:---आणखीही असे आहे की,या लोकी काम्यकर्माच्या योगाने ज्यांच्याकरिता पुरुष भोगांची इच्छा करितो तो देह पाहू गेले असता,श्वान-सुकरादिकांनी भोग्य नसून नश्वर आहे व तो तरी कर्मवशेकरून प्राप्त होतो व नाश पावतो.म्हणून आपण--जीवानी जो देह नाशिवंत आहे,त्याच्यासाठी काम्य कर्म न करता निष्काम कर्म करून परमात्म्याकडे--सुखरूपतेकडे जाण्याचा प्रयत्न करावा. ||४३|| भावार्थ:---तस्मात ज्याअर्थी देहाचीच अशी (परकीय नश्वर इत्यादिक)स्थिती आहे त्याअर्थी,देहाहून निराळा ममताविषयक जे पुत्र,कलत्र,गृह,द्रव्यादिक,राज्य,खजीना,गज,अमात्य, भृत्य आणि आप्त ते परकीय व नश्वर आहेत हे सांगावे!आपण--जीव ज्या देहात राहतो,तो देह नश्वर आहे.देहसंबंधी जे पत्नी,पुत्र,कलत्र,गृह,द्रव्यादिक,धनादिक,राज्य,खजिना,गज,अमात्य,भृत्य-- --भाऊ,आणि आप्त ते सुद्धा नश्वर म्हणजे सत्य नसून मिथ्या--कधी आहेत व कधी नाहीत व असले तरी वास्तविक नसून भासणारे--स्वप्नवत आहेत तसेच परकीय म्हणजे आपले नसून पंचमहाभूतांचे आहेत.आपण त्यांचे म्हणजे पंचमहाभूतांचे--देहाचे नसून परमात्म्याचे जो परमात्मा अविनाशी--अमर आहे,त्यांचे आहोत.म्हणून आपण सत्संग केला असता असे हे सर्व कळेल.म्हणून संत--महात्मा यांच्या मुखातून वेदांत--शास्त्राचे श्रवण करावे.||४४|| भावार्थ:--तस्मात नित्यानंदाचा केवळ समुद्रच अशा आत्म्याला,वस्तुत: पंचमहाभूतें व त्याचे कार्य अनर्थकारक असून पुरुषार्थाप्रमाणे भासणाऱ्या देहासहवर्तमान नाश पावणाऱ्या व अतितुच्छ अशा ह्या पुत्रादिकांनी काय स्वार्थ होणार आहे?कांहीच नाही.म्हणून आपण--जीवानी देहसंबंधीचा मोह व जडाचा लोभ करू नये,कारण त्यांचा मोह व लोभ केला असता आपले--जीवाचे हित न होता अहितच होणार आहे.म्हणून देहासंबंधीतीवर प्रेम करावे,कारण प्रेमात सुख आहे तर मोहात व लोभात दु:ख आहे.उदा--महाभारत या इतिहासात राजा धृतराष्ट्राचे प्रेम नव्हते,तर मोह होता.पद्म--पुराणात या ग्रंथात कदर्यू--ब्राह्मणाला धनावर अनासक्ति म्हणजे गरजेपुरतेच धन असावे अशी वृत्ति व अधिक धन नसावी अशी वृत्ति असणे,असे नसून तर म्हणजे लोभ--फक्त धनाचा संग्रहच असावा अशी त्याची धारणा होती.इतकेच काय,त्या धनाचा उपभोग स्वत:साठी करीत नसून संग्रहच करून जमिनीत धन पुरून ठेवण्यात समाधानी होता.म्हणून आपणास--जीवास जीवाचा मोह असू नये,तर प्रेम असावे.आपणास--जीवास धनाची अनासक्ती असावी,तर आसक्ती--लोभ नसावा.||४५|| भावार्थ:---आता भोग भोगण्यास अवकाश नसल्यामुळे ह्यांचा काहीच उपयोग नाही असे दर्शवितो-हे असुरहो,गर्भाधानदिसंस्काररूप अवस्थामध्ये प्राचीन कर्माच्या योगाने क्लेश पावणाऱ्या ह्या देहधारी प्राण्याला,या लोकी कितीसा स्वार्थ आहे तो सांगा बरे ?वास्तविक पाहता आपण--जीव सुखरूप असतांना आपणास--सुखाची--विषयांची गरज आहे का ?अर्थातच सुखाची--विषयांची मुळीच गरज नाही.आपणास--सुखाची गरज केवळ अज्ञानामुळे भासत आहे,म्हणून सत्सागाद्वारे अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घेतला असता मुळीच सुखाची गरज नाही,कारण आपण--जीव सुखरूपच आहे.||४६|| भावार्थ:---बरे कर्मसमाप्तीनंतर त्याला भोग भोगण्यास अवकाश मिळेल असे म्हणावे तर हा देही(जीव)आत्म्याच्या अनुकुलतेने देहाच्या योगाने कर्मे करितो व कर्माच्या योगाने देह धारण करितो.ती दोन्हीही अज्ञानानेच करितो,ती वास्तविक नाहीत.म्हणून आपण--जीवानी अज्ञान निवृत्त करून ज्ञान झाले असता कर्म करत नाही व कर्म न केल्यावर शरीर प्राप्त होत नाही.||४७|| भावार्थ:---तस्मात धर्म,अर्थ व काम हे ज्याच्या स्वाधीन आहेत त्या निरपेक्ष,सर्वसमर्थ आणि दु:खहर्त्या परमात्म्याचे तुम्ही निष्काम बुद्धीने सेवन करा.म्हणून आपण--जीवानी परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी निष्काम बुद्धीने आचरण करावे.||४८|| भावार्थ:---कारण तो श्रीहरीच स्वत: निर्माण केलेल्या पंच महाभूतांनी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांच्या आत्मा,प्रिय नियंत आणि अंतर्यामी आहे.||४९|| भावार्थ:---आता श्रीहरीच्या सेवेविषयी आम्हां असुरांना अधिकार नाही हेही म्हणणे अयोग्य आहे.कारण,जसे आम्ही भगवंताचे भजन करीत असता सुखी झालो तसा कोणीही देव,असुर,मनुष्य,यक्ष आणि गंधर्व असो तो मुकुंदाच्या चरणाची सेवा करू लागला असता सुखी होईल.||५०|| भावार्थ:---हे असुरपुत्रहो,मुकुंदाला संतुष्ठ करण्याकरिता द्विजत्व,देवत्व,ऋषीत्व,सद्वर्तन,बहुज्ञता,दान,तप,याग,शुद्धत्व आणि व्रते हि समर्थ नसून तो श्रीहरी,केवळ निष्काम भक्तीच्याच योगाने संतुष्ठ होतो भक्तीवाचून इतर सर्वही द्विजत्वादिक साधने केवळ नटनी आहेत.भगवंत निष्काम सेवेनेच प्राप्त होतो.||५१-५२|| भावार्थ:---तस्मात,हे दानवहो,आपल्याप्रमाणेच सर्वाना सुख व दुख: होते अशी बुद्धी धारण करून सर्व-- भूतांचा आत्मा आणि ईश्वर असा जो भगवान श्रीहरि--निर्गुण--निराकार त्याचे ठिकाणी भक्ती करा.||५३|| भावार्थ:---कारण,दैत्य,यक्ष,राक्षस,स्त्रिया,शुद्र,व्रजवाशी गोपाल,पक्षी,आणि इतरही पातकी जीव,अच्युताच्या निष्काम भक्तीने खरोखर मोक्ष पावले आहेत.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करावी.||५४|| भावार्थ:---असो.गोविंदाचे ठिकाणी एकनिष्ठ भक्ती आणि स्थावरजंगमात्मक सर्वभूताचे ठिकाणी भगवान पाहणे असे आहे हाच काय तो या लोकी पुरुषाला उत्कुष्ठ स्वार्थ असे म्हटले आहे.म्हणून आपण--जीवानी एकनिष्ठ म्हणजे फक्त परमात्म्यावरच श्रद्धा असावी.तसेच सर्व भूतात एकच असलेला परमात्मा अंतर्यामीरूपाने जीवात्मा आहे.या धारणामुळे इतर जीवांचा आपण--जीव द्वेष करत नाही,करण सर्वांतच भगवंत आहे.एक म्हणण्याने अद्वेताची सिद्धी होते.||५५|| ७---ह्याप्रमाने श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सातव्या(७)स्कंधातील दैत्य-पुत्रनुशासननामक हा सातवा (७)अध्याय पंचावन्न(५५)अध्याय समाप्त झाला.||७|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणाअर्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ ८-----आतां आठव्या अध्यायांत,हिरण्यकशिपू दैत्य अतिकृद्ध होवून पुत्राला मारू लागला असतां,नृसिंहाने प्रकट होवून स्व:त त्याचा वध केला व ब्रह्मादिकांनी त्या नृसिंहाची स्तुती केली अशी कथा आहे.||८||(यावरून आंतून दयारूप अमृताने परिपूर्ण व बाहेरून दिसण्यामध्ये क्रोधयुक्त अशा नृसिंहाने शत्रूबुद्धीने भजत असलेल्या दैत्याधिपतीचे रक्षण केले असे सिध्द होते.)||८|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराज,याप्रमाणे प्रल्हादाने केलेले भाषण श्रवण करून,ते--दैत्यपुत्र निर्दोष असल्यामुळे सर्व दैत्यपुत्रांनी त्याचाच स्विकार केला,कारण भक्त प्रल्हाद सात्विक व दैत्यपुत्र सात्विक असल्यामुळे सात्विकाने सात्विकाचा स्वीकार केला.गुरूने जे शिकविले होते त्याचा त्यांनी--दैत्य-पुत्रांनी मुळीच स्वीकार केला नाही,कारण दैत्य-गुरु राजस व तामस व दैत्यपुत्र सात्विक असल्यामुळे दैत्यगुरूंनी जे शिकवले त्याचा स्वीकार केला नाही. दैत्यगुरूंनी त्याची--दैत्यपुत्रांची बुद्धी अंतर्निष्ठ झाली असे पाहून तो भयभीत झाला आणि त्याने ते सर्व यथास्थित वृत्त,राजाला सत्वर निवेदन केले.||२|| भावार्थ:---ते दु:सह आणि अप्रिय असे पुत्राचे दुर्वर्तन श्रवण करून ज्याचे शरीर,कोपाच्या आवेशाने कंपित होवू लागले आहे अशा त्या हिरण्यकाशिपुने,पुत्राचा वध करावा असे मनात आणिले.||३|| भावार्थ:---आणि जो विनयामुळे नम्र आहे,ज्याने इंद्रियांचे दमन केले आहे,जो हात जोडून अग्रभागी उभा राहिला आहे व जो तिरस्कार करण्यास अयोग्य आहे अशा त्या प्रल्हादाचा कठोर वाणीने तिरस्कार करून,स्वभावत:च क्रूर व पायाने ताडण न केलेल्या सर्पाप्रमाणे श्वासोच्छवास टाकणारा तो हिरण्यकशिपू सक्रोध वक्रदृष्टीने अवलोकन करीत असे म्हणाला की,-------------||४-५|| भावार्थ:---हे उद्धटा,हे मंद्बुद्धे,हे कुलभेदकरा,व हे अधमा,अरे माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या व उद्धट अशा तुला मी आज यमसदनास पोचवितो.आपण--जीवांनी भगवत-भक्तांना आश्रय द्दावा,तर त्यांच्या प्रतिकूल वागू नये,कारण त्यामुळे भगवंत आपल्या प्रतिकूल होऊन होऊन दु:ख देतो.||६|| भावार्थ:---हे मुर्खा,जो क्रुद्ध झालं असता,भयाने लोकपालासहवर्तमान तिन्ही लोक कांपत असतात त्या माझ्या आज्ञेचे तू निर्भय पुरुषाप्रमाणे कोणाच्या बलाचा आश्रय करून उल्लंघटन केले आहेस?||७|| भावार्थ:---प्रल्हाद म्हणाला---हे राजा,ब्रहमदेव प्रभृती थोर-लहान जे स्थावरजंगमात्मक सर्वही प्राणी आहेत,ते,ज्याने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत,तो भगवान केवळ माझेच बल आहे असे नाही.तर तुझे व इतरही सर्व बलिष्ठ लोकांचे बल तोच आहे.सर्व सत्ता भगवंताचीच आहे,त्याच्या सत्तेवर सर्व प्राणी जीवन जगात नाहेत,तर सर्व प्राण्यांना स्वत:ची सत्ताच नाही.तुम्हा--आम्हास त्याचीच सत्ता आहे. ||८|| भावार्थ:---त्याला सर्व प्राण्यांना स्वाधीन ठेवण्याचे कारण असे की,हे राजा,तो परमेश्वर भगवान विष्णूच कालरूपी आहे,तोच इंद्रीयशक्ती आणि इंद्रिये ह्यांचे स्वरूप आहे व तोच हा गुण-त्रयाचा नियंता परमेश्वर,आपल्या शक्तीच्या योगाने ह्या जगाचे उत्पत्ती-स्थिती-संहार करितो.म्हणून आपण जीवानी भगवंताच्या अज्ञानुसार जीवन जगावे.||९|| भावार्थ:---आता जो हा माझा शत्रू तोच माझेही बल कसा होईल?असे म्हणशील तर हे राजा,तू आपल्या ह्या शत्रूमित्रादिकल्पनारूप असुरस्वभावाचा त्याग करून मनाची वृत्ति सर्वत्र सारखी ठेव.कारण,न जिंकलेल्या व कुमार्गामध्ये प्रवृत्त होणाऱ्या मनावाचून दुसरे कोणीच शत्रू नाहीत व मनाची वृत्ति सारखी राहणे हेच भगवंताचे उत्कृष्ठ पूजन आहे.म्हणून आपण--जीवानी शत्रू--मित्र--असा भाव न ठेवता मनाची वृत्ति सारखी ठेवावी.मनाची वृत्ति सारखी ठेऊन जीवन जगणे,यासच भगवंताचे पूजन असे म्हणतात.||१०|| भावार्थ:---बरे,दिग्विजयकाळी मी सर्व शत्रू जिंकिले असल्यामुळे सांप्रत मला शत्रू नाहीत असे म्हणशील तर,---हे दैत्याधिपती,तुझ्यासारीखे किती एक मंदबुद्धी पुरूस,प्रथम सर्वस्व हरण करणाऱ्या इंद्रियरुप षड्रिपूनां न जिंकता,आपण दशदिशा जिंकल्या आहेत असे मानितात.आपण--बहिर्गत शत्रूंना जिंकण्यापेक्षा प्रथम अंतर्गत जे षड्रीपुंनां--काम,क्रोध,लोभ,मोह,मद.मत्सर जिंकावयास पाहिजे.परंतु,वास्तविक पाहू गेले असतां,ज्याने मनोनिग्रह केला आहे,जो ज्ञानी आहे आणि ज्याची सर्व प्राण्यांविषयी समदृष्टी--सर्वांच्या अंतर्यामी भगवंत एकच आहे,असा ज्यांचा निश्चय आहे,त्या साधूला मात्र देहाभिमानाने कल्पिलेले कामादिक मानसिक शत्रूसुद्धा नाहीत,मग बाहेरचे शत्रू असतील ? असणारच नाहीत.म्हणून आपण--जीवानी बहिर्गत जे शत्रू षड्-रिपू आहेत,सत्संग करून,त्यांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा,त्यातच आपले हित आहे.||११|| भावार्थ:---हिरण्यकशिपू म्हणाला---हे मंद्बुद्धे,जो तू,मीच शत्रूंना जिंकणार आहे,तुझ्यासारखे नाहित अशी माझी निंदा करून आपली स्तुती करीत आहेस,तो तू खरोखर मरणाची इच्छा करीत आहेस.कारण,जे खरोखर मरणोन्मुख झालेले असतात त्यांच्या वाणी अशा अनन्वित होतात.||१२|| भावार्थः---तस्मात्,हे मंदभाग्या,माझ्याहून दुसरा जगदीश्वर जो तूं सांगितलास तो कोठे आहे?प्रल्हाद म्हणाला---तो सर्व ठिकाणी आहे.हिरण्यकशिपू म्हणाला---तर मग ह्यां खांबामध्येही कां नाही?नंतर प्रल्हाद त्या खांबाकडे पाहून आणि नमस्कार करून म्हणाला---मला दिसत आहे.||१३|| भावार्थः---त्या वेळी,हिरण्यकशिपुला जेव्हां त्याठिकाणी तो दृष्टीस पडेना तेव्हां तो म्हणाला---अरे ! अजूनही तूं विपरीत बोलत आहेस,ह्याकरीतां मी तुझे शिर आतां धडापासून वेगळे करितो,जा हरी तुला आवडणारा रक्षक आहे तो आज तुझे रक्षण करो.||१४|| भावार्थः---ह्याप्रमाणे कठोर भाषणणांनी क्रोधाने आपल्या महाभगवद्भक्त प्रल्हाद वारंवार पीडा देणाऱ्या त्या अतिबलाढ्य,महादैत्याने,हातामध्ये खड्ग घेऊन,सिंहासणावर उडी टाकून,आपल्या मुष्टीने प्रल्हादाच्या मस्तकी हात जोडून पहात असलेल्यास स्तंभाला ताडन केले.||१५|| भावार्थः---हे राजा,त्याचवेळी त्या खांबांमध्ये अतिभयंकर ध्वनि असा झाला की,ज्याच्या योगाने ब्रह्मांडकटह फुटलाच की काय?असे सर्वांस भासले.आणि इच्छा धरून त्याबद्दल आपल्या बलाने प्रयास करणारा तो हिरण्यकशिपू,ज्याच्या योगाने दैत्यसेनाधिपती अत्यंत भयभीत झाले होते तो अपूर्व अद्भुत नाद श्रवण करून,सभेमध्ये तो नाद कशापासून निघाला ते पाहण्याची इच्छा करीत असूनही ते त्या ध्वनीचे आश्रयस्थान त्याच्या दृष्टीस पडले नाही.||१७|| भावार्थः---इतक्यामध्ये सर्वभूतांचेठिकाणी असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरीता व आपल्या दासाने केलेले भाषण सत्य करण्याकरितां मनुष्याकार नव्हे व मृगाकारही नव्हे असे अत्यंत अद्भुत रूप धारण करणारा भगवान श्री हरी सभेमध्ये स्तंभाचेठिकाणी प्रगट झाले.भक्त-प्रल्हादाचे भाषण सत्य--खरे करण्याकरिता भगवंत नृह-सिंहाच्या रुपात प्रगट झाले. ||१८|| भावार्थः---ह्याप्रमाणे तो हिरण्यकशिपू अद्भुत नाद श्रवण करून,तो ज्याने केला त्या प्राण्याला चोहोंकडे पाहात असतां स्तंभापासून बाहेर निघणारे मनुष्याचे व सिंहाचे मिश्ररूप अवलोकन करून,अहो मृगही नव्हे व नरही नव्हे असा हा काय विचित्र प्राणी आहे ! असा पावणाऱ्या जटा व मानेवरील केस ह्याच्या योगाने भयंकर दिसत आहे,||२०|| भावार्थः---ज्याच्या दाढा उंच आहेत,ज्याची जिव्हा तलवारीसारखी चंचल व वस्तऱ्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे,जे भृकुटी युक्त मुखाने उग्र दिसत आहे,ज्याचे कान ताठ व शंकूप्रमाणे उभारलेले आहेत,ज्याचे तोंड व नाकपुड्या हि पर्वताच्या गुहेप्रमाणे पसरलेली आहेत,जे जबडा पसरलेले असल्यामुळे भयंकर दिसत आहे,ज्याचे शरीर स्वर्गाला स्पर्श करीत आहे,ज्याची मान आखुंड आणि स्थूल आहे,ज्याचे वक्ष:स्थळ विशाळ आहे,ज्यांचे उदर रकृश आहे.जे चंद्रकिरणाप्रमाणे गौरवर्ण असलेल्या केसांनी व्याप्त झालेले आहे,ज्याचेठिकाणी चोहोंकडे पसरलेले शेकडो भूजसमुदाय आहेत,जे नखरूप आयुधांनी युक्त आहे,ज्याच्या समीप जाणे अशक्य आहे आणि ज्याने स्वतःच्या चक्रादिक व इतरांच्या वज्रादिक श्रेष्ठ आयुधांच्या योगाने सर्व दैत्य-दानव,पळवून लाविले आहेत,अशा त्या रूपाविषयी हिरण्यकशिपू विचार करीत आहे तो इतक्यांत,तो नृसिंहरुपी भगवान,त्याचे अग्रभागी येऊन पोंचला.तेव्हा प्रायशः श्रीहरीने माझा असा हा मृत्यूहेतू मनांत आणिला आहे तथापि ह्या उद्दुक्त झालेल्या हरीच्या हातून माझे काय होणार आहे?असे म्हणत व हातामध्ये गदा घेऊन गर्जना करीत तो दैत्यश्रेष्ठ,नृसिंहाला संमुख वेगाने धावला आणि त्या वेळी अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो त्याप्रमाणे नृसिंहाच्या तेजामध्ये पडलेला तो दैत्य दिसेनांसा झाला.||२१-२२-२३-२४|| भावार्थः---अहो,!ज्या सृष्टीच्या आरंभी आपल्या तेजाच्यायोगाने प्रलयकाळाच्या अंधकाराचासुद्धा नाश केला होता त्या सत्त्वप्रकाशरूप श्रीहरीचे ठिकाणी,जे त्या तमोमय असुराचे अददर्शन झाले,ते कांही आश्चर्य नव्हे.असो त्या महादैत्याने भगवंताच्या संमुख येऊन,क्रोधपूर्वक आपल्या अतिवेगाने फिरवलेल्या गदेच्या योगाने नृसिंहाला प्रहार केला.||२५|| भावार्थः---नंतर ठिकठीकाणी प्रहार करणाऱ्या त्या हिरण्यकशिपुला गदेसह वर्तमान जसे गरुडाने मोठ्या सर्पाला ग्रहण करावे त्याप्रमाणे नृसिंहाने हाती धरिले परंतु त्या काळी क्रीडा करणाऱ्या गरुडापासून जसा सर्प गळून त्याप्रमाणे त्या नृसिंहाच्या हातांतून तो असुर सुटून गेला.||२६|| भावार्थः---हे भरतकुलोत्पन्ना धर्मराजा,तेव्हां हिरण्यकशिपुने ज्यांची स्थाने हरण केली होती व जे त्याच्या भीतीने मेघांच्या आड राहिले होते त्या सर्व लोकपालांनी व देवांनी नृसिंहाच्या हातांच्या दैत्य सुतला हे पाहताच ते फार वाईट झाले असे मानिले.असो.तो महादैत्य,ज्याच्या हातांतून आपण सुटला होता त्या नृसिंहाला आपल्या बलाने भयभीत झाला असे मानून,आपण स्वतः युद्धामध्ये श्रमरहित असतां हातात ढाल व तलवार घेऊन मोठ्या वेगाने पुनरपि त्या नृसिंहावार धांवत गेला.||२७|| भावार्थः---हे राजा,श्येनपक्ष्याप्रमाणे ज्याचा वेग आहे व ढाल-तलवारीच्या मार्गांनी दुसऱ्याला प्रहार करण्यास अवकाश मुळीच सापडू नये अशा रीतीने जो खाली व वर संचार करीत आहे अशा त्या हिरण्यकशिपुला,महावेगवान नृसिंहाने,तीव्र व मोठ्या शब्दाने भयंकर असा अठ्ठावीस करून जसे मुषकाला सर्पाने ग्रहण करावे त्याप्रमाणे ग्रहण केले.त्या वेळी त्या अट्टहास करून जसे मुषकाला सर्पाचे ग्रहण करावे त्याप्रमाणे ग्रहण केले.त्या वेळी त्या अट्टहासाच्या भयाने व श्रीहरीच्या तेजाने त्या हिरण्यकशिपुने नेत्र मिटले होते.||२८|| भावार्थः---नंतर जसा गरुड,अतितीक्ष्ण विषाने युक्त असलेल्याही सर्पाचे विदारण करितो तसा ग्रहणानेच विव्हल झालेल्या,हातांतून सुटण्यकरितां सर्वबाजूंनी सर्वअवयवांची चळवळ करणाऱ्या व पूर्वी इंद्राबरोबर युद्ध करण्याच्या प्रसंगी इंद्राने टाकिलेल्या व्रजानेही ज्याची त्वचासुद्धां भिन्न झाली नाही अशा त्या हिरण्यकशिपुला नृसिंहाने द्वारामध्ये संध्याकाळी आपल्या मांडीवर उताणे पाडून त्याचे नखांनी सहज विदारण केले.||२९|| भावार्थः---तदनंतर ज्याचे नेत्र क्रोधामुळे अवलोकन करण्यास अशक्य व भयंकर आहेत जो,आपल्या जिव्हेने पसरलेल्या मुखप्रातांला छाती आहेत,ज्याचे मानवरील केस व मुख रक्तबिंदुंनी लिप्त झाल्यामुळे आरक्तवर्ण दिसत आहेत,ज्याने आतड्याचया माळा आपल्या कंठामध्ये धारण केल्या आहेत,जो हत्तीच्या शोभणार्या सिंहाप्रमाणे दिसत आहे आणि जो भुजदंडसमूहांनी युक्तअशा त्या नृसिंहरुपी श्रीहरीने नखाग्रांनी ह्र्दयकमळ विदारण केलेल्या त्या हिरण्यकशिपुला मांडीवरून खाली टाकून,ज्यांनी आयुधे उचलली आहेत अशा त्याच्या सेवकांना व त्याच्या मागून येणाऱ्या तत्पक्षपाती दुसऱ्याही हजारो दैत्यांना,नखरूप शस्त्रांच्या पृष्ठभागानीच मारून टाकिले.||३०-३१|| भावार्थः---हे राजा,त्या वेळी त्या नृसिंहाच्या मानेवरील केसांनी कंपित झालेले मेघ विखरून गेले.आदित्यादिक ग्रहहि त्याच्या दृष्टीने निस्तेज झाले,त्याच्या श्वासानेच ताडित झालेले सागर,क्षोभ पावले,त्याच्या गर्जनेने भ्यालेले दिग्गज उच्चस्वराने आक्रोश करूं लागले.||३२|| भावार्थः---त्याच्या मानेवरील केसांनी झुगारून दिलेल्या विमानांनी व्याप्त झालेला स्वर्गलोक डळमळू लागला,त्याच्या पायांनी अत्यंत पिडीत झालेली पृथ्वी कंपित झाली,त्याच्या वेगाने पर्वत ढासळून पडले आणि त्याच्या तेजाने आकाश व दिशा निस्तेज झाल्या.||३३|| भावार्थः---नंतर,संपूर्ण तेजाने युक्त,ज्याला कोणी प्रतीयोद्धा दृष्टी पडत नाही,आणि जो अतिभयंकर असून उग्र मुखाने युक्त आहे तो प्रभू नृसिंह,आपल्या दासाचे ऐश्वर्य आश्चर्यासारिखे आहे असे मानून कौतुकाने सभेमध्ये राजाच्या उत्तम सिंहासनावर दुःसह अशा त्या आदिदैत्य हिरण्यकशिपुचा युद्धामध्ये श्रीहरीने वध केला असे पाहून,अतिहर्षाच्या वेगाने ज्यांची मुखे विकसित झाली आहेत अशा देवांगना पुष्पवृष्टीच्या योगाने नृसिंहावर वर्षाव करूं लागल्या.||३५|| भावार्थः---त्या काळी नृसिंहाला पाहण्याकरितां आलेल्या देवांच्या विमानसमुदायांनी आकाश मंडळ व्याप्त झाले देवानी आपली पटहवाद्ये व दुदुंभी वाजविले.अप्सरा नृत्य करूं लागल्या आणि गंधर्वश्रेष्ठ गायन करूं लागले.||३६|| भावार्थः---बा धर्मराजा,ब्रह्मदेव,इंद्र,शिव इत्यादिक देव,ऋषि,पितर सिद्ध,विध्याधर,महोराग,मनू, प्रजापती, गंधर्व,अप्सरा,चारण,यक्ष किंपुरुष,वेताल,सिद्ध,किंनर आणि सुनंद व कुमुद इत्यादिक जे सर्व विष्णूपार्षद ते सर्वही,त्या स्थानी नृसिंहाच्या किंचित समीपभागी येऊन,फार लांभ उभे न राहतां मस्तकी हात जोडून,सिंहासनावर बसलेल्या परंतु दु:सह तेजाने युक्त अशा त्या नृसिंहाची निरनिराळी स्तुती करूं लागले.||३७-३८-३९|| भावार्थः---ब्रह्मदेव म्हणाला---हे परमेश्वरा,ज्याच्या शक्ति अनंत आहेत,ज्याचे पराक्रम विचित्र आहेत,ज्याची कर्मे श्रवण करून मात्रेकरूनच अंतःकरणाला शुद्ध करणारी आहेत,जो आपल्या सहज लीलेने स्त्वादिक गुणांच्या योगेकरून जगाचे उत्पत्ती-स्थिती-संहार करितो,असे असूनही ज्याच्या स्वरूपाला कधीही नाश नाही त्या अनंतस्वरूपी तुज भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरितां मी नम्र आहे.म्हणून आपण--जीवानी जो भगवंत ज्याच्या स्वरूपाचा कधीच नाश होत नाही,म्हणजेच जो भगवंत अविनाशी अस्र्ण सुखरूप आहे,त्यासच नम्र होऊन शरण जावा,करण तोच भगवंत सुखरूप आहे.||४०|| भावार्थः---नंतर विष्णूला कोप येण्याचा काल जाणणारा श्रीरुद्र,हि कोपाची वेळ नव्हे,असे सांगण्याच्या अभिप्रायाने त्या नृसिंहाचा प्रार्थना करितो की,---हे भक्तवत्सला,सहस्त्र,युगांचा अंत हा तुझा कोपकाळ होय,आतां तर हा अतिअल्प असुर तूं मारिला आहेस,यास्तव विनाकारण क्रोध न धरितां तुला शरण आलेल्या ह्या त्या दैत्याच्या पुत्ररूप आपल्या भक्ताचे तूं रक्षण कर.आपण--जीवानी भगवंत होण्यासाठीच निष्काम कर्म करून प्रसन्न करून घ्यावे.||४१|| भावार्थ:---इंद्र तर हविर्भाग वगैरे प्राप्त होणे हा आमचा पुरुषार्थ नसून तुझी सेवा करणे अचा आमचा पुरुषार्थ आहे.म्हणून आपण--जीवानी भगवंताचीच निष्काम सेवा करावी.तू तर ह्या क्रोधाच्या आवेगाने आपले कार्य साधीलेस व ते सर्व सिद्धीसही गेले.तस्मात,आता क्रोध आवरून अशा अभिप्रायाने म्हणाला की,--हे परमेश्वरा,यज्ञामध्ये अंतर्यामी रूपाने तूच भोक्ता असल्यामुळे आमचे रक्षण करणाऱ्या तू, दैत्यापासून स्वत:चेच भाग परत घेतले आहेस आणि तुझे गृहरूप जे आमचे हृद्य ते भय हेतुत्वे करून आमच्या स्मरणमार्गामध्ये नेहमी असलेल्या ह्या दैत्याने व्यापून टाकिले होते,परंतु तू,भय दूर करून ते त्रयलोक्याचे ऐश्वर्य मिळवून देण्याकरिता मी हि खटपट केली आहे असे म्हणशील तर स्वामिनी,हे काळाने,गिळून टाकलेले त्रयलोक्याचे ऐश्वर्य म्हणजे काय पदार्थ आहे!तो पदार्थ नाशिवंत व दु:ख देणारा आहे,म्हणून नको.कारण,हे नृसिंह,तुझी शुश्रुषा करणाऱ्या भक्तजणांना मुक्तीसुद्धा जर बहु गौरवाने मान्य नाही,तर त्यांस स्वर्गादी इतर ईश्वराने काय करावे.म्हणून आम्हां जीवांना भक्त भगवंताची सेवा मिळावी,हाच उद्धेश आहे,अन्य दुसरी कोणतीच इच्छा नाही. भगवंतांच्या सेवेपुढे मोक्ष--सुखही नको.||४२|| भावार्थ:---ऋषी तर तपाची प्रवृत्ती केल्यामुळे आमच्यावर मोठा अनुग्रह केलास असे म्हणतात.हे आदिपुरुषा,आपलेठिकाणी पूर्वी लीन असलेले हे विश्व,तू ज्या तपाच्या योगाने पुन्हा उत्पन्न केले आहेस,ते आपले प्रभावरूप सर्वोत्कृष्ट ध्यानलक्षण तप,तू आम्हां ऋषींना उपदेशिले होतेस ते तप,आता ह्या दैत्याने लोपवून टाकिले असता हे शरणागतपालका भक्ताच्या रक्षणार्थ धारण केलेल्या ह्या नृसिंहस्वरूपाने तू त्या दैत्याचा वध करून पुनरपि तप करा अशी आम्हास आज्ञा दिली आहेस,त्या तुज भगवंताला नमस्कार असो.भगवंताच्या--संत--महात्मा यांच्या अज्ञाचे आपण पालन करावे,कारण त्यात आपले--जीवाचे पारमार्थिक हित आहे.आपल्या स्वरूपाकडे नेणारे आहे,सुखारुपातेकडे नेणारे आहे.,||४३|| भावार्थ:---पितर तर श्रद्धांचा उद्धार करून आपणावर परम उपकार करणाऱ्या भगवंताला नमस्कार करीत म्हणतात,हे देवा आम्हाला पुत्रांनी श्रद्धापूर्वक दिलेली पिंडदानादिक,जो आपणच बलात्काराने भक्षण करीत असे आणि तीर्थस्नान कारीतेवेळी दिलेली तीलोदकही जो पीत असे,त्या दैत्याच्या उदराची वपा नखांनी विदारण करून त्यापासून ज्याने ते पिंडवगैरे बाहेर काढिले आहेत त्या तुज सर्व धर्मरक्षक नृसिंहाला नमस्कार असो.||४४|| भावार्थ:---सिध्द म्हणतात---हे नृसिंहा,योग व तप ह्यांच्या बलाने ज्या दृष्ठीने आमची अणिमादि सिद्धिरूप योगसिद्ध गती हरण केली होती,त्या अनेक दर्पांनी युक्त असलेल्या दैत्याचे ज्या तू नखांनी विदारण केले आहेस त्या तुला आम्ही नमस्कार करीत आहो.||४५|| भावार्थ:---विद्याधर म्हणतात---नानाप्रकारच्या धारणेने प्राप्त झालेल्या आमच्या गुप्त होण्याच्यावगैरे विद्येला,देशभक्ती व पराभवसामर्थ्य ह्यांच्या गर्विष्ठ झालेल्या ज्या मुर्खाने प्रतिबंध केला होता,त्या दैत्याचा ज्याने युध्दयज्ञामध्ये पशुप्रमाणे वध केला आहे त्या मायेने नृसिंहरूप धारण करणाऱ्या तुला आम्ही नित्य प्रणत आहो.||४६|| भावार्थ:---नाग म्हणता---हे परमेश्वरा,ज्या पाप्याने आमच्या फणांतीळ रत्ने व आमची स्त्रीरत्ने हरण केली होती,त्याच्या वक्ष:स्थलांचे विदारण करून,ज्याने ह्या (आमच्या)स्त्रियांना आनंद दिला आहे त्या तुला नमस्कार असो.||४७|| भावार्थ:--नंतर नृसिंहाने अवलोकन केले असता,मस्तकी हात जोडून उभे राहिलेले मनू प्रार्थना करितात--- हे देवा आम्ही तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणारे मनु आहो,आजपर्यंत दैत्य हिरण्यकाशिपुने आमच्या वर्णाश्रमासंबंधी सर्व धर्ममर्यादा मोडून टाकीलेल्या होत्या.त्या दुष्टांचा तू वध केला आहेस.यास्तव हे प्रभो,आता,तुझे आम्ही काय शुश्रुषन--सेवा करावे?त्याबद्दल आम्हां दासना आज्ञा करावी.||४८|| भावार्थ:---त्याचप्रमाणे त्याने अवलोकन केलेले प्रजापती,प्रार्थना करितात की,-हे परमेश्वर तू उत्पन्न केलेले आम्ही प्रजापती आहो.ज्या दैत्याने निषेध केल्यामुळेच आम्ही हल्ली प्रजा उत्पन्न करीत नाही.तो हा दैत्य,तू वक्ष:स्थळाचे विदारण केल्यामुळे खरोखर मारून पडला आहे.आता पुढे हा आम्ही प्रजा उत्पन्न करू,हे सत्वमुर्ते तुझा हा अवतार,जगाचे कल्याण करणारा आहे.||४९|| भावार्थ:---तसेच त्याने अवलोकन केलेले गंधर्वही म्हणाले की,---हे प्रभो,तुझ्या अग्रभागी नृत्य करणाऱ्या व नृत्यामध्ये गायन करणाऱ्या आम्हांला,शौर्य आणि शक्ती ह्यांच्या योगाने पराक्रमी झालेल्या ज्या दैत्याने,आजपर्यंत आपल्या स्वाधीन केले होते तो हा दैत्य,तू ह्या मरणदशेला पोचविला आहेस,आणि असे होणे योग्यच आहे कारण,कुमार्गाचेठिकाणी प्रवृत्त झालेला पुरुष,कल्याण,पावण्यास योग्य होतो काय ?नाहीच होत.म्हणून आपले--जीवाचे कल्याण होण्यासाठी आपण जर कुमार्गाने जात असुत,तर भगवंताने शिक्षा करणे म्हणजे आपल्यावर कृपा करणे आहे,म्हणून शिक्षा करणारांचे आपण--जीवनी आभार व्यक्त करून कृतज्ञानता मानावयास पाहिजे. ||५०|| भावार्थ:---चार म्हणतात---हे हरे ज्यामुळे साधूच्या अंत:करणामध्ये भयोत्पाद्क या नात्याने वास करीत असलेल्या ह्या असुराला तू मारून टाकीला आहेस,त्यामुळे तुझ्या संसार निवर्तक चरणकमळाचा आम्ही आश्रय केला आहे.||५१|| भावार्थ:---यक्ष म्हणतात---हे नरहरे,मनोहर कर्माच्या योगाने तुझ्या सेवकांमध्ये मुख्य असलेले जे आम्ही त्यांना,हल्ली दितीपुत्र हिरण्यकशिपूने,पालखी वाहणारे भोई केले होते.परंतु हे चोवीस तत्वाच्या नियंत्या प्रभो,त्याने केलेले लोकदू:ख जाणणाऱ्या तू,त्याला मरणदेशाला पोचविले आहेस,म्हणून आता पुढे आम्ही तुझीच शुश्रुशादिक--सेवादि कर्मे करू||५२|| भावार्थ:---तद्नंतर,तुझे स्तवन करण्यास आम्हां गरीबांची योग्यता काय आहे?अशा अभिप्रायाने की,पुरुष म्हणाले---हे देवा,आम्ही अतितुच्छ प्राणी आहो,तू तर,अद्भुत प्रभाववान सर्वनियतां पुरुषोत्तम आहेस.आता मी हा महादैत्य मारिला म्हणून तुम्ही माझे का वर्णन करीत नाहीत असे म्हणशील तर---हे परमात्या, ह्यात कार्य वर्णन करावयाचे आहे?कारण,जेव्हा भगवद्भक्तांनी ह्याचा तिरस्कार केला तेव्हाच हा दुर्जन नष्ट झाला आहे.म्हणून आपण--जीवानी भगवत-भक्तांचा तिरस्कार करू नये. ||५३|| भावार्थ:---वैतालिक म्हणाला---हे भगवन,सभा व यज्ञ ह्यामध्ये तुझ्या निर्मल यशाचे गायन करून आम्ही पूर्वी मोठमोठ्या पूजा(देणग्या)मिळविल्या आहेत,परंतु ज्याने त्या सर्व अगदी बंद करून टाकिल्या होत्या,तो हा रोगासारख्या घातकी दुर्जन दैत्य तू,मारून टाकीलास हि फार चांगली गोष्ट झाली.||५४|| भावार्थ:---किनर म्हणतात---हे ईश्वरा,आम्ही किंनरगण तुझे अनुयायी असून ह्या दितीपुत्र हिरण्यकशिपूने आम्हांला वेठ करण्यास(मजुरीवाचून ओझे वाहण्यास)लाविले होते.म्हणून हे हरे,तो पापी दैत्य,तू मारून टाकीला आहेस.आता पुढेही हे नाथा,नरसिंहा,तू आम्हां सेवकांच्या समृद्धीला कारण हो.||५५|| भावार्थ:---विष्णूपार्षद म्हणतात---आम्हां भक्तजनांना आश्रय देणाऱ्या भगवंता,सर्वलोकांना मंगलकारक असे हे तुझे अद्भुत नृसिंहरूप आम्ही आजच पहिले;पूर्वी कधीच पहिले नव्हते.हे ईश्वरा,तो हा हिरण्यकशिपू,मुळचा तुझा दास असून ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळे दैत्य झाला होता.आता त्याचे हे मारणे त्याच्या अनुग्रहासाठीच झाले,असे आम्ही समजतो.आपणास--जीवास शिक्षा करणे,धन हरण करणे,किंवा मृत्यू देणे म्हणजे आपल्यावर कृपा करणे होय.कशावरून---समजा हिरण्यकशुपाला मारले नसते,तर भावी काळात त्याच्याकडून किती तरी निषिद्ध कर्मे झाली असते व त्यामुळे पाप अधिक झाले असते,व त्या पापाचे फळ,त्यालाच दु:खरूपाने भोगावयास मिळाले असते,पण त्यास मारल्यामुळे भावी पाप होण्यास प्रतिबंध आला.||५६|| ८-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्तम(७)स्कंधामध्ये दैत्य-वधरूप व नृसिंह्स्तवन-- कथनरूप हा आठवा(८) अध्यायछेपन्नावा(५६)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||८|| | ||श्रीकृष्णाअर्पणमस्तू||||श्रीसदगुरुअर्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |९-----आता ह्या नवव्या अध्यायामध्ये ब्रम्हदेवाने भीतीने प्रेरणा केलेल्या असुरबालक प्रल्हादाने,अतिभयंकर नृसिंहरूप धारण करणाऱ्या नृसिंहाचा कोप शांत करण्याकरिता स्तुती केली अशी कथा वर्णन केली आहे.||९|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---त्यामध्ये प्रथमत: सिंह जसा इतरांना उग्ररूप असून आपल्या बालकांना सौम्य असतो त्याप्रमाणे भगवान नृसिंहहि दुष्टांना उग्र असून स्वभक्तांना सौम्यच आहे,अशी आगमांत सांगितलेली भगवंताची भक्तदयाळूता सांगण्याकरिता नारद म्हणतात---हे धर्मराज,ह्याप्रमाणे दूरच उभे राहून स्तुती करीत असलेले ब्रह्मरुद्रप्रभूती सर्व देवादिक,क्रोधाने ज्याला आवेश झाला आहे म्हणून जवळ जाण्यास अत्यंत अशक्य अशा त्या नृसिंहसमीप जाण्यास समर्थ झाले नाहीत.||१|| भावार्थ:---फार तर काय परंतु प्रत्यक्ष लक्ष्मीला,देवांनी कोपशांत्यर्थ पाठविले असता तिही पुर्वी कधीही न पाहिलेले व न एकीलेले असे ते भगवंताचे अत्यंत अद्भुत नृसिंह रूप अवलोकन करून भयभीत झाली व समीप जाण्यास समर्थ झाली नाही.||२|| भावार्थ:---नंतर ब्रहमदेवाने आपल्या समीप उभा असलेल्या प्रल्हादाला प्रभूच्या क्रोधशांतिकरिता पाठविले.ते असे की,'बा प्रल्हादा,तू पुढे जा आणि आपल्या पित्यावर क्रुद्ध झालेल्याप्रभूला शांत कर.||३|| भावार्थ:---हे राजा,तेव्हा ठीक आहे असे म्हणून त्या महाभगवद्भक्त बालकाने(प्रल्हादाने)हळूहळू भगवंतासमीप जाऊन,त्यास हात जोडून साष्ठांग नमस्कार घातला.आपण--जीवानी आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत,त्यांना आपणहून सांष्टांग नमस्कार करावा.||४|| भावार्थ:---त्या वेळी,आपल्या चरणमूलाचेठिकाणी पडलेल्या त्या बालकास अवलोकन करून कृपेने व्याप्त जाह्लेल्या त्या श्रीनृसिंहदेवाने त्याला उठवून,काळरूप सर्पापासून ज्यांची बुद्धी भिवून गेली आहे अशा शरणागताना ज्याने अभयदान दिले आहे असे आपले करकमल त्याचे मस्तकी ठेवले.आपल्यापेक्षा जे कनिष्ट आहेत,त्यांनी आपले दर्शन घेतल्यानंतर त्यांना श्रेष्ठांनी आशिर्वाद ध्यावावयास पाहिजे. ||५|| भावार्थ:---ते समयी नृसिंहाच्या कर स्पर्शाने ज्याचे वासनारूप सर्व निरस्त झाले आहे व तत्क्षणीच ज्याला भगवंताच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले आहे,असा तो प्रल्हाद परमानंदाने पूर्ण,रोमांच उठलेल्या देहाने युक्त व प्रेमाने आर्द्र झालेल्या हृदयाने युक्त होवून ज्याच्या नेत्रामध्ये आनंदाश्रू प्राप्त झाले आहेत असा,त्याने आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचे चरणकमल परमपुरुषार्थ--ब्रह्म--परमात्माररूपाने धारण केले.||६|| भावार्थ:---नंतर शांतचित्त अशा त्या प्रल्हादाने भगवंताचेठिकाणी आपले हृदय व दृष्टी लावून एकाग्र अंत:करणपूर्वक प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीच्या योगाने श्रीहरीचे स्तवन केले.||७|| भावार्थ:---भगवंताची कृपामृतदृष्टी,आपल्यावर असल्याप्रमाणे सर्वावर व्हावी ह्याकरिता उत्तम अशा बेचाळीस (४२) श्लोकांनी प्रल्हादाने श्रीहरीचे स्तवन केले आहे.त्यामध्ये प्रथमत: भगवंताच्या स्तुतीविषयी आपणाला अधिकार नाही असे मनात आणीत असता प्रल्हाद म्हणतो की,सत्वगुणाचेठिकाणी एकाग्रबुद्धी असलेले ब्रह्मादिक देवगण,भगवच्चिंतनपर ऋषी आणि ज्ञानसंपन्न असे सनकादिकहि बहुतकालपर्यंत आराधन करीत असून हा वेळ पर्यंत आपल्या प्रवाहांनी व धनरुपादिक गुणांनी स्तुत्यादिकेकरून आपले-- ठीकानी ज्याचा संतोष उत्पन्न करून घेण्याविषयी समर्थ झाले नाहीत,तो श्रीहरी मज घोरजातीच्या असुरावर कसा संतुष्ठ होईल?होणारच नाही.||८|| भावार्थ:---ह्याप्रमाणे श्रीहरिला संतुष्ठ करण्याविषयी आपली योग्यता नाही,असे मनात आणून आतां योग्यता संपादन करितो की,-वित्त,सत्कुलामध्ये जन्म,शौदंर्य,तप,पांडित्य,इंद्रियसौष्ठव,उद्योग,प्रताप,कांती,शरीरशक्ती,बुद्ध आणि अष्टांगयोग हे बाराही-गुण,लोका मध्ये व शास्त्रामध्ये जरी श्रेष्ठत्वकरून प्रसिध्द आहेत तथापि ते परमपुरुष,भगवंताला संतुष्ठ करण्यास समर्थ होत नाहीत असे मी मानतो.कारण केवळ भक्तीच्याच योगाने भगवन्-गजेंद्रावर संतुष्ट झाला होता.आपण--जीवानी भगवंतास संतुष्ट करण्यासाठी अनेक साधने आहेत,पण निष्काम भक्तीच्या योगाने सहजास भक्तावर संतुष्ट होतो,म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्तीच करावी.निष्काम भक्ती म्हणजे "जे जीव दु:खी आहेत,त्यांचे दु:ख आपल्या अधिकारानुसार निवृत्त करून त्यांना सुख देण्यासाठी प्रयत्न करणे,व त्या मोबदल्यात संसार--विषयांची मागणी न करता भगवंतच मागणे व भक्तीचा अहंकार न येऊ देणे त्यास "निष्काम भक्ती" असे म्हणतात.याप्रमाणे भक्ती केली असता संसंग प्राप्त होऊन त्याद्वारे ज्ञान होऊन भगवंत प्राप्त होतो.||९|| भावार्थ:---ह्याप्रमाणे केवळ भक्तीच्याच योगाने श्रीहरीचा संतोष होतो असे सांगितले.आता भक्तीवाचून दुसरे काहीच त्याच्या संतोषास कारण नाही असे सांगतो---पूर्वी सांगितलेल्या बारा गुणांनी युक्त असूनही पद्मनाभ-भगवंताच्या चरणकमलापासून विमुख असलेल्या ब्रह्मणापेक्षाहि त्या पद्मनाभाचेठिकाणी त्याने, मन,वचन,कर्म,द्रव्य,आणि प्राण हे अर्पण केले आहेत त्या चांडाळालासुद्धा मी श्रेष्ठ मानितो.आपला--जीवाचा वर्ण महत्वाचा नसून भगवंताच्या चरणकमलाच्या ठीकाणी निष्काम भक्ती--प्रेम असणे महत्वाचे आहे.कारण,असा असणारा तो चांडाळ,आपले सर्वकुल पवित्र करितो आणि तो अतिगर्विष्ट ब्राह्मण,आपणासहि पवित्र करीत नाही,मग कुलाची गोष्ठ कशाला पाहिजे!एतावता भक्तिहीन मनुष्याचे सर्वादि गुण,शुद्धीला कारण होत नसून केवळ गर्वोत्पत्तीलाच कारण,होतात,म्हणून तो भक्तिमान पुरुषापेक्षा कमी समजला पाहिजे.म्हणून आपण--जीवानी अह्न्कारहित व निष्काम भक्तीच करावी,करण त्यामुळे भगवंत संतुष्ट होतो.||१०|| भावार्थ:---तर मग जसा एखादा प्राकृत पुरुष,धनादिकांच्या अर्पणाने सन्मानाची इच्छा करितो त्याप्रमाणे भगवंतालाहि इच्छा असते काय,असे म्हणावे तर तसे नाही.कारण,---हा ईश्वर,निजलाभानेच--नीजस्वरूपाने--स्वस्वरुपानेच परिपूर्ण असल्यामुळे आपल्याकरिता क्षुद्रजनांपासून पुजेची इच्छा करीत नसून केवळ तो कृपाळू असल्यामुळे भक्तांकरिताच तिची--स्वस्वरुपाची इच्छा करितो.कारण,मुखाचे-- ठिकाणी केलेली तिलकादि शोभा जरी प्रतिबिंबाला प्राप्त होते,त्याप्रमाणे ज्या धनादिकांच्या योगाने हा जन भगवंताचे पूजनवगैरे करितो ते सर्वही त्याला स्वत:हाच प्राप्त होते.म्हणजे त्या पुजामुळे त्यालाच धन प्राप्त होते,पण भगवंत प्राप्त होत नाही.म्हणून आपण--जीवानी धनासाठी भक्ती करावयाची नसून भगवंत--प्राप्तीसाठी भक्ती करावयाची आहे.||११|| भावार्थ:---तस्मात ज्याअर्थी केवळ भक्तिच्याच योगाने भगवान संतुष्ठ होतो त्याअर्थी मी जरी नीच आहे तथापि आता नि:शंकपणे सर्वप्रयत्नाने यथामती ईश्वराचे महात्म्य वर्णन करितो.कारण,ज्या महात्म्याच्या वर्णनेकरून,अविद्येने संसारामध्ये पडलेला पुरुष शुद्ध होतो.आपण--जीवानी ईश्वराची निष्काम भक्ती करावी,कारण त्यामुळे संसार जो अशुद्ध आहे,त्यातून बाहेत पडण्यासाठी म्हणजेच शुद्ध होण्यासाठी भगवंताची निष्काम भक्तीच करावी.||१२|| भावार्थ:--- असो.याप्रमाणे भगवंताची स्तुती करण्यास आपणाला अधिकार आहे असे सिध्द करून,आता कोपाचा उपसंहार करण्याकरिता त्या भगवंताची प्रार्थना करितो की,---हे ईश्वरा,तुला भीत असलेले हे सर्वही ब्रह्मादिक देव,आम्हां असुरांप्रमाणे वैरभावाने तुझी भक्ती करणारे नसून तुज सत्वमूर्ती भगवंताच्या आज्ञेमध्ये श्रद्धापूर्वकच वागणारे भक्त आहेत आणि तुज भगवंताच्या मनोहर अवतारांच्या योगाने होत असलेल्या नानाप्रकारच्या लीला ह्या विश्वाच्या कल्याणाकरिता,ऐश्वर्यप्राप्तीकरिता आणि निजानंदाच्या लाभाकरिता होत असतात,भय उत्पन्न करण्याकरिता होत नसतात.भगवंत मृत्यू-लोकांत आपले--जीवाचे कल्याण करण्याकरिताच येत असतो,म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या लीला श्रवण कराव्यात,कारण त्यामुळे आपले मन स्थिर होत असते.||१३|| भावार्थ:---म्हणून ह्यांच्या भयाचा परिहार होण्याकरिता तू आपला क्रोध आवरून धर.कारण ज्यांच्याकरिता हा क्रोध तू धारण केला आहेस त्या हिरण्यकशिपू दैत्यालाही तू आज साधूंच्या संतोषाकरिता मारिले आहेस.आता इतरांच्या वधाने साधूला आनंद कसा होईल?असे म्हणशील तर सुख पावलेले ते लोक,आता तुझ्या क्रोधाचा उपसंहार होण्याची वाट पाहत आहेत.तर मग जनांना पुन्हा भय प्राप्त होवू नये म्हणून मी क्रोध धारण करितो असे म्हणशील तर---हे नृसिंहा,भयनिवृत्तीकरिता सर्वलोक,या नृसिंहस्वरूप स्मरण करितील.म्हणजे ह्या रूपाच्या केवळ स्मरणानेच जर भयनिवृत्ती होणार आहे तर क्रोध धारण करण्याचे कांहीच प्रयोजन नाही.आपण--जीवानी क्रोध करू नये,कारण क्रोध हा भयास कारण आहे.||१४|| भावार्थः---आतां,तूं जर भीत असशील तर मी क्रोधाचा त्याग करितो,असे म्हणशील तर---हे अजिता,ज्याचेठिकाणी अतिभयंकर अशी मुख,जिव्हा,सूर्यासारिखे नेत्र,भृकुटीचा वेग आणि उपदंष्ट्रा हि आहेत,ज्याच्या गळ्यांत आतड्यांच्या माळा घातलेल्या आहेत,ज्याच्या मानेवरील केंस रक्ताने भरलेले आहेत,ज्याचे कान,शंकूसारखे उभे टवकारलेले आहेत,ज्याच्यापासून निघालेल्या शब्दाने दिग्गज भयभती होऊन गेले आहेत,ज्याच्या नखाग्रे शत्रूंना विदारण करणारी आहेत त्या तुझ्या भयंकर रूपापासून मी तर मुळीच भीत नाही.||१५|| भावार्थः---मला मोठे भय तर दुसरेच ते असे की,---हे दिनवत्सला,दुःसह आणि उग्र असे जे संसारचक्रांतील दुःख त्यापासून मी अगदी भिवून गेलो आहे.कारण,त्याठिकाणी घातकी लोकांमध्ये मला,कर्मांनीबद्ध करून टाकून दिले आहे,तेव्हां हे अतिसुंदरा,परमात्मा,मजवर तूं प्रसन्न होऊन संसारदुःखनिवर्तक अशा आपल्या आश्रयभूत चरण कमलाजवळ मला केव्हां बरे हाक मारिशील?आपण--जीवानी निष्काम भक्ती केली तर आपणास--जीवास भगवंत चाराजवळ--अधिष्ठानाकेडे बोलावितो म्हणजेच संत--महात्मा यांचा सुयोग प्राप्त करून देतो.||१६|| भावार्थः---आतां,दास्य केले तरच मी प्रसन्न होतो असे म्हणशील तर---नानाप्रकारच्या योनीमध्ये दुःख पावत असलेल्या मला दास्य करण्याचे कांहीच ज्ञान नाही.तस्मात तूंच त्याचा मला उपदेश कर अशी प्रार्थना करितो---आपण--जीवानी सत्संग केला असता दश्य भक्ती म्हणजे काय?किंवा इतर कोणत्याही अध्यात्मीक प्रश्नांचे उत्तर संत--महात्मा यांचा सत्संग केला असता कळू शकते.हे विभो,प्रियवस्तूपासून वियोग आणि अप्रिय वस्तूंशी संयोग ह्यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या शोकाग्निने सर्व योनीमध्ये मी पोळून गेली आहे.आतां दुःखाचा प्रतिकार करावा असे म्हणशील तर दुःखाच्या निवृत्तीकरितां औषधरूप हे द्रव्यसंपादिक करणे तेंही दुःखमयच आहे असे जाणून देहादिकांचेठिकाणी असलेल्या अभिमानाने मी मोह पावत आहे;यास्तव तूं आपला दास्यरूप उपाय मला कथन कर.आपण--जीवानी भगवंताची दास्य निष्काम भक्ती करावी.त्यामुळे आपले दु:ख निवृत्त होते.||१७|| भावार्थः---आतां,दास्यरूप उपाय करण्याविषयी जरी प्रवृत्त झालास तथापि त्याला अडथळा करणाऱ्या पूर्वोक्त नानाप्रकारच्या दुःखाचा परिहार कोठून होणार असे म्हणशील तर---हे नृसिंहा,तूं अनुग्रह केल्यामुळे तुझ्या दासाचेठिकाणी प्रवृत्त झालेला,तुझ्या चरणद्वयाचां आश्रय करणाऱ्या सत्पुरुषांच्या समागम करणारा मी,विषयांपासून विशेषेकरून मुक्त होऊन,प्रिय,मित्र व श्रेष्ठ देवतारूप,अशा तुझ्या,ब्रह्मदेवाने गायन केलेल्या लीलासंबंधी कथांचे वर्णन करूं लागले म्हणजे सर्वदुःखांना अनायासाने तरून होईन,म्हणजे त्यांची गणना करणार नाही.म्हणजे सकाम भक्ती न करता निष्काम भक्ती करेल.||१८|| भावार्थः---आतां दुःखांनी संतप्त झालेल्या जनाला दुःखनिवृत्तीचा उपाय लोकांमध्ये प्रसिद्धच आहे मग माझे दास्यवगैरे करण्याचे काय कारण आहे;असे म्हणशील तर---हे नृसिंहा,दुःखाची संतप्त झालेल्या जनास दुःख निवृत्तीचा उपाय म्हणून जो या लोकी जरी आहेत तथापि ते कायमचे नव्हेत कारण,ते रक्षण असतांही बालकांना येते आणि त्याप्रमाणेच नौकाही समुद्रामध्ये बुडत असलेल्या प्राण्याचे रक्षण करणारी आहे असे म्हणावे तर तेंही नाही.कारण,औषध दिले असतांही मृत्यू येतो असे आपल्या म्हणावे तर तीही नाही.कारण,कधी कधी नौकेसहवर्तमानहि लोकसमुद्रामध्ये बुडतात असे आपल्या दृष्टीस पडते.तस्मात,वास्तविक रक्षक असा एक तूंच आहेस.आपण--जीवानी संसारातील कोणत्याही साधनाने आपण दु:ख निवारण करू शकत नाही,तसा आपणास--जीवास अनुभव आहे.त्यावरून भगवंतच फक्त आपले संरक्षण करू शकतो.म्हणून आपण--जीवानी भगवंताची निष्काम भक्तीच करावी.आपण जर भगवंताची सकाम भक्ती केली तर ती भक्ती भगवंताची होत नसून,ती भक्ती संसाराची--विषयांची होते.म्हणून भगवंत आपले--जीवाचे संरक्षण करू शकत नाहीत.म्हणून आपण--निष्काम भक्तीच करावी.||१९|| भावार्थः---बरे,कांहीठिकाणी कोठूनतरी कोणत्यातरी प्रकाराने कदाचित कोणीतरी रक्षक दृष्टीस पडतोच असे म्हणशील तर,त्या ठिकाणीसुद्धां त्या त्या रूपाने तूंच रक्षक असतोस असे घेऊन भगवंताचीच सर्वरूपे आहेत हे सांगण्याकरितां प्रल्हाद भाषण करितो की,---हे भगवन,सत्वादिस्वभावयुक्त असा प्राचीन ब्रह्मादिक मुक्ती कर्ता अथवा त्याने प्रेरित असा अर्वाचीन पित्रादिक करतां,जेथी ज्या निमित्तास्तव,ज्या काली,ज्या साधनाने,ज्या संबंधाने,ज्याच्यापासून,ज्याकरीतां,ज्या प्रकाराने,जे उत्पन्न करितो ते सर्व तुझेच स्वरूप आहे.निष्काम भक्ती केली असता,भगवंत आपले रक्षण करितो,तो स्वत: येऊन करीत नसला तरी आपल्या देहसंबंधीतांना किंवा इतर जीवा-मार्फत भगवान आपले--जीवाचे संरक्षण करितो.||२०|| भावार्थः---आता तुझ्यावांचून इतर कोणीच रक्षक नाही म्हणून असंसारी व नित्यमुक्त अशा तूंच मजशरणागताचे रक्षण करावे अशी प्रार्थना करितो,हे जन्मादिविकारशून्या,त्वंदशभूत पुरुषाच्या अवलोकनरूप अनुग्रहानेच प्रेरित झालेल्या कालाच्या योगाने,जिच्यांतील सत्वादिगुणांचा क्षोभ झाला आहे ती माया,अविद्येच्या द्वाराने जीवाच्या भोगाकरितां जे सोळा विकारांनी युक्त,दुर्जय,अनंत कर्मवासनांनी युक्त आणि वेदोक्त कर्मप्रधान असे मन (लिंगशरीर)उत्पन्न करिते,त्या संसारचक्ररूप मनाला (मन-प्रधाण लिंगशरीराला)तुझ्याहून निराळा म्हणजे तुझी भक्ति न करणारा कोण बरे पुरुष तरून जाईल?कोणीच जाणार नाहीआपण--जीवानी जर भगवंताची निष्काम भक्ती न केली तर आपण इतरांच्या साह्याने संसार--सागरातून तरुण जाणार नाहीत.म्हणून थोडक्यात आपण--जीवानी निष्काम भक्तीच करावी.||२१|| भावार्थः---आतां मलाहि मायेच्या संबंधाने कर्तृत्त्वादिक असल्यामुळे तुझ्यापेक्षां माझेठिकाणी विशेष काय आहे?असे म्हणशील तर---हे समर्थां ईश्वरा,ज्या तूं आपल्या चैतन्यशक्तीच्या योगाने निरंतर बुद्धीचे गुण जिंकिले आहेस व जो तूं मायेचा नियंता असून सर्व कार्यांच्या व साधनांच्या शक्ति आपल्या स्वाधीन ठेवणारा आहेस,तो तूं,अविद्येने षोडशविकारात्मक संसारचक्रामध्ये टाकीलेला असल्यामुळे इक्षुदंडाप्रमाणे अत्यंत पिडीत होणाऱ्या मजशरणागताला आपल्या समीप आकर्षण करून घे.आपण--जीवानी भगवंताकडे संसारातील कोणतीच इच्छा प्रदर्शित करू नाहे,कारण संसारातील भोग हा प्रारब्ध कर्मानुसार निश्चित झालेला असतो,त्यात कांहीच बदल करता येत नाही.म्हणून आपण निष्काम कर्म करून भगवंताची कृपा संपादन करावी.||२२|| भावार्थः---आतां,तूं संसारापासून उद्विग्न कां होत आहेस?असे तूं लोकपालांच्या भोगांचा उपभोग घे;अथवा पित्याचे राज्य मी देतो ते ग्रहण कर असे म्हणशील तर---हे प्रभो,हा संसारी जन,स्वर्गलोकाचेठिकाणी जे प्राप्त होण्याची इच्छा करितो ते सर्व लोकपालांचे-आयुष्य,संपत्ति व आधिपत्य रूप अधिकार अतितुच्छ आहेत असे मी पाहिले आहे.कारण,जे माझ्या पित्याच्या कोपयुक्त हास्याने फिरवलेल्या भृकुटीच्या चालनमात्रेकरून विध्वंस पावले आहेत.तर मग आपल्या राज्य घे असे म्हणशील तर,तो माझा पिताहि तूं मारून टाकिला आहेस.तेव्हा त्याच्याराज्याचे महत्त्व काय असणार?आपण--जीवास धन--संपत्ती हि दु:खास कारण आहे,म्हणून राज्य--धन--संपत्ती विषयी प्रतिकूलता असावी,करण ते दु:खाचे साधन आहे,म्हणून त्यांच्याविषयी वैराग्य असावे.||२३|| भावार्थः---तस्मात,जीवांचे हे भोग,आयुष्य,संपत्ती आणि वैभव ह्यांचा परिणाम जाणणारा मी,ब्रह्मदेवाच्या भोगांपर्यंत इंद्रियांनी उपभोग घेण्यास योग्य असलेल्या सर्व विषयांची इच्छा करीत नाही.कारण,त्या सर्वही आनिमादी संपत्ति,तुज कालरूप परमेश्वराच्या महापराक्रमाने विध्वस्त झालेला आहेत.यास्तव मला तूं आपल्या सेवकांच्या समीपभोगीच नेऊन पोचीव.आपण--जीवानी धनाविषयी प्रतिकूलता भावना असावी,कारण धन हे दु:खास कारण आहे.म्हणून आपण--जीवानी भगवंताचे निष्काम सेवकाच असावे.||२४|| भावार्थः----आतां वर्तमान कालीही भोगण्यास विषय योग्य नाहीत असे सांगतो---विषय हे कानालामात्र गोड लागणाऱ्या परंतु मृगजळाप्रमाणे मिथ्या असलेल्या सर्व संपत्ती कोठे?(कितीशा सुख देणार आहेत)आणि सर्वरोगांचे उद्धवस्थान असे शरीर तरी कोठे?(कितीसा उपभोग घेणार आहे?)परंतु यद्यपि हा लोक असे विषयांचे नश्वरत्व जाणणारा आहे तथापि मधासारख्या दुःसाध्यहि सुखलेशांनी कामरूप अग्नीची शांति करीत असल्यामुळे हा विरक्त होत नाही;म्हणजे कामाग्नीने शमन करण्यामध्ये व्यग्र झालेल्या जनाला विरक्त होण्यास अवकाशाच मिळत नाही.म्हणून आपण जीवानी विषयांचे यथार्थ स्वरूप जाणून घ्यावे.विषयांचे यथार्थ स्वरूप जाणून घातले असता,विषयांविषयी वैराग्य उत्पन्न झाले असता आपण--जीव देवाकडे सहजच आकृष्ट होतोत. ||२५|| भावार्थः---तर मग तूं कसा विरक्त झालास असे म्हणशील तर,अयोग्य अशाही माझ्याठिकाणी प्रवृत्त झालेल्या तुझ्याकृपेनेच हे झाले,अशा आशयाने म्हणतो की,---हे ईश्वरा,ज्यामध्ये तमोगुण अधिक आहे व जे रजोगुणानेच उत्पन्न झाले आहे अशा असुरकुळामध्ये उत्पन्न झालेला मी कोणीकडे?आणि तुझी कृपा कोणीकडे?कारण,ब्रह्मदेव,रुद्र,व लक्ष्मी ह्यांच्या मस्तकी जो कधीही अर्पण केलेला नाही तो कमलाप्रमाणे सर्व संताप दूर करणारा पुरुषार्थरूप आपला हात,तूं माझे मस्तकी अर्पण केला आहेस.भगवंताची आपल्यावर कृपा झाली तर आपले दोष निवृत्त होतात व त्यामुळे संत--महात्मा यांचा सत्संग करावा हि भावना उत्पन्न होऊन संत--महात्मा यांचा सत्संग घडतो.||२६|| भावार्थः---असे होणे हे तरी तुझेठिकाणी काही आश्चर्य नव्हे.कारण,हे ब्रह्मादिक देव उत्तम आहेत व हा असुर नीच आहे हि उत्कृष्टनिकृष्टबुद्धि एखाद्या प्राकृत जनासारखी तुझेठिकाणी नाही.कारण,तूं जगाचा आत्मा व सुह्र्द आहेस.तर मग माझा प्रसाद सर्वांचेठिकाणी सारखा कां होत नाही?असे म्हणशील तर---हे परमेश्वरा,सेवेच्या योजाने तुझा प्रसाद होतो परंतु जसा कल्पवृक्ष सेवकाच्याच इच्छेनुसार फळ देतो तो स्वतः विषय मुळीच नसतो त्याप्रमाणे सेवातारतम्याने तुझ्या प्रसादापासून धर्मादिकांची प्राप्ति होते.म्हणून उत्कृष्टत्व व निकृष्टत्व हे काही तुझ्या प्रसादाविषयी कारण नाही,तर आपल्या--जीवाच्या कर्मामुळेच उत्कृष्टत्व व निकृष्टत्व प्राप्त होते.म्हणून आपण--जीवानी जाने करून भगवंताची कृपा होऊन सत्संग घडेल असेच कर्मं करावे,तर जेणेकरून संसार प्राप्त होईल असे कर्म करू नये.||२७|| भावार्थः----आतां,तुझ्या भक्तांच्या कृपेमुळे मला हे ज्ञान झाले आहे,याकरितां त्यांच्याच समीप तूं मला पोंचीव असे सांगण्याच्या आशयाने प्रल्हाद भाषण करितो की,---संसाररूप सर्पयुक्त कृपामध्ये पडलेल्या विषयेच्छू जणांच्या मागून,त्यांच्याच सहवासाने त्या संसारकुपांत पडणाऱ्या मजवर जसा आता तुझा हा प्रसाद आहे तसाच पूर्वी देवर्षी नारदाने मला आपला असे म्हणून माझ्यावर अनुग्रह केला आहे म्हणजे साधनसामुग्रीचा उपदेश केला आहे.तो मी,त्या तुझ्या सेवकांच्या सेवेचा कसा बरे त्याग करीन?करणारच नाही.एतावता नारदाच्या अनुग्रहाने पूर्वी जी तू मजवर अत्यंत दया केलीस तोच मी तुझा मोठा अनुग्रह समजतो.आता माझे प्राणरक्षणवगैरे केलेस हा काही मोठ्सा अनुग्रह नव्हे.भगवंताची आपल्यावर--जीवावर विशेष कृपा म्हणजे संत---महात्मा यांचा सत्संग घडणे हि होय,तर आपले--जीवाचे प्राण रक्षण करणे हीही कृपा आहे,पण हि कृपा मध्यम आहे.म्हणून आपण--जीवानी साधू--संत--महात्मा यांचा सत्संग घडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत,तर प्राणाचे रक्षण हे प्रारब्धानुसार होत असतेच.||२८|| भावार्थ:---आणि माझे हे प्राणरक्षण तू,माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता केले नाहीस,तर दुसऱ्याकरिता केलेले आहेस असे सांगतो---हे अनंता,जेंव्हा माझा पिता,पुत्रवधरूप अयोग्य कर्म करण्याच्या इच्छेने, हातात खड्ग घेवून,माझ्याहून निराला तुला मान्य ईश्वर जर आहे तर ती आता तुझे रक्षण करो;मी तुझे शीर उडवितो,असे जेंह म्हणाला तेंव्हा तू प्राक्त होवून,माझे प्राणरक्षण व पित्याचा वद्ध केलास,ते आपला सेवक जो नारदऋषी त्यांचे वाक्य खरे करण्याकरिता केले आहेस.भगवंत भक्तांनी दिलेला शब्द खरा करण्याकरिता इतरांचे रक्षण करीत असतो.म्हणून आपण--जीवानी भक्त--साधू--संत--महात्मा यांच्या आज्ञाचे पालन करून कृपा संपादन करावी.||२९|| भावार्थ:---आता माझ्या प्राणाचे रक्षण व दैत्याचा वध हे तुझेठीकानी पक्षपाताने घडलेले कर्म नव्हे तर मायागुणरूप उपाधीने घडलेले आहे अशा अभिप्रायाने म्हणतो की,---हे भगवन,हे सर्व जग,तूंच एक आहेस.कारण,तू ह्याच्या आरंभी कारणत्वाने व शेवटी अवधीत्वाने व निराळेपणाने वर्तणूक करितोस आणि मध्येही तूंच एक आहेस.तर मग भेद प्रतीती कशी होते?असे म्हणशील तर---हे जगदात्म्या,आपल्या मायेने हे गुणपरीनात्मक जग उत्पन्न करून त्यामध्ये प्रविष्ट झालेला तू त्या गुणाच्या योगाने उत्पन्न करणारा,रक्षण करणारा व मारणारा अशा अनेक रूपांनी युक्त असल्यासारखा भासतोस.ईश्वराचे वास्तविक स्वरूप गुणातीत आहे,तर जीवाच्या कर्मांनुसार भगवंत मायाचा स्वीकार करून व जीवाच्या कार्मांनुसार फळ देण्यास प्रवृत्त होतो,तर स्वत:साठी नाही.||३०|| भावार्थ:---आता,जर हे जग मीच आहे तर जगाच्या वैषम्यामुळे मला वैषम्य का नसावे?असे म्हणशील तर---हे ईश्वरा,हे कार्यकारणात्मक जग तूच आहेस,तुझ्याहून निराळे नाही.तू जर जगाच्या आदि व अंती निराळा राहत असल्यामुळे ह्याच्याहून भिन्न आहेस म्हणून हा आपला व हा दुसऱ्याचा अशी जी बुद्धी हि केवळ व्यर्थ माया आहे.मायामुळे भिन्नता दिसून येते,तर हि भिन्नता भगवंताची मुळीच नाही,कारण "भगवंत सम आहे व विषमता हि मायेची आहे."जसे बीज(कारण)आणि वृक्ष (कार्य)ह्यामध्ये वृक्षाला पृथ्वीपणा व बीजाला भूतसूक्ष्म(गंधगुण)पणा आहे त्याप्रमाणे ज्या मातीवागैरे पदार्थापासून ज्या घटादिकांची उत्पत्ती,प्रकाश,लय,व स्थिती हि होतात ते घटादिक तद्रूप(मृत्तीकादिरुपच)असतात म्हणून हे सर्वही कार्यकरणात्मक जग,परम कारण,अशा तुझेच स्वरूप आहे.त्याप्राने भगवंत सर्व कार्यकारानात्मक आहे,कारण "अध्यस्त वस्तू अधिष्ठाणरुपच असते,तर त्याहून भिन्न नसते."असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे.||३१|| भावार्थ:---त्यामध्ये विश्वाच्या अंती ईश्वर भिन्न रूपाने कसा असतो हे दर्शवितो की,---हे भगवन,तू प्रलयकालच्या उदकामध्ये आपल्याच योगाने आपलेठिकाणी या जगाचा उपसंहार करून,आत्मसुखाचा अनुभव घेत असता कर्मरहित होवून शयन करितोस.तर जीवासारखी मलाही तमोवृत्तीरूप निद्रा आहे की काय?असे म्हणशील तर---नाही नाही; तर स्वरूपानुसंधानरूप योगाने डोळे मिटून स्वरूप्रकाशाने निद्रा जिंकून तू ज्याअर्थी जाग्रदादिक अवस्थात्रयाहून निराळ्या आपल्या तुरीयस्वरूपाचे ठिकाणी राहतोस त्याअर्थी जीवाप्रमाणे सुषुप्तीअवस्थेप्रमध्ये तू तम अवलोकन करीत नाहीस व जाग्रद व स्वप्नावस्थेमध्ये विषयांशीहि संबंध होत नाही.जीव हा सुषुप्ती अवस्थेत अज्ञानी असतो,व जीवाचा जाग्रत अवस्था व स्वप्न अवस्थेत विषयांसी संबंध असतो.||३२|| भावार्थ:---आता,जगताचे कारण,असल्यामुळे जगताच्या पूर्वीही ईश्वर भिन्नरूपाने असतो हे दाखवीत असता,जगाच्या स्थितीकालीही तोच असतो हे स्पष्ट करितो,की,---ज्याने--ईश्वराने स्वत:च्या कालशक्तीने प्रकृतीचे सत्वादिधर्म प्रेरित केले आहेत व जो तू,उदाकामध्ये शेषशय्येवर निजतोस त्या तुझेच स्वरूप हे जग आहेस व त्याच्या मधेही तूच आहेस.कारण,शेषशय्येपासून तुझ्या योगानिद्ररूप समाधीचे जेव्हा विसर्जन होऊ लागले तेंव्हा,सूक्ष्म वटबीजापासून उत्पन्न होणाऱ्या महावटवृक्षाप्रमाणे, तुझेठिकाणीच लीन असलेले हे ब्रह्मांडरूप महाकमळ तुझ्या नाभीपासून प्रलयोदकामध्ये उत्पन्न झाले.||३३|| भावार्थ:---ह्याप्रमाणे जगाच्या कारणत्वेकरून अनुगत असलेला ईश्वर,जगामध्येहि आहे असे जे सांगितले तेच शुध्दसत्वरूप ब्रहमदेवाच्या अनुभवाने स्पष्ट करण्याकरिता,त्याची पुर्वावस्था प्रल्हाद कथन करितो की---हे ईश्वरा त्या कमलापासून उत्पन्न झालेला सूक्ष्म द्रष्टा ब्रहमदेवहि,त्या कमळावाचून इतर काहींच न पाहत असता,स्वत:हाचेठिकाणी व्याप्त असलेल्या बीजभूत अशाही तुला,स्वत:हून बाहेर आहेस असे मानून,शोध करण्याकरिता उदकामध्ये प्रवेश करून वर्षेपर्यंत शोध करीत असताही त्याला तुझी प्राप्ती झाली नाही.आणि हे योग्यच आहे.कारण अहो,!अंकुर उत्पन्न झालं असता त्यामध्ये अनुगत असलेले कारणरूप बीज त्याहून निराळे पुरुषाला कसे बरे मिळाले?मिळणारच नाही.बीजास कोंब उत्पन्न झाल्यानंतर कारणरूप असलेले बीज त्या कोंबाहून वेगळे दिसणार नाही.त्याप्रमाणे ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यानंतर कारण दिसणार नाहीच असे निश्चितच आहे.असे असूनही ब्रह्मदेव करणाचा शोध शंभर वर्षे काय ?कितीही वर्षे शोध घेतला तरी दिसणार नाही असे निश्चितच आहे,म्हणून कारण असलेले विष्णू दिसले नाही,दिसणारही नाहीत.||३४|| भावार्थ:---नंतर तुझ्या उपासनेने त्याने आपलेठिकाणीच तुला पहिले असे सांगतो---हे ईश्वर,त्या ब्रहमदेवाने,शंभर वर्षेपर्यंत उदकामध्ये शोध करीत असताही जेंव्हा तुला पहिले नाही तेंव्हा,अतिविस्मित होवून तुझा शोध करण्याचे त्याने सोडून दिले आणि नाभिकमलाचा आश्रय करून बहुकालपर्यंत केलेल्या तीव्रतापाने अंत:करण शुद्ध झाल्यावर,जसा भूमीचेठिकाणी सूक्ष्मरूपाने गंध व्याप्त असतो त्याप्रमाणे भुते,इंद्रिये आणि मन ह्यांनी बनलेल्या स्वदेहाचेठिकाणी अतिसूक्ष्मरूपाने व्याप्त असलेल्या तुला अवलोकन केले.म्हणून आपण--जीवानेसुद्धा अंत:करण शुद्ध व स्थिर करून सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||३५|| भावार्थ:---आणि ईश्वरत्वेकरून तुला पाहून तो कृतार्थ झाला असे सांगतो--याप्रकारेकरून अपरिमित,वदने,पाद,मस्तके,हस्त, मांड्या, नाशिका,मुखे,कारण,नेत्र,भूषणे आणि आयुधे ह्यांनी करून,चतुर्दशलोकविस्तारात्मक पादादिरचनेनेयुक्त आणि मायामय अशा विराट्पुरुषाने स्थिती असलेले तुला पाहून त्या ब्रहमदेवाला आनंद झाला.आपणास--जीवास परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर विलक्षण आनंद होतो,म्हणून आपण--जीवानी सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा विलक्षण आनंद घ्यावा.||३६|| भावार्थ:---त्या वेळी हयग्रीवमूर्ती धारण करणाऱ्या तुही वेदद्रोही व अतिप्रबल अशा रजस्तमोरूप मधुकैटभनामक दैत्याचा वध करून,त्या ब्रह्मदेवाला वेदसमूह अर्पण केलेस म्हणून म्हणून सत्वगुण हीच तुझी अत्यंत प्रिय मूर्ती आहे असे म्हणतात.||३७|| भावार्थ:---याप्रमाणे हे जग तूच एक आहेस इत्यादी आठ श्लोकांनी पक्षपाताने भक्ताचे रक्षण व त्याच्या शत्रूचा वध हे कृत्य ईश्वराचे स्वाभाविक नसून सत्वगुणरूप उपाधीमुळे घडले आहे असे जे सागितले त्याचाच उपसंहार करण्याच्या अभिप्रायाने प्रल्हाद कथन करितो की,---हे महापुरुषां,ह्याप्रमाणे तू मनुष्यांमध्ये रामादिक,तिर्यग्योनीमध्ये वराहादिक,ऋषीमध्ये परशुरामादिक,देवांमध्ये वामनादिक,व जलचरांमध्ये मत्स्यकुर्मादिक अवतार धारण करून,लोकांचे पालन करितोस,जगाला प्रतिकूल जे असतील त्यांचा वध करितोस आणि युगामध्ये असलेल्या धर्माचे रक्षण करितोस.परंतु,ज्याअर्थी कलीयुगामध्ये तू गुप्त झाला आहेस म्हणजे अवतार धारण करून ते पालनादिक करीत नाहीत त्याअर्थी तीनच युगांमध्ये प्राक्त होणारा तू 'त्रियुग'ह्या नावांने प्रसिद्ध आहेस.||३८|| भावार्थ:---ह्याप्रमाणे भगवंताचे तत्व निवेदन करून त्यांचा विचार करण्यास मी अयोग्य आहे असे निवेदन करीत प्रार्थना करितो की,---हे वैकुंठनाथा,पातकांनी दुषित,बहिर्मुख,दुर्धर,कामातुर व हर्ष,शोक,भय पुत्रैषणा,वित्तैषणा आणि लोकैषणा ह्यांनी दु:खित झालेलेही हे माझे मन,तुझ्या कथांचेठिकाणी प्रीतियुक्त होत नाही.अशाप्रकारच्या त्या मनामध्ये,मी दिनाने--अज्ञानी--जीवानी तुझ्या तत्वाचा विचार कसा करवा?||३९|| भावार्थ:---त्याप्रमाणे हे अच्युता,जशा अनेक सवती आपल्या पतीला आपाआपल्या घरी येण्याकरिता आकर्षण करून त्रास देतात त्याप्रमाणे अत्यंत अतृप्त झालेली माझी जिव्हा मला मधुरादी रसाकडे आकर्षण करिते,शिश्न,कामिनीकडे ओढून नेते,त्वचा चंदनादी पदार्थाकडे ओढिते,क्षुधेने तप्त झालेले उदर आहाराकडे नेते,श्रवणेद्रिय गीतादिकाकडे घेवून जाते,घ्रानेन्द्रिय सुगंधप्रत नेते,चंचलदृष्टी रुपाकडे वळविते, आणि कर्मेंद्रिय आपआपल्या विषयाकडे मला आकर्षण करितात.आपण--अज्ञानी असल्यामुळे ज्ञानेंद्रियें,व कर्मेंद्रियें व अंत:करण हे सर्व इंद्रियें आपापल्या विषयांकडे जातात.म्हणून आपण सत्संग करून ते मन व इंद्रियें आपल्या--जीवाच्या ताब्यात घ्यावे.||४०|| भावार्थ:---आता मला,एकलाच हि दु:खद दशा प्राप्त झाली आहे असे नाही तर पुष्कळ लोक असेच क्लेश भोगीत आहेत;तस्मात,सर्वांचेच तू रक्षण कर अशी प्रार्थना करितो---हे नित्यमुक्ता,संसाररूप वैतरणी नदीमध्ये आपल्या कर्माने पडून परस्परापासून प्राप्त होणारे मरण,जन्म व भोजन ह्यापासून भयभीत झालेल्या आणि स्वजनाच्या देहाचेठीकानीमैत्री व इतरांच्या देहाचेठीकानी वैर धारण करणाऱ्या ह्या मूढजनसमुदाय पाहून अरेरे ह्याला दु:ख होत आहे! अशी दया करून,ह्याला वैतरणी नदीतून तत्काळ बाहेर काढून रक्षण कर.||४१|| भावार्थ:---आता मी एकट्याने सर्वांचा उद्धार कसा करावा असे म्हणशील तर---हे जगद्गुरो,भगवन,ह्या विश्वाची उत्पत्ती,स्थिती व लय ह्यांचे कारण,अशा तुला सर्वजणांचा उद्धार करणे ह्यामध्ये पर्याय काय बरे आहे?काहींच नाही.कारण,जगताची उत्पत्ती वगैरे करणे ह्यापेक्षा हे कठीण आहे काय?मुळीच नाही आणि मूढजनाचे ठिकाणी तुज महात्म्याचा अनुग्रह योग्य आहे.आता,तुला व त्वसंबंधी लोकांना मी तारीन.परंतु सर्वजनांचा उद्धार करण्याचा तू दुराग्रह धरू नकोस,असे म्हणशील तर---हे दीनबंधो,तुझ्या भक्तजणांची सेवा करणाऱ्या आम्हांस त्या तुझ्या संसारापासून उद्धार करण्याचा काय उपयोग आहे? काहींच नाही.कारण,भगवद्भक्त सेवेच्या प्रभावाने आम्ही स्वत:च संसारातून तरुण जाऊ.||४२|| भावार्थ:---परंतु वत्सा प्रल्हादा,तुलामात्र मी तारतो व तेवढ्यानेच तू कृतार्थ हो.अरे हा लोकांना तारण्याचा आग्रह धरून काय उपयोग आहे असे म्हणशील तर हे सर्वोत्तमा,मला तर,दुस्तर अशा ह्या संसाररूप वैतरनीची मुळीच भीती वाटत नाही.कारण,तुझ्या चरित्रांच्या गायनरूप महामृतामध्ये माझे अंत:करण अगदी मग्न होऊन गेले आहे,परंतु त्या महामृतापासून ज्यांचे चित्त पराङमुख झाले आहे व इंद्रियनिमित्त मायिक विषयसुखाकरिता कुटुंबपोषणाचावैगरे भार वाहणाऱ्या अत्यंत मूढ जणांचे मला फार वाईट वाटत आहे.आपण--जीव जर ज्ञानी--वक्ता असेल तर अज्ञानी जीवाबद्दल आत्मीयता येऊन त्यांना संमार्गास लावण्यासाठी आपण--जीवानी प्रयत्न करावा,करण आपणास--जीवास सन्मार्गास लावण्याकरिता साधू--संत--महात्मा यांनी प्रयत्न करावयास पाहिजे.||४३|| भावार्थः---आता तू तर आदि मुक्त घे,त्या लोकांना तत्वज्ञानी मुनी उपदेश करतील असे म्हणशील तर---हे देवा प्रायश: स्वत:लाच मुक्ती प्राप्त होण्याविषयी इच्छा करणारे मुनी,एकांतस्थळी मौन धारण,करून ध्यानादिक करीत असतात,ह्यामुळे परोपकाराविषयी ते तत्पर नाहीत आणि ह्या दीनजनांना सोडून आपण मुक्त व्हावे अशी मी इच्छा करीत नाही.तर मग त्यांच्या उद्धारांकरिता दुसऱ्या कोणाची प्रार्थना कर;मलाच कां आग्रह करितोस असें म्हणशील तर---हे परमेश्वरा,अनेक योनीमध्ये भ्रमण पावत असणाऱ्या ह्या मूढजनांचा उद्धार करणारा तुजवाचून दुसरा मला कोणीही दिसत नाही.आपणास--जीवांस भगवंत किंवा संत--महात्मा यांच्याशिवाय उद्धार करणारा कोणीच नाही,कारण या व्यतिरिक्त अन्य सर्व अज्ञानी आहेत,ते त्यांचा--अज्ञानी-जणांचा उद्धार करू शकत नाहीत. ||४४|| भावार्थ:---आतां स्त्रीसंभोगादिकांने हे सुखीच आहेत हे काही दीन नाहीत असे म्हणशील तर---हे परमात्म्या,मैथुनादिकांच्या योगाने विषयांचे गृहस्थांना होणारे जे सुख ते अतितुच्छ--दु:खदायक असून खाजविलेल्या खरजीपासून प्रथम किंचित सुख होते होते परंतु मागाहून हे अधिकच दुःख देणारे होते,तसे हे गृहस्थाश्रमसंबंधी विषयांचे सुखही उत्तरोत्तर अधिकच दुःखकारक आहे.तरमग त्यापासून लोक विरक्त होऊन मुक्त कां होत नाहीत असे म्हणशील तर---काम दुःसह असल्यामुळे कामुक जन नानाप्रकारची दुःखे भोगीत असूनही गृह्संबंधी सुख आतां पुरे असे कधीही मानीत नाहीत,करण ते अज्ञानी आहेत. तुझ्या प्रसादाने एखादामात्र धीर पुरुष कंडूप्रमाणे कामाचेही सहन करितो.आपण--जीवानी निष्काम कर्मे करून व निष्काम उपासना करून,भगवंताची कृपा संपादन केली असता,आपणावर--जीवावर भगवंताची कृपा झाल्यामुळे संत--महात्मा यांचा सत्संग प्राप्त होतो व त्यामुळे संसार--विषय हेच दु:खाचे हेतू आहे,असे कळल्यानंतर त्या विषयांचा त्याग होऊन परमात्म्याचे ज्ञान होते.असे झाल्यानंतर परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर सर्व दु:खांची निवृत्ती व परमनंदाची प्राप्त होते.||४५|| भावार्थः---आतां तुझे ज्ञान तर भक्तीवाचून सकाम अशा मौनादिसाधनांनी होतच नाही असे सांगतो,म्हणून आपण--जीवानी निष्काम कर्म करावे,तर सकाम कर्म करू नये.हे प्रभो,प्राकृतरूपाने रहित अशाही तुझी,बिजांकुराप्रमाणे प्रवाहाने प्राप्त झालेली हि कार्यकारणात्मक दोन रूपे,वेदाने प्रकाशित केली आहेत,यांखेरीज तुझे ज्ञापक चिन्ह 'जसे देवदत्तादिकांचे गोरेपणावगैरे असते तसे' कांहीच नाही,म्हणून जसे अग्निहोत्री काष्ठाचेठिकाणी असलेल्या अग्नीला मंथनाने प्राप्त करून घेतात त्याप्रमाणे इंद्रियनिग्रह करणारे योगी,कार्यकारणांचेठिकाणी व्यापकत्वेकरून असणाऱ्या तुला भक्तियोगाने प्रत्यक्ष अवलोकन करितात,तसे दुसऱ्या उपायांनी तुझे तत्वज्ञान होत नाही.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून ज्ञानाद्वारे परमात्म्याचा अनुभव घेऊन सुखरूप व्हावे.||४७|| भावार्थः---आतां हेंच फिरून स्पष्ट करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की,हे सर्वव्यापी परमेश्वरा,वायू,अग्नि,पृथ्वी,आकाश, जल,शब्दादीविषय--शब्द,स्पर्श,रूप,रस,व गंध,प्राण,इंद्रिये,मन,चित्त,अहंकार व स्थूलसूक्ष्मात्मक हे सर्व जग तूंच आहेस.किंबहुना मन व वाणी ह्यांनी प्रकाशित केलेली कोणतीही वस्तू तुझ्याहून भिन्न नाही,करण अध्यस्त वस्तू अधिष्ठानरूप असते.म्हणजे जग हे परमात्माच आहे.||४८|| भावार्थः---असे असून तुझी भक्ति न करणारे पुरुष स्वस्वरूपी स्थित असलेल्या तुला अवलोकन करीत नाहीत असे सांगतो---हे उरुगाय भगवन्,जे सत्त्वादिगुण,गुणाभिमानी देव,देव व मनुष्ये यांसहवर्तमान महदादितत्त्वे,मन बुद्धि इत्यादिकांचे अभिमानी देव हे सर्व,आदि व अंत ह्यांनी युक्त असल्यामुळे तुला जाणत नाहीत.आपणास--जीवास देहाच्या व देहसंबंधीचा म्हणजेच संसाराचा अभिमान असल्यामुळे आपल्या स्वस्वरुपला जाणत नाही,म्हणून सत्संग करावा.ह्यास्तव विद्वान लोक,असा विचार करून अध्ययनादि व्यापारांपासून उपरम पावतात म्हणजे समाधीच्या योगाने तुझीच उपासना करतात.||४९|| भावार्थः----यास्तव हे अतिपुज्या परमात्म्या,प्रणिपात,स्तुति,सर्वकर्मसमर्पण,उपासना,चरणांचे स्मरण व कथेचे श्रवण अशा चांगल्या षडंगसेवेवाचून पुरुषाला,परमहंसांना प्राप्त होण्यास योग्य अशा तुझ्याठिकाणी भक्ति कशी प्राप्त होईल?होणारच नाही.म्हणून आपण--जीवानी सत्संग करावा,तस्मात्,ज्याअर्थी भक्तीवांचून मोक्ष नाही व उत्तमसेवेवाचून भक्ति नाही त्याअर्थी पूर्वी प्रार्थना केलेला तुझा दास्ययोगच तूं मला दे.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करावी.निष्काम भक्ती केली असता संत--महात्मा यांचा सत्संग घडतो.||५०|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,याप्रमाणे भक्तप्रल्हादाने भक्तिपूर्वक निर्गुणपरमात्म्याच्या गुणांचे वर्णन केले असतां,तो परमात्मा प्रसन्न झाला म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करावी.आणि कोप आवरून धरून त्या नम्र असलेल्या प्रल्हादाला म्हणाला की,-------------||५१|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाला---हे असुरश्रेष्ठाप्रल्हादा,तुझे कल्याण असो;मी तुजवर प्रसन्न झालो आहे.तस्मात् हे कल्याणा,तूं इष्ट वर माग.कारण,मी पुरुषांच्या मनकामना पूर्ण करणारा आहे.||५२|| भावार्थः---हे आयुष्मन,मला प्रसन्न न करणाऱ्या पुरुषास माझे दर्शन होणे खरोखर दुर्लभ आहे,म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करून भगवंत प्रसन्न करून भगवंताची कृपा संपादन करावी.परंतु माझे ज्याला दर्शन तो प्राणी 'आपली कामना परिपूर्ण झाली नाही असा' शोक करण्यास योग्य होत नाही.आपण--जीवानी भगवंताची निष्काम भक्ती न केली तर भगवंत प्रसन्न होत नाहीत,त्यामुळे आपल्यावर--जीवावर भगवंताची कृपा होत नाही,त्यामुळे संत--महात्मा यांचा सत्संग होत नाही.||५३|| भावार्थः---ह्याकरीतां सदाचारसंपन्न,महाभाग्यवान आणि आपले कल्याण व्हावे अशी इच्छा करणारे विवेकी पुरुष,परमभक्तीच्या योगाने सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या मज परमेश्वराला संतुष्ट करितात म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करून सर्व मनोरथ पूर्ण करावे म्हणजे सर्व जीवांची मनातील जी इच्छा "सर्व दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती" म्हणजेच लौकिक भाषेत "सर्व दु:ख कायमचे जावो व सर्व सुख कायमचे मिळो." यालाच परमपुरुषार्थ--मोक्ष असे म्हणतात.||५४|| भावार्थः---हे धर्मराजा,याप्रमाणे प्राण्यांना लोभ उत्पन्न करणाऱ्या वरांच्या योगाने,भगवंताने लोभ दाखविलेल्याही त्या असुरश्रेष्ठ प्रल्हादाने,भगवंताचेठिकाणी एकांतभक्त असल्यामुळे,वरांची इच्छाच केली नाही.भक्त प्रल्हादासारखे आपणही जो वर नाशिवंत आहे,त्याची इच्छाच करू नये,तर आपण जीवानी जे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान असे अनिवाशी आहे,ते ज्ञान सत्संग करून प्राप्त करून घ्यावे.||५५|| ९-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांमध्ये(७)सप्तमस्कंधात भगवत्स्तवनामक हा(९)नववा अध्याय(५५) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||९|| | ||श्रीकृष्णाअर्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणाअर्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ |१०-----आता ह्या दहाव्या अध्यायामध्ये,प्रल्हादभक्तावर अनुग्रह करून श्रीहरी गुप्त झाले व प्रसंगोपात्त त्या श्रीहरीनेच रुद्रावर अनुग्रह केला,अशी कथा वर्णन केली आहे.||१०|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---हे धर्मराज,ते वर माग वगैरे भगवंताचे सर्व बोलणे भक्तीयोगाला विघ्नकारक आहे असे मानणारा तो प्रल्हाद बालक,आश्चर्य करीत करीत हृषीकेश भगवंताला असे म्हणाला की,-------||१|| भावार्थ:---प्रल्हाद म्हणाला---हे परमेश्वरा,स्वभावत:च विषयांचेठिकाणी आसक्त असलेल्या मला त्याच वरांनी लुब्ध करू नकोस.कारण,त्यांच्या संगाची भीती बाळगून त्यापासून विरक्त झालेला मी,मोक्षप्राप्ती होण्याच्या इच्छेने तुला शरण आलो आहे.आपण--जीवानी सत्संग करून चौथा जो पुरुषार्थ मोक्ष आहे,तोच प्राप्त करून आपले--जीवाचे महाकल्याण करून घ्यावे.||२|| भावार्थ:---आता मी का भक्ताला लुब्ध करीन,असे म्हणशील तर तसे नाही परंतु वर माग असे म्हणणाऱ्या तुझा अभिप्राय वेगळाच आहे.तो असा की,हे प्रभो हृदयाला गाठीसारखे बंधास कारण,व संसाराला बीजभूत अशा विषयांचेठिकाणी मज भक्ताला जी तू प्रेरणा केलीस ती केवळ भृत्य--सकाम सेवक लक्षण,सकाम भक्तीच्या जाणण्याच्या इच्छेने केली आहेस,तर वास्तविक नाही.||३|| भावार्थ:---नाही तर हे जगद्गुरो,कृपाळू अशा तुला अनर्थ साधनामध्ये स्वभक्ताची प्रवृत्ती करणे हे घडत नाही.आता,असे केल्याने भृत्यलक्षण कसे समजेल असे म्हणशील तर---हे ईश्वरा,तुझ्यापासून जो सेवक विषय प्राप्त होण्याची इच्छा करितो तो सेवक नव्हे.तर तो केवळ वाणी--व्यापारी--देवाण-घेवाण करणारा होय.जो देवाण--घेवाण करतो,तो संसारी--विषयी असतो,तर पारमार्थिक नसतो.||४|| भावार्थ:---आता कामनेनेही स्वामी सेवकामध्ये स्वामी सेवकपणा असतो असे म्हणशील तर खरे,परंतु तो उपाधीमुळे झालेला असतो वास्तविक नसतो असे सांगतो-जो सेवक स्वामीपासून आपले मनोरथ पूर्ण करण्याची इच्छा करितो ती सेवक नव्हे व जो सेवकापासून स्वकार्य होण्याच्या इच्छेने त्याला द्रव्य वगैरे देतो तो स्वामीही नव्हे,तर ते व्यापारी समजले पाहिजेत.म्हणून आपण--जीवानी परमार्थ करीत असतांना द्रव्याचा--लोभाचा विवेक--विचार न करता चौथा जो पुरुषार्थ--मोक्ष हा विचार करून आपले--जीवाचे महाकल्याण करून घ्यावे.||५|| भावार्थ:---तुझ्या माझ्यामध्ये असलेला मात्र स्वामी-सेवकभाव वास्तविक आहे.कारण मी,तुझा निष्काम भक्त आहे व तुही माझा निरपेक्ष स्वामी आहेस.ह्यामुळे जसा राजा आणि सेवक ह्यांच्यामध्ये स्वामी--भृत्यभाव असतो तसा आमच्यामध्ये नाही.म्हणून आपण भक्त प्रल्हादाचे अनुकरण करावे,तर सकाम भक्ताचे अनुकरण करू नये.||६|| भावार्थ:---तथापि तू,मज परम उदार परमेश्वराच्या संतोषाकरिता काहीतरी वर माग असे म्हणत असशील तर---हे वरदश्रेष्ठा परमेश्वर,तू,जर मला इष्ट वर देत असलास तर,माझ्या हृदयामध्ये कामवासनांचा अंकुर उत्पन्न होवू नये हा मी तुजपासून वर मागतो.भक्त प्रल्हादाने भगवंतास माझ्या(भक्त प्रल्हादाच्या) हृदयामध्ये कामवासंनाचा--विषयांचा अंकुर उत्पन्न होऊ नये म्हणजेच संसार नको तर परमार्थ मागितला आहे.जी मागणी परमार्थाकडे नेते,ती मागणी निष्काम भक्तीच असते.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्तीच करावी,करण ती परमात्म्याकडे--सुखरुपतेकडे नेते.तर सकाम भक्ती करू नये,कारण सकाम भक्ती संसाराकडे--विषयांकडे--दु:खाकडे नेते.असा विवेक करून निश्चय करावा.||७|| भावार्थ:---बरे कामाची उत्पत्ती झाली असता काय दोष आहे?असे म्हणशील तर---हे कमलनयन,कामाकुंराच्या उत्पात्तीमुळे इंद्रियें, मन,प्राण,देह,धर्म,धैर्य,सारासार विवेक,लज्जा,ऐश्वर्य,प्रताप,स्मृती आणि सत्य हि सर्व नाहीशी होतात.थोडक्यात विषयांच्या कामनेमुळेच सत्य असलेले सर्व गुण नाहीसे होतात.त्यामुळे आपला परमार्थ हा परमार्थ न होता संसारच--दु:खच अनुभवास येते.म्हणून सकाम भक्त न होता निष्काम भक्ताच व्हावे. ||८|| भावार्थ:---हे पुंडरीकाक्षा जेंव्हा पुरुष मनामध्ये असलेल्या सर्वकामनांचा त्याग करितो तेंव्हाच तुझ्यासारीखे--परमात्म्यासारखे ऐश्वर्य--सुखरूपता प्राप्त होण्यास तो योग्य होतो.म्हणून आपण--जीवांनी सत्संग करून सर्व कामनेंचा त्याग करून सुखरुप आहोत असे कळून घेण्याचा प्रयत्न करावा.||९|| भावार्थ:---ह्यानंतर निर्दोष वर देण्याची इच्छा करणाऱ्या भगवंताचे निराकरण करीत असता प्रल्हाद नमस्कार करितो की,---हे भगवंता हे महात्म्या पुराणपुरुषा,हे श्रीहरे व अद्भुत सिंहरूप धारण करणाऱ्या ब्रहमस्वरूप परमात्म्या,तुला नमस्कार असो.आपण जो भगवंत सत्तावन आहे,त्यासच नमस्कार करावा.||१०|| भावार्थ:---नंतर तू एकनिष्ठ भक्त आहेस हे खरे तथापि माझी आज्ञा स्वीकारावीस अशा अभिप्रायाने श्रीनृसिंह म्हणाला,तुझ्यासारखे जे मझे एकनिष्ठ भक्त आहेत ते कधीही इहलोकसंबंधी विषय मजपासून प्राप्त होण्याची इच्छा करीत नाहीत.तथापि हे मन्वंतर संपेपर्यंत तू दैत्याधीप्तींचा राजा होवून त्या भूलोकीच्या विषयभोगाचा उपभोग घे.आपण--जीवांनी जो भगवंत अविनाशी आहे,त्याच्याशी एकनिष्ट राहावे,कारण तो भगवंत जो भक्त इह--लोकींचे विषय व परलोकींच्या विषयांचा त्याग करितो,असे आपणांचीच इच्छा पूर्ण करितो व आपणांस सुखरूप करितो.||११|| भावार्थ:---बरे तसे केले असता बंध प्राप्त होईल असे म्हणशील तर---हे प्रल्हादा,माझ्या प्रियकथांचे श्रवण करीत असता तू,सर्वभूताचेठिकानी राहणाऱ्या एका मज यज्ञाधीष्ठात्या परमेश्वराचे मनामध्ये धारण करून माझे आराधन कर.आता ह्याच कर्माच्या योगाने बंध प्राप्त होईल असे म्हणशील तर---तर नाही.माझेठिकाणी समर्पणरूपाने तू कर्मचा त्याग करून माझे आराधन कर.||१२|| भावार्थ:---म्हणजे विहित कर्में करून सुखानुभावाने पुण्याचा,सदाचरणाने स्वधर्मांने--पातकाचा आणि कालयोगाने--प्रराब्धबलाने देहाचा त्याग करून व देवालोकांही गायन करण्यास योग्य अशी अत्यंत पवित्र इहलोकी प्रख्यात करून,कर्मबंधनापासून मुक्त होत असता तू--आपणांस--जीवांस मजप्रत प्राप्त होशील.||१३|| भावार्थ:---आणि फार तर काय परंतु,तुझे--निष्काम भक्तांचे व माझे--भगवंताचे व ह्या माझ्या चरित्राचे स्मरण करणारा जो पुरुष,तू वर्णन केलेल्या ह्या माझ्या स्तोताचे पठण करीत तोही कर्मबंधनापासून मुक्त होईल मग तुला--निष्काम भक्तांच्या कर्मबंधनाची शंका नाही हे काय सांगावे?||१४|| भावार्थः---ह्याप्रमाणे ईश्वराच्या कर्माधिकार प्राप्त झाला असतां,पित्याच्या दुष्कर्मनिवृत्तीकरितां प्रल्हाद प्रार्थना करितो की,---हे महेश्वरा,वर देणाऱ्या ब्रह्मादिकांना अधिपती अशा तुजपासून मी दुसरे असे एक मागणे मागतो की,---क्रोधाने अंतःकरण व्याप्त झाल्यामुळे ईश्वरी तेज न जाणणाऱ्या माझ्या पित्याने हा माझ्या भ्रात्याचा घात करणारा आहे अशा असत्य दृष्टीने साक्षात तुज त्रैलोक्याधिपती सर्वलोकगुरूची जी निंदा केली व तुझ्या भक्ताशी जो द्रोह केला त्या दुरंत व दुस्तर पातकापासून तो माझा पिता शुद्ध होवो.आपण--जीवानी आपल्या जन्मादात्या व पालन--पोषण केल्यामुळे पित्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेऊन त्यास पातकापासून निवृत्त करावयास पाहिजे म्हणून,हे दिनवत्सला,तूं कटाक्षाने अवलोकन केलेस तेव्हांच तो पवित्र झाला आहे तथापि दीनपणामुळे मी हि तुझी पुनरपि प्रार्थना करीत आहे.--||१५-१६-१७|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाला---हे निष्पापा,तुझा पिता आपल्या एकवीस पूर्वजांसहवर्तमान पवित्र झाला आहे.कारण,हे साधो,ह्याच्या घरी कुल पवित्र करणारा असा तूं उत्पन्न झाला आहेस.आपण--जीवानी निष्काम भक्त होण्याचा सत्संग करून आवश्य प्रयत्न करून आपल्या पूर्व-कुळातील एकवीस पिढ्यां पवित्र होतात व आपण तीन दोषांनी पवित्र पवित्र होऊन आपले जन्म-मरण निवृत्त होतोत.||१८|| भावार्थः---हे प्रल्हादा,जेथे जेथे अत्यंत शांत,समदर्शी,परोपकारी आणि सदाचारसंपन्न असे माझे भक्त राहतात ते किकट देशांसारखे अत्यंत अपवित्र असलेलेही वंश पवित्र होतात.म्हणून आपण--जीवांनी शांत--कामनारहित होऊन,समदर्शी म्हणजे सर्वांना ज्यांच्या--त्यांच्या अधिकारानुसार समान मानणारा,आणि सदाचारसंपन्न म्हणजे आपल्या स्वधर्मांनुसार विहित कर्में करून,निषिद्ध कर्मांचा त्याग करून आचरण करणारे असे भक्त कोठेही राहोत,त्यांचे अपवित्र असलेले वंश पवित्र होतात.||१९|| भावार्थः---आतां तुझ्या भक्तांचा हा महीमाच आहे तेव्हां ह्यांत कांही आश्चर्य नाही.परंतु,मी कांही तसा नाही असे म्हणशील तर---हे दैत्यश्रेष्ठा,माझ्या भक्तिने निरिच्छ झालेले जे लोक आहेत ते कामक्रोधादिकांमुळे जरी कदाचित् परतंत्र झाले तथापि ते लहानथोर प्राण्यांच्या समुदायांमध्ये कोणाचीही हिंसा करीत नाहीत.आपण--जीव निष्काम भक्ती करणारे भगवंताचे भक्त काम--क्रोधात असतांनासुद्धा इतर प्राणीमात्रांना दु:ख देत नाहीत--त्यांची हिंसा करीत नाहीत,कारण सर्वांत भगवंत अंतर्यामीरूपाने आहेतच अशी त्या निष्काम भक्तांची भावना दृढ असते. ||२०|| भावार्थः---फारतर काय परंतु,या लोकी जे पुरुष तुला अनुसरून वागतील ते सुद्धा माझे भक्त होतील,म्हणून आपण भक्तांनी श्रेष्ठांचे अनुकरण केले असता कनिष्ठ भक्त आपले आचरण करितात.तूं पुरुष तुला अनुसरून वागतील ते सुद्धा माझे भक्त होतील,तूं तर खरोखर माझ्या सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेस.आपण भक्तांनी श्रेष्ठ म्हणजे निष्काम भक्त होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||२१|| भावार्थः---हे प्रल्हादा,माझ्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळे सर्वप्रकारे पवित्र झालेल्या आपल्या पित्याची केवळ शास्त्रमर्यादारक्षणार्थ तूं देहादिक प्रेतकार्ये कर.म्हणजे तुज सत्पुत्राच्या योगाने तो उतमलोकांस जाईल.सत्पात्राकडून--निष्काम भक्ताकडून--पुत्राकडून पित्याबद्दल किंवा देहसंबंधीबदल किंवा भक्तांबदल एखादे कार्य होत असेल तर ज्या जीवाचे किंवा ज्या जीवासाठी किंवा ज्या भक्तांसाठी कार्य होईल तो जीव किंवा तो भक्त उत्तम-लोकांस जात असतो.||२२|| भावार्थः---आणि बा प्रल्हादा,ब्रह्मवेत्त्यांच्या वचनाला अनुसरून तूं पित्याच्या स्थानावर आरूढ हो आणि माझ्याठिकाणी मन लावून व मजविषयी तत्पर होऊन सर्व आचरण कर.संत--महात्मा यांच्या अज्ञानुसार संसारिक-व्यवहारिक कार्यसुद्धा करावे.संसारिक-व्यवहारिक कार्य करणेसुद्धा पारमार्थिक कार्यच असते.||२३|| भावार्थः---श्रीनारद म्हणाला---हे धर्मराजा,याप्रमाणे भगवंताने सांगितले असतां प्रल्हादानेही जे और्ध्वदेहिक कृत्य ते सर्व केले;नंतर द्विजश्रेष्ठांनी त्याला राज्याभिषेक केल्यावर तो प्रल्हाद भगवत्पर--भगवंताची अज्ञा म्हणून सर्व--कर्मे राज्य-कारभार करूं लागला.आपणास--जीवास संत--महात्म्याच्या अज्ञानुसार कांही संसारिक--व्यवहारिक कार्य करण्याचा प्रसंग आला तर आपणही संत--महात्मा--सदगृरू यांच्या अज्ञानुसार संसारिक--व्यवहारिक कार्य करावे,कारण ते कार्य पारमार्थिक असते,त्यास संसारिक--व्यवहारिक कार्य म्हणू नये.||२४|| भावार्थः---इकडे देवादिकांनी परिवेष्टित असलेल्या ब्रह्मदेवाने,प्रसन्नतेमुळे सौम्यवदन अशा नृसिंहरुपी पाहून व पवित्र वाणींनी त्याची स्तुती करून असे भाषण केले की,---||२५|| भावार्थः---ब्रह्मदेव म्हणाला---हे देवाधिदेवा,हे सर्वांतर्यामी परमात्म्या,तूं जगत्स्त्रष्ट्याचांही पूर्वज आहेस.हा लोकांना त्रास देणारा पापी असून,तूं मारिलास हि फार चांगली गोष्ट झाली,कारण ज्यांना भगवंताकडून किंवा भगवंतासमोर मृत्यू येतो,त्यांना त्यांच्यामुळे सद्-गती किंवा ज्ञानी महात्मा असेल तर मोक्ष मिळेल.||२६|| भावार्थः---जो हा दैत्य,माझ्यापासून वर प्राप्त झाल्यामुळे मी उत्पन्न केलेल्या देवमनुष्यादिकापासून मृत्यू पावण्यास अशक्य झाला होता व तपोयोगसंबंधी बलाने गर्विष्ठ होऊन ह्याने वेदप्रणीत सर्व धर्म नाहीसे करून टाकिले होते त्याला तूं मारीलेस हि फार चांगली गोष्ट झाली.कारण अन्याय करणारास जिवंत ठेवले तर त्याच्याकडून अधिक पाप होईल,त्यामुळे त्यास आधीक दु:ख भोगावे लागेल.अधिक पाप ज्याच्याकडून होत आहे,ते पाप त्यास मारल्यानंतर होणार नाही,म्हणून त्यास मारणे,हेच चांगले--हिताचे असते.||२७|| भावार्थः---त्याप्रमाणे बालक असूनही सदाचारसंपन्न व महाभगवद्भक्त असा ह्याचा पुत्र प्रल्हाद तूं मृत्यूपासून सोडविलास हे चांगले झाले व सांप्रतकाली तो तुला शरण आला हेंही फार चांगले झाले.||२८|| भावार्थः---हे भगवन्,तुझे हे स्वरूप,मनोनिग्रह करून तुझे ध्यान करणाऱ्या पुरुषाला,सर्व त्रासांपासून किंबहुना वध करण्याची इच्छा करणाऱ्या मृत्यूपासूनही रक्षण करणारे आहे.||२९|| भावार्थः---श्रीनृसिंह म्हणाला---हे ब्रह्मदेवा,आजपासून अशाप्रकारचा वर,क्रूरस्वभावाचा असुरांना तूं कधीही देऊं नकोस.कारण,सर्पांना दुध पाजिले असतां ते जसे सज्जनांचा उपद्रव करणारे होते तसे स्वभावतःच भयंकर अशा असुरांना दिलेला वरही दिलेला लोकांना उपद्रव करणारा होतो.म्हणून आपण जीवांनीसुद्धा क्रूर स्वभावांच्या जीवांना दया दाखवणे योग्य नसते म्हणजेच असत्पात्रांना दान करणे पापकारक असते,तर सत्पात्रांना दान--दया करणे पुण्यकारक असते.जसे सापास दुग्ध-पान करू नये,कारण ते हानिकारक असते.तर इतरांना दुग्धपान करावे,कारण ते सुखकारक असते. ||३०|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाला सांगून त्याने पूजन केल्यावर,भगवान श्रीहरी तेथेच अंतर्धान पावला.म्हणजे सर्वभूतांना अदृश्य झाला.आपण--जीवानी कार्य झाल्यानंतर कार्याच्या ठिकाणी न थांबता अन्य ठिकाणी जावे.अन्य ठिकाणी जाऊन इतर कार्य करावे,म्हणजे वेळेचा सदोपयोग होतो,तर वेळ निरर्थक होत नाही.जीवनात वेळे-इतके महत्व अन्य वस्तूस नाही.||३१|| भावार्थः---नंतर प्रल्हादाने,भगवंताने अंशभूत अशा ब्रह्मदेव,महादेव,कश्यपादि प्रजापति व इंद्रादि देव ह्यांचे उत्तम प्रकाराने पूजन करून,त्यांना मस्तकाने वंदन केले.आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषाचे आदर-सत्कार--पूजन--मान--प्रतिष्ठा द्दावी.||३२|| भावार्थः---तदनंतर,भृगुतीप्रभृती मुनीसहवर्तमान ब्रह्मदेवाने,प्रल्हादाला,दैत्य व दानव ह्यांचे अधिपत्य दिले.||३३|| भावार्थः---नंतर हे राजा,प्रल्हादाने पूजित असे जे ब्रह्मादिक देव त्याची प्रशंसा करून व त्याला उत्तमप्रकाराने आशिर्वाद देऊन आपापल्या स्थानाप्रत निघून गेले.||३४|| भावार्थः---असो.हे धर्मराजा,ह्याप्रमाणे पूर्वी जयविजयसंज्ञक असलेले जे विष्णूपार्षद ते विप्र-शापामुळे दितीचे पुत्र झाले असतां,ह्रदयामध्ये असलेल्या श्रीहरीने वैरभावाने त्यांचा वध केला.||३५|| भावार्थः---नंतर पुनरपि त्याच विप्रशापामुळे ते रावण व कुंभकर्ण या नावांचे दोन राक्षस झाले असतां,तेथे रामाच्या पराक्रमांनी त्यांचा वध केला.||३६|| भावार्थः---तो असा की,---रामाच्या बाणांनी ह्रदय विदीर्ण होऊन युद्धभूमीवर शयन करणाऱ्या त्यांनी, पूर्वजन्माप्रमाणेच आपले चित्त रामाकडे लाऊन देहाचा त्याग केला.||३७|| भावार्थः---नंतर तेच फिरून ह्या भूलोकी शिशुपाला व दंतवक्र ह्या रूपांनी उत्पन्न झाले आणि वैरानुबंधाने हे धर्मराजा,तूं पहात असतांच श्रीहरीचेठिकाणी सायुज्यमुक्ति पावले.||३८|| भावार्थः---हे राजा,कुंभारीण-नामक माशीने वारंवारन दंश केलेला कीटक जसा निरंतर तिच्या ध्यानाने तिचे स्वरूप पावतो त्याप्रमाणे कृष्णद्रोही राजांनी कृष्णनिंदानिंदादिकांच्या योगाने जे पूर्वी पातक केले होते त्याचा श्रीकृष्णाच्या ध्यानाने त्याग करून,शेवटी ते तत्स्वरूप पावले.आपणही--जीवांनी भगवंताचे ध्यान करून तत्स्वरूप व्हावे.||३९|| भावार्थः---असो,जे एकनिष्ठ भक्त,आहेत ते भेददृष्टीरहित अशा सर्वोत्कृष्ट भगवद्भक्तिने श्रीहरीने चिंतन करून जसजसे पूर्वी त्यांच्या सारुप्यप्रत पावले,त्याप्रमाणे शिशुपालप्रभृति राजेही वैरानुबंधाने श्रीहरीने चिंतन करून त्याच्या सारुप्यप्रत पावले आहेत.आपणही--जीवांनी आपल्या अधिकाराप्रमाणे साधना करून ते--ते साध्य प्राप्त करावे.||४०|| भावार्थः---हे राजा,दमघोषाचा पुत्रवगैरे श्रीकृष्णाचा द्वेष करीत असूनही त्याच्या सायुज्याप्रत कसे पावले असे जे तूं मला विचारिले होतेस ते हे सर्व तुला मी कथन केले आहे.||४१|| भावार्थः---ह्याप्रमाणे हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू ह्या आदिदैत्यांचा वध जिच्यामध्ये आहे अशी हि ब्राह्मणाविषयी भक्तिमान अशा परमपूज्य महात्म्या श्रीकृष्णाच्या श्रीनृसिंहवताराची पुण्यकारक कथा,मी तुला कथन केली आहे.||४२|| भावार्थः---त्याप्रमाणे ह्या आख्यानामध्ये महाभगवद्भक्त प्रल्हादाचे चरित्र म्हणजे त्याची भक्ति,त्याला झालेले भगवंताचे तत्त्वज्ञान व वैराग्य हि सर्व कथन केली आहेत.म्हणून आपण--जीवांनी महाभागवद्भाक्तांचे चरित्रे श्रवण करावी,कारण त्यामुळे आपणास प्रतिकूल परीस्थित परमार्थ कसा करावा,त्याचे मार्गदर्शन मिळून आपले--जीवाचे हित होते.तसेच उत्पत्ती,स्थान व लय ह्यांचा अधिपती जो श्रीहरी त्याचे खरे स्वरूप,कळते.त्याच्या गुणकर्माचे प्रल्हादाने केलेले वर्णन तसाच देवदैत्यादि--- कांच्या स्थानांचा कालेकरून झालेला मोठा फेरफार,व ज्याच्या योगाने भगवंताची प्राप्ती होते असा भगवद्भक्तांचा धर्म आणि आत्मानात्मविवेक करण्याचे साधन हे सर्वही प्रकार या आख्यानामध्ये पूर्णरीतीने वर्णन केले आहेत.आपणास--जीवास भगवंताचे वास्तविक स्वरूप कळते,भगवद्भक्तांचा स्वधर्म कळतो,आत्मानामात्मा याचा विवेक कळून असरांचा त्याग कसा करावा व साराचे ग्रहण कसे करावे,तेही कळते.म्हणून आपण भगवद्भक्ताचे चरित्र श्रवण करावे व त्यानुसार साधना करावी.||४३-४४-४५|| भावार्थः---ह्याच्या श्रवणादिकांचे फळ सांगतो---विष्णूच्या पराक्रमवर्णनाने विस्तार पावलेले हे पुण्यकारक आख्यान जो पुरुष,श्रद्धेने श्रवण करील व कथन करील तो पुण्यपापरूप कर्मपाशापासून मुक्त होईल. आपण--जीवांनी भगवन विष्णूचे चरित्र श्रवण करावे,कारण त्यामुळे आपण--जीव कर्मबंधानापासून मुक्त होतो.||४६|| भावार्थः---ह्या आदिपुरुष विष्णूच्या नृसिंहरूपाने केलेल्या हिरण्यकशिपूवधरूप व सेनाधिपतीवधकरून लीलांचे व भगवद्भक्तामध्ये श्रेष्ठ अशा दैत्यपुत्र प्रल्हादाच्या पुण्यकारक प्रभावांचे जे पुरुष,शुचिर्भूत होऊन श्रवण करून पठन करील,तो निर्भय अशा वैकुंठलोकाप्रत पावेल.म्हणून आपण--जीवांनी शुचिर्भूत होऊन म्हणजे स्नानादि नित्य कर्मे करून श्रवण व पठाण करावे,कारण त्यामुळे आपण वैकुंठास प्राप्त होउत.||४७|| भावार्थः---असे नारदाने आख्यान श्रवण करून,कायहो प्रल्हादाचे भाग्य हे ! ज्याने देवांना प्रत्यक्ष अवलोकन केले आम्ही तर भाग्यहीन आहो असा खेद मानणाऱ्या धर्मराजास नारद म्हणतो की,---हे राजा,ह्या मनुष्यालोकामध्ये तुम्ही खरोखर महाभाग्यशाली आहां.कारण,ज्या तुमच्या घरी मनुष्यरूप धारण करून गुप्त असलेले साक्षात श्रीकृष्णनामक परब्रम्ह वास करीत असल्यामुळे,त्या तुमच्या घरी दर्शनमात्रेकरून सर्वलोकांस पवित्र करणारे महासमर्थ ऋषि,चोहोकंडून येतात.||४८|| भावार्थः---आतां,कृष्ण हा आमच्या मामाचा पुत्र असून त्याला तूं परब्रह्म कसे म्हणतोस असे म्हणशील तर---हे धर्मराजा,महाविवेकी लोकांना इच्छा करण्यास योग्य असा जो उपाधिरहित परमानंद,तदनुभवरूप जे ब्रह्म तोच हा खरोखर तुमचा प्रिय,सुहृद,मातुल-पुत्र,आत्मा,आज्ञाधारक, गुरु आणि तुम्हांला पूज्य असा श्रीकृष्ण होय.आपल्या--जीवाच्या घरी जर निष्काम भगवद्भक्त असेल तर आपले--जीवाचे भाग्य--पूर्व-पुण्याई उदयास आली असे समजावे.आपण त्या पूर्व-पुण्याईची सदोपयोग करून घ्यावा म्हणजे त्यांच्या मुखातून सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान संपादन करावे. ||४९|| भावार्थः---बरे,हा जर परब्रह्म असेल तर षोडशसहस्त्र स्त्रियांचेठिकाणी रममाण होणे व धर्मादिकांचे आचरण करणे हे ह्याला काशाला पाहीजे ?असे म्हणशील तर---हे राजा, शंकर ब्रह्मादिकांनीही आपल्या बुद्धीच्या योगानेसुद्धा ज्याचे वास्तविक तत्व हे असे आहे अशारीतीने साक्षात वर्णन केले नाही,तो हा भक्तपालक भगवान्,मौन भक्ति आणि इंद्रियदमन यांच्या योगाने आम्ही पूजन केला आहे,तो आम्हांवर प्रसन्न होवो.सारांश,प्रल्हादाच्या घरी परब्रह्म वास करीत नाहीत,त्याच्या दर्शनाकरितां त्याच्या घरी ऋषि येत नाहीत,तसेच जे परब्रह्म मातुलपुत्रादिरूपाने त्याच्याशी संबद्ध होऊन राहिलेले नाही,व ते स्वतःच प्रसन्नही होत नाही.म्हणून तुम्हीच त्याच्यापेक्षा--भक्त प्रल्हादापेक्षा व आमच्यापेक्षाही महाभाग्यशाली आहां.म्हणून आपण--जीवांनी आपल्या घरी साधू--संतांना--महात्मा यांना बोलावून,त्यांचा आदर--सत्कार व पूजा करून,त्यांना भोजन देऊन,त्यांची सेवा करून,त्यांना धन देऊन,त्यांच्या मुखातून वेदांत--शास्त्राचे श्रवण करावे.||५०|| भावार्थः---आतां इतरांना दुष्कर असे त्रिपुरभेदादिक कर्म श्रीरुद्राने केले तेव्हां तो अशाप्रकारचा ईश्वर असूनही तो भगवंताचे तत्व जाणत नाही हे कसे?अशी शंका झाली असतां त्या रुद्राचाही पूरभेदादि प्रभाव ह्याच्या साहाय्यानेच आहे केवळ स्वतःचा नाही असे हे सांगण्याच्या अभिप्रायाने नारदऋषि आख्यानाचा उपक्रम करितो की,---हे राजा,पूर्वी अनंतमायावी अशा मयासुराने नाहीसे केलेले श्रीरुद्रदेवाचे यश,त्या ह्या भगवंतानेच विस्तृत केले आहे.||५१|| भावार्थः---युधिष्ठीर म्हणाला---हे देवर्षे,कोणत्या कर्मामध्ये जगदीश्वर महादेवाची कीर्ती मयासुराने नष्ट केली होती व ती ह्या श्रीकृष्णाने पुनरपि कशी वृद्धिंगत केली मला सांगावे.||५२|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,ह्या श्रीकृष्णाचे वाढविलेल्या देवांनी,युद्धामध्ये पराजित केलेले असुर मायावीलोकांचा श्रेष्ठ आचार्य अशा मयासुराला शरण गेले.||५३|| भावार्थः---तेव्हां त्या समर्थ मयासुराने,एक सुवर्णाची एक रुप्याची आणि एक लोखंडाची अशा तीन नगऱ्या उत्पन्न करून त्यांना दिल्या.त्या अशा होत्या की,---त्याचे जवळ येणे व दूर जाणे हे मुळीच लक्षणात येत नसे व त्यांमध्ये युद्धाच्या बाणखड्-गादिक सामुग्री अतर्क्य ठेवलेल्या होत्या.||५४|| भावार्थः---हे राजा,त्या विमानरूप नगऱ्यांनी असुरांचे सेनाधिपती अलक्षित होत असत,पूर्वीचे वैर स्मरून,पालकांसहवर्तमान तिन्ही लोकांचा नाश करण्यास प्रवृत्त झाले.||५५|| भावार्थः---नंतर इंद्रादीलोकपालांसहवर्तमान सर्वलोक,श्रीरुद्राजवळ जाऊन म्हणाले की,---हे सर्वव्यापका देवा,ज्याना तीन नगररूप स्थाने मिळाली आहेत त्या असुरांनी नष्टप्राय केलेल्या आम्हां त्वदीय जणांचे तू रक्षण कर.||५६|| भावार्थः---नंतर त्या देवांचे,भगवान सर्वसमर्थ रुद्रांने भिऊ नको असे आश्वासन करून पाशुततास्त्राने अभिमंत्रित केलेला बाण धनुष्याला लावून त्या पुरांवर सोडिला.||५७|| भावार्थः---तेव्हा त्याप्रमाणे सूर्यमंडलापासून किरणसमूह उत्पन्न होतात त्याप्रमाणे त्या बाणांपासून अग्निसारखे बाण उत्पन्न झाले व त्यामुळे ती पुरे दिसेनाशी झाली.||५८|| भावार्थः---नंतर,त्या बाणांचा स्पर्श होता क्षणीच पुरांमध्ये राहणारे सर्व असुर गतप्राण होऊन पडले त्यावेळी महामायावी मयासुराने गतप्राण झालेल्या त्या असुरांना आणून स्वतः निर्माण केलेल्या कुपामृतांमध्ये टाकिले.||५९|| भावार्थः---तेव्हा त्या सिद्धामृतरसाने स्पर्श केलेले असुर,व्रजासारखे दृढशरीरी व महाबळी होऊन मेघांचे विदारण करणाऱ्या विद्दद्रूप अग्नीप्रमाणे एकदम उठले.||६०|| भावार्थः---त्याकाळी भग्नसंकल्प झालेल्या व मनामध्ये खिन्न झालेल्या श्रीरुद्राला अवलोकन करून ह्या भगवान विष्णूने त्या सिद्धामृतसारख्या नाशाकरितां उपाय योजिला.||६१|| भावार्थः---तो असा की,---त्याकाळी ब्रह्मदेव वत्स झाला व हा विष्णू स्वतः गाय झाला आणि मध्यान्हकाळी त्रिपुरासुरांच्या रसकुपाजवळ प्रवेश करून त्यांतील अमृताचे प्राशन केले.||६२|| भावार्थ:---तेंव्हा त्या रक्षक असुरांनी,प्रश्न करणाऱ्या गाईला पाहिले असताही तिचे निवारण केले नाही. कारण,ते भगवंताच्या मायेने मोहित झालेले होते.म्हणून आपण--जीवांनी भगवंताच्या मायेला भुलवू नये,कारण मायेचा मोह झाला असता अहितच होते.ते गाईने प्राशन केलेले जाणून अचिंत्यकार्यकर्तृत्व--रूप भगवंताच्या गतीचे स्मरण करून,स्वत: शोकरहित असा महामायावी तो मयासुर,त्या शोक करणाऱ्या असुरांना म्हणला की,---अहो,देव,असुर,मनुष्य अवि इतरही कोणी यक्षगंधर्वादिक असलातरी तो यालोकी आपणाला,दुसऱ्याला अथवा उभयंतांनाही दैवाने जे प्राप्त झाले असेल त्याचा परिहार करण्यास समर्थ होत नाही.म्हणून आपण--जीवांनी प्रारब्धभोग हा भोगूनच संपत असते.असो.नंतर ह्या विष्णूने धर्म,ज्ञान,वैराग्य,समृद्धी,तप,विद्या,आणि कृपा,इत्यादी आपल्या शक्तीच्या योगाने शंभूला--रथ,सारथी, ध्वज,अश्व,धनुष्य,कवच व बाणवगैरे सर्व युद्धसामुग्री निर्माण करूण दिली.||६३-६४-६५-६६|| भावार्थ:---नंतर युद्धार्थ तयार झालेल्या भगवान ईश्वराने रथारूढ होऊन,धनुष्य व बाण हस्तामध्ये धारण केले आहे आणि हे राजा,मध्यान्हसमयी धनुष्याला बाण लावून त्याच्या योगाने दुर्भेध्य अशी ती तिन्ही पुरे दग्ध करून टाकिली.त्या काळी स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या,आकाशामध्ये दाटी झालेल्या शेकडो विमानामध्ये बसलेले देव,ऋषी,पितर,आणि सिद्धाधीपती हे जयजयकर करून पुष्पांची वृष्टी करू लागले आणि अप्सारागण आनंदित होवून गायन नृत्य करू लागले.||६७-६८-६९|| भावार्थ:---हे राजा,ह्याप्रमाणे भगवान,त्रीपुराने तिन्ही पुरे दग्ध करून ब्रह्मादिक स्तुती करीत असता आपल्या स्थानाप्रत गमन केले.||७०|| भावार्थ:---हे धर्मराज,ह्या प्रकारची आपल्या मायेने आपल्या नरदेहाचे अनुकरण करणाऱ्या ह्या जगद्गुरु श्रीहरीची सर्वलोकस पवित्र करणारी चरित्रे,ऋषींनी वर्णन केलेली आहेत.आता,तुला दुसरे काय कथन करू ते सांग.||७१|| १०-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सप्तम(७)स्कंधापैकी युधिष्ठीरनारदासंवादसंबंधी त्रिपुरविजय नामक हा दहावा अध्याय एकाहत्तर(७१)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुअर्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ ११---याप्रकारे दहा अध्यायांनी ज्ञानयोगाचे व भक्तीयोगाचे कथन केले.आता पाच अध्यायांनी कर्मयोगाचे वर्णन करितात,त्यापैकी ह्या आकराव्या अध्यायामध्ये,मनुष्याचे साधारण धर्म प्रथमतः सांगून,नंतर ब्राह्मणादिवर्णाचे व स्त्रियांचे मुख्य गौण असे वर्णन केले आहे.||११|| ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---श्रीशुक्राचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,ज्याचे मन,भगवंताचेठिकाणी आहे व जो अतिश्रेष्ठ लोकामध्येही श्रेष्ठ आहे त्या दैत्यराज प्रल्हादाचे साधूंच्या सभांमध्ये सत्कार केलेले चरित्र श्रवण करून,आनंदाने युक्त झालेल्या युधिष्ठिराने पुनरपि त्या ब्रहमपुत्र नारदाला प्रश्न केला की,---||१|| भावार्थ:---युधिष्ठीर म्हणाला---हे भगवन,ज्याअर्थी पुरुषाला धर्माचरणाने ज्ञान व भक्ती हि प्राप्त होतात त्याअर्थी वर्ण व आश्रम ह्यांच्या आचारांनी युक्त असा मनुष्याचा सनातन धर्म श्रवण करण्याची मी इच्छा करितो.आपण--जीवानी संत--महात्मा यांच्या मुखातून सनातम धर्म श्रवण करावा,कारण सनातन धर्म कळल्यानंतर,त्यानुसार त्याच्याप्रमाणे आचरण करता येते.||२|| भावार्थ:---आता,तुम्हाला हा प्रश्न करण्याचे कारण इतकेच की ब्रहमनिष्ठऋषे,साक्षात प्रजाधिपती ब्रह्मदेवाचे तुम्ही पुत्र आहा व तप,योग आणि समाधी ह्यांच्या योगाने त्याच्या पुत्रामध्ये श्रेष्ठ असे संत समंत आहां.आपणही--जीवानी तप,योग,आणि समाधी साधनाच्याद्वारे श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करावा.||३|| भावार्थ:---आता स्मृतीकारांणी धर्म सांगितलाच आहे असे म्हणाल तर हे भगवन,ज्यांचे नारायण हेच मुख्यदैवत आहे असे आपणासारिखे द्यालु सदाचारसंपन्न आणि शांत असे ब्राहमण,जसे सर्वोत्कृष्ठ व गुह्य असलेल्या धर्माला जाणतात त्याप्रमाणे इतर जाणत नाहीत.म्हणून आपण जे दयाळू आणि सदाचारसंपन्न आहेत,त्यांचाच सत्संग करावा,कारण ते धर्मास जाणतात.म्हणून यथार्थ धर्म सांगतात व त्यानुसार आचरण करितात. ||४|| भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराज,सर्वलोकांच्या धर्माला कारणभूत असा जो जन्मादिविकार शून्य भगवन,नारायण त्याला नमस्कार करून त्याच्या मुखापासून श्रवण केलेला सनातन धर्म मी तुला सांगतो.ज्यांनी सदगुरू मुखातून त्यांची सेवा व त्यांच्यावर श्रद्धा ठेवून श्रवण केलेले आहे, त्यांच्यामुखातून त्यांची सेवा करून व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊनच श्रवण करावे.||५|| भावार्थ:---आता त्याच्या मुखापासून आपापल्या श्रवण होण्याची संभावना करीत नारायणाचे वर्णन करिता की,---लोकांच्या कल्यांनाकरिता जो नारायण आपल्या नरनामक अंशासहवर्तमान धर्मापासून दक्षकन्येचे ठिकाणी अवतार धारण करून,अजूनही बदरिकाश्रमामध्ये तप करीत राहिला आहे.||६|| भावार्थ:---आता प्रथमत: धर्माविषयी प्रणाम सांगतो की,---हे राजा,सर्व वेदमय असा भगवान श्रीहरी,वेद्-- वेत्यांची स्मृती व ज्याच्या योगाने मन,संतुष्ठ होते ते सदाचरण हि धर्माची मुख्य प्रणामे होत.||७|| भावार्थ:---(आता,प्रथमतः मनुष्यमात्राला साधारण धर्म कोणता हे सांगण्याच्या अभिप्रायाने नारद भाषण भाषण करितो की--------------- राजापांडुपुत्रा,सत्य,दया,तप(एकद्श्यूपवासादि)शुद्धत्व,सहनशिलता,युक्तायुक्तविवेक,मनोनिग्रह,बाह्यद्रिये,मनो--निग्रह,ब्राह्यद्रियदमन,अहिंसा,ब्रहमचर्य,दान यथायोग्यमंत्राचा जप,सरलता,---||८|| भावार्थ:---संतोष,सर्वत्र,समदृष्ठी ठेवणाऱ्या महात्म्यांची सेवा,प्रवृत्तकर्मापासून हळूहळू निवृत्ती,मनुष्यांना कर्माचे फळ विपरीत प्राप्त होते हे पाहणे,व्यर्थभाषणापासून निवृत्त होणे,आत्माविचार करणे,||९|| भावार्थ:---अन्नादिकांचे सर्वभूतांना यथायोग्यरीतीने वाटून देणे,त्याचेठिकाणी आणि विशेषतः मनुष्याचे ठिकाणी आत्मबुद्धी व देवताबुद्धी धारण करणे,||१०|| भावार्थ:--महाम्यांना आश्रयभूत अशा ह्या श्रीकृष्णाचे कीर्तन,श्रवण,सेवन,अर्चन,स्मरण,दाससख्य, व आत्मनिवेदन करणे,||११|| भावार्थ:---असा हा तीस लक्षणांनी युक्त असलेला सर्व मनुष्याचा उत्कृष्ठ साधरण धर्मऋषींनी,उत्तमप्रकारेकरून सांगितला आहे.कारण,ह्याच्या योगाने सर्वात्मा भगवान प्रसन्न होतो.आपण--जीवानी सत्संग करून तीस लक्षणांनीयुक्त असलेला श्रवण करून कळून घ्यावा व त्यानुसार आचरण करावे.कारण त्या तीस धर्मानानुसार आचरण केले असता,भगवंत प्रसन्न होऊन कृपा करितो.||१२|| भावार्थ:---आता,वर्णधर्म कथन करण्याच्या अभिप्रायाने द्विजांचे लक्षण सांगतो की,---हे राजा ज्याचेठिकाणी गर्भधानादी संस्कार मंत्रयुक्त अविच्छिन्न झाले आहेत व ब्रहमदेवाने ज्याला संस्काराने युक्त असे म्हंटले आहे,तोच द्विज होय,जन्माने व अविचाराने शुध्द असलेल्या द्विजांना(ब्राहमण,क्षत्रिय व वैश्य यांना)यजन,अध्ययन व दान हि कर्मे सांगितली आहेत व ब्रहमचर्यादिक आश्रमांची कर्मेही सांगितली आहेत.||१३|| भावार्थ:---याप्रमाणे तिन्ही वर्णाचे आवश्यक धर्म सांगून आता ब्राह्मणादिक चारही जीवनोपयुक्त धर्म सांगतो की,---हे राजा,अध्ययन,अध्यापन,यजन,याजन,दान आणि प्रतीग्र्ह हि सहा कर्मे ब्राह्मणाला विहित असून त्यांपैकी अध्यापन,याजन आणि प्रतिग्रह हि हि उपजीविकार्थ आहेत,क्षत्रियाला आपत्कालामध्ये प्रतीग्रहावाचून सर्व कर्मे विहित आहेत.प्रजापालन करणाऱ्या राजाने,ब्राह्मणावाचून इतरांकडून करवगैरे घेऊन उपजीविका करावी असे सांगितले आहे.||१४|| भावार्थः---तसेच वैश्याने सर्वदा ब्राह्मणकुला अनुसरून कृषीकर्म,व्यापार,गोरक्षण आणि व्याजबट्टा ह्यांच्यावर उपजीविका चालवावी,शूद्राने द्विजशुश्रुषा करावी व स्वामीची सेवा करणे हेंच त्याच्या उपजीविकेचे साधन होय.||१५|| भावार्थ:---आता ब्राह्मणाच्या मुख्य वृत्ति कथन करितो की,---हे राजा कृषिकर्मादी अनेकप्रकारची वृत्ति,अयाचित,प्रत्यही धान्याची याचना करणे,आणि शिर्लोछान--शेतकऱ्याने शेत कापून नेल्यावर त्यांत राहिलेली कणसे घेऊन त्यांजवर उपजीविका करणे ह्याला शिली असे म्हणतात व बाजारामध्ये वगैरे पडलेले धान्यकण वेंचून त्यांच्यावर निर्वांह करणे ह्याला उंछन असे म्हणतात.हि चारप्रकारची वृत्ति ब्राह्मणाला विहित असून त्यांपैकी पहिल्या पहिल्या पेक्षां पुढली पुढली वृत्ति अनुक्रमाने श्रेष्ठ आहे.||१६|| भावार्थः---आतां कोणत्या वृत्तीचा कोणी स्वीकार करावा हि व्यवस्था दर्शविण्याकरितां आपद्वत्ति कथन करितो की,---हे राजा,कनिष्ठवर्णाच्या पुरुषाने आपत्काल नसतांना श्रेष्ठवर्णाला विहित असलेल्याच वृत्तीचा स्वीकार करूं नये व आपत्काली तर क्षत्रियावाचून सर्वांना सर्ववृत्ति विहित आहेत.परंतु,क्षत्रियाने मात्र आपत्कालीही प्रतिग्रहावाचून इतर वृत्तीचा स्वीकार करावा.||१७|| भावार्थः---तशीच चार प्रकारची पूर्वी सांगितलेली जी ब्राह्मणांची वृत्ति ती इतरांनीही विहित आहे हे दर्शविण्याकरितां भाषण करितो की,---हे धर्मराजा,मनुष्याने ऋत,अमृत,मृत,प्रमृत आणि सत्यानृत ह्यांतील कोणत्याहि वृत्तीने उपजीविका करावी.परंतु,कसाजरी प्रसंग आला तथापि श्ववृत्तीने कधीही निर्वाह करूं नये||१८|| भावार्थः---(आतां ऋतादिकांचे स्प्ष्टीकरण करितो की,-)हे राजा,ऋत म्हणजे शिर्लोछण,अमृत म्हणजे अयाचित,मृत म्हणजे नित्य याचना,प्रमृत म्हणजे कृषिकर्म,सत्यानृत म्हणजे वाणिज्य व श्ववृत्ती म्हणजे नीचाचे सेवन असे म्हटले आहे.असो.ती श्ववृत्ती निंद्द असल्यामुळे ब्राह्मण व क्षत्रिय ह्यांनी सर्वदा व्रज करावी.कारण,ब्राहमण हा सर्ववेदमय आहे व राजा सर्ववेदमय आहे.||१९-२०|| भावार्थः---(आतां,ब्राह्मणादी वर्णांचे स्वरूपबोधक धर्म कथन करितो की,-)हे राजा,मन,बाह्येद्रिय--दमन,तप,शुद्धत्व,संतोष,क्षमा,मनाची सरलता,विवेक,दया भगवन्निष्ठत्व आणि सत्य हे ब्राह्मणांचे लक्षण होय.||२२|| भावार्थः---देव गुरु आणि भगवान अच्युत ह्यांचेठिकाणी भक्ति,धर्म अर्थ व काम ह्या त्रिवर्गाच्या योगाने संतुष्ट होणे,आस्तिक्य,नित्य उद्योग आणि चातुर्य हे वैश्याचे लक्षण होय.||२३|| भावार्थः---आणि नम्रता,स्नानादिकाने शुद्धत्व,निष्पकट भावाने स्वामीची सेवा,अमंत्रक यज्ञ,चौर्य न करणे,सत्य भाषण करणे आणि गो ब्राह्मणांचे रक्षण करणे हे शूद्रांचे लक्षण होय.||२४|| भावार्थः---(आतां स्त्रीधर्म सांगतो की,---)हे राजा,पतिशुश्रुषा करणे,त्याला अनुकूल असणे,त्याच्या बंधूच्या हिताचे आचरण करणे आणि पतीचा जो नियम असेल त्याचेच आपण आचरण करणे हे पतिव्रतास्त्रियांचे लक्षण आहे व हाच धर्मही आहे.||२५|| भावार्थः---त्याचप्रमाणे प्रतिव्रतास्त्रीयाने झाडसारव करावी व त्यामध्ये रांगोळ्यावगैरे घालाव्या,स्वतःहि सौभाग्यादिक अलंकारांनी भूषित असावे,घरांतील भांडीकुंडीवगैरे स्वच्छ ठेवावी आणि लहानमोठे पदार्थ,विनय,इंद्रियनिग्रह,सत्य व प्रियवाक्ये व प्रेम ह्यांच्या योगाने यथायोग्यकाली पतीची सेवा करावी||२६-२७|| भावार्थः---आणि त्याचप्रमाणे दैवाने मिळालेल्या लाभाने संतुष्ट,विषयभोगाविषयी अनासक्त,दक्ष,धर्मज्ञप्रिय व सत्य भाषण करणारी,सर्वठिकाणी सावध,शुद्ध आणि सप्रेम अशा स्त्रीने महापातकरहित अशा आपल्या पतीचे सेवन करावे||२८|| भावार्थः---पति हेंच मुख्य दैवत आहे असे मानणारी जी स्त्री,श्रीहरीच्या सेवेविषयी तत्पर असलेल्या लक्ष्मीप्रमाणे हरीभावाने पतीचे सेवन करिते,ती स्त्री,जशी वैकुंठामध्ये श्रीहरीसहवर्तमान लक्ष्मी आनंदाने क्रीडा करिते त्याप्रमाणे,हरीचे स्वरूप पावलेल्या आपल्या पतीसहवर्तमान त्याच वैकुंठाचेठिकाणी आनंदाने क्रीडा करिते.||२९|| भावार्थः--आता,हीनवर्णाच्या पुरुषांपासून उत्तमवर्णाच्या स्त्रियांचेठिकाणी झालेले प्रतिलोमज व उत्तम वर्णांच्या पुरुषापासून हीनवर्णाच्या स्त्रियांचेठिकाणी झालेले अनुलोमज ह्यांची वृत्ति सांगण्याच्या अभि--प्रायाने नारद म्हणतो की,---हे राजा,चोर व पातकी नसणारे जे रजकचर्मकारादिक अत्यंज आणि चांडाळपुल्कसादिक अंतेवसायी लोक आहेत त्यांच्या कुलपरंपरेचे प्राप्त झालेली जी वस्त्राक्षालनादिक वृत्ति असेल तीच त्यांची होय.||३०|| भावार्थः----आता,श्रेष्ठ अशाही परधर्मापेक्षा नीच असाही आपला स्वधर्मच चांगला असे सांगतो----हे राजा,युगायुगाचेठिकाणी सत्वादिगुणांच्या स्वभावानुसार ज्या पुरुषांना जो धर्म विहित असेल तोच त्यांना बहुतकरून इहलोकी आणि परलोकी सुखाला कारण होते असे वेददृष्ट्या मुनींनी सांगितले आहे.||३१|| भावार्थ:---बरे,स्वाभाविक कर्म जर बंधाला कारण आहे तर ते सुखाला कारण कसे होते;असे म्हणशील तर---हे राजा,स्वाभाविक वृत्तीने स्वकर्माचरीन करून वर्तणूक करणारा पुरुष,पुढे हळू हळू त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करून निर्गुणावस्थेला कशी प्राप्त होणार असे म्हणशील तर---हे राजा,दरसाल पेरणी होत असलेले शेत जसे काही काळाने नि:सत्व होवून धान्य उत्पन्न करण्यास समर्थ होत नाही व त्यामध्ये पेरलेले बीजहि जसे नाहीसे होते त्याप्रमाणेच वासनारूपाने ज्यामध्ये विषय वास करीत आहेत असे चित्त,जसा प्रज्वलित झालेला अग्नि,धृताच्या बिंदुनी शांत न होता मोठ्या घृतधारेने शांत होतो त्याप्रमाणे,विषयांच्या अतिभोगाने त्यांविषयी विरक्त होते.||३३-३४|| भावार्थ:---(असो मनोनिग्रह वगैरे लक्षणावरून ब्राहमणादिक वर्णाचा व्यवहार करणे हेच मुख्य आहे,केवळ जाती मुख्य नाही,असे दर्शविणाऱ्या अभिप्रायाने नारद म्हणतो की,---)हे धर्मराजा ज्या पुरुषाचे जे वर्णबोधक लक्षण सांगितले आहे ते लक्षण इतर वर्णाच्या पुरुषाचेठिकाणी जर दृष्टीस पडेल तर तो अन्यवर्णातील पुरुषही त्या लक्षणाच्या निमित्ताने त्या वर्णातील आहे असे समजावे.केवळ जातीमुळेच तो त्या वर्णातील आहे असे समजू नये.||३५|| ११-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणातील सप्तम(७)स्कंधामध्ये सदाचार निर्णयनामक हा अकरावा(११) अध्याय पस्तीस(३५)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. ||११|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ १२---आता ह्या बाराव्या अध्यायामध्ये,ब्रहमचारी आणि वानप्रस्थ ह्याचे धर्म व चारी आश्रमांचे साधारण धर्म सांगितले आहेत||१||असो.आकराव्या अध्यायामध्ये ब्राहमणादी वर्णाचेवगैरे धर्म कथन केले.आता स्कंधसंपेपर्यंत आश्रमधर्माचे कथन करितात त्यांत ह्या बाराव्या अध्यायामध्ये ब्रहमचारी आणि वानप्रस्थ ह्यांच्या असाधारण धर्माचे आणि चारही आश्रमांच्या साधारण धर्माचे वर्णन करून तेरावया अध्यायामध्ये यतीचे धर्म,व चवदाव्या अध्यायामध्ये गृहस्थाश्रमाचे धर्म सांगितले आहेत,आणि पंधराव्या अध्यायांती सर्वधर्माचे सार वर्णन केले आहे.नारद म्हणाला---हे धर्मराज,गुरूच्या घरी वास करणाऱ्या ब्रहमचार्याने इंद्रियदमन करून व आपण निच आहे असे मानून दासाप्रमाणे गुरुचे हित करीत असावे आणि गुरुचेठीकानी अत्यंत दृढ प्रेम धारण करावे.||१२|| १२----- ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम ____________________________________________________________________________________________ भावार्थ:---सायंकाली व प्रात:काली गुरु,अग्नि,रवी,आणि सुरश्रेष्ठ विष्णू यांचे पूजन करावे.एकाग्रअंत:करण पूर्वक गायत्रीचा जप करून त्रिकाळ संध्या करावी.त्यांत सायंकाली व प्रात:काली संध्याकालनिमित्तक मौन धारण करावे.आपण--जीवांनी सुरश्रेष्ठ विष्णू--आदि ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्यांचे पूजन एकाग्र अंत:कारणाने सायंकाळी व प्रात:काळी गायत्रीचा जप करून करावी.कारण त्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होऊन इच्छित फळ देतात.सायंकाळी व प्रात:काळी मौन व्रत धारण करावे.||१||२|| भावार्थ:---तशीच गुरूने हाक मारली तर सावधगिरीने त्यांच्यापासून वेदाध्ययन करावे व अध्यायनाच्या प्रारंभी आणि शेवटी गुरुचरनांना मस्तकाने नमस्कार करावा.सदगृरूंनी हाक मारल्यानंतर त्यांच्या वेळेनुसार वेदांत--शात्राचे श्रवण करावे.श्रवणाला बसण्यापूर्वी व श्रावण झाल्यानंतर त्यांच्या पायावर आपले डोके ठेऊन साष्टांग नमस्कार करावा.||३|| भावार्थ:---हस्तामध्ये दर्भ धारणा करून मेखला,कृष्णाजिन,वस्त्र,जाता,दंड,कमंडलू,आणि यज्ञोपवतीत हि यथोक्तरीतीने धारण करावी.||४|| भावार्थ:---तसेच सकाळी संध्याकाळी भिक्षाटन करून ती भिक्षा गुरूला अर्पण करावी आणि त्याने आज्ञा दिली तर भोजन करावे व जर कदाचित आज्ञा दिली नाही तर उपवास करावा.आपल्याकरिता व सदगुरुकरिता भिक्षा मागून ती भिक्षा सदगुरूंना अर्पण करावी.त्यांनी अज्ञा दिल्यानंतरच भोजन करावे,अन्यथा भोजण करू नये.||५|| भावार्थ:---त्याचप्रमाणे सुशील मिताहारी,श्रद्धायुक्त आणि जितेंद्रिय होवून त्याने,पुरुषात विषयासाक्त असलेल्या स्त्रिया व स्त्रियांत आसक्त असलेले पुरुष--स्त्रैण पुरुष ह्यांच्याशी कार्यापुरताच व्यवहार ठेवावा,कारण त्यांच्या दुर्गुणांचा आपल्यावर--जीवावर परिणाम होत असतो,म्हणून शक्यतो त्यांचा संपर्क होऊच नये.त्यामुळे आपल्यात विषयांची आसक्ती निर्माण होते,त्यामुळे आपला परमार्थ व संसारही होत नाही.म्हणून त्यांचा संबंध येऊ देऊ नये.आपण--जीवानी या नियमाचे कटाक्षाने पालन करावे.||६|| भावार्थ:---आणि गृहस्थाव्यतिरिक्त ब्रह्मचाऱ्याने स्त्रियांच्या कथा वर्ज कराव्या.कारण इंद्रिये बलवत्तर आहेत ती जितेंद्रिय पुरुषाचेही मन,बलात्काराने--इच्छा नसताही विषयांकडे जातात.म्हणूनच सावध ! ||७|| भावार्थ:---तसेच तरुण पुरुषाने,आपले केस,विंचरणे,शरीरमर्दन करणे व अभ्यंगवगैरे करणे हि कधी गुरुपत्न्या अथवा तरुण स्त्रिया ह्यांच्याकडून करवू,नयेत.जसे तूप हे अग्नीसमोर ठेवले की,पातळ होतेच,त्याचन्यायाने स्त्रीची किंवा पुरुषांचा एकमेकाशी शारीरिक संबंध आला की,कामना हि उत्पन्न होतेच.म्हणून संपर्कात येउच नये.||८|| भावार्थ:---कारण,"स्त्री हि खरोखर अग्निरूप आहे व पुरुष हा घृतकुंभरूप आहे." तस्मात एकांतामध्ये प्रत्यक्ष कन्येशीहि संभाषणादि व्यवहार करू नये व एकांत नसताही कारणापुरतेच तिने सांगितलेले करावे.या नियमाचे पालन काटेकोरपणाने पालन करावे.आपली जवळची असलेली श्रेष्ठ-मंडळी आपणास "या नियमाचे पालन करा" असे सांगत असेल तर त्यांचे आपल्यावर फार उपकार आहेत,असा भाव ठेऊन त्यांचे म्हणणे प्रत्यक्षात आणा,त्यांच्याविषयी क्रोध येऊ देऊ नका,तर त्यांच्या पायांवर आपले डोके ठेवा.||९|| भावार्थ:---आता,स्त्रीया--वगैरे हे सर्व,मिथ्या असून फार वाईट असल्यामुळे ते स्वत: टाकिल्यासारखेच आहे.मग त्यांचा त्याग करण्याविषयी काय हा अतिआग्रह असे म्हणशील तर---हे धर्म-राजा,स्वरूपसाक्षातकाराच्या योगाने देह व इंद्रियवगैरे हे सर्व आभासमात्र आहे,असा निश्चय करून जोपर्यंत हा जीव स्वतंत्र झाला नाही तोपर्यंत हा पुरूस व हि स्त्री इत्यादी भेद्बुद्धी नाहीशी होत नाही व त्या भेद्बुद्धीमुळे विषयचिंतनाच्या योगाने जीवाला उपभोग करण्याची बुद्धी उत्पन्न होते ह्याकरिता त्यागच केला पाहिजे.आपण सत्संग केला असता विषयांपासून किंचित सुख मिळत नसते व जे कांही सुख मिळते,ते सर्व परमात्म्याचेच सुख असे कळते.म्हणून आपण--जीवानी सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचाच अनुभव घ्यावा व दु:खरुपी जन्म--मरण निवृत्त करावे. ||१०|| भावार्थ:---असो.सहाव्या श्लोकापासून सांगितलेले हे सर्व धर्म,गृहस्थाला व यतीलाही विहितच आहेत,म्हणून वरील सांगितलेले नियम सर्व पुरुषांनी पाळावे,कारण त्यात आपणा सर्व पुरुषाचेच हितच आहे.परंतु,ऋतुकली स्त्रीचेठिकाणी गमन करणाऱ्या व तिजपासून झालेल्या पुत्रादिकांच्या रक्षणाविषयी व्यग्र असलेल्या गृह्स्थालाचमात्र गुरूची जीविका चालविण्याचा विकल्प आहे म्हणजे जर सामर्थ्य असेल तर त्याने गुरूची उपजीविका चालवावी व सामर्थ्य नसेल तर चालवू नये.गृहस्थाश्रमात समर्थेवाण अनेक-जन आहेत,त्यांच्यावर सदगुरुच्या--संत--महात्मा यांच्या उपजीविकेचे जबाबदारी टाकलेली आहे,म्हणून सदगुरुचीही उपजीविका चालते.जे भक्त आर्थिकदृष्ट्या दीन--गरीब आहेत,त्यांनी शारीरिक सेवा करावी. ईश्वर,शात्र,संत--महात्मा व जन्म देणारी आई हे एवढे दयाळू आहेत की,यांच्याइतके दयाळू देहसंबंधीसुद्धा निश्चितच नाहीत.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून,संत--महात्मा होण्याचा आवश्य प्रयत्न करावा, पण देहसंबंधी निश्चितच होऊ नका.संसारात सुखरूप होण्याचाच प्रयत्न आहे व परमार्थातही सुखरूप होण्याचा प्रयत्न चालू आहे.असे असूनही संसारात राहून परमार्थ करणारे सुखरूप आहेत व फक्त संसारच करणारे दु:खरुपच आहेत.उदा--संत-तुकाराम महाराज,संत एकनाथ महाराज,ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज,संन्याशी शंकराचार्य.इत्यादी.वरील उदा-- गृहस्थी,ब्रह्मचारी,व संन्याशी आहेत.ते सर्व सुखी आहेत.आपणही गृहस्थी आहोत पण फक्त संसारच केल्यामुळे दु:खीच आहोत.संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांनी संसार व परमार्थ केला म्हणून सुखरूप--देवच आहेत.आपण--जीवांनी मृत्यू-लोकात येऊन संसार करून परमार्थ केला तरी सुखरूप--देव होता येते.किंवा ब्रह्मचारी राहून किंवा संन्याशी राहून सुखरूप--देव होता येते.म्हणून ज्यांनी--त्यांनी आपापल्या अधिकारानुसार करावे व सुखरूप--देव होण्याचा प्रयत्न करावा.यातच जीवनाचे महासार्थक आहे.फक्त संसार करण्यात महा--दरिद्रता आहे--दु:ख़रूपता आहे.आपण सत्संग करून विवेक करावा व मार्ग निश्चित करून जीवन व्यतीत करावे,मनाच्या मार्गाने जीवन व्यतीत करू नये,केल्यास दु:खरुपताच आहे.प्रत्येक जीवाच्या मनात हि इच्छा आहे की,मला--जीवाला दु:ख कधीच येऊ नये व सुख कधीच जाऊ नये.आपली हि जी इच्छा आहे,ती केवळ संसार करून होते का ?आपली--जीवाची हि इच्छा संसार करून भूतकाळात कोणाचीच झाली नाही,वर्तमान काळात कोणाचीच झाली नाही व भविष्यकाळातही कोणाचीच झाली नाही.याच अर्थ १००%कोणाचीच होत नाही हे सत्य त्रिकाळ सत्यच आहे,म्हणून आपल्या अधिकारानुसार संसार करून परमार्थ करावाच,कारण इतर मनुष्य सोडून जे मृत्यू--लोकातील जीव--प्राणी--कुत्रा--मांजर इत्यादी आहेत,त्यांनी मागे परमार्थ केला नाही,वर्तमान काळातही कोणीच करीत नाहीत व भविष्यकाळातही कोणीच परमार्थ करू शकत नाहीत हाच आपला--म्हणजे मनुष्य--जीवाचा १००%अनुभव आहे,कारण वर्तमान काळातील अनुभवावरून निश्चित आपण आपल्या विवेकाद्वारे--विचाराद्वारे बुद्धीने निर्णय घेऊन संसार करून परमार्थ करू शकतो.आपण अविवेकाद्वारे--अविचाराद्वारे निर्णय घेऊ शकत नाहीत,असे सुद्धा निश्चितच आहे.आपण हा परमार्थ साधनावर आरूढ होऊन साध्यापर्यंत--सुखरूपतेचा अनुभव येईपर्यंत करावयास पाहिजे.जसे आपण भुकेची तृप्ती होईपर्यंत जेवण करतोत,त्याचप्रमाणे मनाची तृप्ती होईपर्यंत म्हणजे सुखरूपतेच अनुभव येईपर्यंत परमार्थ करावयास पाहिजे.म्हणून संत--महात्मा म्हणतात "करावी तातडी परमार्थाची" त्यास कारण एकमेव हे आहे की,मानव शरीरातून कधी प्राण जाईल,याविषयी आपण--जीव अज्ञात आहे,म्हणजे माहित नाही,असा आपणास अनुभवच आहे,कारण आपल्या समोर इतरांचे जात आहेत,कोणी आपल्या अगोदरचे जात आहेत,तर कोणी आपल्या नंतरचे जात आहेत.कोणी तर बाला-वयातच जात आहे.असे निश्चित कोणाचेच नाही,म्हणून वर्तमान काळातच म्हणजे "या क्षणापासून सुरवात करावी,तर विलंब मुळीच करू नये." परमार्थ कसा करावा असे कळण्याकरिता साधू--संत--महात्मा यांचा सत्संग करून कळून घेत--घेत परमार्थ करावा.जसे विद्दालय--महाविद्दालयात जाऊनच गुरुजींची संगती वारंवार करून व्यवहारातले शिक्षण घेऊन अभ्यास करूनच व्यावहारिक शिक्षण घ्यावे,यातच आपले व्यावहारिक तात्पुरते हित आहे.त्याचप्रमाणे संत--महात्मा यांच्या आश्रमात जाऊन व संत--महात्मा यांच्या मुखातून श्रवण करूनच व आभ्यास करूनच परमार्थ करावा.यात आपले पारमार्थिक कायमचेच महाहित आहे.संसार करून हित होते,तर परमार्थ करून माहाहित होते.केव्हाही हितापेक्षा महाहीतच अत्यंत श्रेष्ठ असते.तात्पुरते हित करण्यापेक्षा कायमचेच महाहित करणे अत्यंत श्रेष्ठ असते.जसे चहाचे सेवन करण्यापेक्षा दुधाचे सेवन करणे श्रेष्ठ असते.चहाचे सेवन करणे हानीकारक--दु:खकारक आहे,तर दुधाचे सेवन करणे लाभकारक--सुखकारक आहे.अविवेकाने किंवा विवेकाने दु:खकारक व सुखकारक हे निश्चित असते.जसे याकरिता आयुर्वेद--शात्र व वैद्द काय सांगते,त्यानुसार चहा किंवा दुधाचा निश्चय करावा,त्याचा प्रमाणे वेदानुसार--वेदांत शात्र व संत--महात्मा--आचार्य काय सांगतात त्यानुसार निश्चय करावा.थोडक्यात आपल्या मनाने करू नये,करण मनाच्या--जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे,तर संत--महात्मा--आचार्य यांच्याठिकाणी ज्ञान आहे.||११|| भावार्थ:---त्याप्रमाणे ज्या गृहस्थांनी व्रत ग्रहण केले असेल त्यांनी मस्तकाला तेल लावणे,न्हाणे,शरीरमर्दन करणे,स्त्रीचे सेवन करणे,स्त्रियांची चित्रेवगैरे काढणे,मांस,व मध्य ह्यांचे सेवन करणे,मला धारण करणे,चंदनाची उटी लावणे,आणि शरीरावर अलंकार घालणे हि सर्व वर्ज्य करावीत.थोडक्यात व्रत धारण करणाऱ्या साधकाने रजोगुणाचा व तमोगुणाचा त्याग करून सत्वगुणांचा स्वीकारकरून व्रत करावे.सात्विक कार्य करण्यासाठी सात्विक गुणांचा स्वीकार करावा.तेव्हा पूर्ण फळ मिळत असते.||१२|| भावार्थ:---ह्याप्रमाणे द्विजांने गुरुग्रही वास करून स्वधीकारानुरूप यथाशक्ती शिक्षादी अंगे व उपनिषदे हयासहवर्तमान वेदत्रयीचे अध्ययन करून,त्यांच्या अर्थाचा विस्तार करावा.||१३|| भावार्थ:---आणि नंतर जर सामर्थ्य असेल तर गुरूला अभिष्ठ असा वर देवून,त्याने आज्ञा दिली असता गृहस्थाश्रम अथवा संन्यासाश्रम स्वीकारावा किंवा नैष्ठिक ब्रहमचारी होवून गुरुगृहीच वास करावा.आपण--जीवांनी सदगुरुच्या अज्ञानुसार आश्रमाचा स्वीकार करावा,आपल्या स्वबुद्धीने स्वीकारू नये,कारण त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव असते.थोडक्यात संसार स्वीकार करावा की,'परमार्थाच' करावा किंवा संसार स्वीकारून परमार्थ करावा याचा निर्णय सदगुरूंनी करावा व शिष्याने त्यानुसार त्यांच्या अज्ञानुसारच निर्णय घ्यावा. ||१४|| भावार्थ:---आणि अग्नि,गुरु,आत्मा व सर्वभुते ह्यांचेठीकानी जरी वस्तुत: अधोक्षज भगवान प्रविष्ट नाही तथापि आपल्या आश्रयाला असलेल्या जीवांसहवर्तमान त्यामध्ये तो प्रविष्ट आहे असे अवलोकन करावे.||१५|| भावार्थ:---हे राजा,ह्याप्रमाणे आचरण करणारा ब्रहमचारी,वानप्रस्थ,यती अथवा अपरोक्षज्ञान--संपन्न होऊन परब्रहमस्वरूपास पावतो.||१६|| भावार्थ:---असो.आता,ऋषींनी सांगितलेले वानप्रस्थाचे धर्म मी कथन करितो.ज्या धर्माचे यालोकी आचरण करणारा मुनी,अनायासानेच महार्लोकाप्रात जातो.||१७|| भावार्थ:---हे राजा,वानप्रस्थाश्रमी पुरुषाने,नांगरलेल्या जमिनीपासून उत्पन्न झालेले(तांदूळवगैरे) भक्षण करू नयेत,नांगरल्यावाचूनही जमिनीमध्ये निष्पाप होऊन परिपक्व होण्याच्याच कलापुर्वीच परिपक्व दशेस आलेले(फलमुलादिक)भक्षण करावे.||१८|| भावार्थ:---त्याने वनसंबंधी निवारादी धान्याच्या योगाने नित्य अशा चारुपुरोडाशांचा निर्वाह करावा व नवे अन्न प्राप्त झाले असता पूर्वसंचित अन्नाचा त्याग करावा.||१९|| भावार्थ:---आणि केवळ अग्निरक्षणार्थच पर्णकुटीकेचा अथवा पर्वतगुहेचा आश्रय करावा.स्वत: तर शीत,वायू,अग्नि,पर्जन्य आणि सूर्याचा ताप ह्यांना सहन करीत असावे.||२०|| भावार्थः---जटाधारण करणाऱ्या त्याने केश,रोम,नखे,श्मश्रू,मल,कमंडलू,कृष्णाजिन,दंड आणि व वल्कले यांचे धारण करून अग्नि करितां स्त्री ची स्त्रुवावगैरे पात्रे धारण करावी.||२१|| भावार्थः---आणि तपाच्या क्लेशाने बुद्धीचा नाश न होईल अशा रीतीने त्या मुनीने बारा,आठ,चार,दानें अथवा एक संवत्सरपर्यंत धर्मांचे आचरण करावे.||२२|| भावार्थः---परंतु तो वानप्रस्थाश्रमी पुरुष,व्याधीने अथवा जरेच्या योगाने स्वकर्म करण्याविषयी अथवा ज्ञानाभ्यास करण्याविषयी जेव्हा असमर्थ होईल तेव्हां त्याने निरशनादिक--अन्नाचा त्याग करून नियम धारण करावे.||२३|| भावार्थः---आतां निरशनादीकद करण्याचे पूर्वी काय करावे ते सांगतो,---हे धर्मराजा,प्रथमतः आपलेठिकाणी अग्नीचा समारोप करून देहादिकाचेठिकाणी असलेल्या अहंकाराचा व ममत्वबुद्धीचा त्याग करावा आणि नंतर आपल्याला कारणभूत अशा आकाशादी पंचमहाभूतांचेठिकाणी यथायोग्य रीतीने देहाचा उत्तम प्रकारेकरून लय करावा.||२४|| भावार्थः---तो असा की,---आकाशामध्ये देहगत छिद्रांचा,वायूमध्ये प्राणांचा,तेजाचेठिकाणी उष्णतेचा,जलाचेठिकाणी रक्त,श्लोश्मा व पु ह्यांचा आणि पृथ्वीचेठिकाणी अवशिष्ट राहिलेल्या अस्थिमांसादी कठीण अंशांचा उत्पत्यनुसार बुद्धिमान पुरुषाने लय करावा.||२५|| भावार्थः---(ह्याप्रमाणे स्थूल शरीराचा लय सांगून आतां लिंगशरीररूप अशा अध्यात्मदित्रयाचा लय सांगतो-)हे धर्मराजा,भाषणासहवर्तमान वागिंद्रियांचा अग्नीचेठिकाणी,ग्रहणादिरूप व्यापारासहवर्तमान हस्तांचा इंद्राचेठिकाणी,गतीसहवर्तमान पायांचा विष्णूचेठिकाणी,रतीसहवर्तमान उपस्थेद्रियांचा प्रजापतीचेठिकाणी,पुरीशोत्पसर्गासहवर्तमान गुदेंद्रियांचा मृत्यूचे ठिकाणी,शब्दासह- सहवर्तमान श्रोत्रेंद्रियांचा दिशांचेठिकाणी आणि स्पर्शासहवर्तमान त्वगिंद्रियांचा वायूचेठिकाणी त्याच्या त्याच्या स्थानारूप लय करावा.||२६-२७|| भावार्थः---तसाच हे राजा,चक्षुरींद्रियासहवर्तमान रूपाचा सूर्याचेठिकाणी,वरुणासहवर्तमान रसाने--द्रीयांचा रसरूप उदकाचेठिकाणी आणि अश्विनीकुमारांसहवर्तमान घ्राणेंद्रियांचा गंधयुक्त पृथ्वीचे-- ठिकाणी लय करावा.||२८|| भावार्थः---त्याचप्रमाणे मनोरथासहवर्तमानमनाचा चंद्राचेठिकाणी,ज्ञानविषयासहवर्तमान बुद्धीचा ब्रह्मदेवाचेठिकाणी,अहंकारासहवर्तमान कर्माचा ज्यापासून अहंकममतापूर्वक क्रिया होते त्या रुद्राचेठिकाणी चेतनेसहवर्तमान चित्ताच जीवाचेठिकाणी व गुणांच्या कार्यामुळे विकार पावणाऱ्या जीवाचा निर्विकार ब्रह्माचेठिकाणी लय करावा."थोडक्यात कार्यांचा लय त्याच्या करणात करावा."||२९|| भावार्थः---आतां,विकारयुक्त जीवाचा निर्विकार ब्रह्मामध्ये लय कसा होईल असे म्हणशील तर--हे राजा,विकारहेतूभूत सर्वोपाधीच्या लयद्वाराने होईल.तो लय असा की,---पृथ्वीचा जलाचेठिकाणी जलाचा तेजाचेठिकाणी,तेजाचा वायूचेठिकाणी,वायूचा आकाशाचेठिकाणी,त्या आकाशाचा अहंकाराचेठिकाणी,त्या अहंकाराचा महत्तत्त्वाचेठिकाणी,त्या महत्तत्त्वाचे मायेचेठिकाणी आणि त्या मायेचा परमात्म्याचेठिकाणी लय करावा."थोडक्यात सर्व कार्यांचा लय ज्याच्या--त्याच्या करणाच्या ठिकाणी करावा."||३०|| भावार्थः---ह्याप्रमाणे सर्व उपाधीच्या लय झाल्यामुळे अवशिष्ट राहिलेला चिद्रूप आत्मा अविनाशी आहे असे जाणून,ज्याप्रमाणे अग्नि,काष्ठरूप उपाधी दग्ध झाली असतां दाहरूप व्यापारापासून उपराम पावतो त्याप्रमाणे वानप्रस्थाचेअद्वैतस्वरूपी सर्वव्यापारांपासून विराम पावावे.सर्व नाम-रूपाचा त्याग झाल्यानंतर म्हणजेच सर्व नामे व सर्व रूपे हे मिथ्या आहेत असा निश्चय करावा.अध्यस्त वस्तू म्हणजेच सर्व नामे व रूपे अधिष्ठानारुपाच असतात,असे जाणावे.||३१|| १२-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक(७)सप्तमस्कंधापैकी ब्रह्मचर्याद्दा श्रमधर्मनिरुपणनामक हा(१२)बारावा अध्याय(३१)श्लोकांनी युक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसद्गुरुचारणारविंदार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________________________ |१३-----आता तेराव्या अध्यायामध्ये,ज्ञानसाधक जो यति त्याच्या मोठ्या धर्माचे अवधुतांच्या इतिहासाने कथन करून,त्याच्या सिद्धावस्थेचेही वर्णन केले आहे||१|| |१३---- यतिधर्माचे निरुपण आणि अवधूत-प्रल्हाद-संवाद ____________________________________________________________________________________________ भावार्थः---नारद म्हणाला:---हे धर्मराजा,वानप्रस्थधर्माविषयी आणि आत्मविचाररूप विद्याभासाविषयी जो असमर्थ असेल त्याने पूर्वी सांगितल्याप्रमाणे अग्निसमारोपाची वगैरे भावना करून निरशनादिक--आशारहित व्रत स्वीकारावे,व जो समर्थ असेल त्याने पूर्वी प्रमाणे भावना करून,देहमात्र शिल्लक ठेऊन,इतर सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा आणि कशाचीही अपेक्षा न धरितां एकेक गावांमध्ये एकेक रात्र राहणे,कारण यामुळे कोणाचीच आसक्ती राहात नाही. अशा प्रकाराने पृथ्वीवर संचार करीत असावे.||१|| भावार्थः---जर कदाचित त्याला वस्त्र धारण करावयाचे असेल तर गुह्यस्थान झांकन्यापुरतेच--लौकीकासाठी कौपिन धारण करावे. आणि प्रेषोच्चारणाचे पूर्वी जे कांही दंडादिचिन्हांहून इतर टाकिले असेल त्याचा शीतज्वरादि आपत्ती नसता आपत्ती स्वीकार करूं नये.स्थूल--शरीरावर नैसर्गिक शीत-ज्वरादिचा परिणाम होऊ शकतो,म्हणून अशाप्रसंगी वस्त्राचा उपयोग करावा,एरव्ही करू नये.||२|| भावार्थः---व ज्यांचा "नारायण" हाच श्रेष्ठ आश्रय आहे जो सर्वप्राण्यांचे हितचिंतन करीत आहे आणि जो स्वस्वरुपीच रममाण होत आहे अशा त्या भिक्षूने,कोणाचाही आश्रय न धरितां भूमीवर एकट्यानेच संचार करीत असावे.आपण--जीवांनी जर संन्यास घेतला असेल तर आपण--जीवांनी फक्त भगवंताचाच आश्रय घ्यावा,कारण भगवान भक्तांचा योग-क्षेम सांभाळीत असतो.आपण--जीवांनी स्वत:ची काळजी घेण्याचे कारण नसल्याने सर्व-प्रण्यांचेच हितचिंतन करावे व त्यांना सुख देण्याचा किंवा सुखरूप करण्याचा म्हणजेच इतर जीवांचे अज्ञान निवृत्त करून जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञान देण्याचाच प्रयत्न करावा.आपण स्वस्वरूपी रममाण--आत्मस्वरुपाचेच चिंतन करीत जीवन व्यतीत करावे.||३|| भावार्थः---तसेच आपण--जीवांनी कार्यकारणाहून पर अशा अविनाशी आत्माचेठिकाणी हे विश्व कल्पित आहे व कार्यकरणात्मक प्रपंचामध्ये सर्वठिकाणी परमात्मा आहे असे अवलोकन करावे.||४|| भावार्थ:---आता जीवात्मा बद्ध असून परब्रहम मुक्त असल्यामुळे त्या उभयंताचा समनाधिकरणश कसा होईल असे म्हणशील तराजा जीवानीसुषुप्तिअवस्थेमध्ये आत्मतत्व तमोगुणाने व्याप्त असते,जाग्रत व स्वप्नह्या अवस्थेमध्ये विक्षेपयुक्त असते,संधिकालामध्ये मात्र तमोगुण व विक्षेप हे दोन्ही नसतात म्हणून निद्रेच्या आरंभी व जागद्रवस्थेच्या अंती आत्मस्वरुपाकडे,लक्ष लाऊन असणाऱ्या यतिने--आपण--जीवांनी,आपले तत्व पाहात असून बंध व मोक्ष हे वस्तुत खरे नसून केवळ अविद्ध्येने कल्पित आहेत असे जाणून,सर्वठिकाणी परब्रहमरूप आत्म्याचे अवलोकन करावे.||५| | भावार्थ:---त्याप्रमाणे देहाला निश्चित असलेला मृत्यू व अनिश्चित असलेले वाचणे--जिवंत असणे ह्याकडे मुळीच लक्ष न देता,भूतांची उत्पत्ति व लय हि ज्याच्यापासून होतात त्या कालाचीच केवळ प्रतीक्षा करीत असावे.आपले--जीवांचे प्रारब्ध कर्मांचा भोग संपल्यानंतर मृत्यू--काळ हा येतच असतो,जर प्रारब्ध कर्मांचा भोग शिल्लक असेल तर मृत्यू--काळ येत नसतोच.त्यास--मृत्यूस आणता येत नसते.म्हणून आपण--जीवांनी भगवंत यांच्या नांवाचा नामोच्चार करावा,किंवा भगवंताच्या अवतारांच्या लीला श्रावण कराव्यात किंवा भगवंताच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करीत--करीत राहावे,काळाची वेळ,जेव्हा आपले प्रारब्ध कर्मांचा भोग संपेल, तेव्हांच निश्चितरूपाने काळ अज्ञानी जीवाचा सूक्ष्म देह नेण्याकरिता येतच असतो.ज्ञानी पुरुषाचे प्राण प्रारब्ध कर्मांचा भोग संपल्यानंतर आपल्या कारणात--अधिष्ठानरूप होत असतात.ज्याचे प्राण अधिष्ठानरूप होत असतात,कारण अध्यस्त वस्तू अधिष्ठानरूपच असते,म्हणून त्यास जन्म प्राप्त होत नसतो,तर तो जीव सुखरूपच--परमात्माररूपच असतो.||६|| भावार्थ:---तसेच यतीने आत्मवस्तूचे प्रतिपादन न करणारी जी शास्त्रे त्यांचेठिकाणी आसक्त होऊ नये,ज्योतिषविध्यादी वृत्तीवर उपजीविका करू नये,वितंडादिक वादांमध्ये पर्यवसान होणाऱ्या तर्काचा त्याग करावा आणि दुराग्रहाने वादिप्रतिवादीमध्ये कोणाच्याही पक्षाचा आश्रय करू नये.आपण--जीवांनी सर्व शास्त्रे जाणावी,पण त्या शास्त्रात आसक्त होऊ नये,कारण आसक्ती हि दु:खास करण आहे.वेदांत--शास्त्रानुसार जगन्-मिथ्या व ब्रह्म सत्य आहे,असा निश्चय करावा,करण सहा शास्त्रापैकी वेदांत--शास्त्रच फक्त अद्वैत तत्व एक आहे व ते--ब्रह्म सत्य आहे असा उपदेश करिते,तर इतर शास्त्रे जीव व देव भिन्न असून द्वैत सत्य आहे असे मार्गदर्शन करते,म्हणून त्यांच्या विचाराचा त्याग करावा व वेदांत--शास्त्राचा स्वीकार करून जन्म--मरण निवृत्त करावे. ||७|| भावार्थ:---त्याप्रमाणे लोभवगैरे दाखवून बलात्काराने शिष्य संपादन करू नयेत,बहुत ग्रंथाचा अभ्यास करू नये,ग्रंथावर टीका करू नयेत आणि कोणत्याही ठिकाणी मठादिक बांधण्याच्या खटपटीत पडू नये.आपण--जीवाने परमार्थ करणारास लोभ वृत्ति दाखवून म्हणजे धन देऊन त्यांना शिष्य करून घेऊ नये,कारण तो अधर्म आहे.अधर्माने धर्माकडे प्रवृत्त करणे पापाचे लक्षण आहे.यात धर्मांतर करणारा व धर्मांतर धनाची आसक्ती दाखवून घेणारा जो आहे ,त्या दोघानांही नरकाची प्राप्ती होऊ चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपण--जीवांनी धर्मांतर करू नका व प्रवृत्तसुद्धा करू नका.आपल्या धर्मांचे यथार्थ तत्व सांगून स्वरूप व फळ सांगा,त्यानुसार पटले तर स्वीकृत करा,मात्र धनाचे प्रलोभन दाखवून धर्मांतर करू नये,कारण त्यामुळे दोघासही दु:खाची प्राप्ती होते.||८|| भावार्थ:---आता परमहंसांचा विशेष धर्म दर्शवितो की,---हे राजा,शांत व समचित्तात अशा महात्म्य यतीचा आश्रम प्रायश: धर्माचरण करण्यासाठी नसतो,तस्मात,दंडादि आश्रमचिन्हे त्याने लोकसंग्रहार्थ धारण करावीत किंवा त्यांचा त्याग करावा.म्हणजे थोडक्यात संन्याशाने सकाम कर्मे करू नये.बाह्यता आश्रमचिन्हे लोकसंग्रहांकारिता असावी,तर अंतरंगात--मनात नसावी--त्याग करावा.||९|| भावार्थ:---आता यतीला जर दृढ ज्ञान झाले नाही तर तो योगश्रेष्ठ होण्याचा संभव आहे म्हणून तसे ना होण्याकरिता सांगतो-यतीने मनांमध्ये आत्मानुसंधानरूप स्वर्थामात्र प्रत्यक्ष करून त्याखेरीज दुसरे कोणतेच वर्णाश्रमादि चिन्ह लोकांना स्पष्ट दाखवू नये व स्वत: ज्ञानी व वक्ता असूनही लोकदृष्ट्या त्याने आपणास उन्मत्तासारखे व मुक्यासारखे दाखवावे.आपण--जीवानी यती--संन्यासी झालोत तर आत्मानुसंधान स्वर्थामात्र असावा,तर स्वार्थ नसावा.बाह्य चिन्हे लोकांना दिसतील असे धारण करू नये.आपणास--जीवांस जीव--ब्रह्म-ऐक्य ज्ञानाचा अहंकार नसावा."अहंकार निवृत्त करणे म्हणजे परमार्थ व अहंकार वाढविणे म्हणजे संसार"असा विवेक करून त्यानुसार आचरण करावे. ||१०|| भावार्थ:---(आता परमहंस धर्मच इतिहासाने स्पष्ट करून दाखवितो की,)---हे धर्मराज,ह्याविषयी प्रल्हाद आणि अजगर वृत्तीने वागणारा एक मुनी ह्यांचा संवादरूप हा एक पुरातन इतिहास दृष्टांतरूपाने ज्ञानी लोक कथन करीत असतात की-----------------||११|| भावार्थ:---एके वेळी भगवत्प्रिय प्रल्हाद लोकतत्व जाणण्याच्या इच्छेने काहीं अमात्यांसहवर्तमानन लोकांमध्ये वारंवार संचार करीत असता त्याने कावेरीनदिच्या तीरी सह्यपर्वताच्याजवळ धुळीने,मलीन झालेल्या अवयवांनी,ज्याचे निर्मल तेज अगदी झाकून गेले आहे अशा भूमीवर निजलेल्या एका मुनीला अवलोकन केले---------||१२-१३|| भावार्थ:---नंतर कर्म,आकृती वाणी आणि वर्णाश्रमादी चिन्हे ह्यांच्या योगाने लोक,ज्याला हा सिध्दपुरुष आहे किंवा नाही हे मुळीच जाणत नाहीत,||१४|| भावार्थ:---त्या मुनीचे,त्या महाभगवदभक्त प्रल्हाद असुराने यथाविधी पूजन करून,चरणाचेठिकाणी मस्तक ठेवून त्याला नमस्कार केला आणि तत्व जाणण्याची इच्छा करीत असता त्याला असे विचारीत झालं की,--------------||१५|| भावार्थ:----हे ब्रहमनिष्ठ,उद्योगी असून विषय भोग करणाऱ्या पुरुषाप्रमाणे तू आपला देह पुष्ट धारण करितोस ह्यांचे कारण काय?बरे उद्योगावांचूनच मला भोग प्राप्त होतो असे म्हणशील तर हे भगवान,उद्योगी पुरुषांनाच द्रव्य प्राप्त होते,द्रव्यवानांनाच भोग प्राप्त होतो व उपभोग घेणारांचाच हा देह पुष्ट होतो,भोगांवाचून होत नाही: असे या लोकी प्रसिद्ध आहे,||१६|| भावार्थ:---यास्तव हे ब्रहमनिष्ठा,उद्योग न करिता शयन करणाऱ्या तुझ्याजवळ नि:संशय द्रव्य नाही,की ज्याच्या योगाने विषयभोग मिळून देह पुष्ट होईल.तस्मात,हे विप्रा,तू भोगरहित हा असूनही हा तुझा देह पुष्ट असण्याचे कारण काय?हे आम्हांला सांगण्यास योग्य असेल तर कथन कर.||१७|| भावार्थ:---आणि त्याहूनही द्रव्यसंपादनवगैरे करण्यास समर्थ असूनही का उद्योग करीत नाहीस हे विचारण्यास आशयाने प्रल्हाद म्हणतो की---हे भगवान,तूं विद्वान दक्ष व चतुर असून,लोकांचे मन रंजन करणाऱ्या चमत्कारिक कथाही तुझ्याजवळ आहेत.तथापि लोक कर्मे करीत असता ते सर्व तू जाणत असूनही उदासीनवृत्ति धारण करून उगीच शयन करीत आहेस ह्याचे कारण काय?||१८|| भावार्थ:---नारद म्हणाला---हे धर्मराजा,दैत्याधिपती प्रल्हादाने ह्याप्रमाणे प्रश्न केला असता त्याच्या भाषणरूप अमृताने वश झालेला तो महामुनि,विस्मयपूर्वक असे म्हणाला की--------------||१९|| भावार्थ:---ब्राहमण म्हणाला---हे आसुरश्रेष्ठा,तू ज्ञानी जणांना संमत असल्यामुळे पुरुषांच्या प्रवृत्तीनिवृत्तीची फळे काय आहेत हे खरोखर अंतदृष्टीने जाणत आहेस.||२०|| भावार्थ:---कारण,सूर्य जसा अंधकाराचा नाश करितो त्याप्रमाणे भगवान नारायण देव ज्याच्या एकनिष्ठ भक्तीच्या योगाने हृदयामध्ये सर्वदा वास करीत असता,अज्ञानाच्या नाश करितो.म्हणून आपण--जीवांनी भगवंताची निष्काम एकनिष्ठ भक्ती करावी,कारण निष्काम एकनिष्ठ भक्तीने अज्ञानाचा नाश करितो.म्हणजे आपले--जीवांचे पूर्वकर्म कर्मे परिपक्व झाले असता भगवंत सदगुरू व आपली--जीवाची भेट सत्संग करण्यासाठी घालून देतो.||२१|| भावार्थ:---तथापि हे राजा,तुझ्या प्रश्नांची आम्ही यथाश्रुत उत्तरे देतो.कारण,अंत:करणाची शुद्धी होण्याची करणाऱ्या पुरुषांना तू मान्य आहेस.म्हणून आपण--जीवांनी निष्काम भक्ती करावी,कारण भगवंत आपणास--जीवास आपला भक्त म्हणून स्वीकार करितो,तर जे विषयांसाठी--संसारासाठी भक्ती करतात ते भगवंताचे भक्त नसून संसाराचे--विषयांचे भक्त असतात.||२२|| भावार्थ:---आता लोक कर्मामध्ये प्रवृत्त होत असून तूंच कशाकरिता त्यापासून निवृत्त होऊन असे जे तू मला विचारीलेस त्याबद्दल सांगतो एक---हे राजा,यथायोग्य विषयांनीसुद्धा परिपूर्ण करण्यास अशक्य व जन्मप्रवाह उत्पन्न करणाऱ्या तृष्णेने,मला पूर्वी कर्मे करावयास लावून नानाप्रकारच्या योनीमध्ये टाकिले होते.आपण--जीव पामर असल्यामुळे म्हणजे संसार--विषय यांचा भोग विधी--निषिद्ध याचा विवेक न करता विषयांचा भोग घेत होतोत.त्यामुळे आपणाकडून--जिवाकडून पाप उत्पन होत होते म्हणजे दु:ख उत्पन्न होत होते,म्हणून भगवंतानी आपणाकडून--जीवाकडून पाप उत्पन्न होऊ नये म्हणून विषयांचा भोग नियंत्रित करण्यासाठी विहित कर्मे करावी असे सांगितले होते.आपण--जीवानी विहित कर्मे करावीत असा म्हणण्याचा भावार्थ नव्हता,तर विषयांचा त्यागाच करावा असा भावार्थ होता,पण आपणास भावार्थ न कळल्यामुळे आपण विषयांचा भोग घ्यावा असा अर्थ घेतला.त्या उपदेशातील भावार्थ कळला नाही,म्हणून भावार्थ कळण्याकरिता संत--महात्मा यांच्या मुखातून अंत:करण शुद्ध करून व अंत:करण स्थिर करून श्रावण करावे,वेदांत शास्त्र श्रावण करावे.जसे शारीरिक परिश्रम करून सेवन केले तर पचून शरीरास धाष्ट--पुष्ट करिते,अन्यथा रोग उत्पन्न करून अपय करिते,तसे आपण निष्काम कर्मे व निष्काम भक्ती न करता वेदांत श्रावण केले तर उपाय न होता अपाय होतो म्हणजे त्या वेदांत--शास्त्राचा उपयोग परमात्मा भेटण्यासाठी न करता अर्थ--धन--मान--प्रतीष्ठासाठी--विषयांचा भोग घेण्यासाठी करतोत,अंती परमात्मा यांची भात ण होते यमाची भेट होऊन यमपुरीस जाऊन दु:खच भोगितो आणि त्यानंतर चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:खच भोगितो.म्हणून आपण--जीवांनी निष्काम कर्मे करावी व निष्काम भक्ती करून भगवंताचेच भक्त व्हावे.असे झाले असता भगवंत आपल---जीवाची व संत--महात्मा यांची भरत घालवून सत्संग घडवितो व त्याद्वारे जीव--ब्रह्म--ऐक्य--ज्ञान होऊन सर्व विषयांचा त्याग करून परमात्मारूप होऊन अत्यंत दु:खाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते.म्हणजेच आपले जीवांचे सार्थक होते.||२३|| भावार्थ:---नंतर त्याच तृष्णेने कर्माच्या योगाने नानाप्रकारच्या योनीमध्ये फिरत असणाऱ्या मला भगवदिच्छेने,धर्माच्या योगाने स्वर्गाचे द्वार,अधर्माच्या योगाने स्वान--सुकारादिक अशा चौऱ्याऐंसी योनीचे द्वार,मिश्र अशा धर्माधर्मांच्या योगाने त्या मनुष्य-लोकांचे द्वार व सर्व निवृत्तीच्या योगाने मोक्षाचे द्वार अशा या मनुष्यदेहामध्ये घातले आहे.म्हणून आप--वर्तमानकाळात मनुष्य-लोकांचे द्वार म्हणजेच निवृत्त मार्गाच्या द्वारात टाकले आहे,म्हणून आपण निष्काम कर्मे करून व निष्काम भक्ती करून सत्संगाद्वारा जीव-ब्रह्म--ऐक्य-ज्ञान प्राप्त करून घ्यावे,व मोक्ष संपादन करावा.असे ज्ञान फक्त मनुष्य देहातच प्राप्त करून घेता येते,तर अन्य कोणत्याच देहात प्राप्त करून घेता येत नाही,कारण इतर देह हे पुण्य--पाप भोगण्यासाठीच आहेत.मनुष्य--देहच फक्त देव प्राप्तीसाठीच आहे.आपल्याजवळ अज्ञान नांवाचा दोष असल्यामुळे आपण देव प्राप्त करून न घेता संसारच करितो व त्यानंतर पशु--पक्षी योनीत जाऊन संसारच करितो.म्हणून आपण आपण कांही लोक परमार्थ करितात,त्यांची संगती करून संसार व परमार्थ करावा किंवा फक्त परमार्थाच करावा.संत तुकाराम महाराजांनी संसार करून परमार्थ केला,तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मचारी राहून परमार्थ केला व शंकराचार्यांनी संन्यास स्वीकारून परमार्थ केला.त्यातच--परमार्थ करण्यातच आपले परमहित आहे.||२४|| भावार्थ:---परंतु येथेही सुखप्राप्ती व दु:खनिवृत्ती होण्याकरिता कर्मे करीत असलेल्या स्त्रीपुरुषांच दु:खप्रप्तीरूप विपरीतपणा अवलोकन करून मी त्या कर्मापासून निवृत्त झालो आहे.आपण मनुष्य जीवन जगत असतांना संसारात बरेसचे लोक किंचित सुख व अपार दु:ख भोगीत आहेत,असे आपण पहातोत,तरी पण संसारापासून परावृत्त होत नसून त्या दु:खमय अवस्थेतच जीवन जगतोत.यासच मायेचा चमत्कार म्हणतात.म्हणून आपण साधू--संत--महात्मा यांच्या जीवनाकडे पाहून संसाराचा त्याग करून परमार्थ करावा,कारण त्यातच आपले--जीवाचे हित आहे,त्या संसारातील कांही लोक संसाराचा त्याग करून परमार्थ करितात असे दिसून येते.त्यांचा आदर्श घेऊन आपण--जीवानी संसाराचा त्याग करून किंवा संसार करून परमार्थ करावा.नारद मुनींनी अशा प्रकारे इतरजनांचे संसारातील दु:ख पाहून संसारात न पडता परमार्थ करितात.त्यांचा आदर्श आपण--जीवांनी घेऊन संसाराचा त्याग करून परमार्थ करावा व भगवंताची निष्काम भक्ती करावी. ||२५|| भावार्थ:---आता कर्मामध्ये जर प्रवृत्ती असली तर केंव्हा नाही केंव्हातरी सुखप्राप्ती होण्याचा संभव आहे,कर्माच्या निवृत्तीनें काय बरे प्राप्त होणार आहे?असे म्हणशील तर---हे राजा,सुख हेच जीवाचे स्वरूप असून सर्व कर्मनिवृत्ती झाली असता ते आपोआप प्रकाशित होते.म्हणून आपण--जीवांनी सर्व कर्में निवृत्त करून म्हणजेच वृत्ति निवृत्त करावी,कारण सर्व-वृत्ति निवृत्त झाली असता सुख हे मिळतेच.म्हणून मनाच्या संकल्पापासून होणारे जे विषयांचे भोग अशात्वत आहेत असे पाहून मी प्रारब्धकर्माच्या उपभोग घेत असता काहींच उद्योग न करिता येथे निजून राहिलो आहे.आपण--जीवांनी सुखासाठी प्रयत्न न करता प्रारब्धानुसार जे सुख मिळेल त्यातच समाधानी असावे,म्हणजेच प्रयत्न करू नये.आपण--जीवांनी पारमार्थिक सुखासाठीच आवश्य प्रयत्न करावा,कारण प्रयत्नाने परमार्थ होत असतो,तर प्रयत्न न करता परमार्थ होत नसतो.||२६|| भावार्थ:---तर मग असे केले असता कोणालाही संसार प्राप्त होणार नाही असे म्हणशील तर---हे राजा ह्याप्रमाणे स्वत:चेचठिकाणी असलेला आपला सुखरूप पुरुषार्थ विसरूनच पुरुष,दु:खहेतुभूत प्रपंचामध्ये पडून जन्ममरणादिकेकरून भयंकर अशा देवतीर्यागादिरुपाणे संसाराप्रात पावतो.आपल्या--जीवाच्याठीकाणी असलेल्या अज्ञानामुळे आपल्या--जीवाच्या ठिकाणी स्वस्वरूपाचा विसर पडलेला आहे,म्हणून प्रयत्नाने सत्संग करून अज्ञान निवृत्त करून,ज्ञान प्राप्त करून घ्यावे.सर्व-विषयांचा त्याग केल्यानंतर परमात्म्याचा अनुभव येत असतो.त्यानंतर आपले--जीवाचे जन्म--मरण निवृत्त होत असते.||२७|| भावार्थ:---ह्यास दृषांत-जसा जलापासून उत्पन्न झालेल्या शेवाळ तृण इत्यादिकांनी झांकून गेलेल्या जलाचा त्याग करून,जलाच्या इच्छेने मृगजलाकडे धावतो त्याप्रमाणे आत्मस्वरुपाहून दुसरेठिकाणी पुरुषार्थ आहे असे जाणणारा पुरुष आत्मस्वरूपाचा त्याग करून विषयाकडे धावत असतो.म्हणून आपण--जीवांनी धर्म,अर्थ,काम,हे पुरुषार्थ नसून ते संसार आहेत असा विवेक करून लक्षात घ्यावे.म्हणून ते न मिळवता चौथा जो पुरुषार्थ मोक्ष तो सर्व विषयांचा त्याग करून मिळवण्याचा प्रयत्न करावा,कारण ज्याप्रमाणे विषय आहेत,तेथे परमार्थ नाही व जेथे परमार्थ आहे,तेथे विषय नाहीत,असे हे निश्चितच आहे.त्याप्रमाणे जेथे अंधार आहे,तेथे प्रकाश नाही व जेथे प्रकाश आहे,तेथे अंधार नाही.म्हणून आपण--जीवांनी सर्व विषयांचा त्याग करूनच परमार्थ करावा.||२८|| भावार्थ:---असो.ह्याप्रमाणे स्वत: निरुद्योगी असण्याचे कारण काय ते सांगितले.आता,सुखप्राप्ती व दु:खनिवृत्ती होण्याकरिता कर्मे करीत असलेल्या स्त्रीपुरुषांना दु:खरूप विपरीत फल प्राप्त होते म्हणून जे वर सांगितलेले आहे ते स्पष्ट करण्याच्या अभिप्रायाने ब्राहमण म्हणती की,---हे राजा,दैवाधिन असलेल्या,देहादिकांच्या योगाने आपणाला सुखप्राप्ती व दु:खनिवृत्ती होण्याच्या इच्छा करीत असणाऱ्या दैवहीन पुरुषाची वारंवार केलेली कर्मे निष्फलच होतात.आपण--जीवांनी सत्संगाद्वारे विवेक करून असे जाणून घ्यावे की,संसारात जे प्रयत्न करून सु:ख--दु:खे मिळतात,त्यास कारण आपलीच--जीवाचीच पूर्व-जन्मातील,त्यातील कांही कर्मे परिपक्व होऊन वर्तमान जन्मात प्रराब्धरूपाने भोगावयास आलेली आहेत,त्या कर्मांस प्रारब्ध कर्मे असे म्हणतात.आपण--जीवांनी ती कर्मे भोगूनच संपणार आहेत.त्यांना संपण्यास अन्य कोणतेही कारण नाही.||२९|| भावार्थ:---बरे,कदाचित कर्मेही जरी सफळ झाली तथापि त्यांच्या फलांचा उपयोग काहीच होत नाही.कारण,आध्यात्मिकादिक--आधिभौतिक व आधिदैविक दु:खांनी कधीही न सोडीलेल्या मरणधर्मयुक्त पुरुषाला दु:खाने संपादन केल्याने वित्तांनी व तन्निमित्तक विषयांनी कितीसे सुख दिले जाणार आहे?काहीच नाही.ते मिळणारे सुख क्षण-मात्र असून अपार दु:खरूप आहे,म्हणून त्या विषयांच्या सुखाचा त्याग केल्यानेच आपल्या--जीवाचे परमहित आहे.||३०|| भावार्थ:---आता,दु:खावाचून जरी प्रराब्धमुळे द्रव्य प्राप्त झाले तथापि त्या द्रव्यामुळेच दु:ख होत असते,करण द्रव्याने विषयांचेच सुख मिळत असते.कारण,अजीतेंद्रिय,द्रव्यलोभी,सर्वाविषयी शंकायुक्त आणि भयामुळे गाढ निद्रा न लागणारे अशा धनाढ्य पुरुषानाही भयादिक दु:खे प्राप्त होतात हे मी पाहात आहे.द्रव्याच्या पोटी अनेक--अनंत दुखे आहेत.म्हणून आपण द्रव्य हे विधीनुसारच प्राप्त करावे,पण निषिद्ध कर्मांपासून प्राप्त करू नये,विधीनुसार असो किंवा निषिद्धनुसार असो दोन्ही कर्मांचे फळे आपणासच--जीवासच भोगावयास येते.||३१|| भावार्थ:---भय प्राप्त होते ते असे की,---हे असुरश्रेष्ठा,आपणास--जीवांस वाचण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषांना राजा,चोर,शत्रू,स्वजन,पशु पक्षी,याचक,काळ यापासून व स्वत:पासूनहि म्हणजे स्थूल-शरीरापासून,सूक्ष्म शरीरापासून अज्ञानापासून,न कळण्यापासून भय नित्य प्राप्त होत असते.वास्तविक पाहता स्वत:चे स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर व अज्ञान--न कळने आपले स्वरूप नसून ते दुसऱ्यांचेच आहे--नाम--रूपांचेच आहे,तर आपले नाही.आपण--जीवात्मा परमात्म्याचेच आहोत,कारण आपण त्या परमात्म्याचेच प्रतिबंब आहोत.||३२|| भावार्थ:---म्हणून अनर्थाला कारण असल्यामुळे प्राण व द्रव्य ह्यांची इच्छा करू नये.असे सांगतो---हे दैत्याधिपति,शोक,मोह,भय,क्रोध, प्रीत,धैर्य,हानी,आणि श्रम इत्यादिक दु:खे ज्यांच्यामुळे पुरुषांना होतात त्या प्राण्यांची व त्या द्रव्याची इच्छा विवेकीपुरुषाने सोडून द्यावी.म्हणून आपण--जीवांनी द्रव्यांचा लोभ धारण न त्या द्रव्याचा त्यागच धारण करावा.त्यातच आपले--जीवांचे परम हित आहे.||३३|| भावार्थ:---आता ह्याप्रमाणे अनर्थाचा अनुभव घेणारेही कितीएक लोक विरक्त होत नाहीत व दैवाने प्राप्त होईल त्याच्यायोगाने संतुष्टही होत नाहीत,मग तुलाच कसे वैराग्य वगैरे प्राप्त झाले?असे म्हणशील तर---हे असुरश्रेष्ठा,ह्या लोकांमध्ये मधमाशी व अजगर हे दोघेजन आमचे श्रेष्ठ गुरु होत.कारण,त्यांच्या शिक्षिनें वैराग्य,व संतोष ह्याची आम्ही प्राप्ती करून घेतली आहे.म्हणून आपण--जीवांनी जग हे आपले गुरु आहेत,अशा प्रकारची धारणा करून इतरांकडून कांहीनाकांही तर गुण घेण्याचा प्रयत्न करावा.असा गुणग्रह्य दृष्टीकोन असेल तर आपल्या गुणांत वृद्धी होत असते,व त्यामुळे आपलेच हित होत असते.||३४|| भावार्थ:---हे दैत्याधिपती,अतिकष्ट करून जमविलेला मध जसा मधुमक्षिकांचा घात करून दुसराच घेवून जातो.ह्यास्तव हरण करितो त्याप्रमाणे "सर्वविषयापासून विरक्त राहावे" हे मी,मधुमाक्षिकेपासून शिकलो आहे.आपण--जीव याच माधुमक्षिकापासून सर्व-विषयांचा त्याग करावा असा बोध घेऊन सर्व विषयांचा प्रत्यक्ष कृतीरूपाने त्याग करावाच,तर फक्त कळून घेऊ नयेच. ||३५|| भावार्थ:---आणि अजगरापासून शिकलो आहे ते असे की,काहीएक खटपट न करिता दैवाने जे प्राप्त होईल त्याच्या योगाने अजगराप्रमाणे संतुष्ट राहतो आणि जरी काहीच प्राप्त झाले नाही तरीही मी त्या अजगराप्रमाणेच धैर्य करून पुष्कळ दिवसपर्यंत तसाच निजून राहतो.आपण--जीवांनी अजगराप्रमाणे दैवाने जे मिळेल त्यात संतुष्ट राहून जीवन जगावे,आणि परमार्थासाठी मात्र प्रयत्न करून सत्संगाद्वारे अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||३६|| भावार्थ:---आता शरीर पुष्ट असावयाचे कारण दर्शवित असता,यदृच्छालाभानेच झालेल्या संतोषाचे सविस्तर वर्णन करितो---हे प्रल्हादा,कधी पुष्कळ,कधी स्वादिष्ट,कधी स्वादरहित,कधी बहुगुणयुक्त,कधी गुणहीन,कधी श्रद्धापूर्वक समर्पण केलेले,कधी सन्मानरहित प्राप्त झालेले आणि कधी भोजनोत्तरही मिळालेले अन्न मी भक्षण करितो व त्याहूनही कधी दिवसा प्राप्त होवो,मी ते भक्षण करितो.म्हणजे आपण--जीवांनी प्रसंगानुसार अन्न मिळेल ते भक्षण करून उदार-निर्वाह करावा.ते अन्न साधारण असेल किंवा विशेष असेल किंवा सन्मानपूर्वक असेल किंवा अपमानपुर्वक असेल ते सर्व संतुष्ट चित्ताने भक्षण करावे,कारण अन्न हे प्रारब्धानुसार मिळत असते. ||३७-३८|| भावार्थ:---तसेच तागाचे वस्त्र,रेश्मीवस्त्र अजिन-पटकूर,वल्कल अथवा अन्यहि जे कांही प्राप्त होईल ते मी परिधान करितो.कारण,मी प्रारब्धाच्या फळाचा उपभोग घेणार संतुष्टचित्त आहे.आपण--जीवांनी तागाचे वस्त्र,रेश्मी वस्त्र,जुने--फाटके,वल्कल किंवा अन्य जे कांही प्रराब्धवशात जे मिळेल ते संतुष्ट-चित्ताने परिधान करावे.||३९|| भावार्थ:---त्याचप्रमाणे मी कधी भूमीवर,कधी तृणावर,कधी पानांवर,कधी पाषाणावर,कधी भस्मामध्ये व कधी दुसऱ्याच्या इच्छेने राजवाड्यातील छप्परपलंगावरती परांच्या गादीवरहि शयन करितो.आपण--जीवांनी प्रारब्धानुसार कधी भूमीवर,कधी तृणावर,कधी पानावर,कधी भस्मावर,कधी दुसऱ्याच्या इच्छेने राजवाड्यातील छापर-पलंगावरती परांच्या गादीवर करावे.म्हणजेच प्रांसगानुसार जीवन व्यतीत करावे. ||४०|| भावार्थ:---तसेच हे प्रभो,दुसऱ्याच्याच इच्छेने कधी स्नान करून,शरीराला उटी लावून व उत्तम वस्त्रे,मला आणि अलंकार धारण करून रथ,गज व अश्व यांवर आरूढ होऊन संचार करितो आणि कधी कधी तर नग्न होऊन पिशाचाप्रमाणे हिंडत असतो.आपण जीवांनी जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे जीवन व्यतीत करावे.||४१|| भावार्थ:---ह्याप्रमाणे वर्तणूक सांगून,आता मान अथवा अपमान करणाऱ्या पुरुषाविषयी मला वैषम्य नाही असे सांगतो---हे राजा,स्वभाव:तच विषम असलेल्या जनाची मी निंदा अथवा स्तुती मुळीच करीत नाही.परंतु,उलटी भगवान विष्णूचे ठिकाणी ह्यांना सायुज्यमुक्ती प्राप्त होवो अशी ह्यांच्या कल्यानाचीच इच्छा करितो.आपण--जीवांनी आपल्या अनुकूल किंवा प्रतिकूल असणाऱ्या जणांची स्तुती किंवा निंदा मुळीच करू नये,परंतु अनुकूल किंवा प्रतिकूल जे जन आहेत त्या उभयंताचे सायुज्य-मुक्ती प्राप्त होऊन त्यांचा महाकल्याण होवो अशीच भगवंताजवळ प्रार्थना करितो.||४२|| भावार्थ:---अशाप्रकारची स्थिती होण्यास उपाय असा की,---हे दैत्यश्रेष्ठा,सत्यदर्शी मुनीने प्रथमत: मनोवृत्तीचेठिकाणी जातीरुपादिक भेदांचे ऐक्य करावे.नंतर त्या मनोवृत्तीच ज्याचेठिकाणी देहात्मबुद्धी वगैरे,भ्रांती,भासते त्या मनामध्ये,त्या मनाचा सात्विक अहंकाराचे ठिकाणी त्या अहंकाराचा महत्वद्वारा मायेचेठिकाणी आणि त्या मायेचा आत्मानुभवाचेठिकाणी लय करावा;नंतर स्वानुभवाच्या योगाने स्वस्वरूपी स्थित होऊन व सर्व कर्माचा त्याग करून विराम पावावे.आपण--जीवांनी कार्यांचा कारणांत काय करीत जावे.अशे करीत--करीत जे उरते तोच भगवंत जाणावा.||४३-४४|| भावार्थ:---हे प्रल्हादा,ह्याप्रमाणे मंद दृष्टीने पाहू गेलो असता,लोक व शास्त्र ह्यांना विरुध्द असून अत्यंत गुह्य असे हे मी आपले वृत्त तुला कथन केले आहे.कारण,तू भागवन्निष्ठ आहेस.म्हणून आपण--जीवांनी भगवन्निष्ठ व्हावे म्हणजे फक्त भगवंतच सुखरूप आहे,तर अन्य कोणीच सुखरूप नाही,असा निश्चय करावा व त्यालाच शरण जावे.||४५|| भावार्थ:--- हे धर्मराजा,ह्याप्रमाणे दैत्याधिपती प्रल्हादाने मुनिपासून परमहंसधर्म श्रवण करून त्याची पूजा करून त्याचा निरोप घेतला आणि आनंदित होवून तेथून पुनरपि आपल्या गृहाप्रत गमन केले.आपण--जीवांनी ज्यांच्या मुखातून शास्त्र श्रवण केले,त्यांची आदराने पूजा,सन्मान व कृतज्ञपणा भाव नेहमीच असावा.||४६|| || ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक(७)सप्तमस्कंधामध्ये यातिधर्म निरुपणनामक हा(१३)तेरावा अध्याय(४६)शेचाळीस श्लोकांनी युक्त समाप्त झाला|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसद्गुरूचारणारविंदार्पणमस्तू||
____________________________________________________________________________________________ |१४-----(आता ह्या चवदाव्या अध्यायामध्ये,देशकालादिभेदाने विशेष श्रेयस्कर असा गृहस्थाश्रमसंबंधी उत्कृष्ट धर्म सांगितला आहे.||१४||) |१४--- गृहस्थांचे सदाचार ___________________________________________________________________________________________ भावार्थः---असो.गृहस्थाश्रमाचे धर्म सांगण्याचे सोडून देऊन मोक्षाला अंतरंग साधन असल्यामुळे प्रथमतः वानप्रस्थकर्म य यतिधर्म सांगितले असतां,गृहस्थाश्रमी पुरुषाला मोक्ष प्राप्त होणारच नाही की काय?अशा शंकेचे युधिष्ठीर प्रश्न करितो की,---हे देवर्षे,गृहामध्येच ज्याचे मन आसक्त झाले आहे माझ्यासारिखा गृहस्थ,ज्या प्रकाराने अनायासाने ह्या पदवीला पावतो तो प्रकार मला कथन कर.||१|| भावार्थः---नारद म्हणाला---हे धर्मराजा,गृहस्थाश्रमी पुरुषाने,गृहस्थाश्रमाला योग्य अशी कर्मे,साक्षात भगवान वासुदेवाचेठिकाणी अर्पण होतील अशा रीतीने करून महर्षीची सेवा करावी.म्हणून--जीवांनी गृहस्थाश्रमात असतांना आपल्या स्वसधर्मांचे पालन करून ती कर्मे भगवंतास निष्काम बुद्धीने अर्पण करावीत,त्याबरोबर अहंकारबुद्धीचा त्याग करावा.अशा बुद्धीने ग्राहस्थाश्रामाची जीवन व्यतीत करावे. ||२|| भावार्थः---तसेच त्याने भगवद्भक्त पुरुषांचा समागम करून आपल्या आवश्यक कर्मानुष्ठानाच्या कालाखेरीज राहिलेल्या काळामध्ये भगवंताच्या अवतारकथामृताचे वारंवार श्रद्धापूर्वक श्रवण करीत असावे.आपण आपल्या स्वधर्मांचे करावेच,त्याचबरोबर भगवंताच्या अवतारकथामृताचे वारंवार श्रद्धापूर्वक श्रवण करावे.||३|| भावार्थः---आणि झोपेतून उठलेला पुरुष जसा स्वप्नामध्ये दृष्टी पडलेल्या पुत्रादिकांविषयी आसक्ती सोडून देतो त्याप्रमाणे सत्संगाच्यायोगाने स्वतःच वियुक्त होत असलेल्या देहस्त्रीपुत्रादिकांचेठिकाणी असलेली आसक्ती हळूहळू सोडून द्यावी,कारण ते--स्त्री-पुरुष देहसंबंधी आहेत व आपण--जीव ब्रह्मसंबंधी आहे म्हणण्यापेक्षा ब्रह्मच आहे.||४|| भावार्थः---आतां दुर्जनांचा उपद्रव होऊं लागला असतां त्या गृहस्थाचया हातून गृहस्थाश्रमाला योग्य अशा क्रिया कशा होतील?असे म्हणशील तर ---हे राजा विवेकी पुरुषाने कार्यापुरताच देह व गृह ह्यांच्याशी संबंध ठेवावा आणि अंतर्द्रष्ट्या त्या गृहादिकांचेठिकाणी विरक्त असून बाह्यदृष्ट्या आपण त्यांचेठिकाणी आसक्त आहे असे दाखवून लोकांमध्ये आपले मनुष्यत्व चालवावे.आपण जीवानी कार्याकरण्यापुरतेच देह आणि ग्रह ह्यांच्यासी संबंध ठेवावा.आणि अंतर्दृष्ट्या देह व गृह याच्याशी विरक्तपणा असावा.||५|| भावार्थः---आणि ज्ञाती मातापितर,पुत्र,श्नाते,व इतर सुह्रज्जन जे जे भाषण करितील व ज्या ज्याविषयी इच्छा करितील त्याला त्याला,आपण कोनांशीहि ममतेने आग्रह न ठेविता अनुयोद्न द्यावे.आपण--जीवानी देह व देहसंबंधी ममतेने--मनातून भाषण करू नये तर स्थूल शरीराने म्हणजे दिखावूपनाने भाषण करावे.||६|| भावार्थः---आतां ह्याप्रमाणे सर्वांना अनुमोदन दिले असतां द्रव्यक्षय होण्याचा प्रसंग येईल व तसे झाले असतां,वाचणे तरी कसे होणार आणि आपल्याहातून कर्मे तरी कशी घडणार?अशी शंका घेशील तर हे राजा स्वर्गसंबंधी वृष्ट्यादिकांनी उत्पन्न होणारे धान्यवगैरे,भूमी संबंधी प्राप्त होणारे सुर्वणवगैरे व अकस्मात प्राप्त होणारे द्रव्यवगैरे ह्या प्रकारच्या तिन्ही द्रव्यांपिंकी जी द्रव्ये दैवाने प्राप्त झाली असतील त्या सर्वांचा उपभोग घेऊन,ज्ञानवान पुरुषाने पूर्वी सांगितलेली कर्मेवगैरे करावी.आपण--जीवानी प्रारब्धानुसार जे मिळेल त्याचाच भोग घ्यावा,तर प्रयत्न करून कर्मांचा भोग घेऊ नये.आपण--जीवानी संसारातील कर्मे अंत:करणपूर्वक न करिता स्थूल शरीराने--दिखावू कर्मे करावी.||७|| भावार्थः---(आतां जरी कदाचित दैवयोगाने पुष्कळ द्रव्य मिळाले तथापि त्याच्यावर अभिमान धारण करूं नये असे सांगतो)हे धर्मराजा,आपले पोट भरण्यास जितके अन्नादिक लागेल तितक्याच देहधारी पुरुषाचे स्वत्व आहे,त्यापेक्षा अधिकावर जो आसक्ति ठेवितो तो चोर होय,तो दंडास पात्र होतो.म्हणून आपण--जीवानी संसारात दैवानुसार जीवन जगावे,तर परमार्थात अंत:करणपूर्वक प्रयत्न करून कर्मे करावी,करण मनुष्य देहातच प्रयत्नपूर्वक परमार्थ करता येतो,तर इतर--चौऱ्याऐंसीयोनीत--देहात परमार्थ करता येत नाही. ||८|| भावार्थः---म्हणूनच स्वतःचे घर अथवा शेत ह्यांमध्ये प्रवेश करून जरी कोणी भक्षण केले तथापि त्यांचे निवारण करूं नये दर्शवितो हे राजा मृग,उंट,गर्दभ,वानर,मूषक,सर्प,पक्षी आणि मक्षिका ह्यांना आपल्या पुत्रासमान मानावे.कारण,वास्तविक पाहूं गेले असतां त्याच्यामध्ये व आपल्या पुत्रांमध्ये कितीसे अंतर आहे,अंतर कांहीच नाही,कारण सर्वांत परमात्माच अंतर्यामी रूपाने आहे.||९|| भावार्थः---असो.याचप्रमाणे गृहस्थाश्रमी पुरुषानेही अतिकष्टाने द्रव्यसंपादन करून धर्म अर्थ व काम ह्या त्रिवर्गांचे सेवन करूं नये.तर दैवाने जेवढे प्राप्त झाले असेल तेवढ्यानेच देशकालानुसार धर्मार्थकामांचे सेवन करावे.||१०|| भावार्थः---तशाच श्वान पतित आणि चांडाळापर्यंत सर्व प्राण्यांना आपल्या भोग्यवस्तू यथायोग्यरीतीने वांटून द्याव्या व जिच्याविषयी हि माझी आहे असा मनुष्यांना अभिमान झालेला असतो त्या आपल्या एका स्त्रीलाही अतिथीची शुश्रुषा करण्याकडे नेमावी.आपणाकडे जी मिळगत आहे,ती आपण स्वत:च्याच उपभोगासाठी व्यय न करिता श्वानादी जे प्राणी आहेत,त्यांनाही त्या संपत्तीतून भोगण्यास यथायोग्य वाट द्दावा.तसेच आपल्या कुंटूबातील इतर जे देहसंबंधी आहेत,त्यांनाही इतरांच्या सेवेत लावावे,कारण त्यामुळे आपणास "जनसेवा हीच ईश्वराची सेवा घडते."याप्रमाणे आपल्यात व्यापापणा दिसून येतो,प्रमात्माही व्यापक आहे,तसा आपल्यातील व्यापकपणा दिसून येतो.याप्रमाणे आपल्यात व्यापकपणा दिसून आल्यास व्यापक असलेल्या परमात्म्याशी आपण एकरूप होतोत.म्हणजेच व्यापक असलेल्या परमात्म्याशी आपण परमात्मारूप होतोत.यामुळे आपले जन्म--मरण निवृत्त होते.||११|| भावार्थः---असे केले असतां,ईश्वरही वश होतो(असे दर्शवितो)-हे राजा,जिच्या करीता लोक आपले प्राण देतात,पित्याच्या अथवा गुरूचा घात करण्यास मागे पुढे पाहत नाहीत,त्या स्त्रीचेठिकाणी असलेल्या स्वत्वाभिमानाचा ज्याने त्याग केला आहे,त्या पुरुषाने इतरांना अजिंक्य असाही परमेश्वर निःसंशय जिंकिला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.||१२|| भावार्थः---बरे तिचेठिकाणी असलेल्या स्वत्वाभिमानाचा त्याग कसा करितां येईल? असे म्हणशील तर "विचाराने" करावा असे सांगतो---हे राजा,कृमि,विष्ठा अथवा भस्म ह्यांचेठिकाणी ज्याचे शेवटी पर्यवसान होणार असे हे तुच्छ शरीर कोणीकडे?व त्या शरीराकरितांच जिच्यावर प्रेम असणार ती भार्या कोणीकडे?आणि आपल्या महिम्याने आकाशालाही आच्छादित करून टाकणारा हा परमात्मा कोणीकडे?म्हणून देह स्त्री इत्यादिकांचा अभिमान सोडून आत्मप्राप्तीचा प्रयत्न करावा.देह व देहसंबंधी यांची तुलना केली तर देह व देहसंबंधी दु:ख देणारे आहेत व परमात्मा हा सुख देणारा आहे.म्हणून परमात्म्याचे आहोत किंवा आपण--जीव अंत:करणाचा बाध म्हणजे अंत:करण भेट काळात नाही व भविष्य काळातही नाही व वर्तमान काळात फक्त भासणारे म्हणजे मिथ्या आहे,यास बाध निश्चय असे म्हणतात.अंत:करणाचा बाध निश्चय केल्यानंतर आपण--जीव परमात्माच आहोत.||१३|| भावार्थः---असो.दैवयोगाने प्राप्त झालेल्या व पंचमहायज्ञ होऊन अवशिष्ट राहिलेल्या अन्नादिकांनी उदरपूरण करून,शिल्लक राहिलेल्या अन्नावर स्वत्वाचा त्याग करणारा जो ज्ञानी पुरुष,तो निवृत्तीमार्गनिष्ठ अशा सत्पुरुषांच्या गतीला प्राप्त होतो.आपण--जीवानी उदार-निर्वाह झाल्यानंतर उरवीत जे कांही असेल ते इतरांना देणे आपण स्वधर्माच असतो.असे असेल;तर त्या वस्तुविषयी आपणास आसक्ती नाही असे दिसून येते.वस्तूविषयी आसक्ती नसणे हे परमात्म्याकडे जाण्याचे--एकरूप होण्याचे लक्षण आहे.||१४|| भावार्थः---आतां,हे वर सांगितलेलेच फिरून सविस्तर कथन करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की,---पूर्वी सांगितलेल्या व्यंजनादि--वृत्तीने प्राप्त झालेल्या द्रव्याच्या योगेकरून,गृहस्थाश्रमी पुरुषाने,प्रत्यहि हे धर्मराजा,देव,ऋषी,मनुष्ये,भुते,आणि पितर ह्या पंचमहायज्ञाच्या देवतांचे व स्वत: आपले अंतर्यामी परमात्म्याचे आराधन--उपासना करावी.||१५|| भावार्थ:---आणि जेव्हा अधिकारादिक सर्व यज्ञ संपत्ती आपणाजवळ असतील तेव्हा यज्ञप्रतीपादक ग्रंथोक्तविधीने अग्निहोत्रादिक करून पुरुषाचे आराधन करावे.||१६|| भावार्थ:---परंतु यज्ञासाठी अतिशय आग्रह धरू नये.हे राजा ब्राह्माणाच्या मुखामध्ये अर्पण केलेल्या अन्नादिकांची जशी ह्या सर्व यज्ञभोक्ता भगवंताची पूजा होते तशी अग्निरूप मुखामध्ये समर्पण केलेल्या होमद्रव्याने होत नाही.आपण--जीवांनी अग्नीच्या मुखामध्ये होमद्रव्य अर्पण करण्यापेक्षा ब्राह्मणांच्या म्हणजे ब्रह्मास जो जाणणारा--अनुभव घेणारा जो पुरुष आहे,त्या ब्राह्मणाच्या मुखामध्ये अन्नादिक अर्पण करावे म्हणजेच इच्छित भोजनाने तृप्त करावे,असे केल्यास तीच भगवंताची पूजा होते,तीच भगवंताची सेवा होते.तीच सेवा निष्काम भक्तीने भगवंतास अर्पण करावी.त्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन आपल्यावर--जीवासावर कृपा करितो.||१७|| भावार्थ:---तस्मात,ब्राहमण,पंचमहायज्ञ,देवता,मनुष्य,आणि अश्वादिक ह्यांचेठिकाणी त्यांना इष्ट असलेल्या विषयांनी ह्या अंतर्यामी परमात्म्यानेच तू यथाशक्ती पूजन करीत जा व त्यामध्येही ब्राह्माणानंतर इतरांचे पूजन करण्याचा क्रम ठेव.||१८|| भावार्थ:---द्रव्यवान,द्विजाने,स्ववित्तानुसार भाद्रपद मासामध्ये मातापितरांचे व त्यांच्या कृष्णपक्षसंबंधी महालयनामक श्राद्ध करावे.||१९|| भावार्थ:---त्याचप्रमाणे आयन,वियुव,व्यतीपात,दिनक्षय,चंद्रग्रहण,सूर्यग्रहण,व्दादशी,श्रवनादी तीन नक्षत्रे,वैशाखशुक्लतृतीय,कार्तिकशुक्ल, नवमी,हेमंतऋतू व शाशिरऋतू ह्यातील चार अष्टका,माघशुक्ल,सप्तमी,माघ आणि संपूर्ण चंद्राने युक्त अशी पूर्णिमा ह्यांचा योग आला असता,तसेच,मांसनावे पडणारी चित्र,विशाखा व जेष्ठा,इत्यादी नक्षत्राचा आणि पूर्ण चंद्र अथवा न्यून चंद्र ह्यांनी युक्त असलेल्या पौर्णिमेचा योग आला असता अनुराधा,श्रावण उत्तर,उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदा ह्यातील कोणतेही नक्षत्र द्वादशीला आले असता व ह्या तीन नक्षत्राचा एकादशीच्या दिवशी योग आला असता आणि जन्मनक्षत्र,अथवा श्रवण ह्यांचा दिवसास योग आला असता,गृहस्थाश्रमी पुरुषाने पित्रादिकांचे श्राद्ध करावे.||२०-२१-२२-२३|| भावार्थ:---आता हे काल केवळ श्राद्धाचेच आहेत असे नव्हे तर संपूर्ण धर्म आचरण,करण्यासही हे काल उक्त आहेत असे सांगतो---हे धर्मराजा,ते पूर्वोक्त सर्वकाळ पुण्याकार्क कर्माचे अनुष्ठान करण्यास योग्य आहेत कारण,ते स्वत: श्रेयोवर्धक आहेत म्हणून ह्यांचेठीकानी पुरुषाने,सर्व प्रयत्नाने,स्नानदानादिक पुण्यकर्मे केली असता तेच त्याच्या आयुष्याचे साफल्य होय.||२४|| भावार्थ:---हे राजा,ह्यांचे ठिकाणी स्नान,जप,होम,व्रत,देवद्विजपूजन केले असता अथवा पितर,देव,नर,आणि भुते ह्यांना,काही अर्पण केले असता ते कर्म,अक्षय फळ देणारे होते.||२५|| भावार्थ:---हे राजा,त्याचप्रमाणे भार्येच्या पुंसवनादिक संस्कारांचा,अपत्यांच्या जातकादिक संस्कारांचा तसाच आपल्या यज्ञदिक्षादिक संस्कारांचा काळ दह्नादी प्रेत्क्रिया,सांवत्सारिक श्राध्द आणि अभूद्याकरिता केलेले इतरही कर्म उत्तमप्रकारे करून पुण्य संपादन करावे.||२६|| भावार्थ:---हे राजा,आता तुला धर्मादी श्रेयस्कर देश कथन करितो,ते असे की,---ज्यांचेठीकानी हे संपूर्ण चराचर विश्व रचलेले आहे त्या भगवंताची केवळ मूर्तीच असे सत्पात्र जेथे प्राप्त होईल तो देश अत्यंत पुण्याकारक होय म्हणून आपण--जीवांनी जेथे भगवंताच्या मूर्तीचे मंदिरे आहेत,तो देश पवित्र समजावा,करण त्या देशात साडू--संत--महात्मा यांचे निवास्थान असते,त्या मंदिरात साधू--संत--महात्मा अनुष्ठान करीत असतो,त्या मंदिरात संत--महात्मा भगवंताच्या नावांचे स्मरण,लीलांचे कीर्तन व भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करीत असतो,म्हणून भगवंताच्या मूर्तीचे मंदिरे सत्पात्र आहेत,आपण त्याठिकाणी निवास करावा,म्हणजे आपणही पवित्र होतोत.त्याचप्रमाणे,तप विद्या आणि दया ह्यांनी युक्त ब्राहमणाचे कुल जेथे वास करीत असेल तोही देश पुण्याकारक जाणावा.जेथे ब्रह्मास--निर्गुण--निराकाराचा ज्यांना अनु भाव व ते ज्या देशात राहतात,तो देश सत्पात्र आहे,त्या देशात आपण निवास करावा,म्हणजे आपण--जीव पवित्र होतो.||२७-२८|| भावार्थ:---तसेच श्रीहरीचे आराधन होत असते तो देश पुण्यकर्माचे स्थान होय,त्याचाप्रमाणे हरीची उपासना--भक्ती केली जाते,तोहो देश सत्पात्र आहे.त्याचप्रमाणे पुराणामध्ये प्रख्यात असलेल्या गंगादिनद्या जेथे आहेत,पुष्करादि सरोवरे,उत्तमलोकांनी आश्रय केलेली क्षेत्रे,गाय,प्रयाग,पुलहाश्रम,नैमिषारण्य,फाल्गुनक्षेत्र,सेतू,प्रभास,द्वारका,वाराणशी,मथुरा,पंपासरोवर,नंदा,सीता व राम ह्यांचे आश्रमवगैरे, महेंद्र व मलय इत्यादी सर्व कुलपर्वत आणि ज्याच्याठीकानी श्रीहरीच्या स्थिरमूर्ति आहेत ते देश,हि सर्व,हे राजा,पुण्याकारक स्थाने होत.तस्मात,कल्याणेच्छू पुरुषाने वारंवार ह्या स्थानाचे सेवन करावे,म्हणजे त्याठिकाणी आपण--जीवांनी निवास करावा.कारण,ह्या ठिकाणी पुरुषांनी केलेला धर्म,सहस्त्रपटीने अधिक फळ देणारा असतो.||२९-३०-३१-३२-३३|| भावार्थः---(आतां पात्र कथन करितो---)हे भूपते,पात्र जाणणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा विद्वान लोकांनी एक श्रीहरीरूपच पात्र ह्या लोकामध्ये सांगितले आहे.कारण,हे संपूर्ण चराचर विश्व तन्मय--भगवंतच आहे.सर्वत्र चराचरात भगवंतच आहे.जसे दागिन्यात सर्वत्र सोनेच आहे,तसे जगात सर्वत्र भगवंतच आहे.असा भाव ठेऊन आपण अभेद भक्ती करावी,करण अशी भक्ती केली असता आपणास--जीवास मोक्षच प्राप्त होतो.||३४|| भावार्थः---ह्या विषयी प्रत्यक्ष अनुभव असा की,---हे राज,देव,ऋषी,सिध्द आणि सनकादि ब्रह्मपुत्रवगैरे असतांही तुझ्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेविषयी भगवान अच्युतच सत्पात्र म्हणून संमत झाला आहे.म्हणून आपण--जीवानी सर्वांपेक्षा भगवंतच सत्पात्र श्रेष्ठ आहेत,म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजेच वेदानुसार--वेदांत शात्रानुसार भगवंतच श्रेष्ठ आहेत असा भाव निश्चित करून त्यानुसारच निष्काम भक्ती करावी. ||३५|| भावार्थः---कारण,जीवसमुदायांनी व्याप्त असलेला ब्रह्मांडकोशरूप जो वृक्ष त्याचे मूळकारण अच्युतच आहे ह्यास्तव त्याची पूजा केली असतां सर्व जीवांची व आत्म्याची तृप्ति केल्यासारखी होते.जसे वृक्षाच्या मुळास पाणी घातले असता सर्व वृक्षास पाणी पोहंचे,त्याप्रमाणे भगवंत सर्वांचा अंतर्यामी आहे,असा भाव ठेऊन सर्व प्राणिंमात्र भगवंतच आहे असा भाव धारण करून सर्व प्राणिंमात्रांची सेवा म्हणजेच भगवंताची सेवा आहे असा भाव ठेऊन दु:खित जीवांची दु:ख निवारण करणे म्हणजे भगवंताचीच सेवा आहे.अशा सेवेने भगवंत संतुष्ट होऊन आपल्यावर कृपा करितो.||३६|| भावार्थः---हे राजा,नर पशु,पक्षी,ऋषी व देवता हि पुरे (शरीरे)ह्याने उत्पन्न केली आहेत व ह्या सर्व पुरांमध्ये अंतर्यामीरूपाने आणि प्रत्यंगशाने हा स्वतः वास करितो,म्हणून हा पुरुष ह्या नावाने प्रसिद्ध आहे.||३७|| भावार्थः---असो.हे राजा,त्या मनुष्यादिक शरीरांमध्ये भगवान तारतम्याने म्हणजे पशुपक्ष्यादी शरीरांकडे पुरुष शरीराचेठिकाणी अधिक अंशाने राहतो,ह्यामुळे पुरुष हे पात्र होय व त्यांतूनहि ज्याचे ज्याचेठिकाणी जसा जसा तपश्चर्यादि योगाने ज्ञानांश अधिक अधिक अनुभवास येतो तसा तसा तो तो पुरुष अधिक अधिक सत्पात्र आहे असे समजावे.असा आपण--जीवांनी तारतम्याने विवेक करून सत्पात्र निश्चित करून त्याप्रमाणे सेवा करावी. ||३८|| भावार्थः---तर मग प्रतिमांदिकांचेठिकाणी लोक श्रीहरीचे पूजन कशाकरितां करितात?असे म्हणशील तर---हे राजा,त्रेतायुगादि युगांमध्ये त्या मनुष्यादिकांना एकमेकांचा अवमान करण्याची बुद्धी उत्पन्न झाली असे पाहून,विद्वान लोकांनी पूजेकरीता श्रीहरीची प्रतिमा कल्पिली आहे.वास्तविक पाहता प्रेत्येक जीवमात्रेत भगवंतच आहे,असेही असले तरी कालपरत्वे जीवा--जीवांत अवमान करण्याची बुद्धि उत्पन्न झाली,परिणाम भेद अधिक वाढला,म्हणून द्वेष अधिक वाढला,म्हणून विद्वान लोकांनी पूजेकरिता श्रीहरीची प्रतिमा यांची निर्मिती केली.लोंकाचा देवाच्या प्रतीमिविषयी द्वेष भाव न होता आदर भाव निर्माण झाला.त्यामुळे भगवंताची मूर्ती हीच पूजा प्रचली झाली.असे असले तरी ज्या जीवांना इतर जीवांविषयी आदर आहे,त्यांनी सर्वत्र भगवंत असा भाव ठेऊन इतर जीवांचे दु:ख निवृत्त करून,त्याना सुख देण्याचाच प्रयत्न करावा.असे केले असता मूर्तीपूजापेक्षा सर्वत्र भगवंत आहे अशी भावना करून जीवांची भक्ती केलेली श्रेष्ठ असते.म्हणून जीवांनी आपापल्या अधिकारानुसार भक्ती करावी.||३९|| भावार्थः---तेव्हांपासून कांही लोक प्रतिमेवर चांगली श्रद्धा ठेवून चांगल्या प्रकारच्या पूजासामग्रीने श्रीहरीची उपासना करितात,तथापि पुरुषद्वेषी लोकांनी प्रतिमेची पूजा केली असतांही त्यांना ती पुरुषार्थ देणारी होत नाही व पुरुषांविषयी द्वेषभाव सोडून देऊन तिचे अर्चन केले असतां मंदाधिकारी पुरुषांनाही ती पुरुषार्थ देणारी होते.थोडक्यात मूर्तीची पुजापेक्षा जीवांची भक्ती अधिक श्रेष्ठ असते,म्हणून "जन सेवा हीच ईश्वर सेवा" हीच श्रेष्ठ सेवा--भक्ती करावी.||४०|| भावार्थः---आतां पुरुषांचेठिकाणी जाति व तप इत्यादिकांच्या योगाने असलेला विशेष भेद सांगतो---हे राजेंद्रा,पुरुषामध्येही जो तप,विद्या आणि संतोष ह्यांच्या योगाने श्रीहरीची वेदरूप तनु धारण करितो तो ब्राह्मणच--जे वेदांतशास्त्राचे जाणते असून जे परमात्मा अनुभव आहेत असे ब्राह्मण सत्पात्र आहे असे तत्त्ववेत्ते म्हणतात.||४१|| भावार्थः---कारण,हे राजा,आपल्या चरणरजाने त्रैलोक्य पवित्र करणारे ब्राह्मण म्हणजे ज्यांनी वेदांतशास्त्राचा अभ्यास करून व सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घेतला आहे,त्यासखरोखर ह्या जगदात्म्या श्रीकृष्णाचेही मोठे दैवत आहेत.मग आम्हांसारिख्याचे दैवत आहेत हे काय सांगावे!||४२|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(७)सप्तमस्कंधापैकी युधिष्ठीरनारदसंवादसंबंधी सदाचारनिर्णयनामक हा(१४)चौदावा अध्याय(४२)श्लोकांनी युक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णाअर्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणाअर्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ |१५-----आतां ह्या पंधराव्या अध्ययामध्ये सर्ववर्णांच्या व आश्रमाच्या मर्यादा दाखविणारे मोक्षधर्मांचे लक्षण संक्षेपाने संग्रह करून वर्णन केलें आहे.||१५|| १५----- गृहस्थासाठी मोक्षधार्मांचे वर्णन ____________________________________________________________________________________________ भावार्थः---आतां,सर्व मोक्षधर्मांचा संग्रह करण्या करितां ह्या अध्यायाचा प्रारंभ असून त्यामध्ये प्रथमतः श्राद्धसंबंधी कांही विशेष कथन करण्याच्या अभिप्रायाने)नारद भाषण करितो की,----हे राजा,किती एक ब्राह्मण कर्मनिष्ठ असतात,कांही तपोनिष्ठ असतात कांही वेदाध्ययन करण्याविषयी तत्पर,कांही अध्यापणाविषयी तत्पर,कांही ज्ञानाभ्यासाविषयी तत्पर असून काही योगाभ्यासाविषयी तत्पर असतात.||१|| भावार्थः---त्यांमध्ये मोक्षरूप फळ प्राप्त होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाने,पितरांच्या उद्देशेकरून देण्यास योग्य जे काव्य द्रव्य अन्न आणि देवांच्या उद्देशाने देण्यास योग्य जे हव्य अन्न ते ज्ञाननिष्ठ ब्राह्मणाला द्यावे,त्याच्या अभावी योग्यतानुरूप इतरांसही द्यावे.||२|| भावार्थः---त्यांतदेवस्थानी दोन ब्राह्मण आणि पितृस्थानी तीन ब्राह्मण बसवून अथवा दोहोठीकानीही एकेक ब्राह्मण बसवून त्यांस भोजन घालावे.अधिक ब्राह्मण सांगण्यास यजमान जरी समर्थ असला तथापि त्याचे श्राद्धाचेठिकाणी ब्राह्मणाचा विस्तार करुं नये.||३|| भावार्थः---आतां,विस्तारावा जो निषेध केला त्याची प्राप्ती कोठून आली होती,असे म्हणशील तर----हे राजा,स्वजनांस जर बोलवावा तर त्याच्या पित्रादिकांना कसे वर्ज्य करावे?ह्याप्रमाणे स्वजनास निमंत्रण केले असतां विस्तार होऊन देश,काल तदनुकुल श्रद्धा अन्नादिव्य,पात्र आणि पूजन हि बरोबर होत नाहीत म्हणून विस्तार करूं नये.||४|| भावार्थः---आपण--जीवांनी तर देश आणि काल हे प्राप्त झाले असतां मुनींनी सेवन करण्यास योग्य असे व्रीह्यादि अन्न श्रीहरिला समर्पण करून श्रद्धापूर्वक यथाविधी सत्पात्र ब्राह्मणांना अर्पण केले असतां ते मोक्षप्रद आणि मनोरथ पूर्ण करणारे होते.||५|| भावार्थः---असो.हे राजा,देव,ऋषी,पितर,भुते स्वतः आपण आणि स्वजन ह्यांना उत्तमप्रकारेकरून अन्न वांटून द्यावे व ते सर्व देवकीद--ईश्वरस्वरूपी आहेत असे समजावे,कारण ते सर्व भगवंताचीच आहेत,तर तर देहसंबंधीची नाहीत.असा भाव धारन करून सर्वांना अन्न किंवा इतर गरज असणाऱ्या वस्तूचे वाटप करावे,कारण ते सर्व भगवंताचीच आहेत.||६|| भावार्थः---हे राजा,धर्मतत्त्व जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धामध्ये मांस अर्पण करुं नये व आपणही भक्षण करूं नये.कारण,मुनींनी सेवन करण्यास योग्य अशा व्रीह्यादी अन्नांनी जसे पितर सर्वोत्कृष्ट रीतीने तृप्त होतात तसे पशु हिंसेने होत नाहीत.म्हणून आपण--जीवांनी पितरांना किंवा इतर कोणत्याही जीवांस मांस अन्न म्हणून देऊ नये,करण मांस देणे हा अधर्म आहे.मनुष्याचे मांस हे अन्नच नाही,कारण जे प्राणी ओठाने पाणी पितात ते प्राणी शाकाहारी आहेत उदा--ओठाने पाणी पिणारे प्राणी--मानव--मनुष्य,गाय,घोडा,गाढव,शेळी--मेंढी इत्यादी.यात आपण उदाहरण म्हणून तुलनात्मक गाय व मनुष्याचे घेउत.यात गाईस कितीही भूक लागली तरी ती गाय मांस न खाता उपाशी राहील पण मांस खाणार नाही.मनुष्यास भूक न लागली तरी मांस सेवन आग्रहाने करतोच.म्हणजेच मनुष्यास अधिक बुद्धीचा सदोपयोग न करता तो रजोपयोग किंवा तामोपयोग करतो.पूर्व-जन्मातील संस्कारानुसार उपयोग करितो.म्हणून आपण जीवानी सत्संग केला असता पश्चाताप होतो,व त्यांचा आदर्श घेऊन आपण--जीव सात्विक संस्कारानुसार आचरण करण्याची शक्यता अधिक असते व त्यानुसार आचरण करून शाकाहारीच आहाराचा स्वीकार करतो.जे प्राणी जीभीने पाणी चाटून पितात ते प्राणी मांसाहारी आहेत.उदा--वाघ,कावळा,कुत्रा,मांजर,सिंह इत्यादी.त्यांचा नैसर्गिक आहार हा मांसच आहे,त्यानुसार आहार सेवन करतो.यावरून पशूची चूक नसून मनुष्याचीच चूक आहे,म्हणून ज्याची चूक आहे,त्या जीवानीच चूक दुरुस्ती करावी.म्हणून मानवासाठीच सत्संग आहे,तर पशुसाठी सत्संग नाही.असा विवेक मनुष्याने करून जीवन व्यतीत करावे.||७||
भावार्थः---हे राजा,सद्धर्मेच्छु पुरुषांनी कायावाचामनेकरून होत असलेल्या भूतहिंसेचा जो त्याग करणारे ह्यासारख्या दुसरा कोणताही सर्वोत्कृष्ट धर्म नाही.म्हणून आपण--जीवांनी सर्वोत्कृष्ट धर्म घडण्यासाठी भूतअहिंसेच्याच धर्मांचेच पालन करावे,तर भूतहिंसेचा त्याग करावा.असे कळण्यासाठी सत्संगच करावा,तर दु:संगाचा त्याग करावा.||८|| भावार्थ:---म्हणूनच यज्ञवेत्यामध्ये श्रेष्ठ असे कितीएक निष्काम ज्ञानी पुरुष,आत्मज्ञानाने प्रदीप्त झालेल्या मनोनिग्रह अग्नीचेठिकाणी कर्ममय यज्ञाचे हवन करितात म्हणजे मनोनिग्रह करून त्याला विघ्नकारक होत असलेल्या ब्राह्यकर्माचा त्याग करितात.||९|| भावार्थ:---कारण,सर्वही प्राणी,पशुपुरोडाशादिक द्रव्यांनी यज्ञ करणाऱ्या पुरुषाला पाहून,आत्मतत्व न जाणणारा,आपल्या प्राणांची तृप्ती व निर्दय असा हा पुरुष,माझा घात करील असे मानून भीत असतात.||१०|| भावार्थ:---तस्मात दैवाने प्राप्त झालेल्या सात्विक अन्नाचेठीकानी धर्मवेत्या पुरुषाने,प्रतिदिवशी संतोषपूर्वक नित्यनैमित्यिक कर्मे करावी.म्हणून आपण जीवानी नैमित्यिक जो प्राणीहिंसेनेयुक्त यज्ञाचा त्याग करून नित्यनैमित्यिक निष्काम कर्मे करावीत,कारण त्यात पशूची हिंसा होत नाही.पशूची हिंसा करणे निषिद्ध कर्म आहे,म्हणून निषिद्ध कर्मांचा त्याग करावा.||११|| भावार्थ:---तसेच विधर्म,परधर्म,आभास,उपमा आणि छल ह्या पाच अधर्मसंबंधी पोटभेदांचा धर्मवेत्या धार्मिक पुरुषाने त्याग करावा.||१२|| भावार्थ:---ह्या पाचांचा अर्थ असा की,---"धर्मबुद्धीने ज्यांचे अनुष्ठान करू लागले असता स्वधर्माला बाध येतो तो १---"विधर्म" होय;"आपण- जीवांनी धर्मापेक्षा स्वधर्म महत्वाचा असतो,म्हणून स्वधर्मांचा स्वीकार करून विधर्मांचा त्याग करावा.त्यातच आपले--जीवांचे हित आहे." एका वर्णाला विहित असलेला धर्म दुसऱ्या वर्णाने स्वीकारणे हा २---"परधर्म होय;" आपण--जीवांनी आपला जो वर्ण आहे,त्या वर्णानुसार आचरण करावे व दुसऱ्या वर्णाचा धर्म आपण न स्वीकारिता त्याचा त्याग करावा,कारण आपल्या वर्णाचा जो स्वधर्म आहे,त्यानुसार आचरण करणे,यातच आपले हित आहे. "वेदविरुद्ध आगमामध्ये कथन केलेला जो पाखंडधर्म अथवा दंभ हा ४---"उपधर्म" म्हणजे "उपमा" होय," आपण--जीवांनी पाखंड जो धर्म आहे,तो वेदविरुद्ध आहे,जो वेदविरुद्ध धर्म आहे,तो नास्तिक असतो,म्हणून नास्तिक न होता आस्तिक असावे,म्हणून आपण पाखंड धर्मांचा आवश्यक त्यागाच करावा,कारण त्यात महाअनर्थक आहे,म्हणून पाखंड मताचा त्यागाच करावा.जो पाखंडी आहे,त्याची सावलीही आपल्या शरीरावर पडू देऊ नका."शब्दाचा भलताच अर्थ करणे हा "छळ" होय" म्हणून आपण स्वत:च्या मनाने शब्दाचा अर्थ लावू नये,कारण मनाने शब्दाचा अर्थ भलताच म्हणजे अयथार्थ लागत असतो.तर सदगुरुंच्या मुखातून शब्दाचा अर्थ--भावार्थ श्रवण करून यथार्थ लागत असतो.आणि "चारही आश्रमाहून निराळाच अवधुतादिकांचाआचाररूप जो अधर्म,पुरुषांनी स्वच्छेने स्वीकारलेला असतो तो "आभास" होय.अधर्म म्हणजे मनाला वाटेल त्याप्रमाणे--विहित-कर्म असो किंवा निषिद्ध कर्म असो,त्यानुसार आचरण करणे त्यास ५---"आभास होय."असो हे पांचप्रकारचेही--१-- अधर्म वर्ज्य करावे." म्हणून आपण--जीवानी विधर्म,परधर्म,आभास,उपमा,आणि छळ या पांच अधर्माचा त्याग करावा,करण यामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप होते.पापाचे फळ दु:ख आहे.ते आपणास भोगावयास येते.म्हणून यांचा आपण--जीवांनी त्याग करावा. ||१३|| भावार्थ:---आता स्वधर्मानुष्ठानंतर धर्मवृद्धीकरीताही परधर्माचे अनुष्ठान करू नये.कारण,त्यांच्या काही उपयोग नाही अशा आशयाने नारद भाषण करितो की,---हे धर्मराज,ब्राह्मणादि स्वभावाचे सांगितलेला जो वेदाध्ययनादिक धर्म तो कोणाच्या बरे दु:खनाशाविषयी समर्थ होणार नाही ? सर्वांच्याहि होईल.म्हणून आपण जीवांनी ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य.शुद्र असे जे वर्ण आहेत,ज्यांनी--त्यांनी आपापल्या वर्णानानुसार स्वाभाविक जे कर्म आहे,त्यानुसार आचरण करावयास पाहिजे,असे केले असता सर्वांच्या गरजा भागवून सर्वांना सुख प्राप्त होते.||१४|| भावार्थ:---त्याचप्रमाणे धनहीन पुरुषाने धर्मार्थ अथवा देह्धारणार्थ द्रव्याची इच्छा करु नये.कारण,अजगराप्रमाणे काहीएक खटपट न करणाऱ्या पुरुषाला त्याचे प्रारब्धाच चरितार्थ चालविणारे होते.जन्मताच प्रत्येकजण ज्याचे--त्याचे प्रारब्ध कर्म बरोबर घेऊन आलेला आहे,त्यानुसार ज्याला-त्याला तो-तो भोग मिळतच असतो.म्हणून आपण--जीवानी विहित कर्म करावे व निषिद्ध कर्म करू नये.||१५|| भावार्थ:---तस्मात,संतुस्ट,निरिच्छ व स्वस्वरूपी रममाण होणाऱ्या पुरुषाला जे सुख होते ते विषयलोभामुळे अर्थाच्या इच्छेने दशदिशाकडे धावणाऱ्या पुरुषाला कोठून प्राप्त होणार?व्हाव्याचाच नाही.म्हणून आपण--जीवानी विधीनुसार विहित कर्म करावे व निषिद्ध कर्म करू नये.सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून स्वस्वरुअपतच रममाण असावी व विषयांच्या मागे ण धावता ,विषयांचा त्याग करावा.||१६|| भावार्थ:---जसे पायामध्ये जोडा असलेल्या पुरुषाला खडे व काटे इत्यादिकापासून दु:ख न होता सुख होते त्याप्रमाणे सर्वदा संतुष्टचित्त असलेल्या पुरुषाला सर्व दिशा सममय होतात.आपण--जीवानी विहित कर्म करून म्हणजे आपले कर्तव्य कर्म करावे व जे मिळेल त्यात सदासंतुष्ट असावे,करण आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जे मिळाले आहे,ते मिळालेच आहे.एक मात्र विवेकपूर्व आपण--जीवानी लक्षात ठेवावे की,प्रयत्न करून जे मिळेल त्यात संतुष्ट असावे,तर "प्रयत्न न करता मिळेल त्यात संतुष्ट असावे यास प्रारब्ध म्हणता येत नाही,तर यास "आळस" असे म्हणतात.आळस म्हणजे यास प्रारब्ध असे म्हणू नये." "म्हणून आपण विधीनुसार प्रयत्न करून जे मिळेल त्यास "प्रारब्ध" असे म्हणावे" व त्यानुसार जीवन व्यतीत करावे.||१७|| भावार्थ:---यास्तव हे राजा,उदकमात्रेकरुनहि जनांने संतुष्ठ का न राहावे?हे मला समजत नाही.आता संतोष नसण्यामध्ये मोठा दोष काय बरे आहे?अशी शंका घेशील तर---हे राजा,उपस्थेन्द्रियजन्य व रसनेन्द्रियजन्य सुखाविषयी लंपट--आसक्त असलेला पुरुष,कुत्र्या --प्रमाणे दुसऱ्याच्या मर्जीमार्फत आचरण करू लागतो.म्हणजेच दुसऱ्याच्या--विषयांच्या अधीन होऊन जीवन जगतो.जो दुसऱ्याच्या--विषयांच्या अधीन होऊन जीवन जगतो,तो दु:खरूप असतो,म्हणून आपण दुसऱ्यांच्या--विषयांच्या अधीन जीवन न जगता स्वतंत्र जीवन जगावे,कारण स्वतंत्र जीवन जगणारा सुखी असतो,तर "स्वस्वरूपात" रममाण असलेला "सुखरूप" असतो.म्हणून आपण-- जीवांनी विषयांच्या अधीन होऊन जीवन जगू नका,कारण हे अधिन जीवन म्हणजेच दु:खरूप आहे,स्वतंत्र जीवन हे सुखी आहे,म्हणजे तात्पुरते सुखी आहे,स्वत्रंत होऊन जीवन जगू नका,तर स्वस्वरूपात जीवन जगणारा सुखरुपच आहे,हेच आपले यथार्थ जीवन आहे.यामुळे आपले जन्म--मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होते.||१८|| भावार्थ:---तसेच असंतुष्ट असलेल्या ब्राहमणाचे तेज 'वेदाध्यायनादिकापासून'झालेला प्रभाव''विद्या शास्त्रापासून झालेले ज्ञान'तप 'व्रतोपवासादिकांपासून झालेले पुण्य' व सत्कीर्ती हि सर्व इंद्रियांच्या विषयासक्तीमुळे क्षीण होवून जातात आणि विवेकही नाहीसा होतो.म्हणून आपण--जीवानी विषयांच्या आसक्तीत जीवन जगू नका,कारण त्यामुळे शक्तीत क्षणता येते व विवेक नाहीसा होतो.विवेकहीन जीवन दु:खमय असते.म्हणून आपण जीवानी विषयांचा भोग घेण्याऐवजी विषयांचा त्याग करावा.आपण विहित कर्म जर सकाम केले तर,त्याचा हेतू विषयच आहेत म्हणून तेही जीवन दु:खमयच आहे.||१९|| भावार्थ:---पुरुषाच्या अन्नजलविषयक इच्छेची शांति,क्षुधा व तृषा ह्यांची निवृत्ती झाली म्हणजे होते व क्रोधाचीही शांति,त्याचे फळ जे हिंसादिक त्याची प्राप्ती झाली म्हणजे होते परंतु,लोभाची शांति,दिशा जिंकून आणि पृथ्वीचा उपभोग घेऊनसुद्धा होत नाही.म्हणून आपण--जीवांनी जडाविषंयी--धनाविषयी--मानप्रतीष्ठाविषयी लोभ नसावा,कारण तो दु:खास कारण आहे,त्याचा त्याग हा सुखासच करण आहे.||२०|| भावार्थ:---जे राजा,लौकिक न्याय व वैदिक न्याय जाणणारे,दुसऱ्यांच्या संशयाची निवृत्ती करणारे व सभांचे अधिपती असेही किती एक पंडित,असंतोषामुळे नरकामध्ये पडतात.म्हणून आपण--जीवांनी फक्त पंडित न होता महात्मा व्हावे,कारण पंडित हा शास्त्राचा जाणकार असतो,पण विषयांचा त्यागी नसून विषयांचा भोगी असतो.म्हणून तो लोभी असल्यामुळे असंतुष्ट असतो म्हणून दु:खी असतो.त्यामुळे तो मृत्यू पावल्यानंतर नरकास जाऊन दु:ख भोगितो.म्हणून आपण--जीवांनी फक्त पंडित न होता,महात्मा व्हावे.महात्मा संतुष्ट असतो,जो संतुष्ट असतो,तो सुखरूप असतो.||२१|| भावार्थ:---आता कामादिकांचा जय कसा करावा हे सांगतो---हे राजा,संकल्पाचा त्याग करून कामाचा(इच्छेचा)जय करावा,कामवर्जनाने क्रोध जिंकावा,विषयाचेठिकाणी अनर्थबुद्धी ठेवून लोभाचा जय करावा आणि तत्वविचाराने संसारभयाची निवृत्ती करावी.आपण--जीवांनी संकल्पेचा--इच्छेचा त्याग करून कामावर जय प्राप्त करून घ्यावा,कारण कामापासून--इच्छेपासून दु:ख आहे.आपणास दु:ख नको,तर सुख किंवा सुखरूपता हवी आहे.कामाचाच त्याग केला तर क्रोध सहजच जिंकील्या जातो.विषयांमुळे अनर्थ होतो असे कळाले तर लोभाची वृत्ति उत्पन्न होत नाही,कारण लोभाची वृत्ति उत्पन्न न झाली तर दु:ख उत्पन्न होत नाही.तत्व म्हणजे ब्रह्म-तत्व जाणले असता भयाची निवृत्ती होते,कारण भय हे विषयांत आहे,आपण विषयांचा त्याग केला असता भय रहात नाही,म्हणून ब्रह्मतत्व जाणून घ्यावे.||२२|| भावार्थ:---आत्मानात्मविवेकाने शोक व मोह ह्यांचा त्याग करावा,महात्म्या सात्विक जणांच्या सेवेने दंभाचा त्याग करावा,मौनाच्या योगाने लोकवार्तादिक योगविघ्ने टाळावी आणि देहादिकांची हालचाल बंद करून हिंसेचा त्याग करावा.आपण--जीवांनी आत्मानात्म म्हणजे आत्मा म्हणजे सुखरूप असलेला व अनात्मा म्हणजे दु:खरूप असलेला असा विवेकाद्वारे पृथकरण--वेगळेपण केले असता अनात्म्याचा त्याग केला असता व आत्म्याचा स्वीकार केला असता दु:ख निवृत्त होते व सुख प्राप्त होते.त्यामुळे सहजच शोक व मोह निवृत्त होतात.सात्विक वृत्तीचा स्वीकार व तामस वृत्तीचा त्याग केला सहजच दंभ वृत्तीचा त्याग होतो.लोक-वार्तादिकवृत्तीचा त्याग केला असता सहजच मौनाचा स्वीकार होतो.देहादिकांची हालचाल बंद केली असता हिंसेचा त्याग सहजच होतो.म्हणून आपण-- जीवांनी विवेक सत्संगातच करावा,अन्य ठिकाणी करू करू नये ,कारण अन्य ठिकाणी अविवेकच आहे.||२३|| भावार्थ:--- तसेच ज्या प्राण्यापासून आपल्याला भय उत्पन्न होते त्यांचेच हिताचरण करून त्यांच्या पासून झालेले भय नाहीसे करावे;दैवाने प्राप्त झालेले व्यर्थ मन पीडावगैरे दुःख समाधानाने निवृत्त करावे,प्राणायामादी योगबलाने देहजन्य दुःख घालवावे आणि सात्विक आहारादिकांच्या सेवनाने निद्रेचा त्याग करावा.तसेच ज्याच्यापासून भय--दु:ख होते त्याचेच आपण हित--सुखच करावे,त्यामुळे तो आपल्याला भय देणार नाही.दैव म्हणजे प्रारब्ध याने पीडा होतेच असे विवेकाद्वारे कळाले तर आहे त्या परीस्थित समाधान सहजच मिळत असते.प्राणायामादी योगबलाने देहजन्य दु:ख घालावे,कारण जेथे देह तेथे दु:ख हे असतेच असा विवेक करून देहादिक दु:ख निवृत्त करावे.सात्विक आहार सेवन केला तर अति निद्रेचा त्याग होतोच.थोडक्यात विवेक करूनच जीवन जगावे,कारण विवेक हा दु:खाकडे न नेता तो सुखाकडेच नेत असतो.तो विवेक सत्संगातच करावा.||२४|| भावार्थः---तसेच सत्वगुण वृद्धिगत करून रजोगुण जिंकावेत.मनोनिग्रहाने सत्वगुणाला जिंकावे.गुरुचेठिकाणी भक्ति करणारा पुरुष,ह्या सांगितलेल्या कामादिक सर्वांना अनायासाने जिंकण्यास समर्थ होईल.म्हणून आपण--जीवांनी सत्वागुणांत अधिक राहावे,कारण त्यामुळे सात्विक गुण अधिक वाढतो,त्यामुळे आपोआपच रजोगुण कमी होतो.मनोनिग्रह--मन ताब्यात घेतले असता सत्व गुण जिंकल्या जातो. सदगुरू भक्ती केली असता म्हणजे सदगुरुंच्या उदेशाचे--अज्ञाचे पालन केला असता काम,क्रोध,लोभ,मोह,मद,आणि अहंकारास जिंकितो.त्यामुळे सर्व विषयांचा त्याग होतो व सर्व विषयांचा त्याग झाला असता परमाम्याची अनुभूती येते.परमात्म्याची अनुभूती आल्यानंतर संसाराची निवृत्ती होते व सुखरूपता प्राप्त होते.||२५|| भावार्थः---आतां गुरुही मनुष्य असल्यामुळे मनुष्याच्याच अवस्थेमध्ये असतो यास्तव त्याची भक्ति करून सर्वांचा जय कसा होईल असे म्हणशील तर---हे राजा,साक्षात ज्ञानदिप देणाऱ्या अशा भगवान गुरूविषयी,हा मनुष्य आहे अशी ज्याची दुर्बुद्धी असेल त्याचे अध्ययनवगैरे सर्व हत्तीच्या शौचविधी प्रमाणे व्यर्थ होय.आपले सदगुरू हे मनुष्य आहेत,अशी धारण न करिता ते भगवंतच आहेत अशी आपली दृढ भावना असावी.त्यामुळे आपण केलेल्या साधनेस पारमार्थिक फळ म्हणजे आपले जन्म-मरण निवृत्त होऊन आपण परमात्मारुपच आहोत असा दृढ निश्चय होतो.आपले सदगुरू हे आपल्यासारखे मनुष्य आहेत,अशा प्रकारची दुर्बुद्धी असेल तर आपले अध्ययन हे हत्तीच्या स्नानासारखे होईल म्हणजे स्नान न केल्यासारखे होईल.म्हणजेच शब्द ज्ञान होईल पण अनुभवास येणार नाही.अनुभवास न आले तर दु:ख निवृत्त होणार नाही,दु:ख निवृत्त न झाले तर परमानंदाची प्राप्ती होणार नाही.म्हणजेच जन्म--मरण परमंपरा निवृत्त होणार नाही.||२६|| भावार्थः---आतां,गुरूचेही पुत्रवगैरे त्याला मनुष्यच मानितात असे म्हणशील तर---हे राजा,प्रकृतिपुरुषांचा नियंता,योगेश्वरांनाही ध्यान करण्यास योग्य अशा चरणकमलांनी युक्त असा जो साक्षात भगवान तोच हा गुरु होय.तस्मात,केवळ भ्रमामुळेच लोक ह्याला मनुष्य असे मानितात.म्हणून आपण--जीवांनी सत्संग करून भ्रम निवृत्त करावा.||२७| भावार्थः---असो.ह्याप्रमाणे सर्व उपायांनी कामादिकांच्या वेगाने नियमन करून व जितेंद्रिय होऊन ध्येयनिष्ठ व्हावे नाही तर त्या पुरुषाची सर्व शास्त्रे निष्फळ होतात असे सांगण्याच्या अभिप्रायाने नारद म्हणतो---हे राजा,सर्वही नियमविधी,षडीद्रियवर्गांचे संयमन करण्यामध्येच पर्यवसान पावणारे आहेत;परंतु तशा असलेल्याही त्यांच्या योगाने जर योगसिद्धी न होईल तर ते सर्वही विधी केवळ श्रम देणारेच होत.आपण--जीवांनी काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर यांचे नियमन करावे म्हणजे विधीनुसार कर्तव्य करावेत तसेच मन व इंद्रियें ताब्यात ठेवावे.असे करूनही योगसिद्धी जर न झाली तर म्हणजेच साध्यापर्यंत न गेलोत तर केलेले पर्यंत केवळ परिश्रमच आहेत,फळ नाही.||२८|| भावार्थः---म्हणजे जशी कृष्यादी कर्मे व त्यांची फळे मोक्षाला साधन न होतां उलट संसारालाच कारण होतात त्याप्रमाणे बहिर्मुख असलेल्या जनाची इष्टापुर्तादिक कर्मे परमार्थाला साधन होत नाहीत.म्हणून आपण--जीवांनी सकाम कर्म करीत असतांना किंवा सकाम भक्ती करीत असतांना द्वेत असते.जेथे द्वेत असते,तेथे संसारच असतो.म्हणून द्वेत म्हणजे परमार्थ नाही,तर अद्वेत म्हणजे परमार्थ आहे.जीज्ञासू हा अद्वेताकडे जात असतो व द्वेतात असणारे हे पामर व विषयी आहेत,म्हणजेच संसारी आहेत.म्हणून सकाम कर्म व सकाम भक्ती हे परमार्थाचे साधन नसून ते संसाराचेच साधन आहेत.निष्काम कर्म व निष्काम भक्ती हे साधन मात्र पारमार्थिक साधन आहे,कारण ते साधन परमात्म्याकडे नेणारे आहे.म्हणून आपण--जीवांनी निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून व सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाद्वारा परमात्म्यासी एकरूप व्हावे.म्हणजेच आपल्या--जीवाच्या स्वस्वरुपासी एकरूप व्हावे.यालाच मोक्ष असे म्हणतात.यामुळे अत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होत असते. ||२९|| भावार्थः---आता वर सांगितल्याप्रमाणे योगसाधन करणाऱ्याहि ज्या पुरुषाच्या चित्ताला कुटुंबादिकांच्या संगाने विक्षेप होतो त्याने काय करावे?ते सांगतो---हे राजा,जो पुरुष,चित्ताचे संयमन करण्याविषयी उद्दुक्त--तत्पर असेल त्याने,कोणत्याहि अनात्म वस्तूचा संग्रह न करिता सर्वसंग परित्याग करून संन्यास ग्रहण करावा आणि भिक्षेने प्राप्त झालेले अन्न परिमित भक्षण करून एकट्याने एकांतस्थळाचा आश्रय करून रहावे.उपजीविका करण्याकरिता भिक्षा मागून परिमित अन्नाचे भक्षण करावे.लोकांतात न राहता एकांतात जीवन व्यतीत करावे.आपण जीवांनी अंत:करण पूर्वक,मन,इंद्रियें यांना आपल्या--जीवांच्या ताब्यात घेऊन सर्वसंग परित्याग करून संन्यास घ्यावा.||३०|| भावार्थः---नंतर त्याने आपल्या नासाग्राचेठिकाणी दृष्टि ठेऊन आपले मन विषयसंबंधाने रहित होईपर्यंत पूरक,कुंभक आणि रचेक ह्यांच्या योगाने प्राणवायू व अपानवायू ह्यांचा उत्तमप्रकाराने विरोध करावा.||३२|| भावार्थः---आणि विषयांनी आपणाकडे ओढले असल्यामुळे भ्रमण करीत असलेले मन जिकडे तिकडे जाईल तेथून ते माघारे ज्ञानीपुरुषाने हळूहळू ह्रदयामध्ये स्थापन करावे.आपण संन्यास घेतला असेल तर जर यदाकदाचित आपले मन जर पूर्व संस्कारामुळे विषयांकडे जात असेल तर त्यास प्रतिबंध करून हृदयामध्ये स्थापन करावे.||३३|| भावार्थः---ह्याप्रमाणे निरंतर अभ्यास करीत असलेल्या यतीचे--आपले--जीवांचे चित्त थोडक्याच काळामध्ये,जसा काष्ठारहित झालेला अग्नि शांत होतो त्याप्रमाणे शांति पावते.||३४|| भावार्थः---नंतर विषयांनी क्षोभ न पावलेले,सर्व वृत्ति शांत व ब्रह्मसुखाला पावलेले ते आपले--जीवांचे चित्त पुन्हा कधीही विषयासक्त होत नाही.||३५|| भावार्थः---आतां संन्यास घेऊनही जो विषयभोगांची इच्छा करील तो निंद्य होय असे सांगतो---हे धर्मराजा,धर्म,अर्थ आणि काम ह्या तिन्ही पुरुषार्थचे उत्पत्ति क्षेत्र अशा ह्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून,जो संन्यास ग्रहण करितो आणि पुनरपि जो भिक्षु,त्या धर्मादिकांचे सेवन करितो तो खरोखर ओकून टाकलेले अन्न भक्षण करणारा व निर्लज्ज होय.थोडक्यात आपण संन्यास ग्रहण करण्यापूर्वीच धर्म,अर्थ,काम,यांचा त्याग अंत:करणपूर्वक केला असेल तर संन्यास ग्रहण करावा.अंत:करण पूर्वक त्याग केला नसेल तर संन्यास घेऊ नये.धर्म,अर्थ,काम,यांचा अंत:करणपूर्वक त्याग न करता संन्यास घेतला असेल,त्यास शास्त्रकार निर्लज्ज असे म्हणतात,कारण तो संन्यास मोक्षासाठी न घेता प्रतीष्ठासाठी घेतला असा होतो म्हणजेच संसारासाठीच होतो,त्यापेक्षा न घेतलेलाच बारा असतो.आपण मात्र ते करू नये,तर गृहास्थाआश्रामातच राहून जीवन व्यतीत करावे,त्यातच--ग्राहस्थाश्रामातच हित आहे. ||३६|| भावार्थः---आणि असे होणे हे कांही अघटित नाही.कारण,आपला देह आत्मा नव्हे,तो मरणाधर्मी आहे व मरणानंतर तो विष्ठारूप,कृमिरूप अथवा भस्मरूप होतो असे ज्यांनी पूर्वी मानिले असते तेच महामूर्ख लोक,पुनरपि ह्या देहाची हा अनात्मरूप आहे असे समजून प्रशंसा करूं लागतात असे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.||३७|| भावार्थः---(आता यतीच्या निमित्ताने प्रसंगोपात्त स्वधर्माचा त्याग करणाऱ्या इतर पुरुषांनीही निंदा करितो---)हे राजा,गृहस्थाचा कर्मत्याग,ब्रह्मचाऱ्याचा व्रतत्याग,तपस्वीजनाची ग्रामसेवा आणि संन्याशाची विषयासक्ती,हि झाली असतां हे चारी आश्रमी अत्यंत नीच होत;कारण,हे खरोखर आश्रमाची विडंबना करितात.तस्मात ते देवमायेने अत्यंत मोहित झाले आहेत असे समजून दयेने त्यांची उपेक्षाच करावी.म्हणून आपण--जीवांनी जर आपण गृहस्थाश्रमात असाल तर कर्माचा त्याग करू नये,आपण जर ब्रह्मचारी असाल तर व्रताचा त्याग करू नये,आपण जर तपस्वी असाल तर ग्रामसेवा करू नये,आपण जर संन्यासी असाल तर विषयांची आसक्ती धारण न करता विषयांचा अंत:करणपूर्वक त्यागाच करावा.आपण त्या--त्या आश्रमात राहून आपले विधीने जे कर्तव्य सांगितले आहे,त्यानुसार आचरण न केले तर ती त्या--त्या आश्रमाची विडंबना आहे--अहितकारक आहे.अशा प्रकारचे जे आहेत,त्यांची इतरांनी उपेक्षाच करावी,तर संगती मुळीच करू नये,केलीच तर त्यात आपलेही अहिताच आहे.असा विवेक करून त्यानुसार आपण--जीवांनी निर्णय घेवून आचरण करावे.असे--विडंबना करणारे ग्रहस्थी,ब्रह्मचारी,तपस्वी,आणि संन्यासी यांचा त्यागाच करावा,करण त्यातच आपले हित न होता अहित निश्चितच आहे,असा विवेक करून त्यांचा त्याग करून विधीचा स्वीकार करून आचरण करणारे जे गृहस्थी,ब्रह्मचारी,तपस्वी,व संन्यासी यांची संगती करून आपले--जीवांचे महासार्थक करावे.||३-८-३९|| भावार्थ:---(आता आत्मतत्व जाणणारा संन्याशी विषयाचेठिकाणी आसक्त असला तर काय दोष आहे?असे म्हणशील तर---)हे राजा,आत्मा हा परब्रहम आहे असे जर संन्याशी जाणेल तर त्या ज्ञानाच्या योगाने ज्याच्या वासना नष्ठ झाल्या आहेत असा तो,कोणत्या बरे इच्छा धरून अथवा कोणत्या बरे हेतूने,विषयासक्त होवून देहाचे पोषण करील,कोणत्याच हेतूने करणार नाही.सारांश "ज्ञानी पुरुषाला विषयांचेठिकाणी आसक्ती असण्याचा संभवच नाही." ||४० भावार्थ:---आता,विषयासक्तीमुळे अज्ञजणाला--आपणास--जीवांस अध:पात होतो म्हणून मुमुक्षुजनाने--आपण--जीवांनी अगदी सावध राहून सर्वदा तत्वज्ञानाविषयी प्रयत्न करीत असावे हा अर्थ,हा अर्थ अधिक स्पस्ट होण्यासाठी सांगतात की, 'आत्मा हा रथी आहे,देह हाच रथ आहे,असे जन,इत्यादी'श्रुत्युक्त रथरुपकदवाराने कथन करितो की,---हे राजा,देह हाच रथ आहे असे तत्त्ववेत्ते म्हणतात---- इंद्रिय हे अश्व--घोडे,इंद्रीयाधिपती मन हे त्यांना आवरून धरावयाच्या दोऱ्या,शब्दादि विषय हे मार्ग,निश्चयात्मिका बुद्धी हा सारथी व ईश्वराने निर्माण केलेले चित्त हेच देहाला व्यापून राहणारे बंधन आहे असे म्हणतात.||४१|| भावार्थ:---तसाच दहा प्रकारचा प्राण हा कणा,पाप व पुण्या हि चक्रे,अभिमानी जीव हा रथी प्रणव हे त्याचे धनुष्य बाण लक्ष्यावर योजीतात त्याप्रमाणे ओंकाराने जीवाला ब्रह्माचे ठिकाणी योजावे.||४२|| भावार्थ:---राग,द्वेष,लोभ,मोह,भय,मद,मन,अवमान,असूया,वंचना,हिंसा,मत्सर||४३|| भावार्थ:---अभिनिवेश,प्रमाद,क्षुधा व निद्रा इत्यादी शत्रू होत आणि त्यामध्ये समाधी लावणाऱ्या योग्याला एखादेवेळी रजोगुण व तमोगुण यांच्या अभिमानादिक वृत्तीही शत्रू होतात व परोपराकारादिक सात्विक वृत्तीही शत्रूच समजले पाहिजेत.थोडक्यात यांत कांही वृत्त्या ह्या तामस,कांही वृत्त्या ह्या राजस व कांही वृत्त्या ह्या सात्त्विक आहेत.जसे लोखंडाची सांखळी हीही चालण्यास प्रतिबंध करिते,चांदीची सांखळी हीही चालण्यास प्रतिबंध करिते व सोन्याची सांखळी जरी असेल तर तीही चालण्यास प्रतिबंध करितेच तसे तामस वृत्ति असो किंवा राजस वृत्ति असो किंवा सात्त्विक वृत्ति असो तेही परमाम्यास एकरूप होण्यास प्रतिबंध करतेच,कारण त्या तीनही वृत्या ह्या अनात्मा आहेत व परमात्मा तीनही वृत्तीरहित--वृत्तीतीत आहे.म्हणून तीनही व्रीत्तीचा त्याग आवश्य करावाच लागतो.त्यानंतर आपण परमात्मारूप होतोत म्हणण्यापेक्षा आहोत असा अनुभवच येतो.आपले--जीवांचे तेच वास्तविक स्वरूप आहे.||४४|| भावार्थ:---म्हणून पुरुषाने,इंद्रियादि सर्व सामुग्रीयुक्त आपल्या स्वाधीन असलेल्या हा मानवदेहरूपी रथ जोपर्यंत धारणा केला आहे तोपर्यंतच त्याने गुरुचरणसेवेने पाजळलेले ज्ञानखड्ग धारण करून,भगवान अच्युताचाच आश्रय करून,शत्रुचे निरसन करावे आणि चित्तामध्यो शांति धारण करून स्वानंदाचे संतुष्ठ व्हावे.नंतर ह्या रथादिकांची उपेक्षा करावी.आपल्या स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर नंतर देहाची उपेक्षा करावी,कारण या मनुष्य देहातच आपल्या स्वरुपाची ओळख करून स्वरूपाचा अनुभव घेता येतो.ती ओळख आणि स्वरुपाचा अनुभव घेतलेला आहे.सध्याचा अनुभव घेतल्यानंतर देह असो किंवा नसो,त्या देहाबद्दल उपेक्षा करावी,तर अपेक्षा करू नये.कारण कांहीच कर्तव्य राहिलेले नाही,जे मिळवायचे आहे,ते मिळालेच आहे.देह राहिला आहे,तोपर्यंत कौतुकाने जे अज्ञानी आहेत,त्यांना वेदांताचा उपदेश करावा,व आपल्या स्वरूपाचा विलाक्ष्ण आनंद लुटावा.||४५|| भावार्थ:---कारण,अच्युताचा आश्रय जर नसेल तर अत्यंत गैरसावध असलेल्या ह्या रथाधिपती जीवाला,बहिर्मुख जे इंद्रियें घोडे व बुद्धिरूप सारथी हि,प्रवृत्तिमार्गांत नेऊन विषयरूप चोरांमध्ये टाकितात.नंतर ते चोर,अश्व व सारथी ह्यांच्या सह्वर्तमान ह्या रथ्याला,महामृत्युभयाने युक्त व अंधकाराने व्याप्त अशा संसाररूप कुपामध्ये नेवून टाकितात.म्हणून आपण--जीवांनी अच्युताचा आश्रय म्हणजे सत्त्वगुणांचा स्वीकार करून जीवन व्यतीत करावे.जर आपण सत्त्वगुणांचा आश्रय न घेता तमोगुणांचा व रजोगुणांचा आश्रय घेतला,तर बहिर्मुख वृत्ति होऊन इंद्रियें--घोडें व बुद्धिरूप सारथी हे प्रवृत्तिमार्गात नेऊन जे चोर--विषये दु:खरूप आहेत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करितात.म्हणजेच त्यामुळे आपणास--जीवांस दु:खरूप संसारात टाकतात.म्हणून आपण--जीवांनी मन व इंद्रियें यांना आपल्या--जीवांच्या ताब्यात ठेवावयास पाहिजे.आपण--जीवांनी मनाच्या व इंद्रियांच्या अधीन होता,त्यांना आपल्या अधीन करावे.त्यामुळे आपली परमात्म्याकडे--सुखरुपतेकडे मार्गक्रमण होईल,तर संसाराकडे--विषयांकडे मार्गक्रमण थांबेल म्हणजे तो मार्ग बंद होईल म्हणजेच दु:ख थांबेल.असे कळण्यासाठी सत्संग करावा लागेल.||४६|| भावार्थ:---आता वेदोक्त इष्ठापुर्तादि कर्म करणाऱ्या पुरुषाला ह्याप्रमाणे अनर्थप्राप्ती कशी होईल अशी कदाचित शंका घेशील तर तिच्या निवृत्तीकरिता वेदोक्त कर्माचे दोन प्रकार दर्शवून त्यांच्या फळांच्या भेद सांगतो----हे धर्मराजा,प्रवृत्त व निवृत्त असे दोनप्रकारे वेदविहित कर्म,आहे.त्यापैकी प्रवृत्तकर्माच्या योगाने पुरुष वारंवार संसारामध्ये पडतो व निवृत्तकर्माच्या योगाने मोक्ष पावतो.म्हणून आपण जीवांनी सकाम--विषयांचा भोग न घेता निवृत्ती मार्ग मणजे परमात्म्याकडे जाण्याचा निष्काम परमार्थ करावा.त्यामुळे आपली--जीवांची मोक्ष--अत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ति होऊन आपण--जीव सुखरूप होतो.||४७|| भावार्थ:---हे राजा,पश्वादि हिंसयुक्त व व्रीह्यादी--यज्ञाची सामुग्री--तील,जवा,तूप,इत्यादी व द्रव्यमय-- अशी जी अग्निहोत्रादि कर्मे म्हणजे अग्निहोत्र,दर्श्यागपूर्णमास याग,चातुर्मास्ययाग,पशुयाग,सोमयाग,वैश्वदेव,आणि बलीहरण ह्यांना "इष्ट" म्हणजे स्वत:साठी असे म्हणतात आणि देवालय,विश्रांतिचेस्थाने,कूप व पाणपोई आणि अन्नसत्र इत्यादिकांना "पूर्त" म्हणजे सामुदायक जीवांसाठी असे म्हणतात व हे दोन्ही प्रकारचे कर्म कामनेने व अत्यंत आसक्तीने केले असता प्रवृत्तीसंज्ञक म्हणजे विषयांसाठी--संसारासाठी होते.इष्ट व पूर्त कर्मे हे विषयांसाठीच--संसारासाठीच केली जातात,तर परमार्थासाठी केली जात नसतात.||४८||४९|| भावार्थ:---आता प्रवृत्त कर्म केले असता ऊर्ध्वगती--स्वर्गगती व अधोगती--मृत्यूलोकी ह्यांच्या योगाने पुरुषाला संसार कसा प्राप्त होतो हे दर्शवितो---हे राजा,प्रवृत्त कर्म करणारा पुरुष,प्रथमत:च चरूपुरोडाशादी द्रव्यांचे जे दोहोत्पाद्क रूप त्याला पावोन,नंतर तो धुमाभिमानिनीदेवता,रात्रीभिमानीदेवता,कृष्णपक्ष्याभिमानीदेवता,दक्षिणायनाभिमानीनीदेवता आणि चंद्रलोक ह्यांप्रत पावोन,त्या चंद्रलोकामध्ये भोगांचा उपभोग घेतल्यानंतर अदृश्य होवून वृष्टीद्वारा औषधी,लता,अन्न,आणि रेत ह्यांच्या रूपाने अनुक्रमाने तेथून खाली--मृत्यू-लोकात येतो.असो.ह्याप्रमाणे हा प्रवृत्त कर्ममार्ग,पुनर्जन्माला कारण आहे व हे राजा,वर निर्दिष्ट केलेल्या क्रमाने प्रत्येक अवस्थेला पावोन इहलोकी--मृत्यू-लोकी तो पुरुष,पुन्हा उत्पन्न--जन्मास होतो.म्हणून आपण--जीवांनी प्रवृत्ती मार्गाचा म्हणजे संसाराच्या--विषयांच्या मार्गांचा त्याग करून निवृत्ती मार्गांचा म्हणजे परमात्म्याच्या मार्गांचा स्वीकार करून जन्म--मरण निवृत्त करावे.भगवंतानी याकरिताच मनुष्य देह दिलेला आहे,म्हणून स्वस्वरुपासच एकरूप व्हावे,कारण हा मार्ग सुखरुपच आहे.||५०-५१|| भावार्थ:---आता ह्या प्रवृत्त कर्ममार्गाविषयी अधिकारी कोण हे दर्शवितो की,---हे राजा,गर्भाधानापासून तो अगदी स्मशानपर्यंत असलेल्या संस्कारांनी संस्कृत झालेला द्विज--ब्राह्मण,क्षत्रिय,व वैश्य मार्गाविषयी अधिकारीच होय.आता पशुपुरोडाशादि द्रव्यसाध्य यज्ञांचेठिकाणी हिंसा अवश्य होत असल्यामुळे निवृत्त कर्मच अत्यंत श्रेष्ठ होय असे द्रशवितो,---हे राजा निवृत्तकर्मनिष्ठ पुरुष,ज्ञानेंद्रियाचेठिकाणी कर्मेंद्रियव्यापाराची ऐक्यभावना करितात.म्हणजेच आपण--जीवांनी निष्काम कर्मे करावीत व निष्काम उपासना--भक्ती करावी.निष्काम म्हणजे विषयांचा त्याग करून व अहंपणा निवृत्त करून केलेले कर्म ईश्वर अर्पण करून करणे,यास निष्कामता असे म्हणतात.असे केले आपले--जीवांचे अंत:करण शुद्ध व स्थिर होते.अंत:करण शुद्ध आणि स्थिर झाल्यानंतर सत्संग करण्याची भावना उदयास येते.सत्संग केल्यानंतर वेदांताचे श्रावण केल्यामुळे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान उत्पन्न होऊन सर्व विषयांचा त्यागानंतर परमात्म्याचा--ब्रह्माचा अनुभव येतो.त्यामुळे जन्म--मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होते.||५२|| भावार्थ:---तसेच दर्शनादि संकल्परूप मनाचेठिकाणी इंद्रियांची,वाणीचेठिकाणी,विकारयुक्त मनाची,वर्णसमुदायाचेठिकाणी वाणीची,अकरा--दि स्वरत्रयात्मक ॐकराचेठिकाणी त्या वर्णसमुदायाची,बिंदूचेठिकाणी ॐकराची,नादाचेठिकाणी बिंदूची सूत्रात्मरूप प्राणाचेठिकाणी त्या नादाची आणि ब्रह्माचेठिकाणी त्या प्राणाची ऐक्यभावना करितात.||५३|| भावार्थ:---अशा रीतीने,मुमुक्षूचा अनुसंधानप्रकार सांगून,आता त्याला अर्चीरादी मार्गाने ब्रहमलोकाची प्राप्ती होते असे दर्शवितो---हे राजा,जो निवृत्त कर्मनिष्ठ ज्ञानी अनुक्रमाने अग्नि,सूर्य,दिन,सायंकला,शुक्लपक्ष,पुर्णमासी आणि उत्तरायण ह्यांच्या अभिमामिनी देवतांना पावोन,ब्रह्मलोकाला जातो.ह्याब्रह्मलोकी गेला असता भोगसामाप्ती झाल्यानंतर तो प्रथमत: स्थुलोपाधी असतो,नंतर सूक्ष्माचेठिकाणी स्थुलोपाधीचा लय करून तैजसनामक सूक्ष्मोपाधिरूप होतो.नंतर सुक्ष्मोपाधीचाही करणामध्ये लय करून तो प्राज्ञनामक कारणोपाधी होतो कारण,साक्षीरूपाने अवस्था-त्रयामध्ये अनुगत असल्यामुळे त्याचा साक्षिस्वरूपामध्ये लय करून तुर्य (अवस्थात्रयातीत)होतो आणि नंतर तो शुद्धात्मस्वरूप होऊन मुक्त होतो.आपण--जीवांनी ज्ञान मार्गाचा स्वीकार करून सर्व विषयांचा त्याग करून मृत्यू-लोकातच परमात्म्याची अनुभूती घ्यावी.मात्र आपणास ज्ञान प्राप्त झाले म्हणजे परोक्ष ज्ञान प्राप्त झाले,पण सर्व विषयांचा अधिकार कमी असल्यामुळे त्याग झाला नाही तर ब्रह्म लोकांत जाऊन तेथे विषयांचा भोग घेतल्यानंतर त्याग हा करावाच लागतो.तेथे विषयांचा त्याग जर झाला तर आपण तेथे मुक्ती प्राप्ती होते,पण विषयांचा त्याग ब्रह्म-लोकांत न झाला तर पुन्हा मृत्यू लोकांत जन्मास येऊन नंतर तरी सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याची अनुभूती आल्यानंतरच जन्म--मरण निवृत्त होते.||५४|| भावार्थ:---असो.ह्याला देवयान(निवृत्ती कर्ममार्ग)असे म्हणतात व ज्यांचे अंत:कारण अगदी शांत आहे असा या मार्गाने चालत असलेला आत्मोपासक पुरुष,अनुक्रमाने अग्न्याध्यभिमानीनि देवतारूपी होऊन आत्मनिष्ठ झाला असता प्रवृत्तकर्मनिष्ट पुरुषाप्रमाणे पुनरपि संसारामध्ये परत येत नाही.||५५|| भावार्थ:---हे राजा,जो पुरुष,तो हे वेदप्रतिपादित प्रवृत्त-निवृत्त कर्ममार्ग शास्त्रदृष्ट्या जाणतो तो देहस्थ असूनही मोह पावत नाही.||५६|| भावार्थ:---कारण,देहाच्या आरंभी कारणरूपाने व अंती अवधिरूपाने जे असते आणि तसेच भोग्यरूपाने बाह्यागत,भोक्तृरूपाने अंतर्गत, उच्च,नीच,ज्ञान,ज्ञेन,वचन,वाच्य,तम आणि प्रकाश असे जे काही वस्तू आहे ते सर्व,हा ज्ञानी पुरुष,स्व:ताच होतो.सर्व विषयांचा त्याग केल्यामुळे ज्ञानी पुरुषास परमात्म्याची अनुभूती आल्यामुळे सारांश त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच वस्तू नसल्यामुळे त्याला मोह प्राप्त होत नाही.मोह होण्यासाठी द्वेत असावे लागते,पण ज्ञानी पुरुषास अद्वेताची अनुभूती आलेली असल्यामुळे त्याच्या आत्माभिन्न कांहीच नसते,म्हणून मोह उत्पन्न होत नाही.तो परमात्मारूप असतो.अध्यस्त वस्तू अधिष्ठानरूपाच असते.जसे सोन्याचा अलंकार हा अलंकार नसून सोनेच असते त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष ब्रह्मररूपच असतो.||५७|| भावार्थ:---आता,असे जर आहे तर ज्ञानसंपन्न पुरुषालाही आपल्याहून भिन्न वस्तूची कशी प्रतीती होते?अशी शंका घेशील तर---हे राजा,तर्काला विरोध येत असल्यामुळे सर्वप्रकारे बाधित झालेल्याही प्रतीबिंबादिक आभास जसा सत्यत्वाने प्रतीती होतो?परंतु खरा नाही,तसाच हा सर्व इंद्रियांनी उपभोग घेण्याचा विषयसामुदायिक खरेपणाने कल्पित आहे परंतु वास्तविक खरा नाही कारण,तसे होणे दुर्घट आहे.||५८|| भावार्थ:---आता वास्तविकपणे असत्य कसा असे विचारशील तर---हे राजा,पृथिव्यादि पंचमहाभूतांच्या ऐक्यबुद्धीला आश्रयरूप जे देहादिक ते पंचभूतांचा समुदाय,विकार व परिणाम ह्यातील काहींच नाही.म्हणजे जसे वन हा वृक्षाच्या समुदाय आहे त्याप्रमणे देह हा पंचमहाभूतांचा समुदाय म्हणावा तर तसे म्हणता येत नाही.कारण,वनातील एका वृक्षाचे आकर्षण केले असता सर्ववनाचे आकर्षण कधीही होत नाही आणि देहाच्या जर एका प्रदेशाचे आकर्षण केले तर सर्वदेहाचे आकर्षण होते.बरे हा देह पंचमहाभूतांचा विकार अथवा त्यांचे रुपांतर आहे असे म्हणावे तर तेही संभवत नाही.कारण,असे होण्यास तो देहादिक सावयव पदार्थ,आपल्या अवयवाहून अत्यंत भिन्न मानवा तर तसे अनुभवास येत नाही व त्यांना युक्त आहे असे म्हणावे तर प्रत्येक अवयवांशी तो संपूर्ण स्वरूपाने तरी युक्त असला पाहिजे.परंतु ह्या दोहोपैकी कोणताच प्रकार असण्याचा संभव नाही.कारण,प्रत्येक अवयवांशी संपूर्ण रूपाने युक्त आहे असे म्हणावे तर केवळ अंगीलच्याठिकाणीही देहबुद्धी होणार;आणि अंशाने युक्त असे म्हणवे तर त्यास अन्य अवयवी मानून,त्याशी आणखी इतर कोणीतरी अवयवी आहेत असे मानावे लागेल व हे रहाटगाडगे एकदा सुरु झाले म्हणजे कधीच संपवायचे नाही.तस्मात,हे देहादिक सर्व मिथ्याच आहे.||५९|| भावार्थ:---(ह्याप्रामाने देहादिक मिथ्या आहेत असे सांगितले.आता त्यांना हेतुभूत असलेली पृथीव्यादिक पंचमहाभूतेही मिथ्याच आहेत असे सांगतो,---)हे धर्मराजा,देहादिकास धारण करणारी पंचमहाभूते,सावयव असल्यामुळे स्वकीय सूक्ष्म,अवयवावाचून कधीही असावयाचे नाहीत.आता अवयव सत्य आहे असे म्हणावे तर तर पूर्वोक्तप्रकाराने पदार्थ अवयवी असत्य ठरला असता त्याचा अवयवहि शेवटी असत्यच ठरणार.||६०|| भावार्थ:---आता देहादी अवयव पदार्थच जर मिथ्या आहे तर उत्पत्ति व नाश ह्यांनी युक्त असलेल्या बाल्यादी अवस्थामध्ये तोच हा देवदत्त इत्यादिक ओळख,राहणार नाही असे म्हणशील तर---हे राजा, "परमात्म्याचेठिकाणी अज्ञानाने भेद कल्पित असल्यामुळे पूर्वपूर्वावस्थेतील आरोपाचे उत्तरोत्तर अवस्थामध्ये सादृश्य असल्यामुळे तोच हा देवदत्त असे वाटते हि केवळ भ्रांती आहे व तीही अज्ञाननिवृत्तीपर्यंतच असते." आता सर्वच जर मिथ्या आहे तर अमुक गोष्ट करू नये अशाप्रकारे शास्त्राचे विधिनिषेधकतृत्व कसे घडते ? असे म्हणशील तर---हे राजा "स्वप्नावस्थेमध्ये जागृती व सुषुप्ती ह्या अवस्थाचा जसा मिथ्या अनुभव येतो तशीच विधीनिषेधाची व्यवस्था होय." जोपर्यंत ज्या जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे,तोपर्यंत विधी--निषेधाचे पालन करावेच लागते,जसे स्वप्न अवस्थेत असतांना स्वप्न सत्यच वाटते व जागृतीत आल्यानंतर स्वप्न व सुषुप्ती मिथ्या वाटते.त्याचप्रमाणे परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर सर्वत्र परमात्मा आहे,असा अनुभव आल्यामुळे त्यास विधी-निषेधाची आवश्यकता वाटत नाही.||६१|| भावार्थ:---आता हे प्रतिपादन केलेले अद्वैतच भावनात्रयाच्या उपदेशेकरून दृढ करितो की,---हे राजा भावाद्वैत,क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अवलोकन करणारा मुनि,ह्या देहाचेठिकाणीच असतांना आत्मतत्त्वानुभवाने आपल्या जाग्रदादि तिन्ही अवस्थांची निवृत्ती करितो.म्हणून आपण--जीवांनी सत्संग करून भावाद्वैत,क्रीयाद्वैत व द्रव्याद्वैत अवलोकन करून आत्मत्त्वानुभावाने जागृत,स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांची मिथ्यात्वाने निवृत्ती करावी.||६२|| भावार्थः---हे राजा,पट आणि तंतू ह्यांमध्ये सर्वत्रठिकाणी कार्यकारणरूप वस्तू एकच आहे असे जे जाणणे त्याला "भावद्वैत" म्हणतात कारण,भेद वास्तविक खरा नाही.आपण--जीवांनी जसे पट--कपडा आणि तंतू--धागा म्हणजेच कपडा--कार्य आणि तंतू--कारण एकच आहेत असे विवेक करून जाणून घ्यावे,तसे अलंकार--कार्य आणि सोने--म्हणजेच अलंकार--कार्य आणि सोने--कारण एकच आहेत असा विवेक करून जाणून घ्यावे तसे देह हे कार्य आहे आणि आत्मा कारण आहे एकच आहे असे जाणून सर्वत्र परमात्माच आहे,असा निश्चय करावा.कारण अध्यस्त जो देह व अधिष्ठान जो परमात्मा एकच आहे,कारण अध्यस्त वस्तू अधिष्ठानरूपच असते.जसे अंधार हा प्रकाशरूपच असतो तसे देह हा परमात्मारूपच असतो.देह हा भासमान असतो म्हणजे मिथ्या--दिसण्यापुरतेच असतो,असण्यापुरता नसतो,आणि अधिष्ठान वस्तू सत्य असते.आपण--जीव हा अध्यस्त नसून अधिष्ठान आहे.||६३|| भावार्थः---तसेच हे कुंतीपुत्रा,कायावाचामनेकरून केलेल्या सर्वकर्मांचे जे परब्रह्माचे ठिकाणी फलेच्छा सोडून अर्पण करणे ह्याला "क्रियाद्वैत" म्हणतात.म्हणून आपण--जीवांनी निष्काम कर्मे करून व निष्काम भक्ती करून म्हणजेच फलेच्छा त्यागून व अहंपणेचा त्याग करून सत्संगाद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानद्वारा सर्वविषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घेऊन नामरूपातीत व्हावे.हेच आपले--जीवाचे अंतिम ध्यये आहे.आपले--जीवाचे वास्तविक स्वरूप आहे.||६४|| भावार्थः---आणि त्याचप्रमाणे आपण स्वतः,भार्या,पुत्रवगैरे आणि इतरही सर्वप्राणी ह्यांच्या वित्तादिकांचे व भोगांचे जे ऐक्य मानणे म्हणजे सर्वांचे देह,पंचमहाभूतात्मक असून सर्वांचा भोक्ता परमात्मा आहे अशा अभेददृष्टीने अर्थ व काम ह्या उभयंताचेठिकाणी ऐक्यदृष्टि करणे त्याला "द्रव्याद्वैत" म्हणतात.म्हणून आपण--जीवानी अनात्मा जे अध्यात्म,अधिभौतिक,व अधिदैविक असो,असे जे भासणारे आहे,सर्व परमात्माच आहे,म्हणजे ऐक्यदृष्टी करणे त्यास द्रव्याद्वैत असे म्हणतात.||६५|| भावार्थः---आता सांगितलेल्या आश्रमधर्माची गोळाबेरीज दर्शवितो---हे राजा,ज्या देशकालांमध्ये ज्या उपायाने ज्यापासून जे द्रव्य त्या पुरुषाला विहित असेल त्याच द्रव्याने त्या पुरुषाने ती विहित कर्मे करावी,आपत्काल नसतांना इतर द्रव्यांनी करूं नयेत.म्हणजे आपण--जीवांनी विहित कर्मे--स्वधर्मांचेच कर्में करावी व आपत्कालात पराधार्मांची कर्में करावी,तर एरव्ही करू नये.||६६|| भावार्थः---असो.हे राजा ह्या पूर्वोक्त व इतरही वेदोक्त स्वकर्माच्या--स्वधर्मांच्यायोगाने ह्या श्रीकृष्णाची निष्काम भक्ति करणारा पुरुष,गृहामध्यें असतांनाही ह्याच्या--स्वत:च्या--परमात्म्याच्या स्वरूपाला पावतो.म्हणजे स्वकर्मे किंवा स्वधर्मे निष्काम केले,त्यामुळे अंत:करण शुद्ध झाले ,व त्यामुळे सत्संग व त्याद्वारे ज्ञान उत्पन्न होऊन मोक्ष प्राप्ती होते.म्हणजेच स्वरूपाला प्राप्ती झाली.||६७|| भावार्थः--ह्याप्रमाणे हे सर्व साधारण धर्मसांगून आतां भक्तजनाला भक्तीच सर्वपुरुषार्थांचे कारण आहे हे सांगण्याकरितां,त्या पांडवानाच उद्देशून नारद म्हणतो की,---हे राजाधिराजा,परिहार करण्यास अशक्य अशा विपत्तिसमुदायाला,परमात्मा श्रीकृष्णप्रभूच्या योगानेच जसा तूं तरून गेला आहेस व त्याच्याच चरणकमलाच्या सेवामुळे दिग्गजांपर्यंत सर्वजणांना जिंकून,जसे तू राजसुयादिक यज्ञ केले आहेस त्याप्रमाणे त्या श्रीकृष्णाच्याच आश्रयाने तूं संसारांतूनही तरून जा.आपण--जीवांनी अज्ञान अवस्थेमध्ये संसारात असले तरी निष्काम कर्में करून व निष्काम भक्ती करून म्हणजेच अंत:करण शुद्ध झाल्यानंतर व स्थिर झाल्यानंतर सत्संगाद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून व सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा म्हणजे आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा.||६८|| भावार्थः---आतां महात्म्यांच्या अवज्ञेने श्रीकृष्णसेवा नष्ट होते व त्यांच्या कृपेनेच पुनरपि प्राप्त होते हे दर्शविण्याच्या अभिप्रायाने आपला पूर्वीचा वृत्तांत कथन करितो की,---हे राजा,पूर्वी गेलेल्या महाकल्पामध्ये गंधर्वामध्ये श्रेष्ठ असा उपबर्हन नांवाचा मी(नारदमुनी) एक "गंधर्व" होतो.||६९|| भावार्थः---सौंदर्य,सौकुमार्य,वाङ्माधुर्य आणि सौंगंध ह्यांच्या देवांच्या सत्रामध्ये दक्षप्रभृत्ती प्रजापतीनी श्रीहरीचे यश गायन करण्याकरितां गंधर्वसमुदाय व अप्सरोगण ह्यांस बोलाविले होते.||७१|| भावार्थः---ते जाणून स्त्रियांनी परिवेष्टित असा मी गायन करीत करीतच त्याठिकाणी गेलो तेव्हा ती मी केलेली अवज्ञा जाणून त्या प्रजापतीनि क्रोधाच्या वेगाने ज्याअर्थी तूं आमची अवज्ञा केली आहेस त्याअर्थी "तूं निस्तेज होऊन सत्त्वर शुद्रयोनीप्रत जा" असा मला शाप दिला.||७२|| भावार्थः---तो शाप होताक्षणीच मी एका दासीच्या उदरी जन्मास आलो परंतु त्या शुद्रजन्मामध्येही मला ब्रह्मवेत्त्यांचा समागम व शुश्रुषा घडल्यामुळे पुढे मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो.संत--महात्मा यांची आपणास सेवा घडावी,कारण संत--महात्मा यांच्या सेवेने प्रगती होऊन सत्वगुण वाढतो.म्हणून आपण संत--महात्मा यांची सेवा आवश्य करावी.||७३|| भावार्थः---असो हे धर्मराजा,योगाने गृहस्थाश्रमी पुरुषही अनायासाने संन्यासीलोकांची गति पावतो तो हा गृहस्थाश्रमसंबंधी पापनिवर्तक धर्म मी तुला सांगितला आहे.आपण संत--महात्मा यांची निष्काम सेवा केली तर आपण गृहस्थाश्रमी जरी असुत,तरी पण आपण संन्यास आश्रमात पदार्पण करावे अशी भावना होऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार करू शकतो.||७४|| भावार्थः---आतां नारदऋषि,धर्मराजाची कृतार्थता मनांत आणूण पूर्वी दहाव्या अध्यायांत सांगितलेलेच श्लोक पुन्हा सांगतो की,---हे धर्मराजा,ह्या मनुष्यलोकामध्ये तुम्ही खरोखर भाग्यशाली आहां.कारण,ज्या तुमच्या घरी मनुष्यरूप धारण करून गुप्त असलेले साक्षात श्रीकृष्णनामक परब्रह्म वास करीत असल्यामुळे,तुमच्या घरी दर्शनमात्रेकरून सर्वलोकांस पवित्र करणारे मुनी सर्वदिशांकडे येत आहेत.भगवंत साक्षात श्रीकृष्ण पांडवांच्या घरी रहात असल्यामुळे श्रीकृष्णांचे दर्शन घडावे,म्हणून अनेक संत--महात्मा व मुनिजन पांडवांकडे येत आहेत,त्यामुळं अनेक ऋषी--मिनी व संत--महात्मा यांचे दर्शन व इतर-जणांनाहि त्यांचे दर्शन घडत आहे.म्हणून आपण--जीवांनी साधू--संत--महात्मा यांना आपल्या घरी बोलावून त्यांचे दर्शन,दान व उपदेश ग्रहण करावा व इतरानांहि पाचारून त्यांनाही दर्शनाचा,दानाचा व उपदेश घडू द्दावा.त्यात आपले व इतरांचे हित होते.असा विवेक करून आपले अधिक हित करावे.||७५|| भावार्थः---आतां,कृष्ण हा आमच्या मामाचा पुत्र असून त्याला तूं परब्रह्म असेल तर सोळाहजार स्त्रियांचेठिकाणी रममाण होणे व धर्मादिकांचे आचरण करणे हे ह्याला कशाला पाहिजे?असे म्हणशील तर---हे राजा,शंकरब्रह्मादिकांनीही आपल्या बुद्धीच्या योगानेसुद्धा ज्याचे साक्षात वास्तविक यथार्थतत्त्व वर्णन केले नाही,तो हा भक्तपालक भगवान,मौन,भक्ति आणि इंद्रियदमन यांच्यायोगाने आम्ही पूजन केला आहे.तो आम्हांवर प्रसन्न होतो.||७७|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे देवर्षीनारदाने कथन केलेले धर्मरहस्य भरतकुलामध्ये श्रेष्ठ अशा धर्मराजाने श्रवण करून,तो प्रेमाने अगदी विव्हळ झाला व अत्यंत प्रसन्न होऊन त्याने नारदमुनीने व श्रीकृष्णाचे पूजन केले.आपण--जीवांनी आपल्याकडे संत--महात्म्ये यांना पाचारून त्यांचा सत्संग करावा.त्यांची पूजा--अर्चा करून त्यांना दानाधर्महि करावा.||७८|| भावार्थः---ह्याप्रमाणे पूजाकेलेला तो नारदमुनि,श्रीकृष्ण व कुंतीपुत्र युधिष्ठीर यांचा निरोप घेऊन तेथून निघून गेला,इकडे कृष्ण हा साक्षात परब्रह्म आहे असे श्रवण करून धर्मराजा अतिशय विस्मित झाला.आपणही--जीवांनी संत--महात्मा यांचा निरोप घेऊन अज्ञानीजणांना उपदेश करण्याकरिता अन्य ठिकाणी जाऊन सत्संग करवा व विलक्षण परमात्म्याचा आनंद घेत जीवन व्यतीत करावे.आपल्या--जीवांच्या प्रारब्ध कर्मांचा क्षय होण्यापूर्वी जन्मो--जन्मो भगवंताची निष्काम सेवा व अज्ञानीजणांची जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाची उपदेशरूपी सेवा निरंतर घडावी म्हणून मनुष्य देह आणि तेही संन्यस्तवृत्तीने मिळो हीच विनवणी करून नतमस्तक व्हावे.||७९|| भावार्थः---हे परीक्षित राजा ह्याप्रमाणे ज्यांमध्ये देव,असुर व मानव इत्यादी चराचर प्राणी उत्पन्न झाले आहेत ते हे दक्षकन्यांचे वंश मी तुलां निरनिराळे वर्णन केले आहेत.||८०|| ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महा पुराणांतील सप्तम(७)स्कंधामध्ये युधिष्ठीरनारदसंवादांतील सदाचारनिर्णयनामक हा पंधरावा(१५) अध्याय ऐंशी(८०)श्लोकांनी समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| ||इति सप्तम:स्कंध समाप्त ----सातवा स्कंध समाप्त || | ||हरि:ॐतत्सत्|| | ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment