श्रीमद्भागवतमाहात्म्यम्-उत्तार्ध:
| ॐ नमो भागवते
वासुदेवाय | | श्रीमद्भागवतमाहात्म्यम्-उत्तार्ध: | |
अथ प्रथमोध्याय: |
__________________________________________________________________________________________|१---परीक्षित
आणि वज्रनाभ यांची भेट,शांडिल्यमुनींच्या मुखातून भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि
व्रजभूमीच्या महत्त्वाचे वर्णन. __________________________________________________________________________________________
भावार्त्थ:---महर्षी
व्यास म्हणतात:---ज्यांचे स्वरूप सच्चिदानंद आहे,जे अनंत सुखाचा वर्षाव
करतात,ज्यांच्या शक्तीनेच या विश्वाची उत्पत्ती,स्तिथी आणि प्रलय होतात,त्या भगवान
श्रीकृष्णांची आम्ही भक्तिरसाच्या प्राप्तीसाठी नित्य स्तुती करतो.आपण--जीवांनी
श्रीकृष्ण जो सच्चिदानंद आहे,त्याची निष्काम भक्ती प्राप्ती होण्यासाठी स्तुती
करावी.||१|| भावार्थ:---नैमिषारण्यामध्ये
आसनावर बसलेल्या बुद्धिमान सूतांना भगवंतांच्या कथांचे रसिक असेलेल्या शौनकादी
ऋषींनी प्रणाम करून विचारले.आपण--जीवांनी वक्ता यांना आसनावर श्रवणास बसण्यापूर्वी
प्रथम प्रणाम करूनच नंतर बसावे. ||२|| भावार्थ:---ऋषींनी विचारले---श्रीमथूरामंडलात
श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्यूम्न,प्रद्यूम्नाचा पुत्र अनिरुद्ध,अनिरुद्धाचा पुत्र "वज्रनाभ"
आणि हस्तिनापुरामध्ये आपला नातू परीक्षित यांना राज्याभिषेक करून जेव्हा युधिष्ठीर
हिमालयात निघून गेला,तेव्हा त्या दोघांनी कोणकोणती कार्ये कसकशी केली?||३||
भावार्थ:---सूत म्हणाले:---भगवान नारायण,नरोत्त्म
नर,देवी सरस्वती आणि महर्षी व्यासांना नमस्कार करून "जय--श्रीमद्भागवत"
ग्रंथाचे पठन करावे.आपण--जीवांनी भगवंत नारायण,नरोत्तम नर,विद्देची देवी
सरस्वती आणि श्रीमद्भगवत ज्यांनी ग्रंथ
आपले--जीवांचे तीन-दोष १--मल-दोष,२--विक्षेप-दोष व ३--आवरण-दोष निवारून करून परमात्मारूप
आहोत असे कळण्याकरिता व त्याचा अनुभव येऊन जन्म--मरण निवृत्त होण्याकरिता लिहिला
आहे,म्हणून त्यांना नमस्कार क्सरून आसन ग्रहण करावे.त्यांनी आपल्यावन अनंत उपकार
केलेले आहेत,म्हणून आदरपूर्वक नमस्कार करावा.||४|| भावार्थ:---ब्रहमर्षींनो ! धर्मराज
महाप्रस्थानाला गेला,तेव्हा सम्राट परीक्षित एके दिवशी वज्रनाभाला भेटण्यासाठी
मथुरेला गेला.||५|| भावार्थ:---पित्यासमान
असणारा परीक्षित भेटण्यासाठी आल्याचे पाहून वज्रनाभाचे ह्रदय प्रेमाने भरून
आले.त्याने त्याचे स्वागत करून व त्याला नमस्कार करून मोठ्या प्रेमाने आपल्या
महालात आणले.आपणाकडे--जीवांकडे कोणी अचानक किंवा हेतूपुरस्पर भेटीस आल्यानंतर
आदराने--प्रेमाने उभे राहून आसनस्थ बसवावे.त्यांचा आदर-सत्कार करावा.हे आपले नैतिक
कर्तव्य असते.||६|| भावार्थ:---ज्याचे मन नेहमी श्रीकृष्णांच्या ठायी रममाण झाले
होते,त्या वीर परीक्षिताने वज्रनाभाला आलिंगन देऊन,अंत:पुरात जाऊन श्रीकृष्णांच्या
रोहिणी इत्यादी पत्न्यांना नमस्कार केला.स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना आपण
नमस्कार करावा,कारण परमार्थ असो किंवा संसार असो शास्त्रांनी दोघांनाही समान समजले
आहे.||७||
भावार्थ:---सम्राट परिक्षिताचा त्यांनी खूप
सन्मान केला.विश्रांती घेतल्यानंतर आरामात बसून तो वज्रनाभाला म्हणाला.||८||
अर्थः---परीक्षित म्हणाला:---“हे वज्रनाभा!तुझे वडील आणि आजोबा यांनी
माझे वडील आणि आजोबांना मोठमोठ्या
संकटातून वाचविले.माझे रक्षणही त्यांनीच केले.||९|| अर्थः---प्रिय
वज्रनाभा!मी कितीही चांगल्या गोष्टी केल्या,तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होऊ
शकणार नाही.म्हणून मी तुला विनंती करतो की,तू खुशाल राज्यकारभारात माझी मदत
घे.||१०||
| कोशसैन्यादिजा चिन्ता तथारिमनादिजा
| मनागपि न कार्या ते सुसेव्याः किन्तु मातरः ||११|| भावार्थ:---तुला
खजिन्याची,सैन्याची किंवा शत्रूंना धाकात ठेवणे इत्यादींची जरासुद्धा काळजी
करण्याचे कारण नाही.(याबाबतीत मी तुला साह्य करीन.)तू फक्त तुझ्या या मातांची
चांगल्या तऱ्हेने सेवा कर.||११||
अर्थः---तुला काही आडचन आली तर मला सांग .मी ती
दूर करीन.हे ऐकून वज्रनाभ अतिशय प्रसन्न होऊन त्याला म्हणाला.||१२|| भावार्थ:---वज्रनाभ
म्हणाला:---महाराज!आपण मला जे काही सांगितले,ते आपणास साजेसेच आहे.मला धनुर्विद्दा
शिकवून आपल्या वडिलांनीसुद्धा माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत.||१३||
भावार्थ:---मी क्षत्रियाला
योग्य अशा शौर्याने चांगल्या रीतीने संपन्न असल्यामुळे मला कोणत्यही गोष्टीची
किंचितशीसुद्धा काळजी वाटत नाही.मला फक्त एकाच गोष्टीची मोठी चिंता आहे.त्यासंबंधी
आपण कांहीसा विचार करावा.||१४||
भावार्थ:---माझ्या मथुरेच्या राज्यावर अभिषेक
झाला असला तरी मी निर्जन वनातच राहत आहे.येथील प्रजा
कोठे निघू
गेली,याविषयी मला काहीच माहिती नाही.प्रजा असेल,तरच राज्याचे सुख असतेना!||१५||
भावार्थ:---वज्रनाभाने परिक्षिताला असे
म्हटल्यावर वज्रनाभाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्याने नंदादिकांचे पुरोहित
महर्षी शांडिल्य यांना बोलाविले.||१६||
भावार्थ:---तेव्हा शांडिल्य पुर्णकुटीतून बाहेर पडून ताबडतोब तेथे येऊन
पोहोचले.वज्रनाभाने त्यांचा विधीपूर्वक सत्कार केला.नंतर ते उच्चासनावर विराजमन
झाले.आपण--जीवांनी आपल्याकडे--जीवांकडे आपल्यापेक्षा--जीवापेक्षा उच्च अधिकारी
आल्यानंतर त्यांचे आदरस्वगत करून त्यांना आपल्यापेक्षा उच्च आसन देऊन आपण--जीवांनी
कमी उंचीच्या आसनावर नंतर बसावे.||१७||
भावार्थ:---वज्रनाभाचे
म्हणणे परीक्षिताने त्यांना सांगितले.तेव्हा अत्यंत प्रसन्नतेने महर्षी शांडिल्य त्यांचे
सांत्वन करीत म्हणू लागले---------||१८|| भावार्थ:---शांडिल्य म्हणाले:---व्रजभूमिचे
रहस्य मी तुम्हांला सांगतो,लक्षपूर्वक ऐका. ‘व्रज’शब्दाचा अर्थ व्याप्ती असा
आहे.या व्युत्पत्तीनुसार,व्यापक असल्याकारणानेच या भूमीचे ‘व्रज’असे नाव पडले
आहे.||१९||
भावार्थ:---सत्त्व,रज,तम,या तीन
गुणांच्या पलीकडे जे परब्रहम आहे,तेच व्यापक आहे.म्हणून त्याला ‘व्रज’असे
म्हणतात.ते सदानंदस्वरूप,परम ज्योतिर्मय आणि अविनाशी आहे.मुक्तांचे तेच स्थान
आहे.||२०|| भावार्थ:---या
व्रजधामामध्ये नंदनंदन भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे.त्यांचा श्रीविग्रह सच्चिदानंदस्वरूप
आहे.ते आत्माराम आणि आप्तकाम आहेत.प्रेमरसात बुडालेले रसिकजनच त्यांचा अनुभव
घेतात.म्हणून आपण--जीवांनी जे कृष्ण सच्चिदानंद आहेत त्यांना कळून घेऊन,त्यांचा
अनुभव घ्यावा.||२१||
| आत्मा तु राधिका तस्य तयैव रमणादसौ |
आत्मारामतया प्राज्ञैः प्रोच्यते गूढवेदिभिः ||२२|| भावार्थ:---भगवान
श्रीकृष्णांची आत्मा आहे राधिका.तिच्याशी रममाण होत असल्याकारणानेच हे रहस्य
जाणणारे ज्ञानी त्यांना ‘आत्माराम’म्हणतात.||२२||
भावार्थ:---‘काम’म्हणजे
हवे असलेले पदार्थ--इच्छित पदार्थ,भगवान श्रीकृष्णांना हवे असलेले व्रजातील पदार्थ
म्हणजे गाई,गोप,गोपी आणि त्यांच्याबरोबर लीला करणे,विहार करणे इत्यादी.हे सर्व
त्यांना नेहमीच मिळालेले असते,म्हणूनच श्रीकृष्णांना ‘आप्तकाम’असे म्हटले गेले
आहे.||२३|| भावार्थ:---प्रकृतीच्या
बरोबर होणाऱ्या लीलेमध्येच रजोगुण,सत्त्वगुण आणि तमोगुण यांच्याद्वारे होणारी
सृष्टीची उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय यांची प्रचीती येते.अशा प्रकारे भगवंतांची
लीला हि एक परमार्थिक आणि दुसरी व्यवहारातील,अशी दोन प्रकारची असते.||२५|| |
वास्तवी तत्स्वसंवेद्दा
जीवानां व्यावहारिकी | आद्दां विना द्वितीया न द्वितीया नाद्दगा क्वचित् ||२६|| भावार्थ:---पारमार्थिक
लीला ही स्वसंवेद्द असते.जीवांच्या देखत जी लीला होते ती व्यवहारिक लीला
होय.पारमार्थिक लीलेखेरीज व्यावहारिक लीला होऊ शकत नाही;परंतु व्यावहारिक लीलेचा
परमार्थिक लीलेत प्रवेश होऊ शकत नाही.जसे कार्यात कारण असते,पण कारणात कार्य
नसते,त्याप्रमाणे व्यावहारिक लीलेत पारमार्थिक लीला असते,पण पारमार्थिक लीलेत
व्यावहारिक लीला नसते.म्हणजेच जीवात किंवा जगात परमात्मा आहे,पण परमात्म्यात जीव व
जग नाही.म्हणून आपण--जीव नसून परमात्मा आहोत,असे सत्संगाद्वारे कळून घेऊन अनुभव
घ्यावा.||२६||
भावार्थ:---तुम्ही दोघेजण--वज्रनाभ आणि परीक्षिती भगवंतांची जी लीला पाहात
आहात,ती व्यावहारिक लीला आहे.पृथ्वी इत्यादी लोक या लीलेच्या अंतर्गत आहेत.याच पृथ्वीवर
हे मथुरामंडळ आहे.||२७||
भावार्थ:---जेथे
भगवंतांची ती पारमार्थिक लीला गुप्तरूपाने सदैव होत असते,तीच ही व्रजभूमी आहे.कधी
कधी प्रेमपूर्ण भक्तांना ती येथे सगळीकडे दिसू लागते.निष्काम--प्रेमपूर्ण भक्तांना
आजही--आताही पारमार्थिक लीलेचे दर्शन होते.म्हणून आपण--जीवांनी
निष्काम--प्रेमपूर्ण भक्त होऊन पारमार्थिक लीलांचे दर्शन घ्यावे. ||२८|| भावार्थ:---अठाविसाव्या द्वापर
युगाच्या शेवटी जेव्हा केव्हा भगवंताच्या रहस्य-लिलीचे अधिकारी येथे एकत्र
येतील,त्यावेळी सुद्धा आता प्रमाणेच भगवान आपल्या भक्तांसह अवतार घेतील.हेतू हाच
कि,आपल्या अधिकारी भक्तांत मिसळता यावे,त्यावेळी भगवंताचे प्रिय देव इत्यादीसुद्धा
सगळीकडे अवतार घेतील.||२९-३०||
भावार्थ:---आता
एवढ्यात,अगदी अलीकडे,जी अवतार झाला होता,त्यावेळी भगवंत आपल्या सर्व आवडत्या
भक्तांच्या अभिलाषा पूर्ण करून अंतर्धान पावले आहे.यावरून हे निश्चित झाले कि,येथे
भगवंत येण्याआधी तीन प्रकारचे भक्तजन उपस्थित होते,यात कोणतीही शंका नाही.||३१|| भावार्थ:---त्यांपैकी
पहिले नित्य अंतरंग पार्षद दुसरे त्यांच्या अंतरंग-लीलेत प्रवेश करून घेऊ
इच्छिणारे.तिसरे देवता इत्यादी. त्यांपैकी देवादिकांना भगवंतांनी अगोदरच
व्रजभूमीतून द्वारकेत नेऊन पोचविले होते.||३२|| भावार्थ:---नंतर
त्यानांच मुसळाचे निमित्त करून पुन्हा आपापल्या अधिकारावर पाठविले.तसेच जे
भगवंतांनाच प्राप्त करून घेण्याची इच्छा करणार होते,त्यांना प्रेमानंदस्वरूप बनवून
नेहमीसाठी आपल्या नित्य अंतरंग-पार्षदामध्ये सामील करून घेतले.जे सर्व नित्य
पार्षद आहेत,ते अजूनही येथे असले,तरी जे त्यांच्या दर्शनाने अधिकारी नाहीत,त्यांना
ते दिसत नाहीत.||३३-३४|| भावार्थ:---जे
लोक व्यावहारिक लीला पाहात होते,ते नित्यलीलेच्या दर्शनाने अधिकारी नाहीत.म्हणून
येथे येणाऱ्यांना सगळीकडे निर्जन वनच दिसते.||३५|| भावार्थ:---म्हणून,हे व्रजनाभा !
तुला काळजी करण्याचे कारण नाही.माझ्या आज्ञेने तूं तेथे पुष्कळशी गांवे
वसव,त्यामुळे तुझे मनोरथ पूर्ण होतील.||३६|| भावार्थ:---भगवान
श्रीकृष्णांनी जेथे जशी लीला केली,त्यानुसार त्या ठिकाणाचे नांव ठेवून तूं अनेक गांवे
वसव आणि अशा प्रकारे दिव्य अशा या व्रजभूमीचे चांगल्या रितीने सेवन करीत राहा.||३७||
भावार्थ:---गोवर्धन,दिर्घपूर(डिग,मथुरा,महावन(गोकुळ,नंदीग्राम(नंदगाव)आणि
बृह्त्साणु(बरसाना)या ठिकाणी तूं गावे निर्माण कर.||३८|| भावार्थ:---भगवंतांच्या
लीलांची ठिकाणे असलेल्या नदी,पर्वत,दऱ्या,सरोवर,कुंड,लताकुंज,वने इत्यादीचे सेवन
करीत राहिले असता तुझ्या राज्यातील प्रजा अतिशय सुख संपन्न होईल आणि तुलासुद्धा
आनंद मिळेल.||३९||
भावार्थ:---हि
व्रजभूमी सच्चिदानंदमय आहे.म्हणून प्रयत्नपूर्वक तूं या भूमीचे सेवन केले
पाहिजेस.भगवंताच्या लीलांची ठिकाणे माझ्या कृपेने तुझ्या लक्षात येवोत.आपण--जीवांनी
जी व्रजभूमी आहे,तेथे जाऊन दर्शन घ्यावे.||४०|| भावार्थ:---हे
व्रजनाभा ! ह्या व्रजभूमिचे सेवन करीत राहिल्याने तुला उद्धव भेटतील.त्यांच्याकडून
मातांसह तुला हे रहस्य कळेल.||४१||
भावार्थ:---एवढे
बोलून शांडीत्य श्रीकृष्णाचे स्मरण करीत,आपल्या आश्रमाकडे निघून गेले.ते ऐकून
परीक्षित आणि व्रजनाभ अतिशय प्रसन्न झाले.आपणही--जीवांनी कोणतेही शारीरिक कार्य
करीत असतांना मनात भगवंताचे नामोच्चारण निरंतर करीतच जीवन व्यतीत करावे,कारण
कलियुगात भगवंताच्या नामोच्चारानानेच उद्धार होतो. ||४२|| __________________________________________________________________________________________
|२-- यमुना आणि
श्रीकृष्णपत्न्यांचा संवाद,कीर्तनोत्सवामध्ये उद्धवांचे प्रगट होणे.
__________________________________________________________________________________________
भावार्थः---ऋषींनी
विचारले---सूत महोदय! आता आम्हांला हे सांगा की,परीक्षित
आणि वज्रनाभ यांना असे सांगून शांडिल्य मुनी
आपल्या आश्रमाकडे परत गेले,तेव्हा या दोन्ही राजांनी कोणकोणती कामे कस-कशी
केली?||१|| भावार्थः---सूत
म्हणाले---त्यानंतर परीक्षिताने इंद्रप्रस्थाहून हजारो मोठमोठ्या शेठ-सावकरांना
बोलावून त्यांना राहाण्यासाठी मथुरेत जागा दिली.गावांचा सत्ताधीश असो किंवा
राज्याचा सत्ताधीश असो,त्यांनी आपले
गांव--राज्य,आर्थिकदृष्ट्या,सामाजिकदृष्ट्या
धार्मिकदृष्ट्या,राष्ट्रदृष्ट्या अनुक्रमे
श्रीमंत-लोकांना,समाजसेवकांना,राष्ट्र-सेवकांना राजाश्रय देणे जरुरी असते.आपण
यांना राजाश्रय न दिला
तर,गावांचा--राज्याचा सर्वांगी विकास होणार नाही.||२||
भावार्थः---सम्राट परीक्षिताने त्यांच्याखेरीज मथुरामंडळातील ब्राह्मण व
प्राचीन वानर आदर करण्यास योग्य आहेत,असे समजून त्यांनाही मथुरा नगरीमध्ये
वसविले.||३|| भावार्थः---परीक्षिताने
साहाय्य आणि शांडिल्यांच्या कृपेने,वज्रनाभाने सर्व स्थानांचा क्रमाने शोध
घेतला,जेथी भगवान श्रीकृष्ण गोप-गोपीसह अनेक प्रकारच्या लीला करीत
होते.लीला-ठिकाणांची निश्चिती झाल्यावर त्यांनी त्या त्या ठिकाणच्या
लीलांच्याप्रमाणे त्या ठीकांणाना नावे दिली.भगवंताच्या लीला-विग्रहांची स्थापना
केली.त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी अनेक गावे वसविली,ठिकठीकाणी भगवंताच्या
नावांनी तलाव आणि विहिरी खोदल्या.पुष्प-कुंज आणि बगीचे लावले.शंकर इत्यादी
देवतांची स्थापना केली.आपण--जर सत्ताधीश असाल तर पुरातन वैभव शोधून त्यांचे
संरक्षण करावे.तलाव--विहिरी,तलाव,धरणे बांधून प्राण्यांना पिण्यासती पाणी,व
शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करावी.||४-५|| भावार्थः---गोविंददेव.हरिदेव
इत्यादी नावांनी भगवद्-मूर्ती स्थापन केल्या.वज्रनाभाने अशा रीतीने आपल्या
राज्यामध्ये सगळीकडे फक्त श्रीकृष्णभक्तीचाच प्रचार करून तो अतिशय आनंदित
झाला.त्याच्या प्रजाजणांनाही अतिशय आनंद झाला होता.भगवंताच्या संकीर्तनामध्ये
संलग्न राहून परमानंदाच्या समुद्रात डुंबत असणारी प्रजा वज्रनाभाच्या राज्याची
नेहमीच प्रशंसा करीत असे.आपण--जीव सत्ताधीश असाल तर भगवंताच्या मंदिराचे संवर्धन
करावे.जेथे भगवंताची मंदिरे नसतील,त्याठिकाणी मूर्तीची स्थापना करून त्यांच्या
व्यवस्थेचे व्यवस्थापन अव्याहित चालू ठेवावे.||७|| भावार्थः---श्रीकृष्णांच्या
विरह-वेदनांनी व्याकुळ झालेल्या राण्या एके दिवशी कालिंदीला आनंदित असल्याचे पाहून
मत्सर सोडून सरळ भावनेने विचारू लागल्या.||८|| भावार्थः---श्रीकृष्णांच्या
राण्या म्हणाल्या---कालिंदीताई!आम्ही जशा श्रीकृष्णांच्या धर्मपत्नी आहोत,तशीच
तूसुद्धां,आहेस.आम्ही तर त्यांच्या विरहाग्नीने होरपळून निघत आहोत.परंतु तू मात्र
तशी नाहीस.याचे कारण काय?कल्याणी सांग तर खरे.||९|| भावार्थः---हा
प्रश्न ऐकून या आपल्याच सवती आहेत,याविचाराने तिचे मन दयेने द्रवले,म्हणून ती हसून
म्हणाली------||१०|| भावार्थः---कालिंदी
म्हणाली---आत्माराम श्रीकृष्णांची आत्मा आहे श्रीराधा.मी तिचे दास्य करीत
असल्यामुळे हा विरह आम्हांला स्पर्श करू शकत नाही.||११||
भावार्थः---श्रीकृष्णांच्या सर्व राण्या श्रीराधाराणीच्या अंशाच्या विस्तार
आहे.भगवान श्रीकृष्ण आणि राधा सदैव एकमेकांच्या समोर आहेत.त्यांचा परस्पर नित्य
संयोग आहे.म्हणून राधेच्या स्वरूपातच अंशत: विद्यमान असणाऱ्या श्रीकृष्णांच्या
ज्या अन्य राण्या आहेत,त्यांनासुद्धां भगवंताचा नित्य सहवास प्राप्त झालेला आहे.||१२||
भावार्थः---श्रीकृष्णच राधा आहेत आणि राधाच श्रीकृष्ण आहेत.त्या दोघांचे
प्रेम हीच बासरी आहे.त्याचप्रमाणे राधाराणींची प्रिय सखी चंद्रावली हि सुद्धां
श्रीकृष्ण-चरणांच्या नखरूपी चंद्रम्याच्या सेवेमध्येच आसक्त असल्यामुळे
"चंद्रावली"नावाने ओळखली जाते.||१३|| भावार्थः---श्रीराधा आणि
श्रीकृष्णांच्या सेवेची तिला अतिशय आवड आहे.म्ह्णून ती दुसरे कोणतेच रूप धारण करीत
नाही.याच श्रीराधेमध्ये मी,रुक्मिणी इत्यादींचा समावेश असल्याचे पाहिले आहे.||१४||
भावार्थः---तुम्हां सर्वांचासुद्धां सर्वांशाने श्रीकृष्णांशी वियोग झालेला
नाही.परंतु तुम्हांला हे रहस्य माहित नसल्याने तुम्ही इतक्या व्याकुळ होत
आहात.||१५||
भावार्थः---पूर्वी
तशाच प्रकारे अक्रूरसुद्धा श्रीकृष्णांना नंदगावाहून जेव्हा मथुरेला घेऊन आला
होता,त्यावेळी गोपींना श्रीकृष्ण-विरहाचा जो अनुभव आला होता,तो सुद्धा विरहाचा
फक्त आभास होता.हे रहस्य जोपर्यंत त्यांना माहित नव्हते,तो पर्यंत त्या अत्यंत
दुःखी होत्या,नंतर उद्धवाने येऊन जेव्हा त्यांचे समाधान केले,तेव्हा त्यांना हि
गोष्ट समजली.||१६|| भावार्थः---जर
तुम्हांलासुद्धां उद्धवाचा सहवास लाभला,तर तुम्ही सुद्धां आपल्या पतीबरोबर नित्य
विहार करीत असल्याचे सुख प्राप्त करू शकाल.||१७||
भावार्थः---सूत म्हणतात---असे सांगितल्यावर प्रसन्न असणाऱ्या यमुनाराणीला
श्रीकृष्णपत्न्या पुन्हा म्हणाल्या.त्यावेळी त्यांच्या मनात उद्धवाला भेटून
त्याच्याकडून प्रियतमाचा नित्य सहवास कसा कसा घडेल,हे जाणून घेण्याची इच्छा
होती.||१८|| भावार्थः---श्रीकृष्णपत्न्या
म्हणाल्या---हे सखी! तूं धन्य आहेस.कारण तुझा पतीशी वियोग नाही.जिच्या कृपेने तुझे
इच्छित तुला प्राप्त झाले,तिच्या आता आम्हीसुद्धां दासी होऊ.||१९||
भावार्थः---परंतु तू म्हणालीस की,उद्धवाशी भेट झाल्यावरच आमचे सर्व मनोरथ
पूर्ण होतील.म्हणून,हे कालिंदी ! त्याची भेट कशी होईल,ते सांग.आपण--जीवांनी
संत--महात्मा यांची भेट घेण्याचा आवश्य प्रयत्न करावा.त्यांचा सत्संग केला असता
आपणांस--जीवास ज्ञान प्राप्त होते.||२०||
भावार्थः---कालिंदी म्हणाली---भगवान श्रीकृष्ण जेव्हा परधामाकडे जाण्यास
निघाले,तेव्हा ते आपला मंत्री असलेल्या उद्धवाला म्हणाले,'हे उद्धवा ! साधंना
करण्याचे ठिकाण म्हणजे बदरीकाश्रम.तूं जेथे जा'.भगवंताच्या या आज्ञेनुसार सध्या
उद्धव प्रत्यक्ष रुपात बदरीकाश्रमामध्ये आहे आणि तेथे जाणाऱ्या
जिज्ञासूंना,भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाचा तो प्रत्यक्ष उपदेश करीत असतो.म्हणून--आपण
बद्रिकाश्रमी जाऊन त्या भूमीचे दर्शन घ्यावे.||२२|| भावार्थः---साधनेने
फळ देणारी भूमी म्हणजे वज्रभूमी.हे रहस्य-सुद्धा भगवंतांनी उद्धवाला सांगून
पूर्वीच हि भूमीसुद्धां त्याला दिली.परंतु भगवान येथून अंतर्धान पावल्यानंतर हि
फलभूमी अदृष्य रुपात आहे.म्हणून उद्धवहि आता येथे दृष्टीस पडत नाही.||२३||
भावार्थः---उद्धवाचे दर्शन होऊ शकेल असे आणखी एक ठिकाण आहे.गोवर्धन
पर्वताजवळ भगवंताच्या लीला-सहचारिणी असणाऱ्या गोपींचे विहारस्थळ आहे.त्यांची
चरणधूळ अंगावर पडावी म्हणून तेथी अंकुर किंवा वेलीच्या रुपात निश्चितच उद्धव तेथे
असणार.म्हणून आपण--जीवांनी गोवर्धन पर्वताजवळ जाऊन तेथील ब हुमिचे दर्शन घेऊन
तेथील धूळ आपल्या अंगास लावावी.||२४|| भावार्थः---शिवाय
भगवंतांनी त्याला आपले नित्य उत्सव-स्वरूप दिले आहे.म्हणून तुम्ही सर्वजणी आता
वज्रनाभाबरोबर कुसुम सरोवराजवळ जा.आपण--जीवांनी कुसुम सरोवराजवळ जाऊन तेथील
पाण्यानी स्नान करून त्या भूमीची धूळ आपल्या अंगास लावावी,त्यामुळे अंत:करण शुद्ध
होत असते.||२५||
भावार्थः---तेथे भगवद्भक्तांना एकत्र आणून वीणा,बासरी,मृदंग इत्यादि
वाड्यासह भगवंताचे नाम आणि लीलांचे कीर्तन असलेल्या सरस संगीताने उत्सव सुरु
करा.||२६|| भावार्थः---जेव्हा
अशा प्रकारे तेथे मोठा कीर्तनमहोत्सव चालू होईल,तेव्हा निश्चितच तेथे उद्धवाचे
दर्शन होईल.तो तुम्ही सर्वांचे मनोरथ अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण करील.||२७|| भावार्थः---सूत म्हणतात-हे
ऐकून प्रसन्न झालेल्या त्यांनी यमुनादेवीला नमस्कार केला आणि तेथून परत येऊन
वज्रनाभ आणि परीक्षित यांना सर्व वृत्तांत सांगितला||२८||
भावार्थः---ते ऐकल्यावर परिक्षितीला अतिशय आनंद झाला आणि तो त्याचवेळी
त्यांना बरोबर घेऊन त्याच ठिकाणी आला व त्याने ताबडतोब सर्व कामांना सुरुवात
केली||२९||
भावार्थः---गोवर्धन पर्वताच्याजवळ वृंदावनात कुसुमसरोवरावर जे
श्रीकृष्णसख्यांचे विहारस्थळ होते,तेथेच श्रीकृष्णकीर्तनाचा उत्सव सुरु
झाला.||३०||
भावार्थः---कीर्तनमहोत्सवाने श्रीराधाकृष्णांची लीलाभूमी जेव्हा साक्षात
साकारली,तेव्हा तेथे आलेले सर्व भक्तजन एकाग्रचित्त झाले.||३१||
भावार्थः---तेव्हा सर्वांच्या देखतच,तेथे वाढलेल्या गवत आणि वेलींच्या
झुडपांतून प्रगट होऊन उद्धव सर्वांच्या समोर आला.त्याचे शरीर श्यामवर्णाचे
होते.त्यावर पितांबर शोभून दिसत होता.त्याने गळ्यात वनमाळा आणि गुंजांची माळ घातली
होती.मुखाने तो सदैव गोपीवल्लभांच्या मधुर लीलांचे गायन करीत होता.उद्धवाच्या
येण्याने त्या संकीर्तनाची शोभा अनेक पटींनी वाढली.स्फटिकाने मढलेल्या गच्चीवर
चांदणे पडल्यावर जशी शोभा वाढते तशी.त्यावेळी आनंदसमुद्रांत डुंबणारे सर्वजण इतर
सर्व विसरून गेले||३२-३३|| भावार्थः---थोडया
वेळाने जेव्हा ते शुद्धीवर आले,तेव्हा मनोरथ पूर्ण झाल्याने त्यांनी उद्धवांची
पूजा केली||३५|| __________________________________________________________________________________________
|३— श्रीमद्भागवताची परंपरा आणि त्यांचे
माहात्म्य,भागवत श्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती __________________________________________________________________________________________
भावार्थ:---सुत
म्हणतात:---तेथे जमलेले लोक श्रीकृष्णकीर्तनात तल्लीन झालेले पाहून उद्धवाने
सर्वांचा सत्कार केला आणि परिक्षिताला आलिंगन देऊन म्हटले.||१|| भावार्थ:---उद्धव म्हणाला:---हे राजा!तू धान्य
आहेस!तू केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीनेच नित्य पूर्णत्वाला पोहोचला आहेस.कारण
श्रीकृष्णकीर्तनाच्या महोत्सवमध्ये तुझे मन अशा प्रकारे बडून गेले आहे.आपले--जीवांचे
मन भगवंतात बुडून जावे,म्हणजे मनपूर्वक परमार्थ करावा. ||२||
भावार्थ:---सुदैवाने
श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठायी तुझी भक्ती आणि वज्रनाभावर प्रेम आहे,ते योग्यच
आहे.कारण श्रीकृष्णांनीच तुला शरीर आणि हे वैभव दिले आहे.||३||
भावार्थ:---सर्व द्वाराका--निवासी
लोकांमध्ये हे सर्वाधिक धन्य आहेत,याबाबत मुळीच शंका नाही.कारण यांनी व्रजामध्ये
राहावे,अशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञा केली होती.||४||
भावार्थ:---श्रीकृष्णांचा मनरूपी चंद्र
राधेच्या मुखकमलाच्या चांदण्याने युक्त होऊन त्यांची लीलाभूमी असलेल्या वृंदावनाला
आपल्या किरणांनी सुशोभित करीत येथे नेहमी प्रकाशमान असतो.||५||
भावार्थ:---श्रीकृष्णचंद्र हा नित्य
परिपूर्ण आहे,त्याच्या ज्या सोळा कला आहेत,त्यांतून हजारो चिन्मय किरणे बाहेर
पडतात,या सर्व कलांनी युक्त श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये नेहमीच असतात.,म्हणून
आपण--जीवांनी व्रज-भूमीत जाऊन त्या भूमीचे दर्शन घ्यावा,कारण त्यामुळे
आपले--जीवांचे अंत:करण शुद्ध होईल.||६||
भावार्थ:---हे परीक्षिता!शरणागतांचे भय दूर
करणारा हा जो वज्र आहे.त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाचे ठिकाणी आहे.||७||
भावार्थ:---भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात या सर्वांना आपल्या योगमायेने आच्छादित
केले आहे.त्यामुळेच हे आपले स्वरूप विसरले आहेत.म्हणून हे दुःखी आहेत,हे निःसंशय.म्हणून
आपण--जीवांनी योगामायेचे आच्छादन सत्संग करून निवृत्त करावे,कारण आपणास--जीवांस
आपल्या स्वरूपाचे स्मरण होईल.||८||
अर्थः---श्रीकृष्णांचा प्रकाश
प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही आपल्या स्वरूपाचा बोध होऊ शकत नाही.जीवांच्या
अंतःकरणामध्ये श्रीकृष्णतत्वाचा जो प्रकाश आहे,त्याच्यावर नेहमी अज्ञानाचा पडदा
पाडलेला असतो.आपण--जीवांनी अज्ञानरूपी पडता सत्संगाच्याद्वारे निवृत्त करावा.||९|| भावार्थ:---अठ्ठावीसाव्या द्वारपार
युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्या
मायेचा पडदा दूर सारला,त्यावेळी जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला होता.||१०|| भावार्थ:---पण ती वेळ आता तर निघून गेली.म्हणून
त्यांचा प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी आता दुसरा उपाय सांगतो,तो ऐक.इतर वेळी जर
कोणी श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश प्राप्त करून घेऊ इच्छित असेल,तर तो त्याला
श्रीमद्भागवतापासून प्राप्त होऊ शकेल.भगवन व्यास मुनींनी श्रीमद्भागवत महापुराण व
इतर ग्रंथ लिखित केलेले आहे.त्या ग्रंथात भगवंताच्या नामोच्चाराचे,अवतारांचे,लीलांचे,स्वरूपाचे
वर्णन केलेले आहे,म्हणजेच भगवंत--श्रीकृष्ण वाङग्-मयरूपाने विद्दमान आहेतच.त्या
ग्रंथाचे आपण--जीवानी सत्संगाद्वारे श्रवण करावे.त्यामुळे आपल्या ठिकाणी असलेले
तीन प्रकारचे दोष--१--मलदोष,२--विक्षेपदोष,व ३--आवरण दोष निवृत्त होऊन
चौथा जो पुरुषार्थ मोक्ष अनुभवास येऊन जन्म--मरण निवृत्त होतात.||११|| भावार्थ:---भगवंतांचे
फक्त जेव्हा कोठे श्रीमद्भागवत-शास्त्राचे कीर्तन आणि श्रवण करतात,तेव्हा तेथे
खात्रीने भगवान श्रीकृष्ण असतातजसे जेथे--जेथे रामायण असते,तेथे--तेथे श्रावण
करण्यासाठी भक्त हनुमान सासतात,त्य्याचाप्रमाणे जेठेर--जेथे श्रीमद्भागवत ग्रंथाचे
चिंतन चालू आहे,तेथे--तेथे भगवंत--श्रीकृष्ण असतात.म्हणून आपण श्रीमाद्भागवत ग्रंथ
श्रवण करावा.||१२|| भावार्थ:---जेथे श्रीमद्भागवताच्या एका किंवा
अर्ध्या श्लोकाचा सुद्धा पाठ होतो,तेथेसुद्धा ते गोपींसह विराजमान असतात.आपण जर
श्रीमद्भगवतगीता या ग्रंथाचा की,ज्या ग्रंथात भगवंत श्रीकृष्णांनी भक्त अर्जुनास
जीव--ब्रह्म--ऐक्य ज्ञानाचा उपदेश केलेला.त्यामुळे अर्जुणास मोक्ष मिळालेला
आहे.त्याचप्रमाणे आपन जर श्रीमद्भागवत गीताचा सत्संग किंवा पाठ केला तर
आप्सानास--जीवास मोक्ष मिळेल.||१३|| | भारते मानवं जन्म प्राप्य भागवतं
न यैः | श्रुतं पापपराधीनैरात्मघातस्तु तैः कृतः ||१४||
भावार्थ:---या भारतवर्षात मनुष्यजन्म मिळूनही
ज्या लोकांनी पापामुळे श्रीमद्भागवतकथा ऐकली नाही,ते आत्मघात्कीच समजावे.आपण--जीवांनी
मनुष्य देहात येऊन श्रीमद्भागवत ग्रंथाचे श्रावण करावे,जर आपण या ग्रंथाचे श्रावण
केले तर आत्मघात होईल व त्यामुळे आपणास मनुष्य देह न मिळता चौऱ्याऐंसी योनीच्या
शरीरास जाऊन दु:ख भोगावे लागेल. ||१४|| भावार्थ:---ज्या भाग्यवान लोकांनी
दररोज श्रीमद्भागवत शास्त्राचे सेवन केले आहे,त्यांनी आपले पिता,माता आणि पत्नी
अशा तिन्ही कुळांचा चांगल्या तऱ्हेने उद्धार केला,असे समजावे.आपण--जीवांनी दररोज
सत्संग केला तर आपले माता--पिता,व पत्नीचा म्हणजे दोन्ही कुलांचा उद्धार निश्चित
होईल.||१५||
भावार्थ:---श्रीमद्भागवताच्या सेवनाने ब्राहमणांना
ज्ञान प्राप्त होते.क्षत्रियांना शत्रूंवर विजय मिळतो,वैश्यांना धन मिळते आणि
शूद्रांना स्वास्थ्य लाभते.श्रीमद्भागवत ग्रंथाचा सत्संग केला असता आपली इच्छित
वस्तू प्राप्त होते.||१६||
भावार्थ:---स्त्रिया आणि अन्य लोकांच्यासुद्धा
सर्व इच्छा श्रीमद्भागवतामुळे पूर्ण होतात.मग कोणता भाग्यवान त्याचे नित्य सेवन
करणार नाही,बरे?जो--जो श्रीमद्भागवताचा सत्संग करेल,त्याची--त्याची मनातील इच्छा
पूर्ण होते.||१७|| भावार्थ:---जन्म-जन्मांतरी
साधना करून जेव्हा मनुष्य सिद्ध होतो,तेव्हा त्याला श्रीमद्भागवताची प्राप्ती
होते.जेथे भागवताचा प्रकाश असतो,तेथे भगवद्भक्ती उत्पन्न होते.म्हणून आपण
श्रेमाद्भागवत ग्रंथ सहज जरी श्रावण केला तर पुन्हा आपण--जीव आपणहून श्रवण करून
भक्त होऊतच,इतका गोडवा आणणारा ग्रंथ आहे. ||१८|| भावार्थ:---पूर्वी
सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद्भागवत मिळाले आणि त्यांनी ते मला
दिल्यामुळे मी श्रीकृष्णांना प्रिय झालो.
आपण--जीवांनी जर फक्त ग्रंथ सहज हातात घेतला तर आपलयाला तो ग्रंथ श्रवण
करावा, हि भावना उदयास येऊन श्रीमद्भागवत ग्रंथ सत्संग करून--श्रवण करून
श्रीकृष्णांचे भक्त होतोतत.||१९| भावार्थ:---परीक्षिता!बृहस्पतींनी मला एक
आख्यायिकासुद्धा सांगितली होती,ती तू ऐक.या आख्यायिकेमुळे श्रीमद्भागवतश्रवणाच्या
संप्रदायाचा क्रमसुद्धा समजतो.||२०|| भावार्थ:---बृहस्पती
म्हणाले:---आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा
सृष्टीनिर्मितीचा संकल्प केला,तेव्हा रजोगुण
सत्त्वगुण व तमोगुण यांनी युक्त अनुक्रमे ब्रह्मा,विष्णू व शिव असे तीन देव प्रगट
झाले.तेव्हा भगवंतांच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रहमदेवाने त्यांना
प्रार्थना केली.भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे जगाची उत्पत्ती पालन आणि संहार
करण्याचा अधिकार दिला.||२१-२२|| भावार्थ:---ब्रहमदेव म्हणाला:---हे
परमात्मन!आपण नर म्हणजे पाण्यात शयन करीत असल्यामुळे “नारायण”नावाने प्रसिद्ध आहात;सर्वांचे
आदिकारण--उत्पत्तीचे कारण असल्याने आदिपुरुष--उत्पत्ती करणारे आहात,आपणास माझा
नमस्कार असो.आपण--जीवांनी भगवंत--पुरुषास नमस्कार करावा. ||२३||
भावार्थ:---प्रभो!आपण मला सृष्टीची
उत्पत्ती करण्यास सांगितले परंतु.या अत्यंत पापी रजोगुणाने मला आपली स्मृती
ठेवण्यात विघ्न उत्पन्न करू नये,एवढी कृपा करा.ब्रह्मदेवास उत्पत्ती कशा प्रकारची
करावी,याचे स्मृतीचा विसर पडला आहे,त्याचप्रमाणे आपणास--जीवांस आपल्या स्वरूपाचा
अज्ञानामुळे विसर पडला आहे,म्हणून आपण सत्संगाद्वारे अज्ञान निवृत्त करून ज्ञान
प्राप्त करून घ्यावे.||२४||
भावार्थ:---बृहस्पती
म्हणतात:---तेव्हा प्रथम भगवंतांनी त्याला श्रीमद्भागवताचा उपदेश करून म्हटले,की
“ब्राहमण!तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू
नेहमी याचे सेवन करीत राहा.”||२५|| भावार्थ:---श्रीमद्भागवताचा
उपदेश ऐकून ब्रहमदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने श्रीकृष्णांची नित्य प्राप्ती
होण्यासाठी व सात आवरणे नष्ट होण्यासाठी श्रीमद्भागवताचे साप्ताहपारायण केले.आपणसुद्ध--जीवांनीसुद्धा
श्रीमद्भागवाताचे सत्संगाद्वारे श्रवण करावे.||२६||
भावार्थ:---सप्ताहयज्ञाच्या विधीनुसार सात
दिवसपर्यंत श्रीमद्भागवताचे पारायण करण्याने ब्रहमदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण
झाले.याप्रमाणे ती वारंवार साप्ताहयज्ञाचे अनुष्ठान करीत सृष्टी उत्पन्न करीत
असतो.आपणसुद्धा--जीवांनीसुद्धा श्रीमद्भागवताचे सात पारायण करून सात सत्संग करावेत.त्यामुळे
आपणास सकामता असेल तर इच्छित इच्छा पूर्ण होईल किंवा निष्कामता असेल तर चौथा
पुरुषार्थ मोक्ष मिळेल. ||२७||
भावार्थ:---विष्णूंनीसुद्धा आपले मनोरथ सिद्ध
होण्यासाठी त्या परमात्म्याला प्रार्थना केली.कारण त्या पुरुषोत्तमांनीच विष्णुंची
सुद्धा प्रजापालनाच्या कामात नेमणूक केली होती.||२८||
भावार्थ:---विष्णू म्हणाले:---हे
देवा!मी आपल्या आज्ञेप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांमुळे उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती
आणि निवृत्ती यांच्याद्वारा योग्य रतीने प्रजेचे पालन करीन.भगवन विष्णूंनी
श्रीमद्भागवताचे पारायण केले,म्हणून आपणही श्रीमद्भागवताचे पारायण करावे.||२९||
भावार्थ:---कालक्रमानुसार
जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल,तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून मी पुन्हा
धर्माची स्थापन करीन.आपण--जीवांनी मानव-देह प्राप्त झाल्यानंतर सत्संगाद्वारे
ज्ञान प्राप्त करून,भगवंताची काय--माने वाचे--वाङग्-मयरूपी सेवा घडण्यासाठी पुन्हा--पुन्हा मनुष्य-देहास
येऊन सेवा घडावी,म्हणून भगवंतास प्रार्थाना करावी.||३०||
|
भोगार्थिभ्यस्तु
यज्ञादिफलं दास्यामि निश्चितम् | मोक्षार्थिभ्यो विरक्तेभ्यो मुक्तिं पन्चविधां
तथा ||३१|| भावार्थ:---ज्यांना भोगांची इच्छा
आहे.त्यांना त्यांनी केलेल्या यज्ञादी कर्मांचे फळ अवश्य देईन.त्याचप्रमाणे जे
मुक्त होऊ इच्छितात,त्या विरक्तांना पाच प्रकारच्या मुक्तीसुद्धा देईन.आपण--जीवांनी
श्रीमद्भागवताचे सकाम भावनेने श्रवण केले तर इच्छित मागणी पूर्ण होईल व निष्काम
भावनेने श्रवण केले तर चौथा जो पुरुषार्थ मोक्ष प्राप्त होईल.||३१||
भावार्थ:---परंतु
जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाहीत,त्यांचे पालन मी कसे करावे.हे मला समजत
नाही.तसेच मी माझे व लक्ष्मीचेसुध्दा रक्षण कसे करावे,ते आपण सांगावे.||३२||
भावार्थ:---आदिपुरुष श्रीकृष्णांनी
त्यांनासुद्धा श्रीमद्भागवताचा उपदेश करून म्हटले,‘आपल्या मनोरथांच्या सिद्धीसाठी
तू या श्रीमद्भागवतशास्त्राचा नेहमी पाठ करीत जा.’म्हणून आपण--जीवांनी भगवंताची
सेवा घडण्यासाठी श्रीमद्भागवत--शात्राची सेवा घडावी,म्हणून श्रीमद्भागवत--शास्त्राचा
पाठ करावा.त्यामुळे आपणास--जीवास मानव-देहात जन्मोजन्मी भगवंताची सेवा घडेल.||३३||
भावार्थ:---या उपदेशाने प्रसन्न झालेले श्रीविष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात
श्रीमद्भागवताचे स्मरण करू लागले.यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने
पालन करण्यास समर्थ झाले.भगवन विष्णूंनी लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात
श्रीमद्भागवताचे पारायण करतात,म्हणून परमार्थाचे व जगाचे पालन करण्यास समर्थ
झाले.त्याचप्रमाणे आपणसुद्धा प्रत्येक महिन्यात श्रीमद्भागवताचे पारायण केले असता
आपणास--जीवांस जन्मोजन्मी मानद-देह प्राप्त होऊन भगवंताची सेवा निश्चितरूपाने
घडेल.||३४||
| यदा विष्णुः स्वयं वक्ता लक्ष्मिश्च
श्रवणे रता | तदा भागवतश्रावो मासेनैव पुनः पुनः ||३५|| भावार्थ:---जेव्हा श्रीवूष्णू स्वतः सांगतात
आणि लक्ष्मी प्रेमाने श्रवण करते,त्या प्रत्येक वेळी भागवतकथेचे श्रवण एक
महिन्यातच पूर्ण होते.आपणसुद्धा श्रीमद्भागवताचे पारायण करावे.||३५||
भावार्थ:---परंतु जेव्हा लक्ष्मी स्वतः कथा
सांगते आणि श्रीविष्णू ऐकतात,तेव्हा भागवतकथेचे रसास्वादन दोन महिनेपर्यंत चालू
राहते.त्यावेळी कथा खूपच रंगते.||३६||
भावार्थ:---यानंतर
ज्याची भगवंतांनी संहार करण्यासाठी नेमणूक केली होती,त्या रुद्रानेही आपले
सामर्थ्य वाढविण्यासाठी त्या परमपुरुषांना प्रार्थना केली.||३८||
भावार्थ:---रुद्र
म्हणाला:--- हे माझे पभू देवाधिदेवा!नित्य,नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्याची
शक्ती माझ्या अंगी आहे.परंतु आत्यंतिक प्रलयाची शक्ती नाही.हेच माझे मोठे दुःख
आहे.माझ्यातील हि कमतरता नाहीशी व्हावी,म्हणून मी आपल्याला प्रार्थना करीत
आहे.||३९-४०|| भावार्थ:---बृहस्पती म्हणतात:---नारायणांनी
रुद्राची प्रार्थना ऐकून त्यालाही श्रीमद्भागवताचाच उपदेश केला.त्याने एका वर्षात
एक पारायण या पद्धतीने भागवतकथेचे सेवन केले.या सेवनाने त्याने तमोगुणावर विजय मिळविला आणि आत्यंतिक संहार-मोक्ष करण्याची
शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतली.आपणही--जीवांनी श्रीमद्भागवताचे श्रवण केले,तर
गुणातीत होऊन परमात्मारूप होता येते.||४२--४२|| भावार्थ:---उद्धव
म्हणता:---श्रीमद्भागवताच्या महात्म्यासंबंधीची हि कथा मी माझे गुरु श्रीबृहस्प्ती यांचे तोंडून ऐकली आणि भागवताचा
उपदेश प्राप्त करून घेऊन मी आनंदित झालो व त्यांना प्रणाम केला.||४३|| भावार्थ:---त्यानंतर
श्रीविष्णूंच्याच पद्धतीने मीसुद्धा एकेका महिन्यात श्रीमद्भागवत कथेचा चांगल्या
तऱ्हेने रसास्वाद घेऊ लागलो.||४४|| भावार्थ:---तेवढ्यानेच
मी भगवान श्रीकृष्णांच्या प्रियतम सखा झालो.त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये
आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्त केले.||४५||
भावार्थ:---विरहव्याकूळ गोपिंमध्ये वास्तविक नित्य विहर करणाऱ्या
श्रीकृष्णांनी,त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या
मुखाने श्रीभागवताचा संदेश पाठविला.आपणसुद्धा जर आपणास--जीवांस परमात्म्याचा अनुभव
आला असेल तर,वक्ता होऊन इतरांचा भ्रम निवृत्त करावा.||४६||
| तं यथामति लब्ध्वा ता आसन्
विरहवर्जिता: | नाज्ञासिषं रहस्यं तच्चमकारस्तु लोकितः ||४७|| भावार्थ:---तो संदेश आपल्या बुद्धीनुसार
ग्रहण करून गोपी ताबडतोब विरह--वेदनांतून मुक्त झाल्या.हे रहस्य तर मी समजू शकलो
नाही.परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पहिला.आपणसुद्धा--जीवांनीसुद्धा
श्रीमद्भागवत श्रवण सत्संगाद्वारे दु:खातून मुक्त व्हावे.||४७||
भावार्थ:---या घटनेला पुष्कळ दिवस
लोटल्यावर जेव्हा ब्रहमदेव इत्यादी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे
येण्याविषयी प्रार्थना करून निघून गेले,त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्यासमोरच
असलेल्या मला भगवंतांनी श्रीमद्भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच उपदेश केला आणि
माझ्या बुद्धीत तो दृढ केला.त्याच्याच प्रभावाने मी बदरिकाश्रमात राहूनसुद्धा येथे
व्रजातील वेलींमध्येही निवास करीत आहे.||४८-४९|| भावार्थ:---त्याच
आधारावर मी येथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहतो.भक्तांना श्रीमद्भागवताच्या
सेवनानेच श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश मिळेल.||५०|| भावार्थ:---
सूत म्हणतात:---हे ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटले.म्हणून येथे
उपस्थित झालेल्या या सर्व भक्तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद्भागवताचा
पाठ करीन.परंतु या कार्यात तुम्हीच मला सहाय्य केले पाहिजे.आपण श्रीमद्भागवत--
महापुरणाचे श्रवण करावे.||५१|| भावार्थ:---परीक्षित
म्हणाला:---हे हरिदासा!आपण श्रीमद्भागवत-कथेचे निरुपण करावे.||५२||
याबाबतीत माझ्याकडून जे साहाय्य पाहिजे
असेल,त्याची आज्ञा करावी.
भावार्थ:---सूत
म्हणता:---हे ऐकून उद्धव प्रसन्न होऊन म्हणाला---||५३|| भावार्थ:---उद्धव म्हणाला भगवान
श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला,तेव्हापासून येथे कली बलवान झाला
आहे.म्हणून आपण--जीवांनी कलियुगात नामसंकीर्तन निरंतर करावे.ज्यावेळी हे सत्कार्य
सुरु होईल,तेव्हा तो याच्यामध्ये मोठे विघ्न आणील.||५४|| भावार्थ:---म्हणून
तू आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव.इकडे मी तुझ्या सहाय्याने वैष्णवी
पद्धतीने एक महिनाभर श्रीमद्भागवतकथेचे रसपान करवून यांना भगवान
मधुसूदनांच्यानित्य गोलोक धामामध्ये पोहोचवीन.||५५-५६|| अर्थः---सुत
म्हणतात:---उद्धवाचे म्हणणे ऐकल्यावर कलीवर विजय मिळवण्याच्या विचाराने राजाला
आनंद झाला.परंतु तो चिंतातुरही झाला.त्यावेळी त्याने चिंतेचे कारण उद्धवाला
सांगितले.||५७||
भावार्थ:---परीक्षित म्हणाला:---अहो काका
!आपल्या आज्ञेनुसरा कलीयुगाला मी लगाम घालीन.परंतु मला श्रीमद्भागवताची प्राप्ती
कशी होईल?||५८|| भावार्थ:---सुत
म्हणतात:---हे ऐकून उद्धव पुन्हा त्याला म्हणाला------------||५९||
भावार्थ:---उद्धव म्हणाला:---राजन!तुला तर
कोणत्याही गोष्टीसाठी,कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचे कारण नाही.कारण या भागवत
शास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस.||६०||
भावार्थ:---जगातील माणसे प्रापंचिक कामातच
गढून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत तरी बहुतेकांनी भागवतश्रवणाचे नांवसुद्धा काढलेले
नाही.||६१||
भावार्थ:---या
भारतवर्षातील बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद्भागवतकथेची प्राप्ती झाल्यावर
शाश्वत सुख प्राप्त करून घेतील.||६२|| भावार्थ:---महर्षी
श्रीशुकदेव साक्षात श्रीकृष्णांचेच स्वरूप आहेत.तेच तुला श्रीमद्भागवताची कथा
ऐकवतील,यात तिळमात्र शंका नाही.||६३||
भावार्थ:---राजन!त्या कथेच्या श्रवणाने तू
व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील.त्यानंतर या पृथ्वीवर
श्रीमद्भागवतकथेचा प्रचार होईल.||६४||
म्हणून राजेंद्रा!तू जाऊन कलीला बंधनात ठेव.
भावार्थ:---सूत म्हणतात:---उद्धवने असे
सांगितल्यावर परीक्षिताने त्याला प्रदक्षिणा घातली,नमस्कार केला आणि तो
दिग्विजयसाठी निघून गेला.||६५|| भावार्थ:---इकडे
व्रजाने आपला पुत्र "प्रतीबाहू" याला मथुरेच्या राज्यावर बसविले आणि
आपल्या मातांच्या बरोबर तो श्रीमद्भागवत ऐकण्याच्या इच्छेने वृंदावनात राहू लागला.आपण--जीवानी
वृदावंनात जाऊन श्रीमद्भागवत--शास्त्र श्रावण करावे.||६६||
भावार्थ:---त्यानंतर उद्धवने
वृंदावनात गोवर्धन पर्वताजवळ एक महिनाभर श्रीमद्भागवतकथेचा रस भक्तांना
वाटला.||६७|| भावार्थ:---त्या रसाचे आस्वादन करतेवेळी
प्रेमी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर सगळीकडे भगवंतांची सच्चिदानंदमय लीलाच प्रगट झाली
आणि त्यांना सर्वत्र श्रीकृष्णचंद्रांचा
साक्षात्कार होऊ लागला.आपण जर अंत:करणपूर्वक वृंदवनांत जाऊन श्रीमद्भागवत श्रावण केले तर भगवंत
श्रीकृष्णांचे दर्षण आजही होऊ शकते. ||६८||
अर्थः---त्यावेळी
सर्व श्रोत्यांनी स्वतःला भगवंताच्या स्वरूपातच आपण असल्याचे पहिले.वज्रानाभाने
आपल्याला श्रीकृष्णांच्या उजव्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेले पहिले आणि त्यांच्या
विरहशोकातून मुक्त होऊन तो त्या ठिकाणी अत्यंत शोभू दिसू लागला.वज्रनाभाच्या त्या
रोहिणी इत्यादी मातासुद्धा रास-रजनीत प्रकाशित होत असलेल्या श्रीकृष्णरूपी
चंद्राच्या विग्रहामध्ये स्वतःला कला आणि प्रभेच्या रुपात स्थिर झाल्याचे पाहून
अत्यंत आश्चर्यचकित झाल्या.त्याचप्रमणे आपल्या प्राणप्रियाच्या विरहवेदनेपासून
मुक्त होऊन त्यांच्या परमधामामध्ये गेल्या.||६९-७१|| भावार्थ:---ते सर्वजण नेहमीच गोवर्धन पर्वतावरील
वन आणि झाडांमध्ये,वृंदावन,काम्यवन इत्यादी वनांमध्ये तसेच तेथील दिव्य गाईंसमवेत
श्रीकृष्णांच्याबरोबर विहार करीत अत्यानंदाचा अनुभव घेत
असलेले,श्रीकृष्ण-प्रेमामध्ये मग्न असलेल्यांना दिसतात.आपणही भावपूर्ण अवस्थेत
पहिले तर आपणांस दर्शन होऊ शकते.||७३|| | य एतां भगवत्प्रा य एतां भगवत्प्राप्तिं
श्रृणुयाच्चापि कीर्तयेत् | तस्य वै भगवत्प्राप्तिर्दुःखहानिश्च जायते ||७४|| भावार्थ:---सूत
म्हणतात:---जे लोक ही भगवत्प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसऱ्यांना ऐकवतील,त्यांना
भगवत्प्राप्ती होईल व त्यांचे दुःख नाहीसे होईल.म्हणून आपण जीवांनी
ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार सांगावी किवा ऐकावी.=,करण त्यामुळे आपणांस भागवत
प्राप्ती होईल.||७४|| __________________________________________________________________________________________
|४--- श्रीमद्भागवताचे स्वरूप,प्रमाण,श्रोता-वक्त्यांची
लक्षणे,श्रवण विधी आणि महात्म्य __________________________________________________________________________________________
| साधु सूत चिरं जीव चिरमेवं प्रशाधि नः |
श्रीभागवतमाहात्म्यमपूर्वं त्वन्मुखाच्छ्रुतम् ||१|| भावार्थ:---शौनकादी ऋषी म्हणाले:---सूत
महोदय!आपणास उदंड आयुष्य मिळो आणि आपण आम्हांला असाच उपदेश दीर्घकाळपर्यंत करीत
राहावा.आम्ही आपल्या तोंडून श्रीमद्भागवताचे अपूर्व महात्म्य ऐकले.||१||
भावार्थ:---सूत महोदय!आता आपण आम्हांला
श्रीमद्भागवताचे स्वरूप,त्याचे प्रमाण,ते श्रावण करण्याची पद्धत,तसेच वक्ता आणि
श्रोते यांची लक्षणे सांगावीत.||२||
| श्रीमद्भागवतस्याथ
श्रीमद्भगवतः सदा | स्वरूपमेकमेवास्ति सच्चिदानन्दलक्षणम् ||३|| भावार्थ:---सूत
म्हणतात:---श्रीमद्भागवत आणि श्रीभगवंतांचे स्वरूप सदासर्वदा एकच आहे आणि ते
म्हणजे सच्चिदानंदरूप हेच.श्रीमाद्भागावाताचे जे स्वरूप आहे,तेच स्वरूप
आपले--जीवांचे आहे,म्हणून आपण आपले--जीवांचे स्वरूप कळन्याकरिता व अनुभवास
येण्याकरिता सत्संगाच्याद्वारे श्रवण करून कळून घ्यावे,त्यातच आपले--जीवांचे
महाहीत आहे.||३|| भावार्थ:---भगवान
श्रीकृष्णांचे ठायी ज्यांचे प्रेम आहे,त्या भक्तांच्या ह्रदयामध्ये भगवंतांचे
माधुर्य अभिव्यक्त करणारे काव्य म्हणजे श्रीमद्भागवत होय.||४||
अर्थः---जे वाङ्मय ज्ञान,विज्ञान,भक्ती व त्याच्या प्राप्तीच्या
साधन-चतुष्टयाला प्रकाशित करणारे असून,मायेचे समूळ उच्चाटन करणारे आहे,ते म्हणजे श्रीमद्भागवत
समज.आपण--जीवांनी श्रवण केले तर मायाचे समूळ उच्चाटन होते,त्यामुळे जन्म--मरण
निवृत्त होते.||५||
भावार्थ:---श्रीमद्भागवत अनंत अक्षरस्वरूप
आहे.त्याचे प्रमाण कोण जाणू शकेल बरे?प्रथम विष्णूंनी ब्रहमदेवांना चार
श्लोकांच्या द्वारे याची केवळ दिशा दाखविली होती.||६||
भावार्थ:---विप्रगणहो !या भागवताच्या अतिशय
खोल असलेल्या पाण्यात बुडी मारून त्यातून आपल्यासाठी इष्ट वस्तू प्राप्त करण्यास
फक्त ब्रहमदेव विष्णू,शंकर इत्यादीच समर्थ आहेत.जो--जो श्रीमद्भागवत श्रवण करील
तो-तो मोक्ष प्राप्त करून जन्म--मरण निवृत्त करील.||७||
भावार्थ:---परंतु ज्यांच्या बुद्धी इत्यादी
वृत्ती मर्यादित आहेत,त्या माणसांनी आपले हित साधावे,म्हणून श्रीव्यासमुनींनी
परीक्षित आणि शुकदेव यांच्त झालेल्या संवादरुपाने जे कथन केले,त्याचेच नाव
श्रीमद्भागवत आहे.या ग्रंथाची श्लोकसंख्या अठरा-हजार (१८०००)आहे.जे लोक कलीरूप अजगराच्या विळख्यात
सापडले आहेत,त्यांच्या सुटकेसाठी हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे.आपण--जीवांनी कलीरूप
अजगारातून सुटण्यासाठी श्रीमद्भागवत श्रवण करावे.||८-९||
भावार्थ:---भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे
श्रवण करणाऱ्या श्रोत्यांविषयी आता सांगतो---उत्तम आणि अधम असे श्रोत्यांचे दोन
प्रकार मानलेले आहेत.||१०|| भावार्थ:---चातक,हंस,शुक,मीन
इत्यादी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत.वृक,भुरुंड वृश,उष्ट्रा इत्यादी अधम
श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद सांगितले आहेत.||११||
भावार्थ:---चातक ढगातून
पडणाऱ्या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो,त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन
फक्त श्रीकृष्णांसंबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो,त्याला चातक
म्हटले आहे.म्हणून आपण--जीवांनी चातक होऊन म्हणजे सर्व विषयांचा--संसाराचा त्याग
करून श्रीमद्भागवत श्रवण करावे. ||१२||
भावार्थ:---हंस ज्याप्रमाणे पाणी
मिसळलेल्या दुधातून शुद्ध दूध तेवढे घेतो,त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून
त्यातील सार तेवढे घेतो,त्याला हंस म्हणतात.आपण--जीवांनी श्रीमद्भागवत श्रवण करून
त्या भागवतातील सार म्हणजे परमात्मा घ्यावा व विषयांचा--संसाराचा त्याग करावा,कारण
विषय--संसार हे दु:खास कारण आहे व परमार्थ हा सुखाला कारण आहे. ||१३||
भावार्थ:---ज्याप्रमाणे
चांगल्या रीतीने शिकविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसेच येणाऱ्या
इतरांनासुद्धा प्रसन्न करतो,त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि
थोडक्यात शब्दात दुसऱ्यांना ऐकवितो व त्यायोगे व्यास व इतर श्रोत्यांना आनंद देतो
त्याला शुक म्हणतात.आपण वक्ता असाल तर इतरांचे दु:ख निवृत्त करावे व त्यांना
परमानंदाचा अनुभव यावा.||१४|| भावार्थ:---जशी
क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहात राहून दुग्धपान
करते,त्याप्रमाणे जो श्रोता कथा ऐकतातांना डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि तोंडातून
एक शब्दही बाहेर न काढता अखंड कथारसाचाच आस्वाद घेत राहतो,तो प्रेमी श्रोता मीन
म्हटला गेला आहे.आपणही मीनासारखे श्रोते होऊन सारच--परमात्माच सेवन करावा.म्हणजेच
जन्म--मरण निवृत्त करावे.||१५||
भावार्थ:---वनामध्ये
बासरीचा मधुर आवाज ऐकण्यात मग्न झालेल्या हरिणांना लांडगा जसा भयानक ओरडण्याने
भिवावितो, त्याचप्रमाणे मूर्ख माणूस कथा श्रवण करीत असतांना रसिक श्रोत्यांना
डिवचीत मध्येच मोठ्याने बोलतो,तो वृक म्हणावा.आपण--जीव वृक न होता हरीण
व्हावे,कारण त्यामध्ये आपले जन्म--मरण निवृत्त होऊन आनंदरूप होउत.||१६||
भावार्थ:---हिमालयाच्या
शिखरावर असलेला भूरुंड नावाचा पक्षी कोणाची तरी उपदेशपर वाक्ये ऐकून तसेच
बोलतो,परंतु स्वतः त्यापासून बोध घेत नाही.याप्रमाणे जो उपदेशपर गोष्टी ऐकून त्या
दुसऱ्यांना शिकवितो,परंतु स्वतः तसे आचरण करीत नाही,अशा श्रोत्याला भूरुंड
म्हणतात.आपण--जीव भूरुंडासारखे श्रोता न होता राजा परीक्षितासारखे श्रोता
व्हावे,जसा राजा परिक्षित मोक्त झाला,तसेच आपण मुक्त होउत. ||१७|| भावार्थ:---बैलासमोर
द्राक्षे येऊ देत किंवा कडवट पेंड,दोन्ही तो एकाच चवीने खातो,त्याप्रमाणे जो
ऐकलेले सारेच ग्रहण करतो,परंतु घेण्याजोगे काय व टाकण्याजोगे काय हे ठरविण्यास
ज्याची बुद्धी असमर्थ असते,असा श्रोता वृष--बैलोबा म्हटला जातो.म्हणून आपण
वृश--बैलोबा श्रोता न होता राजा परीक्षितासारखे श्रोते व्हावे,कारण राजा परीक्षिती
साध्यापर्यंत गेला. ||१८|| भावार्थ:---उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून
फक्त कडूलिंबाचा पालाच चघळतो,त्याप्रमाणे जो भगवंतांच्या मधुर कथा ऐकण्याचे सोडून
त्याऐवजी संसारातील गोष्टीत रममाण
होतो,त्याला उंट म्हणतात.आपण उंट श्रोता न होता म्हणजे संसाराच्या गोष्टी किंवा
दृष्टांत न ऐकता संसाराच्या गोष्टील भावार्थ किंवा दृष्टांतील भावार्थाकडे लक्ष द्दावे.||१९||
| अन्येsपि बहवो
भेदा द्वयोर्भृंगखरादयः | विज्ञेयास्तत्तदाचारैस्तत्तत्प्रकृतिसम्भवैः ||२०|| भावार्थ:---असे काही थोडेसे भेद सांगितले आहेत.त्यांच्याव्यतीरिक्तसुद्धा
उत्तम-अधम अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे ‘भ्रमर’, ‘गाढव’इत्यादी अनेक भेद
आहेत.हे भेद त्या त्या श्रोत्यांच्या स्वाभाविक आचार-व्यवहारावरून ओळखता
येतात.||२०|| भावार्थ:---जो वक्त्याला योग्य रीतीने प्रणाम
करून त्याच्यासमोर बसतो आणि इतर संसारातील गोष्टी सोडून फक्त श्रीभगवंतांच्या कथाच
ऐकण्याची इच्छा ठेवतो,समजून घेण्यात अत्यंत कुशल असतो,नम्र असतो,हात जोडलेले
असतात,शिष्यभावनेने श्रद्धा ठेवून,ऐकले असेल त्याचे सतत चिंतन करीत राहतो,जे समजले
नसेल ते विचारतो,पवित्र भावनेने वागतो,तसेच श्रीकृष्णभक्तांवर सदैव प्रेम
करतो,अशाच श्रोत्याला वक्ते लोक उत्तम श्रोता म्हणतात.आपण--जीवांनी उत्तम श्रोता
होण्यासाठी कथेतील अर्थाकडे न पाहता भावार्थाकडे पाहावे.भगवंताच्या कथेतीलही
भावार्थ पाहावा.कथा लक्षपूर्वक,श्रद्धापूर्वक--आदरपूर्वक--नम्रपुर्वक श्रवण करावी.जे
श्रीकृष्णाचे भक्त आहेत,त्यांच्याविषयी--आदर असावा.त्यांच्यावर प्रेम करावे.||२१||
| भगवन्मतिरनपेक्षः सुहृदो दीनेषु सानुकम्पो
यः | बहुधा बोधनचतुरो वक्ता सम्मानितो मुनिभिः ||२२|| भावार्थ:---आता वक्त्याची लक्षणे
सांगतात.ज्याचे मन नेहमी भगवंतांच्या चरणी लागलेले असते,ज्याला कोणत्याही वस्तूची
अपेक्षा नसते,जो सर्वांचा प्रिय सखा आणि दीनांवर दया करणारा असतो,तसेच अनेक
उदाहरणे देऊन तत्त्वाचा अर्थ सांगण्यात चतुर असतो,असा वक्ता मुनींना सन्माननीय
वाटतो.आपण जर श्रीमद्भागवत कथेचे वक्ता असाल,तर आपली श्रीकृष्णांच्या
चरणावर--निर्गुण-निराकार मूळ स्वरूपावर दृष्टी असून त्या
मूळ-स्वरूपाचा--परमात्माचा अनुभव घ्यावा.श्रोत्यास भावार्थ कळेल,त्यापासून बोध
घेऊन आचरण कसे कळेल,असे सांगावे.त्यासाठी व्यवहारातील व पुराणातील--शास्त्रातील प्रमाणही
दृष्टांत सांगावेत.||२२||
भावार्थ:---विप्रगण
हो!भारतवर्षाच्या भूमीवर श्रीमद्भागवत कथेचे सेवन करण्याचा जो आवश्यक विधी आहे,तो
मी आता सांगतो,ऐका.ज्यामुळे सुख अधिकाधिक वाढते.||२३||
भावार्थ:---सात्विक,राजस,तामस,आणि
निर्गुण हे श्रीमद्भागवत-सेवनाचे चार प्रकार आहेत.||२४||
भावार्थ:---एखाद्या यज्ञासारखा निरनिराळ्या प्रकारच्या पूजा-सामग्रीने मोठा
उत्सव केला जातो,अतिशय परिश्रमपूर्वक घाईगडबडीत,सात दिवसात आनंदाने पारायण केले
जाते,ते राजस म्हटले जाते.म्हणून आपण--जीवानी शक्यतो राजस पारायण न करता सात्विक
पारायण करावे.||२५|| भावार्थ:---कथेच्या रसाचा आस्वाद घेत,अति
परिश्रम न घेता,एक किंवा दोन महिनेपर्यंत जेव्हा श्रवण केले जाते,ते पूर्ण आनंद वाढविणारे
सात्त्विक सेवन म्हटले जाते.आपण--जीवांनी कमीतकमी आठ दिवस,किंवा एक महिना,किंवा
दोन महिने किंवा सतत श्रवण करावे,कारण कथेचा आनंद प्राप्त होऊन जन्म--मरण निवृत्त
होते.||२६||
भावार्थ:---श्रद्धेने आरंभ
करून श्रवण थांबते.आठवण झाल्यावर पुन्हा सुरु केले जाते,अशा प्रकारे आळसामुळे जे
वर्षभर सेवन केले जाते,ते तामस सेवन होय.हे सुद्धा सुख देणारेच असते.आपण तामस
श्रीमद्भागवत सेवन न करता सात्विक श्रीमद्भागवत श्रवण करावे.त्यात आपले महाहीत
आहे.||२७||
भावार्थ:---जेव्हा वर्षे महिने आणि दिवस या
नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण केले जाते,ते
सेवन निर्गुण मानले गेले आहे.म्हणून आपण कालावधीचा नियम न ठरवता निरंतरच व
प्रेमाने--निष्काम श्रावण करावे,ते सेवन निर्गुण म्हटल्या जाते.त्यामुळे विलक्षण
आनंद प्राप्त होऊन जन्म--मरण निवृत्त होते.||२८|| भावार्थ:---परीक्षित
आणि शुकदेव यांच्यातील संवादरूपाने सुद्धा जे भागवताचे सेवन झाले होते,तेही
निर्गुणच होय.तेथे जी सात दिवसांची मर्यादा आहे,ती राजाच्या उरलेल्या आयुष्याच्या
दिवसांच्या संख्येमुळे आहे.साप्ताह कथेचा नियम म्हणून नव्हे.राजा परीक्षितीने सात
दिवस कथा श्रावण केली,त्यास कारण त्यांचे आयुष्य सात दिवसच राहिले होते,म्हणून
त्यांनी सात दिवस श्रावण केले.आपण मात्र जसे राजा परीक्षितीने मृत्यू येईपर्यंत
श्रवण केले,त्याचप्रमाणे प्रत्येकाने ज्याचे--त्याचे मरण येईपर्यंत श्रवण करावे.||२९|| | अन्यत्र त्रिगुणं चापि निर्गुणं च यथेच्छया | यथा
कथश्चित् कर्तव्यं सेवनं भगवच्छ्रुते: ||३०|| भावार्थ:---भारतवर्षाव्यीतिरिक्त इतर ठिकाणी
सुद्धा त्रिगुण किंवा निर्गुण कोणत्याही प्रकारे का होईना,श्रीमद्भागवताचे सेवन
करावे.अन्य देशात भूतलावर कोठेही त्रिगुण किंवा निर्गुण श्रीमद्भागवत वक्ता होऊन
सांगावे किंवा श्रवण करावे.||३०|| भावार्थ:---फक्त
श्रीकृष्णांच्या लीलांचेच श्रवण,कीर्तन व रसास्वादनासाठी जे लोक हपापलेले असतात
आणि मोक्षाचीसुद्धा अपेक्षा ठेवीत नाहीत,त्यांचे श्रीमद्भागवत हेच धन आहे.आपण--जीवांनी
श्रीकृष्णाकरीतच श्रीमद्भागवत श्रवण करावे. ||३१||
भावार्थ:---त्याचप्रमाणे हे संसारातील
दुःखांना भिऊन मुक्ती मिळवू इच्छितात,त्यांच्यासाठी सुद्धा हे भवरोगावरील औषध
आहे.म्हणून या कलीयुगात प्रयत्नपूर्वक याचे सेवन कले पाहिजे.आपण--जीवांनी
मुक्तीसाठी--चौथा पुरुषार्थ प्राप्तीसाठी--जन्म--मरण निवृत्तीसाठी श्रावण करावे. ||३२||
भावार्थ:---वरील
लोकांखेरीज जे लोक विषयातच रमणारे आहेत,ज्यांना नेहमी संसारातील सुखेच मिळावीत अशी
इच्छा असते,त्यांच्यासाठी सुद्धा,आता या कलियुगात सामर्थ्य,धन आणि वैदिक कर्मांचे
ज्ञान नसल्याने,कार्ममार्गानेच मिळणारी सिद्धी अत्यंत दुर्मिळ झाली आहे.म्हणून
त्यांनी सुद्धा भागवतकथेचेच सेवन करावे.आपण--जीवांनी सकाम--संसारातील इच्छा
प्राप्त होण्यासाठी श्रीमद्भागवत श्रवण करावे.||३३-३४||
भावार्थ:---हि
भागवताची कथा धन,पुत्र,स्त्री,वाहने,इत्यादी यश,घर आणि निष्कंटक राज्यसुद्धा देऊ
शकते.आपण--जीवांनी धन,पुत्र, स्त्री,वाहने,यश,घर,राज्य-प्राप्तीसाठी,थोडक्यात
ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार,ज्याच्या--त्याच्या इच्छेनुसार श्रीमद्भागवत
वक्ता होऊन सांगावे किंवा श्रवण करावे.ज्याच्या--त्याच्या भावनेनुसार त्यास ते--ते
वांच्छित फळ मिळेलच,यांत कांहीच शंका नाही.||३५|| भावार्थ:---या भागवताचा आश्रय घेणारे लोक या
संसारातील मनाजोगते उत्तम भोग भोगून भागवताची सांगत धरल्याने शेवटी श्रीहरींचे
परमधाम प्राप्त करून घेतात.अखेर ज्याच्या--त्याच्या भावनेनुसार त्या जी--जी भावना
असेल,त्यानुसार ते-ते फळ मिळोन अखेर शेवटी श्रीकृष्णाचे धाम--स्थान मिळेलच.||३६||
भावार्थ:---जेथे
श्रीमद्भागवताचे कथा-कथन चाललेले असते,तसेच जे लोक ही कथा श्रवण करण्यात तत्पर
झालेले असतात,त्यांची सेवा शरीराने व धनाने करावी.जे--जे श्रीमद्भागवत श्रवण करीत
असतील किंवा वक्ता होऊन संगत असतील,त्यांची आपण--जीवांनी धनाने व शरीराने सेवा
करावी.थोडक्यात आपापल्या अधिकारानुसार सेवा करावी,त्यानुसार इच्छित फळ सेवा
करणारास मिळेल.||३७|| अर्थः---त्या
लोकांच्या कृपेने अशी मदत करणाऱ्यांनासुद्धा भागवतसेवनाचे पुण्य प्राप्त
होते.श्रीकृष्णांखेरीज ज्या अन्य कशाचीही इच्छा केली जाते,त्या सर्वांना धन अशी
संज्ञा आहे.||३८||
भावार्थ:---श्रोता वक्ता हे सुद्धा दोन
प्रकारचे मानले गेले आहेत;एक श्रीकृष्णांनी इच्छा करणारे आणि दुसरे धनाची!जसा
वक्ता तसाच श्रोता जर असेल,तर त्या ठिकाणी कथेच्या सुखामध्ये वाढ होते.सर्वांना
ज्याच्या--त्याच्या भावनेनुसार त्यांना--त्यांना ते--ते फळ मिळतेच.म्हणून आपण--जीवांनी
आपापल्या अधिकारानुसार ते--ते कार्य करून सेवा करावी.||३९||
भावार्थ:---जर दोघांचे विचार
एकमेकांच्या विरुध्द असतील,तर कथेची गोडी वाटत नाही आणि फळ मिळत नाही.परंतु जर
दोघेही श्रीकृष्णप्राप्तीची इच्छा करणारे असतील तर त्यांना उशिरा का होईना,सिद्धी
अवश्य प्राप्त होते.||४०||
भावार्थ:---धनार्थीचे अनुष्ठान
व्यवस्थितपणे पार पडले तरच त्याला सिद्धी प्राप्त होते.परंतु श्रीकृष्णांची इच्छा
करणाऱ्याच्या विधीमध्ये काही कमतरता राहिली,तरीसुद्धा जर त्याच्या ह्रदयात प्रेम
असेल तर ते प्रेमच त्याच्यासाठी सर्वोत्तम विधी आहे.सर्व साधनांत प्रेम--निष्काम
सेवन सर्व साधनांत श्रेष्ठ साधन आहे,म्हणून आपण--जीवांनी शक्यतो
निष्कामतेने--प्रेमाने सांगावे किंवा ऐकावे.असे न वाटले तर ज्याच्या--त्याच्या
भावनेनुसार श्रवण करावे.मात्र हे लक्षात असू द्दावे की,श्रवण न करणे,फारच मोठा
अपराध आहे,अपराध मात्र मुळीच करू नये,करण इतर चौऱ्याऐंसी योनीत श्रावण करण्याचा
मुळीच संधी नाही,करण काळातच नाही.म्हणून मनुष्य देहात आल्यावर कोणत्याही भावनेने
श्रीमद्भागवताचे श्रवण करावेच--करावेच--करावेच-------------------- ||४१||
भावार्थ:---सकाम पुरुषाने कथा समाप्त होईपर्यंत स्वतः सर्व विधींचे पालन केले
पाहिजे.दररोज प्रात:काळी स्नान व नित्यकर्म पूर्ण करावे.नंतर भगवंतांचे चरणामृत
घेऊन पूजेच्या साहित्याने ग्रंथ आणि गुरु (व्यास) यांचे पूजन करावे.त्यानंतर
प्रसन्न मनाने श्रीभाद्भगवताची कथा सांगावी किंवा ऐकावी.आपण--जीवांनी श्रीमद्भागवताच्या
नियमानुसार कथा श्रवण करावी.कथा श्रवण करण्यापूर्वी व कथा श्रवण केल्यानंतर
ग्रंथास व व्यासांना नमस्कार करून आदराने श्रवण करण्यास बसावे व जावे.कठेचा शेवटी
श्रीमाद्भागावाताच्या ग्रंथाची,व्यासांची व वक्त्यांची पूजा
करावी.त्यांना--वक्त्यांना त्यांच्या अधिकारानुसार किंवा द्रव्यांच्या
उपयोग्यतानुसार--सत्कार्यानुसार वस्त्र--अलंकार व द्रव्य म्हणून दक्षिणा
द्दावी.त्यातही देणाराचे व जणांचेच हित असते.||४२-४३|| भावार्थ:---दुध
किंवा हविष्यान्नाचे भोजन मौन पाळून करावे.दररोज ब्रम्हचर्याचे पालन करून भूमीवर
झोपावे.क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा.||४४||
| कथान्ते कीर्तनं नित्यं समाप्तौ जागरं चरेत् |
ब्राम्हणान् भोजयित्वा तु दक्षिणाभिः प्रतोषयेत् ||४५|| भावार्थ:---दररोज
कथा संपल्यानंतर कीर्तन करावे आणि कथा समाप्त होईल,त्या दिवशी रात्री जागरण करावे
ब्राहमणांना भोजन घालून त्यांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे.||४५||
| दारागारसुतान्
राज्यं धनादि च यदीप्सितम् | परं तु शोभते नात्र सकामत्वं विडम्बनम् ||४७|| भावार्थ:---कथेचे वाचन करणाऱ्या गुरूला
वस्त्र,अलंकार इत्यादी देऊन गाईचेही दान करावे.अशा प्रकारे विधान पूर्ण क्र्ल्याने
माणसाला स्त्री,घर,पुत्र,राज्य,धन इत्यादी जे जे पाहिजे,ते सर्व नमनोवांछित फल
प्राप्त होते.परंतु हा सकामभाव वाईटच.श्रीमाद्भागवताच्या कथेला तो शोभ त नाही.(कथा
वाचून वा ऐकून भगवंतांच्या ठिकाणीच प्रेम निर्माण झाले पाहिजे.प्रपंचावर
नव्हे.)||४६-४७||
| कृष्णप्रप्तिकरं शश्वत् प्रेमानन्दफलप्रदम्
| श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेण भाषिताम् ||४८|| भावार्थ:---श्रीशुकदेवांनी सांगितलेले हे
श्रीमद्भागवत--शास्त्र कलीयुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारे
आणि नित्य प्रेमानंदरूप फल देणारे आहे.म्हणून प्रत्येक मानवांनी तो स्त्री असो
किंवा पुरुष असो,सर्वांनी श्रवण करावे,करण त्यामुळे मनुष्य देहास आलेले सार्थकता
प्राप्त होते.आपले--जीवांचे जन्म--मरण निवृत्त होते.वक्ता यांनी सदगुरू कृपेने
भावार्थ केलेला आहे.जे योग्य असेल ते सदगुरूंचे आहे तेच सारगृहीदृष्टीने घ्यावे व
जे योग्य नसेल,ते वक्त्याचे आहे,त्याचा त्याग करावा. ||४८|| __________________________________________________________________________________________
| इति श्रीस्कान्दे महापुराण एकाशीतिसाहस्त्रयां
संहितायां |४----द्वितीये
वैष्णवखण्डे श्रीमद्भागवतमाहात्म्ये(उत्तरार्ध)भागवतश्रोतृवक्तृलक्षणश्रवणविधीनिरुपणं
नाम चतुर्थोऽध्यायः(४)आठ्ठेचाळीस (४८)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||४|| __________________________________________________________________________________________
| *****
| ||समाप्तमिदं श्रीमद्भागवतमहात्म्यम् || | श्रीकृष्णार्पणमस्तु
| ||हरी: ॐ तत्सत् || =====================================================================================
| ||आरती
श्रीमद्भागवताची || | जय जय हो जय श्री भागवता |आरती करू तुज भगवंता
||धृ.|| | श्री शुक मुनीने
|परम भक्तीने |नानापरीने |गाइयले ज्या हरीचरिता |
| ||आरती करू||१|| |
आत्माराम मुनी सकळ |सेवुनि झाले जन सुफळ | | पहा पर्वणी |आली अवनी |की अघहरिणी |भवजलतरणी ती
पतिता
| ||आरती करू||२|| | येथे व्यासांची
वाणी |सार्थक हरिगुण गाऊणी| | शास्त्रपुराने
मुकुटमणी |परमप्रेमामृत जननी| | सहज सेविता|भाविक
भक्ता|उदार दाता |मोक्ष तत्त्ता दे दाता | | || आरती करू
||३|| |
गमते जणू
मानसतीर्थ|व्दादश सोपाने युक्त | | निर्मल भाक्तिजले भरित
|विहारे हरी हंसचि चित्त | | लोक सुकमळे | संत
व्दिजकुळे |सेवुनि रमले|भान हरपले रस पीता | | ||आरती करू||४|| | अपार महिमा ग्रंथाचा |वदवेना
कोणा साचा|
| प्राणचि कीर्तन
कारांच्या |मेवा कविवर संतांचा |
| जणू बोधाचा
|स्वयंप्रभेचा |व्दादश कळिचा |रवी अंतरिचा तमहर्ता| | ||आरती करू||५|| | ग्रंथ नव्हे हा
श्रीकृष्ण|गीते वेधी मन पूर्ण
| अनन्य होता या शरण | खचित टळे
जन्म-मरण |
| त्रिताप जाती|चिर ये शांती
|नाथ ही वदती | |
कृष्ण पदी ठेवू
माथा |आरती करू तुज भगवंता||६|| =====================================================================================
Comments
Post a Comment