अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः दहावा पूर्वार्ध
| ॐ नमो भगवते वासुदेवाय | श्रीमद्भागवतमहापुराण | ____________________________________________________________________________________ | दशमस्कन्ध--स्कंध दहावा-१० | l [पूर्वार्ध] | ___________________________________________________________________________ १--वसुदेव—देवकी विवाह—[१]भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन,वसुदेव देवकीविवाह आणि कंसाकडूनदेवकीपुत्रांची हत्या असें जे श्रीकृष्णनामक परब्रम्हस्वरूप त्याला आम्ही नमस्कार करितों||१|| ___________________________________________________________________________ ||श्री गणेशाय नम:|| जगाच्या सर्गविसर्गादिक नऊ लक्षणांनी लक्षित व जगाचें अधिष्ठान अर्थः----दशमस्कंन्धामध्ये कृष्णकीर्तीच्या वर्णनासाठी नव्वद अध्याय सांगितले आहेत,त्यांतील पहिल्या चार अध्यायांनी ब्रम्हदेवांच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हरण करण्याकरितां प्रसंगा सहित श्रीहरीचा अवतार निरूपण केला आहे,नंतर पस्तीस अध्य्यांनी गोकुळामध्ये वास करणाऱ्या रामकृष्णांची वृंदावनादिकांचेठिकाणी झालेली लीला वर्णन केली आहे.पुढे एका अध्यायानें यमुनेच्या उदकामध्यें अक्रुराने केलेली स्तुती सांगितली आहे,नंतर अकरा अध्यायांनी मधुवनामध्ये (मथुरेत)राहणाऱ्या श्रीकृष्णाने केलेल्या कंसवाढदिक व विद्याभ्यासदिक लीला वर्णन केलेल्या आहेत आणि बाकीच्या एकून चाळीस,अध्यायांनी द्वारकेंतील लीला सांगितली आहे.याप्रमाणे नव्वद अध्यायांचा सारांश आहे.त्यांत पहिल्या अध्यायामाध्यें तर-देवकीच्या आठव्या गर्भापासून,आपणास मृत्यू प्राप्त होणार अशी आकाशवाणी श्रावण करून भय पावलेल्या कंसानें तिच्या सहा पुत्रांचा वाढ केला अशी कथा सांगितलेली आहे ||१|| अर्थ:---नवमस्कंधाच्या शेवटी संक्षेपानें वर्णन केलेल्या कृष्णावतारचरित्राच्या श्रवणामृतानें तृप्त झालेला परीक्षित् राजा,तेंच चारित्र सविस्तर ऐकण्याच्या इच्छेनें उक्तानुवाद पूर्वक प्रश्न करितो-राजा म्हणाला –हे शुकाचार्य,सोमसूर्याच्या वंशाचा विस्तार तुं मला सांगितला आहेस आणि दोन्ही वंशामध्ये उत्पन्न झालेल्या राजांचे विस्मयकारक चरित्रही सांगितलें,आहेस ||२|| अर्थः----त्यांत सोमवंशामध्ये झालेला अत्यंत धर्मशील जो यदुराजा त्याचा वंशविस्तार व चरित्रही सांगितलेंस.आतां त्या यदुवंशामध्यें अंशनें अवतीर्ण झालेल्या श्रीविष्णूंची चरित्रें आम्हांस वर्णन कर ||३|| मनुष्यदेह धारण करून अर्थः---आतां ती नवमस्कंधामध्यं सांगितलीच आहेत असें म्हणशीलतर खरें परंतु जगदात्मा आणि भूतपालक अशा भगवंताने यदूच्या वंशामध्ये अवतार धारण करून जी कृत्यें केली आहेत ती आम्हांला विस्तारानें सांग||३|| अर्थः----या लोकामध्यें भुक्त मुमुक्षु आणि विषयी असे तीनप्रकारचे जन आहेत तयांमध्यें भगवच्चरित्राचा कोणालाही अर्थः---आतां ती नवमस्कधामध्य संगीतलीच आहेत असे म्हणशीलतर खरें परंतु जगदात्मा आणि भूतपालक अशा भगवंताने यदूच्या वंशामध्ये अवतार धारण करून जी कृत्यें केली आहेत ती आम्हांला विस्तारानें सांग ||४|| अर्थः---या लोकामध्ये भुक्त,मुमुक्षु आणि विषयी असे तिन्प्रकारचे जन आहेत त्यांमध्ये भगवच्चरित्राचा कोणालाही कंटाळा नाहीं असें सांगतो-ज्यांची विषयभोगेच्छा निवृत्त झाली आहे अशा जीवन्मुक्तांनीही गायन केलेला,मुमुक्षूंना तर भावरोगाचें औषधरूप आणि विषयीलोकांच्या कानांना गोड लावणारा अशा श्रेष्ठकीर्ती भगवंतांच्या गुणानुवादापासून,आत्मघातक्यावाचून दुसरा कोण बरें पुरुष कंटाळेल?कोणीच कंटाळणार नाही||४|| अर्थः---आतां आपुलें कुलदैवत श्रीकृष्ण आहे म्हणून त्याची कथाच नित्य श्रावण करावी अशा आशयानें म्हणतो-हर ब्रम्हनिष्ठ,माझे पितामह (युधिष्ठिरादिक),ज्या कृष्णरूप नौकेचा आश्रय करून,युद्धामध्यें देवांनाही जीकणांऱ्या भिष्मादिक अतिरथीरुपी तिमिगील नामक महामत्स्यांनी दुस्तर अशा कौरवसैन्यरुपी समुद्राला वत्सपदा-सारखा अतितृच्छ करून तरले,म्हणजे त्यांनी अनायासानेंच कौरव सैन्य जिंकिले त्या कृष्णाची चरित्रें मला सांग||५|| अर्थ:---श्रीकृष्णाने केवळ पांडवांचेच रक्षण केले असे नाही तर अश्वत्थामाच्या ब्रम्हस्त्रानें अर्थः---हे विद्वन!सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपाने राहून अमृत्त्वाचे आणि बाहेर कालारुपणे राहून अर्थ:---- श्रीकृष्णाने केवळ पांडवांचेच रक्षण केले असे नाही तर अश्र्वथामाच्या ब्रह्मस्त्राने दग्ध झालेले कौरव आणि पांडव यांच्या वंशाचे मूळबीज असे हे प्रत्यक्ष माझे शरीरहि, शरण गेलेल्या माझ्या मातेच्या (उत्तरेच्या ) उदरामध्ये प्रविष्ट झालेल्या ज्याने, हातामध्ये चक्र घेऊन रक्षण केले आहे. ||६|| अर्थः---आपण आताच सांगितले की,बलराम रोहिणीचे पुत्र होते.त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्येसुद्धा आपण त्यांची गणना केलीत.दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे?||८|| अर्थ:-----आणि जो सर्व प्राणिमात्रांच्या आत व बाहेर पुरुषरूपाने व कालरुपांनी राहून अंतर्दृष्टी व बाह्यदृष्टी लोकांना मोक्ष आणि संसार देत असतो, त्या मायेने मनुष्यावतार धारण करणाऱ्या श्री कृष्णाचे पराक्रम मला वर्णन कर. ऐतावता तजो अंतर्दृष्टी पुरुषांना अंतर्यामीरूपाने मुक्ती देतो व बाहिर्दृष्टी पुरुषांना कालरुपाने जन्ममरणरूप संसारचक्रात पाडतो त्याची चरित्रे अंतर्दृष्टीनेच श्रवण केली पाहिजेत असे तात्पर्य||७|| अर्थ:---केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या?तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले?||१०|| अर्थ:----तसेच तुं संकर्षण बलराम हा रोहिणीचा पुत्र म्हणून सांगितलेस आणि पुन्हा तोच देवकीचा पुत्र म्हणून सांगितलेंस,तो देहांतर झाल्यावांचून एकाच जन्मामध्यें दोघींचा पुत्र कसा झाला?हे मला सांगावे||८|| अर्थ:---तसाच यादवांचा पती जो भगवन श्रीकृष्ण, त्याला कान्सादिकांचे भय नसताही तो पित्याचे (वासुदेवाचे) घर सोडून गोकुळामध्ये कोणत्या कारणास्तव गेला? आणि त्याने नंदादिक गोपांसह वर्तमान कोठे केला?||९|| अर्थ:---तसेच त्याला कृष्णाने गोकुळामध्ये, मथुरेमध्ये व द्वारकेमध्ये राहून काय केले? व त्याने देवकीचा भाऊ असल्यामुळे वध करण्यास अयोग्य आशा आपल्या कंसमामाला स्वताच कसे मारिले ? ||१०|| अर्थ:---तसाच त्यानें मनुष्यदेहाचा अंगीकार करून याद्वांसवर्तमान द्वारकेमध्ये गीतीवर्ष वास केला?त्या प्रभूला स्त्रिया किती होत्या ?||११|| अर्थः---हे सर्वज्ञमुने,हें मी विचालेल व नविचारलेलेही जे असेल तें सर्व श्रीकृष्णाचे चरित्र,श्रद्धापूर्वक श्रावण करणाऱ्या मला कृपाकरून सविस्तर सांगावे.||१२|| अर्थः---बरें शुद्ध्देने तृषेनें व्याकूळ झालेल्या तुला श्रावण करण्याविषयी स्वस्तथा कोठे आहे?असें म्हणशील तर-जीही क्षुधा पूर्वी मला अति दुःख होती,ती क्षुधा आता दुःखाचीही त्याग करणाऱ्या मल,मी तुझ्या मुखकमलापासून गळणाऱ्या हरिकथा रूप अमृताचें प्राशन करीत असल्यामुळे बाधा करीत नाही.तें हरिकथामृताचें सेवन मात्र बंध झाली असता माझे वांचणे होणार नाही.||१३|| अर्थः----सुत म्हणाला-हे शौनक,या प्रकारच्या परिक्षिताचा उत्तम प्रश्न श्रावण करून भगवद्भक्तामध्यें श्रेष्ठ अशा त्या भगवान शुक्राचार्याने राजाची प्रशंसा करून,फलिसंबंधी पातकांचा नाश करणारें श्रीकृष्णाचें चरित्र सांगण्यास आरंभ केला.||१४|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजर्षिश्रेष्ठ तुझ्या बुद्धीने चांगला निश्चय केला आहे.कारण,ज्या बुद्धीचा योगाने तुला वासुदेव कथेचे ठिकाणी निष्ठायुक्त प्रीती उत्पन्न झाली आहे.||१५|| भावार्थ:---राजर्षी परीक्षितांनी श्रीशुकाचार्यांना जो प्रश्न केलेला आहे,त्या प्रश्नांच्या उत्तरात सर्वांचे हित होणार आहे,म्हणून तो पारमार्थिक आहे—धार्मिक आहे.आपणही संत—महात्मा यांना असेच प्रश्न करावेत.त्यात आपलेही हित व इतरांचेही हित आहे.||१५|| | वासुदेवकथाप्रश्नः पुरूषांस्त्रीन् पुनाति हि | वक्तारं पृच्छकं श्रोतृंस्तत्पादसलिलं यथा ||१६|| अर्थः---वादुदेवकथासंबंधी केलेला प्रश्नसुद्धा,जसें वासुदेवाचे पादोदक (गंगा), दर्शनस्पर्श वगैरे करणारांस पवित्र करतें त्याप्रमाणें वक्ता,प्रश्न करणारा व श्रोते जन अशा तिन्प्रकारच्या पुरुषांना पवित्र करितो.||१६|| भावार्थ:---भगवंतांच्या कथा,संत—महात्मा कथा,धर्मशात्र व वेदांत शात्र यांच्याविषयी प्रश्न करून सात्विक संस्कार करावेत,कारण प्रश्नकर्ता,वक्ता आणि श्रोते या तिघांचे कल्याण करते.त्यामुळे आपण पवित्र व ज्ञानी होतोत.आचरणात सुधारणा होते.||१६|| अर्थ:---आतां प्रथमतः भगवंतांच्या अवतारांचे कारण सांगतो-हे राजा,मदोन्मत होऊन राजांप्रमाणे वर्तन करणारे जे दैत्य त्यांच्या लक्षावधि सेनांच्या अतिशय भारानें पीडित झालेली भूमि,खेदानें व्याप्त झाल्यामुळें गाईंचे स्वरूप धारण करून,करुणायुक्त आक्रोश करणारी व जिच्या मुखावर दुःखाश्रु प्राप्त झाले आहेत अशी होऊन,ब्रम्हदेवाला शरण गेली आणि त्याच्या समीपभागीं उभी राहून स्तुति करीत तिनें आपलें दुःख त्याला सांगितलें ||१७-१८|| भावार्थ:---राज्यकर्ते यांना अंहकार आलेला असल्यामुळे सुप्रशासन न होता कुप्रशासन होऊ लागले.त्या कुप्रशानाचा परिणाम प्रजा सुखी न राहता दु:खी जीवन भोगू लागली.अन्यायाचे समाज्र पसलेले होते.पृथ्वी मातेला अधर्मिकता वाढल्यामुळे पापांचा भार पृथ्वीवर वाढला होता.तो भार पृथ्वीला सहन होत नव्हता,म्हणून पृथ्वीमाता आपल्यावरील भार कमी किंवा नाहीसा करण्याकरिता ब्रह्मदेवांना शरण गेली.त्याचप्रकारे आपणही अधर्माप्रमाणे आचरण केल्यामुळे आपल्या अंत:करणावर अधर्माचा—पापांचा भार वाढल्यामुळे सुखांची अनुभूती न येत दु:खांची अनुभूती येते.पृथ्वीमाता जसी ब्रह्मदेवाकडे दु:ख निवृत्तीसाठी गेली,त्याचप्रमाणे आपणही संत—महात्मा यांच्याकडे आपले दु:ख निवृत्त होऊन सुखासाठी किंवा सुखरुपतेसाठी संत—महात्मा यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून निष्काम धर्माचे वेदांताचे ज्ञान श्रवणाद्वारे प्राप्त करून त्यानुसार आचरण करावयास पाहिजे.||१७|| भावार्थ:--- पृथ्विमातेने गाईचे रूप धारण केले होते.पृथ्वीला कोणतेही रूप धारण करता येते,कारण ती देवता आहे.म्हणून तिने सात्विक रूप--गाईचे रूप धारण केले होते,ती दु:खी असल्यामुळे खिन्न स्वरात हंबरडा फोडून रडू लागली.दु:खात कोणीही रडत असते.दुखा:चा भोगण्याचा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आपण सदैव धर्मानुसार आचरण करावयास पाहिजे.वास्तविक पाहता पृथ्वी हि धर्मानुसार वागत होती,पण इतर लोक अधर्मानुसार वागत होते,त्यामुळे त्या दु:खी होत्या.त्यांचे दु:ख निवारण करण्याकरिता त्या ब्रह्मदेवाकडे गेल्या होत्या.दुष्टांचा संहार झाल्यानंतर सामान्य लोक सुखी होतील.||१८|| अर्थ:---ब्रम्हदेवानें ते भूमीचें दुःख श्रवण करून तिच्या सहवर्तमान,देवांसह वर्तमान व महादेवासहवर्तमान क्षीरसमुद्राच्या तीरीं गमन केले.||१९|| भावार्थ:--- ब्रह्मदेव पृथ्वीचे दु:ख निवारण करू शकत नाव्हात्म्हनुना त्यांनी त्या पृथ्वीचे दु:ख निवारण करण्याकरिता भगवान शंकरांना आपल्या सोबत घेऊन क्षीरसागर निवासी भगवान विष्णूकडे गेले.त्याप्रमाणे आपणाकडे कोणी तरी कांही कामांसाठी आलेले आहे.ते कार्य आपल्याकडून होत असल्यास आपम्नच करावे.आपणांकडून ते कार्य होत नसेल तर आपण ते कार्य इतरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करावा.थोडक्यात स्वत: किंवा इतरांकडून तरी ते कार्य करावेच.असे केले असता आपणास परोपकार केल्याचे फळ मिळते व ज्याचे कार्य केले,ते कार्य झाल्यामुळे तो समाधानी होतो,म्हणजेच त्याची दु:खातून सुटका होऊन सुखरूप होतो.||१९|| अर्थः---जेथे जाऊन,त्याने एकाग्रचित्त होऊन,जगताचा नाथ,देवांचा देव,भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा व त्यांच्या दुःखाची निवृत्ति करणारा अशा भगवंतांची पुरुषसूक्ताच्या योगानें स्तुति केली ||२०|| भावार्थ:---ब्रह्मदेवांनी भगवान विष्णुंची स्तुती केली.ती स्तुती करत असतांना आपण कनिष्ठ असून ज्याची स्तुती करत आहोत ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत असा भाव असावा.असा भाव असला म्हणजे आपले कार्य होत असते.||२०|| अर्थः---तेव्हा त्या ब्रम्हदेवानें समाधीच्यावेळी आकाशामध्यें उच्चारिले देवाची वाणी ऐकुण समाधींचे विसर्जन करून तो देवांस म्हणाला की,-हे देवहो,समाधीच्याठिकाणी मी ऐकलेली भगवंतांची अज्ञारूप वाणी, तुझी माझ्यापासून लवकर ऐका आणि मोठ्या त्वरेने आचरण कर ||२१|| अर्थ:---ईश्वराने आह्यी प्रार्थना करण्याच्या पुर्विच्फ्ह भूमीचा संताप जाणला आहे.म्हणून तुम्हीही आपआपल्या अंशांनी यादवांमध्ये तो अवतार धारण करण्याच्या पूर्वीच अवतार धारण करावे आणि तो देवाधिदेव भगवान,आपल्या काल्शक्तीच्या योगानें पृथ्वीचा भार दूर करीत असता जोपर्यंत भूमीवर संचार करील तोपर्यंत त्याच्या सहाय्याकरितां तुम्हीही भूमीवर राहावें ||२२|| | वसुदेवगृहे साक्षाद् भगवान् पुरुषः परः | जनिष्यते तत्प्रियार्थं सम्भवन्तु सुरस्त्रियः||२३|| अर्थ:---वसुदेवांच्या घरी साक्षात् भगवन् परमपुरुष,अवतार धरण करील त्यांचे प्रिय करण्याकरितां तुमच्या स्त्रियांनीही अवतार धारण करावेत ||२३|| अर्थः----सहस्त्रमुखांनी युक्त व आपल्याच तेजानें प्रकाशमान असा वसुदेवाचा अंश जो शेष देव तोही हरींचे प्रिय करण्याच्या इच्छेने त्याच्या पूर्वी त्याच्या वडील श्रात्याच्या नात्याने अवतार धारण करील.||२४||
| विष्णोर्माया भगवती यया सम्मोहितं जगत् | आदिष्टा प्रभूणांशेन कार्यार्थे सम्भविष्यति ||२५||
अर्थः—फार काय सांगावे परंतु जिने सर्वही जग अत्यंत मोहित केले आहे ती ऐश्वर्यदिगुणयुक्त विष्णूची मायही भगवंताने अज्ञ केली असतां,देवकीच्या गर्भाचें आकर्षण करणे व यशोदेला मोह करणे इत्यादी कार्ये करण्याकरितां यशोदेच्या ठिकाणी अवतार धारण करील ||२५|| अर्थ:---याप्रकारेकरून मरीच्यादीक प्रजापातींचा अधिपती अशा समर्थ ब्रम्ह देवानें,देवागनांना आज्ञा ब्कारून व भूमीचें तुझे भाग्य मोठे आहे.तुं भगवंतांच्या चारणांनि लवकरच भूषित होशील,अशा भाषणांनी आश्वासन करून सर्वोत्कृष्ट अशा आपल्या स्थानप्रत (सत्यलोकात)गमन केले.||२६|| अर्थः---आता कंसाच्या बंदीगृहामध्ये अवतार झाला.हे सांगण्याकरिता प्रस्तावकथा सांगतो-पूर्वी यादवांचा अधिपती शुरसेननामक राजा (सहस्त्रार्जुनाच्या उरलेल्या पांच पुत्रांपैकी दुसरा) होता त्यानें मातुरानामक नाग्रीमाध्यें वास करून माथुर व शूरसेन या नावांच्या देशांचे राज्य केले.||२७| अर्थः--- त्या काळापासून याद्वांतील सर्व राजांची ती मधुर राजधानी (राहण्याचे मुख्य स्थान )झाली.ज्या मथुरेमध्यें भगवान हरी,नित्य सानिध्य प अर्थः---त्या म्मथुरेमध्ये एकेवेळी शूराचा पुत्र अशा वासुदेवांने विवाह करून नवीन पानिग्रःन केलेल्या देवकी भार्येसहवर्तमान आपल्या घरी जाण्याकारीतां रथावर आरोहण केले.||२९|| अर्थः---त्यावेळी उग्रसेनाचा पुत्र जो कंस त्याने,आपल्या भागिनिचें सन्मानपूर्वक प्रिय करण्याच्या इच्छेनें,सुवर्णाने बांधविलेल्या शेकडो रथांनी परिवेष्टित होऊन वासुदेवाच्या रथावर बसून घोड्यांचे दोरे ग्रहण केले म्हणजे देवकीवासुदेवांना मुख्यस्थानी बसवून आपण सारथी झाला. ||३०|| अर्थ:---तेव्हा प्रस्थानसमयी कन्येवर प्रेम करणाऱ्या देवकाने, कन्येला(देवकीला)सुवर्णाच्या माळांनी अलंकृत असे चारशे हत्ती, पंधरा हजार घोडे, अठराशे रथ आणी नूतन यौवन प्राप्त झालेल्या सालंकृत दोनशे दासी इतके आंदन दिले.||३१-३२|| अर्थ:---तेव्हा प्रयाणाच्या आरंभी वरवधूंना मंगलकारक अशी, शंख, शिंगे, मृदंग, नगारे इत्यादिक वाध्ये एकदम वाजू लागली ||३३|| अर्थः--- मार्गामध्ये घोड्यांचे दोरे ग्रहण करणाऱ्या कंसाला, रे रे कंसा असे संबोधन देऊन अदृश्यरूप वाणी म्हणली की- हे मूर्ख कंसा, तू ज्या आपल्या बहिणीला सन्मानपूर्वक पतीच्या घरी पोहचवीत आहेस त्या देवकीचा अष्टम गर्भ तुझा वध करील||३४|| अर्थः---असे सांगितले असता भोजच्या कुळामध्ये कलंकरूप तो पापी खल कंस, बहिणीला मारण्यास प्रवृत्त होऊन त्याने ऐका हातामध्ये खड्ग घेऊन दुसऱ्या हाताने तिला वेणीचे ठिकाणी ग्रहण केले ||३५|| अर्थ:---तेव्हा निर्लज्ज घातकी व निंध्यकर्म करणारा अशा त्या कंसाचे स्तुति, युक्ती, साममार्ग, व भेद (दृष्टादृष्टभय) यांच्या योगेकारून सांत्वन करीत असता महाभाग्यवान (मोठा धर्मनिष्ठ) वासुदेव म्हणाला की, ||३६|| अर्थ:---वासुदेव म्हणाला, हे कंसा, जरासंधादिक शुरांनी ज्या तुझे शौर्यादिक गुण वर्णन केले आहेत तो भोजकुळात उत्पन्न झालेल्या लोकांचे यश वाढविणारा तू, विवाहोत्साहामध्ये स्त्रीला त्यामध्ये बहिणीला कसा मारीतोस.||३७|| भावार्थ:--- वसुदेव म्हणतात,”हे कंसा देवकीचा विवाह नुकताच संपन्न झालेला आहे.अशा शुभप्रसंगी त्या देवकीला मारणे योग्य नसून निंदनीय आहे.तु तर भोजवंसी असून भोजवंशाची कीर्ती वाढवणारा आहेस.अशी कीर्ती तुला शोभते का?तुझ्या वशांची निंदा होईल.म्हणून तु हे कृत्य करू नकोस.आपणही कीर्ती वाढवणारे कृत्य करावे,निंदनीय कृत्य करू नये.वंदनीय कार्य हे इहलोकातील व परलोकातील कीर्ती वाढवणारे व सुख देणारे असते व निंदनीय कृत्य करू नये,कारण निंदनीय कृत्य इहलोकातील व परलोकातील अपकीर्ती वाढवणारे व दु:खाला कारणीभूत असते.म्हणून निंदनीय कृत्य न करता वंदनीय कृत्य करावे.असा विवेक करावा.||३७|| | मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते | अद्द वाब्दशतान्ते वा मृत्युर्वे प्राणिनां ध्रुवः ||३८||
अर्थः—--मरणाऱ्या भयाने मारितो असे म्हणशील तर- हे वीर, जन्माला आलेल्या प्राण्यांना देहाबरोबरच मृत्यू उत्पन्न होतो, हे ब्रह्म देवाने ललाटी लिहिलेलेच आहे. तथापि कालविलंबाकरिता मारितो असे म्हणशील तर-आज किंवा शंभर वर्षांनी प्राण्यांना मृत्यु खरोखरच प्राप्त होणार, तेव्हा कळविलंबाकरिता पापाचरण करणे योग्य नाही.||३८|| अर्थ:---आणि हा देह गेला असता जर दुसरा देह प्राप्त होणारच नाही तर पापाचरनाणेही त्याचे रक्षण करणे योग्य होईल परंतु तसे नाही. हा देह मरण पावण्याची वेळ आली म्हणजे तेथे असणारा कार्मानुसरी परतंत्र जीव, कर्मवशेकरून यत्नावाचूनच प्राप्त झालेल्या देहांतराची प्राप्ती झाल्यावर नंतर पूर्वीच्या देहाचा त्याग करितो||३९|| भावार्थ:--- जे जन्म घेतात त्यांचा त्या शरीराबरोबर त्या शरीराचा मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो.कलियुगात मनुष्याच्या शरीराचे आयुष्य अधिकाधिक शंभर आयुष्य नश्चित झालेले आहे.म्हणून तुला देवकीला मारण्याची मुळीच आवश्यकता नाही.म्हणून आपणही कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू नयी,कारण मृत्यू अगोदरच निश्चित झालेला असतो.म्हणून आपण निमित्त कारण होऊ नये,कारण निमित्त कारणाकडेच पाप किंवा पुण्य येत असते,म्हणजे आधार किंवा धर्म येत असतो.म्हणून निमित्त होऊ नये.||३८|| | देहे पन्चत्वमापन्ने देही कर्मानुगोsवशः | देहान्तरमनुप्राप्य प्राक्तनं त्यजते वपुः ||३९|| भावार्थ:--- जेव्हा शरीराचा अंत होतो,तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करते आणि कर्मानुसार आपले शरीर सोडतो. शरीर सोडण्याची कोणाचीच इच्छा नसते,तरी शरीर सोडावे लागते,कारत पूर्व कार्मानुसार सुटत असते.म्हणून आपण धर्मानुसार आचरण करून सत्कर्म केले तर,सत्कर्माच्या पुण्याईमुळे त्याला सुखाचे भोग मिळत असतात.||३१|| | व्रजंस्तिष्ठन् पदैकेन यथैवैकेन गच्छति | यथा तृणजलूकैवं देही कर्मगतिं गतः ||४०|| अर्थः---जसा चालणारा पुरुष, पुढे ठेवलेल्या ऐका पायाने भूमीला धरून त्या पायावर देहाचार घालून उभा राहतो आणि नंतर मागचे पूल पुढे ठेवून चालतो किंवा जशी गवतावरची कीड, आपल्या देहाच्या पुढील भागाने प्रथम दुसरा तृणाला धरून नंतर मागच्या भागाने धरलेले तृन सोडून देत्ये त्याप्रमाणे कर्ममार्गाचे ठिकाणी प्राप्त झालेला जीवही प्रथम देहांतराला पावोन नंतर पुर्व्देहाचा त्याग करितो.||४०|| भावार्थ:--- ज्याप्रमाणे मानुष एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय उचलतो,त्याचप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जीवसुद्धा ते ते शरीर व त्या त्या शरीरातील सुख—दु:खाचे फळ भोगितो.म्हणून मनुष्य देहात असतांना जीवांनी धर्मानुसार आचरण करावे व अधर्मानुसार आचरण करू नये.धर्माचे फळ सुख आहे व अधर्माचे फळ दु:ख आहे,म्हणून धर्मानुसार आचरण करावे.||४०|| अर्थ:---स्वीकार करणे किंवा परित्याग करणे हे धर्म देहाविषयकच आहेत असे दर्शवण्याकरिता दुसरा दृष्टांत सांगतो- जाग्रदवस्थेमध्ये पाहिलेले (राजादी शरीर) व ऐकीलेले (इंद्रादी शरीर) प्राप्त करून घेण्याकरिता, त्याचे मनाने चिंतन करणारा पुरुष, जसा स्वप्नामध्ये त्या राजादीशरीरासारखेच काहीतरी शरीर पाहतो आणि लागलेच ते मी आहे असे मानितो आणि नंतर त्याला जग्या देहाची विस्मृती होते, किंवा दुसरा दृष्टांत, जसा जग्रदवस्थेमध्येच दृष्टश्रुतीविषयांचे मानाने चिंतन करणारा पुरुष, मनोराथाच्या योगाने बुद्धी गढून गेली म्हणजे त्या दृष्टश्रुतांसारख्याच कोणत्यातरी देहाला पाहतो व तो मीच आहे असे मानितो व नंतर मुळच्या देहाचेठीकानी स्मृतीरहित होतो त्याप्रमाणे जीव या जन्मामध्येच कर्मवशेकरून दुसऱ्या देहाला त्याग करितो||४१|| भावार्थ:--- ज्याप्रमाणे एखादा पुरुष जाग्रत असस्थेमध्ये राचे ऐश्वर्य ऐकून किंवा पाहून मानाने त्याची अभिलाषा करतो आणि स्वनात राजा बनतो.स्वप्नात राजा बनल्यामुळे आपले मुळरूप विसरतो,त्याचप्रमाणे जीव संस्कारानुसार कामना करून हे शरीर सोडून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो व आपले पहिले स्वरूप,कर्म विसरतो.||४१|| अर्थ:---आता अनेकप्रकारचे देह उत्पन्न होण्यास कारण अशी कर्मे केलेली असल्यामुळे अमुकच देह प्राप्त होईल हे कसे समजावे असे म्हणशील तर संगती ऐक-देहाच्या मरणसमयी, फालाभिमुख झालेल्या क्रमाने प्रेरणा केलेलं या जीवाचे संकल्प विकल्पात्मक मन, मायेने देवमणूष्यादिक नाना देहरूपाने निर्माण केलेल्या गुणकार्यरूप पंचमहाभूतात्मक देहामध्ये ज्या ज्या (देवादिक) देहाकडे धावते (त्याचे चिंतन करिते. ) आणि ज्याची ज्याची अभिमानाने प्राप्ती करून घेते त्या त्या देहाचे ठिकाणी हा जीवात्मा, तोच मी आहे असे मानून त्याच्यासहवर्तमान उत्पन्न होतो (नानायोनिचे ठिकाणी संसार पावतो)||४२|| भावार्थ :--- देहांताच्या—मरणाच्या वेळेस जीवाचे वासानायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासाणांच्या अधीन होते,कारण संचित आणि प्रारब्ध कर्माचे संस्कार असल्यामुळे,मायेने रचलेल्या अनेक पंचभौतिक शरीरांकडे घावत धावत फालाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते.तल्लीन होते म्हणजे वारंवार तेच चिंतन करते.त्यामुळे त्याला त्याच्या कर्मानुसार तसेच शरीर ग्रहण करते.त्या शरीरात कर्मानुसार सुखदु:खाचे भोग मिळतात व त्यानुसार जीवन जगतो.||४२|| अर्थ:---आता कोणतातरी देह प्राप्त होईल खरा तथापि या अतिप्रिय राजदेहाच्या रक्षणासाठी, करू नये तेही करितो असे म्हणशील तर- हे कंसा, जसे सूर्यचंद्रादिक ज्योती, उदकाने भरलेल्या घटादिकांचे ठिकाणी प्रतिबिंबित झाले असता ते वायूच्या योगाने कंपादियुक्त आहेसे भासते त्याप्रमाणे आपल्या अविध्येने रचिलेल्या देहांचेठिकाणी हा जीवात्मा प्रेमाने प्रविष्ट झाला असता त्याचा अभिमान धरण करितो; एतावता देहाच्या अध्यासने देहांचे कृशत्वादिक धर्म जसे आत्म्याचे ठिकाणी भासतात त्याप्रमाणे प्रेमास्पदत्वादिक आत्म्याचे धर्मही देहाचेठीकानी भासतात, मिळून राजाच्या किंवा श्र्वानसुकरादिकांच्या देहांमध्ये काही विशेष नसल्यामुळे मृत्यूचा प्रतिकार करणे हे व्यर्थ आहे. ||४३|| भावार्थ:--- ज्याप्रमाणे सूर्य-चंद्रादि वस्तू पाणी तेल इत्यादी द्रव पदार्थामध्ये प्रतिबिंबित होतार आणि वाऱ्याने द्रवपदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात,त्याचप्रमाणे जीव हा त्याच्या अज्ञानामुळे रचलेल्या पूर्वसंस्कारामुळे शरीरावर प्रेम करतो म्हणजे शरीर म्हणजे मी व शरीरासंबंधी म्हणजे माझे असे मनात भावना धारण करून जीवन जगतो.शरीराचे कर्मानुसार जाणे—येणे चालू असते पण अज्ञानामुळे स्वत:चेच जाणे—येणे समजतो.या धाराणेमुळे तो चौऱ्याऐंसी योनीस प्राप्त होतो.||४३|| अर्थ:---याप्रमाणे सांगितलेल्या सामोपायाचा उपसंहार करीत आता भेद सांगतो ज्याअर्थी दुसऱ्याचा द्रोह करणाऱ्या पुरुषाला यालोकी त्याच्या संबंध्यापासून परलोकी यमापासून भय प्राप्त होते त्याअर्थी आपल्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने, आपण द्रोह करणारा होऊन, कोणाचा द्रोह करू नये. ||४४|| भावार्थ:--- प्रेत्येकाला सुखाचीच गरज असते.सुखासाठीच तो प्रयत्न करत असतो.म्हणून प्रेत्येक जीवाने इतरांचा द्रोह म्हणजे द्वेष न करणे,कारण द्वेष केल्याने इतरांना दु:ख होते.इतरांना दु:ख दिले कि,त्यामुळे आपणासही दु:ख मिळते.म्हणून आपल्या सुखासाठी इतरांचा द्रोह—द्वेष करू नका.कारण हा कर्माच्या अधीन आहे,म्हणजे जसे कर्म करील,त्या कर्मानुसार त्याला ते फळ मिळणार हे निश्चितच आहे.म्हणून जीवांनी इतरांना दु:ख न देता सुखकारक कर्म करावे.त्यामुळे आपणास सुख मिळते.जो इतरांचा द्रोह—दु:ख देईल,त्यास मृत्युलोकात भय व मृत्युलोकात मेल्यानंतर परलोकात भय होऊन दु:ख भोगावे लागेल.म्हणू आपणतरी कोणाचा द्रोह—द्वेष देऊ नये.असे केले असता असता आपणास दु:ख न मिळता इहालोकात सुख व परलोकातही सुख मिळते.||४४|| अर्थ:--पुन्हा सामव सांगतो – हे कंसा, हि देवाकीतर लाकडाच्या बाहुलीसारखी आपले रक्षण करण्यास असमर्थ, दिन व लालन करण्याविषयी योग्य अशी तुझी धाकटी बहिण आहे. आणि तू दिनवत्सल आहेस म्हणून निरपराधी अशा हिचा तू वध करण्यास योग्य नाहीस.||४५|| भावार्थ:--- देवकी तुझी धाकटी बहिण आहे.भावाने बहिणीचा प्राण घेणे योग्य आहे का?बहिणीचा प्राण घेणारा भाऊ ठरेल काय? समाज तुझ्या अशा कृत्यास योग्य म्हणेल काय?यामुळे समाजातील लोक तुझी निंदा करतील.त्यांनी निंदा केलेली तुला आवडणार नाही.तुला लाजिरवाणे जीवन जगावे लागेल.तुला लाजिरवाणे जीवन असह्य होऊन दु:खदायक ठरेल.असा तु विवेक कर.कंस असे अधार्मिक कृत्य करण्यास तयार झाला आहे,तसे कृत्य आपण जीवनात कधीच करू नये.स्त्रीहत्या करू नये असे शात्र आहे.||४५|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला- हे राजा याप्रमाने साममार्गाने व भेदांनी देवकीच्या वाध्पासून निवृत्त होण्याविषयी बोध केलेलाही तो कंस, स्वत:क्रूरस्वभावाचा व त्यातही हिनसा करणाऱ्या राक्षसांना अनुसरणारा असल्यामुळे निवृत्त झाला नाही.||४६|| भावार्थ:--- वसुदेवांनी त्या कंसास समजावून सांगितले,पण त्याचे संस्कार क्रूरतेचे असल्यामुळे त्याच्यावर सात्विक संस्काराचा परिणाम झाला नाही.आपल्यावर सात्विक संस्काराचा परिणाम होण्यासाठी निष्काम कर्म करावे लागते,त्यामुळे अं:करण शुद्ध होते.अंत:करण सुद्ध केले असता सात्विक संस्काराचा परिणाम होऊन वागणुकीत परिवर्तन होते.म्हणून निष्काम कर्म करावे.||४६|| | मृत्युर्बुद्धिमतापोह्यो यावद् बुद्धिबलोद्यम् | यद्दसौ न निवर्तेत नापराधोsस्ति देहिनः ||४८|| अर्थ:---तेव्हा त्या कंसाचा तो आग्रह जाणून, देवकीला प्राप्त झालेला मृत्यू चुकवावा. असा प्रयत्न केला असताहि जर तो चुकला नाही तर मग मात्र प्राण्याचा अपराध (दोष) नाही; नाही तर आहे. ||४७-४८|| भावार्थ:--- जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे,तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.कारण आपणास त्याचा दोष लागत नाही.कारण प्रारब्ध हे बीजरूपाने असते,म्हणून प्रयत्नास वाव—संधी असते,म्हणून प्रयत्न करावा.म्हणून प्रत्येक जीवाने अति प्रयत्न करून कोणतेही संकट टाळण्याचा प्रयत्न करून आपले हित करावे.||४७—४८|| अर्थः---म्हणून ह्या मृत्युरूपी कंसाला पुढे होणारे पुत्र देण्याचा ठराव करून आज दिन अशा ह्या देवकीला सोडवितो आता हेही न्यायाला योग्य नाही असे म्हनावे तर म्हणतो- हीचे ठिकाणी पुढे जर मला पुत्र झाले तर त्यावेळी जे होणार ते होदो, परंतु आज हिचे वाचणे तर घडेल बरे तोपर्यंत जर हाच मरण पावला तर मग काहीच अन्याय नाही आणि जर मला पुत्र होतील व तोपर्यंत हा कंस मारणार नाही तर माझ्या पुत्रापासुनच यांचे मरण विपरीतपनाही का होणार नाही?समयी होर्सल. आता मोठ्या कंसाला तुझ्या बालकापासून कसा मृत्यू घडेल अशी शंका आली असता म्हणतो की, हिचा अष्टम गर्भ तुला मारील, असे बोलणाऱ्या ईश्र्वराची शक्ती दुर्लघ्य आहे, म्हणून यावेळी पुत्र अर्पण करण्याचा ठराव करणे हीच मसलत चांगली आहे. आणि तसे झाले असता आज प्राप्त झालेला हा मृत्यू निवृत्त होईल: निवृत्त होईल; निवृत्त झालेला पुन्हा काळांतरी आला तर मग माझा अपराध नाही. ||४९-५०|| भावार्थ:--- वसुदेवांनी विचार केला कि,आपणास संकट होणाऱ्या पुत्रापासून आहे.देवकीपासून नाही.म्हणून मी आपणास आम्हास होणते पुत्र जन्मताच आपणास आणून देऊ,त्या पुत्रास आपण मारू शकता व त्यामुळे तुमची बहिण देवकी हिचे प्राण वाचतील.असे केले असता आपणास स्त्रीहत्याचे पातक लागणार नाही व तुम्हास मृत्यू येणार नाही,कारण आपण आमच्या पुत्रांना मारणार.||४९|| भावार्थ:--- विधात्याचे विधान कळणे कठीण आहे.दैव जाणणे कठीण आहे.म्हणून आपल्या हातात फक्त प्रयत्न आहेत.याकरिता प्रारब्धापेक्षा प्रयत्नवादी जीवन जगावे.त्यात आपले हित असते.फक्त प्रारब्धवादी जीवन जगू नये.फक्त प्रारब्धवादी जीवन आळशी बनवून प्रयत्न यास प्रतिबंध करते.””दे रे हरी पलंगावरी”हा नियम भारतीय—वैदिक संस्कृतीला—धर्मशात्राला अजिबात मान्य नाही.प्रारब्ध हे बीजरूपाने असते.योग्य प्रयत्न करून त्या प्रारब्धरूपी बीजास वाढ किंवा घट करता येते.असा प्रयत्न करून सुखाकडे जात येते.यामुळे आताही जीवन सुखमय बनवून मृत्युनंतर परलोकात सुखमय जीवन बनवता येते.अशा रीतीने दु:ख टाळून सुखाकडे नेता येते.कधी—कधी मृत्यू समोर येऊन टळतो आणि टळल्याला परत येतो.थोडक्यात जीवन प्रयत्नवादी असावे.||५०|| | विपर्यया वा किं न स्याद् गतिर्धातुर्दुरत्यया | उपस्थितो निवर्तेत निवृत्तः पुनरापतेत् ||५०|| अर्थ:---आत प्राण्यांचे दैवही दुर्वित्कर्य आहे असे दृष्टांतपूर्वक सांगतो – जन वनात वृक्षांना किंवा गावात घरंना जळणारा अग्नी, घराचात्याग करून असलेल्याही वृक्षाना किंवा घरांना जळतो त्याला काष्ठांच्या वियोगाविशयी प्राण्याच्या पुण्यपारूप आष्टाष्टा खेरीज दुसरये कांहीच निमित्त नाही;याप्रमाणेंच जिवाच्याही शरीराच्या जन्माचा किंवा मरणाचा हेतू अतर्क्य आहे.||५१|| | अग्नेर्यथा दारुवियोगयोगयो - रदृष्टतोsन्यन्न निमित्तमस्ति | | एवं हि जन्तोरपि दुर्विभाव्य: रीरसंयोगवियोगहेतुः ||५१|| अर्थः---याप्रमाणें वासुदेवांनी आपल्या बुद्धीची कल्पना चालेल तितका विचार करून. पाप करण्यास उद्युक्त झालेल्या त्या कंसाचा अति याद रुपुर्वक स्त्रोत्र नमस्कारदिकेंकरून सत्कार केला.||५२|| भावार्थ:--- देवकीचा प्राण वाचविण्यासाठी वसुदेवांनी खूप प्रयत्न केले.त्यासाठी कंस याची प्रशंसा केली,कारण मन—सम्मान—स्तुती,लोभ.प्रलोभन याने प्रतिकूलता हि अनुकुलतेत येऊ शकते.म्हणून आपण इतरांना अनुकूल बनवण्यासाठी मान—सम्मान, स्तुती,लोभ,प्रलोभन देऊन इतरांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करावा.आपले इच्छित कार्य होऊ शकते.||५२|| अर्थः---आणि भयानें कंपित झालेल्या मानाने युक्त असाही तो वासुदेव,त्याच्या विश्वासाकारीतां प्रसन्नमुखकमळ होत असता हास्य करीत करीत,क्रूर व निर्लज्ज अशा त्या कंसाला म्हणाला कीं .||५३|| भावार्थ:--- कंस हा अतिशय क्रूर आणि निर्लज्ज असल्यामुळे आला आपलेसे करण्याकरिता वसुदेवांना फार कष्ट झाले.आपणासही आपले कार्य अशा तमोगुणी किंवा रजोगुणी मनुष्याकडून करून घेण्यासाठी फार कष्ट करावे लागतात.आपल्या हिताचे कार्य करून घेतेवेळेस अत्यंत कलेश—कष्ट होतात,ते सर्व कलेश—कष्ट सहन करावे लागतात.मनाला क्लेश—कष्ट होतात,पण ते निमुटपणे सहन करावे लागतात.आतून दु:ख होत असले तरी बाह्यात्कारी आनंद दाखवा लागतो.त्याशिवाय इच्छित कार्य होत नाही.||५३|| अर्थ:---वासुदेव म्हणाला हे -सौम्या त्या आकाश वाणीने जसे तुला सांगितले आहे तसाच मी निश्चय केला आहे,तो असा की,ह्या देवकीपासून तर तुला भय नाही,ज्या पुत्रापासून तुला भय उत्पन्न झाले आहे,म्हणजे अष्टम पुत्र मारिले अशे आकाशवाणीने सांगितल्यावरून परस्परांचा अपेक्षेने कदाचित सर्वही पुत्र अष्टम होण्याचा संभव आहे,यास्तव हिच्या सर्वच पुत्रांनी मी तुला समर्पण करीन.मग तू त्यांना मार किंवा मारू नको त्या बद्दल माझा आग्रह नाही.||५४|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला - हेराजा त्या वासुदेवाच्या वाक्यामाध्यें असलेली जी युक्त व सत्यत्व त्यांला जाणणारा तो कंस,तत्काल बहिणीच्या पदापासून निवृत्त झाला.नंतर मनोरथ सिद्ध झाल्यामुळे संतुष्ट झाल्या वासुदेवांनीही त्या कंसाची तुं महाविवेकी सारग्राही आहेस अशी प्रशंसा करून देवकी स्त्री सहवर्तमान आपल्या गृहामध्ये प्रवेश केला. .||५५|| भावार्थ:--- कंस यास वसुदेव खोटे बोलत नाहीत,अशी खत्री असल्यामुळे आपल्या बहिणीस—देवकिस मारण्याचा विचार सोडून दिला.याकरिता खरे बोलणे व खरे वागणे धर्म दृष्टीने व व्यावाहारिक दृष्टीने हितकारक आहे,याकरिता आपणास खरे बोलणे व खरे वागण्याचे संस्कार—वळण असावयास पाहिजे.जो आपले कार्य करण्यास होकार देतो,त्याची स्तुती,मान करणे जरुरी असते.||५५|| | अथ काल उपावृत्ते देवकी सर्वदेवता | पुत्रान् प्रसुषुवे चाष्टौ कन्यां चैवानुवत्सरम् ||५६|| अर्थ:---नंतर गर्भ धरणाला व प्रसुतीला योग्य असा काळ प्राप्त झाला असता,भगवानाच जेची आराध्य देवता आहे अशी ती देवकी,प्रत्येक वर्षास एक एक याप्रमाणे आठ पुत्र व एक कन्या अश्या नउ मुलांना प्रसवली.||५६|| अर्थ:---त्याच सत्य संकल्पपेकरून प्रसिद्ध व खोटेपानापासून अत्यंत भिणारा त्या वसुदेवाने,प्रथम झालेल्या कीर्तिमान नामक पुत्राला,मोठ्या दुःखाने कंसाला अर्पन केले.||५७|| भावार्थ:--- प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला.वसुदेवाने त्या सर्वांना मोठ्या कष्टाने कंसाच्या स्वाधीन केले,कारण असत्याचे त्यास फार भय वाटत होते.असत्य बोलणे व वागणे फार महापाप आहे.त्यामुळे जीवास फार दु:ख भोगावे लागते.चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपणही जीवन जगात असतांना सत्यानेच सर्व व्यवहार करावा.धर्मानुसारच बोलावे व धर्मानुसार आचारण करावे.सत्यानुसार बोलणे व त्यानुसार आचरण केले तर जीवाला सुख मिळते. निष्काम कर्म व निष्काम भक्ती केली तर अंत:करण शुद्ध होते व स्थिर होते.त्यानंतर वेदांत ज्ञानाचे अधिकारी होतोत.||५७|| | किं दुःसहं नु साधूनां विदुषां किमपेक्षितम् | किमकार्यं कर्द्याणां दुस्त्यजं किं धृतात्मनाम् ||५८|| अर्थ:---आतां मृत्यूला पुत्र कसा दिला अशी आकांक्षा आली असतां म्हणतो-सत्यप्रतिज्ञ अशा साधूंना कोणतें दु:ख सहन करण्यास अशक्य आहे?कोणतेंच नाही.पुत्रलाललनसुखाची अपेक्षा कशी सोडली?अशी आशंका आली असतां म्हणतो-भगवान्-च तत्व आहे दुसरें काही नाही असें जाणणाऱ्या विवेकी पुरुषांना कशाची बरें अपेक्षा आहे?कशाचीच नाही.आतां आपणच नेलेल्या बालकाचा कंस वध करणारा नाहीं असें जाणणाऱ्या विवेकी पुरुषांना कशाची बरें अपेक्षा आहे?कशाचीच नाही.आतां आपणच नेलेल्या बालकाचा कंस वध करणार नाही असे मानून नेले असें का म्हणू नये तर म्हणतो-आत्मा,धर्मकृत्य,पुत्र,स्त्री व सेवकजन यांना पिडा करणाऱ्या कदर्यपुरुषांना करण्यास अयोग्य असें काय आहे?कांहीच नाहीं,बरे देवकीनें तरी पुत्राचा त्याक कसा केला?तर सांगतो-ज्यांनी आपल्या चित्तमध्यें हरीचंय धरण केले आहे त्यांना दुस्त्यज असें काय आहे?काहींच नाही ||५८|| भावार्थ:--- सज्जन अनुकूल व प्रतिकूल सर्व सहजतेने सहन करतात.ज्ञानी पुरुष्यांना कोणत्याच गोष्टींची अपेक्षा नसते,कारण कोणतेही विषय कितीही मिळवले किंवा त्यांचा भोग घेतला तरी समाधान मिळत नसते.अंती ते बरोबर येत नसतात.म्हणून ते मिळवण्याची ते अपेक्षा करत नसतात.नीच पुरुष कांहीही करतो,कारण काय करावे व काय करू नये याचे त्याला ज्ञान नसते.पाप व पुण्य व त्याच्या परिणामाची त्याला जाणीव नसते.ज्याचे मन व इंद्रिये ताब्यात आहे,तो आनात्माचा त्याग करू शकतात.||५८|| अर्थ:---असो,हे राजा वसुदेवाचें पुत्य्र आणणें सुखदुःखाचे ठिकाणीं समत्व व सत्यवचनाचे ठिकाणीं राहणें हिं पाहून संतुष्टचित्त झालेला कंस प्रसन्नता दर्शवून हास्य करीत त्याला असें म्हणाला की ||५९|| भावार्थ:--- वासुदेवांचा जीवन—मृत्युमधील समान भाव आणि सत्याची एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न झाला.त्यास त्यांचा अधिकार कळाला.सत्य हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे असे वसुदेवांनी आचरणात आणून दाखवले.तसेच आपणसुद्धा सत्यानेच आचरण करावे.सत्याचे आचरण करत असतांना अहित झाले तरी हरकत नाही,पण सत्य सोडू नये.त्यात आपलेच हित असते.||५९|| अर्थ:---हे वासुदेव.हा कुमार परत जाउं दे;कारण,त्याच्यापासून मला भय नाही,तर तुमच्या आठव्याचं गर्भापासून मला मृत्यू आहे असें आकाशवाणीने सांगितलें आहें ||६०|| भावार्थ:--- वासुदेव आपल्या नवजात मुलाला घेऊन कंस याच्याकडे जातात.नवजात बालकाला कंसाकडे देतात,पण कंस त्याचा स्वीकार न करता,शांतपणे,आनंदात परत करतात,व वासुदेवास म्हणतात,”मला या पहिल्या बालकापासून भीती नसून आठव्या बालकापासून भीती आहे,म्हणून याला आपल्या घरी नेऊन योग्य संगोपन करून वाढवा.”असे कंसाचे म्हणणे ऐकल्यानंतर वसुदेवांनी ते बालक घेऊन घराकडे आनंदाने निघाले.त्याचप्रकारे आपणही विवेक करून कारणांचा शोध लावून असे आचरण करावे.विनाकारण कोणालाही दु:ख देऊ नये.आपण धर्मानुसार आचरण करावे. विवेक जाग्रत ठेवून आचरण करावे.||६०|| अर्थ:---तेव्हा वासुदेव बरे आहे असे म्हणून पुत्र घेऊन आपल्या घरी निघून गेला,परंतु त्यानें अस्थिर चित्त अशा त्या दुष्ट कंसावे वाक्य खरें असें मानिलें नाही.||६१|| भावार्थ:--- वसुदेव बालकाला घेऊन घरी जाऊ लागले.कंसाच्या मनातील भाव बदलू लागला,कारण वसुदेव आणी कंस समोरासमोर असतांना,वसुदेवांच्या सात्विक गुणांचा सात्विक परिणाम व्हावावायाचा व वासुदेव समोरून निघून गेल्यानंतर कंस यावर राजस, व तामस गुणांचा परिणाम होत असे.त्यामुळे कंस याचे मन चंचल होत असे.अशा द्विध अवस्थेत कंस सापडत असे.कदाचित आपलीही चंचल अवस्था होऊ शकते,म्हणून चंचल अवस्था होऊ नये म्हणून आपण निष्काम भक्ती केली असता आपले मन स्थिर होते.मनात चंचल अवस्था राहत नाही.त्यामुळे द्विधा अवस्था होत नाही.द्विद्धा अवस्थेत दु:ख होत असते.||६१|| अर्थ:---हे राजा याप्रमाणें कंसाला प्राप्त झालेली शांती देवकार्याला अनुकूळ होणार नाही असें मानणाऱ्या भागवान् नारदानें कंसाजवळ येऊन त्याला एकांती असें सांगितले की,-हे कंस जे गोकुळांमध्ये नंदादिक गोप आहेत व ज्या त्यांच्या यशोदादिक स्त्रिया आहेत तसेच जे वासुदेवादिक जे वासुदेवादिक यादव आहेत ज्या त्यांच्या देव्क्यादिक स्त्रिया आहेत तसेच नंदाचे व वासुदेवाचे जे ज्ञाति (गोत्रज ) संबंधी व मित्र आहेत आणि तुला अनुसरून राहिलेले जे अक्रुरादिक आहेत ते सर्वही बहुतकरून देवतारुपीच आहेत आणि त्यांनी पृथ्वीला भर झाल्यासारका असलेल्या दैत्यांच्या वधाविषयी ब्रह्मदिकांकडून भगवंताची प्रार्थना करण्याचा उध्योग केला आहे. ||६२-६४|| भावार्थ:--- नारद मुनी यांनी कंस याची भेट घेय्न त्यास सांगितले कि,”वासुदेव—देवकी नंद—गोपी यादव हे सर्व देव आहेत.तुझे सेवक हे सुद्धा देवच आहेत.दैत्यामुळे व तमास लोकामुळे अधर्म वाढला आहे,त्यामुळे पाप वाढले आहे व त्या पापांचा भर पृथ्वीला झालेला आहे.म्हणून भगवंत धर्माची स्थापना करण्यासाठी व दुष्टांचा वध करण्याकरता येत आहेत.”||६२—६४|| | देवकीं वसुदेवं च निगृह्य निगडैर्गृहे | जातं जातमहन् पुत्रं तयोरजनशङ्क्या ||६६|| अर्थ:--- अर्थ:---असे कंसाला सांगून नारदऋषी निघून गेला असता कंसाने, यादव हे देव आहेत असे मानून आणि आपल्या वाधाकरिता देवकीच्या गर्भाचे ठिकाणी उत्पन्न झालेला विष्णूच आहे असे मानून. देवकी आणि वासुदेव यांना, पायात बेड्या घालून कारागृहांमध्ये कोंडून ठेवले आणि विष्णूच्या शंकेने त्यांच्या झालेल्या झालेल्या पुत्रांचा वध केला. ||६५-६६|| भावार्थ:--- भगवान विष्णू मला मारण्याकरिता देवकीच्या व वासुदेवाच्या पोटी जन्मास येत आहे,म्हणून देवकी व वसुदेवाना बेड्या टाकून कैदेत टाकून त्यांच्यावर चोवीस तास कडक पहारा ठेवला,जेणेकरून या दोघांनी येथून पळून,कोठे जाऊ नये.||६५—६६|| | मातरं पितरं भ्रातृन् सर्वांश्च सुहृदस्तथा | घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ||६७|| भावार्थ:--- सत्ताधीश लोभापोटी माता—पिता,बंधू किवा इष्ट मित्र यांची हत्या करतात,कारण त्यांच्यावर राजस व तमोगुणाचे संस्कार झालेले असल्यामुळे ते क्रूरतेने वागत आहेत.अधार्मिक संस्कार हे अन्यायाच्या मार्गाकडे पाठवतात.म्हणून आपण ज्याठिकाणी अधार्मिक वातावरण आहे,कार्य आहे,अशांच्या वातावरणात राहता कामा नये,कारण संस्कारांचा परिणाम होत असतो.म्हणून आपण सात्विक गुण,सात्विक वातावरण,सात्विक जीवांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावेत.जसे वातावरण आहे तसा परिणाम निश्चित होत असतो.अशी काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.दुर्लक्ष मुळीच करू नये.||६७|| अर्थ:---हे राजा, या भूमिवर आपल्या प्राणांची तृप्ती करणारे व विषयामुक्त असे जे राजे होतात ते बहुतकरून आई, बाप, भाऊ व तसेच सर्वही मित्र यांच्यासुद्धा वध करतात मग इतरांची कथा काय !||६७|| भावार्थ:--- कंस हा पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होता आणि त्यावेवेस विष्णूने त्या कंसास मारले होते,असे कंस यास माहित होते,म्हणून त्याने यादवांसी वैर मांडले होते.विचार केले असता भगवंतांसी कंस याने वैर करावे का?विष्णूसी मिळवून घ्यावे? आपण भगवंतांसी वैर-प्रतुकुल—अधर्माने न वागता,प्रेम—अनुकूल—धर्माने वागावे.त्यातच आपले हित आहे.संत—महात्मा यांच्याशी—प्रेमाने—अनुकूल,धर्मानुसार आचरण करावे .निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून,ज्ञान मार्गा—मोक्ष स्वीकारावा.||६८|| अर्थ:---पुर्वजन्मामध्ये विष्णूने मारलेला जो कालनेमिनामक दैत्य तोच या जन्मी मी झालो आहे असे जाणणारा तो कंस, यादव हे देव आहेत असे ऐकील्यापासून त्यांच्याबरोबर विरोध करू लागला.||६८|| भावार्थ:--- कंस याने आपल्या पित्याला—उग्रसेन यांना कैद केले.स्वत: शुरासेनदेशाचा राज्यकारभार पाहू लागला.रजसत्ताचा लोभ—हव्यास—त्वरा किती अन्र्थाकारा असते.राजसत्तेच्या लोभाने—हव्यासाने जन्म देणाऱ्या पित्यास कैद करण्यास भाग पाडले.राजसत्ता त्याला पित्याच्या पाश्च्यात मिळणार होतीच,पण आताच,या क्षणास पाहिजे होती.पहा त्या लोभाचा—हव्यासाचा परिणाम काय असतो.आपल्यावर असा परिणाम होऊ नये म्हणून धर्म,सत्संग,साधू—महात्मा यांच्या मुखातून शात्र ऐकून स्वधार्मानुसार,धर्मानुसार वागण्याचा प्रयत्न करावा.आपणास कुटुंबाचा सत्ताधीश,गावाचा सत्ताधीश,तालुक्याचा सत्ताधीश,जिल्ह्याचा सत्ताधीश राज्याचा—प्रांताचा सत्ताधीश,देशाचा सत्ताधीश किंवा जगाचा सत्ताधीश व्हावे हि भावना उदयास येते.सत्ताधीश होऊन मात्र प्रजांना सुखी ठेवण्याची सेवा करावी ?,कि धन,मान,प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सत्ताधीश व्हावे ? याचा विवेक करावा.धर्मशात्र सांगते कि, प्रजाजणांना सुखी होण्यासाठी सत्ताधीश व्हावे ? प्रजाजनांचे शोषण करून दु:खी करण्यासाठी,धन मिळवण्यासाठी,मान—प्रतीष्ठा मिळवण्यासाठी सत्ताधीश व्हावे ? या सर्व प्रश्नांची योग्य उत्तर मिळण्यासाठी महाभारत व श्रीमद्भागवत ग्रंथांचे संत—महात्मा यांच्या मुखातून श्रद्धा ठेऊन श्रवण,मनन व निदिध्यासन करावे.असे केले असता सुप्रशासन होऊन,प्रजा सुखी होऊन,सत्ताधीश प्रारब्धवश जेव्हा मृत्यू येईल,त्यानंतर सकाम—पुण्याच्या भावनेने स्वर्गास प्राप्त होईल व निष्काम भावना असेल तर अंत:करण शुद्ध होऊन संत—महात्मा होताल,यात तिळमात्र शंका नाही.हे त्रिवार सत्य—सत्य आहे.आपण स्वर्ग पाहिजे असेल तर धर्मानुसार राज्यकारभार करून प्रजा यांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करा किंवा निष्काम परमार्थ करून प्रराब्धवशात मृत्यू आल्यानंतर लागलीच सत्ताधीश होऊन प्रजा यांची सेवा करा किंवा संत—महात्मा होऊन प्रजा यांची धार्मिक सेवा करा.जर सत्ताधीशांनी प्रजा यांना सुख न देता दु:ख दिले तर सत्ताधीशांना मृत्यूनंतर फक्त दु:खच भोगावे लागेलच.म्हणून सत्ताधीशांना ज्या कारणासाठी सत्ता दिलेली आहे,तेच कार्य करावे,अन्य कार्य करू नये.असा विवेक करून कृत्य—आचरण करावे.||६९|| _______________________________________________________________________________________________________ २--- २---१--भगवंत श्रीकृष्ण---[१]भगवंतांचा गर्भ—प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती--- _______________________________________________________________________________________________________ अर्थ:---आणि नंतर यादव भोज व अंधक यांचा अधिपती अशा आपल्या उग्रसेन पित्यालासुद्धा बंदीत टाकून तो महाबली कंस शुरसेनदेशाचे राज्य स्वतां करू लागला. ||६९||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरान दशमस्कंधामध्ये कृष्णावतारोपक्रम निरुपनामक हा पहिला अध्याय समाप्त झाला.||१|| -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अर्थः---आता ह्या दुसऱ्या अध्याय मध्ये कंसाचा वध करण्याकरिता देवकीच्या गर्भामध्ये असलेल्या श्रीहरीची ब्रम्हादिक देवांनी स्तुति केली व त्या देवकीचेंही सांत्वन केलें अशी कथा वर्णन केलेली आहे||१||अर्थः---कंस यादवांबरोबर विरोध करुं लागला म्हणुन सांगितले तो विरोध सांगण्याकरितां श्रीशुकाचार्य म्हणाला:----हे राजा,प्रलंब दैत्य,बक (पक्षिरूपी दैत्य),अघासुर (अजगररुपी दैत्य),मुष्टिक (मल्ल),अरिष्ट (वृषभरूपी दैत्य),द्विविद (वानर),पुतना (राक्षसी),केशी (अश्वरूपी दैत्य) आणि धेनुक (गर्दभरूपी दैत्य)यांनी व बाणासुर,नरकासुर इत्यादिक दुसऱ्याही दैत्याकृती राजांनी युक्त व जरासंघाचा आश्रय असलेला तो बलाढ्य कंस,यादवांना दुःखे देऊ लागला||१-२|| भावार्थ:--- कंस याने जरासंधाच्या साह्याने पुष्कळशे दैत्य जमा करून यादवांचा संहार करू लागला.कंस यास माहित होते कि दुष्टांना मारण्याकरिता भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे.असे माहित असतांना भगवंतांसी वैर करावे का ?भगवंतांसी वैर का केले कारण,पूर्व तामस संस्कार असल्यामुळे विवेक जाग्रत झाला नाही.म्हणून तामस संस्काराच्या वातावरणात जाऊ नये.||१—२|| | सप्तमो वैष्णवं धाम यमनन्तं प्रचक्षते | गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः ||५|| अर्थ:---त्यानें पिडा दिलेले ते यादव,कांही कुरुदेशांत,कांही कुरुदेशांत,काही पांचालदेशात,काही शाल्वदेशांत,काही विदेहदेशांत व कांही कोशलदेशांत व जाऊन राहिले ||३|| अर्थः---कितीएकअक्रुरादिक बांधव त्या कंसाच्याच आज्ञेंत राहून सेवा करून राहिले.असो,कंसाने देवकीचे सहा पुत्र मारिले असतां,ज्याला अनंत असें म्हणतात तो विष्णूचा तेजोरूपी अंश देवकीचा सातवा गर्भ झाला,तो आनंदरुपीभगवंताचा अवतार असल्यामुळें देवकीच्या हर्षाला व पुर्वंगर्भांसारखा दृष्टीनें शोकाला कारण झाला||४-५|| अर्थः----तेव्हां विश्वात्म्या,भगवंतानेंही,आपणच ज्यांचा नाथ आहे अशा यादवांना कंसापासून भय उत्पन्न झाले आहे असें जाणून आपल्या शक्तिरूप युग्मायेला अज्ञ केली कीं,||६|| अर्थः---हे देवि,हे भद्रे,तुं गोप व गाई यांनी अलंकृत अशा गोकुळामध्ये गमन कर.त्या नंदाच्या गोकुळामध्यें वासुदेवाची रोहिणीनामक भार्या आहे.आतां ती गोकुळांत कां आहे असे म्हणशील तर-तीच केवळ गोकुळांत आहे असें नाहीं तर दुसऱ्याही वसुदेवाच्या स्त्रिया,कंसाच्या भीतीनें देशांतरांचे ठिकाणीं गुप्तरूपाने राहिल्या आहेत ||७|| | देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् | तत् संनिकृष्य रोहिण्या उदरे संनिवेशय ||८||
अर्थः---तेथे जाऊन काय करावें असें म्हणशील तर-देवकीच्या उदरामध्ये शेश्नाम्क माझा अंश गर्भ आहे त्याला तेथून युक्तीनें काढून रोहिणीच्या उदरामध्ये चागल्याप्रकारें स्थापन कर ||८||अर्थः---हे शुभे,नंतर लागलाच मी परिपूर्ण स्वरुपानें देवकीच्या पुत्रत्वाप्रत पावेन आणि तुं नंदपत्नी यशोदेचेठिकाणी उत्पन्न होशील ||९|| अर्थः---याप्रमाणें माझ्या आज्ञेचे पालन केलेस म्हणजे पुत्रादिकामना धरण करणारांची श्रेष्ठ स्वामिनी व भक्तांना ||१०|| भावार्थ:---लोक तु वर देण्यास म्हणजेच कामना पूर्ण करण्यास समर्थ आहे असे समजून तुझी पूजा--अर्चा करतील.त्या पूजाअर्चा करण्यासाठी धूप,दीप,नैवेद्ध्य इत्यादी अर्पण करतील.यामुळे तुझ्या पूजा—आर्च्या केल्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण होईल.||१०|| अर्थ:---लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा,भद्रकाली,विजया,वौष्णवी,कुमुद,चंडिका,कृष्णा,माधवी,कन्या,माया,नारायणी,ईशानी,शारदा,अंबिका, अनुराधा इत्यादी अनेक नांवे ठेवतील.||११—१२|| अर्थः---देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात ‘संकर्षण’म्हणतील,तो लोकरंजन करणार असल्याने त्याला ‘राम’म्हणतील,तो लोकरंजन करणार असल्याने त्याला ‘राम’म्हणतील आणि बलावांनामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याला ‘बल’सुद्धा म्हणतील.||१३|| अर्थः---जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली,तेव्हा योगमायेने “जशी आपली आज्ञा”असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले.||१४|| भावार्थ:--- सत्ता हि भगवंतांची असल्यामुळे भगवंतांनी जसे सांगितले,तसे मायाने केले,करावेच लागते,कारण सत्तावाणाचे, ज्याला सत्ता नाही त्याला ऐकवे लागतेच.म्हणून मायी भगवंतांचे सर्व ऐकले.आपणहि सत्ताधीश जो आहे,त्याचे आणि सत्ताधीशांनी ज्यांना—ज्यांना अधिकार दिलेला आहे,त्यांचेही ऐकावे लागतेच,ते आपल्या हिताचेच असते.||१४|| अर्थः---तेव्हा तया येगनिद्रेने देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरांत नेलां असतां अहो देवकीचा गर्भ पतन पावला,अशा खिन्न वाणीनें मधुरानगरीतील लोक आक्रोश करुं लागले परंतु त्याचें तत्तव त्यांना काही समजलें नाही ||१५|| | भगवानपि विश्वात्मा भक्तानामभयङ्करः | आविवेशांशभागेन मन आन कदुन्दुभेः ||१६|| अर्थः---इकडे भक्तांना अभय करणारा असा विश्वात्मा भगवान हरी पूर्णानंदयुपणे वसुदेवांच्या मनामध्ये प्रविष्ट झाला यावरून त्याला जीव सारखा धातू संबंध नाही असें सुचविले ||१६|| अर्थः---तो वासुदेव,ते भगवत्संबंधी तेज धारण करीत असता सूर्यासारखा प्रकाश पाहून लागला आणि कान्साधिक लोकांना समीप जाण्यास व पराभव करण्यास अशक्य वाटू लागला ||१७|| |ततो जगन्मङ्गलमच्युतांशं समाहितं शूरसुतेन देवी | दधार सर्वात्मकमात्म भूतं काष्ठा यथाssनन्दकरं मनस्तः ||१८|| अर्थः---नानात्र वसुदेवाने शुध्द मानाने वैधदीक्षेनें अर्पण केलेला,आपले (देवकीचे) ठिकाणी पूर्वीच असलेला जगाचें मूर्तिमंत मंगल अशा अखंडेश्वर्यरुपी भगवंताला त्या शुद्धसत्वमय देवकीनें मानानेच जसे पूर्ण दिशेने चंद्राला धारण करावे त्याप्रमाणे धारण केले||१८|| भावार्थ:--- देवकी व वसुदेवानी मनाच्या संकल्पाने भगवंतांना धारण केले,म्हणून भौतिक स्थूल शरीराचा संबंध नसतो.जसे मनुष्य मात्राचे पती—पत्नीचे शारीरिक संबंध असतात,कारण ते नाशिवंत—नष्ट होणारे असतात.तसे शारीरिक संबंध भगवंतांसाठी नसतात, कारण भगवंत अविनाशी असतात.भगवंत अविनाशी आहेत म्हणजे त्यांचा नाश नाही.असा दोन्हीतील मुलत: फरक असतो.||१८|| अर्थः---तेव्हा जगन्निवास भगवंताचे निवासस्थान झालेली ती देवकी कंसाच्या बंदिग्रहामध्ये कोंडून ठेवलेली असल्यामुळे जशी घटादिंकामध्ये कोंडून ठेवलेली दीपाची ज्वाला सर्व जणांना प्रकाश करणारी होती नाही किंवा जशी आपले ज्ञान दुसर्यास प्राप्त होऊ नये.असे मानणाऱ्या ज्ञानवंचक पुरुषाचे ठिकाणी गुप्त असलेली वेदादीविद्या लोकांच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे ती सर्वजणांना आनंदकारकत्वेंकरून अत्यंत शोभली नाही तर स्वतांच अन्नादाचा अनुभव घेऊ लागली ||१९||अर्थ:---त्यावेळी जिच्या कुक्षीमध्ये भगवान् वान करीत आहे,जी आपल्या कांतीने त्या घराला शोभा आणीत आहे व जिचें हास्य आनंद युक्त आहे अशा त्या देवकीला पाहून कंस म्हणाली की,- ज्याअर्थी हि देवली पूर्वी अशी (कंतियुक्त) दिसत नव्हती त्याअर्थी माझे (गजाचे) प्राण हरण करणारा हरीच (सिंहच)हिच्या कुशीमध्यें (गुहेमध्ये) खरोखर राहिला आहे ||२०||अर्थः----तर आतां त्याविषयी मी लवकर काय बरें केलें पाहिजे?आतां सामादिक उपाय आहेत असें म्हणावें तर.ज्याअर्थी हा भगवान् देवाचे कार्य करण्यास उद्द्युक्त झाला आहे त्याअर्थी आपला पराक्रम सोडणार नाहीम्हणजे माझ्या वाधाविषयी पराक्रम करीलच.बरें आता हिला मारावे असें म्हणावें तर,कार्य साधण्याविषयी तत्पर असलेलीहि पुरुष आपल्या पराक्रमाचा नाश करीत नाही.कारण स्त्रीचा त्यामध्यें बहिणीचा त्याग गर्भिणीचा हा वध केला असता तो यश संपत्ति तत्काल नाश करील ||२१|| भावार्थ:---कंस विचार करू लागला कि,आपण आता काय करावे.देवकीच्या पोटात भगवंत असयामुळे कंस याचा अगोदर देवाकीविषयी असलेला प्रतिकूल विचार देवकीच्या अनुकूल झाला.भगवंतांच्या पोटात असण्याचा हा परिणाम झाला.म्हणून आपण नेहमीसाठी भगवंतांच्या कथा,लीला श्रवण कराव्यात.संत—महात्मा यांच्या कथा श्रवण कराव्यात.संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र श्रावण करावे.नेहमी—नेहमी सत्संग करावा.त्यांची सेवा करावी,त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी.यात सर्व जीवांचेच हित आहे.||२१|| अर्थः---आणि तो अतिक्रूरपणानें वर्तन करितो तो अतिप्रसिद्ध असलेलही पुरुष जिवंत असून मेल्यासारखाच आहे.कारण तो जिवंत असतांनाच लोक त्याचा धिक्कार करितात आणि त्यांचा देह मरण पावल्यानंतर,तो निश्चयानें पाप्याला प्राप्त होणाऱ्या नरकांत जाऊन पडतो ||२२|| भावार्थ:--- जो अत्यंत क्रूर वागतो,त्याच्याकडून नेहमीच अधर्म होतो म्हणजेच त्याच्याकडून इतरांना दु:खच होते.म्हणून त्याला नेहमीसाठी दु:खच भोगावे लागते.असा मनुष्य नरकात जाऊन नरक यातना—दु:ख भोगितो व त्यानंतर चौऱ्याऐंसीला जाऊन दु:खच भोगितो.म्हणून आपण क्रूरता हा दोष आहे,म्हणून हा दोष जाण्यासाठी निष्काम परमार्थ करावा लागतो,त्यामुळे दोष जातो.दोष गेल्यानंतर क्रूरता हा दोष नाहीसा होऊन दयाळू हा गुण येतो.दयालुता या गुणामुळे आपण इतारांना दु:ख न देता सुख देतोत.||२२|| अर्थः---याप्रमाणे विचार करून देवकीवधरूप अतिभयंकर संकल्पापासून तो स्वतंत्र कंस स्वतांच निवृत्त होऊन,हरीचा वैरानुबंध धारण करीत असल्यामुळे तो त्या हरीच्या जन्माची प्रतीक्षा करीत राहिला.||२३|| भावार्थ:--- भगवत सान्निध्यामुळे त्याचा क्रूर भाव बदलून तात्पुरता व्बदाळून दया भाव त्याच्या ठिकाणी देवकीच्या सान्निध्यामुळे दिसू लागला.म्हणून आपण नेहमीसाठी जेथे सात्विक वातावरण,अखंड हरीनाम साप्ताह,भगवत साप्ताह,कीर्तन आणि सत्संग आदि ठिकाणी राहून सत्संग करावयास पाहिजे.त्या सात्विक वातावरणाचा परिणाम आपल्या अंत:करणावर होऊन सात्विक होतोत.||२३|| अर्थः---नंतर बसला असतां,जीनला असतां,उभा राहिला असतां,भोजन करीत असतां,व भूमीवर फिरत असतां,मिळून सर्व अवस्थांमध्ये वैरभावाने श्रीकृष्णांचे चिंतन करणारा तो कंस,सर्वही जग,तन्मय आहे असें पाहुं लागला ||२४|| भावार्थ:--- कंस भीतीच्या पोटी श्रीकृष्णांचा ध्यास करू लागला.उठता,बसता,खाता—पिता,जागेपणी—झोपी जात असता आणि चालता—फिरता नेहमी श्रीकृष्णांचा ध्यास करू लागला,भगवंतांचे म्हणणे आहे कि,निमित्त कोणतेही असो,भगवंतांचा ध्यास लागावा. असे असले तरी आपण प्रेमाच्या पोटी भगवंतांचा सतत—सतत ध्यास करावा,हिंतन करावे.आपला विषय भगवंतांच असावा.यामुळे भगवंत आपलासा होऊन आपण भगवंतमय होऊन भगवंत—स्वरूप होतोत.त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.||२४|| अर्थः---एकेवेळी नारदादिक ऋषी,गंधर्वदिक अनुचर व इंद्रादिक देव यांसहवर्तमान ब्रम्हदेव व शंकर,हे त्या वसुदेवदेवकींच्या कारागृहामध्ये आले आणि सर्व मिळून सुंदर वाणीनी मनोरथ पूर्ण करणाऱ्या त्या भगवंतांची स्तुती करू लागले ||२५|| | सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये | सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना: ||२६|| अर्थः---त्यांत प्रथमतः भगवंतानें सांगितलेलें सत्य केले म्हणून हर्षयुक्त झालेले ते देव त्याची सत्यत्वाने स्तुतु करितात –ज्यांचे व्रत (संकल्प) सत्य आहे,ज्याचे ठिकाणी सत्य हेंच श्रेष्ठ प्राप्तीचे साधन आहेज सृष्टीच्या पूर्वा,प्रलयानंतर व स्थितीकाळी सत्यवनाने (कायमपणाने)राहतो,जो पृथिव,उदक,तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचे कारण आहे,जोठिकाणी अंतर्यामी त्वेकरून राहिला आहे व जो त्यांचे लक्ष स्थान आहे,तसाच जो मधुर वाणी आणि समदृष्टी यांचा प्रवर्तक आहे अशा सर्वप्रकारे सत्यरूपी तुज भगवंतला आम्ही शरण प्राप्त झालो आहों ||२६|| भावार्थ:---भगवंत सत्य संकल्प आहेत,म्हणजे त्यांनी कोणताही संकल्प केलेला अपूर्ण न राहता पूर्ण होतो,म्हणून त्यांना सत्यसंकल्प असे म्हणतात.आपणही सत्याने आचरण करण्याचा प्रयत्न करावा.सत्याने आचरण केल्याने परमात्मा सिद्धी होते.आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.म्हणून जीवनात सत्यानुसार आचरण करावयास पाहिजे.भगवंत भूत्कालातही आहे,वर्तमान काळातही आहे व भविष्यकालातही असतो,म्हणजे तो नित्य असतो.तो नित्य आहे म्हणून सृष्टी नित्य वाटते,पण सृष्टी अनित्य म्हणजे कधी आहे व कधी नाही.जसे तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर शरीर आणि शरीराची सावली यात शरीर सत्य आहे व सावली मिथ्या म्हणजे काल्पनिक आहे.त्याचप्रमाणे भगवान आणि सृष्टी यांचा विचार केला तर भगवंत सत्य आहे व सृष्टी मिथ्या काल्पनिक आहे.जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामूळे सृष्टी मिथ्या—काल्पनिक न वाटता सत्य वाटते.जेव्हा आपण संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र श्रावण केल्यामुळे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान होते.तेव्हा भगवंत सत्य वाटतो व सृष्टी मिथ्या—काल्पनिक वाटते.म्हणून अज्ञान घालवावे व ज्ञान प्राप्त करून घ्यावे.यात आपले हित आहे.सुखरुपतेकडे जाण्याचा मार्ग आहे.आपण मात्र सत्य आहात व जी सृष्टी मिथ्या—काल्पनिक आहे,त्यातही आहात.जसे घरातही आकाश—पोकळी आहे व घराच्या बाहेरही पोकळी आहे.भिंत यातही आकाश--पोकळी आहे.याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी पोकळी आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे.कना—कनात भगवंत आहे.मिथ्या—काल्पनिक सृष्टीचे--पदार्थाचे कारण आहात.आपण आहात म्हणून सृष्टी—काल्पनिक पदार्थ आहे.सृष्टीस स्वता:ची सत्ता नाही.भगवंतांच्या सत्तेवर यांचा सर्व व्यवहार आहे.म्हणून आपणास भगवंताचे—कारणाचे ज्ञान असणे जरुरी आहे.म्हणून आपण कारणाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.आपण कारण म्हणजे अधिष्ठान आहात व सृष्टी अध्यस्त—कार्य आहे.कारण हे कार्यापेक्षा श्रेष्ठ असते.म्हणून कारणाचे ज्ञान असणे अत्यंत जरुरी आहे.म्हणून आपण अधिष्ठान असल्यामुळे आपणास आम्ही शरण आलेलो आहोत.त्याचप्रकारे आपणही ज्ञान प्राप्त करून भगवंतांस शरण जावे.||२६|| अर्थः--- आतां तुम्हीही लोक्धीप्ती असल्यामुळे माझ्यासार्के अहां मग मला कां शरण येतां? म्हुनाये.कारण,सर्व सुष्ट्यादिकांचे मूळ कारण व एक सर्वेश्वर तंच आहेस,आम्ही तर तुझ्या आश्रयानेंच राहणारें आहों आणि लोकदिरूप द्वैत तूझ्याहून निराळें नाही,असें सांगर्णीयज्ञाकरीता द्वैत प्रपंचाचे वृक्षरूपानें निरुपण करितात-हे प्रभो,हा प्रपंच आदिवृक्ष रुपी ओ,तो असा कीं,-ज्यांचे प्रकृति हर एक अळें आहे,ज्यांची सुखदु:खें ही दोन फळें,सत्त्व रज तम हीं तीन मुळें,धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार रस,त्वचा चक्षु श्रोत्र जिव्हा व प्राण हे पांच ज्ञान्प्रकार,काम,क्रोध लोभ मोह माया आणि मत्सर हे सहा स्वभाव,त्वचा चर्म इत्यादिक सप्तधातू ह्या सात साली,पंचमहाभूतेमन बुद्दी व अहंकार ह्या आठ शाखा,नौ मुखादिक द्वारें ह्या नौ ढोली व दहा पानें आहेत आणि ज्याच्यावर जिव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत ||२७|| भावार्थ:--- हा संसार एक सनातन म्हणजे पुर्व परंपरेनुसार असा एक वृक्ष आहे.एक प्रकृती हि या वृक्षाचा आधार आहे.आधार असल्याशिवाय जसा वृक्ष वाढू शकत नाही.त्याचप्रमाणे मायाचा स्वीकार केल्याशिवाय हा वृक्ष वाढू शकत नाही.या वृक्षास दु:ख आणि सुख हि याला दोन फळ आहेत.संसारिक जीवन जगत असतांना आपणास अधिक दु:ख व अल्पशा सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.हीच त्याचे फळे आहेत.सत्व,रज आणि तम हि तीन मुळे आहेत.मुळावर जसे झाड राहते तसे या सत्व,रज आणि तम या तीन गुणाच्या आधाराने संसाररूपी जीवन चालते.या गुणानुसार विभागणी आपणास दिसून येते.म्हणून सत्व गुणांनी सुख मिळते,म्हणून सात्विक गुण अधिक असावयास पाहिजे.राजस व तमास गुण आवश्यक तेवढाच असावा.अधिक असू नये.धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष हे चार रस—पुरुषार्थ आहेत.धर्मानुसार कामना असावी व धर्मानुसार अर्थ संपादन करावा.मोक्ष हा अंतिम चौथा पुरुषार्थ आहे.निष्काम भावनेने कर्म व उपासना केली असता अंत:करण शुद्ध होऊन स्थिर होते.त्यानंतर संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र श्रावण केले असता ज्ञान प्राप्त होते.त्या ज्ञानाचा अनुभव घेतला असता जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूपता येते.तेव्हा जीवनाचे सार्थक होते.म्हणून आपण धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष संपादन करावा.कान,नाक,त्वचा नेत्र,जीभ आणि नाक जाणण्याचे साधन आहे.याद्वारे जीवाला जानता येते—कळते.म्हणून जीवाने सात्विक गुण अधिक जाणून त्या गुणात अधिक वृद्धी करावी.उत्पन्न होणे,स्थिर होणे,वाढणे,बदलने,क्षय,पक्त,मांस,मेद,अस्थी,मज्जा आणि शुक्र अशा सत धातू या वृक्षाच्या साली आहेत.म्हणून या सप्त धातूंना समान ठेवण्याचा प्रयत्न करावा.यामुळे आरोग्य राह्ते.पंच महाभूते—आकाश,वायू,तेज,आप—पाणी,पृथ्वी,मन,बुद्धी आणि अंहकार या आठ फांद्या आहेत.याला मुख,डोळे,कान,नाक,गुद आणि शिश्न अशी नउ द्वारे आहेत. प्राण,अपान,व्यान,उडान,समान,नाग,कूर्म,कृकल,देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण हि याची दहा पाणे आहेत.याद्वारे शरीराची व्यवस्थित हालचाल होऊन कार्य व्यवस्थित चालते.या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हि दोन पक्षी आहेत.या वृक्षावर जीव हा अज्ञानी असून अल्पज्ञ आहे.जीव हा कर्म कर्म करण्यास स्वतंत्र आहे,पण फळ भोगण्यास परतंत्र आहे,कारण फळ देणारा ईश्वर आहे,तो ईश्वर जीवाच्या कर्मानुसार फळ देतो.म्हणून जीवानी स्वधर्मानुसार कर्मे करावीत तर अधर्मानुसार कर्मे करू नयेत.जीव हा अज्ञानी असल्यामुळे मायाच्या ताब्यात आहे.जोपर्यंत मायाच्या ताब्यात असेल तोपर्यंत त्यास किंचित सुख व अधिक दु:ख भोगावे लागेल.यासाठी म्हणजे त्याचे दु:ख जाण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम भक्ती करावी.त्यानंतर ज्ञान प्राप्त करुण घ्यावे,जीवाने निष्काम कर्म व निष्काम भक्ती न केली तर तो ज्ञान मार्गाकडे जाऊ शकणार नाही.त्यामुळे मृत्युनंतर यमपुरीस जाऊन तेथील दु:ख भोगून चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगत—भोगत जीवनक्रम व्यतीत करील.या संसाररूपी झाडावर दुसरा पक्षी ईश्वर आहे.हा ईश्वर ज्ञानी असून सर्वज्ञ आहे.माया त्याच्या ताब्यात आहे,कारण तो ज्ञानी आहे.जीवनी केलेल्या कर्मानुसार फळदाता आहे.तो जगाची उत्पत्ती,स्थिती व लय—संहार करणारा आहे.मायाचा स्वीकार करून सर्व कार्य करणारा आहे.||२७|| अर्थः---अशा प्रकारच्या या संसारवृक्षरूप कार्याचा तू एकच उत्पत्तिस्थान, तूच लयस्थान व तूच पालन करणारा आहेस. आता अशाप्रकारचे ब्रह्मविष्णूरुप प्रसिद्ध आहेत, मी नाही, असे ब्रह्मणशील तर- तुझ्या मायेने ज्याचे ज्ञान आच्छादित झाले आहे ते तुलाच ब्रह्मादिरूपेकरून नानाप्रकारचा पाहतात. जे तर मायामोहाने रहित असे विवेकी आहेत ते तसे पहात नाहीत, तर ब्रह्मादिरुपेकरून स्थित अशा तुला एकालाच पाहतात.||२८|| भावार्थ:--- या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र भगवंतच आहे.त्यांच्यातच स्थिती व प्रलय होतो.ज्यांचे म्हणजे अज्ञानी जीवांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेलेले आहेत,म्हणून त्यांच्यात भेददृष्टीने पाहातात.त्यामिले त्यांना ब्रह्मदेव,विष्णू,शंकर,इंद्र,चंद्र अशा अनेक देवता व अनेक जीव दिसतात.त्या सर्वांना सत्य समजून व्यवहार करतात.असे त्यांचा ठिकाणी अज्ञान असल्यामुळे ते यमपुरीस जाऊन तेथील दु:ख भोगितात व तेथील दु:ख भोगाल्यानंतात चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगितात.याकारीता जीवांनी संत—महात्मा यांच्या संगतीत येऊन निष्काम कर्म करून व निष्काम भक्ती करून जीवब्रह्मऐक्यज्ञान संपादून त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा.म्हणजे आपलेही जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊत.जे जीव ज्ञानी—संत—महात्मा आहेत त्यांना अभेददृष्टी असल्यामुळे परमात्मा एक असून सत्य आहे व जे अनेक दिसतात ते सर्व मिथ्या आहेत असे त्यांना अनुभव असतो.त्यामुळे वर्तमान शरीर सुटल्यानंतर त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतात.||२८|| अर्थः---आता मज देवाकीपुत्राचे असे कसे वर्णन करिता ? असे ब्रह्मणशील तर- ज्ञानैकस्वरुपी आत्मा तूच स्थावरजंगमात्मक प्रपंचाच्या पालनाकरिता, धर्माने वागणाऱ्या पुरुषांना सुखकारक व दुष्टांना नाशककारक अशी शुद्धसत्वगुणात्मक स्वरूपे धारण करतोस. तू कोणाचाही पुत्र नाहीस. ||२९|| भावार्थ:---भगवंत ज्ञानस्वरूप आत्मा—परमात्मा आहेत.निर्गुण—निराकार असलेले परमात्मा जगासाठी सगुण—निराकार,सगुण—साकार, व नाम-रूप होतात,म्हणजे जीव-जड होतात.भगवंत दिसणारे—व्यक्त व न दिसणारे म्हणजे अव्यक्त आहेत.अनेक नावे व अनेक रूपे धारण करतात.भगवंतांची हि रूपे विशुद्ध सत्वमय आहेत.ती रूपे संतांना सुख देणारी व दुष्टांना दु:ख देणारी असली तरी दुष्टांचा दुष्टपणा जाऊन त्यांना सुख देण्यासाठीच असतात.भगवंतांचा हेतू सर्वांना दु:ख न मिळता सुख मिळावे हाच असतो.म्हणून आपणसुद्धा इतरांना दु:ख न देता,त्यांचे दु:ख नाहीसे करून सुख देण्याचा प्रयत्न करावा.म्हणीन जीवांनी सकाम भक्ती न करता निष्काम भक्ती करावी,कारण निष्काम भक्तीने दुर्गुण--दोष जातात व सदगुण--सात्विक गुण येतात.||२९|| अर्थः---आतां केवळ इत्क्याकरिताच नाही तर भक्तांना मोक्ष प्राप्त होण्याकारीतही तू रूपे धारण करितोस असे सांगतात – हे कमलनेत्रा,शुद्धसत्वमूर्ति अशा तुझेठीकानी,समाधाने स्थापन केलेल्या चित्ताच्या योगेकरून विवेकी पुरुष,साधूंनी स्वीकारलेल्या तुझ्या चरणरूप नौकेचा आश्रय करून संसारसमुद्राला गोवत्सपदासारखा करितात ||३०|| भावार्थ:---संत—महात्मा हे आपले चित्त आपल्यात म्हणजे परमात्म्यात पूर्ण एकाग्रतेने लावतात,कारण त्यांना विषय हे दु:खदायक असून परमात्मा हे सुखदायक आहेत असा त्यांना अनुभव आलेला असतो.त्यासाठी आपणही त्यांची म्हणजे संत—महात्मा यांची संगती करून,त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन,त्यांची निष्काम सेवा करून,त्यांचा मुखातून श्रवण करावे.यथार्थ श्रवण झाले असता आपणास त्या परमात्म्याचे ज्ञान होईल.परमात्म्याची अनुभूती येण्याकरिता सर्व विषयांचा भोग न घेता त्याग करावा लागेल.विषयांचा त्याग केल्यानंतर परमात्म्याची अनुभूती येईल व त्यानंतर आपले जन्म—मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप होऊत.||३०|| अर्थः---आता चरणनौकेच्या योगाने पुर्विचेलोक जर संसारसमुद्राला तरुण गेले,तर आतांच्या लोकांनी कसे तरून जावे ?असे म्हणशील तर – हे स्वप्रकाशस्वरूपा,जसा सूर्याचा आश्रय करणाऱ्या लोकांना अंधकाराचे भय नाही त्याप्रमाणे तुझा आश्रय करणाऱ्या भक्तांना संसाराचे भय नाही म्हणून सर्व भूतांचेठिकाणी प्रीती करणारे ते तुझ्या चरणनौकेजवळ जातांक्षणीच त्यांना भवसमुद्र वत्सपदासारखा झाला असतां,तुझ्या चरणकमलरूप नौकेला,दुसऱ्याच्या उपयोगाकरिता तेथेच ठेऊन म्हणजे भक्तिमार्गसंप्रदाय प्रवृत्त करून,ते इतरांना भयंकर व दुस्तर अशा भवसमुद्राला स्वतांच अनायासाने तरुण गेले.याचे मुख्य कारण,तू भक्तांवर अनुग्रह करणारा आहेस ||३१|| भावार्थ:--- आपले निष्काम—प्रेमळ भक्त जगाचे खरे हित करणारे असतात.साधक—संत—महात्मा निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून चरणकमळ म्हणजे जीवब्रह्मऐक्य ज्ञानाने संसार सागरातून स्वत:तरता व इतरांना तरुण जाण्यासाठी उपदेश करून तरुण नेतात.आपला अनुभव ग्रंथाद्वारे शब्दांकित करून भक्तांवर अनुग्रह करतात.म्हणून आपण संत—महात्मा यांची संगती करून तुंच्या उपदेशानुसार आचरण करून व ग्रंथांचे चिंतन करून आपण आपले परम कल्याण करून घ्यावे.त्यात आपलेच हित आहे.||३१|| अर्थः---आता विवेकी पुरुषांना माझ्या भजनाचा काय उपयोग आहे /कारण,ते मुक्तच आहेत,असे म्हणशील तर – हे कमलनयना,जे दुसरे कित्येक लोक,स्वतालाच मुक्त असे मानणारे,तुझ्या चरणाचा आदर न करणारे व तुझेठिकाणी भक्ति नसल्यामुळे शुद्धबुद्धि न झालेले आहेत ते बहुत जन्मांमध्ये केलेल्या तपाच्या योगाने सत्कुलजन्म,तप व शास्त्राध्ययन इत्यादिक मोक्षाजवळच्या पदवीला पावुनही तेथून खाली(नरकामध्ये)पडतात.म्हणजे विघ्नाच्या योगाने पराभव पावतात ||३२|| भावार्थ:--- जे लोक आपल्या—भगवंतांच्या चरणकमळांणा म्हणजे निष्काम कर्म व निष्काम भक्ती करत नाहीत त्यामुळे ज्ञान मार्गाचा अवलंब करत नाहीत.त्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध होत नाही.उपदेशाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही.त्यामुळे ते भगवंतांस शरण जात नाहीत.शब्दज्ञान होऊन त्यांना मोक्ष मिळत नाही.त्यामुळे त्यांची प्रगती न होता अधोगती होते.म्हणून आपण संत—महात्मा यांची संगती करून निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून ज्ञानाद्वारे मोक्ष संपादन करावा.||३२|| अर्थः---हे माधवा,तुझे भक्त तर,तुझेठिकाणी ज्यांनी आपले दृढ प्रेम ठेवले आहे असे असल्यामुळे अभाक्तांप्रमाणे कधिही आपल्या भक्तिमार्गापासून भ्रष्ट होत नाहीत.तर हे प्रभो,तुं रक्षण केलेले ते भक्त,कालकर्मादिकांच्या भयाने रहित असते हजारो विघ्नांचे सैन्य पदरी बाळगणाऱ्या विघ्नेसनाधिपतीच्याही मस्तकी पाय देऊन फिरत असतात म्हणजे ते सर्व विघ्ने जिंकून आपले कार्य साधीतात |||३३|| भावार्थ:--- आपल्या म्हणजे भगवंतांच्या—परमात्म्याच्या चरणांवर म्हणजेच अधिष्ठान ज्ञानावर निस्स्मि—निष्काम प्रेम आहे,असे भक्त भगवंतच प्राप्त व्हावा व भगवंतांचे ऐश्वर्याविषयी त्यागाची भावना असणारे कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत म्हणजे पतन—अधोगती होत नाही.याकरिता आपण भगवंतच मागवा भगवंतांचे ऐश्वर्य जे मिथ्या असून दु:खाला करण आहे त्याविषयी त्याग असावा,विषय हेसुद्धा मिथ्या असून दु:खास करण आहेत.म्हणून विषयांचा त्याग करून भगवंत घ्यावा.निष्काम भक्ताकडे भगवंतांचे लक्ष असते.त्याच्यावर संकट जरी आले किंवा कांही शिण आला तरी भगवंत नाहीसे करतो.||३३|| अर्थः---आता साधूंना सुखकारक रूपे धारण करितोस असे सांगितले ते कोणत्याप्रकारचे सुख धने ह्नशील तर- हे प्रभो,तू, जगाच्या पलनाकरिता, प्राण्यांना कर्मांची फळे प्राप्त करून देणारे शुद्धसत्वगुणात्मक शरीर धारण करीतोस म्हणून त्या शरीराने युक्त असलेल्या तुझे, चारही आश्रमामध्ये असणारे हे जन, अनुक्रमाने वेदाध्ययन, कर्मानुष्ठान, वानप्रस्थधर्म व समाधी यांच्या योगाने पूजन करितात.तू अवतारच धारण केले नाहीस तर तुझे पूजन होणार नाही व कर्मफलसिद्धीही होणार नाही.||३४|| भावार्थ:--- भगवंत जगाचे कल्याण करण्यासाठी विशुद्ध सत्वमय मंगलरूप धारण करतात.वेद,कर्मकांड,अष्टांगयोग,तपश्चर्या,समाधी इत्यादी साधनांचे रूप घेऊन आराधना करतात.त्यानुसार भक्त साधना करून आपणास प्राप्त होण्याचा प्रयत्न करतात.||३४|| अर्थः---हे जगधारा, तुझे हे सत्त्वगुनात्मक शरीर, जर प्रगट होणार नाही तर अज्ञानाला आणि अज्ञानाने उत्पन्न झालेल्या द्वैतभेदाला नाहीसे कराणारे अपरोक्षज्ञान मुळीच होणार नाही आता वृध्यादी जड पदार्थाचा प्रकाश ज्यापासून होतो ते ब्रम्ह असें ज्ञान होईलच असें म्हणावे तर नाही.कारण,ज्याच्या संबंधित हे बाहेरचे घटदीपदार्थरूप गुण,बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या ज्याच्या योगाने प्रकाश पावतात व त्या प्रकाशनच्या योगेकाधून तू सर्वसाक्षी परिपूर्ण आहेस असें जे केवळ अनुमान होते ते काल्पनिक असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष ज्ञान असें म्हणता येत नाही आणि शुद्धसत्त्वगुणात्मक तू उत्पन्न झालास म्हणजे तुझ्या सेवेने तदाकार झालेल्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रसादाने तुझे साक्ष्त्काररूप प्रत्यक्ष ज्ञान होते.||३५|| भावार्थ:--- आपले म्हणजे भगवंतांचे स्वरूप विशुद्ध सत्वमय नसेल तर अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य भेदबुद्धि नष्ट होणार नाही.भेदबुद्धि नष्ट न झाली तर आपले दु:ख जाऊन सुख प्राप्त होणार नाही.म्हणून आपण भगवंतांची निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करून आपले परम कल्याण करून घ्यावे.अन्यथा दु:खास प्राप्त होऊन भोगावे लागेल.||३५|| अर्थः---हे देवा जो मनइंद्रियादिकांचा साक्षी व ज्याचा मार्ग अनुमानानेच कळण्या जोगा आहे त्या तुझी भक्तवात्सल्यादीक गुण,रामकृष्णादिक जन्मे आणि रावणवादादिक कर्मे यांच्या सहवर्तमान स्वकारलेली जी नामे व रूपे,ती जरी अभक्तांना अनुमानाने चिंतन करण्यास व वाचनाने कीर्तन करण्यास अशक्य आहेत तथापि तुझी उपासना करणारे लोक,उपासनेमध्ये तुला प्रत्यक्ष पाहतात हे प्रसिद्ध आहे ||३६|| भावार्थ:--- मन आणि वेदवाणी याद्वारा स्वरूपाचे केवळ अनमान करता येते,पण अनुभव येत नाही.आपल्यामुळे नाम व रुपाची उत्पत्ती होते व त्या नामरूपाचा अनुभवही येतो.आपला अनुभव येत नाही कारण आपण साक्षी आहात.आपण साक्षी हाही नामरुपारहित असतो,म्हणून शब्दाने त्याचा अनुभव येत नाही.आपण निष्काम कर्म व निष्काम भक्तीने अंत:करण शुद्ध व स्थिर होऊन जीवाब्राह्मऐक्यज्ञानद्वारा परोक्षज्ञान प्राप्त होते.परोक्षज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व विषयांचा त्याग करून,त्यात शब्द विषयहि म्हणजे परोक्षज्ञान याचा त्याग गेल्यानंतर परमात्म्याचा अनुभव येतो.परमात्मा हा नामरूपरहित आहे.त्या परमात्म्यास एकरूप होण्यासाठी त्याच्यासारखे म्हणजेच नामरूपरहित व्हावे लागते.जिव्हा जीवात्मा व परमात्मा सारखे होतील,तेव्हा ते एकरूप होतील.त्याला जन्म—मरण नाही,आपणही त्याच्यासारखे होऊत तेव्हा आपणास जन्म—मरण नाही.तोही सुखरूप आहे,तेव्हा आपणही सुखरूप होउत.वासानासहित मन म्हणजे जीव आहे.जीव आहे तोपर्यंत दु:ख आहेम्हणून मनातील वासनेचा त्याग केला असता मन बाधित होते,म्हणजे जसे हरबरारुपी बिज भाजले असता त्याचा फुटाना होतो.फुटणा पेरल्यानंतर उगवत नाही,त्याचप्रमाणे सर्व विषयांचा त्याग केला असता मन,मनरुपाने न राहता परमात्मरूप होते.त्यानंतर जीव जन्म—मरणरहित—सुखरूप होतो.यासच परमात्म्याचा साक्षात्कार असे म्हणतात.अशा रीतीने आपण निष्कामकर्म व भक्ती करून ज्ञान प्राप्त करून ज्ञानाचा अनुभव घ्यावा.तेव्हा जन्म—मरण निवृत्त होउन आपण सुखरूप होऊत,अन्य मार्गाने जन्म—मरण म्हणजे दु:ख निवृत्त होणार नाही.||३६|| अर्थः---तस्मात जो मनुष्य तुझ्या पुण्यकारक नावाचे रूपांचे वस कर्मोंचे,श्रावण करीत,वर्णन करीत,चिंतन करीत व दुसर्यांकडून स्मरण करावीत असतां लौकिक कार्मामध्येही तुझ्या चरणकमलांचेठिकाणी चित्त स्थापन करितो तो पुन्हा संसार प्राप्त होण्याविषयी योग्य होत नाही ||३७|| भावार्थ:-- ईश्वराच्या नामाचा मुखाने उच्चार व रूपाची पूजा केली असता,नामरूपाचे घ्यान केले असता व नाम—रूप,चरित्राचे लीलांचे निष्काम श्रवण असता आपले अंत:करण शुद्ध होते व स्थिर होते.त्यानंतर स्वरूपाचे श्रवण केले असता ज्ञान होते.त्या ज्ञानाने आवरण दोष म्हणजेच अज्ञान निवृत्त होउन ज्ञान होते.ज्ञानाचा अनुभव आला असता जन्म—मरण निवृत्त होते.||३७|| अर्थः---सर्वातर्यामी पुरुषाची स्तुती करून ब्रम्हदेव व शंकर आता विशेष करून श्रीकृष्णाअवतारांचे अभिनंदन करितात-हे हरें,तुझ ईश्वराच्या जन्म मात्र करून तुझ्या तारण रुपी ह्या भूमीचा भार दूर झाल्यासारखा आहे हें आर चांगले झाले.आतां तुझ्या वज्राकुंादि शुभ लाक्षनेयुक्त कोमल चरणांची चिन्हे झालेल्या ह्या पृथ्वीला व तू कृपा केलेल्या स्वर्गालाही आम्ही अवलोकन करू,हेही आमचे भाग्यच उदयास येणार आहे.||३८|| भावार्थ:--- भगवंतांच्या अवताराने पृथ्वीचा भार कमी केला,कारण त्यांनी दुष्टांचा संहार करून त्यांना नष्ट केले.त्यामुळे लोकांना—सज्जणांना आपले सात्विक कार्य करण्यास संधी आली.न्यायचे राज्य आले.लोक सुखाने जीवन जगू लागले.त्यामुळे पुण्याचा प्रभावाने आणि पापांच्या प्रतिबंधामुळे त्यामुळे पृथ्वीचा भार फारच हलका झाला.त्यामुळे आम्हास आपल्या चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी माता पहावयास मिळणार.पुण्यांचा प्रभाव होणार,कारण लोक आता दुष्टांना मारल्यामुळे सात्विक कार्य होणार.पुण्यात वाढ होणार.त्यामुळे स्वर्गात लोक अधिक जाणार,त्यामुळे स्वर्गाचे वैभव वाढणार.अशा तितीने सर्वांचे शौभाग्य वाढणार.||३८|| अर्थः---आतां तुझ्या जन्माने भार दूर झाल्यासारखाच आहे असें म्हल्यानें मला सुद्धा जिवासारखा संसार आहे असें सांगता की काय?नाही नाही असें म्हणतात-हें नित्यमुक्त,ईश्वर,जन्मरहित अशा तुला जन्म घेण्याचे कारण क्रीदेवाचून दुसरे काहीच तर्क करिता येत नाही.तुला जन्माचे कारण नाही हें तर राहुं द्या परंतु जीवात्म्याचे ठिकाणीही उत्पत्ती,मरण व स्थितीही हें प्रकार हि, तुझ्याविषयी,देह इंद्रिय अंतःकरण इत्यादीकांचेठिकाणी जी दादात्म्य अध्यासरूप अविद्या तिच्या योगानें केलेले आहेत,वस्तुतः खरे नाहीत ||३९|| भावार्थ:---आपण अजन्मा असून जन्म घेता,कारण जीवाच्या कल्याणासाठी जन्म घेता.वास्तविक पाहता लीलेने जन्म घेता,कारण इतरांवर झालेल्या अन्याय निवारण करण्यासाठी आपण येतात व त्यांच्यावरील अन्याय दूर करतात.आपण जगाची उत्पत्ती,स्थिती आणि लय—प्रलय करतात,असे लोक त्यांचा ठिकाणी अज्ञान असल्यामुळे आरोप करतात.वास्तविक आपण करत नाहीत.||३९|| अर्थः---आतां प्रस्तुतची प्रार्थना करितात-हें ईश्वरा,तू जसें मत्स्य,हयग्रीव,कूर्म,वराह,नृसिंह,हंस,श्रीराम व वामन इत्यादिक अवतार धारण करून आमचे व त्रीलोक्याचे रक्षण करतोस त्याचप्रमाणे सांप्रतकाली पृथ्वीचा भार दूर कर.हें यादव श्रेष्ठ,तुला वंदन करितो,असें म्हणून सर्वहि देवांनी मस्तकणी नमस्कार केले.||४०||अर्थ:---नंतर ते देव देवकीला म्हणाले कि-हें मातोश्री,जो साक्षात् षड्गुणैश्र्वर्यसंपन्न परमपुरुष ईश्वर,आम्हां देवांच्या उत्कर्षासाठी पुर्वी रामरूपी झाला होता तोच आतां तुझ्या कुशीमध्ये प्राप्त झाला आहे,हि मोठी आनंदाची गोष्ट आहे.आतां मरणोन्मुख झालेय कंसापासून तुला भय नसो.तुझ्या पुत्र यादवांच रक्षण करणारा होईल.||४१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रकारेंकरून ज्याचे स्वरूप हें अमुख असें दाखविता य्र्त नाही त्या सर्वांतर्यामी पुरुषाची स्तुती करून ब्रम्हदेव व शंकर यांना पुढे करून देव,स्वर्गाप्रत निघून गेले ||४२|| याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुरानांतील दशमस्कांधाच्या पूर्वार्धात गर्भ स्तुती निरुपण नामक हा दुसरा अध्याय समाप्त झाला ||२|| श्रीकृष्णार्पनमस्तु || ________________________________________________________________________________________________________ |३-- २---२--भगवान श्रीकृष्ण---[२]भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------¬¬¬¬ |आतां ह्या तिसऱ्या अध्यायमध्ये श्रीहरी,सत्ता प्रकट झाला असता,त्याची देवकी वासुदेवांनी स्तुती केली आणि त्यास कंसापासून भ्यालेल्या वसुदेवाने गोकुळामध्ये पोहचविले अशी कथा वर्णन केलेली आहेत ||१|||
| अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः | यर्ह्येवाजनजन्मर्क्षं शान्तर्क्षग्रहतारकम् ||१||
अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला—हे राजा,ब्रम्हादिदेवांनी गमन केल्यानंतर ज्यावेळी भक्तजनाची अविद्या निवृत्त करणारा व कालकर्मादिकांच्या स्वाधीन असलेल्या रहित असा तो स्वतंत्र भगवान प्राक्त होणार त्यावेळी सर्व गुणांनी संपन्न असा परम कल्याणकारक काळ प्राप्त झाला.त्यावेळी शांत अशा नकक्षत्रांनी तार्यांनी व ग्रहांनी युक्त असें ब्राम्ह्देवांचे रोहिनी नक्षत्र होते ||१|| भावार्थ:--- सर्व गुणांनी युक्त अशी उत्तम वेळ आली म्हणजे तेव्हा रोहिणी नक्षत्र,आकाशातील सर्व नक्षत्रे,ग्रह आणि तारे शुभ होते. अशा योग्य वातावरणात भगवंत पृथ्वीचा भर कमी करण्याकरिता व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी म्हणजेच तमोगुण व राजौनांचे प्राबल्य कमी करण्यासाठी व सत्वगुणाची वाढ करण्यासाठी भगवंत शुभ कळत प्रगट झाले.आपण त्याच तिथीला आजही शुभ कर्म करून भगवंतांच्या आगमनाचा दिवस म्हणजे गोकुळ वद्ध अष्टमी उत्सव अति प्रसन्न व आनंदात साजरी करावयास पाहिजे.त्यामुळे आपणास ते निष्काम किंवा सकाम सत्कर्म केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होते.आपण त्या दिवसी सर्व वेळ व धन त्या कार्यात व्यतीत करून आपले सार्थक करून घ्यावे.अन्नदान करून सर्व प्रकारची निष्काम किंवा सकाम सेवा करावी.||१|| अर्थः--- त्यावेळी सर्वदिशा- प्रसन्न झाल्या, आकाश-निर्मळ अशा नक्षत्रादिकांच्या उद्यानें युक्त झालें,पृथ्वी-ज्यांमध्ये पुत्रजन्मादिक पुष्कळ उत्साह आहेत अशा नागरांनी,गावांनी गवळवाड्यांनी व रात्नादिकांच्या खाणीने युक्त झाली ||२|| भावार्थ:--- त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या होत्या,कारण भगवंतांचे आगमन होत असल्याकारणाने आपणासही त्यांचे दर्शन होणार,म्हणून दिशाही प्रसन्न झाल्या होत्या.त्याचप्रमाणे आपणही वर्तमान काळात कृष्ण—जयंती साजर करण्यासाठी पूर्व उत्सवाची तयारी म्हणून आपल्यात उत्सावपूर्ण वातावरण निर्मिती करून आनंदात भगवंतांच्या आगमनाची प्रसन्न चित्ताने वाट पाहावी.||२|| अर्थः—नद्या-स्वच्छ उद्काने युक्त झाल्या.मोठमोठे डोह-कमळांच्या शोभेने युक्त झाले,वनांच्या रांगा-ज्यांवर पक्ष्यांच्या व भ्रवरांच्या समुदायांच्या मनोहर शब्द होत आहे अशा पुष्पांच्या घोसांनी युक्त झाल्या ||३|| भावार्थ:--- नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते,त्याचप्रमाणे आपणही अंत:करण शुद्ध करून भगवंतांच्या दर्शनाची,स्वरूपास प्राप्त होण्याची तळमळ करावयास पाहिजे,त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप होणार आहोत.आपण भगवंतांच्या लीला व चरित्रांचे गुणगान करून आनंदात असावयास पाहिजे.कधी—कधी नामस्मरण करण्यात तल्लीन व्हावयास पाहिजे.||३|| अर्थः—त्यावेळी वर-स्पर्श झाला असता आनंद देणारा,पवित्र सुगंध युक्त व शुध्द असा वाउ लागला आणि ब्राम्हणादिकांचे,कुंडामध्ये शांत असल्लेले अग्नी,अपोआप प्रदीप्त झाले.||४|| भावार्थ:--- पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुगंधी करीत होता,त्याचप्रमाणे जीवांनी निष्काम कर्म व निष्काम उपासना करून संत—महात्मा यांचा स्वधार्मांचा व वेदांतांचा उपदेश ग्रहण करावयास पाहिजे,कारण असा उपदेश ग्रहण केला तर चित्तावर परिणाम होऊन आपल्या आचरणात बदल होते.त्यामुळे आपल्यातला दोष जातो,जीवाब्राह्मऐक्यज्ञान होते.||४|| अर्थ:---कंसादिक असूर ज्यांच्या द्वेष करितात साधूंची म्हणी प्रसन्न झाली,त्या जन्मरहित परमेश्वराचा जन्म समय अगदी जवळ आला असता स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या ||५|| भावार्थ:--- आसुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने प्रसन्न झाली होती,कारण त्यामुळे सत्कर्म करण्यास प्रतिबंध न राहता सात्विक कार्य करण्यास अनुकुलता असणार आहे.त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणातील तमोगुण व रजोगुण निवृत्त झाल्यानंतर सात्विक कार्य करण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे आपली मन प्रसन्न असावयास पाहिजे.आपण सात्विक कार्य करावी.||५|| अर्थ:---त्यावेळी किन्नर आणि गंधर्व,भगवताचे गुनानुवाद गाऊ लागले.सिद्ध व चारण स्तुती करू लागले विध्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर वर्तमान नृत्य करु लागल्या ||६|| भावार्थ:--- आपण गोकुळ अष्टमीच्या दिवसी भागवतांच्या चरित्रांचे,व लीलांचे गायन निष्कामतेने करावयास पाहिजे.आपण एकट्याने नव्हे तर कुटुंबातील सर्वांनी या कार्यकर्मात सहभाग घ्यावावयास पाहिजे,म्हणजे त्यांनाही सात्विकता येते.||६|| अर्थ:---हर्षाने पूर्ण झालेले ऋषी आणि देव पुष्पवृष्टी करू लागले,समुद्राची गर्जना चाललीच होती त्याच्या मागून मेघही मंद मंद गर्जना करू लागले ||७|| भावार्थ:--- देव आणि ऋषी--संत—महात्मा आनंदात पुष्पांचा वर्षाव करू लागले,त्याप्रकारे त्यांचा सहवासात आपणही पुष्पांचा वर्षाव करावयास पाहिजे.आपल्या अज्ञानामुळे आपण गोकुळ—अष्टमीच्या दिवसी आपला संसारातील कार्य न सोडता या भगवंतांच्या उत्सवात भाग न घेता,आपल्या संसारिक कार्यातच मग्न असतोत.आपली भावना अशी असते कि,हे कार्य आपले नसून ऋषी,संत—महात्मा यांचेच ते कार्य आहे.या भावनेमुळे आपण आपल्या संसारिक कार्यात मग्न असतोत.आपल्या ठिकाणी अज्ञान असते त्याचा तो परीनाम आसतो.वास्तविक पाहता अशा प्रकारच्या कार्यात सहभाग होऊन आपले आपण हित करावयास पाहिजे.हे सर्व मानवांचे कार्य आहे,कारण परमार्थ फक्त मनुष्य देहातच करता येतो,तर तर चौऱ्याऐंसी योनीत अधर्माचे दु:ख भोगावे लागते.||७|| | निशीथे तमउद्भूते जायमाने जनार्दने | देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशय: | आविरासीद्य यथा प्राच्यां दिशीन्दुरिव पुष्कलः ||८||अर्थ:--मध्यरात्रिची वेळ म्हंटली म्हणजे आदींची लोकांना भय उत्पन्न करणारी,त्यांत ती मेघाच्या निबिड अंधाकाराचे व्याप्त झाली होती,त्याचवेळी जसा पूर्व दिशेचे ठिकाणी षोडशकलात्मक पूर्णचंद्र उदय पावतो त्याप्रमाणे देवतारूपी त्या देवकीचेठिकाणी,सर्वांच्या बुद्धीमध्ये अंतर्यामित्वेकारून वास करणारा तो व्यापक विष्णू ईश्वर,चतुर्भुजस्वरूपाने प्राक्त झाला ||८|| भावार्थ:---जनार्दनांच्या अवताराची वेळ होत आलेली होती.मध्यरात्र!सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरलेले होते. सर्व जण आपापल्या अधिकारानुसार साधनांनी परिपूर्णता करून भगवंतांच्या आगमनाची वाट पाहत होते.अशा प्रसंगी भगवान विष्णू देवरुपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा,तसे जन्मास आले नाही म्हणजेच अयोनी प्रगट झाले.||८|| अर्थ:---त्या अद्भुत बालकाला वसुदेवाने अवलोकन केले,तो असा होता कि,त्याचे डोळे कमळासारखे सुंदर होते,त्याला चार हात – असून त्यांमध्ये त्याने शंख,गदा,चक्र आणि कमल ही आयुधे धारण केली होती.त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्सलांछन असून त्याच्या गळ्याने कौस्तुभरत्न शोभत होते,त्याने पिवळी वस्त्रे परिधान केलेली असून त्याचे स्वरूपसौदर्य पाण्याने भरलेल्या काळ्या मेघासारखे हाते ||९|| अर्थः---त्याचे कुरळ केंस,बहुमोलाच्या वैदूर्यररत्नांनी जडित असलेल्या किरीटाच्या व कानांतील कुंडलांच्या कांतीने स्फुरण पावत असून तो उत्तमप्रकारचा कमरपट्टा,बाहूभूषणे कडीतोडेवगैरे अलंकारांनी प्रकाश पावत होता.अशा त्या बालकाला वसुदेवाने पहिले ||१०||अर्थः---तेव्हा तो वसुदेव, साक्षात श्रीहरी आपला पुत्र झाला असे विस्मयाने प्रफुल्लीतनेत्र व कृष्णावतारनिमित्तक कर्तव्य उत्साहाच्या लगबगीने युक्त होऊन हर्षभरित झाला आणि त्याने ब्राह्मणाला दहाहजार गाई मनाने अर्पण केल्या. कारण, कारागृहामध्ये तत्काळ प्रत्यक्ष गाई देण्यास असमर्थ असल्यामुळे त्याने त्या देण्याचा मानंने संकल्प केला. ||११|| भावार्थ:--- भगवंत पुत्राच्या रूपाने आलेले आहेत हे पाऊन वसुदेवांना आनंद झाला.त्या आनंदाला कांही सीमा राहिली नाही.तपश्चार्याचे फळ प्राप्त झाले,त्या आनंदात दानधर्म म्हणून दहा हजार गाई दान देण्याचा ताबोडतोब संकल्प केला.त्याचप्रमाणे आपणही कौटुंबिक जीवन जगात असतांना आपल्या जीवनाच्या प्रसंगात अपत्य जन्मास आल्यानंतर दानधर्म करावा.||११|| अर्थः----हे राजा, नन्तर शुद्धबुद्धि व भगवंताचा प्रभाव जाणणारा असल्यामुळे निर्भय असा तो वसुदेव, आपल्या क्रांतीच्या योगाने सुतीकागृहाला प्रकाशित करणाऱ्या त्या बालकाला हा परमेश्र्वर आहे असे जाणून, साष्टांग नमस्कार घालून हात जोडून स्तुती करू लागला. ||१२|| अर्थः---वासुदेव म्हणाला;--हे ईश्वरा,मी तुला जाणिले आहे.तुं संध्या जरी माझ्या पुत्राप्रमाणें दिसत आहेस तथापि तुं वास्तविकपणे प्रकृतीहून पर पुरुष असून केवलानुभवानंद स्वरूपी,सर्वं प्राण्यांच्या बुद्धीना पहाणारा अंतर्यामी ईश्वर आहेस.अशा तुला मी प्रत्यक्ष पाहिजें तेव्हां हें माझें भाग्य होय ||१३|| अर्थः---आतां देवकीच्या उदरामध्यें प्रविष्ट झालेल्या माझी काय ही अतिस्तुती करितोस?असें म्हणशील तर-तो सच्चिदानंदस्वरूपी,तुं,सुश्तीच्या आरंभी आपल्या मायेने हे त्रिगुणात्मक जग उत्पन्न करून नंतर त्यामध्ये प्रविष्ट नसूनही प्रत्यक्षपणानें किंवा सदुपने प्रविष्ट झाल्यासारखा दिसतोस ||१४|| अर्थ:---या विषयीं दृष्टांत सांगतो-जशी ही निरनिराळ्या स्वभावाची महत्तत्वादिक तत्त्वें एकमेकांस सुटून असलीं म्हणजे ती सुटून असेपर्यंत कोणतेंच विशिष्ट कार्य करू शकत नाहीत आणि तीच शब्दादि आणि अकरा इंद्रियें अशा सोळा विकारांसहवर्तमान एकठिकाणी मिळाली म्हणजे ब्रम्हांड उत्पन्न करितात व उत्पन्न केल्यावर त्यांत प्रविष्ट झाल्यासारखी दिसतात परंतु तीं प्रविष्ट होत नाहीत;कारण,कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीच तीं तेथें असल्यामुळे कार्य उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्या तेथे प्रवेश होत नाही ||१५-१६|| अर्थः---याप्रमाणे ज्यांचे स्वरूप,रूपादी विषयांच्या ज्ञानानें अनुमान करण्यास योग्य आहे अशी इंद्रिय व त्यांनी ग्रहण करावयाची घटडी विषय यासहवर्तमान तू राहत असूनही त्या विषयांबरोबर तुझे ज्ञान होत नाही कारण,पदार्थाच्या बरोबर जेवढे गुण असतील तेवढ्याचे प्रत्येक इंद्रियाला ज्ञान होतेंच असा काहीं नियम नाही; तर ज्या इंरीयांमध्ये जो विषय ग्रहण करण्याची शक्ती असेल तेव्ध्याचें आत्र त्याला ज्ञान होते.जसें पिकलेला पेरू वगैरे पदार्थ दुरुनपहिला तर चक्षु इंद्रियाने त्याचे पिवळे रूपमात्र दिल पण त्याच्या बरोबर असलेले मधुरस किंवा मृदढस्पर्शवगैरे गुण काहींच समजणार नाही त्याचप्रमाणे हे प्रभो,तुं विषयाबरोबर राहत असूनही विषयांच्या ज्ञानाबरोबर तुझे ज्ञान देवकीच्या गर्भात प्रविष्ट झालास हे कसें म्हणता येईल?म्हणून तुं आनंदानुभवरुपी आहेस असें तुझे ज्ञान मला झाले हें माझें मोठेय होय!||१७|| अर्थः---जो पुरुष,आत्म्यापासून प्रकाश पावणाऱ्या देहादिकांचेठिकाणी,आत्म्याहून निराळेच हे देहादिक खरे आहेत असा निश्चय करितो तो मूढ होय.ज्याअर्थी विचार केला असता ते त्याने स्वीकार केलेले देहादिक सर्व पदार्थ,वाचेने उच्चारावयाचे मात्र आहेत,त्यावांचून त्यांत दुसरे तथ्य असे काही नाही,त्याअर्थी विचारी पुरुषांनी अवस्तुत्वकरून टाकलेल्या देहादिकांचा वस्तूबुद्धीने स्वीकार करणारा जो पुरुष तो मूर्खच होय ||१८|| अर्थः----हे सर्वव्यापका,सत्व,रज व तम ह्या तीन गणांनी रहित,कोणताहि व्यापार न करणारा व विकाररहित अशा तुझ्यापासूनच या जगाचे उत्पत्तीस्थितीसंहार होतात असे लोक व वेद वर्णन करितात.आता निर्व्यापार अशा माझेठिकाणी कर्तुतत्व असले तर निर्विकारीत्व कसे घडले ?असे म्हणशील तर तू ब्राम्हस्वरूपी (सर्वव्यापक)ईश्वर(सर्वशक्तिमान्)आहेस म्हणून तुझेठिकाणी निर्विकारीत्व व कर्तृव्य ही दोन्ही विरुध्द होत नाहीत,तुझे ठिकाणी कर्तृत्व सांगण्यावा आशय इतकाच की,तू गुणाचा आश्रय आहेस म्हणून,जसे सेवकाने केलेल्या कर्माचे कर्तृत्व राजाचेठिकाणी मानितात त्याप्रमाणे गुणांनी केलेल्या सृष्ट्यादिकांचे कर्तत्व तुझेठिकाणी मानितात तथापि वस्तुतः तुं अकर्ता व निर्विकारीच आहेस ||१९|| अर्थः---तोव तुं.त्रैलोक्याच्या संरक्षणाकरिता आपल्या मायेच्या योगाने आपल्या शुभ्रवर्ण (सत्वगुणात्मक विष्णूमूर्ति)धारण करितोस.तसाच त्रैलोक्याची उत्पत्ति करण्याकरिता रजोगुणाने वृद्धिंगत झालेला तांबडा वर्ण (रजो—गुणात्मक ब्रम्हामूर्ती)धारण करितोस आणि सर्वजनांच्या नाशाविषयी कृष्ण वर्ण (तमोगुणकार्ययुक्त रुद्र्मुर्ती)धारण करितोस ||२०|| अर्थः—हे व्यापका,हे सर्वशक्तिमंत परमेश्वरा,संप्रतकाळी यालोकांचे रक्षण करण्याची इच्छा करण्याची इच्छा करणारा तुं,माझ्या गृहचेठीकाणी कृष्णवर्णाने आवर्तन झाला,आहेस म्हणून साधूंच्या रक्षणाकरिता तू राजांचे नांवमात्र धारण करणारे जे दैत्यांचे कोट्यवधींची सेनाधिपती त्यांनी इकडेतिकडे फिरविलेल्या त्यांच्या सेनांचा संहार करिशील ||२१|| अर्थः---हे देवाधिदेवा,ह्या दुष्ट कंसाने तर तुझे जन्म आमच्या घरी होणार असे एकूण तुझे वडील सहा भाऊ मारून टाकिले,तो आतांच आपल्या दूतांनी कळविलेला तुझा अवतार ऐकून हातात शस्त्र धारण करून इकडे धावंत येईल,यास्तव तू सावध आसावेस ||२२|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला ----हे राजा,नंतर कंसापासून भ्यालेली देवकी,भगवंताच्या चातुर्भूजादी लक्षणांनी युक्त अशा ह्या,आपया पुत्राला अवलोकन करून आनंदाने हर्षयुक्त्मुख होत्साती त्याची स्तुती करुं लागली ||२३||अर्थः---देवकी म्हणाली -----हे ईश्वरा,वेदांनी जे परमार्थस्वरूप वर्णन केले आहे ते बुद्धीप्रभृती इंद्रियांचा प्रकाश करणारा साक्षात् विष्णू तूंच आहेस.ते तुझे स्वरूप असे की,-- जे अव्यक्त(नसमजणारे)सर्वांचे आदिकारण,ब्रम्हरुपी,प्रकाशरूपी,निर्गुण,निर्विकार,सत्तामात्र,कोणत्याही विशेष धर्माने रहित व कोणत्याही क्रियाधर्माने रहित आहे.म्हणून तुला दुसऱ्यापासून भय होण्याची शंकाच नाही ||२४|| अर्थः---आता महाप्रलयाचेठिकाणीहि अवशेष राहणाऱ्या तुला भय कोठून असणार असे सांगत्ये – हे प्रभो,ब्रम्हदेवाचे दोन परार्धे आयुष्य संपल्यावर, प्रलयाचेवेळी चराचर सर्वलोक नाहीसे होऊन ते मह्भूतात मिळून गेले असता, व ती महाभूतेही त्यांच्या सुक्ष्मभूतात मिळून गेली असता, आणि ते व्यक्त असलेले सूक्ष्मभूतरूपी कारणही कालाच्या वेगाने मायेमध्ये मिळून गेले असता,हे जग,माझ्यामध्ये अशाप्रकारे लय पावले आहे, पुन्हा अशाप्रकारे उत्पन्न करावयाचे असे जाणणारा ऐक तूच अवशेष राहतोस. ||२५|| अर्थ:----हे मायेच्या चालक देवा,ज्याच्या योगानें हे जग चालले आहे,तो निमेषापासून संवत्सरापर्यंत अवांतर भेदांनी युक्त असून प्रळयाला कारण आहे,तो मोठा काळ,प्रळयाचे ठिकाणीं अवधिभूत असलेल्या तुझीच लीला आहे असे म्हणतात,त्या अभ्यास्थानरुपी तुज परम्यात्म्याला मी शरण आल्ये आहे.||२६|| अर्थ:----आता त्याचा निर्भयस्थानपणा सांगत्ये --- हे सृष्टीकर्त्या ईश्वरा,मृत्यूरुपी सर्पापासून भ्यालेला हा मरणधर्मयुक्त संसारी जन,सर्वलोकांमध्ये पलायन करीत असता तेथे तेथेही मृत्यू असल्यामुळे हा निर्भायस्थान पावला नाही परंतु काही एक सुदैवाने तो तुझ्या चरणकमलाजवळ प्राप्त झाला असता निर्भयपणे राहतो.कारण या जनापासून मृत्यू माघार फिरतो ||२७|| अर्थ:----याप्रमाणे देवकी स्तुती करून आता प्रस्तुत गोष्टीची प्रार्थना करित्ये की,-- हे देवा तो तू भक्तांचे संकट दूर करणारा आहेस म्हणून घोरकर्म करणाऱ्या ह्या कंसापासून भ्यालेल्या आमचे रक्षण कर आणि मुमुक्षूंना ध्यान करण्यास योग्य असे हे आपले ईश्वरी स्वरूप मांसदृष्टी लोकांना प्रत्यक्ष दाखवू नकोस ||२८|| अर्थ:----याचें कारण हें मधुसदन,हा पापी कंस,माझेठीकानी तुझें जन्म झाले असें न जाणों.कारण,अधीरबुद्धी असलेली मी,ज्याअर्थी माझे बहुत पुत्र कंसाने मारले आहेत त्या त्याअर्थी तुझ्यानिमित्त ह्या कंसापासून फारच भीत आहें||२९|| अर्थ|:----हे विश्वमूर्ते,शंख,चक्र,गदा व पद्म यांच्या शोभेने सेवन केलेलें हें अलौकिक चतुर्भून स्वरूप गुप्त कर||३०|| अर्थ:-----आतां हें काय म्हणून गुप्त करावें ? अशा प्रकारच्या मजपुत्राच्या योगानें तुझी मोठी प्रशंसा होईल असें म्हणशील तर-जो परमपुरुष तुं प्रळ्याच्या वेळेंस हें सर्व जग,आपल्या शरीराचे ठिकाणीं असंकोचित पणें धारण करितोस तोच तुं,माझ्या उदरीं जन्माला आलास असे जें म्हणणे तें मनुष्य लोकांचेठिकाणी असंभावित असल्यामुळे अतिशय उपहासाला (थट्टेला) पात्र होईल म्हणून या स्वरूपाचा तुं उपसंहार कर ||३१|| अर्थ:-----तेव्हां श्रीभगवान् म्हणाला---हर प्रतिव्रते देवकी,तुं येथून पूर्वीच्या तिसर्या ज्न्ममध्ये स्वायंभुव मन्वंतरांत पृशनी या नावांची स्त्री होतीस,त्यावेळी हा वसुदेव,सुप्त नावांचा प्रजापती होता व पाचें आचरण निर्दोष असे ||३२|| अर्थः----नंतर ज्यावेळी ब्रम्हदेवाने तुम्हाला सृष्टी करण्याविषयी आज्ञा केली त्यावेळी तुम्ही दोघांनी,आपल्या इंद्रियसमुदायाचे दमन करून परम उग्र तपश्चर्या केलीत ||३३|| अर्थ:----ती अशी कि,--दृष्टी,वारा,उन्हाळा,थंडी,पंचास्गिसाधने प्राप्त झालेला घाम व निरनिराळ्या ऋतुकालांचे धर्म यांचे वारंवार सहन करणाऱ्या,प्राणायामाच्या योगाने आपल्या अंतःकरणांतील पातके अगदी नाहीशी करून टाकणाऱ्या,गलितपर्णाचे व वायूचे भक्षण करणाऱ्या आणि माझ्यापासून मनोरथ पूर्ण करून घेण्याची इच्छा करणाऱ्या अशा तुम्ही दोघांनी,एकाग्रचित्ताने माझे आराधन केलेत ||३४||३५|| अर्थः----याप्रमाणे माझेठिकाणी अंतःकरण ठेऊन अत्यंत दुर्घट तीव्र तपश्चर्या करणाऱ्या तुम्ही दोघांची,दिव्यमानाने बारा हजार वर्षे निघून गेली||३६|| अर्थ:---हे पवित्रे देवकी,तेव्हा तपाच्या योगाने श्रद्धेने व निश्चल भक्तीने,हृदयामध्ये चितन केलेला वर्दश्रेष्ठ असा मी तुझांवर संतुष्ट होऊन तुम्हाला वर देण्यासाठी इच्छेने या चतुर्भुज स्वरूपाने तुमच्या अग्रभागी प्रकट झालो.नंतर मी तुम्हाला वर मागा असे म्हंटले असता,तुम्ही माझ्यासारखाच पुत्र वर मागून घेतला ||३७||३८|| | अजुष्टग्राम्य विषयावन पत्यौ च दम्पती |न वव्राथेऽपवर्गं मे मोहितौ मम मायया ||३९|| अर्थ:---त्यावेळापर्यंत तुम्ही दोघांनी विषयभोग (मैथूनादिक)मुळीच अनुभविलेले नव्हते व तुम्हाला अपत्य प्राप्त झाले नव्हतेमम्हणून तुम्ही देवाच्या मायेने मोहित होऊन,मजपासून मोक्ष मागून घेतला नाही.||३९|| भावार्थ:--- भगवंतांचे दर्शन होईपर्यंत त्या दोघांचा विषयांसी कांहीच संबंध नव्हता,कारण तप करण्यासाठी विशातांच्या संबंधाचा त्याग करावा लागतो,म्हणून त्यांचा आणि विषयांचा संबंध आला नव्हता.मी तुमाच्या तापाने प्रभावित झालो व तुम्हास दर्शन देण्यासाठी तुमच्या समोर प्रगट झालो.प्रगट झाल्याबरोबर मायाने मोहित होऊन पुत्र मागितला,त्यामुळे मोक्ष मागितला नाही. मायेचे स्वरूप हे असेच असते.ती माया मोक्षाकडे जाऊ देत नाही.म्हणून जीवांनी संसारातील कांहीच मागू नये,कारण संसारातील सर्व वस्तू ह्या नाशिवंत असतात.अखेर दु:खाला कारण असतात,म्हणून संसारातील कांहीच मागू नये.||३९|| | गते मयि युवां लब्ध्वा वरं मत्सदृशं सुतम् | ग्राम्यान् भोगानभुन्जाथां युवां प्राप्तमनोरथौ ||४०|| अर्थ:----असो. तथास्तु असे म्हणून वर देऊन मी गेलो असता, पुढे तुझी माझ्या सारखा पुत्र्रूपी वर पावोन, त्याच्या योगाने प्राप्तमनोरथ झाला आणि विषयभोगांचा उपभोग करू लागला.||४०|| भावार्थ:---तुमच्या मनातील संकल्प—भगवंतांसारखा पुत्र प्राप्त व्हावा,म्हणून इच्छा पूर्ण झाली.त्यानंतर—इच्छा पुरती झाल्यानंतर,विषयांचा भोग घेणे सुरु केले.विषयांची ओढ असे संस्कार अंत:करणात असल्यामुळे होत असते.आपण श्यकेतो विषयांचा भोगाचा त्याग करण्याचे संस्कार करून घ्यावावयास पाहिजे.सहज—आनंद—विनोदाने म्हणून विषयांचा व इंद्रियांचा संबंध येऊ देऊ नये.त्यामुळे संस्कार दृढ होउन संसाकारात वाढ होत असते.असा विवेक करून विषयांच्या त्यागाचे संस्कार असावेत.\|४०|| | अदृष्ट्वान्यतमं लोके शिलौदार्यगुणैः समम् | अहं सुतो वामभवं पृश्निगर्भ इति श्रुतः ||४१|| अर्थ:---पुढे या लोकांमध्ये, स्वभावाने औदार्याने व इतर गुणांनी आपल्यासारख्या योग्यतेचा दुसरा कोणीच नाही असे पाहून मीच पृशनीगर्भ या नावाने पशिद्ध असा तुमचा पुत्र झालो होता पुढे तीच तिन्ही दोघे अतिप्रसिद्ध असा तुमचा पुत्र झालो होता ||४१|| | तयोर्वां पुनरेवाहमदित्यामास कश्यपात् | उपेन्द्र इति विख्यातो वामनत्वाच्च वामनः ||४२|| अर्थः---पुढे तीच तुम्ही दोघे अदिती काश्य्रुपणे झालं असता, जो कश्यपापासून अदितीचे ठिकाणी झालेला उपेंद्र या नावाने प्राख्यात व वर्हस्वांग असल्यामुळे वामन या नावाने प्रसिध्द पुत्र झाला, तोही पुन्हा मीच झालो होतो.||४२|| | तृतीयेsस्मिन् भवेsहं वै तेनैव वपुषाथ वाम् | जातो भूयस्तयोरेव सत्यं मे व्याहृतं सति ||४३|| अर्थः---हे पतिव्रते देवकी, आता त्या कश्यपअदितीरुपच तुमच्या ह्या तिसऱ्या जन्मामध्ये पूर्वी दाखविलेल्या त्या चतुर्भुजजादिविशिष्ठ स्वरूपानेच मी पुन्हा उत्पन्न झालो आहे. ऐतावता, तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होईल म्हणून जे मी सांगितलेले होते ते खरे झाले. ||४३|| भावार्थ:--- भगवंत सत्यवादी आहेत.दिलेल्या शादांचे ते पालन करतातच.म्हणून आपल्या दिलेल्या शब्दांचे पालन करणे धर्मच आहे.सत्य हाच धर्म आहे,सत्याचाच विजय प्राप्त होत असतो.सत्य तेथे सुख असते.असत्याचा पराजय होत असतो.जेथी असत्य तेथे दु:ख असतेच.जीवाला दु:खाची अपेक्षा नाही तर सुखाची अपेक्षा आहे.म्हणून जीवनात सत्याचाच आश्रय करावा.||४३|| अर्थः---प्रथम माझें अशा प्रकारचे जन्म झाले होतो याच्या स्मरणाकरीता हे चतुर्भुजादिविशिष्ट रूप मी तुम्हाला दाखविले आहे. त्या वाचून मनुष्यसारखा शरीराने माझ्या स्वरूपाने ज्ञान होत नाही आतां पुढे तुझ्या इच्छेने मी बळकही होईन||४४|| | युवां मां पुत्रभावेन ब्रम्हभावेन चासकृत | चिन्तयन्तौ कृतस्नेहौ यास्येथे मद्गतिं पराम्||४५|| अर्थः---आता,प्रसन्न झालास असून आम्हाला वारंवार जन्म कसे प्राप्त झाले?असें म्हणशील तर-आता पुढे होणार नाही आता तुम्ही या जन्मामध्ये पुत्र भावाने किंवा ब्राम्ह्भावाने वारंवार माझे चिंतन करा किंवा माझ्या ठिकाणीं प्रीती करा म्हणजे तुंम्ही शेवटी उत्कृष्ट अशा माश्या मोक्ष रूप गतीला पावलं ||४५|| भावार्थ:--- भगवंत आपल्या भक्तांना म्हणतात कि,”तुम्ही माझ्याबदल पुत्रभाव व ब्रह्मभाव नेहमी ठेवावा,कारण तुमच्या म्हणण्यानुसार पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्मास आलो.तुमचे तपामुळे अंत:करण शुद्ध व स्थिर झालेले आहे.तुम्ही वेदांताचे श्रवण केलेले असल्यामुळे माझ्यावर म्हणजेच परमात्म्यावर ब्रह्मभाव ठेवावा.त्यामुळे तुम्हास परमपदाची प्राप्ती होईल.तुमचे या जन्मात जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होताल.पुत्राची वासना असल्यामुळे या पूर्वी तुमचे जन्म—मरण निवृत्त झाले नाही.थोडक्यात देह,देहसंबंधीची किंवा विषयांची वासना असेल तर जन्म—मरण निवृत्त होत नाही.याकरिता देह,देहसंबंधीची वासना व कोणत्याही विषयांची वासना नसावी.त्या वासनेचा त्याग करावा.वासनेचा त्याग केला असता परमात्म्याची अनुभूती येते व त्यानंतर जन्म—मरण निवृत्ती होते.भगवंतांची पुत्ररूपाने वासना हि जन्म—मरण निवृत्तीला प्रतिबंध करते तर देह—देहसंबंधीची—विषयांची वासना प्रतिबंध करेल,यात तिळमात्र शंका नाही,असे निश्चितच आहे.असा विवेक करून आपण परमार्थ करावा.||४५|| | इत्युक्त्वाSSसीद्धरिस्तूष्णीं भगवानात्ममायया | पित्रोः सम्पश्यतो: सद्दो बभूव प्राकृतः शिशुः ||४६|| अर्थः---आता हे वासुदेवा,जर तू कंसापासून भीत असशील तर तू मला गोकुळामध्ये नेऊन पोहचाव आणि तेथे यशोदेच्या पोटी माझी माया उत्पन्न झाली आहे तिला तेथे लवकर घेऊन ये.||४६||भावार्थ:--- असे सांगून भगवंत शांत राहिले आणि माता—पिता समोर असतांना भगवंतांनी आपल्या योगमायेने ताबोडतोब एका सामान्य मानवासारख्या बालकाचे रूप धारण केले.यानंतर हे आपला पुत्रा आहे हा भाव निर्माण झाला व ब्रह्मभावहि ठेवला.||४६|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला—हें राजा याप्रमाणे भगवान हरी भाषण करून स्वस्थ राहिली आणि ती माता-पितरे पाहत,असता तत्काळ आपल्या योगमायेच्या योगेने लौकिक मुलाप्रमाणे लहान बालक झाला.||४७|| भावार्थ:--- तेव्हा वसुदेवांनी भगवंतांच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सुतीकागृहाच्या बाहेर निघाले.भगवंतांना पुढील काम म्हणजे दुष्टांनाचा संहार व सज्जनांचे संरक्षण करावयाचे होते म्हणून वसुदेवांना सुतीकागृहाच्या बाहेर निघण्याची प्रेरणा दिली.त्याचवेळेस नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया--पुत्री प्रगट झाली,कारण तिच्याशिवाय भगवंत कार्य करू शकत नाहीत.||४७|| अर्थः—नंतर,भगवंताने आज्ञा केलेल्या त्या वसुदेवाने,पुत्राला ग्रहण करून जेव्हा स्तुतिका गृहातून बाहेर जाण्याची इच्छा केली त्याचवेळी जन्मरहित अशी योगमायाही नंदस्त्री याशोदेपासून उत्पन्न झाली ||४८|| भावार्थ:--- त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या होत्या.त्यामुळे नगरातील सर्व लोक गाढ निद्रेत झोपी गेले होते.वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाज्याजवळ पोहचले,तसे ते दरवाजे आपोआप उघडले,कारण भगवंतांनी त्याच मायेला तशा प्रकारची आज्ञा दिलेली होती.त्यामुळे हे सर्व कार्य केले.पाऊस सुरु होता,कारण वरुणराजाला भगवंतांचे दर्शन घ्यावावयाचे होते.भगवंत शेषांनी आपल्या फण्याच्या साह्याने भगवंतांचे पाऊसापासून सरंक्षण केले. त्याचप्रमाणे आपणसुद्धा भगवंतांची कोणत्याही प्रकारची सेवा करून आपले कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करावा.||४८|| अर्थः---त्या योगमायेनें,द्वारपालांच्या ज्ञानाला साधन भूत आशा इंद्रियांच्या सर्व वृत्ते हरन केले असता,म्हणजे द्वारपाल जाणे असूनही त्यांना चित्रासारखे स्तब्ध करून सोडिले असता व नगरवासी सर्व लोक निद्रिस्थ करून टाकिले असता,जे दरवाजे पूर्वी कंसाने मोठ्मोठ्या फळ्यांच्या ठिकाणीं लोखंडी सांखळदंड लावून खिले ठोकून बंद करून टाकलेले व उघडण्यास अशक्य केल्लेले होते ते सर्वही श्रीकृष्णाला घेऊन वासुदेव आला असता,जसें सूर्याचे आगमन झाले असता अंधकाराने विदारण होतें त्याप्रमाणे आपोआप सपाट उघडले मंदमंद गर्जना करणारा मेघ (मार्गामध्ये लोकांचे फिरणे बंद होण्यासाठी) दृष्टी करू लागला आणि त्या आपल्या पसरलेल्या सहस्त्र फनांनी उदकाचे निवारण करीत शेष सर्प वसुदेवाच्या मागून जावू लागला ||४९-५०|| भावार्थ:---यमुना नदीचे पाणी काठोकाठ भरून वाहत होते.ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट दिली,त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली,कारण यमुनेला भगवंतांचे दर्शन घ्यावावयाचे आहे,असे भगवंतांनी ओळखिले.म्हणून भगवंतांनी आपला उजव्या पायाचा अंगठा बाहेर काढून यमुनेच्या पाण्यात बुडविला म्हणजेच यमुनेला भगवंतांनी दर्शन दिले.त्यामुळे यमुनेचे पाण्याने वसुदेवांना वाट दिली.दोन्ही बाजूला पाणी थांबले व वासुदेव त्या वाटेने यमुनेच्या पलीकडील किनाऱ्यावर पोहोंचले.||५०|| अर्थः---त्यावेळी इंद्र वारंवार वृष्टी करत असल्यामुळे यमुनानदी अगाध जलपुरच्या वेगाने उठलेल्या लाटांनी हे सावळून गेली होती व भयंकर शेकडो भवऱ्यांनी व्याप्त झाली होती.तिने पूर्वी जशी सीतापती रामचंद्राला समुद्राने वात दिली त्या प्रमाणे श्रीकृष्णाला वानाऱ्या वासुदेवाला वाट दिली||५१|| भावार्थ:--- याही ठिकाणी योगमायेने आपल्या प्रभावाने व हगावंताच्या अज्ञाने गोकुळातील वातावरणावर आपला प्रभाव टाकून सर्वांना गाढ निद्रेत झोपवले.त्यामुळे वसुदेवांनी यशोदेच्या अंथरुणावर त्या मुलाला म्हणजे बालकृष्णांना झोपवले व त्या ठिकाणच्या कन्येला घेऊन परत मथुरेत कारागृहात परत आल्रे.हा सर्व त्या योगमायेचा परिणाम आहे.||५१|| अर्थः---पुढे तो वासुदेव,नंदाच्या गोकुळात जाऊन,तेथे निद्ररूप योग मायेने गाढ निजलेल्या नंदादिक गोपांना पाहून,त्या पुत्रला यशोदेच्या शारीरेवर ठेवून आणि तिच्या कन्येला घेऊन पुन्हा आपल्या घरी निघून गेला||५२|| | यशोदा नन्दपत्नी च जातं परमबुध्यत | न तल्लिङ्गं परिश्रान्ता निद्रयापगतस्मृतिः||५३|| अर्थः---नानात्र त्या वसुदेवाने,देवकीच्या शर्यवर त्या कन्येला ठेवून आपल्या पायांमध्ये लोखंडाच्या बेड्या बांधून घेऊन पूर्वी प्रमाणेच बंदिगृहामध्ये राहिला ||५३|| | इकडे गोकुळामध्ये नंदाची पत्नी जी यशोदा तिने तर,आपणाला काहीतर मूळ झाले इतके मात्र जाणविले परंतु कन्या झाली तेव्हां पुत्र झाला हे काही जाणले जाही.कारण,ती प्रूतीवेदेने अगदी व्याकूळ झालेली असून त्या योगनिद्रेने शुद्धीरहित (बेशुद्ध) झाली होती ||५४|| याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुरानांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये कृष्णावतारनिरुपणनामक हा तिसरा अध्याय समाप्त झाला ||३|| श्रीकृष्णार्पणमस्तू || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ४--- २---२--भगवान श्रीकृष्ण---[३]कंसाच्या हातून सुटून योगामायेचे आकाशात जाऊन भाविष्यकथन. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------आतां ह्या चवथ्या अध्यायामाध्यें हे मूढा,मला मारून काय उपयोग ! तुला मारणारा शत्रू कोठें ना कोठेतरी उत्पन्न झालास आहे असें त्या योगमायेचें भाषण श्रावण करून कंस अगदी भयभीत झाला आणि त्याने दृष्ट प्रधानांबरोबर मसलत करून लहान,बालकांचा वध करणें हेंच श्रेयस्कर आहे असें मानिलें; अशी कथा वर्णन केलेली आहे||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,वसुदेव कारागृहांत येऊन राहिल्यावर नगरच्या बाहेरचे व आंतले सर्व दरवाजे पूर्वीप्रमाणे बंद होऊन राहिले.नंतर बालकाचा ध्वनि श्रावण करून कारागृहाचे रक्षक जागृत होऊन उठले ||१||भावार्थ:--- योगमायेने पहिल्यासारखी स्थिती करून ठेवली,म्हणून कोणाला काय झाले व केव्हा झाले हे समजले नाही.आपनासासुद्धा अज्ञानरूपी मायेने संसारातील मायेचे स्वरूप न समजल्यामुळे काय होत आहे व कसे होत आहे हे कळत नाही.म्हणून आपण संत महात्मा यांची संगती करून निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून,तसेच ज्ञान प्राप्त करावे.||१|| अर्थ:-- व त्यांनी मोठ्या त्वरेनें कंसाकडे जाऊन त्या कंसाला,तो ज्याची उद्विग्रपणें वात पहात होता टी देवकीच्या अष्टमगर्भाचे जन्म कळविलें ||२|| अर्थः—तें ऐकून,हा आपला काळ उत्पन्न झाला आहे असें मानून व्याकूळ झालेला तो कंस,शय्येवरून घाबरून उठून ठेंचचकळत केंस सुटलेला तशाचातसाच त्वरेनें बाळंतिनीच्या घरांत प्रविष्ट झाला||३|| भावार्थ:--- कंस याच्या दूतांनी कंस यास सांगितले कि देवकीला मुल झालेले आहे.ताबोडतोब पलंगावरून उठला आणि सुतिकागृहाकडे गेला.हा आपला काळ जन्माला आला आहे,असे समजून तो दु:खाणे व्याकूळ झाला व अडखळत चालू लागला.||३|| अर्थः---तेव्हां त्या भ्रात्याला,देवमाता देवकी,दीनपणानें असें म्हणाली कीं,-हे कल्याणरूपा कंसा,ही कन्या,तुझी सून होण्यासारखी आहे.या स्त्रीचा वध करणें हे तुज शूराला योग्य नाही||४|| भावार्थ:--- कंस देवकीजवळ येताच दीनवाणी होऊन ती रडू लागली,कारण ती म्हणाली,”हे माझे हित चिंतीनाऱ्या बंधो!”वास्तविक पाहता आतापर्यंत कंस याने देवकीच्या सर्व पुत्रांना मारलेले आहे,तरी पण म्हणते,हे माझ्या हित चिंतनाऱ्या बंधो !गरज असेल तर व्यवाहारात असे बोलावे लागते,कारण त्याला दया येऊन देवकीच्या कन्येचा वध करू नये असा तिचा प्रयत्न दिसून येतो.म्हणून कंस यास म्हणते,हि मुलगी तुझ्या सुनेप्रमाणे,व स्त्रीही आहे.शात्र सांगते कि,स्त्रीला मारू नये,ती केविलवाणी प्रयत्न करते.||४|| अर्थ:----हे दादा, दैवाने प्रेरणा केलेल्या तू, आमचे अग्नीसारखे तेजस्वी पुष्कळ पुत्र मारिले आहेस. आता हि ऐक मुलागीतरी तुमाला (विश्रांतीसाठी) दे||५|| अर्थ:----हे समर्था कंसा, मी तुझी धाकटी बहिण नव्हे बरे? तू पुत्र मारील्यामुळे मी अगदी दिन झाल्ये आहे. यास्तव मज हतभगीनीला हि शेवटची ऐक मुलगी तरी देण्याची कृपा करण्याविषयी तू भाग्य आहेस||६|| अर्थ:----श्रीशुक्राचार्य म्हणाला- हे राजा, याप्रमाणे त्या देवकीने यातना केली असताही, त्या कंसाने तिची निर्भत्रस्ना करून मुलीला पोटाशी धरून, दिनापेक्षाहि दिन असल्याप्रमाणे रोदन करणाऱ्या त्या देवकीच्या हातून त्या खलाणे मुलीला हिसकावून घेतले.||७|| भावार्थ:--- कंस आलेला हे पाहून तिने आपल्या मुलीला पोटासी कवटाळून घेतले व कंस यास दयेसाठी केविलवाणी प्रयत्न करत आहे.पोटचे अपत्य कोणत्याही मातेला देऊ वाटणार नाही.अशा प्रसंगात कंस याने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली.कल्पना कार त्या याशोदामातेची अवस्था काय झाली असेल?आपल्या ठिकाणी कंस याचासारखा निर्दयपणा हा दुर्गुण आहे,त्याचा स्वीकार न करता दुर्गुणाचा त्याग करावा व दया हा सदगुण आहे त्याचा स्वीकार करण्यात हित आहे.||७|| | तां गृहीत्वा चरणयोर्जातमात्रां स्वसुः सुताम् | अपोथयच्छिलापृष्ठे स्वार्थोन्मूलितसौहृद: ||८|| अर्थ:---नंतर आपले प्राण वाचणे या स्वार्थाकडे लक्ष ठेऊन ज्याने स्नेह्रूप अंकुर मनातून उप्तूनच टाकीला आहे अशा त्या कंसाने, नुकतीच उत्पन्न झालेल्या त्या बहिणींच्या कन्येला पायांचे ठिकाणी धरून,अंगामध्ये स्नानाकरिता स्थापन केलेल्या शिळेवर आपटिले||८|| भावार्थ:---नवजात भाचीचे पाय पकडून कंस याने तिला जोराने एका खडकावर आपटले.असा तो निर्दयी असलेला कंस याला किंचितही दया आली नाही.याला मानुष म्हणावे कि दगड कांही कळत नाही,बुद्धी कुंठीत होते.आपण मात्र कंसासारखे न होता दयावान होण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.कारण दयात आपले हित असते व निर्दयपणात अहित असते.म्हणून दयावंत व्हावे.||८|| | सा तद्धस्तात् समुपत्य सद्दो देव्यम्बरं गता | अदृश्यतानुजा विष्णोः सायुधाष्टमहाभुजा ||९||अर्थः----त्यावेळी ती विष्णूची धाकटी बहिण,शिळेवर न पडता त्याच्या हातांतून निसटून उडी मारून वर आकाशांत गेली आणि तेथे तत्काळ देवी होऊन आयुधे धारण केलेल्या आठ मोठ्या बाहूंनी युक्त दिसूं लागली||९|| भावार्थ:--- श्रीकृष्णांची धाकटी बहिण कंसाच्या हातातून निसटून ताबोडतोब आकाशात गेली आणि तीच आपल्या आठ हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली दिसली.ती भगवंतांची माया होती.त्यामुळे तिने आपल्या आठ हातात आठ शत्रास्त्रे घेतलेली देवी होती.कंसास पत्यक्ष सांगण्यासाठीच ती आलेली होती.कंस यावर तिचा तात्पुरता परिणाम झाला.पण टिकला नाही.||९|| अर्थः----ती अशी कि,- दिव्यपुष्पांच्या माळां,सुंदर वस्त्रे व उड्या व रत्नजडित भूषणे यांनी अलंकृत,धनुष्य,शूल,बाण,ढाल,खड्ग,शंख,चक्र व गदा यांना धारण करणारी||१०|| अर्थः---आणि मोठयमोठ्या पूजा अर्पण करणाऱ्या – सिद्ध चारण,गंधर्व,अप्सरा,किंनर व नाग यांनी स्तवीलेली अशी ती देवी,कंसाला असे म्हणाली की,||११|| | किं माया हतया मन्द जातः खलु तवान्तकृत् | यत्र क्व वा पूर्वशत्रुर्मा हिंसी: कृपणान् वृथा ||१२|| अर्थः---“अरे मुर्खा,कंसा मला तूं मारून काय साध्य करणार आहेस ? कांहीच नाही.तुझा नाश करणारा पूर्वजन्मीचा शत्रू,आतंही तुला मारण्यासाठी कोठेंतरी खास उत्पन्न झाला आहे.आतां दुसऱ्या गरीब मुलांना व्यर्थ मारू नकोस||१२|| भावार्थ:--- त्या देवीने त्यास सावध केली कि,”मला मारून तुला कांहीच मिळणार नाही,कारण तुला मारणारा तुझा शत्रू दुसऱ्या ठिकाणे आनंदाने वाढत आहे.तु निर्दोष बालकांची हत्या करून पाप वाढून घेत आहेस.ते पाप तुला केव्हाना केव्हा तरी फेडावे लागणार आहे.एवढे पाप करून कांहीच उपयोग होणार नाही.शेवटी तो तुला मारण्यासाठी आलेला आहे.हा विचार करून पहा.||१२|| अर्थः----याप्रमाणे ती भगवती माया देवी,त्या कंसाला सांगून या भूमीवर वारानस्यादिक अनेक नावांच्या क्षेत्रांमध्ये अनेक नावांनी प्रसिद्ध होऊन राहिली.||१३|| | अहो भगिन्यहो भाम मया वां बत पाप्मना | पुरुषाद इवापत्यं बहवो हिंसिताः सुताः ||१५|| अर्थः-----त्या मायादेवीने सांगितलेले ऐकून तो कंस, आकाशवाणी अन्यथा कशी झाली !या आश्चर्याने युक्त झाला आणि देवकीवासुदेवांना बंधात ठेवणे हे व्यर्थ आहे असे मानून, त्यांना बंधनापासून मुक्त करून नम्रतापूर्वक म्हणाला की,(ताई) हे भगिनिपते (भावजी)पापी,अशा मी,जसा राक्षस आपल्या मुलाचा वध करतो त्याप्रमाणे तुमचे पुष्कळ पुत्र मारून टाकले,हि फार वाईट गोष्ट झाली ||१४-१५|| भावार्थ:---त्या देवीचे बोलणे ऐकून कंस भयभीत झाला.तो घाबरला व आता आपण काय करावे याचा विचार करू लागला.त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले.त्याला त्यांच्याविषयी भीतीपोटी दयाभाव उत्पन्न झाला.||१४|| भावार्थ:--- समोर देवकी व वसुदेव आहे,म्हणून व आकाशात दिसलेली अष्टभुजा देवी व तिच्या हातातील आयुध्ये पाहून भयभीत झालेला कंस यास तात्पुरता झालेला पश्चाताप आहे.म्हणून देवकी व वसुदेव यांना यांच्याजवळ पश्चातापात्मक बोलत आहे.कंस त्यांना म्हणतो कि,”मी विनाकारण तुमच्या मुलांना मारून टाकले आहे.मी विनाकारण तुमच्यावर अन्याय केलेला आहे.माझी राक्षस वृत्ती आहे.यापुढे मी तुम्हास त्रास देणार नाही.त्याचप्रमाणे आपणाकडून कोणावर अन्याय केला असेल तर पश्चाताप व्हावा.||१५|| अर्थः---तो तुमचे पुत्र मारणारा,निर्दय झालेला,आपल्या कार्यासाठी बांधव आणि मित्र यांचा त्याग करणारा,खळ व जिवंत असून मेल्यासारखा मी,ब्रम्ह भटक्या प्रमाणे कोणत्या बरे (नारकादिक) लोकांमध्यें जाईन?||१६|| भावार्थ;--- दुष्ट हा दुर्गुण आहे,म्हणून आपल्या अंगी दुष्टपणा नसावा.आपला दुष्टपणा जाण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना—भक्ती करून अंत:करण शुद्ध करावे लागते.जसे—जसे अंत:करण शुद्ध होईल तसे—तसे आपला दुर्गुण कोणताही नाहीसा होतो.याकरिता निष्काम सत्कर्म व धर्मानुसार आचरण करावे लागते.सदगुण येण्यासाठीही निष्काम सत्कर्म व धरणानुसार आचरण करावे लागते व निष्काम भक्ती करावी लागते,त्यामुळे दया इत्यादी सदगुण येत असतात.असे कळण्याकरिता संत—महात्मा यांची संगती करावी लागते,त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी लागते,त्यांची सेवा करावी लागते.त्यांच्याकडून श्रवण करून तसे आचरण करावे.कंस म्हणतो कि,बालकांचा वध केलेला असल्यामुळे मला यमपुरीस जाऊन व चौऱ्याऐंसी योनीस जाऊन गु:ख भोगावे लागेल.||१६|| अर्थः----अहो!देवतादेखील खोटे बोलतात,केवळ मनुष्यच बोलतात असें नाहीं.ज्या आकाश वाणीवर विश्वास ठेवून म्या दुष्टाने,बहिणीचे बालक व्यर्थ मारिले ||१७|| भावार्थ;--- मनुष्य खोटे बोलतात,देवता खोटे बोलतात विधाता—ब्रह्मदेवही खोटे बोलतात,म्हणजे अधर्मानुसार वागतात.त्यामुळे अधर्माचे फळ ज्याचे त्याला दु:ख म्हणून भोगावेच लागतात.याकरिता आपण खोटे बोलू नये,कारण आपणासही दु:खाचे फळ भोगावे लागतेच.दुसऱ्यावर विश्वास ठेऊ नये तर धर्मावरच विशास ठेवावा आण्यावर विश्वास ठेऊ नये.आण्यावर विश्वास ठेवला कि व आपण अधर्मानुसार अपान आचरण केले कि,दु:खाचे फळ भोगावे लागतेच यात कांहीच शंका नाही.||१७|| | मा शोचतं महाभागावात्मजान् स्वकृतम्भुजः | जन्तवो न सदैकत्र दैवाधीनास्तदासते ||१८|| अर्थः---हे वासुदेवा,हे देवकी,तू हि महाभाग्यशाली आहां.यास्तव आपले प्रारब्ध कर्म भोगणाऱ्या आपल्या पुत्रांचा तुही शोक करू नका,सर्वही प्राणी,देवाधीन आपल्यामुळे सदोदित राहत नाहींत त्यांतूनही एकेठिकाणी राहत नाही,तर प्रयोग पावतात||१८|| भावार्थ:--- आपण दोघे म्हणजे देवकी आणि वसुदेव महात्मे आहात.महात्मा म्हणजे जे निष्काम कर्म व निष्काम भक्ती करणारे व घर्मानुसार आचरण करून जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करून जीवन जगणारे जे असतात,त्यांना महात्मासे म्हणतात.महात्मा जो असतो,त्याचे जन्म—मरण निवारण होऊन,तो सुखरूप जीवन जगत असतो.त्याचे अनुकरण लोक करत असतात.||१८|| अर्थः---जसे आधारभूत असलेल्या भूमीचे ठिकाणी धातादिक पदार्थ उत्पन्न होतात व नाश पावतात,जसे आधारभूत आत्म्याचे ठिकाणी देह उत्पन्न होतात व नाशही पावतात आणि ते घटादीपदार्थ भिन्नवगैरे होऊन विकार पावले असतांही जशी भूमि विकार पावत नाहीं त्याप्रमाणें जन्मरणादिकेंकरून देह विकार पावले असतांही आत्मा विकार पावत नाहीं,तर एकरूपच राहतो असा विचार केलां असतां शोकादिकांना अवकाशाच राहत नाहीं ||१९|| भावार्थ:--- जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात,परंतु मातीमध्ये बदल होत नाही.त्याचप्रमाणे शरीराचे उत्पन्न होणे,नाहीसे होणे,चालूच असते,कारण शरीर हे अनात्मा आहे,असार आहे,दु:खरूप आहे,म्हणून आपणास शरीराला येऊ नये.यासाठी निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करावा.आत्मा अमर आहे.||१९|| अर्थ:---आतां अज्ञानें करून तर केव्हांही संसाराची निवृत्ति होत नाही असें सांगतो-आत्मा विकाररहित आहे असें यथार्थरीतीनें न जाणणाऱ्या प्राण्याला देहादिकांचेठिकाणी आत्मबुद्धी होते आणि असें झालें म्हणजे मी वेगळा व वेगळा इत्यादिक भेदबुद्धी उत्पन्न होते.नंतर पुत्रकलत्रादि शरीरांचेठिकाणी संयोग आणि वियोग अनुभवयास येऊलागतात.म्हणून जन्ममरणादिरूप संसार निवृत्त होत नाहीं ||२०|| भावार्थ:--- अज्ञानामुळे शरीरालाच आत्मा—मी समजतात.शरीर म्हणजे आपण नसून शरीरात राहणारे आपण आत्मा आहोत.जसे घार म्हणजे आपण नसून घरात राहणारे आपण आहोत तसे शरीर म्हणजे आपण नसून शरीरात राहणारे आपण आहोत.असा विवेक संत—महात्मा यांच्या सहवासात करून,कळून घेण्याचा प्रयत्न करावा.जोपर्यंत जीव शरीर म्हणजे मी आहे व शरीरासंबंधी—पिता—पुत्र—पुत्री,माता—पिता,पत्नी—पती,भौ—बहिण,आजोबा—आजी माझे आहेत असे समजतो तोपर्यंत त्या जीवास यमपुरीस व लक्ष्यचौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.यामुळे जन्म—मरण संसारातून सुटका होत नाही.म्हणून परमार्थ करावा.||२०|| अर्थः---अशा प्रकारानें हे तुझे पुत्र नव्हत व मी मारिले असेंही होत नाहीं.आतां अज्ञानदृष्टीने तुझ्या पुत्रांना मी मारिलें असें जरी तुझ्या मनांत आलें असेल तथापि,हे भद्रे (देवकी,)ज्याअर्थी सर्वही पाणिदर्ग,कर्मपरवश असून आपण केलेल्या कर्मांचे जन्ममरणादिरूप फळ भोगीत असतो,त्याअर्थी माझ्या व त्यापुत्रांच्या कर्माप्रमाणे घडलें असे मनांत आणून तुं त्यांचा शोक करुं नकोस ||२१|| भावार्थ:--- कंस म्हणतो कि,ताई म्हणजे देवकी,तुझ्या पुत्रांना मी मारले आहे,त्यांचे प्रारब्ध मृत्यू येनचे होते म्हणून ते मेले.त्यांना मी मारणे नसते तरी ते मरणारच होते,हे निश्चितच होते.एवढे मात्र खरे कि,मी त्यांचा माराण्याचे निमित्त झालो.म्हणून मला त्या मारण्याचे दु:ख हे फळ भोगावे लागेलच.मी त्यांना मारले नसते तर त्यांच्या प्रराब्धानुसार त्यांना मृत्यू आलाच असता.त्याला करण त्यांचे कर्माच ठरले असते.म्हणून आपण इतरांच्या दु:खाचे व मृत्यूचे निमित्त कारण होऊ नये.झ्ल्यास आपणास दु:ख येतेच.||२१|| अर्थः--- तर मग ब्राम्हणादिकांना मारणारास व मरणारासप्रायश्चित कसें सांगितलें आहे?असें म्हणशील तर तें अज्ञानमूलकच आहे.कारण जोपर्यंत हा देहाभिमानी पुरुष,मी मारला गेलों आहें व मी मारणारा आहें असें मानून देहाचेठिकाणीं असलेलें कर्तृत्व अत्म्याचेठिकाणीं मानतो तोपर्यंतच त्या मारण्याचावगैरे अभिमान धारण करणारा तो अज्ञानी पुरुष,त्या पासून झालेलें पाप व दुःख पावतो,दुसरें काहीं नाहीं ||२२|| भावार्थ:--- आपले स्वरूप न समजल्यामुळे जोपर्यंत जीव समजतो कि,”मी मरणारा आहे किंवा मारणारा आहे,असा अभिमान धरणारा जीव हा अज्ञानीन जीव पिडा भोगणारा व पिडा देणारा होतो.”म्हणून जीवांनी अभिमान धारण न करता निराभिमानी होण्याचा प्रयत्न करावा.यासाठी संत—महात्मा यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून निराभिमानी होण्याचा प्रयत्न कराव सुखी व्हावे.||२२|| अर्थः----आता देहाभिमानाने मी पाप करून तुम्हांस दुःख दिले असे मानित असाल तर हे दीनवत्सल साधुहो,तुम्ही माझ्या दृष्टपणाबद्दल माझी क्षमा करा.असे बोलून नंतर मुखावर दुःखाश्रु गळूं लागलेल्या त्या कंसाने,देवकीवसुदेवांचे चरण घट्ट धरिले||२३|| भावार्थी:--- आपण आपल्या दुष्टतेच्या दुर्गुनामुळे इतरांचे हित केले तर आपणास पश्चाताप व्हावा.पश्चाताप झाल्यानंतर आपण त्यांना क्षमा मागून पुन्हा असा किंवा कोणताही अपराध करणार नाही,असे मान्य करावयास पाहिजे.असे केले असता आपणाकडून अपराध घडत नसतो.असे झाले असता आपल्या अपराधात कमीपणा येऊन दोष नाहीसे होऊन गुण येत असतात.||२३|| अर्थः----याप्रमाणे हातांतून सुटून गेलेल्या कन्येच्या भाषणाने,वसुदेवकी निर्दोष आहेत असा निश्चय वाटलेल्या त्या कंसाने,आपले प्रेम दर्शवित त्या देवकीवसुदेवांच्या शृंखलबंधनातून मुक्त केले||२४|| भावार्थ:--- यानंतर कंस याने योमायेच्या वचणावर विश्वास ठेवला स्वत:च्या सौजन्याने देवकी व वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले.प्रतिकूल परीस्थित भगवंत,संत-महात्मा व इतरांवर विश्वास ठेवत असतो.जीवनात अनुकूल परिस्थिती असेल तर तो भगवंतांवर--संत—महात्म्यावर व इतरावर विश्वास बहुतेक ठेवत नाही.अपवादात्मक परीस्र्थितीत ठेवत असतो.म्हणून जीवनात प्रतिकूल परिस्थिती असलेली बरी असते,कारण विश्वास ठेवत असतो.वूश्वास ठेवल्यामुळे आपले हित होत असते.||२४|| अर्थः----देवकीनेही,त्या भावाला पश्चाताप झाला आहे असे जाणून,आपला क्रोध शांत केला आणि त्याला आपल्या घरी जाण्यास अनुमोदन दिले.वसुदेवानेही आपला क्रोध आणि भगवन्मायेने महात्म्य मनात आणून हास्य करून त्याला म्हणाला कि,||२५|| भावार्थ:---कंसास पश्चाताप झाला,तेव्हा कंस याने देवकिस क्षमा केली,म्हणून आपल्या दुर्गुण कर्माचा त्याग केला असता व निष्काम कर्म व निष्काम भक्ती केली असता आपला दुर्गुण निवृत्त होऊन सदगुण येत असतो.आपणास जसा कंस यास पश्चाताप झाला त्याप्रमाणे आपणाकडून दुस्कर्म घडले असता इतरांकडून आपण क्षमा मागावयास पाहिजे व इतरांवर अन्याय करू नये.||२५|| | एवमेतन्महाभाग यथा वदसि देहिनाम् | अज्ञानप्रभवाहंधी: स्वपरेति भिदाः यतः ||२६|| अर्थः----हे महाभाग्यवाना कंसा,तूं जसे म्हणतोस हे असेंच आहे.म्हणजे सर्व प्राण्यांना आत्म्याच्या अज्ञानापासून अहंबुद्धी उत्पन्न होते आणि तिच्यापासून हा आपला व हा परकी अशी भेददृष्टी उत्पन्न होते.||२६|| भावार्थ:--- अज्ञानामुळे आपण शरीर म्हणजे मी आहे असे मानतो व शरीरसंबंधितांना माझे समजतो.यामुळेच आपपरभाव निर्माण होतो.आपपरभाव हा भेद निर्माण करतो.भेदामुळेच दु:खास पात्र होतो.याकरिता अज्ञान निवृत्त करण्याकरिता संत—महात्मा यांची संगती करून,त्यांचा मुखातून शात्र श्रवण करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जन्म—मरण निवृत्त होते.||२६|| अर्थः---नंतर भेद दृष्टी धारण करणारे ते पुरुष,शोक,हर्ष,भय,व्देष,लोभ,मोह आणि मद यांनी युक्त असते देव दैत्यादिस्वरुपांनी परस्परांना मारणाऱ्या देवदैत्यादीरुपी परमेश्वराला पाहत नाहीत तर मीच मारणारा व हा मरण पावला असे मानितात||२७|| भावार्थ:--- १--भेददृष्टीमुळेच शोक म्हणजे दु:ख होते.२--भेद दृष्टीमुळेच हर्ष म्हणजे विषयानंद म्हणजे तात्पुरता आनंद प्राप्त होतो व पुन्हा दु:खच प्राप्त होते.३—भेददृष्टीमुळेच भय म्हणजे भिती निर्माण होते.भीती हि एकात नसते,तर अनेकात असते.अनेक म्हणजेच भेददृष्टी होय.४—भेददृष्टीमुळेच द्वेष म्हणजे इतरांची प्रगती न सहन होणे.इतरांची प्रगती पाहून आपणास दु:ख होते.आपणास दु:ख होण्यापेक्षा आपण त्याहीपेक्षा अधिक प्रयत्न करून इतरापेक्षा पुढे जाऊन प्रगती करता येते.त्यामुळे द्वेष भावना निर्माण न होता आपण आपली प्रगती करू शकतो.५—भेददृष्टीमुलेच लोभ म्हणजे जड वस्तू पुन्हा—पुन्हा असावी वाटते.जड वस्तू म्हणजे धन—मान पुन्हा—पुन्हा असावा वाटतो.धन—मान आपल्या मृत्युनंतर येथेच राहणार आहे.आपल्याबरोबर फक्त पाप—पुण्य व त्याचे संस्कार येणार आहेत.म्हणून आपल्याबरोबर जे पुण्य व पुण्याचे संस्कार चांगले आहेत,ते मिळवण्याचा प्रयत्न करावा.याकरता लोभ वृत्ती सोडावी,कारण तो दुर्गुण आहे.दुर्गुनात अहित आहे.६—भेददृष्टीमुळेच मोह निर्माण होतो.मोह हा देहसंबंधीचाच अधिक होतो.मोहामुळे आपण आपले कार्य न करता त्या देहसंबंधीजवळच रहावसे वाटते.यामुळे आपण आपले आपले कर्तव्य कर्म न केल्यामुळे इच्छित साध्यापर्यंत जाऊ शकत नाहीत.म्हणून मोह हा दुर्गुण असल्यामुळे त्याचा त्याग करावा. ७—भेददृष्टीमुळे मद म्हणजेच अंहकार होय.एखादे चांगले म्हणजे धर्मानुसार कृत्य केले तर त्या कृत्याचा अंहकार—अभिमान—गर्व येतो किंवा एखादे अधार्मिक कृत्य केले त्याचा अधिकच अंहकार—अभिमान—गर्व येतो.हा अंहकार—अभिमान—गर्व हाच मुख्य दु:खास व लक्षचौऱ्याऐंसी योनीस कारण आहे.थोडक्यात दोष आहे व धर्मानुसार अंहकाररहित जीवन जगणे हा गुण असून सुखास—सुखरुपतेस—जन्म—मरण निवृत्तीस कारण आहे.म्हणून अंहकाराचा त्याग करून जन्म—मरण निवृत्त करावे.म्हणून संत—महात्मा यांची संगती करून,त्यांच्यावर डोळस श्रद्धा ठेऊन,त्यांची धर्मानुसार सेवा करून,त्यांचा मुखातून शात्र श्रावण करावे.यामुळे आपला आंधळेपणा म्हणजेच अज्ञान जाऊन डोळसपणा म्हणजेच ज्ञान प्राप्त होते.भगवंतच एका वस्तूने म्हणजे ज्ञानानेच अज्ञानाचा परस्पर नाश होतो.हे अज्ञानी जीवाला कळत नाही.म्हणून कळून घेण्याचा प्रयत्न करावा व आपले परमकल्याण करून घ्यावे.||२७|| अर्थः---श्रीशुक म्हणतात – हे राजा,याप्रमाणे प्रसन्नचित्त देवकीवसुदेवांनी निष्कपटपणे भाषण व घरी जाण्याविषयी अनुज्ञा दिलेला तो कंस,आपल्या घरांत प्रविष्ट झाला.||२८|| भावार्थ:--- श्रीशुक म्हणतात,वसुदेवांनी कंस यास पश्चाताप झाल्यानंतर निष्कपट भावाने म्हणजे आपले म्हणजे वासुदेवांचे अहित—स्वत:चे आठही बालक मारुनसुद्धा धर्मानुसार व कंस याच परम हित करणारा उपदेश केला.त्याचप्रकारे आपणही मानवता हा दृष्टीकोन आपल्या समोर ठेऊन निष्कपट भावाने उपदेश करावा.त्यातच आपलेही हित आहे व इतरांचेही हित आहे.||२८|| अर्थः-----नंतर ती रात्र निघून गेली असता, दुसरे दिवशी प्रत:काळी कंसाने, सभेमध्ये प्रधानमंडळास बोलावून आणून योगनिद्रेने संगीतले होते ते सर्व त्याला सांगितले ||२९|| भावार्थ:--- कंस याने दुसऱ्या दिवसी आपल्या मंत्र्यांना बोलावले व काल योगमायेचा झालेला सर्व वृत्तांत सांगितला.वास्तविक मंत्र्यांचा सल्ला घ्यावावयास हरकत नाही.कंस यास पश्चाताप झाला होता पण मंत्री यांना पश्चाताप झाला नव्हता.त्यामुळे त्या मंत्र्यांचा सल्ला घेणे योग्य होईल का?ज्यांच्यावर—ज्या मंत्र्यांना पश्चाताप झालेला त्यांचा सल्ला घेणे योग्य होईल का?||२९|| अर्थ:---ते कंसाचे भाषण ऐकून दूरवर दृष्टी नसलेले देवांचे शत्रू ते दैत्य , देवांविषयी क्रोधाचा अविर्भाव दाखवून त्या कंसाला असे म्हणाला कि, ||३०|| भावार्थ:--- कंसाची मंत्री हे फारशे शहाणे—सत्वगुणी नव्हते.ते तमास व राजस स्वभावाचे होते.त्यामुळे ते सत्विकविषयी सल्ला देण्यास मुळीच योग्य नव्हते.ते मंत्री स्वभात: सत्वगुणांच्या म्हणजे देवकार्य करण्याच्या प्रतीकुल होते,म्हणून त्यांचा सल्ला घेणे हीच कंस याची मोठी चूक झाली.कंसाचे बोलणे ऐकल्यानंतर ते देवशत्रु कंसास म्हणाले.आपणास मात्र सात्विक विषयांविषयी सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यावावयाचे असेल आपण तमास व राजस लोकांचा सल्ला किंवा मार्गदर्शन न घेत सात्विक जे संत—महात्मा यांचे मार्गदर्शन किंवा सल्ला घ्यावा.कंसासारखी चूक करू नये.कंसासारखी चूक केल्यास चुकीचा सल्ला मिळू शकतो.||३०|| अर्थः---हे भोजेंद्रा असे जर आहे तर आजच नगरे, गाव व गोकुळ इत्यादिकांचेठिकाणी दहा दिवसांच्या आतल्या व दहा दिवस होऊन गेलेल्या सर्व बालकांना आम्ही मारून टाकितो, आम्हाला आज्ञामात्र दे म्हणजे झाले.||३१|| भावार्थ:--- भोजराज—कंसास म्हणतात,आजच आपण शहरे,गांवे,गवळ्यांच्या वस्त्या इत्यादी ठिकाणी जेवढे लहान मुले असतील,ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरील असोत,सर्वांना आजच मारून टाकुत.त्यांनी हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे का ? का अन्याय करणारा आहे ?विनाकारक अनेक बालजीवांना मारणे योग्य आहे का ?त्यांचा जीवनाचा विचार जो सत्ताधीश कंस आहे,त्याने विचार करावा किंवा नाही? असा विचार का केला नाही,कारण सल्ला घेणारा व सल्ला देणारे तमोगुणी व रजोगुणी असल्यामुळे दोघांनीही विचार केला नाही.विचार करण्यासाठी सत्वागुणीच पहाजेत.त्यांच्यात सत्वगुणी कोणीच नव्हते.||३१|| अर्थ:---- हे कंसा, तुझ्या नुष्याच्या दोरीच्या टणातत्कारशब्दानेच निरंतर भयाभीत होणारे व युद्धाच्या कामात भिणारे देव, उध्योग करून काय करणार आहेत ? त्यांच्या हातून काहीच होणार नाही.||३२|| अर्थ:----पूर्वी झालेल्या युद्धांमध्ये तू बाण सोडू लागलास तेव्हा तुझ्या बाणांनि चोहेकडून ताडित झालेले व वाचण्याची इच्छा धारण करणारे ते देव, पलायन करणे हेच वाचण्याचे साधन आहे. असे मानून पळून गेले.||३३|| अर्थः----कितीएक देव,हातांतील शस्त्रे टाकून देऊन दीनपणे तुझ्यापुढे हात जोडून उभे राहिले;कितीएकांचे पळता पळता कांसोटे सुटले व शेड्य सुटल्या व ते आम्ही भयभीत झालो आहो,असे म्हणू लागले||३४|| अर्थः----तुझीतर अशी चाल आहे की – शस्त्रास्त्रे विसरलेल्या,विरथी असलेल्या,भयाने व्याप्त झालेल्या,दुसऱ्याबरोबर युध्द करीत असलेल्या विमुख झालेल्या,धनुष्य मोडलेल्या व युद्ध न करणाऱ्या शत्रूंना तू प्रहार करीत नाहींस ||३५|| अर्थः---तेव्हा निर्भय स्थानाचेठिकाणी शूर असणाऱ्या व युद्धावाचून दुसरेठिकाणी आपली केवळ प्रौढी मिरविणाऱ्या अशा देवांनी आता उद्योग करून काय करावयाचे आहे?काहींच नाही.आता हरीपासून व शंकरापासून मी भितो असे म्हणशील तर सर्व प्राण्याच्या अंतर्यामी प्रविष्ट होऊन बाहेर कोठेच न दिसणाऱ्या हरीने,किंवा जेथे पुरुष मुळीच जात नाहीत अशा इलावृतनामक अरण्यामध्यें राहणाऱ्या शंकराने काय करावयाचें आहे?तसेंच अल्पपराक्रमी इंद्रानें अथवा तपश्चर्या करणाऱ्या ब्रम्हदेवानेंतरी काय करावयाचें आहे?कांहीच नाही||३६||भावार्थ:--- कंस व त्याच्या मंत्रीगणांना देवांचे सामर्थे माहित नव्हते.वास्तविक पाहता आपणास शत्रूपक्षाचे सामर्थे माहित नसेल तर आपला पराजय होत असतो.म्हणून शत्रूपक्षाचे सामर्थे जाणून अगोदरच प्रयत्न करावा,कारण त्यानुसार सामग्री करावी लागते.||३६|| अर्थः---तथापि देवांचे व आमचें शत्रुत्व असल्यामुळें आम्ही त्यांची उपेक्षा करितां कामा नयें,तर नितीलाच अनुसरले पाहिजे,असें आम्ही मनितों .म्हणून तुला अनुसारणाऱ्या आम्हांस त्यांचे मूळ उपटून टाकण्याविषयी आज्ञा कर म्हणजे झाले ||३७|| भावार्थ:--- त्यातील एक मंत्री मात्र म्हणतो कि,आपण देवांची उपेक्षा करता कामा नये.त्यांच्या सामर्थेची जाणीव करून घ्यावावयास पाहिजे.याकरिता आपण त्यांचे मूळ उघडून टाकण्याचे नियोजन करूत.त्यायोग्य पुन्हा आपल्याशी युद्ध करणार नाहीत.||३७|| अर्थः--- जशी शरीरामध्यें उत्पन्न झालेल्या ज्वरादिक रोगाची स्त्रानपानादिकुपथ्य करणाऱ्या मनुष्यांनी उपेक्षा केली असतां,आकडा तो रोग आंगांत भिनून गेला म्हणजे मग औषधादिप्रयोगानें निवृत्त करणऱ्यास शक्य होत नाहीं,||३८|| भावार्थ:---जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्या रोगाची उपेक्षा केली तर रोगाची तीव्रता वाढते,त्यामुळे तो रोग असाध्य—त्याचे निर्मुलन होत नाही.त्यामुळे मृत्यू येण्याची शक्यता असते.म्हणून रोग होऊ देऊ नये.रोग झाला तर प्राथमिक अवस्थेत उपचार करावा.त्यामुळे रोग नाहीसा होतो.त्याचप्रमाणे आपण शत्रूची उपेक्षा केली तर तो शत्रू कालांतराने आपले सामर्थे वाढवू शकतो.म्हणून वेळेवरच त्याचा बंदोबस्त करावा.जीवांना बहिर्गत व अंतर्गत असे दोन शत्रू असतात.अंतर्गत शत्रू म्हणजे काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर यांचे नियंत्रण करावे.यांचे नियंत्रण करण्यासाठी संत—महात्मा यांची संगती करून त्यांचा मुखातून शात्र श्रवण केले असता दोषातील अनर्थ कळत असतो.अनर्थ कळल्यावर त्यांना आपण शम—दम याद्वारे मन व इंद्रिये ताब्यात घेन्याचा प्रयत्न केला असता ते शत्रू आपले अहित न करता हित करत असतात.याकरिता त्यांना नियंत्रात ठेवावे.||३८|| | मूलं हि विष्णुर्देवानां यत्र धर्मः सनातनः | तस्य च ब्रम्ह गोविप्रास्तपो यज्ञाः सदक्षिणाः ||३९|| अर्थ:---देवांचा किंवा जशी इंद्रियें पहिल्यापासून आवरून न धरितां त्यांना हवेतसें वागूं दिले म्हणजे मग ती अनावर होतात त्याप्रमाणें शत्रूही सैन्य जमवून मोठा प्रबळ झाला म्हणजे मग त्याला जिंकून घालवून देतां येत नाही ||३९|| भावार्थ:--- देवांचा आधार विष्णू आहे आणि जेथे सनातनधर्म आहे,तेथे विष्णू राहतो,म्हणून आपण सनातन धर्मास प्रतिबंध करूत.सनातन धर्मास प्रतिबंध केल्यामुळे त्याला व त्याच्या भक्ताला अडचणी आल्यामुळे सत्कर्म बंद पडतील.वेद,गाय,ब्राह्मण, तपश्चर्या,आणि ज्यामध्ये दक्षिणा दिल्या जाते ते यज्ञ बंद पडतील.ब्राह्मणांचा उदारनिर्वाह बंद पडेल.||३९|| गाय,ब्राह्मण,तपश्चर्या,आणियज्ञ या सनातन धर्माची मुळास प्रतिबंध येईल.म्हणून हे कार्य आताच करून प्रतिबंध करुत. अर्थः--- यास्तव हे राजा,आम्ही सर्व प्रयत्नांनी,वेदवेत्ते तपस्वी व यज्ञशील असे ब्राम्हण व दूध,दही,तूपवगैरे उत्पन्न करणाऱ्या गाई यांना मारून टाकितों ||४०|| भावार्थ:--- ब्राह्मण,तपस्वी,याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हविर्द्रव्य देणाऱ्या गाईचा आम्ही संपूर्ण नी:पात म्हणजे त्यांना मारुत.त्यांना मारून टाकल्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या वस्तू मिळणार नाही.त्या वस्तू न मिळाल्यामुळे यज्ञ बंद पडेल.||४०|| | विप्रा गावश्च तपः सत्यं दमः शमः | श्रद्धा द्या तितिक्षा च क्रतवश्च हरेस्तनू: ||४१|| अर्थः—ब्राम्हण,गाई,वेद,तप,सत्य,इंद्रियनिग्रह,शांति,श्रद्धा,दया,सहनशीलता आणि यज्ञ ह्या विष्णूच्या मूर्ती आहेत ||४१|| भावार्थ:--- ब्राह्मण,गाई,वेद,तपश्चर्या,सत्य,इंद्रीयदमन,मनोनिग्रह,श्रद्धा,दया,सहनशीलता आणि ज्ञान हि विष्णूची शरीरे आहेत.जसे शरीरात जीव राहतो,तसे ब्राह्मण,म्हणजे सात्विक गुणांचे अधिक्य असलेला १---ब्राह्मण,म्हणजे सात्विक गुणांचे अधिक्य असलेला, षटकर्म—१--सदगुरूंकडून ब्रह्मविद्ध्या प्राप्त करून घेणारा,२—सदगुरूंकडून ब्रह्मविद्या प्राप्त करून घेतलेली दान करणारा,३—सत्कर्म करणारा,४—सत्कर्म करून घेणारा,५—सत्कार्यास दान देणारा,६—सत्कार्यास दान घेणारा,असा जो षटकर्म करतो त्यास ब्राह्मण असे म्हणतात.२---गायी म्हणजे सात्विक प्राणी असलेला.जिचे सर्व पदार्थ कांहीनाकांही सात्विक कार्या करण्यासाठी उपयोगी येणारे असतात,त्यांना गायी असे म्हणतात.३---तपश्चर्या,म्हणजे सात्विकता आपल्यात येण्याकरिता शरीराला दिले जाणारे कष्ट,त्यास तप असे म्हणतात.तप हे निष्काम केले तर अंत:करण शुद्ध होते व सकाम तप केले तर संसारातील जी कामना आहे,ती पूर्ण होते.श्यकतो तप हे निष्काम म्हणजे अंत:करण शुद्धीसाठी केलेले चांगले असते.शात्रांचा तोच उद्ध्येश असतो.४--सत्य,म्हणजे धर्मशात्राप्रमाणे आचरण करणे व अधर्माशात्रानुसार आचरण न करणे,कितीही व्यावहारिक अहित झाले तरी धर्मशात्रानुसार आचरण करने.मनात जो भाव आहे,त्याचा वाचेत उच्चार करणे,ज्या शब्दांचा उच्चार केला,त्यानुसार आचरण करणे,त्यास सत्य असे म्हणतात.५--इंद्रीयदमन,म्हणजे इंद्रिये जीवाच्या ताब्यात असणे त्यास इंद्रिये दमन असे म्हणतात.जीवानी मनानुसार व इंदियांनुसार वागणे इंद्रियेदमन न म्हणता स्वैराचार असे म्हणतात.स्वैराचाराने अधोगती होऊन दु:खास प्राप्त व्हावे लागते.म्हणून जीवाच्या हितासाठी स्वीचर नसावा,तर इंद्रिये दमन असावे.त्यामुळे जीवास सुख प्राप्त होते.६--मनोनिग्रह,म्हणजे मन मनाप्रमाणे न वागता जीवानुसार वागणे त्यास मनोनिग्रह असे म्हणतात.मनोनिग्रहाने इंद्रिये जीवाच्या ताब्यात येतात.त्यामुळे जीवास सुख प्राप्त होते.७--श्रद्धा,म्हणजे साधू—महात्मा,आई—वडील,आपल्यापेक्षा ज्ञानवृद्ध मंडळी यांच्यावर अत्यंत विश्वास,म्हणजे यांनी जे सागितले ते खरे व हिताचे वातणे,त्यास श्रद्धा असे म्हणतात.व्यावाहारिक कार्यासाठी व पारमार्थिक कार्यासाठी विश्वास असणे जरुरी असते, कारण साधन म्हणजे ज्या साधनाद्वारे साधना करावयाची असते त्यास साधन असे म्हणतात,ते वर्तमान काळात असते व साध्य म्हणजे इच्छित असलेले ध्येय—हित—फायदा हे भविष्यकाळात असते.म्हणून तोपर्यंत साधनावर विश्वास ठेऊन ते साधन वर्तमान काळात करावे लागते.साध्य—हित—फायदा होईपर्यंत वाट पहावी लागते.तसी वाट पाहणे गरजचे असते.८--दया,म्हणजे इतरांचे दु:ख-- गरज पाहून त्याचे ते दु:ख—गरज नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे,त्यास दयाभाव असे म्हणतात.दयाभावाने आपले अंत:करण शुद्ध होते किंवा पुण्य होते,म्हणजेच परोपकार किंवा उपकार होत असतो.९--सहनशीलता म्हणजे आपल्यावर झालेला अन्याय किंवा अहित किंवा दु;ख,हे अन्याय किंवा अहित न वाटता किंवा दु:ख न वाटता ते सहज—विनादु:ख सहन करणे,त्यास सहनशीलता असे म्हणतात.१०--यज्ञ म्हणजे सत्कर्म करणे,त्यास यज्ञ असे म्हणतात.दान,पूजा,संगतिकरण म्हणजे संत—महात्मा,देव,शात्र व सत्संग करणे.अशा ठिकाणी भगवंत--विष्णू राहत असतो.हे त्याची राहण्याची ठिकाणी आहेत.म्हणून या दहागुणानुसार वागण्याचा प्रयत्न करावा.यामुळे आपले परम हित होऊन परम कल्याण होत असते.असे ज्ञान होण्यासाठी संत—महात्मा यांचे श्रवण करावे.||४१|| अर्थः---आणि तोच सर्व देवांचा अधिपती सर्वांचा अंतर्यामी आणि असुरांचा घात करणारा आहे.शंकर व ब्राम्देव यांसह सेव देवांना त्याचाच आधार आहे,तेव्हां त्याच्या वधाचा उपाय म्हटला म्हणजे ऋषींचा वध करणें हाच होय.||४२||भावार्थ:--- तो विष्णूच सर्व देवांचा देव आहे.विष्णूंच्या म्हणण्यानुसार इतर देव कार्य करतात.स्वत:च्या मतानुसार कांहीच कार्य करत नाहीत.ते कार्य करण्यास परतंत्र आहेत,म्हणजेच स्वतंत्र नाहीत,कारण त्यांना सत्ता नाही.विष्णूच्या सत्तेवर सर्व देव कार्य करतात.म्हणून आपण विष्णूलाच मारून टाकुत.त्याला मारले कि बाकिंच्यांना कांहीच सत्ता नसल्यामुळे ते कांहीच कार्य करू शकत नाहीत.त्यातल्या—त्यात सर्व ऋषींना व ब्राह्मणांना मारून टाकले कि सर्व सत्कार्य बंद पडते.||४२|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:—हे राजा,याप्रमाणें मृत्यूचा पाशांनी वेष्टित झालेल्या दृष्टबुद्धि त्या असुर कंसाने ,दुष्ट प्रधानमंडलळाबरोबर विचारव करून ब्राम्हणांची हिंसा करणें हेंच चांगले हितकारक आहे असें मानिले ||४३||भावार्थ:--- अशा रीतीने दुष्ट—तमोगुणी व रजोगुणी मंत्र्यांनी सल्ला—मसलत करून कंस याने ब्राह्मणांना व ऋषींना मारणे योग्य ठरवले व त्यानुसार तसा ठराव केला.वास्तविक पाहता कंस यास पश्चाताप झाला होता.त्यामुळे त्याने देवकी व वासुदेव यांना कैदेतून सोडून दिले होते.दुष्ट मंत्र्यांचा सल्ला—मार्गदर्शन घेतल्यामुळे पुन्हा त्याच्या पश्चातापावर आवरण—झाकण पडले व पूर्वीसारखा तमोगुणी व रजोगुणी बनवून तमास कार्य करण्यास परावृत्त झाला.म्हणून आपण फक्त सात्विक गुणी जे आहेत, त्यांचेच मार्गदर्शन घ्यावावयास पाहिजे,तर तमोगुणीचे व रजोगुणींचे सल्ला किंवा मार्गदर्शन न घ्यावावयास पाहिजे.असे केले असता आपले हित होत असते.म्हणून आपण नेहमीसाठी सात्विक वातावरणात राहणे हिताचे असते,असे लक्षात असावे.||४३|| अर्थः---नंतर दुसऱ्यांना दुःख देणें हेंच ज्यांना प्रिय आहे अशा यथेच्छरूप धारण करणाऱ्या त्या राक्षसांना,साधुजनांना दुःख देण्यांविषयी दशदिशांकडे जाण्याची आज्ञा करून,त्या ख़ँश्रँआ आपल्या गृहामध्यें प्रवेश केला.||४४||आदींच ज्यांचे स्वभाव राजोगुणमय आहेत आणि त्यांत तमोगुणाने (क्रोधाच्या आवेशानें)ज्यांच्या बुद्धीला भ्रंश झाला आहे व ज्यांचा मृत्यू जवळ आला आहे असे ते राक्षस,कंसाच्या आज्ञेने साधुजणांचा द्वेष करुं लागले ||४५|| भावार्थ:---असुरांचा स्वभाव रजोगुणी व तमोगुणी असल्यामुळे त्यांचे चित्त विवेक करू शकत नव्हते.विवेक होण्यासाठी चित्त सत्वगुणी असावयास पाहिजे,म्हणून आपले चित्त सत्वगुणी होण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम उपासना केली असता व सात्विक संस्कार करून घेतले असता चित्त सत्वगुणी होते व चित्त सत्वगुणी झाले संतांचा व ईश्वराचा आदर केल्या जातो.||४५|| | आयुः श्रियं यशो धर्मं लोकानाशिष एव च | हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः ||४६|| अर्थः---हे राजा,साधूंचा छळ केला असतां केवळ म्र्य्तुच प्राप्त होतो असें नाही,तर त्यापासून-पुरुषाचें आयुष्य,संपत्ति,यश,धर्म,उत्तमलोकप्राप्ति,लोकांनी दिलेले पुत्रवान् हो,आयुष्यवान् हो इत्यादिक आशीर्वाद व सर्व कल्याणें यांचा नाश होतो ||४६|| भावार्थ:--- जे लोक संतांचा अनादर करतात,त्यांचा त्या कुकर्मामुळे त्यांचे१--मनुष्यदेहातील आयुष्य कमी होते व रोगग्रस्त शरीर होऊन दु:खास प्राप्त होतात.२—लक्ष्मी नष्ट होते म्हणजे दरिद्रता—गरिबी प्राप्त होते.३—कीर्ती नष्ट म्हणजे त्यांच्याविषयी अनादर निर्माण होते,त्यांचा अपमान होतो.४—धर्मानुसार वर्तन न करता अधर्मानुसार वर्तन करून कामदि दोष उत्पन्न होतात.५—इहलोक व परलोकात सुख न मिळता दु:ख प्राप्त होते.६—अशा—आकांक्षा पूर्ण न होता अपूर्ण राहतात,त्यामुळे सुख न मिळता दु:ख प्राप्त होते.७—त्यामुळे कल्याण न होता अकल्याण होऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपण ईश्वर,संत—महात्मा,आई—वडील,श्रेष्ठांचा व कोणाचाही अनादर करू नये.आपण अनादर केला तर म्हणजे कुकर्म केले तर आताही दु:ख मुत्युनंतरहि दु:ख होते.||४६|| (याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्ये कंसोद्योगनिरुपणनामक हा चवथा अध्याय समाप्त झाला ) ||४ || श्रीकृष्णार्पणमस्तु || ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ५--- देवकी २---२-- भगवान श्रीकृष्ण---[४]गोळूतात भगवंतांचा जन्म—महोत्सव. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आता ह्या पाचव्या अध्यायामध्ये, मोठ्या उत्साहाने आपल्या पुत्राचा जातकर्मनामक संस्कार करून नंद, कारभार देण्याकरिता मथुरेमध्ये गेला असत, वासुदेवाच्या भेटीने त्याला मोठा आनंद झाला, अशी कथा वर्णन केली आहे||१|| अर्थः---श्रीशुक्रचार्य म्हणाला – हे राजा, इकडे गोकुळामध्ये उदारचीत अशा नंदाने, पुत्र उत्पन्न झाला असता आनंदयुक्त होऊन ज्योतिशी ब्राह्मणांना बोलावून स्वत:स्नान करून शुचिर्भूत होऊन अलंकार धारण केले आणि त्या ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्मनामक संस्कार यथाशास्त्र करविला. तसेच पितारांचे व देवांचे नांदीश्राद्धादिकेकारून पूजाकरविले||१||२|| भावार्थ:--- नंदामहाराजांना मुलगा झाला हे कळताच आनंद झाला.स्नान करून,पवित्र होऊन वस्त्रालंकार परिधान करून वेदवेत्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याहवाचन म्हणजे ग्रंतांचे पारायण करून घेतले.आपणसुद्धा आपल्या घरी अपत्य-बाळ जन्मास आल्यानंतर ब्राह्मण—संत—महात्मा यांच्याकडून ज्ञानेश्वरी,तुकाराम महाराज अभंगगाथा इत्यादी धार्मिक ग्रंथाचे पारायण करावयास पाहिजे.त्यानंतर जात—कर्म संस्कार म्हणजे ब्राह्मण यांना पाचारून त्यांच्याकडून रास नांव व गणनांव व ऋषीनांव विचारून व्यावहारिक नांव ठेवले पाहिजे.त्यानंतर ब्राह्मणाना दक्षिणा देउन त्यांचा मान--स्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.त्यानंतर आपण त्या ब्राह्मणाकडून कुलदेवाताची पूजा करावयास पाहिजे.त्यानंतर पितरांची पूजा करावयास पाहिजे.हा आपला स्वधर्म आहे.||१—२|| भावार्थ:--- आप बाळ जन्मास आले त्या दिवसी ब्राह्मांना,संत—महात्मा व गरजवंतांना दानधर्म करावयास पाहिजे.||३|| अर्थ:---नंतर त्याने अलंकारांनी भूषित केलेल्या दोन लक्ष गाई ब्राह्मणास दिल्या. तसेच रत्नसमुहांनी व सोन्यांचा मुलामा दिलेले उंची वस्त्रांनी आच्छादन केलेले सात तिळांचे पर्वत दिले ||३|| | कालेन स्नानशौचाभ्यां संस्कारैस्तपसेज्यया | शुध्यन्ति दानैः सन्तुष्ट्या द्रव्याण्यात्माssत्मविद्दया ||४|| अर्थः---आता, गाई, सुवर्ण इत्यादिक द्रव्यांमध्ये जशी कितीऐकांची दानेकरुनच शुद्धी होते तशीच अन्नदानायुक्त जातकर्मादी संस्कारांनीच गर्भाची शुद्धी होते असे दर्शविण्याकरीता दृष्टांत रूपाने निरंतर शोधक असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करितो- काळाने अपवित्र झालेल्या भूमिवगैरे पदार्थांची शुद्धी होते, स्नाने देहाची, क्षालनाने अपित्र पदार्थ लागलेल्या वस्त्रपत्रादिकांची, तापाने इंद्रीयादिकांची, यज्ञांनी ब्राह्मणादिकांची, दानांनी धान्यादिद्रव्यांची, संतोषाने मनाची व ब्रह्मविध्येने जीवातम्याची शुद्धी होते.||४|| भावार्थ:---१--कालगतीने म्हणजे पाऊस पडल्यानंतर कांही काळाने अशुद्ध असलेले पाणी शुद्ध होते.अशुद्ध असलेली भूमी कांही काळाणे कष्ट घेतलेली शुद्ध होते,इत्यादी वस्तू कष्ट घेतल्याने शुद्ध होते.२—स्नाने अशुद्ध शरीर,इत्यादी अशुद्ध झालेले शुद्ध होते. म्हणून स्नान सुर्यादापुर्वी करून नित्यनैम्यात्मिक कर्मे करून संसारिक कार्य करावे.३—धुण्याने वस्त्रे इत्यादी शुद्ध होते,म्हणून पाण्याने वस्त्र इत्यादी धुण्याचा प्रयत्न करावा.४—संस्कारांनी गर्भ,इत्यादी सात्विक कर्मे करून शुद्ध होते,म्हणून गर्भ धारण करत असतांना आईने सात्विक विचाराचे—संत—महात्मा,भगवंतांचे चरित्राचे स्मरण करावे.भगवंतांचे नामस्मरण करावे.गर्भ धारणा केल्यानंतर सत्संग करावा,संत—महात्मा यांच्या मुखातून धर्म शात्राचे,सात्विक चरित्रे श्रवण करावे.त्यामुळे गर्भावर सात्विक संस्कार होतात.त्या सात्विक संस्कारामुळे त्याच्या आचरणात परीवर्तन होते.म्हणून गर्भाधान संस्कार जरुरी असतो.५—तपश्चार्याने अशुद्ध असलेले अंत:करण,ज्ञानेइंद्रिये व कर्मेइंद्रिये शुद्ध होतात.म्हणून तपचर्या,निष्काम कर्मे,निष्काम भक्ती करणे जरुरी असते.६—यज्ञाने ब्राह्मण,इत्यादी नित्य निष्काम कर्म करून शुद्ध होतात.म्हणून ब्राह्मण व इतरांनी निष्काम कर्म करावे.७—दानाने--- आर्थः---असो. त्यावेळी ब्राह्मण कल्याणकारक आशीर्वाद देऊ लागले; सुत, मागध व बंदि हे, स्तुतीपठादि करू लागले; गव्यांनी गायन केल; चौघडे, ना गरे वगैरे वाद्येवाजू लागली.||५|| अर्थः---त्यावेळी केर काढून स्वच्छ केलेलं ते गोकुळ, चंदनादिकांचे साडे घातलेल्या द्वारांनी, अग्नायांनी, व गाजघरांनी युक्त होते आणि अभारलेल्या चित्रविचित्र ध्वजांनि, जयपात्कांनी, माळां, वस्त्रांच्या झालरी व पल्ल्वांची तोरणे यांनी भूशीत झाले होते.||६|| अर्थ:----हळद व तेल अंगाला लावून माखलेल्या गाई, वृषभ आणि लाहना लहान खोड हे, काव्वागैरे चित्रविचित्र धातू, मोरांची पंखे, पुष्पांचे हार, वस्त्रांच्या झुली सुवर्णपुष्पांच्या माळां आणि भूषित झाले||७|| अर्थ:----त्यावेळी गोप, महम,ओळ वस्त्रे, भूषणे अंगरखे आणि पागोटी गळून, हातामध्यें नानाप्रकारचे वस्त्रभूषनादिक नजराणे घेऊन नंदाच्या घरी येऊ लागले.||८|| अर्थः---गोपिनी तर याशोदेला पुत्र झाला हे वर्तमान ऐकून आनंदित होऊन आपल्या देहांना वस्त्रे, भूषणे, काजळ इत्यादिकेकडून भूषित करू लागल्या ||९|| अर्थः---नूतन केशर काह्ळून ते लाविल्यामुळे ज्याच्या मुखकमळना शोभाआली व ज्यांचे काटीपश्र्चाद्भाग मोठे आहेत आशा त्या गोपी, औटी भरण्याची सामने हाहात घेऊन नंदाच्या घरी त्वरेने निघाल्या. तेव्हा चालताना त्यांचे स्तन हलत होते||१०|| अर्थः---तेव्हा नंदाच्या घरी जाणाऱ्या त्या गोपी, मार्गामध्ये फारच शोभू लागल्या. त्यांचा कानांत कुंचलुन निर्मळ केलीली रत्नखचित कुंडले होती त्यांच्या कंठामध्ये पदकनावांची भूषणे होती, त्यांनी चीत्रविचित्ररंगांची वस्त्रे परिधान केली होती व हातात जादावाची कांकणे घातली होती. त्यांच्या वेण्यातून गाळलेल्या फुलांचे वर्षाव वाटेत होत होते व हलत असणारी कुंडले स्तन व हर यांच्या योगाने त्यांना फारच शोभा आली होती. ||११||
| ता आशिषः प्रयुन्जानाश्चिरं पाहीति बालके | हरिद्राचुर्णतैलाद्भिः सिन्चन्त्योsजनमुज्जगुः ||१२|| अर्थः---त्या गोपी, नंदाचे घरी जाऊन बालकाला (श्रीकृष्णाला ) तू गोकुळचा राजा होऊन प्रजांचे चिरकाल रक्षण कर, असे आशीर्वाद देऊन हळदीचे चूर्ण तेल व पाणी परस्परांच्या अंगावर उडवून उच्चस्वराने गाणी गाऊ लागल्या. ||१२|| अर्थः---असो; जगाचा अधिपती अनंत श्रीकृष्ण, नंदाच्या गोकुळात आला असता जो मोठा उत्साह झाला त्यावेळी नानाप्रकारची वाद्ये आवजू लागली ||१३|| अर्थः---परमहर्ष पावलेले गोपही परस्परांवर दही, दुध, तूप, व पाणी यांचे सेवन करीत एकमेकांच्या मुखांना लोणी सरवीत नृत्य करताना दही, दुध, तूप, पाणी लोणी यांच्या कर्दमात एकमेकांना ढकलून पाडू लागले. ||१४|| अर्थः---त्यावेळी उदारमनाच्या नंदाने, त्या गोपाना सुतमागध बांधांना व जे दुसरे गीतनृत्यादिक विध्यांवर उपजीविका चालविणारे व अनाथ होते त्यांना वस्त्रे, अलंकार गोधने व जे पदार्थ ज्यांना पाहिजे होते त्यांना, विष्णूचा संतोष व आपल्या पुत्राचा उत्कर्ष होण्याकरिता, उदार मानाने देऊन, योग्यतेनुसार सर्वच सत्कार केला||१५-१६|| अर्थः---तेव्हा महाभाग्यवती रोहीनिनीहि नंद्गोपा(तू येथे आलीस म्हणून तुझ्या पायगुणानेच मला पुत्र पुत्र झाला, तू मोठी भाग्यवती आहेस इत्यादी पदार्थांनी आपला आनंद प्रदर्शित करून संतोषविली असता, ती उत्तम वस्त्रे माळा व कंठातील अलंकार यांनी भूषित होऊन, घराच्या मालकीनिसारखी त्या श्रीकृष्णजन्मोत्साहामध्ये आलेल्या अन्यस्त्रीयांचा सत्कार करीत संचार करू लागली. ||१७|| अर्थः---हे राजा, त्या श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते नंदाचे गोकुळ, सर्व समृद्धीनी युक्त व श्रीहरीच्या राहण्याने सर्वप्रीयात्वादिक आपल्या गुणांनी युक्त होऊन लक्ष्मीचेही क्रीडा स्थान झाले. ||१८|| अर्थः---हे राजा, याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्महोत्साह करून एकेवेळी नंदराजा, गोकुळाच्या राक्षनाविसःयी गोपांना सांगून, कंसाचा वार्षिक कर देण्याकरिता मथुरेस निघून गेला. ||१९|| अर्थः---नंतर वसुदेवाने आपल्या भावासारखा अत्यंत मित्र जो नंद तो आला आहे असे ऐकून व त्याने कंसराजाला कर दिला असे जाणून, त्याच्या गाड्यांचा तळ दिलेल्या (वस्तीस उत्तरण्याच्या ) जागी त्याला भेटण्याकरिता गेला. ||२०|| अर्थः---त्या आलेल्या अतिप्रिय वासुदेवाला पाहून, देहामध्ये प्राण आला म्हणजे जसा तो देह धडपडून उठतो त्याप्रमाणे नंद एकाएकी उठून संतुष्टचित्त व प्रेमाने व्याकूळ झाला. आणि त्याने त्या वासुदेवाला बाहूंनी दृढ आलिंगन दिले ||२१|| | दिष्ट्या संसारचक्रेsस्मिन् वर्तमानः पुनर्भवः | उपलब्धो भवानद्द दुर्लभं प्रियदर्शनम् ||२४|| अर्थ:---हे राजा, नंतर नंदाने पाध्य आसन इत्यादिकेंकरून पूजा केलेला, कुशलप्रश्न करून आदर केलेला व आसनावर सुखाने बसलेला तो वासुदेव, आपल्या रामकृष पुत्राचे ठिकाणी आसक्त चित्त होऊन, नंदाला असे म्हणाला कि, ||२२|| अर्थ:---वासुदेव म्हणाला – देदादा (नंदा) वयोवृद्ध, पुत्ररहित व पुत्र होण्याची आशाही निवृत्त झालेल्या तुला, हल्लीच पुत्र झाला म्हणून ऐकिले ती फार चांगली गोष्ट झाली||२३|| अर्थः---हे नंदा, जसे भोवऱ्या मध्ये सापडलेल्या मुंग्यांचेवगैरे वाचणेच दुर्लभ आहे, मग त्यांना एकमेकींचे दर्शन होणे किंवा गाठ पडणे हे अशक्यच असून ते जर झाले तर ते जसे पुर्नजन्म झाल्यासारखे होते त्याप्रमाणे या संसारचक्रामध्ये पडलेला तू. पुन: जन्मास आपल्यासारखा आज मला भेटलास हि फार चांगली गोष्ट झाली. कारण, प्रियमित्रांचे परस्पर दर्शन होणे हे दुर्मिळ आहे. ||२४|| अर्थ:---ते असे कि, जशी उदकप्रवाहाच्या ओघाने वाहून जाणार्या तृणकाष्ठ्दिकांची स्थिती एकेठिकाणी घडत नाही त्याप्रमाणे चित्रविचित्र कर्मे असणाऱ्या शुज्ज्नांचा प्रियकारक समागम ऐके ठीकानि घादट नाही. ||२५|| अर्थ:---असो. ज्यामध्ये इष्टमित्रांसहवर्तमान तू हल्ली राहिला आहेस ते ब्रह्द्वन (मोठे अरण्य) हल्ली गाईवगैरे पशूंना हितकारक आहेना ? तसेच रोगरहित आणि पुष्कळ पाणी, गवत व वेळी वगैरींनी युक्त आहेना?||२६|| भावार्थ:---आपल्या स्वजनांना सुख देणे हा आपला स्वधर्म आहे.म्हणून आपल्या स्वजनांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.स्वजन म्हणजे आपल्या स्वभावानुसार स्वभाव असलेले जे असतात त्यांना स्वजन असे म्हणतात.||२७|| अर्थः---- हे दादा, माझा मुलगा (बलराम ) आपल्या आईसह तुझ्या गोकुळात असतो तो तुळस आपला बाप असे मानित असून मानित असून त्यांचे तुम्ही उभयता करीत असता तो खुशाल आहेना?||२७|| | पुंसस्त्रिवर्गो विहितः सुहृदो ह्यनुभावितः | न तेषु क्लिश्यमानेषु त्रिवर्गोsर्थाय कल्पते ||२८|| अर्थः---आता पुत्राच्या आदर्षणाचा क्लेश सांगतो- या पुरुषाला धर्मार्थकामरुपी जो त्रिवर्ग शास्त्राने सांगितलेला आहे तो, त्याच्या इष्टमित्रांना सुख मिळण्याकरिताच प्रवृत्त झालेला आहे. तो त्रिवर्ग, ते इष्टमित्रादिक क्लेश पावत असता सुखप्राप्तीला कारण होत नाही ||२८|| अर्थः---असे वासुदेवाचे भाषण ऐकून नंद वासुदेवाचे सांत्वन करीत म्हणाली कि,- हे वासुदेवा, तुझे देवकीचे ठिकाणी झालेले पुष्कळ पुत्र कंसाने मारिले , हि गोष्ट मोठी झाली छाकटी एक कन्या निघाली होती तीही स्वर्गाला निघून गेली. ||२९|| | नूनं ह्यदृष्टनिष्ठोsयमदृष्टपरमो जनः | अदृष्टमात्मनस्तत्त्वं यो वेद न स मुह्यति ||३०|| अर्थः---खरोखर या प्राण्याची सर्व स्थिती, दैवावरच अवलंबून आहे, म्हणजे जेव्हा यांचे, पुत्रादिसुख देणारे दैव, क्षीण होते तेव्हाच ते पुत्रादिक नाश पावतात आणि ते दैवच याला सुख देणारे झाले म्हणजे जरी ह्याला पुत्रादिकांचा वियोग झाला असला तरी ते दैवच पुन्हा त्यांचा संयोग करून देते. याप्रमाणे आपणाला सुखदु:खे प्राप्त होण्याचा संभव असल्यामुळे तू कोणत्याच प्रकारचे दु:ख मनात अनु नकोस.||३०|| भावार्थ:--- प्राण्यांचे सुखदु:ख ज्यांच्या--त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते.भाग्य हे मागच्या जन्मातील कर्म हे संचित कर्मांत जाऊन पडत असते म्हणजे जमा होत असते.संचीताले कर्म परिपक्व झाल्यानंतर प्रराब्धरुपणे वर्तमान शरीरात भोगावयास येत असते.वर्तमान शरीरात त्यानुसार सुख--दु:खाचे भोग मिळत असतात.म्हणून वर्तमान शरीरात असतांना धर्मानुसारच आचरण करावे. प्रारब्धाचे भोग भोगीत असतांना त्यामुळ तो सुखाने सुखी होत नाही व दु:खाणे दु:खी होत नाही.असे कळण्याकरिता संत—महात्मा यांचा सत्संग करावा लागतो.सत्संग करावे वाटण्यासाठी निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून अंत:करण शुद्ध करावे लागते.||३०|| अर्थ:---असे नंदाचे बोलणे ऐकून दु:खाचा त्याग करून नंदाला वासुदेव म्हणाला कि, -हे नंदा, तुम्ही कंसाला जो वार्षिक कर ध्यावयाचा तो दिला आहे व आमची तुमची भेटहि झाली आहे. आता येथे उगीच फार दिवस राहू नये. कारण, गोकुळामध्ये उत्पात होत आहेत, यास्तव तुम्ही लवकर परत चला||३१|| अर्थः---श्रीशुक्राचार्य म्हणाला- याप्रमणे वासुदेवाने सांगितलेले ते नंदादीक गोप, त्याचा निरोप घेऊन गाड्यांना बैल जुंपून गोकुळात जाणण्याकरिता निघाले.||३२|| (याप्रमाणे श्रीमद्भा. महापुराणाच्या दशमस्कंधामध्ये वसुदेवनंदसमागमरूप हा पाचवा अध्याय समाप्त झाला.) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ देवकी ६--- २---३---भगवान श्रीकृष्ण---[१]पुतनाचा---उद्धार. (१७-८-१९ शनिवार श्लोक क्र १६ पासून सुरुवात ) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ | नन्द: पथि वच: शौरेर्न मृषेती विचिन्तयन् | हरिं जगाम शरणमुत्पातागमशंङ्कितः||१|| भावार्थ:--- स्वजन जे आत्मीयतेचे आहेत,त्यांचा बोलण्यावर विश्वास ठेवावे लागते.त्यानुसार आचरण करावे लागते.त्यात आपले हित होत असते.अशा प्रंसगी भगवंतांना मनोभावाने शरण जावावयास पाहिजे.त्यांची स्तुती करावी,कांही परोपकारही करावा.||१|| अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे राजा, वासुदेवाचे भाषण असत्य व्हावयाचे नाही असे चिंतन करणारा तो नंद, आल्या पुत्राला काहीतरी भयंकर संकट प्राप्त झाले असेल कि काय? अशी शंका मनात आणून, मार्गामध्येच सर्व दु:खे दूर करणाऱ्या श्रीहरिला शरण गेला. ||१|| अर्थः---इकडे कंसाने लहान मुलांना मारण्याकरिता पाठविलेली, बालकांचा घात करणारी पुतनानावांची भयंकर राक्षसी, नगरे, गाव व गोकुळ वगैरेठिकाणी बालकांचा वध करीत संचार करू लागली.||२|| | न यत्र श्रवणादीनि रक्षोघ्नानि स्वकर्मसु | कुर्वन्ति सात्वतां भर्तुर्यातुधान्यश्च तत्र हि ||३|| अर्थः---आता कृष्णाविषयी शंका करणाऱ्या राजाला, भलत्याच कामाविषयी प्रवृत्त झालेली तीच राक्षसी मारेल असे सुचवीत म्हणतो कि-, हे राजा, ज्या नगरादिकांमध्ये आपापल्या कर्माचेठिकाणी वर्तणूक करणारे लोक, भक्तपालक श्रीकृष्णाची राक्षसांचा नाश करणारी श्रवणकीर्तनादिक करीत नाहीत, तेथेच त्या राक्षसीवगैरे विघ्ने करितात. एतावता स्वधर्माचरणामध्ये भगवंताचे श्रवणादिक करणारे लोक जेथे असतात त्या गावातसुद्धा शक्ती चालत नाही तर साक्षात् भगवंताचे ठिकाणी कशी चालेल ? चालणारच नाही.||३|| भावार्थ:--- जे लोक भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण करत नाही,तेथे राक्षसांचे प्राबल्य—वर्चस्व असते.राक्षस हे क्रूर असतात,त्यामुळे त्यांच्यापासून दु:ख होते.म्हणून आपणास दु:ख होऊ नये म्हणून आपण नेहमी भगवंतांच्या नांवाचे स्मरण करत जावे.संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र जरूर श्रवण करावे व त्याद्वारे भगवंतांच्या लीला व संत—महात्म्यांचे चरित्र गन्र्थ श्रवण करावे.त्यामुळे त्या परीसारतात राक्षस राहणार नाहीत.आपल्यात सत्वगुण येणार.जेथे सत्वगुण असतो तेथे राक्षस नाहीत.म्हणून सत्संग करावा.||३|| अर्थः---असो. आकाशमार्गाने संचार करणारी व यथेच्छरूप धारण करणारी ती पुतना राक्षसी, एकेवेळी स्वत मायेने, सभ्यस्त्रीचा वेश धारण करून नंदाच्या गोकुळात येऊन त्याच्या घरामध्ये प्रविष्ट झाली. ||४|| अर्थः---त्या स्त्रीला, आपला पती पाहण्याकरिता हातात कमळ घेऊन आलेली हि अतीरूपवती लक्ष्मीच आहे असे सर्व गोपींनी पानिले. तिचे सौंदर्य असे होते कि,- तिच्या वेनिमध्ये मोगरीची फुले गुंफिली होती, तिच्या स्थूळ कटीपश्र्चाद्भागाने व मोठ्या स्तनांनी चोहीकडे आकर्षण केल्यामुळेच कि काय तिचा मध्यभाग कृश झालेला होता, तिने उत्तम वस्त्रे परिधान केली होती, तिच्या हलत असलेल्या कर्णभूषनांच्या कांतीने विशेष चमकणाऱ्या केसांनी तिचे मुख सुशोभित दिसत होते व ती सुंदर हास्ययुक्त कटाक्ष फेकून गोकुलवासी पुरुषांचे मन आकर्षण करून घेत होती. म्हणून चित्ताचे आकर्षण झालेल्या गोपांनी तिचे निवारण केले नाही; गोपिंनातर ती लक्ष्मिच आली असे वाटले म्हणून त्या उगीच राहिल्या. मिळून कोणीहि निवारण न कलेली ती, पुतना, नंदाच्या गृहामध्ये प्रविष्ट झाली. ||५-६|| अर्थः---आणि तेथे लहान मुलांचा शोध करणाऱ्या त्या पुतनेने, प्रारब्धयोगाने, शय्येवर निजलेल्या, दुष्टांचा संहार करणाऱ्या परंतु भास्मामध्ये अच्छादुन ठेवलेल्या अग्नीप्रमाणे ज्याने आपले प्रचंड तेज गुप्त राखिले आहे त्या श्रीकृष्ण बालकास अवलोकन केले. ||७|| अर्थ:---तेव्हा चराचर अंतरात्मकातो श्रीकृष्ण, त्या पुतनेला, हे लहान मुलांना मारणारे पिशाच आहे असे जाणूनही आपले नेत्र झाकून स्वस्थ राहिला. तेव्हा जसा एखादा अज्ञानी मनुष्य, दोरी आहे असे समजून निजलेला साप उचलून घेतो त्याप्रमाणेच श्रीकृष्णाचे स्वरूप न समजणाऱ्या त्या पुतना त्या राक्षसिणी, दृष्टांचा नाश करणाऱ्या त्या अनंताला, हा बालक आहे असे मानून उचलून आपल्या मांडीवर घेतले.||८|| भावार्थ:---चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी—भगवंतांनी लहान मुलांना मारणारा ग्रह आहे,हे जाणून आपले डोळे बंद केले.१--कारण अविद्दा हि पूतना आहे.भगवंत श्राकृष्ण यांनी असा विचार केला कि,माझ्यासमोर अविध्या टीकू शकत नाही.या दुष्ट प्रवृतीला तर मारव्याचे आहे,म्हणून डोळे बंद केले.२—ती पटना बलाघातीने आहे,”पूतानपी नवती”हि पूतना पवित्र बालकांनाहि मारून टाकते,अशा बलघातिनी कृत्य करणाराचे तोंड पाहू नये,म्हणून त्याने आपले तोंड बंद केले.३—पूर्व जन्मात पूतनाने कांही साधना केलेली आहे,म्हणून पूर्व जन्माची साधना पाहण्यासाठी भगवंतांनी डोळे बंद केले.४—भगवंतांनी विचार केला कि,पूतना पापिनीचे दुध कधी पिले नाही,म्हणून तिचे दुध पिण्याकरिता डोळे बंद केले.५—भगवंतांच्या उदरात निवास करणारे असंख्य कोटी जीव घाबरून गेले कि,भगवंत विषपान करत आहेत,त्या विषांचा प्रतिकूल परीणाम भगवंतांवर होईल,म्हणून त्या जीवांना योग्य—यथार्थ समजावून सांगण्यासाठी भगवंतांनी डोळे बंद केले.६—भगवंत गोकुळात लोणी—दुध खाण्यासाठी आले होते,पण प्रत्यक्षात विष पिण्याचा प्रसंग आला.म्हणून डोळे बंद करून शंकराजींचे ध्यान करून म्हणतात कि,”आपण येथे येऊन पूतनेच्या स्थनांतील दुध प्यावे,कारण मला दही—लोणी—दुध पिण्याचे आहे,”म्हणून डोळे बंद केले.७—श्रीकृष्णाच्या नेत्रांनी विचार केला कि,परम स्वतंत्र ईश्वर या दुष्टणीस चांगली किंवा वाईट गति देओ,परंतु या दुष्टणीस चंद्रमार्ग किंवा सूर्यमार्ग तिस न मिळो.म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले.८—भगवंतांनी विचार केला कि,पुतानाचे नेत्र—डोळे मनुष्यासारखे आहेत,त्यामुळे हिची शोभा वाढत आहे,म्हणून हि दर्शनाच्या योग्य नाही.म्हणून डोळे बंद केले.९—श्रीकृष्णांच्या नेत्रांत स्थित धर्मात्मा निमीने त्या दुष्ट पुतनेस डूसू ने,म्हणून डोळे बंद केले.१०—श्रीकृष्णांचे नेत्र राजहंस आहेत,त्यांना पुतानाचे दर्शन घेण्याची उत्कंठा नव्हती.म्हणून भगवंतांनी नेत्र बंद केले.११—श्रीकृष्णांनी विचार केला कि,बहिरांगाने हिने माताचे सुंदर रूप धारण केले आहे,परंतु अंत:करण अत्यंत क्रूर आहे,म्हणून भगवंतांनी आपले डोळे बंद केले.१२—भगवंतांनी विहार केला कि,”मी न भिणारा असून तिच्यावर—पुतनेवर प्रभाव पडला नाही,यामुळे कदाचित पुन्हा परत येईल,म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले.१३—बालालीलाच्या सुरवातीलाच स्त्रीच समोर आली,म्हणून भगवंतांनी दुष्ट स्त्रीचे रूप पाहणे योग्य नाही,म्हणून नेत्र बंद केले.१४—श्रीकृष्णांच्या मनात हा विचार आला कि,पुतानेस करुणा दृष्टीने पहिले तर तिला मारता येणार नाही.तसेच उग्र दृष्टीने पाहिले तर ती आताच्या--आता भस्म होऊन जाते.लीलाच्या सिद्धीसाठी नेत्र बंद करणे योग्य आहे,म्हणून नेत्र बंद केले.१५—हि बाल—सेविकीचे रूप धारण करून आलेली आहे,म्हणून मारणे योग्य नाही.परंतु ती इतर गौळ्यांना मारेल म्हणून तिला न पाहत—पाहत मारलेले बरे,म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले.१६—मोठ--मोठे संकटे योगाने निवृत्त होतात,म्हणून घ्यान करण्यासाठी नेत्र बंद केले.१७—पूतना हा निश्चय करून आली होती कि,व्रजातील सर्व शिशूंना मारून टाकीन, परंतु भक्तरक्षापरायण भगवंतांच्या कृपेमुळे वज्रातील एकही शिशु तिला दिसला नाही,आणि बालकांना शोधीत—शोधीत लीलाशक्तीच्या कृपाप्रसादाने नंदलाय म्हणजेच नंदबाबाच्या राजवाड्यातच आली.भगवंतांनी विचार केला कि,जे माझ्या प्रेमळ भक्तांना दु:ख देण्याचा प्रयत्न करतात,त्यांचे भगवंत तोंड पाहत नाही.पूतना तर सर्व बालकांना मारण्याचा संकल्प करून आली होती,म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले.१८—पूतना राक्षिसीनीचे—क्रूररूप लपवून मायावी सुंदर स्त्रेचेरूप घेऊन आली होती.भगवंतांची दृष्टी पडल्यावर माया ही राहाब्णार नाही व असली राक्षसीरूप प्रगट होईल.ते राक्षसी रूप पाहिल्यावर यशोदा—मातेस भीती वाटेल आणि त्या भीतीमुळे कदाचित प्राण निघून जातील म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले.१९—पूतना हिंसापूर्ण म्हणजे क्रूरतेने आली होय्ती,परंतु भगवंत तिची हिंसा न करून तिचे परम कल्याण करू इच्छित होते,कारण ती एक स्त्री—अबला स्त्री आहे.भगवंत समस्त गुणांचे भांडार आहेत.त्यांच्यात धृष्टता आदि दोष नाहीत.म्हणून पूतनेचा वाढ करण्यास त्यांना लज्जा वाटते.त्या लाज्जामुळे त्यांनी आपले नेत्र बंद केले.२०---भगवंत जगत—पिता आहेत---असुर—राक्षादि हि—हि भगवंतांची लेकरे आहेत,परंतु ते सर्वदा क्रूरतेने व निष्टुरतेणे वागत आहेत,म्हणून त्यांना दंड देणे जरुरी आहे.स्नेहमय माता—पिता जेव्हा आपल्या क्रूर व निष्टुर असे जे पुत्र आहेत,तेव्हा माता—पिता यांच्या मनात दु:ख होत असते.परंतु त्यांना भय—दंड देण्यासाठी बाहेर प्रगट करत नाहीत. आशा प्रकारे भगवंतसुद्धा जेव्हा असुरांना दंड—शिक्षा करतात,तेव्हा पिता या नात्याने त्या भगवंतांसहि दु:ख होते,परंतु दुसऱ्या असुरांना भय—दंड दाखवण्यासाठी दु:ख होऊन त्यास प्रगट करत नाहीत.भगवंत त्या पुतानेस मारणार आहेत,परंतु तिचे म्रुत्युकालीन दु:ख आपल्या डोल्यान्नादिसू नये म्हणून त्यांनी आपले डोळे बंद केले.२१—लहान मुलांचा स्वभाव असा असतो कि,ते आपल्या आईच्या समोर खूप खेळतात,आनंदाने राहतात,परंतु कोणत्याही अपरिचितांना पाहून भितात आणि डोळे बंद करतात.अपरिहीत पुतानाके पाहून,म्हणून बाला—लीला बिहारी भगवंतांनी डोळे बंद केले.हेच त्यांच्या बाल—लीलाचे माधुर्य आहे.भगवंत क्रोधाने पुतानाच्या प्राणांसहित स्तन—पाण करू लागले,याचा असा अर्थ प्रतीत होतो कि,क्रोधाची देवता रुद्र यांनी प्राणांचे—पाण केले आणि श्रीकृष्णांनी स्तनांचे पाण केले--दुधाचे पाण केले.त्याचप्रमाणे आपण जीवन जगात असतांना असरांचा—अनात्मा यांचा त्याग करावा व सारांचे—आत्म्याचे ग्रहण करावे.असे केले असता आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊत.||८|| अर्थः---बरे यशोदा व रोहिणी या दोघींनी तिचे कसे निवारण केले नाही असे म्हणावे तर-त्या अभयता (यशोदा व रोहिणी)माता, बाहेरून मऊ , चित्रविचित्र व सुंदर दिसणाऱ्या म्यानामध्ये असलेल्या प्रखर तलवारीप्रमाणे, बाहेरून आईसारखे प्रेमळ व मनोहर आचरण दिसत असलेल्या परंतु आतून क्रूरस्वभावाच्या त्या सुंदर स्त्रीला एकाएकी घरामध्ये अवलोकन करून तिच्या तेजाने अगदी दिपून गेल्या आणि या या मुलीची आई किंवा हि अशाविषयीसुद्धा मोहित होऊन केवळ तिच्याकडे पाहत उभ्या राहिल्या, म्हणजे तुम्ही मुलाला काय म्हणून उचलिले असेही म्हणवले नाही. ||९|| भावार्थ:--- पूतना हि स्वभावाने अत्यंत क्रूर होती,परंतु वरवर मात्र अत्यंत मधुर व्यवहार करीत होती.रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले,पण तिच्या सौंदर्याप्रभावाने स्तब्धपणे त्या तिला पाहताच राहिल्या,मोहित झाल्या—भुलल्या.पूतना हि राक्षसवृत्तीची म्हणजे तमोगुणी व रजोगुणी असल्यामुळे राक्षसवृत्तीची होती.म्हणून तिला व तिच्या कार्याला आपण भूलूनये किंवा मोहित होऊ नये. त्यामुळे त्यांचा दुर्गुण आपल्यात येण्याची किंवा अहित होण्याची अधिक श्यकता असते.म्हणून सावध राहावे.||९|| अर्थः---त्या भयंकर पुतनेने, त्या स्थळाच्याठिकाणी कृष्णाला मांडीवर घेऊन त्या बालकाला, पचन होण्यास फारच कठीण असे विश ज्यामध्ये भरले आहे असा आपला भयंकर स्तन अर्पण केला. तेव्हा क्रोधयुक्त झालेल्या भगवंताने हातांनी तो तिचा घट्ट आवळून, ती प्रसूत झालेली नसल्यामुळे तिच्या स्तनात दुध मुळीच नव्हते, केवळ विषय होते, ते नुसते बधेला म्हणूनचकी काय तिच्या प्राणाचे अनुपान करून त्यासहवर्तमान ते विष प्राशन केले.||१०|| भावार्थ:--- पुतनेने त्या बालाकृष्णास आपल्या मांडीवर घेऊन विष लावलेले स्तन त्याच्या तोंडात दिले.ते विष जहाल व न पचू शकणारे होते,म्हणून भगवंतांनी रागाने दोन्हिऊ हाताने तिचे स्तन दाबून तिच्या प्रणांसह तिचे दुध प्राशन केले.त्याचप्रमाणे आपणास कोणी हेतूपुरस्पर गोडीगुलाबीने-न कळू देता कपटबुद्धीने तमोगुणाचे किंवा राजोगुनांचे संस्कार करत असेल तर आपणच त्याच्याच पदद्धीतेने आपण त्याच्यावर सात्विक संस्कार करून त्याचा दुष्ट दुर्गुण घालवावा,कारण त्यात हित असतेच.||१०|| अर्थ:---तेव्हा तिच्या जीवाच्या सर्व मर्मस्थानाचे ठिकाणी अत्यंत पीडा होऊ लागली. असता सोड सोड, पुरे आता! असे म्हणणारी ती पुतना राक्षसी, डोळे पांढरे करून हात व पाय वारंवार अपटणारी व सर्वांगाला घर्म सुटलेली ती मोठ्याने रडू लागली. ||११|| अर्थः---अतिशय गंभीरवेगाने युक्त अशा तिच्या त्या शब्दाने, पर्वतांसहवर्तमान पृथ्वी कापू लागली, ग्रहांसहसहवर्तमान स्वर्गलोक ढळमळू लागला, सप्त पाताळे व अष्ट दिशा यांचे ठिकाणी प्रतिध्वनी झाल, वज्रपातच झाला कि काय अशा भयाने लोक भूमीवर पडले.||१२|| अर्थः---याप्रमाणे प्राणाचे आकर्षण करून स्तनपान करू लागल्यामुळे, स्तनामध्ये प्राणघातक वेदना उत्पन्न झाली असता, मरणकाळी मृत्युपिडाने व्याकूळ झालेलीती पुतना, मायिक स्वरूप धारण करण्यास असमर्थ होऊन, तिने आपले मुळचे स्वरूप धारण केले असता ती आपल्या मुखाचे विदारण करून व केस, पाय व हात यांना पसरून गतप्राण होत्साती, वज्राने प्रहार केलेल्या वृत्रासुराप्रमाणे गोकुळामध्ये पडली. ||१३|| अर्थः---हे राजश्रेष्ठ, तिच्या देहाने पडता पडताही सहा कोसपर्यंत जमिनीवरील वृक्षांचे चूर्ण करून टाकले. तेव्हा गिं नुष्यादिकांना वगळून जे वृक्षाचेमात्र चूर्ण झाले ते एक मोठेच आश्र्चर्य झाले. ||१४|| अर्थः---हे राजा, ज्याच्या जबड्यामध्ये नांगराचा फळासारख्या भयंकर दाढा आहेत, ज्याच्या नाकपुड्या पर्वताच्या गुहेसारख्या आहेत, ज्याच्यावर पर्वतावरून खाली कोसळणाऱ्या मोठ्या खड्कांसारखे स्तन आहेत, जे भयंकर असून पसरलेल्या तांबुसवर्शच्या केसांनी युक्त आहे,||१५|| अर्थः---ज्याच्यावर अधाऱ्या विहिरीसारखे खोल डोळे आहेत, जे वाळवेच्या मैदानासारख्या असलेल्या कमरेच्या पुढील भागाने भयंकर आहे, जेथे पसरलेले हात मांड्या वपाय हे नदीला पूल बांधल्यासारखे लांबचलांब दिसत आहेत आणि ज्याचे पोट एखाध्या कोरड्या झालल्या डोहासारखे खोल आहे, असे ते भयंकर शरीर अवलोकन करून, पूर्वी त्याच्या मोठ्या ओरडण्याने ज्यांची ह्रदये विदीर्ण झाली होती, कानटाळ्या बसल्या होत्या व मस्तकशूळ उत्पन्न झाला होता ते सर्व गोपाळ व गोपी अत्यंत भयभयीत झाले. ||१६-१७|| अर्थः---आणि त्या पूतनेच्या वक्षस्थळावर निर्भयपणे क्रीडा करनाया (हस्तपदादिकांचे चालन करणाऱ्या) कृष्णबालकाला अवलोकन करून ज्यांना उत्कट स्नेहाने घाबारेपणा प्राप्त झाला आहे आशा त्या गोपींनी लगबगीने त्याच्याजवळ जाऊन त्याला उचलून घेतले.||१८|| अर्थ:---नंतर त्या गोपींनी, यशोदारोहिणीसहवर्तमान त्या बालकाच्या सर्व अंगाचेठीकानी, गाईचे शेपूट फिरविणे, दृष्ट काढणे, इत्यादिकेंकरून त्याचा उत्तमप्रकारचा रक्षणविधी केला.||१९|| अर्थः---तो असा कि, त्या बालकाला प्रथम गोमुत्राने स्नान घालून पुन: गाईच्या पायाखालची धुळीने व गाईच्या शेणशने त्याच्या लालटादिक बारा अवयवांचे ठिकाणी केशवादिक बारा नावांनी टिळक लावून रक्षनविधी केला||२०|| अर्थ:---याप्रमाणे राक्षसीच्या वक्ष:स्थळावर सापडलेल्या त्या बालकाला भूतबाधा होईल म्हणून प्रथम गडबडीनेच आपण आचमनवगैरे न करताच त्याचा रक्षणविधी करून, त्यांना जरासा धीर आल्यावर त्या गोपींनी आपल्या ह्स्तपादांचे प्रक्षालन करून व आचमन करून, प्रथम आपल्या हस्तांचेठिकाणी व अवयवांचेठिकाणी निरनिराळ्या अजादिक अकरा बीजांचा न्यास करून, म्हणजे करशुद्धीविषयीचेठिकाणी अजादिक अकराबीजांचा न्यास करून, म्हणजे करशुद्धासिविषयी तीन बीजे व दोन्ही हातांच्या बोलांच्या संधीचेठिकाणी चारचार बीजे तसेच पुन्हा चरनादिक एकेक अवयवांचेठिकाणी अजादिक एकक बीज याप्रमाणे न्यास करून त्यांनी बालकाच्याही अवयवांचेठिकाणी तसास बीजांचा न्यास केला.||२१|| अर्थ:---हे आमच्या पालका बालका, तुझ्या पापांचे अज (जन्मरहित ईश्र्वर) रक्षण करो. तसाच गुढघ्यांचे-मनीमान, मांड्यांचे-यज्ञ, कमरेचे-अच्युत, उदराचे-हयग्रीव, हृदयाचे-केशव, तुझ्यावक्षस्थळाचे-ईश, कंठाचे-सूर्य, भुजांचे-विष्णू आणि तुझ्या मस्तकाचे ईश्र्वर रक्षण करो.||२२|| अर्थ:----आता दिशांचेठिकाणी रक्षणविधी करितात-चक्रधारण करणारा हरी तुझ्या अग्रभागी असो, गदा धारण करणारा हरी तुझ्या पाठीमागे असो. धनुर्धारी मधुसूदन आणि खड्गधारी अजन (जन्मरहित भगवान ) हे उभयंता तुझ्या दोन्ही बाजूंकडे असो, शंखधारण करणारा उरुगाय (पुष्कळ गाइलेला ) तुझ्या चारी चारी कोपऱ्यांचेठिकाणी असो, उपेंद्र (वामन) तुझ्या ऊर्ध्वभागी असो. गरुड तुझ्या अधोभागी असो. आणि नांगर धारण करणारा बलराम तुझ्या सभोवती असो.||२३|| अर्थ:---याप्रमाणे बाहेरचे रक्षण करून आता अंतरंग रक्षण करितात हृषीकेश, तुझ्या इंद्रियाचे रक्षण करो. नारायण, तुझ्या प्राणांचे रक्षण करो. श्र्वेतद्विपाचा अधिपती, तुझ्या चित्ताचे आणि योगेश्र्वर, तुझ्या मनाचे रक्षण करो.||२४|| अर्थ:---पृश्र्नीगर्भ, तुझ्या बुद्धीचे रक्षण करो, षड.गुणैश्र्वर्यसंपन्न परमेश्र्वर, तुझ्या अहंकाराचे रक्षण करो. तू खेळत असतांना तुझे गोविंद रक्षण करो, निजलेल्या तुझे माधव रक्षण करो.||२५||दिनांक:-१७\८\२०१९ वार शनिवार||देवकी|| अर्थ:---वैकुंठाधीपतीने तुझे चालताना रक्षण करावे, लाक्ष्मिपतीने बसलेल्या तुझे रक्षण करावे, सर्व पिशाच्यांना भय उत्पन्न करणाऱ्या यज्ञभोक्त्या भगवंताने, भोजनकाली तुझे रक्षण करावे.||२६|| अर्थ:---डाकिनी (दृष्टस्त्रिया), राक्षसी, कुष्मांडनावाचे रुद्रगण, तसेच जे बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस व विनायक (विघ्र करणारे) आहेत.||२७|| अर्थ:---कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पुतना, मृतका इत्यादिक जे उन्माद (वेद लावणारे) आहेत तसेच देह, प्राण व इंद्रिये यांना विस्मृती पडणारे अपरमान (फेंपरेवगैरे ग्रह)आहेत||२८|| अर्थ:---अत्सेचा जे स्वप्नामध्ये दृष्टी पडून भेडसावणारे व पुढे दु:ख सुचविणारे ग्रह आहेत आणि जे वृद्धांना व बालकांना झपाटनारे ग्रह आहेत ते सर्वही विष्णूच्या नामग्रहणाचे भीत असतात म्हणून ते सर्वही पूर्वी सांगितलेली नावे ऐकिल्याबरोबर नष्ट होवोत.||२९|| अर्थ:---श्रीशुक्राचार्य म्हणाला-हे राजा, याप्रमाणे, कृष्णाचेठिकाणी धारण केलेल्या अतिशय प्रेमाने युक्त अशा त्या गोपींनी, ज्याचा रक्षणविधी केला त्या बालकाला, यशोदा मातेने स्तनपान करवून निजविले.||३०|| अर्थः---इतक्यात मथूरेतून गोकुळामध्यें प्राप्त झालेले नंदादिक गोप, तो मरून पडलेला पूतनेचा देह पाहून फारच विस्मित झाले.||३१|| अर्थ:---त्यांचा विस्मय असा कि,- अहो वसुदेव हा पूर्वजन्मी मोठा तपस्वी ऋषि असून तो सांप्रतकाली येथे जन्मास आला आहे, किंवा तो पूर्वजन्माचे ठिकाणी महाज्ञानी असावा. कारण, त्या वसुदेवाने गोकुळामध्ये उत्पात होत आहेत असे जे सांगितले होते तोच हा उत्पात होत आहेत असे जे सांगितले होते तोच हा उत्पात आमच्या दृष्टीस पडला.||३२|| | तावन्नन्दाद्यो गोपा मथुराया व्रजं गताः | विलोक्य पूतनादेहं बभूवुरतिविस्मितः ||३१|| | नूनं बतर्षिः संजातो योगेशो वा समास सः | स एव दृष्टो ह्युत्पातो यदाहानकदुन्दुभिः ||३२|| अर्थ:---नंतर गोकुळात राहणाऱ्या त्या गोपालांनी त्या पूतनेच्या देहाचे कुऱ्हाडीनि प्रत्येक अवयव तोडून निरनिराळे कंकडे केले व तो एकेक अवयव दुर्गंधाच्या भयाने दूर नेऊन काष्ठांवर ठेवून जाळून टाकीला.याप्रमाणे सर्व शरीराचे दहन केले. दुसरे आश्र्चर्य असे झाले कि,-श्रीकृष्णाने स्तनपान केल्यामुळे तत्काळ पापरहित झालेला तो त्या राक्षसी देह, जळू लागला असता, त्यापासून अगरूच्या सुगंधासारखा सुगंधयुक्त धूर उत्पन्न झाला. ||३३-३४|| भावार्थ:--- भगवंतांचा स्पर्श त्या पुतनेला झाला होता.तिचे दुध भगवंतांनी प्राशन केले होते.म्हणून तिचा देह जळत असतांना तिच्या—पूतनेच्या देहातून धुपासारखा सुगंधी धूर बाहेर निघत होता.भगवंतांचा संबंध कसाही आला तरी कल्याणाच होते.||३३—३४|| अर्थः---असो; लोकांच्या लोकांच्या बालकांना मारणारी व राक्तभक्षण करणारी राक्षसी जी पुताना ती, मारण्याच्या इच्छेनेहि श्रीकृष्णाला स्तन देऊन (स्तनपान करवून)जर सद्ग्तीला पावली जर जशा त्याच्या माता (गाई व गोपी) त्याचेठिकाणी अतिशय प्रीतीने युक्त होऊन त्याचे प्रिय करीत असत त्याप्रमाणे, आस्तिक्य बुद्धीने व प्रेमळक्षणभक्तीने परमात्म्या कृष्णाला तुलसीवगैरे अतिप्रिय वस्तूंचे समर्पण करणारा बहकत, उत्तम गतीला पावेल हे काय पुन्हा सांगितले पाहिजे? सांगावयास नको.||३५-३६||दिनांक:-१८\८\२०१९||वार:-रविवार||देवकी|| भावार्थ:--- कोणत्याही निमित्ताने भगवंतांचे स्मरण किंवा स्पर्श किंवा संबंध आला कि सदगती प्राप्त होते.म्हणून आपण निष्काम कर्म करवून व निष्काम भक्ती करून भगवंतांसी संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे आपल्याला सदगती मिळू शकते. भगवंतांसी प्रतिकुल भावना ठेऊन जर सदगती मिळते तर अनुकूल भावना--प्रेमपुर्वक भावना ठेऊन सदगाती मिळेलच.यात कांहीच शंका घेण्याचे कारण नाही.म्हणून आपण विरोधी भक्ती करण्यापेक्षा प्रेमपूर्वक भक्ती करून एकरूप व्हावे.कारण आपल्याजवळ पूर्वसंस्कार प्रेमापुवक भक्तीचेच आहेत.म्हणून आपण अनुकूल भक्ती करणे हिताचे आहेत,||३५-३६|| अर्थः---भगवंताने, लोकांनी वंध्य अशा ब्रह्मदिकांनीही वंदन करण्यास योग्य व भक्तांच्या ह्रदयामध्ये राहणारे अशा आपल्या पायांनी जिच्या शरीराचे आक्रमण करून स्तनपान केले ती पुतना राक्षसीही जर देवकीयशोदांना प्राप्त होण्यास योग्य अशा गतीला पावली तर ज्यांचे स्तनसंबंधी दुध कृष्णाने प्रश्न केले आहे त्या गाई व गोपी, त्या गतीला पावतील हे काय सांगावे.!||३७-३८|| अर्थः---तर हे राजा, कैवल्यादिक सर्व पुरुषार्थ देणाऱ्या देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णाने, ज्यांची पुत्रस्नेहाने गलीत झालेली दुग्धे संतोषपूर्वक प्रश्न केली, त्या श्रीकृष्णाचेठिकाणी निरंतर पुत्रदृष्टीने स्नेह करणाऱ्या गाईगोपींना, आज्ञानापासून प्राप्त होणारा संसारच पुन्हा प्राप्त होण्यास योग्य नाही.||३९-४०|| भावार्थ:--- ज्यांचे--ज्यांचे दुध,दही व दही भरपूर सेवन केले,त्यांना—त्यांना त्यांचा—त्यांचा इच्छानुसार सर्व कांही दिले.म्हणून आपण भगवंतांच्या संबंधी जे असेल ते सर्व देण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.त्यामुळे आपणास सदगती मिळेल.ज्या गोपी व गाई नित्य भगवान कृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहत होत्या,म्हणजे नित्य संबंध भगवंतांसी ठेवत होत्या त्या संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत.त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन त्या सुखरूप झाल्या.म्हणून आपण भगवंतांसी कोनातेनाकोणते नाते लावून नित्य त्यांचेच स्मरण करावे.म्हजे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊत.||३९-४०|| अर्थः---असो. पुतनेचे प्रेत दहन केले तेव्हा चितासंबंधी धुराचा सुटलेला अगरुसारखा वास, पुतना राक्षसी येण्याच्या पूर्वीच गाई चारण्याकरिता दूर गेलेल्या गोकुलवासी लोकांनी घेऊन, काय हे आश्र्चर्य! कोठून हा सुगंध येतो असे बोलत बोलत ते गोकुळात प्राप्त झाले.||४१|| अर्थः---आणि त्यांनी तेथे गोपांनी वर्णन केलेली- पुतनेचे आगमन, तिचे स्वरूपसौंदर्य, तिची कृती व तिचे मरण आणि बालकाचे कुशल हि श्रवण करून ते अत्यंत विस्मित झाले.||४२|| अर्थः---हे राजा, उदारबुद्धी अशा नंदाने तर, मरूनच वाचलेल्या अशा श्रीकृष्णपुत्राला मांडीवर घेऊन मस्तकाचे ठिकाणी अवग्रहण केले आरि ते परम आनंद झाला||४३|| | य एतत् पूतनामोक्षं कृष्णस्यार्भकम्द्भुतम् | शृणुयाच्छ्रद्धया मर्त्यो गोविन्दे लभते रतिम् ||४४|| अर्थः---हे राजा, जो मनुष्य हे श्रीकृष्णाचे अद्भूत बालचित्र, भक्तिपूर:सर श्रवण करितो त्याला गोविंदाचेठिकाणी परमप्रीती प्राप्त होते.||४४|| भावार्थ:--- “पूतना मोक्ष”हि भगवंत बालकृष्णांची अद्भुत लीला जो मनुष्य अंत:करणपूर्वक—एकाग्र चित्ताने श्रवण करील त्यास भगवंतांबदल निष्काम किंवा सकाम प्रेम उत्पन्न होऊन तो भक्तीमार्गाला लागेल,म्हणून आपण श्रीमद्भागवत नेहमी श्रवण करावे. त्यामुळे आपले हित होऊन आपण ज्ञान मार्गाला लागून,संत—महात्मा यांची संगती लागून जन्म—मरण निवृत्त होईल.||४४|| याप्रमाणे श्रीमद्भवातनामक पुराणातील दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये पुतनामोक्षनिरुपणनामक हा सहावा अध्याय समाप्त झाला.||६|| श्रिकृष्णार्पनमस्तु -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- (अध्याय ७ वा ) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ अर्थ:---श्रीकृष्णाची बाललीला श्रवण करून आनंद पावलेला राजा पुन्हा तेच विचारण्याकरिता म्हणाला कि, हे समर्थ शुक्राचार्य, भगवान हरी ईश्र्वर, ज्या ज्या मात्स्यादिक अवतारांनी, जी जी वेदोद्धरणादिक कर्मे करितो ती ती सर्व कर्मे आमच्या कानांला गोड लागणारी व मनाला आनद देणारीच आहेत.||१|| अर्थ:---तथापि जे चरित्र श्रवण करणाऱ्या पुरुषमात्राच्या मनाची ग्लानी व तिजपासून उत्पन्न होणारी नानाप्रकारची इच्छा तत्काल नाहीशी होते, अंत:करण शुद्ध होते, हरीच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते आणि भगवद्भक्ताचे ठिकाणी सख्य होते. तेच हरीचे चरित्र, माझ्यावर अनुग्रह करावा असे मानीत असशील तर मला सांग ||२||वार:-सोमवार||दिनांक:-१९\८\१९.||देवकी|| अर्थ:----आता अतिउत्सुक्तेने पुन: विशेष प्रश्न करितो कि, आता मनुष्यलोकी प्राप्त होऊन मनुष्यजातीला अनुसरणाऱ्या त्या श्रीकृष्णाचे अद्भुत असे दुसरेही बालचरीत्र मला वर्णन कर.||३|| अर्थ:---श्रीशुक्राचार्य म्हणाला, हे राजा, ऐके दिवशी श्रीकृष्ण उपडा वळू लागला म्हणून त्याला कौतुकाने मंगलस्नान घालावयाचे होते आणि त्याच्यादिवाशी श्रीकृष्णाचा जन्मनक्षत्राचा (रोहिणीचा) योग आला होता म्हणून त्या दोन्ही उत्साहांच्या निमित्ताने गोकुळातील सर्व सुवासिनी स्त्रिया मिळाल्या असता, त्यांच्यामध्ये यशोदेने, वाध्यांचा गजर,गोपींची गीते व ब्राह्मणाचा वेदघोष ह्यांच्यायोगाने सुशोभित असे श्रीकृष्णाला अभ्यंगपूर्वक मंगलस्नान घातले ||४|| अर्थ:---नंतर त्या नंदपत्नी यशोदेने, ज्याची अंगी टोपी वगैरे वस्त्रै लेववीन, भूषणे घालणे, कस्तुरीचे गंध लावणे, गोरोचनाची तीट लावणे, डोळ्यात काजळ घालणे, व अंगास उटी लावणे इत्यादिक कृत्ये केली आहेत व अन्न, पात्र, वस्त्रे मला, इच्छितपदार्थ व गाई देऊन उत्तम सत्कार केलेल्या ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करवून ज्याचे रक्षाबंधनादिक मंगलकृत्य केले आहे अशा त्या झोप येऊ लागलेल्या श्रीकृष्णाला, छकड्याच्या खाली पाळण्यामध्ये हळूहळू झोप्या ओव्या गातगात निजविले||५|| अर्थ:---नंतर तो उपडा वळण्याच्या उत्साहात पुरा करण्याविषयी उत्कंठीत झालेली व उदारचीत्त अशी ती यशोदा, आपल्या घरी आलेल्या गोकुळातील गोपी वगैरे मंडळीचा, हळदकुंकू देणे, ओट्या भरणे, वस्त्रभूषनादिक देणे इत्यादिकेंकरून सत्कार करीत असता, तिने त्या कृष्णाचे रोदन मुळीच ऐकिले नाही. इकडे स्तनपानाची इच्छा धरून रोदन करणारा तो श्रीकृष्ण, रडता रडता आपले पाय वर करून नाचवू लागला. ||६|| अर्थ:---तेव्हा त्या छाकड्याच्या खाली निजलेल्या त्या बालकाच्या चिमुकल्या व पल्ल्वासारख्या कोमल चरणाने ताडन केलेले ते गाडे, ज्याच्या वरची सोन्यारुप्याखेरीज कांशाचीवगैरे दुधदह्यादिकांणी भरलेली भांडी कोसळून पडली आहेत, ज्याची चाके व आस अस्ताव्यस्त होऊन पडले आहेत व ज्याच्या दांड्या मोडल्या आहेत असे उलथून पडले ||७|| अर्थ:---तेव्हा उपडा वळण्याच्या समारंभाविषयी तेथे याशोदाप्रमुख गोकुलवासी स्त्रिया ऐअक्त्र जमल्याच होत्या, त्यांनी व नंदादिक गोपालांनी तो गाडा उलटलेला पाहून, त्या आश्र्चर्यकारक दर्शनाने ते सर्व घाबरून गेले आणि गाडे आपोआप कसे उलथून पडले असे बोलतबोलत उत्पातदिकांच्या शंकेने अनेक प्रकारच्या आशंका घेऊन, वादविवाद करीत असता, शेवटी मोह्पावलेले ते सर्वजण घाबरेपणाने चोहोकडून त्या गाड्याच्या व बालकाच्या सभोवती जमले. तेव्हा हा काय उत्पात आहे? किंवा सहज आपोआप हे गाडे उलथून पडले अशा संशयात पडलेल्या त्या गोपांना व गोपींना, तेथे खेळत असलेल्या बालकांनी असे सांगितले कही,रडत असलेल्या या कृष्णानेच आपल्या पायाने हे गाडे उलथून पडले आहे, यात संशय नाही. ||८-९|| अर्थ:---परंतु त्या नंदादिक गोपींनी, हे बालक काहीतरी सांगत आहेत असे समजून, त्यांचे बोलणे खरे मानिले नाही. करण, त्यांनी त्या श्रीकृष्णबालकाचे अपरिमित बाल जाणिले नव्हते ||१०|| अर्थ:---असो. रडणाऱ्या त्या मुलाला ग्रहण करून, याला काहीतरी पिशाचबाधा झाली असावी अशी शंका मनात आणणाऱ्या त्या यशोदेने ब्राह्मणाकडून राक्षसांचा नाश करणाऱ्या मंत्रांनी त्याला अंगारा लावून व आशीर्वाद देववून. मग त्याच्याकडून स्तनपान करविले.||११|| अर्थ:---आता भगवंताचे सामर्थ्य न जाणणाऱ्या ब्राह्मणाचे वेष्टित सांगतो-ब्राह्मणानि बलाढ्य गोपांकडून तो गाडा पूर्ववत स्थानपण करवून व कृष्णालाही बाळलेन्यासह पाळण्यात पूर्वीप्रमाणे ठेववून ग्रहशांत्यर्थ नवग्रहांचा यज्ञ करून, त्या कृष्णासहित असलेल्या गाड्यासभोवती आठ्दिशांचे ठिकाणी आठ लोकपाळाना बळी अर्पण केले आणि त्या बालकाचे दही अक्षता व कुशोदक यांच्या योगाने पूजन केले. ||१२||दिनांक:-२०\८\१९||वार:-मंघळवार||देवकी|| अर्थ:---निश्र्चययुक्त अशा नंद्गोपानेही, जे ब्राह्मण, गुणावर दौषारोप, असत्य भाषण, दांभिकपणा, शांतीचा अभाव, हिंसा व आभिमान या दुर्गुणांनी रहित असतात, त्या सत्यशील ब्राह्मणांनी दिलेले आशीर्वाद निष्फळ होत नाहीत असे मनात आणून, त्या बालकाला आपल्याजवळ घेऊन, त्या ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करवून, अरिष्टशांत्यर्थ होम करवून व सामवेद ऋग्वेद व यजुर्वेद यांनी संस्कार केलेल्या व आत पवित्र औषधी टाकलेल्या उद्कांनी अभिषेक करवून त्या ब्राह्मणांना, षड्रसगुणयुक्त अन्नाचे समर्पण.||१३-१४-१५|| अर्थ:---आणि त्यांना, आपल्या पुत्राचा अभ्युदय होण्याकरिता, सुशीलत्वादिक गुणांनी युक्त आणि वस्त्रांच्या झुली, फुलांच्या माळा व सुवर्णपुष्पांच्या माळा घातलेल्या गाई अर्पण केल्या. त्यावेळी त्या ब्राह्मनांनीही आशीर्वाद दिले||१६|| अर्थ:---हे राजा, जे ब्राह्मण मंत्रवेत्ते व योगाभ्यासी आहेत त्यांनी जे आशीर्वाद उच्चारिले ते तसेच होणार, ते कधीही निष्फळ होणार नाहीत ते स्पष्ट आहे.||१७|| अर्थ:---एके वेळी ती साध्वी यशोदा, आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याला कुरवाळीत व खेळवीत असता, एकाएकी पर्वताच्या शिखराप्रमाणे जड लागणाऱ्या त्या कृष्णाचा भार, सहन करण्यास ती समर्थ अझाली नाही. ||१८|| अर्थ:----तेव्हा श्रीकृष्णाच्या उदरी असणाऱ्या जगताच्या भाराने पिडीत झाल्यामुळे मिस्मित झालेल्या त्या यशोदेने, त्याला भूमीवर ठेवून तृणावर्तापासून आपला (मातेचा) मृत्यू चुकाविण्याकरिता आपणाला मांडीवरून खाली ठेवावे म्हणून कृष्णानेच केलेला भार ण जाणून तिने उत्पाताच्या शंकेने महापुरुष भगवंताचे (परमेश्र्वरा, तू दिलेल्या पुत्राचे तूच रक्षण कर) असे ध्यान केले व सृष्टीक्रमाप्रमाणे ती आपली कामे करू लागली. ||१९|| अर्थ:---इकडे लहानमुलांना मारण्याकरिता कंसाने पाठविलेल्या कंसाचा सेवक तृणावर्त नावांचा दैत्य, चक्रवाताच्या ( वावटळीच्या) स्वरूपाने गोकुळात आला आणि त्याने, धुळीच्या योगाने सर्व गोकुळ आच्छादन करून, सर्वांचे डोळे अगदी धुळीने झाकून टाकले आणि भयंकर मोठ्या शब्दाने पुर्वादिक दिशा व आग्रेयादिक विदिशा नदीत करून आंगणात जमिनीवर बसलेल्या, कृष्णाला उचलून आकाशात नेले. ||२०-२१|| अर्थ:---त्यावेळी दोन घटिकापर्यंत सर्व गोकुळ, धुळीने व अंधकाराने व्यापून गेले होते. यशोदेने जेथे आपला मुलगा ठेविला होता तेथे तो तिला दिसत नाहीसा झाला.||२२|| दिनांक:-२१\८\१९||वार:-बुधवार||देवकी|| अर्थ:---तृणावर्ताने उत्पन्न केलेली वाळू डोळ्यात शिरून घाबरलेला सर्वजण, कोणीच आपणास किंवा दुसऱ्यास पाहत नाहीसा झाला. ||२३|| अर्थ:---याप्रमाणे बह्यंकर अशा वायुचक्रापासून धुळीचा गोकुळात वर्षाव होऊ लागला असता, मुलाचा मार्ग न पाहून तो पाहण्याच्या उपयाविषयी असमर्थ झालेली ती माता यशोदा, वारंवार त्या मुलाच्या गुणांचे स्मरण करीत, जशी वासरू मरण पावलेली गाय अतिदिनपणाने हंबरडे फोड्त्ये त्याप्रमाणे करूनस्वराने शोक करू लागली. व शोकाने व्याकूळ होऊन भुर्च्छित पडली.||२४|| अर्थ:---नंतर धुळीच्या वर्षावाचा वेग कमी होऊन तो वावळटीचा वाराही कमी झाला असता, गोपिनी यशोदेचे रुदन ऐकून तिच्याजवळ आल्या, आणि तेथे श्रीकृष्णाला ण पाहोन त्या अत्यंत दु:खचित्त व ज्यांच्या मुखावरून दु:खाश्रू वाहन आहेत अशा होऊन, रुदन करू लागल्या.||२५|| अर्थ:---इकडे, तृणावर्तहि वावटळीचे स्वरूप दरान करून कृष्णाचे हरण करीत असता कसातरी वर आकाशात गेला, परंतु भगवंताने त्याला मारण्याकरिता पुन्हा जडत्व स्वीकारल्यामुळे तो कृष्णाला घेऊन पुढे (मथुरेस) जाण्यास समर्थ झाला नाही, तर कृष्णाच्या भाराने त्याचा जाण्याचा वेग बंद झाल.||२६|| अर्थ:---तेव्हा त्याने दैत्यरूप धारण करून कृष्णाला मारण्याचे मनात आणिले असता, श्रीकृष्णाने त्याला गळ्यास मिठी मारून धरिले. त्यावेळी गाळ्याचेठीकानी धारीलेला तो दैत्य, आपल्यापेक्षाही अतिशय जड असलेल्या त्या अद्भत बालकाला (श्रीकृष्णाला) पर्वतप्राय मानीत असता, त्याला गळ्यापासून सोडवून दूर करण्याविषयीसुद्धा समर्थ झाला नाही.||२७|| अर्थ:---तर गळा धरण्याचेच निच्श्रेष्ट झालेला, डोळे बाहेर आलेला व शब्द बंद होऊन गतप्राण झालेका तो दैत्य, बालकासहवर्तमान गोकुळामध्ये गोपालांनी दोहनादिकांचा विचार करावयास बसण्याकरिता एक मोठी शीला स्थापन केली होती. तिच्यावर पडला.||२८|| अर्थ:---त्यावेळी एकठीकानी जमून रुदन करीत असलेल्या स्त्रियांनी, जसा रुद्राच्या बाणाने विद्ध होऊन त्रिपुरासुर खाली पडला त्याप्रमाने आकाशातून खाली शिळेवर पडलेल्या व सर्व अवयव फुटून गेलेल्या त्या भयंकर दैत्याला अवलोकन केले.||२९|| अर्थ:---आणि त्याच्या वक्षस्थळावर लोंबत असलेल्या श्रीकृष्णाला अवलोकन करून, त्या गोपींनी त्याला त्वरेने उचलून घेऊन त्याच्या मातेपाशी श्रेऊन दिले आणि त्या सर्व विस्मित झाल्या. याप्रमाणे आकाशमार्गाने राक्षसाने नेलेल्या तथापि मृत्युच्या मुखातून सुटून घेऊन खुशाल असलेल्या त्या कृष्णाला पुन: पावोन, याशोदादिक गोपी व नंदादीप सर्व गोप अतिशय हर्ष पावले. ||३०|| अर्थ:---आणि परस्पर म्हणू लागले कि, अहो केवढे मोठे आश्चर्य! असे आम्ही कोठेच पहिले किंवा ऐकीलेही नाही; हा बालक, राक्षसाने मारून टाकीला असताही पुन्हा आपणच प्राप्त झाला. तेव्हा दुसरे त्यास म्हणाले कि,- हो ह्यात काय आश्र्चर्य आहे? हे असेच व्हावयाचे. कारण, हा क्रूरस्वभावाचा गह्तकी होता म्हणून तो आपल्या पापानेच मरण पावला. साधूची सर्वत्र समदृष्टी असत्ये म्हणून तो भयापासून मुक्त होते. आम्ही व आमच्या ह्या मुलाने कोणाचा घात पात केलेला नाही. म्हणून हा मृत्युपासूनहि सुटला आहे.||३१|| अर्थ:---अहो, आम्ही जन्मांतरी, कृछूचांद्रायणादिक काय तप केले होते, किंवा भगवंताचे पूजन केले होते अथवा वापीकुपतडागाडीक निर्माण केली होती, किंवा पंचमहायज्ञ आचरण केले होते याव्दा तुलापुरुषादिक दाने दिली होती, किंवा सर्व प्राणीमात्रांचा भगवदुब्धीने सन्मा केला होता हे काहीच आम्ही जनात नाही. ज्या पुण्याच्या योगाने मरण पाव्लेलाही हा बालक, आपले बंधू अशा आम्हाला हर्ष उत्पन्न करीत पुन्हा प्राप्त झाला आहे. एकंदरीत हे फार चांगले झाले. ||३२||दिनांक:-२२\८\१९ वार:-गुरुवार ||देवकी|| अर्थ:---असो. याप्रमाणे त्या वृहद्वननामक गोकुळामध्ये बहुत आश्र्चर्यकारक चमत्कार पाहून मिस्मित झालेल्या नंदगोपाने, गोकुळात उत्पात होत आहेत, हे वसुदेवाचे वचनच खरे होत आहे असे मानिले. ||३३|| अर्थ:---आता तृणावर्त दैत्य आला त्यावेळी आपला जडपणा पाहून शंकायुक्त झालेल्या मातायशोदेला बबोध करण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या मुखामध्ये जांभयीच्या वेळी तिला ब्रह्मांड दाखविले, तो प्रकाश सांगतो- ऐकेवेळी पुत्रस्नेहाने व्याप्त अशा परमसौभाग्ययुक्त यशोदेने, खेळत असलेल्या कृष्णाला घेऊन आपल्या मांडीवर बसविले आणि त्याला दुध स्त्रवत असलेला स्तन पाजविला||३४|| अर्थ:---हे राजा, तेव्हा स्तनपान बहुतेक होत आलेल्या त्या कृष्णाचे सुंदर हास्ययुक्त मुख, चुंबन घेऊन कुरवाळीत असणाऱ्या त्या माता यशोदेने, अकस्मात जांभई देणाऱ्या त्याच्या मुखामध्ये हे बाहेर दिसत असलेले सर्व जग अवलोकन केले.||३५|| अर्थ:---ते असे कि,- आकाश स्वर्ग, पृथ्वी, नक्षत्रमंडळ,दिशा, सूर्यचंद्र, अग्नी, वायू, सप्तसमुद्र द्वीपे पर्वत व त्या पर्वतांपासून झालेल्या नध्या, वने व स्थावरजंगमात्मक सर्व प्राणी.||३६|| अर्थ:---असे हे सर्व जग अवलोकन करून हे राजा, ती मृगशावनयना यशोदा, एकाएकी भयातीत होऊन थरथर कपू लागली आणि डोळे झाकून हे काय माझ्या दृष्टीस पडले असे मानुन आश्र्चर्ययुक्त झाली||३७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्ये शकटतृणावर्त दैत्यभंगकथनरूप हा सातवा अध्याय समाप्त झाला. ||७|| ||श्रीकृष्णार्पणमस्तु || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ८--- २---३--भगवान श्रीकृष्ण---[२]नामकरण संस्कार आणि बाललीला ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ | गर्गः पुरोहितो राजन् यदूनां सुमहातपाः | व्रजं जगाम नन्दस्य वसुदेव प्रचोदितः ||१|| अर्थः---श्रीशुक्राचार्य म्हणाला-हे राजा, महातपस्वी जो गर्गमुनी तो यादवांचा पुरोहित होत; म्हणून पुत्रांचच्या नामकरणाकरिता वसुदेवाने त्यास सुचविले असता, तो ऐकेवेळी नंदाच्या गोकुळात प्राप्त झाला.||१|| अर्थः---त्याला पाहताच अत्यंत संतुष्ट झालेल्या नंदाने, उठून उभे राहुन त्यास हात जोडीले आणि हा मुनी साक्षात विष्णूच आहे अशा बुद्धीने नमस्कारपूर्वक त्याची पूजा केली.||२|| भावार्थ:---गर्गाचार्यांना पाहून नंदाबाबांना फार आनंद झाला,कारण ते ब्राह्मण होते.त्याचप्रकारे आपणास ब्राह्मण—संत—महात्मा यांना पाहून आनंद वाटावा.आपल्या घरी गर्गाचार्यांना आलेले पाहून नंदाबाबा उठून उभे राहिले.त्याचप्रकारे आपल्याकडे ब्राह्णन—संत—महात्मा आलेले पाहून आपण उठून उभे राहावयास पाहिजे.त्यानंतर त्यांचा चरणांना वंदन करून त्यांना भगवत्स्वरूप मानून त्यांची पूजा केली.त्याचप्रकारे आपणसुद्धा त्यांच्या चरणांना वंदन करुन त्यांना भगवत्स्वरूप समजून त्यांची पूजा करावी.||२|| | सूपविष्टं कृतातिथ्यं गिरा सुनृतया मुनिम् | नन्दयित्वाब्रवीद् ब्रम्हन् पूर्णस्य करवाम किम् ||३|| अर्थः---नंतर आतिथ्य सत्कार केलेला तो मुनी आसनावर स्वस्थपणे बसला असता, त्याला मधुर वर्णाने आनंद देऊन नंद म्हणाला कि,-हे ब्रह्मनिष्ठा, पूर्णमनोरथ अशा आपली, आम्ही कोणती सुश्रुषा करावी?||३|| अर्थ:---अंतमी जर पूर्ण मनोरथ आहे तर तुझ्या घरी कसा आलो? असे म्हणशील तर- हे सर्वज्ञा आपल्यासारखा थोरांचे आपल्या आश्रमातून दुसऱ्याजे गहरी जाने बहुश:गह्डताच नाही. जर कदाचित घडले तर ते त्या दिनचीत्त गृहस्थाश्रमि लोकांचे कल्याण करण्यासाठी असते, त्याखेरीज आपल्या स्वार्थाकरिता नसते. ||४|| भावार्थ:--- संत—महात्मा स्वत: मनाने किंवा बोलावल्यानंतर येणे हे आपल्या भ्ग्याचे लक्षण आहे.वास्तविक पाहता लोकांच्या काल्यासाठीच अव्याहत त्यांचे कार्य निरंतर चालूच असल्यामुळे ते व्यग्र—व्यस्त असतात.म्हणून त्यांना येणे कठीण असते.म्हणून ते आले ते आपले भाग्य आहे.भाग्य उदयास येण्यासाठी निष्काम धर्मानुसार आचरण केले असता भाग्य उदयास येते.||४|| अर्थः---आता त्याला मुलांचे नामकरण करण्यास सांगण्यासाठी त्याच्या ज्ञानाचा अतिशय सांगतो- हे गर्गऋषे, इंद्रियांना होत नसलेले ज्ञान ज्यापासून प्राप्त होते. ते ज्योती:शास्त्र तू स्वत: रचिले आहेस. ज्या ज्योती:शास्त्राच्या योगाने पुरुषाला, भूतभविष्य ज्ञान समजते.||५|| दिनांक:-२३\८\१९||वार:- ||शुक्रवार||देवकी|| | त्वं हि ब्रम्हविदां श्रेष्ठः संस्कारान् कर्तुमर्हसि | बालयोरनयोर्नृणां जन्मना ब्राह्मणो गुरुः ||६|| अर्थः---असा तू ज्योतिषी असून मंत्रवेत्तत्यांमध्येहि श्रेष्ठ आहेस, त्यापेक्षा या दोन्ही बालकांचे नामकरनादिक संस्कार करण्याची कृपा करावीस. आता हे गुरुचे कृत्य आहे असे म्हणशील तर- ब्राह्मण हा जन्मातच सर्व मनुष्याचा गुरु आहे.||६|| भावार्थ:--- आपण ब्रह्मवेत्यात श्रेष्ट आहात,म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकारनादि संस्कार आपणच करावेत.आपणसुद्धा नामकारनादि संस्कार ब्रह्मवेत्याकडून करून घ्यावावयास पाहिजेत.ते धर्मानुसार योग्य आहे,ब्रह्मवेत्य ब्रह्मण गुरु असतो.||६|| अर्थः---याप्रमाणे भाषण करून अतिउत्साहयुक्त झालेल्या नंदाला हे गुप्तरीतीने केले पाहिजे अशा अभिप्रायाने निषेध करीत गर्ग म्हणाला- हे नंदा, मी यादवांचा आचार्य म्हणून सर्व काल पृथ्वीवर प्रसिद्ध आहे, यास्तव मी संस्कार केलेल्या तुझ्या पुत्राविषयी कंस आपल्या मनात, हा देवकीचाच पुत्र आहे अशी कल्पना करील||७|| अर्थ:---आता कदाचीत यादवांचा पुत्र आहे असे जाणो, परंतु हा वसुदेवाचाच त्यात देवकीचेठिकाणीच झालेला असे कसे जाणेल? असे म्हणशील तर- तो पापबुद्धी कंस, तुझा शत्रू खोठेतरी झाला आहे असे देवकीच्या कन्येचे भाषण ऐकून, देवकीचा आठवा गर्भ स्त्री होण्यास योग्य नाही असे मनामध्ये नित्य चिंतन करून साधारणपणे देवकीचा पुत्र कोठेतरीआहे असे जनात आहे. त्यात मी संस्कार केला यावरून तोच हा असा निश्र्चय करून त्याने जर तुझ्या मुलास मारिले तर तो आमचा मोठा अन्याय होईल||८-९|| अर्थ:---नंद म्हणाला- हे ऋषिवर्या, असे जर आहे तर माझा जवळच्या पुरुषातही न पाहिलेला तू, या गोकुळामध्ये एकांतस्थळी पुण्याहवाचनपूर्वक या रामकृष्णाचा, द्वीजातींना (ब्राह्मणक्षत्रियवैश्यांना) आवश्यक असलेला संस्कारमात्र कर, मोठे विस्तृत अनुष्ठान करू नकोस||१०|| अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे राजा, याप्रमाणे प्रार्थना केलेल्या त्या गर्गमुनीने, गुप्तपणे आपणास इच्छीत असलेलेच ते बालकांचे नामकरण,एकांतस्थळी केले.||११|| | एवं सम्प्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितमेव तत् | चकार नामकरणं गूढो रहसि बालयोः ||११|| अर्थः---गर्ग म्हणाला- हे नंदा, हा रोहिणीचा पुत्र, आपल्या पालनपोषणादिक गुणांनी संबंधिजनांना रमविल म्हणून हा आपणच राम या नावाने प्रख्यात होईल. हा लोकांपेक्षा अधिकबली असल्यामुळे याला बल असे म्हणतील.तसाच काहीएक कारणाने यादवांमध्ये कलह उत्पन्न झाला असता हा त्यांना सच्छीक्षण देऊन त्यांची एकी करील म्हणून याला संकर्षण असे म्हणतील.||१२|| अर्थः---हे नंदा, युगयुगाचेठिकाणी देहधारण करणाऱ्या ह्या तुझ्या मुलाचे पांढरा, तांबडा व पिवळा असे तीन दुसरेही वर्ण आहेत. आता तर हा कृष्णत्व पावला आहे, म्हणून याचे कृष्ण असे नाव पडेल.||१३|| अर्थः---हा शोभायुक्त तुझा पुत्र, पूर्वी केव्हातरी वसुदेवाचा पूत्र झाला होता म्हणून याचे दुसरे नाव वासुदेव असे नाव पडेल||१४|| | प्रागयं वसुदेवस्य क्वचिज्जातस्तवात्मजः | वासुदेव इति श्रीमानभिज्ञा: सम्प्रचक्षते ||१४|| अर्थः---या तूझ्या पुत्रांची गुणांना योग्य अशी- ईश्र्वर, सर्वज्ञ इत्यादिक व कर्मांना योग्य अशी गोवर्धनोद्धरण इत्यादिक पुष्कळ नावे आणि रूपे आहेत ती सर्व मीही जाणत नाहीत.||१५||--दिनांक:-२४\८\१९||वार:-शनिवार||देवकी|| अर्थः---गोपांच्या व गाईच्या कुळाला आनंद उत्पन्न करणारा हा पुत्र तुमचे कल्याण करील. याच्या योगाने तुम्ही सर्व संकटे अन्यायासाने तरुण जाल.||१६|| भावार्थ:--- भगवंतांना नावे अनेक आहेत.भगवंतांची नावे गुणानुसार व कर्मानुसार आहेत.आपणही योग्य नावे ठेऊन,त्यानुसार गुण व कर्मे करावीत.सर्वसामान्यांनी असे जाणून,त्यानुसार कार्य करावीत.नावानुसार कर्मे न केली न ते मुळीच योग्य नाही.||१५|| अर्थ:---हे गोकुलाधीपते नंदा, पूर्वी जेव्हा वेनराजा मरण पावला तेव्हा चोरांनी पिडीत झालेले साधु, याने पृतूरूपानेच रक्षण केले व वाढविले साल्यामुळे त्यांनी त्या चोरांना जिंकून टाकिले होते.||१७|| भावार्थ:--- हा बालकृष्ण तुमचे परम कल्याण म्हणजे जन्म—मरण निवृत्त करून सुखरूप करेल.त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख आहे,त्याने कुटुंबातील जे सदस्य आहेत,त्यांचे व्यावहारिक धर्मानुसार कल्याण करावे.गोप आणि गायींना आनंदित करील.आपणसुद्धा आपले उत्पन्नाचे जे साधन आहे,त्याच्याकडे लक्ष देऊन आनंदीत करावेत.कृष्णांच्या साह्याने मोठमोठ्या संकटातूनअगदी सहज पार पडाल.त्याचप्रमाणे आपणसुद्धा मोमोठ्या संकटातू कुटुंबप्रमुखाच्या साह्याने सहज पार पडावे.||१६|| अर्थः---जे महाभाग्यवान मनुष्य ह्याचेठिकाणी प्रीती करितात त्यांचा शत्रू पराभव, जसे दैत्य, विष्णूने रक्षन केलेल्या देवांचा पराभव करीत नाहीत त्याप्रमाणे करीत नाहीत||१८|| भावार्थ:--- एकदा पृथ्वीवर राजा नाव्हता,तेव्हा डाकुंनी पिडा दिलेल्या सज्जनांचे भगवंताने—श्रीकृष्णने रक्षण केले होते.तसे आपण जे लोक संकटात पडलेले आहेत त्यांना साह्य करून संकटातून सोडावयास पाहिजे.हा आपला स्वधर्म आहे.भगवंतांची भक्ती करून यांना लुटारूवर विजय मिळवला होता,तसेच आप भगवंतांची भक्ती करून म्हणजे इतरांचे दु:ख कमी करून सुख दिले असता, भगवंत आपल्यावर आलेले संकट दूर करून सुख देतो.म्हणून आपण भगवंतांची भक्ती करावी.त्यात आपले हित आहे.||१७|| अर्थः---तस्मात हेनंदा, हा तुझा पुत्र, गुणांनी, ऐश्र्वार्याने, कीर्तीने व पराक्रमाने केवळ नारायणासारखा आहे म्हणून तू याचे सावधाणपणे रक्षण कर.||१९|| भावार्थ:--- जे भाग्यवान पुरुष भगवंतांवर प्रेम करतात म्हणे निष्काम भक्ती करतात,त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपणही भगवंतांची निष्काम भक्ती केली तर आपले संकट भगवंत दूर करतात,म्हणून निष्काम भक्ती करावी.||१८|| अर्थः---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे राजा, याप्रमाणे नंदाला सांगून गर्गमुनी, आपल्या घरी निघून गेला असता, परमसंतोष पावलेल्या त्या नंदाने आपले मनोरथ पूर्ण झाले असे मानिले ||२०|| अर्थः---आता बलरामासहित श्रीकृष्णाने, गोकुळामध्ये बालक्रीडासंबंधी अनेकप्रकारचे चमत्कार करून नंदाला व यशोदेला जो परम आनंद उत्पन्न केला त्याचे वर्णन करितो- नामकरण झाल्यावर थोडाच काळ निघून गेला असता, राम आणि कृष्ण हे दोघेही गोकुळात हातासह गुढघ्यांनी रांगत विहार करू लागले.||२१|| भावार्थ:--- अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत गेले.त्यांचे म्हणणे ऐकून नंदाला आनंद झाला.आपणासही आपल्या मुलांचे गुण ऐकून आनंद वाटत असतो.म्हणून मुलांनी आपल्या आई—वडिलांना आनंद वाटावा म्हणून आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी त्या मुलांनी आचरण स्वधर्मानुसार करावे लागते,तेव्हा गुणांत वाढ होते.||२०|| | कालेन व्रजताल्पेन गोकुले रामकेशवौ | जानुभ्यां सह पाणिभ्यां रिङ्गमाणौ विजन्ह्तु: ||२१|| अर्थः---ते रामकृष्ण, पुढे हात टाकून रंगताना दोन्ही पाय ओढीत गोकुळातील गोमुत्रादिकांच्या कर्मदामध्ये, कंबरेत व पायात घातलेल्या भूषणास लावलेल्या घागऱ्यांच्या स्पष्ट होणाऱ्या नादाने मनोहरसंचार करीत असून, त्या घागऱ्यांच्या नादाने ज्याचे मनहर्षयुक्त झाले आहे असे ते, मनुष्यलोकाला अनुसरून कोणी परकी मनुष्यादिक दृष्टी पडेले म्हणजे आज्ञानाप्रमाणे भ्याल्यासारखे होऊन आपल्या माताजवळ परत येत असत.||२२|| अर्थः---त्यावेळी त्यांच्या माता (रोहिणी व यशोदा) कृपेने ज्यांचेस्तन दुधाने पूर्ण बहरून गळू लागले आहेत आशा होत्सात्या, चिखलाची उटी लागल्यामुळे सुदर दिसणाऱ्या त्या आपल्या पुत्रांना बाहूंनी कवटाळून घेऊन त्यांच्या मुखात स्तन देऊन ते स्तनपान करीत असता, मंदहास्यसहित व लहान लहान दंतांनी युक्त असे त्यांचे मुख अवलोकन करून मोठा आनंद पावत असत.||२३|| अर्थः---पुढे ते रामकृष्ण, गावांतील स्त्रियांना बाललीला दृष्टीस पडण्याजोगे मोठे झाले. तेव्हा ते गोकुळातील वासरांची पुच्छे घट्ट धरीत असत; मग पुच्छे ग्रहण केलेल्या वासरांनी जिकडे तिकडे ओढीत नेलेल्या त्या रामकृष्णांना पाह्णाऱ्या गोकुळातील स्त्रिया, आपापल्या घरांतील करावयाची कामे सोडून देऊन्म तो चमत्कार पाहून हसत असता फारच आनंद पावत असत.||२४|| अर्थः---त्या राम कृष्णाच्या माता (रोहिणी व यशोदा) जेव्हा गाई म्हशीवगैरे शिंगांच्या जनावरांपासून, अग्नीपासून, कुत्री डुकरेवगैरे जनवरांपासून, तलवार, कुऱ्हाडीवगैरे हत्यारांपासून, पाण्यांपासून, कावळे गिधाडवगैरे पक्ष्यांपासून व कुपनच्यावगैरे काट्यानपासून, अतिचपळ आणि खेळकर असह आपल्या मुळांचे निवारण करण्याविषयी व घरातील कामे आटशेपण्याविषयी समर्थ होईनात तेव्हा त्याच्या मनची अगदी धांदल होऊन जात असे राजा, घरच्या सौख्याची पराकाष्ठा कायती हीच होय. ||२५||दिनांक:-२५\८\१९||वार:-रविवार||देवकी|| भावार्थ:---मुलबाळ खोडकर असतील तर माताचे लक्ष घरकामात न लागता द्विधातावस्थेत राहते.त्यामुळे त्या आपले काम व्यवस्थित करू शकत नाही.तरी पण मातांनी आपले लक्ष मुलाबाळात ठेवणे जरुरी असते.मुलाबाळांनी खोड्या कमी कराव्यात.||२५|| | कालेनाल्पेन राजर्षे रामः कृष्णश्च गोकुले | अघृष्टजानुभिः पद्भिर्वीचक्रमतुरन्जसा ||२६|| अर्थः---हे राजर्षे, पुढे थोड्याच काळाने गोकुळामध्ये राम आणि कृष्ण हे दोघेही रंगावयाचे सोडून देऊन पायांनी आधाराशिवाय सहज्चाळू लागले.||२६|| अर्थः---नंतर जो भगवान श्रीकृष्ण, बलरामासहवर्तमान गोकुळातील सवंगड्या बालकांना बरोबर घेऊन गोकुलवासी स्त्रियांना हर्ष उत्पन्न करीत असता क्रीडा करू लागला.||२७|| | कृष्णस्य गोप्यो रुचिरं वीक्ष्य कौमारचापलम् | शृण्वत्याः किल तन्मातुरिति होचुः समागताः ||२८|| अर्थः---तो कुष्णाचा कुमारवस्थेसंबंधी सुंदर चपलपणा (खोड्या) पाहून नंदाच्या घरी आपआपल्या घराहून एकत्र मिळून आलेल्या गोपी, त्या कृष्णाची आई यशोदा श्रवणाकरिता असता असे तिला स्पष्ट सांगत असत की||२८|| अर्थः---हे यशोदे, तुझा पुत्र, एखादेवेळी दुध काढण्याची वेळ झाली नसताही आमचे वत्स सोडून देतो, त्याच्यायोगाने ते वत्स सर्व दुध इतात त्यामुळे आमची मोठी हानी होते. बरे त्या सोडलेल्या वात्सांना धरण्याकरिता घरांतील लोक धाऊ लागले म्हणजे रिकाम्या घरात शिरून आमचे चांगले असलेले दही दुधवगैरे आम्ही न देताच चोरून खातो. अरे, या कृष्णाला ताडन करा, बांधून ठेवा, असे बाह्य दाखविण्याकरिता ओरडले तर हसू लागतो, ती नाही. दही, दुध, लोणीवगैरे पदार्थ उंचावर ठेविले असता ते चोण्याचे उपाय करितो. आपणच खातो. असे नाही तर आपण खाण्याच्या पूर्वी ते माकडांना वाटून देतो; परे त्या माकडांमध्ये तृप्त झालेल्या एखाध्या माकडाने जर दही वगैरे खाल्ले नाही तर ते त्याचे बहरलेले भांडे फोडून टाकितो बरे घरात दहीवगैरे ठेविले नसल्यामुळे त्याला मिळाले नि तर, मी यांची गहरे जाळून टाकितो असे म्हणून रागावून पर्यंकादिकांवर निजविलेल्या मुलांना चिमटे काढून उठवून रडवून जातो. तो कदाचित घरे जाळील या भयाने आम्हास घरातदहीवगैरे ठेवावे लागते.||२९|| भावार्थ:--- गाईची धार काढण्याची वेळ झाली नसतांना हा वासरांना दुध पिण्यासाठी सोडून देतो,कारण वास्तविक पाहता गाईचे दुध मुख्यता वासराचे असते.आपण—मानव अतिरेक करून स्वत: खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी त्याचा उपयोग घेतो.त्यामुळे त्या वासरांची उपासमार होते.त्यामुळे ते उपासी राहतात.म्हणून भगवंत वासरांना त्यांची उपासमार होऊ नये,म्हणून सोडत असत.||२९|| अर्थः--- चोरण्याचे उपाय असे की,- कोणत्या बह्न्द्यात कोणता चांगला पदार्थ ठेवलेला आहे ते जाणणारा तुझा मुलगा दहीवगैरे पदार्थ, उंच शिक्यावर ठेवलेले असल्यामुळे हासत येण्यासारखे नसल्यास ते खाली पाट उखळीवगैरे रचण्याचा उपाय करितो. तथापि, जर ती भांडी खाली उतरण्यास अवघड असली तर कोयतीवगैरे घेऊन त्याना छिद्रे पाडितो, ती तरी धारा अचूक बाळकांच्या तोंडात पडत असला तर अनेकतेजस्वी रत्ने दहार्ण केलेले आपले शरीरच पदार्थांना प्रकासः करणारे करितो. मिळून ज्या काळी गोपी आपल्या घराच्या कामांमध्ये चित्ते असला त्यावेळी तो असे उपद्रव करितो.||३०|| भावार्थ:--- गोपींना दानधर्म घडावा म्हणून,भगवंत त्यांचे दुध,दही इतर गोपाळांना देत असत.गोपी जेव्हा घरकामामध्ये व्यग्र असत,तेव्हा भगवंत दही—दुधाच्या खोड्या करत असे.म्हणजेच प्रपंच्यातील वेळ काढून आपण परमार्थ करावा लागतो.||३०|| अर्थः---आणि देवपुजा स्वयंपाकवगैरे करण्याकरिता चांगले सारवून झाडून ठ्वलेल्या घरांमध्ये मुत्रपुरी शोत्सर्गादिक करितो. असेच दांडगेपणाचे प्रकार करितो. अशा प्रकारच्या चोरट्या उपायांनी विलाक्ष्ण कर्मे करूनही तुझ्या जवळ येऊन बसला की जसा एखादा साधुच तसा राहतो. याप्रमाणे गाऱ्हाणी सांगण्याच्या निमित्ताने भयभीत झालेल्या नेत्रांनी युक्त असल्यामुळे सुशोभित असलेल्या श्रीकृष्णाच्या मुखाचे अवलोकन करणाऱ्या त्या गोपींनी गाऱ्हाणी सांगितलेलीती यशोदा, हास्ययुक्त मुख झाली आणि तिने कृष्णाची निंदावगैरे करावी असे मनात आणिले नाह्ही.||३१|| भावार्थ:---एवढ्या खोड्या करून भगवंत त्या खोड्याचा आपला संबंध नाही,असे दाखवत असे.तसे आपण संसारात राहून अलिप्त असावे.संसारातील विषयांकडे दुर्लक्ष करून,त्याविषयी उदासीन भावना असावयास पाहिजे.संसार आसक्ती नसावी.||३१|| | एकदा क्रीडमानास्ते रामाद्दा गोपदारका: | कृष्णो मृदं भक्षितवानिति मात्रे न्यवेद्यन् ||३२|| अर्थः---एकेवेळीव काही अपराधप्रसंगी तिने मनात आणिले होते परंतु तेव्हा तर मोठेच आश्र्चर्य झाले. ते असे की, खेळत असलेल्या त्या बलरामादिक गोपबालकांनी यासाहोदेजवळ येऊन तिला कृष्णाने मृत्तिका बह्कासःन केले असें कळविले||३२|| अर्थः---तेव्हा त्याच्या हिताची इच्छा करणाऱ्या त्या यशोदेने कृष्णाला हाती धरिले आणि निर्भत्सना करून, भयाने चपळपने पाहणाऱ्या नेत्रांनी युक्त अशा ती म्हणाली की,-||३३|| भावार्थ:--- भागवनतांच्या मित्रांनी व बलरामदादांनी आईला सांगितले कि कृष्णांनी माती खाल्ली आहे.त्यामुळे याशोडला कृष्णाने माती खाणे पटले नाही.कारण माती हि शरीरास अपाय करते.म्हणून याशोदाणे त्यास रागावून विचारले---||३२|| अर्थः---हे चपलगात्रा कृष्ण, तू एकांती मृतिका काय म्हणून भक्षण केलीस? तुझे हित इच्छिणारे हे बालक सांगत आहेत पहा! तसाच तुझ्या पूर्वी झालेले हा रामही सांगत अआहे.||३४|| अर्थ:---तेवह कृष्ण म्हणाला- हे माते, मी मृतिका भक्षण केली नाही. हे तर सर्वजण खोटे सांगत आहेत. जर हे खरे सांगतात असे तुला वाटत असेल तर तू माझे मुख प्रत्यक्ष पहा.||३५||दिनांक:-२६\८\१९||वार:-सोमवार||देवकी-- भावार्थ:--- काय रे खोडसाळा! तु कोणाला नकळत माती का खाल्ली?तुझे मित्र व बलरामदादा सांगत आहे कि,”तु माती खाल्ली”. माती खाणे हा दोष आहे.मातीमुळे शारीरिक रोग होतात,म्हणून माती खाऊ नये.तुला आता शिक्षा करावी लागते.मुलांनी अपराध केला असता,त्याने पुन्हा अपराध करू नये म्हणून त्यास शिक्षा करावयास पाहिजे,न शिक्षा केल्यास अपराधात वाढ होते.||३४|| अर्थः---बरे, असे जर आहे तर आपले मुख पसरून दाखीव. असे तीने सांगितले असता क्रीडेकरिताच मनुष्यबालक झालेला परंतु अखंडितऐश्र्वर्य अशा त्या भगवान श्रीकृष्णाने, आपलेम मुख पसरिले ||३६|| अर्थः---तेव्हा यशोदेने त्या पसरलेल्या मुखामध्ये जग पहिले. ते असे कि,- स्थावर अंतरीक्ष लोक,दिशा, पर्वत, द्वीपे व समुद्र ह्यांसहित भूलोक; प्रवह्नामक वायू, विध्युद्र्पी अग्नी, चंद्र व तारे ह्यांसहवर्तमान स्वर्गलोक; उदक तेज, वायू व आकाश, सात्विकाहंकारापासून झालेले देव आणि मन, राजसाहंकरापासून झालेले शब्दादिक विसःय व तीन गुण:या प्रमाणे मुलाच्या लहान शरीराचेठिकाणी त्यामध्येहि पसरलेल्या लहानशा मुखामध्ये, जीव, काळ, स्वभाव, कर्म व अंत:करण, यांच्या योगाने स्थावरजंगमशरीरांच्या निरनिराळ्या भेदांनी भरलेले हे विचित्र जग एकदम पाहून, त्यात एका प्रदेशामध्ये आपणासहित गोकुल पाहून ती यशोदा, मनामध्ये अशी शंका पावली की,- ||३७-३८-३९|| भावार्थ:---आईला भगवंतांच्या मुखामध्ये हे सर्व विश्व आणि स्वत:सह सारे गोकुळ श्रीकृष्णांच्या उघडलेल्या महानष मुखात दिसले.यशोदा साशंक झाली.तिला कांहीच कळेना.हे मी पाहत आहे,ते काय आहे,हे याच्या तोंडात असे सामावले असेल?||३७—३९|| अर्थ:---जे मी पाहिलेते काय स्वप्न आहे! नंतर आपण जागृत आहे असे ठरवून म्हणत्ये हि हरीची माया आहे काय! किंवा हा माझ्याच बुद्धीला काही मोह उत्पन्न झाला आहे काय! अथवा या माझ्या मुलाचेच हे काहीतरी अचिंत्य स्वाभाविक ऐश्वर्य आहे!||४०|| भावार्थ:---हे जे मी पाहत आहे हे स्वप्न आहे? कि भगवंतांची माया ? माझ्या बुद्धीत कांही भ्रम म्हणजे आहे एक व वाटते दुसरे? का या मुलातच जन्मत: कांही योगसिद्धी आहे काय?असे अनेक प्रश्न तिला निर्माण झाले.ती हातास झाली,कांही कळेना.||४०|| अर्थः---असे अनेक तर्क करून शेवटचा पक्ष स्विकारून म्हणत्ये- ज्या परमेश्र्वरापासून, चित्त, मन, कर्म आणी वाणी यांच्यायोगाने अनायासाने तर्क करण्यास अशक्य असे, ज्याचा आश्रय असलेले हे जग, ज्याच्या योगाने, ज्या बुद्धीपासून प्रतीतीला येते, त्या परमेश्र्वराच्या अत्यंत अशा चरणाप्रत मी नम्र (शरणागत) आहे.||४१|| भावना:---याशोडला मातेला कांही कळेना,म्हणून तिने भगवंतांचा धावा केला.सत्ता सर्व भगवंतांचेच असे तिला वाटू लागले.||४१|| अर्थः--- मी यशोदा,ह्या नंदाच्या सर्वप्रकारच्या द्रव्याने रक्षण करणारी भार्या आहे, हा नंद माझा पती आहे, हा कृष्ण माझा पुत्र आहे, गोधनासाहित सर्व गोपी व गोप हे माझे व (परिवार ) आहेत; याप्रमाने ज्याच्या मायेने मला कुस्तीत बुद्धी उत्पन्न झाली तोच भगवान माझी गती (मायेपासून रक्षण करणारा) असो.||४२|| भावार्थ:--- शरीर मी आहे व शरीरासंबंधी माझे आहेत.असी जी भावना त्यास कुबुद्धी असे म्हणतात.कुबुद्धी हि दु:खास कारण असते व सुबुद्धी म्हणजे शरीर मी नाही व शरीरासंबंधी माझे नाहीत,यास सुबुद्धी असे म्हणतात,हि सुखाला अरण असते.म्हणून जीवांनी कुबुद्धी घालवावी व सुबुद्धी संतांची संगती करून आणणावी.म्हणून आपण भगवंतांचा आश्रय घ्यावा,कारण सत्ता त्यांची आहे.||४२|| | इत्थं विदितततत्त्वायां गोपिकायां स ईश्वरः | वैष्णवीं व्यतनोन्मायां पुत्रस्नेहमयीं विभुः ||४३|| अर्थः---याप्रमाणे त्या यशोदा गोपीला तत्वज्ञान झाले असता, ईश्र्वर व सर्वसमर्थ अशा त्या श्रीकृष्णाने तिच्यावर पुत्रसहस्त्ररूप आपली वैष्णवी माया पसरली||४३|| भावार्थ;---अशा प्रकारे भगवंतांनी यशोदेला ईश्वरी—परमात्मा तत्वाचे ज्ञान दिले.त्यानंतर लागलीच पुत्रस्नेहरूप वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयात संचार केला,कारण तीची देहातीत अवस्था झाली होती,म्हणून देहावर आणण्यासाठी—पुत्रस्नेह उत्पन्न होण्यासाठी योगमायेचा संचार केला.त्यामुळे त्यानंतर ती बालाकृष्णास भगवंत भावाने न पाहता पुत्रभावाने पाहू लागली.||४३|| अर्थः---तेव्हा तत्काळ जिचे पूर्वीचे ज्ञान नष्ट झाले अआहे अशी ती यशोदा, पुत्राला मांडीवर घेऊन जशी पूर्वी स्नेह वृद्धिंगत झालेल्या चित्ताने व्याप्त होती त्याप्रमाणे पुन्हा झाली.||४४|| भावार्थ:--- भगवंतांनी योगमायेचा हृदयात संचार केल्यामुळे यशोदेस विश्वदर्षणाचा विसर पडला.त्यानंतर बालाकृष्णास पुत्रभावाने तिने प्रेमाने उचलून मांडीवर घेतले.तिच्या हृदयात पूर्वीप्रमाणे प्रेमाचा पान्हा फुटला.प्रेमदृष्टीने बालाकृष्णाकडे पाहू लागली.||४४|| अर्थः---आता मायाबालकाचा उद्रेक सांगतो- कर्मकांडरूप असलेल्या ऋग्वेद, यजुर्वेदव सामवेद यांनी इंद्रादिरूपाने, उपनिषद्भागांनी, ब्रह्मरूपाने, संख्याशास्त्रांनी पुरुषरुपाने व पंचरात्रदि वैन्वतंत्रांनी भगवद्रूपाने, ज्याचे महात्माय गायन केले आहे त्या श्रीहरिला त्या यशोदेने आपला पुत्र, आहे असे मानिले||४५||दिनांक:-२७\८\१९||वार:-मंगळवार||देवकी--- अर्थः---राजा म्हणाला- हे ब्रह्मनिष्ठा, नंदाने भगवंताच्या बाललीलेचे अनुभवरूप मोठे फळ देणारे असे जन्मांतरी कल्याणाचे साधन काय केले होते? तसेच ज्याच्या तृप्तीविषयी याज्ञादिकाही समर्थ नाहीत, त्या हरीने जिचे स्तनपान केले आहे, त्या महाभाग्यवती यशोदेनेहि कल्याणाचे साधन काय केले होते?||४६|| अर्थः---म्हणजे ज्यांना प्रसन्न झालेंला भगवान अवतीर्ण झाला त्या देवकीवासुदेवांनीही कृष्णाच्या, ज्या उदार बालचरित्राचा अनुभव घेतला नाही, मोठमोठ ज्ञानी ज्याचे अजूनही गायन करितात आणि जे श्रोतेवगैरे लोकांच्या पापांचे नाश करणारे आहे त्या बालचरित्राचा ज्या नंदाने व यशोदेने अनुभव घेतला त्यांनी पूर्वी पुण्य काय केले होते.?||४७|| भावार्थ:---भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या,त्या पवित्र आहेत,कारण भगवंत पवित्रातले पवित्र आहेत.म्हणून आपण त्यांच्या त्या बाललीला संत—महात्म्यांच्या मुखातून श्रवण कराव्यात त्यामुळे आपण पवित्र होतोत.तसेच आपले पाप—ताप नाहीसे होतात किंवा अशुद्ध झालेले अंत:करण शुद्ध होते.संत—महात्म्ये भगवंतांच्या लीलांचे गायन करतात,कारण त्यामुळे त्यांचा साक्षात्कारही होऊ शकतो.म्हणून आपणही त्यांचा लीला श्रावण कराव्यातकारण त्यामुळे आपणासही साक्षात्कार होऊ शकतो.जन्म—दाते जे वसुदेव--यशोदा त्यांना या बाललीला पाहावयास न मिळता नंद—यशोदा मात्र तो आनंद लुटत आहेत.कारण ज्याच्या—त्याच्या प्रारब्धचा व प्रयत्नाचा हा भाग असतो.आजचे प्रारब्ध हे पूर्वजन्मातील योग्य प्रयत्नाचे फळ असते.म्हणून आपण मनुष्य देहात असतांना धर्मानुसार आचरण करून,कांही पुण्याई करून संचीतातले कर्म जमा करावयास पाहिजे.त्यातच हित असते.||४७|| अर्थः---श्रीशुक्राचार्य म्हणाला- हे राजा, अष्टवसूंमध्ये परमश्रेष्ठ असा जो द्राननामक वासू, तो आपल्या घरानामक स्त्रीसहवर्तमान ब्रह्मदेवाच्या गोपालनादिरूप आज्ञांचा स्वीकार करीत असता त्यास म्हणाली की,||४८|| अर्थः---आम्ही उभयंता तुझी आज्ञा मान्य करितो परंतु भूमीवर झालेल्या आह्यां उभयंताना, देवाधीपती विश्र्वनियंत्या श्रीहरीचेठिकाणी अशी उत्कृष्ट भक्ती प्राप्त व्हावी की, जिच्या योगाने संसारात असलेल्या जनाने अनायासाने संसारदु:ख तरुण जावे (मुक्त व्हावे)||४९|| भावार्थ:---त्यांनी ब्रह्मदेवांना मागणी केली कि,भगवंतांवर आमची अनन्य भक्ती निर्माण होवो.अनन्य भक्ती म्हणजे भगवंता--- व्यतिरिक्त अन्य कोणावर निष्ठा नसणे.थोडक्यात अनेकवार निष्ठा न ठेवता एकावरच निष्ठा असणे.अशा अनन्य निष्ठेमुळे संसारसागर सहजपणे तरुण जाऊ शकतो.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊ शकतो.म्हणून आपणही अनन्य निष्काम भक्ती करून आपले जे साध्य जन्म—मरण निवृत्त होण्यासाठी प्रयत्न करून सुखरूप होण्याचा प्रयत्न करावा.||४|| अर्थः---नंतर ब्रह्मदेवाने बरे तसे असो असे म्हटले असता तो द्रोनवसु, गोकुळात उत्पन्न झाला, तोच ऐश्र्वर्यादिगुणयुक्त महायशस्वी नंद या नावांने प्रसिद्ध झाला आणि त्याची पत्नी जी घर ती यशोदा झाली.||५०|| भावार्थ:--- ब्रह्मदेव:---ब्राम्हदेवांनी त्यांना आपल्या मागणीनुसार भगवंतांवर अनन्य भक्ती उत्पन्न होईल असा आशीर्वाद देऊन,”ठीक आहे.” असा होकार दिला.आपणही भगवंतांची भक्ती केली तर आपणासही अशा प्रकारचा किंवा अन्य आशीर्वाद मिळू शकतो.आपणास मात्र त्यांच्यासारखी भक्ती करावी लागते.द्रोण आणि धरा म्हणजेच व्रज येथील नंदाबाबा आणि यशोदा नावाने जन्मास आले.||५०|| अर्थः---हे राजा, त्या ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने इतर गोपगोपिंपेक्षा त्या यशोदानंदाची पुत्रत्वाने उत्पन्न झालेल्या जनार्दन भगवंताचेठिकाणी पराकाष्ठेची प्रीति होती.||५१|| भावार्थ:---भगवंतांनी त्यांच्या तपामुळे व भगवंतांनी दिलेल्या शब्दामुळे भगवंत त्यांचे पुत्र झाले.त्यामुळे त्यांचे नंदाबाबा व यशोदाचे अधिक प्रेम बालकृष्णावर जडले.त्यांचा त्यांच्यावर मोह करू लागले--रूपाने त्यांना वेड लागवले.आपणास असे वेड लागावे.||५१|| | कृष्णो ब्रम्हण आदेश सत्यं कर्तुं व्रजे विभुः | सहरामो वसंश्चक्रे तेषां प्रीतिं स्वलीलया ||५२|| अर्थः---समर्थ अशा श्रीकृष्णानेही, ब्रह्मदेवाचा वर सत्य करण्यासाठी बलरामासहर्तमान गोकुळात वास करून पुत्रभावाला अनुसर्णाऱ्या आपल्या लीलेने त्या नंदादिकांना संतोष उत्पन्न केला.||५२|| भावार्थ:--- ब्रह्मदेवाचे वचन सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम यांचेसह व्रजामध्ये राहून त्यांना बाललीलांनी आनंदित अरु लागले.आपणही निष्काम भक्ती केली आपणाससुद्धा त्या व्रजात गोप किंवा गोपिका किंवा गोपाल म्हणून जन्मास येऊन व आपणास तो आनंद लुटावयास मिळेल,यात कांहीच शंका नाही.साधना मात्र त्यांच्यासारखी करावी लागेल.||५२|| याप्रमाने श्रीमद्भागवतनामक महापुरानातील दशमस्कन्धाच्या पूर्वार्धात विश्र्वरूपदर्शनकथननामक हा आठवा अध्याय समाप्त झाला.||८|| ||श्रिकृष्णार्पनमस्तु ||-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ९--- २---३--भगवान श्रीकृष्ण---[३] श्रीकृष्णाला उखळाला बांधणे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | अर्थ:---श्रीशुक्राचार्य म्हणाला- हे राजा, नंदाच्या घरी दासी पुष्कळ होत्या, त्या एकेवेळी निरनिराळ्या कामी योजल्या गेल्या असता नंदाची पत्नी यशोदा, स्वताव दह्याचे मंथन (ताक)करू लागली.||१|| -भावार्थ:---१--एकदा नंदराणी यशोदा घराच्या दासींना दुसत्या कामाला लावून स्वत: दही घुसळत होती.कारण यशोदा हि विशुद्ध वात्सल्यप्रेमांच्या व्यवहाराने षड—ऐश्वर्यशाली भगवंतानासुद्धा प्रेमाधीनता,भक्ताच्या अधीन असल्यामुळे आपल्या भक्तांच्या हाताने बांधून घेण्याचे यश देते,म्हणून तिला “यशोदा” असे म्हणतात.गोपराज नंदांच्या वात्सल्य पेमाच्या आकर्षणाने सच्चिदानंन्द- परमानन्दस्वरूप श्रीभगवान नन्दनन्दरूपाने जगतात अवतीर्ण होऊन जगतातील लोकांना आनंद प्रदान करतात.जगतांना या अप्राकृत परमानन्दाचा रसास्वादन करण्यात नन्दबाबा कारण आहेत.नन्दबाबाची गृहणी यशोदा असल्यामुळे तीस नन्दगेहिनी म्हटलेले आहे.ती स्वत: नन्दगेहिनी असल्यामुळे दघी मंथन तिने करू नये,तरीपणसुद्धा पुत्रस्नेहच्या आधिक्यामुळे तिने मनातल्या—मनात विचार केला कि.”माझा लाडका लालस माझ्या हाताने दही घुसळण करून काढलेले लोणी खाऊ घालणार,म्हणून ती स्वत: दही घुसळत होती.२—या श्लोकात भक्ताच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे.--------------------------------------------हिंदी—पाण-१७६---- अर्थः---तेव्हा दही घुसळण करत्येवेळी त्या प्रसिद्ध श्रीकृष्ण बालकाची, या लोकी पुरांदिकांमध्ये व गोकुळामध्ये जी जी गाईलेली चरित्रे तिला माहित होती त्यांचे स्मरण करून ती गायन करू लागली||२|| अर्थः---आणि जिच्या भ्रकुटी सुंदर आहेत व जिच्या केषपाशांतून मोगरीची फुले खाली गळत आहेत अशी ती यशोदा, विस्तीर्ण काटीतटाचेठिकाणी कमरपट्ट्याने बंधन केलेले रेशमीवस्त्र, पुत्रस्नेहाने दुध स्त्रवणारे कुचयुग, रज्जूच्या ओढण्याने श्रम पावलेल्या हातामध्ये चंचळ कांकणे, कानांमध्ये कुंडले व धर्मयुक्त मुख हि पाच दह्र्ण करीत असता दह्याचे मंथन करू लागली.||३||दिनांक:-२८\८१९||वार:-बुधवार||देवकी|| अर्थः---त्या दही मंथन करणाऱ्या आईजवळ स्तनसंबंधी दुध पिण्याची इच्छा करणारा श्रीहरी येऊन त्याने, दही घुसळण्याची रवी धरून, जशी तीला प्रीति वाटेल तशा अंगचालनादिक चेष्टा करीत करीत मंथनाचा निषेध केला.||४|| अर्थः---तेव्हा ती यशोदा त्याचे हास्यतुकत मुख अवलोकन करीत करीत मांडीवर बसलेल्या त्याला स्नेहाने स्त्रवणाऱ्या स्तनाचे पान करवू लागली इतक्यात चुलीवर ठेवलेले दुधफार तापून उतास जाऊ लागले तेव्हा तृप्त न झालेल्या त्या कृष्णाला तसाच टाकुन ती लगबगीने ते दुध उतरण्याकरिता निघून गेली.||५|| अर्थ:---तेवह आई पोटभर प्यावयास न देता निघून गेली म्हणून क्रोध प्राप्त झालेल्या त्या श्रीकृष्णाने, कोपाने स्फुरण पावणाऱ्या आपल्या लाल अधरोष्ठाला दातानंनी चावून वरवट्यांच्या दगडाने दह्यांचा डेरा फोडून रडण्याच्या ढोंगाणे डोळ्यात खोटीच आसवे आणीत घरामध्ये जाऊन एकांतस्थळी लोण्याचे भक्षण केले.||६|| अर्थः—इकडे यशोदेने चांगले तापलेले दुध उतरून पुन: ताक करण्याच्या जागी गेली, ती तेथे दह्याचे बहंडे फुटलेले पाहून ते कर्म आपल्या मुलाचेच आहे असे जाणिले आणि त्यालाही तेथे पाहत असता ती हसू लागली.||७|| अर्थः---नंतर तिने, पालथी घातलेल्या उखळीवर चढून शिंक्यावर असलेले लोणी यथेच्छपणे मांक दास देणाऱ्या व ज्याचे नेत्र चौर्यकर्माने आई येईल की काय म्हणून कावरेबावरे झाले आहेत अशा त्या कृष्णाला दुरून पाहून, नंतर चालताना होणारा पापांचा शब्द जसा त्याला ऐकू येणार नाही तशी हळूहळू पाठीमागून त्याच्याजवळ गेली.||८|| अर्थः---जेव्हा जिने हातात काठी घेतली आहे अशा येणाऱ्या त्या मातेला पाहून त्वरायुक्त असा तो श्रीकृष्ण, त्या उखळावरून खाली उतरून भाल्यासारखा पळू लागला. त्यावेळी, एकाग्रतेने तदाकारता पावविलेल्या व प्रवेश करण्यास योग्य झालेल्या योग्यांच्या मनालाही ज्याची प्राप्ती होत नाही त्या कृष्णाला धरण्याकरिता यशोदा त्याच्या मागून धावू लागली.||९|| अर्थः---याप्रमाणे कृष्ण्याच्या मागून धावणारी जिची गती होलनाऱ्या मोठ्या कटीपश्र्चाद्भागाच्या भाराने स्तब्ध झाली आहे, तिचा कटीप्रदेश फार सुंदर आहे व जिच्या वेगाने सुटून गेलेल्या बुचड्यातून गळलेली पुष्पे मागोमाग पाडतजात अआहेत असह त्या यशोदेने श्रीकृष्णास धरिले.||१०|| | त्यक्त्वा यष्टिं सुतं भीतं विज्ञायार्भकवत्सला | इयेष किल तं बद्धुं दान्मातद्वीर्यकोविदा ||१२|| अर्थः---आणि अपराध केलेला, रोदन करणारा, ज्यांच्यामध्ये असलेले काजळ चोहीकडे पसरले आहे अशा आपल्या डोळ्यांना हाताने चोळणारा, ताडणाच्या भीतीने वर पाहणारा आणि ज्याचे नेत्र भयाने कावरेबावरे झाले आहेत अशा त्या कृष्णाला हाती धरून ती यशोदा त्याला रेरे चोका, मी तुला असे काठीने मारीन की, तू पुनः अशा खोड्या कधीही करणार नाहीस, असे भय उत्पन्न करीत रागे भरली||११|| अर्थ:---नंतर पुत्रावर प्रेम करणाऱ्या परंतु त्यांचे सामर्थ्य न जाणनाऱ्या त्या यशोदेने, मुलगा ताडण्याच्या भयाने भ्याला आहे असे जाणून, हातांतील काठी टाकून देऊन त्याला दाव्याने बांधून ठेवण्याचे मनात आणिले.||१२|| | तदू दाम बध्यमानस्य स्वार्भकस्य कृतागस: | द्वयङ्गुलोनमभूत्तेन सन्दधेsन्यच्च गोपिका ||१५|| अर्थ:---तिचा आज्ञानिपणा असा की, बंधन म्हटले म्हणजे बाहेरून वेष्टन केलेल्या दाव्याने आत सापड्नाराचे घडते, तसेच पूर्वपश्र्चीमादिक विभाग असलेल्या वस्तूला पूर्वेकडून दावे धरून सभोवार वेढा घातल्याने होते, ते तेथे काहीच नाही असे सांगतो-ज्या कृष्णाला अंतर्भाग नाही, बाह्यभाग नाही, पूर्वभाग नाही व पश्र्चिमभागही नाही. बरे व्यापकाने व्याप्याचे बंधन घडते ते पाहू गेले असता, जगताचा पूर्व भाग, पश्र्चिम भाग (आदी व अंत) अंतर्भाग व बहिर्भाग हे सर्व जो आहे व जो जगद्रूपी आहे, त्या अव्यक्त असून मनुष्यरूप धारण केलेल्या अधोक्षज भगवान श्रीकृष्णाला, आपला पुत्र असे मानून ती यशोदा, जसा एखाध्या साधारण बालकाला त्याची आई बंधन करित्ये त्याप्रमाणे उखळाशी बांधू लागली.||१३-१४||दिनांक:-२९\८\१९||वार:-गुरुवार||देवकी|| अर्थ:---तेव्हा डेरा फोडणेवगैरे अपराध केलेल्या त्या आपल्या बालकाला ती गोपिका बंधन करूं लागली असता ते दावे दोन आंधळे कमी येऊ लागले, तेव्हा तिने त्या डाव्यांशी दुसरे दावे सात्रदले||१५|| अर्थ:---तेव्हा दोन दावी साधून जे एक दावे झाले तेही दोन आंगळे कमी येऊ लागले तेव्हा त्याच्याशी तिने तिसरे साधले, तेव्हा तेही दोन आंगळे कमी आले. पुढे चवथे पाचवे असे जे जे दावे ती संधीत असे ते तेही दोन आगळे कमी येत असे.||१६|| अर्थ:---याप्रमाणे आपल्या घरची सर्व दावी साधणारीही ती यशोदा, दोन आगळे दावे मी आल्यामुळे जेव्हा कृष्णाचे बंधन करण्यास समर्थ झाली नाही, तेव्हा तिचा प्रयत्न निष्फळ झाला असे पाहून मंदहास्य करणाऱ्या सर्व गोपीमध्ये, ती आपणही हास्य करीत असता विस्मय पावली.||१७|| | एवं संदर्शिता ह्यङ्ग हरिणा भृत्यवश्यता | स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे ||१९|| अर्थ:---तेव्हा कृष्णाने, शरीराला घाम सुटलेल्या व केसांच्या बुचुड्यातून पुष्पमाळा गळून पडलेल्या आपल्या आईला, आपणास बांधून ठेवण्यासाठी फार श्रम झाले असे पाहून, कृपेने तो आपल्या बंधनाविषयी योग्य झाला म्हणजे त्याने याशोदेकडून आपले बंधन करून घेतले. त्यावेळी नंद व रोहिणी हि तेथे नव्हती, असती तर त्यांनी यशोदेचे निवारण केले असते||१८|| | नेमं विरिन्चो न भवो न श्रीरप्यङ्गसंश्रया | प्रसादं लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात् ||२०|| अर्थ:---हे राजा, ब्रह्मादी पालकांसहित हे सर्व जग ज्याच्या स्वाधीन आहे, त्या स्वतंत्र व भक्तांचे संकट दूर करणाऱ्या श्रीकृष्णाने, याप्रमाणे आईकडून बंधन करून घेऊन भक्तवश्यता दाखवली आहे.||१९|| | नायं सुखापो भगवान् देहिनां गोपिकासुतः | ज्ञानिनां चात्मभूतानां यथा भक्तिमतामिह ||२१|| अर्थ:---आता भगवंताचा प्रसाद दुसरेंही भक्त पावतात परंतु हेतर अतिआश्र्चर्य आहें असे रोमांचसहित सांगतो-ब्रह्मदेव (पुत्र) शंकर (स्वात्मा) व हृदयाचेठिकाणी स्थान प्राप्त झालेली लक्ष्मी (पत्नी) हे तिघेही ईश्र्वरतत्वाने व कृपापत्रत्वाने प्रसिद्ध असल्यामुळे भगवंतापासून, प्रसाद पावले नाहीत असे नाही,पावले; परंतु मुक्ति देणाऱ्या भगवंतापासून त्यालाच बंधन करणाऱ्या मनोरथ पूर्ण करून घेणे हा दुर्लभ प्रसाद, जाती आचार सत्यदिकांनी हीन अशाही गोपीला प्राप्त झाला तो त्या ब्रह्मदिकांनी हि प्राप्त झाला नाही.||२०|| अर्थ:---सारांश-हा यशोदानंदन भगवान श्रीकृष्ण, या संसारामध्ये भक्तिमान पुरुषांना जसा सुलभ आहे तसा देहाभिमान तापसादिकांना किंवा भगवंताचा केवळ आत्माच अशा देहाभिमानरहित झाण्यान्नाहीसुलभ नाही.||२१|| अर्थ:---आता भक्तांनी कामात बांधलेल्याही भगवंताचे दुसऱ्याला मुक्त करण्याचे सामर्थ्य सांगतो-समर्थ अशा त्या श्रीकृष्णाने आपली माता यशोदा, आपणास उखळीला बांधून ठेऊन घरच्या घरच्या कामात आसक्त झाली असता, आपणास नंदाकडून सोडवून घ्यावे असे मनात आणून त्या नंदाला लवकर तेथे आणण्याकरिता तेथून जवळच असलेल्या अर्जुननामक जुळ्या वृक्षांकडे अवलोकन केले. ते वृक्ष, पूर्वीगुह्यकनांवाच्या देवयोनीत उत्पन्न झालेले, नलकुबर व मानिग्रीव या नावांनी प्रख्यात असे कुबेराचे पुत्र होते. ते संपत्तीने युक्त असल्यामुळे मदांग झाले असता, त्यास नारदाने शाप देऊन वृक्षयोनीत आणिले होते.||२२-२३||दिनांक:-३०\८\१९||वार:-शुक्रवार||देवकी|| ||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धात गोपीप्रसादकथनरूप हा नववा अध्याय समाप्त झाला.||९|| ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अध्याय दहावा ---देवकी ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ अर्थ:---राजा म्हणाला- हे ज्ञानसंपन्ना, त्या नलकुबरमनीग्रीवांचे शापाला कारणभूत असे जे निंदित कर्म असेल की, ज्याच्या योगाने भगद्भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा नारदालाही क्रोध उत्पन्न झाला व त्यांस शापदिला ते मला सांगावे.||१|| अर्थ:---असा प्रश्न केला असता श्रीशुक्रचार्य म्हणाला-कुबेर हा श्रीरुद्राचा सखा होय. त्याचे पुत्र जे नलकुबर व मानिग्रीव तेही रुदाचे सेवक होते, ते अतिशय गर्विष्ठ व मदोन्मत्त होऊन त्यांनी रुद्रसेवेचा त्याग केला आणि एकेवेळी ते, वरुणाने निर्माण केलेल्या, बुद्धिभ्रंश करणाऱ्या, मदिरेचे प्राशन करून ज्यांचे डोळे मदाने धुंद झाले आहेत असे होऊन, गंगेजवळच्या कैलासपर्वतावरील सुंदर पुष्पवाटिकेमध्ये, बरोबर गायन करणाऱ्या स्त्रीजनांसहवर्तमान क्रीडा करीत संचार करू लागले.||२-३|| अर्थ:---नंतर ते कुबेरपुत्र, स्त्रियांसहवर्तमान कमळांच्या वनपंक्ती प्रफुल्लीत असलेल्या गंगेच्या मध्यभागी प्रवेश करून, जसे हत्ती हत्तीनिसहवर्तमान क्रीडा करितात त्याप्रमाणे क्रीडा करू लागले.||४|| अर्थ:---हे राजा, तेथे सहजगतीने प्राप्त झालेल्या भगवान देवर्षी नारदाने ह्या देवास पहिले आणि ते मत्त झाले आहेत असे जाणिले.||५|| अर्थ:---कारण, त्यावेळी त्यांच्याबरोबर क्रीडा करणाऱ्या अप्सरा नग्न होत्या त्यांनी त्या नारदाला पाहताच लज्जित होऊन हा कदाचीथ शाप देईल अशा शंकेने अतित्वरेने आपापली वस्त्रे परिधान केली. परंतु नग्न असलेले ते गुह्यक वस्त्रे परिधान न करिता तसेच उभे राहिले ||६|| अर्थ:---तेव्हा मंदिराप्राशनाने मत्त व श्रीमदाने अंध झालेल्या त्या कुबेरपुत्रास पाहून नारद ऋषी त्यांच्यावर मदनाशपुर्वक श्रीकृष्णदर्शनरूप अनुग्रह करण्याकरिता शाप देत असता असे म्हणाला की,||७|| अर्थ:---नारद म्हणाला- प्रीयविषयांचे सेवन करनाऱ्या पुरुषाला जसा श्रीमद, बुद्धीभ्रंश (विवेकनाश) करणारा होतो तसा सत्कुळात जन्म व विध्या इत्यादिक किंवा रजोगुणकार्यभूत हर्षादिक कोणताच मद बुद्धीभ्रंश करणारा होत नाही. कारण, ज्या श्रीमदामध्ये नश्र्वर अशाही या देहाला, हा जरामरणरहित आहे असे मानणारे व मनाचा निग्रह न करता निर्दय झालेले लोक (भक्षण करण्याकरिता )पशूंचा वश करतात.||९|| अर्थ:---पहा, हे शरीर, जिवंत असता नरदेव (राजा ) भूदेव (ब्राह्मण) इत्यादीनामयुक्त असते तरीही मरणानंतर कुतरी इत्यादिकांनी भक्षण केले असता विष्ठरूप होते, पुत्रादिकांनी दग्न केले तर भस्मरूप होते व तासेस्च पडले तर कृमिरूप होते त्याच्या सुखाकरिता जो पुरुष, प्राणिमात्रांचा द्रोह करितो, की ज्या द्रोहापासून नरकयातना प्राप्त होते तो पुरुष, आपला स्वार्थ जाणतो काय? नाहीच जाणत.||१०||३१\८\१९||वार:-शनिवार||देवकी|| अर्थ:---आता देहाचेठिकाणी भीपनाही घडत असे सांगतो-हा देव काय स्वाधीनपणाने प्रसिद्ध असल्यामुळे आपला म्हणावा, किंवा अन्नदात्याच्या अन्नाने रक्षण होत असल्यामुळे अन्नदात्याचा म्हणावा, अथवा पित्याच्या रेतापासून झाल्यामुळे पित्याचा म्हणावा, यद्वा आईच्या उदरांतून झाल्यामुळे आईचा म्हणावा किंवा आईचा बाप, इला पुत्र होईल तो माझा अशा ठरवणे कन्या देतो म्हनून त्याचा म्हणावा अथवा वेठीलावगैरे धरणाऱ्या बलाढ्य पुरुषाचा म्हणावा किंवा विकनाराचा, अग्नीचा अथवा श्र्वानाचा म्हणावा?||११|| अर्थ:---याप्रमाणे साधारण व प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तेथेंच लय पावणाऱ्या देहाला हा आपणच आहे असे मानून त्याच्या सुखाकरिता मूर्खपुरुषारेखील कोण बरे ज्ञानी पुरुष, प्राण्याची हिंसा करील? कोणीच करणार नाही.||१२|| अर्थ:---याप्रमाणे श्रीमदाचे चेष्टित सांगून आता त्याच्या प्रतिकाराचा निश्र्चय करतो- श्रीमदाने अंध झाल्यामुळे कर्तव्याकर्तव्य न पाहणाऱ्या विवेकशून्य पुरुषाला दारिद्र्य हेच श्रेष्ठ अंजन आहे.कसे म्हणावे तर दरिद्री पुरुषच, आपल्या सारखी सर्वभूते आहेत असे पाहतो, म्हणजे दारिद्र्यामुळे अनेक दु:खे भोगणारा दरिद्री, अशीन दु:खे सर्वांना प्राप्त होत असतील असे निश्र्चर्याने जाणतो.||१३|| अर्थ:---याविषयी दृष्टांत सांगतो- जसा अंगात कांटा मोडलेला पुरुष, मुखाची म्लानता इत्यादिक चिन्हांनी सर्व जीवांना सुख दु:खे सारखी होतात असे जाणून, दुसऱ्या प्राण्याला कांटा मोडण्याची इच्छा करीत नाही व त्याच्या निवृत्तिविषयी यत्न करितो, त्याप्रमाणे ज्याला कधीच कांटा लागला नाही तो दुसऱ्याची व्यथा जाणत नाही व तिच्या निवृत्तिविषयी यत्नही करीत नाही.||१४|| अर्थ:---आणि दारिद्र्य हे मोक्षसुद्धा मिळविते. काज्ञारण, या संसारात दरिद्री पुरुषच विद्या तप इत्यादिकांच्या मदांनी व अहंकाराच्या उद्धटपणाने रहित होऊन प्रारब्धवशेकरून जे काही दु:ख पावतो तेच त्याचे परम तप होय||१५|| अर्थ:---क्षुधेने कृशदेहहोऊन नित्य अन्नाची इच्छा करणाऱ्या दारिद्र्याची इंद्रिये प्रतिक्षणी शुकश होत जातात व नरकादिदु:खाला हेतुभूत असलेली जी हिंसा तीही निवृत्त होते.||१६|| अर्थ:---आणी दारिद्र्यस सर्वठिकाणी ब्रह्मरूप पाहणाऱ्या साधूंची गाठ पडत्ये. नंतर त्या साधूंच्या सगागमेकरून तो दरिद्री, विषयवासनारूप तृष्णेचा क्षय करून टाकितो व ओ नंतर लवकरच जीवन्मुक्त होतो.||१७|| अर्थ:---आता साधूंनाही द्रव्यवाचन प्रिय होईल, दरिद्री प्रिय होणार नाही. असे म्हणावे तर-ज्याचे चित्त शत्रूमात्रारहित आहे अशा मुकुंदचरणाची इच्छा करणाऱ्या साधूंना, धनाच्या योगाने गर्विष्ठ, उपेक्षा करण्यास योग्य व दुर्व्यसनी लोकांना आश्रय करणाऱ्या दुर्जनांनी काय करावयाचे आहे? काहीच नाही.||१८|| अर्थ:---यास्तव श्रीमदाने अंधत्व, वारुणी मंदिरेने मत्त होऊन स्त्रीजित झालेल्या आणि मनाचा निग्रह न करणाऱ्या ह्या नकुलबरमणी ग्रीवांचा अज्ञानाने झालेला संपत्तिमद मी हरण करितो.||१९|| अर्थ:---ज्याअर्थी हे लोकपाल कुबेंराचे पुत्र असताही अज्ञानाने व्याप्त व अत्यंत दुष्मदाने युक्त होऊन नग्न असलेल्या आपल्या देहालासुद्धा जाणत नाहीसे झाले आहेत त्याअर्थी हे काहीकाळपर्यंत वृक्षयोनी पावण्यास योग्य आहेत, म्हणजे पुन्हा असे मदांध कधीही होणार नाहीत आणि त्या वृक्षयोनिमध्येही माझ्या प्रसादेकरून, ह्यांना आपल्या वाईट कर्माचे स्मरण राहील.||२०-२१||दिनांक:-१\९\१९||वार:-रविवार||देवकी|| अर्थ:---नंतर देवांच्या मानाने शंभर वर्ष निघून गेल्यावर माझ्या अनुग्रहाने श्रीकृष्णाचे सान्निध्य पावोन हे नलकुबरमानिग्रीव पुन्हा देवत्व पावतील आणि त्या श्रीकृष्णाचेठिकाणी यांना भक्ती प्राप्त होईल||२२|| अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे राजा, त्या देवर्षी नारदाने असे भाषण करून नरनारायणाच्या आश्रमी गमन केले व नलकुबमनिग्रीव हे गोकुळामध्ये यमलार्जुन वृक्ष होऊन राहिले.||२३|| अर्थ:---याप्रमाणे राजाने विचारलेले शापाचे करण सागू आता प्रस्तुत सांगतो-भगवद्भाक्तांमध्ये मुख्य अशा नारदऋषीचे भाषण सत्य करण्यासाठी उखळा चे ठिकाणी बांधलेला श्रीकृष्ण, जेथे ते यमलार्जुन वृक्ष होते तेथे हळूहळू निघून गेला||२४|| अर्थ:---याचा अभिप्राय असा की- ज्या अर्थी नारद हा मला अतिप्रिय आहे व हे कुबेराचे पुत्र देव असून वृक्षत्व पावले आहेत त्याअर्थी त्या महात्म्या नारदाने दिव्यमानाने शंभर वर्षानंतर श्रीकृष्णदर्शनाने हे शापमुक्त होईल असे जे गायन केले आहे ते तसेच साधितो.||२५|| अर्थ:---असे मनात आणून तो श्रीकृष्ण जुळ्या त्या अर्जुनवृक्षांच्या मधून गेला. तेव्हा श्रीकृष्णाच्या प्रवेशमात्रानेच ते त्याने ओढीलेले उखळहि वाकडे चालत गेले||२६|| अर्थ:---त्यावेळी मागून गरंगळत जाणाऱ्या व वृक्षांस अडकलेल्या त्या उखळाला जोराने ओढणाऱ्या व दाव्याने बांधलेल्या त्या श्रीकृष्णबालकाने, ज्यांच्या मुळ्या उपटल्या आहेत व त्याच पर्मेश्र्वराच्या पराक्रमाने ज्यांचे खांदे, पल्लव व खांध्या हि अतिशय कापली आहेत असे ते अर्जुनवृक्ष, मोठा भयंकर कडकडाट शब्द करून भूमीवर पडले.||२७|| अर्थ:---आणि जसा वृक्षांचे ठिकाणी असलेला अग्नि तेथून मुर्तिमान प्रकट होतो त्याप्रमाणे त्या वृक्षांपासून प्रकट झालेले व परम कांतीने दिशा प्रकाशयुक्त करणारे असे दोघे सिद्ध (नलकुबरमनिग्रीव)कृष्णाजवळ येऊन,श्रीमदरहित झालेल्या त्यांनी सर्व लोकांचा नाथ अशा श्रीकृष्णाला मस्तकाने वंदन करून हात जोडून असे भाषण केले की,||२८|| अर्थ:---हे कृष्णा,हे कृष्णा,हे अचिंत्यप्रभावा,तूं गोपबालक नव्हेस तर सर्व जगाला कारणभूत असा परमपुरुष आहेस.स्थूलसुक्ष्मात्मक हे सर्व विश्व,तुझेच स्वरूप आहे असे ब्रम्हवेत्ते जाणत आहेत.||२९|| अर्थ:---जगाचा नियांताही तूंच आहेस.कारण,सर्व प्राण्याची जी देह,प्राण,अहंकार व इंद्रिये आहेत त्या सर्वांचा रक्षण करणारा तू एकच आहेस.आता ह्या जगाचे काल हे निमितकारण बाहे,प्रकृति उपादान कारण आहे,प्रकृतीपासून झालेले महत्तत्व जगदाकारत्वेकरून परिणाम पावते,याचा करता व नियंता पुरुष आहे,येथे मी काय आहे?असे म्हणशील तर –ज्याअर्थी भगवान अविनाशी ईश्वर विष्णु तूंच आहेस त्याअर्थी कलही तूंच आहेस म्हणजे काल ही तुझा लीला आहे ||३०|| अर्थ:---महत्तव आरि रज,सत्व,तम,ह्या तीन गुणांनी युक्त अशी प्रकृतिनावांची सूक्षम शक्तीही तूच आहेस.तूच सर्व साक्षी पुरुष असून सर्वांशी शरीरे,इंद्रिये व मन यांचे राग व प्रीति इत्यादिक विकार जाणणारा मिळून सर्वही तूच आहेस ||३१||दिनांक:-२\८\१९||वार:-सोमवार||देवकी|| अर्थ:---आता मीच जर सर्व आहे तर घटादि पदार्थांचे ज्ञान झाले असता माझे ज्ञान का होत नाही? बरे, होते म्हणावे तर सर्व जन ब्रह्मवेत्ते होतील, असे म्हणशील तर-प्रकृतीचे गुणकार्यरूप बुद्धी, अहंकार, इंद्रिये इत्यादिक जे दृश्य विकार त्यांनी तुज दृष्ट्यांचे ग्रहण केले जात नाही. तर मग प्रकृतीचे नसल्यामुळे जीवच माझ्या स्वरूपाला जानुदे असे म्हणशील तर- जीवादिकांची उत्पत्ती होण्याच्या पूर्वीच स्वप्रकाशत्वेकरून सिद्ध असलेल्या तुला या संसारामध्ये देहादिकांनी वेष्टित असलेला कोण बरे जीव जाणण्यास समर्थ होईल? कोणीच होणार नाही. ||३२|| अर्थ:---यास्तव षड्गुणेश्र्वर्यसंपन्न, वसुदेवाचा पुत्र, जगताचा सष्टा व आपल्यापासून प्रकाश पावणाऱ्या सत्वादिक हुनानी ज्यांचा महिमा, मेघांनी सूर्याच्या प्रकाशासारखा आच्छादित झाला आहे त्या तुज ब्रह्मरुपाला नमस्कार असो.||३३|| अर्थ:---आता मी अशाप्रकारचा ईश्र्वर आहे हे तुम्हास कसे समजले असे म्हणशील तर-देहधारी जीवांचेठिकाणी नसणाऱ्या व ज्यांच्या बरोबरीचे व ज्यांच्याहून अधिक कोणामध्येच नाहीत अशा तुझ्या पराक्रमांनी शरीररहित अशाही ज्या तुझे अवतार प्राण्यांमध्ये समजले, तो चतुर्विध पुरुषार्थाचा स्वामी तू; सर्वलोकांच्या उत्कर्षाकरिता व मोक्षाकरिता आपल्या परिपूर्णस्वरूपाने सांप्रतकाली अवतीर्ण झाला आहेस.||३४-३५|| अर्थ:---आता भक्तीच्या उद्रेकेकरून वारंवार नमस्कार करी- तात- हे परमकल्याणा, हे परममंगला, तुला वारंवार नमस्कार असो. सर्वांतयामी व शांत अशा तुज यादवांच्या पालकाला नमस्कार असो.||३६|| अर्थ:---हे व्यापका, तुझा सेवक जो नारद त्याचे आम्ही दास आहो आम्हास स्वस्थानी जाण्याची आज्ञा करावी. आम्हाला तुज भगवंताचे दर्शन, नारदऋषीच्या अनुग्रहेकरूनच झाले आहे.||३७|| अर्थ:---स्वस्थानी गेलेल्याही आम्हांस पूर्वीसारखा पुन्हा वाईट स्वभाव प्राप्त होऊ नये, तर आमची वाणी तुझ्या गुणकथनाविषयी तत्पर असो, आमचे कान-तुझ्या कथाश्रवणाविषयी हात-तुझ्या पूजादीकर्माविषयी मन- तुझ्या चरणांच्या स्मृतीविषयी, मस्तक- तुझे राहण्याचे स्थान अशा जगाच्या नमस्काराविषयी आणि दृष्टि तुझ्या मुर्तीरूप सत्पुरुषांच्या दर्शनाविषयी तत्पर असोत.||३८|| अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे राजा, याप्रमाणे त्या नलकुबर मानिग्रीवांनी स्तुति केली असता, दाव्याने उखळाचेठीकाणी बांधलेला तो गोकुलाधीपती भगवान श्रीकृष्ण, हास्य करून त्या नलकुबरमानिग्रीवांस म्ह्नालकी-||३९|| अर्थ:---श्रीभगवान म्हणाला- हे गुह्यकहो, श्रीमदाने अंध झालेल्या तुम्हांवर, कृपाळू झालेल्या नारदऋषीने वाणीच्या योगाने लक्ष्मीनाशरूप अनुग्रह केला हे मला पूर्वीच माहित होते.||४०|| अर्थ:---आणि हे योग्यच आहे, आश्र्चर्य नव्हे. कारण, जसा सूर्याच्या दर्शनाने दृष्टीचा प्रतिबंध करणारा अंधकार निवृत्त होतो त्याप्रमाणे आत्मवेत्या साधूंच्या त्यातही विशेषकरून माझेठीकाणी चित्त अर्पण करणाऱ्या साधूंच्या दर्शनेकरून बंध प्राप्त होत नाही.||४१||दिनांक:-३\९\१९||वार:-मंगळवार||देवकी|| अर्थ:---यास्तव हे नलकुबरमानिग्रीव हो, तुझी माझ्या चिंतनादिकांविषयी तत्पर असते आपल्या स्थानाप्रत गमन कार. तुम्हांला माझेठीकानी इच्छित असलेला परम प्रेमा प्राप्त झालाच आहे. हाच संसाराची निवृत्ती करणारा आहे.||४२|| अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला – हे राजा, याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेले ते नलकुबरमनिग्रीव उखळाला बांधलेल्या त्या श्रीकृष्णाला वारंवार प्रदिक्षणा व नमस्कार करून त्याची आज्ञा घेऊन उत्तर दिशेकडे निघून गेले.||४३|| ||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पुर्वाधामध्ये नारदशापकथनरूप हा दहावा अध्याय समाप्त झाला.||१०|| ||श्रिकृष्णार्पणमस्तु|| --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अध्याय अकरावा---देवकी--- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अर्थ:---श्रीशुक्रचार्य म्हणाला- हे कुरुश्रेष्ठा, राजा, नंदादिक गोपांनी, पडणाऱ्या त्या वृक्षांचा शब्द ऐकून वज्रपाताच्या भयाने शंकितचित्त असते ते त्याठिकाणी प्राप्त झाले.||१|| अर्थ:---आणि त्यांनी तेथे भूमीवर पडलेले ते यमलार्जुन वृक्ष पाहिले परंतू ते पडण्याचे कारण, प्रत्यक्ष पुढे दिसत असलेलेही ते लक्ष्य न जाणून भ्रम पावले.||२|| अर्थ:---म्हणजे उखळाला ओढीत असलेल्या, दाव्याने बांधलेल्या त्या श्रीकृष्ण बालकाला न जाणून हे कोणा राक्षसादिकाचे कर्म असावे! हे कोणत्या करणास्तव झाले! हे मोठे आश्र्चर्य आहे! हा अरिष्टसूचक उत्पात आहे की काय ! असे बोलून भयाने व्याकुल होत असते ते नंदादिक गोप श्रम पावले; म्हणजे त्यांचा काहीच निश्र्चय होईना.||३|| अर्थ:--- तेव्हा त्यांना तेथे खेळत असलेले बालक म्हणाले की- वांकडे पडलेले उखळ ओढणाऱ्या व वृक्षांच्या मधून गेलेल्या ह्या कृष्णानेच वृक्ष पाडिले असे आम्ही पहिले आहे. केवळ इतकेच नाही तर त्या वृक्षांपासून निघालेल्या दिव्य दोन पुरुषांनाहि आम्ही पहिले आहे.||४|| अर्थ:---तेव्हा तेथे जे गोप केवळ तर्कनिष्ठ होते त्यांनी त्या बालकाच्या हातून एवढ्या मोठ्या वृक्षांचे ते उपटणे घडणार नाही अशा तर्काने त्या बालकाच्या भाषणाचा अंगीकार केला नाही. कीतीएक तर- पुतना, तृणावर्त इत्यादिकांच्या भंग प्रत्यक्ष पाहिलेला असल्यामुळे हेही त्याचेच कर्म असेल किंवा नसेल असे संदिग्धचित्त झाले.||५|| अर्थ:---असो दाव्याने उखालाचे ठिकाणी बांधून ठेविलेला म्हणून उखळाचे आकर्षण करणारा अशा आपल्या पुत्राला पाहून हास्य करणाऱ्या नंदाने त्याला लवकर सोडविले.||६|| अर्थ:---पुढे भगवंताने मला लोक जाणतील अशी शंका मनात आणून अतिशय बालपणाचे अनुकरण केले. ते असे की,- गोपींनी तू फार चांगले नृत्य करितोस अशी स्तुति केली असता,भगवान बालकाप्रमाणे नृत्य करीत असे. तसेच केव्हांतरी गायन करण्याकरिता गोपींनी त्याची प्रशंसा, केली असता काष्ठाच्या बाहुलीप्रमाणे त्यांच्या स्वाधीन होऊन अज्ञानी बालकासारखा, जसे त्यांना हर्षादिक प्राप्त होतील त्याप्रमाणे मोठ्याने गायन करीत असे.||७|| अर्थ:---केव्हांतरी गोपींनी, पाट, अधोली व पादुकावगैरे आणण्याविषयी आज्ञा केली असता, ते आणण्याविषयी असमर्थ असल्यासारखा केवळ हातांनी त्यांचे ग्रहण करीत असे. केव्हांतरी माझ्याबरोबर युद्ध कर असे सांगितले असता, आपल्या गोकुलवासी भक्तांना व ते पाहणारांना प्रीति उत्पन्न करीत असता दंड थोपटणे वगैरे करीत असे||८||दिनांक:-४\९\१९||वार:-बुधवार||देवकी|| अर्थ:---याप्रमाणे या लोकामध्ये जे त्याचे ऐश्र्वर्य जाणणारे ज्ञानी आहेत त्यांना आपली केवळ भक्तवश्यता आहे असे दाखवीत असता तो भगवान श्रीकृष्ण, बालकासारखे खेळ करून गोकुलवासीजणांना हर्ष उत्पन्न करीत असे.||९|| अर्थ:---एकेवेळी बोरे वगैरे फळे विकणाऱ्या मळणीने हे लोकहो, फळे विकत घ्या, असे वाचन उच्चारिले असताते ऐकून, सर्वफळे देणारा श्रीकृष्ण, फळे घेण्याकरिता धान्य घेऊन सत्वर मळणीजवळ गेला.||१०|| अर्थ:---तेव्हा त्वरेने बाहेर जाणाऱ्या त्या कृष्णाचे ज्यापासून मार्गाचे ठिकाणी ठिकाणी काही धान्यकन गळून पडत आहेत असे हस्तद्व हे, फळे विकणाऱ्या माळनीने फळांनी भरून टाकिले, तेव्हा श्रीकृष्णाने हातात अवशेष राहिलेल्या धान्याने तिचे फळांचे भांडे (टोपले) मानकेगैरे रत्नांनी परिपूर्ण केले||११|| अर्थ:---नंतर एके दिवशी यमुनानदीच्या काठी जाऊन बालकासहवर्तमान अत्यंत क्रीडा करणाऱ्या अर्जुनवृक्षांना मोडणाऱ्या त्या कृष्णाला आणि रामाला, सौभाग्यादिगुणसंपन्न रोहिणीने पुत्रवत्सल अशा यशोदेला पाठविले.||१२-१३|| अर्थ:---तेव्हा पुत्रस्नेहाने जिच्या स्तनातून दुध स्त्रवत आहे अशी ती यशोदा, बालकासहवर्तमान फार वेळ क्रीडा करणाऱ्या श्रीकृष्णपुत्राला हाका मारू लागली की,||१४|| अर्थ:---बा कमलनयना कृष्णा, कृष्णा घरी ये. खेळणे पुरे कर. हे पुत्रका, तू खेळता खेळता फार श्रमला आहेस व क्षुधेने व्याकूळ झाला आहेस म्हणून स्तनपान कर.||१५|| अर्थ:---हे ताता, कुलनंदा रामा, तू कृष्णासहवर्तमान लवकर घरी ये. अरे तू सकाळीच जेवला आहेस, तर आता तू लवकर भोजन करावेस.||१६|| अर्थ:---हे कृष्णा, भोजन करण्यास उध्युक्त झालेला गोकुलाधिपती (नंद)तुझी वाट पाहत आहे म्हणून लवकर घरी ये, आम्हा उभयंताचे प्रिय कर. मुलांनो, तुम्ही आपआपल्या घरी चला.||१७|| अर्थ:--- हे पुत्रा कृष्णा, तुझे सर्वांग धुळीने मळकट होऊन गेले आहे, यास्तव तू चांगले स्नान कर; आज तुझे जन्मनक्षत्र आहे म्हणून आहे म्हणून तू शुचिर्भूत होऊन ब्राह्मणांना गाईचे दान कर.||१८|| दिनांक:-५\९\१९||वार:-गुरुवार||देवकी|| अर्थ:---हे कृष्णा, पहा पहा ते तुझे सवंगडे बालक आईनी स्नाने घातलेले व अलंकार धारण केलेले आहेत. अरे तुही स्नान करून भोजन कर आणि अलंकार धारण करून खुशालपानि खेळ||१९|| अर्थ:---हे राजा, याप्रमाणे भाषण करणाऱ्या व स्नेहाने जिची बुद्धी श्रीकृष्णाचे ठिकाणी अगदी आसक्त झाली आहे आशा त्या यशोदेने, ब्रह्मदिकांचे चूडामणी (परम पूज्य)अशा त्या अच्युत भगवंताला आपला पुत्र असे मानून त्याला बलरामासहवर्तमान हाती दह्रून आपल्या घरी नेले आणि त्या उभयंताना स्नान भोजन व अलंकारवगैरे घालून वाढदिसाचा सन केला||२०|| अर्थ:---याप्रमाणे बृहद्वनामध्ये क्रीडा करून आता वृंदावनात जाण्याची इच्छा करणाऱ्या श्रीकृष्णाने प्रेरणा केलेल्या गोपांची मसलत सांगतो- नंदादिक गोप वृनद्धानी बृहद्वनामध्ये पुतना आली इत्यादी मोठमोठ्या उत्पांचा अनुभव घेऊन, एकेवेळी सर्व एकठिकाणी मिळाले आणि गोकुळाच्या हिताविषयी विचार करू लागले.||२१|| अर्थ:--- त्यात उपनंद ह्या नावाचा एक गोप ज्ञानाने व वयाने अधिक असून, कोणत्या देशी कोणत्या काली कोणत्या स्थितीने वागले असता आपला कार्य भाग सिद्ध होतो याच तत्व जाणणारा व रामकृष्णाचे प्रिय करणारा होता म्हणाला की-||२२|| अर्थ:---गोकुळाचे हित इच्छीनाऱ्या आम्ही, येथून उठून दुसरे ठिकाणी गेले पाहीजे. कारण, येथे बालकज्ञांच्या नाशाला कारण असे मोठमोठे उत्पात प्राप्त होत आहेत.||२३|| अर्थ:---ते असे की- हा श्रीकृष्ण बालक, बालकांचा घात करणाऱ्या त्या पुतना राक्षसीपासून दैवयोगानेच मुक्त झाला आहे. तसाच खरोखर हरीच्या अनुग्रहेकरूनच याच्यावर छकडा पडला नाही.||२४|| अर्थ:---या बालकाला चक्रवातरुपी दैत्याने पक्ष्यांचे विहारस्थान अशा आकाशामध्ये नेले होते तेथे आणि तेथून हा शिळेवर पडला होता तेथेही, आम्ही आराधन केलेल्या देवांनीच याचे संरक्षण केले आहे.||२५|| अर्थ:---त्या दोन यमलार्जुन वृक्षांमध्ये सापडून हा कृष्ण किंवा दुसरा कोणीही बालक जो मरण पावला नाही तेही भगवंतानेच केलेले रक्षण होय.||२६|| अर्थ:---यास्तव जोपर्यंत दुसऱ्या उत्पातापासून झालेल्या अनर्थाने गोकुळाला स्पर्श केला नाही तोपर्यंत (त्याच्या पूर्वीच) बालकांना घेऊन, गोधन व सेवकादिकांनसहवर्तमान आम्ही येथून दुसरेठीकाणी जाऊया ||२७|| अर्थ:---कोठे जावे? असे म्हणाल तर- वृंदावन या नावाचे वन आहे; ते पशूंना हितकारक, नवी नवी अंतर्गत वने असलेले, गोपाल गोपी व गाई ह्यांन सेवन करण्यास योग्य व पवित्र अशा पर्वत, तरून आणि वेली ह्यांनी युक्त आहे.||२८|| अर्थ:---तेथे जण्याचे जर तुम्हा सर्वांना आवडत असेल तर आजच जाऊया, आपापल्या गाड्यांवर सामान भरून बैल जुपा, उशीर करू नका, गोधने पुढे जावू ध्या.||२९|| अर्थ:---ते उपनंदगोपाचे वचन श्रवण करून सर्व गोप एकबुद्धी होऊन, चांगले आहे, चांगले आहे असे म्हणत असते, आपापले गाड्यांचे समूह जोडून त्याच्यावर सामानसुमान घालून निघाले||३०|| अर्थ:---हे राजा,ते गोपाळ, वृद्ध, बालक, स्त्रिया व भांडीकुंडीवगैरे सर्व सामान गाड्यांवर घालून आपण कमरा बांधून, सावधगिरीने हातात धनुष्ये घेऊन, गोधने पुढे करून व सर्व बाजूंनी शिंगे वाजवून मोठा वाध्यघोष करीत करीत पुरोहित ब्राह्मणानसाहवर्तमान निघाले.||३१-३२|| अर्थ:--- त्यावेळी ज्यांच्या कंठाचेठिकाणी पदके आहे म्हणजे सर्व भूषनांनी भूषित झालेल्या व स्तनाचेठिकाणी लाविलेल्या नव्या केशराच्या योगाने ज्यांना शोभा आली आहे व ज्यांनी उत्तम वस्त्रे परिधान केली आहेत अशा रथावर बसलेल्या गोपी, मोठ्या संतोषाने कृष्णलीला गाऊ लागल्या.||३३|| अर्थ:---तशाच त्या कृष्णरामाच्या कथाश्रवणाविषयी उत्सायुक्त असलेल्या यशोदा व रोहिणी, ह्याही कृष्णरामासहवर्तमान एका शकटावर बसून चालल्या असतां त्या शोभू लागल्या.||३४|| अर्थ:---याप्रमाणे नंदादीप गोप, ग्रीष्मादिक सर्वकालाचेठिकाणीहि सुख देणाऱ्या त्या वृंदावनामध्ये प्रवेश करून, तेथे त्यांनी शकटांच्या योगेकरून अर्धचंद्राकार गोकुलाचे वसतीस्थान केले.||३५|| अर्थ:---हे राजा, रामकृष्णानाही वृंदावन गोवर्धन व यमुनेची वाळवंटे पाहून, हि क्रीडावगैरे करण्यास योग्य स्थाने आहेत असे मनात येऊन उत्तम संतोष झाला.||३६|| अर्थ:---असो.याप्रमाणे बालचरित्रांनी व मधुरभाषणांनी व मधुरभाषणांनी गोकुळवासी लोकांना प्रीती करणारे ते रामकृष्ण,काही कालाने वत्स चारण्यास योग्यवयाचे झाले||३७|| अर्थ:---आता रामकृष्णांची कौमारलीला सांगतो-गोकुलापासून फार लांब नव्हे अशा ठिकाणी गोपाळांच्या बालकांसह वर्तमान मुरल्या,वेत,काठ्या,शिंगे,चेंडू वगैरे खेळण्याची साहित्ये घेऊन क्रीडा करणारे ते रामकृष्ण,वत्सांना चारुं लागले||३८|| अर्थ:---ते केव्हांतरी मुरल्या,पांवे व अलगुजे वाजवीत असत,केव्हांतरी गोफनीची दगड मारीत असत,केव्हांतरी घागऱ्या बांधलेल्या पायांनी नृत्य करीत असत,केव्हांतरी घोंगडीवगैरे पांघरून बैलांची सोंगे घेतलेल्या दुसऱ्या वत्सपालकांसंवर्तमान ते आपणही तशीच बैलांची सोंगे घेऊन गर्जना करून परस्पर युद्ध करीत असत ,केव्हांतरी त्या त्या जातीच्या शब्दांनी हंसमयूरादिकांचे अनुकरण करून प्राकृत बालाकांप्रमाणे क्रीडा करीत असत||३९-४०|| अर्थ:---एकेवेळी यमुनेच्या तीराचे ठिकाणी आपल्या प्रीतीयुक्त संख्यासहवर्तमान वत्सांना चारणाऱ्या त्या रामकृष्णांना इच्छा करणारा एक दैत्य प्राप्त झाला||४१||अर्थः---वत्सांच्या समुदायामध्ये आलेल्या त्या वत्सरुपी दैत्याला पाहून,भृसंकेताने बलरामाला दाखवीत न समजल्यासारख्या जो अच्युत श्रीकृष्ण हळूच त्याच्याजवळ प्राप्त झाला||४२||अर्थ:---आणि त्याने मागचे पाय व शेंपूट यांसहवर्तमान त्याला धरून गरगर फिरविले आणि फिरविन्यानेच गतप्राण झालेल्या त्याला एका कवठीच्या झाडावर फेकून दिले||४३|| अर्थः---तेव्हा अंतकाळी मायिक स्वरूप राहत नसल्यामुळे मोठा देह धारण करणारा तो दैत्य,पाड्विलेल्या कपित्थफळांसहवर्तमान स्वतंही भूमीवर पडला.त्या पडलेल्या दैत्याला पाहून विस्मित झालेले सर्वही बालक,कृष्ण,फार चांगले केलेस,अशी श्रीकृष्णाची प्रशंसा करूं लागले त्यावेळी अत्यंत झालेले देवही पुष्पवृष्टी करूं लागले||४४||अर्थः---याप्रमाणे सर्व लोकांचे मुख्य पालक असे ते रामकृष्ण,वत्सांचे पालक होऊन,बरोबर शिधोऱ्या घेऊन गाईच्या वत्सांना चारीत असता संचार करूं लागले||४५||अर्थह---एकेवेळी त्या रामकृष्णादिक सर्वही गोपबालकांनी आपापल्या वत्सांना समुदायाला,पाणी पाजण्याकरीता यमुनेच्या पाणवठ्यावर जाऊन पाणी पाजविले व आपणही प्राशन केले ||४६||अर्थः---नंतर त्या बालकांनी त्या यमुनेच्या कांठी असलेला,इंद्राच्या वज्राने तुटून भूमीवर पडलेले पर्वताचे शिखरच कि काय असा बकरुनी एका मोठा प्राणी पाहिला आणि ते भयभीत झाले||४७||अर्थः---तो तीक्ष्णवोंचेचा,बकरूप धारण करणारा,बकनामक महाबलाढ्य दैत्य होता.त्याने एकाएकी कृष्णाच्या अंगावर धावून येऊन कृष्णाला गिळून टाकिले||४८||अर्थः---तेव्हा महाबकाने गिळीलेल्या कृष्णाला पाहून बलरामाखेरीज सर्व गोपबालक,जशी प्राणांवांचून इंद्रिये निश्चेष्ठ होतात त्याप्रमाणे मूर्च्छित झाले ||४९||अर्थः---इकडे बकाने ताळ्वेल्या मुळाशी अग्नीप्रमाणे जाळणारा,ब्रम्हदेवाचाही पिता परंतु नंदाचा बालक अशा त्या कांहीच इजा न होतां तत्काळ वमन करून बाहेर टाकिले आणि मोठ्या क्रोधाने त्याला चोंचेणे मारण्याकरिता पुन्हा त्याच्या अंगावर धावला||५०||अर्थः---तेव्हा भक्तांचा पालक व देवांना आनंद देणारा अशा त्या श्रीकृष्णाने,वेगाने येणाऱ्या त्या बकासुराला चोंचेणे खालचा व व्र्चासे दोन्ही भाग आपल्या हातांना आवंळून धरून सर्व बालक पहात असता,जशी लव्हाळ्याची काडी फाडून टाकावी त्याप्रमाणे अनायासाने त्याचे विदारण केले||५१|| अर्थः---तेव्हा स्वर्गलोकाचे राहणाऱ्या देवानी नंदनवनांतील मोगऱ्याच्या वगैरे पुष्पांनी बकासुराला शत्रूवर (कृष्णावर)पुष्पवृष्टी केली व नगारे व शंख या वाद्यसहित उत्तमप्रकारच्या स्तवांनी स्तुती केली;ते पाहून गोपाळांचे पुत्र,आश्चर्य पावले||५२||अर्थः---तेव्हा रामादिक बालक,बकासुराला मुखांतून सुटलेल्या त्या श्रीकृष्णास पावोन व आपल्या स्थानावर प्राप्त झालेल्या त्याला आलिंगन करून,जसा प्राणावाचून व्याकुळ झालेला इंद्रियांचा गण,पुन्हा आपल्या स्थानी प्राप्त झालेल्या प्राणाचा संयोग पावला म्हणजे आनंद पावतो त्याप्रमाणे आनंद पावले आणि सायंकाळी सर्व वत्सांना एकेठिकाणी करून गोकुळांत येऊन ते बकवधादिक कृष्णचरित्र सांगुं लागले||५३||गोपबालकांनी वर्णन केलेले ते कृष्णचरित्र ऐकून अतिप्रीतीने आनंदयुक्त झालेल्या गोपी व गोप,मारूनच आलेल्यासारखा त्या कृष्णाकडे तृप्त न झालेल्या व अमृताचेच प्राशन करतात कि क्या अशा नेत्रांनी अवलोकन करूं लागले||५४||अर्थः---आणि म्हणाले कि,-काय हो सांगावे ! या कृष्णबालकाका पुष्कळ मृत्यूंची कारणे (दैत्यादिक)प्राप्त झाली,तथापि,त्यांनी पूर्वी दुसऱ्यांना भय उत्पन्न केले होते म्हणून त्यांचेच अनिष्ट झाले||५५||अर्थः---जरीही (दैत्य)दर्शनमात्रेकरून प्राण हरण करणारे होते तथापि ते,या बालकाच्या पराभव करण्यास मुळीच समर्थ झाले नाहीत,तर मारण्याच्या इच्छेने याच्याजवळ येऊन,ते जसे अग्नीचा नाश करण्यास प्राप्त झालेले पतंग,आपणच नाश पावतात त्याप्रमाणे स्वतांच नाश पावले||५६||अर्थः---अहो ब्रम्ह्वेत्या ऋषींच्या वाणी,कधीही खोट्या होत नाहीत.कारण,भगवानगर्गऋषीचे,हे नंदा हा तुझा पुत्र गुणांना नारायणासारखा आहे इत्यादिक जे सांगितले होते ते तसेच आमच्या अनुभवास,आले आहे||५७|| अर्थः---याप्रमाणे भाषण करणारे नंदादिक गोप,हर्षाने कृष्णरामाची कथा वर्णन करीत व त्यांच्यासहवर्तमान रमत असते,त्यापासून झालेल्या आनंदाच्या योगेकरून त्यांनी संसारसंबंधी तापाचे अनुसंधान राखिले नाही ||५८||अर्थः---हे सांगितलेले व दुसरेही,लंपडाव खेळणे,पूलबांधणे,माकडासारख्या उड्या मारणे वगैरे लहान मुलांचेखेळ खेळून रामकृष्णांनी गोकुळामध्ये आपले बाळपण घालविणे||५९||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धात वत्सबकवधनिरुपणनामक हा अकरावा अध्याय गिळून टाकणाऱ्या झाला ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------१२--- अघासुराला उद्धार ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,एकेवेळी,वनामध्येच प्रथम भोजन करण्याकरिता प्रातःकाळी उठून मनोहर अशा शिंगाच्या शब्दाने सवंगड्या वत्सपालकांना,मी वनांत जातो तुम्हीही सर्वजण लवकर या असे सुचविणारा श्रीकृष्ण,वत्सांना पुढे सोडून गोकुलांतून निघाला||१||अर्थः---तेव्हा त्या श्रीकृष्नाबरोबरच त्याचे स्नेही हजारो गोपबालक,शिधोरीचे सुरेख शिंके,वेतकाठी,शिंग व मुरली हे समान घेऊन हजारांपेक्षाही अधिक संख्या असलेल्या आपापल्या वत्सांना पुढे चालवीत मोठ्या आनदाने गोकुलांतून बाहेर निघाले ||२||अर्थः---नंतर ते बालक असंख्यात कृष्ण्याच्या वत्सांमध्ये आपापल्या वत्सांना मिळवून चरित असते त्या त्या वनामध्ये लहानमुलांचे अनेक प्रकारचे खेळ मांडून खेळू लागले||३||अर्थः---त्यांना त्यांच्या मतांनी पूर्वी कांचा,गुंजा,रत्ने व सुवर्ण यांच्या अलंकरांनी भूषित केले होते तथापि अतिउत्सुकतेणे त्यांनी पुन्हा –फळांचे घड,पल्लव फुलांचे घोंस,सुटी फुले,मोराची पंखे व काववगैरे धातू यांनी आपणास भूषित केले||४||अर्थः---ते एकमेकांची शिंकी शिंगेगैरे चोरून लपवून ठेवीत असत व ती आपणाजवळ आहेत असे त्यांना समजले म्हणजे दूर फेकून देत,नंतरते रडकुंडीस आले म्हणजे पुनः फेकलेल्या ठिकाणी जाऊन हंसत हंसत ज्यांची त्यांला परत आणून देत असत||५||अर्थः---एखादे वेळी,कृष्ण जर वनशोभापाहण्याकरिता दूर गेला असला तर त्याला मी पूर्वी स्पर्श करीन,मी पूर्वी स्तपार्श करीन अशी प्रतिज्ञा करून धावत धावत जाऊन त्याला स्पर्श व आलिंगन करून मोठ्या आनंदाने रमत असत||६|| अर्थः---कितीएक गोप,मुरल्या वाजवीत खेळत असत,कितीएक शिंगे वाजवीत,कितीएक भ्रमराबरोबर गायन करीत,कोणी कोकिळा बरोबर तसे शब्द करीत,दुसरे पक्ष्यांच्या छाया बरोबर धांवत असत,कोणी हंसाबरोबर त्यांच्यासारख्या मनोहर गतीने चालत असत,कितीएक बगळ्यांच्याजवळ त्यांच्यासारखे ध्यान करीत बसत,कोणी मोरांबरोबर त्यांच्यासारखे नाचत असत,किती एकजण,वृक्षांच्या शाखांवरून खाली लोंबत असलेली वानरांची पुच्छे ओढीत व त्यांना धरून वृक्षांवर आपण आरोहण करीत,कोणीएक,वानराबरोबर त्यांना वांकुल्या दाखवीत,कोणी वानराबरोबर वृक्षांच्या या शाखेवरून त्या शाखेवर उड्या मारीत असत.||७-८-९||अर्थः---कोणी नदीच्या कांठी वाहत असलेल्या थोड्या पाण्यामध्ये स्नान करून बेडकांबरोबर त्यांच्या सारखे उद्या मारीत पोहत असत,कोणी नद्यांच्या पाण्यांत पडलेल्या आपल्या पडछायांना हंसत असत,दुसरे कित्येक आपल्याच शब्दाचा प्रतीध्यानी निघाला असतां,तो दुसराच कोणी मनुष्य बोलत आहे असे समझुन त्याला शिव्या देत असत||१०||अर्थः---याप्रमाणे गोपांच्या क्रीडा वर्णन करून विस्मित असता त्यांचे अभिनंदन करितो-हे राजा,याप्रमाणे तत्त्ववेत्या पुरुषांना स्वप्रकाश परमसुखरूप,दास्य करणाऱ्या भक्तांना आत्मस्वरूप देणारा नाथ आणि मायाचा आश्रय करणाऱ्या लोकांना मनुष्य पुत्र रूपाने भासणारा अशा त्या श्रीकृष्ण भगवंतबरोबर,ज्यांनी पुण्याच्या राशी केलेल्या आहे अशा त्या गोपबालकांनी क्रीडा केली तेव्हा त्यांचे भाग्य किती वर्णन करावे!||११||अर्थः---ज्या भगवंताचे चरणरज,बहुत जन्मांमध्ये अनुष्ठान केलेल्या तापाने व समाधीवगैरे कष्टशंनी ज्यांनी आपले मन स्वाधीन करून घेतले आहे त्या योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे तोच भगवान स्वतः होऊन ज्याच्या दृष्टी गोचर सवंगडी होऊन राहिला आहे त्यांचे भाग्य किती वर्णन करावे?ते वाणीला व मनालाही अगोचर आहे ||१२||अर्थः---असो याप्रमाणे रामकृष्णांबरोबर गोपबालकांची क्रीडा चालली असता ती सुखाने चाललेली क्रीडा पाहण्याचे ज्याला शन झाले नाही असा एक आघनामक महा दैत्य त्या वृंदावनामध्ये अकस्मात प्राप्त झाला.तो इतका प्रबल होता कि,अमृत प्रश्न केल्यामुळे अभर झालेल्या देवांनी आपण ह्यांच्या हातून जीवत राहून किंवा नाही अशी शंका घेऊन वाचण्याच्या इच्छेने,ते हा दुष्ट दुरात्मा केव्हा कसा मरेल अशी निरंतर वाट पाहत होते.किंवा यांत्याच दुसरा अर्थ होता,तो असा कि,-ते रामकृष्णादिकांचे खेळणे असे होत कि,अमृत पिऊन अमर झशालेलीही देव,आपल्या वाचनाचे साफल्य व्हावे असे मनात आणून ज्या खेळाने मनात त्यांचे निरंतर चिंतन करीत असत||१३||अर्थः---असो,कंसाने आज्ञा केलेला,पुतनेचा व बकासुराचा धाकटा भाऊ असो तो आघासुर,कृष्ण हे मुख्त ज्यामध्ये अशा बालकांस अवलोकन करून,हा कृष्णच माझ्या भावंडाचा(पूतनेचा व बकासुराचा) नाश करणारा आहे यास्तव त्या दोन्ही भावंडाच्या स्थांनी वत्सवत्सपालांसहवर्तमान मरून टाकीन||१४||अर्थः---बरे यांना मारले असतांही गोकुळांतले गोप वगैरे अवशेष राहतील असे म्हणावे तर ह्या रामकृष्णनादिक सर्व वत्सपालांनी जेव्हा भावंडांची तिलांजली केली जाईल तेव्हा गोकुलांतील नंदादिक सर्व गोप मेल्यासारखेच होतील.कारण,प्राण गेला असता शरीराचेठिकाणी चिंता कशाची आहे?जे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांचेही पुत्र हेच प्राण आहेत||१५||अर्थः---असा निश्चय करून त्यावेळी त्या खळ अघासुराने,कृष्णरामादिकांना गिळून टाकण्याच्या इच्छेने,चार कोसपर्यंत लांब,मोठ्या पर्वतासारखे पुष्ट,गुहे सारख्या पसरलेल्या तोडांचे युक्त व आश्चर्यकारक असे एक मोठे अजगराचे स्वरूप धारण करू त्या वत्सपालकांच्या जाण्याच्या मार्गाचे ठिकाणी शयन केले||१६||अर्थः---त्यावेळी तो दैत्य,ज्याचा खालचा ओंठ भूमीमध्ये शिरला आहे,वरचा ओंठ मेघमंडळात गेला आहे,ज्याच्या जबड्याच्या दोन्ही बाजू पर्वताच्या दऱ्यासारख्या असून दाढा पर्वताच्या शिखरांसारख्या आहेत,ज्याच्या नाकांतून कठोर वायुसारखा श्वास चालेलला असून जो वणव्यासारखा जाळणाऱ्या दृष्टींनी युक्त आहे||१७||अर्थः---तशा अजगरस्वरूप धारण केलेल्या त्या दैत्याला पाहून,सर्वही गोपबालक,हि एकप्रकारची वृंदावनाची शोभाच आहे असे मानून,तिची पसरलेल्या अजगरमुखाच्या सारखेपणाने कौतुकज्ञाने करूं लागले||१८||अर्थः---ते म्हणाले कि,-अहो मित्र हो,पुढे दिसत असलेले हे वन एखाद्या प्राण्यासारखे दिसते कि नाही?सांगा त्यामध्येही आम्हाला गिळून टाकण्याकरिता पसरलेल्या अजगरसर्पाच्या मुखासारखे दिसत आहे कि नाही?सांगा बरे!||१९||अर्थः---खरोखर तसेच आहे,हा सूर्याच्या किरणांनी तांबडा झालेला मेघ,त्याच्या वरच्या ओठासारखा दिसतो पहा.तसेच त्या मेघाच्या पडछायेणे तांबूस वर्ण दिसणारे हे नदीचे तीर,त्याच्या खालच्या ओंठासारखे भासत आहे||२०|| अर्थः---ह्या उजव्या व डाव्या बाजूंच्या पर्वतांच्या गुहा,दोन्ही ओंठाच्या प्रांतभागांच्या बरोबरीने दिसत आहेत पहा!ह्या उंच असलेल्या शिखरांच्या रांगाही त्या अजगराच्या दाढासारख्या दिसत आहेत पहा!||२१||अर्थः---हा लांब व रुंद असलेला मार्ग,त्याच्या जिव्हेसारखा भासत आहे,या शिखरांच्या आंत असलेला हा अंधकारही,त्याच्या तोंडातल्या मध्यभागासारखा वाटत आहे||२२||अर्थः---अहो,वणव्याने ऊन झालेला हा प्रखर वारा,त्याच्या श्वासारखा भासतो पहा!त्या वणव्याने जळलेल्या प्राण्यांचा जो हा दुर्गंध येत आहे तोही,अजगरांच्या पोटांत असलेल्या मांसाच्या दुर्गंधासारखा भासतो पहा||२३||अर्थः---तेव्हा दुसरे गोपबालक म्हणाल-खरे हा सर्पच आहे तथापि आम्ही येथे आंत शिरलो तर हा आम्हांला खाणार कि काय?तसे झाले तर या श्रीकृष्णाच्या हातून हाही बकासुराप्रमाण एका क्षणात नाश पावेल.असे परस्पर भाषण करून,ते सर्वही बालक,बकासुराला मारणाऱ्या त्या श्रीकृष्णाच्या सुंदर मुखाकडे पाहून मोठयाने हास्य करीत असता टाळ्या वाजवीत वाजवीत वत्सासहवर्तमान त्याच्या मुखांत शिरले||२४||अर्थः---इकडे सर्व प्राण्यांच्या ह्रदयांमध्यें राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने,हा अजगररूपी राक्षस आहे असें न जाणणारी यज्ञ त्या बालकांचे याप्रमाने खोटेच पस्पपर झालेले भाषण ऐकून तो खराच राक्षस आहे असे जारीले आणि खराशखर राक्षस असून या बालकांनाही अजगरासारखी वृंदावनाची शोभा आहे असें वाटते असा विचार करून आपल्या सवंगड्यांना आज जाण्यास प्रतिबंध करण्याचे जो मानत आणितो ||२५|| अर्थः---तो पर्यंत ते वत्सांसह सर्व बालक,दैत्याच्या उदरात प्रविष्ट झाले परंतु मारलेल्या आपल्या पूतना बक नामक भावंडाचे स्मरण बाळगनाऱ्या व म्हणूनच बकारीचा आत प्रवेश केव्हां होईल?अशी वात पाहणाऱ्या त्याने तोड मिटून त्यांना गाळीले नव्हते.कारण श्रीकृष्णासहवर्तमान सर्वांना गिळून टाकावें आसें त्याच्या मनात होते||२६|| अर्थः---तेव्हां सर्वांना अभय देंणारे श्रीकृष्ण प्रारब्धाने घडलेल्या आघासुराच्या मुखप्रवेशानें दिन झालेल्या ज्यांना दुसरा कोणीच रक्षक नाही अशा आपल्या हातातून सुटलेल्या आणि मृत्यूरुपी आघासुराच्या जटरागनीला तृणा सारख्या झालेल्या त्या वत्स वत्स पालकांना पाहून विस्मित व कृपेने पिडीत झाला आहे आणि त्या सर्व दृष्टया हरीने विचार केला की,या दृष्ट दैत्याचे वांचणें न व्हावे व माझ्या भक्तांची हिंसा न व्हावी या दोन्हीं गोष्टी कशा घडतील?व यांविषयी मी काय कृत्य केले पाहिजे या बद्दल विचार करून या दोन्ही गोष्टी होण्याचा उपाय जाणून नंतर त्याने त्या आघासुराच्या मुखात प्रवेश केला.||२७-२८|| अर्थः---तेव्हां मेघाच्या आड राहणारे देव मोहाने भागवत प्रभावाला विसरून आतां श्रीकृष्ण मरण पावेल असें मनात आणून व आघासुराच्या मरणाविषयी निराश होऊन हाय हाय शब्दाचा उच्चार करूं आक्रोश करूं लागले आणि त्या आघासुराचे बांधव व कंसादिक राक्षस होते ते हर्ष पावले.||२९|| अर्थः---तो देवांचा अक्रोश ऐकून,नाश शून्य असा भगवान् श्रीकृष्ण,बालक व वत्स यांसहवर्तमान आपले चूर्ण करण्याची इच्छा करणाऱ्या त्या दैत्याच्या कंठामध्यें त्यानें गिळण्याच्या पूर्वी आपण वेगाने वाढला ||३०||अर्थः---त्या वाढण्यामुळे मुखादिकांचा मार्गभूत कंठ रोधून गेला आहे ज्याचे डोळे बाहेर आले आहेत व जो धडपडू लागला आहे अशा त्या महादेहधारी आघासुराच्या देहांमध्यें कोंडून राहिलेला प्राण वायू मस्तकांतील ब्रम्हरंध्राला फोडून त्या द्वाराने बाहेर निघून गेला ||३१|| अर्थः--- त्या प्राण वायू बरोबरच सर्वही इंद्रिये बाहेर निघून गेली असता,नंतर लहान झालेला भगवान श्रीकृष्ण त्या अजगराच्या पोटांत सापडून मरण पावलेल्या मित्रांना व वत्सांना आपल्या मृताचा वर्षाव करणाऱ्या दृष्टीने उठून,त्यांसह वर्तमान त्या आघारासुराच्या मुखातून पुन्हा बाहेर पडला||३२||अर्थः---तेव्हा पुष्ट अशा त्या अजगराच्या देहापासून निघालेले आश्चर्य कारक मोठे शुद्ध सत्वमी तेज,आपल्या प्रकाशाने दशदिशांना प्रकाश पाडीत होत असते श्रीकृष्ण बाहेर पडण्याची वाट पाहत आकशामध्ये राहिलेले होते ते,कृष्ण बाहेर पडतांच त्यांच्या ठिकाणी सर्व देव पाहत असता प्रविष्ट झाले||३३||अर्थः---तडनंतर आघासुराच्या वदाने अति हर्ष पावलेल्या देवाधिकांना स्वकार्य करणाऱ्या श्रीकृष्नाचा सत्कार केला.त्यात देवांनी त्याच्या पुष्पांचा वर्षाव केला,अस्परांनी नृत्य केले,गंधर्वादिकांनी गायन केले,वाद्य वाजविणाऱ्या विद्याधरदिकानी वाद्यांचा गजर केला,वसिष्ठादिक ब्राम्हणांनी स्तव केले व पार्षदगणांनी जयजयशब्दाच्या योगाने सत्कार केला||३४||अर्थः---ते आश्चर्यकारक,स्तव उत्तम वाद्यांचे गजर,गायने,जयजयकारशब्द इत्यादिक अनेक उत्साहांपासून झालेल्या मंगलकारक शब्दांना,ब्रम्हदेवाने आपल्या सत्यलोकाच्या जवळ ऐकून तो त्या वृदावणामध्ये शब्दांना,ब्रम्हदेवाने आपल्या सत्यलोकाच्या जवळ ऐकून तो त्या वृंदावनामध्ये आला आणि त्या ईश्वर श्रीकृष्णाचा महिमा पाहून विस्मय पावला||३५||अर्थः---हे राजा,अद्भुत असे ते अजगरामध्ये चर्म (सांगाडा)वृंदावनामध्ये वाळलेल्या असून गोकुळवासी लोकांना बहुत कालपर्यंत खेळण्याकरिता मोठे बीळ झाले होते||३६||अर्थः---आता,दुसरेही एक मोठे आश्चर्य झाले ते असे कि,-विस्मित झालेल्या सर्व बालकांनी,जे आपणांला श्रीकृष्णाने प्रसिद्ध मृत्युपासून सोडविले होते व सर्परुपी अघासुराला,त्याच्या तेजाच्य श्रीकृष्णाचे ठिकाणी झालेला प्रवेश दृष्टी पडला असल्यामुळे,जे संसारलक्षण मृत्युपासून सोडविले होते ते श्रीकृष्णाने कौमारावस्थेमध्ये (पांचवे वर्षी)घडलेले कर्म,त्याच वेळी पाहून ते पौगंडावस्थेमध्ये (सहावे वर्षी)आजच ते घडले असे गोकुळांत वर्णन केले||३७||अर्थः---हे राजा,ज्याच्या स्पर्शाने सर्व पताकांचे क्षालन होऊन तो अघासुर पापरूपी दैत्यही)असज्जनांना अत्यंत दुर्लभ अशी भगवंताची समानरुपता पावला,परंतु वस्तुतः त्या ब्रह्मादी स्थावरांत सर्व श्रेष्ठकनिष्ठवस्तूंना उत्पन्न करणाऱ्या व मायेने मनुष्यपुत्रत्व स्वीकारणाऱ्या परमेश्वर श्रीकृष्णाचे हे मृत्युपासून वत्सवत्सपालांना व अघासुराला मुक्त करणे आश्चर्यकारक नाही||३८|| अर्थः---कारण,केवळ मनामध्ये चिंतन केलेल्या व एकवार मोठ्या बलात्काराने ह्रदयामध्ये स्थापन केलेल्या ज्याच्या मूर्तीच्या प्रतीमेनेही प्रऱ्हादादिक कितीएक भक्तांना भगवत्स्वरूपप्राप्तीरूप मुक्ती दिली आहे,मग नित्य अशा स्वानंदाभुवनाने मायेला दूर सारणारा तोच साक्षात परमेश्वर,आपण होऊन ज्याच्या देहामध्ये प्रविष्ट झाला त्याला झाली यांत आश्चर्य काय आहे? काहीच नाही||३९|| अर्थः---सुत म्हणाला-हे शौनकादिक ऋषीहो,याप्रमाणे,श्रीकृष्णाने रक्षण करून धर्मराजादिकासह दिलेला जो परीक्षित राजा त्याने आपल्या रक्षणकर्त्या श्रीकृष्णाचे आश्चर्यकारक चरित्र श्रावण करून,त्या श्रवनाच्या योगाने ज्याचे मन अगदी तत्पर झाले आहे अशा त्या राजाने,पुनरपि तेंच पुण्यकारक श्रीकृष्णचरित्र सांगण्याकरिता व्यासपुत्र शुकाचार्याला प्रश्न केला||४०|| अर्थः---राजा म्हणाला-हे ज्ञानसंपन्ना,पांच वर्षाच्या आंतल्या कौमारावस्थेमध्ये हरीने केलेले अघारसुरवधरूप कर्म,दहा वर्षांच्या आंतल्या पौंगडावस्थेमध्ये बालकांनी गोकुळामध्ये गायन केले,असे जे तूं मला सांगितलेस ते काळांतरी (कौमारावस्थेत)केलेले कर्म,तत्कालीन (पौंगडावस्थेत केलेले)कसे होईल?म्हणजे पांचवे वर्षी केलेले कर्म सहावे वर्षी ते आज केले असे त्या बालकांस कसे वाटले?||४१||अर्थः---ते,हे त्रिकालज्ञानसंपन्ना गुरो,मला सांग.ते मला मोठे कौतुक वाटत आहे.आणि हि खरोखर हरीची मायाच असावी.तिच्यावांचून अशी गोष्ट घडावयाचीच नाही||४२||अर्थः---हे गुरो,आम्ही ब्राम्हणाचा अपराध करणारे असल्यामुळे जरी अधम क्षत्रिय आहो तरी,ज्या अर्थी तुजपासून पवित्र अशा कृष्णकथामृताचे वारंवार प्राशन करितो त्या अर्थी या मनुष्यलोकी सर्वांहून धन्य आहो||४३||अर्थः---सुत म्हणाला-हे भगवद्भक्तांमध्ये अतिउत्तमा शौनका,याप्रमाणे परीक्षित राजाने प्रश्न केला असता,तो व्यासनंदन शुकाचार्य,त्या प्रश्नाने स्मरण करविलेल्या अनंत भगवंताने ज्याची सर्व इंद्रिये आकर्षण केली आहेत असा एकाग्रचित्त होऊन समाधिस्त झाला,तेव्हा पुन्हा जयजयकाराही शब्दश्रवणाने ज्याला पुनः बाह्यदृष्टी प्राप्त झाली आहे असा असता,तो राजाप्रत भाषण करूं लागला कि,-||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्ये अघासुरमोक्षनिरुपणनामक हा बारावा अध्याय समाप्त झाला ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ १३--- देवकी २---४--भगवान श्रीकृष्ण---[४]ब्रह्मदेवाचा मोह आणि त्याचा निरास. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ | साधु पृष्टं महाभाग त्वया भागवतोत्तम | यन्नूतनयसीशस्य शृण्वन्नपि कथां मुहुः ||१||श्रीशुक म्हणतात:---परीक्षिता !तु फार भाग्यवान आहेस.भगवंतांच्या भक्तांमाध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे.म्हणून तर तु इतका सुंदर प्रश्न विचारलास.तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यांत आणखी नाविन्य आणतोस.||१|| | सतामयं सारभृतां निसर्गो | यदर्थवाणीश्रुतिचेतसामपि | | प्रतिक्षणं नव्यवदच्युतस्य यत् | स्त्रिया विटानामिव साधुवार्ता ||२|| अर्थः—जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंतांच्या लीलेचे गण,श्रवण आणि चिंतन करीत असते.त्यांचा हा स्वभावाच असतो की, त्यांना प्रतीक्षिणी भगवंतांच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात. ज्याप्रमाणे स्त्रीलंपत पुरुषांना स्त्रियांसंबंधीच्या गोष्टीच आवडतात.||२||| शृणुष्वावहितो राजन्नपि गुह्यं वदामि ते | ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ||३|| अर्थः---राजा ! तु एकाग्र चित्ताने श्रवण कर. भगवंतांची ही लीला रहस्यमय असूनसुध्दा मी तुला ती ऐकवितो; कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात.||३||अर्थः---भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व मुलांना मृत्युरूप अघासुराच्या जबड्यातून वाचविले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले.||४||अर्थः---मित्रानो ! यामुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे. पाहना ! इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे ! आम्हांला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे पहा ! एकीकडे रंगी – बेरंगी कमळे उमलेली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजरव करीत आहेत; तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत. त्यांचा प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवीत आहेत.||५||अर्थः---आता आपण येथे भोजन करू. कारण दिवस बराच वर आला आहे आपण भुकेने व्याकूळ झालो आहोत. वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात रहातील.||६||अर्थः---“ठीक आहे.’’असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्या शिदोऱ्या उघडून भगवंतांच्याबरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले.||७|| अर्थः---गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारी बाजूंनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनविल्या आणि ते श्रीकृष्णांकडे तोंडे करून बसले.यावेळी सर्वांच्या डोळ्यांतून आनंद ओसंडत होता.कमळाच्या गड्डयाच्या चारी बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या,तसे ते सारे कृष्णांभोवती शोभून दिसत होते.||८||अर्थः---कोणी फुले,कोणी जून पाने,कोणी कोवळी पाने,अंकुर,फळे,शिंकी,साली,दगड यांची पत्रे तयार करून ते भोजन करू लागले.||९||| सर्वे मिथो दर्शयन्तः स्वस्वभोज्यरुचिं पृथक् | हसन्तो हासयन्तश्चाभ्यवजन्हुः सहेश्वराः ||१०|| अर्थः---भगवान श्रीक्रर्श्ना आणि बाल-गोपाल असे जणू सर्वजण एकमेकांना हसत-हसवत भोजन करू लागले.||१०||अर्थः---त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती.शिंग आनिवेताची काठी डाव्या बगलेत धरली होती.सुंदर हातात दहीभाताचा घास होता.बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती.आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोद्पूर्ण बोलण्याने आपल्या सवंगडयांना हसवीत होते.जे सर्व यज्ञांचे भोक्ते तेच आज मुलांसमवेत बाललीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची हि लीला पाहात होते.||११||अर्थः---हे भारता!अशा प्रकारे बाल-गोपाल भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली.||१२||अर्थः---गोपाळांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले,तेव्हा ते घाबरले.त्यावेळी विश्वातील भयाला भिवविणारे श्रीकृष्ण म्हणाले,”मित्रांनो!तुम्ही जेवण थांबू नका.मी वासरांना येथे घेऊन येतो.”||१३||अर्थः---भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पाहड,दऱ्या,कुंज,गुहा इत्यादी ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले.||१४||अर्थ:---परीक्षिता!ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते.प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले.लीलेने मनुष्य-बालक झालेल्या भगवंतांच्या आणखी एखादा मनोहर महिमा पाहावा,असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वत:अंतर्धान पावले.||१५||अर्थ:---वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले.येऊन पाहिले तर गोपालसुध्दा नाहीत.तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूला जाऊन त्यांना शोधले.||१६||| क्वाप्यदृष्ट्वान्तर्विपेने वत्सान् पालांश्च विश्ववित् | सर्वं विधिकृतं कृष्णः सहसावजगाम ह ||१७|| अर्थ:---सर्वज्ञ श्रीकृष्णांना त्या वनात गोपाल आणि वासरे कोठेच दिसली नाहीत,तेव्हा त्यांनी लगेच ताडले की,ही ब्रह्मदेवाची करणी आहे.||१७||| ततः कृष्णो मुदं कर्तुं तन्मातृणां च कस्य च | उभयायितमात्मानं चक्रे विश्वकृदीश्वर: ||१८|| तेव्हा श्रीकुष्णांनी,वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवालासुद्धा आनंदित करण्यासाठी स्वत:वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली.यात त्यांना अशक्य ते काय?कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत ना!||१८||ती बालके आणि वासरे संख्येने ज्तकी होती,जेवढी त्याची लहन शरीरे होती,त्यांचे हात-पाय जसेजसे होते,त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या,शिंगे,बासऱ्या,पणे आणि शिंकी होती,जसे आणि जितके वस्त्रालंकार होते,ज्याप्रमाणे ते खने-पिणे इत्यादी व्यवहार करीत,अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्वस्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले.त्यावेळी’’हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे’’हि वेद वाणी सार्थ आहे.||१९|| अर्थः-----सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाळ झाले.आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजामध्ये प्रवेश केला.||२०|| राजा!ज्या गोपाळांची जी वासरे होती,त्यांना त्याच गोपाळांच्या रुपने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांचा गोठ्यात बांधले आणि ते त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांचा त्यांचा घरात्ब गेले.||२१|| अर्थः---बासरीची तान एकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या.गोपाळ बनलेल्या परब्रम्ह श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुये समजून,हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले.आणि प्रेमामुळे स्तनातून पाझणारे अमृतासारखे दुध त्या त्यांना पाजू लागल्या.||२२|| अर्थः---परीक्षिता!अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रुपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करीत.त्या माता त्यांना उटणे लावीत,न्हाऊ घालीत,चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत.नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत.अशा रीतीने त्यांचे लालन-पालन करीत.||२३||अर्थः---गाईसुद्धा धावत धावत गोठ्यांत येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात.तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे संडातून पाझरणारे दुध त्यांना पाजीत.||२४||| गोगोपीनां मातृतास्मिन् सर्वा स्नेहर्द्धिकां विना | पुरोवदास्वपि हरेस्तोकता मायया विना ||२५|| अर्थः---या गाई आणि गौवळणीचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता.मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त होते.तसेच भगवानसुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत.परंतु भगवंतांचे ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता.||२५||अर्थः---आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासीयांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळू हळू वाढतच गेले.एवढेच नव्हे तर,श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते,तसेच त्यांना आपल्या या बालाकांबद्द्लहि पुर्विपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले.||२६||अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वत:गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बसून स्वत:च स्वत:चे पालन करीत एक वर्षपर्यंत वनांत आणि गौळवाड्यांत क्रीडा करीत राहिले.||२७||जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास पाच-सहा दिवस शिल्लक होते,तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चारीत वनात गेले.||२८||अर्थः---त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गाई चरत होत्या.तेथून त्यांनी व्रजाजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले.||२९||अर्थः---वासरांना पाहतातच गाईंचे वात्सल्य उफाळून झाले.करता ज्या वाटेने जाने कठीन होते,त्या वाटेनेही हंबरत जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळत सुटल्या.त्यावेळी त्यांचा संडातून दुधाच्या धारा वाहात होत्या,माना वशिंडाकडे वळवून शेपट्या आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या.||३०|| अर्थ:---ज्या गाईंना आणखी आनखी वासरे झाली होती,या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेन आपोआप वाहाणारे दुध पाजू लागल्या.त्या वेळी त्या आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटीत होत्या की, जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय!||३१|| अर्थः---गोपांनी त्यांना आडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला,पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गाईंचा आतिशय राग आला.जेव्हाते अतिशय कष्टानेत्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले,तेव्हा त्यांनी वासरांनसमवेत मुलांनाही पहिले.||३२|| अर्थः---आपल्या मुलांना पाहाताच त्यांचे हृदय प्रेमाने उचंबळून आले.प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणो कोठच्या कोठे पळून गेला.त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयासी कवटाळले आणि त्यांचा मस्तकाचे अवघ्राण करून ते अत्यंत आनंदित झाले.||३३||अर्थ:---आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला.नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते हळू-हळू निघून गेले.गेल्यानंतरसुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहत राहिले.||३४||अर्थ:--ज्यांनी आईचे दुध पिणे सोडले होते,त्या बालकांवरसुद्धा गाई आणि गौळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले.कारण त्यांना त्याचे कारण माहीत नव्हते.||३५||| किमेतदद्भुतमिव वासुदेवेsखिलात्मनि | व्रजस्य सात्मनस्तोकेष्वपूर्वं प्रेम वर्धते ||३६|| अर्थ:---“हे काय आश्चर्य आहे!व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे,तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे!||३६||अर्थ:---ही कोणती माया आहे?कुठून आली?ही एखाद्दा देवतेची,मनुष्याची की असुराची आहे?नाही.हे शक्य नाही.ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे.कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही.”||३७||अर्थ:---असा विचार करून बलरामांनी ज्ञानदृष्टीने पहिले, तेव्हा त्यांचा लक्षात आले कि, हि सर्व वासरे आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्णच आहेत.||३८|| अर्थः---तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले-“भगवन!हि गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत.या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊनसुध्दा आपण एकतेच या रूपांमध्ये दिसत आहात.आपण एकतेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात,ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा.”तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली.||३९|| अर्थः---तोपर्यत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आले.त्यांचा कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रूटी [ तिक्ष्ण सुईने कमळाच्या पणाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा ] इतका काळच झाला होता. त्यांनी पहिले कि,भगवान श्रीकृष्ण,गोपाल आणि वासरांच्याबरोबर एक वर्षापुर्वीप्रमानेच क्रीडा करीत आहेत.||४०|| अर्थः---ते विचार करू लागले, “गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती,ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत.||४१|| अर्थः---तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त, हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे, जे एक वर्षापासुन भगवंतांच्याबरोबर खेळत आहेत,ते कुठून आले?”||४२|| अर्थः---ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार अरुनही या दोहोंपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाहीत.||४३|| अर्थः--- स्वतः मोहापासून दूर राहून विस्व्हाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना, ब्रम्हदेव आपल्या मायेने मोहित करावयास निघाले होते. परंतु ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले.||४४||| तम्यां तमोवन्नैहारं खद्दोतार्चिरिवाहनि | महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युन्जतः ||४५|| अर्थः---ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या आंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसहि लागत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुशंवर आपल्या मायेने मोहित करतात, तेव्हा ते त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत. उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात.||४५|| अर्थ:---तेवढ्यात ब्रम्हदेवांना समोरच,सर्व गोपाल आणि वासरे श्रीकृष्णांनाच्या रुपात दिसू लागले.ते सर्वजण ढगांप्रमाणे श्यामवर्ण,पितांबरधारी,शंख,चक्र,गदा आणि पद्म यांनी युक्त असे चार हात असलेले,मास्तकांवर मुगुट,कानांमध्ये कुंडले,कंठांमध्ये मोत्यांचे हार व वनमाळा धारण केलेले दिसत होते.||४६-४७||अर्थः---त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्हे,बाहुंमध्ये बाजूबंद,मनगटांमध्ये शंखाकार रत्नजडीत कडी,पायांमध्ये नूपुरे आणि कडी,कमरेला करदोते व बोटांमध्ये आंगठ्या झगमगत होत्या.||४८||अर्थ:---त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर,अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या.||४९||
अर्थ:---त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहात होते.असे वाटत होते कि,जणू काही या दोहोंच्याव्दारा सत्त्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार्क्रून भक्तजनांच्या मनांत इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत.||५०||अर्थ:---स्वत:पासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत-गात अनेक प्रकारच्या पुजासामग्रीने भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांची उपासना करीत आहेत.||५१||अर्थ:---अणिमा,महिमा इत्यादी सिद्धी, माया, विद्या इत्यादी विभूती आणि महत्तत्त्व इत्यादी चोवीस तत्त्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले आहे.||५२||अर्थः---काल, स्वभाव, संस्कार, कामना, कर्म, विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रुपाची उपासना करीत आहेत. भगवंतांच्या समोर ती सर्व तत्वे आपले अस्तित्व गमावून बसली होती.||५३||अर्थः---ते सर्व सत्य, ज्ञान, अनंत, अन्न्दस्वरूप आहेत, एकरस आहेत. तसेच तत्वज्ञान्यांची सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शहि करू शकत नाही.||५४|| अर्थ:---अशाप्रकारे ब्रम्हदेवांनी एकाच वेळी पहिले कि ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होते आहे, त्या परब्रह्मरूप श्रीकृष्णांची हि रूपे आहेत.||५५|| | एवं सकृद् ददर्शाजः परब्रम्हात्मनोsखिलान् | यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचरम् ||५|| अर्थः—हे अंत्यत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रम्हदेव चकित झाले. त्यांची अकराही इंद्रिये भान विसरली. भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले. जणू काही व्रजाच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी.||५६||अर्थः---ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलीकडचे आहे, ज्यांचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश,आनंदस्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहेत,वेदांतसुद्धा ज्यांचे साक्षात निषेध करून आनंदस्वरूप ब्रम्हाचे तो काहीसे दिग्दर्शन करतो,त्या भगवंतांचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रम्हदेव हे काय आहे, हे न कळल्याने दिङ्मूढ झे व त्यांचा रूपांना पाहण्यासही असमर्थ ठरले.हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला.||५७||अर्थः---यामुळे ब्रम्हदेवांना बह्यज्ञान झाले. ते जणू मारुन्पुन्हा जिवंत झाले. त्यांनी कसेबसे डोळे उघडले. तेव्हा कुठे त्यंना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले.||५८|अर्थः---नंतर जेव्हा ते चेहुकडे पाहू लागले, तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले,सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणाऱ्या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले.||५९||| यत्र नैसर्गदुर्वैराः सहासन् नृमृगादयः | मित्राणीवाजितावासद्रुतरूट्तर्षकादिकम् ||६०|| अर्थः---तेथे श्रीकृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध,लोभ इत्यादी दोष तेथून पळून गेले आहेत आणि तेथे स्वभावतःच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षीसुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहात आहेत.||६०||अर्थः---वृदांवन पाहताना ब्रम्हदेवांना दिसले की,अद्वितीय परब्रम्ह,गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहे.एक असूनही त्यांना मित्र आहेत,अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधीत आहेत.||६१||अर्थः---भगवंतांना पाहाताच ब्राम्हदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातले.त्यांनी आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलांऩा स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले.||६२||अर्थः---श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्यांचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून पुन्हा लोटांगण घालीत.अशाप्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंतांच्या चरणांवरच पडून राहिले .||६३||अर्थः---नंतर हळू हळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले.भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले.ते थरथर कपू लागले.नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने वाणीने ते भगवतांनी स्तुती करू लागले.||६४|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | १५--- २—५--भगवान श्रीकृष्ण---[५]गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ | ततश्च पौगण्डवयः श्रितौ व्रजे | बभूवतुस्तौ पशुपालसम्मतौ | गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदै-|र्वृन्दावनं पुण्यमतीव चक्रतुः ||१|| | नृत्यन्त्यमी शिखिन ईड्य मुदा हरिण्य: | कुर्वन्ति गोप्य इव ते प्रियमिक्षणेन | | सूक्तैश्च कोकिलगणा गृहमागताय | धन्या वनौकस इयान् हि सतां निसर्गः ||७|| अर्थः---केव्हांतरी राजहंसाच्या शब्दामागून आपण तसा शब्द करीत असे,केव्हांतरी आपल्या सख्यांना हंसवीत असता नृत्य करणाऱ्या मोरांच्या समीपभागी आपण नृत्य करीत असे||११||अर्थः---एखादेवेळी गाईंना व गोपाना आवडणाऱ्या मेघासारख्या गंभीर वाणीने,सांकेतिक नांवांनी दूर गेलेल्या गाईना प्रीतीने जवळ बोलावीत असे||१२||अर्थः---केव्हांतरी चकोर,कौंच,चक्रवाक्र,भारद्वाज व मोर या पक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण करीत असे,केव्हांतरी इतर प्राणी व्याघ्रसिंहाचा शब्द ऐकून भिऊन पळत दूर जाउं म्हणजे आपणही भ्याल्यासारखा होऊन पळून जात असे ||१३||अर्थः---केव्हांतरी क्रीडेच्या योगाने श्रम पावून गोपांच्या मांडीने उसे करून निजलेल्या आपड वडीलबंधू बलरामाला,तो कृष्ण स्वतांच चरण संमर्द नादिके करून श्रमरहित करीत||१४|| अर्थः---केव्हांतरी एकमेकांचे हात धरून उभे राहिलेले ते रामकृष्ण,एकमेकांबरोबर नृत्य करणाऱ्या,गायन करणाऱ्या व कुस्ती करणाऱ्या गोपांची तुम्ही नृत्याविषयी विद्याधरासारखे आहां,गायनाविषयी गंधर्वासारखे आहां व कुस्तीने त्रैलोक्याला जिंकणारे आहां अशी प्रशंसा करीत असत||१५||अर्थः---केव्हांतरी बाहूयुद्धाच्या श्रमाने श्रम पावलेला श्रीकृष्ण,झालाखाली कोंवळ्या पल्लवांच्या बिछान्यावर गोपांच्या मस्तक ठेऊन शयन करीत असे||१६|| अर्थः---त्यावेळी कितीएक गोप त्या महात्म्या श्रीकृष्णाची चरणशुशुषा करीत असत.दुसरे भगवंताबरोबर क्रीडा करूनच निष्पाप झालेले कितीएक गोप,पल्लवादिकांच्या विंझण्यांनी त्याला वारा घालीत असत||१७||अर्थः---हे महाराजा,दुसरे कितीएक गोप,ज्यांच्या बुद्धीला स्नेहाने पाझर सुटला आहे असे होऊन,त्या महात्म्या श्रीकृष्णाच्या शयनादिक लीलांना योग्य असून त्याला सुखकारक अशी गायने हळूहळू त्याचा निद्राभंग जसा न होईल तशा रीतीने गात असत||१८||अर्थः---याप्रमाणे,ज्याच्या चरणपल्लवाचे लक्ष्मीचे लालन केले आहे त्या भगवंताने,आपल्या मायेच्या योगाने आपल्या खऱ्या स्वरूपाचे आच्छापण करून,आपल्या आचरनांनी गोपपुत्रत्वाने अनुकरण करीत व मध्येमध्ये ईश्वरासारखी चरित्रे करून दाखवीत ग्राप्यगोपांसारखे होऊन क्रीडा केली||१९||अर्थः---आतां त्याचे ईश्वरचरित्र दाखविण्याकरिता सांगतो कि,-रामकृष्णांचा एक परम मित्र श्रीदामानामक गोपाळ होता तो व सुबल,स्टोककृष्ण इत्यादिक गोप हे सर्व रामकृष्णाजवळ येऊन प्रेमाने असे म्हणाले कि,-||२०||अर्थः---हे महापराक्रम्या रामा रामा,हे दुष्टनाशका कृष्णा,या क्रीडास्थानापासून जवळच तालवृक्षांच्या रागांनी व्याप्त असे एक मोठे अरण्य आहे||२१||अर्थः---तेथे पुष्कळ तालवृक्षांची फळे आहेत,ती कितीएक खाली पडली आहेत व कितीएक वर खली पडत आहेत परंतु काय करावे! ती दुरात्मा धेनुकासुराने दुसर्याने घेण्यास अटकाव केलेली आहेत||२२||अर्थः---हे रामा,हे कृष्णा,गर्दभाचे रूप धरण करणारा तो महापराक्रमी असुर,आपल्या सारख्या बलवान दुसर्याही पुष्कळ ज्ञातींनी परिवेष्टित आहे||२३||अर्थः---हे शत्रूनाशका कृष्ण,तो मनुष्यांचे भक्षण करीत असतो म्हणून त्यापासून भ्यालेले मनुष्य,त्या वनांत जात नाहीत,ते वन,गाईवगैरे पशूंनी व पक्ष्यांच्या समुदायानिंही वर्ज्य केले आहे||२४||अर्थः---पूर्वी कधीच भक्षण केलेली नाहीत अशी सुवासिक फळे तेथे आहेत.हा पहा जिकडे तिकडे पसरलेला सुवासिक गंध येत आहे||२५||अर्थः---हे कृष्णा,सुगंधाच्या योगाने लोभाविष्टचित्त झालेल्या आम्हांला ती फळे मिळवून दे.ती फळे भक्षण करण्याची आम्हांला मोठी इच्छा झाली आहे,परंतु हे राम,जर तुला आमचे सांगणे रुचत असेल तर आणण्याकरिता चलावेस||२६||अर्थः---याप्रमाणे मित्र गोपांचे भाषण ऐकून हास्य करून त्या मित्रांचे प्रिय करण्याच्या इच्छेने,समर्थ असे ते रामकृष्ण,गोपांनी परिवेष्टित होऊन त्या तालवनामध्ये निघून गेले||२७||अर्थः---बलरामाने तर त्या वनांत प्रवेश करून आपल्या बाहूंच्या बळाने,तालवृक्षांच्या,मदोन्मत्त हत्तीप्रमाणे कांपवून त्यांची फळे भूमीवर पाडिली||२८||अर्थः---जेव्हा गर्दभरूप धारण करणारा तो धेनुकासुर,पडणाऱ्या फळांचा शब्द ऐन वृक्षपर्वतासहित पृथिवीतळाला कांपवित असता,बलरामाला मारण्याकरिता त्याच्यासमोरधांवून गेला||२९||अर्थः---आणि घेऊन पाठीमागच्या दोन पायांनी मोठ्या वेगाने बलरामाच्या वक्ष:स्थळावर प्रहार करून गर्दभजातीचा शब्द करीत तो बली व खळ धेनुकासु,पुन्हा प्रहार करण्याकरिता बलरामच्या सभोवार धाउं लागला||३०||अर्थः---आणि अत्यंत क्रुद्ध झालेला तो धेनुकासूर,पुन्हा बलरामाजवळ येयुन त्याच्याकडे आपलें पुच्छ करून उभा राहिला आणि हे राजा,तो बलरामाला मारण्याकरितां आपलें पाठीमागचें पाय झाडूं लागला||३१||अर्थः---तेव्हा बलरामाने त्या दैत्याला एकाच हातानें मागच्या पायांच्या अग्रभागी धरून गरगर फिरवून,फिरविण्यानेंच मरण पावलेल्या त्याला एका तालवृक्षाच्या मुळावर फेंकील ||३२||अर्थः---त्या बलरामाने टाकलेल्या गर्द्भाच्या देहानें ताडित झाल्यामुळे कांपणारा,मोठ्या शेद्याचा तो महाताल,आपल्या बाजूला असलेल्या दुसऱ्या तालवृक्षाला कांपवित त्याच्यावर मोडून पडला.तेही दुसऱ्या ताडाला कांपवीत त्यांच्यावर मोडून पडला,तेही दुसऱ्या तादाव्र मोडून पडला.||३३||अर्थः---याप्रमाणे लीलेनें टाकलेल्या गर्दभाच्या देहानें जो तालवृक्ष ताडित झाला होता त्याच्या योगानें दुसरा व त्याच्या योगानें तिसरा याप्रमाणे सर्वहि तालवृक्ष,मोठा वारा सुटला असतां जसे कंपित होतात त्याप्रमाणे कंपित झाले ||३४||अर्थः---हे राजा,ज्याचेठिकाणी हें जग,उभ्याच व आडव्या तंतूचेठिकाणी विणलेल्या पटाप्रमाणें ओतप्रेत रचिलेले आहे,त्या जगदीश्वर भागवान् अनंताचेठिकाणी हें धेनुकासुराला गरगरा फिरवून मारणेंवगैरे आश्चर्य नाहीं||३५|| अर्थ:---असो याप्रमाणे धेनुकासुर मरण पावल्यानंतर त्याचे ज्ञाति जे गर्दभ होते ते सर्वही हतबंधू झाल्यामुळे क्रुद्ध होऊन,कृष्ण,राम व गोप यांना मारण्याकरितां त्यांच्या अंगांवर धांवून आले ||३६|| अर्थः---तेंव्हा हे राजा,श्रीकृष्ण व बळराम यांनी अंगांवर धाऊन येणाऱ्या त्या गर्दभांना सहज लीलेनें मागच्या पायांचेठिकाणी धरून गरगर फिरवून तालवृक्षांवर फेंकुन दिलें ||३७||अर्थः---त्यावेळी फळांच्या समुदायांनी व मोडलेल्या तालवृक्षांच्या शेंड्यांसह गतप्राण होऊन पडलेल्या दैत्यांच्या देहांनी व्याप्त झालेलें टी भूतळ,जसं मेघांच्या योगानें आकाशतळ शोभतें त्याप्रमाणे शोभूं लागले ||३८||अर्थः---दुसऱ्यांना दुष्कर असें तें रामकृष्णाचे फार मोठें कर्म पाहून,देवादिकांनी पुष्पवृष्टिवगैरे केली.त्यांत देवांनी पुष्पवृष्टी केली,गंधर्वांनी गायनपूर्वक वाद्यें वाजविली व ऋषींनी स्तुति केली ||३९||अर्थः---नंतर सर्वमनुष्य धेनुकासुर मरण पावलेल्या त्या वनामध्यें निर्भयपणे तालफलें भक्षण करूं लागले,तसेच गोमहिष्यादिक,पशुही तृण भक्षण करूं लागले||४०||अर्थः---नंतर कमलपत्राक्ष,व श्रोत्यावक्त्यांना ज्यांची श्रावण कीर्तनें पुण्यकारक आहेत असा तो बलरामसाहित श्रीकृष्ण, देवऋष्यदिकांनी व गोपांनी स्तूयमान होत असता गोकुळांपरत आला ||४१|| अर्थः---त्यावेळीं त्याच्या दर्शनाविषयीं उत्कंठीतदृष्टि होऊन एकत्र मिळालेल्या गोपी,वनांतून येणाऱ्या,गोरजानें व्याप्त झालेल्या,कुरळकेशांचेठिकाणी ज्यानें मोराची पिसें व वनांतील फुलें धारण केलीं आहेत,ज्यांचे हास्य मनोहर आहे,ज्याची कीर्ती अनुयायी गोप गायन करीत आहेत अशा मुरलीध वाजविणाऱ्या त्या श्रीकृष्णाला पाहण्याकरितां,सामोन्या गेल्या ||४२|| | अथ गावश्च गोपाश्च निदाघातपपीडिताः | दुष्टं जलं पपुस्तस्यास्तृषार्ता विषदूषितम् ||४८|| | विषाम्भरस्तदुपस्पृश्य दैवोपहतचेतसः | निपेतुर्व्यसवः सर्वे सलिलान्ते कुरुद्वह ||४९|| | वीक्ष्य तान् वै तथा भूतान् कृष्णो योगेश्वरेश्वरः | ईक्षयामृतवर्षिण्या स्वनाथान् समजीवयत् ||५०|| | अन्वमंसत तद् राजन् गोविन्दानुग्रहेक्षितम् | पीत्वा विषं परेतस्य पुनरुत्थानमात्मनः ||५२|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ १६--- वैष्णवी २---६--भगवान श्रीकृष्ण---[६]कालीयांवर कृपा. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| विलोक्य दूषितां कृष्णां कृष्णः कृष्णाहिना विभुः | तस्या विशुद्धिमन्विच्छन् सर्पं तमुदवासयत् ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा कलीयसर्पाने यमुना नदी दुषित केली असे पाहून तिची शुद्धता होण्याची इच्छा करणाऱ्या समर्थ भगवान श्रीकृष्णाने त्या सर्पाला तेथून घालवून दिले ||१|| अर्थः----राजा म्हणाला –हे ब्राम्हण षड्गुनैश्र्वर्य संपन्न अशा भाग्वान श्रीकृष्णाने खोल पाण्यामध्ये युगेपर्यंत राहणाऱ्या त्या कालीयासार्पाचा निग्रह कोणत्या प्रकाराने केला ?तासाचा रमनकव्दिपामध्ये राहणारा तो कालीयसार्पही जलचर नसता त्या पाण्यामध्ये का येयून राहिला होता?ते मला सांगावे ||२|| अर्थः---हे ज्ञाननिष्ठ <आपल्या भक्ताच्या इच्छेनुसार वर्तन करणाऱ्या सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णाने गोपाल्रुपणे आचरण केल्यान्या मोक्ष प्रपक चरित्र रूप अम्रीताचे सेवन करणाऱ्या कोण बरे पुरुष तृप्त होईल ?कोणीच नाही :यास्तव ते मला सांगावे ||३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाले-हे ब्रज यमुना नदीच्या पत्रामाध्येबकालियाच्या विश्रूप अग्नीने ज्याचे पानि आधानासारखे कडत होते ,ज्यामध्ये वरून जाणारे पक्षीही मारून पडत होते आणि ज्याच्या विषयुक्त उदाकाच्या तरंगावरून ,पाण्याचे कान घेवून आलेल्या वार्याने स्पर्श केलेले तिरस्थ वृक्ष व पशुपाक्षादिक प्राणी मारून जात असत असा एक कलीय सर्पाचा डोह होता ||४-५||अर्थः---त्या अपरिहार्ययुक्त विषाच्या सामर्थ्याने बलाढ्य असलेल्या कालीयासर्पाचा व त्याने विषयुक्त केलेल्या यामुनानडीला पाहून खालच्या निग्रहाविषयी आवतीर्ण झालेल्या त्या श्रीकृष्णाने ,त्याला घालवून देण्याकरिता आपली कमर वस्त्राने घटत बांधून व फार उंच असलेल्या कालाम्बाच्या वृक्षावर चढून हातानी दंड थोपतिले आणि त्या कळंबावरून खाली विशोदाकाने भरलेल्या त्या डोहामध्ये उडी टाकिली||६|| अर्थ:--त्यावेळी ज्याचे पाणी ,पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या उडी टाकण्याच्या वेगाने क्षोभ पावलेल्या अंतर्गत सर्पाच्या विषाने युक्त होऊन वर उसळले आहे व ज्याच्या लता विषाने तांबड्या पिवळ्यावगैरे वर्णाच्या भारुंकर झाल्या आहेत तो कालीयासार्पाचा डोह ,चोहोकडे पसरत चारशे हातापर्यंत विस्तार पावला .हे राजा अनंतबळी अशा त्या कृष्णाचे हे काही आचार्य नाही||७|| अर्थः---हे राजा नंतर डोहामध्ये मोठ्या मोठ्या हत्तीप्रमाणे लीला करून विहार करणाऱ्या त्या श्रीकृष्णाने भूजदंडनी ताडन केलेल्या पाण्याचा नाद ऐकून त्या कृष्णाच्या क्रीदेने आपल्या घराचा नाश होणार असे पाहून ते सहन करणारा तो कालीयासार्प कृष्णाजवळ धावून आला||८||अर्थः---आणि त्याने देखणं ,सुखुमार मेघासारखा श्यामवर्ण ,श्रीवात्छ्लांचन व पिवळा पितांबर धरण करणारा ,मंद हास्याने मनोहर मुख दिसणारा निर्भयपणे क्रीडा कार्नासरा व कलमवर्गासारखा कोमलचार्नानी युल्त अशा त्या श्रीकृषणाला क्रोधाने मार्मामर्माचे ठिकाणी दंश करून आपल्या देहाने वेष्ठित केले||९||अर्थः---तेव्हा सर्पाच्या देहाने वेष्ठित झाल;इल्या व हालचाल बंद पडलेल्या त्या कृष्णाला पाहून ,ज्यांनी आपली देह मित्र संपत्ती ,स्त्रिया व इहलोकाचे व पर्लोकीचे भोग कृष्णाला अर्पण केले आहेत व ज्यांना तो कृष्णाचा प्रिय आहे असे त्याचे सवंगडे गोप अत्यंत दुखित व दु:खानंतर अतिशय झालेल्या शोकाने व भयाने ज्याची भूद्धी विवेकशून्य झाली आहे असे मुर्चीत होऊन पडले||१०||अर्थः---तशाच गाई ,वृषभ व कालवडी ह्या सर्वही श्रीकृष्णाकडे आपल्या दृष्टी लावून ,तो कृष्ण सर्पाने वेष्ठित झाल्यामुळे निश्रेष्ट झाला आहे असे पाहून ,अत्यंत दु:खित व भयभीत होऊन ,आक्र्दन करीत रडतच आहेत कि काय अशा उभ्या राहिल्या ||११||अर्थः---त्याचा वेळी गोकुळामध्ये पुढे लवकरच भय सुचविणारी भूमीवर भूकाम्पादिक आकाशामध्ये उल्कापातादिक व देहाचे ठिकाणी वामनेत्र स्फुर्नादिक असे तीन प्रकारचे अतिबयंकर महोत्पात होऊ लागले ||१२||अर्थः---हे राजा ,त्यांना पाहून नद्प्रभृती सर्प गोप बाल्रामावाचून कृष्ण गाई चारण्याकरिता वनात गेला आहे असे जाणून नंतर त्या झालेल्या उत्पातांनी कृष्ण मरण पावला असे मनात आणून भयाने व्याकूळ झाले आणि ‘कृष्णाच्या वियोगानें,झालेलें’ ‘दुःख पुढें निर्वाह कसा होईल याबद्दलचां चिंतारूप’शोक व आतां कृष्ण वियोगानें आम्हांस मरण प्राप्त होईल असें’भय यांच्या योगानें टी अगदीं गडबडून गेले.कारण ते कृष्णाचा खरा प्रभाव जाणणारे जाणारे नव्हते व त्यांचे पंचप्राण व मन हिं कृष्णाचेठिकाणी अगदीं गढून गेलीं होतीं ||१३-१४|| अर्थः---नंतर दीन व वत्सांचा वियोग झालेल्या गैप्रमाणे आक्रोश करणारे ते सर्व गोप,बाल वृद्ध व स्त्रिया यांसहित कृष्णाच्या दर्शनाविषयीं उत्कंठीत होऊन कृष्णाचा शोध करण्यास जाण्याकरितां गोकुळांतून निघाले||१५|| अर्थः---ते नंदादिक गोप,तशाप्रकारें व्याकूळ झालें असें पाहून,मधुकुलामध्यें उत्पन्न झालेल्या व ज्ञानैश्र्वर्यादिगुणांनी पूर्ण अशा त्या बलरामाने हास्य करून कांहीच भाषण केलें नाहीं.कारण तो श्रीकृष्णाचा प्रभाव जाणणार होता म्हणजे कृष्णाला कालियाचें भय णाश्र्ण,त्याच्या मनांत कालियामर्दन पाहण्याकरीता नंदादिकांनीं यमुनेच्याकाठि यावें असें आहें हें जंत होता ||१६|| अर्थः---असो,ते नानादादिक गोप,भगवंताला जाणविणाऱ्या लक्षणांनी युक्त अशा पावलांनी सुचविलेल्या मार्गांचे प्रिय श्रीकृष्णाचा शोध करीत करीत यामुनेच्या काठिया गेले ||१७|| अर्थः---म्हणजे जे राजा,त्या गोपांनी,गाई जाण्याच्या मार्गावर तेथं तेथे दुसर्या गोपादिकांच्या पावलांच्या मध्येंमध्यें,कमळ,यव,अंकुश,व्रज,ध्वज या चिन्हांनी युक्त आशिया गोपाधिपती श्रीकृष्णाची पावलें पाहून,मोठ्या त्वरेनें यमुनेच्या कांठी गमन केलें ||१८||अर्थः---आणि ते दूरूनच डोहामध्यें कालियासर्पाच्या देहानें वेष्टित होऊन निश्चेष्ट झालेल्या कृष्णाला,तसेंच डोहाच्या कांठी मूर्छा येऊन पडलेल्या गोपांना आणि आसमंताद्भागी आक्रंदन करणाऱ्या गाईवगैरे पशूंना पाहून,अतिदुःखित होऊन मोठी मूर्छा पावले ||१९|| अर्थः----त्यावेळीं कृष्णाचें प्रेम,मंदहास्य अवलोकन व प्रियवचनें यांचे स्मरण करणाऱ्या व त्या अनंत भगवंताचेठिकाणी अनुरक्तचित्त असलेल्या सर्व गोपी ,प्रिय श्रीकृष्णाला कालीयासारपणे वेधून टाकिले असे पाहताच अत्यंत दु:खाणे संतप्त झाल्या व प्रिय कृष्णाने रहित अशा त्रैलोक्यात शयनया पाहू लागल्या ||२०|| अर्थ:---आणि त्यावेळी कृष्णाची माता कृष्णाजवळ जाण्यासाठी कालियाच्या डोहात प्रवेश करू लागली असता ,तिला हाताने धारीउन तिच्यासारखाच दुखणे युक्त व दु:खाश्रू धाल्नार्या त्या गोपी तिला बोध होण्यासाठी गोकुल्प्रीय श्रीकृष्णाच्या त्या रत्या पुतानावाधादिक कथा वर्णन करीत असता शेवटी त्याहि कृष्णाच्या मुखाकडे आपल्या दृष्टी लावून शवतुल्य झाल्या ||२१|| अर्थ:---त्यावेळी त्यांचे पंचप्राण इंद्रिय अंतकारणे कृष्णाकडे लागले आहेत ते नदादिक गोपही कालियाच्या डोहात प्रवेश करू लागले असे पाहून ,कृष्णाचा पराक्रम जाणणाऱ्या त्या भगवान रामाने त्यांना आता कृष्ण कालीयाचा निग्रह करून बाहेर येईल ||२२|| अर्थ:---याप्रमाणे मुनुष्यालीलेला अनुसरणार्या त्या श्रुकृश्नाने दोन घटकाप्रयंत कालीयासार्पाचा वेष्ठानामध्ये राहून आपल्या वियोगाने बायाकामुलाला सर्व गोकुळ अतिदुखीत झालेलाहे असे पाहून व याच्या रक्षक मीच आहे दुदरा कोणी नाही असे जाणून ,कालीयासापणे केलेल्या वेष्ठान रूप बंधनापासून बाहेर पाडण्याकरिता आपला देह पुगाविला||२३|| अर्थ:----तेव्हा त्या कृष्णाच्या फुग्विलेल्या शरीराने देहात कला लागलेला तो कालीयासार्प ,कृष्णाला घातलेला वेध काढून श्वासोच्च्छ्वास टाकीत रागाने आपल्या फड्या उचलून ,ज्याच्या नाक्पुड्यातून श्वासोच्छ्वासाबरोबर विषय बाहेर पडत आहे ज्याचे वटारलेले डोळे,मांडे भाजण्याच्या तापलेल्या खापरासारखे लाल दिसत आहेत व ज्याच्या मुखामध्ये गरगर फिरविलेल्या कोलातीसारखे लळलळीत जिव्हा हलत आहेत असा तो सर्प,कृष्णाला पाहत ताठ उभा राहिला ||२४|| अर्थ:----तेव्हा तो कृष्णाही क्रीडा करीत असता,प्रत्येक मुखामध्ये दोन अग्रे असलेल्या जिभेने दोन्ही ओठांचे प्रत चाटणाऱ्या अ अतिभयंकर विशाग्नी युक्त दृष्टीने असलेल्या त्या कालीयासार्पाच्या सभोवार त्याच्या फडावर उडी मारण्याच्या संधी साधण्यासाठी,गरुडासारखा निर्भयपणे फिरू लागला आणि तो सर्पही दंश करण्याच्या संधी साधण्याकरिता आपल्याच सभोवार गरगर फिरू लागला ||२५|| अर्थ:----याप्रमाणे आपल्या सभोवार फिरण्याचे सक्तीशीनझालेल्या परंतु वर फड्या उचलणाऱ्या त्या कालीयाला खाली वाकून त्याच्या मोठ्या फाद्यावर आरूढ झालेला व नृत्यादी कैश्ल्याचा आदिगुरु असा तो आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण,तेथे नृत्य करू लागला त्यावेळी त्याचे चरणकमळ,मुळचेच तांबडे असून ते त्या कालियाच्या फाद्यावर असलेले जे रत्नसमूह यांच्या साप्र्श्ने विशेष तांबडे झाले ||२६|| अर्थ:----तेव्हा गंधर्व सिध्द देव चरण व अप्सरा हि त्याची सेवक साधुमाडली ,तो आपला स्वामी श्रीकृष्ण नृत्य करण्यास उद्युक्त असे जाणून त्वरेने तेथे येवून मृदंग ,पानाव आनक वगैरे वाद्ये ,गायने ,पुष्पवृष्टी ,नेवैध्ये व स्तुती यांच्या योगेकारून त्याचे सेवन करू लागली ||२७|| अर्थ:----हे राजा त्यावेळी खलांना दंड धारण करणाऱ्या त्या श्रीकृष्णाने ,ज्याला शंभर मुख्य मस्तके आहेत व जो क्षिनबळ होऊन मेल्यासारखा झाला असूनही क्रोधवश असल्यामुळे पुन:पुन: गरगर फिरत असे त्या कालीयाचेब जे जे मस्तक ,आपला ताठपणा टाकून नम्र होईना ते ते मस्तक ,ते मस्तक नृत्याच्या छलान पायांचे प्रहर करून मर्दन केले .तेव्हा तो सर्प मुखातून व नाकपुड्यातून विषाने मिश्र असे भयंकर पक्त वक़्मन करीत असता मोठी मुर्चा पावला ||२८||` अर्थ:----तथापि पुन्हा क्रोधाने मोठ्याने श्वासोच्छवास टाकणाऱ्या व नेत्रातून विषाचे वमन करणाऱ्या त्या कालीयासार्पाच्या मस्कापैकी जे जे मस्तक वर फडी करीत करीत असे ते ते श्रीकृष्णाने ,आपल्या नृत्य करणाऱ्या पायांच्या प्रहाराने वाकवून दमवून टाकिले .यावेळी हर्ष पावलेल्या गन्धर्वादिकांनी पुष्पाणि पूजा केलेला तो श्रीकृष्ण ,सर्व गोपनी शेशासन असा पुरण पुरुषासारखा पुष्पाणि पूजन केला किवा गन्धर्वादिकांनी पुष्पाणि तो श्रीकृष्ण सर्व गोपनी श्रीनारायानासारखा पहिला ||२९|| अर्थ:----हे राजा त्या श्रीकृष्णाच्या अलौकिक तांडवनृत्याने ज्याच्या चार्त्यासारख्या मोठ्या फड्या फाटून गेल्या आहेत व पूर्वी फुगणाऱ्या त्या श्रीकृष्णाच्या सारीराने ज्याचे शरीर हाडे चुरून खिळखिळे झाले आहे तो कालीयासार्प ,मुखाने पुष्कळ रक्ताचे वामन करीत असता ,त्या श्री कृष्णाला हा चराचराचा गुरु पुरण पुरुष शरीराने भगवान नारायण आहे असे जाणून मननेच शरण गेला||३०|| अर्थ:----त्यावेळी ज्याच्या उदराचे ठिकाण अनंत ब्रम्हांडे आहेत त्या श्रीकृष्णाच्या अतिशय भाराने व्याप्त्न झालेल्या व त्याच्या खोताच्या प्रहाराने ज्याची फानारूप छार्त्रे फाडून गेली आहेत अशा त्या कालीयासापला पाहून ,दुखित झालेल्या त्याच्या स्त्रिया शरण जाण्याच्या गडबडीने ज्यांची वस्त्रे ,भूषणे व केसांची बंधने सैल झाली आहेत अशा होऊन श्रीकृष्णाजवळ प्राप्त झाल्या ||३१|| अर्थ:----आणि आपल्या अपराधी पतीची मुक्तता होण्याची इछा करणाऱ्या व अतिशय खिन्नचित्त झालेल्या त्या साध्वी नागिनी आपल्या बालकांना पुढे करून भूमीवर आपले शरीर दंदासारखे पाडून हात जोडून प्राणीमंत्राचा पालक व शर्नागताना आशर्य देणारा अशा त्या श्रीकृष्णाला शरण गेला आणि त्यांनी त्याला नमस्कार केले ||३२|| अर्थ:----आणि त्या नागपत्नी ,प्रथमता कुपीत झालेल्या भगवंताची दंडानुमोदानाने शांतता करीत असता स्तुती करी म्हणाल्या कि ,-हे देवा दंश करणे व वेध घालणे वगैरे अपराध करणाऱ्या त्या सर्पाचे ठिकाणी तू केलेला हा दंड योग्यच आहे कारण शत्रयुवर आणि पुर्तावर सारखी दृष्टी ठेवणाऱ्या तुझा हा अवतार खालांच्या निग्रहाकरिता व साधूच्या रक्षणाकरिता आहे .यास्तव तू दुष्ठाना पापनिवृत्तीवगैरे फळ प्राप्त होणारे सुचवीत असताच दंड करीत असतोस ||३३|| अर्थ:----आता हा दंड नव्हे तर नानुग्रहाचा आहे असे सांगतात –हे प्रभो तू हा आम्हाला जो दंड केलास हा अनुग्रहाच केला आहेस .कारण तू दंड खरोखर दुष्ठाचे सर्व दोष घालविणारा होता ज्याअर्थी देहधारी अशा या कालिया जन्मानंतरच्या पताकाने सर्पयोनित्व दिसत आहे त्याअर्थी त्या सर्पयोनीला कारणभूत असलेल्या पापाची निवृत्ती करणारा व क्रोधात्वेकारून भासणारा हा तुझा दंडही क्रोधापी देवस्य वारेन युल्या :इत्यादी –क वाक्य प्रमाण असल्यामुळे अनुग्रहाचा आहे असे सत्पुरुष मान्य होते ||३४|| अर्थ:----आता कालियाच्या पूर्वपुण्याचे अभिनंदन करीत म्हणतात हे देवा सर्वाची जीविका चालविणारा तू ज्या तापाच्या अथवा धर्माच्या योगाने संतिष्ठ होत आहेत तसे तप ह्याने पूर्वजन्मी स्वत मनरहित राहून व दुसर्यांना मन देवून काय आचरण केले होते ?अथवा सर्व्भुइतचे ठिकाणी दया करून दरम तरी कोणता आचरण केला होता ?||३५|| अर्थ:----आता ह्याचा हा भाग्योदय ,ताप व धर्म इत्यादिकेकारून संपादन केलेला नव्हे तर हे तुझ्या कृपेचे अचीत्या वैभवच आहे असे सांगतात –हे देवा ,ब्रम्हादिक देवही तपादिकांच्या योगेकारून जिच्या प्रसादाची इच्छाकारीतात त्या सर्व स्त्रियामध्ये श्रेष्ठ अशा लक्ष्मीनेही ज्या चरणर ज्याच्या स्पर्शाचा अधिकार यांनीच कालियाला प्राप्त झाला हा याच्या कोणत्या तापाचा किवा पुण्याचा प्रभाव ते आम्ही जनात नाही ||३६|| अर्थ:----ज्या तुझ्या चरणराजप्रत प्राप्त झालेले भक्तजन,स्वार्गस्थान राज्य,ब्रम्हापद,पातलादीबिळस्वर्गचे राज्य आनिमादिक ऐश्वर्य किवा मोक्ष यांचीदेखील मुलीचा इच्छा करीत नाही ,तर त्यांना तुच्छ मानतात ||३७|| अर्थ:----व जे चरणरज मला सेवया होते .अशी इच्छा धरून जन्मामारानदी संचारचक्रामध्ये श्रमान पावणाऱ्या हि प्राण्याला आपोआप इच्छितसम्पत्ती प्राप्त होते हे नाथ ,ते लक्ष्मी इत्यादिकानाही दुर्लभ असे तुझे चरणरज ,हा तमोगुणापासून उत्पन्न झालेला व क्रोधाच्या स्वाधीन अस्सानारही आमचा पती नागराज पावला तेव्हा त्याचे भाग्य किती वर्णन करावे ||३८|| अर्थ:---यास्तव अचीत्या एश्वर्यादिक गुणरूप ,अंतर्यामी इयत्त रहित ,पंचा महाभूताचा आश्रय ,त्यांच्या पूर्वीही असणारा व कारणरूप असून कारणाहून निराला अशा तुजकारणे आमाचा नमस्कार असो ||३९|| अर्थ:---आता एकाच कारण व कार्नातीत कसा ?ते सांगत नमस्कार करितात –तू अनंत शक्तींनी युक्त प्रकृतीचा प्रवर्तक व चैतन्यशक्तीने पूर्ण असा ईश्वर असल्यामुळे करण्रूपी आहेस आणि गुणरहित ,निर्विकारी व ज्ञानपूर्ण असा ब्राम्हरूपी असल्यामुळे कार्नातीत आहेस ,त्या उभायस्वरूपी तुला नमस्कार असो ||४०|| अर्थ:----आता अनंतशक्ती असल्यामुळे कलाश्क्तीने विश्व सृष्ट्यादिरूप अशा त्या भगवंताला नमस्कार करितात –काळ स्वरूपी काल्श्क्तीचा आश्रय सृष्टी काल प्रलयकाळ इत्यादिक कलांच्या अवयवांचा साक्षी जगाचा करता ,जगाचे कारन ,सूक्ष्मभुते ,इंद्रिये ,प्राण,मन,बुद्धी,व चित्त इतत्स्वरुपी व त्रिगुणात्मक अभिमानाच्या योगाने ज्याने स्वताच्या अंशभूत जीवाच्या स्वानुभव गुप्त ठेवला आहे त्या तुला नमस्कार असो ||४१-४२|| अर्थ:----अनंत सूक्ष्म ,निर्विकार ,सर्वज्ञ ,अनेकप्रकारच्या अस्ति,नास्ति,सर्वज्ञ ,किंचीज्ज्ञ,बध्ह ,मुक्त,एक अनेक इत्यादी वदना मौएच्या योगाने अनुसरणारा व नावे आणि नावांचे वाच्य या शक्तीभेदानी नानाप्रकारे भासणारा तुला नमस्कार असो ||४३|| अर्थ:---प्रत्येक्षादि प्रमाणाचा आधार स्वत सिध्द ज्ञानवान ,वेदरूप श्वासोच्छवास युक्त व अनेकप्रकारे विधिनिषेध दाखविणारा अशा वेदरूपी तुज भगवंताला नमस्कार करितात असो ||४४|| अर्थ:---आता चार्तुव्यह्मुर्ती रूपाने सर्वोपास्यत्व दर्शवून नमस्कार करितात हे प्रभत्ते ,संकर्षण ,वासुदेव ,प्रद्युम्न व अनिरुध्ह अशा चार मूर्तींनी उपसाकांचा पालक अशा तुज कृष्णाला वरवर नमस्कार असो ||४५|| अर्थ:---आता एकाला चातुर्मुर्तीपणा कसा ते दर्शवित नमस्कार करितात –मन बुद्धी अहंकार व चित्त ह्या अन्ताकार्नाच्या चार भेदांना प्रकाशमान होणारा चीत्तादिकांचा चेतना निश्चय इत्यादिक वृत्तींनी उपल्क्षित ,त्यांच्या साक्षी व स्वत सिध्द ज्ञानवान म्हणजे चित्तदीक ,ज्याच्या शोधमात्र करितात परंतु त्यांना तो समजत नाही अशा तुला नमस्कार असो||४६|| अर्थ:--- जे इंद्रियप्रवर्तक ,अंतर्क्य महिम्याने युक्त सर्वप्रकारच्या ज्ञानाचे मुल्कर्ण ,स्वस्वरूपी रामनाम होणारा व त्याच स्वभावाचा तुला नमस्कार असो ||४७|| अर्थ:---स्थूल व सूक्ष्म अशा सर्व तत्वाच्या गती जाणणारा ,सर्वच अधिष्ठाता ,जगाच्या निषेधाचा अवधी आणि विद्या यांच्या योगाने कारण अश तुला नमस्कार असो ||४८|| अर्थ:---याप्रमाणे दंडाच्या अनुमोदानाने व नमस्काराणी भगवंताला प्रसन्न करून घेवून आता तुझ्या स्वाधीन असणाऱ्या प्राण्यांचा काय अपराध आहे ?अशा आशयाने प्रार्थना करितात –हे प्रभो ,तू वस्तुत निरिच्छ असूनही अनादिसिद्ध अशा कालशक्ती चा स्वीकार करून जीवना चातुर्विधी पुरुषार्थ देणारी सृठ्यादी लीला करीत असता केवळ अवलोकन मात्रेकारून संसाररूपाने असलेल्या प्राण्यांच्या त्या त्या शांतघोरादिक स्वभावानं जागृत करीत गुणांच्या योगाने या जगाचे उत्पत्तीस्थिती सहार करितोस ||४९|| अर्थ:---त्या तुझ्याच त्रैलोक्यामध्ये ह्या अनेकप्रकारच्या काही शांत काही अशांत व काही मूढ अशा मूर्ती आहेत प्रिय त्यापैकी संप्रतकालंभ साधूच्या धर्मरक्षणासाठी प्रवृत्त होऊन अवतार धरण करणाऱ्या व ते करीत असलेल्या तुला शांत मुर्चीत प्रिय आहेत :इतर प्रिय नाहीत अर्थ---तथापि ज्याअर्थी आपल्या प्रजेने केलेला अपराध स्वामीने एकावर सहन करावा असे आहे त्याअर्थी हे शांतचित्त कृष्ण ,तमास असल्यामुळे तुला न जननार्या ह्या मूढ कालीयासार्पाचा अपराध तू क्षमा करण्यास योग्य आहे ||५१||अर्थः---हे भगवान ,ज्याअर्थिओ हा कलिअयसर्प प्राण टाकीत आहे हा त्याअर्थी आता त्याच्यावर अनुगार्ह कारण आणि पराधीन असल्यामुळे साधूनही शोक करण्यास योग्य अशा आह्या स्त्रियांना हा पतिरूप प्राण अर्पण कर ||५२||अर्थः---आता तुमच्यावर अनुग्रह केला असता इतरांना मृत्यीव प्राप्त होईल असे म्हणशील तर –तुझी आज्ञा करणाऱ्या आह्या दशिनी ,आह्या काय करावे ते सांगा .कारण त्य्झी आज्ञा पालन करणारा पुरुष सर्वप्रकारच्या भयांनी युक्त अशा संसारापासून मुक्त होतो||५३||अर्थः---श्रीशुकचर्य म्हणतात –हे र५अज याप्रमाणे नागप्त्न्याही स्तुतीनामस्कारादिकेकारून प्रराथाना केलेल्या त्या भगवान श्रीकृष्णाने पायाच्या प्रहारांनी फड्या फाडून गेलेल्या व मुर्चीत झालेल्या त्या कलीय सर्पाला सोडून दिले व त्याच्या त्याच्या पुशे आपण उभा राहिला||५४||अर्थः---नंतर हळूहळू इंद्रिय व प्राण प्राप्त झालेला तो दिन कालीयासार्प ,मोठ्या काष्ठाने श्वासोच्छवास टाकीत हात जोडून त्या श्रीकृष्णाला म्हणाला कि -||५५||अर्थः---कालिया म्हणाला-हे देवा ,आम्ही जन्मत:चा दुसऱ्याला दु:ख देणारे काष्ठ ,तमाशी व दिर्घकोपी आहो .हे नाथ ,सर्व प्राण्यांना देहादिकांचे ठिकाणी अहंत मामातादिरूप दुराग्रह प्राप्त होतो ||५६||अर्थः----हे श्रुस्ती करणाऱ्या देवा ,गुणांच्या योगाने नानाप्रकारे निर्मिलेलें हें जग, तूंच उत्पन्न केलें आहेस. यामध्यें नानाप्रकारचे शांत, घोर इत्यादिक स्वभाव, देह्शक्ती, इंद्रियशक्ति, मातृशक्ती, पितृश्क्ती, वासना व स्वरूप हे प्रकार आहे||५७||अर्थः---हे भगवन ,त्या सृष्टीमध्ये आह्यी जातीनेचा मोठे रंगीत सर्प आहो यास्तव ब्राम्हदिकानीही दुर्जय अशा तुझ्या मायेला तिच्या योघाने मोहित झाले आह्मी तुझ्या अनुग्रहावाचून इला कसे बरे टाकू?टाकणारच नाही ||५८||अर्थः---यास्तव ते शांतघोरादिक स्वभाव उत्पन्न होण्याविषयी तू सर्वज्ञ जगदीश्वर चा कारण आहेस म्हणून आम,च्यावर अनुग्रह किवा आमचा निग्रह जे करण्यास इच्छित असशील ते कर ||५९||अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणतात-हे राजा,असे कालियाचे भाषण एकूण यमुनेची शुद्धता ,व भक्ताचे रक्षण इत्यादिक कार्ये करण्याकरिता मनुष्यावतर धरण कारनारा तो भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाला कि –हे सर्प तू या डोहात राहू नकोस लवकरच आपले ज्ञाती अपत्ये व स्त्रियासहवर्तमान समुद्रामध्ये असलेल्या आपल्या रामानाव्दिपात निघून जा .हि यमुना नदी ,गाई व मनुष्य यांनी पाणी प्यावयाची आहे हि आजपासून निर्विशोदक होऊ दे ||६०||| य एतत् संस्मरेन्मर्त्यस्तुभ्यं मदनुशासनम् | कीर्तयन्नुभयोः सन्ध्योर्न युष्मद् भयमाप्नुयात् ||६१|| अर्थः---जो मनुष्य तुला मी सांगितलेल्या ह्या आज्ञेचे वेळी सकाळी किवा संध्याकाळी स्मरण करील किवा कीर्तन करील त्याला तुही कधीही भय उप्तन्न करू नको ||६१||| योsस्मिन् स्नात्वा मदाक्रीडे देवादींस्तर्पयेज्जलैः | उपोष्य मां स्मरन्नर्चेत सर्वपापैः प्रमुच्यते ||६२|| अर्थः---जो मनुष्य मी क्रीडा केलेल्या या डोहामध्ये स्नान करून उदाकानी देवदिकांचे तपार्ण करील व उपाषण करून माझे ध्यानपूर्वक पूजन करील तो सर्व पापापासून मुक्त होईल ||६२||अर्थः---हे कालिया तू ज्याच्या भयाने आपल्या राम्नक व्दिपाचा त्याग करून ह्या डोहाचा आश्रय करून राहिला आहेस तो गरुड तुला आता कधीच खाणार नाही कारण तुझ्या फाद्यावर माझ्या चरणाची चिन्हे उमटली आहेत ||६३||अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणतात-हे राजायाप्रमाणे अधभूतकर्म करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या कालीयासारपणे ,हर्श्ने आदरपूर्वक त्या श्रीकृष्णाचे दिव्या वस्र्ते .मला ,नाणी बहुत मोलाची रत्ने,दिव्यचन्दानच्या उत्या आणि कमलांची मोठी मला अर्पण करून पुजनकरून पूजन केले तसेच नागप्त्न्यानीही पूजन केले ||६४-६५|| अर्थ:--याप्रमाणे स्त्रीपुत्रसुहृदयवर्तमान त्या कालीयासारपणे जगनाथ गरुड ध्वज श्रीकृष्णाचे पूजन करून त्याला प्रसन्न करून घेतले असता त्याने मुखाने जा अशी आज्ञा केल्यावर तो कालिया स्वत संतुष्ठ होऊन त्याला प्रदक्षणा व नमस्कार करून समुद्रामध्ये असलेल्या आपल्या रामानादिकातून निघून गेला .त्याचवेळी ती यमुना क्रीडा करण्या करिता मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णाचे अनुग्राहे करून विषसबंध रहित अमृता सारख्या गोड पाण्यानी झाली ||६६-६७||
||याप्रमाणे श्रीमदभागवत नामक महापुरानातीलदशमस्काधाचायापूर्वार्धामध्ये कालीयानिर्यापननामकहा सोळावा अध्यायसमाप्झाला|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १७-- किरण २---७--भागण श्रीकृष्ण---[७]] कालियाकथा आणि गोपांच्या दवानालापासून बचाव. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ (आतां ह्या सतराव्या अध्यायामाध्यें त्या कालियसर्पाला रमणक द्विपामध्यें घालवून दिलें असतां,आपल्या दुःखाने श्रम पावलेल्या व तेथेंच निजलेल्या नंदादिक बंधूंचे श्रीकृष्णाने वणव्यापासून रक्षण केले;अशी कथा व्रेन्न केलेली आहे)||१|| | नागालयं रमणकं कस्मात्तत्याज कालियः | कृतं किं व सुपर्णस्य तेनैकेनासमन्जसम् ||१|| अर्थ-----राजा म्हणाला-हे शुकाचार्य,कालियसर्पानें,रमणक नांवांचे आपलें द्विपस्थान कोणत्या कारणानें टाकिलें होतें?||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे महापराक्रम्या राजा,गरुडाचे भक्ष्य अशा सर्पांनी,आपली बाधा निवृत्त होण्याकरितां रमणकद्वीपामध्यें पूर्वी एका वृक्षाखाली गरुडाला जो एक बळी प्रत्येक महिन्याच्या अमावस्थेच्यादिवशी अर्पण करण्याच्या ठाराव केला होता त्याप्रमाणे दर अमावस्येस सर्व आल्या रक्षणाकरितां आपापला भाग महापराक्रमी गरुडाला देत असत ||२-३|| अर्थः---विष व पराक्रम यांच्या मदानें व्याप्त असलेल्या त्या कद्रूपुत्र कालियसर्पानं मात्र त्या गरुडाला तुच्छ मानून त्याला आपल्या हिशाचा भाग मुळींच दिला नाहीं.उलटा त्याला दुसऱ्यांनी दिलेलामात्र बळी,त्यानें स्वतां भक्षण केला.||४|| अर्थः---हे राजा,टी वर्तमान ऐकून क्रुद्ध झालेल्या भगवंतानें प्रिय वाहन असा तो भगवान् गरूड,त्या कालियाला मारण्याची इच्छा धरून वेगानें त्याच्या अंगावर धांवून गेला ||५||
अर्थः---तेव्हां वेगानें येणाऱ्या त्या गरुडाला पाहून,विष व दांत हींच ज्याचीं आयुधें आहेत,ज्यानें आपल्या एकशें एक फड्या उचलून धरिल्या आहेत,व ज्याची जिव्हा लळलळीत असुन डोळे टवकारलेले भयंकर आहेत असा तो कालियसर्पही मोठ्या वेगानें गरुडाच्या अंगावर युद्ध करण्याकरितां धांवला आणि त्यांनें आपल्या दातांनी त्याला दंश केला||६|| अर्थः---तेव्हां क्रुद्ध झालेला,भगवंतांचे वाहन,उग्रपराक्रमी व महावेगवान् अशा त्या गरुडाने,त्या कलियाचा धिक्कार करून त्याला आपल्या सुवर्णासारख्या कांतीच्या उजव्या पक्षाने प्रहार केलां ||७|| अर्थः---तेव्हा गरुडाच्या पक्षाने ताडित झालेला तो कालिया,अत्यंत विव्हळ होऊन त्या गरुडाने गमन करण्यास कठीण अशा यमुनेच्या डोहामाध्यें प्रविष्ट प्रविष्ट झाला ||८|| अर्थः---तो डोह गरुडाला अगमय असण्याचे कारण असें की-त्या यमुनेतील डोहाच्चया तीराचेठिकाणी एक्वेळी सौभरीऋषीनें निवारण केलेल्याहि त्या गरुडाने,क्षुधित असल्यामुळें आपणाला आवडणाऱ्या एका मोठ्या मत्स्याला बलात्कारानें मारून भक्षण केलें ||९||अर्थः---तेव्हां तो मत्स्यराज मारला गेला म्हणून त्याच्या कुटुंबातील सर्व मत्स्य दीन व अत्यंत दुःखित झालें असें पाहून,कृपेने तेथें राहणाऱ्या मात्स्यांना निर्भयपणा संपादन करीत असता तो सौभरी ऋषि म्हणाला कीं,-||१०||| अत्र प्रविश्य गरुडो यदि मत्स्यान् स खादति | सद्दः प्राणैर्वियुज्येत सत्यमेतद् ब्रवीम्यहम् ||११|| अर्थः---या यमुनेच्या डोहामध्यें आजपासून तो गरूड प्रवेश करून जर मत्स्यांचे भक्षण करील तर तत्काल प्राणांशी वियोग पावेल.हें मी सत्यच भाषण करीत आहें||११|| | तं कालियः परं वेद नान्यः कश्चन लेलिहः | अवात्सीद् गरुडाद् भीतः कृष्णेन च विवासितः ||१२||अर्थ:---अशा त्या सौभरिऋषीच्या शापाला केवळ कालियसर्पच जाणत होता,दुसरा कोणींही सर्प जाणत नव्हता.म्हणून तो कालियसर्पच गरुडापासून भिऊन तेथें येऊन राहिला होता,त्याला कृष्णानें तेथून घालवून दिलें ||१२|| अर्थ:---याप्रमाणें प्रासंगिक कथा सांगून आतां प्रस्तुतकथा सांगतो-नंतर डोहांतून बाहेर पडलेल्या,दिव्यमाळा,चंदनें व वस्त्रें धारण करणाऱ्या,बहुत मेलच्या रत्नसमुदायांनीं सर्व बाजूंकडून भूषित व जांबूनदननामक सुवर्णाने अलंकृत अशा कृष्णाला पाहून उठलेले सर्व गोप,’जशी करचरणादिक इंद्रिये प्राण गेला असतां मूर्छित होतात व पुन्हा प्राण प्राप्त झाला असतां आपापली कार्यें करूं लागतात त्याप्रमाणें’आनंदाने पूर्णचित्त होऊन प्रीतीने चोहोकडून त्या कृष्णाला आलिंगन करूं लागलें ||१३-१४|| अर्थ:---हे राजा,त्यावेळीं यशोदा,रोहिणी,नंद,गोपी व गोप हे सर्व श्रीकृष्णाला भेटून मुर्छना टाकून देहस्थितीवर आले व पूर्णमनोरथ झाले ||१५||अर्थ:---बलरामहि श्रीकृष्णाला आलिंगन करून हास्य करूं लागला.कारण,तो त्या श्रीकृष्णाचे सामर्थ्य जाणणारा होता.वृक्षहि पूर्वी शुष्क झाले होते ते तत्काल अंकुरयुक्त झाले.गाई,वृक्षभ व वत्स हेही परम आनंद पावले ||१६|| | नन्दं विप्राः समागत्य गुरवः सकलत्रका: | ऊचुस्ते कालियग्रस्तो दिष्ट्या मुक्तस्तवात्मजः ||१७|| अर्थः---त्यावेळीं जे सत्पणीक पुरोहित ब्राम्हण होते ते तेथें येऊन नंदाला म्हणाले कीं,-हे नंदा,कालियसर्पानें गिळिल्यासारखा झालेला तुझा हा पुत्र श्रीकृष्ण,त्यापासून सुटला ही फार चांगली गोष्ट झाली ||१७||अर्थः---यास्वत आतां कृष्णाची मुक्तता झाली म्हणून संतोषानें आम्हां सपत्नीक ब्राम्हणांना दान दे.तेव्हां हे राजा,संतुष्टचित्त झालेल्या नंदानें त्या ब्राम्हणांना,गाई व सुवर्ण यांचे दान दिलें ||१८||अर्थः---त्यावेळी जिचा अदृष्ट झालेला पुत्र पुन्हा प्राप्त झाला आहे अशा त्या महाभाग्यवती पतिव्रता यशोदेनेंही ब्राम्हणांना दानें देऊन श्रीकृष्णाला आलिंगन केलें आणि मांडीवर घेऊन वारंवार नेत्रांतून आनंदाश्रू ढाळीले ||१९||अर्थः---हे राजश्रेष्ठा,ज्या दिवशीं कालियमर्दन झालें त्या दिवशी क्षुधा,तृषा,रडणें व धांवणेवगैरे श्रमाच्या योगानें व्याकूळ झालेला ते गोकुळवासी लोक व गाई,त्या रात्रीं त्या यमुनेच्या काठींच वस्तीला राहिल्या ||२०||अर्थः---त्या रात्री मध्यरात्रीच्या समयीं ग्रीष्मऋतुंमध्यें वनापासूनउत्पन्न झालेला वणवा,निजलेल्या गाईसहित गोकुळवासी जनांला सर्वबाजूंनी एकदम वेढा घालून जाळूं लागला ||२१|| अर्थः---तेव्हां जळूं लागलेले ते गोकुळवासी लोक उठून अगदीं घाबरून गेले आणि ते मायेच्या योगानें मनुष्यासारखा भासणारा परंतु वस्तुतः ईश्वर अशा त्या श्रीकृष्णाला शरण गेले ||२२||अर्थ:---हे कृष्णा,हे कृष्णा,हे महाभाग्यवंता,हे अमितपराक्रम्या रामा,हा भयंकर अग्नि,तुमचे असे म्हणविलेल्या आम्हांला जाळून टाकीत आहे ||२३||अर्थः---यास्तव हे सर्वसमर्था प्रभो,अत्यंत दुस्तर अशा ह्या मृत्युरूपी अग्नीपासून तुझे मित्र अशा आमचें रक्षण कर.हे देवा,आम्हीं सर्व भायांचा निवर्तक अशा तुझ्या चरणाचा त्याग करण्यास इच्छित नाहीं.म्हणजे आम्हीं मृत्यूपासून भीत नाही परंतु तुझ्या चरणाचा वियोग होईल म्हणून मात्र आम्हांस मोठें भय वाटत आहे ||२४|| अर्थ:---याप्रमाणे स्वजनाची व्याकुळता पाहून त्या सर्वशक्ति धारण करणाऱ्या जगदीश्वर अनंतानें,अतिदुःसह अशाही त्या अग्नीचें प्राशन करून टाकिलें ||२५||(याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुराणांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्यें दावाग्निपाननिरुपणनामक हा सतरावा अध्याय समाप्त झाला)||१७||| श्रीकृष्णार्पणमस्तु |_________________________________________________________________________________________________________१८--- प्रलंबासूर उद्धार | _________________________________________________________________________________________________________(आता ह्या अठराव्या अध्यामध्ये वसंतऋतूच्या गुणांनी युक्त असा ग्रीष्म ऋतुप्राप्त झाला असता,श्रीकृष्णाने सहजन लीलेने बलरामाकडून प्रलंबासुराला मारविले,अशी कथा वर्णन केलेली आहे.)||१|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा नंतर प्रात:काळ झाला असता कालियादमनाने व वणव्यापासून आपल्या रक्षनाने संतुष्टचित्त झालेल्या गोपांनी परिवेष्टित झालेला तो श्रीकृष्ण त्यांनीच वारंवार गायन केला असता गाईंच्या समुदायांनी शोभित अशा गोकुळामध्ये प्रविष्ट झाला||१||अर्थः--- याप्रमाणे जिच्यामध्ये गोपालरूपाचे मिष आह्व अशा मायेने,ते रामकृष्ण गोकुळामध्ये क्रीडा करीत असता,प्राणीमात्रांना फारसा प्रिय ग्रीष्मनामक ऋतू प्राप्त झाला ||२||अर्थः---परंतु जो ग्रीष्म ऋतूही,ज्यामध्ये बलरामासहवर्तमान भगवान्श्रीकृष्ण साक्षात राहत होता त्या वृंदावनाच्या (पुढे सांगावयाचे)गुणांनी वसंतऋतुसारखा लोकांच्या दृष्टीला भासू लागला ||३||अर्थः----ते वसंतत्रऋतूचे साम्य असे की,-- ज्या ग्रीष्मामध्ये वृंदावनात झुळझुळ वाहणाऱ्या झाऱ्याचया नादांनी झिल्लिकानावांच्या किड्यांचे कठोर ध्वनि अगदी लोपून गेले होते आणि त्याच झऱ्यांच्या तुषारांनी भिजून गेलेल्या वृक्षसमूहांनी ते वृंदावन अलंकृत झाले होते||४|| अर्थः----ज्या वनामध्ये राहणाऱ्या लोकांना,अगदी कोवळ्या तृणाने व्याप्त असलेल्या प्रदेशाचेठिकाणी,नद्या,सरोवरे व झरे ह्यांच्या लाटांवरून गार होऊन आलेल्या व संध्याकाळ,रात्र व दिवस यांचेठीकानी अनुक्रमाने प्रफुल्लित होणाऱ्या कल्हार,कुमद व उत्पल या नावांच्या कमलांवरून त्यांचे सुवासिक रजःकण वाहून आणणाऱ्या वाऱ्याच्या योगाने ग्रीष्मऋतूंतील अग्नि व सूर्य यांपासून होणारा ताप मुळीच प्राप्त होत नाही||५||अर्थः----ज्या वृंदावनामध्ये,अपरंपार पाणी असणाऱ्या नद्यांच्या काठांवर खेळणाऱ्या लाटांनी,वालावंटासहवर्तमान आसमंतात थलथलीत कर्दम झालेल्या भूमीचा ‘ज्याच्यावर कोवळे गवत उगवले आहे असा’ओलेपणा ग्रीष्मऋतूतील विषासारखे अतिप्रखरहि सूर्याचे किरण शोषून करून घेत नाहीत||६|| अर्थः----आणि जेथे शब्द करणारे चित्रविचित्र मृग व पक्षी आहेत,गायन करणारे मोर व भ्रमर आहे,मंजुळ शब्द करणारे कोकिळा व सारस पक्षी आहेत त्या प्राफुल्ल्लित वृक्षांनी व्याप्त झालेल्या,शोभायायुक्त वृंदावनामध्ये क्रीडा करण्याची इच्छा करणाऱ्या भगवान् श्रीकृष्नाणे बलरामासहवर्तमान,गोप व गाई यांनी परीवेहिष्ट होऊन मुरलीध वाजवित वाजवीत प्रवेश केला||७||८||अर्थः----नंतर रामकृष्णादीक गोपाळ,आपल्या शरीरांना गेरू,पिंवडीवगैरे धातूंचे रंग लावून त्यावर पल्लव,मोरांची पिसे,पुष्पगुच्छ व माळां हे अलंकार धारण करून नृत्य,गायन व परस्पर कुस्त्या करू लागले||९||अर्थः---त्यावेळी कृष्ण नाचू लागला म्हणजे कित्येक गोपाळ गाऊ लागत,काहींजन मुरल्या,टाळ्या,व शिंगेवगैरे वाद्ये वाजवीत असत,दुसरे कितीएक वाहवा ! शाबास ! अशी त्याची प्रशंसा करीत असत||१०||अर्थः---हे राजा,गोपांच्या जातीने आच्छादित होऊन गोपाळरुपाने अवतीर्ण झालेले देव,ते त्या कृष्णारामाची ‘जशी रंगभूमींवर सोगे घेऊन आलेले नट दुसऱ्या नटांची स्तुती कारीरतात तसे’स्तुती करू लागले||११||अर्थः---काकपक्ष (झुलुपे)धारण करणारे ते रामकृष्ण,कधीकधी एकमेकांना गरगर फिरविणे,खळग्यांवरून उड्या मर्मे,लोटालोटी करणे,हातांनी बाहू थोपटणे व परस्परांस ओढणे इत्यादिकेकरून कुस्त्या करण्याच्या प्रकाराने क्रीडा करीत असत||१२||अर्थः---हे महाराजा,केव्हांतरी ते रामकृष्ण,दुसरे कोणीतरी गोप नाचुं लागले म्हणजे स्वतां गायन करीत,वाद्ये वाजवीत आणि भालेशाबास ! उत्तम ! असे म्हणून त्यांची प्रशंसा करीत असत||१३||अर्थः---केव्हातरी ते बेलफळांनी,केव्हा कुंभ्याच्या फळांनी,केव्हातरी आंवळ्याच्या मुठींनी,एखादेवेळी शिवाशिव न करण्याने व डोळे बांधण्याने केव्हातारी पाशुपक्ष्यांसारखा लीलेने क्रीडा करीत असत ||१४||अर्थः—केव्हा तरी बेडकासारख्या उड्या मारणे,केव्हातरी नानाप्रकारच्या थट्टा करणे,केव्हातरी झाडांना झोपाळे बांधून झोके घेणे व केव्हातरी राजांची व प्रधानादिकांची सोंगे घेऊन कचेरीसारखे काम चालविणे इत्यादिकेकरून क्रीडा करीत असत||१५||अर्थ---याप्रमाणे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले खेळ खेळत ते रामकृष्ण,वृंदावनामध्ये व नद्या,पर्वत दोन्हीकडून प्रव्त असलेले मधली खोरी (घोली)कुंजे (झुडूपांतील प्रदेश)अरण्ये व सरोवरे यांचेठीकानी संचार करीत असत ||१६||अर्थः----एकेप्रसंगी त्या वनामध्ये गोपांसहवर्तमान रामकृष्ण गाई चरित असतां,त्या दोघांना हरण करण्याच्या इच्छेने,एका गोपाचे स्वरूप धारण करणारा कोणीएक प्रलांबनांवाचा दैत्ये तेथे प्राप्त झाला||१७||अर्थः---तेव्हा दाशार्हकुळांत उत्पन्न झालेल्या सर्वज्ञ भगवान् श्रीकृष्णाने,त्याला जाणूनही त्याचा वध करण्याचे मनांत आणून,त्याच्या बरोबर सख्य करण्याचे सर्व गोपांस अनुमोदन दिले.||१८||अर्थः---आणि चमत्कारिक अनेक खेळ जाणणारा तो श्रीकृष्ण,तेथे गोपाळांना आपल्या जवळ बोलावून म्हणाला कि,-- हे गोपहो,आम्ही सार्वजन आपले वय व बळ यांच्या योग्यतेप्रमाणे दोन्ही बाजूंनी सारख्या गड्यांच्या जोड्या करून घेऊन खेळ खेळूया ||१९||अर्थः---तेव्हा गोपाळांनी बरे आहे असे म्हणून राम आणि कृष्ण ह्या दोघांना दोन्हीपक्षांचे नायक (पुढारी)नेमिल आणि कांहीजण कृष्णाच्या पक्षाकडे मिळाले आणि दुसरे रामाच्या पक्षाला मिळाले ||२०||अर्थः---पुढे गोप,एकाने पाठीवर बसावे आणि दुसऱ्याने त्यला नेमलेल्या स्थळापर्यंत वाहून न्यावे.अशा ठरावाने नानाप्रकारचे खेळ खेळू लागले.त्यात ज्या पक्षाचा जय होईल त्या पक्षाला गाड्यांनी दुसऱ्या पक्षांतील गद्याच्या पाठीवर बसावे आणि त्यापाराजय पावलेल्या गाड्यांनी त्यांत वाहावे असा ठराव होता||२१||अर्थः---याप्रमाणे वाहणारे व पाठीवर बसणारे ते कृष्णप्रभृति गोपाळ,गाई चरित असते भांडीरक नावांच्या वडाजवळ जाऊन पोचले.तोच वड,खांद्यावरून गड्यांना खाली उतरण्याचे अवधिस्थान होता||२२||अर्थः---हे राजा,पुढे जेव्हा खेळामध्ये रामाच्या पक्षांतील श्रीदाम वृषभ इत्यादिक गोपांनी जय मिळविला तेव्हां त्यांना श्रीकृष्णादिक वाहुं लागले||२३||अर्थः---तेव्हां पराजय पावलेला भगवान् श्रीकृष्ण,श्रीदाम्याला वाहुं लागला,भद्रसेन,वृषभाला आणि प्रलंबासुर,बलरामाला वाहू लागला||२४||अर्थः---तेव्हा दानवश्रेष्ठ असा तो प्रलांबासुर श्रीकृष्णास जिंकणे कठीण आहे असे मनांत आणून त्याचा दृष्टिमार्ग चुकविण्याकरिता बलरामाला वाहून नेत असता त्याला उतरण्याच्या मर्यादेपलीकडे म्हणजे त्या भांडीरकवटवृक्षापलीकडे मोठ्या त्वरेने घेऊन जाऊ लागला||२५||अर्थः---तेव्हा तो महासुर,मेरूपर्वताप्रमाणे जड वाटणाऱ्या त्या रामाला त्वरेने वाहत असता जेव्हा वेगरहित झाला तेव्हा गोपरूपी शरीराने ते वाहने घडणार नाही असे मनात आणून त्या दैत्याने आपले मुळचे दैत्यरूप स्वीकारले.तेव्हा सुवर्णाचे अलंकार धारण करणारा तो दैत्य,विजांच्या कांतांनी युक्त व चंद्राला वाहणाऱ्या मेघाप्रमाणे म्हणजे जर यथायोग्य स्थानी मेघावर विजा स्थिर राहिल्या व वर चंद्र प्राप्त झाला तर तो मेघ जसा शोभित तसा शोभू लागला||२६||अर्थः---ज्या स्वरुपाचेठिकाणी अग्नीच्या निखाऱ्यासारखे धगधगीत डोळे आहेत,भुवयांना लागलेल्या भयंकर दाढा आहेत,पेटणाऱ्या अग्नीच्या ज्वाळाप्रमाणे सुटलेले केस आहेत आणि जे कडी किरीट व कुंडले यांच्या कांतीने आश्चर्यकारक दिसत आहे हे ते आकाशामध्ये अत्यंत वाढत चाललेले त्या दैत्याचे स्वरूप पाहून बलरामाला किंचित भीती उत्पन्न झाली||२७||अर्थः---नंतर लागलीच स्मृति प्राप्त होऊन भयरहित झालेल्या त्या बलरामाने आपल्या गोपाळमंडळीला सोडून मर्यादेच्या पलीकडे आपणास घेऊन जाणाऱ्या त्या प्रलांबासूर शत्रूच्या मस्तकाचेठीकाणी,व्रजासारखा वेग असलेल्या दृढमुष्टीने,जसा इंद्र,व्राजाने पर्वतावर प्रहार करितो त्याप्रमाणे क्रोधाने प्रहर केला||२८||अर्थः----याप्रमाणे प्रहर केलेला तो दैत्य,तत्काळ मस्तक फुटल्यामुळे स्मृतिरहित होत असता मुखांतून रक्ताचे वमन करीत व मोठा भयंकर शब्द उच्चारीत गतप्राण होऊन,जसा इंद्राने व्रजाच्या योगाने प्रहार केलेला पर्वत कोसळून पडतो त्याप्रमाणे भूमीवर पडला||२९||अर्थः---तेव्हा महाबलाढ्य अशा बलरामाने मारलेल्या त्या प्रलंबासुराला पाहून बलरामाला,चांगले केलेस,चांगले केलेस,असे म्हणत ते गोप,अत्यंत विस्मित झाले ||३०||अर्थः----आणि परलोकी जाऊन आलेल्यासारख्याच त्या बलरामाला आलिंगन देऊन प्रमाणे विव्हळचित्त झालेले ते गोप, ‘हे रामा,तू चिरंजीव हो आणि असेच आमचे निरंतर रक्षण कर.असे आशिर्वाद देऊन स्तुति करण्यास योग्य अशा त्याची स्तुती करू लागले||३१||अर्थः---याप्रमाणे सर्वाना उपद्रव करणाऱ्या त्या प्रलंबासुराचा बळरामाने वध केला असता,परम आनंद पावलेल्या देवांनी,बलरामावर पुष्पांची वृष्टि केली आणि ‘रामा,तू फार चांगले केलेस,ठीक झाले ! अशी’प्रशंसा केली||३२|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्यें प्रलंबासूरव धनिरुपणनामक हा अठरावा अध्याय समाप्त झाला)||१८|| | श्रीकृष्णार्पणमस्तु | _________________________________________________________________________________________________________ ||१९|| गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव _________________________________________________________________________________________________________आता ह्या एकोणिसाव्या अध्यायामध्ये,श्रीकृष्णाने मोळाच्या रानामध्ये प्रविष्ट झालेल्या गोपांच्या व गाईंच्या समुदायाचे,अरण्यातील वनव्यापासून त्या अग्नीच्या प्राशनाने रक्षण केले,अशी कथा वर्णन केलेली आहे अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला हे राजा प्रलांबासुराचा मारल्यानंतर ते गोपाळ खेळण्यात गढून गेले असता यथेच्छपणे चरत चरत दूर जाणाऱ्या त्यांच्या गाई,गवताच्या लोभाने एका घोर अरण्यात प्रविष्ट झाल्या||१|| अर्थः---त्या सर्व गाई,शेळ्या आणि म्हशी,या वनांतून त्या वनांत व त्या वनांतून दुसऱ्या वनांत अशा प्रवेश करीत असता,ग्रीष्मऋतूसंबंधी तापाने तृषाक्रांत होऊन ओरडत ओरडत फार उंच व दाट गवत असलेल्या एका मोळाच्या अरण्यांत प्रविष्ट झाला ||२||अर्थः---इकडे कृष्ण व राम हे ज्यांमध्ये पुढारी आहेत त्या सर्व गोपांना,पशु दिसेनासे झाले असता, ;आम्हांला हि खेळावयची दुर्बुद्धी कोठून आठवली,आता आम्ही गाई कोठे शोधाव्या असा’पश्चाताप होऊन शोध करणाऱ्याही त्यांना फार वेळपर्यंत गाईचा मार्ग सापडला नाही त्यावेळी कृष्णारामांना मात्र गाई कोठे आहेत ? पुढे काय होणार ? हे सर्व कळत असल्यामुळे वाईट वाटले नाही||३||अर्थः----नंतर उपजीविकाने साधन ज्या चुकल्यामुळे व्याकूळचित्त झालेले ते सर्व गोपाळ,गाईंची पावले उमटलेल्या भूप्रदेशांच्या योगाने व त्या गाईंच्या खुरांनी व दातांनी तुटलेल्या तृणाच्या योगाने गाईंचा मार्ग अनुलक्षून चालले.||४||अर्थः---जाता जाता मोळाच्या अरण्यामध्ये मार्ग चुकून ओरडत असलेल्या आपल्या गोधनाला पाहून,चालता चालता थकून गेलेले व उन्हाळ्याने झालेले ते गोप,गाईंना तेथून वळवून माघारे फिरले.||५||अर्थः----त्यावेळी भगवंताने मेघासारख्या गंभीरवाणीने हाका मारलेल्या त्या गाई,आपापल्या सांवळी पोवळीरगैवे,नावांचा ध्वनी ऐनु अत्यंत आनंदित झाल्या आणि कृष्णाला हंबरण्याकरिता रूपाने उलट हाका देऊ लागल्या||६|| अर्थः---तो इतक्यात त्या वनामध्ये काही दुर्भाग्यामुळे वायूच्या साह्याने वृद्धिंगत झालेला व गाई आणि गोपांचा नाश होण्यास कारण अशा मोठा वनसंबंधी अग्नी (वणवा)चोहोकडून प्रवृत्त झाला आणि तो आपल्या भयंकर ज्वाळांनी स्थरजंगमात्मक वस्तूला जाळू लागला||७||अर्थः---तेव्हा चोहोकडून जाळीत आपणाकडे येत असलेल्या त्या वणव्याला पाहून,गाई व गोपाळ भयभीत झाले आणि,ते जसे मृत्युच्या भयाने घाबरे झालेले लोक श्रीहरिला शरण जातत त्याप्रमाणे बलरामासह श्रीकृष्णाला शरण जाऊन म्हणाले की,-- ||८||अर्थः---हे कृष्णा,कृष्णा’तू महाशक्तीमान आहेस;हे रामा,तुझ्या पराक्रमाचा अंत नाही यास्तव तुम्ही उभयतां वणव्याच्या योगाने जळू लागलेल्या व तुम्हांला शरण आलेल्या आमचे रक्षण करण्यास समर्थ आहा||९||अर्थः----हे सर्वधर्मज्ञा कृष्णा,तुझे संबंधी बंधू बांधवही दुःखाचा अनुभव घेण्यास खरोखर योग्य नाहीत,मग आम्हीतरी तूंच ज्यांच्या रक्षक आहेस असे तुझ्याच आश्रय करून राहिलो आहो||१०||अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला हे राजा,या प्रमाणे त्या गोपाळांचे दिन भाषण श्रवण करून तो भगवान श्रीकृष्ण,त्यांना,गोपहो,तुम्ही भिऊ नका आणि डोळे मिटा म्हणजे तुमचे कल्याण होईल,असे म्हणाला||११||अर्थः---तेव्हा बरे आहे असे म्हणून गोपांनी डोळे मिटले असता त्या योगेश्वर भगवंताने त्या भयंकर अग्नीचे मुखाने प्राशन करून त्या गोपाळांना,मोळाच्या रानांत प्रवेश,क्षुधा,तृषा व श्रम इत्यादिकांपासून झालेल्या संकटांतून मुक्त करून,एका क्षणांत पुन्हा भांडीरकवडाजवळ आणून पोचविले.नंतर ते गोप डोळे उघडून पाहतात तो,आपल्याला व गाईना कृष्णाने संकटांतून सोडविले आहे असे त्याच्या दृष्टीस पडेल तेव्हा ते विस्मित झाले||१२||१३|| अर्थः---आणि योगमायेने संपादन केलेले,वनव्यापासून आपले मोक्षणरूप ते श्रीकृष्णाचे अपूर्व सामर्थ्य पाहून त्या गोपांनी त्या कृष्णाला हा मरणधर्मनिवर्तक परमेश्वर आहे असे मानिले||१४||अर्थः---नंतर बलरामासहित गोपांनी स्तविलेला तो कृष्ण,गाईंना माघाऱ्या वळवून सायंकाळी मुरलीध वाजवीत वाजवीत गोकुळामध्ये प्रविष्ट झाला||१५||अर्थः---तेव्हा,ज्यांना श्रीकृष्णाचा वियोग झालेला काळ एका क्षणाइतका असला तरी तो शंभर युगांसारखा लांबच लांब वाटत असे त्या यशोदादिक गोपींना त्या गोविंदाचे दर्शन झाले असता परमानंद प्राप्त झाला||१६|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- २०-- २---८--भगवान श्रीकृष्ण---[८]वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन. | ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता ह्या ह्या विसाव्या आध्यामध्ये,वर्षाऋतू व शरऋतू यांतील शोभांच्या वर्णनाने,गोप व बलराम यांनी युक्त असलेल्या श्रीकृष्णाच्या वनामध्ये घडलेल्या वर्षाऋतूंतील क्रीडा निरुपण केल्या आहेत | तयोस्तद्भूतं कर्म दावाग्नेर्मोक्षमात्मनः | गोपाः स्त्रीभ्यः समाचख्युः प्रलम्बवधमेव च ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणतात:---हे राजा,नंदादिक गोपांनी,वनव्यापासून आपण सर्वांस सोडविणे व प्रलांबासुराचा वध करणे ही त्या कृष्णरामांची,अद्भुत कर्मे,वृद्ध गोपांना व यशोदादिक स्त्रियांना वर्णन केली||१|| अर्थः---तेव्हा ती ऐकून विस्मित झालेल्या त्या वृद्ध गोपींनी गोकुळामध्ये अवर्तीन झालेल्या रामकृष्णाना हे कोणीतरी देवांमध्ये श्रेष्ठ देव आहेत असे मानिले ||२||अर्थः----असो मागे सांगितल्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूचे दिवस निघून गेल्यानंतर,सर्व जीवजंतूची उत्पत्ति करणारा,सर्व प्राण्यांचे जीवन चालविणारा,चंद्रसूर्यांच्या सभोवती चक्राकार खळी पडणारा व मेघांच्या फळ्या जिकडे तिकडे चालवून आकाशमंडलाला क्षोभवून टाकणारा असा वर्षाऋतू प्राप्त झाला||३||| सान्द्रनीलाम्बुदैर्व्योम सविद्दुत्स्तनयित्नुभिः | अस्पष्टज्योतिराच्छन्नं ब्रम्हेव सगुणं बभौ ||४|| अर्थः---त्यावेळी,विजा व गर्जना यासहित दाटप्राप्त झालेल्या काळ्याभोर मेघांनी आच्छादित झालेले व सूर्यचंद्रादिक ग्रह स्पष्टपणे दिवसत नाहीसे झालेले आकाश,सत्वादिक गुणांनी आच्छादित झालेल्या व आपले स्वयंप्रकाश रूप स्पष्टपणे अनुभवास येत नाहीसे झालेल्या जीवब्राम्हासारखे शोभुं लागले||४|| अर्थः—तेव्हा जसे राजे,प्रजांपासून कर घेऊन द्रव्यसंचय करितात पण योग्य काली ते द्रव्य त्यांच्याकरिता खर्च करितात त्याप्रमाणे,सूर्य—आठ महिनेपर्यंत आपल्या किरणांनी शोषून घेतलेले भूमीचे उदकरूप धन,वृष्टीकाल प्राप्त झाला असतां पुन्हा भूमीवर सोडून देव्यास प्रवृत्त झाला||५||अर्थः---जसे कृपाळू घन,क्षुयादिकेकरून तृप्त झालेल्या जणांना पाहून कंपितचित्त होत असाता त्यांच्या वांच्याकरिता त्यांना आपल्या उपजीविकांचे साधन असलेल्याहि अन्नादिकांचे दान करितात त्याप्रमाणे मोठेमोठे मेघही आपल्या विजारूप नेत्रांनी तृप्त झालेलया जगाला पाहून,प्रखरवायुने कंपित असते या जगाची वृद्धि करणारे व जीवनाचे साधन अशा उदकाची वृष्टी करू लागले||६|| | तपः कृशा देवमीढा आसीद् वर्षीयसी मही | यथैव काम्यतपसस्तनुः सम्प्राप्य तत्फलम् ||७|| अर्थः----त्यावेळी ग्रीष्मऋतुने शुष्क झालेली भूमि,पुनः पर्जन्याने भिजून गेली असता,असे सकाम तप करणाऱ्या पुरुषाचे शरीर,त्या तपाचे फळ (भोग)पावून भोजनादिकेकरून पुष्ट होते त्याप्रमाणे पुष्ट झाली||७||अर्थः---जशी कलियुगामध्ये पाखंडशस्त्रे,अज्ञानापासून झालेल्या पापाने प्रकाश पावू लागतात,वेद प्रकाश पावत नाहीत त्याप्रमाणे रात्रींच्या आरंभी काजवे;मेघांपासून उत्पन्न झालेल्या अंधकाराने प्रकाश पावू लागले गुरुशुक्रादिक ग्रह प्रकाश पावत नाहीसे झाले||८||| श्रुत्वा पर्जन्यनिनदं मण्डूका व्यसृजन् गिरः | तूष्णीं शयानाः प्राग् यद्वद् ब्राम्हणा नियमात्यये ||९|| अर्थः---जसे पूर्वी गुरूच्या नित्य कर्माच्या वेळी उगीच राहिलेले त्याचे शिष्य,ब्राम्हण नंतर गुरूच्या शब्द ऐकून अध्ययन करितात त्याप्रमाणे पूर्वी निवांत निजून राहिलेले बेडूक,मेघाचा शब्द ऐकून आपल्या वाणी उच्चारुं लागले ||९||| आसन्नुत्पथवाहिन्यः क्षुद्रनद्दोsनुशुष्यती: | पुंसो यथास्वतन्त्रस्य देहद्रविणसम्पदः ||१०|| अर्थ:---जशा जितेंद्रिय पुरुषाच्या यौवनादिक देहसंपत्ती व धनगृहादिक द्रव्यसंपत्ती,पूर्वी शांतस्वभावाच्या असल्या तरी पुढे ती शस्त्रमर्यादेचे उल्लांघटन करून वागुं लागला म्हणजे त्या संपत्ति कुमार्गाने जाऊ लागतात त्याप्रमाणे पूर्वी शुष्क असलेल्याही लहान लहान नद्या वृष्टि होऊ लागली असता आपापल्या पात्रांच्या बाहेरून भलत्याच वाटांनी वाहू लागल्या||१०||अर्थ:---जशी राजाची सैन्यसंपत्ति कित्येकांच्या हिरव्या व कित्येकांच्या तांबड्या पोशाखांनी व कित्येकांच्या मस्तकावर धारण केलेल्या पांढऱ्या छत्र्यांनी,हिरवा तांबडी व पांढरी दिसत्ये त्याप्रमाणे भूमि कोठेकोठे उगवलेल्या हिरव्या गतवाने हिरवी,कोठेकोठे इंद्रगोपानांवांच्या किड्यांनी तांबडी व कोठेकोठे उगवलेल्या आलंब्यांनी आच्छादित झाल्यामुळे पांढरी दिसू लागली||११||| क्षेत्राणि सस्यसम्पद्भिः कर्षकाणां मुदं ददुः | धनिनामुपतापं च दैवाधीनमजानताम् ||१२|| अर्थः---तशीच क्षेत्रे(शेते)चांगला पाऊस पडून सुंदर दिसणाऱ्या पिकांच्यायोगागे शेतकरी लोकांना आनंद देऊ लागली व नंतर पाऊस बंद झाल्यामुळे वाळून जाणारी तीच शेते,वृष्टि होणे व न होणे हि देवाधीन आहे असे न जाणणाऱ्या त्याच शेतकरी धन्यांना खेदही देऊ लागली ||१२||अर्थः--जसे भगवद्भक्त,हरीच्या सेवेने साधकदशेमध्ये सुंदररूप व सिद्धदशेमध्ये परमानंदस्वरूप धारण करितात त्याप्रमाणे पाण्यामध्ये रहाणारे मत्स्यादिक व भूमीवर राहणारे वृक्षादिक,सर्व प्राणी,नवीन उदकाच्या सेवनाने सुंदर रूप धारण करू लागले ||१३||अर्थः---त्यावेळी,जसे योगसाधना परिपूर्ण न झालेल्या योग्याचे भोगवासनायुक्त झालेले चित्त,विषयांनी युक्त होऊन चंचल होते त्याप्रमाणे नद्यांचा समागम घडलेला व वाऱ्याने लाटा उठलेला समुद्र खवळून गेला||१४||| गिरयो वर्षधाराभिर्हन्यमाना न विव्यथुः | अभिभूयमाना व्यसनैर्यथाधोक्षजचेतसः ||१२|| अर्थः---जसे परमेश्वराचेठिकाणी आसक्तचित्त झालेले पुरुष,आध्यात्मिकादिक तापांनी कितीही पीडा दिली असतांही डगमगत नाहीत त्याप्रमाणे गोवर्धणादिक पर्वत,पर्जन्य धारांनी पुष्कळ प्रहार केले तथापि मुळींच दुःख पावले नाहीत||१५||अर्थः---जसे ब्राम्हणांनी पाठ केलेलेही वेद,काही दिवसार्पयंत आवृत्ति केली नसतां कालगतीने आठवत नाहीसे होऊन शेवटी संदिग्ध होतात त्याप्रमाणे ह्या वर्षऋतूमध्ये गवतांनी आच्छादित झालेले व ते गवत काढून साफ न केलेले मार्ग,त्या मार्गांनी वारंवार जाणाऱ्यायेणाऱ्यांसही संदिग्ध झाले||१६||| लोकबन्धुषु मेघेषु विद्दुतश्चलसौहृदा: | स्थैर्यं न चक्रुः कामिन्यः पुरुशेषु गुणिष्विव ||१७|| अर्थः---जशा अस्थिर प्रेम असणाऱ्या जारिणी स्त्रिया,दातृत्वादिक गुणयुक्तही पुरुषांजवळ स्थिर राहत नाहीत त्याप्रमाणे सर्वालोकांवर उपकार करणाऱ्याहि मेघांचेठिकाणी विद्दुल्लता स्थिरपनाणे राहत नाहींशा झाल्या ||१७||अर्थः---ज्याप्रमाणे निर्गुण पुरुष,मायासंबंधी सत्वादि तीन गुणांच्या मिश्रणाने प्रकट झालेल्या प्रपंचामध्ये शोभतो त्याप्रमाणे ज्याला दोरी मुळीच नाही असे इंद्राचे धनुष्य,गर्जनादिगुणयुक्त आकाशाचेठिकणी शोभू लागले||१८||अर्थः----जसा आपल्याच प्रकाशाने भासमान होणाऱ्या अहंकारबुद्धीने अच्छादित झालेला जीवात्मा, ‘मी दाता मी शूर इत्यादिक’गर्वाने फुगून गेला म्हणजे शोभित नाही त्याप्रमाणे आपल्याच कांतीने प्रकाशित होणाऱ्याहि मेघांनी अच्छादित झालेला चंद्र,शोभत नाहीसा झाला||१९||अर्थः----जसे गृहामध्ये राहून तापत्रयाने तप्त झालेले व विरक्त झालेले लोक,भगवद्भक्ताचा समागम झाला असता आनंद पावून पूजा स्तुती नमस्कारादिकेकरून त्याचा सत्कार करितात त्याप्रमाणे पूर्वी ग्रीष्मतापाने तप्त होऊन खिन्न झालेले मोर,मेघाच्या उत्साहयुक्त व हर्षयुक्त होऊन,आपल्या ‘टाहो शब्द व नृत्य इत्यादिकेकरून’त्याचा सत्कार करू लागले ||२०||| पीत्वापः पादपाः पद्भिरासन्नानात्ममूर्तयः | प्राक् क्षामास्तपसा श्रान्ता यथा कामानुसेवया ||२१|| अर्थः---जसे पूर्वी तपश्चर्येच्या क्लेशांनी युक्त व शिथिलेद्रीय झालेले सकाम तपस्वी,पुण्यप्रभावाने इच्छित विषयभोग पावोन,त्यांच्या निरंतन सेवनाने पुष्ट होतात त्याप्रमाणे पूर्वी ग्रीष्मतापाने शुष्क झालेले वृक्ष आपल्या मुळांनी उदकाचे शोषण करून,नवे अंकुर,पुष्पे,फळे इत्यादिकांच्या योगाने पुष्ट झाले ||२१|| अर्थः--- हे राजा,जसे दुर्बुद्धीयुक्त विषयवासनांनी बद्ध झालेले गृहस्थ,घोर कृत्यांनी युक्त किंवा ज्यांती कृत्ये कधीच संपत नाहीत अशा घरांमध्ये राहतात त्याप्रमाणे मत्स्यादिकाचा लोभ धारण करारे चक्रवाक पक्षी,ज्यांनी तीरे कर्दम कंटक इत्यादिकांनी युक्त आहेत.अशाहि सरोवरांचेठिकाणी,राहू लागले ||२२|| अर्थः---जसे वेदाने सांगितलेले वर्णाश्रम धर्म मार्ग,पाखंडी पुरुषांच्या कृतर्कवादांनी कलियुगामध्ये सोडून जातात त्याप्रमाणे इंद्र,वृष्टि करू लागला असता नद्यांच्या व शेतांच्या काठी असलेले बांध जलप्रवाहांच्या योगेकरून फुटून जाऊ लागले||२३|| अर्थः---जसे पुरोहितांनी प्रेरणा केलेले राजेलोक किंवा सावकारलोक,त्यात्याकली दुःखित झालेल्या लोकांना अन्नवस्त्रादिक उपभोग वस्तूंचे दान करितात त्याप्रमाणे वायूंनी प्रेरणा केलेले मेघ,सर्व प्राण्यांना जीवनाचे साधन अशा उदकाची पाहिजे त्यात्यावेळी वृष्टि करू लागले||२४|| अर्थः---याप्रमाणे वर्षाऋतूच्या संपत्तीने समृद्ध झालेल्या व पिकलेल्या फळांनी ओथंबलेल्या खजुरीच्या व जांभळीच्या वृक्षांनी युक्त अशा त्या वृंदावनामध्ये गाईननीं व गोपाळांनी वेष्टित असा तो बलरामासह श्रीकृष्ण,क्रीडा करण्याकरिता प्रविष्ट झाला||२५|| अर्थः---तेथे मोठाल्या कांसांच्या भाराने हळूहळू चालणाऱ्याहि गाई,भगवंताने त्यांची नावे घेऊन बोलाविल्या असता,प्रीतीने ज्यांच्या स्तनांतून दुध गळत आहे अशा त्या गाई,धावत धावत त्याच्याजवळ जात असत||२६||अर्थः---त्यावेळी तो लीला पाहून आनंद पावणाऱ्या त्या वनातील कितीएक भिल्लीणी,भगवंताच्या दृष्टीस पडत असत,केव्हांतरी तो कृष्ण परमात्मा,त्या वनामध्ये मध स्त्रवणाऱ्या वनांच्या पंक्ति,पर्वतावरून खाली पडल्यामुळे धोधो वाजणारे पाण्याचे धबधबे व त्यांच्याजवळ असलेल्या गुहा पहात व पक्ष्यादिकांचे नानाप्रकारचे शब्द ऐकत फिरत असे ||२७||अर्थ:---केव्हातरी कंदाचे मुळांचे व फळांचे भक्षण करणारा तो भगवान पाऊस पडत असला म्हणजे वृक्षाच्या ढोलीमध्ये व पर्वताच्या गुहेमध्ये प्रवेश करून तेथेच क्रीडा करीत असे ||२८|| अर्थः—केव्हांतरी बलरामाने युक्त असा तो श्रीकृष्ण आपल्या बरोबर भोजन करण्यास योग्य अशा सख्य गोपांसहवर्तमान पाण्याजवळ शिळेवर बसून घरांतून आणलेल्या दहीभाताचे भोजन करीत असे||२९||अर्थ:---हिरवे गवत उलवलेल्या प्रदेशावर बसून रवंथ करणाऱ्या व डोळे झांकून तृप्त असलेल्या वृषभांना,वात्सांना व आपल्या कासांच्या भाराने श्रम पावलेल्या गाईना पाहून तशीच आपपल्या प्रभावाने वृद्धिंगत झालेली व सर्व प्राण्यांना आनंद देणारी वर्षाऋतूसंबंधी त्या वृंदावनातील शोभा पाहून भगवंताने,फार चांगली आहे असे मानिले ||३०||३१||
अर्थ:---याप्रमाणे क्रीडा करीत असलेले ते रामकृष्ण,गोकुळामध्ये राहत असतां,ज्यामध्ये मेघ,नाहीसे झाले आहेत,उदके स्वच्छ झाली आहेत व वायू शांत वाहू लागला आहे असा शरऋतू प्राप्त झाला||३२||| शरदा निरजोत्पत्त्या निराणि प्रकृतिं ययुः | भ्रष्टानामिव चेतांसि पुनर्योगनिषेवया ||३३|| अर्थ:---तेव्हा जशी दुःसंगान योगश्रष्ट झालेल्या पुरुषांची अंतःकरणे पुन्हा प्रणायामदिक योगसाधनांच्या सेवनाने तळ्यावर येऊन स्वच्छ होतात त्याप्रमाणे पावसाळ्यांत बिघडून गेलेले नद्यावगैरेची उदके,कमले उत्पन्न करणाऱ्या त्या शरऋतूच्या योगाने स्वच्छता व मधुरता पावली||३३||अर्थः---जशी श्रीकृष्णाचेठिकाणी प्राप्त झालेली भक्ती,ब्रम्हचारी,गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी या चार आश्राम्यांच्या दुःखाचा नाश करिते त्याप्रमाणे शरऋतूने,आकाशातील मेघ,प्राणिमात्रांची दाटी,भूमीवरील कर्दम व उदकांतील मळ यांचा नाश केला||३४||अर्थः---त्यावेळी जसे पुत्रषणा,वित्तेषणा व लोकेषणा इत्यादिक सर्व इच्छा सोडून पापमुक्त झालेले शांत ऋषि शोभतात त्याप्रमाणे आपले सर्व उदर पृथ्वीवर सोडून देऊन पांढरे झालेले मेघ शुभू लागले ||३५||| गिरयो मुमुचुस्तोयं क्वचिन्न मुमुचुः शिवम् | यथा ज्ञानामृतं काले ज्ञानिनो ददते न वा ||३६|| अर्थः---जसे ज्ञानी पुरुष,मोक्षसाधन रूप ज्ञानामृताचा एकाद्या अधिकारी पुरुषाला मात्र कृपेने उपदेश करितात,कर्माविद्येचा उपदेश करणाऱ्या उपाध्यांसारखे सर्वत्र प्रसार करीत नाहीत त्याप्रमाणे पर्वत,कल्याणकारक असे आपलेठिकाणी असलेले उदक एखादेठिकाणीच सोडीत असत सर्वठिकाणी सोडीत नसत म्हणजे डोंगरांतून वर्षाऋतुसारखे सर्वठिकाणी पाणी वाहत नसे||३६||अर्थः---जसे कुटुंब पोषणाविषयी आसक्त असलेले मूढ पुरुष,प्रतिदिवशी क्षीण होत चाललेले आपले आयुष्य जाणत नाहीत त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणाऱ्या मत्स्यादिक जलजंतुनी,त्या शरत्काली आपले जीवनहेतूभूत जल उत्तरोत्तर क्षीण होत चालले आहे असे जाणिले नाही||३७|| अर्थ:---जसा इंद्रिय निग्रह न केलेला ,दरिद्री व दिन कुटुंबि मनुष्य ,संसारातील अनेकप्रकारचे ताप पावतो त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणारे जलचर प्राणी ,शरऋतूतील सूर्याच्या किर्णापासून होणार ताप पावू लागलो ||३८|| अर्थ:---जसे धैर्यवान ज्ञानी पुरुष ,हळूहळू ह्या जड असलेल्या शरीरादिकावरील अहंतेचा व ममतेचा त्याग करितात त्याप्रमाणे सर्वस्थळे कर्दमाचा व वेली आपक्क्तेचा हळूहळू त्याग करू लागला||३९|| | निश्चलाम्बुरभूतूष्णीं समुद्रः शरदागमे | आत्मन्युपरते सम्यङ्मुनिर्व्युपरतागमः ||४०|| अर्थ:---जसा ध्यान करणारा ऋषि ,मनाला उपरती झाली आसता वेद घोशादिक कर्म मार्ग सोडून देऊन शांत होते त्याप्रमाणे शरऋतू प्राप्त झाला असता समुद्राने गर्जनावगैरे करण्याचे सोडून देऊन निश्चळोदक झाला ||४०||अर्थ:---जसे योगसाधना करणारे पुरुष,क्षोभ पावणाऱ्या आपल्या द्वरभूत इंद्रियांनी स्त्रवणारे ज्ञान,त्या इंद्रियांच्या प्रत्याहाराने रक्षण करितात त्याप्रमाणे शेतकरी लोक,आपल्या भाताच्यावगैरे शेतांतून बांधांना खांडी पडून वाहणारे पाणी,ते बांध नीट पक्के बांधून शेतांत कोंडून ठेवू लागले||४१|| अर्थ:---जसे ज्ञान झाले म्हणजे ते देहाभिमानापासून होणाऱ्या तापाचा नाश करिते व जसा श्रीकृष्ण,गोकुलसंबंधी स्त्रियांना आपल्या विरहापासून उत्पन्न झालेल्या तापाचा नाश करीत असे त्याप्रमाणे उदय पावणारा चंद्र,प्राणिमात्रांना शरऋतूंतील सूर्याच्या किरणांपासून होणाऱ्या तापाचा नाश करू लागला||४२|| | खमशोभत निर्मेघं शरद्विमलातारकम् | सत्वयुक्तं यथा चित्तं शब्दब्रम्हार्थदर्शनम् ||४३|| अर्थः---जसे सत्वगुणाने युक्त (शद्ध)झालेले अंतःकरणक वेदब्रम्हतील पूर्वोत्तमीमांसामध्ये निर्णय केलेल्या अर्थांना दाखवीत असता शोधते त्याप्रमाणे मेघशून्य झालेले आकाश शरऋतूच्या योगाने नक्षत्रांना स्वच्छ दाखवीत शोभू लागले||४३|| अर्थः---जसा यादवसमुहाने वेष्टित झालेला यादवपती श्रीकृष्ण,समशीतोष्ण (फार गार नव्हे व फार उष्ण नव्हे)अशा पुष्पवनांतून आलेल्या वाऱ्याचा स्वीकार करून सर्व तपांचा त्याग केला.गोपीमात्र त्या वायूचा स्वीकार करूनही ताप घालविण्यास समर्थ झाल्या नाहीत कारण त्यांची मने श्रीकृष्णाने हरून नेली होती||४५||अर्थः---जसे ईश्वराराधनरूप कर्मयोग,ईश्वराच्या संबंधाने धर्मादी पुरुषार्थरूप फळांनी युक्त होऊन सर्व भोग उत्पन्न करणारे त्याप्रमाणे गाई,पक्षिणी व स्त्रिया ह्या,शरऋतूच्या निमित्ताने आपापल्या पटींनी बलात्काराने अनुगमन केलेल्या होऊन गर्भिणी झाल्या ||४६||अर्थः---हे राजा,जसे चोरांवाचून सर्वलोक धार्मिक राजाच्या योगाने निर्भय व हर्षयुक्त होतात त्याप्रमाणे चंद्रविकासिनी कमळीनिवचून सर्व कमळे सूर्योद्याच्या योगाने प्रफुल्लित झाली|\४७||अर्थः---त्यावेळी जिकडेतिकडे धान्ये पिकून संपन्न झालेली भूमि,नगरे व गाव यामध्ये सर्वठिकाणी प्रवृत्त झालेल्या नवान्नप्रशनादिक वैदिक महोत्साहणे व दिवाळीवगैरे इंद्रियप्रतिजनक उत्सवांनी शुभू लागली.त्यामध्ये,हरीच्या रामकृष्णरूप अवतारांच्या योगाने त्यांच्या दर्शनादिक उत्साहांनी अत्यंत शोभू लागली||४८||अर्थः---यज्ञादिक कर्मे योगसाधने मंत्रसिद्धी,भगवद्भक्ति इत्यादिक साधनांनी सिद्ध झालेले पुरुष,जसे प्रारब्धाने आयुष्य आयुष्य अवशिष्ट असेल तोपर्यंत अडकून राहून ते प्रारब्ध संपले म्हणजे मृत्यूकाल प्राप्त होतंच आपण याज्ञादिकांनी संपादन केलेल्या देवादी शरीरंस पावतात त्याप्रमाणे वाणी (व्यापारी) सैन्यासी,राजे व ब्रम्हचारी हे वर्षाऋतूमध्ये पावसाच्यावगैरे कारणाने एकाठिकाणी राहून ते शरऋतू प्राप्त होताच आपापल्या स्थानापासून निघून आपापले – व्यापार,स्वच्छदता,दिग्विजय व विद्याभ्यासवगैरे कार्यभाग करू लागले ||४९||
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शारदा २१--- २---९--भगवान श्रीकृष्ण---[९]वेणूगीत. | ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आता ह्या एकविसाव्या अध्यायामध्ये,शरऋतूच्या योगाने सुंदर असलेल्या वृंदावनामध्ये श्रीकृष्ण गेला असता,त्याच्या वेणुगीताचा नाद श्रावण करून,गोपांनी गेलेले गीत वर्णन केले आहे||१||| इत्थं शरत्स्वच्छजलं पद्माकरसुगन्धिना | न्यविशद् वायुनां वातं सगोगोपालकोsच्युतः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,याप्रमाणे शरऋतूच्या योगाने जेथे पाणी स्वच्छ आले आहे व जेथे कमळसमुहांवरून आलेला वारा वाहत आहे अशा त्या वृंदावनामध्ये एकेदिवशी गाईगोपाळांसहवर्तामान श्रीकृष्ण प्रविष्ट झाला||१||अर्थ:---तेव्हा जेथे प्रफुल्लित झालेल्या वनपंक्तिमध्ये मत्त झालेल्या श्रमरांच्या व पक्ष्यांच्या कुळांनी सरोवरे,नद्या व पर्वत हि नदीत झाली आहेत अशा त्या वनामध्ये गाई,गोपाळ व बलराम यांसह श्रीकृष्णाने प्रवेश करून गाई चरित असता वेणू करू लागल्या ||३||अर्थः---हे राजा,त्यांनी ते कृष्ण्चारीत्र वर्णन करण्यास आरंभ केला परंतु,कृष्णमूर्ति ध्यानांत येताच मदनाच्या योगाने व्याकुलचित्त झालेल्या त्या गोपी,वर्णन करण्यास समर्थ झाल्या नाहीत||४|| अर्थः---(आता ज्याप्रकारचे कृष्णस्मरण त्यांच्या मनाला क्षोभ करणारे झाले ते सांगतो---)मस्तका रव मोराच्या पिसांचा टोप नटासारखे सुंदर शरीर,कणांवर किर्नकारवृक्षाची फुले,सुवर्णासारखा पिंवळा भरजरीचा पितांबर व वैजयंती (पाच वर्णाच्या सुवासिक फुलांनी गुंफलेली )माळां धारण करणारा व गोपांच्या समूहांनी ज्याची कीर्ति गायन केली आहे असा तो श्रीकृष्ण वेणूची छिद्रे अधरामृताने (मुखावायुने)पूर्ण करीत (मुरली वाजवीत)असता,जेथे तेथे भूमीवर उमटलेल्या आपल्या पावलांनी सर्वांना प्रीति उत्पन्न करणाऱ्या त्या वृंदावनामध्ये प्रविष्ट झाला||५|| अर्थः—हे राजा,याप्रकारे स्मरण करणाऱ्या त्या सर्व गोकुळवासी स्त्रिया सर्वाप्राणीमात्रांचे मन हरण करणारा वेणुनाद श्रवण करून श्रीकृष्णस्वरूपाच्या माधुर्यादिकांचे वर्णन करीत असत्या पदोपदी परमानंदमूर्ति कृष्णाला मानाने आलिंगन करू लागल्या||६||अर्थः---गोपी म्हणाल्या हे साखीहो,नेत्र धारण करणाऱ्या लोकांच्या नेत्राचे फळ म्हंटले म्हणजे हेंच मुख्य आहे याहून दुसरे उत्कृष्ट फळ आम्ही जाणत नाही.ते फळ कोणते?असे म्हणाला तर समवयाच्या मित्रांसहवर्तमान गाईंना या वनांतून त्या वनांत प्रवेश कराविणाऱ्या नंदसत रामकृष्णाचे वेणू वाजविणाऱ्या व स्नेहयुक्त कटाक्ष फेकणारे ज्यांनी प्राशन केले आहे म्हणजे नेत्र्रूप भ्रमारांनी त्याच्या माधुर्याचया अनुभव घेतला आहे त्यांनीच ते फळ मिळविले आहे,दुसऱ्या कोणीहि मिळवेले नाही,||७||अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या आंब्याच्यचे कोवळे पल्लव,मोरांची पिसे,फुलांचे घोस व भूमीवर व पाण्यात उगवणारी कमळे,यांच्या चित्रविचित्र बनविलेल्या माळांनी मध्येमध्ये संयुक्त झालेल्या काळ्या व पिवळ्या पितांबारांच्या योगाने ज्यांचा वेश विचित्र दिसत आहे असे हे रामकृष्ण,गोपाळांच्या सभेमध्ये जेव्हा केव्हातरी गायन करू लागतात,तेव्हा ते जसे रंगभूमीवर गायन करणारे उत्तम नट शोभतात त्याप्रमाणे शोभतात.केवढे हे त्या गोपांचे भाग्य !!||८||अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या –हे गोपीहो,ह्या वेणुने पुण्य तरी काय करून ठेवले आहे?न जाणो.कारण,--हा वेणू,गोपिकांनाच उपभोग्य असलेल्याही श्रीकृष्णाच्या आधारसुधेचा स्वातंत्र्याने यथेष्ट उपभोग करितो आणि इतरांच्या वाटयाला मात्र आपल्या उच्छीष्टरसाचा अंश अवशेष ठेवितो.हे कशावरून असे म्हणाल तर –त्या विषयी सूचक चिन्ह असे की,--- जसे कुलवृष्ट पुरुष,आपल्या वंशांत भगवद्भक्त पुरुष उत्पन्न होऊन त्याने भगवंताचा प्रसाद मिळविला असे ऐकून,रोमांचयुक्त होऊन आनंदाश्रु ढाळतात त्याप्रमाणे हा ज्यांच्या पाण्याने पुष्ट झाला त्या आईसारखा नद्या,आपल्यामध्ये प्रफुल्लित झालेल्या कमळसमुदायाच्या रूपाने रोमांच्युक्त झाल्यासारख्या दिसतात;तसेच हा ज्यांच्या वंशात उत्पन्न झाला आहे ते वृक्षही मधाच्या धारांच्या रूपाने आनंदाश्रू ढाळल्यासारखे दिसतात||९||अर्थ:----दुसऱ्या गोपी म्हणाल्या --- हे सखींनो,हे वृंदावन,भूमीची कीर्ति,स्वर्गापेक्षाही अधिकच पसरीत आहे कारण ह्या वृंदावनाने,जेथे तेथे उमटलेल्या श्रीकृष्णाच्या चरणकमलांनी शोभासंपत्ती मिळविली आहे तेथे गोविंदाचा मुरलीनाद ऐकल्याबरोबर मत्त झालेले मोर,त्या गोविंदाला,ह्या मंदगर्जना करणारा काळा मेघच आहे असे मानून आनंदाने नृत्य करीत असतात व ते नृत्य पाहून पर्वताच्या खोऱ्यांतून फिरणारी सर्व श्वापदे,थाव्याथव्यांनी जमून ते नृत्य पाहण्याकरिता व मुरलीचा नाद ऐकण्याकरिता स्तब्ध झालेली असतात.हा चमत्कार दुसऱ्या लोकांचेठीकानी नाही म्हणून हे वृंदावन भूमीची कीर्ति पसरीत आहे||१०||अर्थ:---दुसऱ्या म्हणाल्या – हे सखीनो,तिर्यकयोनीमध्ये उत्पन्न झाल्यामुळे विवेकहीन असल्यामुळे ह्या कृतार्थच आहेत.कारण – ज्या वेणुनाद श्रवण विचित्रवेष धारण करणाऱ्या नंदकुमाराची प्रेमयुक्त,कटाक्षांनी रचिलेली पूजा ( सन्मान )करितात आणि त्यातरी आपल्या पती काळवीट हरीनासहवर्तमान करितात.आमचे पती तर आम्ही कृष्णाकडे पाहिले असतां तेसुद्धा सहन करीत नाहीत !||११||अर्थ:---दुसऱ्या गोपी म्हणाल्या – हे गोपीहो,आम्ही एक आश्चर्यसांगतो तें ऐका – ज्यांचे रूप व शील स्त्रियांना रत्युत्साह उत्पन्न करणारे आहे त्या श्रीकृष्णाला पाहून व त्याने वाजविलेल्या मुरलीने विचित्र गायन ऐकून,विमानांत बसून गमन करणाऱ्या देवांगना,आपापल्या पतींच्या अंकांवर बसलेल्या असतांही मदनाने त्यांचे धैर्य नाहीसे होऊन त्या मोहित होतात;तेव्हा व्याकूळ व अस्ताव्यसथ झालेल्या त्यांच्या बुचड्यांतून फुले गळूं लागून त्यांच्या निऱ्या सुटतात.एतावता देवांगनानादेखील मोह झालेला दिसतो मग आम्हांला होतो यांत नवल काय ! ||१२||अर्थ:---त्यावेळी गाईहि कृष्णाच्या मुखांतून निघालेले वेनुगीतरूप अमृत खाली न गळावे म्हणून आपल्या ताठ उभे केलेल्या कर्णरूप ओंजळींनी प्राशन करीत,व श्रीकृष्णाला नेत्रद्वारा मनामध्ये घेऊन त्याला दृढ आलिंगन देत आणि नेत्रांतून आनंदाश्रू ढाळीत स्तब्ध उभ्या राहतात.तसेच लहान वत्सही,स्तनपान करीत असतां,कृष्णाच्या मुरलीचा शब्द कानी पडताच देहभान पसरून स्तनांतून ओढून घेतलेल्या दुधाचे ग्रास ( घोट ) गळफड्यांतून खाली गळत असता स्तब्ध उभे राहतात||१३||अर्थः---एक गोपी म्हणाला कि,आई,ह्या वनामध्ये जे पक्षी आहेत ते बहुतकरून मोठे मननशील ऋषीच असावेत.कारण,जसे मननशील ऋषि श्रीकृष्णाचे दर्शन होईल तशा रीतीने वेदोक्त कर्मफलांचा त्याग करून,वेदवृक्षाच्या शाखांच्या आश्रय करून व सुंदर पल्लवस्थानीय कर्मांचा मात्र स्वीकार करून श्रीकृष्णकथांचे गायन व श्रवण करितात तसे हे पक्षीसुद्धा कृष्णाचे दर्शन होईल अशा रीतीने फळपुष्पादिकांनी रहित व सुंदर वृक्षांच्या पल्ल्वांनी युक्त अशा फांद्यावर बसून कृष्णाने प्रकट केलेले मधुर वेनुगीत,काहीएक अवर्णनीय सुखाने डोळे न मिटता व आपल्या जातीचे कलकलाट शब्दही न करतां श्रवण करितात||१४|| अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या – अहो,जिवंत प्राण्यांच्या गोष्टीतर एकीकडे राहूं द्या,परंतु ह्या निर्जीव असलेल्याही नद्या,ते कृष्णाचे वेनुगीत ऐकून भोवऱ्याच्या रूपाने सूचित होणाऱ्या मदनाने ह्यांच्या प्रवाहाचा वेग स्तब्ध होतो आणि ह्या,कृष्णाला नजराणा अर्पण करीत असता त्या आपल्या तरंगरुपी भुजांनी कृष्णाच्या चरणयुगुलाचे,त्याला घट्ट आलिंगन होईल अशा रीतीने ग्रहण करितात||१५|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या - मेघ हा श्रीकृष्णाला आपला मित्र असे मानितो आणि उन्हाळ्यामध्ये बलराम व गोप ह्यांसहवर्तमान गोकुलांतील गाईना चारणाऱ्या व गाईंच्या मागून जातांना मुरली वाजविणाऱ्या त्या श्रीकृष्णाला पाहून प्रथम त्याच्या मस्तकावर आपण उगवतो आणि नंतर प्रेमाच्या योगाने वृद्धिगत होऊन पुष्पवृष्टिसहवर्तमान स्वतांच्या शरीराने त्या मित्रावर ( कृष्णावर ) आपल्या देहाचे छत्र धारण करितो ( छाया पाडितो ) येथे देवांनी केलेली पुष्पवृष्टि मेघांनीच केली असे सांगितले आहे||१६||अर्थ:---दुसऱ्या अहंकारयुक्त गोपी म्हणाल्या --- हे मैत्रीणीनो,वनांत राहणाऱ्या भिल्लिणी खरोखर कृतार्थ (धन्य)आहे.कशा म्हणाला तर ----ज्या भिल्लिणी,प्रथम कृष्णाच्या स्त्रियांच्या स्तवनाचेठिकाणी लेपन झालेले,नंतर रातिकली श्रीकृष्णाच्या चरणकमलांना लागल्यामुळे त्या चरणांच्या तांबडेपणाने विशेष शोभा आलेले,आणि त्या कृष्णाच्या वनांत घडलेल्या फिरण्याने तृणाला लागलेले केशर पाहतांच त्याच्या दर्शनाने कामपिडा पावोन,ते (गवताला लागलेले)केशर घेऊ,कामाने तप्त झालेल्या आपल्या मुखांचेठीकानी व स्तनांचेठिकाणी लेपन करून कामपीडेचे निरसर करितात,म्हणून त्याच धन्य होत,ज्यांना अरण्यांत जाता येत नाही व केशर मिळूवन स्वतांची कामपिडा शांत करिता येत नाही,त्या आम्हांसारख्या स्त्रियांना धिक्कार असो ||१७|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या – हे स्त्रिया हो,काय सांगावे ! हा गोवर्धन पर्वत तर भगवद्भक्तांचा शिरोमणी आहे.कारण,हा राम आणि कृष्ण यांच्या चरणस्पर्शाने आनंद युक्त व उगवलेल्या तृणाच्या रूपाने रोमांच धारण करीत असता,गाईगोपाळांसहित आपल्यावर आलेल्या त्या रामकृष्णांच्या,पाणी,कोवळे गवत,गुहा,कंद व मुळे यांच्या योगाने सन्मान करितो||१८||अर्थः--- दुसऱ्या म्हणाल्या – हे सख्यानो,गोपालांसह प्रत्येक वनामध्ये गाईंना चारणाऱ्या व दुध काढत्येवेळी गाईचे पाय बांधण्यास उपयोगी पडणाऱ्या दोऱ्या मस्तकाला गुंडाळून व खोडकर गाईंना दुध काढत्येवेळी ओढून धरण्यासाठी केलेले फांस खाद्यांवर धारण करून श्रेष्ठ गोपांच्या शोभेने विराजमान होणाऱ्या रामकृष्णांच्या,मधुरशब्दांनी युक्त अशा महामुरल्यांना ध्वनींनी,शरीर धारण करणाऱ्या गाई जंगमप्राण्यांना जो चालणे बंद पडण्याचा स्थावरधर्म दिसतो व वृक्षवगैरे निर्जीव प्राण्यांच्या शरीरांवर रोमांच उभे राहून त्यांना जो जंगमप्राण्याचा धर्म दिसतो हें मोठेच आश्चर्य आहे||१९|| | एवंविधा भगवतो या वृन्दावनचारिणः | वर्णयन्त्यो मिथो गोप्यः क्रीडास्तन्मयतां ययुः ||२०|| अर्थ:---हे राजा,याप्रकारे करून वृंदावनामध्ये संचार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या ज्या अनेक क्रीडा त्याचे वर्णन करणाऱ्या त्या गोपी,शेवटी तन्मयता पावत असत ||२०|| _________________________________________________________________________________________________________ शारदा२२--- २---१०--भगवान श्रीकृष्ण---[१०]वस्त्रहर३४ (१७-८-१९शनिवार श्लोक क्र ३२ सुरुवात) _________________________________________________________________________________________________________आता ह्या बाविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने,वस्त्राहरणरूप लीलेने गोपांच्या कन्यांना वर देऊन यज्ञशाळेमध्ये गमन केले,अशी कथा वर्णन केलेले आहे| ||२९--८-१९ अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला --- हे राजा,हेमंतऋतूमध्ये त्यांतही पहिल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नंदाच्या गोकुळातील कन्यांनी,हविष्यान्नभोजन करण्याचा नियम स्वीकारून,कात्यायनी देवीचे पूजनरूप व्रत आचरण केले,म्हणजे श्रीकृष्णप्राप्तीकरिता एक महिनापर्यंत दररोज कात्यायनी देवीचे पूजन करावे असा नियम केला||१||अर्थः----त्याचा प्रकार सांगतो –हे राजा,त्या कन्यांनी,अरुणोदयाच्या वेळी यमुनेच्या उदकामध्ये स्नान करून,त्या उदकाच्या तीरी वाळवेची कात्यायनी देवीची प्रतिमा करून त्या देवीची –चंदने,सुगंधयुक्त पुष्पे,पल्लव,फळे,तांदूळ,धूप,दीप,लहानमोठे भक्ष्यादिकांचे नैवेद्य व दहीभातवगैरे बळी समर्पण करून पूजा केली||२||३|| अर्थः----त्यांत---हे कात्यायनि,हे महामाये,हे महायोगिनी,हे सर्वेश्वरी देवी,नंदगोपाचा पुत्र जो श्रीकृष्ण त्याला माझा पतीकर,तुला नमस्कार असो.याप्रमाणे प्रार्थनापूर्वक नमस्काररुपी मंत्राचा आपआपल्या मनामध्ये जप करून त्या कन्यांनी देवीची पूजा केली||४|| अर्थ:---याप्रमाणे श्रीकृष्णाकडे चित्त असलेल्या त्या कन्यांनी एकमहिनापर्यंत हविष्यान्नव्रत आचरण करून नंद्पुत्र आपला होवो अशा इच्छेने भद्रकालीनामक कात्यायनी देवीचे पूजन चालविले||५|| अर्थः---आता व्रताचे पूर्वांग सांगतो-प्रतिदिवशी उषःकाली ( पहांटेच्या वेळी ) त्या कन्या उठून त्या त्या नावांनी दुसऱ्या कन्यांना जाग्या करून एकीमेकीकडे हात धारून यमुनेमध्ये स्नानाकरिता जाऊ लागल्या म्हणजे उच्चस्वराने श्रीकृष्णाचे गायन करीत असत||६|| अर्थः---त्या कन्या,एकेदिवशी यमुनेच्या काठी जाऊ तेथे आपापली वस्त्रे,पूर्वीप्रमाणे फेडून ठेऊन,मोठ्या हर्षाने श्रीकृष्णाचे गायन करीत उदकामध्ये एकीमेकीच्या अंगावर पाणी उडवून खेळत होत्या||७|| अर्थः---इतक्यामध्ये योगेश्व्ररांचीही ईश्वरअसा भगवान श्रीकृष्ण,ते त्याचे व्रताचरण आपल्या प्राप्तीकरिता आहे असे जाणून त्यांच्या कर्मांचे फल देण्याकरिता मित्रांसहवर्तमान तेथे प्राप्त झाला||८|| अर्थः---आणि त्यांची वस्त्रे ग्रहण करून मोठ्या त्वरेने कंदबवृक्षावर आरोहण करून,हंसनाऱ्या बालकांसहवर्तमान आपणही हंसत असता तो कृष्ण,थट्टेने त्यांस म्हणाला की,||९|| अर्थः---हे स्त्रिया हो,येथे ( कळंबाच्या झालाखाली ) येऊन यथेष्टपणे आपापले वस्त्र ग्रहण करा.हे खरेंच सांगतो,मस्करी नव्हे; कारण,तुम्ही व्रत करून श्रम पावला आहां,तेव्हा तुमची मस्करी करणे योग्य नाही||१०|| अर्थः---मी आजपर्यंत खोटे भाषण कधीच केले नाही,ते हे गोप जाणत आहेत; यास्तव हे सुंदरकटी हो,तुम्ही एकेकजणींनी येथे येऊन किंवा सर्वजणांनी बरोबरच येऊन आपापली वस्त्रे परिधान करावी.एकेकीनेच.आले पाहिजे असा आमचा आग्रह नाही||११|| अर्थः---तेव्हा ते त्या कृष्णाचे वस्त्राहरणादिकरूप थट्ट करणे पाहून ज्यांचे प्रेमाने व्याप्त झालेल्या,व एकमेकीकडे पाहून लज्जेने हसूं लागलेल्या त्या गोपी,पाण्यांतून बाहेर निघाल्या नाहीत||१२|| ||3०-८-१९ अर्थः---तर श्रीकृष्ण असे बोलत असता थट्टेच्या योगाने ज्यांचे चित्त कृष्णाकडे जडले आहे अशा गारपाण्यामध्ये त्या गोपी,पाण्यांतून कंठापर्यंत निमग्न झालेल्या व थरथर कांपणाऱ्या त्या गोपी,वस्त्रे हरण करणाऱ्या त्या कृष्णाला म्हणाल्या की,-||१३||अर्थः---त्यामध्ये मोहित झालेल्या म्हणतात – हे कृष्णा,तूं अन्याय करूं नकोस.बहुत गोपांसहवर्तमान कुलस्त्रियांना नग्न पाहण्याची इच्छा करणे हा तुझा अन्याय आहे.तूं नंदगोपाचा पुत्र सर्वांना प्रिय व गोकुळाला स्तुत्य आहेस हे आम्ही जाणत आहो.अन्याय केलास तर त्र ते गोकुळात समजले म्हणजे तुझी अपकीर्ती होईल व आम्हांस वाईट वाटेल,यास्तव आमची वस्त्रे दे.आम्ही थंडीने फार कांकडलो आहो||१४|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या – हे श्यामसुंदरा,आम्ही दासी आहो यास्तव तूं सांगितलेले सर्व करितो. दुसऱ्या प्रौढ स्त्रिया म्हणाला हे धर्मज्ञा नग्नस्त्रीला पाहू नये हा धर्म तू जाणणारा आहेस यास्तव आमची वस्त्रे दे.न देशील त्र हे तुझे वर्तन आम्ही नंदराजाला सांगू बरे ! ||१५||अर्थः----श्रीभगवान म्हणाला –हे मंदहास्य करणाऱ्या स्त्रिया हो,तुम्ही जर माझ्या दासी असून मी सांगितलेले करीत आहा त्र कमजास्ती काहींच न बोलता येथे येऊन आपापली वस्त्रे ग्रहण करा||१६|| अर्थः----नंतर भगवदाज्ञेचे उल्लंघन करणे हे योग्य नव्हे असा निश्चय करून थंडीने बाहेरून कांपनाऱ्या व आतून क्लेश पावलेल्या त्या सर्वही कन्या,हातांनी योनीचे आच्छादन करून यमुनेच्या पाण्यांतून बाहेर निघाल्या ||१७||अर्थः-----नंतर त्यांनी प्रेमलक्षणभक्तीने प्रसन्न केल्यामुळे संतुष्ट झालेल्या तो भगवान श्रीकृष्ण,ऋतूसंपर्क न होणार्या वयांत असलेल्या त्य कन्यांना पाहून कंदबवृक्षाच्या खांद्यावर त्यांची वस्त्रे ठेऊन मंदहास्य करीत त्यांना म्हणाला की,-||१८||अर्थः------हे स्त्रियाहो,तुम्ही व्रत धारण करणाऱ्या असूनही नग्नपणे जे उदकामध्ये स्नान केलेत ते ‘उदकामध्ये अग्नी व देवता राहतात इत्यादिक अर्थाच्या श्रुति असल्यामुळे’व्रताचे वैगुण्य कारणारे देवांचे हेळणच (अपराधच)झाले आहे.यास्तव त्या पापाच्या निवृत्तीकरिता मस्तकाचेठीकाणी आपला अंजली करून खाली वांकून नमस्कार करा आणि आपापले वस्त्र घ्या||१९||अर्थः----याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितलेले भाषण ऐकून नग्नपणे केलेले स्नान,व्रताच्या नाशाविषयी कारण होते असे मानून,त्या व्रताची पूर्णता व्हावी अशी इच्छा करणाऱ्या त्या कन्यांनी त्या व्रताचा व दुसऱ्याही सर्व कर्मांचा साक्षात फलभूत अशा त्या श्रीकृष्णालाच नमस्कार केला.कारण,तोच सर्वपापांची निवृत्ती करणारा आहे||२०|| अर्थः----तेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे नमस्कार करणाऱ्या त्या कन्यांना पाहून त्याच्या नमस्काररूप कर्माने संतुष्ट झालेल्या त्या करुणामूर्ती देवकीपुत्र भगवान श्रीकृष्णाने,त्यांना वस्त्रे दिली||२१||अर्थः----हे राजा,याप्रमाणे श्रीकृष्णाने त्या कन्यांना जरी, ‘तुम्ही नग्नपणे जे स्नान केलेत इत्यादिक सांगून’अत्यंत फसविले, ‘येथे येऊनच आपापली वस्त्रे घ्या अशा आग्रहाने’त्यांच्याकडून लज्जा टाकविली, ‘मी खरे बोलतो खोटे बोलत नाही इत्यादिकेकरून’त्यांची थट्टा केली. ‘मस्तकी अंजली करून खाली नमस्कार करून आपापले वस्त्र घ्या असे सांगून खेळण्यांच्या पदार्थसारख्या खेळविल्या व त्यांची वस्त्रे हरण केली तथापि त्या कन्यांनी ह्या श्रीकृष्णाची निंदा किंवा त्याच्याकडे दोषदृष्टीने अवलोकनसूद्धा केले नाही.कारण,त्या कन्या,त्या प्रिय श्रीकृष्णाच्या समागमानेच आनंदयुक्त झाल्या होत्या||२२||अर्थः----नंतर आपापली वस्त्रे परिधान करून त्या प्रिय श्रीकृष्णाच्या समागमाने त्याला वश झालेल्या व त्याने चित्त हरण केलेल्या त्या कन्या,त्या कृष्णाचेठिकाणी लज्जेने विलास युक्त अवलोकन करीत तेथेंच स्तब्धपणे उभ्या राहिल्या||२३||अर्थः---तेव्हा पतिभावाने आपल्या चरणस्पर्शाची इच्छा धरून कात्यायनीपूजनरूप व्रत आचरण करणऱ्या त्या कन्यांचा आपल्याशी संभोगविषयक संकल्प आहे असे जाणून,तो भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण,त्या स्त्रियांप्रत म्हणाला की,---||२४|||| ३१--८--१९ अर्थः---हे पतिव्रता स्त्रियाहो,तुमचा मनोरथ माझे सेवन करण्याचा माझ्याशी क्रीडाविषयक आहे तो लज्जेने तुम्ही जरी मला सांगितला नाहीत तथापि मी जाणिला आहे,आणि त्याचा मी स्वीकारही केला आहे.तो हा मनोरथ थोडा बहुत सत्य होण्यास योग्य आहे||२५||अर्थः----कारण,जसे भाजलेले किंवा शिजविलेले यवादिक धान्य,भूतकरून पुन्हा अंकुर उत्पन्न केहोण्यास योग्य होत नाही.केवळ भक्षण करण्यासच उपयोगी पडते त्याप्रमाणे माझेठीकानी ज्यांनी आपली बुद्धी लावली आहे त्यांचा विषयभोगसंकल्प,वारंवार जन्ममरणरूप संसारांत विषयभोग संपादन करण्यास योग्य होत नाही,त्र काहीवेळ भोग भोगून शेवी तो त्यांना नुकती देव्यास योग्य होता||२६|| अर्थ:---न्हणून हे अबलाहो,तुम्ही पूर्णमनोरथ झाला,आता गोकुळांत गमन करा.हे सतीहो,ज्याअर्थी तुम्ही माझ्याबरोबर रतिक्रीडा करण्याचा संकल्प करून हे कात्यायनीपूजनरूप व्रत आचरण केले आहे ज्याअर्थी पुढे येणाऱ्या ह्या शरऋतुंतील रात्रींमध्ये तुम्ही माझ्याबरोबर रतिक्रीडा कराल||२७||अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला हे राजा,याप्रमाणे भगवंताने आज्ञा केलेल्या व वरप्राप्ती झाल्यामुळे पूर्णमनोरथ झालेल्या त्या कुमारिका,भगवंताच्या पार्श्वभागाचा त्याग करण्याचे कठीण असल्यामुळे मोठ्या कष्टाने त्याच्या चरणकमळाचे ध्यान करीत असता तेथून गोकुळामध्ये निघून गेल्या ||२८||अर्थः---इकडे गोपांनी परिवेष्टित असा तो देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण,बलरामासहवर्तमान गाई चरित चरित वृंदावनातून दूर गेला||२९|| अर्थः----नंतर प्रखर अशा उन्हाळ्यांतील उन्हामध्ये आपल्या छायांनी आपणास छात्रासारखे असलेल्या वृक्षांना पाहून तो भगवान श्रीकृष्ण,गोकुळवासी गोपांस म्हणाला की,--||३०|| अर्थः----आता ब्राम्हणाच्या स्त्रियांवर अनुग्रह करण्याकरिता यज्ञमंडपाकडे जाणारा भगवान ब्राम्हणांचा कठीणपणा मनांत आणून त्याच्या पेक्षंही हे वृक्ष श्रेष्ठ आहेत अशा आशयाने त्यांचे अभिनंदन करितो की,--स्तोककृष्णा,हे अंशो,हे श्रीदामन,हे सुबला,हे अर्जुना,हे विशाला,हे ऋभषा,हे तेजस्विन,हे देव्प्रस्थान व हे वरूथपा,||३१|| अर्थः----दुसऱ्याकरिताच केवळ वांचनाऱ्या ह्या महाभाग्यशाली वृक्षांना तुम्ही पहा,हे स्वंता,वारा,वृष्टि,ऊन व थंडी यांचे सहन करीत असून आमची सर्व निवारण करितात||३२||अर्थः---आहो सर्व प्राण्यांची उपजीविका चालण्याचे साधन असा यांचा जन्म,सत्पुरुषांच्या जन्मासारखा श्रेष्ठ आहे,पहा –ज्या वृक्षांचे याचक (त्यांच्याजवळ आलेले लोक)कधीही विमुख जात नाहीत||३३||अर्थः----हे वृक्ष,आपल्या –पत्रे,पुष्पे,फळे,छाया,मुळे,साली,काष्ठे सुगंध,डिंग,भस्म,साल व पल्लवादिक अंकुर यांच्या योगाने दुसऱ्यांचे मनोरथ,पूर्ण करितात||३४||अर्थः---या संसारामध्ये असलेल्या प्राण्यांच्या जन्माचे इतकेच साफल्य आहे की,आपल्या प्राण्यांनी धनादिकांनी,हिंतचिंतनाने निरंतर दुसऱ्याचे कल्याणच करीत असावे||३५||अर्थः---याप्रमाणे वृक्षांची प्रशंसा करीत ती भगवान श्रीकृष्ण,पल्लव,फुलांचे गुच्छ,फळे पुष्पे व पत्रे यांच्या समुदायांनी शाखा नम्र झालेल्या वृक्षांच्या मधून असलेल्या मार्गाने यमुनेच्या तीरी गेला.||३६|| ||१—९२०१९||अर्थः---हे राजा,त्या तेथे त्या सर्व गोपांनी,स्वच्छ व आरोग्यकारक असे यमुनेचे गार पाणी गाईना पाजून,नंतर ते मधुर उदक आपणही यथेच्छ प्राशन केले||३७||अर्थः---नंतर हे राजा,त्या यमुनेच्या उपवनामध्ये यथेच्छपणे गाई चारणारे परंतु क्षुधेने व्याकूळ झालेले ते गोप,कृष्णरामांजवळ येऊन असे म्हणाले की,--||३८|| ________________________________________________________________________________________________________ २३--- शारदा २---११-- भगवान श्रीकृष्ण –[११]यज्ञपत्न्यांवर कृपा _________________________________________________________________________________________________________आता तेविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने गोपांकडून अन्न्याचनेच्या मिषाने यज्ञ करणाऱ्या दीक्षितांच्या स्त्रियांवर अनुग्रह करून त्या दीक्षितांना अनुताप उत्पन्न केला अशी कथा वर्णन केलेली आहे||१||| राम राम महावीर्य कृष्ण दुष्टनिबर्हण | एषा वै बाधते क्षुन्नस्तच्छान्तिं कर्तुमर्हथः ||१|| अर्थ:--- गोप म्हणाले ---हे महापराक्रम्य रामा,राम,हे दुष्टनाशका श्रीकृष्णा,हि अतिशय क्षुधा आम्हांला पिडा करीत आहे यास्तव तिची निवृत्ती करण्यास तुम्ही समर्थ भावार्थ:---बलराम दादा आणि श्रेकृष्णाकडे गोपाळ भूक लागली म्हणून ती शमणाविषयी कांही तरी उपाय करा असी मागणी करत आहेत.त्याचप्रमाणे आपण आपली दु:खाची भूक शमवून सुखाची गरज पुर्ण होण्यासाठी भगवंतांकडे व संत—महात्म्याकडे दुख:ची भूक शमन होण्यासाठी व सुखाची गरज पूर्ण होण्यासाठी म्हणजेच अधर्माचे दु:ख जावो व धर्मांच्या भुकेचे तृप्ती होवो तसेच जिज्ञासूंनी आत्यंतिक दु:ख निवृत्त होवो व परमानंदाची प्राप्ती होवो---मोक्षाची,असी मागणी करावयास पाहिजे.कारण फक्त त्यांच्याकडेच ही मागणी पूर्ण होऊ शकते,अन्याकडे होऊ शकत नाही.भगवंतांना निष्काम धर्माप्रमाणे वागून संत—महात्म्यांची मागणी करा व संत—महात्म्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन व त्यांची सेवा करून सत्संगाद्वारे जीव—ब्रह्मऐक्याच्याज्ञानाची मागणी करा.कांही तरी देल्याशिवाय मिळत नसते,म्हणून कांही तरी देऊन मागा व मागीतल्याश्वाय मिळत नसते.जसे जमिनीत बीज टाकले तर जमीन जे टाकले,तेच टाकल्याच्या अधिक पटीने परत देते व त्यामुळे आपले दु:ख जाऊन आपल्याला सुख मिळत असते.याकरिता देऊन मागणी करावी,तेव्हाच मिळत असते,अन्यथा नाही.||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,याप्रमाणे गोपांनी क्षुधेच्या निवृत्ती करिता प्रार्थना केलेला तो देवकीपुत्र भगवान श्रीकृष्ण,आपल्या भक्त अशा ब्राम्हणाच्या स्त्रीवर प्रसन्न होत असता असे म्हणाले की,-||२|| भावार्थ:--- गोपाळांनी जेव्हा देवकी नंदन भगवंतांना अशी पार्थांना केली,तेव्या त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मणपत्नीवर कृपा करण्यासाठी म्हटले.भगवंतांची कृपा होण्यासाठी अन्नदान,तीर्थयात्रा,नामस्मरण,दानधर्म,परोपकार अशा प्रकारची निष्काम भक्ती करावी लागते.त्यामुळे भगवंतांनी त्यांना दानधर्म घडण्यासाठी,निष्काम भक्ती घडण्यासाठी,ब्राह्मणपत्नीणांना अन्नदान घडावे म्हणून गोपाळांना त्यांच्याकडे पाठवले.भक्तांची एवढी काळजी भगवंत घेत असतात,म्हणून नेहमी अन्नदान करावे.||२|| अर्थः---हे गोपहो,येथून जवळच वेदार्थाचा उपदेश करणारे ब्राम्हण,स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने अंगिरसनामक सत्राचे अनुष्ठान करीत आहेत त्य यज्ञमंडपामध्येधटे तुम्ही जा||३||भावार्थ:--- ब्राह्मण मंडळी स्वर्गाच्या इच्छेने पुण्य होण्यासाठी आंगिरस यज्ञ करीत आहेत.सकाम कर्म करत आहेत,कारण सकाम कर्माने पुण्य होत असते.पुण्यामुळे स्वर्गातील विषयांचे भोग मिळत असतात.मृत्यू लोकांत असतांना धन मिळवून विषयांचा भोग घेतला व पुण्य संपादून स्वर्गात विषयांचाच भोग घेतला.या दोन्ही कृतीत—धन व पुण्य,साधनात फरक आहे.दोन्हीचे साध्य एकच आहे.म्हणून धनाने विषयांचा भोग घ्यावा,व त्याचबरोबर दानधर्म व परोपकारही करावा.पुण्य करावे,पुण्याच्या मोबदल्यात स्वर्गात जाऊन विषयांचा भोग घेण्यापेक्षा निष्काम कर्म करून अंत:करण शुद्ध केलेले चांगले असते.त्यामुळे वागणुकीत फरक होतो.||२|| | तत्र गत्वौदनं गोपा याचतास्मद्वीसर्जीताः | कीर्तयन्तो भगवत आर्यस्य मम चाभिधाम् ||४|| अर्थः---आणि तेथे जाऊन त्यांना,भगवान बलरामाचे व माझे नावं सांगून,आम्ही पाठविलेल्या तुम्ही आमच्या करिता त्यांच्याजवळ अन्न मागावे म्हणजे तुमची क्षुधेची निवृत्ती होईल||४|| भावार्थ:--- भगवंत म्हणतात,”गोपाळांनो!येथून जवळच असलेल्या यज्ञशाळेत जाऊन थोरले भाऊ बलराम दादा व माझे[श्रीकृष्ण] नांव सांगून अन्न मागून आणा.आपल्याला आपली गरज भागवण्यासाठी दुसऱ्यांची सत्ता वापरून आपली गरज भागवता येते.त्यासाठी आपणास धर्माप्रमाणे वागवावे लागते.धर्मानुसार वागले असता किंवा सत्तावांनाबरोबर प्रेमाने वागावे लागते.||४|| अर्थः—याप्रमाणे भगवंताने आज्ञा केलेले ते गोप तेथे जाऊन त्या ब्राम्हणांना हात जोडून प्रथम भूमीवर दंडासारखे पडेल आणि नंतर भगवंताने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याजवळ अन्नाची याचना केली ||५|| भावार्थ:--- गोपाळांनी यज्ञपत्नीजवळ गेल्यानंतर प्रथम त्यांना सांष्टांग दंडवत घातला.श्रेष्ठांची आणि आपली भेट झाल्यानंतर आपण लीनता दाखवून वागावे लागते.लीनता हा सदगुण आहे.यामुळे आपली जी गरज आहे,ती गरज भागून सुखी होतोत.||५|| | हे भूमिदेवाः श्रृणूत कृष्णस्यादेशकारिणः | प्राप्तान्जानीत भद्रं वो गोपान् नो रामचोदितान् ||६|| अर्थः---त्यांत प्रथम त्याचे महत्त्व व आपले दैत्य सुचवीत म्हणाले की,--हे ब्राम्हणहो,तुमचे कल्याण असो.आम्ही विनंती करितो इकडे लक्ष द्या.श्रीकृष्णा सांगितलेली आज्ञा करणारे व बलरामाने तुमच्याकडे पाठविलेले आम्ही गोप आहो,असे तुम्ही ||६|| अर्थः-येथून जवळच गाई चरित आलेले राम कृष्ण फार क्षुधाक्रांत झाले आहेत ते यावेळी तुमच्याकडून अन्न मिळावे अशी इच्छाकरित आहेत यास्तव धर्मवेत्त्यांमध्ये शश्रेष्ठ अशा ब्राम्हण हो,जर तुमच्याजवळ अन्न व ते देव्याची तुम्हाला श्रद्धा असेल त्र अन्नार्थी अशा त्या रामकृष्णांना अन्न द्या||७||अर्थः---आता आम्हा दीक्षित असल्यामुळे आमच्या जवळचे अन्न भक्षण करणारा दोषी होतो असे म्हणाला तर –हे पशुयागदीक्षेमध्ये अग्नीच्या व सोमाच्या उद्देशाने पशूचे आलंभन (हिंसा)होण्याच्या पूर्वी त्या दीक्षितांचे अन्न भक्षण करणारा व सौत्रामणी इष्टीमध्ये अन्न भक्षण करणारा पुरुषमात्र दोषी होतो,त्यांखारीज दुसऱ्यावेळी दिक्षिताचेही अन्न भक्षण करणारा पुरुष दोषी होत नाही,असे शास्त्रप्रसिद्ध आहे||८|| भावार्थ:---बलराम आणि श्रीकृष्ण येथून कांही अंतरावर जवळच आहेत.आम्ही सर्वजन गाई चारत आहोत.त्यामुळे आम्हाला भूक लागली आहे.आपण धर्म जाणणारे असून परोपकार करणारे आहात.म्हणून आम्हास अन्नदान देण्याची कृपा करावी.||७|| | दिक्षाया: पशुसंस्थायाः सौत्रामण्याश्च सत्तमाः | अन्यत्र दिक्षितस्यापि नान्नमश्रन् हि दुष्यति ||८|| अर्थः—याप्रमाणे गोपांच्या मुखाने भगवंताने केलेली याचना श्रवण करणाऱ्याही त्या ब्राम्हणांनी ती श्रवण केलीच नाही,म्हणजे तिजकडे चित्त दिलेच नाही.कारण,ते ब्राम्हण,स्वर्गादिकांविषयी आशामात्र धारण करणारे,बहुत क्लेशांनी होणाऱ्या कर्माचेठिकाणी श्रद्धा धारण करणारे,अज्ञानी व आम्ही ज्ञानवृद्धा आहो असा व्यर्थ अभिमान धारण करणारे होते||९|| भावार्थ:--- ज्या यज्ञात पशुबळी दिल्या जातो आणि सौत्रामणी यज्ञात यजमानाचे अन्न खाऊ नये,कारण पशुबळी दिल्याने जीवाची हत्या होते.जीवाची हत्या केल्याने पाप लागते.त्या पापाचे फळ पापी जो आहे भोगावे लागते,म्हणून पापी मनुष्याचे अन्न खाल्ल्याने आपणास पाप लागून तेही आपणास दु:ख भोगावे लागते.सौत्रामणी यज्ञ यातहि कांही अंसी अधर्म होतो,म्हणून अधर्म करणारा जो कर्ता आहे,त्याचेही अन्न खाऊ नये.त्याचेही पाप आपल्याला लागून पाप भोगावे लागते,म्हणून अन्न खाऊ नये.||८|| | इति ते भगवद्दाच्ञा श्रृण्वन्तोsपि न शुश्रुवः | क्षुद्राशा भूरिकर्माणो बालीशा वृद्धमानिनः ||९|| अर्थः---आता कर्मांच्या उल्लंघन करून देवतांच्या उद्देशाने केलेले अन्न भलत्याच वेळी दुसऱ्याला कर्म द्यावे?असे कोणी म्हणले तर सांगतो –देश,काल,चरुपुरोदशादिक,निरनिराळी द्रव्ये,मंत्र,तंत्र (प्रयोग,ऋत्विज,अग्नी,देवता,यजमान,यज्ञ व फल उत्पन्न करणारा धर्म हे सर्वही ज्याचे स्वरूप आहेत||१०|| ||२—९---२०१९||भावार्थ:---सकाम करणारे तुच्छ आहेत तर निष्काम कर्म करणारे योग्य आहेत.सकाम करणारे ज्ञानी जरी असले तरी ते अज्ञानीच आहेत,कारण अजून त्यांना भगवंतांची भक्ति कसी करावी,हे त्यांना कळाले नाही.म्हणून ते स्वत:ला ज्ञानी समजत होते.||९|| अर्थः--- त्या साक्षात परब्रम्ह अधोक्षज भगवान श्रीकृष्णाचा,मनुष्यदेहावर,आम्ही ब्राम्हण थोर आहो असा अभिमान धारण करणाऱ्या त्या दुर्बुद्धी दीक्षितांनी,हा मनुष्य आहे आशा दृष्टिने आदर केला नाही||११|| भावार्थ:--- देश,काल,अनेक द्रव्य,मंत्र,तंत्र,ऋत्विज,अग्नी,देवता,यजमान,यज्ञ आणि धर्म हे सर्व रूपे भगवंतांची आहेत.हि त्यांनीच सर्व निर्माण केलेली असल्यामुळे त्यांचीच आहेत.आपल्याला आपणांकडून किंचित मोबदला न घेता आपल्याला धर्मांप्रमाणे वापरण्याकरिता दिलेली आहेत.आपण धर्मान्नुसार वापर करून,आपले हेतू साध्य झाल्यानंतर त्यांची त्यानंच परत करावयाची आहेत.आपला हेतू साध्य झाल्यानंतर त्यांची त्यांना परत करावयाची आहेत.व्यवहारात जीवन जगात असतांना आपले साध्य झाल्यानंतर ती वस्तू परत आपण विनामोबदला—मोबदला न घेता परत घेऊन का ? अगोदरच परतीच्या वेळेस किती मोबदला द्यावयाचा आहे,असे निश्चित करूत ?असा विचार करून जीवन जगावे.वस्तू दिलेल्या उपकाराची जान ठेऊन वागावे.||१०|| | तं ब्रम्ह परमं साक्षाद् भगवन्तमधोक्षजम् | मनुष्यदृष्ट्या दुष्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे ||११|| अर्थः---हे राजा जेव्हा ते ब्राम्हण अन्न देतो असे किंवा देत नाही असेहि म्हणाले नाही,तेव्हा अन्न लाभाविषयी निराश झालेल्या त्या गोपांनी रामकृष्णा जवळ येऊन त्यांना झालेले वर्तमान सांगितले ||१२|| भावार्थ:--- तेच इंद्रियातीत साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते.परंतु स्थूल—शरीराला आत्मा मानणाऱ्या त्या मूर्खांना भगवंत साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही.वास्तविक स्थूल—शरीराला आत्मा मानणाऱ्या त्या मूर्खांना भगवंत साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही.अज्ञान अवस्था असल्यामुळे भगवंत समोर असून कळत नाही.जसे समोर दोरी असून,दोरी,दोरीरुपाणे न कळाल्यामुळे साप नसून साप वाटला.त्याचप्रमाणे भगवंत समोर असून अज्ञान असल्यामुळे भगवंत न वाटता सामान्य मनुष्य वाटतो.असे जे अज्ञानी असतात ते शरीराला आत्मा समजतात.म्हणून आपले अज्ञान संत—महात्मा यांची संगती करून,त्यांची सेवा करून,यांच्यावर श्रद्धा ठेऊन श्रवण करावे.म्हणजे आपणास वास्तविक आत्म्यास आत्मा मानून शरीरात आत्मा असतो असे कळेल. असे कळल्यानंतर भगवंतास भगवंत म्हणतील.त्यांना आध्यात्मिक ज्ञान होऊन त्यांचे जन्म—मरण निवृत्त होतील.||११|| अर्थः---ते गोपांनी सांगितलेले ब्राम्हणाचे वर्तन ऐकून,तो जगदीश्वर भगवान,हास्य करून त्या गोपांनी म्हणालाकी,--कार्यार्थी पुरुषांनी कंटाळू नये,कोणत्या बरे याचकाचा अपमान होत नाही?भक्ती हीन असणारे पंडितही मोह पावतात अशी लोकाची स्थिती आहे||१३||अर्थः---गोपहो,आता तुम्ही मी येथे येऊन बलरामासहित क्षुधित आहे हे वर्तमान त्या ब्राम्हणाच्या पत्नींना जाऊन कळवा.त्या तुम्हाला पाहिजे तितके अन्न देतील.कारण,त्या देहाने मात्र तेथे (यज्ञशाळेत )राहतात परंतु बुद्धीने माझ्याजवळ राहून माझ्यावर अतिशय स्नेह करणाऱ्या आहेत||१४|| भावार्थ:--- गोपाळांना ते ब्राह्मणांना होय किंवा नाही असे कोणतेच उत्तर दिले नाही.त्या ब्राह्मणांचे देहसंबंधी नातेवाईक किंवा कोणी असते तर त्यांना भोजणास आग्रह करून बसवले असते व जेवण देऊन त्यांचा घराच्या मुला—मुलींना व त्यांचा पत्नीला शिदोरी बरोबर दिली असती.भगवंत किंवा संत—साधू—महात्मा असता तर असे केले नसते.यास वागण्यास कारण देहसंबंधीचे महत्व कळते,कारण त्याच्या हिताचे महत्व कळालेले असते.देवाचे किंवा संत—महात्मा यांचे महत्व कळलेले नसते,कारण त्यांचा हिताचे महात्व्कालालेले नसते.म्हणून असे होते.याकरिता वस्तू व वस्तूचे महत्व अलून घ्या.असे कळण्याकरिता सत—महात्मा यांची संगती करून महत्व कळून घेण्याचा प्रयत्न करा.प्रयत्न केला असता महत्व कळेल.महत्व कळाले म्हणजे आपले योग्य होईल.||१२|| अर्थः---नंतर त्या गोपांनी यज्ञमंडपांत जाऊन तेथे पत्नीशाळेमध्ये बसलेल्या व अलंकार धारण केलेल्या ऋषीपत्नीना पाहून नमस्कार करून लीनपणे असे भाषण केले की,--||१५|| अर्थः---हे विप्रपत्नीहो,तुम्हांला आम्ही (गोप)नमस्कार करितो.तुम्ही आमची भाषणे ऐकून घ्यावी.येथून जवळच फिरत येणाऱ्या श्रीकृष्णाने आम्हांला येथे (तुमच्या समोर)पाठविले आहे||१६||अर्थः---कशाकरिता म्हणाल तर –गोप व बलराम यांसहवर्तमान तो कृष्ण,गाई चरित चरित घराहून फार दुरप्रदेशी येथे आला आहे,त्याला क्षुधा लागली आहे,यास्तव त्याच्या बरोबर असणाऱ्या आम्हा गोपांसह क्षुधित असलेल्या त्याला तुम्ही अन्न द्यावे||१७|| भावार्थ:--- भगवंत म्हणतात,कि तुम्ही त्यांच्या पत्नीकडे जा आणि त्यांना प्रणाम नाम्रतेने करा,म्हणजे अंहकाररहित,कमीपणा घेऊन,अन्नाची गरज म्हणून अशा अविर्भावात आपले म्हणणे सांगा.||१५|| अर्थः---तेव्हा,श्रीकृष्ण जवळ आला आहे असे ऐकून,त्याला लवकर अन्ने वाढून नेण्याच्या कामी त्या अगदी गडबडून गेल्या.कारण,त्या श्रीकृष्णाच्या कथांनी आकर्षितचित्त असून नित्य त्याच्या दर्शनाविषयी उत्कंठीत होत्या||१८|| भावार्थ:--- आम्ही आपणास नमस्कार करत आहोत.आपण फार महत्वाचे सात्विक कार्य करत आहात.आपल्यासारखे कार्य आमच्याकडून होत नाही.आपले कार्य समोरच्याकडून करून घ्यावावयाचे असेल तर,त्यांची स्तुती करा,त्यामुळें आपले कार्य होण्याची शक्यता असते.येथून जवळच—कांही थोड्याशा अंतरावर भगवान बालकृष्ण आहेत.आम्ही त्यांचे संवगडी आहोत.त्यांनीच आम्हास आपणाकडे पाठवलेले आहे.ते तुमच्या परीचीत---आत्मियतीचे—जिव्हाळ्याचे---त्यांच्याइतके तुम्हास तुमचे पतीही प्रिय नाहीत.||१६|| अर्थः---व फार कालापासून,यशश्रवणाने,उत्तमकीर्ती भगवंताचेठिकाणी चित्त स्थापन केलेल्या त्या सर्व स्त्रिया,फोडण्यावगैरे घातल्यामुळे रस,सुगंध इत्यादिक बहुत गुणांनी युक्त झालेले –भक्ष्य,भोज्य,लेह्य व चोष्य असे चार प्रकारचे अन्न निरनिराळ्या पात्रांनी ग्रहण करून प्रती,श्राते,बंधू व पुत्र यांनी निवारण केले असतंही त्यांना व जुमानीत,जशा समुद्राकडे नद्या जातात त्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे जावयास निघाल्या||१९||२०|| भावार्थ:--- भगवान बाळकृष्ण,बलरामदादा आणि आम्ही गोपाल यांच्यासहित गाई चारत—चारत इकडे पुष्कळ लांब आलो आहोत.भगवान बाळकृष्ण,बलरामदादा आणि गोपाल या सर्वांना फारच भूक लागलेली आहे.त्यासाठी आपण आम्हास स्वयंपाक केलेले अन्न देण्याची कृपा करावी.आपण उदार आणि श्रद्धाळू आहात,म्हणून आपण निश्चित देताल यात मुळीच शंका नाही.||१७|| | श्रुत्वाच्युतमुपायातं नित्यं तद्दर्शनोत्सुका: | तत्कथाक्षिप्तमनसो बभूवुर्जातसम्भ्रमाः ||१८|| अर्थः---त्या स्त्रियांनी अशोकवृक्षायांच्या नूतन पल्ल्वांनी सुशोभित अशा यमुनेच्या उपवनामध्ये गोपांनी बरोबर घेऊन बलरामासहवर्तमान संचार करणाऱ्या श्रीकृष्णाला अवलोकन केले||२१|| भावार्थ:--- श्रीमद्भागवतातील भगवंतांच्या लीला श्रवण केल्या म्हणजे,आपले मन भगवंताकडे जाते---आकर्षित होते.म्हणून भगवंतांच्या कथा भागवत ग्रंथातून श्रवण नेहमी कराव्यात.भगवंतांचे दर्शन घ्यावे ही भावना दृढ होउन,त्यासाठी आपण अधिक प्रयत्न केल्या जातो.यासाठी संत—महात्मा यांच्या मुखातून श्रीमद्भागवत कथा पुन्हा पुन्हा ऐकावी.भगवंतांचे नाव ऐकताच त्या भगवंतांच्या भेटीसाठी उतावीळ म्हणजे केव्हा भेट होईल,लवकर भेट व्हावी अशी त्यांची तीव्र उतकंठा झाली आहे.त्याचप्रकारे आपलीही भगवनंतांची भेट होण्याची उत्कंठा व्हावावयास पाहिजे.देहासंबंधीच्या भेटीपेक्षा भगवंतांविषयी अधिक उत्कंठा व्हावी.||१८|| | निषिध्यमानाः पतिभिर्भ्रातृभिर्बन्दुभिः सुतैः | भगवत्यूत्तमश्लोके दीर्घश्रुतधृताश्रयाः ||२०|| अर्थः---तो श्रीकृष्ण –मेघासारखा श्यामवर्ण,पितांबरधारी,कंठामध्ये घातलेल्या पुष्पांच्या माळा,मस्तकावर धारण केलेले मोरांची पिसे,अंगाला लावलेली काव आणि कानांवर खोवलेले कोवळे पल्लव यांच्या योगाने नटासारखा वेष धारण करणारा,मित्राच्या खांद्यावर हात ठेवलेला,दुसऱ्या हाताने कमळ नाचविणारा,कानांमध्ये कमळांच्या कुडक्या घातलेला,गालांवर कुरळकेश आलेला व मंदहास्याने युक्त मुखकमळ असलेला होता||२२|| भावार्थ:--- त्यांनी भक्ष्य म्हणजे,भोज्य म्हणजे,लेह्य म्हणजे आणि चोष्य म्हणजे असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यात भरून घेतले.विशेषत: त्यांचे बंधू,बांधव,पती,पुत्र असे देहसंबंधी जे होते,ते—ते नेऊ नका—जाऊ नका असे म्हणून प्रतिकूलता दाखवत होते,परंतु त्यांच्याशी विरोघ करून,त्यांची नाराजी पत्करून त्या भगवंतांकडे जाण्यासाठी निघाल्या.बऱ्याच दिवसापासून त्यांचे मन भगवंतांत गुंतले होते,आसक्त झाले होते.त्याचप्रमाणे आपणसुद्धा देहसंबंधीची प्रतिकूलता असूनसुद्धा,त्यांचा विरोध पत्करून भगवंतांच्या कथा,संत—महात्मा यांच्या कथा,वेदांत श्रवण करावयास जावावयास पाहिजे.संसाराकडे दुर्लक्ष करून परमार्थ करावयास पाहिजे,कारण त्यात आपले पारमार्थिक हित असते.निष्काम कर्म ,उपासना व ज्ञान प्राप्त करावयास पाहिजे.||१९—२०|| ||३---९---२०१९|| अर्थः---हे राजा, ज्या स्त्रिया,पूर्वी बहुतवेळा ऐकीलेले जे प्रियतम श्रीकृष्णाचे उत्कर्ष त्याच जणू कानाला कृतार्थ करणाऱ्या करूभूषानांनी,कृष्णाचेठिकाणी निमग्नचित्त झाल्या होत्या,त्यांनी आता त्याच श्रीकृष्णाचा नेत्रद्वार अंतःकरणामध्ये प्रवेश करवून त्याच्याशी फारवेळपर्यंत आलिंगन कयन,जसा अहंकाराच्या वृत्तींनी सुषुप्तीच्या साक्षी प्रज्ञाला आलिंगन करून (त्याचेठीकाणी लय पावोन)तापाचा त्याग करितात त्याप्रमाणे संसारसंबंधी तापाचा त्याग केला||२३|| अर्थः---आसो.त्यावेळी घरे पतीवगैरे सर्वांच्या अशा सोडून देऊन केवळ आपल्या दर्शनाच्या इच्छेने तशारीतीने प्राप्त झालेल्या त्या स्त्रियांना,सर्वबुद्धीसाक्षी त्या भगवंताने जाणून हास्ययुक्त मखाने भाषण केले की--||२४|| अर्थः---हे महाभाग्यवतीहो,तुमचे आगमन झाले ही फार चांगली गोष्ट झाली.बसावे,तुमचे कार्य आम्ही कोणते करावे?कारण,तुम्हांला येण्याचा प्रतिबंध झाला असताही त्याचा तिरस्कार करून तुम्ही आम्हांला पाहण्याच्या इच्छेने प्राप्त झाला,हे तुम्हांला योग्य आहे||२५|| भावार्थ:---सुषुप्तीत मन शांत होते,सुखाला प्राप्त होते,तसे भगवंत हा डोळ्यांचा विषय झाल्यावर शांत होते.भगवंत डोळ्यांचा विषय होण्यासाठी तसा प्रयत्न करावा लगतो,त्यासाठी अंत:रंगातील भक्ति करावी लागते,म्हणजे इतर जीवांचे दु:ख कमी करून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा लागतो.असी भक्ति केली म्हणजे भगवंतांचे दर्शन होऊन आपण स्थिर—शांत होतोत.||२३|| | तास्तथा त्यक्तसर्वाशा: प्राप्ता आत्मदिदृक्षया | विज्ञायाखिलदृग्दृष्टा प्राह प्रहसिताननः ||२४|| अर्थः---खरोखर असे आहे की,आपला पुरुषार्थ पाहणारे विवेकी पुरुष,आत्मा व सर्वांहून प्रिय अशा माझेठीकाणी स्वतांच फलेच्छारति अखंडभक्ती उत्तमप्रकार करीत असतात||२६|| भावार्थ:---ब्राह्मणपत्न्या सर्व विषयांची म्हणजे संसारातील नाशिवंत विषयांची अशा सोडून फक्त निष्काम भावनेने दर्शनासाठी आल्या आहेत,असा भाव पाहून भगवंतांना आनंद झाला,कारण त्यांना फक्त निष्काम भक्त प्रिय असतात.||२७|| | स्वागतं वो महाभागा आस्यतां करवाम कीम् | यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नमिदं हि वः ||२५|| अर्थः---मी सर्वांहून प्रिय कसा असे म्हनाला तर---ज्या माझ्या संपर्कानेच प्राण,बुद्धी,मन,शरीर,स्वजन,स्त्री,अपत्य,धन इत्यादिक प्रिय झाले आहेत त्या मजहून दुसरा कोण बरे प्रिय आहे ?कोणीच नाही||२७|| भावार्थ:--- ब्राह्मणपत्न्या निष्काम भावनेने आलेल्या आहेत,हे पाहून भगवंतांना आनंद झाला,कारण भगवंतांना निष्काम भक्त प्रिय असतात,तर सकाम भक्त प्रिय नसतात.म्हणून आपणही भगवंतांचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा.प्रिय भक्त होण्यासाठी संसारातील विषयांची मागणी करावयाची नसते,तर फक्त भगवंतच प्राप्त व्हावा,अन्य कांहीच नको.यामुळे जीव सुखरूप होतो.||२५|| | नन्वद्धा मयि कुर्वन्ति कुशलाः स्वार्थदर्शनाः | अहैतुक्यव्यवहितां भक्तिमात्मप्रीये यथा ||२६|| अर्थः--- यास्तव माझ्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या तुम्ही आतां परत यज्ञमंडळपामध्ये गमन करावे.कारण,तुमचे पती,गृहस्थाश्रमि ब्राम्हण आहेत ते तुम्ही तेथे गेला म्हणजे तुमच्या सहवर्तमान आपले सत्र संपवितील,म्हणून पतींवर अनुग्रह करण्याकरिता माघाऱ्या चला||२८|| संकोचितपणासुद्धा नसतो,तर “फक्त मीच” पाहिजी असतो—“माझेच प्रेम” पाहिजे असते.||२६|| अर्थः---असे सांगितलेल्या त्या यज्ञपत्नी म्हणाल्या की,--विभो,अशाप्रकारचे कठोर भाषण तू बोलण्याविषयी योग्य नाहीस.तर तू आपले प्रतिज्ञारूप ‘माझा भक्त नाश पावत नाही’ ‘त्याला पुरावृत्ती होत नाही’असे वाक्य आहे ते सत्य कर.आम्हीतर पतिपुत्रादिक सर्वबंधुंचा तिरस्कार करून,तू आपल्या पायाने अवज्ञेनेही दिलेल्या तुळशीच्या माळेला बहुमानपूर्वक मस्तकी धारण करण्याकरिता (तुझ्या दासी होण्याकरिता )तुझ्या चरणाजवळ प्राप्त झालो आहो;म्हणून आता आम्हाला परत जाणे योग्य नाही||२९|| भावार्थ:--- इतर जे प्रिय आहेत,ते त्यांना माझ्यामुळेच प्रिय वाटतात.त्यांचे माझावरच प्रेम असते,तर इतरांवर प्रेम नसते.||२७|| अर्थः----आणि आता घरांतून न ऐकता निघून गेलेल्या आम्हांला आमचे पती,आईबाप,किंवा पुत्र,हेसुद्धा घरांत घेणारा नाहीत मग श्राते,ज्ञाति,मित्र इत्यादिक जन आम्हांला घरांत घेणार नाहीत हे काय सांगावे.तस्मात हे कामलोभादिनाशक,तुझ्या पायांच्या अग्रभागी देह पडलेल्या आम्हांला आता तुम्हाहून दुसरी स्वर्गादिकहि गति न होवो.असे तू आपले दास्यचं आम्हांस सांग म्हणजे झाले||३०|| अर्थः----याप्रमाणे प्रार्थना केलेला श्रीभगवान पुन्हा म्हणाला की.—हे स्त्रियाहो,मी भाक्तत्वाने स्वीकारून घरी जाण्यास आज्ञा केलेल्या तुमची तुमचे पति,आईबाप,भाऊ,पुत्रइत्यादिक तसेच दुसरे जे सर्व लोक आहेत ते कोणीही निंदा करणार नाहीत.असे सांगून प्रत्यक्ष देवांना दाखवून म्हणाला की.—हे देवसुद्धा तुम्हांला घरी जाण्यास अनुमोदन देत देत आहेत||३१|| भावार्थ:--- आम्हाला आता देहासंबंधीकडे पाठवू नका,कारण त्यांच्याकडे दु:ख आहे,आम्हास तर सुख पाहिजे,व ते सुख तुमच्याकडून आता मिळाले आहे.आपल्या चरणावरून स्पर्शित झालेली माला आमच्या केसामद्ध्ये धारण करावी,कारण त्यामुळे पुन्हा पुन्हा---सतत सतत---अखंडित आपलेच स्मरण राहो.कारण त्यामुळे अखंडित सुख आम्हास प्राप्त होवो.ही आमची भावना आहे.||२९|| अर्थः---आता तुझा त्याग करण्यास आम्ही सार्थक नाही,असे म्हणाल तर—हे यज्ञपत्नीहो,ज्याअर्थी या संसारामध्ये माझ्याशी जो आलिंगनादिक व्यवहार असणे तो मनुष्यांच्या सुखाकरिता व उत्तरोत्तर स्नेहवृद्धिकरिता होत नाही,त्याअर्थी माझेठीकाणी मनाचे स्थापन करणाऱ्या तुम्ही लवकर माझ्या स्वरूपाप्रत पावाल||३२|| भावार्थ:--- आम्हाला सुखासाठी अन्याकडे जावे लागणार नाही,असी आमची अवस्था झाली आहे.जर तुमचा व आमचा वियोग झाला तर सुख मिळणार नाही.सुखाची तर गरज जीवांना आहेच.तुमच्याशिवाय अन्याकडे सुख नाहीच,हा आमचा दृढ अनुभव आहे.म्हणून आम्हास देहसंबंधीकडे परत पाठवू नका.ओकारी पुन्हा खाण्यास सांगू नका,कारण देहसंबंधी ओकारीसारखे आहेत व तुम्ही अन्नासारखे आहात म्हणजेच देहसंबंधी दु:खरूप असून आपणच सुखरूप आहात.म्हणून देहसंबंधीकडे परत पाठवू नका.||३०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला—हे राजा,याप्रमाणे भगवंताने सांगितलेल्या त्या यज्ञपत्नी,पुन्हा यज्ञमंडपामध्ये निघून गेल्या,व त्या ऋषींनाही स्त्रियांवर दोषरोप व ठेवता आपापल्या सहाय्याने सत्राची समाप्ति केली||३३|| भावार्थ:--- भगवंत म्हणतात कि,”जे माझ्याशी युक्त म्हणजे एकरूप झालेले आहेत,ज्यांनी संसारातील विषयांचा त्याग केलेला आहे,जे मला अत्यंत प्रिय आहेत,त्यांचा कोणीच तिरस्कार करत नाही.त्यांना शत्रूच कोणी राहत नाही.ते सर्वांना प्रिय असतात.||३१|| | न प्रीतयेsनुरागाय ह्यसंगसंगो नृणामिह | तन्मनो मयि युन्जाना अचिरान्मामवाप्स्यथ ||३२|| अर्थः---त्या यज्ञमंडपामध्ये पूर्वी स्त्रिया अन्न घेऊन निघत्येवेळी एक स्त्री पतीने धरून कोंडून ठेविले होती,तिने पूर्वी भगवंतांचे जसे श्रवण केले त्याप्रमाणे मनांत आणिलेल्या त्या भगवंताबरोबर मनाने आलिंगन करून,कर्मसंबंधाने वागत असलेल्या देहाचा त्याग केला म्हणजे तो,आपला देह पतीजवळच ठेऊन आपण चैतन्याने भगवत्स्वरूपास जाऊन पोंचली (मुक्त झाली)||३४||भावार्थ:--- त्या भगवंतांच्या आज्ञाधारक होत्या,तसे आपनसुद्धा भगवंतांचे आज्ञाधारक व्हावयास पाहिजे.कदाचित आपणास शंका येऊ शकते कि,त्या यज्ञपत्न्यांना श्रीकृष्ण प्रत्यक्ष भेटले,बोलले,जेवण केले,तसे आमच्याबरोबर कांहीच व्यवहार झालेला नाही.आपण व्यवहारात असेही पाहतो कि,एखाद्ध्याचे पत्राद्वारे निरोप आला म्हणजे,त्यांचे म्हणणे खरे धरून त्याप्रमाणे वागतोत—कृती करतोत.तसे श्रीकृष्णांचा पत्राद्वारे---शात्राद्वारा निरोप संत—महात्मा घेऊन आलेले आहेत व रात्रंदीवस आम्हास वेदांताचे पाठ,प्रवचन,श्रीमद्भागवत व कीर्तन या पत्राद्वारे म्हणजेच शात्राद्वारे सांगत आहेत.तसे आपणास वागावे म्हणून सांगत आहेत,हे निश्चीतारुपणे आहे,यात कांही शंका करू नका.विनाविलंब ते कार्य हाती घेऊन आपले परमकल्याण करून आवश्य घ्यावे.||३३|| ||४—९—२०१९|| | तत्रैका विधृता भर्त्रा भगवन्तं यथाश्रुतुम् | हृदोपगुह्य विजहौ देहं कर्मानुबन्धनम् ||३४|| अर्थः---इकडे भगवान प्रभू श्रीकृष्णानेही,स्त्रियांनी आणून दिलेल्या त्या चातीर्विध अन्नाने गोपांना भोजन घालून आपणही भोजन केले||३५|| भावार्थ:--- जी ब्राह्मणाची पत्नी,त्याने त्या पत्नीस श्रीकृष्णाकडे जाण्यास प्रतिबंध केला होता,तिचे मन श्रीकृष्णात गुंतलेले असल्यामुळे ती श्रीकृष्णात एकरूप झाली होती.एकरूप होऊन तिने आपले स्थूल शरीर नंतर सोडले.कोणताही व कितीही प्रतिबंध आला तरी परमार्थ करता येतो,हे महत्वाचे आहे.संसारासाठी एखादी वस्तू कमी असेल तर तो पदार्थ होऊ शकत नाही.||३४|| अर्थः---याप्रमाणे लीलेकारिता मनुष्यशरीराचा स्वीकार करणारा तो श्रीकृष्ण,मनुष्यलोकांचे अनुकरण करीत असता आपल्या स्वरूपसौदर्याने,व वाङ्माधुर्याने नानाप्रकारच्या चरित्रांनी गाई,गोप आणि गोपी यांना रमविण्याकरिता स्वताही रमू लागला||३६|| भावार्थ:--- भक्ष्य,भोज्य,लेहा आणि चोष्य अशा चार प्रकारचे अन्नाचे गोपाळांना भोजन दिले आणि त्यानंतर स्वत: भगवंत जेवले.त्याचप्रमाणे आपण कुटुंबप्रमुख असल्यानंतर अगोदर सर्वांच्या जेवणाची सोय करून नंतर कुटुंबप्रमुखांनी जेवण करावयास पाहिजे.असे त्याचे कर्तव्य ठरते.अगोदर कुटुंबप्रमुखांनी जेवणे व त्यानंतर इतरांनी जेवण करणे अधर्म आहे.||३५|| अर्थः---तिकडे यज्ञमंडपातील ते ब्राम्हण.ज्याअर्थी मनुष्यांचे अनुकरण करणाऱ्या विश्वेश्वर रामकृष्णाच्या याचनेचा आम्ही भंग केला आहे,त्याअर्थी आम्ही अपराधी आहो असे मनांत आणून पश्चात्ताप पावले||३७|| | अथानुस्मृत्य विप्रास्ते अन्वतप्यन् कृतागसः | यद् विश्वेश्वरर्याच्नामहन्म नृवीडम्बयोः ||३७|| अर्थः---त्यांनी स्त्रियांची कृष्णाचेठिकाणी अतिउत्कट भक्ति पाहून आणि आपण त्या भक्तीने रहित आहो असे जाणून पश्चात्ताप पावले आणि आपलीच निंदा करून घेऊ लागले की,--||३८|| भावार्थ:--- ब्राह्मण यांना नंतर पश्चाताप झाला,तसा आपणास आपली होऊन गेलेली चूक कळाली तर पश्चाताप होणे जरुरी असते,कारण पश्चाताप झाल्यानंतर चूक सुधारता येत असते.पश्चाताप न झाला तर चूक ही चूकच राहत असते.||३७|| अर्थः---ते आम्ही अधोक्षज भगवान श्रीकृष्णाचेठिकाणी विमुख आहो त्या आमच्या शौक्ल (उत्पात्तीने झालेल्या)सावित्र (गायत्रीच्या उपदेशाने झालेल्या)व दैक्ष यज्ञ दीक्षा ग्रहण केल्याने झालेल्या)अशा तीनप्रकारच्या जन्माला व वेदविद्देला धिक्कार असो.तसाच ब्रम्हचार्यव्रताला धिक्कार असो.बहुज्ञतेला धिक्कार असो.कुळाला धिक्कार असो व यज्ञकर्मातील आमच्या चातुर्यालाहि धिक्कार असो.||३९|| भावार्थ:--- ब्राह्मण—मंडळींनी आपल्या पत्नीचा निष्काम भाव—अलौकिक भक्ती म्हणजे निष्काम भक्ती पाहून आपण मात्र भक्त नाहीतच,असा त्यांना मनस्वी खेद झाला.त्यामुळे त्यांना स्वत:विषयीचा कमीपणा वाटून दु:ख होऊ लागले.त्याचप्रकारे इतरांची भक्ती पाहून आपणास आपला कमीपणा वाटून,आपणही निष्काम भक्ती करावी असे वाटावे.त्यात आपली प्रगती होत असते.||३८|| | धिग् जन्म नस्त्रिवृद् विद्दां धिग् व्रतं धिग् बहुज्ञताम् | धिक् कुलं धिक् क्रियादाक्ष्यं विमुखा ये त्वधोक्षजे ||३९|| अर्थः---ज्याअर्थी आम्ही लोकांचे उपदेशकर्ते,गुरु व ब्राम्हण असूनही स्वार्थाविषयी मोह पावतो त्याअर्थी भगवंताची माया योग्यंनाद्धां मोह करणारी आहे असे खरोखर वाटते||४०||भावार्थ:--- त्या ब्राह्मणांना आपण भगवंतांच्या विन्मुख झालोत असे वाटू लागले,कारण सकाम कर्मकांडात आपण गर्क आहोत.धन,मान,प्रतिष्ठा यात आपण आसक्त झालो आहोत असे आपणास वाटून सकाम सोडून निष्काम परमार्थ करावा असे वाटले पाहिजे.आपला जन्म सकाम गायत्री मंत्रांचा उच्चार,सकाम वेदाध्ययन,बहुश्रुतपणा,सकाम कर्मकांड याचा धिक्कार असा त्यांना पश्चाताप झाला.तसाच पश्चाताप आपणास म्हणजे सकाम ब्राह्मण—मंडळीस वाटावयास पाहिजे.पश्चाताप न हाल तर घोर अधोगती निश्चित आहे,असा विवेक करून निश्कामातेकडे ब्राह्मण—मंडळींनी यावावयास पाहिजे.पण लक्षात कोण घेतो-------||३९|| | नूनं भगवतो माया योगिनामपि मोहोनी | यद् वयं गुरवो नृणां स्वार्थे मुह्यामहे द्विजाः ||४०|| अर्थः---अहो,स्त्रियांनासुद्धा जगद्गुरू कृष्णांचेठिकाणीआम्हप्रतिरोध केला असतांही अनावर असलेली केवढीहि भक्ति पहा ! जिने गृहनामक मृत्युपाश तोडून टाकिले आहेत||४१|| भावार्थ:---गुरूंना जर आपले हित कळाले नाही तर,ते इतरांचे हित करतील का?अर्थातच करणार नाहीत.म्हणून गुरु होण्यासाठी अगोदर आपले हित करून घ्यावे,व नंतर इतरांचे हित करण्याचा प्रयत्न करावा.विहरीत नसेल तर पव्हरा यात येणार नाही,हे निश्चितच आहे.तसे जे आपल्याकडे नाही,ते इतरांना देता येणार नाही,म्हणून असेल ते दध्या व नसेल ते देण्याचा प्रयत्न करू नका.इतरांचे हित करता येत नसेल तर करू नका,मात्र इतरांचे अहित करू नका.असा विवेक जाग्रत करून जीवन जगावे.||४०|| | अहो पश्यत नारीणामपि कृष्णे जगद्गुरौ | दुरन्तभावं योsविध्यन्मृत्यूपाशान् गृहाभिधान् ||४१|| अर्थः---या स्त्रियांना,ब्राम्हणांचा उपनयनादिक संस्कार नाही,गुरुगृहाचेठिकाणी वासपूर्वक वेदाध्ययनादिक नाहीत,तप नाही,आत्मविचार नाही,शुचिर्भूतपणा नाही,तशीच शुभकारक स्नानसंध्यादिक कर्मे नाहीत||४२|| भावार्थ:--- स्त्रिया असूनसुद्धा या निष्काम कर्म—निष्काम भक्ती--परमार्थ करत आहेत व आम्ही पुरुष असून शात्रांची पोटासाठी विक्री करत आहोत.आमचे जीवन किती घ्रणास्पद आहे—निन्ध्य आहे—लाजिरवाणे आहे.आपल्या या पत्नींचा प्रंपचाचा पाश नष्ट झालेला आहे व आमचा पाश अजूनही गच्च आवळलेला आहे.आमच्या जीवनाचा धिक्कार असो,असे ब्राह्मणांना वाटत आहे.ताशास प्रकारचा पश्चाताप आपणास म्हणजे कर्मकांडाची विक्री जे करतात,त्यांना पश्चाताप वाटावयास पाहिजे.असे वाटले तर मानुषकिने जीवन,अन्यथा पशु—जीवन ठरेल.म्हणून मनुष्य देहात मनुषकिने जीवन जगावे व पशु योनीत पशु जीवन जगावे.||४१|| अर्थः---तथापि योगेश्वरांचाही ईश्वर अशा उत्तकीर्ती श्रीकृष्णाचेठिकाणी दृढभक्ति असून ती भक्ति,उपनयनादिक संस्कारयुक्त अशाही आम्हांला नाही,तेव्हां हे केवढे आश्चर्य !||४३|| भावार्थ:---स्त्रियांनी गुरुकुलात प्रेवेश केला नाही,तप केले नाही,आत्मा—आनात्मा विवेक केला नाही,पवित्र होण्यासाठी कोणती साधना केलेली नही,कोणतेही सत्कर्म केले नाही,तरीपण भगवंतांच्या ठिकाणी दृढ निष्काम भक्ती आहे.यास कारण भगवंतांकडे संसारातील कांहीही मागितले नाही व भक्ती केली त्याचाह परिणाम आहे.म्हणून भक्ती करावी व त्या भ्कातीच्यामोबदल्यात भगवंताकडे कांहीही मागू नये.यात्भाक्ती करून कांहीच न मागणे हे महत्वाचे आहे व संसारातील कांही तरी मागणे अयोग्य आहे.असे विवेकांती लक्षात घ्यावे.वस्तू असावी व त्याच वस्तूचे मूल्य कळावे,तर त्या वस्तूचा उपयोग होतो,वस्तूचे महत्व न कळाले तर वस्तू प्रत्यक्ष समोर असून तिचे मूल्य न कळल्यामुळे तिचा उपयोग होत नाही.म्हणून वस्तूचे मूल्य कळवून घेण्याचा प्रयत्न करावा.जे संस्कार संपन्न आहेत,पण सकाम भक्ती करतात,कर्मकांड करून त्या कर्मकांडाची विक्री करतात म्हणजेच भगवंतांवर प्रेम न करता धनावर आहे,केवळ पोटाचे भरणपोषण करण्यावर आहे.म्हणून ते आपले जीवन पशुतुल्य जगत आहेत.म्हणून ते दु:खी---||४२—४३|| अर्थ:---म्हणूनच साधूंची गति अशा त्या भगवंताने आम्ही स्वर्थाविषयी अज्ञांनी आणि घरच्या कामामध्ये निमग्न असल्यामुळे विचाराविषयी असमर्थ आहो,असे गोपांच्या वाक्यांनी आम्हांस सुचविले आहे,केवढा हा त्याचा अनुग्रह ?||४४|| भावार्थ:--- आमच्या पत्नीची निष्काम भक्ती पाहून आम्हास पश्चाताप झाला व त्यामुळे आम्ही निष्काम भक्तीचा मार्ग स्वीकारला.आमच्यातील पशुता जाऊन आमच्यात मानवता—मानुषकी आली.हे आमच्या पत्नीने आमच्यावर केलेले उपकार आहेत,कारण त्यांच्यामुळे आम्ही निष्काम मार्गाला लागलोत.गृहस्थ आश्रमात असून आम्हास भगवंतांचे दर्शन झाले.सेवा घडली.हीच भगवंतांची कृपा होय.या कृपेमुळेच आमचा उद्धार झाला—परमकल्याण झाले.मनुष्य देहाचे सार्थक झाले.आपणास पत्नी किंवा कोणीही कारणीभूत होऊ शकते,म्हणून जगातील दोष टाकावा व गुण घेण्याचा प्रयत्न करावा.त्यातच आपले हित आहे.||४४|| अर्थः---अन्यथा चतुर्विध पुरुषार्थ देणाऱ्या व स्वंता पूर्णमनोरथ अशा त्या श्रीकृष्णाला आज्ञा करण्यास योग्य अशा आमच्या योगाने काय करावयाचे होते ?काहीच नाही.तथापि त्या समर्थाचे ,हे अन्न मागणेवगैरे केवळ आमच्यावर अनुग्रह करण्याकरिता मनुष्याचे अनुकरण आहे||४५|| || भावार्थ;---अहेतुक कृपा म्हणजे,कारण नसतांना,अधिकार नसतांना केलेली कृपा होय.भगवंतांची कृपा ही कारणावाचून होत नसते.कारणावाचून कृपा म्हणावे,तर ब्राह्मण मंडळी जी आहे,त्यांच्यावरही कृपा व्हावयास पाहिजे,पण झाली का ?नाही,कारण त्यांची पूर्वजन्मातील पुण्याई नव्हती व वर्तमान जन्मातील पुण्याई नव्हती,म्हणून ब्राह्मण मंडळीवर कृपा झाली नाही,तर त्यांच्या पत्नीवर कृपा झाली कारण त्यांची पुर्वापुण्यायी व आताचे योग्य प्रयत्न,म्हणून त्यांच्या पत्नीवर अहेतुक कृपा झाली.||४५|| भावार्थ:---स्वत: इतर देवांना सोडून,कारण इतर देव सुखी आहेत,तर भगवंत सुखरूप आहेत.म्हणून लक्ष्मी चंचलता व गर्व हे लक्ष्मीचे दोष आहेत,पण तीनेही हे दोन दोष यांचा त्याग करून ती भगवंतांच्या चरणकमलांच्या म्हणजे अधिष्ठानांच्या निरन्तर स्पर्शांच्या लोभाने सेवा करत असते.दोष ठेऊन सेवा केली असती तर तिला मिळाली नसती.सेवा करण्यासाठीसुद्धा विशिष्ट अधिकार लागतो.असे ऐश्वरेवान असणारे प्रभू दुसऱ्याकडे अन्नाची याचना करत आहेत.असे करणे---असा व्यवहार करणे हेही लोकांना भूलवणे---संभ्रमात पाडणे नव्हे काय?जे सर्व जीवांचे पालनपोषण करणारे आहेत,त्यांना अन्नाची मागणी करणे गरजेचे आहे का ?मुळीच मागणी करण्याची गरज नाही,पण आपली परीक्षा घेण्याकरिता किंवा अधिकार पाहण्याकरिता ही सर्व लीला केलेली आहे.म्हणून आपण निष्काम भक्ती करावी,यासाठी नाशिवंत जे धन आहे त्याचा त्याग करावा,म्हणजे आपले हित होते.||४६|| | देश: काल: पृथग्द्रव्यं मन्त्रतन्त्रर्त्विजोsग्नयः | देवता यजमानश्च क्रतुर्धर्मश्च यन्मयः ||४७|| अर्थः---पहा—लक्ष्मीसूद्धा,दुसऱ्या (सेवन करणाऱ्या)ब्राम्हदिकांचाही त्याग करून तसाच आपल्या चांचल्यगर्वादिक दिशांचा त्यःग करून केवळ चरणसेवेच्या मनोरथाने ज्याचे वारंवार सेवन करिते त्याची जी दुसऱ्याजवळ अन्नाविषयीची याचना ती केवळ लोकांना मोह करणारी आहे||४६|| अर्थः---देश,काळ,निरनिराळी चारुपुरोडशादिक द्रव्ये,मंत्र,तंत्र,ऋत्विज,अग्नि,देवता,यजम,यजमान,यज्ञ व धर्म हे सर्वही ज्याच्या मूर्ति आहेत|४७|| ||५—९—२०१९|| | अहो वयं धन्यतमा येषां नस्तादृशिः स्त्रियः | भक्त्या यासां मतीर्जाता अस्माकं निश्चला हरौ ||४९|| अर्थ:---तोच हा योगेश्वर साक्षात भगवान विष्णु,यादवांमध्ये उत्पन्न झाला आहे,असे जरी आम्ही पुष्कळठिकाणी ऐकिले आहे तथापि मूर्ख असल्यामुळे त्यांचे अनुसंधान राखत नाही||४८|| भावार्थ:--- सात्विक वृत्तीची पत्नी किंवा सात्विक वृतीचा पती मिळणे,म्हणजे भाग्य उदयाला येणे हे आहे.पूर्व जन्मातील पुण्य व वर्तमान जन्मातील सात्विक प्रयत्न केले असता असा योगायोग लाभत असतो,अन्यथा नाही.एकमेकाच्या निष्काम भक्तीमुळे एकमेकांची भक्ति निश्चल होत असते.म्हणून पती किंवा पत्नीचा स्वीकार करण्यापूर्वी त्यांची सात्विकता पाहणे ही कौटुंबिक जीवनातील फार महत्वांची घटना आहे.कोणाचीही सेवा करण्यापेक्षा सात्विक पती किंवा पत्नींची सेवा करण्यास मिळणे,ही फार भाग्याचा योगायोग आहे.तो योगायोग प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावा लागतो.यासाठी मनाचा सात्विक स्वभाव पाहावा.||४९|| अर्थः---याप्रमाणे आपली निंदा करून,आता भगवद्भक्तस्त्रियांच्या संगतीने आपली कृतार्थत सांगतात –अहो ! आम्ही लोकांमध्ये अतिधन्य अहो.कारण,ज्या आमच्या तशा स्त्रिया आहेत.म्हणजे ज्याच्या भक्तिसामर्थ्याने आम्हालाही श्रीहरीचेठिकाणी निश्चळ बुद्धि प्राप्त झाली आहे|\४९|| भावार्थ:---माया ही असी असते,ती विचार न केल्यामुळे असारात गुंतवते व विचार केला तर ती सारात गुंतवते.याकरिता नेहमी विवेक करून पुढील पाऊल टाकावे.विवेक हाच सदगुण आहे व अविवेक हा दुर्गुण आहे.म्हणून सदगुणांचा स्वीकार करावा.||५०|| अर्थः—असे भाषण करून भगवंताजवळ क्षमा मागतात –हे प्रभे,सर्वठिकाणी अंकुठीतबुद्धी असणाऱ्या तुज अंतर्यामी षड्गुनैश्वरयसंपन्न श्रीकृष्णाला नमस्कार असो.ज्याच्या मायेने मोहितबुद्धि झालेले आम्ही कर्ममार्गाने श्रमण पावत आहो.||५०|| भावार्थ:--- आपणाकडून अपराध घडला तर भगवंतांजवळ क्षमा मागावी.कारण आम्ही मायेने मोहित केल्यामुळे कळाले नाही.म्हणून मायेचे स्वरूप कळून घेण्याचा प्रयत्न करावा.यासाठी साधू—संतांची संगती करा व त्यांचा मुखातून शात्र श्रवण करा.||५१|| | इति स्वाघमनुस्मृत्य कृष्णे ते कुतहेलनाः | दिदृक्षवोsप्यच्युतयोः कंसाद् भिता न चाचलन् ||५२|| अर्थः—तोच सर्व कारणभूत सर्वातर्यामी श्रीकृष्ण आपल्या मायेने मोहितचीत झाल्यामुळे आपला प्रभाव न जाणणाऱ्या आमच्या अपराधाची क्षमा करण्याविषयी समर्थ आहे||५१||अर्थः---याप्रमाणे श्रीकृष्णाची अवज्ञा करणारे हे दीक्षित ब्राम्हण,आपल्या अपराधाचे स्मरण करून त्या रामकृष्णांच्या दर्शनाची इच्छा करीत होते परंतु कंसापासून भिऊन म्हणजे ‘म्हणजे आम्ही दर्शनाकरिता गेलोतर,कंसाने आपल्या शत्रू विष्णु हाच आहे असे जाणून जर कदाचित गोकुळाचा नाश तर तो आमचा दुसरा अपराध होईल असे मनांत आणून’त्याच्या दर्शनाकरिता गेले नाहीत,तर आपल्या आश्रमांतच त्याची भक्ती करीत राहिले||५२|| भावार्थ:---त्यांना श्रीकृष्णांच्या दर्शनांची इच्छा झाली,पण कंश याच्या भीतीमुळे त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत.कारण निमित्त कंश यांचे मुख्य कारण नसून पूर्व कर्म हे होते.म्हणून दर्शनाला गेले नाहीत.||५२||---------------------------------------------||५२|| -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|२४--- शारदा २—भगवान श्रीकृष्ण---१२---इंद्रयज्ञ निवारण----[१२]—इंद्रयज्ञ—निवारण. ३८ | -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|आता ह्या चोविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अनेकप्रकारच्या कारणांनी इंद्राचा यज्ञ मोडून गोवर्धनाच्या यज्ञाचा उत्साह प्रवृत्त केला अशी कथा वर्णन केलेले आहे | | भगवानपी तत्रैव बलदेवेन संयुत: | अपश्यन्निवसन् गोपानिन्द्रयागकृतोद्दमान् ||१|| अर्थः---भूमीवर ब्राम्हनांना झालेला कर्मांचा गर्व घालवून,स्वर्गावर देवांमध्ये इंद्राला झालेल्या मदाचा भंग करण्याकरिता श्रीकृष्णाने त्याच्या यज्ञाचे निवारण केले ||२||अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,ते दीक्षित कसाच्या भीतीने कृष्णाच्या दर्शनास न जाता आपल्या आश्राम्माध्येच भगवंताची भक्ति करीत राहिले.इकडे बलदेवासहवर्तमान भगवान श्रीकृष्णानेही त्या गोकुळामध्ये वास करित असता एकेवेळी इंद्राच्या यज्ञाकरिता उद्दोग करणाऱ्या गोपांस पहिले||१|| | कथ्यतां मे पितः कोsयं सम्भ्रमो व उपागतः | किं फलं कस्य चोद्देशेः केन वा साध्यते मख: ||३|| अर्थ:---आणि सर्वसाक्षी व सर्वात्मा असा तो भगवान श्रीकृष्ण,संद्राच्या याज्ञाकरिता हा उद्दोग चालला आहे असे जाणत असूनही नम्रतेने लीनपणाने नंदादिक वृद्धगोपांस प्रश्न करू लागला की,||२|| | एतद् ब्रूहि महान् कामो मह्यं शुश्रुषवे पितः | न हि गोप्यं हि साधूनां कृत्यं सर्वात्मनामिह ||४|| | अस्त्यस्वपरदृष्टीनाममित्रादास्तविद्विषाम् | उदासीनोsरिवद् वर्ज्य आत्मवत् सुहृदुच्यते ||५|| अर्थः---हे बाबा,तुम्हांला हा मोठ्या गडबडीचा विशेष उत्सव काय प्राप्त झाला आहे?तो मला सांगा.हा याग विशेष आहे असे म्हणाला तर,याचे फळ काय?कोणत्या देवाच्या उद्देशाने हे कर्म प्रवृत्त झाले आहे?व कोणत्या अधिकाऱ्याने हा यज्ञ साधावयाचा||३|| भावार्थ:--- आपले कांही रहस्य असेल तर संत—महात्मा यांना कोणी शत्रू,मित्र वा तिऱ्हाईत नसतो,कारण त्यांच्या दृष्टीत आपला आणि परका असा कोणताही भेद नसतो,कारण ते सर्वांसी समदृष्टीने वागत असतात.परंतु ज्यांच्यात भेददृष्टी असते,त्यांना मित्र,शत्रू व तिऱ्हाइत असतो.म्हणून अशा भेददृष्टीवाल्यांना मात्र गुप्त—महत्वाची गोष्ट सांगू नये.असे असले तरी मित्र यास गुप्त—महत्वाची गोष्ट सांगावी.कारण तो कोणासही सांगत नसतो.व्यवहारात असे करावे लागते—वागावे लागते.||४—५|| | ज्ञात्वाज्ञात्वा च कर्माणि जनोsयमनुतिष्ठती | विदुषः कर्मसिद्धिः स्यात्तथा नाविदुषो भवेत् ||६|| अर्थः---हे ताता,मला,ऐकण्या विषयी मोठी इच्छा आहे,यास्तव श्रवणाची इच्छा करणाऱ्या मला हे सर्व सांग.आता हे गोप्य आहे असे म्हणशील त्र,या व्यवहारामध्ये,जे सर्वठिकाणी आत्मदृष्टी ठेवणारे साधू आहेत,ज्यांना स्वकीय व परकीय दृष्टी नाही व ज्यांना मित्र,उदासीन व शत्रू हे नाहीत त्या साधूंचे कोणतेही कर्म गोप्य नसते.आता साधूंच्या व आमच्यामध्ये थोडासा भेद आहे असे म्हणाला तरी,विचाराच्या कामांत शत्रूप्रमाणे उसिनही वर्ज्य करावा परंतु मित्र असेल तो आपणासारखाच मनिला पाहिजे ||४-||५|| भावार्थ:---कोणतेही कार्य,कारण लक्षात ठेऊन---समजून---ज्ञान प्राप्त करून करावे,कारण तो साधक साद्ध्यापर्यंत जातो.यथार्थ फळ मिळते.कार्य केले,पण कारण कळून घेतले नाही,तर यथार्थ फळ मिळत नाही.म्हणून कोणतेही कार्य असो,त्याचे कारण जाणून घ्या व नंतर ते कार्य करा.त्यात कर्त्याचेच हित असते.म्हणून कोणतेही कार्य कारण जाणून करा.न जाणून करू नका.||६|| | तत्र तावत् क्रीयायोगो भवतां किं विचारीतः | अथवा लौककस्तन्मे पृच्छतः साधु भण्यताम् ||७|| अर्थ:---आणि मित्राबरोबर विचार करून कुनतेही कर्म करावे,गतानुगतिकपणाने करू नये कारण,हा जन,जाणून व न जाणूनही कर्म करितो त्यांत जाणून करणाराला त्या कर्मांचे त्या कर्माचे फळ जसे प्राप्त होते तसे न जाणून करणाराला प्राप्त होत नाही||६|| अर्थ:--असे असतां हा तुमचा याग करण्याचा उद्दोग मित्रांसहवर्तमान शास्त्राने विचार केलेला आहे अथवा लोकव्यवहारानेच प्राप्त झाला आहे,ते विचारणाऱ्या मला सविस्तर सत्य सांगा||७|| अर्थ:---ते ऐकून नंद म्हणाला –हे कृष्णा,भगवान इंद्र हा वृष्टीचा अधिपती आहे,मेघ हे त्याच्या प्रियमुर्ती आहेत.ते मेघ,अ प्राणीमात्रांना तृप्ति करणारे व वांचण्याचे साधन अशा पाण्याची वृष्टि करतात.||८|| ||६—९—२०१९|| अर्थ:---यास्तव वा कृष्णा,आम्ही वैश्य व दुसरेही ब्राम्हणक्षत्रियादिक मनुष्य,मेघांचा पती अशा त्या ईश्वर इंद्राचे,त्याने केलेल्याच वृष्टीने सिद्ध झालेल्या अन्नादिक द्रव्यांनी यज्ञ करून आराधना करितात||९||| य एवं विसृजेद् धर्मं पारम्पर्यागतं नरः | कामाल्लोभाद् भयाद् द्वेषात् स वै नाप्नोति शोभनम् ||११|| अर्थ:---आणि ते यज्ञ होऊन अवशेष राहिलेल्या अन्नदिकेकरून धर्मार्थकांमांची सिद्ध होण्याकरिता आपली जीविका चालवितात.आता कृष्णादिकेकरून अन्नादिकांची सिद्धी होत असल्यामुळे इंद्राच्या आराधनाने काय करावयाचे आहे ?असे म्हणशील---कोणताही कृषीवगैरे उद्दोग करणाऱ्या पुरुषांना इंद्रच वृष्टीद्वारा फलसाधक आहे,वृष्टीवाचून काहीच सिद्ध होणार नाही||१०|| | कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव विलीयते | सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मनैवाभिपद्दते ||१३|| अर्थः---यास्तव वृद्धानापरंपरे प्राप्त झालेल्या धर्मरूप या यागाचा जो पुरुष,कामाने,लोभाने,भयाने किंवा द्वेषाने त्याग करील तो कधीही सुख पावणार नाही||११|| भावार्थ:--- जीव स्वत:च्या कर्मानुसार जन्म,भोग व मरणास प्राप्त होतो.म्हणजेच सुख व दु:खास प्राप्त होतो.भोगाचे कर्म हे बीजरूपाने असते.त्या बीजाचे आपण जसा प्रयत्न करून त्यानुसार फळ मिळेल.प्रयत्न न केले तर फळ मिळणार नाही.म्हणून आपण योग्य बीजाचे योग्य प्रयत्न करून फळ मिळवण्याचा प्रयत्न करावा.अयोग्य बीज असेल तर योग्य प्रयत्न करून नष्ट करावे.म्हणजे त्याचे फळ भोगावयास येणार नाही.हा नियम जन्म—मरण यास नसणार,कारण हा नियम जन्मताच मरन निश्चीत केलेले असते.ज्या कर्मात प्रयत्न करूनही बदल होत नाही,त्यास “प्रारब्ध कर्म” असे म्हणतात”.||१३|| | अस्ति चेदिश्वरः कश्चित फलरुप्यन्यकर्मणाम् | कर्तारं भजते सोsपि न ह्यकर्तुः प्रभूर्ही सः ||१४|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला हे राजा,असे नंदाचे व दुसऱ्याहि गोकुलवासी गोपांचे भाषण ऐकून इंद्राला क्रोध उत्पन्न करण्याकरिता म्हणजे कोप उत्पन्न करण्याच्या द्वाराने इंद्राला गर्वपर्वतावरून खाली उतरण्याकरिता तो श्रीकृष्ण नंदपित्याला असे म्हणाला की,||१२|| भावार्थ:---ईश्वर हा जो जसे कर्म करील,त्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.जीवाच्या म्हणण्यानुसार देत नाही,व त्याच्या मतानुसारही देत नाही.ईश्वर हा “करावे तसे भरावे”या नियमाने फळ देतो.जीवाने कर्म केले तर फळ,अन्यथा नाही.||१४|| | किमिन्द्रेनेह भूतानां स्वस्वकर्मानुवर्तीनाम् | अनिशेनान्यथा कर्तुं स्वभावविहितं नृणाम् ||१५|| अर्थ:---प्रथम कर्मवादाने देवांचे निराकरण करीत श्रीभगवान म्हणाला –हे ताता,सर्व प्राणी,जन्मांतरी केलेल्या कर्माने उत्पन्न होतो;कर्मानेच ल्य पावतो;शुख,दुःख भय किंवा कल्याण हि सर्वही कार्माच्याचयोगाने पावतो||१३|| अर्थः—आता काही लोक,कर्माला कारण मानणे हे अतिसाहस आहे असे मानून,कर्मपरतंत्र अशा ईश्वराला कारण मानितात,त्या मताचे दुषण करितो --स्वतःकर्मानी अलिप्त असून दुसऱ्याच्या कर्माचे फळ देणारा असा जर कोणी ईश्वर आहे असे म्हणावे तर तो –जो जे कर्म करितो त्यालाच त्या कर्माचे फळ देतो;कर्म करणाराल देत नाही||१४|| भावार्थ:---जर सर्व प्राणी आपापल्या कर्मांचे फळ भोगत असतील तर आम्हांला इंद्राची काय आवश्यकता ?कारण फळ देणारा ईश्वर आहे,तर इंद्राची गरज नाही.इंद्र हा जीवाच्या कर्मानुसार पाण्याचा वर्षाव करणार,वर्षाव करण्यास तो स्वतंत्र नाही.||१५|| | स्वभावतन्त्रो हि जनः स्वभावमनुवर्तते |स्वभावस्थमिंद सर्वं सदेवासूरमानुषम् ||१६|| अर्थः---यास्तव कार्मापासुनच फलसिद्धी होत असून त्याच्या स्वाधीन असलेला तो इंद्र,अजागलस्तनतुल्य असून प्राक्तनंरसंस्कारानेच मनुष्यांना घडवणारे कर्म किंवा त्याचे सुखदुःखादिक फळ अन्यथा करण्यास असमर्थ आहे.त्या इंद्राचा यज्ञ करून,आपापल्या कर्माला अनुसरणाऱ्या लोकांना काय उपयोग आहे?कांहीच नाही||१५|| भावार्थ:--- ज्याचा जसा स्वभाव असेल,त्यानुसार तो जीव कर्म करणार व कर्मानुसार त्या कर्मांचे फळ भोगणार.याचा अर्थ जो तो स्वभावानुसार वागणार,हे जग सर्व स्वभावरच अवलंबून आहे,अन्य कांही कारण नाही.म्हणून जीवाने सात्विक कर्म करून सात्विक वर्तन करावे.हे सर्व कळण्याकरिता शात्र व संत---मातात्मा यांची संगती करून,त्यांच्या मुखातून शात्र श्रवण करावे.||१६|| | देहानुच्चावचान्जन्तुः प्राप्योत्सृजती कर्मणा | शत्रुर्मीत्रमुदासीनः कर्मैव गुरुरीश्वर:||१७|| अर्थः---हा सार्वजन प्राक्तनसंस्काराच्याच स्वाधीन आहे.तो आपल्या त्या स्वभावाला अनुसरून धर्म अधर्म इत्यादिक कर्मचेठिकाणी प्र्वूत्त होतो.एतावता देव,असुर,मनुष्यांसहवर्तमान हे सर्व जग,स्वभावाचेठीकानी राहिलेले आहे||१६|| भावार्थ:---सर्व व्यवहार हा कर्मानुसार होतो.कर्म हे सात्विक संस्कारापासून करावे,कारण सात्विक संस्कारानुसार सात्विक कर्म केले तर त्यास सात्विक फळ मिळणार,सात्विक फळ म्हणजेच सुख होय.||१७|| | तस्मात् सम्पूजयेत् कर्म स्वभावस्थः स्वकर्मकृत् | अन्जसा येन वर्तेत तदेवास्य हि दैवतम् ||१८|| अर्थः---तस्मात स्वभावाने उत्पन्न होणाऱ्या कर्मानेच हा प्राणी मोठे लहान (देव मनुष्यादिक) देह पावोन कर्मसमाप्ति होतांच त्यांचा त्याग करितो व शत्रू,मित्र,उदासीन,गुरु,व ईश्वर हि सर्व कर्मांच्या योगानेच घडतात||१७|| भावार्थ:--- मनुष्याने सात्विक संस्कारित होऊन सात्विक कर्म करावे.म्हणजेच धर्माचे पालन करावे.आपल्या अधिकारानुसात जे कर्म आहे,त्यावर आदर असावा.इतरांच्या अधिकारानुसार जे कर्म आहे,त्याचा त्याग करावा.कारण इतराच्या अधिकारानुसार कर्म केले तर ते दु:खाला कारणीभूत होणार.याकरिता भगवंत म्हणतात,स्वधर्म हा सुखाला कारण आहे व परधर्म दु:खाला कारण आहे.म्हणून आपण पराधार्मांचा त्याग करून स्वधर्मांचे पालन करावे.त्यातच आपले व इतरांचे हित आहे.||१८|| | आजीवैकतरं भावं यस्त्वन्यमुपजीवति | न तस्माद् विन्दते क्षेमं जारं नार्यसती यथा ||१९|| अर्थः---म्हणून आपापल्या प्राक्तनसंस्काराला अनुसरून आपापली वर्णाश्रमादि कर्मे करणाऱ्या पुरुषाने कार्माचाच सन्मान करावा.आता कर्म म्हणले देवतांच्या उद्देशाने अन्नादिक समर्पण करणे हे होय;त्याची सिद्धी देवतांवाचून कशी होईल?असे म्हणाल तर—हा प्राणी ज्याच्या योगाने सुखाने वांचतो तेच याचे दैवत होय,म्हणजे त्याच्याच उद्देशाने त्याने कर्म करावी||१८||भावार्थ:--- एका देवतेला सोडून अनेक देवतेची भक्ति करणारा,अशा व्यभिचारी भक्ताला शांती---सुख मिळत नाही,तर दु:ख मिळते. म्हणून व्यभिचारी भक्ति कधीच करू नये.अव्यभिचारी भक्ति म्हणजे एका देवावर निष्ठा,तो एकच देव अनेक ठिकाणी अनेक रूपानी नटलेला आहे.असा भाव ठेऊन सर्वांना नमस्कार करणारा तो अव्यभिचारी भक्त होय.तो सुखाला प्राप्त होऊन शांत होतो.याकरिता जीवानी व्यभिचारी भक्ति न करता अव्यभिचारी भक्ति करावी.ती भक्ति सुखाकडे नेते.||१९|| | वर्तेत ब्रम्हना विप्रो राजन्यो रक्षया भुवः | वैश्यस्तु वार्तया जीवेच्छूद्रस्तु द्विजसेवया ||२०|| अर्थः---जो पुरुष,एका देवतेच जीवनोपायत्वेकरून सेवन करून तिला न मानिता दुसऱ्याच देवतेची सेवा करितो तो पुरुषाद्व त्या देवतेपासून,जशी जारिणी स्त्री पतीचा त्याग करून जरापुरुशापासून कल्याण पावत नाही त्याप्रमाणे कल्याण पावत नाही ||१९|| भावार्थ:---१---ब्राह्मण:---जो षटकर्म करतो त्यास “ब्राह्मण”असे म्हणतात.१—अध्ययन—शात्रांचा अभ्यास—विद्ध्या संपादन करणे,२—अध्यपन—शात्र संपादन करून विध्याचे दान करणे—शिकवणे,३—दान स्वीकार करणे,४—दान करणे,सत्कर्म करणे,६—सत्कर्म करून घेणे.यास षटकर्म असे म्हणतात.२---क्षत्रिय:---जो शूर—वीर असून देशाचे संरक्षण करतो व प्रेजाजनांना पुत्रवत समजून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो यांना “क्षत्रिय”असे म्हणतात.३---वैश्य:---वस्तूंचा योग्य मोबदला घेऊन देवाण—घेवाण करतो त्यास “वैश्य” असे म्हणतात.४---शुद्र:---प्रजाजनांची योग्य मोबदला घेऊन शारीरिक किंवा बौद्धिक सेवा करतो त्यास “शुद्र” असे म्हणतात. ज्याच्या त्याच्या गुणानुसार सेवा केल्यामुळे—कार्य केल्यामुळे सर्वांची गरज भागून सुखी होतात,म्हणून ज्याने त्याने आपापल्या गुणानुसार सेवा किंवा कार्य करावे.असे केले असता सर्व सुखी होऊन आपले कर्तव्य पार पडतात “स्वधर्म” असे म्हणतात.भगवंत कृष्ण यांनी भगवतगीतेत अर्जुन यास जो उपदेश केलेला आहे,तोही गुणकर्मानुसारच केलेला आहे.||२०|| | कृषिवाणिज्यगोरक्षा कुसींद तुर्यमुच्यते | वार्ता चतुर्विधा तत्र वयं गोवृत्तयोsनिशम् ||२१|| अर्थः---आता आपली वृत्ती सांगण्याकरिता वर्णांच्या वृत्तीचा भेद सांगतो—ब्राम्हणाने वेदाध्ययनादिकेकरून आपली वृत्ती संपादन करावी.राजाने भूमीच्या रक्षणाने,वैश्याने वर्ताच्या योगाने व शूद्राने ब्राम्हणाच्या सेवेच्या योगाने आपली वृत्ती चालवावी||२०|| | सत्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः | रजसोत्पद्दते विश्वमन्योन्यं विविधं जगत् ||२२|| अर्थः----त्यात वैश्याची जी वर्तावृत्ती ती शेती,व्यापार,गाईचे रक्षण आणि चवथे वाढीदिढी करणे अशी चार प्रकारची सांगितली आहे.त्यामध्ये आम्ही (गोपाल)निरंतर गाईचे सेवा करून वृत्ती चालवणारे आहो||२१|| ||७—९—२०१९||| रजसा चोदिता मेघा वर्षन्त्यम्बुनि सर्वतः | प्रजास्तैरेव सिद्ध्यन्ति महेन्द्रः किं करिष्यति ||२३|| अर्थ:---आता गाईचीही वृत्ती इंद्राच्या स्वधीनच आहे असे म्हणाल त्र—सत्व,रज आणि तम असे हे तीन गुण अनुक्रमाने जगाच्या स्थिती,उत्पत्ती आणि लय याचे कारण आहेत,त्यांमध्ये रजोगुणाच्या योगाने सत्रीपुरुशसंभोग होऊन हे नानाप्रकारचे देवमनुष्यादिरूप जग उत्प्प्न होते||२२|| भावार्थ:---मेघ रजोगुणामुळे पाऊस पाडतो.त्यापासून अन्न व अन्नापासून सर्व जीवांची उपजीवाका चालते.यात---पाऊस पाडण्यात इंद्राचा कांहीही संबंध नाही. इंद्राचा व पाऊसाचा कांहीच संबंध नसतांना,त्या इंद्राला यज्ञ म्हणून करण्याचे कांहीच प्रयोजन नाही.जो कांहीच कार्य करत नाही,त्याला विनाकारण मोबदला काय म्हणून द्ध्यावा?अर्थातच देऊच नये.इंद्रयज्ञ करू नका.जसे भाजीपाला किंवा अन्नधान्य ज्या शेतकऱ्यांनी उत्पन्न केले,ते ग्राहकांना विक्री सरळ करू दध्या,त्यात दलालाची मुळीच गरज नाही,कारण त्या दलालामुळे शेतकरी व ग्राहक यांचे अहित होते व विनाकारण दलालांचे---इंद्राचे हित होते,म्हणून त्या इंद्राची गरज नाही.||२३|| अर्थः---रजोगुणाच्या योगाने प्रेरणा केलेले मेघ,सर्वत्र नदीसमुद्रादिकांचेठिकाणी उदकाची वृष्टी करितात,त्या उदकांनीच प्रजांची अन्न्संपादनादिक कार्यसिद्धी होत्ये;असे असतां इंद्र काय करितो ? काहींच करीत नाही||२३||भावार्थ:---म्हणून आपण गाई,ब्राह्मण आणि पर्वत यांचीच पूजा करूत म्हणेच इंद्राची पूजा करण्याची गरज नाही.आपण जे साहित्य इंद्र पूजेसाठी आणलेले आहे,त्याच साहित्यांनी गोवर्धन पर्वत आहे,त्यांचीच पूजा करूत.हेच योग्य आहे.गोवर्धन पर्वतामुळे आपणास गाईंना चारा,त्यामुळे दुग्ध व्यवसाय,त्यामुळे उदर—निर्वाह,शेती व्यवसाय आपला व्यवस्थित होतो.म्हणून त्या गोवर्धन पर्वताचे आपल्यावर उपकार आएत,म्हणून त्या उपकरातून ऋण चुकवण्यासाठी आपण त्यांची पूजा करू या.||२६|| अर्थः---तथापि आपले योगक्षेम चालण्याकरिता देवतेची अपेक्षा आहे असे म्हणाल तर—हे ताता,की ज्यांच्या रक्षणाकरिता इंद्र देव पाहिजे ती आमची नगरे नाहीत,देश नाहीत,गाव,नाहीत व घरेही नाहीत तर आम्ही निरंतर अरण्यरूप घरवाले असल्यामुळे व्नाध्ये पर्वतावर राहणारे आहो||२४|| अर्थ:---म्हणून तुम्ही जीवनाला कारण अशा गाईची व भूमिवरचे प्रत्यक्ष देव अशा ब्राम्हणांचा आणि कंद,मुळे,जळ,तृण,इत्यादिकेकरून योगक्षेम चालविणाऱ्या गोवर्धन पर्वताचा यज्ञ आजपासून आरंभा.इंद्राच्या यज्ञाची जी साहित्य आहेत त्यांनीच हा यज्ञ साधावा||२५|| भावार्थ:---वेदज्ञ जे ब्राह्मण आहेत,त्यांच्याद्वार अग्नीत हवन करा.त्यांना गाई,अन्न आणि दक्षिणा दान म्हणून दध्या.त्या ब्राह्मणांचा उदार—निर्वाह त्यांच्यावरच आहे.त्यामुळे ते वेदांचा अभ्यास करून,त्याद्वारे यज्ञकर्म करतात.||२७|| | अन्येभ्यश्चाश्वचान्डालपतितेभ्योयथार्हतः | यवसं च गवां दत्त्वा गिरये दीयतां बलिः ||२८|| अर्थः---पायस (क्षीर) आदिकरून मुगाच्या वरनापर्यंत नानाप्रकारचे स्वयंपाक हवन कार;तुम्ही त्या ब्राम्हणांना षड्रसयुक्त अन्न द्दावेत व धेनुसहित दक्षिणा द्दाव्यात ||२७|| भावार्थ:--- चांडाळ म्हणजे तमोगुणी असलेला,पतित म्हणजे पापी असणारा,उपेक्षित असलेला,पशु—पक्षी यांना त्यांचा आधिकारानुसार यथायोग्य अन्नदान करावे,गाईंना चारा देऊन आणि त्यानंतर गोवर्धनाची पूजा करावी.||२८|| अर्थः---दुसऱ्याही श्वान चांडाळ पतीतांपर्यंत सर्व गोरगरिबांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे अन्नादिक द्यावे.आणि गाईना कोवळे तरून देऊन गोवर्धनपर्वताला पक्कान्नादिकांचा मोठ बाली (नेवैद्दे )अपूर्ण करा||२८|| भावार्थ:--- सर्वांनी स्थूल शरीराला--अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करावी.तसेच आपल्या मनाला सुंदर वस्त्रे परिधान करावीत म्हणजे धर्मानुसार वागून निष्काम कर्मे व निष्काम भक्ती करावीत,म्हणजे जे जीव दु:खी आहेत,त्यांचेदु:ख कमी किंवा नाहीसे करून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा.परोपकार,दया,क्षमा,शांतीचा अलंकार घालावा,म्हणजेच असे सदगुणरुपी दागिने घालावीत.गाई,ब्राह्मण—साधू—महात्मा यांना अन्नदान करावे.गाई,ब्राह्मण,अग्नी व गोवर्धन यांना प्रदक्षिणा घालवावी.यांना नमस्कार करावा,कारण यांचे आपल्यावर उपकार आहेत.म्हणून उपकार फेडण्याकरिता त्यांना नमस्कार करावा.||२९|| अर्थः---आणि तुम्ही अलंकार धारण करून,भोजन करून,अंगाला उट्यावगैरे लाऊन व उत्तम वस्त्रे परिधान करून,गाई ब्राम्हण,अग्नि व गोवर्धनपर्वत यांना प्रदक्षिणा घाला ||२९|| भावार्थ:---आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत,त्यांना सल्ला द्यावयास हरकत नाही.त्या सल्ल्याचा निर्णय घेण्याचाधिकार मात्र श्रेष्ठांनाच असावा.कनिष्ठांनी निर्णय घेउ नये.आपणास गाई,ब्राह्मण आणि पर्वत प्रिय असावा,कारण हे आपले कल्याण करणारे आहेत.||३०|| | कालात्मना भगवता शक्रदर्पं जिघांसता | प्रोक्तं निशम् नन्दाद्दा: साध्वगृन्हन्तः तद्वचः ||३१|| अर्थः---हे तात,अशाप्रकारचे कर्म करावे हे मला मान्य आहे.तुम्हांला जर आवडत असेल तर करा.एकंदरीत हा मी सांगितलेला यज्ञ,गाई,ब्राम्हण,पर्वत व मी या सर्वांना आवडणारा होणार आहे||३०|| भावार्थ:--- बाळकृष्ण यांचा हेतू सर्वांच्या लक्षात आल्यामुळे सर्वांनी होकार दिला,कारण त्याद्वारे इंद्राचा अंहकार घालवण्याचा हेतू होता.आपण चांगले कार्य करावे पण कार्य केल्याचा अभिमान येऊ नय,कारण अभिमान हा अनर्थ—अहित करत असतो.||३१|| अर्थः--- श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,इंद्राचा गर्व हरण करणाऱ्या कालरूपी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले वचन ऐकून,नंदादिक गोपांनी त्यचा आदरपूर्वक अंगीकार केला||३१|| भावार्थ:--- प्रथम ब्राह्मणाकडून स्वस्तिवाचन केले,भगवंतांची आराधना—स्तुती केली.गोवार्धाची व ब्राह्मणांची पूजा केली.भेटवस्तू अर्पण केल्या,कारण साक्षात त्यांच्याकडून गोपांचे हित होत होते.गुरांना पुढे करून,त्यांच्यासह गोवर्धनाची प्रदक्षणा केली.||३२—३३|| अर्थः---आणि जसे श्रीकृष्णाने सांगितले होते तसेच सर्व केले.ते असे की—ब्राम्हणाकडून मोठ्या आदराने पुण्याहवाचून करवून इंद्रयागाकरिता केलेल्या पक्कान्नादिसाहीत्याने गोवर्धनपर्वताला बळी अर्पण करून ब्राम्हणांना भोजन घालून व इतरहि सर्वांना अन्न अर्पण करून गाईना कोवळे गवत यथेच्छ घातले आणि ब्राम्हणाचे आशीर्वाद घेऊन त्या नंदादिक गोपांनी,व अलंकार धारण केलेल्या व कृष्णचरितत्रे गायन करणऱ्या गोपांनी सर्व गोधने पुढे करून,बैल जुंपलेल्या छाकाड्यांवर बसून गोवर्धन पर्वताला प्रदिक्षिणा केली||३२||३३||३४|| ||८—९---२०१९|| | कृष्णस्त्वन्यतमं गतः | शैलोsस्मीती ब्रूवन् भूरी बलीमादद्य बृहद्वपुः ||३५|| अर्थः---श्रीकृष्णाने तर गोपांना गोवर्धनाचेठीकाणी ‘हि देतता आहे असा’विश्वास उत्पन्न करणारे दुसरेच एक स्वरूप धारण करून भव्यस्वरूपी असता गोवर्धनपर्वताच्या शिखरावर राहिला आणि त्याने मी पर्वताभिमानीदेव आहे असे म्हणून गोपांनी अपर्ण केलेले मोठा बली भक्षण केले||३५||भावार्थ:--- भगवान बाळकृष्ण गोपांचा विश्वास बसेल असे दुसरे शरीर धारण करून गोवर्धन पर्वतावर बसले,कारण आपण त्यास दगड समाजातोत,कारण जीवांच्या ठिकाणी अज्ञान आहे.वास्तविक त्या ठिकाणी भगवंत असतो.तो आपणास आपल्या चक्षु इंद्रियास दिसत नाही.म्हणून आपण दगड अशी भावना न ठेवता तो भगवंत आहे अशी भावना ठून भक्ती करावी.स्वत: भगवंत अन्न खाऊ लागले.आपणसुद्धा त्या किंवा कोणत्याही ठिकाणी भगवंत आहे,हि भावना दृढ करून कृती करावी,कारण भावाचे महत्व आहे.||३५|| अर्थ:---इकडे कृष्णाने गोपांना सांगितले की,-- अहो आश्चर्य पहा !तुम्ही बहुतवेळ इंद्राची पूजा केली परंतु तो असा मूर्तिमंत कधीच दृष्टीस पडला नाही.ह्या गोवर्धनपर्वताने तर आपले प्रत्यक्षरूप दाखवून आमच्यावर अनुग्रह केला आणि आम्ही दिलेला बळी भक्षण केला.हा पर्वत इच्छित रूपे धारण करून आपली अवज्ञा करणाऱ्या वनांतील मनुष्यांना सिंहव्याघ्रसर्पदीरूपाने मारितो;यास्तव आपल्या व गाईच्या कल्याणाकरिता याला आम्ही नमस्कार करूया.असे म्हणून गोकुळवासी जनासहवर्तमान त्या कृष्णाने आपणच त्या नवे स्वरूप धारण केलेल्या आपणास नमस्कार केला||३६||३७|| भावार्थ:--- भगवानह्या श्रीकृष्णांनी आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजावासिसह स्वत:सुद्धा नमस्कार केला,कारण आपण कृती केली तर त्याचे अनुकरण इतर करत असतात.इतरांनी अनुकरण करावे म्हणून भगवान बालाकृष्णांनी स्वत: अगोदर नमस्कार केला.भगवंत म्हणतात साक्षात गिरीराज स्वत: प्रगट होऊन आपल्यावर कृपा केली आहे.भगवंतांनी हि जी लीला केली आहे,कारण कार्य करून घेणारा एक आहे व आपण कार्य करणारा दुसरा आहे.आपण मात्र कार्य करून घेणारा जो भगवंत आहे,त्याला न मानता कार्य करणारालाच मानतो.हि आपली चूक आहे.जीवांकडून होणाऱ्या चुकीची दुरुस्ती करण्याकरिता भगवंतांनी हि लीला केलेली आहे.याचा अर्थ इंद्र कांहीच कार्य करत नाही,असे मात्र नाही.इंद्र हा भगवंतांची सत्ता वापरून भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे सेवकासारखे कार्य करतो.सत्ता व आज्ञा हि सर्व भगवंतांची आहे.जसे विजेचा दिवा प्रकाश देतो हे खरे आहे,पण हा प्रकाश विजेचा आहे का दिव्याचा आहे?तर प्रकाश हा विजेचा आहे व विज दिव्यामार्फत बाहेर पडतो.त्याचप्रमाणे इंद्र हा भगवंतांची सत्ता वापरून आज्ञा मानून सेवक म्हणून पाऊस पाडण्याचे कार्य करतो.आपलाही कोणत्याही कार्याचे फळ देणारा भगवंत आहे व इतर कार्यवाहक आहेत.||३६|| अर्थः---याप्रमाणे श्रीकृष्णाने प्रेरणा केलेले ते नंदादिक गोप,गोवर्धन पर्वत,गाई व ब्राम्हण यांचा यज्ञ यथाविधी करून कृष्णासहवर्तमान गोकुळांत प्रविष्ट झाले||३८|| भावार्थ:--- जीवांसाठी गोवर्धन पाहिजे ते रूप धारण करून पाऊस पडण्यास साह्य करतो.जो साह्य करतो त्याचा जिवांकडून अनादर होऊ नये,तर स्वरक्षण व्हावे.त्या गीरीराजास नष्ट करू नये.गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो व पाऊस पडल्यामुळे गाईंना व मनुष्यांना व पिकांना पाणी मिळते व त्यामुळे पाणी व अन्नधान्य मिळून आपला म्हणजे सर्वांचा उदारनिर्वाह होतो.याकरिता आपण भगवंत व गोवर्धन यांचे उपकार मानून त्या उपकरातून उतराई होण्याकरिता नमस्कार करू या.||३७|| | इत्यद्रिगोद्विजमखं वासुदेवप्रणोदिताः | यथा विधाय ते गोपाः सहकृष्णाव्रजं ययुः ||३८|| भावार्थ:--- अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपिकांनी गोवर्धन,गाई आणि ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा केली.त्याचप्रमाणे आपणसुद्धा भगवंत व जे प्रत्यक्ष कार्य करतात,त्यांच्यावर आदरपूर्वक भाव ठेऊन त्यांची पूजा करावी.|३८|------------------------|३८| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ शारदा |२५--- २—भगवान श्रीकृष्ण---१३-- [१३]---गोवर्धन-धारण. ३३ ||३-९-२०१९|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता ह्या पंचविसाव्या अध्यायामध्ये गोकुळाच्या नाशाकरिता क्रोधाने इंद्र वृष्टी करू लागला असता,प्रभू श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्या धारावृष्टीपासून गोकुळाचे रक्षण केले अशी कथा आहे|| इन्द्रस्तदाssत्मनः पूजां विज्ञाय विहतां नृपः | गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नन्दादिभ्यश्र्चुकोप सः ||१|| अर्थः---श्रीशुकाचर्य म्हणाला हे राजा,त्यावेळी गोपांनी आपली पूजा करावयाची टाकली असे जाणून,देवांचा राजा इंद्र,श्रीकृष्ण ज्यांचा रक्षक आहे त्या नंदादी गोपांवर क्रुद्ध झाला||१|| अधिकार नसतांना दिला कि,त्याचा अंहकार आल्याशिवाय राहत नाही.म्हणून कोणी कोणाला विनाकारण मान—सन्मान देऊ नये.इंद्राला समजले कि,आपली यावेळेस पूजा केली नाही,त्यामुळे त्याला क्रोध आला.इंद्रास क्रोध आल्यामुळे नंद आणि गोपांवर रागावला.वास्तविक पाहता मान—सन्मान दिला तरी घेऊ नये.मान,सन्मान तर मुळीच मागवून घेउ नये.इंद्र हा मान—सन्मान मागून घेतो,कारण तो त्या मान—सन्मान याचा अधीकारी नव्हता,पण लोक अज्ञानामुळे देत होते.||१|| अर्थ:---आणि क्रुद्ध झलेल्या व मीच ईश्वर आहे असा गर्व धारण करणाऱ्या त्या इंद्राने,प्रळय करणाऱ्या मुघांच्या सांवर्तकनामक गणाला गोकुळावर नाश करण्याविषयी आज्ञा करून विशेष असे सांगितले की,--||२||भावार्थ:--- इंद्रास मान—सन्मान न दिल्यामुळे क्रोधाच्या भरत त्याने प्रलय करणाऱ्या सांवर्तक नांवाच्या गणास गोकुळात पाऊस पाडण्याची आज्ञा दिली.सेवकाने जेवढे काम दिलेले आहे,तेवढेच काम करावे,त्यापेक्षा अधिक करू नये.तसे करने म्हणजे नियमांचे उल्लंघन होते--अधर्म होतो.तो स्वत:चा अधिकार विसरला व आपणच ईश्वर आहोत अशा आविर्भावात वागू लागला.वास्तविक सत्ता ही भगवंतांची आहे.भगवंतांनी त्या विभागाचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापक म्हणून त्याची नेमणूक केली होती.भगवंतांच्या सत्तेचा विनियोग भगवंतांच्या अज्ञानुसार करणे इंद्राचे कर्तव्य होते.असे असतांना तो स्वताच्या मन मानेल तसा कारभार पाहू लागला.म्हणून भगवंतांनी त्याला शिक्षा करण्याकरिता गोवार्धांच्या पूजेचा आग्रह धरून तिया इंद्राचा अंहकार घालवण्यासाठी हे सर्व कृत्य केले.तरीही इंद्राच्या लक्षात अजूनही आले नाही.तो अंहकारानेच कृत्य करू लागला.||२|| अर्थ:---अहो अरण्यामध्ये राहणाऱ्या गोपांच्या धनसंपत्तीच्या गर्वाचे वैभव किती आश्चर्यकारक आहे पहा ! ज्या गोपांनि मर्त्य (मरणधर्माने युक्त) अशा कृष्णाचा आश्रय करून अमर अशा मज देवाची अवज्ञा केली आहे ! ||३||भावार्थ:--- इंद्र हा अंहकाराच्या भावनेत गवळ्यांना नाश—अंहकार चढला आहे असे समजू लागला.वास्तविक पाहता इंद्र यासच अंहकार चढला होता.ज्याचा त्याला अंहकार दिसत नसतो.त्या श्रीकृष्णाच्या बळावर माझा[इंद्र]अपमान केला असे म्हणू लागला.||३|| | यथादृढै: कर्ममयैः क्रतुभिर्नामनौनिभैः | विद्दामान्वीक्षिकिं हित्वा तितीर्षान्ति भवार्णवम् ||४|| अर्थ:---जसे कोणी अज्ञानी पुरुषद्ध आत्मनुस्मरणरूप विद्देचा त्याग करून,तरण्यास असमर्थ असून नाममात्राने नौकेसारख्या भासणाऱ्या कर्ममय यज्ञांनी संसारसमुद्राला तरुण जाण्याची इच्छा करितात त्याप्रमाणे पुष्कळ बोलणारा,बालक,उद्धट,व अज्ञानी असून अपनांसच पंडित असे मानणारा अशा ह्या मनुष्य असलेल्या कृष्णाचा आश्रय करून गोपांनी मज देवाचा अपमान केला आहे||४||५|| भावार्थ:---कर्म मार्गांनी संसारसागारातून तरुण जाने शक्य नाही.संसारसागरातून तरुण जाण्यासाठी ज्ञान मार्गाची गरज आहे,कारण संसारबंधन हे अज्ञानामुळे पडले आहे,याकरिता अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करावे लागणार आहे.जशी समजूत आहे,तसा व्यवहार केल्या जातो.समजूत बदलण्यासाठी ज्ञानाची गरज आहे.म्हणून ब्रह्म विद्ध्याची गरज आहे.ज्ञानानेच संसारसागर पार होतो.||४|| अर्थः---ह्या संपत्तीने मत्त झालेल्या व कृष्णाने ज्यांचे देह फुगविले आहेत अशा गोपांचा संपत्तीमदयुक्त गर्व तुम्ही घालवून टाका;यांचा गाईवगैरे पशूंचा संहार करा||६|| अर्थ:---तेव्हा भिरणाऱ्या त्या मेघांना पुन्हा म्हणाला की,--मीहि ऐरावत गजावर बसून महापराक्रमी देवगनांसहवर्तमान नंदाच्या गोकुळाचा नाश करण्याकरिता गोकुळांत येतो||७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,याप्रमाणे इंद्राने आज्ञा केलेले व प्रळय करण्याकरिता जे बांधून ठेविले होते ते बांधणे सोडून टाकलेले मेघ,नंदाच्या गोकुळाला धारांच्या वृष्टींनी जोराने पिडा करू लागले||८||भावार्थ:---गोकुळवासियांना धनाची नशा चढली आहे,म्हणून माझी पूजा केली नाही.धनाची घमेंड नाहीसी होण्यासाठी अतिवृष्टी करा.त्यामुळे पिके येणार नाहीत.जनावरांना खावावयास मिळणार नाही व त्यामुलेत्या गाईंचा—जानावारांचासान्हार होईल.असे झाले असता त्यांची जीवहानी व वित्तहानी होईल.असे झाले असता त्यांचा अंहकार नाहीसा होईल.तेव्हा तेमाझी पूर्वीप्रमाणे पूजा—आर्च करू लागतील.म्हणजेच मला शरण येतील.तेव्हा त्यांचा अंहकार नाहीसा होईल व मला आदर,मान—सन्मान देतील.||५|| | इत्थं मघवताssज्ञप्ता मेघा निर्मुक्तबन्धना: | नन्दगोकुलमासारैः पिडयामासुरोजसा ||८|| अर्थ:---विजांच्या योगाने प्रकाश पावणारे,वज्रपातांसह गर्जना करणारे,तीव्र अशा आव्ह प्रवह इत्यदिक प्रळयकाकरक वायूंनी प्रेरित झालेले ते मेघ,पाण्याच्या गारांची वृष्टी करू लागले||९|| ||९—९—२०१९||भावार्थ:---इंद्राने मेघांना आज्ञा दिल्यानंतर मुसळधार पाऊस सुरु झाला.त्यामुळे गोकुळाला पिडा—त्रास होऊ लागला.पाऊस पडत असल्यामुळे त्यांचे कामे बंद पडली.गाईंना चार खाता येईना.एकमेकांचे सर्व व्यवहार बंद पडले.काय करावे असे कांहीच सुचेना.||८|| अर्थ:---ते मेघ,एकसारख्या खंबाएवढ्या मोठ्या वृष्टीच्या धारा सोडू लागले असता पाण्याच्या ओघांनी बुडून गेलेली भूमि,उंच किंवा सखल मुळीच दिसत नाहींशी झाली ||१०||अर्थ:---त्यावेळी गाईवगैरे गोपा व गोपी हि अतिवृष्टीने,अतिवायुने व थंडीने थरथर कांपत असता गोविंदाला शरण गेली||११||अर्थ:--- वृष्टीने पिडीत झालेल्या व थरथर कापणाऱ्या गाई तर आपली मस्तके व वत्स यांना देहाने आच्छादन करून भगवंताच्या पायांजवळ प्राप्त झाल्या||१२|| अर्थ:---गोप व गोपी म्हणाल्या की,----हे कृष्णा,हे कृष्णा,हे महाभाग्यवंता,प्रभो,भक्तवत्सला,ज्यांचा नाथ तूंच आहेस अशा गाईच्या कुळांचे व आमचे,क्रोधयुक्त झालेल्या ह्या देवापासून रक्षण करण्यास तू योग्य आहेस||१३|| | कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो | त्रातुमर्हसी देवान्नः कुपिताद् भक्तवत्सलः ||१३|| अर्थ:---तेव्हां प्रार्थना करण्याच्या पूर्वींच शिलायुक्त वृष्टीच्या पडण्याने तडित झाल्यामुळे अचेतनप्राय झालेले गोकुळ जाणून भगवान श्रीहरीने,ते रागावलेल्या इंद्राचे कर्म असे जाणिले||१४||अर्थ:---ते असे की,--वृष्टी होण्याचा काळ नसता अतिभयंकर,मोठ्या वाऱ्याने युक्तव जिच्यामध्ये शिळाच पुष्कळ आहेत अशी वृष्टी,आपला याग आम्ही मोडीला म्हणून गोकुळाच्या नाशाकरिता इंद्र करीत आहे||१५||अर्थः---असो.आता तिचा प्रतिकार मी आपल्या सामर्थ्याने उत्तमप्रकारे साधितो आणि मुर्खपणामुळे लोकांचे अधिपती आम्हीच आहो असा अभिमान धारण करणाऱ्या इंद्रादी लोकपालांचे श्रीमदरूप अज्ञान घालवितो||१६|| | तत्र प्रतिविधिं सम्यगात्मयोगेन साधये | लोकेशमानिनां मौढ्याद्धरीष्ये श्रीमदं तमः ||१६|| अर्थ:---आता देव सात्विक असून भक्त आहेत त्यांना अज्ञान कसे ? असे म्हणावे तर—ज्याअर्थी सत्वगुण किंवा भक्ति असणाऱ्याहि देवांना आम्हीच ईश्वर असा गर्व होण्यास योग्य नाही त्याअर्थी ते हल्ली दृष्ट झाले आहेत तेव्हां मजपासून त्या दृष्टांचा मानभंग झाला असता हा त्यांच्यावर अनुग्रहच होणार आहे||१७||भावार्थ:--- आपणही आपल्या अज्ञानामुळे---मुर्खपणामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून करून इतरावर अन्याय करु शकतो.अन्याय करणे दोष---अधर्म आहे.अखेर शेवटी त्या अधर्माचे फळ,ज्याचे त्याला भोगावे लागते.म्हणून सर्वांनी अहंकाराचा त्याग करावा.अधर्माचा त्याग करून धर्माप्रमाणे आचरण करावे.त्यातच आपले हित असते.आपण आपले हित करावे.||१६|| | हि सद्भावयुक्तानांसुरानामीशविस्मयः | मत्तोsसतां मानभगःप्रशमायोपकल्पते ||१७|| अर्थ:---यास्तव मी आपल्या सामर्थ्याने,ज्याचा रक्षक मीच आहे व ज्याला मी आपले असे म्हंटले आहे त्या मला शरण आलेल्या गोकुळांचे रक्षण करितो;हाच मी आता संकल्प केला आहे||१८||भावार्थ:--- अभिमान हा सत्वगुण कमी होऊन रजोगुण वाढला म्हणजे होत असतो.त्यासाठी त्याचा अभिमान घालवला तरच याला शांतता मिळेल,अन्यथा याला दु:ख भोगावे लागेल.ईश्वर जीवांचा अभिमान घालवण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतो.||१७|| अर्थ:---असे म्हणून त्या श्रीकृष्णाने सहज लीलेने एका हाताने गोवर्धन पर्वत उपटून,जसा लहान बालक छत्राक (अळंबे) धारण करितो त्याप्रमाणे डावया हातावर धारण केला||१९|| भावार्थ:--- ज्याच्या जो आश्रित आहे,त्याचे पालनपोषण करणे,हे आश्रयदाता यांचे कर्तव्य असते.आश्रय देऊन रक्षण न केले तर अधर्म घडतो.त्या अधर्माचे फळ आश्रयदाता याला भोगावे लागते.यारिता आश्रिताचे रक्षण करावेच,हाच खरा धर्म आहे.||१८|| अर्थः---नंतर तो भगवान गोपांस म्हणाला की,--हे माते,हे ताता,हे गोकुळवासी लोक हो,तुम्ही सर्वांनी आपापल्या गोवर्धनासहवर्तमान सुखाने अडचण न करिता चार कोस लांब असलेल्या पर्वताच्या ह्या खाग्यामध्ये प्रवेश करा||२०||अर्थः---ह्या खळग्यामध्ये राहणाऱ्या तुम्ही माझ्या हातावरून पर्वत खाली पडेल अशी शंका मनामध्ये मुळीच आणू नका.वाऱ्याचे व वृष्टीचे जे भय तेसुद्धा आता तुम्ही मनांत आणू नये.कारण,त्यापासून तुमचे रक्षण मी योजिले आहे||२१|| भावार्थ:--- भगवंतांनी सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उखडून छत्रीसारखा धारण केला,आणि म्हणतात,”आई—बाबा आणि व्रजवासीयांनो !तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वतांच्या खाली आरामात बसा.हा पर्वत तुमचे सर्व प्रकारे सरंक्षण करेल.हा घाली पडणार नाही व तुम्हास पाऊस लागणार नाही.येथे तुमची सर्व प्रकारांची व्यवस्था होईल.तुम्ही या ठिकाणी बसल्यामुळे सुख होईल.||२०|| अर्थः---असे सांगून मनाल विश्वास पावविलेले ते गोप,भागवताने सांगितल्याप्रमाणे आपापले समान गाड्यांवर घालून गोधनासहवर्तमान व सेवकपुरेहितादिकांसहवर्तमान दाटी न होईल तशा रीतीने पर्वताच्या त्या खळग्यामध्ये प्रविष्ट झाले||२२|| अर्थः---नंतर कृष्णदर्शनाच्या आनंदाने,क्षुधेचे व तृषेचे दुःख आणि सुखाची इच्छा यांचा त्याग करून त्या गोकुळवासी लोकांनी अवलोकन केलेले तो श्रीकृष्ण,पर्वताचे धारण करून राहिला.तो सात दिवसपर्यंत त्या स्थानावरून हाललासूद्धा नाही||२३|| अर्थः----कृष्णाचे ते सामर्थ्य पाहून अतिविस्मित,गर्वरहित व श्रष्टसंकल्प झालेल्या इंद्राने,आपल्या मेघांचे निवारण केले||२४|| भावार्थ:--- सगळे वज्रवासी भगवंतांकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहत आसल्यामुळे त्यांना तहान—भुकेचा विसर पडला,दु:खाचा विसर पडला,सर्व कांही विसरले,कारण भगवंत सन्मुख असण्याचा हा परीणाम झाला.म्हणून आपण आपले मन भगवंतांत ळावले कि—एकरूप केले कि,आपल्यासही सर्वांचा विसर पडतो.त्यासाठी आपली वृत्ती भगवंताकार करावी लागते--आभ्यास करावा लागतो.||२३|| | कृष्णयोगानुभावं तं निशाम्येन्द्रोsतिवीस्मितः | निःस्तम्भो भ्रष्टसंकल्पः स्वान् मेघान् संन्यवारयत् ||२४|| अर्थः---तेव्हां,आकाश मेघरहित व सूर्याच्या उदयाने युकत झाले आणि भयंकर वारा व दृष्टि ही शांत झाली,असे पाहून गोव धर्नधारी श्रीकृष्ण सर्व गोपाना म्हणाला की,---||२५|| भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या योगमायेचा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.शिक्षा केली म्हणजे अहंकार नाहीसा होतो.इंद्राचा अंहकार कमी झाला.म्हणून आपला अंहकार जाण्यासाठी शिक्षांचा स्वीकार करावयास पाहिजे.||२४|| अर्थः---गोप हो,आता वारा व वृष्टी शांत झाली.नाद्दायाचे पाणीही अगदी थोडे झाले,यास्तव तूनही आता आपापल्या स्त्रिया,गोर्धने व बालक यांसहवर्तमान या खळग्यातून बाहेर पद.पुन्हा आपणास भीती प्राप्त होईल असे मनांत मुळीच आणू नका||२६|| | निर्यात त्यजत त्रासं गोपाः सस्त्रीधनार्भकाः | उपारतं वातवर्षं व्युदप्रायाश्च निम्नगाः ||२६|| अर्थः---नंतर ते सर्व गोप,आपापले समान गाड्यांवर घालून आपापले गोधन ग्रहणकरून स्त्रिया,बकल व वृद्ध यांसहवर्तमान हळूहळू बाहेर पडेल||२७|| भावार्थ:---भगवंत बाळकृष्ण म्हणतात कि,”आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया,गोधन,मुले,वगैरे जे आहेत,त्यांना घेऊन गोवर्धनाच्या बाहेर या.आता पाऊस व वादळ थांबले आहे.नदीचे पाणी ओसरले आहे.कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही.आपणही भगवंतांची निष्काम भाक्तीकेली तर आपणास कोणत्याही प्रकारांची भीती राहत नाही.निष्काम भक्ती करून अनुभव घ्यावा.||२६|| अर्थः---नंतर भगवान प्रभू श्रीकृष्णानेही सर्व लोक पाहत असता,सहजलीलेने त्या पर्वताला त्याच्या स्थायी पूर्वीप्रमाणे ठेविले||२८|| अर्थः---नंतर त्या रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाला प्रेमाच्या वेगाने पूर्ण,झालेले गोकुळवासी सर्व लोक,यथायोग्य आलिंगनादिकेकरून भेटले तशाच गोपिही स्नेहयुक्त आनंदाने दही,अक्षता व पाणी यांच्या योगेकरून पूजन करून उत्तम आशीर्वाद देऊ लागल्या ||२९|| अर्थः---यशोदा,रोहिणी,नंद व बलवानामध्ये श्रेष्ठ असा राम,हे स्नेहाने व्याकूळचित्त असता कृष्णाला आलिंगन देऊन आशीर्वाद देऊ लागले ||३०|| भावार्थ:---भगवंतांनी पाऊस व वादळ यापासून स्वरक्षण केल्यामुळे सर्वांच्याप्रेमांचा विषय बाळकृष्ण झाला.सरस्व त्यांचे मन बालकृष्णात लागले.प्रेमांनी वेडे झाले.कोणी भागावान्तान्नामिठी मारू लागले,कोणी त्याचे चुंबन घेऊ लागले,कोणी कडकडून मिठी मारू लागले,वयस्कर ज्या गोपी होत्या,त्यांनी भगवंतांचा मंगलविधी केला आणि त्यांना शुभाशिर्वाद दिले.आपणास असे भगवंतांचे वेद्लागावयास पाहिजे.आपला विषय भगवंत व्हावा.आपला विषय भगवंत होण्यासाठी देह व देहसंबंधीचा विसर पडावयास पाहिजे.असा विसर पडल्यानंतर भगवंतांचे वेड लागते,भगवंतांचे पिसे लागते.नाशिवंत जे विषय आहेत--विसर पाडावा लागतो.||२९|| | यशोदा रोहिणी नन्दो रामश्च बलिनां वरः | कृष्णमालीग्य युयुजुराशिषः स्नेहकातराः ||३०|| अर्थः---त्यावेळी श्रीकृष्णाने इंद्राचा निग्रह करूनही गोकुळचे संरक्षण केले असता स्वर्गलोकाचेठिकाणी असणारे देवगण,साध्य,सिद्ध,गंधर्व व चारण हे,खिन्न झत्तले नाहीत तर,मनामध्ये संतुष्ट झाले आणि वाणीने स्तुति करून देहाने पुष्पवृष्टि,करू लागले||३१|| भावार्थ:---बलरामदादा यांनी प्रेमाविव्हाल अंत:करणाने हृदयासी कवटाळून धरले,कारण भगवंतांचे आकर्षण तसे असते.त्यांचा सानिध्यात गेले कि जीवांची अवस्था अशी होते.याकरिता तन—मन—धनाने म्हणजेच सर्स्वाने शरण गेल्यास असी अवस्था होते.यासाठी भगवंतांचा अनुभव आपानांना येण्यासाठी आपणही सर्स्वाने शरण जावावयास पाहिजे.आपणास अनुभव येतो.||३०|| अर्थः---हे राजा,तसेच त्यावेळी स्वर्गावर देवांनी वाजविलेले शंख व दुंदुभि वाजू लाफ्ले,नारद तुंबर इत्यादिक गंधर्वापती गायन करू लागले||३२||अर्थः---हे राजा,तदनंतर प्रेमाने युक्त अशा गोपांनी परिवेष्टित असा तो श्रीकृष्ण,बलरामासहवर्तमान त्या स्थानापासून गोकुळांत प्रविष्ट झाला.त्यावेळी प्रेमभावामुळे श्रीकृष्णाला मानंतून आवडणाऱ्या त्या गोपीही कृष्णाची त्या गोवर्धनोद्धरणासारखी दुसरीही चरित्रे गायन करीत करीत आनंदयुक्त होऊन गोकुळांत जावयास निघाल्या ||३३|| | ततोsनुरक्तैः पशुपैः परीश्रीतो राजन् स गोष्टं सबलोsव्रजद्धरिः तथाविधान्यस् कृतानि गोपिका गायन्त्य ईयुर्मुदिता हृदिस्पृशः||३३|| भावार्थ:--- ज्यांनी आपल्यावर उपकार केले,त्यांचे उपकाराचे स्मरण ठेऊन,त्यांचे ते उपकार फेडण्याचा व गुणवर्णन करण्याचा प्रयत्न करावा.यात आपले हित झालेले असते व पुन्हा हित होत असते,कारण पुन्हा ते उपकारकर्ते आपल्यावर उपकार करतात.||३३||-----------------------------------------------------------||३३||______________________________________________________________________________________________________| ||२६|| श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांनी नांदांशी वार्तालाप ||२५|| |________________________________________________________________________________________________________ |आता या सव्विसाव्या अध्यामध्ये श्रीकृष्णाची अद्भुत कार्मो पाहून विस्मित झालेल्या गोपांना,नंदाने गर्गऋषीचे भाषण सांगून कृष्णाचे ऐश्वर्य वर्णन केले अशी कथा वर्णन केलेली आहे |अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला – हे राजा,ह्या गोवर्धनोद्धरणासारखी दुसरीही श्रीकृष्णाची अमानुष कर्मे पाहून त्या कृष्णाचा प्रभाव न जाणत असल्यामुळे आश्चर्ययुक्त झालेले गोप,नंदाजवळ जाऊन म्हणाले की,||१|| अर्थ---हजे नंदराजा,ज्याअर्थी,या कृष्णबालकाची ही सर्वथह कर्मे आश्चर्यकारक आहेत त्याअर्थी हा ग्राम्य अशा आम्हा गोपांमध्ये आपल्याला आयोग्य असे जन्म पावण्यास कसा योग्य होईल?होणारच नाही||२||अर्थ:---जो सात वर्षंच्या वयाचा बालक (कोणतेही मोठे कर्म करण्यास असमर्थ)असून त्याने,जसा गजेंद्र,सोडेने कमळ उपटून धारण करून उभा राहतो त्याप्रमाणे एका हाताने लीलेने,गोवर्धन पर्वत उपटून कसा बरे धारण केला ! ||३||अर्थः---अगदी डोळे मिटून राहिलेल्या (अगदीच लहान )अशा ह्याने महाबळी पूतनेचा स्तन,प्राणासह वर्तमान जसे काळाने देहाचे आयुष्य शोषण करावे त्याप्रमाणे कसा बरे शोषण केला?||४||अर्थः---गाड्याच्या खाली निजून वर पाय करणाऱ्या व तीन महिन्याचा असून रडत असलेल्या या कृष्णाच्या प्यांच्या अंगठ्याने ढकलून दिलेला गाडा कसा बरे उलटा होऊन,पडला ?||५||अर्थः---एकवर्षाचा अंगणांत बसलेला (चालण्यासही असमर्थ)व तृणावर्त दैत्याने आकाशात नेलेला अशा ह्या कृष्णाने,ग्ला दाबल्यानेच कासावीस झालेल्या त्या तृणावर्तला असे बरे मारिले ! ||६||अर्थः---एकेवेळी लोण्याची चोरी केली असता रागावलेल्या यशोदामातेने उखळाचेठिकाणी बंधिलेल्या व हातांनी व गुडघ्यांनी रांगत रांगत अर्जुनवृक्षांच्या मधून जाणाऱ्या याने,ते अर्जुनवृक्ष कसे बरे पडिले||७||अर्थः---एकेवेळी बलरामा सहित व बालकांनी परिवेष्टित असलेल्या याने,वनामध्ये वासरे चरित असता,आपणाला चोचेने मारण्याकरिता ब्काच्या वेषाने प्राप्त झालेल्या शत्रूच्या (दैत्याच्या)तोंडाची खालची व वरची अशा दोन्ही चांचुपुटाना हातांनी धरून कसे बरे फाडून टाकिले ?||८||अर्थः---तसेच आपणाला मारण्याच्या इच्छेने वात्सामध्ये वात्साच्या रूपाने प्रवेश करणाऱ्या वत्सासुराला सहज लीलेने मारून,त्याचा देह कंवठीच्या झाडावर फेंकून त्याच्या योगाने कंवठे कशी बरे पडिले ?||९||अर्थः---तसेच बलरामासहित असलेल्या याने,धेनुकासुराला व त्याचया बांधून मारून पिकलेल्या तडफळांनी युक्त व इतरांनी प्रवेश करण्यास निर्मय असे तालवन कसे बरे केले ?||१०||अर्थः---बाळाच्या योगाने शोभणाऱ्या बळरामाकडून प्रलांबासुराला मारवून स्वता गोकुळसंबंधी पशूंना व गोपांना अरण्यातील वणव्यातून कसे बरे सोडविले ||११||अर्थः---आणि अतिक्रूर विषाने युक्त अशा कलियसर्पाल बलात्काराने दमवून,गर्वरहित झालेल्या त्याला यमुनेच्या डोहांतून घालवून देऊन या कृष्णाने यमुनानदी निर्विष उदकाची कशी बरे केली ?||१२|| अर्थः---हे नंदा,पशुपक्ष्यादिकांसाहित आम्हा सर्व गोकुळवासी लोकांचा ह्या तुझ्या पुत्राचेठिकाणी वाढलेला प्रेमा सोडवण्यास मोठा कठीण आहे,तसाच त्याचाहि प्रेमा आमचेठिकाणी स्वाभाविकच आहे,तेव्हा हाच आम्हा सर्वांचा आत्मा आहे की काय ?||१३||अर्थः---हे गोकुळाधिपते नंदा,सात वर्षांचा बालक कोठे ! व महापर्वताचे धारण कोठे !यास्तव ईश्वरावाचून हे कर्म घडणे कठीण आहे म्हणून तुझ्या पुत्राविषयी आम्हांला हा परमेश्वर आहे अशी शंका उत्पन्न होत्ये||१४||अर्थः---असे गोपांचे भाषण ऐकून नंद म्हणाला ---गोपहो,माझे भाषण ऐका,आणि त्याच्या योगाने माझ्या बालकाविषयी जी तुम्हांला शंका प्राप्त झाली आहे ती दूर होऊ द्या.या पुत्राला उद्देशून गर्गाचार्याने जे मला सांगितले आहे ते तुम्हांला सांगतो ||१५||अर्थः---प्रत्येक युगामध्ये अवतार ग्रहण करणाऱ्या या तुझ्या पुत्राचे पंधरा,तांबडा व पिंवळा असे तीन वर्णन असून आता हा कृष्णापणा पावला आहे||१६||अर्थः---हा श्रीमान तुझा पुत्र,पूर्वी एकेवेळी वसुदेवाचा पुत्र झाला होता म्हणून ते जाणणारे पुरुष याला वासुदेव असे म्हणतात ||१७||अर्थः---हे नंदा,तुझ्या पुत्राची,गुणांना व कर्मांना अनुसरून राहणारी नवे स्वरूपे ते पुष्कळ आहेत ती मी जाणत आहे इतर कोणी जाणत नाही||१८||अर्थः---हा पुत्र तुन्हाला परलोकी सुख उत्पन्न करील व या लोकीही तुम्हा सर्व गोपांना व गाईना हा आनंद करणारा होईल.याच्या योगाने तुम्ही,इतरांनी दुर्निवार्य अशी दुःखे अनायासाने तरुण जाल||१९||अर्थः---हे गोकुळाधिपते,पूर्वी भूमीवर कोणीच राजा नाहीस झाला होता तेव्हा चोरांनी पिडीत झालेल्या व या श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या साधूंनी बालादिकांच्या योगाने वृद्धीगत होऊन अनायासाने चोरांनी जिंकिले होते||२०||अर्थः---जे अनेक जन्मांमध्ये पुण्य संपादन केलेले महाभाग्यवंत मानव,याच्यावर प्रिती करितात त्यांचा पराभव शत्रू,जसा विष्णूने रक्षण केलेल्या देवांचा पराभव दैत्य कधीच करीत नाहीत तसा करीत नाहीत||२१||अर्थः---यास्तव हे नंदा,हा तुझा पत्र गुणांनी,संपत्तीने,कीर्तीने व पराक्रमाने नारायणासारखा आहे नंदा म्हणतो---गोप हो,असे गर्गाचार्याने मला सांगितले आहे म्हणून याच्या कार्मंविषयी कोणतेच आश्चर्य मानण्यासारखे नाही||२२||अर्थः---असो.असे मला गर्गऋषि,आपल्या घरी निघून गेला असता त्यावेळी मी तसे (मोठा गुणी होईल असे )मानीत होतो परंतु आता भक्तजणांची दुखे घालविणारी कर्मे करणाऱ्या याला हा साक्षात नारायणाचा अंश आहे असे मानितो ||२३||अर्थः---या प्रमाणे गर्ग गीत रूप नंदाचे भाषण ऐकून,अचिंत्यपराक्रमी अशा त्या श्रीकृष्णाचा प्रभाव ज्यांनी पहिला व ऐकिला आहे असे ते गोप,नंदाचा व श्रीकृष्णाचा सत्कार करून आनंदयुक्त व आश्चर्यरहित झाले ||२४||अर्थः---आता सर्वही गोवर्धनोद्धारणरूप चरित्राचे स्मरण करीत,ऐश्वर्य प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या प्रीतीची प्रार्थना करितो – आपला यज्ञ बंद केला म्हणून रागाने गोकुळाच्या नाशाकरिता इंद्र वृष्टी करू लागला असता,वज्रपात,गारांची वृष्टी व तीव्रवायू यांच्या योगाने ज्यातील गोपाळ,पशु व स्त्रिया दुखी झाल्या होत्या व ज्याच्या रक्षक आपण आहे अशा गोकुळाला पाहून द्या उत्पन्न झालेल्या व हंसून गोवर्धनाद्धारणाची प्रौढ धारण करणाऱ्या ज्या श्रीकृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत उपटून,जसा लहान बालक लीलेने अळंबे उटपून धारण करितो त्याप्रमाणे धारण करून गोकुळचे रक्षण केले तो इंद्राचा गर्व हरण करणारा व गाईंचा अधिपती श्रीकृष्ण,आम्हा वक्त्यांश्रोत्यांवर संतुष्ट होवो||२५|| ___________________________________________________________________________________________ |२७--- शारदा २---१४---श्रीकृष्ण—[१४]श्रीकृष्णांना अभिषेक. २८ | ___________________________________________________________________________________________ | आता या सत्ताविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचा मोठा प्रभाव अवलोकन करून,कामधेनु व इंद्र यांनी,श्रीकृष्णाला गाईच्या व गोकुळाच्या अधिपत्याविषयी जो अभिषेक केला त्या उत्सवाचे वर्णन केले आहे | | गोवर्धने धृते शैल आसाराद् रक्षिते व्रजे | गोलोकादाव्रजत् कृष्णं सुरभिः शक्र एव च ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाले:---हे राजा,श्रीकृष्णाचे गोवर्धन पर्वत धारण केला असता व धारांच्या वृष्टीपासून गोकुळाचे रक्षण केले असता,स्वर्गावरून इंद्र व गोलोकापासून कामधेनु ही उभयतांही कृष्णाजवळ प्राप्त झाली||१|| भावार्थ:--- श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकूळाचे रक्षण केले,तेव्हा त्यांच्याकडे गोलोकातून कामधेनु आणि स्वर्गातून इंद्र आला,कारण भगवंतांच्या सत्तेचा,सामार्थेचा परिणाम झाला.आपल्याकडे कोनते ना कोणते सामर्थे असण्यापेक्षा जीवब्रह्मऐक्याच्या ज्ञानाच्या अनुभवाचे सामर्थे असावयास पाहिजे,कारण त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होत असते.किंवा जीव—ब्रह्मऐक्याच्या ज्ञानाचे सामर्थे यामुळे जन्म—मरण निवृत्त न होता संस्कार फक्त होतात.किंवा निष्काम भक्तीचे सामर्थे किंवा निष्काम कर्माचेसामर्थे असले म्हणजे अंत:करण शुद्ध होऊन आपल्यातील दोष निवृत्त होत असतात.किंवा सकाम भक्तीचे किंवा सकाम कर्माचे किंवा धर्माने धन—मान—प्रतिष्ठा—सत्ता हे सामर्थे असावयास किंवा नसावयास पाहिजे.कारण यामुळे तात्पुरते सुख मिळून अंती दु:खच मिळत असते.अधार्मिक धन—मान—प्रतिष्ठा—सत्ता हे सामर्थे नसावयास पाहिजे,कारण यामुळे मृत्यूनंतर केवळ दु:खच मिळत असते.असा विवेक करून मोक्ष मार्गाचा स्वीकार करावा.||१|| | विविक्त उपसन्गम्य व्रीडीतः कृतहेलन: पस्पर्श पादयोरेनं किरीटेनार्कवर्चसा ||२|| अर्थ:---त्यामध्ये इंद्राने येऊन काय केले ते सांगतो –अपराध केल्यामुळे लज्जित झालेल्या इंद्राने,एकांती श्रीकृष्णाजवळ जाऊन सूर्यासारख्या तेजानेयुक्त अशा आपल्या कीरीटाने त्याच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला.||२||भावार्थ:--- इंद्राने भगवंतांची अवहेलना केल्यामुळे तो लज्जित झाला.त्याच्याकडून चूक झालेली त्याच्याच लक्षात आली.म्हणून तो भगवंतांना एकांत स्थानी जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला.आपण मात्र लज्जित होण्यासारखे कार्य करू नये. याकारीते विवेकापूर्व कार्य करावे.विवेकपुर्वक कार्य केले असता आपल्याकडून चूक होत नाही.चूक न त्यामुळे अहित होत नाही.||२|| अर्थः---आणि अमित तेजाने युक्त अशा कृष्णाचा गोवर्धनोद्धारनादिक व पुतनानिधानादिक प्रभाव ज्याने पाहिला व ऐकिला आहे म्हणून ‘मीच त्रैलोक्याचा अधिपती असा’ज्याचा मद नष्ट झाला आहे असा तो इंद्र,हात जोडून म्हणाला की,||३||भावार्थ:--- परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून—ऐकून आपणच तिन्ही लोकांचे स्वामी आहोत असा इंद्रांना अंहकार झाला होता,तो नाहीसा झाला,कारण त्याचे पाऊस पाडण्याचे कार्य ज्या उद्ध्याशाने केले होते,तो त्याचा उद्ध्येश साध्या न होता त्याची फजिती झाली.त्यामुळे तो लज्जीत झाला.त्यामुळे त्याचा अंहकार नाहीसा झाला आपण कोण आहोत व आपले कार्य काय आहे,त्याचे त्याला स्मरण झाले.आपण भगवंतांचे सेवक आहोत व भगवंतांच्या आज्ञानुसार आपण पाऊस पाडण्याचे कार्य देवतेकडून करून घ्यावावयाचे असते,असे त्याला स्मरण झाले.आता तो भगवंतांची स्तुती करू लागला.||३|| अर्थः---इंद्र म्हणाला:---हे देवा,तुझे स्वरूप एकरूपी,सर्वज्ञ,आणि जेथे रजोगुण व तमोगुण मुळींच नाहीत असे शुद्धसत्वात्मक आहे तुला अस्मदादिकांचेठिकाणी दिसणारा हा मायाकार्यरूप,अज्ञानोत्पन्न संसार मुळीच नाही ||४||अर्थः---जर तुला अज्ञान व अज्ञानाचाकार्यरूप देहसंबंध हेच नाहीत तर अज्ञानाने केलेले व पुन्हा दुसरा देह उत्पन्न होण्यास कारण व अज्ञानी पुरुषांचा आश्रय करून असणारे जे लोभमोहादिक ते कोठून बसे असतील?तथापि हे ईश्वरा,ऐश्वर्यादिगुणांनी पूर्ण असा तू धर्माच्या रक्षणाकरिता व खालांच्या निग्रहाकरिता त्यांना मानभंगादिरूप दंड धारण करितोस||५||अर्थः---आता तुझ्या दांडाविषयी मज गोपपुत्राला शक्ति कोठे आहे? कारण कोणते ? व मी दंड तरी कोणता धारण केला आहे ? असे म्हणशील तर –हे प्रभो तू सर्वजगतांचा जनक,उपदेश गुरु आणि नियंता आहेस म्हणून तुला दंड करण्याचे कारण आहे.तू दस्तर कालरुपी आहेस म्हणून तू दंड करण्या समर्थ आहेस यास्तव तू दंडधारण करून,जगदीश्वर असा अभिमान धारण करणाऱ्या आमच्या हिताकरिता आपल्या लीलावतारांनी क्रीडा करितोस;तुझी लीलाच मानभंग कयन आमचे हित करिते||६||अर्थः---हे कसे म्हणशील तर --- जे माझ्यासारखे अज्ञ असून आम्ही जगदीश्वर आहो असा अभिमान धारण करितो ते,भय मानण्याच्या वेळीही भायानी गणना न करणाऱ्या तुला पाहून,तत्काळ जगदीशमदाचा त्याग करून गर्वरहित असते तुझ्या भक्तिलक्षणमार्गाचे सेवन करितात.यास्तव तुझी लीला खालांनासुद्धा दंडरूपच आहे||७|| अर्थः---याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचे व अभिप्रायाचे वर्णन करून,आता त्याने आपली क्षमा करावी अशाविषयी प्रार्थना करितो कि,--हे प्रभो,तो तू वृष्टि करून अपराध करणाऱ्या ऐश्वर्यमदाने व्याप्त होऊन तुझा प्रभाव न जाणणाऱ्या व मुधाचीत्त अशा माझ्या अपराधाची क्षमा करण्यास समर्थ आहेस.हे ईश्वरा,आता पुन्हा अशी दृष्टबुद्धी मला कधीच प्राप्त होऊ नये||८||अर्थः---हा मोठा अपराध कसा सहन करावा असे म्हणशील तर --- हे अधोक्षजा देवा,ह्या भूमीवर झालेला हा तुझा अवतार,स्वता भाररूपी असून पुष्कळ भारांची उत्पत्ती करणाऱ्या सेनांचे अधिपती अशा राजांच्या नाशाकरिता व तुझ्या चरणाची सेवा करणाऱ्या साधूंच्या उत्कर्षाकरिता आहे.यास्तव तू,तुझा सेवक असून अत्यंत अपराध करणारा जो मी त्याच्या अपराधाची क्षमा करावी||९||अर्थः---सर्वातर्यामी,अपरीच्छिन्न,वासुदेव व यादवांचा अधिपती अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न तुज श्रीकृष्णाला नमस्कार असो ||१०||अर्थः---तर मी काय यादव आहे?असे म्हणशील तर नाही,आपल्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे देहाचा स्वीकार करणारा,शुद्धज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे अशा सर्वरूपी,सर्वांचे कारण अशा तुज सर्वभूतात्म्याला नमस्कार असो ||११||अर्थः---आता आपला अपराध निवेदन करितो हे भगवान.माझा यज्ञ गोपांनी मोडीला असता अतिक्रोधयुक्त व अभिमानी अशा मी,गोकुलाच्या नाशाकरिता हे वृष्टीरूप भलतेच कृत्य आचरण केले आहे||१२||अर्थः---तथापि हे ईश्वरा,तू माझा उद्योग व्यर्थ करून व गर्व घालवून मजवर अनुग्रह केला आहेस,म्हणून आता ईश्वर,गुरु व आत्मा अशा तुला मी शरण आलो आहे||१३||अर्थः---याप्रमाणे इंद्राने स्तुति केली असता भगवान श्रीकृष्ण,हास्य करीत करीत मेघासारख्या गंभीरवाणीने त्याला असे म्हणाला कि||१४||अर्थः---श्रीभगवान म्हणाला –हे इंद्रा,तुझ्यावर अनुग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या मी,देवांच्या राज्याने निरंतर अत्यंत मत्त झालेल्या तुझ्या यज्ञाचा भंग केला आहे||१५||अर्थः---मी ज्याच्यावर अनुग्रह करण्याची इच्छा करितो त्याला संपत्तीपासून श्रष्ट करितो.कारण,अधिपत्याचया व संपत्तीच्या मदाने आंधळा (विवेकशून्य)झालेला पुरुष,दंड धारण करणाऱ्या कालयमादिरूपी मजप्रत पाहत नाही||१६|| अर्थः---हे इंद्रा,तुम्ही स्वर्गावर गमन करावे आणि माझी आज्ञा पालन करावी.तेणेकरूनच तुमचे कल्याण होईल.गर्वरहित व सावधान अशा वरुणादिक सर्व तुम्ही आपापल्या अधिकारांवर राहवे||१७||अर्थः---नंतर संतुष्टचित्त झालेली कामधेनु,आपल्या संततिरूप गाईसहवर्तमान गोपरूपी त्या ईश्वर श्रीकृष्णाला वंदन करून व हे कृष्णा,तू आमचे चांगले रक्षण केलेस असे अभिनंदन करून म्हणाली की,--||१८||अर्थ---कामधेनु म्हणाली –हे कृष्णा,हे कृष्णा हे अचिंत्यशक्तियुक्ता,विश्वोत्पादका,जगन्मुर्ते,अच्युता,सर्व लोकांना नाथ अशा तू,इंद्राने मार्लेल्याही आमचे रक्षण केले आहेस||१९||अर्थः---हे जगत्पते,ज्याअर्थी तू आमचे सर्वोत्कृष्ट दैवत आहेस त्या अर्थी गाई,ब्राम्हण,देव व जे साधु आहेत त्या सर्वांच्या उत्तरोत्तर अभ्युदयाकरिता तूच आमचा इंद्र हो||२०||अर्थ:---आता तुमचा इंद्र दुसरा आहे,असे म्हणशील तर –त्या इंद्राच्या इंद्रपणाने आता पुरे झाले.ब्रम्हदेवाने प्रेरणा केलेले आम्ही,तुलाच आमच्या इंद्रपानाच्या अधिकाराविषयी अभिषेक करितो.आता देवच इंद्र होतो,मी मनुष्य कसा होईन ?असा म्हणशील तर --- हे सर्वेश्वरा,तू भूमीचा भर दूर करण्याकरिता अवतीर्ण झाला आहेस.तू मनुष्य नव्हेस||२१||भावार्थ:--- भगवंतांचे स्वरूप काय आहे व आपले स्वरूप काय आहे,याचे त्याला स्मरण झाले,कारण त्याचा अंहकार निहीसा झाला होता.याकरिता आपणास कोणताही अंहकार येऊ नये.अंहकार हा आपण कोण आहोत व इतर कोण आहेत असे कळू देत नाही.जसे दारू या मादक द्रव्याचे सेवन केल्यामुळे त्यामुळे आलेली नशा,व त्या नशेचा परिणाम,आपण कोण आहोत व इतर कोण आहेत याचे स्मरण होऊ देत नाही.त्याचप्रमाणे अंहकाराच्या नाशामुळे आपल्यास आपण कोण आहोत व इतर कोण आहेत याचे स्मरण होऊ देत नाही.याकरता कोणत्याही कार्याचा अंहकार येऊ नये कारण तो अंहकार अहित करतच असतो.याकरता विवेक करा.||४|| | एवं कृष्णमुपामन्त्र्य सुरभिः पयसाssत्मनः | जलैराकाशन्गाया ऐरावतकरोद्धृतेः ||२२|| | इन्द्रः सुरर्षिभिः साकं नोदितो देवमातृभिः | अभ्यषिन्चत दाशार्हां गोविन्द इति चाभ्यधात् ||२३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,याप्रमाणे कामधेनुने,श्रीकृष्णाची प्रार्थना करून आपल्या दुधाच्या योगाने त्याला अभिषेक केला.तसाच अदितिवगैरे देवमातांनी प्रेरणा केलेल्या इंद्रानेही,देव व ऋषि यासहवर्तमान ऐरावत गजाच्या शुंडेने उचललेल्या आकाशगंगेच्या उदकांनी श्रीकृष्णाला गाईच्या आधिपत्याविषयी अभिषेक करून त्याचे गोविंद असे नाव ठेविले||२२||२३||भावार्थ:--- अंहकार निवृत्त झाल्यानंतर इंद्राने व कामधेनुने भगवान श्रीकृष्णांना आपल्या दुधाने व इंद्राने आकाशगंगेच्या पाण्याने अभिषेक केला.भगवंतांना गोविंद हे नाव देऊन त्या नावाचे स्मरण करू लागले.त्याचप्रमाणे आपणही पवित्र पाण्याने व मनपुर्वक भगवंतांना अभिषेक करावयास पाहिजे.अभिषेक करत असतांना भगवंतांच्या नावाचे सतत स्मरण करावयास पाहिजे.||२२-२३|| अर्थः---त्यावेळी त्याठिकाणी आलेले तुंबरू,नारद,गंधर्व,विद्याधर,सिद्ध व चारण इत्यादिक देव, त्या श्रीकृष्णाचे लोकांच्या पापांचा नाश करणारे यश गाऊ लागले.हर्षाने युक्त अशा रंभादिक अप्सरा,नृत्य करू लागल्या||२४|| अर्थः---देवसमूहांमध्ये जे मुख्य देव होते ते,त्या श्रीकृष्णाच्या स्तुति करू लागले,तसचे नंदनवसंबंधी पुष्पांच्या वृष्टींनी त्याला अच्छादित करू लागले,त्रैलोक्यातील सर्वलोक परमानंद पावले.त्यावेळी गाईनी,आपल्या दुधाने पृथिविला भिजवून टाकिले||२५|| भावार्थ:--- प्रमुख देवता भगवंतांची स्तुती करून त्यांच्यावर नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू लागल्या.त्यामुळे सगळीकडे परमानंद ओसंडू लागला.आपणसुद्धा भगवंतांची स्तुती करत असतांना परमानंद ओसंडून आपण त्यात तल्लीन व्हावे.||२५|| | नानारसौघाः सरितो वृक्षा आसन् मधुस्त्रवा: | अकुष्टपच्यौषधयो गिरयोsबिभ्रदुन्मणीन् ||२६|| अर्थः---नद्या दुधवगैरे सर्व रासांना वाहू लागल्या,वृक्ष मधाचा स्त्राव करणारे झाले.साळीवगैरे सर्व ओषधी,भूमि नांगरल्यावाचूनच पिकू लागल्या.तसेच पर्वत,आपापल्यामध्ये गुप्त असलेल्या रत्नाना बाहेर प्रगटरीतीने धारण करू लागले||२६||भावार्थ:---निसर्गातील ज्या जड व जीव होते,त्यांच्यावर अनुकूल परिणाम होऊन आनंदाची अनुभूती घेऊ लागल्या.त्या वातावरणाचा परिणाम म्हणून नद्यांना रसाचा पूर आला.वृक्षामधून मधाच्या धारा वाहू लागल्या.नांगरणी व्पेरणी न करता जमिनीतून अंकुर निघून अन्नधान्य उत्पन्न होऊ लागले.दगडातून रत्ने बाहेर दिसू लागली.असा त्या वातावरणाचा परिणाम जड—जीवांवर झाला. त्याचप्रमाणे आपण अशा सात्विक वातावरण राहून आपल्याहीमानावर परिणाम होऊन आपल्यावर परिवर्तन व्हावे.||२६|| | कृष्णेsभिषिक्त एतानि सत्त्वानि कुरुनन्दन | निर्वैराण्यभवंस्तात क्रूराण्यपी निसर्गतः ||२७|| अर्थः---बा कुरुनंदना राजा,श्रीकृष्णाला इंद्रपणाने अभिषेक केला असता स्वभावाने क्रूर असणारे जे सर्पव्याघ्रादिक सर्व प्राणी तेही वागैरेहीत झाले||२७|| भावार्थ:--- भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावात:च होते,त्यांचा क्रूरपणा नाहीसा झाला,कारण ज्यांच्यात निष्कामभाव असतो,त्यांचा काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर असे जे हानिकारक दोष आहेत,त्यांची निवृत्ती होते.म्हणून नेहमी आपण निष्काम परमार्थ करावयास पाहिजे.सकाम परमार्थ केल्यास दोष निवृत्त होत नसतात.यासाठी निष्काम परमार्थ करावा.||२७|| | इति गोगोकुलपतिं गोविन्दमभिषिच्य सः | अनुज्ञातो ययौ शक्रो वृतो देवादीभिर्दीवम् ||२८|| अर्थ:---याप्रमाणे त्या इंद्राने श्रीकृष्णाला गाईच्या व गोकुळाच्या अधिपात्याविषयी अभिषेक करून नंतर श्रीकृष्णाने जाण्याविषयी आज्ञा केली असता तो इंद्र,देवादिकांसह वर्तमान स्वर्गावर निघून गेला||२८||____________________________________________________________________________________________________ ||२८|| नंदांना वरून लोकातून सोडवून आणणे -१७-- ________________________________________________________________________________________________________ आता ह्या अठ्ठ्याविसाव्या अध्यायामध्ये,श्रीकृष्ण,वरुणाच्या घराहून नंदाला सोडवून आणिले व गोपांना वैकुंठलोक दाखविला,असे वर्णन केले आहे _________________________________________________________________________________________________________अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला की,-हे राजा,एकादशीचे दिवशी निराहार उपोषण करणाऱ्या नंदाने,जनार्दन भगवंताचे पूजन करून दुसरे दिवशी,कलामात्र द्वादशी शेष असल्यामुळे,तितक्या वेळांत पारणा साधण्याकरिता एकादशीच्याच रात्री राक्षसी वेळा न जाणता अरुणोदयाच्या पूर्वीच स्नान करण्यासाठी यमुनेच्या उदकामध्ये प्रविष्ट झाला तेव्हा त्याला वरुणाच्या सेवक असुराने धरून वरुणाजवळ नेले||१-२|| अर्थः---इकडे नंदाला न पाहणारे सर्व गोप,मोठ्याने आक्रोश करुल लागले की,--हे कृष्ण,हे रामा,स्नानाकरिता गेलेले नंद कोठेच दिसत नाही.ते ऐकून सर्वज्ञ व भक्तांना अभय देणारा तो समर्थ श्रीकृष्ण,नंदाला वरुणाने दूतद्वारा नेले आहे असे जाणून,त्याच्याजवळ गेला||३|| अर्थः---तेव्हा आपल्याजवळ प्राप्त झालेल्या श्रीकुष्णाला पाहून त्याच्या दर्शनाने आनंदयुक्त झालेल्या त्या वरुणाने,मोठ्या पूजेचे श्रीकृष्णाचे पूजन करून भाषण केले की,||४|| अर्थः---वरून म्हणाला –हे प्रभो,आज तुझे दर्शन झाले म्हणून आज्च्ज मी देह धारण केल्याचे साफल्य झाले आहे व आजचा मी अर्थ मिळविला आहे म्हणजे सर्वरात्नांच्या खाणीचा अधिपती अशाही मी याच्यापूर्वी अशाप्रकारचा अर्थ कधीच मिळविला नव्हता.कारण,तुझ्या चरणाचे सेवन करणारे भक्तजन जन्ममरणादिरूप संसार—मार्गाचा अंत पावले आहेत||५|| अर्थः---यास्तव ज्या तुझ्या स्वरूपाचेठिकाणी,लोकसृष्टीची नानाप्रकारे रचना करणारी माया ऐकुंसुध्दा येत नाही,म्हणजे नसल्या सारखीच राहत्ये,त्या निरतिशयैश्वर्यसंपन्न,पूर्ण व सर जीवांचा नियंत अशा तुला नमस्कार तुला असो ||६|| अर्थः---- हे देवा,कर्तव्य कर्म व भगवद्धर्महि न जाणणाऱ्या ह्या माझ्या मूर्ख सेवकाने हा तुझा पती येथे आणिला आहे,त्या सेवकद्वारा झालेल्या माझ्या अपराधाची तू क्षमा करण्यास समर्थ आहेस||७||अर्थः----आणि हे कृष्णा,तू सर्वसाक्षी असल्यामुळे माझ्यावरही अनुग्रह करण्यास योग्य आहेस.हे पितृवत्सला गोविंदा,हा तुझा पिता (नंद)तू घेऊन जा ||८|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,याप्रमाणे वरुणाने प्रसन्न केलेला व त्या वरुनादिक लोकपालांचाही ईश्वर असा तो भगवान् श्रीकृष्ण,आपल्या नंद पित्याला ग्रहण करून व्रजवासी बंधूंना हर्ष उत्पन्न करीत गोकुळामध्ये प्राप्त झाला||९||अर्थः---नंदाने तर कधीच न पाहिलेले ते लोकपाल वरुणाचे ऐश्वर्य पाहून व त्या वरुनादिकांची कृष्णाचेठिकाणी नम्रता पाहून विस्मित झाला आणि त्याने आपल्या ज्ञातीवर्ग उपनंदादिक सर्व गोपांना ते वरुणाचे ऐश्वर्य वर्णन केले||१०|| अर्थः---हे राजा,नंतर,त्या कृष्णाला ईश्वर असे मानून,त्याचे अचिंत्य वैभव पाहण्यासाठी औत्सुक्यबुद्धी उत्पन्न झालेले ते गोप,हा सर्वेश्वर भगवान् श्रीकृष्ण,कधीच व पाहिलेल्या आपल्या ब्रम्हस्वरूपाला व वैकुंठलोकाला आम्हांस पोचवील काय ? किंवा दाखवील तरी काय ? असा संकल्प करू लागले||११|| अर्थः---असा आपल्या भक्तांचा अभिप्राय त्या सर्वसाक्षी भगवान् श्रीकृष्णाने,स्वतांच जाणून,त्याच्या संकल्पाची सिद्धी होण्याकरिता कृपेने हे चिंतन केले की,--||१२||अर्थः---या संसारामध्ये हा लोक, देहादिकांवर अहंबुद्धी,शब्दस्पर्शादिक विषयभोगांचा अभिलाषा व नानाप्रकारची कर्मे करून देवतीर्यगादिक उत्कृष्टनिकृष्टयोनीमध्ये श्रमण पावत असून,आपल्या परमार्थभूत गतीला (स्वरूपाला)खरोखर जाणत नाही ||१३|| अर्थः---असे चिंतन करून महादयाळू भगवान् श्रीकृष्णाने,आपल्या प्रकृतीहून पलीकडच्या ब्राम्हस्वरुपाला व वैकुंठनामक लोकाला गोपांस दाखविले ||१४||अर्थः---देहादिकंनी आच्छादित असलेल्या गोपांना,त्याचे दर्शन अशक्य असल्यामुळे प्रथम देहादिकांहून निराळेच ब्रम्हस्वरूप दाखविले.ते असे की,--जे ब्रम्हस्वरूप कालत्रयी राहणारे,चैतन्यरूप,देशादिपारीच्छेदरहित,स्वप्रकाशव निरंतर सिद्ध आहे.व जे,एकाग्रचित्त व मननशील असे ज्ञानी,सत्वादिक तिन्ही गुणाचा निरास झाला असता पहात असतात ते कृपेनेच दाखविले.||१५||अर्थः—तेव्हा ते सर्व गोप,ब्रम्हरूप डोहामध्ये पोचविले असतां तेथेंच निमग्न झाले.पुन्हा तेथून कृष्णाने बाहेर काढिले असतां, समाधीपासून उठल्यासारखे होऊन,त्यांनी त्याच ब्रम्हाचा वैकुंठनामक लोक पहिला.आता ब्रम्हाचेठीकाणी निमग्न झालेल्यांना पुन्हा वैकुंठलोकाचे पाहणे अघटीत आहे असे म्हणशील तर—जो श्रीकृष्ण निमित्त झाला असतां पूर्वी अक्रुरानेही वैकुंठलोक पहिला होता.म्हणजे अतर्क्यैश्वर्य संपन्न अशा श्रीकृष्णाचेठिकाणी काहीच असंभावित नाही||१६||अर्थः---असो.ते नंदादिक गोपतर त्या वैकुंठलोकाला पाहून व तेथे मूर्तिमंत वेदांनी स्तुति केलेल्या श्रीकृष्णाला पाहून परमानंदाने पूर्ण झाले.नंतर पुनः श्रीकृष्णाने तेथून बाहेर काढिले असता झोपेतून जागृत झाल्यासारखे होऊन विस्मितझाले||१७|| _________________________________________________________________________________________________________ | २९-- शारदा २---भगवान श्रीकृष्ण१४—[१] रासलीलेचा प्रारंभ. ४८ शारदा च इतपर्यंत आहे _________________________________________________________________________________________________________ आता ह्या एकूणतिसाव्या अध्यायामध्ये रासक्रीडेकरिता श्रीकृष्णाची गोपींबरोबर भाषणे व गोपींची कृष्णाबरोबर प्रतीभापणे झाली त्याचे वर्णन असून रासक्रीडा गोपींना गर्व झाला तेव्हा श्रीकृष्णाचे गुप्त होण्याचे कौतुक वर्णन केले आहे||१|| _________________________________________________________________________________________________________| भगवानपी ता रात्रिः शरदोत्फुल्लमल्लिकाः | वीक्ष्य रन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः ||१|| अर्थः---या अध्यापासून पांच अध्यायांनी रासक्रीडामहोत्सव वर्णन केला आहे.त्यात ब्राम्हादिकांच्या जयाने गर्विष्ठ झालेल्या मदनाचा गर्व घालविण्याकरिता लक्ष्मीपती भगवान् श्रीकृष्ण,गोपांच्या रासमंडलाला शोभा आणीत उत्कर्ष पावला असे वर्णन आहे||२|| भावार्थ :--- जशी शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्री चांदणे हे पांढरेशुभ्र असते,त्याचप्रमाणे पुण्य होण्याकरिता धर्माप्रमाणेच आचरण करावे लागते,अंत:करण शुद्ध होण्याकरिता निष्काम कर्म व निष्काम उपासना करावी लागते.मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती.तसेच आपल्यात दया,क्षमा व शांती हे सदगुण उमलली पाहिजेत. असे वातावरण पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय घेऊन रासक्रीडा करण्याचा संकल्प केला.त्याचप्रमाणे साधू—संत—महात्मा हे विषयी यांना पुण्य होण्याकरिता किंवा जीज्ञासु यांना ज्ञान प्राप्त होण्याकरिता उपदेश करतात.म्हणून विषयी यांनी धर्माप्रमाणे व जिज्ञासू यांनी अंत:करण शुद्ध करून अधिकारवाणीने श्रवण करावे.अधिकारसंपन्न होऊन श्रावण केले असता फळापर्यंत जाण्याची शक्यता असते, म्हणून आपणास प्रयत्न करावा लागतो.||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,योगमायेचा आश्रय करणाऱ्या त्या भगवान् श्रीकृष्णानेही शदऋतूच्या योगाने सुवासिक पुष्पे प्रफुल्लित झालेल्या व गोपकन्यांना सांगितलेल्या त्या शरऋतूतील रात्री प्राप्त झाल्या असे पाहून,क्रीडा करण्याचे मनांत आणिले||१|| भावार्थ:---,आधिदौविक व आध्यात्मिक ताप दूर करतात.म्हणजेच त्यांना ज्ञानद्वारे मोक्ष प्रदान करतात. त्याचप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचे मूख आपल्या शितालारूप करांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचरांचा ताप हरित उदयाला येतात.संत—महात्मा आपल्या मुखाद्वारे उपदेशरूपी शब्दांनी ज्ञानाचा वर्षाव करत ताप नाहीसा करून सुखरूप करतात.||२|| अर्थः--- त्याचवेळी त्या कृष्णाच्या प्रीतीकारिता,जसा फार दिवसांनी दर्शन झालेला प्रीयपती,विनोदस्थितीमध्ये आपल्या स्त्रीचे मुख,तांबड्या वर्णाच्या केशराने लिप्त करितो त्याप्रमाने सर्वजणांच्या तपग्लनी दूर करणारा तो प्रसिद्ध चंद्र,आपल्या अतिसुखाकारक करांनी (किरणांनी)उदरागाने,पूर्वदिशारूप स्त्रीचे मुख तांबडे करीत असता उदय पावला ||२|| | दुहन्त्योsभीययु: काश्चीद् दोहं हित्वा समुत्सुका: | पयोsधिश्रीत्य संयावमनुद्वास्यापरा ययुः ||५|| अर्थः---तेव्हा श्रीकृष्णाने,लक्ष्मीच्या मुखाच्या कांतासारखी कांति असणाऱ्या,नव्या केशराप्रमाणे तांबड्या व कामळीणीना प्रफुल्लित करणाऱ्या पूर्णमंडल चंद्राला पाहून आणि त्याच्या सुखकारण किरणांनी सुशोभित झालेले वृंदावन पाहून स्त्रियांच्या मनाला हरण करणारे असे मधुर गायन केले||३|| भावार्थ:--- बासरीचा आवाज ऐकून त्या आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता त्याच क्षणाला सोडून श्रीकृष्णांकडे निघाल्या.तसे आपणही कोठे तरी सात्विक कार्य होत असेल तर पूर्वीचे संसारातील कार्य ओडून परमार्थीक कार्यास ताबोडतोब---एका क्षणाचा विलंब न लावता जावावयास पाहिजे.असे केले असता आपला सत्वगुण वाढत जाऊन सात्विक संस्कार असतात. ||५|| | परिवेषयन्त्यस्तद्धीत्वा पाययन्त्य: शिशुन् पयः | शुश्रूषन्त्यः पतीन् काश्चीदश्नन्त्योsपास्य भोजनम् ||६|| अर्थः---ते मदनांची वृद्धी करणारे गायन ऐकून,ज्यांची मने कृष्णाने आकर्षण केली आहेत व सपत्न्यभाव उत्पन्न होऊ नये म्हणून ज्यंनी आपला कृष्णाकडे जाण्याचा प्रकार एकीमेकींना मुळीच कळू दिला नाही,अशा त्या गोकुलांतील स्त्रिया,तो श्रीकृष्ण,जेथे होता तेथे गायनध्वनीच्या मार्गाने निघून गेल्या.त्यावेळी जाण्याच्या वेगाने त्यांच्या कानांतील कुंडले हालत होती||४|| अर्थः---श्रीकृष्णसूचकशब्दाच्या श्रवणाने कृष्णाकडे चित्त लागलेल्या लोकांच्या धर्मार्थकाप्रतिपादक कर्मांची तत्काल निवृत्ति होत्ये हे दर्शविण्याकरीता गोपी,अर्धे अर्धे झालेलेच आपले कर्म टाकून गेल्या असे सांगतो—कितीएक गोपी –गाईचे दुध काढीत होत्या त्यांनी अर्धे दुध काढिले तो इतक्यात वेनुनादाचे श्रवण झाले असता,कृष्णप्रप्तीविषयी उत्कंठीत होऊन ते दुधाचे भांडे तेथेंच टाकून गेल्या.कितीएक—दुधाच्या स्थालीमध्ये असलेले दुध इतक्यांत वेनुनादाचे श्रवण झाले असता,कृष्णप्रप्तीविषयी उत्कंठीत होऊन ते दुधाचे भांडे तेथेंच टाकून गेल्या.कितीएक –दुधाच्या स्थालीमध्ये असलेले दुध चुलीवर ठेऊन ते तापले किंवा नाही ते न पाहता तशाच निघून गेल्या.दुसऱ्या कितीएक चुलीवर शिजत ठेवलेला सांजा न उतरता तशाच गेल्या||५||भावार्थ:---संसारातील राजस कार्य सोडून सात्विक कार्यास भगवंतांकडे जाण्यास प्रवृत्त झाल्या.जन्म ज्याला दिला त्याळा दुध पाजण्याचे कार्य सोडून भगवंतांकडे सात्विक कार्य श्रवण करण्याकरिता गेल्या,कारण संसारातील कार्यापेक्षा सात्विक कार्य हित करते.ज्या पतीची सेवा करत होत्या त्याही पतीचे कार्य सोडून भगवंतांकडे सात्विक कार्य श्रवण करण्याकरिता गेल्या.ज्या स्वत:जेवत होत्या,त्या भजनाचा त्याग करून भगवंतांचे श्रवण करण्याकरिता निघून गेल्या.त्याचप्रकारे आपण स्वत:राजस कार्य असो कि,जन्म देणाऱ्या लेलारांचे कार्य असो,त्यास प्राधान्य न देता सात्विक कार्य करण्यास प्रवृत्त व्हावावयास पाहिजे.देहासंबंधीचे कार्य सोडून सात्विक कार्य करावयास पाहिजे.आपण स्वत: जेवाणासारख्या महत्वाच्या कार्याचा त्याग करून सत्विक्कार्यास प्राधान्य देऊन श्रवण करण्यास प्राधान्य ध्यावावयास पाहिजे,कारण त्यात आपले हित असते.थोडक्यात संसारातील कार्यही करावयाचे आहे व पारमार्थिक कार्यही करावयाचे आहे,पण अगोदर पारमार्थिक कार्य करावे व त्यानंतर संसारिक कार्य करावे.असे केले असता परमार्थही होतो व संसारही होतो.अधिक हित देणारे कार्य अगोदर करावे व कमी हित करणारे कार्य नंतर करावे.||७|| | ता वार्यमाणाः पतिभिः पितृभिभ्रातृबन्दुभी: | गोविन्दापहृतात्मानो न न्यवर्तन्त मोहिताः ||८|| अर्थ:---कितीएक पातीपुत्रादिकांना अन्न वाढीत होत्या ते वाढणे अर्धेच टाकून निघून गेल्या.दुसऱ्या कितीएक आपल्या मुलांना स्तनसंबंधी दुध पाजीत होत्या ते तितकेच टाकून गेल्या.कितीएक—पतीची शुश्रूषा करीत होत्या ती अर्धीच टाकून गेल्या.कितीएक ---भोजन करीत होत्या त्या ते टाकून गेल्या||६|| भावार्थ:--- संसारातील देहसंबंधींनी---नातेवाईकांनी---पतींनी,माताजींनी--पित्यांनी,बाब्धवांनी,बहींणींनी व इतरांनी पारमार्थिक कार्य करण्यात अडथळा---प्रतिबंध केला तरी आपण पारमार्थिक कार्य न थांबवता,ते कार्य आवश्य करावेच.कारण पारमार्थिक कार्य करण्यात अधिक फळ मिळते.ते कार्य करण्यात हित असते.पारमार्थिक कार्य केल्यानंतर देहसंबंधीची कार्य नंतर करावीत.||८|| अर्थः---कितीएक –अंगाला चंदनादिकांची उटी लावीत होत्या,कितीएक---अंगाला उटणे लावीत होत्या व दुसऱ्या कितीएक –डोळ्यांमध्ये काजळ घालीत होत्या त्यांनी ती आपली कर्मे अर्धी अर्धीच टाकून त्या कृष्णाजवळ गेल्या.कितीएक,वस्त्रे भूषणे गळ्यांत घालणे,नाकांतील नथ कानांत घालणे व कानांतील बाळी नाकांत घालणे इत्यादिकेकरून ज्यांची वस्त्रे व भूषणे उलटपालटपणा पावली आहेत अशा होऊन कृष्णाजवळ निघून गेल्या||७||भावार्थ:--- बासरीची आवाज कानावर पडला,त्यांना त्यांच्या देहसंबंधिचा प्रयत्न करून प्रतिबंध आला त्यामुळे त्या जाऊ शकल्या नाहीत,तेव्हा यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णांचे ध्यान करू लागल्या.त्याचप्रमाणे आपणास देहसंबंधीचा प्रयत्न करून प्रतिबंध आला असता आपण रजोगुण व तामोगुनाकडे दुर्लक्ष करून सात्विक कार्य करावयास पाहिजे.||९|| | दुःसहप्रेष्टविरहितीव्रतापधुताशुभाः | ध्यानाप्राप्ताच्युताश्लेषनिर्वृत्या क्षिणमंगलाः ||१०|| अर्थः---आता कृष्णाने ज्यांचे मन आकर्षण केले आहे त्यांना विघ्ने होत नाहीत असे सांगतो---गोविंदाने चित्त आकर्षण केल्यामुळे मोह पावून श्रीकृष्णाकडे जाणाऱ्या त्या स्त्रिया,पति,आईबाप व भाऊबंधु इत्यादिकांनी त्यांचे निवारण केले असतंही त्या माघाऱ्या फिरल्या नाहीत,तर कृष्णाजवळच गेल्या ||८||भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या विरहाने---भेदाने—अंतराने त्या दु:खी झाल्या त्या विरहाच्या दु:खामुळे त्यांचे पाप आणि पुण्य भस्मीभूत---जळाले.त्यामुळे त्या कृष्णरूप झाल्या—परमात्मरूप झाल्या.पाप आणि पुण्य भस्मीभूत झाल्याशिवाय जन्म—मरण निवृत्त होत नाही.म्हणून निष्काम धर्माप्रमाणे वागून अधर्माप्रमाणे वागणे बंद करा.असे केके असता आपले अंत:करण शुद्ध होईल आणि अधर्माप्रमाणे वागणे बंद केले असता पाप होणार नाही म्हणजेच अंत:करण अशुद्ध होणार नाही.यानंतर ज्ञानाने मोक्ष मिळेल.||१०||
| कृष्णं विदुः परं कान्तं न तु ब्रम्हतया मुने | गुणप्रवाहोपरमस्तासां गुणधीयां कथम् ||१२|| अर्थः---त्यावेळी कितीएक गोपीतर ---घरामध्येच होत्या त्यांना त्यांच्या पातीपुत्रादिकांनी,दारांना कडयाकुलूपे घालून कृष्णाकडे जाण्याचा अटकाव केल्यामुळे मार्ग मिळाला नाही.म्हणून त्या पूर्वीच कृष्णाकडे ध्यान करणाऱ्या होत्या परंतु त्यावेळी त्यांनी डोळे झांकून कृष्णाचे एकाग्र ध्यान केले||९|| | उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्दः सिद्धिं यथा गतः | द्विषन्नपी हृषीकेशं किमुताधोक्षजप्रियाः ||१३|| अर्थः---आणि त्या,दुःसह जो अतिप्रिय श्रीकृष्णाचा विरह त्याने प्राप्त झालेल्या तीव्र तापाने,अनेक जन्मार्जित पापकार्मांचे फळ (दुःख)एकदम भोगून शुद्धचित्त झाल्या;तशाच ध्यानाने प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाच्या आलिंगनसंबंधी परम सुखाने अनेक जन्मार्जित पुण्यकर्माचे फळ(सुखही)भोगून क्षीणपुण्य झाल्या,एतावता तत्काल ज्यांनी पुण्यपापरूप बंधने आगदी तुटून गेली आहेत अशा त्या गोपी,जारबुद्धीनेही त्याच परमात्मा कृष्णाचेठिकाणी संगत होऊन,आपल्या गुणमय देहाचा त्याग करून सायुज्यमुक्ति पावल्या||१०||११|| भावार्थ:--- भगवंतांचे सतत—निरंतर स्मरण—ध्यास असणे अरुरी आहे.असा ध्यास लागला असता आपणास सर्वाविषयी प्रेमभावना जाग्रत भावना राहिल्यामुळे आपण इतरांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करूत.त्यामुळे आपण ज्ञान मार्गाचा अवलंब करून,सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त होऊन,विषयांचा त्याग केला असता भगवंताची प्राप्ती होईल--जन्म-मरण निवृत्त होतील.||१३|| अर्थः---हे राजा म्हणाला हे –शुकाचार्य,त्या गोपांनी श्रीकृष्णाला जारबुद्धीने हा केवळ सुंदर पुरुष आहे असे मात्र जाणिले,ब्राम्हत्वाने मुळीच जाणिले नाही.तेव्हा श्रीकृष्णाचेठिकाणी सौदर्यादिगुणबुद्धि धारण करणाऱ्या त्या गोपींना त्या श्रीकृष्णाच्या ध्यानाने देह पडून सायुज्यमुक्ति कशी झाली ? म्हणजे पतीपुत्रादिकाही वस्तुतः ब्रम्हरूप असून त्यांच्या सेवनाने जसा मोक्ष होत नाही तसाच ब्रम्हबुद्धि नसल्यामुळे श्रीकृष्णाच्या ध्यानानेही त्यांना मोक्ष होऊ नये,तो कसा झाला ?||१२||भावार्थ:---अविनाशी,अनंत,निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंतांचे प्रगट होणे,हे माणसांच्या परम कल्याणासाठीच आहे.भगवंतांची कृपा झाल्याशिवाय दर्शन होत नाही.भगवंतांची कृपा झाली असता महात्मा यांची भेट होते.||१४|| | कामं क्रोधं भयं स्नेहमैक्यं सौहृदमेव च | नित्यं हरौ विदधतो यान्ति गुनात्मनः ||१५|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला –हे राजा,याचे उत्तर तुला मी पूर्वीच (सप्तमस्कंधामध्ये)सांगितले आहे.त्या इंद्रियनियंत्या श्रीकृष्णाची द्वेष करणारा शिशुपाळहि,जर उत्तमप्रकाच्या सिद्धीला (सायुज्यमुक्तीला)पावला तर श्रीकृष्णाचे प्रिय करणाऱ्या व त्याला अत्यंत आवडणाऱ्या त्या गोपी,त्याच्या ध्यानाने सायुज्यमुक्ति पावला यांत आश्चर्य काय ?तात्पर्य—जीवांचेठिकाणी ब्रम्हत्व अज्ञानादिकेकरून वेष्टित असते,म्हणून तेथे ज्ञानाची अपेक्षा असत्ये.श्रीकृष्णाचे स्वरूप चैतन्यघन असल्यामुळे तेथे ब्रम्हत्वाने ज्ञानाची अपेक्षा नाही ||१३|| भावार्थ:---कोणत्याही भावनेने का असेना,आपल्यास भगवंतांचे स्मरण राहणे हे महत्वाचे आहे.साधन महत्वाचे नसून साद्ध्य महत्वाचे आहे.याकरिता नेहमी स्मरण भगवंतांचे करावे.ते आपल्या मनात कोणतेही कार्य करत असतांना असावेत.||१५|| अर्थः---आता देहधारी तो कृष्ण अज्ञानादिक करून युक्त नाही,असे कसे होईल असे म्हणशील तर—हे राजा,गुणनियंता,विकारशून्य,निर्गुण व बुद्धीला अगोचार अशा भगवंताचे हे प्रकट होणे,मनुष्यांच्या केवळ मोक्षरूप कल्याणाकरिता आहे,म्हणून त्याला देहधारी जीवांसारखे म्हणता येत नाही||१४|| अर्थ:---यास्तव त्या हरीचेठिकाणी,गोपिंसारखा काम,शिशुपालासारखा क्रोध,कंसासारखे भय,यशोदेसारखा स्नेह,ज्ञान्यासारखे ऐक्य,पांडवासारखे सत्य,किंवा नारदादिकांसारखी नित्य भक्ती,करणारे जे पुरुष आहेत ते सायुज्य मुक्ति पावतात||१५||अर्थः---आता भगवंताला हा मोठा भार नाही असे सांगतो –हे राजा,त्या योगेश्वरेश्वर व कर्माधीन असणाऱ्या जन्माने रहित अशा भगवान कृष्णाचेठिकाणी मन लावणाऱ्या गोपी मुक्त झाल्या ह्याविषयी तू विस्मय करू नकोस.कारण,ज्या कृष्णापासून हे स्थावरजंगमात्मक जगसुद्धा,त्याची कृपा झाली असता मुक्त होईल.||१६||अर्थः---असो.वेनुनादाने मोहित होऊन आपणाजवळ आलेल्या त्या गोपींना पाहून बोलणारांमध्ये श्रेष्ठ,असा तो भगवान् श्रीकृष्ण,आपल्या वाग्विलासांनी त्यांना अत्यंत मोहित करीत असता म्हणाला की,||१७|| अर्थः---श्रीभगवान् म्हणाला---हे महाभाग्यवती गोपीहो,तुम्ही मजकडे आला हे फार चांगले झाले.तुमचे प्रिय मी काय करावे ?इतक्यांत घाबरेपणाने सर्व गोपी आल्या असे पाहून भ्याल्यासारखा म्हणाला की,--गोपीहो,माझ्या आवडत्या गोकुळाचे कल्याण तर आहे ना ? तुमचे येण्याचे कारण काय !ते सांगा ||१८|| अर्थः---लज्जेने मंदहास्य करणारांना पाहून म्हणाला की,--हे सुकुमारीहो,यावनामध्ये स्त्रियांनी राहुं नये यास्तव तुम्ही माघाऱ्या गोकुळांत चला.कारण,हि रात्र भयंकररुपी असून हिचेठीकानी व्याघ्रदिक भयंकर प्राणी फिरत असतात||१९||अर्थः---आणि तुम्हांला न पाहणारे तुमचे आईबाप,पुत्र,भाऊ व पति तुमचा शोध करीत असतील यास्तव त्या बंधूंना,आपण सांडल्याबद्द्ल भय उत्पन्न करू नका||२०|| अर्थः---तेव्हा थोड्यांश प्रेमकोपाने दुसरीकडे पाहू लागल्या असत्या,त्यांना पाहून म्हणाला की,--अहो तुम्ही पूर्णचंद्राच्या किरणांनी प्रकाशित झालेले व यमुनेच्या जळाला स्पर्श करून येणाऱ्या वाऱ्याच्या मंदगतीने कंपायमान होणाऱ्या वृक्षांच्या पल्ल्वांनी सुशोभित दिसणारे व प्रफुल्लित दिसणारे हे वृंदावनहि पाहिलेत||२१||| तद् यात मा चिरं गोष्ठं शुश्रूषध्वं पतीन् सती: | क्रन्दन्ति वत्सा बालाश्च तान् पाययत दुह्यत ||२२|| अर्थः---यास्तव हे सतीहो,तुम्ही आता गोकुळांच चला,विलंब करू नका.पतीची शुश्रूषा करा,तुमचे बालक क्षुधार्त होऊन रडत असतील त्यांना पाजा व गाईचे वत्स आक्रोश करीत असतील त्यांना पाजवून गाईचे दोहन करा||२२||भावार्थ:--- आपण संसारिक कार्य सोडून आलेले आहात.देहसंबंधीची—पतीची,सासूसासऱ्यांची,मुलाबाळांची सेवा सोडून आलेल्या आहात.लहान मुले रडत असतील,कारण त्यांना दुधाची गरज आहे.वासरांना दुध पिण्याची गरज आहे,म्हणून परत जा.||२२|| | अथवा मदभिस्नेहाद् भवत्यो यन्त्रीताशयाः | आगता ह्युपपन्नं वः प्रीयन्ते मयि जन्तवः ||२३|| अर्थः---तेव्हा आवेशाने क्षुभितदृष्टी झालेल्यांना पाहून म्हणाला---अथवा माझ्या स्नेहाने तुम्ही वशीकृतचित्त होऊन आला असाल तर हे तुम्हांला योग्य आहे.कारण,माझेठीकाणी सर्वही प्राणी प्रीति करितात||२३||भावार्थ:--- भगवान फक्त प्रेमाने वश होतात,भेटतात,दर्शन देतात.पण मात्र जडाने म्हणजे,पैसा,मान,प्रतिष्ठा,पुण्याने भेटत नाहीत---दर्शन देत नाहीत.त्याकरिता अंत:करणात भाव—प्रेम असावयास पाहिजे.यामुळे ईश्वर दर्शन देतो---भेटतो.तुम्ही केवळ प्रेमाने आला असाल,तेही योग्यच आहे.जे केवळ प्रेमाने माझ्याकडे येतात,त्यांचा आदर—सत्कार मी नेहमीच करत असतो,नव्हे—नव्हे तर मी त्यांची वाट पाहत उभाच असतो.म्हणजेच निष्काम भक्ताची वाट पाहतो,कारण फक्त निष्काम भक्त प्रेम करतात.||२३|| | भर्तु: शुश्रुषनं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया | तब्दन्धुनं च कल्याण: प्रजानां चाणु पोशनम ||२४|| अर्थः---हे कल्याणीहो,निष्कपटपणे पतीचे शुश्रूषण करणे व पतीचे बंधूवगैरे असतील त्यांच्याशी प्रेमभावाने यथायोग्य वर्तन ठेवणे व मुलांचे पोषण करणे हाच स्त्रियांचा उत्कृष्ट धर्म आहे||२४|| भावार्थ:---पतीची,पत्नीची,पुत्रांची,आई---वडिल,देहसंबंधी व इतर जीवांची अधिकारानुसार---धर्मानुसार सेवा केल्याने ज्याचे त्याचे अंत:करण शुद्ध होते.आपले अंत:करण शुद्ध करणे हाच परमार्थ आहे.यामुळे भगवंतांविषयी निष्काम भाव---प्रेम वाढते.||२४|| | दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्यधनोsपी वा | पतिः स्त्रीभीर्न हातव्यो लोकेप्सुभीरपातकी ||२५|| अर्थः---द्दुतादिक करणारा असल्यामुळे दृष्ट स्वभावाचा,भाग्यहीन,वृद्ध,मूर्ख,रोगी व दरिद्री असाही पती,पुण्यलोकाची इच्छा करणाऱ्या स्त्रियांनी टाकू नये.ब्रम्हहत्यादि महापातकाने दुषित असेल तर मात्र त्याचे दुरून सेवन करावे,संपर्क करू नये||२५|| भावार्थ:--- धर्मशात्रानुसार पापी म्हणजे अधर्मानुसार वागणारा जो पती आहे,त्याचा त्याग करावा,त्याचा त्याग---सोडण्यास---- करण्यास धर्मशात्राची परवानगी आहे.त्याग केला तरी अधर्म होत नाही.१---पण वाईट स्वभावाचा---पत्नीवर अन्याय करणारा असला तरी,२---भाग्यहीन म्हणजे धर्नानुसार प्रयत्न करतो,पण त्यात त्याला यश प्राप्त होत नाही,धन मिळत नाही,सुख मिळत नाही,रोग नाहीसा होत नाही,३---वृद्ध---म्हातारा असणारा,४---मूर्ख म्हणजे ज्याची बुद्धी मंद आहे,५---रोगी म्हणजे ज्याच्या ठिकाणी आरोग्य नाही असा तो,६---निर्धन म्हणजे ज्याच्याकडे धन,वैभव,कीर्ती नाही असा तो,ज्याच्याकडे रूप नाही असा तो,असा जो आहे,त्याचा त्याग करू नये.अशा पतीचा त्याग केला तर अधर्म होतो,कारण आपल्या पूर्वकर्मानुसार पती मिळत असतो.||२५|| | अस्वर्ग्यमयशस्यं च फल्गु कृच्छ्रं भयावहम् | जुगुप्सितं च सर्वत्र औपपत्यं कुलस्त्रियाः ||२६|| अर्थः---कुलीन स्त्रीला,परपुरुषापासून मिळणारे जे सुख ते,परलोकी स्वर्गाचा व या लोकी यशाचा नाश करणारे,तुच्छ,दुःखाने मिळवावयाचे,भयसूचक व लोकांमध्ये तसेच शास्त्रांमध्येहि निंद्द आहे||२६|| | श्रावानाद् दर्शनाद् ध्यानान्मयी भावोsनुकीर्तनात् | न तथा सन्निकर्षेन प्रतीयात ततो गृहान् ||२७|| अर्थः---हे स्त्रियाहो,माझेठीकाणी जसा श्रवणाने,दर्शनाने,ध्यानाने व माझ्या गुणवर्णनाने,स्नेहाचा अतिशय होता तसा अंगसंबंधाने होत नाही.यास्तव तुम्ही आपापल्या घरी निघून चला||२७|| भावार्थ:--- भगवंतांच्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने,रूपाच्या दर्शनाने,या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने,माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते,कारण भगवंतांच्या लीला आणि गुण श्रवण करण्याकरिता संत—महात्मा यांची संगती करून श्रवण करू शकतो,त्यामुळे कौटुंबिक कार्यही होते व श्रवणही होते.म्हणजेच संसार करून परमार्थ होतो,तसे माझ्याजवळ राहून होत नाही.म्हणून तुम्ही जशा आल्या तशा आपापल्या घरी परत जा.घरी राहिले असता स्वधर्माचे पालन करून,संसार करून परमार्थ होतो.||२७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला—हे राजा,असे घरी जाण्याबद्दलचे न आवडणारे ते गोविंदाचे भाषण ऐकून भगवंतबरोबर क्रीडा करण्याचा संकल्प भग्न झाल्यामुळे खिन्न झालेल्या त्या गोपी,दुस्तर अशी पराकाष्ठेची चिता पावल्या||२८|| भावार्थ:---भगवान श्रीकृष्णांचे गोपींच्या प्रतिकूल बोलणे ऐकून दु:खी झाल्या,कारण घरादारांचा व देहसंबंधीचा त्याग करून बासरीचा आवाज ऐकून श्रवण करण्याकरिता आल्या होत्या.त्यांच्या अशा धुळीला मिळाल्या.अपेक्षा भंग झाला.काय करावे कांही सुचेना.||२८|| अर्थः---त्या अशा की,दुःखाचा अतिशय भर झालेल्या त्या गोपी,शोकापासून उत्पन्न झालेल्या उष्णश्वासवायुने,पिकलेल्या तोंडल्यासारखे अधारोष्ठ शोषून गेलेली आपली मुखे खाली करून पायांच्या अंगुष्ठाने ‘आपणास पोटात घेण्याच्या प्रार्थनेकरितांच की काय,भूमीचे लेखन करीत व डोळ्यांतील काजळ वाहविणाऱ्या दुःखाश्रूंनी स्तनांचे केशरे क्षालन करीत असता केवळ स्तब्ध उभ्या राहिल्या ||२९|| | प्रेष्ठं प्रियेतरमिव प्रतिभाषमानं कृष्णं तदर्थविनिवर्तीतसर्वकामाः | | नेत्रे विमृज्य रुदितोपहते स्म किन्चीत् संरम्भगद्गदगीरोsब्रुवतानुरक्ताः ||३०|| अर्थः---नंतर रडताना पाण्याने भरून आलेले डोळे पुसून,किंचीत् कोपावेशाने सद्गदितवाणी झालेलया व त्या कृष्णाच्या प्राप्तीकरितांच सर्व विषय सोडून देलेल्या आणि त्याचेठीकाणीच प्रेमयुक्त असलेल्या त्या गोपी,अतिप्रिय असून अप्रियासारखे भाषण करणाऱ्या त्या श्रीकृष्णाला म्हणाल्या की,||३०|| भावार्थ:--- कृष्णासाठी सर्व संसारातील कामना—इच्छा सोडून दिल्या होत्या.श्रीकृष्णावरच त्यांचे अनन्य प्रेम होते.अनन्य पेम म्हणजे फक्त भगवंतांवरच प्रेम,अन्य कोणावर—मान,प्रतिष्ठा,धन,विषय व देह--देहसंबंधीवर—नातेवाईकावर---जीव यांच्यावर प्रेम नसणे.यास अनन्य प्रेम असे म्हणतात.आपलेही अनन्य प्रेम असावयास पाहिजे.फक्त भगवंतांवर प्रेम असावयास पाहिजे.भगवंतांचे निष्टुर बोलणे ऐकून गोपिकांना रडू आले.आपल्यास पारमार्थिक कार्यास कांही प्रतिकूलता निर्माण झाल्यास दुश्चित अवस्था व्हावावयास पाहिजे.त्या दु:खित अंत:करणाने भगवंतांस---प्रीयतमास म्हणतात----||३०|| | मैवं विभोsर्हती भवान् गदितुं नृशंसं सन्त्यज्य सर्वविषयांस्तव पादमुलम् | | भक्ता भजस्व दूरवग्रह मा त्यजास्मान् देवो यथाssदिपुरुषो भजते मुमुक्षुन् ||३१|| अर्थः---गोपी म्हणाल्या ---हे स्वच्छंदा समर्था कृष्णा,असे प्रत्याख्यानरूप घातकी भाषण स्पष्ट बोलण्याविषयी तू योग्य नाहीस,तर,जसा आदिपुरुष भगवान,मुमुक्षुंचा अंगीकार करितो व त्यांचे इच्छित संपादन करितो त्याप्रमाणे सर्व विषयाचा त्याग करून तुझ्या चरणमुलाचे सेवन करणाऱ्या आमचा तू अंगीकार कर;त्याग करू नकोस||३१|| भावार्थ:--- आपण आम्हास निष्ठुरतेने बोललात आणि आपल्याकडे आत्मीयतेने आलेलो आहोत.आम्ही आपणाकडे संसाराविषयक किंवा विषयासंबंधी मागणी करण्याकरिता आलेलो नाहीत,कारण आम्ही आपले निष्काम भक्त आहोत.आम्ही फक्त तुमच्या चरणांवरच म्हणजे अधिष्ठानांवर—परमात्मा प्रेम करत आहोत.आम्हास फक्त तुम्ही—परमात्मा पाहिजे,त्याशिवाय तुमचे जे विषय आहेत,त्याची आम्हास अजिबात गरज नाही,कारण त्या विषयांचा कंटाळा आला आहे,म्हणूनच आम्हास आपण पाहिजे आहात,कारण आम्ही निष्काम भक्त आहोत.जसे मुमुक्षु आहेत,तसेच आम्हीही आहोत.म्हणून आमच्यावर निष्काम रेम करा.गोपिकांसारखी आपली अवस्था असावयास पाहिजे.निष्काम भक्ती करावी,म्हणजे भगवंत मिळत असतो.||३१|| अर्थः---हे कृष्णा,आता पती,मुले व त्याचे बंधू यांची शुश्रूषावगैरे करणे हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असे जे तू धार्मवेत्याने आम्हांस सांगितलेस ते सर्व,सर्वांचा भोक्ता तू ईश्वर असल्यामुळे उपदेशांचा विषय अशा तुझ्याचठिकाणी असो म्हणजे सर्वबंधूचेठिकाणी जे काय करावयाचे ते तुझ्याचठिकाणी घडो.कारण,तू सर्वप्राण्यांचा आत्मा व हितकर्ता असल्यामुळे त्यांना अतिप्रिय आहेस||३२|| भावार्थ:---आपण धर्मज्ञ असून धर्माचे रहस्य जाणता आम्ही आमचे पती,पुत्र आणि बांधवांची एव करणे स्त्रियांचा धर्म आहे असे आम्हास तुम्ही सांगितले आहे.आम्ही तेच करावे,तर मग परमार्थ कधी करावा असे आम्हास सांगावे.स्त्रियांनी फक्त संसारच करावा का? तुमची सेवा आम्हा स्त्रियांनी कधी करावी?तुमची सेवा करावी का करू नये?तुम्हीच बंधू आणि प्रीतम आत्मा आहात.||३२|| अर्थः--- भावार्थ:---आत्मज्ञानी लोक तुमच्यावर प्रेम करतात,तसे आम्हास वाटत आहे कि आम्हीसुद्धा तुमच्यावर प्रेम करावे.म्हणून आम्ही तुमची निष्काम भक्ती करत आहोत.पतीपुत्र,हे अनित्य आहेत व दु:खद आहेत,म्हणून त्यांचा त्याग करून आपण अविनाशी असून सुखरूप आहात,म्हणून सुखरूप होण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहोत.आमची हि मोक्षाची इच्छा पूरी करा.||३३|| अर्थः--- भावार्थ:--- आपल्या बासरीच्या आवाजाने आमचे घरात असलेले चित्त घरात न राहता देहसंबंधित न राहता ते चित्त आपल्याकडे लागले आहे.आपण आमचे चित्त चोरले आहे,म्हणून आम्हास घराकडे जावे असे न वाटता आपणाजवळच राहावे असी भावना झालेली आहे.अशी आमची वस्तुस्तिथी झालेले आहे,तर आम्हास व्रजामध्ये जावे असे वाटेल काय?आम्ही तेथे जाऊन काय करावे,कारण आमचे सर्व मन आपल्यात गुंतले आहे.जेथे मन तेथे राहावे अशी भावना होत असते.व्रजात जाऊन काय करावे?गोपिसारखी भावना आपली व्हावावयास पाहिजे.आपल्या चित्ताचा विषय घर,देहसंबंधी न राहता भगवंतसंबंधी व्हावा||३४|| अर्थः--- भावार्थ:--- आम्ही बासरीच्या आवाजाने आपणाकडे आलोत,तेव्हापासून तुमच्या चरणांचा स्पर्श झाला,त्यामुळे आम्हास आनंद प्राप्त झाला.आपल्या आनंदापासून आमचे मन विषयांदाकडे जावावयास तयार नाही.एक क्षणभरसुद्धा व्रजात जावे अशी भावना राहिलेली नाही,तर देहसंबंधिची सेवा करावी असे वाटेल काय?गोपिसारखी अवस्था आपली व्हावावयास पाहिजे.असी भावना होण्यासाठी निष्काम परमार्थ करावा लागतो.संसारातील कोणत्याही विषयांची अपेक्षा न करता फक्त भगवंत मिळावा हीच भावना असावी.||३६|| अर्थः--- भावार्थ:--- लक्ष्मीमाता नेहमी आपल्या वक्षस्थाळावर विराजमान असुनसुद्धा अजून ती आपल्या चरणधुळीची अपेक्षा करते.त्याच चरणरजांची आम्हाससुद्धा अपेश आहे म्हणजेच अधिष्ठानाची—परमात्म्याची अपेक्षा आहे,कारण ते सुखरूप आहे.त्याचप्रमाणे आपणसुद्धा भगवंतांच्या चरण--रजांची म्हणजेच अधिष्ठानाच्या ज्ञानाची अपेक्षा करून प्रयत्न करावयास पाहिजे.||३७|| अर्थः--- भावार्थ:--- आपण आमच्यावर कृपा करा.जेणेकरून संत—महात्मा यांची भेट होऊन त्यांचा मुखातून श्रवण केल्यामुळे जीवब्रह्मऐक्यज्ञान होईल म्हणजेच अधिष्ठानाचे--परमात्म्याचे ज्ञान होईल.त्यामुळे आमचे जन्म—मरण निवृत्त होईल.आमचे अंत:करण शुद्ध व स्थिर झालेले आहे,त्यामुळे जीअत्मा आणि परमात्मा यांच्या एकतेची आकांक्षेची आग भडकलेली आहे.||३८|| अर्थः--- भावार्थ:--- त्रेलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल कि,जी भगवंतांच्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घ तान ऐकून,तसेच गाई,पक्षी,वृक्ष आणि हरीण यांनासुद्धा रोमांचित करणारे त्रेलोक्यसुंदर रूप पाहून आर्य—मर्यादिपासून विचलित होणार नाही.भगवंतांचा मधुर पदांचा आवाज आणि दीर्घ तान ऐकून गाईपक्षी आणि हरीण तल्लीन होतात तर जे मानव योनीतील स्त्री—पुरुष आहेत ते मंत्रमुग्ध होतील यात तिळमात्र शंका येणार नाही.जर शंका आली तर त्यांना जीव न म्हणता जड—दगड मानावयास मुळीच हरकत नाही.आपणही संत—महात्मा यांच्या मुखातून भगवंतांच्या मधुर लीला व भगवंतांचे शब्दरूपी स्वरूप ऐकून का समाधी—स्थिरता येणार नाही?अर्थातच येईल.तो देहातीत झाल्याशिवाय राहणार नाही.आपणास हि धारणा होण्यासाठी निष्काम परमार्थ करावा लागेल.निष्काम परमार्थ केला असता जीवब्रह्म ऐक्याने निश्चितच समाधि लागून आनंदरूप हौउत,यात संक नाही.||३९|| अर्थः--- | इति विक्लवीतं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः |प्रहस्य सादयं गोपीरात्मारामोsप्यरीरमत्||४२|| अर्थः--- भावार्थ:---भगवंत ज्याप्रमाणे भक्तांची व्यथा—दु:ख समजतात,त्याचप्रमाणे संत—महात्मा विषयी व जीज्ञासुची व्यथा—दु:ख तळमळ जाणून,गरज जाणून धर्माचा,वेदांताचा उपदेश करण्यात थोडीसुद्धा हयगय करत नाहीत,कष्ट घेतात,परोपकार--ज्ञानदान करतात.म्हणून आपण नम्रतेने,श्रेद्धेने,सेवणे पात्र होऊन श्रवण करण्याचा प्रयत्न करावा.त्यांच्याशी आत्मीयतेने रममाण व्हावे.||४२|| अर्थः--- भावार्थ:--- भगवंतांनी गळ्यात सात्विक वैजयंतीची माळ धारण केलेली आहे.भगवंत गोपींचे गुणगान करत आहेत तर गोपी भगवंतांचे गुण वर्णन करत आहेत.त्याचप्रमाणे संत—महात्मा विषयी व जीज्ञासुचा अधिकार पाहून त्यानुसार उपदेश करतात.अध्कर महत्वाचा असतो,कारण अधिकारानुसार उपदेश केला तर परिणाम होतो,अन्यथा होत नाही.जसे आपण ऊस सेवन करण्यास बसलो आहोत तर आई लहान मुलांना गुळ खावावयास देते,म्हातारे जे आहेत,त्यांना ऊसाचा रस पिण्यास देते व तरुणांना ऊस खावावयास देते,त्याप्रमाणे संत—महात्मा ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्यास जो--तो उपदेश करतात,साधना करून घेतात.||४४|| अर्थः--- भावार्थ:---यानंतर श्रीकृष्णांनी गोपीसह शुभ्र वाळू म्हणजे अंत:करण शुद्ध असलेल्या,ज्यांच्या चित्तात वासनेचा मळ नसलेल्या अशा मानवी देह असणाऱ्या अंत:करणात—मनात उपदेश केला.ते वाळवंट कुमुदिनीच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासित झाले होते.म्हणजे सात्विक भावाने युक्त झालेले होते.तसेच आपले अंत:करण शुद्ध आणि स्थिर करून आपण संत—महात्मा यांच्या मुखातून श्रद्धायुक्त भावाने युक्त वातावरणात धर्माचा किंवा वेदांतांचा उपदेश ग्रहण करावयास पाहिजे.त्यातच आपले परम हित असते.||४५|| | एवं भगवतः कृष्णाल्लब्धमाना महात्मन: |आत्मानं मेनिरे स्त्रीणां मानिन्योs भ्यधीकंभुवि||४७|| अर्थः--- भावार्थ:--- गोपी ह्या वास्तविक पाहता विषयात अनासक्त असल्यामुळे भगवंतांनी त्यांची स्तुती केली.भगवंतांनी केलेली स्तुती त्यांना सहन न झाल्यामुळे त्या स्तुतीचा त्या गोपिकांना अंहकार आला.वास्ताविक यात अंहकार हा पारमार्थिक कार्यातील दोष आहे.त्यांचा अंहकाररुपी दोष वाढला.पारमार्थिक कार्यास प्रतिबंध आला—घसरण झाली—अधोगती झाली.जगातील स्त्रियात आम्ही श्रेष्ठ आहोत व बाकीच्या कनिष्ट आहेत असा त्यांचा भाव झाला.यासाठी पारमार्थिक कार्य करत असतांना त्या कार्यांचा आपणास अहंकार येऊ नये.पारमार्थिक कार्यांचा अंहकार न येणे गुण आहे,तर त्या कार्यांचा अंहकार येणे दोष आहे,म्हणून विवेकपुर्वक कार्य केले असता अंहकार येत नाही तर अविवेकपूर्वक कार्य केल्यास अंहकार हा येतोच म्हणून विवेकापुर्वक कार्य करावे.संत—महात्मा यांचे मार्गदर्शन घेऊनच कार्य करावेतर स्वत: मनाने कार्य करू नये.आपण दुसऱ्यांना कमी समजून आपण श्रेष्ठ आहोत हा भाव येऊ नये.अंहकार घालवणे—नाहीसा करणे म्हणजे परमार्थ आहे तर अंहकार वाढवणे संसार आहे.असा विचार करावा.||४७||
| तासां तत् सौभगमदं वीक्ष्य मानं च केशवः |प्रशमाय प्रसादाय तत्रैवान्तरधीयत ||४८|| अर्थः--- भावार्थ:--- भगवंतांनी जाणले कि यांना अंहकार आलेले आहे म्हणून त्यांचा तो आलेला अंहकार घालवण्यासाठी,त्यांचे परमाहित होण्यासाठी,त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवंत तेथेच लागलीच अंतर्धान झाले.असे भगवंत दयाळू आहेत.||४८||----------------||४८|| _________________________________________________________________________________________________________ | ३०--- किरण अध्याय पूर्ण रास लीला---१७.[गोपींचा विरह---२] | _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या तिसाव्या अध्यायामध्यें कृष्णविरहहानें तप्त झालेल्या गोपिंनी,उन्मत्तासारखें अव्ययस्थितपणे वनांतील प्रत्येक स्थळीं फिरून श्रीकृष्णाचा शोध केला; अशी की वर्णन केलेली आहे.) | अन्तर्हिते भगवती सहसैव व्रजाङगनः | अतप्यंस्तमचक्षाणा:करीण्य इव युथपम्||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें श्रीकृष्ण भगवान् अकसमत् अंतर्धान पावला असतां त्याला न पाहणाऱ्या त्या गोकुळासंबंधी स्त्रिया,‘जशा कामातूर झालेल्या हत्तिणी गजेंद्रला न पहातां पश्चाताप पावतात त्याप्रमाणें’पश्चाताप पावल्या||१|| भावर्थ:---व्रजयुवती भगवंत दिसत नाहीत,असे पाहून दु:खाणे व्याकूळ झाल्या.जसे गजराजाविणे हत्तींनी दु:खी हतात.त्याचप्रमाणे आपणही भगवंत प्राप्त होण्यासाठी दु:खाणे व्याकूळ व्हावावयास पाहिजे.दु:खाणे व्याकूळ झाल्यास आपण अधिक प्रयत्न करूत.||१|| अर्थः---आणि लक्ष्मीपति श्रीकृष्णाच्या गतीनी प्रेमहास्यसहित विलासयुक्त अवलोकनांनी,मनोरम भाषणांनी क्रीडांनी व दुसऱ्याही नानाप्रकारच्या विलासांनी चित्तावें आकर्षण पावोन तन्मय झालेल्या त्या गोपांनी,त्यावेळीं कृष्णाच्या त्या त्या ‘पूतनेचे स्तनपान करणें’ इत्यादिक लीलांचे अनुकरण करून (त्या त्या लीला स्वीकारून )खेळूं लागल्या||२|| | गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु प्रियाः प्रियस्य प्रतिरूढमूर्तयः | | असावहं त्वित्यबलास्तदात्मिका न्यवेदिषुः कृष्णविहारविभ्रमाः ||३|| अर्थः---याचेंच स्पष्टीकरण करितो-त्या प्रिय श्रीकृष्णाची गति,हास्य,अवलोकन,भाषण इत्यादिकांचेठिकाणी ज्यांची केवळ मनेंच जडली आहेत असें नाहीं,तर देहसुद्धां ऐक्य पावले आहेत,व कृष्णासारखेंच ज्यांचे क्रीडाविलास सुरु झाले आहेत,त्या कृष्णाशी ऐक्य पावलेल्या,त्याच्या आवडत्या गोपी,‘हा कृष्ण मीच आहें असें’परस्पर निवेदन करुं लागल्या||३|| भावार्थ:--- गोपींची अवस्था कृष्णमय झाली होती,त्याचप्रकारे आपलीही अवस्था कृष्णमय व्हावावयास पाहिजे,त्यासाठी संसारिक विषयांचा विसर पडावयास पाहिजे.संसारिक विषयांचा विसर पडला म्हणजे आपलिही अवस्था कृष्णमय होऊन जाते.विषयांविषयी प्रतिकूलता भावना होण्यासाठी,विषय हे अनर्थ करणारे—दु;ख देणारे आहेत.असा निश्चय व्हावावयास पाहिजे.असा निश्चय होण्यासाठी संत—महात्मा यांचा सहवास सेवा करून करावयास पाहिजे.तेव्हा योग्य विवेक होईल व विषयांविषयी वैराग्य होईल.||३|| अर्थः---व एकेठिकाणी मिळून उच्चस्वराने कृष्णाचे गायन करीत व उन्मता प्रमाणे या मनांतून त्या वाणात व त्या वनांतून दुसऱ्या वनात फिरत श्रीकृष्णाचा शोध करून लागला आणि त्यावेळी,आकाशाप्रामाणे चराचर प्राणी मात्रांच्या आत व बाहेर व्यापून राहणाऱ्या त्या कुराण पुरुष श्रीकृष्णाच्या पत्ता वृक्षांना विचारू लागल्या ||४|| भावार्थ:---गोपी भगवंतांचेच गुणवर्णन वेड्यासारखे म्हणजे इतर विषयांचा त्याग करून करू लागल्या.वास्तविक पाहता वनस्पतींना भगवंत कृष्णांचा ठावठीकाना विचारू लागल्या.वास्तविक पाहता वनस्पतींना यांचा प्रश्न समजेल का?प्रश्न न समाजाला तर उतार येईल का?असे गोपींना समजू लागले का?कारण इरात विषयांत त्यांची चित्त नसून,फक्त भगवंत कृष्णातच चित्त होते.आपणही गोपिकापासून बोध घ्यावा कि,आपण आपले चित्त अन्य विषयांत न ठेवता,फक्त भगवान कृष्णातच चित्त ठेवावे.||४|| | दृष्टो वः कच्चीदश्वत्थ प्लक्ष न्यग्रोध नो मनः | नन्दसूनुर्गतो हृत्वा प्रेमहासावलोकनै||५|| अर्थः अर्थः---त्यांमध्ये थोर पणामुळे यांनी कृष्णास पाहिले असेल अशा आशेने त्या गोपी,अश्वत्थामा दिकांस म्हणाल्या की,-हे अश्वत्थाम,हे प्लाशा,हे वटवृक्षा,तुम्ही कोठे कृष्णाला पाहिले काय?का विचारता ?असें म्हणालतर-प्रेमयुक्त हास्यविलसित नेत्रकटाशांनी आमचे मन हरण करून तो चोरसारखा कोठे गेला आहे ||५|| अर्थः--- अर्थः---- आतां थोर असून आपल्या पुष्पांनी पुष्कळांवर उपकार करणाऱ्या वृक्षास विचारितात-हे कर्बक-अशोक,नाग,पुत्राग,चंपक,यता मार्गाने गेलेला कृष्ण तुम्ही पाहिला काय?तो मानवतीस्त्रियांचा गर्व हरण करणारे हास्य करणार आहे,म्हणजे त्याने आपल्या हास्याने आमचा गर्व चोरून नेला आहे.||६|| | कच्चीत्तुलसि कल्याणि गोविन्दचरणप्रिये | सह त्वालिकुलैर्बिभ्रद् दृष्टस्तेsतिप्रियोsच्युत:||७|| अर्थः----हे गोविंद चरणप्रिय कल्याणरूपे तुळशी,शमरकुलांसह वर्तमान तुला धारण करणारा श्रीकृष्ण,तू पाहिला आहेस काय?कारण,तुला तो फारच आवडणारा आहे म्हणून तो पाहिला असशील ||७|| भावार्थ:---हे कल्याण करणाऱ्या तुळशी!भ्रमर तुमच्या भोवती पिंगा घालीत असतांना त्यांचा स्वीकार न करता भगवंतांच्या चरणा-- कडेच जाते,कारण तुला भगवतांचेच चरण आवडतात.तसेच आपणासही भगवंतांचेच चरण आवडवेत म्हणजे अध्यस्त—जग—विषय न आवडता अधिष्ठानच--परमात्माच आवडावा,कारण परमात्मा सुखरूप आहे व जग—विषय हे दु:खरूप आहेत.||७|| अर्थः---तिच्याकडून उत्तर मिळालें नाहीं तेव्हां मोठ्या गुणी असून नम्र असल्यामुळें या वाल्लिनी पाहिलें असेल ,असें मनांत आणून दुसऱ्या वल्लींना विचारितात कीं,-हे मालति,हे बेटमोऱ्ये,हे जाई,व हे जुई,तम्ही श्रीकृष्णाला पाहिलें काय?तो फुलें घेण्याकारीतां हाताच्या स्पर्शानें तुम्हांला प्रीति उत्पन्न करीत कदाचित् गेला असेल!||८|| भावार्थ:--- हे मालते!मल्लीके! जाई आणि जुई,भगवंत कृष्ण आपणास स्पर्श करून सुख देत पुढे गेले असतील.तुमच्याजवळ सुगंध आहे,म्हणून तुम्हाला स्पर्श केला असेल.त्याचप्रमाणे आपणही सदगुण—सात्विकता असेल तर भगवंत आपल्याकडे येऊन आपणास सुख देतील.याकरिता जीवांनी सदगुण प्राप्त करून सात्विकता वाढून ज्ञानमार्गांनी भगवंत प्राप्त करून घ्यावा व सुखरूप व्हावे.||८|| अर्थः---त्यांच्या कडूनही उत्तर मिळालें नसतां,फलादिकांनी प्राण्यांच्या तृप्ति करणारे हे वृक्ष संगतील म्हणून दुसऱ्या वृक्षांना विचारितात-हे चूत,प्रियाल,पनस,असन,कोविदार,जंबू,अर्क,बिल्व,बकुल,आम्र,कदंब,नीप हो,व दुसऱ्याकरिता उत्पन्न होऊन यमुनेच्या कांठी राहणाऱ्या इतरही हे सर्व वृक्षहो,तुम्ही कृष्णाने चित्त आकर्षण केल्यामुळें शून्यचित्त झालेल्या आम्हांस कृष्णप्राप्तीचा मार्ग सांग ||९|| भावार्थ:--- आमवृक्ष!चारा!फणसा!आसन्या!कांचना!जांभळा!रुई!बेला!बकुला!आमा!कदंबा!दुपारी!तसेच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो!आम्ही[गोपी]भगवंत कृष्णाशिवाय सुन्या झालेलो आहोत.आम्ही उदास झालेलो आहोत.आमचा प्रिय कृष्ण कोणी पहिला का?पहिला असेल आम्हास सांगा.कोठेही असला तरी आम्ही त्याच्याकडे जाण्यास त्यात आहोत.कोणतेही साधन सांगा,आम्ही ते करावयास तयार आहोत.त्याचप्रमाणे भगवंत—परमात्मा भेटण्यासाठी—कळण्याकरिता व अनुभव येण्याकरिता,योग्य मार्गांचा अवलंब करावयास पाहिजे.कितीही कष्ट घ्यावावयास पाहिजे.संत—महात्मा यांची सेवा करून श्रवण करावयास पाहिजे. यासाठी निष्काम कर्म,निष्काम भक्ति करावयास पाहिजे.असे केले असता श्रवणाचा—ज्ञानाचा परिणाम होऊन आपल्यात सात्विकपणा येतो व आचरण धर्मानुसार होते.तेव्हा भगवंत कळून भगवंतांचा अनुभव येऊन जन्म—मरण निवृत्त होते||९|| त्यांच्याकडूनही उत्तर मिळालें नसतां,कृष्ण कोठें का असेना परंतू,त्याच्या पृथविबरोबर वियोग कधीही घडत नाहीं म्हणून हिला विचारावें अशा अशायानें विचारितां कि,-हे पृथिवी,तुं काय बरे तप केले आहेस?कारण कीं,जी तुं श्रीकृष्णाच्या चरणस्पर्शाने उत्साहयुक्त होऊन व कोंवळ्या तृणादिकांच्या स्वरुपानें अंगावर रोमांच उठलेली शोभत आहेस.हा तुझा उत्साह काय आतां झालेल्या कृष्णाच्या चरणस्पर्शानें उत्पन्न झाला आहे?किंवा पूर्वी वामनरुपी भगवंताने आपल्या पायांनें तुझें आक्रमण केलें होतें म्हणून झाला आहे?अथवा त्याच्याही पुर्वी झालेल्या वराहरूपी भगवंतांच्या अलिंगनानें झाला आहे?एतावता तुं त्याला खरोखर पाहिलें आहेस यास्तव आम्हांस दाखीव ||१०|| अर्थः---पुढें हरिणीचें डोळे टवटवीत पाहून तिला कृष्णदर्शन झालें असेल अशा संभावनेनें प्रश्न करितात कीं,-हे सखि हरिणांगने,तुमच्या दृष्टीना,आपल्या मनोहर मुख बाहू वगैरे अवयवांनी सुख उत्पन्न करणारा श्रीकृष्ण,प्रियस्त्रीसह वर्तमान या वाटेनें गेलाय काय?कारण,येथे स्त्रीच्या आलिंगनानें तिच्या कूचसंबंधी केशराने लिप्त झालेल्या त्या श्रीकृष्णाच्या कुंदपुष्पांच्या माळेचा सुगंध येत आहे||११|| अर्थः---पुढें फळभारानें नम्र झालेल्या वृक्षांना,हे कृष्णाला पाहून नम्र झाले आहेत असें मानून स्त्रीसहवर्तमान त्याचें गतीविलास मनांत आणीत असता प्रश्न करितात की,-हे वृक्षहो,उजव्या हातानें लीलेकारीतां कमळ धारण करणारा व ज्याच्या माणू तुळशीच्या सुगन्धनेअ मदांध झालेल्या भ्रमरांचे समुदाय जात आहे असा श्रीकृष,स्त्रियेच्या खांद्यावर डावा बाहू ठेवून येथें फिरत असतां,आपल्या सप्रेम अवलोकनांनी तुमच्या नमस्काराचे अभिनंदन करितो काय?||१२|| अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या:---हे सख्यांनो,या वल्लींना विचार.यान्नाकाय ठाऊक असें म्हणाल तर-ह्या वल्लीनि आपल्या वृक्षरूप पतींच्या खांद्यांना आलिंगन केलेलें असूनही केलेलें असूनही ह्या खरोखर फुले तोडण्याकरीता जवळ येणाऱ्या कृष्णाच्या नखांनी स्पर्श केलेल्या आहेत कारण,ह्या अंगावर कंटकादिरूपाने रोमांच धारण करीत आहते.काय त्यांचे भाग्य हे!||१३|| | इत्युन्मत्तावचो गोप्य:कृष्णान्वेषणकातराः | लीला भगवतस्तस्ता ह्युनुचक्रुस्तदात्मिकाः||१४|| अर्थः----याप्रमाणे कृष्णाचा शोध करण्याविषयी अतिविव्ह्ल व तन्मय होऊन उन्मत्तासारखें भाषण करणाऱ्या त्या गोपी,भगवंतांच्या पूतस्तनपानादीक लीलांचे अनुकरण करुं लागल्या.||१४|| अर्थः----टी असें कीं,-पुतनेसारखे आचरण करणाऱ्या एका गोपींचे,कृष्णासारखे आचरण करणारी एक गोपी स्तनपान करुं लागली.लहान मुलासारखें आचरण करून रडणाऱ्या दुसऱ्या एका गोपीने शकटासारखें आचरण करणाऱ्या गोपाला पायानें प्रहर केला ||१५|| अर्थः---एका गोपिनें तृणावर्तदैत्यासारखें आपणास करून कृष्णासारखी बाल्यस्थिती स्वीकारणाऱ्या दुसरी उचलून नेले.दुसरी एक गोपी,घागऱ्यांच्या शब्दांनी युक्त अशा आपल्या पायांना ओढीत ओढीत रांगू लागली ||१६|| अर्थः---दोन गोपी कृष्णासारख्या व रामासारख्या झाल्या व किती एक गोपी गोपांच्या बालकांसारख्या झाल्या.आणि वत्सासारखे आचरण करणाऱ्या एका गोपीला कृष्णासारखे आचरण करणाऱ्या गोपिनें मारून टाकिले,तशीच दुसरी एक आपणच कृष्ण असें मानणारी गोपी,बकासारखें आचरण करणाऱ्या गोपीला मारणारी झाली.||१७|| | आहूय दूरगा यद्वत कृष्णस्तमनूकुर्वतीम् | वेणुं क्वणन्तिं क्रिडन्तीमन्या: शंसन्ति साध्विति ||१८|| अर्थ:---जसा कृष्ण गाईंना बोलावितो त्याप्रमाणें दूर गेलेल्या गाईंना बोलावून त्या कृष्णाचे अनुकरण करूण मुरली वाजविणाऱ्या व क्रीडा करणाऱ्या एका गोपीची,गोपबालकांची भावना करणाऱ्या दुसऱ्या गोपी प्रशंसा करूं लागल्या||१८|| | कस्याचीत् स्वभुजं न्यस्य चलन्त्याहापरा ननु | कृष्णोsहं पश्यत गतिं ललितामिती तन्मना: ||१९|| अर्थ:---कृष्णाकडे मनाचाली लागलेली एक गोपि,दुसऱ्या गोपीच्या खांद्यावर आपला हात ठेऊन चालत असता ती म्हणाली की,-हे सख्यांनों,मी कृष्ण आहें माझें-हें सुंदर चालणें पहा ||१९|| | मा भैष्ट वतवर्षाभ्यां तत्त्रानं विहितं मया | इत्युक्त्वैकेन हस्तेन यतन्त्यून्नीदधेsम्बरम् ||२०|| अर्थः--दुसरी एक गोपी-तुम्ही वर व पर्जन्य यांपासून भय मानूं नका.त्यांपासून तुमचे रक्षण करण्याचें मी योजिलें आहे.असें म्हणून गोवर्धन पर्वत उचलण्याचा आविर्भाव करून तिनें एका हातानें पांघरण्याचें वस्त्र पसरून वर उचलून धरिलें ||२०|| अर्थ:---हे राजा,कृष्णासारखे आचरण करणारी,दुसरी एक गोपी कलियसर्पासारख्या आचरण करणाऱ्या दुसऱ्या गोपील पायानें दाबून व तिच्या मस्तकावर चढून म्हणाली कीं,-हव दृष्टसर्पा,तुं ह्या डोहातून निघून जा,मी खालांना दंड धारण करण्याकरितां उत्पन्न झालों आहे||२१|| अर्थः---त्या गोपिंमध्ये कृष्णासारखे वर्तन करणारी एक गोपी,गोपांसारखे वर्तन करणाऱ्या दुसऱ्या गोपींना म्हणाली कीं,-गोपहो,हा भयंकर प्राप्त झालेल्या वणवा फा आणि लाक्र आपले डोळे झांका,तुम्हांला मी अनायासानेंच मिर्भय करीन ||२२|| | बद्धान्यया स्त्रजा काचित्तन्वि तत्र उलुखुले | भीता सुदृक् पिधायास्यं भेजे भीतिविडम्बनम् ||२३|| अर्थः---त्या गोपिंमध्ये ख़ूश्रःणाश्राख़ःआ आचरण करणार्या एका सुकुमार गोपीला,यशोदेसारखें वर्तन करणाऱ्या दुसऱ्या गोपिनें फुलांच्या मोळेनें,लोणी चोरल्याच्या निमित्तानें उखळाला बांधिली असतां,भ्यालेल्या तिनें,सुंदर नेत्रांनी युक्त असें आपलें मुख हातांनी आच्छादन करून भयाचें अनुकरण केले ||२३|| | एवं कृष्णं पृच्छमाना वृन्दावनलतास्तरुन् | व्यचक्षत वनोद्देशे पदानि परमात्मनः ||२४|| अर्थः---याप्रमाणें कृष्णलीलांचे अनुकरण करणाऱ्या व वारंवार वृंदावनातील वल्लीना व वृक्षांना कृष्णाचा प्रश्न करणाऱ्या त्या गोपी नीं,एका वनप्रदेशामध्यें श्रीकृष्णाची भूमीवरील धुरळ्यात उमटलेली चरणचिन्हें पहिली ||२४|| भावार्थ:---गोपी अशा रीतीने भगवंतांनी केलेल्या पूर्व लीला प्रत्यक्ष करू लागल्या.अशा लीला करत असतांना त्यांना भगवंतांच्या चरणाचे ठसे वाळवंटात दिसले.त्यांना अशाच किरण दिसला.त्या आनंदित झाल्या,त्यांच्यांत उत्साह दिसून आला.||२४|| | पदानि व्यक्तमेतानी नन्दसुनोर्महात्मनः | लक्ष्यन्ते हि ध्वजाम्भोजवज्राङ्कुशयवादिभिः ||२५|| अर्थ:----आणि परस्पर म्हणाल्या कीं,-उदाचित्त अशा श्रीकृष्णाची हीं खरोखर चरणचिन्हें आहेत.कारण हि ध्वज,कमळ,व्रज,अकुंश,यव इत्यादिक चिन्हांनी चिन्हित असलेली दिसत आहेत||२५|| अर्थः---नंतर त्या त्या पावलांनी श्रीकृष्णाचा शोध करणाऱ्या त्या गोपांनी,पुढें तीं कृष्णाची पावलें एका स्त्रीच्या पावलांनी मिश्र असलेली पहिली आणि दुःखीट होऊन म्हणाल्या कीं,-||२६|| त्यांना त्याच चरण—चि न्हांबरोबर दुसर्या एका युवतीचे चरणचिन्ह दिसू लागले.दुसऱ्या युवतीचे चरणचिन्ह दिसल्याबरोबर त्या इत्तर गोपी अतिशय दु:खाणे व्याकूळ झाल्या,अगोदरही दु:खी होत्या,पण दुसऱ्या युवतीचे चरण—चिन्ह दिसताच अतिशय दु:खाणे व्याकूळ झाल्या,कारण काय?कारण दुसरी युवती सुख भोगीत होती व इत्तर मात्र दु:खी होत्या,त्यामुळे या पूर्वीपेक्षा अधिक दु:खी झाल्या.वास्तविक पाहता इत्त्रांचे सुख पाहून आपण सुखी व्हावे असे शात्र सांगते.त्या गोपी या निष्काम भक्त होत्या,तर जिज्ञासू नव्हत्या,म्हणून त्या अतिशय दु:खी झाल्या.म्हणून भगवंत कृष्णांना त्यांना भ्त्न्याची उत्कंठा झाली न भगवंत कृष्ण केव्हा भेटतील याची त्वरा करू लागल्या.||२६|| अर्थः---हत्तीबरोबर जाणाऱ्या हत्तीनिप्रमाणे कृष्णाबरोबर गेलेल्या व त्याने खांद्यावर हात ठेवलेल्या कोणा स्त्रीची हि पावले आहेत?||२७|| | अनयाSSराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः | यन्नो विहाय गोविन्दः प्रीतो यामनयद् रहः||२८|| अर्थः---कृष्णाबरोबर गेलेल्या ह्या स्त्रीनेंच (राधेनेंच) खरोखर हरीचें आराधन केलें आहे.कारण,आम्हां सर्व गोपींचा त्याग करून जिच्या आराधनानें संतुष्ट झालेल्या गोविंदाने तिला एकांत स्थळी नेले आहे ||२८|| भावार्थ:--- भगवंत फक्त राधीकेवर प्रसन्न झाले आहेत,आमच्यावर प्रसन्न झालेले नाहीत.याकरिता आपण दु:खी होण्यापेक्षा भगवंतांस प्रसन्न होण्यासाठी साधनेवर आरूढ होऊन प्रयत्न करावावयास पाहिजे.साधनाने साध्यापर्यंत जावे.||२८|| | धन्या अहो अमी आल्यो गोविन्दाड़्घ्र्यब्जरेणवः | यान् ब्रम्हेशो रमा देवी दधुर्मुध्न्र्यघनुत्तये ||२९|| अर्थः---दुसर्या गोपी म्हणाल्या-हे सख्यांनो,अहो हे गोविंदाचे चरणकमळरेणू मोठे धान्य आहेत.ज्यांना सर्वदोशांच्या निवृत्ति करितां-ब्रम्हदेव,शंकर व लक्ष्मी देवी सुद्धा,आपल्या मस्तकी धारण करितात म्हणून यांच्या अभिषेकाने आम्हालाही कृष्णाची प्राप्ती होण्याचा संभव आहे ||२९|| भावार्थ:---सख्यांनो!भगवान कृष्णांनी आपल्या चरणकमळांनी ज्या—ज्या धुळीला स्पर्श केला—झाला,ती धान्य होय.आपणसुद्धा भगवंतांची सर्व इंद्रियांनी सेवा करावयास पाहिजे,कारण आपण त्यामुळे धन्य हौउत.ब्रह्मदेव,शंकर,लक्ष्मी व इत्तर बरेचजन भगवंतांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी धारण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात.तसा आपणही प्रयत्न करावा.||२९|| अर्थ:---दुसऱ्या म्हणाल्या-असें असो,परंतु सर्व गोपींचे सर्वस्य अशा श्रीकृष्णाला जे एकटीच हरण करून एकांती त्याच्या अधरामृताचे सेवन करीत आहे तिची जीं उठलेली पावलें ती आमच्या मनाला फारच क्षोभ उत्पन्न करीत आहेत ||३०|| अर्थ:---याप्रमाणें कृष्णाचा शोध करणाऱ्या त्या गोपी,पुढेकेवळ श्रीकृष्णाच्याच चरणरेणूंना पाहून अत्यंत संताप संताप पावून म्हणाल्या कीं-यथें त्या रात्रीची पावले दिसत नाहींत तेव्हा सुकुमार अशा तिच्या पायांच्या तळव्यांना तृणाचे अंकुर टोंचून दुख होऊं लागले असेअल म्हणून त्या प्रीय्स्त्रीला,प्रिय श्रीकृष्णाने उचलून खरोखर खांद्यावर घेतले असेल||३१|| अर्थः---सख्यांनी,उंच असलेली फुलें काढून घेण्यासाठीं पायांच्या अग्रांनी भूमितलाचें संदर्भात झालेली म्हणूनच आधी उठलेली हीं कृष्णाची पावलें पहा.येथे प्रिय श्रीकृष्णाने त्या प्रियस्त्रीच्या केशांमध्ये घाल्ण्याकारीतां फुलें काढून त्यांचा संचय केला आहे||३२|| अर्थ:---दुसऱ्या गोपी,कृष्णाच्या गुडघ्यांमध्यें बसलेल्या स्त्रीचे भूमीवर उठलेलें चिन्ह पाहून म्हणाल्या कीं,-येथें त्या कामी कृष्णानें त्या कामिनी स्त्रीचे केंस विचरून बुचडावगैरे बांधण्याचे काम केलें आहे.कारण तीं काढलेली फुलें त्या स्त्रीच्या केसांत शोभतील तशा रीतीने मळण्याकरितां श्रीकृष्ण येथे खरोखर होता ||३३|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे गोपींनी केलेल्या भावने प्रमाणेच स्वतहाच संतुष्ट,आत्माराम व स्त्रियांच्या विलासांनी मोहित न होणारा अशेहि श्रीकृष्णाने त्या स्त्री सह वर्तमान,विषयासक्त पुरुषांचा दिन पणा व स्त्रियांचा उद्टपणा दाखविण्याकरिता क्रीडा केली होती ||३४|| अर्थः---असो.याप्रमाणे निरर्थक भाषणें करणारे व उन्मत्तासारख्या झालेल्या त्या गोपी,वनांमध्ये फिरत होत्या.बरे इतर स्त्रियांना वनांत टाकून, ज्या गोपीला कृष्णाने एकांती नेले होते तिनेही त्यावेळी,आम्हां तू असलेल्या सर्व गोपिंना सोडून हा प्रिय श्रीकृष्ण,माझ्या सांगण्याप्रमाणे माझे सेवन करीत आहे त्या पक्षी आपणच सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ आहे असें मानिले||३५-३६|| | सा च मेने तदाSSत्मानं वरिष्ठं सर्वयोषिताम् | हित्वा गोपिः कामयाना मामसौ भजते प्रियः ||३७|| अर्थः---आणि श्रीकृष्णाबरोबर काही दूर पर्यंत वनप्रदेशात जाऊन ती गर्वित होऊन श्रीकृष्णाला म्हणाली कि,-कृष्णा,येथून पुढे माझ्यानें चालवत नाहीं यास्तव मला खांद्यावर बसून,जेथे तुझ्या मनांत जावयाचे असेल तेथे ने ||३७|| भावार्थ:--- ज्या राधाला तिच्या साधनेमुळे—भक्तीमुळे भगवंत राधेबरोबर गेले.राधेला “फक्त मीच भगवंत कृष्णाबरोबर आहे,इत्तर कोणीच नाहीत”अशा प्रकारचा अंहकार—अभिमान—मीपणा आला.हा अंहकार—अभिमान—मीपणा महादोष आहे,या महादोषामुळेच जीवाला यमपुरीस जाऊन व चौऱ्याऐंशी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागत आहे.याकरिता संत—महात्मा यांची धर्माशात्रानुसार निष्काम सेवा करून अंहकार नाहीसा करावा.निष्काम सेवा अंहकार घालवू शकते.धन,मान,वैभव,ऐश्वर्य,रूप,विद्ध्य,ज्ञान,असे अनात्मा असावा,पण त्या अनात्म्याचा अंहकार—अभिमान,मीपणा नसावा.मीपणा हा दु:खाकडे नेत असतो,तर निराहंकर हा सुखाकडे नेत असतो,म्हणून आपण संत—महात्मा यांची संगती करून अंहकार—अभिमान--मीपणा घालवण्याचा प्रयत्न करावा.||३६—३७|| | ततो गत्वा वनोद्देशं दृप्ता केशवमब्रावित् | न पारयेsहं चलितं नय मां यत्र ते मनः ||३८|| अर्थ:--- अर्थः---असा स्त्रियांचा उद्धटपणा दाकव आता कानपुरुषांचा दिन पणा दाखवितो-असें सांगितले असतां भगवंताने,असें असेल तर तू खांद्यावर बसावेस असें त्या प्रिय स्त्रियेला सांगितले,आतां भगवंतांचे अखंडिततत्त्व सांगतो-नंतर ती स्त्री खांद्यावर बसण्याविषयी उध्द्युक्त झाली असता तो श्रीकृष्ण अक्स्मार्थ अंतर्धान पावला.तेव्हा ते स्त्री पश्चाताप पावली||३८|| भावार्थ:--- राधेला—गोपीला “माझ्यावरच भगवंत प्रसन्न आहेत,मीच सर्वांपेक्षा विशेष आहे व इत्तर या फारच सामान्य आहेत”असा अंहकार—अभिमान—मीपणा राधिकेला—गोपीला आला व त्या अंहकारात राधा—गोपी म्हणते”प्रियतमा!मला पायी—पायी चालण्याचा थकवा आलेला आहे,म्हणून तुम्हास जेथे जयायाचे असेल तेथे मला उचलून न्या.”कनिष्ठाने वरिष्ठांची सेवा करावयाची असते किंवा वरिष्ठाने कनिष्ठांना आज्ञा देण्याचा नियम आहे.येथे राधा ही कनिष्ठ असून भगवंत कृष्ण वरिष्ठ आहेत.असे राधेला—गोपींना माहित आहे,पण जेथे अंहकार असतो,तेथे असे काळात नसते व वळतही नसते.म्हणून राधेकेकडून नियमाचे उल्लंघन झालेले असून कळले नाही.याकरिता विवेक जागृत ठेऊन बोलावे—निर्णय घ्यावा.असे न केल्यास अंहकार व दु:ख येते ||३८|| | एवमुक्त: प्रियामाह स्कन्ध आरुह्यतामिति | ततश्चान्तर्दधे कृष्णः सा वधूरन्वतप्यत ||३९|| अर्थः---ती अशी कीं,-हा नाथा,रमणा,अतिप्रिया,महापराक्रम्या,संख्या,तू कोठे आहेस कोठे?तुझ्या वियोगानें अतिजीन झालेल्या मज दासीला तो आपले सान्निध्य दाखीव||३९|| भावार्थ:---राधिकेने असे सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात,”तू माझ्या खांद्यावर बस.”असे म्हणताच राधिका खांद्यावर बसण्यास उत्सुक झाली.त्याच क्षणी भगवंत कृष्ण अंतर्धान झाले.भगवंत अंतर्धान होताच राधीकेले पश्चाताप झाला,तिचा अहंकार नाहीसा झाला.तिला आपली चूक लक्षात आली.सहसा शिक्षेशिवाय चूक लक्षात येत नाही,म्हणून भगवंत अंतर्धान झाले.शिक्षा ही प्रगती करत असते,म्हणून शिक्षा करणाऱ्याविषयी प्रतिकूलता न येता अनुकुलता यावी.आदरभाव यावा.कृतज्ञनेता यावी.||३९|| | हा नाथ रमण प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुज | दास्यास्ते कृपणाया मे सखे दर्शय सन्नीधिम् ||४०|| अर्थः अर्थ:---याप्रमाणें प्रिय श्रीकृष्णाच्या वियोगानें मोहित होऊन दुःखी झालेल्या सखीला,भगवंताच्या मार्गाने शोधून करणाऱ्या त्या गोपींनी समीपभागीं अवलोकन केले||४०|| भावार्थ:---राधा म्हणते,”हे नाथ!हे रमणा!हे महाभुजा!आपण कोठे आहात?तुमाच्याविना मी दु:खी आहे.मी तुमच्याशिवाय एकटी राहू शकत नाही.असी चूक यापुढे करणार नाही.आपण मला क्षमा करा.मी तुमची दिन दासी आहे.मला माझा व तुमचा अधिकार कळाला.म भक्त आहे व आपण माझे ईश्वर आहात.मी कनिष्ट असून आपण वरिष्ठ आहात.मला क्षमा करा---माझ्याजवळ या. माझ्यासमोर प्रगट व्हा,कारण तुम्ही माझे प्राण आहात.प्राणाशिवाय जीव राहत नाही तसे मी तुमच्याविना राहू शकत नाही.” आपणास राधेकेसारखी अवस्था प्राप्त व्हावायास पाहिजे.त्यासाठी राधेकेसारखी साधना प्रयत्नाने प्राप्त करावी लागते.||४०|| | अन्विच्छन्त्यो भगवतो मार्गं गोप्योsविदुरतः | ददृशः प्रियविश्लेषमोहितां दुःखितां सखीम् ||४१|| अर्थः---नंतर, तिने त्या गोपींना,कृष्णापासून आपणास झालेली जन्मणाची प्राप्ती व आपल्या दृष्टस्वभावामुळे (अंतर्धान पाहून आपला त्या ग्रुप)झालेली अपमानाची प्राप्ति सांगितली असता,टी ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले||४१|| भावार्थ:--- इत्तर गोपी ह्या भगवंतांना शोधत—शोधत चालत—चालत तेथे जाऊन पोहचल्या कि जेथे राधा भगवंत कृष्णांच्या वियोगाने बेशुद्ध होऊन पडलेली आहे.इत्तर गोपींनी राधा हिस सावध केले व राधेसी बोलू लागल्या----त्याचप्रकारे आपल्यापैकी एखाद्या भक्ताची अवस्था दु:खी झालेली असेल तर.आपण त्या दु:खित भक्तास दोन शब्द अनुकूल बोलून दु:ख घालवावे.||४१|| | तया कथितमाकर्ण्य मानप्राप्तीं च माधवात् | अवमानं च दौरात्म्याद् विस्मयं परमं ययुः ||४२|| अर्थः---नंतर तिच्यासहवर्तमान त्या गोपी,कृष्णाच्या शोध करण्याकरीता जेथ पर्यंत चंद्राचा प्रकाश पडला होता तेथ पर्यंत वनांत पुढे गेले.नंतर दाट झाडीच्या छायेने पडलेल्या अंधकाराने व्याप्त झालेले टी वन पाहून तेथून मघाऱ्या फिरल्या ||४२|| भावार्थ:--- राधेकेने भगवंत श्रीकृष्ण आणि तिच्यात घडलेले पूर्ववृतांत सर्व सांगितला.तसच तिने हेही सांगितले कि,”माझ्या एकटीवर श्रीकृष्ण प्रसन्न आहेत व तुमच्यावर प्रसन्न नाहीत.असा मला अंहकार आला .त्या अंहकारामुळे भगवंत व माझा वियोग झालेला आहे.मला आता त्या अंहकाचा पश्चाताप झालेला आहे.आता यापुढे मी अंहकाररहित जीवन जगणार आहे.इत्तर गोपींनी असे ऐकल्यानंतर आश्चर्याचा पारावारा राहिला नाही.आपल्यालाही अंहकार आलेला आहे.त्याही विवेक करू लागल्या.||४२|| | ततोSविशन् वनं चन्द्रज्योत्स्ना यावद् विभाव्यते | तमः प्रविष्टमालक्ष्य ततो निववृतुः स्त्रियः ||४३|| अर्थः---याप्रमाणे कृष्णच ज्याचा आत्मा आहे अशा त्या गोपींनी कृष्ण प्राप्ति झाली नसताही कृष्नाक्डेच मन ठेऊन कृष्णाच्याच गोष्टी परस्पर वर्णन करीत,कृष्णाच्याच लीला स्वीकारीत व कृष्णाच्याच गुणांची गायन करीत आपल्या घरांचे स्मरण सुद्धा केले नाहीं||४३|| | तन्मनस्कास्तदालपास्तद्विचेष्टास्तदात्मिकाः | तद्गुणानेव गायन्त्यो नात्मागाराणि सस्मरुः||४४|| अर्थः---तर कृष्णाच्या आगमनाची इच्छा करणाऱ्या त्या सर्व गोपी,एकठिकाणी जमून,जेथे पूर्वी कृष्णाशी सांगत झाल्या होत्या त्याच यमुनेच्या वाळवंटावर पन्ह येऊन कृष्णाचे ध्यान करीत असता त्याकृष्णाचेच गायन करून लागल्या.||४४|| भावार्थ:---सर्व गोपींचे मन श्रीकृष्णमय झाले होते.श्रीकृष्णांच्या गुणांचे स्मरण करू लागल्या—गायन करू लागल्या.थोडक्यात त्या कृष्णमय झाल्या होत्या.त्यांना आपल्या देह व देहासंबंधीची आठवण—स्मरण राहिले नाही.तसे आपले मन भगवंतमय होणे जरुरी आहे.आपणास परमार्थ करत असतांना देह व देहासंबंधीची आठवण—स्मरण होऊ नये.तेव्हा भगवंतांची अनुभूती येत असते.||४४|| | पुनः पुलिनामगत्य कलिन्द्दाः कृष्णभावना: | समवेता जगुः कृष्णं तदागमनकाक्ष्गिताः ||४५|| | ( याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुरणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धात कृष्णशोधवर्णनरूप हा तिसावा अध्याय समाप्त ) | || श्रीकृष्णापणामस्तू || _________________________________________________________________________________________________________ | ३१--- किरण रास लीला---१७.[गोपी गीत---३] अध्याय पूर्ण आहे ________________________________________________________________________________________________________ १-७-२०१९-बुधवार आतां ह्या एकतीसाव्या अध्यायामध्यें कृष्णदर्शनाविषयीं निराश होऊन पुन्हा यमुनेच्या वाळवंटावर आलेल्या गोपींना,कृष्णाचेंच वारंवार गायन करीत त्याच्या येण्याची प्रार्थना केली;अशी कथा वर्णन ||१|| | जयति तेsधिकं जन्मना व्रजः श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि | दयित दृश्यतां दिक्षु तावका स्त्वयी धृतासवस्त्वां विचिन्वते ||१|| अर्थः---गोपी म्हणाल्या:---हे प्राणाप्रिया कृष्णा,तुझ्या जन्माच्या निमित्तानें हें गोकुळ,वैकुंठापेक्षाही अधिकच उत्कर्ष पावत आहे.कारण,येथें तुझें जन्म झाल्यामुळें तुला अनुसरणारी लक्ष्मीही या गोकुळाला निरंतर शोभवून राहत्ये.त्याप्रमाणे सर्व गोकुळ आनंदयुक्त झालें असतां,येथे तुझ्या दासी आम्ही गोपिमात्र.तुझ्या प्राप्तीकरीतांच कसेंतरी प्राणाचें धारण करून दशदिशांकडे तुझ्हा शोध करीत हिंडत आहो.यास्तव तुं आम्हांला प्रत्यक्ष दिसावेंस ||१|| भावार्थ:--- गोपी गीत गाऊ लागल्या.प्रियतमा!आपण व्रजभूमीमद्ध्ये जन्मास आलात—प्रगट झालात.म्हणून या भूमीचा महिमा वाढला आहे,कारण आपण याठिकाणी स्थाईक झाला आहात,त्यामुळे या व्रजभूमीला महत्व आले आहे.आपण भगवंत आहात.आपल्यामुळे लक्ष्मी कायमची याठिकाणी स्थाईक झाली आहे.म्हणून याठीकानाला ऐश्वर्य प्राप्त झाले आहे.हे प्रियतमा! ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण धारण केलेले आहेत अशा आम्ही गोपी दशदिशामद्ध्ये आपणास शोधीत आहोत.आपल्या भेटीशिवाय आमची प्राण या शरीरात राहू शकत नाहीत.आम्ही कासावीस होत आहोत.आमच्याकडून अपराध झालेला आहे.आम्ही यापुढे अंहकाररहित जीवन जगण्याचा निश्चय केलेला आहे.म्हणून आपण आम्हास क्षमा करा.आम्हास क्षमा करून आमच्यापुढे प्रगत होताल,याची आम्हास खात्री आहे.याकरिता आमची अवस्था पाहून लवकर प्रगत व्हावे,आम्ही सर्वजन विनती करतोत.||१|| अर्थः---आतां तुम्ही शोधानां बापुड्या,मला दिसण्याचें कारण काय आहे?असें म्हणशील तर-हे इच्छितवर देणाऱ्या संभोगपते,श्रऋतंतू सरोवरामध्यें उत्पन्न होऊन प्रफुल्लित झालेल्या कमळाच्या गाभ्यांतील शोभेचा तिरस्कार करणाऱ्या आपल्या दृष्टीनें,मोलाखेरीज दास्य करणाऱ्या आम्हां दासींना ठार मारणाऱ्या तुं केलेला हा वध या लोकीं होत नाहीं काय ?म्हणजे शस्त्रानेंच केलेला वध,वध होतो?दृष्टीने केलेला वध,वध होत नाहीं काय ?तर होतोच.यास्तव दृष्टीने अपहार केलेल्या प्राणाचें प्रत्यर्पण करण्याकरितां तुं आमच्या दृष्टी पडावेंस ||२|| भावार्थ:--- आम्ही गोपी जी भक्ती करत आहोत,ती निष्काम व अंहकररहित आहे.आम्हास कोणत्याही प्रकारचा विनाशी—विषयीरुपी असा कोणताही मोबदला नको,कारण त्याला अंत आहे.आंम्हाला अविनाशी—भगवंत—आपली गरज आहे.आपल्या रूपांनी आम्हास वेड लावले आहे.आपल्या नेत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.आम्ही आपल्याशिवाय राहू शकत नाहीत,म्हणून लवकर प्रगट व्हा.||२|| अर्थः---ह सर्वोत्तमा,कलियाच्या डोहांतील विषादकच्या प्राशनाने प्राप्त झालेल्या मृत्यूपासून,अघासुर दैत्यापासून,इंद्राने केलेल्या वृष्टीपासून,वायूपासून व वीजा पडून उत्पन्न झालेल्या अग्नीपासून,वृशभरूपी अरिष्टासुरापासून,व्योमासुरापासून व दुसऱ्याही सर्वप्रकारच्या भयापासून कालियदमनादिकेंकरून तुं वारंवार आमचें राखण केले आहेस आणि आतां काय म्हणून दृष्टीनें मदनाला पाठवून त्याजकडू आमचा घात करवितोस?||३|| अर्थः--- हे सख्या,तुं खरोखर यशोदेचा पुत्र नाहींस तर सर्व प्राण्यांच्या बुध्दिंचा साक्षी परमेश्वरच आहेस.आतां तो परमात्मा मनुष्यांसारखा दिसतो काय?असें म्हणशील तर –तोच परमात्मा तुं ब्रम्ह्देवाणें केली असतां जगाच्या रक्षणाकरिता यादवांच्या कुळांमध्ये अवतीर्ण झाला आहेस.यास्तव आतां तुला भक्तांची उपेक्षा करणें हें अत्यंत अनुचित आहे म्हणून तुं आमच्या दृष्टी पडावेंस ||४|| भावार्थ:---आपण सर्वांच्या हृदयात विराजमान आहात.अंतरात्मा,साक्षी,आहात.ब्रह्मदेवाच्या प्रथानेनुसार आपण विश्वाचे कल्याण करण्याकरीता यदुवंशात अवतीर्ण झाला आहात.तुमच्यामुळे आम्ही आहोत,असी आमची धारणा आहे.म्हणून प्रगत व्हा.||४|| | विरचीताभयं वृष्णिधुर्य ते चरणमियुषां संसृतेर्भयात् | करसरोरुहं कान्त कामदं शिरसी धेही नः श्रीकरग्रहम् ||५|| अर्थः---आणि तुझ्या भक्त अशा आमच्या ह्या चार प्रार्थना संपादन कर.त्या कोणत्या असें म्हणशील तर-हे सुंदर यादव श्रेष्ठा,जन्ममरण रूप संसारापासून भिऊन तुझ्या चरणास शरण आलेल्या भक्तांना अभय देणारे,ब्रम्हादिकांचे मनोरथ पूर्ण करणारे व साक्षात लक्ष्मीचेहि पाणिग्रहण करणारे असें जे तुझे हस्तकमळ तें तू आमच्या मस्तकीं स्थापन कर.||५|| भावार्थ:---हे यदुवंशशिरोमणी१ जे लोक जन्म—मृत्यू संसाराच्या चक्राला भिऊन तुमच्या चरणांना शरण येतात,कारण भक्तांचे आपण आश्रयदाते आहात.आपल्याशिवाय अन्य कोणीच आश्रयदाता नाही.आपण सर्वांना निर्भय करतात,म्हणून आपणास आम्ही शरण आलेलो आहेत.सर्वांच्या कामना पूर्ण करणारे आपण आहात.म्हणून आमचा स्वीकार करून आम्हास निर्भय करा.||५|| अर्थः---हे वीरा,तुं गोकुळवासी जनांच्या सर्व पीडा दूर करणारा असून तुझें हास्य,भक्तजनांचा गर्व नाहीसें करणारें आहे.यास्तव हे प्राणसारख्या,खरोखर तुझ्या दासी अशा आमचा स्वीकार कर आणि आम्हां स्त्रियांना,आपलें कमळासारखे सुंदर मुख दाखीव ||६|| अर्थः---हे कृष्णा,अनन्यभावानें नम्र झालेल्या प्राण्यांच्या पापाचें नाश करणारें,गाईवगैरे पशुंचे रक्षण करण्याकरितां दयेनें त्यांच्यामागून चालणारें,अतिसुंदर असल्यामुळें लक्ष्मीचेंही राहण्याचे अचळ स्थान व अतिपराक्रमी असल्यामुळें कालियसर्पांच्या फड्यांवर अर्पण केलेलें असें तुझें चरणकमळ,आमच्या कुंच्यावर स्थापन कर आणि आमच्या मदनाचा नाश कर ||७|| अर्थः---आणि ह कमळनेत्रा वीरा,ज्ञानिजनांनासुद्धां आवडणाऱ्या व मनोहरवाक्यांनी युक्त अशा तुझ्या मधुरवाणीनें मोह पावणाऱ्या ह्या आम्हां दासींना तुं आपले अधरामृत पाजून सावध कर ||८|| अर्थः---तुझा विरह प्राप्त झालेल्या आम्हांला मरणच प्राप्त झालें असतें परंतु टी मरण,तुझें कथामृत पाजविणाऱ्या पुण्यवान् पुरुषांनी हा वेळपर्यंत चुकविले आहे.म्हणून तापत्रयानें तप्त झालेल्या जनांना शांत करणें,ब्राम्हदिकांनी स्तुत्य,काम्यकर्माचे निरसन करणारें,श्रवणमात्रेंकरून मंगलकारक व अत्यंत शांत असें तुझें कथामृत,विस्तृतपणे जे पुरुष या भूमीवर गायन करितात ते मोठेच दाते होत.म्हणजे जे केवळ कथामृताचे वर्णन करितात टी सुद्धां जर अतिधन्य आहेत तर मग जे तुला पाहतात ते धन्य होतील हें काय सांगावें!यास्तव आम्ही प्रार्थना करितों कीं तुं आमच्या दृष्टी पडावेंस ||९|| भावार्थ:--- आपल्या व भक्तांच्या कथा अमृतस्वरूप आहेत.अंत:कारण शुद्ध करणाऱ्या आहेत.अज्ञानी जीवांनी त्या कथा पुन्हा—पुन्हा श्रवण करावयास पाहिजे.त्या कथा विरहाने—दु:खाणे व्याकूळ झालेल्यांचे ते जीवनसर्वस्व आहेत,म्हणजे जीवनात परिवर्तन—बदल करणाऱ्या आहेत.ज्ञानी लोक त्यांचे गायन करतात.म्हणून आपण जीवांनी गायन व श्रवण करावयास पाहिजे,कारण त्यामुळे पाप—ताप नाहीसे होतात.भगवंतांच्या कथेचे—जीवब्रह्मऐक्यज्ञानाचे जे दान[निष्काम] भावनेने करतात,ते सर्वात दानशूर असतात.म्हणून भक्तांनी निष्काम भावनेने कथा—ज्ञान सांगाव्यात—वर्णन कराव्यात.त्यामुळे अशा दानशुरांचे जन्म—मरण निवृत्त होते.||९|| अर्थः---आतां माझ्या कथाश्रवणेंकरूनच जर तुम्ही संतुष्ट आहां तर माझ्या दर्शनाचे तुम्हांस कारण काय आहे?असें म्हणशील तर-हे तुझ्या विलासानें क्षुभितचित्त झालेल्या आमची केवळ तुझ्या श्रवणमात्रेंकरून शांतता होत नाही तर तुझी प्रप्तींच झाली पाहिजें.कारण,हे प्रिया,ध्यानमात्रेंकरूनच मंगलकारक असें तुझें जें अतिसुंदर मंद हास्य,प्रेमपूर्वक नेत्रकटाक्षांनीं केलेलें अवलोकन व खेळणें तशीच ह्रदयाला आवडणारीं जीं सांकेतिक विनोदभाषणें ह्या सर्व गोष्टीं,हे कपट्या,आमच्या मनाला क्षोभ करीत आहेत.||१०|| भावार्थ:---आपल्या लीलांचे व स्वरूपाचे ध्यान मंगल करणारे आहे,म्हणून आपण भगवंतांचे ध्यान करावे.आपण प्रेमाच्या—भक्तीच्या जे कथन केले,त्या आम्हास फार आवडल्या.याकातीता आम्हास आपण लवकर दर्शन द्याल,अशी आम्हास अपेक्षा आहे.||१०|| अर्थः---आतां आम्ही तुझ्याठिकाणी अतिप्रेमाने आर्द्रचित्त असून तुं आमचेठीकीण काय म्हणून कपट आचरण करितोस असें दोन श्लोकांनी सांगतात-हे नाथा,हेसुन्द्रा ज्यावेळी गाईंना चारणारा तुं,गोकुळांतून बाहेर जातोस त्यावेळी तुझें कमळासारखे कोमळ पाय,कणसें,गवताचें बुडखे व दर्भादिकांचे अंकुर टोचून क्लेश पावत असतील म्हणून आमचें मन,काळजीनें अस्वस्थपणा पावतें.अशाप्रकारच्या (तुझ्या दुःखाने शंकितचित्त झालेल्या)आम्ही आहों आणि हे वीरा-तुं तर सायंकाळी काळ्या कुरळकेसांनी वेष्टित व गाईंचा धुरळा बसलेलें आपले कमळासारखे मुख धारण कारित ते वारंवार आम्हांला दाखवीत आमच्या मनामध्यें केवळ मदनालामात्र उत्पन्न करितोस पण आपला संग देत नाहींस म्हणून तुं मोठा कपटी आहेस||११-१२|| भावार्थ:--- हे नाथ गुरे चारण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर—वनात जातात,यावलेस आम्हास फार वाईट वाटते कि.भगवंत बालकृष्ण किती कोमल व नाजूक आहेत.त्यांच्या पायाला गाई चारत असतांना काटे मोडत असतील,टोचत असतील.किती दु:ख होत असेल असा विचार मनात येतो,त्यावेळेस आम्हाला अतीव दु:ख होते.काय करावे असे कांहीच कळत नाही.||११|| अर्थः---यास्तव आतां तू आपलें कपट टाकून देऊन असें कर कीं,-हे रमणा,हे संतापहारक,शरणागतांचे मनोरथ पूर्ण करणारें,ब्रम्हदेवाने पूजित,पृथ्वीचें भूषण,ध्यानमात्रेंकरून आपत्ति घालविणारें व सेवा करत्यवेळीं सुद्धां परम आनंद देणारें असें तुझं चरणकमळ,कामसंताप दूर होण्याकरितां आमच्या स्तनावर अर्पण कर ||१३||आणि हे वीरा,सुरताची वृद्धि करणारें सुस्वरनाद करणाऱ्या मुरलीनें उत्तमप्रकारें चुंबन केलेंले आणि ज्यांना त्याची प्राप्ति होत्ये त्या मनुष्यांना सार्वभौमादि सुखांचाही विसर पडणारें असें तुझें अधरामृत तुं आम्हांला अर्पण कर||१४|| अर्थः----कृष्णा,तुं जेव्हा दिवसा वनामध्यें फिरत असतोस तेव्हा तुला न पाहणाऱ्या प्राण्यांना एका त्रुटी इतका स्वल्पही काळ,युगासारखा होतो म्हणजे तितका वेळ फार दुःख होतें आणि जेव्हा संध्याकाळी तुं परत येतोस तेव्हा कुरळ केसांनी युक्त व अतिसुंदर असें तुझें मुख मोठ्या प्रेमानें अवलोकन करणाऱ्या प्राण्यांना,डोळ्यांना पापण्या करणारा ब्रम्हदेवही केवळ मूर्ख आहे असें वाटून लागले,म्हणजे दर्शनांत निमेशमात्रही अंतर सोसवत नाही.मिळून तुझ्या दर्शनाने अतिसुख होते.||१५|| भावार्थ:--- दिवसा जेव्हा वनामध्ये विहार करण्यासाठी जातात,त्यानंतर आपण आम्हास दिसत नाहीत.आपण न दिसल्यामुळे एक—एक—क्षण युगासारखा वाटतो.त्यामुळे आमचा विरह अधिक वाढतो.आपण ज्यावेळेस सांयकाळी घरी परत येतात,त्यावेळेस आपणास आम्ही न्याहाळून पाहतो,पण पाहत असतांना पापण्या सतत—सतत खाली—वर होत असल्यामुळे आपण दृष्टीआड जातात.त्यामुळे आम्ही कासावीस होतोत.वातकी ईश्वरांनी या डोळ्यांच्या पापण्या खालीवर मिटणे व उघडे सतत ठेवले नसते तर फार चांगले झाले असते.पण हा केवढा मूर्खपणा ईश्वरांनी केला असे वाटते.पण ---- भावार्थ इतके आपणास पाहण्यासाठी आम्ही त्वरा करतोत.||१५|| अर्थ:---म्हणून हे अच्युत,आम्ही,गायनाच्या सर्व गति जाणणाऱ्या तुझ्या मधुरगायनानें मोहित होऊन आपल्या पती,पत्र,कुल,भाऊ,बंधुजन या सर्वांचा त्याग करून तुझ्याजवळ प्राप्त झालों आहों.यास्तव हे दशाहुर्ता रीतीनें होऊन रात्रीच्या वेळीं चालून आलेल्या बायकांना तुझ्याशिवाय दुसरा कोण बरें पुरुष टाकील?कोणीच टाकणार नाहीं||१६|| भावार्थ:--- हे अच्युता!आही आमचे पती—पुत्र,बंधू—बांधव आणि कुलाचा त्याग करून आपल्याकडे आलेलो आहोत.त्यांचे आम्हास स्मरणसुद्धा नाही व त्याचे दु:खही नाही,पण आपली भेट होत नाही,त्याचे फारच दु:ख होत आहे.म्हणून या दु:खातून सुटका व्हावी,म्हणून आम्हास दर्शन ध्यावे असी आम्ही विनंती करत आहोत.गोपींना जशी अवस्था झाली,तसी अवस्था भगवंतांविषयी आपणास व्हावी,तेव्हा आपलेही कल्याण झाल्याविषयी राहणार नाही.तुमच्या मधुर गीताने आम्ही मोहित झालो आहोत,आपणही भगवंतांच्या व भक्तांच्या कथेने व भगवंतांच्या स्वरूपाने मोहित व्हावयास पाहिजे.गोपी म्हणतात,”रात्रीचा प्रसंग आहे,आम्हा गोपिसोबत दुसरे कोणीच नाहीत व आपणही नाहीत,म्हणून भगवंता प्रगट होऊन दर्शन ध्या.”||१६|| अर्थः---यास्तव मदनाला उत्पन्न करणारें तुझें एकांतांतील भाषण,हास्य्युक्त मुख,प्रेमयुक्त अवलोकन आणि लक्ष्मीचें राहण्याचें स्थान असें विशाल वक्षस्थळ हीं पाहून तुझ्या संबंधाविषयी आम्हांला अतिशय इच्छा उत्पन्न होत्ये आणि वारंवार मन माहित होतें ||१७|| भावार्थ:--- भगवंता—प्रियतमा१ आपले हे स्वरूप व्रज—वनवासियांची सर्व दु:खे नाहीसे करणारे आणि विश्वाचे कल्याण करणारे आहेत.आपल्या वियोगाने आम्ही व्याधीग्रस्त झालेलो आहोत.त्यामुळे आम्हास कांही तरी औषध ध्या व आमचा रोग घालावा.तुमच्या दर्शनाने आमचा हा विरहाचा रोग समूळ नाहीसा होईल.याकरिता आपले दर्शन ध्यावे.||१८|| अर्थः---आणि हे कृष्णा,तुझा अवतार,गोकुळांत व वृद्वानांत राहणाऱ्या सर्व प्राण्यांची दुःखें निरसन करणारा असून सर्व जगाला मंगलरूप आहे.यास्तव तुझ्या संबंधाची मनांत इच्छा धारण करणाऱ्या आम्हांस,स्वजनांचा हृद्रोग नाहींसा करणारे जें अतिगुप्त औषध असेल टी तूंच जंत आहेस,तें-तूं,कृपणपणा न धरितां आम्हांस अर्पण कर||१८|| भावार्थः--- अर्थः---याप्रमाणें भाषण करून अतिप्रेमाने व्याकूळ झालेल्या त्या गोपी,शेवटीं रुदन करीत म्हणाल्या कीं,-हे प्रिया,सुकुलो-द्रवा,जें तुझें सुकुमार चरणकमळ,आम्ही आपल्या कठीण स्तनावर भीतभीत (त्याला इहा होईल म्हणून)हळूहळू धारण कार्रीत होतों,त्या चरणकमळानेंच तू सांप्रत अरण्यांत फिरत आहेस तेव्हां ते पदकमळ,दगडाची करपें वगैरे लागून क्लेश पावत नसेल काय?याप्रमाणे ज्यांचे आयुष्य तूंच आहेस अशा आमची बुद्धि आतां मोह पावत्ये.तू भेटशील म्हणून हा वेळपर्यंत आम्ही जिवंत राहिलों पुढे राहण्याचा नेम नाहीं यास्तव लवकर भेट दे ||१९|| | याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराण दशमस्कंध गोपिगीतवर्णननामक हा एकतिसावा अध्याय समाप्त ||३१|| _________________________________________________________________________________________________________ | ३२--- किरण रास लीला---१७.[भगवंतांकडून गोपींचे सांत्वन] -----४ अध्याय पूर्ण आहे | _________________________________________________________________________________________________________आतां ह्या बत्तिसाव्या अध्यायामध्यें,गोपींच्या विराहालापांनी सद्गदितचित्त झालेल्या त्या श्रीकृष्णाने तेथे प्रकट होऊन त्या गोपींचे सन्मानपूर्वक सांत्वन केलें;अशी कथा वर्णन केलीं आहे ||१|| | इति गोप्य:प्रगायान्त्य:प्रलपन्त्यश्च चीत्रधा | रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः ||१|| अर्थः—श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी अतिशय उत्सुक होऊन असें अनेकप्रकारें गायन करणाऱ्या व प्रलाप करणाऱ्या त्या गोपी;शेवटी उच्चस्वरानें सुस्वर रडूं लागल्या ||१|| भावार्थ:--- गोपींच्या अहंकारामुळे व त्या अंहकाराच्या परिणाम म्हणून भगवंतांच्या वियोगामुळे श्रीकृष्णांच्या दर्शनाची लालसा—इच्छा यामुळे गोपी दु:खामुळे मोठ्या—मोठ्याने रडू लागल्या.अशा दु:खाच्या प्रसंगी आपण दु:खितांचे दु:ख आपल्या अधिकारानुसार कमी किंवा नाहीसे करून,सुख देण्याचा निष्काम प्रयत्न करावा.यासच “निष्काम भक्ती” असे म्हणतात.निष्कामतेणे अंत:करण शून्य होते.निषिद्ध कर्म करून पाप होते म्हणजेच अंत:करण अशुद्ध होते.पुण्य करून अंत:कारण अशुद्ध होत नाही.||१|| | तासामाविरभूच्छौरि: स्मयमानमुखाम्बुज: | पिताम्बरधरः स्त्रग्वी साक्षान्मन्मथमन्मथः ||२|| अर्थः---तेव्हा त्यां गोपिंमाध्यें,ज्यांचे मुखकमळ हास्ययुक्त आहे असा पीतांबरधरी,फुलांच्या माळा धारण करणारा आणि जगन्मोहक असा साक्षात् मदनालाही मोहित करणारा तो श्रीकृष्ण प्रकट झाला.||२|| भावार्थ:--- भगवंत त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी प्रगत झाले,कारण त्यांना अंहकाराबदल पश्चाताप झाला होता.आपल्या च्कीचा पश्चाताप झाला असता जीवनात सुधारणा—प्रगती होत असते.त्यांचे मुखकमल स्मित झाले होते,कारण गोपिंकाना पश्चाताप झालेला होता.म्हणजे त्यामुळे त्यांच्यात सुधारणा—प्रगती होणार होती.कनिष्ठांची प्रगती पाहून वरिष्ठ आंडीत होतात.||२|| अर्थः---त्या आलेल्या प्रियतम श्रीकृष्णाला पाहून संतोषाने प्रफुल्लितनेत्र झालेल्या त्या सर्व गोपी,जसे अचेतन शरारामध्यें प्राण आला म्हणजे त्याचे करचरणादिक अवयव,एकदम चलनवलन करुं लागतात त्याप्रमाणे एकदम उठून उभ्या राहिल्या ||३|| भावार्थ:---भगवंत बाळकृष्ण यांना पाहताच गोपींचे डोळे प्रेमाने भरून आले.त्या आनंदाने बेहोष झाल्या.त्यांचा आनंद गगनात मावेना—गगन अपुरे पडले.जसा गोपींनी निष्काम भक्ती मार्गाचा स्वीकार केले,तसा आपणही निष्काम भक्तिमार्गाचा स्वीकार करून कल्याण करावे.जसे शरीरातील प्राण निघून गेल्यानंतर शरीर अचेत पडते,तशा त्या अचेत जमिनीवर पडल्या होत्या.त्याचप्रमाणे आपलीही अवस्था गोपिसारखी झाली तर आजही—आताही भगवंत आपल्यासमोर प्रगट होतात.असा अनुभव घ्यावा.||३|| अर्थः---आतां उठलेल्या त्यांची कर्मे सांगतो-अकीनें मोठ्या आनंदाने श्रीकृष्णाचे हस्तकमळ आपल्या दोन्ही हातांनी धरिलें.दुसरीनें,चंदनाची उटी लाऊन भूषित केलेला त्याचा बाहू आपल्या खांद्यावर घेतला ||४|| अर्थः---एका सुंदरीनें,त्याचें चर्वण केलेले तांबुल,आपल्या ओजळीने ग्रहण केले,त्याच्या विरहाणें सप्ततपझालेल्या तिसऱ्या गोपीने,त्याचे सुकुमार चरणकमळ आपल्या स्तनावर धारण केले ||५|| अर्थः---प्रणय कोपाच्या आवेशाने विव्हल झालेली एक गोपीतर आपला आधारोष्ट चावून व भ्रुकुटी वक्रण करून तेत्रकटाक्षांच्या संपतांनी श्रीकृष्णाला प्रहारच करिते कीं काय अशी त्या कदे तक लावून पाहू लागली||६|| | अपरानीमिषद्दृग्भ्यां जुषाणा तन्मुखाम्बुजम् | आपीतमपि नातृप्यत् सन्तस्तच्चरनं यथा ||७|| अर्थः---दुसरी एक गोपी,आपल्या डोळ्याच्या पापण्यासुद्धा न हलविता प्रेम पूर्वक पाहिलेलेही त्यांचे मुख पुन्हा पुन्हा प्रीतीने पाहात असतां ती,जसे सत्पुरुष त्याच्या चरणाचे वारंवार सेवन करीत असतांही तृप्त होत झाली नाही||७|| | तं काचीन्नेत्ररन्ध्रेण हृदिकृत्य निमिल्य च | पुलकान्ग्युह्यास्ते योगीवानन्दसम्प्लुता ||८|| अर्थः---कोणी एकीनें तर-आपल्या नेत्रच्छिद्रद्वारा त्या श्रीकृष्णाला ह्रदयात नेऊन व त्याला आलिंगन करून पुन्हा तो बाहेर पडून नये म्हणून डोळे झांकून,जिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेट अशी ती गोपी,आनंदात निमग्न होऊन योग्यासारखी स्तब्ध राहिली ||८|| | सर्वास्ताः केशवालोकपरमोत्सवनिर्वृताः | जहुर्वीरहजं तापं प्राज्ञं प्राप्य यथा जनाः ||९|| अर्थः---असो.त्या सर्व गोपिनी,श्रीकृष्णाच्या दर्शनरूप परमोत्साहणे आनंदित होऊन,त्याच्या विरहापासून झालेल्या तापाचा,जशे मुमुक्षु जन ईश्वराला पाहून संसारतापाचा त्याग करितात त्याप्रमाणे त्याग केला ||९||बां परीक्षित राजा,श्रीकृष्णाच्या दर्शनादिकेंकरून ज्यांचा विरहजनी शोक निवृत्त झाला आहे अशा त्या ग्पीने वेष्टित झालेला तो भगवान श्रीकृष्ण,जसा प्रकृत्यांधिक उपाधींनी युक्त झालेला अंतर्यामी पुरुष,अधिकच शोभतो त्याप्रमाणे शोभू लागला||१०|| अर्थः---नंतर त्या गोपींना आपल्या बरोबर घेऊन,जेथे प्रफुल्लित झालेल्या कुंद व मंदार वृक्षांवरून आलेला सुगंध वायू वाहात असल्यामुळें त्या गंधाला लुब्ध झालेला श्रमर फिरत आहेत,जेथ शरऋतूंतील चंद्राच्या किरण समूहांनी रात्री संबंधी अंधकार नाहीसा झाला आहे व जेथे यमुना नदीच्या हस्त रूप तरंगांनी,अतिशय मऊ वाळू पसरून ठेविली आहे,अशा यमुनेच्या सुखकारक वाळवंटात प्रवेश करून,त्यांनी युक्त झालेला तो पभू श्रीकृष्ण,अतिशय शोभू लागला.||११-१२|| | शरच्चन्द्रांशुसन्दोहध्वस्तदोषातमः शिवम् | कृष्णाया हस्ततरलाचितकोमलवालुकम् ||१२|| भावार्थ:--- शरद पोर्णिमा व भगवंतांचे प्रगट होणे,यामुळे जिकडे—तिकडे प्रकाशमय वातावरण झाले होते.अशा परीस्थित भगवंतांनी त्या सर्व गोपिसाहित वाळवंटात प्रवेश केला,कारण आता त्या अधिकारसंपन्न झाल्या होत्या.याकरिता परमार्थ साधकांनी आपला अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करावा,कारण अधिकारानुसार साधना केली कि,फळ मिळतच असते—साध्याकडे वाटचाल होत असते.यामिना नदीने आपल्या आताच्या हातांनी वाळू समतोल केली होती,त्याचप्रमाणे आपणही आपले अंत:कारण समता—समभाव या सदगुणानी परिपूर्ण करावयास पाहिजे.तेव्हा भगवंतांचे आपणास दर्शन होते.आपण नेहमीसाठी साधनेवर आरूढ पाहिजे.||१२|| | तदर्शनाल्हादविधूतहृदृजो मनोरथान्तं श्रुतयो यथा ययुः | स्वैरुत्तरीयैः कुचकुङ्कुमाङिक्तै रचीक्ऌपन्नासनमात्मबन्धवे ||१३|| अर्थः---श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी तेव्हां अशा श्रुती,कर्म कांडामध्ये परमेश्वराला न पहाता कमीकर्माचे प्रतिपादन करीत असतां त्या अपूर्ण मनोरथ असल्या सरख्यो होतात आणि त्याच श्रुती,ज्ञान कांडांमध्ये ईश्वराला पाहून त्याचे प्रतिपादन करीत असतां पूर्ण मनोरथ होतात त्याप्रमाणे त्या भगवताच्या दर्शनानंदाने विरहजनी शोक दूर झालेल्या त्या गोपी,आपल्या मनोरथांचा अंतः पावल्या म्हणजे पूर्ण मनोरथ झाल्या व तश्याच स्थितीमध्येहि त्यांनी भगवंताच्या प्रेमाने सेवन केले.ते असें की,-त्या गोपींनी,स्तनसंबंधी केंशर लागलेल्या आपल्या प्रावरणवस्त्रांनी सर्व जीवांचा अंतर्यामी अशा त्या श्रीकृष्णाला असावयास असन कल्पिले,||१३|| भावार्थ:--- भगवंत कृष्णांच्या दर्शनाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीसी झाली व त्या आनंदित झाल्या.त्यांची मनोभावना पूर्ण झाली.निष्काम कर्म करून,निष्काम भक्ती करून मनोरथ पूर्ण होत नाही,तर मनोरथ पूर्ण होण्यासाठी परोक्ष जीवब्रह्म--ऐक्यऐक्य अनुभवाच्या ज्ञानाने मनोरथ पूर्ण होतात,म्हणजेच जन्म—माराम निवृत्त होऊन जीव सुखरूप होतो.जसे वेद कर्म व भक्तीचे वर्णन करीन त्याचा मनोरथ पूर्ण होत नाही,तर ज्ञानाचे वर्णन केल्यानंतर त्याचे मनोरथ पूर्ण होतात.म्हणून जीवांनी निष्काम कर्म करून,निष्काम भक्ती करून व जीवब्रह्मऐक्यज्ञानानेच मनोरथ पूर्ण होईल,अन्यथा नाही.गोपींना बाळकृष्णचे दर्शन झाल्यानंतर आपल्या अंगावरील उपवस्त्रे आपल्या परमाप्रीयास बसण्यासाठी अंथरली.त्यांना ती वस्त्रे अंथरण्यास संकोचपणा न वाटता धन्यता वाटली—सार्थकता वाटली.आपली अवस्था गोपिंसारखी होणे अत्यंत जरीरी आहे.तेव्हा मनोरथ पूर्ण होईल.||१३|| अर्थः---तेव्हां सिद्धयोग्यांच्या ह्रदयकमळामध्यें ज्याच्या आसनाची कल्पना आहे तो षड्गुणैश्र्वर्य संपन्न ईश्वर,गोपांच्या सभेमध्यें त्या उत्तरीय वस्त्रांच्या आसनावर बसला.तेव्हां त्यां गोपींनी त्याचें प्रीतीनें पूजन केलें असतां त्यांना त्रैलोक्यातील शोभेचें एकच स्थान असें आपलें शरीर दाखवीत असता शोभुं लागला ||१४|| भावार्थ:---योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी—ज्या जीवब्रह्मऐक्यज्ञानी भक्तासाठी आसन केलेले असते,तेच भगवंत—परमात्मा गोपींच्या ओढन्यांवर बसण्यास त्यांना संकोच—कमीपणा वाटला नाही.त्रीलोकांतील सौंदर्य ज्यांच्या ठिकाणी एकवटलेले होते,असा श्रीविग्रह त्यांनी धारण केलेला होता.असे भगवंत गोपींनी जे वस्त्र अंगावर परिधान केले,त्यावर सहज बसले.||१४|| अर्थ:---नंतर हास्ययुक्त लीलावलोकानें कटाक्ष फेकणाऱ्या भूकुटीनें युक्त अशा त्या गोपी,मदनाला प्रदीप्त करणाऱ्या त्या श्रीकृष्णाच्या ‘आपल्या मांड्यांवर घेतलेल्या त्याच्या पायांच्या व हातांच्या संमदर्शनाने’सत्कार करून व ‘कितीतरी सुंदर व सुकुमार शरीर हे’इत्यादिकेंकरून त्याची स्तुति करून तो कृष्ण अंतर्धान पावला होता म्हणून किंचित कुपित झालेल्या त्या गोपी,त्याचा अपराध त्याच्या मुखानें वडविण्याकरितां भाषण करुं लागल्या की,-||१५|| | भजतोsनुभजन्त्येक एक एतद्वीपर्ययम् | नोभयांश्च भजन्त्येक एतन्नो ब्रूहि साधु भोः ||१६|| अर्थः---हे कृष्णा,या जगामध्यें कितीएक लोक,आपली सेवा करणाऱ्या लोकांनच अनुसरून त्याच्या सेवेनुसार त्यांची प्रतिसेवा करितात;कित्येक,आपली उलट सेवा होण्यी अपेक्षा न धरितां सेवा न कारणांरांचीही सेवा करितात,कित्येक तर प्रत्युपकार करणारांची किंवा न करणारांचीही सेवा मुळींच करीत नाहीत.तेव्हां ह्या तीन पक्षांमध्यें कोणाकोणाला गुणदोषांचे फळ कसकसे मिळतें?तें तुं आम्हांस स्पष्टरीतीनें सांग||१६|| | मिथो भजन्ति ये सख्यः स्वार्थैकान्तोद्दमा हि ते | न तत्र सौहृदं धर्मः स्वार्थर्थ तद्धि नान्यथा ||१७|| अर्थः--- याप्रमाणे प्रश्न केला असतां गोपींचा अभिप्राय जाणून भगवान् म्हणाला की,-हे संख्यानो,जे पुरुष,परस्परांच्या उपकारांची फेड करण्याकरीता परस्परांची सेवा करीता ते केवळ स्वार्था करितांच तो धंदा करणारे होत.म्हणजे त्याचे तें भजन केवळ स्वार्थाकरितांच असतें दुसऱ्याकरिता नसतें.म्हणून त्यामध्यें खरें प्रेम व त्यापासून होणारें सुख किंवा धर्म हें मिलींच नाहींत ||१७|| भावार्थ:--- सख्यांनो!जे १---प्रेम करणारावर प्रेम करतात,असे हे सर्व स्वार्थीच असतात.त्या वृत्तित प्रेमही नसते व धर्मही नसतो,तर केवळ स्वार्थच—लोभच असतो.असे हे सर्व तमोगुणांनीग्रस्त असतात.यांना “पामर जीव” असे म्हणतात.फक्त जडास मानतात.||१७|| | भजन्त्यभजतो ये वै करुणाः पितरो यथा | धर्मो निरपवादोsत्र सौहृदं च सुमध्यमा: ||१८|| अर्थः---आतां हे कृशकटीनों,जे पुरुष,निरपेक्षपणे आपणावर प्रत्युपकार न कारणांराची सेवा करितात ते दोन प्रकारचे आहेत,एक दयाळू (साधू) व दुसरें-जसे आईबाप केवळ स्नेहानें पुत्रांचे संगोपन करितात तसे स्नेही होत.त्यांमध्ये दयाळूं पुरुषांना त्यांच्या निर्पेक्षा उपदेशादिक करण्यापासून निर्विवाद धर्म घडतो व दुसऱ्या स्निग्ध पुरुषांना सौह्र्द (प्रेम)व त्यांपासून सुख प्राप्त होतेआ||१८|| भावार्थ:--- हे सुंदरींनो! २--जे लोक प्रेम न करणारावरवरही प्रेम करता.असे स्वभावात:च करुणाशील असलेले सज्जन माता—पिता, असे लोक असतात.यांना “विषयी—धर्माशात्रानुसार आचरण करणारे” असे मानण्यास कांहीच हरकत नाही.आपले हित होवो किंवा न होवो,दुसर्यांचे हित व्हावे एवढीच सदिच्छा असते.आपला स्वार्थ होवो असे त्यांना वाटत नाहो.इत्तारांचेच हित व्हावे.३—धर्मशात्रानुसार आचरण करणारे,आपले अहित झाले तरी हरकत नाही,पण समोरच्याचे हितच व्हावे.निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करून अनुभव येऊन जन्म—मरण निवृत्त करणारे यांना “जिज्ञासू” असे म्हणतात.या चौघातून आपण कोण होण्याचा प्रयत्न करावा?यातून आपण पामर किंवा पामरातील पामर कृतघ्न मात्र मुळीच होऊ नये,कारण हे दोघेही यमपुरीस जाऊन दु:ख भोगीत असतात व त्यानंतर चौऱ्याऐंसीयोनीस प्राप्त होऊन नेहमीसाठीच दु:ख भोगीत असतात.आपण यातील कमीतकमी विषयी म्हणजे धर्मशात्रानुसार आचरण करून पुण्य संपादन करणारा सदगातीला—स्वर्ग किंवा वैकुंठ किंवा कैलासास जाणारा होय.आपण वास्तविक पाहता जिज्ञासू व मुक्त होणारा जो आहे,तोच होण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठीच हा मनुष्यदेह मिळालेला आहे.विषयांचा भोग मिळण्यासाठी नरदेह मिळालेला नाही,कारण विषयांचा उपभोग मामुष्ययोनीतही मिळतो व चौऱ्याऐंसीयोनीतही मिळतो.म्हणून मनुष्यदेहात फक्त परमार्थाच करावा,कारण मनुष्यात्तर देहातच परमार्थ करता येतो,अन्य कोणत्याच देहात परमार्थ करता येत नाही.यावर पुन्हा—पुन्हा विवेक—विचार करावा.असे कळण्याकरिता व वालाण्याकरिता संत—महात्मा यांची निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना करावी.असे केले असता अंत:कारण शुद्ध होऊन स्थिर होते.असे झाल्यानंतर संत—मातम यांच्या मुखातून शात्र श्रावण करून ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा.असे झाले असता आपले जन्म—मरण निवृत्त होऊन जीव सुखरूप होतो.याकरिता मुख्य म्हणजे संसारातील कांही मागणी करता,जन्म—मरण निवृत्त होईल हीच फक्त इच्छा प्रगट करावी.||१८|| | भजतोsपी न वै केचिद् भजन्त्यभजतः कुतः | आत्मारामा ह्याप्तकामा अकृतज्ञा गुरुदृहः ||१९|| अर्थः---आता कितीएक तर-प्रत्युपकार कारणारांचीही सेवा करीत नाहींत मग प्रत्युपकार न करणारांची कोठून करणार ! करीतच नाहींत.ते पुरुष,चार प्रकारचे आहेत.एक स्वस्वरूपी रममाण असणारें,दुसरें विषयांना पाहत असताही पूर्णकाम असल्यामुळें भोगेच्छा न धरणारे,तिसरें दुसऱ्यानें केलेल्या उपकारांचे अनुसंधान न राखणारे (मूर्ख)व चवथे गुरुद्रोही म्हणजे दुष्टचित्त असल्यामुळें,जों आपल्यावर उपकार करितो तो गुरुतुल्य पूज्य असूनही त्याचा सत्कार न करितां उलटा त्याचा द्रोह करणारे (निर्दय)असे होत ||१९|| भावार्थ:--- १----कांही लोक प्रेम करणारावरही प्रेम करत नाहीत,मग प्रेम न करणारावर कोठून प्रेम करतील?अर्थातच प्रेम करणार नाहीत असे वेगळे सांगण्याची मुळीच आवस्यक्ता नाही.अशांना शस्त्र “कृतघ्न” असे म्हणते.कृतघ्न म्हणजे केलेल्यांचे उपकार न मानणारा व त्यांचेही अहित करणारा असा “पामारातला पामर” होय.४—जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य—संत—महात्मा—ऋषी—मुनी असे चार प्रकारांचे लोक जगात वावरत असतांना आपल्याला दिसतात.आपण थोडक्यात आपण पामर किंवा कृतघ्न मुळीच होऊ नये,तर कमीतकमी निष्काम विषयी किंवा जीज्ञासू होऊन मुक्त होण्याचा प्रयत्न करावा.||१९|| | नाहं तु सख्यो भजतोsपि जन्तुन् भजाम्यमिषामनुवृत्तीवृत्तये | यथाधनो लब्धधने विनश्टे तच्चिन्तयान्यन्निभृतो न वेद ||२०|| अर्थ:---असे भगवंताचें वचन ऐकून,हा कृष्ण,बर्हिर्दृष्टी असल्यामुळे आत्माराम नव्हें,गायनानें आम्हांस बोलविल्यामुळें पूर्णकाम नव्हे व चतुर असल्यामुळे कृ तोपकार न जाणणारा (मूर्ख)हि नव्हें,तर शेवटच्या पक्षांतला गुरुद्रोही (निर्दय)आहे,असें मनांत आणून नेत्रसंकेतांनी परस्पर गुप्तहास्य करणाऱ्या त्या गोपींना पाहून तो श्रीकृष्ण म्हणाला की,-हे संख्यांनो,मी तर यांच्यापैकी कोणीच नसून परमकारूणिक व परममित्र आहे.कसा म्हणाला तर-मी,माझी सेवा करणार्या प्रन्यन्चेअ,‘त्यांना निरंतर माझें ध्यान व्हावें म्हणून’सेवन करीत नाहीं.जसा निर्धन पुरुष,कदाचित् प्राप्त झालेलें द्रव्य नष्ट झाले आम्ह्न्जे त्याच्या चितेनें अगदीं च्याप्त होऊन दुसरें क्षुधातृषावगैरे कांहीच जंत नाहीं त्याप्रमाणे माझा भक्तही कदाचित् मल प्रत्यक्षपाहून पुन्हा मी गुप्त झालो असतां,माझ्या चिंतेत निमग्न होऊन आपल्या देहाचे सुद्धां अनुसंधान राखीत नाहीं,तर माझेच निरंतर चिंतन करीत राहतो.||२०|| भावार्थ:--- भगवंत म्हणतात,”सख्यांनो! मी तर प्रेम करणारांवर प्रेम करत नाही,कारण ज्याअर्थी प्रेम करतात,त्याअर्थी माझ्याकडून त्यांचे विशेष हित होते.त्या विशेष हितासाठी पुन्हा—पुन्हा मला भेटतात.यांची चित्तवृत्ती नेहमी माझ्यास्कडेच लागावी,म्हणून त्यांच्यावर प्रेम करत नाही.नेहमीसाठी चित्तवृत्ती माझ्याकडेच लागली तर ते भगवंतरुपच होऊन सुखरूप होतात.याकरिता मीसुद्धा दर्शन देतो व पुन्हा दर्शन देत नाही,यासाठी पुन्हा—पुन्हा माझेच स्मरण करतात.त्यामुळे त्यांचे संसारातील लक्ष कमी होऊन,माझ्याकडेच लक्ष लागते,म्हणून त्यांच्यावर प्रेम करत नाही.माझे नेहमी लक्ष त्यांच्याकडेच असते,पण मात्र त्यांना कळू देत नाही,कारण तसे जर कळले,तर त्यांचा अभिमान वाढतो.भक्तांचा अभिमान वाढला तर त्यांचे अधोगती होते.म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करत नाही.जसे आई लेकरांचा मोह करत नाही तर प्रेम करते.तसेच मीसुद्धा त्यांचा अभिमान वाढू नये,म्हणून पुन्हा—पुन्हा भेटत नाही,पण लक्ष त्यांच्याकडेच असते.”आपणसुद्धा अभिमान येऊ नये व लक्ष भगवंतांकडे लागावी,म्हणून आपली ओढ भगवंतांकडे असावी.संसारात लक्ष कमी असावे.चित्तवृत्ती नेहमी भगवंतांकदडेच असावी.असा विवेक करावा.||२०|| | एवं मदर्थोज्झितलोकवेद स्वानां हि वो मय्यनुवृत्तयेsबलाः | मया परोक्षं भजता तिरोहितं मासूयीतुं मार्हथ तत् प्रियं प्रियाः||२१|| अर्थः---याप्रमाणे हे स्त्रियांनो,माझ्या प्राप्तीकरिता क्या तुम्ही योग्यायोग्य विचार,धर्माधर्मविचार व बांधवाचा स्नेह हे सर्व टाकिले आहत त्या तुमची निश्चळ वृत्ती माझे ठिकाणी रहावी म्हणून तुमचे प्रेम आलाप गुप्तरीतीनें श्रवण करणाऱ्या मी अंतर्धान केलें होतें हे प्रिय संख्यांनो,तुम्ही तुमचे प्रिय करणाऱ्या मजवर दोषारोप ठेवण्यास योग्य नाहीं||२१|| भावार्थ:---भगवंत म्हणतात,” गोपिंनो!तुम्ही माझ्यासाठी लोकामार्यादेचा त्याग केला.लोकांकडे लक्ष दिले नाही.त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष दिले.वेदांचा जो उपदेश आहे,त्याचाही त्याग केला.उदा—वेद सांगतो कि,”स्त्रियांनी पती हाच ईश्वर मानून,त्यांच्याच अज्ञाचे पालन करावे.त्यांचीच सेवा करावे”तुम्ही मात्र त्यांच्या अज्ञेचे पालन न करता,माझ्याकडे आपण आलेले आहात,कारण तुम्हास कळले आहे कि,”अटीच्या आज्ञेचे पालन केले तर तात्पुरते सुख मिळते व भागाकॅन्तांच्या अद्नेचे पालन केले तर कायमचे सुख मिळते असे तुम्हास कळलेले आहे.याचा अर्थ तुमचा अधिकार काय आहे,असे तुम्हास कळलेले आहे.म्हणून तुम्ही असे आचरण करत आहात.म्हणून मी प्रेम करत होतो,पण कळू देत नव्हतो.म्हणून तुम्ही माझ्याकडे दोषदृष्टीने पाहू नका.तुमची भक्ती वाढवावी,म्हणून लपून बसलो होतो.गैरसमजूत करून घेऊ नका.गैरसमजूत झाली तुमचा परमार्थ सुटेल.याकरिता विवेक करा.||२१|| | न पारयेsहं निरवद्दसंयुजां स्वसाधुकृत्यं विबुधायुषापि वः|या माभजन् दुर्जरगेहश्रुंखलाः संवृश्च्य तद् वः प्रतीयातु साधुन ||२२|| अर्थः---असो,आतां अगदी खरा प्रकार सांगतो ऐका-निष्कपटपणें माझें सेवन करणाऱ्या तुमच्या चांगल्या आचरणाचा मी आपल्या चांगल्या आचरणानें प्रत्युपकार करण्याविषयीं देवांच्या आयुष्यानेहिं समर्थ होणार नाहीं कारण,ज्या तुम्ही तोडून टाकण्यास कठीण अशा गृहरुपी शृंखळा (बेड्या)अगदी तोडून टाकून माझे सेवन केलें आहेत,त्या तुमच्या प्रत्युपकार सत्कृत्याचा तुमच्या स्वभावानेच प्रत्युपकार घडव.माझे चित्त पुष्कळ भक्तांवर प्रेमयुक्त असल्यामुळे एकनिष्ठ नाहीं,म्हणून माझ्या हातून तुमचा प्रत्युपकार होणे अशक्य आहे||२२|| भावार्थ:--- घर—संसाराच्या तोडण्यास कठीण अशा बेड्या--काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर तोडून माझ्यापर्यंत आला आहात. परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न करणे,यासच आत्मिक संयोग असे म्हणतात.आत्मिक संयोग केला असता जन्म—मरण निवृत्त होते,अन्य साधनांनी आत्मील संयोग होत नाही.म्हणून परमार्थ करत असतांना आत्मिक संयोग होईपर्यंत प्रयत्न करावा.आत्मिक संयोग हा निर्दोष असून अंतिम आहे.त्यामुळेच मोक्ष मिळतो.देवांचे आयुष्य जरी मला मिळाले व तुमचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तरी या तुमच्या प्रेमाचे व सेवेचे ऋण फेडू शकत नाही.एवढे तुम्ही ऋण करून ठेवले आहे म्हणून तुम्हीच तुमच्या सौज्याण्याने तुमच्या ऋणातून मुक्त करा,अन्यथा मी सदैव तुमच्या ऋणातच राहील.याप्रमाणे आपण भगवंतांची सेवा करून,भगवंतांवर ऋण करून जीवन जगावे व ते ऋण भगवंतास फेडता येऊ नये,याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे.जीवन जगात असतांना ऋणको न होता,धनको होऊन जीवन जगा.त्याचा आपले हित—सुख आहे.ऋणको होऊन जगण्यात अहित—दु:ख आहे.||२२||-----------------------------||२२|| याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुरानांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धात गोपीसांत्वननामक हा बत्तिसाव अध्याय समाप्त झाला||३२|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || | _________________________________________________________________________________________________________| ३३--- किरण रास लीला---१७.[महारस---५] अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________ आतां ह्या तेहतिसाव्या अध्यायामध्यें गोपींच्या मंडळामध्यें प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाने,रासक्रीडा,जलक्रीडा व वनक्रीडा यांच्या योगानें त्या गोपीना रमविले अशी कथा वर्णन केलेली आहे ||१|| | इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वाचः सुपेशलाः | जहुर्वीरहजं तापं तदन्गोपचिताशिषः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणतात:---हे राजा,याप्रमाणें भगवंताच्या मनोहर वाणी ऐकून त्याच्या करचरणादिक अवयवांच्या स्पर्शाने पूर्णमनोरथ झालेल्या त्या गोपींनी,विरहापासून झालेल्या आपल्या तापाचा त्याग केला ||१|| भावार्थ:--- भगवंतांनी रासक्रीडा सुरु करण्यास होकार दिला.भगवंतंकडून होकार मिळाल्यानंतर गोपींचा विरह—दु:ख कमी झाले आणि प्रेम मिळाल्याने त्यांचा मनोरथ पूर्ण झाला.त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नाही.आनंदात मग्न झाल्या.||१|| अर्थः---त्या यमुनेच्या वाळवंटामध्यें,हर्षयुक्त झालेल्या व आपल्या सांगण्याप्रमाणे वागणाऱ्या आणि एकमेकींचे हात धरून उभ्या राहिलेल्या त्या स्त्रीरत्नांसहवर्तमान श्रीकृष्णाने,रासक्रीडा (नांचणाऱ्या बहुत स्त्रियांनी युक्त अशी एक नृत्यूक्रीडा)आरंभिली ||२|| भावार्थ:---भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयाशी आणि निष्काम सेविका एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या.त्या स्त्रीरत्नांबरोबर भगवंतांनी रासलीला—रासक्रीडा सुरु केली.भगवंत श्रीकृष्णांचे शरीर दिव्य—अलौकिक होते व गोपींचा अधिकार हा उच्चतम असल्यामुळे हे रासलीला आत्मानंद व परमात्मा यांच्या ऐक्याची होती.शरीरभावाच्या अतीत ही रासलीला होती.प्रेमातसुद्धा उच्चअवस्था असते,तेथे स्थूलता नसते.जेथे जड किंवा जड वस्तूस प्राधान्य असते तेथे प्रेम नसते,तर जेथे प्रेम असते,तेथे जड किंवा जड वस्तूस प्राधान्य नसते,असा सर्वांचा अनुभव आहे.याकरिता आपण जीवन जगत असतांना जड किंवा जड वस्तूस प्राधान्य देऊ नये.जे जड किंवा जड वस्तूस प्राधान्य देतील तेथे अपेक्षाभंग होऊन दु:खच भोगावे लागते.हाही अनुभव आपणास येतो,म्हणून जड वस्तूस प्राधान्य न देता प्रेमास प्राधान्य ध्यावे,कारण तेथे आनंद असतो.प्रेम हे निर्गुण व निराकार आहे तर जड किंवा जड वस्तू ही सगुण साकार आहे.म्हणून प्रेमात आनंद आहे तर जडात किंवा जड वस्तुत दु:ख आहे.||२|| | यं मन्येरन् नभस्तावद् विमानशतसड़्कुलम् | दिवौकसां सदाराणामौत्सुक्यापहृतात्मनाम् ||४|| अर्थः---ती रासक्रीडा-मंडळरूपाने उभ्या राहिलेल्या त्या दोन दोन गोपींच्या मध्यें एकेक स्वरुपानें प्रवेश केल्लेल्या,व ज्या कृष्णाला सर्वही,स्त्रिया आपापल्याजवळ उभा राहून हा मलाच आलिंगन करीत आहे असें मानित,असा त्या अचिंत्यशक्तिं श्रीकृष्णाने कंठाचे ठिकाणी ग्रहण केलेल्या गोपीच्या मंडळाने (घरानें )सुशोभीत अशी,जों सुरु झालि तो इतक्यांत तो चमत्कार पाहण्याचा उत्सुकतेनें व्याकूळ चित्त झालेल्या स्त्रियांसहवर्तमान देवकीच्या शेकडो विमानांनी आकाश भरून गेले.||३-४|| भावार्थ:--- भगवंतांनी अनेक गोपिका असल्यामुळे अनेक रूप धारण केले,कारण प्रत्येक गोपींना वाटत होते,भगवंत माझ्यासमोरच असावा.भगवंतांचे दिव्य शरीर व गोपींची उच्चतम अवस्था यामुळे त्याठिकाणी गोपिंका भगवंतांसी एकरूप झाल्या.त्यांनी आनात्मा यांचा त्याग करून आत्म्याचे गृहन केले—ऐक्य केले.जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य झाले.परमानंदात बुडाल्या,त्यांना अनात्म्याचा विसर पडला.या प्रकारची अवस्था प्राप्त होण्यासाठी आपणास अनात्याचा त्याग करणे जरुरी आहे,म्हणजे वैराग्य असणे जरुरी आहे.वैराग्य येण्याकरिता आणत्म्याचे स्वरूप काळाने जरुरी आहे.आनात्म्यांचे स्वरूप कळण्याकरिता संतसंगती जरुरी आहे.संतसंगती होण्याकरिता निष्काम कर्म व निष्काम भक्ती करणे जरुरी आहे.म्हणून निष्काम कर्म व निष्काम भक्ती करावी. हा भगवंत श्रीकृष्ण आणि गोपिकांचा रासोत्सव पाहण्याकरिता आकाशात शेकडो विमानांची गर्दी झाली होती.त्यांनाही ही रासोत्सव पाहून आत्मिक आनंद मिळत होता,पण तात्पुरता होता,कारण अनुभूती नव्हती.म्हणून अनुभूती येण्याकरिता निष्काम कर्म,निष्काम भक्ती व जीवब्रह्मऐक्यज्ञानाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी आपला अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करावा.||३—४|| | ततो दुन्दुभयो नेदुर्निपेतुः पुष्पवृष्टयः | जगुर्गन्धर्वपतयः सस्त्रीकास्तद्दशोsमलम् ||५|| अर्थः---त्या रासारंभी,देवांनी वाजविलेले दंदुभी नाद पावूं लागले.त्यांनी केलेल्या अनेक प्रकारच्या पुष्पांच्या बहुत पुष्पवृष्ठी खाली पडू लागल्या व स्त्रियांसहित विश्वावसुप्रभूती गंधर्वश्रेष्ठ त्या भगवंताचे निर्मळ यश गाऊ लागले ||५|| अर्थः--- याप्रमाणे बाहेरची गीटवाद्यादि संपत्ति सांगून आतां रासक्रीडामध्येंच गीतवाद्यांदिकांचा प्रकार वर्णन करतो-श्रीकृष्णसहवर्तमान नृत्यू करणाऱ्या त्या गोपींच्या हातील कांकणाचा,पायांतील भूषनांचा व कमरपट्ट्यांना लावलेल्या घागऱ्याचा एकच मोठा शब्द झाला||६|| अर्थः---त्या रासमंडळाचेठिकाणी,जशा सुवर्णाच्या दोन दोन मण्यांमध्ये नीळरत्नमणी विशेष शोभतो त्याप्रमाणे सुवर्णवर्णाच्या आलिंगन केलेल्या त्या दोन दोन गोपिंमाध्यें श्यामवर्ण भगवान् श्रीकृष्ण,अतिशयच शोभू लागला ||७|| अर्थः---तशाच पाय मागेपुढे ठेवणे,हात नाचविणे,मंडहास्ययुक्त,भ्रुकुटीचे चालन करणें,कमरा लावाविनें,पदर व कूच हालणें,व गालांचेठिकाणी कुंडले ठिकाणी वारंवार चमकणे या लक्षणांनी युक्त,असून मुख्यांवर धर्म बिंदू प्राप्त झालेल्या,केसांचे ठिकाणी व कमरपट्टेचे ठिकाणी दृढ ग्रंथी असलेल्या व कृष्णाचे गायन करणाऱ्या त्या कृष्णास्त्रिया (गोपीं) हि अशा मेघमंडळाचे ठिकाणी निजा चमकत शोभतात तशा कृष्णाच्या योगानें शोभू लागल्या.येथे नानमुर्ती धारण करणारा कृष्णा मेघचक्रसारखा,त्या गोपी,अनेक विजांसारख्या,धर्मबिंदू तुशारांसारखे व गायन गर्जनंसारखे जाणावें||८|| अर्थः---त्यावेळीं नृत्यू करणाऱ्या,कंठातून नानाप्रकारचे राग अच्चरणाऱ्या,कृष्णाच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या व कृष्णनाची प्रितीच आवडत असणाऱ्या त्या गोपी,उच्चस्वरानें असें गाऊ लागल्या कीं,त्या गायनाच्या योगानें हें जग भारून गेलें.||९|| भावार्थ:--- त्या प्रेममग्न गोपिका नाचत—नाचत उंच स्वरात रागदरीत मधुर गायन करू लागल्या.श्रीकृष्णांच्या संगतीमुळे व गायन व नृत्य करत असल्यामुळे शरीराच्या अंगाचा स्पर्श होणे साहजिकच असल्यामुळे अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या.त्यांची अवस्था देहातीत झाल्यामुळे त्या परमानंदात दुबल्या होत्या—एकरूप झाल्या होत्या.त्याचप्रमाणे आपणही भगवंतांची एकरूप होण्याचा प्रयत्न करावा.असे झाले म्हणजे आपले जन्म—मरण नाहीसे होऊन आपण सुखरूप हौउत.||९|| | काचित् समं मुकुन्देन स्वरजातीरमिश्रीताः | उन्निन्ये पूजीता तेन प्रीयता साधु साध्विति |तदेव ध्रुवमुन्नीन्ये तस्यै मानं च बह्वदात् ||१०|| अर्थः---कोणीएक गोपी,कृष्णाबरोबर षड्जादिस्वरांचे आलाप करीत असतां,श्रीकृष्णाने चढविलेल्या अलापांमध्ये न मिसळणारे नवेनवेच आलग्प घेउं लागली तेव्हां टी ऐकून कृष्णानें वाहवा,वाहवा असें म्हणून तिचा सत्कार केला असनां,तिनें तेच आलाप घेणें,ध्रुवनामक,तालावर उंच चढविलें,तेव्हांतर तिला कृष्णानें मोठाच मान दिला ||१०|| भावार्थ:--- परमार्थ करत असतांना कांही व्यतेय—अडथळा आला तर भागाकॅंत साह्य—मदत करत असतो—उत्तेजन देत असतो.||११|| अर्थः---याप्रमाणें नृत्यगीतादिकेंकरून कृष्णापासून मान मिळालेल्या त्या गोपिंचें अतिप्रीतीनें विलसित असे वर्तन झालें की,-कोणीएक अतिसुकुमार गोपीला रासक्रीडेच्या योगानं श्रम होऊन कृशपणा प्राप्त झाला असतां,तिच्या हातांतून कांकणे व केंसाच्या बुचड्यांतून मोगरीची फुलें गळू लागली,तेव्हां तिनें आपल्या पार्श्वबाजूला असणाऱ्या श्रीकृष्णाच्या खांद्याला बाहुनें घट्ट धरिलें||११|| अर्थः---त्या गोपिंमध्यें एका गोपिंने तर-आपल्या खांद्यावर ठेवलेल्या,कमळासारखा सुगंध येत अस लेल्या व चंदनाची उटी लावलेल्या कृष्णाच्या बहुला हुंगून अंगावर रोमच धारण केले आणि त्या बाहूंचे चुंबन करुं लागली ||१२|| अर्थ:---त्यावेळी नृत्याच्या योगानें हालत असलेल्या कुंडलांच्या कांतीने शोभणारा आपला गाल कृष्णाच्या गालाशीं मिळविणाऱ्या एका दुसऱ्या गोपीला,श्रीकृष्णाने आपण चर्वण केलेले चांबून चर्वण ||१३|| अर्थः---जिच्या पायांतील पैजण व कमरपट्ट्याच्या घागऱ्या शब्द करीत आहेतअशा नृयू व गायन करणाऱ्या एका गोपिनें,आपणास श्रम झालें असतां,त्या श्रमांची निवृत्ति करून सुख देणारें असें पार्श्वबाजूला असणाऱ्या श्रीकृष्णाचे हस्तकमल आपल्या स्तनावर धारण केले ||१४|| अर्थ:---हे राजा,याप्रमाणे लक्ष्मीचा प्रियपति अश श्रीकृष्णाला अति पावोन,त्याच्या बाहूंनी कंठांचे ठिकाणी अलीअग्न केलेल्या त्याससर्व गोपींनी त्याचेंच गायन करीत करीत यथेष्ट क्रीडा केली ||१५|| अर्थः---त्यावेळी वाद्ये वाजविणारे व गायन करणारे गंधर्वकिंनरादिक रसावेशाने मोह पावून ते स्वतांच नाचूं लागले.असतां,दुसरीच वाद्यदिसंपत्ति दर्शवित रासक्रीडेच्या संभ्रम वर्णन करितो-कानावर खोवलेली कमळे व कुरळ केंस यांच्या योगानें शोभणाऱ्या गालांनी व घामाच्या बिंदुनी,ज्या गोपींच्या मुखांवर शोभा आले आहे व ज्यांच्या केसांतून फुलांच्या माळा खालीं पाडत आहेत,त्या गोपी,हातांतील कांकणे व पायांतील नुपुरें ह्याच वाद्यांच्या गजरासहवर्तमान,भ्रमर हेच जेथे गायक आहेत अशा राससभेंमध्यें भगवंताबरोबर नुत्य करुं लागल्या ||१६|| अर्थः---जशी गोपींनी,अनेक विलासांनी भगवंतासहवर्तमान क्रीडा केली त्याप्रमाणेंच श्रीकृष्णानेंही,त्या गोपींबरोबर-जशी लहानबालकानें,आरशांत पडलेल्या आपल्या प्रतिबिबांबरोबर क्रीडा करावी त्याप्रमाणे आलिंगन,करणें,हातानें स्तन,व मांड्या इत्यादिकांना स्पर्श करणें सप्रेम अवलोकन करणें,चुंबनादिक विलास करणें व हास्य करणें याच्या योगेंकरून क्रीडा केली||१७|| अर्थ:---हे राजा,त्यावेळी,त्या भगवंतांच्या अंगसंगाने प्राप्त झालेल्या मोठ्या हर्षानें,ज्यांची इंद्रियें परवश झाली आहेत व ज्यांच्या अंगावरील माळां व भूषणें गळून खालीं पडली आहेत अशा त्या गोकुळातील स्त्रिया,बांध सुटून अस्ताव्यस्त झालेल्या आपल्या केंसांना,नेसलेल्या वस्त्रांना व स्तनावरील कुंचक्यांना,सहजगत्या पूर्वीप्रमाणे व्यवस्थितपणें धारण करण्यास समर्थ झाल्या नाहीत ||१८|| अर्थः---केवळ त्या गोपीच व्याकलेंद्रीय झाल्या असें नाहीं,तर-अशाप्रकारची कृष्णाची क्रीडा पाहून कामानें पिडीत झालेल्या देवांच्या स्त्रियाही मोहित (मूर्छित)झाल्या.तसाच शुक्र मंगल वगैरे ग्रहणा सहवर्तमान चंद्रही ते पाहून आश्चर्ययुक्त झाला.यावरून आश्चर्य पावलेल्या चंद्राने आपली गति विसरली असतां,त्याच्या मागचे सर्वही गृहत्याच्याठिकाणीच राहिले.नंतर मोठ्या झालेल्या रात्रींमध्ये गोपींनी सुखानें क्रीडा सुखानें क्रीडा असें सूचित होतें.||१९|| | कृत्वा तावन्तमात्मानं यावतीर्गोपयोषितः | रेमे स भगवांस्ताभिरात्मारामोsपि लीलया ||२०|| अर्थ:---आणि त्या भागवान् श्रिकृष्णाने स्वस्वरूपी रममाण असूनही पूर्वी कट्यायनीव्रताचा वेळी गोपकन्यांना सांगितलें होतें त्याप्रमाणें सर्वांचे मनोरथ पूर्ण होण्याकरितां,जितक्या गोपस्त्रिया होत्या तितकी आपलीं स्वरूपे लीलेने धारण करून,त्यांच्याबरोबर क्रीडा केली.||२०|| भावार्थ:--- भगवंत स्वत:तच रमणारे असले तरी तरी पण इतरांना परमार्थ घडण्यासाठी भगवंतांनी गोपिकांचा उद्धार करण्याकरिता त्यांना परामिर्थिक कार्य करण्याकरिता सहकार्य केले.रासलीला—जीवब्रह्मऐक्यज्ञानासाठी जेवढ्या गोपी होत्या तेवढे भगवंतांनी स्वत:ची रूपे धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला,त्यामुळे त्यांचा उद्धार झाला.आतासा आपण आपला उद्धार संत—महात्मा यांची संगती करून घ्यावा,कारण त्यातच आपले हित आहे.जीवब्रह्मऐक्यज्ञानाद्वार परमात्म्याचा अनुभ घ्यावा.||२०|| | तासामतिविहारेण श्रान्तानां वदनानी सः | प्रामृजत् करुणः प्रेम्णा शन्तमेनान्ग पाणिना ||२१|| अर्थः---आतां कृष्णाच्या कृपातिशय सांगतो-हे राजा,अतिविहाराच्या योगानें श्राम पावलेल्या त्या गोपींची धर्मयुक्त झालेलीं मुखें दयाळू अशा त्या,श्रीकृष्णाने,निरतिशय सुखकारक आपल्या हस्तानें प्रेमानें पुशिली ||२१|| अर्थः---नंतर कृष्णाच्या नखस्पर्शांनी अतिहर्ष पावलेल्या त्या गोपी,झळकणाऱ्या सुवर्णकुंडलांची व करळ केसांची कांति गालांवर पडून प्राप्त झालेल्या विशेष शोभेनें व अमृतासारख्या हास्ययुक्त अवलोकनानें त्या कृष्णपतीचा सन्मान करीत होत्साता त्याच्या पवित्र कर्मांचे गायन करुं लागल्या ||२२|| भावार्थ:--- गोपींनी भगवंत श्रीकृष्णांचा मानस्मान केला.त्यांच्यामुळे परमार्थ घडला.त्यांनी गोपींना उपदेश केला नसता तर गोपींचा उद्धार झाला नसता.म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मानस्मान करून गीत गाऊ लागल्या.तसेच आपण जे संत—महात्मा किंवा भगवंत यांचा मान-स्मान करुण गीत गायन करावयास पाहिजे. तेव्हा आपणास पारमार्थिक साधना घडू शकते.||२२|| अर्थः---आतां त्या कृष्णाची गोपींसहवर्तमान जलक्रीडा सांगतो-नंतर त्या गोपींनी युक्त असतो श्रीकृष्ण,त्या गोपींच्या अंगसंगाने समर्दित झालेल्या व त्यांचे कुंच संबंधी केंशर लागून रंगलेल्या आपल्या गळ्यांतील माळेच्या संबंधाने,गंधर्वपतींसारखें (गायन) गुंजाराव करीत येणाऱ्या श्रमरांनी अनुगम्यमान असता,विहाराने प्राप्त झालेला श्रम घालविण्याकरितां जसा नदीच्या तीराशी टक्कर खेळून टी फेडून टाकणारा एखादा गजेंद्र,झालेले श्रम घालविण्यासाठी हत्तिनिणीसहवर्तमान जलामध्यें प्रविष्ट होतो त्याप्रमाणें अदकांमध्ये प्रविष्ट झाला.||२३|| अर्थ:---हे राजा,हास्य करणाऱ्या तरुणी स्त्रियांनी चोहोंकडून अतिशय पानीं उडवलेला,प्रेमानें पाहिलेला व पुष्पवृष्टी करणाऱ्या देवांनी स्तुती केलेला तो भगवान्श्रीकृष्ण,स्वतां आत्मा-राम असूनही गाजेद्रसारखी लीला करीत असता उदकमध्यें स्त्रियांबरोबर रममाण झाला||२४|| अर्थः---आतां वनक्रीडा दाखवितो-नंतर त्या कृष्णानें,पाण्यांतील व स्थळावरील पुष्पांचा सुगंध वाहणाऱ्या वायुनें जेथील सर्वही दिक्प्रदेश व्याप्त केलेआहेत अशा यमुनेच्या उपवनामध्यें श्रामरांच्या व गोपींच्या समुदायांनी परिवेष्टित होऊन,जसा मदस्त्रावी गजेंद्राने हत्तीणींच्या समुदायांनी परिवेष्टित होऊन,क्रीडा करीत वनात संचार करावा त्याप्रमाणे क्रीडा करीत संचार केला ||२५|| | एवं शशांकशुविराजिता निशाः स सत्यकामोsनुरताबलागनः | सिषेव आत्मन्यवरूद्धसौरतः सर्वाः शरत्काव्यकथारसाश्रयाः ||२६|| अर्थः---त्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या स्त्रियांच्या समुदायातात राहणारा सत्यसंकल्प व आपल्या ठिकाणीच विर्याचा निरोध करून ठेवणारा (अस्खलितविर्य)अशा त्या श्रीकृष्णाने,चंद्राच्या किरणाने प्रकासहयुक्त झालेल्या व शरदृनंमध्यें होणारे असून काव्यात सांगितलेले जे रस त्यांना आश्रय भूत असलेल्या त्या सर्वही रात्रीचे सेवन केले म्हणजेच त्या सर्व रात्री मध्यें याप्रमाणेच क्रीडा केली ||२६|| भावार्थ:---शरद ऋतूतील ती रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती,त्याचप्रमाणे आपण निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून आपले अंत:कारण शुद्ध व स्थिर करावयास पाहिजे.त्यारात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रियसी गोपिस कामक्रीडा—शुद्ध सत्वमय गुणांनीयुक्त असलेली—म्हणजे जेथे कोणत्याही विषयांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसलेली स्वत:मध्ये आवरून अनेक प्रकारे विहार केला.त्यामुळे जीवात्मा व परमात्मेच्याऐक्यज्ञानाचा परमामंद अनुभवला येऊन मनुष्य जन्माचे सार्थक केले.||२६|| | संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च | अवतीर्णो हि भगवानंशेन जगदीश्वरः ||२७|| अर्थः--राजा म्हणाला :---हे शुकाचार्य,धर्माच्या संस्थाप्नेकारिता व अधर्माच्या निवृत्तिकरिताच आपल्या अंशरूप बळरामासहवर्तमान तो भगवान जगदीश्वर अवतीर्ण झाला.असें असून ||२७|| अर्थः---हे ब्राम्ह्निष्ठा,उपदेशानें धर्ममर्यादांची दुसर्यांकडून प्रवृत्ती करणारा,स्वतः आचरण करून दाखविणारा व विरोधाच्या निरासाने सर्व प्रकारे धर्माचे रक्षण करणारा अशा त्या कृष्णानेच परस्त्रीसंभोगरूप हे मोठे धर्म विरुद्ध कर्म कसें केले?||२८|| अर्थः---पूर्ण मनोरथांना हा अधर्म नाही असें म्हणावे तर पूर्ण क्रम आहे ते सुद्धा निद्यकर्म करीतच नाहीत असें असतां,पुर्णमनोरथ अशा श्रीकृष्णाने कोणत्या अभिप्रायाने हे परस्त्रीसभोगात्मक निद्यकर्म आचरण केले?हे अचारसंपन्ना,हा आमचा संशय तू छेदन कर||२९|| अर्थः---परमेश्वराचे ठिकाणी याचा दोष नाही हें सिद्ध करण्याकरितां सामान्यपण थोर पुरुषांचे वर्तन सांगत श्रीशुकाचार्य म्हणाला कीं,हे राजा,ब्रम्हदेव,इंद्र,चंद्र,विश्वामित्र इत्यादिकांचे ठिकाणीही धर्ममर्यादांचे उल्लंघन व परस्त्रीसेवन विषयी हटाने प्रा वृत्त झाल्याचे साहसहि दिसून येते परंतु टी कर्म तेजस्वी पुरुषांना जसे विष्टादीक सर्व अमंगल पदाच्या जळनाऱ्याहि अग्रीला टी कर्म मुलेच दोष लावण्यास समर्थ होत नाहीं त्याप्रमाणे पाप लावण्यास समर्थ होत नाहीं.||३०|| | नैतत् समाचरेज्जातु मनसापि ह्यनिश्वरः | विनश्यत्याचरन् मौढ्यद्दथा रुद्रोsब्धिजं विषम् ||३१|| अर्थः---तर मग् थोरांचे पाहून दुसरेही तसेच करतील असें मानशील तर-देहादिपरतंत्र असल्यामुळे ते तेजोहीन असलेल्या पुरुषानें कधीही हें शस्त्रविरुद्ध कर्म मनानेही आचरण करूनही.जर मुखपणमुळे आचरण करीत तर तो जसा रुद्रखेरीज दुसऱ्या पुरुषाने समुद्रापासून झालेले काळकुत विष भक्षण केले नाश पावतो त्या प्रमाणे नाश पावेल||३१|| भावार्थ:--- ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थे नसते,त्यांनी मनानेसुद्धा अशा गोष्टी करू नयेत.अधिकार नसेल तर त्यांचा अध:पात झाल्याशिवाय राहत नाही.जसे भगवंत शंकरांनी हालाहल विष प्याले,म्हणून आपण प्याले तर आपण त्याच विषाने मृत्यूस प्राप्त हौउत.भगवंत श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सर्व जनतेचे रक्षण केले.आपण भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला,त्या पर्वतातील थोडासुद्धा हिस्सा आपण उचलू शकत नाही.म्हणून अधिकारानुसार कृत्य करावे.अनाधिकार कृत्य करू नये.अनाधीकारानुसार कृत्य केले तर अहितच होते,अधोगती होते,म्हणून अधोगतो होईल असे कोणतेही कृत्य करू नये.||३१|| | ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् | तेषां यत् स्ववचोयुक्तं बुद्धीमांस्तत् समाचरेत् ||३२|| अर्थः---तर मग सदाचाराचे प्रमाण कसे?असे म्हणशील तर- ज्ञानवैराग्यादिकाच्या वेगाने सपन्न झालेल्या तेजस्वी पुरुषाचे अज्ञारूप भाषण सत्य आहे,म्हणून टी त्यांनी जसे केले असे तसेच आचरण करावें.आणि त्यांचे आचरण केव्हा तरी सत्य असतें म्हणून बुद्धिमान पुरुषानें त्यांचे आचरण,त्यांच्या भाषनांशी जे जुळत असेल तेवढे मात्र आचरण करावें ||३२|| | कुशलाचरितेनैषामीह स्वार्थो न विद्दते | विपर्ययेण वानर्थो निरहंकारीणां प्रभो ||३३|| अर्थः---आतां ते तरी,काय म्हणून असे साहस कर्म करितात,असें म्हणशी तर-हे समर्था राजा,त्या निरहंकारी पुरुषांना धर्मनुष्ठानानें या लोकी किंवा परलोकी काही फळ किंवा सुख मिळवावयाचे नाहीं आणि अधर्मानुष्ठाने अनर्थ किंवा दुखहि प्राप्त होणारे नाहीं.तर त्याचे कृत्य केवळ प्रारब्ध कर्माचा क्षय होण्यापुरतेच असतें ||३३|| भावार्थ:--- परीक्षित!अशा सामर्थ्यवान पुरुषाच्या ठिकाणी कर्ताभाव नसतो,तसा त्यांचा निश्चय झालेला असतो.शुभ कर्म किंवा अशुभ कर्म असो,त्या शुभ कर्मांचे फळ त्यांना मिळत नाही व अशुभ कर्माचे फळही त्यांना मिळत नाही.जाणून—बुजून अशुभ कर्म ते करत नाही.असा भावार्थ लक्षात ठेऊन विचार—वेवेक करून आचरण करावे.जेथे काय करावे व काय करू नये असे कळत नाही,तेथे संत—महात्मा यांच्या उपदेशानुसारच वागावे.त्यातच आपले हित असते. ||३३|| | किमुताखिलसत्वानां तिर्यङ्मर्त्यदिवौकसाम् | ईशितूश्चेशितव्यानां कुशलाकुशलान्वयः ||३४|| अर्थः---ती तर ईश्वराखेरीज इतर ज्ञानीपुरुषांची गोष्ट झाली,यावर नियमन करण्यास (नागविण्यास) योग्य अशा तिर्यग्योनी,मनुष्य,देव,इत्यादिक सर्व प्राण्यांना वाघ्विणाऱ्या श्रीकृष्णाला धर्माचरणाने पुण्याचा व अधर्माचरणाने पापाचा संबंध नाही हे काय सांगितले पाहिजे?||३४|| अर्थः---ज्याच्या चरणकमल संबंधी परागांची सेवा करून तृप्त झालेले भगवद्धभक्त,तसेच ज्याच्या ध्यानरूप योगाच्या सामर्थ्याने सर्व कर्मबांध निवृत्त झालेले योगी व त्याचे ऐक्य रूप चिंतन करणारे ज्ञानीही कोणत्याच कर्माने बांध न पावता येथेच्छपणें संचार करितात,त्या आपल्या इच्छेने कृष्णावतार धारण करणार्या भाग्वान्तानाला विरुध्द आचरनाणे बांध कोठून होणार!!||३५|| अर्थः---याप्रमाणें गोपींना परदरत्व स्वीकारून उत्तर सांगितलें.आतां सर्वांतर्यामी भगवंतांची ही परदारसेवा मुळींच नाहीं,असें सांगतों-जे गोपींच्या,त्यांच्या पतींच्या व सर्वही प्राण्यांच्या अंतरी बुध्यादिकांच्या सांक्षित्वेकरून संचार करितो तोच भगवत् लीलेच्या योगानें तेथे देहधारी झाला आहे.ज्याला देहाच्या योगानें दोष लागेल असा आम्हांतुम्हां सारखा देहधारी तो नव्हे ||३६|| | अनुग्रहाय भूतानां मानुषं देहमास्थितः | भजते तादृशिः क्रीडा याः श्रुत्वा तत्परो भवेत् ||३७|| अर्थ:---तर मग त्या पूर्णकाम भगवंतांची निंद्यकर्माचेठिकाणी प्रवृत्ति कां झाली असें म्हणशीलतर-पूर्णकाम अशाही भगवंताने,प्राणीमात्रांवर अनुग्रह करण्याकरीता मनुष्यदेहाचा स्वीकार करून अशा क्रीडा केल्या कीं,ज्यांचे श्रवण शृंगाररसानें आकृष्यअचीत असे अतिबहिर्मुख असलेलेही लोक तत्पर होतील ||३७|| भावार्थ:--- भगवंत जे जीव संसारात आसक्त झालेले आहेत त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच स्वत:ला मनुष्यारुपणे प्रगट होतात.त्यांना धर्मानुसार आचरण करून सुखाकडे—सुखरुपतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात.भगवंतांनी धर्मानुसार आचरण केल्यामुळे आपले सारखे जीव त्यांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करून भगवत्परायण होतात.म्हणून आपण संत—महात्मा यांच्या उपदेशानुसार आचरण करून त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केल्यास आपण धार्मिक होऊन सुखाकडे किंवा सुखारुपातेकडे निश्चित रूपाने जाऊत.याकरिता संत—महात्मा यांचे धर्मानुसार सेवा करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा.||३७|| अर्थः---आतां दसरेही आचारभ्रष्ट कोणी पुरुष आमचें आचरण असेंच आहे असें म्हणशील तर-गोकुळांत राहणाऱ्या गोपींच्या पतींनी श्रीकृष्णाची मुळींच निंदा केली नाहीं;कारण ते त्यांच्या मायेंने मोहित होऊन आपापल्या जवळच आहेत असें मानीत होतें.अशा प्रकारचें ऐश्वर्यनसतां उगीच कृष्णासारखा परदारसंभाग करणार पुरुष पापी होत असें जाणावें ||३८|| | ब्रम्हरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिताः | अनिच्छन्त्यो ययुर्गोप्य: स्वगृहान् भगवत्प्रियाः ||३९|| अर्थः---असो.ब्राम्हामूहूर्त (पहाटेची वेळ)प्राप्त झाली असतां घरी जाण्यास अनुमोदन दिलेल्या त्या भागवतप्रिया गोपी,घरी जाण्याची इच्छा नसतांही मोठ्या कष्टानें आपापल्या घरीं निघून गेल्या ||३९|| | विक्रीडीतं व्रजवधूभिरीदं च विष्णोः श्रद्धान्वितोsनुश्रुयादथ वर्नयेद् यः| | भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीरः||४०|| अर्थः---हे राजा,जो श्रद्धायुक्त पुरुष,गोकुळसंबंधी स्त्रियांसहवर्तमान कृष्णाच्या ह्या क्रिडेचें अनुक्रमानें श्रवण करील किंवा पठण करील,तो त्या भागवान् श्रीकृष्णाठिकाणी उत्कृष्ट भक्ती पावोन थोड्याच काळामध्यें जितेंद्रिय होत असता ह्रदयामध्ये राहून रोगासारखा अनर्थ करणाऱ्या कामाचा अगदीं निरास करील ||४०|| भावार्थ:--- परीक्षिता!जो जीव श्रीमद्भागवत ग्रंथातील श्रीबालकृष्ण आणि गोपिबारोबाराची रासलीला—रासक्रीडा श्राध्येने श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो,त्याला भगवंतांच्या चरणांविषयी परमभक्तीची प्राप्ती होतो,म्हणून आपण म्हणजे अज्ञांनी जीवांनी संत—महात्मा यांच्यावर श्रद्धा ठेऊन,त्यांची धर्मानुसार निष्काम सेवा करून श्रीमद्भागवत श्रवण करावे.त्यामुळे आपली विषयांपासून निवृत्त होऊन भगवंतांविषयी निष्काम भक्ती करावी अशी भावना जागृत होऊन आपण भक्तिमार्गाचा स्वीकार करूत.||४०|| | याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धात रासक्रीडानिरुपणनामक हा तेत्तिसावा अध्याय समाप्त झाला | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| | _________________________________________________________________________________________________________३४---- किरण ३४-सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार अध्याय पूर्ण आहे ________________________________________________________________________________________________________आतां ह्या चौतिसाव्या अध्यायामध्यें,श्रीकृष्णाने,अजगराने गिळलेल्या नंदास सोडविले आणि त्या अजगररुपी सुदर्शननामक विद्या धरासही अंगी रस ऋषींच्या शापा पासून मुक्त केले तासाच शंकचूडनाप्रक यक्षाचा वध केला,हि कथा वर्णन केलेली आहे ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्यम्हणाला:--हे राजा,एकेवेळी महादेवाच्या यात्रेस जाण्याविषयी मनांत कौतुक उत्पन्न झालेले नंदादिक गोपाळ,बैल जोडलेल्यागाड्यांवर बसून मथुरेच्या पश्चिमेस सरस्वतीनदीच्या कांठी असलेल्या अंबिकावनामध्यें निघून गेलें ||१|| अर्थः---हे राजा,तेथे त्यांनी सरस्वतीनदीमध्यें स्नान करून गंधपुष्पादिक पूजासाधनांनी भक्तमनोरथपूर्वक अशा रुद्रदेवाची व अंबिकादेवीची भक्तिपुर:सर पूजा केली ||२|| अर्थः---आणि तो महादेव आपल्यावर संतुष्ट व्हावा म्हणून त्या सर्वगोपांनी आदरपूर्वक गाई,सुवर्ण,वस्त्रें व मधुसहित मधुर अन्य ब्राम्ह्नास अर्पण केली||३|| अर्थ:---नंतर ते महाभाग्यशाली नंदसुनंदादिक गोप,केवळ उदकाच्या प्रशानाने उपोषण करून होता,तो रात्री सहज फिरत फिरत हळू हळू उराने चालत तेथे येऊन निजलेल्या नंदास गिळू लागला||५|| अर्थ:---केव्हा सर्पाने पायांकडून गिळलेला तो नंद,असा आक्रोश करो लागला कीं, बा कृष्णा कृष्णा,हा मोठा अजगर सर्प मला गिळीत आहे,यास्तव शरण आलेल्या मला यापासून तू सोडीव ||६|| अर्थः—असें त्याचे दिनभाषण व रोडन श्रवण करून,जागृत होऊन त्वेरेने उठलेले गोपाळ,नंदल सर्पाला गिळिले असें पाहून जळक्या काष्ठांनी त्या सर्पाला ताडल करून लागले||७|| अर्थः---जळक्या कष्टांनी अंग भाजलेलाही तो अजगर जेव्हा नंदाला सोडीनातेव्हा,भक्त पालक अशा भगवान श्रीकृष्णाने तेथे येऊन सर्पाला पायानें स्पर्श केला.||८|| अर्थः---तेव्हां तो सर्प,भगवंताच्या मनोरथपूर्वक चरणाच्या स्पर्शाने ज्याचे शापरूप पातक नाहीसे झाले आहे असा होऊन सर्प शरीराचा त्या करून विद्या दराने पूजित अशा आपल्या विद्या धरस्वरुपास पावला||९|| अर्थः---तेव्हां सुवर्णपुष्पांची माळा धारण करून देदीप्यमान आपल्या आग्रभागी नमस्कार करून उभा राहिलेल्या त्या पुरुषाला,पाहून,इंद्रियांचा साक्षी असाही तो भगवान श्रीकृष्ण,गोपालमध्यें आपलें ऐश्वर्य प्रसिद्ध करण्याकरितां माहित नसल्यासारखा त्याला प्रश्न करुं लागला कीं,||१०|| अर्थः---जो आतां अद्भुत दिसणारा.तुं परमशोभेने प्रकाश पावत आहेस तो तुं कोण आहेस?तुज उत्तमाला पराधीनपणा प्राप्त झाली नसावी.तेव्हां तुला ह्या निंद्य सर्पयोनींत कोणी कसें पडिलें आहे?ते मला सांग||११|| अर्थः---तेव्हां सर्प म्हणाला:---हे प्रभो,सुदर्शन या नावांने प्रसिद्ध असा मी एक देवविशेष विद्याधर आहें.तो मी पूर्वी कांतीने व स्वरूपसमृद्धीने युक्त असून विमानांत बसून दशदिशांकडे फिरत असतां-||१२|| अर्थः---एकेंवेळी कुरूपी अशा अंगिरस् ऋषींना पाहिलें आणि आपल्या रूपसौंदर्याने गर्वित होऊन त्यांस हंसलो.तेव्हां मी उपहास केलेल्या त्या ऋषींनी,मी केलेल्या अपराधाच्या निमित्तानें मला शाप दिला होता म्हणून आतां सर्वपूज्य अशा तुं मला पायानें स्पर्श केलास त्याच्यायोगानें मी शापमुक्त झालों आहे||१४||हे सर्वपापनिवारका,संसारापासून भिऊन तुला सहारन आलेल्या लोकांचे पाप दूरकरणार अशा तुज भगवंताजवळ तुझ्या पादस्पर्शाने शापनिर्मुक्त झालेला मी,आपल्या लोकीं जाण्याविषयी आज्ञा मागतों ||१५|| अर्थः---हे भक्तपालका,महापुरुषा,सर्वलोकेश्वरा,महायोगिन् मीहि तुला सहारन आलों आहें,यास्तव मला स्वलोकी जाण्याविषयी आज्ञा दे ||१६|| अर्थः---हे अच्युता,तुझ्या दर्शनेंकरून तत्काल ब्रम्हशापासून मी मुक्त झालो ह्यांत कांही आश्चर्य नाहीं:कसें म्हणशील तर-ज्या तुझ्या केवळ नांवांचा उच्चार करणारा पुरुषद्व सर्व श्रोत्यांना व आणणाला तत्काळ पवित्र करितो त्या तुझ्या पायानें स्पर्श केलेला मी पवित्र झालो ह्यांत आश्चर्य काय?||१७|| अर्थः---याप्रमाणे सुदर्शन विद्याधर श्रीकृष्णाचा निरोप घेऊन व त्याला प्रदक्षिणा व नमस्कार करून स्वर्गाप्रत निघून गेला आणि श्रीकृष्णाने नंदालाही संकटांतून सोडविले ||१८|| अर्थः---हे राजा,गोकुळवासी गोप,चरणस्पर्शमात्रेंकरून अजगरसर्पापासून नंदाचें व शापापासून सुदर्शन विद्याधराचें मोक्षणरूप तें श्रीकृष्णाचे मोठे वैभव पाहून विस्मिचीत्त झाले आणि त्या अंबिकावनामध्यें करावयाचा जो नियम होता तो सर्व संपवून मोठे आदरानें कृष्णाच्या त्याच वैभवाचे परस्पर कथन करीत,त्या अंबिकावनांतून पुन्हा गोकुळात परत आले.||१९|| अर्थः---नंतर एकेवेळी श्रीकृष्ण व अद्भुत पराक्रमी बलराम हे उभयतां,कोनांमध्ये रात्रीच्या वेळी गोकुळ संबंधी स्त्रियानमध्यें प्राप्त होऊन क्रीडा करीत होते ||२०|| अर्थः---ते प्रेम धारण करणाऱ्या स्त्रीजणांनी सुस्वरपणे गायन केलेले,अलंकार धारण केलेले,अंगाला चंदनादिकांची उटी लावलेले,वनमाला धार केलेले व निर्मळ आस्ते परिधान केलेले असून जेथे चंद्र व नक्षत्रे उदय पावली आहेत त्या मोगऱ्याच्या सुगंधाने मत्त झालेले श्रमर फिरत असलेल्या व चंद्रविकासी कमळांचा सुगंध वाहणाऱ्या वाऱ्याने सेवन केलेल्या रात्रीच्या प्रवेशाचा सत्कार करीत होतें ||२१-२२|| अर्थः---ते रामकृष्ण,दुसर्यांनी एकदम कल्पनाही करण्यास अशक्य असें स्वरसमुदायांचे चड उतार कारून आलाप करीत असतें श्रवण करणाऱ्या सर्व लोकांच्या मनाला व कानाला सुख कारक होईल तशा रीतीने गायन करून लागले ||२३|| अर्थः---हे राजा,त्यांचे टी गायन ऐकून मोह पावलेल्या गोपी,त्या मोहाच्या योगानें, ज्या देहापासून वस्त्र गलीत झाले आहे व ज्याला केसांतून पुष्ण|माला गलीत झाल्या आहेत,त्या आपल्या देहाचे सुद्धा भान विसरून गेल्या||२४|| अर्थः---याप्रमाणे याठेष्ठ पणें अत्यंत मत्त असल्यासारखे टी रामकृष्ण क्रीडा करित असतां,तेथे शंकचूड या नावाने प्रख्यात असलेला एक कुबेराचा सेवक प्राप्त झाल ||२५|| अर्थः—आणि हे राजा,भयाची शंका सुद्धा मानत न आणणारा तो संकचूड,तें रामकृष्ण पहात असतां,त्यांचा अनादर करून,ते ज्याचे रक्षक आहेत अशा अक्रूसह करणाऱ्या स्तरीयसमुद्याला तो उत्तरेदिशेकडे बलत्कारानें वळवून घेऊन चालला ||२६|| अर्थः---तेव्हां,वाघानें धरलेल्या गाई जशा अक्रूश करितात त्याप्रमाणे,‘हें रामा,हे कृष्णा’ अशा हाका मारीत असलेल्या व आपल्या म्हणून स्वीकारलेल्या त्या गोपींना त्य पासून सोडून घेण्याकरिता ते दोघेही श्रात्ये (राम कृष्ण धावलेले )||२७|| अर्थः---आणि गोपींचे भय घालविणारे ‘भिऊ नका असा’शब्द उच्चारणारे,हातात शालवृक्ष उपटून घेतलेले व वेगानें धाव्नारें टी रामकृष्ण,वेगानें त्वरीत पणें गुहेकांमध्यें अधम अशा शंक चुडा जवळ प्राप्त झाले ||२८|| अर्थः---तेव्हां तो मूढ शंकचूड,एक मूर्तिमंत मरणकाळ व एक मृत्युमंत मृत्यू अशा भयंकर प्राप्त झालेल्या त्या रामकृष्णांना पाहून भयभीत झाला आणि वाचण्याच्या इच्छेने स्त्री जणांचा त्यात करून पलायन करू लागला ||२९|| अर्थः---त्यावेळीं तो जिकडेतिकडे धांवेल तिकडे तिकडे श्रीकृष्णाहि,त्याच्या मस्तकीं असलेलें रत्न हरण करण्याच्या इच्छेनें धाऊं लागला.इकडे बलराम तर स्त्रियांचें रक्षण करीत तेथेच राहिला ||३०|| अर्थः---हे राजा,नंतर सर्व करण्यास समर्थ अशा श्रीकृष्णाने,जवळच त्याच्या समोरून येऊन आपल्या केवळ मृष्टीनेंच मस्तकांतील मण्यासह त्या दुरात्मा शंखचुडाचें मस्तक हरण केलें ||३१|| अर्थ:---याप्रमाणें शंखचूडाला मारून तेजोयुक्त असा त्याच्या मस्तकीं असलेला आणि ग्रहण करून श्रीकृष्ण बलरामाजवळ आला आणि त्यानें मोठ्या प्रीतीनें तो मणि,सर्वस्त्रिया पाहत असतां बळरामास अर्पण केला||३२|| | याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्यें शंखचूडवधकथननामक हा चवतिसावा अध्याय समाप्त झाला ||३४|| | श्रीकृष्णार्पणमस्तु | _________________________________________________________________________________________________________ | ३५--- किरण १८---युगलगीत—१---युगलगीत. अध्याय पूर्ण आहे. _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या पस्तिसाव्या अध्यायामाध्यें दिवसा श्रीकृष्ण वनामध्यें गेला असतां गोकुळांतील स्त्रियांनी दोन दोन श्लोकांचे एकेक अशा युग्मगीतांनी दुःखानें दिवस घालविलें अशी कथा वर्णन केलेली आहे||१||) | गोप्यः कृष्णे वनं याते तमुणुद्रुतचेतसः | कृष्णलीला: प्रगायन्त्यो निन्यर्दुःखेन वासरान् ||१|| अर्थः---आतां रात्री कृष्णानें यथेच्छपणें रमविलेल्या व दिवसा त्याचा विरह झालेल्या गोपींचा,वारंवार गायनानें दिवस घालविण्याचा प्राकार सांगत श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,दिवसा श्रीकृष्ण वनांत गेला असतां त्याचेठिकाणी आसक्तचित्त असलेल्या त्य गोपी,कृष्णाच्या लीलांचे उत्तम प्रकारे गायन करीत मोठ्या कष्टानें दिवस घालवीत असत||१|| भावार्थ:--- जेव्हा कृष्ण गाई घेऊन वनात चारण्यासाठी जात असत,तेव्हा त्या कृष्णासोबातच गोपींचे चीत्तसुद्धा जात असे.याचा अर्थ असा होतो कि,त्यांच्या चित्ताचा विषय कृष्णच झाला होता.कृष्णांचाच त्यांना ध्यास लागला होता.त्यांचे शरीर संसतात होते,पण मन मात्र संसारात होते.पारमार्थिकदृष्ट्या मन परमार्थात असावे,व स्थूल शरीर संसारात असले तरी चालते.तरीही तो जीव साध्यापर्यंत जाऊ शकतो.स्थूल शरीर व सूक्ष्मशरीर परमार्थात असेल तर फारच उत्तम,कारण साध्य लौकर प्राप्त होते.थोडक्यात मनाला महत्व आहे.म्हणून त्यांना दिवस कष्टाचा जात असे,कारण दिवसा कृष्णांचे दर्शन होत नसे.आपली अवस्था गोपिसारखी होवावयास पाहिजे.आपण संसारात असलो,तरी आपले मन परमार्थात असावयास पाहिजे,आपणसही साध्या—मोक्ष मिळू शकतो.||१|| अर्थः---त्यांच्या गायनाचा प्रकार असा की-कार्य गोपी दुसऱ्या गोपींना म्हणाल्या-गोपी हो,डाव्या बाहूंच्या मुळावर ज्याने आपला गाल टेकला आहे व ज्याने आपल्या भ्रुकुटी नाचविल्या आहेत असा तो श्रीकृष्ण,आपल्या हाताच्या कोमळ अंगुलींनी ज्याच्या सप्तस्वरछिद्रांचा आश्रय केला आहे तो अधरोष्ठाचेठिकाणी लावलेला वेणू जेव्हां वाजवितो-||२|| अर्थः---तेव्हां विमानात आपल्या पतींना आलिंगन करून बसलेल्याही सिद्धांच्या हि स्त्रिया,ते वेणू गीत ऐकून प्राथन अश्चर्य पावतात,नंतर ज्यांनी आपली चित्ते मदनाच्या बाणांना अर्पण केली आहे अहसा (कामातूर)व लज्जायुक्त होऊन इतक्या मोहित होतात कीं,ज्यांना कामपिधेने प्राप्त झालेल्या त्या तळमळीत,निऱ्या सुटून गलीट झालेल्या नेसलेल्या वस्त्राचेही भान राहत नाही,यास्तव अशा प्रकारच्या कृष्णाच अविर्ह आम्ही कसा सहन करावा ||३|| भावार्थ:--- भगवान कृष्ण जेव्हा मंजुळ स्वरांनी बासरी वाजवीत,तेव्हा सिद्धपत्न्या म्हणजे सिद्धांच्या स्वर्गातील पत्न्या,त्यांचे चित्त कामाबानांनी विद्ध होत असे.वास्तविक पाहता भगवंतांकडे विषयांच्या भावनांनी—दृष्टीकोनातून पाहू नये.पण त्यांचा अधिकार हा उच्च नसल्यामुळे त्यांचे असे चित्त होत असे.जेथे विषय असतात तेथे भगवंत नसतात,असे त्यांना ज्ञान नव्हते.म्हणून आपण त्या भावनेने भगवंतांना व संत—महात्मा यांना पाहू नये,कारण त्यामुळे भगवंत भेटत नसतो.जेथे राम तेथे काम--विषय नसतो.||२—३|| अर्थ:---दुसऱ्या म्हणाल्या;---गोपी हो,हे मोठे आश्चर्य आहे.ज्याचे हास्य हारासारखें पाढरे आहे व ज्याच्या वक्ष:स्थळावर विजेसारखी देदीप्यमान लक्ष्मी स्थिर राहत आहे,असा नंद्पुत्र श्रीकृष्ण,त्याच्या विरहानें दुखित झालेल्या आम्हांसारख्यांना सुख उत्पन्न करण्याकरितां जेव्हा मुरली वाजवितो-||४|| अर्थः---तेव्हां गोकुळांतीलवृषभ,गाई व वनांतल,हरीण यांचे थव्यांचे थवे,दुरूनच वेणनाद श्रवणाने ह्रटचित्त असते,दातांनी तोडलेले ग्राम चघळल्या खेरीज तोंडात तसेच धरून कान टवकारून डोळे झांकून निद्रस्थ असल्यासारखे व लिहिलेल्या चित्रांसारखे स्तब्ध होऊन राहतात ||५|| भावार्थ:--- भगवंतांना पहिल्यावर काम हा राहत नसतो व चांचलता राहत नाही,कारण चंचलता ही कामाचीच असते,तर भगवंतांची नसते.म्हणून काम नाहीसा होण्यासाठी व चंचलता निवृत्त होण्यासाठी भगवंतांचे गुणवर्णन ऐकावेत.त्या वेणूचा मंजुळ स्वर एकूण व्रजातील बैल,गाय,हरीण,चार खात असतांना स्तब्ध होऊन म्हणजे चार खाणे किंवा रवंथ करणे बंद करून मंजुळ स्वर ऐकत--स्तब्ध होत असत.त्याप्रकारे भगवंतांचे गुणवर्णन ऐकत असतांना मन एकाग्र करून श्रवण करावे.मनात विषय नसावा.||४—५|| अर्थः---दुसऱ्या गोपी तर असें म्हणाल्या कीं-हे सखी,मोरांच्या पिसांचे झुबके,गेरू वगैरे धातू व कोवळे पल्लव यांच्या योगेंकाढून मल्लासारख्या जाण्यानिमांचे अनुकरण करणारा,बलरामासाहित व गोपांसाहित असलेला श्रीकृष्ण,जेव्हां तेव्हा तरी वेनुच्या नादानें गाईंना बोलवितो-||६|| अर्थः---तेव्हां तो वेणुनाद ऐकून,जशा आम्ही (गोपी) पुष्कळ पुण्य नसल्यामुळे,वाऱ्यानि उडवून आणलेल्या त्याच्या चरणकमळसंबंधी धुळीची इच्छा करीत असता कुतीतगति होऊन उभ्या राहतो व आमचे बाहू प्रेमानें कंपू लागतात व आमच्या डोळ्यांतील पाणि स्थब्ध राहते,त्याप्रमाणे नद्याही पुढे जाण्याचे वेग बंद पद्वून स्तब्ध होतात त्यांची उदके निश्चळ होतात व त्यांचे तरंग रूप भूज प्रेमानें कांपू लागतात.||७|| अर्थः---अन्य गोपीं म्हणाल्या कीं,-सख्यांनो, निश्र्चलसंपत्तीने युक्त अशा आदिपुरुष भगवंतासारखा व अनुचरांनी (सेवन देवांनी किंवा गोपांनी) ज्याचा पराक्रम वर्णन केला आहे असा वनांत संचार करणारा तो कृष्ण, गोवर्धनपर्वताच्या आसमंतात संचार करणाऱ्या गाईंना, जेव्हा त्याच्यां नावांनी युक्त असलेल्या वेनुगीताने बोलावितो||८|| अर्थः---तेव्हां आपलेठिकाणी विष्णू प्रकाश पावत आहे असे सुचवीतच की काय पुष्पांनी व फळांनि संपन्न असून ज्यांच्या शाखा भाराने लावल्या आहेत व ज्यांच्या आंगावर प्रेमाने कंटकरुपी रोमांच उठले आहेत आशा वनांतील वल्ली व तशीच स्थिती पावलेले वृक्ष, आपल्यापासून मधाच्या धारा उत्पन्न करीत असत||९|| भावार्थ:--- वनातील वृक्ष आणि वेलीसुद्धा त्या वेनुच्या सुस्वरांनी फुलांनी व फळांनी बहरून येतात,म्हणजेच त्या सुचवतात कि आम्हीसुद्धा आम्हीसुद्धा त्या सुस्वरांनी तल्लीन होऊन नम्रतेने आमच्या फांद्या वाकवून त्यांना नतमस्तक होत आहोत.तसे आपणही भगवंतांच्या कथा ऐकत असतांना तल्लीन होऊन ऐकाव्यात व आपल्यात नम्रता यावी—सात्विकता यावी.||८—९|| अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या- सुंदर पुरूषांमध्ये मुख्य व वनमाळांमध्ये दिव्यगंधाने युक्त असलेल्या तुळशीच्या मधाने मत्त झालेल्या श्रमरसमूहांनी मोठ्याने गाईलेले अनुकूल गायन, आदराने श्रवण करणारा तो श्रीकृष्ण, जेव्हा वेणू वाजवू लागतो ||१०|| अर्थः---तेव्हां सरोवरांचेठिकाणी राहणारे सारस,राजहंस व इतर पक्षी,त्या सुंदर गीतानें मोहित होऊन एकाग्रचित्तपणें कृष्णाजवळ येऊन,मौनव्रत धारण करीत,व श्रवण सुखानें डोळे मिटीट असता हरीची उपासना करतात,केवढे हे आश्चर्य!||११|| भावार्थ:---भगवंतांनी कपाळावर केशरी रंगाचा टिळक लावलेला दिसून येतो,तसा आपणसुद्धा आपल्या कपाळावर टिळक लावण्याचा प्रयत्न करावा.भगवंतांनी गळ्यामध्ये सुंदर माळा धारण केलेल्या आहेत,तशाच प्रकारच्या तुळशीच्या,रुद्राक्षाच्या माळा आपल्या गळ्यात धारण कराव्यात.कारण त्या माळामध्ये शारीरिक व मानसिक दोष घालवण्याचे सामर्थे असते.भगवंतांच्या बासरीचे मधुर स्वर सरोवरातील सरस व हंस वगैरे प्राणी यांचे चित्तसुद्धा मोहून जातात.तसे आपले चीत्त्सुद्धा मोहून जावावयास पाहिजे.असे चित्त म्हून जाण्याकरिता आपले मन स्थिर करून श्रवण करावयास पाहिजे.त्यातील कांही पक्षी भागावान्ताजावाल्न येऊन बसतात व संगीत ऐकतात.तसे आपणही भागवत कथा श्रवण करीत असतांना इकदेईतिकदे न बसता सभामंडपात,जेणेकरून वक्ता दिसेल,अशा पद्धतिने कथा श्रवण करावी,कारण त्यामुळे वक्त्याचे भाव दिसतात--कथेतील आनंद मिळून परिणाम होतो.||१०—११|| अर्थ;---काही गोपी म्हणाल्या-हे गोपी हो,कानांवर खोवलेल्या पुष्पमाळांच्या तुऱ्यांनी शोधणारा तो श्रीकृष्ण,बळरामसाहित,गोवर्धन पर्वताच्या आसमंताद्भागी फिरत असतां,स्वतः हर्षयुक्त होऊन जगाला हर्ष उत्पन्न असतां वेनुच्या नादानें जेव्हा ते जग भरून टाकित ||१२|| अर्थः---तेव्हां पूज्य अशा त्या कृष्णाला मोठ्या गर्जनेने कटकट होईल अशी शंका मनात आणणारा मेघ,कृष्णावल येत नाही व मोठ्यांनी गरजनाही करीत नाही,तर दुरूनच वेनुनादाच्या मागून मंद मंद गर्जना करीतो आणि जगाचा ताप दूर करण्याचा व श्यामत्वादीक गुणांच्या साम्यत्वामुळे त्या आपल्या सख्या श्रीकृष्णावर छायेनें छत्र धारण करीत असता पुष्पांची वृष्टि करितो.येथे मेघांच्या आड राहून देवांनी केलेल्या पुष्पवृष्टीचीच मेघावर कल्पना ती मेघ करितो असें वर्णन केल आहे||१३|| भावार्थ:--- भागवत कथा चालू असतांना आपणही अधून—मधून भजन—नामस्मरण कथेत चालू असते,त्यावेळेस आपण मुखाने भजन करावे व हाताने टाळी वाजवावी.त्यामुळे आपल्याला कथेतून जो आनंद असतो तो अवर्णीय असतो.||१२—१३|| अर्थः---दुसऱ्या गोपी मोठे आश्चर्य करित म्हणाल्या कीं,हे पतिव्रते यशोदे,नानाप्रकारच्या गोपक्रीडांमध्यें निपुण असा तुझा पुत्र कृष्ण,पिकलेल्या तोंडल्यासारख्या तांबड्या आपल्या अधरोष्ठाला वेणु लावून धरून,विणूवाद्यांविषयीं अनेकप्रकारच्या आपल्या कल्पनेच्याच शिक्षा ज्यांमध्यें आहेत अशा निषाद,ऋषभ इत्यादिक स्वरांच्या आलापभेदांना जेव्हां वाजवून दाखवितो-||१४|| अर्थः---तेव्हां गाय्नाचें तत्त्व जाणणारे इंद्र,शंकर ब्रम्हदेव इत्यादिक देवांचे अधिपतिहि,जिकडून गायनाचा ध्वनि येत होता तिकडे आपली मान वांकवून व चित्त देऊन मंद्र,मध्यम व अतिउच्च या क्रमांनी नीटपणें तें गायन ऐकून त्यांतील,भेदांचे तत्त्व न समजल्यामुळे मोह पावतात ||१५|| भावार्थ:--- भगवंत ज्यावेळेस गायन करतात,त्यावेळेस मोठ—मोठे देवसुद्धा त्यांच्या गायनात तल्लीन होतात.इतकेच काय!ब्रह्मदेव, शंकर,इंद्र इत्यादी देवतासुद्धा रागारागिनी ओळखू शकत नाहीत,इतके तेसुद्धा मोहित होतात.तेसुद्धा नम्र होतात आणि गायनात तल्लीन होतात.तसे आपणसुद्धा कथा श्रवण करत असतांना मन तल्लीन—एकाग्र करून श्रवण करावी,असे श्रवण केले असता अधिक चांगले असते—आपल्या हिताचे असते.आपण वक्तयासी श्रद्धा--नम्रता असावी—ठेवावी.||१४—१५|| | (१७-८-१९ शनिवार पासून सुरुवात )अध्याय पूर्ण आहे अर्थः---आमच्या तर मोहाची गोष्ट काय सांगू?हे यशोदे,ध्वज,व्रज,कमळ व अंकुश इत्यादिक अनेकप्रकारच्या चिन्हांनी युक्त अशा आपल्राचरणरूप कमळपत्रांनी गोकुळसंबंधी भूमीला गाईंच्या खुरांनी आक्रमण केल्यामुळें प्राप्त झालेलें दुःख घालवीत असता,हत्तीसारखी गति असणारा तो कृष्ण,वेणु वाजवीत जेव्हां चालतो व विलासयुक्त अवलोकन करितो तेव्हा त्याच्या चालण्याच्या व विलासयुक्त अवलोकनाच्या योगानें मदनाचा वेग अर्पण केलेल्या व वृक्षांसारख्या निश्चेष्टस्थितीला पोंचविलेल्या आम्ही (गोपी)मोहित होऊन आपल्या नेसलेल्या वस्त्राला व सुटलेल्या केशबंधाला जाणत नाहींसा होतो.||१६-१७|| भावार्थ:--- तळव्यावर ध्वज,वज्र,कमळ,अंकुश,इत्यादी सुंदर चिन्हे आहेत,अशा आपल्या चरणकमळांनी ते गाईंच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दु:ख नाहीसे करतात,त्यामुळे आम्हास त्यांच्याविषयी प्रेमभाव उतपन्न होतो.त्याचप्रमाणे आपणसुद्धा ज्यांना कोणत्याही कारणाने दु:ख झाले असेल तर ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार दु:खित जीवांचे दु:ख नाहीसे करण्याचा आपण निष्काम प्रयत्न करावा.यासच “निष्काम भक्ती” असे म्हणतात.यामुळे आपण भगवंतांचे प्रिय भक्त होतोत.दु:खितांचे दु:ख निवारण करत असतांना आपणास आपल्या वैयक्तिक किंवा कौटंबिक कार्याची आठवणही राहत नाही.आपलेपणा व परकेपणा भेद गेलेला असतो.देहास कष्ट झाले तरी कष्ट,कष्ट वाटत नाहीत.त्या कार्यात आत्मिक आनंद वाटतो.हा आनंद सुखप्रद असतो.||१६—१७|| अर्थः---गाईंच्या गणनेकरितां माळेंत ओवलेलें मणि धारण करणारा,तसाच जिवा सुगंध प्रिय आहे अशा तुळशीच्या माळेनें उपलक्षित असा श्रीकृष्ण,एखाद्या प्रदेशीं मण्यांच्या योगाने गाईची आसमंतात् गणना करीत आवडत्या भिन्नाच्या खांद्यावर आपला बाहु ठेऊ जेव्हां केव्हातीर वेणु वाजवितो-||१८|| अर्थः---तेव्हां त्या वाजविलेल्या वेणुच्या शब्दानें आकर्षित चित्त झालेल्या काळवीट हरिणाच्या स्त्रिया (हरिणी),आम्हां गोपिअसारख्याच घरादारांची आशा सोडून,माधुर्यादिक गुणासमूहांचा समुद्र अशा कृष्णाच्या आसमंताद्भागी स्तब्ध उभ्या राहतात.||१९|| भावार्थ:--- त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते,त्या मळ्यातील मण्यांच्या साह्याने गाईं मोजतात,असे आपण आपल्या गळ्यातील मालेने भगवंतांचे नामस्मरण करावे,त्यामुळे आपले अंत:कारण शुद्ध होते.अंत:कारण शुद्ध झाल्यावर भगवंत आवडतो.भगवंत जसे आपल्या मित्रासोबत माधुरास्वरांनी बासरी वाजवतात,तसे आपण आपल्या मित्रासोबत भगवंतांच्या लीलांचे,संत महात्मा यांच्या अन्भागाचे गायन करावयास पाहिजे.त्यामुळे आपले अंत:कारण शुद्ध होते.भगवंतांच्या सुस्वरांनी मोहित झालेल्या माध्या ज्याप्रमाणे गोपिकाप्रमाणे अभिलाषा सोडून भगवंतांस मोहित होतात .त्याचप्रमाणे आपणही संसाराची आसक्ती सोडून,भगवंतासी एकरूप व्हावावयास पाहिजे,कारण त्यात परम हित असते.म्हणून संसाराची आसक्तीचा त्याग करावा.||१८-१९|| अर्थः---दुसऱ्या गोपी म्हणाल्या-हे पवित्रे यशोदे,तुझा वत्स,इतक्यांत दुसऱ्या म्हणाल्या –नंदाचा पुत्रर श्रीकृष्ण,वृंदावनांत क्रीडा करून गोपींना आनंद वाटण्याकरिता कुंदपुष्पांच्या माळांचे वेष कौतुकानें धारण करून संध्याकाळीं गोप व गोधने यांसहवर्तमान यमुनेमध्यें,आपणावर प्रेम करणाऱ्या गोपांना हर्ष देत असता जेव्हां क्रीडा करितो-||२०|| अर्थः--तेव्हां चंदनासारख्या सुगंधयुक्त गार स्पर्शाने त्या कृष्णाच्या सत्कार करणारा मंदवायु,अनुकूळ वाहुं लागतो.व त्यावेळी स्तुतिपाठकांसारखे स्तुतिवगैरे करणारे गंधर्वादिक उपदेवांचे गण वाद्यें गायनें व पुष्पवृष्टि यांच्या योगानें त्याचें सेवन करितात ||२१|| अर्थः---नंतर येणाऱ्या कृष्णाला पाहून त्या गोपी हर्षानें परस्पर म्हणाल्या कीं,हे संख्यांनो,हा पहा देवकीच्या उदरीं उत्पन्न झालेला कृष्णरुपी चंद्र,सुह्र्द अशा आमचे मनोरथ पूर्ण करण्याकरितां येत आहे.हा सर्वगोकुळाचा व गाईंचा हितकर्ता आहे.कारण यानें गोवर्धन पर्वताचे धारण केलें होतें हा सायंकाळी सर्व गोधनें एकत्र करून वेणु वाजवीत गोकुळांत परत येउं लागला म्हणजे मार्गाचेठिकाणी ब्रम्हादिक देवही याच्या चरणांना वंदन करितात,गोप याच्या कीर्तीचे वर्णन करितात,गोप याच्या कीर्तीचे वर्णन वर्णन करितात,ह्याच्या गळ्यांतल्या माळां गाईंच्या पावलांपासून उठलेल्या धुरळ्याने मळीण झाल्या आहेत,हा श्रमयुक्त झालेल्याही आपल्या देहाच्या कांतीने आमच्या नेत्रांना मोठा हर्ष उत्पन्न करीत येत आहे||२२-२३|| भावार्थ:--- प्रेमाशिवाय कोणी कोणाचे काम करत नाही,म्हणून एकमेकांनी एकमेकांना प्रेम देण्याचा आवश्य करावा.तेव्हा आपले कार्य होत असते.भगवंतांना गोप व गोपींनी प्रेम दिले म्हणून भगवंतांनी गोवार्धानापासून त्यांचे संरक्षण केले.म्हणून आपण भगवंतांवर प्रेम करावे,म्हणजे भगवंत आपले संरक्षण करत असतो.जीव हा मात्र आपले भगवंतासारखे—इतके संरक्षण करू शकत नाही,कारण जीव हा स्वार्थी असतो.भगवंत दिवसभर परिश्रम करून सांयकाळी आपला—गोपींचा मनोरथ पूर्ण करण्याकरिता—दर्शन देण्याकरिता आपल्याकडे—गोपींकडे येत आहेत.म्हणून गोपिंका बालकृष्णांची वाट पाहत आहेत.त्याचारमाणे आपणसुद्धा निष्काम भक्ती करण्याकरिता भक्तीची वाट पहावयास पाहिजे.म्हणजे भक्ती ही अंत:करणपूर्वक करावयास पाहिजे.||२२—२३|| अर्थः---कितीएक गोपी,जवळ आलेल्या कृष्णाला पाहून मोठ्या गडबडीने म्हणाल्या कीं,-गोपीहो,ज्याचे नेत्र थोड्याशा मदानें विव्हळ झाले आहेत,ज्यांचें मुख पिकुं लागलेल्या बोरासारखें पांढरे दिसत आहे,ज्यानें वनपुष्पांची माळा धारण केली आहे,जो आपल्या प्रेमळभक्तांचा सन्मान करणारा आहे,ज्याचें चालणें गजराजासारखें आहे व ज्यांचे मुख आनंदयुक्त आहे असा हा यदुपति श्रीकृष्ण,आपल्या सुवर्णकुंडलांच्या कांतीने सुकुमार गालांना शोभावीत,जसा दिवसाचें वेळीं लोकांना झालेल्या तापाला घालवीत सायंकाळी चंद्र उदय पावतो त्याप्रमाणें गोकुळांतील गाईंचा व आमचा दुर्निवार विरहताप घालवीत अगदीं जवळ येत आहे फा ||२४-२५|| भावार्थ:--- भगवंत जाणून आहेत कि,गोपी या आपली श्राध्येने व आतुरतेने दर्शनासाठी वाट पाहत आहेत.आम्हास दिवसाहर विरह—दु:ख झालेले आहे,याची त्यांना जाणीव आहे,म्हणूनच त्वरेने आम्हास दर्शन देण्याकरिता येत आहेत.त्यांना दुरून पाहूनच आम्हास आनंद वाटत आहे.जसे—जसे जवळ येत आहेत,तसतसा आमचा आनंद वाढत आहे.आपलाही भगवंताविषयी ओढ असावी.ग्पिंची ओढ आये व आपली ओढ नसेल तर कांहीही उपयोग नाही.म्हणून गोपींची ओढीसारखी आपली ओढ असावे,आपले हित आहे.||२४—२५|| | एवं व्रजस्त्रीयो राजन् कृष्णलीला नु गायतीः | रेमिरेsहःसु तच्चीत्तास्तन्मनस्का महोदयाः ||२६|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणे ज्यांचे निश्चयात्मक चित्त व संकल्पविकल्पात्मक मन कृष्णाचेठिकाणी गढून नेलें आहें,त्या उत्सवयुक्त झालेल्या गोपी,दिवसाचें वेळीहि विरहदुःखानेंही कृष्णलीलांनेच गायन करीत असता रमत असत ||२६|| भावार्थ:--- भगवंत जेव्हा—सकाळी वनात गोपालासोबत व गाईसोबत जात असत,तेव्या त्या भगवंतांचे दर्शन घेत असत.भगवंत वनात गेल्यानंतर व वनातून परत येईपर्यंत त्या गोपिका भगवंतांच्याच लीलांचे गुणवर्णन चीत्तासाहित करत असत.तसे आपले आपले चित्त गोपिकासारखे व्हावयास पाहिजे.त्यात आपले हित आहे, असे आपणास त्यांचा भाव पाहून धारणा व्हावी.||२६------२६|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्यें युग्मगीतवर्णनामक हा पस्तिसाव्या अध्याय समाप्त झाला||३५|| | || श्रीकृष्णार्पणमस्तु || _________________________________________________________________________________________________________ | ३६—किरण १९--कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे—१ अधाय्य पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________(आतां ह्यां छतिसाव्या अध्यायामध्ये,कृष्णानें अरिष्टासुराला मारिलें व कंसाने नारदमुखापासून बळराम व श्रीकृष्ण हे वासुदेवाचे पुत्रर आहेत असें जाणून,त्यांना मथुरेत आणण्याची अक्रुरास आज्ञा केली अशी कथा अवर्णन केली आहे||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणें देवगंधर्वादिकांनी केलेल्या गायन,नृत्यू,वाद्य,पुष्पवृष्टि इत्यादिकांसहवर्तमान प्राप्त झालेल्या कृष्णाला पाहून गोकुळांमध्यें मोठा उत्साह प्रवृत्त झाला असतां,तें सहन न करणारा व ज्यांचे कोळें व देह हीं मोठी आहेत असा एक वृषभकृति अरिष्टनामकदैत्य आपल्या खुरांनी विदारण केलेल्या भूमीला कांपवीत गोकुहामध्यें प्राप्त झाला ||१-२|| अर्थः---त्या लोकांना कर्कश लागणारा वृषभजातीचा शब्द करीत पायांनी भूमीचें विदारण करीत, करीत,पुच्छ वर उचलून शिगांच्या अग्र भागांनी नदीच्या कांठांना खणून टाकीत व थोडें थोडें शेन टाकीत तसाच थोडा मूत्रोत्सर्ग करीत डोळे वटाळून गोकुळांमध्यें आला होता.हे राजा,ज्याच्या भयंकर शब्दाने गाईंच्या व स्त्रीयाच्या गर्भाचे स्त्राव १व पात अकाळीत होत असत,ज्याच्या कोळ्याच्या आड,‘हा पर्वतच आहे कीं काय अशा बुद्धीने’ मेघ लपत असत||३-४|| अर्थः---त्या भयंकर शिंगांच्या वृषभासुराला पाहून गोपी व गोप फार त्रास पावले.हे राजा,सर्व पशुही त्याला पाहून भयानें गोकुळाचा त्याग करून पळून गेलें ||५|| अर्थः---नंतर,ते गोपादिक सर्वही हे कृष्णा,हे कृष्णा,रक्षण कर.रक्षण कर याप्रमाणे भाषण करीत गोविंदाला शरणे गेलें.तेव्हां भगवान् श्रीकृष्णाने,भयानें व्याकूळ झालेलें ते गोकुळ पाहून-||६|| अर्थः---तुम्ही भिऊ नका,असें वाणीनें गोपांचे अश्वासन करून,त्या वृषभासुराला आपल्या समोर बोलाविले.टी असें कीं,हे मंदबुद्धे दुष्टा,गोपालांना व पशूंना त्रास देऊन तुला अकाय फळ मिळणार आहे?कांहीच नाहीं||७| अर्थः--कारण,तुझ्यासारख्या दुर्बुद्धी दुष्टांच्या बल्युक्त गर्वाचा नाश करणारा मी आहे,तुं माझा समीप ये.असें भाषण करून तो श्रीकृष्ण,हाताच्या तळव्यांनी आपले बाहू थोपटून त्या अरिष्टाला क्रोध आणित असता-||८|| अर्थः---सख्याच्या खांद्यावर सर्प देहासारखा सुकुमार आपला हात पसरून उभा राहिला.याप्रमाणें क्रोध आणविल्यामुळें क्रुद्ध झालेल्या व ज्याचे डोळे वटारलेले असून रक्तसारखे लाल आहेत व ज्यानें आपल्या शिंगांची अग्रें पुढें केली आहेत असा तो अरिष्टासुर,आपल्या खुरानें भूमी उकरीत कृष्णाकडे कटाक्षांने वांकडें अवलोकन करून वेगानें,इंद्राने टाकलेल्या व्रजाप्रमाणे कृष्णाच्या अंगावर धाऊन आला ||९-१०|| अर्थः—तेव्हा त्या भाग्वान्तान्ने त्याला शिंगाचेठिकाणी धरून,जसा महागज दुसऱ्या गजाला मागें लोटीतो त्याप्रमाणें त्याला अठरा पावलें मागें लोटून दिले||११|| अर्थः---त्यावेळीं भगवंतानें मागें लोटल्यामुळे भूमीवर पडलेला अरिष्टासुर,पुन्हा उठून ज्याच्या सर्व अवयवांना घाम सुटला आहे व ज्याला मोठा क्रोध आला आहे असें असता कृष्णाच्या अंगावर धाऊन आला||१२|| अर्थ:---तेव्हा कृष्णानें,येणाऱ्या त्या अरिष्टासुराला शिंगाचेठिकाणीं धरून भूमीवर पडून पायानें दाबून ‘जसा एखादा पारित ओलें वस्त्र पायानें दाबून हातानें पिळतो व त्यांतून पाणी बाहेर काढितो त्याप्रमाणें त्याला पिळून त्याच्या रोमरंध्रांतून रक्त बाहेर काढिलें आणि त्यांचे शिंगे उपटून त्याच्यायोगानें त्याला ताडन केलें.तेव्हा तो भूमीवर पडून -||१३|| अर्थः---मुखांतून रक्तांचे वमन करीत,मूत्र व शेण यांचा त्याग करीत व आपले पाय धडपडावीत डोळे फिरवून मोठ्या कष्टदशेला पावला व शेवटीं मृत्यूचा घरी निघून गेला.तेव्हां सर्व देवांनी,श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करीत व त्यांचे स्तवन केले.||१४|| १८-८-१९-रविवार अर्थः---याप्रमाणे वृषभासुराला मारून गोपांनी स्तूयमान व गोपींच्या नेत्रांचा मुर्तिमान् उत्सवच असा तो श्रीकृष्ण,बळरामांसहवर्तमान गोकुळांत प्रविष्ट झाला ||१५|| अर्थः---याप्रमाणें अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीकृष्णाने अरिष्टासुराला मारिलें असतां,नंतर,ज्यांचे दर्शन देवासारखे आहे असा भग-वान्नादर ऋषि,मथुरेमध्यें कंसाला भेटून म्हणाला कीं,-||१६|| अर्थः---हे कंसा,देवकीचा अष्टम गर्भ म्हणून प्रसिद्ध असलेली तुझ्या हातून सुटून गेलेली जी कन्या ती,यशोदेची कन्या होय.तसाच यशोदेचा पुत्र म्हणून प्रसिद्ध जो कृष्ण तो देवकीचा आठवा पुत्रर होय आणि रोहिणीचा अपुत्र जो राम देवकीचा सातवा पुत्र होय,हे दोन्ही वासुदेवाचे पुत्र असून ते तुजपासून भिणाऱ्या वासुदेवांने आपला मित्र हो नंद ज्याची इंद्रियें खवळली आहेत अशा त्या भोजपति कंसाने,वसुदेवाला मरण्याकरितां हातामध्यें त्रीक्ष्ण धारेचे खड्ग ग्रहण केले.||१७-१८|| भावार्थ:--- देवर्षी नारद कंसास म्हणतात,”हे कंसा तुझ्या हातातून आकाशात निसटून गेलेली कन्या यशोदेची होती,आणि व्रजामध्ये नंदाच्या घरी जे आहेत,ते श्रीकृष्ण आहेत,ते देवकीचे पुत्र आहेत.तुझ्या भीतीमुळे वसुदेवांनी त्यांचा मित्र नन्द यांच्याकडे ठेवलेले आहे.”असे ऐकताच कंस यास फारच क्रोध आला.क्रोधाने त्याचे अंग चळचळा कापू लागले.काय करावे असे त्याला कळेना.||१७—१८|| अर्थः---तेव्हां,वासुदेवाला मारिलेंस तर-टी ऐकून रामकृष्ण गोकुळांतून पळून जातील,मग त्या शत्रूंचा वध तुझ्या हातून होणार नाहीं,म्हणून तूर्त तुं वसुदेवाचे बंधन करून प्रथम त्या आपल्या शत्रूंच्या वधाचा उपाय कर.अशी मसलत सांगणाऱ्या नारदाने त्या कंसाचें निवारण केलें तेव्हां वसुदेवाचे पुत्र जे राम कृष्ण ते आपले मृत्यूरुपी आहेत असें जाणून त्या कंसाने लोखंडाच्या पाशांनी (बेड्यांनी) देवकीसह वसुदेवांचे बंधन केलें ||१९|| अर्थः---पुढें नारदषि निघून गेल्यांवर कंसाने केशी दैत्याला बोलावून आणून,हे केशिन्,तुं गोकुळांत जाऊन रामकृष्णांचा वध कर,अशी आज्ञा करून त्यास गोकुळांत पाठविलें ||२०|| अर्थः---नंतर तो भोजराज कंस,मुष्टिक,चाणूर सहल,तोशलक इत्यादिक मल्लांना,महातांना व प्रधानांना बोलावून आणून म्हणाला कीं-||२१|| अर्थः---भो भो वीरहो,हे चाणूर मुष्टिक हो,तुम्हीं हें माझें अज्ञारूप भाषण ऐका.नंदाच्या गोकुळामध्यें खरोखर वसुदेवाचें पुत्र रामकृष्ण आहेत,त्यांच्यापासून मला मृत्यूनिश्चयानें प्राप्त होणार असें आकाशवाणीनें सांगितलें आहे.यास्तव जेथें प्राप्त झालेल्या त्यांना तुम्हीं (चाणूरमुष्टिकांनी) मल्ललीलेनें मारून टाकावें||२२-२३|| भावार्थ:--- त्या कंसाने वसुदेवांना मारण्याचा प्रयत्न करू लागला,पण नारद मुनींनी त्याला त्या कुकर्मास प्रतिबंध केला.तेव्हा कंस याने देवकी व वसुदेव यांना लोखंडी बेड्यांनी कैद करून तुरुंगात टाकले.त्यानंतर कंस याने केशीस सांगितले कि,”तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णास मारून टाक म्हणजे त्यांची हत्या कर.”त्यांची हत्या अगोदर केली म्हणजे आपल्याला मरणाची भीती राहणार नाही.यापुढे आपण सुखाने जीवन जगुत.आपणास कोणापासून भीती नाही.आपला कोणी शत्रू राहणार नाही.||१९-२२|| अर्थः---हे सेवक जनहो,मल्लांचे युद्ध व्हावयाच्या जग्याच्या सर्व बाजूंनी एकमेकांना चिकटलेली उंच अशीं बसावयाची स्थानें करावीत,म्हणजे परवासी व देशवासी सर्वलोक त्यांच्यावर बसून यथेष्टपणें मल्लयुद्ध पहा-तील||२४|| भावार्थ:--- यदाकदाचित केशीकडून बलरामदादा आणि कृष्ण यांची हत्या न झाली तर,त्यांना मथुरेत बोलावून घेउत.त्यांना कुस्त्या खेळण्याचे निमित्त करून त्यांना मारून टाकूत.त्यासाठी त्याने त्याने कुस्ती खेळण्यासाठी रंग—मंचक तयार करून ठेवले.प्रजानां कुस्ती पाहण्याचे निमंत्रण दिले.असा सर्व डाव—पेच टाकून,जेणेकरून त्यांचा मृत्यू होईल अशी आखणी केले—नियोजन केले.||२४|| | महामात्र त्वया भद्र रंगद्वार्युपनियताम् | द्विपः कुवलयापीडो जही तेन ममाहितौ ||२५|| अर्थ:---हे कल्याणकारका महाम्हाता,तुं कुवलयापीड नांवाचा हत्ती,रंगमंडपाच्या दरवाज्यामध्यें न्यावास आणि त्याच्या योगानें माझे शत्रू असे-जे रामकृष्ण त्यांचा वध करतात||२५|| भावार्थ:--- जो त्या कंस याचा चतुर माहूता होता,त्यास असे सांगितले कि कुस्तीच्या आखाड्यावर कुलायापिड हत्तीला फाटकावर दारू पाजवून उभा कर,म्हणजे आल्या—आल्या हा हत्ती फाटकावरच बलारण आणि कृष्णास मारून टाकेल.||२५|| अर्थ:---हे शिवभक्त हो,आतां येणाऱ्या चातुर्दशी तिथीस तुम्हीं शैवतत्रांत सांगितल्याप्रमांणे धुनर्यागाचा (धनुष्याचेठिकाणीं शिवाचें आवाहन करून पूजन करण्याचा यज्ञाचा)आरंभ करावा आणि त्यामध्यें भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या या शिवाला प्रसन्न करून घेण्याकारीतां त्याला योग्य अशा शुद्ध पशूंची हिंसा करावी ||२६|| भावार्थ:--- कंस म्हणतो कि,”आता येत्या चतुर्दशीला विधीपूर्वक धनुष्य—यज्ञाला आरंभ करा आणि त्याचवेळी वर येणाऱ्या भूतनाथला पवित्र पशूंचा बळी द्या.”कोणत्याही कार्यास पशूंचा बळी देणे म्हणजे त्या जीवाचा वाढ करणे अधर्म आहे.कोणताही धारण जीवाचा बळी द्या असे संगत नाही.जो धर्म पशूंची हिंसा करा असे सांगतो,तो धर्म नसतो,तर अधर्माच असतो.धर्मच म्हणून जीव ज्याच्या—त्याच्या रसना—इंद्रियाचे चोचले पुरवणे आहे.याचा अर्थ असा आहे कि,रसना इंद्रिय ज्याच्या नियंत्रीत नसते,तो असा अधर्मयुक्त व्यवहार करून जीवाची हत्या करत असतो.म्हणून आपण कोणत्याही जीवाची हिंसा करून अधर्माने वागू नये.||२६|| अर्थ:---याप्रमाणे उपाय करण्याकरितां लोकांना आज्ञा करून,आपल्या कार्यभागाचा सिद्धांत जाणणाऱ्या त्या कंसाने,यादवश्रेष्ठ अशा अक्रूराला बोलावून आणून,त्याच्या सन्मानकरितां आपल्या हातानें त्याचा हात धरून,मोठा आनंद दर्शवीत त्याला म्हणाला कीं-||२७|| भावार्थः---स्वार्थी लोक फार कुशल असतात.आपला हेतू साध्य करण्याकरिता बह्याकारी आत्मीयता दाखवतात,कारण त्यांना आपले साध्य करून घ्याववयाचे असते,म्हणून वरकरणी प्रेम दाखवतात.हे प्रेम नसून देहाव असतो,म्हणून अशा बह्याताकारी प्रेम दाखखवणाऱ्यापासून सावध होऊन व्यवहारात काळजीपूर्वक वागावयास पाहिजे.कंस हातातहात घेऊन अक्रूरास म्हणतो.||२७|| अर्थः---हे हे दानपते अक्रुरा,तुं माझें मित्रकृत्य करावेंस.कारण,या भोज व वृष्णिनामक सर्व यादवांमध्ये माझें आदरपूर्वक उत्तम हित करणारात तुझ्या हून दुसरा कोणीं नाहीं||२८|| १९-८-१९ सोमवार भावार्थ:--- कंस आपले महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी अक्रूर यास बाह्यात्कारी मोठेपना—मान--सन्मान देत आहे.कंस म्हणत आहे कि,” भोजवंशी आणि वृष्णीवंशी यादावांमाध्ये माझा[कंसाचा] हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणीच नाही.”आपण व्यवहार करत असतांना,समोरील व्यक्ती आपल्यासी खरोखर बोलत आहे किंवा वागत आहे,याचा आपण विचार करावयास पाहिजे.आपणही विचार करून,वागावयास पाहिजे.कंस हा अक्रूरासी आत्मीयता दाखवत आहे,कारण त्याला आपले साध्य करून घ्यावावयाचे आहे.||२८|| | अतस्त्वामाश्रितः सौम्य कार्यगौरवसाधनम् | यथेन्द्रो विष्णुमाश्रीत्य स्वार्थमध्यगमद् विभुः ||२९|| अर्थ:---यास्तव हे प्रियकारक,जशी,वयानेंमोठा असलेल्या इंद्राने,वायानें कनिष्ठ आलेल्याही वामनरुपी विष्णूचा आश्रय करून,बलिराजानें हरण केलेली त्रैलोक्यसंपती पुन्हा प्राप्त करून घेली त्याप्रमाणें मी आपलें मोठें कार्य साधून घेण्याविषयीं तुझा आश्रय केला आहे.||२९|| भावार्थ:--- कंस हा समर्थ असून अक्रूर यांची साह्यता घेत आहे,त्याचप्रमाणे आपणही व्यवहारात---संसारिक कार्यात वडिल—मंडळींची साह्यता घेतली पाहिजे.तसेच पारमार्थिक कार्यासाठी संत—महात्मा यांची साह्यता घेतली पाहिजे.आपण इतरांची साह्यता व आपल्या प्रयत्नाने प्रगती करू शकतो---सुखाकडे जाऊ शकतो.असा विवेक करून जीवनात वागण्याचा प्रयत्न करावा.||२९|| अर्थ:---यास्तव तू नंदाच्या गोकुळांत जा आणि तेथें वसुदेवाचे पुत्र रामकृष्ण आहेत त्यांना ह्या माझ्या रथावर बसवून घेऊन ये.ह्या कामास विलंब करुं नकोस.||३०|| अर्थः---विष्णूचा आश्रय करणाऱ्या देवांनी,त्या रामकृष्णांपासून मला मृत्यु प्राप्त होणार असें निश्चयानें ठरविलें आहे,यास्तव त्यांना मारविण्याचा माझा अभिप्राय तुं गुप्त ठेऊन ‘धनुर्याग पाहण्याकरितां,तुम्हीं दूध दहींवगैरे भेटी घेऊन राजांच्या अज्ञेनें चलावें असें सांगून’ नंदादिक गोपासहवर्तमान त्या रामकृष्णांना येथें घेऊन ये.||३१|| भावार्थ:--- कंस म्हणतो कि,”विष्णूकडून माझा मृत्यू व्हावा असे निश्चित झालेले आहे,असे देवांचे म्हणणे आहे.या करिता बलराम आणि कृष्णांना घेऊन यावे.त्याचबरोबर नन्द आणि गोपांनाही घेऊन यावे.”कंस हा तमोगुणी असल्यामुळे कुकृत्य करत आहे.||३१|| अर्थ:---म्हणजे जेथे आणलेल्या त्यांना,मी मृत्यूतुल्य अशा कुलवयापीडा हत्तीकडून मारवीन,जर कदाचित् त्याच्यापासून ते सुटले तर व्रजासारख्या दृढशिरी चाणूरमुष्टिकादिक मल्लांकडून मारवीन ||३२|| भावार्थ:--- बलराम आणि कृष्णांना मारण्याकरिता कंस त्यांना मथुरेत बोलावत आहे.हत्तीला दारू पाजून बलराम—कृष्णांचा वाढ करावा असा त्याचा मानस आहे.कदाचित हत्तीकडून वाचला तर,मुष्टिक व चाणूर या पहिलावानाकडून मारण्याचे त्याचे नियोजन चालू आहे.कारण रुष्ण वाचला तर कंस याचा प्राण घेणार आहे,म्हणून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.कंस हा तमोगुणी असल्यामुळे तो कृष्णास विष्णू मानण्यास तयार नाही.त्याची या गोष्टीवर श्रद्धा नाही,श्रद्धेसाठी सत्वगुणांची गरज असते.||३२|| अर्थः----ते मरण पावले म्हणजे शोकानें तप्त झालेल्या त्यांच्या वसुदेवादिक बंधूंना व वृष्णि,भोज व दशार्हक यांना मीच मारून टाकीन ||३३|| भावार्थ:--- बलराम आणि कृष्णास मारल्यानंतर त्यांचे बांधव दु:खी होतील,त्यामुळे त्यांनाही मारील असे कंस म्हणतो.||३३|| अर्थः---नानात्र वृद्ध असूनही राज्याची इच्छा करणाऱ्या उग्रसेन पित्याला व त्याच्या श्रात्या देवकाला आणि जे दुसरे माझे शत्रू आहेत त्या सर्वांना मारून टाकीन ||३४|| भावार्थ:---कंस म्हणतो कि,पिता उग्रसेन हे वृद्ध झालेले आहेत,पण माझ्याकडे राज्यकारभार देत नाहीत,म्हणून त्यांनाही,त्यांचे बंधू देवक,अन्य जे मला विरोध करतील अशा सर्वांना यमसदनाला पाठविण म्हणजे त्यांचाही वध करील.||३४|| अर्थः---हे मित्रा,नंतर हि पृथिवी,शत्रुरहित होईल;कारण कीं,जरासंध राजा माझा सासरा असल्यामुळें तो मला पूज्यच आहे,द्विविदनामक वानर माझा मित्र आहे;शंबरासुर,नरकासुर व बाणासुर यांनी माझेंच सख्य केले आहे,यास्तव आतं त्या जरासंधादिकांच्या मदतीनें मी देवांचा पक्षपात धरणाऱ्या सर्व राजांना मारून पृथविचें राज्य करीन||३५-३६|| भावार्थ:--- कंस म्हणतो कि,”अशा रीतीने माझ्या सर्व शत्रूंचा वध करीन व राज्याचा कारभार पाहीन.जिकडे—तिकडे माझीच सत्ता असेल.इतर जे राजे आहेत ते माझे मित्र आहेत,यामुळे शत्रू कोणी राहणार नाही.मीच मुख्य सत्ताधीश होईल.”असे मनोराज्य कंस करत आहे.आपण असे काल्पनिक मनोराज्य करू नये,कारण मनोराज्य वास्तवात येत नसते.त्यामुळे दु:ख भोगावे लागते.||३६|| | एतज्ज्ञात्वाssनय क्षिप्रं रामकृष्णाविहार्भकौ | धनुर्मखनिरीक्षार्थ दृष्टुं यदुपुरश्रीयम् ||३७|| अर्थ:---हें माझ्या मनांतले जाणून तुं धनुर्याग पाहण्याकरितां व मथुरा नगरीची शोभा पाहण्याकरितां, ‘राजानें तुम्हांस बोलविलें आहे असें सांगून’तूर्त लहान असलेल्या त्या रामकृष्णांना लवकर घेऊन ये ||३७|| भावार्थ:--- कंस अक्रूरास म्हणतो कि,”बलराम आणि कृष्णास येथे लवकर घेऊन या.त्यांना आपण दोघे जे बोलालोत,ते त्यांना कांहीच सांगू नका.त्यांना मात्र एवढे सांगा कि,धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहण्यासाठी आवश्य यावे.”||३७|| | राजन् मनीषितं सम्यक् तव स्वावद्दमार्जनम् | सिध्यसिध्यो: समं कुर्याद् दैवं हि फलसाधनम् ||३८|| अर्थः---अक्रूर म्हणाला:---महाराज,आपला हा विचार,आपल्या मरणारा चुकविणारा असल्यामळें फार चांगला आहे.तथापि मनुष्यानें कोणत्याहि कामांत आग्रह न धरितां फळाची सिद्धी किंवा असिद्धी यांविषयी मनाची समता ठेवावी.कारण,फल उत्पन्न करणारे दैव (ईश्वर)आहे||३८|| भावार्थ:--- अक्रूर कंस यास म्हणतो कि,”कोणीही आपल्यावरील आलेले अरिष्ट दूर करतात.आपण आपल्यावर आलेले संकट दूर करण्याचा आवश्य प्रयत्न करावा.प्रयत्न करणे आपल्या हातात आहे,पण त्या प्रयत्नाला यश—अपयश येणे हे प्रारब्धावर—दैवावर अवलंबून असते,जीव हा कर्म करण्यास स्वतंत्र असतो,पण फळ भोगण्यास परतंत्र असतो.म्हणून जीवाने कर्म धर्मानुसार करण्याचा प्रयत्न करावा,कारण धर्मानुसार कर्म केले तर ईश्वर सुखाचे फळ देताच असतो व अधर्मानुसार कर्म केले तर दु:खाचे फळ मिळताच असते.धर्म—अधर्म कळण्याकरिता संत---महात्मा यांची संगती करून कळून घेण्याचा प्रयत्न करावा.||३८|| | एवमादिश्य चाक्रूरं मन्त्रीणश्च विसृज्य सः | प्रविवेश गृहं कंसस्तथाक्रूरः स्वमालयम् ||४०|| अर्थः---हा प्राणी दैवानें विपरीत योजलेलेही मनोरथ करून त्यांच्या सिद्धीविषयी पराकाष्ठेचे यत्न करीत असतो परंतु त्या मनोरथांची सिद्धी झाली तर हर्षानें आणि नाहीं झाली तर शोकानें युक्त होतो,असा जरी व्यवहार आहे तथापि मी सेवक असल्यामुळें तुझीं आज्ञा करतों,म्हणजे रामकृष्णांना आणण्याकरितां गोकुळांत जातों||३९-४०|| भावार्थ:--- मनुष्य मोठ—मोठे मनोरथ करतो,पण मनोरथानुसार फळ न मिळता,कर्मानुसार फळ मिळत असते..म्हणून आपण विनाकारण मनोरथ न करता स्वधर्मानुसार कर्म करावे.म्हणून अक्रूरसुद्धा म्हणाव कि,”मी माझ्या स्वधार्माचेच पालन करीन म्हणजे तुमच्या आज्ञेचे पालन करीन.जीव हा कधी धर्मानुसार तर कधी अधर्मानुसार वागत असतो,म्हणून त्यास कधी सुखाचे तर कधी दु:खाचे फळ मिळत असते.याकरिता जीवनी नेहमीसाठी धर्मानुसारच आचरण करावे,तर अधर्माचा त्याग करावा.||३९-४०|| (श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्यें अरिष्टासुरवधनिरुपणनामक हा छतिसाव्या अध्याय समाप्त झाला) | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| _________________________________________________________________________________________________________| ३७- केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________आतां ह्या सदतिसाव्या अध्यायामध्यें श्रीकृष्णाने केशिदैत्याचा वध केला असतां,नारदाने पुढें होणाऱ्या कर्माची सूचना करून त्या श्रीकृष्णाची स्तुति केली,नंतर क्रीडा करणाऱ्या कृष्णानें व्योमासुराचा वध केला अशी कथा वर्णन केली आहे.||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,कंसाने पाठविलेला केशी दैत्य,तर मोठ्या घोड्याचें स्वरूप धारण करून,मनोवरच्या केंसांच्या सपाट्याने जिकडेतिकडे उडवून दिलेल्या मेघांनी व देवांच्या विमानांनी आकाश व्याप्त करीत व पायांनी व भूमीचे विदारण करीत,ज्याच्या वेग मनाच्या वेगसारखा तीव्र आहे,ज्यानें आपल अश्वजातीच्या शब्दांनी सर्व जगाला भीति उत्पन्न केली आहे||१|| दि२०-९-१९ मंगळवार अर्थः---“ज्याचे नेत्र विशाळ आहेत,ज्याच्या तोंडाचा जबडा भयंकर आहे,ज्याच्या कंठ पुस्ट आहे,जो काळ्या मोठ्या मेघसारखा लट्ठ आहे ज्याचें चित्त दुष्ट आहे,तो केशिदैत्य कंसाचें हित करण्यीच इच्छा धरून भूमीला कांपवीत नंदाच्या गोकुळात प्राप्त झाला ||१|| अर्थः---तेव्हा आपल्या गोकुळाला घोड्यासारख्या खिकाळण्यानें त्रास देणाऱ्या व पुच्छाच्या व केसांनी मेघांना विसकटून टाकणाऱ्या आणि युद्धकरीत नाला (कृष्णाला)शोधीत असणाऱ्या त्या केशिदैत्याला,पुढें सरसावणाऱ्या त्या भगवान् श्रीकृष्णाने,आपल्या समोर बोलाविलें,तेव्हां त्या दैत्यानें सिंहासारखी मोठी गर्जना केली||२|| अर्थः---आणि दुसऱ्यांनि पराभव करण्यास व पुढेही जाण्यास अशक्य व अतिक्रुद्ध असा तो महावेगवान् दैत्य,मुखानें आकाश पिऊनच टाकतो कीं काय! असा असतां,आपलें तोंड पसरून कृष्णाच्या समोर धांवला आणि त्यानें आपल्या पाठीमागच्या पायांनी त्या कमळनयन श्रीकृष्णाला ताडन केलें ||३|| अर्थः---तेव्हां श्रीकृष्ण भगवंतानें,टी त्यांचे ताडन चुकवून,त्यांचे आपणास मारण्याकरितां क्रोधानें पसरलेल्या पायांचेठिकाणीं त्याला हातांनी धरून गरगर फिरविलें आणि चारशे हातांच्या अंतरावर अवज्ञापूर्वक फेंकून दिलें आणि जसा गरुड,अनायासनेंच सर्पाला फेकून निर्भयपणें राहतो त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण निर्भय उभा राहिला ||४|| अर्थः---याप्रमाणें भगवंताने फेंकून दिलेला तो केशि दैत्य,प्रथम मूर्छित होऊन नंतर पुन्हा सावध होऊन उठला आणि क्रोधानें आपलें मुख पसरून वेगानें श्रीकृष्णाला गिळून टाकण्याकरिता त्याच्या अंगावर धांवला,तेव्हा त्या श्रीकृष्णानेही हास्य करीत करीतच त्याच्या मुखमध्यें आपली डाव्या हाताचा,जस मुषकाला धरण्याकरीता त्यांच्या बिळांट गारुडी सर्पाचा प्रवेश कारविला ||५|| अर्थः----तेव्हां,जसे तापलेल्या लोखंडाचा स्पर्श झालेले दांत पडतात त्याप्रमाणें भगवंताच्या हाताचा स्पर्श झालेले ते केशी दैत्याचें सर्व दांत पडले आणि त्याच्या देहांत प्रविष्ट झालेला भगवंतांचा हात,जसा औषध न पोंचलेला जलोदरादिक रोग वाढतो त्याप्रमाणें वाढू लागला||६|| अर्थः---त्यावेळीं अतिशयच वाढणाऱ्या त्या कृष्णाच्या हातानें प्राणवायू कोंडलेला,अंगाला घाम सुटलेला वडोळे फिरलेला तो केशी दैत्य,पाय धडपडावीत व मलोत्सर्ग करीत भूमीवर मरून पडला||७|| अर्थः---तेव्हां गतप्राण झालेल्या त्या केशी दैत्याच्या पिकलेल्या चिबुडाप्रमाणें विदीर्ण झालेल्या देहांतून त्या महापराक्रमी श्रीकृष्णाने आपला हात काढूनघेतला.तेव्हा प्रयत्नावांचून शत्रूला मारणाऱ्या व गर्वरहित अशा त्या श्रीकृष्णावर,विस्मित झालेल्या देवांनी पुष्पवृष्टी करून त्याची स्तुति केली||८|| अर्थः---हे राजा,नंतर एकेंवेळी भगवद्भक्तांमध्यें अतिश्रेष्ठ असा नारद ऋषि,स्तुत्य कर्में करणाऱ्या त्या कृष्णाजवळ एकांती येऊन म्हणाल्या कीं,||९|| अर्थः---हे कृष्णा कृष्णा,हे अपरिछिन्नस्वरूपा,हे योगेशा,हे जगदीश्वरा,हे वासुदेवा,हे जगन्निवासा,हे यादवश्रेष्ठ हे प्रभो,तुं पृथिविला भारभूत असलेल्या दैत्यांचा संहार करण्याकरितां भूमीवर अवतीर्ण झाला आहेस,यास्तव त्या अवताराला योग्य असें आचरण करून जगाचें रक्षण कर.हे कृष्णा,जसा अग्नि कष्टामध्यें गुप्तरूपानें राहतो त्याप्रमाणे तुं एकचसर्वभूतांचा बुद्धीच्या आत राहणारा,आत्मा साक्षी,महापुरुष,ईश्र्वर आहेस,यास्तव परतंत्र असलेल्या जीवांची तुझ्या प्रेरणे वाचून कोणत्याही कार्याच्या ठिकाणी प्रवृत्ति घडत नाही.तू स्वतंत्र आहे,म्हणून तुला साधनांची अपेक्ष नाही.तू आपणच आपल्या मायाशाक्तिच्या योगानें सत्त्व,रज,आणि तम हे तीन गुण उत्पन्न केले आहेस आणि त्यांच्या योगे करून,सत्यसंकल्प अअसा ईश्वर तुं,हे जग उत्पन्न करितोस,पालन करितो व याच्या संहारही करितोस,तोच तुं आता राजांच्या स्वरूपाने प्रगट झालेल्या,दैत्य,प्रथम व राक्षस यांच्या नाश्याकारीतां आणि धर्ममर्यादांच्या रक्षणाकरिता प्रगट झाला आहेस ||१०-११-१२-१३-|| अर्थः---हा घोड्याचें रूप धारण करणारा दात्य तुं लिहिलीने मारिलास त्याच्याच योगानें सर्वांचे कल्याण झालें आहे.ज्याच्या शब्दमात्रेंकरून भयभीत झालेले देव,स्वर्गलोकाला सोडून पळून जात असत ||१४|| दि:----२१-८-१९ किरण बुधवार अर्थः---हे समर्था,आजच येथे अक्रूर येईल,उड्या तुं मथुरते जाशील आणि परवांच्या दिवशी चाणून,मुष्टिक तसेच दुसरेही मल्ल,कुवलयापीड हत्ती आणि कंस,यांना मारशील टी मी पाहीन ||१५|| अर्थः---त्यानंतर-पंचजनाचा पुत्र,शंखापूर कालयवन मूर दैत्य व नरकासुर यांचा वध,पारिजात वृक्षांचे आणणे,इंद्राचा पराजय ||१६|| अर्थ:---व पराक्रम दाखविणे,हेच याचे मोलवगैरे अशा राजकण्याचा विवाह आणि हे जगत्पते,द्वारकेमध्यें असताना, ब्राम्हणाच्या गाईंचे हरण केल्यामुळें सरठयोनीं पावलेल्या नृगराजाचें त्या पापापासून मुक्त करणें,जांबवतीसहवर्तमान स्यमंतकमण्याचें परत आणणे,ब्राम्हणाच्या मरण पावलेल्या पुत्रांचे महा कालपुरापासून परत आणून देणे||१७-१८|| अर्थः---पौंड्रकाचा वध,काशिपुरीचे जाळणें,दंतवक्रांचा वध व धर्मराजाच्या राजसूययज्ञामध्यें शिशुपाळाचा वध ||१९|| अर्थः---हीं व आणखीही द्वारकेमध्यें वास करणारा तुम,भूमीवर कवींनी गायन करण्यास योग्य अशी जी दुसरीं चरित्रें करिशील ती सर्व मी पाहीन ||२०|| अर्थः---नंतर भूभार घालविण्याची इच्छा करणारा तूं अर्जुनासारथी होऊन जें अक्षौहिणीसंख्यांच्या सेनांचें संहाररूप कर्म करिशील तेंही मी अवलोकन करीन||२१|| अर्थः----हे कृष्णा,केवल ज्ञानमूर्ती,आपल्रू परमानंद स्वरूपस्थितीनेच सर्व मनोरथ पूर्ण झालेला सत्यसंकल्प आणि चैतन्यशक्तीनें निर्माण केलेला मायेचा कार्यरूप संसारप्रावाः ज्यापासून नित्य निवृत्त झाला आहे अशा निरतिशयैश्र्वर्यसंपन्न तुज भगवंताला मीर शरण आलों आहें.||२२|| अर्थः---ईश्वर,स्वतंत्र आपल्या स्वाधीन असलेल्या मायेच्या योगानें मह्त्तत्त्वादिक सर्वप्रकारच्या विशेषांची कल्पना करणारा परंतू आता क्रीडेकरितां मनुष्यदेह धारण करणारा,अशा यादव,वृष्णि व सात्वत यांमध्यें अग्रगण्य असलेल्या तुज भगवंताला मी नमस्कार करितो ||२३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें श्रीकृष्णाच्या दर्शनाने आनंदयुक्त असलेला तो भागवत,श्रेष्ठ नादर ऋषि,यादवपति श्रीकृष्णाला नमस्कार करून त्यानें जाणण्याची आज्ञा दिलीअसतां निघून गेला||२४|| अर्थः---भगवान् श्रीकृष्णाही,युद्धांमध्ये केशिदैत्याला मारून गोकुळाला सुख उत्पन्न करीत असता संतुष्ट झालेल्या गोपाळांसहवर्तमान पशुंचे रक्षण करुं लागला||२५|| अर्थः---एकेवेळीं ते आरामकृष्णादिक गोपाळा,गोवर्धनपर्वता-च्या आसमंताद्भागी गाईंचा चारीत असता काही चोर व कांही पालक होऊन,चोरून लपवून ठेवण्याचें खेळ खेळूं लागले||२६|| अर्थः---हे राजा,त्या गोपांमध्यें कितीएक चोर झाले व कितीएक (रामकृष्णादिक)त्यांचे रक्षक झाले आणि कितीएक मेढे झाले त्यांत चोरांनी मेंढ्यास चोरून लपवूनें ठेवावें व पालकांनी त्यांना शोधून काढावें याप्रमाणे सर्व गोपाळ निर्भयपणें क्रीडा करुं लागलें||२७|| अर्थः---तेव्हां मयासुराचा पुत्र महामायावी व्योमनामक असुर,गोपाळांचा वेष धारण करून आपण चोर झाला आणि मेंढे होणाऱ्या पुष्कळ गोपाळांना वारंवार घेऊन जाऊ लागला ||२८|| दि २२-८-१९ गुरुवार वार किरण अर्थः---तो महादैत्य,नेलेल्या नेलेल्या गोपाळांना पर्वताच्या गुहेंत घालून तिचें द्वार,शिळेनें अच्छादन करून घेत असे असें होतां शेवटी मेंढें झालेले गोपाळ पांच चार अवशेष राहिले ||२९|| अर्थः---तेव्हां सत्पुरुषांना आश्रय देणाऱ्या श्रीकृष्णाने,त्याचें टी कर्म जाणून,गोपांना नेणाऱ्या त्या व्योमासुराला,जसा सिंह,बळानें लांडग्याला धरितो त्याप्रमाणे एकेकी धरिलें ||३०|| अर्थः---तेव्हां त्या बलवान् दैत्यानें गोपस्वरूपाचा त्याग करून महापर्वतासारखें आपलें स्वरूप धरण केलें आणि आपणास सोडवून घेण्याकरीतां पुष्कळ प्रयत्न केला परंतू कृष्णानें धरल्यामुळे व्याकुल झालेला तो आपणास सोडून घेण्यास समर्थ झाला नाहीं ||३१|| अर्थः---भगवंताने त्याला दोन्हीं हातांनी धरून भूमीवर पाडिलें आणि अंतरिक्षामध्यें उभे राहिलेंले सर्व देव पाहात असतां,यज्ञांतील पशुला जसें मारितात त्याप्रमाणें श्वास कोंडून बुक्क्यांनी मारिलें ||३२|| अर्थः---अन्नात्र गृहेचे द्वार ज्या शिळेनें बंद केले होतें ती शिळा,फोडून दूर केली आणि त्यासंकटांतून गोपांना मोकळे करून देवांनी व गोपांनी स्तुती केलेला तो श्रीकृष्ण,आपल्या गोकुळांत प्रविष्ट झाला ||३३|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील पूर्वार्धामध्यें व्योमासूरव्धकथनयप हा सदतिसाव्या अध्याय समाप्त झाला ||३७||) | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| _________________________________________________________________________________________________________| ३८--- किरण १९--अक्रूराचे व्रजगमन—२ अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________(आतां ह्या अडतिसाव्या अध्ययमध्यें अक्रूर जसे मनोरथ करीत गोकुळांतगेला त्याप्रमाणें रामकृष्णांनी त्याला घरीं नेऊन त्याचा सत्कार केली अशी वर्णन केली आहे ||१|| | अक्रुरोपी च तां रात्रीं मधुपुर्यां महामतिः | उषित्वा रथमास्थाय प्रययौ नन्दगोकुलम् ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,महाबुद्धिमान असा तो अक्रुरही ज्या रात्रीं कन्सनेअ आज्ञा केली होती ती रात्र मथुरेमध्ये राहून प्रात:काळीं रथावर बसून नंदराजाच्या जावयास निघालां ||१|| भावार्थ:--- महाबुद्धिमान अक्रूर नियोजित जसे निश्चित ठरले होते,त्यानुसार सकाळी नित्यकर्म करून स्वधार्मांचे पालन म्हणून सकाळीच नंदनच्या गोकुळाकडे जाण्यास निघाला.आपणही स्वधर्मांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा,कारण स्वधार्मांचे पालन केले असता सुखाकडे जाण्याची शक्यता असते.आपला स्वधर्म कळण्यासाठी संत—महात्मा यांचा सत्संग करून,कळून घ्यावे.||१|| अर्थः---तो महा भाग्यवान अक्रूर,मार्गाचेठिकाणी जात असतां,कमळनेत्र भगवंतांविषयीं परमभक्ति पावत असता असें हें मनांत चिंतन करुं लागला किया,-||२|| अर्थः---चतुर्दशीस होणारा धनुर्याग पाहण्यासाठी एकादशीच्या दिवशीं रामकृष्णास आणण्याबद्दलची कंसाची आज्ञा आकृरास झालिया.द्वादशीच्या दिवशी सकाळी केशिदैत्याला वाढ झाला.नंतर नारदऋषि कृष्णाची स्तुती करून गेल्यावर तिसरे प्रहारीं व्योमासुराचा वाढ झाला व सायंकाळी अक्रूर गोकुळांत गेला स कथेचा आक्राम आहे||२|| | किं मयाssचरितं भद्रं किं तप्तं तपः | किं वाथाप्यर्हते दत्तं यद् द्रक्ष्याम्यद्द केशवम् ||३|| अर्थः---“मी असे कल्याणकारक कर्म (यज्ञादिक) काय केलें होतें?किंवा कोणतें परम तप (व्रतोपवासादिक) केलें होतें?अथवा सत्पात्र ब्राम्हणाला कोणतें दान दिलें होतें?किया,ज्याच्या योगानें आज मला भगवंतांचे दर्शन होईल ||३|| भावार्थ:--- अक्रूर मनातल्या मनात असा विचार करतात कि,”आज मला श्रीकृष्णांचे दर्शन होणार,याचा अर्थ असा होतो कि,आज माझे परमभाग्य भाग्य उदयाला येणार.मी यापूर्वी कोणती तरी तपश्चर्या केली असणार कि,ज्यामुळे मला भगवंतांचे दर्शन होत आहे.कोणत्या तरी सत्पात्रास दान डेली असावे,त्याचे फळ मला आज मिळत आहे.आपल्यालाही भगवंतांचे दर्शन होण्यासाठी तपश्चर्या करावयास पाहिजे,आपण परोपकार,भगवंतांच्या नांवांचा उच्चार करावयास पाहिजे.जीवन जगात असतांना निरंतर मनातल्या मनात किंवा वनित सतत नामस्मरण असावयास पाहिजे.सतत ध्यास असावयास पाहिजे.भागावात—शात्र श्रावण करावे.त्यामुळे आपणास भगवंतांचे ज्ञान होईल व त्यांचा अनुभव येईल,त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होईल.||३|| | ममैतद् दुर्लभं मन्य उत्तमश्लोकदार्शनम् | विशयात्मणो यथा ब्रम्हकीर्तनं शुद्रजन्मनः ||४|| अर्थः---मी असें मानितो किया,शुद्राच्या जातींत उत्पन्न झालेल्या पुरुषाला जसें वेदाचें अध्ययनादिक दुर्लभ आहे,त्याप्रमाणे विषयासक्तिचित्त असलेल्या मला हें उत्तमकीर्तिं भगवंतांचे दर्शन होणें दुर्लभा आहे ||४|| भावार्थ:--- जे लोक विषयात आसक्त आहेत,त्यांनास भगवंतांचे दर्शन होते,कारण विषयात अशक्त असणारे लोक नेहमीसाठी विषयांचेच चिंतन करत असतात.ज्याच्यात अशक्त आहोत,ते विषय आपल्या मनात,वाचेत व कृतीत येत असतात.म्हणून आपण संसारिक विषयांचे चिंतन करता भगवंतांचे चिंतन करावे.याकरिता सतत—सतत भगवंतांचेच स्मरण करावे.भगवंतांच्या नावाचे स्मरण आपली इच्छा नसली तरी करावे.त्यामुळे आपल्या मनात भगवंतांच्या स्मरणाचे संस्कार होत असतात.त्यानंतर आवड निर्माण होत असते.जसे तमोगुण असलेल्या व्यक्तीस वेदापठण करणे कठीण असते,कारण पूर्वसंस्कार नसतात.म्हणून इच्छा नसली तरी पुन्हा—पुन्हा प्रयत्न करावेत.प्रयत्नांती परमेश्वर असतो.प्रयत्नाला फळ मिळत असते.यासाठी प्रयत्न करावा.||४|| | मैवं ममाधमस्यापी स्यादेवाच्युतदर्शनम् | ऱ्हियमाणः कालनद्दा क्वचित्तरति कश्चन ||५|| अर्थः---अथवा असें नाहीं,तर मज अधमलाहि भगवंतांचे दर्शन होईलच.कारण,जसा नदीच्या प्रवाहानें वाहविलेल्या तृणकाष्ठादिक पदार्थांमध्ये एखादा पदार्थ,अकदेअवेलिअ कडेला लागतो त्याप्रमाणें काळरूप नदीनें वाहविलेल्या जीवनांतूनहि कोणी एखादा जीव तरून कर्मबळानें कडेला जातो||५|| अर्थः---म्हणून आज ह्या गोकुळांत जाण्याचया प्रवृत्तीनेंच माझें पाप काह्रोख्र नष्ट झालें आहे व माझा जन्म सफळ झाला आहे असा निश्चय होतो;कारण,आज मी,योग्यांनी ध्यान करण्यास योग्य अशा भगवंतांच्या चरणकमळास नमस्कार करीन.||६|| भावार्थ:--- ज्याअर्थी मला आज भगवंतांचे दर्शन होत आहे,त्याआर्थी पूर्व पाप नष्ट झाली आहेत.त्यामुळे हा माझा जन्म सफल झाला आहे.आपणसुद्धा निष्काम कर्म करून अंत:कारण शुद्धीची साधने करावयास पाहिजे.असे केले असता आपलेही पाप नष्ट होऊन आपणास भगवंतांचे दर्शन निश्चीतृपणे होणारच,यात तिळमात्र शंका नाही.म्हणून आपण जन्म सफल करून घ्यावावयास पाहिजे.मनुष्य देह हा पुन्हा—पुन्हा मिळत नाही.इतर देहात भगवंतांची साधना करता येत नाही.म्हणून आताच साधना करावीच.||६|| अर्थः---अहो ! भगवद्भक्तांचा द्रोह करणाऱ्याही कंसाने आज माझ्यावर मोठाचा अनुग्राः केला आहे.कारण,ज्यानें पाठविलेला मी,अवतार धारण करणार्या श्रःईःईणःआ चार्नक्म्ल पाहीन.ह्रदयांमध्यें ध्याण केलेल्या त्या चारणकमळाच्या नखसमूहाच्या कांतीनें,पूर्वींचे ध्यान करणारें अंबरीषादिक भक्त,दुस्तर अशाही संसाररूप अंधाकाराला तरून गेलें आहेत ||७|| अर्थः---आणि ज्या चरणकमळांची,ब्रम्हदेव,शंकर इत्यादिक देवी,लक्ष्मी देवी व भक्तांसहित ऋषिगण पूजा करीत आहेत.येणेंकरून येनेअकारून के परम ऐश्वर्ययप,परमसौभाग्यरूप व परमपुरुषार्थरूप आहें.तसेंच है चारण्याकरितां सख्यांसहवर्तमान व वनांत संचार करीत आहे (अतिकृपाळू आहे)आणि जें गोपिकांच्या कूचसंबंधी केशरानें रंजित आहे (प्रेमळभक्तांना अतिसुलभ आहे) ||८|| २३-८-१९शुक्रवार अर्थः---दुसरा मनोरथ करितो कीं,ज्याअर्थी हरिण,मला उजवा चालून गमन करीत आहे त्या अर्थी मी आज भगवंतांचे मुख पाहीन यांत संशय नाहीं.ते मुख असें आहे कीं,ज्याचेठिकाणी सुंदर गाल व नासिका शोभत आहें,जेथें तांबड्या कमलासारखें नेत्र आहेत व हास्यसहित अवलोकन आहे व जें कुरळ कंसांनी वेष्टित आहे ||९|| भावार्थ:--- ब्रह्मदेव,शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात,लक्ष्मीदेवी आणि प्रेमी—निष्काम भक्तांसह मोठ—मोठे लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात आणि गोपी ज्यांची भक्ती करतात त्यांचे आज अक्रूर यांना दर्शन होणार.आपणसुद्धा त्याच भगवंतांची म्हणजे श्रीकृष्णांची—परमात्म्यास्ची निष्काम भक्ती करावयास पाहिजे.यामुळे जन्म—मरण निव्रुत्थौन आपण सुखरूप होणार.||८|| अर्थः---आणि पृथ्वीचा भार दूत करण्याकरितां आपल्या इच्छेनें मनुष्यनाट्य स्विकारणाऱ्या व अतिशय सौंदर्याचा आश्रय अशा विष्णूचें जर मला दर्शन होईल तर माझ्या नेत्रांचें अनायासानें साफल्य होणार नाहीं काय ? तर होईलच ||१०|| अर्थः---जो ईश्वर,आपल्या अवलोकन मात्रेंकरून कार्यांना कारणांना उत्पन्न करणारा असूनही अहंकार रहित आहेत आणि आपल्या तेजानें (सच्चिदानंदस्वरूप साक्षात करणे) अज्ञान भेद व श्रम (अनात्मा वस्तूचे ठिकाणी आत्मा बुद्धी) यांनी रहित आहेत.तथापि तो ईश्वर स्वाधीन असलेल्या मायेच्या योगानें केवळ अवलोकन मात्रेअकारूनप्राण ,इंद्रीयव बुद्धी ,मयांसहित आपल्या ठिकाणी रचलेल्या जीवांसहवर्तमान वृदावानांमध्ये गृहांमध्ये लिहिलेले क्रीडा करून लागला म्हणजे कर्म करणार्या सारखा व आसक्त असल्यासारखा प्रतीस्तीस येतो.||११|| अर्थः---ज्या भगवंताच्या,सर्वलोकांच्या पापांचा नाश करणाऱ्या वा महामंगलरूप अशा भक्तवत्सल्यादिक गुणांनी,गोवर्धद्धार णादिक कर्मांनी व रामकृष्णादिक जन्मांनी मिश्र असलेल्या म्हणजे त्या गुणादिकांचे प्रतिपादन करणाऱ्या तथा रूप वाणी,वक्त श्रोता इत्यादिक सर्वांचा जन्माचे सार्थक करितात,सज्जनांच्या सभांना शोभवितात व जगाला पवित्र करितात आणि ज्या वाणी,भगवदगुणांदिकांच्या प्रतिपादनाखेरीज आहेत त्या,पडलालीत्या दिक अलंकारांनी अलंकृत असल्या तरी,वस्त्रांदिकांनी अलंकृत असलेल्या शवांसारख्याच सज्जनांना मान्य आहेत ||१२|| अर्थः--- भावार्थ:--- आपण भगवंतांच्या गुण,कर्म आणि जन्म यांचे वाणीने वर्णन करावे.जी वाणी वर्णन करत नाही,ती वाणी व्यर्थ होय.जिवंत असून मेल्यासारखी होय.म्हणून आपण मनष्य देहात असतांना भगवंतांची निष्काम भक्ती करावी.||१२|| अर्थ:---तोचच भगवान ईश्वर,खरोखर आपण केलेल्या वर्णाश्रमधर्मर्पादांचे पालन करणाऱ्या इंद्रदिक लोकांना सुख देण्याकरिता यंदावांच्या कुळामध्येंशे श्रीर्कुष्ण रूपाने अवतार धारण करून यशाचा विस्तार करीत असता गोकुलांमध्ये राहिला आहे.ज्याचे सर्वांना मंगळकारक यश दु गात आहे ||१३|| अर्थः----सत्पुरुशन्चा गुरु व गतिरूप,त्रेलोक्यांमध्ये सुदंर,नेत्रवंतांना परम आनंद देणारा व लक्ष्मीचंहि आवडते स्थान असें स्वयप धारण करणारा अशा त्या श्रीकृष्ण भाग्वान्तानला आज मी निश्चयानें पाहीन.कारण,आज मला पाहंटेच्या वेळां,शुभसूचक शकून दाखविणाऱ्या झाल्या आहेत.||१४|| अर्थः---भगवंतांचे दर्शन झाल्यानंतर तत्काळ रथावरून खालीं उतरून मी,प्रधानपुरुष अशा त्या रामकृष्णांच्या चरणांना,कीं ज्यांचे स्वरूपसाक्षात्कार होण्यासाठीं केवल बुद्धीने ध्यान केलें आहे त्यांना,साक्षात् नमस्कार करीन आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या सख्या गोपांनाही नमस्कार करीन||१५|| अर्थः---आणि त्यावेळीं चरणमुळाचेठिकाणीं नमस्कार करून पडलेल्या माझ्या मस्तकावर तो समर्थ श्रीकृष्ण,आपलें हस्तकमळ ठेवली.जें काळरूप सर्पाच्या वेगानें अत्यंत भय पावणाऱ्या व शरण जाणाऱ्या मनुष्यांना अभय देणारें आहे||१६|| अर्थः---ज्या हस्तकमळावर इंद्राने तसेंच बळियराजानें पूजन व दानसंबंधी उदक समर्पण करून,त्रैलोक्याचें इंद्रपद मिळविलें आहे आणि सौगंधिक्नांवाच्या कमळांसारखा सुगंध असलेल्या ज्या हस्तकमलानें,आपल्या स्पर्शानें रासक्रीडेमध्यें गोकुळवासी स्त्रियांचा श्राम दूर केला आहे.केवढे हें आश्चर्य!||१७|| अर्थः---जरी मिया कन्सनेअ पाठविलेला त्याचा दूत आहें तथापि भागवान् श्रीकृष्ण,माझ्या वर हा शत्रूकडचा आहे अशी बुद्धि करणार नाहीं.कारण,तो सर्वज्ञ व सर्वांचा अंतर्यामी असल्यामुळे आपल्य ‘खरें ग्रहण करण्यास समर्थ असल्यास’ज्ञानचक्षुनें माझ्या मनाच्या बाहेरच्या व आंतल्या सर्व चेष्टा जाणत आहें.म्हणजे मी जरी बाहेरून कंसाला अनुसरनारा असलों तरी आंतून आपणाला अनुसरणारा आहें,हें त्याला ठाऊक आहे ||१८|| भावार्थ:--- भगवंत सर्वांचे साक्षी आहेत,म्हणून आपण—जीव कोणते कर्म करतो असे तो जाणतो.आपण शुभ कर्म केले किंवा अशुभ कर्म केले,ते त्येला कळते,म्हणून आपण शुभ कर्म करावे व अशुभ कर्म करू नये,कारण तो कार्मान्नुसार शिक्षा करत असतो व त्यानुसार सुख किंवा दु:ख भोगावे लागते.शुभ कर्म व अशुभ कर्म कळण्याकरिता संतांचा सत्संग करावा लागतो.||१८|| | अप्यङ्घ्रिमूलेsवहीतं कृतान्जलीं मामीक्षिता सस्मितमार्द्रया दृशा | | सपद्दपध्वस्तसमस्तकिल्बिषो वोढां मुदं वीतविशंक उर्जीताम् ||१९|| अर्थः---आणखीही जर तो भगवान्,चरणाच्या समीपभागीं एकाग्रतेणें हात जोडून उभा राहिलेल्या मजकडे,आपल्या हास्यसहित कृपामृतानें आर्द्र झालेल्या दृष्टीनें पाहील तर,तत्काल मी सर्व पापांपासून व पुनर्जन्मादि आशंकां पासून मुक्त होऊन मोठ्या आनंदानें पावेन||१९|| भावार्थ:--- भगवंतांचे दर्शन झाल्यामुळे म्हणजे त्या ज्ञानाची अनुभूती आल्यामुळे जीवाचे जन्म—मरण नाहीसे होतात.म्हणून आपण भगवंतांची अनुभूती येण्याकरिता निष्काम कर्म करून ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा.||१९|| अर्थः---आणि दर्शनानंतर तो भागवान्,जर आपले बाहू लांब पसरून त्यांनी,ज्याला भगवंताशिवाय दुसरा कोणीच इष्ठ देव नाही,अशा,अति स्नेही मज चुलत्याला आलिंगनकरीन,त्र त्याचवेळी माझा देह आतीपवित्र होईळ आणि त्या आलिंगनाच्या योगानें देहाचा कर्मात्मक बंधही सूतोन जाईल||२०|| | लब्धान्गसंग प्रणतं कृतांजलीं मां वक्ष्यतेक्रूर ततेत्युरुश्रुवा:|तदा वयं जन्मभृतो महीयसा नैवादृतो यो धिगमुष्य जन्म तत् ||२१|| अर्थः---नंतर “त्र भगवंताबरोबर आलिंगन मिळालेल्या व नमस्कार करून हात जोडून उभा राहिलेला मला,तो महाकीर्तीमहान श्रीकृष्ण हे अक्रुरा,काका,इत्यादिक संबोधनाणे देव जेव्हा भाषण करून लागेल.तेव्हा आमच्या जन्माचें सार्थक होईल.सर्व पूज्य अशा भगवंताने,ज्याचा आदर मोलीच केला नाही,त्या पुरुषाच्या जन्माला धिक्कार असो ||२१|| भावार्थ:--- भगवंत अक्रूर यांना आपला म्हणून स्वीकार करतील,त्यावेळी त्याचे जीवन धन्य होईल.त्याचप्रमाणे आपणास भगवंतांनी आपले म्हणून स्वीकार करावे,म्हणून भगवंतांची भक्ती करावी.त्यातच आपले हित आहे.आपण भगवंतांचेच आहोत.||२१|| अर्थः---अर्थः---यद्यपि त्या भगवंताला कोणीही पुश प्रिय नाही,अप्रिय नाही,अत्यंत मित्र नाही,द्वेष नाही व उदासीनहि नाहि तथापि जसा कल्पवृक्ष आपल्या आश्रय करणारासच फल देतो इतरांना देत नाहीं त्याप्रमाणे तो परमात्मा,भाक्ताचेच मनोरथ पूर्ण करणारा होतो,इतरांचे पूर्ण करणारा होत नाही ||२२|| दि:--२४-८-१९ शनिवार भावार्थ:--- भगवंतांचेच सर्व जीव असल्यामुळे त्यांना कोणाविषयी भेद नाही.त्यांना जीवांविषयी आपलेपणा व परकेपणा नाही.जो जसे कर्म करतो,जो ज्याप्रमाणे इच्छा करतो,त्यानुसार त्याची इच्छा पूर्ण करतो.ज्से आई आपल्या मुलांना त्याच्या मागणीप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करते किंवा कल्पवृक्ष मागणारांची त्याच्या मागणीप्रमाणे इच्छा पूर्ण करतो,तसे भगवंत इच्छा पूर्ण करतो.||२२|| अर्थः---असो,यादव श्रेष्ठ अस त्या कृष्णाचा वडील बंधू जो बलराम तुही,हर्षयुक्त होऊन नमस्कार करणाऱ्या मला आलिंगन देईल व त्यावेळी जो मी अंजली करीन त्याचेठिकाणीच मला धारून घरात घेऊन जाईल आणि तेथे अर्घ्यपाद्यदिकेंकरून माझा सत्कार करून,नंतर मला कंसाने आपल्या बंधूचे ठिकाणी केलेले विचारील ||२३|| | इति संचिन्तयन् कृष्णं श्वफल्कतनयोsध्वनि | रथेन प्राप्तः सूर्यश्चास्तगिरिं नृप ||२४|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणला-याप्रमाणे श्वफलकाचा पण पुत्र तो अक्रूर,मार्गांमध्ये कृष्णाचे चिंतन करीत असता,रथाच्या योगानें गोकुळांत जाऊन पोहोंचला,सूर्यनारायणहि असतां चालच पोहोचला ||२४|| अर्थः---त्यावेळी त्या अक्रुराचे,ज्याचे चरणरीन सर्वलोक पालांनी आपल्या किरीतांचे ठिकाणी धारण केले आहेत त्या भगवान श्रीकृष्णाचे,पृथ्वीला अलंकार रूप असून कमल,यव,अंकुश,इत्यादिक चिन्हांनी चिन्हित अशी धुरुळ्यात उमटलेली पावले अवलोकन केली ||२५|| | तद्दर्शनाल्हादविवृद्धसम्भ्रमः प्रेम्णोर्ध्वरोमाश्रुकलाकुलेक्षणः | रथादवस्कन्द्द स तेष्वचेष्टत प्रभोरमुन्यड़्घ्रिरजांस्यहो इति ||२६|| अर्थ:----तेव्हा त्या पावलांच्या दर्शनापासून झालेल्या आनंदाने अगदी व्याकूळ झालेल्या,प्रेमानें अंगावर रोमांच उटलेला आनंदाने प्राप्त झालेल्या डोळे भरून आलेला तो अक्रुरा,अहो ब्रम्हादिकांनाही दूर्ल अशी हि श्रीकृष्णाची चरणराजे आहेत असें म्हणात आणून,रथांवरून खालीं उडी टाकून त्याच रन रजामध्यें लोळू लागला ||२६|| भावार्थ:--- अक्रूर यास भगवंतांचे दर्शन झाल्यानंतर त्याच्या हृदयात आनंद मावेनासा झाला.डोळ्यांत आनंदाश्रू आले.त्याचप्रमाणे आपणही भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या अंत:करणात तळमळ प्रयत्नाने निर्माण करावी.भगवंतांची निष्काम भक्ती करावी. तो रथातून उतरून धुळीत लोळू लागला,कारण भगवंतांच्या चरणचिन्हाने ती पृथ्वी—पृथ्वीतील कण पवित्र झाले होते,तिच्यात सात्विकपणा आला होता.त्या कणांचा स्पर्श व्हावा म्हणून व त्या कणांनी आपण अधिक पवित्र व्हावे म्हणून लोळू लागला. त्याचप्रमाणे आपणही भगवंतांचा सत्संग,प्रसाद,धुळीचे कण आपणास मिळावे म्हणून प्रयत्न करावेत,त्यामुळे आपणही पवित्र हौउत. त्यामुळे त्या धुळीच्या कणांच्या स्पर्शाने अत्यानंदित झाला.आपणही त्यांच्यासारखा प्रयत्न करून अत्यांदित होण्याचा प्रयत्न करावा.त्यातच आपले परम हित होत आहे,अंत:कारण शुद्ध होणार आहे.त्यामुळे भगवंतांचे दर्शन होणार आहे.||२६|| अर्थ:---हे राजा कंसाची आज्ञा झाल्यापासून येतपर्यंत जो हा हरीच्या चिन्हांच्या दर्शनादिकेंकरून झालेला अक्रुराच्या प्राकार वर्णन केला.इतकाच हा पुरुषार्थ,देहधारी प्राण्यांना,गुरूच्या उपदेशानें दांभिक पण,भय व शोक यांचा त्याग करून,हरीच्या मूर्तीच्या दर्शनश्रवणादिकेंकरून व्हावयाचा आहे.याहून दुसरा काहींच प्राप्त व्हावयाचा नाही ||२७|| भावार्थ:--- आपलीही अक्रूरासारखी अवस्था निर्माण व्हावयास पाहिजे,कारण मनुष्या देहात आल्यानंतर तोच लाभ श्रेष्ठ आहे.याकरिता जीवांनी—आपण दंभ म्हणजे थोडे कार्य करून अधिक कार्य केल्याचा चित्तामध्ये अंहकार येणे त्यास दंभ असे म्हणतात.अशा प्रकारचा दंभ आपल्यात येऊ देऊ नये.असा दंभ आला तर त्या साधनेचे फळ मिळत नाही.दान्भामुळे आपले अहित होते,म्हणून दंभाचा त्याग करावा.आपणास भीती आणि शोक म्हणजे दु:ख वाटू नये,कारण धर्मानुसार आचरण केले तर भीती नसते.अधर्मानुसार आचरण केले तर भीती असते,कारण अधर्मामुळे दु:ख मिळत असते.याकरिता धर्मानुसार आचरण करावे.||२७|| अर्थः---असो.नंतर त्या अक्रुरनेअ कृष्णाला व रामाला आवलोकन केले.टी राम कृष्ण-गाईचे दूध काढण्याच्या स्थानीगेलेले होते.पिवळा व कला पितांबर धारण करणारें,शरदऋतूतील कमळासारखे मित्र असलेले,||२८|| अर्थः---अकरा वर्षाच्या वयाचें,शाम व श्वेत वर्ण,लक्ष्मीचे आश्रय स्थान,कुष्ट व वाटोळ्या बाहूंनी युक्त,सुमुख,फारच सुंदर,हत्तीच्या छाव्यासारख्या गती असणारें,||२९|| अर्थः---ध्वज,अंकुश व कमळ यांच्या रेखा चिन्हांनी इतर असलेल्या आपल्या चरणांनि गोकुळाला शोभविणारे उदारचित्त,कृपाविलसित व हास्ययुक्त अवलोकन करणारें ||३०|| अर्थः---वक्ता,श्रोता वगैरे जनांना इच्छित फल देणाऱ्या मनोहर क्रीडा करणारें,रत्नादिकांच्या वनपुष्पांच्या व माळा धारण करणारें,अंगाला सुगंध युक्त चंदनाची उटी लावलेलेल,स्नान केलेले,निर्मळ वस्त्र परिधान केलेले,||३१|| अर्थः----प्रधन पुरुष,सृष्टीच्या पूर्वी असणारें,जगाचें कारण,जगाचे पालन,जगाच्या रक्षणा करिता आपली मूर्तीभेदन रामकृष्ण रूपानें अवतार धारण करणारें,||३२|| | प्रधानपुरुषावाद्दौ जगध्देतू जगत्पती | अवतीर्णो जगत्यर्थै स्वांशेन बलकेशवौ ||३२|| अर्थः---तसेच हें राजा,आपल्या कांतीने दशदिशा प्रकाशित करणारें आणि जसे सुवर्णाने मढविलेले पाचेचा व रुपयाचा व भेद पर्वत दिसतात त्याप्रमाणें दिसत होतें||३३|| | दिशो वितिमिरा राजन् कुर्वानौ प्रभया स्वया | यथा मारकतः शैलो रौप्यश्च कनकाचीतौ ||३३|| अर्थः---त्यावेळीं स्नेहानें विव्हल झालेला तो अक्रूर,तुरेने रथांवरून काळी उतरून रामकृष्णाच्या चरणांच्या समीपभागी दंडासारखा पडला ||३४|| भावार्थ:--- बलराम—कृष्णांना पाहताच प्रेमावेगाने रथातून खाली उडी मारली आणि बलराम—कृष्णांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातले.त्याचप्रमाणे आपणही संत—महात्मा,भगवंत श्रेष्ठ लोक दिसताच संश्तंग दंडवत करावा,कारण त्यात आपले हित असते.त्यांच्याकडून आपणास हितौपदेश श्रवण करण्यास मिळतो,कारण त्यांना अनुभव असतो.अनुभव असल्यामुळे त्यांचे बोलणे हिताचेच असते.त्यांनी अहितांचा त्याग केलेला असतो.हित व अहित कशात आहे,याचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो.||३४|| अर्थः---हे राजा,-भगवंताच्या दर्शनापासून झालेल्या आनंदानें प्राप्त झालेल्या अशुंनी ज्याचें नेत्र भरून आले आहे व ज्याच्या अंगावर रोमांच उभे राही;ले आहे,असा तो अक्रूर,कंठ दाटून आल्यामुळे मी अक्रूर नमस्कार करितो असें हि सांगण्यात समर्थ झाला नाही ||३५|| अर्थः---त्यावेळीं शरणागत वत्सल अशा भगवंतानेच,आम्हांला नेण्याकरीता हा अक्रूर आला आहे असें जाणून संतुष्ट होऊन ,आपणास मारण्याचे सामर्थ्य आहे असें दर्शवितच कीं काय चक्राच्या चिन्हांनी चिन्हित अशा हाताने,त्याला समीपभागी उचलून घेऊन दृढ आलिंगन दिलें ||३६|| भावार्थ:--- भगवंत सर्वज्ञ असल्यामुळे आकृरांच्या मनातील भाव जनाला,त्यामुळे त्या अक्रूरासी हृदयाजवळ आत्मियताने धरले. त्यामुळे अक्रूर यास फारच आनंद झाला.त्याच्या जन्माचे सार्थक झाले.तो सुखरूप झाला—आनंदित झाला.||३६|| | संकर्षनश्च प्रणतमुपगुह्य महामनाः | गृहीत्वा पाणिना पाणी अनयत् सानुजो गृहम् ||३७|| अर्थः---नंतर उदारचित्त अशा बळरामानेही नमस्कार करणाऱ्या त्या अक्रूराला आलिंगन देऊन आपल्या हाताने त्याचे जोडलेले हात धरून कृष्णसहवर्तमान त्याला घरात नेलें||३७|| दि:-२५-८-२९ रविवार अर्थः----नंतर कुशन प्रश्न करून व श्रेष्ठ्ज असण करून,चरणांचे यथा विधी प्रक्षालणकेलें आणि मधुपर्कपूजा अर्पण केली||३८|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी त्याचे चागले स्वागत केले.त्याची क्षम—कुशल विचारले.अक्रूर यास उच्च आसनावर बसविले.त्याचे विधीपूर्वक पाय धुतले व पूजा केली,कारण तो श्रेष्ठ होता—अनुभवी आत्माज्ञानी होता.म्हणून आपणही भगवंतांचे भक्त होण्याचा प्रयत्न करून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा,कारण त्यात आपले परम हित आहे.||३८|| नंतर मोठ्या आदरानें समर्थ अशा बलरामाने त्या अतिथी अक्रुराच्या संतोषार्थ गावोत्सर्ग करून व चरण शुश्रुशावगैरेनी त्याचे श्रम घालवून त्याला मोठ्या प्रतीनें शुद्ध व षड्रसयुक्त अन्नाचें भोजन घातले ||३९|| भावार्थ:--- भगवंतांनी अक्रूर यास एक गाय भेट दिली.त्याचप्रमाणे आपणही संत—महात्मा यांना गाय किंवा धन देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा.दान करण्यात आपले हित असते,पण तो संत—महात्मा सत्पात्र असावा,त्यास दान देणे हिताचे असते.तो दान घेणारा सत्पात्र नसेल तर देणाऱ्याचे हित न होता अहित होत असते.अक्रूर यांच्या पायाची सेवा केली,कारण तो दुरून आलेला असल्यामुळे त्याचा थकवा दूर करण्यासाठी त्याची शारीरिक सेवा केली.आपणही संत—महात्मा यांची धर्मानुसार शारीरिक सेवा करावी,कारण संत—महात्मा हा सत्पात्र असतो.जगाचे कल्याण करण्याकरिता त्यांचे जीवन असते,म्हणून सेवा करावी.||३९|| अर्थः---नंतर भोजन झालेल्या त्याला पुन्हा परम धर्मावेत्त्या त्या बलरामाने,तांबूल,चंदनादिकांच्या उट्या व सुवासिक पुष्पांच्या मालां करून परम संतोष उत्पन्न केला||४०|| | पप्रच्छ सत्कृतं नन्दः कथं स्थ निरनुग्रहे | कंसे जीवति दाशार्ह सौनपाला इवावयः ||४१|| याप्रमाणें सत्कार केलेल्यात्या अक्रूराला नंदराजानें प्रश्न केला कीं,हे-यादवश्रेष्ठा अक्रुरा,अतिक्रूर असा कंस जिवंत असतां जसें खाटकीच रक्षक असलेल्या मेढ्यांना सुख मिळणयचं नावांच नको परंतू वांचणे सुद्धां घडण्याचे कठीण असतें त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या प्रकारें वांचतां आहां?म्हणजे ज्यांना वाचणे घडण्याचे सुद्धां दुर्लभ आहे त्यांना दुसरा कुशळप्रश्नच करितां येत नाहीं ||४१|| अर्थः---केवळ प्राण्याची तृप्ती करणाऱ्या ज्या खळ कंसाने,आक्रोश करणाऱ्या आपल्या बहिणीच्या अगदी लहान मुलांचीही हिसा केली,त्याच्या प्रजा असलेल्या तुमचें काय बरें कुशळ विचारावें?||४२|| | इत्थं सुनृतया वाचा नन्देन सुसभाजीतः | अक्रूर परिपृष्टेन जहावध्वपरिश्रमम् ||४३|| अर्थः---याप्रमाणे प्रथम अक्रुराने कुशळ विचारलेल्या नंदाने,मधुर वाणीने व सत्कार केलेल्या त्या अक्रुराने,मार्गामध्यें झालेल्या सर्व परिश्रमाचा त्याग केला||४३|| भावार्थ:--- आकृरांचा सर्वांनी मन—सम्मान केला.आत्मीयता—प्रेम दिले,त्यामुळे अक्रुराचा शिण—परिश्रम नाहीसे झाले.म्हणून आपण आपल्याकडे हे अतिथी किंवा कोणीही आले तरी,त्यांचा मन—सम्मान करावा आपण आत्मीयतेने त्यांची विचार—पूस करून प्रेम देण्याचा प्रयत्न करावा.त्यात आपले व त्यांचेही हित असते.म्हणून आपण जगाला असे प्रेम देण्याचा प्रयत्न करावा.||४३|| याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील पूर्वार्धात अक्रूरगोकुळगमन वर्णननामक हा अडतिसावा अध्याय समाप्त झाला ||३८|| | || श्रीकृष्णार्पणमस्तु || | _______________________________________________________________________________________________________ ३९-----किरण ३९---१९---श्रीकृष्णां---बलरामांचे मथुरागमन---४—अध्याय पूर्ण आहे _______________________________________________________________________________________________________ (आतां ह्या एकूणचाळिसाव्या अध्यायामाध्यें जाऊं लागला असतां,गोपींच्या झालेल्या भाषणांचे व यमुनेंमध्यें अक्रुराने पाहिलेल्या विष्णुलोकांचे वर्णन केलें आहें ||१|| ) अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,नंतर पर्यंकाचेठिकाणीं सुखानें बसलेल्या व रामकृष्णांनी बहुत आदरसत्कार केलेल्या त्या अक्रुराचे,त्यानें जे मार्गामध्यें केले होते ते सर्व मनोरथ परिपूर्ण केले||१|| भावार्थ:--- भगवंतांची निष्काम भक्ती केली असता,पारमार्थिक सर्व इच्छा पूर्ण होतात.म्हणून निष्काम भक्ती करावी.त्या जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन तो जीव सुखरूप होतो.यासच परमार्थअसे म्हणतात.यासास मोख असेही म्हणतात.||१|| अर्थः---हे राजा,लक्ष्मीपति भगवान्,प्रसन्न झाला असतां दुर्लभ कांहीच नाहीं.तथापि जे भगवद्भक्त आहेत ते कशाचीच इच्छा धरीत नाहींत ||२|| भावार्थ:--- भगवंत प्रसन्न झाल्यावर सर्व इच्छा पूर्ण होत असतात,पण त्यासाठी निष्काम परमार्थ करावा लागतो.भगवंतांचे प्रिय भक्त कोणत्याही वस्तूची अपेक्षा करत नाही,कारण परमात्मा हा सर आहे व परमात्मा सोडून जे आहे ते सर्व असार आहे.असार हे दु:खास कारण आहे.असे भक्तास ज्ञान असते,म्हणून संसारातील—म्हणजेच असरातील ते कांहीच मागत—इच्छित नाहीत.याकरिता आपणही असार—संसारातील कांहीच मागू नये,कारण ते सर्व दु:खास कारण आहे.श्रेष्ठांचे कनिष्ठांनी अनुकरण करावे,कारण श्रेष्ठांना ज्ञान असून त्या ज्ञानाचा अनुभव असततो.असे सर्व कळण्याकरिता संत—महात्मा यांचा अनुभव घ्यावा लागतो.||२|| अर्थः---तेव्हां देवकीपुत्र भगवानें श्रीकृष्णाने,संध्याकाळचे भोजनवगैरे आटोपल्यावर स्वस्थपणें त्या अक्रूराला,कंसाची यादवांचेठिकाणीं वर्तणूक कशी आहे?हें व दुसरेंही कांही विचारावयाचें होतें ते सर्व विचारिलें||३|| | तात सौम्यागतः काच्चीत् स्वागतं भद्रमस्तु वः | अपि स्वज्ञातिबन्धूनामनमीवमनामयम् ||४|| अर्थ:---श्रीभागवान् म्हणाला:---हे तात,हे सौम्या,तुझें येणें निर्विघ्नपणे झालें आहे ना?कारण,तेंच आम्हांस इष्ट आहे.तुमचे कल्याण होवो.आमच्या मित्रांचे ज्ञातींचे व बांधवांचे दुःखरहित आरोग्य आहे ना?||४|| भावार्थ:--- आपण अन्य ठिकाणी गेल्यानंतर—जीवांची भेट झाल्यानंतर एकमेकांच्या स्थूल शरीर,सूक्ष्म—शरीर--मन याबद्दल क्षम-- कुशलता विचारावयास पाहिजे.त्यानंतर आपण आपले जे साध्य आहे,त्याविषयी बोलले पाहिजे,अगोदर बोलू नये.||४|| अर्थः---हे अक्रुरा,या वेळीं असें विचारणेही मला योग्य होत नाहीं;कारण,नावांने मात्र आमचा मामा परंतु वस्तुतः आमच्या कुळाला रोगतुल्य असा कंस,वृध्दिंगत होत असता,आमच्या ज्ञातींचे व त्यांच्या मुलांबाळांचे काय बरें कुशळ विचारावें?||५|| अर्थः---ही मोठी दुःखाची गोष्ट आहे किं,आमच्या निमित्तानें पूज्य अशा मातापित्र देवकी वासुदेवांना फारच दुःख झालें.ज्या आमच्या निमित्त त्यांचे पुत्र मरण पावले व त्यांना कैद प्राप्त झाली!||६|| २६-८-१९ सोमवार भावार्थ:--- भगवंत म्हणतात कि,”माझ्यामुळेच माझ्या आई—वडिलांना दु:ख भोगावे लागत आहे.माझ्यामुळेच त्यांना कंस याने तुरंगात टाकले आहे.माझ्ये कर्तव्य हे आहे कि.मी माझ्या आई—वडिलांना दु:खातून—तुरांगातून सुडवून घ्यावावयास पाहिजे.तसेच आपलेही हे कर्तव्य आहे कि,आपणही आपल्या आई—वडिल कोणत्याही कारणाने का असेना,त्यांचे दु;ख घालावून त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.असे न केले तर आपणास कृतज्ञतेचा दोष लागेल व आपलेही दु:ख आपले मुलबाळ घालवणार नाहीत.म्हणून आपण आपल्या स्वधार्मांचे पालन करावयास पाहिजे.स्वधर्माचे पालन आपल्या हितासाठी करणे जरुरी आहे.||६|| अर्थः---असो.हे प्रिया अक्रुरा,मला,स्वकीय अशा तुमचें दर्शन,तेथील लोकांचा वृत्तांत समजण्याकरितां फार दिवस इच्छित होतें टी आज झालें,ह्याच्या योगानें मला मोठा आनंद झाला-यास्तव बा अक्रुरा,तुझ्या येण्याचें कारण काय असेल तें सविस्तर सांगावें ||७|| भावार्थ:--- आपल्या आत्मीयतेचे कोणी तरी भेटावे असी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे.आज माझी ती इच्छा माझ्या सुदैवाने आपण आल्यामुळे पूर्ण झालेली आहे.ठीक,बरे असो. आपण आपणहून आलात,त्यामागचे कारण काय आहे.कृपा करून सांगा.||७|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें भगवंताने प्रश्न केला आं अक्रुराने,यादवांचेठिकाणी असलेला कंसाचा वैरभाव व वसुदेवाच्या वधाचा प्रयत्न इत्यादिक सर्व वर्णन केलें ||८|| अर्थः----जो धनुर्याग पाहण्याचा त्याचा कपटाचा निरोप व ज्याकारीतां (चाणूरादिकांकडून मारविण्यासाठी भेटींसह आपण्याकरीतां)आपणास दूताचें काम सांगून कंसानें पाठविलें होतें व जें नारदाने वसुदेवापासून वा याचें (कृष्णाचें)जन्म कंसास सांगितलें होतें तें सर्व त्या अक्रुराने कृष्णास वर्णन केलें||९|| भावार्थ:--- आपल्या स्वामीने—मालकांनी जे कर्तव्य आपणास सांगितले आहे-जी सेवा सांगितलेली आहे,ती त्यानुसार पार पाडावयास पाहिजे,कारण तो आपला स्वधर्म आहे.कंस यांनी जो निरोप सांगितला होता,तो निरोप जसा होता तसा श्रीकृष्णास सांगितला.||९|| अर्थः---असें अक्रुराचे भाषण शत्रुरूपीं वीरांना मारणाऱ्या त्या कृष्णानें व रामानें ऐकून,हास्य केलें व आपणास मारण्याचा कंसराजाचा अभिप्राय गुप्त ठेऊन धनुर्याग पाहण्याकरिता राजानें आम्हांस बोलाविलें आहे असें नंदराजास कळविलें ||१०|| | गोपान् समादिशत् सोsपि गृह्यतां सर्वगोरसः | उपायनानि गृन्हीध्वं युज्यन्तां शकटानि च ||११|| अर्थः---तेव्हां त्या नंदगोपानेंही आपल्या गोकुळामध्यें दंवडीवाल्याकडून थाळी पिटवून सर्व गोपांना असें कळविलें कीं,-गोपहों,तूम्हीं सर्वांनी कंसराजास नजराणा देण्याकरीतां दहीं दूध वगैरे सर्वप्रकारचा गोरस व संग्रही असलेल्या उत्तम वस्तु ग्रहण कार,छकड्यांना बैल जुंपा,उद्यां सकाळी आम्ही सर्व मथुरेंत जाउं,कंसराजाला गोरस अर्पण करू,मोठा होणारा धनुर्याग महोत्साह पाहुं.हा उत्साह पाहण्याकरिता सर्व देशांतील लोक चालले आहेत||११-१२|| | गोप्यस्तास्तदुपश्रुत्य बभूवुर्व्यथीता भृशम् | रामकृष्णौ पुरीं नेतमक्रूरं व्रजमागतम् ||१३|| अर्थ:---तेव्हां कृष्ण हेंच ज्याचें जीवन आहे अशा गोपी,रामकृष्णांना मथुरानगरीत नेण्याकरितां गोकुळांत अक्रूर आला आहे,असें वर्तमान ऐकून अत्यंत दुःखित झाल्या||१३|| भावार्थ:--- आपले ज्याच्यावर प्रेम—आत्मीयता—सार—सुखाचे साधन आहे,त्यांना आपल्यापासून दूर—अन्य ठिकाणी नेत असेल व त्यामुळे आपला त्यांच्याशी वियोग होत असेल,तर साधक व्याकूळ—दु:खी होणारच यात किन्हीच संशय नाही.त्यामुळे व्रज—गोपी दु:खी झाल्या.त्यांचे मन कोणत्याच विषयात रमेना.अक्रुराविषयी गोपींच्या मनात प्रतिकूल भावना निर्माण झाली.||१३|| | कश्चीत्तत्कृतहृत्तापश्वासम्लानमुखश्रियः | स्त्रंसद्कूलवलयककॆशग्रन्थ्यश्च काश्चन् ||१४|| अर्थः---त्यांच्या दुःखाची चिन्हें सांगतो-कितीएक गोपींच्या त्र-मुखाची कांति,त्या श्रवणाने केलेल्या हत्तापासून प्रखर झालेल्या श्वासवायुनें म्लान होऊन गेलिया,कितीएक गोपी,दुःखानें कृश झाल्यामुळें त्यांची नसलेली वस्त्रें व हातांतील कांकणे गळून पंडूलागली व बुचड्यांचे बंध सुटून त्यांतून फुलें गळू लागली ||१४|| भावार्थ:--- भगवान मथुरेला जाणार,असे जेव्हा गोपींना समजले,तेव्हा त्या दु:खित झाल्या.त्यांचा स्वास उष्ण चालू लागला,त्यामुळे त्यांचे मुखकमले म्लान झाली होती.दु:खात स्वस उष्ण असतो.अतिशय दु:खी झाल्यामुळे त्यांच्या हातातील काकने गळून पडली.म्हणजेच त्या शक्तिहीन झाल्या.त्यांच्या वेण्या शिथिल झाल्या.त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या.त्यांनी कांहीच कळेना.||१४|| | अन्याश्च तदनुध्याननिवृत्ताशेषवृत्तयः | नाभ्यजानन्निमं लोकमात्मलोकं गता इव ||१५|| अर्थः---त्या भगवंतांच्या निरंतर ध्यानानें,दुसऱ्या कितीएक गोपींच्या,संपूर्ण चित्तवृत्ती निवृत्त होऊन,जसें मुक्त झालेल्या पुरुषांना त्याच्या देहाचेंसुद्धां अनुसंधान राहत नाहींत तसें त्या गोपींना त्यांच्या देहाचेसुद्धां भान राहिलें नाहीं||१५|| अर्थः---दुसऱ्या कितीएक गोपी,सप्रेम हास्यानें प्रेरित केलेल्या मनोहर व चित्रविचित्र पदांनी युक्त अशा कृष्णाच्या वाणीचे स्मरण करून मोह पावल्या ||१६|| भावार्थ:--- कांही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम,स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या,कारण श्रीकृष्णांचे प्रेम जीवांच्या प्रेमापेक्षा विशेष होते,त्या आनंदाला पारावार नव्हता.जसे लहान बालकांना आईचे दुध आणि इतर प्राण्यांचे दुध पिण्यात फारच विलक्षण फरक असतो—उपयोगेत—समाधानात फरक असतो.तसे भगवंत कृष्णंचे प्रेम आणि जीवांच्या प्रेमात विलक्षण फरक असतो—समाधानात फरक असतो.म्हणून जीवांनी भगवंतांचे प्रेम निष्काम भक्ती करून संपादन करण्याचा प्रयत्न करावा.भगवंतांच्या स्पर्श हा मनोरथ पूर्ण करणारा असतो,म्हणून भगवंतांचा स्पर्श होण्यासाठी प्रयत्न करावा.भगवंतांची ती शब्दरचना व तो मधुर आवाज पुन्हा—पुन्हा ऐकावा वाटतो.आतुरता वाढतच जावे असे वाटते.म्हणून आपण त्यांचे शब्द—उपदेश—शात्र पुन्हा—पुन्हा ऐकावे,कारण त्यामुळे परमाहित होऊन जन्म—मरण निवृत्त होते.आपणही तसा प्रयत्न करावा.||१६|| अर्थ:---त्यावेळीं कृष्णाच्या अतिसुंदर गति,रासक्रीडादिक चेष्टा,सप्रेम हास्ययुक्त अवलोकन,शोक घालविणारी थट्टेचीं भाषणें व मोठी उदार गोवर्धनोद्धारणादिक चरित्र,यांचें कीर्तन करणाऱ्या,त्याचा वियोग होईल म्हणून भ्यालेल्या,विरहानें व्यालु झालेल्या,कृष्णाकडे चित्त लागलेल्या व नेत्रांतून दुःखाश्रु ढाळणाऱ्या अशा कितीएक गोपी,थव्याथव्यांनी एकत्र जमून बोलू लागल्या कीं||१७-१८|| भावार्थ:--- भगवंतांचे चालणे,हावभाव,प्रेमपूर्ण पाहणे,स्मितहास्य,यामुळे विशेष आनंद प्रात होत होता.त्यामुळे त्यांचे जीवन कृष्णमय झाले होते,म्हणजेच कृष्णाशिवाय त्यांना इतर कांहीच आवडत नव्हते.आपली अवस्था गोपिसारखी प्रयत्नाने करण्याचा प्रयत्न करावा.त्यात आपलेही परमहित आहे.त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे आश्रू वाहून त्या आनंदमय झाल्या,तसे आपण आनंदमय होण्यासाठी पराकाष्ठा केली असता त्यांच्यासारखी अनुभूती आपणासही आल्याशिवाय राहणार नाही.आपण प्रयत्न-------- ||१७—१८|| अर्थः---गोपी म्हणाल्या;---हे ब्रम्हदेवा,तुला कोणत्याही अंशी दया नाहीं.कशी म्हणशील तर-तुं प्राणिमात्रांना परस्पर मित्रभावाने व स्नेहाचें एकत्र करून,त्यांना सुखभोग प्राप्त होण्याच्या पूर्वीच त्यांचा वियोग करून टाकितोस,यास्तव तुझें खेळणें लहानमुलाच्या खेळण्यासारखें निर्थक आहे.||१९|| भावार्थ:--- गोपी आनंदाच्या भरात म्हणू लागल्या---“हे विधाता हे विश्व घडवतोस,त्यांचे पालन—पोषण करतोस व संहार करतोस हे योग्य आहे.तुझ्या हृदयात दयाभाव नाही,कारण प्रथम प्रेम,मैत्री करतोस,पण हे प्रेम—मैत्री टिकवत नाही.त्यामुळे आम्ही दु:खी होतोत.आमची तृप्ती होण्यागोदारच ताटातूट करतोस.असे तुझे वागणे आम्हास पटत नाही.”गोपिकांना स्वत:च्या ठिकाणी आलेला अंहकार काळात नाही.कोणासही आपला दोष—उणीव दिसत नाही—कळत नाही.म्हणून श्रेष्ठांनी—संत—महात्मा यांनी दोष—उणीव जर दाखवली,तर मान्य करून सुधारण्याचा आपण प्रयत्न करावा.त्यामुळे आपली प्रगती होते व सुखाकडे जाऊ शकतोत.||१९|| २७-८-१९ मंगळवार अर्थः---जो तूं,काळ्या केसांनी वेष्टित,सुंदर गालांनी व उंच नासिकेने युक्त व शोक घालविण्याऱ्या गूढहास्यानें सुंदर असें मुखकमळा आम्हांला दाखवून पुन्हा तेंअदृश्य करितोस म्हणून तुझें कर्म अगदीं निंद्य आहे||२०|| भावार्थ:--- विधाता! अगोदर आम्हास मुकुंदाचे मुखकमल,सोंदर्य,स्मितहास्य दाखवलेस,त्यामुळे आम्हास जीवनात शांती प्राप्त झाली.आता मात्र ते मुखकमलाचे आम्हास दर्शन होणार नाही.आम्हास दर्शन न झाल्यामुळे दु:ख प्राप्त होणार आहे.अगोदर सुख व नंतर दु:ख प्राप्त होणार आहे.अगोदर दु:ख व नंतर सुख हे योग्य आहे,पण अगोदर सुख व नंतर दु:ख असे कोणासही सहन होणार नाही.अगोदर सुख व नंतर दु:ख देणाऱ्यास दुष्ट म्हणावे किंवा म्हणू नये?याचा अर्थ दुष्टच म्हणावे.हे योग्य आहे का?||२०|| अर्थः---तूं ज्या अर्थी आपणच दिलेलें आमचें चक्षुं काहीं विचार न करितां मुर्खासारखा हरण करितोस त्या अर्थी तूं मोठा क्रूर आहेस.आतां तुमचें चक्षु अक्रूर हरण करितो,मी नाहीं,असें म्हणशील त्र-जो क्रूर नसेल तो अक्रूर,तो असे करण्यास कधींही समर्थ होणार नाहीं,म्हणून या अक्रूरनांवांनें खरोखर तुच येथे आला आहेस आता म कृष्णाला नेतो तुमच्या चाक्शुला नेत नाही असे म्हणशील तर ज्या तृ दिलेल्या चक्षूने कृशानाच्या नेत्र्मुखादिक एखाद्या अवयवावर सुद्धां,तुझें सर्व सृष्टीचें चातुर्य आम्हीं पाहत होतों,तो कृष्णाचा वियोग झाल्यावर दुसरें कांहींच पाहण्यासारखें नसल्यामुळें,यांनी आपलें अरव चातुर्यरहस्य जाणिलें अशा रागानें तूं कृष्णाचा वियोग करून आम्हांला आंधळ्या करीत आहेस||२१|| अर्थः----आतां ब्रम्हदेवाला सोडून आपणामध्येंच म्हणतात कीं,अरेरे ! श्रीकृष्णही एका क्षणामध्यें स्नेह तोडून टाकणारा व नव्या नव्या स्त्रिया प्रिय असणारा आहे.पहा-आम्हीं घरें,स्वजन,पुत्र व पति या सर्वांचा त्याग करून,साक्षात् त्याच्याच दास्यत्वाप्रत पावलों व त्यानें केलेल्याच मंदहास्यादिकेंकरून परवश झालों.असें असताही आतां हा कृष्ण आम्हांकडे पहात सुद्धां नाहीं||२२|| भावार्थ:--- गोपी ह्या घर—दार,सगे-सोयरे,पती—पुत्र,इत्यादींना सोडून भगवंतांच्या—बालाकृष्णांच्या दासी झाल्या आहेत.असे असतांना श्रीकृष्ण त्यांना सोडून मथुरेला जात आहे.कृष्णांचा आणि गोपिकांचा वियोग होत आसल्यामुळे गोपिकांना दु:ख होत आहे.हा माथुरला जात आहे,कारण त्यास नवनवीन भक्त पाहिजे आहेत,आमचा त्यांना कंटाळा येत आहे.आपण असा आरोप भगवंतांवर घेऊ नये,कारण भगवंत यांना अनेक काम करावयाचे आहेत.त्यांना सर्व जीवांचे कल्याण करावयाचे आहेत.||२२|| अर्थः---ईष्येनें म्हणतात कीं-मथुरानगरींतील स्त्रियांना ही येणारी रात्र मोठी सुप्रभात (सुखसूचक शकुन होणाऱ्या प्रात:काळानें युक्त)होणार आहे.तसेच त्यांचे मनोर्ठ्ठी खरोखर सत्य होणार आहेत.कारण,ज्या पुरवासी स्त्रिया,नगरींमध्यें प्रवेश करणाऱ्या श्रीकृष्णाचे कटाक्ष अवलोकनावृध्दिंगत झालेल्या हास्यरसानें युक्त असें मुख,आदरानें अवलोकन करतील ||२३|| भावार्थ:--- गोपींना वाटके कि सदैव भगवंत आमच्याजवळच असावेत.आम्हास जसा भगवंतांकडून आनंद मिळाला,तसा उद्या मथुरेतील स्त्रियांना मिळेल व आम्हास दु:ख मिळेल.गोपींना असे कळले नाही कि,भगवंत सर्व ठिकाणी आहे व भगवंत आपल्या अंत:करणात आहे.त्यामुळे आपण भगवंतांचे स्मरण केले तरी आपणास आनंद मिळेल असे त्यांना लक्षात आले नाही.आपलेही हित व्हावे व इतरांचेही हित व्हावे असी व्यापक भूमिका आपणात असावयास पाहिजे.केवळ आपलेच पाहणे हे योग्य नाही.||२३|| अर्थः---आतां दोनतीन दिवस तसें होऊन,परंतु पुढें आमच्या स्नेहानें आकर्षण केलेला व नंदादिकांनी मागें फिरविलेला तो कृष्ण गोकुळांत परत येईल,असें म्हणाल तर-हे स्त्रीयाहो,श्रीकृष्ण हा स्वतां जरी धैर्यवान् आहे व नंदादिकांच्या आज्ञेंमध्येंही आहे तथापि त्या पूरस्त्रियांच्या मधासारख गोड मुंजळ भाषणांनी आकृष्टचित्त होऊन व त्यांच्या ल्ज्जायुक्त हस्यांनी व सुंदर विलासांनी,त्यांच्याचठिकाणी आसक्त झाला म्हणजे मग गावांढळ (चातुर्यरहित)अशा आम्हांकडे पुन्हा कशाला येईल?येणारच नाहीं||२४|| भावार्थ:--- भगवंत यांना श्रेष्ठांची अज्ञा आली असेल,त्यामुळे जात असतील.ते जर मथुरेतील स्त्रियांना,त्यांच्या भक्तीला पाहून, तेथेच रमले तर आमचा विचार करणार नाहीत.त्या वियोगामुळे आम्हास झालेले दु:ख असह्य होईल.आपणास भगवंतांच्या वियोगाचे दु:ख व्हावावयास पाहिजे.आपणांना स्मरणाचा वियोग झाला तर तसे ध:ख झाले तर,आपणांस स्मरण होणार नाही.||२४|| अर्थः---आणि आता आमच्या उत्साहाचें सेवन करणारें दुसरेच होतील.कारण,आज त्या मथुरेंमध्यें,लक्ष्मीचा पति व सौदर्यादिक गुणांचा आश्रयभूत अशा देवकीपुत्राला जे पाहतील त्या-दाशार्ह,भोज,अंधक,वृष्णि व सात्वत इत्यादिक यादवांच्या आणि मार्गामध्यें गमन करणाऱ्या त्या श्रीकृष्णाला पाहणाऱ्या इतरही लोकांच्या दृष्टींना आज अवश्य मोठाच आनंद प्राप्त होईल||२५|| अर्थः----आतां चडफडत अक्रूराला म्हणतात कीं,-असें दुष्टकर्म करणाऱ्या निर्दय पुरुषाला अक्रूर असें हें चांगला नांवच योग्य नाहीं कारण,हा अतिशयच क्रूर आहे.कसा म्हणाल तर-जो अक्रू,अत्यंत दुःखित झालेल्या आम्हां लोकांचे सांत्वन न करितां,प्राणापेक्षाही अतिप्रिय अशा श्रीकृष्णाला,आमच्या दृष्टिमार्गास अगोचरस्थळीं घेऊन जाणार आहे ||२६|| भावार्थ:--- आम्हा दु:खित असतांना,आम्हास कांही तरी धीर ध्यावा.हा धीरही देत नाही.आमचे दु:ख हलके करत नाही.याचा अर्थ असा होतो कि,दु:खितांचे दु:ख आपण आपल्या परीने—अधिकारानुसार कमी किंवा नाहीसे करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. दु:खितांचे दु:ख करणे हा आपला धर्म असावयास पाहिजे.अक्रूर क्रूर वागती,त्यामुळे त्याचे नाव बदलून अक्रूर न म्हणता क्रूर म्हणावयास पाहिजे.नावानुसार आचरण करावयास पाहिजे.अक्रूर नावाप्रमाणे आचरण करतो,पण तो कर्तव्यानुसार वागतो.||२६|| अर्थः---अरे!कठोरचित्त असा हा श्रीकृष्ण जाण्याकरीतां रथावर बसला आहे आणि त्याच्या अगून हे मदोन्मत्त गोपही छकड्यांवर बसून जाण्याची त्वरा करीत आहेत.बरें,त्यांचा अन्याय पाहून उपनंदादिक वृद्ध गोपही त्याचे निवारण करीत नाहींत,त्यापेक्षां आमचें दैवत प्रतिकूळ होऊन हिं अशी कृत्यें करीत आहे.जर आमचें दैव अनुकूळ असतें तर यांच्यांमध्यें एखाद्यालातरी कांही विघ्न झालें असतें,किंवा अकस्मात् व्रजपात झाला असतां,अथवा दुसरेंच कांहीतरी अनिष्ट झाले असतें,ते कांहीच होत नाहीं.तेव्हा प्रतिकूळ दैव असलेल्या आमच्या वांचण्यालाच धिक्कार असो.||२७|| भावार्थ:--- हे पहा!थोडीही दयामाया नसलेले श्रीकृष्ण रथात बसले.जातांना थोडेही बोलत नाहीत.आमचे दु:ख हलके करत नाहीत. त्यांच्यासोबत गोपगणउद्धा बसले आहेत.आपल्या व्रजमधील वृद्ध मंडळीही आपल्या दु:खाकडे दुर्लक्ष करत आहेत.एकंदरीत सर्व परिस्थिती प्रतिकूल होत आहे--आपले प्रारब्ध प्रतिकूल झाले आहे.प्रारब्ध हे भोगावे लागतेच,तरी प्रयत्न करावयास पाहिजे.||२७|| अर्थः---आतां साहसकृत्याचा निश्चय करितात-आम्ही सर्व एकत्र जमून कृष्णा जवळ जाऊन मथुरेस जाण्याविषयी त्याचा निषेध करूंया.असें केल्यानें वृद्धपुरुषांचा कोप होईल असें म्हणाल तर-अधर्मनिमेषसुद्धां टाकण्यास कठीण अशा कृष्णाच्या संगतीपासून दैवानें वियोग झाल्यामुळें दीनचित्त झालेल्या आमचें,कुळांतील वृद्ध पुरुष व बांधव काय बरें करणार आहेत?अशाप्रकारच्या आम्हांला यावेळीं मृत्यूचेसुद्धां भय नाहीं||२८|| भावार्थ:--- वियोगाच्या दु:खाणे व्यथित झालेल्या गोपी ह्या श्रीकृष्णानास अडवण्याचा प्रयत्न करत आहेत.रस्त्यात आडव्या पडण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्यास आपल्या घरातील नातलग काय करतील,म्हणजे प्रतिकूल होतील,याचीही त्या परवा करत नाही.त्याचरीतीने आपणासही परमार्थ करत असतांना असे प्रतिकूल प्रसंग येतात.त्यावेळेस आपण नातेवाईकांची पर्व न करता म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करावयास पाहिजे.प्रतिबंध आला तरी त्यास न मानता आपण आपला परमार्थ करावयास पाहिजे.आपणास आतापर्यंत श्रीकृष्णाशिवाय एक क्षणही वियोग सहन होत नव्हता.आता तर ते कायमचे जात आहेत,त्यामुळे आपल्या दु:खास तिळमात्रही सीमा राहणार नाही.त्यामुळे आपल्या शरीरात प्राण राहणार नाही.शरीरात प्राण न राहिल्यामुळे श्रीकृष्णास आपण पाहू शकणार नाहीत.श्रीकृष्णांच्या वियोगाचे आपणासही असे दु:ख व्हावयास पाहिजे.||२८|| अर्थः---या दुसर्या कारणानेहीं आम्हीं साहसकर्मच केलें पाहिजें असें सांगतात-हे गोपीहो,ज्या कृष्णाच्या स्नेहानें घडलेल्या सुंदर हास्य,मनोहर भाषण,लीलापुर्वक कटाक्षावलोकन व आलिंगन यांनी युक्त असलेल्या रासक्रीडारूप सभेमाध्यें,आम्ही पुष्कळ रात्री एकाक्षणासारख्या घालविल्या आहेत,त्या ह्या कृष्णांवाचून आतां दुःसह असें विरहदुःख कसें बरें सहन करावें?ते सहन करणें फारच कठिण आहे ||२९|| भावार्थ:--- त्या गोपींना ती रासाक्रीडाची रात्रीचे स्मरण होत आहे.तो आनंद व आता त्या वियोगाचे दु:ख असी तुलना करून दु:खित होत आहेत.आपणास ती आनंदाचे रात्र एक क्षणाची वाटली,तर आता या वियोगाचे सहन करणे शक्य नाही—असह्य होईल.||२९|| अर्थः---आता असो तें दुःख सहन करणें,परंतु आमचें वाचणेंच घडणें कठिण आहें,असें सांगतात जो श्रीकृष्ण,दररोज सायंकाळी बलरामासहवर्तमान गोपांनी वेष्टित व गाईंच्या खुररजाने ज्याच्या गळ्यातील माळा व कुरळ केंस मळीन झाले आहेत असा होऊन गोकुळामध्यें प्रवेश करितो व मुरलीं वाजवीत मंदहास्यपूर्वक आमचें चित्त हरण करितो,त्या कृष्णांवांचून,आतां आम्हीं वांचावे तरी केंस?||३०|| भावार्थ:--- गोपिंका श्रीकृष्णांच्या मागील गोपालाणांचे स्मरण करत आहेत.सकाळी श्रीकृष्णांचे वनात जात असतांना व सांयकाळी श्रीकृष्णांचे परत येत असतांना होणारे दर्शन असे दृश्य त्यांना दिसत आहे.यानंतर म्हणजे मथुरेला गेल्यानंतरचा वियोग यातील अंतर व अंतरापासून झालेले दु:खाचे स्मरण करत आहेत.आपली अवस्था गोपिंसारखी व्हावावयास पाहिजे.||३०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें बोलणाऱ्या,कृष्णाचेठिकाणी अत्यंत आसक्तचित्त झालेल्या व पुढें होणाऱ्या श्रीकृष्णाच्या विरहानें घाबरलेल्या त्या सर्व गोपी,लज्जा सोडून मोठ्यानें स्वर काढून हे गोविंदा,दामोदरा,हे माधवा,याप्रमाणें संबोधनें देत रुदन करुं लागल्या||३१|| भावार्थ:--- त्या गोपींना असह्य दु:ख होत आहे.असे असले तरी त्या श्रीकृष्णांचा धावा करत आहेत.गोविंद,माधवा,दामोदर असे म्हणत रडत आहेत—आक्रोश करत आहेत.आपलीही अवस्था गोपिंसारखी श्रीकृष्णाविषयी व्हावावयास पाहिजे.||३१|| | स्त्रीणामेवं रुदन्तीनामुदिते सवितर्यथ | अक्रूरश्चोदयामास कृतमैत्रादिको रथम् ||३२|| अर्थः---याप्रमाणें स्त्रिया रुदन करीत असता,सूर्योदय झाल्यावर स्नानसंध्यादिक नित्यकर्म आटोपलेल्या त्या अक्रुराने,रामकृष्ण अंत बसलेला तो र्थ,मथुरेकडे चालविला ||३२|| भावार्थ:--- अशा प्रकारे रडन्यातच—दु:खातच सारी रात्र गेली.सूर्योदय झाला.नित्यकर्म आटोपून अक्रूर रथावर स्वर होऊन मथुरेकडे रथ हाकू लागला.गोपींचा निश्चय झाला श्रीकृष्ण आम्हास सोडून कायमचेच मथुरेला गेलेले आहेत.आता आपली व श्रीकृष्णांची भेट होणार नाही.त्या बेचैन झाल्या.त्यांचे कोणत्याही विषयांत लक्ष लागेना.काय करावे असे कांहीच कळेना--दु:ख भोगू लागल्या.||३२|| अर्थः---तदानंतर कंसराजाला द्यावयाच्या पुष्कळ भेटी व गोरसानें तोंडोतोंड भरलेले कुंभ घेऊन,नंदादिक गोप,आपापल्या गाड्यावर बसून त्य रथाच्या मागून निघाले ||३३|| अर्थः---त्यावेळीं सर्व गोपीही त्य प्रिय श्रीकृष्णाच्या मागून चालल्या असतां,त्यानें रथांतून मागें फिरून पहिल्यामुळें त्या किंचीत् आनंद पावल्या आणि आपणास परत जाण्याविषयी भगवंतांची आज्ञा होण्याची वात पहात तेथेंच उभ्या राहिल्या ||३४|| दि:---२८-८-१९ बुधवार भावार्थ:--- श्रीकृष्णांनी मथुरेला जात असतांना गोपींकडे पाहिले.तेव्हा त्यांना बरे वाटले—आनंदित झाल्या.भगवंत कांही बोलतील असे गोपींना वाटले,म्हणून निरोपाच्या अपेक्षेने उभ्या राहिल्या.श्रीकृष्ण त्यांना कांहीच बोलले नाही,म्हणून त्यांचा अपेक्षाभंग झाला.भगवंत हेतुपुरस्पर कांहीच बोलले नाही.त्यांच्या चेहऱ्यावरील श्रीकृष्णास दु:ख दिसले.गोपी अपेक्षेने तेथे उभ्या राहील्या.||३४|| अर्थ:---तेव्हां यादवश्रेष्ठ श्रीकृष्णाने,आपल्या मथुरेत जाण्याच्या निमित्तानें अतिशय ताप पावलेल्या त्या गोपींना पाहून मी लवकरच येईन,अशा दूतांजवळ सांगून पाठविलेल्या प्रेमयुक्त भाषणांनी त्यांचे सांत्वन केलें||३५|| भावार्थ:--- श्रीकृष्णांनी गोपींचे दु:ख पाहून दुतामार्फात “मी येईन’ असा निरोप दिला.त्यामुळे गोपींचे कांही आणसी दु:ख कमी झाले. आपणही आपल्या वियोगामुळे कोणी दु:खी होत असेल,तर आपणही प्रेमाने बोलावे किंवा निरोप पाठवावा.आपल्या बोलण्याने—प्रेमाने दु:ख कमी किंवा नाहीसे होत असेल तर,इतरांचे दु:ख घावण्याचा प्रयत्न करावा.त्यात त्यांचेही हित होते व आपले हित होते.||३५|| अर्थः---तेव्हां त्यांनी आपलीं मनें कृष्णाबरोबर पाठविली आहेत अशा त्या गोपी,कृष्णाच्या रथाचा ध्वज जोपर्यंत दिसत होता व नंतर आकाशांत उडालेला त्या रथाचा धुरळा जोपर्यंत दिसत होता,तोपर्यंत चित्ररूपी स्त्रिया जशा निश्चळ राहतात त्याप्रमाणे निश्चळ राहून ||३६|| भावार्थ:--- जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती,तोपर्यंत त्या पाहताच होत्या.त्या गोपींना वाटत होते कि,भगवंत आमच्या प्रेमाच्या—भक्तीच्या पोटी परत येतील व मथुरेला जाणार नाहीत.अशा दु:खाला कारण असते.||३६|| | ता निराशा निववृतुर्गोविन्दविनिवर्तने | विशाको अहनी निन्युर्गायन्त्य: प्रियचेष्टीतम् ||३७|| अर्थः---नंतर दूर गेलेला श्रीकृष्ण माघारा फिरण्याविषयीं निराश झालेल्या त्या गोपी,तेथून माघाऱ्या फिरल्या आणि प्रिय कृष्णाचें चेष्टित गायन करून शोकरहित असतां एकेक रात्र व एकेक दिवस घालवूं लागल्या||३७|| भावार्थ:--- श्रीकृष्ण परत येत नाहीत असे लक्षात आल्यावर,तेव्हा त्या घरी परतल्या.श्रीकृष्णांच्या लीलांचे त्या गोपी गायन करू लागल्या.आपण जसे वाहन नसेल तर पायाने पायी—पायी चालू लागतोत,तश्या त्या गोपी श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष दर्शन होत नसल्यामुळे त्यांच्याच लीलांचे स्मरण—गायन करू लागल्या.त्याचप्रमाणे आपणसुद्धा भगवंतांचे जरी प्रत्यक्ष दर्शन होत नसले तरी भगवंतांच्या लीलांचे श्रावण—गायन करावयास पाहिजे.त्यात आपले हित आहे.त्यामिले पुण्या किंवा अंत:कारण शुद्ध होऊन आनंद प्राप्त होतो. असे केले म्हणजे आपल्यास संसारातील दु:खाचा विसर पडतो व भगवंतांविषयी प्रेम—जिव्हाळा निर्माण होतो.||३७|| अर्थः---हे राजा,इकडे बळराम व अक्रूर यांसहित श्रीकृष्णही,वायूसारखा वेग असलेल्या रथानें पापांचा नाश करणाऱ्या यमुनेच्या कांठी प्राप्त झाला||३८|| अर्थ:--- तेथें वृक्षांच्या झाडींमध्यें र्थ उभा करून त्यावरून बळरामासह श्रीकृष्ण खालीं उतरला आणि त्या यमुनेच्या निर्मळ व इंद्रनीळ मण्यांसारख्या श्यामवर्ण उदकाने हस्तपादमुखाचे प्रक्षालन करून व तें उदक प्राशन करून पुन्हां वृक्षांच्या झांडीत येऊन तो बलरामासह श्रीकृष्ण रथावर बसला ||३९|| अर्थः---तेव्हां शत्रुंपासून शंका उत्पन्न झालेल्या त्या अक्रुराने,रामकृष्णांना रथांवर बसून मग त्यांना विचारून तो माध्यान्हिक कृत्य करण्याकरितां यमुनेच्या डोहामध्यें प्रविष्ट झाला आणि तेथें त्याने यथाविधी स्नान करण्यास आरंभ केला||४०|| | निमज्ज्य तस्मिन् सलिले जपन् ब्रम्ह सनातनम् | तावेव ददृशेsक्रूरो रामकृष्णो समन्वितौ ||४१|| अर्थः---आनित्य उद्कांमध्ये बुडी मारून सनातन ब्रम्हरूप प्राणवादिक मंत्रांचा जप करूं लागला त्यावेळीं त्या अक्रुराने तेथें एकत्र आलेल्या त्या रामकृष्णांसंच अवलोकन केली||४१|| अर्थः---तेव्हां तो अक्रूर,ते रथावर बसलेले वसुदेवांचे पुत्र येथें कसें आले?जर रथावरून उतरून येथें आले असतील त्र रथावर नसतील असा तर्क करून त्याने वर मस्तक करून रथाकडे पाहिलें ||४२|| अर्थः---तों तेथें तें पूर्वीप्रमाणेबसलेले आहेत असें त्याच्या दृष्टीस पडलें.तेव्हां पाण्यांमध्यें जें त्यांचे मला दर्शन तें खोटा किंवा खरें,याची खात्री करून घेण्याकरिता त्या अक्रुराने पुन्हा अपन्यामध्ये बुडी मारली ||४३|| अर्थः---तो तेथेही पुन्हा त्याने,नम्र मस्तक सिद्ध चारणगंधर्वांनी व असुरांनी स्तुति केलेला,हजर मस्तकांनी युक्त,हजार फड्यांवर किरीट धारण करणारा,दैदीप्यमान,काळें वस्त्र धारण करणारा,कमळाच्या कांदासारख्या श्वेतवर्ण व जसा रुपयाचा कैलासपर्वत सुवर्णमय शिखरांनी शोभतो त्याचप्रमाणे फड्यांवरील किरीटांनी शोभणारा अशा शेषाला अवलोकन केलें||४४-४५|| अर्थः---त्याच्या कुंडलाकार केलेल्या अर्ध्या देहावर निजलेला मेघासारखा श्यामवर्ण पिंपळा भ्र्जीच्या पितांबर नेसलेला,चार बाहूंनी युक्त,शांत,कमळपात्रां- सारख्या आरक्त नेत्रांनी युक्त,||४६|| अर्थः---सुंदर व प्रसन्न मुख असलेला,सुंदर हास्यसहित अवलोकन करणारा,सुरेख भ्रुकुटी,उंच नासिका,सुंदर कर्ण,मनोहर गाल व आरक्त अधारोअसलेला ||४७|| अर्थः---गुडघ्यांपर्यंत लांब व पुष्ट अशा भुजा उंच खांदे व वक्षस्थळावर लक्ष्मी असलेला,शंखासारखा तीन रेखांनी युक्त कंठ,खोल नाभि व वळकुट्यांनी युक्त असें अश्र्वत्थाच्या पर्णासारखे पोट असलेला ||४८|| अर्थः---विस्तीर्ण असलेल्या कमरेच्या मागच्या बह्गानें व हत्तीच्या सोडेंसारख्या सुंदर अशा दोन मांड्यांनीयुक्त,सुंदर गुडघ्यांनी व सुरेख पायांच्या पोटऱ्यांनी युक्त ||४९|| अर्थः---थोडेस उंच जें घोटें व अरुणवर्ण जो नखांचा समुदाय त्यांच्या कांतीनी युक्त,नव्या ज्या अंगुळी व आंगठे त्याच जणुं पाकळ्या त्यांच्या योगानें शोभत असलेल्या चरणकमळांनी युक्त ||५०|| २९-८-२०१९ गुरुवार अर्थः---बहुत मोलाच्या रत्नसमुदायांनी जडित असलेल्या किरीट,कडी तोडे,बाहुभूषणे,कमरपट्टा,यज्ञोपवीत हार,नुपुरे आणि कुंडलें यांच्या योगानें प्रकाशमान,उजव्या हातांत कमळ धारण करणारा व बाकीच्या तीन हातांनी शंख,चक्र व गदा हीं धारण करणारा,वक्षस्थळाचेठिकाणी श्रीवत्सलांछन व कंठामध्यें कौस्तुभ आणि वनमाळा असलेला ||५१-५२|| अर्थः---तसाच निर्मळचित्त अशा सुनंदनंदादिक पार्षदांनी आपला स्वामी अशा बुद्धीनें,सनकादिक ऋषींनी,ब्रम्हरुद्रादिक देवेश्वरांनी महेश्वरबुद्धीने, मरीच्यादिक नऊ ब्राम्हश्रेष्ठांनी प्रजापतिबुद्धीने,आणि प्रऱ्हाद,नारद,वसू इत्यादिक उत्तम भगवदभक्तांनी भगवान् अशा बुद्धीने,मिळून सर्वभक्तांनं निर-निराळ्या अभिप्रायानें स्तुति केलेला ||५३-५४|| अर्थः---व लक्ष्मी,पुष्टि,सरस्वती,कांति,कीर्ति,तुष्टि,इला,उर्जा,विद्या,अविद्या,शक्ति आणि माया ह्या बारा शक्तींनी सेवन केलेला ||५५|| | विलोक्य पुष्ट्या गिरा कान्त्या कीर्त्या तुष्ट्येलयोर्जया | विद्दयाविद्दया शक्त्या मायया च निषेवितम् ||५६|| अर्थः---अशा देवाला अवलोकन करून संतुष्ट झालेला,उत्तम भक्तीनें युक्त,आंगावर रोमांच उठलेला व प्रीतीच्या अतिशयानें सद्गतिचित्त होऊन आनंदाश्रूंनी डोळे भरून आलेला तो अक्रूर,हळूहळू धैर्याचा आश्रय करून,मस्तकाने भगवंताला नमस्कार करून व लहान जोडून एकाग्रचित्त असतां,सद्गदित वाणीनें त्या भगवंतांची स्तुति करूं लागला ||५६-५७|| भावार्थ:--- अक्रूर यास भगवंतांचे विविध रूपाने पाण्यात स्नान करत असतांना दिव्य—विश्वारूपाचे दर्शन झाले,कारण भगवंतांनी त्याच्यावर कृपा केली.अक्रूराची साधना ही परिपक्व झाल आली,म्हणून दर्शन झाले.अक्रूर यास अत्यानंद झाला,त्यामुळे डोळ्यांतून आश्रू वाहू लागले.आपलीही साधना परिपक्व झाल्यानंतर आपणासही भगवंतांचे दर्शन होऊ शकते,म्हणून साधना करावी. भावार्थ:---आपणही भगवंतांचा साक्षात्कार झाल्यानंतर भगवंतांची स्तुती करावयास पाहिजे.साक्षात्कार न झाला तरी पण स्तुती करावी.त्या स्तुतीने भगवंत प्रसन्न होतात. भगवंतांची भक्ती करावी.त्यामुळे त्यामुळे आत्मानंदाची प्राप्ती येते.||५६-५७|| | (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील दशमस्कंधामध्यें भगवत्प्रयाणनिरुपणनामक हा एकूणचाळीसावा अध्याय समाप्त झाला ||३९||) | | || श्रीकृष्णार्पणमस्तु || _________________________________________________________________________________________________________ |४० किरण अक्रुराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या चाळिसाव्या अध्यायामध्यें अक्रुराने,श्रीकृष्ण हा ब्रम्हादिकांचाहि ईश्वर आहे असें जाणून भक्तीनें नमस्कार करून त्यांचे सगुणनिर्गुणभेदांनी स्तवन केलें,अशी कथा वर्णन केली आहे)||१|| अर्थः---अक्रूर म्हणला:---हे कृष्णा,सर्व कारणांचे कारण,आद्य,पुरुष व अविनाशी,अशा तुज नारायणाला मी नमस्कार करितों.ज्या तुझ्या नाभीपासून प्रकट झालेल्या कमळकोशांतून ब्रम्हदेव उत्पन्न झाला आहे व पुढें त्या ब्रम्हदेवापासून हा सृष्टिरूप सर्व लोक प्रकट झाला आहे ||१|| अर्थः---पृथिवी,जळ,अग्नि,वायू,आकाश,अहंकार,महत्तत्व,माया,पुरुष,मन,इंद्रिये,विषय व देव हे जे प्रकार जगाला कारण आहेत ते सर्वही तुझ्याच श्रीमूर्तीपासून उत्पन्न झाले आहेत||२|| अर्थः---हे मायादिक सर्वही पदार्थ,सर्वांचा आत्मा अशा तुझ्या स्वरूपाला जंत नाहींत.कारण,हे प्रत्यक्षातदिक कारणांनी जडत्वेंकरून ग्रहण केलेले आहेत.आतां हे पदार्थ,जड असल्यामुळे मला न जाणोत,परंतु ह्या सर्वांना व आपणालाही जाणणारा जो जीव तो तरी,मला जाणत असेल,असे म्हणशील तर-तो उत्तम कोटींतला जीव-(ब्रम्हदेव)हि,मायेच्या गुणांनी बद्ध झाला असल्यामुळें त्या गुणाहून पर अशा तुझ्या स्वरूपाला जंत नाहीं,मग दुसरा जीव कोठून जाणेल?||३|| अर्थः---आतां जर कोणी जंत नाहींत त्र जीवांच्या संसाराची निवृत्ति कशी होईल?असें म्हणशील तर,साक्षात् अगोचर अशाही तुझें कोणत्यातरी मार्गानें भजन करणारांस तूं प्राप्त होतोस असें सांगतों-योगसाधन करणारे कितीएक योगी,साक्षात् महापुरुष आणि अंतर्यामी ईश्वररूप अशा तुझें आराधन करितात.दुसरे कितीएक आत्मनिष्ठ पुरुष,शरीराच्या नेत्रह्र्दयादिक अवयवांचा,सर्व प्राणिमात्रांचा व सर्व प्राणिमात्रांचा व सर्व देवतांचा साक्षी अशा तुझें आराधन करितात ||४|| अर्थः---कितीएक यज्ञयागादिक कर्म करणारे ब्राम्हण,ऋग्वेद,यजुर्वेद व सामवेद यांत सविस्तर सांगितलेल्या या यज्ञानुष्ठान प्रकारांनी इंद्रवरुणादिक अनेक देवतांच्या नांवांनी तुझेंच यजन करितात||५|| अर्थः---कितीएक ज्ञानी लोक,सर्वकर्मांचा त्याग करून व शांततेचा आश्रय करून ज्ञानमूर्ति अशा तुझेंच समाधीच्या योगानें आराधन करितात ||६|| अर्थः---दुसरे जे कितीएक,पंचरात्रांत सांगितलेल्या विधीनें वैष्णवदीक्षेचा संस्कार पावले आहेत,ते-तुझ्या स्वरूपत्वेंकरून स्वात्म्यांचे चिंतन करीत असते,वासुदेव संकर्षण,प्रदुम्न व अनिरुद्ध या भेदांनी बहुमूर्तिरुपी व नारायणरूपानें एकमूर्ती अशा तुझें उपासन करितात||७|| ३०-८-२०१९शुक्रवार अर्थः---हे भगवनच,दुसरे कितीएक उपासक,शिवानें सांगितलेल्या पाशुपतादिक मार्गानें व बहुत आचार्यांनी सांगितलेल्या पाशुपतादिक मार्गाने व बहुत आचार्यांनी सांगितलेल्या त्यांतील नानाप्रकारच्या भेदांनी,शिवरूपी तुझेंच उपासन करितात||८|| अर्थः---हे प्रभो,जे कोणी दुसऱ्या क्षुद्रदेवतांचे भक्त आहेत ते सुद्धां,जरी त्या त्या देवतांच्याठिकाणीं परमेश्वरबुद्धि धारण करणारे असले तथापि ते सर्वही सर्वदेवांचे अंतर्यामी अशा तुज परमेश्वराचेंच आराधन करितात||९|| अर्थः---हे समर्था,जशा पर्वतांपासून उत्पन्न झालेल्या नद्या,पर्जन्योदकानें भरून जाउं लागल्या म्हणजे त्या चारही दिशांकडून समुद्रामध्येंच प्रवेश करितात त्याप्रमाणे ननप्रकर्चेअ भजन मार्गाहि त्या त्या देवतेच्या द्वारानें शेवटीं तुझीच प्राप्ती करून देणारे होतात||१०|| अर्थः---कारण-सत्व,रज आणि तम हे तुझ्या शक्तिरूप प्रकृतीचे गुन असल्यामुळे त्यांचेठीकाणीच प्रकृतीकार्योपाधिक –ब्रम्हादिक स्थावरपर्यंत सर्व जीव व आपल्या उपाधिद्वारा ओतप्रेत आहेत,ते गुण प्रकृतीमध्यें आहेत व ती प्रकृती तुझ्यामध्ये प्रविष्ट होत असल्यामुळे सर्वही तुझ्यामध्येंच अप्रविष्ट होतात ||११|| अर्थः---आतां मलासुद्धां संबंध आहे जर तुझें म्हणणें आहे असें प्रकृतिकार्यरूप जीवांचा व माझा विशेष काय तर?असें म्हणशील तर-हे प्रभो,तूं,गुणांनी अलिप्तबुद्धि,सर्वांचा आत्मा व सर्वांच्या बुद्धिचा साक्षी आहेस,त्या तुला तुझ्या प्राप्तीकरिता माझा नमस्कार असो.अविद्येने केलेला हा संसार तर-देव,मनुष्य,पशु,पक्षी,इत्यादिक देहांभिमानी जीवांनाच प्राप्त होतो,तुला प्राप्त होत नाही,म्हणून त्यांच्या मध्यें पुष्कळ अंतर आहे||१२|| अर्थः---आतां त्याचे सर्वांत महत्त्व वर्णन करितो,-हे देवा जो हा अग्नी आहे ते तुझें मुख होय.प्राप्त पाताळांसहित भूमी-हे तुझें कमरेंपर्यंत पाय होता.सूर्य हे-चक्षु,आक्श हे नाभि,दिशा हे कान,सत्य लोक हें मस्तक,इंद्रादिक हे देव तुझें बहु,समुद्र कुक्षीं,वायू हे तुझें प्राण व बळ असे कल्पित आहेत||१३|| अर्थः---वृक्ष आणि औषधि हे तुझे मस्तकावरील केंस,पर्वत ही तुज परमेश्वराची नखें आणि हाडें होत,रात्र व दिवस हें तुझें डोळें झोकणे व उघडणे आहे,ब्रम्हदेव हें,तुझें गुह्य इंद्रिय आणि वृष्टि हें तुझें वीर्य असें सर्वांनी मानिलें आहे||१४|| अर्थः---इतकेंच निया तर-बहुत जीवांनी भरलेले हे लोकपालांसहित लोक,अविनाशी व केवळ मनानें ग्राह्य अशा तुज पुरुषाचेठिकाणीं कल्पित असून ते जसे पाण्यामध्ये मत्स्यादिक जलचर यथावकाश संचार करितात,अथवा जसे उदुंबरवृक्षावर असंख्यात फळें असून त्यांत परस्परांची वार्तासुद्धां न जाणणारे हजारों मास्क राहतात त्याप्रमणे एकाच तुझेंठिकाणी अनंत ब्रम्हांडांतर्गत लोकांमध्ये परस्परांच्या वार्तासुद्धां न जाणणारे अनंत जीव राहतात ||१५|| अर्थः---त्र त्या जीवांचा तारण्याचा प्रकार कसा?असें म्हणशील तर-या लोकीं क्रीडा करण्याकरितां तूं जीं जीं मत्स्यादिक रूपें धारण करितोस त्यांच्या योगानें,आध्यात्मिकादिक दुखांचा नाश करणारें तुझें यश जे जीव आनंदानें गायन करितात ते तरून जातात||१६|| अर्थः----आतां त्या रूपांना दर्शवीत नमस्कार करितो-सत्यव्रत राजाचें रक्षण व वेदांचा उद्धार करण्याकरितां मत्स्यरूप धारण करून प्रळयकालच्या समुद्रामध्यें संचार करणाऱ्या तुला नमस्कार असो.मधुकैटभनामक दैत्यांना मारण्याकरिता हयग्रीवावतार धारण करणाऱ्या टोला नमस्कार असो.||१७|| अर्थः---मंद्र पर्वत धारण करणाऱ्या महाकूर्मरुपी तुला नमस्कार असो.पृथ्वीचा उद्धार करण्याची क्रीडा करणाऱ्या वराहवताररूपी तुला नमस्कार असो||१८|| हे साधुलोकांच्या भयहरण करणाऱ्या देवा,आश्चर्यकारक नृसिंहमूर्ति धारण धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो.त्रैलोक्य व्यापून टाकणाऱ्या वामनरूपी तुज भगवंताला नमस्कार असो.||१९|| अर्थः---गर्विष्ठ झालेल्या क्षत्रिय कुलरूप अरण्याचे छेदन करणाऱ्या भृगुकुलाधिपती तुज परशुरामाला नमस्कार असो,रावणाच्या नाश करणाऱ्या तुज रघुकुलाधिपती श्रीरामाला नमस्कार असो.||२०|| अर्थः---भक्तांचा पालक अशा वासुदेव,संकर्षण,प्रदुम्न व अनिरुद्धरूप चतुर्व्यूहमूर्ति धारण करणाऱ्या तुज श्रीकृष्णाला वारंवार नमस्कार असो||२१|| अर्थः---दैत्य व दानव यांना मोह उत्पन्न करणाऱ्या परंतु वस्तुतः शुद्धस्वरूपी अशा तुज बुद्धमूर्तीला नमस्कार असो.म्लेच्छरूप क्षत्रियाचा संहार करणाऱ्या कल्किरुपी तुला नमस्कार असो.||२२|| ३१-८-२०१९शनिवार अर्थः---हे भगवन्,हा सर्वही जीवलोके तुझ्या मायेने मोहित झाला आहे,म्हणून तुच्छ देहादिकांचेठिकाणी,मी आणि माझें असा अभिमान धारण करून कममार्गामध्यें श्रमण करीत करीत असतो ||२३|| अर्थः—केवळ लोकच श्रमण करीत आहेत असें नाहीं तर-हे विभो,मीसुद्धा स्वप्नतुल्य अशा-देह,पुत्र,गृह,स्त्रिया,धन व स्वजन इत्यादिकांचेठिकाणीं मूर्खत्वानें सत्यत्वबुद्धि धारण करून श्रमण पावत आहें,म्हणजे आसक्त झालों आहे.||२४|| अर्थः---अनित्य अशा कर्मफळाला नित्यत्व मानणारा,आनात्मरूप देहाला आत्मा माणणारा व दुःखरूप गृहादिकांनी सुखरूप मानणारा,सुखदुःखदिकांमध्यें रममाण होणारा,व अज्ञानें व्याप्त झालेला मी,आपल्या निरतिशय प्रमाचें स्थान अशा तुला जंत नाहीं||२५|| अर्थः---जसा अज्ञानी पुरुष जलापासूनच उत्पन्न झालेल्या शेवाळानें व तृणादिकांनी अच्छादिक झालेलें खरें जळ सोडून देऊन,केवळ आभासमात्र अशा मृगजळाकडे धांवतो त्याप्रमाणें मी,परमानंदरुपी तुला पराड्मुख होऊन मृगजळतुल्य विषयांत आसक्त झालों आहे||२६|| अर्थः---तो कृपणबुद्धि झालेला मी,काम व कर्मांनी मोक्ष पावलेल्या व प्रबल इंद्रियांनी त्या त्या विषयांकडे आकर्षण केलेल्या आपल्या मनाला वश करून घेण्यास समर्थ होत नाहीं||२७|| अर्थः---हे परमेश्वरा,हे पद्मनाभ,तो मी,विषयासक्त पुरुषांना दुष्प्राप अशा तुझ्या चरणाप्रत शरण आलों आहें.तें हें तुला शन जाणें तरी तुझ्या अनुग्रहानेंच घडलें आहें,असें मिया मानितो.आता साधूंच्या समागमनें हें घडतें असें म्हणशील तर-या जीवाच्या संसाराची समाप्ति होण्याचा,तुझ्या कृपेनें जेव्हां वेळ येतो तेव्हांच साधूंच्या सेवेने तुझेठिकाणी मति होत्ये.तुझ्या कृपेवाचून सत्सेवा घडत नाहीं,तिच्याखेरीज तुझेंठिकाणीं मति प्राप्त होत नाहीं व तिच्यांवाचून मुक्ति मुळींच प्राप्त होत नाहीं||२८|| अर्थः---असें बोलून पायांवर पडत असता नमस्कार करितो-सर्वप्रकारच्या ज्ञानांचे कारण,अपरोक्ष ज्ञानस्वरूपी,सर्वजीवांनी सुखदु:खादिक देणाऱ्या कालकर्मस्व भावादिकांचाहि प्रवर्तक अशा अनंतशक्ति तुज परिपूर्ण ब्रम्हस्वरुपाला नमस्कार असो ||२९|| अर्थः---सर्व प्राणिमात्रांचे वसतिस्थान अशा तुज वासुदेवाला नमस्कार असो.विषयांचे ग्रहण करणाऱ्या सर्व इंद्रियांचा प्रवर्तक अशा तुला नमस्कार असो.हे प्रभो,शरण आलेल्या माझें तूं रक्षण कर ||३०|| | ( याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील दशमस्कंधामध्यें अक्रूरस्तुतिवर्णनरूप हा चाळिसावा अध्याय समाप्त झाला||४०||) | | || श्रीकृष्णार्पणमस्तु || | _________________________________________________________________________________________________________ |४१—किरण २०--श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश---१-- अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या एकेचाळिसाव्या अध्यायामध्यें श्रीकृष्णाने मथुरानगरींमध्यें प्रवेश करीत असतां रजकाचा वध केला आणि तंतुवायक (कोष्टी)व सुदामा माळी यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना वर दिले,अशी कथा वर्णन केलेली आहे.)||१|| | स्तुवतस्तस्य भगवान् दर्शयित्वा जले वपुः | भूयः समाहरत् कृष्णो नटो नाट्यमिवात्मनः ||१|| अर्थ:--- श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणे भगवंताने चतुर्भुज स्वरूप,दाखवून तो अक्रूर स्तुति करीत असतां,जसा लोकांना नाटक दाखविणारा नट,ते लोक प्रशंसा करीत असतां,आपलें नात्य आटोपुण घेतो त्याप्रमाणें पुन्हा तें आपलें स्वरूप,आटोपण घेतलें||१|| भावार्थ:--- अक्रूरास दर्शन दिल्यानंतर भगवंतांनी पुढे कार्यांचा भार असल्यामुळे ते स्वरूप आवरून घेतले.||१|| अर्थः---तो अक्रुरही भगवान् अंतर्धान पावला असें पाहून लागलाच उदकांतून बाहेर निघाला आणि आपलें माध्यान्हिक सर्व कर्म आटोपून विस्मित असता रथाजवळ आला||२|| अर्थः---त्याला कृष्णानें विचारिलें कीं,-हे अक्रुरा,यावेळीं तुला भूमीवर,आकाशांत किंवा उदकांत काहीतरी आश्चर्यकर्क दृष्टि पडलें काय?तुझ्या मुद्रेवरून तूं काहीतरी आश्चर्य पाहिलें असें आम्हांस अनुमान होतें ||३|| अर्थः---अक्रूरम्हणाला-हे कृष्णा,या भूमिवर काय,आकाशात आणि उदकात जितके म्हणून चमत्कार आहे तें सर्व विश्वरूपी तुझेंच ठिकाणी भरलेले आहेत,तेव्हां तुला पाहणाऱ्या मी कोणते बरें आश्चर्य पहिले नाहीं?तर सर्वही आश्चर्य पहिलीच आहेत||४|| | यत्राद्भूतानी सर्वानी भूमौ वियति वा जले | तं त्वानुपश्यतो ब्रम्हन् किं मे दृष्टमिहाद्भूतम् ||५|| अर्थः---हे ब्रम्हस्वरूपा हे कृष्णा,ज्या तुझ्याठिकाणी सर्वच आश्चर्ये भरली आहेत त्या तुज परमात्म्याला पाहणाऱ्या मी,भूमीवर,आकाशामध्यें किंवा पाण्यामध्यें तुझ्यावाचून दुसरें काय आश्चर्य पहिले आहे?काहीच नाहीं.तूच आश्चर्यरुपी दृष्टि पडला आहेस||५|| दि:---१-९-१९ रविवार अर्थः—असें उत्तर सांगून त्या अक्रुराने रथ हंकीला आणि दोन प्रहर उलटल्यावर रामकृष्णांना घेऊन मथुरे जवळ पोहोंचला||६|| अर्थः---हे राजा,तेव्हां मार्गामध्यें जेथें तेथें जमलेले ग्रामस्थ लोक त्या वसुदेव पुत्र रामकृष्णांना पाहून आपली दृष्टि माघारी फिरविण्यास समर्थ झालें.नाहींत म्हणजे त्यांना पाहतच उहे राहिले||७|| भावार्थ:--- गावात प्रेवेश करण्यापूर्वी जे—जे श्रीकृष्णास पाहण्यासाठी आले,ते सर्व आनंददमग्न होऊ लागले.आपण त्याठिकाणी तेव्हा नव्हतो,कारण तेव्हा असतोत तर आता-आज दिसलो नसतोत.म्हणून आता—या जन्मात साधना करावी.||७|| अर्थः---अक्रूराला स्नान संध्यादिक करण्यास विलंब लाघला म्हणून रामकृष्ण जाण्याच्या पूर्वीच पुढें गेलेले गोकुळवासी नंदादिक गोप,मथुरेच्या उप वनांत पोहोचून तेथें रामकृष्णाची वात पाहत राहिले.||८|| अर्थः---नंतर भगवान् श्रीकृष्ण त्यांच्याजवळ जाऊन पोहोचल्यावर आपला हाताने अक्रूराच्या हात धारून हास्य केल्या सारखे दर्शवित नम्र असलेल्या त्या आक्रूरास म्हणाला कीं-||९|| अर्थः---बा अक्रुरा,आम्हांस आणिले हे वर्तमान कंसास सांगण्याकरिता पुढें नगरीमध्यें या रथांसहवर्तमान तुम्ही प्रवेश करावा आणि कंसाला हे वर्तमान कळून लागलेच आपल्या घरीं जावें.कारण,आमचा नगरींत प्रवेश होण्याच्या वेळीं काहीतरी होण्याचा संभव आहे;म्हणून आम्हीं आतां येथें सामानसुमानवगैरे उतरून विश्रांती घेऊन नंतर मथुरानगरीतील शोभा अवलोकन करूं||१०|| भावार्थ:--- अक्रूर भगवंतास म्हणतात कि,”श्रीकृष्णा आता तरी मला एकट्यास सोडू नका,कारण आपले गोकुळात दर्शन झाल्यापासून मला तुमच्याशिवाय राहू वाटत नाही.तुम्ही माझे चित्त घेतले आहे.याकरिता मला एकट्यास सोडू नका.||११|| अर्थः---अक्रूर म्हणाला-हे प्रभो,तुझ्या उभयतांनी रहित असा मी एकटाच मथुरेंमध्यें प्रवेश करण्यासाठी इच्छा करीत नाहीं हे नाथ,भक्तवत्सला,तुझा भक्त अशा माझा त्याग करण्याचें तूं मनांत आणूं नयेस ||११|| | आगच्छ याम गेहान् नः सनाथान् कुर्वधोक्षजः | सहाग्रजः सगोपालैः सुहृद्भीश्च सुहृत्तम ||१२|| अर्थः---हे अधोक्षजा,परममित्रा,बळराम,गोपाळ व मित्र यांसहवर्तमान तूं आमच्या घरीं ये,आम्हीं सर्व मिळून जाऊया,तूं आम्हांला सनाथ करावेंस ||१२|| | पुनीही पादरजसा गृहान् नो गृहमेधिनाम् | यच्छोचेनानुतृप्यन्ति पितरः साग्नयः सुराः ||१३|| अर्थः---आपल्या चरणरजानें मज गृहस्थाश्रम्याचें घर पवित्र करावेंस.ज्या तुझ्या चरणाच्या क्षालनोदकानें (गंगोदकानें )तर्पण केलेले पितर,अग्नि व देव क्षणोक्षणी तृप्त होत असतात ||१३|| भावार्थ:--- संत—महात्मा,भगवंत यांच्या चरणांचा स्पर्श आपणास किंवा आपल्या घरास किंवा घराच्या वस्तूस झाला असता,ती वस्तू पवित्र होत असते.म्हणून आपण संत—महात्मा यांना आपल्या घरी नेऊन,त्यांच्या मुखातून उपदेश ग्रहण करावयास पाहिजे. त्यांची पाध्य –पूजा कार्वयास पाहिजे.त्यांना कांही दानधर्म करावयास पाहिजे.त्यातच आपले हित आहे.पुण्याचा संचय किंवा अंत:कारण शुद्धतेचासायास आहे.धर्मानुसार कायिक,वाचिक मानसिक दान करावयास पाहिजे.त्यातच आपले परम हित आहे.||१३|| अर्थः---तुझ्या चरणयुगलाचें क्षालन करून बळीराजा,मोठ्या कीर्तीविषयीं योग्य व गुणांनी थोर झाला आणि त्यानें सांप्रतकाळीं सुतलांमध्यें व पुढें स्वर्गाचेठिकाणीं अतुळ ऐश्वर्य मिळविलें आहे,तशीच त्यानें निष्काम भक्तांची त्वत्स्वरूपप्राप्तिरूप जी उत्तम गति तीही मिळविली आहे ||१४|| | आपस्तेsङ्घ्र्यवनेजन्यस्त्रील्लोकान्छुचयोsपुनन् | शिरसाधत्त याः शर्वः स्वर्याताः सगरात्मजाः ||१५|| अर्थः---तुझ्या चरणाच्या क्षालनानें पवित्र झालेल्या उदकांनी,तिन्ही लोकांना पवित्र केलें आहें.कारण जय उदकांना शंभर मस्तकीं धारण करितो व ज्यांच्या स्पर्शमात्रेंकरून सगरराजाचें पुत्र स्वर्गास निघून गेले आहेत ||१५|| भावार्थ:--- संत—महात्मा यांच्या पाध्य—पूजाचे जल हेच गंगोदक—तीर्थ असते.आपण म्हणजे पापी जीवांनी पवित्र नद्यात स्नान केल्याने ते पाप त्या पवित्र नदीत जमा होते.पवित्र नदीत जे जमा झालेले पाप असते,त्या नद्या त्या पपांच्या निवृत्तीसाठी संत—महात्मा यांचे दर्शन घेण्यासाठी जातात व त्यांच्या दर्शनाने पवित्र होत असतात.म्हणून संत—महात्मा यांचा चरणांचा सहवास करावा.त्यांना सोडून अन्य ठिकाणी जाऊ नये,त्यांच्याकडे ईश्वर पवित्र नद्या येत असतात,म्हणून त्यांच्या सत्संगाने सर्व कांही प्राप्त होत असते.त्यांचा सत्संग केला तर,अन्य तीर्थास व क्षेत्रास—भगवंतांकडे जाण्याची गरज नाही.असा विवेक करावा.||१५|| अर्थः---हे देवदेवा,हे जगन्नाथा,हे पुण्यश्रावणकीर्तना,हे उत्तमकीर्ते,हे नारायणा,तुला माझा नमस्कार असो||१६|| अर्थः---श्रीभगवान् म्हणाला कीं,-हे अक्रुरा,मी प्रथम यादवकुळाशी वैर करणाऱ्या कंसाला मारून नंतर,बळरामासह तुझ्या घरीं येईन आणि तुझेंतर काय,पण सर्वही सुह्रदांचे प्रिय करीन ||१७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें भगवंतानें सांगितलेला तो अक्रूर,किंचित् खिन्न झाल्यासारखा होऊन,नगरींमध्यें प्रविष्ट झाला,आणि रामकृष्णांस आणिलें असें कंसाला सांगून तो आपल्या घरीं निघून गेला||१८|| अर्थः---नंतर मथुरानगरी पाहण्याची इच्छा करणाऱ्या गोपांनी परिवेष्टित व बळरामानें युक्त अशा त्या कृष्णानें,अपराण्हकाली मथुरेंमध्यें प्रवेश करून ती नगरी अवलोकन केली||१९|| २-९-१९सोमवार अर्थः---ती अशी होती कीं,-जिच्यामध्यें स्फटिकमण्याची गोपुरें व घरांची द्वारें होतीं,तांब्याची व लोखंडाची धान्यवगैरे ठेवण्याची कोठारें होती,जी आसमंताद्भागी असलेल्या खंदकांनी आंत प्रवेश जी सुवर्णाचे चवाठे,सावकाराची घरें व घरांना योग्य असें बगीचे,यांनी तशीच कारागिरांच्या दुकानांनी व घरांनी अलंकृत होती,जी वैडूर्यमणि,हिरे,स्फटिक,नीळ,प्रवाळ,मौक्तिक व पाच यांनी बंधाविलेल्या घरांच्या ओट्यावर,वळचरणींवर,गवाक्षांवर व गच्यांवर बसलेल्या पारव्यांच्या व मोरांच्या शब्दांनी नादयुक्त होती,जिच्यामध्ये राजमार्ग,बाजारांतील गल्ल्या,इतर मार्ग आणि अंगणीं ही सडासंमार्जन केलेलीं होतीं व जेथें तेथे फुलें अंकुर व तांदूळ विखरिलेले होते ||२१-२२|| अर्थः---त्या नगरींमध्यें प्रत्येक घराच्या दरवाज्यांच्या दोन्हीं बाजूंस तांदूळांवर दह्यांचे व चंदनाचे पट्टे ओढलेले उदकपूर्ण कुंभ स्थापन केले होते,त्या कुंभाच्या सभोंवर फुलांच्या माळा,गळ्यामध्यें वीतवीत रुंदीच्या रेशमी वस्त्रांच्या पट्ट्या,मुखांमध्ये आंब्यांचेवगैरे पल्लव,त्यांच्या वर पत्रामध्यें दिव्यांच्या रांगा,पुढें पुष्पफळांनी युक्त असे केळींचे व सुपारीचे उभे केलेले वृक्ष,तसेच उभारेलेल ध्वज व बांधलेली तोरणें होतीं ||२३|| अर्थः---हे राजा,अशाप्रकारच्या त्या नगरींमध्यें आपल्या मित्रांसहवर्तमान राजमार्गाने प्रविष्ट झालेल्या त्या रामकृष्णांना पाहण्याकरिता उत्सुक होऊन त्वरायुक्त झालेल्या नागरिक स्त्रिया,आपापल्या घरांतून निघून त्या रामकृष्णांच्या समोर प्राप्त झाल्या व ज्या घरांतून बाहेर जाण्यास योग्य नव्हत्या त्या कुलस्त्रिया,आपापल्या घरांच्या माड्यांवर चढूल्या ||२४|| भावार्थ:--- श्रीकृष्ण आणि बलरामदादा मथूरेतून राजमार्गाने जात असतांना,नगरातील स्त्रिया त्यांना उत्सुकतेने पाहण्यासाठी गच्चीवर पाहण्यासाठी घाई करू लागल्या,कारण भगवंतांच्या स्वरूपाचा तो परिणाम आहे.आपणही त्यासाठी भगवंतांचे स्वरूप जाणून घेऊन अनुभव घेण्याचा प्रयात्व करावयास पाहिजे.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होणार—सुखरूप होणार आहोत.||२४|| अर्थः---आता त्यांची उत्सुकता सांगतो-कितीएक स्त्रियांनी संभ्रमनें पायांतील भूषणें हातांत व हातांतील भूषणें पायांत घालून पांघरण्याचें वस्त्र नेसून व नेसावयाचें पांघरण्यास घेऊन तशाच निघाल्या.कांहींएकांनी कुंडले व कंकणे वगैरे जीं दोन दोन भूषणें कर्णादिकांवर धारण करावयाची होती त्यांतील एकेक विसरून एकेकच धारण करून गेल्या.कितीएक दोन कानांपैकी एकांतच तानवडें घालून व दोन पायांपैकी एकांतच नुपूर घालून गेल्या.कितीअक एका डोळ्यांत काजल चालून दुसऱ्यांत तें घातल्याशिवायचं गेल्या ||२५|| अर्थः---कितीएक भोजन करीत होत्या त्या भोजनाचा त्याग करून मोठ्या उत्साहाने तशाच गेल्या.कितीएकांच्या अंगाला संख्यांनी तैलाभ्यंग केला होता त्या स्नान केल्या शिवाय तशाच गेल्या,कांहींएक निजल्या होत्या त्यांनी भगवान् आला असा मार्गांतील लोकांचा कलकलाट शब्द ऐकून,गडबडीनें उठून गेल्या.कितीएक आया,मुलांकडून स्तनपान करवीत होत्या त्या मुलांना एकीकडे सारून तशाच गेल्या.||२६|| अर्थः---त्यावेळीं मत्तगजासारखी गति असणाऱ्या त्या कमळनेत्र भगवान् श्रीकृष्णाने,आपाल्या प्रौढ लीलांनी,हस्यांनी,अवलोकनांनी व लक्ष्मीसुद्धां रमविणाऱ्या देहानें,त्यांच्या दृष्टींना आनंद देऊन त्यांच्या मनांचे आकर्षण केलें ||२७|| अर्थः---हे कामादि शत्रु जिंकणाऱ्या राजा,त्या स्त्रिया कृष्णाचे गुण वारंवार ऐकिल्यामुळें पूर्वीच कृष्णाचेठिकाणी चित्त जडलेल्या होत्या,आतां त्या कृष्णाला प्रत्यक्ष पाहून,त्याच्या अवलोकनें व हास्यरूप सेवनानें सत्कार पावल्या असतां,त्यांनी आपल्या उघडलेल्या नेत्रांच्या द्वारानें अंतकरणामध्यें प्रवेश करविलेल्या त्या आनंदमूर्ति श्रीकृष्णाला आलिंगन करून व अंगावर रोमांच धारण करून,पूर्वी तो प्राप्त झाला नसल्यामुळें मनामध्यें जें अनंत दुःख होतें त्यांच्या त्याग केला||२८|| भावार्थ:---- मथुरेतील स्त्रियांनी यापूर्वी श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन ऐकले होते,पण प्रत्यक्ष दर्शन मात्र झाले नव्हते.आता मात्र त्यांना प्रत्यक्ष दर्शन झाले.म्हणून त्या अत्यानंदात होत्या.त्यांनी भगवंतांना मनोमय आलिंगन दिले.श्रीकृष्णांना आपल्या हृदयात नेऊन बसवले,कारण त्यांचे अंत:कारण शुद्ध व स्थिर झालेले होते.त्याचप्रकारे आपली धारणा झाली तर आपल्यासुद्धा अंत;करणात भगवंतांची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.म्हणून आपण प्रयत्न करावा.त्यामुळे त्यांचा विरह—दु:ख नाहीसे होऊन शांत झाल्या.त्याचप्रकारे आपलेही जन्म—मरण निवृत्त होऊन सुखस्वरूप हौउत.त्यासाठी तसा प्रयत्न याच मनुष्य देहात करावा.||२८|| अर्थः---त्यावेळीं ज्या स्त्रिया राजमंदिरांच्या शिखरांवर चढल्या होत्या त्या,कृष्णाला पाहून तत्काळ आनंदानें प्रफुल्लितमुखकमळ झाल्या,आणि त्यांनी पुष्पांच्या समूहांनी राम्कृश्नांव्र पुष्पवृष्टी केली ||२९|| अर्थः---त्यावेळीं हर्ष पावलेल्या ब्राम्हणांनी,रस्त्यामध्यें जेथे तेथें,तिलक करण्यासाठी दहीं व अक्षता,पादप्रक्षालनाकरता उद्कांची भांडी,पुजेकरितां फुलांच्या माळा,चंदने,मिष्टान्ने व फळेंवगैरे घेऊन त्या रामकृष्णाची पूजा केली ||३०|| भावार्थ:--- ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही,अक्षता,पाण्यांनी भरलेले घट,फुलांचे हार,चंदन आणि भेट वस्तुंनी बारम आणि कृष्णांची पूजा केली.त्यांना भेतास्तु दिल्या.त्याचप्रकारे आपण पूजा करून अनेक भेट वस्तू दान कराव्यात.||३०|| अर्थः---त्यावेळीं नगरांतील स्त्रियां आपआपणांत म्हणूं लागल्या कीं,-अहो,ज्या गोपी,मनुष्यलोकाला मोठा आनंद देणाऱ्या ह्या रामकृष्णांना क्षणोक्षणी पाहतात त्यांनी जन्मांतरी काय बरे मोठे तप केलें होतें!||३१|| अर्थः---याप्रमाणे लोक भाषण करीत असतां श्रीकृष्णाने रस्त्यानें येणाऱ्या,वस्त्रें धुणाऱ्या व वस्त्रांना रंगही देणाऱ्या अशा एका रजकाला पाहिलें आणि त्याच्या जवळ धुतलेली अतिउंची वस्त्रें होतीं तीं मागितली ||३२|| अर्थः---ती आशिया कीं,हे रजका,वस्त्रादिकेंकरून पूज्य अशा आम्हांस हीं योग्य वस्त्रें दें.देणाऱ्या तुझें उत्तम कल्याण होईल यांत संशय नाहीं||३३|| दि३-९-१९ मंगळवार अर्थः---याप्रमाणें सर्व पदार्थांनी सर्वदेशीं व सर्वकाळी परिपूर्ण अशा भगवंताने याचना केलेले तो कंसाचा सेवक मदोन्मत्त रजक क्रुद्ध होऊन निंदापूर्वक म्हणाला कीं,-||३४|| अर्थ:--हे उद्धट पुरुषहो, जे तुम्हीं रजानें धारण करण्याची वस्त्रें मागतां त्या पर्वतावर व वनांत फिरणाऱ्या तुम्हीं आजपर्यंत अशी उंचीं वस्त्रें कधीतरी परिधान केलिया होतीं काय?||३५|| अर्थः---आम्हीं न जाणता मागीत्लिया असें म्हणाल तर-हे मूर्ख हो,या स्थानांतून तुम्हीं दुसरेठिकाणी निघून जा आणी यापुढें जर तुम्हांला वांचण्याची इच्छा असेल तर तुम्हीं अशी उंची वस्तूंची प्रार्थना कोणाजवळहि करूं नका.कारण,राजकीय पुरुष आहेत ते,खरोखर तुमच्यासारख्या उद्धट मनुष्यांना बांधून ठेवितात,मार देतात व त्यांच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून घेतात ||३६|| अर्थः---याप्रमाणें असंबद्ध भाषण करणर्या त्या राजकाचें मस्तक,क्रुद्ध झालेल्या त्या देवकीपुत्र श्रिक्रुश्ननेअ,आपल्या नाखानेंच देहापासून निराळें करून भूमीवर पाडिलें ||३७|| अर्थः---तेव्हां त्या राज्काच्या सर्व सेवकांनी वस्त्रांची गाठोडी तेथेंच टाकून सर्व मार्गांनी पलायन केलें.नंतर श्रीकृष्णाने तीं वस्त्रें ग्रहण केली||३८|| अर्थः---त्यावेळीं कृष्णानें व बळरामानें,आपणास आवडणारी पिवळी व निळी वस्त्रें नेसून कितीएक वस्त्रें गोपांना अर्पण केली,बाकी होतीं तीं भूमीवर टाकून देऊन ते पुढे निघून गेले||३९|| अर्थः---पुढें एका प्रीतियुक्त तंतुवायकानें (कोष्टयानें)चित्रविचित्र वर्णांच्या वस्त्रमय भुषणांनी त्या रामकृष्णांना यथानुरूप वेषांची रचना केली||४०|| अर्थः---तेव्हां जसे एखाद्या उत्सवामध्यें अलंकार घातलेले-पांढरा व कला असें लहान दोन हत्ती शोभतात त्याप्रमाणे नानाप्रकारच्या वस्त्रमय अलंकारांनी भूषित झालेले ते रामकृष्ण अत्यंत शोभूं लागले ||४१|| अर्थः---तेव्हां त्या तंतुवायकावर प्रसन्न झालेल्या भगवंताने,त्याला देहावसणानंतर आपली समानरुपता देण्याचा संकल्प केला आणि या लोकीं (जिवंत स्थितीमाध्येंही)त्याला उत्कृष्ट संपत्ति संपत्ति,शारीरबळ,ऐश्वर्य,आत्मविषयक स्मृति आणि इंद्रियांचे पटुत्व दिलें ||४२|| भावार्थ:--- ज्या शिप्यांनी भगवंतांना वेश करून दिला,त्या शिप्यांना भगवंत कृष्ण यांनी भरपूर संपत्ती,शक्ती,ऐश्वर्य,आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती दिल्या.त्यामुळे त्यानुसार ते आचरण करू लागले.सात्विक आचरण केल्यामुळे त्यांना अखेर शेवटी सारुप्य मोक्ष दीला.म्हणू आपण इतरांना ज्या वस्तूची गरज आहे ती—ती वस्तू देण्याचा प्रयत्न करावा—दान देण्याचा प्रयत्न करावा.त्यात आपले हित होते.त्या हितामुळे आपल्याला जीवनात सुख मिळते.याकरीता आपण दानधर्म करावा.||४२|| अर्थः---नंतर तो रामकृष्ण,सूदामानामक माळ्याच्या घरीं गेले;त्यांना पाहताच तो त्वरेनें उठून,त्यानें भूमीवर मस्तकाने नमस्कार केला||४३|| भावार्थ:--- बलरामदादा आणि कृष्ण सुदामा माळ्याच्या घरी गेले.सुदामा माळ्यांनी ताबोडतोब त्यांना उठून जमिनीवर टेकून नमस्कार केला. तशा प्रकारचा आपल्याकडे संत—महात्मा—वरिष्ठ आल्यानंतर नमस्कार करावा.त्यात आपले हित असते.||४३|| अर्थः---आणि त्यांना असण देऊन पाद्य अर्पण करून नानात्र गोपांसहवर्तमान त्यांची माळा,तांबूल,चंदनाची उटी व इतरही पूजासाहित्यें अर्पण करून पूजा केली ||४४|| अर्थः-- भावार्थ:--- बलरामदादा आणि श्रीकृष्ण यांना आसनावर बसवून त्यांची पाद्य—पूजा केली.त्यांची अर्घ्य,फुलांचे हार,पाने,चंदन,इत्यादी सामुग्रीने पूजा केली.त्याचप्रमाणे आपणही आपल्याकडे संत—महात्मा आल्यानंतर किंवा बोलावून त्यांची पाद्य—पूजा करावयास पाहिजे.त्यांची पाद्य—पूजा निष्काम केली असता आपले अंत:कारण शुद्ध होते व सकाम केली असता पुण्य प्राप्त होते.||४४|| | प्राह नः सार्थकं जन्म पावितं च प्रभो | पितृदेवर्षयो मह्यं तुष्टा ह्यागमनेन वाम् ||४५|| अर्थः---आणि म्हणाला कीं,-हे प्रभो,तुम्हीं माझ्या घरीं आलां त्याच्या योगानें माझ्यावर पितर देव ऋषि हे संतुष्ट झाले आहेत.तुम्हीं माझें कूळ पवित्र केलें म्हणून आज्माझें जन्म सफळ झालें आहें ||४५|| भावार्थ:--- सुदामा माळी बलरामदादा आणि श्रीकृष्ण यांना म्हणतो कि.”आपल्या आगमनामुळे आमचा जन्म सफल झाला.जीवनाचे सार्थक झाले,कारण सत्पात्र आहात,त्यामुळे आमचे दर्शन झाले,आपली पूजा करण्यास मिळाली.”आपणासहीतसे वाटावे.||४५|| अर्थः---तुम्हीं खरोखर सर्व जगाचे परम कारण असून साधूंच्या पालनाकरितां व अभिवृद्धिकरितां आपल्या मूर्तिभेदाने या लोकीं अवतीर्ण झालां आहां ||४६|| भावार्थ:--- भगवंत सर्व जगताचे परम कारण आहेत.त्याच्याशिवाय जगातला अस्तित्व नाही.त्यांचीच सत्ता आहे,म्हणून आपण आहोत.भगवंत अभ्युदय—उन्नती—प्रगती आणि धर्माची—मोक्षाची स्थापना करण्याकरिता अवतीर्ण होतात.म्हणून आपण ते आल्यानंतर त्यांचा सत्संग करून सेवा करून आपले परम हित साधण्याचा प्रयत्न करावात्यात आपले हित आहे.||४६|| अर्थः---तुम्हीं जगाचे आत्मे सर्वांचे सुह्र्द,सर्वप्राण्यांवर समदृष्टी ठेवणारे व आपली भक्ति कारणांराचें सेवन करणारे आहां,त्या तुम्हांला कोठेंच विषमदृष्टि नाहीं ||४७|| दि ४-९-१९ बुधवार भावार्थ:--- आपण भजन करणाऱ्यांनाच भजता,तरीसुद्धा विषमता नाही,कारण ते स्वधार्मानुसार वागतात.स्वधार्मानुसार वागणे आपले कर्तव्यच असते.त्यात आपलेच हित आहे. जे पराधार्मानुसार वागतात,त्यांनी स्वधार्मानुसार वागण्यासाठी म्हणजे आपले कर्तव्य पर पाडण्यासाठी दंड करतात.दंड दिल्यामुळे ते स्वधार्मानुसार वागतात.त्यामुळे सर्वजण एकमेकावर प्रेम करतात.सर्वांनी एकमेकावर प्रेम केले असता सर्वांना सुख मिळते.जिकडे—तिकडे स्वधर्मचे राज्य—रामराज्य येते.म्हणून प्रेत्याकांनी स्वधार्मांचे पालन करावे.||४७|| | तावाज्ञापयतं भृत्यं किमहं करावानी वाम् | पुंसोsत्यनुग्रहो ह्येष भवाद्भीर्यन्नीयुज्यते ||४८|| अर्थः----तुम्हीं जगदीश्वरांनी,भृत्य अशा मला आज्ञा करावीं कीं,-तुमचे दास्य मी कोणतें करावें?कारण,तुम्ही आपला म्हणून स्वकारून,पुरुषाला जी आज्ञा केली जात्ये तो तुमचा त्याच्यावर मोठाच अनुग्रह असें समजलें पाहिजे||४८|| अर्थः--- भावार्थ:--- सुदामा माळी हा भगवंतांचा मी दास आहे,अशी भावना व्यक्त करतो,कारण प्रेत्येक व्यक्ती ही कोणाची तरी दास असतेच.कोणाचेही दास होण्यापेक्षा भगवंतांचे दास होण्यात आपले परम हित आहे--कल्याण आहे--सुख आहे.आपणही भगवंतांचे दास होण्याचा आपण आवश्य प्रयत्न करावा.भगवंतांचे दास झाल्यानंतर आपणास जीवांची सेवा करावी वाटते.संकोच वाटत नाही.जीवांची सेवा केली असता निष्काम भक्ती घडते.जनसेवा हीच ईश्वरसेवा असते.भगवंतांची सेवा करण्यास मिळणे यात फार हित असते.म्हणून भगवंतांची सेवा आपण नेहमी करावी.त्यामुळे भगवंतांची कृपा होते.भगवंतांच्या कृपेत आपला उद्धार होतो.||४८|| अर्थः---हे महाराज,अशी प्रार्थना करून व एकाएकीं श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणून संतुष्टचित्त झालेल्या त्या सुदाम्या माळ्याने,सुगंधिक पुष्पांनी गुंफलेल्या माळा त्या कृष्णरामादिक सर्व गोपांना अर्पण केल्या ||४९|| अर्थः---तेव्हां त्या माळांनी गोपांसह अलंकृत व संतुष्ट झालेल्या त्या वरदमूर्ति रामकृष्णांनी,नम्र असलेल्या त्या सुदामा माळ्याला इच्छित वर मागून घेण्याची आज्ञा केली||५०|| | सोsपि वव्रेsचलां भक्तिं तस्मिन्नेवा खिलात्मनी | तद्भक्तेषु च सौहृर्द भूतेषु च द्यां पराम् ||५१|| अर्थः---सुदाम्यामळ्यांनेंही,त्या सर्वात्म्या श्रीकृष्णाचेठिकाणी अचलभक्ति,त्यांच्या भक्तांचेठिकाणी मित्रता आणि सर्व प्राणिमात्रांवर परम दया हे वर मागितले ||५१|| भावार्थ:---सुदामा माळी यांनी भगवंतांकडून हा वर मागितला कि,भगवंतांच्याठाई त्याची दृढ भक्ती नेहमीसाठी असावी.त्यांच्या भक्तांची सेवा नेहमीसाठी असावी.त्यांचा सत्संग नेहमी घडावा,दु:खितांची नेहमी दु:ख घालवून सुख देण्याची सेवा घडावी. त्याचप्रमाणे आपणासही सत्संग,संत—महात्मा यांची सेवा दु:खितांचे दु:ख घालवून सुख देण्याची सेवा करावी.||५१|| अर्थः---याप्रमाणें त्यानें मागितलेल्या वरांना देऊन तशीच त्याने न मागितलेलीही वंशवृद्धियुक्त संपत्ती,बळ,आयुष्य,यश व कांति ही देऊन तो श्रीकृष्ण,बळरामासह तेथून पुढें गेला||५२|| भावार्थ:---सुदामा माळी यांनी जे वर मागितले ते वर भगवंतांनी दिले व त्याशिवाय लक्ष्मी—धन शोर्य,आयुष्य,कीर्ती,आणि सोंदर्य दिले.म्हणून आपण आपल्या हितासाठी भगवंतांची भक्ती करावी.त्यातच आपले परम हित आहे.||५२||--------------------||५२|| | याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुरणाच्या दशमस्कंधात कृष्णपूरप्रवेशनामक हा एकेचाळीसावा अध्याय समाप्त झाला ||४१|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु || _________________________________________________________________________________________________________ | ४२--- किरण २०---श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश---कुब्जेवर कृपा--२-- अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________(आतां बेचाळीसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने केलेला कुब्जेचा सरळपणा,धनुष्याचा भंग व त्याच्या रक्षकांचा वध यांचें तसेंच अरिष्टदर्शन व रंगोत्सह यांचे वर्णन केलें आहें)||१|| | अथ व्रजन् राजपथेन माधवः | स्त्रियं गृहीतान्गविलेपभाजनाम् | | विलोक्य कुब्जां युवतीं वराननां | पप्रच्छ यान्तीं प्रहसन् रसप्रदः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,-नंतर राजमार्गानें गमन करणाऱ्या त्या श्रीकृष्णाने,हातांत चंदनादिकांच्या उट्यांची पात्रें ग्रहण करून जाणाऱ्या सुंदरमुख परंतु तीनठिकाणीं वक्र असलेल्या एका कुब्जानामक तरून स्त्रीला पाहून,हास्य करून तिला सुख देत देत असें भाषण केलें कीं,-||१|| भावार्थ:--- श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालू लागले,तेव्हा त्यांना एक युवती भेटली.ती दिसायला सुंदर होती,पण शरीराने कुबडी होती.तिच्या हातात उटण्याचा एक डब्बा होता.भाक्तींना आनंद देणारे श्रीकृष्ण तीस हसत—हसत म्हणतात.||१|| अर्थः---हे श्रेष्ठामांड्या असलेल्या सुंदर स्त्रिये,या नगरींमध्यें तूं कोणाची कोण आहेस?व ही अंगाला लावण्याची उटी तूं कोणाकरीतां घेऊन जात आहेस?हें आम्हांला खरे सांग.तूं कोणाकरितांही उटी घेऊन जात असेनास कां परंतु ही उत्तम उटी तूं आम्हांला दे,असें करशील त्र,तुझें कल्याण लवकरच होईल ||२|| अर्थः---कुब्जा म्हणाली:---हे सुंदरा,मी त्रिव्रका नावांची कंसाची,अंगाला उटी लावण्याच्या कामीं त्याला मान्य अशी दासी आहे.मी कुब्जा असल्यामुळे निर्बळपणे हळूहळू बारीक घांसलेले चंदन कंसाला फार आवडत असतें,या चंदनाला योग्य तुमच्या वाचून दुसरा कोण बरें आहे?कोणिच नाहीं.||३|| भावार्थ:--- हे सुंदर!मी कंस यांची आवडणारी दासी आहे.जरी मी त्यांची आवडती दासी असले तरी,त्याहीपेक्षा आपण या उटण्याचे आत्र—अधिकारी आहात.म्हणून हे उटणे कंस यांच्यापेक्षा आपणास अधिक योग्य आहे.हे उटणे दोघांना माझ्या हाताने लावते.||३|| अर्थः----असें बोलून भगवंतांच्या रूप,सुकुमारता,रसिकता हास्य,भाषण व अवलोकन यांच्या योगानें मोहितचित्त झालेल्या त्या कुब्जानें,त्या रामकृष्णांना ती दाट चंदनाची उटी अर्पण केली ||४|| भावार्थ:--- भगवंतांचे सौंदर्य,कोमलता,मधुरता,मंद,हास्य,प्रेमालाप आणि पाहणे यामुळे ती युवती प्रभावित झाली.कंस बलरामदादा आणि कृष्णांच्या सौंदर्यामुळे फिका पडला.त्या दोन्ही भावांना भरपूर उटणे लावले.अंत:करणपूर्वक सेवा केली.||४|| अर्थः---नंतर रामकृष्णांच्या पांढऱ्या व काळ्या वर्णांहून इतर (तांबड्या व पिंवळ्या) वर्णांनी सुशोभित व नाभीच्या वर शरीराला लावलेल्या त्या ऊटीनें रंगविलेले ते रामकृष्ण शोभूं लागले ||५|| | प्रसन्नो भगवान् कुब्जां त्रीवक्रां रुचीराननाम् | ऋज्विं कर्तुं मनश्चक्रे दर्शयन् दर्शने फलम् ||६|| अर्थः---तेव्हां प्रसन्न झालेल्या भगवंताने,आपल्या दर्शनाचें फळ दाखविण्यासाठीं तीनठिकाणीं वांकडी असलेल्या त्या सुंदरमुखी कुब्जेला सरळ करण्याचा विचार मनांत आणिला ||६|| भावार्थ:--- भगवंतांस वाटले कि हिने सेवा केलेली आहे,म्हणून तिला प्रत्यक्ष फळ द्यावे म्हणून,तिचे शरीर सरळ करावे असा विचार मनात आला.याकरिता आपणही भगवंतांची सेवा केली तर आपणाससुद्धा त्या सेवेचे फळ मिळते.असा विवेक करावा.||६|| अर्थः---आणि आपल्या दोन्हीं पायांनी तिच्या पायांची अग्रे (बोटे)दाबून दोन आंगळ्या वर उचलेला आपल्या हातानें तिला हनुवटीचेठिकाणीं धरून तिचा देह वर उचलला ||७|| अर्थः—ती कुब्जा तेव्हां श्रीकृष्णाच्या स्पर्शेकरूनच सरळ झालेल्या शरीरानें युक्त व जिचा कटीप-श्र्वाद्धाग व स्तन मोठे आहेत अशी स्त्रियांमध्ये उत्तम स्त्री झाली ||८|| अर्थः---आणि रूप,गुण,व उदारता यांनी युक्त व कामातुर होऊन ती कुब्जा,हास्य करीत श्रवणाने पांघरलेल्या वस्त्राचा पदर धरून त्याला म्हणाली कीं,-||९|| दि ५-९-१९ गुरुवार | एहि वीर गृहं यामो न त्वां त्युक्तुमिहोत्सहे | त्वयोन्मथितचित्तायाः प्रसीद पुरुषर्षभ ||१०|| अर्थः—हे वीर,ये आमच्या घरीं जाऊया.मी येथें तुझा त्याग करण्यांत उत्साह मानीत नाहीं.हे पुरुषश्रेष्ठा,तुझ्या निमित्त्क कामानें क्षुभितचित्त झालेल्या मजवर तूं प्रसन्न हो ||१०|| अर्थः---याप्रमाणे त्या कुब्जा स्त्रीनें प्रार्थना केल्यावर,श्रीकृष्णाने,बळराम पाहत असतां,गोपीच्या मुखांकडे पाहून हास्य केलें आणि तिला सांगितलें कीं||११|| | एष्यामि ते गृहं सुभ्रुः पुंसामाधिविकर्शनम् | साधितार्थोsगृहाणां नः पान्थानां त्वं परायणम् ||१२|| अर्थः---हे सुंदरभ्रुकुटि स्त्रिये,मी कांही कार्य करावयाचें आहें तें केल्यावर,पुरुषांच्या मनातील संतापाचा नाश करणाऱ्या तुझ्या घरीं येईन.कारण,पांथस्थ लोकांना तुंच मोठा आश्रय आहेस ||१२|| अर्थः---या प्रकारच्या मधुर वाणीने तिचें विसर्जन करून,पुढें बळरामासह जाणाऱ्या त्या श्रीकृष्णाच,मार्गामध्यें मोठमोठ्या सावकार लोकांनी, अनेकप्रकारच्या भेटी,तांबूल,माळा व चंदनादिकांच्या उट्या अर्पण करून पूजा केली||१३|| _________________________________________________________________________________________________________ |४२--- किरण २०---श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश---धनुष्य भंग—३ _________________________________________________________________________________________________________ अर्थः---त्या भगवंताच्या दर्शनाने उत्पन्न झालेल्या जो मदन त्याच्या क्षोभाने स्त्रियांची त्र अशी स्थिती होऊन गेली कीं,त्यांना आपल्या शरीराचें व शिथिल झालेल्या वस्त्राचें,केशपशाचें व कांकणांचे भानसुद्धां राहिलें नाहीं.त्या केवळ चित्रांसारख्या निश्चळ होऊन राहिल्या ||१४|| अर्थः---नंतर भगवंताने पूरवासी लोकांना धनुष्याचे स्थान विचारीत धनुर्मुखशाळेमध्यें जाऊन,तेथें इंद्राचा धनुष्यासारखें अद्भुत धनुष्य अवलोकन केलें ||१५|| अर्थः---तें –बहुत पुरुषांनी रक्षण केलेले,पूजन केलेलें व सुवर्णालंकारादिक समृद्धीने युक्त होतें.ते पाहन त्याच्या रक्षकांनी निवारण केलें असतांही श्रीकृष्णाने बलात्कारानें तें धनुष्य ग्रहण केलें ||१६|| भावार्थ:--- भगवंतांनी धनुष्याची पूजा केली,कारण धनुष्याला देवता असते.ती पूजा देवतेची असते.आपणही शस्त्राची पूजा करावयास पाहिजे.ग्रामीण भागात आजही शस्त्राची—पूजा केली जाते.पूजा केली असता ती देवता प्रसन्न होते.||१६|| अर्थः---आणि महापराक्रमी त्या श्रीकृष्णाने,डाव्याहातानें सहज वर उचलेले तें धनुष्य,सज्य करून,सर्व लोक पाहत असतां एकानिमेषामध्येंच आकर्षण करून,जसा मदांध झालेला हत्ती उसांच्या दंडाला मध्येंच सोडून टाकितो त्याप्रमाणें मध्येंच मोडून टाकिलें ||१७|| अर्थः---तेव्हां त्या धनुष्याच्या मोडणाऱ्या शब्दानें,आकाश,स्वर्ग,भूमि व सर्वदिशा भरून टाकल्या. तो शब्द ऐकून कंसाला मोठें भय उत्पन्न झालें ||१८|| अर्थः---तेव्हां त्या धनुष्याचे रक्षक,जे होते तें आपल्या अनुचरांसहित क्रुद्ध व शस्त्रधारी होऊन,रामकृष्णांना धरण्याची इच्छा करणाऱ्या त्यांनीं धरा,मारा असें भाषण करीत करीत त्यांच्या सभोंवार वेढा घातला.||१९|| अर्थः---त्यावेळीं मरण्याची इच्छा करणाऱ्या त्या धनुष्यरक्षकांना पाहून,क्रुद्ध झालेल्या रामकृष्णांनी,धनुष्याची शकलें घेऊन त्यांस मारून टाकिलें ||२०|| अर्थः---त्याकालीं कंसाने पाठविलेले सैन्यही मारून,ते रामकृष्ण त्या धनुर्मखशाळेंतून बाहेर पडले आणि नगरांतील संपत्ति पाहून हर्ष पावून,निर्भयपणें नगरांत संचार करू लागले||२१|| | तयोस्तद्भूतं वीर्यं निशाम्य पुरवासिनः | तेजः प्रागल्भ्यं रूपं च मेनिरे विबुधोत्तमौ ||२२|| अर्थः---त्या रामकृष्णाचे तें धनुर्भंगादिक आश्चर्यकारक कर्म ऐकून व तेज,प्रौढता व सौंदर्य हीं पाहून पुरवासी लोकांना ते कोणी देवामध्यें श्रेष्ठ आहेत असें मानिलें ||२२|| अर्थः---याप्रमाणें ते यथेष्टपणें नगरांत फिरत असतां सूर्य अस्त पावला.तेव्हां गोपांनी परिवेष्टित असे तें रामकृष्ण,नगरांतून आपल्या उतरण्याच्या जागीं परत आलें ||२३|| दि:---६-९-१९ शुक्रवार अर्थः---श्रीर्कुष्ण गोकुळांतून निघतेवेळीं त्याच्या विरहानें व्याकूळ झालेल्या गोपींनी,आतां मथुरवासी लोकांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील आशिया जीं भाषणें केली होतीं ती सर्व तेथें श्रीकृष्णाच्या शरीराची शोभा पाहणाऱ्या लोकांची खरी झालिया.कारण,जें कृष्णाचे शरीर,लक्ष्मीनेंही आपली सेवा करणाऱ्या ब्रम्हादिक इतर देवांचा त्याग करून आपल्या आश्रयत्वेंकरून स्वीकारीलें आहें ||२४|| अर्थः---असो इकडे रामकृष्णांनी हस्तपादांचे प्रक्षालन करून दूधपुरीवगैरे अन्नाचें भोज केलें आणि कंसाचे कर्तव्य जाणून त्या रात्रीं सुखानें शयन केलें ||२५|| _________________________________________________________________________________________________________ ४२--- किरण २०---श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश.२२---कंस यास श्रीकृष्णांची भीती---४--- _________________________________________________________________________________________________________ | दीर्घप्रजागरो भीतो दुर्नीमित्तानी दुर्मतिः | बहून्यचष्टोभयथा मृत्योर्दोत्यकारणी च ||२७|| अर्थः---इकडे तो दुष्टबुद्धि कंस तर,धनुष्याचा भंग,धनुष्याचा रक्षकांचा वध व आपल्या सैन्याचा वध हें त्या रामकृष्णाचे केवळ खेळणें झालें असें ऐकून भिऊन गेलो आणि त्या साऱ्या रात्रींत त्याला झोंप लागली नाहीं आणि त्यानें स्वप्नामध्यें व जागृदवस्थेंमध्यें मृत्यूसूचक अशी पुष्कळ दुश्चिन्हें अवलोकन केलीं||२६-२७|| भावार्थ:--- धनुष्यभंगाचे कृत्य आणि सेनेचा केलेला संहार,ही वार्ता ऐकून कंस घाबरला.बालारामादादा व श्रीकृष्णांच्या धास्तीमुळे त्यास रात्रभर झोप आली नाही.जागेपणी तर त्याला म्रीत्युची भीती वाटू लागली.सतत त्यास ध्यास मृत्यूचा लागला.अखेर शेवटी पाहते झोप लागली व त्यानंतर स्वनातही श्रीकृष्ण मारत आहेत असे स्वप्न पडले,कारण जागृतीत ज्याचा घ्यास लागला,त्याचे स्वप्न पडत असतेया न्यायाने त्यास स्वप्नन पडले.काय करावे,कोणती योजना करावी,असे त्याला कांहीच कळेना.||२६—२७|| अर्थः---तीं अशीं कीं-आरशांत किंवा पाण्यात आपलें प्रतिबिंब दिसत असतांही तेथें आपलें मस्तक न दिसणे,तसेच चंद्र,दीप इत्यादीक ज्योतींच्या व डोळ्यांच्या मध्यें अंगुलीवगैरे दुसरें कांही व्यवधान नसतांही त्या ज्योतींची दोन दोन रूपे दिसणे,||२८|| अर्थः---प्रतिबिंबाचेठिकाणीं चाळणीसारखा छिद्रांची प्रतीती होणें,कान झांकले असतां आंत जो ध्वनि ऐकूं येतो तो प्राणघोष होय,तो ऐकूं न येणे,वृक्षांचेठिकाणीं सुवर्णासारखा पिंवळा वर्ण दिसणें,धुरळा किंवा कर्दम इत्यादिकांमध्यें उठलेली आपली पावलें न दिसणें,हि त्या कंसाने जागेपणीच दुश्चिन्हे पाहिली ||२९|| | स्वप्ने प्रेतपरिश्वंग खरयानं विषादनम् | यायान्नलदमाल्येकस्तैलाभ्यक्तो दिगम्बरः ||३०|| अर्थः---आणि त्यानें स्वप्नामध्यें,प्रतिबरोबर आलिंगन करणें,गर्दभावर बसून जाणें,विष भक्षण करणें व जास =वंदीच्या फुलांची माळा धारण करून अंगालातेल लावून नग्नपणें एकट्याने जाणें हीं दुश्विन्हे पाहिलीं||३०|| अर्थः---अशाप्रकारची दुसरीहि स्वप्नामध्यें व जागृदवस्थेमध्यें मरणसूचक दुश्विन्हें पाहून मरणापासुन भ्यालेला कंस,चिंतेनें निद्रा मुळींच पावलिया नाही.||३१|| अर्थः---मोठ्या कष्टानें ती रात्र निघून गेल्यावर उदकांपासून सूर्याचा उदय झाला असतां,त्या दिवशीही त्या कंसाने मल्लक्रीडारूप मोठा उत्साहच करविला ||३२|| अर्थः---तो असा कीं-कंसाचे सेवक मल्लयुद्ध होण्याचे स्थान अशा त्या रंगमंडपाला झाडून सारवून पुष्पमालादिकांनी अलंकृत करूं लागलें,तुताऱ्या व दुंदुभवगैरे वाद्यें वाजूं लागलिया,पाहणारांस बसावयाची मोठ-मोठी असतें,माळां पताका वस्त्रें व तोरणें यांनी अलंकृत झालिया||३३|| अर्थः---व त्यांवर पुरवासी व देशवासी ब्राम्हणक्षत्रियादिक लोक येऊन बसलें.तसेच जागोजागी मांडून ठेवलेल्या सिंहासनावर राजेही सुखपूर्वक येऊन बसले ||३४|| अर्थः---कंसराजा तर-आपल्या प्रधानमंडळासहवर्तमान मांडलिक राजांच्या मध्यभागीं,दुष्टचिन्हें पाहिल्यामुळे कंपित झालेल्या ह्रदयाने युक्त असता मुख सिंहसनावर येऊन बसला ||३५|| अर्थः---नंतर ज्यामध्यें मल्लांचा ताळ सर्वांपेक्षा मोठ्यानें ऐकूं येत आहे अशीं अनेक वाद्यें वाजू लागलीं असतां,मोठमोठेमल्ल आपापल्या शिक्षक आचार्यसहवर्तमान अलंकृत होऊन,मोठ्या गर्वानें त्या मंडपात येउं लागले ||३६|| अर्थः—ते चाणूर,मुष्टिक,कूट,शल,तोशल इत्यादिक मल्ल,सुंदर वाद्यांचा शब्द ऐकून त्या मल्लभूमीवर आले||३७|| अर्थः---तसेच कंसाने बोलाविलेले नंदगोपादिक गोपही,आणलेल्या भेटी संकल्प समर्पण करून एका बाकांवर बसले||३८|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधांतील पूर्वार्धात मल्लरंगादिवर्णनरूप हा बेचाळीसाव्या अध्याय समाप्त झाला)||४२|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु || दि:--७-९-१९ शनिवार _________________________________________________________________________________________________________ |४३--- किरण २०---श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश---कुवालायापिडाचा—हत्तीचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश---५-- _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या त्र्येचाळीसावा अध्यायामध्ये रामकृष्णांनी कुवलयापीडा हत्तीला मारून रंगमंडपात प्रवेश केला व नंतर श्रीकृष्णाचे चाणूराबरोबर भाषण झालें अशी कथा वर्णन केली आहें) ||१|| | अथ कृष्णश्च रामश्च कृतशौचो परन्तप | मल्लदुन्दुभिनिर्घोषं श्रुत्वा द्रष्टुमुपेयतुः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,नंदादिकांनी रंगमंडपात प्रवेश केल्यावर आम्ही धनुष्याचा भंग व त्याच्या रक्षकांचा वधवगैरे कर्म करून आपलें ऐश्वर्य सूचित केलें असतांही,हा कंस आमच्या आईबापांना सोडीत नाहीं आणि आम्हांलासुद्धां मारण्याची इच्छा करितों म्हणून आतां ह्या मामाचाही वध केला असतां आम्हांला कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाहीं.याप्रमाणे पूर्वदिवशीच ज्यांनी आपल्या आपराधाचा परिहार करून घेतला आहे,ते कृष्णराम,शौचमुखमार्जनवगैरे करून मल्लांचा तालांचा व दुंदुभिचा शब्द ऐकून तें मल्लयुद्ध पाहण्याकरिता रंगमंडपांत जावयास निघाले||१|| भावार्थ:--- कुस्तीचा नगरा जो आहे,त्याचा आवाज ऐकून श्रीकृष्ण आणि बलरामदादा यांनी ऐकिला आणि तिकडे निघाले.||१|| अर्थः---श्रीकृष्ण रंगमंडपाच्या दरवाज्यासमोर,आला तों तेथें असलेला कुवलयापीडनामक हत्ती,हातानें आपल्या अंगावर मोठ्या वेगाने चालविलेला आहे असें त्याच्या दृष्टीस पडलें ||२|| अर्थः---तेव्हां कृष्णानें कमर बांधून व आपले कुरळे केंस हाताने मागे सारून मेघाच्या नादासारख्या गंभीरवाणीनें त्या हाताला म्हटले कीं,-||३|| अर्थः---हे ह्यात,हे ह्यात,आम्हांला मार्ग दे,रस्त्यावरूण एकीकडे हो,विलंब करूं नकोस.तूं मार्ग न देशील त्र आजच हत्तीसहवर्तमान तुला यमाच्या घरीं पाठवून देईन||४|| अर्थः---याप्रामाणे निर्भत्सना केली असतां क्रुद्ध झालेल्या ह्या हातानें,अंकुशादिकेंकरून कोपविलेला व अंत;करणारा मृत्यू,त्याचें निमित्त काल व त्याचा नियंत यम या तिघांचेही काम एकदम करणारा अशा त्या कुवलयापीड हत्तीला,कृष्णाला मारण्याकरितां त्याच्या अंगावर चालविलें ||५|| भावार्थ:--- श्रीकृष्ण यांनी माहुताला धमकवल्यानंतर त्यास क्रोध आला.माहुताने क्रोधाच्या भारत हत्तीला श्रीकृष्णांच्या दिशेने अंगावर सोडले.त्यास असे वाटले कि,हत्ती हा आता श्रीकृष्णांस यास मारून यमसदनाला पाठवितो.त्याला आनंद वाटला.आपण मात्र इतरांना दु:ख न देता सुख देण्याचा प्रयत्न करावा.इतरांचे दु:ख पाहून—ऐकून सुख न होता दु:ख व्हावे.||५|| अर्थः---नंतर त्या हत्तीने मोठ्या वेगानें कृष्णासमोर जाऊन आपल्या सोडेंनें त्यास धरिलें.तेव्हां तो कृष्णही त्याच्या सोंडेतून खालीं पडून त्या हत्तीला मुष्टीनें प्रहार करून त्याच्या पयांमध्ये गुप्त झाला ||६|| भावार्थ:--- कुलायापिड हत्ती हा दारूने धुंद केलेला असल्यामुळे त्याने भगवंतांस मारण्याकरिता घेप घेतली.भगवंतांच्या अंगावर हत्ती येताच भगवंताने त्यास एक ठोस दिली व त्याच्या पायाच्या मधोमध येऊन लपले.त्यामुळे हत्तीला ते दिसेनासे झाले.||६|| अर्थः---तेव्हां कृष्ण दिसत नाहींसा झाल्यामुळें अत्यंत क्रुद्ध झालेल्या,घ्राणेंद्रियानें वास काढून सांडलेली वस्तु शोधून काढणाऱ्या त्या हत्तीनें,आपल्या शुंडेनें कृष्णाचा शोध करून त्यास धरिलें.पुन्हा तो कृष्ण,बलात्काराने त्याच्या सोंडेतून सुटून पाठीमागे गेला||७|| अर्थः---आणि त्यानें अतिबलिष्ठ अशाही त्या गजाला पुच्छाठिकाणीं ग्रहण करून,जसा गरूड सर्पाला धरून अर्कषन करितो त्याप्रमाणे सहज लीलेनें पंचवीस धनुष्यें (१०० हात)मागें आकर्षण केलें ||८|| अर्थः---नंतर तो श्रीकृष्ण,पृच्छ धरणाऱ्या आपण्याला धरण्याकरितां जर तो हत्ती,उजवेकडून वळूं लागला तर त्याला डावेकडे ओढीत आसें आणि जर तो दावेकडून वळू लागला त्र त्याला बलात्काराने उजवेडकडे फिरवीत असें याप्रमाणें डावेउजवेकडे फिरविलेल्या त्या हत्तीबरोबर,जस पुच्छ धरून फिरविलेल्या गोवत्साबरोबर लहान बालक भ्रमण करितो त्याप्रमाणें श्रमण करूं लागला.||९|| अर्थः---नंतर भगवंताने त्या हत्तीचें पुच्छ सोडून त्याच्या समोर येऊन,आपल्या हातानें त्याला प्रहार केला चोहोंकडे धांवतांना पावलोपावलीं त्याला आपणास स्पर्श करूं देऊन,खालीं बसून उठून धांवण्याच्या आपल्या चलाखीनें त्याला वारंवार भूमीवर ठेंचकळून पाडिलें ||१०|| अर्थः---नंतर तो भगवान् धांवण्याच्या लीलेनें हत्तीला फसविण्यासाठी भूमीवर पडून,तत्काळ त्याला न दिसतांच उठून एकीकडे झाला,तेव्हां क्रुद्ध झालेल्या त्या हत्तीनें,कृष्ण भूमीवर पडला असें जाणून गुडघेमिटीला येऊन दातांनी भूमीवर प्रहार केला||११|| अर्थः---तेव्हां आपल्या पराक्रम व्यर्थ झाला असतां अतिक्रुद्ध झालेला व त्यांत हातांनी अंकुश लावून खिजावलेला तो हत्ती क्रोधानें कृष्णाच्या अंगावर धांवला ||१२|| अर्थः---मधुसूदन भगवंताने,येणाऱ्या त्या हत्तीला पाहून हातानें त्याचीं सोंड धरिली आणि त्यास भूमीवर पाडिलें||१३|| | पतितस्य पदाssक्रम्य मृगेन्द्र इव लीलया | दन्तमुत्पाट्य तेनेभं हस्तिपांश्चाहनद्धरी: ||१४|| अर्थः---व पाडिलेल्या त्याचें शरीर पायानें दाबून धरून,जसा सिंह हत्तीला दाबून धरून त्याचें दांत उपटतो त्याप्रमाणे सहज लीलेनें त्याचा दांत उपटून त्यां दातानेंच हत्तीचा व ह्यातांचा वध केला ||१४|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्णांनी त्याला धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने त्यांना –हत्तीला आणि माहुताला यासादानाला पाठवले.त्या महुतास कंस—स्वामी याची अज्ञा असल्यामुळे त्यास ते कृत्य करावे लागले.याकरिता आपण जे तमोगुणी,अधर्माने वागणारे आहेत,त्यांचे स्वामित्व स्वीकारू ने,कारण आपणासही अधर्मानुसार वागावे लागते.म्हणून त्यांचा त्याग करावा.||१४|| अर्थः---नंतर मेलेल्या हत्तीचा त्याग करून हातांत दंत असलेला तो भगवान् रंगमंडपांत जाव यास निघाला,त्यावेळीं खाद्यांवर हत्तीचा दांत ठेवणारा,रक्ताच्याव मदाच्या बिंदूचा सर्व बाजूंनी शरीरार शिटकावा उठलेला व धर्मबिंदू उठलेले मुखकमळ धारण करणारा तो कृष्ण शोभूं लागला ||१५|| अर्थः---हे राजा,त्या एकट्या कृष्णानेच रंगमंडपात प्रवेश केला नाही तर-किती एक गोपांनी परिवेष्टित असे ते उभयंता बंधू रामकृष्ण,हत्तीचे दंत हींच श्रेष्ठ आयुधे धारण करून रंगमंडपात प्रविष्ट झाले||१६|| अर्थः---त्यावेळी शृंगादिक सर्व रसांनी केवळ मूर्तीच असा तो भगवान श्रीकृष्ण,मंडपात असलेल्या सर्वलोकांना त्यांच्या त्यांच्या अभिप्रायनुरूप निरनिराळा भासला तो असा कि,-चानूरमुष्टीकादिक मल्लांना वज्रासारखा (रौद्ररसरूप),मनुष्यांना राजासारखा (अद्भुतरूप)स्त्रियांना मुर्तिमान मदनासारखा(शृंगारसरूप),नंदादिक गोपांना स्वजनासारखा (हास्यरसरूप),दुष्टराजांना शिक्षण करणारा (वीररसरूप),देवकीवसुदेवांना बालकासारखा(करुणारसरूप),कंसाला मृत्युसारखा (भयानकरसरूप),त्याचा प्रभाव न जाणणाऱ्या अज्ञालोकांस मोठाच पराक्रम करणाऱ्यासारखा(भिभत्सरसरूप),योग्यांना परमतत्त्वासारखा (शांतरसरूप)आणि यादवांना परमदेवतेसारखा(भक्तीरसरूप)विदित झालेला तो श्रीकृष्ण,बलरामासहवर्तमान रंगमंडपात प्रविष्ट झाला||१७|| अर्थः---हे राजा,कुवलयापीडनामक हत्ती मारला गेला असे व ते रामकृष्णाही दुर्जय आहेत असे पाहून,त्यावेळी धैर्यवान असाही तो कंस अत्यंत भयभीत झाला||१८|| अर्थः---तेव्हा विचित्र वेश,अलंकार,मला व उत्तमवस्त्रे धरण करून,रंगमंडपात प्रविष्ट झालेले ते महापराक्रमी रामकृष्ण,आपल्या कांतीने पाहणाऱ्या लोकांचे मन आकर्षण करीत असते,जसे सभेमध्ये उत्तमवेश धारण करणारे नत शोभतात तसे शोभूं लागले ||१९|| अर्थः---हे राजा,त्या दोघा उत्तमपुरुषाना अवलोकन करून,मंचावर बसलेले नगरवासी व देशवासी लोक,उत्तम हर्षाच्या वेगाने ज्यांची नेत्रे व मुखे प्रफुल्लीत झाली आहेत असे होऊन,ते आपल्या नेत्रांनी त्यांचे मुख आदराने पाहत असतांही तृप्त झाले नाहीत||२०|| अर्थः---ते लोक,नेत्रांनी जणुं रामकृष्णमूर्तीचे प्रशानच करितात कि काय,जिव्हेने जणुं चाटतातातच कि काय ! नाकपुड्यांनी जणुं हुंगतात कि काय व बाहूंनी आलिंगन करीतातच कि काय? असे दिसूं लागले||२१|| अर्थः---आणि ते लोक,दुष्टी पडलेले त्यांचे रूप,शौर्यादिक गुण,सप्रेमहास्यादिक माधुर्य व प्रौढपणा यांच्या योगाने त्यांच्या पराक्रमाचे स्मरणच करविल्यासारखे होऊन पाहिलेल्या त्या ऐकीलेल्या त्यांच्या लीलांचे परस्पर वर्णन करूं लागले||२२|| अर्थः---ते असे कि,-हे रामकृष्ण,साक्षात हरी नारायनाचे अंश असून येथे वसुदेवाच्या घरी अवताररूपाने प्रकट झाले आहेत||२३|| अर्थः---हा श्रीकृष्ण,देवकीचेठिकाणी उत्पन्न झाला व यास वसुदेवाने गोकुळांत नेऊन ठेविले,तो इतकाळापर्यंत दुसऱ्या कोणास न समजता नंदाच्या घरी वृद्धिगत झाला||२४|| अर्थः---यानेच पुतना राक्षसी मारिली आहे,व चक्रवात दैत्यही मारिला आहे,यमलार्जुन वृक्ष पाडिले आहेत,शंखचूड,केशी,धेनुक व तसेच दुसरेही पुष्कळ दैत्य मारिले आहेत||२५|| अर्थः---यानेच गोपासह गाई वाणव्यांतून सोडविल्या आहेत,कालीय सर्प दमविला व इंद्रही गर्वरहित केला आहे||२६|| अर्थः---या कृष्णाने सात दिवसपर्यंत एका हाताने गोवर्धन पर्वत धारण करून वृष्टी,वारा व विजा यांपासून गोकुलांचे रक्षण केले आहे||२७|| अर्थः---नित्य आनंदित व सुहास्य अवलोकन असलेले याचे मुख पाहणाऱ्या गोपी,श्रमावांचून अनेकप्रकारचे तप आनंदाने तरून गेल्या आहेत||२८|| अर्थः---याने रक्षण केलेला हा यदुराजाचा वंश,पुष्कळ प्रख्यात होऊन,संपत्ती कीर्ती व महत्त्व यांस पावेल||२९|| अर्थः---आणि हा कमलनेत्र व सौंदर्यातिशयाने युक्त असा बलराम,या कृष्णाचाच वडील बंधू.याने प्रलंबासुर,वत्सासुर व जे बकादिक दैत्य ते मारून टाकिले आहेत||३०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे लोक आपआपल्यामध्ये भाषण करीत असतां,व वाद्ये वाजत असतां,ते लोकांचे भाषण सहन न करणारा चाणूरमल्ल,कृष्ण व राम यांना संबोधने देऊन वाक्य बोलिला कि,-||३१|| अर्थः---हे नंदपुत्रा कृष्णा,हे रामा,तुम्ही दोघेही वीर पुरुषांना मान्य व मल्लयुद्धामध्ये कुशळ आहां असे ऐकून तुमचे मल्लयुद्ध पाहण्याची इच्छा धारण करणाऱ्या या कंसराजाने,तुम्हांस येथे बोलाविले आहे||३२|| अर्थः---मानाने कर्माने व वाणीने राजाचे प्रिय करणाऱ्या प्रजा,राजापासून बक्षिसेवगैरे मिळवून कल्याणा पावतात,आणि त्या प्रजा,राज्याच्या मर्जीच्या उलट वागल्या तर राजापासून बंध व मृत्यूवगैरे विपरीत फळे पावतात||३३|| अर्थः---आम्ही मल्लयुद्धांत कुशळ नाहीं असे म्हणाल तर-वत्साचे पालन करणारे गोपबालक व गाई चारणारे गोप,आनंदयुक्त होऊन नित्य मल्लयुद्धाने क्रीडा करीतच वत्स व गाई चारीत असतात असे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे म्हणून तुम्ही मल्लयुद्धामध्ये कुशल आहां यांत संशय नाही||३४|| अर्थः---यास्तव तुम्ही व आम्ही मिळून राजाला प्रिय असलेले मल्लयुद्ध करुया.राजा संतुष्ट झाला असता आम्हांवर सर्वलोक प्रसन्न होतील.कारण,राहा हा सर्वभूताय आहे||३५|| अर्थः---असे ते चानुराचे भाषण ऐकून मल्लयुद्ध आपणास इष्ट आहे असे मानून श्रीकृष्णाने त्या भाषणाला सत्कार केला आणि त्या स्थळी व त्याकाळी योग्य असे भाषण केले कि,-||३६|| अर्थः---अरण्यांत राहणारे आम्ही व नगरांत राहणारे तुम्ही सर्व,या कंस राजाच्या प्रजा असून निरंतर त्याचे प्रिय करीत आहो,म्हणून तो आम्हांस जी आज्ञा करील तो आमच्यावर मोठा अनुग्रहच आहे ||३७|| अर्थः---तथापिआम्ही बालक आहो म्हणून आमची समबली बालकांबरोबर क्रीडा व्हावी,अधिकबळी मल्लाबरोबर होऊं नये.म्हणजे ते यथायोग्य मल्लयुद्ध होईल आणि आणि मल्लांच्या सभासदांना अधर्माचा स्पर्शसुद्धा होणार नाही||३८|| अर्थः---ते ऐकून चाणून पुन्हा म्हणाला कि कृष्णा,ज्या तूं हजार हत्तीचे बळ असलेलाहत्ती सहज लीलेने मारिलास तो तूं बालक किंवा किशोर मुळीच नाहीस,तसाच बलरामही बाल किंवा किशोर नाही म्हणून तुमच्याबरोबर,बलाढ्य,यांत मुळीच अन्याय नाही.यास्तव तूं माझ्यावर आपला पराक्रम चालीव.मुष्टिक,बळरामाबरोबरमल्लयुद्ध करूं दे.||३९-४०|| | (याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराण दशमस्कंध पूर्वार्धामध्यें रंगभूमिप्रवेशनिरुपण हा त्र्येचाळिसावा अध्याय समाप्त झाला ||४३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| _________________________________________________________________________________________________________ |४४---किरण २०---श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश---चाणूर व मुष्टिक यांचा उद्धार---६--- _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या चव्वेचाळीसाव्या अध्यायांत,रामकृष्णांनी केलेलें मल्लांचे व कंसादिकांचे मर्दन,कंसाच्या स्त्रियांचे सात्वन व आईबापांचे घेतलेले दर्शन वर्णन केले आहे )||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:-- हे राजा,याप्रमाणे चानुरादिकांच्या वधाचा निश्चय करणारा भगवान् मधुसूदन श्रीकृष्ण,चानुराबरोबर युद्ध करण्याकरीतासिद्ध झाला.तसाच बळरामहि मुष्टीकाबरोबर युध्द करण्यास तयार झाला.तेव्हां ते कृष्णचानुर व बलमुष्टिक,हातांनी हातांना धरून व पायांनी पायांना विळखे घालून एकमेकांना जिंकण्यसाठी बलत्काराने एकमेकांचे आकर्षण करूं लागले ||२|| अर्थः---आपल्या अरत्नींनी (एका कनिष्ठागुळीवाचून मूठ केलेल्या हातांनी )दोन्हीं अरत्नीना,गुडघ्यांनी गुडघ्यांना व मस्त्कानें मस्तकाला परस्पर प्रहार करूं लागले|||३|| अर्थः---हातांत धरून सभोवर फिरविणें,दूर लोटून देणें,बाहूंनी आंवळणें,खालीं पडणें,दुसऱ्याला मागें टाकून आपण पुढें जाणें,व मागाहून जाणें याप्रकारांनी ते कृष्णचाणूर व राममुष्टिक परस्पर मल्लयुद्ध करूं लागलें ||४|| अर्थः---पाय व गुडघे एकठिकाणी करून पडलेल्याला वर उचलणें,हातांनी उचलून नेणें,गळ्याला मिठी घातलेल्यास दूर लोटून देणें आणि पाय व हात एकाठिकाणीं आंवळून धरणें,याप्रमाणे जय मिळविण्याची इच्छा करणारे ते एकमेकांच्या देहांना अपकार करूं लागले||५|| अर्थः---हे राजा,त्यावेळीं थव्याथव्यांनी जमलेल्या व कृष्णविषयक दयेनें युक्त अशा सर्व स्त्रियांनी,एकीकडून बळयुक्त व दुसरीकडून बळहीन असलेलें टी युद्ध पाहून,परस्पर म्हणाल्या किया-||६|| अर्थः---या राजाच्या सभासदांचा हा मोठा अधर्म आहे.ज्या सभासदांनी कमी व जास्तीं बाळांनी युक्त असलेले युद्ध,राजा जर पाहिलं तर त्यांचे निवारण करावें;टी न करितां हेच सभासद तें युद्ध,राजा पाहत असतां आपणही पाहण्याची इच्छा करितात ||७|| अर्थः---ज्यांचे सर्व अवयव व्रजासारखे कठीण आहेत असे हे मेरूपर्वतासारखे मोठे चाणूर व मुष्टिक मल्ल कोठें!आणि अतिसुकुमार अवयव असलेले व यौनावस्थासुद्धां प्राप्त न झालेलेले रामकृष्ण कोठें!!||८|| अर्थः---यावरून या सभेच्या हातून हें धर्माचें उल्लंघन खरोखर होणार आहे.ज्या सभेमध्यें अधर्म प्रवृत्त होतो तेथें शहाण्या मनुष्यानें कधीही बसूं नये ||९|| अर्थः---सभासदांचे दोष जाणणाऱ्या बुद्धिमान् पुरुषानें आदीं सभेंमध्येंच जाऊं नयें.कारण,तो मनुष्य जर सभासदांचे दोष जाणूनही न बोलेल किंवा सभासदांच्या संतोषार्थ धर्मपक्षांचा उलट बोलेल,अथवा विचारिले असताही मी जंत नाहीं असें म्हणेल तर त्याला पाप लागेल.||१०|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या:---कीं,चोहोकडून धांवणाऱ्या श्रीकृष्णाचे मुखकमळ,जसा उदकाच्या बिंदूंनी व्याप्त झालेला कमळाचा कळा दिसतो त्याप्रमाणें श्रमोडकांनी व्याप्त झालेले दिसत आहे पहा! ||११|| अर्थः----अन्य म्हणाला:----अहो !थोड्या लाल झालेल्या नेत्रांनी युक्त,मुष्टिकावर क्रोध युक्त झालेलें परंतु हास्याच्या आवेशानें शोभायमान दिसणारे बळरामाचें मुख तुमच्या दृष्टीस पडत नाहीं काय?पडतच आहे ||१२|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या-या सभेला धिक्कार असो,ज्या सभेमध्यें या श्रीकृष्णाचा पराभव होत आहे,गोकुळसंबंधी भूमि धान्य आहेत.ज्यांचेठिकाणी शंकर व लक्ष्मी यांनीसुद्धा,ज्याचें चरणाचें पूजन केलें आहे असा हा श्रीकृष्ण,मनुष्यशरीरानें गुप्त असा साक्षात् पुराणपुरुष असतंही वनांतील तरतऱ्हेच्या रंगाची फुलें धारण करून बळरामासहवर्तमान गाई रक्षण करीत,मुरली वाजवीत व अनेकप्रकारच्या क्रीडा करीत संचार करितो ||१३|| अर्थः---ही मोठी दुःखाची गोष्ट कीं,आम्हीं अगदी अल्पपुण्य अहों,म्हणून या कृष्णाच्या दुःखस्थितीच्या वेळीं यांचें आम्हांस दर्शन झाले अहो!त्या गोपींनी जन्मांतरी काय बरें तप केलें होतें?ज्या गोपी,या श्रीकृष्णाचें स्वरूप कीं,ज्याच्यासारखे किंवा अधिक जगतामध्यें दुसर्या कोणानेंच सौंदर्य नाहीं असें सौदर्याचें सार स्वतः सिद्ध,यश,लक्ष्मी आणि ऐश्वर्य यांचे एकांतस्थत्तन,पुण्यवंतांखेरीज,पाहण्याससुद्धां दुर्लभ व दररोज नव्यासारखे वाटणारे टी स्वरूप,नेत्रांनी जणुं प्राशन करितात किया काय!अशा अतिशय अस्क्तीनें पाहतात ||१४|| अर्थः---ज्या गोपी,गाईंची दूध काढतांना,तांदूळवगैरे कांडतांना,तांदूळवगैरे कांडतांना,दह्यांचे मंथन करितांना,सरवितांना,मुलांना झोप्यां काढतांना,रडत असलेल्या मुलांचे सांत्वन करितांना व सडासंमार्जवगैरे करितांना अनुरक्तचित्त व सद्गतिकंठ होऊन या कृष्णांचे गायन करितात.तेव्हां घराची सर्व कामें कारेईत असतंही श्रीकृष्णकडे चित्त असलेल्या त्या गोकुळवासी स्त्रिया धन्य होत ||१५|| अर्थः---आणि ज्यो गोपी,गाईंसहवर्तमान प्रातःकाळीं अरण्यांत जाणाऱ्या व सायंकाळी मुरली वाजवीत गोकुळांत येणाऱ्या त्या श्रीकृष्णाचा वेणुनाद शरण करून घरांतून त्वेरेनें बाहेर निघून मार्गाचेठिकाणी या श्रीकृष्णाचे दयादृष्टियुक्त व मंदहास्यसहित मुख अवलोकन करितात.||१६|| अर्थः---हे राजा,याप्रमाणें स्त्रिया भाषण करीत असता,भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या त्या भगवान् श्रीकृष्णाने,शत्रूचा वध करण्याचें मनांत आणिलें ||१७|| अर्थः---तेव्हां भयसहित आशिया तीं स्त्रियांची भाषणें ऐकून,पुत्रांचे सामर्थ्य न जाणणारे देवकीवसुदेव,पुत्रस्नेहानें झालेल्या शोकानें व्याकूळ होऊन पाप पावले.||१८|| अर्थः---असो.याप्रमाणें जसे कृष्णचाणूर एकमेकांना फिरविनेंवगैरेत्या त्या आणणाप्रकारच्या युध्दप्रकारांनी परस्पर युद्ध करीत होते तसेच बलराम व मुष्टिक हेहि परस्पर युद्ध करीत होते||१९|| अर्थः---तेव्हां व्रजाच्या प्रहारासारखे असह्य जे भगवंतांच्या अवयवांचे प्रहार त्यांच्यायोगानें अवयवांच्या खिळखिळ्यां होऊं लागलेला तो चाणूर वारंवार ग्लानता पावूं लागला ||२०|| अर्थः---त्यावेळीं क्रुद्ध झालेल्या व शयेन पक्ष्यासारखा वेग असलेल्या त्या चाणूरानें,आपल्या दोन्हीं हातांच्या मुठी करून त्यांनीं एकदम उडी टाकून,भगवान वासुदेवाच्या वक्षस्थळांवर प्रहार केला||२१|| याप्रमाणें त्यानें ताडन केलें असताहि त्याच्या प्रहरनेअ तो श्रीकृष्ण जसा मालेनें ताडन केलेला हत्ती हलत सुद्धा नाहीं त्याप्रमाणे हलला सुद्धा नाही तर त्याने झटकन त्या चानुराला बाहूंचे ठिकाणी धरून बहुतवेळ गरगर फिरवून त्या फिरवीण्यानेंच क्षीनायुशी झालेल्या त्याला भूमितळावर आपटिले;तेव्हां तो चाणूर,अंगावरील भूषणें व केंस असताव्यस्त होऊन,जसा गौडदेशामध्यें एका उत्सांवत ध्वजपतादिकांनी अलंकृत असा एक पुरुषाकृती मोठा ध्वज,उभारितात तो कांही कारणानें एकाएकी पडतो त्याप्रमाणे भूमीवर पडला ||२२-२३|| अर्थः---तसाच मुष्टिकमल्लहि,ज्यानें पाल्य मुष्टीनें प्रथम बळराजाला ताडण केलें होते त्यास,त्याच बलाढ्य बळरामाने हाताच्या चपाटीनें ताडन केले असतां तो अत्यंत पीडित व कंपित होऊन मुखांतून रक्ताच्या गुळण्या टाकीत,जसा प्रचंड वार्याने उप्त्लेला वृक्ष पडतो त्याप्रमाणे भूमीवर गतप्राण होऊन पडला ||२४-२५|| अर्थः---हे राजा,नानात्र अंगावर आलेल्या कूटनामक मल्लाला,योद्धांमध्यें श्रेष्ठ अशा त्या बळरामानें अवज्ञापूर्वक सहज लीलेनें डाव्या मुठीनें मारून टाकिलें ||२६|| अर्थः---त्याचवेळी श्रीकृष्णाच्या पायांच्या प्रहाराने शलनामक मल्लांचे मस्तक फुटून गेलें व तोशकल मल्लांची कृष्णानें चिरून दोन शकले केलीं.अशाप्रकारें तें दोघेही मल्ल करून पडले ||२७|| अर्थः----याप्रमाणे चाणूर,मुष्टिक,कूट,शल आणि तोशलक हे मुख्य मल्ल मरण पावले असतां,शेष राहिलेले सर्व माल आपले प्राण वांचण्याची इच्छा धरून पळून गेले ||२८|| अर्थः---नंतर ते रामकृष्ण,समवयांच्या गोपांना त्या आखाड्यावर बोलावून,त्यांचे हात धरून त्याचें आकर्षण व आलिंगन वगैरे करून वाद्यें वाजत होती त्यांच्या तलाप्रमाणें नृत्यादिक करून पायांतील नुपूरांचा शब्द करीत असते त्यांच्याशी मल्लयुद्धक्रीडां करं लागले ||२९|| अर्थः---त्या वेळी एका खंसाखेरीज जे ब्रम्हाणादिक सर्वजन तेथें होते ते चांगले झालें,चांगले झालें असें म्हणत त्या रामकृष्णाच्या युद्धकर्मानें हर्ष पावले||३०|| अर्थः---याप्रमाणे मल्लांतील मुख्य जे चाणूर मुष्टीकादिक ते मरण पावलें असता व शेष राहिलेले पळून गेले असतां,भोजराज कंसाने,वाजविण्यास सांगितलेंली आपलीं वाद्यें बंद करून,आपल्या सेवकांस असें वाक्य सांगितलें कीं,-||३१|| अर्थ:---ह्या दुराचारी रामकृष्णांना नगरांतून बाहेर घालवू द्या;गोपांचे धन हरण करा;माझ्या वैऱ्यांचे संगोपन करणाऱ्या दुर्मति नंदाला कैत करा.||३२|| अर्थः---तसेंच पुत्रांना चोरून दुसरेठिकाणी नेवून ठेविल्यामुले अतिदृष्ट व दुर्बुद्धी अशा वसुदेवाला,तुम्ही लवकरच मारून टाकावें तसाच शत्रूपक्षाला अनुसरणारा पिता उग्रसेनही अनुचरांसहवर्तमान मारून टाकावा||३३|| अर्थः---याप्रमाणे कंस बडबडूं लागला असतां,अत्यंत क्रुद्ध झालेला अविनाशी तो श्रीकृष्ण,लाघिमासिद्धीच्या आश्रयानें उडी मारून त्वरेनें उंच असलेल्या त्याचा मंचकावर आरूढ झाला ||३४|| अर्थः---त्या आरोहण करणाऱ्या आपल्या मृत्यूरुपी श्रीकृष्णाला पाहून त्या धैर्यवान् कंसाने,असणा वरून त्वरेनें उठून हातामध्यें ढाल व तलवार ग्रहण केली |||३५|| अर्थः---त्यावेळीं असह्य व उग्र तेज असलेल्या त्या भगवान् श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने,हातांत तलवार घेऊन उजवीकडे,डावीकडे व वर आकाशामध्यें श्येनपक्ष्याप्रमाणे त्वरेनें भ्रमण करणाऱ्या त्या कंसाला,जसा गरूड बलात्कारानें सर्पाला धरितो त्याप्रमाणे धरिलें ||३६|| अर्थः---तेव्हा धरण्याच्या योगानेच किरीट एकीकडे पडलेल्या त्या कंसाला केसांचे ठिकाणी धरून,त्या उंच मंचकावर खाली रंगमंडपावर पाडिले आणि त्याच्यावर सर्व जगाचा आश्रय व स्वतंत्र असा तो भगवान स्वतां पडला||३७|| अर्थः---नंतर श्रीकृष्णाचे मरण पावलेल्या कंसाचे सर्वलोकांच्या देखत भूमीवर,जसे सिंहाने हत्तीचे आकर्षण करावे त्याप्रमाणे आक्र्श्नकेले.हे राजा,त्यावेळी सर्व लोकांनी उच्चारीलेला मोठा हाहाकार शब्द झाला||३८|| अर्थह---तो कंस,प्रतिदिवशी आठही प्रहर भयभीत झालेल्या बुद्धीने,त्याच चक्रधारी ईश्वराचे खातांना,पितांना,बोलतांना,चालतांना,निजतांना व श्वासोच्छ्वास टाकताना,अग्रभागी अवलोकन करीत असल्यामुळे शेवटी त्याच्याच दुर्लभ स्वरूपाप्रत पावला||३९|| अर्थः---त्या कंसाचे कंक,न्यग्रोध इत्याद्दिक आठ कनिष्ठ भाऊ होते ते अतीकृध होऊन,श्रात्या कंसाचे उतराई होंन्याकारिता कृष्णाच्या अंगावर धांवून आले||४०|| तेव्हा तशा अतिवेगाने युद्ध करण्याकरिता उद्दुक्त होऊन आलेल्या त्या कंसबंधूंना,बलरामाने तेथे असलेला एक परीघ उचलून त्याच्या वेगाने,जसा सिंह पशूंना मारून टाकितो त्याप्रमाणे मारून टाकिले||४१|| अर्थः---त्यावेळी स्वर्गलोकी,देवानी वाज्विलेले दुंदुभी वाजूं लागले,तशाच ब्रम्हादेवशंकर प्रभूती ईश्वराच्या विभूती,संतोषाने कृष्णारामावर पुष्प वृष्टी करून प्रश्नासा करूं लागल्या व अप्सरा नृत्य करूं लागल्या||४२|| अर्थः—हे महाराजा,त्या कंसादिकाच्या स्त्रिया आपल्या पतीच्या मरणाने दुःखित होऊन आपली मस्तके बडवून घेत व नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत तेथे प्राप्त झाल्या||४३||अर्थः---आणि वीरशय्येवर निजलेल्या आपापल्या पतींना आलिंगन करून शोक करणाऱ्या त्या स्त्रिया,वारंवार दुःखाश्रू ढाळीत सुस्वर विलाप करूं लागल्या कि,-||४४||अर्थः---हा नाथ !हा प्रिया!हा दयालो!हा अनाथवत्सला !तूं मरण पावलास त्याच्या योगाने आम्ही घरे व पुत्रादिकांसहवर्तमान मेल्यासारख्या झालो आहो ||४५||अर्थः---हे पुरुषश्रेष्ठा,तुज पतीवांचून जशा आम्ही उत्साह व मंगलरहित झालो आहो त्याप्रमाणेच हि मथुरा नाग्रीही उत्साह व मंगल रहित होऊन शान्भत नाहीशी झाली आहे ||४६||अर्थः---हे प्राणप्रिया,तूं निरपराधी प्राण्यांचा मोठा भयंकर जो द्रोह केलास त्याच्या योगाने हि अशी दशा पावला आहेस.प्राणीमात्रांचा द्रोह करणारा कोण बरे पुरुष सुख पावणार आहे ? कोणीच पावणारा नाही ||४७||अर्थः---हा श्रीकृष्ण,संपूर्ण प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा,संहार करणारा व रक्षण करणारा आहे,त्याच्याशी द्रोह करणारा पुरुष कोठेही सुखाने वृद्धिगत होणारा नाही ||४८||अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणे भाषण करणाऱ्या त्या राजस्त्रियांचे,लोकांचे पालन करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने,आश्वासन करून,नंतर हात झालेल्या त्या कांसादिकांची जी आर्ध्वदैविक क्रिया सांगितलेली आहे ती सर्व करविली||४९|| अर्थः---नंतर त्या रामकृष्णांनी देवकी मातेला व वसुदेव पित्याला बंधनातून मुक्त करून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले||५०||अर्थः---तेव्हा त्यादेव्की वसुदेवांनी,वंदन करणाऱ्या त्या रामकृष्ण पुत्रांना पुत्रभ्रांती टाकून हे जगदीश्वर आहेत असे मानिले आणि त्यास आलिंगन केले नाही,तर शंकायुक्त होऊन त्याच्या पुढे ती उभयंता हात जोडून उभी राहिली||५१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धात कंसवधनिरुपणनामक हा चव्वेचाळीसावा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________|४५--- किरण २०--- श्रीकृष्ण-बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश---९--- _________________________________________________________________________________________________________ (आता ह्या पंचेचाळीसावा अध्यायमध्यें श्रीकृष्णाने देवकी वसुदेव आणि नंदादिक गोप यांचें सांत्वन करून,उग्रसेनाला राज्यभिषेक केला;तसाच गुरूच्या घरीं वास करून सर्व विद्या शिकून पुन्हा मथुरेंमध्यें आगमन केलें,अशी कथा वर्णन केली आहे ||१||) | पितरावुपलब्धार्थो विदित्वा पुरुषोत्तमः | मा भूदिति निजां मायां ततान जनमोहीनिम् ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,पुरुषोत्तम भगवंताने,देवकीवासुदेवांनां,आपल्यावर पुत्रबुद्धि असल्यानें प्राप्त होणाऱ्या संसारीक परमसुखभोगाच्या पूर्वीच,आम्ही दोघेहिं सर्वेश्वर आहों असें ज्ञान झालें हें पाहून,व मी प्रसन्न असतां यांना ज्ञान म्हणजे काय दुर्लभ आहे नाहीं?तर माझेठिकाणी पुत्रभावानें प्रेमच दुर्लभ आहे.असें जाणून आताचं त्यांना टी ज्ञान होऊं नये म्हणून सर्वजणांना मोह करणारी आपली माया त्यांच्यावर पसरली ||१|| भावार्थ:--- भगवंतांना पूर्वजन्मात देवकी व वासुदेवांनी असा वर मागितला होता कि,”आपल्यासारखा पुत्र आम्हास व्हावा.”भगवंतांनी त्यांना त्या वराबद्दल होकार दिला होता.म्हणून भगवंतांनी विहार केला कि.”माझ्यासारखे मी सोडून इतर कोणीच नाही.म्हणून यांची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्या पोटी मलाच जन्मावे लागेल”म्हणून भगवंतांनी त्या कारणासाठी व इत्तर कारणासाठी यांचे पुत्र म्हणून जन्मास आले.पुत्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर मायाद्वारे पुत्र मोहाचा प्रभाव टाकला.वासुदेव व देवकिंना पुत्रभाव—मोहभाव निर्माण झाला व त्यामुळे पुत्रभावाने स्नेह करून आनंद घेऊ लागले.आपण या जन्मात भगवंतांचे निष्काम भक्ती करून भगवंतांचे प्रिय भक्त होता येऊन जन्ममरण निवृत्त करता येते.यासाठी सत्संग करावा लागतो.||१|| | उवाच पितरावेत्य साग्रजः सात्वतर्षभः | प्रश्रयावनतः प्रीणन्नम्ब तातेती सादरम् ||२|| अर्थः--- ती अशी कि,-बलरामासहित यादवश्रेष्ट तो श्रीकृष्ण मोहित झालेल्या त्या देवकीवासुदेवाजवळ जाऊन ,विनयाने नम्र होऊन मोठ्या आदराने –हे मते हे ताता ,अशी संबोधने देवून म्हणाला कि -||२|| भावार्थ:---श्रीकृष आणि बलरामदादा आई—वडिलाकडे जाऊन आदरपूर्वक विनम्रभावाने “बाबा !आई !असी हक करू लागले.प्रेमाने हक मारल्यामुळे वासुदेव व देवकींना आनंद होऊ लागला.असेच आपण आपापल्या आई—वडिलांना प्रेमपूर्वक आई आणि बाबा—दादा म्हणून आपापल्या आई—वडिलांना आनंद देणे आपले कर्तव्य आहे.त्यात आपल्याला व आई—वडिलांनाही आनंद मिळू शकतो.||२|| अर्थ:-----हे ताता ,तुम्ही उभयंता आम्हा पुत्राकरिता निरंतर उत्कंठीत असूनही तुम्हाला आम्हांकडून बाल्य,पौगंड व कैशोर या अवस्थामध्ये प्राप्त होणारी सुखे मुळीच प्राप्त झाली नाहीत||३|| भावार्थ:--- भगवंतांना जन्मास आल्याबरोबर जन्मास आल्याबरोबर गोकुळास जावे लागले,म्हणून बालय,पौगंड आणि किशोर अवस्थांचे सुख देऊ शकले नाही,कारण कंस याची भीती असल्यामुळे या दोघानंही गोकुळात राहावे लागले होते.आपण सुदैवाने जेथे जन्म हाल तेथेच असतोत.म्हणून आपण बाली,पौगंड व किशोर अवस्थेत आई—वडिलांना सुख देण्याचा प्रयत्न करावा.||३|| अर्थः---केवळ तुमच्याच सुखाची हानी असे नाही,तर प्रारब्धहीन अशा आमच्याही तुमच्याजवळ वास घडला नाही,त्यामुळे आईबापांच्या घरी व त्यांनी लालनपालन केलेले बालक,जो आनंद पावतात तो तुमच्यापासून आम्हांला मिळाला नाही||४|| भावार्थ:--- श्रीकृष्ण व बलरामदादांना आई—वडिलांचा जो बालस्नेह आहे,लाड जो आहे,प्रेम जे आहे ते मिळाले नाही,म्हणून त्यांना दु:ख होत आहे.आपणास मात्र आई—वडिलांचे सुख—स्नेह—लाड मिळाले आहे,म्हणून आई—वडिलांना दु:ख न देता सुख भोगावे||४|| | सर्वार्थसम्भवो देहो जनितः पोषितो यतः | न तयोर्याती निर्वेशं पितोर्मर्त्य: शतायुषा ||५|| अर्थः---आणि तुमच्या शुश्रुशेच्या लोपाने आमचे धर्महानीही झाली आहे,कारण,सर्व पुरुषार्थांना संपादन करणारा देह ज्यांनी उत्पन्न केला व पोषण केला त्या मतपितारांचे ऋण फेडणे हे मनुष्याच्या हातून वांचनुही घडत नाही||५|| भावार्थ:--- आपल्याला माता—पिता यांच्यामुळेच स्थूल शरीराचा जन्म प्राप्त झालेला आहे.त्यांनी कष्ट घेऊन गर्भात व गर्भाच्या बाहेर आल्यानंतर लहानाचे मोठे करत असतांना अतोनात कष्ट घेतलेले आहेत.म्हणून त्या कष्टांचे ऋण फेडण्यासाठी आपल्या शरीरात प्राण आहेत,तोपर्यंत कितीही कष्ट घेतले तरी फितू शकत नाहीत.म्हणून आपल्या शरीरात प्राण आहेत,तोपर्यंत त्यांचे पालन—पोषण प्रेमपूर्वक करावे.आज—काळ आपण समाजाकडे नजर जर टाळली तर असे दिसून येत आहे कि,मुलांचा नोंदणीकृत विवाह किंवा शुभ विवाह पार पडल्यानंतर आई—वडिलांना आपल्यासोबत न ठेवता,ते वेगळ्या ठिकाणी व विवाहित मुलगा वेगळ्या ठिकाणी,अन्य मार्ग नाही,म्हणून दु;खात जीवन कंठत आहे.म्हणून विवाहित मुलाने असे करणे म्हणजे आई—वडिलांना कृतघ्न—अधर्म करणे आहे.यामुळे सामाजिक अहित,वैयक्तिक अहित,कौटुंबिक व आपल्या—मुलाच्या मृत्युनंतर यामापुरीतील दु:ख भोगावे लागते.मुलांनी म्हातारपणी आई—वडिलांचे पालन—पोषण न केले तर सत्ताधीस शासनकर्त्यांनी अशा प्रकारच्या मुलांना आई—वडिलांच्या मालमातेत—प्रोपेर्त्य यात मुळीच अधिकार नसावा असा कायदा करावयास हवा.त्यामुळे तरी आई—वडिलांची सेवा करतील.त्यामुळे वयस्क आई—वडिलांना सुख मिळेल व दु:ख मिळणार नाही.ज्या आई—वडिलांना मालमता---परंतु नाही अशा मुलांना कारागृहात बंदिस्त ठेवावे.असा कायदा असल्यामुळे तो मुलगा आई—वडिलांचे पालन—पोषण करेल.||५|| | यस्तयोरात्मजः कल्प आत्मना च धनेन च | वृत्तिं न दद्दात्त्मं प्रेत्य स्वमांसं खाद्यान्ति हि ||६|| अर्थः---त्यामध्ये,जो पुत्र,समर्थ असूनही आपल्या देहाने आपल्या देहाने व धनाने त्या आईबापांची अन्नवस्त्रादिकेकरून जीविका चालवीत नाही.त्या पुत्राकडून परलोकी यांचे दूत त्याचेच मांस खाववितात||६|| भावार्थ:--- आपापल्या सामर्थे--अधिकार—योग्यतानुसार जो आपल्या आई—वडिलांची—मातापित्यांची प्रेमपूर्वक सेवा न केल्यामुळे त्याच्याकडून अधर्म घडतो.त्या अधर्मामुळे त्या मनुष्याला आई—वडिलांची—मातापित्यांची सेवा न केल्यामुळे त्यास मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस त्यालाच खाऊ घालतात.मृत्युलोकातील शरीर स्थुलशरीर सुटल्यानंतर यमदूत त्याला ज्या शरीरात टाकून नेतात त्या शरीराचे मांस खाऊ घालतात.त्यानंतर त्यास त्याच्या कर्मानुसार त्यास असह्य शिक्षा करतात.ती असह्य शिक्षा भोगल्यानंतर त्यास लक्ष चौऱ्याऐंशी योनीस कर्मांचा भोग भोगण्यासाठी पाठवतात.म्हणून आपण अधर्मानुसार न वागता धर्मानुसार वागावे.त्यातच आपले हित आहे—त्यातच आपले सुख आहे.धर्म—अधर्म कळण्याकरिता संत—महात्मा यांची संगती करावी.||६|| | मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् | गुरुं विप्रं प्रसन्नं च कल्पोsबीभ्रच्छ्वसन् मृतः ||७|| अर्थ:---आणि जो पुत्र,समर्थ असून वृद्ध अशा आईबापांचे,पतिव्रता स्त्रीचे,लहान पुत्रांचे,गुरुचे,ब्राम्हणांचे व शरणागटाचे रक्षण करीत नाही तो जिवंत असून मेल्यासारखाच होय||७|| भावार्थ:--- ज्याचे त्याचे सामर्थे नसले तरी,तो ज्या अवस्थेत—परिस्थितीत राहील,त्याच परस्थितीत मत—पिता,पतिव्रता पत्नी,लहान मुले,गुरु,ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालन—पोषण आपापल्या परिस्थितीनुसार करावे.त्याने पालन—पोषण न केले तर अधर्म होतो.अधर्माचे फळ ज्याला—त्याला भोगावेच लागते.म्हणून स्वधर्माचे पालन—पोषण परिस्थितीनुसार करावेच.||७|| अर्थः---यास्तव,तुम्हा उभायांताचा सत्कार न करणाऱ्या आमच,हे अकरा वर्षांचे दिवस व्यर्थच निग्फ्हून गेले आहेत.याचे कारण,आज पर्यंत आम्ही कान्सापासून नित्य उद्विग्नचित्त असल्यामुळे तुमचे रक्षण करण्यास समर्थ झालो नाही||८|| भावार्थ:--- भगवंत लाहात वयात त्यांच्याच आई—वडिलांनी त्यांना गोकुळात नंदाबाबाकडे सुरक्षित राहावेत म्हणून पालन—पोषणासाठी ठेवले होते.म्हणून ते आतापर्यंत आई—वडिलांची सेवा करू शकले नाहीत.म्हणून आई—वादिलासमोर खेद—दु:ख व्यक्त करतात.तसा कांही प्रसंग आलानंतर आपणही खेद—दु:ख व्यक्त करावे.एकंदरीत आई—वडिलांचे सेवा करणे कर्तव्याच आहे.||८|| अर्थः--- हे तट,हे मते,दुष्ट बुद्धी कंसाने दुःख दिलेल्या व बंदीगृहांत कोंडून ठेवलेल्या तुमची शुश्रुषा करण्याच्या वेळीही शुश्रुषा न करणाऱ्या आमच्या अपराधांची आता तुम्ही आई बाप असल्यामुळे क्षमा केली पाहिजे||९|| भावार्थ:--- बलरामदादा आणि श्रीकृष्ण लहानवयात त्यांना आई—वडिलांची सेवा न केल्यामुळे त्यांना क्षमा मागतात.तसेच कंस याने तुम्हास अतिशय कष्ट आमच्यामुळे दिले.त्यामुळे आपणास अतीव दु:ख सहन करावे लागले.असा खेद-दु:ख व्यक्त करतात. त्याप्रमाणे आपणाकडून कांही अपरिहार्य कारणास्तव सेवा जर सेवा न घडली तर पश्चाताप व्यक्त करावयास पाहिजे.||९|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,मायेने अम्नुष्यरुपी परंतु जगाचा अंतर्यामी अशा श्रीकृष्णाच्या या प्रकारच्या वाणीने मोहित झालेले ते देवकी वसुदेव,त्या रामकृष्णांना मांडीवर बसवून घेऊन व आलिंगन करून आनंद पावले||१०|| भावार्थ:--- वसुदेव व देवकीने बलरामादादा व श्रीकृष्ण यांची ही नम्रतेची वाणी ऐकून,मोहित होऊन त्यांना आपल्या मांडीवर प्रेमाने घेतले.त्यामुळे त्यांना परमानंद प्राप्त झाला.आपणासही आपल्या माता—पित्यांनी प्रेमाने घेतले तर,आपणास प्रेम मिळेल.||१०|| अर्थः---आणि त्यावेळी हे राजा,अश्रूंच्या धारांनी त्यांचे सेवन करणाऱ्या,त्याच्या मायेने मोहित झालेल्या,स्नेह्रूप पाशाने बंध पावलेल्या व सद्गतीतकंठ झालेल्या त्या देवकी वसुदेवांनी,कांहीच भाषण केलेलं नाही||११|| अर्थः---याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने देवकी वसुदेवांचे सात्वन करून,नंतर मत श उग्रसेनाला यादवांच्या मुख्य गादीवर अभिषेक केला||१२|| भावार्थ;--- अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा यांनी आई—वडिलांचे सांत्वन करून उग्रसेन यांना मथुरेचे—यादवांचे राजा केले.वास्तविक पाहता मथुरेचे राजा स्वत: होऊ शकत नव्हते,तरी पण सत्ता स्वत:कडे घेऊ शकत होते.श्रीकृष्णांनी सत्ता व राजा हे पद उग्रसेनाकडेच ठेऊन राज्यकारभार त्यांच्याकडेच ठेवला.आपणही कोणाचेही योग्य कार्य करून त्यांनाच ते देणे आपलाही धर्म ठरतो.यत्किंचितही आपणास मोह किंवा लोभ होऊ नये.तेव्हा आपल्या जीवनात आपण सुखाकडे जाऊ शकतो.||११|| अर्थः---आणि त्याप्रत भाषण केले कि,-हे महाराज,आपण आम्हा सेवकांना व सर्वप्रजानां आज्ञा करण्यास समर्थ आहा.आता तूच प्रजानां आज्ञा कर असे म्हणाल तर-ययाती राजाच्या शापाने यादुच्या वंशातील लोकांनी सिंहासनावर बसता कामा नये,तुम्हांला तर यादतत्त्व असले तरी माझ्या आज्ञेने दोष नाही||१३|| | मयि भृत्य उपासीने भवतो विबुधादयः | बलिं हरन्त्यवनताः किमुतान्ये नराधीपाः ||१४|| अर्थः---मला तशी शक्ती नाही असे म्हणाल तर-मी सेवक आपली सेवा करीत असता देवडी क्सुद्धा नम्र होऊन आपणास पूजा समर्पण करितील,मग दुसरे राजे कारभार समर्पण करतील यांत नवल काय !||१४|| अर्थः---नंतर,त्या विश्वकर्त्या भगवंताने,कंसाच्या भयाने व्याकूळ होऊन सर्व दिशांकडे पळून गेलेल्या आपल्या-यादव,वृष्णी,अंधक,मधु,दाशार्ह,कुकुर इत्यादिक सर्व ज्ञातींना व संबंध्यांना त्या त्या दिशांकडून आणवून प्रवासामध्ये वास केल्यामुळे कृश झालेल्या त्यांचे सांत्वन करून व वस्त्रकृष्णांच्याच दानाने संतुष्ट करून त्यांना आपआपल्या गृहामध्ये राहविले||१५-१६|| भावार्थ:--- जे कंस याच्या भीतीमुळे देशोधडीला—मथुरा सोडून अन्य ठीकाणी गेले होते,त्यांना परत मथुरेला बोलावून धन देऊन स्थाईक केले.त्याचप्रकारे कांही कारणास्तव आपल्या देशातील कांही कांही कारणास्तव बाहेरच्या देशाला गेले असतील व त्यांना परत येण्याची इच्छा असेल,तर त्यांना आपल्या देशात स्थाईक करावयास पाहिजे.हा सात्ताधैशांचा स्वधर्म आहे आहे.||१५—१६|| अर्थः---तेव्हा,कृष्ण व बलराम यांच्या बाहूंनी शत्रूंपासून रक्षण केलेले व रामकृष्णांच्याच योगाने दुःख निवृत्त होऊन पूर्णमनोरथ झालेले ते यादव कृतार्थ असते आपापल्या गृहाचेठिकाणी रममाण झाले||१७|| अर्थः---त्या मथुरेमध्ये राहणारे वृद्ध पुरुषही,नित्य आनंदाने भरलेले,शोभायुक्त व उद्यायुक्त हास्यसहित अवलोकनाने युक्त असे श्रीकृष्णाचे मुखकमळ प्रतिदिवशी पाहत असल्यामुळे श्रीकृष्णाच्या मुख कमळामृताचे वरणावर सेवन करीत असते तरुणासारखे अतिबलीष्ठ व पराक्रमी झाले||१८-१९|| अर्थः---हे महाराज,नंतर देवकी पुत्र भगवान श्रीकृष्ण व बलराम हे उभयंता,नंदाजवळ येऊन व त्याला आलिंगन देऊन असे म्हणाले कि,-||२०|| | पितुर्युवाभ्यां स्निग्धाभ्यां पोषीतौलालीतौ भृशम् | पित्रोरभ्यधिका प्रीतीरात्मजेष्वात्मनोsपि हि ||२१|| अर्थः---हे ताता,स्नेहयुक्त अशा तुम्ही उभयंतांनी आपल्या देहापेक्षाही अत्यंत अधिकपणाने आमचे पोषण व लालन केले आहे आणि हे तरी आश्चर्य नव्हे.कारण,लोकामध्ये आपल्या देहापेक्षाही पुत्रांवर आई बापांची प्रीती अधिक असत्ये असे प्रसिद्ध आहे||२१|| | स पिता सा च जननी यौ पुष्णीतां स्वपुत्रवत् | शिशुन् बन्धुभिरुत्सृष्टानकल्पैः पोक्षरक्षणे ||२२|| अर्थः---आता देवकीवसुदेवांचे पुत्र तुम्ही आम्हा आमचे नव्हे.असे तुम्ही कधीही बोलुं नये.कारण,पोषनाविषयी व रक्षणाविषयी असमर्थ अशा आई बापादिकांनी टाकलेल्या लहान आम्हा पुत्रांचे ज्या तुम्ही(यशोदानदांनी)आपल्या पुत्रांप्रमाणे पोषण केले आहे,ती आम्ही आमची मातापितरे आहा यांत संशय नाही||२२|| भावार्थ:--- कांही कारणास्तव ज्या बालकांचे आई—वडिल पालन—पोषण करू शकले नाहीत.त्यांचे पालन—पोषण इतरांने केले तर पालन—पोषण करणारे जे आहेत,ते त्या बालकांचे आई—वडिल होय.त्यांची सेवा त्या बालकाने करावयास पाहिजे.||२२|| अर्थः---असो.हे ताता नंदा,आता तुम्ही सर्व गोपांनी गोकुळामध्ये चलावे.आम्हीही येथे असलेल्या आपल्या सर्व सुह्र्द्यांना;सुख उत्पन्न करून नंतर,आमच्या स्नेहाने दुःखित झालेल्या तुम्हा ज्ञातीना पाहण्याकरिता येऊ||२३|| भावार्थ:--- वज्रातील नंदाबाबांना श्रीकृष्ण म्हणतात कि,”आमच्यामुळे ज सुहृद—संबंधींना सुखी करा व त्यांना सांगा कि,तुम्हा सर्वांच्या प्रेम--भेटीसाठी निश्चित आम्ही येउतच.आमच्यावर फक्त विश्वास ठेवा.विश्वासानेच सर्व कांही व्यवहार होतो.||२३|| अर्थः---याप्रमाणे व्रजवासी गोपांसह नंदाचे भगवान श्रीकृष्णाचे सात्वंन करून,नंतर वस्त्रे अलंकार आणि सोन्यारुप्याखेरीज काशांची पितळेची वगैरे भांडी देऊन यांचा मोठ्या आदराने सत्कार केला||२४|| अर्थः---असो.याप्रमाणे कृष्णाने सांगितलेला तो नंदराजा,स्नेहाने विव्हळ झाला आणि त्या रामकृष्णांना आलिंगन करून,अश्रूंनी नेत्र पूर्ण करीत असता गोपांसहवर्तमान गोकुळामध्ये निघून गेला||२५|| | अथ शूरसुतो राजन् पुत्रयोः समकारयत् | पुरोधसा ब्राम्हनैश्च यथावद् द्विजसंस्कृतिम् ||२६|| अर्थः---हे राजा,नंतर वसुदेवाने आपल्या पुरोहित गर्गाचार्यकडून व ब्राम्हणाकडून यथाविधीने रामकृष्णाचा यपनयसंस्कार करविला||२६|| भावार्थ:--- वासुदेवांनी पुरोहित व ब्राह्मणाकरावी दोन्ही मालांचे—बळरामदादा व कृष्णांचे विधीपूर्वक मौजीबंधन केले.आपणही आपल्या मुलांचे मौजीबंधन करावयास पाहिजे.मौजीबंधन करावे असे धर्माशात्राचा नियम आहे.मौजीबंधन हा विधी केल्याशिवाय शिक्षण व लग्न करण्याचा अधिकार नाही.म्हणून सर्वांनी योग्यता आल्यानंतर विशिष्ट वयात मौजीबंधन करावे.||२६|| अर्थः---आणि त्या ब्राम्हणांची पूजा करून त्या उत्तम अलंकृत ब्राम्हणांना,दक्षिणा आणि सुवर्णपुष्पांच्या मला धरण करणाऱ्या,चांगल्या अलंकृत व रेशमी उंची वस्त्राच्या झुली घातलेल्या सवत्स गाई दान दिल्या||२७|| भावार्थ:--- मौजीबंधनाचा विधी पर पडल्यानंतर त्या ब्राह्मणांना योग्य दक्षणा दिली.एखादे धार्मिक कार्य करून आपणहून जे काय धन देल्या जाते त्यास दक्षणा असे म्हणतात.कार्य करणारा जो कर्ता आहे,त्यास “दक्षणा” घेण्याचा अधिकार आहे.आपापल्या योग्यतेनुसार दक्षणा देणे हे आपले कर्तव्य आहे.आपल्या कार्याचा करार ठरवून जो मोबदला घेतल्या जातो त्यास “मुल्य—किमत” असे म्हणतात.शात्राने दक्षणा घेण्याचा अधिकार दिलेले आहे,पण मूल्य घेण्याचा अधिकार दिलेले नाही,म्हणून मुल्य घेऊ नये दक्षणा मात्र घ्यावी.दक्षणा म्हणून घेतल्यास धर्मही होतो व व्यवहारही होतो,म्हणून धर्मानुसार आचरण करावे.||२७|| अर्थः---तशाच त्या महाबुद्धिमान वसुदेवाने,रामकृष्णांना जन्मनक्षत्री ज्या गाई मनाने संकल्प करून दिल्या होत्या,पर्सने अधर्माने लेल्या होत्या त्यांचेही रमरनपूर्वक दानकेले ||२८|| अर्थः--- याप्रमाणे उपनयसंस्कार पावोन द्विजत्व पावलेल्या व उत्तम नियम धारण करणाऱ्या त्या रामकृष्णांनी,यादुकुलाचा आचार्य अशा गर्गऋषीपासून ब्रम्हचर्यव्रताचा स्वीकार केला||२९|| भावार्थ:--- पुरोहित--गुरु यांच्याकडून यज्ञोपवित संस्कार झाल्यावर राम--कृष्ण द्विज झाले.द्विज झाल्यानंतर त्या नियमांचे नेहमीसाठी पालन केले.उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते.म्हणून आपणही आपापल्या मुलांचे उपनयन संस्कार करावयास पाहिजे,कारण त्यात आपले हित असते.धर्मांचे पालन होऊन आपली प्रगती होते.||२९|| | प्रभवो सर्वविद्दानां सर्वज्ञो जगदीश्वरौ | नान्यसिद्धामलज्ञानां गुहमानौ नरेहितैः ||३०|| अर्थः--- जरी ते दोघेही जगदीश्वर,सर्व विद्यांचे उत्पत्तिस्थान व सर्वज्ञ होते तथापि ते मनुष्यचेष्टांनी आपले स्वतःसिद्ध निर्मल ज्ञान गुप्त राखीत होते म्हणून लोकसंग्रहकरिता विद्या ग्रहांनासाठी व गुरुगृही वास करण्याची इच्छा धरून काशगोत्रांत उत्पन्न झालेल्या,अवंतीनगरांत राहणाऱ्या सांदिपाणी नामक गुरूकडे निघून गेले||३०-३१|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण सर्वज्ञ होते,तरी पण त्यांनी आपल्याकरिता म्हणजे तुमच्या व आमच्याकरिता उपनयन संस्कार हा विधी पार पाडून,गुरुची सेवा करून सर्व विद्या प्राप्त करून घेतली.म्हणून आपण मनुष्यदेहात आल्यानंतर उपनयन संस्कार करून,गुरूगृही राहून,गुरूची विधियुक्त सेवा करून विद्या प्राप्त करून आवश्य घेणे जरुरी आहे.त्यात आपलेच हित आहे.||३०|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण स्वत:गुरुकुलात सेवा करून विद्या संपादन करण्यासाठी गेले.भगवंत श्रीकृष्णांनी जसे कृतीत आणून दाखवले,तसे आपणही प्रत्यक्ष कृती करून दाखवयास पाहिजे.असे केले असता नंतर जे आपले मुले—बाळे तेही आपले अनुकरण करतील.कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करत असतात.त्यामुळे स्वधर्माचे पालन होत असते.त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत असते.मानव देहाला आल्यानंतरच या किंवा कोणत्याही नियमांचे पालन होते,अन्य देहात होत नाही.||३१|| | यथोपसाद्द तौ दान्तौ गुरौ वृत्तीमनीन्दिताम् | ग्राह्यन्तावुपेतौ स्म भक्त्या देवमीवादृतो ||३२|| अर्थः---योग्यरीतीने गुरूजवळ जाऊन इंद्रिय निग्रह करून राहणारे व गुरुनेंहि आदर ठेवलेले ते,गुरूची उत्कृष्ट सेवा कशी करावी यांचे इतर लोकांना शिक्षण देत असत.देवासारख्या भक्तीने गुरूची सेवा करूं लागले||३२|| भावार्थ:---बलरामादादा आणि श्रीकृष्ण संयमशील,विधीपूर्वक गुरुजींजवळ राहून उत्तम सेवा-अंत:करणपूर्वक करू लागले.देव समजून सेवा करू लागले.त्याचप्रमाणे आपणही उपनयन संस्कार करून,गुरूंचा अंगीकार स्वीकारून गुरूंची उत्तम—अंत:करणपूर्वक धर्मानुसार सेवा करावयास पाहिजे.गुरूंच्या धर्मपूर्वक अज्ञाचे पालन करणे हे शिष्याचे कर्तव्य असते.त्यामुळे आपलावर त्यांची कृपा होते.जीवांना वळण लागावे म्हणून बलरामदादांनी व श्रीकृष्णांनी ते भगवंत असूनसुद्धा मनुष्यांना वळण लागावे—संस्कार व्हावे म्हणून गुरूंचा स्वीकार करून,त्यांची सेवा करून आपणासाठी आदर्श निर्माण केला.म्हणून त्यांचा आदर्श घेऊन गुरूचा स्वीकार करून,गुरूंची सेवा करून त्यांच्या आज्ञेचे पालन करावयास पाहिजे.असे केले तर आपणास जे सुख अपेक्षित आहे,ते मिळेल.||३२|| अर्थः--- तेव्हा निष्कपट स्नेहाने युक्त अशा त्यांच्या सेवेने त्यंच्यावर संतुष्ट झालेल्या ब्राम्हण श्रेष्ठ त्या सांदिपनी गुरूने,रामकृष्णांना,शिक्षा,कल्प(सूत्र ),व्याकरण इत्यादिक वेदाच्या सहाअंगांचे व ईश केन.कथ,प्रश्न इत्यादिक दहा उपनिषदासहित ऋग्वेदादीक चार हि वेदांचे यथास्थित अध्ययन सांगितले||३३|| भावार्थ:--- बलरामदादांनी व श्रीकृष्ण यांनी निष्काम भावनेने,शुद्ध अंत:करणाने गुरूंची सेवा केली,गुरूंच्या आज्ञेचे पालन केले,शात्रांचा अभ्यास केला,त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा झाली.त्यामुळे गुरूंनी सर्व विद्ध्या त्यांना प्रदान केली.आपणही आपल्यावर गुरुकृपा होण्यासाठी निष्काम सेवा करावी,गुरूंच्या आज्ञेचे पालन करावे,शात्रांचा अभ्यास करावा.यामुळे गुरुकृपा होइल.||३३|| अर्थः---मंत्रांच्या व देवतांच्या ज्ञानासाहित धनुर्वेद,मानवादिक धर्मशास्त्रे,तसेच मीमांसादीक न्यायमार्ग,तर्कविद्या,आणि सहप्रकारची राजनीती सांगितली||३४|| अर्थः--- हे राजा,मनुष्यश्रेष्ठामध्येही श्रेष्ठ व सर्वविद्यांचे प्रवर्तक अशा त्या रामकृष्णांनी,गुरूने एकवार उपदेश केला असता तितक्या योगानेच ते वेदादिक सर्वही शिकून पाठ केले||३५|| | अहोरात्रैश्चतु:षष्ट्या संयत्तौ तावतिः कलाः | गुरुदक्षिणयाssचार्यं छन्दयामासतुर्नृप ||३६|| अर्थः--- नंतर जितेंद्रिय अशा त्य दिघांनी,चौसष्ट अहोरात्रांमध्ये गायन करणे,वाद्ये वाजविणे इत्यादिक चौसष्ट कालाशिकून घेतल्या आणि गुरुदक्षिणा मागण्याविषयी गुरूची प्रार्थना केली||३६|| भावार्थ:--- शिष्यांना गुरूंनी ज्ञानदान दिलेले असल्यामुळे ते गुरुदक्षणा मागत नसतात.शिष्यांनी न मागता आपणहून ध्यावावयास पाहिजे.जसे आपण पाहुणे म्हणून कोणाकडे परगांवी गेलोत,तर त्यांच्या घरून परत निघतेवेळेस मुलांच्या हातात कांही पैसे ध्यावावयाचे असतात,कारण घरादानी घेत नसतो.हे उदाहरण ग्रामीण लोकांचे आहे.शहरी लोकांचे नाही,पण बोध घेण्यासारखे आहे. तसे आपले सदगुरू दक्षणा घेत नसतात,म्हणून गुरु आईजवळ कांही मागणी करावयाची असते.म्हणून ते गुरुआईकडे जातात.||३६|| अर्थः--- तेव्हा हे राजा,त्या सांदिपनी ब्राम्हणाने त्या रामकृष्णांचा तो अद्भुत महिमा व मनुष्यांमध्ये असंभावित असलेली बुद्धी पाहून,आपल्या स्त्रीबरोबर विचार केला आणि प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रांत बुडून मरण पावलेला आपला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली||३७|| भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या गुरूंनी त्यांच्या पत्नीचा सल्ला घेऊन प्रभासक्षेत्रामध्ये समुद्रात बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली.कारण ती दक्षिणा देण्याचे सामर्थे त्यांच्यात होते.अधिकार—योग्यता पाहून मागणी करावी लागते. अर्थः--- तेव्हा बरे आहे असे म्हणून अपार पराक्रमी असे ते दोन्ही महारथी रामकृष्ण,बसून प्रभास क्षेत्रांत गेले आणि तेथे समुद्रांच्या कंठी जाऊन क्षणभर बसले.तेव्हा समुद्राने हे परमेश्वर आहेत असे जाणून मनुष्याच्या वेषाने पूजासाहित्य घेऊन त्यांच्या जवळ येऊन त्यांची पूजा केली||३८|| अर्थः---त्यावेळी भगवान त्यास म्हणाला कि,-हे सागरा,येथे मोठ्या लाटेने जो तूं बालक,पूर्वी बुडविला आहेस तो आमच्या गुरूचा पुत्र आहे,म्हणून तो लवकर आणून दे||३९|| अर्थः---समुद्र म्हणाला-हे देवा कृष्णा,तो गुरुपुत्र मी हरण केला नाही,तर माझ्या पाण्यांत राहणारा व शंखाने रूप धारण करणारा मोठा एक दैत्य असुर आहे त्याने तुमच्या गुरूचा पुत्र निःसंशय आणिला आहे,ते ऐकून त्या समर्थ श्रीकृष्णाने सत्वर जळांत प्रवेश करून त्याला मारून पोट फाडून पाहूं लागला तो तेथे गुरूचा पुत्र दृष्टीस पडला नाही||४०-४१|| अर्थ:--नंतर त्या पंचजनाच्या देहापासून झालेला पांचजन्यनामक शंख घेऊन तो रथावर माघारा आला नंतर त्या श्रीकृष्णाने,बलरामासवर्तमान यमाच्या आवडत्या संयमिनीनामक नगरीमध्ये जाऊन शंख वाजविला,तेव्हा शंखाचा शब्द ऐकून प्रजांचा निग्रह करणाऱ्या त्या यमाने-||४२-४३|| अर्थः---त्यांची भक्तीने युक्त अशी मोठी पूजा केली आणि तो नम्र होऊन,सर्व प्राणीमात्रांचा अंतर्यामी अशा त्या कृष्णाला म्हणाला कि,-लीलेकरिता मनुष्यदेह धारण करणाऱ्या हे विष्णो,युमचे कोणते काम मी करावे?ते सांगावे||४४|| | गुरुपुत्रमिहानीतं निजकर्मनिबन्धम् | आनयस्व महाराज मच्छासनपुरस्कृतः ||४५|| अर्थः---श्रीभगवान म्हणाला –हे महाराज यम,आपल्या कर्माच्या योगाने बांधला गेलेल्या गुरुपुत्राला तुझ्या दूतांनी येथे आणिले आहे,त्याला तूं माझी आज्ञा प्रमाण मानून आला समर्पण कर,माझ्या आज्ञेने आणून देणाऱ्या तुला कांही दोष लागणार नाही||४५|| | तथेति तेनोपानीतं गुरुपुत्रं यदुत्तमौ | दत्त्वा स्वगुरवे भूयो वृणीष्वेति तमुचतुः ||४६|| अर्थः---“नंतर बरे आहे असे म्हणून त्या यमाने आणून दिलेल्या गुरु पुत्राला येऊन घेऊन रामकृष्णांनी तो आपल्या गुरूला अर्पण केला आणि पुन्हा दुसरा वर मागावा अशी प्रार्थना केली||४६|| भावार्थ:--- भगवंत श्रीकृष्ण आणि बालरामदादांनी यमराजाकडून गुरुपुत्र आणून देला आणि म्हणतत “आपणास आणखी कांही पाहिजे असेल तर मागावे.”गुरूंनी जी मागणी केली त्याची पूर्तता करणे शिष्यांचे कर्तव्य असते.||४६|| अर्थः--- तेव्हा गुरु म्हणाला-हे वत्सा कृष्णा.तुम्ही उभयंतांनी मला गुरुदक्षिणा उत्तम प्रकराची दिली आहे.तुमच्या सारख्यांचा गुरु अशा माझा मनोरथापैकी कोणता बरे मनोरथ अवशेष राहणार आहे ?कोणताच राहणार नाही,म्हणून मला आतां कांहीच मागण्याची इच्छा नाही||४७|| भावार्थ:--- त्यानंतर गुरूंनी कांहीच मागणी केली नाही,कारण ते अपेक्षारहित जीवन जगत असतात.||४७|| अर्थः--- हे वीरहो,आता तुम्ही आपल्या घरी जावे.तुमची कीर्ती लोकांना पवित्र करणारी असो,तसेच तुम्ही अध्ययन केलेले वेद या लोकी परलोकी सफळ होवोत||४८|| भावार्थ:--- गुरूंनी श्रीकृष्ण आणि बलरामदादांना असा आशीवाद दिला कि,”लोकांना पवित्र होणारी कीर्ती तुम्हंना प्रप्त होवो तुम्ही शिकून घेतलेली विद्या इहापारालोकी नित्य नूतन राहो.” गुरूंनी दिलेला आशीर्वाद हा मिळत असतो.दिलेली विद्या नित्य राहो असा आशीर्वाद दिलेला आहे.इहलोक व परलोकात दिलेला आहे.म्हणजे नेहमिसाठीच,सर्वालोकांत राहो.||४८|| | गुरुनैवमनुज्ञातौ रथेनानीलरंहसा | आयातौ स्वपुरं तात पर्जन्यनिनदेन वै ||४९|| अर्थः---राजा,याप्रमाणे गुरूने आज्ञा केली असता ते रामकृष्ण,वायुसारखा वेग व मेघासारखा नाद असलेल्या रथाने आपल्या नगरमध्ये येऊन पोंचले||४९|| अर्थः तेव्हा बहुत दिवस रामकृष्णांना न पाहणाऱ्या सर्व प्रजा,त्यांना पाहून,जसे द्रव्य सांडलेले पुरुष,ते द्रव्य पुन्हा प्राप्त झाले असता आनंदयुक्त होतात त्याप्रमाणे अत्यंत आनंदित झाल्या||५०|| भावार्थ:--- भगवंत बलरामदादा आणि श्रीकृष्ण गुरूगृही असल्यामुळे मथुरेतील प्रजा यांना त्यांचे दर्शन न झाल्यामुळे ती प्रजा दु:खी झालेली होती.बलारादादा व भगवंत कृष्ण मथुरेत आलेले पाहून आनंदित झाले.त्याचप्रमाणे आपल्यालाही वाटावे कि अजून आपणांस भगवंतांचे दर्शन झाले नाही.त्यासाठी आपण संत—महात्मा यांचे संगती करून त्यांच्या अज्ञानेचे पालन केले असता आपणास दर्शन होऊ शकते.त्यासाठी तसा प्रयत्न करणे अत्यंत जरुरी आहे.त्यासाठी निष्काम सेवा करून ज्ञान प्राप्त करावे.||५०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानाच्या दशमस्कधांतील पूर्वार्धात गुरुपुत्रानयननामक हा पंचेचाळीसावा अध्याय समाप्त झाला _________________________________________________________________________________________________________ | ४६--- किरण २१---उध्दवा चे व्रजगमन---१--- पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________ (आतां ह्या शेचाळीसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने,उद्धवाला गोकुळांत पाठवून त्याच्या वाणीने यशोदानंदांचा शोक घालविला,अशी कथा वर्णन केली आहे||१|| | वृष्णीनां प्रवरो मन्त्री कृष्णस्य दयितः सखा | शिष्यो बृहस्पते: साक्षादुध्द्वो बुद्धीसत्तमः ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,वृष्णीच्या वंशजांमध्यें श्रेष्ठ,साक्षात् बृहस्पतीचा शिधय बुद्धीने,अतिश्रेष्ठ व श्रीकृष्णाचा अतिप्रिय मित्र,असा उद्धव या नावांचा एक मुख्य प्रधान होता ||१|| भावार्थ:--- उद्धव हा वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता,एवढा तो गुणवान,बुद्धिमान होता.बृहस्पतींचा शिष्य होता.विशेस म्हणजे तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्र होता.तसा आपण गुणवान होण्याचा प्रयत्न करावा.आपला मित्र सत्वगुणी असावा,मित्राच्या संगतीचा आपल्या गुणावर परिणाम होतो.सात्विक संस्कार होतात.संस्कारानुसार उच्चार व उच्चारानुसार आचरण होत असते.||१|| अर्थः---शरणांगतांचे दुःख हरण करणाऱ्या भगवान् श्रीकृष्णाने,एकेवेळी एकांतस्थळीं आपल्या हातानें त्या अनन्यभक्त प्रिय उद्धवाचे हात ग्रहण करून भाषण केलें कीं-||२|| अर्थः---हे सौम्या उद्धवा,तूं गोकुळांमध्यें जा आणि आमच्या आईबापांना (यशोदानंदांना) आमच्या वियोगापासून दुख झाले आहें तें घालवून हर्ष उत्पन्न कर.तसेंच गोपांनीही माझ्या वियोगापासून झालेलें मनोदुःख माझे निरोप सांगून दूर कर.||३|| भावार्थ:--- भगवंत उद्धवास म्हणतात कि,”हे उद्धवा!तू व्रजामध्ये जा.तेथे माझे माता—पिता दु:खी असतील,म्हणून त्यांचे दु:ख घालवून त्यांना सुख—आनंद देण्याचा प्रयत्न कर.तसेच त्याच ठिकाणी गोपी आहेत.त्या तर दु:खी आहेतच.त्यांना माझा निरोप सांगून त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न कर.आपणही इतरांचे दु:ख कमी करून सुख देण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||३|| अर्थः---गोपींना विशेष निरोप सांगण्याचे कारण कीं,त्या गोपी,माझ्या ठिकाणींच मन लावणाऱ्या,माझ्याकरितांच प्राण धारण करणाऱ्या व माझ्या प्राप्तींसाठींच पतिपुत्रादिकांचा त्याग करणाऱ्या असून दयावंत व अतिप्रिय अशा मजप्रतच मानाने प्राप्त झालेल्या आहेत.जे लोक,माझ्या निमित्त इहपरलोकीं प्राप्त होणाऱ्या सुखांचा व त्यांच्या साधनांचा त्याग करून राहत्ता त्याचे मी पोषण करितों व त्यांना सुख देतों||४|| भावार्थ:--- गोपींचे मन—प्राण निय माझ्याकडेच लागलेले असते,कारण त्यांचा विषय मीच झालो आहे.त्यांनी माझ्यासाठी त्यांचे शात्रानुसार झालेले जे पती,पुत्र,सासू—सासरे इत्यादींना सोडले आहे,म्हणजे त्या शरीराने त्यांच्यात राहतात,पण सर्व मन माझ्याकडेच लागलेले असते.माझावरच प्रेम करतात.त्यांनी माझ्यासाठी लौकिक व परालौकिक धर्म सोडला आहे.त्या शरीराने संसार करतात पण मन संसारात ठेवत नाहीत,हे लोकांच्या लक्षात आलेले आहे,त्याचीही ते पर्वा करत नाहीत.पारलौकिक म्हणजे त्यांचा निष्काम धर्म आहे,म्हणून पुण्य होत नाही.त्यामुळे परलोकही-स्वर्गही मिळणार नाही.त्याची पर्वा करत नाहीत.त्या शुद्ध माझ्यावरच प्रेम करतात. त्यामुळे त्या मलाच प्राप्त होणार आहेत.वर्तमान—काळात त्यांची भावना असी आहे कि,माझे दर्शन व्हावे,म्हणून दु:खी आहेत. आपणही शरीराने संसारात राहण्याचा प्रयत्न करून मानाने परमार्थात राहण्याचा प्रयत्न करावा.सर्वस्व आपले मन भगवंतांकडे लावण्याचा प्रयत्न करावा.आपणही लौकिक व पारलौकिक सुखाची पर्वा न करता भगवंतांवर निष्काम प्रेम करावे.देहसंबंधित म्हणजे पत्नी—पती—पुत्र यांच्यात असावे पण मन भगवंतांकडे असावे.गोपिंसारखी अवस्था आपुन जर केली तर भगवंत आपले जन्म—मरण निवृत्त करतो,असे शात्र सांगते—खात्री देते.याकरिता संत—महात्मा यांची संगती करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||४|| अर्थः---हे उद्धवा,प्रिय पदार्थांपेक्षांही अतिप्रिय असलेला मी,दूर राहिल्यामुळें त्या गोकुळांतील स्त्रिया,माझें स्मरण करून विरहानें झालेल्या माझ्या उत्कंठेने विव्हळ होऊन मोह पावत आहेत बरें!||५|| भावार्थ:--- त्या गोपींचे माझ्यावर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना माझे स्मरण झाले तर त्या स्मरणाने त्यांची शुद्ध हरपून बेशुद्ध होतात—व्याकुल होतात,इतके त्यांना अतीव दु:ख होते.म्हणून त्यांना झालेले दु:ख कमी करून सुख देण्याचा प्रयत्न करावा.||५|| अर्थः---आणि बहुतकरून त्या माझ्या आवडत्या गौळिणी,मी गोकुळांतून मथुरेत येत्येवेळी मी लवकरच माघार येईन असें जे निरोप सांगितले होते त्यांवरून माझ्यावरआपला अंतर्यामी आत्मा ठेऊन कशातरी संकटाने प्राण धारण करीत आहेत.तात्पर्य त्यांचा आत्म अजर त्यांच्या देहांत असता तर तो विरह तापानें जळालाच असता,तो माझेठिकाणीं असल्यामुळें त्या कशातरी वाचत आहेत |||६|| भावार्थ:--- मी मथुरेला येण्यापूर्वी “मी येईन “असे त्यांना आश्वासन देलेले आहे.तेवढ्या आश्वासनावर त्या तेथे दु:खी जीवन जगत आहेत—जिवंत राहिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे आपणास कधी भगवंतांचे दर्शन होईल याप्रकारची तळमळ लागावयास पाहिजे.||६|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,याप्रमाणें भगवंताने सांगून सत्कार केलेला तो उद्धव आपल्या स्वामी श्रीकृष्णाचा तुमचा व माझा वियोग कधिंच नाहीं इत्यादीप्रकारचा निरोप शिरसा ग्रहण करून रथावर बसून नंदाच्या गोकुळांत निघून गेला||७|| अर्थः---तो श्रीमान् उद्धव,सूर्यास्त होण्याच्या वेळीं,पुढें प्रवेश करणाऱ्या पशूंच्या खुररजांनी ज्याचा र्थ अच्छादित झाला आहे असा होऊन नंदाच्या गोकुळांमध्यें प्राप्त झाला||८|| अर्थः---तें गोकुळ,वाफेला आलेल्या गाईंकरितां परस्पर युद्ध करणाऱ्या मदोन्मत्त वृषभांच्या गर्जनांनी युक्त असून ओट्यांच्या भारानें युक्त अशा आपापल्या वत्सांकडे धांवणाऱ्या दुभत्या गाईंनीं भूषित होतें||९|| अर्थः---तसेंच जिकडेतिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या गोवत्सांनीं सुशोभित असून गाईंच्या असून धार काढण्यांचा शब्दांसहित वत्साला सोड.नको सोडूं त्याला ने,दुसऱ्याला आण,तें भांडें दे,हें घे इत्यादिक गोपांच्या शब्दांनी व मुरल्यांच्या नांदानें भूषित होतें ||१०|| अर्थः—रामकृष्णांच्या पापनाशक कर्मांचे गायन करणाऱ्या व उत्तम अलंकार धारण करणाऱ्या गोपींनी व गोपींनी अत्यंत अशोभित होतें||११|| अर्थः---अग्नि,सूर्य,अतिथी,गाई,ब्राम्हण,पितर व देव यांच्या पूजनांनी युक्त असलेल्या गोपांच्या घरांनी व जेथें तेथें लावलेल्या धुपांनी व दीपांनी युक्त होतें||१२|| भावार्थ:--- वज्रभूमीमध्ये गोपांच्या घरात अग्नी,सूर्य,अथिती,गाई,ब्राह्मण आणि देवतांची—पितरांची धूप,दीप,फुले इत्यादींनी पूजा होत होती,याप्रकाराने आपण सात्विक वातावरण पाहून उद्धवास आनंद झाला.तसा अग्नी,सूर्य,अथिती,गाई,ब्राह्मण आणि देवतांची—पितरांची धूप, दीप,फुले,इत्यादींनी पूजा करून आनंद घ्यावावयास पाहिजे.आपण साधनावर आरूढ व्हा तेव्हा साध्या होते.||१२|| अर्थः---आणि तें गोकुळ,हंस,कारंडव,पाणकोंबडे इत्यादिकांनी व्याप अशा कमळांच्या समुदायांनी शोभित असलेल्या सरोवरांच्या कांठीं राहणाऱ्या पक्ष्यांच्या व श्रमरांच्या नादांनी युक्त अशा प्रफुल्लित वनांनी चारी बाजूंनी भूषित होतें||१३|| | तमागतं समागम्य कृष्णस्यानुचरं प्रियम् | नन्द प्रीतः परिष्वज्य वासुदेवधीयार्चयत् ||१४|| अर्थः---तो कृष्णाचा प्रियसेवक उद्धव प्राप्त झाला असें ऐकून संतुष्ट झालेल्या नंदानें,सामोरें जाऊन त्याला आलिंगन करून वासुदेवबुद्धीने (हा कृष्णच आला आहे अशा बुद्धीने) त्याचा सत्कार केला||१४|| भावार्थ:---श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा वज्रामध्ये आला,तेव्हा त्यांची भेट घेऊन नन्द यांना अतिशय आनंद झाला,कारण उद्धव हा सात्विक असल्यामुळे व नंदबाबा सात्विक असल्यामुळे उभयतांना आनंद झाला.तसे आपण सात्विक होण्याचा प्रयत्न करून सत्विकांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे उभायान्तांना आनंद मिळत असतो.एकट्याने आनंद घेण्यापेक्षा उभायान्तांना किंवा अनेकांना आनंद देण्याघेण्यात आनंद फारच अवर्णनीय असतो.आपण दोन्ही प्रकारचा आनंद घेण्याचा आवश्य करावा.त्या उद्धावात नंदाबाबांनी श्रीकृष्ण पहिला व मान—सन्मान केला.आपणही संत आणि देवात फरक न करता एक समजावे.||१४|| | भोजितं परमान्नेन संविष्टं कशिपौ सुखम् | गतश्रमं पर्यपृच्छत् पादसंवाहनादिभिः ||१५|| अर्थः---नंतर पायसादिक उत्तम अन्नानें भोजन केलेल्या पलंगावरती मऊ बिछान्यांवर सुखानें वसलेल्या व चरणशुश्रूषादिकेंकरून श्रमरहित झालेल्या त्या उद्धवाला नंदाने प्रश्न केला कीं,-||१५|| भावार्थ:--- नंदाबाबांनी उद्धवास पक्वान्नाचे भोजन वाढले.श्रीकृष्ण आणि उद्धव एक आहेत असा भाव ठेऊन प्रेमपूर्वक जेवण दिले.त्याप्रमाणे आपणही संत—महात्मा आपल्याकडे आल्यानंतात संत—महात्मा व देव एकाच आहेत असा भाव ठेऊन आदर—सत्कार करून जेवण ध्यावावयास पाहिजे.नंदाबाबांनी त्यांची पाय दाबून सेवा करून प्रवासातील शिन हलका केला.आपल्याकडे संत—महात्मा किंवा अठीती आल्यानंतर नंदाबाबांनी जसे आचरण केले तसे आचरण आपणही करावयास पाहिजे.यात आपलेच हित असते.अगोदर हा सर्व व्यवहार करून,त्यानंतर देवकी,वासुदेव,भगवंत बालारामादादा व श्रीकृष्ण यांच्याबद्दल क्षेम—कुशलता विचारली.||१५|| अर्थ:---हे मित्रा,हे महाभाग्यवंता उद्धवा,आम्हां गोकुळवासी लोकांचा सखा वसुदेव,बंधांतून मुख होऊन,बांधवांनी व मित्रांनी युक्त असता आपल्या पुत्रादिकांसहवर्तमान सुखाने राहतो ना?तेंच आम्हांस इष्ट आहे ||१६|| | दिष्ट्या कंसो हतः पापः सानुगः स्वेन पाप्मना | साधूनां धर्मशिलानां यदूनां द्वेष्टी यः सदा ||१७|| पापी कंस आपल्याच पापानें कनिष्ठ बंधुंसहवर्तमान व चानुरादिक मल्लांसहवर्तमान मरण पावला,ही गोष्ट मोठी आनंदाची झाली.कारण,तो धर्मशील व दुसऱ्याचे कार्य साधणाऱ्या यादवांचा निरंतर द्वेष करीत असे||१७|| भावार्थ:--- कंस हा पापी असल्यामुळे पापांचे फळ,म्हणून आपल्या अनुसयांसह मारला गेला हे फार चांगले झाले!कारण तो धार्मिक व सत्याने वागणारे जे लोक होते,त्यांचा नेहमी द्वेष करत असे.धार्मिक लोकांचा व सत्यांनी वागनारांचा द्वेष केला तर अधर्म होतो.अधर्माचे फळ दु:ख भोगावे लागते.आता धर्माने वागण्यास व सत्याने वागारांचा कोणी द्वेष करणार नाही.द्वेष न केल्यामुळे एकमेकांना दु;ख न मिळता सुख मिळेल.याकरिता आपण धर्माने वागून सत्याने आचरण करावयास पाहिजे.||१७|| अर्थः---बरें,श्रीकृष्ण केव्हांतरी सुह्रद अशा आमचें व माता यशोदा,सुखे गोप,आपणाच रक्षक असलेलें गोकुळ,गाई,वृंदावन व गोवर्धन पर्वत यांचे स्मरण करितो काय?||१८|| अर्थः---बरें,श्रीकृष्ण,स्वजनांना पाहण्याकरिता एकवार तरी इकडे येईल काय?आला तर सुंदरनासिकेनें व मंदहास्यसहित अवलोकनानें युक्त असें त्याचें मुख आम्हीं पाहूं ||१९|| अर्थः---नंतर कृष्णानें केलेल्या उपकारांच्या स्मरणादिकेंकरून निरुपम आनंदाने गहिवरून म्हणाला कीं,-उद्धवा महाम्या श्रीकृष्णाने,वणवा,वाऱ्यासहित वृष्टि,अरिष्टासूर व अघासुर,यांपासून व दुसऱ्याही अनेकप्रकारच्या दुस्तर मृत्यूपासून आमचें रक्षण केलें आहे ||२०|| अर्थः----हे मित्रा,कृष्णाचीं गोवर्धनोद्धारणादिक चरित्रे,लीलेने युक्त कटाक्षसहित अवलोकन,हास्य व भाषण यांचें स्मरण करणाऱ्या आमचे सर्वही व्यापार शिथिल होऊन गेले आहेत||२१|| भावार्थ:--- नंदाबाबा उद्धवस म्हणतात कि,”हे उद्धवा!आम्हांला श्रीकृष्णांचे पराक्रम,नेत्रकटाक्ष मनोहर हृदय,मधुर भाषण इत्यादींची आठवण येते,तेव्हा दुसरे कामे थांबतात.त्याचप्रकारे आपणास संत—महात्मा यांनी त्यांच्या मुखातून भगवंतांची वर्णन केलेली आपण श्रावण करावे.त्या वर्णनांचे स्मरण—आठवण करावे.ते स्मरण करत असतांना त्यातील जो भाग त्याग करावयाचा आहे,त्या भागाचा त्याग करावा व ज्या भागानुसार आचरण करावयाचे आहे,त्यानुसार आचरण करावे.असे केले असता आपण सुखाकडे जातोत.||२१|| अर्थः---केवळ शिथिलाच झालें असें नाहीं त्र,कांहीं दिवसांनी मुळींच नाहींसेहिं होतील.कारण कालियदमनादिक क्रीडा झालेली यमुनानदी,श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी अलंकृत असा गोवर्धन पर्वत,वनांतील प्रदेश व त्याची क्रीडा करण्याची स्थानें हीं अवलोकन करणाऱ्या आमचें मन निरंतर कृष्णरूप होऊन जातें ||२२|| भावार्थ:--- नंदबाबांची मन ती दृश्य पाहून तन्मय होऊन जात असे.त्याचप्रमाणे श्रावण करत असतांना आपले मन तन्मय होणे जरुरी आहे.मन तन्मय होणे म्हणजे त्या दृशाशिवाय अन्य—दुसरे विचार आपल्या मनात न येणे,त्यास मन तन्मय होणे असे म्हणतात.मन तन्मय झाल्यामुळे त्या दृशांचा परिणाम आपल्यावर होतो.त्या विचाराचा परिणाम आपल्यावर होऊन त्यानुसार आपले आचरण होते.याकरिता आपण संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करत असतांना मन तन्मय व्हावे.||२२|| | मन्ये कृष्णं च रामं च प्राप्तविह सुरोत्तमौ | सुराणां महदर्थाय गर्गस्य वचनं यथा ||२३|| अर्थः---मी त्र गर्गाचर्यांच्या गंभीर अर्थाच्या भाषणावरून राम आणि कृष्ण हे दोघे,देवश्रेष्ठ (वासुदेव व संकर्षण)असून देवांच्या दैत्यवधादिक कार्याकरीता भूमीवर अवतीर्ण झाले आहेत असें मानितों||२३|| अर्थः---अहो,ज्यांनी,दहा हजार हत्तीचे बळ असलेला कंस,चाणूर व मुष्टिक या नांवांचे महाबळी मल्ल व दहा हजार ह्त्तीचें बळ असलेला कुवलयापीड गज यांना,जसें लहानसा सिंह,मोठ्याहि हत्तीवगैरे पशूंना मारून टाकितो त्याप्रमाणे टाकिलें ||२४|| अर्थः---तसेंच ज्या कृष्णानें,ती ताड (९०० हात) लांब व अतिशय घट्ट,असें धनुष्य,जसा हत्ती काठी मोडून टाकितो त्याप्रमाणे मोडून टाकिलें व सात दिवसपर्यंत एका हातानें गोवर्धन पर्वत धारण केला ||२५|| अर्थः---तसेच गोकुळांमध्यें देवदैत्यांना जिंकणारे-प्रलंबासूर,धेनुकासूर,अरिष्टासूर,तृणावर्त व बाकासुर इत्यादिक दैत्य सहज लीलेनें मारून टाकिलें||२६|| | इति संस्मृत्य संस्मृत्य नन्दः कृष्णानुरक्तधिः | अत्युत्कन्ठोsभवत्तुष्निं प्रेमप्रसरविह्वल: ||२७|| अर्थः—श्रीशुकाचार्यम्हणाला-हे राजा,याप्रमाणे श्रीकृष्णाचे वारंवार स्मरण करून श्रीकृष्णाचेठिकाणी प्रेमबुद्धि असलेला तो ननाद,प्रेमाच्या पुराने व्याकूळ होऊन,कंठ दाटून आल्यामुळें उगीच राहिला म्हणजे पुढें काहिंच बोलण्यास समर्थ झाला नाही||२७|| अर्थः---तेव्हा नंदरजानें वर्णन केलेली पुत्राचीं श्रावण करणारी यशोदा त्र स्नेहानें जिच्या स्तनातून दूध गळत आहे अशी होऊन नेत्रांतून टपटप दुःखाश्रू ढाळूं लागली ||२८|| अर्थः---याप्रकारेंकरून भगवान् श्रीकृष्णाचेठिकाणी त्या नंदयशोदांची परमप्रीति अवलोकन करून,मोठ्या हर्षानें उद्धव नंदाला म्हणाला कीं,-||२९|| अर्थः---उद्धव म्हणाला-हे मान देणाऱ्या नंदा,तुम्हीं उभयतां खरोखर या लोकांतील सर्व प्राण्यांमध्यें अतिशयच प्रशंसा करण्यास योग्य आहां.कारण,ज्या तुम्ही सर्व जगाचा गुरु अशा नारायणरूप कृष्णाचेठिकाणी अशीं प्रेमयुक्त बुद्धि धारण केली आहेत.||३०|| भावार्थ:--- ज्यांना भगवंतांबदल मनात विशेष प्रेमभाव आहे,ते जीव भाग्यवान आहेत.त्यामुळे भगवंतांची त्यांच्यावर कृपा होते.भगवंतांच्या कृपेमुळे जीव सुखी होतो.म्हणून आपण भगवंतांवर प्रेमभाव प्रयात्नांने ठेवावा.त्या प्रेमाभावात आपलेच हित आहे.ज्यांना भगवंतांबदल प्रेमभाव नाही ते जीव दुर्भाग्यवान आहेत.त्यांच्यावर भगवंतांची कृपा होत नाही.भगवंतांची कृपा न झाल्यामुळे तो जीव सुखी न राहता दु:खी होतो.याकरिता आपण महात्मा यांची संगती करून प्रेमभाव कसा करावा,असे कळून घ्यावे.||३०|| अर्थः---कारण,हे रामकृष्ण दोघेही सर्वजगाचे पुरुष व प्रधानरूप बीज कारण आहेत.आणि हेच सर्व प्राण्यांमध्यें प्रवेश करून त्या प्राण्यांचे व त्या त्या भिन्न भिन्न वाटणाऱ्या जीवांचे नियंते पुराणपुरुष आहेत||३१|| भावार्थ:---भगवंत सर्व विश्वाचे उपादानकारण व निमित्तकारण आहेत.परमात्मा—पुरुष व माया—प्रकृती मिळून विश्वाची निर्मिती करतात.माया—प्रकृती ही उपादानकारण असून परमात्मा—पुरुष हा निमित्तकारण आहे.जसे घटाचे उपादानकारण माती आहे व निमित्तकारण कुंभार आहे.मुलाचे उपादानकारण माता असून निमित्तकारण पिता आहे.दोघाचे मिळून मुल आहे.तसे परमात्मा—पुरुष व माया—प्रकृती मिळून जग आहे.माया—प्रकृती ही असत्—जड—दु:खरूप आहे व परमात्मा—पुरुष सत्—चित्—आनंद आहे.दोघेही शरीरात प्रेवेश करून त्या शरीरात राहणाऱ्या माया—प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवाचे नियमन—व्यवहार करतात.||३१|| अर्थः---हे नंदा,ज्याचेठिकाणी कोणताही प्राणी,प्राणोत्क्रमणाच्या वेळीं क्षणमात्रहि आपलें शुद्ध केलेलें मन स्थापन करून व त्याच्यायोगानें कर्मवासनांचा त्याग करून,ब्रम्हमय व सूर्यासारखा प्रकाशमान असता तत्काल परमगति पावतो,त्या सर्वांचा आत्मा,कारण व भूभारहरण करण्याकरितां मनुष्यावतार धारण करणाऱ्या परिपूर्ण नारायणाचेठिकाणी तुम्हीं उभयतां भक्ति करीत आहां तेव्हां तुमचें आतां कोणतें चांगलें कर्तव्य कर्म अवशेष राहिलें आहे?कोणतेच नाहीं ||३२-३३|| भावार्थ:--- जो जीव जेव्हा मृत्युच्यापुर्वी आपले शुद्ध मन म्हणजे मलदोषरहित,विक्षेपदोषरहित व आवरणदोषरहित—नामारुपांचा त्याग करून परमात्म्याच्याठिकाणी एकाग्र होतो.म्हणजेच सर्व वासनांचा त्याग करतो.तेव्हांच परमात्मरूप—मोक्षास प्राप्त होतो.||३२|| अवतार धारण करता कारण दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता व साधू—संत—महात्मा यांचे रक्षण करण्याकरिता येतात.म्हणू त्यांच्याठिकाणी सुदृढ प्रेमभाव धारण करा.असे करून ज्ञानोत्तर भक्ती आपले स्थूल—शरीर सुटेपर्यंत करा.||३३|| अर्थः---तो भक्तांचा पति भगवान् श्रीकृष्ण,थोड्यास काळानें गोकुळामध्यें येईल आणि तुम्हां मातापितरांचा दर्शनादिक मनोरथ पूर्ण करील||३४|| अर्थः---सर्व यादवांचा शत्रू अशा कंसाला रंगमंडपामध्यें मारून नंतर श्रीकृष्णाने तुमच्याजवळ येऊन जे तुम्हांस सांगितलें आहे कीं,तुम्हीं गोकुळांत चला;आम्हीं यादवांना सुख उत्पन्न करून मग येऊ,तें सत्य करील ||३५|| अर्थः---हे भाग्यंवतहो,तुम्हीं खेद करूं नका,आपल्या समीपभागिंच कृष्ण आहे असें पहा.तो सर्वप्राण्यांच्या ह्रदयामध्यें राहतो परंतु जसा काष्ठामध्यें असलेला अग्नि,मंथनादिक उपयांवांचून दिसत नाहीं त्याप्रमाणें सर्वत्र असलेलाही तो भागवान्,भाक्तीवांचून प्राप्त होत नाहीं||३६|| | न हयस्यास्ति प्रियः कश्चीन्नाप्रियो वास्त्यमानिनः | नोत्तमो नाधमो नापी समानस्यासमोsपि वा ||३७|| अर्थः---अहंतारहित व सर्वत्र समदृष्टी असणाऱ्या हा परमेश्वराला,कोणी प्रिय नाहीं,कोणीं अप्रियहि नाहीं,कोणी उत्तम नाहीं व कोणी अधम किंवा विषमहि नाहीं||३७|| | न माता न पिता तस्य न भार्यां न सुतादयः | नात्मियो न परश्चामी न देहो जन्म एव च ||३८|| अर्थः---ह्याला माता नाहीं,पिता नाहीं,भार्या नाहीं व पुत्रादिकही नाहींत.कोणी आपलानाहीं व कोणी परकीयहि नाही,ह्याला देह नाहीं,जन्म नाहीं व कर्महि नाही;तथापि तो भगवान्,या लोकांमध्यें साधूंच्या रक्षणाकरितां व क्रीडा करण्याकरितां सात्विक,राजस व तामस अशा देवतिक्मनुष्यादिकांमध्यें अवतार धारण करितो||३८-३९|| भावार्थ:--- भगवंतास कोणतेही कर्तव्य नसले,तरीसुद्धा सज्जनांच्या रक्षणासाठी व दुष्टांचा संहार करण्यासाठी आणिक रूपे धारण करून कार्य करतात.जीवास मात्र अज्ञानामुळे कर्तव्य पर पाडावे लागतात.म्हणून आपण विधीनुसार कर्तव्य पार पडावयास पाहिजे.तसेच जे जीव दु:खी आहेत,त्यांचे दु:ख कमी करून सुख द्यावावयास पाहिजे.यात आपलेही हित व त्यांचेही हित होते.||३९|| | सत्वं रजस्तम इति भजते निर्गुणो गुनान् | क्रिडन्नतीतोsत्र गुणैः सृजत्यवती हन्त्यजः ||४०|| अर्थः---तो वस्तुतः निर्गुण असतांही आपल्या क्रीडासाधनत्वेंकरून सत्त्व,रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करितां आणि जन्मरहित व क्रीडारहित असूनही स्वच्छेनें क्रीडा करूं लागला म्हणजें गुणांच्या योगानें उत्पत्तिस्थितीसंहार करितो||४०|| अर्थः----जसें आपल्या सभोवर गरगर फिरणाऱ्या मनुष्याला,श्रमण पावलेल्या दृष्टीनें,पुथिवी वाटोळी फिरत असें वाटतें,तसें चित्त,कर्म करूं लागलें म्हणजे तेथें अहंकारबुद्धीने श्रम पावलेल्या जनाचा आत्माहि कर्माधीन असल्यासारख्या भासतो ||४१|| भावार्थ:--- ज्याच्या—त्याच्या चित्तामध्ये अहंबुद्धी असल्यामुळे भ्रमामुळे स्वत:ला आत्मा असून,आत्मा न समजता कर्ता समजतो. स्वत:स कर्ता समजल्यामुळे त्या जीवास लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपण संत—महात्मा यांची संगती करून,त्यांच्या मुखातून शात्र श्रावण करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.यामुळे भ्रम नाहीसा होऊन ज्ञान प्राप्त होते.त्यामुळे जीव स्वत:स कर्ता न समजता आत्मा—ब्रह्म समजतो.त्यामुळे जन्म—मरण नाहीसे होऊन सुखरूप होतो.||४१|| अर्थः---हा भगवन् हरी श्रीकृष्ण,तुम्हां उभयतांचाच पुत्र आहे असें नाहीं,त्र सर्वांचाही पुत्र,आत्मा पिता,व माता तो ईश्वरच आहे ||४२|| अर्थः---पाहण्यांतकिंवा ऐकण्यात येणारा,जो भूत,भविष्य,वर्तमान,स्थावर,जंगम,लहान किंवा मोठा जो कोणताही पदार्थ उच्चारण्यांत येतो तो भगवंता- खेरीज मुळींच नाहींर,त्र तो भगवानच् सर्वरूप व सर्वांचा परमार्थरूपआहे||४३|| भावार्थः---काळात असून फक्त तोच सत्य आहे.तो कणा—कणात व्यापून आहे.ब्रह्मांडात सर्व ठिकाणी तो आहे.जग—नाम व रूप हे मात्र मिथ्या आहेत.मिथ्या म्हणजे जी वस्तू दिसण्यापुरती असते,मात्र असण्यापुरती नसते,अशा वस्तूस मिथ्या वस्तू असे म्हणतात.म्हणून आपण सत्य वस्तूचा स्वीकार करून मिथ्या वस्तूचा त्याग करावयास पाहिजे.मिथ्या वस्तू उ:खास कारण आहे व सत्य वस्तू सुखास कारण आहे.जसे झाड व झाडाची सावली आहे.यात झाड हे सत्य आहे व झाडाची सावली मिथ्या आहे.झाडास फळ आहे,पण झाडाच्या सावलीस फळ नाही.तसे परमात्मा—झाड सुखरूप आहे तर माया—झाडाची सावलीस फळ नाही म्हणून ज्यास फळ नाही त्याच्याकडे जाऊ नये व ज्यास फळ आहे,त्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा.||४३|| अर्थः—श्रीशुकाचार्य म्हणाला;--हे राजा,याप्रमाणें तो उद्धव आणि नंद हे परस्पर भाषण करीत असतां,ती सर्व रात्र निघून गेली.तेव्हां गोपी,उठून दिवे लावून घरांचे सडासंमार्जनादिक करून व चंदनादिकेंकरून,तीं पूजित करून,दह्यांचे मंथन करूं लागल्या ||४४|| अर्थः---तेव्हां ज्यांच्या राजुंचे आकर्षण करणाऱ्या हातांमध्ये कांकणांच्या माळा आहेत,ज्यांचे नितंब,स्तन,व हार हे हालत आहेत,ज्यांचे गाल कुंडलांच्या योगानें स्फुरण पावत आहेत व ज्यांचीं मुखें तांबडे केशर लावलेली आहेत अशा त्या गोपी,दीपांच्या तेजानें झळकणाऱ्या माखेलादिकांवर असलेल्या रत्नांच्या योगेंकरून शोभूं लागल्या||४५|| अर्थः---तेव्हां श्रीकृष्णाचे यश उच्चस्वरानें गायन करणाऱ्या गोपींचा,दह्यांच्या घुसळण्याच्या शब्दानें मिश्र झालेला तो मोठा स्वर्गांपर्यंत जाऊन पोंचला.ज्या ध्वनीच्या योगानें सर्व दिशांचे पाप नष्ट होऊन जात आहे ||४६|| अर्थः---नंतर भगवान् सूर्याचा उद्य झाला असतां,गोकुळवासी स्त्रियांनी,नंदाच्या दरवाज्यापुढे सुवर्णाचा रथ पाहून,त्या,हा रथ कोणाचा आहे इत्यादिक भाषण करूं लागल्या ||४७|| अर्थः---त्या क्रोधानें म्हणाल्या कीं,-अहो ज्याने कमलनयन श्रीकृष्णाला मथुरेत नेलें तो कंसाचा कार्यभाग साधणारा अक्रूर तर आला नाहीं ना?||४८|| कंसाला मारवून पुन्हा कशाकरितां येईल?अशी शंका आली असतां आपणच म्हणतात कीं,-तेव्हां केलेल्या कामानें संतुष्ट झालेल्या आपल्या धन्याचें (कंसाचे)औध्र्वदेहि कृत्य,आतां आमच्या योगानें साधणार आहे काय?म्हणजे आमच्या मासांचे पिंड करून त्याला देणार आहे काय?असें त्या स्त्रिया बोलत असतां,इतक्यांत यामुनेवरून स्नानसंध्यादिक कर्में आटोपून उद्धव तेथें प्राप्त झाला ||४९|| | (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील दशमस्कंधाच्या पूर्वार्धात नंदशोकापनयननामक हा शेचाळीसावा अध्याय समाप्त झाला)| _________________________________________________________________________________________________________ | ४७--- किरण २१---उद्धव व गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत-------२----- अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________(आतां ह्या सत्तेचाळिळसाव्या अध्यायामध्यें,उध्द्वानें श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे गोकुळांत असणाऱ्या गोपींना श्रीकृष्णाचे निरोप सांगून तत्त्वाचा बोध केला.नंतर नंदादिक सर्वांचा निरोप घेऊन पुन्हा हा मथुरेंत परत आला अशी कथा वर्णन केली आहे||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,ज्याच्या भुजा,गुडघ्यापर्यंत लांब आहेत,ज्यांचे नेत्र नवीन कमलासारखे सुरेख आहेत,ज्यानें पीतांबर व कमळांची माळा धारण केली आहे,ज्यांचें मुखकमळ सुशोभित आहे व ज्यांची कुंडले मणिखचित देदीप्यमान आहेत अशा त्याकृष्ण्सेव्क उद्धवाला पाहून,शुद्धहास्य करणाऱ्या गोकुळसंबंधी सर्व स्त्रिया,स्त्रियांना फारच मनोहर दिसणारा व कृष्णासारखा पीतांबरादिक वेश व भूषणें धारण करणारा हा कोणाचां कोण आहे )कोणत्या देशांतून येथें आला आहे?असा तर्क करणाऱ्या व त्याला जाणण्याविषयीं उत्कंठा धारण करणाऱ्या त्या सर्वगोपी,उत्तमकीर्ति भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय करणाऱ्या त्या उद्धवाच्या सभोंवार जमल्या||१-२|| अर्थः---नंतर तो श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आल आहे असें जाणून त्याला गोपींनी एकांती बोलावून नेलें आणि सलज्ज हास्ययुक्त अवलोकन व मधुर भाषण,इत्यादिकेंकरून त्याचा सत्कार करून,आसनावर बसवलेल्या त्याला नमस्कार करून,नम्रतेने विचारुं लागल्या कीं,-||३|| अर्थः----आम्ही तुला श्रीकृष्णाचा सेवक येथें प्राप्त झाला आहेस असें जाणतो.श्रीकृष्णाने आपल्या आईबापांचे (यशोदानंदाचे)प्रिय करण्याच्या इच्छेनें तुला येथे पाठविलें असावें||४|| अर्थः---कारण,आईबाप वगैरे बंधूंच्या स्नेहाचा संबंध सोडून देणें हें मानशील ऋषीलासुद्धा कठीण असतें,नाहीतर कंसाला मारून राज्य मिळविणाऱ्या त्या श्रीकृष्णाला गोकुळांत स्मरण करण्यास योग्य असें आम्हीं कांहीच पाहत नाहीं||५|| अर्थः---बंधुखेरीज दुसऱ्यावर जी प्रीति असत्ये ती केवळ आपलें कार्य साधण्यापुरतीच असून मैत्रीचें अनुकरणमात्र करणारी असत्ये,खरी नसत्ये;ती मैत्री,जशी पुरुषांनी स्त्रियांचेठिकाणीं कामनिमित्तक केलेली मैत्री असत्ये ती कामाची निवृत्ति होतांच निवृत्त होत्ये किंवा जशी भ्रमरांनी फुलांवर त्यांच्या परागनिमित्तिक केलेली मैत्री परांगांची निवृत्ति होतांच निवृत्य होत्ये,तशी समजली पाहिजे||६|| भावार्थ:---माता—पित्यांखेरीज इतरांबरोबर जे प्रेमसंबंधाचे जे सोंग आणले जाते,ते स्वार्थासाठीच असते.त्यास स्वार्थी प्रेम असे म्हणतात.वास्तविक प्रेम म्हणत नाही.ते प्रेम दिसन्यापुरते असते,पण असण्यापुरते नसते.स्त्रीयावरील प्रेम स्वार्थी असते.||६|| | निस्स्वं त्यजन्ति गणिका अकल्पं नृपतिं प्रजाः | अधीतविद्दा आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ||७|| | खगा वितफलं वृक्षं भुक्त्वा चातीथयो गृहम् | दग्धं मृगास्तथारण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ||८|| अर्थः---जसा वेश्या,निर्धन झालेल्या पुरुषाचा अत्याग करितात,किंवा जशा प्रजा पालनपोषणादिक करण्यास असमर्थ असलेल्या राजाचा;विद्या पढलेले शिष्य,गुरुचा;ऋत्विज,दक्षिणा दिलेल्या यममानाचा पक्षी,फळहीन झालेल्या वृक्षाचा,अतिथी,भोजन केलेल्या घराचा व हरिणी,वव्यांनें जळू लागलेल्या अरण्याचा त्याग करितात त्याप्रमाणे जार पुरुष,प्रीतीनें र्त झालेल्या स्त्रीचा भोग झाल्यावर लागलाच त्याग करितो||७-८|| भावार्थ:--- १---धन संपलेल्या माणसाला गणिका सोडून देते,कारण तिचे त्या माणसावर प्रेम नसून त्याच्या धनावर प्रेम असते म्हणजे धन हडप करण्याकरिता त्याचा आदर—सत्कार करते.त्या धनवान माणसास वाटके कि,ती गणिका माझ्यावर प्रेम करत आहे.जेव्हा याच्याकडील धन संपते,तेव्हा हे त्याला तिच्याकडे येऊ देत नाही,तेव्हा कळते,तिचे माझ्यावर प्रेम नसून माझ्या धनावर प्रेम होते.आता कळून कांहीच उपयोग नसतो.म्हणून आपण तरी अशा गणिकाची संगती न करता,आपली विधीची—लग्नाची जी पत्नी आहे,तिच्यावरच प्रेम करावे.इतर स्त्रियांवर प्रेम करू नये.२---रक्षण करू न शकणारा राजास प्रजा सोडून देते,कारण प्रजेंचे रक्षण करणे,त्यांना सुखी ठेवणे हे राजाचे कर्तव्य असते,अंतर्गत संरक्षण व बहिर्गत म्हणजे परकीय आक्रमण यापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे.म्हणून राजाने प्रजेचे संरक्षण करावे.त्यात त्याचेही हित व प्रेजेचे हित असते.३---शिक्षण पूर्ण झाल्यावर विध्यार्थी—शिष्याला गुरूला सोडून जातात,कारण विद्या प्राप्त झाल्यानंतर गुरूला सोडून विद्याच्या उपयोग करण्यासाठी जावे लागते.सोडणे दोष नाही,परंतू त्यांच्याशी कृतज्ञ राहावे लागते.कृतज्ञ म्हणजे गुरूंनी आपणास जी विद्या देलेली आहे,त्यांचा आपल्यावर ऋणांचा जो भार आहे,ती फेडावायाचा आहे असा भाव ठेऊन त्यांच्याशी अधून—मधून ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करणे व त्यांनी ज्यावेळेस बोलावले,त्यावेळेस त्यांच्याकडे जाऊन,त्यांच्या अज्ञाचे पालन करून कर्तव्य पार पाडणे त्यास कृतज्ञ असे म्हणतात.गुरुकडून विद्या प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्या घरी गेल्यानंतर आपल्यावर गुरूंचे उपकारांचे ऋण आहे असा भाव न ठेवता व ऋण फेडण्याचा प्रयत्न न करता,त्यांचे बोलावणे—निरोप आला तरी त्यांच्याकडे न जाणे,निरोपही न करणे त्यास कृतघ्न असे म्हणतात.म्हणून जीवांनी कृतघ्न न होता कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करावा,कारण त्यात विध्यार्थ्याचेच—शिष्याचेच हित असते. दक्षणा मिळाली कि ऋत्विज यजमानाला सोडून जातात.ऋत्विज म्हणजे शात्रानुसार धार्मिक विधी वेदमंत्रांच्या साह्याने करणारा जो ब्राह्मण असतो त्यास ऋत्विज असे म्हणतात.ऋत्विज यांनी गुरूकडे राहून धार्मिक विधीचे वेदमंत्र आहेत,त्याचा अभ्यास करावयाचा असतो.तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ऋत्विज होऊन विधी पार पाडवा.त्यात आपलेही हित व यजमानाचे हित असते. यजमानाचे बोलावणे आल्यानंतर त्यांच्याकडे जावे लागते.त्या कर्मांच्या विधीचा दक्षणा म्हणून स्वीकार करावा,तर व्यापारी वृत्ती नसावी,कारण शात्राने सांगितले आहे कि,दक्ष घ्यावी पण व्यापार करू नये.व्यापार केल्यास दोष लागतो,दक्षणा घेणे दोष नाही.||७|| भावार्थः---पक्षी फळे नसलेल्या झाडाला सोडून जातात,म्हणून आपल्यावळ कांहीनाकांही गुण असेल तर लोक विचारतात.आपल्याजवळ गुण नसेल तर कोणीच विचारत नाहीत.म्हणून आपण गुणवान होण्याचा प्रयत्न करावा.२—भोजन झाल्यावर अथिती गृहस्थाला सोडून जातात,कारण त्यांना पुढचा मार्ग स्वीकारावा लागतो.प्रवासात त्यांच्या साध्याकरिता मार्गक्रमण त्यांना करावे लागते,अथितीने जरुरीपुरते थांबावे,विनाकारण थांबू नये.तसेच आपण कोणतेही कार्य करत असतांना कार्यरत असावे व एक कार्य झाल्यानंतर पुढील कार्यास लागावे,विनाकारण थांबवू नये.३—पशु जळलेल्या जंगलाला सोडून जातात,कारण तेथे राहून कांहीच उपयोग होत नाही.त्याचप्रमाणे आपणसुद्धा विनाकारण कोठेही थांबवू नये.जेथे हित आहे,तेथेच थांबावे,कारण वेळे इतके महत्व कशालाच नसते.४—जार पुरुष स्त्रीला उपभोगल्यानंतर सोडून जातात,कारण त्या जार पुरुष्याचे प्रेम त्या स्त्रीवर नसून तिच्या शरीराचा भोग घेण्यासाठी असते.असे ते जार पुरुष स्वार्थी असतात.म्हणून स्त्रियांनी जार पुरुष्यांशी शारीरिक संबंध न ठेवता विधीने—लग्नसंबंध करून—विधिवत पती म्हणून स्वीकार करून प्रेमाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.थोडक्यात स्त्रीने व पुरुष्याने विधिवत—लाग्न संबंधाने—प्रेमाने एकमेकांचा स्वीकार करून प्रेमाने जीवन जगावे.जार पुरुषाचे व व्यभिचारिणी स्त्रीचे संबंध अनेकाशी असल्यामुळे रोगग्रस्त असण्याची शक्यता असते,त्यामुळे असाध्यरोग होण्याची शक्यता असते,त्या रोगामुळे प्राण निघून जाण्याची अधिक शक्यता असते,म्हणून असे संबब्ध न करता विधिवत स्त्री—पुरूषांचा स्वीकार करून प्रेमिक संबंध स्थापून आपले जीवन जगावे.अधार्मिक संबंध स्थापित करून शारीरिक संबंध केले तर मेल्यानंतर यमपुरीत गेल्यानंतर यम त्य—त्या स्त्री—पुरुषांना लोखंडाची तापलेली स्त्री व न तापलेला म्हणजे साधा पुरुष यांच्याशी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडतात.आता फक्त कल्पना करा कि अशी कृती करण्यात किती वेदना—दु:ख होत असेल.तसेच तापलेला पुरुष व न तापलेली स्त्री यांना त्याच रीतीने शारीरिक संबंध स्थापित करावयास भाग पाडतात.त्या स्त्रीचे किती आशय दु:ख भोगावे लागते.थोडक्यात स्त्री—पुरुष विधिवत—लग्न—पेमाने स्थापित करून जीवन जगावे.किंवा ब्रह्मचारी राहून विधिवत जीवन जागून परमार्थ करावा,हे तर सर्वांपेक्षा अतिउत्तम आहे.||८|| अर्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें कृष्णाचा दूत असा तो उद्धव,गोकुळांत गेला असता लोकव्यवहार सुटून कृष्णाकडे देह वाणी व मन लागलेल्या त्या गोपी,प्रिय श्रीकृष्णाची कैशोर व बाल्यवस्थामध्यें झाललीं जी कर्मे त्यांचे वारंवार स्मरण करून गायन करीत व निर्लज्ज पणें रुदन करीत असता उद्धवाला विचारुं लागल्या||९-१०|| भावार्थ:--- गोपींचे मन वाणी आणि शरीर श्रीकृष्णामध्येच तल्लीन झाले होते,कारण लोकव्यवहार करत असतांना लोकव्यवहारात त्यांचे लक्ष—मन नव्हते,त्यांचे मन श्रीकृष्णातच होते.शरीराने संसारात होत्या व मनाने—प्रेमाने श्रीकृष्णात होत्या.आपणही शरीराने संसारात असावे व मनाने परमार्थात असावे.श्रीकृष्णांनी किशोर अवस्थेत जीतक्या बाललीला केल्या,त्या सर्व बलैलांचे स्मरण करून गायन करू लागल्या.आपणही श्रीमद्भागवत कथेतील लीला,काल्याच्या कीर्तनातील लीला,अभंगातील लीला चे गायन—श्रवण करतोत. ते श्रावण फक्त शरीराने न करता प्रेमाने—मनाने श्रवण—गायन कराव्यात.देहाभानाचा—संसाराचा विसर पडावा.असे झाले म्हणजे गोपींना जे फळ मिळाले तेच फळ आपणासही मिळेल,यात तिळमात्र शंका नाही,हे लक्षात------------------------------ठेवावे.वियोग म्हणून रडूही लागल्या,कारण संयोग व्हावा ही त्यांच्या चित्ताची भूमिका होती.आपणासही वियोगाचे रडू यावे व संयोग येण्याची चित्तात तळमळ असावी.चित्तात भेटीची तळमळ असली म्हणजे संयोग हा होतोच.फक्त तळमळ--------------------ठेवावे.||९—१०|| अर्थः---त्यांमध्यें कोणी एक गोपी श्रीकृष्णाच्या समागमाचें ध्यान करीत असता एका श्रामाराला पाहून त्याच्यावर,श्रीकृष्णाने आपली प्रसन्नता करण्याकरितां ह दूत पाठविला आहे अशी कल्पना करून असें म्हणाली कीं,||११|| अर्थः---गोपीं म्हणाली-हे भ्रमरा हे कापट्याच्या मित्रा,तुं आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कारानें आमची प्रार्थना करुं नकोस.तुझ्या मिशा,सवतीच्या स्तनांनी संमर्दन झालेल्या भगवंतांच्या वनमालासंबंधी केशरानें रंगून गेल्या आहेत.जच्या तुं असला (मिशा रंगलेला)दूत आहेस त्या यादवपति श्रीकृष्णाने यादवांच्या सभेमध्यें निंदा होण्यास पात्र अशी त्या मानवती नगरवासी स्त्रियांचीच प्रसन्नता संपादन करावी ||१२|| अर्थः---जसा तुं दुष्टचित्त आहेस तसाच तुझा धनी श्रीकृष्णहि आहे,जसा तुं फलांचा सुगंध घेऊन लागलाच त्यांचा त्याग करितोस त्याप्रमाणेंच श्रीकृष्णानेही मोहित करणारें आपले अधरामृत एकावरच आम्हांसपाजून आमचा तत्काळ त्याग केला आहे.आम्हीं काहीं त्या लक्ष्मीसारख्या फसावयाच्या नाहीं||१३|| अर्थः---नंतर अनेकप्रकारचें गुंजाराव शब्द करणाऱ्या त्याला,हा आमच्या प्रसन्नतेकरितां कृष्णाचें गायन करीत आहे असें मानून म्हणाली कीं,-हे भ्रमरा,ये तुं येथे आम्हां वनचर स्त्रियांच्या पुढें त्या पुराणपुरुष यादवपति श्रिक्रुश्नचेअ फारसें गायन करण्याकरितां करितोस?श्रीकृष्णाच्या सांप्रतकाली ज्या सख्या आहेत त्यांच्यापुढे त्याची कथा गायन कर.कारण,ज्यांच्या कामज्वरव श्रीकृष्णाने शांत केला आहे त्या श्रीकृष्णाला आवडत्या स्त्रियाच तुला इच्छित असेल टी देखील ||१४|| अर्थः---हे मातें,असे बोलुं नकोस.तुझें स्मरण करून मदनानें विव्हळ झालेल्या त्या कृष्णानें,तुला प्रसन्न करण्याकरितां मला पाठविलें आहे असें म्हणशील तर-हे कपट्या,सुंदरहास्ययुक्त भ्रूसंकेत करणाऱ्या त्या श्रीकृष्णाला स्वर्ग,भूमि व पातळ यांमध्यें जितक्या म्हणून स्त्रिया आहेत त्यांपैकी कोणत्या बरें दुर्लभ आहेत?कोणत्याच नाहींत अरें लक्ष्मीसुद्धा ज्याच्या चरणरजाची सेवा करिते त्याच्याजवळ आमची योग्यता काय आहे?तथापि तूं कृष्णाजवळ जाऊन असें काळींव कीं दीनावर द्या करणाऱ्या पुरुषालाच मोठा यशस्वी असें म्हणतात||१५|| भावार्थ:---गोपी म्हणतात कि,कृष्णांच्या कपटपूर्ण मनोहर हश्यांना आणि इसाऱ्यांना आम्ही भाळणार नाहीत,कारण आमचा त्याग करून कृष्ण गेलेला आहे,नाटकी—स्वार्थी आहे.त्याला उत्तम श्लोक नांव ते शोभणार नाही,कारण आम्हास धोका दिलेला आहे.तो कृष्ण दिनावर दयाभाव दाखवीत नाही.आम्हास द्सोडून गेलेला आगे,म्हणून त्यास गालबोट लागलेले आहे.भक्तांनी—आपण असा आरोप भगवंतांवर करू नये कारण त्यास अनेक भक्त असतात,अनेक काम करावयाचे असते.म्हणून आपण भगवंत म्हणजे स्थूल शरीरापुरता भगवंत नसून तो व्यापक आहे.तो पूर्ण ब्रह्मांडात व्याप्त असून सर्वांच्या अंत:करणात आहे.आपल्या बाहेरही आहे आपल्या शरीराच्या आतही आहे.जसे घात पाण्यात बुडवल्यानंतर घाटाच्या आताही पाणी आहे व घाटाच्या बाहेरही आहे.||१५|| अर्थः---नंतर पायांवर बसावयास आलेल्या त्या भ्रमराला,हा कृष्णाकडून आपणाजवळ क्षमा करविण्याकरितां आला आहे असें मानून म्हणाली कीं,-श्रमरा,तुं माझ्या पायांवर मस्तक थेम नकोस.कृष्णाकडून शिकून आलेल्या व दूतकर्मांनी व प्रियकर भाषणांनी दुसऱ्याची प्रार्थना करण्यास चतुर झालेल्या तुझें सर्व कपट मी जाणत्यें.कृष्णासारखा तूंही अविश्वसनीय आहेस.बरें,तुं अशी तिरस्कार करितेस तेव्हां त्या कृष्णानें तुझा काय अपराध केला आहें?असें म्हणशील तर-त्या कृतघ्न श्रीकृष्णाने,त्याच्या करितांच ज्या आम्हीं,पुत्र,पति व स्वर्गादिक परलोक यांचा त्याग केला आहे त्या आम्हांला टाकून दिलें,हा अपराध केला आहे.तेव्हा आतां त्याच्या बरोबर एकी करून काय करावयाचें आहे?कांहीच नाहीं||१६|| भावार्थ:--- गोपी हे भ्रमरास--दूतास म्हणजे उद्धवास अप्रत्यक्ष उद्धेसून बोलत आहे,कारण आपला खेद—दु:ख श्रीकृष्णास सांगावे हा त्या गोपींचा उद्ध्येस आहे.वास्तविक पाहता गोपींनी श्रीकृष्ण यांच्यासाठी आपले पती,पुत्र आणि इतर नातेवाईकांना सोडले आहे.त्यांना श्रीकृष्णाइतके महत्व दिले नाही.श्रीकृष्ण आम्हासी कृतघ्न झालेला आहे.अशा व्यक्तीसी आम्ही कधीच तडजोड करणार नाही,कारण तो आमच्याशी कृतघ्न झालेला आहे.गोपींचा हा भाव प्रेमळ आहे,कारण असे ब्प्लाले असता,हगावंत श्रीकृष्ण लवकर येतील व त्यायोगे आमचे दर्शन होईल असा त्यांचा शुद्ध भाव आहे.तसाच आपलाही भगवंतांवर शुद्ध भाव असावा.||१६|| अर्थः---आणि कृष्णाची पूर्वीची कर्मे मनांत अंम मी त्यापासून फारच भितें-ज्यानें रामावतारी व्याधासारखा स्वीकारून वाळूच्या वध केला आणि सीतेच्या अंकितपणें कामातून होऊन आलेल्या शुर्पणखेच्या कर्णनासिकांचे छेदन करून तिला विद्रूप केलें.तसेच त्याच्याही पूर्वी वामनवतारीं,जसा कावळा एखाद्याचा पार्थ थोडासा भक्षण करूनही पुन्हा त्यला वेढा घालवितो त्याप्रमाणें ज्यानें बळीराजाकडून पूजा ग्राःन करूनही त्याचें वारूनपाशांनी बंधन केलें त्या कृष्णाची सख्यें जोडून आतां पुरें झालें.असें जर आहे तर तुम्हीं काय म्हणून त्यांचे निरंतर गायन करितां,असें म्हणशील तर-त्याचा कथारूप अर्थ टाकावयाचा मोठा कठीण आहे ||१७|| भावार्थ:--- अरे ए मधुकरा! जेव्हा तुम्ही रामावतार होता,तेव्हा वालीला व्याधाप्रमाणे—शिकाऱ्याप्रमाने कपात करुन नियमांचे उल्लंघन करून मारले—अधर्मानुसार मारले.शूर्पणखा तुमची पत्नी होण्याची इच्छा होती,पण त्यांचे कान—नाक कापून विद्रूप केले.बलीकडून वामन अवतारात एकरूप दाखवून अन्य रूप धारण करून दान घेऊन,त्यांनाच पाताळात ढकलेले.जसे कावळा घालणारच बळी घेऊन त्यालाच दु:ख देतो.त्याप्रमाणे वालीला वागवले.म्हणून अशा गैरवागनारांची आम्हास अजिबात मैत्री करावयाची नाही.हे असे गोपींचे बोलणे अति प्रेमाचे आहे.त्यांचा भाव शुद्ध आहे.असे म्हून शेवटी म्हणतात आमची मैत्री करण्याची इच्छा नाही,तरी पण त्यांच्याविशायींच्या लीला आम्ही टाळू शकत नाहीत,कारण आम्हास त्यांचे वेड लागलेले आहे.भगवंतांनी लौकरात—लौकर भेटावे हा तसा बोलण्याचा उद्द्येस आहे.आपणही भगवंतांसी जवळीक साधण्याचा प्रयत्न करावा.भगवंतांविषयी वेड—ध्यास लागावे.||१७|| अर्थः---आणि त्याची कथाही धर्मकामार्थरूप वेलीला आपटून टाकणारे आहे,असें आम्हीं जरी जाणतो तथापि तिचा त्या करण्यास आम्हीं शकत होत नाहीं,काय करावें!ज्या भगवच्चरित्र कर्णामृताच्या एका कानाच्या एक वार हि सेवनाने ज्याचे राग द्वेषांदिक धर्म नाहीसें झालें आहेत असें पुष्कळ लोक,असून नसल्यासारखें होऊन दुःखित झालेले घरातील स्त्रीपुत्रादिक कुटंब तत्काळ सोडून देऊन आपणही भोगरहित होत असतां पक्षांसारखे पोट भरणाऱ्या करितां भिक्षा मागत हिंडत असता.म्हणजे ज्यांच्या कथा रूप अमृताच्या एकव रही श्रवणाने राग द्वेषा दिदोष रहित झाल्यामुळें संसारिक लोकांसारखा नाश न पावणारे कितीएक परमहंस योगी,तुच्छ अशा गृहासहित कुटुंबाचा तत्काला त्याग करून सर्वसंगरहित असतें परहंस धर्माचे आचरण करीता म्हणून त्या श्रीकृष्णाच्या कथा रूप अर्थ परमपुरुषार्थी रुपी असल्यामुळें दुस्त्यज आहे ||१८|| भावार्थ:---गोपींची अवस्था असी झाली आहे कि,भगवंतांच्या लीलांचा भगवंतांबरोबर सहवास घडला व भगवंत मथुरेला गेल्यानंतर लीलांचे स्मरण करतातच,यामुळे त्याचे सर्व लक्ष भगवंत कृष्णाकडेच लागलेले आहे.आपलीही अवस्था गोपींसारखी झाली तर गोपींसारखीच फळ आपल्यास मिळेल.म्हणून गोपींसारखी निष्काम भक्ती करण्याचा आपण प्रयत्न करावा,त्यात हित आहे.||१८|| अर्थः---बरें अशा शाहाण्या जर तुम्हीं आम्हां तर पूर्वी कृष्णाबरोबर सख्य करून त्याच्या स्वाधीन कशी झाली होती?असें म्हणशील तर-जशा,काळवीट हरणाच्या भोळ्या स्त्रिया,हरिणी,व्याधाचे मधुर गायन ऐकून तें सत्य आहें असें मानीत असतां त्याजवळ जाऊन बाणांची विद्ध झाल्या म्हणजे दुःखाचा अनुभव घेतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या अज्ञानी स्त्रिया आम्ही,त्याच कपटी श्रीकृष्णाचे मी कधीच खोटे भाषण केलेले नाहीं इत्यादीक भाषण खरें आहे असें मानीत असता त्या कृष्णाच्या नखस्पर्शाने अतिशय वृद्धींगत झालेल्या मदनाच्या पिडीने युक्त होऊन वारंवार हें दुःख पाहत आहो .यास्तव हें दूता,स्मरणामात्र करून मनाला क्षोभ उत्पन्न करणारी तीं कृष्ण कथा राहुं दे,तूं दुसरीच कथा संग||१९|| भावार्थ:---हरिणी जशा व्याधांच्या मंजुळ गायाणावर विश्वास ठेवतात आणि विश्सामुळे फसतात,त्याचप्रमाणे आम्ही प्रियशी गोपी त्या कपटी श्रीकृष्णांचे गोड—गोड बोलणे खरे वाटले,ते ऐकून फसलोत.संसाराकडे दुर्लक्षित झालोत.देहसंबंधीकडे दुर्लक्षित झालोत. आता आम्ही फक्त यांच्या लीलांचे स्मरण करूत.आम्हास त्यांनी धोका देलेले पण आम्ही त्यांना धोका देणार नाहीत.त्याचप्रमाणे आपण सतत—निरंतर भगवंतांचेच स्मरण करावे.त्या लीलांचा विसर पडू देऊ नये.यात जीवांचेच सार्थक आहे.||१९|| अर्थः---परत जाऊन पुन्हा आलेल्या त्याला म्ह्नालिया किया,-हे प्राणसारख्याचा मित्रा,श्रीकृष्णाने पाठविलें म्हणून तूं पुन्हा आला आहेस काय?हे दूता,तूं मला पूज्य आहेस,तुला काय पाहिजे?जें पाहिजें असेअल टी मागून घे.मी तुम्हांला कृष्णाजवळ नेणार आहें,असें म्हणत असशील तर-ज्याचा समागम सोडणें फार कठीण आहे त्या कृष्णाजवळ,येथें असणाऱ्या आम्हांला तूं कसा नेशील ?नेण्यास कोणती अडचण आहे असें म्हणशी ल तर-हे सौम्या,ज्याच्या वक्ष:स्थळाचेठिकाणी क्षमीनामक स्त्रीनिरंतर सहवास करीत आहे,त्याला आमची काय गरज आहे?||२०|| भावार्थ:--- हे प्रियतमाच्या सख्या!तू त्यांच्याकडून आलास असे आम्हास वाटत आहे,कारण त्यांचा सहवास करणारे सत्वगुणी असतात असे आम्हास वाटत आहे.बहुतेक गोपींची मनधरणी करण्यासाठी तुम्हास आमच्याकडे पाठवलेले असावे असे आम्हास वाटत आहे.एखादी व्यक्ती विरहाने दु:खी झालेली असेल व आपले त्या दु:खित व्यक्तीकडे जाने होत नसेल तर आपण कमीत—कमी त्यांच्याकडे आपण आपला जवळचा कोणी तरी पाठवून त्यांचे सांत्वन करावयास पाहिजे,कारण निरोपाने पूर्ण समाधान न झाले तरी कांहींना--कांही समाधान होत असते.आपल्या कामाच्या वेळेनुसार केव्हांना—केव्हा तरी आपण प्रत्यक्ष भेट घ्यावयास पाहिजे.त्यात आपलेई हित होते व त्यांचेही हित होत असते.म्हणून विवेक करून इतांच्या सुखदु:खात भाग घेणे कर्तव्य ठरते.||२०|| अर्थः---त्यानें कांही गुप्त मजकूर सांगितलेली ती गोपी त्याला पुन्हा म्हणत्ये कीं,-हे सौम्या,मी तुला असे विचारीत्यें कीं,नंदराजाच्या पुत्र श्रीकृष्ण,व्रतबंध झाल्यावर वोस्या शिकण्याकरिता गुरूच्या घरीं गेला होता तो तेथून येऊन आता मथुरेंमध्यें खुशाल आहे ना?बरें,तो यशोदानंदांसहित आपल्या घराचें व बांधव गोपांचें स्मरण करितो काय?बें तो केव्हांतरी आम्हां दासिंच्या कथावर्ता बोलतो काय?बरें,केव्हांतरीं अगरुसारखा सुगंधयुक्त आपला आहात आमच्या मस्तकीं ठेवील काय?||२१|| भावार्थ:--- हे मधुकरा !आपण आम्हास हे सांगा कि,श्रीकृष मथूरेत आहेत कि अन्य ठिकाणी गेलेले आहेत?त्यांना त्यांचे आई—वडिल—नंदाबाबा आणि यशोदा जे गोकुळात आहेत त्यांची आठवण येते का? गोकुलमध्ये जे गोपाल आहेत,त्यांची त्यांना आठवण येते का?आम्ही तर त्यांची दासी आहोत,या दासींची कधी तरी आठवण येते का ?या दासुन्विषयी कांही संगतात काय ?अगुरुसारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मास्तकावर ठेवतील काय?त्यामुळे त्यांची आमच्यावर कृपा होईल.त्यासाठी आम्ही इच्छित झालो आहेत,कारण त्यामुळे आमचे कायमचे दु:ख जाईल व कायमचे सुख प्राप्त होईल.||२१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयीं उत्कंठीत झालेल्या त्या गोपींना पाहून तो उद्धव,प्रिय श्रीकृष्णाच्या निरोपांनी त्यांचे सांत्वन करीत असता असें म्हणाला कीं,-||२२|| भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या गोपींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगितला. त्यांचे सांत्वन—दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला.आपणही कोणी कांही कारणाने दु:खी असेल तर,त्यांचे दु:ख कमी किंवा पूर्ण निष्कामतेने घालवण्याचा प्रयत्न करावा.त्यासच “निष्काम” भक्ती असे म्हणतात.त्यात उभयतांचे हित असते||२२|| | अहो यूयं स्म पूर्णार्था भवत्यो लोकपूजिताः | वासुदेवे भगवती यासामित्यर्पितं मनः ||२३|| अर्थः---उद्धव म्हणाला –अहो गोपीहो,तुम्ही कृतार्थ असून सर्व लोकांना पूज्य आहां.कारण ज्या तुमचें मन षड्गुणैश्र्वर्यसंपन्न वासुदेव श्रीकृष्णाचेठिकाणी याप्रमाणें अर्पित असून स्थिर झालें आहे||२३|| भावार्थ:--- उद्धव गोपींना म्हणतो कि,”गोपिंनो तुम्ही कृतकृत्य आहात म्हणजे मानव देहाला आल्यानंतर परमात्मरूप झाला म्हणजे आपण मोक्षरूप झाला आहात.आपण पूजनीय झाला आहात,कारण तुम्ही तुमचे मन भगवंतांस समर्पित केले आहेसमर्पित केले आहे म्हणजे,ज कर्म केले आहे,जी उपासना केलेली आहे,ते निष्काम केलेले आहे.त्या कर्मांच्या मोबदल्यात तुम्ही भगवंतांकडे संसारातील कांहीच मागितले नाही.संसारातील कांहीच न मागता ते कर्म—उपासना भगवंतांना अर्पण केलेली आहे.त्याचप्रमाणे आपणसुद्धा निष्काम कर्म व उपासना करून ते सर्व भगवंतांस अर्पण करावे.असे केले असता,गोपींना जे सध्य प्राप्त झाले तेच सध्य आपणाससुद्धा प्राप्त होणार,असे निश्चित आहे.म्हणून निष्काम परमार्थ करावा.||२३|| अर्थः---दान,व्रत,तप,होम,मंत्रादिकांचा जप,वेदपाठ,इंद्रियांचा निग्रह,तशींच नानाप्रकारची दुसरीही कल्याणाची साधनें यांच्या योगेकरून श्रीकृष्णाचेठिकाणीं भक्तिच साधली जात्ये ||२४|| भावार्थ:---दान,व्रत,तप,होम,जप,वेदाध्ययन,ध्यान,धारणा,समाधी आणि आत्मकल्याण ही असी अनेक साधन—भक्ती आहे.या सर्व साधनांचे साध्य भगवंत प्राप्तिच आहे,अन्य दुसरे कांहीच नाही.म्हणून आपण वरील जी साधने आहेत आहेत,त्या सर्व साधने निष्काम कर्म करून,निष्काम उपासना करून भगवंतच प्राप्त करावा,कारण त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होणार,यात तिळमात्र शंका नाही.||२४|| अर्थः—हे गोपीहो,तुम्हीं उत्ममह्लोक भगवंताचेठिकाणीं जी सर्वोत्तकृष्ट भक्ति केलीत हि फार चांगली गोष्ट झाली.कारण,ही भक्ति मननशील ऋषींनाहि अतिदुर्लभ आहे ||२५|| भावार्थ:--- गोपींनी स्वत: निष्काम कर्म व निष्काम भक्ती करून जगापुढे आदर्श ठेवलेला आहे.त्यामुळे आपले भाग्य उदयास आले आहे.म्हणून मार्ग तयार असेल तर त्यावरून जाण्यास विशेष कष्ट लागत नाहीत.आपणास त्या मार्गाने जावावयाचे आहे.||२५|| | दिष्ट्या पुत्रान् पतीन् देहान् स्वजनान् भवनानी च | हित्वावृणीत यूयं यत् कृष्णाख्यं पुरुषं परम् ||२६|| अर्थः—आणि तुम्हीं आपले पुत्र,पति,देह,स्वजन व घरेंदारे वगैरे टाकून जो श्रीकृष्णनामक परपुरुषाचा स्वीकार केलात हि फार चांगली गोष्ट झाली ||२६|| भावार्थ:--- तुम्ही पुत्र,पती,शरीर,स्वजन आणि घरे सोडून म्हणजे देहसंबंधीचा त्याग करून भगवंत श्रीकृष्णांचा स्वीकार केलेला आहे.देहसंबाधीकडे दु:ख आहे,तर भगवंत परमात्मा यांच्याकडे सुख आहे.जीवास दु:ख नको आहे,तर सुख हवे आहे.त्यामुळे ती आपली इच्छा पूर्ण झालेली आहे.त्यामुळे आपले भाग्य उदयास येऊन कृत्यकृत्य झाला आहात.||२६|| | सर्वात्मभावोsधिकृतो भवतीनामधोक्षजे | विरहेण महाभागा महान् मोsनुग्रहः कृतः ||२७|| अर्थः---हे महाभाग्यवतीहो,तुम्हांला विरहानें भगवान् श्रीकृष्णाचेठिकाणीं जी प्रेमलक्षण एकांतभक्ति प्राप्त झालीं तीं तुम्हीं मला सहज दाखविलीत,त्याच्या योगानें तुम्हीं माझ्यावरसुध्दां मोठा अनुग्रह केला आहेत,म्हणजे ती पाहून मीहि कृतार्थ आहे ||२७|| भावार्थ:--- श्रीकृष्णांच्या वियोगामुळे गोपींना जी एकांत भक्ती घडली,ती भक्ती उद्ध्वास प्रत्यक्ष पाहावयास मिळाली—त्या भक्तीचे दर्शन घडले.त्यामुळे गोपींची कृपा उद्द्वास झाली असे उद्धव त्यांच्यासमोर प्रगट करत आहे.||२७|| अर्थः---यास्तव हे कल्याणीहो,मी श्रीकृष्णाचे गुप्तकार्य करणारा दूत आहें तो मी त्या प्रिय श्रीकृष्णाचा तुम्हांला सुख कारक असा सांगावयाचा जो निरोप घेऊन आलों आहें तो आतां सांगतों ऐका ||२८|| अर्थः---श्रीभगवंताने तुम्हांला असें सांगितलें आहे कीं,तुमचा व माझा सांगितले कोणत्याही देशीं किंवा कोणत्याही कालीं वियोग मुळींच नाही.कारण मी सर्वांचा आत्मा आहें,जशी आकाश,वायू,तेज,जळ,व पृथिवी ही पंचमहभुते स्थावरजंगमात्मक सर्व पदार्थांमध्यें राहत आहेत त्याप्रमाणें मीहि,मन,प्राण,भूतें इंद्रिये आणि गुण यांच्या अधिष्ठानरूपत्वेंकरून सर्वांमध्यें व्यापून राहिलों आहे.||२९|| भावार्थ:--- श्रीकृष्ण यांचा निरोप उद्द्व गोपींना सांगत आहे---‘ तुमचा माझ्याशी झालेला पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही,कारण जीवात्मातील आत्मा व मी एकच आहे.तो आत्मा मीच आहे.जीवात्म्यातील स्थुलशरीर व सुक्ष्मशरीर मिथ्या—आनात्मा आहे.त्या जीवात्म्यातील आत्मा मीच आहे.आत्म्याचा व माझा वियोग कधीच होऊ शकत नाही,कारण तो अमर आहे व व्यापक असून एक आहे.माझ्या कृपेमुळे तुमचे जन्म—मरण निवारण झालेले आहे.तुम्ही भाग्यवान आहात.मी तुमचा स्वीकार केलेला आहे.हे मिथ्या जी पंचमहाभूते आहेत,त्यांना माझाच आश्रय आहे.ते माझ्यामुळेच—माझ्या सत्तेमुलेच आहेत.||२९|| अर्थः---आणि मी आपल्या मायेच्या सामर्थ्यानें आपल्या स्वरूपाचेंठिकाणीं भूतें,इंद्रियें आणि गुण यांच्या रूपानें आपणच उत्पन्न करितों,संहार करितों व पालन करितों||३०|| भावार्थ:--- भावांत त्याच्या मायाद्वारे पंचमहाभूते,इंद्रिये,आणि इंद्रियांची विषय स्वत:मध्ये स्वत:च उत्पन्न करतो.त्या सर्वांचे पालन—पोषण करतो व त्यांचा संहार तोच करतो.हा सर्व व्यवहार करत असला तरी जीवांच्या कार्मान्नुसार हे कार्य करतो.||३०|| | आत्मा ज्ञानमयः शुद्धो व्यतिरिक्तोsगुणान्वयः | सुषुप्तीस्वन्पजाग्रद्भिर्मायावृत्तिभिरीयते ||३१|| अर्थः---कारण,आत्मा,-शुद्ध व गुणांत ण सांपडलेला असल्यामुळें गुणांहून निराळ,ज्ञानरूप आहे.तो मायाकार्यभूत मनाच्या सुषुप्ती,स्वप्न व जागृतीरूप वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रीगुणांसी त्याचा संबंध नाही.तथापि सुषुप्ती,स्वप्न व जागृतीरूप वृत्तींनी विश्वतैजसाप्रज्ञरूपांनी प्रतीतीला येत असतो स्वतां प्रतीतीला येत असतो स्वतां प्रतीतीला येत नाहीं ||३१|| भावार्थ:--- आत्मा मायापासून वेगळा आहे,कारण आत्मा आत्मा आहे व माया आनात्मा आहे.आत्मा सत्—चित्—आनंदरूप आहे तर माया ही असत्—चित्—दु:खरूप आहे.म्हणून आनात्म्याचा त्याग करून आत्म्याचा स्वीकार करावा.त्रिगुण हे मायाचे आहेत,तर आत्म्याचे नाहीत.आत्म्याचा व गुणांचा कांहीच संबंध नाही.सुषुप्ती,स्वप्न व जागृति या वृत्ती मायेच्या आहेत.जेवढे—जेवढे मायेचे आहेत ते—ते दु:खरूप आहेत.म्हणून ज्ञानाद्वारे विवेक करून त्यांचा त्याग करावा. अर्थः---जसा जागा झालेला पुरुष,स्वप्नात पाहिलेले पदार्थ मिथ्या आहेत असें मानितो त्याप्रमाणे ज्ञानी लोक ज्यांस खोटे मानितात,त्या शब्दादिक विषयांचे ज्या मनाच्या योगानें चिंतन घडतेआ व चिंतन होत असतां ज्याच्या योगानें इंद्रियांना व इंद्रिययुक्त देहाला अध्यासने ती सर्व इंद्रियादिक मीच आहे असें प्राणी मानितो,त्या मनाचा निरोध आळस ण करितां केला पाहिजे-||३२|| भावार्थ:---झोपेतून जागा झालेला मनुष्य स्वनात दिसलेले पदार्थ खोटे आहेत असा निश्चय करतो व ते पदार्थ न मिळाले तरी दु:ख मानीत नाहीत,कारण ते पदार्थ दिसण्यापुरते होते तर असण्यापुरते नव्हते.त्याचप्रमाणे आपणास प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ खोटे म्हणजे मिथ्या आहेत.मिथ्या म्हणजे दिसण्यापुरते असून असण्यापुरते नाहीत,म्हणजेच स्वनासारखे आहेत.म्हणून ते न मिळाले तरी दु:खास पात्र होऊ नये.असे सर्व कळण्याकरिता संत—महात्न्म यांची संगती करून कळून घेण्याचा प्रयत्न करावा.इंद्रीयापासून विषयांना आवरण्याचा प्रयत्न करावा,कारण इंद्रिय आणि विषयापासून जे सुख मिळाल्यासारखे वाटते,ते क्षणिक असते,जसे स्वनात मिळालेल्या धनापासून क्षणिक सुख असते.विषयापासून मिळालेल्या सुखात स्वप्नात मिळाल्याला सुखात कांहीच फरक नाही.म्हणून शब्द,स्पर्श,रूप,रस गंध या पंचविषयांपासून इंद्रियांना आवरावे—ताब्यात ठेवावे.शरीरास आवश्यक तेवढ्या विषयांचा भोग घ्यावा.विषय सेवन करण्यासाठी अपरिमित अहित होते.त्यासाठी भरपूर धन मिळवावे लागते.त्यांच्यासाठी भरपूर वेळ जातो. त्यामुळे आपणास परमार्थ करण्यासाठी भरपूर वेळ मिळत नाही.याकरिता विषयांचा त्याग करून सुखी व्हावे||३२|| | एतदन्तः समान्मायोः योगः सांख्यं मनीषिणाम् | त्यागस्तपो दमः सत्यं समुद्रान्ता इवापगाः ||३३|| अर्थः---(वेद वेदांतील साधनांचा समुदाय),अष्टांगयोग विचारवान् पुरुषांचा आत्मानात्मविवेक,संन्यासस्वधर्म इंद्रिय निग्रह व सत्य हे सर्वही प्रकार,जशा सर्व नद्दया अखे समुद्रामाध्येंच जाऊन मिळतात त्याप्रमाणे मनोनिग्रहामध्येंच पर्यवसानपावतात,म्हणजे मनोनिग्रह हेंच त्यांचे शेवटचें फळ होय ||३३|| भावार्थ:--- १--वेदाभ्यास,म्हणजे जे वेद आहेत,त्यांचे अध्ययन—अभ्यास करणे होय.त्यामुळे आपणास “जीवाब्राह्मऐक्यज्ञान” होते. ज्ञानामुळे आचरण कसे करावे व आचरण कसे करू नये ते कळते म्हणजेच धर्म म्हणजे काय व अधर्म म्हणजे काय याचे ज्ञान होते.धर्मानुसार आचरण केल्या जाते व धर्मानुसार आचरण केल्या जात नाही.त्यामुळे पाप न होता पुण्य मिळते.स्वस्वरूपाचे ज्ञान होऊन जन्म—निवारण होऊन जीव सुखरूप होतो.म्हणून संत—महात्मा यांची संगती करून वेदांचा अभ्यास करावा.२--योग म्हणजे परमात्मा यांच्याशी ऐक्य—संबंध जोडणे,त्यास “योग” असे म्हणतात.निष्काम कर्मयोगाने अंत:कारण शुद्ध होते.निष्काम भक्तीने अंत:कारण शुद्ध होते.३—आत्मानात्मा विवेकाने आत्मा सार आहे.जे सार आहे,ते सुखरूप आहे.आत्मा असार आहे.जे आसार व आनात्मा असार आहे.जे असार आहे,ते दु:खरूप आहे.४—त्याग म्हणजे आत्मानात्मा विवेक करून अनात्मा याचा त्याग करून आत्म्याचा स्वीकार—भोग घ्यावावयास पाहिजे.आपण असे केले असता सुखरूप होतोत.५—तपश्चर्या तीन प्रकारची आहे.शारीरिक तप म्हणजे देव,ब्राह्मण,गुरु—मत—पिता,आचार्य,वृद्ध,श्रेष्ठ,ज्ञानीजन यांचे पूजा,मान—सम्मान,आदर,पावित्र,सरलता,ब्रह्मचारी व अहिंसा यास शारीरिक तप असे म्हणतात वाचिक तप म्हणजे उद्वेग होईल असे न बोलणे व प्रिया,हितकर,सत्य बोलणे.तसेच वेदाशात्रांचे अध्ययन करणे.देवाच्या जप करणे.मानसिक तप म्हणजे मनाची प्रसनता,शांत भाव,भगवंत चिंतन करण्याचा स्वभाव,मामाचा निग्रह व अंत:करणाची पवित्रातता,६—इंद्रीयसंयम म्हणजे इंद्रिय व विषय यांचा संबंध धर्मानुसार करणे,कारण विषयांच्या भोगत दु:ख आहे,म्हणून विषयांचा भोग न घेता त्याग करणे,म्हणून इंद्रिये आपल्या ताब्यात असणे जरुरी आहे.इंद्रिये आपल्या ताब्यात राहण्यासाठी मन ताब्यात ठेवणे अत्यंत जरुरी आहे,म्हणून मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा.७—सत्य म्हणजे धर्माशात्रानुसार मनात विवेक--विचार करणे,मनात जसा विवेक--विचार केला,त्यानुसार उच्चार करणे आणि जसा उच्चार केला तसेच आचरण करणे,त्यास “सत्य” असे म्हणतात.वरील जी साधने सांगितले आहेत त्या सर्वांचे फळ मनाचा निग्रह करून परमात्म्यास मिळणे होय. म्हणून वरील सर्व साधनांचा विवेक करून त्यानुसार आचरण करणे.त्यास ‘सत्य” असे म्हणतात.सत्याने आचरण केल्यास अंत:कारण शुद्ध,अंत:कारण स्थिर होऊन ज्ञानाद्वारे मोक्ष—जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊ शकतो.||३३|| अर्थः---आतां कृष्णां तुं इतर भक्तांसारखा आम्हांलाही आत्मज्ञानाचा उपदेशकरून नदीं लावतोस किया काय?आम्हीं तर सर्वांमध्यें सुंदर व सर्वगुणसमुदायाने भूषित अशा तुझा विरह मुळीच सहन करीत नाहीं,असें म्हणाल तर-तुम्हांला अत्यंत प्रिय असा मी,जो तुमच्या दृष्टीच्या दूर राहतों तो तुम्हांला वारंवार माझें चिंतन व्हावें व तुमचे मन माझेठिकाणींच लागून राहावें याकरितां राहतों ||३४|| भावार्थ:--- गोपिंनो !मी तुम्हांला प्रिय असूनसुद्धा तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो,कारण त्या व्यक्तीचे किंवा त्या वस्तूचे नेहमी स्मरण करत राहतो.त्याला त्याच्याविषयी ओढ निर्माण होते.अशी ओढ निर्माण झाली असता माझा अनुभव—साक्षात्कार होतो.त्या साक्षात्काराने मी नेहमी जवळ आहे,असा अनुभव येतो.तुमची ती अवस्था येण्यासाठी मी दूर राहतो.रासलीला क्रीडा करत असतांना प्रत्येक गोपिंसमोर मी उभा होतोत्याचप्रमाणे मी आता-या क्षणास गोकुलातही राहू शकतो व मथूरेतही राहू शकतो,यावर विश्वास ठेवा.म्हणून तुमचे आत्मकल्याण व्हावे या उद्ध्यासाने दूर राहतो.आपणही आज—वर्तमानकाळात संत—महात्मा यांच्या मुखातून शात्र श्रवण केले तर आपणास श्रीकृष्णांचा अनुभव येऊ शकतो.म्हणून साधनेत तीव्रता केली तर भगवंतांचा अनुभव येऊन आपले जन्म—मरण निवृत्त होऊ शकते.त्या अनुभवामुळे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखारुपता येते.म्हणून प्रयत्न करा------||३४|| | यथा दुरचरे प्रेष्ठे मन अविश्य वर्तते | स्त्रीणां च न तथा चेतः सन्नीकृष्टेsक्षिगोचरे ||३५|| अर्थः---जसें स्त्रियांचे व इतरही स्नेह्यांचे मन,परदेशी असलेल्या पति व मित्र वगैरेचेठिकाणीं प्रविष्ट होऊन निश्चळ राहतें तसें जवळ (डोळ्यांसमोर)असलेल्यांवर निश्चळ राहत नाहीं||३५|| भावार्थ:--- बहुतेक स्त्रियांचे चित्त तिचा प्रियकर दूर असेल तर तिचे चीत त्यात अधिक गुंतून राहिलेले असते.जिचा प्रियकर जवळच आहे,तिचे ती त्याचे तेवढे स्मरण करत नाही.असा अनेकांना अनुभव आहे.म्हणून तुम्हांस माझे स्मरण नेहमीसाठी व्हावे म्हणून मी तुमच्यापासून दूर राहिलेला आहो.म्हणून तुमच्यापुन दूर राहत आहे.तुम्हास सतत स्मरण व्हावे हा हेतू आहे.||३५|| अर्थः---यास्तव तुम्हीं,सर्ववृत्तीचें व्यापार सुटलेलें आपले जे मन असेल टी पूर्णपणें माझेठिकाणींच स्थिर करून माझेंच क्षणोक्षणी चिंतन करा म्हणजे लवकरच माझ्या स्वरुपाप्रात पावाल||३६|| भावार्थ:--- जेव्हा तुमचे मन माझ्याशिवाय अन्य ठिकाणी—अन्याकडे जाणार नाही,तर माझेच स्मरण करील,तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त होताल.कायमच्या जेव्हा मला प्राप्त व्हाल,तेव्हा माझ्यापासून अन्यत्र जाणार नाहीत.तेव्हा अन्यत्र न जाता आल्यामुळे जन्म—मरण निवृत्त होताल.जन्म—मरणरहित झाल्यामुळे सुखरूप होताल.जीवनाचे उच्चतम ध्येय प्राप्त होणार.||३६|| | य मया क्रीडता रात्र्यां वनेsस्मिन् व्रज आस्थिताः | अलब्धरासा: कल्याण्यो माssपुर्मद्वीर्यचिन्तया ||३७||शारदा पावणे चारला आली वैशाली ३ वजून ३७ मिनिटाला आली अर्थः----हें माझें सांगणें केवळ मधुर वाटण्यासारखें आहे असें समजू नका.कारण,हे कल्याणीहो,ह्या वृंदावनामध्यें रात्रीच्या वेळीं क्रीडा करणाऱ्या माझ्याबरोबर ज्यांना रासक्रीडा घडली नाहीं त्या पटींनी अटकावून ठेविल्यामुळे गोकुळांत राहिलेल्या गोपी,माझ्या लीलांचे चिंतन करूनच माझ्या पावल्या आहेत.म्हणून तुम्ही माझ्या चिंतनानेंच माझ्या स्वरूपाप्रत पावाल यांत संशय नाहीं||३७|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,याप्रमाणें श्रीकृष्णानें सांगितलेला निरोप ऐकून कृष्ण लीलांचे स्मरण झालेल्या व तृप्त झालेल्या व तृप्त झालेल्या त्या गोपी,उद्धवाला म्हणाल्या कीं,||३८|| अर्थः---गोपी म्हणाल्या-हे उद्धवा,यादवांना दुःख देणारा कृष्णाचा शत्रू कंस,आपल्या भ्रात्यांसहवर्तमान जो मरण पावला त्याच्या योगानें आम्हांस मोठा आनंद झाला आणि पूर्वीप्रमाणे धनादिक सर्व संपत्ति प्राप्त झालेल्या वासुदेवादिक आप्तांसहवर्तमान श्रीकृष्ण आतां खुशाल आहे,हीही गोष्ट मोठी आनंदाची झाली||३९|| आर्थ:---बरें,हे सौम्या उद्धवा,तुला असें विचारितों किं,आमच्या पूर्वी स्नेहयुक्त व लज्जासहित हास्यानें व उदार अवलोकनानें सत्कार केलेला तो भागवान् श्रीकृष्ण,आमच्यावर करावयाची प्रीति,हल्लीं मथुरावासी स्त्रियांवर करीत आहे काय?||४०|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या:--अहों हे काय विचारितां !रतिसुखाचे सर्वप्रकार जाणणारा,उत्तम स्त्रियांना आवडणारा आणि त्या उत्तमस्त्रियांनी आपल्या भाषणांनी व नानाप्रकारच्या विलासांनी सत्कार केलेला तो श्रीकृष्ण,त्यांचेठिकाणीं कसा बरें आसक्त होणार नाहीं?होईलच ||४१|| भावार्थ:--- भगवंतांची भक्ती केली तर ते त्या भक्तांवर प्रेम करता,भगवंतांसी अनुकूल राहिल्यानंतर—निष्काम भक्ती,पूजा,स्मरण केले तर ते त्या भक्तात रममाण होतात.याकरिता जीवांनी भगवंतांवर विशेष अन्याय प्रेम करावे,तसे आन्यावर करू नये.||४१|| अर्थः---पुन्हां अन्य गोपी म्हणाल्या-ह्या चिंतेने आम्हांला काय करावयाचें आहे!हे साधो,पुरवासी स्त्रियांच्या सभेंत यथेष्ट क्रीडा करण्याच्या गोष्टी निघाल्या म्हणजे त्यांत तो श्रीकृष्ण,आम्हां भोळ्या गौळानिचे केव्हांतरी स्मरण करितो काय?||४२|| भावार्थ:---मथुरेत असतांना तेथील नागरी स्त्रियांच्या समूहात कांही गप्पा करत असतांना,कांही प्रसंगवशात गोकुळातील ग्रामीण गोपींचे स्मरण—आठवण करतात का?आम्हास वाटके कि नागरी स्त्रियांच्या पुढे ग्रामीण स्त्रियांचे स्मरण करीत नसावेत,कारण आम्ही ग्रामीण भागातील राहणाऱ्या साध्या—सुध्या,भोळसर,राहाणी ग्रामीण,अशिक्षित तर नागरी स्त्रिया आधुनिक असतात,त्यांचे राहणीमान विशेष असते,त्या सुशिक्षित असतात.त्यामुळे आम्हास वाटकी,ते श्रीकृष्ण आमची आठवण—स्मरण करत नसावेत.||४२|| अर्थः---दुसर्या म्हणाल्या गोकुळांत असत्येवेळीं चंद्रविकासी कमळें,कुंदपुष्पें आणि चंद्र यांच्या योगानें रम्य अशा वृंदावनात,चरणांतील नूपुरांच्या नाद होत असलेल्या राससभेमध्यें आम्हां स्त्रियांसहवर्तमान,भगवान् ज्या रात्रीमाध्यें रममाण झाला आणि आम्हीं त्याच्या मनोहर कथांची स्तुति केली.त्या रात्रींचे तो कृष्ण आतां कदाचित् स्मरण करितो काय?||४३|| भावार्थ:--- श्रीकृष्ण गोकुळात असतांना एका पूर्णिमेस त्यांनी व आम्ही--गोपींनी रासमंडळ करून नृत्य केले होते.त्यावेलेष त्यांच्याच लीलांचे गायन करत होतो.तेव्हा ते आमच्याबरोबर विहार करीत होते.तो त्यादिवशीचा आनंद अवर्णनीय आहे.तो आनंदाचा अनुभवच घ्यावा लागतो.त्या आनंदाचे स्मरण करून आजही तो आनंद आम्ही उपभोगत आहोत आणि भविष्यात उपभोगीत राहुत.||४३|| अर्थ:---बरें,जसा इंद्र मेघांकडून वृष्टि करून शुष्क झालेलया वनांचे संजीवन करितो त्याप्रमाणें आपल्या मुखहस्तादिक अवयवांच्या दर्शनस्पर्शानादिकेंकरून,आपल्या विरहाग्नीनें करपून गेलेल्या आमचे संजीवन करीत असता तो श्रीकृष्ण आता या गोकुळांमध्यें कधींतरीं येईल काय?||४४|| भावार्थ:--- आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विरहाग्नी मध्ये होरपळून निघत आहोत.तो विरहाग्नी त्यांच्या भेतीशिवा जाऊ शकत नाही,म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत.सतत त्यांचेच स्मरण करत आहोत.आमचे लक्ष देहसंबंधित म्हणजे संसारात अजिबात लक्ष राहिलेले नाही.आम्ही शरीराने संसारात आहोत व मनाने भगवंतांतच आहोत.समजा वन अग्नीने पेटलेले आहे व तावढ्यात पूस आलेला आहे,त्यावेळेस जीवदान मिळाले आहे,त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्या करस्पर्शाने आम्हास जीवदान देतील काय?आम्ही त्यांच्या करस्पर्शाने वाट पाहत आहोत.हा आमचा विरहरूपी निरोप त्यांना आपण कृपा करून कळवावा.||४४|| अर्थः---दुसऱ्या म्हणाल्या:---कृष्ण येथें कशाकरितां येईल?पूर्वी निरुपाय असल्यामुळे तो येथे राहिला होता,आतां त्यानें राज्य मिळविलें,शत्रूंचा संहार केला.आतां तो राजांच्या कन्यांना वरून स्त्रियांनी यूक्त व पितापुत्र इत्यादिक सर्व सुह्र्दांनी युक्त झाला ||४५|| भावार्थ:--आपल्या प्रीयकरांनी कंस यास मारून राज्य मिळवले आहे.आता ते राजाकुमारीसी विवाहबद्ध होतील.विवाहबद्ध झाल्यामुळे आपला मुळीच विचार करणार नाहीत,कारण ते आपल्या पत्नीला भुलतील,त्यामुळे आपल्याकडे लक्ष देणार नाहीत.जो जीव असतो,तो संसारात रममाण झाल्यानंतर भगवान—श्रीकृष्णाकडे लक्ष देत नाही,पण देव तसे करत नसतो.जो—तो—आपापल्या संस्कारानुसार बोलत असतो—वागत असतो.म्हणून गोपी आपल्या संस्कारानुसार बोलत आहेत.वास्तविक गोपींना माहित आहे कि,श्रीकृष्ण आपणांस विसरणार नाही,पण लवकर येण्यासाठी असा भाव व्यक्त करत आहेत.आपण मात्र असे आरोप भगवंतांवर करू नयेत,कारण गोपींचा जसा अधिकार आहे,तसा अधिकार आपला नाही.अधिकारानुसार वर्तणूक करावयास पाहिजे.||४५|| | किमस्माभिर्वनौकोभिरन्याभिर्वा महात्मनः | श्रीपतेराप्तकामस्य क्रियेतार्थः कृतात्मनः ||४६|| अर्थ:---तेव्हा कितीएक गोपी तर परमार्थ सांगत म्हणाल्या किं,-लक्ष्मीचा पति,पूर्णमनोरथ,व निरंतर पूर्णरूप अशा त्या महात्म्या भगवंताला आरण्यांत राहणाऱ्या आमच्या योगानें किंवा दुसऱ्या राजकन्यांच्या योगानें कोणता कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे?कोणताच नाहीं||४६|| भावार्थ:---गोपी म्हणते कि,महात्मा श्रीकृष्ण स्वत: लक्षीपती आहेत.त्यांना कोणतीच कामना नाही.ते कृत्यकृत्य आहेत.त्यांना साध्य प्राप्तच आहेच.त्यामुळे आम्ही गौळणी किंवा दुसऱ्या राजकुमारी यांच्याशी त्यांना कांहीच देणे—घेणे नाही.जे कृत्यकृत्य असतात त्यांना इतरांचा कांहीच संबंध नसतो.असे मात्र नसते.जे कृत्यकृत्य असतात,त्यांना जगाचा उद्धार करावयाचा असतो,म्हणून जीवांना ज्ञान देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात.ते दयाघन असतात.आपणांस जो अनुभव आला,तो वाटतात.||}४६|| अर्थः---जारकर्म करणाऱ्या पिंगलानामक वेश्येंनेंही असें सांगितलें आहे किं,आशा न धरणें हेंच परम सुख आहे व अशा धरणें हेंच परम दुःख आहे.पहा,ही गोष्ट आम्हीं जंत आहों तथापि आम्हांला त्या कृष्णा विषयीं आशा अनिवार आहे ||४७|| भावार्थ:--- संसारात कोणतीही अशा न धरणे हेच सगळ्यात मोठे सुख आहे.हे वस्तुस्थितीने खरे आहे.जसे अधर्माने वागू नये व धर्माने वागावे,तसेच जे विषयी लोक आहेत त्यांची संगती करू नये,पण जे संत—महात्मा आहेत,त्यांची संगती आवश्य करावी.||४७|| अर्थ:---याचें कारण,त्या उत्तमश्लोक भगवंताची एकांती झालेली वार्ता सोडून देण्याविषयीं कोण पुरुष समर्थ होईल?कोणीच होणार नाहीं.फा,तो भगवान् लक्ष्मीची इच्छा मुळींच करीत नसतांही त्याच्या वक्षस्थळरूप अंगापासून ती लक्ष्मी कधींही एकीकडे होत नाहीं ||४८|| भावार्थ:--- ज्यांची कीर्ती महात्मे गातात,त्यांनीच एकांतात म्हणजे मन स्थिर करून—संसारात मन न जाऊ देता—विषयांकडे मन न जाऊ देता ज्या प्रेमाच्या—ज्या प्रेमानंदाच्या गोष्टी केल्या,त्या विसरणे गोष्टी—उपदेश आम्ही शक्य नाही.आम्हा सर्वांची ही अवस्था झाली आहे.त्या गप्पा—उपदेश बोलत असतांना आम्ही असंख्य गोपी होतोत.आम्हा सर्वांची ही अवस्था झालेली आहे.ज्या लक्ष्मीने आपले वरण केलेले आहे,त्यामुळेच—उपदेशरूपी ज्ञानामुळे क्षणभरसुद्धा आपणास सोडून जात नाही.असे जर आहे तर आमचे किती क्षण.किती दिवस,किती महिने,किती वर्ष निर्थक श्रीकृष्णाविना जात आहेत.आमची मन कसे होत असेल,याचा विचार करावा.||४८|| | पुनः पुनः स्मारयन्ति नन्दगोपसुतं बत | श्रीनिकेतैस्तत्पदकैर्विस्मर्तुं नैव शक्नुमः ||५०|| अर्थः---आणि कृष्णाची विस्मृती होईल त्र आम्हांस दुःख होणार नाहीं परंतू ती विस्मृतीचा हो नाहीं.कारण,हे प्रभो उद्धवा,बळरामासहित श्रीकृष्णाने सेवन केलेले व सौदर्यसंपत्तिची आश्रयस्थाने अशा कृष्णाच्या चरणाचिन्हांनी चिन्हित झालेले हे-नद्या,पर्वत व वनप्रदेश,तशाच गाई व वेणूनाद,वारंवार आम्हांला त्या नंदकुमाराचें स्मरण करवितात म्हणून त्या कृष्णास विसरण्यास आम्हीं समर्थ होत नाहीं||४९-५०|| भावार्थ:--- बलरामदादा आणि श्रीकृष्ण जेथे विहार करत असत,तीच ही यमुना नदी,तोच हा गोवर्धन पर्वत आणि तोच हा वनप्रदेश असा भूभाग आम्हास दिसत आहे,पण येथे येणारा श्रीकृष्ण दिसत नाही,म्हणून आम्ही दु:खी आहोत.त्या गाई आणि तो वेणूचा स्वर आम्ह्या कानात अजूनही घुमत आहे,पण श्रीकृष्ण दिसत नाही.कार्य दिसत आहे,पण कारण दिसत नाही.म्हणून दु:खी आहोत. म्हणून जीवन जगात असतांना—कार्य करीत असतांना कारणाचा आवश्य विचार करावा.जसे पुत्रांनी जीवन जगात असतांना आई—वडिलांचा म्हणजे कारणांचा विचार करून—स्मरण करून जीवन जगावे,तसे आपण जीवन जगात असतांना कारणाचा म्हणजे परमात्म्याचा विचार करून जीवन जगावे.फक्त आपला म्हणजे कार्याचा विचार करून जीवन जगू नये.कारणाचा विचार करा.||४९|| भावार्थ:--- गोकुळातील गावात,परिसरात,यमुनेत व वनात जिकडे—तिकडे नंदनंदनांचीच आठवण करून देतात.म्हणून त्यांना आम्ही विसरू शकत नाही.आमचे शरीर सुटेपर्यंत आम्ही त्यांना विसरू शकत नाहीत.म्हणून आपण त्यांचे दर्शन घेण्यासाठी पाठवा गोपींनी जसा दर्शनाचा आग्रह धरला—इच्छा व्यक्त केली,त्याचप्रमाणे आपणही भगवंतांच्या,संत—महात्मा यांच्या दर्शनाचा,श्रवण करण्याचा आग्रह करावयास पाहिजे.भगवंतांच्या नामौउच्चारांचा,पूजा करण्याचा,शात्र श्रवण करण्याचा अट्टाहास करावयास पाहिजे.||५०|| अर्थः---श्रीकृष्णाची सुंदरगाति,उदारहास्य,लीलासाहित अवलोकन व मधुरवाणी,यांच्या योगानें आकर्षितबुद्धी झालेल्या त्या आम्हांला आता त्याचा विसर कसब बरें पडेल?मुळींच पाडणार नाहीं||५१|| भावार्थ:--- भगवंत—श्रीकृष्णांची चालायची चाल—पद्धत,उन्मुक्त हास्य म्हणजे मनात कोणत्याही विषयांचा हेतुरहित हास्य करणे,सहज प्रेमाने हासणे,विलासापूर्ण पाहणे म्हणजे निष्काम—फलारहित पाहणे,सहज प्रेमाने हासणे म्हणजे हेतुरहित हासणे.जेथे प्रेम असते,तेथे हेतुराहिता असते—अपेक्षा नसते.बोलण्यात मधुरता असते.थोडक्यात जेथे हेतुराहिता असते,तेथे प्रेम असते व जेथे हेतू—अपेक्षा असते,तेथे प्रेम नसते.म्हणून आपण जीवन जगात असतांना किंवा कोणतेही कार्य करत असतांना निरपेक्षता—वासनारहित जीवन जगावे,त्यामुळे प्रेम देता येते.वासनारहित प्रेम कोणीच विसरू शकत नाही.त्या प्रेमाची कोणीही वाट पाहत उभे असतात.जेथे वासना असते तेथे कोणीच वाट पाहत नाहीत,तर अशा व्यक्ती आल्या तर त्यांनी आपल्याकडे येऊ नये असे वाटत असते.म्हणून विशारारहित प्रेम वाटण्याचा प्रयत्न करावा.वासनारहित प्रेम घ्यावे व वासनारहित प्रेम वाटावे.कांही लोक वासानासाहित प्रेमाची अपेक्षा करतात व आपण मात्र वासनारहित प्रेम देतात.असे योग्य नाही.म्हणून वासनारहित प्रेम देणे व वासनारहित प्रेम घेणे हे योग्य आहे.योग्य ते प्रेम देणे व योग्य ते प्रेम घेणे,हे धर्मयुक्त आहे.परमार्थकडे नेणारे आहे.|५१|| | हे नाथ हे रमनाथ व्रजनाथार्तीनाशन | मग्नमुद्धरं गोविन्द गोकुलं वृजीनार्णवात् ||५२|| अर्थः----असें बोलून भगवंतांच्या विरहानें झालेलें दुःख,भगवान्च निवृत्त करण्यास समर्थ आहे असा निश्चय करून म्हणाल्या कीं,-हे नाथा,हे रमानाथा,हे व्रजनाथा,हे दुखनाशका,हे गोविंदा,दुःखसमुद्रांत निमग्न झालेल्या ह्या गोकुळाचा तूंच उद्धार कर||५२|| भावार्थ:---हे स्वामी !हे लक्ष्मीनाथ !हे व्रजानाथ !आमचे संकटे दूर केली.हे गोविंदा !दु:ख सागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा.आतापर्यंत आमची संकटे दुर करून आम्हाला आनंदित केले.तो आपण संकटातून वाचवून जो आनंद आपल्या दर्शनाने दिला तो आनंद आज आम्हास दिला,तो आनंद आज मिळत नाही.म्हणून तो आनंद मिळण्यासाठी आपण गोकुळात येऊन द्यावे.||५२|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:---हे राजा,नंतर त्यांना उद्धवानें पुन्हा पूर्वी सांगितलेलेच श्रीकृष्णाचे निरोप सांगितले असता,श्रीकृष्ण हा आपला आत्मा आहे असें जाणून,विर्हनें झालेला संताप दूर झालेल्या त्या गोपींनी,उद्धवाची गुरुबुद्धीने पूजा केली||५३|| भावार्थ:--- भगवंतांनी सांगितलेला संदेश उद्धवाने गोपिकांस सांगितला,त्या संदेशावर गोपींनी मनन,निदिध्यासन,तत्वंपदार्थशोधन केले.त्यानंतर त्यांना कळाले कि,नामरुपांनीयुक्तरूप हे भगवंतांचे वास्तविक रूप नसून इंद्रीयांतित श्रीकृष्ण हे त्याचे खरे स्वरूप आहे.त्या श्रीकृष्णांस नामरूप नाही,तोः कृष्ण आनंदरूप आहे असे कळले व तसा त्याचा अनुभव आला.त्यानंतर गोपींची विरह व्यथा शांत झाली.म्हणून आपण आपले अंतकरण शुद्ध होण्यासाठी,अंत:करण स्थिर करण्याकरिता नाम—रूपाने जो युक्त श्रीकृष्ण यांचे चिंतन करावे व आवरण दोष जाण्यासाठी नाम—रूपरहित जो श्रीकृष्ण आहे त्याचे सवरून जाणून त्याचाच अनुभव घ्यावातो अनुभव येण्यासाठी श्रावण,मनन,निधीध्यासन व तत्वंपदार्थशोधन करावे.असे केले असता नामरूपरहित जो परमार्थ आहे,त्याचा अनुभव येतो.तेव्हा आपले कायमचे दु:ख निवृत्त होऊन कायमचे सुखरूप होतोत—त्यासच मोक्ष असे म्हणतात.||५३|| अर्थः---नानात्र तो उद्धव,गोपिंचें शोक घालविण्याकरितां कितीएक महिने गोकुळांत राहिला होता.तोपर्यंत त्यानें कृष्णाच्या लीलीयुक्त कथांचे गायन करून सर्व गोकुलास रमविलें.||५४|| भावार्थ:--- गोपींचा शोक मिटवण्यासाठी कांही महिने तेथे राहिला.भगवंत श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार,त्यांचे दु:ख मिटेपर्यंत तो कांही महिने गोकुळात राहिला.वारंवार त्यांना वेदांताचा उपदेश करू लागला.त्यामुळे गोपींचे दु:ख कमी होऊन त्यांना आनंदित करू लागला.त्याचप्रमाणे आपणही इतरांचे दु:ख आपापल्या अधिकारानुसार करावयास पाहिजे.तोच आपला स्वधर्म आहे.||५४|| अर्थः---तो उद्धव,जितके दिवस नंदाच्या गोकुळांत रहिला होता तितके गोकुळवासी लोकांचे दिवसश्रीकृष्णाच्या कथेनें क्षणप्राय होऊन गेले ||५५|| भावार्थ:--- जितके दिवस नंदनच्या व्रजामध्ये उद्धव राहिला,त्यांनी त्या दिवसात भगवंतांच्या लीला आणि वेदांतांचा उपदेश केला,त्यामुळे श्रीकृष्णांच्या संबंधित कथनामुळे व्रजावासियांना आनंद वाटू लागला.श्रावण करत असतांना तो काळ एका क्षणासारखा वाटू लागला.त्यांना वाटत असे कि,उद्धावांनी त्या लीला व वेदांत पुन्हा—पुन्हा सांगावा.श्रावण करून त्यांची तृप्ती होत नव्हती. त्याचप्रमाणे आपणही भगवंतांच्या लीला व वेदांत श्रावण करीत असतांना कितीही श्रावण केले तरी तृप्ती होऊ नये.||५५|| अर्थः---त्या भगवद्भक्त उद्धवाने,नद्या,वनें,पर्वत,पर्वताच्या गुहा व प्रफल्लित झालेले वृक्ष पाहून,तेथें तेथें हनलीलांच्या प्रश्नादिकेंकरून गोकुळवासी लोकांना कृष्णाचें स्मरण करवून आपणही आनंदाचा अनुभव घेतला ||५६|| भावार्थ:--- जेथे—जेथे भगवंत श्रीकृष्णांनी विहार केला—प्रवास केला —फिरले,तेथे—तेथे उद्धव त्यांना भगवंतांच्या लीला केल्या व क्ष झाल्या,त्याची चर्चा करून आपणही आनंद घेऊ लागले व गोपिंनाही आनंद देऊ लागले.गोपी स्मरण करून लीला सांगू लागल्या व उद्धावही त्यांच्यासह आनंद लुटू लागले.आपणही भगवंत यांच्या लीलांचे स्मरण करून आनंद घ्यावावयास पाहिजे.||५६|| अर्थः---असो,पूर्वी सांगितल्याप्रमाणे कृष्णाचेठिकाणी मनाचा लय होत असल्यामुळे गोपींना प्राप्त झालेला विव्हळपणा पाहून परम संतुष्ट झालेला तो उद्धव,त्या गोपींना नमस्कार करित असता त्यांचें महत्व असें गायन करुं लागला कीं-||५७|| अर्थः---अहो!या भूमीवर केवळ ह्या गोपिंनीच आपल्या जन्माची सार्थकता करून घेतली आहे.कारण,ह्या गोपी,सर्वात्म्या भगवान् श्रीकृष्णाचेठिकाणीच परम प्रेमयुक्त झाल्या आहेत,जें परमप्रेम,संसारापासून भिणारे मुमुक्षु,मुक्त व आम्हीं भक्ताही इच्छित आहों.कारण,भगवत्कथांचेठिकाणी प्रीति असणाऱ्या प्राण्याला ब्राम्हण कुलांत उत्पन्न झाल्यानें,गायत्रीच्या उपदेशानें व यज्ञदीक्षा ग्रहण केल्यानें प्राप्त होणाऱ्या शौक्ल,सावित्र व याज्ञिक नांवाच्या तीनप्रकारच्याही जन्मांनी किंवा ब्रम्हदेवाच्या जन्मांतरी कोणता विशेष आहे?कोणताच नाहीं म्हणजे कोणत्याही जातींमध्ये झाला तरी भगवद्भक्तीमान्च श्रेष्ठ होय ||५८|| भावार्थ:--- पृथ्वितलावर गोपींनी जसी निष्काम भक्ती केली,त्याप्रकारची निष्काम भक्ती अन्य कोणी केलेली दिसून येत नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या निष्काम भक्तांनी व जिज्ञासू जणांनी गोपींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे अनुकरण करावयास पाहिजे.असे केले असता आपणासही भगवंतांचा अनुभव येऊन आपले जन्म—मरण निवृत्त होऊन आपण सुखरूप हौउत.मनुष्य देहात जन्मास आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची गोडी जर आपणास लागली तर आपण सुखमय हौउत.असे होत असेल तर ब्रह्मदेवासारखा श्रेष्ठ जन्माची मुळीच गरज नाही.म्हणून आपण गोपिंसारखी निष्काम भक्ती करून परमकल्याण करावे.||५८|| अर्थः---आणि ईश्र्वराचा प्रसाद होणे हेच महत्त्वाचे कारण आहे आणि तो प्रसाद तरी, जाती आचार किंवा ज्ञान यांच्या योगाने होत नाही तर केवळ भजणानेच होतो. पहा- जंगलात फिरणाऱ्या व व्यभिचाराच्या दोषाने दुषित झालेल्या अशा ह्या गौळनी कोणीकडे! आणि परमात्मा कृष्णाचेठिकाणी जडलेला हा निश्चल प्रेमा कोणीकडे!!यावरून असें सिद्ध होतें किं,जसें अमृत सेवन केलें असतां टी,आपलें सामर्थ्य न जाणणाऱ्या प्राण्यालाही अमर करितें त्याप्रमाणें सर्व करण्यास समर्थ असा ईश्वरही,आपलें निरंतर भजन करणाऱ्या अज्ञानीं जनांचेही स्वतःच कल्याण करितो.म्हणजे त्यला सर्वोत्कृष्ट फळ देतो||५९|| भावार्थ:--- गोपी या ग्रामात राहणाऱ्या,साधे जीवन जगणाऱ्या आणि भगवंत श्रीकृष्ण यांच्या ठिकाणी त्यांचे अनन्य प्रेम पाहून हेवा करावा वाटतो.त्यांचा आदर्श आपण जर घेतला तर आपले निश्चितरुपस्ने कल्याण होईल.म्हणून त्यांचा आपण आदर्श घेऊन कल्याण करून घ्यावे. डोळे झाकून अमृत सेकॅन केली तरी अमृत प्रसं करणारा अमर होतो.त्याचाप्रमान्रे भोळेपणाने भगवंतांचे स्वरूप न जनता अनन्य प्रेम केले तर,आपले परम—कल्याण होणार हे निश्चितच आहे.म्हणून आपण भगवंतांवर अनन्य प्रेम करावे.अनन्य प्रेम म्हणजे एकाचाच आश्रय घेणे,अन्याचा—दुसऱ्यांचा आश्रय न घेणे.त्यास नाण्यान्य भक्ती असे म्हणतात.म्हणून अनन्य भक्ती असावी,व्यभिचारी भक्ती नसावी.व्यभिचारी भक्ती म्हणजे अनेकवार असलेली भक्ती,त्या भक्तीस “अनन्य भक्ती” असे म्हणतात.व्यभीचारी भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होत नाही,तर अनन्य भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होते.||५९|| अर्थः--- आणि हा गोपिंवर झालेला भगवंतांचा प्रसाद तर अत्यंत अपूर्व आहे.कारण,रासक्रीडेमध्यें या कृष्णाच्या बाहूदंडानी कंठांचेठी कानीं आलिंगन केल्यामुळे मनोरथ पूर्ण झालेल्या ह्या गोपींना जो हा भगवतप्रसाद मिळाला आहे तो.कमळासारखा सुगंध व कांति असणाऱ्या उर्वश्यादिक अप्सरांना सुद्धां मिळाला नाहीं.अधिकार तर काय परंतु,वक्षस्थळाचेठिकाणीं अनन्यभावानें रमत असलेल्या लक्ष्मीलाही प्राप्त झाला नाहीं.मग दुसऱ्या स्त्रिया,याला,मिळविण्यास समर्थ नाहींत हे काय सांगावे!||६०|| भावार्थ:--- रासलीला करत असतांना भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हात घालून जो प्रसाद दिला,तो कृपा प्रसाद म्हणजे विषयारहित परमात्म्याची प्राप्ती होय.कारण त्यांची निष्काम भक्ती पाहून म्हणजे संसारातील विषयांची कामना—इच्छा न करता परमात्म्याची प्राप्ती व्हाई म्हणून केलेली निष्काम भक्ती होय.तो कृपाप्रसाद लक्ष्मीलासुद्धा दिला नाही,कारण अधिकारानुसार कृपा-- प्रसाद समभावाने दिला जातो,तर आपपर भावाने नसतो.म्हणून भगवंतांचा कृपा प्रसादपदासाठी अधिकार प्रयत्नाने मिळवावा.||६०|| अर्थः---अहो त्या गोपींचे भाग्य तर राहुं द्या,परंतु माझी त्या प्रभूजवळ अशी प्रार्थना आहे कीं,-ह्या गोपींचा चरणरेणू सेवन करणाऱ्या वृंदावनातील झालीं,वेळी व औषधी ह्यांमधील एखादी तरी मी व्हावें.कारण,ज्या गोपींनी,टाकण्यास कठीण असा आपला स्वजन व धर्ममार्ग टाकून देऊन,श्रुतीनींसुद्धा प्राप्त करून घेण्यास दुर्लभ असा कृशप्राप्तीचा मार्ग स्वीकारिला आहे,म्हणजे भगवत्पारायण झाल्या आहेत.आणि ज्यांनी,लक्ष्मीनें पूजन केलेलें तसेंच ब्राम्हडी काननी व पूर्ण मनोरथ असलेल्या योगेश्वरांनीही आपल्या ह्रदयांमध्यें चिंतन केलेलें जें भगवंतांचे चरणकमळ टी राससभेंमध्यें आपल्या स्तनावर धारण करून व त्याला आलिंगन करून आपला ताप निवृत्त करून घेतला आहे ||६१-६२|| भावार्थ:---व्रजांगानांची चरणधूळ म्हणजे जेथे—जेथे--ज्या—ज्या ठिकाणी भगवंतांच्या पायाचा—शरीराचा स्पर्ष जालेला आहे,त्या जमिनीवरील धूळ माझ्या शरीरावर पडावी म्हणून त्या व्रजामध्ये—तेथिल जमिनीमध्ये कमीतकमी एखादे झुडूप—वेलीचा—वनस्पतीचा जन्म मला मिळाला तर मी माझे भाग्य उदयास आले असे समजेन व जास्तीत—जास्त मनुष्याचा जन्म मिळाला तर परमभाग्य उदयास आले मी समजेन.त्यामुळे त्या माझ्या जीवनात संसारात न पडता ब्रह्मचारी राहून निच्काम भक्तीच करत राहील.असे उद्धव म्हणत आहे.आपण उद्धव यांचा आदर्श घेऊन आपणही निष्काम भक्ती कारण आपल्या मनुष्य देहाचे सार्थक करावे.||६१|| भावार्थ:---लक्ष्मी,ब्रह्मदेव,भगवान शंकर हेही भगवंत श्रीकृष्णांचीच सदैव चिंतन करतात,म्हणून आपणसुद्धा त्यांचीच भक्ती करावी,अन्यांची भक्ती करू नये.रासलीलांच्या वेळेस श्रीकृष्णांचे चरणारविंदांना गोपींनी आपल्या वक्ष:स्थळावर म्हणजे शुद्ध अंत:करणावर—निष्काम भावनेने —विषयांरहित भावनेने धारण केले होते.त्यामुळे त्यांचा त्रिविध ताप नाहीसा झाला.आपणसुद्धा निष्काम भावनेने—विषयांरहित भावनेने आपल्या शुद्ध अंत:करणात स्थान घ्यावावयास पाहिजे.त्यामुळे त्यांचा त्रिविध ताप म्हणजे १---आधिभौतिक ताप म्हणजे इतर जिवांकडून होणारा ताप—दु:ख त्यास “आधिभौतिक ताप”असे म्हणतात.उदा—व्याघ्र,सिंह,मनुष्य इत्यादी जीवांपासून होणारे दु:ख होय.ते दु:ख निवृत्त होण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.शस्त्र—आस्त्रने संरक्षण करावे.२---आधिदैविक ताप म्हणजे देवतेकडून—इंद्रादी देवता.यासाठी त्यांची उपासना करावी.किंवा निसर्गाकडून होणारे ताप—दु:ख त्यास आदिदैविक ताप—दु:ख असे म्हणतात.उदा—यक्षराक्षसपिशाच्च,शितावातादिकांपासून होणारे दु:ख,ज्वालामुखी,भूकंप,अतिवृष्टी,अनावृष्टी,धुके,इत्यादी.३--आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक ताप—दु:ख व मानसिक ताप—दु:ख होय.उदा—रोगक्षुधादिकांपासून होणारे दु:ख व मानासुक दु:ख म्हणजे मनाला होणारे दु:ख होय.उदा—अपमान,मानसिक अहित होय.ते सर्व दु:ख नाहीसा करण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे जीवांनी हे सर्व दु;ख निव्रीत्तीसाठी आवश्य प्रयत्न करावा.त्याचे तात्पुरते दु:ख निवृत्त होते.जीव हा अज्ञानी आहे. त्यामुळे तात्पुरते दु:ख निवृत्त करतो,पण यामुळे तात्पुरते दु:ख कांही अंशी निवृत्त होते,पण जीव पूर्ण समाधानी होत नाही. याकरिता जीवास पूर्ण समाधानी होण्यासाठी त्याने आत्यंतिक म्हणजे कायमची निवृत्ती करावी.ते कळण्याकरिता त्यास संत—महात्मा यांची संगती करावी लागते.संत—महात्मा यांच्या मुखातून शास्त्र श्रावण केले असता अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान प्राप्त होते.त्या ज्ञानाने संचित कर्म व क्रियामाण कर्म ज्ञानाग्नीने जळून जाते.राहिलेले प्रारब्ध कर्म ज्ञानाग्नीने जळत नाही,तर वर्तमान शरीतात भोगून संपते.त्यामुळे आत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होते.यास मोक्ष असे म्हणतात.तेव्हा जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन तो कायमचाच सुखरूप होतो.म्हणून आपण संत—महात्मा यांची संगती करून,निष्काम कर्म व निष्काम उपासना करून संतांच्या मुखातून वेदांत—शास्त्र श्रवण करून,विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.तेव्हा आपलेही जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप हौउत.यासच मोक्ष असे म्हणतात.मनुष्य देहातच हा प्रयत्न करता येतो,अन्य नाही.||६१-६२|| अर्थः---असो,आतां ज्या गोपींचे भगवत्कथासंबंधी गायन,त्रैलोक्याला पवित्र करीत आहे,त्या नंदगोकुळांतील स्त्रियांच्या चरणरेणूला मी वारंवार नमस्कार करितों||६३|| भावार्थ:--- उद्धव म्हणतात कि,नादांच्या व्रजातील राहणारे जे गोपांग आहेत.त्यांनी भगवंतांची निष्काम भावाने सेवा केलेली आहे,म्हणून त्यांच्या चरणांची धूलीळा वारंवार नमस्कार करतो,त्यांच्या चरणांची धूळ डोक्यास लावतो.आपणही जे संत—महात्म्यांच्या चरणांची धूळ आपण आपल्या डोक्यास लावून,वंदन करावयास पाहिजे.त्यामुळे आपले अंत:कारण शुद्ध होते.गोपींनी ज्या लीलांचे गायन केले आहे—कथन केलेले आहे,ते आपण गायन केले किंवा श्रावण केले तर,आपलेही अंत:कारण शुद्ध होईल.म्हणून आपण त्या लीलांचे आयन श्रवण करावयास पाहिजे.त्यामुळे आपण पवित्र होतोत,म्हणून गायन—श्रावण करा.||६३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला :--हे राजा,नंतर तो उद्धव,गोपींचा,यशोदेचा,नंदाचा व गोपंचा निरोप घेऊन मथुरेंत जाण्याकारीतां रथावर बसला ||६४|| अर्थः---तेव्हां तो जावयास निघाला असें जाणून,नंदादिक सर्व गोप,रामकृष्णांना अर्पण करावयाच्या नानाप्रकारच्या भेटी हातांत घेऊन मोठ्या प्रेमानें डोळ्यांतून अश्रू ढाळीत असते म्हणाले कीं,-||६५|| भावार्थ:--- उद्धव मथुरेला जाण्यासाठी निघाले आहेत,हे ऐकून त्यांना निरोप देण्याकरिता नन्द,गोपगण आणि गौलातील सर्व गोपी त्यांना निरोप देण्यासाठी भेटवस्तू घेऊन आल्या.त्यांनी या गोपींना उपदेश करून,दु:ख घालवून शांत केले होते.म्हणून उपकाराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी सार्वजन आले होते.तसे आपण आपले ज्यांनी परमहित किंवा हित केले असेल तर त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपणही तसा प्रयत्न करावयास पाहिजे.त्यांच्या डोळ्यात वियोगाचे आश्रू आले.आपल्याही डोळ्यात वियोगाचे आश्रू यावावयास पाहिजे,कारण आपणास त्यांनी ज्ञान दिले,म्हणून सुखी आहोत.||६५|| | मनसो वृत्तयो नः स्युः कृष्णपादाम्बुजाश्रयाः | वाचोsभिधायीनिर्नान्मां कायस्तत्प्रह्वणादिषु ||६६|| अर्थः---उद्धवा,तुं आमचा कृष्णतत्त्वोपदेष्टा गुरु आहेस,म्हणून तुझ्याजवळ आमची एवढीच प्रार्थना आहें कीं,-आपल्या मानाच्या वृत्ति,निरंतर श्रीकृष्णाच्या चरणकमळाचा आश्रय करणाऱ्या असोत;आमच्या वाणी,कृष्णाच्या नांवांचा उच्चार करणाऱ्या असोत;आणि आमचा देह,कृष्णाच्यानमस्कारादिक कर्मांमध्ये तत्पर असो||६६|| भावार्थ:--- गोकुळातील सर्वजण भावना व्यक्त करून म्हणतात कि,”आमच्या मनाच्या वृत्ती या श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या आश्रयाने राहोत,कारण त्यामुळे आनात्माकार वृत्ती न राहता आत्माकार---भगवंतांकडेच राहाव्यात.आमची वाणी त्यांच्याच नामाचे उच्चारण करत राहो.म्हणजेच इत्तर नामांचे उच्चारण न करोत.थोडक्यात भगवंतंकार व्रीत्ती राहो.”त्यांनी जी भावना व्यक्त केली,त्याप्रमाणे आपणही भगवंतंकार वृत्ती राहोत असी भावना व्यक्त करावयास पाहिजे.आपले स्थूल शरीर त्यांच्याच सेवेला सतत लागोत अशी भावना व्यक्त करावयास पाहिजे.थोडक्यात त्यांचेच अनुकरण आपणही करावयास पाहिजे.||६६|| | कर्मभिर्भ्राम्यमाणानां यत्र क्वापिश्वरेच्छया | मंगलाचरीतैर्दानै रतीर्न: कृष्ण ईश्वरे ||६७|| आम्हीं ईश्वराच्या इच्छेनें कर्मांच्या योगानें देवमनुष्यादिक कोणत्याही योनींमध्ये भ्रमण करीत असलों तरी,आमच्या जन्मांतरी व ह्या जन्मीं केलेल्या मंगलकारक कृत्यांच्या व दानाच्या योगानें आमची प्रीति कृष्णरूप ईश्वराचें ठिकाणीं असो ||६७|| भावार्थ:--- आमच्या कर्मानुसार व भगवंतांच्या इच्छेनुसार आम्हास जी गती मिळेल,तेथे आम्हास भगवंतांची सेवा मिळो अन्य सेवा न मिळो,शुभ आचरण करण्याची बुद्धी मिळो,दान करण्याची बुद्धी मिळो.आमचे प्रेम भगवंतांवर असावे.||६७|| अर्थः---हे राजा,याप्रमाणे कृष्णाच्या भक्तीनें गोकुळवासी लोकांनी पूजा केलेला तू उद्धव,पुन्हा श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या त्या मथुरानगरीमध्यें परत आला.||६८|| अर्थः---नंतर श्रीकृष्णाला,वासुदेवाला,बलरामाला,व उग्रसेन राजाला,यथायोग्य नमस्कार करून,त्यानें,त्यांना गोकुळवासी लोकांच्या भक्तीचा उद्रेक वर्णन केला व नंदादिकांनी दिलेल्या सर्व भेटी अर्पण केल्या ||६९|| भावार्थ:--- उद्धव मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णांना नमस्कार केला.आपणही कोणतेही कार्य केल्यानंतर भगवंतांस नमस्कार करावयास पाहिजे.व्रजावासियांची प्रगाढ भक्ती प्रगत केली.वास्तविक ती भक्ती पाहून उद्धवास आश्चर्य वाटले,कारण त्याच्यापेक्षाही व्रजावाशियांची भक्ती विशेस होती.त्यामुळे त्याचा भक्तीविषयी अंहकार नाहीसा झाला.उद्द्वास मिळालेल्या भेटवस्तू स्वत:कडे न ठेवता,त्या भेटवस्तू त्याने श्रीकृष्ण,बलरामदादा व कंस यांना दिल्या.आपणही आपणास ज्यांच्या वतीने आपण गेलोत,त्यांनाच मिळालेल्या वस्तू देणे हे आपले कर्तव्य असते.||६९||----------------------------||६९|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनाम्क्क महापुराणांतील दशमस्कंधातील पूर्वार्धामध्यें भ्रमरगीतादिनिरुपणनामक हा सत्येचाळिसावा अध्याय समाप्त झाला||४७||) | ||श्रीकृष्णार्पणमस्तु || | _________________________________________________________________________________________________________ | ४८--- किरण २२---भगवंतांचे कुब्जा आणि अक्रुराच्या घरी जाणे---१-- अध्याय पूर्ण आहे ____________________________________________________________________________________________________ आतां ह्यां अठ्ठेचाळीसाव्या अध्यायामध्ये,श्रीकृष्णाने कुब्जेबरोबर क्रीडा केली आणि अक्रुराच्या घरीं जाऊन त्याला हस्तिनापुरात पाठविलें अशी कथा वनृन केलेली आहे||१|| | अथ विज्ञाय भगवान् सर्वात्मा सर्वदर्शनः | सैरन्ध्र्याः कामतत्पायाः प्रियमीचच्छन् गृहं ययौ ||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हनला:---हे राजा,नंतर सर्वात्मा व सर्वदर्शी अशा त्या भगवन् श्रीकृष्णाने,कामतप्त झालेल्या कुब्जेचा कामसंताप जाणून,तिचें प्रिय करण्याकरितां तिच्या घरी गमन केलें||१|| भावार्थ:---सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण,कुब्जा यांना येतो म्हणून आश्वासन दिल्यामुळे भगवंत श्रीकृष्ण सुखी करण्यासाठी कुब्जा यांच्या घरी गेले.तसेच आपणही कोणास त्यांच्याकडे येण्याचे आश्वासन दिले असले तर,आपण त्यांच्याकडे जाने हे आवश्यक असते,कारण ते आपले कर्तव्य असते—स्वधर्म असतो,कारण ते आपली वाट पाहत असतात.त्यांनी आपली इतर कर्तव्य बंद केलेले असते.हाणून आपण निमंत्रण स्वीकारून होकार दिल्यानंतर आवस्य जावे,हयगय करू नये.कारण त्यात आपलेही व इतरांचेही हित आहे.म्हणून आपण आपल्या शब्दांचे पालन करावे.||१|| अर्थः---तें तिचें घर-बहुत मोळाच्या पात्रदिकांनी युक्त,कामशस्त्रांत सांगितलेल्या कामोद्दीपक पदार्थांनी समृद्ध आणि मोत्यांच्या माळा ध्वज,चांदवे,शय्या,परांच्या गाद्या चिकटीवलेलीं मोठमोठी खुच्यावगैरे आसनें,अगुरुचे धुप,मणिमय दीप,फुलांच्या माळा व चंदनादिकांच्या उट्या यांनी अलंकृत होतें ||२|\घरीं येणाऱ्या त्या श्रीकृष्णाला पाहताच गडबडून गेलेली ती कुब्जा,आसनावरून उठून,संख्यासहवर्तमान यथायोग्य रीतीनें सामोरी जाऊन तिनें श्रीकृष्णाची,उत्तमप्रकारचें आसन पाद्य इत्यादिक उपचार अर्पण करून पूजा केली||३|| अर्थः---तसेंच उद्धवाचेही तिनें उत्तमप्रकारेंकरून पूजन केलें असतां,तो आसनाला स्पर्श करून भूमीवरच बसला नंतर लोकरीतीला अनुसरणाऱ्या श्रीकृष्णानेंही नव्या (ज्याच्यावर कोणीहि पूर्वी शयन केलेलें नाही अशा)बहुत मोलाच्या पर्यंकांवर प्रवेश केला||४|| अर्थ:---तेव्हा ती कुब्जाहि स्नानं करणें,अंगाला उट्या लावणे,उंची वस्त्रें परिधान करणें,भूषणे व माळा धारण करणें,तांबूल व अमृतासारख्या गोड मादकपदार्थांचे सेवन करणें इत्यादिकेंकरून भगवंताबरोबर रमण्यास आपल्या देहाची योग्यता संपादान करून,सलज्ज मंदहास्य व विलासयुक्त अवलोकन करीत श्रीकृष्णाजवळ प्राप्त झाली ||५|| अर्थः---कृष्णाच्या नुतन समागविषयक लज्जेनें स्वतां जवळ येण्यास शंकायुक्त असलेल्या त्या कुब्जेला श्रीकृष्णाने,आपल्याजवळ बोलावून तिला कंकणांनी भूषित अशा तिच्या हस्ताचेठिकाणीं धरून शय्येवर नेली आणि तिच्यासहवर्तमान क्रीडा केलीं,चंदणाची उटी अर्पण करण्याशिवाय जिचें दुसरें काहींच पुण्य नव्हतें त्या कुब्जेचें केवढे हें भाग्य ते पहा!!||६|| अर्थः---नंतर,अनंतशक्ति श्रीकृष्णाच्या चरणांचा वासच घेत्ये कीं काय अशा त्या कुब्जेनें,मदनानें तप्त झालेल्या आपल्या स्तन,वक्ष:स्थळ व नेत्र यांचेठिकाणी त्याच्या चरणाचें स्थापन करून.त्याच्या योगानें आपल्या स्तनादिकांचीं कामपीडा घालवून,स्तनांच्या मध्यभागी प्राप्त झालेल्या त्या आनंदमूर्ति अतिप्रिय श्रीकृष्णाचे बाहूंनी अलिंगन करून आपला बहुत दिवसांचा ताप घालविला ||७|| अर्थः---अहो!ती कुब्जा,याप्रमाणें उटीच्या अर्पणानेंचे दुष्प्राप्य अशाहि त्या मोक्षधिपती श्रीकृष्णाला पावोन भाग्यहीन अशी ती,त्याच्याजवळ अशी याचना करुं लागलीं कीं,-||८|| अर्थः---हे अतिप्रिया कमलनयना,तुझा सांग सोडन देण्यास मी उत्साह पावत नाहीं,यास्तव तुं माझ्याबरोबर कांही दिवसपर्यंत रममाण हो व ह्या माझ्या घरिंच रहा ||९|| अर्थः---याप्रमाणे याचना केलेला,भक्तांचा सन्मान करणारा तो सर्वेश्वर श्रीकृष्ण,तिला इच्छित वर देऊन कांही दिवसपर्यंत तिच्या घरीं राहून,वस्त्रभूषणादिकांच्या दानानें तिचा मनोरथ पूर्ण करून नंतर उद्धवासहवर्तमान सर्वसंपत्तींनीं समृद्ध अशा आपल्या घरीं निघून गेला ||१०|| अर्थः---त्या कुब्जेची तर काय कथा परंतु दुसराही जो कोणी पुरुष,भक्तीवांचून हजारो उपयांनीही आराधन करण्यास अशक्य व ब्रम्हादिकांचाहि ईश्वर अशा त्या सर्वेश्वर विष्णूचें आराधन करून,त्यापासून मिथ्याभूत व तुच्छ असें विषयासुख मागतो तो कुबुद्धीच समजला पाहिजे ||११||नंतर एकेदिवशी अक्रूराला हस्तिनापुरामध्यें पाठविण्यांकरितां व अक्रुराचेहि प्रिय करण्याकरितां तो प्रभू श्रीकृष्ण,बळराम व उद्धव यांसहवर्तमान अक्रुराच्या घरीं गेला ||१२||तेव्हां मनुष्यश्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ अशा त्या आलेल्या आपल्या बांधवरुपी रामकृष्णोद्धवांना प्रणाम केला.नंतर त्य तिघांनी हि उलट त्या अक्रूराला अभिवंदन केले असतां,त्या अक्रुराने,आसनावर बसविलेल्या त्यांची यथाविधी पूजा केली||१३-१४|| अर्थः---हे राजा,नंतर त्यांचे पाय धुतलेली उदकें,मस्तकीं धारण करणाऱ्या त्या अक्रुराने त्यांचे अर्ध्यादिक उपचार,दिव्य वस्त्रें,गंध माळा व उत्तम भूषणें यांनी पूजन करून व मस्तकानें नमस्कार करून मांडीवर घेतलेल्या त्यांच्या पायांचे शुश्रुषण करणारा व नम्रतेने युक्त असा तो अक्रूर,कृष्णरामांना म्हणाल्या कीं,-||१५-१६|| अर्थः---तुम्ही मल्लादिकांसहवर्तमान पापी कंस मारलात ही फार चांगली गोष्ट झालीं.हें तुमचें कुळ,तुम्ही अपार दु:खांतून बाहेर काढलेंत म्हणून वृद्धिंगत झालें आहे||१७|| अर्थः---तुम्ही जगाचे कारण व जगन्मय असें प्रकृतिपुरुषरुपी आहां.तुम्हांवाचून दुसरें कारण किंवा कार्य कांहीच नाहीं||१८|| अर्थः---हे ब्रम्हस्वरूपा,आपल्या रजोगुणादिक शक्तींनी,आपणच उत्पन्न केलेल्या त्या जगामध्यें तूं कारणत्वानें असल्यामुळें प्रविष्ट नसूनही प्रवेश केल्यासारखा भासून,पाहण्यांत व ऐकण्यांत येणाऱ्या पदार्थांच्या स्वरुपानें नानाप्रकारें भासत असतोस||१९|| अर्थ:---जशी पृथिव्यादिक कारणें,रुपांतराने आपलींच प्रकट होण्याची स्थानें अशा चराचरप्राणिमात्रांमध्यें,कारणरूपानें पूर्वी असूनही नंतर प्रविष्ट झाल्यासारखीं होऊन कार्यरूपानें अनेकप्रकारें भासतात तसा एकच स्वतंत्र आत्मा तूं,आपण कारण असलेल्या सर्व भूतभौतिक कार्यांचेमध्यें त्या त्या स्वरुपानें भासतोस.||२०|| अर्थः---तूंच आपल्या शक्तिरूप रजःसत्वतमोगुणांनी जगाचे उत्पत्तिस्थितिसंहार करितोस तथापि त्या गुणांच्या व कर्मांच्या योगाने बद्ध होत नाहींस.कारण,ज्ञानरूपी तुझ्या बंधाला कारण होणारी अविद्या कोठें आहे?मुळींच नाहीं||२१||तुला बंधांची शंकासुद्धा नाहीं हें तर राहूं देच परंतु अविद्योपाधिक जीवात्म्यालाहि वस्तुतः जन्म आणि जन्ममुलक भेद हें मुळींच नाहीत.कारण,देहादिक उपाधींचे कोणत्याहि तऱ्हेने निरुपण करितां येत नाहीं.आता बांध अहिया असें म्हणणारा तूं मोक्षाचा अंगीकार करितोस काय?होय म्हणशील तर-बांधावाचूमोक्ष कसा?तेव्हा बांध प्राप्त झालाच पाहिजे असें म्हणशील तर-तुला अविद्या नसल्यामुळें बंधन किंवा मोक्ष हे दोन्हीही नाहीत.असा आतां उखळाचेठिकाणी मला बांधलेला तूं ऐकिला आहेस व यमुनेच्या डोहात मुक्त असलेला पाहिजे आहेस तेव्हां बांध मोक्ष नाहीत हे कसें ? कसें म्हणशील तर-आमच्या समजुतीने बंध मोक्ष आहेत असें वाटते परंतु तटें केवळ आमचे अज्ञानच आहे||२२|| भावार्थ:---शुद्ध आत्म्यास स्थूलदेह,सूक्ष्मदेह व कारणदेह उपाधी नाही,म्हणून आत्म्यास जन्म—मरण नाही कि त्याच्याहून अन्य पदार्थ नाहीच.म्हणून आत्मा हा सत्—चित्—आनंद आहे.आत्मा यास बंध व मोक्ष नाही.जीवात्म्यास अज्ञनामुळे स्थूलदेह व सूक्ष्मदेह उपाधी आहे.जीवाच्या अविवाकामुळे,बंध—मोक्ष ही कल्पना आहे.म्हणून जीवात्म्यास जन्म—मरण आहेत,चौऱ्याऐंसी योनी आहेत,सुख—दु:ख आहेत.म्हणीन जीवनी संत—महात्मा यांची संगती करून,अज्ञान घालवून जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करून,अनुभव घ्यावा.असे केले असता तो शुद्ध आत्मा—परमात्मा--सत्—चीत्—आनंद असतो.||२२|| अर्थः---तर माझे अवतार व चरित्रें हीं सर्व अज्ञानकल्पितच आहेत काय?नाहीं नाही;ही तर तुझी लीला आहे कारण,जगाच्या हिताकारीतां तुं सांगितलेला जो हा पुरातन वेद मार्ग,तो जेव्हां जेव्हां दुष्ट पाखंडमार्गांनी बाधित होतो तेव्हां तेव्हां तुं आपला शुद्धसत्वात्मक अवतार धारण करितोस||२३|| अर्थः---हे प्रभो,तोच तू आतां दैत्यांचे अंशभूत अशा कंसादिक राजांच्या शेंकडो अक्षौहिणी सैन्याचा वधानें भूमीचा भार दूर करण्याकरितां व या यादवकुळाच्या यशाचा विस्तार करण्याकरितां या भूलोकीं वसुदेवाच्या घरामध्यें आपल्या अंशभूत बळरामांसहवर्तमान अवतीर्ण झाला आहेस||२४|| अर्थः---हे अधोक्षजा ईश्वरा,जो तुं पांचमहायज्ञाच्या देवता,पित्र,भूतें व राजे ह्या रूपांनी बनला आहेस व ज्याच्या चरणाचें क्षालनोदक (गंगा)त्रैलोक्याला पवित्र करितें तो जगद्गुरू तूं,ज्यांच्यामध्यें प्रविष्ट झाला आहेस तीं आमचीं घरें आज तपोवनांपेक्षाही मोठी भाग्यवंत आहेत,म्हणजे अत्यंत पवित्र झालीं आहेत ||२५|| अर्थः---आतां आपला मनोरथ पूर्ण झाला असा संतोष मानित म्हणतो कीं,हे प्रभो,भक्तप्रिय,सत्य वक्ता,सर्वांचा हित कर्ता व भक्तांनी केलेली भक्ती जाणणारा,अशा तुजवांचून दुसर्याला कोणी बुद्धिमान पुरुष शरण जाईल?कोणीच जाणार नाहीं.कारण,तुं भक्ती करणाऱ्या भाक्तला त्यानें इच्छिलेले सर्वही पुरुषार्थ देतोस.अधिक तर काय परंतु तू आपणलाहि त्याच्या स्वाधीन करितोस.असें करण्याचें कारण,ज्या तुला उत्कर्ष किंवा अपकर्ष हे मुळीच नाहींत||२६|| अर्थः—हे जनार्दना,सनकादिक योगेश्वारांना व इंद्रादिक देवेश्वरांनाहि,ज्याच्या स्वरूपाचें ज्ञान दुर्लभ आहे तो तूं,आज येथे अविवेकी अशा आमच्या घरी प्रत्यक्ष प्राप्त झाला आहेस,तेणे करून मला मोठा आनंद झाला.आता पुत्र,स्त्री,धन,माता-पितर,घर व देह इत्यादिकांवर असलेली हि मोहपाशरूप तुझी मायां तुं लवकर नाहीशी कर.||२७|| भावार्थ:--- कुब्जा दासी म्हणते,”भगवंत श्रीकृष्णा मला आपले दर्शन झाले,माझे परम भाग्य उदयास आले.जीव हा [कुब्जा] स्त्रि,पुत्र,धन,स्वजन,घर,देह इत्यादिरूप मोहाने बांधले गेलो आहोत,त्यामोले आम्हास जन्म—मृत्युच्या बंधनात फिरावे लागत आहे.आम्हास पुन्हा—पुन्हा किंचित सुख व अपर दु:ख भोगावे लागत आहे.आपल्याच मायेचा हा खेळ आहे. मी आपणास शरण आलेली आहे,तरी कृपा करून आपण आमचे अज्ञानरुपी बंधन लगेच नाहीसे करा.||२७|| अर्थः---याप्रकारें भक्त अक्रुराने पूजा केलेला व स्तुती केलेला तो भगवान् श्रीकृष्ण,मंदहास्य करून भाषणांनी अक्रूराला मोह उत्पन्न करीतच कीं काय म्हणाला कीं,-||२८|| अर्थः---श्रीभगवान् म्हणाला-तूं आमचा निरंतर हित करणारा व काका असल्यामुळें आम्हांस प्रशंसा करण्यास योग्य आहेस.आम्हीं तर-तुमची मुलें असल्यामुळें तुम्हांस रक्षण करण्यास,पोषण करण्यास व दया करण्यास योग्य आहो||२९|| | भवद्विधा महाभागा निषेव्या अर्हसत्तमाः | श्रेयस्कामैर्नुभिर्नित्यं देवाः स्वार्था न साधवः ||३०|| अर्थः---तुम्हासारखे महा भाग्यवंत जे अतिउत्तम पुरुष आहेत तेच कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी सेवन करण्यास योग्य आहेत.आतां मनुष्यांनी देवांचीच सेवा सेवा करण्याचें प्रसिध्द आहे,असें म्हणाल तर-देव स्वार्थप्र आहेत तसे साधु नाहींत.साधुत्र केवळ दुसऱ्यांवर अनुग्रह करणारे आहेत परमार्थदृष्टीनें पाहून गेले असतां,साधु हेच देव असल्यामुळें त्यांचीच सेवा करावी||३०|| | न ह्यम्मयानी तीर्थानि न देवा मृच्छीलामयाः | ते पुनन्त्युरूकालेन दर्शनादेव साधवः ||३१|| अर्थः---तर पाषाणादिकांनी निर्माण केलेले काय देवच नव्हेत?असें म्हणशील तर-उदकमय तीर्थं ही तीर्थें व मृत्तिकापाषाणमय देह व हे दे नव्हेत असें नाहीं,तर ती तीर्थ व ते देव आहेत खरे परंतु त्यांच्या व साधूंच्या मध्यें पुष्कळ फरक आहे.तीं तीर्थे व ते देव,पुष्कळ काळपर्यंत सेवा केली असतां पवित्र करितात आणि साधूलोक दर्शनमात्रें करूनच पवित्र करितात ||३१|| भावार्थ:--- फक्त पाणी म्हणजे तीर्थ नाहीत,तर जेत्जे पाणी असून तीर्थ आहे,म्हणजे त्यांच्या ठिकाणे त्या तीर्थाच्या देवता असतात,त्या देवातेमुळे त्या पाण्यास तीर्थत्व आलेले असते.म्हणून तीर्थास महत्व येते.म्हणून आपण तीर्थास महत्व देऊन तेथे स्नान करून ते पाणी सेवन करावे.माती आणि पाषाण यांनी बनवलेल्या मुती म्हणजे देवता नाहीत तर त्या मातीच्या मूर्तीत व पाषाणाच्या दगडात देवत्व आल्यानंतर देवता होतात.त्या देवता आपापले कार्य करतात.तीर्थ व देवता कांही विशिष्ट काळ गेल्यानंतर फळ देतात,ताबोडतोब फळ देत नाहीत.संत—महात्मा मात्र दर्शन दिल्यानंतर ताबोडतोब फळ—पवित्र करतात.ज्ञान देतात.थोडक्यात संत—महात्मा यांचे फळ ताबोडतोब मिळते.म्हणून आपण ताबोडतोब फळ मिळण्यासाठी संत—महात्मा यांचे दर्शन,ज्ञान घेऊन आपले परम कल्याण करून घ्यावे,कारण त्यात हित आहे.||३१|| अर्थः---तो तशाप्रकारचां साधु व आमच्या सर्वही सुह्र्दांमध्यें श्रेष्ठ असा तूं आहेस;यास्तव पांडवांचे कल्याण करण्याच्या इच्छेनें त्यांचा वृत्तांत जाणण्याकरीतां हस्तिनापुरांत जाऊन ये ||३२|| अर्थः---पिता (पांडुराजा) मरण पावला असतां तो युधिष्ठिरादिक बालक,राजा धृतराष्ट्राने आपल्या हस्तिनापुरांमध्यें आणिलेले असून ते तेथे आपल्या कुंतीमतेसहवर्तमान अतिदुःखानें राहत आहेत असें आम्हीं ऐकिलें आहे ||३३|| | तेषु राजाम्बिकापुत्रो भ्रातृपुत्रेषु दिनधिः | समो न वर्तते नूनं दुष्पुत्रवशगोsन्धदृक् ||३४|| अर्थः---कारण तो धृतराष्ट्र आंधळा,कृपणबुद्धि आणि आपल्या दुर्योधनादिक कुपुत्रांच्या स्वाधीन असल्यामुळें त्या पांडवाचेठिकाणी आपल्या मुलांसारखी खरोखर वर्तणूक ठेवीत नाहीं||३४|| अर्थ:---म्हणून तूं हस्तिनापुरामाध्यें जाऊन संप्रतकाळीं त्या धृतराष्ट्राचे पांडवांचेठिकाणी वर्तन चांगल्या रीतीचे किंवा वाईटरीतीचें आहे तें जाणून ये,म्हणजे तें समजल्यावर जसें त्या सह्र्दांना सुख होईल तसें करिता येईल||३५|| अर्थः---याप्रमाणें तो भगवान् ईश्वर श्रीकृष्ण,अक्रूराला आज्ञा करून,नंतर उद्धव आणि बळराम यांसहवर्तमान आपल्या घरी प्रविष्ट झाला ||३६|| (याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणाच्या दशमस्कंधातील पूर्वार्धामध्यें कुब्जानुग्रहादिनिरुप्णनामक हा अठ्ठेचाळीसावा अध्याय समाप्त झाला ||४८|| | ||श्रीकृष्णर्पणमस्तु|| | _________________________________________________________________________________________________________ ४९ —किरण - अक्रुराचे हस्तिनापुरला गमन---१--- अध्याय पूर्ण आहे _________________________________________________________________________________________________________आतां,ह्या एकूनपन्नासाव्या अध्यायामाध्यें,अक्रूर हस्त्तिनापुरात जाऊन राजा धृतराष्ट्राची आपल्या भावाच्या (पंडूच्या)पुत्रांवर विषमबुद्धि आहें असें पाहून पुन्हां मथुरेंट परत आला,अशी कथा वर्णन केलेली आहे||१|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:----हे राजा,नानात्र तो अक्रूर,कुरुकुळांत श्रेष्ठ असलेल्या राजांच्या याशांनी म्हणजे त्यांनी बांधविलेल्या देवांच्या व ब्राम्हणाच्या गृहदिकांनी चिन्हित अशा त्या हस्तिनापुरांत जाऊन,तेथें धृतराष्ट्र,भीष्माचार्य,विदुर व कुंती यांस भेटला ||१|| अर्थः---तसाच बाल्हिक,सोमदत्त,द्रोणाचार्य,कृपाचार्य,कर्ण,धुर्योध्न,अश्वत्थामा,पांडव व दुसऱ्याहि सुह्रदांना यथायोग्य रीतीनें भेटून त्या बंधूंनी त्याला बंधूचा ( यादवांचा ) कुशळ प्रश्न केला असतां,त्यानें स्वतःही त्यांना आरोग्यप्रश्न केला ||२-३|| अर्थः---नंतर त्या हस्तिनापुरामध्यें तो अक्रूर धृतराष्ट्राचे वर्तन जाणण्याच्या इच्छेनें काहीं मास पर्यंत राहिला.कारण,तो धृतराष्ट्र-दुष्टपुत्राने युक्त,अल्पधीरी व करणादिक खळांच्या इच्छेप्रमाणे वागणारा होता||४|| अर्थः---अक्रूर तेथे फार दिवस राहिल्यामुळे पाद्वांचे शत्रू जिंकण्याचे सामर्थ्य,इंद्रियशक्ति,शरीर बल,शूर पणा वनाम्रता वगैरे असलेल्या उत्तमगुणांचे व त्यावर असलेल्या प्रजा जणांच्या प्रेमाचे सहन न करणाऱ्या धुर्योधनादिकांनी विषप्रयोगादिक दुष्ट कर्म केले होते व जे त्याच्या मनात पडवांना लाखेच्या घरात घालून मारावयाचे होतें ते सर्वथह या अक्रूराला कुंतीने व विदुराने स्पष्टपणे सांगितले.||५-६|| अर्थः---टी सांगण्याच्या पूर्वीचा कुंतीचा वृत्तांत असा कीं,-कुंतीने आपला भाऊ अक्रूर आला आहे असें ऐकून त्याच्याजवळ जाऊन ती आपल्या जन्मभूमीचें स्मरण करीत असता नेत्रांमध्यें दुःखाश्रू आणून असें म्हणाली कीं,-||७|| अर्थः---हे सौम्या,अक्रुरा,माझी-माता,पिता,भाऊ,बहिणी,भावांचे पुत्र,कुळांतील स्त्रिया व मैत्रिणी हीं सर्व माझें स्मरण करितात काय?||८|| | भ्रात्रेयो भगवान् कृष्णः शरण्यो भक्तवत्सलः | पैतृष्वसेयान् स्मरति रामश्चाम्बुरुहेक्षनः ||९|| अर्थ:---तसाच भक्तांवर द्या करणारा व शरण जाण्यास योग्य असा माझ्या भावाचा मुलगा भगवान श्रीकृष्ण व कमळनेत्र बलराम,हे उभयतां आपल्या आतेचे पुत्र असलेल्या धर्मादिकांचे स्मरण करितात काय?||९|| | सापत्नमध्ये शोचन्तिं वृकाणां हरिणीमिव | सान्त्ययिष्यति मां वाक्यैः पितृहीनांश्च बालकान् ||१०|| अर्थ:---मीतर-जशी लाडक्यामध्यें हरिणी सांपडून शोकाक्रांत होतें त्याप्रमाणें या शत्रूंमध्येसांपडून सशोक करीत आहें;यास्तव तो श्रीकृष्ण माझें व या पितृहीन झालेल्या बालकांचे सांत्वन करील काय?||१०|| अर्थः---याप्रमाणें अक्रुराप्रत बोलून,प्रेमवेगानेंवेगानें भागवान् आपल्याजवळच आला आहें असें मानून त्याची प्रार्थना करितें की,-हे कृष्णा,हे कृष्णा,हे महायोगिन,हे जगदात्म्या,हे जगत्पालका,हे गोविंदा,बालकांसहवर्तमान क्लेश पावणाऱ्या व तुला शरण आलेल्या माझें तुं रक्षण कर||११|| भावार्थ:---कुंती भगवंत श्रीकृष्णास शरण जात आहे,कारण कुंतीही आपल्या मुलासहित दु:खी आहे.तात्विक विचार केला तर प्रत्येक जीवाने भगवंतास शरण जावे,त्या जीवाची परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो,त्याने भगवंतांस शरण जाऊन आपले जन्म—मरण निवृत्त करावे.मनुष्य देहातच जन्म—मरण निवृत्त करता येते,अन्य देहात नाही.||११|| | नान्यत्तव पदाम्भोजात् पश्यामि शरणं नृणाम् | बिभ्यतां मृत्यूसंसारादिश्वरस्यापवर्गीकात् ||१२|| अर्थः---हे प्रभो,मृत्यूसंसारापासून भिणाऱ्या प्राण्यांना मोक्षप्रद अशा तुज ईश्वराच्या चरणकमळातून दुसरें रक्षण करणारें कोणीहि मी पाहत नाहीं||१२|| भावार्थ:--- मृत्यू लोकात आलेले सर्व जीव मृत्यूला प्राप्त होणार आहेत,कारण हा मृत्यू लोक आहे.येथे येणारे लोक बहुतेक अज्ञानी असतात,म्हणून येथील लोक मृत्यूला भितात.जर तो जीव भगवंत,साघू—महात्मा यांना शरण गेला तर,म्हणजे त्यांच्या अज्ञानुसार—शात्रानुसार आचरण केले तर तो सुखरूप होऊ शकतो.निष्काम कर्म,निष्काम भक्ती व जीवब्रह्मऐक्यज्ञान प्राप्त करून,त्या ज्ञानाचा अनुभव घेतला तर,त्याचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होऊ शकतो. म्हणून आपण त्यानुसार निष्काम कर्म,निष्काम भक्ती केली व जीवब्रह्मऐक्यज्ञान संत—महात्मा—भगवंत यांना शरण जाऊन,ज्ञान प्राप करून त्या ज्ञानाचा अनुभव घेतला तर आपलेही निश्चितरुपाणे जन्म—मरण निवृत्त होते.याशिवाय अन्य—दुसरे साधन कोणतेच नाही.असे वेदशात्र पुन्हा—पुन्हा संगत आहे.संत—महात्मा तेच संगत आहेत.||१२|| अर्थः---यास्तव धर्ममूर्ती,अपरिच्छिन्नरुपी जीवांचा सखा अनिमादी संपत्तियुक्त व ज्ञानात्मा अशा तुज कृष्णाला नमस्कार करीत मी शरण आलें आहें||१३|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला:----हे राजा,याप्रमाणें स्वजनांचे व जगदीश्वरकृष्णाचें स्मरण करून त्याच्या वियोगादिकेंकरून दुःखित झालेली ती तुमची पणती कुंती,शेवटी रुदन करुं लागली ||१४|| अर्थ:----तेव्हा,त्या कुंतीसारखेंच ज्याचें दुःख व सुख आहे,असा अक्रूर व महायशस्वी विदुर ह्या उभयतांनी,तुझें व माद्रीचे हे पुत्र-धर्म,वायू,इंद्र व अश्विनीकुमार यांपासून झालेले असून महापराक्रमी आहेत यास्तव तुं खेद मुळींच करुं नयेत असें सांगून त्या कुंतीचें सांत्वन केलें||१५|| अर्थः---नंतर त्या अक्रुराने मथुरेत जातेंवेळीं,भीष्मादिक बंधूंच्यामध्यें सभेंत बसवलेल्या व आपल्या पुत्रांवर आसक्त असून पाडवांचेठिकाणी विषमबुद्धि धारण करणाऱ्या त्या धृतराष्ट्रराजाजवळ जाऊन,त्याला कृष्णरामादिक बंधूंनी जें प्रेमानें सांगितलें होतें टी सांगितलें ||१६|| अर्थः---अक्रूर म्हणाला:---हे कौरवांची कीर्ति वाढविणाऱ्या विचित्र वीर्यनंदना,धृतराष्ट्रा,तुं पांडुराजा (भाऊ) मरण पाव-ला म्हणून त्याचे पुत्र असतांही आता ह्या सिंहासनावर बसला आहेस||१७|| | धर्मेण पालयन्नुर्विं प्रजाः शीलेन रन्जयन् | वर्तमान: समः स्वेषु श्रेयः कीर्तीमवाप्स्यसि ||१८|| अर्थः---तो तुं,धर्मानें पृथिवीचे पालन करीत,व आपल्या सुस्वभावानें प्रजांन रमवित पंडूचे पुत्र व आपले पुत्र यांचेठिकाणी समत्वाने वर्तणूक ठेवशील तर कल्याण व कीर्ति पावशील||१८|| भावार्थ:---जीवांनी धर्मानुसार जीवन जगावे,धर्मानुसार आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचा,धर्नानुसार आपल्या जिल्ह्याचा, धर्मानुसार आपल्या प्रदेशाचा,धर्मानुसार देशाचा,धर्मानुसार संपूर्ण जगाचा—अखील मानवांचा कारभार पाहून त्यांचे दु:ख घालवून व त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा.असे केले असता सुख देणारे सुखी व ज्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला तेही सुखी होतील.यात कांहीच शंका नाही.भगवंतांस शरण जावे.त्याचे आपण सेवक आहोत.सत्ता त्याची आहे,असा भाव आपल्या ठिकाणी असावा.त्याची सत्ता असून त्याच्या म्हणण्यानुसार,कायद्यानुसार व धर्मानुसार सत्ता वापरेल.या सत्तेचा वापर माझ्या कुटुंबापुरताच न करता अखिल मानव हे माझे कुटुंब आहे असी भावना ठेवेल.||१८|| अर्थः---नाहीतर (याच्या विपरीत आचरणर करशील तर)यालोकीं लोक तुझी निंदा करतील,परलोकी नरकास जाशील म्हणून तुं पांडव व आपले पुत्र यांच्याविषयी सारखें वर्तन ठेव||१९|| भावार्थ:--- आपण जर धर्मानुसार—कायद्यानुसार आचरण न केले तर याच लोकात तुमची निंदा होईल.लोक तुम्हास चांगले म्हणणार नाहीत.तुमची मानहानी होईल,त्यामुळे तुम्हास सुख न वाटता दु:ख होईल.म्हणून धर्मानुसार—कायाध्या—प्रमाणे आचरण करा.तुम्हास मृत्युनंतर नरकात दु:ख भोगण्यास इच्छा नसतांना जावे लागेल.नरकातील दु:ख भोगल्यानंतर लक्ष चौऱ्याऐंसीस जाऊन दु:ख भोगावे लागेल.म्हणून आपण सर्वांनी धर्मानुसार व कायद्यानुसार जीवन जगावे.यातच आपले हित आहे,अन्यथा नरकास व लक्ष चौऱ्याऐंसीस जाऊन दु:ख भोगावे लागेल.||१९|| अर्थः---आता आपले पुत्र व दुसर्याचे पुत्र यांच्यावर समत्व कसें होईल?असें म्हणशीलतर-हे राजा,यालोकीं ||२०|| अर्थः---पहा!हा जीव एकटाच जन्मास येतो,स्त्रीपुत्रादिकांसह जन्मास येत नाहीं व एकटाच मरण पावतो,स्त्रीपुत्रादिकांसह मरण पावत नाहीं,तसाच पुण्याचें फळ सुख एकटाच भोगतो व पापाचें फळ दुःखही एकटाच भोगतो ||२१|| भावार्थ:---जीव जन्मास येत असतांना एकटाच जन्मास येतो व जातांना—मृत्युच्या वेळेस एकटाच जातो,येतांना व जातांना मागील संस्कार घेऊन येतो व जातांना—मृत्यूनंतर फक्त संसार व पाप—पुण्य घेऊन जातो.जड—धन—संपत्ती—सत्ता,वैभव,देहसंबंधी—आई—वडिल,पती—पत्नी,पुत्र--पुत्री कांहीच बरोबर घेऊन जाऊ शकत नाही.म्हणून पाप न करता पुण्य करावे किंवा निष्काम कर्म,निष्काम भक्ती व ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यून जन्म—मरण निवृत्त करावे.||२१|| अर्थः---आणि ज्यावेळी स्त्रीपुत्रादिक याच्याबरोबर असतात त्यावेळीहि विचार केला असतां ते स्त्रीपुत्रादिक शत्रूच आहेत.कारण,ते,आम्ही पोषण करण्यास योग्य आहों असें मिष दाखवून ह्या मूढबुद्धि पुरुषाचें अधर्मानें मिळविलेले द्रव्य,जसें मात्स्याला वांचण्यांस साधनभूत असलेले पाणी,त्याचे स्त्रिपुत्रादिक हरण करितात त्याप्रमाणें हरण करितात||२२|| भावार्थ:--- कुटुंबाचे पालन—पोषण करणे हा कुटुंब कर्ता जो आहे त्याचा स्वधर्म आहे.म्हणून त्याने ते कार्य करावे.जो जीव अधर्माने कमावलेले धन स्वजन लुटतात व मृत्युनंतर स्वजन लुटतात.म्हणून आपण अधर्माने धन कमवू नये व धर्मानुसारच धन कमवावे व धर्मानुसारच खर्चावावे—दानधर्म करवावा.यातच आपले हित असून सुखकारक आहे.||२२|| अर्थः---आणि हे आपले आहेत असें मानून,ज्यांचे अधर्मानें पोषण करितो ते प्राण,द्रव्यें व पुत्रकलत्रादिकहि,पूर्णमनोरथ न झालेल्या त्याला (मेलेल्याला किंवा जिवंतालाच)सोडून देतात||२३|| भावार्थ:--- जो माणूस देहसंबंधीतांना आपले समजून अधर्माने त्यांचे पालन—पोषण करतो,तेच त्याचे धन—पुत्र इत्यादी त्याचेच पालन—पोषण करत नाहीत,त्याच्या इच्छा पूर्ण करत नाहीत.त्यास दु:ख भोगावे लागते.म्हणून जीवांनी धर्मानुसार धन कमवावे व धर्मानुसारच खर्च करावे.असे केले असता तोच धर्म आपले रक्षण करतो.त्यामुळे पुण्य होते.||२३|| अर्थः---मग स्वार्थाविषयीं मूढ,स्वधर्मापासून ब्राष्ट,व पूर्णमनोरथ होण्याच्या पूर्वीच स्त्रीपुत्रादिकांनी टाकलेला तो पुरुष,स्वतां त्यांच्या पोषणासाठी केलेलें पापमात्र घेऊन अंधतामिस्त्रादि नरकांमध्यें प्रवेश करितो||२४|| भावार्थ:--- जो जीव धर्मांचे पालन न करता अधर्मानुसार आचरण करतो,त्याला व्यवाहारिक सुखसुद्धा मिळू शकत नाही.अधर्मानुसार कुंटूबाचे पालन—पोषण केले तर त्याचेच पुत्र त्याचे पालन—पोषण करत नाहीत.म्हणून आपण अधर्माने आचरण करू नये.समाधान त्यास मिळत नाही.तो नेहमी चिंतेत असतो,दु:खात असतो.तो पाप अधिक करतो.||२४|| | तस्माल्लोकमिमं राजन् स्वप्नमायामनोरथम् | वीक्ष्यायम्यात्मनाssत्मानं समः शान्तो भव प्रभो ||२५|| अर्थः----वास्तव हे विचारसमर्था राजा,पुत्रादिकांवर आसक्त होणें हे अनर्थाला कारण आहे म्हणून धनपुत्रादिकांसहित हा लोक,स्वप्न,माया किंवा ,मनोरथ यांसारखा अनित्य आहे असें पाहून,आपल्या बुद्धीनेंच आपल्या मनाचें नियमन करून,तू शांत व सर्वठिकाणी समानबुद्धि धारण करणारा हो ||२५|| भावार्थ:--- हा संसार मिथ्या,स्वप्न,जादूसारखा व मनोराज्य आहे.असा हा संसार आहे,म्हणून स्वत:च स्वत:वर नियंत्रण ठेऊन म्हणजे मन व इंद्रिये यांना नियंत्रात ठेवून धर्मानुसार आचरण करावे.असे केले असता आपण निष्काम धर्मानुसार आचरण करतोत.निष्काम धर्मानुसार आचरण केले असता,संत—महात्मा यांची संगती करून त्यांच्या मुखातून कांही शात्र—धर्म ऐकावा वाटतो,त्यामुळे समत्व बुद्धी निर्माण होते समत्वबुद्धी निर्माण झाल्यामुळे शांतता प्राप्त होते.||२५|| अर्थः---धृतराष्ट्र म्हणाला:---हे दानपते अक्रुरा,तुं जी काल्यान कारक वाणी बोलत आहेस त्या ह्या वाणीच्या योगानें,जसा मारणारा प्राणी,अमृत भक्षण करूनही तृप्त हो नाहीं त्याप्रमाणें मी तृप्त होत नाही;म्हणजे तुं ही वाणी आतां पुरी करावीस असें मानीत नाही.||२६|| भावार्थ:--- धृतराष्ट्र अक्रूर यांना म्हणतात कि,”आपला सल्ला—मार्गदर्शन मला पटले—आवडले.माझ्या कायानाचाच मार्ग मला सांगितला.कितीही चविष्ट पदार्थ दिला—सेवाव केला किंवा स्वर्गातील अमृत सेवन केले तरी त्यास मर्यादा पडते,कारण तो स्थूल पदार्थ आसल्यामुळे त्यास साठवण्यास आपल्या पोटाची मर्यादा येते,त्यामुळे आपण त्या पदार्थास इच्छा असूनसुद्धा पुरे—पुरे म्हणोतोत.आपण जे ज्ञानामृत दिले आहे,त्यासाठी त्याची साठवण करण्यासाठी मनात केली जाते.मन असे आहे कि ते फार अमर्याद आहे,म्हणून कितीही ऐकले तरी ऐकावेच वाटते,मनाची तृप्ती होताच नाही.म्हणून मी आपल्या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही.म्हणून आपण जिवंत राहावे इतकेच स्थूल पदार्थांचे सेवन करावे व धर्माचे—ज्ञानामृताचे सेवन कितीही केले तर त्रुप्तीच होऊ नये.म्हणजे पुन्हा—पुन्हा सेवन अखंड करावे.||२६|| अर्थः---तथापि हे सौम्या,तुझी मधुर व हितकारक अशी हि वाणी,पुत्रांच्या प्रेमानें विषय होऊन चंचल झालेल्या माझ्या ह्रदयांमध्यें,जशी स्फटिकमी सुदाम्या पर्वतावर चमकलेली वीज स्थिर रहात नाहीं तर तत्काळ नष्ट होत्ये त्याप्रमाणे स्थिर न राहतां व्यर्थ होत्ये||२७|| भावार्थ:--- उपदेश श्रावण करत असतांना तो आपल्या चित्तात स्थिर व्हावावयास पाहिजे,पण होत नाही,कारण आपले मन स्थिर झालेले नसते.म्हणून उपदेश श्रवण करण्यापूर्वी आपले चित्त स्थिर करून श्रवण करावे,मन स्थिर होण्यासाठी निष्काम भक्ती करावी लागते.निष्काम भक्ती अनेक प्रकारची आहे.उदा—जे जीव दु:खी आहेत,त्यांचे दु:ख निवारण करून त्यांना सुख देण्याचा सतत प्रयत्न करणे,यास निष्काम भक्ती असे म्हणतात.निष्काम भक्तीने अंत:कारण स्थिर होते. मन सम होते.मन स्थिर झाल्यानंतर श्रवण केले असता,श्रवणाचा मनावर परिणाम होऊन आचरण धर्मानुसार होते.||२७|| अर्थः--- बरें असें जाणणाऱ्याहि तुला कसा हा मोह प्राप्त होतो?असें म्हणशील तर-ईश्वराच्या मनांत जें कर्तव्य असेल तें अन्यथा करण्यास कोण बरें पुरुष समर्थ होईल?कोणीच नाहीं.जो ईश्वर,भूमीचा भार उतरून टाकण्याकरितां यदूच्या कुळामध्ये श्रीकृष्णरूपानें अवतीर्ण झाला आहे ||२८|| अर्थः---जो अतर्क्यमार्ग असलेल्या आपल्या मायेंने हें सर्व जग उत्पन्न करून त्यांत अंतर्यामीरुपानें प्रविष्ट असता,सर्व प्राण्यांना कर्मे व त्या कर्मांची निरनिराळी फळें देत असतो व जो समजण्यात न येणार्या आपल्या क्रीडेपासूनच उत्पन्न झालेल्या संसारचक्राला फिरवीत असतो,त्या परमेश्वराला नमस्कार असो||२९|| भावार्थ:--- भगवंत आपल्या मायेचा स्वीकार करून जगाची निर्मती करून त्यात प्रेवेश करतात.ज्याच्या—त्याच्या कर्मफळाची वाटणी करून त्यांना—त्यांना भोग देतात.म्हणून आपण धर्मानुसार कर्म करावे.धर्मानुसार कर्म केले असता सुख मिळते व अधर्मानुसार कर्म केले असता दु:ख हे फळ मिळते.म्हणून धर्मानुसारच आचरण करावे व अधर्मानुसार आचरण करू नये.म्हणून असा जो भगवंत आहे,त्यांनाच नमस्कार करावा.संत—महात्मा यांना नमस्कार करावा.||२९|| | इत्यभिप्रेत्य नृपतेरभिप्रायं स यादवः | सुहृद्भिः समुनज्ञातः पुनर्यदुपुरीमगात् ||३०|| अर्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला :---हे राजा,याप्रमाणें त्या अक्रुराने,धृतराष्ट्र राजाचा अभिप्राय जाणून,पांडवादिकांनी मथुरेस जाण्याविषयी अनुज्ञा दिली असतां,पुन्हा मथुरेमध्यें गमन केलें||३०||अर्थः---हे राजा,नानात्र ज्याकरितां (धृतराष्ट्राचें वर्तन जाणण्याकरितां) भगवंतानें स्वताः त्या अक्रूराला पाठविलें होतें तें पांडवाविषयी धृतराष्ट्राचे विषदानादिक सर्व वर्तन त्यानें रामकृष्णांना सांगितलें||३१|| भावार्थ:--- अक्रूर मथुरेला गेल्यानंतर रामकृष्णांना धृताराष्ट्र पांडवांसी जसे वागतात,तसाच सर्व वृतांत सांगितला. त्याकरीताच अक्र्र यांना हस्तिनापुरास पाठवले होते,त्यानुसार आक्रूर यांनी ते सर्व कार्य केले.धृतराष्ट्रांना उपदेश मनानेच सांगितला,कारण सात्विक कार्य करावे,पण मनाने सांगू नये,त्यामुळे अंहकार येत नाही.म्हणून सांगितले नाही.आपणही सात्विक कर्म कोणास सांगू नये,कारण सांगितल्यास अंहकार येतो,म्हणून अंहकार येऊ नये सात्विक कर्म सांगू नये.||३१|| याप्रमाणें श्रीमदभागवतनामक महापुराणाचया दशमस्कंधांतील पूर्वार्धात धृतराष्ट्रवृत्तपरिज्ञाननामक हा एकूण पन्नासावा अध्याय समाप्त झाला ||४९|| ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| समाप्तमिद दशमस्कन्धस्य पुर्वार्द्धम् ||------दहावा स्कन्ध समाप्त [पूर्वार्ध | ||श्रीकृष्णार्पणमस्तु || | | हरी:ॐतत्सत् | ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment