अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः सहावा
| ॐ नमो भगवते वासुदेवाय | | श्रीमद्भागवतमहापुराण | =========================================== | षष्ठ स्कंध:(६)---सहावा स्कंध(६) | =========================================== |१---- अथ प्रथमोध्याय: १---(पहिला अध्याय---१) | ___________________________________________________________________________________ श्रीगणेशाय नम: || आतां सहाव्या स्कांधामध्ये एकुणीस अध्यायांनी पोषण(मर्यादा उल्लंघन केलेल्या भक्तांचे रक्षण)सांगितले आहे.त्यांत पहिल्या तीन अध्यायांनी अजामिलांचे आख्यान,पुढील आठ अध्यायांनी वृत्रासुराचे आख्यान आणि त्यानंतरच्या दोन अध्यायांनी मरुद्गणाचे असा प्रकरणाचा क्रम आहे.त्यांपैकी या पहिल्या अध्यायामध्ये विष्णूदुतांना धर्मादिकांचे लक्षण सांगितले आहे. |श्रीशुक उवाच:--- भावार्थः---प्रथमतः परीक्षित राजा,ऐकीलेल्या कथेचा अनुवाद करून त्यांत पूर्वाध्यायी ऐकीलेल्या नरकांचा परीहाराचा उपाय विचारण्यासाठी प्रश्न करितो- |राजोवाच | निवृत्तीमार्ग: कथित आदौ भगवता यथा | क्रमयोगो पलब्धेन ब्रम्हणा यद संसृति: ||१|| राजा म्हणाला-----हे भगवन्,ज्याच्या योगाने क्रमाक्रमाने अर्चिरादिमार्गेकरून प्राप्त झालेल्या ब्रहमदेवासहवर्तमान साधकपुरुषांना मोक्ष प्राप्त होतो तो निवृत्तीमार्ग,तूं पूर्वी (द्वितीयस्कंधामध्ये)मला सांगितला आहेस.म्हणून आपण--जीवानी निवृत्ती--मार्गाचा अवलंब करून चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे,त्याचा अवलंब करून जन्म--मरण निवृत्त करावे."यामुळे आपण--जीव सुखरुपच--परमात्मारुपच स्वस्वरुपास प्राप्त होणार आहोत." आपली--जीवाची जी इच्छा 'कायमचे दु:ख निवृत्त व्हावे व कायमचीच सुखारुपता प्राप्त व्हावे."ती पूर्ण होणार आहे.||१|| भावार्थः---तसाच हे मुने,स्वर्गादिसुख हेंच ज्याचे फळ आहे व मायाबद्ध पुरुषाला,ज्याच्या योगाने वारंवार जन्म प्राप्त होते तो प्रवृत्तिलक्षणही मार्ग तूं,पूर्वी(तृतीयस्कंधामध्ये)मला वर्णन केला आहेस.आपण--जीवानी शक्यतो प्रवृत्ती मार्गाचे अनुकरण करू नये,कारण प्रवृत्ती मार्ग हा संसाराचाच आहे.आपला अधिकार जर निवृत्ती-मार्गाचा नसेल तर प्रवृत्ती मार्गाचा--संसार मार्गाचा अवलंब करावा.उदा--आपणास जर गाईचे शुद्ध तूप पचत नसेल तर गाईचे दुधच सेवन करावेच.संसार हा तात्पुरते दु:ख निवृत्त करतो व तात्पुरतेच सुख देतो."आपणास--जीवास कायमचे दु:ख निवृत्त व्हावे व कायमचीच सुखरुपता मिळावी अशी अखिल जीवांची इच्छा आहे,"ती इच्छा पूर्ण होत नाही.म्हणून "आपण--जीवानी प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून निवृत्तीच मार्गाचा स्वीकार करून आपली इच्छा पूर्ण करावी."||२|| भावार्थः---त्याचप्रमाणे अधर्मलक्षणरूप नरकांचेही मला वर्णन केले आहेस आणि ज्यामध्ये प्रथम स्वायंभुव मनु झाला त्या पहिल्या मन्वंतराचेंही (चतुर्थस्कंधाच्या आरंभी)व्याख्यान केले आहेस.आपण--जीवानी अधर्माचा--परधर्माचा स्वीकार करू नये,कारण अधर्म किंवा परधर्म हा दु:खास कारण आहे.आपणास--जीवास सुखाची गरज आहे,म्हणून स्वधर्मांचाच स्वीकार करून जीवन व्यतीत करावे.||३|| भावार्थः---प्रियव्रत आणि उत्तानपाद ह्यांचा वंश व त्यांची चरित्रे कथन करून,द्वीपे,खंडे,समुद्र,पर्वत,नद्या,बागा व वनस्पति हे विभाग लक्षणे आणि प्रमाणे ह्यांसहवर्तमान मला सांगितलेस तशीच भूमंडलाची ज्योतीर्गणाची व सप्तपाताळांची रचना प्रभूने जशी केली आहे तसे मला सांगितलेस.||४-५|| | अधुनेह महाभाग यथैव नरकान्नर: | नानोग्रयातनान्नेयात्तन्मे व्याख्यातुमर्हसि ||६|| भावार्थः---आतां हे महाभाग्यवंता,नानाप्रकारच्या भयंकर यातनांनी युक्त अशा नरकांस ज्या उपायाने पुरुष जाणार नाही तोच उपाय या प्रसंगी मला सांगण्याविषयी तूं समर्थ आहेस.||६|| भावार्थः---असे राजाचे भाषण श्रवण करून मन्वादिकांनी सांगितलेले प्रायश्चित केल्यावाचून नरकांची निवृत्ती होणे अशक्य आहे असे सांगण्याच्या अभिप्रायाने श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,या जन्मामध्ये पुरुष,कायावाचेमनेकरून केलेल्या पापांचे याच जन्मामध्ये मन्वादिकांनी धर्मशास्त्राप्रमाणे जर प्रायश्चित करणार नाही तर तो पापी,मेल्यावर,मी जे तुला भयंकर यातनांनी युक्त नरक सांगितले त्या नरकांप्रत खरोखर जाईल.||७|| भावार्थः---तस्मात रोगांचे निदान जाणणारा वैद्य ज्याप्रमाणे दोषांचा कमी-जास्तपणा पाहून औषधाची योजना करितो त्याप्रमाणे मरणाचे पूर्वी या जन्मीच व त्यांतूनही रोगादिकांनी पिडीत देह झाला नाही तोपर्यंतच मनाचे संयमन करून आणि पापांचे अल्पत्व अथवा महत्त्व जाणून त्यांचे प्रायश्चित करण्याकरितां पुरुषाने त्वरित प्रयत्न करावा.आपण--जीवानी वर्तमान देहास मरण येण्यापूर्वी व देह रोगादिकांनी पिडीत झाला नाही तोपर्यंत मन आणि इंद्रियें आपल्या--जीवाच्या ताब्यात घेऊन स्वधर्मांनुसार कार्य करावे.एका क्षणाचाहि विलंब करू नये.||८|| भावार्थः---राजा म्हणाला----हे मुने,दृष्टि पडणारे दुःख (राजदंडादिक)व ऐकू येणारे दुःख (नरकपातादिक)ह्यांच्या योगाने पाप हे आपले शत्रू आहे असे जाणत असतांही हा जीव पुनः (प्रायश्चित्तानंतर)फिरून पापाच्या वासनांच्या स्वाधीन होऊन पातक करितो,तर प्रायश्चित्ताचा उपयोग काय?आपण जीवानी प्रायश्चित कर्म केल्यानंतर पुन्हा निषिद्ध वासनांचा स्वीकार करू नये,कारण निषिद्ध कर्मांचे फळ पाप--दु:ख आहे.आपण प्रायश्चित कर्म केल्यामुळे पाप--दु:ख निवृत्त झाले.त्यानंतर आपण निषिद्ध कर्मांचा स्वीकार केला तर,प्रायश्चित कर्मे करून काय फायदा होणार आहे?कांहीच फायदा होणार नाही.उदा--आपण--जीवानी स्नान केल्यानंतर पुन्हा अंगास माती लावावी का ?पुन्हा अंगास माती लावू नये,कारण माती लावल्यास पुन्हा अंगास मळ बसेल.आपण स्नान करून काय फायदा होणार आहे? हा आपला मूर्खपणा असेल.||९|| भावार्थः---आणि त्यांतूनही कधीकधी हा जीव पातकापासून निवृत्त होतो परंतु कधीकधी फिरून त्याच पापाचे आचरण करितो तस्मात्,जसे हत्तीला स्नान घातले असतांही तो पुन्हा धुरळ्याने आपणास मळीन करितो त्याप्रमाणे प्रायश्चित अगदी व्यर्थ आहे असे मला वाटते.||१०|| | कर्मणा कर्मनिर्हारो न ह्यात्यन्तिक इष्यते | अविव्ददधिकारित्वात्प्रायश्चित्तरति विमर्शनम् ||११|| भावार्थः---श्री शुकाचार्य म्हणाला----हे राजा,कृच्छ्रादिप्रायश्चित्तरूपाने पातकाचा समूळ नाश होत नाही.कारण प्रायश्चित्ताचा अधिकारी अज्ञानी पुरुष आहे,ह्याकरिता अज्ञान नाहीसे होत नसल्यामुळे केलेल्या प्रायश्चित्तानि जरी पातक नष्ठ झाले तरी त्या पुर्वपातकांच्या संस्काराने फिरून फिरून दुसरऱ्या पातकांची उत्पत्ती होते म्हणून ज्ञानप्राप्ती होणे हेच पापाचे मुख्य प्रायश्चित्त होय.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून चौथा पुरुषार्थ मोक्ष प्राप्त करून घ्यावा.त्यामुळे संचित व क्रीयामान कर्मे नष्ट होतात व त्यामुळे सर्व पापांची निवृत्ती होते व प्रारब्ध कर्म भोगून क्षय होतो.||११|| भावार्थ:---आणि हे राजा,ज्याप्रमाणे पथ्यरूपच अन्न भक्षण करणाऱ्या पुरुषाला व्याधी पिडा देत नाही त्याचप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष हळूहळू तत्वज्ञान सामर्थ्य होतो.जसे आपण पथ्यरूपच अन्नाचे सेवन केले तर रोग होत नाही,त्याचप्रमाणे आपण स्वधर्मानुसार निष्काम कर्मांचे आचरण केले तर तत्वज्ञान प्राप्त होऊन जन्म--मरण निवारण होते.||१२|| भावार्थः---हे राजा,ज्याप्रमाणे वेळवांच्या घर्षणाने उत्पन्न झालेला अग्नी त्यांचे सर्व बेट दग्ध करितो त्याप्रमाणे तप,ब्रहमचर्य,मन:संयमन,बाह्येन्द्रीयदमन,सत्य,दान,शौच,अहिंसादी यम (जपादि)व नियम ह्यांच्या योगाने श्रद्धायुक्त असलेले धर्मज्ञ विवेकी पुरुष,कायावाचामनेकरून घडलेल्या मोठ्याही पातकांचा नाश करितात.आपणास--जीवास पारमार्थिक साधना घडली तर वेदांताचा श्रावण करण्याचा अधिकार येतो व त्यामुळे सत्संगाद्वारे जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञान होऊन सर्व कर्मांचा म्हणजे संचित कर्मांचा व क्रियमाण कर्मांचा नाश होतो व प्रारब्ध कर्म भोगूनच क्षण होते.||१३-१४|| भावार्थः---परंतु असे होणे अतिकठीण असल्यामुळे ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करितो त्याप्रमाणे कितीएक वासुदेवपरायणलोक,केवळ भक्तीच्या योगानेच पातकांचा समूळ नाश करितात.निष्काम कर्मे व निष्काम उपासना करूनही पातकांचा नाश होतो.||१५|| | न तथा हयघवान राजन् पुयेत तप आदिभि: | यथा कृष्णार्पितप्राणस्तत्पुरूषनि षेवया ||१६|| भावार्थः---आणि हे तर ज्ञानमार्गापेक्षाही श्रेष्ठ आहे,असे सांगतो,हे राजा ज्याप्रमाणे कृष्णाचेठिकाणी प्राणसुद्धा अर्पण केलेला पातकी पुरुष,भगवद्भक्तांच्या निरंतर सेवेने शुद्ध होतो त्याप्रमाणे तपश्चर्यादिकांनी शुद्ध होत नाही.म्हणून आपण जीवानी निष्काम भगवंताची उपासना--भक्ती करावी.निष्काम भक्तीने आपण--जीव शुद्ध होतोत.||१६|| भावार्थः---कारण,ज्यामध्ये दयालु व निष्कर्म असे ईश्वरपरायण लोक असतात व जो सर्व प्रकारे निर्भय असल्यामुळे क्षेमकारक आहे असा भक्तीमार्गच या लोकी फार चांगला आहे.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्तीच स्वीकार करावा.||१७|| भावार्थः---हे राजेंद्रा,ज्याप्रमाणे मद्याच्या कुंभाला नद्या पवित्र करीत नाहीत त्याप्रमाणे नारायणविमुख पुरुषाला त्याने आचरण केलेली प्रायश्चित पवित्र करीत नाहीत,कारण प्रायश्चित कर्म केल्यानंतर पूर्व संस्कारामुळे निषिद्ध कर्मांचे आचरण केल्या जाते.म्हणून प्रायश्चित कर्म हे पवित्र करू शकत नाही.याकरिता आपण निष्काम भक्तीचाच स्वीकार करावा.||१८|| भावार्थः---परंतु,या संसारामध्ये ज्यांनी श्रीकृष्णाच्या गुणांविषयी प्रीती करणारे आपले मन त्या श्रीकृष्णाच्या चरणकमळाचेठिकाणी एकवार तरी लाविले आहे व तेवढ्यानेच ज्यांच्या पापाचे प्रायश्चित झाले आहे ते लोक,यमाला आणि पाश धारण करणाऱ्या त्याच्या दूतांना स्वप्नामध्येही अवलोकन करीत नाहीत.म्हणून आपण--जीवानी निष्काम भक्ती करावी,कारण निष्काम भक्तीनेच भगवंताविषयी प्रीती--प्रेम उत्पन्न होते.आपण केलेली निष्काम भक्ती भगवंतास समर्पण करावी.समर्पण भक्ती केली की,भगवंत आपल्या उद्धाराची काळजी घेऊन आपला--जीवाचा उद्धार करितो.||१९|| भावार्थः---असो ह्याविषयी हा एक पुरातन इतिहास पूर्वीचे ज्ञाते कथन करीत असतात तो इतिहास म्हणजे विष्णूच्या व यमाच्या दुतांचा संवाद आहे,तो तूं मजपासून श्रवण कर.||२०|| भावार्थः---कान्यकुब्जनामक नगरामध्ये अजामिळनामक कोणी एक दासिपती द्वीज राहत असे,तो पूर्वी सदाचारसंपन्न ब्राहमण असून त्या दासीच्या संसगाने दुषित झाल्यामुळे सदाचार नष्ट झाला होता,म्हणून आपण--जीवानी कोणाचाही दु:संग करू नये,कारण दु:संग हा अधोगातीकडेच नेत असतो.म्हणून आपण--जीवानी सत्संग करावा,कारण सत्संग हा परमात्म्याकडेच--सुखरुपतेकडेच नेत असतो.||२१|| भावार्थः---वाटसरू लोकांस लुटने,द्दूत खेळणे,फसविणे व चोऱ्या करणे ह्यांच्या योगाने निंद्यवृत्तीचा आश्रय करून तो अपवित्र अजामिळ,कुटुंब पोषण करण्याकरितां प्राण्यांना पीडा देत असे.अजामिळ ब्राह्मणास दु:संग घडल्यामुळे त्याचा सात्विक--गुण कमी होऊन राजस व तमोगुणाची वृद्धी झाली.म्हणून आपण--जीवानी दु:संगाचा त्याग करावा.||२२|| भावार्थः---हे राजा,अशा दुराचाराने वागत असणाऱ्या व त्या दासीच्या पुत्रांचे लालन करणाऱ्या त्या आजामिळला आयुष्याचा अठ्ठ्यांशी वर्षे इतका मोठा काळ निघून गेला,कारण दु:संग हा ज्यास--त्यास दु:संग न वाटता सुसंगच वाटतो.असा त्याचा दोष असलेला काळात नाही,म्हणून अठ्ठ्यांशी वर्षे निघून गेली असे त्यास कळाले नाही.||२३|| भावार्थः---त्या वृद्ध पुरुषाला दासीचेठिकाणी दहा पुत्र झाले होते,त्यांमध्ये नारायणनामाचा कनिष्ठ पुत्र अगदी बालक होता आणि त्यामुळे आई बापांना तो अत्यंत प्रिय होता.||२४|| भावार्थः---यास्तव अस्पष्ट व मधुर भाषण करणाऱ्या त्या बालकाचेठिकाणी त्या वृद्ध अजामिळाने आपले अंतःकरण अगदी बद्ध केले होते व त्याची लीला अवलोकन करीत असतांना तो अत्यंत आनंदित होत असे.||२५|| भावार्थ:----बालकावर असलेल्या प्रेमामुळे,तो इतका काही बद्ध होवून गेला होता की, आपण स्वत:भोजनपाण व काही भक्षण करीत असतानाही तो प्रथम त्या बालकाकडून भोजन व पान करवील असे,परंतु, त्या मुढाने समीप प्राप्त झालेल्या आपल्या मृत्युला जाणले नाही.म्हणून आपण आपल्या देहसंबंधित--संसारात अजामिळ ब्राह्मनासारखे आसक्त होऊ नये,कारण मृत्यू जवळ आला असता त्याचे--मृत्यूचे स्मरण झाले नाही,म्हणजे वृद्धावस्था प्राप्त झाली पण संसारातच आसक्त राहिला.त्यास परमार्थाचे स्मरण झाले नाही.||२६|| भावार्थ:----असो.ह्याप्रमाणे वागणाऱ्या त्या अज्ञ आजमीळाने आपली मति--बुद्धी,मृत्युकाळ प्राप्त झाला असताही त्या बालवयी नारायणनामक आपल्या पुत्रावरच ठेविली.त्याच्या बुद्धीला मृत्यू समोर आला असताही,पुत्राचेच स्मरण झाले,पण भगवंताचे स्मरण झाले नाही.कोणीही असो,आपली--जीवाची बुद्धी संसारातच आसक्त असते,कारण जन्मभर संसारातच बुद्धी खर्च केली,पण परमार्थात खर्च केली नाही.हा सर्व परिणाम संसाराचा आहे. म्हणून आपण जीवानी अजामिळ ब्रह्मासारखे वर्तन न करिता आपण आपले वेळ परमार्थासाठी खर्च करावा.||२७|| भावार्थ:----इतक्यामध्ये ज्यांनी हस्तामध्ये पाश धारण केले आहेत,जे अत्यंत भयंकर आहेत,ज्यांची मुखे वाकडी आहेत आणि ज्यांचे रोम ऊर्ध्व आहेत असे तसे आपणास नेण्याकरिता आलेली तीन पुरुष त्याने अवलोकन केले आणि इंद्रिये व्याकूळ झाली असता,दूर क्रीडासक्त असलेल्या त्या आपल्या नारायणनामक पुत्राला दीर्घ व उच्च अशा स्वराने त्याने हाक मारली.म्हणून आपण आपल्या--जीवाच्या पुत्राचे नाव देवाचे किंवा भक्तांचे ठेवावे.त्यानिमित्ताने भगवंताचे स्मरण घडते--आपल्या मुखास त्या निमित्ताने स्मरण होते.त्यामुळे देवाचे संस्कार घडतात.||२८-२९|| भावार्थ:----हे महाराज,मरणोन्मुख झालेला ती अजामिळ हरिकीर्तन करीत आहे असे श्रवण करून विष्णूचे पार्षदगण एकेकी त्याठिकाणी आले,कारण तो जे आपल्या पुत्राचे म्हणून नाव घेत होता ते त्यांचे स्वामीचे होते. विष्णूचे पार्षद गणांनी श्रावण केले की,विष्णू--नारायण भगवंतांचे नाव आजामील ब्राह्मणाने अंतीसमय घेर्तलेले आहे ,म्हणून त्यास वैकुंठास घेऊन जाण्यास विमानासहित आले.वास्तविक पाहता अजामिळ ब्राह्मणाने अंत-समय आपल्या पुत्राच्या नावाचा उच्चार केला होता.योगायोग अजामिळ ब्राह्मणाच्या पुत्राचे नाव नारायण व भगवंताचे नाव नारायण असे आहे.म्हणून भगवंताच्या पार्षदगणांस वाटले कि,आपल्या स्वामीचे नावाचा उच्चार अंत-समयी अजामिळ ब्रह्माने केलेला आहे,म्हणून त्यास वैकुंठास नेण्याकरिता विमान घेऊन आले.||३०|| भावार्थ:----असो.तेथे आल्यानंतर त्या विष्णुदुतानी,हृदयातून दासिपती अजामीळाला ओढीत असलेल्या यमदुतांचे स्वसामर्थ्याने निवारण केले.विष्णूदुतांनी स्वसामार्थ्याने यमदुतांचे सामर्थे कमी केले,कारण विष्णूंचे सामर्थे यमापेक्षा कमी आहे,कारण विष्णू हे यमांचे स्वामी आहेत व यम त्यांचा सेवक आहे.सत्ता हि स्वामींची असते.||३१|| भावार्थ:----ह्याप्रमाणे विष्णूदूतांनी यमदुतांचा प्रतिषेध केला असता ते त्यांना म्हणाले की,धर्मराजाच्या आज्ञेचे प्रतिषेध करणारे तुम्ही कोण आहां?||३२|| भावार्थ:----कोणाचे आहा?कोठून आला?आणि कशाकरता आला?तुम्ही त्याला नेवू देत नाही?तेव्हा,देव उपदेव किंवा कोणी उत्तम सिद्धजन आहांत काय?||३३|| भावार्थ:-----अहो,ज्या सर्वाचे नेत्र कमलपत्राप्रमाणे आहेत,ज्यांनी पिवळी अशी रेशमी वस्त्रे परिधान केली आहेत,ज्यांनी किरीट,कुंडले व देदीप्यमान कमळांच्या माळा धारण केल्या आहेत,ज्या सर्वांचेही वय तरुण आहे,ज्या सर्वाना सुंदर असे चार--चार भुज आहेत,ज्यांना धनुष्य,भाता,खड्ग,गदा,शंख,चक्र,आणि कमल ह्यांच्या योगाने शोभा आली आहे व जे आपल्या प्रभेच्या योगाने अंधकाराने व अन्य प्रकाशने रहित अशा दिशा करीत आहेत ते तुम्ही,आम्हा धर्मपालाच्या दासांचा निषेध कशाकरिता करिता?||३४-३५-३६|| भावार्थ:-----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षितराजा,ह्याप्रमाणे त्या यमदुतानी भाषण केले असता वासुदेवाप्रमाणे वागणारे विष्णूदुत,किंचित हास्य करून मेघासारख्या गंभीर ध्वनीने युक्त असलेल्या आपल्या वाणीने त्यांना असे म्हणाले की,||३७|| भावार्थ:-----विष्णूदूत म्हणाले---अहो तुम्ही जर खरोखर धर्मराजाच्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहात तर धर्माचे तत्व आणि धर्माचे जे लक्षण असेल ते आम्हास कथन करा.||३८|| भावार्थ:---व कोणत्या प्रकाराने कोणास कसा दंड योग्य असे पात्र कोणते?आणि कर्म करणारे सगळेच प्राणी दंडास योग्य आहेत की काय?अथवा फक्त मनुष्यच असून त्यांतूनही कांही निवड झालेली आहे काय?हे तुम्ही आम्हास सांगा.||३९|| |यमदूता ऊचु: | वेदप्रणिहितो धर्मो ह्यधर्मस्तव्दिपर्यय:| वेदो नारायण: साक्षात्स्वयम्भूरिती शुश्रुम ||४०|| भावार्थ:---यमदूत म्हणाले---हे विष्णूदुतहो,धर्म हा वेदविहित--वेदाने त्यानुसार--"धर्मांनुसार आचरण करा असे सांगितले आहे".अधर्म हा त्याच्या उलट आहे,म्हणजे वेदाने अधर्म निषिद्ध--"अधर्मानुसार आचरण करू नका असे सांगितले आहे".वेद हा स्वतः नारायणाच्या श्वासापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे साक्षात नारायणच आहे असे आम्ही ऐकिले आहे.||४०|| भावार्थ:---आतां हा नारायण कोण ? म्हणून विचाराल तर हे विष्णूदुतहो,ज्याच्यायोगाने स्वस्वरूपाचेठिकाणी रज,सत्त्व व तम ह्यांनी बनलेले हे प्राणी गुण,नामे,कर्म आणि रूपे ह्यांच्या योगाने यथायोग्य रीतीने निरनिराळे समजले जातात तो "नारायण" होय.म्हणजेच जो परमात्मा सर्वांचेच अधिष्ठान आहे व त्या अधिष्ठानावर भासलेले--मिथ्या असलेले नामे व रूपे--जग कल्पित आहे.त्यास "नारायण--परमात्मा--ब्रह्म" असे म्हणतात. ||४१|| भावार्थ:---परंतु तथापि अमुकएक मनुष्याने अधर्म केला असे कोठून समजते ? असे म्हणाल तर सूर्य,अग्नि,आकाश,वायू,इंद्रियाभिमानी--देवता,चंद्र,संध्या,अहोरात्र,दिशा,उदक,पृथ्वी,काल आणि धर्म हे जीवाचे साक्षी आहेत.आपले--जीवाचे साक्षी असलेले सूर्य,अग्नि,आकाश,वायू,इंद्रियाभिमानी--देवता,चंद्र,संध्या,अहोरात्र,दिशा,उदक, पृथ्वी,काळ,आणि धर्म यांच्या अनुउपस्थित कार्य न होता,यांच्या उपस्थितच आपले--जीवाचे कोणतेही कार्य होते. म्हणून ते आपल्या--जीवाच्या कार्याचे साक्षी आहेत. ||४२|| भावार्थ:---तस्मात ह्या सूर्यादिकांच्या योगाने अधर्म समजला म्हणजे दंडाच्या पात्राचीही योजना करितां येते,आणि कर्म करणारे सर्वही प्राणी आपापल्या कर्मानुसार दंडास पत्र होतात.म्हणून आपण--जीवानी साक्षीच्या योगाने अधर्म समाजाला जातो व त्यानुसार दंड--शिक्षा--दु:ख दिल्या जाते,म्हणून आपण विहित कर्मे करावीत व निषिद्ध कर्मे करू नयेत.||४३|| | सम्भवन्ति हि भद्राणि विपरीतानि चानघा: |करिणां गुणसंङगोऽस्ति देह्वान् न ह्यकर्मकृत्||४४|| भावार्थ:---हे निष्पापहो,कर्म करणाऱ्या प्राण्यांना गुणांचा संग असल्यामुळे शुभ व अशुभ अशी दोन्ही कर्मे त्यांचे हातून होण्याच संभव असतो.आपण--जीव गुणांचा संग केल्यामुळे शुभ--अशुभ कर्मे होतात.आतां जर कोणी कर्मकर्ता नसेल तर त्यांचे हातून वाईट कर्मे होणार नाहीत.परंतु असे नाही.कारण,कर्म न करणारा असा कोणीही देहधारी प्राणी नाही,तस्मात कर्म करणारे सर्वही प्राणी पातक अवश्य घडत असल्यामुळे,दंडास पात्र होतात.आपल्या ठिकाणी--जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे गुणाचा संग होतोच,म्हणून आपण--जीवानी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून व ज्ञान प्राप्त करून,गुणातीत होण्याचा प्रयत्न करावा.गुणातीत झाल्यानंतर शुभ--अशुभ कर्मे घडत नाहीत.त्यामुळे आपणास--जीवास कोणत्याही दंड होणार नाही,तर आपण परमात्मरूप--सुखरुपच होउत.||४४|| | येन यावन यथाऽधर्मो धर्मो वेह समीहित:| स आव तत्फलं भुङक्ते तथा तावदमुत्र वै ||४५|| भावार्थ:---असो मनुष्यलोकी ज्याने जसा व जितका धर्म अथवा अधर्म केलेला असेल त्यालाच परलोकी तसे व तितकेच त्याचे फल निःसंशय भोगावे लागते.आपण--जीवानी मनुष्य--लोकी--मृत्यू लोकांत जसा धर्म किंवा अधर्म केला असेल,त्यानुसार सुख किंवा दु:ख भोगावे लागते.||४५|| भावार्थ:-----आता केवळ सुर्यादिकच धर्माधर्म कळविणारे आहेत असे नसून अर्थापत्तीने हि गोष्ट सिध्द आहे असे सांगतात.हे देवश्रेष्ठ्हो,गुणांचा त्रीविधपणा असल्यामुळे या जन्मी ज्याप्रमाणे प्राण्याचेठिकाणी शांतपणा,घोरपणा, आणि मूढपण अथवा सौख्य,दु:खत्व व मिश्रत्व ह्यांच्या योगाने सात्विक राजस व तामस असे तीन प्रकार उपलब्ध होतात त्याप्रमाणे जन्मात्ततरीसुद्धा--अन्य जन्मातसुद्धा ते असल्याचे अनुमान--व्यतिरिक-व्याप्तीने होते.||४६|| भावार्थ:----आता सांप्रताच्या जन्मानेच मागल्या व पुढल्या जन्मातील धर्म व अधर्म ह्यांचे ज्ञान होते हे दृष्टांता-- सहित असे सांगतात की,सध्या असलेला(वसंतादिक)ज्याप्रमाणे मागे गेलेल्या व पुढे येणाऱ्या वसंतादीक दोन कलांचे गुण दर्शवितो त्याचप्रमाणे हा जन्मही,मागल्या व पुढल्या अशा दुसऱ्या दोन जन्मातील धर्म व अधर्म यांना दाखविणारा होतो.||४७|| भावार्थ:----हा धर्माधर्म जाणण्याचा प्रकार इतरांचा आहे,धर्मराज तर मनोमात्रेकरूनच हे सर्व जाणतो असे सांगतात-अंतर्यामिरुपाने देहामध्ये असलेला यमनामक देव,जीवाचे पूर्वरूप विशेषकरून मनानेच अवलोकन करितो आणि नंतर मनाच्याच योगाने तो अपूर्वरूपाचा विचार करितो.कारण तो षड्गुनैश्वर्य संपन्न असून जन्मादिविकार रहित आहे.||४८|| भावार्थ:-----परंतु हा जीव तर ईश्वराने प्राप्त करून दिलेल्या विध्यमान देहालाच जाणत असून मागचा आणि पुढचा हे दोन देह तो जाणत नाही अशा आशयाने म्हणतात की,---निद्रेने युक्त असलेला पुरुष ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्याच देहादिकाविषयी हा मी असा अभिमान धारण करितो,जाग्रतवस्थेत असलेल्या देहादिकाचे त्याला भान राहत नाही त्याचप्रमाणे हा अज्ञ जीव,पूर्वकर्माच्या योगाने प्राप्त झालेल्या ह्या देहालाच हा मी असे मानितो पूर्वीच्या अथवा पुढच्या देहास तो जाणत नाही.कारण,जन्माच्या योगाने त्याची इतर,जन्माविषयीची स्मृती नष्ट झालेली असते.||४९|| | पश्चभि: कुरुते स्वार्थान् पश्च वेदाथ पश्चभि: | एकस्तु षोडशेन त्रीन् स्वयं सप्तदशोऽश्रुते||५०|| भावार्थः---ह्याप्रमाने असलेल्या योगाने शब्दादी पंच विषय श्लोकांनी दाखवितात तो असा की,------------हा जीव,पांच कर्मेंद्रियांच्या योगाने ग्रहण--घेणे व त्याग--देणे इत्यादी कर्मे करितो,पांच ज्ञानेंद्रियांच्या योगाने शब्दादी--शब्द,स्पर्श,रूप,रस,व गंध असे पांच विषय जाणतो,प्राणपंचकाच्या--व्यान,समान,उदान,प्राण,व आपण,योगाने देहवृत्ती चालवितो--क्रिया करितो.सोळाव्या मनासहवर्तमान सतरावा आपण--जीव स्वत: एकटाच असून ज्ञानेंद्रीय,क्रमेद्रीये व मन ह्यांच्या विषयांना पावतो.||५०|| भावार्थः---असो,ते हे षोडशकलांनी युक्त,गुणत्रयापासून झालेले व अनादि असे लिंगशरीर,त्यांत बद्ध झालेल्या जीवाला,हर्ष,शोक,भय पीडा देणाऱ्या संसारामध्ये वारंवार भ्रमण करविते.||५१|| भावार्थः---यास्तव हे लिंगशरीरच,कामक्रोधादिक षड्रिपू ज्याने जिंकिले नाहीत अशा ह्या देहधारी अज्ञ जीवाकडून त्याला इच्छा नसतंही कर्मे करविते,नंतर तो जीव,ज्याप्रमाणे कोळी आपल्या तंतूवेष्टनरूप कर्माच्या योगाने आपल्याला बद्ध करून घेऊन,त्यांतून बाहेर जाण्याचा उपाय जाणत नाही,त्याचप्रमाणे कर्माच्या योगाने आपल्याला आच्छादित करून घेऊन मुक्त होण्याचा मार्ग जाणत नाही.म्हणून आपण--जीवानी काम.क्रोध,लोभ,मोह,मद.आणि मत्सर या सहा शत्रूंना जिंकून म्हणजे आपल्या--जीवाच्या ताब्यात घ्यावे,कारण ते आपल्या जीवाच्या ताब्यात नसले म्हणजे ते आपणहून निषिद्ध कर्मे करितात,त्यामुळे आपणास--जीवास बद्ध करून दु:ख भोगावे लावतात.त्यामुळे आपल्याला--जीवाला बद्ध--आच्छादित करून मुक्तीचा--मोक्षाचा मार्ग बंद करितात.मोक्षाचा मार्ग बंद केल्यामुळे आपणास यमपुरीस व लक्ष चौऱ्याऐंसी योनीस जाऊन दु:ख पुन्हा पुन्हा भोगावे लागतात.||५२|| भावार्थः---ह्याविषयी अनुभवानेच,प्रमाण सांगतात की,-----कोणीही जीव क्षण भर देखील कर्म केल्यावांचून कदापि राहत नाही.कारण,पूर्वकर्मसंस्कारापासून झालेल्या गुणकार्यरूप वासनादिकांनीच,परवश झालेल्या त्या जीवाकडून बलात्काराने कर्म करविले जाते.आपण--जीव पूर्वसंस्कारामुळे बलात्काराने--इच्छा नसतांना निषिद्ध कर्मे केल्या जातात.म्हणून आपण--जीवानी मन म्हणजे ताब्यात व इंद्रिये ताब्यात घेऊन शम न दम साधना करावी.||५३|| भावार्थः---(आतां जीवाला कर्मानुरूप देह प्राप्त होतो असे सांगतात)अदृष्टरूप निमित्त प्राप्त झाले असतां,त्या निमित्ताला अनुरूप असे स्थूल किंवा सूक्ष्म शरीर जीवाला प्राप्त होते,ते तरी बलिष्ठ कर्मवासनांमुले आईच्या स्वभावासारखे किंवा पित्याच्या स्वभावासारखे होते.||५४|| | एष प्रकृतीसंङगेन पुरुषस्य विपर्यय: | आसीत् स एव नचिरादीशसंङगाव्दिलीयते ||५५|| भावार्थः---आतां संसारचक्राचा उपसंहार करून मुक्तीप्रहार दर्शवितात की,------प्रकृतीसंगामुळे पुरुषाला हा जो विपर्यास प्राप्त होतो तो,परमेश्वराच्या भजनाने स्वरूप कालातच नाहीसा होतो.म्हणून आपण--जीवानी प्रकृत्तीची व तिच्या गुणकार्याची संगती करू नये.आपण सत्संग करावा,कारण त्यामुळे सात्विक गुणांची वृद्धी होते.त्यामुळे परमात्म्याकडे--मोक्षाकडे जाण्याच मार्ग सुलभ होतो.||५५|| भावार्थः---असो.याप्रमाणे साधारण रीतीने धर्मादिनिर्णय सांगून आता प्रस्तुत अजामिळाचा अधर्म कथन करीत तो दंडास पात्र आहे असे सांगतात हा अजामिळ विद्यासंपन्न,सुस्वभाव,सदाचार आणि क्षमादिक गुण,ह्यांचे केवळ निवासस्थान,पूजादी नियम धारण करणारा,सौम्य,इंद्रियदमन करणारा,सत्यवादी,मंत्रवेत्ता,शुची,गुरु,अग्नी,अतिथी आणि वृद्ध ह्यांची शुश्रुषा करणारा,निरभिमानी,सर्व प्राणीमात्रांचा मित्र,साधू,मितभाषी आणि मत्स्यरहित असा होता.थोडक्यात अजामिळ ब्राह्मण हा सात्विक गुणांनी संपन्न असा होता.म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे सात्विक गुणसंपन्न व्हावे.||५६-५७|| भावार्थः---परंतु एकदा पित्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा हा ब्राहमण,वनामध्ये गेला आणि फळे,पुष्पे,समिधा व दर्भ हे घेऊन घरी येण्यास माघारा फिरला.||५८|| भावार्थः---येताना त्यांने आपल्या समीपभागी मार्गामध्ये,पीठापासून निर्माण केलेल्या सुरेचे प्राशन केल्यामुळे मदाच्या योगाने जिचे नेत्र फिरून गेले आहेत व मत्त झाल्यामुळे जिचे वस्त्र अतिशय सैल झाले आहे अशा एका वेश्येसहवर्तमान क्रीडा,गायन व हास्य करणारा,आपल्या आचारापासुन भ्रष्ट झालेला,निर्लज्ज आणि कामुक असा कोणीएक शुद्र अवलोकन केला.अजामिळ ब्राह्मणाने सात्विक कार्य करीत असतांना जी वेशा मदिरा--दारू सेवन केल्यामुळे जिच्या अंगावरील वस्त्र सैल झालेले आहे,व तिच्या सोबतच मदिरा--दारू सेवन केलेला व कामुक असलेला आचारभ्रष्ट पुरुष असे दृश्य फक्त दुरूनच पाहिले.||५९-६०|| | दृष्ट्वा तां कामलिप्तेन बहुना परिरम्भिताम् | जगाम हृच्छयवशं सहसैव विमोहित: ||६१|| भावार्थः---नंतर कामोद्दीपन करणाऱ्या तिच्या हरीद्रादिक अंगराजाने लिप्त झालेल्या आपल्या बाहुने तो तमोगुणी तिला आलिंगन देत आहे असे अवलोकन करून,हा अजामिळ एकाएकीच अत्यंत मोहित होऊन कामवश झाला.असे फक्त दृश्य दुरूनच आजामीळ ब्राह्मणाने पाहिले.||६१|| भावार्थः---आणि जितके म्हणून धैर्य व ज्ञान होते त्यांच्या बलाने तो स्वतः आपले मन आवरूं लागला असतंही,मदनाने कंपित झालेल्या आपल्या मनाचे नियमन करण्यास तो समर्थ झाला नाही.म्हणून आपण--जीवानी अशा प्रकारच्या राजस व तामस दृशापासून अलिप्त राहून जीवन व्यतीत करावा,कारण दृश्य पाहिल्याचा परिणाम विपरीत होऊन विषयांकडे प्रवृत्त करितो व त्यामुळे कुसंस्कार वाढवून निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्तीत करतो.आजकालचे पालक--आई--वडील,किंवा मित्रमंडळ किंवा शिक्षक,किंवा समाजसेवक किंवा राजकीय सत्ताधीश किंवा कोणी इतर याकडे लक्ष देऊन,यावर कांही उपाययोजना करतात काय? त्यांच्या अधिकारातील--कर्तव्यातील हा विषय असावा किंवा नसावा?हा प्रत्येकांनी विवेक--विचार करून यावर लक्ष देतील काय?||६२|| भावार्थः---ह्या प्रमाणे स्त्रीदर्शनामुळे उत्पन्न झालेल्या कामरूप ग्रहाने त्या अजामिळाला ग्रासून टाकीला असतां,त्याचीस स्मृती नष्ट झाली आणि सर्वदा मनामध्ये तिचेच चिंतन करीत असता तो स्वधर्मापासून भ्रष्ट झाला.म्हणून आपण--जीवानी स्त्रीचे दर्शन करू नये म्हणजे स्त्री हि कामवासना तृप्ती करण्याचेच साधन आहे असा विवेक न करता प्रेमाचे साधन आहे असा विवेकपुर्वक विवेक करून जीवन व्यतीत करावे.त्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयींचा प्रेम-भाव स्मरण करून त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा संकल्प करावा.त्यातच आपले प्रेम साठविलेले आहे. ||६३|| भावार्थः---नंतर मनोहर अशा ग्राम्याविषयी ज्या रीतीने ती प्रसन्न होईल त्या रीतीने आपल्या पित्याच्या सर्व द्रव्याने त्याने तिला संतुष्ट केले.आपण--जीवानी स्त्रीला प्रसन्न करून घेण्यापेक्षा,तिला द्रव्य समर्पण करण्यापेक्षा,तिला आपला अमुल्य वेळ देण्यापेक्षा आई--वडिलांची सेवा,अनाथांची सेवा,समाजाची सेवा,राष्ट्राची--देशाची सेवा,भगवंताची सेवा,संत--महात्मा यांची सेवा करावी,धनही यांच्या कार्यासाठी खर्च करावे,वेळही यांच्यासाठीच खर्च करावा.यामुळे आपण जीवाचा संसार हाच परमार्थ होतो.||६४|| |विप्रां स्वभार्यामप्रौढां कुले महति लम्भिताम् | विससर्जचिरात्पाप: स्वैरिण्यापाङगविद्धधी: ||६५|| भावार्थः---आणि त्या जारिणी स्त्रीच्या नेत्रकटाक्षाने अंतःकरण विद्ध झाल्यामुळे त्या पातकी अजामिळाने,मोठ्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्या अशा आपल्या विवाहित व तरून ब्राहमणी भार्येचा लवकरच त्याग केला.कुलीन म्हणजे स्वधर्मानुसार पतीची सेवा करणारी पतिव्रता व विधीनुसार वेदमंत्र म्हणून अग्नीच्या साक्षीने समाजाच्या आशीर्वादाने स्वीकार केलेली असी शात्रसंपन्न आचारसंपन्न,पतीस सुख देणारी अशा पवित्र स्त्रीचा त्याग करून तामोगुणांनी संपन्न असलेली,निषिद्ध कर्मांनियुक्त,समाजात निंदनीय--बहिष्कृत असलेली,पुरुषांना लुटणारी--दु:ख देणारी व प्रेम न देणारी अशा स्त्रीचा स्वीकार केला.अशा पुरुषास ब्राह्मण म्हणावे काय?ब्राह्मण हा शब्द लाजेल काय ?किंवा अजामिळ लाजेल काय? आपण जीवांनी अजामिळ ब्राह्मणाचा आदर्श घेऊ नये,कर्तन तो अजामिळ या कृतीवरून--ब्राह्मण या पदास--आचारानावरून अयोग्य आहे.आयोग्याचा आदर्श न घेता योग्य सत्पुरुषाच आदर्श घ्यावा.||६५|| भावार्थ---पुढे बापाने मिळविलेले द्रव्य संपल्यावर हा मंदमती अजामिळ,न्यायाने अथवा अन्यायाने कोठून तरी द्रव्य संपादन करू ह्या कुटुंबीनि वेश्येचे कुटुंबपोषण करूं लागला.आपण--जीव जर विधिवत स्त्रीचा त्याग करून निषिद्ध स्त्रीचा स्वीकार करून जीवन व्यतीत करू लागलोत तर आपणसुद्धा अजामिळ ब्राह्मणासारखे जीवन व्यतीत करत असतांना वडिलोपार्जित खूप द्रव्य असूनसुद्धा निषिद्ध स्त्रीच्या मनधरनिसाठी पुरेसे न झाल्यामुळे न्यायाने किंवा अन्यायाने द्रव्य मिळवून पुरेसे होणार नाही,कारण निषिद्ध स्त्रीची वृत्ती प्रेम देण्याची नसते,तर द्रव्य हरण करण्याची वृत्ती--लोभी वृत्ती असते.त्यामुळे आपणास त्या निषिद्ध स्त्रीकडून प्रेम न मिळता दु:खाचीच अनुभूती असते,कारण दोघाच्या वृत्तीत भेद आहे.जेथे भेद आहे,तेथे दु:ख आहे असा शास्त्राचा नियम आहे व आपला--जीवाचा अनुभव आहे.असे असले तरी आपण--जीव हा त्या निषिद्ध स्त्रीच्या ठिकाणी मोहित असल्यामुळे कळत नाही,म्हणून त्या निषिद्ध स्त्रीपासून परावृत्त होत नाही.||६६|| भावार्थः—याप्रमाणे शास्त्राचे उल्लंघन करून यथेच्छ वागत असल्यामुळे सज्जनांनी निंदित,वेश्यान्नरूप मल भक्षण करणारा,अशुचि आणि पापरूप आयुष्याने युक्त असलेला हा अजामिळ,ज्याअर्थी चिरकाल पर्यंत असाच वागला आहे.म्हणून अजामिळ ब्राह्मण हा--आपण--जीव परधर्मानुसार--अधर्मानुसार जीवनभर आचरण करीत आहे.||६७|| | तत एनं दण्डपाने: सकाशं कृतकिल्बिषम् | नेष्यामोऽकृतनिर्वेशं यत्र दण्डेन शुध्यति ||६८|| भावार्थः---पातक करूनही ह्याने प्रायश्चित केले नाही त्या अर्थी यमराजाच्या समीप आम्ही ह्याला घेऊन जात आहोत,म्हणजे त्याठिकाणी हा दंडाने शुद्ध होईल.अजामिळ ब्राह्मणाने--आपण--जीवानी अजूनही प्रायश्चित कर्म केले नाही.म्हणून आम्ही--(यमदूत)ह्यास--अजामिळ ब्राह्मणास--आपणास--जीवास यमपुरीस यमराजाजवळ दंड--शिक्षा देण्याकरिता म्हणजेच पापातून मुक्त करण्याकरिताच म्हणजेच शुद्ध करण्याकरिताच नेत आहोत.||६८|| ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील सहाव्या(६)स्कंधातील अजामिलोपाख्यानसंबंधी हा पहिला(१) अध्याय आडूष्ट(६८)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीसदगुरुर्पणमस्तू ||
२---आतां ह्या दुसऱ्या अध्यायांतमध्यें विष्णूदुतांनी यमदूतांना भगवंताच्या नांवाचें अद्भुत महात्म्य कथन करून त्या,अजामिळनामक ब्राह्मणाला विष्णूलोकाप्रत नेलें असे कथन केलें. _______________________________________________________________________
२--- विष्णूदूतांकडून भागवत-धर्म-निरुपण आणि अजामिळाचे परमधामगमन _______________________________________________________________________
|श्रीशुक उवाच | एवं ते भगवद् दूता यमदुताभिभाषितम् | उपधार्याथ तान् राजन् प्रत्याहुर्नयकोविदा: ||१|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,त्या न्यायनिपुण विष्णूदुतांनी,ह्याप्रमाणे यमदूतांनी केलेले भाषण श्रवण करून,त्यांना प्रत्युत्तर दिले की,-----||१|| भावार्थः---विष्णुदूत म्हणाले,हरहर ! धर्मज्ञ पुरुषांच्या सभेला अधर्म,स्पर्श करीत आहे हि मोठी दुःखाची गोष्ट आहे.कारण,ज्या सभेमध्ये धर्मवेत्ते पुरुष,दंडास अयोग्य अशा निष्पाप पुरुषांना उगीच दंड करीत आहेत.||२|| भावार्थः---अरेरे ! जे समदृष्टी शाधुलोक,प्रजाजनांचे आई--बापाप्रमाणे परिपालन करून त्यांना शिक्षण देतात,त्यांचेच ठिकाणी त्यांचा जर असा विपरीपणा होऊं लागला तर प्रजाजनांनी कोणाला शरण जावे.जे ज्ञानी--धर्मेवेत्ते,साधू,महात्मा आहेत,समदृष्टीवान त्यांनी स्वधर्मांनुसारच आचरण करावे,तर परधर्मानुसार--अधर्मांनुसार आचरण करू नये,अन्याय न करता न्यायानुसार आचरण करावे.जर ते परधर्मंनुसार--अधर्मांनुसार आचरण करू लागले तर,अपराध न करून दंड देऊ लागले तर,प्रजाजनांनी न्यायासाठी कोणाकडे जावे की,दंडच सहन करावा?||३|| | यद्यदाचरति श्रेयानितरस्तत्तदीहते | स यत्प्रमानं कुरुते लोकस्तदनुवर्तते ||४|| भावार्थः---असे ह्यांनी केलेला अधर्म दुसरेही करूं लागतील ह्या करीता हे फार वाईट आहे.कारण,श्रेष्ठ पुरुष जेजे कर्म करितो ते तेच कर्म इतर लोकही करितात व तो श्रेष्ठ पुरुष,जे शास्त्र प्रमाण मानितो त्या शास्त्रालाच लोकही अनुसरतात,म्हणजे प्रमाण मानितात.श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करीत असतात,म्हणून श्रेष्ठांनी स्वधर्मांनुसारच आचरण करावे.त्यांच्या आचरणात अधर्माचा अपवाद्सुद्धा होऊ नये.||४|| भावार्थः---अरेरे ! जसा पुश,धनी आपले रक्षण करील किंवा मारील हे कांहीच न जाणतां खुशाल निजतो त्याप्रमाणे हा लोक,धर्म अथवा अधर्म हे स्वतः कांही एक न जाणतां निश्चित होऊन ज्याच्या मांडीवर आपले शीर ठेऊन खुशाल निजतो.म्हणून श्रेष्ठांनी कनिष्टांचा विवेक करून आचरण करावे,तर अन्यायमात्र बिलकुल करू नये.||५|| भावार्थः---प्राणिमात्रांना विश्वास ठेवण्यास योग्य असा तोच पुरुष,जर खरोखर सद्य असेल तर ज्याने विश्वासाने आपला आत्मा स्वाधीन केला आहे व आपणाशी मित्रपणा जोडिला आहे त्या अज्ञानी द्रोह करण्यास कसा बरे योग्य होईल?होणारच नाही.म्हणून ज्ञानी--साधू--महात्मा--श्रेष्ठांनी अज्ञानी लोकांशी द्रोह करू नये,तर प्रेम करावे.योग्य आचरण--न्यायपुर्वक करावे.||६|| भावार्थः---बरे ह्या पापाच्या दंडाविषयी तुम्ही विष्णूदूत कशाकरीता असे म्हणाल तर----हे यमदूतहो,मोक्षसाधनभूत अशा श्रीहरीच्या नामाचा ज्याअर्थी ह्याने विवश असतांनाही उच्चार केला आहे त्याअर्थी कोटीजन्मसंबंधी पातकाचेही ह्याने प्रायश्चित केले आहे.म्हणून आपण--जीवानी नित्य भगवंताच्या नावांचा नामौच्चार करावा.ज्या नांवावर श्रद्धा असेल त्या नांवाचा नामौच्चार करावा.ज्यांनी देह आपणास--जीवास दिला आहे त्याच्या नांवाचा उच्चार करणे.त्याच्या लीला श्रवण करावे व त्याचे स्वरूप जाणून घेणे व ज्याच्या नांवाचा नामोच्चार केला,लीला श्रवण केल्या व स्वरूप जाणून घेतल्यामुळे हित ज्याचे स्वरूप जाणून घेतले त्याचे होत आहे की,आपले--जीवाचे हित होत आहे? ज्याचे स्वरूप जाणून घेतले त्याचे हित किंवा अहित न होता जीवाचेच हित म्हणजे सर्व दु:खाची निवृत्ती व सर्वसुखाची प्राप्ती होत आहे,जन्म--मरणरुपी दु:ख निवृत्त होत आहे.असा विवेक करून जीवन जगावे.||७|| भावार्थः---अहो,'कर्माला सफल करणारे हरीचे नाम आहे' असे म्हणणे हे योग्य आहे,परंतु ते हरीचे नाम,स्वतंत्रपणाने पातकानिवृत्ती करणारे कसे होईल?म्हणून शंका घ्याल तर----हे यमदुतहो,'नारायणा इकडे ये' असा आक्रोश करून पुत्राला हाक मारण्याच्या बुद्धीने ह्याने हे आभासमात्र चतुरक्षर नामा उच्चारिले,तेवढ्यानेच पातक्याच्या पापाचे प्रायश्चित झाले आहे.आपण--जीवानी भगवंताक ह्या नावाचा उच्चार कोणत्याही भावनेने केला.तरी भगवंताच्या नावाचाच उच्चार केलेला आहे,त्यामुळे आपणास--जीवास प्रायश्चित कर्म घडते,असा धर्मशात्राचाच सिद्धांत आहे.ज्याने प्रायश्चित कर्म केले त्याचे पाप निवृत्त झाले.ज्याचे पाप निवृत्त झाले,त्यास दंड देता येत नाही.म्हणून आपण अजामिळ ब्राह्मणास यमपुरीस नेऊ शकत नाही,तर आम्ही त्यास वैकुंठपुरीस नेणार आहोत.अजामिळ ब्राह्मण तुमचे ग्राहक नसून आमचे ग्राहक आहे.म्हणून आपण जसे आला आहात तसेच परत जा.||८|| | स्तेन: सुरापो मित्रध्रुग्ब्रूह्यहा गुरुतल्पग: | स्त्रीराजपितृगोहन्ता ये च पातकिनोऽपरे ||९|| भावार्थः---आता बुद्धीपुरस्कार केलेली व कोट्यावधी द्वादश शब्द प्रायश्चिताहि निवृत्त न होणारी अशी अनेक महापातके ह्यांचे हे एकच प्रायश्चित कसे होईल?अशी शंका घ्याल तर----हेयमदुतहो,चोर,मद्यपी,मित्रद्रोही,ब्रह्म-- घातकी,गुरुस्त्रीगामी आणि त्याचप्रमाणे स्त्री,राजा मातापितर आणि गाई ह्यांची हत्या करणारा हे व दुसरेही जे पातकी आहेत त्या सर्वपातक्यांचे भगवनमोच्चारण हेंच श्रेष्ठ प्रायश्चित होय कारण,नामोच्चारण करणाऱ्या पुरुषांविषयी,'हा माझा आहे मी सर्व प्रकारे ह्यांचे रक्षण केले पाहिजे' अशी विष्णूला बुद्धी उत्पन्न होते.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या नांवाचा नामोच्चार निरंतर मनात करावा किंवा वैखरी वाणीने करावा.||९-१०|| भावार्थः---खरोखर श्रीहरीच्या नामपदांच्या उच्चार केला असतां,पातकी पुरुष,जसा शुद्ध होतो तसा मन्वादिक वेदवेत्त्यांनी सांगितलेल्या प्रायश्चित्तानि शुद्ध होत नाही.म्हणून आपण--जीवानी निरंतर भगवंताच्या नांवाचा नामोच्चार निरंतर मनात करावा,कारण आपण अन्य साधनापेक्षा शुद्ध होतो.दुसरे असे कि,कृछचांद्रायणादी प्रायश्चिते,जशी केवळ पातकनिवृत्तीने क्षीण होऊन जातात त्याप्रमाणे नामपदाचे उच्चारण क्षीण होत नसून ते,श्रेष्ठकीर्ती परमेश्वराच्या गुणांचे ज्ञान करून देते.भगवंताचे नामोच्चारण हे पातक नष्ट करून भगवंताचे स्वरूपही जाणून घेण्याचा अधिकार देते.||११|| भावार्थः---असो जे केले असतांही जर मन फिरून पापमार्गाकडे धावूं लागले तर ते प्रायश्चित अत्यंत शोधक नव्हे ह्या करीता पापांचा समूळ नाश करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषांना,वारंवार हरीचे गुणवर्णन करणे हेंच प्रायश्चित होय.कारण,हा गुणानुवादच खरोखर चित्तशोधक आहे.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या गुणांचे--लिलीचे श्रवण करावे,कारण त्यामुळे प्रायश्चित कर्म घडून चित्त-शुद्ध होते.चित्त चुद्ध होणे म्हणजे आपण परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सुलभ होत आहे.||१२|| भावार्थः---तस्मात,ज्याअर्थी ह्याने मरता-मरतां भगवननामाचा संपूर्ण उच्चार करून सर्व पातकांची निष्कृती केली आहे त्याअर्थी तुम्ही ह्याला वाईट मार्गाने (यमलोकांकडे)नेऊ नका.म्हणून आपण--यमदुतांनी अजामिळ-ब्राह्मणास यामालोकांकडे दंड देण्यास नेऊ नका,कारण त्याच्याकडून भगवंताच्या नांवाचा नामोच्चार झालेला आहे,म्हणजेच त्या निमित्ताने प्रायश्चित्त कर्म घडलेले आहे.||१३|| भावार्थः---बरे तेही असो परंतु,ह्याने भगवंताचे नांव न घेता पुत्राचे नाव घेतले अशी शंका घ्याल तर---हे यमदूतहो पुत्रादिकांचे ठिकाणी संकेताने ठेविलेले,थट्टेने अथवा गायनसंबंधी आलाप परिपूर्ण करण्याकरीता घेतलेले किंवा विष्णूचा काय उपयोग आहे अशा अवज्ञेनेही केलेले विष्णूनामोच्चारण सर्व पातकांचा नाश करणारे आहे,असे वेदवेत्ते समजतात.थोडक्यात भगवंताच्या नांवाचा उच्चार कोणत्याही भावनेने होवो,ते उच्चारण पापांचा नाश करणारे आहे.भगवंताच्या नांवाचा उच्चार हा शरीर सुटण्याच्या अंत्यक्षणी झालेला आहे,कारण अंत्यक्षणास अधिक महत्व आहे.त्यानुसार पुढील गती प्राप्त होत असते.असा प्रकारचा योगायोग घडण्यासाठी पूर्व-पुण्याई व अधिक अंत्य--क्षण बरोबर उत्तम गती (पूर्व--पुण्याई+वर्तमान शरीरातील अंत्य--क्षण==भावी उत्तम गती.)||१४|| भावार्थः---अहो,ह्याने कांही संकल्पपूर्वक भगवंताचे नांव न घेता केवळ पुत्रस्नेहाच्या अधीन होऊन घेतले असे म्हणाल तर----घरावरूनवगैरे पडलेला,मार्गामध्ये अडखळून पडलेला अवयवन भग्न झालेला--अप:घात झालेला, सर्पादिकांनी दंश केलेला,ज्वरानेवगैरे तप्त झालेला व दंडादिकाने ताडित झालेला अशा पराधीन अवस्थेमध्ये हि ज्या पुरुषाने हरी असे म्हटले तो,यातना भोगण्यास योग्य नाही.थोडक्यात आपण जीवानी कोणत्या अवस्थेच्या-- कारणाच्या निमित्ताने भगवंताच्या नांवाचे उच्चारण यास महत्व नसून अंत्य-क्षणी घडले यास महत्व आहे.याकरिता आपण जीवानी मनातल्या मनात कोणतेही कार्य करत असतांना भगवंताच्या नावांचे नामोच्चारान करीत जावे,परिणाम अंत्यक्षणी भगवंताच्या नावांचे उच्चारण सहजच येते,कारण आपल्या--जीवाच्या इंद्रियास अगोदर प्रयत्न-पूर्वक वळण लावलेले आहे,त्याचा परिणाम सहजच मुखास भगवंताच्या नावांचे उच्चारण येत असते,तर आणावे लागत नाही.याचा आपण--जीव प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो.आमच्या जीवनातील एका शिक्षिकेचे उदा-अनुभवाचे आहे.ती शिक्षिका सतत--सतत भगवंताच्या नावांचा नामोच्चारण जीवनभर करीत असे.कांही काळानंतर तिचे शरीर सुटत असतांना नामोच्चार करीत शरीर सुटले.स्मशान-भूमीत अग्निडाग देण्यापूर्वी अचानक एक गाय आली आणि त्या गाईने त्या शिक्षिकेच्या शरीरास उजवी प्रदक्षिणा करून निघून बाहेर गेली.||१५|| भावार्थः---आता मोठ्या पापाला केवळ नामोच्चारणरूप अल्प प्रायश्चित योग्य नसून मोठेच प्रायश्चित योग्य आहे म्हणाल तर---हे यमदूतहो,मोठ्यां आणि लहान पातकांना मोठी आणि लहान प्रायश्चित्ते तारतम्य मन्वादिमहर्षीनि सांगितली आहेत.||१६|| भावार्थः--म्हणूनतप,दान जप इत्यादी त्याच्या प्रायश्चित्तांनी तींतींमा ९ पातके नष्ट होत असून अधर्माचरणाने मलीन झालेले त्या पातक्यांचे अंत:कारण शुद्ध होत नाही आणि ईश्वराच्या चरणसेवेने तर तेंही शुद्ध होते.म्हणून आपण--जीवानी ईश्वराची चरण-सेवा म्हणजे ईश्वराचे शुद्ध स्वरूप जे मायारहित आहे,ते जाणून घ्यावे.||१७|| भावार्थः---तथापि हे पापाचे प्रायश्चित आहे असे जाणून त्याने काही भगवंताच्या नामांचा उच्चार केला नाही असे म्हणाल तर----हे यमदूतहो,ज्याप्रमाणे समजूत अथवा न समजूनही टाकीलेला अग्नी,काष्ठांना दग्ध करितो त्याप्रमाणे अज्ञानाने अथवा ज्ञानाने उच्चारीलेले जे पवित्रकीर्ती परमेश्वराचे नाम ते,पुरुषाच्या पातकांना दग्ध करिते.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या नांवाचा नामोच्चार निरंतर करावा,कारण त्यामुळे सर्व पापे जाळून जातात.उदा--भगवंताच्या नांवाच्या नामोच्चारण निरंतर केल्यामुळे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला.म्हणून आपण निरंतर भगवंताच्या नांवाचा नामोच्चार निरंतर करावा.||१८|| भावार्थः---परंतु ब्राहमाणसभेच्या द्वाराने ह्याला भगवंताच्या उपदेश झालेला नाही व श्रद्धापूर्वक याचा उच्चारही झालेला नाही तस्मात,हे प्रायश्चित्त कसे होईल?असे म्हणाल तर----हे यमदूतहो,ज्याप्रमाणे अतिशय वीर्यवान्- औषध यदृच्छेने भक्षण केले असतां ते,त्याचे गुण व जाणणाऱ्याहि रोग्याचेठिकाणी आपला गुण करिते,त्याप्रमाणे उच्चारिलेल्या भगवन्नामात्मक मंत्रही आपला गुण करीलच यांत संशय नाही.म्हणून आपण--जीवानी कोणत्याही भावनेने भगवंताच्या नांवाचा नामोच्चार केला तर पातक नष्ट करिते.||१९|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,ह्याप्रमाणे त्या विष्णूदूतांनी भागवतधर्माचा चांगला निर्णय करून,त्या ब्राह्माणाला यमपाशांतून मुक्त करून मृत्यूपासूनही सोडविले.अजामिळ ब्राह्माणास भागवताधर्माच्या निर्नियानुसार अजामिळ ब्राह्मणास यमपाशांतून मुक्त करून मृत्युपासून सोडविले.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या नांवाचा नामौच्चार निरंतर करावा.||२०|| भावार्थः---हे शत्रूदमना,ह्याप्रमाणे विष्णूदूतांनी निराकरण केलेल्या त्या यमदूतांनी यमाजवळ जाऊन घडलेला सर्व वृत्तांत यथास्थितपणे कथन केला.यमदुतांनी विष्णुदूत श्रेष्ठ आहेत असे जाणून त्यांच्याशी वादविवाद न करते त्यांचे स्वामी यमराज यांच्याकडे जाऊन जसा वृतांत घडला,तसाच कथन केला,त्याप्रमाणे आपणास कांहीनिमित्त असा किंवा कोणत्याही स्वरूपाचा वाद-विदाचा प्रसंग आल्यास,व समोरचा पक्ष आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर आपण त्यांच्याशी वाद-विवाद न करता आपले जे स्वामीजी,त्यांच्याकडेच सर्व वृतांत कथन करावा.||२१|| भावार्थः---इकडे यमपाशांतून मुक्त झाल्यामुळे निर्भय झालेला तो ब्राहमण,शुद्धीवर आला आणि विष्णूदूतांच्या दर्शनाने आनंदयुक्त होऊन त्याने त्यांना मस्तकाने वंदन केले.||२२|| भावार्थः---आणि हे निष्पापा राजा,तो अजामिळ कांहीतरी बोलण्याच्या बेतामध्ये आहे असे जाणून त्याच्या समक्ष विष्णुदूत त्या ठिकाणी एकदम गुप्त झाले.||२३|| भावार्थः---इकडे,तो अजामिळ,यमदुतांच्या मुखांतून वेदत्रय प्रतिपाद्य असा गुणाश्रयरूप धर्म श्रवण करून व विष्णूदूतांच्या मुखांतून भगवत्प्रणीत असा निर्गुण धर्म श्रवण करून,श्रीहरीचे महात्म्य श्रवण केल्यामुळे तत्काळ भगवंताचेठिकाणी भक्तिमान झाला व आपल्या पातकांचेस्मरण होऊं लागल्यामुळे त्याला मोठा पश्चाताप होऊन तो म्हणाला की,------||२४-२५|| अजामिळ--ब्राह्मण म्हणाला---अहो,इंद्रियमनन करणाऱ्या माझी हो मोठीच हानी झाली कारण,शूद्राचेठिकाणी पुत्रत्वाने उत्पन्न होणाऱ्या मी स्वतंत्र आपले ब्राहमणत्व नाहीसे करून टाकिले.जसा अजमिळ ब्राह्मणास पूर्व असलेल्या दोषांविषयी पश्चाताप झाला,त्याचप्रमाणे आपणास--जीवास पूव दोषांचा पश्चाताप होऊन त्या दोषापासून निवृत्ती कायमची होऊन यापुढे कधीच जीवनात असा दोष न करण्याचा निश्चय करावा.||२६|| भावार्थः---अरेरे ! आपल्या पतिव्रता तरून स्त्रीचा त्याग करून ज्याने मद्यपान करणाऱ्या जारिणी स्त्रीशी गमन केले असा जो सज्जनांनी निंदित,कुलाचा केवळ कल आणि पापाचरण करणारा मी त्या मला धिक्कार असो.अजामिळ ब्राह्मणास श्रवण केल्यानंतर स्वत:चा दोष कळाला,म्हणून त्याचप्रमाणे आपल्यातला--जीवातला स्वत:तातील दोष श्रवण केला तर कळेल,म्हणून आपण संत--महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावे.श्रवण करून आपणास--जीवास पश्चाताप होऊन तो दोष निवृत्त करण्याचा ताबोडतोब प्रयत्न करावा,कारण दोष हा दु:खाकडेच नेत असतो.||२७|| भावार्थः---अहो,ज्यांना मजवाचून कोणीही आप्तवगैरे नव्हतो व जे वृद्ध असून अनाथ होते आणि जे संसारतापाने व माझ्या रागाने संपप्त झाले होते त्या माता पितरांच्या वेदाध्ययन करणाऱ्याहि मी कृतघ्नाने,नीच पुरुषाप्रमाणे तत्क्षणी त्याग केला आहे.अजामिळ ब्राह्मणाने ज्याप्रमाणे विहित देहसंबंधीचा त्याग करून जे निषिद्ध संबंधीचा स्वीकार केला,अशी कृती करणे हे कृतघ्नता असून तो दोष आहे.म्हणून आपण--जीवानी कोणत्याही दोषांचा स्वीकार न करता त्याचा त्याग करावा.||२८|| भावार्थः---तस्मात,धर्म बुडविणाऱ्या कामीजणांना ज्याठिकाणी यमयातना प्राप्त होतात अशा अतिभयंकर नरकामध्ये तो मी खरोखर जाऊन पडेन.आपण जर निषिद्ध संबंधीचा स्वीकार केला तर आपणास यामापुरीत जाऊन यमयातना म्हणजे दंड देऊन दु:ख दिल्या जाते.म्हणून निषिद्ध कर्मांचा त्यागच करावा.||२९|| भावार्थः---अहो,हे आश्चर्य मी काय स्वप्नामध्ये पाहिले आहे?अथवा हे या जाग्रदवस्थेमध्येच प्रत्यक्ष केले आहे?बरे !जे पुरुष,ह्स्तामध्ये पाश धारण करून मला ओढीत होते ते आतां कोठे गेले?||३०|| भावार्थः---आणि मला पाशांनी बांधून यमदूत भूमीच्या अधोभागी (नरकांत)घेऊन चालले असतां,ज्यांनी सोडविले ते दिसण्यांत सुंदर असलेले चार सिद्ध पुरुष आतां कोठे गेले?||३१|| भावार्थः---असो.जरी मी या जन्मी पातकी आहे तथापि जन्मांतरी मी त्या सूरश्रेष्ठांच्या दर्शनाकरितां खरोखर कांहीतरी पुण्य केले असावे,ज्या पुण्याच्या योगाने माझे मन प्रसन्न होत आहे.||३२|| भावार्थः---पूर्वपुण्यावांचून मरणोन्मुख झालेल्या अशुचि शुद्रस्त्रीचा पती अशा माझी जिव्हा या जन्मी भगवंतालासुद्धां वश करणाऱ्या अशा भगवन्नामाचा उच्चार करण्यास योग्य होणार नाही.||३३|| भावार्थः---अहो,कपटी,पापी,ब्राह्मण्यनाशक आणि निर्लज्ज असा मी कोणीकडे व नारायण असे हे मंगलकारक भगवन्नाम कोणीकडे?||३४|| भावार्थः---तस्मात् तो महापातकी असलेलाही मी,आतां ज्या रीतीने फिरून आपणाला अंधतम नरकामध्ये पडणार नाही तशा रीतीने चित्त दहा इंद्रिये व प्राणवायू यांचा निग्रह करून साधन करण्याविषयी प्रयत्न करीन.जसा अजामिळ ब्राह्मणास निषिद्ध कर्मांविषयी पश्चाताप झाला,त्याचप्रमाणे आपणास--जीवास निषिद्ध कर्मांविषयी पश्चाताप होण्यासाठी सत्संग करावा,व त्यानंतर निषिद्ध कर्मांविषयी दोष-बुद्धी उत्पन्न होऊन पश्चाताप होऊन निषिद्ध कर्मे आपल्याकडून होणार नाही,याप्रकाराची काळजी घ्यावी.म्हणून आता आपले--जीवाचे मन आणि इंद्रियें ताब्यात घेऊन त्यानुसार विहित कार्मांचेच आचरण करीन असा निश्चय करावा.||३५|| भावार्थः---आणि अज्ञान,काम व कर्म ह्यांपासून उत्पन्न झालेल्या त्या ह्या संसारबंधाचा त्याग करून,मी सर्वभुताचा सुदृढ,त्याचे हित करणारा,शांत दयाळू आणि इंद्रियदमन करणारा असा होईन.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून त्याद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून त्याद्वारे अज्ञान निवृत्त करीन.म्हणजेच जो संसार--विषय दु:खरूप आहेत,त्यांचा त्याग करीन.संसाराचा--विषयांचा त्याग करण्यासाठी मन आणि इंद्रियें आपल्या--जीवाच्या ताब्यात असावेत.||३६|| भावार्थः---व जिने--वेशाने-निषिद्ध-स्त्रीने मज(अजामिळ-ब्राह्मणास)अधमाला--पामरास वानराप्रमाणे खेळविले आहे त्या स्त्रीमय ईश्वरमायेने ग्रासलेल्या--ताब्यात घेतलेल्या आत्म्याला मी(अजामिळ-ब्राह्मण--जीव)आतां--वर्तमान शरीरात मुक्त करीन.आपणही अजामिळ ब्राह्मणाचा आदर्श घेऊन व पश्चाताप झाल्यानंतर सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून त्याद्वारे अज्ञान निवृत्त करावे--म्हणजेच मुक्त होण्याचा प्रयत्न करावा,आपण--जीवाने--साधकाने साधनाचा स्वीकार करून साध्यापर्यंत जाण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||३७|| | ममाहमिती देहादौ हित्वाऽमिथ्यार्थधीर्मतिम्| धास्ये मनो भगवति शुद्धं तत्कीर्तनादिभि:||३८|| भावार्थः---परमार्थ वस्तूचेठिकाणी बुद्धीची योजना करणारा मी हा म्हणजे स्थूल शरीर मी व हे म्हणजे शरीरसंबंधी माझे अशा प्रकारच्या देहादिकाचेठिकाणी असलेल्या अभिमानाचा त्याग करून,भगवंताच्या कीर्तनादिकांनी म्हणजे निष्काम भगवंताचा नामोच्चार शुद्ध झालेले,भगवंताची निष्काम उपासना--भक्ती करून मन स्थिर करून व सत्संगाद्वारे आवरण म्हणजे अज्ञान निवृत्त करून आपले मन त्याचेठिकाणी--परमात्म्यात लावीन म्हणजे सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घेईन.||३८|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ह्याप्रमाणे साधूंचेठिकाणी झालेल्या एकक्षणमात्र संगाने अत्यंत वैराग्य उत्पन्न झालेला तो अजामिळ,पुत्रादिकांचेठिकाणी असलेल्या सर्व स्नेहाचा परित्याग करून,त्या दासीच्या घरांतून हरीद्वारास निघून गेला.अजामिळ ब्राह्मणास वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर वेशेचा--निषिद्ध स्त्रीचा त्याग करून सत्संगासाठी हरिद्वार क्षेत्री निघून गेला,त्याप्रमाणे आपण सत्संग करण्यासाठी निषिद्ध जीवांचा,विहित जीवांचा व घर-दारांचा त्याग करून संत--महात्मा यांचा सत्संग करावा.||३९|| भावार्थः---तो ब्राहमण,देवाचा साक्षात्कार होणाऱ्या त्या क्षेत्रांत योगमार्गाचा आश्रय करून आसनावर बसला व सर्व इंद्रियसमुदाय विषयांपासून परावृत्त करून त्याने आपले मन आत्म्याचेठिकाणी लाविले.आपणही अजामिळ-ब्राह्मणासारखे सर्व विषयांचा त्याग करून परमात्मा यांच्या ठिकाणी मन स्थिर करावे.||४०|| भावार्थः---नंतर,देह व इंद्रिये इत्यादी गुणकार्यापासून आपल्या आत्म्याला पृथक करून,चित्ताच्या एकाग्रतेनें त्याला अनुभवात्मक भगवतस्वरूपब्रह्माचेठिकाणी योजिले.जसे अजामिळ-ब्राह्मणाने देह--इंद्रियें इत्यादी गुण-कार्यापासून आत्म्यास वेगळे करून,चित्ताच्या एकाग्रतेने त्यास अनुभवात्मक भगवतस्वरुपब्रह्माचेठिकाणी एकरूप केले,त्याचप्रमाणे आपण--जीवानी अजामिळ-ब्राह्मणासारखीच साधना करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||४१|| भावार्थः---नंतर जेव्हा भगवत्स्वरूपाचेठिकाणी त्याचीबुद्धी निश्चल झाली त्याच वेळी त्याने आपल्या अग्रभागी विष्णुदूत अवलोकन केले आणि हे पुरुष,आपण पूर्वी अवलोकन केलेले आहेत असे जाणून त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला.||४२|| |साकं विहायसा विप्रो महापुरुषकिङकरै | हैमं विमानमारुह्य ययौ यत्र श्रिय: पति: ||४४|| भावार्थः---नंतर तो अजामिळ ब्राहमण,विष्णूदूतांसहवर्तमान सुवर्णाच्या विमानामध्ये आरूढ होऊन ज्याठिकाणी श्रीपती विष्णू राहतो त्या वैकुंठामध्ये आकाशमार्गाने निघून गेला.||४४|| भावार्थः---हे राजा,ज्याने दासीपती होऊन सर्व धर्म बुडविले होते,जो निंद्य कर्मामुळे पतित झाला होता,जो व्रतापासून भ्रष्ट झाला होता आणि ज्याला यमदूत नरकामध्ये टाकीत होते असाहि तो अजामिळ,याप्रमाणे अंतकाळी भगवन्नामाचा उच्चार करून तत्क्षणी यमपाशांतून मुक्त झाला.म्हणून आपण निरंतर स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन,पारमार्थिक चिंतनात आपला वेळ व्यतीत करावा.||४५|| भावार्थः---तस्मात् ज्याच्या चरणाचेठिकाणी तीर्थे आहेत त्या भगवंताच्या कीर्तनाहून दुसरे मुमुक्षुजणांना पापवासना छेदन करणारे असे कोणतेही श्रेष्ठ प्रायश्चित नाही.कारण,भगवत्कीर्तनावाचून इतर प्रायश्चित्ते केली असतांही,मन,रज व तम ह्यांच्या योगाने मलीनच राहते आणि भगवन्नामसंकीर्तनेकरून ते मन,कर्माचेठिकाणी फिरून कधीही आसक्त होत नाही.म्हणून आपण निरंतर भगवंताचे स्वस्वरूपाचे चिंतन करत राहावे.||४६|| भावार्थः---असो.याप्रमाणे हा पापनाशक परमगुह्य इतिहास जो पुरुष,श्रद्धेने युक्त होऊन श्रवण करितो अथवा भक्तीने कथन करितो तो पुरुष,निःसंशय नरकाप्रत जात नाही,यमदूत त्याच्याकडे पाहतहि नाहीत आणि जरी जी पातकी असला तरी तो विष्णूलोकी विराजमान होतो.म्हणून आपण अजामिळ-ब्राह्मणाचे चरित्र श्रवण करावे किंवा वक्ता असेल तर इतरांना सांगावे,कारण त्यामुळे नरकाची गती प्राप्त होत नाही व यमदूत आपल्याकडे येत नाही,तर विष्णूकडे म्हणजेच वैकुंठास जातो.||४७-४८||
| म्रियमानो हरेर्नाम गृणन् पुत्रोपचरितम् | अजामिलोऽप्यगाद्धाम किं पुन: श्रद्धया गृणन् ||४९|| भावार्थः---हे राजा,अजामिळासारखा महापातकीसुद्धा मरता मरता पुत्रमिषाने हरिनामाचा उच्चार करून जर त्याच्या स्थानप्रत गेला आहे तर श्रद्धापूर्वक हरीनामाचा उच्चार करणाऱ्या पुरुषाला ते स्थान प्राप्त होईल ह्याविषयी संशय कशाला पाहिजे?म्हणून आपण भगवंताच्या नांवाचा नामोच्चार करसव,किनवा भगवंताच्या गुण--लीला श्रवण करावे,किंवा भगवंताचे स्वस्वरूपाचे--परमात्म्याचे चिंतन करावे.थोडक्यात अधिकारानुसार साधना करावी.||४९|| २----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी अजामिलोपाख्यानसंबंधी हा दुसरा(२)अध्याय एकोनपन्नास श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||२|| | ||श्रीकृष्णार्पनमस्तु|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ३----आतां या तिसऱ्या अध्यायामध्यें यमधर्मानें विष्णूभक्तांचा उत्कर्ष वर्णन करून आपल्या दूतांचे सांत्वन केले व त्यांस विष्णूभक्तांचे सेवक केले अशी कथा वर्णन केलेली आहे. ______________________________________________________________________________ |३--- यम आणि यमदूतांचा संवाद ______________________________________________________________________________| |राजोवाच | निशम्य देव: स्वभटोपवर्णितं प्रत्याह किं तान् प्रति धर्मराज: | | एवं ह्ताज्ञो विह्तान्मुरारे- र्नैदेशिकैर्यस्य वशे जनोऽयम् ||१|| भावार्थः---राजा प्रश्न करितो----हे मुने,याप्रमाणे ज्याच्या आज्ञेचा भंग झाला आहे व हे सर्व लोक ज्याच्या स्वाधीन आहेत तो देव धर्मराज,आपल्या दूतांनी वर्णन केलेला वृत्तांत श्रवण करून,विष्णूदूतांनी ताडन करून परत पाठविलेल्या त्या दूतांना काय म्हणाला?||१|| भावार्थः---काय आश्चर्ये हे ! हे ऋषे,यमदेवाच्या आज्ञेचा भंग,आम्ही पूर्वी कोणापासूनही कधीही झालेला ऐकिला नाही,आतां तर हे त्याच्या दुतांचे सुद्धा निराकरण झाले यास्तव सर्वही लोकांना असलेला हा संशय तुमच्यावांचून दुसरा कोणीही छेदन करणार नाही असा माझा निश्चय आहे,म्हणून याचे उत्तर तुम्हीच मला सांगा.||२|| भावार्थः--श्रीशुकाचार्य म्हणाला--हे राजा,विष्णूदूतांनी ज्यांचा प्रयत्न म्हणून पाडला आहे अशा त्या यमदुतांनी, संयमिनी नगरीचे परिपालन करणाऱ्या आपल्या यमनामक प्रभूजवळ अशी विज्ञापना केली की,-------------||३|| भावार्थः---यमदूत म्हणाले---हे प्रभो,पुण्य,पाप व मिश्र असे तीनप्रकारचे कर्म करणाऱ्या जीवलोकाला कर्मफल देणारे असे शास्तेतरी--शासन--दंड देणारे ह्या त्रैलोक्यामध्ये खरोखर किती आहेत?||४|| भावार्थः---आतां,असेनात पुष्कळ शास्ते--शासन करणारे ! त्यांपासून बाध काय येणार आहे असे,म्हणाल तर---हे प्रभो लोकांमध्ये जर दंड धारण करणारे अनेक शास्ते--शासन करणारे असेल तर सुख आणि दुःख हि कोणाला बरे होणार आहेत ? व कोणाला नाहीत? म्हणजे त्या शास्त्यांमध्ये--शासन करणारे जर परस्परांचा विरोध असेल तर एकजन प्राण्याला दुःख देण्याची इच्छा करील व दुसरा सुख देण्याची इच्छा करील,ह्यामुळे,परस्परांच्या विरोधाने सुख व दुःख ह्या दोहोंचाही प्रतिबंध झाला म्हणजे ती दोन्हीही कोणालाच प्राप्त होणार नाहीत.बरे कदाचित्,ते शास्ते--शासन कर्ते जर,एकमताने वागत असेल तर,एकमेकांच्या कार्याला एकमेक अनुमोदन देतील आणि यामुळे सुख व दुःख ह्या उभयंताचीही प्राप्ती झाला असतां,ती दोन्ही कोणाला बरे प्राप्त होणार नाहीत?मिळून बहूनायकी झाली तर पाप्यानांच दुःख व्हावयाचे व धर्मात्म्यांनाच सुख व्हावयाचे ह्या मर्यादांचा भंग होईल.||५|| भावार्थः---बरे,पुष्कळ कर्मकर्त्या पुरुषांच्या व्यवस्थेकरितां पुष्कळ शास्ते--शासन कर्ते असेल तर हा दोष येणार नाही,असे म्हणाल तर---हे प्रभो,अनेक कर्मकर्त्या पुरुषांना अनेक शास्ते--साषण कर्ते असणे हे संभवेल.परंतु सार्वभौमराजाच्याठिकाणी मुख शास्तृत्व--शासनत्व असून मांडलिक राजांचेठिकाणी जसे नुसते शास्तृत्व--नामधारी शासनत्व असते,तसे ह्या जीवलोकांचा जो मुख शास्ता--शासन कर्ता असेल त्याचेठिकाणी मुख्य शास्त्रत्व राहून इतरांचेठिकाणी ते केवळ नाममात्रानेच राहील.||६|| भावार्थः---असो,ज्याअर्थी ह्याप्रमाणे संभवत नाही त्याअर्थी आमच्या मते तर देवांसहवर्तमान सर्व प्राण्यांचा एक अधिपती तूंच असून सर्व मनुष्यांच्या पुण्यपापांचा निर्णय करणारा,शास्ता--शासन कर्ता व दंडधारण करणाराही तूंच आहेस. भावार्थः---परंतु,त्या तूं,केलेला दंड सांप्रतकाली लोकांमध्ये चालत नाही.कारण,चार अद्भुत सिद्धांनी तुझ्या आज्ञेचे अगदी उल्लंघन केले आहे.||८|| भावार्थः---ते असे की,तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही पातकी अजामिळाला यातनागृहामध्ये घेऊन चाललो असता,चार सिद्धपुरुषांनी येऊन बलात्काराने आमचे पाष टाकून त्याला सोडविले.||९|| भावार्थः---यास्तव तुजपासून आमचे हित व्हावे व कामांची व्यवस्था लागून आपलेहि कल्याण व्हावे असे जर तूं मानीत असशील तर त्या पातकी अजामिळाने 'नारायण' असे म्हणता क्षणीक 'भिऊ नको' असे म्हणत म्हणत त्याच्या समीप जे सत्वर आले ते महाप्रभावशाली कोण होते?त्यांना तुजपासून जाणण्याची आमची इच्छा आहे.||१०|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,प्रजांचे संयमन करणाऱ्याला त्या यमदेवाला ह्याप्रमाणे दूतांनी प्रश्न केला असतां,तो प्रसन्न झाला आणि श्रीहरीच्या चरणकमळाचे स्मरण करीत तो आपल्या दूतांना म्हणाला की,-||११|| भावार्थः---यमम्हणाला---हे दुतहो,उभ्या व आडव्या तंतूचेठिकाणी विणलेल्या वस्त्राप्रमाणे ज्याचे ठिकाणी हे विश्व ओतप्रेत भरलेले आहे,ज्याच्या(विष्णू ब्रह्मा व रुद्र ह्या)अंशापासून ह्या विश्वाची उत्पत्ति व व लय हि होतात आणि वेसण घातलेल्या बैलांप्रमाने हा जीवलोक,ज्याच्या स्वाधीन आहे असा तो स्थावर जंगमाचा मुख्य अधिपति,माझ्याहून वेगळाच आहे.||१२|| भावार्थः---अहो,ज्याप्रमाणे शेतकरी लोक,दावणीचेठिकाणी दाव्यांनी बैलांना बांधितात,त्याप्रमाणे जो आपल्या वेदवाणीरूप दावणीचेठिकाणी ब्राह्माणादि--ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,व शुद्र नावांनी,जनांना बद्ध करून टाकितो व नामकर्मरूप बंधनसाधनांनी बद्ध होऊन भयभीत झालेले ते हे जीव,ज्याच्या स्वाधीन असून आपआपली कर्मे करितात.म्हणून आपण जीवानी आपापल्या स्वधर्मांनुसार आपापली कर्मे करावी,तर अधर्मांनुसार--परधर्मांनुसार कर्मे करू नये.केल्यास शासन कर्ता आपणास--जीवास दंड करितो.||१३|| भावार्थः---इतरांची गोष्ट पहिले कशाला?परंतु,मी यम,महेंद्र,निर्ऋति,वरुण,चंद्र,अग्नी,शंकर,वायू,सर्प ब्रहमदेव,द्वाद शादित्य,विश्वेदेव,अष्टवसु,साध्य,मरूद्ग्न,सिद्धांसहवर्तमान तसेच इतर जे मरिचीप्रभृति जगत्स्त्रष्टे आहेत ते,बृहस्पती आदिकरून सुरेश्वर आणि रजोगुण व तमोगुण व यांचा स्पर्शही नसल्यामुळे सत्वगुणच ज्यांच्यामध्ये मुख्य आहे असे भृग्वादिक ऋषीही,मायेने मोहित आल्यामुळे ज्याची लीला जाणत नाहीत.जे जीव मायला मोहित न होता मायेला आपल्या अधीन करून ठेवतात ते परमात्म्याला जाणून परमात्मरूप होतात.||१४-१५|| भावार्थः---आणि जसे तांबड्या काळ्यावगैरे रंगांनी युक्त असलेले रूपवान पदार्थ,आपणास पाहणाऱ्या व आपणाहून निराळ्या नेत्रेंद्रीयाला पाहत नाहीत त्याप्रमाणे सर्वही प्राणी आपल्या ह्रदयामध्ये असलेल्या त्या आपल्या द्रष्ट्याला,इंद्रिये,मन,प्राण,चित्त अथवा ह्यांच्या योगेकरून जाणत नाहीत,अशाप्रकारचा तो--दृष्टा--परमात्मा परमेश्वर माझ्याहून--जीवाहून निराळाच आहे,कारण हे सर्व--मन,प्राण,चित्त,अज्ञानी-जीव जड आहेत व दृष्टा--परमात्मा चेतन आहे.||१६|| भावार्थः---आतां याप्रकारचा परमेश्वर तुझ्याहून भिन्न असो.परंतु आमची निर्भत्सना करून ज्यांनी त्या पातक्यांचे रक्षण केले ते कोण?म्हणून विचाराल तर---हे दूतहो,स्वतंत्र,सर्वोत्कृष्ट,सर्वेश्वर,मायाधिपती आणि महात्मा असा जो श्रीहरि त्याचे दूत,प्रायशः या त्रैलोक्यामध्ये संचार करीत असतात व दिसण्यांत ते मनोहर असून त्यांचे रूप,गुण व स्वभाव हे श्रीहरीसारखेच असतात.म्हणून आपण--जीवानी सत्संग करावा,तर दु:संग करू नये,कारण संगतीचा परिणाम होत असतो.सत्संगाने सात्विक गुण वाढतो,तर दु:संगाने राजस व तामस गुण वाढत असतो. ||१७|| भावार्थः---आणि जे देवांनाही पूज्य आहेत,ज्यांची रूपे अवलोकन करण्यासही अशक्य आहेत व जे अत्यंत अलौकिक आहेत असे ते विष्णूदूत,त्या विष्णूची भक्ति करणाऱ्या मनुष्यजणांचे माझ्यापासून,शत्रूपासून व अग्नी इत्यादिकांपासून सर्वठिकाणी रक्षण करितात.म्हणून आपण--जीवानी विष्णूचीच निष्काम भक्ती करावी.||१८|| भावार्थः---बरे,ते जर विष्णूभक्त असतील तर त्यांनी अधार्मिक अजामिळाचा पक्षपात कसा गेला म्हणून विचाराल तर----हे दूत हो,साक्षात भगवंताने सांगितलेला हा धर्म तर ऋषी देव,सिद्धांतील मुख्य,असुर आणि मनुष्य हे सुद्धा कोणी जाणत नाहीत,मग विद्याधर आणि चारण इत्यादिक कोठून जाणणार.||१९|| भावार्थः---आतां कोणीच जर जाणत नाहीत तर तो धर्म आहे,ह्याविषयी प्रमाण काय ?असे म्हणाल तर---हे योद्धे हो,ब्रहमदेव,नारद,शंकर,सनत्कुमार,कपिल,मनु,प्रल्हाद,जनक,भीष्म,बली,शुक्र व मी (यम)हे बारा-जन आम्ही गुप्त, अत्यंत शुद्ध आणि दुर्बोध असा भगवंताने सांगितलेला धर्म जाणतो.त्या धर्माचे महत्त्व इतके आहे की,जो धर्म केवळ जाणला असतांही मोक्ष प्राप्त होतो,मग आचरण केला असतां मोक्ष प्राप्त होईल यांत आश्चर्य काय? ||२०-२१|| भावार्थः---अहो,भगवंताच्या नामोच्चारणादिकांनी केवळ एकवार उच्चाराने अजामिळसुद्धा मृत्यूपाशांतून मुक्त झाला असे हरिनामोच्चारणमहात्म्य कसे आहे ते पहा !||२३|| भावार्थः---आता केवळ नामाच्या आभासानेच सर्व पातकांचा क्षय कसा होईल?असे म्हणाल तर,हे दूत हो,भगवंताच्या गुणांचे,कर्माचे व नामाचे उत्तम प्रकारेकरून कीर्तन करणे ह्या एवढ्या मोठ्या साधनांनी पुरुषांच्या केवळ पापनाशाकरितांच उपभोग करण्याची गरज नाही.कारण,महापातकी अजामिळ मरणदुःखाने विवश झाल्यामुळे अस्वस्थचित्त असतांना नारायण म्हणून पुत्राकरितां आक्रोश करूनही मुक्तीस गेला.||२४|| भावार्थः---तर मग मन्वादिकानी द्वादशाब्दादिक प्रायश्चित्ते उगीच सांगितली असे म्हणाल तर---हे दूत हो,हे मनप्रभृति मोठमोठे लोक प्रायशः ते हे हरीनाममाहात्म्य जाणत नाहीत म्हणूनच ते पापक्षयार्थ द्वादशाब्दादी प्रायश्चित्ते सांगतात व मायादेवीने त्यांच्या बुद्धीला अत्यंत मोह पाडल्यामुळे श्रवण करणाऱ्यास मधुर लागेल अशा रीतीने पुष्पस्थानभूत अर्थवेदांनी मनोहर असलेल्या तिन्ही वेदांमध्ये त्यांच्या मतीचा अभिनिवेश होतो आणि त्यामुळे विस्तारयुक्त अशा मोठ्या कर्मामध्येच ते श्रद्धापूर्वक प्रवृत्त होऊन हरिनामोच्चारणासारख्या अल्प अशा प्रायश्चित्तरूप कर्मामध्ये ते प्रवृत्त होत नाहीत.||२५|| याप्रमाणे विचार करून जे ज्ञानवान लोक,खरोखर एकाग्रमनाने अविनाशी भगवंताचेठिकाणी भक्ति करीत असतात,त्यांना मजपासून दंड होणे योग्य नाही कारण,त्याचे ठिकाणी पातक नसतेच व जरी कदाचित असले तरी त्याच्याही महाकीर्तीमान परमेश्वराचे नामसंकीर्तनच नाश करिते.||२६|| भावार्थः---असो.याप्रमाणे धर्मतत्त्वाचा निर्णय करून,सेवकांना यमधर्म आज्ञा करितो की,जे समदृष्टी साधू लोक समीपदेखील तुम्ही कधी जाऊं नका.कारण,त्यांना दंड करण्यास आम्ही व प्रत्यक्ष कालही समर्थ नाही.||२७|| भावार्थः---तर मग येथे शिक्षा करण्याकरितां आम्ही कोणाला आणावे ?असे म्हणाल तर---हे दूतहो,सर्वसंग परित्याग केलेल्या रसज्ञ परमहंसगणांनी निरंतर सेवन केलेल्या भगवंताच्या चरणकमलांतील मकरंदरूप रसापासून पराडमुख असून नरकाचा मार्गच कि काय अशा आपल्या स्वधर्मशून्य घरामध्ये ज्यांनी आशा धारण केली आहे त्या दुष्ट लोकांना तुम्ही येथे आणीत जा.आपण--जीवानी जर भगवंताच्या नावाचा नामोच्चार न केला तर,आपण जर भगवंताचे गुण किंवा लीला श्रवण न केले तर किंवा आपण--जीवानी जर भगवंताच्या स्वस्वरूपाचे चिंतन न केले तरच यमराजाचे दूत यमपुरीस नेऊन दु:ख देतात. ||२८|| भावार्थः---आणि ज्यांची जिव्हा एकदाही भगवंताच्या गुणायुक्त नामाचा उच्चार करीत नाही,ज्याने मन कधीही त्याच्या चरणाविंदाचे स्मरण करीत आणि ज्यांचे मस्तक एकदांसुद्धा श्रीकृष्णाला नम्र होत नाही,असे जे भगवत्सेवा न करणारे दुष्ट असतील त्यांना तुम्ही आणित जा.म्हणून आपण--जीवानी भगवंताची व भगवंताच्या भक्तांची सेवा करावी,कारण भगवंताची व भक्तांची सेवा न केली तर यमपुरीस जाऊन दु:ख भोगावे लागते.||२९|| भावार्थ:---असो.ज्याअर्थी आमच्या लोकांनी अन्यायाचे वर्तन केले त्याअर्थी षड्गुनैश्वर्य संपन्न असा तो पुराणपुरुष नारायण,आपण होऊनच ती सहन करो.कारण,हात जोडून असलेल्या आम्हां अज्ञ स्वभक्तांची क्षमा करणे हेंच त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला योग्य आहे.त्या सर्वव्यापी व सर्वांतर्यामी परमेश्वराला नमस्कार असो.||३०|| भावार्थः---तस्मात हे कुरुकुलोत्पना राजा जगन्मंगलरूप असे विष्णूचे जे नामसंकीर्तन तेच मोठमोठ्या पातकांचेही सर्वोत्कृष्ट आहे असे जाण.म्हणून आपण--जीवानी निरंतर भगवंत विष्णूच्या नांवाचे उच्चारण करावे,कारण त्यामुळे पातकांचा नाश होतो.पातकांचा नाश झाल्यामुळे यमराजाचे यमदूत आपणास यमपुरीस नेण्याकरिता येत नाहीत.||३१|| भावार्थः---कारण श्रीहरीचे अमर्याद पराक्रम वारंवार श्रवण करणाऱ्या व पठन करणाऱ्या पुरुषांचे अंतःकरण,अनयासाने उत्पन्न झालेल्या भक्तीच्या योगाने असे शुद्ध होते,तसे व्रतादिकांच्या योगाने शुद्ध होत नाही.वर्तादिक--व्रत,अन्नदान,तीर्थ-स्नान,हेही सत्कर्म आहे,पण भगवंताच्या नांवाचे नामोच्चारण,भगवंताचे गुणवर्णन,भगवंताच्या लीला-वर्णन,भगवंताचे स्वरूप-ज्ञान हे त्याहीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.म्हणून जे अधिक श्रेष्ठ साधन आहे,त्या साधनांचे--मार्गाचे अनुकरण करावे.||३२|| भावार्थ:---श्रीकृष्णाच्या चरणकमलांतील मकरंदाचा स्वाद घेणारा जो पुरुष आहे तो,पूर्वी अतितुच्छ मानून टाकिलेल्या दुख:प्रद विषयांचेठिकाणी फिरून कधीही रममाण होत नाही त्या मकरंदाचा आस्वादन न घेणारा व विषयवासनांनी घेरलेला असा जो अन्य पुरुष तो तर,आपल्या पातकांचे परिमार्जन करण्याकरितांही पुन्हा प्रायश्चित्तरूप कर्मच करितो व त्या कर्मापासून फिरूनही पातकच उत्पन्न होते.म्हणून आपण--जीवानी श्रीकृष्णाच्या चरणकमळातील मकरंद--निर्गुण-निराकार परमात्म्याचा स्वाद--अनुभव घ्यावा.असे आपण--जीव विषयांच्या ठिकाणी--परिसरात रममाण होत नाही.जो पुरुष प्रायश्चित कर्म करितो व विषयांचेही सेवन करितो,कारण सत्संग न केल्यामुळे व परमात्म्याचा अनुभव न आल्यामुळे विषयांचेच सेवन करितो. ||३३|| भावार्थः---हे राजा,याप्रमाणे आपल्या प्रभुणे,निवेदन केलेले भगवन्माहात्मय स्मरण करून त्या यमदुतांच्या मनाला विस्मय न वाटतां हे सांगितलेले सर्व खरे आहे असेच ते मानूं लागले म्हणजे व तेव्हापासून हा आमचाच घात करील म्हणून शंका बाळगीत असलेले ते यमदूत,विष्णूच्या आश्रयाने राहिलेल्या जनाला अवलोकन करण्यासही भिऊ लागले.म्हणून यमदूत हे भगवंताच्या भक्ताकडे कधीच येत नाहीत.जे भगवंताचे अभक्त आहेत,त्यांच्याकडेच जातात.त्यांना यमपुरीस नेऊन दंड--शासन करितात.||३४|| | इतिहासमिमं गुह्यं भागवन् कुम्भ सम्भव: | कथयामास मलय आसीनो हरिमर्चयन् ||३५|| भावार्थः---हे राजा,हा गुह्य इतिहास,पूर्वी एकाग्र अंतःकरणपूर्वक मलयपर्वतावर बसून श्रीहरीने अर्चन करणाऱ्या भगवान अगस्त्यऋषीने मला कथन केला होता.||३५|| ३---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी यमकृत स्वदूतसांत्वननामक हा तिसरा(३) अध्याय पस्तीस(३५)श्लोकांनियुक्त समाप्त झाला||३|| | ||श्रीकृष्णार्पनमस्तु|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ४---आतां विश्वरूपाचे जन्मकथन करण्याकरिता या चवथ्या अध्यायापासून तीन अध्यायांनी प्रथम,प्रचेताचा दक्षनामक जो पुत्र त्याचा वंश कथन केला आहे.त्यांत,या चवथ्या अध्यायामध्ये,प्रजोत्पत्तीकरितां दक्षाने तपश्चर्या करून हंसगुह्यनामक स्तोत्राने श्रीहरीचे आराधन केले,अशी कथा वर्णन केलेली आहे.(प्रसंगोपात्त नाममाहात्म्य श्रवण करून स्वयंभूव मनूच्या पुत्रांच्या वंशांतील जाणण्याची इच्छा करणारा-------------------------) ______________________________________________________________________________ |४---- दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव ______________________________________________________________________________
|देवासुरनृणां सर्गो नागानां मृगपक्षिणाम् | सामासिकस्त्वया प्रोक्तो यस्तु स्वायम्भुवेऽन्तरे ||१|| भावार्थः---राजा म्हणाला----हे भगवन,देव,असुर,नर,नाग,मृग आणि पक्षी ह्यांची जी स्वायंभुवमन्वंतरात झालेली सृष्टी,तृतीयस्कंधामध्ये तूं संक्षेपाने मला कथन केलीस तिचाच विस्तार तुझ्यापासून जाणण्याची मी इच्छा करितो आणि मायातीत भगवंताने ज्या शक्तीने व ज्या प्रकाराने दक्षाच्या पुढील सृष्टी उत्पन्न केली त्या शक्तीला व त्या प्रकारालाही जाणण्याची मी इच्छा करितो.||१-२|| भावार्थः---सुत म्हणाला----हे मूनी,श्रेष्ठहो,ह्याप्रमाणे परीक्षित-राजाने केलेला उत्तम प्रश्न श्रवण,महायोगी ऋषीश्रेष्ठ श्रीशुकाचार्य म्हणाला,त्यांची प्रशंसा करून म्हणाला की,-----------------||३|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-----हे राजा,जेव्हा प्राचीनबर्हीराजाच्या प्रचेतसनामक दहा पुत्रांनी समुद्रांतून बाहेर येऊन वृक्षांनी व्याप्त झालेली प्रथ्वी अवलोकन केली.||४|| भावार्थः---तेव्हा संतापामुळे त्यांना कोप प्राप्त होऊन,ते वृक्षांवर क्रुद्ध झाले आणि दग्ध करण्याच्या इच्छेने त्यांनी आपल्या मुखांतून वायू आणि अग्नी हे उत्पन्न केले.||५|| भावार्थः---नंतर,हे कुरुश्रेष्ठा,त्या वायूच्या व अग्नीच्या योगाने दग्ध,होऊं लागलेल्या त्या वृक्षांना अवलोकन करून त्यांना सोमनामक महाराजा,त्या प्रचेत्यांना कोप शांत करीत असता म्हणाला की,------------------||६|| भावार्थः---हे महाभाग्यवंत प्रचेतेहो,तुम्ही सर्वप्रजांचे अधिपती असल्यामुळे विशेषेकरून त्यांची वृद्धी करण्याची इच्छा करणारे आहां.यास्तव या दीन वृक्षांचा द्रोह करणे हे तुम्हांला योग्य नाही.||७|| भावार्थः---अहो,प्रजापालकांचा अधिपती जो अविनाशी भगवान प्रभू श्रीहरी,त्याने वनस्पतीरूपाने भक्ष्य व औषधिरूपाने अन्न हि उत्पन्न केली आहेत.म्हणून आपण ज्या वनस्पती अन्न,औषधी,पाणी व वृक्ष आहेत यांची वृद्धी करावी,कारण त्या मानवांच्या उपजीविकेचे गरज भागविणारे साधन आहे.त्या वनस्पतीची,पाण्याची व वृक्षांची वृद्धी करावी,ऱ्हास--तोड-मोड करू नये--अपव्यय करू नये.||८|| भावार्थः---तसेच पक्षांनी संचार करणाऱ्या पक्षांचे अचल असे पुष्पफलादी अन्न,पादचारी गवादिपशुंचे पादरहित असे तृणादी अन्न,हस्तांनी युक्त असलेल्या व्याघ्रादिकांचे हस्त रहित असे मृगादीपशु रूप अन्न आणि दोन पायांनी युक्त असलेल्या मनुष्यांचे चतुष्पादादिरूप अन्न हे श्रीहरीनेच उत्पन्न केले आहे.||९|| भावार्थः---तस्मात हे निष्पापहो,पित्याने (प्राचीनबर्हीराजाने)व देवाधिदेव भगवंताने प्रजोत्पत्तीकरीता आज्ञा केलेले तुम्ही,वृक्षांना दग्ध करण्यास बरे योग्य व्हाल ? म्हणून आपण--जीवानी वृक्षांची लावगड करावी,तर वृक्षांची तोड कधीच करू नये,कारण ते वृक्ष सर्व प्राणीमात्रांना विशेषत:मानवा मात्रांसाठी अत्यंत जीवन-आवश्यक आहे.||१०|| भावार्थः---ह्याकरीतां तुमच्या पित्याने,पितामहाने व प्रपितमहामुनींसुधा सेवन केलेल्या सन्मार्गाचा तुम्ही आश्रय करा आणि वृद्धिंगत झालेला हा आपला कोप शांत करा.आपण--जीवानी आपल्यापेक्षा वडील--श्रेष्ठ जे होते किंवा आहेत त्यांच्या सन्मार्गाचा आश्रय घेऊन त्यानुसार आचरण करावे.त्यानुसार आचरण केले असता आपले अहित करणारे जे काम,क्रोध,लोभ.मोह,मद.आणि मत्सर--द्वेष शांत होतात.कारण ते शांत होण्यात आपलेच हित आहे.त्यामुळे आपण दु:खाकडे न जाता सुखाकडे किंवा सुखरुपतेकडे जाणार असे निश्चितच आहे.||११|| भावार्थः---प्रचेतहो,बालकांचे रक्षण करणारे जसे माता-पितरच आहेत,म्हणून आपण--जीवानी त्यांनी आपले रक्षण केलेले आहे,म्हणून आपण त्यांचे रक्षण वृद्धावस्थेत करणे आपले ओघाने कर्तव्यच असते.आज--काल समाजाकडे नजर टाकली असता असे दिसून येत आहे की,पुत्र-पुत्रीचे लग्न झाल्यानंतर ते पुत्र आपापल्या आई-वडिलांना किंवा पुत्री सासू--सासऱ्यांना वेगळे टाकत आहेत.हे त्या पुत्र--पुत्रीचे योग्य आहे काय?त्या पुत्र--पुत्रीचे असे वागणे मुळीच योग्य नाही.कारण त्यांनी आपल्याला आपल्या लाहान वयात आपले लग्नहोईपर्यंत फारच कष्ट घेतलेले असतात.म्हणून आपण त्यांच्या त्या ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांचे पालनपोषण करणे योग्यच आहे--यथार्थ आहे--धर्मशात्राचे म्हणणे आहे.समजा आपण आपल्या आई--वडिलांचे वृद्धावस्थेत पालन-पोषण न केले तर,आपलेच पुत्र--पुत्री आपले पालन--पोषण करणार नाहीत.आपलेच कर्म आपल्यालाच भोगावयास येते,म्हणून तरी आपण आपापल्या आई--वडिलांचे पालन--पोषण,आपल्या पुत्राने--पुत्रीने पालन-पोषण प्रेमाने करावयास पाहिजे.नेत्रांचे रक्षण करणाऱ्या जशा पापण्यात आहेत,स्त्रीचा रक्षक व पोषक जसा पतीच आहे,भिक्षुचा निर्वाह करणारा जसा गृहस्थच आहे आणि अज्ञजणांचा सुह्र्द्य जसा ज्ञानोपदेश करणारा ज्ञानीच आहे त्याप्रमाणे प्रजाजणांचा रक्षण करणारा राजाच होय.आपणास--जीवास ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार रक्षकाची गरज आहे,म्हणून प्रत्येकांनी ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार ती--ती कर्तव्य पार पाडावयास पाहिजे.||१२|| भावार्थः---त्यांतूनही प्राणी हे ईश्वराचे अध्यस्त असल्यामुळे व ईश्वर हा प्राण्यांचे अधिष्ठान असल्यामुळे त्यांच्याशी--ईश्वराशी द्रोह करणे योग्य नाही असे सांगतो----प्राण्यांच्या देहामध्ये अंतर्यामीरूपाने समर्थ हरी वास करीत असतो यास्तव सर्व चराचर विश्व त्याचेच निवासस्थान आहे असे तुम्ही अवलोकन करावा,असे केल्याने तुम्ही त्याला संतुष्ट केलेसे होईल.आपण--जीवानी आपल्या अंत:करणात अंतर्यामीरूपाने जो समर्थ हरी--परमात्मा वास करितो,त्यास सत्संगाच्याद्वारे जाणून त्याचाच अनुभव घ्यावावयास पाहिजे,कारण त्यामुळे आपले जे जन्म--मरण दु:खप्रद आहे,त्याचे निवारण होऊन सुखरुपता अनुभवयास येते.म्हणजेच सर्व जीवांची जी इच्छा "सर्व दु:ख निवृत्त होवो व सर्व सुखांची प्राप्त होवो,"ती पूर्ण होते.||१३|| भावार्थः---हे प्रचेतहो देहामध्ये ह्रदयाकाशापासून अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर आत्मविचाराने जो संयमन करितो तोच गुणत्रयाचे अतिक्रमण करून भगवत्स्वरुपास पावतो.म्हणून--आपण मन आणि सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन सत्संग करून आत्मविचार करावा.असा आत्मविचार करणारा भगवत्स्वरूपास--परमात्म्यास प्राप्त होतो म्हणजेच आपण--जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत,असा निश्चय होतो.||१४|| भावार्थः---तस्मात् दीन वृक्षांना दग्ध करणे हे आतां पुरे करा,कारण वृक्ष हे निसर्गाचा समतोल साधतात,म्हणून वृक्ष लावगड करा,पण वृक्षांची तोड करू नका.अवशिष्ट राहिलेल्या वृक्षाचे व तुमचे कल्याण असो,आणि वृक्षांनी पालन केलेल्या व वरण्यास योग्य अशा ह्या कन्येचा तुम्ही पत्नी ह्या नात्याने स्वीकार करा.||१५|| भावार्थ:----हे परीक्षित राजा,याप्रमाणे प्रचेत्यांचे सांत्वन करून आणि सर्वोत्कृष्ठ नितंबप्रदेशाने युक्त असलेली ती प्रम्लोचानामक अप्सरेची कन्या त्यांना अर्पण करूण,"सोम्रराजाने" तेथून गमन केले व त्यांनीही धर्मविधीने तिच्याशी विवाह करून घेतला.आपणास--जीवास गृहस्थाश्रमात पदार्पण करावयाचे असेल,तर भावी पत्नीचा धर्म-विहित-विधीने स्वीकार करावा,असा--धर्म-विहित-विधीने केलेला विवाह हा "सुखाला" कारण असतो.||१६|| भावार्थ:----पुढे त्यांच्यापासून त्या मारीषेचेठिकाणी प्रचेतस म्हणून प्रसिध्द अशा "दक्षनामक" पुत्र प्रसिध्द झाला आणि त्यांच्याच प्रजोत्पाद्नाने हे त्रैलोक्य भरून गेले आहे.||१७|| भावार्थ:-----आता कन्येचेठिकाणी प्रेम करणाऱ्या त्या "दक्षानेख" विर्यद्वारा व "मनोद्वारा" प्राणी कसे उत्पन्न केले ते तू सावधपणे श्रवण कर.||१८|| भावार्थ:----हे राजा,आकाश,भूमी,व जल ह्यामध्ये राहणाऱ्या ह्या देव असुर व मनुष्य इत्यादिक प्रजा व मनुष्य "दक्षप्रजापतीने" पूर्वी "मनोमात्रेकरून" उत्पन्न केल्या.||१९|| भावार्थः---परंतु ती प्रजासृष्टी वृद्धिंगत होईना असे अवलोकन करून त्या दक्षप्रजापतीने विंध्याचळाजवळ असलेल्या पर्वतावर जाऊन दुष्कर तपश्चर्या केली.||२०|| भावार्थः---ती अशी कि,त्याठिकाणी पापनाशक असे एक "अघमर्षननामक" सर्वोत्कृष्ट तीर्थ आहे,त्यामध्ये त्या दक्षाने त्रिकाळ स्नान करून तपाच्या योगाने श्रीहरिला संतुष्ट केले.||२१|| भावार्थः---हे राजा,ज्या हंसगुह्यनामक स्तोत्राने अधोक्षज भगवंताची दक्षप्रजापतीने स्तुती केली व ज्याच्या योगाने श्रीहरी संतुष्ट झाला ते स्तोत्र तुला मी कथन करितो.||२२|| भावार्थः---दक्षप्रजापती म्हणाला---ज्याची--ज्ञानी महात्म्यांची विच्छक्ती सफल--परमात्म्याची अनुभूती असल्यामुळे जो जीव आणि माया ह्यांचा नियंता अहो,ज्याच्यापासून प्रत्यक्षादि प्रमाणे माघारी फिरली असल्यामुळे,विषयांनाच परमार्थ समजणाऱ्या जीवांनी ज्यांचे स्वरूप अवलोकन केले जात नाही आणि जो स्वयंप्रकाश आहे त्या सर्वोत्कृष्ट परमात्म्याला मी नमस्कार करितो.आपण--जीवानी स्वयंप्रकाश जो निर्गुण-निराकार असलेला परमात्मा त्यास नमस्कार करावा म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा,कारण त्यामुळे आपले--जीवाचे जंन्म--मरण निवृत्त होणार आहे.||२३|| भावार्थः---आतां ईश्वराने स्वरूप अदृष्ट कसे हे दर्शविण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की,-----------जसा रुपादिक विषय,आपणाला प्रकाश करणाऱ्या इंद्रियादिकांचे प्रकाशत्व जाणत नाही त्याप्रमाणे ह्या देहामध्ये वास करणारा अंतर्यामी सखा जीव,तेथेच वास करीत असलेल्या ज्या प्रपंचसाक्षी सख्या ईश्वराचे,अंतःकरणाला प्रेरणा करणे इत्यादिक सख्य,जाणत नाही.त्या महेश्वराला नमस्कार असो.रुपादिक विषय--शब्द.स्पर्श,रस,गंध इंद्रीयादिकांचे--श्रोत्र,त्वचा,चक्षु,जिव्हा,व घ्राण जानत नाही,कारण विषय जड--न जाणणारे आहेत.अंतर्यामी असलेला कूटस्थ जानत नाही,कारण त्याच्यामुळे--अंतर्यामी--कूटस्थामुळे जाणल्या नामरूपास--विषयांस जाणल्या जाते. "ज्याच्यामुळे--कूटस्थामुळे जाणल्या जाते,तो--कूटस्थ जाणू शकत नाही,व जो जाणल्या जातो--नामरूप--विषय जाणल्या जातो,त्याच्यामुळे--नामरुपामुळे--विषयांमुळे जानता येत नाही."म्हणजेच ज्याच्यामुळे जाणल्या जाते-- कूटस्थ हा आत्माच असतो व जो जाणणारा असतो तो जीव==अनात्मा+आत्मा-कूटस्थ असतो म्हणजेच चित्+अंत:करण(जड) असतो.जो चित्+अंत:करण--जड असतो,तोच जाणणारा--कळणारा असतो.तोच सुखी--दु:खी असतो.ज्याच्यामुळे कळते तो कूटस्थ--चित्-असतो.जो कूटस्थ--चित्-असतो तो सुखरूप असतो.म्हणून आपण जीवानी अंत:करणाचा बाध करून जो परमात्मा--कूटस्थ आहे त्याच्याशी एकरूप व्हावे,कारण तो सुखरूप आहे.||२४|| भावार्थः---बरे,रुपादी विषय जड असल्यामुळे ते इंद्रियादिकांना न जाणोत परंतु सचेतन असलेला जीव,साक्षी आत्म्याला कां जाणत नाही?ह्या शंकेचे निरसन करीत म्हणतो,की,-----)देह,प्राण इंद्रिये,अंतःकरणे,महाभूते व त्यांची सूक्ष्म रूपे हि आपल्या स्वरूपाला,अन्य,इंद्रियवर्गाला व ह्या दोहोपेक्षाही भिन्न अशा देवतावर्गाला जाणत नाहीत आणि जीव तर,ह्या सर्व तिघांनाही जाणतो व ह्यांना कारणीभूत असलेले गुणही त्याला माहित आहेत,परंतु तोहि ज्या सर्वज्ञाला--ईश्वरास जाणत नाही.म्हणजे तो जीव,देशादि म्हणजे देश,काळ,वस्तूने परिच्छिन्न म्हणजे मर्यादित असल्यामुळे अपरिच्छन्न--व्यापक आत्म्याला जाणण्यास समर्थ होत नाही.म्हणून आपण--जीव--मी त्या अनंताचे स्तवन करितो.जेव्हा आपण--जीव सत्संगाद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून सर्व विषयांचा त्याग करून परमात्माचा अनुभव घेउत,तेव्हाच आपण अपरिच्छिन्न--व्यापक-एक-अद्वितीय आहोत,असा निश्चय होईल.||२५|| भावार्थः---ह्याप्रमाणे परमेश्वराचे स्वरूप अदृष्ट कसे ते निवेदन करून त्याचे स्वप्रकाशत्व कथन करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की,-----दर्शन--ज्ञानेंद्रियांचा विषय नाही,कारण ज्ञानेद्रिये अपंचीकृतपंचमहाभूतांच्या सत्व-गुणांचे कार्य आहे व परमात्मा हा गुणातीत आहे,म्हणून ज्ञानेंद्रिये परमात्म्याला जाणू शकत नाही. स्मरण मनाचे कार्य आहे,परमात्मा हा स्मराणातीत आहे म्हणून मनाचा बाध करावा लागतो.यांचा--मनाचा व इंद्रियांचा नाश--बाध झाल्यामुळे ज्याकाळी नामरूपांचे बोधक अशा मनाची समाधी लागते,म्हणजे वृत्तीरहित अवस्था प्राप्त होते.त्या वेळी केवळ स्वरूपज्ञानानेच जो समजला जातो व शुद्ध मन हेंच ज्याचे समजण्याचे स्थान आहे त्या शुद्धस्वरूप परमात्म्याला म्हणजे सगुण--निराकाराला--ईश्वरास नमस्कार असो.||२६|| भावार्थः---परंतु अशा प्रकारचा परमेश्वर कोणाला समजतो ह्या अपेक्षा पूर्ण करण्याकरितां म्हणतो की----समिधा-- नामकपंधरा मंत्रांनी प्रकाशमान होणाऱ्या काष्ठस्थित अलौकिक अग्नीला जसे याज्ञिकलोक मंथनाने पृथक करून,काढतात,त्याप्रमाणे ह्रदयामध्ये निश्चल केलेल्या व सत्तावीस--१--पांच महाभूतें २--पांच-ज्ञानेंद्रीये,३--पांच कर्मेंद्रिये,४--पांच-प्राण,अंत:करणचतुष्ट,अविद्दा,काम,कर्म असे एकून सत्तावीस सत्वरूप आपल्या शक्तीभूत उपाधींनी प्रकाशमान नसलेल्या म्हणजेच अनात्मा असलेल्या ज्या अठ्ठाविसाव्या तत्वाने म्हणजे जे तत्व मुख्य आत्मा आहे ते तत्व स्वप्रकाशमान--परमात्मा आहे.स्वबुद्धीने विवेचन करून,विवेकी लोक,ध्यान करितात आणि सर्व भेदांनी परिपूर्ण असलेल्या मायेचा त्याग केल्यामुळे प्राप्त झालेल्या मुक्तीसुखामध्ये ज्याचा अनुभव येतो,ज्याची सर्व नामे सर्व रुपे आहेत आणि ज्याच्या स्वरूपी मायारूप अचिंत्यशक्ती आहे तो परमात्मा--ईश्वर मजवर प्रसन्न होवो.||२७-२८|| भावार्थः---बरे,केवळ स्वरूपज्ञानानेच जर ईश्वर समजला जातो तर वागादिक इंद्रियांना अगोचर असल्यामुळे त्याला सर्वनामत्व व विश्वरूपत्व संभवणार नाही,अशा शंका घेवून,सर्व नावांच्या योगाने वाच्य व प्रत्यक्षादिकांच्या योगाने दृश्य असे जरी त्याचे स्वरूप संभवत नाही तथापि मायेमुळे सर्व संभवते हे तीन श्लोकांनी उपपादन करण्याच्या अभिप्रयाणे नमन करितो की----जे जे वाणीने युक्त,बुद्धीने निश्चित,इंद्रियांनी गृहीत अथवा मनाने संकल्पित आहे ते ते स्वप्रकाश परमात्म्याचे रूप नव्हे.कारण,ते सर्व गुणांचेच रूप होय आणि सचेतन अधिष्ठान असल्यावाचून गुणांचा लय व उत्पत्ती हि संभवत नाहीत,ह्याकरिता,गुणांचा लय,व उत्पत्ती ह्यांच्या योगाने ज्याचे अनुमान होते तो परमेश्वर गुणव्यतिरिक्त आहे.||२९|| भावार्थ:----ह्याप्रमाणे वस्तुत: ईश्वराला गुणस्वरूप नाही असे स्वीकारून त्याचेठीकानी मायारूप अचिंत्यशक्ती आहे असे पूर्वी सांगितल्यावरून मायेने सर्ववाच्यत्वेकरून सूचित झालेले विश्वरूपच कथन करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की.----अधिकरण(सप्तमी),आपादन(पंचमी),करन(तृतीय),संबंधी(षष्ठी),संप्रदान(चतुर्थी),कारण (द्वितीय),कर्ता व प्रयोजकर्ता(प्रथम),हे सात विभक्तीचे अर्थ,व भावकमार्दिक अर्थी होणाऱ्या प्रत्ययाचे अर्थ हे सर्व ब्रहमच आहे.कारण,ह्या सर्वाच्या पूर्वी ते प्रसिध्द असल्यामुळे ते त्याचे कारण आहे,आणि ब्रह्मादिक उत्कृष्ठ व अस्मादादिक निकृष्ठ अशा असलेल्या कर्णाचे ते मुख्य कारण असून सजातीयविजातीय भेद्शुन्य असे ते निरपेक्ष---निर्गुण-निराकार आहे.||३०|| भावार्थ:----आता,ह्याप्रमाणे ब्रहम जर विश्वाचे कारण असेल तर ह्याविषयी मीमासंक का विवाद करितात?व दुसरे स्वभाववादी लोक त्यांना अनुमोदन का देतात?आणि त्या उभयतांना तत्ववेत्यांनी बोध केला असताही ते फिरून फिरून मोहित का होतात?ह्या शंकेचे निरसन करणाऱ्या अभिप्रायाने भाषण करितो की,-ज्याच्या माया व अविद्या इत्यादी शक्ती वाद करणाऱ्या वादिजनांच्या विवादांची आणि कधी कधी संवादांची स्थाने होतात व ह्या वादीजानांच्या मनाला वारंवार मोह उत्पन्न करीतात त्या सर्वव्यापी अनंतगुण--सगुण-निराकार--ईश्वरास परमात्म्याला नमस्कार असो.||३१|| भावार्थ:---बरे,ज्याच्या शक्ती विवादादिकांची स्थाने होतात ते ब्रहम कोणते?हे सांगण्याच्या आशयाने भाषण करितो की,----उपासनाशस्त्राप्रमाणे पातळ हे देवांचे पादमूल आहे तेथून-देवाच्या शिरस्थानी सत्यलोक आहे इथपर्यंत विरडूपाने सांगितलेल्या,उपासनेमध्ये ईश्वर आहे आणि ज्ञानशास्त्रात ब्राह्माला पादादिक अवयव नाहीत म्हणून अवयवयुक्त ईश्वर नाही अशाप्रकारे निरनिराळे व परस्पर विरुध्द धर्म,ज्यामध्ये प्रतिपादन केले आह्र्त अशी एकाच वस्तूचा आश्रय करून राहणारी व एकच वस्तूचे प्रतिपादन करणारी जी उपासना व ज्ञान हि दोन शास्त्रे त्यांचेठीकानी विवादविषाहून निराळे आणि विवादाला अनुकूल असे जे काही समत्वेकरून समजण्यात येते ते सर्वव्यापी ब्रहम होय,त्याला नमस्कार असो.||३२|| भावार्थ:---आता उदासीन व सर्वत्रसारखा असणाऱ्या परमेश्वराला नमस्कार करून काय लाभ होणार आहे?ह्या शंकेचे निरसन करण्याच्या अभिप्रायाने भाषण करितो की-----प्राकृत नामरूपरहित असतानाही ज्या अचिंत्य ऐश्वर्यनी युक्त असलेल्या अनंत परमात्म्याने,आपल्या चरणमूलाची सेवा करणाऱ्या लोकांवर अनुग्रह करण्याकरिता अवतारांच्या योगाने रूपे व कर्माच्या योगाने नामे धरण केली आहेत तो--सगुण-साकार--रामकृष्णादि मजवर प्रसन्न होवो.||३३|| भावार्थ:---आता तुझ्यासारखे सकाम जन गणेशादिकांची प्रार्थना करितात परंतु त्यांना सोडून तू कशाकरिता भगवंताचीच प्रार्थना करितोस,ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता दक्ष प्रजापती पुनरपि भाषण करितो की,-----ज्याप्रमाणे वायू चंपादिक अनेक सुगंधी पुष्पांचा आश्रय करून नानाप्रकारच्या गंधानी युक्तअसल्यासारखा भासतो, त्याचप्रमाणे जो अंतर्यामी ईश्वर,अर्वाचीन ज्ञानमार्गानी जणांच्या इच्छेनुसार अनेकदेवतारुपाने भासमान होतो तो माझा मनोरथ सत्य करो. ||३४|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला:--हे कुरुश्रेष्ठ,त्या अघमर्षणनामक तीर्थाचेठीकानी याप्रमाणे स्तुती केलेला तो भक्तवत्सल भगवान,उत्तम स्तुती करणाऱ्या त्या दक्षाच्या अग्रभागी प्रकट झाला.||३५|| भावार्थ:---हे राजा,त्याने आपले पाय गरुडाच्या स्कंधावर ठेविले होते,तो लांबलांब अशा आठ महाभूजनी युक्त असून त्याने त्या हातामध्ये चक्र,शंख,खड्ग,ढाल,बाण,धनुष्य,पाश,व गदा हि आठ आयुधे धारण केली होती.||३६|| भावार्थ:---त्याने पितवस्त्र परिधान केले होते,तो मेघासारखा श्यामवर्ण होता,त्याचे मुख व नेत्र,प्रसन्न असून त्याचे शरीर वनमालेच्या योगाने कंठापासून तो पायापर्यंत व्याप्त झाले होते,त्याने श्रीवत्सलांच्छन हे झळकत होते.||३७|| भावार्थ:---त्याने मोठा मुकुट मस्तकी धारण केला होता,त्याने हातामध्ये मोठमोठे कडी तोडे घातले होते,त्याने स्फुरण पावणारी मकराकृती कुंडले कर्णाचेठीकानी धारण केली होती,तो कटीसुत्र,आंगठ्या,साखळ्या व तोरड्या आणि बाहुभूषणे ह्यांनी भूषित झाला होता.||३८|| भावार्थ:---त्या त्रीलोक्याधीपती भगवंताने ते श्रीपुरुषोत्तमनामक रूप धारण केले होते,तो इंद्रादिलोकपालांनी,नारद व नंद इत्यादिकपार्षद गणांनीपरिवेष्टित होता आणि त्याची स्तुती पश्वाद्वांनी गायन करीत असलेले सिद्ध,गंधर्व व चारण करीत होते.||३९|| भावार्थः---असो.ते अत्यंत आश्चर्यकारक रूप अवलोकन करून दक्षप्रजापतीच्या मनाला फारच आनद झाला व त्यामुळे अगदी गोंधळून जाऊन त्याने भूमीवर दंडासारखा त्याला सगुण-निराकारास प्रणाम केला.||४०|| भावार्थ:---नंतर झऱ्यांच्या योगाने जशा नद्या भरून जातात त्याप्रमणे तीव्र आनंदाच्या इंद्रिये अगदी भरून गेल्यामुले तो दक्षप्रजापती, काहीएक भाषण करण्यास समर्थ झाला नाही.||४१|| भावार्थ:---तथापि सर्वभूतांचे हृग्द्त जाणणारा भगवान जनार्दन,त्याप्रकारेकरून नम्र झालेल्या त्या दक्षप्रजापतीनामक प्रजेत्पादनेच्छू भक्ताला,असे म्हणाला की,------||४२|| भावार्थ:---श्रीभगवान म्हणाले-----हे महाभाग्यवान प्रचेतस्पुत्रा,तू तपाच्या योगाने चांगला सिद्धी झाला आहेस.कारण,मजविषयीच्या श्रद्धेने माझेठीकानी तुला उत्कृष्ठ भक्ती उत्पन्न झाली आहे.||४३|| भावार्थ:---तस्मात हे प्रजानाथ,ज्याअर्थी ह्या विश्वाची वृद्धी करणारे तुझे तप आहे त्याअर्थी मी तुजवर प्रसन्न झालो आहे.आता मी लोकवृध्युर्थ तप केले असताना तुला प्रसन्न होण्याचे कारण काय ?असे तू म्हणशील तर--- हे प्रजापते,प्राण्यांची समृद्धी व्हावी हीच माझी इच्छा असून ती तुझ्या तपाने परिपूर्ण होणार असल्यामुळे मी प्रसन्न झालो आहे.भगवंत सकाम भक्ती करून तप केले तर भगवंत आपली संसाराची इच्छा पूर्ण करितात,पण त्यामुळे भगवंत मिळत नाही,कारण भगवंताकडे भगवंताचे ऐश्वर्य मागितले आहे,त्यामुळे भगवंताचे ऐश्वर्य मिळते,पण भगवंत मिळत नाही.म्हणून ज्यांनी--त्यांनी ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार भक्ती करावी.||४४|| भावार्थ:---आणि लोकविभूतीचा विस्तार करण्याचा प्रयत्न तुझा उचितच आहे कारण,ब्रह्मा,रुद्र,तुम्ही प्रजापतीचा प्रजापती,मनू,व इंद्र्दिसुरेश्वर ह्या सर्व माझ्याच विभूती असून उत्पत्तीला कारण आहेत.||४५|| भावार्थ:---आता तपाची प्रसंशा करीत करीत प्रसंगोपात्त अन्यही लोकवृद्धीकारक विध्याविदिकांची भगवान स्तुती करितात की.-------हे ब्रह्मनिष्ठा,तप हे माझे हृद्य,विद्या हि माझी तनु,क्रिया हा माझा आकार,उत्तमप्रकारेकरून निष्पन्न झालेले क्रतु हे माणे अवयव,धर्म,हे माझे मन आणि देव हे माझे प्राण आहेत.||४६|| भावार्थ:---आता संतानाची वृद्धी करणारे तपच आहे हे दर्श्वण्याकरिता दुसऱ्या व तिसऱ्या स्कंधामध्ये सांगितलेल्या इतिहास चार श्लोकांनी कथन करितो की,-सृष्टीच्या पूर्वी केवळ मी एकटाच होतो,ग्राहक अथवा ग्राह्य अशी काही एक अन्य वस्तू नसून केवळ चैतन्य मात्र होते आणि तेही व्यक्त नसल्यामुळे सर्वत्र स्वस्थ निद्रीसत असल्यासारखे होते.कारण सुर्ष्टीच्या प्रलय-काळात सुर्ष्टीचा परमात्म्यात लय झालेले असते म्हणजे सुर्ष्टी जी सुखसं-रूपाने लय पावलेली असते.जसे दैनंदिन प्रलय-काळात म्हणजेच सुषुप्ती अवस्थेत म्हणजेच लौकिक भाषेत झोप या अवस्थेत सुष्टीचा--नामरूपाचा लय अज्ञानात झालेला असतो.आपण झोपेतून उठल्यानंतर पूर्व-वत सृष्टी कार्यरत होते. ||४७|| भावार्थ:---पुढे अनंतगुणांनी युक्त असलेल्या मज अनंताचेठिकाणी जेव्हा मायेच्या योगाने गुणमय ब्रह्मांडरूप देह उत्पन्न झाला तेव्हाच आयोनिसंभव आद्द ब्रह्मदेव उत्पन्न झाला.||४८|| भावार्थ:---निरंतर माझ्या सामर्थ्याने युक्त होवून सृष्टी करण्याकरिता उद्युक्त झालेला तो सुरश्रेष्ठ,जेव्हा आपल्याला अधर्म असल्यासारीखे मानू लागला तेव्हा,"तप कर",म्हणून मी त्याला उपदेश केला असता त्या समर्थ ब्रहमदेवाने उग्र तप करून त्याच्या योगाने तुम्ही नऊ जगत्स्त्रष्ट्याना प्रथम उत्पन्न केले.||४९-५०|| भावार्थ:---(असे सांगून आता संतानवृद्धीचा उपाय कथन करितो की,)हे प्रजाधिपते "दक्ष",पांचजननामक प्रजापतीच्या ह्या "असिक्नीनामक" कन्येचा,पत्नी ह्या नात्याने तू निश्चयेकरून स्वीकार कर.||५१|| भावार्थ:---म्हणजे स्त्रीपुरुषसंबंधी रतिरुप धर्माने युक्त असा तू,त्याच प्रकारचा धर्माने युक्त असलेल्या त्या भार्येचेठीकानी फिरून बहुतप्रकारापनेहि (भावी)प्रजासृष्टी उत्पन्न करशील.||५२|| भावार्थ:---नंतर तुझ्यापुढील सर्व प्रजा,माझ्या मायेच्या योगाने स्त्रीशी संयुक्त होवून पुत्रादीरूपाने होतील व माझे पूजन करतील.||५३|| | इत्युक्ता मिषतस्तस्य भगवान् विश्वभावन: | स्वप्नोप्लब्धार्थ इव तत्रैवान्त र्दधे हरि: ||५४|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला-----हे परीक्षितराजा,विश्ववर्धक भगवान श्रीहरी,याप्रमाणे भाषण करून त्या दक्षप्रजापतिसमक्ष स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या वस्तूप्रमाणे त्याचठिकाणी अंर्तधान पावला.||५४|| ४----याप्रमाणे श्रीमदभागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी दक्ष प्रसादनिरुपननामक हा चवथा(४)अध्याय चौपन्न(५४)श्लोकांनियुक्त अध्याय समाप्त झाला.||४|| ______________________________________________________________________________ ५----आतां पाचव्या अध्यायांत,भाषणसंबंधी कुटे घालून नारदाने,आपल्या पुत्रांचा नाश केला असे श्रवण करून दक्षप्रजापतीने त्या नारदाला शाप दिला असे निरुपण केले आहे.||१|| |५----- श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांचा शाप ______________________________________________________________________________| |श्री शुक उवाच | तस्यां स पाश्चजन्यां वै विष्णूमायोपबृंहितं:| हर्यश्वसंज्ञानजनयद् विभू: ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राज,खरोखर विष्णूच्या मायाशक्तीने वृद्धिंगत झालेल्या त्या समर्थ दक्षप्रजापतीने पंचजननामक प्रजापतीच्या त्या कन्याचे ठिकाणी हर्यश्वनामक दहा हजार पुत्र उत्पन्न केले.||१|| भावार्थः---हे राजा,त्या दक्षाच्या सर्व पुत्रांचा आचार व स्वभाव हे सारखेच होते आणि प्रजासृष्टीविषयी पित्याने आज्ञा केली असतां,ते भगवंताचे आराधन करण्याकरीता पश्चिमदिशेस निघून गेले.||२|| भावार्थः---त्या पश्चिमदिशेस सिंधूनदी व समुद्र यांचा जेथे संगम झाला आहे तेथे मुनी व सिद्ध यांनी सेवन केलेल्या अतिविस्तीर्ण अशा नारायणसरोवरनामक तीर्थाच्या कांठी ते गेले.आपणही--जीवांनी पवित्र नदीचा व समुद्राचा संगम जेथे असेल तेथे देव प्राप्तीसाठी जाऊन व तेथे जाऊन निवास करावा.||३|| भावार्थः---आणि त्या तीर्थाच्या स्नानमात्रेकरूनच ह्या हर्यश्वाच्या अंतःकरणांतील रागादी मल अगदी नाहीसा झाला आणि त्यांना परमहंसधर्माविषयी मति उत्पन्न झाली.आपले--जीवाचे अंत:करण शुद्ध झाल्यानंतर सत्संग करून देव प्राप्त करून घ्यावा.||४|| भावार्थः---परंतु पित्याच्या आज्ञेने विवश झालेल्या त्या हर्यश्वांनी,उग्र तपच आचरण केले.तेव्हा प्रजेच्या वृद्धीकरीता उद्दुक्त झालेल्या त्यांना देवर्षी नारदाने अवलोकन केले||५|| भावार्थः---आणि भाषण केले की,हे हर्यश्वहो,ज्यामध्ये एकच पुरुष,आहे असे राष्ट्र व भूमीचा अंत अवलोकन न करिता तुम्ही प्रजापालक असूनही अज्ञानी असल्यामुळे प्रजा कशा उत्पन्न कराल?||६|| भावार्थः---व त्याप्रमाणे तुम्ही,जेथे बाहेर पडण्याचा मार्ग दृष्टीस पडत नाहीत असे बीळ,बहुरूपिनी स्त्री,जारीनिचा पति पुरुष,दोहोंकडून वाहणारी नदी,पंचवीस पदार्थांचे अद्भुत घर,विचित्र कथेने युक्त असलेला आज्ञा न जाणणारे तुम्ही सृष्टी कशी उत्पन्न कराल?||७-८|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,हर्यश्वांनी ते भाषण श्रवण केल्यानंतर स्वाभाविक विचारशक्तीने युक्त असलेल्या बुद्धीने,देवर्षींच्या भाषणरुपी कुटांचा त्यांनी स्वतःच विचार केला.आपण--जीवानी संत--महात्मा यांच्या उपदेशाचा विवेक--विचार करून,त्यानुसार जीवन व्यतीत करावे.||१०|| भावार्थः---आतां नारदाने सांगितलेल्या दहा वाक्यांचे अर्थ त्या हर्यश्वांनी विचारपूर्वक जे ठरविले तेच अनुक्रमाने दहा श्लोकांनी सांगतात-----हे राजा,भू म्हणजे आपल्या अनादीसंबंधास कारणभूत जे लिंगशरीर त्याच्या नाशाचा उपाय अवलोकन न करितां बंधहेतूभूत कर्माचा काय उपभोग होणार आहे ?||११|| भावार्थ:---तसाच षड्गुणैश्वर्यसंपन्न,स्वतःच्याच आराधाने असलेला आणि सर्वसाक्षी असा मायातील ईश्वर एकच आहे,तस्मात त्या नित्यमुक्त परमात्म्याला अवलोकन न करीता ईश्वराचेठिकाणी अर्पण न केलेल्या कर्मांनी पुरुषाला काय उपयोग होणार आहे?ईश्वराच्या ठिकाणी जे कर्म अर्पण केले नाही,त्या कर्मांनी संसारच--किंचित सुख व अपार दु:खच प्राप्त होतो,तर देव--सुखरूपता प्राप्त होत नाही.म्हणून आपण--जीवानी निष्काम कर्में करून ईश्वरालाच अर्पण करावें,करण त्यामुळे देव--सुखरूपता प्राप्त होते.||१२|| भावार्थः---तशीच ज्याची प्राप्ती झाली असतां पाताळांत गेल्याप्रमाणे पुरुष तेथून कशीही परतर येत नाही,ते ज्योतीरूप ब्रहम न जाणणाऱ्या पुरुषाला नश्वर अशा स्वर्गादिसाधनरूप कर्मांनी या जगतामध्ये काय उपयोग होणार नाही?म्हणून आपण--जीवानी निष्काम कर्मे व निष्काम उपासना करून ते निष्काम भावनेने ईश्वरास अर्पण करावे.यानंतर सत्संग करून जीव-ब्रह्मा-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून जन्म--मरण निवृत्त करावे.||१३|| भावार्थः---तशीच जारिणी स्त्रीप्रमाणे आपल्याला मोहक अशा रजआदिक---सात्विक,राजस,तामस गुणांनी युक्त असून अनेक रूपे धारण करणारी जी आपली बुद्धी तिचा नाश (विवेक)ज्याप्ला प्राप्त झाला नाही त्या पुरुषाला अंशात कर्मांनी इहलोकी काय उपयोग होणार नाही?म्हणून आपण--जीवानी सत्संग करून विवेक प्राप्त करून घ्यावा व त्याद्वारे सारासार--सार--असार यांचा निवडा करून असाराचा त्याग करून साराचा स्वीकार करावा.||१४|| भावार्थः---त्याचप्रमाणे त्या बुद्धीच्या संगाने स्वातंत्र्य नष्ट होऊन दुष्ट स्त्रीच्या पतीप्रमाणे तिच्या सुखदुःखरूप गतीला अनुभव घेणाऱ्या जीवाला न जाणणाऱ्या पुरुषाला इहलोकी विवेकरहित कर्मांनी काय उपयोग होणार नाही.म्हणून आपण जीवानी वेवेकारहित कर्मे करू नये,कारण विवेकरहित कर्मांनी संसाराच प्राप्त होऊन किंचित सुख तर अपार दु:ख प्राप्त होते.म्हणून आपण--जीवानी सत्संगसहित--विवेकसहित जीवन जगावे.||१५|| भावार्थः---तशीच सृष्टि व लय करणारी आणि संसाररूप प्रवाहामध्ये पडलेल्या जणांचे जे तपोविद्यादि निर्गम स्थान त्याच्या समीप त्याचा प्रतिबंध करण्याकरितां क्रोध,अहंकार,इत्यादिकांनी वेगयुक्त अशी जी तिच्या स्वरूपाचा विचार न करणारा जो पुरुष,त्याला मायिक कर्मांनी काय उपयोग होणार नाही?आपणास--जीवास सात्विक कर्म--तप,आत्म-विद्दा प्राप्त करून घेण्यासाठी काम,क्रोध,लोभ,मोह,मद--अहंकार,मत्सर-द्वेष हे दोष प्रतिबंध करितात.या दोषांच्या आहारी जाऊन जे कर्मे केले जातात त्याचा पारमार्थिक कार्यासाठी उपयोग न होता प्रतिबंध करितात.म्हणून आपण जे दोष आहे,त्यांचा त्याग करून पारमार्थिक कार्य केले असता पारमार्थिक कार्य होऊ शकते.||१६|| भावार्थः---तसाच पंचवीस तत्वांचा जो अंतर्यामी आश्चर्यकारक आश्रय आहे त्या अध्यात्मरूप ईश्वराला (देहादि कार्य व महतत्त्वांदि कारणे ह्यांच्या समुदायाच्या अधिष्ठात्याला) न जाणणाऱ्या पुरुषाला मिथ्या स्वातंत्र्याभिमानाने इहलोकी केलेल्या कर्मांनी कार्य उपयोग होणार आहे ?म्हणून आपण--जीवानी निष्काम कर्मे करून ती कर्मे ईश्वरास अर्पण करावी.निष्काम उपासना करून ईश्वरास अर्पण करावी. असे केले असता ती कर्मे आपणास--जीवास परमात्म्याकडे नेतात.त्या निष्काम कर्मांचा आपणास--जीवास उपयोग आहेत,तर सकाम कर्मे उपयोगी नाहीत.||१७|| भावार्थ:---तसेच चित्जडात्मक--आपण--जीव-वस्तूंचे ज्याने विवेचन केले आहे व जे बंध आणि मोक्ष ह्यांना दर्शविणारे आहे त्या ईश्वरप्रतिपादक शास्त्राचा अभ्यास न केल्यामुळे त्याविषयी अज्ञानाने युक्त असलेल्या पुरुषाला,बहिर्मुख कर्मांनी काय उपयोग होणार नाही?म्हणून आपण वेदातील जे अवांतर वाक्य आहेत,जी जीवाचे स्वरूप सांगतात,जी ईश्वराचे स्वरूप सांगतात,जी परमातम्याचे स्वरूप सांगतात,जी अज्ञानाचे--ज्ञानाचे स्वरूपे सांगतात,जी जगाचे स्वरूप सांगतात.आपण श्रवण करण्यासाठी सत्संग करावा.कांही महावाक्य आहेत,जी जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे प्रतिपादन करितात,त्यासाठी सत्संगाच करावा.असा हा संग आपल्या--जीवाचा कल्याण करणार आहे. ||१८|| भावार्थः---त्याचप्रमाणे तीक्ष्ण व सर्व जगताचे आकर्षण करणारे असे जे भ्रमनात्मक स्वतंत्र काळचक्र ते न जाणाऱ्यांना पुरुषाला दुष्ट कर्मांनी इहलोकी काय उपयोग होणार नाही?म्हणून आपण--जीवानी जे कर्म दुष्ट आहे,जेकार्म संसार वाढविणारे आहे,त्याचा त्याग करावा व जे कर्म परमात्म्याकडे नेणारे आहे,त्याचा स्वीकार करावा,ते कर्म सुखरुपतेकडे नेणारे आहे.||१९|| भावार्थ:---आणि शास्त्ररूप पित्याची निवृत्ती मार्गाच्या उपयोगार्थ असलेली निवृत्तीकारक आज्ञा जो पुरुष जाणत नाही,तो गुणमय प्रवृत्तिमार्गाचेठिकाणी विश्वास युक्त होऊन सृष्ट्यादी कर्माविषयीकसा प्रवृत्त होईल?म्हणून आपण--जीवानी संसाराची निवृत्तीकारक जी वाक्य आहेत,त्या वाक्याचा--उपदेशाचा स्वीकार करावा.जी प्रवृत्तीकारक--संसाराकारक वाक्य--उपदेश आहे,त्याचा त्याग करावा.||२०|| भावार्थ:---असो,हे राजा,एक विचाराने युक्त असलेल्या त्या हर्यश्वांनी ह्याप्रमाणे नारदवाक्यांचा निश्चय करून नारदाला प्रदक्षिणा केली आणि ते मोक्षमार्गास गेले.म्हणून आपण--जीवानी हर्यश्वांनी नारदांच्या उपदेशांचा स्वीकार करून निवृत्ती--मोक्षमार्गास सत्संग करण्याकरिता संत--महात्मा यांच्या आश्रमात गेले,त्याचप्रमाणे आपणही निवृत्ती--मोक्ष मार्गाचा स्वीकार करून सत्संग करण्याकरिता संत--महात्मा यांच्या आश्रमात जावे.||२१|| भावार्थः---इकडे तो नारदही स्वरब्रह्मामध्ये साक्षात्कार झालेल्या ऋषीकेशाच्या चरणकमली आपले एकाग्रचित्त स्थापन करून लोकांत संचार करूं लागला.||२२|| भावार्थः---नंतर सुस्वभावाने शोभणारे आपले पुत्र नारदाच्या योगाने धर्मापासून भ्रष्ट झाले असे श्रवण करून,दक्षप्रजापती शोक करीत अत्यंत ताप पावला.कारण,सत्पुत्र असणे हे एक शोकाचे स्थानच आहे.||२३|| भावार्थः---पुढे ब्रहमदेवाने त्याचे सांत्वन केले असतां त्या दक्षप्रजापतीने असक्रीयनामक भार्येचेठिकाणी पुनरपि शबलाश्वनामक हजारो पुत्र उत्पन्न केले.||२४|| भावार्थः---नंतर त्याही पुत्रांना प्रजोत्पादनाविषयी पित्याने आज्ञा केली असतां तेही आपले सर्वज्ञ भ्राते ज्याठिकाणी सिद्ध झाले होते त्या नारायणनामक सरोवराच्या कांठी ब्रह्मचर्यादि वृत ग्रहण करून तपश्चर्या करण्याकरिता निघून गेले.||२५|| त्या सरोवराच्या स्नानमात्रेकरून त्यांच्या अंत:करणातील रागादि मल अगदी नाहीसा झाला व त्या ठिकाणी परब्रहमरूप प्रणव मंत्रांचा जप करीत करीत त्यांनी मोठी तपश्चर्या केली.आपण जीवांनी त्या पुत्रासारखी म्हणजे परब्रह्मरूप प्रणव मंत्रांचा जप करावा.||२६|| भावार्थः---त्यांमध्ये प्रथमतः कांही महिने जलपान करून व पुढे कांही महिने वायूभक्षण करून त्यांनी पुढे सांगितलेल्या अर्थाच्या मंत्राचा जप करीत करीत मंत्राधिपती भगवंताचे आराधन केले.आपणही--जीवानी कांही दिवसांनी साधना करून प्रणव मंत्रांचा जप करावा.||२७|| भावार्थः---त्या मंत्राचा अर्थ असा की,-----विशुद्धचित्ताचा आश्रय करून राहणाऱ्या सर्वांतर्यामी व सर्वव्यापी परमहंस नारायणाचे आम्ही ॐकारपूर्वक नमस्कार करून ध्यान करितो.आपणही प्रणव-मंत्रांचा जप करून त्यानंतर परमहंस नारायणाचे ॐकारपूर्वक नमस्कार करून ध्यान करावे.||२८|| भावार्थः---हे राजेंद्रा,ह्याप्रमाणे सृष्टिची वृद्धी करण्याची इच्छा करणाऱ्या त्या शबलाश्वांनाही नारदमुनी येऊन पूर्ववत वाक्यसंबंधी कुटे घालून आणखीही असे भाषण केले की,-----------------||२९|| भावार्थः---हे दक्षपुत्रहो,तुम्ही उपदेश करणार्या माझे भाषण एकाग्रचित्ताने श्रवण करा.ते असे की,हे भ्रातृवत्सलहो,तुम्ही आपल्या ज्येष्ठबंधूचा मार्ग अवलोकन करा.||३०|| भावार्थ:---कारण,जो धर्मवेत्ता भाऊ,आपल्या भ्रात्यांच्या श्रेष्ठ मार्गाला अनुसरतो तो पुण्यवान पुरुष,भ्रातृवत्सल अशा मरुद्रुण--नामक देवांसहवर्तमान स्वर्गामध्ये आनंद पावतो.म्हणून आपण--जीवानी आपला जेष्ठ बंधू सात्विक असेल तर त्यांच्या साधनांचे अनुकरण करून त्यानुसार आचरण--अनुष्ठान केले तर आपणास--जीवास मरुद्रुण--नामक देवांसहवर्तमान स्वर्गात आनंद प्राप्त होतो.||३१|| भावार्थः---हें राजा,ह्याप्रमाणे यथार्थज्ञानी असा तो नारदमुनी त्यांना उपदेश करून निघून गेला व ते शबलाश्वांहि आपल्या ज्येष्ठबंधुच्याच मार्गाला अनुसरले.आपणही जसे शबलाश्वांहि अनुकरण केले,त्याप्रमाणे आपणही अनुकरण करावे.||३२|| भावार्थः---आणि गेलेल्या रात्री अशा फिरून माघाऱ्या येत नाहीत त्याप्रमाणे अंतर्मुख वृत्तीने प्राण होणारा जो परमेश्वराला चांगला योग्य मार्ग त्याप्रत गेलेले ते अद्यापि परत येत नाहीत.म्हणून आपण--जीवनी त्यांच्या मार्गाचे अनुकरण करावे,करण त्यामुळे आपणही संसाराच्या मार्गात परत येणार नाहीत--म्हणजेच त्यानंतर मोक्षरूप होउत.||३३|| भावार्थ:---असो.इकडे ह्या वेळी झालेले बहुत उत्पात अवलोकन करणाऱ्या दक्षप्रजापतीने,आपले पुत्र नारदाने पूर्वीप्रमाणे धर्मापासून भ्रष्ट केले असे वर्तमान ऐकिले.||३४|| भावार्थः---आणि पुत्रशोकाने अगदी मोहित झालेला तो दक्षप्रजापती नारदावर क्रुद्ध झाला.तेव्हा आपल्या पुत्रांची परमहंसधर्माविषयी झालेली निष्ठा श्रवण करून,दक्षही प्रायशः विरक्त होईल म्हणून त्या मजवर अनुग्रह करण्याकरितां त्याच्या समीप प्राप्त झालेल्या देवर्षी नारदाला अवलोकन करून तो दक्ष,ज्याचा अधरोष्ठ रोषाने स्फुरण पावू लागला आहे असा होत असतां,त्या नारदाला म्हणाला की,------------------------||३५|| भावार्थः---दक्ष म्हणाला-----हे साधो,साधू वेश धारण करणाऱ्या तूं आमच्या बालकांचे अकल्याण केले आहेस.कारण,ते स्वधर्मामध्ये प्रवृत्त झाले असता तूं त्यांना संन्याशाचा आश्रय मार्ग दाखविलास.||३६|| भावार्थः----आता मोक्षाला हेतुभूत असल्यामुळे संन्याशाचा मार्ग चांगलाच आहे हे खरे,प्रवृत्त ऋणत्रयाचे अपाकारण केल्यावाचून संन्याशाचा आश्रय केला तर तो मोठा अनर्थच होतो यास्तव हे पाप्या (नारदा)ब्रहमचर्यव्रत,पुत्रत्पोदन व यज्ञानुष्ठान यांच्यायोगेकरून ऋषी,पितर व देव यांच्या ऋणापासून जे मुक्त झाले नाहीत व ज्यांनी कर्मांचा विचार केला नाही,त्या माझ्या बालकांच्या,या लोकसंबंधी व परलोकसंबंधी क्ल्यानांचा तूं विघात केला आहेस.||३७|| भावार्थः---आणि बालकांच्या कोमळ मतीचा नाश करणारा असा निर्दय तूं,श्रीहरीच्या यशाचा नाशक असून त्याच्या पार्षदगणांमध्ये निर्लज्जपणाने कसा संचार करितोस?||३८|| भावार्थ:---अरे,खरोखर वैरभावरहित वैर करून त्यांच्या मित्रभावाचा नाश करणाऱ्या अशा तुझ्यावाचून इतर सर्व भगवद्भक्त,अनुग्रह करण्याविषयी अगदी तत्पर असतात आणि तुला तर प्राण्यांची अप्रिय करण्याविषयी लाज कशी वाटत नाही.||३९|| भावार्थ:---आता,वैराग्यापासून शांती प्राप्त होते व शांतीपासून प्राण्यांचा स्नेह्पाश तुटून जातो म्हणून ज्या दिवशी संन्यास ग्रहण करावा इत्यादी श्रुतीवाक्ये असल्यामुळे विरक्त पुरुषाला ऋणत्रयाचे आपाकारण करणे आवश्यक नाही,ह्यामुळे वैराग्याचा उपदेश करून मी तुझ्या पुत्रावर अनुग्रःच केला आहे असे तू,म्हणशील तर----हे नारदा तुला जरी असे वाटते तथापि ज्ञानावाचून केवळ अवधूतवेश धारण करणाऱ्या तू ह्याप्रमाणे जरी मती फिरवलीस तथापि पुरुषास वैराग्य कधीही उत्पन्न होणार नाही वैराग्यावाचून ज्ञान नाही व ज्ञानावाचून स्नेस्पाश तुटणार जाणार नाहीत.||४०|| भावार्थ:---कारण,विषय दु:खास कारण आहेत हे पुरुषाला अनुभव घेतल्यावाचून समजत नाही.तस्मात अनुभवाने ती गोष्ठ जाणून पुरुषाला स्वताच जैसे वैराग्य उत्पन्न होते तसे इतरांनी बुद्धीभेद केल्याने होत नाही.||४१|| भावार्थ:---असो ह्याप्रमाणे कर्ममर्यादेने वागणाऱ्या आम्हा सदाचार संपन्न गृहस्थाचे जे तू असह्य अप्रिय केलेस ते आम्ही तुझे सहनच केले आहे.||४२|| भावार्थ:---तथापि,हे संतानच्छेदका ज्याअर्थी तू आमचे अकल्याण केले आहेस म्हणजे आमच्या पुत्रांना स्थानापासून भ्रष्ट केले आहेस त्याअर्थी हेमुढा लोकामध्ये भ्रमण करणाऱ्या तुला कोठेही एकत्र निवास्थान प्राप्त होणार नाही.||४३|| |श्रीशुक उवाच | प्रतिजग्राह तब्दाढं नारद: साधूसम्मत: | एतावान् साधुवादो हि तितिक्षेतेश्वर: स्वयम् ||४४|| भावार्थ:---श्रीशुकाच्र्य म्हणाला----हे परीक्षित राजा,लोकामध्ये साधू म्हणन संमत अशा नारदमूनीने त्या दक्षाच्या शापाचा तथास्तु म्हणून स्वीकार केला,कारण स्वत: उलट शाप देण्यास समर्थ असताही सहन करणे हाच साधु-शब्दाचा अर्थ आहे.ज्यांच्यामध्ये सहनशीलता असते,त्यांनाच साधू--महात्मा असे म्हणतात.आपणही--जीवानी साधू होण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी सहनशीलता आपल्यात सद्गुण आनन्याचा प्रयत्न करावा.||४४|| |५----याप्रकारे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधामध्यें नारदपाशपथकनामक हा पांचवा(५)अध्यायात चौरेचाळीस(४४)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||५|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ______________________________________________________________________________ ६-----आता सहाव्या अध्यायामध्ये दक्षाने उत्पन्न केलेल्या साठ (६०) कन्येचेठिकाणी जे भिन्नभिन्न वंश झाले त्यांचे वर्णन व त्या वंशामध्ये अदितीच्या विश्वरूपाची उत्पत्ती झाली,हि कथा वर्णन केवली आहे. ______________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच | तत: प्राचेतसोऽसिक्न्यामनुनीत: स्वय्मभुवा | षष्टिं संजनयामास दुहितृ: पितृवत्सला: ||१|| भावार्थ:---श्रीशुकाच्र्य म्हणाला----हे राजा,नंतर ब्रहमदेवाने त्या,दक्षनामक प्रचेतस्पुत्राचे सांत्वन केले असता त्याने आपल्या "असिक्निनामक" भार्येचेठीकानी साठ कन्या उत्पन्न केल्या.त्या कन्या,प्रजाविरुध्द पित्याचा संकल्प पूर्ण करणाऱ्या झाल्या.||१|| भावार्थ:---त्यापैकी,धर्माला सहा,कश्यपाला तेरा,चंद्राला सत्तावीस,भूत अंगिरा आणि कृशाश्व ह्या प्रत्येकानं दोन-दोन आणि अवशिष्ट राहिलेल्या चार कन्या,तार्क्ष्यनामक धारन केलेल्या क्श्यपालाच त्याने अर्पण केल्या.||२|| भावार्थः---हे राजा,ज्यांच्या पुत्रपौत्रादिकांनी त्रैलोक्य भरून गेले आहे अशा ह्या आपल्या सहवर्तमान दक्षकन्यांनी नामे तूं मजपासून श्रवण कर.||३|| भावार्थः---हे राजा,१--भानू,२--लंबा,३--ककुभ्,४--जामि,५--विश्वा,६--साध्या,७--मरूत्वती,८--वसू,९--मुहूर्ता आणि--१० संकल्पा ह्या दहा(१०)धर्माच्या पत्न्या होत.आतां त्यांचे पुत्र श्रवण कर.||४|| भावार्थ:---हे राजा,भानूपासून "देवऋषभ" झाला व त्या देवऋषभापासून "इंद्रसेन" झाला.लंबेपासून "विद्योतनामक" पुत्र झाला व त्या विद्योतापासून "स्तनयित्नु" नामक पुत्र झाले.||५|| भावार्थः---ककुभेपासून "संकट",त्याच्यापासून "कीकटनामक" पुत्र तारू किटकापासून भूमीवरील "दुर्गाभिमानी--देव" उत्पन्न झाले.जामीपासून "स्वर्ग" व स्वर्गापासून "नंदीनामक" पुत्र उत्पन्न झाला.||६|| भावार्थः---विश्वेपासून "विश्वदेवनामक" पुत्र झाले,त्यांना पुढे संतती झाली नाही असे म्हणतात.तसाच साध्येपासून "साध्यनामक--गण" व त्यांच्यापासून "अर्थसिद्धीनामक" पुत्र उत्पन्न झाला.||७|| भावार्थः---मरुत्वतीचेठिकाणी "मरुत्वान" आणि "जयंत"असे दोन पुत्र उत्पन्न झाले.त्यांपैकी,जो "जयंत" तो वासुदेवाचा अंश असून त्याला "उपेंद्र" असे म्हणतात||८|| भावार्थः---तसेच "मुहूर्ताभिमानी--देवगण" मुहूर्तेपासून उत्पन्न जाहले व तेच प्राण्यांना आपआपल्या मुहूर्तमात्र कालापासून उत्पन्न जाहलेले फल देतात.||९|| भावार्थः---संकल्पेपासून "संकल्प--नामक" पुत्र झाला व त्यापासून "कामनामक" पुत्र उत्पन्न झाला असे म्हटले आहे.आतां वसूपासून जे "अष्टवसूनामक--आठ--पुत्र उत्पन्न झाले त्यांची नावे तूं मजपासून श्रवण कर.||१०|| भावार्थः---हे राजा,१--द्रोण,२--प्राण,३--ध्रुव,४--अर्क,५--अग्नि,६--दोष,७--वसू आणि ८ विभावसु हि त्यांची नावे असून त्यांपैकी द्रोणाच्या अभिमतीनामक पत्नीपासून "हर्ष","शोक" व "भय" इत्यादिक पुत्र उत्पन्न झाले.||११|| भावार्थः---प्राणाची "ऊर्जस्वतीनामक--भार्या"असून तिच्यावर "सह","आयु" व "पुरोजव" असे तीन पुत्र झाले.ध्रुवाच्या धरणीनामक भार्येला नानाप्रकारचे "नगराभिमानी--देव" झाले.||१२|| भावार्थः---तशीच अर्काची "वासनानामकभार्या" असून तिला "तर्षादीक" पुत्र झाले,अग्नीचीभार्या "वसोधारा" असून तिचेठिकाणी "द्रविणकवगैरे" पुत्र उत्पन्न झाले.||१३|| भावार्थः---त्याचप्रमाणे "स्कंद" हा कृत्तिकांचा पुत्र असून तो अग्नीचा पुत्र आहे.त्या स्कंदापासून "विशाखादिक" पुत्र उत्पन्न झाले.दोषाची भार्या शर्वरी असून तिचेठिकाणी श्रीहरिला अंश असा "शिशुमारनामक--पुत्र" उत्पन्न झाला||१४|| भावार्थः---तशीच "आंगीरसी" हि वसुची--भार्या (असून तिचेठिकाणी "विश्वकर्मा" हा "शिल्पाचार्य" पुत्र उत्पन्न झाला,त्या विश्वकर्म्यापासून "चाक्षुषनामक" मनु पुत्र उत्पन्न झाला.मनुपासून "विश्वेदेव" व "साध्यगण" हे पुत्र उत्पन्न झाले||१५|| भावार्थः---विभाववसुची "उषानामक--भार्या" असून तिचेठिकाणी "व्युष्ट","रोचिष" आणि "आतप" असे तीन पुत्र उत्पन्न झाले,त्यांतील आतपापासून ज्याच्यायोगाने सर्वप्राणी कर्माचेठिकाणी प्रवृत्त होतात असा पंचयाम--पांच प्रहरांनी युक्त असा "दिवसनामक--पुत्र" झाला म्हणूनच रात्रीला "त्रियामा" म्हणतात.कारण,अवशीच्या ३ घटिका (प्रदोष)व पहाटेच्या ५ घटिका (उष:काळ)यांस "दिवसांचे--अवयव" असे मानिले आहे||१६|| भावार्थः---त्याचप्रमाणे भूतनामक ऋषीची जी सरूनामक भार्या तिचेठिकाणी "कोट्यावधी--रुद्र" उत्पन्न झाले, १--रैवत,२--अज,३--भव,४--भीम,५--वाम,६--उग्र,७--वृषाकपि,८--अजैकपाट,९--अहिर्बृध्य,१०--बहुरूप,११--महान अशा अकरा(११) रूपांनी युक्त असलेल्या रुद्राची जे "भूत,प्रेत,विनायक इत्यादिक भयंकर पार्षद" ते त्या भूतऋषीच्या दुसऱ्या "भूतानामक--भार्येचेठिकाणी" उत्पन्न झाले.||१७-१८|| भावार्थः---तशाच अंगिरानामक प्रजापतीच्या एका स्वधानामक पत्नीने "पितरांचा" व दुसऱ्या सतीनामक पत्नीने "अथर्वागिरनामकवेदाचा-पुत्र" या नात्याने स्वीकार केला.||१९|| भावार्थः---कृशाश्वव ऋषीने आपल्या एका अर्चीनामक भार्येचेठिकाणी "ध्रुमकेशनामक--पुत्रास" व दुसऱ्या धिषणानामक--भार्येचेठिकाणी "वेदशिरस","देवल","वयुन" आणि "मनु" ह्या चार पुत्रांस उत्पन्न केले.||२०|| भावार्थः---तशाच तार्क्ष्य हे नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या विनता,कद्रू,पतंगी आणि यामिनी ह्या चार भार्या असून त्यांपैकी पतंगीचे--ठिकाणी "पक्षी",यामिनीचेठिकाणी "शलभ"("टोळ"),सुपर्णेचेठिकाणी विनतेचेठिकाणी)साक्षात यज्ञाधिपती विष्णूचे "वाहन-गरुड" व सूर्याचा--सारथी "अरुण" आणि कद्रूचेठिकाणी "अनेक--नाग"उत्पन्न झाले.||२१-२२|| भावार्थः---हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा,"कृत्तिकादिक सत्तावीस जी नक्षत्रे" ह्या चंद्राचया भार्या होत.परंतु त्यांपैकी रोहिणीचेठिकाणी चंद्राचे अतिशय प्रेम असल्यामुळे तो इतरांची उपेक्षा करीत असे म्हणून दक्षाचे क्रुद्ध होऊन त्याला शाप दिल्यामुळे तो क्षयरोगाने ग्रस्त झाला असतां,त्याला त्याचेठिकाणी अपत्ये प्राप्त झाली नाहीत त्या चंद्राचे जरी--------------||२३|| भावार्थः---त्या दक्षाला फिरून प्रसन्न करून घेतला तथापि कृष्णपक्षामध्ये क्षय पावणाऱ्या आणि शुक्लपक्षामध्ये वृद्धिंगत होणाऱ्या अशा सोळा कला मात्र त्याला प्राप्त झाल्या,अपत्ये प्राप्त झाली नाहीत.आतां हे राजां,त्यांच्या संततीपासून हे सर्वजग भरून गेले आहे त्या लोकमाता "कश्यपपत्नीची" कल्याणकारक नावे तूं श्रवण कर.हे राजा,१--अदिती,२--दिती,३--दनु,काष्ठा,५--अरिष्टा,६--सुरसा,७--इला,||२४-२५|| भावार्थः---८--मुनि,९--क्रोधवशा,१०--ताम्ना,११--सुरभि,१२--सरमा,१३--तिमी हि त्यांची तेरा(१३) नावे असून त्यांपैकी तीमिचेठिकाणी "जलचरगण" आणि सरमेचेठिकाणी "व्याघादी--वनचर प्राणी" भावार्थः---हे राजा गाई म्हशी व जे आणखी "पायांस दोन नख्या असणारे मेंढे बकरे वगैरे पशु" आहेत ते उत्पन्न झाले आणि तसेच ताम्रेपासून "श्यन व गृध इत्यादी क्रूरपक्षी" आणि मुनिपासून "अप्सरांचे समुदाय" उत्पन्न झाले आहेत.||२७|| भावार्थः---हे राजा,"दंदशुकादिक-सर्प" हे क्रोधवषेचे पुत्र होत,"सर्व--वृक्ष" इलेचे पुत्र होत,आणि "यातुधान-नामक राक्षसगण" हे सूरसेचे पुत्र होत.||२८|| भावार्थः---तसेच अरीष्ठेचे "गंधर्व" व काष्ठेचे "एकखुरांचे--अश्वधिक--पशु" हे पुत्र होत.आता दत्तुचे एकसष्ट पुत्र होत,त्यापैकी मुख्य मुख्य तू श्रवण कर.||२९|| भावार्थ:--हे राजा,"द्वीमुर्धा,शंभर,हयग्रीव,विभावसु,अयोमुख,शुकुशिरा,स्वभार्नु,कपिल,अरुण,पुमोला,वृषपर्वा,एकचक्र, अनुपातन,धुम्रकेश,विरुपाक्ष,विप्रचीत्ती आणि दुर्जय,हे अठरा पुत्र मुख्य" होत.||३०-३१|| भावार्थः---त्यापैकी स्वभार्नुच्या स्वप्रभानामक कन्येशी "नमुचीने" व वृषपर्व्याच्या "शर्मिष्ठानामक--कन्येशी" महाबलाढ्य "नहुषपुत्र--ययाति राजाने" विवाह केला.||३२|| भावार्थः---तसाच दनूचा "वैश्वानरनामक--पुत्र" होता त्याच्या उपदानवी,ह्यशिरा,पुलोमा व कालका अशा ज्या सुंदररूप संपन्न चार कन्या होत्या त्यांपैकी हे राजा,"हिरण्याक्षाने,उपदानवीशी","क्रतुने हयशीरेशी" व "भगवान कश्यपनामक--प्रजापतीने ब्रहमदेवाच्या आज्ञेमुळे "पुलोमा आणि कालका ह्या दोन्ही वैश्वानरकन्यांशी विवाह" करून घेतला.कश्यपाने वरीलेल्या त्या कन्यांचेठिकाणी पौलोम व कालकेय असो "निवाकवचनामक--साठहजार युद्धशाली दानव उत्पन्न" झाले.हे राजा,तुझा पितामह अर्जुन स्वर्गावर गेला होता तेव्हां इंद्राचे प्रिय करण्याकरितां त्याने एकट्यानेच त्या यज्ञविघातक आठहजार निवातकवचांचा वध केला.||३३-३४-३५-३६|| भावार्थः---त्याचप्रमाणे "विप्रचीती--नामक--दानवाने" "सिंहीकेचेठिकाणी" "ऐकशेएक(१०१) पुत्र" उत्पन्न केले त्यामध्ये ज्याला ग्रहत्व प्राप्त झाले तो "राहू--ज्येष्ठपुत्र" असून बाकीचे "केतूनामक--शंभर--पुत्र" त्यापेक्षा कनिष्ठ होते.||३७|| भावार्थः---हे राजा,आतां पुढे ज्यामध्ये "प्रभू--नारायण--देव",आपल्या अंशाने अवतीर्ण झाला असा जो "अदितीचा" वंश तो तूं मजपासून अनुक्रमाने श्रवण कर.||३८|| भावार्थः---१--विवस्वान,२--अर्यमा,३--पूषा,४--त्वष्टा,५--सविता,६--भग,७--धाता,८--विधात,९--वरुण,१०--मित्र,११--शुक्र आणि १२--उरुक्रम हे द्वादशादित्य होत.||३९|| भावार्थः---त्यांपैकी विवस्वानाच्या महाभाग्यवती संज्ञानामक भार्येला "श्राद्धदेवनामक मनु व यमदेव आणि यमुना हे जुळे अशी अपत्ये" झाली व तीच संज्ञास्त्री घोडीचे रूप धारण करून पृथ्वीवर गेली असता तिला "अश्विनी कुमार नामक दोन पुत्र" झाले.||४०|| भावार्थः---तशीच विवस्वानाची जी छायानामक दुसरी पत्नी तिला "शनैश्वर" व "सावर्णीनामक--मनु" हे दोन पुत्र आणि जिने संवरणनामक ऋषीला पति वरिले ती "तपतीनामक--कन्या" अशी तीन अपत्ये झाली.||४१|| भावार्थः---त्याचप्रमाणे "अर्यमानामक--आदित्याची" "मातृका" हि "पत्नी"होय,व त्या उभयंतांना कृताकृतज्ञानसंपन्न असे पुष्कळ--पुत्र झाले आणि त्या पुत्रांची सृष्टि झाली तिच्यामध्ये आपले पुर्वावर अनुसंधान राखण्याचे ज्ञान असल्यामुळे तिला ब्रहमदेवाने "मनुष्यजाती" कल्पिली आहे.||४२|| भावार्थः---तसाच पूषानामक आदित्य दक्ष प्रजापतीवर क्रुद्ध झालेल्या महेश्वरांस दांत बाहेर काढून हंसल्यामुळे जो "भग्नदंत" होऊन पिष्टभक्षण करणारा झाला असे पूर्वी मी तुला चतुर्थ स्कंधामध्ये सांगितलेच आहे,त्या पुषाला कांहीच संतति झाली नाही.||४३|| भावार्थः---तशीच दैत्यांनी कनिष्ठभगिनी जी रचनानामक कन्या ती "त्वष्ट्याची भार्या" असून त्या उभयंताना "संनिवेश" आणि "महापराक्रमी--विश्वरूप" असे दोन पुत्र झाले.||४४|| | तं वव्रिरे सुरगणा स्वस्त्रीयं व्दिषतामपि | विमतेन परित्यक्ता गुरुणाऽऽङ्गिरसेन यत् ||४५|| भावार्थः---तेव्हा देवांनी अवज्ञा केलेल्या बृहस्पती गुरूने त्यांचा त्याग केला होता तेव्हां शत्रूचा कन्यापुत्र अशाही त्याविश्वरुपाला देवांनी आपला गुरुत्वाविषयी वरिले होते.||४५|| ६---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील षष्ठ(६)स्कंधापैकी दक्षकन्या वंशकथननामक हा सहावा(६) अध्याय पंचेचाळीस(४५) श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीसदगुरूचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________ |७---आता या सातव्या अध्यायामध्ये बृहस्पती गुरूने त्याग केलेल्या देवांनी विश्वरूपाला पुरोहित होण्याविषयी वरिले असता त्याने ते पुरुहीतपणाचे कृत्य केले अशी कथा वर्णन केळवली आहे.||७|| _____________________________________________________________________________ | |राजोवाच | कस्य हेतो: परित्यक्ता आचार्येणात्मन: सुरा:| एतदाचक्ष्व भगवच्छिष्याणामक्रमं गुरौ ||१|| भावार्थ:---परीक्षित राजा म्हणाला---हे भगवान,आचार्य बृहस्पतीने आपल्या देवशिष्याचा त्याग कशाकरिता केला?कारण अपराधावाचून असे होण्याच्या संभाव नाही,यास्तव शिष्यांनी गुरूचा काय अपराध केला?हे तूम्ही मला कथन करा.||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे भरतकुलोत्पन्ना राजा,त्रीभूवाच्या ऐश्वर्यमदने ज्याने सन्मार्गाचे उल्लंधन केले आहे,मरुग्द्ण,अष्टवसू,एकदशरुद्र,द्वादशादित्य,ऋभुगण,विश्वदेव,साध्य आणि आश्विनीकुमार हे ज्याच्या सभोवती आहेत,सिध्द,चारण,गंधर्व,ब्रह्मवेत्ते,मुनी,विध्याधर,अप्सरोगण,किन्नर,पक्षी,आणिसभोवतीआहेत,सिध्द,चरण,गंधर्व, ब्रह्मावेत्तेमुनी,विध्याधर,अप्सरेच्या,किन्नर,पक्षी,आणि नाग हे ज्याची उत्तमरीतीने सेवा व गुणांची गायनपूर्वक स्तुती करीत आहेत,सभेमध्ये जो सिंहासनारूढ झाला आहे,चंद्रमंडलासारखे मनोहर असे श्वेतछत्र व इतरही चौऱ्या व विझणेवगैरे सार्वभौमचिन्हांनी जो युक्त आहे आणि आसनाच्या अर्धभागावर स्थित असलेल्या इंद्राणीसहवर्तमान जो अतिशय विराजमान होत आहे.||२-३-४-५-६|| भावार्थ:---त्या इंद्राने देव-दैत्यांनी पूजित,मुनिमध्ये श्रेष्ठ,स्वत:चा व देवाचे परमगुरु आणि सभेमध्ये प्राप्त झालेला अशा बृहस्पतीला अवलोकन करीत असताही जेव्हा प्रत्युथान व आसन योगाने त्याचा आदर केला नाही व जेव्हा आसनावर बसला असताही तो किंचित हलला सुद्धा नाही तेव्हा ऐश्वर्यमदापासून उत्पन्न झालेल्या विकार जाणणारा तो अंगिराऋषीचा पुत्र ज्ञानसंपन्न प्रभू बृहस्पती,एकाएकी तेथून निघून मुकाटयाने आपल्या घरी परत आला.आपण--जीवानी आपलेपेक्षा व विशेषकरून सदगुरू असतील तर त्यांचा आदरसत्कार विशेषरूपाने करणे आपले कर्तव्य आहे,त्यांचा अनादर आपल्याकडून--कानिष्टांकडून--शिष्यांकडून होऊ नये.त्यामुळे आपणावर--कानिष्टांवर त्यांची अवकृपा होऊन आपलेच--कानिष्टांचे--शिष्यांचे अहित होत असते.||७-८-९|| भावार्थ:---त्याचवेळी गुरूची हेलना झाली हे जाणून सभेमध्ये स्वत: आपणच आपली निंदा करू लागला की,-||१०|| भावार्थ:---अरेरे! मी केलेले कर्म अगदी अयोग्य आहे.कारण मी,मंदमतिने ऐश्वर्याच्या योगाने मत्त होवून सभेमध्ये गुरूचा तिरस्कार केला आहे.आपल्याकडून श्रेष्ठांचा अपमान होऊ नये,झाल्यास त्या कृत्याचा पश्चाताप आपणास--कनिष्टास--शिष्यास व्हावा.||११|| भावार्थ:---अहो ! जिच्यायोगाने सत्वगुणप्रधान अशा देवाचाही मी राजा असता,मला आज अहंकार प्राप्त झाला, त्या स्वर्गाधीपतीच्या लक्ष्मीची कोण ज्ञानी पुरुष इच्छा करील?कोणीही करणार नाही.आपणास--जीवास सदगुरुपेक्षा ||१२|| भावार्थ:---सिंहासनस्थ राजाने अभ्युत्थानवगैरे करू नये,असे वृद्धजन म्हणतात तर त्याविषयी म्हणतो की,-हे देवहो,सार्वभौम राजाच्या सिंहासनार आरूढ झालेल्याने कोणालाही प्रत्युथ्यन देवू नये,असे जे कोणी म्हणत असतील ते उतम धर्म जाणत नाहीत,कारण,कुलसंपन्न ब्राहमण अथवा सर्वव्यापी विष्णूचा भक्त येत असता त्याला पाहून,जो आसनावरून उठत नाही तो दु:खानी पिडीत होतो असे शास्त्र आहे.ह्याकरिता कुमार्गाचा उपदेश करून अधोभागी नरकामध्ये पडणाऱ्या त्या लोकांच्या वचनावर जे विश्वास ठेवितात तेसुद्धा पाषाणमय होडीमध्ये बसलेल्या लोकाप्रमाणे बुडून जातात.आपल्यापेक्षा--जीवापेक्षा जे विशेष श्रेष्ठ आहेत,ते म्हणजे सदगुरू,ईश्वर व शास्त्र यांच्या इतके श्रेष्ठ ब्रह्मांडात कोणीच नाही.राजा हा ईश्वराची उपाधी आहे,असे असले तरी त्या सार्वभौम राजाससुद्धा सदगुरू,ईश्वर,व शात्र त्याच्यापेक्षाही--राजापेक्षाही श्रेष्ठ आहे,म्हणून त्या सिंहस्थ--राजानेसुद्धा अभ्युत्थानवगैरे--आदरसत्कार--पूजा करावी,त्यांना आणण्याकरिता आपले सिंहासनाचा त्याग करून म्हणजे स्वत: उठून,ते जेथे आहेत,तेथे जाऊन,त्यांना साष्टांग दंडवत घालून आसनस्थ बसवून त्यानंतर आपण आसनस्थ व्हावे.सार्वभौम राजा असला त्याने याप्रमाणे कृती करावी,तर आपण--जीवानीसुद्धा त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक करावे,असे सांगण्याची गरज आहे का ? ||१३-१४|| भावार्थ:---तस्मात,गंभीरबुद्धीने युक्त असलेल्या त्या देवगुरु ब्राहमणाच्या चरणी मस्तक ठेवून मी त्याला निष्कपट भावनेने प्रसन्न करून घेईन.आपणसुद्धा--जीवानी आपणाकडून अशा प्रकारचा अपराध घडला असेल तर सदगुरुंच्या चरणी साष्टांग दंडवत करून निष्कपट भावनेने प्रसन्न करून घ्यावे,करण गरज हि आपली--जीवाची--कनिष्टांची असते,तर वरिष्ठांची नसते.||१५|| भावार्थ:---ह्याप्रमाणे तो इंद्र विचार करीत असता,भगवान्--ब्रहस्पति आपल्या सर्वोत्कृष्ट मायेच्या योगाने स्वगृहांतूनही अंतर्धान पावले.||१६|| भावार्थ:---नंतर आपला गुरु कोठें आहे याचा शोध करून पाहत असतांही जेव्हां त्या भगवान्--देवाधीपती इंद्राला त्याचा पत्ता लागेना तेव्हा तो इंद्र,असुरापासून आमचे रक्षण कसे होईल ह्याविषयी देवासहवर्तम,बुद्धिपूर्वक विचार करीत असताही त्याच्या मनाला स्वस्थता वाटेना.||१७|| भावार्थ:---इतक्यामध्ये तो वृत्तांत श्रवण करीतच दुर्मद असे सर्व असुर,शुक्राचार्याची संमती घेवून व शस्त्राचे धारण करून देवाबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले.||१८|| भावार्थ:---नंतर त्यांनी टाकीलेल्या तीक्ष्ण बाणाच्या योगाने ज्यांची मस्तके,मांड्या व बाहु हि फुटून गेली आहेत असे ते देव,इंद्रासहवर्तमान मानखाली घालून ब्रहमदेवाला शरण गेले.||१९|| भावार्थ:---त्या वेळी भगवान अयोनिसंभ ब्रहमदेव,तशाप्रकारे पिडीत झालेल्या त्या देवांना पाहून,मोठ्या कृपेने त्यांचे सात्वन करीत करीत असे म्हणाले की,------------------------------||२०|| भावार्थ:---ब्रहमदेव म्हणाले----अरेरे ! सूरश्रेष्ठहो,तुम्ही ऐश्वर्याच्या मदाने,इंद्रियदमन केलेल्या ब्रहमज्ञानी ब्राहमणाचा अनादर केलात,हे तुमचे करणे फारच वाईट झाले आहे.आपल्याकडून ब्रह्मज्ञानी ब्राह्मणांचा अनादर होऊ नये,कारण यांच्याकडे जे ज्ञान आहे,त्या ज्ञानाद्वारे आपले जन्म-मरण निवृत्त होऊन सुखरपरुता प्राप्त होते.म्हणून त्यांच्यावर आपली जवाची श्रद्धा--आदर असावा.||२१|| भावार्थ:---तस्मात हे देवहो,तुम्ही समृध्द असूनही तुम्ही स्वत: ज्यांना मारणारे आहात त्या तुमच्या क्षीण झालेल्या शत्रूपासून जो तुमचा पराभव झाला हे त्या अन्यायाचेच फळ होय.आपल्याकडून जिवाकडून सदगुरुंचा अनादर झाला की,त्या अनादाराचे फळ जे दु:खरूप आहे,ते भोगावेच लागते.||२२|| भावार्थ:---ह्याप्रमाणे सांगून गुरूचा तिरस्कार आणि सत्कार हेच अनुक्रमे क्षयवृद्धीला कारण आहेत हे असुरांच्या दृष्टाताने सांगतो की,हे इंद्र,गुरूचा तिरस्कार केल्यामुळे अगदी क्षीण झालेल्या व साप्रन्त्काली त्या शुक्रचार्याचीच भक्तिपूर्वक सेवा करून समृध्द झालेल्या ह्या शत्रूकडे तू पहा!अरे फार तर काय परंतु आपल्या शुक्रगुरुला देवतेसमान मानणारे हे असुर,आज माझेही स्थान ग्रहण करतील.देवतांनी सदगुरुंचा अनादर केला म्हणून त्यांचा पराभव झाला,व असुर यांनी सदगुरुंचा आदर--सन्मान केला म्हणून त्यांचा विजय प्राप्त झाला.म्हणून आपण--जीवानी नेहमी सदगुरुंचा आदर करावा,तर अनादर करू नये.||२३|| भावार्थ:---अभेध्यमंत्राने युक्त असलेले ते शुकचार्याचे शिष्य (असुर) या वेळी स्वर्गाची गणना तरी करीत आहेत काय?नाहीच करीत परंतु ब्राहमण,गोविंद--ईश्वर आणि गाई हि,ज्यांच्यावर अनुग्रह करणारी आहेत त्या श्रेष्ठ पुरुषांचे मात्र अकल्याण होत नाही,इतरांचे होते.म्हणून आपण ब्राह्मण,ईश्वर,व गायी यांच्याविषयी श्रद्धा--आदर-सन्मान असावा,त्यामुळे आपले--जीवाचे कल्याण होते.||२४|| भावार्थः---यास्तव हे देवहो,जितेंद्रिय,तपस्वी आणि आत्मज्ञानसंपन्न असा जो त्वष्ट्याचा पुत्र "ब्राहमण--विश्वरूप" आहे,त्याच्याकडे तुम्ही आताचं सत्वर गमन करा आणि त्याचा सत्कार करून त्याला गुरु करून घ्या.म्हणजे तो तुमचे मनोरथ पूर्ण करील.परंतु तुम्ही जर त्यांचे असुर पक्षपातरूप कर्म सहन कराल तरच हे घडेल.म्हणून आपण ब्राह्मण जो ब्रह्मज्ञानी आहे,त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करावा.त्यांचा आदर-सत्कार करा,त्यामुळे ते प्रसन्न होतील व तुमचे कार्य पार पाडतील. ||२५|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,याप्रमाणे ब्रहमदेवाने आज्ञा केलेले ते देव,चिंतारहीत होऊन,त्या विश्वरूप ऋषीजवळ जाऊन व त्यांस आलिंगन देऊन असे म्हणाल की,------------------------||२६|| भावार्थः---देव म्हणाले---बा विश्वरूपा,तुमचे कल्याण असो.आम्ही तुमच्या आश्रमाप्रत अतिथी प्राप्त झालो आहे या करीता या समयी योग्य असलेला मनोरथ तूंम्ही पूर्ण करावा.||२७|| भावार्थः---हे ब्रहमनिष्ठा,जे सत्पुत्र आहेत ते जरी पुत्रवंत असले तथापि पितरांची शुश्रुषा करणे हाच त्यांचा उत्कृष्ट धर्म होय.तेव्हा,तुम्हांसारखा ब्रहमचारी पुत्रांचा हाच धर्म आहे ह्यांत काय सांगावयाचे आहे?||२८|| भावार्थः---याप्रमाणे सांगून अतिथी पितर ह्यांची प्रशंसा करण्याकरीता देव पुन्हा म्हणतात की,----आचार्य हि वेदाची मूर्ती,पिता ब्रहमदेवाची मूर्ती,भ्राता इंद्राची मूर्ती,माता हि साक्षात पृथ्वीची मूर्ती,भगिनी दयेची मूर्ति,अतिथी हि साक्षात धर्माची मूर्ती,अभ्यागत मूर्ती आणि सर्वभुते हि ईश्वराची मूर्ती होय.||२९-३०|| भावार्थः---तस्मात् बा विश्वरूपा,पिडीत झालेल्या आम्हां पितरांची शत्रूजन्य पराभवरूप पीडा तूंम्ही आपल्या तपाने दूर करण्याकरीता आमच्या आज्ञेचा अंगीकार करण्यास योग्य आहात.||३१|| भावार्थः---ती आज्ञा अशी की,---हे विश्वरूपा,तूं ब्रह्माज्ञानी व ब्राह्मण असल्यामुळे आम्ही तुम्हाला गुरुस्थानी उपाध्याय वरितो म्हणजे तुमच्या तेजाच्या योगाने आम्ही अनायासे आपल्या शत्रूंना जिंकून टाकुं.||३२|| भावार्थः---आता तुमचे उपाध्ययत्व स्वीकारलेले असतां मजकनिष्ठाला तुम्ही अभिनंदन कराल आणि ते तर निंद्य आहे असे म्हणाल तर---हे ब्रह्मनीष्ठा,प्रयोजननिमित्त ज्येष्ठांनी पादाभिवंदन केले असतां ते निंद्य आहे असे वृद्धजन मानीत नाहीत,आणि त्यांतूनही मंत्राहून अन्यत्रठिकाणी वय हे ज्येष्ठत्वाचे कारण आहे,मंत्राविषयी नाही.याकरितां आम्हांला मंत्र सांगणारे या नात्याने तूंम्हीच आमचे ज्येष्ठ आहात.आपले कार्य करणारा ज्येष्ट असतो,म्हणून आपण ज्येष्ठ आहात.||३३|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---ह्याप्रमाणे देवगणांनी उपाध्यायत्वाविषयी त्या महातपस्वी विश्वरुपाची प्रार्थना केली असतां,तो प्रसन्न झाला आणि मधुरवाणीने त्यांना असे म्हणाला की,-------------||३४|| भावार्थः---हे नाथहो,उपध्यायत्व हे वृद्धिंगत झालेल्या ब्रहमतेजाचा व्यय करणारे असल्यामुळे लोकांनी निंद्य मानिले आहे.परंतु आपल्यासारिखा लोकनाथांनी त्याविषयी याचना केली असतां मजसारिखा आपला शिष्य ते कर्मे नाकारिल ?कारण,'तुमच्यासारख्याचे वचन अमान्य करणे हाच शिष्याचा पुरुषार्थ आहे'असे शास्त्रवेत्ते म्हणतात.||३५|| भावार्थः---आतां उपाध्ययत्वाचा योगाने द्रव्यलाभ झाला असतां त्यापासून धर्म होईल नाही तर निर्धन पुरुषाचा धर्म कोठून होणार?म्हणूनच उपाध्यायपणाच्या योगाने लोकांला हर्ष होतो असे म्हणाल तर------हे देवहो,द्रव्यहीन तस्वीजणांचे धन म्हटले म्हणजे शिर्लेच्छन--शिल म्हणजे शेतामध्ये धन्याने उपेक्षा केलेल्या धान्याच्या कणसांचे ग्रहण करणे यास "शिल" असे म्हणतात.उंछ्न म्हणजे बाजार-वगैरे-ठिकाणी पडलेल्या धान्याचे कण वेचून घेणे यास "उंछ्न" असे म्हणतात.त्या द्रव्याने गृहस्थाश्रमामध्ये साधूंची सत्कर्मे आचरण करणारा जो मी तो,ज्याच्यायोगाने दुर्मति जन हर्ष पावतो.ते निंद्य उपाध्यायत्व (मनापासून)कसे बरे स्वीकारीन ?स्विकारणारच नाही.||३६|| भावार्थः---असे जरी आहे तथापि तुमचे म्हणणे मी अमान्य करीत नाही.कारण,आपले गुरूंचे मागणे अगदी अल्प आहे याकरिता मी अर्थ व प्राण ह्यांच्यायोगाने आपले सर्व मागणे परिपूर्ण करीन.||३७|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,त्या महातपस्वी विश्वरूपाने ह्याप्रमाणे त्यांना वचन दिले.तेव्हा त्यांनी त्याला वरिले असतां त्याने दीर्घ प्रयत्नाने त्यांचे उपाध्यायत्व केले.||३८|| भावार्थः---ते असे कि,त्या समर्थ विश्वरूपाने,शुकाचार्याला विद्येने रक्षित असलेली देव-द्वेषी असुरांची जी संपत्ति ती,नारायणकवचात्मक वैष्णवविद्येच्या योगाने बलात्काराने त्यांपासून हिरावून घेऊन इंद्राला अर्पण केली.महातपस्वी विश्वरूपाने,शुक्राचार्याने रक्षित असलेली,देवाचीच असलेली व असुरांनी बळकवलेली,संपत्ती नारायणकवचात्मक वैष्णव-विद्देच्या योगाने बलात्काराने हिरावून घेऊन इंद्राला अर्पण केली म्हणजेच ज्यांची होती,त्यांनाच अर्पण केली.ज्याची-त्याचीच असलेली संपत्ती ज्यांची--त्यांनाच अर्पण करणे स्वधर्म आहे,न्यायकारक आहे.आपणही--जीवानी असेच न्यायाकारक कार्य करावे.||३९|| | यया गुप्त: सहस्त्राक्षो जिग्येऽसूरच मुर्विभू: | तां प्राह स महेन्द्राय विश्वरूप उदारधी: ||४०|| भावार्थः---म्हणजे जिच्यायोगाने सुरक्षित झालेल्या प्रभू-इंद्राने दैत्यांच्या सैन्यांचा पराभव केला ती नारायणकवचरूप वैष्णवी विद्या इंद्राला त्या उदारबुद्धी विश्वरूपाने सांगितली.आपल्याकडे न्यायाची विद्दा असेल तर इतरांना देण्यास हरकत नाही,पण अन्यायकारक असलेली विद्दा देऊ नये.||४०|| ७---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील षष्ठ(६)स्कंधापैकी विश्वरूपकृत पौरोहित्यस्वीकारकथननामक हा सातवा(७) अध्याय चाळीस(४०)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.|| ______________________________________________________________________________ ८-----आतां या आठव्या अध्यायामध्ये विश्वरूपाने इंद्राला नारायनात्मक कवच सांगितले व त्याच्यायोगाने सुरक्षित झालेल्या इंद्राने,दैत्याचा पराभव केला,अशी कथा वर्णन केलेली आहे.||८|| |८---- नारायण कवचाचा उपदेश ______________________________________________________________________________ |राजोवाच | यया गुप्त: सहस्त्राक्ष: सावाहन् रीपुसैनिकान्| क्रीडन्निव विनीर्जित्य त्रिलोक्य बुभुजे श्रियम्||१|| भावार्थः---राजा म्हणाला---हे भगवन,ज्याच्यायोगाने सुरक्षित झालेल्या इंद्राने वाहनासहवर्तमान शत्रूंच्या सेनाधिपतीचा खेळल्यासारखा सहज पराभव करून त्रैलोक्यासंबंधी ऐश्वर्याला उपभोग घेतला ते नारायणात्मक कवच मला सांगा व ज्या दुसऱ्या साहायभूत सेनाधिपतीने रक्षित झालेल्या इंद्राने युद्धामध्ये शस्त्रपाणि शत्रुंचा पराभव केला आणि तो ज्या प्रकाराने केला व ते सर्वही मला सांगा.||१--२|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,पुरोहित म्हणून वरीलेला त्वष्टयाचा पुत्र जो विश्वरूप त्याने,प्रश्न करणाऱ्या इंद्राला जे नारायणनामक कवच सांगितले आहे ते तूं आतां एकाग्र-मनाने मजपासून श्रवण कर.||३|| भावार्थः---विश्वरूप म्हणाला----हे महेंद्रा,कोणीही पुरुषास भय प्राप्त झाले असतां त्याने हस्तपादप्रक्षालनपूर्वक आचमन करून,हातांत पवित्रक धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे,आणि विष्णूच्या अष्टाक्षर व द्वादशाक्षर मंत्रांनी "अंगन्यास"म्हणजेच आपल्या उजव्या तळहाताचा--पांच बोटाचा स्पर्श हृदयास करणे,उजव्या हाताच्या तळहाताचा पांच-बोटासहित डोक्याला स्पर्श करणे,उजव्या हाताच्या तळहाताच्या पांचीबोटाचा स्पर्श शिखास--शेंडीस करणे,डाव्या तळहाताच्या बोटांने उजव्या खांद्यास स्पर्श करणे व उजव्या तळहाताचा बोटांने डाव्या खांद्यास स्पर्श करणे,अंगठ्याजवळील तीन बोटांनी दोन्ही डोळे व कपाळास स्पर्श करणे,उजव्या हाताच्या पांच बोटांनी उजव्या कानापासून सुरवात करून उजव्या कानापर्यंत पूर्ण प्रदक्षिणा करणे,उजव्या हाताच्या तळव्याने डाव्या हाताच्या तळव्याच्या हातावर टाळी वाजविणे म्हणजेच एकमेकांना स्पर्श करणे,यांस "अंगन्यास" असे म्हणतात. व "करन्यास"म्हणजे तर्जनीचा अंगठ्यास स्पर्श करणे,अंगठ्याने तर्जणीस स्पर्श करणे,अंगठ्याने मध्यमाला स्पर्श करणे,अंगठ्याने अनामिकाला स्पर्श करणे,अंगठ्याने कनिश्ष्ठिकेला स्पर्श करणे,उजव्या तळव्याच्या हाताने डाव्या तळव्याच्या हाताला स्पर्श करणे,उजव्या तळव्याच्या पृष्ठ भागास डाव्या तळव्याच्या पृष्टभागास स्पर्श करणे,डाव्या तळव्याच्या पृष्ठभागास उजव्या तळव्याच्या पृष्ठभागास स्पर्श करणे,या सर्वांना "करन्यास" असे म्हणतात.मौनव्रतधारणपूर्वक शुचिर्भूत व्हावे.नंतर आपल्या शरीराचेठिकाणी नारायणमय--कवच बांधावे,ते असे की,"ॐनमो नारायणाय" ह्या अष्टाक्षरमंत्रांतील,प्रणवसंपुटीत अशा ॐकारादि एकेक अक्षराचा अनुक्रमाने पाय,गुडघे,मांड्या,उदर,ह्रदय,उर,मुख आणि मस्तकाचे ठिकाणी "न्यास"म्हणजे स्पर्श करणे.अथवा एकेक अक्षराचा मस्तकापासून पायापर्यंत "विपरीतक्रमाने"मस्तक,मुख,उर,हृदय,उदार,मांड्या,गुडघे,पाय,असा न्यास--स्पर्श करावा. ||४-५-६|| भावार्थ:----नंतर "ॐ नमो भगवते वासुदेवाय" ह्या द्वादशाक्षर मंत्राने अंगुली अंगुष्ठ्पुर्वे ह्यांचेठिकाणी ॐकारापासून यकरापर्यंत बारा अक्षरांनी करन्यास--स्पर्श करावा म्हणजे ॐकारादिक एकेक अक्षरांचा अनुक्रमाने दक्षिण-उजव्या तर्जनीपासून वाम-डाव्या तर्जनीपर्यंत अंगुलीचे--बोटांचे ठिकाणी न्यास--स्पर्श करून अवशिष्ठ राहिलेल्या चार अक्षरांचा अगुष्ठांच्या पहिल्या व शेवटच्या पर्वाचेठिकाणी न्यास करावा.||७|| भावार्थ:----नंतर "ॐ विष्णवे नम:"या मंत्रातील "ॐ"काराचा हृदयाचेठिकाणी,नंतर "वि"काराचा मस्तकाच्याठिकानी, "ष"कराचा भ्रुमध्याचेठिकाणी,"ण"कराचा शिखेचे--शिंडीच्या ठीकानी "वे"काराचा नेत्रांचेठीकानी,व "न"काराचा सर्वसंधीचे-ठीकानी न्यास--स्पर्श करावा आणि फंडत अशा सविसर्ग मकाराचा सर्वदिशांचे-ठिकाणी निर्देष करावा म्हणजे ॐम: अस्त्रायफट्---उजव्या कानापासून डाव्या कानापर्यंत पूर्ण बोटांने प्रदक्षिणा करून उजवा हाताची बोटे,डाव्या तळहातावर टाळी वाजविणे.इति दिग्बंध:’असे म्हणून दिग्बंधन करावे,म्हणजे तो ज्ञानी मंत्रमूर्ति होतो.तो मंत्र "ॐ विष्णवे नम:"असा होय.||८-९-१०|| भावार्थः---नंतर विद्दा,तेज आणि तप हि ज्यांची मूर्ति आहे व जो ऐश्वर्यादीक--यश,श्री,ओदार्य,ज्ञान,वैराग्य,ऐश्वर्य, सहा शक्तीनि युक्त आहे,त्या ईश्वररूप परमात्म्याचे ध्यान करावे आणि नंतर ह्या पुढील नारायणकवचनामक मंत्राचा पाठ करावा.||११|| भावार्थ:---तो असा की,------ज्याने गरुडाच्या पृष्ठभागावर आपली चरणकमले ठेविली आहेत,ज्याला आठ भूज आहेत,जो शंख,चक्र,ढाल,तलवार,गदा,बाण,धनुष्य,आणि पाश यांना धारण करणारा आहे व जो अणिमादि आठ ऐश्वर्यानि युक्त आहे तो श्रीहरी,माझे रक्षण करो व आकाशामध्ये विश्वरूपी त्रिविक्रम,माझे रक्षण करो.||१३|| भावार्थ:---तसाच जो महान अट्टहास करीत असता दशदिशा नदीत झाल्या व असुरस्त्रियाचे गर्भ पतन पावलो तो हिरण्यकशिपूच शत्रू समर्थ नृसिह,अरण्य व युद्धप्रसंग इत्यादी संकटस्थानामध्ये माझे रक्षण करो.||१४|| भावार्थ:---तसाच,ज्याने आपल्या द्रष्ठेच्या योगाने पृथ्वीचा उद्धार केला आहे व ज्याच्या अवयवांनी अज्ञाचे निरुपण करितात तो वराहरूपी परमात्मा,मार्गामध्ये माझे रक्षण करो.गीरीशिखाराचेठिकाणी परशुराम आमचे रक्षण करो आणि देशांतरामध्ये लक्ष्मणसहवर्तमान असणारा भरताग्रज दाशरथी रामचंद्र आमचे रक्षण करो.||१५|| भावार्थ:---त्याचप्रमाणे अभिचारादिरूप भयंकर धर्म आणि सर्वप्रसाद ह्यापासून श्रीनारायण माझे रक्षण करो,गर्वापासून नर,माझे रक्षण करो,योगभ्रंशापासून योगनाथ असा दत्तात्रेय माझे रक्षण करो व कर्मबंधापासून सर्वगुणांचा अधिपती कपिलमहामुनी,माझे रक्षण करो.||१६|| भावार्थ:---तसेच मदनापासून सनत्कुमार,मार्गामध्ये घडत असलेल्या देवांच्या(त्यांना नमस्कार न करिता पुढे जाणे इत्यादी )अवज्ञेपासून हयग्रीव,देव पुजासंबंधी अपराधापासून देवर्षीश्रेष्ठ नारद आणि सकल नरकापासून कुर्म्रूप धारण करणारा श्रीहरी,माझे रक्षण करो.||१७|| भावार्थ:---अपथ्यापासून भगवान धन्वंतरी,शीतोष्णादी भयापासून इंद्रियदमन करणारा ऋषभ योगी,लोकापवादा-- पासून यज्ञामुर्ती परमात्मा,लोकांपासून होणाऱ्या घातापासून बलराम आणि क्रोधादिन असलेल्या सर्पगणापासून शेष माझे रक्षण करो.||१८|| भावार्थ:---अज्ञानापासून भगवान वेदव्यास,पाखंडसमुदाय आणि प्रमाद ह्यांपासून बुद्ध आणि काळाच्या मलरूपी कलीपासून धर्मरक्षण करण्याकरिता ज्याने मोठा अवतार धरण केला आहे तो "भगवान--कल्की" माझे रक्षण करो.||१९|| भावार्थ:---तसाच,प्रात:काळी पांच घटिका दिवसपर्यंत गदेच्या योगाने केशव,पुढे दहाघटीका दिवसपर्यंत हातामध्ये मुरली धारण करणारा गोविंद,पुढे पंधरा घटिका दिवसपर्यंत शक्तिआयुद्ध धारण करणारा नारायण,पुढे मध्यान्हकाली वीस घटिका दिवस पर्यंत हस्तामध्ये चक्र धारण करणारा विष्णू,||२०|| भावार्थ:---पुढे अपराह्ण--सांयकाळ पंचवीस घटिका दिवसपर्यंत भयंकर असे शाड्यर्ग--नामक धनुष्य धारण करणारा देव मधुसूदन,त्यानंतर सायंकाळी तीस घटिका दिवसपर्यंत ब्राहमदित्रिमूर्ती धारण करणारा माधव माझे रक्षण करो.||२१|| भावार्थ:----नंतर उत्तर रात्रीच्या वेळी म्हणजे सव्वीस घटिका रात्रपर्यंत,ज्याच्या वक्ष:स्थाचेठीकानी श्रीवत्सलांच्छन चिन्ह आहे तो ईश्वर सूर्योदयापासून श्रीदामोदार आणि दिवसाच्या व रात्रीच्या संधीच्या वेळी(सकाळी व संध्याकाळी भगवान कालमूर्ती,विश्वेश्वर माझे रक्षण करो.||२२|| भावार्थ:---हे सुदर्शनचक्रा,तुझी धाव प्रलयकाळाच्या अग्निसारखी तीक्ष्ण आहे भगवंताने प्रेरणा केलेले तू आमच्या सभोवती भ्रमण करीत करीत,जसा वायूच्या सहाय्याने युक्त असलेला अग्नी,वाळून गेलेल्या गवताला सत्वर जाळून टाकितो त्याप्रमाणे तू आमच्या शत्रुसैन्याला सत्वर जाळून टाक.||२३|| भावार्थ:---हे गडे,तुझ्या ठीनग्याचा स्पर्श व्रजासारखा असह्य आहे आणि तू अच्युतला प्रिय आहेस व मीही अच्युताचा दास आहे,म्हणून तू माझ्या कुश्मांड,वैनायक,यक्ष,राक्षस,भूत व ग्रह्य ह्या शत्रूचे तू अतिशीघ्र चूर्ण कर,चूर्ण कर.||२४|| भावार्थ:---हे पांचजन्यनामक शंख,कृष्णाने आपल्या मुखावायुने तुला पुरीत केले असता,तू भयंकर शब्द करून आमच्या शत्रूच्या हृदयांना कांपवित असता यातुधान,प्रथम,प्रेत,मातृगन,पिशाच,ब्रहमराक्षस,आणखीहि जे कोणी घोरदृष्टीने युक्त असतील त्या सर्वाना पळवून लाव.||२५|| भावार्थ:---हे तीक्ष्णधारेने युक्त अशा श्रेष्ठ खड्ग,ईश्वराने प्रेरित असे तू माझ्या शत्रूच्या सैन्याचा छेद कर.हे ढाले चंद्राकार शंभर मन्दाळणी युक्त अशी तू माझ्या पापी शत्रूच्या नेत्राच्या आच्छादन कर व उग्र दृष्टीलोकाचे नेत्र हरन कर.||२६|| भावार्थ:---हे भगवान ज्या सुर्यादिक ग्रहापासून,उल्कापातादी केतुपासून,दुष्ट लोकापासून,सर्प वृश्चिककापासून,उग्र दंष्ट्रानी युक्त अशा व्याघ्रसिहांदि श्वापदापासून,भूतप्रेतादिकापासून आणि पातकापासून आम्हाला जी जी भये प्राप्त झाली आहेत.||२७|| भावार्थ:---ती सर्व भये,आणि ते आमच्या इष्ठ सिद्धीला अडथळे आणणारे यक्ष राक्ष्सादिक असतील ते सर्वही तुझ्या नावाच्या रूपाच्या त्याचप्रमाणे स्त्रोतानी(बृह्द्रथरादिक समानी)स्त्विलेली जो वेद्मुत्री प्रभू भगवान गरुड,तो माझे सर्व संकटापासून रक्षण करो व विश्वेक्सेननामक मुख्य पार्श्धी आपल्या नावानी माझे सर्व संकटापासून रक्षण करो.||२९|| भावार्थ:---तशीच श्रीहरीचे नामे,रूपे,वाहने व आयुधे हि,आमच्या बुद्धी,मन आणि प्राण ह्यांचे सर्वसंकट तपासून रक्षण करोत व भगवंताचे मुख्य पार्षद आमचे रक्षण करो.||३०|| भावार्थ:---तसेच मुर्तामुत असे जे जगत ते सर्व वस्तुत: भगवानच आहे असे जर यतार्थरीतीने सत्य असेल तर ह्या सत्याच्या योगाने आमचे सर्व उपद्रव नाश पावोत.||३१|| भावार्थ:---ज्या प्रकाराणे सर्वत्र एकरूप आत्मस्वरूपाचे वारंवार चिंतन करणाऱ्या ज्ञानी पुरुषांना ईश्वर,स्वत: भेदरहित असताही आपल्या मायेच्या योगाने भूषणे,आयुधे,मूर्ती व नामे ह्या शक्ती धारण करीत आहेत असे भासते,हे जर यथार्थ असेल तर त्याच सत्यभूत प्रमाणाच्या योगाने सर्वज्ञ व सर्वगत असा भगवान श्रीहरी आपल्या सर्वस्वरुपांनी आमचे सर्वठिकाणी आमचे रक्षण करो.||३४|| भावार्थ:---हे इंद्रा,मी तुला हे नारायनात्मक कवच सांगितले आहे,आता याच्याचयोगाने तू कवच युक्त होवून अनायासाने दैत्यसेनाधीपातीचा पराजय करशील.||३५|| भावार्थ:---हे कवच धारण करणारा पुरुष ज्याला नेत्राने पाहतो किंवा आपल्या पायाने स्पर्श करितो तो प्राणीसुद्धा भयापासून तत्काळ मुक्त होतो.||३६|| भावार्थ:---आणि त्या (नारायनकवचात्मक) विद्या धारण करणाऱ्या पुरुषाला तर राजे,चोर व ग्रह इत्यादिकापासून आणि व्याघ्रदिकापासून व कोठेही कधीही भय प्राप्त होतच नाही.||३७|| भावार्थ:---हे इंद्र,पूर्वी कौशिकनावाचा कोणीएक ब्राहमण हे कवच धारण करीत होता,त्याने योगधारणेने निर्जल प्रदेशामध्ये आपल्या देहाचा त्याग केला.||३८|| भावार्थ:--पुढे एकेवेळी जेथे त्या ब्राहमणाने देहत्याग केला होता त्या स्थानावच्रून आकाशातून विमानात बसून स्त्रियांशी परीवेस्थित असा गंधर्वादिपती चित्ररथ जात असता,तो विमानसहवर्तमान अधोमुख होवून आकाशातून तत्काळ खाली पडला नंतर वालखिल्य ऋषीच्या 'तूं त्यांच्या अस्थी गंगेत टाकशील तर येथून आपल्या गंधर्व-- लोकास जाण्यास समर्थ होशील नाही तर जाणार नाहीस.'अशा उपदेशावरून त्याने त्याच्या अस्थी घेऊन पूर्ववाहिनी सरस्वतीनदीमध्ये टाकिल्या व तेथे स्नान करून तो त्या कौशिक ब्राहमणाच्या प्रभावाविषयी विस्मययुक्त होत असता विमानातून बसून पुन्हा आपल्या गंधर्व लोकाप्रत निघून गेला.||३९-४०|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला—-हे परीक्षितराजा,जो पुरुष योग्यकाली आदरपूर्वक हे नारायनात्मक कवच श्रवण करितो व जो धारण करितो त्याला सर्व भुते पूज्य मानितात आणि तो सर्व भयांपासून मुक्त होतो.म्हणून आपण--जीवानी "नारायानात्मक-कवच"श्रवण करावे,व धारण करावे म्हणजे अनुष्ठान करावे,आपण--जीव पूज्य होऊन सर्व भयातून मुक्त होउत.||४१|| | एतां विद्यामाधिगतो विश्वरूपाच्छतक्रतु: | त्रैलोक्यलक्ष्मीं बुभुजो विनिर्जित्य मृधेऽसुरान् ||४२|| भावार्थ:---असो विश्वरूपापासून इंद्राने हि विद्या प्राप्त करून घेतली व तिच्या योगाने युद्धामध्ये दैत्यांना जिंकून त्रैलोक्यसंबंधी ऐश्वर्याचा उपभोग घेतला.त्याचप्रमाणे आपण--जीवानी नारायण-कवच विद्दा प्राप्त करून अनुष्ठान करावे.||४२|| ८---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी नारायणकवचकथननामक हा आठवा(८) अध्याय बेचाळीस(४२)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||८|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||सदगुरुचरणार्पणमस्तू || | ______________________________________________________________________________ ९---आतां या नवव्या अध्यायामध्ये इंद्राने कोपामुळे विश्वरुपाचा वध केला असतां,त्वष्टयाने वृत्रासुर उत्पन्न केला व त्यापासून भयभीत झालेल्या देवांनी श्रीहरीची स्तुती केली,हा विषय वर्णन केला आहे.||९|| |९----विश्वारुपाचा वध,वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंताच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे. ______________________________________________________________________________|| |श्रीशुकउवाच | तस्यासन् विश्वरूपस्य शिरांसि त्रीणि भारत | सोमपीथं सुरापीथमन्नादमिती शुश्रुम||१|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे भरतकुलोत्पन्ना राजा,त्या विश्वरुपाला सोमपीथ(सोमपान करण्याचे एक)सुरापीथ(सुरापान करण्याचे एक)व अन्नाद(अन्न भक्षण करण्याचे एक)अशी तीन शिरे होती असे आम्ही ऐकिले आहे.||१|| भावार्थ:---हे राजा,तो विश्वरूप,यज्ञामध्ये उघडरीतीने विनयपूर्वक देवांना(हे इंद्राला व हे अग्नीला असे)उच्चस्वराने हविर्भाव देत असे.कारण,देव त्याचे पितर होते.||२|| भावार्थ:---आणि तोच विश्वरूप त्याची माता असुरकन्या असल्यामुळे मातेच्या पक्षपाताने असुरास अनुकूल होता म्हणून देवांचा याग करीत असताना असुराप्रत गुप्तरीतीने(कोणत्यातरी उपायाने)हविर्भाग पोचवित असे.||३|| भावार्थ:---इंद्राने त्या विश्वरूपाचा तो देवाचा अपराध व धर्मामध्ये असलेले कपट जाणून,ह्याप्रमाणे हा असुरांना वाढूनच आमचा घात करील असे मनात आणून भयभीत झाला त्याने क्रोधाने वेगाने त्याची तिन्ही शिरे तोडून टाकिली.||४|| भावार्थ:---त्या वेळी त्याचे जे सोमपीथ-संज्ञक शिर होते त्याचा कपिंजल पक्षी(कवडा),सुरापीथसंज्ञक होते त्याचा कलविंक पक्षी(चिमणी)आणि अन्नादसंज्ञक होते त्याच्या तित्तिरी पक्षी(लव) झाले.||५|| भावार्थ:---पुढे इंद्र जरी त्या ब्रहमहत्येचे निवारण करण्यास समर्थ होता तथापि त्याने तिचा ओंजळीने स्वीकार केला व संवत्सरपर्यंत तसेच राहून संवत्सराच्या अंती हे ब्रह्मघातक्या म्हणून सर्व प्राणी निंद्दनावाने त्याला हाक मारूं लागले असतां,तो लोकापवाद दूर करण्याकरिता त्याने ती ब्रहमहत्या भूमी,उदक,वृक्ष आणि स्त्री ह्यांना,चार विभाग करून वाटून दिली.||६|| भावार्थ:---त्या वेळी 'जर माझ्यावर खणलेला खळगा आपोआप भरून येईल तर मी ब्रहमहत्याचा चवथा भाग ग्रहण करीन,अशा बोलीने त्या वरासहवर्तमान भूमीने चवथा भाग ग्रहण केला.त्या ब्रहमहत्येचे स्वरूप,भूमीचे--ठिकाणी खाऱ्या मातीमध्ये कोठे कोठे उखररूपाने दृष्ठीस पडते.तेथे अध्ययनादिकांचा निषेध आहे.||७||---------- भावार्थ:---तसेच ‘छेदन केले असता फिरून अंकुर उत्पन्न होवोत,’असा वर मागून घेवून वृक्षांनी ब्राम्ह्हत्येचा दुसरा भाग ग्रहण केला ते ब्राम्ह्हत्येचे रूप,त्यांचेठीकानी डिंकाच्या रूपाने दृष्टीस पडते म्हणून वृक्षाचा दिनक भक्षण करू नये||८|| भावार्थ:---त्याचप्रमाणे ‘गर्भाला पिडा न होता प्रसूतीकालपर्यंत पुरुषाशी निरंतर संभोग व्हावा हा वर मागून घेवून स्त्रियांशी ब्रम्हहत्येचा चतुर्भाग ग्रहण केला ते पातक त्यांचेठीकानी प्रत्येक महिन्यामध्ये राजोरुपणे दृष्ठीस पडते म्हणूनच त्यांचा संगवगैरे करू नये||९|| भावार्थ:---तसेच दुग्धादीपदार्थात आपले मिश्रण केले असता त्या पदार्थाची वृद्धी व्हावी अस वर मागून घेवून जाळणे पातकाचा चतुर्भुज ग्रहण केला,ते पातक बुडबुडे आणि फेस ह्यांच्या रूपाने पाण्याचेठिकाणी दृष्टीस पडते म्हणून बुडबुडे फेसवगैरे जलाच्या बाहेर टाकून नंतर त्या उदकाने स्नानादिक कर्मे करावीत म्हणजे ते उदक पापनाश करणारे होते||१०|| भावार्थ:---असो.नंतर ज्याच्या पुत्राचा वध झाला त्या त्वष्टयाष्ठ्याने ‘इंद्रोशत्रो विलंब न करीत वृद्धिगत हो आणि शत्रूचा वध कर,’असे उच्चारण वधार्थ शत्रू उत्पन्न करण्याकरिता अग्नीमध्ये हवन केले||११|| भावार्थ:---नंतर त्याचवेळी,जसा प्रलय काळी सर्व लोकांचा संहार करण्याकरिता काळ प्राक्त होतो त्याप्रमाणे दक्षिनाग्निपासून भयंकर रूप धारण करणारा तो वृत्रासुत्र प्रगट झाला||१२|| भावार्थ:---हे राजा ,तो वृतासुत्र प्रतीदिवशी आपल्या सभोवती बन टाकण्याच्या प्रदेशाइतका वाढत असून अग्नीने जाळलेल्या पर्वतासारखा उंच होता,त्याचे तेज,संध्याकाळच्या मेघसमुदायासारखे काळे होते त्यांची त्याची शिखा व श्मुश्रू तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या,त्याचे नेत्र मध्यान्ह कालच्या सूर्याप्रमाणे उग्र होत||१३-१४|| भावार्थ:---तो पृथ्वी व आकाश ह्यांना आपल्या दैदिप्यमान त्रिशुलावर आरोपण करूनच कि काय उच्चस्वराने गर्जना करीत आहे व पायाने पृथिवी कंपित करीत नृत्य करीत आहे असा भासत होता!||१५|| भावार्थ:---तो,आकाशाचे प्रश्नच करीत आहे कि काय!जिव्हेच्या गृहेप्रमाणे योगाने नक्षत्राच्या चातीतच आहे कि काय!आणि त्रैलोक्याला गिळूनच टाकीत आहे कि काय!अशा आपल्या मोठ्या, भयंकर दाढेने युक्त व पर्वताच्या गुहेप्रमाणे खोल असलेल्या मुखाने वारंवार जांभया देत होता.त्या वृत्रासुराला पाहून,भयभीत झाले दशदिशाकडे पलायन करू लागले||१६-१७|| भावार्थ:---हे राजा,ज्या त्वष्टयाच्या पुत्ररूपी तमोगुणात्मक असुराने हे सर्व लोक व्यापून टाकिले,म्हणून त्या अतिभयंकर पापी असुराला वृत्र असे नाव पडले आहे||१८|| भावार्थ:---त्या वेळी स्वकीयगनासह वर्तमान देवश्रेष्ठानी त्याच्या अंगावर धावून जावून आपआपल्या दिव्य शस्त्रास समुदायांनी त्याला प्रहर केला.परंतु त्याने ती सर्व शास्त्राचे गिळून टाकिली||१९|| भावार्थ:---नंतर ग्रस्ततेज झालेले व वृत्रासुराने त्रैलोक्य प्राप्त केल्यामुळे ज्यांचे कोठेही गमन होईना असे ते सर्व देव विस्मित व खिन्न होवून त्याचठिकाणी एकाग्र अंत:करण पूर्वक अंतर्यामी आदिपुरुषाची स्तूती करू लागले||२०|| भावार्थ:---देव म्हणाले-अहो!वायू,आकाश,अग्नी,उदक व पृथ्वी हि पंचमहाभूते,त्यांनी निर्माण केलेले तैलोक्य,त्याचे अधिपती ब्रम्हादिक व त्यापेक्षा हि अलीकडेच जे आम्ही सर्व देव ते ज्या कालाला भिवून त्याची पूजा करितो म्हणजे त्यात्याकाळी सांगितलेले कर्म नियमाने करितो,तो काह्ली ज्याला भितो त्या परमेश्वरापासूनआमचे रक्षण होवो||२१|| भावार्थ:---कारण,सम सर्वठिकाणी लाभाने पूर्णंमनोरथ,रागादिशुन्य व अहंकररहित अशा त्या परमेश्वरापासून दुसऱ्याकडे जो अज्ञ जन आपल्या रक्षणार्थ जातो तो श्र्वानाच्या पुछाने समुद्र तरुण जाण्याची इच्छा करितो.म्हणजे जसे श्र्वान्वाच्या पुच्छाने समुद्र तरुण जाण्याची इच्छा करितो.म्हणजे जसे श्र्वानपुष्पाचा आश्रय घेतो तसे ईश्वरावाचून इतरांच्या आश्रयाने दु:खसमुदायातून पार पडणे होत नाही||२२|| भावार्थ:---ह्याप्रमाणे भाषण करुन आता,महाभय प्राप्त झाले असता,तो ईश्वरच रक्षण करतो असे दृष्टोत्पत्तीस आले आहे म्हणून सांगतात----ज्याच्या अहो पूर्वी मोठ्या सुटलेल्या वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांच्या शब्दामुळे भयंकर झालेल्या प्रलयकालीन उदकामध्ये नाभिकमलापासून पडल्यासारखा झालेला एकटाच ब्रहमदेवहि ज्याच्या योगाने त्या भयापासून तरला,तोच भगवंत आमचा तारक--संसार--सागरातून तारुण नेणारा असो.म्हणून आपण-- जीवानी सत्संग करून विवेकाद्वारे परमात्मा कोण आहे असे जाणून त्या परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२४|| भावार्थ:---अशी ईश्वराची प्रार्थना करून आता ज्याअर्थी भगवंतानेच आम्हाला उत्पन्न करून पुष्कळवेळी आमचे पालन केले त्याअर्थी आम्ही त्यालाच शरण जातो असे सांगतात-------ज्या अद्वितीय ईश्वराने आपल्या मायेने आम्हास उत्पन्न केले आहे,ज्याने अनुग्रह केला असता आम्ही विश्व उत्पत्ती करतो,आणि "स्वतंत्र ईश्वर आहोत",असा अभिमान धारण करणारे आम्ही आमच्या पूर्वीच अंतर्यामीरूपाने त्या-त्या ठिकाणी आमची प्रेरणा करणाऱ्या ज्या ईश्वराचे स्वरूप जाणत नाही.म्हणून आपले--जीवाचे कर्तव्य आहे की,ज्यांनी उत्पन्न केले,पालन केले,त्यालाच शरण जावे,तर अन्याला शरण जाऊ नये,त्यालाच जाणून घ्यावे.त्यांचा अनुग्रह झाला असता,संत--महात्मा यांची भेट होते व त्यांच्याच सत्संगामुळे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान प्राप्त होते.त्यामुळेच आपण--जीव सुखरूप होतोत.म्हणून आपण--जीवानी ईश्वर,संत--महात्मा व वेदांत--शात्र यांचे स्वरूप व कार्य जाणून त्यांच्याशी कृतज्ञ--केलेल्या उपकाराची जान ठेऊन त्या उपकरातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा,तर कृतघ्न असू नये,कृतघ्न म्हणजे केलेल्या उपकाराची जान न ठेवणारा होऊ नये.कृतज्ञ हा गुण आहे,तर कृतघ्न हा दोष आहे.आपण दोषी न होता गुणी व्हावे.दोषी हा अधोगतीकडे--दु:खाकडे जात असतो,तर गुणी हा प्रगतीकडे--सुखाकडे जात असतो.||२५|| भावार्थ:---जो वस्तुत: निर्विकारच असून देव,ऋषी,पश्वाद,ज्ञानहीन जाती व मानव ह्यांचेठीकानी आपल्या मायेच्या योगाने उपेंद्र,परशुराम,मत्स्य,आणि राम इत्यादी रूपांनी अवतार धारण करून शत्रूपासून अत्यंत पिडा झालेल्या आमचे,आपले असे समजून प्रत्येक युगामध्ये संरक्षण करितो.म्हणून त्याचप्रमाणे आपण--जीवानी जे जीव-प्राणी आहेत,ते आमचे--आपलेच आहे असा भाव धारण करून त्यांचे आपल्या स्वधर्मानुसार दु:ख निवारण करून,त्यांना सुख देण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||२६|| भावार्थ:---जो विश्वाहून भिन्न असूनही विश्वरूपी आहे,म्हणजेच विश्वाचे अधिष्ठान तोच असून विश्व भिन्न--अध्यस्त आहे,व विश्वाचा परिणामही तोच आहे,म्हणून विश्वरूपी आहे.जो पृकृतीरूपी व पुरुषरुपी असल्यामुळे विश्वाचे कारण आहे,जो आणि तोच महात्मा आम्हा स्वभक्ताचे कल्याण करील.आपण--जीवनी त्याचेच भक्त होण्याचा आवश्य प्रयत्न करावा,कारण त्यामुळेच आपले कल्याण होणार आहे,अन्यथा कल्याण होणार नाही.||२७|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे महाराज,ह्याप्रमाणे ते देव स्तुती करीत असता,शंख,चक्र व गदा धारण करणारा भगवान प्रथम त्या देवांच्या हृदयामध्ये प्रगट झाला आणि नंतर अग्रभागी दृस्तीगोचर झाला.भगवंत प्रथम हृदयामध्ये आहे व आपण--जीवानी निष्काम भक्ती केल्यानंतर सगुण-निराकार किंवा सगुण--साकाररूपाने समोर प्रगट होतो.||२८|| भावार्थ:---तेव्हा हे राजा,श्रीवत्सलांछन व कौस्तुभमणी या दोन चीन्हावाचून भगवंतासारख्या सर्व लक्षणांनी युक्त असलेल्या सोळा पार्षदगणांनी आसमंताभ्दागी सेवन केलेल्या व विकाशित झालेल्या शरदऋतूतील कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत अशा त्या भगवंताला पाहून त्याच्या दर्शनापासून झालेल्या आनदाने विवश झालेल्या सर्व देवांनी,त्याला भूमीवर साष्टांग नमस्कार घातला आणि काही वेळाने उठून ते देव त्यांची पुनरपि स्तुती करू लागले.आपणही--जीवानी भगवंतास पाहून किंवा संत--महात्मा यांना पाहून प्रथम साष्टांग दंडवत घालून नमस्कार करावा,व त्यानंतर त्यांची स्तुती करावी.||२९-३०|| भावार्थ:---देव म्हणाले---हे देवा,स्वर्गादी फलोत्पादनाकारीत यज्ञारूपी सामर्थ्याने युक्त,त्या फलाना देणारा कालरूपी व त्या यज्ञाचा घात करणाऱ्या दैत्याचेठिकाणी आपले चक्र फेकणारा आणि पराक्रमांनी युक्त असलेल्या पुष्कळ नांवानी युक्त अशा तुला नमस्कार असो.||३१|| भावार्थ:---आता माझे--परमात्म्याचे गुणातीत रूप सोडून,गुणापाधिक--ईश्वराच्या रूपाचे तुम्ही कशाकरीता वर्णन करिता,असे म्हणशील तर--हे विधात्या,सात्विकादिक तिन्ही गतीचे परमस्थानभूत असे जे तुज गुणत्रय नियंत्याचे निर्गुण स्वरूप ते जाणण्यास अलीकडच्या सृष्टीतील कोणीही प्राणी समर्थ होणार नाही,याकरिता त्या तुला केवळ नमस्कार करितो.निर्गुण--निराकार स्वरूप जाणण्याकरिता अधिकार लागतो.आज--वर्तमान काळात माझ्यात--जीवात नाही,म्हणून अधिकार येण्याकरिता सगुण--निराकारास किंवा सगुण--साकारास नमस्कार करीत आहे.||३२|| भावार्थः---ह्याप्रमाणे सामान्यतः स्तुति करून आतां उत्कटभरतीच्या योगाने नानाप्रकारची संबोधने देऊन त्या ईश्वराचे दुर्ज्ञेयत्व वर्णन करितात की,---हे भगवंता,हे नारायणा,हे वासुदेवा,हे आदिपुरुषा,हे महापुरुषा,हे-महानुभावा, हे शुद्धधर्मा,हे परमकल्याणा,हे परमदयालो,हे केवला,हे जगदाधारा,हे लोकैकनाथा,हे सर्वेश्वरा,हे लक्ष्मीनानाथा,आणि हे परमहंसा,संन्याशांनी अष्टांगयोगाने चित्ताची एकाग्रता करून अभ्यासिकेला जो भगवद्भजन परमहंस धर्म त्याने,ज्यांचे अज्ञानरूप कवाड उघडले आहे म्हणजे ज्यातील अज्ञान नाहीसे झाले आहे त्या चित्तामध्ये प्रकट झालेल्या अंतर्यामीरुपाचेठीकानी स्वत:च ज्याचा आनंदरूपाचा अनुभव येतो तोच तू आहेस.ज्यांचे संसाग करून अज्ञान नाहीसे करून यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतले आहे,स्वत:च ज्याचा निर्गुण-निराकाराचा आनंदरुपाने अनुभव येतो,त्यामुळे आपले--जीवाचे जन्म--मरण निवृत्त होते.||३३|| भावार्थ:---आता केवलनुभवस्वरूप जर मी--परमात्मा आहे तर मी--परमात्मा सृष्टीवगैरे करितो हे कसे?असे विचारशील तर-----हे परमेश्वरा,तुझा हा क्रीडेचा प्रकार खरोखर दुर्बोधच आहे.कारण तू निराश्रय,शरीररहित,आमच्या सहाय्याची अपेक्षा न करणारा आणि निर्गुण असून आपल्या निर्विकार स्वरूपाने हे सगुण विश्व उत्पन्न करितोस,रक्षा करितोस,आणि ह्यांचा संहारही करितोस,कारण सत्ता तुझीच पूर्ण असून स्वतंत्र आहेस.||३४|| भावार्थ:---बरे आणखीहि तुजवषयी एक दुर्बोध गोष्ठ आहे ती अशी की,------हे परमेश्वरा जसा एकदा पुरुष,इहलोकी गृहादि निर्माण करून त्याचठिकाणी परतंत्रतेमुळे आपण केलेल्या पुण्यपापाचे फल भोगतो त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूप असा तू जीवरूपाने गुणकार्यरूप देहामध्ये प्रविष्ट होऊन,पारतंत्र्याने पुण्य-पापांचे फळ भोगतोस आणि स्वस्वरूपी रममाण व आणि कधीही लोप न पावणाऱ्या चैतन्यशक्तीने--कूटस्थ-युक्त असे होत असता उदासीनपणाने असतोस हे आम्हास खरोखर समजत नाही.ज्या जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे,ते जीव जणू शकत नाहीत,पण जे जीव ज्ञानी आहेत,ते जणू शकतात.म्हणून आपण--जीवानी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून म्हणजेच ज्ञान प्राप्त करून जाणून घ्यावे.असे केले असता आपली जीवाची जीवदशा निवृत्त होऊन परमात्मारुपता अनुभवयास येते. ||३५|| भावार्थ:---ह्याप्रमाणे विरोधाने भगवंताचे दुर्ज्ञेयत्व कथन करून आता त्या विरोधाच्या परीहाराने ज्ञानप्रकार वर्णन करितात की,------तुझ्या षड्गुणैश्वर्यसंपन्न स्वरूपी पूर्वोक्त दोन्ही गोष्टी--पारतंत्राने पुण्य--पापांचे फळ भोगितो व कूटस्थ-युक्त रूपाने उदासीनपणाने असतोस,असे असले तरी त्या विरुध्द नाहीत.कारण,तू अपरिमित गुणसमुदायाचा निधी व स्वातंत्र्य,असा ईश्वर असल्यामुळे तुझे महात्म्य अतर्क्य आहे.आणि वस्तुस्वरूपाला स्पर्शही न करणारे असे जे अलीकडचे--सगुण--साकाराचे--जीवाचे विकल्प(असे करावे किंवा तसे करावे असे),वितर्क(काय बरे येथे योग्य आहे असे),विचार(असेच करावे असे निश्चयरूप)आणि कुतर्क ह्यांनी युक्त असलेल्या शास्त्रांनी व्याकूळ झालेले अंत:कारणच ज्या दुराग्रहाचा आश्रय आहे,त्याच्यायोगाने वाद करणाऱ्या लोकांच्या विवादाला ज्या तुझे स्वरूप गोचर होत नाहीत आणि हा सर्व संसार जेथे शांत झाला आहे,त्या तुझ्या केवळ स्वस्वरूपाचे ठिकाणी मायामध्ये स्थापन केली असता कोणता बरे कर्तृत्वादी प्रकार संभवणार नाही ? सर्वही संभवतीलच आणि त्यातूनही कर्तृत्वादी धर्म जर वस्तूत: तुझेठीकानी खरे असतील विरोध येईल परंतु ते धर्म तुझे ठिकाणी खरे मुळीच नाहीत,तर मिथ्या आहेत.कारण,तू दोन्ही स्वरूपाहून--सगुण--साकार व सगुण-निराकाराहून निराळाच निर्गुण-निराकार--परमात्मा--ब्रह्म आहेस--परमानंद आहेस.म्हणून आपण--जीवानी सत्संगाच्याद्वारे अंत:कारणाचा बाध--अंत:करण मिथ्या आहे असा निश्चय करून निर्गुण-निराकाराचा अनुभव घ्यावा.असे झाले असता आपण--जीवात्मा व परमात्मा एकच आहे.||३६|| भावार्थ:---याप्रमाणे भाषण करून तोच अविरोध पुरुषमतीभेदाने दर्शवितात की,-----हे परमात्मा,जसा दोरीचा तुकडा त्याचे यथार्थ ज्ञान असणाऱ्या लोकांना दोरीच्या रूपाने भासत असताही सर्पादी विषयक बुद्धी असणाऱ्या लोकांना सपार्दी भयंकररूपाने भासतो त्याचप्रमाणे यथार्थबुद्धिलोकांना तू केवळ निर्गुणस्वरूपाने भासत असतांही भ्रांतबुद्धिच्या लोकांना कर्तृत्वादिरूपाने भासतोस.एतावता माझ्या मायेने तुझेठीकानी लोकांची जसजशी मति होईल तसतसा तू त्यांना अनुग्रह करणारा किंवा निग्रह करणारा भासतोस.म्हणून आपण--जीवानी सत्संग करावा.||३७|| भावार्थ:---याप्रमाणे विरोधाचा परिहार करून आता निश्चित केलेल्या परमार्थस्वरूपचे वर्णन करितात,-------विचार करून पहिले असता नानाप्रकारच्या रूपांनी प्रतीत होणारा तूंच सर्व वस्तूमध्ये सद्रूपाने स्थित आहेस,सर्व जगताला कारण असलेल्या महत्तात्वादीकानही कारणभूत अशा सर्वेश्वरहि तूच आहेस,सर्व जीवाचेठीकानी अंतर्यामीरूपाने राहत असल्यामुळे सर्व विषयाच्या प्रकाशांनी तुझे अनुमान होत आहे आणि तुझ्यावाचून इतर वस्तूचा निषेध करणाऱ्या सर्व श्रुतीनीही सत्यत्त्वाने तुझे एकाकेच वर्णन केले आहे.||३८|| भावार्थः---याप्रमाणे परमार्थस्वरूपाचे वर्णन करून आतां त्याची "भक्ति" करणे हाच मुख्य पुरुषार्थ आहे असे सांगतात हे मधुसुदना,एकवार आस्वाद घेतलेला तुझ्या महात्म्यरूप अमृतरससमुद्राचा जो बिंदू त्याच्या योगाने आपल्या मनामध्ये अत्यंत स्त्रवत असलेल्या निरंतर सुखाने राहिलेल्या व ऐकीलेल्या सुखलेशांच्या आभासांनी ज्यांना विस्तृती पडली आहे म्हणूनच सर्वांचा आत्मा असल्यामुळे सर्वभूतांचा प्रिय आणि हितकर्ता अशा तुज भगवंताचेठिकाणी ज्याने मन अतिशय आणि निरंतर सुखाने तृप्त असते,जे रागादीरहित आहेत,जे आपल्या पुरुषार्थाविषयी निपुण आहेत आणि ज्यांचा तूंच प्रिय व सुह्र्त आहेस असे हे एकनिष्ठ परम भगवद्भक्त,जी केली असतां फिरून हे संसारभ्रमण प्राप्त होत नाही त्या तुझ्या चरणकमलांच्या निरंतर सेवेला कसे बरे सोडून देतील?देणारच नाहीत.म्हणून आपण--जीवानी भगवंताची निष्काम भक्ती करावी.||३९|| भावार्थः---असो,हे त्रिविक्रमा,हे त्रैलोक्यनायका,तूंच त्रैलोक्याचा आत्मा व उत्पत्तीस्थान असून तुझी लीला त्रैलोक्यामध्ये मनोहर आहे व दैत्य आणि दानववगैरे सर्व तुझ्याच विभूति आहेत.तस्मात्,हे भगवन् त्यांचा हा उत्कर्षकाल नाही असे समजून ज्याप्रमाणे पूर्वी देव,नर पशु व मिश्रजाति ह्याची रूपे आपल्या योगाने धारण करून त्या दैत्यांना अपराधानूरूप दंड धारण केला आहेस त्याप्रमाणेच सांप्रतकालीही हे दंडधारणकरणाऱ्या देवा,जर तूं इच्छित असशील तर ह्या त्वष्ट्याच्या पुत्राचा (वृत्रासुराचा)वध करावास.||४०|| भावार्थः---परंतु प्रथमतः हे पित्या,हे पितामहा,हे निष्पापा,तुझ्या चरणकमलांच्या ध्यानानेच ज्या आमच्या हृदयामध्ये तूं प्रेमरूप शृंखला बांधून ठेविली आहेस आणि आपली मूर्ती प्रकट करून ज्यांचा तूं आपले असे म्हणवून स्विकारीले आहेत त्या तुला नम्र असणाऱ्या व तुझे भक्त अशा आमच्या अंतःकरणातील ताप,तूं आपल्या सद्य,निर्मल,मनोहर आणि शीतल अशा हास्यरहित आणि कृपेमुळेच बाहेर निघालेल्या प्रियवाणीरूप--शब्दांने ज्ञान--अमृताच्या कलेने शांत करण्यास योग्य आहेस.||४१|| भावार्थः---ह्याप्रमाणे सांगून आतां आमचा अभिप्राय तूं जाणतच आहेस तेव्हां ह्याविषयी आम्ही तुला काय विदित करावयाचे आहे?असे सांगतात-------हे भगवन् ज्याप्रमाणे अग्नीच्या अंशभूत असलेल्या कीटळे इत्यादिकांनी त्या मुख्य अग्नीला प्रकाश केला जात नाही त्याप्रमाणे आम्ही तरी आपल्या कार्याविषयी तुला विशेष काय सांगावे?कारण,तूं सर्व जगताची उत्पत्ति,स्थिती व लय ह्यांना निमित्तभूत असणाऱ्या दिव्यमायेच्या योगाने आपली क्रीडा चालविणारा,सर्व जीवसमूहांच्या ह्रदयामध्ये ब्रह्मस्वरूपाने व अंतर्यामीरूपाने आणि बाहेर प्रकृतीरूपाने,देश काल,देह व त्याच्या विशेष अवस्था ह्यांचे उल्लंघन न करितां उपादान कारणत्वेकरून व प्रकाशत्वेकरून त्यांचा अनुभव घेणारा,सर्वांच्या बुद्धयादिकांचा साक्षी,आकाशासारख्या अलिप्त असलेल्या शरीराने युक्त व शुद्धसत्वमूर्ती असा अशा साक्षात परब्रह्मरूप आहेस.||४२|| भावार्थः---म्हणूनच अचिंत्यैश्वर्यसंपन्न व सर्वांचा परमगुरु अशा तुला शरण प्राप्त झालेल्या भक्तांना नानाप्रकारच्या दुःखांसहित प्राप्त होणाऱ्या संसारपरिश्रमाला दूर करणारी जी तुझ्या चरणकमळाची छाया ती प्रत आम्ही ज्या कार्याच्या इच्छेने प्राप्त झालो आहो ते आमचे कार्य,तूं आपण होऊनच संपादन करावेस.||४३|| भावार्थः---(ह्याप्रमाणे आपली कामना पूर्ण करण्याविषयी देवांनी परमेश्वराची प्रार्थना केली परंतु पूर्वी आपण भक्तीचे श्रेष्ठत्व वर्णन केले होते म्हणून आम्हांला भक्तीचीच इच्छा आहे अशी परमेश्वराला शंका न यावी म्हणून आपला मनोरथ कथन करितात की,------हे सदानंदरूप परमेश्वरा,ज्याने आमची तेजे,अस्त्रे व आयुधे गिळून टाकिली आहेत त्या त्रैलोक्याला ग्रासून टाकणाऱ्या वृत्रासुरांचा तूं सत्वर वध करावास.||४४|| भावार्थः---आतां वृत्रासुराचा शीघ्र वध व्हावा म्हणून देव ईश्वराला पुन्हा नमस्कार करितात की,---------ह्रदयाकाश हे ज्याचे निवासस्थान आहे,जो सर्व बुद्धयादिकांचा साक्षी आहे,जो सदानंदरूप,अनादि व शुद्ध आहे,ज्यांचे यश रुचीकर आहे,सज्जन लोक सर्वसंग परित्याग कथन ज्याचा स्वीकार करितात,संसाररूप मार्गामध्ये असलेल्या जनाला ज्याच आश्रय प्राप्त झाला असतां शेवटी अत्यंत सुख प्राप्त होते त्या तुज हरीला नमस्कार असो.आपण--जीवानी हरीस--परमात्म्यास नमस्कार करावा,करण तोच आपला--जीवाचा आश्रय आहे व आपण--जीव त्याच्या आश्रित आहोत.आपण अध्यस्त असून तो अधिष्ठान आहे.||४५|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,ह्याप्रमाणे आदरपूर्वक देवांनी स्तुति करून संतुष्ट केलेला श्रीहरि,आपले स्तोत्र श्रवण करून त्यांना म्हणाला------------------||४६|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाले---हे सूरश्रेष्ठहो,माझ्या स्तुतीने युक्त जे हे ज्ञान त्याच्या योगाने मी तुम्हांस प्रसन्न झालो आहे.कारण,ज्या ज्ञानाच्या योगाने पुरुषांना माझेठिकाणी मी परमात्मा संसाररहित आहे अशी स्मृति व भक्ती प्राप्त होते.म्हणून आपण--जीवानी भगवंताची स्तुती करावी,करण त्यामुळे भगवंत प्रसन्न होतो व त्यामुळे आपली इच्छा पूर्ण करितो.||४७|| भावार्थ:---आता देवांनी पूर्वी भक्तीचे श्रेष्ठत्व वर्णन केले होते ह्यास्तव भगवान भक्तक्ताचे अभिनंदन करितो की,---हे सुरश्रेष्ठहो,मी प्रसन्न झालो असता पुरुषाला दुर्लभ असे काय आहे?कांहीच नाही.तथापि माझेठीकानी ज्याला एकनिष्ठ मति प्राप्त झाली आहे तो तत्त्ववेत्ते पुरुष,माझ्या सेवेवाचून दुसऱ्या कशाचीच इच्छा करीत नाही.||४८|| भावार्थ:---आता तूच होवून आमचे कार्य सिद्धीस न्यावे अशी जी तुम्ही प्रार्थना केलीत त्याप्रमाणेच करणे मजदयालु परमेश्वराला योग्य नाही असे सांगण्याच्या अभिप्रायाने म्हणती की,----विषयाचेठीकानी तत्वबुद्धि धारण करणारा म्हणजे विषय हेच सुखाचे साधन आहे,व त्याहून अन्य सुखाचे साधन नाही अशा विचाराच्या पुरुष्यास कृपण पुरुष,असे म्हणतात.तो आपले कल्याण जाणत नाही व त्या विषयेच्छू अज्ञानी पुरुषाला,जर कोणी ते विषयतच प्राप्त करून देईन तर तोही त्याच्यासारखाच अज्ञानी होय.जे अज्ञानी जीव असतात तेच एकमेकांस विषयांचीच आदान--प्रदान म्हणजे देणे--घेणे व्यवहार करीत असतात,व त्याद्वारे सुख मिळवण्यात मनुष्य देहाचे आयूष्य व्यय-खर्च करीत असतात.आपण--जीवानी विषयांमार्फत सुखाची प्राप्ती करू नये,करण विषयांत सुख नसून सुखाचा भास आहे,तर देवात--परमात्म्यात सुख--सुखरूपता आहे,म्हणून सत्संगाद्वारे अज्ञान निवृत्त करून व ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घेऊन आनंदरूप--परमानंद प्राप्त करून घ्यावा. ||४९|| भावार्थ:---जसा अपथ्य पदार्थाची इच्छा करणाऱ्या रोग्याला,उत्तम वैद्य,तोच पदार्थ देत नाही,त्याप्रमाणे स्वत: कल्याण जाणणारा ज्ञानी पुरुष,अज्ञजनाला त्या प्रवृत्तीमार्गाचाच उपदेश करीत नाही.म्हणून आपण--जीवानी स्वत: कल्याण जाणणारा ज्ञानी पुरुष अज्ञाजनांना त्या प्रवृत्ती मार्गाचा--संसार मार्गाच उपदेश न करता निवृत्त मार्गाचा उपदेश करीत असतात.म्हणून आपण--जीवानी ज्ञानी पुरुषाची संगत करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान संपादन करून जन्म--मरण--दु;ख निवृत्त करावे.||५०|| भावार्थ:---ह्याप्रमाणे तत्वकथानच्या योगाने अयोग्यतत्वाचा परिहार करून,आता त्याच्या अभिप्रायाला अनुसरून भाषण करितो की,----हे इंद्र,तुमचे कल्याण असो.आता तुम्ही दधीचनामक श्रेष्ठ ऋषीजवळ जा आणि विद्या,आणि व्रत,व तप ह्यांच्या योगाने दृढ झालेल्या त्याच्या शरीराची त्याच्याजवळ याचना करा,या गोष्टीला विलंब करू नको.||५१|| भावार्थ:---ह्याप्रमाणे देवांना जाण्याची आज्ञा देवून,दधीचऋषीच्या विद्देचा उत्कर्ष त्याचे शरीराचेठिकाणी आहे हे कथन करण्यासाठी भाषण करितो की,-----हे इंद्रा,अश्वरशिरस नावाने प्रसिध्द असलेल्या जे शुध्द ब्रहम ते दधीचऋषीला माहित आहे ते त्याने अश्विनीकुमरांना उपदेशिले व त्याच्या योगाने त्यांना जीवन्मुक्तत्व प्राप्त झाले.||५२|| भावार्थ:---आणि त्याचप्रमाणे त्या त्या अथर्वणवेदी दधीच ऋषीला मत्स्वरूपी(नारायणननामक)अभेद कवचही माहित आहे कारण त्याने ते त्वष्टयाने आपल्या विश्वरूपनामक पुत्राला अर्पण केले,तेच त्या विश्वरूपापासून तू धारण केले आहेस,तस्मात ह्याप्रमाणे विद्देच्या योगाने दृढ झालेल्या त्याच्या शरीराची तुम्ही त्याच्याजवळ जाऊन याचना करा.एक वज्रनामक श्रेष्ठ आयुध तयार होईल.(याविषयी अशी कथा आहे की,-----रथाच्या प्रवर्ग्याचे(यज्ञातील महावीर नांवांच्या एका कर्माचे)व ब्रह्मविद्देचे उत्कृष्ट ज्ञान आहे,असे अश्विनीकुमारांना समजल्यावर ते एकेवेळी त्याच्या जवळ आले आणि म्हणाले की,हे दधीचऋषे,तू आम्हास त्या दोन्ही विद्देचा उपदेश कर.तेव्हा तो म्हणाला की,----या वेळी मी आपल्या नित्याच्या कर्मास आरंभ केला आहे म्हणून तुम्ही आता जावून मग या,म्हणजे मी तुम्हास त्या विद्दा सांगेन.ते एकूण अश्विनी कुमार निघून गेला असता,त्या ऋषीजवळ इंद्र येवून म्हणाला की,--------हे मुने अश्विनीकुमार वैद्द आहेत,म्हणून त्यांना तू ब्रहमविद्देचा उपदेश करू नकोस.या माझ्या वचनाचा अनादर करून जर तू त्यांना ब्रहमविद्दा सांगितलीस तर तुझा शीरच्छेद करीन,असे सांगून इंद्र तेथून निघून गेल्यावर पुन्हा अश्विनीकुमार येवून म्हणाले की,हे ऋषी,आता आम्हास ब्रहमविद्दा सांग.तेव्हा त्याने,इंद्राचे भाषण त्यास कळविले,ते ऐकूण म्हणले की,आम्ही प्रथमच तुझे मस्तक तोडून ठेवून धडाला दुसरे घोड्याचे मस्तक लावून तुला संजीवन करीतो,मग त्या शिराच्या योगाने तू आम्हास विद्दा सांग.इंद्राने तू तुझे(घोड्याचे)मस्तक तोडून नेले म्हणजे,पुन्हा आम्ही आम्ही तुझे मस्तक तुला संजीवन करून गुरुदक्षिणा देवून निघून जावू,हे ऐकून असत्याची भीती बाळगणाऱ्या त्याने अशा रीतीने(घोड्याच्या मस्तकाने)त्या अश्विनीकुमारांना प्रवर्ग्याचा ब्रहमविद्देचा उपदेश केला म्हणून त्या विद्देला "आश्वशिरण" असे नांव पडले आहे.||५४|| | तस्मिन विनिहते यूयं तेजोऽस्त्रायुधसम्पद: | भूय: प्राप्स्यथ भद्रं वो न हिंसन्ति च मत्परान् ||५५|| भावार्थ:---नंतर माझ्या तेजाने संवर्धित झालेला असा तू,त्या वज्राच्या योगाने वृत्रासुराचे शिर हरण करशील आणि त्याचा वध झाला म्हणजे पुन्हा तुम्हाला तेज,अस्त्रे,आयुधे,आणि संपत्ती,हि सर्व प्राप्त होईल.तस्मात हे देवहो,मोठा देह धरण करणारा तो त्रैलोक्यनामक वृत्रासुराच आमचा वध करील असे तुम्ही मनात आणू नको.कारण,मजविषयी तत्पर असलेल्या पुरुषाची कोणीही हिंसा करीत नाही,ह्याकरिता तुमचे कल्याणच होईल.भगवंताचे जे भक्त आहेत व भगवंतांनी त्याचा स्वीकार केलेला आहे,त्याचे अहित किंवा हिंसा कोणी करू शकत नाही.||५५|| ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी इंद्रनुग्रह निरुपणनामक हा(९)नववा अध्याय (५५)श्लोकांनी युक्त समाप्त झाला||९|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू||
______________________________________________________________________________आता ह्या दहाव्या अध्यायामध्ये भगवंताच्या आज्ञेकरून दधीचऋषीच्या अस्थीने वज धारण करणाऱ्या व देवानाही युक्त अश्या इंद्राने,असुरांनी,युक्त्य अशा वृत्रासुराशी युद्ध केले अशी कथा वर्णन केली||१|| |१०--- दधीची ऋषीच्या अस्थीपासून देवांकडून वज्र-निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण ______________________________________________________________________________
|श्रीशुक उवाच | इंद्रमेवं समादिश्य भगवान् विश्वभावन: | पश्यतामनिमेषाणां तत्रैवान्तर्दधे हरि: ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला--–हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे तू इंद्राला सांगून भगवान विश्वपालक श्रीहरी,सर्व देव पाहत असता तेथेच गुप्त झाला.||१|| भावार्थ:---हे भरतकुलोत्पन्ना राजा,इकडे भगवंताचे सांगितल्याप्रमाणे देवांनि त्या अथर्वण वेदि महर्षी दधीचीजवळ जावून याचना केली असता,तो आनंदित झाला आणि त्या देवांच्या मुखातून धर्म श्रवण करण्याच्या इच्छेने त्यांचे मागणे अमान्य करीत आहे कि काय असे दर्शवित म्हणाला की,------------------||२|| भावार्थ:---हे देवहो,तुम्ही सत्वगुणात्मक असलेल्या इंद्रियांच्या देवता असताही शरीर धारण करणाऱ्या प्राण्यांना अंतकाळी मूर्च्छा उत्पन्न करणारे दु:सह जे दु:ख प्राप्त होते ते जाणत नाही काय?||३|| भावार्थ:---आता ते आम्ही जाणतोच;परंतु,आमच्या वराने श्रीविष्णूच याचना करीत आहे असे म्हणशील तर---हे देवहो,जगण्याची इच्छा करणाऱ्या जीवाना इहलोकी जो देह अत्यंत प्रिय आहे,तो त्याची याचना करणाऱ्या विष्णुलासुद्धा देण्यास कोण बरे उत्साह पावेल ? कोणीही पावणार नाही.||४|| भावार्थ:---देव म्हणाले-----हे ब्रह्मनिष्ठा,ज्यांची कर्मे सत्कीर्तीमान लोकांनीही वर्णनीय आहेत त्या तुम्हा सारिख्या प्राणीमात्रावर द्या करणाऱ्या महापुरुषांना त्याग करण्यास अशक्य अशी वस्तू कोणती बरे आहे ? कोणतीच नाही.||५|| भावार्थ:---हे ऋषे,स्वर्थाविषयी तत्पर असलेल्या लोकांना दुसऱ्याचे संकट खरोखर समजत नाही जर समजले तर ते याचनाच करणार नाहीत तसेच ज्याच्याजवळ याचना केली तो जर समर्थ असेल तर व दुसऱ्याचे संकट जाणणारा असेल तर,"नाही" असे कधीच म्हणणार नाही.यास्तव ज्याप्रमाणे आम्ही स्वार्थनिष्ठ असल्यामुळे तुझे संकट जाणत नाही त्याप्रमाणेच आमची प्रार्थना अमान्य करणारा तूंही आमचे संकट जाणत नाहीस.आपण--जीवानी स्वार्थी न होता निस्वार्थी व्हावे.आपली गरज जरी असेल तर,ज्याच्याकडे मागणी केलेला आहे,तो आपल्या मागणीची पूर्तता करण्यास समर्थ असेल तर,मागणी करावी,अन्यथा करू नये.जो आपल्या मागणीची पूर्तता करण्यास समर्थ असेल तर,तो समर्थ पुरुष "नाही" असे म्हणणार नाही.आपणही--जीवानी नाही असे म्हणू नये.||६|| भावार्थ:---ऋषी म्हणाला---हे देवहो,तुमच्या मुखातून धर्म श्रवण करण्याच्या इच्छेनेच खरोखर मी तुम्हाला "नाही" असे म्हटले आहे,तस्मात आता हा मी,कधीतरी मला सोडूनच जाणाऱ्या प्रिय असलेल्या देहाचा तुमच्याकरिता त्याग करितो.ज्या साधनाच्या द्वारे आपण--जीव साध्यापर्यंत गेलेला आहे,ते साधन अन्याच्या उपयोगाचे असेल आपण ते साधन ज्यास उपयोगाचे त्यांना ते साधन द्दावेच,देण्याची हयगय मुळीच करू नये.||७|| भावार्थ:---हे नाथहो,जो पुरुष,भुतांच्या दयेने आपल्या अनित्य देहाच्या योगाने धर्म किंवा कीर्ती ह्यापैकी कांहीच संपादन करण्यास इच्छित नाही त्याचा,वृक्षादीस्थावरगणही खेद करीत असतात म्हणजे तो त्यांपेक्षाही जड होय.म्हणून आपण--जीवानी अनित्य देहाने धर्म किंवा कीर्ती संपादन करावी,करण त्यासाठीच नरदेह आहे.आपण नरदेहास येऊन धर्म किंवा कीर्ती संपादन करीत नसताल व अन्य कांही तरी संपादन करीत असाल,तर आपल्यापेक्षा वृक्ष किंवा दगड--माती बरे म्हणावे लागतील.||८|| भावार्थ:---यास्तव प्राण्यांना दु:ख झाले असतां ज्याला स्वत:ला दु:ख होते व त्यांना हर्ष झाला असतां ज्याला हर्ष होतो,त्या पुरुषाचा जो धर्म तोच अक्षय धर्म होय.करण,सत्कीर्तीमान्-लोकांनी त्याच धर्माचे सेवन केले आहे.म्हणून आपण जीवानी इतर प्राण्यांना दु:ख झाले तर आपणांस दु:ख व्हावे किंवा इतर प्राण्यांना सुख झाले असेल तर आपणास सुख व्हावे.त्यासच "अक्षय--धर्म" म्हणतात,म्हणून आपण अक्षय धर्माचे पालन करावे.हाच धर्म आपणास परमात्म्याकडे--सुखरुपतेकडे नेणारा आहे,अन्य "क्षय--धर्म" धर्म संसाराकडे--दु:खाकडे नेणारा आहे.||९|| भावार्थ:---अरेरे ? ज्यांचा आपल्या स्वत:करिता तीळमात्रही उपयोग होत नाही,ज्यांना कोल्ही कुत्री खावून टाकणार व ज्याचा एक क्षणही भरवसा नाही त्या द्रव्य,पुत्रादिक बांधव आणि देह ह्यांच्या योगाने मर्त्यजनाने कोणावरही उपकार न करणे हि कितीतरी दैन्याची व दुख:ची गोष्ट आहे ! म्हणून आपण--जीवानी स्वत:करिता क्षय--धर्म न करता अक्षय--धर्म करावा,करण तो धर्म आपणास--जीवास सुखाकडे नेत असतो.द्रव्य,पुत्रादिक--देहसंबंधी यांच्यामुळे आपण--जीव कोणावर उपकार--परोपकार करू शकत नाहीत,अक्षय--धर्माचे पालन करू शकत नाहीत.अशा वृत्तीमुळे आपणास--जीवास दैन्य--दु:ख प्राप्त झाले आहे.म्हणून आपण--जीवानी दैन्य वृत्तीचा त्याग करून अक्षय-धर्माच्या वृत्तीचा स्वीकार करावा.||१०|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे निश्चय केलेल्या त्या अथर्वणवेदी दधीच ऋषीने,परब्रहम भगवंताचेठिकाणी आपल्या जीवाचे एकीकरण म्हणजे अंत:करणाचा बाध करून परमात्मारूप होऊन,देहाचा त्याग केला.||११|| भावार्थ:---तो असा की,ज्याने इंदिये,प्राण,मन,व बुद्धी ह्यांचे सायमन--बाध केले आहे आणि ज्याची अज्ञानरूपी बंधने तुटून गेली आहेत अश्या त्या तत्वदर्शी--परमात्मरूपी मुनीने उत्तम समाधीचा--निर्विकल्प--वृत्तीतीत अवस्थेचा स्वीकार केला,त्या वेळी देह पडला हे सुद्धा त्याला समजले नाही.आपणही--जीवानी महर्षि दधीचीप्रमाणे अंत:कारणाचा बाध करून वृत्तीतीत अवस्था प्रस्थापित करून परमात्मरूप व्हावावयास पाहिजे.||१२|| भावार्थ:---नंतर,भगवंताच्या तेजाने युक्त झाल्यामुळे तो महाबलाढ्य झाला आहे,त्याच्या सभोवती सर्व उत्पन्न करीत असता,ऐरावतावर आरूढ होवून शोभू लागला.||१३-१४|| भावार्थ:---आणि हे राजा,ज्याप्रमाणे प्रलयकाळी क्रुद्धः झालेला रुद्र,यमाला मारण्याकरिता त्याच्या अंगावर धावून जातो त्याप्रमाणे असुरसेनापतीनि परीवेस्ठीत असलेल्या वृत्रासुराचा वध करण्याकरिता तो इंद्र,वेगाने त्याच्या अंगावर धावून गेला.||१५|| भावार्थः---नंतर वैवस्वतमन्वंतराच्या प्रारंभी पहिल्यानेच सुरु झालेल्या चार युगांमध्ये त्रेतायुगाच्या आरंभी नर्मदा-- तीरी देवांचा असुरांसहवर्तमान अतिभयंकर संग्राम झाला.||१६|| भावार्थः---यामध्ये हे राजा,रुद्र,अष्टवसू,द्वादशादित्य अश्विनीकुमार,अर्यमादि,पितर,अग्नि,मरुद्गण,ऋभूसंज्ञक व साध्यसंज्ञक देव आणि विश्वेदेव ह्यांच्या योगाने व स्वतःच्या योगाने शोभत असलेल्या वज्रधारी देवाधिपती इंद्राला,युद्धामध्ये अवलोकन करून,वृत्रासूरप्रभृति दैत्यांस त्याचा उत्कर्ष सहन झाला नाही.||१७-१८|| भावार्थः---ह्याकरीता नमुचि,शंबर,अनर्वा,ऋषभ,अंबर,हयग्रीव,शंकूशिरा,विप्रचित्ती,अयोमुख,पुलोमा,वृषपर्वा,प्रहेती,हेति व उत्कल इत्यादि दैत्य,दानव,यक्ष व हजारो राक्षस आणि सुमाली व माली हे ज्यामध्ये प्रमुख आहेत व सुवर्णाचे अलंकार ज्यांनी धारण केले आहेत असे वृत्रासुराकडील दुर्मद व निर्भय असे दैत्य प्रत्यक्ष मृत्यूलाही दुःसह अशा इंद्रसैन्याच्या अग्रेसराचे सिंहासारिख्या गर्जनेने निवारण करून,त्यांना पीडा देऊं लागले आणि गदा,परीघ,बाण,ग्रास, मुद्गर,तोमर,शूल,परशु,खड्ग,शतघ्नी आणि भृकुंडी इत्यादी शस्त्रास्त्रांनी ते असुर सूरश्रेष्ठांवर चोहोंकडून वृष्टि करूं लागले||१९-२०-२१-२२-२३|| भावार्थः---राजा,एका बाणाच्या पिसाऱ्याला दुसऱ्या बाणाचा पिसारा लागून राहील अशा रीतीने सोडलेल्या बाणजालांनी आसमंतात आच्छादित झालेले ते देव आकांशातील मेघांनी आच्छादित झालेल्या नक्षत्राप्रमाणे दिसेनासे झाले.||२४|| भावार्थः---हे राजा,ते शास्त्रास्त्रवृष्टीने ओघ,शीघ्र वेध करणाऱ्या देवांनी अंतरिक्षामध्येच हजारोठिकाणी छेदन टाकिल्यामुळे देवसैनिकांना येऊन लागले नाहीत.||२५|| भावार्थः---नंतर ज्यांचे सर्व शस्त्रास्त्रांचे समुदाय क्षीण झाले आहेत असे ते असुर,पर्वतशिखरे,वृक्ष व पाषत्तन ह्यांच्या योगाने देवसैन्यावर वृष्टी करूं लागले परंतु त्या गिरीशिखरादिकांचेहि पूर्वीप्रमाणेच देवांनी तुकडे तुकडे केले.||२६|| भावार्थः---हे राजा,नंतर वृत्रासुरा ज्यांचा स्वामी आहे असे ते असुर,आपल्या शस्त्रास्त्रसमुदायांनी त्या इंद्राच्या सेनेतील लोकांना कांही जखमसुद्धा न होता ते सुखरूप आहेत आणि वृक्ष,पाषाण व अनेक प्रकारची पर्वतशिखरे ह्यांच्या योगानेही त्यांना कांहीच इजा झाली नाहीत असे अवलोकन करून भयभीत झाले.||२७|| भावार्थः---सारांश-जशी सत्पुरुषांचेठिकाणी दुर्जनांनी योजिलेली निंदापर कठोर भाषणे व्यर्थ होतात म्हणजे त्यांना क्षोभ उत्पन्न करीत नाहीत,त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा अनुकूल असलेल्या त्या देवगणांचेठिकाणी दैत्यांनी पुन्हापुन्हा त्यांच्या नाशाविषयी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाले.||२८|| भावार्थः---नंतर श्रीहरीचे भक्त नसल्यामुळे ज्यांचे धैर्य शत्रूंनी हरण केले आहे व युद्धाविषयीचा ज्यांचा गर्व नष्ट झाला अशा त्या जगद्विख्यात असुरांनी आपले प्रयत्न व्यर्थ झाले असे पाहून व आपल्या अधिपतीचा त्याग करून पलायन करण्याचे मनांत आणिले व त्याप्रमाणे पलायन करूं लागले.||२९|| भावार्थः---त्या वेळी पलायन करीत असलेल्या आपल्या अनुयायी असुरांना व मोठ्या भयाने पळत सुटलेले व अस्ताव्यस्त झालेले ते सैन्य अवलोकन करून तो पुरुषश्रेष्ठ महापराक्रमी धैर्यवान वृत्रासुर असुर हास्य करून धैर्यवान लोकांना मनोहर वाटणारे असे हे समयोचित भाषण करूं लागला------------हे विप्रचिते,हे नमुचे,हे पुलोमन हे मय,हे अनर्वन आणि हे शंबर तुम्ही माझे भाषण श्रवण करा-----------------||३०-३१|| भावार्थः---अहो शूरपुरुषहो,जो प्राणी उत्पन्न झाला आहे त्याला सर्वठिकाणी मृत्यू हा नि:संशय येणारच आहे कारण,या संसारमार्गामध्ये मृत्युच्या निवृत्तीचा उपाय ईश्वराने निर्माण केलाच नाही."जो जन्मतो तो मृत्यूच्या निवृत्तीचा उपाय ईश्वराने निर्माण केलाच नाही."असा शास्त्राचाच नियम आहे.तस्मात ह्यांच्यापासून अनायासाने जर इहलोकी यश आणि परलोकि स्वर्ग हे प्राप्त होत असतील तर ह्या प्राप्त झालेल्या योग्य मृत्यूचा कोण स्वीकर करणार नाही ? सर्वही करतीलच.जर जो युद्ध-वीर समरंगणात शत्रूपक्षाबरोबर लढत--लढत यश प्राप्त झाले तर मृत्युलोकी यश प्राप्त होऊन त्यास कीर्ती प्राप्त होते किंवा शत्रुपक्षाबरोबर लढत--लढत समरंगणात मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती होत असते,म्हणून "देह जावो अथवा राहो स्वदेशाविषयी दृढ भावो"अशा भावनेने समरंगणात लढवावे,तर पलायन करू नये.||३२|| | व्दौ संमताविह मृत्यू दुरापौ यद् ब्रम्हसंधारणया जीतासु: | | कलेवरं योगरतो विजह्याद् यद्ग्रणीर्वीरशयेऽनिवृत्त: ||३३|| भावार्थ:---कारण,योगमार्गामध्ये प्रवृत्त होवून व इंद्रियदमन करून ब्रहमचिंतनानें देहाचा त्याग करणे आणि रणभूमीचे ठिकाणी अग्रेसर होवून माघार न फिरता देहत्याग करणे,असे हे दोन प्रकारचे मृत्युच या लोकी शास्त्रसंमत असून खरोखर दुर्लभ आहेत.म्हणून आपण जीज्ञासू असाल तर मन आणि इंद्रिये ताब्यात घेऊन व सर्वाविषयांचा त्याग करून ब्रह्मचिंतनाने देहाचा त्याग करावा किंवा आपण जर देशभक्त असाल तर रणभूमीच्या ठिकाणी अग्रेसर होऊन माघार ण फिरता देहत्याग करावा.यात दोघेही ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार उत्तम गतीस प्राप्त होतात.||३३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी हा(१०)दहावा अध्याय(३३)श्लोकांनी युक्त संपन्न झाला||१०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ ११---आता आकराव्या अध्यायामध्ये,इंद्रासहवर्तमान युद्ध करणाऱ्या वृत्रासुराची भक्ती,ज्ञान व बल ह्यामध्ये पर्यवसान असलेली मनोहर भषणे वर्णन केली आहेत.||११|| |११--- वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती ______________________________________________________________________________| |श्रीशुक उवाच | |त एवं शंसतो धर्म वच:पत्युरचेतस: | नैवागृन्हांन् भयत्रस्ता: पलायनपरा नृप ||१|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ह्याप्रमाणे तो दैत्याधिपती वृत्रासुर धर्मकथन करीत असतांही भयभीत झाल्यामुळे अंतःकरण व्याकुळ होऊन पळत सुटलेल्या त्या असुरांनी ते त्या आपल्या प्रभुचे भाषण श्रवण केले नाही.||१|| भावार्थः---हे राजा,कालानुसार वर्तन करणाऱ्या देवांनी पळविलेली ती दैत्यांची सेना,अनाथाप्रमाणे अस्ताव्यस्त होत आहे असे अवलोकन करून,देवांचा पराक्रम सहन न करणारा तो इंद्रशत्रू असुरश्रेष्ठ वृत्रासुर,अत्यंत क्रुद्ध होऊन संतप्त झाला,आणि बलात्काराने त्या देवांचे निवारण करून निर्भत्सनापूर्वक असे म्हणाला की,------------||२-३|| भावार्थः---अहो,मातेच्या उदरांतून विष्ठेप्रमाणे बाहेर निघालेल्या आणि संग्रामातून पळत सुटलेल्या दैत्यांना पृष्ठभागी धांवून ताडन करणाऱ्या तुम्हांस काय बरे फल प्राप्त होणार आहे ? म्हणून आपण--जीवानी जर देश-भक्त असून लढण्याचा प्रसंग आला असेल तर,माघार घेऊन सैन्य पलायन करीत असेल तर पाठीस मारू नये,असा शात्राचा नियम आहे,करण यश किंवा धर्म यांपैकी कांहीच प्राप्त होणार नाही.कारण,आपणास शूर-मानणाऱ्या पुरुषांना भयभीत झालेल्या पुरुषांचा वध करणे हे या लोकी स्तुत्य नाही व परलोकी स्वर्गाची प्राप्ति करून देणारेही नाही.||४|| भावार्थः---तस्मात हे शुद्रहो,जर तुम्हांला संग्रामाची हौस असेल,अथवा तुमच्या ह्रदयामध्ये धैर्य असेल आणि विषयसुखाविषयी इच्छा नसेल तर एकक्षणभर माझ्या अग्रभागी उभे रहा.आपण जर देश-भक्त सैनिक असाल, तर वृत्रासुरसारखे नियमाने युद्ध करावे,तर देवतासारखे गैर-नियमानुसार युद्ध करू नये.||५|| भावार्थः---हे राजा,ह्याप्रमाणे भाषण करून शरीराच्या योगाने आपल्या देवगण शत्रूंना भयभीत करणाऱ्या त्या महाबलिष्ठ वृत्रासुराने अशी मोठी गर्जना केली की,तिच्या योगाने सर्व प्राणी निष्चेष्ट--किर्यारहित झाले.||६|| भावार्थः---आणि त्या वृत्रासुराच्या गर्जनेने व त्याने केलेल्या बाहूताडनाच्या नादाने सर्व देवगण,व्रजाने ताडित झाल्याप्रमाणे मूर्च्छित होऊन भूमीवर पडले.||७|| भावार्थः---ते समयी ज्याप्रमाणे मदोन्मत्त गज,देवनळांच्या वनाचे मर्दन करितो त्याप्रमाणे रणभूमीवर मदोन्मत्त झालेला वृत्रासुर,हस्तामध्ये शूल धारण करून स्वसामर्थ्याने पृथ्वीला कंपित करीत करीत,भयभीत होऊन,डोळे मिटून पडलेल्या देवसैन्याचे पायांनी मर्दन करूं लागला.||८|| भावार्थः---नंतर,देवसैन्याने मर्दन सहन न करणाऱ्या इंद्राने,त्या वृत्रासुराला अवलोकन करून संमुख धावून येणाऱ्या त्या आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेंकिली.ती अत्यंत दुःसह गदा,आपल्या आंगावर येत आहे असे जाणून ती वृत्रासुराने डाव्या हाताने सहज धरिली.||९|| भावार्थः---हे राजा,नंतर अत्यंत क्रुद्ध झालेल्या त्या महापराक्रमी इंद्र-शत्रू वृत्रासुराने,युद्धामध्ये गर्जना करीत करीत त्याच गदेने इंद्रवाहन ऐरावताच्या गंडस्थलावर प्रहार केला,तेव्हा त्याची त्या कर्माबद्दल सर्वांनी प्रशंसा केली.आपणही--जीवानी योग्य कार्याची प्रशंसा करावी.||१०|| भावार्थः---ह्याप्रमाणे तो ऐरावत वृत्रासुराच्या गदेने ताडित झाला असतां व्रजाने ताडिल झालेल्या पर्वताप्रमाणे त्याचे सर्वांग चुरून गेले आणि तो श्रम पावून फुटून गेलेल्या मुखांतून रक्ताचे वमन करीत करीत अत्यंत पिडीत असतां,इंद्रासहवर्तमान तत्क्षणी अठठावीस(२८) हात मागे सरला.||११|| भावार्थः---त्या वेळी वाहन मूर्च्छित झाल्यामुळे खिन्न झालेल्या इंद्रावर त्या महात्म्या वृत्रासुराने पुनरपि गदेचा प्रहार केला नाही व त्यासमयी अमृतस्त्राव होणाऱ्या आपल्या ह्स्ताच्या स्पर्शाने जखमी झालेल्या ऐरावत वाहनाची पीडा दूर करून इंद्र पुन्हा युधार्थ उभा राहिला.||१२|| भावार्थः---हे गजेंद्रा,वज्र धारण करून युद्धाच्या इच्छेने स्थित असलेल्या त्या भ्रातृघातक (विश्वरुपाला मारणाऱ्या)शत्रूला अवलोकन करून व त्याचे ते भ्रातृवधरूप क्रूर पापकर्म स्मरण करून,शोकाने संतप्त झालेला तो वृत्रासुर,मोहाने व्याप्त होऊन हंसत हंसत त्याला म्हणाला की,------------||१३|| भावार्थः---वृत्रासुर म्हणाला-----हे अतिदुष्टा,जो तूं ब्रह्मघातकी आणि भ्रातृघातकी आहेस तो शत्रू,आज माण्या अग्रभागी स्थित झालास हि फार आनंदाची गोष्ट आहे आणि आज मी आपल्या शुलाने तुझे पाषाणसदृश्य ह्र्दय विदारण करून तत्काल आपल्या भ्रात्याला ऋणापासून मुक्त होईन,हीही गोष्ट आनंदाचीही आहे.||१४|| भावार्थः---अरे,स्वर्गप्राप्तीची इच्छा करणारा निर्दय याज्ञिकजन,जसा पशुचा शिरच्छेद करितो.त्याप्रमाणे ज्या तूं आत्मज्ञानी,ब्राहमण,स्वतःचा गुरु,निष्पाप आणि यज्ञार्थ दीक्षा घेतलेली अशा माझ्या ज्येष्ठ बंधूचा विश्वासपूर्वक शिरच्छेद केला आहेस व ह्यामुळे लज्जा,संपत्ति,दया व कीर्ती ह्यांनी त्याग केलेल्या आणि स्वतःच्या त्या कर्मामुळे पुरुषभक्षक राक्षसांनी सुद्धा निंदा केलेल्या त्या माझ्या शुलाने देह निर्वाण होऊन दुःखाने मरण पावलेल्या व अग्नीचचाही स्पर्श न झालेला तुला गृध्रपक्षी यथेष्ट भक्षण करितील.||१५-१६|| भावार्थः---आतां ह्याप्रमाणे जरी मी मृत झालो तरी तू कसा सुखी राहशील ?कारण,माझे अनुयायी देव तुला मारितीलच असे म्हणशील तर-----हे दुष्टा,तुज घातक्याच्या अनुरोधाने वागणारे जे कोणी इतर अज्ञ देव येथे अस्त्रधारण करून मला प्रहार करितील त्यांचे कंठ मी आपल्या तीक्ष्ण धारेच्या शुलाने तोडून त्यांच्या योगाने गणासहवर्तमान भैरवादी भूतनाथांचे यजन करीन.||१७|| भावार्थः---अथवा हे वीरा इंद्रा,ह्या संग्रामामध्ये माझ्या सैन्याचा नाश करून कदाचित तूंच जर माझे शीर व्रजाने हरण केलेस तर मी कर्मबंधनापासून मुक्त होऊन व देहाच्या योगाने भूतांना बळी अर्पण करून,धीर सत्पुरुषांच्या पदास प्राप्त होईन.||१८|| भावार्थः---याप्रमाणे भाषण करून वांचण्यापेक्षा मला मृत्यूच अभिमत आहे अशा आशयाने पुनरपि भाषण करितो की,----हे सुरेश्वरा,मी तुझा शत्रू तुझ्या पुढे उभा असतांना,तूं आपले अमोघ वज्र कशाकरितां टाकीत नाहीस ? अरे,जशी कृपणपुरुषापाशी केलेली कार्ये होण्याविषयीची याचना व्यर्थ होते त्याप्रमाणे व व्यर्थ झालेल्या पूर्वीच्या गदेप्रमाने आतां वज्रही निष्फळ होईल,असा तूं संशय मनामध्ये आणूं नकोस.||१९|| भावार्थः---आतां माझे हे वज्र अमोघ कसे म्हणून विचारशील तर-----हे इंद्रा,तुझे हे वज्र खरोखर श्रीहरीच्या तेजाने व दधीच ऋषीच्या तपाने पाजळलेले आहे.याकरिता विष्णूने प्रेरणा केलेला असा तूं,त्याच वज्राच्या योगाने मज शत्रूचा वध कर.स्वतःच्या विजयाविषयी तुला संदेह नको.कारण,"जिकडे श्रीहरी असतो तिकडेच विजय,तिकडेच लक्ष्मी व तिकडेच द्यावगैरे सर्वही गुण असता"म्हणून आपण--जीवानी श्रीहरीचा--परमात्म्याचा आश्रय घेऊन सत्संग करून ज्ञान--मार्गाने श्रीहरीरुपच--परमात्मारुपच व्हावे. ||२०|| भावार्थः---आतां वधाच्या योगाने मला पीडा होईल हाही संशय तूं मनामध्ये मुळीच आणूं नकोस,कारण,माझा स्वामी जो भगवान संकर्षण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या चरणकमली मी आपले मन स्थिर करून,तुझ्या वज्राच्या योगाने विषयभोगरूप पाश छिन्न झाला असतां,देहाचा त्याग करून,योगीजनांला प्राप्त होणाऱ्या मोक्षरूप गतीला पावेन.आपणही वृत्रासुरासारखे परमात्म्याच्या चरणाकमली आपले मन स्थिर करून देहाचा त्याग करावा.||२१|| भावार्थः---तर मग "भगवान संकर्षण मज स्व-दासालाच स्वर्गादिसंपत्ती देईल हीसुद्धां शंका तूं मनामध्ये आणूं नकोस अशा अभिप्रायाने पुनरपि भाषण करितो की,-----आपले--परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांची बुद्धी निश्चित झाली आहे अशा आपल्या भक्तजणांना परमेश्वर स्वर्गाचेठिकाणी,भूतलावर आणि पाताळांत ज्या संपत्ति आहेत त्या निःसंशय देत नाही.कारण,त्याच्यापासून वैर,उद्वेग,मानस संताप,गर्व,कलह,दुःख आणि श्रम हि उत्पन्न होतात.म्हणून आपण--जीवानी भगवंताकडे जड--संपत्ती,मान--प्रतिष्ठा मागू नये,कारण ती जड संपत्ती किंवा मान--सन्मान वैर,उद्वेग,मानस,संताप,गर्व,कलह,दु:ख आणि श्रम हे दोष उत्पन्न करितात.||२२|| भावार्थः---बरे तर मग स्वभक्तास भगवान काय देतो असे असशील तर-----हे इंद्रा,आमचा स्वामी संकर्षण,आपल्या भक्ताला धर्मार्थकामसंबंधी होत असलेल्या आयासांचा नाश करितो त्या आयासांच्या प्रयत्न तुमचेठिकाणी नाहीसा झाला नाही त्याअर्थी भगवत्प्रसाद तुम्हांवर झाला नाही,म्हणूनच स्वर्गादि संपत्तीहि तुम्हालांच प्राप्त होतील||२३|| भावार्थः---ह्याप्रमाणे इंद्राला आपला अभिप्राय सांगणु,वृत्रासुर भगवंताची प्रार्थना करितो कि,-हे हरे,तुझे पायच ज्यांचा मुख्य आश्रय आहे त्या दासांचा अनुदास पुनरपि मी होण्याची इच्छा करितो,माझे मन,तुज प्राणनाथाच्या गुणांचे स्मरण करो,माझी वाणीही त्यांचेच कीर्तन करो व माझा देहही तुझेच सेवनरूप कर्म करो ||२४|| भावार्थः---आता "दास्यांच्या योगाने तुला काय उपयोग होणार आहे?मी तुला मोठमोठी फळे देतो" असे म्हणशील तर हे सर्वसौभाग्यनिधे,मी स्वत:पासून तुला निराला करून ध्रुवपद,ब्रह्मपद,सार्वभौम,पातालाधीपती,योगसिद्धी अथवा मोक्षही नाही.||२५|| भावार्थ:---तर मग तुला इच्छा तरी कशाची आहे असे विचारशील तर-----हे कमलनयन,ज्याप्रमाणे पंख न फुटलेले पक्ष्याचे बालक,दिविभूतादि पक्ष्यापासून पिडीत झाले असता ते आपल्या मातेला अवलोकन करण्याची इच्छा करितात,किंवा दाव्यांनी बंधीलेली लहान लहान वासरे ज्याप्रमाणे स्तनपानाची इच्छा करितात अथवा कामाने खिन्न झालेली स्त्री,ज्याप्रमाणे दूरदेशास गेलेल्या पतीला अवलोकन करण्याची इच्छा करिते,त्याप्रमाणे तापत्रयाने पिडीत,कर्मणी बद्ध आणि कामादिकांणी खिन्न झालेले माझे मन,तुला--परमात्म्याला अवलोकन करण्याची इच्छा करिते.म्हणून आपण--जीवानी तापत्रयांनी--अध्यात्मिक-ताप,आधिभौतिक-ताप,व आधिदैविक-तापांनी पिडीत--दु:खी,संसारिक-कामांनी खिन्न--दु:खी आहोत,म्हणून जो परमात्मा सुखरूप आहे,त्याच्याशी एकरूप--सुखरूप व्हावे.||२६|| | ममोत्तमश्लोकजनेषु सख्यं | संसारचक्रे भ्रमत: स्वकर्मभि: | | त्वन्माययाऽऽत्मा त्मजदारगेहे- | ष्वासक्तचित्तस्य न नाथ भूयात्||२७|| भावार्थ:---हे नाथ,स्वकर्माच्या योगाने सांसरचक्रामध्ये भ्रमण करीत असलेल्या माझे,तुज श्रेष्ठकीर्ती परमेश्वराच्या भाक्ताचेठीकानी सख्य होवो,आणि तुझ्या मायेने पुत्र,दारा आणि गृह ह्यांचेठीकानी मी आसक्तीचित्त आहेच ह्यास्तव पुनरपि त्यांचेठीकानी माझी आसक्ती न व्हावी.माझे सख्य पुत्र.दारा,आणि गृह आसक्त-चित्त न राहता,परमेश्वराच्या भक्ताच्या ठिकाणी चित्त सख्य होवो,कारण ते परमात्मारूप असतात व आपण त्यांचा सत्संग केल्यामुळे आपणही परमात्मारुपच--सुखरुपच होतोत.||२७|| ११---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी वृत्रासुर संभाषणनामक हा(११)अकरा अध्याय सत्तावीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||११|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ |१२---आता या बाराव्या अध्यायामध्ये अतिखिन्न झालेल्या इंद्राला स्वतांच वृत्रासुराचे आपल्या वधाविषयी उत्तेजन दिले असता,त्या इंद्राने वृत्रासुराचा वध केला असे वर्णन केले आहे.||१२|| |१२--- वृत्रासुराचा वध ______________________________________________________________________________ | ऋषिरुवाच | एवं जिहासुर्नुप देहमाजौ | मृत्युं वरं विजयान्मन्यमान: | | शूलं प्रगृह्याभ्यपतत् सुरेंद्र | यथा महापुरुषं कैटभोऽप्सू ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षितराजा,याप्रमाणे विजयापेक्षा मृत्यूच श्रेष्ठ असे मानणारा व युद्धामध्ये देहत्याग करण्याची इच्छा करणारा तो वृत्रासुर,जसा कैटभनामक दैत्य प्रलयोदकामध्ये श्रीविष्णुवर चाल करून गेला होता त्याप्रमाणे शूल घेऊन देवेंद्राच्या अंगावर धांवला.||१|| भावार्थ:---नंतर त्या असुरश्रेष्ठ वृत्रासुराने प्रलयकालच्या अग्निप्रमाणे कठोरशिखांनी युक्त असलेला शूल गरगर फिरवून वेगाने महेंद्राला मारण्याकरितां फेकला आणि गर्जना करून 'हे पाप्या मेलास' असे तो वीर क्रोधाने म्हणाला.||२|| भावार्थ:---ते समयी ग्रह व उल्का ह्यांप्रमाने पाहण्यास अशक्य असा तो शूल,भ्रमण करीत करीत आकाशामध्ये येत आहे असे पाहून भय रहित अशा त्या व्रजधारी इंद्राने,शंभर अरांनी युक्त असलेल्या त्या शुलाचे व त्या वृत्रासुराच्या वासूकिसर्पीसारख्या बाहुचे छेदन केले.||३|| भावार्थ:---नंतर ज्याचा एकबाहू छिन्न झाला आहे अशा खवळलेल्या त्या वृत्रासुराने व्रजधारण करणाऱ्या इंद्राजवळ येऊन,आपल्या परिध आयुधाने,हनुवटीवर इंद्राला आणि ऐरावताला ताडन केले.त्या बरोबर इंद्राच्या हातांतून व्रज खाली पडले.||४|| भावार्थ:---त्या काळी देव,असुर व सिद्धचारनांचे समुदाय,त्या वृत्रासुराच्या महाअद्भुत कर्माची प्रशंसा करूं लागले आणि इंद्राचे ते संकट पाहून हाहाकारपूर्वक अत्यंत आक्रोश करूं लागले.देव,असुर,व सिद्धचारणांचे समुदाय,त्या वत्रासुराची प्रांशसा करू लागले आणि त्याचबरोबर इंद्रावर संकट पाहून आक्रोश करू लागले,याप्रमाणे त्यांची द्विधा अवस्था झाली.||५|| भावार्थ:---नंतर शत्रूसमीप आपल्या हातांतून गळून पडलेले वज्र,जेव्हा इंद्र लज्जित होऊन घेईनासा झाला तेव्हां पुनरपि वृत्रासुर त्याला म्हणाला की,---हे इंद्रा,खेद करण्याची हि वेळ नव्हे.आतां तूं वज्र धारण करून आपल्या शत्रूचा (माझा)वध कर.खरा शूर असलेला योद्ध हा शत्रूंना बेसावध अवस्थेत आक्रमण करीत नसतो,तर शत्रूंना सावध करून आक्रमण करीत असतो.||६|| भावार्थः---कारण,उत्पत्ति,स्थिती व लय ह्यांचा अधिपति जो सर्वज्ञ,अनादि,नित्य आणि अंतर्यामी परमात्मा त्यावांचून,युद्धाची इच्छा धारून शस्त्र धारण करणाऱ्या व देहालाच आत्मा समजणाऱ्या लोकांना सर्वदा जय कधीही प्राप्त होत नाही.परंतु क्वचितठिकाणी जय मिळतो व क्वचितठिकाणी मिळतच नाही,असे होत असते.आपण--जीव हा परमात्म्याचेच आहोत,तर देहाचे नाहीत असा निश्चय करून जीवन व्यतीत करावे,कारण सहसा देहालाच आत्मा समजणाऱ्याचाच जय होत नाही,तर क्वचित--अपवाद प्रसंगात जय प्राप्त होत असतो,असा विवेक करून ईश्वरास मानून जीवन व्यतीत करावे.||७|| भावार्थः---त्यानंतर जीवाला पराधिनत्व कसे हे सांगणाऱ्या अभिप्रायाने भाषण करितो की,------जाळ्याने बद्ध झालेल्या पक्षी जशी हालचाल करितात त्याचप्रमाणे पालकांसहवर्तमान हे चतुर्दश लोक ज्याच्या अधीन असल्या--मुळे स्वत: विवध होत्साते चलनावलनादि चेष्टा करितात तोच सर्वचालक भगवान ह्या जयादिकांचे कारण आहे हे तू कसे म्हणतोस असं म्हणशील तर---हे इंद्रा इंद्रियशक्ति मानसशक्ति,प्राण,जीवन व मृत्यू ह्यांच्या रूपाने स्थित असलेला तो भगवानच सर्वाला कारण आहे.हे न जाणून लोक,मोहाने--अज्ञानामुळे जड-देहच कारण आहे असे समजतात.म्हणून आपण--जीवानी ईश्वरावर श्रद्धा ठेऊनच जीवन व्यतीत करावे,कारण आपला--जीवाचा मुख्य आश्रय तो ईश्वर आहे.आपल्या--जीवाच्या इंद्रिये-शक्तिला,मानस-शक्तिला,प्राण-शक्तिस व जीवन-मृत्यूस करण आहे.थोडक्यात ईश्वराच्या कृपेशिवाय आपण एक पाऊल टाकू शकत नाहीत,म्हणून ईश्वरास मानावे व त्याची भक्ती करावी.||८|| | ओज: अहो बलं प्राण ममृतं मृत्युमेव च | तमज्ञाय जनो हेतूमात्मानं मन्यते जडम् ||९|| भावार्थः---आतां इंद्रियशक्ति,मनःशक्ति व शरीरशक्ति हि,जयाची कारणे असून त्यांचे कारण प्राण आहे,व प्राणाच्याच स्थितीला वांचणे व वियोगाला मृत्यू असे म्हणण्याची प्रसिद्धी आहे.तेव्हा भगवानच जयादिकांचे कारण आहे हे तूं कसे म्हणतोस अस असशील तर–---हे इंद्रा,इंद्रियशक्ति,मानसशक्ति,शरीरशक्ति,प्राण,जीवन व मृत्यू ह्यांच्या रूपाने स्थित असलेला तो भगवानच सर्वाला कारण आहे.हे न जाणून लोक,मोहाने जड देहच कारण आहे असे समजतात.म्हणून आपण--जीवानी सत्संग केला असता यथार्थ ज्ञान होऊन सर्व कांही कळते व त्यानुसार जीवन व्यतीत होत असते.असे केले असता आपण आपले अज्ञान नांवाचा दोष निवृत्त होऊन मोह नाहीसा होऊन देहास आत्मा न समजता--जीवास--परमात्म्यास आत्मा समजतोत.||९|| भावार्थः---हे इंद्रा,ज्याप्रमाणे काष्ठमय स्त्री आणि यंत्रमय मृग हे पराधीन असतात तशीच सर्वभूते ईश्वराधीन आहेत असे समज,करण आपण त्याचे--ईश्वराचे अंश आहोत व ईश्वर अंशी आहे.जसे फुल म्हणजे ईश्वर--परमात्मा व पाकळी महणजे जीव आहे.सर्व पाकळी मिळून फुल आहे,त्याचप्रमाणे सर्व जीव मिळून ईश्वर--परमात्मा आहे.असे आपणास जीवास सत्संग केला असते,तेव्हा कळते.||१०|| | पुरुष: प्रकृतिर्व्यक्तमात्मा भुतेन्द्रियाशया: | शक्नुवन्त्यस्य सर्गादौ न विना यदनुग्रहात् ||११|| भावार्थः---परंतु अहो,आपल्या उत्पत्तिला कारणीभूत अशा प्रधान पुरूषांदिकांच्या स्वाधीन भुते आहेत असे म्हणणे योग्य दिसते अशी शंका घ्यावी तर----हे इंद्रा,पुरुष,प्रकृति,महतत्त्व,अहंकार,पंचमहाभूते,इंद्रिये व मन हि ईश्वराच्या अनुग्रहावांचून ह्या विश्वाची उत्पत्तिवगैरे करण्यास समर्थ होत नाहीत.ईश्वराच्या सत्य संकल्पामुळेच व अनुग्रहामुळेच प्रकृत्ति विश्वाची उत्पत्ति,पालन व संहार कार्य करिते.||११|| भावार्थः---बरे स्वकर्मद्वारा जीवच सृष्टयादिकांविषयी कारण आहे असे मीमांसक मानितात असे म्हणशील तर----हे इंद्रा,वर सांगितलेल्याप्रमाणे ईश्वरच स्वतंत्र व सर्वनियंता आहे हे न जाणणारा पुरुष,पराधीन जिवालाच स्वतंत्र मानितो.आतां त्याचप्रमाणे पित्रादिक हेच स्त्रष्टे व व्याघ्रादिक हेच घातक दृष्टीस पडतात असे म्हणशील तर,हे इंद्रा,स्वतः ईश्वरच भूतांच्या योगाने,भूतांच्या--जीवाच्या कर्मांमुळेच भूते उत्पन्न करितो व त्यांच्याच कर्मांमुळेच योगाने त्यांचा संहार करितो.म्हणून आपण जीवांनी विहित कर्मे करावीत व निषिद्ध कर्मे करू नये.||१२|| भावार्थः---आतां तुजपासून पराजय पावलेल्या मला जयाचीवगैरे शंकाही नाही.तस्मात्,कशाकरीता मला बलात्काराने युद्धाविषयी प्रवृत्त करितोस असे म्हणशील तर----हे इंद्रा,पराजयकाळी पुरुषाची इच्छा नसूनही जशी त्याला अकीर्ति,ऐश्वर्य हानि व अलक्ष्मी इत्यादिक प्राप्त होतात त्याचप्रमाणे जयकाली आयुष्य,श्री,कीर्ती,ऐश्वर्य आणि इतरही ज्या संपत्ति आहेत त्या सर्वही पुरुषांस प्राप्त होतात.ज्याच्या--त्याच्या कर्मामुळेच जय--पराजय होत असतात.||१३|| | तस्मादकीर्तियशसोर्जयापजययोरपि | सम: स्यात् सुखदु:खाभ्यां मृत्युजीवितयोस्तथा ||१४|| भावार्थः---असो ज्याअर्थी याप्रमाणे सर्व ईश्वराधीन आहे त्याअर्थी पुरुषाचे अपकीर्ती अथवा यश,जय अथवा पराजय,सुख अथवा दुःख आणि त्याचप्रमाणे मृत्यू अथवा जीवित ह्यांविषयी हर्ष किंवा विषाद न मानितां समदृष्टीने रहावे.आपण--जीवानी प्रारब्धानुसार जीवन जगावे. ते प्रराब्ध अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल त्यानुसार जीवन जगावे.प्रारब्ध म्हणजे विधीनुसार प्रयत्न आवश्य करावे.असे करून अपयश किंवा यश आले तर त्यास प्रारब्ध समजून जीवन अनुकूल किंवा प्रतिकूल परीस्थित समाधनाने जीवन व्यतीत करावे.||१४|| भावार्थः---आतां समदृष्टी होण्यास उपाय काय?असे विचारशील हे इंद्रा,सत्त्व,रज आणि तम हे प्रकृतिचेच गुण असून आत्म्याचे नाहीत,आपण--जीव आत्मा आहे.यास्तव त्या गुणकार्य--देहाचे आहेत,तर देहाचेठिकाणी आपण साक्षीमात्र आहे असे जो जाणतो तो हर्षादिकांनी--हर्ष--आनंद किंवा शोक--दु:खानी लिप्त होत नाही,तर अलिप्त असतो.||१५|| भावार्थः---असे सांगून आतां हर्ष आणि खेद ह्यांच्या निवृत्तीविषयी मीच तुझा गुरु आहे असे सांगण्याच्या अभिप्रायाने वृत्रासुर म्हणतो की,-----हे इंद्रा,माझे आयुध व भूज ह्यांचा छेद झाल्यामुळे जरी तूं माझा पराजय केलास तथापि,तुझे प्राण हरण करण्याच्या इच्छेने मी युद्धामध्ये यथाशक्ति उद्योग करीतच आहे हे तूं पहा ! म्हणून आपण--जीवानी अनुकूल किंवा प्रतिकूल परीस्थित स्वधर्मानुसार प्रयत्नपूर्वक उद्योग--कर्तव्य कर्मे करावीच.असे करून जर अपयश आले किंवा यश आले तरी समाधानाने जीवन व्यतीत करावे.||१६|| भावार्थः---असो.जयादिक अनियत आहेत हे जे आरंभी कथन ते त्याच्याच आता वृत्रासुर द्दूतरूपकाने उपसंहार करितो.तो असा की,----ह्या समररूप द्दुतामध्ये प्राण हीच पणाला लावण्याची स्तुति होय,बाण हेच फांसे होत,वाहने ह्याच इकडे तिकडे फिरविण्याच्या सोंगट्या होत आणि ह्या रण-द्दुतामध्ये बाणरूप फांसा पडण्याचे पूर्वी अमक्याच्या पराजय होईल हे समजत नाही.||१७|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षितराजा,असे वृत्रासुराचे निष्कपट भाषण श्रवण करून इंद्राने त्याची प्रशंसा केली व ह्स्तामध्ये व्रज ग्रहण करून,विस्मयरहित असतां हंसत हंसत त्याला असे म्हणाला की,-----||१८|| भावार्थः---इंद्र म्हणाला----हे दानवा,तूं जन्मत: निष्कृष्ट असूनही कृतार्थ आहेस,हे मोठे आश्चर्य आहे आणि ज्याअर्थी अशा संकटसमयीसुद्धा तुझी अशाप्रकारची मति आहे त्याअर्थी तूं पूर्वी अनन्यभावाने अगदी मनांपासून जगन्मित्र जगदीश्वर परमात्म्याची सेवा केली आहेस.||१९|| भावार्थः---आणि त्याचप्रमाणे तूं ज्याअर्थी आपल्या असुरस्वभावाचा त्याग करून सत्पुरुष स्वभावाला पावला आहेस त्याअर्थी तूं खरोखर जनमोहक जशा वैष्णवीमायेला तरला आहेस.||२०|| भावार्थः---अहाहा !हे वृत्रासुरा,तूं स्वभावतः रजोगुणी असून हि सत्त्वमूर्ती भगवान वासुदेवाचेठिकाणी तुझी बुद्धी दृढ झाली आहे हे खरोखर मोठे आश्चर्य होत.||२१|| भावार्थः---आणि ह्यामुळेच स्वर्गादिसुखाची तुला अपेक्षा नाही हे अगदी योग्य आहे,कारण,ज्या तुला मोक्षाधिपती भगवान श्रीहरीचेठिकाणी भक्ति प्राप्त झाली आहे त्या आनंदरूप अमृतसागरामध्ये क्रीडा करीत असणाऱ्या तुला खाचेतील उदकासारखा अत्यंत क्षुद्र अशा स्वर्गादीकांनी काय करावयाचे आहे?कांहीच नाही.आपणही--जीवानी वृत्रासुरासारखा विवेक करून सत्संगच्याद्वारे ज्ञान प्राप्त करून परमात्मारूप व्हावे,तर मृत्यू-लोकांतील व परलोकांतील नाशिवंत विषयांचा त्याग करावा,करण ते क्षण-भंगुर सुख देणारे असून दु:ख उत्पन्न करणारे आहेत.||२२|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित--राजा,याप्रमाणे धर्म जाणण्याच्या इच्छेने परस्पर भाषण करणारे,संग्राममुख्य असे ते इंद्र आणि वृत्रासुर,एकमेकांबरोबर युद्ध करूं लागले.||२३|| भावार्थः---हे श्रेष्ठराजा,शत्रूदमन करणाऱ्या वृत्रासुराने,आपला भयंकर लोहमयपरिष वामहस्ताने फिरवून इंद्रावर फेकिला. ||२४|| भावार्थः---त्या वेळी देवेंद्राने,तो वृत्रासुराचा परिघ व अवशिष्ट राहिलेला तो हत्तीच्या सोंडेसारखा हात एकदमच आपल्य शंभर अरांनी युक्त असलेल्या वज्राने तोडून टाकिले.||२५|| भावार्थः---ते समयी हे राजा,इंद्राने वज्राच्या योगाने ताडन केल्यामुळे पंख तुटून आकाशांतून खाली पडलेल्या पर्वताप्रमाणे,समुल छेदून टाकीलेल्या बाहुच्या मुळापासून होणाऱ्या रक्तवस्त्राने युक्त असलेला तो वृत्रासुर शोभू लागला.||२६|| भावार्थः---नंतर,ज्याने अध्रोष्ठ भूमीला लावून वरचा ओंठ स्वर्गाला लाविला आहे,जो आपल्या आकाशासारख्या गंभीर मुखाने,सर्पासारख्या भयंकरजिव्हेने आणि मृत्यसारखा उग्रदंष्ट्रांनी त्रैलोक्य गिळूनच टाकीच आहे कि काय?असा दिसत आहे,ज्याने अतिशय उंच असा मोठा देह धारण केला आहे,जो वेगाने पर्वताना स्थानापासून हलवीत आहे व जो पायांनी पृथ्वीचे चूर्ण करून टाकीत आहे,अशा त्या साक्षात पादचारी पर्वतराजाप्रमाणे असलेल्या वृत्रासुराने इंद्रासमीप येऊन,ऐरावतनामक वाहणासहवर्तमान त्याला गिळून टाकिले.||२७-२८-२९|| भावार्थः---हे राजा,महाबलाढ्य व महापराक्रमी अजगर,जसा हत्तीला गिळून टाकितो त्याप्रमाणे वृत्रासुराने ग्रस्ते केलेल्या त्या इंद्राला पाहून,प्रजापति व महर्षी ह्यांसहवर्तमान सर्व देव उद्विग्न अरेरे!फार वाईट झाले म्हणून आक्रोश करूं लागले.||३०|| भावार्थः---असो त्या दानवश्रेष्ठ वृत्रासुराने जरी त्या इंद्राला गिळून टाकिले होते तथापि पोटांत गेलेला तो इंद्र,धारण केलेल्या नारायणकवचाच्या योगाने,योगबलाने व मायेच्या बलाने युक्त झालेला असल्यामुळे मरण पावला नाही.||३१|| भावार्थः---नंतर वज्राने त्याच्या उदराचा भेद करून तो समर्थ इंद्र बाहेर निघाला आणि पर्वतशिखराप्रमाणे असलेले त्या शत्रूचे शिर,त्याने आपल्या बळाच्या योगाने छेदून टाकिले||३२|| भावार्थ:---हे राजा,वृत्राला मारण्याकरिता त्याची मन तोडीत सभोवती फिरत असलेल्या त्या अतिवेगवान वज्राने सुर्यादिकाच्या व उत्तरायण गतिरूप संवत्सर पूर्ण होण्यास जितके दिवस लागताततितक्या(३६०)दिवसानंतर वृत्रासुराची हत्या होण्याचा योग्य-काळ प्राप्त झाला असता त्याचे मस्तके तोडून खाली पाडिले.||३३|| भावार्थ:---ते समयी स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागले आणि महर्षीगणासह सिद्धी व गंधर्व ह्यांनी इंद्रवीर्यप्रकाशक मंत्रांनी त्या इंद्राची स्तुती करीत करीत आनंदाने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली.||३४|| | वृत्रस्य देहान्निष्क्रांतमात्मज्योतिररिन्दम | पश्यतां सर्वलोकानामलोकं समपद्यत |३५|| भावार्थ:---हेशत्रूदमना राजा,त्या काली,वृत्रासुराच्या देहातून निघालेले जे जीवनामक तेज ते सर्व लोक पाहत असताना लोकातील अशा भगवत्स्वरूपाचेठिकाणी जावून मिळाले.म्हणजेच वृत्रासुर परमात्मारूप झाला,त्याप्रमाणे आपण--जीवानी परमात्मारूप होवावे.||३५|| ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी वृत्रावधनामक हा(१२)बारा अध्याय (३५)श्लोकांनी युक्त समाप्त झाला | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ |१३---आता या तेराव्या अध्यायामध्ये वृत्रासुराच्या ब्रहमहत्येच्या महाभायामुळे पुष्कळ दिवसपर्यंत इंद्र नाहीसा झाला असता,विष्णूने त्यांचे संरक्षण केले अशी कथा निरुपण केली आहे.||१३|| |१३--- इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण ______________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच | वृत्रे हते त्रयो लोका विना शक्रेण भूरीद | सपाला ह्यभवन् सद्यो विज्वरा निर्वुतेन्द्रिया: ||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे बहुदान देणाऱ्या राजा,वृत्रासुराचा वध होताक्षणीच एका इंद्रावावाचून तिन्ही लोक,लोकपालासह वर्तमान संतापरहित होवून त्यांची मने आनंदित झाली.इंद्राकडून वृत्रासुराची--ब्रह्मानुभावी महात्म्याची हत्या झाल्यामुळे ब्रह्महत्याचा दोष लागला,म्हणून इंद्र हा आनंदित नव्हता,तर दु:खात होता.||१|| भावार्थ:---त्या युद्धभूमीपासून देव,ऋषी,पितर,इतर प्राणी देवानुयायी गंधर्ववगैरे,दैत्य आणि ब्रहमदेव,महादेव व इतरही लोकपाल अस्वस्थचित्त असलेल्या इंद्राला न विचारता आपापल्या स्थानाप्रत स्वत:च परत गेले.आपण--जीवानी अवस्थचित्त जे आहेत,त्यांना न विचारता तेथून निघून जाने योग्य नाही,कारण ते दु:खी आहेत--त्यांचे सांत्वन करून--धीर देवून जावे.||२|| भावार्थ:---राजा म्हणाला---हे मुने ज्या वृत्रासुराच्या वधाने सर्वही देवांना सुख प्राप्त झाले,त्याच्याच योगाने इंद्राला दु:ख काय म्हणून झाले ? ते इंद्राच्या दु:खाचे कारण श्रवण करण्याची मी इच्छा करितो.||३|| भावार्थ:---ह्याप्रमाणे राजाचा प्रश्न श्रवण करून,इंद्राच्या दु:खाचे कारण उपोद्धाता सहित सांगण्याकरिता------ श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा वृत्रासुराच्या पराक्रमामुळे ऋषीसह वर्तमान उद्विग्न झालेल्या सर्वदेवांनी त्याचा वध करण्याकरिता इंद्राची प्रार्थना केली असता,ब्राहमणवधापासून भयभीत झालेल्या त्या इंद्राने त्याचा वध करण्याचे मनामध्ये न आणित,देवाप्रत भाषण केले की,-------------||४|| इंद्र म्हणाला---हे देवहो,स्त्रिया,भूमी,उदक,आणि वृक्ष ह्यांनी मजवर अनुग्रह करून विश्वरूप वधापासून उत्पन्न झालेले माझे पातक वाटून घेतले,म्हणून मी त्या पातकापासून मुक्त झालो,आता मी वृत्रहत्या कोणाला देवून आपल्या पाताकापासून मुक्त होवू?||५|| श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,ते भाषण श्रवण करून,महेंद्राप्रत ऋषींनी सांगितले की,------हे इंद्रा,आम्ही तुझ्याकडून अश्वमेधयज्ञाने श्रीहरीचे यजन करवू,म्हणजे तेणेकरून तुझे कल्याण होईल तू भिवू नकोस.||६|| भावार्थ:---अरे,ब्रहमत्येच्या पातकाची तर गोष्ट कशाला पाहिजे?परंतु परिपूर्ण,परमात्मा आणि समर्थ अशा देवाधिदेव नारायणाचे,अश्वमेधाच्या योगाने तू पूजन करून जगताच्या वधापासून मुक्त होशील.||७|| भावार्थ:---अरे,ब्राहमण,पिता,गाय,माता,व गुरु ह्यांचा घात करणारा पातकी जन व त्याचप्रमाणे श्वानभक्षक आणि चांडाळ हे सुद्धा त्यांच्या नामसंकीर्तनाने शुद्ध होतात त्या परमात्म्याचे आम्ही अनुष्ठान केलेल्या अश्वमेधनामक महाक्रतुने,तू श्रद्धापूर्वक यजन केले असता,ब्रहमदेवासहवर्तमान ह्या चराचरविश्वाचा वध जरी केलास तथापि त्या पातकाने लिप्त होणार नाहीसा,मग ह्या दुष्टाच्या वधाने तुला काय होणार आहे?||८-९|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा ह्याप्रमाणे ब्राहमणांनी प्रेरणा केली असता,इंद्राने शत्रूचा वध केला परंतु त्याचा वध होताक्षणीच मूर्तिमती ब्रहमहत्या त्या इंद्रसमीप--भोगण्यास प्राप्त झाली.||१०|| भावार्थ:---असो,देवादिकांनी करविलेल्या त्या ब्रहमदेवाच्या योगाने झालेला ताप इंद्रालाच सहन करावा लागला त्यामुळे त्याला सुख प्राप्त होईना,आता धैर्यादिगुणांनी युक्त अशा इंद्राला दु:ख कसे प्राप्त झाले?असे विचारशील तर-----हे राजा,नावलौकीकांची लाज बाळगणारा अब्रूदार पुरुष निंदेस प्राप्त झाला असता धैर्यादिक गुणही त्याला सुख देत नाहीत.म्हणून आपण--जीवानी ब्रह्मज्ञानी जो आहे,त्याची हत्या करू नये,त्याची निंदा करू नये.कारण ब्रह्मज्ञानी-जणांची हत्या केल्यास दोष लागून दु:ख भोगावे लागते.||११|| भावार्थ:---हे प्रजाधिपते परीक्षित राजा,जी स्वरूपाने चांडाळस्त्रीसारिखी आहे,जिच्या शरीराला वार्धक्यदशेमुळे कंप सुटला आहे,जी क्षयरोगाने अगदी व्याप्त झाली आहे,जिचे वस्त्र रक्ताने भरलेले आहे,जी मस्तकावरील आपले शुभ्र केस पिंजारून "उभा रहा उभा रहा" असे इंद्राला म्हणत आहे व जी मत्स्यासारखा दुर्गंधीने युक्त असलेल्या आपल्या श्वासवायुच्या दुर्गंधाने मार्ग दुषित करीत आहे,अशी ती ब्रह्महत्या,आपल्या मागोमाग धांवत येत आहे असे पाहून इंद्र,प्रथमतः आकाशामध्ये गेला,परंतु तेथेही ती आहेच असे पाहून नंतर तो सर्व दिशांप्रत हिंडू लागला.नंतर जिकडे जावे तिकडे ती आहेच असे जेव्हां त्याने पाहिले तेव्हां तो राजा,ईशान्यदिशेस जाऊन तो सत्वर मानससरोवरामध्ये प्रविष्ट झाला.||१२-१३-१४|| भावार्थः---त्या ठिकाणी कमलदेंटाच्या तंतुमध्ये कोणाच्या दृष्टीस न पडतां ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल अशी चिंता करीत सहस्त्रसंवत्सरपर्यंत तो इंद्र तेथे राहिल.त्या वेळी त्याला भोगप्राप्ति मुळीच झाली नाही.कारण,त्याने जलामध्ये वास केला असल्यामुळे त्याला हविर्भाग नेऊन देणाऱ्या अग्निरुपी दूताचा तेथे(पाण्यांत)प्रवेश होईना.||१५|| भावार्थः---असो.जो पर्यंत त्या ठिकाणी इंद्र गुप्त होऊन राहिला होता तो पर्यंत विद्या,तप,विचार,सामर्थ्य आणि शरीरबल ह्यांच्या योगाने,स्वर्गाचे पालन करण्यास समर्थ असलेल्या "नहुषराजाने" स्वर्गाचे राज्य केले.परंतु संपत्ति व ऐश्वर्य ह्यांच्या योगाने उत्पन्न झालेल्या "मदामुळे" त्याची बुद्धी झाली असतां,"इंद्रपत्नीशचीने" कांही उपाय करून,त्याला--"नहूस राजास" "सर्पयोनीस" पोचविले.याविषयी अशी कथा आहे की,एकेवेळी नाहूस राजाने इंद्राणीला सांगितले की,आतां मीच इंद्र आहे,यास्तव तू माझे सेवन कर.तिनें तो वृत्तांत बृहस्पतीला कळविला असतां तो म्हणाला-----"तू त्याला असे सांग की,तू ब्राह्मणांनी वाहिलेल्या पालखीत बसून आलास म्हणजे मी तुझे सेवन करीन.म्हणजे तो ब्राह्मणांच्या शापानें स्वर्गांवरून भ्रष्ट होईल.पुढें इंद्राणीनें तसें केलें असतां,नहुषाने अगस्त्यादिक ऋषींना पालखीचे वाहन करून आपण,आंत बसला आणि 'लवकर चला लवकर चला' असें म्हणून त्यानें,अगस्त्य ऋषीला पायानें स्पर्श केला,तेव्हां क्रुद्ध झालेल्या त्या अगस्त-ऋषीने 'तू सर्प हो' असा शाप दिला असतां,तो अजगर सर्प होऊन खाली--मृत्यू-लोकांत पडला.म्हणून "आपण--जीवानी स्त्रींचे निषिद्ध सेवन करूच नये,केलेच तर स्त्रींचे विहितच सेवन करावे," कारण त्यामुळे अधोगतीच होतच असते.||१६|| भावार्थः---तदनंतर ब्राहमणाच्या वचनाने बोलावलेला तो इंद्र,स्वर्गलोकास प्राप्त झाला,तो पूर्वीच सत्यपालक श्रीहरीच्या ध्यानाने निष्पाप झाला होता व ईशान्यदिशेस असणाऱ्या श्रीरुद्रदेवतेने निर्बळ केलेले त्याचे ते ब्रहमहत्यारूप पातक,मानससरोवरांत राहणाऱ्या लक्ष्मीने रक्षण केलेल्या त्या इंद्राचा पराभव करण्यास समर्थ झाले नाही.आपण--जीवानी दोष निवृत्त होण्यासाठी श्रीहरीचे ध्यान करावे.||१७|| भावार्थः---हे भरतकुलोत्पन्ना राजा,नंतर ब्रह्मीऋषींनी त्याच्याजवळ येऊन त्याला,ज्यामध्ये श्रीहरीचे आराधन आहे अशा अश्वमेधाची यथाविधी दीक्षा दिली.||१८|| भावार्थः---नंतर तो राजा वेदवेत्त्या ऋषींनी अनुष्ठान केलेल्या त्या अश्वमेधामध्ये इंद्राने ज्याच्या शरीरामध्ये सर्व देव आहेत अशा सर्वांतर्यामी भगवंताचे पूजन केले असतां,सूर्याच्या योगाने जसे धुके नाहीसे होते तसा तो वृत्रासूरवधरुपी मोठाही पापसंचय,त्या परमात्म्यानेच खरोखर नाहीसा केला.म्हणून आपण--जीवानी सर्वांर्यामी जो भगवंत आहे,त्याचे पूजन करावे,करण त्यामुळे आपल्यातला--जीवातला दोष जात असतो. ||१९-२०|| भावार्थः---याप्रमाणे तो इंद्र,मरिचीप्रभृति ऋषींनी यथाविधी अनुष्ठान केलेल्या अश्वमेधाच्या योगाने यज्ञाधिपती पुराणपुरुषानेच पूजन करून,निष्पाप झाला आणि पूर्वीप्रमाणे सर्वांना पूज्य झाला.म्हणून आपण--जीवानी पुरण-पुरुष जो अंतर्यामी भगवंत त्यांची भक्ती--पूजा करावी.||२१|| भावार्थः---असो.जे सर्वपातकांचे क्षालन करिते,ज्यामध्ये पवित्रचरण श्रीहरीचे कीर्तन,भक्तीची वृद्धी,भक्तजणांचे वर्णन,ब्रहमहत्येपासून महेंद्राचा मोक्ष आणि विशेषेकरून इंज्ञानिजनांनी सर्वदा पठन करावे किंवा प्रत्येक पर्वणीला तरी अवश्य श्रवण करावे.म्हणून आपण--जीवानी श्रीहरीचे कीर्तन,श्रीहरीची भक्ती,भक्त-जणांचे वर्णन श्रवण करावे.||२२|| | पठेयुराख्यानमिदं सदा बुधा: | श्रुन्वन्त्यथो पर्वणि पर्वणीन्द्रियम् | | धन्यं यशस्यं निखीलाघमोचनं | रिपुज्ययं स्वस्त्ययनं तथाऽऽयुषम् ||२३|| भावार्थः---द्राचा जय हि वर्णन केलेली आहेत व जे धनदायक,यशस्कर,सर्वपापनिवर्तक,शत्रूनाशक,कल्याणकारक आणि आयुर्वर्धक आहे.असे जे इंद्रसंबंधी महाख्यान,||२३|| ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानांतील(६)षष्ठस्कंधामध्ये इंद्रविजयकथनरूप हा(१३)तेरावा अध्याय(२३)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ |१४---आतां ह्या चवदाव्यापासून चार अध्यायांमध्ये वृत्रासुराचे ज्ञान व भक्ति इत्यादिक गुण श्रवण करून परीक्षित राजाने प्रश्न केला असतां,वृत्रासुराचे पूर्वजन्मसंबंधी चरित्र सांगून त्याच्या ज्ञानादिकांचे कारण सांगितले आहे.||१४|| |१४--- वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र ______________________________________________________________________________ |परीक्षिदुवाच | रजस्तम:स्वभावस्य ब्रम्हन् वृत्रस्य पाप्मन: | नारायणो भगवति कथमासीद् दृढा मति: ||१|| भावार्थः---परीक्षित राजा प्रश्न करतो:----हे ब्रह्मनिष्ठा,रजोगुणात्मक व तमोगुणात्मक स्वभाव असलेल्या त्या पापी वृत्रासुराला,भगवान नारायणाचेठिकाणी दृढमति कशी प्राप्त झाली होती?||१|| भावार्थः---कारण,शुद्धसत्वगुणरुपी असलेल्या देवांना व शुद्धचित्त असलेल्या ऋषींनाही बहुतकरून मुकुंद-चरणाचे-- ठिकाणी भक्ती प्राप्त होत नाही,कारण ते सत्संग करीत नाहीत.||२|| भावार्थः---आतां भक्तिचे दुर्लभत्व सांगतो----ह्या भूमंडळावर पृथ्वीच्या परमाणुइतके असंख्यात प्राणी आहेत परंतु त्यांपैकी कांही जे मनुष्यादिक प्राणी आहे ते मात्र धर्माचरण करितात.जरी धर्माचरण करितात,पण सकाम धर्माचरण करितात.म्हणून आपण--जीवानी निष्काम विहित धर्माचरण करून सत्संग करावा.||३|| भावार्थः---त्यांमध्येही कांही श्रेष्ठ ब्राह्मणच बहुतकरून मुमुक्षु (मोक्षाची इच्छा करणारे)असतात व त्या हजारो मुमुक्षुमध्येही एकदाच गृहादीसंगापासून मुक्त होऊन तत्व जाणतो,करण पूर्व संस्कारामुळे आपण--जीव सर्व विषयांचा त्याग करू शकत नाही.शम व दम साधना झाल्याशिवाय मन व इंद्रिये ताब्यात येत नाहीत.म्हणून आपण मन व इंद्रिये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे सत्संगामुळे वैराग्य होऊन विषयांचे त्याग होऊ शकतो.विषयांच्याठिकाणी त्यागामुळे निष्काम परमार्थ होऊ शकतो.||४|| भावार्थः---आणि हे महर्षे,मुक्त व तत्त्वज्ञानी अशा कोट्यावधी लोकांमध्येसुद्धां ज्याचे अंतःकरण अत्यंत शांत आहे व नारायण हाच ज्याचा मुख्य आश्रय आहे असा पुरुष अत्यंत दुर्लभ आहे.आपण--जीव शांत होण्यासाठी सत्संग करणे जरुरी आहे,करण श्रवण केल्यामुळे सार व असाराचा विवेक उत्पन्न होतो,त्यामुळे विषयांचा त्याग होतो व त्या त्यागामुळे शांतता प्राप्त होते.म्हणून कांही मोजकेच तत्त्व--ज्ञान मार्गात येतात.म्हणून असा अंतरंग असलेला साधक विरला असतो. म्हणून आपण--जीवानी विरला साधक होण्याचा प्रयत्न करावा.||५|| भावार्थः---मुमुक्षु साधक विरला असे असून सर्वलोकांना अत्यंत ताप देणारा असा तो पापी वृत्रासुर,भयंकर संग्रामामध्येही सदानंदरूप परमात्म्याचेठिकाणी अशाप्रकारचा दृढभक्तिमान कसा झाला?||६|| भावार्थः---आतां इंद्राच्या भीतीनेच परमात्म्याला तो शरण गेला,असे हि म्हणतां येत नाही.कारण,पराक्रमाच्या योगाने त्याने संग्रामामध्येही इंद्राला संतुष्ट केले.तस्मात हे प्रभो,त्या वृत्रासुराच्या भत्त्यादिकांविषयी आम्हांला मोठा संशय आला असल्यामुळे त्याचे कारण श्रवण करण्याची उत्सुकता प्राप्त झाली आहे.||७|| भावार्थः---सुत म्हणाला---हे शौनका,श्रद्धायुक्त अशा त्या परीक्षित राजाने केलेला उत्तम प्रश्न करून,शुकाचार्याने त्याची प्रशंसा करून भाषण केले की,--------------||८|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,नारदापासून,देवलापासून आणि व्याप्त मुखापासूनही श्रवण केलेला हा इतिहास तूं स्वस्थ अंतःकरणपूर्वक उत्तम प्रकारे श्रवण कर.||९|| भावार्थः---हे राजा,शूरसेननामक देशामध्ये "चित्रकेतू" नावाने प्रसिद्ध असा एक सार्वभौम राजा होता,त्याचे सर्व मनोरथ पृथ्वी पूर्ण करीत असे.||१०|| भावार्थ:---त्याल एककोटी भार्याअसून तो स्वतः पुत्रोत्पादनास समर्थ असतांही दैवयोगाने त्या सर्व वंध्याच मिळाल्या असल्यामुळे त्यांचेठिकाणी त्या राजाला संतती प्राप्त झाली नाही.आपणास--जीवास पुत्र-प्राप्ती हि प्रारब्ध व प्रयत्न यामुळे होत असते.चित्रकेतू राजा पुत्रोत्पादानास समर्थ असताही प्रारब्धात पुत्र नसल्यामुळे त्याला पुत्र झाला नाही.प्रारब्ध म्हणजे पूर्व जन्मातले प्रयत्न तेच वर्तमान शरीरात भोगण्यास येत असते,म्हणून आपण--जीवानी वर्तमान शरीरात असतांना विहित कर्मे करावे,करण विहित कर्मांचे फळ अनुकूल म्हणजेच सुख असते,व निषिद्ध कर्मे करू नये,कारण निषिद्ध कर्मांचे फळ प्रतिकूल म्हणजे दु:ख असते.कांही काळानंतर आपणच विहित--निषिद्ध कर्मांचे अनुकूल--सुख व प्रतिकूल--दु:ख आपणच--जीवास भोगावयास येत असते.म्हणून आपण जीवानी विवेक-पूर्वक विहित कर्मे करावी व निषिद्ध कर्मे करू नयेत.||११|| भावार्थ:---ह्यास्तव रूप,औदार्य,वय,जन्म,विद्या,ऐश्वर्य आणि संपत्ति इत्यादि सर्वगुणांनी संपन्न असलेल्याही त्या वंध्यापति चित्रकेतु राजाला मोठी चिंता उत्पन्न झाली.||१२|| भावार्थ:---त्यामुळे सर्व संपत्ति,सुंदरनयनांनी युक्त असलेल्या राण्यात आणि पाहिजे ते पदार्थ देणारी हि पृथ्वी,ह्यांच्या योगाने त्या सार्वभौम राजाला आनंद होईना,कारण गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर पुत्र असणे जरुरी आहे,हेही बरोबर आहे,पण प्रारब्ध दोषामुळे जर आपणास जीवास पुत्र उत्पन्न न झाला तर,त्यांनी सत्संग करून "ज्ञानपुत्र" उत्पन्न करून पूर्ण-समाधानी व्हावे.ज्ञान-पुत्राने आपले जीवाचे जन्म--मरण निवृत्त होऊन अत्यंतिक--कायमस्वरूपाचे दु:ख निवृत्त होऊन परमानंदाची--कायमच्याच सुखाची प्राप्ती होते.हाडामांसाचा पुत्र सात्विक गुणांनियुक्त उत्पन्न झाला तर तो आपले पूर्ण समाधान न देता कांही समाधान--सुख व कांही अधिक असमाधान--अधिक दु:ख देऊ शकतो.हाडामांसाचा पुत्र हा रजोगुणांनी व तमोगुणांनीयुक्त असेल तर तो अधिक दु:ख व अल्प प्रमाणात सुख देऊ शकतो.थोडक्यात हाडामांसाचा पुत्र व ज्ञानपुत्र यांचा सारासार विवेक केला असे दिसून येते की,हाडामांसाच्या पुत्रापेक्षा अनंत पटीने ज्ञान-पुत्र महा-हीतकारक--सुखकारक असतो,याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावे.साधू-संत--महात्मा यांना ज्ञान--पुत्राचा अनुभव आहे.||१३|| भावार्थ:---नंतर एकेदिवशी भगवान अंगिरा ऋषि,ह्या त्रैलोक्यामध्ये पर्यटन करीत करीत भगवत्प्रेरनेने त्याचे घरी प्राप्त झाला.||१४|| भावार्थ:---त्या काळी चित्रकेतूराजाने प्रत्युत्थान व पूजासाहित्य इत्यादि उपचारांनी त्याचे यथाविधी पूजन केले आणि भोजन करून तो आसनावर स्वस्थ बसला असतां,तो राजा,विनयपूर्वक त्याचे समीप बसला.||१५|| भावार्थ:---त्या वेळी हे महाराजा प्ररीक्षिते,विनयाने नम्र होऊन आपल्या समीप-भागी भूमीवर बसलेल्या राजाचा त्या महर्षीने सत्कार केला व त्याला चांगल्या प्रकाराने संबोधन देऊन असे भाषण केले की,--------------||१६|| भावार्थ:---अंगिरा ऋषी म्हणाला---हे राजा,जसा महतत्त्व अहंकारादिक सात प्रकृतीच्या योगाने जीव नित्य सुरक्षित असतो व तो त्यांच्यावांचून क्षणभरही राहत नाही तसाच राजाहि गुरु,अमात्य,देश,किल्ले,द्रव्यसंचय,दंड आणि मित्र ह्या सात प्रकृतिनी नित्य सुरक्षित असला म्हणजे राज्यसुखाचा अनुभव घेतो,ह्याकरीता तुझे स्वतःचे तसेच प्रकृतीचे आरोग्य व स्वस्तिक्षेम आहे ना?||१७|| भावार्थः---हे नृपा,सात प्रधानांवर आपला सर्वभार टाकून जसा राजा त्या प्रधानांच्या साह्याने राज्यसुखाचा उपभोग घेतो तसेच प्रधानही मुख्य प्रभुत्व राजावर टाकून राजाच्याच योगाने धनांनी समृद्ध होतात.||१८|| भावार्थः---तस्मात् भार्या,प्रजा,अमात्य,सेवक,व्यापारी लोक,मंत्री,नगरवासी-लोक,मांडालिक-राजे आणि पुत्र हे सर्व तुझ्या आज्ञेत आहेत ना ? ||१९|| भावार्थः---व त्याचप्रमाणे तुझे मनही तुझ्या स्वाधीन आहे ना ? कारण ज्याचे मन स्वाधीन असेल त्याच्याच आज्ञेमध्ये हे सर्व भार्यादी असतात व सर्व लोकही आपल्या पालकांसह-वर्तमान आळस न करितां त्याला करभार आणून देतात.आपले--जीवाचे मन ताब्यात असावे,करण त्यामुळे आपल्या--जीवाच्या अज्ञात आपल्या कुंटूबचे सर्व,पत्नी-पुत्र-पुत्री सेवक अज्ञात वागत असतात.आपण देशाचे राजा असून जर आपले मन आणि इंद्रिये ताब्यात असेल तर सर्व प्रजा अज्ञात असून आपणहून कर देऊन सुखी असतात.म्हणून आपण आपले मन आणि इंद्रिये ताब्यात घेण्याचा आवश्य प्रयत्न करावा.त्यातच आपले व कुंटूबाचे व देशाचे हित आहे.||२०|| भावार्थः---परंतु हे राजा,तू आपल्या मनांच्या योगाने संतुष्ठ दिसत नाहीत ह्यांचे कारण काय?कारण,तुझे मुख अगदी चिंताक्रांत झाल्यासारीखे दिसत आहे,ह्यावरून तुझा काहीतरी मनोरथ स्वता: तुझ्याकडून पूर्ण अथवा दुसऱ्याकडून पूर्ण झाला नाही असे मला वाटते.आपली--जीवाची इच्छा पूर्ण न होता अपूर्ण राहिली तर आपण--जीव चिंताक्रांत--असमाधानी--दु:खी असतो.म्हणून आपली--जीवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी जो परमात्मा पूर्ण आहे,तो सत्संग करून प्राप्त करून,त्याचाच अनुभव घ्यावा.म्हणजे आपण पूर्ण समाधानी होउत,अन्यथा होणार नाहीत.||२१|| भावार्थः--- हे राजा,याप्रमाणे स्वत: सर्वज्ञ असूनही त्या मुनीने,चीत्रकेतू राजाला नानाप्रकारचे प्रश्न केले असता,नंतर विनयाने नम्र झालेला तो प्रजेच्छू राजा,त्या मुनीला म्हणाला की,-------------------||२२|| भावार्थः---चित्रकेतू म्हणाला----हे भगवन,तप,ज्ञान,व समाधी यांच्या योगाने ज्यांचे पातके नाहीसे झाले आहे,त्या तुम्ही योगीजनांना आम्हासारख्या देहधारी प्राण्यांच्या बाहेर व आंत(मनात)जे काही आहे ते ठावूक नाही काय? सर्वही ठावूक आहे.||२३|| भावार्थः---तथापि हे ब्रहमनिष्ठा,तूं जाणत असूनही ज्या अर्थी मला प्रेरणा करून माझ्या मनामध्ये चिंतीत असलेले विचारीत आहेस त्याअर्थी तुझ्या आज्ञेनेच मी आतां तुला कथन करितो.||२४|| भावार्थः---हे भगवन क्षुधा व तृषा ह्यांनी व्याप्त होऊन अन्नोदकांची इच्छा करणाऱ्या पुरुषाला जसे इतर चंदनादिक पदार्थ सुख देत नाहीत,त्याप्रमाणे लोकपालांनाही इच्छा करण्यास योग्य अशा ह्या सार्वभौम ऐश्वर्यसंबंधी संपत्ती मज निपुत्रिकाला आनंद देत नाहीत.||२५|| भावार्थः---तस्मात हे भाग्यशाली मुने,निपुत्रिकपणापासून तूं माझे रक्षण कर,म्हणजे पूर्वजांसहवर्तमान प्राप्त होणाऱ्या दुस्तर नरकांतून प्रजेच्या योगाने जसे आम्ही तरून जाऊं तसा आम्हांस काहीतरी उपाय सांगावा.||२६|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे चित्रकेतु राजाने त्या दयालु भगवान ब्रह्मपुत्राची प्रार्थना केली असतां,त्या समर्थ ब्राह्मणाने राजाला पुत्रप्राप्ति होण्याकरितां त्वष्टानामक आदित्याला अर्पण करण्याच्या उद्देशाने चरू सिद्ध करून त्याच्या योगाने त्वष्ट्याचे यजन केले.||२७|| भावार्थः---आणि हे भरतकुलोत्पन्ना राजा,त्या अंगिरानामक ब्राह्मणाने राजाच्या राण्यामध्ये ज्येष्ठ व गुणांनीही श्रेष्ठ अशी जी कृतद्दुती नावांची राणी होती तिला,यज्ञशेष राहिलेला चरू अर्पण करून राजाप्रत भाषण केले की,----हे राजा,तुला हर्ष आणि शोक देणारा असा एकपुत्र होईल.असे सांगून तो ब्रह्मपुत्र निघून गेला.||२८-२९|| भावार्थः---नंतर कृत्तिकादेवीने ज्याप्रमाणे अग्निपासून स्कंदरूप पुत्र धारण केला होता त्याप्रमाणे त्या वंध्या कृतद्दुतीनेही तो हविःशेष भक्षण केल्यामुळेच चित्रकेतूपासून गर्भधारण केले.||३०|| भावार्थः---हे राजा,शूरसेन देशांचा अधिपती अशा चित्रकेतु राजाच्या वीर्यापासून झालेला तो तिचा गर्भ शुक्लपक्षांतील चंद्राप्रमाणे दिवसानुदिवस हळूहळू वाढूं लागला.||३१|| भावार्थः---नंतर प्रसूतिकाल प्राप्त झाला असतां,शूरसेननामक देशांमध्ये राहणाऱ्या,प्राण्यांना अत्यंत आनंद उत्पन्न करीत असता तो पुत्र जन्मास आला.||३२|| भावार्थः---इकडे ते वर्तमान ऐकताक्षणीच आनंदित झालेल्या त्या राजाने स्नान करून,शुचिर्भूत होऊन अलंकार धारण केले,आणि ब्राह्मणाकडून पुण्याहवाचनद्वारा आशीर्वाद ग्रहण करून पुत्राचे जातककर्म करविले.||३३|| भावार्थः---आणि त्या ब्राह्मणांना,उदारचित्ता अशा त्या चित्रकेतूराजाने,त्या काली सुवर्ण,रौप्य,वस्त्रे,भूषणे,गांवे, अश्व,गज आणि साठकोटी गाई अर्पण करून ह्यावेळेस लोकांचे मनोरथ पूर्ण केले असतां आपल्या पुत्राला यश व संपत्ती प्राप्त होऊन त्याच्या आयुष्याचीही वृद्धी होईल अशा अभिप्रायाने इतर प्राण्यांचेही मनोरथ,पर्जन्य जसा वृष्टी करून लोकांचे मनोरथ पूर्ण करितो त्यांप्रमाणे पूर्ण केले.||३४-३५|| भावार्थः---नंतर,जसे निर्धन मनुष्यास संकटाने धन प्राप्त झाले असतां त्याचेठिकाणी त्याची प्रीती वाढत जाते त्याप्रमाणे मोठ्या संकटाने प्राप्त झालेल्या पुत्राचेठिकाणी त्या राजर्षी पित्याचे प्रेम दिवसानुदिवस अधिकाधिक वाढूं लागले.||३६|| भावार्थः---त्याचप्रमाणे कृतद्दुती मातेचे त्या पुत्रावर अत्यंत मोहकारक प्रेम वाढूं लागले व तिच्या सर्व सवतींना प्रजेच्छारूप ताप होऊं लागला.||३७|| | चित्रकेतोरतिप्रीतिर्यथा दारे प्रजावति | न तथान्येषु सज्जज्ञे बालं लालयतोऽन्वह्म् ||३८|| भावार्थः---इकडे प्रतिदिवशी बालकाचे लालन करीत असल्यामुळे चित्रकेतू राजाची जशी त्या पुत्रवती भार्येचेठिकाणी अतिप्रीति जडली तशी इतरांचेठिकाणी जडली नाही.ज्यांना अधिक पत्न्या आहेत,त्यांनी सर्व पत्नींवर सारखेच प्रेम करावे,कारण तो सर्वांचाच पती आहे.ज्या पत्नीस बालक आहे व ज्या पत्नीस बालक नाही,अशा दोन्ही पत्नीवर सारखेच प्रेम करावे किंवा ज्यांना मुल--बाळ नाही,त्यांच्यावर मुल-बाळ असणाऱ्या पत्नीपेक्षा अधिक प्रेम करावे,असे असले तरी राजाने प्रत्यक्ष ज्या पत्नीस पुत्र होता ,तिच्यावर अधिक प्रेम केले व ज्यांना पुत्र नाही,त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.||३८|| भावार्थः---म्हणून त्या सर्व सवती,पोटी संतान नसल्यामुळे होणारे दुःख व त्यामुळेच होत असलेला राजपासून अनादर ह्यांच्या योगाने अतिशय संपप्त पुत्रयुक्त असलेल्या संवतीचेठिकाणी मत्सर बुद्धीने आपलीच निंदा करूं लागल्या.||३९|| भावार्थः---अरेरे ! चांगल्या संततीने युक्त असलेल्या सवती,जिचा दासीप्रमाणे तिरस्कार व पतीही गृहामध्ये जिला बहुमान देत नाही त्या पापानी निपुत्रिक स्त्रीला धिक्कार असो.||४०|| भावार्थः---अहो,स्वामि सेवेमुळे ज्यांना वारंवार सन्मान मिळतो त्या दासींना तरी खरोखर काय बरे दुःख आहे ? कांहीच नाही.कारण,त्यांच्याहून हातून सेवा घडत असल्यामुळे त्यांना मानतरी मिळत असतो आणि आम्हीतर वंध्या असल्यामुळे केवळ अनादारालाच आहो.तस्मात दासीच्याही दासीसारख्या खरोखर भाग्यहीन आहो.||४१|| |एवं संन्दह्यमनानां सपत्न्या: पुत्रसंपदा | राज्ञोऽसम्मतवृत्तीनां भावार्थः---हे राजा,ह्याप्रमाणे सवतीच्या पुत्रसंपत्तीने अतिसंतप्त झालेल्या व ज्यांचे वांचनेही राजाल अगदी नकोसे झाले आहे अशा त्या त्या सर्व स्त्रियांना कृतद्दुतीविषयी बलवत्तर द्वेष उत्पन्न झाला.राजास इतर पत्न्या नकोशा वाटत आहेत,हा राजाचा शंभर% दोष आहे,तर वांझ पत्नीचा १%हि दोष नाही,म्हणून पतीने असा भेदभाव करू नये.||४२|| भावार्थः---तेव्हा द्वेषामुळे त्या स्त्रियांची बुद्धि अगदी नष्ट होऊन त्यांचे मनहि फार क्रूर झाले व राजा पुत्रावर प्रेम करीत असे ते त्यांना सहन झाले नाही,म्हणून त्यांनी त्या पुत्राला विष घातले.राजाच्या म्हणजे पतीच्या पुत्रास म्हणजेच सतीच्या पुत्रास विष देऊन मारून टाकणे हा वांझ पत्नीचा शंभर%दोष आहे.म्हणून वांझ पत्नी ज्या आहेत,त्यांना जेव्हा मनुष्य देह मिळेल,त्यावेळेस त्यांना पूर्व कर्मामुळे पुत्र होणार नाही,कारण "करावे तसे भरावे" असा धर्म-शात्राचा नियम आहे.म्हणून आपण--जीवानी असे कृत्य करू नये,त्यात आपलेच अहित आहे.||४३|| भावार्थः---इकडे सवतीचे ते महापातकरूप कृत्य कृतद्दुतीला माहित नसल्यामुळे आपला बालक निद्रिस्तच आहे असे मानून त्याला दुरूनच पाहून ती घरांत संचार करीत होती.||४४|| भावार्थ:---परंतु पुढे आपला बालक फारवेळ निजला आहे असे जाणून त्या चतुर राणीने हे भद्रे,माझ्या पुत्राला घेवून ये म्हणून दाईला अज्ञा केली.||४५|| भावार्थ:---नंतर ती दासी बालकाजवळ गेली आणि त्याच्या नेत्रातील बुबुळे बाहेर आली आहेत व प्राण,इंद्रिये आणि आत्मा ह्यांनी त्याग केला आहे असे समजून ‘अरेरे!माझा सर्वस्वी घात झाला’अशा मोठ्याने आक्रोश करून ती भूमीवर पडली.||४६|| भावार्थ:---नंतर हातांनी वक्ष:स्थळ बडवून घेणाऱ्या त्या दासीच्या तो अत्यंत आक्रोशयुक्त उच्चस्वर श्रवण करून,राणी मोठ्या त्वरेने पुत्राजवळ आली आणि पाहते तो बाल्यावस्थेमध्ये आपला पुत्र एकाएकी मरण पावला असे तिच्या दृष्टीस पडले.||४७|| भावार्थ:---आणि अतिशय वाढलेल्या शोकामुळे ती अगदी मूर्छित होवून भूमीवर पडली असता,तिचे केस व वस्त्र हि अगदी अस्ताव्यस्त होवून गेली.||४८|| भावार्थ:---नंतर राजाच्या अंत:पुरातील पुरुष व स्त्रियावगैरे सर्वलोक,ते राजपत्नीचे रोदन श्रवण करून तेथे आले व समदु:खी होत असे ते रोदन करू लागले,तेव्हा अपराध करणाऱ्या त्या सवतीही अत्यंत दु:खित होवून मिथ्याच रोदन करू लागल्या.||४९|| भावार्थ:---नंतर काहीएक कारण नसता पुत्र मरण पावलो हे वर्तमान श्रवण करून,ज्यांच्या डोळ्यापुढे वारंवार अंधारी येत आहे,ज्याच्या मागून प्रधानमंडळ धावत आहे व जो स्नेहानुबंधाने वाढलेल्या शोकाने मार्गामध्ये वारंवार ठेचकाळत,पडत व मूर्छित होत आहे असा तो चीत्रकेतू राजा,ब्राहमणांनी परिवेष्ठी होवून,मरण पावलेल्या त्या बालकाच्या पायासामीप येवून पडला,त्या वेळी त्याने केस व वस्त्रे हि अगदी अस्ताव्यस्थ झाली होती.तो दीर्घश्वास टाकीत असे,त्याचे नेत्र अश्वबिंदुनी भरून गेले होते व त्यांचा कंठ दाटून आल्यामुळे त्याच्याने काहीच भाषण करवेनासे झाले.||५०-५१|| भावार्थ:---त्या काळी कृतद्दुति राणी,अतिशोकाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या आणि एकच संतती रूप असून मरण पावलेल्या बालपुत्राला अवलोकन करून अंत:पुरवासी जन आणि आमात्यादी प्रधानमंडळ ह्यांना शोक उत्पन्न करीत असता नानाप्रकारानी विलाप करू लागली.||५२|| भावार्थ:---तेव्हा केशर व चंदन ह्यांनी भूषित असलेल्या आपल्या दोन्ही स्तनावर कज्जलयुक्त बिंदुनी सिंचन करणारी ती कृतद्दुति,ज्यांच्यापासून पुष्पे गळून पडत आहेत असे आपले केस अस्ताव्यस्त करून सुस्वर आणि विचित्र असे टिटवीपक्षिणीप्रमाणे रोदन करीत पुत्राचा असा शोक करू लागली की,------------------||५३|| भावार्थ:---हे विधात्या,वृध्द जीवंत असताना बालकाला मरण प्राप्त होते यावरून तू आपल्या सृष्टीच्या विरुध्द वागत आहेस.कारण,जीवंत असलेल्या वृध्द-जनाला सृष्टि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नाही व तशामध्ये बालकही मरण पावला म्हणजे तुझी सृष्टीच्या विरूद्धच झाले आहे,असे म्हणशील तर----हे ब्रहमदेवा,जर तू विपरीत असशील तर तू प्राण्यांना अतिदू:ख देणारा असल्यामुळे त्याचा नित्यशत्रूच आहेस,कृपाळू नाहीस असे होईल.||५४|| भावार्थ:---आता जीवाच्या कर्मानुसार त्याची उत्पत्ती वगैरे करणाऱ्या माझा काय बरे आपराध आहे असे म्हणशील तर----हे विधात्या,अरे पुत्र जिवंत असतांनाच पिता मरण पावावयाचा व पिता जिवंत असतानाच पुत्र उत्पन्न व्हावयाचा असा जर जीवांना कर्माधीनत्व असल्यामुळे जीवलोकामध्ये जन्ममरणाविषयी नियम नसेल तर ते जन्मादिक प्राण्यांच्या स्वक्रमानीच त्यांना प्राप्त व्हावेत,तर मग येथे तुझे काय प्रयोजन आहे?काहीच नाही.बरे आता ‘मज ईश्वरावाचून हि जड कर्मेच जगाची उत्पत्तीवगैरे करण्यास कशी समर्थ होतील?हे तुझे म्हणणे जरी खरे असेल तथापि आपल्या सृष्टीच्या वृद्धीकारिता तू जो स्नेह्पाश उत्पन्न झाला आहेस त्याला तू स्वत:च छेदून टाकीत आहेत तेव्हां अशाप्रकारेच तुझे दुःखकारक कर्म पाहून कोणीही पुत्रादिकांवर प्रेम करणार नाही.||५५|| भावार्थः---ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची निंदा करून पुत्रालाच उद्देशून राणी भाषण करते की,----अरे बाबा,तूं मज दीन अनाथेचा त्याग करण्यास योग्य नाहीस.अरे,तुझ्या शोकामुळे संतप्त झालेल्या आपल्या पित्याकडे तरी तूं पहा,अरे बाळा,निपुत्रिक लोकांना दुस्तर असे घोर नरकदुःख आम्ही तुझ्या योगाने अनायासाने तरून जाऊ.तस्मात् त्या निर्दय यमासहवर्तमान तूं दूर जाऊ नकोस.||५६|| भावार्थः---हे बाबा,आता ऊठ,अरे तुला निजून पुष्कळ वेळ झाला,हे राजपुत्रा,ते तुझे हे खेळगडी लहान बालक,तुला खेळण्याकरितां बोलावीत आहेत,अरे तुला फार भूक लागली असेल ह्याकरितां तूं भोजन कर व स्तनपान कर आणि हे बाळा,आम्हां स्वजनांचे दुःख हरण कर.||५६|| भावार्थः---हे पुत्रा,पूर्वी मी तुझ्याजवळ आले असूनही हतभाग्य असल्यामुळे तुझे मनोहर हास्य आणि सानंददृष्टि ह्यांनी युक्त असलेले मुखकमल अवलोकन केले नाही व आतांही तुझ्या बोबड्या मधुरवाणी करीत नाही.तस्मात् त्या निर्दय यमाने तुला नेल्यामुळे पुनरपि कधीच परत न येण्याच्या गेलास कि काय?राणी कृतद्दुति आपल्या बालकाच्या वियोगामुळे भावनेच्या आहारी जाऊन विलाप--दु:ख करीत आहे,कारण त्या राणीस पुत्राचा मोह झालेला आहे,म्हणून भावनेच्या आहारी जाऊन दु:ख व्यक्त करीत आहे.जीवाचा मोह हा दु:ख देतच असतो.||५८|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित-राजा,ह्याप्रमाणे नानाप्रकारच्या विलाप-वाक्यांनी ती राजपत्नी मृतपुत्राविषयी शोक करीत असतां,चित्रकेतू राजा अत्यंत संतप्त होऊन,कंठ मोकळा करून मोठ्याने रडू लागला.राजससुद्धा पुत्राचा मोह झालेला आहे.जीवाचा मोह हा दु:ख देताच असतो.||५९|| भावार्थः---ह्याप्रमाणे ती उभयंता स्त्री-पुरुषे विलाप करूं लागली,तेव्हा त्यांचे अनुयायी अमात्यवगैरे सर्व पुरुष आणि स्त्रिया हि रोदन करूं लागली,असे होता--होती सर्व नगरांतील लोक निश्चेष्ट पडले.||६०|| | एवं कश्मलमापन्नं नष्टसज्ञंमनायकम् | ज्ञात्वाङगिरा नाम मुनिराजगाम सनारद: ||६१|| भावार्थः---ह्याप्रमाणे सर्व लोक मोहित होऊन निचेष्ट झाले आहेत व त्यांना बोध करणाराही कोणी नाही असे जाणून,अंगिरानामक मुनि नारदासहवर्तमान त्याठिकाणी प्राप्त झाला.||६१|| १४-----ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(६)षष्ठस्कंधापैकी चित्रकेतुशोकनिरुपणनामक हा(१४)चवदा अध्याय(६१)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१४|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ |१५---आतां ह्या पंधराव्या अध्यायामध्ये अंगिरा ऋषीसहवर्तमान प्राप्त झालेल्या नारद मुनीने तत्त्वोपदेशाच्या योगाने चित्रकेतु राजाच्या शोकाचा परिहार केला,अशी कथा वर्णन केली आहे.||१५|| |१५--- चित्रकेतुला अंगिरा आणि नारदांचा उपदेश ______________________________________________________________________________भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,त्या वेळी शोकाने व्याप्त होऊन पुत्रप्रेताजवळ प्रेतासारख्या पडलेल्या त्या चित्रकेतु राजाला चांगल्या वाक्यांनी बोध करण्याकरितां नारद व अंगिराऋषी भाषण करूं लागले की,--------------------------------||१|| भावार्थः---अंगिरा ऋषी म्हणतात:---हे राजेंद्रा,ज्याक्रीतां तूं शोक करीत आहेस तो ह्या प्रजारूप सृष्टीमध्ये भूत,वर्तमान व भविष्य जन्मांमध्ये तुझा कोण असावा ? व तूं तरी ह्यांच्या बांधवापैकी कोण असावास ? आतां हा माझा पुत्र व मी ह्याचा पिता आहे असे म्हणशील तर---हे राजा,पूर्वजन्मी पित्रादिरूपाने जे संयुक्त झालेले असतात तेच मरणानंतर वियुक्त म्हणजे इहजन्मी कदाचित त्याचेच अथवा दुसऱ्याचे पुत्रादिक होतात व पुनरपि जन्मांतरी ते त्याचे अथवा दुसऱ्याचे भार्यादिक किंवा शत्रूमित्रादिक होतात.तस्मात् जो ज्याचा पुत्रच असावयाचा व जो ज्याचा पिता तो त्याचा पिताच असावयाचा हा नियम मुळीच नाही.ज्याच्या--त्याच्या कर्मांनुसार त्यांना ते-ते शरीर मिळत असते.वर्तमान काळातील शरीर हे आपल्याच--नातेवाईकांनी जाळतात किंवा पुरतात,त्यामुळे आपणास नंतर दुसरे शरीर मिळत असते.||२|| भावार्थः---जशी नदीच्या प्रवाहवेगाने वाळू नियुक्त व संयुक्त होते त्याप्रमाणे जीवही काळवेगाने संयुक्य व वियुक्त होतात.||३|| भावार्थः---तथापि इतका काल लोटेपर्यंत मला पुत्र नव्हता व वृद्धपणी होऊन तो मरण पावला म्हणून मला दुःख होते असे म्हणशील तर---हे राजा,ज्याप्रमाणे बिजांचेठिकाणी कधीकधी बीजे उत्पन्न होतात आणि कांहीकांहीचेठिकाणी उत्पन्न होतच नाहीत अथवा झाली असतांही नाश पावतात,त्याचप्रमाणे ज्याच्या-त्याच्या--जीवाच्या कर्मांनुसार ईश्वरमायेने प्रेरित झालेली पुत्रादिरूप भुते पित्रादिरूप भुताचेठिकाणी उत्पन्न होतात आणि कांहीकांचेठिकाणी कदाचित् उत्पन्न होतच नाहीत अथवा झाली असतांही नाश पावतात,म्हणून आपण विहित कर्मे करावी,तर निषिद्ध कर्मे करू नयेत.आपल्यापासून--जीवापासून इतर जीवांना निषिद्ध कर्मे म्हणजे दु:ख होईल असे कर्मे करू नये,तर इतर जीवांना विहित कर्मे म्हणजे सुखकारक होईल असे कर्मे करावीत.तेच कर्मे कालांतराने आपणास--जीवास प्रराब्धरुपानें भोगावयास येतात.त्यामुळे आपणांस विहित कर्मांचे फळ सुख मिळते व निषिद्ध कर्मांचे फळ दु:ख मिळते.हे राजा तुला या जन्मात पुत्र नाही,करण तू केलेले निषिद्ध कर्माच त्याला करण आहे,म्हणून आपण जीवन जगात असतांना निषिद्ध कर्मे करू नये,तर विहित कर्मेच करावी.तस्मात् बिजांमध्ये जन्यजनकभाव असतांनाही जसा पितृपुत्रादिभाव नसतो म्हणूनच त्यांचेठिकाणी शोकवगैरे नाही त्याचप्रमाणे स्थिती असल्यामुळे त्यांच्याविषयीही शोक करणे योग्य नाही.कारण,ईश्वरमायेने प्रेरणा केलेल्या भूतांचीच उत्पत्ति होते व होत नाही ह्या दोन्ही गोष्टी वस्तुतः सत्य नाहीत.म्हणून आपण सत्संग करून ज्ञान-पुत्र उत्पन्न करून सुखरूप व्हावे.||४|| भावार्थः---आणि त्यांतूनही उत्पत्ति व नाश ह्या गोष्टी सर्वसाधारण असल्यामुळे केवळ पुत्रांकरितांच शोक करूं नये ह्या अभिप्रायाने भाषण करितात की,-------हे राजा,सांप्रतकाळी असणारे आम्ही,तूं हे इतरही जे चराचर प्राणी आहेत ते जसे जन्माच्या पूर्वी नव्हते व मरणानंतरही असणार नाहीत त्याप्रमाणेच सध्याही नाहीतच असे समजले पाहिजे.कारण,जी गोष्ट स्वप्नाप्रमाणे आदी व अंती नसते मी मध्येही नसतेच.त्याचप्रमाणे हाडामांसाच्या पुत्राचा तसेच आहे.||५|| भावार्थ:---आता हे नाहीत म्हणावे तर ह्यांची प्रतीती कशी होते आणि मी ह्यांचा जनक इत्यादिक अभिमान तरी कसा होतो?म्हणशील तर---हे राजा,भूताधिपति व जन्मादिविकारशून्य असा जो ईश्वर तो,स्वत: उत्पन्न केलेल्या व परतंत्र अशा भूतांच्या योगाने भूताची उत्पत्ती,स्थिती व लय करितो,ह्यास्तव ईश्वराने मायेच्या योगाने भूते उत्पन्न केली असल्यामुळे आम्ही आता आहो,व पूर्वी नव्हतो अशी प्रतीती होते व मी ह्याचा जनक इत्यादी अभिमानही भूतांना निमित्तमात्रेकरूनच होतो.आता सृष्ट्यादिकांच्या योगाने ईश्वराला जर काही साध्य असेल तर तो पूर्ण काम नाही असे होईल आणि जर काही साध्य नसेल तर त्याची सृष्ट्यादिकविषयी प्रवृत्त कशी होईल?अशी शंका घेशील तर----हे राजा याप्रमाणे बालक वस्तुत अपेक्षा नसूनही खेळण्याची लीला करितो त्याप्रमाणे ईश्वरालाही वस्तुतः कसलीच अपेक्षा नसून तो सृष्ट्यादिकांच्या योगाने लीला करीत असतो.त्याच्यासारख्याच--बालकाच्या वृत्तीप्रमाणे आपणही निरपेक्ष जीवन जगावे.||६|| भावार्थ:---आता जन्मादि व्यवहारातून आत्म्याचा नसून देहाचाच आहे असे सांगण्याच्या अभिप्रायाने भाषण करितात की,----हे राजा,ज्याप्रमाणे बिजापासून बीज उत्पन्न होते त्याचप्रमाणे पित्याच्या देहाने मातेच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो तथापि पृथ्वीरूप अर्थ जसा निर्विकार आहे त्याप्रमाने देहधारी जीवात्मा,देहसबंधी जन्मादि-विकारणांनी अलिप्त असल्यामुळे,सर्वकाळ एकरूपच आहे.||७|| भावार्थ:---आता जीव हा नश्वरदेहाचा सबंधवान असल्यामुळे अशाश्वत-तत्व असणारा असे म्हणशील तर-----------हे राजा,घटत्व-पटत्वादिक जातीचा व त्यांचा घागर,परळ,धोतरजोडा,पितांबर इत्यादिक व्यक्तीचा निराळेपणा वस्तुमात्रावर कल्पित आहे त्याप्रमाणे देह व देही(जीव)ह्यांचा परस्परसंबंधाने असलेला हा विभाग अनादी असून अज्ञानाने कल्पित आहे.जसा परळ व कपडा यांचा निराळेपणा वस्तू-मात्रावर म्हणजेच परमात्मा-वस्तू--मात्रावर कल्पित आहे,त्याचप्रमाणे देह--शरीर व देही--जीव यांचा संबंध परमात्मा-वस्तू-मात्रावर कल्पित आहे.म्हणून आपण जीवानी सत्संग करून,असलेला जो कल्पित संबंध परळ व कपडा यातील निराळेपणा वस्तू-मात्रावर म्हणजेच परमात्मा-वस्तू-मात्रेवर कल्पित आहे व देह--शरीर व देही--जीवात्मा यांचा संबंध परमात्मा--वस्तू-मात्रेवर कल्पित आहे.त्या कल्पित भागाचा अनात्मा असल्यामुळे बाध करून म्हणजे मिथ्या आहेत असा निश्चय करून,परमात्मा--वस्तू सत्य आहे,असा निश्चय करावा.याचा भावार्थ असा की,"जगत मिथ्या आहे व ब्रह्म सत्य आहे"असा निश्चय करून "परमात्मा-तत्वाचा" अनुभव घ्यावा.असा अनुभव घेतला असता जन्म--मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होते.||८|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला-हे राजा,ह्याप्रमाणे नारद व अंगिरा ऋषी भाषणांनी पावलेला तो चीत्रकेतू राजा मानसिक दु:खाने म्लान झालेले आपले मुख हस्ताने पुसून,त्या ऋषीप्रत ब्भाष्ण करू लागला कि,-||९|| भावार्थ:---चीत्रकेतू राजा म्हणाला-अवधूतवेश धरण करून गुप्तरीतीने संचार करणारे,पूज्यलोकामध्येही अतिपूज्य आणि ज्ञान संपन्न असे तुम्ही दोघेजण येथे कोण आला आहा?||१०|| भावार्थ:---कारण,उन्मत्तासारखा वेश धरण करणारे भगवद्भक्त ब्राहमण,विषयांचेठिकाणी आसक्तबुद्धी असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना बोध करण्याकरिता पृथ्वीवर यथेष्ट संचार करीत असतात.आपण--जीव हा योग्य वक्ता असेल तर,आपण--जीवानी ज्यांच्या ठिकाणी विषयांची आसक्ती आहे,त्यांना वेदांत--शात्राचा बोध करून "जगत मिथ्या व ब्रह्म सत्य आहे"असा उपदेश करून विषयांच्या ठिकाणी असलेली आसक्तबुद्धीचा त्याग करण्याचा व जे ब्रह्म सत्य आहे,त्याचा अनुभव घ्यावा,कारण ते ब्रह्म सुखरूप आहे.म्हणून असा उपदेश करावा.||११|| भावार्थ:--आता असे परोपकारी कोण आहेत असे म्हणाल तर हे ब्रहमनिष्ठहो,सनत्कुमार,नारद,ॠभू,अंगिरा, उद्दालक,असित,अपांतरतम,व्यास,मार्कंडेय,गौतम,वशिष्ठ,भगवानपरशुराम,कपिल,शुकाचार्य,दुर्वास,याज्ञवल्क्य,उद्दालक, जातूकर्ण्य,रोमश,च्यावन,दत्त,पतंजली सहवर्तमान आसुरि,वेद्शिरा,ऋषी,बोध्य,पंचशिरा, मुनी,हिरण्यनाभ,कौशल्य, श्रुतदेव,आणि ऋतध्वज हे व अन्यही सिद्धधीपती लोकास ज्ञानाचा उपदेश करण्याकरिता पृथ्वीवर संचार करीत असतात.आपणही वक्ता असाल तर वरील महात्म्यांसारखा उपदेश करावा.||१२-१३-१४-१५|| भावार्थ:---तस्मात ग्राम्यपशुसारखा विषयलंपट असल्यामुळे मूढ्बुद्धी व महामोहरूप अंधकारामध्ये मग्न झालेल्या माझा तुम्ही उद्धार करण्याविषयी समर्थ आहा,यास्तव मला ज्ञानरूप दिवा दाखवा.आपण--जीव अज्ञानी आहोत,म्हणून संत--महात्मा यांना शरण जाऊन उद्धार करून घ्यावा,करण अन्य शरीरात उद्धार करून घेता येत नाही,तर फक्त मनुष्य देहातच उद्धार करून घेता येतो.||१७|| भावार्थ:---हे प्रभो,पुत्रशोकामुळे याप्रमाणे तू दुस्तर दु:खामध्ये निमग्न झालास परंतु तू भगवद्भक्त असल्यामुळे असे दु:ख भोगण्यास योग्य नाहीस असे जाणून,तुजवर,अनुग्रह करण्याविषयी आम्ही येथे प्राप्त झालो आहो,कारण ब्राहमण-वत्सल अशा भगवद्भक्त खिन्न होण्यास योग्य नाही.आपण--जीव निष्काम भगवद्भक्त असाल,तर संत--महात्मा आपल्याकडे येऊन शोक--दु:ख नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत असतात.||१८-१९|| भावार्थ:---हे राजा,जेव्हा मी पूर्वी तुझ्या घरी आलो होतो तेव्हाच तुला उत्तम ज्ञानाचा उपदेश करणारा होतो,परंतु पुत्रप्राप्तीची फार इच्छा आहे,असे समजून मी तुला त्या वेळी पुत्रच दिला आहे.संत--महात्मा आपणास--जीवास आपणहून अनात्माकार वस्तू देत नाहीत,पण आपण फारच आग्रह केला,तर अनात्माकार वस्तू देतात.म्हणून आपण अनात्माकार वस्तू मागू नये,तर आत्माकार वस्तूच मागावी,करण आत्माकार वस्तू सुखरूप असते.||२०|| भावार्थः---आतां पुत्रवान लोकांना काय दुःख होते ह्याचा तुला अनुभव येतच नाही.पुत्रच केवळ दुःखाला कारण आहे असे नव्हे तर,हे शूरसेना (चित्रकेतु राजा),याचप्रमाणे दारा,गृह,द्रव्य अनेक प्रकारच्या ऐश्वर्यसंपत्ति व शब्दादि विषय राज्यसंबंधी ऐश्वर्ये भूमि,राज्य,सैन्य,जामदारखाना,सेवक,अमात्य व सुह्रज्जन हे सर्वही शोक,मोह,भय,आणि पीडा देणारे असून अनित्य आहेत,गंधर्वनगराप्रमाणे क्वचित भासमान होऊन लय पावतात आणि स्वप्न,माया व मनोरथ ह्याप्रमाणे मिथ्या आहेत.म्हणून आपण परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व वस्तू दु:खरूप आहेत.||२१-२२-२३|| भावार्थः---कारण,वास्तविक सत्यत्वावांचुनच ते दृश्यमान होत असल्यामुळे क्षणांतरी दिसत नाहीसे होतात म्हणून केवळ मनः कल्पितच आहेत.आतां हे पापपुण्यांपासून होतात असे मीमांसक म्हणतात,यास्तव ते मनः कल्पित कसे?असे म्हणशील तर---हे राजा,कर्मवासनांच्या योगाने विषयांचे चिंतन करणाऱ्या मनापासूनच कर्मे उत्पन्न झाली आहेत.यास्तव पाप-पुण्यरूप कर्मच जर मनापासून होते तर त्या कर्माच्या योगाने साध्य होणारे अर्थही--वस्तूही--विषयही मनःकल्पितच आहेत.म्हणून आपण मनापासून जे--जे उत्पन्न होतात ते--ते सर्वही दु:खरुपच आहे.विषय हे मनापासून उत्पन्न झालेले आहेत,म्हणून दु:खरुपच आहेत,म्हणून विषयांचा त्याग करावा.||२४|| भावार्थः---ह्याप्रमाणे ममतास्पद असलेले पुत्रादिक हे सर्व दुःखाला कारण आहेत असे सांगून त्या सर्वांचे मूळ, देहसंबंध आहे हे सांगण्याच्या अभिप्रायाने भाषण करितात की,----हे राजा,पंचमहाभूतरूप द्रव्ये,ज्ञानेंद्रिये,व कर्मेंद्रिये ह्यांच्या समुदायाने बनलेला हा देहच,देहाभिमानी जीवाला नानाप्रकारचे क्लेश संताप उत्पन्न करितो असे सांगितले आहे.आपण--जीवानी आपण ज्या देहात राहतोत,त्या देहातील देही--जीव आहोत,तर देह नाही.जसे घरात राहणारा मानुष घर नसून घरात राहणारा आहे,तर घर नाही,त्याचप्रमाणे जीव हा देह नसून देही--जीव आहे,तर देह नाही,देहाहून वेगळा आहे,असा आपण विवेक केला तर कळून येते.म्हणून आपण सत्संग करावा.||२५|| भावार्थः---तस्मात् अव्यग्र--स्थिर(व्यग्र--अस्थिर--चंचल)मनाने आत्मतत्त्वाचा विचार करून,हे विषय नित्य आहेत अशाप्रकारच्या द्वैतप्रपंचसंबंधी विश्वासाचा त्याग कर आणि शांतीचा आश्रय कर.म्हणून आपण जीवानी मन शुद्ध आणि अव्यग्र म्हणजे स्थिर करून म्हणजेच अन्य विषय मनात न येऊ देता आत्म-त्तव हे नित्य आहे--सुखरूप व विषय हे अनित्य--दु:खरूप आहेत असा विवेक--विचार करावा,व जे आत्मात्त्व नित्य--सुखरूप आहे त्याचा स्वीकार करावा व विषय अनित्य--दु:खरूप आहेत,त्याचा त्याग करावा.म्हणजेच सार तत्त्वाचा स्वीकार व असार--तत्त्वाचा त्याग करावा.याचा अर्थ असा होतो की,पुत्र हे असार--तत्त्व आहे व सार--तत्त्व परमात्मा त्याचा स्वीकार करावा.||२६|| भावार्थः---याप्रमाणे अंगिरा ऋषीने उपदेश केलेले तत्त्व भगवत्प्रसादांवाचून प्राप्त होत नाही याकरिता त्याचा प्रसाद होण्यासाठी मंत्रविद्येचा उपद्देश करण्याच्या अभिप्रायाने नारद भाषण करितो की,----हे राजा,तूं शुचिर्भूत होऊन,ह्या मंत्ररूप उपनिषदाचा--जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा मजपासून स्वीकार कर,म्हणजे तिचे जपरूपाने धारण करीत असतां सात रात्रीमध्ये तूं संकर्षण प्रभूला अवलोकन करिशील.सात--दिवसात आपण--जीवनी"मी ब्रह्म आहे" अशा प्रकारची धारणा केली,तर "मी ब्रह्म आहे" असा निश्चय होईल.त्यानंतर तू पुत्राची मागणी करणार नाही,कारण ज्यास सुखरूपतेचा अनुभव आलेला असतो,तो सुखाची संबंधित दु:खाची--विषयांची--पुत्राची अपेक्षा करीत नसतो.||२७|| भावार्थः---कारण,हे नृपा,त्या संकर्षणाच्या--परमात्म्याच्या चरणासमीप--ऐक्य प्राप्त होऊन--करून पूर्वीचे रुद्रादि देव ह्या द्वैतभ्रताचा त्याग करून समाधिशून्य अशा त्याच्या सर्वोत्कृष्ट महिम्याला तत्काळ पावले आहेत,त्याप्रमाणे तूंही--चित्रकेतू राजा लवकरच पावशील.म्हणून आपण--जीवानी जीवात्मा आणि परमात्मा वेगळे नसून एकच आहेत,असा निश्चय करावा,त्यामुळे आपण परमानंद--सुखरूप होऊत.||२८|| |१५---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी चित्रकेतुशोकहरणनामक हा(१५)पंधरावा अध्याय (२८)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१५|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ |१६-----आतां ह्या सोळाव्या अध्यायांत,पुत्राच्या भाषणानेच त्या चित्रकेतु राजाचा शोक घालवून त्याला शेषाचा संतोष करणाऱ्या महाविद्देचा नारदाने उपदेश केला,अशी कथा वर्णन केली आहे.||१६|| |१६----- चित्रकेतुला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन ______________________________________________________________________________भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,तद्नंतर देवर्षी नारदाने,मरण पावलेल्या त्या राजपुत्राला योगसामर्थ्याने उठवून शोक करीत असलेल्या त्याच्या ज्ञातीना दाखवून असे भाषण केले की,----------------||१|| भावार्थः---नारद म्हणाला---हे जीवात्म्या,तुझे कल्याण असो,तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या शोकांना अत्यंत संतप्त झालेल्या ह्या सुह्रदांना,बांधवाना व मातापितरांना तू अवलोकन कर.||२|| भावार्थ:---अरे अपमृत्युने मृत झाल्यामुळे तुझे आयुष्य अवशिष्ठ राहिले आहे ह्याकरिता आपल्या देहामध्ये प्रवेश करून पित्याने दिलेल्या भोगाचा तू सुह्र्द्गणासहवर्तमान उपभोग घे,व राजासनावर आरूढ हो.||३|| भावार्थ:---ह्याप्रकारे नारदमुनीचे भाषण श्रवण करून तत्क्षणीच शरीरामध्ये प्रविष्ट झालेला जीव,त्या पुत्रमुखाने म्हणाला की,नारदा,कर्माच्या योगाने देव,पशु,पक्षी,व मनुष्य ह्या योनीमध्ये भ्रमर करणाऱ्या माझे कोणत्या जन्मामध्ये हे मातापितर झाले होते ? जीवात्मा हा देव,पशु,व मनुष्य योनीत भ्रमण त्याच्या कर्मामुळे करीत असतो.आपण आता ज्यांना माता-पिता म्हणतात ते अन्य जन्मामध्ये म्हणजे देव,पशुत,माझे माता--पिता होते का?अर्थातच आपले उत्तर येईल की,अन्य जन्मात हे आई-वडील नव्हते.असे जर आहे तर मी माझे आई--वडील कोणास म्हणावे ? ||४|| भावार्थ:---आता मी मरण पावल्यामुळे पुत्रबुद्धीने जर हे मजकरिता शोक करीत असतील तर शत्रुबुद्धीने माझ्या मरणाबद्दल ह्यांना हर्ष करीत कां होवू नये?कारण,सर्वच प्राणी क्रमाक्रमाने सर्वाचे परस्पर बंधू,सपिंड शत्रू,मध्यस्त,मित्र उदासीन आणि द्वेशी होत असतात.आपल्याबद्दल--जीवाबद्दल कधी अनुकूल कधी प्रतिकूल बुद्धि होत राहते,निरंतर सारखी बुद्धि राहत नसते.तो मृत-पुत्र म्हणतो की,माझ्याबद्दल प्रतिकूलच भावना ठेऊन शोक--दु:ख करीत आहेत,तर अनुलुल भावना ठेऊन हर्ष--आनंद भावना करावी.||५|| भावार्थः---अहो,ज्याप्रमाणे क्रय-विक्रयांस योग्य अशा सुवर्णादि वस्तू व्यवहार करणाऱ्या पुरुषांमध्ये इकडे-तिकडे हिंडत असतात त्याचप्रमाणे जीवही जनकाचे(आईबापाचे)ठिकाणी हिंडत असतो.आपण--जीव कर्मांच्या योगाने जनक जे आई-वडील यांच्याकडे हिंडत असतो.आपण--जीवानी-मात्र सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घेऊन इकडे--तिकडे म्हणजेच आई--वडिलांकडे जाणे--येणे बंद करावे,कारण जाण्या-येण्यात कष्ट--दु:ख आहे,तर स्थिर राहण्यात सुख आहे.||६|| भावार्थः---ह्याप्रमाणे कर्मांच्या योगाने जीव कसा भ्रमण करीत असतो हे दृष्टातांने,सांगून एका जन्मामध्येही होणारा संबंध नियत नाही हे दृष्टांतपूर्वक सांगण्याच्या अभिप्रायाने पुनरपि भाषण करितो की,सुवर्णादि नित्य वस्तूंचाही संबंध पुरुषांचेठिकाणी अनित्यच दृष्टीस पडतो.कारण,जोपर्यंत ज्या वस्तूंचा ज्या पुरुषाशी संबंध असतो तोपर्यतच त्या वस्तूचेठिकाणी त्या पुरुषाचे ममत्व असते तीच वस्तु,विकणे किंवा बक्षीस देणेवगैरे कारणांनी दुसऱ्याकडे गेली म्हणजे तिच्यावरील त्याचे ममत्व नाहीसे होते.त्याचप्रमाणे स्थूल शरीर सुटले म्हणजे स्थूल शरीरास मरण आल्यामुळे पूर्वीच्या शरीराविषयी ममत्व राहात नाही,तर अन्य--मिळणाऱ्या शरीराशी ममत्व राहते,अशी वस्तुस्थिती आहे.म्हणून कोणीच दु:ख करण्याचे कारण नाही.म्हणून मला--शरीर सोडून गेलेल्या जीवात्म्यास दु:ख होत नाही,तर जे पूर्वीचे आई--वडील आहेत,त्यांना दु:ख होत आहे.वास्तविक पाहता त्यांनाही दु:ख होऊ नये,कारण ज्याचे प्रारब्ध भोगून संपले तो जातच असतो,असा नियम निश्चित ठरल्याला आहेच.||७|| भावार्थः---ह्याचप्रमाणे पित्रादिसंबंधाला प्राप्त झालेला नित्य व वस्तुतः अहंकाररहित असाहि तो जीव,ज्या पित्रादिकांचेठिकाणी जोपर्यंतच त्याच्या त्या पित्रादिकांचे त्याचेठिकाणी स्वत्व असते.जो जीव जोपर्यंत पित्रादिसंबंध आहेत,तोपर्यंत स्वत्व ठेवतो व नंतर स्वत्व ठेवीत नाही,त्याचा स्वत्वाचा--शरीराचा संबंध तुटलेला असतो.म्हणून आपण--जीवानी संबंधीचे शरीर सुटले तरी दु:खी होऊ नये,करण त्याने--मृत्यू झालेल्या व्यक्तीने संबंध सोडलेला असतोच.||८|| भावार्थः---आतां,जीव नित्य आहे हे सिद्ध करण्याकरितां म्हणतो की,----हा जीव नित्य आहे.कारण,हा अविनाशी व जन्मादिरहित आहे.हाच स्वप्रकाश असल्यामुळे जन्मादिकांनी युक्त असलेल्या देहादिकांचा आश्रय आहे.हा समर्थ असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनी आपणासच विश्वरूपाने उत्पन्न करितो.आपण--जीव अज्ञान अवस्थेत असतांना हा कर्मे करून स्थूल शरीरास उत्पन्न करितो व केलेल्या कर्मांचे सुख--दु:ख भोगितो.आपण--जीव जेव्हा सत्संग करील,त्यावेळेस जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभ घेईल,त्यावेळेस त्याचे जन्म--मरण निवृत्त होतात व सुखरूप होतो.म्हणजेच संसारास आपल्यामुळेच--जीवामुळेच प्राप्त झाला व आपण--जीवाने सत्संग केल्यामुळेच मुक्तही झाला.त्यला कोणी बंधनात टाकले नाही व त्याला बंधातून कोणी सोडवलेही नाही.आपल्यामुळे--जीवामुळेच बंध व आपल्यामुळेच--जीवामुळेच मुक्त अवस्था प्राप्त आहेत.||९|| भावार्थः---ह्या आपल्याला--जीवाला अतिप्रिय,अथवा अप्रिय,किंवा स्वकीय अथवा परकीय असा कोणीच नाही.कारण,हित आणि अहित करणाऱ्या मित्रादिकांच्या सर्व विचित्रबुद्धीचा हा साक्षी असल्यामुळे असंग आहे तस्मात सुह्र्दांनी युक्त हो आणि शोकसंतप्त झालेल्या सुह्रदांना व बांधवांना अवलोकन कर असे तुझे म्हणणे बरोबर नाही.आपआपल्या--जीवाच्या भावनामुळेच--मानल्यामुळे सुख--दु:ख होतात व न मानल्यामुळे सुख-दु:ख होत नाहीत.आपण--जीव हा मुळचा सुखरुपच आहे.जेव्हा आपण--जीव सत्संग करील,तेव्हा असे यथार्थ कळत असते,म्हणून सत्संग करावा.||१०|| भावार्थः---आतां भोगांचा उपभोग घे इत्यादिक जे म्हणालास त्याबद्दल सांगतो ऐक----–हा जीवात्मा,स्वतंत्र,कारण व कार्य ह्यांचा साक्षी आणि उदासीनासारखा सर्वत्र स्थित असल्यामुळे सुख,दुःख व राज्यादिक कर्मफल ह्यांचा स्वीकार करीत नाही.यास्तव अशाप्रकारच्या माझा व तुमचा कांहीच संबंध नसल्यामुळे तुम्ही मजविषयी शोक--दु:ख करूं नये.म्हणून--जीवानी अनुकूल--प्रतिकूल परीस्थित सुख--दु:ख करू नये,तर सुखरूप असावे.||११|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे भाषण करून जेव्हा तो जीव निघून गेला,तेव्हा त्या बालकाचे ते चित्रकेतुप्रभृती ज्ञातिबांधव विस्मित होऊन,त्यांनी आपली स्नेहरूप शृंखला तोडून शोकाचा त्याग केला.जसा चित्रकेतू राजाने अंगीऋषीचा,चित्रकेतू व जीवात्म्याचा उपदेश ग्रहण करून पुत्र-वियोगाच--पुत्र-संबंधाचा त्याग केला करून दु:खाचा त्याग केला,त्याप्रमाणे आपण--जीवानी आपणास--जीवास कोणत्याही प्रकारचे जे दु:ख आहे,ते सत्संगाने निवृत्त करून सुखरूप व्हावे व जन्म--मरणरूपी दु:ख निवृत्त करून सुखरूपी व्हावे.||१२|| भावार्थः---नंतर सपिंडांनी त्या बालकाचा देह दग्ध करून,त्याच्या योग्य अशा श्राद्ध-तर्पणादि क्रिया केल्या आणि शोक,मोह भय आणि दैन्य उत्पन्न करणारा व त्याग करण्याविषयी अशक्य असा जो स्नेह त्याचा त्यांनी केला.राजा-चित्रकेतू यांनी ज्याप्रमाणे सत्संग करून दु:खरहित झाले,त्याचप्रमाणे आपण सत्संग करून दु:खरहित होण्याचा प्रयत्न करावा.||१३|| भावार्थः---हे महाराजा,त्या वेळी बालहत्येमुळे निस्तेज होऊन लज्जित झालेल्या व पुत्रादिक हे सर्व दुःखाला कारण आहेत ह्या अंगिराऋषीच्या भाषणाचे स्मरण करणाऱ्या त्या बालघातकी राजस्त्रियांनी,पुत्रकामनाशून्य व निर्मत्सर होऊन,बालहत्येविषयी ब्राह्माणांनी सांगितलेले जे प्रायश्चित ते त्या यमुनेचे तीरी केले.म्हणून आपण--जीवानी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अपराध घडल्या असल्यास शास्त्रानुसार प्रायश्चित कर्म करावीत,कारण त्यामुळे--प्रायश्चित कर्मामुळे पापांची निवृत्त होऊन त्यानंतर आपण--जीवानी अपराध करू नये.||१४|| भावार्थः---असो,याप्रमाणे अंगिरा ऋषि व नारद ह्यांच्या भाषणांनी आत्मज्ञान झालेला तो चित्रकेतू राजा,सरोवराच्या चिखलांतून बाहेर निघणाऱ्या हत्तीप्रमाणे गृहरूप अंधकूपांतून बाहेर निघाला.आपणही--जीवानी राजा-चित्रकेतू प्रमाणे सत्संग केला असतां अज्ञान निवृत्त होऊन जीव--ब्रह्म-ऐक्य-ज्ञान होऊन व ज्ञानाचा अनुभव घेतला असता जन्म-मरण निवृत्त होऊन सुखरूपता प्राप्त होते.||१५|| भावार्थः---पुढे त्यानें--चित्रकेतूनें,यमुनेमध्ये यथाविधी स्नान करून व पापनाशक अशा पितृतर्पणादि जलक्रिया केल्यावर मौनधारण पूर्वक इंद्रियसंयमन करून,त्या ब्रहमपुत्रांना प्रणाम केले.त्याप्रमाणे--चित्रकेतूप्रमाणे आपण--जीवानी प्रसंगाणानूसार प्रायश्चित कर्म करावे व सत्कर्मप्रवर्तक यांना नमस्कार करावा.||१६|| भावार्थः---नंतर ज्याने इंद्रियदमन केले आहे व जो शरण आला आहे अशा त्या भगवद्भक्त चित्रकेतु राजावर भगवान नारदमुनीने प्रसन्न होऊन त्याला ह्या पुढील विद्देचा उपदेश केला.आपण--जीवानी सत्संग करावा.||१७|| भावार्थः---तो असा की,---आपण--जीवानी हे भगवन(चित्त,बुद्धि,मन आणि अहंकार ह्यांचेठिकाणी अनुक्रमाणे) वासुदेव,प्रद्दुम्न,अनिरुद्ध आणि संकर्षण ह्या रूपांनी असलेला जो तूं त्या तुला आम्ही मनाने नमस्कार करितो.||१८|| भावार्थः---हे विज्ञानमय परमात्म्या,तुझ्यापासून द्वैतदृष्टि निवृत्त झाल्यामुळे आपलेठिकाणी तूं रममाण होत असल्याने परमानंदरूप आहेस आणि म्हणूनच शांत आहेस.तस्मात तुंला नमस्कार असो.||१९|| भावार्थः---हे ईश्वरा,ज्या तूं स्वानंदाभुवानेच मायानिमित्तक--रागद्वेषादि लाटांचे निरसन केले आहेत व जो तूं अंतर्यामीरूपाने इंद्रियांचा प्रवर्तक व्यापक,व जगद्रूपी आहेस त्या तुज परमेश्वराला नमस्कार असो.||२०|| भावार्थः--हे परमात्म्या,मनासहवर्तमान सर्व इंद्रिये तुझ्या स्वरूपाला प्राप्त न होतां उपराम पावली असतां,प्रकृत्यादि कारणांचा व देहादिक कार्यांचा मूळकारण आणि नामरूपरहित असा जो एक तूं चैतन्यरूपाने प्रकाश पावतोस त्या तूं आमचे रक्षण करावेस.||२१|| भावार्थः---हे ईश्वरा,हे कार्यकारणात्मक विश्व ज्याचेठिकाणी असते,ज्याचेठीकानी लय पावते व ज्याच्यापासून उत्पन्न होते आणि मातीच्या घटादिक पदार्थामध्ये जशी माती असते त्याप्रमाणे जे सर्वत्रठिकाणी व्याप्त आहे त्या तुज ब्रहमस्वरूपाला नमस्कार असो.||२२|| भावार्थः---ते अनुभवणारा येईल मग मनासह सर्वइंद्रीयांना ते अगोचर कसे! अशी! शंका येईल तर ये ईश्वरा, सर्वप्राणीमात्रांच्या आंत व बाहेर आकाशाप्रमाणे व्यापून असणाऱ्या ज्याला कर्मेंद्रिये स्पर्श करीत नाहीत व मन,बुद्धि आणि ज्ञानेंद्रिये जाणत नाहीत,त्या तुज ब्रहम-स्वरूपाला मी नम्र आहे.||२३|| भावार्थ:---आता इंद्रीयादिकांना ब्रहमस्वरूपाचे अज्ञान असण्याचे कारण असे की,---देह,इंद्रिये,प्राण,मन,व बुद्धी हे जड आहेत.जड वस्तू जाणू शकत नाही.त्या जड वस्तूस जाणण्याकरिता चिदाभासाची--चैतन्याची गरज असते.फक्त अंत:करण जाणू शकत नाही,कारण ते जड आहे,व फक्त चैतन्य जाणू शकत नाही,कारण ते निर्विकार आहे. "अंत:करण +कूटस्थ=चिदाभास--जीवात्मा जाणू शकतो." सर्व "ब्रह्माच्या--चैतन्याशांने" युक्त झालेले असतात तेव्हाच जाग्रत व स्वप्न या अवस्थामध्ये आपापल्या कर्माविषयी प्रवृत्त होतात,सुषुप्ती अवस्थेत अंत:करण लीन असल्यामुळे कार्य करू शकत नाही.जसे थंड असलेले लोखंड दाह करीत नाही,त्याप्रमाणे सुषुप्ती व मूर्छा इत्यादी अवस्थेमध्ये ते देहादिक कर्माचेठीकानी प्रवृत्त होत नाहीत,कारण ते कार्यरत नसते.म्हणून जसे लोखंड अग्निशक्तीनेच दाह करणारे असून अग्नीवाचून दाह करीत नाही त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये असलेल्या ज्ञानक्रियाशक्तीच्या योगानेच प्रवृत्त होणारे देहादिक,ज्या ब्रह्मास स्पर्श करीत नाही व जाणत नाहीत.आता जीव हा अवस्थात्रयाचा त्या ब्रह्माला जाणत असेल असे म्हणावे तर जाग्रदादी अवस्थांमध्ये साक्षी हि संज्ञा हि त्या ब्रह्मालाच प्राप्त होते,दुसरा जीव म्हणून कोणी असून त्याला प्राप्त होत असे नाही.||२४|| भावार्थ:---तस्मात् हे सर्वोत्कृष्टा सर्वेश्वरा,सर्वश्रेष्ठ जे भक्त त्यांच्या समुदायाच्या करकमलरूप कळ्यांनी ज्याच्या दोन्ही चरणकमलांची सेवा होत आहे व जो महापुरुष,महापराक्रमी आणि महाऐश्वर्याचा पति आहे त्या तुज भगवंताला नमस्कार असो.||२५|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला--हे समर्थ परीक्षित राजा,ह्याप्रमाणे नारदाने,त्यास शरणागत आलेल्या चित्रकेतुनामक भगवद्भक्ताला,ह्या विद्येचा उपदेश करून,नंतर अंगिरा-ऋषीसहवर्तमान ब्रह्मलोकी गमन केले||२६|| भावार्थः---नंतर केवळ उदकाचे सेवन करून एकाग्र अंतःकरणाने युक्त अशा त्या चित्रकेतु राजाने,नारदाने उपदेश केलेल्या त्या विद्येचा सात दिवसपर्यंत सांगितल्याप्रमाणे यथासांग जप--मनन,व निदिध्यासन केले.||२७|| भावार्थः---नंतर,हे राजा,त्या जप केलेल्या विद्येच्या योगाने चित्रकेतु राजाला अकुंठीत असे (वारंवार फलरूप)विद्याधराधिपत्य अवांतर परोक्ष-ज्ञान प्राप्त झाले.||२८|| भावार्थः---नंतर कांही दिवसांनी विद्देने दिप्त झालेल्या गमन करणारा तो चित्रकेतु राजा,देवाधिदेव शेषाच्या चरणसमीप गेला.चित्रूकेतू राजास "सामीप्य-मुक्ती" प्राप्त झाली.परोक्ष--ज्ञानाने सामीप्य मुक्ती प्राप्ती होते.||२९|| भावार्थः---आणि त्याने,कमलकंदाप्रमाने गौरवर्ण आहे,ज्याने नीलवस्त्र परिधार केले आहे,ज्याचे देदीप्यमान किरीट,बाहूभूषणे,कटिसूत्र व कडी तोडे हे अलंकार धारण केले आहेत,जो प्रसन्न व आरक्तवर्ण नेत्र ह्यांनी युक्त आहे जो सनत्कुमारादि सिद्धाधिपतीच्या समूहांनी परीवेष्टी आहे त्या प्रभूला अवलोकन केले.||३०|| भावार्थः---हे राजा,त्याच्या दर्शनाच्या योगाने ज्याचे सर्व किल्बिष नाहीसे झाले आहे,ज्याचे अंतःकरण स्वच्छ व निर्मळ झाले आहे,ज्याच्या नेत्रामध्ये आनंदाश्रू आले आहेत व ज्याच्या शरीरावर रोमांच उठले आहेत अशा त्या चित्रकेतु राजाने,त्या आदिपुरुष संकर्षणाला अत्यंत भक्तिपूर्वक शरण जाऊन प्रणाम केला.||३१|| भावार्थः---परंतु,प्रेमाश्रूबिंदूंनी श्रेष्ठकीर्ती परमेश्वराच्या चरणकमलांच्या आसनाला वारंवार अभिषेक करीत असलेला तो चित्रकेतु राजा,प्रेमाने कंठ दाटून आल्यामुळे सर्वही वर्णाचे उच्चारण बंद पडले म्हणून त्या प्रभूचे स्तवन करण्यास पुष्कळ वेळपर्यंत समर्थ झाला नाही.||३२|| भावार्थः---नंतर बुद्धिपूर्वक मनाला वश करून व सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्तीचा निरोध करून,भाषण करण्यास समर्थ झालेल्या चित्रकेतू राजाने,भक्तीप्रतिपादक अशा पंचरात्रादि शास्त्रोक्तरूपाने युक्त असलेल्या त्या जगद्गुरू परमेश्वराची अशी स्तुती केली की,--------------------------------||३३|| भावार्थ:---चित्रकेतू राजा म्हणाला---हे अजित,देवादिकांना तू अजिंक्य असताही अतिदयाळू असल्यामुळे इंद्रियदमन केलेल्या समदृष्टी भक्तांनी तुला अगदी स्वाधीन करून घेतले आहे व तुही त्यांना अगदी खरोखर वश केले आहेस कारण,निष्काम सेवा करणाऱ्या भक्तांना तू आपले स्वरूप देणारा आहेस.||३४|| भावार्थ:---बरे मी भक्तांना वश आहे असे कशावरून?कारण,माझ्या बरोबर स्पर्धा करणाऱ्या सृष्ट्यादिकारक अन्य ईश्वराकडून माझ्या पराजय होण्याचा संभव आहे असे म्हणशील तर----हे भगवन,जगताची उत्पती,स्थिती व लय इत्यादिक हि सर्व खरोखरच तुझीच लीला आहे ब ब्रह्मादिक--ब्रह्मदेव व महादेव जगत्स्त्रष्टे हे ईश्वर नसून तुझ्या पुरुषरूप अंशाचे अंश आहेत आणि त्याविषयी वास्तविक स्थिती अशी असताही ‘आम्ही पृथक ईश्वर आहोत’अशा अभिमानाने ते व्यर्थ स्पर्धा करीत असतात.म्हणून आपण--जीवानी कोणत्याही प्रकारचा अभिमान धारण करू नये,कारण अभिमानामुळेच परमात्म्याची अनुभूती येत नाही.परमात्म्याची अनुभूती आल्याशिवाय जन्म--मरण निवृत्त होत नाही व परमानंदाची प्राप्ती होत नाही.म्हणून आपण अहंकार निवृत्त करावा.||३५|| भावार्थ:---आता ईश्वरच सृष्ट्यादिकांचा कर्ता आहे ह्याचे उपपादन करितो की,----परमाणूरूप जे अगदी सूक्ष्म मूळ-कारण व ब्रह्मांडरूप जे अगदी शेवटचे अतिविस्तीर्ण कार्य ह्या उभयतांच्या आदी,अंती व मध्यंतरी तू असल्यामुळे आदी,व मध्य हे तुला मुळीच नाहीत.ह्यावरून "तू 'नित्यच' आहेस आणि ते 'परमाणुप्रभूती' तुझ्यापासूनच उत्पन्न होत असल्यामुळे 'अनित्य' आहेत," कारण,सत्यत्वेकरून प्रतीतीला येणाऱ्या कार्याच्या आदी व अंती जे नाशरहित असते तेच मध्यास्थितीतही नित्य असते."अनित्य जी वस्तू आहे,ती दु:खरूप आहे व नित्य जी वस्तू आहे,ती सुखरूप आहे." म्हणून आपण जीवानी अनित्य वस्तूचा त्याग करू नित्य वस्तूचा अनुभव घ्यावा.||३६|| भावार्थ:---ह्याप्रमाणे नित्यत्व पतीपादन करून ईश्वराचा काळाने परिच्छेद होत नाही असे सांगितले,आता देशानेही त्याचा परिच्छेद होत नाही हे सांगण्यासाठी अभिप्रायाने भाषण करितो की,-पहिल्यापहिल्यापेक्षा उत्तरोत्तरम दहादाहापट अधिक असलेल्या भूमिप्रभूती सात आवरणांनी परिवेष्टित असे हे ब्रह्मांड,दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांड-- सहवर्तमान तुझे ठिकाणी अगदी परमानुप्राय भ्रमर करिते,तस्मात्-तू खरोखर अनंत आहेस.म्हणजे परमात्म्याचा देशांनीही अंत होत नाही.||३७|| भावार्थ:---ह्याप्रमाणे देश व काळ ह्या दोहोनेही ईश्वराचा अंत लागत नाही हे प्रतिपादन करून आता ज्याअर्थी ह्याप्रमाणे परमेश्वर तूच आहेस व इतर देव तुझ्या विभूती आहेत त्याअर्थी तुला टाकून विषयांच्या इच्छेने दुसऱ्याची उपासना करणारे पुरुष अतिमंद आहेत हे सांगण्याच्या आशयाने चित्रकेतु राजा भाषण करितो की,-------हे ईशा,जे विषयेच्छू पुरुष तुज सर्वोत्कृष्टाला न भजतां तुझ्या विभूतींची (इंद्रादिकांची)उपासना करितात,ते खरोखर नरकार पशु होत.म्हणून आपण--जीवानी विभूतींची--देवतेची उपासना न करता सर्वोत्कृष्ट जो भगवंत--परमात्मा आहे,त्याचीच उपासना करावी.कारण,जसा राजकुलाचा नाश झाला म्हणजे सेवकांचे भोगही नाहीसे होतात त्याप्रमाणे उपास्य देवतेचा नाश झाला म्हणजे उपासकांचेही भोग नाश पावतात.देवता ह्या नाशकारक आहे व भगवंत हा अविनाशी आहे,म्हणून आपण--जीवानी अविनाशी त्त्वाची उपासना करावी. ||३८|| भावार्थः---ह्यानंतर विषयांच्या इच्छेनेही केलेली ईश्वरसेवा मोक्षफळाला कारण होते हे सांगण्याच्या अभिप्रायाने म्हणतो की,हे परमेश्वरा,जशी भाजलेली बीजें अंकुरोत्पत्तिला कारण होत नाहीत त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा तुझेठिकाणी केलेल्या विषयवासनांही दुसऱ्या देहांच्या उत्पत्तीस कारण होत नाहीत,म्हणून आपण जीवानी निर्गुण--निराकार असलेला परमात्मा प्राप्त करून घ्यावा,करण त्याच्या प्राप्तीमुळे देह हा उत्पन्न होत नाहीत.कारण ह्या जीवाच्याच गुणसमुदायापासून संसारास कारण असे अहंताममतादिक द्वंद्वसमूह उत्पन्न होतात.तस्मात कामनेनेही तुजनिर्गुण परमेश्वराची सेवा केली असतां हळू हळू म्हणजे प्रथम सकाम करून व नंतर निष्काम कर्म करून निर्गुणत्व प्राप्त होते.||३९|| भावार्थ:---आता फळाच्या इच्छेनेंही केलेलें तुझें आराधन जर मोक्ष कारण होतें मग भगवद्धार्माच्या महात्म्याची गोष्ठ काय सांगावी,हे सांगण्याच्या अभिप्रायानें व त्या धर्माच्या संप्रदायाची प्रवृत्ती करणारा हि तूंच आहेस,असे दर्शविण्याच्या आशयानें चित्रकेतू राजा पुनरपि भगवंताची स्तुती करितो की,हे अपराजिता,ज्या वेळी तूं निर्दोष अशा भागवतधर्म कथन केलास,त्यावेळी खरोखरच तूं सर्वांना जिंकिले आहेस.कारण,"लोकैषणा वित्तेषणा आणि पुत्रैषणा" यांनी रहित आणि आत्मस्वरूपी रममाण होणारे जे सनत्कुमारादि मुनी,तेसुद्धां मोक्षाकरिता त्या भगवद्धार्माचे अद्यापि श्रवण सेवन करितात.आत्मस्वरूपी रममाण असणारे म्हणजे परमात्म्यची अनुभूती घेतलेले सत्कुमारादि भगवद्धार्माचे श्रवण करितात,कारण भगवद्धर्म हा तिन्ही दोषांनी संपन्न असलेलाही श्रवण करू शकतो व त्यामुळे सर्व-साधारण १---पहिला(१)स्कंध ते नवव्या(९) स्कांधाने मल-दोष निवृत्त होतो,२--- दहाव्या(१०)स्कांधाने विक्षेप-दोषांची निवृत्ती होते,कारण त्या स्कांद्धात भगवंताच्या सगुण--साकराच्या लीला आहेत.३---आकराव्या व बाराव्या स्कांधाने आवरण दोष निवृत्त होतो व त्यामुळे चौथा पुरुषार्थ जो "मोक्ष" त्याची प्राप्ती होऊन जन्म--मरण निवृत्त होऊन परमान्दाची प्राप्ती होते.म्हणून सनत्कुमारादि महात्मा पुरुष भगवद्धार्माचे श्रवण करितात.म्हणून भगवद्धार्माचे आपण सर्वांनी श्रावण करावे,करण आपल्यात--जीवात तीन दोष आहेत,त्यामुळे आपलेही--जीवाचे तीन दोष--मल दोष, विक्षेप-दोष व आवरण-दोषांची निवृत्त होऊन चौथा पुरुषार्थ जो मोक्ष--अत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होते.नरदेहास आलेल्याचे महासार्थक होते.||४०|| भावार्थ:---आतां,भागवतधर्मे निर्दोष कसा ? म्हणून शंका घ्यावी तर----हे परमेश्वरा,इतर काम्यधर्मामध्यें जशी ‘तू आणि मी,माझे आणि तुझे’अशी विषम बुद्धी उत्पन्न होते त्याप्रमाणें भागवद्धर्मांमध्ये पुरुषांना विषम बुद्धी उत्पन्न होत नाही.करण यांत सर्वांना सारखे समजले जाते,तर अधिकाराचा विचार केल्या जात नाही.आतां तो काम्यधर्माचेही वेदोक्त असल्यामुळे निर्दोषच आहेत’ असे म्हणावे तर----हे भगवन,शत्रुमरणादि कामनेने सांगितलेला जो काम्य धर्म तो रागद्वेषादिकांनी युक्त असल्यामुळे फार अशुध्ह आहे,त्यांचे फळ नश्वर असल्यामुळे तो विनाशी आहे आणि त्यामध्यें हिंसावगैरे पुष्कळ असल्यामुळे तो अधर्मांनी भरलेला आहे.म्हणून आपण--जीवानी सकाम कर्मे जे हिंसादि दोषांनी भरलेली आहेत,ती दु:खदायक आहेत.त्यामुळे आपणांस व भगवंतासही दु:ख होते.म्हणून ते सकाम कर्मे आपण--जीवानी करू नये.||४१|| भावार्थ:---आता हीच गोष्ठ पुन्हा विस्तारानें वर्णन करितो की,-----आपल्या आणि दुसऱ्याला ज्यामध्ये पीडा होते आणि दुसऱ्याला पीडा दिली असता अधर्म होतो व तुलाही पिडा होते.म्हणून जीवानी यज्ञदि कर्मे करू नयेत,करण यामध्ये हिंसा होते व हिंसा केल्यामुळे आपणांस,दुसऱ्यास व भगवंतास पीडा--दु:ख होते,आनंद कोणासही होत नाही.म्हणून आपण या प्रकारची दु:खदायक कर्मे करू नयेत.||४२|| भावार्थ:---आतां भागवद्धार्मापासून तर पीडा होत नाही असे दर्शविण्याच्या अभिप्रायाने सांत्वन करितो की,-----हे परमेश्वरा जिच्या योगाने तू भागवतधर्म सांगितला आहेस ती तुझी दृष्टी कधीही परमार्थाला सोडून असत नाही कारण,स्थावरजंगमात्मक प्राणीसमुहांचे ठिकाणी समबुद्धी ठेवणारे श्रेष्ठ भगवद्भक्तच त्या भगवद्धर्मांचे सेवन करितात. म्हणून आपण परमार्थ करीत असतांना समबुद्धीच ठेऊन परमार्थ करावा व विषमबुद्धिने संसारच होतो.||४३|| भावार्थ:---तस्मात् हे भगवान,तुझ्या दर्शनापासून पुरुषांची सर्व पातके नाहीशी होतात,हे काही अघटीत नव्हे,कारण,तुझे नांव एकदा ऐकिलें असता,निकृष्ट जातीचा चांडाळहि संसारापासून मुक्त होतो.म्हणून आपण--जीवानी भगवंताच्या नांवाचा नामोच्चार करावा,भगवंताच्या सगुण-साकराच्या लीला श्रवण कराव्या व भगवंताचे स्वरूप जाणून घ्यावे.यामुळे आपले तीन दोष निवृत्त होऊन परमात्म्याचा अनुभव येऊन जन्म-मरण निवृत्त होऊन परमानंदाची प्राप्ती होते.||४४|| भावार्थ:---याकरिता हे भगवान,तुझ्या अवलोकनाने आमच्या अंत:करणांतील सर्व दोष आज नाहीसे झाले व आम्ही कृतार्थं झालों आहों आणि असें होणें हें योग्यच आहे.कारण,तुमचा परमभक्त अशा देवर्षीनारदाने जे भाषण केले ते अन्यथा कसे होईल?होणारच नाहीम्हणून आपण--जीवानी भगवद्धर्माचे श्रवण करून व तीन दोष निवृत्त करून जन्म--मरण निवृत्त करावे.||४५|| भावार्थ:---ह्याप्रमाणे आपली कृतार्थता दर्शवून मी पूर्वी कसा अत्यंत मूढ होतो व आता नारदाने कसा मजवर अनुग्रह केला ते तुज सर्वांतरयामी परमात्म्याला मी कितीसे सांगणार आहे?अश्या अभिप्रायाने स्तुती करितो की,-हे अनंता,ह्या संसारामध्ये लोक जे आचरण करितात ते तुज जगदात्म्याला सर्व विदित आहेच.तस्मात् जसा काजव्यानी सुर्याला काहीएक प्रकाश कर्तव्य नाही तसे तुज परमगुरूला विशेष करून कळविण्याजोगे काय बरे आहे?काहीच नाहीत.म्हणून जीवानी परमात्म्यास कळून घेऊन अनुभव घ्यावा.||४६|| भावार्थ:---तस्मात् हे भगवन,सर्व जगताची उत्पत्ती,स्थिती व लय करण्यास जो समर्थ आहे,भेददृष्टी असणाऱ्या कुयोगीजनांना ज्याचे आत्मतत्व समजत नाही,त्या अत्यंत शुध्द तुज भगवंताला नमस्कार असो.||४७|| भावार्थ:---जो हालचाल करू लागला असता ब्रह्मादिक जगत्स्त्रष्ठे आपआपले व्यापार करू लागला,जो अवलोकन करू लागला असता ज्ञानेंद्रीय आपआपला विषय अवलोकन करितात,ज्याच्या मस्तकावर हे भूमंडळ केवळ मोहरीप्रमाणे भासत आहे आणि जो सहस्त्र मस्तकांनी युक्त आहे त्या तुज भगवंताला नमस्कार असो.||४८|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे कुरुद्वाहा परीक्षित राजा,ह्याप्रमाणे उत्तम प्रकाराने,भगवान अनंताची स्तुती केल्यावर तो प्रसन्न होवून विध्याधराधीपति चित्रकेतुला म्हणाला की,------------- ||४९|| भावार्थ:---श्री भगवान म्हणाले----हे राजा नारद आणि अंगिरा ह्यांनी जो मजविषयी तुला उपदेश केला त्याच्या योगाने व त्याचप्रमाणे नारदाने उपदेश केलेल्या त्या अविद्येच्या योगाने आणि ह्या माझ्या दर्शनाने तू उत्तम प्रकारेकरून कृथार्थ झाला आहे.||५०|| भावार्थ:---ह्याप्रमाणे सामान्यत: सांगून नारदाने केलेला उपदेश दृढ-व्हावा ह्याकरिता भगवान स्वत: उपदेशकरीता की,----हे राजा,भूतांचा प्रकाशक व भूताचे कारण मीच असल्यामुळे सर्व भूते व त्याचा आत्मा मीच आहे.आता धर्माधर्मादिप्रकाशक शब्दब्रह्म व परब्रहम हे भूताचे प्रकाशक व कारण असे प्रसिध्द आहे.मग ते सर्वही तूच कसा आहेस ? असे विचारशील तर---हे राजा शब्दब्रहम व परब्रह्म हि दोन्ही माझीच नित्य स्वरूपे आहेत,करण शब्द-ब्रह्म म्हणजे भगवंताच्या श्वासोच्छश्वासापासून वेद झालेले आहेस,त्यासच शब्द-ब्रह्म असे म्हणतात व परमात्मा हे परब्रह्म आहे.म्हणजे दोन्ही एकच आहे.||५१|| भावार्थ:---ह्याकरिता भोग्य प्रपंचामध्ये भोक्तृरुपाणे आत्मा अनुगत आहे व तो प्रपंच आत्म्याचेठिकाणी भोग्यरूपाने व्याप्त आहे आणि त्या उभयंतानाही मी कारणरूपाने व्याप्त केले असून ती दोन्हीही माझेठीकानी कल्पित आहेत असे तू अवलोकन कर.||५२|| भावार्थ:---आता,जाग्रदादि अवस्थाभेदाने भोक्तृभोग्यात्मक विश्व स्पष्ट अनुभवास येते असून ते कल्पित कसे?असे विचारशील तर---हे राजा,जसा निजलेला पुरुष स्वप्नामध्ये उठून,मी शय्येवर बसलो आहे असे मानितो म्हणजे स्वप्नामध्ये जाग्रदावस्थेचा अनुभव घेतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागरणवगैरे ह्या जीवोपाधिभूत बुद्धीच्याच अवस्था असून आत्म्याचे ठिकाणी त्या केवळ मायेने कल्पित आहेत आहेत असे जाणून,आत्मा हा त्यांचा दृष्टा व त्या अवस्थांनी रहित आहे असे समजावे.||५३-५४|| भावार्थ:---आता निद्रावस्थेमध्ये दृश्य वस्तूचा अभाव असल्यामुळे द्रष्ट्त्वाचाही अभावच आहे,तस्मात् आत्मा हा त्या अवस्थाचा द्रष्टा आहे असे कसे म्हणता येईल?अशी शंका घेशील तर---हे राजा,निजलेल्या पुरुष,ज्या स्वरूपाने त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये द्रष्टा आहे असे कसे म्हणता येईल?अशी शंका घेशील तर---हे राजा,निजलेला पुरुष,ज्या स्वरूपाने त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या गाढा निद्रेला व तिच्यामध्ये होत असलेले सुख ह्याचे ज्ञान होणार नाही व तसे झाले असतां मला चांगली झोप लागली होती असे स्मरण कोणेही संभवत नाही परंतु हे स्मरण तर सर्वांना होतेच म्हणून जाग्रदादी अवस्थांचा कोणीतरी साक्षी असणे हे अगदी अवश्य आहे.||५५|| भावार्थः---आतां एकाने अवलोकन केलेल्या वस्तूचे दुसऱ्याला स्मरण होणे संभवत नाही;म्हणून सुषुप्ति अवस्थेमध्ये साक्षिभूत असलेल्या आत्म्याने अवलोकन केलेल्याचे जाग्रदावस्थेतील जीवाला कसे स्मरण होईल ? असा प्रश्न करिशील तर---हे राजा,निद्रा व जागरण ह्या दोन्ही अवस्थांचे अनुसंधान राखणाऱ्या त्या दोन्ही अवस्थांमध्ये जे ज्ञान प्रकाशकरूपाने स्थित असून त्यांहून भिन्न असते ते ज्ञानच "परब्रहम" होय.त्या ज्ञानाहून परब्रहम म्हणजे कांही निराळे आहे असे नाही.म्हणजे जसे यौवनावस्थेमध्ये बाल्यावस्थेत पाहिलेल्या वस्तूंचे स्मरण होते त्याप्रमाणे जाग्रदवस्थेमध्ये निद्रेचे व तिच्यामध्ये झालेल्या आनंदाचे जीवाला स्मरण घडते.यास्तव अशाप्रकारचे ते ब्रहमरूपच आहे असे तूं जाण.||५६|| भावार्थः---आतां मी सांगितलेल्या ह्या मद्रूप ब्रह्माचे पुरुषाला विस्मरण झाले तर पुरुषाचे स्वरूप आत्मस्वरूपापासून निराळे होते आणि त्यामुळे त्या पुरुषाला जन्मानंतर जन्म व मरणानंतर मरण असा संसार प्राप्त होतो.म्हणून आपण--जीवानी ब्रह्माचे विस्मरण होऊ देऊ नये,तर निरंतर स्मरण करावे.||५७|| भावार्थः---ह्याप्रमाणे संसारातून मुक्त होण्यास ब्रहमज्ञानाचीच आवश्यकता आहे हे कथन केले.आतां भोगादिकांची प्राप्ति होणे हे इतर देहांमध्येही शक्य आहे,परंतु,ज्ञानप्राप्तिकरितां तर मनुष्यजन्मामध्येच यत्न केला पाहिजे हे सांगण्याच्या अभिप्रायाने भगवान भाषण करितो की,----हे राजा,ह्या भारतखंडामध्ये जीच्यामध्ये शस्त्रोक्त ज्ञान--परोक्ष-ज्ञान व अपरोक्ष ज्ञान होण्याचा संभव आहे.अशी मनुष्य-योनी प्राप्त झाली असतां,जो तिच्यामध्ये आत्म्याला जाणत नाही त्याला कोणत्याही योनीमध्ये मोक्षप्राप्ति होत नाही,म्हणून आपण मनुष्य योनितच परमार्थ करावा,कारण इतर योनीत फक्त संसारच आहे.||५८|| भावार्थः---तस्मात प्रवृत्तिमार्गामध्ये अतिक्लेश असून त्यांमध्ये फलविपर्यय होतो म्हणजे दु:खाचीच अनुभूती येते,आणि निवृत्तिमार्गामध्ये मोक्षप्राप्ति होते असे जाणून विवेकी पुरुषाने फलकामनेचा त्याग करावा.निष्काम परमार्थ करावा.||५९|| भावार्थः---आतां ह्याच गोष्टीचे फिरून विवरण करितो की,---स्त्री व पुरुष हे उभयंता सुखप्राप्ति व दुःखनिवृत्ति होण्याकरितां नानाप्रकारची कर्मे करीत असतात,परंतु त्यांपासून त्यांच्या दुःखाची निवृत्ति व त्यांना सुखाची प्राप्ति मुळीच होत नाही,कारण सकाम कर्मे केल्यामुळे दु:खाची निवृत्ती होत नाही व सुखाची प्राप्ती होत नाही.||६०|| भावार्थः---याप्रमाणे उद्योगाविषयी आम्ही प्रवीण आहो असा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषांना फलप्राप्ति होत नाही असे जाणून व जाग्रदादी अवस्थात्रयाहून निराळे चवथे सूक्ष्म आत्म्याचे स्वरूप,आहे असे जाणून पुरुषाने विवेकबलाच्या योगाने ऐहिक व आमुष्मिक विषयापासून अगदी मुक्त व्हावे आणि शास्त्रोक्त ज्ञान व अपरोक्ष ज्ञान ह्यांच्या योगाने संतुष्ट होऊन माझ्या सेवेविषयी तत्पर असावे.म्हणून आपण भगवंताची निष्काम सेवा करून सत्संगाद्वारे परोक्ष-ज्ञान व अपरोक्ष-ज्ञानाचा अनुभव घ्यावा.||६१-६२|| भावार्थः---आतां ह्या वर सांगितलेल्या पुरुषार्थाहून श्रेष्ठ पुरुषार्थ कांहीच नाही हे सांगण्याच्या अभिप्रायाने तो परमात्मा भाषण करितो की,----हे राजा,योगमार्गाविषयी निपुणबुद्धी असलेल्या पुरुषांनी--आपण--जीवानी सत्संगाद्वारे परमात्मा सर्वत्र एकच आहे,असे जाणणे हा इतकाच सर्वप्रकारच्या प्रयत्नांनी साधन करावयाचा पुरुषार्थ आहे असे समजावे.||६३|| भावार्थः---तस्मात हे राजा तूं,सावधानचित्त होऊन श्रद्धेने हे माझे उपदेशरूप भाषण धारण कर म्हणजे ज्ञान व विज्ञान ह्यांनी युक्त होऊन लवकरच माझ्या स्वरूपाला पावशील.||६४|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,ह्याप्रमाणे,चित्रकेतु राजाचे आश्वसन करून,त्याच्या समक्षच तो जगद्गुरू विश्वात्मा भगवान श्रीहरी अंतर्धान पावला.||६५|| १६---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी चित्रकेतुपदेशनामक हा सोळावा(१६) अध्याय पाषष्ट(६५) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ १७-----आतां या सत्राव्या अध्यायामध्ये,अतिउत्कृष्टे अशी महासिद्धी प्राप्त झाल्यावर आकाशामधून संचार करणारा तो चित्रकेतु राजा,कैलासाधिपती महादेवाला हंसल्यामुळे पार्वतीच्या शापाने वृत्रासुर झाला,अशी कथा वर्णन केलेली आहे.||१७|| |१७---- चित्रकेतुला पार्वतीचा शाप ______________________________________________________________________________भावार्थः---श्री शुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,दिशेकडे तो भगवान अनंत गुप्त झाला होता त्या दिशेला नमस्कार करून तो चित्रकेतु विद्याधर,आकाशमार्गाने संचार करूं लागला||१|| भावार्थः---अनंतलक्ष वर्षेपर्यंत ज्याचे बल व इंद्रियसामर्थ्ये कुंठीत झाले नाही व याची स्तुति मुनि सिद्ध आणि चारण हे करीत आहेत असा तो महायोगी चित्रकेतु,भक्तदुःखनिवारण करणाऱ्या ईश्वराचे गायन करीत,करीत ज्यांमध्ये संकल्पमात्रेकरून नानाप्रकारच्या सिद्धीप्राप्त होतात अशा मेरूपर्वताच्या गुहांमध्ये स्त्रियांसहवर्तमान रममाण होता झाला.||२-३|| भावार्थः---एकेदिवशी विष्णूने दिलेल्या दिवय विमानामध्ये बसून संचार करीत असतां त्याने सिद्धवारनांनी परिवेष्टित आणि ऋषीच्या सभेमध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन व बाहूने तिला आलिंगन करून बसलेल्या अशा महादेवाला अवलोकन केले आणि ती देवी पार्वती श्रवण करीत असतांना,तिच्या समीप त्याने उच्चस्वराने हास्य करून असे भाषण केले की,-------------||४-५|| भावार्थः---चित्रकेतु म्हणाला-----अहो,सर्वलोकांचा साक्षात गुरु व देहधारी मनुष्यांमध्ये मुख्य असा हा शंकर,सर्वांना धर्म सांगत असून आपण या भरसभेमध्ये भार्येशी संलग्न होऊन बसला आहे.||६|| भावार्थ:---अहो हा,जटाधारण करून तीव्र तपश्चर्या करणारा,ब्रहमवादी व सभापति असून एखाद्या विषयासक्त पुरुषाप्रमाणे अगदी निर्लज्ज होऊन स्त्रीला मांडीवर घेऊन बसला आहे.||७|| भावार्थः---अहो काय सांगावे ! अतिनिकृष्ट लोकसुद्धां बहुतकरून एकांतामध्येच स्त्रीला अलंकार बसवून देतात आणि हा तर महाव्रतस्थ असून अगदी सभेमध्येच स्त्रीला अंकावर धारण करीत आहे.||८|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ते ज्याचे भाषण श्रवण करून,गंभीरमति असा भगवान महादेव व त्याचे अनुयायी सर्व सभासद,सभेमध्ये मौन धारण करून राहिले.||९|| भावार्थः---याप्रमाणे महादेवाचा प्रभाव न जाणून त्याने फारच वाईट भाषण केले असतां,मी जितेंद्रिय आहे म्हणून व्यर्थ अभिमान बाळगणाऱ्या त्या उद्धट चित्रकेतु राजाला,देवी क्रोधाने असे म्हणाला की,-------------||१०|| भावार्थः---पार्वती म्हणाली---अहो,सांप्रतकाली इहलोकी दंडधारी,समर्थ आणि आम्हांसारिख्या निर्लज्ज दुष्टांचा अतिशय निषेध करणारा असा हाच शास्ता आहे काय?||११|| भावार्थः---अहो,कमलयोनि ब्रह्मदेव,तसेच भृगु व नारदप्रभृति ब्रह्मपुत्र सनत्कुमार,कपिल आणि मनु,हे जे शास्त्राचे अतिक्रमण करून वागणाऱ्या महादेवाचे निवारण करीत नाहीत त्यांना,धर्म समजतच नाही की काय?||१२|| भावार्थः---तस्मात् ह्या ब्रह्मादिकांनीही ज्याची चरणकमले ध्याय करण्यास योग्य आहेत व जो परम धर्ममूर्ति आहे त्या ह्या जगद्गुरू महादेवाला,ज्याअर्थी हा स्वतः क्षत्रियाधम असून त्या ब्रह्मादिकांना अज्ञानी समजून निःशंकपणे शासन करीत आहे त्याअर्थी ह्याला दंड करणे हेंच योग्य आहे||१३|| भावार्थः---आतां 'हा हरीभक्त असल्यामुळे दंडाला योग्य नाही' असे म्हणाल तर---हे सभासदहो,साधूंनी सेवित अशा श्रीविष्णूच्या चरणासमीप प्राप्त होण्यास हा योग्य नाही.कारण."मी श्रेष्ठ आहे" असे ह्याला वाटत असल्यामुळे हा उद्धट झाला आहे.आपणास--जीवास कोणत्याही प्रकारचा अहंकार येऊ नये,करण अहंकार हा अधोगतीकडे नेत असतो.||१४|| भावार्थः---तस्मात् हे दुर्मते,तूं महापातकी अशा असुरयोनीमध्ये गमन कर.म्हणजे हे पुत्रा,तूं फिरून या लोकी मोठया लोकांचा असा अपराध करणार नाहीस.||१५|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे भरतकुलोत्पन्ना राजा,ह्या प्रमाणे पार्वतीने चित्रकेतुला शाप दिला असतां,तो विमानांतून खाली उतरला आणि मस्तक नम्र करून त्या सतीला प्रसन्न करूं लागला.||१६|| भावार्थः---चित्रकेतु म्हणाला----हे अंबिके,मी आपल्या ओंजळीने तुझ्या शापाचे ग्रहण करितो,कारण,देवांनी मर्त्यजनाला हे (सुख अथवा दुःख)सांगितलेले असते ते त्याला पूर्वकर्मानेच प्रराब्धरूपाने प्राप्त झालेले असते.||१७|| भावार्थः---आणि हा तर संसारचक्राचा सुखदुःखांचा उपभोग घेतच असतो.||१८|| भावार्थः---तस्मात् मी अयोग्य भाषण केले व तूं मला शाप दिलास ह्यांमध्ये माझा आणि तुझही मुळीच दोष नाही,कारण,ह्या संसारामध्ये सुखाचा कर्ता आपण स्वतःव दुःखाचा कर्ता कोणी अन्य हे वास्तविक मुळीच नसून,जो पुरुष अतिर्मुख असतो तोच आपल्याला व दुसऱ्याला अनुक्रमाने सुखाचा कर्ता असे मानतो.म्हणून आपण आपल्या सुखाचे किंवा दु:खाचे करण आपणच--जीव असतो,तर अन्य कोणी नसते.||१९|| भावार्थः---असो.येथपर्यंत सुखदुःखादिकांचा अंगीकार करून चित्रकेतु राजाने भाषण केले,परंतु आतां मी सुखदुःखादिक वस्तुतः खरी नाहीत असे सांगण्याच्या अभिप्रायाने म्हणतो की,----हे अंबिके,ह्या गुणप्रवाहरुप संसारामध्ये पडलेल्या जीवाला प्राप्त होणारा शाप अनुग्रह,स्वर्ग,नरक,सुख आणि दुःख हे सर्व खरे आहेत काय ? नाहीतच,कारण ते अंत;करणाचे असून मिथ्या आहेत,आपण परमात्मा आहोत.||२०|| भावार्थः---आतां,मायेच्या गुणांचाच जर हा प्रवाह आहे तर ते गुण जड असल्यामुळे बंधमोक्षादिकांचा अनुभव येणार नाही असे म्हणावे तर---हे देवि,स्वतः बंधादीशून्य असा एक भगवान परमेश्वरच आपल्या निमित्तभूत मायेच्या योगाने प्राण्यांना आणि त्यांच्या बंध,मोक्ष,सुख व दुःख ह्यांना उत्पन्न करितो.म्हणजे भगवंत हा ज्याच्या--त्याच्या कर्मांनुसार ज्याला--त्याला ते--ते फळ देत असतो.||२१|| भावार्थः---आतां प्रिय आणि अप्रिय असे वैषम्य जर ईश्वराचेठिकाणी नाही तर त्याला कोणी सुखी व कोणी दुःखी अशा प्रकारची विषम सृष्टी उत्पन्न करण्याचे कारण काय? अशी शंका आली असतां,----जरी ईश्वराचेठिकाणी प्रिय आणि अप्रिय हि दोन्ही नाहीत तथापि प्राण्यांच्या कर्मानुसारच त्यांना सुख अथवा दुःख इत्यादि सर्व भोगावे लागते,असे सांगण्याच्या अभिप्रायाने म्हणतो की,----हे माते त्या ईश्वराला प्रिय,अप्रिय,ज्ञाति,बंधू,स्वकीय अथवा परकीय असा कोणीही नाही.म्हणून सर्व ठिकाणी सम व निःसंग अशा त्याला संगनिमित्तक सुखाविषयी प्रितीच नाही मग प्रीतीपासून उत्पन्न होणारा क्रोध कोठून असणार,असावयाचाच नाही.||२२|| भावार्थः---असे जरी आहे तथापि,त्याच्या मायेने उत्पन्न झालेले जे पुण्यपापरूप कर्म तेच ह्या प्राण्यांच्या सुखदुःखाला,हिताहितांला,बंधमोक्षाला जन्ममृत्युला व संसाराला कारण होते.म्हणून आपण--जीवानी निष्काम विहित कर्मे करावीत व निषिद्ध कर्मे करू नयेत.सत्संग करून त्याद्वारे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा.||२३|| भावार्थः---तस्मात हे कोपिष्ठे पतिव्रते,शापापासून मुक्त होण्याकरितां मी तुझी प्रार्थना करीत नसून माझे भाषण योग्य असतांही तूं जे अयोग्य असल्यासारिखे मानित आहेस त्याची मात्र तूं क्षमा करावीस ऐवढ्याकरितां मी तुझी प्रार्थना करीत आहे.||२४|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे शत्रूदमना राजा,ह्याप्रमाणे ईश्वरपार्वतींनी प्रसन्न करून चित्रकेतु राजा ती उभयंता,विस्मय करीत असतां त्यांच्या समक्ष आपल्या विमानांत बसून निघून गेला.||२५|| भावार्थः---नंतर,देव,ऋषि,दैत्य,सिद्ध आणि पार्षदगण हे सर्व श्रवण करीत असतां भगवान रुद्र,पार्वतीला असे म्हणाला की,------||२६|| भावार्थः---श्री रुद्रम्हणाला---हे सुंदरि,अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरीच्या महात्म्या निस्पृह दासानुदासांचे महात्मय तूं अवलोकन केलेस ना?||२७|| भावार्थः---कारण,स्वर्ग,मोक्ष आणि नरक हे आपल्याला सारखेच आहेत असे मानण्याचा ज्यांचा स्वभावच पडून गेला आहे ते नारायणाचे परम भक्त,सर्वठिकाणी कोठेही भय बाळगीत नाहीत,कारण स्वर्ग,मोक्ष,आणि नरक,हे अंत:करणाचे धर्म असून,त्याहून मी अलिप्त परमात्मा आहे,असा भगवंताच्या भक्ताचा निश्चय असून त्यांना परब्रह्माचा अनुभव आलेला असतो.||२८|| भावार्थः---आतां ह्याप्रमाणे सर्वत्र समदृष्टी होण्याविषयी चित्रकेतुनेच दर्शविलेला हेतू कथन करण्याच्या अभिप्रायाने म्हणतो की,----हे पार्वति.ईश्वराच्या मायेनेच जीवांना देहसंयोगापासून सुख,दुःख,जन्म,मरण आणि शाप व अनुग्रह अशी द्वंदे प्राप्त होत असून त्यांचेठिकाणी जसा पुरुषाला स्वप्नामध्ये आपलेठिकाणीच मी राजा आहे किंवा रंक आहे अशा बुद्धीने सुखदुःखांचा भेद भासतो अथवा जाग्रदवस्थेमध्ये जसा अज्ञानामुळे माळेचेठिकाणी सर्पाचा भास होतो त्याचप्रमाणे अविवेकाने गुणदोषांचा भेद उत्पन्न होतो.म्हणून आपण--जीवानी विवेकाद्वारे सार-असार याचा निवडा करून असराचा त्याग करून साराचा--परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२९-३०|| भावार्थः---तस्मात ज्ञान व वैराग्य ह्यांच्या बलाने युक्त असून भगवान वासुदेवाचेठिकाणी जे भक्ति करित आहेत त्या पुरुषांना ह्या संसारामध्ये,हा चांगला आहे अशा बुद्धिने आश्रय करण्यास योग्य असा कोणताही पदार्थ नाही.आपण--जीवानी या ब्रह्मांडात भगवंतच--परमात्माच आश्रय घेण्यास योग्य आहे,परमात्म्याशिवाय अन्य ब्रह्मांडात कोणाचाच आश्रय चांगला म्हणजे सुखकारक नाही.कारण आपण--जीवात्मा हा परम्याचाच आहे.म्हणून आपण ज्याचे आहोत,त्याचा आश्रय घ्यावा,करण त्यातच सुखरूपता आहे.ज्याचे आपण नाहीत,त्याचा आश्रय घेतला की,त्यातच कायमचेच दु:ख आहे.जीवाला किंचित दु:ख नको असून सुखरुपता आहे.||३१|| भावार्थः---आतां हा चित्रकेतु राजा श्रीहरीचा दास असल्यामुळे,असे भाषण करणे हा त्याचा स्वभावच आहे याकरितां,हि कांही आश्चर्याची गोष्ट नाही असे सांगण्याच्या अभिप्रायाने श्रीहरीने महात्म्य वर्णन करितो की,---ज्याची लीला मी,ब्रह्मदेव,सनत्कुमार,नारद,ब्रह्मपुत्र,मुनि व इंद्रादिक सर्व देव,हे सर्व आम्ही ज्याचा अभिप्राय अथवा लीला जाणण्यास समर्थ नाही,तेव्हा त्याच्या अंशाचे अंशभूत असूनही आम्हीच स्वतंत्र ईश्वर आहोत असा अभिमान बाळगणारे लोक,त्याचे स्वरूप जाणत नाहीतच.वास्तविक पाहता आपण--जीव परतंत्र असून त्यास वाटते "मी स्वतंत्र आहे".असा आपणास--जीवास अभिमान आहे.म्हणून आपण--जीवानी "मी स्वतंत्र नसून परमात्मा स्वतंत्र आहे आहे,"असा निश्चय करावा,कारण त्यामुळे आपण--जीव स्वतंत्र आहे असा अभिमान निवृत्त होतो.असा आपला--जीवाचा अभिमान निवृत्त झाला म्हणजे परमात्म्याचे स्वरूप जाणून परमात्म्याचा अनुभव येतो.परमात्म्याचा अनुभव आला असता आपले--जीवाचे जन्म--मरण निवृत्त होऊन आपण परमात्मारुपच होतोत.||३२|| भावार्थः---आणि त्याला प्रिय,अप्रिय अथवा परकीय असा कोणीही नाही,तथापि सर्व प्राण्यांचा आत्मा असल्यामुळे तो श्रीहरीच सर्वांना प्रिय आहे.परमात्मा सर्वांचाच आहे,तो सर्वांच्या अंत:करणात आहे.म्हणून त्यास कोणी प्रिय,अप्रिय,किंवा परकीय असे कोणीच नाही.||३३|| भावार्थः---हे पार्वति,सर्वत्र समदृष्टि आणि शांत असा हा महाभाग्यवान चित्रकेतु राजा,त्याला अनुसरून वागणारा असल्यामुळे त्याला प्रिय आहे व मीही त्या अच्युताला प्रिय आहे ह्याकरीतांच ह्या चित्रकेतुवर मी क्रुद्ध झालो नाही.||३४|| भावार्थः---तस्मात शांत,समदृष्टी व विष्णूभक्ति अशा महात्म्या पुरुषांविषयी तूं आश्चर्य मानूं नकोस.||३५|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ह्याप्रमाणे भगवान शिवाचे भाषण श्रवण करून,उमादेवीचा विस्मय नाहीसा होऊन मनही शांत झाले.||३६|| भावार्थः---असो याप्रमाणे उलट शाप देण्यास अत्यंत समर्थ असूनही भगवद्भक्त अशा त्या चित्रकेतुने त्या देवीचा शिरसा मान्य केला.कारण,दुसऱ्यांनी अपकार केला असतांही उलट आपण न करणे हेंच साधूंचे लक्षण होय.आपण--जीवानी इतरांनी आपल्यावर अपकार केला असेल तरीही आपण त्यांच्यावर अपकार करू नये.याप्रमाणे आपले आचरण असेल तर आपली वाटचाल--मार्गक्रमण परामात्म्याकडे--सुखरुपतेकडे असते.||३७|| भावार्थः---असो.पुढे तो चित्रकेतु असुरयोनीचा आश्रय करून "शास्त्रोक्त व अपरोक्ष ज्ञानासहवर्तमानच" त्वष्टयाच्या दक्षिणाग्नीमध्ये उत्पन्न होऊन "वृत्रासुर" ह्या नावाने प्रसिद्ध झाला.||३८|| भावार्थः---हे राजा,वृत्रासुराची असुरभावाने उत्पत्ति होण्याचे कारण व त्याची भगवंताचेठिकाणी भक्ति असण्याचे कारण जे तूं मला विचारिले होतेस ते हे मी सर्व तुला वर्णन केले आहे.||३९|| भावार्थः---असो.हे राजा महात्मा चित्रकेतुचा पुण्यकारक हा इतिहास व विष्णूभक्तजाचे माहात्म्य श्रवण केले असता प्राणी बंधापासून मुक्त होतो.म्हणून--आपण--जीवानी महात्मा चित्रकेतूचे--भगवंत--निष्काम भक्तांचे पुण्यकारक व आपणास शुद्ध करणारे व परमात्म्याकडे नेणारे चरित्रे पुन्हा--पुन्हा श्रावण करावे,करण त्यातच आपले परमहित आहे.||४०|| भावार्थः---आणि प्रातःकाळी उठून श्रीहरीचे स्मरण करून व्यवहारसंबंधी काही एक भाषण न करून,जो पुरुष नियमाने या इतिहासाचे पठन करील त्याला उत्कृष्ट गति प्राप्त होईल.म्हणून आपण प्रात:काली उठून श्रीहरीचे स्मरण करून,संसारातील व्यवहाराचा त्याग करून प्रथम नियमाने या इतिहासाचे पठाण किंवा वक्ता होऊन इतरांना सांगेल त्यास--वक्ता आणि श्रोत्यास उत्कृष्ट गती प्राप्त होईल.म्हणून आपण वक्ता किंवा श्रोता व्हावे.||४१|| १७---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(६)षष्ठस्कंधापैकी हा सतरावा(१७)अध्याय एकेचाळीस (४१)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||१७|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ______________________________________________________________________________ १८----याप्रमाणे दक्षकन्यांच्या वंशवर्णनामध्ये विवस्वान्,अर्यमा,पूषा,त्वष्टा,सविता,भग,धाता,विधाता व वरून,मित्र, शक्र आणि उरुक्रम असे अदितीचे बारा पुत्र सांगितले,त्यांमध्ये विश्वरूप,वृत्रासुर आणि चित्रकेतु ह्यांच्या आख्यानांनी त्वष्टानामक चवथ्या अदित्याचा वंश वर्णन केला. १८---आतां ह्यां अठराव्या अध्यायामध्ये अदितीच्या पांचव्यापासून राहिलेल्या पूत्रांचा वंशकथन केला आहे व दितीच्या उदरामध्ये जाऊन इंद्राने तिच्या गर्भाचे मरूदग्नरूप एकूणपन्नास तुकडे केले असे निरुपण केले आहे.||१८|| |१८---- अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गनांच्या उत्पत्तीचे वर्णन ______________________________________________________________________________भावार्थः---असो.(अध्यायाच्या आरंभी सवितानामक पांचव्या आदित्याचा वंश सांगण्याच्या अभिप्रायाने)श्रीशुकाचार्य म्हणाला--हे राजा,सवितानामक पांचव्या आदित्याच्या "पृष्नी" ह्यां नावांच्या भार्येला सावित्री,व्याह्रति,त्रयी,अग्निहोत्र, पशु,सोम,चातुर्मास्य व पंचमहायज्ञ अशी अपत्ये उत्पन्न झाली.||१|| भावार्थः---हे राजा,भगनामक सहाव्या आदित्याच्या "सिद्धीनामक" भार्येला महिमा,विभु,प्रभु आणि सौंदर्यसंपन्न व उत्तम व्रत धारण करणारी आशीर्नामक कन्या हि अपत्ये झाली.||२|| भावार्थ:---धातानामक सातव्या आदित्याच्या कुहू,सिनीवाली,राका आणि अनुमती ह्या चार भार्यांना अनुक्रमे सायंकाल,दर्श,प्रात:काल आणि पुर्वामास हे पुत्र झाले.||३|| भावार्थ:---त्याचप्रमाणे धातानामक आदित्याच्या नंतरचा विधातानामक आठवा आदित्य त्याने,आपल्या क्रीयानामक भार्येचेठिकाणी पुरीष्यनावांचे पंचचीत अग्नी उत्पन्न केले व वरुनानामक नवव्या आदित्याची चर्ष्णणीनामक भार्या होती त्याचेठीकानी पूर्वी ब्रहमदेवाचा पुत्र असलेला भृगुऋषि पुनरपि उत्पन्न झाला.||४|| भावार्थ:---पूर्वी वारुळापासून उत्पन्न झालेला तो महायोगी वाल्मिकी तोही वरुनाचाच पुत्र होय.अगस्त्य आणि वशिष्ठ हे दोन ऋषि मित्र आणि वरून ह्या उभयंत्याचे मिळून पुत्र होत.कारण,उर्वशीसमीप पतन पावलेले वीर्य त्या उभयंतानि कुंभामध्ये सिंचन केले असल्यामुळे त्यापासून ते उत्पन्न झाले होते.असो,मित्रानें आपल्या रेवतीनामक भार्येचेठिकाणी दुसरे उत्सर्ग,अरिष्ठ,आणि पिप्पल असे तीन पुत्र उत्पन्न झाले.||५-६|| भावार्थ:---बा परीक्षिते,इंद्रनामक आकराव्या समर्थ आदित्याने आपल्या पौलोमीनामक भार्येचेठीकानी जयंत,ऋषभ आणि तिसरा मिढूश असे तीन पुत्र उत्पन्न केले,असे आमच्या एकण्यात आहे.||७|| भावार्थ:---मायेने वामनरूप धारण केलेले जो भगवदवताररूप उरूक्रम नावाचा बारावा आदित्य त्याच्या किर्तीनामक पत्नीचेठीकानी बृह्च्छ्लोक नावाचा पुत्र झाला व त्या बृहच्छ लोकालाही सौभागादिक पुत्र झाले.||८|| भावार्थ:--- त्या महात्म्या वामनाने आदितीचेठिकाणी कसा अवतार धरण केला तो प्रकार आणि त्याची कर्मे,गुण आणि प्रभाव हे कसे होते ते सर्व मी तुला पुढे(आठव्या स्कंधामध्ये)कथन करीन.||९|| भावार्थ:---हे राजा,आतां ज्याच्यामध्ये श्रीमान भगवद्भक्त प्रल्हाद आणि बलि हे झाले आहेत असे दितीपासून झालेले कश्यपाचे पुत्र मी कथन करितो.||१०|| भावर्थ:---दितीला प्रथमतः दैत्यांना व दानवांनाही पूज्य असे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या नावांचे दोन पुत्र झाले ती तुला मी तृतीयस्कंधामध्ये सांगितले आहेत.||११|| भावार्थः---कयाधूनामक दानवी जी जंभासुराची त्याने दिलेली कन्या ती हिरण्यकशिपुची भार्या असून तिला चार पुत्र झाले.||१२|| भावार्थः---त्यांची नांवे-संर्हाद,अनुर्हाद,र्हाद आणि प्रल्हाद अशी होती.त्यांची सिंहीकानामक एक भगिनी होती तिला,विप्रचित्नामक दैत्यापासून राहू हा पुत्र झाला.तो अमृतपान करीत असताना श्रीहरीने चक्राच्या योगाने त्यांचे मस्तक हरण केले.संर्हादाच्या कृतिनामक भार्येला पंचजनननावांचा पुत्र उत्पन्न झाला.||१३-१४|| भावार्थः---र्हादाची जी धमनीनामक भार्या होती तिला,अतिथीरूपाने प्राप्त झालेल्या अगस्त्य ऋषीला मारण्याकरितां,मेषरूप धरण करणाऱ्या वातापिचा ज्याने पाक केला होता.तो इज्वल आणि ज्याचा पाक केला तो वातापि असे दोन पुत्र झाले.||१५|| भावार्थः---अनुर्हादाला सुर्म्यानामक भार्येचेठिकाणी बाष्कल आणि महिष असे दोन पुत्र झाले.विरोचन हा तर प्रल्हादाचा पुत्र असून त्याला देवीनामक भार्येचेठिकाणी बलिनामक पुत्र झाला.||१६|| भावार्थः---त्या बलीपासून अशनानामक भार्येचेठिकाणी ज्यांच्यामध्ये बाण हा ज्येष्ठ आहे असे शंभर पुत्र उत्पन्न झाले.हे राजा,पुण्यकारक कीर्तीला योग्य असा त्या बलीचा प्रभाव,मी पुढे अष्टमस्कंधामध्ये कथन करीन.||१७|| भावार्थः---बाणासुराने कैलासनाथ महादेवाचे आराधन करून त्याच्या गणामध्ये प्राधान्य मिळविलेले व अद्यापि भगवान शिव,त्याच्या पार्श्वभागी राहत असून त्याच्या नगराचे रक्षण करीत आहे.||१८|| भावार्थ:---त्याचप्रमाणे दितीला मरुत् नांवांचे एकूणपन्नास पुत्र होते व सर्व संततिरहित असून इंद्राने त्यांना आपल्यासारखे देव केले होते.||१९|| भावार्थ:---राजा म्हणाला---हे गुरो,स्वाभाविक असुरभावाचा त्याग करून इंद्राने त्यांना देवत्व कसे दिले व त्यांनी तरी त्याजवर काय उपकार केला होता हें जाणण्याची,हे ऋषे देखील मजसहवर्तमान इच्छा करीत आहेत,तस्मात् ब्रहमनिष्ठ,भगवंता,हे तू आम्हास कथन कर.||२०-२१|| भावार्थ:---सुत म्हणाला---हे शौनका,आदरयुक्त,मित व अर्थाने भरलेले असे ते परीक्षित राजाचे भाषण करून,त्या सर्वज्ञ व्यासपुत्राने आनंदपूर्ण अंत:करणने त्याच्या सत्कार करीत उत्तर दिले की,-----------------||२२|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षित राजा,इंद्राला मागाहून साहाय्य करणाऱ्या दितीचे पुत्र मारविले असता शोकाने प्रदीप्त झालेल्या क्रोधाच्या योगाने संतप्त होवून ती दिती असे चिंतन करू लागली की,||२३|| भावार्थ:---अहो,विषयासक्त,क्रुरस्वभावाचा कठीण-चित्ताने-युक्त आणि श्रातृघातुकी अशा इंद्राला मारवून मी कधी बरे सुखी होईन?||२४|| भावार्थः---आतां ‘स्वदेहरक्षणार्थ राजा इतरांचा घात करीतच असतो तेव्हा ह्याने आपल्या भ्रात्याचा घात केला ह्यात काय आश्चर्य आहे’असे म्हणावे तर---अहो पूर्वकालीन राजांच्या देहाविषयी विचार केला तर असे दिसून येते की,ज्याला पूर्वी ‘प्रभू’ असे म्हणत असतात तोच देह,मरणानंतर दोन तीन दिवस राहिल्याने,कृमि श्वानादिकांनी भक्षण केला असता विष्ठा आणि दग्ध झाला असता भस्म अशी नावें पावतो.त्या देहाकरिता जो भूतांचा द्रोह करितो तो आपला स्वार्थ जाणतो काय ? नाहीच जाणत कारण,भूतद्रोहापासून प्राप्त नरक प्राप्त होतो.म्हणून आपण--जीवांनी भूतांचा--प्राणीमात्रांचा द्रोह करू नये,कारण भूतांचा--प्राणीमात्रांचा द्रोह केल्याने नरकाची--दु:खाची प्राप्ती होते.||२५|| भावार्थः---तस्मात् हे देहादिक नित्य आहेत असे मानीत असल्यामुळे ज्याचे चित्त उच्छृंखल झाले आहे त्या इंद्राचा मद नाहीसा करणारा असा पुत्र मला कोणत्या उपायाने होईल ? खरोखर अशा प्रकारचा पुत्र उत्पन्न होण्यास भर्त्याचे--पती प्रिय करणे ह्यावांचून इतर साधन नाही.म्हणून आपण--जीव कोणाची तरी पत्नी असेल तर तिने पतीचीच पतीच्या मनोभावाने सेवा करावी,करण त्यामुळे तिला वांच्छीत--इच्छित असलेला पुत्र प्राप्त होतो.||२६|| भावार्थः---असे मनांत आणून ती दिति,शुश्रुषा,प्रेम,विनय आणि इंद्रियदमन ह्यांच्या योगाने भर्त्याचे निरंतर प्रिय करूं लागली.||२७|| भावार्थः---आणि हे राजा,असे होता होता पतीचा अभिप्राय जाणणाऱ्या त्या दितीने उत्कृष्ट भक्ति,मनोहर आणि मधुर अशी वचने व सुंदरहास्यपूर्वक कटाक्ष ह्यांच्या योगाने कश्यपाचे मन वश केले.पत्नीने पतीच्या मनोभावाने सेवा केली तर पती,पत्नीच्या मनानुसार वागतो.म्हणजे दोघेही एकमेकाच्या मनाचा विचार करून प्रेमाने वागतात.दोघेही प्रेमाने वागून सुखी जीवन जगतात.||२८|| भावार्थः---ह्याप्रमाणे शुश्रूषादिकांची त्या चतुर स्त्रीने ज्ञानी कश्यापालाहि मोहित करून टाकिले असतां,त्याने स्त्रीच्या अधीन होऊन 'ठीक आहे,मी तुझे मनोहर पूर्ण करीन' असे भाषण केले,ते कांही त्या स्त्रीचेठिकाणी आश्चर्य नव्हे.||२९|| भावार्थः---कारण,सृष्टीचे आरंभी ब्रह्मदेवाने सर्व प्राणी निःसंग आहेत असे पाहून मैथुनधर्माने सृष्टि वाढविण्याकरितां आपल्या अर्ध्या देहाचीच त्याने स्त्री बनविली व तिने पुरुषाची मति हरण केली.||३०|| भावार्थः---असो.बा परिक्षित,ह्याप्रमाणे स्त्रीने भगवान् कश्यपाची शुश्रूषा केली असतां तो अत्यंत प्रसन्न झाला आणि हास्यपूर्वक दितीची प्रशंसा करून असे म्हणाला की,--------------||३१|| भावार्थः---कश्यप म्हणाला----हे निर्दोषे सुंदरी,मी तुजवर प्रसन्न झालो आहे,याकरितां तूं वर माग.कारण,भर्ता सुप्रसन्न झाला असतां इहलोकसंबंधी अथवा परलोकसंबंधी कोणता मनोरथ स्त्रीला दुर्लभ आहे?कोणताच नाही.म्हणून स्त्रींनी पतीची मनोभावाने सेवा केली असता तिचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन ती स्त्री सुखी होऊन सर्वांना सुख देते.||३२|| भावार्थः---आतां परमेश्वर सुप्रसन्न झाला असतां सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी प्रसिद्धी आहे असे म्हणशील तर हे शोभने,पति हेंच स्त्रियांचे परम दैवत आहे असे सांगितले आहे.परंतु मनामध्ये असलेला वासुदेव श्रीपतिच सर्वप्राण्यांचे परम दैवत असल्याचे प्रसिद्ध आहे असे म्हणशील तर,ते म्हणणे सत्य आहे.||३३|| भावार्थः---कारण,नामे आणि रूपे ह्यांच्या योगाने नानाप्रकारांनी कल्पिलेल्या देवतारूपांनी पुरुष त्याच भगवंताचे पूजन करीत असतात व स्त्रियाही त्याच पतिरूपधारी भगवंताचे पूजन करितात.स्त्रीने पतीची हेच माझे आराध्य दैवत आहे,अशी भावना ठेऊन सेवा केली,तर तीच सेवा "भगवंताचीच" असते.||३४|| भावार्थः---तस्मात् हे सुमध्यमे,आपले कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या पतिव्रता स्त्रिया,अनन्यभावाने पतिरुपी सर्वात्मा ईश्वराचे पूजन करितात.||३५|| भावार्थः---त्याचप्रमाणे हे भद्रे,ज्याअर्थी अशा भावाने भक्तिपूर्वक तूं माझे अर्चन केले आहेस त्याअर्थी असाध्वी स्त्रियांस अत्यंत दुर्लभ असाहि मी तुझा मनोरथ पूर्ण करीन.||३६|| भावार्थः---दिती म्हणाली---हे ब्रह्मण,आपण जर मला वर देत असाल तर,ज्याने विष्णूच्या सहाय्याने माझ्या दोन पुत्रांचा घात केल्यामुळे मी मृतपुत्र जाह्ले आहे,त्या इंद्राला मारणारा असा एक मृत्यूरहित पुत्र मी मागते.||३७|| भावार्थः---हे राजा,ते वचन श्रवण करितांच तो विप्र कश्यप,मनामध्ये खिन्न होऊन संतप्त झाला आणि आपल्या मनामध्येच म्हणाला की,---अहो फारच मोठा हा अधर्म आज मला प्राप्त झाला आहे.||३८|| भावार्थः---अरे! काय आश्चर्ये हे ! विषयासक्त झाल्यामुळे माझा विवेकवगैरे नष्ट होऊन स्त्रीरूप मायेने ह्याप्रसंगी माझे मन अगदी वश करून घेतले.तस्मात् मी निःसंशय आज नरकामध्ये पडणार.||३९|| भावार्थः---अहो,खरोखर पाहूं गेले असतां,आपल्या स्वभावाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रीचा काय बरे ह्यामध्ये अपराध आहे?तस्मात् ज्या,अर्थी इंद्रियांच्या अधीन होऊन मीच स्वार्थाविषयी मूढ झालो त्याअर्थी मलाच धिक्कार असो.||४०|| भावार्थ:---अरे स्त्रियाचे मुख पाहावे तर अगदी शरदऋतूतील कमलाप्रमाणे विकसित असते,भाषण ऐकवे तर अमृताप्रमाणे कर्णाला मधुर लागणारे असते परंतु हृदयाविषयी जर विचार केला तर ते मात्र अगदी वस्तऱ्याच्या धारेसारखे तीक्ष्ण असते.यास्तव स्त्रियांचे कृत्य कोण बरे जाणत असेल?||४१|| भावार्थ:---अहो,स्वार्थाकरिता कामनेमुळे ज्या साक्षात आत्म्याप्रमाणे अत्यंत प्रिय वाटतात अशा स्त्रियांना खरोखर कोणीही प्रिय नाही.कारण,स्वार्थाकरिता पतीचा,पुत्राचा भर्त्याचा त्या आपण स्वता घात करितात किंवा दुसऱ्याकडूनही करवितात.||४२|| भावार्थ:---असो,वर देतो म्हणून जी मी प्रतिज्ञा केली आहे ते माझे भाषण असत्य होवू नये व इंद्र हा देवराज असल्याने वधाला योग्य नसल्यामुळे त्याचाही वध होऊ नये,ह्या दोन्ही सिद्धीस जाण्याविषयी वैष्णव-व्रताचा आपण ह्या दितीला उपदेश करावा.म्हणजे त्याच्या योगानेच हिचे चित्त शुध्द झाले असता,हिचा इंद्राविषयीचा क्रोध नाहीसा होईल व मृत्युरहित असा हिला पुत्रही प्राप्त होईल आणि त्या व्रताला दीर्घकाळ लागत असल्यामुळे काहीतरी त्यांत वैगुण्य प्राप्त झाले म्हणजे इंद्राचाही वध होणार नाही.तस्मात् ह्याप्रसंगी असे करणे हे योग्य दिसते.||४३|| भावार्थ:---हे कुरुनंदना,याप्रमाणे भगवान मरिचीपुत्र कश्यपाने विचार केला आणि किंचित क्रुद्ध होऊन आपली निंदा करीत करीत तिला असे म्हणाला की,---------||४४|| भावार्थ:--- कश्यप म्हणाला----हे भद्रे,मी सांगतो ते व्रत जर तू एक वर्षेपर्यंत अगदी सांगितल्याप्रमाणे धारण केलेस तर तुला इंद्राला मारणारा पुत्र होईल आणि त्या व्रतांत जर काही वैगुण्य झाले तर तो पुत्र देवांचा बंधू(इंद्राचा पक्षपाती)होईल.||४५|| भावार्थ:---दिती म्हणाली---हे ब्रहमण,मी व्रत धारण करीत,तस्मात् ह्या व्रताविषयी आवश्यक कृत्ये कोणती,निषिद्ध कृत्ये कोणती आणि व्रतविघातक न करणारी,आवश्यक नसणारी व निषिद्धही नसणारी अशी विहित कृत्ये कोणती?ती सर्व आपण मला कथन करावी.||४६|| भावार्थ:---कश्यप म्हणाला---हे प्राणीसमुदायापैकी कोणाचीही हिंसा करू नये,त्यामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप होते.कोणाला शाप देवू नये,कारण शाप देल्याने पुण्य व्यय--खर्च होते.अनृत--खोटे भाषण करू नये,कारण त्यामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप लागते.नखे व केस यांचे छेदन करू नये,कारण राजोगुनांचे प्राबल्य वाढते.अमंगल पदार्थास स्पर्श करू नये,कारण त्यामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप वाढते.||४७|| भावार्थ:---तसेच उदकामध्ये प्रविष्ठ होवून स्नान करू नये,कारण त्या देवतेचा अपमान होतो.कोणावर कोप--क्रोध करू नये,कारण क्रोधाच्या वेगात घेतलेल्या निर्णय अन्यायकारक असतो.अन्यायामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप होते.दुर्जनाशी संभाषण करु नये,कारण दुर्जनांचा दुर्गुण आपल्यात येतो व त्यामुळे आपणाकडून दुषित व्यवहार होतो.दिशीत व्यवहारामुळे अंत:करण अशुद्ध होते किंवा पाप लागते.धुतलेले नसेल ते वस्त्र परिधान करू नये,धुतलेले वस्त्र शुद्ध असते व न धुतलेले वस्त्र अशुद्ध असते.पूर्वी धारण केलेली माळा,वस्त्र किंवा कोणतीही वस्तू आपण--जीवानी कधीही धारण करू नये,कारण त्या माळावर,वस्त्रावर किंवा वस्तूवर इतरांचे दुषित संस्कार असू शकतात,म्हणून दुसऱ्यांच्या वस्तू वापरू नये.त्याचा आपल्या अंत:करणावर परिणाम होऊन आपल्याकडून दुषित व्यवहार होऊ शकतो.||४८|| भावार्थ:---त्याचप्रमाणे उच्छिष्ट,भद्रकाली--देवीला अर्पण केलेले,मांसाने युक्त,शूद्राने आणीलेले आणि रजस्वलेने अवलोकन केलेले अन्न भक्षण करू नये,ओंजळीने उदकाचे प्राशन करू नये,कारण ते अन्न तमोगुणांनीयुक्त असते म्हणून तमोगुणाचा प्रभाव आपल्यावर होईल,म्हणून ते अन्न खाऊ नये.||४९|| भावार्थ:---तसंचे मुख उच्छिष्ट असता,हातपाय धुतले नसता,संध्याकाळ असता,केस मोकळे असता,अलंकार धारण केले नसता,मौनव्रत ग्रहण केले नसता आणि अंगावर पांघरण्यास काही वस्त्र घेतले नसता कधीहि गृहातून बाहेर जावू नये.कारण त्या प्रसंगात अशुद्ध असते,म्हणून त्या प्रसंगात घरातून बाहेर पडू नये.||५०|| भावार्थ:---त्याचप्रमाणे हस्तपाद प्रक्षालन न करिता,असावध असता,पाय ओले असता,उत्तरेस मस्तक असता,पश्चिमेस मस्तक असता,इतरांशी संलग्न असता,नग्न असता,आणि संध्याकाल असता कधीहि शयन करू नये,कारण तो काळ,तो देश,तो प्रसंग अशुभ असतो,ती कृती करू नये.||५१|| भावार्थ:---असो ह्याप्रमाणे सांगितलेल्या निषेधांचे परिपालन करावे आणि धौतवस्त्र--धुतलेले परिधान करून शुचिर्भूत असून व सौभाग्यादि सर्व मंगलानी युक्त होऊन,प्रथम भोजन करण्याचे पूर्वी गाई,ब्राह्मण,लक्ष्मी,आणि नारायण ह्यांचे पूजन करावे.||५२|| भावार्थ:---त्याचप्रमाणे माला,गंध,व नैवेद्य आणि भूषणे ह्या उपचारांनी सुवासिनीस्त्रियांचे पूजन करावे आणि त्याचप्रमाणे पतीचे पूजन करून त्यांच्या सेवेविषयी तत्पर आसवे व तो आपल्या कुक्षीमध्ये आहे असे चिंतन करीत असावे.||५३|| भावार्थ:---असो.हे पुत्रोत्पत्ति करणारे संवत्सरात्मक व्रत जर तू अविच्छिन्न धारण करिशील तर तुला इंद्र घातक पुत्र होईल.||५४|| भावार्थ:---हे राजा,नंतर त्या दितीने ‘ठीक आहे,मी ह्याप्रमाणेच व्रत धरण करीन’असे म्हटले आणि इंद्राला मारणारा पुत्र आता आपल्याला होणार ह्या अभिमानाने तिच्या मनाला हर्ष होवून,तिने कश्यपाचे वीर्य धारण केले व व्रत अगदी सांगितल्याप्रमाणे धारण केले.आपणही जर स्त्री साधक असून ग्राहस्थाश्रमी असेल तर हे व्रत अवश्य करून,त्या नियामांचे पालन केल्यास दितीला जे फळ मिळेल,तेच फळ आपणास मिळेल. ||५५|| भावार्थ:---हे मानप्रद राजा,इकडे,ज्ञानसंपन्न इंद्राने,त्या आपल्या मातृभगिनीचा अभिप्राय जाणून,आश्रमामध्ये व्रतस्थ असलेल्या त्या दितीचे सेवकवृत्तीने तो शुश्रुषण करू लागला.||५६|| भावार्थ:---पुष्पे,फळे मुळे,समिधा कुश,पत्रे,अंकुर,मृकी,आणि उदक हे सर्व पदार्थ तो तिला नित्य वेळोवेळी वनातून आणून देत असे.||५७|| भावार्थ:---हे राजा,ज्याप्रमाणे पारधी मृगांना वेश धारण करितो त्याप्रमाणे त्या व्रतस्थ दितीच्या व्रतामध्ये काहीतरी छिद्र--व्रतातील उणीव प्राप्त होण्याची इच्छा करणारा तो इंद्र जेव्हा काहीच व्रतामध्ये चिद्र सापडेना तेव्हा तो प्रसंगी कशाच्या योगाने माझे कार्य होईल अशी तीव्र चिंता करू लागला.||५९|| भावार्थ:---असे होता होता एकेवेळी,व्रताचरणाच्या श्रमामुळे कृश होऊन प्रारब्धाने मोहित झालेली ती दिती,उच्छिष्ट असून मुखमार्जन व पादप्रक्षालन न करिता संध्याकाळी निद्रस्त झाली.दितीकडून ज्याप्रकारे व्रताचा भंग झाला,त्याप्रमाणे आपल्याकडून होऊ नये,म्हणून नेहमी जागरूक राहून नियमांचे पालन करावे.||६०|| भावार्थ:---इतक्यात ती संधी साधून--नियमांचे उल्लंघन झालेले आसे पाहून तिचे--अदितीचे चित्त निद्रेने हरण केले आहे अशा त्या दितीच्या उदरांतमध्ये योगाधिपती इंद्र आपली योगमायेने प्रविष्ट झाला.||६१|| भावार्थ:---आणि त्याने त्याठिकाणी सुवर्णासारख्या कांतीने युक्त असलेल्या गर्भाच्या व्रजाच्या योगाने सात तुकडे केले.असे केल्यानंतरही जेव्हा तो गर्भ रोदन करू लागला तेव्हा इंद्राने, ‘तू रोदन करू नकोस' अशा भाषणाने त्याचे लालन केल्यासारखे करून,त्या एकेकाचे फिरून सात सात तुकडे केले.||६२|| भावार्थ:---हे राजा,ह्याप्रमाणे जेव्हा तो इंद्र,त्यांना व्रजाने चिरू लागला तेव्हा ते सर्व हात जोडून याला म्हणाले की,----हे इंद्र आम्ही मरुद्गणनामक तुझे भ्राते--भाऊ असता तू आम्हास मारण्याची काय म्हणून इच्छा करितोस.||६३|| भावार्थ:---ह्या त्यांच्या भाषणावरून इंद्राने,हे अगदी अनन्यभावाने आपल्या आज्ञेमध्ये वागणारे मरुद्गण आहेत असा निश्चय करून त्यास सांगितले की,----हे मरुद्गण,आता तुम्ही भिवू नका,तुम्ही माझे भ्राते--भाऊ आहां.||६४|| भावार्थ:---असो हे राजा,द्रोणपुत्र अश्वत्थाम्याच्या ब्रहमस्त्राने दग्ध झालेला असूनहि तू जसा मरण पावला नाहीस त्याचप्रमाणे इंद्रव्रजाने अनेकप्रकरणी छिन्नभिन्न झालेलाहि तो दितीचा गर्भ भगवत्कृपेमुळे मरण पावला नाही.म्हणून आपण जीवानी भगवंताची निष्काम भक्ती करून कृपा संपादन करावी.||६५|| भावार्थ:---हे राजा,आदिपुरुष भगवंताचे एकवर पूजन करूनही पुरुषाला त्याची साम्यता प्राप्त होते,तेव्हा काही कमी असे एकवर्षेपर्यंत दितीने श्रीहरीचे अर्चन केले असल्यामुळे तिचा गर्भ मरण पावला नाही हे आश्चर्य नव्हे,तर त्याच्या शकलापासून मरुद्गननामक इंद्रासहवर्तमान पन्नास देव उत्पन्न झाले आणि त्याचे ठिकाणी असलेला दैत्यत्वरूप मातृदोष दूर करून इंद्राने यज्ञामध्ये सोमपानाचे अधिकारी केले.||६६-६७|| भावार्थ:---इकडे दितीने,उठल्यावर इंद्रासहवर्तमान त्या अग्निसारख्या तेजस्वी असलेल्या कुमरांना अवलोकन केले आणि इंद्राविषयी मनात क्रोध न आणीत ती दिती संतुष्ठ झाली.||६८|| भावार्थ:---नंतर ती इंद्राला म्हणाली,बा इंद्र,देवांना भय उत्पन्न करणारा पुत्र प्राप्त व्हावा ह्या इच्छेने मी हे अतिदुष्कृत्य व्रत आचरण केले होते.||६९|| भावार्थ:---हे पुत्र,मी एकाच पुत्राचा संकल्प केलेला असून हे एकूणपन्नास कसे झाले?हे जर तुला माहित असेल तर मला खरे सांग,खोटे सांगू नकोस.||७०|| भावार्थ:---इंद्र म्हणाला---हे माते,मी तुझ्या मनातील निश्चय जाणून धर्माकडे लक्षण न देता केवळ स्वार्थबुद्धीने तुझ्यासमीप येऊन राहिलो होतो,त्या मी संधी साधून तुझ्या गर्भाचे छेदन केले.||७१|| भावार्थ:---ते असे की,----प्रथमत: मी तुझ्या गर्भाचे सात तुकडे केले असता ते तत्काळ सात पुत्र झाले.नंतर त्या साताचेहि,एक-काचे सात--सात असे एकूण पन्नास तुकडे केले तेसुद्धा मरण पावले नाहीत तर पुत्रच झाले व तेव्हा ते अत्यंत आश्चर्य पाहून भगवत्पुजेची हि काहीतरी अवांतर फलभूत अवर्णनीय सिद्धीच आहे असा मी निश्चय केला.||७२|| भावार्थ:---तस्मात "जे निष्कामबुद्धीने भगवंताचे आराधन करीत असून त्याच्यापासून मोक्षाची इच्छा करीत नाहीत तेच पुरुष,स्वर्थाविषयी निपुण होत" असे शास्त्रामध्ये सांगितले आहे.म्हणून आपण--जीवानी "निष्काम बुद्धीने भगवंताची भक्ती करावी," कारण आपण--जीव कोणत्याही विषयांची किंवा मोक्षाचीसुद्धा इच्छा करीत नाही ते भगवंताचे "श्रेष्ठ--भक्त" होय.त्या भक्तांचा "योग-क्षेम" भगवंत चालवितो.||७४|| भावार्थ:---ह्यास्तव आपला आत्मा आणि स्वानंदप्रद अशा जगन्नाथ देवाचे आराधन करून,कोण बरे ज्ञानी पुरुष,विषयभोगाची इच्छा करील ? कोणीच करणार नाही.कारण,नरकामध्येसुद्धा विषयभोग आहेतच.म्हणून आपण--जीवानी कोणत्याच विषयांची अपेक्षा करू नये,तर फक्त भगवंताची निष्काम भक्ती करावी.||७५|| भावार्थ:---तस्मात् हे परमपूज्य माते,मज मूढाचा हा अपराध क्षमा करणे हे तुला योग्य आहे.कारण,तुझा हा गर्भ मृत झाला असूनही ईश्वरकृपेने वांचला हे फार चांगले आहे.अदितीने इंद्राबद्दल शत्रुतत्वाची भावना धारण करून त्या शत्रुत्त्वाचे रुपांतर मित्रत्वात झाले,कारण भगवंताची कृपा होय.म्हणून आपण जीवनी निष्काम भक्ती निरपेक्ष वृत्तींनी करावी.||७६|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---–ह्याप्रमाणे इंद्राने आपला शुध्द भाव दर्शविला असता त्याच्या योगाने संतुष्ठ झालेल्या त्या दितीने इंद्राला स्वर्गी जाण्याविषयी आज्ञा दिली तेच तो प्रभू इंद्र,मरुद्गणांसह वर्तमान तिला नमस्कार करून स्वर्गप्रत निघून गेला.||७७|| भावार्थ:---हे राजा,तू मरुद्गनाच्या मंगलकारक जन्माविषयी जे मला विचारिले होतेस ते हे सर्व आख्यानन मी तूला कथन केले आहे,आता तुला मी दुसरे काय कथन करू ? त्याचा प्रश्न कर.||७८|| १८----ह्याप्रमाणे श्रीमद्भगवतनामक महापुराणातील षष्ठ(६)स्कंधापैकी मरुद्गणोत्पत्तिकथननामक हा अठरावा(१८) अध्याय अठ्ठ्याहातर(७८)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१८|| | ||श्रीकृष्णार्णपणमस्तु|| ||श्रीगुरुचरणार्पणमस्तू|| ____________________________________________________________________________ |१९---आता एकोणविसाव्या अध्यायामध्ये,श्रीहरीला संतुष्ट करणारे असे जे व्रत कश्यपाने दितीला सांगितले, त्यांचेच लोकहीताकरिता विवरण केले आहे.||१९|| |१९--- पुंसवन-व्रताचा विधी ____________________________________________________________________________ भावार्थ:---परीक्षित राजा म्हणाला---हे ब्रहमनिष्ठा,ज्याच्या योगाने विष्णू प्रसन्न होतो असे जे पुंसवाननामक--- (पुत्रोत्पत्तिकारक) व्रत तू सांगितले आहेस,त्याचा विस्तार जाणण्याची मला इच्छा आहे.||१|| भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे परीक्षितराजा,मार्गशीर्षमहिन्यातील शुक्लपक्षामध्ये भर्त्याची--पतीची आज्ञा घेवून स्त्रीने प्रतिपदेस ह्या सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या व्रताचा आरंभ करावा.||२|| भावार्थ:---तो असा की,---प्रथमत: मरुग्दणांचे जन्म श्रवण करून व्रत करण्याकरिता ब्राहमणांना विचारावे आणि दंतधावन,स्नान व शुभ्रवस्त्रपरिधान करून अलंकार धारण करावे व प्रथम भोजनाचे पूर्वी लक्ष्मीसहवर्तमान भगवान नारायणाचे पूजन करावे.||३|| भावार्थ:--- त्यांत प्रथमतः नमस्काराचे मंत्र सांगतात.हे हे पुर्णमनोरथा परमेश्वरा,तुझेठीकानी सर्वकाही वस्तूची परिपूर्णता आहे.कारण,तू निरपेक्ष असून लक्ष्मीपती आहेस व तुझेठीकानी सर्व आणिमादि सिद्धी आहेत त्या तुज भगवंताला वारंवार नमस्कार असो.||४|| हे ईश्वरा,ज्याअर्थी तू कृपा,ऐश्वर्य,महिमा,वीर्य आणि सत्यसंकल्पवगैरे इतरही सर्वगुणांनी परिपूर्ण आहेस त्याअर्थी तू भगवान आणि सर्व समर्थ आहेस.||५|| भावार्थ:---"विष्णूपत्नि महामाये महापुरुषलक्षणे" "हे-विष्णूपत्नि,हे-महामाये,हे-परमेश्वरलक्षणयुक्ते," हे महाभागे,आणि हे लोकमते,तू मजवर प्रसन्न व्हावेंस ह्याकरिता मी तुला नमस्कार करिते ह्या मंत्रांनी नमस्कार करावे.||६|| भावार्थः---आतां पूजेचा मंत्र सांगतात की,---हे राजा,षड्गुणैश्वर्यसंपन्न,पुरुषोत्तम.महाप्रभाववान,लक्ष्मीपती आणि महाविभूतींनी युक्त अशा तुज भगवंताला ॐकारपूर्वक नमस्कार करून,मी पूजेचे उपचार अर्पण करिते ह्या मंत्राने स्वस्थ अंतःकरणपूर्वक प्रतिदिवशी आवाहन,अर्ध्य,पाद्य,आचमन,स्नान,वस्त्र ,यज्ञोपवीत,भूषणे,गंध,पुष्पे,धूप, दीप आणि नैवेद्द इत्यादि उपचार श्रीविष्णूला समर्पण करावे.||७|| भावार्थः---आणि नैवेद्दाचा जो शेष राहिला असेल,त्याच्या बारा आहुतीच्या अग्नीमध्ये,षड्गुणैश्वर्यसंपन्न,पुरुषोत्तम आणि लक्ष्मीपति आणि महाविभूतिनी युक्त अशा तुज भगवंताला ॐनम:स्वाहा (ओंकारपूर्वक व नमस्कारपूर्वक हा हविर्भाग समर्पण असो.)ह्या अर्थाच्या मंत्राने होम करावा.||८|| भावार्थः---असो ह्याप्रमाणे जिला सर्व संपत्तीची असेल तिने ज्यांच्यापासून सर्व लोकांची उत्पत्ती होते व सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहेत त्या उभयंता लक्ष्मीनारायणाचे नित्य भक्तीने पूजन करावे.||९|| भावार्थः---आणि नंतर भक्तीने नम्र झालेल्या अंतःकरणाने भूमीवर साष्टांग नमस्कार घालून नंतर पूर्वोक्त मंत्राचा दहावेळ जप करावा आणि स्तोत्र पठन करावे ते असे---||१०|| भावार्थः---हे लक्ष्मीनारायणहो,तुम्ही सर्व जगताचे मुख्य कारण व प्रभु आहां.हे प्रभो,हि तुझी स्त्री लक्ष्मीतर सूक्ष्म,दुर्ज्ञेय,माया आणि शक्ति ह्या नावांनी युक्तिअशी साक्षात् प्रकृतीच आहे.||११|| भावार्थः---व तिचा नियंता जो परमपुरुष तो तूंच आहेस.हे परमेश्वरा,तूं सर्व यज्ञरुपी आहेस व हि इज्या आहेत,तूं फलभोक्ता आणि हि लौकिक क्रिया आहे,||१२|| भावार्थः---तूं सत्त्वादिक गुणांना प्रकट करणारा व उपभोग करणारा काल व हि देवी सत्वादि गुणांची साम्यावस्था आहे.तूं सर्वरीरांत राहणारा अंतरात्मा आणि हि लक्ष्मी,शरीर व इंद्रिये ह्यांना आश्रयभूत आहे आणि तूं नामरूपांचा आधार आणि प्रकाशक असून हि भगवती लक्ष्मी नामरूपस्वरूपिणी आहे.ह्याप्रमाणे तुम्हां उभयंताचा संबंध आहे.||१३|| भावार्थः---ज्याअर्थी तुम्ही उभयंता त्रैलोक्याची वरप्रद आणि परमेश्वर आहां त्याअर्थी हे श्रेष्ठकीर्तीमंता देवा,माणे मोठेही मनोरथ तुजपासून परिपूर्ण होवोत.||१४|| भावार्थः---हे राजा,ह्याप्रमाणे वरप्रद नारायणाची लक्ष्मीसहवर्तमान स्तुति करून तो नैवेद्द एकीकडे करावा आणि आचमन देऊन पुनरपि पूजन करावे.||१५|| भावार्थ:---नंतर भक्तिनम्र अंत:करणपूर्वक(पूर्वोक्त)स्त्रोताने स्तुती करावी,यज्ञपुरुषाचे उच्छिष्ट अवघ्राण करून(हुंगून)पुनरपि श्रीहरीचे पूजन करावे आणि त्याचप्रमाणे ईश्वरबुद्धीने परम भक्तिपूर्वक जे जे उपचार पतीला प्रिय असतील त्याला भजावे व पतीनेही स्वत: प्रेमशील होऊन पत्नीच्या लहानमोठ्या कर्माना अनुकूल असावे.पती-पत्नीने ऐकामाकाच्या सहकार्याने प्रेमापुर्वान व्यवहार करून प्रेमाची--कर्तव्याची आदान--प्रदान--देवाण-घेवाण करावी. ||१६-१७|| भावार्थ:---दांपत्यापैकी एकानेही केलेले कर्म उभयतांना फलदायक होते ह्याकरिता पत्नी(रजोदर्शनादिकामुळे)पूजन करण्यास अयोग्य असली तर पतीनेच स्वस्थ अंत:करणपूर्वक हे सर्व करावे.||१८|| भावार्थ:---कारण,कसा जरी प्रसंग आला तरी हे विष्णूव्रत धारण करणाऱ्याने त्याचा विच्छेद करू नये.असो.नियमपूर्वक हे व्रत धारण करणाऱ्याने देवाचे पूजन केल्यानंतर माला,गंध,नैवेद्द आणि अलंकार इत्यादी उपचारांनी ब्राहमण व सुवासिन ह्यांचे प्रतिदिवशी पूजन करावे.||१९|| भावार्थ:---नंतर देवास देवघरामध्ये स्थान करून देहाची शुद्धी आणि सर्व मनोरथाची पूर्णता होण्याकरिता त्याला निवेदन केलेला प्रसाद प्रथमत: यथायोग्य विभागाने इतरास देवून आपण भक्षण करावा.||२०|| भावार्थ:---असो.ह्या पूजाप्रकारे बारामहिन्याचे एकवर्षापर्यंत पूजन करून कार्तिकमहिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या साध्वीने--पत्नीने उपवास करावा.||२१|| भावार्थ:---नंतर प्रभातकाल झाल्यावर स्नान करून पूर्वीप्रमाणे भगवान विष्णूचे पूजन करावे आणि दुधामध्ये शिजविलेला घृतयुक्त चरूने पार्वणस्थाली पाकाच्या विधानाने पतीने बाराचा आहुतीचा होम करावा.||२२|| भावार्थ:---तद्नंतर सुप्रसन्न झालेल्या द्विजांनी दिलेली आशीर्वाद शिरसा मान्य करून त्यांना मस्तकाने प्रणाम करावा आणि त्यांच्या अनुज्ञेचे आचार्यास अग्रभागी भोजनास बसवून मौनपुर्वक बंधूवर्गासह वर्तमान आपण भोजन करावे.नंतर सत्पुत्रदायक व सौभाग्यकारक असा चारुशेष पत्नीला अर्पण करावा.||२३-२४|| भावार्थ:---हे राजा,पुरुषाने यथाविधी हे व्रत केले असता त्यला भगवंतापासून इहलोकीच इष्टार्थप्राप्ती होते व स्त्रीने हे व्रत आचरिले असता तिला सौभाग्य,संपत्ती,संतति,दीर्घायुषी पती,यश व गृह हि प्राप्त होतात.||२५|| भावार्थ:---त्याचप्रमाणे कन्येने केले असता तिला सर्वलक्षणसंपन्न पति प्राप्त होतो,विधवेने केले असता पापापासून मुक्त होऊन ती उत्तमगतीस जाते.जिची मुले वांचत नाहीत अशा स्त्रीने हे व्रत केले असता तिला दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतात,धनाढ्य असूनही भाग्यहीन अशा स्त्रीने हे व्रत केले असता तो आपल्या विशेष रोगापासून मुक्त होवून इंद्रीयासहवर्तमान दृढदेही होतो आणि यज्ञयागादिक कर्मामध्ये पुरुषाने हे पठन केले असता त्याचे पितर व देव अत्यंत तृप्त होतात.म्हणून आपण--जीवानी हे "पुसंवनव्रत" आचरण करावे.||२६-२७|| भावार्थ:---आणि ते संतुष्ठ झाले म्हणजे सर्वमानोरथ पूर्ण करितात तशीच अग्निद्वारा हविर्भागग्रहण करणारी श्रीहरी आणि लक्ष्मी हि उभयंता होमसमाप्तीकाली संतुष्ट होऊन व्रत करणाऱ्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण करितात.असो हे राजा,ह्याप्रमाणे मरुद्गणांचे मोठे पुण्यकारक जन्म व दितीचे महाव्रत हे सर्व मी तुला कथन केले.||२८|| १९---ह्याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील(६)षष्ठस्कंधापैकी पुसंवनव्रतनिरुपणनामक हा(१९)एकोणिसावा अध्याय (२८)श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१९|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरुचरर्णाविंदार्पणमस्तु|| | ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | इति श्रीमद्भागवते षष्ठस्कंध: सटीक: सार्थश्व समाप्त: | ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment