अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः पाचवा
.
| ॐ तत्सत् l ॐनमो भगवते वासुदेवाय | | श्रीमद्भागवतमहापुराणम् | ===============================================l पंचमस्कंध: |============================================== ____________________________________________________________________________________________________१---आतां या पांचव्या स्कांधामध्ये सव्वीस अध्यायांनी,भूलोक,स्वर्गलोक,व पाताळलोक यांच्या मर्यादा,द्विपादिकांच्या मर्यादा आणि त्यांच्या रक्षणाचे प्रकार सांगून त्रैलोक्याच्या स्थितीचे वर्णन केले आहे.त्यांत पहिल्या अध्यायामध्ये ज्ञान-संपन्न अशा प्रियव्रत राजाचा राज्य-भोग व पुनः राज्य-सुखाचा त्याग करून त्यांची ज्ञान-निष्ठा,अशी आश्चर्यकारक कथा वर्णन केली आहे. |१--- प्रियव्रत चरित्र ________________________________________________________________________________________|राजोवाच | प्रियव्रतो भागवत आत्माराम: कथं मुने: | गृहेsरमत यन्मूल: कर्मबन्ध: पराभव: ||१|| अर्थ:---प्रियव्रत राजाचे आश्चर्यकारक संक्षिप्त चरित्र ऐकून,राजा म्हणाला---हे मुने,आत्मस्वरूपी रममान असणारा भगवद्भक्त प्रियव्रत राजा,गृहाचेठिकाणी(संसारामध्ये) कसा आसक्त झाला ? कारण,ज्या गृहामुळे,आत्म्याला कर्माच्या योगेकरून बंध- आणि आत्मस्वरुपाची विस्मृती प्राप्त होते.आपण—जीव गृहाच्या ठिकाणी अज्ञानामुळे आसक्त होतो,अज्ञान नावाचा दोष असल्यामुळे आपणास--अज्ञानी जीवास बंध व आणि आत्मा-स्वरूपाची विस्मृती प्राप्त होते.म्हणून आपण—जीवानी गृहादिकांच्या ठिकाणी—विषयांच्या ठिकाणी असलेली आसक्ती निवृत्त करण्यासाठी तसेच बंध व विस्मृती निवृत्त होण्यासाठी आपण—जीवानी साधू—संत—महात्मा यांचा सत्संग करावा.आपणास—जीवास सत्संग केले असता अज्ञान नावाचा दोष निवृत्त होऊन,बंध निवृत्त होऊन तसेच आत्मा-स्वरुपाची विस्मृती निवृत्त होऊन आत्मा—स्वरूपाचे स्मरण होते म्हणजे “मी ब्रह्म आहे”असा अनुभव येतो,त्यामुळे आपले जन्म—मरण होऊन सुखरुपता प्राप्त होते.||१|| | न ननुं मुक्त संङगानां तादृशानां व्दिजर्षभ | गृहेष्वभिनिवेशोऽयं पुंसां भवितुमर्हति ||२|| अर्थ:----हे द्विज श्रेष्ठा,खरोखरच सर्वसंगपरित्याग करणाऱ्या त्या प्रियव्रत राजासारख्या पुरुषांना,अज्ञानी लोकांचेठिकाणी प्रसिध्द असणारा हा गृहादिकांचेठिकाणी अभिमान प्राप्त होण्यास योग्य नाही.म्हणून आपणास—जीवास संत—महात्मा यांचा सत्संग करून गृहादिकांच्या—घर,देह,देहसंबंधी,धन,मान-प्रतिष्ठा—संसाराविषयी,विषयांविषयी मिथ्यत्व निश्चय करून,त्यांचा त्याग करून—अभिमानाचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घेऊन सुखरूप व्हावे.||२|| | महतां खलु विपर्षे उत्तमश्लोकपादयो:| छायानिर्वृत्तचीत्तानां न कुटूंम्बे स्पृहामति: ||३|| अर्थ:---हे ब्रहमर्षे,पवित्रकीर्ती अशा भगवंताच्या चरणांच्या छायेने संतुष्ठचित्त झालेल्या सत्पुरुषांना,स्त्रीपुत्रादिकुंटुंबाचेठिकाणी अभिलाषबुद्धी होत नसते हा निश्चितार्थ आहे.भगवंताचे चरण म्हणजे अधिष्ठान—निर्गुण-निराकार ज्ञानाने सत्पुरुष संतुष्ट—चित्त होत असतात,कारण स्त्री-पुरुष-पुत्र—पुत्री,जे देहसंबंधी हे जे आहेत,ते सर्व मिथ्या आहेत,म्हणून त्यांचा त्याग केलेला असतो.||३|| | संशयोऽयं महान् ब्रम्हन्दारागारसुतादिषु | सक्तस्य यत्सिद्धिरभूत्कृष्णे च मतिरच्युता ||४|| अर्थ:----असे असतां प्रियव्रत राजा,गृहाचेठिकाणी आसक्त कसा झाला ? बरे,हे ब्राहमण श्रेष्ठा,स्त्री,गृह,पुत्र इत्यादिकांच्याठिकाणी आसक्त असलेल्या त्या प्रियव्रताला पुन्हा मोक्षसिद्धी व कृष्णाचेठिकाणी अचळ बुद्धी तरी कशी झाली ? तेव्हां ह्याविषयी मला मोठा संशय प्राप्त झाला आहे,त्याचें निराकरण करावेंआपणास—जीवास संसारांविषयी—देहसंबंधी-विषयी आपण—जीव आसक्त का असतो त्याबद्दल संशय यावावयास पाहिजे.हा संशय निवृत्त करण्यासाठी सत्संग करावा असे आपणास वाटावे.||४|| |श्रीशुक उवाच :- |बाढमुक्तं भगवत उत्तमश्लोकास्य |श्रीमच्चरणारविन्दमकरन्दरस आवेशितचेतसो |भागवतपरमहंसदायितकथांकिञ्चीदन्तरायविहतां |स्वां शिवतमां पदवी न प्रायेण हिन्वन्ति ||५|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,तूं म्हणतोस तें खरें आहे.कारण,पवित्रकीर्ती भगवंताच्या सौंदर्ययुक्त चरणकमलसंबंधी मकरंदाच्या सेवनांत ज्यांची अंत:करणे गढून गेलीं आहेत ते पुरुष कांही विघ्नांनी खंडित झालेल्याही आपल्या,भगवद्भक्त परमहंसांना प्रिय अशा वासुदेवकथारूप अत्यंत कल्याणकारक मार्गाला बहुधा सोडीत नाहींत.आपणही—जीवानी कल्याणकारक जो निष्काम परमार्थ त्याचा स्वीकार करून साध्यापर्यंत जावावयास पाहिजे.||५|| |यर्हि वाव ह राजन् स राजपुत्र: प्रियव्रत: |परमभागवतो नारदस्य चरणोपसेवयाञ्जसावग- |परमार्थसत्वतो ब्रम्ह्सत्रेण दिक्षीदिक्षिष्यमाणोऽवनि- |तलपरिपालनायान्मातप्रवरगुणगणैकांत- |भाजनतया स्वपित्रोपामन्त्रितो भगवति वासुदेव |एवाव्यवधानसमाधियोगेन समावेशितसकल- |कारकक्रियाकलापो नैवाभ्यनन्दद्यद्यपितदप्रत्या- |म्रातव्यंतदधिकरण आत्मनोऽन्यस्मादसतोऽपि |पराभवमन्वीक्षमाण: ||६|| अर्थ:----हे राजा,स्वायंभुव मनूचा पुत्र प्रियव्रत,मोठा भगवद्भक्त होता,नारद ऋषीच्या चरणसेवेच्या योगेकरून अनायासानें त्यानें आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणिलें होते.आपणही संत—महात्मा यांचा सत्संग करून आत्मा—परमात्मा यांचे यथार्थ स्वरूप जाणून घ्यावे.पुढे ज्या वेळीं त्यानें वासुदेव भगवंताचेठिकाणी अखंडीत समाधीयोगाने आपल्या संपूर्ण इंद्रीयांचे एकंदर व्यापार समर्पण करून निरंतर आत्मविचार करीत बसण्याचा संकल्प करण्याचे मनांत आणिलें,त्या वेळी राजाच्याठिकाणी जे जे गुण असावे असे शास्त्रांत सांगीतलें आहे ते सगळे गुण ह्या प्रियव्रताच्या आंगी पूर्णपणे वसत आहेत असें पाहून त्याला पित्यानें (मनूनें) भूमंडळाचें संरक्षण करण्याची आज्ञा दिली,आणि यद्यपि ती पित्याची आज्ञा मोडण्यास अयोग्य होती तथापि तिचा स्वीकार करून राज्य चालविलें असतां त्यामध्यें मिथ्याभूत अशाही प्रपंचाकडून आत्मस्वरूपाचें आच्छादन होईल’ असें विचादृष्टीने मनांत आणणाऱ्या त्या प्रियव्रताने त्या पित्याच्या आज्ञेचा मनापासून स्वीकार केला नाही.आई-वडिलांच्या अज्ञानेचे पालन करणे हे पुत्राचे कर्तव्य असते,पण जी आज्ञा परमार्थास प्रतिबंध करील त्या अज्ञाचे पालन पुत्राने करू नये असेही सांगितले आहे.||६|| अर्थ:----तों इतक्यांत ह्या त्रिगुणात्मक सृष्टीची वृद्धी कशी होईल अशा विचारांत निरंतर गढून गेलेला व सर्व जगताचा अभिप्राय काय आहे तें जाणणारा असा भगवान् स्वयंभू ब्रहमदेव,मूर्तीमंत अशा सर्व वेदांनी व आपल्या मरीच्यादि ऋषिरूप गणांनी परिवेष्टित होऊन आपल्या सत्यालोकापासून खालीं उतरला.||७|| अर्थ:---तेव्हां तो आकाशामध्यें चंद्राप्रमाणे दिशा प्रकाशयुक्त करीत असून प्रत्येक मार्गांत विमानपंक्तीनी युक्त असलेल्या इंद्रादिक श्रेष्ठ देवांनी पूजित असता तसाच मार्गामार्गामध्यें थव्याथव्यांनी उभे राहिलेल्या सिद्धी,गंधर्व,साध्य,चारंव व ऋषिगण यांनी गाइला असता,गंधमानद पर्वताच्या गुहेला प्रकाश करीत करीत ज्याठिकाणी प्रियव्रताला नारद आत्मविद्येचा उपदेश करीत होता व स्वयंभूवमनु राज्याभिषेक करण्याकरीता त्याला घरीं नेण्यासाठी आला होता त्या ठिकाणीं प्राप्त झाला. ||८|| अर्थ:----तेथें ‘हंसावर बसून येणारा हा आपला पिताभगवान ब्रहमदेव आहे’ असें ओळखून नारद ऋषी,एकाएकी उठून उभा राहिला आणि मनु व प्रियव्रत अशा पितापुत्रांसहवर्तमान त्यानें हस्त जोडून पूजनपूर्वक त्याची स्तुती केली. ||९|| अर्थ:---हे भरतकुलोत्पन्ना राजा, त्या नारदाने ज्याला पूजा समर्पण केली आहे आणि मधुर वचनानें अतिशयेंकरून ज्याचे गुणसमुह,अवतार आणि सर्वोत्कर्ष वर्णन केले आहेत असा हास्ययुक्त कृपादृष्टीने अवलोकन करणारा तो भगवान् ब्रहमदेव, त्या प्रियव्रत राजाला असें म्हणाला कीं----------- ||१०|| |श्रीभगवानुवाच | निबोध तातेदमृतं ब्रवीमि | मासूयितुं देवमर्हस्य प्रयेयम् | | वयं भवस्ते तत एष महर्षि- | र्वहाम सर्वे विवशा यस्य दिष्ट्म्||११|| अर्थ:----ब्रह्मदेव म्हणाला----बा प्रियव्रता,हें माझें भाषण श्रवण कर.ती तुला खरें सांगतो.माझ्या मुखानें ईश्वर हरीच तुला आज्ञा करीत आहे असें समज.ज्याचें देशानें किंवा कालाने प्रमाण करितां येत नाहीं त्या—परमात्मा—अधिष्ठान असलेला या देवाला दोषारोपदृष्टीने पाहण्यास तूं योग्य नाहींस.शंकर,तुझा पिता (स्वयंभूव) मनु आणि हा तुझा गुरु देवर्षी नारद व मी हे सर्व आम्ही त्याच्या स्वाधीन असून त्याची आज्ञा शिरसा धारण करितों.म्हणून असा असलेला भगवंत आपण—जीवानी जाणून घ्यावा.||११|| | न तस्य कश्चित्तपसा विद्यया वा- न योगवीर्येण मनीषया वा | | नैवार्थधर्मै: परत: स्वतो वा - कृतं विहन्तुं तनुभृद्वीभूयात ||१२|| अर्थ:---देह धारण करणारा कोणीही प्राणी,तप,ज्ञान,अथवा योगबल,तसेच अर्थ किंवा धर्म यांच्या योगेकरून स्वत: अथवा दुसऱ्याच्या सह्यानें त्याच्या कृतीला अन्यथा—मिथ्या करण्याविषयी समर्थ होणार नाहीं. ||१२|| | भवाय नाशाय च कर्म कर्तुं शोकाय मोहाय सदा भयाय | | सुखाय दुःखाय च देहयोग मव्यक्तदिष्टं जनतांग धत्ते ||१३|| अर्थ:----हे प्रियव्रत,हा जीवांचा समुदाय,जन्म,मरण,कर्म करणें,शोक,मोह,भीती,सुख व दु:ख मिळण्यासाठी ईश्वर ज्या ज्या देहाचा संबंध जमवून देईल त्या त्या देहाला नित्य धारण करितो. ||१३|| अर्थ:---हे वत्सा,सर्वही आम्ही,ज्या भगवंताच्या वेदवाणीरूप दावणीच्याठिकाणी,सत्त्वादिक गुण आणि कर्में यांच्यायोगेकरून वळलेल्या ब्राहमणादिनामरूप सुदृढ दाव्यांनी पक्के बांधलेले असून जसे नाकामध्ये वेसण घातलेले बैलवगैरे पशु,मनुष्याची (धन्याची) सेवा करितात त्याप्रमाणे ईश्वराची पूजावगैरे सेवा करितो, म्हणजे त्याच्या इच्छेनुरूप आपापल्या अधिकारानें प्राप्त झालेली कर्में करितों.म्हणून आपण—जीवानी विहित कर्मांचे पालन करून निषिद्ध कर्मांचा त्याग करावयास पाहिजे.कारण विहित कर्म अंत:करण शुद्धीला--सुखाला कारण आहे,तर निषिद्ध कर्म अंत:करण अशुद्धिला--दु:खाला कारण आहे.||१४|| अर्थ:----हे प्रियव्रता,जसे आंधळे लोक,आपल्याला डोळस पुरुषास सांवलीत किंवा उन्हांत जिकडे जिकडे घेऊन जाईल तिकडे तिकडे जातात त्याप्रमाणे आम्ही,प्रभूनें गुण आणि कर्में यांच्या संबंधानें ज्या ज्या देवतीर्यगादिरूप देहाची योजना केली असेल त्याचा त्याचा स्वीकार करून त्या ईश्वरानें दिलेल्या सुखाचा किंवा दु:खांचा स्वीकार करितों.||१५|| | मुक्तोsपि तावद्भिभृयात्स्वदेह मारब्धमश्नन्नभिमानशून्यः | | यथानुभूतं प्रतियातनिद्र: किं त्वन्यदेहाय गुणान्न वृङ्क्ते ||१६|| अर्थ:---अधिक तर काय परंतु जसा साधारण जन,स्वप्नामध्ये अनुभव घेतलेल्या गोष्टींचे जागृत झाल्यानंतरही अभीमानशून्य होऊन स्मरण करितो त्याप्रमाणें जीवन्मुक्त झालेलाही पुरुष,जोंपर्यंत प्रारब्धकर्म आहे तोपर्यंत त्या प्रारब्धाचा उपभोग करीत असता अभिमानशून्य होऊन आपल्या देहाचें धारण करितो परंतु तो दुसऱ्या देहाला उत्पन्न करणाऱ्या कर्मांचा किंवा वासनांचा स्वीकार करीत नाही.ज्याचे—त्याचे प्रारब्ध कर्मे भोगूनच संपत असते,पण संचित कर्म हे ज्ञानी पुरुषाचे ज्ञाग्नीने जाळून जाते व विहित क्रियमाण कर्म जे संत—पुरुषाचाची स्तुती करतात त्यांना मिळत असते व त्यांची जे निंदा करितात त्यांन निषेद्ध कर्मांचे फळ जे दु:ख आहे,ते मिळत असते.||१६|| | भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्याद् यतः स आस्ते सहषट्सपत्न: | | जितेन्द्रियस्यात्मरतेर्बुधस्य गृहाश्रमः किं नु करोत्यवद्दम् ||१७|| अर्थ:---ज्याची इंद्रिये स्वाधीन नाहीत तो पुरुष,वनांत जाऊन संगतीच्या भीतीनें जरी या वनांत फिरत राहिला तथापि त्याला तेथें संसारभय प्राप्त होतेंच.कारण,तो तेथें कामक्रोधादि सहा शत्रूंसहित व विषयासक्त झालेल्या,मन,बुद्धी व इंद्रिये यांसहित असतो.त्यामुळे त्या अज्ञानी पुरुषास संसाराचे भय—दु:ख वाटतच असते,कारण तो पुरुष कामा—क्रोध—लोभ—मोह—मद व मत्सर यांच्या अधीन झालेला असतो.बरें,इंद्रियांचा जय करून आत्मस्वरूपी रममान असणाऱ्या ज्ञानी पुरुषाचें गृहस्थाश्रमाकडून तरी वाईट काय होणार आहे? काहिंच नाहीं.म्हणून आपण—जीवानी इंद्रियें व मन ताब्यात घेऊन संसारात असावे,कारण त्यामुळे आपणास संसारात भीती न वाटता सुख वाटेल.||१७|| | भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्याद् - यत:स आस्ते सहषट् सपत्न: | | जितेन्द्रिययस्यात्मरतेर्बुधस्य - गृहाश्रम किं नु करोत्यवद्यम ||१७|| अर्थ:----यास्तव हे प्रियव्रता,जसा राजा किल्ल्याच्या आश्रय करूनच प्रबळ शत्रूंना जिंकितो व शत्रुंचा क्षय झाला म्हणजे मग हवा तेथे संचार करितो त्याप्रमाणे जो—आपण—जीव--पुरुष कामादि षड्रिपुंना जींकण्याची इच्छा करीत असेल त्यानें,प्रथमत: गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून तेथें एकदम विषयांचा त्याग न करीतां हळूहळू आपल्या कामादिक शत्रुंचा जिंकण्याचा प्रयत्न करावा आणि ते शत्रु क्षीण झाल्यावर त्या विद्वान पुरुषानें—आपण—जीवानी यथेच्छापणें संचार करावा.||१८|| अर्थ:---तूं वर,पद्मनाभ भगवंताच्या चरणकमळाच्या जो कळा ह्याच किल्ल्याच्या आधारानें राहून कामादिक षड्रिपु जरी जिंकिले आहेस तथापि ईश्वरानें दिलेल्या विषयभोगांचा प्रथम राज्याधीकारावर राहून कांही काळापर्यंत उपभोग घे आणि नंतर सर्व संगाच परित्याग करून आत्मनिष्ठ हो.आपण जर गृहस्थाश्रमी असाल तर काम.क्रोध,लोभ,मोह,मोह,मद व मत्सर यांना विवेकाद्वारे आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेऊन आचरण करावे.आपण कांही काळांनी गृहस्थाश्रमाचा उत्तराधिकारी नेमून सर्व-संगाचा त्याग करून सत्संगासाठी संत—महात्मा यांच्या आश्रमात निवास करावा.त्याठिकाणी सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान संपादन करावे.||१९|| अर्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ह्याप्रमाणे सांगीतलेल्या त्या महाभगवद्भक्त प्रियव्रत राजानें,आपणाला लहानपणा असल्यामुळे आपली,मान लववून नम्रपणाने ‘ठीक आहे,तसें करितों’.असें म्हणून त्रैलोक्याचा गुरु अशा त्या ब्रहमदेवाच्या आज्ञेचा बहुमानपणा स्वीकार केला.आपण—जीवानी श्रेष्ठांच्या अज्ञाचे पालन केल्यास त्यात आपले—जीवाचे हित होत असते.||२०|| अर्थ:---नंतर संतोष पावलेल्या मनूनें शास्त्रोक्त विधीला अनुसरून ज्याची—ब्रह्मदेवाची पूजा केली आहे अशा त्या ब्रहमदेवाच्या,प्रियव्रत व नारद हे अभयतां वक्रता न धरितां शांत दृष्टीनें अवलोकन करीत असतां,आपलें आश्रयमभूत,वाणीला व मनाला अगोचर आणि सर्वव्यवहारशून्य अशा ब्रह्माचे चिंतन करीत करीत सत्यलोकाप्रत गमन केलें. ||२१|| अर्थ:----यामप्रमाणें ब्रहमदेवाने,ज्याचा मनोरथ(पुत्राला राज्याभिषेक करून वनांत जाण्याचा)संपादन केला आहे असा तो मनूही, देवर्षीमध्ये श्रेष्ठ अशा नारदाच्या अनुमताने त्या प्रियव्रत पुत्राला सर्व पृथ्वीमंडळाच्या मर्यादा परिपालन करण्याकरीता बसवून आपण अतिदुस्तर असा जो विषयरुपी विषाचा डोह (घर) त्याच्या उपभोगाच्या इच्छेपासून विराम (उपरती) पावला.आपणही—जीवानी मनूंचे अनुकरण करून—आपल्या पुत्राच्या हाती गृहस्थाश्रमाचा कार्यभार सोपवून गृहस्थास्रामाचा त्याग करून—संसारिक विषयांचा त्याग करून सत्संग करून आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.||२२|| अर्थ:----याप्रमाणे ईश्वराच्या इच्छेनें कर्माधिकार प्राप्त झालेला तो प्रियव्रत राजा,सफल जगाच्या बंधाचा नाश करणारें ज्याचें अलौकिक सामर्थ्य आहे,अशा आदिपुरुष भगवंताच्या चरणद्वयाचे जें निरंतर ध्यान त्याच्या सामर्थ्यांने ज्याचे रागादि मळ जळून गेले आहेत अशा चित्तानेंयुक्त,शुध्द,व थोरांचा मान वाढविनारा होत असता भूमंडळाचे रक्षण करूं लागला.||२३|| अर्थ:----पुढें त्यानें विश्कर्मानामक प्रजापतीच्या बर्हीष्मतीनामक कन्येशी विवाह करून घेतला. पुढें तिचेठिकाणी त्याला दहा पुत्र व त्या सर्वांहून लहान अशी उर्जस्वतीनामक एक कन्या, मिळून अकरा अपत्यें झाली ते पुत्र प्रियव्रतासारखेच सुशील, सद्गुणी, कुशळ, रूपसंपन्न, पराक्रमी व उदार होते. ||२४|| अर्थ:----ते सर्वही पुत्र, अनुक्रमे- आग्नीध्र, इध्मजिव्ह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन मेधातिथी, वितीहोत्र आणि कवी अशा अग्नीच्या नांवांचे होते. ||२५|| | एतेषां कविर्महाविरः सवन इति त्रय आसन्नूर्ध्व | रेतसस्त आत्मविद्दायामर्भभावादारभ्य कृत | परिचयाः पारमहंस्यमेवाश्रममभजन् ||२६|| अर्थ:----ह्यांपैकी कवी,महावीर आणि सवन ह्या तिघांनी बाल्यावस्थेपासून आत्मविद्येंमध्येंच अभ्यास करून ते नैष्ठीक ब्रम्हाचारी झाले. आणि त्यांनी परमहंस मुनिच्याच आश्रमाचा स्वीकार केला.आपणही—जीवानी बाल्यावस्थेपासून आत्मा-विद्देचा अभ्यास करावा.त्यासाठी नैष्ठिक ब्रह्मचार्याचा स्वीकार करावा.तसेच परमहंस मुनिच्याच आश्रमाचा स्वीकार करून सत्संग करावा. ||२६|| अर्थ:----पुढे त्या आश्रमामध्येच शांत स्वभावाचे असे ते तिघेही महर्षी,सर्व जीवसमुहांचे निवासस्थान आणि संसारापासून भ्यालेल्या जिवांचा संरक्षण करणारा अशा वासुदेव भगवंताच्या सुंदर चरणकमलाच्या सतत स्मरणाने उत्पन्न झालेला जो अखंडित सर्वोत्कृष्ट भक्तियोग त्याच्या प्रभावाने शुध्द झालेल्या अंत:करणामध्ये अनुभवास आलेला,सर्वभूतांचा आत्मा व स्वस्वभूतरूप जो भगवान् त्याचेठीकानी,देहादीक उपाधीचें निरसन करून,आत्मस्वरूपाने तादात्म्य पावले.आपणही—जीवानी देहादिक उपाधीचा निरसन करून—देहादिक मिथ्या व दु:खकारक आहेत असा निश्चय करून आत्मस्वरूपाने तादाम्य पावले—एकरूप झाले.||२७|| अर्थ:----दुसऱ्याही भार्येच्याठिकाणी प्रियव्रत-राजाला उत्तम,तामस आणि रैवत असे तीन पुत्र होते ते पुढे मन्वंतरांचे अधिपती झाले.||२८|| अर्थ:----याप्रमाणे ते कविवगैरे आपले तिघेही पुत्र शांतीचा आश्रय करून राहिले असतां,त्या प्रियव्रतराजाने अकरा कोट वर्षे पर्यंत पृथ्वीचे राज्य केले.तो राजा,ज्यापासून कुंठीत न होणारे सर्व पराक्रम उत्पन्न होत असत अशा बलाने परिपूर्ण असलेल्या दोन्ही भूजदंडांनि ओढलेल्या धनुष्याच्या दोरीच्या टणत्कार शब्दानेंच (युध्दावांचुनच) धर्माच्या शत्रुंचे निरसर करणारा,आणि बर्हीष्मतीनामक राणीच्या प्रतीदिवशी वृद्धीगंत होणाऱ्या ज्या ‘पती आला असे पाहून हर्षाच्या वेगाने उठुन उभे राहणे इत्यादिक, लीला त्यांचा योगेकरून व्यक्त दिसणारे जे स्त्रीचे स्वाभाविक शृंगारादीक विलास, लज्जा, संकोचाने हास्यपूर्वक पाहाणे मनोहर विनोदपर भाषणें इतदिकांच्या योगेकरून उत्तरोत्तर कमी कमी होत चाललेल्या विवेकशक्तीने युक्त असल्यासारखे व विषयसक्तीने आत्मस्वरूपाला जाणत नसल्यासारखे लोकांना दाखविण्यारा परंतु वस्तुत: मोठा ज्ञानी होता.आपण—जीवाने बहिरांगाने परमार्थ न करता अंतरंगाने परमार्थ करावा.बहिरंगाचा परमार्थ हा दिसन्यापुरता असतो,तर अंतरंगाचा परमार्थ मोक्ष—फळांनी युक्त असतो—जन्म—मरण निवारण करणारा असतो.||२९|| अर्थ:----हे राजा,काय त्याचा पराक्रम सांगावा,अरे मेरूपर्वताला सर्भोवार प्रदक्षिणा घालणारा भगवान् सूर्य,लोकालोक पर्वतापर्यंत सगळ्या भूमंडळाला प्रकाशित करितो खरा परंतु तो त्या भूंमंडळामध्ये अर्ध्या भागाला प्रकाशित करितो व अर्ध्या भागाला अंधकाराने आच्छादन करितो ते प्रशस्त नव्हे असे माननारा व ज्याचा प्रभाव भगवंताच्या उपासनेमुळे वृध्दिंग झालेला असून कोणत्याही पुरुषाचेठिकाणी दुर्मिळ होता त्या प्रियव्रत राजाने,मी रात्रीच्यासुध्दां दिवस करीत असे मनांत आणून सूर्याच्या रथासारिख्या वेगवान व प्रकाशमय रथांत बसून, दुसरा सूर्यच कि काय अशा त्या राजाने, सूर्याच्या पाठीमागून सात वेळां प्रदक्षिणा केल्या. ||३०|| अर्थ:---त्यावेळी त्याच्या चाकाच्या धांवेने केलेले जे सात खड्डे होते तेच पुढे सात समुद्र झाले.त्यांच्या योगानेच पृथ्वीची जंबू, प्लूक्ष,शाल्मली,कुश,क्रौच,शाक आणि पुष्कर अशी सात द्वीपे झाली आहेत.त्या द्वीपांच्या लांबीरूंदीचे प्रमाण,पहिल्यापेक्षां तिसरे दुप्पट असे अनुक्रमाने चढते आहे. ती समुद्रांच्या बाहेर सभोवार रचीलेली आहेत. ||३१--३२|| अर्थ:----खाऱ्यापाण्याचा समुद्र,उसांच्या रसाचा समुद्र,घृताचा समुद्र,दुधाचा समुद्र,दह्यांच्या मठ्याचा समुद्र,असे हे सात समुद्र, सप्तद्वीपांच्या खंदकांसारखे व प्रमाणाने आंतील द्वीपांएवढालेच असून ते एकेक सातही द्वीपांच्या बाहेरून वेगवेगळे रचिले आहेत. त्या जंबू इत्यादिक सात द्वीपांमध्ये प्रियव्रत राजाने आपल्या आज्ञाधारक अशा आग्रीध्र इध्मजिव्ह यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेथतिथी आणि वितीहोत्र ह्या एकेक पुत्राची अनुक्रमाने एकेक द्विपांतील राज्याधिकार देऊन तेथे स्थापना केली.||३३|| | दुहितरं चोर्जस्वतीं नामोशनसे प्रयाच्छ- | द्यस्यामासीद् देवयानी नाम काव्यसुता ||३४|| अर्थ:----आणि त्याने आपली ऊर्जस्वतीनामक कन्या शुक्राचार्याला अर्पण केली तीचेठिकाणी पुढे देवयानीनामक कन्या झाली.||३४|| अर्थ:----हे राजा, भगवंताच्या चरणरजाने,पंच ज्ञानेद्रीये व मन हि सहा इंद्रीये अथवा क्षुधा,तृषा,शोक,मोह,जरा आणि मृत्यू ह्या सहा लहरी जिंकणाऱ्या भगवद्भक्तांचे अशाप्रकारचे सामर्थ्य असणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही.कारण,जातीचा चांडाळ असूनही जो भगवंताच्या नांवाचा एकवार तरी उच्चार करितो तोही आपल्या संसारबंधाचा त्याग करितो,मग निरंतर भगवत्सेवा करणाऱ्या पुरुषांना दुर्लभ ते काय आहे? कांहीच नाही.म्हणून आपण—जीवानी मन व इंद्रियें आपल्या ताब्यात ठेऊन क्षुधा,तृषा, शोक,मोह,जरा आणि मृत्यू यांना आपल्या ताब्यात ठेऊन त्यांचा परमार्थासाठी विनियोग करावा.आपण—जीवानी जर भगवंताचा नामोच्चार केला तर तो नामोच्चार चौथा पुरुषार्थ मोक्षापर्यंत नेतो,म्हणून आपण भगवंताचे नामोच्चार सदोदित करावा.||३५|| अर्थ:----असो.याप्रमाणे ज्याच्या बळाला व पराक्रमाला परिमिती नाही असा तो प्रियव्रत राजा, एके वेळी नारदऋषीच्या चरणांला शरण जाऊन विद्या प्राप्त झाल्यावर मागाहून आंगावर येऊन पडलेल्या राज्याद्री प्रपंचाच्या संसर्गाने आपल्याला सुखरहित असे मानीत असता अंत:करणामध्ये वैराग्ययुक्त होऊन आपणाशीच असे म्हणूं लागला की,----------------- ||३६|| अर्थ:---अहो!मी हे फार वाईट आचरण केले.कारण,विषयलंपट झालेल्या इंद्रियांनी,मला आज्ञानाने रचिलेल्या दुस्तर अशा ह्या विषयरुपी अंधाऱ्या विहीरींत (ज्यांतून बाहेर निघण्यास फार कठीण पडते अशा अज्ञानयुक्त गृह्स्याश्रमांत) ढकलून दिले आहे. तस्मात् आतां या विषयभोगांनी पुरे पुरे! ह्या स्त्रीच्या खेळांतल्या मर्कटासारखा झालेला जो मी त्याला धिक्कार असो, अशी त्याने आपलीच निंदा करून घेतली.ज्याप्रमाणे प्रियव्रत राजा अज्ञानयुक्त गृहस्थाश्रमात पडलेलो आहे म्हणून पश्चाताप व्यक्त करितो,त्याप्रमाणे आपणही—जीवही अज्ञानरूपी गृहस्थाश्रमात पडलेलो आहो,असा पश्चाताप करावा व विवेकाद्वारे गृहस्थाश्रामाचा—विषयांचा त्याग करून सत्संग करावा.आपले—जीवाचे दु:संगात अहित आहे व सत्संगात हित आहे.||३७|| अर्थ:----नंतर ह्रदयामध्ये वैराग्य धारण करणाऱ्या व भगवंताच्या चरित्रांच्या चिंतनेकरून सर्व संग परित्याग करण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेल्या त्या प्रियव्रत राजाने,आपल्या आज्ञेत वागनाऱ्या पुत्रांना वांटयाप्रमाणे या पृथ्वीचे भाग करून देऊन, व उपभोग घेतलेल्या राणीचाही साम्राज्यसंपत्तीसहवर्तमान मृत झालेल्या शरीराप्रमाणे त्याग करून,भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या आत्मविवेकाने तो राजा,महाभगवद्भक्त अशा नारदाने उपदेश केलेल्या मार्गालाच पुन्हा अनुसरला (शालग्रामक्षेत्रामध्ये जाऊन तेथे भगवंताच्या आराधनाने मुक्ती पावला) आपणही आपल्या पुत्रांना व पत्नीला संपत्तीचे वाटप करून त्यांचा त्याग करून सत्संगाकरिता संत—महात्मा यांच्या आश्रमात जाऊन निवास करावा.||३८|| अर्थ:----हे राजा,त्याच्या महिम्यासंबंधी पूर्वीपासून प्रसिध्द असलेले हे श्लोक आहेत की- प्रियव्रत राजाने केलेले कर्म एक ईश्वरावांचून दुसरा कोण बरे करणार आहे?कोणीच नाही. ज्याने पृथ्वीवरील अंधकार नाहीसा करण्याकरीता रथावर बसून सूर्याच्या मागून फिरत असतां आपल्या रथचक्राच्या धांवेने खड्डे पाडून सात समुद्र केले.||३९|| अर्थ:----ज्याने,प्राण्यांना सुख व्हावे एवढ्यासाठी पृथ्वीवर वेगवेगळी द्वीपांची रचना केली आणि प्रत्येक द्विपामध्ये नद्या, पर्वत, अरण्ये इत्यादीकांच्या योगकरून मर्यादा सिद्ध केल्या आहेत. ||४०|| | भौमं दिव्यं मानुषं च महित्वं कर्मयोगजम् | यश्र्चक्रे निरयौपम्यं पुरूषानुजनप्रिय: ||४१|| अर्थ:----आणि भगवद्भक्तांची प्रीती बाळगणाऱ्या ज्याने, कर्मयोगापासून प्राप्त होणारे पाताळातील, स्वर्गलोकांतील सर्व वैभव नरकतुल्य मानिले आहे. केवढा हा त्याचा प्रभाव! आपणही मृत्यू-लोकातील विषयांचे भोग न स्वर्गातील—परलोकांतील विषयांचे भोग नरकतुल्य आहे असे मानून त्यांचा विषाप्रमाणे त्याग करून सत्संग करावा व अद्वेतज्ञानाद्वारे मोक्ष संपादन करावा.||४१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचमस्कंधामध्ये प्रियव्रतविजयकथनरूप हा पहिला अध्याय समाप्त झाला ||१|| ||श्रीकृष्णाचरणार्पणमस्तू|| ||सदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________|२---- आतां या दुसऱ्या अध्यायामध्ये,ज्याला पूर्वचित्तीनामक अप्सरेच्याठिकाणी नाभीप्रभृति नऊ पुत्र झाले,त्या आग्नीध्र राजाचे स्त्रीजित पुरुषांनां संमत असे चरित्र सांगितले आहे.या प्रियव्रताच्या वंशांत प्रसिध्द असलेला हा आग्रीध्र राजा मोठा स्त्रीजित होता म्हणून उपहास केल्यासारखे त्याचे हे चरित्र शुकाने राजाला सांगीतले आहे. |२--- आग्नीध्र-चरित्र ________________________________________________________________________________________ ||श्रीशुक उवाच:--- | एवं पितरि सम्प्रवृत्ते तदनुशासने वर्तमान अग्नीध्रो जम्बूद्वीपौकस: प्रजा औरसवद्धर्मावेक्ष- माण: पर्यगोपायत् ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---याप्रमाणे प्रियव्रत राजा,नारदाच्या उपदेशाने भगवद्भजनी लागला असतां,त्याच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करणारा राजा,धर्मावर दृष्टी ठेऊन जंबूद्वीपांत राहणाऱ्या सर्व प्रजांचे औरसपुत्रांप्रमाणे रक्षण करूं लागला.आपणही—जीवानी जे आपले उपदेशक संत—महात्मे आहेत,त्यांच्या अज्ञाचे पालन करावे व त्यांच्यावर व त्यांनी जौपादेश केलेला त्या उपदेशावर—शब्दांवर त्यांत श्रद्धा असावी,कारण साधन अगोदर आहे व सध्या त्यानंतर—उपदेशानंतर आहे.जसे व्यवहारात साधन अगोदर आहे व साध्य त्यानंतर आहे.उदा—ज्यावेळेस कन्या किंवा पत्नी हि पतीचा स्वीकार करून व आई—वडिलांचा त्याग करून पतीच्या नवीन घरी एकटीच जाते,कारण पतीवर विश्वास ठेऊनच जाते,त्याचप्रमाणे संत—महात्मा यांच्यावर श्रद्धा—विश्वास ठेऊनच उपदेश ग्रहण करावा लागतो.जितकी श्रद्धा अधिक तितका परमार्थ अधिक होत असतो,म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दावर श्रद्धा—विश्वास ठेवावा लागतो.||१|| अर्थ:---एके वेळी आपणास सत्पुत्र व्हावा अशी इच्छा धारण करणारा तो राजा, देवांगणांचे क्रीडास्थान अशा मंदरपर्वताच्या पाहाडांत जाऊन,उत्तम प्रकारची पुष्पादीक पूजासामग्री संपादन करून,स्नान,आहारसंकोच,आसन व प्राणायाम इत्यादिक तपश्चर्येने नियम स्वीकारीत असता चित्ताच्या एकाग्रतेने विश्वत्रष्टयांचा अधिपती अशा भगवान् ब्रहमदेवाची तपश्चर्या करू लागला.आपणही—जीवानी ज्ञान—पुत्र—चौथा पुरुषार्थ जो मोक्ष संपादन करण्यासाठी अंत:कारण शुद्ध करण्यासाठी,अंत:करण स्थिर करण्याकरिता व अज्ञान निवृत्त करण्याकरिता अनुष्ठान—तप करावे. ||२|| अर्थ:----हे जाणून भगवान् ब्रहमदेवाने आपल्या सभेमध्ये गायन करणाऱ्या पूर्वचित्तीनामक अप्सरेला संभोगासाठी—पुत्र उत्पन्न होण्याकरिता त्या आग्नीध्र राजाकडे पाठवून दिली.आपणही ज्ञान—पुत्र उत्पन्न होण्यासाठी संत—महात्मा यांच्या गृही जाऊन श्रद्धापूर्वक सत्संग करावा.||३|| अर्थ:----ती अप्सरा,त्या राजाच्या आश्रमाजवळच्या उपवनांत इकडेतिकडे फिरू लागली.ते उपवन,नानाप्रकारच्या दाट वृक्षांच्या फाद्यांच्या विस्ताराशी अगदी चिकटून राहिलेल्या सुवर्णवल्लीवर बसलेल्या मयुरादिक स्थलपक्ष्यांच्या जोडप्यांनी उच्चारलेल्या षड्जादिस्वरांनी जागृत झालेल्या पाणकोंबडे,कांरडव,कलहंस इत्यादिक पक्ष्यांनी आपापल्या जातीच्या नीरनिराळ्या शब्दांनी घुमवून टाकलेल्या निर्मल तलावांमध्ये उत्पन्न होणाऱ्या कमळांची केवळ खाणच असे अतिरमणीय होते.आपण—जीवानी त्या संत—महात्मा यांच्या आश्रमात प्रवेश करून सेवा करीत निवास करावा.आश्रमातील वातावरण हे सात्विक—गुणांनी संपन्न असते.त्यमुळे ते वातावरण आपणास प्रसन्नता—आनंददायक वाटते.||४|| अर्थ:-----अतिमनोहर गमनामध्ये जी पावले टाकणे त्यांच्या योगाने जिच्या गतीतिल विलास स्पष्ट होत असे,अशा त्या अप्सरेच्या पदोपदी खुळखुळ वाजणाऱ्या पायांतील नुपुरांचा ध्वनी ऐकून,त्या राजपुत्र अग्नीध्रने,समाधीयोगाने किंचित मिटलेल्या नेत्ररूप कमलांच्या दोन कळ्या किंचित उघडून अवलोकन केले.त्याचप्रमाणे कांही दिवसांनी केलेल्या निवासपुर्वक सेवेमुळे संत—महात्मा आपल्याकडे लक्ष देतात.||५|| अर्थ:----आपल्या जवळच श्रमरीप्रमाणे पुष्पांचा सुवास घेत फिरणारी,देव आणि मानव ह्यांच्या मनाला व नेत्रांना भरून टाकणाऱ्या- गती, विहार, लज्जा विनययुक्त अवलोकन, सुस्वर भाषणे व नेत्रादीक अवयव ह्यांच्या योगानें पुरुषांच्या मनामध्ये मदनाचा संचार करणारी,आपल्या मुखांतून गळलेले अमृतासारखे मधुर व मद्यासारखे मादक असें जें हास्ययुक्त भाषण त्याच्या ठिकाणी जो श्वासाचा सुगंध त्याच्या योगानें मदांध झालेल्या श्रमरांची पीडा होईल या भीतीनें पावलें जलद टाकीत असल्यामुळे जिचे कुचकलश,केसांचा बुचडा कमरपट्टा हे किंचित हालत आहेत अशा त्या अप्सरेच्या अवलोकनाने मनामध्ये प्रवेश करण्यास अवकाश सांपडलेल्या भगवान् मदनाच्या अगदीं वश होऊन तो राजा त्या अप्सरेला आपल्या वश करण्याकरिता जडपुरुषाप्रमाणे असें बोलुं लागला कीं,--------आपण—जीवानी निवसापुर्वक सेवा केल्यामुळे संत—महात्मा आपणास स्वत:कडे बोलावून म्हणतात की,------------------------ ||६|| अर्थ:----हे स्त्रीयें तू कोण आहेस? ह्या पर्वतावर तुझ्या मनांत काय करावयाचे आहे? हे ऋषीश्रेष्ठा,तूं खरोखर भगवान् परमेश्वराची अत्यंत मोहक मायाच आहेस.तिच्या भ्रुकुटीकडे पाहून म्हणतो---- हे मित्रा,गुणरहित अशी ही दोन धनुष्यें,तूं आपल्या कांही कामाकरितां धारण करीत आहेस? किंवा या संसाररूप अरण्यमध्ये विषयासक्त झालेल्या हरीनासारख्या आम्हांस वश करण्याकरीता हीं असली धनुष्यें धारण करितोस ? त्याचप्रमाणे हे साधका तू कोण आहात?तुझा येण्याचा उद्ध्येस—हेतू काय आहे?या आश्रमात येऊन तुला काय करावयाचे आहे?तु कोणत्या कामाकरिता या ठिकाणी आला आहेस?||७|| अर्थ:----कटाक्षांकडे पाहून म्हणतो--- हे भगवान्, तुझे हे दोन बाण, नेत्रकमलरूप पिसाऱ्यांनी युक्त, विलासानें हळूच सूटणारे, मागे दांडा नसूनही सुंदर दिसणारे व अतितीक्ष्ण असलेल्या आग्रभागानी युक्त असे आहेत. तर या वनांत संचार करणारा तूं, हे बाण, कोणावर रोखून सोडीत आहेस तें आम्हीं जाणत नाहीं. म्हणून आम्ही भयानें एवढीच तुझी प्रार्थना करितो कीं,तुझा पराक्रम, मंदबुद्धी अशा आमच्या कल्याणार्थ असो.या ठिकाणी येणारास आम्ही म्हणातो की,तुझ्या कांही महाकल्याणकरिता आला आहेस का?किंवा कल्याणाकरिता आला आहेस असे आम्हांस सांगावे.||८|| अर्थ:----तिच्या शरीराच्या सुगंधाला लुब्ध झालेले श्रमर तिच्या मागुन जात आहेत असें पाहून म्हणतो कीं,---- हे भगवान् हे शिष्यगण आपल्या सभोवती अध्ययन करीत आहेत. आणि नित्य भगवद्भक्त अशा समंत्रक सामाचें गायन करीत आहेत. जसे ऋषिगण वेदांच्या शाखांचे सेवन करितात त्याप्रमाणे हे सर्व जग तुमच्या शेंडीतून खालीं गळलेल्या फुलांच्या वृष्टीचे सेवन करीत आहेत. ||९|| अर्थ:----तिच्या नुपुरांचा शब्द ऐकून म्हणतो--- हे ब्राहमनिष्ठा,वक्ता दिसत नसून स्पष्ट ऐकूं येणाऱ्या तुझ्या चरणसंबंधी पिंजऱ्यांतील साळुंक्यांच्या (नुपुरांतील रत्नांच्या) शब्दाला मात्र आम्ही ऐकतों,परंतु त्या बोलणाऱ्या सारिका कोठें दिसत नाहीत. नंतर तिने धारण केलेल्या पिंवळ्या वस्त्रास,ही नितंबाची (कमरेच्या मागच्या भागाची) शोभाच आहे असें समजून म्हणतो--- तुझ्या नितंबमंडळावर असलेली हि कळंबाच्या फुलांची कांती तूं कोठून संपादन केलीस? पुढें तिचा कमरपट्टा पाहून म्हणतो--- ह्या कांतीवर,फिरवलेल्या जळक्या लाकडाच्या चक्राकार अग्नीसारखे हें आहे.अरे तुझे वल्कल कोठें आहे ? ||१०|| अर्थ:----तिचे स्तन पाहून म्हणतो--- हे द्विजा,तुझ्या या सुंदर दोन शिंगांमध्ये काय बरें भरून ठेविले आहे? मनोहर असें कांहितरी आहे असे मीं समजतो.कारण,मध्येंच बारीक असणाराही तूं त्या शिंगांना मोठ्या कष्टानें धारण करितोस.त्या शिंगांमध्ये माझी दृष्टी गुंतली आहे ती दुसरेठिकाणी जात नाहीं. स्तनांना लागलेले केशर पाहून म्हणतो---हे सुंदरा, तूं आपल्या शिंगांना असा काहि सुगंधकारक तांबडा चिखल लावला आहेस की,ज्याच्या योगानें माझ्या आश्रमाला तूं सुगंधयुक्त करून टाकीत आहेस.||११|| अर्थ:----हे मित्रवर्या,जेथें राहणारा मनुष्य,आमच्या सारख्या पुरूषांच्या मनाला क्षोभ उत्पन्न करणारे असे (शिंगांसारखे) अवयव, आपल्या वक्ष:स्थळावर धारण करितो आणि मुखामध्यें बहुत आश्चर्यकारक मधुर भाषणें मंदहास्यादी विलास व अधरामृत धारण करितो,तो तुझा राहण्याचा लोक तरी कोणता? तो मला दाखीव.||१२|| अर्थ:----तिच्या तांबुलाचा सुवास आल्यावरून म्हणतो--- हे मित्रा,तुझ्या देहाचा आहार तरी कोणता आहे? ज्याच्या भक्षणानें तत्संबंधी वास सुटतो.मला तर असें वाटते कीं,--तूं खरोखर विष्णूचाच अवतार आहेस.कारण, तुझे कान,रत्नमय अशा पापण्या नसलेल्या उत्कृष्ट मकराकार कुंडलांनी युक्त आहेत आणि तुझे मुख,खरोखर भीतीने चंचल झालेल्या नेत्ररूप दोन मत्स्यांनी युक्त असून दंतरूप हंसपक्ष्यांच्या पंक्तीने शोभणारे आणि झालेल्या केशपाशरूप श्रमरसमुदायांने युक्त आहे. ||१३|| अर्थ:----जो हा चेंडू,तूं आपल्या करकमलाने ताडन करीत आहेस तो दशदिशांकडे जसजसा उडत फिरतो तसतसा तो चित्तभ्रमण झालेल्या माझ्या,नेत्रांना चंचल करून टाकीत आहे.तुझ्या कुरळ्या जटांचा कलाप मोकळा सुटला आहे,त्याचे तुला अजून स्मरण होत नाही का ! अरे,हा तुला स्पर्श करण्यास लंपट झालेला धूर्त वायू,तुझे वस्त्र हिरावून नेत आहे,याचेही तुला भान नाही काय ? ||१४|| अर्थ:----हे तपोधना,तपश्चर्या करणाऱ्या पुरुषांच्या तपाचा नाश करणारे हे स्वरूप,तूं कोणत्या बरे तपाच्या सामर्थ्याने मिळविले आहेस.हे माझ्या मित्रा,तूं आतां पुढे माझ्या सहवर्तमान तप आचरण करण्यास योग्य आहेस.अथवा तो सृष्टीची वृद्धी करणारा ब्रहमदेव,मला प्रसन्न होऊन तुलाच माझी पत्नी करील काय ? ||१५|| अर्थ:----असो ज्या तुझ्याठिकाणी आसक्त झालेले माझे मन व वृष्टी ही,दुसरेठिकाणी मुळीच जात नाहीत,त्या ब्रहमदेवाने दिलेल्या तुजमित्राला मी आतां,कधीच सोडणार नाही.हे सुंदरशिंगांच्या स्त्रिये (मनोहरस्तनी) आतां तुझे चित्त,जिकडे जाण्याची इच्छा करीत असेल तिकडे तूं अनुकूळ असणाऱ्या मला घेऊन जा.तुझ्या सख्याही अनुकूळ होऊन मला अनुसरोत. ||१६|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---याप्रामाने स्त्रियांना वश करण्याच्या कामी चतुर व देवासारखा बुध्दिमान अशा त्या अग्निध्नराजाने,ग्राम्यविषयांत चातुर्ययुक्त अशा भाषणाच्या योगाने त्या देवस्त्रील गौरवून आपल्या संमुख केले.आपण-मात्र—जीव—मात्रांनी स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या रूप—सौंदार्यांस भुलवू नये,कारण हा विषय हित न करता अहितच करीत असतो.सुख न देता दु:खच देत असतो.म्हणून आपण—जीवानी स्त्रींच्या किंवा पुरुषाच्या रूप—सौंद्रयांस भुलवू नये.आपण—जीवानी जो परमात्मा सुखरूप आहे,त्यास भुलावे,कारण आपली—जीवाची आवड व परमात्याचे स्वरूप समान—एकच आहे.आपली—जीवाची आवड समान—एकच आहे,तर ती आवड कोणती आहे ? आपण—जीवानी,आपणास—जीवास असा प्रश्न करावी की,हे जीवा तुला सर्वांत मुख्य आवड कोणती आहे ? आपले—जीवाचे उत्तर येते की,माझे—जीवाचे “सर्वं दु:ख जावो व सर्वंसुख मिळो.” आपली—जीवाची हि इच्छा फक्त “जो परमात्मा मुळीच दु:खरूप नसून,तो परमात्मा सुखरुपच आहे” या अशा प्रकारच्या—परमात्म्याच्या अनुभवानेच आपली—जीवाची इच्छा पूर्ण होते,अन्य साधनांनी पूर्ण होत नाही.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून ज्ञानाद्वारे परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||१७|| अर्थ:----त्या अप्सरेनेही,वीरसमुहाचा नायक अशा त्या राजाच्या बुद्धी,सुस्वभाव,रूप,वय संपत्ती आणि औदार्य यांच्या योगेकरून मोह पावून,त्या जंबूद्धीपाधीपतीसहवर्तमान भूमीवरील व स्वर्गावरील विषयांचा उपभोग घेतला.अप्सरेस राजाच्या बुद्धि,सुस्वभाव,रूप,वय,संपत्ती आणि औदार्याचा मोह होऊन भूमीवरील—मृत्युलोकातील सर्वंविषयांचा व स्वर्गातील सर्वविषयांचा भोग घेतला.तरी तिची इच्छा पूर्ण झाली नाही,कारण विषयांत सुख नसतेच,हि वस्तुस्थिती आहे,महणून विषयांचा भोग घेऊन इच्छा पूर्ण होत नाही.म्हणून जो परमात्मा सुखरूप आहे,त्याचीच अनुभूती घ्यावी.याकरिताच पुरुषांनी स्त्रींचा मोह करू नये व स्त्रींनी पुरुषांचा मोह करू नये.||१८|| अर्थ:----त्या राजश्रेष्ठ अग्निध्नालाही तिच्याठिकाणी,नाभी,किंपुरुष,हरीवर्ष,इलावृत,रम्यक,हिरण्यम,करू,भद्राश्व आणि केतुमाल या नांवाचे नऊ पुत्र झाले.आपण—जीवानी सत्संग करून नवविध भक्ती उत्पन्न करून मोक्ष नावाचा चौथा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावा.||१९|| अर्थ:----याप्रमाणे ती पूर्वचित्ती अप्सरा,प्रतिवर्षी एक एक याप्रमाणे नऊ पुत्रांना प्रसवून त्यांना राजाच्याच घरी टाकून नंतर ती पुन्हा ब्रहमदेवाजवळ जाऊन त्याची सेवा करूं लागली.आपण—जीवानी नऊ प्रकारची जी भक्ती आहे तिचा त्याग करून म्हणजेच नाम-रूपांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा. ||२०|| अर्थ:----ते आग्निध्नराजाचे पुत्र,मातेच्या अनुग्रहाने स्वाभाविक गुणानेच दृढशरीर व बळ यांनी युक्त असे ते,पित्याने निरनिराळे भूमीचे विभाग करून राज्यावर स्थापन केले असतां ते जंबुद्धीपाच्या आपापल्या नांवांच्या खंडांचे राज्य करूं लागले.आपणही—जीवानी सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२१|| अर्थ:----आग्नीध्रराजा,विषयांच्या भोगांविषयी अतृप्त होता,कारण आतापर्यंत विषयांच्या भोगणे कोणताच जीव तृप्त झाला नाही व पुढेही होणार नाही,कारण विषयांत सुखच नाही.जसे अंधारात मुळीच प्रकाश नसतोच,तसे विषयांत सुख नसतेच.निरंतर त्या अप्सरेलाच परमपुरुषार्थ असे मानून श्रुत्युक्त कर्माच्या योगाने तिच्या लोकाला पावला.आपणही—जीवानी जर विषय हाच पुरुषार्थ आहे असा मानून ते विषय मिळून भोगण्याचा प्रयत्न केला तर आपण जेथे विषयंच आहे अशा प्रकारच्या लोकाला म्हणजे चौऱ्याऐंसी लाख योनिलाच जाऊन विषयांचा भोग घेऊन आनंद न मिळता दु:खच मिळेल,कारण विषय हे दु:खारुंच आहेत.तो लोक असा आहे कीं,- जेथे पितर आनंद पावतात. ||२२|| | सम्परेते पितरि नवभ्रातरो मेरूदुहितृर्मेरूदेवीं प्रतिरूपामुग्रदंष्ट्रीं लतां रम्यां श्यामां नारीं भद्रां देववीतिमितिसंज्ञा नवोदवहन् ||२३|| अर्थ:----हे राजा, याप्रमाणे पिता परलोकवासी झाला असतां,त्या नाभी इत्यादिक नऊ भावांनी मेरूच्या नऊ कन्यांशी आपले विवाह करून घेतले.त्या कंन्यांची नावे---- मेरुदेवी,प्रतीरुपा,उग्रदष्ट्रीं,लता,रम्या,श्यामा,भद्रा आणि देवविती अशी होती. ||२३|| ||याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्ये आग्रीध्रचरित्रवर्णनरूप हा दुसरा(२) अध्याय तेवीस-(२३)श्लोकांनियुक्त समाप्त झाला||२|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |३---आतां या तिसऱ्या अध्यायामध्ये,ज्याच्या यज्ञांत साक्षात्-हरि प्रगत झाला व नंतर ऋषभावताररूपांने त्याचे पुत्रत्व पावला त्या नाभिराजाचे परममंगलकारक चरित्र वर्णन केले आहे.भार्येसहवार्तमान एकाग्रचित्त नाभिराजाचे चरित्र वर्णन केले आहे. |३--- नाभिराजाचे चरित्र ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | नाभिरपत्कामोप्रजया मेरूदेव्या भगवन्तं यज्ञपुरूषमवहितात्मायजत ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,पुत्राची इच्छा करणाऱ्या नाभीराजाने,अपत्यरहित अशा आपल्या मरूदेवीनामक भार्येसहवर्तमान एकाग्रचित्त होऊन यज्ञपुरुष भगवंताचे यजन केले.आपण यदाकदाचित गृहस्थाश्रमात असून जर आपणास पुत्र-संतान नसेल तर आपण पारमार्थिक कार्य करावयास पाहिजे,जसे नाभी-राजाने केले.||१|| अर्थ:----श्रध्दापूर्वक अत्यंत शुध्द अंत:करणाने यज्ञ करणाऱ्या त्या राजाची यज्ञांतील प्रवर्ग्यनांवांची कर्मे सुरु झाली असतां, द्रव्य,देश,काल,मंत्र,ऋत्विज,दक्षिणा आणि विधानयोग यांच्या संपत्तीनेही प्राप्त होण्यास दुर्लभ व आपल्या भक्तजनांस इच्छित फळे देणाऱ्या इच्छेने ज्याचे मन वेधून गेले आहे असा भगवान् भगवद्भक्तांच्या कृपाळूपणामुळे,सुंदर अवयवांनी युक्त होऊन, कोठेही पराजय न पावणाऱ्या व स्वतंत्र अशाही आपणास,सर्वाच्या मनाला व नेत्रांना आनंदविणाऱ्या अवयवांनी योगाने रमणीय व सुखकारक अशा रुपांने प्रकट करिता झाला. ||२|| अर्थ:---याप्रमाणे भगवान् प्रकट झाल्यानंतर ऋत्विज,सदस्य व यजमान (नाभिराजा) हे,जसे दरिद्री लोक,एकादा निधी प्राप्त झाला असतां त्याचा बहुमान करितात त्याप्रमाणे त्या पुरुषाकार भगवंताला पाहून ज्यांनी आपली मस्तके नम्र केली आहेत असे होत असते,त्याची पूजा करून बहुमानाने स्तुती करूं लागले.तो भगवान् असा होता की,ज्याने चार बाहू प्रकट केले होते, तो सुवर्णासारख्या तेजाने प्रकाशमान होता,पिंवळे दोन पितांबर धारण करणारा असून त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह शोभत होते,चार हातांमध्ये क्रमाने,उत्तम शंख,कमळ,चक्र आणि गदा हि आयुधें असून कंठाचेठिकाणी वनमाला कौस्तुभ इत्यादिक अलंकार दिसत होते,त्याप्रमाणेच,शरीरावर योग्यस्थळी ज्यांचे किरण फांकत आहेत,अशी मुकुट,कुंडले,कडी,करगोटा,हार,बाजुबंद, नुपुरे इत्यादिक भूषणे घातलेली असल्यामुळे तो फारच सुंदर दिसत होता.अशा प्रकारच्या भगवंताच्या रूपांचे दर्शन घ्यावे. ||३|| अर्थ:----ऋत्विज म्हणाले----हे पूज्य श्रेष्ठा,जरी तूं अत्यंत परिपूर्ण असल्यामुळे निरिच्छ—इच्छारहित आहेस तथापि तुझे सेवन अशा आम्ही केलेल्या पूजेचा वारंवार स्वीकार करण्यास तूं योग्य आहेस.हे देवा,आम्हालां तुझी स्तुती करण्याचे सामर्थ्य नाही तथापि तुला वारंवार नमस्कार करावे एवढेच आम्हांला सांधुनी शिकवून ठेविले आहे.कारण,प्रकृतिच्या गुणांच्या मिश्रणरूप प्रपंचांत ज्याची बुद्धी गढून गेली आहे म्हणूनच स्तुती करण्यास असमर्थ असा बरे पुरुष,तुझ्या स्वरूपाला न स्पर्श करणाऱ्या (प्रपंचांतील) नांवे,रूपे व आकृती यांच्या योगेकरून,प्रकृतीपुरूषांहून पलीकडचा ईश्वर अशा तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्यास समर्थ होईल? कोणीच होणार नाही. ||४|| अर्थ:----तो कदाचित् तुझ्या सकलजनसमुहाचे पातक नीरसर करणाऱ्या अतिमंगलकारक उत्तम गुणसमुहाच्या एका अंशाचे वर्णन करील परंतु त्याहून जास्ती त्याच्याने काहीच वर्णन करवणारा नाही.||५|| अर्थ:----असे जरी आहे तथापि हे प्रमेश्वरा,भक्तजनांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेली जी जग्ददाक्षरस्तुती,उदक,शुध्द पल्लव,तुलसी व दूर्वांकुर यांच्या योगानेंही संपादन केलेल्या पूजेने तूं खरोखर संतुष्ट होतोस.पूजा-सामुग्रीपेक्षा भाव श्रेष्ठ असतो,म्हणून कोणतेही पारमार्थिक कार्य भावासहित करावे.पारमार्थिक--भावास फळ आहे.||६|| अर्थ:----असें न म्हणावे तर,पुष्कळ साहित्यांनी युक्त (सर्वांगसंपन्न) अशा या यज्ञाच्या योगेकरूनही,स्वस्वरूपानेच सर्वकाळ साक्षात समन्वयेकरून अतिशये प्राप्त होणारे जे सर्व पुरुषार्थ ते ज्या पपरमानंदरुपी तुझे स्वरूपच आहेत त्या तुला’ या यज्ञामध्ये प्रकट होण्याचे काही विशेष प्रयोजन आहे असे आम्हांस वाटत नाही.तथापि हे प्रभो,विषयभोगांची इच्छा करणाऱ्या आमच्यासारख्या जनांना’ त्यानी अशी आराधना करणे’ हेच योग्य आहे.म्हणून आपण भगवंताची भक्ती करावी. ||७||८|| अर्थ:----तस्मात् हे उत्तमोत्तम पुरुषा,आपला नाश कशांत आहे किंवा आपले उत्कृष्ट कल्याण कशापासून होईल हे न जाणणाऱ्या आमच्या मूढजनांच्या करुनेंने तूं मोक्षसंज्ञक आपले महत स्थान आम्हासं प्राप्त करून देत असता,वस्तुत: पूजेच्या अपेक्षेने रहित आसनही पूजेविषयी सापेक्ष असल्यासारखा या आज्ञामध्ये आमच्या दृष्टी पडला आहेस. ||९|| अर्थ:----यास्तव हे परमपूज्या भगवंता,वर देणारांत श्रेष्ठ अशां तूं जेव्हां आपल्या भक्तजनांना (आम्हांला) आपले दर्शन दिलेस तेव्हा हाच आम्हांला वर प्राप्त झाला,असे आम्ही समजतो. ||१०|| अर्थ:---देवा,तुझे दर्शन फारच दुर्लभ आहे.कारण,वैराग्याने तीक्ष्ण झालेल्या ज्ञानरूप अग्नीच्या योगाने ज्यांनी आपल्या अंत:करणांतील रागलोभादीक सर्व मलांचे निरसन केले आहे अशा तुझ्यासारखा स्वभावाच्या आत्मस्वरूपी सममान होणाऱ्या ऋषिणा देखील ज्या तुझ्या गुणसमुदायाचे वर्णन हेच परम आनंद उत्पन्न करणारे आहे,असा तूं आहेस,म्हणजे त्यांना देखील तुझे दर्शन घडत नाही,म्हणून ते निरंतर अभ्यासाने तुझ्या गुणसमुदायाचे वर्णन करीत असतात. ||११|| अर्थ:----यास्तव हे भगवान् तुझ्या दर्शनानेंच जरी आम्ही कृतार्थ आहो तथापि एक वर तुझ्याजवळ मागून घेतों की,--- स्खलन,(ठेंच कळणे)क्षुधा,पतन,(पडणे)जृंभन,(जांभई देणे) व संकटसमय यांचे ठिकाणी व ज्वर,मरण वगैरे अवस्थांमध्येही तुझे स्मरण करण्यास अशक्य असलेल्या आमच्या मुखांतून तुझी सर्व पातकांचा नाश करणारी---भगवान्,भक्तवत्सल,दिनबंधु इत्यादिक गुनकृत (गुणांनी केलेली) नांवे उच्चार करण्यात येवोत.||१२|| अर्थ:---आणि दुसरीही आमची अशी प्रार्थना आहे की,हा राजर्षी (नाभी) पुत्राची इच्छा करणारा,पुत्राचेचठिकाणी हा पुरुषार्थ आहे असा विश्वास ठेवणारा आणि तो पुत्र तुझ्यासारखा असावा अशी इच्छा करणारा असल्यामुळे,ऐहिक विषयभोग,स्वर्ग व मोक्षही देणाऱ्या तुझे,जसा धनहीन पुरुष,कोंडा किंवा कांही धान्यकण मिळण्याच्या आशेने धनाढ्य पुरुषांचे आराधना करितो त्याप्रमाणे आराधन करीत आहे.||१३|| अर्थ:----हें तरी विशेष आश्चर्य म्हणन्यासारखे नाही.कारण,या संसारामध्ये महात्म्या पुरुषांची चरणसेवा न करणारा असून जिचा मार्ग (ही कोठून आली असा) निश्चित होत नाही व जिचा पराजय कोणाच्यानेही करवत नाही अशा तुझ्या मायेने पराभव व बुद्धीभ्रंश न केलेला व विषयरूपी विषाच्या वेगाने ज्याच्या स्वभावाला गुंग केले नाही असा कोण बरे पुरुष आहे? कोणीच नाही. ||१४|| अर्थ:----हे पुष्कळ कार्ये करणाऱ्या देवदेवा,तुला आम्ही जे येथे पुत्रप्राप्तीरूप स्वल्प कार्य करण्यासाठी बोलविले आहे त्यामध्ये कार्याथ,अज्ञानी व मंद अशा आम्हांकडून जी अवज्ञा घडली असेल ती,ज्ञानी व अज्ञानी या सर्वांना समबुद्धीने मानणारा तूं सहन करण्याविषयी योग्य आहेस.आपण भगवंताची भक्ती करून संसारातील नाशिवंत विषयांची--पुत्राची मागणी करू नये.नाभी-राजाने मागणी केली.आपण जीवाकडे मागणी करण्यापेक्षा देवाकडे मागणी केलेली बरे असते. ||१५|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,याप्रमाणे गद्यरूप स्तोत्राने स्तुती केलेला तो देवश्रेष्ठ भगवान् नाभीराजाने वंदन केलेल्या ऋत्विजांनी ज्याच्या चरणांला वंदन केले आहे असे होता सद्य अंत:करणाने म्हणाला की-------------- ||१६|| अर्थ:----श्रीभगवान् म्हणाला----हे ऋषीहो,काय सांगावे! सत्यभाषण करणाऱ्या तुम्ही माझ्याजवळ’ या राजाला माझ्यासारखा पुत्र व्हावा’ असा दुर्लभ वर मागितला आहे,आणि पाहूं गले असतां माझ्यासारखा मीच आहे दुसरा कोणी नाही,तथापि ब्राह्मणाचे भाषण खोटे होण्यास योग्य नाही.कारण,ब्राहमण क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिन्ही द्विजाती वर्णात श्रेष्ठ जे ब्राहमण त्यांचे कुल हे माझेच मुख आहे.ब्राह्मण श्रेष्ठ आहे,कारण तो सत्वगुणी असतो.वेदांत—ज्ञानी असतो.जीवाना अज्ञान मार्गातून काढून ज्ञान—मार्गाकडे नेत असता उपदेशाचे दान म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा मोबदला घेत नसतो ,म्हणून जो ब्राह्मण निष्काम आहे,तो ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आहे व जो ब्राह्मण ज्ञान—दान करीत नाही तो श्रेष्ठ नाही,म्हणून ज्ञान—दानाचा मोबदला ब्राह्मणांनी घेऊ नये,कारण त्यामुळे त्याचे ब्राहमणत्व नष्ट होते.||१७|| अर्थ:----यास्तव ऐश्वर्यादिकांनी माझ्या सारखा दुसरा पुरुष कोठेच दृष्टी पडत नसल्यामुमळे मीच,ह्या नाभीराजाच्या पोटी अंशाने अवतार धारण करीन.||१८|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----याप्रमाणे मेरुदेवी राणी पाहत असतां तिच्या पतीला (नाभिराजाला) सांगून भगवान् तेथेच अंतर्धान पावला.||१९|| | बर्हिषि तस्मिन्नेव विष्णुदत्त भगवान् परमर्षिभि: प्रसोदितो नाभे: प्रियचिकीर्षया | तदवरोधायने मेरूदेव्यां धर्मान्दर्शयितुकामो वातरशहाणानांश्रमणानामृशीणामूर्ध्वमन्थिनां शुक्ल्या तनुवावतातर ||२०|| अर्थ:----हे परीक्षित राजा, याप्रमाणे नाभीराजाच्या त्या यज्ञामध्ये ऋत्विजानी प्रसन्न केलेला जो भगवान् त्याने,दिगंबर,तपस्वी, ज्ञानीं व नैष्ठीकब्रहमचारी यांचे धर्म आचरण करू न प्रसिध्द करण्यासाठी व नाभीराजाचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याच्या अंत:पुरामध्ये मेरूदेवीच्याठिकाणी शुध्द सत्वात्मक मूर्तीने अवतार धारण केला.||२०|| ३---याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें हा तिसरा(३) अध्याय वीस(२०)श्लोकांनी समाप्त झाला.||३|| ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||सदगुरुचरणार्पणमस्तू|| ________________________________________________________________________________________४---आतां पुढे चतुर्थादिक तीन अध्यायांनी,ज्याने लोकांवर उपकार करण्यासाठी सत्कर्मांचे व योगचर्याचे आचरण करून दाखवले,त्या ऋषभरूपी हरीचे चरित्र वर्णन केले आहे.त्यात चवथ्या अध्यायांमध्यें,ज्या राजामध्ये सर्व जन संतोषरूपअमृताने अत्यंत तृप्त झाले,त्या ऋषभदेवाचे राज्य वर्णन केले आहे. ४--- ऋषभदेवांचे—राज्यशासन ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | अथ ह तमूत्पत्त्यैवाभिव्यज्यमानभगवल्लक्षणं साम्योपशमवैराग्यैश्वर्यमहाविभूतिभिरनुदिनमेध- | मानानुभावं प्रकृतय: प्रजा ब्राम्हणा देवता-श्चावनितलसमवनायातितरां जगृध: ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राज; अवतार झाला असतां उत्पत्तीच्याच योगेकरून ज्याच्या पादतलादिकांचे ठिकाणी वज्रांकुशादीक भगवंताची चिन्हे व्यक्त दिसत आहेत व समता,शांती,वैराग्य,एश्वर्य व सर्वांना,ह्या मुलानेच पृथ्वीचे संरक्षण करावे अशी उत्कट इच्छा उत्पन्न झाली.नाभी-राजाच्या तपामुळे व मागणीमुळे स्वत: भगवंतच ऋषभ—रूपाने जन्मास आले.||१|| अर्थ:----याप्रमाणे मोठया देहाने,कीर्तीने,तेजाने,बलाने,संपत्तीने,यशाने,प्रभावाने व शौर्याने युक्त असलेल्या त्या पुत्रांचे पित्याने (नाभिराजाने) ऋषभ (श्रेष्ठ) असे नांव ठेविले.||२|| अर्थ:----त्या पुत्राची ऐश्वर्यादिक पाहून त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या भगवान् इंद्राने,त्याच्या खंडांत (राष्ट्रमंडळांत) पर्जन्यवृष्टी मुळीच केली नाही,ते जाणून योगेश्वर भगवान् ऋषभ देवाने हास्य केले आणि योगमायेच्या प्रभावेकरून’ अजनाभ’ या नांवाच्या आपल्या खंडांत वृष्टी पाडिली.आपण—जीवानी भगवंताविषयी—जीवाविषयी द्वेष-बुद्धि न ठेवता मित्र-भावना ठेवावी व प्रेम संपादन करावे.||३|| अर्थ:----नाभिराजा तर इच्छेप्रमाणे उत्तम पावोन अतिशय प्रेमभराने विव्हळ होत असता सद्गदित झालेला वाणीने,ज्याने स्वेच्छेने मनुष्याकार स्वीकारला आहे अशा भगवान् पुराण पुरुषाला,हे वत्सा,हे वत्सा,हे वत्सा,हे ताता,अशी प्रेमभावाने संबोधने देऊन मायेने हा आपला पुत्र आहे अशी बुद्धी धारण करणारा तो राजा,त्याचे लालन करीत असतांना परम संतोष पावला.आपण्साही भगवंताची साधू—संतांची—महात्म्याची सेवा करून समाधानी असावे.||४|| अर्थ:--नंतर नागरिक जणांच्या मताप्रमाणे वागत असलेला तो नाभिराजा,नगरवासी जनांपासून तो प्रधानमंडळापर्यंत सर्वलोक आपल्या पुत्रावर प्रेम करीत आहेस असे जाणून,समयानुरूप धर्ममर्यादांचे संरक्षण करण्याकरितां,त्या ऋषभपुत्राला राज्यचेठिकाणी अभिषेक केला व त्याला ब्राहमणांच्या स्वाधीन करून,आपण आपल्या मेरुदेवीनामक भार्येसहवर्तमान बदरीकाश्रमामध्ये जाऊन, दुसऱ्याला उपद्रव न करणारे व तीव्र अशा तपाने व एकाग्र मनाच्या समाधीयोगाने,नरनारायननामक भगवान् वासुदेवाची उपासना करून कांही काळाने त्याच्या महिम्याला पावला. (जीवन्मुक्त झाला) आपण जर गृहस्थाश्रमात असाल तर,आपला गृहस्थाश्रमाचा कारभार पुत्राकडे सोपवून सत्संग करण्याकरिता साधूच्या--महात्म्याच्या आश्रमान सत्संग करण्याकरिता व सेवा करण्याकरिता निवास करावा.सत्संग केल्यानंतर परमात्म्याचा अनुभव येऊन जीवनमुक्ती संपादन करावी. ||५|| अर्थ:----हे पांडवकुलोत्पन्ना राजा, त्याचे हे पुरातनकाळचे दोन श्लोक वर्णन करितात की----ज्याच्या भक्तीपूर:सर केलेल्या यज्ञानुष्ठानरूप कर्मानें हरीसुध्दां पुत्रत्व पावला—पुत्र-रूपाने जन्मास आला.त्या नाभिराजाचें प्रसिध्द असलेले ते कर्म त्याच्या पश्चात कोण बरे पुरुष आचरण करील? कोणीही करणार नाही,कारण भगवंताइतके सामर्थे मनुष्य देहात नसते.||६|| अर्थ:---ज्याच्या यज्ञामध्ये यथेच्छ दक्षिणा देऊन पूजन केलेल्या ब्राहमणांनी,आपल्या प्रभावाने,यज्ञाधीपती अशा भगवंतालाही प्रत्यक्ष दाखविले त्या नाभिराजाहून दुसरा त्याच्यासारखा ब्राह्मणभक्त कोठे बरे आहे? कोठेच नाही.म्हणून आपण ब्राह्मणभक्त—म्हणजे जीव-ब्रह्म-ऐक्य ज्ञानाने संपन्न असून इतरांना निष्काम ज्ञान—दान करून इतरांचा उद्धार करावा,त्यास ब्राह्मण असे म्हणतात.||७|| अर्थ:----असो इकडे नाभिराजाच्या पश्चात राज्य करणाऱ्या त्या भगवान् ऋषभदेवाने,आपले खंडच स्वर्गाला किंवा मोक्षाला साधनभूत असे कर्मानुष्ठान घडण्याचे क्षेत्र आहे असे जाणून,गृहस्थांनी धर्माचरण कसे करावे त्याचे शिक्षित करण्याकरितां स्वत: गुरूच्या घरी वास करून वेदाध्ययन केले,कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करीत असतात,म्हणून स्वत:सदगुरुगृही राहून आध्यात्म-विध्या संपादन केली.नंतर इच्छित दक्षिणा मिळालेल्या गुरुनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याविषयी त्याला आज्ञा दिली असतां—सदगुरुच्या अज्ञानुसार गृहस्थाश्रमात प्रवेश केला.त्याने गृहस्थाश्रम स्वीकरून शास्त्रांत सांगीतलेल्या श्रुत्युक्त अशा दोन्ही प्रकारच्या श्रौतस्मार्त कर्माचे अनुष्ठान चालविले आणि इंद्राने दिलेल्या जयंतीनामक कन्येच्या (आपल्या मार्येच्या) उदरी गुणादिकांनी आपल्यासाखे शंभर पुत्र उत्पन्न केले. ||८|| अर्थ:----त्यांच्यामध्ये ज्येष्ठपुत्र भरत,तो प्रजानुरंजनादिक अत्युत्तम गुणांनी युक्त व महायोगी होता,ज्या भरताचे उत्तम गुण असल्यामुळे त्याच्या या खंडालाही सर्वलोक ‘भरतखंड’ असे म्हणतात. ||९|| अर्थ:----त्याच्या मागचे-कुशावर्त,इलावर्त,ब्रह्मावर्त,मलय,केतू,भद्रसेन,इंद्रस्पक,विदर्भ आणि कीटक असे हे नऊ पुत्र नव्वदांपेक्षा वडील होते ||१०|| अर्थ:----व त्या नव्वदांपैकी,कवि,हरी,अंतरिक्ष,प्रबध्द,पिप्पलायन,आविर्होत्र,द्रुमिल,चमस आणि करभाजन हे नऊ पुत्र भागवतधर्माचा उपदेश करणारे झाले.त्यांचा पुढे वंश झाला नाही.आपणही—जीवानी ज्ञानसंपन्न होऊन—ज्ञान-पुत्र प्राप्त करून ब्रह्मचार्याचे पालन करून ज्ञान—दान कार्य करावे.ते जन्मापासूनच भगवंताची एकनिष्ठ भक्ती करणारे होते. त्यांचे भगवंताच्या माहात्म्याने भरलेले व शांतीचे केवळ निधानच असे उत्तम चरित्र वसुदेव-नारदसंवादरूपाने पुढे एकादस्कंधामध्ये आम्ही वर्णन करू. ||११|| ||१२|| अर्थ:----भगवान् ऋषभदेवही ईश्वर,स्वतंत्र,व केवळ आनंदानुभवरुपी असल्यामुळे ज्यापासून सर्व अनर्थपरंपरा नित्य दूर झाल्या होत्या,असा तो सर्वांचेठिकाणी समदृष्टी,रागलोभादिदोषरहित्त,सर्वांच्या हिताविषयी प्रयत्न करणारा व सर्वांवर दया करणारा होता.आपणही—जीवानी अनर्थ ज्या परंपरा आहेत त्यांचे पालन न करता त्याग कराव्या व इतरांनाही त्या अनिष्ट परमंपरा-- पासून परावर्त करावे.तथापि तो असमर्थ जीवांसारखे कर्म आचरण करीत असता कालाने उच्छिन्न झालेल्या धर्माचे स्वत:आचरण करून धर्माचरण न जाणणाऱ्या लोंकाना शिकवीत शिकवीत धर्म,अर्थ,सत्कीर्ती,पुत्रादि संतती व विषयभोगजनित आनंद,यांच्या संग्रहाने सर्वलोकांनां स्वेच्छाचारापासून निवृत्त करून शास्त्राचाराचेठिकाणी योजिता झाला.आपणही—जीवानी परधर्मापासून—अधर्मांपासून परिवर्तन करून स्वधार्माकडे आचरण करण्यास परिवर्तन करावे.||१४|| अर्थ:----कारण,श्रेष्ठ पुरुषाने चांगले किंवा वाईट जे कर्म आचरण केले असेल तेच इतरही लोक आचरण करितात,म्हणून श्रेष्ठ-पुरुषांनी विधीनुसार आचरण करावे व निषिद्धानुसार आचरण करू नये.||१५|| अर्थ:----सर्व धर्मानी युक्त असे वेदाने सांगीतलेले धर्मरहस्य जरी त्या ऋषभदेवाला स्वत:ला ठाऊक होते तथापि त्याने ते ब्राहमणांना विचारून त्यानी सांगीतलेल्या मार्गानेच सामादिक—साम—समजावून सांगणे,दाम—आर्थिकदृष्ट्या प्रलोभनाने,दंड—आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या दंड किंवा,भेद—आपापसात—जीव-जीवात भेद करून या उपायांनी सर्व लोकाना शिकविले.||१६|| अर्थ:----आणि त्याने द्रव्य (ब्रीह्यादिक),देश (वसंतादिक),वय (तारुण्यादिक),श्रद्धा,ऋत्विज आणि नानाप्रकारचे देवतांचे उद्देश यांनी समृध्द अशा सर्व प्रकारच्याहि यज्ञांनी यज्ञेश्वर भगवंतचे यथाशास्त्र शंभरवेळां यजन केले. ||१७|| अर्थ:----त्या भगवान् ऋषभाने रक्षण केलेल्या या भरतखंडामध्ये अंत्यजादी नीचयोनीमध्ये उत्पन्न झालेलाही कोणी पुरुष, मुळीच नसणाऱ्या आकाशपुष्णादिक वस्तुंप्रमाणे,सर्वलोकपोषण अशा ऋषभदेवाचेठिकाणी प्रतीक्षणी वृद्धीगंत झालेल्या स्नेहातिशयावांचून दुसरी कोणतीही वस्तू कधीही कोणत्याही कारणाने दुसऱ्याकडून आपणाला अशी इच्छा करीत नसे.आपणास—जीवास इतरांची वस्तूविषयी आवड नसावी.व ती वस्तू आवश्यक असे वाटल्यास दुसऱ्याची आहे असेही पाहत नसे. ||१८|| | स कदाचिदटमानो भगवानृषभो ब्रह्मावर्तगतो ब्रहमर्षी प्रवरसभायां प्रजानां निशामयन्तीना- | मात्मजानवहितात्मन:प्रश्रयप्रणयभरसुयन्त्रिता- नप्युपशिक्षयन्निति होवाच ||१९|| अर्थ:----तो भगवान् ऋषभदेव,एकेवेळी भूमीवरपर्यटन करीत असतां ब्रह्मावर्तक्षेत्रांत जाऊन,तेथे अतिश्रेष्ठ ब्रहमर्षीच्या सभेमध्ये सर्व प्रजा श्रवण करीत असतां,अंत:करणाचा निग्रह केलेल्या व नम्रता आणि प्रेम ह्यांच्या अतिशयामुळे उत्तम वर्तन असलेल्याही आपल्या पुत्रांस सर्वप्रजांना समजण्याकरितां उपदेश करीत असता असे म्हणतात की,----------- ||१९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कांधामध्ये हा चौथा अध्याय एकोणीस(१९)श्लोकांनी समाप्त झाला. |याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्ये हा चवथा(४) अध्याय एकोणीस(१९)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||४|| || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीकृष्णारपणर्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ ५---आतां या पांचव्या अध्यायामध्ये ऋषभदेवाने,मोक्ष-धर्माचा उपदेश करणाऱ्या वाक्यांनी पुत्रांना केलेल्या शिक्षकांचे व त्याने स्वत: सुखदु:खादिक द्वंद्वे सहन करून केलेल्या परमहंस-धर्माच्या आचरणाचे वर्णन केले आहे. |५--- ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वत: अवधूतवृत्ती धारण करणे ________________________________________________________________________________________|ऋषभ उवाच:--- | नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामानर्हते विङ्भुजां ये | | तपो दिव्यं पुत्रका येन सत्त्वं शुद्धयेद्दस्माद् ब्रम्हसौख्यं त्वनन्तम् ||१|| अर्थ:----ऋषभदेव म्हणाला----हे पुत्रहो,या मनुष्यलोकाचेठिकाणी प्राण्यामध्ये प्राप्त झालेला हा मनुष्यदेह,विष्ठा भक्षण करणाऱ्या श्वानसुकरादिकांनाही प्राप्त होणारे जे विषयभोग त्यांचे सेवन करण्यास योग्य नाही,म्हणजेच आपण—जीवानी मानुषा—देहात आल्यानंतर विषयांचा भोग न घेता आत्मसुखाचा भोग घ्यावा,कारण विषयांचा भोग क्षणिक आहे तर आत्मा-सुखाचा भोग सुखरूप आहे.म्हणून आपण—जीवानी तर ज्याच्या योगाने अंत:करण शुध्द झाले असतां अखंड ब्रहमसुखाची प्राप्ती होते ते स्वधर्माचरणरूप उत्कृष्ट तपच आचरण करण्यास योग्य आहे. ||१|| | महात्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते- | स्तमोव्दारं योषितां संङगीसंङम् | | महान्तस्ते समचित्ता: प्रशांन्ता - | विमन्यव: सुहृद: साधवो ये ||२|| अर्थ:----हे पुत्रहो,मोठमोठे विचारी पुरुष,साधुंची सेवा करणे हेच मुक्तीने द्वार आहे असे म्हणतात आणि स्त्रीलंपट असलेल्या पुरूषांची संगती धरणे हेच नरकाचे द्वार आहे असे म्हणतात.म्हणून आपण—जीवानी साधूंची सेवा करावी व विषयांचा जे भोग घेतात त्यांच्या संगीताचा त्याग करावा.त्या साधूंचे लक्षण असे आहे की,----जे अत्यंत शांत,क्रोधरहित,सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समबुद्धी धारण करणारे व सदाचारसंपन्न असतात तेच माहात्म्ये साधू होत.त्यांच्या अंगी जे गुण आहेत,ते गुण आपल्यात—जीवात आणण्याचा प्रयत्न करावा.||२|| | ये वा मायीशे कृतसौहृदार्था - | जनेषु देहम्भरवार्तिकेषु | | गृहेषु जायात्मजरातिमत्सु | न प्रितियुक्ता यावदर्थाश्च लोके ||३|| अर्थ:----अथवा मी जो ईश्वर त्याचे ठिकाणी केलेले सख्य (प्रेम) हेंच ज्याचा पुरुषार्थ आहे.आपले—जीवाचे प्रेम भगवंतावर--- किंवा साधूवर असावे,तर देहसंबंधाविषयी नसावे.आपणास—जीवास देहनिर्वाहापेक्षां वस्तुंची इच्छा नसावी आणि ज्यांच्यामध्ये पोट भरण्याच्या संबंधाच्याच वाती निघत असतात त्या लोकाचेठिकाणी व स्त्री,पुत्र आणि द्रव्य यांनी युक्त असलेल्या गृहाचेठिकाणी आपणास—जीवास प्रीती असावी.अशा वृत्तीच्या लोकांना साधू—महात्मा असे म्हणतात.म्हणून आपण—जीवानी साधू बनण्याचा प्रयत्न करावा,कारण त्यांना आनात्मा—पदार्थांविषयी आसक्ती नसते,तर आत्मपदार्थांविषयी आसक्ती—प्रेम आसते. ||३|| अर्थ:----हे पित्रहो,जेव्हां हा पुरुष दुष्टांच्या संगतीच्या योगाने आपल्या इंद्रियांची तृप्ती करून घेण्यासकरितां खटपट करितो तेव्हां खरोखर उन्मत्त झाल्यासारखा (करावे काय व न करावे काय यांच्या अनुसंधानाने रहित) होऊन पापकर्म आचरण करितो,ते मी चांगले असे मानीत नाही.म्हणून जे दुष्ट काम,क्रोध,लोभ,मोह,भय,मद,व मत्सर आहेत त्यांची संगती करू नये,कारण संगतीचा परिणाम होत असतो—म्हणजे त्यांच्यासारखेच आपण दुष्ट होतोत.म्हणून त्यांच्या संगतीचा विवेकापुर्वक त्याग करावा म्हणजे त्यांच्यासारखे आपण—जीव आचरण करणार नाहीत.पूर्व जन्मातील संस्कारामुळे आपल्या—जीवाकडून पापाचरण होत आहे,म्हणून सत्संग करावा.सत्संग केला असता हे दुर्जन आहे असे कळत असते,असे कळल्यानंतर त्यांचा त्याग होत असतो.कारण,त्या पूर्वी केलेल्या पापकर्मांच्या योगेकरूनच हा देह वस्तुत: मिथ्याभूत असतांही आत्म्याला क्लेश देणारा झाला आहे.त्यांची—कामा,क्रोध,लोभ,मोह,भय,मद आणि मत्सर यांची संगती केल्यामुळे आत्मा हा सुखरूप असून दु:खरूप वाटत आहे.म्हणून त्यांना आपल्या—जीवाच्या ताब्यात घ्यावे.जीवांनी—आपण त्यांच्या ताब्यात जाऊ नये. ||४|| अर्थ:----जोपर्यंत प्राणी,आपल्या खऱ्या सच्चीदांनदस्वरूपाच्या विचाराची इच्छा करून त्याचा साक्षात्कार करून घेत नाही तोपर्यंत त्याला आज्ञानेकरून झालेला स्वरूपविस्मृतीरूप पराभव प्राप्त होतो म्हणजे जोपर्यंत आज्ञानाने देहाभीमान असतो तोपर्यंत नित्यनैमित्तीकादिक कर्मे सुटत नाहीत व जोपर्यंत ती कर्मे आहेत तोपर्यंत हे मन प्रवृत्तिस्वभावानेच युक्त होते त्याच्या योगाने संसारबंध प्राप्त होतो.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून आपण—जीव सत्-चित्-आनंद आहोत म्हणजे आपल्या स्वरूपाचे विस्मरण झालेले असल्यामुळे जे आपण नाहीत,म्हणजे असत्-जड-दु:खरूप—देह आपण—जीव नसून त्यासच आपण आहोत असे समजून व्यवहार करू दु:खास भोगत आहोत.जे देहसंबंधी आपले नसून त्यांना आपण—जीव आपले समजत आहे,त्याचा परिणाम म्हणून आपण—जीव चौऱ्याऐंसी लाख योनीस जाऊन दु:ख भोगीत आहे,म्हणून आपण—जीवानी सत्संग करून देह मी नाही व देहसंबंधी माझे नसून मी परमात्मा—ब्रह्म आहे असा निश्चय करून जीवन जगावे.असा परमात्म्याचा अनुभव घेतला असता आपल्या चौऱ्याऐंसी लक्ष योनी प्राप्त होणार होणार नाहीत,त्यामुळे आपणास—जीवास दु:ख प्राप्त न होता सुखरूपता प्राप्त होणारच,कारण आपण मुळचे सुखरूप आहोतच.||५|| भावार्थ:---याप्रमाणे देहादिकांच्या अध्यासेकरून म्हणजे देह मी आहे व देहसंबंधी माझे आहेत,असे आत्म्याचे आच्छादन झाले असतां पूर्वी केलेलं कर्मच—कर्माचे संस्कार पुरुषाच्या मनाला आपल्या स्वाधीन करून घेते म्हणजे त्या पुरुषकडून वांरवार संस्कारामुळे कर्मेच करविते.म्हणून जोंपर्यंत पुरुषाला वासुदेव अशा माझेठिकाणी प्रीती उत्पन्न झाली नाही तोंपर्यंत तो पुरुष देहसंबंधापासून मुक्त होत नाही.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून वासुदेवाविषयी प्रीती निर्माण करावी.आपणास—जीवास वासुदेवाविषयी प्रीती निर्माण झाल्यामुळे देह विषयी व देहसंबंधीविषयी प्रीती निवृत्त होते.त्यामुळे आपणास—जीवास संसारबंध न राहता जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते.||६|| अर्थ:---जेव्हां स्वार्थाविषयी असावध व मीच विद्वान असा अभिमान धारण करणारा हा पुरुष,स्त्रीसंगी पुरूषांच्या नादी लागून, इंद्रियांची विषयासक्तीरूप चेष्टा मिथ्याभूत आहे’ असे पाहत नाही (विषयासक्त होतो) तेव्हा तो आज्ञानी पुरुष,एकाएकी आपल्या स्वरूपस्थीतिला विसरून,ज्यामध्ये मैथूनसुख हेच मुख्य आहे अशा घराचा आश्रय करून,तेथे नानाप्रकारची दु:खे पावतो.आपण—जीव जेव्हा स्वर्थाविषयी असावध—अज्ञानी असतो त्यामुळे मीच विद्वान असा अभिमान धारण करितो,कारण अंत:कारण जेवढे शुद्ध असावयास पाहिजे,तेवढे अंत:कारण शुद्ध झालेले नसते,म्हणून अहंकार निवृत्त होत नाही.अहंकार निवृत्त न झाल्यामुळे विषयांचा त्याग न होता भोग घडतो म्हणजेच विषयासक्ती वाढते,त्यामुळे मैथुन-सुखातच आनंद आहे असे म्हणून त्या मैथुन-सुखातच रममाण—विषयासक्त होतो.म्हणून अनेक प्रकारच्या दु:खास प्राप्त होतो.म्हणून जीवानी निष्काम कर्मे करून अंत:करण शुद्ध करून व निष्काम उपासना करून अंत:करण स्थिर करून घ्यावे.त्यानंतर सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून ज्ञानाचा अनुभव घ्यावा.||७|| | पुंस: स्त्रिया मिथुनी भावमेतं | तयोर्मिथो हृद्यग्रन्थिमाहु: | | अतो गृहक्षेत्रसुताप्त वित्तै - | र्जनस्य मोहोऽयमहं ममेति ||८|| अर्थ:----पुरुष व स्त्री ह्या उभयतांचा परस्पर असलेला जो ‘हि आपली स्त्री व हा आपला पती असा’ अभिमान आपण—जीवानी सत्संग करून निवृत्त करावा,कारण आपण परमात्म्याचे आहोत.त्याला—आपल्याला—जीवाला हा मोठाच दुसरा दुर्भेद्य ह्रदयग्रंथीच्या—अज्ञानाच्या योगाने—संबंधाने देहेद्रीयादिकांचेठिकाणीमात्र’ मी आणि माझें’ असा अभिमान असतो.म्हणून अज्ञानाचा व आपला—जीवाचा संबंध निवृत्त करण्यासाठी संत—महात्मा यांचा सत्संग करावा,कारण सत्संग केला असता आपल्या—जीवाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान प्राप्त होते.ज्ञान प्राप्त झाले असता अज्ञानाचा आपला—जीवाचा संबंध निवृत्त होतो,कारण ज्ञान होते.ज्ञान आणि अज्ञानाचा संबंध होऊ शकत नाही,कारण जसे अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही,रात्र आणि दिवस एकत्र राहू शकत नाही.या मिथुनीभावाच्या योगेकरून तर प्राण्याला- घर,क्षेत्र,पुत्र,आप्त,द्रव्य इत्यादिकांच्याठिकाणी’ ‘हि माझे आहेत’ असा मोठाच मोह प्राप्त होतो.म्हणून आपण—जीवानी स्त्री व पुरुष यांचा जो संबंध मैथुन आहे,त्याचा भोग न घेता त्याग करावा.त्याग केला असता पुत्र उत्पन्न होणार नाही व पुत्र उत्पन्न न झाल्यामुळे घर,द्रव्य यांचा संबंध राहणार नाही व त्यामुळे सत्संग होईल व सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त होईल व ज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त होईल व मोक्षाद्वारे आपला—जीवाचा परमात्मा तत्व एकच आहे असा अनुभव येईल.आपल्या—जीवाच्या प्रारब्धाचा भोगून क्षय झाल्यानंतर सूक्ष्म-देहाच्या तत्वात सूक्ष्म—देहातील तत्व एकरूप होतील,म्हणून स्थूल शरीर उत्पन्न होणार नाही व आपण—जीव हा तर परमात्मा-तत्व आहे जे सुखरूप आहे ते तर अनादि-अनंत आहेच.||८|| | यदा मनोहृद्यग्रन्थिरस्य | तायोर्मिथो हृद्यग्रन्थिमाहु: | | तदा जन: सम्परिवर्ततेऽस्माद् | मुक्त: परं यात्यतिहाय हेतुम् ||९|| अर्थ:----यास्तव जेव्हां या जनाचा कर्माच्या योगाने बांधला गेलेला हा मनोरूप दृढ ह्रदयग्रंथी,शिथील होतो—मिथात्व निश्चय होतो,तेव्हांच हा जन,या मिथुनीभावादीरूप संसारापासून विमुक्त होऊन अनर्थाला कारणभूत अशा अहंकाराचा त्याग करून संसारापासून मुक्त होत असता परमपदाप्रत पावतो.||९|| अर्थ:---आतां अहंकारनिवृत्तीविषयी साधनें सांगतात---आपण—जीवानी हे पुत्रहो,१—विवेकाद्वारे--सदसद्वीवेकयुक्त—अधिकारसंपन्न होऊन अशा--श्रोत्रीय,ब्रह्मनिष्ठ,आणि कृपाळू गुरुरूपी माझेठिकाणी भक्ती करणे,माझी सेवा करणे,माझ्या सेवेत तत्परता राखणे,२--भोगेच्छ सोडून देणे—विषयांच्या भोगाचा त्याग करणे—वैराग्य-युक्त होऊन,३—(१)शीतोष्णादीक—सुखदु:खादिक- द्वंद्वें सहन करणे—अनुकूलता—प्रतीकुलता कष्टरहित सहन करणे,(२)शम—मन आपल्या—जीवाच्या ताब्यात घेणेम्हणजेच आपण—जीवानी मनानुसार न वागणे,(३)—इंद्रियें—इंद्रियें ताब्यात घेणे,म्हणजेच इंद्रियें म्हणतील त्यानुसार आचरण न करणे.(४)उपरती—सर्व प्रपंचपासून निवृत्ती—सर्व विषयांपासून निवृत्ती—चौथा जो पुरुषार्थ मोक्ष त्याची प्राप्ती—जन्म—मरण निवारणाची प्राप्ती.(५)श्रद्धा—ब्रह्मनिष्ठ सदगुरुंच्या त्याचप्रमाणे वेदांत—शात्रातील वाक्यांच्या ठिकाणी भक्ती—श्रद्धा. (६)समाधान—सच्चितस्वरूप जाणून घेतेवेळी केलेली चित्ताची एकाग्रता व ४—मुमुक्षता—संसारबंधनापासून त होण्याची जी तीव्र इच्छा तीस मुमुक्षता म्हणजे मोक्षेच्छा असे म्हणतात.असा चार साधनांनी संपन्न मनुष्य या पंचीकरणाचा अधिकारी आहे. ५--प्राण्याला यालोकी व परलोकी दु:खेंच भोगावी लागतात असे मनांत वागविणे,म्हणून त्या दु:ख नको अशी भावना असलेला, ६—जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानप्राप्तीची इच्छा धारण करणे,७—काम्य कर्मे करण्याचे सोडून देणे म्हणजेच निष्काम कर्मे करणारा—मृत्यू-लोकातील सर्व विषयांचा त्याग करणे व सर्व परालोकांतील सर्व विषयांचा त्याग करणे,कारण त्यामुळे आपले—जीवाचे अंत:करण शुद्ध होते.७---निष्काम उपासना करणे,त्यामुळे आपले अंत:करण स्थिर होते. ||१०|| अर्थ:----आपण—जीवानी १--सर्व कर्मे माझ्या—भगवंताच्य प्रीत्यर्थ—निमित्य करीत जाणे,२--नित्य माझ्या—भगवंताच्या कथा वर्णन करणे—ऐकणे,३--जे लोक मला—व भगवंतास आपला देव मानितात त्यांचा समागम करणे—संत—महात्मा जे वेदांती आहेत,त्याचा सत्संग करणे,४--माझ्या—भगवंताच्या गुणांचे गायन करणे,५--कोणाशीहि वैर न करणे,कारण प्रत्येकात भगवंतच आहे.६--समदृष्टी—ज्याच्या-त्याच्या अधिकारानुसार त्यांना त्याप्रमाणे समजने--ठेवणे,७--शांती धारण करणे—अनुकूल व प्रतिकूल परीस्थित शांत राहणे,कारण भोग हा प्रारब्धानुसार असतो,८--शरीर व घर ह्यांवरील अहंता व ममता तोडण्याची इच्छा धारण करणे—शरीर मी आहे हि अहंता व शरीरसंबंधी माझे आहेत हि ममता यांचा त्याग करणे,जसे घर व मी एक नसून घरात राहणारा मी माणूस घ्रवून वेगळा आहे,त्याचप्रमाणे शरीर मी नसून शरीरात राहणारा जीवात्मा शरीराहून वेगळा आहे असे समजून व्यवहार करणे.||११|| अर्थ:----९--आपण जीवानी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास चालविणे—चिंतन करणे व इतरांना वक्ता म्हणून शिकवणे.१०--एकांतस्थळी वास करणे,कारण एकांतात मन स्थिर असते,जेथे मन स्थिर असते,तेथे चिंतन होत असते,तर लोकांतात मन अस्थिर असते,जेथे मन अस्थीर असते,तेथे चिंतन होत नसते.११--प्राण,इंद्रिये व मन यांना पूर्णपणे स्वाधीन ठेवणे—म्हणजे प्राणाचा व मनाचा व्यय अनात्म्याच्या ठिकाणी न करता आत्मा-चिंतनात लावणे,१२--गुरुवेदांतवाक्यांवर उत्तमप्रकारे विश्वास ठेवणे—म्हणजेच श्रद्धा हि सदगुरू व वेदांत—शात्रावर ठेवणे—सदगुरू म्हणतील तेच योग्य आहे—हिताचे आहे व वेदांत--शात्र जे सांगेल त्यातच आपले हित आहे असा दृढ निश्चय असणे,१३--निरंतर ब्रहमचर्यव्रत धारण करणे,कारण ब्रह्मचार्याचे पालन केले आपले कार्य करण्याची क्षमता वाढते,त्यामुळे कार्य योग्य होते.त्यामुळे शरीर निरोगी राहते.१४--कर्तव्य कर्म करण्यास कधीही न चुकणे,कारण नित्य-नियमाने कर्तव्य-कर्म केल्यास साध्यापर्यंत जाता येते,अन्यथा साध्यापर्यंत जाता येत नाही.म्हणून आपणास समाधान प्राप्त होत नाही.१५--व्यर्थ भाषणांचे वर्जन करने,कारण व्यर्थ भाषण केल्याने विनाकारण वेळ व्यय—खर्चित होतो.जीवनात भूतकाळात गेलेला वेळ पुन्हा वर्तमान काळात आणता येत नसतो.म्हणून निर्थकही बोलू नये व अनर्थकारकही बोलू नये,तर फक्त सार्थक—हितकारक बोलावे.||१२|| अर्थ:----१६--सर्वठिकाणी परमेश्वर व्यापून राहिला आहे असा बोध करून देण्यांत निपुण असे अनुभवपर्यंत ज्ञान संपादन करणे,कारण त्यामुळे साध्यापर्यंत जाता येते व त्यानंतर समाधान प्राप्त होते.जे ज्ञान अनुभवापर्यंत न जाता अर्धवट असते,ते ज्ञान सुखास प्राप्त न होता दु:खास प्राप्त होते.१७--समाधीयोगाचा अभ्यास करणे,कारण निर्गुण—निराकार जी समाधी—साक्षात्कार आहे,त्याद्वारे परमात्म्याची अनुभूती येतो,त्यामुळे चौथा मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त होतो.यांच्या योगेकरून धैर्य,प्रयत्न आणि विवेक यांनी युक्त असलेला कुशल पुरुष—आपण—जीवात्मा,संसाराला कारणभूत अशा अहंकाररुपी लिंगकारुपी लिंगशरीराचा निरास करील—बाध करील,त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होतील.म्हणून आपण वरील सर्व प्रयत्न संत—महात्मा यांच्या सत्संगातच करावेत.||१३|| अर्थ:----यास्तव सावध असलेल्या पुरुषाने—आपण—जीवानी,आज्ञानानें प्राप्त झालेला व कर्माचे वसतीस्थान अशा आपल्या ह्रदयग्रंथीरूप बंधनाचा—अज्ञानाचा,या वर सांगीतलेल्या उपयांच्या यथाशास्त्र आचरण करून वासनेसहवर्तमान निरास—बाध करून नंतर मुक्ती साधनाचा प्रयत्न सोडून द्यावा. ||१४|| अर्थ:----माझा लोक—परमात्म्याचा लोक प्राप्त होण्याची इच्छा करणारा व माझा—भगवंताचा अनुग्रह होणे हाच पुरुषार्थ आहे असे मानणारा,पिता,गुरु किंवा राजा यांनी पुत्रांना,शिष्यांना किंवा प्रजांना पूर्वी सांगीतल्याप्रमाणे,आपले—उपदेश कर्ता यांचे जरी त्यांनी—श्रोत्यांनी ऐकिले नाही तरी क्रोधरहित होऊन—शांत-वृत्तिनेच शिक्षित करावा.पुरुषाला पुन्हा त्या काम्यकर्मामध्ये प्रवृत्त करून संसारकुपामध्ये पाडणारा पुरुष,कोणत्या बरे पुरुषार्थाला पावेल? कोणत्याच पावणार नाही.म्हणून आपण जीवानी निषिद्ध कर्मांचे आचरण न करून,विहित कर्मांचे आचरण सकाम—संसारासाठी न करता निष्काम भावनेने म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठीच करावा.यात्राच आपले—जीवाचे परम-कल्याण आहे—चौथा मोक्षरूपी पुरुषार्थ आहे.||१५|| अर्थ:----याचेंच स्पष्टीकरण करितात----हा लोकव्यवहारांतील प्राणी स्वत:चे कल्याण साधून घेण्यविषयी ज्ञानशून्य असतो; कारण,जो अतिशय भोगेच्छा धारण करणारा असल्यामुळे परस्पर वैरभावाणे युक्त होऊन दुसऱ्याच्या द्रोहाने भोग्य विषयांची इच्छा करितो,तो आज्ञानाने मोहित होत असता स्वल्प सुखासाठी दुसऱ्याच्या द्रोहापासून उत्पन्न झालेले नरकपातादिक अपरिमित दु:ख जाणत नाही.आपल्या—जीवाच्या ठिकाणी अज्ञान हा दोष असल्यामुळे त्यांना स्वत:चे कल्याण करून घेण्याची गरज वाटत नाही,कारण विषय हेच सुखाचे फक्त साधन आहे,अन्य साधनाविषयी अज्ञान असते म्हणून स्वत:चे कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.अज्ञान जीव—आपण विषयांचा भोग घेण्यासाठी धन प्राप्त करून घेण्यासाठी काम,क्रोध,लोभ, मोह,मद-अहंकार,मत्सर—द्वेष,वैर,निर्माण करितो.हे सर्व दु:ख उत्पन्न करणारे साधन आहेत.म्हणून कितीही प्रयत्न केले तरी त्या साधनांचे अंतिम फळ दु:खच असते असे त्यास काळात नाही,कारण तो सत्संग करीत नाही.||१६|| अर्थ:----त्या अविद्येमध्ये निमग्न झालेल्या कुबुद्धी पुरुषाला पाहून ह्याला तुच्छ विषयसुखाकरितां अनंत दु:ख भोगावे लागते, असे स्वत: जाणणारा कोण बरे विवेकी दयाळू पुरुष,त्याला पुन्हा त्याच्या मार्गाचेठिकाणी,जसे आडमार्गाने जाणाऱ्या आंधळ्याला,तूं याचमार्गाने जा असे सांगणे त्या प्रमाणे प्रवृत्त करील ? कोणीच करणार नाही.म्हणून आपण--अज्ञानी जीवानी सभोवती जे लोक आहेत,त्यातील कांही अन्य सुखाची साधन मार्ग स्वीकारत असे त्यास दिसून येते,पण हा त्यांची व त्यांच्या साधनांची निंदा करितो.म्हणून अन्य साधन पाहून दुर्लक्ष करितो.संत—महात्मा आपणहून स्वत: त्याच्याकडे जाऊन सांगतात,तरी त्यांचा तो उपहास करून निंदा करितो.त्यामुळे त्यास वारंवार दु:ख भोगावे लागतात.||१७|| | गुरुर्न स स्यात्स्वजनो न स स्यात् | पिता न स स्याज्जननी न सा स्यात् | | दैव न तत्स्यान्न पतिश्च स स्यात् | न्न मोचयेद्य: समुपेतमृत्युम् ||१८|| अर्थ:---यास्तव भक्तीमार्गाच्या उपदेशाने संसाररूप मृत्यूच्या तावडीत सापडलेल्या पुरुषाला जो सोडवीत नाही गुरु नव्हे; तो स्वजन नव्हे; तो पिता नव्हे; ती जननी नव्हे; ते दैवत नव्हे; अथवा संसाररूप मृत्यूने गांठलेल्या पुरुषाला मुक्त करण्यास जो समर्थ नसेल त्याने त्याच्या गुरुच होऊ नये.स्वजन होऊ नये,पुत्रोत्पादनाविषयी यत्नच करूं नये,माता होऊं नये,कोणापासून पूजा ग्रहण करू नये व कोणाचे पाणीग्रहणहि करू नये.म्हणून जो महात्मा—साधू—संत आहे त्यांनी भक्ती-मार्गाच्याद्वारे अज्ञानी जीवांना मृत्युच्या तावडीतून सोडवणे हा साधूचा—संताचा—महात्म्याचा स्वधर्मच आहे.जसे जे बालक—बालिका आहेत आहेत त्यांना अंक व अक्षर ओळख करून देणे प्राथमिक शिक्षकाचाच स्वधर्म आहे.त्या स्वधर्माचे पालन ते करतात,तेव्हाच ते बालक—बालिका पुढच्या वर्गात प्रवेश करितात.त्याचप्रमाणे साधू--संत—महात्मा यांनी भगवंताचा नामोच्चार,भगवंताची भक्तीचे प्राथमिक संस्कार करावयास पाहिजे.उदा—श्री हरी भक्त परायण--श्री संत गाडगे महाराज यांनी सामान्य जणांना भगवंत--नामोच्चाराचे व भगवंत--भक्तीचे संस्कार केले म्हणून श्री हरी भक्त परायण—श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडे वेदांत—ज्ञानाचे संस्कार करून घेण्यासाठी आपणहून आले.त्यामुळे त्या ज्ञानामुळे परमात्म्याचा अनुभव घेऊन त्यांचे जन्म-मरण निवृत्त होऊन चौथा पुरुषार्थ मोक्ष प्राप्त करून परमात्मरूप झाले.आपण “श्रीहरी भक्त परायण श्रीसंत गाडगे महाराज” व “श्री हरी भक्त परायण श्री हरी भक्त परायण श्रीसंत रंगनाथ महाराज परभणीकर” यांचा आदर्श घेऊन त्याचप्रमाणे “भगवंत नामोच्चाराचे” व “भगवंत—भक्तीचे संस्कार” अखंडित करावे.नंतर वेदांत—ज्ञानाचे संस्कार करून अज्ञान निवृत्त करण्यासाठी “ज्ञान—दान” अखंडीत करावे.असे केले असता अज्ञानी जीवांचा उद्धार होऊन त्यांचे जन्म—मरण निवृत्त करण्याचा ज्यांनी—त्यांनी श्रेय घ्यावे व त्याद्वारे त्यांचे व आपले सार्थक होईल असे निश्चितच आहे.जेष्ठांचे अनुकरण कनिष्ठांनी करावे असे शास्त्र-वचन आहे, त्या नियमांचे पालन होऊन आपणास ज्यांनी संस्कार केले,त्यांच्या ऋणांतून कांही अंशी उतराई निश्चितच होईल.आपण तर ज्यांनी आपल्यावर संस्कार केले आहेत,त्यांच्या ऋणांतून पूर्ण उतराई होऊ शकत नाही,हेही बरोबर आहे,पण अल्पसा हा इतरांवर संस्कार करण्याचा निष्काम प्रयत्न जरूर करावा.-------राम—कृष्ण-हरी---ॐनमोशिवाय-------------||१८|| अर्थ:---याप्रमाणे मोक्षधर्माचा उपदेश करून आतां आपल्या पुत्रांची परस्परांविषयी स्पर्धा नाहीशी होण्याकरितां ऋषभदेव आपले जन्म-कथानक सांगून त्यांना श्नातृशुश्रुषेचा उपदेश करितो---हे पुत्रहो,हे मनुष्याकाररूप माझे शरीर मी स्वेच्छेने ग्रहणकेलेले असल्यामुळे अतर्क्य आहे.जेथे धर्म राहतो असे शुध्दसत्वात्मक ह्रदयापासून उत्पन्न झालां आहां,म्हणून तुम्ही सर्वजण,गुणांनी श्रेष्ठ अशा ह्या आपल्या बंधुरुपी भरताचे निष्कपटबुद्धीने सेवन करा.तेच माझे शुश्रुषन व प्रजांचे पालन होईल.म्हणजे भरताच्या अनुवृत्तीनेच प्रजांचे पालन करावे स्वातंत्र्याने करू नये.पुत्रांनी परस्परांविषयी स्पर्धा निर्माण होऊ नये,म्हणून पित्याचे कर्तव्य हे आहे की,त्यांची उन्नती होण्यासाठी त्यांनी आपापसात स्पर्धा न करता एकत्र राहण्यातच हित असते असे त्यांना समजून सांगावया पाहिजे.जो भाऊ बुद्धिमान असून श्रेष्ठ आहे,त्याच्या म्हण्यानुसारच कारभार करावयास पाहिजे. ||२|| अर्थ:----आतां ब्राहमणांची सेवा सांगन्याकरितां त्याचे श्रेष्ठत्व वर्णन करितो---हे पुत्रहो,सचेतन व अचेतन अशा दोनप्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये मृत्तीका पाषाण इत्यादिक स्थावरांपेक्षा वृक्षादिक स्थावर श्रेष्ठ होत.त्यांच्यापेक्षा जंगम प्राणी श्रेष्ठ होत. त्यांमध्येहि ज्यांना ज्ञानस्थिती आहे ते पश्वदिक श्रेष्ठ होत,त्यांमध्येहि प्रथम,भूत,प्रेत इत्यादिक देवयोनी असल्यामुळे श्रेष्ठ होत.त्याहून हि देवांचे सेवन जे किन्नरादिक ते श्रेष्ठ होत. ||२१|| अर्थ:----त्यांपेक्षा असुर श्रेष्ठ,त्यापेक्षा देव श्रेष्ठ,त्याच्यापेक्षां दक्षादिक ब्रहमपुत्र श्रेष्ठ,त्यापेक्षां शंकर श्रेष्ठ,तो ब्रहमदेवापासून उत्पन्न झाला आहे म्हणून त्यापेक्षा ब्रहमदेव श्रेष्ठ होय. त्या ब्रहमदेवाला मीच पूज्य आहे म्हणून त्याहून मी श्रेष्ठ आहे आणि मला द्विजांमध्ये देवांसारिखे जे ब्राहमण ते पूज्य आहेत म्हणून ते माझ्यापेक्षांहि श्रेष्ठ होत.ब्राह्मण श्रेष्ठ,कारण ब्राह्मणांकडे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान जे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे,तसेच ते त्या ज्ञानाचे दान करतात दान म्हणजे दनाच्या मोबदल्यात कांहीच अपेक्षा करीत नाहीत.सर्वांना उपदेश निष्काम म्हणजे करतात,म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहेत.थोडक्यात जे परम—ज्ञानी आहेत व त्या ज्ञानाचा निष्काम उपदेश करतात म्हणून ते श्रेष्ठ आहेत.म्हणून आपण जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञान संपादन करून निष्काम ज्ञान—दान केले असता “ब्राह्मण” या संज्ञास पात्र होऊन आपले—जीवाचे महा-कल्याण करून घ्यावे.||२२|| अर्थ:----असे म्हणून सभेतील बाह्मणांस म्हणतो----हे ब्राह्मणाहो,मी ब्राहमणांबरोबर दुसऱ्या कोणत्याच प्राण्यांची तुलना करीत नाही.कारण,त्यांच्या सारख्या योग्यतेचा दुसरा कोणीच प्राणी मला दिसत नाही.मग त्यांच्यापेक्षा अधिक योग्यतेचा कोठून दिसणार.दिसावयाचाच नाही.ज्या ब्राहमणांच्या मुखी लोकांनी—भक्तांनी—शिष्यांनी श्रद्धेने हवन केलेले—अहं—मीपणा,मम—माझेपणा, विषयांची आसक्ती—त्याग,धन—जड—त्याग,दोष-त्याग,(अर्पण केलेले) अन्नादीक जसे मी यथेच्छ भक्षण करितो,कारण ते अहंकाररहित व निष्काम असते.त्याप्रमाणे अग्नीहोत्रामध्ये अग्नीच्या मुखी हवन केलेले होमद्रव्य मी भक्षण करीत नाही,कारण ते अहंकारयुक्त व सकाम असते.||२३|| अर्थ:----ज्यांनी या लोकाचेठिकाणी सुंदर व प्राचीन अशी माझी वेदरूप मूर्ती अध्ययनादिरूपेकरून धारण केली आहे व ज्यांचेठिकाणी—ब्राह्मणाच्या परम पवित्र असा सत्त्वगुण,शम,दम,सत्य,अनुग्रह,तप,सहनशीलता आणि अनुग्रह हे आठ वास करितात. ||२४|| अर्थ:----आणि ज्यांना,ब्रहमादिकांपेक्षाहि श्रेष्ठ,स्वर्ग व मोक्ष यांचा अधिपती व अनंतशक्तीनी युक्त अशा मजपासूनही कांहीच मागावयाची इच्छा नसते,कारण त्यांनी परमात्म्याची अनुभूती आलेली असल्यामुळे त्या माझेठिकाणी भक्ती करणाऱ्या, भोगसंपत्तीरहित अशाही ब्राहमणांना दुसऱ्या राज्यादिकांच्या योगाने काय करावयाचे आहे? काहीच नाही,कारण राज्य,संपत्ती, प्रतिष्ठा—मान—जड हे सर्व नाशिवंत व दु:खदायक आहे व परमात्मा अविनाशी,सुखरूप आहे.||२५|| अर्थ:----याप्रमाणे ब्राहमणांचा सन्मान करावा असे सांगुण आतां सर्वभूतांचा सन्मान करावा असे सांगतो---हे पुत्रहो,तुम्ही व सर्वही सभाजनांनी,स्थावरजंगमत्मक सर्वही भुते,माझी स्थाने आहे असे समजून,क्षणोक्षणी मत्सरादिरहित दृष्टीने त्यांचा सन्मान करावा,म्हणजे ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार—गुणांनुसार त्यांचा सन्मान—मूल्यमापन करावे,असे आपण—जीवानी आचरण केले असता,तेच माझे-परमात्म्याचे पूजन केल्यासारखे होईल.||२६|| | मनोवचोदृक्करणेहितस्य | साक्षात्कृतं मे परि बर्हणं हि | | विना पुमान् येन महाविमोहात् | कृतान्तपाशान्न विमोक्तूमिशेत् || २७|| अर्थ:---मन,वाणी,दृष्टी,किंवा दुसरी कोणतीही इंद्रिये ह्यांच्या व्यापाराचे—कृतीचे—आचरण करण्याचे प्रत्यक्ष फळ म्हटले म्हणजे माझे आराधन—पूजन—भक्ती करणे हेच होय.कारण,त्या माझ्या आराधनावांचून हा पुरुष,प्रचंड मोहरुपी कालपाशापासून—मृत्युपासून आपली मुक्तता--जन्म—मरण निवृत्त करून घेण्यास समर्थ होत नाही.म्हणून आपण निष्काम भक्ती करावी.||२७|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,याप्रमाणे महापराक्रमी व सर्व प्राण्यांचे हितचिंतन करणारा तो भगवान् ऋषभदेव, लोकांना हितोपदेश करण्याकरितां,स्वत:च सुशिक्षित असलेल्याही आपल्या पुत्रांना (पुवोक्त) उपदेश करून,नंतर ज्याचा स्वभाव अत्यंत शांत आहे व ज्यांच्यापासून सर्व कर्में निवृत्त झाली आहेत अशा महामुनींना,भक्तीज्ञान वैराग्यरूप परमहंसांच्या धर्माचा उपदेश करण्याकरितां,आपल्या शंभर पुत्रांमध्ये ज्येष्ठ,परम भगवद्भक्त आणि ज्यांचे भगवद्भक्त हेंच मुख्य आश्रयस्थान आहे अशा भरतनामक पुत्राला पृथ्वीच्या रक्षणाकरितां राज्यभिषेक करून,घरामध्येच सर्व वस्तुंचा त्याग केल्यामुळे ज्याच्या संग्रहि केवळ शरीरमात्र अवशेष राहिले आहे असा तो ऋषभदेव,अस्ताव्यस्त केस पसरलेला वेड्यासारखा दिगंबर बनून आपलेठिकाणीच आहवनीय अग्रीचा समारोप करून,ब्रहमवर्तांतून बाहेर निघाला.आपणही—जीवानी आपण स्वत: ब्रह्म-ज्ञानी होऊन इतरांना ब्रह्म-ज्ञानाचा उपदेश करावा.आपल्या कुटुंबातील सर्वांना इतर-लोकानांही ब्रह्म-ज्ञानाचा उपदेश करावा. ||२८|| अर्थ:----तो—ऋषभ—देव अवधूतासारखा (मातीवगैरे चिकटलेला) वेश धारण करून,लोकांमध्ये जड,अंध,मुक्या,बहिऱ्या किंवा पिशाच्याने झपाटलेल्या मनुष्यासारखा फिरत असून लोकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारून बोलविला असतांहि मौनव्रत धारण करून निमूट राहत असे.ऋषभ-देव हा ब्रह्मानुभूतीसंपन्न असल्यामुळे गेरूचे वस्त्र परिधान व मौनव्रत धारण करुन जीवन व्यतीत करू लागला,त्याचप्रमाणे आपण—जीवानी गृहस्थाश्रमाचा त्याग सत्संग करून जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाद्वारे परमात्म्याचा अनुभव घेऊन,त्यानंतर गेरू वस्त्र परिधान करून मौन व्रत घारण करून जीवन व्यतीत करावे.||२९|| अर्थ:----तो,नगरे,गांव,खाणी,शेतकऱ्यांची खेडी,पुष्पवाटिका,डोंगरपायथ्याचे गांव,सैन्याचे तळ,गांईचे गोठे,गौळवाडे,यात्रेकरून लोकांचे समुदाय,पर्वत,वने,ऋषीचे आश्रम इत्यादीठिकाणी,मार्गामार्गामध्ये त्याला अधम मनुष्यांनी,भेडसावने,मारणे,त्याच्यावर मुत्रोत्सर्ग करणे,थुंकी टाकणे,दगड,विष्ठा,व धूळ फेकणे,गुदद्वाराचा वायू सोडणे,व अपशब्द भाषण करणे इत्यादिकांनी त्रास दिला असतांहि,वनांतील माशांनी त्रास दिलेल्या जंगलातील हत्तीप्रमाणे त्या त्रासाला न जुमानितां,मिथ्याभूत रचनेनें युक्त परंतु ज्याला ‘सत्’ (आहे) असे नांवमात्र प्राप्त झाले आहे अशा देहाकाररुपी या शरीराचेठिकाणी,सत्-आणि असत् अथवा चैतन्य आणि जड या उभयतांच्या अनुभवस्वरूपाने स्वत:च्या महिम्याचेठिकाणी स्थित असल्यामुळे’ ज्याने ‘मी आणि माझे असा’ अभिमान मुळीच ठेविला नव्हता,म्हणूनच ज्याचे मन आत्मानंदापासून कधीच ढळत नव्हते,असा तो ऋषभदेव एकाटाच पृथ्वीवर भ्रमण करूं लागला.आपणही—जीवानी ऋषभ-देवासारखे नाम व रूपाविषयी मिथ्यात्वाचा निश्चय करून व मान—अपमानरहित जीवन जगात परिभ्रमण करावे.||३०|| अर्थ:----त्याच्या अत्यंत सुकुमार अशा हात,पाय,वक्ष:स्थळ,भव्यबाहू,खांदे,गळा,मुख इत्यादिक अवयवांची ठेवण फारच उत्तम होती;त्याचे मुख,मूळच्याच सुंदर अशा स्वाभाविक हास्याने शोभत होते;तो नवीन कमळांच्या पत्रांसारख्या आणि तापहारक बाहुल्या ज्यांच्या मध्ये आहेत अशा तांबूस व दीर्घ असलेल्या मुखाच्या विलासाने नागरिक स्त्रियांच्या मनांत मदनाला उद्दीपण करणारा होता.अशा प्रकारचाहि तो ऋषभदेव,पुढच्या बाजूने लोंबत असलेल्या कुरळ झुपकेदार पिंगट केसाचा मोठा भार धारण करीत असल्यामुळे,अवधूतासारख्या मळकट झालेल्या आपल्या शरीराने लोकांना पिशाचाची बाधा झालेल्या मनुष्यासारखा दिसत असे.आपले—जीवाचे राहणीमान साधे व जगाविषयी मिथ्यत्वाचा निश्चय करून जीवन व्यतीत करावे.||३१|| अर्थ:----पुढे जेव्हां त्या भगवान् ऋषभदेवाला हे सर्व लोक,भगवध्दयानरूप योगसाधनाचे प्रत्यक्ष नाशक आहेत असे दिसून आले आणि त्यांचा बंदोबस्त करावा तर ते कर्म निंद्य आहे असे वाटूं लागले,तेव्हां त्याने आजगर व्रताचा (एके ठिकाणीच राहून प्रारब्ध कर्म भोगण्याचा) स्वीकार केला.नंतर तो निजलेला राहून प्रारब्धवशेकरून प्राप्त झालेल्या अन्नादिकांचे भोजन करीत असे,जलाचें प्राशन करीत असे,फलादिकांचे भक्षण करीत असे,मुत्रपुरीषोत्सर्ग करीत असे व तो आपल्या विष्ठेमध्ये लोळूं लागला म्हणजे त्या विष्ठेनेंच त्याचे अवयव लिप्त होत असत.आपणही—जीवाने ऋषभ-देवाचा आदर्श घेऊन देहातीत असस्थेत जीवन जगावे.||३२|| अर्थ:----हे राजा,त्या ऋषभदेवाच्या विष्टेच्या गंधाने सुगंधयुक्त झालेला वायू त्या देशाला सभोवार दहा योजनेपर्यंत सुगंधयुक्त करीत असे.||३३|| अर्थ:----या आजगर व्रताप्रमाणेच गाई,मृग व कावळे यांच्यासारखी वृत्ती धारण करून तो ऋषभदेव,गाई मृग व कावळे यांच्या वर्तणुकीप्रमाणे चालतांना,उभ्यांनी, बसून अथवा निजून पिणे खाणे व मूत्रोत्सर्गादिक व्यवहार करीत असे.||३४|| | इति नानायोगचर्याचरणो भगवान् कैवल्य-पतिर्ॠषभोsविरतपरममहानन्दानुभव आत्मनि | सर्वेषां भूतानामात्मभूते भगवति वासुदेव आत्मनोsव्यवधानानन्तरोदरभावेन सिद्ध- | समस्तार्थपरिपूर्णो योगैश्र्वर्याणिवैहायसमनोजवा- न्तर्धान्परका यप्रवेशदूरग्रहणादीनि यदृच्छ- | योपगतानि नाञ्जसा नृप ह्रदयेनाभ्यनन्दत्||३५|| अर्थ:----हे राजा,याप्रमाणे नानाप्रकारच्या योगचर्या आचरण करणारा तो भगवान् मोक्षाशीपती ऋषभदेव,श्रुतीमध्ये मनुष्यगंधर्वादिकांना उत्तरोत्तर शंभरपटीने सांगीतलेल्या आनंदाचा अनुभवस्वरूपी होऊन,सर्व प्राणीमात्रांचा आत्माभूत व शड्गुणैश्वर्यसंपन्न अशा वासुदेव परमात्म्याचेठिकाणी आपल्या अभेद भावाने,ईश्वररामध्ये आपल्यामध्ये असलेल्या देहादीक उपाधीचा निरास केल्यामुळे तो स्वत:सिद्ध असलेल्या सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण होता.आपणसुद्धा—जीवानी देहादिक उपाधीचा निरास करून म्हणजे देहादिक हे सर्व मिथ्या आहेत असा निश्चय करावा.त्याने—ऋषभ-देवाने,संकल्प केल्यावांचुनच प्रत्यक्ष प्राप्त झालेल्याही,आकाशांत फिरणे,मनाच्या वेगासारखी देहाची गती असणे,गुप्त होणे,परकायांत प्रवेश करणे,दूरचा पदार्थ ग्रहण करणे व पहाणे इत्यादिक योगैश्वयाचा (योगसिद्धीचा) मनाने सुध्दा अंगीकार केला नाही.जर आपणास कांही कारणास्तव ऋद्धी—सिद्धी प्राप्त झाल्या असतील त्या ऋद्धी—सिद्धीचा अंत:करणपूर्वक त्याग करावा,कारण त्यांच्या त्यागाशिवाय आपणास—जीवास परमात्म्याचा अनुभव येणार नाही.परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय आपले—जीवाचे जन्म—मरण निवृत्त होणार नाहीत.||३५|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचमस्कंधा(५) मध्ये हा पांचवा(५)अध्याय पस्तीस (३५)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||५|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________आतां |६---आता सहाव्या अध्यायामध्ये देहाभिमान लीन झाल्यामुळे ज्याने आरंण्याला जळणाऱ्या दावाग्रीला पहात असताही पहिले नाही,त्या ऋषभदेवाच्या देह्त्यागाचा क्रम वर्णन केला आहे||१|| | वृषभदेवाचा देहत्याग ________________________________________________________________________________________ | न नूनं भगव आत्मारामाणां योगसमीरित-ज्ञानावभर्जितकर्मबीजानामैश्र्वर्याणि पुन:क्लेश- | दानि भवितुमर्हन्ति यदृच्छयोपगतानि ||१|| अर्थ:----राजा म्हणाला---हे ज्ञानैश्वर्यसंपन्न शुकाचार्य,योगवायुने प्रदीप्त झालेल्या ज्ञानाग्रीने ज्यांनी आपली रागादिक कर्मबीजे दग्ध करून टाकिली आहेत त्या आत्मस्वरूपी रममान असणाऱ्या योग्यांनी,आपोआप प्राप्त झालेली ऐश्वर्यें,पुन: खरोखर दु:खदायक होत नाहीत,असे असतां सहज प्राप्त झालेल्या योगसिद्धीचा ऋषभदेवाने अंगीकार का केला नाही?कारण,ऋद्धी—सिद्धी या अनात्म-स्वरूप आहेत.जे—जे अनात्म स्वरूप आहे ते—ते दु:खदायक असते.म्हणून जसे ऋषभ-देवांनी ऋद्धी—सिद्धीचा त्याग केला,म्हणून आपण ऋद्धी—सिद्धीचा त्याग करावा. ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,तूं म्हणटलेस ते खरे आहे,परंतु,जसे हरीण आपल्या जाळ्यांत सापंडले तरी धूर्त पारधी त्यांच्यावर विश्वास ठेवीत नाही,न जाणो ते कदाचित् फसवून पळून जातील असे मानितो,त्याप्रमाणे या लोकी कित्येक बुद्धिमान् पुरुष,स्वभावत:च चंचल असलेल्या मनाचा पूर्णपणे विश्चास धरीत नाहीत.आपणसुद्धा मनावर विश्वास ठेऊ नये,कारण ते मन धोकेदायक आहे,कारण मन हे चंचल असते,जे चंचल असते ते धोकेदायक असते.म्हणून त्या मनाला आपण—जीवानी ताब्यात घेतले पाहिजे. ||२|| अर्थ:----ह्याबद्दल असे म्हणटले आहे की,ज्याच्या विश्वासाने,शंकराचेहि बहुकालपर्यंत संचय केलेले तप,मोहिनीचे स्वरूप द्दष्टी पडतांत स्त्रवून गेले.तसेच सौभरीप्रभृती ऋषीचेहि तप व्यर्थ झाले.यास्तव स्थिर नसणाऱ्या मनाबरोबर कधीही मैत्री करू नये,तर जे मन स्थिर आहे त्याच्याबरोबर मैत्री करावी.मन स्थिर करण्याकरिता निष्काम,करण्याकरिता निष्काम भक्तीच करावीच. ||३|| | नित्यं ददाति कामस्य च्छिद्रंतमनु येऽरय:| योगिन: कृतमैत्रस्य पत्युर्जायेव पुंश्चली||४|| अर्थ:----जशी जारिणी स्त्री,जार पुरूषांना आश्रय देऊन त्यांच्याकडून,आपल्यावर विश्चास ठेवणाऱ्या पतीचा घात करते. त्याप्रमाणे विश्वास ठेवणाऱ्या योग्याचे मन,नित्यश: कामाला अवकाश देऊन त्याला अनुसरून असणाऱ्या क्रोधादीक शत्रुंनाही देहांत प्रवेश करण्यास अवकाश देते.म्हणून आपण—जीवानी प्रथम जो “काम” आहे त्याचा संकल्प—विकल्प करू नये तर त्या संकल्प—विकल्पाचा त्याग करावा.त्याचा त्याग केला असता काम उत्पन्न होत नाही,त्यामुळे पुढील क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर उत्पन्न होत नाही.||४|| | कामो मन्युर्मदो लोभ: शोकमोहभायद्य:| कर्मबन्धश्च यन्मुल: स्विकुर्यात्को नु तद् बुध: ||५|| अर्थ:-----यास्तव,काम,क्रोध,मद,लोभ,शोक,मोह,भय,इत्यादिक शत्रू व कर्मबंध ह्या सर्वाना जे मूळकारण होते ते मन आपल्या स्वाधीन आहे असे कोण बरे ज्ञानी पुरुष मागील? कोणीच मागणार नाही.म्हणून आपण—जीवानी या सर्वांचे मुळ कारण असणारे मन ताब्यात ठेवावे.मन ताब्यात असले म्हणजे,कामादि उत्पन्न होत नाहीत.कामादि उत्पन्न न झाले तर अनर्थ होत नाही.अनर्थ न झाला तर सार्थक होतेच.||५|| अर्थ:------असो याप्रमाणे इंद्रादी सर्व लोकपलांस भूषणरूप असून लोकविलक्षण अशी अनेक प्रकारची जी जड पुरूषांसारखी अवधूतवेष,भाषणे व आचरणे त्यांचे योगेकरून ज्याचे ठिकाणी भगवंताची सामर्थे दिसून येत नाही असा तो ऋषभ-देव,योग्यांना देहात्यागाचा प्रकार शिकवावा म्हणून आपल्या देहाचा त्याग करण्याची इच्छा धरून आपला जीवात्मा,परमात्मा भगवंताचे ठिकाणी अनुमात्रहि व्यवधान न रहातां अभेदरूपाने ऐक्यभाव पावला आहे असे वारंवार पाहात असता,देहाभीमान निवृत्त झाल्यामुळे संसारापासून उपराम पावला.आपण—जीवनी ऋषभ-देवाप्रमाणे अनुकरण करून संसारापासून “उपरम”या अवस्थेचा स्वीकार करून अधिकार वाढवावा.||६|| अर्थ:-----याप्रमाणे लिंगदेहाचा अभिमान सुटलेल्या त्या भगवान् ऋषभदेवाचा देह,योगमायेच्या वासनारूप संस्कारे करून अभिमानाच्या आभासाने या पृथ्वीवर संचार करीत असतां तो सहजगत्या कोंक,वेक आणि कुटक या नावांच्या दक्षीण-कर्नाटक देशांमध्ये जाऊन तेथे कुटकपर्वताच्या उपवनामध्ये तोंडांत पाषाणाचा ग्रास घेऊन उन्मत्तपुरुषाप्रमाणे केस मोकळे सोडलेला व अगदी नग्न असा फिरत होता.आपण—जीवानी ऋषभ-देवाप्रमाणे देहातीत होण्याचा प्रयत्न करावा.||७|| अर्थ:----एकवेळी वायूच्या वेगाने कंपीत झालेल्या वेळवांच्या घर्षणाने उत्पन्न,त्या वनाला चोहोकडून ग्रासुं लागला असून,त्याने ऋषभदेवाच्या देहासहवर्तमान ते वन जाळून टाकिले.म्हणजेच ऋषभ-देवाचे शरीर प्रारब्धाच्या योगाने त्या वनात वणव्याने जळून नष्ट झाले.ऋषभ-देवाप्रमाणे म्हणजे प्रारब्धाच्या योगाने सुटावे.प्रत्येकाचे प्रारब्ध हे भिन्न—भिन्न असते,म्हणून भिन्न—भिन्न प्रारब्धाच्या योगाने शरीर नष्ट होऊ शकते.||८|| अर्थ:----हे राजा,पुढे कलीयुगामध्ये अधर्माचा उत्कर्ष होऊ लागला असतां प्राण्याच्या पूर्वसंचीत पापफळाने अगदी मोहित झालेला,लोक,वेक आणि कुटक या देशांचा अर्हन्-’या नावाचा मंदबुद्धी राजा,ज्या ऋषभदेवाचे आश्रमातीत (परमहंसधर्माचे) आचरण,त्या देशांतील लोकांकडून श्रवण करून व स्वत: ते शिकून,निर्भय अशा आपल्या स्वधर्ममार्गाचा त्याग करील आणि स्वत:च्या बुद्धीनेंच कुमार्गरूप पाखंडमताची प्रवृत्ती करील.आपण—जीवानी स्वधर्माचा त्याग न करता परधर्माचा स्वीकार करून नये,कारण त्यामुळे सुख न मिळता दु:खच भोगावे लागते. ||९|| अर्थ:----ज्याप्रवृत्त केलेल्या पाखंडमतानेच कलीयुगामध्ये नीच पुरुष,देवमायेने मोहित होऊन आपल्या वर्णाश्रमाणूरूप धर्मशास्त्राने सांगीतलेल्या पवित्र आचार सोडून देऊन,देवांचा अपमान करणारी,स्नान न करणे,आचमन न करणे,पवित्रता न राखणे,केस उपटून व कापून मुखाला शोभा आणणे इत्यादिक निंद्य नियमरूप व्रते आपापल्या इच्छेप्रमाणे धारण करीत असते ज्यामध्ये अधर्मच पुष्कळ आहे अशा कलीच्या योगाने बुद्धीभ्रंश पावोन,वेद ब्राहमण विष्णू व सत्पुरुष यांची निंदा करणारे होतील.आपण—जीवानी पाखंड मताचा स्वीकार करू नये,कारण मायेच्या मोहास प्राप्त होतो.त्यामुळे निंद्द कर्मांचे आचरण होते.जेथे निंद्द कर्मांचे आचरण असते,सत्विक्तेची निंदा केली जाते,संत—साधू—महात्मा यांची निंदा केली जाते.म्हणून तेथे सुख न अनुभवास येता दु:खच अनुभवयास येते.||१०|| अर्थ:----ते पाखंडी लोक,वेदोक्त आधाराने रहित अशा पाखंडीलोकांनी स्वेच्छेने प्रवृत्त केलेल्या अलीकडच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेऊन जसे आंधळ्यानी आम्ही मार्ग पाहतो असे सांगून फस विलेले दुसरे आंधळे त्यांच्या मागून जाऊन अंधकुपांत पडतात त्याप्रमाणे’ तरणोपायरहित अशा अंधतम नरकामध्ये आपोआप जाऊन पडतात.म्हणून आपण पाखंडी मताचा स्वीकार न करता वैदिक मताचा स्वीकार करावयास पाहिजे.पाखाडी मताचा आपण—जीवानी स्वीकार करून त्यानुसार आचरण केले तर सुखाचा अनुभव न येत दु:खाचाच अनुभव येतो.||११|| अर्थ:-----हे राजा,हा ऋषभावतार रजोगुणाने व्याप्त झालेल्या लोकांना मोक्षमार्गाचे शिक्षित देण्यासाठी भगवंताने धारण केला होता.त्याला योग्य असे श्लोक प्राचीन काळापासून लोक गात असतात. ||१२|| अर्थ:-----अहो काय आश्चर्य सांगावें! सप्तसमुद्रंकित भूमीच्या पाठीवर जितकी म्हणून द्वीपे व जितकी म्हणून खंडे आहेत त्यांमध्ये हे भरतखंडच अधिक पुण्यस्थान होय.कारण,ज्या भरतखंडातील लोक,ऋषभदेवरुपी भगवंताची अवतारयुक्त भड्गलकारक कर्मे गात असतात. ||१३|| अर्थ:----अहो! प्रियव्रत राजाचा वंश,सत्कीर्तीच्या योगाने अतिशुध्द आहे.कारण,जो अर्वातर्यामी व सर्वाचे कारण असा अनादि पुरुषोत्तम त्याने ज्या देशामध्ये ऋषभावतार धारण करून मोक्षप्राप्तीला साधनभूत अशा धर्माचे आचरण केले.म्हणून आपण ऋषभ-देवाचे आचरण करून त्यानुसार परमार्थ केला तर निश्चित परमात्म्याचा अनुभव येईल. ||१४|| अर्थ:----फार कशाला पाहिजे परंतु जन्मरहित अशा या ऋषभदेवाच्या दिशेला कोण दुसरा योगी मनोरथाने तरी जाण्यास समर्थ होईल? कोणीच होणार नाही.कारण,इतर जे योगी आहेत ते ज्या ऋषभदेवाने,खऱ्या नव्हत म्हणून सोडून दिलेल्या योगसिद्धीची इच्छा करितात आणि त्या प्राप्त होण्याकरितां मोठमोठे प्रयत्न करितात तेव्हां त्यांना ऋषभदेवासारखा निरिच्छपणा व ब्रहम--साक्षातत्कार प्राप्त होणे हे फारच दुर्लभ आहे.बरेसचे जीव ऋद्धी—सिद्धीच्या नादी मागून परमार्थापासून वंचित होतात. ऋद्धी--सिद्धीपासून वंचित होण्यासाठी विषयांचा त्याग करावा लागतो.विषयांचा त्याग करणारा विराळा असतो,म्हणून असा फारच दुर्लभ असतो.सर्व--विषयांचा त्याग केल्याशिवाय परमात्म्याची अनुभूती येत नाही.||१५|| अर्थ:----जो पुरुष याप्रमाणे सर्व वेद,लोक,देव,ब्राहमण आणि गाई यांचा परमगुरु अशा ऋषभदेवनामक भगवंताचे,मी तुला वर्णन महामंगलाचे आश्रयस्थान असे हे अत्यंत शुध्द चरित्र,वृद्धीगंत झालेल्या श्रद्धेने मनाच्या एकाग्रतेने श्रवण करितो अथवा वर्णन करितो त्या दोघांनाही त्या भगवान् वासुदेवाचेठिकाणी एकनिष्ठ भक्ती प्राप्त होते.म्हणू आपण—जीवानी ऋषभ-देवाचे चरित्र श्रद्धेने श्रवण करावे,कारण त्यामुळे आपणास—जीवास वासुदेवाच्या—भगवंताच्याठिकाणी एकनिष्ठ भक्ती निर्माण होते.भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्तीमुळे भगवंत आपल्यावर—जीवावर प्रसन्न होतो.||१६|| अर्थ:----त्या भक्तिरूप नदीमध्ये विवेक,पुरुष,अनेकप्रकारच्या पापांमुळे संसारतापाने तप्त होत असलेल्या आत्म्याला क्षणोक्षणी निरंतर स्नान घालीत असते त्याच परम आनंदाने तृप्त होऊन,आपोआप प्राप्त झालेल्या किंवा भगवंताने स्वत: दिलेल्याही जन्ममरणादीदोषरहित अशा परमपुरूषार्थरुपी मोक्षाचा आदर,करीत नाहीत.कारण,ते विवेकी पुरुष भगवंताने आपले म्हणून स्वीकार केलेले असल्यामुळेच त्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त झालेले असतात. ||१७|| अर्थ:----हे राजा मुक्तीदाता जो भगवान् श्रीकृष्ण तो तुम्हां पांडवांचा व यादवांचा रक्षण करणारा,धर्मापदेश करणारा, उपास्यदेवता,मित्रगणामध्ये मुख्य,किंबहुना एखादेवेळी दूतत्वादिक कार्याचे वेळी आज्ञेप्रमाणे वागणारा झाला.ह्या सर्व तुमच्या नि:सीम भक्तांच्या गोष्टी निराळ्याच आहेत.ते असो,परंतु इतर भक्तांबद्दल म्हणशील तर त्यांना भगवान् एखादेवेळी मुक्ती देतो,पण सप्रेम भक्तीयोग देत नाही.||१८|| | नित्यानुभूतनिजलाभनिवृत्ततृष्ण: श्रेयस्यतद्रचनया चिरसुप्तबुद्धे: | | लोकस्य य: करुणयाभयमात्मलोक- माख्यान्नमो भगवते ऋषभाय तस्मै ||१९|| अर्थ:----हे राजा,निरंतर अनुभव घेतलेल्या आत्मस्वरूपाच्या लाभाने ज्याच्या भोगेच्छा निवृत्त झाल्या आहेत अशा ज्याने,देहादिकां-विषयीच्या मनोरथपंरपरांनी ज्यांची बुद्धी कल्याणाविषयी चिरकाल निद्रिस्त झाली आहे अशा जणांच्या करुणेने, निर्भय अशा आत्मस्वरूपाचे निरुपण केले आहे त्या षड्गुनैश्वर्यसंपन्न भगवान् ऋषभदेवाला नमस्कार असो.आपण—जीवानी संत—महात्मा यांना नमस्कार करावा,कारण त्यांची बुद्धी देहादिकांविषयी निद्रिस्त झालेली असते,कारण त्याविषयी त्यांचा—देहादिकांविषयांचा मिथ्यात्वनिश्चय झालेला असतो व त्यामुळेच त्यांना परमात्म्याचा अनुभव आलेला असतो.त्यांचासरखाच अनुभव आपणास—जीवास यावा म्हणून त्यांना अनन्य शरण जाऊन व त्यांचाच सत्संग करावा.||१९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्ये ऋषभदेवचरित्रकथनरूप हा सहावा(६)अध्याय(१९)श्लोकांनी-- युक्त समाप्त झाला. ||६|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |७---याप्रमाणे तीन अध्यायांनी ऋषभ-देवाचं आख्यान वर्णन केले आतां पुढे आठ अध्यायांनी अमृततुल्य असे भरताचे आख्यान वर्णन करितात. |७--- भरताचे चरित्र ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | भरतस्तु महाभागवतो यदा भगवताऽवनितलपरीपालनाय सुञ्चिन्तितस्तदशुशासनपर: पञ्चजनीं विश्वरूपदुहितरमुपयेमे||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणतात:---हे राजा,महाभगवध्दक्त अशा भरतालातर जेव्हां भगवान् ऋषभदेवाने भूमीतलाच्या संरक्षणा--- विषयी संकल्पमात्रनेच अभिषेक केला,तेव्हां त्या ऋषभदेवाच्या आज्ञेत तत्पर असणाऱ्या त्या भरताने (राज्य करीत असतां) पंचजनीनामक विश्वरुपाची कन्या वरिली.||१|| अर्थ:-----नंतर त्या भार्येंच्याठिकाणी त्याने अपणा स्वत:ला सर्वप्रकारे करून (बुद्धीनैपुण्यादिक गुणांनी) योग्य असे पांच पुत्र, जसा तामसाहंकार,शब्दस्पर्शरूपरसगंधाना उपन्न करितो त्याप्रमाणे उत्पन्न केले. ||२|| | सुमतिं राष्ट्रभृतं सुदर्शनमावरनं धूम्रकेतुमिती | अजनाभं नमैतद्वर्षं भारतमिती यत आरभ्य व्यपदिशन्ति ||३|| अर्थ:-----त्यांची नावे---सुमती,राष्ट्रभृत,सुदर्शन,आवरण आणि धुम्रकेतू अशी होती.”अजनाभ” या नांवाने पूर्वी प्रसिध्द असलेल्याही ह्या खंडाला ज्या भरताच्या कारर्कीर्दीपासून सर्वलोक “भरतखंड” असे म्हणतात. ||३|| अर्थ:----तो सर्व शास्त्रांचे रहस्य जाणणारा व स्वधर्माला अनुसरणारा भरत राजा,आपापल्या आधीकरांचेठिकाणीवर्तणूक करणाऱ्या प्रजांचे फार कृपाळूपणाने आपल्या बापआजांप्रमाणे संरक्षण करू लागला. ||४|| अर्थ:----आणि त्यानेंय क्रतुरुपी भगवंताचे त्या त्या योग्यकाली आपल्या अधिकाराने प्राप्त झालेल्या अग्निहोत्र,दर्शपूर्णमास, चातुर्मास्ये,पशु आणि सोमयाग यांच्या प्रकृतिच्या योगेकरून लहानमोठ्या यज्ञांनी,श्रद्धेने,होता,अध्वर्यू इत्यादिक चार ऋत्विजांनी करवावयाच्या अनुष्ठानप्रकाराने आराधना केली.||५|| अर्थ:----अनुष्ठानाच्या योगाने संपादन केली आहेत पूर्वोत्तरांगें ज्यांची असे त्याचे नानाप्रकारे याग चालू झाले असतां,आणि अध्वर्यूनी घृतादिक होमद्रव्ये देवतांना अर्पण करण्यासाठी हातांत घेतली असतां,तो यजमान भरत राजा,यागांपासून उत्पन्न होणारे जे धर्मनामक अपूर्व कर्मफल त्याचे,सर्वदेवताप्रकाशक अशा मंत्रांच्या ज्या इंद्रादिक देवता त्यांचा अंतर्यामी,मुख्य कर्ता, परदेवतारूप,यज्ञपुरुष व प परब्रहमरूप अशा भगवान् वासुदेवाचेठिकाणीच चिंतन करीत असता,स्वत:च्या कुशलपणाने रागादीक मलांचा क्षय करून यज्ञभोक्त्या त्या सुर्यादिक देवांनाही वासुदेवाच्या नेत्रादीक अवयवांचेठिकाणी ऐक्यरुपाने चिंतन करूं लागला.||६|| अर्थ:-----याप्रमाणे कर्मांच्या पूर्णपणाने शुध्दचित्त झालेल्या त्या भरताला,आपल्या अंत:करणाचेठिकाणी प्रकट होणारा व्यापक, महापुरुषरुपी ‘श्रीवत्सलांछन,कौस्तुभमनी,वनमाला,चक्र,शंख आणि गदा यांनी उपलक्षित’ आणि आपल्या नारदादिक भक्तांच्या ह्रदयामध्यें चित्राप्रमाणे निश्चळ राहिलेल्या पुरुष रूपाने मनामध्ये प्रकाश पावणारा अशा भगवान् वासुदेवाचेठिकाणी प्रतीदिवशी जिचा वेग वाढत चालला आहे अशी फार मोठी भक्ती उत्पन्न झाली.आपणही—जीवानी निष्काम कर्मे करून भगवंताविषयी भरतासारखी निष्काम प्रेम-भक्ती वाढवावी.सर्व भक्तीत “प्रेम-भक्ती” अत्यंत महत्वाची असते.||७|| अर्थ:----याप्रमाणे भक्तीयोगांत अनेक सहस्त्र वर्षे काळ निघून गेला असतां,आतां राज्यभोगरूप कर्मांचा शेवट लवकरच होणार आहे असा निश्चय करणाऱ्या त्या भरत राजाने,वाडवडीलांपासून चालत आलेल्या व आपण भोगलेल्या व राज्याचे विभाग आपल्या पुत्रांना वाटणीप्रमाणे करून देऊन,आपण सर्वसंपत्तीचे स्थान अशा स्वत:च्या घरांतून पूलहाश्रमि (हरीक्षेत्री) निघून गेला.आपण—जीव योगायोगाने गृहस्थाश्रमात असाल तर ज्याप्रमाणे भरत—राजाने गृहस्थाश्रमाचा त्याग केला,त्याप्रमाणे आपण आपल्या पुत्रांना उत्तराधिकारी करून त्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून सत्संगासाठी संत--महात्मा यांच्या आश्रमात निवास करावा.||८|| अर्थ:----ज्या क्षेत्रामध्ये विद्याधर कुंडांत,भक्तांवर असलेल्या दयेच्या योगाने,भगवान् हरी,अजूनही तेथे राहणाऱ्या आपल्या भक्तांना इच्छित असलेल्या शालग्राम शिलाचक्रांनी,ऋषीच्या आश्रमस्थानांना चोहोकडून पवित्र करिते.आज वर्तमान काळात विद्ध्याधर कुंडात,भक्तांना इच्छित असलेल्या शीला-चक्रांनी ऋषीच्या आश्रमांना पवित्र करतात.आपण त्या क्षेत्राचा सत्संग केला तर आपणही—जीवही पवित्र होतोत.||१०|| | तस्मिन वाव किल स एकल: पुलहाश्रमोपवने | विविधकुसुमकिसलयतुलसिकाम्बुभि: कंन्दमुल- | फालोपहारैश्च समीहमानो भगवत आराधनं विविक्त | उपरतविषयाभिलाष उपभृतोपशम: परां | निर्वृतिमवाप ||११|| अर्थ:----त्या क्षेत्रांत पूलहाश्रमाच्या उपवनामध्ये एकांतस्थली एकटाच राहणारा,ज्यांच्या विषयवासना सुटल्या आहेत व ज्याने अंत:रणाचा निग्रह केला आहे असा तो भरत राजा,निश्चयाने अनेक प्रकारची पुष्पें,पल्लव,तुलसी,उदक व कंदमुळ-फळांचे नैवद्य इत्यादिक उपचारांनी भगवंताचे आराधन करीत असता परम आनंद पावला.म्हणून आपणही—जीवानी त्याठिकाणी—विद्ध्याधर कुंडच्या क्षेत्रात निवास करून साधना करावी.||११|| अर्थ:----अशा प्रकारे निरंतर चाललेल्या त्या भगवंताच्या आराधनाने भगवंताचेठिकाणी वाढत चाललेल्या प्रेमभराने,द्रव पावलेल्या ज्याच्या ह्रदयांत ते आराधन करण्याबद्दलसुध्दां उदासीनता वाटूं लागली आहे व मोठ्या हर्षाच्या वेगाने ज्याच्या देहाचेठिकानी रोमांच उभे राहत आहेत व उत्कंठतेमुळे वाहुं लागलेल्या आनंदाश्रुंनी ज्याच्या नेत्रांची अवलोकनशक्ती बंद झाली आहे,असा तो भरता राजा,आपल्याला प्रीती उत्पन्न करणारा जो भगवान् त्याच्या आरक्तवर्ण चरणकमलाच्या ध्यानाने वृध्दिंगत झालेल्या भक्तीयोगेकरून,ज्यांत परमानंद पूर्ण भरला आहे अशा गंभीरह्रदयरूप डोहांत ज्याची बुद्धी बुडून गेली आहे असा तो,त्या चाललेल्या भगवंताच्या पूजेलाही विसरू लागला,म्हणजे त्याचा समाधी लागुं लागली.भारत-राजास ज्याप्रमाणे परमात्म्याचा अनुभव आलेला आहे.त्याचप्रमाणे आपणही—जीवानी परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी प्रयत्न करावा.||१२|| अर्थ:---याप्रमाणे भगवंताच्या आराधनाचे नियम धारण करणारा तो राजा,मृगचर्मरूप वस्त्रांनेच त्रिकाल स्नानानें भिजलेला, पिंगटवर्ण व कुरळ असा जो जटांचा समूह त्याच्या योगाने शोभत असता,सूर्यप्रकाशक ऋचेने’ ध्येय: सदा सवितृमंडलमध्यवर्ती’ इत्यादीकेंकरून सांगीतलेल्या सुवर्णमय भगवान् पुरुषाचे,सूर्यमंडळ उदक पावत असतां उपस्थान करीत करीत असे म्हणाला की- ||१३|| | परोरजः सवितुर्जातवेदो देवस्य भर्गो मनसेदं जजान | सुरेतसादः पुनराविश्य चष्टे हंसं गृध्राणं नृषद्रिंगीरामिमः ||१४|| अर्थ:----प्रकृतीहून पलीकडचे,शुध्दसत्त्वात्मक व कर्माचे फळ देणारे जे सूर्याचे तेज त्याला आम्ही शरण जातो.जे तेज, संकल्पमात्रेकरूनच या जगाला उत्पन्न करितें तसेच उत्पन्न केलेल्या अंतर्यामिरूपानें प्रवेश करून सुखाची इच्छा करणाऱ्या जीवाला आपल्या चैतन्यशक्तीने रक्षण करिते आणि प्राण्याचेठिकाणी उपाधीरूपाने राहणाऱ्या बुद्धीला गती देते.म्हणून आपण—जीवाने परमात्मा यांना शरण जावे,कारण परमात्मा सुखरूप आहे.(त्या तेजाला आम्ही शरण जातो.) ||१४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्ये हा सातवा(७) अध्याय चौदा(१४)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________८----आतां आठव्या अध्यायांत तो भारत राजा,श्रीविष्णूचे आराधन करीत असता,एका हरिणाच्या रक्षणाविषयी आसक्त झाल्यामुळे त्याच्या कामात विघ्न होऊन त्याला हरीण-जन्म प्राप्त झाला असे निरुपण केले आहे. |८--- भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | एकदा तु महानद्दां कृताभिषेकनैयमिका- वश्यको ब्रह्माक्षरमभिगृणानो मुहूर्तत्रयमुदकान्त उपविवेश ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,एकेवेळी तर तो भरत राजा,मलमुत्रोत्सर्गादि आवश्यक विधी आटोपल्यावर त्या गडंकी नदीमध्ये स्नासंध्यादिक नित्यनैमित्तिक कर्मे करून,प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्तंपर्यत नदीच्या तीरी बसला होता.आपण—जीवानी मलमुत्रोत्सर्गादि आवश्यक विधी झाल्यानंतर पवित्र नदीमध्ये स्नासंध्यादिक झाल्यानंतर नित्य-नैमित्तिक कर्म करावे,कारण तो एक शात्राचा विधी आहे.त्यामुळे आपले अंत:करण शुद्ध होते.||१|| अर्थ:---हे राजा,त्या वेळी त्या ठिकाणी नदीच्या समीपभागी जलप्राशनाच्या इच्छेने आपल्या कळपाचा वियोग पावलेली एक हरिणी एकटीच प्राप्त झाली.||२|| अर्थ:----त्या हरिणीने पराकाष्ठेच्या तृषेने उदक प्राशन करण्यास आरंभ केला,इतक्यांत जवळच गर्जना करणाऱ्या एका सिंहाचा लोकांना भयंकर असा मोठा नाद उत्पन्न झाला. ||३|| अर्थ:----तो ऐकतांच त हरिणी आधीच स्वभावाने भित्री असल्यामुळे कावरीबावरी होऊन पाहणारी त्यात सिंहाच्या भीतीच्या धसक्याने जिचें मन फारच घाबरून गेले आहे अशा तिनें,डोळे घाबरे करून तृष्णा शांत होण्याच्या पूर्वींच एकाएकी नदीच्या पलीकडे उडी टाकिली.||४|| | तस्या उत्पतन्त्या अन्तर्वत्न्या उरुभयावगलीतो | योनिनिर्गतो गर्भः स्त्रोतसि निपपात ||५|| अर्थ:----त्यावेळी उडी टाकणाऱ्या त्या गर्भिणी हरिणीचा गर्भ, मोठया भयाने गर्भाशयांतून चलित होऊन योनीद्वारा बाहेर निघून नदीच्या प्रवाहांत पडला.||५|| अर्थ:----त्या गर्भाचा पात,उडी मारणे व सिंहाचे भय या कारणांमुळे उत्पन्न झालेल्या खेदाने पिडीत झालेली व आपल्या कळपाशी वियोग पावलेली ती काळवीट हरीणाची स्त्री (हरिणी),पर्वताच्या एका गुहेमध्ये जाऊन पडली आणि लागलीच मरण पावली.||६|| | त्वं त्वेणकुणकं कृपणं स्त्रोतसानुह्यामानमभी-विक्ष्यापविध्दं | | | बंधुरीवानुकाम्पया राजर्षीर्भर | आदाय मृतमातरमित्याश्रमपदमनयत् ||७|| | अर्थ:---इकडे त्या राजर्षी भरताने,प्रवाहांतून वाहत चाललेल्या,आणि बंधूनी टाकलेल्या अशा त्या हरीनबालकाला एखादया बांधवाप्रमाणे मोठ्या कृपेने प्रवाहांतून बाहेर काढून’ असे! हा आई मेलेला अनाथ आहे,असे जाणून,त्याला उचलून आपल्या आश्रमस्थानी नेले. आपण एखादा जीव संकटात—अनाथ असेल तर त्याचे दु:ख निवारण करणे हा आपला स्वधर्म आहे.||७|| अर्थ:----पुढे त्या हरीण-बालकाचेठिकाणी ‘हे माझें आहे’ असा अभिमान धारण करून त्या पाडसाला प्रतीदिवशी तृणादिक खाऊं घालणे,लांडगेवगैरे पशुंपासुन त्याचें रक्षण करणे,त्याचे चुंबक घेणे,त्याला खाजविणें इत्यादिकेंकरून त्याजवर जडलेल्या आसक्तीमुळें त्या भरतराजाचे स्वत:चे अहिंसा सत्य इत्यादिक यम,व स्नान संध्या भगवत्पूजन इत्यादिक नियम,हे उत्तरोत्तर एकेक कमी कमी होऊन काहीं दिवसांनी खरोखर सर्वच उच्छीन्न झाले.जो जीव पारमार्थिक आहे,त्यांनी देह मी आहे व देहसंबंधी माझे आहेत,या प्रकारची “अहंता व ममता” या वृतीचा त्याग करावा,असे शास्त्र-वचन आहे.असे असतांना “हरीण माझे आहे”या वृत्तीचा त्याग करावा कि भोग घ्यावा ? भरत राजास त्या हरिणाची—पाडसाची आसक्ती जडली.शास्त्र-नियमानुसार त्या वृत्तीचा व आसक्तीचा त्याग करावा असे विधान आहे.या बाबतीत भरत—राजाच्या वृत्तीचे अनुकरण न करता त्याग करावा.त्या हरिणाच्या आसक्तीचा एवढा परिणाम झाला की,यम,नियम,स्नान-संध्यादिक सर्व कर्मे बंद पडून हरिणाची संगोपानदी कार्य सुरु झाले.आपणमात्र भरत राजाच्या या कृतीचे समर्थ न करता त्याग करावा,कारण हि हरणाची आसक्ती आहे.देवाची,मानव-जीवाची,विषयांची आस्तकी बंधन करते,तर हरिणाची आसक्ती बंधनात टाकतेच,यांत तिला-मात्र शंका नाही.म्हणून आपण—जीवानी जीवाच्या आसक्तीचा व जडाच्या आसक्तीचा त्याग करावाच.||८|| अर्थ:---त्याची हरिणावर आसक्ती अशी जडली होती की,----अहो काय सांगावें! काळचक्राच्या परिभ्रमण वेगानेंच,दीन झालेल्या ह्या हरीण बालकाला,आपले गण,मित्र व बंधू यांपासून वियुक्त करून मलाच शरण आणविला आहे,हा मलाच आई,बाप,भाऊ, ज्ञाती,व कळपांतील हरणें असे सर्व माणून माझ्याजवळ आला आहे.वास्तविक पाहता त्या दीन हरीणास याचे जातवाले हरीण आवडतील की,हा मानवा-जातीतील मानुष आवडेल ?या हरीणास निसर्ग आवडेल कि मानव आवडेल.हरीणास निसर्गात हिंडणे—फिरणे आवडेल की,हे बंधिस्त जिने आवडेल? नैसर्गिक आहार आवडेल की,मानवांनी आणून दिलेला आहार आवडेल ?थोडक्यात त्या हरीणास नैसर्गिक जीवन आवडेल तर मानवी जीवन आवडणार नाही.भरत-राजाने त्या हरिणावर उपकार केले की,अपकार केले? हा माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला जाणत नाहीं,की जाणवू दिले नाही?माझ्यावरच ह्याचा पूर्ण विश्वास आहे.म्हणूनच ‘शरण आलेल्याची उपेक्षा केली असतां दोष आहे’ असे जाणणाऱ्या मी, ह्याच्या निमित्त स्वार्थाची हानी झाली तरी तें मनांत न आणितां या,माझा आश्रय करणाराचें पोषण,पालन,प्रिणन(गोंजारनें) व लालन केलें पाहिजे.हा हरीण शरण आला होता का? हरिणाच्या आसक्तीमुळे त्याची पामार्थिक साधनेचा त्याग झाला व हरिणाचा आसक्तीचा स्वीकार केला.परिणाम परमात्म्यापासून वंचित झाला.या बाबतीत आपण जीवानी भरत—राजाचे अनुकरण करू नये,कारण त्यामुळे पारमार्थिक कार्यांत प्रतिकूलता येते.||९|| | नूनं ह्यार्या: साधव उपशामशीला:कृपणसुह्रद् | एवंविधार्थे स्वार्थानपी गुरुतरानुपेक्षन्ते ||१०|| कारण,शांतस्वभावयुक्त व दीनांचे हित करणारे जे श्रेष्ठ सत्पुरुष आहेत ते अशा प्रसंगी आपलीं विशेष म्हत्त्वाचींहि कार्यें सोडून देतात.आपण—जीवानी कार्य सोडावे,पण कोणते कार्य कोणत्या कार्यासाठी सोडावे,असा विवेक करून करून अधिक महत्वाचे कोणते आहे व त्यापेक्षा कमी महत्वाचे कार्य कोणते आहे असा तारतम्य भावाचा विवेक करून कार्याचा त्याग किंवा स्वीकार करावा.असा तारतम्य भाव लावता न आले तर कार्य अहिताचे होण्याची शक्यता असते.म्हणून विवेकापुर्वक कार्य करावे.उदा-भरत—राजासारखे तारतम्य होऊ नये,तर तारतम्य योग्य असावे. ||१०|| अर्थ:----अशाप्रकारें त्या मृगबालकावर आसक्ती जडलेला तो भरत राजा,बसणें,निजणें,फिरणें,उभे राहणे,भोजन करणें,इत्यादिक सर्व कृत्ये,त्या मृगबालकासहवर्तमान त्याच्या स्नेहाणाने आसक्तचित्त होऊन करीत असे.आपण—जीवानी भरत-राजासारखे करू नये,कारण त्याचे कार्य अनर्थकारक झाले. ||११|| अर्थ:----दर्भ,फुलें,समिधा,पानें,फळें,फुलें किंवा उदक आणण्याकरितां तो वनांत जात असे,तेव्हां लांडगे कोल्हे इत्यादिकांपासून त्याला भय प्राप्त होईल अशी शंका मनांत आणून तो,त्या मृगबालकासहवर्तमानच जात असे. ||१२|| अर्थ:----तेव्हां मार्गांमध्ये पोर स्वभावामुळे त्या त्या ठिकाणीं तो मृगबालक तृणादिकांच्या भक्षणाविषयीं आसक्त होऊन जेव्हा उभा राहत असे,तेव्हां त्या राजाच्या ह्रदयांत प्रेमाचे अतिशय भरते येई आणि तो स्नेहपरवश होऊन त्याला खांद्यावर घेऊन चालत असे.याप्रमाणें मांडीवर व वक्ष:स्थलावर धारण करून त्याचे लाड करीत असतांना,त्या राजाला परमानंद वाटत असे. आपण—जीवानी पारमार्थिक कार्य करीत असतांना देहसंबंधीस किंवा पशुसंबंधीस मांडीवर किंवा वक्ष:स्थळावर घेणे योग्य आहे काय?योग्य मुळीच नाही.त्या देहासंबंधीपासून किंवा पशुसंबंधीपासून परमानंद मिळत असतो का?अर्थाच्तच तो विषयांनंद्च आहे ,तर परमानंद नाहीच असे असूनही परमानंद आहे असे मानाने हा केवळ भ्रम आहे--अध्यास आहे--अज्ञान आहे.यामुळे निश्चितच जन्म—मरण निवारण होणार नाहीच.म्हणून आपण—जीवानी असा व्यवहार—भ्रममुलक—अज्ञानमूलक करू नये.||१३|| अर्थ:----देवपूजा चालली असतां मध्येंच वारंवार उठून तो भरत राजा,जेव्हां इकडे तिकडे गेलेल्या त्या बालकाला मन लावून पाहत असे तेव्हांच तो आपल्या स्वस्थ अंत:करणाने ‘हे वत्सा,तुझेसर्वठिकाणी कल्याण होवो’ असे त्याला आशीर्वाद देत असे.आपण—जीवानी देवाची—ईश्वराची पूजा चालू असतांना मध्येच उठून मन देहसंबंधीकडे किंवा हरणाकडे असावे का?असेल तर त्यास पूजा म्हणावे का?किंवा त्यास—देहसंबंधीस किंवा भक्तांस किंवा पशुस आशीर्वाद द्दावा का? दिलाच तर त्यास परमार्थ म्हणावा का? अर्थतच म्हणता येणार नाही असे निश्चितच आहे.त्यास अज्ञानाच म्हणावे.||१४|| अर्थ:----एकेवेळीं जेव्हां तो मृगबालक बराच वेळपर्यंत राजाच्या दृष्टी पडला नाहीं,तेव्हां द्रव्य नष्ट झालेल्या कृपण पुरुषाप्रमाणे त्याचें मन फारच व्याकूळ—दु:खी होऊन अतिशय उत्कंठेमुळें तो राजा,हरीणबालकाच्या विरहाने ह्रदयामध्यें संताप—दु:खी पावोन अतिदीनपणानें त्या मृगबालकाचा शोक—दु:ख करीत खरोखर मोठ्या मोहजाळांत—हरिणाच्या आसक्तीत निमग्न होऊन असें म्हणाला कीं,-------- देहासंबंधित किंवा पशुसंबंधित अशा प्रकारची अवस्था योग्य आहे का?संत नामदेवांना भगवंत पांडुरंगाची—श्रीविठ्ठलाची आसक्ती बंधनास कारण ठरली,तर भरत-राजास पशूची आसक्ती बंधनास कारण ठरणार नाही का ? अर्थातच हरिणाची आसक्ती बंधानास कारण ठरेलच,यात मुळीच शंका नाही.आपण—जीवानी अशा प्रकारची कोणतीच—ईश्वराची—जीवाची—जडाची—प्रतिष्ठेची आसक्ती धारण न करता त्या आसक्तीचा त्यागच करावा.||१५|| अर्थ:----अहो काय सांगावे? पहा मेलेल्या हरिणीचा पुत्र दीन तो हरीणबालक,फसविणाऱ्या पारध्यासारखी बुद्धी करणारा, भाग्यहीन व नीच अशा माझे ते फसविणेवगैरे अपरांध मनांत न आणितां,आपल्या मनाप्रमाणेंच ‘माझे (भरताचें|) मन शुध्द आहे’ असे समजून सुजनासारखा मजकडे येईल काय? त्या हरिणाचे—पशूचे मनाची आपल्या—राजा--भरताच्या मनाशी तुलना करणे योग्य आहे का? कोठे ह्या राजा-भारताचे मन व कोठे त्या हरीण पशूचे मन ? या दोघांच्या मनात महान फरक असून मोहामुळे वाटत नव्हता.म्हणून आपल्या—जीवाच्या ठीकानो मोहाचा दोष नसावा,तर जीवाविषयी प्रेम असावे.मोह हा आसक्तीस कारण आहे,तर प्रेम हे आसक्तीस कारण नाही.म्हणून आपले सर्व जीवांवर प्रेम असावे.||१६|| अर्थ:---बरें,खुशालपणें या आश्रमाच्या उपवनामध्यें कोंवळें गवत खाणाऱ्या व देवानें रक्षण केलेल्या त्याला मी पाहीन काय?आपण—जीवानी देवाला पाहावे कि ज्या देवाने ज्याला रक्षण केले त्याला पाहावे.म्हणजेच कारणास पाहावे कि कार्यास पाहावे ? कार्य दृष्टी असावी की,कारण दृष्टी असावी ? आपणास कारण दृष्टी असावी,तर कार्य दृष्टी नसावी.||१७|| अर्थ:----बरें,लांडगा,कोल्हा किंवा आपल्या कळपाला बरोबर घेऊन फिरणारा डुक्करवगैरे किंवा एकटाच फिरणारा वाघवगैरे त्याला मारून खात नसेल ना ? जीवाचे लक्ष परमात्मा असावा की जीव—देहसंबंधी किंवा पशुसंबंधी असावे?तर आपले लक्ष देहसंबंधी नसावे,कारण ते दु:खरूप आहेत,तर परमात्माच असावा,कारण तो सुखरूप आहे.आपणास—जीवास दु:ख नको,तर सुखारुपता पाहिजे आहे,म्हणून सुखरूप कोण आहे ?सुखरूप फक्त परमात्माच आहे व आपण—जीव त्याचेच आहेत,म्हणून जीवाने परमात्म्याकडेच जावे,अन्याकडे जाऊ नये,कारण आपण—जीव आन्याचे नाहीत.जसे बालक आईकडेच जाते तर अन्याकडे जात नाही,कारण ते बालक अन्याचे नसून फक्त आईचेच आहे.||१८|| अर्थ:---अरे रे! सर्व जगाच्या कल्याणासाठी उदय पावणारा हा वेदत्रयरुपी भगवान् सूर्य,अस्तमानास जात आहे,म्हणजे मला—राजा—भरतास वेदांताचे—परमात्म्याचे स्मरण होत नसून परंतु माझ्याजवळ हरिणीनें ठेवलेल्या ठेवीप्रमाणे असलेला तो मृगबालक अजून येत नाही; म्हणजेच बालकाचे स्मरण होत आहे.काय करावें? म्हणजे मला परमात्म्याचा विसर पडला तरी चालेल,पण हरिणाचा विसर पडू नये.आपण हा राजा भरताचा दोष आहे म्हणून इतरांच्या दोषांचे अनुकरण न करता त्या दोषांचा त्याग करावा. ||१९|| | अपिस्विदकृतसुकृतमागत्या मां सुखयीष्यति हरीणराजकुमारो | | | विविधरुचिरदर्शनीयनिजमृग—दारविनोदैरससंतोषं स्वानामपनुदन्||२०|| | अर्थ:----अहो अनेकप्रकारच्या,रमणीय व पहाण्याजोग्या आपल्याला (मृगबालकाला) योग्य अशा विनोदाणी माझा खेद दुरी करीत असता,तो हरीणरूप राजपुत्र,येथें येऊन मज पुण्यहिनाला सुख देईल काय ?राजा भारत हा सुखाची अपेक्षा पशु—हरीणाकडून म्हणजे जे दु:खरूप आहे,त्याकडून करणे म्हणजेच त्या राजा-भारतास हरीण याचा मोह झालेला आहे,म्हणून असे विपरीत बोलत आहे.आपण—जीवास पशु—हरिणाचाच नाही,तर कोणाचाही मोह होऊ नये,कारण मोह हा दु:खच देत असतो.||२०|| अर्थ:----अहो त्याच्या बरोबर खेळतांना,खोट्याच समाधीनें डोळे झांकून बसणाऱ्या,मला जो भीत भीत येईन वरकर्मी कोपाच्या आवेशानें जळबिंदुसारख्या कोमळ अशा आपल्या शिंगाच्या आग्रानें घर्षण करीत असे.राजा-भारतास हरिणाचे शिंगे कठोर असतांना जल-बिंदूसारखे—कोमल वाटत आहेत,कारण त्याचा—हरिणाचा त्यास—राजा-भारतास मोह झालेला आहे.राजा-भरतासारखा आपणास—जीवास मोह होऊ नये,कारण मोह हा दु:खास कारण असतो.||२१|| अर्थ:----आणि एखादेवेळी,वरती होमद्रव्ये मांडून ठेविलेले दर्भ,त्यानें आपल्या चपलस्वभावाला अनुसरून दांतांनी ओढून विसकटले असतां,मी दटावला म्हणजे जो अतिशय भ्याल्यासारखा होऊन,लागलेंच आपलें खेळणें टाकून देत असे व एखाद्या ऋषीपुत्राप्रमाणें आपल्या सर्व इंद्रियांचे संयमन करून निश्चळ राहत असे.त्या हरीणास हे पूजेचे होमद्रव्य आहेत असे कळेल का? म्हणून त्याचे खेळणे बंद करील का?हरीण ऋषीप्रमाणे इंद्रियांचे संयम करील का? हि वस्तुस्थिती नसून राजा-भरताचा हे सर्व मनोराज्य—मंदद्वैत आहे.म्हणून आपण—जीवाने राजा—भरतासारखे मनोराज्य—मंद-द्वैत करू नये,कारण ते अनर्थ करणारे आहे.मंद द्वैत हेच तीव्र-द्वैत—काम,क्रोध,लोभ,मोह,भय,मद,मत्सर होत असते.म्हणून आपण—जीवानी मंद व तीव्र द्वैताचा त्याग करावा,कारण ते दु:खास हेतू—कारण आहेत.||२२|| अर्थ:----हे राजा,याप्रमाणें नानाप्रकारचे विलाप करून तो भरत उठून बाहेर जाऊन,त्या हरिणाच्या खुरांनी खळग्या पाडलेल्या भूभागास अवलोकन करून,त्याचें ह्रदय भ्रांतीयुक्त होई व तो म्हणे कीं,अरे! या भाग्ययुक्त भूमीनें काय बरें तप केलें असावें! कारण,ही भूमी,नम्र अशा हरीणबालकाच्या लहान लहान,सुंदर,मंगलकारक व सुकुमार असे खुर ज्यांमध्यें दिसत आहेत अशा ठिकाणीठिकाणीं उमटलेल्या पावलाच्या ओळीनी मृगरुप द्र्व्यान्ये हीन झाल्यामुळें दु:खित झालेल्या मज दीनाला द्रव्यप्राप्तीचा (हरीणप्राप्तीचा) मार्ग सुचवीत असून त्या ओळीनी चोहोंकडून भूषित झालेल्या आपल्या शरीरभागालासुध्दां स्वर्ग व मोक्ष यांची इच्छा करणाऱ्या ब्राहमणांचे यज्ञस्थान करिते.ज्याप्रकारे राजा-भरत हरिणात मोहित झाला,त्याप्रमाणे आपण कोणत्याही प्राण्यांत मोहित होऊ नये,कारण आपण—जीवानी कोणत्याही प्राण्यांचा मोह झाला तर तो मोह परमार्थास प्रतिबंध करितो.||२३|| अर्थ:---हे राजा,इतक्यांमध्यें चंद्रोदय झाला असतां त्याच्या बिंबामध्यें हरिणाला पाहून तो हरिण आपलाच असावा अशा कल्पनेनें राजा म्हणाला कीं,---अहो,सिंहाच्या भयानें ज्याची माता मरण पावली तो हा हरिणबालक आपल्या आश्रमांतून चुकून गेला म्हणजे त्याचें,दीनजनांवर प्रीती करणारा हा भगवान् नक्षत्राधिपती चंद्र,दयेनें रक्षण करीत आहे कीं काय? ||२४|| अर्थ:----इतक्यांत चंद्राचे किरण राजाच्या आंगावर पडले तेव्हां सुख पावून राजा म्हणतो---अहो! पुत्राप्रमाणें पाळलेल्या हरिणाच्या वियोगापासून झालेल्या तापरूप वणव्याच्या ज्वालांनी ज्याची ह्रदयरूप स्थलकमलिनी तापली आहे परंतु अकस्मात् मागाहून येणारा हरिणबालक ज्वाला भेटला आहे अशा मला, ‘हा चंद्र, शीतल सुखकारक व मजवर असलेल्या प्रेमामुळे वारंवार स्त्रवणारें जें आपल्या मुखांतील उदक तद्रूपी अमृतमय किरणांनी’ शात करील काय? ||२५|| अर्थ:----हे राजा,याप्रमाणें न घडून येणाऱ्या मनोरथांनी ज्याचे ह्रदय व्याकूळ झालें आहे अशा त्या योगयुक्त तपस्वी भरताला, हरिणबालकाच्या रूपानें भासणाऱ्या त्याच्या प्रारब्धकर्मांनेच योगमार्गांपासून व भगवदाराधनरूप कर्मापासून भ्रष्ट केलें असेंच म्हटले पाहिजे.आपण-जीवानी राजा-भरतासारखे भ्रमिष्ट होऊ नये,विवेकपुर्वक परमार्थ करावा.भ्रमिष्टपणा पारमार्थिक दोष आहे.असें न म्हणावें तर साक्षात मोक्षाचे शत्रू म्हणून त्याग करण्यास कठीण अशा आपल्या औरस पुत्रांचासुध्दां ज्यानें पूर्वी त्याग केला होता त्या भरताला इतर जातीच्या हरीणबालकाचेठिकाणीं आसक्ती कशी बरें प्राप्त व्हावी? होऊंच नये.असो.याप्रमाणें विघ्नाच्या योगानें ज्याच्या योगमार्ग भ्रष्ट झाला आहे व ज्यानें हरीणबालकाचे पोषण,पालन,प्रीतीजनन व लालन करण्याच्या लाडामुळें आपल्या स्वत:चा काहीच विचार केला नाही,त्या भरतराजाचा,भयंकरवेगानें युक्त असा अपरिहार्य मृत्युकाल,जसा उंदराच्या बिळामध्यें एखादा सर्प प्रविष्ट होतो त्याप्रमाणें प्राप्त झाला.आपण—जीवानी राजा—भरतासारखे इतर प्राण्यांचे पालन—पोषण मोहित होऊन—आसक्तपुर्वक करू नये,कारण त्यामुळे परमार्थ न होता संसार होतो. ||२६|| | तदानिमपी पार्श्ववर्तीनमात्मजमिवानुशोचन्तम् | | अभीविक्षमाणो मृग एवाभिनिवेशितमना विसृज्य लोकमिमं सह | मृगेन कलेवरं मृतमणु न मृतजन्मा नुस्मृतिरितरवन्मृगशरीरमवाप ||२७|| अर्थ:----त्या मरणसमयींदेखील आपल्याजवळ पुत्राप्रमाणें शोक करीत बसलेल्या त्या हरीणबालकाला पहात असणाऱ्या व त्या मृगाचेच ठिकाणीं आसक्तचित्त असलेल्या त्या भरत राजानें,त्या हरिणांसहवर्तमान आपल्या देहाचा त्याग केला.आपण—जीवानी अंती क्षणी—शरीर सुटत असतांना अनात्म पदार्थाचे म्हणजे जडाचे किंवा जीवाचे चिंतन न करता परमात्म्याचा अनुभव घेत म्हणजेच नाम-रूपाचा त्याग—सर्व विषयांचा त्याग करीत शरीराचा त्याग करीत शरीर सुटावे.त्या वेळीं त्याचें शरीर मरण पावलें परंतु त्याच्या बरोबर ‘भगवदाराधनाच्या सामर्थ्यांने’ त्याची पूर्वजन्मस्मृती नष्ट झाली नाही.‘मरणसमयीं जो भाव मनांत असेल तो पुढें प्राप्त होतो ह्या नियमाप्रमाणें’ त्या राजालाही पुढें हरिण--योनी प्राप्त झाली.म्हणून आपण—जीवानी मृत्यू-समई आनात्म-चिंतन करू नये,तर नाम-रूपाच्या पलीकडे जाऊन परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२७|| | तत्रापि ह वा आत्मनो मृगत्वकारणं भगवदा - | राधनसमीहानु भावेनानुस्मृत्य भृशमनुतप्यमान | आह ||२८|| अर्थ:----तेथेंही त्यानें,आपणाला हरिणत्व प्राप्त होण्याचे कारण काय? हें पूर्वीं केलेल्या भगवदाराधनरूप क्रियेच्या प्रभावानें स्मरण करून,अत्यंत पश्चात्ताप पावून,आपलेठिकाणीच म्हणाला कीं,---------भरत—राजा यांना हरिण या पशु-योनीत जन्म प्राप्त झाला,कारण शरीर सुटण असतांना त्यांनी हरिणाचे चिंतन केले म्हणून ‘ज्याचे चिंतन केले तीच त्याची गती प्राप्त होत असते,’म्हणून त्यास हरिणाचे शरीर प्राप्त झाले. म्हणून आपण जीवानी शरीर सुटत असतांना आनात्म्याचे चिंतन करू नये,तर परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२८|| अर्थ:----अहो,फार वाईट गोष्ट झाली.विवेकी पुरूषांच्या मार्गापासून मी भ्रष्ट झालो.कारण,माझा अधिकार मोठा होता.मी पूर्वी सर्वसंगाचा परित्याग केला,एकांतवास करण्याकरितां पवित्र अरण्यांचा आश्रय धरिला,आत्मज्ञान संपादन केलें,भगवंताच्या कथांचे वारंवार श्रवण करणें,मनन करणें,कीर्तन करणें,आराधना करणें आणि स्मरण करणें ह्यांचा आसक्तीमुळें सर्व प्रहर सफळ होत असलेल्या कालच्या योगानें माझें मन,सर्व जीवांचा आत्मा जो षड्गुनैश्वर्यसंपन्न वासुदेव त्याचेठिकाणीं,स्थापन केलेलें असून तें निश्चळ झालं होतें,परंतूच तेच माझें मुर्खांचे मन,पुन्हा पूर्णपणे अलीकडे भगवत्स्वरूपापासून चलित होऊन हरिणीच्या पाडसावर गुंतून राहिलें,ह्याला म्हणावें तरीं काय! राजा-भरत याच्या पूर्व-पुण्याइच्या योगाने हरिणाच्या जन्म पश्चाताप व्यक्त करीत आहे.त्याचप्रमाणे आपण वर्तमान शरीरात असतांना आपणांकडून—जीवाकडून कांही अपराध झाला असेल, तर त्या अपराधाबद्दल अंत:करणपूर्वक पश्चताप करून,पुन्हा तसा अपराध करू नये.त्या अपराधाचा पश्चाताप झाला असेल तर शुद्धता होत असते.||२९|| अर्थ:----हे राजा,याप्रमाणें मनामध्यें वैराग्य प्राप्त झालेला तो हरिण,त्या जन्मांतील आपली माता जी हरिणी तिला सोडून, ज्याठिकाणीं उत्पन्न झाला होता त्या कालंजर पर्वतावरून पुन्हा,शांतस्वभावाच्या मुनीजनांना आवडणारें,भगवंताचे वस्तीक्षेत्र व शालवृक्षांनी युक्त असलेला गांव अशा त्या पुलत्य पूलहऋषींच्या आश्रमी येऊन पोंचला.त्या भरत—राजास हरिणाच्या पशु-योनीत पश्चाताप झाल्यामुळे जन्म देणाऱ्या हरिणरुपी आईचा त्याग करून पुलत्य पुलहऋषीच्या आश्रमी येऊन पोंहचला,कारण त्यास वर्तमान काळातील हरिणाच्या शरीरात झालेल्या पश्चातापाचा परिणाम आहे.जर हरिणाच्या—पशु-योनीत पश्चातापाचा परिणाम होतो,तर वर्तमान काळातील मनुष्य शरीरात प्रयत्न करून विवेकाद्वारे पश्चातापाचा परिणाम होणारच यांत तिळमात्र शंका नाही.असे जर उणीव कशाची आहे?तर त्याचे उत्तर हे आहे की,आपण—जीवानी “योग्य प्रयत्न करावेत”.||३०|| | तस्मिन्नपि कालं प्रतीक्षमाण: संङगच्च भृशमुद्विग्न आत्मसहचर: शुष्कपर्णतृनवीरूधा | वर्तमानो मृगत्वनिमित्तावसानमेव गणयन्मृगशरीरं तीर्थोदकक्लिन्नमुत्ससर्ज ||३१|| अर्थ:---त्याठिकाणीहि तो हरिण,मृत्यूकालाची वाट पाहत असुन कोणाशीही सहवास करण्याबद्दल पराकाष्ठेचा कंटाळा मानून एकटाच फिरत असे.त्या भरत—राजा—हरिणाने एकांत—वास स्वीकारला,कारण “एकांत-वासातच सुख असते व लोकांतच दु:ख असते”.सुकलेली पानें,वेली व गवत ह्यांच्या योगानें तो निर्वाह करीत असून आपणास हरीणजन्म प्राप्त होण्यास कारणीभूत असलेलें कर्म केव्हां संपेल अशी वाट पाहत असतां,पुढें त्याने आपला मृत्यूकाल प्राप्त झाला असें जाणून गंडकीनदीच्या उदकांत स्नान केलेल्या आपल्या शरीराचा त्याग केला.ज्याप्रमाणे राजा—भरतरुपी हरिणाने साधा—सात्विक आहार सेवन केला,त्याचप्रमाणे आपण मनुष्य-देहात असतांना साधा पण सात्विक आहार स्वीकारून सत्संग करून ज्ञानाद्वारे मोक्ष संपादन करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे.||३१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें हा आठवा(८)अध्यायात एकतीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________९---आतां नवव्या अध्यायांमध्ये हरिणारूपी राजा—भरताने हर्ष-खेदादिंकाचा त्याग करून,जड-धर्माने युक्त असें ब्राह्मणत्व स्वीकारले असतां,त्याला कोणी एकाने भद्रकाली देवीजवळ बळी देण्यास नेलें,त्या वेळींसुद्धां त्याला क्रोधादिक विकार प्राप्त झाले नाहीत,असें वर्णन केलें आहे. |९--- भरताचा ब्राहमणकुळात जन्म ________________________________________________________________________________________|श्रीशुक उवाच:--- | अथ कस्यचिद् द्विजवरस्यागिर: प्रवरस्य शमदमतप: स्वाध्यायाध्ययनत्यागसन्तोषतितिक्षा- | | प्रश्रयविद्दानसूयात्मज्ञानानन्दयुक्तस्या त्मसदृश- श्रुतशीलाचाररूपौदार्यगुणा नव सोदर्या अङ्गजा | | बभूवुर्मिथुनं च यवीयस्यां भार्यायाम् ||१|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,भरताने मृगदेह सोडिल्यानंतर पुढें आंगिरसगोत्रांत उत्पन्न झालेल्या व शम,दम,तप, स्वशाखोक्त वेदाध्ययन,सत्पात्री अन्नादिकांचे दान,संतोष,क्षमा,नम्रता,स्वकर्मविद्या,इतरांच्या गुणांवर दोषारोप न करणे, आत्मज्ञान आणि धर्मसंपत्तीपासून उत्पन्न झालेला आनंद यांनी युक्त अशा कोणीएक श्रेष्ठ ब्राहमणाला,पहिल्या स्त्रीच्याठिकाणीं त्याच्यासारखेच वेदाध्ययनशील,सदाचारसंपन्न,रूप व औदार्यादिक गुण यांनी युक्त असे नऊ सहोदर पुत्र झाले आणि कनिष्टभार्येचेठिकाणीं एक पुत्र व एक कन्या अशीं दोन मुलें झाली.||१|| अर्थ:--त्यांमध्यें जो पुत्र होता तो,मृगशरीराचा त्याग करून शेवटीच्या ब्राहमणणत्व पावलेला राजर्षीश्रेष्ठ “भरत” असें म्हणतात.||२|| अर्थ:----त्या ब्राहमणकुलांतही तो भरत,स्वजनांच्या संगापासून आपणाला पुन:जन्मांतर प्राप्त होईल अशी शंका धारण करून अत्यंत उद्वीग्न होत असता,ज्याचें श्रवण,स्मरण व गुणकथन कर्मबंधाचा नाश करणारें आहे त्या भगवंताच्या चरणारविंदयुगुलाचें मनानें विशेषेंकरून धारण करीत करीत,भगवंताच्या अनुग्रहानेंच ज्यानें आपल्या पूर्वजन्मांच्या परंपरेंचे स्मरण केलें आहे असा तो भरत,लोकांस,आपण उन्मत्त जड (वेडा) आंधळा व किंवडा आहें असे दर्शवित संचार करूं लागला.||३|| अर्थ:----त्या उन्मत्तादिरूपानें वागणाऱ्याही पुत्राचें,पुत्रस्नेहामध्यें ज्याचें मन आसक्त आहे अशा त्या ब्राहमणानें,समावर्तनापर्यंत संस्कार यथाशास्त्र करण्याचें मनांत आणून उपनयन केलें आणि त्या उपनयन केलेल्या आपल्या पुत्राचा,शौच आचमन इत्यादिक कर्मनियमांची अपेक्षा नसतांहि ते त्याला ‘पुत्रानें पित्यापासून शिक्षित ग्रहण करावें असें शास्त्र असल्यामुळें’ शिकविले.आपण—जीव यांनी पुत्राचे पिता असाल तर पुत्राचे उपनयन संस्कार करणे,हा पिता या नात्याने स्वधर्म आहे—कर्तव्य-धर्म आहे.तो आपण पार पडावयास पाहिजे,कारण पुत्र त्यावेळेस—उपनयन—संस्काराच्या वेळेस अज्ञानी असतो.हा उपनयन संस्कार ज्यांच्या ठिकाणी सात्विक,राजस-गुण असतो त्यांनी करावा.||४|| अर्थ:----तेव्हां तो भरत,आत्मनिष्ठ असल्यामुळें आपल्याला शिक्षण देण्याविषयींचा पित्याचा आग्रह निवृत्त व्हावा याकरीतां, त्या पित्याच्या सांनिध्य असतांनाच त्याच्या शिक्षणाच्या उलट वेडेंवाकडे आचरण करून दाखवीत असें.तो ब्राहमणही पुढे श्रवणादिक मासांमध्यें त्याचें उपकरण (वेदव्रत) वगैरे झाल्यावर त्याला वेदाध्ययन सांगण्याचें मनांत आणून त्याच्या (उपाकरणाच्या) पूर्वीच चैत्र,वैशाख,ज्येष्ठ व अशाढ या चार महिन्यामध्यें व्याह्रती,प्रणव आणि शिर यांसहवर्तमान त्रिपदा गायत्रीमंत्राचे एकसारखें त्याच्याकडून अध्ययन करवीत असतांहि तितक्या काळामध्येंसुध्दां त्या पुत्राला तो मंत्र स्वरादिकांनी युक्त आला नाहीं,म्हणण्यापेक्षा म्हणाला नाही—उच्चार केला नाही,कारण त्याला त्याची गरज नव्हती. ||५|| | एवं स्वतनुज आत्मन्यनुरागावेशितचित्त: | शौचाध्ययनव्रतनियमगुर्वनलशूश्रुषणाधौप | | कुर्वाणककर्मान्यनभियुक्तान्यपी समनुशिष्टेन| भाव्यमित्यासदाग्रह पुत्रमनुशास्य स्वयं | | तावदनधिगतमनोरथ:कालेनाप्रमत्तेन | स्वयं गृह एव प्रमत्त उपसंरुह्त:||६|| | अर्थ:----याप्रमाणे आत्मतत्वेंकरून अभिमत असलेल्या त्या आपल्या पुत्राचेठिकाणीं प्रेमानें लक्ष्य ठेवणारा तो पिता,त्या भरताने अनादर केलेलीहि शौचाचार,अध्ययन,व्रतनियम आणि गुरु व अग्नी यांची शुश्रुशा इत्यादिक ब्रहमचाऱ्याला आवश्यक असलेली कर्में, ‘पुत्रानें चागले शिकावें’ अशा दुराग्रहाने शिकवूनही,पुत्राचें पांडीत्य अवलोकन करण्याचे ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहींत तो इतक्यांत स्वत:घरच्या कामामध्येंच गुंतून भगवंताच्या आराधनाविषयी अनुसंधानरहित असलेल्या तो ब्राहमण नेमलेल्या वेळीं प्राप्त होणाऱ्या कालाच्या योगानें मरण पावला.आपण—जीव आपला पुत्र अज्ञानी असला तर त्यास आपला मृत्यू येईपर्यंत चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे,असे आपणास भारत—चरित्रावरून दिसून येते. ||६|| अर्थ:----त्या वेळीं, त्या ब्राहमणाची कनिष्ठ भार्या,आपल्या पोटीं झालेली पुत्र व कन्या अशा दोन्ही मुलें आपल्या मवतीच्या स्वाधीन करून,स्वत: सहगमनाच्या योगानें पतीलोकांप्रत निघून गेली.आपण मात्र असे न करता म्हणजे पतिचे सहगमन न करिता उर्वरित आयुष्य परमार्थाकरिता व्यतीत करून आपल्या जीवनाचे यथार्थ—सार्थक करावे,कारण मनुष्य—देह हा पुन्हा—पुन्हा प्राप्त होत नसतो.||७|| अर्थ:---हे राजा,त्या भ्रात्याचा (भरताचा) प्रभाव समजला नाही,त्यामुळें त्यांनी आपल्या भाऊ जडबुद्धी आहे असें समजून त्याला पुढें शिकविण्याचा आग्रह सोडून दिला. जड-भरताचा प्रभाव—अधिकार त्याच्या इतर भावांनी समजला नाही,ते त्यास मंद-बुद्धीचा ---मूर्ख असे समजून त्यास पुढे शिक्षण देण्याचे कार्य बंद केले.अशा प्रकारची भावाची कृती पाहून जड-भरतास कांहीच वाटले नाही,तर त्यास बरे वाटले. ||८|| अर्थ:----आणि तो जडभरतहि,ज्यांना दोन पायांचे पशु म्हटले तरी चालेल अशा नीच लोकांनी,जेव्हा हे उन्मत्ता,दे जडा,हे भेऱ्या अशा हाका मारून बोलविला जात असे तेव्हां तो त्यांना तशाच योग्यतेंची उत्तरें देत असे,लोकांनी त्याच्याकडून कर्में करविली असतां ती त्याच्या इच्छेप्रमाणे करीत असें,कधीं वेठीनें (बिगारीनें) कधीं मजुरीनें,एखादेवेळी भिक्षामागितल्याने किंवा प्रयत्नांवांचून जे कांही,थोडेबहुत,चांगले वाईट अन्न मिळेल तें तो केवळ निर्वाहांकरीता भक्षण करीत असे,इंद्रियांच्या संतोषाकरितां भक्षण करीत नसे.कारण,ज्याचा उत्पादक कोणी नाही असा स्वत: सिद्ध केवळ अनुभवस्वरूपी आनंदरूप आत्मा मीच आहे असें त्याला समजून आत्मज्ञान प्राप्त झाले होतें.आणि सन्मान,अपमान,जय,पराजय इत्यादी द्वंदवांपासून उत्पन्न होणाऱ्या सुखदु:खांबद्दल तो देहभीमान बाळगीत नसे.जड भरत हा विदेही महात्मा असल्यामुळे इंद्रियांच्या संतोषाकरिता कोणतीही कृती रीत नसे,तर देहाच्या निर्वाहाकरीता अन्नाचे भक्षण करीत नसे.जड-भरत यांना परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे ते अपरोक्ष-ज्ञानी होते.त्यामुळे त्यांना मान—अपमान,जय—पराजय,इत्यादी द्वंद्वाचा म्हणजे अनुकूल—प्रतिकुलतेचा त्यांच्यावर कांहीच परिणाम होत नसे.आपण—जीवानी सत्संग करून परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव—अपरोक्ष अनुभव घ्यावावयास पाहिजे,कारण त्यामुळे आपले जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन परमात्मा-रूप आहोत असा निश्चय होतो.||९|| अर्थ:----तो जडभरत,थंडी,उन्हाळा,वारा,आणि पावसाळा यांचेठिकाणीं वृषभासारखा—बैलासारखा नेहमी उघडा राहत असे.तो पुष्ट व सुदृढ अवयवांनी युक्त होता.जसें धुराळ्यानें व्याप्त झालेल्या हिऱ्याचे तेज व्यक्त होत नाहीं त्याप्रमाणें भूमीवर शयन करणें, शरीराला तेलवगैरे न लावणें आणि स्नान न करणें यांच्या योगानें शरीरावर बसलेल्या धुरळ्यानें त्याचें ब्रहमतेज प्रकट दिसत नसे.त्याची कमर एका मळीन वस्त्रानें आच्छादिलेली असे.फार मळकट झालेल्या यज्ञोपवतीनों हा जातीचामात्र ब्राहमण आहे किंवा अधम ब्राह्मण आहे अशा समजुतीनें त्याचें तथ्यस्वरूप न जाणणाऱ्या लोकांनी त्याचा अवमान केला असतांहि तो तिकडे लक्ष्य न देतां तसाच फिरत असे,कारण तो गुणातीत झालेला होता,म्हणून आपण जड-भरतासारखे गुणातीत होण्याचा प्रयत्न करावा.||१०|| अर्थ:----तो जडभरत,जेव्हां कामाच्या मजुरीनें लोकांपासून आहार मिळविण्याची इच्छा करीत असे तेव्हां लोकलज्जेस्तव त्यांच्या बंधुंनींच भाताच्या शेतांत चिखल सारखा करण्याच्यावगैरे कामीं त्याला लावलें असतां तेंही काम तो करीत असे परंतु ‘तेथे चिफखल टाकला असता शेत सारखें होईल व तेथून चिखल काढला असतां तें विषम होईल तसेंच याठिकाणीं बांध घातला असतां शेत कमी होईल व याठिकाणीं बांध घातला असतां जास्त होईल इत्यादी’ कामांकडे तो लक्ष ठेवीत नसे आणि भ्रात्यांनी दिलेल्या तांदुळांच्या कन्या,पेंड,कोंडा,किडके,उडीद व भांडयातल्या जळक्या अन्नाच्या खरपुड्या इत्यादिकांचेसुध्दां तो अमृताप्रमाणें भक्षण करीत असे. ||११|| अर्थ:----आतां त्यानें स्वत:वर मृत्यूचा प्रसंग आला असतांही आपल्या स्थितींत बदल केला नाहीं अशा प्रसंगाचे त्याचें विलक्षण आख्यान सांगतात-----एकेवेळीं कोणीएक चोरट्या शूद्रांचा राजा,आपल्याला संतती व्हावी या इच्छेने भद्रकाली देवीला पुरुषपशुचा बळी अर्पण करण्यास प्रवृत्त झाला.||१२|| अर्थ:----त्यानें एक पशु (पुरुष) धरून आणिला होता तो दैवानें त्याच्या हातांतून मरणभयानें पळून गेला,त्याच्यामार्गाचा पत्ता पाडण्यकरितां त्या चोरांच्या राजाचा दूत,जिकडेतिकडे धांवत सुटले असूनही,ती रात्र मध्यरात्रीच्या वेळीं अंधकारानें व्याप्त झालेली असल्यामुळें त्यांना तो पशु सांपडला नाही;तों अकस्मात् दैवयोगानें एका माळयावर उभा राहून मृग,डुकर इत्यादिकांपासून शेतांचे रक्षण करणाऱ्या जडभरताला त्यांनी अवलोकन केलें. ||१३|| अर्थ:---नंतर ते, ‘पुरुषपशु चांगल्या लक्षणांनी युक्य आहे’असें जाणून व ह्याच्या योगानें आपल्या धन्याची कार्यसिद्धी होईल असे मनांत आणून,हर्षानें प्रफुल्लीतमुख होत असलेले त्याला दोरीनें बांधून चंडीकादेवीच्या मंदिरांत घेऊन गेले.||१४|| अर्थ:----नंतर त्याला त्या चोरांनी स्वत:च्या विधीप्रमाणें स्नान घालून त्याच्याकडून कोरें वस्त्र पांघरवून,त्याला अलंकार,उटी, माळा टिके इत्यादिकांनी सुशोभीत करून भोजन घातले; आणि धूप,दीप,फुलें,लाह्या,आम्रपल्लव,दूर्वांकुर,फळें व नैवेद्य या सामुग्रीनें युक्त अशी वधाची सिद्धता करून,गायन,स्तुती,मृदंग व टिमक्या ह्यांचा मोठा घोष करीत त्या पुरुषपशुला भद्रकाली देविच्या पुढे नेऊन बसविलें. ||१५|| अर्थ:----नंतर त्या चोरांच्या राजाच्या पुरोहीतानें,त्या पुरुषपशूच्या (जडभरताच्या) रक्तरूप मद्याने भद्रकाली देवीच तृप्ती करण्यासाठी देवी मंत्राने अभीमंत्रित केलेला अतीभयंकर तीक्ष्ण खड्ग उचलिला. ||१६|| अर्थ:----हे राजा,ज्यांचे स्वभाव रजोगुण व तमोगुण यांनी व्याप्त झाले आहेत,ज्यांची मनें,द्रव्यमदरुपी रजोगुणाचे आधिक्य झाल्यामुळें मर्यादा सोडून बहकून गेलीं आहेत,जे भगवदंशानें युक्त अशा ब्राहमणकुलाला तुच्छ मानून कुमार्गानें यथेच्छपणें संचार करीत आहेत व ज्यांच्या चित्ताचा उल्हास हिंसेकडेच झाला आहे अशा त्या चोरांच्या हातून,आपत्कालीं सांगीतलेल्या हिंसमध्ये सुध्दां न सांगीतलेलें जें साक्षात ब्रह्मभूत व निर्वैर अशा ब्रहमर्षीपुत्राचे अतिभयंकर वधरूप कर्म,तें होणार असें पाहून अतिदु:सह अशा ब्रहमतेजाच्या योगानें अतिसंतप्त झालेल्या शरीरानें तीच भद्रकाली देवी,एकाएकी आपली मूर्ती टाकून बाहेर निघाली.भद्रकालीने सात्विक महात्मा जड-भरत यांची बाजू घेऊन जे रजोगुणांनी व तमोगुणांनी याप्त चोर यांचा संहार करण्याकरिता मूर्तीतून देवता रूपाने प्रगट झाली.म्हणून आपण—जीवानी सात्विक गुणाची वृद्धी होण्यासाठी राजस गुण व तामस गुणाचे प्राबल्य कमी करावे,कारण त्यामुळे आपण भगवंतांचे प्रिय भक्त होतोत.त्यामुळे भगवंत आपले रक्षण करतो.जर आपला—जीवाचा राजस व तामस गुणाची वृद्धी झाली की,आपोआपच सत्व-गुणाचे प्राबल्य कमी होऊन आपण विषयांचे—देहाचे भक्त होतोत.आपण विषयांचे—देहाहे भक्त झाले असता,भगवंत आपले रक्षण न करता प्रतिकूल होऊन सुख न देता दु:ख देतो.म्हणून आपण सत्संग करून सत्वगुणाचे प्राबल्य अधिक वाढवावे व भगवंतांचे प्रिय भक्त व्हावे.||१७|| अर्थ:----त्या वेळीं अत्यंत अपराधाचे सहन न होणें,व शरीराचा दाह होणें ह्या दोहोंच्या आवेशाच्या वेगामुळें चढून गेलेला जो भ्रुकूटीचा विस्तार,वक्र दाढा आणि लाल डोळे ह्यांच्या संभ्रमानें जिचें मुख अतिभयंकर दिसूं लागलें आहे आणि जगाला मारूनच टाकण्यास उद्युक्त झाली कीं काय अशा अतिशय क्रोधाच्या आवेशाने मोठ्यानें गर्जना करणाऱ्या त्या भद्रकाली देवीनें, त्या स्थानापासून एकदम उडी मारून,जडभरताला मारण्याकरितां पूर्वी अभीमंत्रयन केलेला तोच खड्ग,त्या पुरोहिताच्या हातांतून हिसकवून घेऊन,त्याच्याच योगानें त्या पापी दुष्ट चोरांची मस्तकें तोडिली आणि त्यांच्या कंठापासून स्त्रवणाऱ्या अतिउष्ण रक्तरुपी मद्याचें आपल्या गणासहवर्तमान प्राशन करूरन,त्याच्या अतिप्राषनामुळें उद्भवलेल्या मदनें धुंद झालेली ती देवी, आपल्या पार्षदांसहवर्तमान फार मोठ्यानें गायन करीत व नृत्य करीत मस्तकरूप चेंडूच्या खेळानें खेळूं लागली. ||१८|| | एवमेव खलु महदभिचारातीक्रमः | कात्स्नर्येनात्मने फलती ||१९|| अर्थ:-----हे राजा,याप्रमाणेंच सत्पुरुषांवर योजलेला मारणरूप अपराध,सर्वप्रकारेंकरून योजनाऱ्यालाच खरोखर फलद्रूप होतो.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून स्वधर्मांचे पालन करून ज्ञानाद्वारे सत्पुरुष व्हावे.आपण रजोगुण व तमोगुण वाढवू नये,कारण यामुळे भगवंत आपल्यालाच—जीवाला दु:ख देतो.||१९|| | न वा एतद्विश्नुदत्त महद्भूत्मं यदसम्भ्रमः स्वशिरश्छेदन | | आपतितेsपि विमुक्तदेहाध्यात्मभावसुदृढहृदयग्रन्थीनां सर्वसत्वसुहृदात्मनां | नीर्वेराणां साक्षातभ्दगवतानिमिषारीवरायूधेनाप्रमत्तेन तैस्ते र्भावै:परीरक्ष्यमाणानां | | तत्पादमूलमकुतश्ची भ्द्यमुपसृतानां भागवतपरमहंसानाम्||२०|| | अर्थ:-----हे परीक्षिता,ज्यांनी देहादिकांवर आत्मभावरूप असलेला अतिबळकट ह्रदयग्रंथी सोडीला आहे,म्हणजेच ज्यांचे अज्ञान निवृत्त होऊन व सर्व विषयांचा त्याग करून,परमात्म्याचा अनुभव घेतलेला आहे.जे सर्वभूतांचे मित्र व आत्मे झाले आहेत,म्हणजे ज्याप्रमाणे परमात्मा सर्व प्राणिमात्रांत कूटस्थरूपाने विराजमान आहेत.जड-भरत यांना परमात्मरूप झालेले असल्यामुळे कूटस्थ-रूपाने सर्वांच्या अंत:करणात व सर्वांचे मित्र आहेत.जे कोणाशीही वैर करीत नाहींत,कारण वैर भावना मर्यादित वस्तुत असते,तर जी वस्तू अमर्यादित असते,त्या वस्तुत मित्र भावना असते.ज्याचें साक्षात भगवंतानें,आपल्या नेहमी सावध असलेल्या कालचक्ररुपी उत्तम शस्त्राच्या योगानें त्या त्या अंतर्यामीरूपानें प्रेरणा केलेल्या भद्रकालीवगेरे स्वरूपांनी संरक्षण केले आहें,भगवंत हाच भद्रकालीरूपाने येऊन जड भारतास संरक्षण देऊन चोरांचा शिरच्छेद केलेला आहे.आणि जे निर्भय अशा भगवंताच्या चरणमुलाप्रत—परमात्मापर्यंत—ब्रह्मपर्यंत शरण गेले आहे.त्या महाभगवद्भक्त परमहंसांना स्वतांचा शिरच्छेद होण्याची वेळ आली असतांहि,जी व्याकुळता प्राप्त न होणें हें कांही मोठेंसें आश्चर्य नव्हे.असे असतांना महात्मा जड—भरतांना दु:ख न होणे,असे साहजिकच आहे.||२०|| ९---याप्रकारें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील(५)पंचमस्कंधामध्यें जडभरताच्यना आख्यानांतील हा नववा(९)अध्याय(२०) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||९|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीगुरूचरणार्पणमस्तु|| ________________________________________________________________________________________आतां या दहाव्या अध्यायामध्ये,आपली पालखी वाहणाऱ्या जड-भाताताचा तिरस्कार करणाऱ्या राहूगण-राजाने,आपल्या दुर्वाक्यांचा जड-भारताने केलेला अनुवाद जाणून,त्याला त्वरित प्रसन्न केले अशी कथा वर्णन केलेली आहे. |१०--- जडभरत आणि राजा रहूगणाची भेट _______________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | अथ सिन्धुसौवीरपते रहूगणस्य व्रजत इक्षुमत्यास्तटे तत्कुलपतिना शिबिकावाह- | | पुरुषान्वेषणसमये दैवेनोपसादित: स द्विजवर उपलब्धएष पिवा युवा संहननांगो गोखरवद्धूरं | | वोढुमलमिति पूर्वविष्टिगृहीतै: सह गृहीत: प्रसभमत दर्ह उवाह शिबिकां स महानुभाव: ||१|| | अर्थ:-----त्यांत प्रथम त्या जडभरताचे ज्ञानित्व सांगण्यासाठी श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,नंतर एकेवेळी सिंधूसौवीर देशांचा रहूगणनामक राजा,तत्वज्ञान प्राप्त होण्याकरितां कपिलमहामुनीच्या आश्रमाप्रत जाऊं लागला असतां,इक्षुमतीनामक नदीच्या तीरीं भोइलोकांच्या अधीपतीला,राजाची पालखी वाहण्यासाठी भोई शोधून आणण्याची वेळ पडली तेव्हां,दैवानेंच तेथें आणून पोंचविलेला हा ब्राहमणश्रेष्ठ त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याला वाटलें कीं,---हा पुरुष,तरून व घट्ट अशा अवयवांनी वृषभासारखा किंवा गर्दभासारखा भार (पालखीचा दांडा) वाहण्यास समर्थ आहे,असें मानून त्यानें पूर्वी बलात्काराने वेठीला धरलेल्या पुरूषांबरोबर यालाहि धरलें.तें काम त्याच्या योग्यतेचे नव्हते तथापि तो महासमर्थ जडभरत,राजाची पालखीवाहुं लागला.जड-भरताचा अधिकार अगोदरचे जे पालखी—वाहक होते,त्यांना माहित नव्हते.जड-भरत स्थूल-शरीराने धष्ट-पुष्ट आहे असे समजून म्हणजे बहिरंगाची योग्यता पाहून,त्यास राजा--रहूगणाच्या पालखीस वाहक म्हणून घेतले व जड-भरत पालखी वाहू लागला.||१|| अर्थ:-----तेव्हां चालतांना हिंसा होईल म्हणून हा श्रेष्ठ ब्राहमण,बाणाइतका प्रदेश पाहून तेथें किडा,मुंगी,वगैरे नाही अशी खात्री झाल्यावर पावलें ठेऊन चालत असे,कारण आपल्याकडून इतर प्राण्यांची हिंसा होऊ नये असे शात्र-वाचन आहे,म्हणून त्या नियमांचे पालन करण्याकरिता तो त्यांना चुकवून पालखी वाहू लागला.म्हणून याच्या गतीबरोबर जेव्हां दुसऱ्या पुरुषांची गती सारखी होईना व पालखी वांकडी होऊ लागली तेव्हां तें पाहून,त्या वाहक पुरूषांना रहूगण राजा, म्हणाला कीं, हे वाहकहो,”तुम्ही पालखी चांगल्या रीतीनें वहा, वांकुडी पालखी काय म्हणून वाहतां?” ||२|| | अथ त ईश्वरवचः सोपलम्भमुपाकर्ण्योपाय-तुरीयाच्छङकितमनसस्तं विज्ञापयाम्बभूवुः ||३|| | अर्थ:----असें स्वामीचें निंदायुक्त भाषण श्रवण करून,ते भोई आपणास राजा दंड करील अशी शंका मनांत आणून त्याच्या जवळ(राजा राहूगण) विज्ञापणा करूं लागलें कीं,------------------ ||३|| अर्थ:-----हे महाराज,आम्ही उन्मत्तपणानें मुळींच वागत नाहीआ,तर आपल्या आज्ञेप्रमाणे निट पालखी वहात आहों,परंतु हा आतांच लावलेला नवा भोई श्रमला नसूनही जलद चालत नाही.याच्या बरोबर पालखी वाहण्यास आंम्ही समर्थ नाहीं. ||४|| | सांसर्गिको दोष एव नूनमेकस्यापि सर्वेषां सांसर्गिकाणां | भवितुमर्हतीति निश्चित्य निशम्य कृपणवचो राजा रहूगण| | | उपासितवृद्धोsपि निसर्गेण बलात्कृत ईषदुत्थितमन्युरविस्पष्टब्रम्हतेजसं | जातवेदसमिव रजसाssवृतमतिराहः ||५|| | अर्थ:----याप्रमाणे त्या गरीब भोयांचे भाषण ऐकून,‘संसर्गनिमित्तक एकाचाही दोष,त्याच्या बरोबर संबंध ठेवणाऱ्या सर्वही लोकांस बाधक होण्यास योग्य होतो’ (म्हणून आपण--जीवानी सात्विक जे गुणी आहेत,त्यांचीच संगती करावी,तर जे राजस किंवा तामस आहेत,त्यांची संगती करू नये.) अशा निश्चय करून रहूगण राजा,वृध्दांची सेवा करून शांतस्वभाव झालेला होता तथापि ह्या प्रसंगी आपल्या मुळच्या क्षत्रीयस्वभावानें बलात्कारानें परवश केल्यामुळें त्याची बुद्धी रजोगुणानें व्याप्त झाली होती,म्हणून तो थोडासा क्रोधयुक्त होऊन,भ्स्मानें आच्छादित असलेल्या अग्नीप्रमाणे ज्याचेठिकाणी ब्रहमतेज स्पष्ट दिसत नव्हतें अशा त्या ब्राहमणाला म्हणला कीं,--------- ||५|| अर्थ:----हे बंधो,मोठी दु:खाची गोष्ट आहे कीं! तूं खरोखर फार श्रमला आहेस! पुष्कळ वेळेपर्यंत तूं एकटयानेंच हि पालखी फार लांब रस्त्यावर वाहून आणिली आहेस! आणि तूं फारसी पुष्टहि नाहींस! तुझे अवयवहि सदृढ नाहींत! व म्ह्तारपणानेंहि तूं अगदि पिडीत झाला आहेस! हे मित्रा,तुझें हे दुसरे साथीदार,पालखी मुळींच वाहत नसतील! याप्रमाणें वक्र भाषणानें राजानें त्याच्या पुष्कळ उपहास केला असतांही,ज्यामध्यें,पंचमहाभूतें,इंद्रिये,पुण्यपापरूप कर्में व अंत:करण यांची रचना अविद्येनें रचलेली आहे अशा आपल्या हस्तपादादीक आकारविशेषांनी परिणाम पावलेल्या मिथ्याभूत शेवटच्या देहावर ‘हा मी व हें माझें’ अशा प्रकारचा अभिमान ज्यानें मुळींच बाळगलेला नाहीं असा तो ब्रहमरूप झालेला जडभरत,मुकाटयानें पूर्वीप्रमाणें पालखी वाहुं लागला.राजा-रहूगण यांनी जड-भरत जो ब्राह्मानुभूती संपन्न असलेला अभिमानरहित महात्मा यांना अपमानपुर्वक बोलून उपहास केला तरी सहनशीलतापुर्वक पूर्वीप्रमाणे पालखी वाहू लागला.आपण जड-भरताचे अनुकरण करावे,तर राजा रहूगणासारखे आचरण करू नये,कारण त्यात आपले—जीवाचे हित आहे.||६|| अर्थ:----नंतर पुन: पालखी डमळूंलागेली असतां,अतिक्रुध्द झालेला रहगुण राजा म्हणाला कीं,काय हें ! अरे तूं जीवंत असतांनांच मेला आहेस कि काय? अरे माझा अनादर करून तूं मज स्वामीची आज्ञा उल्लंघन करीत आहेस काय? हे उन्मत्ता,जसा दंडपाणी (यम) जीव-समुदायला शासन करितो त्याप्रमाणे मी तुला शिक्षा करितों,म्हणजे तूं निट ताळ्यावर येसील.अजून पण राजा रहूगणाने जड—भरत महात्मा यांना ओळखिले नाही,म्हणून राजसत्ता असल्यामुळे व अधिकार न कळल्यामुळे असे राजा-रहूगणकडून होऊ लागले.आपण—जीवानी समोरच्या व्यक्तीचा अधिकार जाणून,नंतर अधिकारानुसार बोलावे,अधिकार न जानता कोणास कांहीच बोलू नये,कारण त्यामुळे अधर्म—अन्याय होण्याची शक्यता अधिक असते.||७|| अर्थ:---- हे राजा,याप्रमाणे पुष्कळ अयोग्य भाषण करणारा, ‘मी राजा आहे’ असा अभिमान धारण करणारा रजोगुणानें व फार वाढलेल्या मदानें भगवंताच्या सर्वप्रिय स्थानाचा (भक्तांचा) तिरस्कार करणारा,आपणासच पंडित असें मानणारा आणि भगवद्भक्तांच्या अभिप्राय जाणण्याविषयीं ज्याच्या बुद्धीने अभ्यास केलेलाच नाहीं अशा त्या रहूगण राजाला,सर्वभूतांचा मित्र, आत्मा ब्रहमरूपी ऐक्य पावलेला व गर्वरहित असा तो भगवान् ब्राहमण (जडभरत) किंचित हास्य केल्यासारखें दाखवून म्हणाला कीं,----राजास—सत्ताधीश यांना,संत—महात्मा यांना उपदेश करण्याचा अधिकार अधिक असतो,असे शात्र—वाचन आहे,म्हणून जो राजा-रहूगुण अभिमानी,रजो-गुणी,मद-गुणी,भक्तांचा निंदक,भक्तांचा अधिकाराविषयी अज्ञानी,पंडित-अभिमानी,असा दोषयुक्त रहूगण राजास,सर्व-भूतांचा मित्र,आत्मा—ब्रह्मरूपी ऐक्य पावलेला,गर्वरहित,असा भगवान्-ब्राह्मण—जडभरत किंचित हास्ययुक्त केल्यासारखे दाखवून म्हणाला की,----------||८|| | त्वयोदितं व्यक्तमविप्रलब्धं भर्तुःस मे स्याद्ददि वीर भारः | | गन्तुर्यदि स्यादधिगम्यमध्वा पीवेति राशौ न विदां प्रवादः||९|| अर्थ:----ब्राहमण---जड भरत म्हणाला----हे वीर,राजा,तूं मला फार श्रमला आहेस वगैरे जें भाषण केलेंस ते वर्मी लागण्यासारखें खोचेंचें नसून खरेंच आहे.कारण,हे वीरा,जर भार म्हणून कांही पदार्थ असता व तो वाहणाऱ्या देहाला लागत असता आणि तो मला जर प्राप्त झाला असता,म्हणजे त्या भार वाहणाऱ्या शरीराचा जर माझ्याशीं कांही संबंध असता तर तुझें तें खोंचेचें बोलणे मला वर्मी लागले असतें;परंतु भार आणि शरीर हीं दोन्ही म्हणण्यासारखी नाहींत व त्यांचा माझ्याशी संबंध नाहीं.शरीर आणि भार शरीराच्या संबंधी संबंधी आहेत,त्यांचा आत्म्याशी—माझ्याशी कांहीच संबंध नाही.तसेंच चालणाऱ्याला अमुकठिकाणीं पोंचावयाचे स्थान व मार्ग हि जर सत्य असती व त्यांचा जर माझ्याशी संबंध असतां तर तुझें तें छद्मी ‘बोलणें मला खोंचलें असतें.ते काहिंच नाहीं,कारण चालणाराचे स्थान व मार्ग हे सत्य नाहीत व त्याचा आत्म्याशी--माझ्याशी संबंध नाही,म्हणून तुझ्या खोचंक—छद्मी मला खोंचले नाही.आता हे राजा,तूं मला,फारसा पुष्ट नाहींस वगैरे जें म्हणालास ते चैतन्याला उद्देशून ‘तूं पुष्ट आहेस’ असें म्हणणे विद्वानांचे संभवत नाहीं,मुर्खाचेंच—बोलणाराचे संभवतें,कारण,ते बोलणे पंचमहाभूतांच्या राशीरूप देहालाच—मनाला अवलंबून असतें,आत्म्याला अवलंबून नसतें,कारण आत्मा—मी असंग आहे.||९|| | स्थौल्यं कार्श्यं व्याधय आधयश्च क्षुत्तृड्भयं कलिरिच्छा जरा च | | निद्रा रतिर्मन्युरहं मदः शुचो देहेन जातस्य हि मे न सन्ति ||१०|| अर्थ:----स्थूळपणा,कृशपणा,रोग,हे स्थूल-शरीराचे धर्म आहेत.मानसिक-पीडा,क्षुधा,तृषा,भय,कलह,इच्छा,जरा,निद्रा,ग्लानी,क्रोध, अहंकार,गर्व आणि शोक हे सर्व धर्म,सूक्ष्म—शरीराचे धर्म आहेत.वरील सर्व धर्म देहाभीमानसहवर्तमापण उत्पन्न होणाऱ्या पुरुषालाच आहेत,ते नीरभीमानी अशा मला मुळींच नाहींत.म्हणून आपण—जीवानी देहांचा—स्थूल व सूक्ष्म देहाचा अभिमान धारण करू नये,कारण आपण—जीव निराभिमानी आत्मा आहे.||१०|| अर्थ:----आतां जीवंत असून तूं मेल्यासारखा आहेस असें जें तूं म्हणालास त्याबद्दल सांगतों ऐक.---- हे राजा,जन्म आणि मरण हे धर्म,केवळ मलाच आहेत असें नाहीं,तर जितके म्हणून परिणामी पदार्थ—आनात्मा आहेत त्या सर्वांनाही ते नियमानें दिसून येतात.मी तर आत्मा आहे,म्हणून जन्म—मरण धर्म माझे—आत्म्याचे नाहीत.कारण,ते—अनात्मा विकारी पदार्थ प्रतीक्षणीं उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त आहेत.आतां स्वामीजी आज्ञा उल्लंघन करितोस,असें जें तूं मला म्हटलेंस त्याबद्दल सांगतों ऐक.--- हे स्तुत्य राजा,जेथें सेव्य-सेवकभाव कायमचा निश्चित असेल तेथें धण्याची आज्ञा आणि चाकराचें काम हा प्रकार योग्य होईल, नाहीतर योग्य होणार नाहीं.सेव्य-सेवकपणा हा सूक्ष्म-शरीराचा धर्म आहे.मी सूक्ष्म शरीर नाही,म्हणून आपले—जीवाचे हे धर्म नाहीत.जर कदाचित् तूं राज्यश्नष्ट झालास आणि मला राज्य मिळालें तर हें उलट होणार नाहीं काय? होईलच.म्हणजे अनात्मा पदार्थ बदलानते आहेत,तर स्थिर नाहीत.मी—जीव तर स्थिर—आत्मा आहे.||११|| अर्थ:----राजा आणि सेवक यांची भेदबुद्धी वाटण्याला आवकाश (जागा) म्हटला तर व्यवहारांवाचून दुसरा थोडादेखील माझ्या दृष्टीस पडला नाहीं.व्यवहारात कल्पित भेद व वास्तव अभेद आहे,पारमार्थिक दृश्य भेद नसून अभेदच आहे.तेव्हां तेथें धनी तो काय? आणि त्यांनें आज्ञा करावयाची ती कोणती? पारमार्थिक दृष्ट्या धनी काय?आणि त्या धन्याने कोणास कोणती अज्ञा करावी?कांहीच नाही,कारण आज्ञा करण्याकरिता द्वैताची गरज आहे.परमार्थीक दृष्ट्या फक्त परमात्माच आहे.असें असून तुला अभिमानच असेल तर हे राजा,मी तुझी कोणती सेवा करावी? तें सांग. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सेवा कोणती करावयाची आहे,ती मला कृपा करून सांगावी.||१२|| | उन्मत्तमत्तजडवत्स्वसंस्थां गतस्य मे वीर चीकित्सितेन | | अर्थः कियान् भवता शिक्षितेन स्तब्धप्रमत्तस्य च पिष्टपेष: ||१३|| अर्थ:----आतां मी तुला शासन केलें म्हणजे तूं ताळ्यावर येशील असें तूं म्हणतोस तर----हे वीरा,उन्मत्त,मत्त किंवा जड यांच्यासारखा बाह्यदृष्टीनें वागत असून वस्तुत: ब्रहमरुपास पावलेल्या मला तूं केलेल्या दंडाने किंवा शिक्षेंनें तुझा काय उपयोग होणार आहे? काहिंच नाही,कारण शिक्षा हा आत्म्याचा धर्म आहे किंवा अंत:करणाचा धर्म आहे ?आता मी,मुक्त नसून प्रमत्त किंवा उद्धट आहें असें तुझ म्हणणे असेल तरीदेखील तुझें मला शिक्षा करणें हें पिष्टपेषणासारखें (पिठाच्या वारंवार दळन्यासारखे) निरर्थक होणार आहे,कारण शिक्षा हा अंत:करणाचा धर्म आहे आणि ते जड आहे.जडास शिक्षा होते का? मी तर आत्मस्वरूप आहे.जो आत्मस्वरूप आहे,त्यास शिक्षा नसते.मग शिक्षा कोणास आहे ?शिक्षा हि जो जीव अज्ञानी असून कळणारा आहे,त्याला शिक्षा आहे.मी तर आत्मा—परमात्मा अनुभवी आहे,म्हणून माझे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे मी आत्मानुभवी आहे,म्हणून मला शिक्षा नाही.म्हणून आपण—जीवानी आपले—जीवाचे सत्संगाद्वारा अज्ञान निवृत्त करून ज्ञानप्राप्त करून घ्यावे व परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||१३|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ज्याचें देहाला आत्मा मानन्याचे निमित्त (अविद्या) नाश पावलें आहे आणि ज्याचा स्वभाव शांत आहे असा तो ऋषीश्रेष्ठ जडभरत,याप्रमाणे त्या रहूगणाला अनुवादरूप भाषणाने प्रत्युत्तर देऊन,प्रारब्धकर्मांचा उपभोगानेच क्षय करण्यासाठी राजाची पालखी पूर्वीप्रमाणें वाहुं लागला.||१४|| | स चापि पाण्डवेय सिन्धू सौवीरपतिस्तत्व- | जीज्ञासायां सम्यक् श्रद्धयाधिकृताधिकारस्तद् | हृद्यग्रन्थिमोचनं व्दिजवच आश्रुत्य बहुयोग- | ग्रन्थसम्मतं त्वरयावरुह्य शिरसा पादमुलमुपसृत: | क्षमापायन् विगतनृपदेवस्मय उवाच ||१५|| अर्थ:----हे पांडवपुत्रा,सिंधूसौवीरदेशाचां अधिपती तो रहूगण राजाही,उत्तम श्रद्धेच्या योगानें तत्वजिज्ञासेविषयीं अधीकार प्राप्त झालेला होता.त्यानें ह्रदयग्रंथीचा भेद करणारें व अनेक योगग्रंथांना मान्य असें तें जडभरताचें भाषण ऐकिल्याबरोबर त्याचा ‘मी मोठा राजा असा असलेला’ गर्व अगदी नाहीसा होऊन तो त्वरेनें पलखींतून खाली उतरला आणि त्या ब्राहमणाच्या चरणाप्रत मस्तकानें नमस्कार करून त्याजवळ क्षमा मागत असता म्हणाला की,--------------||१५|| अर्थ:---हे भगवान्,आपले वर्णाश्रमादिक धर्म समजूं न देतां गुप्तरूपाने संचार करणारा तूं कोण आहेस? तूं यज्ञोपवती धारण करीत आहेस त्यावरून बाहमण,क्षत्रीय किंवा वैश्य या तिघां द्विजांपैकी कोणीतरी आहेस कि काय? किंवा दत्तात्रेयादिकांपैकी तूं कोणी अवधूत आहेस कीं काय ? तूं कोणत्या देशामध्यें राहणारा,कोणाचा कोण आहेस व या ठिकाणीं कोणत्या कारणानें आला आहेस? आमच्या कल्याणाकरितां जर येथें प्राप्त झाला आहेस तर तूं शुध्दसत्त्वमूर्ती कपिल महामुनी तर नव्हेस ना ? ||१६|| | नाहं विशङ्के सुरराजवज्रा न्नत्र्यक्षशुलान्न यमस्य दंण्डात् | | नाग्न्यर्क सोमानिलवित्तपास्त्रा च्छङ्के भृशं ब्रम्हकुलावमानात् ||१७|| अर्थ:----हे भगवन्,मी इंद्राच्या वज्रापासून भीत नाहीं,रुद्राच्या शुळापासून भीत नाहीं,यमाच्या दंडापासून भीत नाहीं,तसाच अग्नी,सूर्य,चंद्र,वायू आणि कुबेर यांच्या शस्त्रांपासूनही भीत नाहीं,परंतु ब्राह्माणकुलाच्या अपमानापासून फार भीत असतों,कारण जे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म-ज्ञानी आहे,तो अज्ञानी जणांना उपदेश करून सत्संगास लावतातव त्यामुळे त्यांचे अज्ञान निवृत्त होते व त्यामुळे जीवांचे जन्म—मरण निवृत्त करितात,म्हणून ब्राह्मणाइतके मोलाचे इतर कोणी करू शकत नाही,म्हणून त्यांचा अपराध आपल्याकडून—जीवाकडून झाल्यात ईश्वर त्यांना फार शिक्षा करतो.म्हणून आपल्याकडून—जीवाकडून ब्राह्मणांचा अपराध होऊ नये.||१७|| अर्थ:----यास्तव जो तूं आपला अपरोक्षज्ञानरुपी प्रभाव गुप्त राखून,अनंत महिम्यानें युक्त असूनही जनसंगरहित होत असता जडासारखा फिरत आहेस तो तूं कोण आहेस? तें मला सांग.कारण हे साधो,तुझी योगमार्गानें घाटलेली जीं भाषणें तीं आम्हांस मनानेंही अर्थविचार करण्यास शक्य होत नाहींत किंवा मोठमोठे सूक्ष्मविचारी पुरुषही तुझीं वचनें अर्थविचारानें उकलण्यास समर्थ होत नाहींत. ||१८|| अर्थ:---- मी तर,आत्मतत्त्व,जाणणाऱ्या मुनींचाही परमगुरु अशा ज्ञानकलेंनें अवतार धारण करणाऱ्या साक्षात हरिरूपी कपिलमहामुनीला,या संसारामध्यें शरण जाण्यास योग्य असें वस्तू कोणतें आहे.तें विचारण्यासाठी त्याच्या आश्रमाकडे जात आहे.म्हणून आपण रहूगण राजासारखे संत—महात्मा यांच्याकडे सत्संग करण्याकरिता जाऊन त्यांचा सत्संग करावा.||१९|| अर्थ:----तो कपिलमहामुनिच तूं असून लोकस्थिती पाहण्यासाठी स्वतांचे स्वरूप गुप्त फिरत आहेस कि काय? गृहाचेठिकाणी आसक्त असल्यामुळें विवेकशून्य असलेला पुरुष,योगेश्वरांच्या गतीला कसा बरें ? जाणणारच नाहीं. ||२०|| अर्थ:----असा प्रश्न तो रहूगण राजा,त्यानें दिलेल्या उत्तरांववर शंका करितों कीं,मला श्रम नाहीं,असें जें तूं म्हटलेंस त्याविषयी मला असें वाटतें की,मला तर युध्दादिक कर्म केल्यापासून श्रम झालेला दिसतो,त्याप्रमाणेंच भार वाहणाऱ्या व चालनाऱ्या तुलाही श्रम होत आहे असें मी अनुमान करितो.आतां हा केवळ व्यवहारमात्र आहे यांत खरें काहिंच नाही,असें तूं म्हणशील तर, हा व्यवहारमार्ग (प्रपंच) मूळकारणासहित सत्यच दिसत आहे.कारण,खोटया वस्तूच्या योगानें व्यवहार चालणार नाही.घट जर खोटा आहे असें मानिलें तर त्यापासून पाणी आणणे वगैरे कामें कशीं होतील? होणारच नाहींत. ||२१|| अर्थ:----ज्याप्रमाणे चुलींवर भांडे ठेऊन त्याच्या खालीं अग्नी प्रदीप्त केला म्हणजे त्याच्या योगानें प्रथम तें भांडे तापतें,नंतर त्यांतील पाणी तापतें,नंतर तांदूळ बाहेरून व आंतून शिजवतात.त्याप्रमाणें देह,इंद्रिये,प्राण आणि मन ह्यांच्या संबंधामुळे क्रमाक्रमानें उपाधिंचे धर्म पुरुषावर येऊन पोचतात,त्यांच्या योगानें पुरुषाला संसार प्राप्त होतो.म्हणजे उन्हानें शरीराला ताप झाला कीं इंद्रिये तापतात,नंतर प्राण तापतात,नंतर मनाला ताप होतो आणि शेवटी परमात्म्याचा अंशभूत असलेल्या जीवालाही ताप होतो.||२२| अर्थ:---आतां तुझ्या म्हणण्याप्रमाणें सेव्यसेवकभाव जरी अशाश्वत मानिला तथापि ज्या वेळीं जो राजा असतो त्या वेळीं तो प्रजांना शिक्षण लावणारा व रक्षण करणारा असतोच.प्रमत्ताला शिक्षा करणें हें केवळ पिष्टपेषण म्हणावे तर,जो भगवंताच दास असतो तो कदापि पिष्टपेषणासारखें निरर्थक काम करावयाचा नाहीं.कारण,उन्मत्तादिकांना त्यानें शिक्षा केली असतांहि जरी त्यांचा उन्मत्तादिपणा गेला नाही तथापि त्याच्या योगानें स्वधर्मरूप भगवंताचे आराधन करणाऱ्या त्या पुरुषाची सर्व पापें नष्ट होतात. ||२३|| | तन्मे भवान्नरदेवाभिमान मदेन तुच्छीकृतसत्तमस्य | कृषीष्ट मैत्रीदृशमार्तबन्धो यथा तरे सदवध्यानमंहः ||२४|| अर्थ:----यास्तव हे दु:खितांच्या हितकर्त्यां,मला जरी तुझें भाषण विपरीत वाटत आहे तथापि‘मी राजा आहे’ अशा अभिमानामुळे प्राप्त झालेल्या उन्मत्तपणानें तुझ्यासारख्या महासाधुंचा अपमान केल्याचा दोष मजकडे येत आहे,म्हणून तूं माझ्यावर स्नेहयुक्त दृष्टी करावीस म्हणजे तिच्या योगानें मी सत्पुरुषांच्या अपराधरूप दोषापासून मुक्त होईल.आपणाकडून—जीवाकडून संत—महात्मा यांचा अपराध झाला तर आपण त्यांना क्षमा मागावी,शरण जावे.||२४|| | न विक्रिया विश्वसुह्रत्सखस्य साम्येन विताभीमतेस्तवापि | | महाद्विमानात् स्वकृताद्धिमादृङ् नक्ष्यत्यदुरादपि शूलपाणि: ||२५|| अर्थ:----जगाचा हितकर्ता,मित्र आणि सर्वांशी सारखा भाव असल्यामुळें कोठेंहि अभिमानरहित अशा तुला माझ्यासारखा मनुष्य तर काय परंतु प्रत्यक्ष त्रिशूळधारण करणाऱ्या शंकरासारखा महासमर्थहि तत्क्षनींच नाश पावेल यांत संशय नाहीं.म्हणजे ईश्वरापेक्षाही समर्थे संत—महात्मा यांच्यात असते,कारण संत—महात्मा अज्ञानी जीवांना उपदेश्कारून सत्संगाद्वारे जन्म—मरण निवृत्त करतात,पण भगवंत अज्ञानी जीवांचे अज्ञान्निवृत्त करू शकत नाही,म्हणून या मौलिक कार्यामुळे ईश्वरापेक्षा संत—महात्मा श्रेष्ठ आहे—महत्वाचा आहे. ||२५|| १०---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें ब्राह्मण--रहूगणसंवादांतील हा दहावा(१०)अध्याय पंचवीस(२५) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. ||१०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________|११--- राजा रहूगणाला भरताचा उपदेश ________________________________________________________________________________________ |ब्राहमण उवाच:--- | अकोविद: कोविदवादवादान् वदस्थो नातिविदां वरिष्ठ: | | न सुरयो हि व्यवहारमेनं तत्त्वावमर्शेन सहामनन्ति ||१|| अर्थ:----जड-भरत---ब्राहमण म्हणाला----हे रहूगणराजा,तूं ज्ञानमार्गात निष्णात नसूनही,ज्ञानमार्गात निष्णात असलेल्या पुरुषाचे पक्ष उचलून भाषणें करीत आहेस,इतक्या योगानें तूं महाविद्वानांमध्ये श्रेष्ठ म्हणून गणला जाणार नाहींस.कारण,जे पंडित आहेत ते,तूं सत्यत्वेंकरून सांगीतलेल्या ह्या लौकिक व्यवहाराचा,तत्वविचाराच्या बरोबरीनें कधी उच्चारही करीत नाहींत,तर जरी सुखदु:खादिक विकार नाहींत तथापि आपण केलेल्या सत्पुरुषांच्या अपमानानें,हा व्यवहार आज्ञानविलसीत आहे असें म्हणतात, म्हणून हा सत्य नव्हे.आपणास—जीवास जर वेदांताचे शब्द-ज्ञान झाले असेल व परमात्म्याचा अनुभव आलेला नसेल किंवा आला असेल तर उच्चारही करू नये.म्हणून आपण—जीवानी तर श्रेष्ठ आहे असा अभिमान येऊ नये,कारण अभिमानामुळेच संसाराचा बंध प्राप्त होत असतो.आपण—जीवानी संत—महात्मा—परमात्मानुभवीचा अपमान करू नये,अपमान केलाच तर ते अज्ञानाचे लक्षण आहे--ते बंधनाचे लक्षण आहे,तर मुक्ततेचे लक्षण नाही.||१|| अर्थ:----हे राजा,तसाच वैदिककर्मव्यवहारादि सत्य नव्हें.कारण,तोही गृहस्थाश्रमसंबंधी यज्ञविस्ताररूप विद्यांमध्यें अतिविलसित असलेल्या (पूर्णपणे भरून राहिलेल्या) वेदवादांमध्यें,बहुतकरूनच शुध्द (हिंसादिरहित) व निष्काम असा तत्त्ववाद खरोखर प्रकाश पावत नाहीं.वैदिक-कर्म-व्यवहार सत्य नाही,यज्ञ-मार्गात हिंसा होते,कारण हिंसेने मोक्ष मिळत नाही,तर कर्माने बंधनच प्राप्त होते.म्हणून आपण जीवाने हिंसात्मक कार्य करूनये,कारण ते कर्म निषिद्ध आहे.||२|| अर्थ:----तूं म्हणशील कीं,वेदांतशास्त्र ऐकणाऱ्याहि पुरुषाची व्यावहारिक कर्मात प्रवृत्ती होते,मग त्या व्यवहाराला मिथ्या म्हणता येईल कसें? तर त्याबद्दल सांगतों ऐक----गृहस्थांश्रमातील कर्मजन्य सुख,स्वप्नांतील सुखासारखेच त्याज्य आहे असें ज्याला स्वतांच अनुमान ठरवीता येत नसेल,त्या पुरुषाला उत्तमप्रकारचा तत्त्वबोध करून देण्यास,अतिश्रेष्ठ अशी उपनिषदवाक्येंहि समर्थ होणार नाहींत. ||३|| अर्थ:----जोपर्यंत मनुष्याचें मन,रजोगुण,सत्त्वगुण किंवा तमोगुण यांनी वश केलेले असतें,तोपर्यंत तें मन,स्वतंत्रपणे कोणाला न जुमानितां,ज्ञानेंद्रीयांच्या व कर्मेंद्रीयांच्या सह्यानें पुरुषकडून चांगल्या किंवा वाईट कर्मांचा विस्तार करविते.म्हणून आपण--- जीवानी मन व इंद्रिये आपल्या—जीवाच्या ताब्यात घेऊन व्यवहार करावा,तर मनाच्या व इंद्रियांच्या ताब्यात जाऊन व्यवहार करू नये. ||४|| | स वासनात्मा विषयोपरक्तो गुनप्रवाहो विकृतः षोडशात्मा | बिभ्रत्पृथङ्नामभि रुपभेद मन्तर्बहिवष्टं च पुरैस्तनोती||५|| अर्थ:-----नंतर वासनायुक्त आत्मरुपी,विषयासक्त,गुणांच्या योगानें चलन पावणारें,कामादिरूपाने परिणाम पावणारें,भूतेंद्रीयरूप सोळा कलांमध्यें मुख्य आणि निरनिराळ्या नांवांसहवर्तमान देवतिर्यगादी रूपें धारण करणारें असें तें मन,त्या त्या देवादिशरीरांच्या योगानें जीवाच्या उत्कृष्टतेला व निकृष्टतेला वाढवितें.आपणास—जीवास मनामुळेच चौऱ्याऐंशी लक्ष योनी प्राप्त होतात व मनामुळेच परमात्म्यचा अनुभव येतो,म्हणून मन आपल्या—जीवाच्या ताब्यात घेऊन शात्रानुसार आचरण करावे,कारण त्यामुळे आपणास—जीवास आपल्या स्वरूपाचीच प्राप्ती होते.||५|| अर्थ:----नंतर संसारचक्रामध्ये छळणारें व मायेनें रचलेलें तें अंत:करण,आपल्यामध्ये असलेल्या जीवात्म्याला चिकटून राहून, दु:ख,सुख किंवा तिसरेंच कांही (मोहरूप) असें,काळाने प्राप्त झालेलें दुर्निवार फळ उत्पन्न करितें.आपले—जीवाचे अंत:करण जीवात्म्याला चिकटून—आसक्त होते,त्यामुळे आपणास दु:ख-सुख-मोह इत्यादी विकाराची जे काळांनी—विनाशी तत्वांची प्राप्ती होते.म्हणून आपण—जीवानी संसाराची—विषयांची आसक्ती धारण करू नये.||६|| | तावानयं व्यवहार: सदावि: क्षेत्रज्ञ नैर्गुण्यमथो मन:स्यात् | | तस्मान्मनो लिंङ्गमदोवदन्ति गुणागुणत्वस्य परावरस्य ||७|| अर्थ:---जोपर्यंत मनाचा असा क्रम चालला आहे तोंपर्यंत प्रकाशमान होणारा हा जाग्रत्स्वरूप व्यहवार,निरंतर क्षेत्रज्ञाला (जीवाला) दिसून येतो.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून मन आणि इंद्रियांना आपल्या—जीवाच्या ताब्यात घेऊन व्यवहार शात्रानुसार करावा.तस्मात् या मनालाच त्रिगुणमय निकृष्ट संसाराचें व त्रिगुणातीत उत्कृष्ट मोक्षाचें कारण आहे असें म्हणतात.||७|| | गुणानुरक्तं व्यवसनाय जन्तोः क्षेमाय नैर्गुन्यमथो मनः स्यात् | | यथा प्रदिपो घृतवर्तीमश्रन् शिखाः सधूमा भजती ह्यन्यदा स्वम् || | पदं तथा गुणकर्मानुबद्धं वृत्तीर्मनः श्रयतेऽन्यत्र तत्वम् ||८|| अर्थ:----मन विषयासक्त असलें म्हणजे जीवाच्या संसाराला कारण होतें आणि तेंच मन,निर्गुण झालें म्हणजे जीवाच्या मोक्षाला कारण होतें जसे तुपानें भिजलेली वात भक्षण करणारा ढळढळीत दिवा जोंपर्यंत तेवत असतो तो काजळानें युक्त असलेल्या ज्वाला धारण करिते आणि तुपाचा क्षय होतांच तो आपल्या शुध्द भास्वर स्वरूपाला अथवा महाभूतरुपी तेजोरुपाला जाऊन मिळतो,त्याप्रमाणेंच मन,विषयांमध्यें आणि त्याच्या प्राप्तीस अनुकूल कर्मामध्ये आसक्त झालें म्हणजे तें अनेक प्रकारच्या वृत्तींचा आश्रय करितें आणि निर्गुण झालें म्हणजे तेंच तत्त्वाला जाऊन मिळतें.म्हणून आपण—जीवानी आसक्ती-पूर्वक कर्म करू नये,कारण ते आसक्तीपुर्वक केलेले कर्म बंधानास—दु:खास प्राप्त होते.म्हणून आपण सत्संग करून आसक्तीपुर्वक कर्म न करता,आसक्तिरहित कर्म कसे करावे,असे संत—महात्मा यांच्याकडून कळून घ्यावे.आपण—जीवानी विहित निष्काम कर्म करावे व निषिद्ध कर्म करू नये व केलेले सर्व कर्मे निष्काम भावनेने ईश्वरास अहंकाररहित अर्पण करावे.असे कर्मे आपणास—जीवास बंधनात न टाकता आपल्या—जीवाच्या स्वरूपाकडे—परमात्म्याकडे नेते.त्यामुळे आपले—जीवाचे जन्म—मरण निवृत्त होते.||८|| | एकादशासन्मनसो हि वृत्तय आकूतयः पञ्च धियोsभिमानः| | मात्राणि कर्माणि पुरं च तासां वदन्ति हैकादश वीर भूमीः ||९|| अर्थ:----हे वीरा रहूगणा,पांच कर्मेंद्रीयें,पांच ज्ञानेंद्रीयें एक अभिमान ह्या अकरा मनाच्या वृत्ती आहेत.त्या वृत्तींचे आधारभूत असे पांच सूक्ष्मभूतें,पांच कर्में आणि एक शरीर हे अकरा विषय आहेत असें म्हणतात.||९|| | गन्धाकृतिस्पर्शरसश्रवांसी विसर्गरत्यभिजल्पशिल्पाः | एकादशं स्वीकरणं ममेति शय्यामहं द्वादशमेक आहुः ||१०|| अर्थ:----त्यांची नावें----गंध,रूप,स्पर्श,रस आणि शब्द हे पांच ज्ञानेंद्रीयांचे विषय होत.मलत्याग,संभोग,गमन,भाषण आणि कुशलता (देणेंघेणे) हे पांच कर्मेंद्रीयांचे विषय होत.तसेच ‘हे माझे भोगस्थान आहे’ अशा बुद्धीने ज्याचा स्वीकार होतो तें शरीर, अकराव्या अभिमानाचा विषय आहे असें म्हणतात.परंतु कांही लोक,अहंकार हि एक मनाची बारावी वृत्तीच आहे,असें मानून तिचा शरीर हाच शय्यासंज्ञक बारावा विषय आहे असें म्हणतात.कारण,त्या शरीराचेचठिकाणी अहंकारासहवर्तमान जीव निजतो, म्हणून त्यास “पुरुष” असें म्हणतात.||१०|| अर्थ:----मनाच्या ह्या अकरा वृत्ती,विषय,स्वभाव,संस्कार,कर्म आणि काळ यांच्या योगानें परिणाम पावोन,प्रथमत: शेंकडो प्रकारच्या,नंतर हजारो प्रकारच्या आणि नंतर कोटयावधीप्रकारच्या होतात.त्या सर्व क्षेत्रज्ञ आत्म्याच्या सत्तेनेंच सत्ता पावतात.त्या आपोआप किंवा परस्परांच्या आश्रयानें असत नाहींत.अंत:करण किंवा वृतीस स्वत:ची सत्ता नसून परमात्म्याचा सत्तेने व्हावहार करितात.ते अंत:करण किंवा वृत्ती हि परतंत्र आहे,तर परमात्मा हा स्वतंत्र आहे,म्हणून आपण जो जीव आहे,त्यांनी अंत:करणाच्या किंवा वृत्तीच्य—जो परतंत्र आहे,त्याच्याकडे धाव न घेता जो परमात्मा स्वतंत्र आहे,त्यास—परमात्म्यास ऐक्य करण्याचा प्रयत्न करावा,कारण परमात्मा सुखरूप आहे.आपणास—जीवास सुखरुपतेचीच गरज आहे.||११|| | क्षेत्रज्ञ एता मनसो विभूती र्जीवस्य मायारचितस्य नित्याः | आर्विहीताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यवीशुद्धकर्तुः ||१२|| अर्थ:----आतां मन निर्गुण झालें तर तत्त्वाला—परमात्म्याला जाऊन मिळतें म्हणून सांगीतलें तें तत्व असें की----मायानिर्मित जीवाला उपाधीभूत आणि संसारबंधाला कारण असें अशुध्द कर्म करणारें जे मन त्याच्या प्रवाहरूपानें अविच्छीन्न असलेल्याहि ह्या वृत्ती,जागृती आणि स्वप्न ह्या अवस्थांमध्यें प्रकट—व्यक्त होत असतात व सुषुप्तीमध्यें लय—लीन पावतात असें तिन्ही अवस्थेचा साक्षी हा क्षेत्रज्ञ आत्मा (त्वंपदार्थ जीव) पाहत असतो,तेंच तत्व होय.आपण—जीव परमात्म्याचेच आहोत,पण अज्ञानामुळे शरीराचे समजतोत.म्हणून सत्संग करून समजुतीत बदल करावयाचा आहे.||१२|| | क्षेत्रज्ञ आत्मा पुरुषः पुराणः साक्षात्स्वयंज्योतिरजः परेशः | नारायणो भगवान् वासुदेवः स्वमाययाssत्मन्यवधीयमानः ||१३|| अर्थ:----क्षेत्रज्ञ दोन प्रकारचा,त्वंपदार्थ जीव आणि तत्पदार्थ ईश्वर.त्यांतील त्वंपदार्थ सांगीतला.आता तत्पदार्थ सागतों---हे राजा, तो—ईश्वर,क्षेत्रज्ञ—सर्वज्ञ,व्यापक—आकाशास त्याची गवसणी आहे,त्याहून व्यापक,जगत्कारणभूत,पूर्ण,प्रत्यक्ष,स्वप्रकाश,जन्मरहित, ब्रह्मादिकांचा नियतां व आपल्या स्वाधीन असलेल्या मायेंनें जीवाच्या नियंतृत्वेंकरून असणारा,नारायण,भगवान् वासुदेव आहे.||१३|| | यथानिलः स्थावरजंगमाना मात्मस्वरूपेण निविष्ट ईशेत् | एवं परो भगवान् वासुदेवः क्षेत्रज्ञ आत्मेदमनुप्रविष्टः ||१४|| अर्थ:----जसा वायू,बाहेर असूनही यच्चयावत् स्थावरजंगमात्मक प्राण्यांच्या प्राणरूपानें प्रवेश करून त्यांचे नियमन करितों, त्याप्रमाणे प्रपंचातील अंतर्यामी परमात्मा भगवान् वासुदेव,ह्या जगामध्यें प्रविष्ट होऊन त्यांचे नियमन करितो.||१४|| अर्थ:----हे राजा,देहधारी प्राणी,जोंपर्यंत ज्ञानोत्पतिच्या योगानें ह्या मायेला दूर झुगारून देऊन,सर्वसंग परित्याग करून व कामादी शड्रिपुंना जिंकून आत्मतत्त्व जाणत नाहिंच तोंपर्यंत,तो या संसारात भ्रमण करितो.म्हणून आपण—जीवानी षड्रिपुंना—काम,क्रोध,लोभ,मोह,मद—अहंकार,मत्सर—द्वेष,जिंकून—आपल्या—जीवाच्या ताब्यात घ्यावे,तर आपण—जीवांनी त्यांच्या—कामादि ह्यांच्या ताब्यात जाऊ नये.त्यांना आपल्या—जीवाच्या ताब्यात घेतल्यानंतर सत्संग करावा.सत्संगामुळे आपणास—जीवास जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान होऊन परमात्म्याचा अनुभव येतो.||१५|| | न यावदेतन्मन आत्मलिंगं संसारतापावपनं जनस्य | यच्छोकमोहामयरागलोभ वैरानुबन्धं ममतां विधत्ते ||१६|| अर्थ:----तसेंच जोपर्यंत या जीवनें,आपल्या उपाधीभूत मनाला,‘हे संसारताप पिकण्याचे शेत आहे असें’ जाणिले नाहीं,तोपर्यंत यासंसारामध्यें भ्रमण पावतो व तें मन,तोपर्यंत त्याला शोक,मोह,रोग,प्रीती,लोभ आणि वैर यांच्या संबंधाला व ममतेला उत्पन्न करितें.म्हणून आपण—जीवानी काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर,द्वेष यांना आपल्या—जीवाच्या ताब्यात घेऊन सत्संग करून भ्रम निवृत्त करावा. ||१६|| | भ्रातृव्यमेनं तददभ्रवीर्य- मुपेक्षयाध्येधितमप्रत्त: | गुरोर्हरेश्र्चरणोपासनास्त्रो जहि व्यलीकं स्वयमात्ममोषम् ||१७|| अर्थ:----यास्तव हे राजा, तूं सावध होत असता,गुरुरूपी हरीचें चरणोपासनरूप शस्त्र धारण करून, ‘ वस्तूत:मिथ्याभूत असूनही उपेक्षा केली असतां वृध्दिंगत होऊन,आत्मस्वरूपाला चोरून नेणाऱ्या ह्या आपल्या’ महाबलाढ्य मनोरूपी शत्रूचा वध कर, म्हणजे गुरुरूपी हरीची सेवा करून आपल्या मनाल जिंक.म्हणून आपण—जीवानी विवेक करून म्हणजे अधिकारसंपन्न होऊन सदगुरूंचे चरण म्हणजे अधिष्ठान असलेला परमात्मा हे ज्ञान-शस्त्र हातात घेऊन त्याद्वारे मनाला आपल्या ताब्यात घेऊन ते “मन मिथ्या आहे व परमात्मा हा सत्य आहे” असा निश्चय करावा. ||१७|| ११---याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें ब्राहमण-रहूगणसंवादसंबंधी हा अकरावा(११)अध्याय सतरा (१७)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||११|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१२---आतां बाराव्या अध्यायामध्ये,पुन्हा रहुगण--राजाने संशय घेवून प्रश्न केले असता,त्या योगी जडभारताने,त्याच्या सर्वसंशयांचे निराशकरण केले अशी कथा वर्णन केली आहे.||१|| |१२--- रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान ________________________________________________________________________________________ | रहूगण उवाच:--- | नमो नं: कारणविग्रहाय स्वरूपतुच्छीकृतविग्रहाय | | नमोsवधूत द्विजबन्धुलिंग- निगूढनित्यानुभवाय तुभ्यम् ||१|| अर्थ:----रहूगण म्हणाला----हे अवधूता,तूं साक्षात ईश्वर असून लोकांच्या संरक्षणासाठी देह धारण केला आहेस,तूं आपल्या स्वरूपभूत परमानंदांच्या प्रकाशामुळे आपल्या देहाला तुच्छ मानिलें आहेस,तुला मी वारंवार नमस्कार करितों.ज्या तूं,हा अधम ब्राहमणाचा वेश घेऊन आपला नित्यानुभव गुप्त राखीला आहेस त्या तुला नमस्कार असो.आपण—जीवानी महात्मा यांचा सत्संग करून ज्ञानाद्वारे जागत्-मिथ्या आहे व ब्रह्म सत्य आहे,जीवात्मा हा परमात्म्याच आहे,असा निश्चय करावा.||१|| अर्थ:----हे ब्रहम-ज्ञानसंपन्न मुने,जसें ज्वररूप रोगानें पिडीत झालेल्या पुरुषाला गोड औषध प्राप्त व्हावें अथवा जसें ग्रीष्म ऋतुंतील उन्हानें तापलेल्या प्राण्याला गार गंगोदक प्राप्त व्हावें त्याप्रमाणें ज्याच्या विवेकरूप दृष्टीला,कुत्सित देहाचेठिकाणीं, असलेल्या अभिमानरूप सर्पाने दंश केला आहे त्या मला तुझे हें भाषण अमृततुल्य औषध मिळालें आहे.आपणसुद्धा—जीवानीसुद्धा संत—महात्मा यांचा उपदेश अभिमान निवृत्त करण्यासाठी अमृततुल्य औषध आहे.आपण ते औषध श्रवणद्वारे मनापर्यंत पोंहचवून परिवर्तन करावयास पाहिजे.म्हणजेच उपाधी हि मिथ्या आहे व परमात्मा हा सत्य आहे असा निश्चय करावा.||२|| अर्थ:----यास्तव,तुला माझ्या मनांत असलेला संशयरूप अर्थ मागाहून विचारीन,परंतु आतां प्रथम तूं पूर्वी केलेलें अध्यात्मयोगानें गुंफलेले भाषण मला जसें समजले तसें स्पष्टरीतीनें उघड करून सांग.तें ऐकण्याबद्दल माझ्या चित्ताला फार उत्सुकता वाटत आहे.आपणास—जीवास सांगितलेला उपदेश समाजाला नसेल,तर आपण स्पष्ट-रीतीने पुन्हा श्रवण करावा व आपले संशय निवृत्त करावे.आपणास संशय असतील तर परमात्म्याचा अनुभव येत नाही.||३|| अर्थ:----हे योगेश्वरा,भारवाहणें वगैरे कर्मांचे प्रत्यक्ष दिसत असलेंलें श्रमवगैरे फळ,चालत असलेल्या खऱ्या व्यवहारास कारण असूनही,तें खरे नाहीं,ते केवळ व्यवहारास आधारमात्र आहे,तें प्रत्यक्ष तत्त्वविचार करण्यास समर्थ नाहीं.असें जें तूं म्हणालास ह्यामध्यें माझें मन घोंटाळत—संशय येत आहे.आपण कोणताही संशय असेल तर तो सत्संगाद्वारे निवृत्त करावा.||४|| अर्थ:----ब्राहमण(जडभरत)म्हणाला---हे राजा,तो पृथ्वीचा विकार देह तोच कोणत्यातरी कारणामुळें पृथ्वीवर हिंडुं लागला म्हणजे,त्यालाच हा ओझेंवगैरे वाहणारा मनुष्य असें नांव प्राप्त होतें,कारण सूक्ष्म-देह हि उपाधी असेल तर तो स्थूल-देह हालचाल करू शकतो,अन्यथा करू शकत नाही.आणि जो हिंडत नाहीं त्याला दगड वगैरे नांव प्राप्त होतें,कारण त्यांना—जड पदार्थांना सूक्ष्म देहाची उपाधी नसते—म्हणजेच त्यांच्यात जीवपणा नसतो,तर फक्त जडपणा असतो.जड म्हणजे आपण कोण आहोत असे न कळने—समजणे व इतर कोण आहेत हेही न कळने—समजणे,अशा वस्तूस “जड-पदार्थ” असे म्हणतात.इतकाच काय तो भेद आहें,परंतु तो देह जड असल्यामुळे त्याला भार किंवा श्रम हे मुळींच होत नाहींत आणि त्या पृथ्वीविकाररूप देहाच्याहि पायांवर घोटे,पोटऱ्या,गुडघे,मांड्या,कमर,वक्ष:स्थल,मान व खांदे हे अवयव रचिलेले आहेत.म्हणून तेही सर्व जड आहेत.||५|| अर्थ:----खांद्यांवर लांकडाची केलेली पालखी आणि त्या पालखीत सौवीरदेशांचा राजा रहूगण ह्या नाममात्राचा एक मातीचा पुतळाच बसला आहे.त्या पुतळ्यावर तूं ‘हा आपला देह आहे’ असा अभिमान करून, ‘मी सिंधूदेशाचा राजा आहें’ अशा दुष्ट मदनें आंधळा होऊन राहिला आहेस.आपला—जीवाचा देह हा मातीचा पुतळा—देह हा जड आहे—देहास कळत नाही.ज्यास कळत नाही,त्याचा अभिमान धारण करावा का ? करू नये,कारण तो देह जड आहे.मी जड नसून कळणारा असा जीव आहे.जड वस्तू सिंधू—देशाचा राजा होऊ शकते का ? अर्थातच नाही. ||६|| अर्थ:----आणि ज्यांच्याबद्दल वाईट वाटावे अशा ह्या अतिकष्टे भोगून दीन झालेल्या या भोयांना,वेठीला धरून त्रास देणारा,तूं निर्दय व उद्धट आहेस म्हणून ‘मी लोकांचे रक्षण करणारा आहें’ अशी आपली प्रौढी मिरवनारा तूं वृध्दजणांच्या (सत्पुरुषांच्या) सभेमध्यें शोभणारा नाहींस.जे सत्पुरुष असतात,ते इतरांना दु:ख देत नसतात,इतरांना वेठीस धरत नसतात,कष्ट देत नसतात. तू तर इतरांना सुख न देता कष्ट देत आहेस.इतरांना कष्ट देणारा हा इतरांचा हितकर्ता—रक्षण-कर्ता होऊ शकतो का ? किंवा इतरांचा भक्षण—कर्ता होऊ शकतो ?अर्थातच रक्षण-कर्ता न होता भक्षण-कर्ता होऊ शकतो.म्हणून आपण जीवानी इतरांचे रक्षण करावे,तर भक्षण—मात्र मुळीच करू नये. ||७|| | यदा क्षितातेव चराचरस्य विदाम निष्ठां प्रभवं च नित्यम् | | तन्नामतोsन्यद् व्यवहारमूलं निरुप्यतां सत् क्रिययानुमेयम् ||८|| अर्थ:----जर आम्ही या स्थावरजंगमात्मक—स्थावर म्हणजे झाडे-झुडपे जीव व जंगमात्मक म्हणजे हलचाल करणारे जीव जगाचें सदोदित उत्पत्ती आणि प्रलय पृथ्वीच्याचठिकाणीं होतात असें जाणतों,तर नाममात्राहून दुसरें व्यवहाराचें कारण,‘कार्य घडतें म्हणून’ सत्य असें अनुमान करण्याजोगे काय आहे ? नाही.ते निरूपन कर.श्रुतीनेंही हेंच प्रतीपादन केलें आहे. ||८|| अर्थ:----आतां पृथ्वीला सत्यत्व असेल असें समजशील तर पृथ्वीशब्दाने वाच्य असलेला पदार्थही याप्रमाणें मिथ्या म्हनूणच सांगीतला आहे.कारण,अदृश्य परमाणुंमध्ये पृथ्वीचा लय होतो.आतां ज्या परमाणुंच्या समुहाने पृथ्वी हा विशेष आकार बनला आहे,ते परमाणु सत्य म्हणावे तर तेही वादीजनांनी आज्ञानानें मनानें कल्पिलेले आहेत,म्हणजे पृथ्वीरूप कार्याची उपपत्ती करण्याकरितां वादिमंडळीने त्या परमानूंची कल्पनामात्र केली आहे,परंतु ती आज्ञान,मूलक आहे.कारण प्रपंचच जर भगवंताच्या मायेचा खेळ आहे तर परमाणुची कल्पना सत्य कोठून असणारा ? अर्थातच परमाणू कल्पित—मिथ्या आहे.||९|| अर्थ:----याप्रमाणें दुसरेंही जें कांही,बारीक मोठें,आंखुड लांब,कारण--कार्य,चेतन--जड,असें भासत असेल तें सर्वही,विषयी,स्वभाव, संस्कार,काल आणि कर्म ह्या नांवांनी उपलक्षित असलेल्या भगवंताच्या मायेनेंच केलेलें आहे असें जाण.जे-जे उत्पन्न होते,ते—ते मिथ्या असते व जे—जे मिथ्या असते,ते—ते नाश—नष्ट पावणारे असते.||१०|| | ज्ञानं विशुद्ध पर्मार्थमेक मनन्तरं त्वबहीर्बम्ह सत्यम् | प्रत्यक् प्रशान्तं भगवच्छब्दसंज्ञं यद्वासुदेवं कवयो वदन्ति ||११|| अर्थ:---आतां सत्य कांय’ असें म्हणशील तर सांगतो ऐक---“ज्ञान हेंच परमार्थरुपी सत्य होय.” तें ज्ञान अतिशुद्ध,एक ब्राह्म्याभ्यंतरहित,परिपूर्ण,अंतर्मुख व निर्विकार आहें,त्यालाच भगवान् (षड्गुणैश्वर्यसंपन्न) असें नांव असून विद्वान लोक त्यालाच वासुदेव असें म्हणतात.म्हणून—आपण—जीवांनी “ज्ञान हेंच परमार्थरुपी सत्य आहे”त्याचीच सत्संग करून प्राप्ती करून घ्यावी,कारण त्यामुळे आपण—जीव मोक्षास—अत्यंत दु:खाची निवृत्ती व अत्यंत परमानंदाची प्राप्ती करून देणारे आहे.||११|| अर्थ:----हे रहूगण राजा,हें ज्ञान,पुरुषाला महासमर्थ साधूंच्या चरणधुळीचे--स्नान घडल्यावांचून,म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानावांचून तपश्चर्येने—कर्माने किंवा उपासानेने—मानसिक—कर्माने प्राप्त होत नाहीं,यज्ञानें,अन्नसमर्पणानें किंवा गृहस्थाश्रमात राहून पुष्कळ परोपकार केल्यानें मिळत नाहीं.वेदाभ्यासानें अथवा उदकाची,अग्नीची व सूर्याची उपासना केल्यानेंहि प्राप्त होत नाहीं.तर निष्काम कर्मांमुळे किंवा निष्काम उपासनेमुळे अंत:करण शुद्ध होते.तें—ज्ञान केवळ महासमर्थ साधूंच्या चरणधुळीत स्नान केल्यानेंच म्हणजे त्यांची कृपा संपादन केल्यानेंच प्राप्त होतें.परमात्म्याचे—अधिष्ठानाच्या ज्ञानेच—जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचेच प्राप्त होते,दुसऱ्या कोणत्याही साधनांनी प्राप्त होत नाहीं.म्हणून आपण सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून सर्व विषयांचा त्याग करून अनुभव घ्यावा.त्यामुळे आपले—जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्ती होते.||१२|| | यत्रोत्तमश्लोकगुणानुवादः प्रस्तूयते ग्राम्यकथाविघातः | निषेव्यमाणोsनुदिनं मुमुक्षो र्मतीं सतीं यच्छती वासुदेवे ||१३|| अर्थ:----कारण,ज्या सत्पुरुषांमध्यें,विषयसुखसंबंधी कथांचा विघात करणारा असा,उत्तमकीर्ती भगवंताचा गुणानुवाद निरंतर वर्णिला जातो.त्याचें श्रवण केलें असतां तो मुमुक्षुपुरुषाच्या बुद्धीला निर्मळ करून वासुदेवाकडे वळवितो.म्हणून आपण—जीवांनी सत्संगाद्वारे भगवंताचे नामोच्चरण,भगवंताचे गुणानुवाद.भगवंताचे स्वरूप निरुपण श्रवण करावे.त्यामुळे आपण—जीव परमात्मारुपच होउत.||१३|| अर्थ:---आतां विषयांचेठिकाणीं आसक्ती ठेवणारा मनुष्य,योगमार्गापासून भ्रष्ट होतो,असें सांगत असता,’कोण तूं गुप्तरूपानें संचार करितोस’ अशा राजानें केलेल्या प्रश्नाचें उत्तर सांगतो---हे राजा,मी पुर्वौ भरतनामक राजा असून दिसलेल्या व ऐकीलेल्या वस्तुंवर असलेल्या आसक्तीरूप बंधनाला तोडून,टाकून भगवंताचें आराधन करीत असतां,एका हरिणीची संगत धरिल्यामुळें,माझ्या पुरुषार्थाची हानी होऊन मी दुसऱ्या जन्मी हरीण झालों.म्हणून आपण—जीवानी संगवान न होता असंगावन व्हावे.आपण संगवान झाल्यास मोह होण्याची शक्यता अधिक असते.मोह हा दोष आसक्तीस कारण आहे,तर जोवाची आसक्ती परमात्म्याच्या अनुभवास प्रतिबंध करिते.||१४|| अर्थ:----परंतु हे वीरा,त्या भरतजन्मांत श्रीकृष्णाचे पूजन केल्यामुळे भगवत्कृपेनें प्राप्त झालेल्या त्या स्मृतीनें, हरीणदेहामध्येंसुध्दां मला सोडिलें नाहीं.म्हणून मी आतां जनसंगाची भीती बाळगून असंग होत असता आपलें स्वरूप प्रगट न करितां लोकांमध्ये संचार करीत आहें.भरत—राजा या जन्मातील पूर्व-पुण्याई असल्यामुळे पशु-देहात—हरिणाच्या देहातील स्मृतीने वर्तमान शरीर जे जड-भरत या देहात असंग जीवन जगात आहे,कारण संग हा बाधक असतो,याची मला(जड भरत)स्मृती आहे.म्हणून वास्तविक स्वरुपात जीवन न जगता देहातीत अवस्थेत जीवन जगत आहे.म्हणून आपण जड-भरताच्या जीवन—चरित्राहून आपण बोध घेऊन संग हा बाधक आहे व असंग हा साधक आहे असे समजून सत्संग करून जीवन व्यतीत करावे.||१५|| | तस्मान्नरोsसंगसुसङगजात ज्ञानासिनेहैव विवृक्णमोहः | | हरिं तदीहाकथनश्रुतीभ्यां लब्धस्मृतिर्यात्यतिपारमध्वनः ||१६|| अर्थ:---अशी माझी स्थिती आहे म्हणून मनुष्याने,सर्व संग सोडून देणाऱ्या साधुंच्या समागमानें प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाणें या जन्मामध्येंच मोहरूप बंधनाला तोडून टाकून,भगवंताच्या लीला वर्णन करणें व ऐकणें यांच्या योगानें आत्मसाक्षात्काररूप स्मृती मिळविली तर,तोच मनुष्य,संसार मार्गाच्या पैलपाररुपी श्रीहरीशी ऐक्य पावतो.म्हणून आपण—जीवानी सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून घ्यावा.ज्ञान प्राप्त करुन्घेत असतांना असंग व्रताचे पालन करून भगवंताच्या नावांचा नामोच्चार करावा,भगवंताचे गुणानुवाद श्रावण करावे,भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यावा.त्यामुळे आपले—जीवाचे जन्म—मरण निवृत्त होते.||१६|| १२---याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें हा बारावा(१२)अध्याय सोळा(१६)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. ||१२|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१३---आता या तेराव्या अध्यायामध्ये विरक्त न झालेल्या पुरुषाला तत्वज्ञान उपदेश केला तर तो व्यर्थ होता म्हणून दृढ वैराग्य होण्यासाठी रहूगण--राजाला जडभरताने भवाटवी वर्णन केली,अशी कथा वर्णन केलेली आहे||१|| १३---- संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती ________________________________________________________________________________________| दुरत्ययेsध्वन्यजया निवेशितो रजस्तम: सत्त्वविभक्तकर्मदृक् | | स एष सार्थोsर्थपरः परिभ्रमन् भवाटविं याति न शर्म विन्दति ||१|| अर्थ:----ब्राम्हण(जड-भरत म्हणाला---हे रहूगण राजा,दुस्तर अशा प्रवृत्तीमार्गाचेठिकाणी मायेनें पोंचवीलेला,रज,तम व सत्त्व या तीन गुणांनी विभागून ठेविलेली कर्मेंच आपणास कर्तव्य आहेत असें पाहणारा,व द्रव्य मिळविण्याच्या कामीं तत्पर असा हा जीवसमुदायरूप व्यापारांचा तांडार,फिरतां फिरतां जसा वाण्याचा तांडा द्रव्य मिळविण्यासाठी फिरत असतां वाट चुकून भयंकर अरण्यांत जाऊन पडतो त्याप्रमाणें हा,भवरुपी अरण्यांत पडला आहे.याला तेथें सुख प्राप्त होत नाहीं.आपण—जीव रज,तम,सत्व या गुणांनी युक्त होऊन कर्मेंच आपले कर्तव्य आहे,असे समजतो.त्यामुळे जीवास सुख न मिळता दु:खच मिळते.म्हणून आपण जीवानी संत्संगाद्वारे स्वधर्मांचे अनुष्ठान करून ज्ञान मार्गाचा अवलंब करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||१|| अर्थ:----हे राजा,ज्या भवाटविमध्यें हे सहा इंद्रीयनामक चोर—श्रोत्र,त्वचा,चक्षू,जिव्हा,घ्राण,यांना आपल्या—जीवाच्या ताब्यात घेऊन स्वधार्मांनुसार व्यवहार करावा.ज्याचा नायक (बुद्धी) वाईट आहे त्या तांड्याला—द्रव्याला—धनाला लुटतात—मिळवितात.,म्हणजे त्याचें धर्मोपयोगी असलेलें द्रव्य विषयांच्या उपभोगमिषानें हरण करितात.जेथें कोल्हे (स्त्रीपुत्रादीक) बेसावध असलेल्या त्या व्यापाऱ्यांजवळ जाऊन,जसे लांडगे मेंढ्याला घेऊन जिकडे-तिकडे ओढीतात त्याप्रमाणें त्याला—जीवाला ओढीतात.त्यामुळे जीवास सुखाची प्राप्ती न होता दु:खाचीच प्राप्ती होते.म्हणून आपण सत्संग करावा.||२|| अर्थ:----एखादेवेळी पुष्कळ वेली,तृण व जाळ्या यांनी (काम्य कर्मादिकांनी) प्रवेश करण्यास अशक्य अशा ठिकाणीं (गृहस्थाश्रमांत) उग्र अशा डांसांनी व रानमाशांनी (दुर्जनांनी) त्याला उपद्रव केला जातो.केव्हांकेव्हां गंधर्वनगर (शरीर) ह्याचा दृष्टीस पडतें, आणि केव्हांकेव्हां तो अतिचंचल अशा कोलतीसारख्या पिशाचाला (सुवर्णाला) पाहतो. ||३|| | निवासतोयद्राविनात्मबुद्धी स्ततस्ततो धावति भो अटव्याम् | | क्वचीच्च वात्योत्थितपांसुधूम्रा दिशो न जाणाति रजस्वलाक्षः ||४|| अर्थ:----हे राजा,एखादेवेळी घर,उदक व द्रव्य ह्यांकडे त्याच्या बुद्धीची स्वाभाविक प्रवृत्ती होऊन त्या त्या अटवीमध्यें जिकडेतिकडे धांवतो.केव्हातरी त्याचे डोळे धुळिनें (स्त्रीच्या नादानें) भरले म्हणजे तो वावटळीमध्यें उठलेल्या दिशा (कर्मसाक्षीभूत दिग्देवता) जाणत नाहीं. ||४|| अर्थ:----केव्हांतरी दिसत नसणाऱ्या माश्यांच्या कठोर शब्दांनी (लोकनिंदेणें) त्याच्या कानाला फार त्रास होतो.एखादेवेळी घुबडांच्या शब्दांनी (शत्रूकडील लोकांनी दिलेल्या धमकिनें) त्याच्या मनाला दु:ख होते.केव्हांतरी पापीवृक्षांचा (अधर्मीकांचा) आश्रय करितो.केव्हांकेव्हां मगृजळांकडे (निष्फळ विषयांकडे) धांवतो.आपण—जीव कोठेही धावला तरी त्यास सुख मिळत नाही.||५|| अर्थ:----केव्हांतरी शुष्क झालेल्या नद्यांमध्यें (इहपरत्र दु: देणाऱ्या पाखंडमार्गात) शिरतो, व ठेंच लागून पडतो आणि केव्हांतरी तो अन्न न मिळाल्यामुळें आपल्या बांधवांजवळ अन्न मागतो.केव्हांतरी तो वनव्यांत (घरांत) सांपडून अग्नीच्या योगानें (शोकाग्नीनें) संतत्प होतो.केव्हांतरी राक्षसांनी (राजांनी) त्याचे प्राण (द्रव्य) हरण केले म्हणजे खिन्न होतो. ||६|| अर्थ:----एखादेवेळी शूर पुरूषांनी (प्रतीवाद्यांनी) त्याचें द्रव्य हरण केलें म्हणजे खिन्नचित्त होऊन तो शोक करीत व मोह पावत शेवटी मुर्छा पावतो.केव्हांतरी गंधर्वपुरामध्यें (आपल्या पितृपुत्रादिसमाजांत) प्रविष्ट झाला म्हणजे मुहूर्तमात्र सुख वाटल्यासारखा आनंदांत निमग्न असतो.आपणास—जीवास ते वास्तविक पाहता ते सुख नसून दु:खच असते.सुख आहे असा आपला--जीवाचा भ्रम असतो. ||७|| अर्थ:----केव्हांतरी चालत असतांना त्याच्या पायांना काटे व खडे (विघ्नें) लागतात.केव्हांतरी पर्वतावर चढण्याची (यज्ञयागादीक मोठें कर्म करण्याची) इच्छा करीत असून,तें घडले नाहीं म्हणजे खिन्न झाल्यासारखा राहतो.तसाच कुटूंबाचे पोषण करणारा तो जन, क्षणोक्षणीं जगराग्निनें पिडीत झाला म्हणजे कुटूंबातील लोकांवर संतापतो.||८|| अर्थ:----केव्हांतरी अजगरसर्पाने (झोपेंने) गिळून टाकिलेला तो जन,कांहीच जाणत नाहीं.केव्हांतरी लोकांनी ह्याला प्रेततुल्य समजून अरण्यांत टाकून दिला असतां,तेथें सर्पांनी (घातकी दुर्जनांनी) दंश केलेला (पिडीत झालेला) तो आंधळा (विवेकशून्य) होऊन अंधाऱ्या विहिरीत (मोहांत) पडून राहतो. ||९|| | कर्ही स्म चीत्क्षुद्ररसान् विचिन्वं स्तन्मक्षिकाभिव्य्रथितो विमानः | | तत्रातिकृच्छारात्प्रतिलब्धमानो बलाद्विलूम्पन्त्यथ तं ततोsन्ये||१०|| अर्थ:----केव्हांतरी क्षुद्ररस (परस्त्रीवगैरे) शोधूं लागला म्हणजे,तेथें असलेल्या मधमाशांनी (त्यांच्या पतींनीं) पिडा उत्पन्न केली असतां दु:खित होतो,जरी कदाचित् तेथे अतिक्लेशानें त्याला ती (स्त्रीवगैरे) मिळालीं तथापि दुसरेच त्यांना बलात्काराने हरण करितात आणि जेव्हां त्यांनाही तो जिंकितो तेव्हां तिसरेच हरण करितात. ||१०|| अर्थ:----एखादे प्रसंगी तो,थंडी,ऊन,वारा,पाउस,ह्यांपासून आपलें रक्षण करण्यास असमर्थ असतो.केव्हाकेव्हां परस्परांशी थोडाबहुत व्यापार करूं लागला म्हणजे तो द्रव्याबद्दल लोकांना फसवू लागतो आणि मग त्यांच्याशी द्वेष पावतो. ||११|| अर्थ:----केव्हांकेव्हांतर तो त्या अरण्यांमध्यें क्षीणधन झाला म्हणजे निजावयास शय्या,बसावयास आसन व राहावयास घर यांनी रहित होऊन,तो लोकांपाशी मागुं लागतो.तेव्हां ती त्याला मिळत नाहींत.मग तो लोकांच्या वस्तुंवर अभिलाष धरुं लागला म्हणजे त्यांच्यापासून अपमान पावतो. ||१२|| | अन्योन्य वित्तव्यति षंगवृद्ध वैरानुबन्धो विवहन्मिथच्श | | अध्वन्यमुष्मिन्नुरुकृच्च्रवित्त बाधोपसर्गैर्विहरन् विपन्नः ||१३|| अर्थ:---याप्रमाणें परस्परांशी द्रव्यवहाराच्या प्रसंगानें ज्याच्या वैरसंबंध वाढला आहे असाही तो जनसमुह,एकमेकांशी विवाहसंबंध करीत या भवाटविंतील मार्गाचेठिकाणीं विहार करीत असतां,अनेक संकटे,धनाचा नाश व द्वेषादीक उपसर्ग यांच्या योगानें मेल्यासारखा होतो. ||१३|| अर्थ:----अशा प्रकारचाही तो व्यापाऱ्यांचा मेळा,त्या त्या मेलेल्या लोकांना त्या त्या ठिकाणी टाकून,नव्या नव्या होणारांना घेऊन चालला आहे,तो अजूनही माघार घेत नाहीं.हे वीरा,यांतील कोणी एखादा समर्थ पुरुषही,ह्या मार्गाच्या पलीकडे जो सुखरूप योगमार्ग आहे,त्याला जाऊन पोंचत नाहीं. ||१४|| अर्थ:----ज्यांनी मोठाले दिग्गज जिंकले आहेत असे शूर पुरुषही,पृथ्वी विषयीं ‘हि माझी आहे, हि माझी आहे’ अशा अभिमानानें वैर धरून परस्पर भांडतां भांडता युध्दामध्यें मरून पडतात परतुं वैरभावरहित असा संन्यासी,ज्या स्थनास ते जाऊन पोचत नाहींत.||१५|| | प्रसज्जती क्वापि लताभूजाश्रय स्तदाश्रयाव्यक्तपदाद्विजस्पृहः | | क्वचीत्कदाचीध्दरिचक्रतस्त्रसन् सख्यं विधत्ते बकगंगृध्रै: ||१६|| अर्थ:---पुन्हा सिंहावलोकन्यायानें (सिंह जसा पुढें जात असतां मध्येंच मागें फिरून पाहतो त्याप्रमाणे) भवाटविचें वर्णन करितो- हा जीवसमुदाय,क्वचीत्प्रसंगी वेलींच्या लहानलहान फांद्यांचा (स्त्रियांच्या बाहूंचा) आश्रय करून त्या वेलींच्या आश्रयानें राहणाऱ्या व बोबडे बोबडें बोलणाऱ्या पक्ष्यांवर (मुलांवर) अभिलाष धारण करून त्यांचेठिकाणीं आसक्त होतो.कदाचित् एखादेवेळी सिंहांच्या समुहापासून (कालचक्रापासुन) भिऊन त्या भयाच्या परिहासाठी बक,कंक व गृध्रपक्षी यांच्या बरोबर (पाखंडी लोकांबरोबर) सख्य करितो.||१६|| अर्थ:----पुढे त्यांनी फसविलें म्हणजें,त्यांत काही फळ नाहीं असें जाणून हंसांच्या (ब्राहमणांच्या) कुळामध्यें शिरण्याचा बेत करून तें कुळ (आचार कठीण असल्यामुळे) आवडत नाहीसें झाले म्हणजे वानरांकडे (भ्रष्ट अशा शूद्रांकडे) जातो.त्यांच्या जातीला योग्य असलेल्या यथेच्छ मैथुनादिक्रीडेनें ज्याची इंद्रिये अत्यंत सुख पावलीं आहेत असा होऊन,परस्परांच्या मुखाकडे पाहिल्यामुळें ज्याला आयुष्यवधीचा (मृत्यूकाळाचा) विसर पडला आहे असा होतो. ||१७|| | द्रुमेषु रंस्यन् सुतदारवत्सलो व्यवायदीनो विवशः स्वबन्धने | | क्वचीतप्रमादाग्दिरीकन्दरे पतन् वल्लीं गृहीत्वा गजभीत आस्थितः ||१८|| अर्थ:----वृक्षांवर (घरांमध्यें) क्रीडा करण्याच्या इच्छेने पुत्रकलत्रांविषयीं आसक्त व मैथुनेच्छेनें दीन होत असता आपणास प्राप्त झालेले बंधन तोडण्यास असमर्थ होतो.एखादेवेळी बेसावधपणामुळें पर्वताच्या गुहेंत (रोगादिदु:खांत) पडत असतां त्या गुहेंत असलेल्या हत्तीपासून (मृत्यूपासून) भिऊन अंतराळीच वेलीलाधरून (प्राक्तनकर्माच्या आश्रयानें) राहिलेला असतो. ||१८|| अर्थ:----हे शत्रूमदना रहूगणा,ह्या संकटांतून तो कदाचित् दैवयोगानें सुटला तरी पुनरपि त्या व्यापाऱ्यांच्या मेळ्यांत प्रवेश करून पूर्वीप्रमाणें रमतो.मिळून या मार्गामध्यें मायेनें पोचवीलेला व भ्रमण पावणारा कोणीही जन,आपला परम पुरुषार्थ जाणत नाहीं.||१९|| अर्थ:----हे रहूगणा,तूंहि या मार्गात प्रविष्ट झाला आहेस म्हणून आतां असें कर कीं,---प्राण्यांना—जीवांना शिक्षा करण्याचें सोडून देऊन सर्वांशी मैत्री ठेव आणि मन कोठेंही आसक्त होऊं न देता भगवंताच्या सेवेनें तीक्ष्ण झालेल्या ज्ञान-खड्गाचा स्वीकार करून,कामादीक शत्रू जिंकून या संसारमार्गाला तरून पैलपारास निघून जा.म्हणून आपण जसा रहूगणास ब्राह्मणांनी—जड भरतांनी उपदेश केला,त्याप्रमाणे इतर प्राण्यांना द्वेष भावनांचा त्याग करून दु:ख देण्याचे सोडून द्दावे,इतर प्राण्यांसी मैत्री स्थापन करून सुख द्दावे.आपले मन कोणत्याही जीवांत आसक्त न होऊ देता ज्ञान-खड्गाचा स्वीकार करून काम,क्रोध,लोभ,मोह,मद व मत्सर या शत्रूंना जिंकून या जन्म-मरणरुपी संसारमार्गातून तरुण जावे.||२०|| अर्थ:----राजा म्हणाला---अहो! मनुष्यजन्म हेंच सर्व जन्मांमध्ये कल्याणकारक होय,कारण फालत मनुष्य देहातच सत्संग करता येतो,तर इतर योनीत सत्संग करता येत नाही.इतकेच काय,स्वर्गादी लोकांमध्येंहि देवादिजन्मांनी तरी काय करावयाचे आहे? कांहीच नाही. कारण,त्या जन्मांमध्यें,भगवंताच्या कीर्तीच्या योगानें ज्याची आपलीं अंत:करणें शुध्द करून घेतलीं आहेत त्या सारख्या विपुळ समागम घडत नाहीं.म्हणून आपण मनुष्य देहातच सत्संग करून मोक्ष संपादन करावा. ||२१|| अर्थ:----निरंतर सेवन केलेल्या तुझ्या चरणकमलाच्या रेणूंनी निष्पाप झालेल्या पुरुषाला भगवंताचेठिकाणीं निर्मळ भक्ती प्राप्त होईल यांत आश्चर्य नाही.कारण,ज्या तुझ्या दोन घटीकामात्र घडलेल्या केवळ समागमानेंहि कुतर्कांनी दृढमूळ झालेला माझा अविवेक नष्ट झाला आहे.आपला—जीवाचा सत्संगात अविवेक नष्ट होऊन विवेक उत्पन्न होतो.१--विवेक उत्पन्न झाला की,२--वैराग्य,३--शम,दम,उपरती,तितिक्षा,श्रद्धा,आणि समाधान; ४—मुमुक्षुता प्राप्त होऊन आपण मोक्षाचे अधिकारी होतोत.||२२|| | न ह्यभ्दूतं त्वच्चरणाब्जरेणुभी र्हतांहसो भक्तिरधोक्षजेsमला | | मौहूर्तीकाद्दस्य समागमाच्च मे दुस्तर्कमूलोपहतोsविवेकः ||२२|| अर्थ:----आतां ब्रहमवेत्ते कोणत्या स्वरूपानें संचार करीत असतात तें कळत नाहीं म्हणून त्यां सर्वांना नमस्कार करून,सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करितो-वृध्द लोकांना नमस्कार असो,लहान बालकांना नमस्कार असो,तरुणांना नमस्कार असो,बटू आदीकरून सर्व स्वरूपें धारण करणाऱ्या सत्पुरुषांना नमस्कार असो,जे ब्रहमवेत्ते पुरुष अवधुतांची स्वरूपे धारण करून पृथीविवर संचार करीत असतात,त्यांपासून राजांचे कल्याण असो.अशा प्रकारे आपण—जीवानी सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून सतंत—महात्मा यांची कृपा संपादन करून मनुष्य देहाचा महासार्थक करून घ्यावे. ||२३|| अर्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे उत्तरेच्या पुत्रा राजा,याप्रमाणें मोठया सामर्थ्यांने युक्त अशा त्या ब्रहमर्षीनें (जडभरतानें), आपला अपमान करणाऱ्याहि सिंधूदेशाधीपती रहूगणराजाला अत्यंत दयाळूपणानें आत्मतत्त्वाचा उपदेश करून, त्यानें सदय अंत:करणानें गहीवरून चरणाला वंदन केलें असतां भरलेल्या समुद्राप्रमाणें आनंदानें परिपूर्ण असा तो जडभरत,ज्यांतील इंद्रियांच्या लाटा शांत झाल्या आहेत अशा मनानें युक्त असता या भूमीवर संचार करूं लागला.आपणही श्रोता असाल तर राजा-राहूगणसारखे आचरण करून—सत्संग करून जीवनाचे कल्याण करून घ्यावे.आपण जर वक्ता असाल तर ज्याप्रकारे राजा-रहूगणाने जड भरताची निंदा करून,जड भरताने अधिकार संपन्न असलेल्या रहूगण राजस उपदेश केला,त्याप्रमाणे आपणही आपली निंदा किंवा अपमान किंवा स्थूल सेवा करून घेतली,तरी अधिकार-संपन्न व्यक्तीस किंवा अधिकार जसा असेल त्यानुसार उपदेश करून,इतरांच्या मानव-देहाचे सार्थक करून द्दावे.यासच “साधू—महात्मा” असे म्हणतात.||२४|| अर्थ:-----तो रहूगणराजाहि सज्जनाच्या समागमामुळें ज्यानें परमात्म्याचें तत्व जाणलें आहे असा होऊन त्याच वेळीं त्यानें आत्म्याचे ठिकाणीं अविद्येंनें आरोपण केलेली देहच आत्मा अशी बुद्धी सोडून दिली.हे राजा,या प्रकारचें भगवंताचा आश्रय करणारा जो भरत त्याचा समागम करणाऱ्या त्या रहूगण राजाचें,तत्काल देहाहंकार टाकन्याचें सामर्थ्य होतें.आपणही राजा रहूगणासारखा देह-जगत मिथ्या आहे व ब्रह्म सत्य आहे असा निश्चय करून आपले सार्थक करून घ्यावे. ||२५|| |राजोवाच:--- | यो ह वा इह बहुविदा महाभागवत त्वया भिहित: परोक्षेन वचसा जीव लोकभावाध्वा | स ह्यार्यमनिषया कल्पित विषयो नाञ्जसा- व्युत्पन्नलोकसमधिगम: | | अथ तदेवैतद्दुरवगमं समवेतानुकल्पेन निर्दिश्यतामिति ||२६|| अर्थ:----राजा म्हणाला---हे महाभगवद्भक्त शुकाचार्य,बहुज्ञानसंपन्न अशा तूं,वाण्याच्या समुदायाच्या रूपकानें सुज्ञाच्या बुद्धिने अर्थ समजण्याजोगा जो हा जीवसमुहाचा संसारमार्ग सांगीतला आहेस,तो अशीक्षित लोकांना सहज कळण्याजोगा नाहीं म्हणून त्या दुर्बोध वचनाचा अर्थ,उघड अर्थांच्या पर्यायांनी दाखवून द्यावा असें माझें म्हणणे आहे.वक्त्यांनी आपला उपदेश हा सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगावा,कारण त्यामुळे त्यांना ब्रह्मा-तत्त्वाचे ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होतो. ||२६|| १३---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें तेरावा(१३)अध्याय सव्वीस(२६)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. ||१३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणर्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ १४---पूर्वाध्यायाचे जे भवाटवीरूपक सांगितले त्यांतील कोल्हे,मशक इत्यादिकांच्या अर्थाचे वर्णन या प्रस्तुत चवदाव्या अध्यायामध्ये केले आहे. |१४--- संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण ________________________________________________________________________________________ |परीक्षित राजाने प्रश्न केलेला तो शुकाचार्य म्हणाला की,--------------------- | य एष देहात्ममानिनां सत्त्वदिगुणविशेष-विकल्पितकुशलाकुशलसमवहारविनिर्मित-संसारानुभवस्यद्वारभूतेन | | षडिन्द्रियवर्गेण तस्मिन्दुर्गाध्ववदसुगमेSध्वन्यापतित ईश्वरस्य भागवतो विष्णोर्वशवर्तिन्या मायया जीवलोकोSयं | | यथा वनीक्सार्थोSर्थपर: स्वदेहनिष्पादितकर्मानुभव: श्मशानवदशिवतमायां संसाराटव्यां गतो नाद्दपि | | विफलबहुप्रतियोगेहस्तत्तपोपशमनीं हरिगुरू-चरणारविंदमधुकरानुपदवीमवरुंधे यस्यामुहवा | भावार्थ:--- परीक्षितराजानें प्रश्न केलेला तो शुकाचार्य म्हणाला कीं,---हे राजा,ईश्वर व भगवान् अशा विष्णूच्या स्वाधीन असणाऱ्या मायेनें,देहालाच आत्मा असें मानणाऱ्या जीवाच्या सत्त्वादीक गुणभेदांनी रचीलेली जीं चांगले वाईट व मिश्र अशीं कर्में त्यांच्या योगानें निर्माण केलेल्या नानाप्रकारच्या देहांचा परस्परांशी वियोग संयोग इत्यादिरूप जो अनादिकाळापासून चालत आलेला संसारानुभव त्याचीं साधनभूत जीं श्रोत्र,त्वचा,नेत्र,जिव्हा,घ्राण व मन हीं सहा इंद्रिये,त्यांच्या योगानें अरण्यांतील कठीण मार्गाप्रमाणें चालून जाण्यास कठीण अशा संसारमार्गाचेठिकाणीं,जसा द्रव्य मिळविण्यासाठी बाहेर पडलेला व्यापाऱ्यांचा तांडा वाट चुकून भयंकर अरण्यांत जाऊन पडतो त्याप्रमाणें पडलेला जो हा प्रसिध्द जीवांचा समुदाय तो स्वतांच्या देहानें आचरण केलेल्या कर्मांचा अनुभव घेत असता,स्मशानाप्रमाणें अत्यंत अपवित्र अशा संसाररूप गहन अरण्यांत गेलेला असून त्याचे व्यापार निष्फळ व पुष्फळ विघ्नांनी बिघडते चालले आहेत तथापि अजूनही त्या संसारतपाचा नाश करणाऱ्या हरीरूप गुरूच्या चरणकमलावरील भ्रमरांच्या (साधूंच्या) भक्ती मार्गाला अनुसरत नाहीं.या भवाटवीमध्यें हे पूर्वोक्त सहा इंद्रीय नांवांचे कर्मांच्या योगानें चोरच होत. म्हणून आपण—जीवानी वाट न चुकता म्हणजे निषिद्ध कर्म न करता,सकाम कर्म न करता म्हणजेच संसारात—विषयांत न पडता आपला स्वमार्ग जो परमात्मा आहे,त्याच्याशी एकरूप होण्याचा संसंगाद्वारे प्रयत्न करावा. ||१||
| तद्दथा पुरुषस्य धनं यत्कीन्चीध्दर्मौपयीकं बहुकृच्छाधिगतं | | साक्षात्परमपुरुषाराधनलक्षणो योsसौ धर्मस्तं तु साम्पराय उदाहरन्ति | | तद्धर्म्य धनं दर्शनस्पर्शनश्रवनास्वादनावघ्राणसंकल्पव्यवसाय | | गृहग्राम्योपभोगेन कुनाथस्याजितात्मणो यथा सार्थस्य विलुम्पन्ति ||२|| भावार्थ:---ते असें कीं,----फार संकटाने—विधीनुसार मिळविलेले व धर्माविषयीं उपयोगी पडणारे जें काही पुरुषाचें धन,म्हणजे ईश्वराची पूजावगैरे करणें इत्यादीरुपी जो हा धर्म,तो परलोकाविषयीं उपयोगी पडतो असें म्हणतात.तें धर्माविषयीं उपयोगी पडणारें धन हे इंद्रियनामक चोर,लुटतात म्हणजे त्या पुरुषाला,सुस्वरूप पाहणें,गायनादिकांचें श्रवण करणें,पक्कान्नांचे भोजन करणें,सुगंधी पदार्थांचा वास घेणें,विषयांबद्दल विचार करणें,निश्चय करणें,इत्यादीक घरांतील क्षुद्र उपभोगांच्या नादि लावून,त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन तो विषयांसक्त झाला म्हणजे,जसे भामटे लोक एखाद्या श्रीमंताला दुर्व्यसनांच्या नादि लावून तो बेताळ झाला म्हणजे त्यांचे द्रव्य पूर्णपणे लुटतात त्याप्रमाणें लुटतात.म्हणून आपण—जीवानी विधीनुसार धन मिळवून विधीनुसारच व्यय—खर्च करावयास पाहिजे,तर न निषिद्ध कर्माविषयां-विषयी—दुर्व्यसनांविषयी व्यय—खर्च करू नये.पारमार्थिक—जीवांचे द्रव्य घेऊ नये—त्यांची फसवूनक करू नये.||२|| | अथ च यत्र कौटूम्बिका दारापत्यादयो | नाम्रा कर्मणा वृकसृगाला एवानीच्छतोsपि | कदर्यस्य कुटुम्बिन उरणकवत्संरक्ष्यमाणं मिषतोsपि हरन्ति ||३|| भावार्थ:--तसेच त्या संसारमार्गामध्यें कुटूंबातील लोक नांवानें मात्र स्त्रीपुत्रादिक होत परंतु ते कर्मानें पाहूं गेलें असतां लांडगे किंवा कोल्हेच समजले पाहिजेत.कारण,जसें धनगराने संरक्षण केलेल्याही मेंढ्यांना लांडगे त्याच्या देखत हरण करितात त्याप्रमाणें अतिलोभी अशा कुटूंबीजनानें संरक्षण केलेलें धन त्याची इच्छा नसतां त्याच्या देखत स्त्रीपुत्रादिक हरण करितात||३|| भावार्थ:---हे राजा,जसें शत,प्रतिवर्षी त्याची नांगरणी होत असतांहि,त्यातील गवतांचीवगैरे बीजें जळली नसल्यामुळे पुन्हा पेरणीच्या वेळीं गुच्छ (जाळ्या) गवत व वेली ह्यांनी पर्वताच्या गुहेसारखी दुर्गम होतें त्याप्रमाणें गृहस्थाश्रम हेंच कर्मक्षेत्र असून त्यांतील कर्माचा उच्छेन कधींहि होत नाहीं.कारण,हा गृहस्थाश्रम विषयांचा करंडा—आगर—मुख्य आहे.म्हणजे तसा कापुराच्या करंडयांतील कापूर संपला तरीही कापुराचा वास नाहींसा होत नाहीं त्याप्रमाणे गृहस्थाश्रमांत विषय मिळत नाहींसे झाले तरीही त्यांच्या वासना अवशेष राहतात.म्हणून आपण—जीवानी संसारात जरी असलोत तरी सत्संग करून वासना निवृत्त करावयास पाहिजे.वासना निवृत्त करणे म्हणजे परमार्थ व विषयांवासना वाढविणे म्हणजे संसार होय.संसार म्हणजे दु:ख,तर परमार्थ म्हणजे सुख होय.म्हणून आपण आसक्तीपुर्वक संसार न करता,परमार्थ करावा.||४|| भावार्थ:---त्या गृहस्थाश्रमांत जीव प्राप्त झाला असता,मांशा व डांस यांसारख्या असलेल्या नीच पुरूषांनी व टोळ,पक्षी चोर, उंदीर इत्यादिकांनी त्याच्या द्रव्याला उपसर्ग होत असतांहि,या संसारमार्गातच कोठेंतरी फिरत असणारा व दृष्टीला विपर्यास झालेला तो जिंव,अविद्या,काम व कर्मे ह्यांनी व्याप्त झालेल्या मनानें,गंधर्वनगराप्रमाणें मिथ्याभूत असलेल्या या मनुष्यलोकाला सत्यत्वानें अवलोकन करितो.म्हणून आपण जीवानी सत्संग करून संसार हा सत्य नसून,संसार हा मिथ्या आहे असा निश्चय करावा व ब्रह्म हे सत्य आहे,असा निश्चय करून जीवात्मा हाच परमात्मा आहे,असा निश्चय करावा.||५|| | तत्र च क्वचिदातपोदकनिभान् विषयानुपधावति | पानभोजनव्यवायादिव्यसनलोलुपः ||६|| भावार्थ:---त्यामध्येंहि कोठें कोठें उदक-प्राशन,भोजन व मैथुन इत्यादिक व्यसनामध्यें लंपट होऊन,मृगजळासारख्या असलेल्या विषयांकडे धांवत असतो.म्हणून आपण—जीवानी उदक-अन्नादि,व मैथुनादि व्यसनामध्ये आसक्त होऊ नये,कारण विषयं हे मिथ्या आहेत.जो पदार्थ मिथ्या असतो,तो पदार्थ दु:खदायक असतो.म्हणून आपण जी वस्तू—विषय मिथ्या आहे त्या वस्तूचा-- विषयांचा त्याग करून जी वस्तू सत्य—परमात्मा आहे,त्याचा स्वीकार करावा.||६|| भावार्थ:---जसा अरण्यांत थंडीने पिडीत झालेला वैश्यांचा समूह,आपणास अग्नि मिळावा या इच्छेने जळक्या कोलतीसारख्या भासणाऱ्या पिशाचाला ग्रहण करण्याची इच्छा करितो त्याप्रमाणें,तांबड्या वर्णाच्या रजोगुणानें ज्याची बुद्धि सुवर्णाकडे वळविली आहे असा हा जीवसमुदाय,सर्वदोषांचे राहण्याचें ठिकाण असें अग्निविष्ठारूप सुवर्ण ग्रहण करण्याची इच्छा करितो.आपण—जीवानी जे सुवर्ण विष्टासमान अहित करणारे—दु:ख देणारे आहे,त्याचा विवेकपुर्वक त्याग करावा,कारण सुवर्णाची आसक्ती यमपुरीस व लक्ष-चौऱ्याऐंसी योनीस पाठवून दु:ख देते.||७|| अर्थ:----कधींकधीं,घर,पाणी द्रव्य इत्यादी स्वतांच्या अनेक उपजीविका साधनांचा अभिमान धारण करणारा हा जीवसमूह,ह्या संसाररूप अरण्यांत इकडेतिकडे धांवत असतो.आपणास—जीवास घर-दार,पाणी,द्रव्य इत्यादि उपजीविकेचे साधन असावे,पण त्या साधनांचा अभिमान असूनये,कारण “अभिमान” हा “महादोष” आहे,तर “निराभिमान” हा महागुण आहे.अभिमानाने “संसार—दु:ख” प्राप्त होते,तर निराभिमानाने ‘परमात्मा—सुखरुपता” प्राप्त होते. ||८|| भावार्थ:---केव्हांकेव्हां वावटळीसारख्या मोहक स्त्रीनें ह्याला आपल्या मांडीवर बसवून घेतला असतां तात्काळ तिचेठिकाणी उत्पन्न झालेल्या प्रेमरूप धुळीनें ज्याची बुद्धि अतिशय मळीण झाली आहे व ज्यानें मर्यादा सोडिली आहे असा हा जीवसमूह डोळ्यांत धूळ पडल्यासारखया होऊन रात्री संचार करणाऱ्या पिशाचांप्रमाणें दिशांचेठिकाणीं असणाऱ्या साक्षीभूत देवतांना जाणत नाहीं.म्हणून आपण—जीवानी स्त्रीची आसक्ती—मोह धारन करू नये,तर प्रेम धारण करावा,कारण मोह हा दु:खास कारण आहे व मोह हा सुखाला कारण आहे.||९|| भावार्थ:---केव्हांतरी स्वत:च ज्याला एकवेळ विषयांचें खोटेपण कळून आलें आहे परंतु देहाभिमानामुळे ज्याची स्मृती नष्ट झाली आहे असा हा जीवसमूह,त्या स्मृतीभ्रशानेंच बहुतेक मृगजलासारख्या असलेल्या विषयांकडे धांवत असतो.म्हणून आपणास—जीवास देहाभिमान होऊ नये,कारण त्यामुळे स्मृतीभ्रम होतो,कारण त्यामुळे आपण—जीव विषयांकडे धाव घेतोत,तर परमार्थाकडे धाव घेत नाहीत.म्हणून आपल्या—जीवाच्या ठिकाणी देहाभिमान असू नये.||१०|| भावार्थः---एखादेवेळी शत्रुनी किंवा राजाच्या आश्रीतलोकांनी घुबडें व रानमाशा यांच्या शब्दांसारखी अतिभयंकर अशा क्रोधावेशानें परोक्ष निर्भतर्सना केली असतां,तिच्या योगानें त्या जीवसमूहाच्या ह्रदयाला अत्यंत व्यथा होते.आपण—जीवानी आपली—जीवाची क्रोधवशात निर्भातर्सना—तिरस्कार—अपमान केला तरी दु:ख होऊ नये,कारण निर्भातर्सना—तिरस्कार—अपमान हा मनाचा धर्म आहे,तर आपला—जीवाचा धर्म नाही.त्यापेक्षा निंदकाचे घर असावे शेजारी असे समजून आनंद मानवा,कारण आपण—जीवानी निंदा सहन केल्याने आपले—जीवाचे अंत:करण शुद्ध होते किंवा पुण्य होते.||११|| भावार्थः---तो जीवसमूह,जेव्हां पूर्वीच्या सुकृताचा उपभोग घेऊन चुकतो तेव्हां,श्वेतकावळी इत्यादि पापवृक्ष,पापवल्ली व विषयुक्त कूप ह्यांसारख्या निरूपयोगी व यालोकींच्या किंवा परलोकीच्या कार्याला ज्यांचे द्रव्य लागत नाहीं अशा जीवंत असून मेल्यासारख्या धनिकलोकांच्या मागें स्वत:हि जीवंत असून मेल्यासारखा होऊन धांवत असतो.आपण-जीवानी-मात्र आपले द्रव्य,यालोकीच्या किंवा परलोकीच्या कार्यासाठी व्यय—खर्च करावे,तर विषयांच्या आसक्तीसाठी व्यय—खर्च करू नये.||१२|| | एकदाsसत्प्रसन्गान्नीकृतमतीर्व्युद कस्त्रोत:-स्खलनवदुभयतोsपी दुःखदं पाखन्डमभियाती ||१३|| भावार्थः---एखादेवेळी दुष्टांच्या संगतीनें ज्यांची बुद्धि फसून गेली आहे असा होऊन,ज्यांत पाणी मुळींच नाहीं अशा नदीत अडखळून पडल्यासारखा इहलोकी व परलोकींहि दु:ख देणाऱ्या पाखंडधर्मांत जाऊन पडतो.आपण—जीवानी दुष्टांची संगती करू नये,कारण त्यामुळे त्या धनाने यालोकीचे किंवा परलोकीचे परपोकाराचे कार्य न होता विषयांच्या आसक्तीत खर्च होते.||१३|| भावार्थः---जेव्हां तर शत्रूंनी दिलेल्या पीडेमुळें याला अन्न मिळेनासें होते,तेव्हां हा आपल्या पित्याला किंवा पुत्रांना अथवा पित्याची किंवा पुत्रांची दर्भाची काडी (यत्किंचित् वस्तू) ज्याच्या जवळ असेल त्याला हा खरोखर खावयास उठल्यासारखा पीडा देतो.आपण-जीवानी इतरांना दु:ख देऊ नये.||१४|| भावार्थः---एखादेवेळी हा,आवडत्या गोष्टींनी रहित व दु:ख हेच परिणामांचे ज्यांचे फळ आहे अशा वणव्यासारख्या घरांमध्यें येऊन शोकरुपी अग्नीने ह्यांचे सर्वांग पोळूं लागलें म्हणजे वैराग्य पावतो.||१५|| भावार्थः---केव्हांतरी कालगतीनें प्रतिकूळ झालेल्या राजकुळरूप राक्षसानें ह्याचे धनरूप अत्यंत प्रियप्राण हरण केले असतां, ह्याची हर्षादिक जीवलक्षणें नाहींशीं होऊन हा अगदी मेल्यासारखा असतो.||१६|| भावार्थः---केव्हांतरी मनोरथानें प्राप्त झालेल्या पितृपितामहादिक मिथ्याभूत पदार्थांस हे खरे आहेत असें मानून तत्संबंधी स्वप्नासारख्या क्षणिक सुखाचा अनुभव घेतो.||१७|| भावार्थः---केव्हांकेव्हां हा गृहस्थाश्रमांतील कर्मविधीच्या विस्ताररूप पर्वतावर आरोहण करण्याचीच इच्छा करिता असतां लोकांच्या दु:खांनी ह्यांचे मन अगदी खचून जाऊन,कांटे व खडे ह्यांनी भरलेल्या शेतांत प्रवेश करीत असल्याप्रमाणें दु:ख पावतो.||१८|| भावार्थः---कधींकधीं दु:सह अशा जठराग्नीने ह्याचे धैर्य हरण केले असतां,हा आपल्या कुटुंबातील मनुष्यावर रागावतो.आपण—जीवानी मात्र कुटुंबातील किंवा इतरांवर क्रोध करू नये,कारण क्रोध हा दु:खास कारण आहे.||१९|| भावार्थः---तोच पुन्हा निद्रारूप अजगरानें गिळून टाकिला असतां,आज्ञानरूप गाढ अंधकारामध्यें,मग्न होऊन निर्जर अरण्यांमध्यें टाकलेल्या प्रेताप्रमाणें निजतो,त्या वेळीं ह्याला दुसऱ्या कशाचेंहि ज्ञान होत नाहीं.||२०|| भावार्थ:----एखादेवेळी दुर्जनरूप सर्पांनी ह्यांचे गर्वरूप दात पाडून टाकिले असतां,ह्याला एक क्षणभर सुध्दां झोप येत नाहीं व अंत:करणास व्यथा झाल्याने हळूहळू ज्याचें ज्ञान क्षीण होत चाललें आहे असा होऊन,शेवटीं अंधकूपामध्यें पडणाऱ्या आंधळ्याप्रमाणें हा मोहांत पडतो.आपआस—जीवास मोह होऊ नये,कारण मोह हा दु:खास कारण आहे.||२१|| | कर्ही स्म चीत्काममधुलवान् विचीन्व |परदारपरद्रव्यान्यवरुन्धानो राज्ञा स्वमिभीर्वा निहतः पतत्यपारे निरये ||२२|| भावार्थ:---केव्हांतरी विषयरूप मधुलवांचा शोध करितां करितां हा परस्त्री व परधन हरण करूं लागतो तेव्हा राजानें अथवा स्त्रीच्या व धनाच्या मालकांनी ह्याला ठार मारला असतां अपार नरकांमध्यें जाऊन पडतो.म्हणून आपण—जीवानी परस्त्रीचा व परधनाचा भोग घेऊ नये,कारण परस्त्री किंवा परधन नरकामध्ये व लक्ष-चौऱ्याऐंशी योनीत नेऊन दु:ख देते.||२२|| | अथ च तस्मादुभयथापि हि | कर्मास्मिन्नात्मनः संसारावपनमुदाहरन्ति ||२३|| भावार्थ:---हे राजा,असें आहे म्हणून ह्या प्रवृत्तीमार्गामध्यें केलेलें कर्मच जीवात्म्याला या लोकीं व परलोकीहि जन्म प्राप्त होण्यास कारण आहे असें म्हणतात.म्हणून आपण जीवानी प्रव रुतती मार्गाचा स्वीकार न करता सत्संगाद्वारे निवृत्ती ज्ञान—मार्गाचा स्वीकार करून चौथा पुरुषार्थ मोक्ष करून जन्म—मरण निवृत्त करून परमात्मरूप—सुखरूप असावे.||२३|| | मुक्तस्ततो यदि बन्धाद्देवेदत्त उपाच्छिनत्ति | तस्मादपि विष्णूमित्र इत्यनवस्थितिः ||२४|| भावार्थ:---कदाचित् हा पुरुष त्या राजादिकांच्या बंधांतून जरी मुक्त झाला तरी ज्या वस्तूंकरितां हा बंधांत होता ती वस्तू ह्याच्यापासून देवदत्त (दुसराच कोणीतरी) हरण करितो,म्हणजे याला ती भोगावयास मिळत नाहीं आणि त्या देवदत्तापासून तरी विष्णूमित्र (तिसराच कोणीतरी) हरण करितो ह्याप्रमाणे अव्यवस्था होते.||२४|| भावार्थ:---केव्हांकेव्हां थंडीवारावगैरे अनेक अधिदैविक अध्यात्मिक व अधिभौतिक अशा दु:खद अवस्थांचे निवारण करण्यास असमर्थ होणारा हा प्राणी,अपार चिंतेने खिन्न होऊन राहतो.||२५|| भावार्थ:---एखादेवेळी परस्पर द्रव्यादिकांचा देणेंघेणेवगैरे व्यवहार करीत असतांना यत्किंचित (वीस कवड्यांइतके) किंवा त्याच्यापेक्षाही कमी द्रव्यलोभ्यांपासून हरण करूं लागला असतां,द्रव्याच्या फसवणुकीमुळे दुसऱ्या लोकांशी वैर पावतो.||२६|| | अध्वन्यमुष्मीन्निम उपसर्गास्तथा सुखदुःख | रागद्वेषभयाभिमानप्रमादोन्मादाशोकमोहलोभ | मात्सर्येर्ष्यावमानक्षुत्पीपासाधीव्याधिजन्मजरा मरनादयः||२७|| भावार्थ:---हे राजा,या संसारमार्गामध्यें हे पूर्वी सांगीतलेले उपसर्ग आहेत तसेच सुख,दु:ख प्रीती,द्वेष,भय,अभिमान,पिशाचानें झपाटने,शोक,मोह,लोभ,मत्सर,ईर्ष्या,अपमान,क्षुधा,तृषा,आधि,व्याधि,जन्म,जरा आणि मृत्यू इत्यादिक दुसरेही पुष्कळ उपसर्ग आहेत.||२७|| भावार्थ:---एखादेवेळी देवाची मायाच अशा स्त्रीनें आपल्या बाहुलतांनी ह्याला आलिंगन दिलें असतां,ह्याचे विवेकज्ञान नष्ट होऊन,तिला क्रीडेसाठी घर बांधून देण्याच्या खटपटीत ह्याचें मन अगदी गुंतून जाते,मन तिच्या आश्रयसंबंधाने प्राप्त झालेले जे पुत्र,कन्या व स्वत:ती स्त्री ह्यांचे जें भाषण,अवलोकन व विलास त्यांच्या योगानें ज्यांचे ह्र्दय आकर्षित झालें आहे असा आस्वाधीन मन झालेला हा जीवसमूह,आपणास अपार अशा अंधतम नरकामध्यें पाडितो.म्हून आपण—जीवानी स्त्रीत आसक्त होऊ नये,कारण स्त्रीचा आसक्ती नरकात दु:ख देते.||२८|| भावार्थः---कधीं कधीं षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान् विष्णूच्या परमाणुपासून दोन परार्धेपर्यंत सांगितलेल्या कालरूपी चक्रापासून, म्हणजे जें चक्र,आपल्या शीघ्रगतीनें बाल्यतारूण्यादिरूप वयाच्या स्वरुपानें क्षणमात्रांत ब्रह्मदेवापासून तों तृणस्तंबापर्यंत देखदेखत सर्व प्राणीमात्रांचा संहार करीत असतें.त्यापासून ज्याचे ह्रदय भ्यालें आहे असा होऊन,कालचक्र हें ज्यांचे स्वकीय आयुध आहे अशा त्याच प्रत्यक्ष भगवान् यज्ञपुरुषरुपी परमेश्वराचा अनादर करून,संकेतानें ठरविलेल्या परंतु मुळच्या प्रमाणाने शून्य,अशा पाखंड मार्गानें,आर्याधर्मांत ज्यांचे नाव देखील नाहीं अशा कंकपक्षी,गिधाड,बगळे व वडवाघूळ यांच्यासारख्या पाखंडदेवतांचाच मुख्यत्वेंकरून हा आश्रय करितो.आपण—जीवानी पाखंड-मताचा स्वीकार न करता वेदांत-मताचा स्वीकार करून सत्संगाद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान संपादन करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२९|| भावार्थ:---नंतर आपण ठरविलें तितकें द्रव्य न दिल्यामुळे फसविलेल्या त्या पाखंड्यांनी याला पक्का फसविला म्हणजे,मग त्या मेळ्यांतून निघून हा ब्राह्मणसमुहांत राहूं लागतो,परंतु त्या ब्राहमणाचे उपनयनादिपूर्वक श्रौतस्मार्तकर्मानुष्ठानानें भगवान् यज्ञपुरुषाचेंच आराधन करण्याचे शील याला आवडत नाहींसे झाले म्हणजे पुढें हा त्याला सोडून,वेदोक्तकर्माविषयीं अनधिकारी असल्यामुळें वानरजातीप्रमाणे केवळ कुटुंबपोषण व स्त्रीसमागम हाच ज्याचा व्यापार आहे अशा शूद्रकुलामध्यें शिरतो.म्हणून आपण—जीवानी स्वधर्मांनुसार आचरण करून अधिकारीसंपन्न व्हावयास पाहिजे.आपण आपल्या स्वधार्मांनुसार आचरण न केले तर अधिकार कमी होतो,परिणाम आपली प्रगती न होता अधोगती होते.आपण परमात्म्याकडे न जाता संसाराकडे जातोत.सुखाकडे न जाता दु:खाकडे जातोत.आपानांना—जीवांना दु:खाची गरज नसून सुखाची गरज असते.म्हणून आपण—जीवानी अधिकार वाढवून परमात्म्याकडे—सुखाकडे जाण्याचा प्रयत्न करावा.||३०||
भावार्थ:---त्या शूद्रजातीमध्येंहि प्रतीबंधरहित यथेच्छपणें क्रीडा करीत असतां ह्याची बुद्धी विषयांवर आसक्त होऊन अतिकृपण होते व हा परस्परांचे मुख पाहणें इत्यादीकेंकरून मैथूनादिकर्मात गुंग होऊन आपल्या मरणकाळालाहि विसरून जातो.आपल्यात—जीवात तमोगुणांचे अधिक्य झाले असता म्हणजेच सत्व--गुणांचे अधिक्य कमी झाले असता व रजो--गुणांचे अधिक्य अधिक झाले असता सर्व विषयांच्या भोगत आसक्त झाल्यामुळे मृत्यू जवळ आला आहे,हेही कळत नाही.म्हणजेच मृत्यू येईपर्यंत सर्व विषयांच्या भोगतच आसक्त—गुंग असतो.त्यामुळे मनुष्य देह हा सत्व-गुण वाढवून परमात्म्याकडे—सुखाकडे जाण्याकरिता मिळालेला आहे,असे सत्संगाद्वारे कळून न घेता सर्व विषयांच्या भोगतच आसक्त होतो.वास्तविक पाहता,सर्व विषयांचा भोग घेण्यासाठी मनुष्य-योनी सोडून इतर ज्या त्रेऐंशीलाखनव्ह्यान्नवहजारनऊशेंनव्हयानव(८३९९९९९)योनीत संसारच—विषयांचाच भोग घ्यावयाचा आहे.म्हणून आपण—जीवांनी मनुष्य-योनीत परमार्थाच करावा व इतर योनीत संसारच—विषयांचा भोगच घ्यावा असा विवेक मनुष्य देहातच करून सर्व विषयांचा त्याग करून परमार्थ करून चौथा पुरुषार्थ जो मोक्ष संपादन करावा.||३१|| | क्वचिद् द्रुमवदैहिकार्थेषु गृहेषु रंस्यन् | यथा वानरः सुतदारवत्सलो व्यवायक्षणः ||३२|| भावार्थ:---कधीं कधीं वृक्षांप्रमाणें इहलोकी उपयोगी पडणाऱ्या खाणें पिणें वगैरे विषयांनी युक्त असलेल्या गृहामध्यें रममाण होणारा हा जीवसमूह वानराप्रमाणें मैथूनादिकांविषयी उत्सुकता धारण करणारा आपल्या स्त्रीपुत्रादिकांवर प्रीती करूं लागतो. आपण—जीवानी खाणे-पिणे इत्यादि विषयांत आसक्त होऊ नये.पशुसारखे मैथूनादिकांविषयीं आसक्त होऊ नये,कारण त्यामुळे स्त्री-पुत्रादिकांत आसक्त होतो.आपणांस विषयांची आसक्ती हि यमपुरीस व चौऱ्याऐंशीलक्ष योनीस दु:ख देणारी आहे ,म्हणून सर्व विषयांच्या आसक्तीचा त्याग करावा. ||३२|| भावार्थ:-----याप्रमाणे या संसारमार्गात सुखुदु:खांचा अनुभव घेणारा हा जीवसमुह,एखाद्या पर्वताच्या गुहेसारख्या भयंकर रोगादिसंकटामध्यें पडून मृत्यूरूप हत्तीच्या भयाने भिऊन राहतो.म्हणजेच आपण—जीव संसारात आसक्त—विषयांत आसक्त झालोत तर पुन्हा—पुन्हा जन्म-मृत्युच्या फेऱ्यात सापडून दु:खास प्राप्त होतोत.||३३|| भावार्थ:---केव्हांतरी थंडी, वारा इत्यादिकांपासून उत्पन्न झालेल्या अनेकप्रकारच्या अधिदैविक,अधिभौतिक व अध्यात्मिक अशा दु:खांच्या निवारणाविषयीं असमर्थ होऊन दूरंतचिंतेने व्याकूळ होऊन राहतो||३४|| भावार्थ:---एखादेवेळी परस्परांशी व्यवहार करितां करितां दुसऱ्याला फसवून थोडेंसें धन मिळवितो.आपणास—जीवास धनाची आसक्ती झाली असल्यास अधर्माचा—परधर्माचा अवलंब करून इतरांचे धन फसवूनक करून मिळवतो.||३५|| भावार्थ:---केव्हांतरी जवळचे द्रव्य अगदी संपून जाऊन शय्या,आसन व भोजन इत्यादिक उपभोग याला मिळत नाहींसे झाले असतां,जेव्हां याचनेनें-सुद्धा मनांत असलेल्या वस्तू मिळत नाहींशा होतात तेव्हां त्या अन्यायानें—अधर्मांनी—परधर्मांनी (चौऱ्यादिकानें) मिळविण्याबद्दल आपल्या बुद्धीचा निश्चय करून,त्याप्रमाणे वागू लागला म्हणजे लोकांपासून अपमान,निंदा व ताडण यांस पावतो.म्हणून आपण—जीवानी विषयांत आसक्त होऊ नये,तर सत्संग करून विषय हे दु:खास कारण आहेत,असा निश्चय विषयांविषयी वैराग्य धारण करून त्याग करावा.||३६|| | एवं वित्तव्यतिषन्गविवृद्धवैरानुबन्धोsपि | पूर्ववासनया मिथ उद्वहत्यथापवहती ||३७|| भावार्थ:---याप्रमाणेंच परस्परांमध्यें द्रव्याच्या संबंधामुळें त्याचा वैरसंबंध वाढत चालला असतांहि तो पुन्हा प्रारब्धवशेंकरून परस्परांमध्यें विवाहादि संबंध करितो आणि पुन्हा वैर वाढूं लागलें म्हणजे त्यासंबंधी लोकांचा त्यागहि करितो.आपण--जीव प्राराब्धवाशात संसारात पडलो तर त्या संसारासाठी दहाची आवश्यकता असते.संसारात द्रव्य हे कमी पडत असते,कारण संसारात गरजा ह्या वाढतच असतात.द्रव्याचा संबंधामुळे इतर जीवाशी वैरसंबंध वाढते,त्यामुळे प्रेमसंबंध कमी किंवा नाहीसे होतात.म्हणजेच त्यामुळे जीवास प्रेम देण्यास धन हे प्रतिबंध करते.म्हणून जीवाचा त्याग होतो.प्रत्येकांत परमात्मा असून,धनामुळे त्या जीवांत प्रेम देण्यात धन हे प्रतिबंध करिते.म्हणून आपल्यात—जीवात धनाविषयी आसक्ती नसावी,तर त्याग असावा.||३७|| भावार्थ:---मिळून या संसारमार्गामध्यें अनेकप्रकारच्या क्लेशांनी व उपसर्गांनी पिडीत होऊन,जेथें जो कोणी संकटांत पडेल किंवा मरण पावेल त्याला त्याचा दुसरा सोबती तेथेंच टाकून,नव्या नव्या झालेल्या पुत्रादिकांचा स्वीकार करून,शोक करीत,मोह पावत,भय पावत,विवाद करीत,आक्रोश करीत,हर्ष पावत व गायन करीत असता भगवंताच्या मायेंने बध्द होऊन,एक भगवद्भक्तावांचून दुसरा कोणताही जीव,ज्यापासून हा मनुष्यलोकाचा समुदाय प्रवृत्त झाला आणि ज्याला संसाराचें समाप्तिस्थान असें म्हणतात त्या परमेश्वराजवळ अद्यापि परत येत नाहीं.म्हणून आपण जीवानी सत्संग करून धनाचा—विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा. ||३८|| भावार्थ:---कारण,ज्यांनी प्राण्याचा द्रोह—वैरभाव सोडून दिला आहे,ज्यांचे स्वभाव शांत आहेत व ज्यांची मनें विषयांपासून निवृत्त झालीं आहेत अशा मुनींना जो प्रसिध्द भक्तियोग अनायासाने प्राप्त होतो त्याला ते संसारमार्गात फिरणारे जीव पावत नाहींत.म्हणून आपण जीवानी इतर प्राण्यांच्या वैरभाव सोडून व विषयांचा त्याग करून निष्काम-भक्ती-योग धारण करून सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घेऊन जन्म—मरण निवृत्त करावे.||३९|| भावार्थ:---हे राजा,जे दिग्गजांना जिंकणारे व यज्ञयागादिक अनुष्ठानें करणारे असे राजर्षि आहेत त्यांनांहि तो भक्तीयोग प्राप्त होत नाहीं,कारण तर तेसुध्दां या भूमीच्या निमित्त ‘माझीच हि भूमी आहे, तुझी नव्हे’ असे म्हणून परस्पर वैरसंबंध करीत असते शेवटी युध्दामध्यें परस्परांकडून प्रहार पावून केवळ मरून पडतात.म्हणून आपण—जीवानी वैरभावाचा त्याग करून जड वस्तूचा त्याग करावा,कारण जड हे दु:खास कारण आहे.सत्संगाद्वारे विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||४०|| भावार्थ:---कदाचित् हा जीवसमूह,त्यानें कांही चांगली कर्में केलीं असली तर त्या पुण्यवल्लीचा आश्रय करून त्या रोगादिदु:खांपासून अथवा नरकापासून कसातरी सुटला तर पुनरपि याप्रमाणेंच प्रवृत्तिमार्गाचेठिकाणी संचार करीत असता मनुष्यलोकाच्या मेळ्यांतच जाऊन मिळतो,संसारांतून मुक्त होण्याविषयीं यत्न करीत नाहीं.याप्रमाणे देवलोकाचेठिकाणी गेला तरीहि तेथून परत येऊन मनुष्यलोकाला अनुसरतो.म्हणून आपण जीवानी सकाम कर्म किंवा उपासना न करता निष्काम कर्म व ईश्काम उपासना करावी,कारण ती साधना परमात्म्याकडे—सुखरुपताकडे नेत असते.त्यामुळे आपले—जीवाचे जन्म—मरण निवृत्त होण्याची शक्यता अधिक असते.||४१|| भावार्थ:---याप्रमाणे भरतानें सांगितलेल्या भवाटवीचें आख्यान करून,आतां त्याचें संक्षिप्त चरित्र सांगण्याकरितां श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,पूर्वीचे मोठमोठे शिष्टहि त्या भरताचें माहात्म असें गायन करितात कीं,---जशी मधु-भक्षिका गरुडाच्या मार्गानें गमन करण्यास समर्थ होत नाहीं त्याप्रमाणे राजर्षि ऋषभपुत्राच्या (भरताच्या) मार्गाचें मनानेंहि अनुकरण करण्यास या लोकीं कोणताहि राजा समर्थ होणारा नाहीं,कारण भरताच्या मार्गाचे—ज्ञान-मार्गाचे अनुकरण करण्यास विवेकाद्वारे मन आणि इंद्रियें आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेवावे लागतात.इंद्रियें हे बहिर्मुख असल्यामुळे त्यांना ताब्यात आणण्यासाठी प्रतिकूलता येते,म्हणून इंद्रियांना ताब्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.विशेष प्रयत्न केले असता इंद्रियें ताब्यात येतातच म्हणजेच ते-इंद्रियें सहज-साध्य नसून कष्ट-साध्य आहेत.मन या अंतर-इंद्रिये याच्यावर पूर्व संस्कार अनात्म्याचे असल्यामुळे सत्संगाद्वारे आपल्या-जीवाचे वास्तविक स्वरूपाचे संस्कार केल्यामुळे ते मन आपल्या-जीवाच्या ताब्यात येतेच.मन आणि इंद्रियें आपल्या—जीवाच्या ताब्यात आल्यानंतर आपण भरताच्या वेदांत—मार्गाचे--ज्ञान मार्गाचे अनुकरण करण्यास समर्थ होतोतच.||४२|| भावार्थ:---कारण,पुण्यकीर्ती भगवंताचेठिकाणीं प्रीति असलेल्या त्या ऋषभपुत्र भरतानें,तरुणपनींच मनोहर व त्याग करण्यास अशक्य अशा आपल्या पुत्र,कलत्र,सुदृढ,आणि राज्य ह्यांचा विष्ठेप्रमाणें त्याग केला.आपण–जीवानी स्थूल-शरीराच्या तरुणपणीच सत्संग करून त्याद्वारा आपल्या—जीवाच्या पुत्र,कलत्र,सुदृढ,आणि वैभव हे सर्व विष्टेसारखे त्याग करण्यासच योग्य आहेत,तर अन्नादिकाप्रमाणे भोग घेण्यास मुळीच योग्य नाहीत,असा विवेक करून त्या सर्वांचा त्याग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा स्वीकार करावा.||४३|| भावार्थ:---ज्या भरत राजानें,टाकण्यास अशक्य अशी पृथ्वी,पुत्र,स्वजन,द्रव्य,स्त्रिया,आणि देवश्रेष्ठांनीही प्रार्थना करण्यास योग्य व भरताची दया आपणावर होवो असें अवलोकन करीत असणारी लक्ष्मी,यांची इच्छा मुळींच धरली नाहीं,हे सगळें त्याला योग्यच आहे,कारण,मधुसूदन भगवंताची सेवा करण्यांत ज्यांची अंत:करणें आसक्त असतात त्या थोर पुरुषांना मोक्ष सुध्दां तुच्छ आहे, मग इतरांची कथा काय! जे भगवंतांच्या सेवेत आसक्त आहेत,त्यांना मोक्ष-सुखसुद्धा तुच्छ आहे,त्यांना तर पुत्र,स्वजन, द्रव्य,स्त्रियां,सहजच तुच्छ आहेत म्हणजे त्याग करण्यास योग्य आहेत.म्हणून आपण त्यांना तुच्छ समजून सहजच त्याग करावा. ||४४|| भावार्थ:---हे राजा,ज्या भरतानें,आपल्या हरिणदेहाचा त्याग असतांनाहीं,यज्ञरुपी,धर्माचा फळदाता,कर्मानुष्ठानांत निपुणतेनें युक्त, अष्टांगयोगानें प्राप्य,सांख्यशास्त्रानें प्रतिपाद्य,मायानियंता व सर्व जीवांचा नियंता अशा हरीला नमस्कार असो,असें उच्चारिलें त्या भारताच्या मार्गाचें आचरण करण्यास दुसरा कोण राजा समर्थ होईल? कोणीच होणार नाहीं.आपण-मात्र भारताच्या ज्ञान--मार्गाचे औकरण करून मोक्ष संपादन करून मनुष्य-देहाचे महासार्थक करून घ्यावे.||४५|| | य इदं भागवत सभाजितावदातगुणकर्मणो राजर्षेर्भरतस्याणुचरितं| | स्वस्त्ययनमायुश्यं धन्यं यशस्यं स्वर्ग्यापवर्ग्यं वानुश्रुनोत्याख्या | | स्यत्यभिनन्दती च सर्वा एवशिष आत्मन आशास्ते न कांचन परत इति ||४६|| भावार्थ:----हे राजा,भगवद्भक्तांनी आदरपूर्वक ज्याचे पवित्र गुण व चरित्रें केलीं आहेत त्या राजर्षी भरताच्या कल्याणकारक, आयुष्यवर्धक,धन्यतासंपादक,कीर्तीप्रद,आणि स्वर्ग व मोक्ष मिळवून देणाऱ्या ह्या चरित्राचें,जो मनुष्य,वारंवार श्रवण करितो, व्याख्यान करितो किंवा अभिनंदन करितो त्याचे सर्व मनोरथ भगवंतापासूनच परिपूर्ण होतात.तो दुसऱ्या पासून काहिंच मिळविण्याची इच्छा करीत नाहीं.म्हणून आपण—जीवानी भरताचे चरित्रे श्रवण करून त्यांच्यासाखा ज्ञान—मार्गाचा अवलंब करून चौथा पुरुषार्थ—मोक्ष संपादन करावा.||४६|| १४---याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें जडभरतचरीत्रवर्णननामक हा चवदावा(१४)अध्याय छेहचाळीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||१४|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरूचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१५—आता या पंधराव्या अध्यायामध्येंत्या,त्या भारताच्या वंशात झालेल्या राजांचे वर्णन केले आहे. || |१५--- भरताच्या वंशाचे वर्णन ________________________________________________________________________________________ | श्रीशुक उवाच:--- | भरतस्यात्मज: सुमतिर्नामाभिहितो यमु ह वाव के चित्पाखन्डीन ऋषभपदवीमनुवर्तमान | चानार्या अवेदसमाम्नातां देवतां स्वमनीषया पापीयस्या कलौकल्पयिष्यन्ति ||१|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,भरताचा सुमतिनामक पुत्र होता असें वर्णन आहे.तो,ऋषभदेवाच्या मार्गाला (जीवन्मुक्ततेला)अनुसरला असें ऐकून कितीएक पाखंडी दुर्जन लोक,कलियुगामध्ये पापाचरणाविषयीं तत्पर अशा आपल्या बुद्धिने त्या सुमतिनामक पुत्राला,हा बुद्धच साक्षात अवर्तीण आहे असें मानून,वेदामध्ये न सांगितलेल्या हि आपली इष्ट देवताच आहे अशी कल्पना करितील.||१|| भावार्थ:---त्या सुमतीपासून वृध्दसेनानामक स्त्रीच्याठिकाणी देवताजित या नांवाचा पुत्र झाला. ||२|| भावार्थ:----तसाच त्या सुमतीपासून दुसऱ्या आसुरीनाक स्त्रीच्याठिकाणी देवद्यूम्ननामक धेनुमतीच्या उदरी परमेष्टी नांवाचा पुत्र झाला त्याला,सुवर्चलेच्याठींनी काधनीं प्रतिह पुत्र झाला. ||३|| भावार्थ:---तो प्रतीह पुष्कळ लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करून,त्याच्या योगानेंच स्वत: अत्यंत शुध्द होऊन,अपरोक्षत्वेंकरून महापुरुष भगवंताचा अनुभव घेऊं लागला. ||४|| भावार्थ:----नंतर त्या प्रतिहापासून सुवर्चलेच्या उदरीं,प्रतीहर्ता,प्रस्तोता आणि उद्गाता असे यज्ञादीककर्मांमध्यें निपुण तीन पुत्र झालें.प्रतीहर्त्यापासून स्तुतीच्याठिकाणी अज आणि भूमा असे दोन पुत्र झालें.||५|| भावार्थ:---भूम्यापासून ऋषीकुलेच्याठिकाणी उग्दिथ,उद्ग्तीथापासून देवकुल्येचठिकाणीं प्रस्ताव,प्रस्तावापासून नियुत्सेचेठिकाणीं विभूनामक पुत्र झाला.विभूपासून रतीचेठिकाणीं पृथुषणे,त्या पृथुषेनाला आकुतीचेंठिकाणी नक्त झाला.नक्ताला द्रुतिनामक भार्येंच्या उदरी गयनांवाचा पुत्र अत्युत्तम कीर्तीमान राजर्षिश्रेष्ठ झाला.तो जगत्संरक्षण करण्याच्या इच्छेने सत्त्वगुण धारण करणाऱ्या प्रत्यक्ष भगवान् विष्णूचा अंश असल्यामुळें ज्ञानीत्वादिक उत्तम लक्षणांच्या योगाणें सर्व जनांमध्यें श्रेष्ठता पावला.||६|| भावार्थ:---प्रजांचे पालन,पोषण,प्रीतिजनन,उपलालन व योग्य,शिक्षण या लक्षणांनी युक्त असलेल्या आणि ब्रह्मादिकांपेक्षांहि श्रेष्ठ अशा षड्गुनैश्वर्यसंपन्न महापुरुष परब्रह्माचेठिकाणी सर्वात्मभावेंकरून यज्ञयागादिकांचे अर्पण केलें असतां परमपुरुषार्थाचे साधन होणाऱ्या अशा आपल्या स्वधर्माच्या योगानें तसाच ब्रहमज्ञानी पुरूषांच्या निरंतर चरण सेवेनें संपादन केलेल्या भगद्भक्तीयोगानें निरंतर ज्याची बुद्धी,संस्कारयुक्त व शुध्द झाली आहे व त्यामुळें देहादिकांचेठिकाणी असलेला अहंभाव ज्यांतील नाहींसा झाला आहे अशा अंत:करणांमध्यें स्वतांच त्याला ब्रह्मानुभव मिळत आहे व ज्याचा अभिमान सुटला आहे असताही तो गयराजा,लोकसंग्रहाकरितां पृथ्वीचेच रक्षण करूं लागला.||७|| भावार्थ:---हे पांडूकुलोत्पन्ना परीक्षित-राजा,पूर्वीचें सज्जन,त्या गयराजाच्या महात्म्यानें युक्त अशी हि कथा गायन करितात.||८|| भावार्थ:----अहो,दुसरा कोण राजा कर्मानी गयराजाचें अनुकरण आहे? कोणीच नाहीं. कारण,विधीपूर्वक यज्ञादि कर्में करणारा, सर्वप्रकारें सन्मानास्पद,बहुज्ञानी,धर्मरक्षण करणारा,संपत्ती प्राप्त झालेला,साधूंच्या सभेचा अधिपती आणि सज्जनांची सेवा करणारा असा एक भगवदंशरूप गयराजाखेरीज दुसरा कोण आहे? ||९|| भावार्थ:---ज्या गयराजाला,ज्यांचे आशीर्वाद सत्य आहेत अशा श्रध्दा,मैत्री,दया इत्यादिक पतिव्रता दक्षकन्यांनी मोठ्या आनंदाने गंगादि-नद्यांच्या उदकांनी अभिषेक केला.जो निरिच्छ असतांनाहीं त्याच्या गुणरूप वत्सामुळें जिच्या ओंटीला पान्हा फुटला आहें,अशा गोरूपी पृथ्वीनें ज्याच्या प्रजाजनांचे सर्व मनोरथ परिपूर्ण केले.||१०|| भावार्थ:----जो निष्काम असतांनाही त्याच्या कामना वेदांनी व वेदोक्त कर्मांनी परिपूर्ण केल्या आणि युध्दामध्यें बाणाच्या योगानें प्रतिपूजा केलेल्या राजांनी करभार आणून अर्पण केले त्या प्रमाणेंच ज्यानें रक्षणेंकरून व दक्षिणादाणादिकेंकरून ब्राहमणाची पूजा केली असतां त्यांनी परलोकी प्राप्त होणाऱ्या धर्मफलांचा सहावा भाग त्याला अर्पण केला.||११|| भावार्थ:---पुष्कळ सोमपानानें युक्त अशा ज्याच्या यज्ञामध्यें इंद्र मदांध झाला असतां यज्ञरुपी भगवंतानें,श्रद्धेनें व विशुध्द आणि निश्चल अशा भक्तियोगानें अर्पण केलेलें यज्ञाचें फळ,पूजा ग्रहण केल्यासारखें प्रत्यक्ष स्वीकारिलें.||१२|| भावार्थ:---ज्या भगवंताच्या संतोषानें ब्रहमदेवापासून देव,तिर्यग्योनि,(पशु पक्षी इत्यादिक) मनुष्य,वेली व गवतसुध्दां तृप्त होतें, तो जगाचा जीव भगवान् तृप्त होत असता,ज्या गयराजाच्या यज्ञामध्यें संतोष पावला,त्या गयराजाचें कोण बरें राजा अनुकरण करील?कोणीच करणार नाहीं.||१३|| भावार्थ:---पुढें गयराजाला गयंतिचेठिकाणीं चित्ररथ,सुगती आणि अवरोधन असे तीन पुत्र झाले.चित्ररथापासून ऊर्णेच्या पोटीं सम्राट या नांवाचा पुत्र झाला.||१४|| भावार्थ:----त्या सम्राजाला उत्कलेच्याठिकाणीं मरीचि झाला,मरीचि[पासून बिंदूमतीच्या उदरीं बिंदूमान झाला,त्याच्यापासून सरघेला मधुनांवाचां पुत्र झाला,मधुपासून सुमनेचेठिकाणीं विरव्रत झाला,त्यापासून भोजेचेठिकाणीं मंथु आणि प्रमंथु असे दोन पुत्र झाले,मंथुला सत्येचेठिकाणी भावन झाला,त्यापासून दूषणेच्या उदरीं त्वष्टा झाला,त्वष्टयाला विरोचणेच्या उदरीं विरज झाला आणि विरजाला विषूवीचेठिकाणीं शतचित् आहे मुख्य ज्यांमध्यें असे शंभर पुत्र व एक कन्या आशीं मुले झाली.||१५|| | तत्रायम श्लोक--- | प्रैयव्रतं वंशमिमं विरजश्र्चरमोद्भाव: | अकरोदत्यलं कीर्त्या विष्णु: सुरगनं यथा ||१६|| भावार्थ:----त्याच्या विषयीं अशा अर्थाच्या श्लोक आहे कीं,----जसा विष्णू,देवगणाला शोभा देतो त्याप्रमाने प्रियव्रत राजाच्या वंशांत शेवटीं उत्पन्न झालेल्या विरजराजाने,आपल्या कीर्तीनें,त्या वंशाला अत्यंत अलंकृत केलें.||१६|| १५---याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें प्रियव्रतवंशानुकिरणनामक हा पंधरावा(१५)अध्याय सोळा(१६) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१६--- पूर्वी संक्षेपाने सांगितलेल्या व्दिपांचे व समुद्रादिकांचे,प्रमाण व लक्षण व स्वरूप,स्पष्टपणे वर्णन करण्यासाठी या सोळाव्या अध्यायापासून पुढील पांच अध्यायांचा आरंभ आहे|| | भुवनकोशाचे वर्णन ________________________________________________________________________________________ |राजोवाच:--- | उक्तस्त्वया भूमण्डलायामविशेषो यादवा-| दित्यस्तपति यत्र चासौ ज्योतिषां गणैश्र्चन्द्रमा वा सह द्द्श्यते ||१||
भावार्थ:---राजा म्हणाला--- हे मुने,जितक्या लांबपर्यंत सूर्य प्रकाशमान होतो व जेथपावेतों ज्योतिर्गणासहवर्तमान हा चंद्रमा दिसतो,तितका भावार्थ:----हे भगवान् त्यामध्येंहि प्रियव्रतराजाच्या रथाच्या चाकांनीं पडलेल्या सात खड्यांच्या योगानें,सात समुद्र होऊन त्यांच्या योगानें या पृथ्वीच्या सात विशेष द्वीपांची रचना झाली आहे,असें जें तूं निश्चयानें सामान्यपणें सुचविलें आहेस हेंच सर्व मी लांबी-रुंदीच्या प्रमाणाने व लक्षणानें जाणण्याची इच्छा करितों.||२|| भावार्थ:---कारण,भगवंताच्या सगुण अशा विराट स्वरूपाचेंठिकाणीं स्थिर केलेलें मन,निर्गुण अतिसूक्ष्म,स्वप्रकाश व परब्रहमरूप अशा वासुदेव भगवंताचेंठिकाणीं स्थिर करण्याविषयीं योग्य होतें.यास्तव हे गुरों,हें भगवंताचें ब्रह्मंडात्मक स्थूल स्वरूप मला कृपा करून सांगावें.||३|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे महाराज,हा पुरुष,ज्या अर्थीं भगवन्मायेच्या गुणविस्ताराचा अंत,देवांचें आयुष्य प्राप्त झालें असतांहि आपल्या मनानें जाणन्याविषयीं व वाचेनें वर्णन करण्याविषयीं समर्थ नाहीं,त्या अर्थीं मुख्यत्वेंकरूनच नावें,रूपें,लांबी व रुंदी याची प्रमाणें व लक्षणें सांगून भुगोलाच्या रचनेंचें,व्याख्यान करितों. ||४|| भावार्थ:----हे राजा,आम्ही ज्यांत हल्ली आहों तें हे द्वीप,भूमंडळरूप कमळाच्या पाकळ्यांच्या घेरांतील कर्णिकारुप असून ह्याचें क्षेत्रफळ लक्षयोजनें आहे व हें कमळाच्या पानासारखे समवर्तुळ आहे. ||५|| भावार्थ:---त्यामध्ये नऊ-नऊ हजार योजनें विस्तीर्ण अशी नऊ खंडे असून तीमध्यें असलेल्या साठ मर्यादापर्वतांनी एकमेकांपासून विभाग पडलेली आहेत. ||६|| भावार्थ:---या नऊ खंडांमध्यें इलावृतनांवाचें एक खंड सर्वांच्या मध्यभागी असून,त्याच्यामध्यें कुलपर्वतांचा राजा मेरूपर्वत आहे, तो भूमंडळरूप कमळाचा कर्णीकारुप असून जंबूद्विपाच्या विस्ताराइतका (एकलक्ष योजनें) उंच आणि मुळापासून शिखरापर्यंत सगळा सुवर्णमय आहे,तो मस्तकाचेठिकाणीं बत्तीस हजार योजनें विस्तीर्ण असून,मुळाचेठिकाणीं सोळा हजार योजनें विस्तृत आहे व तितकाच (सोळा हजार योजनें) भूमीमध्यें शिरलेला आहे, मिळून हजार योजनें व भूमीवर चवऱ्याऐंशी हजार योजनें असा एक लक्ष योजनें उंच आहे.||७|| भावार्थ:----इलावृतखंडाच्या उत्तरेकडे नीळ,श्वेत आणि शृंगवान असे तीन पर्वत असून ते अनुक्रमानें असलेल्या रम्कय,हिरण्मय आणि कुरु या खंडांचें मर्यादापर्वत आहेत व ते पूर्वपश्चिम लांब असून दोंहोंबाजूंनी खाऱ्या पाण्याच्या समुद्राला मिळालेले आहेत. त्यांची रुंदी दोनदोन हजार योजनें असून ते एकक पूर्वींच्यापेक्षा उत्तरेकडचा दशांशापेक्षा कांही अधिक अंशानें लांबीमध्येमात्र कमी आहेत,उंची व जाडी सगळ्यांची सारखीच आहे.||८|| भावार्थ:---ज्याप्रमाणें इलावृताच्या उत्तरेकडे नीलादिक पर्वत आहेत त्याप्रमाणेंच दक्षिणकडेही निषध,हेमकुट आणि हिमालय असे तीन पर्वत,दहादहा हजार योजनें उंचीचे व दोनदोन हजार योजनें रुंदीचे व पूर्वपश्चिम समुद्रांपर्यंत लांबीचे असून ते हरीवर्ष, किंपुरुष आणि भारत या खंडांच्या मर्यादा दाखविणारे आहेत. ||९|| भावार्थ :---तसेच इलावृताच्या पश्चिमेकडे व पूर्वेकडे माल्यवान आणि गंधमादन असे दोन पर्वत,उतरेकडे नीलपर्वतापर्यंत व दक्षीणेकडे निषधपर्वतापर्यंत लांबीचे,दोनहजार योजनें रुंदीचे व दाहा-दाहा-हजार योजनें उंचीचे असून ते अनुक्रमानें केतूमाल आणि भद्राशव या खंडांच्या सीमा दाखवितात. ||१०|| भावार्थ:---तसेच मेरूपर्वताच्या पूर्वादीक चारी दिशांकडे मंदर,मेरूमंदर,सुपार्श्व आणि कुमुद असे चार मेरूपर्वताचे आधारभूत सुवर्णमय पर्वत दहादहा हजार योजनें विस्ताराचे व उंचीचे परमेश्वराने रचिलेले आहेत. ||११|| भावार्थ:---या चार पर्वतांवर अनुक्रमाने एकावर एक असे आंबा,जांबुळ,कळंब आणि वड हे चार प्रचंड वृक्ष आहेत ते पर्वतांचे ध्वजय कीं काय? असे अकराशें योजनें उंच व अकराशें योजनें शाखांचा विस्तार असलेले आहेत.त्यांच्या आंगांचे (कांडांचे)घेर शंभरशंभर योजनें विस्तृत आहेत.||१२|| भावार्थ:----तसेच ह्या चार पर्वतांचेठिकाणीं अनुक्रमानें दुध,मध उसांचा रस आणि स्वच्छ उदक ह्यांनी भ्रेलेले चार डोह आहेत. त्यांतील दुग्धादिकांचे सेवन करणारे सिद्ध किन्नरप्रभृती उपदेवाचें गण,योगप्रयत्नावांचून प्राप्त झालेल्या आणिमादिक योगैश्वर्यांना धारण करितात. ||१३|| भावार्थ:---आणि त्या चार पर्वतांवर,अनुक्रमानें नंदन,चैत्ररथ,वौष्णजक आणि सर्वतोभद्र ह्या नांवांची चार उपवनें आहेत.||१४|| भावार्थ:---ह्या उपवनांमध्यें सुंदर अशा देवांगनांच्या समुदायांचे पति देवश्रेष्ठ,उपदेवगणांनी ज्यांचा महिमा गाईला आहे असे होत्सते असते,त्या स्त्रियांसहवर्तमान यथेच्छ क्रीडा करितात.||१५|| भावार्थ:---मंदरपर्वतावर अकराशें योजनें उंच असलेल्या आम्रवृक्षाच्या मस्तकावरून पर्वताच्या शीखरासारखे गोड-आंबे खालीं पडतात. ||१६|| भावार्थ:---त्या अतिउंचावरून पडून फुटणाऱ्या आंब्यांचा अतिमधुर,सुवासयुक्त तांबडा व पुष्कळ जो रस त्याच उदकानें झालेलीं अरुणोदानांवाची नदी,मंदारपर्वताच्या शिखरावरून खालीं पडत असती इलवृत खंडाच्या पूर्वभागाला भिजवून टाकिते.||१७|| भावार्थ:---ज्या रसाच्या प्राशणानें भवानी-देवीची सेवा करणाऱ्या यक्ष-स्त्रियांच्या अवयवांना स्पर्श झाल्यामुळें सुगंधयुक्त झालेला वारा,आसपासच्या प्रदेशाला दहायोजनेंपर्यंत सुगंधयुक्त करितो. ||१८|| भावार्थ:----याप्रमाणे हत्तीच्या आंगाएवढाल्या व अतिसूक्ष्मबिजानें युक्त अशा फार उंचावरून पडल्यामुळें फुटलेल्या जांबळीच्या फळांच्या रसानें उत्पन्न झालेली जंबूनांवाची नदी,दहाहजार योजनें उंच असलेल्या मेरुमंदरनामक पर्वताच्या शिखरावरून भूतलावर पडत असती,आपल्या दक्षिणेकडील सर्व इलावृत खंडाला व्यापुन वाहत असते. ||१९|| भावार्थ:---त्या नदीच्या दोन्हींहि तीरांचेठिकाणी असलेली जी मृत्तिका तिच्या रसानें भिजते ती सर्वही,वायूच्या व सूर्यकिरणांच्या संयोगानें वाळून गेली म्हणजे सर्वदां देवलोकांचें भूषण असें जांबुनदनामक सुवर्ण बनते. ||२०|| भावार्थ:---ती सुवर्ण देवगंधर्वादिक,आपल्या तरुणी-सहवर्तमान मुकुट,कडी,कटीसूत्रें इत्यादी भूषणांच्या रूपानें खरोखर धारण करितात. ||२१|| भावार्थ:---आतां सुपार्श्व पर्वतावर उगवलेला जो मोठा कळंब वृक्ष आहे त्याच्या ढोलीतून पांचवांवा एवढाल्या स्थूळ अशा पांच मधाच्या धारा बाहेर निघतात,त्या सुपार्श्वपर्वताच्या शिखरावरून खालीं पडत असून आपल्या पश्चीमेकडील सर्व इलावृत खंडाला शोभा आणीतात. ||२२|| भावार्थ:---त्या मधुधारांचे सेवन करणाऱ्या प्राण्यांच्या मुखांतून निघालेला वारा आसपासच्या प्रदेशाला शंभर योजनेंपर्यंत सुगंधयुक्त करितो. ||२३|| भावार्थ:----याप्रमाणें कुमुदपर्वतावर उगवलेला जो शतवल्शनांवाचा वटवृक्ष आहे त्याच्या स्कंधापासून खालीं मुख करून दुध, दहीं,मध,धृत,गुड,अन्न,वस्त्रें,शय्या,अलंकार इत्यादिकांचे प्रवाहरूप पुष्कळ नद निघतात,ते सर्वही इच्छितकामना पूर्ण करणारे असून कुमुदपर्वताच्या शिखरवृक्षाखालीं पडत असते.आपल्या उत्तरेकडील इलावृत खंडांमध्यें वाहत असतात. ||२४|| भावार्थ:---ज्या नदसंबंधी दुग्धादिपदार्थांचा उपभोग करणाऱ्या प्रजांना कधींही आंगावर सूरकुत्या पडणें,पांढरेपणा,ग्लानी,घाम, दुर्गंधी,जरा,रोग,अपमृत्यू,शैत्य,उष्णता व फिक्कटपणा इत्यादिक,उपसर्गरूप अनेकप्रकारचे ताप प्राप्त होत नाहींत.जन्मभर निरतिशय सुखच प्राप्त होतें. ||२५|| भावार्थ:---हे राजा,कुरंग,कुरर,कुसुंभ,विकंक,त्रिकुट,शिशिर,पतंग,रूचक,निषध,शिनिवास,कपिल,शंख,वैदूर्य,जारुधी,हंस,ऋषभ,नाग, कालंजर,नारद आणि आदी हे वीस पर्वत जसे कमलकर्णीकेच्या सभोंवती केसर असतात तसे हे मेरूपर्वताच्या पायथ्याजवळ सभोवतीं ईश्वरानें निर्माण केलेले आहेत. ||२६|| भावार्थ:---मेरुपर्वताच्या पूर्वेकडे दक्षिणोत्तर अठरा हजार योजनें लांब व दोनदोन हजार योजनें रुंद व तीतकेच उंच असे जठर व देवकुट यानांवाचे दोन पर्वत आहेत.याप्रमाणे मेरूच्या पश्चीमेंकडे दक्षीणोत्तर लांबीचे पवन आणि पारीयात्र या नांवांचे दोन पर्वत आहेत,दक्षिणेकडे पश्चीमेकडून पूर्वेकडे लांबीचे कैलास आणि करवीर व तसेच उत्तरेकडे पश्चीमेकडून पूर्वेकडे लांबीचे त्रिशृंग आणि मकर हे दोनदोन पर्वत आहेत.या आठ पर्वतांनी सभोंवतीं परिस्तरणें घातलेल्या अग्नीप्रमाणें मेरूपर्वत शोभत आहे.||२७|| भावार्थ:---मेरूपर्वताच्यामाथ्यावर मध्यभागी निर्माण केलेली, दाहा-हजार योजनें लांबरूंदिंची,समचतुष्कोन अशी भगवान् ब्रहमदेवाची सुवर्णमय नगरी आहे असें म्हणतात. ||२८|| | तामनु परितो लोकपालानाष्टानां यथादिशं|यथारूपं तुरीयमानेन पुरोऽष्टावुपक्लृप्ताः ||२९|| भावार्थ:---त्या ब्रह्मापुरीच्या सभोवती पुर्वादिक दिशांचेठिकाणी इंद्रादिक आठ लोकपालांच्या आठ नगऱ्या त्या त्या लोकपालांच्या वर्णाप्रमाणें असून त्या ब्रहमदेवाच्या नगरीच्या चतुर्थांशमानानें (अडीज-अडीज हजार योजनें) रचलेल्या आहेत.ब्रहमदेव,इंद्र,यम, नीर्ऋती,वरून,वायू,सोम व ईशान ह्या नऊ दिक्पालांच्या नगऱ्यांची नांवे अनुक्रमें-मनोवती,अमरावती,टोजोवती,संयमिनी, कृष्णांगणा,श्रध्दावती,गंधवती,महोदया व यशोवती आशीं पुराणांतरी आहेत. ||२९|| १६----याप्रमाणें श्रीमद्भागवतनामक महांपुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें हा सोळावा(१६) अध्याय एकोणतीस (२९)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||१६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू|| ||श्रीसदगुरुर्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१७---आता या सत्राव्या अध्यायांत,गंगेची उत्पत्ती व तिचे चार ओघांनी चार दिशाकडे जाणे तसेच श्रीरुद्राने इलावृत खंडात केलेले संकर्षण देवांचे आराधन हे विषय वर्णन केले आहेत. | गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुति ________________________________________________________________________________________ श्रीशुकाचार्य उवाच:--- | तत्र भगवत:साक्षाद्दज्ञलिङ्गस्य विष्णोर्विक्रमते वामआदाङ्गष्ठनखनिर्भित्रोर्ध्वाण्डकटाह – | विवरेणान्त:प्रविष्टा या बाह्यजलधारा तच्च्ल –पङ्कज जावने जनारुणाकीत्र्जक्लोपरत्र्जिता खिल- | जगदघमलापहोस्पर्शनामला साक्षाभ्दगवत्पदी-त्यनुपल क्षितवचोऽभिधीयमानातिमहता कालेन | युगसहस्त्रोपल क्षणेन दिवो मुर्धन्यवततार यत्तद्विष्णू पदमाहू||१||

भावार्थ:---श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,जेव्हां बलीराजाच्या यज्ञांत त्रिविक्रमरूप धारण करणाऱ्या साक्षात भगवान् श्रीविष्णूनें आपल्या उजव्या पायानें सर्व भूमंडळाचे आक्रमण करून डाव्या पायानें वरचे स्वर्गादीक सर्व लोक व्याप्त केलें,तेव्हा त्या डाव्या पायांच्या नखानें ब्रह्मांडाकटाहाची वरची कवची फुटून त्या विवरानें ब्रह्मांडाच्या बाहेर असलेल्या आवरणोदकाची जी आंत प्रविष्ट झालेली धारा ती त्या भगवंताच्या चरणकमलाचें पालन झाल्यामुळें त्यावरील केशरररूप केसरांनी आरक्तवर्ण होऊन केवळ आपल्या स्पर्शामात्रानें सर्व जगाचा पापरूप मळ हरण करणारी,परंतु स्वत: त्या पापसंपर्कानें रहित होती त्यावेळीं जान्हवी भागीरथी इत्यादिक दुसऱ्या नांवांनी रहित असून साक्षात भगवत्पादि या नांवानेंच उच्चारीली जाणारी ती जळधारा, सहस्त्रयुगांनी मोजिला जाणाऱ्या अतिमोठया काळानें स्वर्गाच्या मस्तकावर उतरली.स्वर्गाचे मस्तक म्हणजे त्याला “विष्णूपद” असें म्हणतात तें होय. ||१|| भावार्थ:---त्या विष्णूपदाचेठिकाणीं दृढ संकल्प असा महाभगवद्भक्त उत्तानपाद राजाच्या पुत्र ध्रुव राहातो.तों त्या विष्णूपादिला पाहून हें आमच्या कुलदेवतारूप श्रीहरीचें चरणारविंदोदक आहे अशा निश्चयानें प्रतीक्षणीं वृध्दिंगत होणाऱ्या भगवद्भक्तीयोगानें ज्यांचे ह्रदयांतर अत्यंत द्रवले आहे असा होऊन,उत्कंठेंमुळें परवश झालेल्या व किंचित मिटलेल्या नेत्रद्वयरूप कमळांच्या कळयांतून गळणाऱ्या निर्मल अश्रूधारेसहवर्तमान ज्याच्या अंगावर रोमांचसमूह स्पष्ट उभा राहत असे होतसत असता,अजूनही त्या गंगेला परमादरपूर्वक आपल्या मस्तकी धारण करितो.||२|| भावार्थ:----नंतर त्या ध्रुवपदाच्या खालीं राह्णारें व त्या गंगेचा प्रभाव जानणारें सप्तर्षिहि,आपल्या तपाची सर्वोत्कृष्टसिद्धी कायती हीच (भगवच्चरणोदकप्राप्तीरूपच) आहे,हिच्याहून दुसरी कोणतीच अधिक नाहीं,असा निश्चय षड्गुनैश्वर्यसंपन्न सर्वांच्या आत्मा जो वासुदेव त्याचेठिकाणीं निश्चळ भक्ती योगाचा लाभ झाल्यामुळें ज्यांनी धर्मादिक इतर पुरुषार्थांची व आत्मज्ञानाची उपेक्षा केली आहे असे होत्सते असते,जसे मुमुक्षु जन,आपण होऊन प्राप्त झालेल्या मुक्तीचा बहुमानपूर्वक स्वीकार करितात त्याप्रमाणें,त्या प्राप्त झालेल्या गंगेला अजूनही आपल्या जटाजूटांनी बहुमानपूर्वक धारण करीत आहेत. ||३|| भावार्थ:----नंतर त्या सप्तऋषींच्या स्थानापासून अनेक सहस्त्रकोटी विमानांच्या समुहांनी व्याप्त झालेल्या आकाशमार्गांने खालीं उतरनारी ती गंगा,चंद्रमंडळाला भिजवून मेरूपर्वताच्या शीखरावर असलेल्या ब्रहमसदनी पडते. ||४|| भावार्थ:----त्या ठिकाणीं चार प्रवाहरूपांनी भेद पावून,सीता,अलकनंदा,चक्षु आणि भद्रा या नांवांनी प्रसिध्द होणारी ती गंगा,पूर्वादी चारही दिशांकडे जाऊन,नद व नद्या यांचा पती जो समुद्र त्याच्यामध्यें प्रवेश करिते. ||५|| भावर्थ:----त्यामध्यें सीतातर त्या ब्रहमसदनापासून,मेरूपर्वताच्या सभोवती केसरासारखें दिसनारें कांही पर्वत आहेत त्यांच्या व त्यांच्यापुढील दुसऱ्या पर्वतांच्या शिखरांवरून खालीं वाहात जातां जातां,गंधमादन पर्वताच्या शिखरांवर पडून भद्राश्वखंडामधून पूर्वदिशेकडे जाऊन खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्यें प्रवेश करिते. ||६|| भावार्थ:----याप्रमाणे माल्यवान पर्वताच्या शिखरावरून केतूमाल खंडांमध्यें खालीं उतरणारी चक्षुनामक गंगा,तीव्रवेगानें युक्त होत असी ती,पश्चीमदिशेकडे समुद्रामध्यें प्रवेश करिते. ||७|| भावार्थ;----तशीच मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे पडणारी भद्रानामक गंगा,कुमुदपर्वताच्या शिखरावरून नील पर्वताच्या शिखरावर उतरते,तेथून श्वेत पर्वताच्या शिखरावर पडून मग त्यालाही मागें टाकून शृंगवान पर्व तशीच अलकनंदानामक गंगा, ब्रहमसदनापासून दक्षीनेकडे पडत असतांना,केसराचल,कैलास निषध इत्यादिक पर्वतांच्या शिखरांचे उल्लंघन करून,हेमकुट पर्वतावर प्राप्त होऊन,तेथून अस्खलीत अशा अतितीव्र वेगानें हिमाचलाच्या शिखरांचे आक्रमण करून भरतखंडांत जाऊन, दक्षिणदिशेकडे समुद्रामध्यें प्रवेश करीते.तिच्यामध्यें स्नान करण्याकरितां जाणाऱ्या पुरुषाला पदोपदीं अश्वमेध,राजसूय इत्यादिक यज्ञांचे फळ दुर्लभ नाहीं;तर सहजच मिळतें.म्हणून आपण—जीवानी गंगा नदीत स्नान करावे,कारण त्यामुळे अंत:करण शुद्ध होते.||९|| भावार्थ:----तसेच प्रत्येक खंडामध्यें दुसरेही पुष्कळ नद व मेरूवगैरे पर्वतांपासून उत्पन्न झालेल्या नद्याही शेंकडो आहेत. ||१०|| भावार्थ:----त्यांमध्येंहि भरतखंड हेंच कर्मे आचरण करण्यास योग्य स्थळ असून इतर जीं आठ खंदे आहेत ती स्वर्गवासी लोकांच्या अवशेष राहिलेल्या पुण्यफळाचा उपभोग घेण्याची स्थानें असल्यामुळें त्यांना भूमीवरील स्वर्गस्थानें असें म्हणतात. ||११|| भावार्थ:----ह्या आठ खंडांमध्यें देवांसारख्या निरोगी व तेजस्वी असणाऱ्या पुरूषांना,मनुष्यामानानें दहाहजार वर्षे आयुष्य असून दहाहजार हत्तींचे बळ असतें.तसेच त्यांच्या वज्रासारख्या दृढ शरीराचेठिकाणीं असलेले जे शक्ती,तारुण्य वय व आनंदित स्वभाव त्यांच्या योगानें,हर्षयुक्त झालेलीं जीं तेथील दंपत्यें त्यांच्या सुरतक्रीडा पुष्कळ काळपर्यंत चालतात,शेवटीं त्या पुरूषांच्या आयुष्याचें एकवर्ष अवशेष राहिलें म्हणजे त्यांच्या स्त्रियांना एकवेळ गर्भसंभव होतो.अशाप्रकारे सुखोत्कर्ष असल्यामुळें तेथें निरंतर त्रेतायुगासारखा काळ राहतो.कारण,कृतयुगांत ध्यायनिष्ठपणा असणें,त्रेतायुगांत विषयसुखाचा उत्कर्ष असणें,आणि द्वापर व कली ह्यांत उत्तरोत्तर फार दु:ख असणें अशी कालाची स्थिती आहे.||१२|| भावार्थ:----त्या आठही खंडांमध्यें राहणारे देवांचे अधिपती,आपापल्या सेवकजनांतील मुख्य मुख्य जणांनी उत्तमोत्तम पूजोपचार अर्पण केले आहेत असे होत असते.सर्व ऋतुंमध्यें असलेले पुष्पगुच्छ,फळें व नूतन पल्लव यांच्या समृद्धीने ज्यांच्या फांद्या व त्या फांद्यावर चढलेल्या वेली लवल्या आहेत अशा वृक्षांनी ज्यांमध्यें सुंदर उपवनें शोभत आहेत अशा आश्रमस्थानामध्यें; व खंडांच्या मर्यादाभूत पर्वतांच्या गुहांमध्यें;तशाच विकसित होणाऱ्या नाना जातींच्या नूतन कमळांच्या सुगंधाने आनंद पावलेले राजहंस पानकोंबडे,कारंडव,सारस व चक्रवाक इत्यादीकपक्ष्यांनी व भ्रमरसमुहांच्या भिन्न जातींनीं घुमविलेल्या निर्मळ सरोवरांमध्यें;अतिसुंदर अशा देवांगणाचे मदनानें क्षोभविलेले जे विलास,हास्य व लीलाकटाक्ष त्यांच्या योगानें ज्यांची मनें व दृष्टी आकर्षण केली आहेत असे होत असते,जलक्रीडादिक विचित्र विनोदांनी यथेच्छपणें क्रीडा करीत असतात. ||१३|| भावार्थ:----नऊही खंडांमध्यें षड्गुनैश्वर्यसंपन्न महापुरुष नारायण,तेथें राहणाऱ्या पुरूषांवर पुढें सांगीतल्याप्रमाणे अनुग्रह करण्याकरितां आपल्या मूर्तीच्या समुहाने स्वतांचे रूप अद्यापी प्रकट करीत असतो. ||१४|| भावार्थ:----इलावृत खंडामध्येंतर भगवान शंकर एकटाच पुरुष राहत असतो.कारण,तेथें पार्वतिच्या शापानें कारण जाणणारा अलीकडचा दुसरा कोणीही पुरुष प्रवेश करीत नाहीं.त्या खंडामध्यें प्रवेश करणाऱ्या पुरुषाला स्त्रीचे स्वरूप प्राप्त होतें त्याचे, पार्वतीशापरूप कारण मी तुला पुढें नवमस्कंधामध्यें सांगेन. ||१५|| भावार्थ:----त्या इलावृतखंडामध्यें,ज्यांनी धनीन पार्वती आहे अशा दहाकोटी हजार स्त्रियांच्या समुहांनी सर्वप्रकारे सेवा केलेला तो शंकर,आपणाला कारणभूत अशा चतुर्व्यूहमूर्ती (वासुदेव,प्रद्यूम्न,अनिरुध्द व संकर्षन ह्या) धारण करणाऱ्या षड्गुनैश्वर्यसंपन्न महापुरुषाची चवथी जी संकर्षणनामक तामसी मूर्ती तिचें समाधीयोगानें मनांत चिंतन करून पुढील अर्थाच्या मंत्राचा जप करीत त्या मूर्तीची स्तुती करितो. ||१६|| अर्थ:---श्रीभगवान् म्हणाले----जो स्वत:व्यापक असून ज्यापासून सर्वगुण प्रकट होतात त्या षड्गुनैश्वर्यसंपन्न अविनाशी महापुरुषाला ॐकारपूर्वक नमस्कार असो.आपणही—जीवानी ॐकार परमात्म्यास नमस्कार करावयास पाहिजे. ||१७|| अर्थ:----हे भजन करण्यास योग्य अशा परमेश्वर,ज्या तुझे चरणकमल,भक्तांना संरक्षण करणारें आहे,जो तूं,षड्गुनैश्वर्यसंपन्न परमस्थान आहेस,ज्या तूं,भक्तांचेठिकाणीं आपलें स्वरूप प्रकट केलें आहेस आणि जो तूं,भक्तानी संसारांतून पार पाडणारा असून अभक्तांना संसरांत टाकणारा आहेस,त्या तुझी मी उपासना करितों.आपण—जीवानी भगवंतांची निष्काम भक्ती करावी.||१८|| भावार्थ:---हे देवा,क्रोधाचा वेग न जिंकणाऱ्या आमची दृष्टी,जशी विषयांच्या योगानें लिप्त होते त्याप्रमाणे नियमनाकरितां त्याच्याकडे पाहणाऱ्याहि ज्या तूझी दृष्टी,मायासंबंधी विषयवासनायुक्त चित्तवृत्ती नी किंचितसुध्दां लिप्त होत नाहीं,त्या तुझा, कोंन बरें इंद्रिययांचें दमन करण्यास इच्छीणारा पुरुष,आदर करणारा नाहीं? सर्वही करतीलच.म्हणून आपण—जीवानी आदर—श्रद्धा करावी. ||१९|| भावार्थ:----हे भगवान्, जो तूं,पापदृष्टी पुरुषाला आपल्या मायेच्या योगानें मत्त असल्यासारखा आणि सुर व तालादिकांचे आसव यांच्या सेवनानें तांबडे डोळे झाल्यासारखा भासतोस आणि ज्या तुझ्या चरणाच्या पूजेच्या वेळीं,तुझ्या चरणाचा स्पर्शानें ज्यांची मनें काममोहित झाली आहेत अशा नागपत्न्या,लज्जित होऊन पुढें भुजादिकांचे पूजन करण्यास समर्थ झाल्या नाहींत,त्या तुझा कोण बरें आदर करणार नाहीं? आपाही—जीवानी आदर कारचा.(सर्वही करतीलच.) ||२०|| भावार्थ:---हे ईश्वरा,जो तूं जगाची उत्पत्ती,पालन व नाश यांचे कारण आहेस आणि तो तिन्ही गुणांनी रहित असल्यामुळें अनंत आहेस असें वेदमंत्र म्हणतात.जो तूं,आपल्या सहस्त्र मस्तकरूप स्थानांपैकी कोणत्या स्थानीं हें भूमंडळ,मोहरीसारखें राहिले आहें तें जाणतसुध्दा नाहींस त्या अनंतरुपी तूला नमस्कार असो.आपणही—जीवानी नमस्कार करावा,||२१|| भावार्थ:---ज्या तुझा पहिला गुणनिमित्तक अवतार म्हटला म्हणजे महत्तत्त्वनामक होय,त्याला सत्त्वगुणाचा आश्रय असल्यामुळें तोच चित्तरूपानें वासुदेवरुपी व ब्रहमदेवरुपी झाला आहे,त्या ब्रहमदेवापासून झालेला मी आपल्या त्रिगुणात्मक तेजानें (अहंकारानें) सत्विक तामस व राजस अशा देवतांच्या महाभूतांच्या व इंद्रियांच्या समुहांनी उत्पन्न करितों. ||२२|| भावार्थ:---आणि हे महत्तत्त्व, अहंकार, सत्त्वतमोरजात्मक देवादिसमुहरूप सर्वही आम्ही, सुत्रांनी बांधून स्वाधीन करून ठेवलेल्या पक्ष्यांप्रमाणें ज्या तुज महात्म्या स्वाधीन राहता असते, तुझ्या अनुग्रहामुळें हें जग उत्पन्न करितों ||२३|| | यत्रिर्मितां कर्ह्यपि कर्मपर्वणीं माया जनोयं गुणसर्गमोहित: | | न वेद निस्तारणयोगमन्जसा तस्मै नमस्ते विलयोदयात्मने ||२४|| भावार्थ:---सत्त्वादिगुणांच्या प्रतीसृष्टीनें मोहित झालेला हा जन,ज्यानें निर्माण केलेल्या व कर्मांच्या गांठीवर गांठी घालणाऱ्या अशा स्त्री-पुत्रादिरूप मायेला मात्र अनायासानें जाणतों,परंतु तिला तरून जाण्याचा उपाय कधीही जाणत नाहीं.त्या संहार व उत्पत्तीस्वरुपी तुज भगवंताला नमस्कार असो.म्हणून आपण—जीवानी मायास जाणून तिच्यातून तरुण जाण्यासाठी सत्संग करून जाणून घ्यावे. ||२४|| १७---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें गंगोत्पत्यादिकथनरूप हा सत्रावा(१७) अध्याय चौवीस(२४) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||१७|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |१८---आता अठराव्या अध्यायामध्ये मेरूपर्वताच्या पूर्व,दक्षिण व पश्चिमेकडील भद्राश्व,हरिवर्ष व केतुमाल या तीन खंडामध्ये व उत्तरेकडील रम्यक हिरण्मय व कुरु या तीन खंडामध्ये असलेल्या सेव्यसेवकांचे वर्णन केले आहे. || |१८---- भिन्न भिन्न वर्षांचे वर्णन. ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | तथा च भद्रश्रवा नाम धर्म सुतस्तत्कुलपतय: | पुरुषा भद्रा श्र्ववर्षे साक्षाद्भगवतो वासुदेवस्य प्रियां | | तनु धर्म मयीं हयशीर्षाभिधानां परमेण समाधिना संनिधाप्येदमभिगृणन्त उपधावन्ति ||१|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---- हे राजा,तसेच भद्राश्वखंडामध्यें त्या खंडाचा अधिपती धर्माचा पुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य सेवक पुरुष राहतात.ते प्रत्यक्ष भगवान-वासुदेवाच्या ह्यग्रीवनामक धर्ममय प्रिय मुर्तीचें उत्कृष्ट समाधीच्या योगानें चिंतन करून,पुढील अर्थाच्या मंत्राचा जप करीत करीत तिची स्तुती करितात. ||१|| भावार्थ:----भद्रश्रवा आणि त्याचे सेवकगण म्हणतात कीं,----हे भगवान् अंत:करणाचा शोधक असून धर्मरुपी अशा तुला ॐकारपूर्वक नमस्कार असो. ||२|| अर्थ:----अहो,तुच्छ अशा विषय सुखांचा उपभोग घेण्याकरितां पापांचे चिंतन करीत असणारा हा जन,मेलेल्या पुत्राला किंवा पित्याला जाळून टाकून त्यांच्या द्रव्यानें आपला निर्वाह करून जीवंत राहण्याची इच्छा करितों,परंतु आपणालाही मारणारा काल अकस्मात प्राप्त होईल असें पहात असतांहि न पाहिल्यासारखें करितों.तस्मात् ही भगवंताची लीला मोठी आश्चर्यकारक आहे.आपण—जीवाने विवेक केला तर ज्या प्रमाणे आपल्या पूर्व पिढी ह्या मरण पावल्या आहेत,त्याअर्थी मीही मारणार असे निश्चित आहे,असे कळून सावध होऊन म्हणजे सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करील.पण अविवेक केला तर सत्संग न करता संसार करीतच मरेल.म्हणून आपण विवेक करीत जीवन जागत,जगले पाहिजे.असे जागत जीवन जगले असता जीवनाचे सार्थक होते.||३|| भावार्थ:---अहो,हें संपूर्ण जग,नश्वर आहे असें विवेक पुरुष,शास्त्रानें व अनुभवानें जाणतात,त्याप्रमाणेच अध्यात्मवेत्ते ज्ञानी, समाधीमध्यें प्रत्यक्ष पाहतात.तथापि हे जन्मरहिता परमेश्वरा,तेच लोक,तुझ्या मायेनें मोहित होतात,हें तुझें कृत्य अतिआश्चर्यकारक आहे,म्हणून मी,शास्त्रादिकांच्या श्रमाचा त्याग करून जन्मादि-वीकारशून्य अशा तुला केवळ नमस्कार करितों.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून सत्पुरुषासारखे जीवन जगून,देह हा नश्वर,दु:खकारक,विषय—दु:खकारक आहेत असे जाणून नश्वर विषयांचा त्याग करून जो परमात्मा अविनाशी आहे,त्याचा भोग घ्यावा. ||४|| भावार्थ:---हे परमेश्वरा,अकर्ता व आवरणरहित अशाही तुझें,विश्वाची उत्पत्ती,स्थिती व लीलारूप कर्म,वेदानें स्वीकरीलें आहे,तें योग्यच आहे,आश्चर्यकारक नव्हे.कारण,तूं मायेमुळें सर्वांचा आत्मा व सर्व कार्यांचा उत्पादक असून वस्तुत: उपाधीरहित आहेस.ईश्वर हा ज्ञानी असल्यामुळे अकर्ता व आवरणरहित आहे,तर आपण—जीव हा अज्ञानामुळे कर्ता-भोक्ता आहे,कारण वास्तविक पाहता अंत:करण कर्ता—भोक्ता आहे,पण जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे म्हणजेच ज्ञान नसल्यामुळे असे त्यास काळात नाही.म्हणून आपण जीवानी सत्संग करून कळून घ्यावे.ईश्वर हा जगाची उत्पत्ती,स्थिती,व लय करीत असला तरी तो ज्ञानी असल्यामुळे त्या कर्माचा अभिमान ईश्वरास नाही.जीव हा अज्ञानी असल्यामुळे कर्म अंत:करण करिते,पण त्या कर्मांचा अभिमान जीव धारण करितो.त्यामुळे त्यास सुखाची अनुभूती न येत दु:खाची अनुभूती येते.म्हणून आपण जीवानी सत्संगाद्वारे ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||५|| भावार्थ:---हे देवा,मनुष्य व घोडा ह्यांसारख्या देह (ह्यग्रीवावतार) धारण करणाऱ्या ज्या तूं,प्रलयकालाचेठिकाणीं ब्रहमदेवाच्या मुखांतून निद्रारूप दोषानें गलीत झालेल्या (अथवा दैत्यानें चोरून नेलेल्या) वेदांना पाताळांतून आणून याचना करणाऱ्या ब्रहमदेवाला समर्पण केलेंस त्या सत्यसंकल्प तुज परमेश्वराला नमस्कार असो.ईश्वर हा ज्याच्या—त्याच्या मागणीनुसार ज्याची-त्याची इच्छा पूर्ण करीत असतो,असे असले तरी त्या जीवास तसे कर्म करावे लागते.म्हणून आपण ईश्वरास नमस्कार करावा.||६|| भावार्थ:---हरीवर्ष खंडामध्येंहि भगवान् नृसिंहरूपानें राहतो.ते रूप ग्रहण करण्याचे कारण पुढें (सातव्या स्कंधात) मी तुला सांगेन.परमेश्वराच्या गुणांचें पात्र,महाभगवद्भक्त आणि दैत्यदानवांच्या कुळाला पवित्र करणाऱ्या स्वभावानें युक्त असा प्रल्हाद, त्या खंडांतील पुरूषांसहवर्तमान त्या भगवंताच्या प्रियस्वरुपाची एकनिष्ठ भक्तीच्या योगानें उपासना करितो आणि या मंत्राचा व स्तोत्राचा जप करितो.म्हणून आपण—जीवानी ईश्वराची एकनिष्ठ—निष्काम उपासना करावी.तसेच ईश्वराच्या मंत्राचा व स्तोत्राचा जप करावा.||७|| भावार्थ:---हे भगवंता नरसिंहा,तूं अंधकाराचा नाश करणाऱ्या अग्नीवगैरे तेजांचाही प्रकाशक आहेस,तुला ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो.तूं प्रकट हों,प्रकट हो.हे वज्रनखा,हे व्रजदंष्ट्रा,तूं,आमच्या कर्मवासनांना जाळून टाक,जाळून टाक आणि ‘ॐस्वाहा’ असे म्हणून आमचें अज्ञानरूप तम गिळून टाक,गिळून टाक तसाच ‘ॐक्ष्त्रौम’ असें म्हणून या जीवाला जसे वारंवार अभय प्राप्त होईल तसा हो. ||८|| भावार्थ:---हे प्रभो,सर्व जगाचे कल्याण असो,दुष्ट असेल त्यानें क्रूरपणा सोडून शांतता धरावी,सर्व प्राणीमात्रांनी आपल्या बुद्धीच्या योगानें परस्परांचे कल्याण चिंतावें,त्यांच्या मनानें शांतिचें सेवन करावें.आमच्या व सर्व प्राण्यांच्या बुद्धीने,निष्काम होऊन, अधोक्षज भगवंताचेठिकाणी प्रवेश करावा.आपण—जीवानी सर्व विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||९|| भावार्थ:---घर स्त्रिया,पुत्र द्रव्य व बंधू यांचेठिकाणीं कोठेही आम्हांला आसक्ती प्राप्त न होवो,जर कदाचित् झालीच तर ती भगवद्भक्तांचेठिकाणींच होवो.कारण,जो पुरुष,भगवद्भक्तांच्या संगतीनें विषयांचेठिकाणीं आसक्त न होतां प्राण वांचण्यापुरता आहारादि-वृत्तीनें संतुष्ट व जीतेंद्रीय असतो,त्याला लवकरच सिद्धी प्राप्त होते,तशी गृहादिकांचेठिकाणी आसक्त असणाऱ्या पुरुषाला प्राप्त होत नाहीं.म्हणून आपण—जीवानी घर,स्त्रिया,पुत्र,द्रव्य,व देहसंबंधी यांच्या ठिकाणी आसक्ती धारण करू नये,कारण यांची आसक्ती हि दु:ख देते.हे सर्व आपले—जीवाचे नसून,आपण—जीव हा परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे.म्हणून आपण ज्याचे आहोत,त्यांच्याकडेच जावे,तर ज्यांचे नाहीत,त्यांच्याकडे जाऊच नाही,कारण तो अपराध आहे,जो अपराध करतो,त्यास शिक्षा हि होताच असते.म्हणून आपण—जीवाची अपराध करू नये.||१०|| भावार्थ:---ज्या भगवद्भक्तांच्या संगतीनें प्राप्त झालेल्या व अत्युत्तम पराक्रमानें संपन्न अशा भगवच्चरीत्रांचे श्रवणादिकेंकरून सेवन करणाऱ्या पुरूषांच्या,मनांमध्यें प्राप्त झालेला जन्मरहित भगवान् मनांतील पापवासनारूप मलांचा नाश करितो आणि गंगादिक तीर्थे तर,वारंवार सेवन करणाऱ्या पुरूषांचा केवळ अंगसंबंधीमात्र मळ हरण करितात,यास्तव त्या सत्पुरुषांचें कोण बरें पुरुष सेवन करणार नाहीं,सर्वही करतीलच.म्हणून आपण ज्यांना—संत—महात्मा यांना यथार्थ कळालेले आहे,अनुभव घेतलेला आहे,त्यांचा सत्संग करून श्रवण,मनन,निधी-ध्यासन,व त्वं-पदार्थ शोधन करून अनुभव घ्यावा.||११|| भावार्थ:---ज्या पुरुषाला,भगवंताचेठिकाणीं निष्काम भक्ती असते,त्याच्यावर ईश्वराच्या प्रसाद होतो आणि त्याच्याजवळ सर्व देव,धर्म-ज्ञानादि सर्व गुणांसहवर्तमान नित्य वास करितात,म्हणून अशा प्रकारच्या मनुष्याचा—संताचा—महात्म्याचा सत्संग करावा.जो मनुष्य,भगवंताची भक्ती करीत नाहीं त्या नुसत्या मनोराज्यानें बाहेरच्या मिथ्याभूत विषयांकडे धांवनाऱ्या पुरुषाचा ----दुर्जनाचा—अज्ञानीजनांचा संग करू नये,कारण जशी संगती असेल,तशाच संगतीचा तसाच परिणाम होत असतो.थोरपुरुषांचे ज्ञानवैराग्यादिक गुण कोठून प्राप्त होणार? व्हावयाचेच नाहींत.म्हणून जे ज्ञानसंपन्न असून त्या ज्ञानाचा अनुभव आलेला आहे,त्यांचाच सत्संग करा.असे केले असता ज्ञान-वैराग्यादि गुण आपल्यात येतील.||१२|| भावार्थ:---ज्याप्रमाणें मत्स्यांचे जीवन उदकावरच अवलंबून असतें म्हणून तें त्यांचा आत्मा होय,त्याप्रमाणे साक्षात भगवान् श्रीहरी हाच देहधरी जीवांचा आत्मा होय.जसे पाण्यातील मासा हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही,त्याचप्रमाणे मानव हा सुखरूप झाल्याशिवाय समाधानी होऊ शकत नाही.पाण्यातील मासा याने पाण्यातच राहावे,त्याप्रमाणे जीवाने परमात्मारुपच व्हावे,तेव्हांच तो समाधानी आहे,अन्यथा नाही.यास्तव त्याला—परमात्म्याला सोडून जर एखादा अतिप्रसिध्दहि पुरुष,गृहामध्यें आसक्त झाला तर त्याचें महत्त्व म्हटले म्हणजें,स्त्रीपुरुष दांपत्यांतील पुरूषांच्या म्हत्त्वाप्रमाणें केवळ वयोमानानंचे होईल,म्हणजें दंपत्यांची पूजा करितांना जशी स्त्रियांपेक्षा पुरुष वयानें अधिक असल्यामुळें त्यांची पूजा प्रथम करितात किंवा बालदंपत्यांपेक्षा वृध्ददंपत्याची पूजा प्रथम करितात अथवा पुत्रांच्या दंपत्यांच्या पूर्वी पित्याच्या दंपत्याची पूजा करितात त्याप्रमाणेंच त्याचें महत्त्व सिद्ध होईल,ज्ञानादिकगुणांनी सिद्ध होणार नाहीं.म्हणून आपण—जीवानी वयाने मोठे होण्यापेक्षा,धनाने मोठे होण्यापेक्षा,मानाने—प्रतिष्ठेने मोठे होण्यापेक्षा,राजकीय सत्तेने मोठे होण्यापेक्षा,विद्दाने मोठे होण्यापेक्षा—पंडित होण्यापेक्षा, परमात्म्याचा अनुभव घेऊन परमात्मरूप असणे या ब्रह्मांडात अन्य दुसरे कांहीच नाही,कारण इतर मोठेपणा विनाशी आहे,तर परमात्मरूप असणे अविनाशी आहे.आपण—जीवानी अनिवाशी असणे हे आपले—जीवाचेच स्वरूपच आहे.जसे आपण परगांवी गेलो,तर आपल्या जन्म—गांवी येण्यातच समाधान आहे.उदा—आपले जन्म-गांव सोडून जगण्याकरिता जगातील अन्य गावांत गेलोत,पण जेव्हा कळले की,कोरोना महारोग आलेला आहे,त्यावेळेस सर्वांनी आपल्या देशात—आपल्या जन्म-गांवी येण्याचा प्रयत्न करून जन्म—गांवीच स्थाईक झाले,तेव्हांच ते समाधानास प्राप्त झाले.||१३|| भावार्थ:----यास्तव हे दैत्य हो,तुम्ही,तृष्णा,प्रीति,खेद,क्रोध,अहंपणा,काम,भीति,दैन्य व चिंता या सर्वांचे मूळकारण आणि जन्ममरणरूप संसाराचें निरंतर फिरणाचें मंडळच अशा घराचा त्याग करून,निर्भय अशा नृसिंहचरणाची सेवा करीत जा.||१४|| भावार्थ:---केतुमालखंडामध्येहि लक्ष्मीचें आणि संवत्सररुपी देवाच्या कन्यांचे व पुत्रांचे प्रिय करण्याच्या इच्छेने कामदेवाच्या स्वरुपानें भगवान् राहतो त्या कन्या व पुत्र त्या खंडाचे अधिपति असून ती पुरुषाच्या आयुष्यमानानें अहोरात्रांइतकी असून,त्या रात्रीच्या अभिमानी देवता ३६००० कन्या आणि दिवसाच्या अभिमानी देवता ३६००० पुत्र अशा आहेत.प्रत्येक वर्षाच्या शेवटी विष्णूचक्राच्या तेजानें त्यां कन्यांच्या मनांत भीती उत्पन्न होऊन,त्यांचे गर्भ,गर्भाशयातून चलित होऊन मरून पडतात.||१५|| भावार्थ:---तेथें राहणारा तो कामदेव,आपल्या अत्यंत सुंदरगतीच्या विलासानें शोभणाऱ्या सुंदर मंदहास्ययुक्त अवलोकनलीलेनें किंचित वर उचललेलें जें सुंदर भ्रुकुटिमंडल त्याच्या योगानें अतिरमणीय दिसणाऱ्या मुखकमलाच्या शोभेनें,लक्ष्मीला रमवीत असता,स्वतांच्या इंद्रियांना तृप्त करून घेतो.||१६|| भावार्थ:---त्या भगवंताच्या मायामयस्वरुपाची उपासना,लक्ष्मी देवी,रात्रींच्या वेळीं संवत्सररूप प्रजापतीच्या कन्यांना बरोबर घेऊन आणि दिवसांच्या वेळीं त्या कंन्यांच्या पतींना बरोबर घेऊन करते व पुढील अर्थाच्या मंत्राचा जप करून स्तवन करिते.||१७|| भावार्थ:---हे भगवान् कामदेवा,तूं इंद्रियांचा नियंता सर्व प्रकारच्या उतम वस्तूंनी स्वरूप कळून येणारा,क्रियाशक्ति,ज्ञानशक्ति, अंत:करणांतील संकल्प निश्चयादिक धर्म व त्याचे विषय ह्याचा अधिपति,अकरा इंद्रियें व पांच विषय अशा सोळा अंशांनी युक्त,वेदोक्तकर्मांनीं प्राप्त होणारा,अन्नरूप,अमृतरूप,सर्वरूप,मन:शक्तिरूप,इंद्रियशक्तिरूप,देहशक्तिरुप असा सुंदर कामरुपी आहेस तुला, ‘ॐऱ्हीं ऱ्हीं ऱ्हूं ॐ’ या बिजांच्या उच्चारपूर्वक मनांतून व देहानें अथवा या लोकीं व परलोकी वारंवार नमस्कार असो.||१८|| अर्थ:---हे भगवान्,ज्या स्त्रिया या लोकामध्ये स्वतां:च इंद्रियांचा नियंता अशा तुज पतीचें नानाप्रकारच्या व्रतांनी आराधन करून,तुझ्याजवळ अन्य पती प्राप्त होण्याविषयीं प्रार्थना करितात,त्यांना अन्य पती प्राप्त होतात परंतु ते पति,परतंत्र असल्यामुळे त्या स्त्रियांच्या प्रियमुलांचे,धनांचें व आयुष्याचें रक्षण करण्यास समर्थ होत नाहींत.||१९|| भावार्थ:---“जो स्वत: कोठूनहि कालादिकांपासून भयरहित असून कालादिकांच्या भयानें व्याकूळ झालेल्या जनांचें सर्वप्रकारे रक्षण करितो तोच “पति” होय”.अशा प्रकारचा पति तूं—परमात्मा एकच आहेस.कारण,तूं पूर्णानंदलाभाहून दुसरें कांहिंच अधिक मानीत नाहींस.दुसऱ्या अज्ञानयुक्तम विषयाभिलाषि दीनजनांना स्वतंत्रता नसल्यामुळें,कालादिकांपासून किंवा मांडलिकराजांसारखें परस्परांपासून मय प्राप्त होतें.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.आपण—जीवानी परमात्म्याचा नुभव घेतला असता,कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही.ज्यांना कोणत्याही प्रकारचे भय राहिले नाही,त्यांचा आपण—जीवानी सत्संग करून भयरहित व्हावे.||२०|| भावार्थ:---हे भगवान्,जी स्त्री त्या तुझ्या चरणकमलांचे केवळ पूजनच इच्छिते,फलाची इच्छा करीत नाहीं,तिचे सर्वही मनोरथ परिपूर्ण होतात.आणि एकाद्या फलाची इच्छा धरून जर ती तुझी पूजा करिते तर तूं तेच फळ तिला देतोस.जें फळ भोगून संपले की तिची मागणी ती पुन: दु:ख पावते.म्हणून आपण—जीवानी भगवंतांची पूजा करून संसाराची—संसारातील विषयांची मागणी करू नये,कारण त्यामुळे तात्पुरते सुख मिळते व त्या सुखाच्या पोटी दु:खाचाच जन्म होत असतो.म्हणून आपण—जीवानी संसाराचा—विषयांचा त्याग करून परमात्म्याचाच अनुभव घ्यावा.असे केले असता आपण—जीव कायमचाच सुखरूपता प्राप्त होते,व त्या सुखरुपतेच्या पोटी कधीच दु:खाचा जन्म होत नाही.यासच चौथा पुरुषार्थ—मोक्ष असे म्हणतात. ||२१|| भावार्थ:----हे अजिता,माझ्या प्राप्तीसाठी,विषयसुखांची इच्छा धारण करणारे ब्रहमदेव,शंकर,देव आणि दैत्यप्रभूती लोक,उग्रतप करितात परंतु तुमच्या चरणकमलाच्या सर्वोत्कृष्ट आश्रयावांचून त्यांना माझी म्हणजे माझ्या कटाक्षापासून होणाऱ्या संपत्तीचिं प्राप्ती होत नाहीं.कारण,माझें ह्र्दय तुमच्याठिकाणी असतें म्हणजे मी तुमच्या तंत्राने वागत असल्यामुळें तुमची सेवा करणारांकडेच पाहते, दुसऱ्याकडे—अभक्तांकडे पाहत नाहीं.म्हणून आपण—जीवानी संपत्ती—विनाशी असलेली तिची अपेक्षा न करता—त्याग करून,अविनाशी असलेला परमात्म्याचाच अनुभव घ्यावा.||२२|| भावार्थ:----हे अजिता,ज्याच्या भजनावांचून कोणताच पुरुषार्थ नाहीं अशा तूं,आपलें जें सर्व मनोरथपूर्वक व भक्तांनी स्तुती केलेले हस्तकमळ भक्तांच्या मस्तकी कृपेनें स्थापना केले आहेस,तें माझ्याही मस्तकी स्थापन कर.हे सर्वश्रेष्ठा,तूं आपल्या वक्ष:स्थळावर मला चिन्हरूपानें धारण केली आहेस,त्यावरून माझेठिकाणी तुझा आदर आहे असें सिद्ध होतें,परंतु माझेठिकाणी केवळ आदरमात्र करावयाचा आणि भक्तांवर मोठी दया करावयाची,हे आश्चर्य आहे.तेव्हां कर्तुं अकर्तुं अन्यथाकर्तुं समर्थ अशा तुझ्या चेष्टिताचा तर्क करण्यास कोण समर्थ आहे? कोणींच नाहीं. ||२३|| भावार्थ:---रम्यक खंडामध्येंहि,त्या खंडाचा अधिपती अशा मनुला भगवंताचें जें आपलें अत्यंतप्रिय मत्स्यावताररूप,पूर्वीं दाखविलें होतें त्याची तो मनु,आतांसुध्दां मोठया भक्तीयोगानें आराधना करितो आणि या अर्थाच्या,मंत्राचा जप करितों कीं,-----म्हणून आपण—जीवानी निष्काम कर्म—मंत्राचा जप करावा व निष्काम उपासना—ब भक्ती करावी.||२४|| भावार्थ:---सर्वांमध्यें मुख्य सत्वगुणप्रधान,सुत्रात्मा,इंद्रियशक्तीरूप,अंत:करणशक्तीरूप आणि देहशक्तीरूप असा जो महामत्स्य-- --रुपी भगवान् त्याला माझा ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो.||२५|| भावार्थ:----आणि अशी स्तुती करितो कीं,जसा एखादा पुरुष,लांकडाच्या बाहुलीला सूत्राच्या योगानें बांधून आपल्या स्वाधीन कर्ण ठेवतो त्याप्रमाणें देवरुपी मोठया शब्दानें युक्त अशा ज्या तूं,विधीनिषेधांना आश्रयभूत ब्राहमणादिक नांवांनीं,त्या-त्या कर्माचेठिकाणी योजून,हें जग आपल्या स्वाधीन करून ठेवलें आहेस,तोच तूं ईश्वर,सर्व लोकांच्या पालकांनी (ब्रह्मादिकांनी) हि अदृष्टस्वरूप—निर्गुण-निराकार होत्सता,सर्व प्राण्यांच्या आंत प्राणरूपानें व बाहेर वायूरूपानें संचार करीत आहेस.म्हणजे सर्वत्र परमात्माच आहे.जसे दागिन्यात सर्वत्र सोनेच आहे,तर सोन्यावाचून अन्य कांहीच नाही.||२६|| भावार्थ:----हे भगवान्,दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न करणें या मत्सररूप ज्वरानें युक्त असे इंद्रादिक लोकपाल,वेगवेगळे राहून अथवा सर्व एकत्र मिळूनही,ज्या प्राणरुपी तुझा त्याग करून द्विपद (मनुष्यादिक),चतुष्पद (गोमहिष्यादिक),जंगम व स्थावर असें जें कांही प्राणिमात्र येथें दिसत आहे,त्यांतील थोड्याचेंहि रक्षण करण्यास समर्थ झाले नाहींत,तो (प्राणरूपानें रक्षण करणारा) तुंच ईश्वर आहेस.ईश्वरच सर्व—त्रीलोक्यातील प्राणीमात्रांचे रक्षण करितो.||२७|| अर्थ:---हे भगवान्,जन्मरहित अशा ज्या तूं,ओषधी (साळी-वगैरे) आणि वल्ली यांना आश्रयभूत अशा ह्या पृथ्वीला माझ्या (मनूच्या) सहवर्तमान धारण करून सामर्थ्यानें मोठमोठया लाटांनी युक्त असलेल्या प्रलयकालीन समुद्रामध्यें पुष्कळ वेळपर्यंत संचार केलास,त्या जगताच्या प्राणसमुहाचें नियमन करणाऱ्या तुज भगवंताला नमस्कार असो.सर्व प्राणीमात्रांचे नियमन करणारा ईश्वरच आहे. ||२८|| अर्थ:---हिरण्मय खंडामध्येंहि कूर्मरूप धारण करणारा भगवान् वास करितो.त्याच्या त्या आपणास फार आवडणाऱ्या मूर्तीची उपासना,तेथें राहणारा पितृगणाचा अधिपति अर्यमा,त्या खंडांतील पुरूषांसहवर्तमान करितो आणि ह्या अथार्त्तच्या मंत्राचा जप करितो कीं,||२९|| भावार्थ:----जो पूर्णसत्वगुणप्रधान आहे,ज्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता (पाण्यांत फिरत असल्यामुळें) लागत नाहीं,जो अमुक वर्षे वांचणार अशा काळाच्या प्रमाणांत सांपडला नाहीं,अशा सर्वव्यापक व सर्वाधाररूप कूर्मरुपी तुज भगवंताला ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो. ||३०|| भावार्थ:----आणि अशी स्तुती करितों की,हे भगवान्,नानाप्रकारच्या रुपांनी नटलेलें व आपल्या (तुझ्या) मायेनें प्रकाशित केलेले हे दृश्य पृथ्वीव्यादि जग,ज्या तुझेंच स्वरूप आहे (तुझ्याहून निराळें नाहीं) आणि अशीं मृगजळाची गणती (अमुक मन किंवा अमुक खंडी आहे अशी) करितां येत नाहीं त्याप्रमाणें ज्या (जगत्स्वरुपी) तुझिया,मिथ्यात्वेंकरून अनुभव येत असल्यामुळें, गणती करितां येत नाहीं,त्या अनिर्वचनीय प्रपंचाकाररुपी तुज भगवंताला नमस्कार असो. ||३१|| भावार्थ:----हे भगवान्,गर्भाशयांतून जन्म पावणारें (मनुष्यादिक) घामापासून उद्भवणारें (ढेंकुणवगैरे),अंड्यांतून निघणारें (पक्ष्यादिक),भूमीला फोडून उगवणारें (वृक्षादिक),स्थावर,जंगम,देव,ऋषी,पितर,पंचमहाभूतें,इंद्रियें,स्वर्ग,अंतरिक्ष लोक,भूमि,पर्वत, नद्या,समुद्र,द्वीपें,गृह आणि नक्षत्रें याप्रमाणें त्या त्या नांवानें उच्चार करण्यास योग्य असा तूं एकच आहेस.परमात्माच सर्व आहे. ||३२|| भावार्थ:----असंख्य भेदांच्या नांवांनीं,रुपांनीं व आकरांनीं युक्त अशा ज्या तुझेठिकाणीं कपिलादिकांनी जी हि चोवीसवगैरे तत्वांची संख्या (स्पष्टीकरणासाठी) कल्पिली आहे,ती तत्वज्ञानेंकरून दूर होते त्या सांख्यतिसिध्दांतरूपी तुज भगवंताला नमस्कार असो. ||३३|| अर्थ:---उत्तरकुरुनामक खंडाचेठिकाणेंहि वराहावतारण धारण केलेला भगवान् यज्ञपुरुष राहतो.तेथें दिव्यरूप धारण करणारी हि भूमी,कुरुखंडांत राहणाऱ्या पुरूषांसहवर्तमान त्या वराहरुपी भगवंताची उपासना करिते आणि ह्या मंत्रात्मक सर्वोत्कृष्ट उपनिषदाचा जप करिते. ||३४|| अर्थ:---हे भगवान् मंत्रांनीं ज्याचें यथार्थ ज्ञान होतें,यज्ञ व क्रतु हें ज्याचे स्वरूप आहे,मोठमोठे याग हे ज्याचे अवयव आहेत, कर्मांच्या योगानें जो शुध्द आहे आणि तीन युगांमध्यें जो प्रसिध्द असतो,त्यातुन वराहरुपी महापुरुषाला ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो. ||३५|| भावार्थ:---आणि अशी प्रार्थना करितो कीं,हे प्रभो,अनेक प्रकारची कर्में व त्यांची फळें यांच्या योगानें प्रकाश न पावनारें ज्या तुझें स्वरूप,पाहण्याची इच्छा करणारें विद्वान व निपुण पुरुष,जसें अग्नीहोत्री,अरणीरूप काष्ठामध्यें मंथनदंडानें आग्निचें मंथनकरितात त्याप्रमाणे आपल्या देहेंद्रीयादिकांचेठिकाणी मनोरूप विवेकसाधनानें तुझें विवेचन करितात व असें केले असतां, ज्या तुझें स्वरूप प्रकट होतें,त्या तुला नमस्कार असो. ||३६|| अर्थ:----यमनियमादिक साधनांनी ज्यांची बुद्धी आत्मस्वरूप जाणण्यास समर्थ झालीं आहे अशा पुरूषांनी,विचाराच्या योगानें व विषय,इंद्रियांचे व्यापार,देवता,देह,काल आणि अहंकार ह्या मायेच्या कार्यरुपी लक्षणांनी ‘शाखाचंद्रन्यायानें’ ज्याचें स्वरूप वस्तूत्वेंकरून जाणलें जातें,त्या मायानिमित्तक आकारानें रहित अशा तुज परमेश्वराला वारंवार नमस्कार असो. ||३७|| अर्थ:----जसे लोहचुंबकाचा आश्रय करणारें लोखंड,त्याच्या सान्निध्यमात्रेंकरून श्रमण पावतें त्याप्रमाणें ज्या तुझ्या आवलोकनमात्रेकरून माया,आपल्या सत्व-रज-तमोरूप गुणांनी,‘तूं आपणाकरितां नसून जीवांकरितां’ इच्छीलेलें’ जगाचें स्थितीसंहारोत्पत्तिरूप कार्य करिते,त्या गुणकर्मांचा साक्षी अशा तुला नमस्कार असो. ||३८|| | प्रमथ्य दैत्यं प्रति वारनं मृधे यो मां रसाया जगदादिसूकर: | | कृत्वाग्रदंष्ट्रे निरगादूदन्वत: क्रीडान्निवेभ: प्रणतास्मि तं विभुमिति ||३९|| भावार्थ:----जो तूं,जगांचा कारणभूत वराहरुपी भगवान्,मला दाढेच्या टोंकावर धारण करून,रसातलापासून निघून प्रलयकालाच्या समुद्रांतून हत्तीसारखा बाहेर पडलास व नंतर प्रतीगजासारख्या प्राप्त झालेल्या हरिण्याक्षदैत्याला मारून क्रीडा करीत असल्यासारखा राहिला आहेस,त्या तुज समर्थ भगवंताला मी नित्य नमस्कार करितो. ||३९|| १८----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचम(५)स्कंधामध्यें भुवनकोशवर्णननामक हा अठरावा(१८) अध्याय एकूणचाळीस(३९)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. ||१८|| | ||श्रीकृष्णार्पण मस्तू|| || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आतां या एकुणिसाव्या अध्यायामध्ये,किंपुरुषखंड व भरतखंड यांमध्ये असलेल्या सेव्यसेवकभावाचे वर्णन करून,सर्व पृथ्वीवरील खंडामध्ये भरतखंडाचेच श्रेष्ठत्व वर्णन केले आहे.|| |१९-- २---किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | किम्पुरुषे वर्षे भगवन्तमादिपुरुषं लक्ष्मणाग्रजं| सिताभिरामं तच्चरणसंनिकर्षाभिरतः | परम भागवतो हनुमान् सह किम्पुरूशैरविरतभक्तिरुपास्ते ||१|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,किंपुरुषनामक खंडामध्ये,लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता जो भगवान सीतापती रामचंद्र त्याची-त्याच्या सेवेविषयी तत्पर असलेला महागवद्भक्त-हनुमान,किंनरासहवर्तमान एकनिष्ठभक्तीने उपासना करितो.आपणही—जीवानी महागवद्भक्त-हनुमानासारखे एकनिष्ठ भक्त होण्याचा आवश्य प्रयत्न करावा. ||१|| भावार्थः----आणि गंधर्वांनी वारंवार गायन केलेली धनी अशा भगवान रामचंद्राची अत्यंत कल्याणकारक कथा,किंपुरुषांत मुख्य अशा आर्ष्टीषेनासहवर्तमान एकाग्रचित्ताने श्रवण करितो,आणि स्वतः हे गायन करितो की,-----||२|| भावार्थः----ज्याची कीर्ती पवित्र आहे,ज्याची लक्षणे,स्वभाव व आचार हि श्रेष्ठ आहे,आपले मन वश करून घेतले आहे,जो लोक मार्गाला अनुसरला आहे,जो साधु-जनांची कसोटीच (परमस्थान)आहे आणि जो वस्तुतः परमेश्वर असून लोकसंग्रहाकरितां ब्राहमणभक्त आहे,त्या महापुरुषरुपी षड्गुणैश्वर्यसंपन्न राजाधिराज रामचंद्राला माझा ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो.||३|| भावार्थः----आणि अशी स्तुति करितो की,वेदाचेठिकाणी जे एक,परमशुद्ध,अनुभवरूप,आपल्या प्रकाशाने अनेकप्रकारच्या जाग्रदादिक अवस्थांचा निरास करणारे,अंतर्यामी,शांतरूप,सुबुद्धी पुरुषाने ब्रह्मत्वेकरून जाणलेले नामरूपातील व अहंकाररहित असे (रामरूप)तत्त्व,प्रसिद्ध आहे,त्याला मी शरण जातो.आपण—जीवानी परमात्मरूप जाणून त्या तत्त्वाचा अनुभव घेऊन जन्म—मरण निवृत्त करावे.||४|| भावार्थः----प्रभूचा ह्या भूतलावर जो (रामरूपी)मनुष्यावतार झाला आहे,तो केवळ रावणाच्या वधासाठीच झाला असे नव्हे,तर या संसारामध्ये स्त्रीसंगादिकापासून दुःख,दुर्निवार आहे,असे मनुष्यांना शिक्षण देण्याकरीताही झाला आहे.असे न म्हणावे तर स्वस्वरूपाचेठिकाणी रममाण असणाऱ्या जगदात्मरुपी ईश्वराला(श्रीरामाला)सीतेच्या विरहापासून दुःखे झाली हे कसे झाले असते?झालेच नसते.आपणास—जीवास संसारात स्त्री-पुत्र-देहसंबंधी,धन—मन—प्रतिष्ठा यांच्या पासून दु:ख होते,असे भगवान रामरूपी अवतार मनुष्यावतर झाला व त्यांनी आपल्याला असे कळावे म्हणून स्वत: आचरण करून दाखवले.म्हणून आपण—जीवानी राम-प्रभूचा अवतरापासून बोध घेऊन त्यानुसार कांहीचा—असार भागांचा त्याग करावा व कांहीचा—सार भांगाचा स्वीकार करावा.सार भाग हा सुखाला कारण आहे व असार भाग हा दु:खाला कारण आहे.||५|| भावार्थः----कारण,तो भगवान वासुदेव (रामचंद्र)धीर पुरुषांचा आत्मा व अनंत हितकर्ता असल्यामुळे त्रैलोक्यामध्ये कोठेही आसक्त नव्हता,म्हणून आपण—जीवानी जडात आसक्त म्हणजे लोभ न करता किंवा जीवात आसक्त म्हणजे मोहित न होता अनासक्त राहून जीवन व्यतीत करावे.तो—राम-प्रभू सीतावियोगापासून झालेल्या मोहाला(दुःखाला)पावला नसता,आणि तो लक्ष्मणाचाहि त्याग करण्यास योग्य नव्हता.यास्तव,त्यांची कृत्ये,केवळ लोकशिक्षेकरितांच आहेत.भगवान राम हे सितावियोगापासून व लक्षमणामनाच्या त्यागापासून दु:खाचा अनुभव आला नाही,व तर तो सर्व व्यवहार आपल्याकरिता—जीवाकारिता--लोक-शिक्षणाकरिता दाखवला,त्याहून ते अलिप्त असून सुखरुपच आहेत.म्हणून आपण—जीवानी संसारात असून सत्संग करून ज्ञान प्राप्त करून,अलिप्त राहावे.||६|| भावार्थः----सत्कुलांत झालेले जन्म,त्या श्रीरामचंद्राच्या संतोषाला कारण होत नाही,सौंदर्य नाही,वक्तृत्व नाही,बुद्धी नाही किंवा आकरही नाही.कारण,त्या लक्ष्मणाग्रज रामचंद्राने,त्या कुलीनता सौंदर्य इत्यादिकांनी रहित अशाही आम्हां अरण्यवासी वानरांचा मित्रत्वेकरून स्वीकार केला आहे.परमार्थ करण्यासाठी कुल,धन,सौंदर्य,वकृत्व,बुद्धि,किंवा आकार अत्यंत गौण आहे,तर भाव हा अत्यंत महत्वाचा आहे.म्हणून आपण जीवांनी भावयुक्त परमार्थ--भक्ती करावी.संसारात धन महत्वाचे असते,तर परमार्थात श्रद्धा—भाव महत्वाचा असतो.||७|| भावार्थः----तस्मात् देव असो,दैत्य असो,अथवा पशुपक्ष्यादिक कोणीही असोत,जो सर्वात्मभावेकरून उत्तम सुकृतज्ञ (थोडे भजन केले असतांही पुष्कळ मानणारा)अशा मनुष्यावतार धारण करणाऱ्या रामरूपी श्रीहरीचे सेवन करील तोच त्याला प्रिय होईल.म्हणून आपण—जीवानी सर्वात्म-भावेकारून रामरूपी—हरीचेच भजन,लीलांचेच श्रावण व रामरूपाचे स्वरूप जाणून व अनुभव घेऊन मनुष्य-देहाचे सार्थक करून घ्यावे.तो श्रीराम कृपाळू असा आहे की,ज्याने अयोध्यानगरवासी सर्व प्राणीमात्रांस आपल्या बरोबर विमानांत बसवून स्वर्गास नेले.आपणही सदगुरू—वक्ता असाल तर अज्ञानी जीवांना अधिकारनूसार उपदेश करून,त्यांचा चौथा पुरुषार्थ जो मोक्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा.||८|| भावार्थः----या भरतखंडामध्येहि ज्याचे स्वरूप लोकांना स्पष्टपणे कळत नाही असा भगवान,नर-नारायणनामक दोनमूर्ती धारण करून,बदरिकाश्रमाचे ठिकाणी कृपेने धैर्यवान पुरुषावर अनुग्रह करण्याकरिता,कल्प संपेपर्यंत वृद्धी पावलेल्या धर्म,ज्ञान,वैराग्य, ऐश्वर्य,शांती आणि विषयत्याग यांच्या योगाने,जेणेकरून आत्म्याचा अनुभव मिळतो अशा तपाचे आचरण करीत राहिला आहे.ईश्वर स्वत: आताही—वर्तमानकाळात नर-नारायणरूपाने बद्रीकाश्रामी धैर्यवान पुरुष्यांवर अनुग्रह करण्याकरिता तप करीत बसलेले आहेत.म्हणून आपण—जीवानी धैर्यवान होऊन,साधना करून भगवंतांची कृपा संपादन करावी.||९|| भावार्थः----त्या भगवंताची,भगवंताने सांगितलेल्या सांख्यशास्त्र व योगशास्त्र यांसहवर्तमान,ज्यामध्ये भगवंताचा पराक्रम वर्णन केलेला आहे अशा पंचरात्रागमाच्या सावर्णी मनुला उपदेश करणारा भगवान नारद,वर्णाश्रमाचे आचरण करणाऱ्या भरतखंडातील प्रजासहवर्तमान उपासना करितो आणि अशा अर्थाच्या मंत्राचा जप करितो की,-----------||१०|| भावार्थः----इंद्रियांचा निग्रह करणे हाच ज्याचा स्वभाव आहे,अहंकाराने जो रहित आहे,भगवद्भक्त हेंच ज्याचे द्रव्य आहे,ऋषीमध्ये जो श्रेष्ठ आहे,परमहंसाचाही जो परमगुरु आहे व आत्म्याचेठिकाणी रममाण होणाऱ्या लोकांचा जो अधिपती आहे त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न नर-नरनारायणाला माझा ॐकारपूर्वक वारंवार नमस्कार असो.आपण जीवानी मन आणि इंद्रियांचा ताबा घेऊन अहंकाररहित होऊन पारमार्थिक साधना करावी.आपले—जीवाचे द्रव्य हे संत—महात्मा असावे.त्यांचा सत्संग करून ज्ञान प्राप्त करून घेणे हेच आपले—जीवाचे साध्य आहे.म्हणून आपण त्यांना—ईश्वरास नमस्कार करावा. ||११|| भावार्थः----आणि असे गायन करितो की,ह्या जगाच्या उत्पत्तीस्थितीसंहारांविषयी कर्तां असतांनाही जो मी कर्ता आहे असा अभिमान धारण करीत नाही,देहामध्ये असतांनाही देहसंबंधी क्षुधा,तृषा इत्यादि धर्मानी जो पराभव पावत नाही,आणि द्रष्टा असतांही दृश्य विषयांच्या योगाने ज्याच्या दृष्टीला विकार होत नाही त्या निःसंग परमपवित्र व सर्वसाक्षी परमेश्वराला नमस्कार असो.आपणही—जीवानी मी कर्ता—भोक्ता आहे असा अभिमान धारण करू नये,कारण कर्ता—भोक्ता मी नसून कर्ता—भोक्ता अंत:कारण आहे.क्षुधा(भूक)—पिपासा(तहान)हे धर्म सूक्ष्म देहातील जो प्राण त्याचे धर्म आहेत,आपले—जीवाचे धर्म नाहीत. आपण—जीव हा द्रष्टा असून दृश्य हे जगत आहे.ईश्वर हा सर्वसाक्षी आहे या ईश्वरास माझा नमस्कार आहे.||१२|| भावार्थः----हे योगेश्वरा,भगवान ब्रहमदेवाने,जे योगमार्गातील निपुणत्व सांगून ठेविले आहे ते हेंच होय कि,पुरुषाने देहाभिमान-- --सोडून जन्म पासून केलेल्या निष्काम भक्तीने अंतकाळी—मृत्युच्याकाळी निर्गुण अशा तुज--परमेश्वराचेठिकाणी मन लावावे,अन्य संसाराच्या—विषयांच्या ठिकाणी मन लावू नये,कारण अंत-काळी ज्याचे स्मरण होते,त्यानुसारच ती गती प्राप्त होत असते.||१३|| भावार्थः----हे भगवन,जसा मूढ पुरुष या लोकीच्या व परलोकीच्या विषयांचेठिकाणी आसक्त होऊन पुत्र,सती व द्रव्य यांविषयीची मी मेलो असतां यांचे कसे चालेल अशी चिंता करीत विष्ठादी मलांनी पूर्ण व अनेक प्रकारच्या दुःखाचे स्थान अशाही आपल्या शरीराच्या नाशापासून भीत असतो,तसाच जर विद्वान पुरुषही भिऊ लागेल तर त्याचा शास्त्रादिकांच्या ज्ञानसंपादनाविषयीचा प्रयत्न केवळ श्रमच होईल.अज्ञानी—जीव मृत्यूस भीत असतो त्याचप्रमाणे ज्ञानी—जीव मृत्यूस भीत असेल तर अज्ञानी व ज्ञानी यांच्यात कांहीच फरक राहणार नाही.ज्ञानी—महात्म्याच्या साधनेला केवळ श्रम म्हणावे लागेल.म्हणून महात्म्यांनी सर्व विषयांचा त्याग करून परमात्मा यांचाच अनुभव—अपरोक्ष-साक्षात्कार करून घ्यावा.म्हणजे फक्त परोक्ष—ज्ञानच प्राप्त करून घेऊ नये.||१४|| भावार्थः----तस्मात् हे प्रभो,हे अधोक्षजा,तूंच कृपाकरून आपलेठिकाणी आम्हांला स्वाभाविक प्रेमलक्षण भक्तीयोग संपादन कर,म्हणजे त्याच्या योगाने आम्ही तुझ्या मायेने ह्या कुत्सित शरीराचेठिकाणी स्थापित केलेल्या व दुसऱ्या उपयांनी त्याग करण्यास अशक्य अशा अहंममतेचा लवकर त्याग करूं.आपण—जीवानी जर निष्काम कर्मे व निष्काम उपासना करून,ते कर्म भगवंतांस समर्पण केले तर ईश्वराची कृपा होऊन संत—महात्मा यांची प्राप्ती होते.त्यायोग्य सत्संग घडून जीव-ब्रहम-ऐक्य-ज्ञान उत्पन्न होऊन,सर्व विषयांचा त्याग केल्यानंतर परमात्म्याचा अनुभव येतो.त्यामुळे आपले—जीवाचे जन्म—मरण दु:ख निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते.||१५|| भावार्थः----हे राजा,ह्या भरतखंडामध्ये नद्या व पर्वतही पुष्कळ आहेत त्यांमध्ये मलय,मंगलप्रस्थ,मैनाक त्रिकुट,ऋषभ,कुटक ,कोल्लक,सह्य,देवगारि,ऋष्यमूक,श्रीशैल,वेकट,महेंद्र,वारिधार,विंध्य,शुक्तिमान,ऋक्षगिरी,पारियात्र,द्रोण,चित्रकुट,गोवर्धन,रैवाटक, ककुभ,नील,गोकामुख,इंद्रनील आणि कामगिरी हे पर्वत मुख्य असून दुसरेही शेकडो हजारो पर्वत आहेत व त्यांच्या पायथ्यापासून निघालेले नद व नद्याही असंख्यात आहेत.||१६|| भावार्थः----ह्या नद्या,नामोच्चारणमात्रेकरूनसुद्धा पवित्र करणाऱ्या असून यांच्या उदकाचा,भरतखंडातील सर्व प्रजा स्नानपानादिकेकारून उपयोग करीतात,तेव्हा त्या त्यांना पवित्र करतील हे काय सांगावे!म्हणून आपण—जीवानी त्या पवित्र नदीत स्नान करून मनास पवित्र करावे.||१७|| भावार्थ:त्यानद्यांपैकी,चंद्रवशा,ताम्रपर्णी,अवटोदा,कृतमाला,वैहायसी,कावेरी,वेणी,पयस्वणी,शर्करावर्ता,तुंगभद्रा,कृष्ण,वेण्या,भिमरथी, गोदावरी,निर्विध्या,पयोष्णी,तापी,रेवा,सुरसा,नर्मदा,चर्मण्वती,सिंधू,अंध,आणि शोन हे दोन नाद महानदी, वेद्स्मुर्ती,ऋषिकुल्या, त्रिसामा,कौशिकी,मंदाकिनी,यमुना,सरस्वती,दृषद्वती,गोमी,सरयू,रोधस्वती,सप्तवती,सुशोमा,शतद्रू,चंद्रभागा,मयद्धृधा,वितस्ता,असि----क्री विश्वा ह्या चौऱ्येचाळीस (४४) महानद्या आहेत.||१८|| भावार्थः----ह्याच खंडामध्ये जन्म घेणारे पुरुष,स्वता आचरण केलेल्या सात्विक,राजस,व तामस,कर्माच्या योगेकारून त्या त्या कर्मानुसार पुष्कळ देवलोकीच्या,मनुष्यालोकीच्या आणि नरकातील गती आपणास मिळवितात.कर्मानुसारेकरून सर्वही गती सर्वस प्राप्त होत असतात.म्हणून आपण—जीवानी सात्विक कर्म करून मोक्ष प्राप्त करून घ्यावा.ज्या ब्राह्मणादि वर्णाला जे संन्यासग्रह्नादिक मोक्षप्राप्ती साधन म्हणून सांगितले आहे,त्या क्रमाने याच खंडामध्ये मनुष्यांना मोक्षही प्राप्त होतो. ||१९|| भावार्थः----हे राजा,सर्वभुताचा आत्मा,रागादि दोषरहित,वाणींनाअगोचर,आधाररहित,सर्वव्यापी व सर्वांतरयमी अशा भगवान वासुदेवाचेठिकाणी,कोणत्याही कामनारूप कारणावाचून जे भक्त जडणे हेच मोक्षाचे स्वरूप होय.तो मोक्ष,जेव्हा भगवतभक्तांचा फारवेळ समागम घडतो तेव्हा नानाप्रकारच्या गती प्राप्त होण्यास निमित्त जो अविध्यारूप हृदयग्रंथी त्याच्या छेद्नव्दार प्राप्त होते.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून हृदय-ग्रंथीचा छेद करून घ्यावा.||२०|| भावार्थः----हे भरतखंड मोक्षप्राप्तीचे साधन आहे म्हणून यांत प्राप्त झालेल्या मनुष्यजन्माचे देवसुद्धा असे गायन करितात की, अहो ज्याविषयी आम्हा देवानाही केवळ एक इच्छाच उत्पन्न होते,ते मुक्ती दात्या भगवंताच्या सेवेविषयी उपयोगी पडणारे भरतखंड मनुष्यामध्ये जन्म,ज्या मनुष्यांनी मिळविले आहे,त्यांनी जन्मांतरी काय बरे आश्चर्यकारक पुण्यकर्म केले असावे?अथवा काही साधन केल्यावाचून यांना हरी प्रसन्न झाला असावा कि काय ?नाही.आपण—जीवानी मनुष्य-देहात,मृत्यू-लोकात,भरत-खंडात व महाराष्ट्र—मराठवाडा—परभणी जिल्ह्यात जन्मांतरीचे निष्काम पुण्यकर्म काय विशेष केले असेल,ते ईश्वराची कृपा ईश्वरच जाणे ! त्यामुळे आपणास—जीवास या भूमीत जन्म प्राप्त झालेला आहे,कारण हि भूमी संत—महात्मा यांची असल्यामुळे सत्संग करण्यास चौथा पुरुषार्थ जो मोक्ष प्राप्त करण्यास अतिउत्तम आहे.||२१|| भावार्थः----करण्यास फार कठीण अशा-यज्ञ,तपे,व्रते व दाने इत्यादिकांना आम्हाला प्राप्त झालेल्या ह्या तुच्छ अशा स्वर्गाचे तरी काय फळ झाले आहे?काहीच नाही,कारण तेथे विनाशी फळ आहे.तेथे नारायणाच्या चरणकमलांची स्मृती नाही,कदाचित असली ती अतिशय विषयभोगाच्या योगानेंयुक्त आहे.म्हणून आपण—जीवानी “यज्ञ,तपे,व्रते व दाने” “सकाम” न करता—संसाराची—विषयांच्या फळाच्या अपेक्षा न करता निष्काम—संसाराची—विषयांची अपेक्षा न करता ईश्वर-अर्पण बुद्धिने करावी.असे कर्म केले असता आपला—जीवाचा यज्ञ,तपे,व्रते,व दाने हि साधने संसाराकडे—विषयांकडे न नेता अविनाशी परमात्म्याकडे—सुखरुपतेकडे नेतात.त्यामुळे परमार्थातील आपला अधिकार वाढवून मोक्ष-मार्गाकडे जाऊन मुक्त होऊन कायमच्या लक्ष-चौऱ्याऐंशी ज्या दु:खद आहेत व यमपुरी जी दु:खकारक आहे,त्यांचे कायमचेच जाणे—येणे बंद होऊन कायमचेच सुखरूप आहोत असा अनुभव येतो.म्हणजेच शात्रीय-भाषेत अत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्त होते—म्हणजेच आपल्याच—जीवाच्या स्वरुपाची म्हणजेच सत्-चित्-आनंदाची प्राप्ती होते—अनुभवास येते.||२२|| भावार्थः----स्वर्गलोकाची तर वार्ता राहू दे,कारण,परंतु कल्पपर्यंत आयुष्य असणाऱ्या लोकांच्या पुनरावृत्तीने युक्त अशा ब्रह्मांडाच्या प्राप्तीपेक्षाही अल्प आयुष्य असणाऱ्या मनुष्यांना भरतखंड भूमीरूप स्थानाची प्राप्ती होणे हे श्रेष्ठ आहे.कारण, पुरुष,तेथील क्षणभंगुर अशाही देहाने क्षणामध्ये सर्व कर्माचे ईश्वराचेठिकाणी समर्पण करून हरीच्या पुनरावृत्तीचे अभयस्थान जावून पोहचतात.मृत्यू-लोकात फक्त भरत—भूमीतच वेदांताचे चिंतन—मोक्षमार्गाचे—ज्ञान—मार्गाचे चिंतन असते,तर अन्य ठिकाणी नसते.अन्य ठिकाणी विनाशी तत्त्वाचे चिंतन असते,ते चिंतन सुख देते,पण सुखरुपता देत नाही.म्हणून तर भारत भूमीत मृत्यू-लोकातील कांही मनष्य प्राणी येऊन वेदांताचे चिंतन करून सुखरुपता प्राप्त करून घेतात.||२३|| भावार्थः----म्हणून ज्याठिकाणी भगवत्कथामृताच्या नद्या नाहीत,व जेथे भगवत्कथावर्णन करणारे भगवद्भक्त नाही येथे मोठ्या गीतनृत्यादिक उत्साहांनी युक्त असे भगवंताचे पूजाप्रकार नाहीत,तो ब्रहमलोक जरी असेल तरी त्याचा सत्पुरुषांनी आश्रय करूं नये,कारण ब्रह्मा-लोकात वेदांचे चिंतन नाही.ज्वा-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान म्हणजेच चौथा-पुरुषार्थ मोक्ष नाही.||२४|| भावार्थः----ज्ञानेंद्रिये,कर्मेंद्रिये,,पंचमहाभूते यांच्या कौशल्याने परिपूर्ण अशा मनुष्यजन्माला या भरतखंडांत प्राप्त झालेले जे प्राणी आहेत त्यांनी,पुनः मृत्यू न यावा यासाठी जर प्रयत्न केला नाही तर ते पुन्हा जसे वनांत राहणारे पक्षी,पारध्याच्या हातून एकवेळ सुटले असतांही,फळांच्या लोभाने त्याच वृक्षावर बेसावधपणे फिरुं लागले म्हणजे पुन्हां बंधन पावतात त्याप्रमाणे बंधन पावतात.आपण मृत्यू-लोकात येऊन,मनुष्य-देहात येऊन,भारतखंडात येऊन जर निष्काम कर्म न केले व निष्काम उपासना न केली तर,हे सत्व कर्म ईश्वरास अर्पण न केले तर सत्संग होणार नाही,सत्संग न झाल्यामुळे चौथा पुरुषार्थ जो मोक्ष त्याची प्राप्ती होणार नाही.त्यामुळे आपणास—जीवास कायमचे सुख मिळणार नाही,तर कायमचेच दु:ख हे मिळणारच.म्हणून सत्संग कराच.जसे शरीर जिवंत ठेवण्यास हवा,पाणी व अन्नाची गरज आहे,त्याचप्रमाणे निष्काम कर्म,निष्काम उपासना व ईश्वरास कर्म समर्पण करणे जरुरी आहे.त्यानंतर सत्संग करून संत—महात्मा यांच्या मुखातून वेदांताचे श्रवण करून ज्ञान प्राप्त करून घेणे जरुरी आहे.||२५|| भावार्थः----कायहो,भरतखंडातील लोकांचे भाग्य हे ? अहो ! ज्या भरतखंडांतील मनुष्यांनी यज्ञामध्ये श्रद्धापूर्वक निरनिराळ्या इंद्र,अग्नी,इत्यादिक भिन्नभिन्न नावांनी बोलावलेला,सर्व ऐश्वर्य देणारा,एक वस्तुतः परिपूर्ण असा हरी,आनंदाने तेथे येऊन विधी,मंत्र व द्रव्ये,यांच्या योगाने देवतांच्या उद्देशाने दिलेले व इंद्राला हे अग्नीला देवांना निरनिराळा निर्वाप केलेल्या चरूपुरोडाशादिक द्रव्याचा हे माझा आहे’ अशा बुद्धीने स्वीकार करितो.||२६|| भावार्थः----आतां निष्काम भक्तच कृतार्थ आहेत असे सांगतात)सकाम भक्तीतिंहि प्रार्थना केलेला हरि,त्यांना मागितलेले फळ देतो हे खरे आहे तथापि तो त्यांना परमार्थ देणारा होत नाही.कारण,दिलेल्या फळाचा भोग झाला म्हणजे पुन्हा त्यांना फळ मागण्याची,इच्छा होते आणि इच्छा न करणाऱ्या भक्तांना तर तो भगवान,सर्व इच्छांची निवृत्ति करणाऱ्या आपल्या चरणपल्लवाला आपण होऊन देतो.म्हणून जीवनी सकाम कर्म न करता निष्काम कर्मच करावे.त्यामुळे भगवंत आपणास—जीवास न मागता चौथा पुरुषार्थ मोक्ष देतात व सुखरूप करतात.||२७|| भावार्थः----यास्तव जर आतां या वेळी आमचे चांगल्या अध्ययनाचे अथवा दुसऱ्या कोणत्याही चांगल्या कर्माचे,भोगलेल्या स्वर्गसुखाहून अवशेष पुण्य काही राहिले असेल तर त्याच्या योगाने भरतखंडामध्ये आम्हांला,हरीच सेवन करण्यास योग्य आहे अशा अनुसंधानाने युक्त जन्म प्राप्त होवो.कारण,तेथे भक्तांना स्वानुभवरूप सुख देतो.भारत-खंडात सेवन करण्यास योग्य आहे, व संसार सेवन कारण यास दु:खप्रद आहे.म्हणून आपणास जो हरी सुखरूप करणारा आहे,त्याचेच सेवन करावे.||२८|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजन,पूर्वी सगरराजाला पुत्रांनी घोड्याचा शोध करीत असतांना हि पृथ्वी सभोवार खणली,त्या वेळी जंबूद्विपाचे दुसरे आठ विभाग झाले आहेत त्यांनाच ती जंबूद्वीपाची आठ उपद्विपे आहेत असे कोणी म्हणतात.||२९|| भावार्थः----त्यांची नांवे-स्वर्णप्रस्था,चंद्रशुक्ल,आवर्तन,रमणक,मंदहरिण,पांचजनय,सिंहल आणि लंका हि होत.||३०|| | एवं तव भारतोत्तम जम्बुद्वीपवर्षविभागो | यथोपदेशमुपवर्णित इति ||३१|| भावार्थः----हे भरतकुलश्रेष्ठा,याप्रमाणे तुला जंबूद्विपाच्या खंडाचा विभाग मला मोहित असल्याप्रमाणे वर्णन केला आहे.||३१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील पंचमस्कंधामध्ये जंबूद्वीपपर्वणनामक हा एकुनिसावा(१९)अध्याय एकतीस(३१) श्लोकांनियुक्त समाप्त झाला||१९|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________२०---आता या विसाव्या अध्यायामध्ये समुद्रासहवर्तमान प्लक्षादिक सहा द्वीपाचे स्थित आणि बाटल्या व बाहेरच्या प्रमाणासहवर्तमान लोकालोक पर्वताची स्थिती सांगितली आहे. || |२०--- अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन. ________________________________________________________________________________________ भावार्थः-----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,आतां पुढे पुढे प्रमाण लक्ष्मण व रचना यांच्या योगाने प्लक्षादिक द्विपांच्या खंडविभागांचे वर्णन करितो.||१|| भावार्थः---जसा मेरूपर्वत,जंबूद्विपांच्या योगाने परिवेष्टित आहे त्याप्रमाणेच व हे जंबूद्वीपही क्षारसमुद्राने परीवेष्टी आहे आणि या द्विपाचा जितका (लक्षयोजने)विस्तार आहे तितकाच क्षारसमुद्राचाही आहे.तसेच,जसा खंदर बाहेरील उपवनाने वेष्टित असतो त्याप्रमाणे क्षारसमुद्रहि त्याच्यापेक्षा दुप्पट विस्तृत असलेल्या प्लक्षनामक द्वीपाने सभोवती वेष्टित आहे.या द्वीपामध्ये प्लक्ष(पायरी)या नावाचा सुवर्णाचा वृक्ष,द्वीपाचे नाव पाडणारा,जम्बुद्वीपातील जांबलीएवढा म्हणजे म्हणजे अकराशे योजना उंच व अकराशे योजने विस्ताराचा असून तो मुळात शंभरयोजने घेराचा आहे.तेथे सप्तजिव्ह या नावाचा अग्नी राहतो. त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा पुत्र इध्मजिव्ह होता.त्याने त्या आपल्या द्वीपाचे सात खंडे करून त्या खंडाचीच नावे असलेल्या आपल्या सात पुत्रांना देवून आपण आत्मयोगसाधनाने उपराम पावला.||२|| भावार्थः-----त्या खंडाची व पुत्राची नावे-शिव-यवयस,सुभद्र,शांत,क्षे,अमृत व अभय अशी होत.त्यामध्ये पर्वत आणि नद्याहि सात-सातच प्रसिध्द आहेत.||३|| भावार्थः-----मानिकुट,वज्रकुट,इंद्रसेन,जोतीष्मान,आणि सत्यंभरा ह्या सात महानद्या आहेत आणि त्या नद्यांच्या स्नान पानादिकेकरून ज्यांचा रजोगुण व तमोगुण नाहीसा झाला आहे,ज्यांना आयुष्य हजार वर्षे आहे आणि ज्यांचे रूप व अपत्योपत्ति हि देवाप्रमाणे सुंदर आहेत असे हंस,पतंग,ऊर्ध्वायन आणि सत्यांग ह्या नावांचे चार वर्ण,वेदत्रयात्मक विद्येच्या योगाने,स्वर्गाचे,केवळ द्वारच अशा वेदत्रयप्रतिपाद्य,षड्गुनैश्वर्यसंपन्न,सर्वातर्यामी सूर्यनारायणाचे पूजन करितात.||४|| भावार्थः-----ते असे की,----जो सत्याचा (प्रचारांस असलेल्या धर्माचा)ऋताचा (प्रचारांत आणावयाच्या धर्माचा)वेदाचा,शुभ्रफलाचा (मोक्षाचा)आणि अशुभफलाचा (वारंवार जन्ममरणादिरूप संसाराचा)नियंता असून पुराणपुरुष विष्णूचे स्वरूप आहे,त्या सूर्यनारायणाला आम्ही शरण जातो.||५|| भावार्थः-----प्लक्षादिक पांचही द्विपामध्ये असणाऱ्या सर्व पुरुषांना आयुष्य,इंद्रिये,इंद्रियांचे पटुत्व,कांती,सहनशीलता,बळ,बुद्धी आणि पराक्रमी यांची स्वाभाविक सिद्धी,सर्वाना सारखीच असते.||६|| भावार्थः-----जसे प्लक्षद्विप,आपल्याएवढ्या दोनलक्षयोजने विस्तारांच्या ऊसांच्या समुद्राने वेष्टित आते तसेच त्याच्या दुप्पट चारलक्ष योजने विस्तारावे शाल्मलिद्वपही आपल्या इतक्या विस्ताराच्या सुरासमुद्राने वेष्टित असून ते सर्वबाजूंनी शोभत आहे.||७|| भावार्थः-----त्या द्विपामध्ये वर सांगितलेल्या पिंपरीच्या वृक्षाएवढी म्हणजे अकराशे योजने उंच व अकराशे योजने विस्ताराची आणि शंभर योजने मुळांत घेर असलेली शाल्मली(सांवर)आहे तिच्यावर आपल्या अवयवभूत वेदांनी(पक्षांनी)ईश्वराची स्तुति करणाऱ्या भगवान गुरूडाचे स्थान (घरटे)आहे.ती त्या द्विपाला शाल्मलद्वीप असे नांव पाडण्यास कारण झाली आहे.||८|| भावार्थः-----त्या द्विपाचा अधिपती प्रियव्रताचा पुत्र यज्ञबाहू असून,त्याने आपल्या सात पुत्रांना त्यांच्या नावांचीच द्वीपाची सात खंडे करून वांटून दिली.त्यांची नांवे सुरोचन,सौमनस्य,रमणक,देववर्ष,पारिभद्र,आप्यायन आणि अविज्ञात अशी आहेत.||९|| भावार्थः-----त्या खंडामध्ये खंडाच्या मर्यादा पाडणारे पर्वत व नद्या सातसातच प्रसिद्ध आहेत.स्वरस,शतशृंग,वामदेव,कुंद, मुकुंद,पुष्पवर्ण आणि सहस्त्रश्रुती हे सात पर्वत आणि अनुमती सिनीवाली,सरस्वती,कुहू,रजनी,नंदा आणि राका ह्या सात नद्या आहेत.||१०|| भावार्थः-----त्या खंडात राहणारे पुरुष-श्रुतधर,विर्यधर,वसुंधर आणि इषंधर या नावाचे चार वर्ण असून ते वेदमय आत्मरूप भगवान चंद्राची वेदमंत्रांच्या योगेकरून आराधना करितात.||११|| भावार्थः-----ती अशी की,----जो कृष्णपक्षी आणि शुक्लपक्षी पितरांना देवांना तसाच सर्वप्रजांचा अन्नाचा विभाग करीत असतो तो सोम आमचा राजा(पालन करणारा)असो.||१२|| भावार्थः-----याप्रमाणे सुरासमुद्राच्या बाहेर आठलक्ष योजने विस्तृत असे कुशद्वीप असून ते पूर्वीच्या पूर्वीच्या द्वीपाप्रमाणेच आठलक्ष योजने विस्तृत असलेल्या घृतसमुद्राने वेष्ठित आहे,त्याचेठीकानी त्या द्वीपाचे नाव पडणारा,दुसरा अग्नीच कि काय असा प्रकाशमान,परमेश्वराने रचीलेला एक कुशस्तब्ध(दर्भाचे बेत)आहे तो आपल्या कोमलशिकांच्या कांतीने सर्वदिशा प्रकाशित करितो.||१३|| भावार्थः-----हे राजा,त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा पुत्र हिरण्यरेतानामक असून त्याने,आपल्या वसू,वसुदान,दृढरुची,नाभिगुप्त,स्तुत्यव्रतविविक्त आणि वामदेव ह्या नावांच्या सात पुत्रांना आपल्या द्वीपाचे यथायोग्य सात विभाग करून देवून आपण तप आचरण केले.||१४|| भावार्थः-----त्यांच्या खंडामध्येही मर्यादापपर्वत व नद्या सात-सातच प्रसिध्द आहेत.चक्र,चतु:शृंग,कपिल,चित्रकुट,देवाणीक,ऊर्ध्रोमा व द्रविण हे सात रसकुल्या,मधुकुल्या,मित्रविंदा,श्रुतविंदा,वेदगर्भ,घृतंच्युता व मंत्रमाला ह्या सात नद्या होत.||१५|| भावार्थः---त्यांच्या उदकाने शुध्द असलेले कुशल,कोविद,अभियुक्त आणि कुळक या नावाने चार वर्ण,अग्निस्वरूपी भगवंताचे यज्ञादिकर्माच्या कौशल्यकरून पूजन करितात.ते असे की,------||१६|| भावार्थः-----हे अग्ने तू साक्षात परब्रहमस्वरूपी भगवंताचे हविर्भाग वाहून नेणारा आहेस,यास्तव पुरुषरुपी भगवंताच्या अवयवरुपी देवांच्या यज्ञाचे(त्यांना अर्पण केलेल्या हविर्भागाने)त्या पुरुषरुपी भगवंताचेच यजन कर.||१७|| भावार्थः-----जसा कुशद्वीप घृतसमुद्राने वेष्ठित आहे त्याप्रमाणे त्या घृतसमुद्राच्या बाहेर सोळालक्ष योजने विस्ताराचा क्रौंचद्वीप सोळालक्ष योजने विस्तुत अशा योजने विस्तुत अशा क्षीरसमुद्राने आपल्या सभोवार वेष्टन केलेला आहे त्या द्वीपामध्ये क्रौंचनामक एक महापर्वत त्या द्वीपांचे नाव पाडणारा आहे.||१८|| भावार्थः---जो पूर्वी कार्तिक स्वामीच्या शक्ती नामक आयुधाने कटीप्रदेश फुटून गेलेला व वरील लतामंडप उध्वस्त झालेला असून क्षीरसमुद्राने पोटात घेतल्यामुळे व वरुणाने रक्षण केल्यामुळे निर्भय झाला होता तोच हा क्रौंचपर्वत होय.||१९|| भावार्थः-----त्या कौंचद्वीपामध्येही त्याच्या अधिपती प्रीयव्रताचा पुत्र घृतपुष्ठ्नामक असून तरुणे आपल्या पुत्राच्या नावांची सात खंडे करून त्यामध्ये त्या आपल्या सात पुत्रांना प्रजापालनाविषयी स्थापन करून आपण,ज्ञानसंपन्न होत असता त्याची कीर्ती परम कल्याण कारक आहे अशा भक्ताची दुखे: हरण करणाऱ्या सर्वांतयामी भगवंताच्या चरणारद्विंदाला शरण गेला.||२०|| भावार्थः-----आम,मधुरूढ,मेघपृष्ठ,सुधामा,भ्राजीष्ठ,लोहीतार्ण आणि वनस्पती हे घृतपृष्ठाचे पुत्र होत.त्यंचे मर्यादापर्वत सात व नद्याही सातच प्रसिध्द आहेत.शुक्ल,वर्धमान,भोजन,उपबर्हिन,नंद,नंदन आणि सर्वतोभद्र हे सात पर्वत आणि अभया,अमृतौघा,आर्यका,तीर्थवती,वृत्तिरूपवती,पवित्रवती,पवित्रवती आणि शुक्ला ह्या सात नद्या आहेत.||२१|| भावार्थः-----त्यांचे निर्मळ व पवित्र उदक सेवन करणारे पुरुष,ऋषभ,द्रविण यां नावांचे त्या खंडातील चार वर्णाचे पुरुष,उदकमय देवाचे उदकाने पूर्ण अशी अंजली अर्पण करून आराधन करितात.||२२|| भावार्थः-----ते असे की,-----हे उदका,तुला ईश्वरापासून सामर्थ्य प्राप्त झालेले असून तूं भूलोक,अंतरीक्षलोक व स्वर्गलोक यांना पवित्र करणारे आहेस ते तूं,आपल्या शरीराने,तुझे स्नानपान करणाऱ्या आमच्या देहांना पवित्र कर.||२३|| भावार्थः---याप्रमाणे पुढे क्षीरसमुद्राच्या बाहेर सभोवार शाकद्वीप आहे.ते बत्तीस लक्ष योजने विस्तृत असून तेवढयाच विस्ताराने,युक्त असलेल्या दह्याच्या मठ्ठयाच्या समुद्राने सभोवार वेष्टित आहे त्याचेठिकाणी द्विपाचे नांव पाडणारा,ज्याची पाने आंतल्याबाजूने खरखरीत व बाहेरच्या बाजूने गुळगुळीत असतात असा एक शाक या नावांचा वृक्ष आहे त्याच्या महासुगंधाने युक्त असलेला वास त्या द्विपाला सुगंधयुक्त करीत असतो.||२४|| भावार्थः-----त्या द्विपाच्या अधिपतीहि प्रियव्रताचा पुत्र मेघातिथी नावांचा होता त्यानेही त्या द्वीपाची आपल्या सात पुत्रांच्या नावांनी प्रसिद्ध अशी सात खंडे करून त्यांमध्ये पुरोजव,मनोजव,पवमान,धुम्रानिक,चित्रहरेक,बहुरूप आणि विश्वधार ह्या नावांच्या आपल्या पुत्रांना अधिपती नेमून,आपण अनंत भगवंताचे ठिकाणी आपले मन लावून तो तपोवनांत निघून गेला.||२५|| भावार्थः-----ह्या खंडामध्येही ईशान,उरुशृंग,बलभद्र,शतकेसर,सहस्त्रस्त्रोत,देवपाल आणि महानस असे सात खंडमर्यादापर्वत असून अनघा,आयुर्दा,उभयसृष्टि,अपराजिता,पंचपदी,सहस्त्रस्त्रुती आणि निजधृती अशा नद्याही सातच आहेत.||२६|| भावार्थः-----त्या खंडातील-ऋतव्रत,सत्यव्रत,दानव्रत आणि अनुव्रत ह्या नावांचे चारवर्णाचे पुरुषद्व प्राणायामाच्या योगाने आपला रजोगुण व तमोगुण दूर करीत असते परम समाधीच्या योगाने वायुरूपी भगवंताचे आराधन करितात.||२७|| भावार्थः-----जो आंत प्रवेश करून जंगमात्मक प्राण्यांचे प्राणादिक वृत्तीच्या योगेकरून रक्षण करितो आणि ज्याच्या स्वाधीन हे सर्व जग आहे तो साक्षात अंतर्यामी ईश्वर,आमचे रक्षण करो.||२८|| भावार्थः-----याप्रमाणेच दह्यांच्या माठ्ठ्याच्या समुद्राच्या बाहेर सभोवती चौसष्ट लक्ष योजने विस्तृत असे पुष्करद्वीप आहे ते तितक्याच गोडपाण्याच्या समुद्राने बाहेरून वेष्टिलेले आहे त्याचेठिकाणी अग्नीच्या ज्वालांप्रमाने निर्मळ अशा कोट्यावधी सुवर्णपत्रांनी युक्त असे एक भगवान ब्रहमदेवाचे आसनभूत मोठे पुष्कर(कमळ)रचिलेले आहे त्यावरून ह्या द्विपाचे पुष्कर असे नांव पडले आहे.||२९|| भावार्थः-----त्या द्विपामध्ये मानसोत्तर नावांचा दहाहजार योजने उंचीचा व विस्ताराचा द्विपासारखा मंडळाकार पूर्वोत्तर खंडाचा एकच मर्यादापर्वत आहे,त्याच्यावर पूर्व,दक्षिण,पश्चिम व उत्तर ह्या चार दिशांकडे इंद्रादि चार लोकपालांच्या चार नगऱ्या आहेत.तसेच त्या पर्वतावरून मेरुच्या सभोवार फिरणाऱ्या सूर्यरथाचे संवत्सरात्मक चक्र देवांच्या अहोरात्रांनी (उत्तरायणदक्षिणायनांनी)फिरत असते.||३०|| भावार्थः-----त्या द्विपाचाही अधिपती प्रियव्रताचा पुत्र वितीहोत्रनामक असून तोहि रणमक व धातकी या नावांच्या आपल्या दोन पुत्रांना खंडांचे अधिपती नेमून,आपण आपल्या वडीलभावांप्रमाणे ईश्वराधनामध्ये तत्पर होऊन राहिला आहे.||३१|| भावार्थः-----त्या खंडातील पुरुष ब्रहमसालोक्यादिकांना साधनभूत अशा कर्माने ब्रहमदेवस्वरूपी भगवंताचे आराधन करितात आणि असे स्तवन करितात की,--------------------||३२|| भावार्थः-----कर्मफलरूप,ब्रहमप्राप्ति करून देणाऱ्या ब्रह्माचेठिकाणी निष्ठा असणाऱ्या,अद्वितीय आणि शांत अशा ज्या स्वरूपाचे लोक पूजन करितात त्या भगवंताला आमचा नमस्कार असो.||३३|| भावार्थः-----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षित राजा,त्या गोडपाण्याच्या समुद्राच्या पलीकडे,सभोवार सूर्यप्रकाशयुक्त व सूर्यप्रकाशरहित असलेल्या दोन्ही प्रदेशांचा विभाग करण्याकरितां त्या दोन्ही लोकालोकनामक पर्वत ईश्वराने स्थापन केला आहे.||३४|| भावार्थः---हे राजा,मानसोत्तरपर्वत व मेरुपर्वत यांच्यामध्ये जितके अंतर(एककोटी सत्तावन लक्ष पन्नास हजार योजने आहे)तितकी भूमि शुद्धोदसमुद्रापलीकडे आहे.हिच्यावर प्राणी राहतात,पण हिच्या पलीकडे लोकालोकपर्वताजवळ दुसरी आठ कोटी एकूण चाळीस गुळगुळीत व चकचकीत भूमि आहे तिच्यावर मात्र पडलेला पदार्थ,पुन्हा कधीही प्राप्त होत नाही कारण,ती देवावांचून इतर सर्व प्राण्यांचा प्रवेश होण्यास अशक्य आहे.||३५|| भावार्थः-----लोकमय प्रदेश आणि अलोकमय प्रदेश ह्या दोन्हांचा सांधा जेथे मिळाला आहे तेथे हा पर्वत आहे म्हणून याला लोकालोक असे नाव पडले आहे.||३६|| भावार्थः-----तो पर्वत त्रैलोक्याच्या बाहेर सभोवती परमेश्वराने स्थापन केला आहे त्याची उंची व विस्तार इतका आहे की,सूर्यापासून श्रुवापर्यंत सर्व ज्योतीर्गनांचे,त्या पर्वतांच्या अलीकडच्या त्रैलोक्याच्या प्रकाश करणारे किरण,कधीही त्या पर्वताच्या पलीकडे जाण्यास समर्थ होत नाहीत.||३७|| भावार्थः-----याप्रमाणे परिणामे,लक्षणे व रचना हयासहवर्तमान व्यासादी कवींनी विचारपूर्वक निश्चित केलेला लोकविस्तार इतकाच आहे म्हणजे तो लोकविस्तार पन्नास कोटी योजने आहे त्या गणलेल्या भूगोलाचा चवथा भाग म्हणजे साडेबाराकोटी योजने हा लोकालोक पर्वत आहे.||३८|| भावार्थः-----त्या पर्वतावर चार दिशाकडे सर्वजगाचा गुरु अशा ब्रहमदेवाने ऋषभ,पुष्कर,वामन आणि अपराजीत असे चार गजेंद्र स्थापन केले आहेत ते सर्वलोकाना स्थिरपणे धरण करण्यास कारण आहेत.||३९|| भावार्थः-----त्या दिग्जाजांचे व आपल्या अंशभूत इंद्रादी लोकपालाचे अनेकप्रकारचे सामर्थ्य वाढविण्यासाठी आणि सर्वलोकाच्या कल्याणासाठी,सुद्र्श्नादिक आपल्या श्रेष्ठ आयुधांनी सुभोषित अशा बाहुदंडाणी युक्त,परमऐश्वर्याचा अधिपती,विष्वकसेनादिक आपल्या मुख्य मुख्य पार्श्दानी आणि धर्म,ज्ञान,वैराग्याध ऐश्वर्य व अष्ठमहासिद्धी या लक्षणांनी युक्त असे आपले शुद्धसत्वानामक स्वरूप धाणार करणारा असा महापुरुषरुपी सर्वांतरयामी जो भगवान,तो त्या लोकालोक पर्वतावर निरंतर चहूकडे फिरत असतो.||४०|| भावार्थः-----हे राजा,चहूकडे फिरत असतो याचा अर्थ इतकाच कि,आपल्या योगमायेने रचलेल्या अनेक प्रकारच्या लोकयात्रेचे रक्षण करण्याकरिताच ह्या भगवंताने अशा प्रकारचा एक वेश कल्पसमाप्तीपर्यंत स्वीकारलेल्या आहे.||४१|| भावार्थ:-----हा जो लोकालोकपर्वताच्या आतील भूमीचा मेरूपर्वताच्या एका बाजूने साडेबाराकोटी योजने विस्तार सांगितला आहे त्यावरून लोकालोकपर्वताच्या बाहेर ब्रहमकटाहापर्वत असलेले जे अलोकभागाचे प्रमाण तेही सांगितल्यासारखेच आहे त्याच्या पलीकडे शुध्द अशी योगेश्वराचीच मात्र गती आहे असे म्हणतात ती गतीब्राहमणाचा मरण पावलेला पुत्र परत आणतेवेळी श्रीकृष्णाने अर्जुनास दाखविली होती.||४२|| भावार्थ:----एतावता स्वर्ग आणि भूमी ह्या दोहोचा जो मध्यभाग तो ब्रह्मंडचा मध्यभाग होय,तेथे सूर्य असतो.सूर्याच्या आणि ब्रह्मंडच्यागोलाच्यामध्ये सर्वबाजुनी ब्रह्मांड पंचवीस-पंचवीस कोटी योजने आहे.||४३|| भावार्थ:----तो सूर्य ह्या मृत(अचेतन,जड अंडामध्ये झाला म्हणून त्याचे नाव मार्तंड असे पडले आहे,तसाच तो पुष्कळ प्रकाशयुक्त अशा ब्रह्मांडापासून उत्पन्न झाला म्हणून ह्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात.||४४|| भावार्थ:----दिशा,आकस,स्वर्ग,पृथ्वी,दुसरेही अनेक विभाग,स्वर्ग,मोक्ष,नरक आणि पाताळांतील स्थाने हि सर्व सुर्यानेच विभाग पाडीलेली आहेत.||४५|| | देवतिर्य ङमनुष्याणां सरीसृपसहा वीरूधाम् | सर्वजीवनिकायानां सूर्य आत्मा दृगीश्र्वर: ||४६|| भावार्थ:----म्हणून सूर्य हा,देव तीर्ग्ययोनी,मनुष्य,सर्प,ओषधी व सर्व जीवांचे समुदाय या सर्वांचा आत्मा असून चक्षुइंद्रियाची अधिष्ठाती देवताही तोच आहे.||४६|| २०-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानातील पंचम(५)स्कंधामध्ये द्वीपादिवर्णरूप हा विसावा(२०)अध्याय छेचाळीस(४६)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||२०|| | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ २१----त्यांत या एकविसाव्या अध्यायामध्ये कालचक्राने प्रतिदिवशी भ्रमण पावणाऱ्या सूर्याच्या मेशादिराशीचे उल्लंघन होवून अंतरीक्षलोकाचेठिकाणी घडणाऱ्या गतीच्या योगाने लोकत्रयेचा प्रकार वर्णन केला आहे.||२०|| |२१--- सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन ________________________________________________________________________________________ | एतावानेव भूवलयस्य संनिवेश: | प्रमाण-लक्षणतो व्याख्याता: ||१|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,या भूमंडळाची विस्ताराने पन्नासयोजने व उंचीने पंचवीस कोटीयोजने इतकीच प्रमाण व लक्षपूर्वक रचना सांगितली आहे.||१|| भावार्थ:----या पन्नास कोटी योजनात्मक प्रमाणाने स्वर्गलोकाच्या मंडळाचेप्रमाण,प्रमाणवत्ते पुरुषद्व जसे पावटे वगैरने धान्याच्या द्विदलापैकी एकाचे मान सांगितले म्हणजे दुसऱ्याचे मान सांगितल्यासारखे होते त्याचप्रमाणे उपदेश करितात.असो. भूगोल आणि खगोल यांच्यामध्ये त्या उभयंतानाही संलग्न असे आकाश आहे.||२|| भावार्थ:----त्या आकाशामध्ये असलेला ज्योतिर्गनाचा अधिपती भगवान सूर्य आहे,तो आपल्या तापाने त्रैलोक्याला तप्त करितो आणि आपल्या प्रकाशाने प्रकाशित करितो तोच हा सूर्य,उत्तरायण,दक्षिणायन आणि वैषुवत या नावांच्या मंद,शीघ्र आणि मध्यम गतीनी चढण,उतरण व सपाटी ह्या स्थानाचेठिकाणी त्यात्या काळी गमन करीत असता,मकरादिक राशीचेठिकाणी संचार करीत असता,दिवस रात्रींना मोठी लहान व सारखी करितो.||३|| भावार्थ:----जेव्हा मेष आणि तुला ह्या राशीवर सूर्य असतो तेव्हा दिवस व रात्री सारख्या असतात आणि जेव्हा वृषभादिक पांच राशीचे ठिकाणी संचार करितो तेव्हा दिवसच वाढत जातात आणि रात्रीचेठींकानी प्रत्येक महिन्यामध्ये एकेक घटिका कमी कमी होत जाते.||४|| भावार्थ:----जेव्हा वृश्चिकादिक पांच राशीवर सूर्य असतो तेव्हा रात्री मोठ्या मोठ्या होवून दिवस लहान लहान होतात.||५|| भावार्थ:----दक्षिणायन प्राप्त होईपर्यंत(उत्तरायणामध्ये)दिवस वाढतात आणि उत्तरायनापर्यंत(दक्षिणायणामध्ये)रात्री वाढतात.||६|| भावार्थ:----याप्रमाणे मेरुपर्वताच्या सभेवार मानसोत्तरपर्वतावर सूर्याची प्रदिक्षणा होण्याची लांबी नऊ कोटी एकावनलक्ष योजने आहे असे ज्ञानी सांगतात त्या मानसोत्तरपर्वतावर मेरूच्या पूर्वेस इंद्राची देवधानीनामक नगरी आहे,दक्षिणेस यमाची संयमनीनामक आहे,पश्चिमेस वरुणाची निम्लोचनीनामक आणि उत्तरेस सोमाची विभावरीनामक आहे.त्या चार नगऱ्याचेठिकाणी कालविशेषेकरून प्राणीमात्राची कर्मादिकाचेठीकानी प्रवृत्ती व निवृत्ती होण्यास कारण अशी सूर्याची उदय,मध्यान्ह,अस्तमान आणि मध्यरात्र हि मेरूच्या चारी दिशाकडे होतात.||७|| भावार्थः---मेरुपर्वतावर असणाऱ्या लोकांना सूर्य,निरंतर दिवसाच्या मध्यभागीच राहून प्रकाश करितो आणि अश्विन्यादि नक्षत्राभिमुख चालत असल्यामुळे मेरुला डावा घालून जात असतो परंतु प्रदक्षिणाकार फिरणाऱ्या प्रवहनामक वायुने फिरविलेल्या ज्योतिश्चक्राच्या योगाने तो मेरुला प्रदक्षिणा करीत आहे असे दिसते.||८|| भावार्थः----ज्या स्थानी सूर्याचा उदय होतो त्याच्या समोर शंकूच्या सरळरेषेत सूत्र धरले असतां ते ज्या दिशेकडील प्रदेशांत पडेल तेथे तो अस्तमान पावतो आणि जेथे ती लोकांनी घाम उत्पन्न करून ताप देत असता म्हणजे मध्यान्ही असतो त्याच्या समोर सरळरेषेत असलेल्या दिशेमध्ये तो गेला म्हणजे तो लोकांना निजवितो म्हणजे मध्यरात्र करितो.कारण,ज्यांनी पूर्वी उदय अस्तमान इत्यादिक अवस्थेमध्ये सूर्याला पाहिले होते तेच पुरुष त्या(मध्यरात्रीच्या) स्थळाचेठिकाणी असणाऱ्या सूर्याला पाहत नाहीत.||९|| भावार्थ:----जेव्हा सूर्य इंद्राच्या नगरीपासून यमपुरीकडे जावू लागतो तेव्हा पंधरा घटीकानी सवादोन कोट आणि साडेबारा लक्षापेक्षा काही अधिक इतकी योजने जातो.||१०|| भावार्थ:----याप्रमाणेच पुढे वरून-पुडीकडे,तेथून इंद्र्पुरीकडे तितक्या घटिकानी तितकी योजने जातो.तसेच चंद्रादिक दुसरे ग्रहही जोतीश्चचक्राचे ठिकाणी नक्षत्रगणासहवर्तमान उदय पावतात व अस्त पावतात.||११|| भावार्थः-----एतावससा एका मुहूर्तामध्ये चवतीस लक्ष आणि आठशेपेक्षा कांही अधिक योजने सूर्याचा हा वेदमय,रथ,चार नगऱ्यांचेठिकाणी संचार करीत असतो.||१२|| भावार्थः----त्या रथाला,संवत्सरूप एक चक्र असून ते मासरूप बारा अऱ्यांनी ऋतूरूप सहा धांवांनी आणि चातुर्मास्यरूप तीन मध्यमण्यांनी युक्त आहे असे वर्णन करितात.त्या रथाला आसांचे एक टोक मेरूपर्वताच्या मस्तकी ठेवलेले असून दुसरे टोक मानसोत्तरपर्वतावर वायूबद्ध भूमीचेठिकाणी ठेवलेले आहे.ज्या आसांमध्ये ओवलेले सूर्याच्या रथाचे चक्र,तेलाच्या यंत्रचक्राप्रमाणे मेरुच्या सभोवार फिरत असून मानसोत्तरपर्वतावर फिरत असते.||१३|| भावार्थः----त्याच आसांवर छिद्र पाडून एक टोक बसविलेला दुसरा एक आसा आहे तो एक टोक सत्तावनलक्ष पन्नास हजार योजने असलेल्या पहिल्या त्या आसांच्या एकचतुर्थाशाइतका म्हणजे एकूणचाळीस लख सदतीस हजार पांचशे योजने असून त्याचे दुसरे टोक वायूपाशाने ध्रुवमंडळावर बांधलेले आहे.||१४|| भावार्थः----सूर्याच्या रथांतील बसण्याची जागा तर छत्तीस लक्ष योजने लांब असून नऊ लक्ष योजने रुंद आहे त्या सूर्यरथाचे जुखउ (जूं)हि नऊ लक्ष योजने लांब आहे.त्या ठिकाणी अरुणसारथ्याने योजिलेले गायत्र्यादी छंदोनामक सात घोडे आहेत,ते सूर्यदेवाला वाहतात.||१५|| भावार्थः----सारथ्यकर्माचे ठिकाणी योजिलेला तो अरुण,पूर्वाभिमुख बसलेल्या सूर्याच्या पुढे पश्चिमाभिमुख म्हणजे सूर्याकडे तोंड करून बसला आहे.||१६|| भावार्थः----त्याचप्रमाणे सूर्याच्या पुढे स्तुति करण्याकरितां ईश्वराने योजिलेले अंगठ्याच्या पेराएवढे साठहजार वालखिल्य ऋषि त्या सूर्याची स्तुति करीत असतात.||१७|| भावार्थः----त्याचप्रमाणे सूर्याच्या पुढे स्तुति करण्याकरीता ईश्वराने योजिलेले अंगठ्याच्या पेराएवढे साठहजार वालखिल्यऋषि त्या सूर्याची स्तुति करीत असतात.||१७|| भावार्थः----तसेच दुसरेही ऋषि,गंधर्व,अप्सरा,नाग,यक्ष,राक्षस आणि देव हे एकएकटे चवदा व दोनदोन मिळून सात गुण,प्रत्येक महिन्यामध्ये निरनिराळी नांवे धारण करीत असते,निरनिराळ्या कर्मांनी प्रत्येक महिन्यामध्ये निरनिराळी नांवे धारण करणाऱ्या सूर्याची जोडीजोडीने उपासना करितात.||१८|| | लक्षोत्तरं सार्धकोनवकोटीयोजनपरिमण्डलं भूवलयस्य क्षणेन | सगव्यूत्युत्तररं द्विसहस्त्रयोजनानि अस भुङ्क्ते ||१९|| भावार्थः----असो.मानसोत्तरपर्वतावर जे भूमंडळाच्या सभोवार घेराचे मान नऊ कोटी एकावन लक्ष योजने आहे त्यांपैकी दोन हजार योजने आणि दोन कोस,तो सूर्यनारायण एका क्षणामध्ये चालत असतो.||१९|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील (५)पंचमस्कंधामध्ये सूर्यरथमंडलवर्ण संबंधी हा(२१)एकविसावा अध्याय एकोणीस(१९)श्लोकांनी समाप्त झाला.||२१|| ________________________________________________________________________________________ २२----आतां या बाविसाव्या अध्यायामध्ये चंद्र व शुक्र इत्यादिक ग्रहांची स्थाने सांगून त्या ग्रहांच्या गतीच्या अनुसार प्राणीमात्रांना इष्टानिष्ट फले प्राप्त होतात असे वर्णन केले आहे. |२२---- भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन. | ________________________________________________________________________________________ |राजोवाच:--- | यदेतद्भगवत आदित्यस्य मेरुं ध्रुवं च प्रदक्षिणेन परिक्रामतो राशीनामभिमुखं प्रचलितं | चाप्रदक्षिणं भगवतोपवर्णितममुष्य वयं कथमनुमिमीमहीति ||१|| भावार्थः----राजा म्हणाला---हे शुकाचार्य,मेरुपर्वत व ध्रुव यांना प्रदक्षिणा करीत फिरणाऱ्या भगवान सूर्याचे,मेषादिराशीच्या समुख अप्रदक्षिणक गमन होत असे जे आपण सांगितले हे विरुध्द भासत असल्यामुळे आम्ही खरे कसे समजावे?||१|| भावार्थ:----श्री शुक्राचार्य म्हणाला----हे राजा,जशी फिरत असणाऱ्या कुंभाराच्या चक्राने फिरणाऱ्या,परंतु चक्रगतीच्या उलटगतीने चालणाऱ्या पिपीलकादिकांची गती उलटच घडते.कारण,ती पिपीलकादिक निरनिराळ्या काळी आढळतात त्याप्रमाणे ध्रुवाला व मेरुला प्रदिक्षणा घालीत भरभर फिरत असणाऱ्या नक्षत्रराशीयुक्त कालचक्रासहवर्तमान फिरणाऱ्या परंतु ध्रुवाच्या व मेरूच्या अप्रद्क्षिनिक क्रमाने असलेल्या नक्षत्राच्या व राशीच्या सन्मुख चालणाऱ्या सुर्यादिकांची गती उलटच घडते.कारण निरनिराळ्या काळी नक्षत्राचे व राशीचे ठिकाणी ते सुर्यादिक ग्रह दृष्टीस भावार्थः-----असो.वेद आणि ज्ञानीपुरुष ज्याचा तर्क करीत असतात तो हा भगवान आदिपुरुष साक्षात सूर्यनारायण,लोकांच्या कल्यानाकरितां वेदत्रयाने प्रतिपाद्य व कर्माची शुद्धी होण्यास निमित्त अशा कालस्वरूपी आपल्या स्वरूपाचे बारा विभाग करून,वसंतादिक सहा ऋतुंमध्ये कर्मभोगास योग्य अशा शितोष्णादिक धर्मास उत्पन्न करितो.||३|| भावार्थः----या मनुष्यलोकांमध्ये वर्णआश्रम आणि आचार यांना अनुसरणारे लोक,त्या सूर्यरुपी भगवंताचे वेदत्रयाने सांगितलेल्या संध्या अग्निहोत्रादि कर्माच्या योगाने इंद्रादिदेवरूपाने व ध्यानादिक योगमार्गांच्या योगाने अंतर्यामीरूपाने श्रद्धापूर्वक आराधन करीत असते अनायासाने कल्याण पावतात.||४|| भावार्थः----असो तो हा लोकांचा आत्मा सूर्य,स्वर्ग आणि भूमि ह्याच्यामध्ये आकाशमंडळात फिरत असलेल्या कालचक्रावर राहून संवत्साराचे अवयवरूप अशा मेषादिराशीरूप बारा मासांचा उपभोग घेतो.तो एकेक मास--चांद्रमानाने शुक्ल व कृष्ण या दोन पक्षांचा,पितरांच्या मानाने एक अहोरात्राचा आणि सौरमानाने सवादोन महानक्षात्रांचा असे म्हणतात.तो सूर्य,जितक्या कालाने संवत्सराचा सहावा भाग भोगतो त्या काळाला “ऋतू” असे म्हणतात हा तरी संवत्सराचा एक अवयवच होय.||५|| भावार्थः----त्या सूर्याला अर्धा आकाशमार्ग चालण्यास जितका काळ लागतो त्या काळाला “अयन” असे म्हणतात.||६|| भावार्थ:----तसेच मंद शीघ्र व समान अशा तिन्हीगतीनी भूमी व स्वर्ग यांच्या मंडळासहवर्तमान आकाशमंडळाचे पूर्णपणे उल्लंघन करण्यास त्या सुर्याला जो काळ लागतो त्याला “संवत्सर”,”पतिवत्सर”,”इडावत्सर”,”अनुवत्सर” आणि “वत्सर” अशी पांच नांवे वर्णन केली आहेत म्हणजे ज्यावर्षी शुद्धशुद्धप्रतिपदेचेठिकाणी संक्रात येते तेव्हां सौर आणि चंद्र ह्या दोन्ही मासांचा एकदम आरंभ होतो त्या वर्षाला “संवत्सर” असे म्हणतात.नंतर सौरमानाने प्रत्येक वर्षामध्ये सहासहा दिवस वाढतात व चंद्रमानाने प्रत्येक वर्षामध्ये सहासहा दिवस कमी होतात असा फरक पडतां पडतां पांच वर्षे गेल्यावर सहाव्या वर्षी पुन्हा शुक्लप्रतिपदेस संक्रांत येऊन संवत्सर येतो.मिळून दोन वर्षांना अनुक्रमाने “परिवत्सर” इत्यादिक नांवे आहेत||७|| भावार्थः----अशाप्रमाणे चंद्र,सूर्याच्या किरनाहून वर लक्षयोजनांच्या अंतरावर उपलब्ध होत असून तो सर्वांच्या पुढे व अतिजलद चालणारा असल्यामुळे सूर्याचा एकमहिन्यांत व महिन्याने होणारा राशीभोग सवादोन नक्षत्रांत व पंधरादिवसांनी होणारा भोग एकच दिवसांत भोगितो.||८|| भावार्थः----आणि शुक्लपक्ष व कृष्णपक्ष यांचेठिकाणी वृद्धिगत होणाऱ्या व क्षीण होणाऱ्या आपल्या कलांनी देवांची व पितरांची अहोरात्रे करीत असून अन्नभय असल्यामुळे सर्व जीवसमुहाचा प्राणरूप व जीवनहेतू असल्यामुळे सर्वांचा जीवरूप होत असता तीस-तीस मुहूर्तांची एकेक नक्षत्राचा उपभोग करितो.||९|| भावार्थः----जो हा इंद्रिये पंचमहाभूते व एक महीना सोळा कलांनी युक्त,मनोमय,अन्नमय आणि अमृतमय असा पुरुषरुपी भगवान चंद्र सांगितला ह्या चंद्राचा देव,पितर,मनुष्ये,भुते,पशु,पक्षी,सूर्य आणि लता यांचे प्राणरक्षण करणे व वृद्धी करणे असा स्वभाव असल्यामुळे ह्यालाच सर्वमय असे वर्णन करितात.||१०|| भावार्थः----चंद्रमंडळापासून तीन लक्ष योजने वर अभिजीन्नामक नक्षत्रासहवर्तमान आठावीस नक्षत्रे काळचक्रामध्ये ईश्वराने योजिलेली आहेत,ती मेरुच्या दक्षिणेकडून फिरत असतात.||११|| भावार्थः----त्यांच्या वरती दोनलक्ष योजने उंचीवर "शुक्र" आहे तो शीघ्र मंद आणि सम अशा तीन प्रकारच्या गतीनी सूर्याच्या पुढे,मागे अथवा बरोबर सूर्यासारखाच संचार करीत असतो,हा वृष्टी करणारा असल्यामुळे बहुधा लोकांना अनुकूलच आहे.हा केव्हा केव्हा क्रमाने पुढे आलेल्या नक्षत्रांचे उल्लंघन करू वृष्टीचा प्रतिबंध करणाऱ्या ग्रहाचा उपशम करितो असे अनुमान होते.||१२|| भावार्थः----शुक्राच्या गतीप्रमाणे बुधाचीही गती आहे परंतु तो सोमपुत्र बुध शुक्राच्या वर दोनलक्ष योजने उंच असून बहुतकरून लोकांना शुभकारक आहे.एकेवेळी तो जेव्हा सूर्याचे उल्लंघन करून पुढे दूर जातो तेव्हामात्र तो अतिशय वारा (तुफान) अश्रपाय मेघ आणि अनावृष्टी इत्यादी भये सुचवितो.||१३|| भावार्थः----त्या बुधाच्या वर मंगळहि दोनलक्ष योजने उंच आहे.तो जर वक्र-गतीचे चालला नाही तर तीन तीन पक्षांनी एकेक अशा क्रमाने बारा राशी भोगितो.तो बहुतकरून अशुभग्रह असून दुःखसूचक आहे.||१४|| भावार्थः----त्या मंगळाच्या वर दोनलक्ष योजने उंचस्थळी भगवान बृहस्पती राहतो.तो जर वक्र झाला नाही तर प्रत्येक राशीचेठिकाणी वर्षवर्षपर्यंत चालतो,तो बहुतकरून ब्राहमणकुळाला अनुकूल असतो.||१५|| भावार्थः----त्याच्यावर दोनलक्ष योजने उंच शनैश्वर आढळतो.तो मंदगति असल्यामुळे प्रत्येक राशीचेठिकाणी तीस-तीस महिने चालत असतो व तितक्या (वीस)वर्षांनी सर्वही (बारा)राशी भोगितो.तो बहुधा सर्वानाही अशुभकारक आहे.||१६|| | तत उत्तरस्मादृषय एकादशलक्षयोजनान्तर उपलभ्यन्ते य एव लोकांना शमनुभावयन्तो भगवतो | विष्णोर्यत्परमं पदं प्रदक्षिणं प्रक्रमन्ति ||१७||| भावार्थः----त्याच्यावर अकरा लक्ष योजने अंतरावर कश्यपादी सप्तर्षी आढळतात ते निरंतर लोकांचे कल्याण चिंतीत असते भगवान विष्णूच्या श्रेष्ठपदाला (आढळपदाला)प्रदक्षिणा घालीत असतात.||१७|| २२---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक पंचम(५)स्कंधामध्ये हा बाविसावा(२२) अध्याय सतरा(१७)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू|| ________________________________________________________________________________________ |२३---आता या तेविसाव्या अध्यायामध्ये,सप्तर्षीमंडळाच्या वर असलेल्या जोतीश्चक्राला आधारभूत अशा ध्रुवमंडळाचे व शिशुमारस्वरूपाने पद असे म्हणतात ते स्थान आहे. २३----- शिशुमारचक्राचे वर्णन ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | अथ तस्मात्परतस्त्रयोदशलक्षयोजनान्तरतो यत्तद्विष्णो: परमं पदमभिवदन्ति यत्र ह महाभागवतो | ध्रुव औत्तानपादिरग्निनेन्द्रेण प्रजापतिना कश्यपेन धम्रेण च समकालयुग्भि: सबहुमानं दक्षिणत: | क्रियमाण इदानीमपि कल्पजीविनामाजीव्य उपास्ते तस्येहानुभाव: उपवर्णित: ||१|| भावार्थ:----श्रीशुक्राचार्यम्हणाला----हे राजा त्या सप्तर्षीमंडळाच्या पुढे तेरा-लक्ष योजने अंतरावर ज्याला विष्णूचे "उत्तमपद" असे म्हणतात ते स्थान आहे.जेथे महाभगभ्दक्त उत्तानपादराजाचा पुत्र ध्रुव अजूनही राहत असतो.तो ध्रुव,त्याच्या बरोबरच नक्षत्ररूपाने तेथे जोडून ठेविलेल्या अग्नी,इंद्र,प्रजापती आणि कश्यप यांनी बहुमानपूर्वक प्रदिक्षणा केला जात असून,कल्पपर्यंत वाचणाऱ्या व भूलोकापासून म्ह्र्लोकापर्यंत राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचा आश्रय आहे.त्या ध्रुवाचा या मनुष्यलोकातील पराक्रम पूर्वी चतुर्थांस्कांधामध्ये मी तुला वर्णन केला आहे.||१|| भावार्थ:----तो ध्रुवच,निरंतर चालत असणाऱ्या व ज्याच्या वेग कोणालाही कळून येत नाही अशा भगवतद्रूपी कालचक्राने,गरगर फिरविलेला ग्रहणनक्षत्रादीक सर्व तेजगोलोकांच्या समूहांचा,ईश्वराने स्थापन केलेला आधारस्तंभच कि काय ! असा निरंतर प्रकाशमान होत आहे.||२|| भावार्थः----जसे शेतकऱ्याने धान्य मळण्याकरितां मेढीच्या सभोवार दांवणीवर बांधून ठेविलेले मळणीचे बैल,सकाळी,दुपारी व संध्याकाळी आपआपली क्रमस्थिती न सोडितां त्या मेढीच्या सभोवार फेऱ्या घालितात याप्रमाणे या कालचक्राचेठिकाणी त्रैलोक्याच्या आंत व बाहेर ईश्वराने योजिलेले सूर्यादी ग्रह व अश्विन्यादी नक्षत्रगण,हे धृवाचाच आश्रय करून वायुने प्रेरित होत असते कल्पपर्यंत त्याच्या सभोवार फिरत असतात,आणि जसे आकाशामध्ये वायुने प्रेरणा केलेले मेघ किंवा श्येनादिक पक्षी,आपआपल्या पंख हालवणे वगैरे कर्माच्या साह्याने फिरत असून ते खाली पडत नाहीत त्याप्रमाणे प्रकृति आणि पुरुष यांच्या संयोगामुळे अनुग्रह झालेले,ज्यांना क्रमाने गति उत्पन्न करून दिल्या आहेत व ज्यांना कर्मच सहाय आहे असे ते नक्षत्रादिक कालचक्राच्या आधाराने फिरत असून,भूमीवर पडत नाहीत.||३|| भावार्थः----कित्येक लोक,हे ज्योतिचक्र,भगवान वासुदेवाच्या योगधारणेविषयी उपयोगी पडणाऱ्या शिशुमार (मकराकार) स्वरूपाचे ठिकाणी राहिलेले आहे,असे वर्णन करितात.||४|| भावार्थः-----हा भगवंताचा शिशुमारनामक दक्षिणावर्त कुंडलाकार देह,खाली डोके व वर पुच्छ करून लांबच लांब पसरलेला आहे,त्याच्या पुच्छा ग्राच्या अधोभागी प्रजापति,अग्नी,इंद्र व धर्म हे आहेत,पुच्छाच्या मूळभागी धाता आणि विधाता हे आहेत,कमरेचेठिकाणी सप्तर्षी आहेत,जसे कुंडलाकारस्थितीने असलेल्या मगराच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंना सारख्या संख्येचे अवयव असतात त्याप्रमाणे त्या दक्षिणावर्त कुंडलाकार असलेल्या शरीरी शिशुमाराच्या उजव्या बाजूला,अभिजितापासून पुनर्वसूपर्यंत चवदा उत्तरायनक्षत्रे कल्पिलेली आहेत तशीच डाव्या बाजूलाही पुष्यापासून उत्तराषाढापर्यंत चवदा दक्षिणायन नक्षत्रे कल्पिलेली आहेत,त्याच्या पृष्ठभागी अजविथी असून उदराचेठिकाणी आकाशगंगा आहे.||५|| भावार्थः----हे राजा,पुनर्वसू आणि पुष्य हि दोन नक्षत्रे अनुक्रमाने शिशुमाराच्या डाव्या आणि कटीपरदेशी,आर्द्रा आणि आश्लेषा हि उजव्या आणि डाव्या पाठीमागच्या पायांवर,अभिजित आणि उत्तराषाधा हि उजव्या व डाव्या नाकपुड्यांवर,श्रवण व पूर्वाषाढाजी उजव्या व डाव्या डोळ्यांवर,धनिष्ठ व मूळ हि उजव्या कानांवर आणि मघादिक आठ दक्षिणा यन नक्षत्रे डाव्या बाजूच्या बरगड्यावर योजावी.तशीच मगृशीर्षापूर्वीची उत्तराभाद्रापदांपर्यंत आठ उत्तरायनक्षत्रे उजव्या बाजूच्या बरगड्यावर उलट योजावी.शततारका आणि ज्येष्ठा हि उत्तरदक्षिणयानांतील राहिलेली नक्षत्रे त्याच्या उजव्या व डाव्या खांदयावर मांडावी.||६|| भावार्थः-----त्या शिशुमाराच्या वरच्या हनुवटीवर अगस्ति,खालच्या हनुवटीवर नक्षत्ररुपी यम,मुखाचेठिकाणी मंगळ,उपस्थावर शनि,कोळ्यावर बृहस्पति,वक्षःस्थळावर सूर्य,ह्रदयाचेठिकाणी नारायण,मनांमध्ये चंद्र,नाभीवर शुक्र,स्तनांवर अश्विनीकुमार,प्राण व अपान ह्या दोहोंचेठिकाणी बुध,गळ्यामध्ये राहू,सर्व अवयवांचेठिकाणी केतू,आणि सर्व रोमांवर सर्व तारांगन आहेत.||७|| भावार्थः-----हे राजा,मनुष्याने शुचिर्भूत होऊन व मौनव्रतधारण करून,भगवान विष्णूच्या ह्या सर्वदेवतामय स्वरूपाचे प्रतीदिवशी संध्याकाळी दर्शन घ्यावे आणि त्याचे ज्योतीर्गनाचा आश्रय,कालचक्ररुपी आणि देवांचा अधिपति अशा महापुरुषाचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करितो अशा अर्थाच्या मंत्राने स्तवन करावे.||८|| | ग्रहर्क्षतारामयमाधिदैविकं पापापहं मन्त्कृतां त्रिकालम् | | नमस्यत: स्मरतो वा त्रिकालं नश्येत तत्कालजमाशु पापम् ||९|| भावार्थः----हे राजा,ग्रह-नक्षत्र-तारामय असे हे देवाधिपती विष्णूचे स्वरूप,ज्या अर्थी पूर्वोक्त मंत्राचा त्रिकाल जप करणाऱ्या पुरुषांच्या पापाचा नाश करिते त्या अर्थी जो पुरुष,ह्याला त्रिकाल नमस्कार करितो अथवा ह्याचे स्मरण करितो त्याचे त्या त्या प्रातःकालादिक तिन्ही काळी उत्पन्न होणारे पातक,तत्काळ नाश पावते.||९|| २३---याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरा.(५)पंचमस्कंधामध्ये हा (२३)तेविसावा अध्याय नऊ(९)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.|| || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचराणार्पणामस्तू || ________________________________________________________________________________________ याप्रमाणे तीन अध्यायांनी स्वर्गमर्यादांचे पालन वर्णन केले.आतां तसेच अधोलोकमर्यादांचे पालन तीन अध्यायांनी वर्णन करितात.|| २४----त्यांत या चोविसाव्या अध्यामध्ये सूर्यमंडळाच्या खाली असणाऱ्या राहूची स्थिती सांगून नंतर अनुक्रमाने अतलादिक सात बिलस्वर्गाच्या मर्यादा वर्णन केल्या आहेत.|| |२४--- राहू इत्यादींची स्थितीणि आतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच | अधस्तात्सवितुर्योजनायुते स्वर्भानुर्नुक्षत्रवच्च- रतीत्येके योsसावमरत्वं ग्रहत्वं चालभत भगवद- | नुकम्पया स्वयमसूरापसद: सैंहिकेयो ह्यतदर्हस्तस्य तात जन्मकर्माणि चोपरिष्टाद्वक्ष्याम: ||१|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----बा राजा,सूर्यमंडळापासून दहाहजार योजने खाली राहू असून तो नक्षत्राप्रमाणे संचार करीत असतो असे कोणी म्हणतात.जो हा राहू,भववत्कृपेमुळे ग्रहत्व आणि अमरत्व पावला,परंतु तो सिंहीकेचा पुत्र स्वतः दैत्यांमध्ये अधम असल्यामुळे तो दोन्ही पावण्यास योग्य नव्हता.त्याचे जन्म व कर्मे मी तुला पुढे (सहाव्या व आठव्या स्कंधामध्ये)सांगेन.||१|| भावार्थः-----हे राजा,अत्यंत ताप उत्पन्न करणाऱ्या सूर्याचे जे हे मंडळ दिसते,ते दहाहजार योजने विस्तृत आहे,चंद्राचे बाराहजार योजने आहे,आणि राहूचे तेराहजार योजने आहे असे म्हणतात.त्या राहुने पूर्वी अमृतपान करितेवेळी सूर्यचंद्राच्या मध्ये शिरून त्याना व्यवधान केले होते म्हणून त्या दोघांनी ती गोष्ट विष्णूला कळविली.ते वैर मनांत धरून तो राहू,अद्यापि अमावस्या किंववा पूर्णिमा यांचेठिकाणी सूर्यचंद्राचा पराभव करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावतो.||२|| भावार्थः-----ते जाणून भगवंताने सूर्याच्या व चंद्राच्या रक्षणाकरीता आपले सुदर्शननामक प्रिय अस्त्र योजून ठेविले आहे,ते सहन करण्यास अशक्य असून वारंवार चंद्रसूर्याभोवती फिरत असते.त्याला पाहून,चंद्रसूर्यासमोर थोडावेळपर्यंत उभा राहणारा तो राहू,त्या चक्राच्या तेजाने भय पावोन ह्रदयामध्ये चकित होतो आणि दुरूनच निवृत्त होतो.त्या चंद्रसूर्यांच्या आड राहूच्या येण्यालाच लोक ग्रहण असे म्हणतात.त्यांतही त्या राहूच्या सरळ किंववा वक्रस्थितीने सर्वग्रास म्हणतात परंतु वस्तुतः राहू दूर असल्यामुळे ग्रास मुळीच होत नाही,||३|| भावार्थः----त्या राहूच्या खाली दहाहजार योजनावर सिद्ध,चारण व विद्याधर यांची स्थाने आहेत.||४|| भावार्थः---त्यांच्या खाली,यक्ष,राक्षस,पिशाच प्रेत व भूतगण,यांचे खेळण्याचे आंगणच असे आकाश आहे,त्याची मर्यादा जो पर्यंत वायू वाहतो व मेघ उपलब्ध होतात तेथपर्यंत आहे.||५|| भावार्थः----त्याच्याखाली शंभर योजने अंतरावर हि पृथ्वी आहे ती जोपर्यंत हंस,भास,ससाणे,गरुड इत्यादिक मोठमोठाले पक्षी उड्डाण करितात तेथपर्यंत होय.||६|| भावार्थः---हे राजा,भूमीची रचना कशी आहे ते तुला मी पूर्वीच सांगितले आहे,भूमिच्याही खाली सात भुविवरे एकाखाली एक अशी दहादहा हजार योजने अंतरावर आहेत त्यांचा विस्तार ब्रह्मंडच्याकटाहाच्या विस्ताराइतक्या आहे.त्यांची नावे--अतल, वीतल,सुटल,महातल,रसातळ आणि पाताल हि होत.||७|| भावार्थ:----हे राजा,स्वर्गापेक्षाहि अधिक असलेल्या कामभोग,ऐश्वर्यानंद आणि संपत्तीच्या योगाने ज्यातील मंदिरे,उपवने व विहारस्थळे भरून गेली आहेत अशा त्या बिलस्वर्गाचेठिकाणी,ज्यांची स्त्रीया,मुले,बंधू,मित्र व सेवक,हि नित्य आनंदी व प्रेम करणारी आहेत व ज्यांच्या इच्छा ईश्वरापासून भग्न होत नाहीत,असे मायेच्या योगाने विहार करणारे दैत्य,दानव व सर्प हे घरधनी वास करितात.||८|| भावार्थ:----हे महाराज,ज्या बिलस्वर्गाचेठिकाणी,मायावी अशा मयासुराने निर्माण केलेल्या नगऱ्या नानाप्रकारच्या श्रेष्ठ रत्नांनी बांधलेली चित्रविचित्र गृह,कोट,वेशी,सभाआंगनी,देवालये,व मंदिरे इत्यादिकांनी आणि नाग,आसुर व जोडयांनी राहणाऱ्या पारवे,राघु व साळुंक्या यांनी गजबजून गेलेल्या उवनांनी कृत्रिम भूमिनी आणि विवराधीपतीच्या उत्तम गृहानी अलंकृत होत असता शोभत असतात.||९|| भावार्थ:----आणि तेथील उपवनेहि,मनाला व इंद्रियांना अत्यंत आनंद देणाऱ्या पुष्पाच्या व फळांच्या घोषांनी आणि सुंदर पल्लवाणी ज्यांच्या समोर मनोहर खांद्या लवलेल्या आहेत व ज्यांना वल्लिनी आपल्या अवयवाणी आलिंगन केले आहे अश्या वृक्षाच्या शोभानी,त्याप्रमाणेच स्वच्छ उदकाने भरलेल्या व ज्यामध्ये चक्रवाक्रादिक अनेक पक्ष्यांची जोडपी वास करीत आहेत, अशा सरोवराच्या शोभानी,आणि सुसरीच्या समुदायांच्या चालण्याने खवळलेल्या पाण्यात असलेल्या कुमुडे,कुवलये,कल्हारे,नीलोत्पले कमले, व तांबडी शंभर पानांची कमले यांच्या समूहात कोटी करून राहिलेल्या पक्ष्याच्या सतत क्रीडेमुळे एकसारख्या चाललेल्या नानाप्रकारच्या मधुर शब्दादिकांनी जे इंद्रियाचे संतोष त्यांच्या योगाने,ती उपवने,देवलोकींशोभेपेक्षाही अतिशये करून शोभत असतात.||१०|| भावार्थ:----तेथे सुर्यादिक ग्रह नसल्यामुळे दिवस रात्र वर्ष इत्यादिक काळाच्या विभागणी उद्भवणारे भय मुळींच दिसून येत नाही.||११|| भावार्थ:----तेथे श्रेष्ठ श्रेष्ठ महाभूजगांच्या मस्तकावरील मनी सर्व अंधकाराचा नाश करीत असतात.||१२|| भावार्थ:-----या बिलस्वर्गाचेठीकानी वास करणारे लोक,दिव्य ओषधीचे रस व रसायने याचेच अन्नपान व स्नानादिक करितात म्हणून त्यांना,चिंता,व्याधी,अंगास वळ्या पडणे,केस पिकने म्हातारपण,देह निजेस्त होणे,दुर्गंधी,घाम,श्रम,व ग्लानी इत्यादी वयनिमित्तक अवस्था प्राप्त होत नाहीत.||१३|| भावार्थः---त्या पुण्यवंताना,भगवंताच्या चक्रसंज्ञक तेजाशिवाय दुसऱ्या कशापासूनहि मृत्यू प्राप्त होत नाही. ||१४|| भावार्थ:----ते भगवंताचे चक्र्रूप तेजमात्र तेथे प्रविष्ठ झाले असता त्या असुरस्त्रियाचे गर्भ ह्यामुळे स्त्रवतात किंवा पतन पावतात.||१५|| भावार्थ:-----असो.अतलवाच्या बिलस्वर्गात मयासुराचा पुत्र बलनामक दैत्य राहतो.त्याने या लोकी पूर्वी शाण्णवप्रकारच्या माया निर्माण केल्या होत्या,त्यापैकी काही माया(कपटविद्या)अजूनही कोणी मायावी दैत्य धरण करितात.एकेवेळी त्या बलासुराने जांभई दिली त्या वेळी त्याच्या मुखापासून स्वैरिणी(स्ववर्णाशी रत होणाऱ्या)कामिनी(इतर वर्णाशी रत होणाऱ्या)आणि पुंश्वली(अति चंचल स्वभावाच्या)अशा तीन प्रकारच्या स्त्रियाचे गण उत्पन्न झाले.त्या स्त्रिया त्या बिलस्थानामध्ये प्रवेश केलेल्या पुरुषाला,तेथे हाटक नावाचा एकप्रकारचा रस आहे तो पाजून संभोग करण्याविषयी समर्थ करून घेतात आणि आपले विलासयुक्त अवलोकन,प्रेमळ,प्रवेश हास्य,गुह्य,भाषण व आलिंगन इत्यादिकांच्या योगेकरून त्यांच्याशी आपण यथेष्टपणे रममान होवून त्यालाही रमवितात.त्या हाटकरसाचे सामर्थ्य असे की,तो सेवन केला असता पुरुष,आपणाला दहाहजार मोठाल्या हत्तीइतक्या शक्ती मानीत असता,मंदाध झाल्यासारखा मी ईश्वर आहे,मी सिध्द आहे,असे मानून वल्गना करितो.||१६|| भावार्थ:-----त्याच्याखाली वीतलनामक विवरामध्ये सर्वदु:खे हरन करणारा हटकेश्वरनामक भगवान शंकर,आपल्या पार्षद संज्ञक भूतगणना बरोबर घेवून ब्रहमदेवाच्या सृष्टीची वृद्धी करण्यासाठी भवानिसह संभोग करीत राहिला आहे.त्या भवानीशंकराच्या वीर्यापासून हाटकीनामक एक मोठी नदी उत्पन्न झाली आहे.तेथे वायूच्या योगाने प्रज्वलित झालेला अग्नी,आपल्या बलाने ते वीर्य प्राशन करितो(आटवितो).त्याने आटवून टाकीलेले ते वीर्य हाटकनावाचे सुवर्ण होते.ते सुवर्ण,दैत्याधिपतीच्या अंतःपुरातील स्त्रियां व पुरुष,अलंकाररूपाने करितात.||१७|| भावार्थः---त्या वितलाच्या खाली सुतलामध्ये,पूर्वी इंद्राचे प्रिय करण्याची इच्छा करणाऱ्या भगवंताने अदितीपासून अवतार धारण करून,बटूवामन,(ब्रहमचारी)रूपाने ज्याचे त्रेलोक्य हरण केले आहे परंतु पुन्हा भगवंताच्या कृपेनेच ज्याचा त्या सुतलामध्ये प्रवेश करविला आहे तो उदारकीर्ती पुण्यश्लोक,विरोचनाचा पुत्र बळीराजा,इंद्रदिलोकपालानाही प्राप्त न झालेल्या अतिसमृध्ह संपत्तीने युक्त होत असता,स्वधर्माच्या योगाने आराधन करण्यास योग्य अशा त्याच भगवंताने आराधन करीत अजूनही निर्भयपने राहिला आहे.||१८|| भावार्थ:----हे राजा,बलीराजासुद्धा सुतलाचे जे राज्य प्राप्त झाले हे त्याने केलेल्या भूमिदानाचे फळ आहे असे कोणी म्हणत असतील तर,भूमीच्या एका बिलस्थानातील जे ऐश्वर्य प्राप्त झाले हे भूमिदानाचे फळ होतच नाही,कारण,सर्व जीवसमुदायाच्या जीवभूत व आत्मभूत असा जो अतिपवित्र परमात्मा वासुदेव,ते पत्र प्राप्त झाले असता,परमश्रद्धेने,अत्यंत आदरपूर्वक, समाधानयुक्त अंत:करणाने,इच्छानुसार अर्पण केलेल्या साक्षात मोक्षाचे द्वारच अशा भूमिदानाचे फळ ते कसे होईल?होणारच नाही.||१९|| भावार्थ:----कर्म,शिंक येणे,पडणे,व अडखलने,इत्यादी संकटाचेठिकाणी,न कळतही एकवारसुद्धा ज्याच्या नावाच्या उच्चार करणारा पुरुष,ज्या कर्मबंधाच्या निवृत्तीसाठी मुमुक्षु पुरुष,सांख्ययोगादी साधनांचे अनेक क्लेश भोगितात त्या कर्मबंधाचा सहज त्याग करितो त्या सर्वभक्तांना आत्मस्वरूप देणाऱ्या व ज्ञानीजणांना ज्ञान देणाऱ्या भगवंताचेठिकाणी आत्मत्वेकरून अर्पण केलेल्या भूमिदानाचे ते फळ देणार नाही,ज्याच्या नावाचा उच्चार करणारा पुरुष,ज्या कर्मबंधाच्या निवृत्तीसाठी मुमुक्षु पुरुष,सांख्य-- योगादी साधनांचे अनेक क्लेश भोगवितात त्या कर्मबंधाचा सहज त्याग करितो त्या सर्व भक्तांना आत्मस्वरूप देणाऱ्या व ज्ञानीजणांच्या ज्ञान देणाऱ्या भगवंताचेठिकाणी आत्मत्वेकरून अर्पण केलेल्या भूमिदानाचे ते फळ देणार नाही.||२०||२१|| भावार्थ:-----आणि भगवंताने तरी या बळीला जे पुनः ईश्वराच्या स्मरणाचा नाश करणारे मायामय भोगांचे ऐश्वर्य दिले हा काही खरोखर त्याच्यावर अनुग्रह केला असे म्हणता येत नाही.||२२|| भावार्थ:----केवढी त्या बलीची एकनिष्ठा भक्ति!अरे!ज्याला दुसरा उपाय मिळालाच नाही अशा भगवंताने,याचनेचे मिषाने ज्या बळीचे शरीरमात्र अवशेष ठेवून बाकीचे सर्व त्रैलोक्य हरण केले आहे,ज्याला मंत्रमय वरूनपाशांनी बंधन केले आहे आणि ज्याला पर्वताच्या गुहेमध्ये प्रतिबंधात ठेविले आहे अशा अशाही त्या बळीचे सर्वत्र प्रसिध्द असे भाषण आहे की,--------||२३|| भावार्थ:-----अहो,ज्याने प्रत्यक्ष बृहस्पतीला मसलतीकरिता एकांत भक्तीने सहाय नेमिले आहे,तो हा इंद्र,दृष्ट्या विद्वान असूनही ईश्वरप्रप्तीरूप स्वार्थांविषयी खरोखर निपुण नाही कारण,त्याने ईश्वरप्राप्तीरूप आपला स्वार्थ सोडून,प्रसन्न असलेल्या विष्णूच्या द्वाराने माझ्याजवळ त्रैलोक्यातील विषयभोगच मागितले,त्या भगवंताजवळ त्यांचे दास्य मागितले नाही?हे अगदी अनुचित केले.कारण,ज्याचा वेग अतिगंभीर आहे अश्या काळाचे एक मन्वंतर होताच उलथून पडणाऱ्या ह्या त्रैलोक्याची भगवंताच्या दश्यापुढे कथा काय?||२४|| भावार्थ:----आमचा आजा (प्रल्हाद)तर स्वार्थाविषयी मोठा निपुण होता त्याने आपला पिता(हिरण्यकशिपू)मरण पावला असता,प्रत्यक्ष भगवान आपण होवून पित्याचे राज्यपद आपणास देत पुरुष अनुसरण्याची इच्छा करणार नाही.||२६|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,ज्यांचे अंत:करण स्वभक्ताविषयी सद्य आहे आणि ज्याने दिग्विजयाविषयी निघालेला रावण,बळीच्या द्वारामध्ये प्रवेश करीत असतां त्याला आपल्या पायांच्या अंगठ्याने दहाकोटी योजने दूर उडवून दिले,तो षड्गुणैश्वर्य संपन्न सर्व जगताचा गुरु प्रत्यक्ष नारायण,हातामध्ये गदा घेवून ज्याच्या द्वारामध्ये उभा राहिला आहे त्या बळीराजाचे चरित्र मी तुला पुढे अष्टस्कंधामध्ये विस्ताराने वर्णन करीन.||२७|| भावार्थ:----त्या सुतलाच्या खाली तलातलामध्ये,त्रैलोक्याचे कल्याण करण्याची इच्छा करणाऱ्या भगवान शंकराने,ज्याची तिन्ही पुरे दग्ध करून टाकिली आहेत परंतु पुन्हा त्या महादेवाच्याच प्रसादाने ज्याला ते स्थान मिळाले आहे व महादेवाने ज्याचे चारीकडून रक्षण केले असल्यामुळे सुदर्शनचक्रादिपासूनहि ज्याला मुळीच भय राहिले नाही असा मायावी लोकांचा परम गुरु त्रीपुराधीपती मयासुरनावाच्या दैत्यराजा,तेथील लोकांनी पूज्य होत असता वास करीत आहे.||२८|| भावार्थ:-----त्याच्या खाली महातलामध्ये,कश्यपाच्या कद्रूनामक स्त्रीपासून झालेल्या अनेक फड्यांच्या सर्पाच्या क्रोधवशनामक एक गण राहत असतो त्यातील कुहक,तक्षक कालिय इत्यादिक अतिदीर्घ व स्थूल देह धारण करणारे सर्प,श्रीहरीचे वाहन अशा पक्षीराजाधीपती गरुडापासून निरंतर भय पावत असते,क्वचित्प्रसंगी आपले पुत्र,स्त्रिया,सुऱ्ह्त कुटुंब ह्यांच्या संगतीने उन्मत होवून क्रीडा करीत असतात.||२९|| भावार्थ:----त्याच्या खाली रसातलमध्ये,दितीचे व दनुचे पुत्र,पनिनामक निवातकवच हिरण्यपुरवाशी व कालेय हे वास करीत असतात,हे उत्पत्तीचे महापराक्रमी,व महासाह्स कर्म करणारे देवांचे शत्रू आहेत.दनुचे पुत्र,पणीनामक निवातकवच,हिरण्यपूरवासी व कालेय हे वास करीत असतात हे उत्पत्तीनेच महापराक्रमी,व महासाहस कर्म करणारे देवांचे शत्रू आहेत.हे ज्याचा पराक्रम सर्व लोकांचेठिकाणी प्रसिद्ध आहे अशा श्रीहरीच्याच तेजाने (सुदर्शनाने)ज्यांचा वीर्यसंबंधी मद नष्ट झाला आहे असे होत असते,सर्पांसारखे लपूनछपून राहत असून सरमानामक इंद्रदूतीने त्यांच्याशी संधि(तह)करण्याची इच्छा न दर्शविता इंद्राची स्तुती करून तुम्ही इंद्राच्या हातून मरण पावाल अशा अर्थाच्या मंत्ररूप वाणीने शाप दिल्यामुळे ते इंद्रापासून भय पावतात.||३०|| | ततोsधरस्तात्पाताले नागलोकपतयो वासुकि- प्रमुखा: शंखकुलिकमहाशंखश्र्वेतधनंजय- | धृतराष्ट्रशंखचूडकम्बलाश्र्वतरदेवदत्तादयो महा-भोगिनो महामर्षा नैवसन्ति येषामु ह वै पञ्चसप्त- | दशशतसहस्त्रशीर्षाणां फणासु विरचिता महामणयो रेचिष्णव: पातालविवरतिमिरनिकर्म स्वरोचिषा विधमन्ति ||३१|| भावार्थः-----त्याच्याखाली पाताळाचेठिकाणी,ज्यांमध्ये वासुकीप्रमुख मोठमोठाले देह धारण करणारे आणि ज्यांना फारच क्रोध आहे असे शंख,कुलिक,महाशंख,श्वेत,धनंजय,शंखचूड,कंबल,अश्वतर आणि देवदत्ता इत्यादिक नागलोकाधिपती वास करितात,त्या पांच,सात,दहा शंभर किंवा हजार फड्या असलेल्या सर्पांच्या फड्यावर स्थापन केलेले तेज:पुंज महामणी,आपल्या तेजाने पातालस्थानांतील अंधकारसमूहाला दूर करितात.||३१|| २४----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील पंचम(५)स्कंधामध्ये सप्तपाताळ मर्यादानिरुपणनामक हा चोविसावा(२४)अध्याय एकतीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पनमस्तु|| ||श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू || ________________________________________________________________________________________ |२५---आता पंचविसाव्या अध्यायामध्ये ह्या सर्व त्रैलोक्याचा,प्रलयकाळी संहार करण्याची इच्छा करणाऱ्या ज्यापासून रुद्राची उत्पत्ती होते त्या पाताळाचेखाली असणाऱ्या शेषाची स्थिती वर्णन केली आहे.|| |२५--- श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती ________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | तस्य मूलदेशे त्रिंशद्दोजनसहस्त्रान्तर आस्ते या वै कला भागवतस्तामसी समाख्याताsनन्त इति | सात्वतीया द्रष्टुदृश्ययो: संकर्षणमहमित्यभिमान- लक्षणं यं संकर्षणमित्याचक्षते ||१|| भावार्थः-----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,त्या पाताळलोकाच्या मूळदेशी तीसहजार योजने अंतरावर अनंत ह्या नावाने प्रसिद्ध अशी भगवंताची तामसी मूर्ती असते.सात्वततंत्राचेठिकाणी निष्ठा धारण करणारे भक्तजन चतुर्व्यूहोयासनेमध्ये,ज्याचे हा मी असे अभिमानरूप लक्षण आणि आणि ज्याच्या योगाने द्रष्टा आणि दृश्य या दोहोंचे एकीकरण,होते म्हणून त्याला "संकर्षण" असे म्हणतात.||१|| भावार्थः----हजार मस्तकांनी युक्त अशा ज्या अनंत मूर्ति भगवंताच्या एकाच मस्तकाचेठिकाणी धारण केलेले हे भूमंडल,मोहरीप्रमाणे दिसत असते.||२|| भावार्थः----प्रलयकाळाचेठिकाणी ह्या जगाचा उपसंहार करण्याची इच्छा करणाऱ्या ज्याच्या क्रोधाने वक्र केलेल्या,सुंदर व भ्रमण पावणाऱ्या ज्या दोन भृकुटी त्यांच्यामधून,अकरा प्रकारच्या मूर्तीभेदाने युक्त व तीन अग्रांचे शूल उभारून बाहेर पडतो.||३|| भावार्थः-----ज्याच्या चरणकमलद्वावरील आरक्तवर्ण व निर्मळ अशा नखरूप रत्नसमूहांच्या मंडळामध्ये,श्रेष्ठ भक्तांसहवर्तमान एक निष्ठभक्तीच्या योगाने प्रणाम करणारे सर्पाचे अधिपती,प्रसन्नचित्ता होऊन,सभोवती स्फुरण पावणाऱ्या कुंडलाच्या कांतीने भूषित झालेल्या गालांनी युक्त अशी आपली सुंदर मुखे अवलोकन करितात.||४|| भावार्थः----विषयभोगांची इच्छा करणाऱ्या नागराजकन्या तर,ज्याच्या सुंदर शरीरमंडलावर शोभणारे,निर्मल,मोठे,पांढरे,सुभग व मनोहर असे जे भूजरूपी रुप्याचे खांब त्यांचेठिकाणी कृष्णागुरु,चंदन ह्यांच्या पंकरूप अनुलेपाची उटी लावीत असतांना,त्या भुजांच्या स्पर्शाने क्षुभित झालेल्या ह्रदयामध्ये मदनाचा प्रवेश झाल्यामुळे मनोहर व विलासयुक्त असे मंदहास्य करीत, त्याचे,प्रेमाने व मदाने आनंदित आणि जेथे मदाने धुंद,किंचित आरक्तवर्ण व कृपाकटाक्षांनी युक्त असे नेत्र ते मुखकमल,सलज्जमुद्रेने अवलोकन करितात.||५|| भावार्थः----तोच हा अनंतगुणाचा समुद्र,आदिदेव,भगवान अनंतनामक शेष,दुसऱ्याचा इत्कर्ष सहन न करणे व क्रोध या दोहोचा वेग आपले ठिकाणी आवरून धरून,लोकांच्या कल्याणासाठी तेथे राहिला आहे||६|| भावार्थ:----हे राजा,ज्याचे ध्यान,देव,दैत्य,सिध्द,गंधर्व,विध्याधर आणि मुनीचे समुदाय करीत असतात,जो निरंतर माडाच्या योगाने आनंदित असून ज्याचे डोळे फिरून गेलेले व धुंद झालेले असतात,जो आपल्या मधुर भाषणामृताच्या योगाने आपल्या पार्षदाना व देवसमुहाच्या अधिपतिना हर्षयुक्त करीत असतो,ज्याची वस्त्रे निळी आहेत,ज्याला एकच कुंडल आहे,ज्याने आपला मनोहर व सुंदर बहु,नांगरच्या पाठीवर ठेवलेला आहे व ज्याच्या लीला उदार आहेत असा तो भगवान शेष जसा इंद्राचा ऐरावत गळ्यात सुवर्णाची साखळी धारण करितो त्याप्रमाणे,जिची कांती मलिन होत नाही व जी नूतन तुळशीच्या स्वादिष्ठ मधुररसाने गुंग झालेल्या भ्रमर समूहांच्या मधुर गायनाने सुभोषित आहे अशा आपल्या वैजयंतीनामक प्रविष्ठ होवून,त्यांच्या फार प्राचीनकाळापासून कर्मवासनांनी घट्ट झालेल्या सत्वरजतमात्मक अविद्यारूप ह्र्दयग्रंथीचे तत्काळ छेदन करितो त्याच्या प्रतापांचे भगवान ब्रम्हपुत्र नारदाने तुंबूरुसहवर्तमान ब्रम्हदेवाच्या सभेमध्ये वर्णन केले आहे ते असे----------||८|| भावार्थः----ह्या जगाच्या उत्पत्तीस्थितीसंहारांना कारण असे सत्त्वादिक मायेचे गुण,ज्याच्या दृष्टिपाताने आपआपले कार्य करण्यास समर्थ झाले आणि ज्याने एकट्यानेच आपल्या स्वरूपी अनेक प्रकारच्या कार्यांनी परिपूर्ण असा हा प्रपंच धारण केला आहे ते अनादि व अनंत असे ब्रहम ज्याचे स्वरूप आहे त्या ब्रहमरूप शेषभगवंतानेच तत्त्व,हा लोक कसे बरे जाणेल? जाणणार नाही.||९|| भावार्थः----ज्याचेठिकाणी हे स्थूलसूक्ष्मात्मक जगत,प्रकाश पावते व ज्याची चरित्रे लोकांना तारणारी आहेत त्या भगवंताने आम्हांवर असलेल्या विपुल दयेने आपण शुध्दसत्वात्मक मूर्ती धारण केली आहे आणि ज्याने आपल्या भक्तजनाची मने आपणाकडे लागण्यासाठी केलेल्या निर्दोष पराक्रमाचे,सिंहाने ग्रहण केले आहे म्हणजे भगवंताचे अनंत पराक्रम पाहून त्यापैकी एखाद्या तरी पराक्रम आपले अंगी असावा असे मनात आणून सिंहाने त्यापैकी एक शौर्याचे शिक्षण घेतले आहे.म्हणून आपण--जीवानी भगवंताचे स्वरूप लक्षण जाणून अनुभव घ्यावा,कारण त्यामुळे आपले--जीवाचे जन्म-मरण निवृत्त होऊन सुखमय आहोत असा अनुभव येतो.||१०|| भावार्थ:----दुसऱ्यापासून ऐकीलेलेहि ज्याचे नाव,अकस्मात किंवा दु:खित असल्यामुळे दु:खानिवृत्तीसाठी अथवा थट्टेने महापातक्यानेसुद्धा जर उच्चारीले,तर तो शुध्द होईल हे काय सांगावे!ज्याअर्थी हा परमपवित्र भगवानच आपल्या नावाने मनुष्याचे सर्व पाप तत्काळ नाहीसे करितो त्याअर्थी त्या शेषभगवंतरूप दुसऱ्या कोणाचा रे मुमुक्षुने आश्रय कारावा?कोणाचाच करू नये.म्हणून आपण--जीवानी फक्त भगवंताचाच आश्रय करावा,कारण भगवंतच सुखस्वरूप आहे.||११|| भावार्थ:-----हे सभासद्हो,ज्या सहस्त्र मस्तकानी युक्त असलेल्या शेषाच्या एकाच मस्तकाचेठिकाणी स्वच्छेने केलेला हा पर्वत,नद्या,समुद्रआणि प्राणी ह्यासाहित भूगोल,अणुरेणुसारखा राहतो त्या अपरीमितपराक्रमाने युक्त अशा व्यापक अनंताच्या पराक्रमाची हजारजिव्हा असलेलाही कोण पुरुष गणना करील ? कोणीही करणार नाही.||१२|| भावार्थ:----असो,ज्याचा प्रभाव अचिंत्य आहे,ज्याचे पराक्रम व गुण अपरिमित आहेत,व जो जगाच्या रक्षणाकरिता अनायासाने भूमीचे धारण करितो तो स्वतंत्र भगवान अत्यंत,या पृथ्वीच्या मुळाशी अधिष्ठानारुपणे--परमात्मारुपाणे राहिला आहे.||१३|| भावार्थ:----हे राजा,ह्या प्रवृत्ती मार्गामध्ये विषयांची इच्छा धरणाऱ्या पुरुषांनी जाण्यास योग्य अशा भरतखंडामध्ये केलेल्या,त्या त्या कर्मामध्ये निर्माण ज्या गती आहेत त्या ह्याच होत.ह्या मी गुरुमुखाविषयी ऐकिल्याप्रमाणे तुला सांगितल्या आहेतआपण --जीव वक्ता असाल तर सदगुरू मुखातून जो उपदेश ग्रहण केला तोच सांगावा,अन्य सांगू नये.||१४|| | एतावतीर्हि राजन् पुंस: प्रवृत्तिलक्षणस्य धर्मस्य विपाकगतय उच्चावचा विसदृशा यथाप्रश्नं | व्याचख्ये किमन्यत्कथयाम इति ||१५|| भावार्थ:----हे राजा,प्रवृत्तीरूप धर्माला अनुसरणाऱ्या पुरुषाला त्या धर्माच्या फलरूप उत्तम,मध्यम व निष्कृष्ट अशा ज्या काही गती प्राप्त होतात त्या तुझा प्रश्नाप्रमाणे मी तुला सांगितल्या आहेत.आता दुसरे काय सांगावे?त्याबद्दल प्रश्न कर||१५|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानातील पंचम(५)स्कंधामध्ये शेषमहिमावर्णननामक हा पंचविसावा(२५)अध्याय पंधरा(१५) श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||२५|| ________________________________________________________________________________________ |२६------आता सविसाव्या अध्यायामध्ये,भूमिखाली जेथे पापिलोकानी त्यांच्या पापानुसार यमदुतानी पिडा केली जाते,त्या नरकाची स्थिती वर्णन केली आहे.|| |२६----- ३---नरकांच्या निरनिराळ्या गतीचे वर्णन महर्ष एतद्वैचीत्र्यं लोकस्य कथमिति ________________________________________________________________________________________ |राजोवाच:--- | महर्ष एतद्वैचित्र्यं लोकस्य कथमिति ||१|| भावार्थ:----राजा म्हणाला----हे महर्षे,जीवलोकाला,उत्तम,मध्यम व कनिष्ठ अशा तीन प्रकारच्या गति प्राप्त होतात म्हणून तूं जे भोगांचे विचित्रत्व मला सांगितलेस ते कसे घडते?||१|| | त्रिगुणत्वात्कर्तू: श्रध्दया कर्मगतयः पृथग्विधाः | सर्वा एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति ||२|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-----हे राजा,सर्व प्राण्यांची कर्मे जरी कांही अंशी सारखी असली तथापि कर्ता सात्विक,राजस व तामस असल्यामुळे त्याची श्रद्धा निरनिराळी असते,म्हणून सात्विक श्रद्धेने कर्त्याला सुख प्राप्त होते,राजस श्रद्धेने सुख व दुःख प्राप्त होते.तामस श्रद्धेने दुःख व मूढपणा प्राप्त होतो.याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या सर्वही कर्माच्या गति तारतम्याने सर्वास प्राप्त होतात.आपण--जीवानी ज्यायोग्य दु:ख प्राप्त होईल त्या वृत्तीचा त्याग करावा व ज्यायोग्य सुख किंवा सुखरूपता प्राप्त होईल अशा वृत्तीचा स्वीकार करावा.यासाठी सत्संग करावा.||२|| भावार्थः---आतां,ज्या धर्माचा श्रुतिस्मृतींनी निषेध केला आहे त्या धर्मालाच मुख्यत्वे अनुसरून जो पुरुष त्यांचे आचरण करितो त्यांची श्रद्धा विचित्र असल्यामुळे त्याच्या कर्माचं फळ विचित्र होते.यास्तव पुरुषांना अनादि अविद्येच्या योगाने इच्छा केलेल्या अधर्माचे फलरूप जे हजारो नरक प्राप्त होतात त्यांपैकी मुख्यमुख्य आतां मी तुला वर्णन करितो.||३|| भावार्थः---राजा म्हणाला----हे भगवन् मुने,नरक म्हणून जे सांगितलेले आहेत ते कांही भूमीवर देशविशेष आहेत किंवा भूमीव्यतिरिक्त अंतरिक्षांमध्येच आहेत अथवा ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत?||४|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला-----हे राजा,त्रैलोक्याच्या मध्येच दक्षिणदिशेकडे भूमीच्या (पाताळाच्या)खाली व गर्भोद्कांच्या वर असलेल्या प्रदेशामध्ये आहेत,त्या दक्षिणदिशेकडे अग्निष्वात्तादिक पितृगण,आपल्या गोत्रांतील प्राण्यांना अखंड विषयभोग मिळावे असे चिंतन करीत व पूर्ण एकाग्रतेच्या योगाने भगवंताचे आराधन करीत राहत असतात.||५|| भावार्थः---त्यादिशाचे ठिकाणीच भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करणारा,पितरांचा राजा भगवान सूर्यपुत्र यम,आपल्या सेवकांसहवर्तमान वास करितो,तो आपल्या पुरुषांनी आपल्या देशामध्ये आणलेल्या मृत झालेल्या प्राण्यांना जसे कर्मदोष असतील त्याप्रमाणे यथायोग्य शिक्षा करितो.||६|| भावार्थः---त्याठिकाणी कोणी पुरुष,एकवीस नरक मुख्य आहेत अशी गणना करितात.हे राजा,आतां ते नरक नांवे,रूपे व लक्षणे यांसहवर्तमान मी तुला अनुक्रमाने सांगतो.१--तामिस्त्र,२--अंधतामिस्त्र,३--रौरव,४--महारौरव,५--कुंभीपाक,६--कालसुत्र, ७-- असिपत्रवन,८--सुकरमुख,९--अंधकूप,१०--कृमीभोजन,११--संदंश,१२--तप्तसूर्मि,१३--वज्रकंटकशाल्मली,१४--वैतरणी,१५--पुयोद, १६--प्राणरोध,१७--विशसन,१८--लालाभक्ष,१९--सारमेयादन,२०--अवीचि,२१--अयःपान हे एकवीस आणि मतांतराने १--क्षारकर्दम, २--रक्षोगणभोज,३--शूलप्रोत,४--दंदशुक,५--अवटनिरोधन,६--पर्यावर्तन,७--सूचीमुख हे सात एकदंर अठ्ठावीस नरक असून ते प्राण्यांना नानाप्रकारच्या यातना भोगण्याच्या जागा आहेत.म्हणून आपण जीवनी विहित-कर्मांचे अनुकरण करावे,तर के कर्मे निषिद्ध आहेत,त्यांचे अनुकरण न करता त्याग करावा,कारण विहित कार्मान्ने सुख मिळते व निषिद्ध कार्मान्ने दु:ख मिळते.||७|| भावार्थः----त्यांमध्ये जो पुरुष,दुसऱ्याचे द्रव्य पुत्र व स्त्री यांचा उपहार करितो त्याला अत्यंत भयंकर असे यमसेवक कालपाशाने बांधून बलात्काराने तामिस्त्र नरकामध्ये टाकितात,म्हणून आपण--जीवानी दुसऱ्याचे द्रव्य हरण करू नये,तर श्वाधार्माने द्रव्य संपादन करून स्वधार्मानुसारच खर्च करावे.अन्न न देणे,पाणी न देणे,काठीने मारणे,भीती घालणे इत्यादिकेकरून पीडा देऊन बहुदुःख पावविलेला तो प्राणी त्यावेळी त्या अंधकारमय नरकामध्ये मुर्छां पावतो,म्हणून आपण--जीवानी ज्यांना अन्न-पाण्याची गरज आहे,त्यांना अन्न-पाणी दान करावे.इतर प्राण्यांना किंवा मानव प्राण्यांना दु:ख न देता सुख द्दावे.इतर प्राण्यांना किंवा मानव प्राण्यांना भीती दाखवून दु:ख न देता अभय देऊन सुख द्दावे.||८|| भावार्थः---ह्याप्रमाणेच जो पुरुष,एखाद्या पुरुषाला फसवून त्याची स्त्री द्रव्य इत्यादिकांचा उपभोग घेतो तो अंधतामिस्त्र नरकामध्ये जाऊन पडतोजेथे पाडलेला व यातना भोगविलेला तो प्राणी,मूळ तोडलेला वृक्ष जसा अवेतन होऊन पडतो.आपण--जीवानी इतरांना फसवून त्याची स्त्री किंवा द्रव्य यांचा उपभोग घेऊ नये,कारण त्यामुळे आपणास--जीवास दु:ख भोगावे लागते. याप्रमाणे वेदनांच्या योगाने तो पुरुष,नष्टबुद्धी व नष्टदृष्टी होतो म्हणून त्या नरकाला अंधतामिस्त्र असे म्हणतात.||९|| भावार्थ:----आणि जो पुरुष,या लोकाचेठिकाणी,हे शरीरच मी व हे द्रव्यादिक माझे असे मानून इतर प्राण्याविषयी द्रोह करून केवळ आपल्या कुटुंबाचे प्रतिदिवशी पोषण करितो,तो त्या कुटुंबाचा या लोकीच त्याग करून आपणच त्या पापाच्या योगाने रौरवनरकामध्ये पडतो.म्हणून आपण--जीवानी देह मी आहे,देहसंबंधी माझे आहेत व द्रव्य माझे आहेत,अशी भावना करून जीवन जगतो,त्यास दु:खच भोगावे लागते,म्हणून आपण--जीवानी सत्संगाद्वारे देह मी नसून,देहसंबंधी माझे नसून व द्रव्य माझे नसून "मी परमात्मारुपच आहे"असा निश्चय करून जीवन व्यतीत करावे.||१०|| भावार्थ:----हे राजा ह्या लोकी कुटुंबाचे पोषण करण्याकरिता याने जे प्राणी,तशा रीतीने मारिले असतील तेच प्राणी त्या पुरुषाला परलोकी यमयातना होवू लागली म्हणजे रुरुनामक प्राणी होवून,जशी त्याने पिडा दिलेली असेल त्याचप्रमाणे ते त्याला पिडा देतात म्हणून या नरकाला रौरव असे नाव दिले आहे.म्हणून आपण--जीवानी कोणत्याच प्राण्यांची हिंसा करू नये,कारण तेच प्राणी आपणास पुन्हा दु:ख देत असतात.रुरु म्हणजे अतिक्रूर प्राण्याचे एक नाव आहे.||११|| भावार्थ:----याप्रमाणेच महारौरनावाचा एक नरक आहे.त्यामध्ये जो प्राणी दुसऱ्या प्राण्याचा द्रोह आपल्या देहाचे पोषण करितो,तो जावून पडतो.तेथे पडलेल्या त्या पुरुषाला क्रव्याद्नावाचे क्रूर (प्राणी) मासासाठी त्याचे लचके काढितात.म्हणून आपण--जीवानी इतर प्राण्यांना दु:ख देऊ नये.कारण आपणास--जीवास नरकात जाऊन दु:ख भोगावे लागतात.||१२|| | यस्तित्वःवा उग्र:पशून् पक्षिणो वा प्राणत | उपरन्धयति तमपकरूनं पुरुषादैरपि विगर्हितममुत्र | यमानुचराः कुम्भीपाकेतप्ततैले उपरन्धयन्ति ||१३|| भावार्थ:----जो तर क्रूरस्वभावाचा मनुष्य,या लोकी पशूंना किंवा पक्ष्यांना जिवंत शिजवीतो त्या राक्षसांनी सुद्धा निंदित अशा निर्दय पुरुषाला,परलोकी कुंभीपाकनामक नरकामध्ये यमाचे सेवक,तापलेल्या तेलामध्ये शिजवतात.म्हणून आपण--जीवानी इतर पशूंना किंवा इतर पक्ष्यांना जिवंत शिजवून त्यांचे मांस--भक्षण करू नये,कारण त्यामुळे त्या प्राण्यांना जिवंत असतांनाच दु:ख भोगावे लागते.म्हणून आपणास--जीवास यमपुरीस नेऊन यम-लोक दु:ख देतात.||१३|| | यस्त्विहः पितृविप्रब्रह्यध्रुक् स कालसूत्रसंज्ञके | नरके अयूतयोजनपरिमन्डले ताम्रमये तप्तखले | उपर्यधस्तादग्न्यर्काभ्यामतितप्यमानेs भिनिवेशितः | क्षुत्पिपासाभ्यां च दह्यमानान्तर्बहिः शरीरः आस्ते | शेते चेष्टतेsवतिष्ठति परीधावती च यावन्ति पशुरोमाणी तावद्वर्षसहस्त्राणि ||१४|| भावार्थ:----तसाच जो पुरुष,या लोकी,पिता,ब्राहमण व वेद यांचा द्रोह करितो त्याला यमदूत,ज्याचा घेर दहाहजार योजने आहे,जो ताम्रमध असून तापलेल्या पटांगनाच आहे आणि जो खालून अग्नीच्या व वरून सूर्याच्या तापाने अतिशयच तापलेला आहे त्या कालसूत्रनामक नरकामध्ये पडतात.तेथे क्षुधा व तृषा यांच्या योगाने त्याच्या शरीराचा आतून व बाहेरून दाह होत असतो,त्याने मारलेल्या पशूच्या अंगावर जितके केस असतात तितकी सहस्त्र वर्षेपर्यंत त्याच्या अंगाचा भडक होवून त्याला त्या नरकात बसताना,निजताना,लोळताना,उभा राहताना व धावताना अतिशय यातना भोगाव्या लागतात.म्हणून आपण--जीवानी पिता-माता, ब्राह्मण--ब्रह्मा-ज्ञानी--उपदेश-कर्ता व वेद यांचा द्रोह करू नये.द्रोह म्हणजे पिता--माता,ब्राह्मण व वेद यांच्या अज्ञाचे पालन करावे,मुळीच उल्लंघन करू नये.पिता--माता,ब्राह्मण वेद यांचे पालन--पोषण करावे.||१४|| भावार्थः---तर जो पुरुष,या लोकी कोणत्याही प्रकारची अडचण नसतांना आपल्या वेदमार्गापासून भ्रष्ट होऊन पाखंड मार्गाचा स्वीकार करितो त्याला यमदूत असिपत्रवननामक नरकांत ढकलून देऊन,त्याला चाबुकाने प्रहार करितात.तेथे जो जिकडेतिकडे सैरावैरा धांवत असता,दोहोंबाजूला धारा असलेल्या तालवनांच्या तरवीरासारख्या पानांनी सर्वांग छिन्न होऊन म्हणजे 'मेलो रे मेलो'असे ओरडतो व पावलोपावली अत्यंत वेदनेमुळे मुच्छित होऊन पडतो.याप्रमाणे स्वधर्ममार्गाचा त्याग करणारा तो पुरुष,पाखंडमार्गाचा स्वीकार केल्याचे फळ भोगितो.म्हणून आपण स्वधर्मांचा त्याग न करता,त्यानुसारच आचरण करावे,कारण आपणास--जीवास दु:ख भोगावे लागते.आपण--जीवाने वेद-मार्गानुसारच आचरण करावे,तर पाखंड--अधर्मांनुसार आचरण करू नये,कारण पाखंड--मार्गाचा अवलंब केल्यास यमदूत असिपत्रवन नावाच्या नरकात नेऊन अनेक प्रकारच्या दु:खाचा भोग देतात.||१५|| भावार्थः---तसाच जो मनुष्य,या लोकी राजा किंवा राजचा आश्रित असून दंड करण्यास अयोग्य अशा पुरुषाला,दंड करितो अथवा ब्राहमणाला देहदंड करितो,तो पापी नर,यमलोकाचेठिकाणी सुकरमुखनामक नरकामध्ये पडतो.तेथे अतिप्रबल यमदुतांनी त्याचे अवयव पिळून टाकिले,म्हणजे जसा येथे घाण्यांत लावलेला ऊंस पेरे फुटूं लागली म्हणजे मोठ्याने शब्द करितो त्याप्रमाणे तो करुणायुक्त स्वराने आक्रोश करूं लागतो आणि या लोकी त्याने दंड करून कोंडलेल्या निरपराधी पुरुषांना जशी मूर्छना येते त्याप्रमाणे त्याला तेथे कधी कधी मूर्छना प्राप्त होऊन तो महत्संकटांत निमग्न होतो.म्हणून आपण--जीव न्याय देण्याचा प्रसंग आला तर नियमानुसार--कायद्यानुसार न्याय द्दावा,जर नियमानुसार--कायद्यानुसार न्याय न देता नियमांचे--कायद्याचे उल्लंघन करून न्याय दिला किंवा दंड दिला तर,त्या न्याय-निवडा करणारा जो पुरुष आहे,त्यास नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून आपण न्याय-निवडा योग्य द्दावा.||१६|| भावार्थः---तसाच स्वतः ब्राहमणदिभावाने विधीनिषेधपूर्वक आचरण केलेल्या कर्मांनी आपली जीविकी चालविणारा व विवेकाच्या योगाने दुसऱ्याच्या दुःखाचे ज्ञान होत असलेला जो पुरुष,या लोकी,ज्यांची ईश्वराने मनुष्यरक्तप्राशनादिक वृत्ति नेमलेली आहे व ज्यांना दुसऱ्यांच्या दुःखांचे ज्ञान नसते.अशा ढेंकूनवगैरे प्राण्यांना मारितो तो परलोकी अंधकूपनामक नरकामध्ये जाऊन पडतो व त्याठिकाणी,त्याने या लोकी ज्यांचा म्हणून घात केलेला असेल तेच पशु,मृग,पक्षी,सर्प,डांस,इवा,ढेकुण व माशा इत्यादिक प्राणी,त्याचा सर्व प्रकारे द्रोह करूं लागतात.त्यामुळे तो,जसा जीव अनेक रोगांनी ग्रस्त झालेल्या शरीरामध्ये दुःख भोगितो त्याप्रमाणे निबिड अंधकारांत निद्रासुखरहित व एकत्र स्थितीरहित होत असता जिकडेतिकडे भ्रमण करीत असतो.म्हणून आपण--जीवानी इतर प्राण्यांची हिंसा करू नये,कारण त्यामुळे आपणास--जीवास नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते,कारण कोणत्याच प्राण्यांची हिंसा आपण करू नये.इतर प्राण्यांना सुख देण्याचा आपण--जीवानी प्रयत्न करावा.||१७|| भावार्थः---जो पुरुष,या लोकांचेठिकाणी,पंचमहायज्ञ न करीता व जे कांही अन्नादिक प्राप्त झाले असेल ते अतिथी,बालक,व वृद्ध यांना यथायोग्य विभागाने न देता आपणच भक्षण करितो,तो शास्त्राने कावळ्यासारखां मानलेला,व दान दिल्याखेरीज व अग्नीमध्ये हवन केल्याखेरीज भक्षण करणारा पुरुष,परलोकी कृमिभोजननामक नरकामध्ये जाऊन पडतो,आणि त्या ठिकाणी लक्षयोजने विस्तृत अशा कृमिच्या कुंडामध्ये स्वतः तो कृमी होतो,तेथील इतर कृमि त्याला खाऊ लागतात व आपणही स्वतः कृमिना खात असतो,याप्रमाणे जो पर्यंत त्याचे पातक असेल तोपर्यंत तो आपल्या प्रायश्चित्तरहित आत्म्याला पिडा देतो.म्हणून आपण जीवानी पंचमहायज्ञ--देवयज्ञ,ऋषीयज्ञ,मनुष्य-यज्ञ,भूतमात्र--प्राणीमात्रयज्ञ,पितृगणयज्ञ आवश्य करावी.आपण--जीवानी पंचमहायज्ञ न केले व अतिथी,बालक,व वृद्ध यांना ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार पालन--पोषण न केले तर दु:ख भोगण्यासाठी कृमीभोजननामक नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते.त्याठिकाणी आपणास--जीवास तेथे असलेले कर्मी खाऊन दु:ख देतात व तेच कर्मी आपणास खावे लागतात.तसेच आपण दानधर्म न केला किंवा अग्नीमध्ये हवन न केले तर कृमिभोजन-नामक नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते,म्हणून आपण--जीवानी दान-धर्म व अतिथी यांची सेवा करावी.कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या अधिकारानुसार पालन--पोषण करावे.||१८|| | यास्तित्वह वै स्तेयेन बलाद्वा हिरण्यरत्नादिनी | ब्राम्हणस्य वापहरत्यन्यस्य वानापदी पुरुषस्तममुत्र राजन् | | यमपुरूषा अयस्मयैरग्नीपिन्डैः सन्दंशैस्त्वची निष्कुषन्ति||१९|| भावार्थः---हे राजा, जो पुरुष,या लोकाचेठिकाणी चौऱ्याने--चोरी करून अथवा बलात्काराने--समोरच्याची इच्छा नसेल तरी आपत्काल--संकटात नसतांनाही ब्राहमणाचे अथवा दुसऱ्याही कोणाचे सुवर्णरत्नादिक द्रव्य हरण करितो,त्या पुरुषाला परलोकी यमपुरुष,त्वचेचेठिकाणी लोखंडाच्या तापलेल्या गोळ्यांनी भाजतात आणि संडसांनी त्याच्या त्वचेचे तोडून लचके काढितात.म्हणून आपण--जीवानी द्रव्याची--धनाची चोरी करू नये.किंवा बलात्काराने म्हणजे शारीरिक बळ किंवा वाचिक बळ किंवा मानसिक बळाने इतरांचे द्रव्य घेऊ नये,कारण त्यामुळे आपणास--जीवास यमपुरीस नेऊन आपल्या--जीवाच्या शरीराच्या त्वचेस तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याने भाजतात आणि सांडसानि त्याच्या त्वचेचे लचके तोडतात.त्यामुळे आपणास--जीवास असह्य दुख भोगावे लागतात.म्हणून आपण--जीवानी इतरांना दु;ख न देता सुख देण्याचाच प्रयत्न करावा.||१९|| | यस्त्वितह वा अगम्यां स्त्रियमगम्यं वा पुरुषं | योषिदभिगच्छति तावमुत्र कशया ताडयन्त--स्तिगमया | | सुर्म्या लोहमय्या पुरुषमालिंगयन्ति स्त्रियं च पुरुषरूपया सुर्म्या ||२०|| | भावार्थः---जो पुरुष,या लोकी गमन करण्यास अयोग्य अशा स्त्रीशी गमन करितो व जी स्त्री,अगम्य पुरुषाशी रत होते त्या उभयतांना परलोकी यमदूत चाबुकाने ताडन करीत असते.तापविलेल्या लोखंडी स्त्रीच्या पुतळीशी आलिंगन करवितात व पुरुषाच्या पुतळ्याशी स्त्रीकडून आलिंगन करवितात.म्हणून आपण--जीवानी विधिवत जी स्त्री--पत्नी आहे तिच्यासीच विधिवत म्हणजे पुत्र--पुत्री उत्पन्न करण्याच्या हेतूनेच गमन--सहवास करावा.जो या नियमानुसार म्हणजे विधिवत नसलेली--पत्नी नसलेल्या स्त्रीसी गमन--सहवास केला,तर वरील-प्रमाणे शिक्षा होऊन दु:ख भोगावे लागेल.||२०|| भावार्थः--- जो पुरुष,या लोकी पशु इत्यादिकांशिही गमन करितो तो परलोकी नरकांत गेला असतां त्याला व्रजासारख्या कठोर काट्यांनी भरलेल्या संवावरीवर चढवून खरखर ओढीतात.म्हणून आपण--जीवानी पशुइत्यादिकांशिही गमन--शरीरीकांशीही शारीरिक संबंध करू नये,कारण त्यामुळे आपणास--जीवास परलोकात--यमपुरीस गेल्यानंतर व्रजासारख्या कठोर काट्यांनी भरलेल्या संवावरीवर चढवून खरखर ओधीतात,त्यामुळे आपणास--जीवास असह्य असे दु:ख भोगावे लागते.||२१|| भावार्थः---जे राजे किंवा राजांचे अधिकारी पुरुष,या लोकी धर्म,मार्गाचा इच्छेद करून टाकितात ते धर्ममर्यादा मोडणारे पुरुष,मरण पावल्यानंतर वैतरणीनामक नरकामध्ये पडतात.त्या नरकाच्या सभोंवार खंदकाप्रमाणे नदीमध्ये जलजंतूचे समुदाय,त्यांना ठिकठीकाणी खात असतात आणि आपल्या पातकामुळे विष्ठा,मुत्र,पु,रक्त,केंस,नखे,हांडे,मांस आणि वसा यांना वाहविनाऱ्या त्या नदीमध्ये ते पापी,वाहत असतांही देहाचा व प्राणांचा वियोग न पावतां आपल्या पापकर्माच्या वेगाने वाहत व कर्मफलांचे वारंवार स्मरण करीत असता पश्चाताप पावतात.म्हणून आपण--जीवानी धर्मार्गाचा इच्छेद--त्याग न करता स्वधार्मांनूसार आचरण करावे,कारण स्वधर्माचा उच्छेद केला असता,वैतरणी नदीत टाकले जाते,की ज्या नदीत विष्टा,मुत्र,पु, रक्त,केंस,नखे,हांडे,मांस,व वसा अशा दुर्गांधानेयुक्त नदीत बुडून वाहत जावे लागते.त्यामुळे आपणास--जीवास दु:ख भोगावे लागते.||२२|| भावार्थः---जे पुरुष,इहलोकी,शुद्धतेचे व आचाराचे नियम सोडून देऊन निर्लज्जपणाने शुद्रस्त्रियांशी गमन करितात आणि पशुसारखे यथेच्छपणे वागतात ते सुद्धा मरणानंतर,पु,विष्ठा,मुत्र,कफ व मळ यांनी परिपूर्ण असलेल्या पुयोदनामक नरकामध्ये पडतात आणि त्यांतील तेच अतिशय घाणेरे पदार्थ भक्षण करितात.म्हणून आपण-जीवानी इह-लोकी--मृत्यू-लोकी नियमानुसार--स्वधर्मानूसार--शुद्ध आचरण करावे.आपण--मात्र तमोगुणी-स्त्रीशी गमन--शारीरिकसंबंध करू नये.आपण--जीवानी पशुसारखे म्हणजे अधर्मान्नुसार आचरण करू नये,कारण त्यामुळे आपणास--जीवास यमपुरीस गेल्यानंतर पयोदनामक नरकात दु:ख भोगावे लागते.||२३|| | ये त्विह वै श्र्वगर्दभपतयो ब्राम्हणादयो | मृगया विहारा अतिर्थे च मृगान्नीन्घन्ति तानापी | | सम्परेताँ ल्लक्ष्यभूतान् यमपुरूषा इषुभिर्विध्यन्ति ||२४|| भावार्थः---तसेच या लोकी जे ब्राहमणादिक लोक कुत्री,गर्दभ इत्यादिकांचे पालन करणारे व शिकार करणारे असतात आणि विहितकर्मावांचून इतर प्रसंगी पशूंची हिंसा करितात त्यांनासुद्धा परलोकी यमदूत लक्ष्य करून बाणांच्या योगाने वेधून टाकितात.म्हणून आपण--जीवानी आपापल्या स्वधर्मानुसार आचरण करावे.तर परधर्मांचे आचरण करू नये.परधर्मांचे आचरण केल्यास शिक्षा केल्या जाते,त्यामुळे आपणास--जीवास दु:ख भोगावे लागते. ||२४|| | ये त्विह वै दाम्भिका दम्भयज्ञेषु पशुन् विषसन्ति तानमुष्मिँल्लोके | | वैशसे नरके पतितान्निरयपतयो यातयित्वा विषसन्ति ||२५|| भावार्थः---जे दांभिक पुरुष,या लोकी मांस खाण्यासाठी दंभयज्ञामध्ये पशूंना मारितात,ते परलोकी वैशसनामक नरकामध्ये पडले असता त्यांना यमदूत अनेकप्रकारच्या यातना देऊन मारितात.म्हणून आपण--जीवानी दंभयज्ञात पशूंची हत्या करू नये,कारण पशूंची हत्या केल्यास वैशसनामक नरकात जाऊन दु:ख भोगावे लागते. ||२५|| भावार्थ:----जो ब्राहमण,या लोकी काममोहित होवून आपल्या वर्णाच्या अन्यस्त्रीला जारपणाने भोगितो किंवा मुखमैथुन करून स्त्रीकडून रेत पिववितो त्या पापी पुरुषाला परलोकी यमदूत,रेताच्या प्रवाहात पाडून त्याच्या कडून रेत पिववितात.आपण--जीवानी काममोहित होऊन अन्य-स्त्रीशी शारीरिक संबंध ठेऊ नये,कारण ठेवल्यास त्यामुळे रेत-प्रवाहाच्या नदीत जाऊन,त्यास रेत पिववितात.त्यामुळे आपणास--जीवसास दु:ख भोगावे लागते. ||२६|| | ये त्विह वै दस्यवोऽन्गिदा गरदा ग्रामान् सार्थान् | वा विलुम्पन्ति राजानो राजभटा वा तांश्चापि हि परत्ये | | यमदुता वज्रदंष्ट्राः श्र्वानः सप्तशतानि विंशतिश्र्च सरभसं खादन्ति||२७|| | भावार्थ:---या लोकी जे राजे अथवा राजांचे आश्रित अधिकारी पुरुष,चोरी करतात,आग लावतात,विष घालतात किंवा व्यापारीलोकाच्या मेळ्यांना लुटतात त्यानाही मरण पावल्या नंतर,परलोकाचे ठिकाणी वज्रासारख्या दाढा असणारे सातशेवीस श्वानरूपी यमदूत मोठ्या आवेशाने तोडून खातात.म्हणून आपण--जीव सत्तीधीस किंवा सत्ताधीशांचे सेवक असाल तर चोरी,आग लावणे,धन लुटणे,असे निषिद्ध कर्मे करू नये,केल्यास यमपुरीस गेल्यानंतर सातशे-वीस स्वान--कुत्रे तोडून खातात.म्हणून आपण स्वधर्मानुसारच आचरण करावे.||२७|| | यस्त्विह वा अनृतं वदति साक्ष्ये द्रव्यविनिमये | दाने वा कथच्ञित्स वै प्रेत्य नरकेऽविचीमत्यधः शिरा | | निरवकाशे योजनशतोच्छ्रायाद् गीरीमुर्धः | सम्पात्यते यत्र जलमिव स्थलमश्मपृष्ठमवभासते | | तदवीचिमत्तिलशो विशीर्यमाणशरीरो न | म्रीयमाणः पुनरारोपितो निपतति ||२८|| | भावार्थ:----जो पुरुष,या लोकी साक्ष देताना,द्रव्य घेण्यादेण्याच्या व्यापारात किंवा दान देताना कोणत्याही कारणाने खोटे बोलतो,तो मरण पावला म्हणजे परलोकाचेठिकाणी त्याला यमदूत निराधर व तरंगानी रहित अश्या अविचीत्रनामक नरकामध्ये,शंभर योजने उंच असलेल्या पर्वताच्या शिखरावरून खाली डोके व वर पाय करून पडतात.जेथे पाषाण मय स्थळ आहे ते पाण्यासारखे भासत असते म्हणून त्या नरकाला ‘अविचीतम’असे म्हणतात त्या स्थळावर पडून त्याच्या शरीराचे तिलप्राय तुकडे होत असून तो मरत नाही,लागलाच जशास तसा होतो.याप्रमाणे त्याला पुन्हा पुन्हा पर्वतावर चढविला म्हणजे खाली पडतो.आपण--जीवानी साक्ष देत असतांना द्रव्य घेऊन खोटी साक्ष देऊ नये,दान देतांनी खोटे बोलू नये,कारण खोटी साक्ष देल्यास,दान देत असतांना खोटे बोलल्यास नरकास नेतात व तेथे अविचीतम--नरकात टाकतात.तेथे शंभर योजने उंच असलेल्या पर्वतावर नेऊन खाली टाकतात,त्यामुळे त्याचा शरीराचे तुकडे होतात,त्यामुळे असह्य असे दु:ख भोगावे लागते.||२८|| भावार्थ:----या लोकाचेठीकानी जो ब्राहमण,त्याची स्त्री अथवा दुसराही कोणी व्रतस्थ पुरुष,मोहाने सुरापान करितो आणि त्याप्रमाणेच क्षत्रिय अथवा वैश्य मोहाने सोमपान करितो,त्यांना नरकामध्ये नेल्यावर यमदूत त्यांच्या उरावर पाय देवून त्यांच्या मुखामध्ये अग्नीच्या योगाने काढून रसरूप बनलेले पोलाद ओतीतात.म्हणून आपण आपल्या स्वधार्मांचेच पालन करावे,तर परधर्मांचे पालन करू नये,कारण यमपुरीस नेल्यानंतर आपणास--जीवास पोलादाचा रस पाजतात,त्यामुळे आपणास असह्य असे दु:ख भोगावेच लागते.||२९|| भावार्थ:----तसाच या लोकी जो स्वत: अधम असूनही ‘मीच मोठा प्रतिष्ठित आहे’असा अभिमान धारण करून,जन्म,तप,विद्या, आचार,वर्ण,आणि आश्रम यांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ लोकांना बहुमान देत नाही,तो जीवंत असतानाही मेल्यासारखा असलेला पुरुष,मेल्यावर क्षारकर्दमनामक नरकात खाली डोके वर पाय करून पडला,असता तो तेथे दुर्धर यातना भोगितो.म्हणून आपण स्वत: अधम असुन "मीच मोठा प्रतिष्ठित आहे"असा अभिमान धारण करितो,त्यास यमपुरीस गेल्यानंतर क्षरकर्दम नरकात टाकून दुर्धर यातना देतात.त्यामुळे आपणास--जीवास अतोनात दु:ख भोगावे लागते. ||३०|| भावार्थ:----तसेच या लोकी जे पुरुष,मनुष्यपशुचा बळी देवून भैरवदिकांचे आराधन करितात व ज्या स्त्रिया नरमांस भक्षण करितात,ती सर्व यमसदनी गेली म्हणजे त्यांनी येथे पशुप्रमाणे मारलेले जे मनुष्य असतील तेच राक्षसगण होवून त्यांना यातना करीत असते खटक्याप्रमाणे त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांचे रक्त पितात,नाचतात आणि हर्षाने गात सुटतात.जसे इहलोकी त्या मनुष्य भक्षकांनी नरमास भक्षण करून आनदाने नृत्यवगैरे केले असेल त्याचप्रमाणे त्यांनी मारलेल्या मनुष्यादिकहि परलोकी तसे करितात.आपण जीवानी मनुष्य योनीत आल्यानंतर मनुष्याचा बळी देऊ नये,कारण मनुष्य देह हा भगवंतांनी परमार्थ करण्यासाठी दिलेला असतो.आपण त्या मनुष्य शरीरास बळी देला तर असे अमुल्य शरीर विनाकारण मृत्यूस प्राप्त होते.ज्यांचा आपण पशु-बळी देला,तच राक्षस होऊन आपले रक्त पितात.त्यामुळे आपणास असह्य दु:ख भोगावे लागते.||३१|| भावार्थ:----तसेच या लोकी जे पुरुष,अरण्यात किंवा गावात निरपराधी प्राण्यांना,प्रथम विश्वासाच्या उपायांनी (खाणेवगैरे)घालण्याने विश्वास दाखवून ते आपल्याजवळ खाण्याच्यावगैरे लोभाने प्राप्त झाले असता नंतर त्याना धरून शूळ अथवा सुत्रादिकामध्ये टोचून हे आपले खेळणेच आहे असे समजून त्यांना दु:ख देतात ते पुरुषहि मेले म्हणजे यमयातनामध्ये यमदुतांनी शुलादिकांचेठिकाणी टोचले जातात,तेव्हा क्षुधा व तृषा यांच्या योगाने अतिपिडीत व तीक्ष्ण चोचींनी युक्त असलेल्या कनक,गिधाडवगैरे पक्ष्यांनी जिकडून तिकडून टोचिलेले ते पुरुष आपल्या पापाचे स्मरण करितात.||३२|| भावार्थ:---हे राजा तसेच या लोकी जे सर्पासारखे क्रूरस्वभावाचे पुरुष,प्राण्यांना विनाकारण दु:ख देतात तेही मरण पावले म्हणजे दंदशुकनामक नरकामध्ये पडतात त्याठिकाणी कितीएक पाच तोंडचे व काही सात तोंडचे असे सर्व आहेत ते त्यांच्याजवळ येवून,उंदराप्रमाणे त्यांना त्रासून टाकितात.म्हणून आपण--जीवानी इतर प्राण्यांना विनाकारक दु:ख देऊ नये,तर सुख द्दावे.दु:ख देल्यास पांच-तोंडाचे,सात तोंडाचे आपल्याजवळ येऊन उंदराप्रमाणे त्रास देतात.म्हणून आपण स्वधर्मानुसारच आचरण करावे.||३३|| ; भावार्थ:----जे पुरुष,यालोकी प्राण्यांना अंधाऱ्या विहरीत,धान्याच्या पेवांत अथवा कोठारात किंवा गुहा इत्यादिकांचे ठिकाणी कोंडून ठेवतात ते लोक परलोकी गेले असता त्यांना यमदूत,त्याच स्थानामध्ये बसवून विषयुक्त अग्नीपासून निघालेल्या धुराने गुदमरून जातील अशा रीतीने कोंडून ठेवतात.म्हणून आपण--जीवानी इतर प्राण्यांना अंधाऱ्या विहिरीत,धान्यांच्या पेवांत,किंवा कोठारात,किंवा गुहेत कोंडून ठेऊ नये,कारण ठेवल्यास यमपुरीस गेल्यानंतर विषयुक्त अग्नीपासून निघालेल्या धुरात कोंडून ठेवतात.म्हणून आपण ते कृत्य करू नये.||३४|| | यास्तित्वः वा अतिथीनभ्यागतान् वा गृहपतीरसकृदुपगतमन्युर्दिधक्षुरीव पापेन चक्षुषा निरीक्षते | | तस्य चापि निरये पापदृष्टेराक्षिनी वज्रतुन्डा गृधाः कंगकाक वटाद्यः प्रसह्योरुबलादुत्पाटयन्ति||३५|| भावार्थ:----जो गृहस्थाश्रमी पुरुष,य़ा लोकी वारंवार क्रोधयुक्त होवून आपल्या घरी आलेल्या अतिथींना किंवा अभ्यंगतांना आपल्या पापयुक्त नेत्राने जळतोच की काय असा पाहतो,तो पापदृष्ठी पुरुष,मरणानंतर नरकामध्ये पडला म्हणजे तेथे वज्रासारख्या चोचीनी युक्त असलेल्या गृध्र,कंक,कात व वट इत्यादी पक्षी,त्याच्या डोळ्यांना बलात्काराने आपल्या मोठ्या शक्तीने उपटून बाहेर काढतात.म्हणून आपण--जीवानी अतिथी,अभ्यंगत,यांच्याकडे पापयुक्त नजरेने पाहू नये,कारण त्यामुळे आपणास यमपुरीस गेल्यानंतर नरकात टाकून वज्रासारखे चोंचीनेयुक्त असलेली गृध,कंक,कात,व वट इत्यादी पक्षी त्याचे डोळे फोडून बाहेर काढतात.त्यामुळे आपणास--जीवास असह्य दु:ख भोगावे लागते.||३५|| भावार्थ:----जो पुरुष,या लोकी ‘मीच श्रीमंत’असा अभिमान धारण करणारा,अहंकाराने युक्त,वक्रदृष्ठी आणि गुरु इत्यादिकांनासुद्धा हे धन चोरतात अशी शंका धारण करणारा,द्रव्यनाशाचा चिंतेने म्लान झालेल्या हृदयाने व मुखाने युक्त आणि त्यामुळेच कधीही सुख न पावणारा असा असतो व ब्रहमराक्षसाप्रमाणे या लोकी द्रव्याचे रक्षण करितो व ते मिळविण्याकरिता--वाढविण्याकरिता व त्यांचे रक्षण होण्याकरिता पातकांचा संग्रह करितो,तो मरण पावल्यावर सुचीमुखनामक नरकामध्ये पडतो त्याठिकाणी यमदूत पिशाच्याप्रमाणे द्रव्यरक्षक करणाऱ्या त्या पापीपुरुषाला सर्व नरकामध्ये,जे काही तुला पापी सांगितले दुसरे व याखेरीज जे अधर्माने वागणारे ते लोक आहेत ते सर्वही,आपापल्या पातकतारतम्याने प्रवेश करितात व त्याचप्रमाणे धर्माला अनुसरून वागणारे लोक स्वर्गादी लोकामध्ये प्रवेश करितात आणि ते पुन: जन्म घेण्याला निमित्त अशा आपल्या धर्म व अधर्म यांच्या अवशेष राहिलेल्या अंशांनी या मनुष्यलोकामध्ये प्रवेश करितात.म्हणून आपणास--जीवास "मीच श्रीमंत"असा अभिमान येऊ नये,दुसऱ्यांचे धन परधर्माने किंवा चोरी करून घेऊ नये,कारण त्यामुळे आपणास जीवनात सुख न मिळता दु:खच अनुभवास येतो.आपणास यमपुरीस गेल्यानंतर "पाताकतारतम्य" नरकात टाकून दु:ख देतात.आपण जर स्वधर्मानुसार धन कमावले तर स्वर्गात नेऊन सुख देतात.त्यांनंतर मृत्यू-लोकात मनुष्याच्या शरीरात जन्म प्राप्त होतो.म्हणून आपण जीवानी परधर्माचा त्याग करून स्वधार्मांचा स्वीकार करून जीवन व्यतीत करावे.||३७|| भावार्थ:---असो.निवृत्तीलक्षण मार्गतर मी तुला पूर्वीच(द्वितीयस्कंधामध्ये)सांगितला आहे.हे राजा,पुराणामध्ये जो चतुर्दशलोक-- रुपी म्हणून वर्णन केला आहे तो ब्रह्मांडकोश एवढाच होय.हे साक्षात महापुरुष भगवान नारायणाचे स्वकीय मायेच्या गुणांनी रचिलेले स्थूळरूप मी तुला सांगितले आहे.जो पुरुष आदराने भगवंताच्या या ब्रह्मांडस्वरूपाचे श्रवन करितो,पठण करितो किंवा लोकांना ऐकवितो,तो पुरुष,श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगाने शुद्धबुद्धि होवून,त्याच परमात्मा भगवंताच्या उपनिषदात वर्णन केलेल्या,जाणण्यास परम कठीण अशाही तत्वस्वरूपाला जाणतो.म्हणून आपण--जीवानी ब्रह्मांडस्वरूपाचे श्रवण,पठन,किंवा वक्ता होऊन ऐकवावे,त्यामुळे आपणास--जीवास परम कठीण असलेले स्वरूप जणतोत.||३८|| भावार्थ:---हे,योगीपुरुषाने--आपण--जीवानी भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्वरूपाचे श्रवण करून,आपले मन प्रथम स्थूल स्वरुपाचेठीकानी लावावे आणि तेथे ते स्थिर झाले म्हणजे नंतर हळूहळू बुद्धीच्या योगाने सूक्ष्म स्वरूपी नेवून लावावे.||३९|| | भूद्वीपवर्षसरिदद्रिनभ: समुद्र- पातालदिङ्नरकभागणलोकसंस्था | | गीता मया तव नृपाद्भूतमीश्र्वरस्य स्थूलं वपु: सकलजीवनिकायधाम ||४०|| भावार्थ:----हे राजा,मी तुला,भूमी द्वीपे,खंडे,नद्या,पर्वत,आकाश समुद्र,पाताले,दिशा,नरक,आणि नक्षत्रसूत्र यांनी युक्त अशा लोकरचनेचे वर्णन केले आहे.हि लोकरचना,सर्व जीवसमुहांचे आश्रयस्थान असे ईश्वराचे आश्चर्यकारक स्थूलस्वरूप होय.||४०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील पंचम(५)स्कंधामध्ये नरकवर्णननामक हा साविसाव्वा(२६)अध्याय चाळीस श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| इति पंचम:स्कंध:समाप्त ---पाचवा स्कंध समाप्त|| | | || हरि:ॐतत्सत् || -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment