अर्थ भावार्थ सहित श्रीमद्भागवतमहापुराण स्कंधः तिसरा
| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ------------------------------------------------------------------------------------------------ l ||श्रीमद्भागवतमहापुराण|| ------------------------------------------------------------------------------------------------ | | | तृतीय स्कन्ध:----तिसरा स्कंध:--- अध्याय(१) पहिला|| ------------------------------------------------------------------------------------------------ |
. || श्रीगणेशायनम: || .
ह्या तृतीय(३)स्कांधामध्ये तेहत्तीस(३३) अध्यायांनी सृष्टिचे वर्णन केलेले आहे,त्यात पहिल्या अध्ययामध्ये आयुष्य क्षीण झालेल्या आपल्या बंधूंचा त्याग करून,तीर्थयात्रेस केलेल्या विदुराचा व उद्धवाचा झालेला संवाद सांगितला आहे. | १---उद्धव आणि विदुर यांचा संवाद---[१---उद्धव आणि विदुर यांची भेट] _________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:--- | एवमेटत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल | क्षत्त्रा वनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत् ||१|| भावार्थः----श्री शुकाचार्य म्हणाला---हे परीक्षितीराजा,सर्वसंपत्तिंनी युक्त अशा आपल्या घराचा त्याग करून वनामध्ये गलेल्या विदुराने योगैश्वार्यसंपन्न मैत्रेयाला असा हाच प्रश्न केला होता.||१|| | यद्वा अयं मन्त्रकृद्वो भगवानखिलेश्वरः| पौरवेन्द्रगृहं हित्वा प्रविवेशात्मसात्कृतम् ||२|| भावार्थः----हे राजा,विदुराच्या घराची थोरवी किती वर्णावी.जेव्हा हा जगन्नियंता षडगुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण,पांडवांची मध्यस्थी करण्यासाठी हस्तिनापुरात गेला होता.तेव्हा त्याने दुर्योधनाच्या घराचा त्याग करून आपले असे मानलेल्या ज्या विदुराच्या घरामध्ये बोलावणे नसतांही प्रवेश केला होता.ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी दुर्योधनाने आमंत्रित करून दुर्योधन हा राजस व तमोगुणी असल्यामुळे त्याच्या वैभवाचा त्याग करून विदुर यांनी निमंत्रण न देताही त्यांची सात्विकता पाहून त्यांच्याकडे आपणहून जेवण केले.त्याचप्रमाणे आपणही—जीवानी गुणांना महत्व देऊन वैभवांकडे तसेच दुर्गुनांकडे दुर्लक्ष करून आचरण करावयास पाहिजे.||२|| भावार्थः----राजा म्हणाला-----हे प्रभो ऐश्वर्य-संपन्न अशा मैत्रेयासहवर्तमान विदुराचा समागम कोठे झाला?व त्या उभयतांचा परस्पर संवाद केव्हा झाला?हे आम्हांस वर्णन करावे.||३|| भावार्थः----निर्मळ-चित्त अशा त्या विदुराचा त्या श्रेष्ठ मैत्रेयाचेठीकोणी झालेला प्रश्न,थोड्या अर्थाचा उदय करणारा नव्हता,तर तो प्रश्न,सत्पुरुषांच्या अनुमोदनाने वृद्धींगत झालेला होता.||४|| भावार्थः----सुत म्हणाला---हे ऋषिहो,परीक्षिती राजाने असा प्रश्न केला असतां,त्या महाज्ञानी ऋषीश्रेठ शुकाचार्याने,संतुष्ट होऊन त्या परीक्षितीला,हे राजा,ऐकावे असे म्हणून उत्तर सांगण्यास आरंभ केला.||५|| | यदा तू राजा स्वसुतानसाधून् - पुष्णन्न धर्मेण विनष्टदृष्टि:| | भ्रातुर्यविष्ठस्य सुतान् विबन्धून् -प्रवेश्य लाक्षाभवने ददाह ||६|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,जेव्हा जन्मांध व विवेकशून्ये अशा धृतराष्ट्र राजाने,दुष्ट अशा आपल्या पुत्रांचे अधर्माने पोषण करीत असतांना,आपल्या पांडूनामक कनिष्ठ श्रोत्याच्या अनाथ पुत्रांना लाखाच्या घरामध्ये प्रवेश करवून दग्ध केले.||६|| भावार्थः----तसेच जेव्हा सभेमध्ये आलीन सून,धर्मराजाची स्त्री,व जिचे स्तनसंबधीं केशर रडता रडता दु:खश्रुंनी धुपून गेले आहे अशा द्रोपदीच्या केशांचे आकर्षणरूप आपल्या दु:शासनपुत्राचे निंद्य कर्म,त्या धृतराष्ट्र राजाने निवारण केले नाही.ज्यास देहसंबंधीचा मोह असतो,तो निद्द कर्मांचे निवारण करू शकत नाहीत.निद्द कर्मांचे निवारण करणे हा अपराध आहे.म्हणून आपणास—जीवास देहसंबंधीचा मोह असू नये.मोह हा अनर्थ करीत असतो. म्हणून आपण मोह निवृत्त करण्यासाठी सत्संग करावा.||७|| | द्दुते त्वधर्मेण जितस्य साधो: सत्यावलम्बस्य वनागतस्य | | न याचतोsदात्मसमयेन दायं तमो जुषाणो यदजातशत्रो: ||८|| भावार्थः---आणि द्दुतामध्ये अधर्माने जिंकलेला,सहनिशील,सत्याचा आश्रय करणारा,वनवास भोगून आलेला पूर्वी केलेल्या संकेताप्रमाणे आपला विभाग मागणारा आशाही धर्मराजाला,पुत्रमोह आज्ञानाचा आश्रय करणाऱ्या त्या धृतराष्ट्राने,जेव्हा राज्य विभाग दिला नाही.||८|| | ध्युते त्वधर्मेण जितस्य साधो: - सत्यावलम्बस्य वनागतस्य| | न याचतोऽदात्समयेन दायं - तमो जुषाणो यदजातशत्रो: ||९|| भावार्थः----आणि जेव्हा पांडवांनी कौरवांकडे आपला विभाग मागण्याकरिता पाठविलेल्या श्रीकृष्णभगवंताने,भरसभेमध्ये,पुरूषांस अमृतासारखी गोड लागणारी जी भाषणे केली ती,ज्याचा राज्य भोगण्याचा पुण्यांशच नष्ट झाला अशा धृतराष्ट्राने किंवा दुर्योधनाने सन्मानपूर्वक स्विकारली नाहींत.ज्याचा-त्याचा राज्य—वैभव भोगण्याचा पुण्यांश नष्ट नष्ट झाला असता अशा व्यक्तींना न्याय मार्ग न आवडता,अन्यायाचाच मार्ग आवडत असतो.त्याची विपरित बुद्धी होऊन,विपरीत निर्णय घेत असतात.||९||
| यदोपहुतो भवनं प्रविष्टो मन्त्राय पृष्ट: किल पूर्वजेन | | अथाह तन्मत्रदृशां वरीयान् यन्मन्त्रिणो वैदुरिकं वदन्ति ||१०|| भावार्थः----आणि जेव्हा धृतराष्ट्राने पांडवांचा विभाग द्यावा किंवा न द्यावा अशा मसलतीकरिता ‘बोलविलेला विदुर राजमंदिरात प्रविष्ट झाला आणि त्यास प्रश्न केला,तेव्हा मसलत देणाऱ्यांत अतिश्रेष्ठ अशा त्या विदुराने जे काही भाषण केलेत्यास मंत्री लोक अद्यापि “विदुरनीति” असे म्हणतात.द्वापार-युगात विदुरकाकांनी दिलेला न्याय,हा आजही न्यायी-लोक त्याचा अभ्यास करून त्यानुसार न्याय देतात.आजही तो ग्रथ “विदुर—नीति” म्हणून प्रसिद्ध आहे.म्हणून आजही आपण व न्यायाधीशांनी “विदुर-नीती” या ग्रंथाचा अभ्यास करून,त्यानुसार आचरण करून न्याय द्दावा.||१०|| | अजातशत्रो: प्रतियच्छ दायं - तितिक्षतो दुर्विषहं तवाग: | | सहनुजो यत्र वृकोदराहि: - श्वसन् रुषा यत्वमलं बिभेषी ||११|| भावार्थः----त्याचा सारांश असा कि,हे धृतराष्ट्रा,तुझे दु:सह आपराध सहन करणाऱ्या धर्मराजाचा विभाग तू दे.कारण ज्या अपराधप्रकरणी तू ज्यापासून फारच(आपले पुत्र मारील म्हणून)भीतोस तो भीमरूपी सर्प,कनिष्ठ बंधू सहवर्तमान रोषाने स्वासोच्छस (फुस्करे)टाकीत आहे.म्हणून आपण जर अन्याच्या मार्गाने कोणाचे धन,घर,सोने-नाणे व जमीन मिळवली असेल तर ज्याची असेल त्याला परत करावी.आपण—जीवानी परत न केली तर केव्हा-न-केव्हा अधिक-अनेक पट्टीने परत करावीच लागेल,यात तीळ-मात्र संशय नाही.आपले—जीवाचे आयुष्य हे या देहापुरते मर्यादित नसून अनंत युगाचे जीवाचे आयुष्य आहे.मरण येणे म्हणजे फक्त स्थूल शरीर सुटणे व अन्य कर्मानुसार दुसरे शरीर मिळणे होय.म्हणून आपणास या वर्तमान शरीरात परत-फेड न आली तरी पुढच्या जीवनात परत-फेड हि येतेच.म्हणून कष्ट करूनच धन मिळवावे व जीवन व्यतीत करावे.||११|| भावार्थः----हे राजा,पांडवांचा तर ज्या मुक्तिदात्या श्रीकृष्णभगवंताने आपले म्हणून स्वीकार केला आहे.तो यादववीरांचा परम दैवत असा भगवान श्रीकृष्ण पृथ्वी वरील सर्व राजे जिंकून ब्राहमण व देव ह्याच्या सहाय्याने युक्त होत्साता अद्यापि आपल्या द्वारकानगरीमध्ये वास करीत आहे यास्तव पांडवांचा विभाग लौकर दे.म्हणून आपण—जीवानी ज्याचा—त्याचा हिस्सा—विभाग ज्यास—त्यास द्दावा.||१२|| | स एष दोष: पुरूषद्विडास्ते गृहान् प्रविष्टो यमपत्यमत्या | | पुष्णासि कृष्णाद्विमुखो गतश्री- स्त्यजाश्र्वशैवं कुलकौशलाय ||१३|| भावार्थः---हे राजा,तूं ज्याचे अपत्यबुद्धीने पोषण किरीस आहेस तो हा श्रीकृष्णाचा द्वेष्टा दुर्योधन,मुर्तिमान दोषच तुझ्या घरात शिरला आहे,यास्तव आपाल्या कुळाच्या कल्याणा करीता या अमंगळ पुत्राचा तू सत्वर त्याग कर.नाही तर तू कृष्णापासून विमुख होशील आणि तुझ्या सर्व संपत्तींचा नाश होईल.आपला—जीवाचा पुत्र किंवा देहसंबंधी दुष्ट—दुर्गुणी—दुर्व्यसनी असेल त्याचा त्याग करावा.आपण त्याचा त्याग न केला तर कुटुंबातील सर्वांना दु:ख भोगीतच मरण पत्करावे लागेल.मनुष्य देहास मरण आल्यानंतर पुढील जीवन दु:खमयच भोगावे लगेल.||१३|| भावार्थः----साधूंनी इच्छा करण्यास योग्य असा ज्याचा स्वभाव आहे त्या विदुराने असे भाषण केले असता,कर्ण दु:शासन व शकुनी यांसहित अतिशय क्रोधाच्या योगाने ज्याचा अधरोष्ठ स्फुरण पावत आहे अशा दुर्योधनानें,त्या विदुराचा तिरस्कार करून भाषण केले कीं------------------||१४|| | क एनमत्रोपजुहाव जिह्यं - दास्या:सुतं यद्वलिनैव पुष्ट:| | तस्मिन् प्रतीप:परकृत्य आस्ते - निर्वास्यतामाशु पुराच्छ्वसान: ||१५|| भावार्थ:----अहो,या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावीले? चमत्कार पहा कि,हा आपण ज्याचा घराचे अन्न खाऊत पुष्ट झाला त्यावरच उलटून त्याच्या शत्रूनें कार्य साधावयास तयार आहे ! तथापि हा आमचा आप्त आहे म्हणून ह्याला जीवदान देऊन लौकर नगराबाहेर बोलावून द्दा.दुष्ट—दुर्गुणी—दुर्व्यसनी यांना सज्जन-सद्गुणी—निर्व्यसनी मनसे आवडत नसतात,त्यामुळे आपले अपरिमित हानी होते,म्हणून त्यांचा आपण संग करावा,त्यात आपले हित होत असते.||१५|| | स इत्थमत्युल्बणकर्णबानै- र्भ्रातु: पुरो मर्मुसू ताडितोSपि | | स्वयं धनुर्द्वारि निधाय मायां गतव्यथोSयादूरू मानयान: ||१६|| भावार्थः----याप्रमाणे धृतराष्ट्रबंधूच्या समोर दुर्योधनाच्या आतितीक्ष्न बाणासारख्या कार्नात प्रवेश करणाऱ्या कठोर भाषणांनी मर्मस्थानी ताडन केलेलाही तो विदुर,मनामध्ये काही दु:ख न बाळगितां हे सर्व भगवंताच्या मायेन महात्म्य आहे,असे मानून आपले धनुष्य राजव्दारामध्ये ठेऊन स्वत:च नगरातून निघून गेला||१६|| भावार्थः----कौरवांच्या पुण्यांनी प्राप्त झालेला तो विदुर,हस्तीनापुरातून बाहेर जावून काही तरी पुण्यकर्म करावे अशा इच्छेने पृथ्वीवर ब्रहमरुद्रादीक अनंत मूर्ती धारण करणारा भगवान् ज्या-ज्या स्थानि राहिला आहे,त्या त्या तीर्थपाद विष्णूच्या पुण्य क्षेत्री यात्रा करीत निघाला.आपणही—जीवानी तीर्थ आणि क्षेत्राच्या ठिकाणी निवास कारण ते तीर्थ आणि क्षेत्रे पुण्यमय असतात.त्याठिकाणी संत—महात्मा यांनी निवास केलेला असतो.आपण त्या ठिकाणी निवास केला तर आपण—जीव पुण्यमय होत असतो.||१७|| भावार्थ:----विष्णूमूर्तीनीं सुशोभित नगरें,पर्वत,कुंजें(लतादिकांनी अच्छादित स्थाने)स्वच्छ उदकाच्या नद्या व सरोवरें,तीर्थव क्षेत्रे यांचे ठिकाणी तो विदुर,एकटाच संचार करीत असे.विदुरांनी तीर्थक्षेत्रे या ठिकाणी निवास केला असा विदुरासारखा संचार आपणही करावा.||१८|| भावार्थः---या पृथ्वीवर पर्यटन करणाऱ्या त्या विदुराने,पवित्र अन्नाचे एकांती भक्षण करणे,प्रत्येक तीर्थी स्नान करणें,भूमीवर शयन करणे,शरीराचे मर्दन तैलाभ्यंवगैरे संस्कार न करणे,वल्कलादिकांचे परिधान करणे, कोणासही आपली ओळख न देणे इत्यादीक हरीचा संतोस करणारी नानाप्रकारची व्रते आचरण केली.विदुरकाकासारखे आपण पवित्र अन्न—भिक्षाचे अन्न एकांतात सेवन करावे.पहाटेच तीर्थात स्नान करावे.भ दर्शन व नामस्मरण करावे.साधे कपडे परिधान करावे.आपण व्रत आचरण करावे.सत्संग करावा.कोणास आपली ओळख देऊ नये,ओळख दिल्यास परमार्थ होत नाही.असे आपले आचरण असेल तर परमार्थ होत असतो.||१९|| भावार्थः----अशा रीतीने तो विदुर,भरतखंडातील तीर्थ यात्रा करीत करीत काही काळाने जोपर्यंत प्रभास क्षेत्रास पोंचला तोपर्यंत श्रीकृष्णाच्या सहाय्याने धर्मराजा,एकचक्र(सैने)व एकच्छत्र अशा पृथिवीचे राज्य कंरु लागला.||२०|| भावार्थः----इकडे त्या प्रभास क्षेत्राचेठिकाणी विदुराने,वेळूंच्या परस्पर घर्षणाने उत्पन्न झालेल्या आग्नीचा आश्रय करणारे वन जसे दग्ध होऊन जाते त्याप्रमाणे,एकमेकांचा स्पर्धेने कौरवांचा नाश झाला असे ऐकिले.नंतर तो विदुर कौरवांचा शोक करीत नाही मौनवत्तीने सरस्वतीनदीच्या उगमाकडे जावयास निघाला.कौरांवांची व पांडवांची बातमी ऐकल्यानंतर विदुरकाकांनी तीर्थ-क्षेत्राचा त्याग न करता तीर्थ—यात्रा सुरूच ठेवल्या.त्याचा प्रमाणे आपण आपल्या देहासंबंधीच्या अनुकुल किंवा प्रतिकूल वार्ता ऐकू परमार्थ न थांबवता चालूच ठेवावा.त्या वार्ता मनातसुद्धा येऊ नयेत.आपल्या तीर्थ—यात्रेचेच विचार मनात असावेत.||२१|| | तस्यां त्रितस्योशनसो मनोश्च पृथोरथाग्नेरसितस्य वायोः | | तीर्थं सुदासस्य गवां गुहस्य यच्छ्राद्धदेवस्य स आसिषेवे ||२२|| भावार्थः----तेव्हा त्याने,त्या नदीच्या काठी अनुक्रमाने,त्रित-तीर्थ,शुक्र-तीर्थ,मनु-तीर्थ,पृथू-तीर्थ,आग्नि-तीर्थ,असित-तीर्थ,वायु-तीर्थ,सुदास-तीर्थ, गो-तीर्थ,गुह-तीर्थ,आणि श्राद्धदेव-तीर्थ या प्रसिद्ध असलेल्या अकरा तीर्थांचे सेवन केले.आपणही—जीवानी या आकार तीर्थाचे सेवन—स्नान करावे.त्यामुळे आपले अंत:करण शुद्ध होते किंवा पुण्य प्राप्त होते.||२२|| भावार्थः---आणि त्याठिकाणी असलेली दुसरीही ऋषींनी व देवांनी बांधलेली असून,शिखरांवरील सुवर्णाच्या कळसांवर बसविलेल्या चक्रांनि सुशोभित अशी श्रीविष्णूची अनेक मंदिरे त्या विदुराने पाहिली.ज्या मदिरांच्या शिखरांवरील चक्रांच्या दर्शनाने दूर असणाऱ्याहि लोकांस श्रीकृष्णाचे वारंवार स्मरण होते.आपणही अनेक देव-मंदिरे पाहून देवतांची दर्शन करावे,त्यामुळे आपले अंत;करण शुद्ध-पुण्य होते.||२३|| भावार्थः----नंतर धनधान्यादिकांनी संपन्न असे सुराष्ट(सुरत)सौवीर,मत्स्य,कुरु व जांगल या देशांचे उलंघन करून काही काळाने तो विदुर यमुनेच्या तीरी जो येऊन पोचला,तो तेथे भगवद्भक्त उद्धव आला होता,तो त्याच्या दृष्टीस पडला.भगवत-भक्त भेटल्यास आपण त्यांची भेट घ्यावी व विचारांची आदान—प्रदान करावी.||२४|| | स वासुदेवानुचरं प्रशान्तं बृहस्पतेः प्राक् तनयं प्रतीतम् | | आलीङ्ग्य गाढं प्रणयेन भद्रं स्वानामपृच्छद्भगवत्प्रजानाम् ||२५|| भावार्थः----तेव्हा त्या विदुराने,नीति--शास्त्रामध्ये प्रवीण बृहस्पतीचा पुरातन प्रख्यात शिष्य,व श्रीकृष्णाचा सेवक असल्यामुळे अतिशांत अशा त्या उद्धवाला प्रेमाने दृढ आलिंगन करून त्यास भगवंताचे पोष्य जे यादव त्यांच्या व कौरवांच्या कुशलाविषयी प्रश्न केला.||२५|| भावार्थः----विदुर म्हणाला---- हे उद्धवा,आपल्या न नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रहमदेवाच्या प्रार्थनेनें या लोंकी पुरणपुरुष रामकृष्ण, पृथ्वीचे कल्याण करून सर्वांस अनंद देत होत्साते वसुदेवाच्या घरीं खुशाल आहेत काय?||२६|| भावार्थः----हे उद्धवा,आह्मा कौरवांचा परममित्र व पूज्य असा तो वसुदेव खुशाल आहे की ? जो अतिउदार असल्यामुळे पिता जसा आपल्या कन्येस आवडते पदार्थ देतो तसा,आपल्या बहिणी व त्यांचे पती यांस इष्ट पदार्थ देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करीत असतो.||२७|| भावार्थः----हे उद्धवा,यादवांचा सेनापती असा वीर जो प्रद्दुम्न तो खुशाल आहे ना?जो पूर्वजन्मी मदन असून या जन्मींहि आपला पुत्र व्हावा म्हणून ब्राहमणाचे आराधन करून त्यांच्या आर्शीवादाने श्रीकृष्णापासून रुक्मिणींने प्राप्त करून घेतला.||२८|| भावार्थः----सात्वत वृष्णि,भोज आणि दाशार्ह या कुलांचा अधिपती जो उग्रसेन तो कंसाच्या भयानें प्राणसंरक्षणार्थ राज्यासनाची आशा दूर सोडून राहिला होता,त्याला कमलनयन श्रीकृष्णानें राज्यभिषेक केला,तो सुखी आहेना?||२९|| भावार्थः----हे सौम्यमूर्ते उद्धवा,जांबवती,अनेक व्रतेकरून ज्याला प्रसवली,तो पराक्रमादि गुणांनी कृष्णासारखा सर्व रथ्यांमध्ये श्रेष्ठ असा हरीचा पुत्र सांब उत्तमप्रकारें सुखी आहेना?पासच पूर्वी पार्वतींने आपल्या उदरी धारण केलें होतें.तेव्हा यांस कार्तिकस्वामी असें नांव असून हा देवांचा सेनापति होता.||३०|| भावार्थः----परमहसंयतीनां देखील दुर्मिळ असें भवत्स्वरूपांचे ज्ञान ज्याला अधोक्षजभगवंताच्या सेवेनें सहज प्राप्त झालें आणि ज्याला अर्जुनापासून धनुर्वेदविद्देंचे रहस्य मिळालें,तो सात्यकी खुशाल आहेना?||३१|| भावार्थः----प्रेमाच्या योगानें ज्याचें लोकलज्जारूप धैर्य नाहींसे झालें व जो श्रीकृष्णाच्या व्रजांकुशादी लक्षणयुक्त पावलांनी चीन्हित अशा मार्गातील धुळीवर गडबडां लोळला,तो भवंतास शरण गेलेला,ज्ञानी व निष्पाप असा अक्रूर,स्वस्तिकक्षेम आहेना?||३२|| भावार्थः----ऋक्,यजु,आणि साम हे तीन वेद,जसा आपल्या मंत्रांमध्ये यज्ञाचा विस्ताररूप अर्थ,धारण करितात तसें,जिणें आपल्या गर्भात श्रीकृष्णदेवास धारण केलें त्या देवकीचें, जिचा पुत्र विष्णू(वामनरूपी)झाला आहे त्या अदितीनामक देवमातेसारखें कल्याण आहे काय?||३३|| भावार्थः----जो चित्त,अहंकार,बुद्धी व मन या च्यार प्रकारच्या अंत:णांतील भेदांतील चवथे जें मन तत्स्वरुपी असून त्याच प्रवर्तकहि आहे,म्हणून ज्याला वेद,शब्दाचे उत्पतीस्थान असे म्हणतात तो तुमचा संबंधी, उपासकांचे मनोरथ पूर्ण करणारा,भगवानअनिरुद्ध,सुख रूप आहेना?||३४||
भावार्थः----हे सौम्यरूपी,उद्धवा,आपल्या अंतर्यामी आत्म्याचें दैवत अशा श्रीकृष्णाची अनन्यभक्तीने सेवा करणारे जे दुसरे-हृदीक,सत्यभामेचा पुत्र व गद इत्यादिक यादव ते सर्व सुखाने संचार करीत आहेत काय?||३५|| भावार्थः----ज्या धर्मराजाच्या सभेमध्ये सम्राज्य-लक्ष्मीकडे पाहून व अनेकठिकाणी मिळालेल्या त्याच्या विजयांचे स्मरण करून दुर्योधनाला अतिशय संताप निर्माण उत्पन्न झाला,तो धर्मराजा,आपल्या बाहुंप्रमाणे वागणाऱ्या अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या सहवर्तमान धर्ममार्गाने धर्ममर्यादाचे रक्षण करीत आहे ना?||३८||
भावार्थः----गदायुद्धाच्या निरनिराळ्या प्रकारांनी युद्धांत संचार करणाऱ्या ज्याच्या पायांचा आघात,रणभूमीलादेखील सहन होत नसे त्या सर्पासारख्या अति क्रोधयुक्त भीमानें,अपराध करणाऱ्या कौरवांविषयी फार दिवस मनात धारण केलेला रोष त्यांच्यावर शासनद्वारा सोडला किंवा नाही.||३७||
भावार्थः----ज्याच्या बाणसमुहाने आच्छादित झाल्यामुळे न दिसणारा आणि कपटाने भिल्लाचा वेष धारण करणारा शंकरही संतुष्ट झाला व जो रथसमुदायाचे रक्षण करणाऱ्या विरांमध्ये कीर्तीचा संपादक,तो गांडीवधनुर्धारी अर्जुन,आपल्या शंत्रुंचा नाश करून खुशाल आहे न?||३८|| भावार्थः----जे माद्रीचे पुत्र असून मातृवियोगानंतर कुंतीने पुत्रत्वेकरून मानिले असता,धर्म भीम व अर्जुन या तिघांनी,जसे पापण्यांनी डोळ्यांचे रक्षण करावे त्याप्रमाणे रक्षण केले.ते नकुलसहदेव,जसे दोन गरुडपक्षी इंद्राच्या मुखातून आलेले भक्ष्य अमृत हिसकावून घेतले,त्याप्रमाणे युद्धांमध्ये शत्रूपासुन आपले राज्य हिसकावून घेऊन सुखाने क्रीडा करीत आहेत ना?||३९|| भावार्थः----काय आश्चर्य आहे,अतिरथी एकट्या विराने केवळ धनुष्याच्या साहाय्याने चारही दिशा जिंकल्या त्या राजर्षिश्रेष्ठ पांडूराजाचा वियोग सहन करून,त्याच्यापाठीमागे केवळ मुलांकरिता राहिलेल्या कुंतिचें,काय कुशल विचारावे! परंतु ती जिवंत तरी आहे काय?||४०|| भावार्थः----हे सौम्यमुर्ते उद्धावा,जाणें मरण पावलेल्या भावाचा(पांडूराजाचा)’त्याच्या धर्मादी पुत्रांशीं द्रोह करून,’द्रोह संपादन केला आणि ज्यानें आपल्या पुत्रांच्या इच्छेला अनुसरून,हिताच्या गोष्टी सांगणारा व प्रत्येक्ष भाऊ अशा मलाही आपल्या नगरांतून बाहेर घालवून दिले.त्या आधोगतीस जाणाऱ्या धतराष्ट्राचा मी वारंवार शोक करितो.आपणही—जीवानी आपल्या प्रतिकूल वागणाऱ्याचा किंवा अनुकूल वागणाऱ्याचा शोक करावा व त्याचा शोक आपल्या अधिकारानुसार निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा.||४१|| भावार्थ:----हे उद्धावा,अशा प्रकारचा कौरवांपासून अपमान पावणारा मी,मनुष्यासारख्या कृतीने मनुष्यांच्या चित्तवृतीस मोह उत्पन्न करणाऱ्या सर्वाश्रयरुपी श्रीकृष्णाच्या अनुग्रहानें,त्यांचे महत्म्य पाहत असल्यामुळें आश्चर्यरहित होत असाता,या पृथ्वीवर गुप्तरुपानें खुशाल संचार करीत आहें.भगवंतांचा आपल्यावर अनुग्रह असेल तर आपण प्रतिकूल परीस्थित परमार्थ करीत असतोत,म्हणून आपण भगवंतांचा अनुग्रह संपादन करावा.आपण—जीवानी निष्काम भक्ती केली असता भगवंतांचा अनुग्रह होत असतो.||४२||
भावार्थः----मला त असें वाटतें कीं,-विद्दा,धन आणि उत्तम कुळांत जन्म,या तीन प्रकारच्या मदांनी उद्धट होऊन आपल्या सैन्याच्या योगानें वारंवार पृथ्वी हलवून सोडणारे अशा दुष्ट राजांच्या वधाने,शरणागतांची दुःखे हरण करण्याच्या इच्छेनेंच,समर्थ अशाही भगवान् श्रीकृष्णानें,कौरवांच्या अपराधांची उपेक्षा केली.||४३|| भावार्थ:----भगवान् स्वतः जन्मरहित असून त्यांची जन्में(अवतार)दुष्ट लोकांच्या नाशाकरितां आहेस व त्या अकर्त्यांची कर्में सर्वजनांची सत्कमार्चठिकाणी प्रवृत्ति व्हावी एतदर्थ आहेत असें नसेल तर गुणातील अशा आनंदस्वरूपी निमग्न असलेला कोण बरें शरीराचा स्वीकार करून कर्माचा पसारा वाढविण्यास योग्य होईल!कोणीच होणार नाही.||४४|| | तस्य प्रपन्नाखिललोकपाना- मवस्थितानामनुशासने स्वे | | अर्थाय जातस्य यदुष्वजस्य वार्तां सखे कीर्तय तीर्थकीर्ते: ||४५|| भावार्थः----यास्तव या सख्या उद्धवा,तीर्थ रूप ज्याची कीर्ती आहे व जो जन्मरहित असूनही शरणागत सर्व लोकपालांच्या व आपले वेदरूप आज्ञें राहणाऱ्या सर्व सज्जनांच्या कार्यांकरीतां यादवांमध्ये उत्पन्न झाला आहे,त्या श्रीकृष्णभगवंताची कथा मला कथन कर.||४५|| याप्रमाणें श्रीमद्भगवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्यें विदुरोद्धव संवाद रूप हा पहिला(१) अध्याय पंचेचाळीस(४५)श्लोकांनी-- युक्त समाप्त झाला ||१|| ||श्रीकृष्णार्पमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ |२--- याप्रमाणे विदुराने प्रश्न केला असता,श्रीकृष्णाच्या वियोगामुळे श्वासोच्छवास टाकून शोक करणारा तो उद्धव,अतिउत्कंठतेने श्रीकृष्णाची बाल-चरित्रे विदुराला वर्णन करू लागला. | २---उद्धव आणि विदुर यांचा संवाद -- [२---भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन] _____________________________________________________________________________________________ | इति भागवतः पृष्टः क्षत्वा वार्तां प्रियाश्रयाम् | प्रतिवक्तुं न चोत्सेह औत्कण्ठ्यात्स्मारितेश्वरः ||१|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----याप्रमाणें विदुरानें परमप्रिय श्रीकृष्णाची वार्ता उद्धवास विचारीली आसतां,त्याला उत्कंठतेनें जगदिश्वर श्रीकृष्णाचें स्मरण झाल्यामुळें,तो भगवद्भक्त उद्धव,विदुरास प्रत्युत्तर देण्याविषयीं बराच वेळापर्यंत समर्थ झाला नाही.||१|| भावार्थः----कारण,जो उद्धव पांच वर्षांचा असतां,त्याला मातेनें प्रातःकालच्या भोजनासाठी बोलाविले,तेव्हां तो लहानपणाच्या खेळांत त्या श्रीकृष्णाची पूजा करीत होता म्हणून त्यानें त्या भोजनाची इच्छा केली नाहीं.||२|| भावार्थ:----तो उद्धव,त्या श्रीकृष्णाच्या सेवेनें कालेंकरून वृद्धदशेस पावला असून,त्याला विदुरानें कृष्णवार्तेविषयीं प्रश्न केल्याबरोबर. त्याला त्या धनाच्या (श्रीकृष्णाच्या)चरणाचें स्मरण झालें,व विरहामुळे गहींवर आला.मग त्याच्यानें उत्तर देववेल कसें?||३|| | स मुहूर्तमभूत्तूष्णीं कृष्णाङ्घ्रिसुधया भृशम् | तीव्रेण भक्तियोगेन निमग्नः साधु निर्वृतः ||४|| भावार्थ:----तेव्हां तो उद्धव,दोन घटिकापर्यंत भाषण व चलनवलनादी व्यापारांनी रहित होऊन निश्चल स्थितीनें राहिला.तो कृष्णचरणस्मरणरूप अमृतानें अत्यंत सुख पावला व तीव्रयुक्तयोगानें श्रीकृष्णाच्या ध्यानामृतात निमग्न झाला.||४|| भावार्थः----ज्याचे शरीर रोमांचांनी व्याप्त झाले आहे,ज्याच्या झाकलेल्या नेत्रांतून प्रेमाश्रुंचा प्रवाह चालला आहे.आणि जो भगवच्चरणाविंद सप्रेमभावाच्या पुरात अतिनिमग्न झाला आहे,आशा त्या उद्धवाला पाहून त्या विदुराने हा कृताकृत्य आहे असे जाणले||५|| भावार्थ:----नंतर तो उद्धव भगवत्स्वरुपापासून हळूहळू पुन्हा देहानुसंधनावर आला आणि डोळे पुसून कृष्णचातुर्याच्या स्मरणाने आश्चर्ये पावत होत्साता विदुराप्रत भाषण करूं लागला.||६|| भावार्थः----उद्धव म्हणाला----हे विदुरा,श्रीकृष्णरूप सूर्यांचे अस्त झाले असता,कालरूप सर्पाने गिळून टाकलेल्या आमच्या गृहांचे ठिकाणी तूं विचारलेल्या बांधवांचे मी काय बरे कुशळ सांगावे.अरेरे! हो लोकच भाग्यहीन आहे,त्यांत यादव तर अगदिंच भाग्यहीन.कारण,क्षीर--- समुद्रामध्यें असणाऱ्या चंद्राला,जसें पूर्वी तेथे असणाऱ्या मत्स्यांनी ‘हा चंद्र आहे असें’ओळखिलें नाहीं तसे कृष्णाबरोबर सहवास करतेवेळीं यादवांनींहि हा श्रीहरी आहे असें ओळखिलें नाही.आपणास—जीवास देह-संबंधितसुद्धा संत—महात्म्य असतात,पण त्यांना ओळखत नाहीत,कारण आपण त्यांना देह-संबंधी या नात्यातून पहातोत.आपण त्यांना देहासंबंधीनात्यातून न पाहता विवेक करून संत—महात्मा या संबंधातून पहावयास पाहिजे.असे पहिले असता ते आपणांस संत—महात्मा आहेत असे कळते.पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे,तेव्हा खरे स्वरूप कळत असते,व त्यांचा आपणास सत्संग घडून माहित होत असते.||८|| भावार्थः--दुसऱ्यांच्या मनातील इंगित जाणणारे,अत्यंत निपुण व एकेठिकाणीं क्रीडा करणारे असून त्या सर्व यादवांनी सर्वभूताश्रय-- स्वरूपीं श्रीकृष्णास,हा कोणी यादवांमध्ये श्रेष्ठ आहे असे मानिले,पण भगवंत--संत—महात्मा असे मानिले नाही.||९|| भावार्थः----जे यादव,देवाच्या मायेनें व्याप्त होऊन श्रीकृष्ण हा आमच्यापैकी यादव आहे असे मानितात व जे शिशुपालक राजे,दुसऱ्या नाहीं त्याच वैरबूद्धीचा आश्रय करून निंदा करितात,त्यांच्या वाक्यांनीं आत्मरूपीं श्रीहरीच्याठिकाणीं चित्त स्थापन करणाऱ्या माझ्यासारख्याची तर बुद्धी मोह पावत नाहीच.मथुरेच्या लोकांनी श्रीकृष्ण हा आमच्यासारखा यादव आहे असे मानले.म्हणजेच देहसंबधी नाते मानिले,तर ज्ञान--संबंधी मानिले नाही.म्हणून आपण विवेक—बुद्धीने ज्ञान-संबंधी मानावयास पाहिजे.||१०||
भावार्थः----ज्यांनी पूर्वी तपश्चार्या केली नाहीं अशा लोकांस,ज्या भगवंताने आपले सर्व सौंदययुक्त स्वरूप दाखवून,त्यांची तृप्ती झाली नाही तोच त्यांचे ते नेत्रभूत आपले स्वरूप,बलत्काराने हिरावून घेऊन गुप्त केले.||११|| भावार्थः---तें स्वरूप असे होतेंकीं,जें ईश्वरानें आपल्या योगमायेचें बल दाखविण्यासाठी ग्रहण केले होतें,मृत्युलोकांत मनुष्यासारख्या लीला करण्यास उपयोगीं पडनारें होतें,स्वतः नारायणाला देखील आश्चर्य उत्पन्न करणारें,सौंदर्य व ऐश्वर्य यांच्या अति पराकाष्ठाने स्थान,आणि कौस्तुभादिक सर्व भषणांनाहि शोभा आणणाऱ्या करचणादिक अवयवांनी सुशोभित असें होतें.||१२|| भावार्थः----अहाहा ! धर्मराजाच्या राजसूययज्ञामध्ये दृष्टीला अनंदकारक जें श्रीकृष्णरूप अवलोकन करून,त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांनी, सृष्टीकर्त्या ब्रहमदेवाचे चराचर जगाच्या निर्माण-कृत्यामध्यें जें काहीं चातुर्य तें आज कृष्ण मूर्तीचे ठिकाणी सर्व खर्च झालें आहे असें मानिलें.||१३||
| यस्यानुरागप्लुतहासरास लिलावलोकप्रतिलब्धमाना:। | व्रजस्त्रियो दृगभि रनुप्रवृत्त धियोSवस्थु:किल कृत्यशेषा: ||१४|| भावार्थः--- ज्या श्रीकृष्णस्वरूपाच्या प्रेमपूर्वक हास्य,विनोद व लीला युक्त अवलोकन यांनी सत्कार पावलेल्या स्त्रिया,ते श्रीकृष्णरूप प्रतिदिवशी वनांत जाऊं लागले असता,त्याच्या मागून ज्यांच्या दृष्टींसहवर्तमान बुद्धीवृत्ति गेल्या आहेत अशा त्या,आपापलीं कृत्यें अर्धिंच चित्रांसारख्या स्तब्ध राहत असत.||१४|| भावार्थः----देव,ऋषि इत्यादिक आपल्याच शांत(सात्विक)स्वरूपांस,आपल्याच दैत्यादिक अंशांत(राजस व तामस)स्वरुपांनी पीडा उत्पन्न होऊं लागली असता त्या सात्विक जणावियीं दया धारण करणारा सर्वेश्वर भगवान्,वस्तुतः जन्मरहित असूनही,महाभूतरूपानें सर्वत्र व्याप्त असलेला अग्नी जसा काष्ठामध्ये प्रगट होतो त्याप्रमाणे,प्रकृतीच्या महत्तत्वरूप अंशाश युक्त होऊन यादवांच्या कुळांत उत्पन्न झाला.||१५||
भावार्थः----हे विदुरा,वासुदेवाच्या घरी(कारागृहामध्यें)जन्मरहित अशाही भगवंताने जन्म घेतल्याचे अनुकरर केले,आरी स्वतः अनंतपराक्रमी असूनही त्याने कंसाच्या भयामुळें गोकुळामध्ये जो वास केला,तसेच कालयवनादिकांच्या भयकरून मथुरानगरींतून जे त्याने पलायन केले,हे त्याचे सर्व कृत्य,माझ्या अंतकरणास अंत्यत खेद उत्पन्न करितें.||१६|| भावार्थः----तसेच श्रीकृष्णाने कंसवधानंतर,वसुदेव देवकी या मातापितरांस जररासं वंदन करून,हे तात,हे माते,आम्ही इतकावेळ कंसापासून फार भीत असल्यामुळे आमच्या हातून तुमची कांहीच शुश्रृशा झाली नाही,तर आमच्या अपराधांची क्षमा करून तुम्हीं आम्हां उभयंत पुत्रांवर प्रसन्न व्हावे असें जें भाषण केलें हें स्मरण करणाऱ्या तुझ्या चित्तास फार दुःख करितें.आपल्याकडून जर कांही कारणास्तव आई—वडिलांची सेवा घडली नाही तर,आपण त्यांना क्षमा मागावयास पाहिजे व त्यांची निरंतर सेवा करावयास पाहिजे,कारण आई—वडिलांची सेवा करणे हा पुत्राचा स्वधर्म असतो—कर्तव्य असते.||१७|| भावार्थः----ज्या श्रीकृष्णानें अतिशयें शोगायमान आशा आमल्या भृकुटीरूप कालशक्तीनें भूमीचा सर्व भार दूर केला,त्याच्या चरणकमलासंबंधी रजांचा योगसाधनेने ज्या मोक्षसिद्धीची मनःपूर्वक इच्छा करितात ती,जन्मापासून कृष्णाचा द्वेष करणाऱ्याहि शिशुपालास राजसुययज्ञामध्ये प्राप्त झाली,हें तुम्हींच प्रत्यक्ष पाहिलें आहे यास्तव त्या श्रीकृष्णाचा विरह कोण बरे सहन करील!अर्थातच कोणीच सहन करणार नाही. ||१८||१९||
भावार्थः----तसेच दुसरेही जे पृथ्वीवरचे वीर,कौरव-पांडव युद्धाप्रसंगी आले होते ते अर्जुनाच्या शस्त्रांनीं निष्पाप होत आपल्या नेत्रांनीं,नेत्रांस अनंदकारक असे श्रीकृष्णाचे मुखकमल पाहून,त्याच्या वैकुंठपदास प्राप्त झाल.||२०|| भावार्थः----हे विदुर,जो श्रीकृष्ण स्वतः त्रैलोक्याचा अधिपती,स्वतःसिद्ध पूर्ण-परमानंद-संपत्तीनेच प्राप्त झालेल्या सर्व भागांनी युक्त,आपणही—जीवाही परमामंद-संपत्तीने परमात्म्यासारखेच आहोत,कारण आपण त्याचेच प्रतिबिंब आहोत.ज्यासारखा व ज्यापासून दुसरा कोणीच नाही,पण आपण—जीव आहोत.आणि म्हणून कारभार किंवा पूजा घेऊन आलेल्या चिरकालीन लोकपालांनी,आपल्या मुकुटांच्या आग्रांनी (म्हणजे त्याच्या संघट्टनशब्दानेंच)ज्याच्या पाय ठेवण्याच्या स्तुति केली आहे असा,म्हणून आपण—जीवानी भगवंतांची स्तुती करावी.||२१|| | तत्तस्य कैकर्यमलं भृतान्नो विग्लापयत्यंग |
| तिष्ठन्निषण्नं परमेष्ठिधिष्णये न्यबोधयद्देव निधारयेति ||२२||
भावार्थः----तो श्रीकृष्ण आपण उभा राहून,राजसिंहासणावर बसलेल्या उग्रसेन राजास’हे देव(राजाधिराज)आपण ह्या कार्याच्या विनंतीकडे लक्ष द्यावें’अशी जी प्रार्थना करीत असें,तें त्याचे दास्यत्व,त्याच्या आम्हां सेवकांस अत्यंत व्यथा(गहींवर)उत्पन्न करिते म्हणजे असें दास्यधर्मानें वर्तन करणारें त्यास प्रयोजन काय होतें?असें मनांत येतें.||२२||
| अहो बकी यं स्तनकालकुटं जिघांसयापाययदप्यसाध्वी |
| लेभे गतिं धात्र्युचितां ततोsन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम ||२३||
भावार्थः----परंतु यास केवळ कृपेवांचून दुसरें कांहिंच कारण दिसत नाहीं अहो!पुतनेंने ज्या कृष्णाला ठार मारण्याच्या इच्छेने आपल्या स्तनामध्यें कालकुट विष भरून तें कृष्णाकडून’स्तनपान करविण्याचा मिषानें’प्राशन करविलें,अशी ती दुष्ट पुतना,श्रीकृष्णापासून यशोदा- मातेला योग्य अशा गतीस पावली.तस्मात् अप्रतिम दयासागर अशा श्रीकृष्णावांचून दुसऱ्या सामान्य दयाळू पुरुषास शरण जावे?||२३||
भावार्थः----हे विदुर,चक्रधारण करणारा श्रीहरी ज्याच्या स्कंधावर आहे युद्धामध्ये प्राप्त होणाऱ्या गरुडास ज्यांनी अवलोकन केले,व त्रैलोक्याधिपती भगवंताचेठीकानी क्रोधावेषरूप मार्गाने ज्यांचे चित्त जडले आहे,अशा दैत्यांनाहि मी भगवद्भक्तच असे मानितो.कारण,कारण त्यांसहि मुक्तीच प्राप्त होते.भगवंतांचे म्हणणे आहे की,माझ्या ठिकाणी जीवांचे चित्त सदोतीत असले पाहिजे,त्यासाठी कारण शत्रुभाव असो किंवा मित्रभाव असो किंवा अन्य कोणताही भाव असो.म्हणून आपला चित्ताचा आय सदोदित भगवंतंच असावा तर अन्य नसावा.म्हणून आपला भगवंताविषयी प्रेमाचाच-भाव असावा.आपण प्रेम--भक्तीचाच स्वीकार करावा.||२४|| | वसुदेवस्य देवक्यां जातो भोजेन्द्रबन्धने | चिकीर्षुर्भगनस्या: शमजेनाभियचित: ||२५||
भावार्थः----आता उद्धव श्रीकृष्णाचे चरित्र संक्षपाने सांगतो----ब्रहमदेवाने प्रार्थना केलेला भगवान,पृथ्वीचे कल्याण करण्याकरिता कंसाच्या बंधिगृहाच्या वसुदेवाचे देवकीचेठिकाणी उत्पन्न झाला व त्याचबरोबर हेही कारण आहे की,वसुदेव—देवकींनी पूर्व-जन्मात भगवंतांसारखा मुलगा व्हावा मागणी केली होती,त्या मागणीची पूर्तता होण्यासाठीसुद्धा जन्म घेतला होता.ले तरी मुख्य प्रयोजन हे पृथ्वीचे कल्याण करण्याकरिताच जन्म घेतला होता.||२५|| भावार्थः----नंतर कंसापासून भिणाऱ्या वसुदेवपित्याने नंदाच्या गोकुलामध्ये पोचविला असता तेथे आपल्या ईश्वरी तेजाचे अच्छादन करून त्याने बलरामासहवर्तमान अकरा वर्षे वास केला.||२६|| भावार्थः----वत्सपालकांनी युक्त भगवंताने वत्सांना चारतेवेळी,शब्द करणाऱ्या पक्ष्यांनी जेथील वृक्ष व्याप्त केले आहेत अशा यमुनुच्या उपवनामध्ये क्रीडा केली.||२७|| भावार्थः----सुंदर अशा सिंहबालकसारख्या ज्याच्या नजरेचा झोंक असे तो भगवान,गोकुळवासी लोकास अवलोकन करण्यास योग्य अशी बाललीला दाखवीत होत्साता,केव्हांतरी रडल्यासारखे व केव्हांतरी हसल्यासारखे अनुकरण करून दाखवीत असे.भगवंत कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल भावात राहत असे.||२८|| भावार्थः----तोच भगवान काही मोठा झाल्यावर,पांढऱ्या गाईंनी व बैलांनी युक्त व लक्ष्मीचे केवळ आश्रयस्थान अशा गोधनास चारित होत्साता,मुरली वाजवून आपल्या बरोबर असलेल्या गोपांस रमवित असे.||२९|| भावार्थः----तेव्हां त्याने जसा बालक,खेळविण्यासाठी केलेल्या मातीच्या किंवा गवताच्या व्या्घ्रसिंहांदिकांस मोडून टाकतो त्याप्रमाणे कंसाने पाठविलेल्या,यथेच्छरूप धारण करणाऱ्या,मायावी नृनावर्तबकादिक दैत्यांस सहन लीलेने मारुन टाकिले||३०|| भावार्थः----व त्याने कालियानामक सर्पाचा निग्रह करून त्यास यमुनेतुंन रमणकद्वीपास घालवून दिले आणि विषयुक्त जलाच्या प्राशनाने मरण पावलेल्या गोपांस व गाईंस उठवून त्यांस पूर्वीप्रमाणे स्वच्छ व निर्विष झालेले ते यमुनेचे उदक पाजिले.||३१|| भावार्थः----नंतर वृद्धिंगत झालेल्या द्रव्याचा चांगला व्यय व गर्विष्ठ झालेल्या इंद्राचा मानभंग करण्याचे मनांत आणून त्या समर्थ श्रीकृष्णाने,उत्तम ब्राह्माणांकडून नंदाच्या हस्ते गाईंची पूजा व गोवर्धनोत्साहरूप यज्ञ करविला.||३२|| | वर्षतीन्द्रे व्रज:कोपाद्भग्रमानेSतिविह्रल: | गोत्रलीलात पत्रेन त्रातो भद्रानुगृण्हता ||३३| भावार्थः----हे विदुरा,आपला मानभंग झाला म्हणून क्रोधाने इंद्र,पर्जन्यवष्टी करूं लागला असता,अतिवीव्हळ झालेल्या गोकुळावर अनुग्रह करणाऱ्या भगवंताने,गोवर्धनपनपर्वतरूप लीलाछत्र धारण करून त्यांचे रक्षण केले||३३|| | शरच्छशिकरेर्मृष्टं मानयन् रजनीमुखम् | गायन् कलपदं रेमे स्त्रीणां मण्डलमण्डनः ||३४|| भावार्थः----शरद-ऋतुंतील चंद्राच्या किरणांनी प्रकाशयुक्त झालेल्या रात्रीच्या मुखास मान देत(शोभवित)होत्साता,गोपींच्या मंडळास शोभविणारा तो भगवान मधुरस्वरयुक्त गायन करीत करीत त्याच्या सहवर्तमान रममाण झाला श्रीकृष्ण भगवंतांनी अनेक लीला करून अनेक कार्य सहज केले.||३४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनरमक महापुराणातील तृतीय(३) स्कंधामध्ये हा दुसरा(२) आध्याय चौतीस(३४) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पमस्तू|| ||श्रीसदगुरुचरणार्पनमस्तू || _____________________________________________________________________________________________ ३-- श्रीकृष्णाने गोकुळांतून मथुरेमध्ये येऊन कंस वधादिक जे कृत्य केले व द्वारकेमध्ये रुक्मिणीहरणादीक जे कृत्य केले ते सर्व या तिसऱ्या आध्यायांत वर्णिले आहे. | ३--उद्धव आणि विदुर यांचा संवाद---[३---भगवंतांच्या अन्य लीला चरित्राचे वर्णन] _____________________________________________________________________________________________ | उद्धव उवाच:---
| तत: स आगत्य पुरं स्वपित्रो- श्र्चिकीर्षया शं बलदेवसंयुत: |
| निपात्य तुंगाद्रिपुयूथनाथं हतं व्यकर्षद् व्यसुमोजसोर्व्याम् ||१||
भावार्थः----उद्धव म्हनाला-----हे विदुर,नंतर बलरामा-सहवर्तमान तो श्रीकृष्ण,आपल्या माता-पितरांस सुख देण्याच्या इच्छेनें मथुरेप्रत येऊन त्याने आपल्या शत्रूसमुदायाचा नाथ अशा कंसाला अतिउंच राजमंचकावरून बलत्काराने खाली पाहून मारिले आणि गतप्राण झालेल्याहि त्याला(आईबापास बरें वाटण्याकरिता)रंग भूमीवर इकडे तिकडे ओढिले.जर आपले राहण्याचे स्थळ कांही कारणांनी इतर ठिकाणे असेल तर आपण आई—वडिलांची सेवा करण्याकरिता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी येऊन त्यांची सेवा करावयास पाहिजे.||१|| | सान्दीपने: सत्कृत्प्रोक्तं ब्रम्हाधीत्य सविस्तरम् | तस्मै प्रादाद्वरं पुत्रं मृतं पञ्चजनोदरात् ||२||
भावार्थः----नंतर बलरामासहवर्तमान त्या श्रीकृष्णानें सांदीपनिनामक गुरुपासून एकवार उपदेशमात्रेकरून चारही वेदांचे सांग अध्यायन केले आणि त्या गुरूला पंचजननामक दैत्याचा उदराचे विदारन करून त्याद्वारा मरण पावलेला पुत्र,यमलोकाहून आणून गुरुदक्षिणा दिली व त्यास दुसरेहि इष्ट वर दिले.आपणही सदगुरूंचा स्वीकार करून,त्यांच्याकडून सत्-विद्देचा उपदेश ग्रहण करावयास पाहिजे.सदगुरूचा स्वीकार केला पण त्यांच्याकडून सत्संग न करता—त्यांच्यामुखातून सत्-शात्राचे—वेदांत—शात्राचे श्रवण केले व त्यानुसार आचरण न केले तर उपयोग काय ? किंवा सत्—शास्त्राचे—वेदांत—शास्त्राचे श्रवण न केले तर उपयोग काय ? अर्थातच कांहीच उपयोग नाही.जसे एकाद्दा मुलीने लग्न करून पतीच्या स्वीकार करून पतीच्या घरी न राहिली किंवा पुरुष पत्नीच्या घरी राहिला नाही,तर उपयोग काय ? अर्थातच नाही.तिला किंवा त्यास संतान(पुत्र—पुत्री)प्राप्त होणारच नाही. त्याप्रमाणे आपण सदगुरूचा स्वीकार केला पण त्यांच्या मुखातून सत्—शास्त्राचे—वेदांत-शास्त्राचे श्रवन न केले तर उपयोग काय ? अर्थातच नाही.त्यास किंवा तीस ज्ञान-पुत्र(ब्रह्म प्राप्ती होणारच नाही.ज्ञान—पुत्र किंवा ब्रह्म—प्राप्ती होऊन अनुभव आला तर जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुप होउत.||२|| भावार्थः----नंतर भीष्मक राजाच्या रुक्मिणीनामक कन्येने,लक्ष्मीसारख्या आपल्या स्वरूपसौंदर्याने मोहित करून स्वयंवरास जे राजे बोलविले होते त्यांच्या मस्तकावर पाय देऊन म्हणजे त्यांचा पराभव करून समक्ष पाहत असतां,श्रीकृष्णाने आपला विवाह रुक्मिणी बरोबर गांधर्वविधीने(परस्पर संकेतरूप नियमाने)होण्याच्या इच्छेने ‘जसे गरुडाने इद्रापासून अमृत हरन केले त्याप्रमाणे’त्या राजांपासून आपला भाग अशा लक्ष्मीच्या अंशभूत रुक्मिणीचे हरण केले.||३|| भावार्थ:----नंतर वेसणीवांचून असलेल्या नग्नजित् राजाच्या सात वृषभांस दमवून स्वयंवरामध्ये भगवंताने नाग्नजितीचा विवाह करून घेतला आणि वृषभांनी पूर्वी गर्वपरिहार केलेल्या,परंतु पुनः नाग्नजीतीची इच्छा धरून कृष्णाबरोबर युद्ध करावयास प्राप्त झालेल्या त्या शस्त्रधारी त्या अज्ञराजांच्या एकसुद्धा शस्त्रप्रहर आपल्यावर न घेतां,आपल्या शस्त्रांनी त्यांचा संहार करून टाकिला.||४|| भावार्थः----स्वतंत्र अशाही त्या भगवंताने स्त्रिजिताप्रमाणे आपल्या सत्यभामानामक स्त्रीचे प्रिय करण्यासाठी स्वर्गावरील पारिजातक वृक्ष द्वारकेस आणिला.तेव्हा त्या निमित्ताने ‘ज्या श्रीकृष्णाने आपल्या मातोश्रींचे कुंडलाहरणरूप मोठे कार्य केले होते त्याच्या बरोबर इंद्राणीच्या सांगण्यावरून वज्रधारी इंद्र,क्रोधाने अंध(विवेक शून्य)होऊन देवगणास बरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाला त्यापेक्षा हा इंद्र,स्त्रियांच्या खेळण्याचा केवळ हरीणच होय असें म्हटले तरी चालेल.||५|| भावार्थः----शरीराच्या योगानें आकाशालाही ग्रासून टाकणारा असा आपला पुत्र नरकासुर,युद्धामध्यें श्रीकृष्णानें चक्राच्यायोगानें मारिला असें पाहून पृथ्वीनें प्रार्थना केलेल्या त्या भगवंतानें,त्याच्या भगदत्तनामक पुत्रास,आपण हरण करून शेष राहिलेलें राज्य देऊन त्याच्या अंत:पुरामध्यें प्रवेश केला.||६||
भावार्थः----त्याठिकाणीं नरकासुरानें पूर्वी आणून ठेविलेल्या राजकन्या होत्या त्या दीनबंधू अशा त्या हरिला पाहतांच तत्क्षणींउठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी अतिहर्षयुक्त लज्जा पूर्वक सप्रेम अवलोकानें श्रीकृष्णास पतीत्वेंकरून वरिलें.||७||
| आसां मुहूर्त एकस्मिन्ना नागारेषु योषिताम् | सविधं जगृहे पाणीननुरूप: स्वमायया ||८||
भावार्थः----नंतर त्या सर्व राजकन्यांस श्रीकृष्णानें द्वारकेंस आणून निरनिराळाया मंदिरांमध्यें ठेविल्या आणि आपल्या योगमायनें त्या स्त्रियांस योग्य अशीं आपली तितकी रूपें प्रगट करून,त्या प्रत्येक मंदिरांत एकाच मुहर्तावर त्या सर्व कन्येचेचें यथाविधि पाणीग्रहण केले.||८||
भावार्थः----नंतर श्रीकृष्णानें आपल्या मायेचा विस्तार होण्याच्या इच्छेनें त्या प्रत्येक राजकन्येच्या ठिकाणीं सर्व गुणांनी आपल्यासारखे दहा पुत्र उत्पन्न केले.||९|| भावार्थः----नंतर सैन्याच्या योगानें आपल्या मथुरानगरीला वेढा घालणाऱ्या कालयवन,जरासंध,शाल्व इत्यादीक राजांस मुचुकुंद,भीम इत्यादिकांकडून भगवंतानेंच मारविलें आणि त्या योगानें आपल्या भक्तांची कीर्ती सर्वठिकाणीं प्रसिद्ध केली.||१०|| भावार्थ:----शंबरासूर,द्विविदवानर,बाणासुर,मुर,बल्वल व अन्यही जे दंतवक्रादिक शत्रू,त्यांपैंकी कितीएकांना भगवंतानें स्वतः मारिलें व कितीएकांना प्रद्दुम्न बलराम इत्यादिकांकडून मारविले.||११|| भावार्थ:----हे विदुरा,पांडू व धतराष्ट्र या तुझ्या बंधुच्या पुत्रांच्या पक्षांकडे साहाय्याकरितां प्राप्त होऊन कुरूक्षेत्रामध्यें येणाऱ्या ज्या राजांच्या सैन्यांनीं भूमी कंपित झाली,त्या राजांसही श्रीकृष्णानेंच मारविलें.||१२|| भावार्थ:----हे विदुरा कर्ण,दुःशासन व शकुनी यांच्या दुष्ट उपदेशानें ज्याची राज्यलक्ष्मी व आयुष्य हिं नष्ट झालीं आहेत व ज्याच्या मांडीचा भंग झाला आहे असा सैन्य व बंधूसहवर्तमान युद्ध भूमीचेठिकाणीं मरून पडलेल्या दुर्योधनास पाऊनहि तो श्रीकृष्ण आनंद पावला नाहीं.||१३||
भावार्थः---आणि मनात म्हणाला कीं,द्रोण,भीष्म,अर्जुन व भीम इत्यादिकांकडून हरण केलेला जो हा आठरा अक्षौहिनी रूप भूमीचा मोठा भार,तो पाहूं गेला असतां कितीसा आहे!(काहिंच नाही)कारण,माझे अंशभूत जे प्रद्दुम्नादीक वीर त्यांच्या योगानें पृथ्वीला सहन करण्यास फारच अशक्य आसें यादवांचेसैन्य अजून जशाचे तसेंच राहिलें आहे.||१४|| भावार्थः----जेव्हा मध्यप्राशनाच्या मदनें लालनेत्र झालेल्या हे यादवांमध्यें परस्पर कलह उत्पन्न होईल तेव्हां याच उपायानें यांचा नाश होईल,यांच्या वधाविषयी दुसरा उपाय नाहीं या कामी मी उदुक्त झालो असता,हे यादव आपोआप मद्यप्राशनवगैरे करून नाश पावतील.||१५||
भावार्थ:----असा विचार करून भगवंतानें धर्मराजाला त्याच्या राज्यावर स्थान्न केलें आणि साधूलोकांचा मार्ग दाखवून आपल्या सर्व मित्रजनांस आनंदभरीत केलें.||१६|| भावार्थः----उत्तरेच्याठिकाणीं अभिमन्यूनें जो पुरुषवंशाचा बीजभूत उत्तम गर्भ स्थापन केला होता तो अश्वत्थाम्याच्या ब्रहमस्त्राने नष्ट झाल्यासारखाच परंतु त्याचें पुनः भगवंताने रक्षण केलें.||१७|| भावार्थः----नंतर,प्रभूनें धर्मराजाकडून तीन अश्वमेघांनी नारायणाचे यजन करविलें.तो धर्मराजाही कृष्णालाच अनुसरून आपल्या कनिष्ठबंधूसहवर्तमान पृथ्वीचे रक्षण करीत होत्साता राज्यसुखाचा अनुभव घेऊं लागला.||१८|| भावार्थः----त्या,जगदात्म्या भगवानश्रीकृष्णानेहि लौकिक वैदीक मार्गास अनुसरून व प्रकृती पुरुषांच्या विवेक स्थितीने सर्व ठिकाणी मनाची आसक्ती सोडून द्वारकेमध्ये विषयांच उपभोग केला.||१९|| भावार्थः----स्नेहयुक्तमंदहस्य शीत अवलोकनाने,अमृततुल्य मधुरवाणीने,निर्दोष मंगलकारक चरित्राने आणि लक्ष्मीने किंवा सर्व शोभेचे मुख्यस्थान अशा स्वरूपाने||२०|| भावार्थः----हा लोक व परलोक यांस रमवित असून विशेष यादवांस रमवित होत्साता रात्रीच्यायोगाने आनंद प्राप्त होतो अशा स्त्रियांच्याठिकाणी क्षणिक प्रेम आहे असा तो भगवान श्रीकृष्णही द्वारकेमध्ये रमता झाला.||२१|| | तस्यैवं रममाणस्य संवत्सरगणान् बहून् | गृहमेधेषु योगेषु विराग: समजायत ||२२||
भावार्थः----याप्रमाणे बहुतसंवत्सरांचे समुदाय पर्यंत विषयांचा उपभोग घेणाऱ्या श्रीकृष्णासहि गृह-धर्माचे ठिकाणी व विषयभोगाच्या उपयांचेठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले.||२२||
अर्थः----मग ज्ञानयोगानें योगेश्वर श्रीकृष्णाला अनुसरणारा कोण बरें पुरुष आपण दैवाच्या स्वाधीन असून दैवाधीन असणाऱ्या विषयांवर विश्वासाने प्रीती करील (कोणीही करणार नाही)म्हणून आपण—जीवानी दैवाधीन असणाऱ्या विषयांवर प्रीती न करता त्यांचा त्याग करावा,कारण वास्तविक पाहता विषयांत आनंद नाहीच,तर परमात्माच आनंदरूप आहे.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||२३|| भावार्थः----ऐकेवेळी द्वारकेमध्ये क्रीडा करणाऱ्या यादवांच्या व भोजांच्या पुत्रांनी,कोप उत्पन्न केलेल्या व भगवंताचा अभिप्राय जाणणारऱ्या ऋषींनी त्या यादवपुत्रास ‘यदुकुलाचा क्षय होऊन’असा शाप दिला.||२४|| भावार्थः----नंतर,काहीएक मासांनी कृष्णाने मोहित केलेले-वृष्णि,भोज व अंधक इत्यादी यादव (त्या शापाच्या परिहाराकरिता)रथांत बसून हर्षयुक्त होत्साते प्रभासक्षेत्रास गेले.||२५|| भावार्थः----त्यांनी तेथील तीर्थामध्ये स्नान करून व त्या तीर्थोदकाने ऋषी व चरित्र याचे तर्पण करून,ब्रह्माणांला सुस्वभाव इत्यादी बहुगुणांनी युक्त अशा अनेक गायीचे दान केले.||२६|| भावार्थः----तशेच सोने,रूपे,शय्या,वस्त्रे,कृष्णाजीने,शालजोड्या,पालख्या,रथ,हत्ती कन्या दान घेणाऱ्या ब्राहमणाची कुटुंबवृत्ति चालविणारी भूमी||२७||
| अन्नं चोरूरसं तेभ्यो दत्त्वा भगवदर्पणम् | गोविप्रार्थासव: शूरा: प्रणेमुर्भूवि मूर्धभि: ||२८||
भावार्थः----आणि बहुत रसांनी युक्त असे अन्न,हि सर्व भगवदर्पण-बुद्धीने त्या ब्राहमणांस देऊन गाई व ब्राहमण यांच्याच सेवेकरितां प्राण धारण करणाऱ्या त्या शूर यादवांने भूमीवर मस्तके ठेऊन त्या नमस्कार केला.||२८|| याप्रमाणे श्रीमद्भगवदनामक महापुराणातील तृतीय(३)स्कंधामध्ये विदुरोद्धवसंवादरूप अध्याय तिसरा(३)अठ्ठावीस श्लोकांनियुक्त असलेला समाप्त झाला||३|| || श्रीकृष्णार्पमस्तू|| || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________|४--- नंतर विदुर,आपल्या बंधूचा नाश झाला असे उद्धवापासून श्रवण करून तो आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी उद्धवाच्या उपदेशाने मैत्रेयऋषीजवळ गेला,अशी कथा या चवथ्या अध्यायात वर्णिली आहे. | उद्धव आणि विदुर यांचा संवाद---[४---उद्धावांचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषीकडे प्रयाण.] _____________________________________________________________________________________________ |उद्धव उवाच:---
| अथ ते तद्नुज्ञाता भूक्त्वा पीत्वा च वारूणीम् | तया विभ्रशितज्ञाना दूरूक्तैर्मर्म पस्पृशु: ||१||
भावार्थः----उद्धव म्हणाला---हे विदुरा नंतर त्या ब्राहमणांनी भोजनाविषयी आज्ञा दिलेल्या त्या यादवांनी भोजन करून नंतर धान्यपिष्टपासून काढलेल्या एकप्रकारच्या मद्दाचे प्राशन केले,त्याच्या योगाने ते ज्ञाननष्ट(बेशुद्ध)होऊन दुष्ट भाषणांनी एकमेकांची मर्मे काढू लागले.किणीही मद्द सेवन केले असता ज्ञानभ्रष्ट—अविवेकी होऊन दुष्ट शब्दांचे उच्चारण करतात--बोलतात.त्यांच्या बोलण्यात अहंकार वाढलेला दिसून येतो.म्हणून आपण मद्द सेवन करू नये.त्यामुळे शारीरिक,मानसिक,बौद्धिक,आर्थिक,सामाजिक,कौटुंबिक हानी—नुकसान—अहित होऊन एकंदरीत पारमार्थिक हानी होते.म्हणून मद्द सेवन तर करू नयेच,तर मद्द सेवन करणाराच्या अंगावरील वाऱ्याचा आपल्या अंगाला—स्थूल शरीरालाही स्पर्श होऊ देऊ नये.असे सावध होऊन जीवन जगावे.||१|| | तेषां मैरेयदोषेण विषमीकृतचेतसाम् | निम्लोचति रवावासीद्वेणूनामिव मर्दनम् ||२||
भावार्थः----तेव्हां मेद्दाच्या दोषाने त्यांची चित्ते परस्पर वीरोद्धयुक्त होऊन,सूर्यास्त झाल्यावर,‘वेळूच्या घर्षणापासून उत्पन्न झालेल्या अग्नीने जसा त्यांच्या सर्व बेटांचा नाश होतो त्याप्रमाणे परस्पर युद्ध होऊन यादवांचा नाश झाला.सर्व बांधवांनी मद्दाचे सेवन केल्यामुळे त्या बांधवत परस्परात युद्ध होऊन सर्वच मृत्यूस प्राप्त झाले.वास्तविक पाहता भावा-भावांत प्रेम असते,पण मद्द सेवन केल्यामुळे एकमेकांचे शत्रू होऊन एकमेकांनी एकमेकांचा घात केला.अशा रीतीने मद्द प्रेमाचे रुपांतर शत्रू-भावात करून एकमेकाच्या मृत्यूस कारण होते.म्हणून सावध होऊन पारमार्थिक कार्य करावे.||२|| भावार्थ:----तेव्हां त्या भगवंताने आपल्या मायेची ती मती पाहून,सरस्वती नदीचे उदकांचे आचमन करून तो एका आश्वत्य वृक्षा खाली जाऊन बसला.||३|| भावार्थः----शरणागताची दु:खे हरण करणारा व आपल्या कुलाचा संहार करण्याची इच्छा करणारा अशा त्या भगवंताने पूर्वी द्वारकेमध्ये असतांनाच मला-(उद्धवाला) तूं बद्रिकाश्रमास जा असे सांगीतले.||४|| | अथापि तदभिप्रेतं जानन्नहमरिन्दम | पृष्ठतोsन्वगमं भर्तुः पादविश्लेषणाक्षम: ||५||
भावार्थः----तथापि हे शत्रूदमान विदुरा त्या भगवंताचे कुलसंहारादीक मनोगत जाणणारा परंतु त्याच्या चरणाचा वियोग न सहन करणारा मी—(उद्धव)त्या स्वामीच्या मागून प्रभास क्षेत्रास गेलो.||५|| भावार्थः----तेथे आपल्या प्रिय स्वामींचा शोध करीत असतां मी,सरस्वतीनदीचा तीराचा आश्रय करून बसणारा,वस्तुतः आश्रमरहित परंतु लक्ष्मीच्याहिं आश्रयस्थान अशा एकट्या भगवंतास आवलोकन केले.||६|| भावार्थः----तो भगवान- श्यामसुंदरमूर्ती,शुद्धसत्वगुणमय,प्रसन्न व आरक्तवर्ण अशा नेत्रांनी युक्त,चार बाहूंनी युक्त पितांबरधारी,||७|| भावार्थः----डाव्या मांडीवर उजवे पदकमळ ठेऊन लहाशा एका अश्वत्थवृक्षाला टेकून बसलेला,विषयसुखाचा त्याग करून निजानंदाने परिपूर्ण असा होता.||८|| भावार्थ:----त्याचवेळी,व्यासमुनि,ज्याचा हितचिंतक व मित्र आहे असा महाभगवद्भक्त,योगसिद्ध मैत्रेय ऋषी,लोकांत संचार करीत करीत सहजगाच्या तेथे प्राप्त झाला.||९|| भावार्थः----तेव्हा श्रीकृष्णाचे ठिकाणी परमप्रीती युक्त आणि त्याच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने व प्रेमभावाने ज्याचे मस्तक नम्र आहे असा तो मैत्रेय ऋषी,श्रवण करीत असतां,तो मुक्तीदाता श्रीकृष्ण,सप्रेममहास्यपूर्वक अवलोकन माझ्या सर्व श्रमाचा परिहार करीत असता म्हणाला--------------||१०||
भावार्थः----श्रीभगवान म्हणाला---हे उद्धवा,अंतर्यामी राहणारा मी,तुझ्या मनांत इच्छित काय आहे ते जाणतो.तू पूर्वजन्मी अष्टवसूपैकी एक वसू होतास तेव्हा विश्वस्थष्ट्या वसुंच्या सत्रामध्ये माझी प्राप्ती व्हावी म्हणून तू माझे यज्ञाच्या योगाने आराधन केले होतेस,म्हणून इतरांनी प्राप्त करून घेण्यास अशक्य जे असे माझ्या प्राप्तीचे साधन (ज्ञान)ते मी तुला देतो.आपण—जीवानी पारमार्थिक इच्छा—निष्काम इच्छा धारण करून पारमार्थिक साधना केली असेल तर त्या फळाची पूर्तता भगवंत या जन्मी किंवा पुढील जन्मी आवश्य मिळत असते,म्हणून आपण—जीवानी पारमार्थिक—निष्काम साधना आवश्य करावी.त्याचबरोबर हेही लक्षात असावे की,संसारिक इच्छा मात्र करू नये,कारण संसारिक इच्छेचे फळ जेव्हा नियमाने जेव्हा परिपक्व होईल तेव्हांच मिळत असते.म्हणून आपण विवेक करून पारमार्थिक साधना करावी.||११|| | स एष साधो चरमो भवाना- मासादितस्ते मदनुग्रहो यत् |
| यन्मां नृलोकान् रह उत्सृजन्तं दिष्ट्या ददृश्र्वान् विशदानुवृत्त्या ||१२||
भावार्थ:----हे साधो,ह्या जीवलोकांचा त्याग करून वैकुंठास जाणाऱ्या माझे एकांतभक्तीचे योगाने तू जे एकांती दर्शन घेतलेस हे फार चांगले झाले.ज्या जन्मात तू माझा अनुग्रह संपादन केलास ते हे तुझे सर्व जन्मामध्ये शेवटचेच होय.या नंतर तू मुक्त होसील.उद्धवास ज्याप्रमाणे भगवंतांचे एकांत दर्शन झाले,त्याप्रमाणे आपणही निष्काम भक्ती करून एकांत दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा.||१२|| | पुरा मया प्रोक्तमजाय नाभ्ये पद्मे निषण्णाय ममादिसर्गे |
| ज्ञानं परं मन्महिमावभासं यत्सूरयो भागवतं वदन्ति ||१३||
भावार्थः----पूर्वी गेलेल्या पाद्मकल्पामध्ये सृष्टीच्या आरंभी माझ्या नाभीपासून उत्पन्न होऊन कमळावर बसलेल्या ब्रहमदेवाला जे मी सांगितले होते,ज्याला विवेकी पुरुष,भगवान असे म्हणत व ज्याच्या योगाने माझी लीला कळून येते,त्या ज्ञानाचा तुला मी उपदेश करितो.||१३|| भावार्थ:----याप्रमाणे त्या पुरुष भगवंताने आदरपूर्वक भाषण केले असता त्याच्या कृपादृष्टीरूप अनुग्रहास पात्र झालेला मी,हर्षाने याच्या अंगावर रोमांच उभे राहिलेआहेत,सद्गतीत कंठ झाला आहे,व नेत्रातून प्रेमाश्रू चालले आहेत असा होत्साह हात जोडून त्या जोडून त्या श्रीकृष्णाला म्हणालो(उद्धव) की,------------------||१४||
भावार्थ:----हे प्रभो तुझ्या चरणकमलाचे सेवन करणाऱ्या लोकांस या लोकी,धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थामध्ये कोणता बरे दुर्लभ आहे?(कोणताच नाही)तथापि,हे सर्व व्यापकादेवा,मी त्या पुरुषार्थाची इच्छा करीत नाही.कारणमी,केवळ तुझ्या चरणाच्या सेवेविषयीच उत्सुक आहे.||१५||
| भावार्थः----हे प्रभो,निरीच्छ अशी तुझी कर्में जन्मरहित अशा तुझ्या जन्म,कालस्वरूपी तुझे शत्रूच्या भयाने पलायन करणे व द्वारकारूप किल्ल्याचा आश्रय करणें आणि स्वस्वरूपी रममाण असणाऱ्या तुझें पुष्कळ स्त्रियासह वर्तमान गृहस्थाश्रम करणें,यांविषयीं ज्ञान संपन्न लोकांचीही बुद्धीखिन्न(आश्चर्ययुक्त)होते.||१६|| अर्थः----हे प्रभो,देवा आकुंठीत आणि अखंड अशा आत्मज्ञानानें संपन्न असा तूं मसलतींच्या वेळीं मला बोलावून आणून एखाद्या अज्ञानी पुरुषाप्रमाणें लक्षपूर्वक जें मला विचारीत होतास तें तुझें भाषण आठवलें म्हणजे,माझ्या म्हणाला केवळ मोह उत्पन्न करितें.आपणास भगवंतांच्या वाक्यांचा—शब्दांचा—वेदांचा—शब्दाचा—उपदेशाचा मोह उत्पन्न व्हावा,कारण तो मोह मोक्षाकडे—सुखाकडे नेणारा आहे. इतर जे संसारीकांचे शब्द—वाक्य त्यांचा मोह होऊ नये,कारण तोमोह अज्ञान—संसार—दु:ख वाढविणारा आहे.||१७||
भावार्थः----हे स्वामिन्,आत्मस्वरूपाच्या रहस्याचा बोध करून देणारे जें उत्तम ज्ञान ब्रहमदेवाला समग्र सांगितले आहेस,तें मला समजण्यासारखें असेल तर कृपा करून सांग.म्हणजे त्याच्या योगानें दुःखरुपी संसार सहज तरून जाईल.आपण उत्तम ज्ञान म्हणजे वेदांताचे ज्ञान—जागण्याचे—ज्ञान सत्संग करून प्राप्त करून घ्यावे.म्हणून त्याचा स्वीकार करावा.अधम--ज्ञान म्हणजे संसाराचे ज्ञान—जगण्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊ नये.म्हणून त्याचा त्याग करावा.||१८|| भावार्थः----अशा रीतीनें आपल्या मनांतील अभिप्राय श्रीकृष्णास कळविला आसतां,त्या कमलनयन भगवान् परमेश्वराने,मला आपल्या स्वरूपाच्या परमस्थितीत ज्ञानाचा उपदेश केला.आपण जर संत—महात्मा यांना आध्यात्मिक प्रश्न विचारले तर ते आपणास आध्यात्मिक प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान करितात.||१९|| भावार्थः----याप्रमाणें आराधना केलेल्या गुरुरूपी श्रीकृष्णापासून पुरुषार्थरुपी आत्मज्ञानाचा मार्ग प्राप्त करून घेतल्यावर,मी त्या देवाला प्रदक्षिणा करून व त्याच्या चरणांस नमस्कार करून त्याच्या विरहाने व्याकुलचीत्त होत्साता येथें आलों आहे.आपण संत—महात्मा—आई—वडील अशा वरिष्ट मंडळींना उजवी प्रदक्षिणा करून व दर्शन घेऊन स्थान सोडावे.||२०|| भावार्थः----तो मीं श्रीकृष्णाच्या दर्शनाने आनंदयुक्त व वियोगानें दुःख युक्त होत्साता आतां त्या प्रिय,अशा बद्रिकाश्रमी गमन करितों.आपणाससुद्धा संत—महात्मा यांच्यापासून ज्ञान प्राप्त झाले म्हणून आनंद वाटावा व त्यांच्या वियोगाचे स्मरण झाले असता दु:ख वाटावे.||२१||
भावार्थः----ज्या स्थलाच्याठिकाणी देव नारायण व भगवान् नर हे लोकांवर अनुग्रह करणारे दोघे ऋषी,लोकास उपद्रव न होण्यासारीखें दुर्घट तप समाप्तीपर्यंत करीत आहेत.आपण वक्ता असाल तर आपल्या ज्ञानाचा परिणाम होण्यासाठी तप करावे.तपामुळे श्रोत्यांवर उपदेशाचा परिणाम होत असतो.उपदेश परिणाम झाला असता श्रोत्यांच्या आचरणांत परिवर्तन होत असते.जीवनात ज्ञान होऊन परिवर्तन होणे फार महत्वाचे असते.जसे आपण शारीरिक परिश्रम करून गाईच्या तुपाचे सेवन केले असता शरीरास व मानस सुदृढता येत असते व शारीरिक परिश्रम न करता तुपाचे सेवन केले असता ते तूप न पचता कष्टदायक—रोगदायक—शक्ती क्षण करीत असते.||२२|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,याप्रमाणे विदुरानें आपल्या आप्तजनाची वधरूप अप्रियवार्ता,उद्धवापासून त्या ज्ञान संपन्न विदुरानें,प्राप्त झालेल्या शोकाचें विवेकेंकरून परिमार्जन केलें.आपणास जर प्रतिकूल परिस्थितीमुळे दु:ख झाले असेल तर विवेक करून ते होत असलेले दु:ख कमी किंवा नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा.||२३|| भावार्थः----आणि हे कौरव कुलातील श्रेष्ठ राजा,त्या विदुरानें श्रीकृष्णाच्या परिवार मंडळामध्यें मुख्य असून बद्रिकाश्रमास जाणाऱ्या त्या महाभगद्भक्त उद्धवास विश्वासानें हें पुढीलभाषण केलें कीं,------------||२४|| भावार्थः----विदुर म्हणाला----हे उद्धवा,योगेश्वर श्रीकृष्णाने,आत्मस्वरूपाच्या रहस्याचा बोध करून देणारें जें ज्ञान तुला सांगितलें आहे.तें तू मला सांगण्यास योग्य आहेस.कारण विष्णूचे सेवक,आपल्या सेवकांच्या कार्यांकरिताच पृथ्वीवर संचार करीत असतात.विष्णूंच्या सेवकाने—संत—महात्मा यांनी आपले जीवन अज्ञानी जीवांना अधिकारानुसार उपदेश करण्याकरिताच,प्रत्येक क्षण व्यतीत करावे.||२५|| भावार्थः----उद्धव म्हणाला----श्रीकृष्णानें तुझें स्मरण केले होतें एवढ्यावरून साक्षात् भगवंतानेच तुला तत्त्वोपदेश केल्यासारखा आहे.जो उपदेश कर्ता संत—महात्मा आहे,त्यांनी आपणास अहंकार येऊ नये म्हणून इतरांचे नाव व्यक्त करून उपदेश करावा.परंतु असंभावना,विपरीत भावना व संशय यांच्या निवृत्तीकरिंतां कोणीतरी तुला ज्ञानी गुरु केला पाहिजे यास्तव कुषीरवाच पुत्र जो मैत्रेय ऋषी त्याचेंच तूं तत्वज्ञानासाठी सेवन कर.आपणास वेदांत—शास्त्र किंवा कोणतेही शात्र श्रावण केले तर संशय हा येतच असतो. असंभावना—विपरीत भावना होताच असते,त्याकरिता असंभावना व विपरीत भावना निवृत्त होण्याहारिता सदगुरुची आवश्यकता असतेच,म्हणून आपण श्रद्धायुक्त अंत:करणपूर्वक सदगुरूचा स्वीकार करावा,कारण आपला संशय निवृत्त न झाला तर परमात्म्याचा अनुभव येत नाही.म्हणून भगवान् जेव्हा मृत्यूलोक सोडून जाऊं लागला तेव्हां त्या भगवंतानें साक्षात् तुला,उपदेश करण्याबद्दल त्या मैत्रेय ऋषीला माझ्या समक्ष आज्ञा केली आहे.म्हणून हे विदुर तू मैत्रीय ऋषीपासून शास्त्र श्रावण करून संशय निवृत्त करून घ्यावे, अशा प्रकारचे नियोजन करून भगवंत निजधामाला गेले आहेत.भगवंत अधिकारानुसार सर्वांची काळजी घेत असतात.ज्यांना—ज्यांना सदगुरू जीवनात भेटतात,त्यांना—त्यांना भगवंतांच्याच कृपेनेच भेटत असतात,त्यासाठी ज्यांची—त्यांचीच पूर्व-पुण्याईच लागत असते.ज्यांची—त्यांची पूर्व—पुण्याइ नसेल संत—महात्मा—सदगुरू भेटत नसतात व भेटले तरी कळत नसतात.||२६|| भावार्थः---शुकाचार्य म्हणाला----हे राजा,याप्रमाणें विदुरासहवर्तमान झालेल्या विश्वमूर्ती कृष्णाच्या गुणकथारूप अमृतानें आध्यात्मिकादि- आध्यात्मिक--दु:ख म्हणजे स्थूल—शरीरास व सूक्ष्म—शरीरास—मनास होणारे दु:ख,आधिभौतिक—दु:ख म्हणजे इतर प्राण्यांकडून होणारे दु:ख व आधिदैविक दु:ख म्हणजे निसर्गाकडून—देवतेकडून होणारे दु:ख असे त्रिविधतापाचें—तीन प्रकारचे दु:ख उपशमन करून यमुनेच्या वाळवंतमध्यें ती रात्र एकाक्षणासारखी घालवून नंतर सकाळी उद्धव तेथून बद्रिकाश्रमास गेला.||२७||
भावार्थः----राजा म्हणाला----यादवांतील सेनाधीपतींच्या समुदायाचे पालन करणारे जे वृष्णी व भोज,ते सुद्धां ब्राहमणांच्या शापानें मरण पावले असतां,तो एक उद्धवच कसा राहिला?कारण.सर्व यादवांच मुख्य,त्रैलोक्याधीपति जो हरी त्यानेंही आपल्या देहाचा त्याग केला.भगवंत मृत्यू—लोकांत आल्यानंतर त्याचे कार्य संपन्न झाल्यानंतर देहाचा त्याग करून वैकुंठास गेले,त्याचप्रमाणे आपणही मृत्युलोकन आपल्या प्रारब्ध कर्मांचा भोग भोगण्याकरिता व परमार्थ करण्यासाठीच आलो आहोत.म्हणून आपण प्रारब्ध कर्माचा भोग भोगीत असता पारमार्थिक कार्य हे प्रयत्न करून संपन्न करावेच.त्याकरीताच मनुष्य देहात व मृत्यू—लोकात आलेलो आहोत.आपण संसार करण्यासाठी आलेलो नाहीत.संसार हा मनुष्य योनी सोडून इतर देहात करावयाचा आहे म्हण्यापेक्षा होताच असतो.||२८|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा ब्राहमणाचा शाप हे केंवळ ज्यांचे मिष आहे अशा कालाच्या योगाने,वृद्धींगत झालेल्या आपल्या कुलाचा संहार करून आपल्या देहाचाही त्याग करण्याची इच्छा करणाऱ्या सफलइच्छावन् श्रीकृष्णानें असा विचार केला कीं,----------------------||२९|| भावार्थः----आतां मी ह्या लोकाला सोडून वैकुंठलोकि गेलों असता,माझ्या आश्रयानें राहणारें साक्षात् ज्ञान त्याला पुढें परंपरेने चालविण्यास,आत्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ असा हा उद्धवच योग्य आहे.आपण आपला योग्य उपदेश कर्ता--उत्तराधिकारी हा आपण स्थूल—शरीराचा त्याग करण्यापूर्वी म्हणजेच आपण मृत्यू—लोकी असतानांच नेमावयास पाहिजे किंवा मृत्यू—पत्र लिखित स्वरुपात असावयास पाहिजे.||३०|| भावार्थः----हा श्रेष्ठ उद्धव,एक आणूमात्र सुद्धां माझ्यापेक्षां कमी नाहीं.कारण,विषयांपासून याला कोणतेही विकार होत नाहींत.यास्तव माझ्याविषयींच्या ज्ञानाचा लोकांस उपदेश करीत होत्साता,तो येथें(पृथ्वीवर)राहूं दे.लोक हे अज्ञानी असतात,म्हणून त्यांचे अज्ञान निवृत्ती करिता त्यांना उपदेश करणारा संत—महात्मा पाहिजे.भगवंतांच्या दृष्टीने उद्धव हा उपदेश करण्याकरिता योग्य आहे,म्हणून उद्धवाने या मृत्युलोकांत राहावे व अज्ञानी जीवांना ज्यांच्या—त्यांच्या अधिकारानुसार उपदेश करावा.||३१|| भावार्थः----असा विचार करून,वेदांत उत्पत्तीस्थान व त्रैलोक्यांचा गुरु अशा श्रीकृष्णानें आज्ञा केलेला तो उद्धव,बद्रिकाश्रमास जाऊन समाधीच्या योगानें श्रीहरीची पूजा करिता झाला,भगवंतांची आज्ञा व मनोगत ओळखून उद्धव ते कार्य करण्याकरिता बद्रीकाआश्रामी श्रीहरीची पूजा करून व आशीर्वाद घेऊन निघाला.त्याचप्रमाणे ज्यांनी—त्यांनी सदगुरुंच्या आज्ञेनुसार अज्ञानी जीवांना ज्यांच्या—त्यांच्या अधिकारानुसार उपदेश करण्याचे कार्य ज्ञान--दान निष्काम भावनेने करीत जीवन व्यतीत करावे.ज्यांनी—त्यांनी ज्ञान-दानच करावे,तर ज्ञानाची विक्री मात्र करू नये,असे विवेक करून लक्षात असू द्दावे.||३२|| भावार्थः--इकडे विदुरही,लीलेने देहधारणा करणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचीं स्तुत्य कर्में उद्धवापासून श्रवण करून,आणि धैर्यवान् पुरुषांच्या धैर्याची वृद्धी करणारे व इतर पशुतुल्य अधीर पुरूषांस सर्वथा करण्यास अशक्य असे त्या श्रीकृष्णाचे देहत्यागरूप ऐकून,||३३-३५|| | कालिन्द्दा: कतिभि: सिद्ध अहोभिर्भरतर्षभ: | प्रापद्दत स्व: सरितं यत्र मित्रासुतो मुनि: ||३६||
भावार्थः----व हे राजा,श्रीकृष्णानें मनःपूर्वक आपलें स्मरण केलें होतें असें श्रवण करून,तो भगवद्भक्त तेथून निघाला गेला असतां,या सर्व गोष्टींचें व श्रीकृष्णाचें चिंतन करीत होता,तो विदुर,प्रेमानें व्याकुळ होऊन रुदन करू लागला.||३६|| याप्रमाणे श्रीमद्भगवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा चवथा(४) आध्याय छत्तीस(३६)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||४|| | ||श्रीकृष्णार्पमस्तू || || श्रीसदगुरुचराणार्पमस्तू || ___________________________________________________________________________________________ ५---नंतर विदुराने मैत्रेयऋषीला प्रश्न केला असता,त्याने विदुरास भगवंताची लीला वर्णिली आहे आणि महत्तत्त्वदिकांची उत्पत्ती व त्या तत्वांनी केलेली हरीची स्तुती या पाचव्या अध्यायांत सांगितली आहे. | मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टीक्रम-वर्णन] _____________________________________________________________________________________________ |श्रीशुक उवाच:---
| द्वारि द्दुनद्दा ऋषभ: कुरूणां मैत्रेयमासीनमगाधबोधम् |
| क्षत्तोपसृत्याच्युतभावशुद्ध: प्रपच्छ सौशील्यगुणाभित्रुप्त: ||१||
भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,कुरुंमध्ये श्रेष्ठ असा तो विदुर,गंगाद्वाराचेठिकाणी म्हणजे हरीद्वाराच्याठिकाणी बसलेल्या महाज्ञानी मैत्रेयऋषीच्या जवळ जाऊन त्याच्या सुशीलत्वदिक गुणांनी संतुष्ट व भगवंताच्या सप्रेमभक्तीने शुद्धचित्त होत्साता,त्याला प्रश्न करू लागला.आपणही संत—महात्मा—श्रीसदगुरुनाथ यांना फक्त आध्यात्मिकच प्रश्न विचारून समाधान करून घ्यावे.||१|| भावार्थः----विदुर म्हणाला:--- हे मैत्रेयऋषे सर्व लोक सुखाकरिताच कर्मे करितात,त्यांपासून त्यांस सुखाची प्राप्ती किंवा दुःखाची निवृत्ती होत नाही परंतू उलट त्या कर्मापासून दुःखच प्राप्त होते.यास्तव या दुःखमय संसारात आम्हांस करण्याविषयी योग्य असे कर्मे कोणते?ते कथन करावे.कारण,आपण सर्वज्ञ आहां.आपणही श्रीसदगुरुनाथांना असेच आध्यामिक प्रश्न विचारावे व आपले समाधान करून घ्यावे.||२|| भावार्थः----मला तर असे वाटते कि,दैवयोगाने श्रीकृष्णापासून विमुख झालेल्या,अधर्मशील व दुःखित अशा दिनजनावर अनुग्रह करण्यासाठीच आपल्यासारखे विष्णूचे मंगलकारक भक्त,या भूमीवर संचार करीत असतात.आपण संत—महात्मा यांची स्तुती करावी.||३|| भावार्थः---त्तस्मात् हे साधूश्रेष्ठा,ज्या मार्गाच्या योगाने अराधन केलेला भगवान्,पुरुषांच्या भक्तीने पवित्र झालेल्या हृदयाचेठिकाणी प्रगट होऊन आत्म्याचा प्रत्येक्ष अनुभव करून देणारे पुरातन ज्ञान देतो तो सुखरूप मार्ग आम्हांस कथन करा.||४|| भावार्थः----त्रिगुणात्मक मायेचा नियंता स्वतंत्र भगवान् रामकृष्णादीक अवतार घेऊन मी कर्मे करितो,व स्वतः निःस्पृह असून हे सर्व विश्व त्याने जसे उत्पन्न केले आहे व त्याचे रक्षण करून त्याची जीविका जसी चालवितो.||५|| भावार्थः----आणि पुनः तोच भगवान,हे सर्व जग प्रलयकालीं आपल्या हृदयाकाशांत लीन करून सृष्टीसंबंधी सर्व व्यापारांपासून निवृत्त होत्साता आपल्या योगमायनेठिकाणी ज्या रीतीने शयन करितो व पुनः सृष्टीकाली योगैश्वर्यसंपन्न देवादिकांचा ईश्वर तो एकच असता या जगात प्रविष्ट होऊन ब्रहमदेव विष्णू इत्यादी अनेकरूपांनी जसा बनला आहे.||६|| भावार्थ:--- आणि तो भगवान ब्राह्मणादिक तीन वर्ण,गाई व देव यांच्या कल्याणासाठी मत्स्यादिक अवतारांनी क्रिडा करीत होत्साता जशी कर्मे करितो,ती मला कथन कर.कारण,पुण्यश्लोकचूडामणी अशा हरीची अमृततुल्य चरित्रे वारंवार श्रवण करणाऱ्याहि आमचे मन तृप्त होत नाही.म्हणून आपण हरीचे चरित्रे पुन्ह: पुन्हा: श्रवण करावी,कारण त्यामुळे आपले अंत:करण शुद्ध आणि स्थिर होते. ||७|| भावार्थः---ब्रहमश्रेष्ठ ! त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्रीनारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव,कर्म,रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली?भगवन,उच्च-नीच वर्णांचे धर्म मी श्रीव्यासंच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत.परंतु श्रीकृष्णकथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही.||८|| भावार्थः----आणि हे ब्रह्माणश्रेष्ठा त्या जगत्स्त्रष्ट्या स्वत:सिद्ध नारायणाने,ज्या प्रकाराने जीवांचे स्वभाव,कर्मे रूपे आणि नांवे ह्यांचा भेद उत्पन्न केला आहे,हे सर्वही वर्णन करा.||९|| भावार्थः----हे भगवान् ब्राहमण,क्षेत्रीय आणि वैश्य हे उंच वर्ण व शूद्रादिक नीचवर्ण या सर्वांचे धर्म व्यासाच्या मुखापासून वारंवार श्रवण केले,परंतु श्रीकृष्णकथारूप अमृताच्या प्रवाहाखरिज त्या स्वल्पसुख देणाऱ्या सर्व धर्माच्या श्रवणाविषयी आमची तृप्ती झाली आहे.परंतु श्रीकृष्णकथामृतौघा—ओघ म्हणजे प्रवाह—या विषयी मात्र निरंतर श्रवण करूनसुद्धा पुन्हा: पुन्हा: श्रवण करावे वाटते म्हणून आमची तृप्ती झाली नाहीं.||१०|| भावार्थः----कारण,जो भगवान्,आपले चरित्र श्रवण करणाऱ्या पुरुषाच्या मनात कर्णेद्रीयद्वार प्रविष्ट होऊन,संसारात घालणाऱ्या गृहादिसंबंधी प्रीतीचा छेद करून टाकितो,त्या तीर्थपाद भगवंताच्या,तुमच्यासारख्यांच्या समाजामध्यें नारदादिकांनी स्तवन केलेल्या मृतौघाविषयी कोण बरें पुरुष,तृप्ती पावणार आहे?कोणाचीच तृप्ती होणार नाही,कारण भगवंताच्या कथा श्रवण केल्या म्हणजे भगवंत कर्ण-इद्रीयांद्वारा मनात प्रविष्ट होतो,त्यामुळे आपणास—जीवास संसाराविषयी प्रीती—प्रेम न राहता वैराग्य निर्माण होऊन प्रतिकूलता भावना निर्माण होते.संसाराविषयी वैराग्य निर्माण झाले म्हणजे भगवंताविषयी अनुकूल भावना निर्माण होऊन प्रेम—प्रीती निर्माण होते. म्हणून आपण भगवंतांच्या कथा पुन्हा: पुन्हा: श्रवण कराव्यात.||११|| भावार्थः----हे मैत्रेया,तुझा सखा जो वेदव्यास मुनी त्यानेही मोक्ष-धर्माच्या शेवटी भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच भारत इतिहास--महाभारत सांगितला आहे.त्यामध्येही मनुष्यांची बुद्धी,विषयसुखाच्या वर्णनद्वारे हरीच्या कथेकडेच लाविली आहे.म्हणून आपण व्यास-लीखीत महाभारत ग्रंथ आवश्य श्रवण करावा,कारण त्यामध्ये हरीच्या कथा सांगितलेल्या आहेत.||१२|| भावार्थः----ती बुद्धी,हरिकथेवर श्रद्धा ठेवणाऱ्या पुरुषांची श्रवणादिकांच्या योगाने उत्तरोत्तर वृद्धींगत झाली असतां,अन्य विषयांचेठिकाणीं वैराग्य उत्पन्न करिते,आणि हरिचरणांच्या वारंवार स्मरणानें तृप्ती झालेल्या त्या पुरुषाच्या सर्व दु:खांचा सत्वर नाश करिते.||१३|| भावार्थः----असें असतां,पूर्वसंचितपापानें हरीच्या कथेविषयीं विमुख झालेल्या,म्हणजे हरिकथेची आवड नसल्यामुळे हरिकथा श्रवण न करणारे तसेच महा--भारत-तात्पर्य न जाणणाऱ्या व शोचेनेयापेक्षाही अतिशोच्य अशा त्या अज्ञपुरूषांचा मी वारंवार शोक करितो.कारण,हरिकथाविमुख लोकांची कायिक,वाचिक व मानसिक सर्व कर्में व्यर्थ होत असल्यामुळें त्याचें आयुष्य निरंतर जागृत असणाऱ्या कालरूपी देव हरण करितो.म्हणजे जे हरिकथा श्रवण करीत नसल्यामुळे त्यांचे मनुष्य देहातील आयुष्य विनाकारण व्यर्थ जात आहे,म्हणून संत—महात्म्यांना दु:ख होत असते,व ते दु:ख घालविण्याचा—निवृत्त करण्याचा संत—महात्म्ये प्रयत्न करीत असतात.म्हणून आपण—जीवांनी संत—महात्मा यांचा सत्संग करावा.||१४|| भावार्थः----तस्मात् हे दीनबंधो मैत्रेया,सुखदात्या पवित्रकीर्ती हरीच्या कथेंमध्ये जी सारभूत कथा असेल तर ती, भ्रमर जसा पुष्पांतून मध निराळा काढतो त्याप्रमाणे इतर कथांतून निराळा काढून या जगाच्या कल्याणकरितां आलांस सांग.संत—महात्म्ये अज्ञानी जीवांचे कल्याण-करण्याकरीताच आलेले असतात.||१५|| भावार्थः----ज्या ईश्वराने,जगाच्या उत्पत्तिनाशांकरितां प्रथम त्रिगुणात्मक शक्तीचा स्वीकार केला आहे,त्याच ईश्वराने मनुष्यामध्ये श्रीकृष्णावतार धारण करून अमानुष कर्मे केली आहेत ती मला वर्णन कर.१६|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे राजा,याप्रमाणे लोककल्यासाठी विदुराने योगैश्वर्यंसंपन्न त्या मैत्रेय ऋषीला प्रश्न केला असतां मैत्रेयाने त्या विदुराचा पुष्कळ प्रकारे गौरव करून उत्तर देण्यास आरंभ केला.||१७|| | साधुं पृष्टं त्वया साधो लोकान् साध्वनुगृण्हता | कीर्तिं वितन्वता लोके आत्मनोsधोक्षजात्मनः ||१८|| भावार्थः---मैत्रेय म्हणाले:---साधु विदुरा ! सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली.तुझे चित्त नेहमी भगवच्चरणीय लागलेले असते.यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे.साधकाचे चित्त नेहमी भगवंतांकडेच असावे.||१८|| भावार्थः----हे विचुरा,व्यासनंदन दुःखांचा परीअशा तुझे-ठीकाणी हे आश्चर्य नाही,कारण,सर्वांच्या हार करणारा जो ईश्वर तो तूं एकाग्र भक्तीने आपल्या अंतकरणांत ग्रहण केला आहेस.||१९|| भावार्थः----हे विदुरा,पुण्य-पापांच्या तारतम्याने प्रजेचे नियमन करणारा तूं भगवान्-यम असून,मांडव्यऋषीच्या शापामुळे व्यासापासून त्याच्या विचित्रवीर्यनामक बंधूच्या दासीचेठिकाणी उत्पन्न झाला आहेस.||२०|| भावार्थः----हे विदुरा.तू षण्गैूणश्वर्यंसंपन्न श्रीकृष्णाला व त्याच्या परिवारमंडळीलाही निरंतर प्रिय होतास.कारण,ज्या तुला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याकरीतां वैकुंठाचेठिकाणी गमन करणाऱ्या त्या श्रीकृष्णाभगवंताने मला सांगून ठेविले आहे.||२१|| भावार्थः----यास्तव हे विदुरा तुला,विश्वाची स्थिती,उत्पत्ती व लय यांनी युक्त असून योगमायेने वृद्धीगत झालेल्या भगवंताच्या लिला मी अनुक्रमानं वर्णन करीतो.||२२|| | भगवानेक आसेदमग्र आत्माssत्मनां विभुः | आत्मेच्छानुगतावात्मा नानामत्युपलक्षण: ||२३|| भावार्थः----हे जग,सृष्टीच्या पूर्वी,द्रष्टा व दृश्य बुद्धिंनी समजण्यात न येणारा,सर्व जीवांचे मूळस्वरूप व नियंता,परमात्मा,भगवान् त्याला ’आपण एकट्यानेच राहावे’अशी इच्छा असल्यामुळे एकटाच होता दुसरे काही नव्हते.एकटा म्हणजे फक्त परमात्मा जो नामारहित वाचातीत—नामातीत—शब्दातीत--गुणातीत—रूपातीत—अवाच्य असा सत्—चित्—आनंद होता व आजही व पुढेही असाच असेल.आपणही त्याच्यासारखेच आहोत.आपल्या—जीवाच्या अज्ञानामुळे तसा असून तसा वाटत नाही.म्हणून आपण जीवानी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून व ज्ञान प्राप्त करून विषयांचा त्याग केला असता परम—तत्वाचा अनुभव येऊ शकतो.म्हणून आपण सत्संग करावा.||२३|| भावार्थः----त्यावेळी एकट्यानेच प्रकाशमान असणाऱ्या त्या द्रष्ट्या आत्म्यानें दुसरे काहिंच दृष्य पहिले नाही.तेव्हा त्याच्या मायादीक शक्ती जरी लीन झालेल्या होत्या तरी त्याची ज्ञान शक्ति जागृत होती म्हणून त्याने आपणास नसल्यासारिखे मानिले.||२४|| | सा वा एतस्य संद्रुष्टू: शक्ति: सदसदात्मिका | माया नाम महाभाग ययेदं मिर्ममे विभु:||२५|| भावार्थ:----हे महाभाग्यवंता विदुर,त्या विश्वव्यापक परमेश्वराने जिच्या योगाने हे चराचर जग निर्माण केले तीच त्या द्रष्ट्या परमेश्वराची कार्यकारणरूप मायानामक शक्ती होय. ||२५|| | कालवृत्त्या तु मायायां गुणमय्यामधोक्षज: | पुरुषेणात्मभूतेन वीर्यमाधत्त वीर्यवान् ||२६|| भावार्थः----नंतर कालशक्तिच्या योगाने गुणक्षोभ झालेल्या त्या मायेच्याठिकाणी,ज्ञानशक्तीयुक्त त्या अधोक्षज परमात्म्यानें आपल्या अंशभूत पुरुषाकडून चिदाभासरूप वीर्य स्थापन केले.||२६|| | ततोsभवन् महत्तत्त्वमव्यक्तात्कालचोदितात् | विज्ञानात्माssत्मदेहस्थं विश्वं व्यञ्जंस्तमोनुद: ||२७|| भावार्थः----नंतर काळाने प्रेरित अशा मायेपासून महत्तत्व उत्पन्न झाले ते स्वतः अनुभव ज्ञानस्वरूपी असून आपल्या शरीरांत असणाऱ्या जगतास प्रगट करणारे व अज्ञानाचा नाश करणारे होते.||२७|| | सोsप्यंशगुणकालात्मा भगवद्दृष्टिगोचर: | आत्मानं व्यकरोदात्मा विश्वस्यास्य सिसृक्षया ||२८|| भावार्थः----त्या महत्तत्त्वावर सर्वाधक्ष भगवंताचा दृष्टीपात होताच ते चीदाभास (निमित्त कारण)तीन गुण (उपदान कारण)व काल (रूपांतराचे कारण)यांच्या स्वाधीन होऊन त्याने या जगाची सृष्टी करण्याच्या इच्छेने आपणच आपल्या स्वरूपाचे रूपांतर केले.||२८|| | महत्तत्त्वाद्विकुर्वाणादहंतत्त्वं व्यजायत | कार्यकारणकर्नात्मा भूतेन्द्रियमनोमयः ||२९|| भावार्थः----तेव्हा रूपांतरास पावनाऱ्या त्या महत्तत्त्वापासून अहंकारतत्त्व उत्पन्न झाले.तो अहंकार,अधिभूत,अध्यात्म आणि आधिदैव असा तीन प्रकारचा होऊन आकाशादि पंचमाभूतें,दहाइंद्रिय,दहा देवता व मन यांस आश्रय झाला.||२९|| भावार्थः----त्याचा प्रकार असा की---तो अहंकार,सात्विक,राजस आणि तामस असा तीन प्रकारचा असून त्यापैकी,विकार पावणाऱ्या सात्विक अहंकारापासून मन उत्पन्न झाले आणि ज्यांच्यापासून शब्दस्पर्शादिक अनुभव येतो त्या देवताही त्या सात्विक अहंकारापासून उत्पन्न झाल्या.||३०|| भावार्थः----पंचज्ञानेंद्रीये व पंचकर्मेंद्रीये हि राजसाहंकारपासून उत्पन्न झाली,तामस अहंकारपासून आकाशयाचे सूक्ष्मरूप जो शब्द,तो उत्पन्न झाला.त्याशब्दापासून त्याचाच--शब्दाचा बोध करून देणारे आकाश उत्पन्न झाले.||३१||
भावार्थः----पुढे काल,माया व चैतन्यांस यांच्या योगाने भगवंताचे अवलोकन केलेल्या आकाशाने,आपल्यापासून उत्पन्न झालेल्या स्पर्शांचे रूपांतर करून त्यापासून वायू उत्पन्न केला.||३२|| भावार्थः----तो वायुही आकाशाने युक्त व स्वत: पुष्कळ शक्तीमान् होता.तो विकारपावूं लागला,तेव्हा त्याने आपल्यापासून तेजाचे सूक्ष्मभूतरूप व त्यापासून लोकांच्या दृष्टीला प्रकाश देणारे तेजहि उत्पन्न केले.||३३|| भावार्थः----नंतर वायूव-ने युक्त,व ईश्वराने अवलोकन केलेले ते तेज,काल,माया व चिदाभास यांच्या योगाने रूपांतर पावूं लागले तेव्हा त्याने रसगुणाने युक्त असे उदक उत्पन्न केले.||३४|| भावार्थः----नंतर ब्रह्माने अवलोकन केलेले काल,माया व चैतन्यांस यांच्या योगाने विकार पावणारे व तेजाचे युक्त अशा त्या उदकाने,गंधरूप सूक्ष्मगुणाने युक्त अशी पृथ्वी उत्पन्न केली.||३५|| भावार्थः----हे विदुरा,आकाश वायू इत्यादीक भूतांमध्ये जे-जे भूत पाठीमागून उत्पन्न झाले त्या-त्या मध्ये पूर्वी उत्पन्न झालेल्या भूतांचा संबंध असल्यामुळे आकाशाचे एक,वायूचे दोन,तेजाचे तीन अशा क्रमाने अधिक अधिक गुण आहेत असे म्हणतात.||३६|| भावार्थ:----काल,माया व ईश्वरांस यांपासून अनुक्रमाने प्राप्त झालेल्या परीणाम,रूपांतर व ज्ञान कला या लक्षनांने युक्त असे हे विष्णूचे अंशरूप महत्तत्त्वदिकांचे आभिमाने देव,भिन्न भिन्न असल्यामुळे ब्रहमांडरचनारूप आपलें कार्य करण्याविषयी असमर्थ होत्साते,हात जोडून त्या परमेश्वराची स्तुति करूं लागले.||३७|| भावार्थ:---देव म्हणाले---हे देवा,शरणागतांचा ताप दूर करण्याविषयी केवळ छन्नरूप अशा तुझ्या चरणकमलास आम्हीं नमस्कार करितो.ज्या चरणकमलाचा आश्रय करणारे,संन्यास लोक,मोठयाही संसाररुपी दुःखास दूर झुगारून देतात.||३८|| अर्थ:----हे सृष्टीकर्त्या षड्गुणश्वर्य संपन्ना ईश्वरा,ज्याअर्थी या संसारामध्ये तापत्रयाने पिडीत झालेले सर्व जीव(तुझ्या चरण सेवेवांचून)आत्मस्वरूपाचेठिकाणी असणाऱ्या सुखास पावत नाहींत,त्याअर्थी आम्ही ज्ञानपरीपूर्णअशा तुझ्या पाचछच्छायेचा आश्रय करितो ||३९|| भावार्थः---हे भगवान्,ज्या तुझ्या पदाचा,मोठमोठे ऋषि,विषयसंगरहित अशा आपल्या शुद्ध अंत:करणामध्ये’ तुझ्यामुखकमलरूप घरट्यापासून उत्पन्न झालेल्या वेदरूप पक्ष्यांच्या आश्रयाने’शोध करितात व जे तुझे पद,’आपल्या उदकांच्या योगाने पातकांचा नाश करणाऱ्या ज्या नद्या त्यामध्ये श्रेष्ठ अशा’गंगाचे उगमस्थान आहे त्या पवित्रचरण अशा तुझ्या पदाला आम्ही शरण आले आहो.आपणही—जीवानी विषयांचा त्याग करून,भगवंतांस अनन्य शरण जाऊन,सत्संग करून परमात्मरूप व्हावयास पाविजे.||४०|| भावार्थः----श्रद्धेने व श्रवणपूर्वक सप्रेमभक्तीने—निष्काम भक्तीने शुद्ध झालेल्या हृदयामध्ये ज्या तुझ्या चरणकमळाचे ध्यान करून प्राप्त झालेल्या वैराग्ययुक्त ज्ञानाने,कितीएक पुरुष,ज्ञानसंपन्न होतात त्या तुझ्या चरणकमलाच्या आसनास आम्ही शरण जातो.आपणही—जीवानी भगवंतांस शरण जावावयास पाहिजे.||४१|| भावार्थः----हे प्रभो,जगाच्या उत्पत्तिस्थिती-नाशांकरितां अवतार धारण करणाऱ्या तुझे जे चरणकमल स्मरण केले असतां,भक्तजनास मोक्षसुख देतें त्या तुझ्या चरण कमलाला सर्व आम्ही शरण आलो आहो.म्हणून आपणही भगवंतांच्या चरणकमलास शरण जावावयास पाहिजे.||४२|| भावार्थः---हे भगवान्,देहरूप नगरीमध्ये वास करणाऱ्याहि तुझे जे चरणकमल इंद्रियांदिसहित,अति तुच्छरूप देहाचे ठिकाणी व त्याला उपयुक्त जीं गृहादीक त्यांचेठिकाणी’मी आणि माझे’असा दूर ग्रह धारण करणाऱ्या जीवांना अत्यंत दूर(प्राप्त होण्यास दुर्लभ)आहे त्या तुझ्या चरणकमलाची आम्ही सेवा करितो.जरी आपणास--अज्ञानी जीवास “देह मी आहे व देहसंबंधी माझे आहेत” असा जरी दृढ निश्चय असला तरी,त्या जीवानी निष्काम कर्मे व निष्काम उपासना करून,अंत:कारण शुद्ध करून व अंत:करण स्थिर करून सत्संग केला असता आत्मा-ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होऊ शकतो.आपण प्रयत्न केला असता,आपण परमात्म्यापासून कितीही दूर असलोत तरी परमात्मरूप होऊन मोक्ष मिळू शकतो.||४३|| भावार्थ:----हे वेदवर्णिता परमेश्वरा,विषयाभिमुख इंद्रीयांनी ज्यांचे मन विषयांकडे आकर्षण केले जाते,ते विषयी पुरुष,तुझ्या लीलाकथा वर्णन करणाऱ्या सत्पुरुषांस मुळींच पाहत नाहींत.मग त्यांना तुझ्या कथेचे श्रवण व तुझ्या चरणकमलांचे दर्शन कोठून होणार?(व्हावयाचे नाहीं)आपणास कितीही विषयांविषयी आकर्षण असले तरी,सत्संग केला असता,विषयांतला दोष दिसून त्या विषयांविषयी वैराग्य निर्माण होऊन परमात्म्याविषयी प्रेम—प्रीती उत्पन्न होते.||४४|| भावार्थ:----हे देव,जे पुरुष तुझ्या कथामृताने प्राशनाने वृद्धींगत झालेल्या भक्तीनें शुद्ध चित्त होतात व वैराग्याने बलिष्ठ असे उत्तम प्रकारचे ज्ञान पावोन आनायासाने तुझ्या वैकुंठलोकांस पावतात.म्हणून आपण—जीवानी निष्काम कर्मे करून व सत्संग करून वैकुंठास जाऊ शकतोत. ||४५|| भावार्थः----तसेच दुसरेही ज्ञानी पुरुष,आत्मस्वरूपाचेठिकाणी मनाची स्थिरता करून त्या उपायाच्या सामर्थ्याने बलवत्तर अशा मायेला जिंकून पुरुषरुपी तुझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करितात परंतु मोक्षप्राप्तीविषयी योगाभ्यासरूप श्रम होतो आणि तुझ्या भक्ती मार्गारूप सेवेच्या योगाने श्रम न होता आनायासानेच मुक्ती प्राप्त होते.म्हणून आपण—जीवानी निष्काम भक्तीचा स्वीकार करून भगवंतांसी ऐकरून करून घ्यावे.आपणास—जीवास निष्काम भक्तियोग मार्ग सुलभ व सोपा आहे.||४६|| भावार्थः----हे आद्द,तूं लोकांची सृष्टी करण्यासाठी तीन गुणांच्या स्वभावांनी ज्या आम्हास उत्पन्न केले ते सर्व आम्ही परस्पर निरनिळे असल्यामुळे ज्याकरीता तूं आम्हंस उत्पन्न केलेस ते तुझे खेळण्याचे ब्रह्मांड उत्पन्न करून तुला समर्पण करण्यास आम्हीं समर्थ होत नाहीं.आपण—जीव जरी कर्मे करून भगवंतांस कर्मे अर्पण करण्यास समर्थ नसला,तरी आपण सत्संग केला असता श्रवण केल्यामुळे निष्कामता सहज उत्पन्न होते.त्यानंतर आपण—जीव केलेले सर्व कर्मे निष्काम बुद्धीने भगवंतंस अर्पण करू शकतो.||४७|| | ततो वयं सत्प्रमुखा यदर्थ बभूविमात्मन् करवाम किं ते |
| त्वं न: स्वचक्षुः परिदेहि शक्त्या देव क्रीयार्थे यदुनुग्रहाणाम् ||५०|| भावार्थः----यास्तव हे अजा—जन्म-रहित असलेला परमात्मा आम्ही ब्रह्मांड करून योग्यकाळी तुला सर्व भोग जोपर्यंत समर्पण करू व आमच्या योग्यतेनुसार आम्हीही अन्न भक्षण करूं,तसेच तेहे सर्व जीव ज्या ब्रह्मांडात राहून तुला व आम्हांला सर्व भोग अर्पण करून निर्विघ्नपणे अन्न भक्षन करितील आशी तूं आतां योजना कर.||४८|| भावार्थ:----तूं कार्यहित आम्हा देवांना उत्पन्न करणारा निर्विकारी पुराणपुरुष आहेस.म्हणूनच हे देवा,तू वस्तुत:जन्मरहित असूनही सत्त्वादीक गुण व कर्में यांचे उत्पत्तीस्थान व जन्मरहित अशा आपल्या शक्तीरूप मायेचेठिकाणी महततत्त्वरूप गर्भाचे स्थापन केलेले आहेस.||४९|| भावार्थ:---यास्तव हे सर्वात्मास्वरूपा देवा,महत्तत्त्वदीक आम्ही सर्व देव,ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो ते तुझे कोणते कार्य करावे?त्या कार्याविषयी तुंच आमच्यावर अनुग्रह करणारा आहेस म्हणून आम्हांला आपली क्रियाशक्ती सहित ज्ञान दृष्टी द्यावीस.||५०|| याप्रमणे श्रीमद्भगवतनामक महापुराणांतील तृतीय(३) स्कंधामध्यें पाचवा(५) अध्याय पन्नास(५०)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||५|| | ||श्रीकृष्णारपमस्तू|| || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ६---नंतर षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वराने त्या सर्व तत्वांमध्ये प्रवेश करून,त्यांनकडून विराट्देह उत्पन्न करविला व त्यांत आधिदैव,आध्यात्म आणि अधिभूत यांनी भिन्न भिन्न योजना केली हा विषय या साहाव्या आध्यायांत सांगितलेला आहे. ६--- ६--मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[विराट शरीराची उत्पत्ती] -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| इति तासां स्वशक्तीनां सतीनामसमेत्य स: । प्रसुप्तलोकतंत्राणां निशाम्य निशाम्यगति गतीमिश्वर:||१|| भावार्थ:---मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,याप्रमाणे त्या ईश्वराने एकमेकांमध्ये मिश्र न होतां निरनिराळ्या राहिलेल्या व विश्वरचना करण्यास असमर्थ अशा त्या आपल्या शक्तींची स्थिती अवलोकन करून------------||१|| भावार्थ:----भूत पराक्रमयुक्त अशा त्या भगवंताने त्यावेळी कालनामक शक्तीचा स्वीकार करून तेवीस त्तत्त्वांचा सामुदयामध्ये अंतर्यामित्वेंकरून एकदम प्रवेश केला.||२|| | सोsनुप्रविष्टो भगवांश्चेष्टारूपेण तं गणम् | भिन्नं संयोजयामास सुप्तं कर्म प्रभोधयन्||३|| भावार्थ:---आणि अणुप्रवेश करणाऱ्या त्या भगवंताने,पूर्वी लीन अससेल्या क्रियाशक्तीला प्रगट करून त्या चेष्टारूप क्रियाशाक्तीने एकमेकांस सुटून असलेल्या त्या—त्या त्तत्वांच्या समुदयाला एकेठिकाणी जुळविले.||३|| | प्रबुद्धकर्मा दैवेन त्रयोविंशतिको गणः | प्रेरितोsजनयत्स्वाभिर्मात्राभिरधिपूरुषम् ||४|| भावार्थः----आणि ठिकाणी एके अनुप्रवेश करणाऱ्या त्या भगवंताने,पूर्वी लीन असलेल्या क्रियाशक्तिने एकंमेकांस सुटून आणलेल्या त्या त्तत्त्वांच्या सामुदायाला जुळविले.||४|| | परेण विशता स्वस्मिन्मात्रया विश्वसृग्गणः | चुक्षोभान्योन्यमासाद्द यस्मिँल्लोकाश्चराचराः ||५|| भावार्थ:---तो उत्पत्तीचा प्रकार असा कि,विश्वसृष्टि करणाऱ्या तत्त्वांचा गणच,आपलेठिकाणी प्रविष्ट झालेल्या परमेश्वरांच्या योगाने परस्परांशी संयुक्त होऊन आपल्या काही अंशाने,ज्याचेठिकाणी चराचर लोक राहिले आहेत अशा पुरुषरूपाने परिणाम पावला.||५|| भावार्थः----तो सुवर्णमय विराट्पुरुष,सर्व जीवांशवर्तमान ब्रह्मांडाच्या मध्यभागीं उदकामध्ये देवमानानें हजार वर्षपर्यंत राहिला होता.||६|| भावार्थः----तो विराट्पुरुष विश्व उत्पन्न करणाऱ्या तत्त्वांचा गर्भरूप असून ज्ञान शक्ति क्रियाशक्ति आणि भोक्तृशक्ति यांनी युक्त होते.त्याने आपणच आपले ज्ञानशक्तिच्या योगाने एक(ह्रदय),क्रियाशक्तिच्या योगाने दहा(प्राण)आणि भोक्तृ शक्तिच्या योगाने तीन(आध्यात्म,आधिदैव आणि अधिभूत)असे विभाग करून घेतले.||७|| भावार्थ:----कारण,हा विराट्-रुपी पुरुष,सर्व—जिवांचा आत्मा असून परमात्म्याच्या नारायणनामक आद्य अवतार होय.ज्याच्या स्वरूपाचे ठिकाणी हा चराचर प्राण्यांचा समुदाय सुरक्षितपणे वास करीत आहे.८|| | साध्यात्म: साधिदैवश्च साधिभूत इति त्रिधा | विराट् प्राणो दशविध एकधा हृदयेन च ||९|| भावार्थः--पूर्वीं सांगितलेले विभाग असे की,तो विराट्पुरुष दहा—पांचज्ञानेद्रीये:--(१)श्रोत्र,(२)त्वचा,(३)चक्षु,(४)जिव्हा,(५)घ्राण;पांचकर्मेद्रिये:-- (१)वाक्-,(२)पाणि—हात,(३)पाद—पाय,(४)शिश्न,(५)गुद;असे मिळून दहा(१०)इंद्रियांसहित मन—१;सर्व इंद्रियांच्या (१)दिशा,(२)वायू,(३)सूर्य, (४)वरून,(५)अश्विनीकुमार,(६)अग्नी,(७)इंद्र,(८)उपेंद्र,(९)प्रजापती,(१०)मृत्यू या देवता—२; व सर्व इंद्रियांचे शब्दादी—(१)शब्द,(२)स्पर्श, (३)रूप,(४)रूप,(५)गंध हे पांच विषय—३,अशा या भेदांनी तीन प्रकारचा,प्राण—१,आपण—२,व्यान—३,उदान—४,समान—५,नाग—६,कूर्म—७,कृकल—८,देवदत्त, आणि--,धनंजय—१०, या भेदांनी दहा प्रकारचा,आणि ह्र्दयरूपाने एक(१),प्रकारचा आहे.||९|| भावार्थ:---तो आधोक्षज प्रभू,विश्वोत्पादक देवांच्या प्रार्थनेचे स्मरण करून,त्यांची अनेक प्रकारे वृत्ति चलवण्यासाठी आपल्या ज्ञानशक्तिने विराट् पुरुषाचे पुढे असे करीन हे मनांत आणूं लागला.||१०|| भावार्थः----नंतर चिंतने केलेल्या त्या विराट्देहाला देवांस उपयुक्त अशीं किती एक स्थाने उत्पन्न झाली,तीं मी तुला सांगतो श्रवण कर.||११|| भावार्थ:---त्या विराट्देहाला प्रथम (१)मुख हे स्थान उत्पन्न झाले,तेथे आग्नेय दिशाचा अधिपती अग्नि,वाणीरूप आपल्या शक्तिसहवर्तमान प्रविष्ट झाला.ज्या वाणीरूप शक्तिच्या योगाने हा पुरुष,शब्दांचे उच्चारण करितो.||१२|| भावार्थः---त्या विराट्पुरुषाला (२)टाळूस्थान उत्पन्न झालें,तेथे लोकपाल वरून,जिव्हेंद्रीयेरूप आपल्या शक्तीसहवर्तमान प्रविष्ट झाला.ज्या जिव्हेंने हा जीव रसाचे ग्रहण करितो.||१३|| भावार्थः---त्या विष्णूला (३)दोन नासिकाछिद्रे उत्पन्न झाली.त्या स्थानी अश्विनीकुमारनामक दोनदेव आपल्या घ्राणेंद्रीयेरूप शक्ति सहवर्तमान प्रविष्ट झाला.ज्या घ्राणेंद्रीयांपासून जीवाला गंधविषयाचा अनुभव प्राप्त झाला.||१४|| भावार्थः----त्या व्यापक विराट्पुरुषाला (४)नेत्रे उत्पन्न झाली तेथे लोकरक्षय-सूर्य आपल्या चक्षुरिंद्रीयांसह प्रविष्ट झाला.ज्याच्या योगाने जीवास रूपाचे ज्ञान होते.||१५|| भावार्थः----त्या विराट्पुरुषास (५)चर्में उत्पन्न झाली,तेथे लोकपाल वायू,आपल्या त्वचारूप इंद्रियशक्तिसह प्रविष्ट झाला.ज्या त्वगिंद्रीयाने जीवास शीतोष्णादीक स्पर्शांचे ज्ञान होते.||१६||भावार्थ:---त्या पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली,त्या स्थानी सर्व ओषधी रोमरूप शक्तिसह प्रविष्ट झाल्या.ज्या रोमरंध्रांच्या योगाने जीवाला कंडूरूप आनंदाची प्राप्ती होते.||१८|| भावार्थः---त्या विराट्पुरुषास (६)कर्ण उत्पन्न झाले,त्या आपल्या स्थानीं सर्व दिशा,श्रोत्रंद्रीय शक्तिसह प्रविष्ट झाल्या,ज्या श्रोत्रेंद्रीयाने जीवाला शब्दाचे ज्ञान होते.||१७|| भावार्थः---त्याला (७)शिश्न उत्पन्न झाले.त्या आपल्या स्थानाचे ठिकाणी प्रजापति,वीर्यशक्तीसह प्रविष्ट झाला.ज्या विर्यरूप शक्तीच्या योगाने हा जीव,संभोगरूप आनंद पावतो.||१९|| भावार्थः----त्या पुरुषाला (८)गुदद्वार उत्पन्न झाले.तेथे लोकांचे रक्षण करणारा मित्र देव,पायुनामक इंद्रियशक्तीसह प्रविष्ट झाला.ज्या इंद्रियाच्या योगाने हा जीव,अन्नाधीसंबंधी त्याग करितो.||२०|| भावार्थः----त्या पुरुषाला (९)हस्त उत्पन झाले तेथे स्वर्गलोकाचा पालक इंद्र,क्रयव्रिकयरूप शक्तींसह प्रविष्ट झाला.जेणेकरून हा पुरुष, आपली उपजीविका पावतो.||२१|| भावार्थः----त्या पुरुषाला (१०)पाय उत्पन्न झाले,तेथे लोकांचे रक्षण करणारा विष्णू,आपल्या गतिरूप शक्तीसह प्रविष्ट झाला.ज्या गतीच्या योगाने पुरुष,गंतव्य देशास प्राप्त झाला.||२२||
भावार्थ:---त्या पुरुषाला (१)बुद्धी उत्पन्न झाली,त्या स्थळाचेठिकाणी आपल्या निश्चयात्मक ज्ञानशक्तीसह ब्रहमदेव प्रविष्ट झाला.ज्या ज्ञान-शक्तीच्या योगाने पुरुषाला निश्चयात्मक ज्ञानाची प्राप्तीहोते.||२३|| भावार्थः----त्या पुरुषाला (२)ह्रदय-मन उत्पन्न झाले.तेथे चंद्रमा आपल्या मनःशक्ती सह प्रविष्ट झाला.ज्या मनाने हा पुरुष,संकल्पादीक क्रिया करितो.||२४||
भावार्थः---- त्या पुरुषास (३)अंहकार उत्पन्न झाला तेथे अभिमान(रुद्र)अंहक्रियारूप शक्तीसह प्रविष्ट झाला.ज्या शक्तीच्या योगाने ह्या पुरुषाला कर्तव्यकर्मांचे ज्ञान होते ||२५|| भावार्थः---- त्या पुरुषाला (४)चित्त हीं उत्पन्न झाले.तेथे नारायण आपल्या चेतनाशक्तीसह प्रविष्ट झाला.जिच्या योगाने आपल्याला चिंतन होते.||२६|| भावार्थः---- या पुरुषाच्या मस्तकापासून स्वर्गलोक,पायांपासून भूमी व नाभीपासून आकाश हि उत्पन्न झाली.ज्या तीन लोकांमध्ये,सत्व रज व तम या तीव गुणांपासून झालेले देव व मनुष्यादिक दिसून येतात.||२७|| भावार्थः----त्यांत देव,उच्चदशेस आलेल्या सत्त्वगुणाच्या योगाने स्वर्गलोकास प्राप्त झाले आणि यज्ञादिरूप व्यवहार करणारे मनुष्य,व त्यांस उपयोगी पडणारे जे गाई वगैरे पशु हे रजोगुणयुक्त स्वभावाने पृथ्वीवर वास करितात||२८|| भावार्थः----तसेच रुद्राचे जे भूतादी पार्षदगण ते तमोगुणाच्या स्वभावाने,भगवंताच्या नाभिस्थानी,स्वर्ग व पृथ्वी यांच्या मध्ये असणाऱ्या अंतरीक्षलोकाचा आश्रय करून राहिले आहेत.||२९|| भावार्थः----हे कुरुकुल श्रेष्ठ विदुरा पुरुषाच्या मुखापासून वेद,व ब्राहमण हे उत्पन्न झाले,जो ब्राहमण,मुखापासून उत्पन्न झाल्यामुळे व सर्ववर्णात मुख्य असल्यामुळे सर्वांचा गुरु होय.ज्यांनी सदगुरुच्या मुखातून श्रवण करून ब्रह्माचे ज्ञान प्राप्त घेऊन त्या ब्रह्माचा—परमात्म्याचा—निर्गुण—निराकाराचा सर्व विषयांचा त्याग करून अनुभव घेतलेला असेल तर त्यांना ब्राह्मण म्हणावे.फक्त ब्राह्मण समाजात जन्म घेतला पण,ब्रह्म-ज्ञानाचा अनुभव घेतला नसेल त्यांना ब्राह्मण म्हणू नये.अशा प्रकारचा उल्लेख भारतीय संस्कृती-- महाभारत प्रसिद्ध असलेल्या ग्रंथात ग्रंथ-कर्ते व्यास-मुनींनी केलेला आहे.||३०|| भावार्थः----बाहुंपासून प्रजापालनरूप क्षत्रियवृत्ती व तिला अनुसरणारा क्षत्रिय उत्पन्न झाला.जो क्षत्रिय,विष्णूचा अंशभूत असल्यामुळे सर्व वर्णाच्या चोरादिकांच्या उपद्रवांपासून रक्षण करितो.||३१|| भावार्थः----त्या विभूच्या मांड्यापासून लोकांच्या निर्वाह चालविण्याऱ्या वैश्यवृत्ती उत्पन्न झाल्या व त्यांपासून वैश्य उत्पन्न झाला.जो वैश्य,सर्व मनुष्यांच्या जीविकेचे साधन(शेतीकी व्यापार वगैरे)चालवितो.||३२|| भावार्थः----सर्व धर्मांच्या सिद्धीकरितां भगवंताच्या पायापासून प्रथम सेवावृत्त उत्पन्न होऊन चालविणारा शुद्रही उत्पन्न झाला.ज्याच्या सेवारूप वृत्तीने श्रीहरी संतुष्ट होतो.३३|| भावार्थः----हे चारही वर्ण,आपापल्या वृत्तीसहवर्तमान,ज्यापासून उत्पन्न झाले त्या आपल्या गुरुरूप श्रीहरींचे स्वतःच्या शुद्धीकरिता श्रद्धापूर्वक आपल्या धर्मांचे आराधन—आचरण करितात.म्हणून प्रत्येकांनी आपापल्या अधिकारानुसार स्वधर्माचे आचरण—पालन करावे. ज्याला—त्याला प्रयत्नाने आपापला गुणानुसार अधिकार वाढविण्यात येतो.हा अधिकार जन्मानुसार नसून गुणानुसार असतो.||३४|| भावार्थः--- हे विदुरा,काल,कर्म आणि स्वभाव या शक्तींनी युक्त अशा भगवंताच्या योगमायेच्या सामर्थ्याने वृद्धिगत झालेले हे विराटस्वरूप पूर्णपणे वर्णन करावयास कोण पुरुष इच्छील?म्हणजे इच्छा सुद्धां अश्यक्य आहे मग निरुपण तर फारच लांब राहिले ||३५||
भावार्थः----असे असतांहि हे विदुरा,ईश्वर-व्यतिरिक्त विषयांच्या वर्णनाने अपवित्र झालेली आपली वाणी पवित्र करण्यासाठी मी श्रीहरीची कीर्ती गुरुपासून ऐकली आहे तशी यथामपी वर्णन करितो.म्हणून आपण आपली वाणी पवित्र होण्यासाठी श्रीहरीची कीर्ती ऐकावी.||३६|| भावार्थः----कारण,ब्रहमनिष्ठ पुरुष,पुण्यश्लोकशिखामणीरूप हरीचे गुणवर्णन करणे हाच पुरुषांचा वाणीचा आणि सज्जनांनी वर्णन केलेले कथामृत प्राशन करण्याविषयी तत्पर असणे हाच कर्मेंद्रियांचा मुख्य लाभ होय असे म्हणतात.आपणास मनुष्य देह हा भगवंतांनी दिलेला आहे.म्हणून आपण या देहाने—इंद्रियांनी कथामृत सेवन करावे.||३७|| | अतो भगवतो माया मायिनामपि मोहिनी | यत्स्वयं चात्मवर्त्मात्मा न वेद किमुतापरे ||३९|| भावार्थः----हे वत्सा विदुरा,आदिकवी ब्रहमदेवाने सहस्त्रसंवत्सर तप करून परिपक्व झालेल्या बुद्धीनेही जगदात्मरूप श्रीहरीचा महिमा जाणला कि काय?तर तो इतकाच आहे असा पूर्णपणे जाणलाच नाहीं.||३८|| | यतोऽप्राप्य न्यवर्तन्त वाचश्च मनसा सह | अहं चान्य इमे देवास्तस्मै भगवते नमः ||४०|| भावार्थ:---तस्मात् भगवंताची माया,ब्रहमही सर्व मायावीजनासहि मोहकारक आहे.कारण,तो सर्वात्मा हरीही आपल्या मायेचे वैभव इतकेच आहे असे जाणू शकत नाहीं.मग इतर जाणूं शकत नाहींत मग काय सांगावे.||३९|| भावार्थः----यास्तव ज्या भगवंताच्या ज्ञानाविषयी प्रवृत्त झालेल्या मनासहित वेदवाणीही,स्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळे ज्यापासून माघाऱ्या फिरतात,अहंकाराची देवता रुद्र व इद्रियांचे अधिपति जे इतर देव तेही ज्याच्या सर्व माहात्म्याज्ञानाविषयीं पराङ्मुख होतात त्या भगवंताकारणे मी नमस्कार करितो.आपणही—जीवानी भगवंतांच्या कथा महात्म्याच्या मुखातून श्रवण करून,भगवंतांना नमस्कार करावा.||४०|| ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- याप्रमाणे श्रीमद्भगवद्नामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा सहावा(६) अध्यायचाळीस(४०)श्लोकांनी युक्त समाप्त झाला. झाला||६|| || श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || _______________________________________________________________________________________ ७---नंतर आपल्या संशयाचे निराकरण करणाऱ्या मैत्रेयऋषींच्या भाषणाचा सत्कार करून,विदुराने त्या मैत्रेयऋषीला पुनः नानाप्रकारचे प्रश्न केले,हा प्रकार या सातव्या आध्यायांत सांगितलेला आहे. |७--- ७---मैत्रेय आणि विर यांचा संवाद---[विदुराचे प्रश्न] _____________________________________________________________________________________________ | एवं ब्रुवाणं मैत्रेयं द्वैपायनसुतो बुधः | प्रीणयन्निव भारत्या विदुरः प्रत्यभाषत ||१|| भावार्थः----श्रीशुकाचार्य म्हणाला----हे परीक्षिते,वेदव्यासपुत्र व ज्ञान संपन्न अशा त्या विदुराने,पूर्वोक्तप्रकारे भाषण करणाऱ्या मैत्रेयऋषीला आपल्या प्रार्थनारुपी भाषणाने संतोष उत्पन्न करीत भाषण केले की,-------आपणही जो वक्ता आहे,त्यांना श्रीमद्भागवत-पुराणाची कथा सांगण्यासाठी प्रार्थना करावी.||१|| भावार्थः--विदुर म्हणाला----हे ब्रह्मनिष्ठ मुने,केवल ज्ञानस्वरूपी निर्गुण भगवंताला सत्त्वादीक गुणांचा संबंध लीलेने तरी कसा घडतो?आणि तो स्वतः निर्विकार असता त्याचे हातून जगत्सृष्टयादीक निरनिराळ्या क्रिया कशा घडतात?||२|| भावार्थ:----लहान बालकाला क्रीडेविषयी प्रवृत्त होण्यास एक इच्छा(अतृप्तता) असते किंवा दुसऱ्या खेळणाऱ्या मुलाच्या प्रेरणेला त्याला खेळण्याची इच्छा होते.ईश्वर तर स्वतः पूर्णकाम असल्यामुळे त्यास इच्छा होऊ नये ती कशी होते?आणि तो सर्वदा इतरांपासून निवृत्त(असंग)असल्यामुळे त्यास दुसऱ्याकडून खेळण्याची प्रवृत्ती तरी कशी घडते ?||३|| भावार्थ:----असा ईश्वराविषयींचा संशय विचारून,आतां जीवाविषयींचाही विचारितो की,हे मैत्रेय ऋषे,षड्गुनैश्वर्यसंपन्न भगवंताने सत्त्वादिगुणयुक्त अशा आपल्या मायेने हे जग उत्पन्न केले.तिच्या योगानेच तो पालन करितो आणि तोच उत्पत्तीच्या उलट रीतीनें संहारहि करील.||४|| भावार्थ:----असे जे तुम्ही सांगितले ते तरी जीवाला जर अविद्देचा वास्तविक संबंध असता तर घडले असते परंतु त्या जीवाचे ज्ञानस्वरूप,देशाच्यायोगाने दिव्याच्या प्रकाशासारखे,कालाच्यायोगाने विजेसारखें,अवस्थेच्या योगाने स्मृतींसारखें,स्वतःच्या योगाने स्वप्नासारखें,दुसऱ्या वस्तूच्या योगाने घटादिकांसारखे कधीहिं नाश पावत नाहीं,तो जीवअद्दवीने(आज्ञानाने)कसा युक्त होईल?होणारच नाहीं.||५|| भावार्थ:----एतावता हा षड्गुणैश्वर्यसंपन्न एक ईश्वरच जर जीव रूपाने सर्व शरीरांचेठिकाणी राहिला आहे.तर ह्या जीवाला भाग्यहीनपणा(आनंदादिभ्रंश)किंवा कर्माच्या योगाने क्लेश का व्हावेत?बरें,असे विनाकारण जर होईल तर ईश्वरालाही दुःखासंबंधादीक प्रकार कां घडू नयेत?||६|| | एतस्मिन्मे मनो विद्वन् खिद्दतेsज्ञानसंकटे | तन्नः पराणुद विभो कश्मलं मानसं महत् ||७|| भावार्थ:--- हे विद्वान पुरुषा,या अज्ञानरुपी कठीण मार्गामध्यें माझे मन दुःख पावत आहे.यास्तव हे समर्था माझ्या मनातील हा मोठा मोह आगदी नाहींसा कर.||७|| भावार्थ:----श्री शुकाचार्य म्हणाला---याप्रमाणे आपणास तत्वज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा करणाऱ्या विदुराने प्रश्न केला असतां,तो मैत्रेय ऋषी,गर्वरहित होत्साता भगवंताचेठिकाणी चित्त ठेऊन किंचित हस्य करून भाषण करूं लागला.||८|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,जीव हा वस्तुतः अगदी मुक्त असतांना त्याला बंध असणे किंवा दैन्य असणे हि गोष्ट तर्क करून लागले असतां आगदी विरुद्ध आहे खरी परंतु भासते तेव्हां तीच हि षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वराची माया होय.||९|| भावार्थ:---जसे स्वप्न अवलोकन करणाऱ्या या पुरुषाला,आपले शीर तुटले किंवा हातपाय तुटले असा आपल्या शरीरामध्ये झालेला विपर्यास,वस्तुतः खरा नसून प्रतितीस यतो तसाच,जीवाला बंध किंवा क्लेश होणे हा केवळ आभासमात्र होय.आपल्याला—जीवाला बंध किंवा क्लेश—दु:ख वस्तुतीने नसून भासमात्र—काल्पनिक म्हणजे प्रतीतीमात्र आहेत.ते बंध किंवा क्लेश—दु:ख अंत:कारणाचे आहेत पण जीव अज्ञानामुळे स्वत:चे समजतो. जसे स्वनातील घटना काल्पनिक आहेत वास्तव नाहीत,त्याचप्रमाणे बंध किंवा क्लेश—दु:ख हे काल्पनिक आहेत,वास्तव नाहीत.||१०|| | यथा जले चन्द्रमसः कम्पादिस्तत्कृतो गुणः | दृश्यतेsसन्नापि द्रष्टुरात्मनो नात्मनो गुणः ||११|| भावार्थः----जसा जीवाला बंध आणि क्लेश यांचा अनुभव येतो तसाच ईश्वरालाही कां येत नाही? ‘असे म्हटले तर ह्याचे कारण इतकेच कि,जसे पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडते म्हणजे,त्यास पाण्याने केलेले कंपादिक धर्म,वस्तुतः खोटे असतांहि दिसून येतात पण ते आकाशांत असलेल्या चंद्रास दिसून येत नाहीत त्याप्रमाणे देह इंद्रिये वगैरे अनात्मवस्तूचे धर्म खोटे असतांहि त्यांचा द्रष्टा अभिमानी जो जीव त्यालाच ते लागू आहेत,ईश्वराला नाहीत.जीव अज्ञानी आहे असल्यामुळे काल्पनिक धर्म हे मिथ्या असून खरे वाटतात,पण ईश्वर ज्ञानी असल्यामुळे ईश्वरास वाटत नाहीत.अज्ञानी व ज्ञानी भेदामुळे या दोघात—जीव-ईश्वरात फरक आहे.||११|| भावार्थः---अनात्मवस्तूंचे ठिकाणी जडलेला जो आत्मस्वधर्म,तो या लोकीच सर्वसंगपरित्यागपूर्वक ईश्वरार्पण केलेल्या धर्माचरणाने,किंवा भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेल्या भगवद्भक्तियोगाने हळूहळू नाहीसा होतो.आपण—जीवानी सर्व-संग परित्याग केला असता स्वधर्माचारण ईश्वरास अर्पण केल्यामुळे व निष्काम भक्ती योगाने हा भेद हळू—हळू नाहीसा होतो.||१२|| भावार्थः----जेव्हा,भगवंताच्या सौंदर्यादिक गुणाचा मोठेपणा जाणून,विषयांपासून निवृत्त झालेली इंद्रिये,अंतर्यामिरूपाने ह्रदयात राहून सर्वाचे दुःख हरण करणाऱ्या त्या परमेश्वराचे ठिकाणी लय पावतील तेव्हा,निजलेल्या पुरुषाचे जसे सर्व क्लेश नाहीसे होतील.आपण जेव्हा सर्व विषयांचा त्याग करून जेव्हा ती इंद्रिये परमेश्वराकडे—परमात्म्याकडे लावावी,तेव्हाच भगवंत आपला स्वीकार करतो.म्हणजे मुरारी--भगवंतांच्या गुणाचे वर्णन व श्रवण केले असता ते,सर्व क्लेशाचा नाश करिते मग आपल्या मनात प्राप्त झालेली त्या ईश्वराच्या चरणकमलसंबंधी धुळीची सेवा करण्याची प्रीति,सर्व दु:खे नाहीशी करते हे काय सांगावे ! म्हणून आपण—जीवांनी भगवंतांची निष्काम सेवा करावी. ||१३|| भावार्थः----मुरारि भगवंताच्या गुणाचे वर्णन व श्रवण केले असतां ते,सर्व क्लेशाचा नाश करिते मग आपल्या मनांत प्राप्त झालेली त्या ईश्वराच्या चरणकमलसंबंधी सेवा करण्याची प्रीति,सर्व दुःखे नाहीशी करिते हे काय सांगावे ! म्हणून आपण भगवंतांची निष्काम सेवा करावी कारण,ती सेवा सर्व दु:खे नाहीसे करते.||१४|| भावार्थः---विदुर म्हणाला----हे समर्था मैत्रेया,तुझ्या उत्तम भाषणरूप खड्गाने माझा संशय अगदी तुटून गेला.आतां माझे मन,ईश्वराचे स्वतंत्रत्व व जीवाचे परतंत्रत्व या दोन्ही गोष्टीमध्ये चांगले प्रवेश करू लागले म्हणजे या दोन्ही बद्दलहि आता मला संशय राहिला नाही.आपण—जीवानी श्रवण केले असता जीव—ईश्वराचे यथार्थ स्वरूप कळते.जीवाचे—ईश्वराचे यथार्थ स्वरूप कळाल्यामुळे आपणास काय स्वीकारावे व कशाचा त्याग करावे हे कळते.असा स्वीकार व त्याग केला असता भगवंतांसी आपले ऐक्य घडते—आपण भगवंतच होतोत—असतोत.||१५|| भावार्थः---कारण,हे ज्ञानसंपन्ना मैत्रेया,स्वप्नामध्ये शिरच्छेदादिकां सारखे व्यर्थ असून आधारशून्य हे जीवाचे भाग्यहीनत्व हरिशक्तीच्या आश्रयानेच भासते.याखेरीज दुसरे जगाच्या उत्पत्यादिकांस काहीच मूळकारण नाही,असे जे तुम्ही भाषण केले ते अतिसमीचीन आहे||१६|| | यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः | तावुभौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः ||१७|| भावार्थः---या लोकांमध्ये देहांदिकांवर अत्यंत आसक्त असणारा जो अतिमूढ तो एक,आणि जो प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या ईश्वरास प्राप्त झाला तो दुसरा हे दोघेमात्र सुखाने राहतात बाकी ज्याला संसारातील दुःखे पाहून तो सोडून द्यावा असे वाटते पण आत्मस्वरूपाचा अनुभव नसल्यामुळे संसार सोडून देतां येत नाही तो मध्यस्थ जीव बहुत क्लेश पावतो.म्हणजे जो संशयग्रस्त झालेला आहे—शब्द-ज्ञानी आहे व ज्यास सर्व—विषयांचा त्याग झालेला नाही व परमात्म्याचा अनुभव आला नाही अशा जीवास दु:ख भोगावे लागतात.म्हणून आपण जेव्हा सर्वसंग—परित्याग—सर्व विषयांचा त्याग करूत,तेव्हाच परमात्म्याचा अनुभव येतो व सुखरूप होतोत.||१७|| | अर्थाभावं विनिश्चित्य प्रतीतस्यापि नात्मनः | तां चापि युष्मच्चरणसेवयाहं पराणुदे ||१८|| भावार्थः---हे मैत्रेया,मी तर आतां हा अनित्य प्रपंच जरी भासत आहे तरी त्यांत काही वास्तविक अर्थ नाही,ही केवळ शांति आहे,असे जाणून कृतार्थ झालो आहे.आतां जी भ्रांति राहिली आहे तिलाहि मी तुमच्या चरणाच्या सेवेने,दूर करीन.आपण भगवंतांच्या चरण सेवेने म्हणजे परमात्म्याशी ऐक्य करून अनुभव घेतल्याने भ्रांती निवृत्त होते.||१८|| भावार्थ:---ज्या तुह्मासाराख्यांच्या चरणसेवेने मधुदैत्यादिक अनादी पुरण-पुरुष भगवंतांच्या चरणाच्या ठिकाणी संसारदु:खाचा नाश करणारा,स्वाभाविक उत्साह-युक्त,सप्रेम भक्तियोग प्राप्त होतो.आपण—जीवानी भगवंतांची निष्काम सेवा केलीअसता भक्तियोग प्राप्त होतो.भक्तियोगाने ज्ञान मार्ग आवडतो व ज्ञान मार्गाने मोक्ष प्राप्त होतो.||१९|| भावार्थः---ज्या तुह्यासारख्यांचा चरणसेवेने मधुदैत्यनाशक अनादि पुराणपुरुष भगवंताच्या वैकुंठलोकप्राप्तीचे मार्गभूत जे तुम्हासारखे साधु त्यांची सेवा,हि ज्याच्या पदरी स्वल्प पुण्याई असेल त्या पुरुषाला अतिदुर्लभ आहे.कारण,त्या साधूंनी देवाधिदेव जनार्दनाचे नित्यशः वर्णन केले जाते.म्हणून आपण साधू—संतांचे अधिक सेवा केली असता सत्संगाचा लाभ होतो. ||२०|| भावार्थः---हे मैत्रेया,तुम्ही पूर्वी सांगितलेली कि,व्यापक ईश्वराने सृष्टीच्या आरंभी इंद्रियाकांसहित महत्तत्त्वादिक सर्व तत्त्वे अनुक्रमाने उत्पन्न केली आणि त्यांच्या अंशांपासून विराट्देह उत्पन्न करून त्यामध्ये स्वतः प्रवेश केला.भगवंतांनी प्रवेश केल्याशिवाय जड देहाला जीव येऊ शकत नाही—जीव झाल्याशिवाय कळत नाही.||२१|| | यमाहुराद्दं पुरुषं सहस्त्राङ्घ्रयूरुबाहुकम् | यत्र विश्व इमे लोकाः सविकाशं समासते ||२२|| भावार्थः---हजारो पाय,मांड्या आणि बाहू यांनी युक्त अशा त्या विराट्पुरुषाला वेद,अनादिसिद्धपुरुष असे म्हणतात;ज्याचे ठिकाणी हे सर्व लोक,संकोच न करितां प्रशस्तरितीने राहिले आहेत.||२२|| भावार्थः---ज्याचेठिकाणी इंद्रिये,विषय व इंद्रियांच्या देवता या तीन वृत्तीसह प्राण,अपान,व्यान,उदान,समान,नाग,कूर्म,कृकल,देवदत्त आणि धनंजय असा दहाप्रकारचा प्राण राहतो,असे तुम्ही सांगितले व ज्यापासून ब्राह्मानादिक—ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य व शुद्र चार वर्ण झाले आहेत,त्या परमेश्वराच्या ब्रह्मादिक विभूति मला कथन करा.||२३|| भावार्थः---ज्या विभूतीच्याठिकाणी मुलगे,नातू,कन्यांचे पुत्र,व गोत्रज यांसहवर्तमान नाना प्रकारांनी निरनिराळ्या स्वरूपाचा प्रजा उत्पन्न झाल्या असून त्यांनी हे सर्व ब्रह्मांड व्याप्त झाले आहे.||२४|| भावार्थः---सर्व प्रजापतीचा पालक जो ब्रहमदेव त्याने कोणते प्रजापती (प्रजा उत्पन्न करणारे)उत्पन्न केले व पशुपक्ष्यादिकांच्या सृष्टिचे प्रकार व त्यांतील अवांतर भेद व चवदा मन्वंतराचे अध्यक्ष मनु कोणते कोणते उत्पन्न केले?||२५|| भावार्थः---हे मैत्रेया,त्या मनुंच्या वंशात कोणतेकोणते राजे उत्पन्न झाले?व त्यांनी कोणकोणती चरित्रे केली?तसेच भूमीच्या वर व खाली जे लोक आहेत त्यांचे व भूलोकांचे प्रमाण व रचना कशी आहे ती वर्णन कर.||२६|| भावार्थः---पशु,मनुष्ये,देव,सर्प,पक्षी,तशाच जरायुज,स्वेदज,अंडज आणि उद्भिज ह्या चार प्राणिकोटी कशा झाल्या तो सृष्टीचा सर्व विभाग मला वर्णन कर.||२७|| भावार्थः---त्याप्रमाणे ब्रह्मादिक तीन गुणावतारांनी जगाच्या उत्पत्तिस्थितीसंहारांना व त्या जगाच्या आश्रयाला उत्पन्न करणाऱ्या त्या लक्ष्मीनिवासस्थानभूत नारायणाचे उदार पराक्रम मला कथन कर.||२८|| भावार्थः---हे समर्था मैत्रेया,कमंडलूधारणादिक चिन्ह,आचार व शमदमादिक स्वभाव या लक्षणावरून ब्राह्मणादिक चार वर्ण व ब्रह्मचार्यादिक—ब्रह्मचारी,गृहस्थी,वानाप्रस्ठी व संन्याशी या चार आश्रम यांचे विभाग आहेत?ऋषीचे जन्मकर्मादिक,वेदाचे विभाग,||२९|| भावार्थः---यज्ञांचे निरनिराळे प्रकार,योगाचा मार्ग,ज्ञानाला साधनभूत जे सांख्यशास्त्र त्याचा मार्ग,भगवंताने सांगितलेला तंत्रमार्ग||३०|| भावार्थः---पाखंडमार्गाविषयी होणारी विषमप्रवृत्ति,नीच-वर्णांच्या पुरुषांपासून उत्तम वर्णातील स्त्रियांना होणाऱ्या संततीचा प्रकार, सत्वादिक गुण व कर्मे यांपासून उत्पन्न झालेल्या जीवांच्या उत्तमादिक गति कोणत्या?व किती प्रकारच्या आहेत?||३१|| भावार्थः---तसेच धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीचे,परस्पर विरोध न येता कोणते आहेत?उपजीविका राजनीती व शास्त्रश्रवणयांचे निरनिराळे प्रकार कसे आहेत?||३२|| भावार्थः----हे मैत्रेया,श्राद्धाचा विधि कोणता?पितरांची उत्पत्ति कशी आहे?ग्रह,नक्षत्रे व तारा यांची कालचक्रावर रचना कशी आहे?||३३|| भावार्थः---तसेच दान,तप,इष्ट (यज्ञयागादिक)व पूर्त (धर्मशाळा तलाव कूप इत्यादिक धर्मार्थ करणे)यांचे फल कोणते?प्रवासांत व संकटांत असलेल्या पुरुषांचा धर्म कोणता?||३४|| भावार्थः---आणि हे निष्पाप मुने,सर्व धर्मोत्पादक भगवान जनार्दन ज्या साधनांनी संतुष्ट होतो किंवा ज्या प्रकारच्या लोकांना प्रसन्न होतो,हे सर्व मला कथन कर.||३५|| अर्थः---कारण,हे ब्राहमणश्रेष्ठा.दीनांवर दया करणारे गुरु,आपली निरंतर सेवा करणाऱ्या शिष्यांना आणि पुत्रांना त्यांनी न विचारल्यादेखील गोष्टीचा उपदेश करीत असतात.म्हणून आपण सदगुरूंचे शिष्यत्व स्वीकारावयास पाहिजे.त्यांचे शिष्यत्व स्वीकारले असता ते आपणास उपदेश करीत असतात.त्यांच्या उपदेशाने आपणास परमार्थाचे साधन कळत असते. ||३६|| भावार्थः----हे भगवन्,पूर्वी सांगितलेल्या त्या तत्त्वांचा प्रलय कितीप्रकारचा होतो?हातांत चामरे घेणारे सेवक,निजलेल्या राजाची जशी सेवा करितात त्याप्रमाणे प्रलयाचेठिकाणी योगनिद्रेने निजलेल्या परमेश्वराची सेवा कोणकोण करीत असतात व त्यावेळी परमात्मा निजल्यानंतर कोण निद्रा करितात?||३७|| भावार्थः--- जीवाचे तत्त्वे कोणते ? व परमेश्वराचे स्वरूप कोणते?इत्यादि ज्या अंशाने त्या जीवेश्वरांचे ऐक्य घडेल ते मला सांग.तसेच उपनिषदांमध्ये गुरुशिष्यांच्या संवादापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान सांगितले आहे ते मला सांग.||३८|| भावार्थः---हे पवित्रा मैत्रेया,या लोकांत होऊन गेलेल्या विद्वानांनी त्या ज्ञानाची जी साधने सांगितली तीही मला सांगा.कारण,मनुष्यांना आपोआप ज्ञान,जे ज्ञान,भक्ति किंवा वैराग्य हि कशी प्राप्त होतील?होणारच नाहीत.आपणास जीवांना उपदेश सांगितल्याशिवाय कांहीच कळत नसते.म्हणून साधू—संतांनी शरण येणाऱ्या भक्तांना उपदेश करावयास पाहिजे.|| भावार्थः---यास्तव हरीची सृष्ट्यादि कर्मे समजावी या इच्छेने प्रश्न करणाऱ्या माझ्या या पूर्वोक्त प्रश्नाची उत्तरे सांगावी.मी तर तुमचा मित्र असून अविद्येने ज्ञान नष्ट झाल्यामुळे अज्ञानाने व्याप्त झालो आहे.||४०|| भावार्थः---हे निष्पापा,सर्व वेद,यज्ञ तप व दाने ही,तत्त्वोपदेशाने जीवाला केलेल्या अभयदानाच्या सोळाव्याहि अंशाच्या पुण्याबरोबर तुलना पावण्यास समर्थ होत नाहीत.||४१|| | स इत्थमापृष्ट पुराण कल्प: कुरूप्रधानेन मुनिप्रधान: |
| प्रवृद्धहर्षो भगवत्कथायां सञ्चोदितस्तं प्रहसन्निवाह ||४२|| भावार्थः---श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजा,याप्रमाणे कौरवांमध्ये श्रेष्ठ अशा विदुराने ज्ञानसाधनभूत पुराणसिद्ध अर्थाविषयी प्रश्न करून भगवत्कथेच्याठिकाणी उत्तम रीतीने प्रेरणा केलेल्या त्या ऋषिश्रेष्ठ मैत्रेयाने,हर्षयुक्त होऊन हासत हांसतच त्या विदुराला उत्तरे सांगण्यास आरंभ केला.||४२|| याप्रमाणे श्रीमद्भागवत-नामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा सातवा(७)अध्याय बेचाळीस(४२)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.
_____________________________________________________________________________________________ ८--- नंतर जलाशायी असणाऱ्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला,त्याने आपल्या उत्पादक भगवंतास न जाणल्यामुळे त्या उदकांत भयभीत होऊन तपाने त्या व्यापक परमेश्वरास प्रसन्न करून घेतले;हि कथा आठव्या अध्यायांत वर्णन केलेली आहे.
८--- ८---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[ब्रह्मदेवाची उत्पत्ती] | सत्सेवनीयो बत पूरुवंशो यल्लोकपालो भगवत्प्रधानः | बभूविथेहाजितकीर्तिमालां पदे पदे नूतनयस्यभीक्ष्णम् ||१||
भावार्थ:---मैत्रेय म्हणाला----अहो ! हा पुरूराजाचा वंश,साधूंनीदेखील सेवन करण्यास योग्य आहे,कारण,या वंशात भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठ असा लोकपालक धर्मराजा(यम)तूं उत्पन्न झाला आहेस.जो तूं पदोपदी (क्षणोक्षणी)भगवंताच्या कीर्तीरुपी मायेला वारंवार नवी नवीन टवटवी आणून देत आहेस,म्हणजे तुझ्या प्रश्नाने भगवंताची चरित्रमाला माझ्या ह्रदयांत वारंवार मूर्तिमंत उभी राहते.||१|| भावार्थः---हे विदुरा,संसारातील क्षुल्लक सुखाच्या प्राप्तीकरीता मोठे दुःख पावणाऱ्या मनुष्यांच्या त्या दुःखाचा नाश व्हावा म्हणून मला तूं प्रश्न केला आहेस.तर मी आतां तुला भागवतनामक पुराण सांगण्यास आरंभ करितो जे पुराण,पूर्वी प्रत्यक्ष शेभगवंताने ऋषीस कथन केले आहे.||२|| भावार्थः---एकेवेळी पाताल-तलाचेठिकाणी बसणारा,अकुंठीत ज्ञानाने परिपूर्ण,आणि योगैश्वर्यसंपन्न अशा आद्य देव शेषाला,त्यापेक्षांहि श्रेष्ठ जो श्रीवासुदेव त्याचे यथार्थ स्वरूप आपणास समजण्याच्या इच्छेने,सनत्कुमारादिक ऋषींनी प्रश्न केला.||३|| भावार्थः----याचेच पुनः तीन श्लोकांनी स्पष्टीकरण करितात.त्यावेळी तो शेष,ज्याचे वेद वर्णन करितात त्या आपल्या आश्रयभूत वासुदेव नामक परमेश्वराचे आनंदस्वरूप ध्यानांत आणून त्याची मानसपूजा करीत होत्साता,अंतर्मुख वृत्तीने परमात्म्याकडे लाविलेल्या आपल्या नेत्रकमळाच्या कळ्या,कृपादृष्टीच्या योगाने सनत्कुमारादिकांचा अभ्युदय व्हावा याकरिता किंचित किंचित उघडीत होता.||४|| भावार्थः---त्या शेषाच्या,नागराजांच्या कन्या,आपल्याला मनाजोगा पति मिळावा ह्या इच्छेने नानाप्रकारच्या पूजा-द्रव्यांनी ज्याचे पूजन करितात अशा पाय ठेवण्याच्या कमलाला,गंगोद्काने भिजलेल्या आपल्या जटाजुटांनी स्पर्श करणाऱ्या त्या शेषाला प्रभाव पूर्णपणे जाणणाऱ्या आणि अतिशय प्रेमामुळे ज्यांतील कांही पदे अर्धवट निघताहेत अशा भाषणांच्या योगाने त्या संकर्षणाची कृत्ये वारंवार वर्णन करणाऱ्या त्या सनत्कुमारादिक ऋषींनी,सहस्त्रमुकुटावर जडित उत्तम उत्तम रत्नाच्या योगाने,वर उचललेल्या ज्याच्या हजार फड्या प्रकाशित झाल्या आहेत अशा शेषाला प्रश्न केला.||५-६|| | सांख्यायन:पारमहंस्यमुख्यो-विवक्षमाणो भगवद्विभूती: | | जगाद सोऽस्मग्दुरवेऽन्विताय - पराशरायाथ बृहस्पतेश्च ||७|| भावार्थः---तेव्हां त्या शेषभगवंताने,मोक्ष धर्मामध्ये आसक्त असलेल्या सनत्कुमाराला हे भागवत सांगितले अशी प्रसिद्धी आहे.हे विदुरा,पुढे त्या सनत्कुमाराला सांख्यायनाने प्रश्न केला असतां,त्याने हे भागवत,उत्तम व्रतनिष्ठ अशा त्या सांख्यायनाला सांगितले.||७|| भावार्थः----नंतर परमहंसधर्मप्रवर्तक व परमेश्वराचा विभूति वर्णन करण्याची इच्छा करणारा अशा त्या सांख्यायनाने,शिष्यगुणसंपन्न अशा आमच्या पराशरनामक गुरूला व बृहस्पती हे सांगितले.||८|| भावार्थः----नंतर पुलस्य ऋषीने,तूं पुराणवक्ता होशील असा वर दिलेल्या त्या दयाळू पराशरमुनीने हे आद्य पुराण मला—मैत्रीय मुनींना सांगितले हे वत्सा विदुरा,तो मी,आतां हे पुराण हरिकथा श्रवणाविषयी श्रद्धाळू व भगवत्सेवेमध्ये तत्पर अशा तुला—विदुराला कथन करितो.||९|| | उदाप्लुतं विश्वमिदं तदाssसीद् यन्निद्रयामीलितदृङ् न्यमीलयत् | | अहिन्द्रतल्पेsधिशयान एक: कृतक्षणः स्वात्मरतौ निरीहः ||१०|| भावार्थः---हे विदुरा,ज्या काली हे सर्व विश्व प्रलयकालीन समुद्रांत बुडून गेले होते त्याकाली,ज्याची चैतन्यशक्ति सर्वदा जागरूक आहे असा,आत्मक्रीडेच्याचठिकाणी आनंद मानणारा,निरिच्छ,एक आणि शेषरुपी शय्येवर पहुडलेली अशा त्या भगवंताने निद्रेच्या मिषाने आपली नेत्रे झाकली होती.||१०|| भावार्थः----तो परमात्मा,ज्याप्रमाणे,दाहकशक्ति प्रकट न झालेला अग्नि,काष्ठामध्ये राहतो त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सर्व प्राणीमात्रांची सूक्ष्मशरीरे स्थापित करून कालनाशक आपली शक्ति करीत होत्साता त्या आपल्या अधिष्ठानरूप उदकाचे ठिकाणी राहिला होता.||११|| भावार्थः---याप्रमाणे आपल्या चैतन्यशक्तिसहवर्तमान चार युगाचे हजारवेळा परिभ्रमण होईपर्यंत उदकामध्येच शयन करणाऱ्या आणि सृष्टिकाळी आपणास जागृत करण्याविषयी आज्ञा केलेल्या कालनामक आपल्या शक्तीनेच सृष्टिसाधनभूत सर्व कर्मे ज्याने सिद्ध केली आहेत अशा त्या परमात्म्याने,आपल्या देहाचे ठिकाणी लीन झालेल्या सृष्टीयोग्य संपूर्ण लोकांस अवलोकन केले.||१२|| भावार्थः---तेव्हा सूक्ष्मभूतांकडे (शब्दस्पर्शादिकांकडे)नजर ठेवणाऱ्या त्या परमेश्वराच्या शरीरामध्ये सूक्ष्मरूपाने बाहेर पडला.||१३|| भावार्थः---प्राणिमात्रांची प्राक्तन कर्मे सुचविणाऱ्या कालाच्या योगाने विष्णूपासून उत्पन्न झालेला तो कमळाच्या कळा,आपल्या तेजानेच त्या अपार उद्कांस सूर्यासारखा प्रकाशित करीत करीत एकाएकी उदकाच्यावर आला.||१४|| | तल्लोकपद्मं स उ एव विष्णुः प्राविवीशत्सर्वगुणावभासम् |
| तस्मिन स्वयं वेदमयो विधाता स्वयम्भुवं यं स्म वदन्ति सोsभूत् ||१५|| भावार्थः---ज्यापासून ते सर्व भोग्य विषयांचे प्रकाशक चतुर्दशलोकरुपी कमळ उत्पन्न झाले,त्याच सर्व शक्तिमान विष्णूने त्या कमलामध्ये अंतर्यामिरूपाने प्रवेश केला.तेव्हा त्या कमलाचेठिकाणी ज्याला स्वयंभू असे म्हणतात तो अध्ययनावांचून स्वतः वेदमूर्ति असा ब्रहमदेव उत्पन्न झाला.||१५|| भावार्थः---तो त्या कमळाच्या मध्यभागी असलेल्या कर्णिकेमध्ये बसला असून,जेव्हा त्याला जग दृष्टी पडेना आणि ते पाहण्याकरितां आकाशामध्ये चोहोकडे दृष्टि लावून सभोवर तो पाहुं लागला,तेव्हा त्याला प्रत्येक दिशेस एक एक अशी चार दिशेस चार मुखे प्राप्त झाली.||१६|| भावार्थः----त्यावेळी प्रलयकालच्या वायुच्या योगाने खळबळलेल्या पाण्यापासून उत्पन्न झालेल्या लाटांच्या समुहाने युक्त अशा त्या उदकांतून वर आलेल्या कमलाचा आश्रय करणाऱ्या त्या ब्रहमवालाहि,लोकतत्त्व काय आहे व आपण कोण आहे,याचे स्पष्टरीतीने ज्ञान झाले नाही.काय हे आश्चर्य ! ||१७|| भावार्थः---तो मनात म्हणाला कि,कमळाच्या कर्णिकेवर बसलेला जो हा मी,कोण आहे?पाण्यामध्ये हे एकच कमळ कोठून आले?हे कमळ कांहीतरी वस्तूचा आश्रय करून राहिले असावे!त्यापेक्षां येथे खाली कांहीतरी वस्तू खात्रीने असली पाहिजे.||१८|| भावार्थः---हे विदुरा,असा विचार करून त्या ब्रहमदेवाने त्या कमळाच्या देठांतील छिद्रातून आंत पाण्यामध्ये प्रवेश केला.आणि त्या कमलाच्या नालाचे आश्रयस्थान शोधीत शोधीत तो खाली गेला असतांहि त्याला ते आश्रयस्थान सांपडले नाही.||१९|| | तमस्यपारे विदुरात्मसर्गं विचिन्वतोsभूत्सुमहांस्त्रिणेमिः | यो देहभाजां भयमीरयाणः परिक्षिणोत्यायुरजस्य हेतिः ||२०|| भावार्थः---हे विदुरा,त्या अपार अंधकारामध्ये ब्रहमदेव,आपला स्त्रष्टा कोण,याचा शोध करीत असतां,फारच मोठा (शंभर वर्षे)काळ निघून गेला.जो काळ ईश्वराचे शस्त्र असून प्राणिमात्रास मरणरूप भय उत्पन्न करीत होत्साता आयुष्याचा नाश करितो.थोडक्यात काळ हा स्थूल—शरीराचे एक—एक क्षणाने आयुष्य कमी करतो,म्हणून आपण—जीवानी एक-एक क्षणाने परमार्थ करावयास पाहिजे.थोडासाही काळ निर्थक किंवा अनर्थात जाऊ नये.असा विवेक करून जीवन व्यतीत करावयास पाहिजे.||२०|| भावार्थः----नंतर मनोरथ परिपूर्ण न झालेला तो ब्रहमदेव,तेथून माघारा फिरून पुनः आपल्या मूळस्थानावर (कमळावर)येऊन बसला व त्याने हळूहळू अभ्यासाने आपल्या प्राणाचा जय करून,विषयांपासून चित्त अंतर्मुख केले व समाधिस्थ होऊन राहिला.त्याचप्रमाणे आपण—जीवानी विषयांपासून चित्त अंतर्मुख परमात्म्याकडे लावावयास पाहिजे.म्हणजे आपल्या चित्ताचा विषय भगवंत करावा.||२१|| | कालेन सोsज: पुरुषायुषाभि प्रवृत्तयोगेन विरूढबोधः | स्वयं तदन्तर्हृदयेsवभात मपश्यतापश्यत यन्न पूर्वम् ||२२|| भावार्थः----नंतर शतसंवत्सरात्मक कालाच्या योगाने परीपक्वदशेस आलेल्या समाधियोगेकरून त्याब्रहमदेवाला ज्ञान प्राप्त झाले.तेव्हा त्या ब्रहमदेवाने,पूर्वी शोध करीत असतांनाही जे पडले नव्हते.ते परमेश्वराचे स्वरूप आपल्या ह्रदयामध्ये आपोआप प्रगट झालेले अवलोकन केले.आपण—जीवाला विषयांचा अनुभव न येता परमात्म्याचा अनुभव येईल.||२२|| भावार्थः----त्याचा प्रकार नऊ श्लोकांनी सांगतात---शेषाच्या सहस्त्रफणारूप छत्राच्या योगाने चोहोकडून युक्त असलेल्या रत्नांच्या प्रकाशांनी ज्यांतील अंधकार नाहीसा झाला आहे, प्रलपकालाच्या उदकामध्ये,कमलाच्या तंतूप्रमाणे शुभ्रवर्णाच्या विस्तृत शेषरुपी शय्येवर निजलेल्या एक पुरुष त्याने अवलोकन केला.||२३|| भावार्थः----तो पुरुष,’संध्याकाळच्या पिंगटवर्ण अश्नाच्या वेष्टणाने वेष्टित,अनेक सुवर्णशिरवरांनी सुशोभित,रत्ने उदकांचे प्रवाह वनस्पति व फुले यांच्या वनपंक्तींनी आणि वेळूरुपी हात व वृक्षरुपी माय यांनी युक्त अशा’ पाचेच्या पर्वताच्या शोभेचा तिरस्कार करीत होता.||२४|| भावार्थः----आणि तो पुरुष,त्रैलोक्याचा समावेश करणाऱ्या नानाप्रकारची उंची उंची भूषणे व वस्त्रे ह्यास शोभा आणणाऱ्या आणि लांबीने व विस्ताराने निरुपम अशा देहाने युक्त असून त्याने आपल्या देहावर अनेक प्रकारचे अलंकार धारण केले होते.||२५|| भावार्थः----आणि तो,आपले मनोरथ परिपूर्ण होण्यासाठी शुद्ध वेदोक्त मार्गांनी आराधन करणाऱ्या भक्तांना,नखरुपी चंद्रकिरणांनी युक्त असलेल्या सुंदरपत्रांनी सुशोभित असे मनोरथपूरक आपले चरणकमल,कृपेने दाखवीत होता.||२६|| भावार्थः----तसाच तो,लोकांचे दुःख हरण करणाऱ्या हास्याने युक्त,सभोवती स्फुरण पावणाऱ्या कुंडलांनी भूषित,आणि आरक्तवर्ण अशा अधरोष्ठाच्या कांती युक्त असून सुंदर नासिकेचे व मनोरथ श्रृर्कंटीनी युक्त अशा आपल्या मुखाच्या योगाने आपल्या भक्तांचा सत्कार करीत होता.||२७|| भावार्थः---हे वत्सा विदुरा,तो पुरुष कमरेचे ठिकाणी कदंवपुष्णाच्या केसारांप्रमाणे विंगटवर्ण अशा पितांबराने व कमरपट्ट्याने फार शोभायुक्त असून श्रीवत्सनामक चिन्हाने युक्त अशा वक्षस्थळाचे ठिकाणी प्रीतीने धारण केलेल्या बहुमौल्यवान हाराने सुशोभित होता.||२८|| भावार्थः---आतां चंदनवृक्षरूपकाने त्या भगवंताचे निरुपण करितात अव्यक्त म्हणजे स्पष्ट नसणारी जी माया किंवा ब्रहम तेच ज्याचे मूळ आहे,बहुत मोलाच्या बाहूभूषणांनी व श्रेष्ठरत्नांची व्याप्त अशा बाहूदंडरूप अनंताशाखांनी युक्त,व ज्याचे स्कंध नागराजाच्या फनांनी वेष्टित आहेत असा भगवान होता.चंदनवृक्षाचेहि मूळ दिसत नसते व तो मोठे खांदे,लहान शाखा,सर्प,फळे व पुष्पे इत्यादिकांनी युक्त असतो.||२९|| भावार्थः---आता मोठया पर्वताच्या रूपकाने वर्णन करितात---वृक्ष पाषाण पशु पक्षी इत्यादि स्थावरजंगमाचा आश्रय,सर्पांचे (पक्षी शेषाचे)प्रीती स्थान,पाण्याने वेष्टित,हजारो किरीटरुपी सुवर्णशृगांनी युक्त,ज्याच्या शरीरावर कौस्तुभरत्न स्पष्ट विराजमान आहे.पर्वतापासूनहि कोठे कोठे रत्ने उत्पन्न होतात.||३०|| भावार्थः---तसाच तो हरि,वेदरूप श्रमांच्या योगाने जिला शोभा आली आहे अशा आपल्या कीर्तिंमय वनमालेच्या योगाने व्याप्त असून सूर्य,चंद्र वायू व अग्नि यांनीही आपल्या प्रकाशादिकांनी आकलन करण्यास अशक्य होता आणि त्रैलोक्यामध्ये चमकणारी व रक्षणाकरितां सभोवती फिरणारी अशा सुदर्शनादिक आयुधांनी युक्त असल्यामुळे शत्रूंच्या हाती लागण्यास दुर्घट होता.||३१|| भावार्थः---अशा ईश्वराचे दर्शन झाल्याबरोबर जग उत्पन्न करणाऱ्या त्या ब्रहमदेवास सृष्टि करण्याचे ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने नारायणाच्या नाभिरूपी सरोवरात कमल-१,त्यांत असलेले आपले स्वरूप२-२,प्रलयकालचे उद्क-३,वायु-४ आणि आकाश-५ ही पांच अवलोकन केली.यांहून दुसरे त्याला कांहीच दिसले नाही.||३२|| | स कर्मबीजं रजसोपरक्तः प्रजाः सिसृक्षन्नियदेव दृष्ट्वा | अस्तौद्वीसर्गाभिमुखस्तमिड्य मव्यक्तवर्त्मन्यभिवेशितात्मा ||३३|| भावार्थः---नंतर रजोगुणाने व्याप्त व प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणारा तो ब्रहमदेव,आपण पाहिलेल्या त्याच वस्तू सृष्टिचे कारण आहेत असे पाहून,सृष्टि करण्याविषयी उत्सुक होत्साता,ज्याचा मार्ग अदृश्य आहे अशा परमात्म्याचेठिकाणी आपले अंतःकरण लावून, त्या स्तुत्य भगवंताची स्तुति करू लागला.||३३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा आठवा(८)अध्याय तेहतीस(३३)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ___________________________________________________________________________________________ ९--- प्रलयकालाच्या समुद्रामध्ये दु:ख पावणाऱ्या ब्रह्मदेवाने,आपल्या तपश्चर्यने संतुष्ट झालेल्या नारायणास अवलोकन करून सृष्टी करण्याच्या इच्छेने त्याची स्तुती केली हि कथा नवव्या अध्यायांत वर्णन केलेली आहे. | ९--मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती] ______________________________________________________________________________________ |ब्रह्मोवाच:--- | ज्ञातोsसि मेsद्द सूचिरान्ननु देहभाजां न ज्ञायते भगवतो गतिरीत्यवद्दम् | | नान्यत्त्वदस्ति भागवन्नपि तन्न शुद्धं मायागुणव्यतिकराद्ददूरूर्विभासि ||१|| भावार्थः---ब्रहमदेव म्हणाला---हे भगवन् आज मी तुला फार वेळाने जाणले आहे.आपणास—जीवास भगवंत तापाशिवाय जनता येत नाही,म्हणून आपण ब्रह्मदेवासारखे तप करावे.जीवानां तुझे ज्ञान होत नाही,हा त्यांचा—आपला--जीवाचा मोठा दोष आहे.तुझ्याहून—परमात्म्याहून दुसरे खरे वस्तु नाही.जर आहे असे भासते म्हणावे,तर तेहि खरे नाही.कारण,मायेच्या सत्त्व रज आणि तम या तीन गुणांच्या मिश्रपणाने तूंच अनेक प्रकारे भासत आहेस.खरे पाहू गेले असता सर्व परमात्माच आहे.जसे खरे पाहू गेले असता अलंकारात सर्व सोनेच आहे.मायेच्या योगाने नाम व रूपाने नटलेला आहे,वास्तविक पाहता सर्व परमात्माच आहे.यातील नाम व रूप हे मिथ्या आहे व परमात्मा सत्य आहे. त्याचप्रमाणे सर्व दागिन्याच्या रूपाने नाम व रूपाने नटला आहे,वास्तविक पाहता सर्व सोनेच आहे.यातील नाम व रूप हे मिथ्या आहे व सोनेच सत्य आहे.||१|| भावार्थः----हे देवा,चैतन्यशक्तीचा प्रादुर्भावामुळे ज्यापासून सर्वदा अज्ञान निवृत्त झाले आहे अशा तुझे,शेकडा अवतारांचे मूलभूत हे स्वरूप आहे कि,ज्याच्या नाभिकमलरूप आश्रयापासून मी उत्पन्न झालो आहे.हे तूंच सज्जनावर अनुग्रह करण्यासाठी प्रथम धारण केले आहेस.||२|| भावार्थः---हे परमात्मन,निरंतर प्रकाशरूप,भेदरहित,आनंदरूप असे जे तुझे निर्गुण स्वरूप ते या स्वरूपाहून निराळे आहे असे मी पहात नाही,तर हेंच ते आहे.म्हणूनच तुझ्या ह्या विश्व निर्माण करणाऱ्या,परंतु विश्वाहून निराळ्या,भूतेंद्रियाचे कारण अशा या मुख्य उपास्य स्वरूपाचा मी आश्रय केला आहे.||३|| भावार्थः---हे जगन्मंगला,तेंच हे आपले रूप तूं,आम्हां उपासकांच्या कल्याणाकरितां ध्यानामध्ये दाखविले आहेस.तस्मात् जरी निरीश्वरवादरूप कुतर्काचा आश्रय करून नरकांत पडणाऱ्या लोकांनी तुझा अनादर केला आहे तथापि षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा त्या तुलाच आम्ही नमस्कार करितो.आपण निरीश्वरवाद न स्वीकारीता ईश्वरवाद स्वीकारावा,कारण ईश्वराशिवाय ब्रह्मांडाचा व्यस्थापन होऊ शकत नाही.आपण निरीश्वरवाद स्वीकारला तर नरकाची गतीस प्राप्त व्हावे लागेल.||४|| भावार्थः----हे नाथ ! जे पुरुष,वेदरुपी वायुने वाहून आणिलेला तुझ्या चरणरुपी कमळांच्या कळ्यांच्या वास,आपल्या कर्णरुपी द्वारांनी सेवन करितात,म्हणजे वेदांनी गाइलेल्या तुझ्या कथा ऐकतात,त्यांनी,दृढभक्तीच्या योगाने तुझ्या चरणाचा स्वीकार केला असल्यामुळे,तूं त्या आपल्या भक्तांच्या ह्रदयकमळांतून कधीहि दूर होत नाहीस.म्हणून आपण—जीवानी दृढ-निष्काम भक्ती करून भगवंतांस आपल्या अंत:करणात प्रथम स्थान द्दावे.||५|| भावार्थः---हे देवा,जोपर्यंत लोक,तुझ्या निर्भय चरणाचा आश्रय करीत नाहीत,तोपर्यंतच त्यांना द्रव्य गृह आणि मित्र यांच्या निमित्ताने,भय,शोक,इच्छा,पराभव आणि अतिलोभ हे असतात व सर्वदुःखाचे मूळकारण जो हे माझे असा दुराग्रह तोही असतो.आपण—जीवानी भगवंतांच्या चरणांचा—अधिष्ठानाचा—परमात्म्याचा आश्रय घ्यावा,कारण त्यामुळे आपले दोष निवृत्त होतात व भीतीही राहत नाही--म्हणजे मृत्यूही येणास नाही—आपण अमर राहणार.||६|| भावार्थः--- यास्तव,सर्वदुःखाचे निवारण करणारा जो श्रवण-कीर्तनादिरुपी तुझा प्रसंग त्यांतून आपली इंद्रिये काढून अतितुच्छ विषयसुखाच्या लेशासाठी,चिरकाल काम्यकर्मे करणारे व लोभाने ग्रस्तचित्त झालेले जे दीन पुरुष आहेत,ते दैवाने मूढबुद्धि (हतमाग्य)आहेत असे जाणावे.आपण—जीव आनंदरूप असून अज्ञानामुळे अतितुच्छ विषयसुखासाठी काम्यकर्मे करून दीनता स्वीकारातोत,हाच आपला मूर्खपणा आहे.म्हणून आपण सत्संग करून संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावे.आपण—जीवानी श्रवण केल्यामुळे आपण सत्-चित्-आनंदरूप असे कळून,त्यानुसार परमात्म्याचा अनुभव येईल व जन्म—मरण निवृत्त होईल.||७|| भावार्थः----हे अच्युता,उरुक्रमा,क्षुधा,तृषा,कफ,वात,पित्त,शीत,उष्ण,वायु,वृष्टि,परस्पर (स्त्रीपुरुषांमध्ये)अतिदुःसह असा कामाग्नि व क्रोध यांनी वारंवार पिडीत झालेल्या या प्रजांना,अवलोकन करणाऱ्या माझे मन,फार दुःखित होते.||८|| भावार्थः---हे ईश्वरा,जोपर्यंत हा लोक,षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा तुझ्या,इंद्रिये आणि विषय यांच्या रूपाने परिणाम पावलेल्या मायेच्या सामर्थ्याने युक्त असे हे जग,तुझाहून निराळे आहे असे पहातो,तोपर्यंतच ज्यामध्ये कर्मांची फळे भोगावी लागतात,वस्तुतः खोटा परंतु दुःखे देणारा असा हा संसार निवृत्ती होत नाही.जोपर्यंत आपण—जीव ईश्वरात आणि आपल्यात—जीवात भेद पाहतो,तोपर्यंत कर्मांची नाशिवंत फळे भोगावी लागतात.वस्तुत: संसार हा खोटा—मिथ्या असून भगवंत खरा आहे.म्हणून आपण संसाराचा त्याग करून परमाम्याचा स्वीकार करून अनुभव घ्यावा.||९|| भावार्थः---हे देवा,तुझ्या श्रवणकीर्तनादिप्रसंगाविषयी विमुख झालेले ऋषिदेखील,दिवसास द्रव्यसंपादन करण्याविषयी नानाप्रकारचे व्यवसाय करणारे,रात्री झोपेत आपले आयुष्य व्यर्थ घालविणारे किंवा नानाप्रकारच्या स्वप्नदर्शनाने क्षणोक्षणी निद्राभंग पावणारे आणि दैवाने ज्यांचे द्रव्यप्राप्तीचे उद्योग सर्वप्रकारे व्यर्थ गेले आहेत असे होत्साते,या लोकाचे ठिकाणी संसार पावतात.म्हणू आपण—जीवानी, ऋषींनी,अर्थ संपादन करणारे वैश्य,झोपित व्यर्थ आयुष्य घालविणारे आळशी पुरुष,जाग्रत अवस्थेत विषयांचा ध्यास करणारे व त्या ध्यासामुळे झोपिनंतर स्वप्न पडणारे व त्यामुळे निद्राभंग पावणारे जीव,ज्यांचे दैव अर्थासाठी प्रयत्न करून अर्थार्जन न करू शकणारे जीव,या सर्वांची प्रतिकूल परिस्थिती व त्यामुळे दु:खित होणारे असंख्य जीव यांची दयनीय अवस्था पाहून मला—मैत्रीय यांना दु:ख होत आहे.म्हणून आपण—जीवानी या मनुष्य देहाचा संसारीक कार्यासाठी वापर न करता पारमार्थिक कार्यासाठी वापर करून आपले दु:ख निवृत्त करावे.त्यातच आपले—जीवाचा परम—हित आहे.||१०|| भावार्थः----हे नाथा,श्रवणाच्या योगाने ज्याचा मार्ग दृष्टिस पडला आहे असा तूं,भक्तपुरुषांच्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या ह्रदयकमळामध्ये खरोखर वास करितोस.हे श्रेष्ठकीर्ते,ते तुझे भक्त,आपल्या मनाने जे जे तुझे स्वरूप चिंतन करितात.ते ते स्वरूप,भक्तांवर अनुग्रह करण्याकरितां तूं प्रकट करितोस.म्हणून आपण—जीवानी भगवंतांची निष्काम भाक्ती करावी. ||११|| | नातिप्रसिदति तथोपचितोपचरै-राराधित:सुरगनै र्हृदि बद्धकामै:| | यत्सर्वभूतद्यासदलभ्ययैका-नानाजनेष्ववहित: सुहृदन्तरात्मा ||१२|| भावार्थः---हे परमेश्वरा,तूं एक असून नानाप्रकारच्या पदार्थांमध्ये शिरला आहेस व सर्वांचा मित्र असून अंतर्यामी आत्मा आहेस.अनेक असतात ते जीव असतात व जो एक असतो तो भगवंत असतो.म्हणून एक असणारा जो भगवंत आहे,त्याचीच उपासना—निष्काम भक्ती करावी.म्हणून दुर्जनांस दुर्लभ अशा सर्वभूतांच्या दयेने जसा फार लौकर प्रसन्न होतोस तसा अंतःकरणात काहीतरी कामना ठेवणाऱ्या सुर--गणांनी,अत्युत्तम उपचारांनी तुझे आराधन केले असतांहि तूं त्यांस प्रसन्न होत नाहीस.आपण—जीवानी निष्काम भाक्तीकेली तर भगवंत प्रसन्न होतो व आपण—जीवानी सकाम भक्ती म्हणजे संसाराविषयी—विषय—प्राप्तीसाठी भक्ती केली तर भगवंत प्रसन्न होत नाही.म्हणून आपण—जीवानी भगवंत प्रसन्न होण्यासाठी निष्कामच भक्ती करावी,तर सकाम भक्ती करू नये.||१२|| | पुंसामतो विविधकर्मभिरध्वराध्यै-र्दानेन चोग्रतपसा व्रतचर्यया च | | आराधनं भगवतस्तव सत्क्रियार्थों -धर्मोऽर्पित:कर्हिचिद्ध्रियते न यत्र ||१३|| भावार्थः---यास्तव,यज्ञादिक नानाप्रकारची कर्मे,दान,उग्र तप व व्रताचरण यांच्या योगाने,षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा तुझे आराधन करणे हेंच,पुरुषांच्या सत्कर्माचे उत्तम फळ होय.कारण,ज्या तुझे ठिकाणी अर्पण केलेला क्रियारूप धर्म,कधीही नाश पावत नाही.भगवंत यांना आपण निष्काम कर्मे अहंकाराचा त्याग करून अर्पण केली तर आपल्या त्या सत्कर्मांचे अविनाशी फळ देतो.भगवंत अविनाशी आहे म्हणून तो आपणास—जीवास अविनाशीच फळ देतो.अविनाशी फळ म्हणजे न संपणारे फळ होय.सदैव सुखरूप ठेवणारे फळ देतो.||१३|| भावार्थः----म्हणून हे भगवन्,सर्वदा स्वरूपचैतन्याच्या प्रकाशानेच द्वैतबुद्धिरुपी भ्रम नाहीसा करणाऱ्या ज्ञानाश्रयरूप तुज पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो.जो भगवंत सत्-चित्-आनंदरूप आहे तोही आपणास ज्ञान मार्गाने सत्-चित्-आनंदरूपच करतो म्हणजे आपल्यासारखाच करितो.आपण भगवंतांसाराखे झाल्यास,आपणास दु:खाचा स्वप्नातसुद्धा अनुभव येणार नाही.तसाच जगाचे उत्पत्ति स्थिती आणि संहार करण्याला निमित्त जी माया तिच्या विलासाने क्रीडा करणाऱ्या तुज परमेश्वराला आम्ही हा नमस्कार करितो.म्हणू आपण—जीवानी अशा प्रकारच्याच भगवंतांस अनन्य शरण जाऊन ज्ञान—मार्गाचा स्वीकार करावा.||१४|| भावार्थः---प्राणोत्क्रमनाच्या वेळी परस्वाधीन झालेलेहि जे प्राणी,तुझी देवकीनंदन,भक्तवत्सल,गोवर्धनधारी इत्यादिक नांवेच केवळ उच्चारितात ते अनेक जन्मांमध्ये केलेल्या पापांचा एकदम त्याग करून मायावगैरे कोणत्याहि आवरणाने रहित अशा ब्रहमपदाला पावतात.त्या जन्मरहित ईश्वराला मी शरण आहे.म्हणून आपण—जीवानी भगवंतांचे निष्काम नामस्मरण करून,निष्काम भक्ती करून ज्ञान—मार्गाने ब्रह्मा-पद प्राप्त करून घ्यावे,कारण त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होते.||१५|| भावार्थः---जो प्रथमतः एक असून,सत्त्व रज आणि तम या तीन गुणांनी आपल्या मुळाचे (प्रकृतीचे)तीन भेद करून स्थिती उत्पत्ति आणि लय ह्यांस कारणीभूत असे आपण विष्णु,मी (ब्रहमदेव)आणि शंकर हे तीन ज्याचे खांदे आहेत असा होऊन नंतर प्रत्येक खांद्याचे मरीच्यादि ऋषिरूप व मन्वंतरादिरूप शाखोशाखांनी युक्त होत्साता वृद्धिगत झाला आहे,त्या जगद्वृक्षरुपी भगवंताला माझा नमस्कार असो.म्हणून आपण जो भगवंत एक आहे व कार्या करण्यासाठी अनेक रूप धारण करितो,त्यास आपण अनन्य शरण जावे.||१६|| भावार्थः----हे प्रभो,तूं सांगितलेल्या स्वपुजनरूप हितकारक आपल्या कर्माविषयी लक्ष न ठेविणारा हा लोक,या लोकी जोपर्यंत विरुद्धकर्माविषयी—सकाम कर्मांविषयी—संसार कार्मांविषयी—संसारातील विषयांविषयी तत्पर—आसक्त असतो,तो पर्यंत,जो बलवान् काल,त्या प्राण्याच्या आयुष्याच्या आशेलाच तत्काल सोडून टाकितो म्हणजे पुन्हा—पुन्हा जन्म—मरण परंपरा जी चौऱ्यालक्षयोनीस आहे तेथे दु:ख भोगण्यासाठीच पाठवितो.म्हणून आपण—जीवानी त्या कालरूपी परमेश्वराला नमस्कार करावा.||१७|| भावार्थः---जे माझे—ब्रह्मदेवाचे सत्यलोकरूप स्थान,दोनपरार्धपरिमित कालापर्यंत राहणारे असल्यामुळे सर्वलोकांनी वंद्य आहे,त्या स्थानावर आरूढ झालेलाहि मी—ब्रह्मदेव,ज्याकालरुपी तुजपासून—भगवंतांपासून भितो,आणि ज्या तुझी प्राप्ति व्हावी म्हणून मी पुष्कळ वर्षे तप केले.त्या यज्ञाधिष्ठा—यज्ञाचे अधिष्ठान असलेला त्या तुज भगवंताला नमस्कार असो.||१८|| भावार्थः---जो तूं—भगवंत,विषयसुखाच्या प्रीतीनेरहित असूनहि स्वतःच उत्पन्न केलेल्या धर्ममर्यादांचे पालन करण्याच्या इच्छेच्या, पशु,पक्षी,मनुष्य व देव इत्यादिक जीव--योनीमध्ये,आपल्याला पाहिजे तसे शरीर घेऊन क्रीडा करितोस,कारण तो भगवंत आहे.भगवंत करितो. स्वत:च्या कर्मामुळे जन्मास येत नाही तर, सज्जनांचे रक्षण व धर्मांचे रक्षण करण्याकरिता कोणत्याही योनीत येऊन कार्य करितो.त्याच्याशिवाय इतरांना ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार सुख—दु:खांची फळे भोगण्यासाठी जन्मास यावे लागते.त्या पुरुषोत्तमरुपी तुज भगवंताला नमस्कार असो.||१९|| भावार्थः----आतां प्रत्यक्ष दिसणाऱ्याच मूर्तीला नमस्कार करितो.तम,मोह इत्यादिक पांच प्रकारच्या अविद्येने व्याप्त नसूनहि आपल्या उदरामध्ये सर्व लोकांच्या रचनेचा उपसंहार करणारा जो तूं,तो लोकांना निद्रासुख असे मिळते हे उपहासाने दाखवित असतां,भयंकर लाटांच्या ओळींनी युक्त अशा पाण्यामध्ये शेषसर्परूपी शय्येचा स्पर्शच जिला अनुकूल आहे अशी योगनिद्रा (स्वाधीनची झोप)स्वीकारिता झालास.||२०|| भावार्थः---हे स्तुतियोग्य भगवन्,ज्या तुझ्या नाभिकमलरूप स्थानापासून मी—ब्रह्मदेव उत्पन्न झालो.ज्याच्या अनुग्रहाने सृष्टि केल्यामुळे त्रैलोक्यामुले उपकार करणार झालो,भगवंतांच्या कृपेमुळे सृष्टी उत्पन्न करतो.भगवंतांच्या अनुग्रहामुळे त्या उदरामध्ये सर्व जग राहत असलेल्या आणि योगनिद्रेच्या शेवटी ज्याचे नेत्र प्रफुल्लित झालेल्या कमळाप्रमाणे दिसूं लागले आहेत अशा तुला नमस्कार असो.||२१|| भावार्थः---अशी स्तुति करून प्रार्थना-–तोच हा सर्व जगताचा हितकर्ता,एक,आत्मा,शरणागतांचे प्रिय करणारा भगवान्,ज्या ज्ञानाच्या योगाने व ऐश्वर्याने,सर्व जगाला सुख उत्पन्न करितो त्याच ज्ञानाशी माझ्या बुद्धीचा संयोग करो,की,जेणेकरून मी हे जग,पूर्ववत पुनः उत्पन्न करीन.||२२|| भावार्थः---शरण आलेल्या पुरुषांना वर देणारा हा भगवान्,आपल्या शक्तिरूप लक्ष्मीसह गुणावतार घेऊन जे जे अघटित कर्म करील त्या त्या कर्मामध्ये त्याच भगवंताच्या पराक्रमाने युक्त हे जग,त्याच्याच आज्ञेने उत्पन्न करणाऱ्याहि माझ्या चित्ताची प्रवृत्ति करो,ज्या प्रवृत्तिच्या योगाने सृष्टिरूप कर्माचे ठिकाणी अभिमान व त्यापासून घडलेले पाप यांचा मी त्याग करीन.आपणही—जीवानी कर्मांच्या ठिकाणी अहंकार धारण न करता केलेले कर्मे भगवंतांस निष्काम भावनेने अर्पण करावीत.||२३|| भावार्थः----या प्रलयकालीन उदकामध्ये निजून राहणाऱ्या ज्या अनंतशक्ती पुरुषाच्या नाभिरूप डोहापासून महत्तत्वरूपी चित्ताचा अभिमानी असा मी उत्पन्न झालो,त्याचेच हे विचीत्ररूप जग विस्तृत करणाऱ्या माझ्या,वेदरूपी वाणीच्या अध्ययनाचा लोप न होवो||२४|| भावार्थः---तो हा अत्यंत दयाळू पुराण--पुरुष भगवान,अतिशय प्रेमयुक्त हास्याने आपले नेत्रकमल विकसित करीत करीत,जगताच्या अभ्युद्याकरिता आणि माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता स्वत: उठून मधुरवाणीने माझा खेद दूर करो.||२५|| भावार्थः---मैत्रेयऋषी म्हणाला---हे विदुरा,याप्रमाणे तो ब्रहमदेव,तपश्चर्या,उपासना आणी सामाधी यांच्या योगाने,आपल्या उत्पत्तीचे कारण अशा विष्णूला पाहून आपल्या मनाच्या व वाणीच्या शक्तीप्रमाणे त्याची स्तुती करून दमल्या सारखा उगीच राहिला.||२६|| भावार्थः----तदनंतर तो मधुसूदन भगवान,आपणाला लोकरचनेचे ज्ञान कसे होईल या उपदेशाने खेद पावणाऱ्या त्या ब्रहमदेवाला अभिप्राय जाणून आनित्य प्रलयोदकाने खिन्नचित्त झालेल्या त्याला पाहून,मोठ्या गंभीर वाणीने त्याचा विषद नाहीसा करीत करीत म्हणाला की---------------,||२७-२८|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाला:--- हे वेदगर्भ,तू आळस करू नकोस,सृष्ठी उत्पन्न करण्याविषयी प्रयत्न कर.तू माझ्यापाशी ज्याबद्दल प्रार्थना करीत आहेस ते मी पूर्वीच संपादन करू ठेविले आहे.||२९|| भावार्थः---हे ब्राहमण तू पुनः तपश्चर्या कर आणि समाधी योगाने माझ्या स्वरूपाचे ध्यान कर म्हणजे त्या दोन्हीच्या योगाने तुला अंत:करणामध्ये सर्व लोक स्पष्ट दिसू लागतील.||३०|| | तत आत्मनि लोके च भक्तियुक्तः समाहितः | द्रष्टासि मां ततं ब्रम्हन्मयि लोकांस्त्वमात्मनः ||३१|| भावार्थः----नंतर हे ब्रहम देवा,तू भक्तियुक्त होऊन अंत:करणाची एकाग्रता केलीस म्हणजे आपलेठीकानी आणि जगाचेठीकानी व्यापून राहिलेल्या मला पाहशील आणि माझे ठिकाणीच सर्व लोक व जीव आहेत असेही पाहशील.||३१|| | यदा तु सर्वभूतेषु दारूष्वग्निमिव स्थितम् | प्रतिचक्षीत मां लोको जह्यात्तर्हेव कश्मलम् ||३२|| भावार्थः---काष्ठाचेठिकाणी असलेल्या अग्नीप्रमाणे सर्वभूताचे ठिकाणी व्यापून असलेल्या मला,हा लोक जेव्हा अवलोकन करील तेव्हाच तो आपल्या अज्ञानाचा त्याग करील.आपण—जीवानी सत्संग करून विवेकाद्वारे सर्व ठिकाणी भगवंतंच आहे असा निश्चय करून अनुभूती घेतली असता अज्ञानाचा त्याग होऊन जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त झाले असे समजावे. ||३२|| | यदा रहितमात्मानं भूतेन्द्रियगुणाशयैः | स्वरूपेण मयोपेतं पश्यन् स्वाराज्यमृच्छति ||३३|| भावार्थः---कारण जेव्हा,हा लोक,पंचमहाभूते,इंद्रिये,गुण,आणि अंत:करण याहून वेगळा,आपल्या जीवात्म्याला,अशा आपल्या जीवत्म्याला, आपल्या आत्मभूत मज परमात्म्याशी ऐक्यरूपाने युक्त आहे असे पाहतो,तेव्हाच तो मोक्ष पावतो.जेव्हा आपण—जीव हा पंचमहाभूते—आकाश,वायू,तेज,आप—पाणि आणि पृथ्वी;पांच कर्मेद्रिये—वाक्,पाणि—हात,पाद—पाय,शिश्न,आणि गुद; पांच ज्ञानेद्रीये—श्रोत्र,त्वचा,चक्षु, जिव्हा,आणि घ्राण;गुण—सत्वगुण,रजोगुण,आणि तमोगुण;आणि अंत:करण असे मिळून आठरा अनात्मा तत्वाहून वेगळा जीवात्मा—आत्मा—परमात्मा आहे.कारण आनात्मा तत्वे हि दु:खरूप आहेत व आत्मा तत्व सुखरूप आहे.जीवास सुखाची गरज आहे.||३३|| | नानाकर्मवितावेन प्रजा बव्हिः सिसृक्षतः | नात्मावसीदत्यस्मींस्ते वर्षीयान्मदनुग्रहः ||३४|| भावार्थः----हे ब्रहमदेवा,अनेकप्रकारच्या कर्म--विस्ताराने पुष्कळ प्रजा उत्पन्न करणाऱ्या हे तुझे चित्त,ज्या अर्थी मोह किंवा आसक्ती पावत नाही त्या आर्थी तुझ्यावर माझा मोठा अनुग्रह आहे असे समज.आपल्या—जीवाच्या ठिकाणी मोह किंवा संसाराची आसक्ती नाही,त्याअर्थी आपणावर भगवंतांचा मोठा अनुग्रह आहे असे समजावे.||३४|| भावार्थः---आणि प्रजा उत्पन्न करणाऱ्याही तुझे मन ज्या अर्थी माझेठीकानी जडले आहे,त्या अर्थी मुख्य वेद्वेत्या अशा तुला अतिपापी असाही हा रजोगुण,मोह उत्पन्न करणार नाही.आपले—जीवाचे मन जर भगवंतांसी जडलेले असेल तर आपल्याला मोह नावाचा दोष नाही असे समजावे.म्हणून आपण—जीवानी जीवाविषयी असलेला मोह घालविण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||३५|| भावार्थः---हे ब्रहमदेवा,ज्याअर्थी तू मला भुते,इंद्रिय,गुण आणि अहंकार यांनी अलिप्त मानितोस,त्या अर्थी प्राणीमात्रास समजण्यास अशक्य अशाही मला आज तू जाणले आहेस.आपण—जीवानी भगवंत हा पंचमहाभूते,अकरा इंद्रिये.तीन-गुण आणि अहंकार याहून वेगळा असलेला परमात्मा समजले असेल तर व तोच सर्वत्र परमात्मा आहे असा निश्चय असेल तर आपली—जीवाची जीवदशा संपून आपण—जीव परमात्मरूपच आहे,असे समजण्यास मुळीच हरकत नाही.आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सत्-चित्-आनंदमय आहोतच.||३६|| भावार्थः---हे ब्रहमदेवा,उदकामध्ये कमळाच्या देठांच्या मार्गाने त्याच्या मुळाचा शोध करीत असणाऱ्या तुला,आपणास कोण आश्रय आहे किंवा नाही असा माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला म्हणून मी हे आपले स्वरूप तुला हृदयामध्येच दाखविले.||३७|| | यच्चकर्थान्ग मत्स्तोत्रं मत्कथाभ्युद्यान्कितम् | यद्वा तपसि ते निष्ठा स एष मदनुग्रहः ||३८|| भावार्थः---हे ब्रहमदेवा,तू माझ्या कथेच्या उत्कर्षाने युक्त जी माझी स्तुती केलीस आणि जी तुला तपाचेठीकानी निष्ठा उत्पन्न झाली तो हा सर्व माझाच अनुग्रह होय.आपणास—जीवास पारमार्थिक साधनांविषयी निष्टा उत्पन्न झाली तर आपण—जीवानी समजावे कि हि जी साधनांविषयी निष्ठा झाली आहे,कारण आपल्यावर--जिवावर भगवंतांचीच कृपा आहे.असे समजून आपण आपल्या साधनेत पारमार्थिक प्रगती—पुढील वाटचाल करावी.||३८|| भावार्थः---सगुण-रूपाने भासत असताही वस्तुत: निर्गुण अशा माझे वर्णन करून लोकांचा अभ्यूदय व्हावा या इच्छेने ज्याअर्थी तू माझी स्तुती केली त्या अर्थी मी तुला प्रसन्न झालो आहे.तुझे कल्याण असो.आपणास जरी भगवंत सगुण—रूपाने भासत असला तरी वास्तविक पाहता तो निर्गुण—निराकारच आहे असे शब्दाने वर्णन करावे.आपणास—जीवास आपण सगुण अवस्थेत असल्याशिवाय त्या निर्गुण—निराकार परमात्म्याचे वर्णन करू शकत नाहीत.आपण सगुण अवस्थेत असतांना निर्गुणाचे भजन केले असता आपण निर्गुण—निराकाराचा अनुभव घेऊ शकतो.||३९|| | य एतेन पुमानित्यं स्तुत्वा स्तोत्रेण मां भजेत् | तस्याशु सम्प्रसीदेयं सर्वकामवरेश्वरः ||४०|| भावार्थः---जो पुरुष तू केलेल्या या स्तोत्राने नित्य स्तुती करून माझे आराधन करील,त्याला सर्व प्रकारचे वर देण्यास समर्थ असा मी लवकरच प्रसन्न होईन.आपण भगवंतांचे वर्णन—स्तुती केली असता भगवंत आपली पारमार्थिक इच्छा पूर्ण करितो म्हणजेच संसाराची इच्छा पूर्ण करीत नाही हे ओघाने आलेच असे समजावे.||४०|| भावार्थ:----हे ब्रहमदेवा,तलाव वगैरे बांधणे,तपश्चर्या करणे,यज्ञयागादिक अनुष्ठाने करणे,दाने देणे योगसाधना करणे व समाधी लावणे यांच्या योगाने सिद्धी होणारे जे मोक्षफळ ते माझी प्रितीच होय असे तत्ववेत्याचे मत आहे.म्हणून आपण तप,परोपकार,दानधर्म, यज्ञयाग निष्काम भावनेने करावे,कारण त्या निष्कामातेमुळे भगवंत मोक्ष-फळ देतो.आपण सकाम भावनेने कोणतेही कर्मे केली तर भगवंत मोक्ष फळ देत नाही.आपली संसारिक इच्छा या वर्तमान देहात पूर्ण न होता अन्य मनुष्य देहात होते.म्हणून आपण—जीवानी या देहातच जे अविनाशी फळ मिळते ,तेच प्राप्त करून घ्यावे.असे केले असता आपली संपूर्ण इच्छा प्राप्त होऊन कायमचे दु:ख निवृउत होते व कायमचे सुखूप होतोतच.आपणास कायमची सुखारुपता मिळाल्यावर संसाराची जी इच्छा केली होती,ती त्या कायमच्या सुखातच तिचा अंतर्भाव असल्यामुळे तिचीही उणीव राहत नाही.असा विवेक करून परमार्थ करावा.||४१|| भावार्थः----हे ब्रहमदेवा,देह इंद्रिय इत्यादिक ज्यांच्याकरिता प्रिय असतात त्या जिवाचाही मी आत्मा असून,पुत्रादी सर्व प्रिय वस्तुपेक्षाही अतिप्रिय आहे म्हणून सर्वांनी माझे ठीकानीच प्रीती ठेवावी.म्हणून आपण—जीवानी देह व देहसंबंधीची—विषयांची प्रीती न करता जो भगवंत सर्व—सुख देतो,त्याचीच प्रीती करावी.असे केले असता आपल्या—जीवाच्या सर्व—सुखाची प्राप्ती होते.||४२|| भावार्थः---हे ब्रहमदेवा तू सर्व प्राण्याचा आत्मा व सर्व वेद्स्वरूपी आहेस.मी सर्वोत्पादक आत्मा तुझ्या अंतर्यामी स्थित आहे.यास्तव माझ्या स्वरूपी विद्दमान जे त्रैलोक्य आहे व प्रजा आहेत त्या तू पूर्वीप्रमाणे अनायासाने उत्पन्न कर.||४३|| | तस्मा एवं जगत्स्त्रष्ट्रे प्रधानपुरुषेश्वरः | व्यज्येदं स्वेन रूपेण कन्जनाभस्तिरोदधे ||४४|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,याप्रमाणे,तो पृकृती--पुरुषाचा नियंता कमलनाभ--भगवान,त्या जगत्स्त्रष्टया ब्रहमदेवाला,असे जग उत्पन्न करण्याचे ज्ञान प्रकाशित करून अंतर्धान पावला.||४४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये ब्रह्मस्तुतीवर्णन-रूप हा नववा(९) अध्याय चौरेचाळीस(४४) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ १०--- नंतर विदुराने कालस्वरुपाच्या ज्ञानाविषयी प्रश्न केला असता,त्याचे उत्तर सांगण्यासाठी मैत्रीयने प्रथम त्या कालाची उत्पत्ती व प्रकृतादि विभागाने दहा प्रकारची झालेली सृष्टिया दहाव्या अध्यायांत,सांगितली आहे. | १०---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन] ___________________________________________________________________________________________ | अन्तर्हिते भगवति ब्रम्हा लोकपितामहः | प्रजाः ससर्ज कतिधा दैहिकीर्मानसीर्विभुः ||१|| भावार्थः---विदुर म्हणाला---हे मैत्रेया,भगवान अंतर्धान पावला असता,सार्वलोकाचा आदिस्त्रष्टा समर्थ जो ब्रहमदेव त्याने आपल्या देहापासून व मनापासून कितीप्रकारच्या प्रजा उत्पन्न केल्या?||१|| भावार्थः---हे भगवंता तू उत्तम ज्ञानसंपन्न आहेस यास्तव जे मी तुला पूर्वी प्रश्न केले आहेत त्यांची अनुक्रमाने उत्तरे सांग,आणि माझे सर्व संशय नाहीसे कर.आपण जर वक्ता असाल तर आपण श्रीत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करणे कर्तव्य असते.वक्त्यांनी आपले कर्तव्य पार पडणे हा त्यांचा स्वधार्म आहे. ||२|| भावार्थः----सुत म्हणाला---हे शौनका त्या विदुराने असा प्रश्न केला असता तो मैत्रेय ऋषी संतुष्ठ होऊन,हृदयामध्ये असलेल्या त्या सर्वप्रश्नाची उत्तरे देवू लागला.आपण जर वक्ता असुत तर आपण श्रोत्यांच्या प्रश्नांचे उत्तरे समाधानपुर्वक द्दावे.||३|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,शड्डगुनैश्वर्यसंपन्न व जन्मरहित अशा नारायणने जे सांगितले होते.त्याप्रमाणे ब्रहमदेवाने हि नारायणाचे ठिकाण आपले मन लावून देवांच्या मानाने शंभर वर्षेपर्यंत तप केले.आपण जर श्रोता असुत तर आपण वक्त्यांनी केलेल्या उपदेशानुसार साधना करणे हा श्रोत्यांचा स्वधर्म आहे. ||४|| भावार्थः---नंतर तो ब्रहमदेव ज्या कमळावर बसला होता ते कमळ व त्या प्रलयकाळाच्या प्रबळ वायुने कापू लागलेले ते उदक पाहून----------------||५|| भावार्थः----वृद्धिगत झालेल्या तपश्चर्येने व परमात्माविषयक उपासनेच्या योगाने बल व ज्ञान हि ज्याची वाढली आहेत अशा त्या ब्रहमदेवाने,जला-सहवर्तमान त्या वायूचे प्राशन केले.||६|| भावार्थः---आणि स्वत: ज्यावर बसला होता ते आकाशाला व्यापणारे,कमळ मोकळे आले असे पाहून,पूर्वी लीन झालेले लोक,या कमळाच्या योगानेच मी पुन: निर्माण करीन असा त्याने विचार ठरविला.||७|| भावार्थः---आणि भगवंताने कर्तव्य कर्माविषयी प्रेरणा केलेल्या त्या ब्रहमदेवाने त्या कमळाच्या कळ्यामध्ये प्रवेश करून त्या एकाच कमळाचे त्रैलोक्यरूपाने (भू: भुव: स्व: असे) तीन विभाग केले.ते कमल इतके मोठे होते,कि,त्याचे ठिकाणी चवदा लोकांची किंवा त्याहूनही जास्ती लोकांची रचना झाली असती.||८|| | एतावान्जीवलोकस्य संस्थाभेदः समाहृतः | धर्मस्य ह्यनिमीत्तस्य विपाकः पारमेष्ठ्यसौ ||९|| भावार्थः----ब्रहमदेवाच्या प्रत्येक दिवशी ज्याची घडामोड होते त्या जीवाच्या भोग्य लोकाच्या रचनेचा प्रकार एवढाच(त्रेलोक्यरूपी) शास्त्रात सांगितला आहे.कारण हा परमेष्ठी(ब्रहमदेव)निष्काम आचरण केलेल्या धर्माचे फलरूप आहे म्हणजे महर्लोक--जनलोक,तपोलोक आणि सत्यलोक हे निष्काम धर्माचे फळ असल्यामुळे त्यांत व त्यांत राहणाऱ्या लोकांचा,ब्रहमदेवाच्या प्रतिदिवशी नाश होत नाही,ते दोन परार्धेपर्यंत राहतात.त्रैलोक्य हे काम्यकर्माचे फलरुप असल्यामुळे त्यांचा व त्यांत राहणाऱ्या लोकांचा,ब्रहमदेवाच्या प्रतिदिवशी नाश होत नाही,उत्पत्तीनाश होतात.म्हणून आपण—जीवानी कमी कर्म न करता निष्काम कर्मे करावीत,कारण त्यामुळे अविनाशी लोक प्राप्त होतो.अविनाशी लीकांतून परमात्मरूप होत म्हणजे त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन आनंदरूप होतात.||९|| भावार्थः---विदुर म्हणाला---हे ब्रह्मण,प्रभो,अद्भुत कर्मे करणाऱ्या बहुरूपी श्रीहरीचे जे कालनामक लक्षण तूं मला सांगितलेस ते विस्ताराने वर्णन कर.||१०|| | गुणांव्यतिकारकारो निर्विषोSप्रतिष्ठित:पुरुषास्तदुपदमात्मानं लिलायसृजत ।।११।। भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,सत्त्व रज आणि तम या तीन गुणांपासून झालेल्या महतत्त्वादिक परिणामांच्या योगाने समजण्यांत येणारा परंतु वस्तुतः स्वरूपरहित व आद्दंतशून्य असा जो काळ त्यालाच निमित्तत्त्वेकरून स्वीकारून,ईश्वराने आपणालाच जगद्रूपाने निर्माण केले.भगवंत हा अधिष्ठान असलेला तोच अध्यस्त झाला—नाव व रुपास आला.जसे दोरीच अज्ञामुळे साप भासली.त्याचप्रमाणे अधिष्ठान असलेला भगवंत आपणास--अज्ञानी जीवास नाम व रूपाने भासला.यातील अधिष्ठान असलेला परमात्मा सत्य आहे तर,त्याच्यावर जग भासले ते मिथ्या आहे.आपणास यथार्थ ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा व कळून घ्यावे. ||११|| भावार्थः--ते असे कि,पूर्वी विष्णूच्या मायेने लय पावोन ब्रहमस्वरूप असलेले हे जग,ईश्वराने अस्पष्टरुपी—भगवंत अस्पष्ट व जग स्पष्ट कालाच्या योगानेच निरनिराळे प्रकाशित केले.||१२|| | यथेदानीं तथाग्रे च पश्चादप्येतदीदृशम् | सर्गो नवविधस्तस्य प्राकृतो वैकृतस्तु यः ||१३|| भावार्थः---हे जग जसे आतां दिसते तसेच प्रळयाच्या पूर्वी होते व प्रळयानंतरहि पुनः असेच उत्पन्न होईल.याप्रमाणे सामन्यात: कालाचे वर्णन करून आतां विशेषतः वर्णन करितात---त्या कालाच्या निमित्ताने प्रकृतीपासून (देव-जातींची)सहा प्रकारची व विकृतीपासून (मनुष्य जातीची)तीन प्रकारची अशी नऊ प्रकारची सृष्टि झाली आहे व त्या दोन्ही (प्राकृत व वैकृत) मिळून दहावाहि एक सृष्टिचा प्रकार आहे.||१३|| | कालद्रव्यगुणैरस्य त्रिविध: प्रतिसंक्रम: | आद्दस्तु महत: सर्गो गुणवैषम्यमात्मन: ||१४|| भावार्थः----तसा या सृष्टिचा काल,द्रव्य आणि गुण यांच्या योगाने,नित्य,नैमित्तिक आणि प्राकृतिक असा तीनप्रकारचा प्रळय होतो.आतां पूर्वी सांगितलेले सर्गाचे १० प्रकार असे कि,महत्तत्त्वाची उत्पत्ति हा पहिला सर्ग आ१,महत्तत्त्व म्हणजे परमात्म्यापासून सत्त्व रज आणि तम या तीन गुणांमध्ये झालेले न्यूनाधिक्य होय||१४|| | द्वितीयस्त्वहमो यत्र द्रव्यज्ञानक्रियोदय: | भूतसर्गस्तृतीयस्तु तन्मात्रो द्रव्यशक्तिमान् ||१५|| भावार्थः---ज्याच्यापासून पंचमहाभूते,ज्ञानकर्मेंद्रिये यांची उत्पत्ति होते तो अहंकार दुसरा सर्ग होय २,ज्यामध्ये पृथिव्यादि महाभूते उत्पन्न करण्याची शक्ति आहे असा शब्दादि सूक्ष्मभूतांचा उत्पत्तिप्रकार हा तिसरा सर्ग होय--३,||१५|| | चतुर्थ ऐन्द्रिय:सर्गो यस्तु ज्ञानक्रियात्मक: | वैकारीको देवसर्ग: पञ्चमो यन्मयं मन: ||१६|| भावार्थः---जो ज्ञानेद्रियकर्मेंद्रियेरूप इंद्रियांचा उत्पत्तिप्रकार तो चवथा सर्ग होय--४,सात्विकहंकारापासून इंद्रियांच्या अभिमानी देवता झाल्या,हा पांचवा सर्ग होय--५,यामध्येच मनाचा अंतर्भाव आहे.||१६|| | षष्ठस्तु तमसः सर्गो यस्त्वबुद्धिकृतः प्रभो | षडिमे प्राकृताः सर्गा वैकृतानपि मे श्रृणु ||१७|| भावार्थः----जीवांना आवरण आणि विक्षेप करणाऱ्या तामिस्त्रादिक पांच प्रकारच्या अविद्येचा जो सर्ग तो सहावा होय--६,”हे प्रकृतिपासून झालेले सहा सर्ग होत.”आतां विकृतीपासून झालेले सर्ग माझ्याहून श्रवण कर.||१७|| | रजोभाजो भगवतो लीलेयंहरिमेधस: | सप्तमो मुख्यसर्गस्तु षड्विधस्तस्थुषां च यः ||१८|| भावार्थः---ज्याच्याठिकाणी मनाची धारणा केली असतां ती,संसारांतील दुःखे नाहीशी करिते त्या रजोगुण धारण करणाऱ्या भगवंताची हि लीला आहे.स्थावरांचा सहाप्रकारचा जो मुख्य सर्ग तो सातवा होय ७,||१८|| | वनस्पत्योषधिलतात्वक्सारा विरुधो द्रुमाः | उत्स्त्रोतसस्तम: प्राया अन्तःस्पर्शा विशेषिण: ||१९|| भावार्थः---ते स्थावरांचे सहा प्रकार असे---पुष्पांवाचून ज्याना फळे येतात ते उंबर,वड पिंपळ-वगैरे वनस्पति--१,एकवार फळे येऊन ती पिंकली कि ज्यांचा नाश होतो त्या केळी,धान्येवगैरे औषधि--२,वृक्षावर आरोहरण करणाऱ्या-पानवेलवगैरे लता--३,ज्यांच्या त्वचा कठिण असतात ते-वेळूवगैरे त्वक्सार--४,वेलीच्याच जाति,पण ज्यांना आधाराची गरज लागत नाही त्या-वेतवगैरे वीरूध्--५,व प्रथम फुले येऊन तद्वारा फळे येणार ते--आंबावगैरे वृक्ष--६,ह्या सर्वांच्या गति व आहार ऊर्ध्वगामी असतात,यांची ज्ञानशक्ति स्पष्ट नसते,यांस अंतर्यामी स्पर्शज्ञान असते,व प्रत्येकाचे काहीतरी विशेष धर्म असतात.||१९|| | तिरश्चामष्टम: सर्ग: सोsष्टाविंशोद्विधो मतः | अविदो भूरितमसो घ्राणज्ञा ह्रद्दवेदिन: ||२०|| भावार्थः----तिर्यक्(वांकडा आहार जाणाऱ्या)जातीचा सर्ग आठवा--,तो अठ्ठावीस प्रकारचा मानिला आहे.त्या सर्वांचे लक्षण-त्यांस उद्दा काय होणार याचे धोरण नसते,आहार मैथुन विश्रांति इत्यादिकांचे मात्र ज्ञान असते,घ्राणेंद्रियाने वस्तू ओळखीता येतात,आणि त्यांच्या मनांत सुखाचे किंवा दुःखाचे परिणाम फार वेळ राहत नाहीत.||२०|| | गौरजो महिष: कृष्ण: सूकरो गवयो रुरु: | द्विशफा: पशवश्चेमे अविरुष्ट्रश्च सत्तम ||२१|| भावार्थः---हे विदुरा,बैल,बकरा,रेडा,हरिण,डुकर,गवा,रूरू (काळवीट)मेंढा व उंट ह्या दोन खुर असणाऱ्या पशूंच्या जाति आहेत.||२१|| | खरोsश्वोsश्वतरो गौर: शरभश्चमरी तथा | एते चैकशफा: क्षत्त: श्रृणु पश्चनखान् पशुन् ||२२|| भावार्थः---हे विदुरा,गर्दभ,अश्व,खेचर,गौर,शरभ आणि चमरी (वनगाय)ह्या एकखुरी पशूंच्या जाति आहेत.आतां पाचनखांचे पशूंचे भेद सांगतो ऐक.||२२|| | श्वा सृगालो वृको व्याघ्रो मार्जार: शशशल्लकौ | सिंह कपिर्गज: कुर्मो गोधा च मकराद्यः ||२३|| भावार्थ:---कुत्रा,कोल्हा,लांडगा,वाघ,मांजर,ससा,साळ,सिंह,वानर,हत्ती,कंसव व घोरपडे हे पांच नखांचे पशू आहेत.मगरवगैरे जलचर व कंक,गिधाड,वाघुळ,ससाणा,कोंबडा,आस्वल,मोर,हंस,सारस,चक्रवाक,कावळा,आणि घुबड इत्यादिक पक्षी स्थलचर मिळून हा १ भेद आहे, एतावता स्थलचर प्राण्याचे भेद--२७--व जलचर आणि स्थलचर मिळून भेद--१--असे तिर्यक्--जातीच्या सर्गाचे भेद--२८--आहेत. ||२३-२४|| भावार्थः----हे विदुरा,”वरून खाली आहार जाणारा मनुष्यांचा एक प्रकारचा सर्ग आहे” तो नववा होय ९,त्या मनुष्यांमध्ये रजोगुणाचा अंश अधिक असून ते कर्म करण्यांत तत्पर व दुःखरूपी संसारात सुख मानणारे असतात.||२५|| भावार्थः---हे श्रेष्ठा विदुरा,सातवा,आठवा व नववा हे तीन सर्ग,वैकृतच (पहिल्या सहा वर्गाच्या विकारांपासून झालेले)होत.पुढे सांगितलेला देवांचा सर्गही वैकृतच आहेत.जो सात्विक अहंकारापासून झालेला देवसर्ग तो पूर्वीच प्राकृत सर्गामध्ये सांगितला आहे.जो सनत्कारादिकांचा सर्ग तो प्राकृत सर्गामध्ये सांगितलेला आहे.जो सनत्कुमारादिकांचा सर्ग तो प्राकृत व वैकृत मिळून दोन्ही प्रकारचा दहावा होय--१०.कारण,ते सनकादिक,देव आणि मनुष्य या दोहोमध्येही आहेत.||२६|| भावार्थः---१—देव,२--पितर,३—दैत्य,४--गंधर्व,व अप्सरा—५--यक्ष व राक्षस,६--भूत,प्रेत व पिशाच,७--सिद्ध,चारण,व विद्याधर,८--किन्नर व किंपुरुषवगैरे असा देवांचाहि सर्ग आठप्रकारचा आहे.हे विदुरा,ब्रहमदेवाने केलेले हे दहा—१०--सर्ग मी तुला सांगितले.||२७-२८|| | अत: परं प्रवक्ष्यामि वंशान्मन्वतराणि च |
| एवं रज: प्लुत:स्त्रष्टा कल्पादिष्वात्मभूर्हरि: |
| सृजत्यमोघसंकल्प आत्मैवात्मानमात्मना ||२९||
भावार्थः----यानंतर वंश व मन्वंतरे हि मी तुला सांगतो.याप्रमाणे तो सत्यसंकल्प परमात्मा हरि,रजोगुणाने युक्त होत्साता,ब्रहमदेवाने रूप घेऊन क्ल्पादिकांचेठायी आपल्याच योगाने आपणालाच जगद्रपेकरून निर्माण करितो.ब्रह्मदेवच जगतरूपाने—अध्यस्तरूपाने—मिथ्यारुपाने निर्माण करितो. आपणही—जीवानीही ब्रह्मदेवच जगतरुपाणे—अध्यस्तरूपाने—मिथ्यारुपाणे आहे असा यथार्थ निश्चय करावा.||२९—३०|| || श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू || याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा दहावा(१०) अध्याय तीस(३०) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.
___________________________________________________________________________________________ |११--- नंतर कालाच्या परमाणु इत्यादी लक्षणांनी युगे,मन्वंतरे इत्यादिकांच्या प्रमाणावरून कल्पाचे (ब्रह्मदेवाचे एका दिवसाचे) प्रमाणादिरूप जे कालाचे स्वरूप,ते या अकराव्या अध्यायांत वर्णन केले आहे. | ११---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[मन्वन्तरादि कालविभागाचे वर्णन] ____________________________________________________________________________________________ | चरमः सद्विशेषाणामनेकोsसंयुतः सदा | परमाणु: स विज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः ||१|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,जो महत्तत्त्वादिक वस्तूमात्रांच्या अंशांतील शेवटचा अंश कि,ज्याचा पुढे कोणत्याही प्रकारे अंश करितांच येत नाही,तसाच,कार्य व समुदाय यांच्या अवस्थेस प्राप्त न होणारा जो अतिसूक्ष्म भाग सर्वदा स्वरूपस्थितीने असतो तो परमाणु जाणावा.अशा परमाणु यातही भगवंत आहे ज्याची एका अंशावर सर्व ब्रह्मांड असून बाकी तो शिल्लकच आहे असा तो व्यापक आहे.त्याच्या व्यापकतेची असीमा आहे म्हणजे त्याच्या वर्णन करता येत नाही.हे पुष्कळ परमाणु एकत्र मिळाले म्हणजे मनुष्यांना घट--पट इत्यादि अवयवी पदार्थांचा भास होतो.एतावता परमाणु हे वस्तूचे अतिशय सूक्ष्म स्वरूप होय.म्हणजे तो परमाणुतही आहे व व्यापकही आहे. ||१|| भावार्थः----ज्याचा अतिसूक्ष्म अंश परमाणु त्याच रुपांतरास न पावणाऱ्या कार्यरुपी पदार्थांचे जे शेवटचे स्वरूप,कि ज्याचा काहीच विशेष धर्म किंवा निराळेपणा दाखवितां येत नाही तो परम-महान जाणावा.एतावता सर्व प्रपंच हेंच कार्याचे अतिशय मोठे स्वरूप होय.सर्व प्रपांच्यात त्याच्या एका अंशाने व्यापक असून बाकी उर्रवीत आहे.||२|| भावार्थः----हे साधूश्रेष्ठा विदुरा,जसा परमाणु हा अतिसूक्ष्म पदार्थ असून ब्रह्मांडत हा अतिस्थूल पदार्थ आहे तसाच कालही स्थूल,सूक्ष्म किंवा मध्यम अशा रीतीने अनुमान करण्यास योग्य आहे.कारण,तो काल,स्वतः अस्पष्टरुपी असून परमाणुपासून ब्रह्मांडा--पर्यंत लहानमोठ्या अवस्थेमध्ये त्याची व्याप्ति असल्यामुळे भगवच्छक्तीने युक्त,दृश्य जगाला व्यापणारा आणि जगाच्या उत्पत्तिस्थितीसंहारांविषयी समर्थ आहे.तोच भगवंत जगाची उत्पत्ती,स्थिती व संहार करून अलिप्त आहे.||३|| | स काल: परमाणूर्वै यो भुङ्क्ते परमाणुताम् | सतोsविशेषभुग्यस्तु स काल: परमो महान् ||४|| भावार्थः----जो प्रपंचाच्या परमाणुरूप सूक्ष्म अवस्थेचा उपभोग करितो तो काल परमाणु होय आणि जो त्या प्रपंचाच्या सर्व अवस्थेचा उपभोग करितो तो काल परममहान (फार मोठा)होय.म्हणजे सूर्य हा कालगती मोजण्याचे मुख साधन आहे,ग्रह,नक्षत्रे,तारा यांच्या चक्रावर सूर्य फिरत असतो.तो अर्ध्या निमेषामध्ये आठ हजार आठ कोस चालतो.अशा चालणाऱ्या सूर्याला परमाणु इतक्या जाग्याचे उल्लंघन करण्यास जो काळ लागतो त्याला “परमाणुकाळ” म्हणतात.त्याच सूर्याला द्वादशराश्यात्मक ग्रहणनक्षत्रचक्रावर फिरण्याला जितका काळ लागतो त्याला “संवत्सर” म्हणतात.त्या संवत्सराच्या आवृत्तीने युगे,मन्वंतरे ह्या क्रमाने ब्रहमदेवाची जी दोन परार्धे (वर्षे १००)तो काळ “परममहान” (फार मोठा )होय||४|| भावार्थः---दोन परमाणुचा एक “अनु” होय.ते तीन अनु झाले म्हणजे एक “त्रसरेणू” मानिला आहे.खिडकीतून घरांत पडलेल्या सूर्याच्या किरणांमध्ये पुष्कळ रजःकण उडून आकाशांत जात असलेले दिसतात,त्यांत जो फार सूक्ष्म असले तो त्रसरेणू होय.हा फार हलका असल्यामुळे भूमीवर पडत नाही.||५|| भावार्थः---त्या तीन त्रसरेणूइतक्या जाग्यास उल्लंघर करण्यास सूर्याला जितका काल लागतो त्या काळाला “त्रुटी” म्हणतात.त्या शंभर त्रुटी झाल्या म्हणजे एक “वेध” होतो.त्या तीन वेधांनी एक “लव” असे समजतात||६|| भावार्थः----तीन लव म्हणजे एक “निमेश” समजावा.तीन निमेष म्हणजे “एकक्षण” होय.पांच क्षण म्हणजे एक “काष्ठा” असे समजतात.त्या पंधरा काष्ठा म्हणजे एक “लघु” होते||७|| | लघुनि वै समाम्राता दशपंच च नाडिका || ते द्वे मुहूर्त: प्रहर: षड्- याम: सप्त वा नृणाम्- ||८|| पंधरा लघु म्हणजे एक “घटिका” म्हटली आहे.त्या दोन घटिका म्हणजे एक “मुहूर्त” आणि सहा किंवा सात किंवा सात घटिका झाल्या म्हणजे मनुष्यांचा एक “प्रहर” होय.हे मान,सकाळचा एक व संध्याकाळाचा एक असे दोन मुहूर्त सोडून बाकीच्या अहोरात्रांतील काळास जुळते.||८|| भावार्थः---घटिका कशी करावी ते सांगतात---पांच गुंजांचा एक “माष (मासा),सोळा माशांचा एक “कर्ष” (तोळा),चार कर्षांचे एक “पल”,आणि पलांचा एक “प्रस्थ” (शेर)पाणि राहण्याजोगे करून त्यास,मध्यभागी चार मासे सोन्याच्या चार आंगळे लांब केलेल्या तारेने (म्हणजे ती तार आंतून जाण्याजोगे)छिद्र पाडावे.त्या छिद्राने प्रस्थपरिमित पाणि आंत भरले म्हणजे एक “पक्ष” होय.तो पक्ष,शुक्ल आणि कृष्ण असा दोन प्रकारचा आहे.||१०|| भावार्थः----ते दोन्ही पक्ष मिळून एक “मास” (महिना)होय.ते पितरांचे एक अहोरात्र जाणावे.दोन महिने म्हणजे एक “ऋतू”.सहा महिने म्हणजे एक “अयन”.ती अयने “दक्षिणायन” आणि “उत्तरायण” अशी दोन आहेत.ती दोन आयने मिळून देवांचे एक “अहोरात्र” असे म्हणतात.बारा महिने म्हणजे एक “संवत्सर” होय.शंभर संवत्सर म्हणजे “मनुष्यांच्या आयुष्याची परममर्यादा” असे सांगितले आहे.||११-१२||
भावार्थः---परमाणुपासून आरंभ करून संवत्सरापर्यंत होणाऱ्या कालाने,ग्रह नक्षत्र आणि तारा यांच्या चक्रावर फिरत असणारा,कालरूपी भगवान सूर्य,या भुवनकोशाला “प्रदक्षिणा” करितो.||१३|| | संवत्सर: परीवत्सर इडावत्सर एव च | अनुवत्सरो वत्सरश्र्च विदुरैवं प्रभाष्यते ||१४|| भावार्थः----हे विदुरा,त्याच वर्षांच्या काळाला सूर्य,बृहस्पति,सवन,चंद्र व नक्षत्रे यांच्या गतीच्या भेदाने,संवत्सर,परीवत्सर,इदावात्सर, अनुवत्सर आणि वत्सर अशी पांच नांवे वर्णन करितात.||१४|| भावार्थः---जो सूर्य,पंचमहाभूतांपैकी एक तेजोमय मंडळरुपी असून आपल्या कालनामक शक्तीच्या योगाने बिजादिकांच्या असणारे अंकुरादिक उत्पन्न होणाच्या शक्तिला अनेकप्रकारे पक्व करून यज्ञादिद्वारा सकाम पुरुषांना सत्त्वादिगुणमय स्वर्गादिफलांचा विस्तार करीत करीत पुरुषाच्या मोहनिवृत्तीकरितां आकाशामध्ये धांवत असतो त्या पांचप्रकारच्या संवत्सरांची प्रेरणा करणाऱ्या सूर्यनारायणाला तुझी पूजा समर्पण करा.||१५||
|विदुर उवाच:---
| पितृदेवमनुष्याणामायु: परमिदं स्मृतम् | परेषां गतिमाचक्ष्व ये स्यु:कलपाद् बर्हि र्विद: ||१६||
भावार्थः---विदुर म्हणाला---हे मैत्रेया,पितर,देव आणि मनुष्ये यांच्या आयुष्याची परममर्यादा,त्यांच्या त्यांच्या मनाने शंभर वर्ष आहे असे आपण सांगितले.आतां जे ज्ञानसंपन्न भृग्वादिक ऋषि,त्रैलोक्याच्या बाहेर आहेत त्या महात्म्यांच्या आयुष्याचे प्रमाण मला सांगावे.||१६|| भावार्थः---आपण यौगैश्वर्यसंपन्न आहां,म्हणून आपल्याला कालरूपी भगवंताची गति माहित आहेच.कारण,आपल्यासारखे ज्ञानी-पुरुष, योगाभ्यासाने सिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टिने सर्व जगास पाहतात.||१७|| | कृतं त्रेता द्वापरं च कलिश्र्चेति चतुर्यगम् | दिव्यैर्द्वादशभिर्वषै: सावधानं निरूपितम् ||१८||
भावार्थः----मैत्रेय म्हणाला-हे विदुरा,युगाच्या आरंभी असणारी संध्या आणि शेवटी असणारा अंश यांसहवर्तमान कृत,त्रेता,द्वापर आणि कली हि चार युगे (चौकडी)देवांच्या बाराहजार वर्षांनी पूर्ण होतात.असे सांगितले आहे||१८|| | चात्वारि त्रीणि द्वे चैकं कृतादिषु यथाक्रमम् | संख्यातानि सहस्त्राणि द्विगुणानि शतानि च ||१९||
भावार्थः---त्या कृतादिक चार युगांचे प्रमाण अनुक्रमाने देवांच्या मानाने चार,तीन,दोन आणि एक अशी सह्स्त्रांच्या दुप्पट शते अशी वर्षे सांगितली आहेत म्हणजे ४८०० वर्षांचे कृतयुग,३६०० वर्षांचे त्रेतायुग,२४०० वर्षांचे द्वापरयुग व १२०० वर्षांचे कलियुग अशी आहेत.||१९|| | संध्यांशयोरन्तरेण य: काल: शतसंख्ययो: | तमेवाहु र्युग तज्ज्ञा यत्र धर्मो विधीयते ||२०||
भावार्थः----शतसंख्यांनी परिमित असलेल्या संध्या व अंश यांच्या मध्ये जो काल चार हजारवगैरे वर्षे,असतो त्यालाच युगवेत्ते पुरुष,”युग” असे म्हणतात.त्या प्रत्येक युगामध्ये निरनिराळा धर्म सांगितला आहे.||२०|| भावार्थः----कृतयुगामध्ये चतुष्पाद संपूर्ण धर्म मनुष्यामध्ये राहत असतो,आणि तोच धर्म,त्रेतादिक,दुसऱ्या युगामध्ये एकेक पादाणे वृद्धिंगत होणाऱ्या अधर्माच्या योगाने कमी कमी होत जातो.||२१|| | त्रिलोक्या युगसाहस्त्रं बहिराब्रम्हणो दिनम् | तावत्येव निशा तात यन्निमीलति विश्र्वसृक् ||२२|| भावार्थः----बा विदुरा,त्रैलोक्याच्या बाहेर असणारे जे ब्रहमलोकापर्यंत लोक,तेथे राहणाऱ्या पुरुषाचा,देवाच्या मानाने हजार युगे झाली म्हणजे एक दिवस होतो.व त्यांची तेवढीच रात्र असते.ज्या रात्रीमध्ये ब्रहमदेव शयन करितो.||२२|| भावार्थः---ती रात्र संपल्यावर पुनः आरंभीलेल्या लोकांचा सृष्टिक्रम,ब्रह्मदेवाचा दिवस संपेपर्यंत चालतो.तोपर्यंत चौदा मनु होतात.||२३|| | स्वं स्वं कालं मनुर्भूङ्क्ते साधिकां ह्येकसप्ततिम् |
| मन्वन्तरेषु मनवस्तद्वंश्या ऋषय: सुरा: |
| भवन्ति चैव युगपत्सुरेशा श्र्चानु ये च तान् ||२४||
भावार्थः----प्रत्येक मनु,आपापल्या अधिकाराचा काळ दिव्यमानाने चार युगाच्या एकाहत्तर आवृत्ती,काही अधिक म्हणजे ७१,६छेद१४ भोगतो.प्रत्येक मन्वंतराचे ठिकाणी मनु,त्याच्या वंशातील राजे,सप्तर्षी,देव,इंद्र,व त्या इंद्राचे अनुयायी जे गांधर्वादिक ते एकदम अधिकारी होतात.||२४|| भावार्थः---हा त्रैलोक्याला वागविणारा ब्रहमदेवाच्या प्रत्येक दिवसात होणारा सृष्टीचा क्रम होय.ज्यामध्ये कामाच्या योगेकरून पशु,पक्षी,मनुष्य,पितर,व देव यांची उत्पत्ती होते.||२५|| भावार्थः---सर्व मन्वंतराध्ये भगवान सत्वगुणाचा स्वीकार करून आपल्या अंशरुपी मन्वादिकांच्या स्वरूपाने पराक्रम प्रगत करीत होत्साता या जगाचे रक्षण करितो.||२६|| भावार्थः----आणि तमोगुणाच्या अंशाचा स्वीकार करून आपला सृष्टी करण्याचा व्यापार बंद करणारा आणि काळाच्या योगाने ज्याच्या ठिकाणी तैलोक्याचा अनुप्रवेश झाला असा तो ब्रहमदेव,दिवसाच्या शेवटी(सायंकाळी)स्वस्थपणे शयन करितो.||२७|| भावार्थः---म्हणजे जेथे चंद्र नाही व सूर्य नाही अशी ब्रहमदेवाची रात्र सुरु होताच तत्काळ,भू: भूव: स्वत: हे तिन्ही लोक अंतर्धान पावतात.||२८|| भावार्थः---ते असे कि,त्या वेळी शेषाच्या मुखांतील अग्निरूप भगवंताच्या शक्तीने त्रैलोक्याचा दाह होऊ लागला असता,त्या अग्नीचा योगाने पिडीत झालेल्या भृग्वादिक ऋषी,आपला महर्लोक सोडून जनलोकी जातात.||२९|| भावार्थः----इतक्यात कल्पांतरूप कालाच्या योगाने वृद्धिंगत झालेले समुद्र,अतिशय क्षोभ पावलेल्या प्रचंड वायूंनी ज्यांच्या लता कंपित झाल्या आहेत असे होवून तत्काळ त्रैलोक्याला बुडवून टाकितात.||३०|| भावार्थः---त्या पाण्यामध्ये तो शेषशाही हरि,आलयो येषां महर्लोकगतानामन्येषां च तै:||३१|| भावार्थः---जनलोकनिवाशी ऋषींनी स्तूयमान होत योगनिद्रेने डोळे मिटून राहत असतो.||३१|| | एवं विधैरहोरात्रै: कालगत्योपलक्षितै: | अपक्षितमिवास्यापि परमायुर्वय: शतम् ||३२||
भावार्थः----या प्रकारच्या कालबगीने उपलक्षित झालेल्या अहोरात्रांनी,सर्व प्राणीमात्रांच्या आयुष्यापेक्षा अधिक असे या ब्रहमदेवाचे शंभर वर्षे असलेले आयुष्यही संपत असल्यासारखेच झाले आहे.||३२|| भावार्थः---कारण,त्या ब्रहमदेवाच्या आयुष्याचा जो अर्धा भाग(पन्नास वर्षे)त्याला “परार्ध” असे म्हणतात.ते दोन परार्ध आहेत.त्यापैकी पहिला परार्ध संपून गेला.सध्या दुसरा परार्ध चालू आहे.||३३|| | पूर्वस्यादौ परार्धस्य ब्राम्हो नाम महानभूत् | कल्पो यत्राभवद्ब्रम्हा शब्दब्राम्हेति यं विदु: ||३४||
भावार्थः---पहिल्या परार्धाच्या आरंभी ब्रहमनामक एक मोठा कल्प(ब्रहमदेवाचा दिवस)होवून गेला.त्यामध्ये,ज्याला “शब्दब्रहम” असे म्हणतात तो ब्रहमदेव उत्पन्न झाला.||३४|| भावार्थः----त्याच पहिल्या परार्धाच्या शेवटी,ज्याला “पाद्य” असे म्हणतात तो कल्प झाला होता.त्या कल्पामध्ये हरीच्या नाभिरूप सरोवरापासून त्रिभुवनात्मक कमल उत्पन्न झाले.||३५|| | अयं तु कथितः कल्पो द्वितीयस्यापि भारत | वाराह इति विख्यातो यत्रासीत्सूकरो हरिः ||३६|| भावार्थः---हे विदुरा वाराह या नावाने प्रसिध्द असलेला कल्प,तर दुसऱ्या परार्धाच्या आरंभी झाला असे सांगितले आहे.या कल्पामध्ये विष्णूने वाराह अवतार धारण केला होता.||३६|| भावार्थ:---हा द्विपरार्धनामक काल,मायारूप उपाधीने रहित अशा अनादि अनंत जगत्म्याच्या केवळ एका निमिषासारखा मनिला आहे.||३७|| | कालोsयं परमाण्वादिर्द्विपरार्धान्त ईश्वर: | नैवेशितुं प्रभुर्भूम्न ईश्वरो धाममानिनाम् ||३८|| भावार्थः---ज्याचा आद्द अंश परमाणु आहे व शेवटच्या अंश परार्धे आहेत असा हा काळ,देह गृह इत्यादिकांचे अभिमान बाळगणाऱ्या पुरुषांचामात्र नाश करण्याविषयी समर्थ आहे.हा सर्वव्यापक परमेश्वराचे नियमन करण्याविषयी मुळीच समर्थ होत नाही.||३८||
| विकारै: सहितो युक्तै र्विशेषादिभिरावृत: | आण्डकोशो बहिरयं पञ्चाशत्कोटिविस्तृत: ||३९||
भावार्थः---हे विदुरा,पृकृती,महत्तत्व,अहंकार व शब्दस्पर्शादिक---शब्द,स्पर्श,रूप,रस,व गंध पांच सुक्ष्मभूते—आकाश,वायू,तेज,आप,आणि पृथ्वी या तन्मात्रांनी उत्पन्न झालेला,अकरा इंद्रिये—पंच-ज्ञानेद्रीये,पंचकर्मेद्रिये व मन पंचमहाभूते अशा सोळा विकारांनी युक्त आणि आंत पन्नास कोटी योजने विस्तृत असून,बाहेरून एकापेक्षा एक दसपट अधिक पृथीव्यादिक सात अवरनानी अरीवेष्ठीत असा हा ब्रह्मांडकोश ज्यामध्ये प्रविष्ठ झाला असता,परमानुसारखा दिसतो इतकेच नव्हे तर दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांडाच्या राशीच्याराशी ज्यामध्ये आहेत.||३९-४०|| | तदाहुरक्षरं ब्रम्ह सर्वकारणकारणम् | विष्णोर्धाम परं साक्षात्पुरुषस्य महात्मनः ||४१|| भावार्थः---आणि जे प्रधानादी सर्व कारणाचेही कारण आहे,त्यालाच साक्षात महात्म्या सर्वव्यापी विष्णूचे अक्षरब्रहमरुपी परमस्वरूप असे म्हणतात.||४१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा आकारावा(११)अध्याय एकेचाळीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || श्रीसदगुरूर्पणमस्तू ||
___________________________________________________________________________________________ १२--- आंता या बाराव्या(१२)अध्यायांत,ब्रह्मदेवाने मनापासून सनत्कुमारादिकांस उत्पन्न केले,परंतु त्यांपासून पुढे सृष्टीची वृद्धि होईना म्हणून,त्यांने आपल्या देहाच्या वामभागांपासून कालनामक महिमा सांगितला.आतां ब्रह्मदेवाने प्रजा ज्या रीतीने उत्पन्न केल्या ते तू माझ्यापासून श्रावण कर. | १२---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---[सृष्टीचा विस्तार] __________________________________________________________________________________________ |मैत्रेय उवाच:---
| इति ते वर्णितः क्षत्तः कालाख्यः परमात्मनः | महिमा वेदगर्भोsथ यथास्त्राक्षिन्निबोध मे ||१|| भावार्थ:---सृष्टीचा उपक्रम करणाऱ्या ब्रहमदेवाने,प्रथम तम(स्वतांच्या स्वरूपाचे अज्ञान),मोह(देह,इंद्रिये ह्यांवरच मी,अशी बुद्धी)महामोह (भोगांची इच्छा)तामिस्त्र(भोगांच्या इछेचा भंग झाला असता क्रोध)आणि अंधतामिस्त्र (भोगांचा सर्वथा भंग झाला असता स्वतांच मरण पावलो असे मानणे)याप्रकारच्या पांच अज्ञानवृत्ती उत्पन्न केल्या.आपण—जीवानी पांच प्रकारच्या अज्ञान-वृत्तीचा विवेकपुर्वक त्याग करावा.आपण यांचा त्याग न केला तर आपणास यमपुरी व चौऱ्याऐंसी लाख योनीस जाऊन द:खे भोगावी लागतात.म्हणून आपण—जीवानी यांचा सत्संग करून विवेकपुर्वक त्याग करावा.||१-२||
| सनकं च सनन्दं च सनातनमथात्म्भू: | सनत्कुमारं च मुनीन्निष्क्रियानूर्ध्वरेतस: ||४|| भावार्थ:---परंतु हि पापरूपी सृष्टी पाहून त्याच्या मनाला समाधान वाटले नाही म्हणून,नंतर त्या ब्रहमदेवाने भगवंताच्या ध्यानाने पवित्र झालेल्या आपल्या मनाच्या योगाने दुसरे सनक,सनंद,सनातन आणि सनत्कुमार असे चार,कर्मरहित नैष्ठिक ब्रहमचारी (आमरणात ब्रहमचर्य व्रत धारण करणारे)मुनी उत्पन्न केले.||३-४||
भावर्थ:---आणि ब्रहमदेवाने त्या पुत्रास,हे पुत्रहो तुझी प्रजा उत्पन्न करा,असे सांगितले.परंतु मोक्षधर्माचे आचरण करण्याविषयी तत्पर असून वासुदेवपारायण अशा त्या पुत्रांनी ते ब्रहमदेवाने सांगणे ऐकण्याची इच्छाच केली नाही.||५||
भावर्थ:---याप्रमाणे आज्ञेचा अंगीकार न करणाऱ्या पुत्रांनी अवज्ञा केलेला तो ब्रहमदेव,अवज्ञेमुळे प्राप्त झालेल्या क्रोधाला आवरून धरण्याविषयी प्रयत्न करूं लागला.आपणही—जीवानी क्रोध आल्यास त्या क्रोधास विवेकाद्वारे आवरण्याचा प्रयत्न करावा.||६|| भावार्थ:---परंतु बुद्धीने आटोपून धरिलेलाही तो क्रोध,ब्रहमदेवाच्या भृकुटीच्या मध्यभागापासून तत्काल,काळा आणि तांबडा वर्ण धारण करणाऱ्या पुत्राच्या रूपाने उत्पन्न झाला.||७|| भावर्थ:---देवांच्याही पूर्वी उत्पन्न झालेला तो पुत्ररुपी भगवान रुद्र,रोदन करूं लागला आणि तूं का रुदन का करीतोस,असे ब्रह्मदेवाने विचारिले असता म्हणाला की,हे बाबा जगद्गुरू,तू मला नावे ठेव आणि मला राहण्यास स्थान करून दे.||८|| असे त्याचे भाषण ऐकून ते पुरे करण्याकरितां,त्या षड्गुनैश्वर्यसंपन्न ब्रहमदेवाने मधुरवाणीने असे भाषण केले की,हे वत्सा,तूं रडूं नकोस.तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करितो.||९|| भावर्थ:--हे सूरश्रेष्ठा,ज्याअर्थी तू खिन्न असलेल्या मुलाप्रमाणे रोदन केलेस त्या अर्थी तुला सर्व प्रजा रुद्र या नावाने हाक मारतील.|१०|| भावार्थ:---ह्रदय,इंद्रिये,प्राण,आकाश,वायू,अग्नि,जल,पृथ्वी,सूर्य,चंद्र आणि तपश्चर्या हि तुला रहावयाची स्थाने,तूं विचारावयाच्या पूर्वीच मी तयार करून ठेविली आहेत.||११|| भावर्थ:---तशीच मन्यु, मनु,महिनस,महान्,शिव,क्रतुध्वज,उग्रसेता,भव,काल,वामदेव आणि धृतव्रत हि तुझी अकरा नांवे होत.||१२|| भावार्थ:---हे रुद्रा,धी,वृत्ति,उशाना,उमा,नियुत्सर्पि,इला,अंबिका इरावती,मुधा,दीक्षा आणि रुद्राणी ह्या अकरा तुझ्या स्त्रिया होत.||१३|| भावार्थ:---हे रुद्रा,हि नांवे आणि स्थाने ग्रहण कर.कारण तूं,प्रजांच्या अधिपती आहेस.याकरितां तूं आतां स्त्रियासहवर्तमान या नावांची व स्थानांची युक्त होऊन पुष्कळ प्रजा उत्पन्न कर.||१४|| भावार्थ:---याप्रमाणे ब्रहमदेवाने आज्ञा केलेल्या त्या भगवान्- नीललोहित रुद्राने,आपले बळ,काळा,तांबडा वर्ण आणि तापट व उग्र स्वभाव यांच्या योगाने आपल्यासारख्या पुष्कळ प्रजा उत्पन्न केल्या.||१५|| भावार्थ:---नंतर,त्या रुद्राने,रुद्रांचे बरेच समुदाय उत्पन्न केले.ते चोहोंकडून जगाला ग्रांसू लागले असे पाहून,ब्रहमदेव मनात शंकित झाला आणि म्हणाला की,-----||१६|| भावार्थ:---हे सुरश्रेष्ठा,आपल्या भयंकर नेत्रांनी माझ्यासहवर्तमान दशदिशा जाळूं इच्छिणाऱ्या अशा प्रजा तूं उत्पन्न केल्यास तेवढ्या पुरेत.||१७|| | तप आतिष्ठ भद्रं ते सर्वभूतसुखावहम् | तपसैव यथापूर्वं स्त्रष्टा विश्वमीदं भवान् ||१८||
भावार्त:---हे रुद्रा,आतां तूं सर्व प्राणिमात्रांना सुखकारक असे तप आचरण कर.तुझे कल्याण होवो.तूं तपाच्या योगाने पूर्वीप्रमाणे हे जग पुनः उत्पन्न करशील.||१८|| भावार्थ:---कारण हा पुरुष,तपाच्या योगेकरूनच सर्व प्राणिमात्रांच्या ह्रदयामध्ये वास करणाऱ्या परमतेजोरूपी अधोक्षज भगवंताला अनायासाने पावतो.आपण—जीवानी निष्काम व अहंकाररहित तप करावे,कारण त्यामुळे परमात्यास एकरूप होऊन मोक्ष मिळतो.||१९|| भावार्थ:---मैत्रय म्हणाला----हे विदुरा,ब्रहमदेवाने अशी आज्ञा केली असतां त्या रुद्राने,ठीक आहे असे म्हणून वेदवाणीचा पति अशा त्या ब्रहमदेवाला प्रदक्षिणा करून व त्याचा निरोप घेऊन त्याने,तप करण्यासाठी वनामध्ये प्रवेश केला.आपणही—जीवानी वनात—एकांतात तप करावे.||२०||
| अथाभिध्यायत: सर्गं दश पुत्रा: प्रजज्ञीरे | भगवच्छक्तीयुक्तस्य लोकसन्तानहेतव: ||२१||
भावार्थ:---इकडे सृष्टिसंबंधी विचार करणाऱ्या व भगवंताच्या शक्तीने युक्त अशा त्या ब्रहमदेवाला लोकांची संतती काढण्यास कारणीभूत असे दहा पुत्र उत्पन्न झाले.||२१|| भावर्थ:---ते मरीची,अत्रि,अंगिरा,पूलह,क्रतु,भृगु,वष्ठी,दक्ष आणि त्यांतील दहावा नारद होय.||२२|| भावर्थ:---त्यांमध्ये ब्रहमदेवाच्या मांडीपासून दक्ष झाला,प्राणापासून वसिष्ठ झाला,त्वचेपासून भृगु झाला,हस्तापासून क्रतु झाला,||२३|| भावार्थ:---नाभीपासून पूलह झाला,दोन्ही कर्णापासून पुलस्त्य ऋषि झाला,मुखापासून अंगिरा झाला,नेत्रांपासून अत्रि झाला आणि त्या धर्मापासून मरीची झाला.||२४|| भावर्थ:---पुनः ब्रहमदेव सृष्टि उत्पन्न करणाचा विचार करूं लागला तेव्हां,त्याच्या दक्षिण स्तनापासून धर्म उत्पन्न झाला आणि त्या धर्मापासून स्वतः नारायण उत्पन्न झाला.तसाच ब्रहमदेवाच्या पृष्ठभागापासून अधर्म उत्पन्न झाला आणि त्यापासून लोकांना भय उत्पन्न करणारा मृत्यू उत्पन्न झाला.||२५|| भावार्थ:---पुढे ब्रहमदेवाच्या ह्रद्यापासून काम,भृकुटीपासून क्रोध,अधरोष्ठापासून लोभ,मुखापासून वाणी,शिष्नापासून सप्त समुद्र,आणि गुदस्थानापासून पापप्रवर्तक राक्षस हे उत्पन्न झाले.||२६|| | छायया: कर्दमो जज्ञे देवहूत्या: पति: प्रभु: | मनसे देहतश्र्चेदं जज्ञे विश्वकृतो जगत् ||२७||
भावार्थः----आणि छायेपासून देवहुतीचा पति जो समर्थ कर्दम ऋषि तो उत्पन्न झाला,याप्रमाणे ब्रहमदेवाच्या मनापासून व देहापासून हे सर्व जग उत्पन्न झाले.||२७|| | वाचं दुहितरं तन्वीं स्वयम्भूर्हरतीं मन: | अकामां चमके क्षत्त: सकाम इति न: श्रुतम् ||२८||
भावार्थ:---आतां ब्रह्मदेवाने दुसरा देह धारण करून केलेली सृष्टि सांगण्याकरिता त्याला त्या देहाचा त्याग करण्याचे कारण सांगतात--- हे विदुरा,ब्रह्मदेवास वाणीनामे एक कन्या होती,ती आपल्या परम सौंदर्याने पित्याचे मन हरण करण्यासारखी अति कोमलांगी होती.ती सकामचित्त नसतां ब्रह्मदेव,कामाबुद्धीने तिचा विचार करू लागला असे आम्ही ऐकिले आहे.ब्रह्मदेवास हा निष्काम असतांना आपल्याच मुलीविषयी कामभोगाची निंद्द असी वासना निर्माण झाली.म्हणून आपण—जीवानी ब्रह्मदेवाच्या उदाहरणावरून स्त्रीपासून दूर राहण्याचा आवश्य प्रयत्न करावा.संत एकनाथ महाराज म्हणतात की,चित्रातील स्त्रीपासून आपण सावध राहावे,कारण त्या चित्रातील स्त्रीपासून काम उत्पन्न होतो,तर व्यवाहारातील—हाडामासांच्या स्त्रीपासून काय वाईट परिणाम होईल याची फक्त कल्पनाच केलेली बरी ! तसेच हाडामांसाच्या स्त्रीने हाडामासांच्या पुरुष्यापासून पुरुष्यापेक्षाही अति सावध राहणे जरुरी आहे,कारण शात्र सांगते की,पुरुष्यापेक्षाही स्त्रीत काम हा निसर्गात: चौपट असतो.असे असले तरी समाजाचे स्त्रीवर अधिक बंधन असते,म्हणून तिचे कामावर आपणहूनच बंधन पडत असते.म्हणून ती सहजच कामावर नियंत्रण करू शकते.असे असले तरी वर्तमान काळात स्त्रीवरील समाजाचे बंधन शिथिल होत चाललेले असे दिसून येत आहे,हे मात्र मुळीच योग्य होत नसून अयोग्य होत आहे.निंद्द कामाचे बंधन स्त्री व पुरुष दोघावरही असावे.स्त्रींवर बंधन करणे व पुरुष्यांवर बंधन न करणे हि विषमता अविवेकपूर्वक आहे—अन्यायकारक आहे.म्हणून स्त्री आणि पुरुष्यावर या दोघावरही बंधन विवेकपुर्वक करणे समानता—न्यायकारक आहे.||२८|| भावार्थ:---तेव्हा अधर्माचे ठिकाणी बुद्धी धारण करणाऱ्या त्या आपल्या पित्यास अवलोकन करून त्याचेच पुत्र जे मरीची आदिक पूर्वी सांगितलेले ऋषि त्यांनी,त्याला नम्रपणाने निषेधरूप बोध केला.श्रेष्ठांचा आचार—विचार योग्य नसेल तर कनिष्ट यांनी त्यांना नम्रपणाने बोध करावा व कनिष्टांचा आचार—विचार योग्य नसेल तर श्रेष्ठ यांनी कनिष्टांना बोध करावा.असे शात्रसुद्धा प्रतिपादन करते असे दिसून येते.||२९|| भावार्थ:---तो असा की,हे ताता,जो धर्ममर्यादाचे रक्षण करणारा तूं,आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या कामास आवरून न धरितां,आपल्या कन्येशी गमन करण्याची इच्छा करीत आहेस हे काय ! तुझ्या पूर्वी होऊन गेलेल्या ब्रह्मादिकांनी हे कृत्य केलेले नाही व तुझ्यानंतर होणारेही दुसरे कोणी करणार नाहीत.म्हणू आपण—जीवानी असे कोनतेही अति निंद्द कर्मे मुळीच करू नये.आपल्या मनातही येऊ नये.||३०|| भावार्थ:---हे जगद्गुरू,हे कृत्य तुमच्यासारख्या तेजस्वी पुरुषांनाहि कीर्तीकारक होणार नाही कारण,तेजस्वी पुरुषांचे वर्तन पाहून तसे आचरण करणारा हा लोक,कल्याणाकारणे योग्य होतो.श्रेष्ठांच्या आचार—विचारांचे कनिष्ट अनुकरण करीत असतात,म्हणून श्रेष्ठांनी विवेकपुर्वक आचार व विचार करावा.स्वधर्मांचेच विवेकपुर्वक आचरण करावे,तर निंद्द कर्मांचे आचरण मुळीच करू नये.||३१|| भावार्थ:---ज्या परमेश्वराने आपल्या स्वरूपी असलेले हे जग,स्वतःच्या तेजाने प्रकट केले त्या भगवंताला नमस्कार असो.तोच भगवान ह्या ब्रहमदेवाला अधर्मापासून निवृत्त करून धर्माचे रक्षण करण्यास योग्य आहे.आपणाकडून—जिवाकडून यदाकदाचित निंद्द कर्मांचे आचरण घडले तर आपण भगवंत यास शरण जाऊन क्षमा मागावयास पाहिजे.||३२|| भावार्थ:---याप्रमाणे आपल्या समोर भाषण करणाऱ्या आपल्या मरीच्यादी ऋषिरूप पुत्रांस अवलोकन करून तो प्रजापतीचा पति ब्रहमदेव,कुकर्माकडे आपली प्रवृत्ति झाली म्हणून लज्जित होऊन त्याचवेळी त्याने आपल्या देहाचा त्याग केला.ब्रहमदेवाने टाकलेल्या त्या निंदास्पद शरीराचा दिशांनी स्वीकार केला.त्या शरीराला लोकांमध्ये “धुके” असे म्हणतात.||३३|| भावार्थ:---एकेसमयी सृष्टिकर्ता ब्रहमदेव,मी जसे पूर्वीच्या कल्पामध्ये लोक उत्पन्न केले होते तसे संगतवार लोक आतां मला कसे करितां येतील असा विचार असतां.त्याच्या चारही मुखांतून वेद उत्पन्न झाले.||३४|| भावार्त:---तसेच उपवेद व न्याय यांच्यासहवर्तमान,होता,अध्वर्यू,उद्राता व ब्रम्हा या चार ऋत्विजांनी कर्मे,यज्ञयागादि अनुष्ठाने,धर्माचे चार पाद,व ब्रम्हचर्यादिक आश्रम व त्यांचा वर्तनक्रम हे सर्व त्याच्याच मुखांपासून उत्पन्न झाले.||३५|| भावार्थ:---विदुर म्हणाला----हे तपोधना मैत्रेय ऋषे,विश्वस्त्रष्ट्यांचा अशा त्या ब्रहमदेवाने आपल्या मुखापासून वेदादिक उत्पन्न केले परंतु त्याने आपल्या ज्या त्या मुखातून जे जे उत्पन्न केले असेल ते मला सांग.||३६|| भावार्थ:---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,त्या ब्रमहमदेवाने,आपल्या पुर्वादिक चार मुखांपासून ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद हे अनुक्रमाने उत्पन्न केले आणि त्याच क्रमाने,शस्त्र(होत्याचे कर्म)इज्या (अध्वर्युचे कर्म)स्तुतिस्तोम (उद्रात्याचे कर्म)आणि प्रायश्चित (ब्रह्माचे कर्म)हि चार उत्पन्न केली.||३७|| भावार्थ:---तसेच-आयुर्वेद (वैद्यशास्त्र),धनुर्वेद (शस्त्रविद्या),गांधर्ववेद (गायनविद्या)व स्थापत्यवेद(कलाकौशल्यज्ञान)हे चार उपवेद त्याने आपल्या पूर्वादि मुखापासून अनुक्रमाने उत्पन्न केले.||३८||
| इतिहासपु राणांनि पंञ्चमं वेदमीश्वर: | सर्वेभ्य एव वक्त्रेभ्य: ससृजे सर्वदर्शन: ||३९||
भावार्थ:---तशीच त्या सर्वदर्शी ब्रहमदेवाने आपल्या सर्वही मुखापासून पंचमवेदरुपी इतिहास पुराने उत्पन्न केली.||३९|| भावार्थ:---त्याने आपल्या पूर्वमुखापासून षोडशी आणि उक्थ हे दोन याग उत्पन्न केले,दक्षिण मुखापासून चयन व अग्निष्टोम,पश्चिम-- मुखापासून आत्पार्याम,आणि उत्तरमुखापासून गोसव आणि वाजपेय असे दोन याग उत्पन्न केले.||४०|| | विद्दा दानं तप: सत्यं धर्मस्येति पदानि च | आश्रमांश्र्च यथासांख्यमसृजत्सह वृत्तिभी: ||४१||
भावार्थ:---तसेच—शौच,दया तप आणि सत्य हे धर्माचे चार चरण आणि वृत्तीसहवर्तमान ब्रह्मचर्यादिक चार आश्रम हे त्याने आपल्या पुर्वादिक चार-मुखांपासून अनुक्रमाने उत्पन्न केले.||४१|| भावार्थ:---आतां ब्रह्मचर्यादिक आश्रमांचे ठिकाणी पुढचा पुढचा श्रेष्ठ असे प्रत्येकाचे चार चार प्रकार सांगतात---त्यांमध्ये ब्रहमचारी आश्रमामध्ये सावित्र (उपनयन झाल्यापासून गायत्रीच्या अध्ययणासाठी तीन दिवसपर्यंत धारण करावयाचे)प्रजापत्य(एक वर्षपर्यंत धारण करावयाचे),बाह्य (वेदाध्ययन संपेपर्यंत धारण करावयाचे)आणि बृहत् (मरणकालापर्यंत धारण करावयाचे),असे चारप्रकारचे ब्रहमचर्य व्रत आहे,गृहस्थाश्रमामध्ये वार्तां (अनिषिद्ध कृषिकर्मादिक वृत्तीने उपजीवन करणे)संचय (यजमानाकडून यज्ञादि कर्मे करवून जे द्रव्य मिळेल त्यावर जीवन करणे),शालीन(न मागतां मिळेल त्यावर निर्वाह करणे),आणि शिलोंछ (शेतांत पडलेले धान्याचे कण आणून त्यांवर उपजीवन करणे)असे चार वृत्तिभेद आहेत||४२|| भावार्थ:---वानप्रस्थ आश्रमामध्ये वैखानस(खणल्यानांगरल्यावाचून उत्पन्न झालेल्या पदार्थावर निर्वाह करणे)वालखिल्य (नवे अन्न मिळाले कि,पूर्वीचे संग्रही असलेले टाकून देणे),औदुंबर (सकाळी उठल्याबरोबर ज्या दिशेला दृष्टि जाईल तिकडून फळेवगैरे आणून निर्वाह करणे),आणि फेनप(आपोआप गळलेली फळेवगैरे खाणे)असे चार प्रकार आहेत.आणि संन्यास आश्रमामध्ये,कुटीचक (आपल्या आश्रमाला सांगितलेली कर्मे मुख्यत्व आचरण करणारा),बर्होद (जी कर्मे केली नसता प्रत्यवाय लागतो तेवढीमात्र करून ज्ञानाभ्यास करणारा),हंस (कर्म मुळीच न करता केवळ ज्ञानाभ्यास करणारा आणि निष्क्रिय (ज्याला ज्ञान झाले तो)असे चार प्रकार झाले.हे सर्व प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ होत.||४३||
भावार्थ:---आन्वीक्षिकी(मोक्षप्राप्ती करून देणारी आत्मविद्या),त्रयी (स्वर्गादी फल कर्मविद्या),वार्ता (निर्वाहाचे साधन शेतकरी वगैरे),आणि दंडनीती (द्रव्याची प्राप्ती करून देणारी राजनीती),ह्या चार वार्ता व भू: स्व:आणि भूभुर्व:स्व: ह्या चार व्याऱ्ह्ती,ब्रहमदेवाच्या पूर्वादी मुखापासून अनुक्रमे उत्पन्न झाल्या आणि प्रणव त्याच्या हृदयाकाशापासून झाला.||४४|| भावार्थ:---त्या समर्थ ब्रहमदेवाच्या लोमांपासून उष्णिक्- छंद,त्वचेपासून गायत्री,मांसापासून त्रिष्टुप,स्नायूंपासून अनुष्टप,अस्थिपासून जगती हे छंद उत्पन्न झाले.||४५|| भावार्थ:---मज्जेपासून पंक्तिछंद उत्पन्न झाला,प्राणापासून बृहतीछंद उत्पन्न झाला.त्याच्या जीवापासून-क पासून म-पर्यंत २५ वर्ण उत्पन्न झाले.त्याच्या देहापासून स्वर उत्पन्न झाले.||४६|| भावार्थ:---त्याच्या इंद्रीयापासून श,ष,स,ह हे चार वर्ण उत्पन्न झाले असे म्हणतात,त्याच्या बलापासून य,र,ल,व हे चार वर्ण उत्पन्न झाले.आणि क्रीडेपासून,निषाद,ऋषभ,गांधार,षड्ज,मध्यम,धैवत,आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले.||४७|| भावार्थ:---हे विदुरा,व्यक्त आणि अव्यक्त अशी ज्याची दोन स्वरूपे आहेत त्या शब्दब्रहमरूपी ब्रह्मदेवाला,ऐश्वर्यादिक अनेक शक्तींनी युक्त असलेला परमेश्वर,सगुण व निर्गुण स्वरुपांनी निरंतर प्रत्यक्ष भासतो.||४८|| भावार्थ:---हे करुकुलोत्पन्ना विदुरा,नंतर त्या ब्रहमदेवाने दुसऱ्या तनूचा स्वीकार करून सृष्टी करण्याचा विचार मनात आणिला.म्हणजे सृष्टी करण्याविषयी समर्थ अशाही मरीच्यादिक ऋषीचा सर्ग विस्तुत झाला नाही असे जाणून तो ब्रहमदेव सृष्टीची वृद्धि होण्याविषयी पुनः हृदयामध्ये चिंतन करू लागला की,------------||४९|| भावार्थ:---आहे काय सांगावे,!मी सर्वदा प्रजावृद्धीच्या कामात गढून गेलो असताही प्रजा वृद्धिगत होत नाहीत ते आश्चर्य आहे !ह्यामध्ये दैवच बिघाड करीत आहे.”आपण योग्य रीतीने प्रयत्न करून अपयश येत असेल,तर त्यास ‘दैव’ असे म्हणतात.” ||५०|| भावार्थ:---अशा प्रकारे ब्रहमदेव,यथायोग्य काम करीत असता व दैवावर विश्वास ठेवीत असतात,त्या ब्रहमदेवाच्या शरीराचे त्या वेळी एकाएकी दोन विभाग झाले.त्याला अध्यापि लोक,ब्रहमदेवाचे शरीर,दुभांगले ह्या आश्चर्यांमुळे हे काय असे म्हणतात.||५१|| | कस्य रुपमभूद् द्वेधा यत्कायमभिचक्षते | ताभ्यां रूपविभाग्यां मिथुनं समपद्दत ||५२||
भावार्थ:---त्या स्वरूपाच्या दोन भागापासून एक मिथुन(जोडपे)उत्पन्न झाले.||५२|| | यस्तु तत्र पुमान्सोऽभून्मनु: स्वायंभुव: स्वराट् || स्त्री या ऽऽसिच्छतरुपाख्या महिष्यस्य महात्मन: ||५३|| *****************************************************************************************************भावार्थ:----त्यामध्ये जो पुरुष होतो तो स्वायंभूवनामक सर्वोभोम “मनु” झाला आणि जी स्त्री होती ती महात्म्या मनुची “शतरूपा” नामक पट्टराणी झाली.||५३|| ***************************************************************************************************** | तदा मिथुनधर्मेण प्रजा ह्येधाम्बभूविरे | स चापि शतरूपायां पञ्चापत्यान्यजीजनत् ||५४||
भावार्थ:---तेव्हापासून मैथुन—स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक संबंध धर्माच्या योगाने प्रजा वृद्धिगत होत चालल्या.हे साधुश्रेष्ठा विदुर,त्या स्वायंभू मनुला शतरुपाच्या ठिकाणी,प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन आणि आकूती देवहुती व प्रसूती ह्या तीन कन्या मिळून पाच मुले झाली.||५४-५५|| | आकूतिं रुये प्रादात्कर्दमाय तु मध्यमाम् | दक्षायादात्मप्रसूतिं च यत आपूरितं जगत् ||५६||
भावार्थ:---नंतर त्याने आपली आकूतीनामक पहिली मुलगी,रुचिनामक ऋषीला दिली.मधली देवहुती कर्दम ऋषीला व प्रसूती दक्षाला दिली. ह्या तीन मुलांच्या संततीने हे—वर्तमान काळातील जग भरून गेले आहे.||५६|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा बारावा(१२)अध्याय छपन्न(५६) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ |१३--- त्या स्वयंभू मनूला सृष्टि करण्याची इच्छा झाली असता,अकस्मात प्रलयोदकामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्याविषयी वराहावतार घेऊन हिरण्याक्ष दैत्याचा वध केला हि कथा तेराव्या(१३) अध्यायांत वर्णिली आहे. | १3---भगवंतांचा वराह अवतार---[वराह अवताराची कथा] |श्रीशु उवाच:---
| निशम्य वाचं वदतो मुने: पुण्यतमां नृप | भूय: प्रपच्छ कौरव्यो वासुदेव कथादृत: ||१|| भावार्थ:----श्रीशुकाचार्य म्हणाला---हे राजन,याप्रमाणे भाषण करणाऱ्या मैत्रेय ऋषीची पुण्याकारक वाणी श्रवण करून,वासुदेवाच्या कथेच्या ठिकाणी आदरयुक्त अशा त्या विदुराने पुनः प्रश्न केला.||१|| भावार्थ:----विदुर म्हणाला---हे मैत्रेय ऋषे ब्रहमदेवाचा प्रिय पुत्र जो सार्वभौम स्वायंभू मनू त्याने,प्रियपत्नी प्राप्त झाल्यानंतर काय केले?||२|| भावार्थ:----हे साधुश्रेष्ठा,त्या आदिराज राजर्षीचे चरित्र श्रद्धेने श्रवण करणाऱ्या मला सांगावे.कारण तो हरीच्याच आश्रयाने वर्तत होता. आपण—जीव हरीच्या आश्रयाने वर्तत आहोत,पण आपल्या—जीवाच्या ठींनी अज्ञान नावाचा दोष असल्यामुळे असे काळात नाही.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून कळून घेणे आपले—जीवाचे आद्द कर्तव्य आहे.||३|| भावार्थ:----ज्या भगवतभक्ताच्या अंत:करणामध्ये मोक्ष देणाऱ्या ईश्वराचे चरणकमल नेहमी प्रगट असते त्या भक्ताचे गुणानुवाद ऐकणे हेच पुरुषांनी फार दिवस श्रम करून संपादन केलेल्या शास्त्रध्यायनाचे मुख्य फळ होय,असे विद्वद्ज्जनानी वर्णन केले आहे.म्हणून आपण ईश्वराचे व निष्काम भक्तांचे चरित्र नेहमी श्रावण करावे,कारण त्यापासून बोध उत्पन्न होऊन आपल्या—जीवाच्या आचारात बदल होत असतो.||४|| भावार्थ:---शुकाचार्य म्हणाला---हे राजन ज्याच्या मांडीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपले पाय पसरून बसत असे,त्या अतिनम्र विदुराने याप्रमाणे प्रश्न करून भागवतकथेच्याठीकानी पृवृत्ती केलेला मैत्रेय ऋषी,अतिहार्षाने रोमांचित तनु होऊन भाषण करू लागला.||५|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,जेव्हां आपल्या भार्येसहवर्तमान स्वायंभुव मनु उत्पन्न झाला तेव्हा त्याने हात जोडून व नम्र होऊन ब्रहमदेवाजवळ भाषण केले की,-------------||६|| | त्वमेक: सर्वभूतानां जन्मकृद् वृत्तिद: पिता | अथापि न: प्रजानां ते शुश्रुषा केन वा भवेत् ||७||
भावार्थ:---- हे भगवन्,तूंच एक,ह्या सर्व प्राणिमात्रांचा उत्पन्न करणारा व पोषण करणारा पिता आहेस तथापि आम्हां प्रजाकडून तुझी शुश्रुषा,कोणते काम केले असतां होईल.सर्व जीवांचा माता—पिता भगवंत आहे म्हणून आपण—जीवांनी भगवंतांची सेवा करावी व जीव हेही भगवंतांचीच रूपे आहेत असे समजून सर्व जीवांची आपण—जीवानी सेवा करावी.जीवांचे दु:ख कमी किंवा नाहीसे करून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा.आपण—जीवानी भगवंत हाच आपला—जीवाचा वास्तविक स्वरूप आहे असे समजून त्याच्याशी एकरूप व्हावे.त्यामुळे आपण तो जसा सुखरूप आहे,त्याप्रमाणे आपणही—जीवाही सुखूप होऊतच,यांत मुळीच शंका नाही.||७|| भावार्थ:----आणि आमच्याकडून होण्यासारख्या कर्मांमध्ये जे केले असतां आमची या लोकी सर्वत्र कीर्ती होऊन परलोकीहि आम्हांस उत्तम गति प्राप्त होईल,ते करण्याविषयी मला आज्ञा कर.हे स्तुतियोग्या,तुला नमस्कार असो.आपणांस परलोकी उत्तम गती प्राप्त होण्यासाठी आपण—जीवानी आपापल्या स्वधार्मांचे निष्काम भावानेने पालन करावे.||८|| |ब्रम्होवाच:---
| प्रीतस्तुभ्यमहं तात स्वस्ति स्तादवां क्षितीश्र्वर | यन्निर्व्यलीकेन ह्रदा शाधि मेत्यात्मनार्पितम् ||९||
भावार्थ:----ब्रहमदेव म्हणाला----बा मनो,मला आज्ञा कर अशा निष्कपट अंतःकरनाने ज्याअर्थी तूं आपणा स्वतां:ला माझ्या स्वाधीन केले आहेस त्याअर्थी तुला मी प्रसन्न झालो आहे.हे भूपते,तुम्हां उभयंताचे कल्याण असो.आपण भगवंतांस निष्काम स्वधर्माने आचरण करून प्रसन्न करून घ्यावेत,त्यामुळे भगवंत आपली—जीवाची इच्छित इच्छा पूर्ण करितात.||९|| भावार्थ:----हे वीरा,पुत्रांनी नम्रतायुक्त व मत्सररहित होऊन आपल्या शक्तीप्रमाणे पित्याची आज्ञा आदरेकरून स्वीकारावी इतकीच त्यांनी पित्याची पूजा करावयाची आहे.आपण नम्रतापूर्वक सेवा केल्याने आपला—जीवाचा अहंकार नाहीसा होतो व मत्सरहित होऊन सेवा केल्याने दोष निवृत्त होतात.||१०|| भावार्थ:----यास्तव आतां तूं,आपल्या स्वतःच्या गुणांला योग्य अशी अपत्ये या शतरूपेच्याठिकाणी उत्पन्न करून पृथ्वीचे धर्माचे पालन कर आणि यज्ञांच्या योगेकरून यज्ञपुरुषाचे आराधन कर.||११|| भावार्थ:----हे राजन,प्रजांच्या रक्षणाच्या योगाने माझी अत्युत्तम सेवा होईल आणि प्रजांचे पालन करणाऱ्या तुझ्यावर ऋषिकेश भगवानहि संतुष्ट होईल.राजाने प्रेजेस सुख देणे हीच भगवंतांची सेवा आहे.त्याचप्रमाणे कुटुंब—प्रमुखाने कुटुंबातील व्यक्तींना सुख देणे व इतर जीवांना सुख देणे हीच भगवंतांची सेवा आहे.अशा सेवेमुळे भगवंत संतुष्ट होऊन आपणास—जीवास सुख प्रदान करितो.||१२|| | तेषां न तुष्टो भगवान् यज्ञलिंगो जनार्दन: | तेषां श्रमो ह्यपार्थाय यदात्मा नादृत: स्वयम् ||१३||
भावार्थ:----यज्ञरुपी जनार्दन भगवान,ज्यांच्यावर संतुष्ट झाला नाही त्यांचा सर्वप्रकारचा श्रम व्यर्थ आहे.कारण,त्यांनी आपल्या आत्म्याचाच अनादर केला आहे.ज्या जीवांवर जीवानी सेवा न केल्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाही,त्याने इतर कर्मे करून केलेला श्रम हा व्यर्थ आहे.म्हणून आपण कार्य न करता इतरांचे दु:ख कमी किंवा नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा.यातच आपले खरे हित आहे,अन्यथा दु:ख—परिश्रम आहे.||१३|| भावार्थ:----मनु म्हणाला----हे पापनाशका प्रभो,आपल्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे मी वर्तन करीन,परंतु येथे सर्वप्रजांना आणि मला रहावयास स्थान आपण दाखवून द्यावे.||१४|| भावार्थ:----हे देवा,सर्व प्राण्यांचे निवासस्थान अशी जी पृथ्वी ती,अगाधजलामध्ये निमग्न होऊन गेली आहे.त्या भूदेवीच्या उद्धाराविषयी प्रयत्न करावा||१५|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,मनूने सांगितल्याप्रमाणे जलामध्ये निमग्न झालेली पृथ्वी अवलोकन करून ब्रहमदेवाने आता मी हिला वर कशी काढूं अशाविषयी बुद्धीने पुष्कळवेळ विचार केला.तो असा की,----||१६|| | सृजतो मे क्षितिर्वाभि: प्लाव्यमाना रसां गता |
| अथात्र किमनुष्ठेयमस्माभि: सर्गयोजीतै: |
| यस्याहं ह्रदयादासं स ईशो विदधातु मे ||१७||
भावार्थ:-----मी सृष्टि उत्पन्न करीत असतां अकालीच उत्पन्न झालेल्या उदकांनी पृथ्वी बुडून रसातलांत गेली ! आतां येथे ईश्वराने सृष्टीविषयी योजलेल्या आम्हीतरी काय करावे !! आतां ज्या ईश्वराच्या ह्रदयापासून मी उत्पन्न झालो त्यानेच ह्या गोष्टीबद्दल योग्य उपायाची योजना करावी.||१७|| | इत्यभिध्यायतो नासाविवरात्सह सानघ | वराहतोको निरगादंगुष्ठपरीमाणक: ||१८||
भावार्थ:----हे विदुरा,अशा रीतीने ब्रहमदेव विचार करीत असतां,एकाएकी त्याच्या नाकपुडीतून एक आंगठ्याएवढे वराहाचे (डुकराचे)पिलूं बाहेर पडले ! ||१८|| भावार्थ:----हे भरत-कुलोद्भवा विदुरा,तो ब्रहमदेव पहात असतानाच,आकाशामध्ये असलेले ते वराहाचे पिलूं एका क्षणांत खरोखर हत्तीएवढे मोठे झाले ! ते सर्वांना मोठेच आश्चर्य वाटले !! ||१९|| भावार्थ:----तेव्हां मरीचीप्रभृति ब्राहमण,सनकादिक ऋषि आणि स्वायंभुव मनु यांसहवर्तमान ब्रहमदेवाने ते वराहस्वरूप पाहून त्याविषयी अनेक प्रकारचे तर्क केले.||२०|| भावार्थ:----डुकराच्या मिषाने आपल्यापुढे असलेला हा दिव्य प्राणीतरी कोण आहे ! काय हो तुझ्या नाकातूनच हा प्राणी बाहेर पडला,केवढे हे आश्चर्य ! ||२१|| भावार्थ:----हा प्रथमतः आंगठ्याच्या अग्राएवढा दिसत होता,तोच एका क्षणांत प्रचंड शिळेएवढा झाला ! काहो ! हा साक्षात यज्ञरुपी भगवानच आपले खरे स्वरूप गुप्त करून माझ्या मनाला मोहांत तर पाडीत नसेल-ना ! ||२२|| भावार्थ:---तो ब्रहमदेव,आपल्या पुत्रांसह असे तर्क करीत आहे.इतक्यांत त्या यज्ञपुरुषरुपी भगवंताने ते आपले शरीर मोठ्या पर्वताएवढे करून गर्जना केली,||२३|| भावार्थः---आपल्या गर्जनेच्या योगाने दशदिशा नादित करणाऱ्या त्या सर्वव्यापक श्रीहरीने ब्रहमदेवाला आणि त्या श्रेष्ठ ब्रह्मणांना हर्ष उत्पन्न केला.||२४|| भावार्थः---तेव्हा जनलोक,तपोलोक व सत्यलोक ह्यांमध्ये वास करणाऱ्या त्या ऋषीनी,आपल्या खेदाचा नाश करणारी त्या मायिक वराहाची गर्जना ऐकून ऋग्वेद,यजुर्वेद,आणि सामवेद ह्यांतील पवित्र मंत्र्याच्या योगाने त्याची स्तुति केली.आपणही त्या भगवंतांची स्तुती करावी. ||२५|| भावार्थः---यज्ञरुपी वराहाने,आपल्या गुणानुवादाने परिपूर्ण अशी त्या भक्तांनी केलेली वेदरूप स्तुति ऐकून त्यांच्या उत्कर्षाकरितां पुनः गर्जना करून एखाद्या मोठ्या हत्तीप्रमाणे लीला करीत करीत उदकामध्ये प्रवेश केला||२६|| भावार्थः---ज्याने आपले पुच्छ वर उचलून धरिले आहे,जो मानेवरचे लांब लांब केस कांपवीत आहे,जो आकाशांत फिरत आहे,ज्याची आकृति कठोर आहे,ज्याच्या कातडीवरील केंस रांठ आहेत.खुरांच्या योगाने ज्याने मेघ अस्ताव्यस्त केले आहेत,ज्याच्या दाढा शुभ्रवर्ण आहेत,ज्याच्या दृष्टीचा प्रकाश जिकडेतिकडे पडला आहे,असा पृथ्वीचा उद्धार करणारा तो भगवान शोभूं लागला.||२७|| भावार्थः---स्वतः यज्ञमूर्ति असूनहि लीलेकरिता वराहरूपाने अनुकरण करणारा तो भगवान,भयंकर दाढांनी युक्त असतांनाहि आपल्या सौम्यसृष्टीने त्या स्तुति करणाऱ्या ऋषीकडे अवलोकन करून आपल्या घ्रानेन्द्रियाने पृथ्वीचा सुगावा लागावा म्हणून हुंगीत हुंगीत जलामध्ये प्रविष्ट झाला.||२८|| भावार्थः---तेव्हा वज्रमयपर्वतासारखे जे भगवच्छरीर त्याच्या पडण्याच्या वेगाने ज्याचा अंतर्भाग खवळून गेला असा तो मेघासारखी गर्जना करणारा समुद्र,घाबरल्यासारखा होऊन पसरलेल्या लांब लांब तरंगरुपी आपल्या बाहूंनी भगवंतास शरण गेला आणि हे यज्ञपालका माझे रक्षण कर अशी त्याने मोठी आरोळी मारिली.||२९|| भावार्थः---त्यावेळी प्रातःसवन,माध्यान्हसवन आणि तृतीयसवन हि तीन सवने ज्याच्या पायांचे सांधे आहेत अशा त्या यज्ञमूर्ति वराहाने,बाणासारख्या अनकुचीदार,आपल्या खुरांनी त्या अपार उदकांचे विदारण करून पातळामध्ये ती पृथ्वी अवलोकन केली.जी पृथ्वी सर्व जीवांना आधारभूत असून पूर्वी,प्रलयकालच्या उदकांत शयन करण्यास उद्दुक्त झालेल्या त्या भगवंताने आपण आपल्या उदरांत धारण केली होती.||३०||
| स्वयंदंष्ट्र योद् धृत्या महीं निमग्नां स उत्थित:संरुरुचे रसायाम । तत्रापि दैत्य गदयाSSपतन्तं सुनाभसंदिपिततीवृ मन्यु:।।३१।। भावार्थः---नंतर उदकामध्ये निमग्न झालेल्या त्या पृथ्वीला आपल्या दाढेच्या योगाने उचलून रसातळातून वर येत असता,तो भगवान फारच शोभू लागला.तेव्हा उदकामध्ये हातात गदा घेवून अंगावर धावून येणारा व पृथ्वीला वर आणण्याविषयी प्रतिबंध करणारा अशा असह्य पराक्रमी हिरण्याक्ष दैत्याला,सुदर्शन चक्राने मी असता तू पराभव काय म्हणून सहन करितोस असे सांगून ज्याला तीव्र क्रोध आणिला आहे अशा त्या भगवंताने,सिह जसा हत्तीला मारून टाकतो त्याप्रमाणे सहज मारून टाकले,तेव्हा जसे एकदा हत्ती मातीच्या टेकडीशी टक्कर करून निघाला म्हणजे त्यांचे गंडस्थळ तांबडी माती लागून लाल झालेले असते तशी त्या भगवंताची गंडस्थळ व मुखहि हिरण्याक्षाच्या रक्तपंखाने लाल झाली होती.||३१-३२|| भावार्थ:----हे विदुर,हत्तीसारख्या लीलेने आपल्या पांढऱ्या दंताच्या अग्रावर पृथ्वी उचलून धारण करणारा आणि तमालवृक्षासारखा श्यामवर्ण अशा त्या वराहरूपी ईश्वराला पाहून,ब्रह्मदेव-पृभूती ऋषी,हात जोडून वैदिकसुक्तानी त्याची स्तुती करू लागले. ||३३|| भावार्थ:---ऋषी म्हणाले---हे अपराजिता,तुझा सर्वदा जयजयकर असो,हे यज्ञाधीपते,आपली वेद्त्रायात्मक मूर्ती वारंवार कंपित करणाऱ्या तुला नमस्कार असो.||३४|| भावार्थ:----हे देवा,जे तुझे हे केसाचेठीकानी दर्भ आहेत,दृष्टीच्या ठिकाणी गृत आहे व,चार चरणाचेठिकाणी,होता अध्वर्यू इत्यादिक चार ऋत्विजांची चार कर्मे आहेत.||३५|| भावार्थ:----हे ईश्वरा तुझ्या मुखाच्या अग्रभागाचे ठिकाणी जुहू(हंसमुखासारखे)पात्र आहे,दोन नाकपुड्याचे ठिकाणी स्त्रुवा(पाळीसारखे पात्र) आहे,उदाराचेठीकानी इडा(हातभार लांब चौकोनी चपटे)पात्र आहे,कर्णचिद्राचे ठिकाणी चमस(आठ चांगले चौकोनी)पात्रे आहेत,मुखाचे ठिकाणी प्रशित्र(गाईच्या कानासारखे)पात्र आहे,कंठचिद्राच्या ठिकाणी ग्रह (बारा सोम पात्रे)आहेत.भगवन तुझे जे चर्णव (रंथवे)तेच अग्निहोत्र होय.||३६||
भावार्थ:----हे यज्ञवराह,दीक्षा यज्ञामध्ये दीक्षा घेण्यासाठी जी इष्टी करतात ती)वारंवार घेतलेला तुझा हा अवतार होय उपसद(या नावाच्या तीन इष्टी)हीच तुझी मान होय ह्या तुझ्या दाढा होत.प्रवर्ग्य(महावीर)हि तुझी जिव्हा होय.साम्यावस्थ(सम्य: होम्रहित अग्नी,आवसथ्य होम करावयाचा अग्नी)हे यज्ञमुर्ती अशा तुझे मस्तक होय,चिती (विटेचे चायन)हे तुझे प्राण होत. ||३७|| भावार्थ:----हे देवा,सोमरस हा तुझे रेत होय,प्रत:सवनादिक तीन सावने ह्या तुझ्या बाल्यादिक तीन अवस्था होत,अग्निष्ट्हो मादिक सप्तसंस्था ह्या तुझ्या सप्त धातू होत,द्वादशादिक सर्व सत्रे,हे तुझ्या शरीराचे सांधे होत.एतावता तू,सर्वयज्ञकृत्रूप असून त्यातील इष्टी ह्या तुझ्या शरीरातील सांध्याची बंधने होत.||३८|| भावार्थः---सर्व मंत्र,देवता,आणि घृतादि द्रव्ये एतद्रूपी,सर्व यज्ञरुपी आणि कर्मरुपी अशा तुला नमस्कार असो.वैराग्य,भक्ति आणि मनाची स्थिरता यांच्या योगेकरून प्राप्त होणारे जे ज्ञान तत्स्वरूपी व ज्ञान देणारा गुरुरूपी अशा तुला पुनः पुनः नमस्कार असो.||३९|| भावार्थः---हे भूमिधारक भगवन्,ज्याप्रमाणे पाण्यांतून बाहेर पडण्याच्या मदोन्मत्त गजाच्या दांताने धारण केलेली कमलिनी पत्रांसहवर्तमान शोभते तशी तूं आपल्या दाढेच्या अग्रभागावर धारण केलेली ही भूमि,पर्वतांसहित अत्यंत शोभत आहे.||४०|| भावार्थः----अथवा आपल्यावर मेघाचे धारण करणाऱ्या मोठ्या शिखराच्या योगाने जशी एकाद्या कुलपर्वताला शोभा प्राप्त होते तसेच तुझे हे वेदत्रयीरूप वराहशरीर,दांतांवर धारण केलेल्या भूमंडलाच्या योगाने शोभत आहे.||४१|| | संस्थापयैनां जगतां सतस्थुषम लोकाय पत्नीमसि मातरं पिता |
| विधेम चासै नमसा सह त्वयायस्यांस्वतेजोSग्निमिवारणावधा: ।।४२।। भावार्थः----हे देवा,स्थावर व जंगम अशा दोन्ही प्रकारच्या विश्वाची राहण्याची व्यवस्था लागण्याकरितां,आपल्या पत्नीरुपी ह्या जगन्मातेला (पृथ्वीला) उत्तमप्रकारे स्थापन कर.कारण,तूं सर्व जगतांचा पिता आहेस.जसे याज्ञिक पुरुष,मंत्राने अरणीमध्ये अग्नि स्थापन करितात तसे तूं भूमीच्याठिकाणी आपले तेज(लोकांना पाटीवर धारण करण्याची शक्ति)ठेविले आहेस.म्हणून या पृथ्वीवर राहणारे आम्ही,तुज पित्यासहवर्तमान या मातेला नमस्कार करितो.||४२|| भावार्थः----हे प्रभो,पाताळांत गेलेल्या भूमीचे जे तूं उद्धरण केलेस हे कर्म तुझ्याहून दुसरा कोण करण्याविषयी मनांततरी आणील?कोणीही आणणार नाही.तथापि सर्व आश्चर्यांचे आगर अशा तुझ्याठिकाणी हा पृथ्वीचा उद्धार आश्चर्यकारक नाही.कारण,ज्या तूं आपल्या मायेने अतिशय आश्चर्यकारक हे जग निर्माण केले आहेस.||४३|| | विधुन्वता वेदमयं निजम वपुर्जनस्तप:सत्यनिवासींनो वयम ।
| पोटशिखोद्धुत शिवाम्बु बिन्दूभिर्वीमृज्यमानाभृशमिश पाविता:।।४४।| भावार्थः----हे ईश्वरा,आपले वेदमय शरीर कंपित करणाऱ्या तूं,आपल्या अंगावरील लांब लांब केसांच्या अग्रांनी उडविलेल्या पवित्र उदकांच्या बिंदूंनी,जन तप आणि सत्य या लोकांच्याठिकाणी वास करणाऱ्या आम्हांवर अभिषेक करून आम्हांस अत्यंत पवित्र केले आहेस.||४४|| भावार्थः----हे देवा,ज्या तुझ्या कर्मांचा अंत नाही अशा तुझ्या कर्मांचा अंत जाणण्याची जो इच्छा करितो त्याच्या बुद्धीला भ्रंश झाला असे समजले पाहिजे,हे भगवन् हे सर्व विश्व,तुझ्या योगमायेने प्राप्त झालेल्या विषयांच्या संबंधाने मोहित झाले आहे.यास्तव अचिंत्य व अनंतशक्ति अशा तुला जाणून हे जशी तुझी भक्ति करील तसा तूं यांच्यावर अनुग्रह कर.||४५|| भावार्थः----मैत्रेय म्हणाले---हे विदुरा याप्रमाणे त्या ब्रह्मवेत्या ऋषींनी स्तुती केली असता,त्या जगद्रक्षक भगवंताने आपल्या खुराच्या योगाने खळबळलेल्या त्या पाण्यावर पृथ्वीच्या स्थापना केली.||४६|| | स इत्थं भगवानुर्वी विष्वक्सेन:प्रजापति: । रसया लीलायोन्नीतामप्स न्यस्य ययौ हरि:।।४७।। भावार्थ:----नंतर प्रजाचा पालक व दुखःहरण करणारा अशा त्या विष्णूक्सेन भगवंताने,पातालातून लीलेने वर काढलेल्या पृथ्वीचे उदकामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्थापन केली.||४७|| भावार्थ:----हे विदुरा,ज्याची मायिक चरित्रे वर्णन करण्यासारखी आहेत व ज्याचेठीकानी लाविलेली बुद्धी,सर्व दु:खाचा नाश करिते, त्या हरीची अतिमंगलकारक सुंदर हि कथा,जो पुरुष भक्तीने श्रवण करितो किंवा दुसऱ्याकडून श्रवण करवितो त्याच्या हृदयामध्ये जनार्दन भगवन सत्वर प्रसन्न होतो.||४८|| भावार्थ:----हे विदुरा,सर्व आशीर्वादांचा स्वामी तो प्रसन्न झाला असता,दुर्लभ काय आहे?काहीच नाही.तथापि त्याच्या जवळ विषयभोग मागू नयेत.कारण,ते फार थोडा वेळ टिकणारे असतात.आणि अंतर्यामाचे ठिकाणी राहणारा तो परमात्मा,अनन्यभावाने आपली भक्ती करणाऱ्या पुरुषांना आपली उत्तम गती स्वत:च देतो.म्हणून आपण—जीवानी विषय—भोग मागू नयेत,कारण त्यात किंचित सुख असते व अपार दु:ख असते व परमात्मा सुखरूप असतो.म्हणून आपण विषयांचा त्याग करून सत्संग करून परमात्मरूपाच अनुभव घ्यावा.||४९|| | को नाम लोके पुरुषार्थसारवित् पुराकथानां भगवत्कथासुधाम् |
| आपीय कर्णाञ्जलिभिर्भवापहा- महो विरज्येत विना नरेतरम् ||५०||
भावार्थ:----यास्तव अहो!या लोकामध्ये पुरुषार्थाचे तत्व जाणणारा कोण बरे पुरुष,संसारनाशक पुरातन कथेतील भगवत्कथामृताचे आपल्या कारणरूप अंजलीनी प्राशन करून कंटाळेल!या पंशुशिवाय दुसरा कोणीही कंटाळणार नाही.म्हणून आपण—जीवानी—मानवानी पुरूषार्थरुपी तत्व सत्संग करून जाणून घ्यावे.||५०|| |याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये वराहप्रादुर्भावकथनरूप हा तेरावा(१३)अध्याय पन्नास(५०)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. || श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ १४--- आतां हिरण्याक्ष दैत्याच्या वधाचे मुळकारण सांगण्यासाठी,काम-मोहित झालेल्या दितीच्या उदरी कश्यपासून प्रदोषकाळी गर्भ राहिला,हि कथा चौदाव्या(१४)अध्यायांत वर्णन केलेली आहे. | १४--मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---वराह अवतार---[दितीची गर्भधारणा] _____________________________________________________________________________________________ | निशम्य कौषारविणोपवर्णितां हरेः कथां कारणसूकरात्मनः |
| पुनः स पप्रच्छ तमुद्दतान्जली र्न चातितृप्तो विदुरो धृतव्रतः ||१|| भावार्थः---शुकाचार्य म्हणाला---हे राजन,भगवत्कथाश्रवणाचे व्रत धारण करणारा तो विदुर,मैत्रेयाने वर्णन केलेली,पृथ्वीच्या उद्धारासाठी वराहअवतार धारण करणाऱ्या श्रीहरीची कथा ऐकूण पूर्णरीतीने समाधान न झाल्यामुळे मैत्रेय ऋषीला पुनः हात जोडून प्रश्न करू लागला.||१|| भावार्थः---विदुर म्हणाला---हे मुनिश्रेष्ठ,त्याच यज्ञमूर्ती हरीने आदिदैत्य हिरण्याक्षाचा वध केला असे आम्ही ऐकले.||२|| भावार्थः-----परंतु हे ब्रहमण,आपल्या दाढेच्या अग्राने सहज पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या त्या भगवंताचे आणि हिरण्याक्ष दैत्यराजाचे युद्ध कोणत्या कारणाने झाले?||३||
भावार्थ:----मैत्रेय म्हणाला---हे वीरा विदुरा,तू फार चांगले विचारीलेस.कारण,तू मनुष्याच्या मृत्युरूप पाशाला तोडून टाकणारी हरीची अवतार कथा विचारिली आहेस.आपण संत—महात्मा यांना असे प्रश्न करावेत की,त्या प्रश्नाच्या उत्तरातून आपलेही समाधान व्हावे व इतरांचेही समाधान व्हावे.||४|| भावार्थ:----नारदमुनीने गायन केलेल्या ज्या कथेच्या योगाने उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव बालक,मृत्युच्या मस्तकावर आपला पाय देवून विमानात बसून अचलस्थानावर आरूढ झाला.||५|| भावार्थ:----आता तू प्रश्न केलास याविषयीच पूर्वी सर्व देवांनी ब्रहमदेवाला प्रश्न केला असता, देवांचाही देव अशा त्या ब्रहमदेवाने,देवांस सांगितलेला हा इतिहास मी ऐकीला आहे.मैत्रीय ऋषींनी ज्यांच्या मुखातून ऐकले त्यांच्या नावांचा नामनिर्देश केलेला आहे,त्याप्रमाणे आपण जर वक्ता असला तर आपण ज्यांच्या—सदगुरुंच्या मुखातून जे शात्र श्रावण केले असेल तर आपण “मी” न म्हणता त्यांच्या नावांचा नामनिर्देश करावा.असे केले असता आपणास अहंकार येत नाही व ज्यांच्या मुखातून शात्र श्रावण केले,त्यांच्याबद्दल कृतज्ञनता व्यक्त होत असते.||६|| | दितिर्दाक्षायाणी क्षत्तार्मारीचं कश्यपं पतीम ।अपत्यकामा चकमे संध्यायां ह्रच्छयार्दीता ।।७।। भावार्थ:---तो असा----हे विदुरा,दक्षाची कन्या दिती ती मरीचि-नामक प्रजापतीच्या कश्यपनामक पुत्राला दिली होती.ती ऐकेऐकी आपल्या सवतीची मुले पाहून आपणासही मुले असावी अशी इच्छा धरून कामातुर होत्साती,सूर्यास्त झाले असता प्रदोषकाळी,ज्याची जिव्हा अग्नी आहे अश्या यज्ञपतीरूप श्रीविष्णूंचे,दुधाच्या योगाने हवन करून होमशाळेत समाधिस्थ बसलेल्या आपल्या पतीची इच्छा करू लागली.||७-८|| भावार्थ:----दिती म्हणाली----हे सर्वज्ञा,ज्याप्रमाणे मदोन्मत्त गज,केळीला पिडा उत्पन्न करितो त्याप्रमाणे,हातात धनुष्य धारण करणारा हा मदन,आपले शौर्य प्रकट करून,तुझ्याकरिता मला पिडा उत्पन्न करीत आहे.||९|| | तद्भवान्दह्यमानायां सपत्नीनां समृद्धिभी: | प्रजावतीनां भद्रं ते मय्यायुङ्क्तामानुग्रहम् ||१०|| भावार्थ:---यास्तव,मुले असणाऱ्या सवतीच्या सुखसमृद्धीनी संताप पावणाऱ्या आपण अनुग्रह करावा.आपले कल्याण असो.||१०|| | भर्तर्याप्तोरुमानानां लोकानाविशते यशः | पतीर्भवद्विधो यासां प्रजया ननु जायते ||११|| भावार्थ:---आपल्या सारखा पती,ज्यांच्या ठिकाणी पुत्ररूपाने उत्पन्न होतो,अशा रीतीने नवऱ्याकडून ज्यांना पुष्कळ मान मिळतो,त्या स्त्रियांची कीर्ती सर्व लोकामध्ये पसरते.||११|| भावार्थ:---पूर्वी आमचा पिता भगवान दक्ष,आम्हा मुलींवर फार प्रेम करीत होता,हे मुलीनो तुम्ही कोणत्या पतीला वरणार,असे आम्हा सर्व मुलीना निरनिराळे विचारू लागला.दक्ष यांनी ज्यारीतीने आपल्या मुलींना त्यांच्या पतीविषयी विचारणा केली,त्याप्रमाणे आपणही आपल्या मुलींना त्यांच्या पतीविषयी विचारणा करून मुलींच्या पसंतीनुसारच त्यांच्या पतीची निवड करावी.||१२|| भावार्थ:----तेव्हा वंशवृद्धीची इच्छा करणाऱ्या त्या आमच्या पित्याने,आम्ह सर्व मुलींचा अभिप्राय जाणून त्यापैकी तुमच्या स्वभावाला अनुसरणाऱ्या आम्हा तेरा जणींना तुम्हाला अर्पण केले.||१३|| भावार्थ:----यास्तव हे कमलनयना प्रियकरा,माझी इच्छा परिपूर्ण कर.कारण,हे सर्वश्रेष्ठ,तुझ्यासारख्या थोरपुरुषाचे ठिकाणी माझ्यासारख्या दिनजनाची याचना कधी निष्पळ व्हावयाची नाही.||१४|| भावार्थ:----हे विदुर,याप्रमाणे अतिवृद्धींगत झालेल्या कामाने मोह पावलेली,दिन व बहुभाषण करणारी अशा त्या आपल्या भार्येचे संध्याकाल टाळण्यसाठी वाणीने सांत्वन करीत होत्सात तो कश्यप ऋषी म्हणाला कि,-------------||१५|| | एष तेsहं विधास्यामि प्रियं भीरु यदीच्छसि | तस्याः कामं न कः कुर्यात्सिद्धिस्त्रेवर्गिकी यतः ||१६|| भावार्थ:---हे मित्र्ये स्त्रिये,हा मी,तुझ्या मनात ज्याची इच्छा असेल ते तुझे प्रिय करितो.कारण,जीच्यायोगाने पुरुषाला धर्म,अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषाची सिद्धी होते,त्या पत्नीची इच्छा कोण बरे पुरुष,पुरविणार नाही?सर्वही पुरावितीलच.आपण—जीवानी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करावयास पाहिजे.ते आपले--पतीचे कर्तव्यच असते.पत्नीची इच्छा पूर्ण न करणे अधर्म ठरत असतो.त्या अधर्माचे पापाचे फळ—दु:ख आपल्याला--पतीला भोगावे लागते.||१६|| | सर्वाश्रमानुपादाय स्वाश्रमेण कलत्रवान् | व्यसनार्णवमत्येती जलयानैर्यथार्णवम् ||१७|| भावार्थ:----जसा नावाडी नौकेच्या योगाने लोकसह वर्तमान स्वत:हि समुद्रास तरुण जातो त्याप्रमाणे सपत्नीक पुरुष,आपल्या गृहस्थाश्रमाच्या योगाने इतर आश्रमी लोकांस घेवून (त्यांस अन्नवस्त्रादिक देवून)स्वत: हि दु:खरूप समुद्रास तारून जातो.आपणास—जीवास पत्नीच्या साह्याने काम,अर्थ व धर्म नावाचा पुरुषार्थ मिळविता येतो.म्हणून आपण तिच्या कोणत्याही स्वधार्मिक इच्छा पूर्ण करणे आपला—जीवाचा स्वधर्म ठरत असतो.||१७|| | यामाहुरात्मनो ह्यर्धं श्रेयस्कामस्य मानिनी | यस्यां स्वधुरमध्यस्य पुमांश्चरती विज्वरः ||१८|| भावार्थ:----हे मानवती स्त्रिये,जिला त्रिविध पुरुषार्थ इच्छिणाऱ्या पुरुषाचे अर्धांग असे म्हटले आहे,जिच्यावर आपल्या सर्व कर्माचा भार टाकून हा पुरुष,निश्चितपने व्यवहार चालवीत असतो.आपली—जीवाची पत्नी अर्धांग आहे,कारण तिच्याशिवाय आपण काआर्थ्म,व धर्म नावांचा पुरुषार्थ प्राप्त करू शकत नाहीत.आपण जे कर्म पत्नीच्या साह्याशिवाय करू शकत नाही व पत्नीच्या सह्यातामुळे करू शकतो,म्हणून त्या कर्मांत पतीचा ५० %भाग असतो,असे आपण लक्षात ठेऊन त्यानुसार आचरण करावयास पाहिजे.म्हणून आपण पाणिग्रहण करीत असतांना तसा संकल्प अग्नीला साक्ष ठेऊन केलेला असतो.म्हणून त्या संकल्पची परीपूर्णता करणे हा आपला—पतीचा स्वधर्म आहे.आपण संसार करीत असतांना याकडे आवश्य विवेक--विचार करून आचरण करावयास पाहिजे.||१८|| | यामाश्रीत्येन्द्रियारातीन्दुर्जयानितराश्रमैः | वयं जयेम हेलाभिर्दस्यून्दुर्गपतीर्यथा ||१९|| भावार्थ:----जसा किल्ल्याचा आश्रय करणारा पुरुष,चोरांना सहज जिंकितो त्याप्रमाणे आम्ही ज्या तुझा आश्रय करून,इतर आश्रमानी जिंकण्यास अशक्य अशा इंद्रियरुपी शत्रूंना सहज जिंकून टाकू.आपण पत्नीचा आश्रय घेतला आहे व पत्नींनी पतीचा—आपला आश्रय आश्रय घेतला आहे.असा दोघांनी एकमेकांचा आश्रय घेतला आहे,म्हणून दोघांनी एकमेकांच्या इच्छा पूर्ण करणे हा ज्याचा—त्याचा स्वधर्म आहे.असा दोघांनी विवेक—विचार करून प्रेमाने जीवन जगून एकमेकांस सुख द्दावे.||१९|| | न वयं प्रभवस्तां त्वमानुकर्तुं गृहेश्वरी | अप्यायुषा वा कात्स्न्र्येन ये चान्ये गुणगृध्नवः ||२०|| भावार्थ:---हे गृहस्वामिनी आम्ही व आमच्या सारखे दुसरे जे गुणग्राही लोक आहेत ते,अनेक उपकार करणाऱ्या तुझ्यासारख्या आपल्या भार्येचे उपकार फेडण्याविषयी आपल्या सर्वही आयुष्याच्या योगाने सुद्धा समर्थ होणार नाहीत.पती व पत्नीचे जीवन हे एकमेकास उपकारक आहेत,म्हणून प्रत्येकांनी आपापल्या स्वधर्मांचेच पालन करावे.असे आचरण केले असता एकमेकांपासून एकमेकांस प्रेम मिळत असते.सर्वांनी एकमेकांस प्रेम देणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.||२०|| | अथापि काममेतं ते प्रजात्यै करवाण्यलम् | यथां मां नातिवोचन्ति मुहूर्तं प्रतिपालय ||२१|| भावार्थ:---तथापि अपत्यप्राप्तीसाठी हा तुझा मनोरथ पूर्ण करितो परंतु लोकांनी माझी निंदा न करावी याकरिता दोन घटीकापर्यंत धीर धर.पत्नीची इच्छा पूर्ण करणे हे पतीचा स्वधर्म आहे किंवा पतीची इच्छा पूर्ण करणे हा पत्नीचा स्वधर्म आहे.परंतु ती इच्छा धर्म--शात्रानुसार पाळणे हे पत्नी—पतीस बंधनकारक आहे.शास्त्रानुसार आचरण करणे दोघानांही सुखकारक आहे.शास्त्रानुसार आचरण न करणे दोघांनाहि दु:खास कारक आहे.म्हणून फक्त अजून थोडासा वेळ थांबावे,अशी माझी तुला—पत्नीस विनंती आहे.||२१|| | एषा घोरतमा वेला घोराणां घोरदर्शना | चरन्ति यस्यां भूतानि भूतेशानुचराणी ह ||२२|| भावार्थ:----हि राक्षस वगैरे भयंकर प्राणी फिरण्याची वेळ असून दिसण्यात व स्वभावानेही भयंकर आहे.कारण,यावेळी शंकराची अनुचर--भुते,जिकडे तिकडे संचार करीत असतात.||२२|| | एतस्यां साध्वि सन्ध्यायां भगवान् भूतभावनः | परितो भूतपर्षद्भीर्वृषेणाटती भूतराट् ||२३|| भावार्थ:----हे पतिव्रते,या संध्याकाळच्या वेळी,प्राणिमात्राचे परिपालन करणारा भूतपती भगवान शंकर,आपल्या बरोबर भूतप्रथमादिक गण घेवून नंदीवर बसून फिरत असतो.||२३|| भावार्थ:----श्मशानातील वावटळीने उडालेल्या धुळीने धूम्रवर्ण असून विस्कटलेला व दैदिप्यमान असा ज्याचा जटाभार आहे आणि भस्माचा लेप दिलेला,निर्मल व सुवर्णासारखा ज्याचा देह आहे असा तुझा दीर जो देव(शंकर),तो चंद्र,सूर्य व अग्नी ह्या आपल्या तीन नेत्रांनी जगातील सर्व प्रकार पहात असतो.शंकर—महादेव हा सर्वज्ञ आहे,त्यामुळे आपण करतो,त्यास सर्वकांही काळात असते.म्हणून या संधीकाळात धार्मिक कृत्ये करावे असे शास्त्राचे बंधन आहे.||२४|| भावार्थ:---या जगामध्ये ज्याला कोणी स्वकीय अथवा परकीय नाही,तसाच ज्याला कोणी अतिमान्य निंद्य नाही.तथापि ज्याने उपभोग घेवून निर्माल्या प्रमाणे आपल्या चरणाचे दूर झुगारून मायिक संपत्तीची आम्ही व्रतादिकाच्या योगेकारून आशा करीत आहो.काय हे आश्चर्य ! आपण जो परमार्थ केलेला आहे,त्यासाठी तप,व्रतादिक केलेले आहे,त्याद्वारे आपण मायिक—पुत्र प्राप्तीची इच्छा करणे व अयोग्य वेळी करणे मुळीच योग्य नाही.त्यामुळे आपणास सुख न मिळता दु:खच भोगावे लागणार,असे निश्चित दिसून येत आहे.म्हणून थोडासा विलंब झाल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण करतो.असे माझे प्रामाणिक—धर्मानुसार मत आहे.||२५|| भावार्थ:----आपल्या वरील मायेचे आवरण नाहीसे करण्याची इच्छा करणारे बुद्धिमान पुरुष,ज्याच्या निर्दोष चरित्राचे वर्णन करितात,ज्याची बरोबरी किंवा अधिकपणा दुसऱ्या कोणासही करिता येणार नही.आणि साधूची गतिरूप अशाही त्या शंकराने पिशाचवृत्तीचे आचरण स्विकारीले आहे.||२६|| भावार्थ:----ज्यांनी वस्त्रे,पुष्पे,अलंकार व केशारादिकांच्या उट्या इत्यादिकाच्या योगेकारून,श्वानांनी भक्षण करण्यास योग्य असे आपले शरीर आत्मवेकरून उपपालन केले आहे,तेच हतभाग्य अज्ञानी लोक,आत्मस्वरूपी रममाण असणाऱ्या ज्या शंकराच्या लोकशिक्षारूप आचरणाचा उपहास करीतात.अज्ञानी—लोक शंकराच्या आचरणाचा उपहास—निंदा करितात.आपण-मात्र शंकराची निंदा करू नये,तर स्तुती करावी,कारण त्यांच्यापासूनच उपदेशाची परंपरा सुरु झालेली आहे.म्हणून संत—महात्मा यांचा सत्संग करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||२७|| भावार्थ:---ब्रह्मादिक देवही,ज्याने केलेल्या धर्ममार्यादाचे पालन करितात,हे सर्व जग ज्याने उत्पन्न केले आहे,आणि सृष्टी करणारी माया हि ज्याच्या आज्ञेमध्ये वागणारी आहे.सृष्टी करणारी जी माया आहे त्या शंकराने स्वत:पिशाचवृत्ती धारण केली आहे!तस्मात जगद्व्यापक भगवंताचे चरित्र अतर्क्य आहे यांत संशय नाही.सृष्टी करणारी,तीसुद्धा भगवंतांच्या आज्ञाचे पालन करते.असे जर आहे,तर आपण—जीवांनी भगवंतांची जी शास्त्ररूपी आज्ञा आहे,त्यानुसार आपण आचरण करावे.ज्याप्रमाणे लोक-व्यवहारात कायद्दाचे ज्ञान कळण्यासाठी वकील असतात.वकील-लोक कायदा सांगण्याकरिता अर्थ—धन घेतात.त्याचप्रमाणे धर्म—शास्त्राचे नियम सांगण्याकरिता संत—महात्मे अर्थ—धन न घेता सेवाभाव म्हणून आपणास सर्व शात्राचे नियम व अर्थ—भावार्थ सांगतात.शात्राचा अर्थ—भावार्थ कळण्याकरिता भगवंतांनी संत—महात्मे यांना मृत्यू—लोकात पाठवले आहे.आपण सत्संग करून ज्ञान प्राप्त करून सुखरूप व्हावे.||२८|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा कश्यपाने याप्रमाणे सांगितले असतांही मदनाने व्याकुळ झालेली ती दिती,वेश्येसारखी निर्लज्ज होऊन,तिने ब्रह्मऋषीचे वस्त्र ग्रहण केले.कश्यप—ऋषीची इच्छा नसतांना इच्छा पूर्ण केली.त्या दितीने आपली इच्छा हि प्रेमपूर्वक केली का ? दितीने आपली इच्छा शरीराने तृप्त केली का ? दितीने आपली इच्छा प्रेमाने तृप्त न करता शरीराने तृप्त केली.असे तिचे योग्य आहे का ? असे तिचे आचरण अयोग्य—अधर्मानेयुक्त आहे.दितीने अधर्माने जे आचरण केले ते निंदनीय आहे काय ?असेल तर त्यापासून आपण सावध होऊन त्याप्रकारच्या आचरणाचा त्याग करावा की स्वीकार करावा ? त्या आचरणाचा स्वीकार मूर्ख करतील व शहाणा मुळीच करणार नाही.आपण मूर्ख व्हावे कि शहाणे व्हावे असे ज्याचे—त्यांनी ठरवावे.त्यानुसार आपण भगवंत—शास्त्र काय म्हणतो,त्यानुसार ठरवावे.||२९|| | स विदित्वाथ भार्यायास्तं निर्बंन्धं विकर्मणि । नत्वा दिष्टाय रहसि तयाथोपविवेश ह ।।३०।। भावार्थ:---नंतर त्या कश्यपाने,निषिद्ध कर्म करण्याविषयी आपल्या भार्येला तो आग्रह आणून,निरुपाय झाल्यामुळे दैवरुपी ईश्वराला नमस्कार करून नंतर एकांती तिच्याशी गमन केले.दितीचे कामापुढे कांहीच चालले नाही तर कामाचा विजय झाला तर दितीचा पराभव झाला यास कारण काय असावे ? कारणाशिवाय कार्य घडत नसते.याचे कारण दितीने विवेक न करता अविवेक केला,म्हणून कामाचा विजय व दितीचा पराभव झाला.म्हणून आपण—जीवानी कोणतेही कार्य करण्यापूर्वी प्रथम विवेक करावा व नंतर कार्य करावे.||३०|| भावार्थः---नंतर त्या मुनीने स्नान करून प्राणायाम केल्यावर मौनव्रताचे धारण केले आणि भर्गशब्दाने वाच्य अशा निर्मळ तेजाचे (सूर्याचे)ध्यान करीत सनातन ब्रहमरूप गायत्रीमंत्राचा जप केला.||३१|| | दितिस्तू व्रिडिता तेन कर्मावदध्येंन भारत । उपसंगम्य विप्रर्षीमधोमुख्यभ्यभाषात ।।३२।। भावार्थः---हे विदुरा,इकडे दिती तर निंद्य कर्माने लज्जित होऊन ऋषीच्या जवळ नम्रमुखी होऊन भाषण करूं लागली.ज्या वेळेस आपण—जीव अविवेक करून कार्य करतो व कार्य पार पडल्यानंतर पश्चाताप करतो,कारण कार्य झाल्यानंतर विवेक जाग्रत होतो व विवेक केल्यामुळे आपण असे निन्द्द कर्म न करावयास पाहिजे असे होते,असे म्हणून पश्चाताप होतो.आता—कार्य झाल्यानंतर पश्चाताप करून कांहीच उपयोग नसतो.म्हणून आपण—जीवानी दुसऱ्यांदा तरी विवेकापुर्वक कार्य करावे.असे केले असता आपण निन्द्द—जनक कार्य करण्यास प्रवृत्त होत नाहीत.दितीच्या उदाहरणावरून आपण—इतरांनी सावध होऊन कार्य करण्यापूर्वी विवेक—विचार करावा व सत्संग करून,त्यानंतर कार्य करावे.म्हणून विवेक—विचार किंवा सत्संग हे साधन अत्यंत महत्वाचे आहे.||३२|| भावार्थः---दिती म्हणाली---हे (ब्रह्मण)मी ज्याचा अपराध केला आहे त्या भूतपति भगवान रुद्राने माझ्या ह्या गर्भाचा नाश करूं नये.भगवंत किंवा संत—महात्मा कोणाचेही अहित करीत नसतात,तर ज्याचे—त्यचे कर्मच ज्याचा—त्याचा नाश करीत असते हि वस्तुस्थिती आहे.म्हणून आपण सत्संग करून हितकारकच कर्मे करावी.||३३|| भावार्थः---जो अपराधांचेठिकाणी अतिभयंकर,सकाम कर्मे,करणाऱ्यास त्यांचे फल देणारा,निष्काम कर्मे करण्यास मुक्ति देणारा,वस्तुतः दंडाचा त्याग करणारा,परंतु दुष्टांचेठिकाणी दंड धारण करणारा व त्यांचा नाश करण्याविषयी क्रोधरूप धारण करणारा अशा त्या सर्वदुःखनाशक महादेवाला नमस्कार असो.||३४|| भावार्थः----तो पूर्णदयाळू,सतीचापति,माझा मेहुणा भगवान देव,अगदी निर्दय अशा व्याधानेसुद्धा दया करण्यास योग्य अशा आम्हां स्त्रियांवर प्रसन्न होवो.||३५|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,थरथर कांपनाऱ्या व आपल्या संततीचे इहपरलोकी कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या त्या आपल्या स्त्रीला अवलोकन करून,संध्याकाळचे विहित कर्मानुष्ठान आटोपल्यावर तो कश्यप ऋषि,त्या स्त्रीला म्हणाला की,------||३६|| | अप्रायत्यादात्मनस्ते दोषान्मौहू र्तिकादुत | मन्निदेशातिचारेण देवांना चातिहेलनात् ||३७|| | भविष्यतस्तवाभद्रावभद्रे जाठराधमौ | लोकान् सपालांस्त्रींश्चण्डि मुहुराक्रन्दयिष्यतः ||३८|| भावार्थः---कश्यप म्हणाला---हे कोपिष्ठे अभद्रे स्त्रिये,तुझ्या अंतःकरणाच्या अशुद्धतेमुळे,संध्याकाळची वेळ अमंगळ असल्यामुळे,माझ्या आज्ञेचा तूं भंग केल्यामुळे व रुद्रानुचर देवांचा तूं अपमान केल्यामुळे तुला अकल्याणकारक असे दोन अधम पुत्र होतील आणि ते लोकपालांसहवर्तमान तिन्ही लोकांस वारंवार दुःख देतील.कश्यप मुनींनी आपली पत्नी अदिती हिस शाप दिला नाही,तर तिच्या निन्द्द आचरणाचा काय परिणाम होईल ते सांगितले,कारण संत—महात्मा कोणाचे हित करीत असतो,तर अहित करीत नसतो.||३७-३८|| | प्राणिनां हन्यमानानां दीनानामकृतागसाम् | स्त्रीणां निगृह्यमाणानां कोपितेषु महात्मसु ||३९|| भावार्थः----त्यांच्यापासून निरपराधी दीन प्राण्यांचा वध होऊं लागला असतां,स्त्रियांवर बलात्कार होऊं लागला असतां आणि त्यांनी अपराध केल्यामुळे भगवद्भक्त क्रोधविष्ट झाले असतां----||३९|| | तदा विश्वेश्वरः क्रुद्धो भगवाँल्लोकभावनः | हनिष्यत्यवतीर्यासी यथाद्रीन शतपर्वधृक् ||४०|| भावार्थः----त्यावेळी लोकांचे रक्षण करणारा हा विश्वेश्वर भगवान क्रुद्ध होत्साता,अवतार धारण करून,जसा व्रजधारण करणारा इंद्र पर्वताचा छेद करितो त्याप्रमाणे तुझ्या मुलाचा वध करील.||४०|| भावार्थः---दिती म्हणाली---हे प्रभो,सुदर्शनचक्राच्या योगाने ज्याचा बाहू उदार(मुक्ती देणारा)आहे,त्या साक्षात विष्णूकडूनतरी माझ्या पुत्रांचा वध व्हावा अशी मी इच्छा करते,परंतु एकाद्या रागावलेल्या ब्राह्माणाकडून (शापद्वारा)माझ्या पुत्रांचा वध न होवो.||४१|| भावार्थः----कारण,ब्राहमणाच्या शापाने जळून मेलेला व प्राणीमात्रांचा भय उत्पन्न करणारा या दोघांवर नरकांतीलही प्राणी द्या करीत नाहीत व तो प्राणी,ज्या ज्या दुसऱ्या कोणत्याही योनीत जाईल त्या त्या ठिकाणाचे प्राणी त्याच्यावर द्या करीत नाहीत.ब्राह्मणाच्या किंवा संत—महात्मा यांचा आपल्याकडून अपराध होऊ नये,कारण तो ब्राह्मण किंवा तो संत—महात्मा प्रत्यक्ष अहित करीत नाहीत,तर यांच्यावर कोणीच व कोठेच दया-भाव दाखवीत नाहीत.मग तो मृत्यू-लोक असो किंवा पर-लोक असो किंवा कोणत्याही योनीत असो. आपण—जीवानी ब्राह्मणांचा—संत—महात्म्यांचा अपराध कोणीच,कोणताच करू नये.यातच आपले अहिताच आहे.||४२|| भावार्थः---कश्यप म्हणाला---हे प्रिये,आपण केलेल्या अपराधांबद्दल झालेले दुःख आणि पश्चाताप यांच्यामुळे,तत्काळ योग्य अयोग्य गोष्टीचा विचार केल्यामुळे,भगवान विष्णूचे ठिकाणी मोठा मान ठेविल्यामुळे आणि शंकर व मी या दोघांविषयीहि पूज्यबुध्दी ठेविल्यामुळे.आपणाकडून—जिवाकडून कोणताच अपराध होऊ नये.यदाकदाचित अपराध झाला तर त्या विवेक—विचार करून अपराधाचा पश्चाताप व्हावा व पूज्य बुद्धी असावी.||४३|| | पुत्रस्यैव तू पात्राणां भवितैकः सतां मतः | गास्यन्ति यद्दशः शुद्धं भगवद्दशसा समम् ||४४|| भावार्थः----तुझ्या पुत्राचा चार पुत्रांमध्ये साधूंना मान्य असा एक पुत्र होईल.त्याची पवित्र कीर्ती भगवंताच्या कीर्तीच्या बरोबरीने लोक गातील. ||४४|| | योगैर्हेमेव दुर्वर्णं भावयिष्यन्ति साधवः | निर्वेरादिभीरात्मानं यच्छीलमनुवर्तीतुम् ||४५|| भावार्थः----हीनवर्ण झालेल्या सोन्याला जसे दहादिक उपायांनी शुद्ध करून घेतात त्याप्रमाणे साधु,ज्या तुझ्या नांतवाच्या (प्रल्हादाचा)स्वभाव प्राप्त करून घेण्याविषयी,निवैरत्व,समचितत्त्व इत्यादिक उपायांनी आपल्या अंतःकरणाला शुद्ध करून घेतील.||४५|| | यत्प्रसादादिदं विश्वं प्रसीदति यदात्मकम् | स स्वदृग्भगवान् यस्य तोष्यतेsनन्यया दृशा ||४६|| भावार्थः----महाभगवदभक्त,उदारचीत्त,महाप्रतापी व थोरामाध्येही थोर असा तो प्रल्हाद,अतिशय वृद्धिगत झालेल्या भक्तीने शुध्द केलेल्या अंतकरणात श्रीविष्णूची स्थापना करून देहादिकावर असलेला अभिमान सोडून देईल.||४७|| भावार्थ:----याविषयीचेठिकाणी लंपट नसणारा,सुस्वभावाने युक्त,गुणांचा निधी,दुसऱ्याचे ऐश्वर्य पाहून संतोष मानणारा,दुसरे दुःखित झाले असतां दुःख मानणारा,आणि शत्रूबुद्धीरहित असा तो प्रल्हाद,जसा चंद्र,ग्रीष्मऋतूसंबंधी तापाचा नाश करितो त्याप्रमाणे जगाच्या शोकाचा नाश करनारा होईल.आपण भक्त प्रल्हादाचे जेवढे सत्वगुण आहेत ते प्रयत्न करून आपल्यात आणावे.त्यामुळे आपण प्रल्हादासारखे भक्त होऊन आपले हित होईल.||४८|| भावार्थः---हे स्त्रिये,या जगाच्या आंत बाहेर व्यापून असणारा,निर्दोष,भक्तांच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा,लक्ष्मीरूप स्त्रीचे परमभूषण आणि दैदीप्यमान कुंडलांच्या योगाने ज्याचे मुख शोभायुक्त झाले अशा कमलनयन भगवंताला,तुझा नातू प्रल्हाद,प्रत्यक्ष अवलोकन करील||४९|| | श्रुत्वा भागवतं पौत्रममोदत दितिर्र्भूशम ।पुत्रयोश्च वधं कृष्णाद्विदित्वाSSसिंमहामना:।।५०।। भावार्थः----(मैत्रेय म्हणाला---हे विदुरा)आपला नातू भगवद्भक्तहोणार असे ऐकून दितीला अतिशय आनंद झाला आणि आपल्या पुत्रांचा वध भगवंताच्याच हातून होणार असे जाणून,त्यांस सद्गती होईल अशा अभिप्रायाने तिच्या मनाला समाधान वाटले.||५०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतातील महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये दिती-कश्यपसवांदरूप हा चवदावा(१४)अध्याय पन्नास(५०) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||सदगुरुच्ररणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________|१५--- नंतर निस्तेज झालेल्या देवांनी,आपल्या तेजोहानीचे कारण ब्रह्मदेवाला विचारले असता,त्याने वैकुंठवासी जय—विजयनामक विष्णू-दुतांनाब्राह्मणाचा शापवगैरे झाल्याचे कारण त्यांस कथन केले,हि कथा या पंधराव्या(१५)अध्यायांत वर्णिलेली आहे. | १५---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---भगवंतांचा वराह अवतार---[३---जय---विजय यांना सनकादिकांचा शाप] _____________________________________________________________________________________________ | प्राजापत्यं तु तत्तेजः परतेजोहनं दितिः | दधार वर्षाणि शतं शङ्कमाना सुरार्दनात् ||१|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,आपल्या पुत्रांकडून देवांना पिडा प्राप्त होईल अशी शंका धारण करणाऱ्या त्या दितीने,इतरांच्या तेजाचा नाश करणारे ते कश्यपऋषीचे वीर्य शंभर वर्षेपर्यंत आपल्या उदरांत धारण केले.||१|| भावार्थः---त्या तेजाच्या योगाने लोकांतील चंद्रसुर्यादिकांचा सुद्धा प्रकाश नाहीसा झालां असतां,हतवीर्य झालेल्या इंद्रादिक लोकपालांनी,अंधकाराने झालेला दिशांचा संकर(पूर्व पश्चिमादिक दिशा ओळखू येत नाही अशी स्थिती)ब्रह्मदेवास कळविला.||२|| भावार्थः----देव म्हणाले---हे विधात्या ज्या तुझ्या ज्ञानमार्गाला कालाने स्पर्श केला जात नाही,त्या तुज भगवंताला माहित नाही अशी कोणतीही गोष्ट नाही.म्हणून आम्ही ज्यापासून अत्यंत भिऊन गेलो आहो असा हा अंधकार कोठून प्राप्त झाला ते जाणतच आहेस.||३|| भावार्थः---हे देवदेवा,हे जगत्पालका,हे लोकनाथमुकुटमने,तूं सर्वही उच्चनीच प्राणीमात्रांचा अभिप्राय जाणणारा आहेस.||४|| भावार्थः---हे देवा,अनेक प्रकारच्या ज्ञानरूप बलाने युक्त अशा तुला नमस्कार असो.मायेच्या योगाने रजोगुणाचा स्वीकार करणारा आणि या ब्रहमदेव स्वरूपाला धारण करणारा,परंतु सर्व प्रपंचाचे कारण अशा तुला नमस्कार असो.||५|| भावार्थः---आपल्याठिकाणी सर्व भुवने ओंऊन ठेवणारा,कार्यकारणस्वरूपी असूनही वस्तुतः त्यांहून निराळा व सर्व जीवांचा उत्पादक अशा तुझे अनन्य भक्तिने जे चिंतन करितात त्या--प्राण,इंद्रिये व मन यांस जिंकणाऱ्या,परिपक्व झालेल्या योगसाधनाने युक्त व तुझा प्रसाद मिळविणाऱ्या पुरुषांना कोठेही पराभव प्राप्त होत नाही.||६-७|| भावार्थः---सर्व प्रजा,ज्या तुझ्या वेदलक्षणवाणीरूप दांवणीने बांधल्या गेल्या असून,नाकांमध्ये वेसण घातलेले वृषभ जसे धन्याचे ओझे पोंचवितात त्याप्रमाणे आपल्या अधिकारानुरूप कर्मे करून ती तुम्हांस व आम्हांस अर्पण करितात,त्या जगन्नियंत्या तुला नमस्कार असो.||८|| भावार्थः---हे परमेश्वरा,त्या तूं,सांप्रतकाली अंधकाराने रात्रदिवस समजत नसल्यामुळे ज्या आमची कर्मे बंद पडली आहेत त्या आमचे कल्याण करावे.आतां शरण आलेल्या आम्हांकडे आपल्या पूर्ण कृपायुक्त दृष्टिने अवलोकन करण्यास तूं योग्य आहेस.||९|| भावार्थः---हे देवा,जसा ओल्या काष्ठामध्ये ठेवलेला अग्नि,धूर उत्पन्न करीत पेटूं लागतो त्याप्रमाणे कश्यपऋषीने दितीच्या उदरी स्थापन केलेले हे गर्भरूप तेज,सर्व दिशा अंधकाराने व्याप्त करीत वाढूं लागले आहे.||१०|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला---हे महाबाहो विदुरा,देवांची प्रार्थना ऐकून घेणारा तो भगवान ब्रहमदेव,दितीचे कुचेष्टीत मनांत आल्यामुळे हास्य करून,देवांना संतोष उत्पन्न करीत होत्साता मधुरवाणीने भाषण करूं लागला.||११|| भावार्थः---ब्रहमदेव म्हणाला---हे देवहो,तुमच्या पूर्वी उत्पन्न झालेले माझे मानसिक पुत्र जे सनत्कुमार,सनक,सनंदन आणि सनातन ते निरिच्छपणे आपल्या सत्यलोकांतून निघून इतर सर्व लोकांचे ठिकाणी आकाशमार्गाने फिरत असत.||१२|| भावार्थः---ते एकेवेळी फिरतां फिरतां निर्मलचित्त व षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा विष्णूच्या सर्व लोकांनी वंद्य अशा वैकुंठलोकास निघून गेले.||१३|| भावार्थः---ज्यांनी पूर्वी निष्काम धर्माच्या योगाने हरीचे आराधन केले आहे ते सर्वही पुरुष,विष्णूसारखी मूर्ती धारण करून त्या वैकुंठलोकाचे ठिकाणी वास करितात.||१४|| भावार्थः---ज्या वैकुंठलोकाचे ठिकाणी वेदांतांतीच जाणला पुराणपुरुष धर्मरुपी भगवान विष्णू,शुद्धसत्त्व गुणमय मूर्ती धारण करून आम्हां भक्तांना सुख देण्याकरिता राहत असतो.||१५|| भावार्थः---जेथे मूर्तिमंत कि काय असे सर्व ऋतूमध्ये पुष्पादि संपत्तीने युक्त अशा मनोरथपूरक वृक्षांनी शोभणारे श्रेयसनामक वन (बाग)आहे.||१६|| भावार्थः---ज्या वनामध्ये स्त्रियासह वर्तमान विमानातून संचार करणारे विष्णूभक्त,पाण्यामध्ये ज्यांचा मकरंद(सुवास)पसरला आहे अशा प्रफुल्लीत झालेल्या वसंत ऋतूतील मोगऱ्यांच्या वायुने आणलेल्या सुगंधाने ज्याच्या बुद्धींना विघ्न होत आहे असेही ते विष्णूभक्त,त्या सुगंध आणणाऱ्या वायूचा तिरस्कार करीत होत्साते,सर्व लोकांच्या पापाचा नाश करणारी प्रभूची चरित्रे गायन करितात. ||१७|| भावार्थः---ज्या वनामध्ये एखादा श्रेष्ठ भ्रमर उच्चास्वराने हरिकथेचे गायन करू लागला असता,परवे,कोकिल,सारस-पक्षी,चक्रवाक, चातक,हंस,शुक्र(राघु)तित्तीरपक्षी आणि मयूर यांचा जो स्वाभाविक कलकलाट शब्द तोही क्षणमात्र बंद होतो.येणेकरून तेथील पक्ष्यांनाही हरिकथाश्रवणाचा आनंद असतो असे दर्शित झाले.आपणही सत्संग करीत असता पक्षाप्रमाणे शब्द बंद करून एकाग्र चित्ताने श्रवण करावे.यातच आपले हित आहे.||१८|| भावार्थः---ज्या वनामध्ये,तुळशीच्या हाराने भूषित अशा श्रीहरीने,त्या तुळशीच्या सुगंधाची प्रसंशा केली असता,त्याच बागेत राहणारे मंदार,कुंद,तिलक,कमोड,चंपक,अर्ण,पुनाग्ग,नागकेसर,बकुल,कमल आणि पारिजात हे पुष्पजातीचे वृक्ष सुगंधयुक्त असूनही आपणा सर्वापेक्षा भगवंताला तुळशी आवडते म्हणून तिची तपश्चर्या थोर असे मानितात.यांच्या योगाने तेथे राहणारे गुणग्राहीच आहेत,मत्सरयुक्त नाहीत असे सूचित झाले.आपण पक्ष्याप्रमाणे—भ्रमारासारखे सार-ग्रहण करून असराचा त्याग केला पाहिजे.||१९|| भावार्थः---पुनः वैकुंठाचे वर्णन करितात---वैकुंठस्थान-हरीचरणाचे ठिकाणी केवळ नम्र असणाऱ्या निष्काम भक्तांना मात्र प्राप्त होणाऱ्या,वैदूर्यमनी,पाच व सुवर्ण यांनी निर्माण केलेल्या विमानांनी व्याप्त आहे.ज्या विमानात असणाऱ्या कृष्णचिंतकाच्या मनामध्ये ज्यांचे कटिभाग विशाल असून मुखावर हास्याच्या योगाने फार शोभा आली आहे अश्या उत्तम स्त्रिया देखील,आपल्या हावभावाणी काम उत्पन्न करू शकत नाहीत.||२०|| भावार्थः---ज्या लक्ष्मीने आपल्यावर अनुग्रह करावा एतदर्थ ब्रह्मादिकांचा यत्न चालला आहे,ती मूर्तिमती लक्ष्मीसुद्धा,ज्या वैकुंठामध्ये,स्फटिकांच्या भीतीनी युक्त असून मधून मधून शोभा आणण्याकरिता ज्याला सुवर्णाच्या पट्या लावलेल्या आहेत अशा श्रीहरीच्या गृहामध्ये,आपला चंचल स्वभाव टाकून नुपुरांच्या योगाने आपले चरणकमल शब्द्युक्त करीत करीत हस्तामध्ये क्रीडेसाठी धारण केलेल्या कमलांचे संमार्जन करीत आहे कि काय अशी पाहण्यात येते.||२१|| हे देवहो,ज्या वैकुंठामध्ये,दाशींना बरोबर घेऊन आपल्या “लक्ष्मीवन”नावांच्या उपवनामध्ये तुळशीच्या योगाने हरीची पूजा करणाऱ्या लक्ष्मीने,पोवळ्यांनि सभोवार बांधविलेल्या स्वच्छ उदकाच्या वापिमध्ये,सुंदर केशांनि व सरळ नासिकेने युक्त असलेले आपले मुख, अवलोकन करून ते भगवंताचे चुंबन केलेले असल्यामुळे फार शोभत आहे,असे मानिले.||२२|| भावार्थ:--पापनाशक हरीच्यासृष्ट्यादि लीलांच्या वर्णनावाचून इतर (अर्थ कामपर विषयांनि युक्त असल्यामुळे बुद्धीला मोह करणाऱ्या अशा निंद्द कथेचे जे पुरुष श्रवण करीतात,ते ज्या वैकुंठलोकाचे ठिकाणी जात नाहीत.ज्या निंद्द कथा,पुण्याचा नाश करणाऱ्या असून दुर्दैवी लोकांनी श्रवण केल्या असता त्या त्या लोकांना आश्रय रहित अशा घोर नरकामध्ये पडतात.केवढे हे दु:ख ! म्हणून आपण निंद्द कथाचे श्रवण करू नये,कारण त्यामुळे नरकात जाऊन दु:खे भोगावे लागतात.आपण वंद्द कथेचे श्रवण केले तर सद्गती प्राप्त होऊन सुखे भोगावयास मिळतात.||२३|| भावार्थः---हे देव हो,ज्या मनुष्येजन्माचे ठिकाणी धर्मज्ञान-सहवर्तमान तत्वज्ञान प्राप्त होते त्या आमच्या(ब्रहमदेव )सारख्यांनी सुद्धा देवाजवळ प्रार्थना करण्यास योग्य अशा मनुष्यजन्माला प्राप्त झालेले जे लोक,भगवंताचे आराधन करीत नाहीत ते खरोखर सर्वत्र पसरलेल्या भगवंताच्या मायेने अत्यंत मोहित झाले आहेत असे समजावे.आपण इतर लोकासारखे भगवंतांच्या मायला मोहित न होता भगवंतांची निष्काम भक्ती करावी,कारण त्यामुळे भगवंत अनुभवयास येऊन आपण सुखरूप होतोत.||२४|| | येऽभ्यर्थितामपि च णो नृगतिं प्रपन्ना-ज्ञानं च तत्वविषयं सह्धर्म यत्र | | नराधनं भगवतो वितरन्त्यमुष्य-सम्मोहिता विततया बत मायया ते ||२४|| भावार्थः---आणि भगवंताच्या श्रवणकीर्तनादी भक्तीने देहादिकाचे ठिकाणी अभिमानरहित व हरीच्या उत्तम यशाच्या परस्पर वर्णनामध्ये प्रेमाने ज्यांचा कंठ दाटून येत आहे व नेत्रातून आनंदाश्रू गळत आहेत,व अंगावर रोमांच उभे राहिले आहेत,आणि ज्यांच्या दयालुत्वादीक स्वभाव आमच्या सारख्यांनी सुद्धा इच्छा करण्यास योग्य आहे असे भक्तजन,आमच्या स्थानापेक्षा वर असणाऱ्या ज्या वैकुंठामध्ये गमन करितात.आपण हरीची निष्काम भक्ती करावी,कारण त्यामुळे आपण हरीच्या वैकुंठास प्राप्त होतोत.||२५|| भावार्थः---विश्वगुरु भगवंताचे राहण्याचे स्थान,सर्व भुवनामध्ये मुख्य असून वंद्द,आणि मोठमोठ्या देवांच्या विमानांनी प्रकाशित झालेले,अश्या त्या अपूर्व दिव्य वैकुंठस्थानात योगसाधनांच्या सामर्थ्याने पावल्यानंतर ते सनकादिक ऋषी,परम आनंद पावले.आपणही सनकादिक ऋषीप्रमाणे परम आनंदास प्राप्त होऊत.||२६|| | तस्मिन्नतीत्य मुनय: षडसज्जमाना: - कक्षा: समानवयसावथ सप्तमायाम् | | देवावचक्षत गृहीतगदौ परार्ध्य - केयूरकुण्डलकिरीटविटविटकंवेषौ ||२७|| भावार्थः---नंतर त्या ऋषींनी,त्या वैकुंठलोकाचे ठिकाणी भगवतदर्शनाच्या उत्कंठेमुळे मार्गातील चमत्कार पाहण्याविषयी कोठेही आसक्त न होता,सहा चौक्या ओलांडून पुढे सातव्या चौक्याच्याठिकाणी सारख्या वयाचे,हातात गदा धारण करणारे,बहु मोलाची बहुभूषणे कुंडले व ते द्वारपाल,श्यामवर्ण अशा चार बाहुमध्ये स्थापन केलेल्या मदोन्मत्त श्र्नमरांनीयुक्त अशा कंठापासून पायापर्यंत लोंबणाऱ्या वनमालेने अलंकृत होते व वांकड्या चढविलेल्या भृकुटींनी,फुलविलेल्या नाकपुड्यांनी व आरक्त नेत्रांनी किंचित रागावलेले मुख धारण करणारे होते.||२८|| भावार्थः---त्या सनकादिक ऋषींनी,सुवर्णाच्या पट्यांनी बांधविलेल्या हिऱ्यांच्या फळांनी युक्त अशा सहा दरवाज्यांचे ठिकाणी जसा पूर्वी प्रवेश केला होता त्याप्रमाणे सातव्या दरवाज्याचे ठिकाणीहि,पाहत असणाऱ्या त्या जयविजय द्वारपालास न विचारता त्यांनी प्रवेश केला.ते सर्वठिकाणी सम असलेल्या आपल्या दृष्ठीने आडकाढीने रहित होत्सात नि:शंकपणे संचार करीत असतात.त्या सनकादिक ऋषींची दृष्टि सम झालेली असल्यामुळे नि:शंकोचपणे प्रवेश केला.आपणही सनकादिक ऋषीप्रमाणे सत्संग करून ज्ञान—मार्गाने “समदृष्टि” करावयास पाहिजे.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होते.||२९|| भावार्थः---तेव्हा ज्यांचा स्वभाव,ब्रहमनिष्ठांचा कैवारी अशा भगवंताच्या स्वभावाच्या उलट अशा त्या दोघां द्वारपालांनी,वृध्द असूनही पांच वर्षाच्या कुमाराप्रमाणे दिसणारे,आत्मसाक्षात्कार संपन्न,असल्यामुळे निषेध करण्यास अयोग्य व नम्र अशा त्या चार सनकादि ऋषींना अवलोकन करून,’अहो येथे वैकुंठात देखील त्याचा उद्धटपणा आहे!’असा त्यांच्या तेजाचा उपहास करून,हातातल्या वेतकाठीने आत जाण्यास त्यांना प्रतिबंध केला.आपल्या स्वामीकडे येणाऱ्यांचा अधिकार सेवकांना कळाला पाहिजे व त्या अधिकारानुसार त्यांच्याशी वर्तुनक करावयास पाहिजे.सेवकास येणाऱ्यांचा अधिकार न कळाला तर व्यवहार अयोग्य होतो व त्या व्यवहाराचे विपरीत फळ भोगावे लागतात.||३०|| भावार्थः---इतर देव पाहत असता,हरीच्या त्या दवारपालांनी निषेध केलेले अतिपुज्यही ऋषी,अतिप्रिय भगवंताच्या पाहण्याच्या इछेचा भंग झाला असता,किंचित क्रोधाच्या योगाने एकाएकी आरक्तनेत्र होऊन म्हणाले कि,------||३१|| भावार्थः---ऋषी म्हणाले----हे द्वारपाल हो,उत्तमप्रकारच्या भगवंताच्या आराधनेने या वैकुंठात येवून राहणाऱ्या समदृष्टी पुरुषांमध्ये तुम्हा दोघांनाच कोण हा विषम स्वभाव (कित्येकांनी आत जावे व कित्येकांनी आत जावू नये असा )दिसून येत आहे ! येथे भगवतभक्तांवाचून इतर कोणीही येत नाही आणि हरी अतिशांत पुरुष असल्यामुळे व त्याच्या स्वरूपी विरोध नसल्यामुळे येथे भयशंकाच नाही.असे असता येथे तुम्हसंच शंखा येते की,आम्ही जसे कपटी आहो,तसा दुसराही कोणीतरी कपटी येथे प्रवेश करील.यास्तव तुम्हीच केवळ लोकवांचक आहां असे भासते.आपल्यासारखेच इतर असतात असे कोणीही आपला समज करू नये.असे समजने चुकीचे असते.व्यक्तीपरतव्य स्वभाव भिन्न—भिन्न असू शकतो.विशिष्ट स्वामीकडे येणारे सर्व सारखेच असतात.||३२|| भावार्थः---कारण,जसे महाकाशामध्ये घटकाश अंतर्भूत असते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष,या वैकुंठाचे ठिकाणी सर्व विश्व आपल्या उदरामध्ये धारण करणाऱ्या भगवंताचे ठिकाणी आपले अंतर काहीच पावत नाही,तर आपले स्वरूप परमात्म्याशी अभिन्न आहे असेच मानितात.संत—महात्मा हे आपल्यात व भगवंतांत भेद न पाहता अभेद मानतात म्हणजे द्वैत हि भावना नसते तर अद्वैत भावना असते.जेथे द्वैत असते तेथे भय असते व जेथे अद्वैत असते तेथे भयच नसते.अशी वस्तूस्थिती असते.असे असता,ज्या कारणाने देवांचा वेश धारण करणाऱ्या तुम्हालाच या परमेश्वराविषयी,जसे एखाद्या लौकिक राजाविषयी त्याच्या चाकरांना ‘महाराजांचे पोटां एखादा कोणी कांही तरी भोसकणार नाहीना?असे भय असते,त्याप्रमाणे हे भय उत्पन्न झाले आहे. ||३३|| भावार्थ:----तस्मात या वैकुंठपालक परमात्म्याचे सेवक असून मंदबुद्धी अशा तुमचे कल्याण करण्यासाठी या अपराधास जे योग्य शासन त्याविषयी आम्ही चिंतन करितो.तुम्ही भेदभाव मनात आणिलात म्हणून ज्या लोकांमध्ये भेदभाव मनात आणणाऱ्या या पापी मनुष्याला,काम क्रोध आणि लोभ हे तीन शत्रू प्राप्त होतात,त्या लोकांमध्ये या वैकुंठ लोकापासून निघून चला.ज्यांच्यात भेदभाव असतो,त्यांच्यात काम,क्रोध आणि लोभ हे तीन दोष असतात,म्हणून तुम्ही सेवक या पदास अयोग्य आहात,म्हणून येथून आपण निघून जावे.||३४|| | तेषामितीरतमुभाववधार्य घोरं तं ब्रम्हदण्डमनिवारणमस् |
| सद्यो हरेरनूच रावुरू बिभ्यतस्तत् दग्रहावपततामतिकातरेण ||३५|| भावार्थ:---याप्रमाणे त्या सनकादिकांचे भाषण एकूण आणि शस्त्रसमुदायांनीहि अनिवार्य असा भयंकर तो ब्रहमशाप आहे असे.जाणून त्या ऋषिपासून द्वारपालापेक्षाही अधिक भय पावणाऱ्या श्रीहरीचे ते दोघे द्वारपाल,तत्काळ अतिभयाने त्या ऋषीचे चरण ग्रहण करून साष्टांग लोटांगण घालून पडले.आपणांकडून जर कांही अपराध घडला तर साष्टांग नमस्कार नम्रतापूर्वक करून क्षमा मागावी.||३५|| | भुयादघोनि भगवद्भिरकारि दण्डो यो नौ हरेत् सूरहेलनमप्यशेषम् |
| मा वोऽनुतापकलया भगवत्स्मृतिघ्नो मोहो भवेदिह तू नौ व्रजतोरधोऽध: ||३६||
भावार्थः---द्वारपाल म्हणाले---हे मुनिश्रेष्ठ हो,आपण अपराध करणाऱ्या आम्हास जो दंड केलास तो होवो,कारण तो प्रभूच्या अज्ञेचा भंग केल्यामुळे आम्हास येथे घडलेल्या सर्वही पापाचा नाश करील.आपणाकडून—जिवाकडून जर अपराध होऊन दंड झाला असेल तर आपण तो दंड आवश्य स्वीकारावा,कारण तो दंड अपराधाच्या पापांचा नाश होतो.परंतु आपला,’आम्ही यांस व्यर्थ शाप दिला असा’ जो कृपानिमित्तक़ पश्चाताप झाला आहे त्याच्या लेशाने,येथून मूढ योनीमध्ये जाणाऱ्याहि आम्हांस भगवंतांच्या स्मृतीचा नाश करणारा मोह प्राप्त न होवो.द्वारपाल म्हणतात की,आम्हांस मूढ योनी मिलालीतरी आमचा होकार आहे,ते दु:ख आम्हीं सहन करूत,पण कोणत्याही योनीमध्ये आम्हांस भगवंतांचे स्मरण असेच राहो म्हणजे भगवंतांच्या स्मृतीचा नाश न होता स्मरण राहो हि आमची मागणी आपण पूर्ण करावी.यावरून आपण—जीवांनी असे लक्षात ठेवावे की,मानव देह असो किंवा इतर योनिताला देह असो अशा सर्व-देहात भगवंतांचे स्मरण असावयास पाहिजे,कारण भगवंत आहोत म्हणून आपण आहोत.भगवंत आश्रय आहे म्हणजे अधिष्ठान आहे व आपण—जीव अध्यस्त आहे.म्हणजेच भगवंत मुख्य आहे व आपण गौण आहोत.भगवंत सार आहे व आपण असार आहोत.म्हणून आपण असारांचा त्याग करून सार असा जो भगवंत आहे, सत्संग करून त्याच्याशी जीव-ब्रह्म—ऐक्य-ज्ञानाद्वारे एकरूप व्हावे.||३६|| भावार्थः---हे देवहो,याप्रमाणे आपल्या द्वारपालांनी साधूंचा अपराध केलास असे जाणून त्याचवेळी सज्जनांचा प्रियकर अशा कमलनाथ भगवंताने,परम हंस महाऋषींनाहि शोध करण्यास योग्य अशा आपल्या-चरणांच्या चालीनेच जेथे त्यांस अवरोध झाला होता त्या ठिकाणी लक्ष्मीसहवर्तमान गमन केले.||३७|| भावार्थः---तेव्हां सनकादिकांनी,समाधियोगाने चिंतन करण्यास योग्य अशा प्रत्यक्ष आलेल्या त्या परब्रहमरुपी हरीस अवलोकन केले.तो हरी असा होता की,ज्याला स्वकीय सेवकांनी गमनयोग्य पादुकाछ्त्रादिक साहित्य आणून दिले आहे,दोन्ही बाजूंनी हंसपक्ष्यांसारख्या शोभणाऱ्या पंख्याच्या सुखकारक वायुने चंचळ होणाऱ्या शुश्नच्छत्ररूप चंद्राच्या किरणाप्रमाणे शोभायमान मोत्याच्या सरांच्या झालरीपासून ज्याच्या अंगावर उदकबिंदू गळत आहेत-----||३८|| भावार्थः---द्वारपाल व सनकादिक ऋषि यांच्यावर प्रसाद करण्याविषयी उत्सुक,इच्छा करण्यास योग्य अशा गुणांचे स्थान,कृपादृष्टिच्या कटाक्षाने भक्तांच्या ह्रदयामध्ये आनंद उत्पन्न करणारा,श्यामवर्ण व विस्तीर्ण अशा वक्षःस्थळाचेठिकाणी शोभणाऱ्या लक्ष्मीच्या योगाने सर्व लोकांच्या चुडामणिस्थानापन्न आपल्या वैकुंठलोकास शोभविणाराच कि काय असा------||३९|| भावार्थः---विस्तीर्ण कटीप्रदेशाचेठिकाणी परिधान केलेल्या भरजरीच्या पितांबरावर झळकणाऱ्या मेखलेने व श्न्मरांच्या शब्दांनी नादित झालेल्या वनमालेनेयुक्त,ज्याच्या (हाताच्या)मनगटामध्ये सुंदर कडी व तोडे आहेत असा आपला एक डावा हात गरुडाच्या खांद्यावर ठेऊन दुसऱ्या उजव्या हाताने लीलेकरितां घेतलेले कमळ गरगर फिरविणारा--------||४०|| भावार्थः---आपल्या कांतीने विद्दल्लतांनांही मागे टाकणाऱ्या मकाराकार कुंडलास शोभा आणण्यास योग्य अशा गालांनी व सरळ नासिकेने ज्याचे मुख शोभत आहे,ज्याच्या मस्तकावर रत्नखचित किरीट आहे,चार बाहुंमध्ये शोभणाऱ्या मोलवान्-हाराने व कंठामध्ये असणाऱ्या कौस्तुभमण्यांने जो शोभायमान आहे---------||४१|| भावार्थः---काय सांगावे,मीच सर्व सौंदर्याचा निधी आहे असा लक्ष्मीला असलेला गर्व या भगवत्सौंदर्याचेठिकाणी अस्त पावला असे भक्तांनी आपल्या मनांत तर्क करून ठरविले होते आणि हे देवहो,माझ्याकरितां,रुद्राकरितां आणि तुम्हाकरितां मूर्तिधारण करणारा अशा त्या विष्णुला अवलोकन करून ज्यांच्या नेत्रांची तृप्तिच झाली नाही अशा त्या सनकादिक ऋषींनी आनंदाने शीरसाष्टांग नमस्कार घातले.आपणही असा सौदार्यांनीयुक्त असलेल्या भगवंतांस शिरसाष्टांग नमस्कार करावा.||४२|| भावार्थः---तेव्हा त्या कमलनयन भगवंताच्या पादकमलांच्या केसरांनी मिश्रित झालेल्या तुळसीच्या मकरंदाने युक्त अशा वायुने,नासिकाद्वाराने त्यांच्या अंतःकरणांत प्रवेश करून ब्रह्मानंद सेवन करणाऱ्याहि त्या ऋषीच्या चित्ताचेठिकाणी हर्ष आणि देहाचेठिकाणी रोमांच उत्पन्न केले.आपल्याही चित्ताच्या ठींकानी सनकादि ऋषीप्रमाणे हर्ष आणि देहाच्या ठिकाणी रोमांच उत्पन्न व्हावे.आपण भगवंतांवर सनकादि ऋषीप्रमाणे भाव ठेवावा.||४३|| भावार्थः---नंतर अतिशय सुंदर अशा आरक्तवर्ण अधरोष्ठाचेठिकाणी कुंदाच्या कळ्यासारख्या दांतांचा प्रकाश जेथे आहे असे काळ्या कमळाच्या मध्यभागासारखे भगवंताचे मुख पाहून ते ऋषि पूर्णमनोरथ होत्साते त्यांनी नखरूप माणकांनी आश्रयभूत अशी त्यांची चरणकमले पहिली तेव्हा त्यास पुन्हा वर मुखाकडे व पुन्हा खाली चरणांकडे पाहण्याची वारंवार इच्छा होऊं लागली.परंतु एकदम भगवंताच्या सर्व स्वरूपलावण्याची ग्रहणशक्ति होईना म्हणून ते भगवंताचे ध्यान करूं लागले.आपणही—जीवानी भगवंतांचे स्वरूप-लावण्य पाहून त्याचेच ध्यान करावे.||४४|| भावार्थः---नंतर या जगामध्ये योगमार्गांनी मोक्षाचा शोध करणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाला विषयभूत,अनेक तत्त्वेत्त्यांना मान्य,नेत्रांना आनंद देणारे आणि दुसऱ्यांना कधीही प्राप्त न होणाऱ्या व नित्य अशा आनिमादि अष्टविभुतीनी युक्त असे पुरुषरूप दाखविणाऱ्या त्या भगवंताची ते ऋषिस्तुति करूं लागले.आपणही भगवंतांची स्तुती करावी,कारण तो स्तुती करण्यास योग्य आहे.||४५|| भावार्थः---कुमार म्हणाले----हे अनंता,जो तूं ह्रदयामध्ये असतांहि दुष्टचित्त पुरुषांस स्फुरण पावत नाहीस,तथापि आमच्या अंतःकरणांत नित्य स्फुरण पावत असून दृष्टिमार्गाला गोचरमात्र तूं आजच झाला आहेस.बाकी जेव्हा तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने (ब्रहमदेवाने)तुझे रहस्य (तत्त्व)आम्हांस वर्णन केले तेव्हांच तूं कर्णरंध्राच्या द्वाराने आमच्या अंतःकरणांमध्ये प्रविष्ट झाला होतास.त्याप्रमाणे आपल्या—जीवाच्या सत्संगाद्वारे कर्णरंध्राच्या द्वाराने आपल्या अंत:करणात प्रविष्ट झाला पाहिजे,त्यासाठी आपण सनकादि ऋषिप्रमाणे विषयांचा त्याग करून व ऐकाग्रचित्त करून श्रवण करावे.||४६|| भावार्थः---हे भगवन्,विषयांविषयी विरक्त व अभिमानरहित असे ऋषि,तुझ्या कृपेने प्राप्त झालेल्या श्रवणादिक दृढ भक्तियोगांनी आपल्या अंतःकरणामध्ये जे जाणतात ते केवळ आत्मतत्त्वच,शुद्धसत्त्वात्मक मूर्तीने भक्तांना प्रतिक्षणी उत्तम आनंद उत्पन्न करणारा तूं आहेस,असे आम्ही जाणतो.||४७|| भावार्थः---हे भगवन्,तुझ्या चरणाचा आश्रय करून करणारे,वर्णन करण्यास योग्य व पवित्र ज्याचे यश आहे अशा तुझ्या कथेचा रस जाणणारे जे निपुण पुरुष आहेत ते मोक्षरुपिही तुझ्या प्रसादाला जुमानीत नाहीत,मग तुझ्या भृकुटीच्या चालनानेच जेथे प्राप्त होते अशा इंद्रपदादिकांनी कथा काय ! आपणही सर्वविषयांचा व पदाचा त्याग करून एवढेच काय,तर मोक्षपदाचाही त्याग करतात,कारण तुझ्या नामाचे,रूपाचे व सौदार्यांचे आकर्षण आहे.”तुझीच—भगवंतांचीच सत्संगरूपी सेवा निरंतर—जन्मो-जन्मी घडावी.”||४८|| भावार्थः---हे भगवन,आज पर्यंत आमच्या हातून पापच घडले नाही.म्हणून आपणाकडून—जीवाकडून भगवंताच्या भक्तांचा अपराध घडू नये.आतां तर तुझ्या भक्तांना आम्ही शापिले म्हणून आम्हांकडून सर्वही पापे घडली आहेत.यास्तव त्या आमच्या पापांनी आम्हांला नरकाचेठिकाणी यथेच्छ जन्म होवो.परंतु जर आमचे चित्त,जसा भ्रमक कंटकांनी विद्ध होत असतांही पुष्पांचे ठिकाणीच रममाण होतो त्याप्रमाणे विघ्नांना न जुमानितां तुझ्या चरणाचे ठिकाणी रमेल व आमच्या वाणी जशी तुलसी गुणाची अपेक्षा न धरिता केवळ तुझ्या चरणसंबंधानेच शोभते त्याप्रमाणे तुझ्या चरणाच्या योगाने जर शोभणाऱ्या होतील आणि आमच्या कर्णांचे छिद्र,तुझ्या गुणगणांनी जर पूर्ण होईल तर एवढेच आम्हांला पुरे आहे.आपण—जीवानी ज्याच्या—त्याच्या कर्मानुसार कोठेही जन्म प्राप्त झाला तर आपल्या कर्णांनी भगवंतांचे नामस्मरण,गुणवर्णन,रूपवर्णन व स्वरूपादिचे वर्णन पडो,व इतर वर्णन न पडो, अशा प्रकारची आपण—जीवानी नम्र विनंती भगवंतांकडे करावी.||४९|| | प्रादुश्र्चकर्थ यदिदं पुरूहुतं रूपं तेनेश निर्वृतिमवापुरलं दृशो न: |
| तस्मा इदं भगवते नम इद्विधेम योऽनात्मनांदूरूदयो भगवान् प्रतीत: ||५०||
भावार्थः---हे विपुलकीर्ते परमेश्वरा,तूं हे जे आम्हांपुढे प्रगट केले आहेस,त्याच्यायोगाने आमच्या दृष्टींना अतिशय सुख झाले.आणि जो तूं विषयासक्त पुरुषांना दर्शन होण्यास अशक्य असून आमच्या दृष्टीस पडलास त्या तुज भगवंताला हा आम्ही नमस्कार करितो.असे म्हणून त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार घातला.भगवंत विषयासक्त पुरुषांना दर्शन देत नाही,कारण जेथे विषय असतात,तेथे भगवंत नसतो व जेथे विषय नसतात तेथे भगवंत असतो.म्हणून आपण सर्व विषयांचा त्याग करून भगवंतंच घ्यावा,कारण विषय दु:खरूप आहेत व भगवंत सुखरूप आहे.आपणांस सुखरुपतेची गरज आहे.म्हणून आपण सदैव भगवंतांस—संत—माहात्म्यास साष्टांग नमस्कार करावा.||५०|| याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा पंधरावा(१५)अध्याय पन्नास(५०)श्लोकांनी समाप्त झाला. ||||| || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसादागुरुचाराणार्पणमस्तू ||
_________________________________________________________________________________________ १६--- असा पश्चाताप झालेल्या त्या ब्राह्मणाचे हरीने सांत्वन केले असता,त्यांनी जयविजयास असुरस्वभाव प्राप्त झाला असूनहि त्यांवर अनुग्रह केला,ही कथा सोळाव्या अध्यायांत वर्णिली आहे. | १६---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---भगवंतांचा वराह अवतार---[जय---विजय यांचे वैकुंठातून पतन] ___________________________________________________________________________________________ | इति तद् गृणतां तेषां मुनीनां योगधार्मिणाम् | प्रतिनन्द्द जगादेदं विकुन्ठनिलयो विभु: ||१||
भावार्थः----ब्रहमदेव म्हणाला---हे देवहो,योगधर्माचरण करणारे ते ऋषि,याप्रमाणे भाषण करीत असतां,त्याचे ते भाषण अंगीकारून वैकुंठवासी भगवान असे म्हणाला की,------------------||१|| | एतौ तौ पार्षदौ मह्यं जयो विजय यवच | कदर्थीकृत्य मां यव्दो बह्वक्रातामतिक्रमम् ||२||
भावार्थः----श्रीभगवान म्हणाले---हे ऋषिहो,ते हे जय आणि विजय माझे पार्षद आहेत.ज्यांनी मला न जुमानितां तुमचा मोठा अपराध केला.||२|| | यस्त्वेतयोर्धृतो दण्डो भवद्भीर्मामनुव्रतैः | स एवानुमतोsस्माभिर्मुनयो देवहेलनात् ||३|| भावार्थः----हे ऋषि हो,तुम्ही तर माझे भक्त असल्यामुळे मत्स्वरूपीच आम्हा.म्हणून तुमचा अपमान झाला तो माझाच अभिप्रायाला अनुसरणाऱ्या तुम्ही यांना जो दंड धारण केला तोच आम्ही मान्य केला.आपल्या सेवकांना अपराधामुळे दंड दिला तर स्वामींनी तो दंड मान्य करावयास पाहिजे,कारण दंड दिल्याने पुन्हा अपराध होत नसतो.||३|| | तद्वः प्रसाद्याम्यद्द ब्रम्ह दैवं परं हि मे | तद्धीत्यात्मकृतं मन्ये यत्स्वपुम्भिरसत्कृताः ||४|| भावार्थः---कारण,ब्राहमण हेच माझे परम दैवत आहे.जो माझ्या सेवकांनी तुमचा अनादर केला तोहि मीच केला असे मी समजतो,आणि त्याबद्दल तुझ्यापाशी क्षमा मागतो.म्हणून आपणही भगवंत यांनी ज्याआर्थी सेवकांनी केलेला पराध म्हणजे मीच अपराध केलेला आहे असा भाव धारण केला,त्याचाप्रमाणे आपल्या संबंधिताने केलेला अपराध म्हणजे मीच अपराध केला असे समजावे.||४|| भावार्थः----कारण,सेवकाने अपराध केला असतां,लोक त्याच्या धन्याची नवे ग्रहण करितात.ते लोकांचे निंदावचन,’जसा श्वेतकुष्ठ रोग त्वचेचा नाश करितो त्याप्रमाणे’ त्या स्वामींच्या कीर्तीस दुषण लाविते.||५|| भावार्थः----ज्या माझ्या अमृतरूप निर्मल यशाच्या श्रवणाविषयी मनाचा प्रवेश झाला असतां,तो चांडाळसुद्धां सर्व जगाला तत्काळ पवित्र करितो,तो वैकुंठनिवासी मी तुमच्याच योगाने अत्युत्तम प्राप्त झालो आहे,यास्तव तुमच्याशी प्रतिकूल वागणाऱ्या आपल्या स्वतःच्या बाहुलासुद्धा मी छेदून टाकीन,मग इतरांची कथा काय!||६|| भावार्थः---ज्या ब्राहमणाच्या सेवेने चरणकमलाचेठिकाणी पवित्र रेणु धारण करणारा,तत्काळ सर्व लोकांचे पाप दूर करणारा व सुस्वभावाने युक्त अशा मला,’जिच्या कृपादृष्टीच्या लेशाकरितां ब्रह्मादिक देव व्रतादिकांचे आचरण करितात ती’ लक्ष्मीही सोडून राहत नाही.||७|| | नाहं तथादनी यजमानहविर्वीताने श्चयोतदघृतप्लुतमदन हुतभुन्मुखेनं | | यद्ब्राह्मणणस्य मुखत श्चरतोSनुधासं तुष्टस्य मययवहितैर्निजकर्मपाकै:।।८।। भावार्थः----शिवाय माझी दोन मुखे आहेत,एक अग्नि व दुसरे ब्राहमण.त्यांत ब्राहमण हेंच माझे मुख मुख्य होय.कारण,माझ्याठिकाणी आपली सर्वही कर्मफले अर्पण करून संतुष्ट असलेल्या व गळत असणाऱ्या घृताने व्याप्त अशा अन्नादिकांचा प्रत्येक ग्रास रसास्वादपूर्वक भक्षण करणाऱ्या ब्राहमणाच्या मुखाने जसा मी संतुष्ट होतो,त्याप्रमाणे यज्ञामध्ये यजमानाने अर्पण केलेले घृतातादिक होमद्रव्य अग्नीमुखाने भक्षण करीत असतांही मी संतुष्ट होत नाही.भगवंत यज्ञामध्ये घृतादिक होमद्रव्य टाकल्याने तेवढा संतुष्ट होत नाही,कारण जेवढा ब्राह्मणांना खावू घातल्याने अधिक संतुष्ट होतो,कारण ब्राह्मण हे कर्म व कर्मफल मला—भगवंतांना अर्पण करितात.तसेच त्यांच्याशिवाय यज्ञ संपन्न होऊ शकत नाही.म्हणून ते मुख्य आहेत.म्हणून भगवंत अधिक संतुष्ट होतो.म्हणून आपण—जीवानी निष्काम परमार्थ करावा,तर सकाम परमार्थ करू नये.||८|| भावार्थः----आणि ज्या माझी अखंड व अप्रतिहत अशी योगमायासंबंधी आणिमादी अष्टैश्वर्यसंपन्न आहे आणि ज्याचे पादोदक शंकरासहित सर्व लोकांना तत्काळ पवित्र करते तो मी,आपल्या किरीटांनी ज्यांचे पवित्र चरणरज धारण करितो,त्या ब्राहमणाचे कर्म कोण सहन करणार नाही,तर सर्वांनीही सहन केलेच पाहिजे.||९|| भावार्थः---आणि पातकामुळे ज्यांची विवेकदृष्टी नष्ट झाली आहे असे जे लोक.माझे शरीरभूत जे श्रेष्ठ ब्राहमण,दुध देणाऱ्या गाई आणि अनाथ प्राणी यांना माझ्याशी भेददृष्टीने अवलोकन करितात त्यांना,मी अधिकार दिलेल्या यमाचे गृधरुपी दूत,सर्पाप्रमाणे क्रुद्ध होऊन आपल्या चोचेंनी फाडून टाकितात.आपण—जीवानी विवेकदृष्टीने कोणताही भेददृष्टीने न पाहता अभेददृष्टीने पहावे,कारण भेददृष्टी दु:खास कारण आहे व अभेददृष्टी सुखाला कारण आहे.||१०|| भावार्थः----तसेच जे लोक,निष्ठुर भाषण करणाऱ्याहि ब्राहमणाचे प्रसन्न अंतःकरणाने वासुदेवबुद्धीने पूजन करून हास्यरूप अमृताने सेवन केलेल्या कमलासारख्या प्रफुल्लीत मुखाने युक्त होत्साते,प्रेमयुक्त मधुरवाणीने स्तुति करितात आणि पिता जसा आपल्या मुलांचे सांत्वन करितो त्याप्रमाणे सांत्वन करितो त्याप्रमाणे सांत्वन करितात,व मी जशी भृगुऋषीला पूर्वी संबोधने दिली आहेत तशी भक्तिपूर:सर संबोधने देतात,त्यांनी मलाच वश केले आहे असे समजावे.||११|| भावार्थः---तस्मात् ह्या द्वारपालांनी आपल्या धन्याचा (माझा)ब्राह्मणाविषयीचा हा अभिप्राय लक्षांत न आणिता तुमची अवज्ञा केली आहे म्हणून हे अपराधास योग्य अशा दुर्गतिला तत्काल पावोन पुनः माझ्याजवळ येवोत.माझ्या सेवकांचा प्रवास लौकरच संपो.असे झाले असतां,तो माझ्यावर आपला मोठा अनुग्रहच होईल.||१२|| भावार्थः----ब्रहमदेव म्हणाला----हे देवहो,याप्रमाणे त्या भगवंताच्या,ऋषिकुलाला योग्य आणि सुंदर अशा दिव्य वाणीचे रसास्वादपूर्वक ग्रहण करून,क्रोधाचे व्याप्त असलेल्याही त्या सनकादिक ऋषीच्या मनाची तृप्ति झाली नाही.||१३|| भावार्थः----महत्त्वसूचक,थोडक्या अक्षरांनी युक्त,अर्थदृष्टीने पाहुं गेले असतां फार बिकट,अभिप्रायाने खोल व अर्थाने गंभीर अशी ती देवाची वाणी सनकादिकांनी कान देऊन ऐकिली व तिचा विचार केला परंतु काय हा आमचे अभिनंदन करितो किंवा निंदा करितो,अथवा आम्ही केलेल्या दंडाचा संकोच करितो याबद्दलचा भगवंताचा अभिप्राय त्यांना समजला नाही.||१४|| भावार्थः----नंतर काही वेळाने आपले अभिनंदन करितो असे जाणून हर्षयुक्त व अंगावर रोमांच धारण करणारे ते ऋषि,हस्त जोडून,योगमायेने आपल्या परमैश्वर्याचा उत्कर्ष ज्याने प्रकट केला आहे अशा त्या भगवंताला म्हणाले की,--------------||१५|| भावार्थः---ऋषि म्हणाले----हे षडगुनैश्वर्यसंपन्न देवा,तूं सर्वेश्वर असुनहि,तुम्ही माझ्यावर अनुग्रह केला परम दैवत ब्राहमणच आहेत,असे जे तूं प्रसिद्ध करितोस ते लोकशिक्षेकरितां आहे यांत संशय नाही.वस्तुतः पहिले असतां देवांनीही पूज्य अशा ब्राहमणाचा आत्मा आणि आराध्य दैवत असा षडगुनैश्वर्यसंपन्न तूंच आहेस.||१७|| भावार्थः----कारण,वेदप्रतिवाद्य जो अनादि धर्म तो तुझ्यापासूनच उत्पन्न झाला आहे,तुझ्याच अवतारांनी त्यांचे रक्षण होते व त्या धर्मामध्ये गुप्त,मुख्य फलरूप निर्विकारी तूंच आहेस असे सर्व श्रुतीनाहि मान्य आहे.||१८|| भावार्थः---कारण,ज्या तुझ्या अनुग्रहाने योगिजन,संसारांतून निवृत्त होऊन अनायासाने तरून जातात,त्या तुझ्यावर इतरांनी अनुग्रह करणे हे काय म्हणावे ! हे मुळीच संभवत नाही.||१९|| भावार्थः---ऐश्वर्यादिकांची इच्छा करणाऱ्या इतर ब्रहमदिकांनी जिचे चरणरज आपल्या मस्तकी धारण केले आहे,ती लक्ष्मीहि ,पुण्यवान पुरुषांची तुझ्या चरणाचे ठिकाणी अर्पण केलेल्या नव्या तुळसीच्या माळेवर बसणाऱ्या श्रेष्ठ स्मरांची जागा आपणास मिळावी अशी इच्छा धरूनच कि काय तुझी निरंतर सेवा करिते.त्याप्रमाणे—लक्ष्मी प्रमाणे आपण—जीवानी भगवंतांची निरंतर सेवा करावी.||२०|| भावार्थः---परंतु महाभगवद्भक्ताचे ठिकाणी निःसीम प्रेम ठेवणारा जो तूं,आपल्या निर्दोष आचरणांनी सेवा करणाऱ्या त्या लक्ष्मीचाही फारसा मान ठेवीत नाहीस,त्या सर्व ऐश्वर्याचे आश्रयस्थान व परम शुद्ध अशा तुला,मार्गामार्गाचे ठिकाणी लागलेले ब्राहमणाचे चरणरज व श्रीवत्सलांछन हि पवित्र करितात काय ! नाही करीत.तथापि तूं ती भूषणत्वेकरून स्वीकारिली आहेस.तेव्हा सर्व तुझे भाषणादिक लोकशिक्षेकरितां आहे यांत संशय नाही.||२१|| | धर्मस्य ते भगवतस्त्रियुग त्रिभिः स्वैः | पद्धिश्चराचरमिदं द्विजदेवतार्थम् | | नूनं भृतंतदभिघाति रजस्तमश्च | सत्त्वेन नो वरदया तनुवा निरस्य ||२२|| भावार्थः---हे षडगुनैश्वर्यसंपन्ना,धर्मरूप धारण करणाऱ्या तुझ्या विशेष महिम्याने युक्त अशा तप,शौच आणि दया ह्या तीनचरनांनीच नाशक जे रजोगुण व तमोगुण त्यांचा निरासकरून ब्राम्हण व देव ह्यांच्या करितांच ह्या चराचर विश्वाचे रक्षण केले आहे||२२|| भावार्थः---हे देवा,धर्मरुपी तूं,जर स्वतः रक्षण करण्यास योग्य विशेष महिम्याने युक्त अशा तप,शौच आणि दया तीन चरणांनीच आम्हांला अमिष्ट वर देणाऱ्या आपल्या शुद्धसत्वात्मक मूर्तीने म्हणजे त्या त्या प्रसंगी स्वेच्छेने धारण केलेल्या त्या त्या अवताराच्या योगेकरून,धर्मचरणांचे नाशक जे रजोगुण व तमोगुण त्यांचा निरासकरून ब्राहमण व देव ह्यांच्या करितांच ह्या चराचर विश्वाचे रक्षण केले आहे.||२२|| भावार्थः----हे देवा,धर्मरुपी तूं,जर स्वतः रक्षण करण्यास योग्य अशा ब्राहमण कुलाचे,प्रिय भाषणयुक्त संभावनेच्या योगाने रक्षण करणार नाहीस तर त्याचवेळी तूं प्रवृत्त केलेला,सर्वांचे कल्याण करणारा,वेदोक्त धर्ममार्ग,नाहीसा होईल,कारण,श्रेष्ठ पुरुषाचे जे आचरण जे तेंच इतर लोक प्रमाणबुद्धीने ग्रहण करीत असतात,म्हणजे तूं ब्राह्माणांची स्तुति व संभावना करण्याचे सोडून दिलेस तर तोच मार्ग सर्व लोकांनी स्वीकारिला जाईल.आपण—जीव श्रेष्ठ असाल तर आपण स्वधर्मांचे पालन करावे,कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करीत असतात.आपण—जीव जर कनिष्ट असुत तर आपण श्रेष्ठांचे अनुकरण करावे.थोडक्यात सर्वांनीच आपापल्या स्वधार्मांचे पालन करावेच.||२३|| भावार्थः----हे देवा,लोकांचे कल्याण करावे अशी इच्छा धरण करणारा,राजे वगैरे आपल्या शक्तीच्या योगाने अधर्माचा नाश करणारा व सत्त्वगुणाचे निधानच अशा तुला जे वेदमार्ग भ्रष्ट होणे हे अगदीच अनिष्ट आहे,एतावता धर्माच्या रक्षणाकरितां ब्राहमणाचे ठिकाणी तूं नम्र झालास म्हणून,त्रिगुणाचा नियंता व विश्वपालक अशा तुझ्या तेजाची हानि होत नाही.कारण,ते नमस्कार करणेवगैरे सर्व कृत्य तुझा विनोद (लोकशिक्षार्थ)आहे.||२४|| भावार्थः----यास्तव हे सर्वेश्वरा,तूं या दोघां द्वारपालांस जो वाटेल तो दंड कर किंवा अधिक जीविका(देणगी)दे,त्याला आम्ही अनुमोदन देतो,अथवा निरपराधी अशा तुझ्या द्वारपालांना आम्ही शाप दिला म्हणून आम्हांला जो योग्य दंड करणे असेल तोहि करावा.||२५|| |श्रीभगवानुवाच | एतौ सुरेतरगतिं प्रतिपद्द सद्दः संरम्भसम्भृतसमाध्यनुबद्धयोगौ | | भूयः सकाशमुपयास्यत आशु यो वः शापो मयैव निमितस्तदवैत विप्राः ||२६|| भावार्थ:---श्रीभगवान म्हणाले----हे विप्रहो,जो तुम्ही यांना शाप दिला तो मीच निर्माण केला असे तुम्ही समजा.हे दवारपाल,लौकरच दैत्य-योनीला पावोन,तेथे माझ्याठीकानी क्रोधावशाने वृद्धिंगत झालेल्या चित्ताच्या एकाग्रतेने ज्याने योगसाधन दृढ झाले आहे असे होऊन पुन्हा लौकरच माझ्याजवळ(या वैकुंठलोकी)येथील.||२६|| भावार्थ:----ब्रहमदेव म्हणाला----हे देवहो,नंतर त्या ऋषिनी,नेत्रांना आनंद उत्पन्न करणनाऱ्या श्रीहरीला व त्यांचे राहण्याचे स्थान अशा स्वयंप्रकाश वैकुंठलोकाला अवलोकन करून,भगवंताला प्रदिक्षणा करून,नमस्कार करून व त्याच्या निरोप घेवून हर्षयुक्त होत्सात ते ऋषी,विष्णूच्या त्या संपत्तीची प्रशंसा करीत करीत आलेल्या मार्गाने परत गेले.||२७-२८|| भावर्थ:----इकडे भगवान विष्णू,आपल्या सेवकांना म्हणाला कि,जा;तुम्ही कांहीं भिवू नका;तुमचे कल्याण असो,कर्तुं,अकर्तुं,व अन्यथाकर्तुं समर्थ असाही मी ब्राहमणांच्या शापाने निरसन करण्याविषयी इच्छित नाही.कारण तो शाप मला मान्य आहे.(या सर्व गोष्ठीचा अभिप्राय असा की,-जरी सनकादिकांना क्रोध येण्याचा संभव नाही,भगवंताचे पार्षद प्रतिकूल वागावयाचे नाहीत,भगवान आपल्या भक्तीची उपेक्षा करणार नाही व वैकुंठवाशी लोकांना पुनर्जन्म नाही,यथापि भगवंताला सृष्टी करण्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाळी युध्द करण्याची इच्छा प्राप्त झाली,तेव्हा इतर सर्व अल्पबली असल्यामुळे आपले पार्षद मंडळी असूनही ते शत्रुत्व पतकारणार नाहीत म्हणून त्यांनाच ब्राहमणाच्या निवारणाविषयी पृवृत्त करून,व ब्राम्हणाचे ठिकाणी क्रोधाचे उद्दीपन करून त्यांच्या शापमिषाने पर्षदानां शत्रू करून युद्धकौतुक संपादन करावे असा भगवंतानेच निश्चय केला होता.म्हणून हि सर्व गोष्ट घडून आली आहे.व भगवंताने,मीच शाप निर्माण केला,भिवू नका,कल्याण असो,शापाचे निरसन करण्याविषयी मी इच्छित नाही,तो मला मान्य आहे इत्यादिक भाषण केले.||२९|| भावार्थ:---हे द्वारपालहो,पूर्वी एकेकाळी मी निजलो असता,आंत येणाऱ्या लक्ष्मीला तुम्ही जेव्हा दारावर प्रतिबंध केला होता,तेव्हाच रागावलेल्या त्या लक्ष्मीने असे भविष्य करून ठेविले होते की,”तुम्ही असाच ब्राहमणांना प्रतिबंध कराल तेव्हा ते तुम्हाला शाप देतील.म्हणून हि गोष्ठ घडून आली”.म्हणून आपण कोणाचाही अपराध करू नये,त्या अपराधाचे फळ आज किंवा उद्दा,वर्तमान जन्मी किंवा पुढील जन्मात भोगावे ज्याची—त्याला भोगावे लागतेच.म्हणून आपण आपल्या स्वधर्मांचेच पालन करावे.||३०|| | मयि संरम्भयोगेन निस्तीर्य बब्रम्हहेलनम् | प्रत्यष्यतं निकाशं मे कालेनाल्पीयसा पुनः ||३१|| भावार्थ:---असो,तुम्ही माझेठीकानी विरोधभक्ती केल्याने ब्राह्माणाच्या शापाला तरुण थोड्याच कालाने माझ्या समीप पुन्हा प्राप्त व्हाल.||३१|| भावार्थ:----याप्रमाणे भगवंताने द्वारपालास आज्ञा करून विमानाच्या पंक्तिनी भूषित व सर्व लोकांपेक्षा अतिशय शोभेने युक्त अशा आपल्या गृहामध्ये प्रवेश केला.||३२|| भावार्थ:---नंतर ते देवश्रेष्ठ द्वारपाल त्या दुस्तर ब्रहमशापाने वैकुंठलोकापासून पतन पावू लागले तेव्हा त्यंचे सौदर्य नाश झाल्यामुळे ते गर्वरहित झाले.कोणीही असो,त्याची अधोगती झाली असेल तर तो गर्वरहित होत असतो.म्हणून आपण प्रारब्धवशात अधोगती झाली असेल आपण धीर धरून त्या अधोगतीस भोगावे,दु:खी होऊ नये,कारण त्या अधोगातीमुळे आपला अहंकार कमी होत असतो किंवा नाहीसा होत असतो.अहंकार कमी किंवा नाहीसा झाला असता परत्म्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होत असतो.||३३|| भावार्थ:----हे देवहो,तेव्हा ते वैकुंठस्थानापासून खाली पडू लागले असता,मोठमोठ्या विमानामध्ये बसून संचार करणाऱ्या वैकुंठवाशी लोकामध्ये मोठा हाहाकार झाला.||३४|| | तावेव ह्यधुंना प्राप्तौ पार्षदप्रवरौ हरे: | दितेर्जठरनिर्विष्टं काश्यपं तेज उल्बणम् ||३५|| भावार्थ:----हे देवहो,तेच हरीचे श्रेष्ठ पार्षद,सांप्रतकाळी दितीच्या उदरामध्ये प्रविष्ठ झालेल्या कश्यपऋषीच्या भयंकर विर्याला मिळून राहिले आहेत.||३५|| भावार्थ:----त्या आवळ्या-जावळ्या दोन्ही दैत्याच्या तेजानेच आज तुमचे तेज फिके पडले आहे.तेथे उपाय करणे आमच्या स्वाधीन काही राहिले नाही,यावेळी भावनाच तसे करण्याची इच्छा करीत आहे. ||३६||
| विश्वस्य यः स्तिथिलयोद्भवहेतुराद्दो योगेश्वरैरपि दुरत्यययोगमायः | | क्षेमं विधास्यति स नो भगवांस्त्र्यधीश स्तत्रास्मदीयविमृशेन कियानिहार्थः ||३७|| भावार्थ:----यास्तव,सत्व,राज,आणि तम या तीन गुणांचा नियंत असल्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीस्थितीलयांना कारण आणि योगेश्वराणीही ज्यांच्या योगमायेचे उल्लंघन केले जात नाही,तो पुराणपुरुष भगवानच या प्रसंगी आमचे कल्याण करील.त्याविषयी आमच्या विचाराचा काय उपयोग होणार आहे?कांहीच होणार नाही.||३७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये सोळावा(१६)अध्याय सदोतीस(३७)श्लाकांनियुक्त समाप्त झाला. || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ १७---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---भगवंतांचा वराह अवतार---[हिरण्यकशपू आणि हिराण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय] | आतां सतराव्या(१७)अध्यायांत त्या दोघा पुत्रांचे लोकभयंकर जन्म सांगून त्यांत कनिष्ट जो हिरण्याक्ष त्याने दिग्विजयाचे केलेला अद्भुत पराक्रम वर्णन केलेला आहे. ____________________________________________________________________________________________|मैत्रेय उवाच:---
| निशम्यात्मभुवा गीतं कारणं शङ्कयोज्झिता: | तत: सर्वे न्यवर्तन्त त्रिदिवाय दिवौकस: ||१||
भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा याप्रमाणे दितीच्या ग्रभोत्पत्तीचे कारण ब्रह्मदेवाने सांगितले.ते श्रवण करून भयशंखेने रहित असे ते सर्वही देव,तेथे तेथून स्वर्गाला माघारे आले.||१|| | दितिस्तु भर्तुरादेशादपत्यपरिशन्किनी | पूर्णे वर्षशते साध्वी पुत्रौ प्रसुषुवे यमौ ||२|| भावार्थ:----इकडे आपल्या पतीच्या सांगण्यावरून आपल्या मुलापासून देवांना उपद्रव होईल अशी शंका मनात बाळगणारी ती पतिव्रता दिती,शंभर वर्षे पूर्ण झाली असता,जुळ्या दोन मुलास प्रसवली.||२|| भावार्थ:----ज्या वेळी ते हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू,जन्माला आले त्या वेळी,स्वर्गात पृथ्वीवर व आकाशात,लोकांना अतिशय भय उत्पन्न करणारे पुष्कळ उत्पात झाले.||३|| भावार्थ:----ते असे कि,----पर्वतासहित भूमीचे प्रदेश कंपायमान होऊ लागले,सर्व दिशा प्रज्वलित झाल्यासारख्या दिसू लागल्या,अंगारासाहित विजा पडू लागल्या,आणि अरिष्टसूचक धुमकेतू आकाशामध्ये उगवले.||४|| भावार्थ:----वावटळरुपी सैन्याने व रज:कणरुपी ध्वजाने युक्त,मोठमोठ्या वृक्षांना उपटून पडणारा,अंगास झोंबणारा व फुत्कार(सोसाट्याचे शब्द)उच्चारणारा असा वारा वारंवार वाहू लागला.||५|| भावार्थ:---अतिहास्य केल्यासारखा विजांनी युक्त मेघसामुहाने,सुर्यादिकाचा प्रकाश नष्ट झालेल्या आकाशामध्ये,दाट अंधकार भरून गेला असल्यामुळे कोणासही तिळभरसुद्धा जागा मोकळी दिसेनाशी झाली.||६|| भावार्थ:----समुद्र,एखाद्या खिन्नचित्त झालेल्या पुरुषासारखा घाबरून गरजू लागला!त्याच्या लाटा उंच उंच उसळू लागल्या!व त्याच्या पोटातील मगरादिक जलजंतू खवलुन गेले! तलाव विहिरी इत्यादिकासाहित नद्या,गढूळ झाल्या व त्यातील कमळे शुष्क झाली.||७|| भावार्थ:---आकाशात राहुग्रस्त झालेल्या चंद्र्सुर्यानी वारंवार खळी पडू लागली.निरभ्र असलेल्या आकाशात भयंकर गर्जना व पर्वताच्या गुहातून,रथाच्या घडघडाटशब्दासारखे ध्वनी होवू लागले.||८|| भावर्थ:----गावामध्ये शिरून,मुखातून भयंकर अग्नीचे वमन करणाऱ्या भालवा,अरिष्ठसूचक ओरडू लागल्या.त्यांच्या बरोबर कोल्हे आणि घुबडे हि कठोर शब्द करू लागली.||९|| भावार्थ:---तसेच जिकडे-तिकडे श्वान,आपल्या माना उंच व लांब करून,केव्हा गायन केल्यासारखे केव्हा रडल्यासारखे अनेकप्रकार ओरडत फिरू लागले.||१०|| भावार्थ:----हे विदुरा,उन्मत्त झालेल्या गर्दभाच्या झुंडीच्या झुंडी,आपल्या जातीप्रमाणे कर्कश शब्दांनी ओरडत व आपल्या कठोर खुरांनी पृथ्वीला ताड करीत सैरावैरा धावू लागल्या.||११|| भावार्थ:---त्या गर्दभाच्या शब्दांनी भय पावलेले पक्षी,रडत रडत आपल्या कोठ्यातून उडून जावू लागले.आणि गोठ्यातील व अराण्यांतील गाई-वगैरे पशु,त्या गर्दभाच्या कठोर गर्जनेने भयभीत होऊन मालामूत्रांचे विसर्जन करू लागले.||१२|| भावार्थ:----गाई भयभीत झाल्या आणि त्यांच्या कासातून रक्तस्त्राव होवू लागले.मेघ पुवाचा वर्षाव करू लागले.देवांच्या मूर्तीपासून अश्रुपात होवू लागला,वारा नसता वृक्ष आपोआप मोडून पडले.||१३|| भावार्थ:----विशेष उत्तेजन आलेले शानिमंगलादिक पापग्रह,शुभकारक गुरुबुधादिक ग्रहाचे उल्लंघन करून जावू लागले आणि ते वक्रगतीने पुनः मागे फिरून परस्पर युध्द करू लागले.||१४|| भावार्थ:----हे सांगितलेले व इतरही मोठेमोठे झालेले उत्पात अवलोकन करून त्यांचे कारण न जाणणाऱ्या ‘सनकादिक ब्रहमपुत्रांवांचून’ इतर सर्व प्रजा भिवून गेल्या आणि जगाच्या प्रलय आतां होणार का काय!असे त्यांनी मानिले.आपणही कोणते तरी कार्य करीत असतांना यापैकी किंवा इतर कोणतेही अपशकून होत असतीलकी,समजावे आपल्यालाही कांही तरी प्रतिकूलता येउन दू:खाचा प्रसंग ओढवणार आहे.अशा प्रांगाच्या वेळेस आपण ते कार्य करू नये,तर भगवंतांचा नामौच्चार करावा.||१५|| | तावादिदैत्यौ सहसा व्यज्यमानात्मपौरुषौ | ववृधातेsश्मसारेण कायेनाद्रिपती इव ||१६|| भावार्थ:---इकडे ते दोघे आदिदैत्ये उत्पन्न झाल्याबरोबर त्यांचा पूर्वसिध्द पराक्रम व्यक्त होवू लागला आणि ते लोहातुल्य शरीराने एकाएकी मोठ्या पर्वताप्रमाणे वाढू लागले.||१६|| भावार्थ:---पुढे थोड्याच वेळाने आपल्या सुवर्णमय किरीटांच्या अग्रांनी स्वर्ग लोकाला स्पर्श करणारे,शरीराच्या विशालतेने दिशा व्यापून टाकणारे,भुजांचे ठिकाणी दैदिप्यमान बाहुभूषणे धारण करणारे आणि पदोपद आपल्या पायांनी पृथ्वी कंपित करणारे,असे ते आदिदैत्य,कमरपट्टा धारण केलेल्या आपल्या कटीप्रदेशानाने सूर्यमंडळाचे अतिक्रमण करून उभे राहिले.||१७|| | प्रजापतिर्नाम तयोरकार्षीद् यः प्राक् स्वदेहाद्दमयोरजायत | तं वै हिरण्यकशिपुं विदुः प्रजा यं तं हिरण्याक्षमसूत साग्रतः ||१८|| भावार्थ:---तेव्हा कश्यप ऋषीने त्या जुळ्या पुत्रांपैकी,जो आपल्या(कश्यपाच्या)देहापासून प्रथम गर्भ राहिला होता त्यांचे हिरण्यकाशीपू असे नाव ठेविले आणि ती दिती ज्याला प्रथम प्रसवली त्यांचे हिरण्याक्ष असे नाव ठेविले त्याचप्रमाणे लोक त्यांना म्हणू लागले.||१८|| भावार्थ:---हिरण्यकाशिपुने ब्रहमदेवापासून आपल्याला कोठूनही मृत्यू नसावा असा वर मिळविला,त्याचा योगाने तो उन्मत्त होवून त्यांचे आपल्या बाहुबलाने इंद्रादि पालकासहवर्तमान तिन्ही लोक स्वाधीन करून घेवून-----||१९|| भावार्थ:---त्याचा आवडता धाकटा भावू जो हिरण्याक्ष,तो नेहमी हिरण्यकशिपू,प्रीती संपादन करीत असे.तो एकेवेळी युध्द करण्याचा इच्छेने हातामध्ये गदा घेवून रणमंडळाच्या शोधा करीत स्वर्ग लोकास गेला.||२०|| भावार्थ:----ज्याचा वेग फार दु:सह आहे,ज्याच्या पायात असलेले सोन्याचे नुपूर,खुळखुळ वाजत आहेत;ज्याने वैजयंतीनामक मला आपल्या कंठामध्ये धारण केली आहे,ज्याने खांद्यावर एक मोठी गदा ऐटीत ठेवली आहे,जो शोर्य शरीरबल आणि ब्रहमदेवाचा वर यांच्या योगाने गर्विष्ठ असून अनावर व निर्भर झाला आहे अशा त्या हिरण्याक्षाला पाहून भयभीत झालेले देव,जसे गरुडापासून भ्यालेले सर्प,जागा मिळेल तेथे लपून राहतात,त्याप्रमाणे राहिले.||२१-२२|| भावार्थ:----त्याकाळी तो दैत्यराज,इंद्रासहवर्तमान सर्व देव,आपल्या तेजाने(धाकाने)गुप्त झाले असे पाहून देवामध्ये आपल्या बरोबर युध्द करणारे मात्त्वीर कोणीच नाही असे पाहता होत्सात मोठ्याने गर्जना करणाऱ्या अपरंपार समुद्राला मदोन्मत गजासारखा गढूळ करू लागला ||२३|| भावार्थ:---याप्रमाणे तो समुद्रामध्ये प्रविष्ठ होताच वरुणाच्या सेनेत असलेले सर्व जलचर प्राणी भयभीत झाले व त्यांना काही सुचेनासे झाले.त्यांने कोणाला देखील मारले नाही तत्रापि त्याच्या तेजानेच ते दिपावल्यासारखे होवून फारच दूर पळून गेले.||२४|| भावार्थ:---बा विदुरा,असा तो महाबली हिरण्याक्ष,अनेक वर्षेपर्यंत समुद्रात फिरत असून वायुने उत्पन्न झालेल्या मोठमोठ्या लहरीवर तीक्ष्ण लोहमय गदेच्या योगाच्या वारंवार ताडन करीत असता काही काळाने वरुणाच्या विभावरी-नामक राजधानीस जावून पोंचला.||२६|| भावार्थ:---तेथे पाताललोकाचा अधिपती,जलचर गणांचा श्रेष्ठ राजा वरून होता.त्यजजवळ तो जावून त्याची चेष्ठा करण्याकरिता त्याला हलक्या जातीच्या मनुष्याप्रमाणे नमस्कार करून हंसत हंसत म्हणाला की,हे राजाधिराज,मला युद्धदान दे.ज्याच्या ठिकाणी आपल्या सामर्थेचा अभिमान झालेला असेल तो आपणहून प्रतिकूलता निर्माण करून दु:खास पात्र होत असतो.म्हणून आपण—जीवानी आपल्यामध्ये जे समर्ठेकिंवा वैभव असेल त्याचा अभिमान धारण न करिता त्या समर्थेचा किंवा त्या वैभवाचा सादौपयोग करावा म्हणजे दुसर्याचे दु:ख हरण करून सुख देण्याचा आवश्य यत्न करावा.यामुळे आपण सुखरुपतेकडे जात असतोत.||२७|| भावार्थ:----हे प्रभो वरुणा,तू लोकपाल,राजाधिराज असल्यामुळे,दुर्मदाच्या योगाने आपापल्या वीर असे मानणारे जे लोक आहेत त्यांचा वीर्यमद घालविणारा,आणि मोठा कीर्तिमान आहेस.कारण,तू पूर्वी एकेकाळी सर्व दैत्यांना व दानवांना जिंकून राजसुय यज्ञाच्या योगेकरून ईश्वराचे याजन केले होतेस.आपण वरुणासारखे जे दुर्मदाच्या योगाने ग्रस्त झालेले आहेत,अशांचा विर्यमद घालवावा.||२८|| भावार्थ:----अतिशय मदोन्मत्त झालेल्या त्या शत्रूने,अशा रीतीने अत्यंत उपहास केलेला तो भगवान वरून,प्राप्त झालेल्या क्रोधाचे आपल्या बुद्धीने स्तंभन करीत करीत म्हणाला की,------ बा हिरण्याक्ष,आम्ही आता युध्दवैगरे करण्याचे सोडून देवून स्वस्थ राहिलो आहो.ज्याला आपल्या सामार्थाचा किंवा वैभवाचा दुर्मद झालेला असेल व तो आपल्यापेक्षा सामार्थशाली असेल तर त्यास त्यापेक्षा सामार्थेशाली जो आहे,त्याच्याकडे पाठवून त्याचा सामार्थेशाली दुर्मद यास उतरवावयास पाहिजे.||२९|| | पश्यामि नान्यं पुरुषात्पुरातनाद् यः संयुगे त्वां रणमार्गकोविदम् | | आराधयिष्यत्यसुरर्षभेहि तं मनस्विनो यं गृणते भवादृशाः ||३०|| भावार्थ:----हे दैत्यश्रेष्ठा,युध्दमार्गामध्ये निपुण अशा तुला संतुष्ठ करील असा पुरण--पुरुष विष्णूखेरीज दुसरा कोणीच पुरुष,मला दिसत नाही:म्हणून तू त्याच्याकडे जा.तुझ्यासारखे शूर पुरुष त्यांची प्रसंशा करीत असतात.||३०|| | तं वीरमारादभिपद्द विस्मय: शयिष्यसे वीरशये श्र्वभिर्वृत्त: | | यस्त्वाद्विधानामसतां प्रशान्तये रूपानि धत्ते सद्नुग्रहेच्छयां ||३१|| भावार्थ:----जो तुझ्यासारखा दुष्ठ पुरुषाचा समूळ नाश करण्याकरिता आणि साधूंवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने अनेक प्रकारची स्वरूपे धारण करितो.तू त्या वीराच्या सन्निध गेलास कि,तत्काळ तुझा गर्व नाहीसा होवून,कुत्र्यांनी परीवेष्ठीत होत्सात तू रणभूमीवर शायन करशील(मरण पावशील)||३१|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हिरण्याक्षाच्या दिग्विजयाविषयींचा हा सत्रावा(१७)अध्याय एकतीस(३१) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ |१८--- नंतर पृथ्वीचा उद्धार करणारा वराहरूपी भागावान्-आणि हिरण्याक्ष दैत्य या दोघांचे इंद्रादि देवांस क्षोभ उत्पन्न करणारे जे महायुद्ध झाले तें या अठराव्या अध्यायांत वर्णन केले आहे. | १८---मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद---भगवंतांचा वराह अवतार---[हिराण्याक्षाबरोबर वराह भगवंतांचे युद्ध्य] _____________________________________________________________________________________________ | मैत्रेय म्हणतात:--- | तदेवमाकणर्य जलेशभाषितं महामनास्तद्विगणय्य दुर्मद:। | हरेर्वीदित्वाङगतिङग नारदाद रसातलं निर्विविशे त्वरान्वित:।।१।। भावार्थ:----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,’विष्णूच्या हातून युद्धात तू मरण पावशील’ असे ते वरुणाचे भाषण ऐकून मनात हर्ष पावलेला तो मदोन्मत्त हिरण्याक्ष,ते भाषण जमेस न धरीता,नारदऋषीपासून हरी मोठ्या त्वरेने तो रसातलामध्ये प्रविष्ठ झाला.जे मदोन्मत्त असतात,त्यांना “आपण मरणार असे न वाटता आपण त्यांना—प्रतीस्पर्धकांना मारणार” असा त्यांचा निश्चय असतो,कारण त्यांना आपल्या सामर्थेचा किवा वैभवाचा अभिमान आलेला असतो. ||१|| भावार्थ:----तेथे आपल्या दाढेच्या अग्राने पृथ्वीला वर काढून धारण करणारा,आसपास प्राप्त होणार्या सर्व वीरांस जिंकणारा आणि नेत्राच्या आरक्त कांतीने आपले(हिरण्याक्षाचे)तेज लुप्त करणारा अशा त्या वराहरूपी हरीला पाहून,तो हिरण्याक्ष दैत्य हास्य करून,म्हणाला की,----कायहो की,आश्चर्य हे ! वनांत संचार करणारा—उदकात शयन करणारा हा मृग—योगी ज्याचा शोध घेतात तो (वराह)येथे पाण्यात दिसत आहे!||२|| भावार्थ:---पुढे तो भगवंताला म्हणाला---हे अज्ञा—ज्याच्याहून दुसरा ज्ञाता नाही अशा सर्वज्ञा इकडे ये.या पृथ्वीला सोडून दे.ब्रहमदेवाने पातळवाशी आम्हां ओकांना दिली आहे.हे वराह स्वरूप धारण करणाऱ्या देवाधाम—ज्याच्याहून देव अधम आहेत अशा देवश्रेष्ठा मी पहात असता हिला घेवून तू हिच्यासहवर्तमान कल्याण पावणार नाहीस—नाहीस काय ? तर पावशिलच.||३|| भावार्थ:---आमच्या शत्रूंनी आमच्या नाशाकरिता—मोक्षाकरिता तुला पुष्ट—तुझा आश्रय केला आहे काय ? जो तू आमच्या परोक्ष जय—दूर राहूनच पाहिजे त्याला जिंकतोस,मिळविणारा होवून दैत्याने मारून टाकितोस,हे मूढा—हे मुढाप्रा म्हणजे मूढ लोकांवर देखील अनुग्रह करणाऱ्या योगमायेचेच---ज्याचे योगमायारूप अचिंत्य बल आहे,ज्यास बल आहे अशा अल्पपराक्रमी—ज्याच्यापुढे लोकांचे पराक्रम तुच्छ आहेत अशा तुला मारून---हृदयामध्ये भक्तीने स्थिर करून,मी आज आपल्या बांधवाच्या शोकाचे—संसार—दु:खाचे मार्जन करीन.आपणही भगवंतांना अंत:करणात निष्काम भक्तीने स्थिर करून आपल्या व इतर भक्तांचे संसार-दु:खातून निवृत्त करावे.||४|| भावार्थ:---आमच्या हातातून सुटलेल्या गदेने,मस्तक,फुटल्यामुळे---न फुटल्यामुळे तू मरण पावलास म्हणजे जे तुझी आराधना करितात ते ऋषी आणि देव,सर्व हि निर्मूळ होवून—मल--दोष,विक्षेप--दोष व आवरण दोषांचे आपोआप नाश पावतील,कारण तुझ्या समोर मला—हिराण्याक्षाला मरण येणार आहे.||५|| भावार्थ:----अशा शत्रूच्या दुर्भाषनृप तोम्ररांनी पिडीत झालेला तो भगवान वराह,आपल्या दंष्ट्राच्या अग्रावर असलेली पृथ्वी भयभीत झाली आहे असे पाहून,हिरण्याक्षाच्या दुर्भाषणाचे सहन करीत मगराने पिडीत झालेल्या हस्तीनिसहित गजाप्रमाणे उदाकातून बाहेर निघाला||६|| भावार्थः---तेव्हा जसा हत्तीच्या मागे मगर धांवत जातो त्याप्रमाणे पाण्यांतून बाहेर पडणाऱ्या त्या वराहाच्या मागून जाणारा,ज्याचे केस सुवर्णासारखे पिंगटवर्ण आहेत,ज्याच्या दाढा उंच आहेत,आणि ज्याचा शब्द वज्र पातासारखा कठोर आहे असा तो हिरण्याक्ष म्हणाला कि,निर्लज्ज अशा असत्पुरूषाना निंद्य असे काय आहे ?असत्पुरुषांना कांहीच निंद्द नसते,कारण ते तमोगुणी असतात--म्हणजे ते वेळ-प्रसंगी भयाने पळूनसुद्धा जातात.आपणमात्र तमोगुण निवृत्त करून निंद्द कर्म करू नये,कारण त्यामुळे अंत:करण अशुद्ध होते.त्यामुळे परमात्म्याकडे जाण्यास प्रतिबंध होतो.||७|| भावार्थः---नंतर त्या भगवंताने,उदकावर पूर्वीच्या योग्य स्थळी पृथ्वीला ठेवून,तिच्यामध्ये आपली आधारशक्ति ठेविली.आणि हिरण्याक्ष दैत्य पाहात असतां,हातांत मोठी गदा धारण करणारा,आंगांत अद्रुत कवच धारण करणारा आणि आपल्या दुष्ट भाषणांनी वारंवार मर्मभेद करणारा अशा त्या हिरण्याक्षाला,प्रचंड क्रोधाने युक्त अशा भगवंताने हंसत हंसत भाषण केले कि,------||९|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाला-----हे हिरण्याक्षा,आम्ही वनचारी मृण तर आहो खरे परंतु हल्ली तुमच्यासारख्या ग्रामसिंहांना (कुत्र्यांना)शोधीत आहो,हे अभद्रा,मृत्यूपाशांनी बद्ध झालेल्या तुझ्यासारख्याची आत्मस्तुति,आमच्यासारखे वीर पुरुष स्वीकारीत नाहीत.तामस व्यक्तींनी केलेली स्तुती सात्विकांनी स्वीकारू नये.||१०|| भावार्थः---हे आम्ही तुझ्यासारख्या रसतलांतील रहीवाश्याची पृथ्वीरुपी ठेव हरण करणारे,निर्लज्ज आहो म्हणून तूं गदेने आम्हांस पळविले आहेस.यास्तव आम्ही जरी युद्ध करण्यास असमर्थ आहो तथापि कसे तरी तुझ्यापुढे युद्धयाविषयी उभे राहिलो आहो.कारण,तुझ्यासारख्या बलिष्ठ पुरुषाशी वैर संपादन करून कोणीकडे जावे?त्यापेक्षा आम्हांस उभे राहणेच अवश्य आहे.||११|| भावार्थः---तूं पादचारी योध्याचा खरोखर अधिपती आहेस यास्तव निःशंकपणे आमच्या पराभवासाठी लवकर प्रयत्न कर.आणि आम्हांला सुह्रज्जनाच्या शोकाचे मार्जन कर.जो आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण करीत नाही तो पुरुष,असभ्य होय.आपण एखादी प्रतिज्ञा केली असेल तर ती पूर्ण करावी,कारण ती प्रतिज्ञा वंद्द होत असते व ती केलेली प्रतिज्ञा पूर्ण न केली तर निंद्द होत असते,त्यामुळे तिचे अनुकरण कोणी करीत नाही.||१२|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला----याप्रमाणे भगवंताने धिक्कार करून क्रोधाने त्या हिरण्याक्षाचा फारच उपहास केला तेव्हा डंवचून खेळावयास लावियेल्या महाभुंजगाप्रमाणे त्याने दुःसह क्रोध धारण केला.||१३||
| सृजन्नमर्शित:श्वासान्मन्यूप्रचलितेन्द्रिय: । आसद्ध्य तरसा दैत्यो गदयाभ्या हनद्धरिम ।।१४।। भावार्थः---त्यावेळी ज्यांची इंद्रिये क्रोधाने क्षुभित आहेत अशा क्रोधविष्ट होऊन श्वासोच्छ्वास टाकणाऱ्या त्या दैत्याने महावेगाने धांवून हरीच्या आंगावर गदेने प्रहार केला.||१४|| भावार्थः----जसा योगाभ्यास पूर्ण झालेला योगी आपल्या मृत्यूला चुकवितो त्याप्रमाणे शत्रूने वक्षस्थलाचेठिकाणी केलेला गदेचा प्रहार भगवंताने किंचित वक्र होऊन चुकविला.||१५|| भावार्थः----तदनंतर फिरून आपली गदा घेऊन ती वारंवार फिरविणारा व क्रोधाने अधरोष्ठ चालणारा अशा त्या हिरण्याक्षाच्या आंगावर रागावलेल्या हरीने धांव घेतली.||१६|| भावार्थः----हे विदुरा,नंतर प्रभूने आपल्या गदेने शत्रूच्या उजव्या भृकुटीवर प्रहार करण्यासाठी गदा फेंकली इतक्यात.गदायुद्धांत चतुर अशा त्या हिरण्याक्षाने ती गदा आपल्याजवळ येण्याच्या पूर्वीच आपल्या गदेने हाणून पाडिली.||१७|| भावार्थः---याप्रमाणे हिरण्याक्ष दैत्य व वराहरुपी भगवान हे उभयंता वीर,अतिशय क्रुद्ध आपआपणांस जय मिळविण्याच्या इच्छेने मोठ्या गदांनी परस्पर प्रहार करूं लागले असतां-------------||१८|| भावार्थः----ज्याप्रमाणे मत्त झालेल्या दोन वृषभांचे गाईकरितां परस्पर युद्ध होते त्याप्रमाणे परस्पर जिंकण्याच्या इच्छेने एकमेकांस स्पर्धा करणारे तीक्ष्ण गदांच्या योगाने ज्यांचे अवयव ठेचून गेले आहेत,जखमांतून वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने ज्यांचा क्रोध फारच वाढला आहे आणि अनेक प्रकारच्या गदायुद्धांच्या मंडळावर फिरणारे अशा त्या दैवदैत्यांचे पृथ्वीकरिता मोठे युद्ध झाले.||१९|| भावार्थः---हे विदुरा,ज्याचे अवयव यज्ञव आहेत,अशा मायेने वराहावतार धारण करणाऱ्या त्या महात्म्या भगवंताने आणि हिरण्याक्ष दैत्याचे पृथ्वी-निमित्त वैर वाढून युद्ध चालले असतां ते पाहण्याची इच्छा करणारा ब्रहमदेव,ऋषीसहवर्तमान तेथे प्राप्त झाला.||२०|| भावार्थः---आणि ज्याला शौर्य प्राप्त झाले आहे,ज्याची भिती निघून गेली आहे;ज्याने,भगवंताने योजिलेल्या युक्तीचा प्रतिकार केला आहे आणि ज्याचा पराक्रम अपरिहार्य आहे अशा त्या हिरण्याक्ष दैत्याला पाहून,हजारो ऋषीचा नायक अशा त्या भगवान ब्रह्मदेवाने,अपूर्व वराहरूप धारण करणाऱ्या नारायणाप्रत भाषण केले कि,-------------||२१|| | एष ते देव देवानामडघरीमूलमपेयुषांम ।विप्रणाम सौरभेंयींणाम भुतनामप्यनागसाम् ।।२२।।
भावार्थः--ब्रहमदेव म्हणाला--हे देवा,पायांजवळ शरण आलेले जे देव,ब्राहमण,गाई आणि निरपराधी प्राणी यांचा अपराध करणारा,त्यांच्या अर्थाचे व प्राणांचे हरण करणारा,आमच्यापासून वर प्राप्त झालेला,आणि कंटकाप्रमाणे सर्वांना उपद्रव करणारा असा हा दैत्य आहे;याच्या बरोबरीचा योद्धा कोणी नसल्यामुळे हा जोडीदार योद्धयाचा शोध करण्याकरीता सगळ्या त्रिभुवनांत फिरत असतो.||२२-२३|| भावार्थः----हे देवा,ज्याप्रमाणे अज्ञबालक शेंपुटवगैरे ओढून क्रुद्ध झालेल्या सर्पाला खेळवितो त्याप्रमाणे मायावी,गर्विष्ठ,प्रतिबंधरहित आणि दुष्टांचा अग्रगण्य अशा या असुराला तूं खेळवूं नकोस.||२४|| भावार्थः---तर हे अच्युता देवा हा भयंकर दैत्य,आपली क्रूरवेळां (संध्याकाळ)प्राप्त होऊन जोपर्यंत सामर्थ्याने वाढला नाही तो पर्यंत तूं आपल्या दिव्य मायेचा स्वीकार करून या दुष्टांचा वध करावा.||२५|| भावार्थः----हे सर्वात्मन प्रभो,लोकांचा नाश करणारा अतिभयंकर हा संध्याकाळ समीप येत आहे,तस्मात् त्याच्या पूर्वीच तूं देवांना जय मिळवून द्दावास.||२६|| भावार्थः----या वेळी हा अभिजीत--नामक मुहूर्ताचा योग असून तो संपत आला आहे यास्तव आम्हा सर्व सुह्र्दांचे कल्याण व्हावे म्हणून तूं ह्या दुर्जय शत्रूचा लौकर वध कर.||२७|| | दिष्ट्या त्वां विहितं मृत्यूमयमासादितः स्वयम् | विक्रम्यैनं हत्वा लोकानाधेहि शर्मणि ||२८|| भावार्थः----हा दैत्य,पूर्वी शापानिग्रहाचे वेळी तूंच निर्माण केलेल्या मृत्यूरुपी तुझ्याजवळ स्वतः होऊन प्राप्त झाला,हि फार आनंदाची गोष्ट आहे.यास्तव आतां तूं पराक्रम करून युद्धामध्ये याचा वध कर आणि सर्व लोकांना सुखाचे ठिकाणी स्थापन कर.||२८|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा अठरावा(१८)अध्याय अठ्ठावीस श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ |१९--- नंतर ब्रह्मादिकांनी प्रारर्थाना केलेल्या त्या वराहरूपी भगवंताने महायुद्धामध्ये हिरण्याक्ष-दैत्याचा वर्णन करण्यांस योग्य असा वध केला हि कथा या एकुणिसाव्या अध्यायांत वर्णन केलेली आहे. | १९---भगवंतांचा वराह अवतार---[हिरण्याक्ष वध] ___________________________________________________________________________________________
। अवधार्य विरिञचस्य निर्व्यलीकामृतं वच: ।प्रहस्य प्रेमगर्भेन तदपाङगेन सोSगृहीत ।।१।। भावार्थः----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,भगवंताने अमृतासारखे गोड व निष्कपट असे ते ब्रहमदेवाचे भाषण श्रवण करून,प्रत्यक्ष कालरुपी अशाहि,मला हा ब्रहमदेव,वेळ सुचवित आहे असे मनांत आणून हास्य केले आणि प्रेमपूर्वक कटाक्षाने त्या भाषणाचा स्वीकार भगवंतांनी त्यांचा भाषणांचा स्वीकार करून त्यानुसार कृती केली.आपण—जीवानी, वास्तविक पाहता ब्रह्मदेव भगवंतांपेक्षा कनिष्ट आहेत,असे असले तरी ब्रह्मदेवाचे भाषण योग्य असल्यामुळे स्वीकृत्ती केली,त्याप्रमाणे इतरांचे म्हणणे योग्य असेल स्वीकार करून कृती करावी.||१|| भावार्थः----नंतर ब्रहमदेवाच्या घ्राणेंद्रियापासून उत्पन्न झालेल्या त्या वराहरुपी भगवंताने उडी मारून आपल्या समोर निर्भयपणे संचार करणाऱ्या हिरण्याक्ष-दैत्याच्या हनुवटीवर गदेने प्रहार केला.||२|| भावार्थः----त्या गदेवर हिरण्याक्षाने आपल्या गदेने प्रहार केला असतां ती गदा भगवंताच्या हातांतून निसटून गरगर फिरत खाली पडतेवेळी शोभूं लागली ते मोठे आश्चर्य मानण्यासारखे झाले.||३|| भावार्थः---त्यावेळी हिरण्याक्षाला शत्रूप्रहाराविषयी अवकाश होता परंतु त्याने निःशस्त्र झालेल्या भगवंताच्या प्रहार केला नाही,तर युद्धामध्ये शस्त्र रहित योद्ध्यावर प्रहार करू नये या धर्माचा त्याने मान केला आणि विष्वक्सेन भगवंताला अधिकच क्रोध आणविला.खरा योद्धा असेल तर स्वधर्मंनुसार—युद्धाच्या नियमानानुसार युद्ध केल्या जाते.युद्धाचा नियम असा आहे की,युद्ध करीत असता कांही कारणास्तव युद्धकर्ताकडे हातात शस्त्र नसेल आपण त्याच्यावर शस्त्राचा वापर करू नये.भगवंतांच्या हातात कांही कारणास्तव शस्त्र नव्हते,तर हिराण्याक्षाने भगवंतांवर शस्त्राचा प्रयोग केला नाही.यालाच “शौर्य” असे म्हणतात,तर युद्ध्याच्या हातात्र शस्त्र नसतांना शस्त्राचा प्रयोग करणे,त्यास “भ्याड” असे म्हणतात.म्हणून आपण जर सैनिक असला या नियमाचे पालन करून “शौर्य” गुण प्रगट करावा.यालाच “स्वधर्म” असे म्हणतात.||४|| भावार्थः----इकडे परमेश्वराच्या हातांतील गदा खाली पडल्यामुळे प्रेक्षक मंडळीत हाहाकार गेला असतां,प्रभुने त्या हिरण्याक्षाच्या धर्माची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शनचक्राचे स्मरण केले.त्याबरोबर प्राप्त झालेले ते चक्र त्याने हस्तामध्ये धारण केले.भगवंतांनी हिरण्याक्षाच्या स्वधर्माची प्रशंसा केली व हातात शास्त्र घेऊन युद्धाला सुरवात केली.आपणही शत्रूपक्षाची प्रसंशा करावी.||५|| भावार्थः----तेव्हां त्याचे चक्र दैत्याच्या वधाविषयी त्वरायुक्त झाले आहे आणि आपल्या पार्षदांमध्ये मुख्य असून दैत्यांमध्ये अधम त्या हिरण्याक्षाबरोबर युद्ध करणारा अशा त्या भगवंताला पाहून त्याचा प्रभाव न जाणणाऱ्या आकाशचारी देवांच्या चित्रविचित्र वाणी उत्पन्न झाल्या की,-----हे देवा,तुझे कल्याण असो,तूं ह्यांचा वध कर.||६|| भावार्थः----त्यावेळी तो हिरण्याक्ष दैत्य,ज्याचे नेत्र कमलपत्रासारखे आहेत व ज्याने हातांत चक्र धरण केले आहे अशा भगवंताला युद्धाच्या तयारीने आपल्या पुढेच उभा आहे असे पाहून ज्याची सर्व इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आहेत असा तो दैत्य,श्वासोच्छवास टाकीत त्वेषाने अधरोष्ठ चावूं लागला.||७|| भावार्थः----भयंकर दाढांनी युक्त व आपल्या क्रोधयुक्त नेत्रांनी जाळतोच कि काय असे अवलोकन करणाऱ्या त्या दैत्याने धांवत जाऊन आतां तुला मी मारलाच असे भाषण करून आपल्या गदेने भगवंताच्या अंगावर त्याने प्रहार केला.||८|| भावार्थः----हे साधो विदुरा,त्यावेळी यज्ञवराहरुपी भगवंताने,तो शत्रू पाहत असतां,वायूवेगाने येणाऱ्या त्याच्या गदेला डाव्य पायाने सहज खाली पाडिले.||९|| भावार्थः----आणि त्याला म्हंटले की,----हे असुरा,हे तूं आपले आयुध घे,आणि पुनः युद्धाचा उद्योग कर.कारण,तूं मला जिंकण्याची इच्छा करीत आहेस.तेव्हां त्या हिरण्याक्षाने पुन्हा ती घेऊन भगवंताच्या अंगावर फेंकिली आणि मोठ्याने गर्जना केली.||१०|| भावार्थ:---त्यावेळी संमुख उभा राहिलेल्या त्या भगवंताने ती गदा आपल्यावर येत आहे असे पाहून येणाऱ्या त्या गदेला,गरुड जसा सर्पिनीला धरितो त्याप्रमाणे,लीलेने हातात धरिले.||११|| | स्वपौरुषे प्रतिहते हतमानो महासुरः | नैच्छद्ग्दां दीयमानां हरिणा विगतप्रभ: ||१२|| भावार्थ:----अशा रीतीने ईश्वरापुढे आपला पराक्रम चालेनासा झाला असे पाहून हतगर्व व निजेस्त झालेल्या त्या महादैत्याला हरीने परत दिलेली ती गदा पुन्हा हातात घ्यावी असे वाटेना.||१२|| भावार्थ:----म्हणून त्याने ब्राहमणाला उद्देशून अभिचार कर्म करणाऱ्या पुरुषाप्रमाणे,वराहरूप धरण करणाऱ्या यज्ञपुरुषाच्या तीन अग्रणी युक्त अग्निसारखा जाज्वल्यमन आणि आपले कार्य करण्यास तत्पर असा त्रिशूल,हातामध्ये ग्रहण केला.||१३|| भावार्थ:----त्याकाळी दैत्यामध्ये महाशूर अशा त्या हिरण्याक्षाने भगवंतावर जोराने फेकलेला तो अतितेजस्वी त्रिशूल,आकाशामध्ये चकाकू लागला असता,भगवंताने आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्रान त्याचा छेद करून टाकीला(यांस दृष्टांत)-पूर्वी देवांना जिंकून अमृताचा कलश नेणाऱ्या गरुडाने,आपल्यावर इंद्राने सोडलेल्या अमोघ वज्राचा मान करण्यासाठी आपले एक पीस टाकले होते त्याचा जसा इंद्राने छेद करून टाकीला होता तद्वतच----- १४|| भावार्थ:----सुदर्शनचक्राने आपल्या शुलाचे भगवंताचे बहुत तूकडे करून टाकिले असे पाहून अतिशय कृध्ह झालेला तो हिरण्याक्ष,गर्जना करीत करीत हरीच्या समोर येवून त्याच्या लक्ष्मीस्थानभूत विस्तीर्ण वक्ष:स्थलावर आपल्या कठोर मुष्ठीने प्रहर करून स्वत: अदृश्य झाला.||१५|| | तेणेत्थमहात:क्षत्तर्भगवानादिसूकर: । नाकम्पत मनक क्वापी स्त्रजा हत इव द्वीप:।।१६।। भावार्थ:----हे विदुरा,नंतर त्या दैत्याने वक्ष:स्थलाचेठिकाणी ताडन केले असताही तो आदि-व्रराहरूपी भगवान,पुष्पमालेने ताडन केलेल्या हत्तीप्रमाणे कोणत्याही अंशाचे ठिकाणी किंचितसुद्धा कंपित झाला नाही.||१६|| भावार्थ:----हे विदुरा,नंतर त्या दैत्याने योगामायेच्या नियंत्या हरीवर अनेक प्रकारच्या आसुरीमायेचा प्रयोग केला.ज्या मायेला पाहून भयभीत झालेल्या सर्व प्रजांनी या जगाचा लय होण्याची वेळ जवळ आली असे मानिले.||१७||
भावार्थ:----ती माया अशी की,----प्रचंड वारे वाहू लागले आणि त्यांनी जिकडे तिकडे धूळ-वूडवून अंधकार पडला.गोफाणीनी मारल्यासारखे सर्व दिशाकडून दगड तसेच विद्युल्लता व गर्जना यांनी युक्त असून वारंवार पू,केश,रक्त,विष्टा,मुत्र,आणि अस्थि यांचा वर्षाव करणाऱ्या दाट मेघांच्या योगाने आकाशातील नक्षत्रगण दिसेनासे झाले.||१८-१९|| भावार्थ:---हे निष्पाप विदुरा,नानाप्रकारच्या शस्त्रांनी वृष्टी करणारे पर्वत जिकडे तिकडे दिसू लागले आणि हातात त्रिशूल घेवून आलेल्या व केस मोकळे टाकलेल्या नग्न राक्षशी चोहोकडे दिसू लागल्या.||२०|| भावार्थ:---तेथे हातात शस्त्र घेवून प्राप्त झालेल्या अनेक यक्ष-राक्षसांनी तसेच शिपाई,गोडे,रथ व हत्ती यांनी अति भयंकर ‘तोडमारा’ अशा वाणी उच्चारील्या.||२१|| | प्रदुष्कृतानां मायानामसुरिणाम विनाशयत | सुदर्शनास्तरं भगवान प्रायुङक्त दयीतं त्रिपात ।।२२।| भावार्थ:---त्यावेळी प्रातः-सवन माध्यान्ह-सवन आणि तृतीय-सवन हे तीन चरण आहेत अशा यज्ञ्ररुपी भगवंताने,हिरण्याक्षाने उत्पन्न केलेल्या त्या आसुरी मायेचा नाश करणारे आवडते सुदर्शनास्त्र सोडिले.||२२|| भावार्थः-----तेव्हा ‘विष्णू,अवतार घेऊन तुझ्या मुलांचा नाश करील’असे पतीचे (कश्यपाने )भाषण स्मरण करणाऱ्या दितीच्या ह्रदयांत एकाएकी कंप उत्पन्न झाला आणि स्तनांतून रक्तस्त्राव होऊं लागला.||२३|| भावार्थः---इकडे हिरण्याक्ष दैत्य,आपल्या माया नष्ट झाल्या असतां पुनः भगवंताच्या समोर येऊन आपल्या बाहुंमध्ये घट्ट आवंळून भगवंताचा चुराडा करावा अशा इराद्द्याने त्वेषाने त्यास आलिंगन करण्यास प्रवृत्त झाला परंतु जो आपल्या मिठीच्या बाहेरच आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.||२४|| भावार्थः----तेव्हा वज्रतुल्य मुष्टींनी प्रहार करणाऱ्या त्या हिरण्याक्षाच्या कर्ण मूलावर(कानशिलांत)जसा इंद्राने वृत्रासुराच्या कंठाचे ठिकाणी वज्राने प्रहार केला त्याप्रमाणे भगवंताने आपल्या हस्ताने प्रहार केला.||२५|| । स आहतो विश्वजिता ह्यवज्ञया परिभ्रमद्गात्र उदस्तलोचन: । | विशीर्णबाहवङघिरशिरोरूहोડपतद यथा नगेन्द्रो लुलितो नभस्वाता ।।२६।। भावार्थः----सगळ्या जगाला जिंकणाऱ्या भगवंताने अवज्ञेने ताडन केलेला तो हिरण्याक्ष दैत्य ज्याचे शरीर आसमंतात भ्रमण जसा पाव (धडपडत)आहे,ज्याचे डोळे बाहेर आले आहेत आणि ज्याचे बाहू,पाय व मस्तकावरील केंस हे अस्ताव्यस्त झाले आहेत असा होऊन वाऱ्याने उपटलेला जसा मोठा वृक्ष पडतो त्याप्रमाणे भूमीवर पडला.||२६|| भावार्थः----त्यावेळी तेथे आलेले ब्रह्मादिक देव,ज्याचा पराक्रम आजपर्यंत कोंठेही कुंठीत झाला नाही,भयंकर दाढेने युक्त,ज्याने अधरोष्ठ चावलेला आहे त्या हिरण्याक्षाला भूमीवर शयन केलेला पाहून म्हणू लागले की,असो असा मृत्यू कोणाला बरे प्राप्त होणार आहे ! कोणासही प्राप्त होणार नाही.||२७|| । यं योगिनो योगसमाधिना रहो ध्यायन्ति लिङगा दसतो मुमुक्षया । | तसैष दैत्यऋषभ: पदाहतो मुखण प्रपश्ययां स्तनुमुत्ससर्ज ह ।।२८।। भावार्थः----कारण,अविद्येने आरोपित लिंगशरीरापासून मुक्त होण्याच्या इच्छेने समाधियोगेकरून योगिजन ज्याचे एकांती ध्यान करितात,त्या भगवंताच्या मुखाकडे पाहात पाहात त्याच्या पुढच्या पायाने (हस्ताने)ताडन केलेल्या त्या दैत्यश्रेष्ठाने आपल्या देहाचा त्याग केला.तेव्हा किती याचे भाग्य वर्णन करावे!!ज्याला भगवंतांच्या हातून मृत्यू येणे हे महाभाग्याचे लक्षण आहे.त्याच्या महाभाग्याचे वर्णन आपण करू शकत नाही.भगवंतांच्या हातून मरण येणारे मागच्या जन्मातील फार पुण्यवान असतात.उदा—हिरण्याक्ष—हिरण्यकश्पु, रावण—कुंभकर्ण,शिशुपाल—दंतवक्र हे मागच्या जन्मातील जय—विजय द्वारपाल आहेत व पुन्हा भगवंतांचेच सेवक होणार आहेत.त्यांच्याकडून सनकादिक ऋषीचा अपराध केला होता,म्हणून सनकादिक ऋषींनी त्यांना “तीन योनी राक्षस होताल” असा शाप दिला होता,म्हणून ते त्यांचा शाप भोगाण्याकारीतच मृत्यू लोकात आले होते व शाप भोगल्यानंतर पुन्हा भगवंतांचे पार्षद म्हणून सेवा करू लागले.भगवंतांची सेवा करणे हि महाभाग्याचे फळ असते.म्हणून आपण भगवंतांची सेवा निरंतर करण्याचा प्रयत्न करावा.||२८|| भावार्थः----वैकुंठवासी भगवंताने जे जय-विजयनामक पार्षद,तेंच हे हिरण्याक्ष आणि हिरण्याकशिपू ब्राहमणाच्या शापाने दैत्ययोनीला पावले असून पुन्हां जन्मांनी आपले स्थान पावतील.||२९|| भावार्थः----देव म्हणाले----हे ईश्वरा,जो तूं सर्व प्रकारच्या यज्ञांच्या विस्ताराचा प्रवर्तक असून जगाच्या रक्षणाविषयी ज्याने शुद्धसत्त्वात्मकमूर्ति ग्रहण केली आहे त्या तुला वारंवार नमस्कार असो.सर्व प्राणीमात्राना दुःख देणारा हा हिरण्याक्ष मरण पावला हे फार चांगले झाले.आम्ही तुझ्या चरणभक्तीने आज आनंद पावलो आहो.कोणासही दु:ख देणारा आवडत नसतो,तर सुख देणारा आवडत असतो.म्हणून कोणालाही दु:ख न देता सुखच द्दावे.यासच “प्रेम-लक्षणायुक्तभक्ती” असे म्हणतात.आपण प्रेम-लक्षणायुक्त भक्ती करावी. ||३०|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,याप्रमाणे आदि वराहरुपी तो भगवान,ज्याचा पराक्रम कोणालाहि सहन होत नसे अशा हिरण्याक्षाला मारून ब्रह्मादिकांनी स्तुतहोत्साता,अखंड आनंदाने युक्त अशा आपल्या वैकुंठलोकाला निघून गेला.||३१|| भावार्थः--- हे सुमित्रा विदुरा,महायुद्धामध्ये भगवंताने अद्भुतपराक्रमशाली हिरण्याक्षदैत्य ज्या प्रकाराने खेळण्यांतील सोंगटीप्रमाणे मारून टाकीला ते वराहावतार धारण करणाऱ्या हरीचे चरित्र,मी गुरुमुखापासून ऐकिल्याप्रमाणे तुला सांगितले आहे.आपण जर श्रीमाद्भागावाताचे वक्ता असाल तर ज्यांच्या मुखातून श्रीमद्भागवत श्रावण केलेले आह्त्यांच्याचे नांवाचा उल्लेख श्रीमाद्भागावातातून वारंवार करावा.हा आपला स्वधर्म आहे.त्यातून आपली सदगुरुविषयी “कृतज्ञनता”दिसून येते.||३२|| भावार्थः---सुत म्हणाला----हे शौनका,याप्रमाणे मैत्रेयाने वर्णन केलेली भगवंताची कथा ऐकून महाभागवत विदुराला परमानंद प्राप्त झाला.आपणही श्रीमद्भागवत श्रावण करून परमानंद प्राप्त करावा.||३३|| भावार्थः----पुण्यकीर्ती व महायशस्वी अशा दुसऱ्या सत्पुरुषांचीही ऐकिली असतां आनंद होईल मग श्रीवत्सलांछन विष्णूची कथा ऐकिली असतां आनंद होईल हे काय सांगावे ! ||३४|| भावार्थः---आतां भक्ती केली तर परमेश्वर पशूंना देखील सुलभ आहे,नाही तर भक्ती न केली तर देवांनादेखील दुर्लभ आहे असे सांगतात.म्हणून आपणास मानव—देह मिळालेला आहे,तर आपण निष्काम भक्ती करून ज्ञानाद्वारे परमानंद प्राप्त करावाच.ज्या भगवंताने,मगराने ग्रासलेल्या व चरणकमलाचे ध्यान करणाऱ्या गजेंद्राला,त्याच्या स्त्रिया हत्तिनी आक्रोश करूं लागल्या असतां लौकर संकटांतून मुक्त केले.त्या अनन्य शरणाणागत व सरळ स्वभावाच्या मनुष्यांनी सुखाने आयुष्य व दुष्ट पुरुषांनी आराधन करण्यास सर्वथा अशक्य अशा भगवंताचे सेवन,त्याचे उपकार जाणणारा कोण बरे पुरुष करणार नाही ! सर्वही करतीलच.म्हणून आपणसुद्धा भगवंतांचे सेवन—अनुभव घ्यावून आपले जन्म—मरण निवृत्त करावे.||३५-३६|| | यो वै हिरण्याक्षवधं महाद्भूतं विक्रीडितं कारणसूकरात्मनः | | श्रृणोति गायत्यनुमोडतेsन्जसा विमुच्यते ब्रम्हवधादपि द्विजाः ||३७|| भावार्थ:----हे शौनकादी ऋषीहो,जो पुरुष पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता वराहावतार धरण करणाऱ्या भगवंताचे हिरण्याक्षवधरूप हे महाअद्भुत चरित्र श्रवण करितो,गायन करितो,किंवा दुसरा वर्णन करीत असता अनुमोदन देतो,तो ब्रहत्येपासूनहि अनायासाने मुक्त होतो.म्हणून आपण श्रीमद्भागवत श्रवण करावेच.सर्व पापातून मुक्त होऊन ज्ञानाद्वारे मुक्त होतो.||३७|| | एतन्महापुण्यमलं पवित्रम धन्यम यशस्यां पदमायुराशिषाम । | प्राणेंद्रियाणां युद्धि शौर्यवर्धनं नारायणोSन्ते गतिरङग श्रुं न्वतां ।।३८।। भावार्थ:----हे विदुरा,स्वर्गादिकांची प्राप्ती करून देणारे अत्यंत पवित्र,धन देणारे,कीर्ती करणारे,आयुष्याची वृद्धी करणारे,मनोरथ पूर्ण करणारे आणि प्राणाची व इंद्रियांची शक्ती वाढविणारे अशा या आख्यानाचे श्रवण करणाऱ्या पुरुषास अंतकाळी नारायनाशी ऐक्यरूप गती प्राप्त होवो.म्हणून आपण श्रीमद्भागवत सत्संग संत—महात्मा—सदगुरुच्या मुखातून श्रवण करावे.||३८|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हिरण्याक्षवधवर्णनरूप हा एकोणिसावा(१९)अध्याय अडोतीस(३८) श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | || श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरानार्पणमस्तू || ____________________________________________________________________________________________ |२०--- पूर्वी ब्रह्मदेपासून वर्णन केलेल्या सृष्टिक्रमांत (स्वायंभुव मनूची उत्पत्ती सांगून त्यापुढे वराहावतारांचे निरुपण केल्यामुळे सृष्टिक्रम सांगण्यांत व्यवधान प्राप्त झाले होते,म्हणून आतां प्रस्तुत मनूचा वंश सांगण्याकरिता आरंभापासून सृष्टिक्रमाचे स्मरण,या विसाव्या अध्यायांत केलेले आहे. | २०-----ब्रहमदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन _____________________________________________________________________________________________ | महीं प्रतिष्ठामध्यस्य सौते स्वायम्भुवो मनु: | कान्यन्वतिष्ठद् द्वाराणि मार्गायावरजन्मनाम् ||१|| भावार्थ:---शौनक म्हणाला----रोमहर्षनपुत्रा सुता,पृथ्वीरूप स्थान प्राप्त झाल्यानंतर स्वयंभूव मनुने पूर्वी ईश्वराचे ठिकाणी लीन झालेल्या अर्वाचीन प्राण्यांच्या निर्गमाविषयी (उत्पत्तीविषयी)कोणते उपाय योजिले? ||१|| भावार्थ:---तसेच,विदुर हा महाभागवतभक्त व कृष्णाचा नि:सीम प्रेमयुक्त मित्र होता.दुर्योधन पुत्रासहित आपल्या वडील बंधू धृतराष्टाने,श्रीकृष्णाचा अनादर केला (कृष्णाने पांडवाचा भाग देण्याविषयी सांगितलेली मसलत ऐकिली नाही)म्हणून ज्या विदुराने त्या धृतराष्ट्राचा त्याग केला.आपण भगवंत,संत—महात्मा व शास्त्र यांचा अनादर कधीच करू नये,कारण त्यांचा अनादर केला तर त्यांचे अहित न होता आपलेच अहित होत असते.||२|| भावार्थ:----आणि जो विदुर,व्यासाचा पुत्र असून आपल्या महिम्याने व्यासापेक्षा काही कमी नव्हता.कारण जो सर्वात्मभावाने श्रीकृष्णाचा आश्रय करणारा असून कृष्णभक्तचीही अनुकूल रीतीने सेवा करीत असे.आपणही—जीवानी विदुरासारखे भगवतभक्त असावे व आपणही श्रीकृष्णांची सेवा करावी.||३|| भावार्थ:---आणि तीर्थसेवेच्या योगाने जो निष्पाप होता त्या विदुराने हरिद्वाराचे ठिकाणी जाऊन तेथे बसलेल्या तत्त्ववेत्त्यामध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेय ऋषीला दुसरे काय बरे विचारिले?||४|| भावार्थः---हे सूता,त्या दोघांचा संवाद प्रवृत्त झाला असतां हरीच्या चरणकमलाच्या आश्रय करणाऱ्या व गंगेच्या उदकाप्रमाणे पापांचा नाश करणाऱ्या निर्मळ कथाच खरोखर प्रवृत्त झाल्या असतील.म्हणून आपण विदुर—मैत्रेय प्रमाने वेदांत शास्त्राचे श्रवण करावे.||५|| भावार्थः---नस्मात वर्णनीय उदार कर्मे करणाऱ्या हरीचे कथामृत प्राशन करणारा व रसज्ञ असा कोण पुरुष,त्या कथामृताविषयी तृप्ती पावेल?कोणीच पावणार नाही.यास्तव त्या कथा आम्हांस वर्णन कर.तुझे कल्याण असो.आपणही विदुराप्रमाणे संत—महात्मा यांच्या मुखातून वेदांत-शास्त्राचे व कथेचे श्रवण करावे.||६|| भावार्थः---व्यास म्हणाला----याप्रमाणे नैमिषारण्यांत राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला असतां रोमहर्षाचा पुत्र उग्रश्रवानामक सूत,भगवंताचेठिकाणी आपले मन अर्पण करून त्या ऋषींना म्हणाला,---हे ऋषीहो,तुम्ही विचारिलेले सांगतो,श्रवण करा.||७|| भावार्थः---सूत म्हणाला---हे ऋषिहो,आपल्या मायेने वराहावतार धारण करणाऱ्या भगवंताची पाताळांतून पृथ्वीचा उद्धार व अनायासाने हिरण्याक्ष दैत्याचा वध केलेली हि लीला श्रवण करून फार आनंद झालेल्या विदुराने मैत्रेय ऋषीला प्रश्न केला की,-----------||८|| भावार्थः---विदुर म्हणाला----हे मैत्रेय ऋषे,भगवंताच्या आराधनेचा प्रकार जाणणारा सर्व प्रजापतीचा अधिपति जो ब्रहमदेव त्याने,जगाच्या सृष्टीविषयी मरीच्यादिक प्रजापतींना उत्पन्न करून पुढे कोणते कृत्य आरंभिले ते मला सांग.||९|| भावार्थः----हे मरीच्यादिक ब्राहमण व जो स्वायंभुव मनु पूर्वी सांगितला त्यांनी,ब्रहमदेवाच्या आज्ञेने हे जग कसे उत्पन्न केले?||१०|| भावार्थः---म्हणजे त्यांनी सपत्नीक होऊन हे जग उत्पन्न केले किंवा सर्व कर्मांमध्ये ते स्वतंत्रपणेच वागत होते?अथवा सगळ्यांनी एकत्र मिळून एकमेकांच्या साहाय्याने हे जग निर्माण केले?ते मला सांग.||११|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---विदुरा,तर्क करण्यास अशक्य असे पूर्व क्ल्पांतील जीवांचे अदृष्ट कर्म,मायेचा नियंता पुरुष आणि काल या हेतूंनी,निर्विकार भगवंताच्या प्रेरणेने क्षुब्ध झालेल्या तीन गुणांपासून महतत्त्व उत्पन्न झाले.||१२|| भावार्थः---ते स्वतः सत्त्वगुणात्मक असून अहंकारोत्पत्तीच्या वेळी रजोगुणमय होते.दैवाने प्रेरित अशा त्या रजोगुणविशिष्ट महत्तत्त्वापासून सात्विक,राजस व तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला.त्यापासून शब्दस्पर्शादिक पांच सूक्ष्म भुते व त्यांचा द्वारा आकाशादिक पंच महाभूते,पांच ज्ञानेद्रिये,पांच कर्मेंद्रिये व त्यांच्या देवता अशी तत्त्वे उत्पन्न झाली.||१३|| भावार्थः---ती एकेकटी तत्वे ब्रह्मांड उत्पन्न करण्याविषयी असमर्थ होती.पुढे दैवयोगाने ती सर्व एकत्र मिळून—अपंचीकृत असलेली विशिष्ट पद्धतीने पंचीकृत करून त्यांनी पंचमहाभूतात्मक एक सुवर्णमय ब्रह्मांड-कोश उत्पन्न केला.||१४|| भावार्थः---तो अंडकोश,चैतन्यरहित असल्यामुळे कांही अधिक एक सहस्त्र वर्षेपर्यंत समुद्राच्या उदकामध्ये तसाच पडून राहिला होता,नंतर त्याचा—परमात्म्याचाच आश्रय करून ईश्वरच नारायणरूपाने बनून राहिला.||१५|| भावार्थः---त्या नारायणाच्या नाभीपासून सहस्त्रसूर्याप्रमाणे अतिशये प्रकाशमान व सर्व प्राणिसमुदायांचे निवासस्थान असे एक कमल उत्पन्न झाले आणि त्यामध्ये ब्रहमदेव स्वतःच उत्पन्न झाला.||१६|| भावार्थः---तेव्हा ब्रह्मांडच्या गर्भोदकांत शयन करणाऱ्या त्या भगवंताने ब्रहमदेवाच्या अंतर्यामाचे ठिकाणी प्रवेश केला असतां त्या ब्रहमदेवाने पूर्वकल्पाप्रमाणे नामरूपादि व्यवस्थेच्या योगाने हि लोकरचना निर्माण केली.||१७|| भावार्थः---ती अशी कि,-ब्रहमदेवाने आपल्या छायारूप अज्ञानाच्या योगाने प्रथम,तामिस्त्र,अंधतामिस्त्र,तप,मोह,आणि महातम अशी पांच प्रकारची अविदया उत्पन्न केली.||१८|| भावार्थः---ती आपल्या पासून तामसी सृष्टि उत्पन्न झाली असे पाहून खेद पावणाऱ्या ब्रहमदेवाने त्या आपल्या देहाचा त्याग केला.तो देह रात्रिरूपी झाला.नंतर क्षुधा आणि तृषा यांचे उत्पत्तिस्थान अशा त्या ब्रहमदेवाच्या रात्रिरूपी देहाचा,त्याच देहापासून उत्पन्न झालेल्या यक्षराक्षसांनी स्वीकार केला.||१९|| भावार्थः---तेव्हा क्षुधा आणि तृषा यांनी व्याकुळ झालेले ते यक्ष राक्षस,त्या ब्रहमदेवालाच भक्षण करण्याविषयी त्याच्याकडे धांवले.आणि परस्पर असे बोलुं लागले कि,ज्याअर्थी ह्याच्यामुळे आम्ही क्षुधेने व तृषेने पिडीत झालो आहो,त्याअर्थी हा आपला पिता आहे अशा कृपायुक्त बुद्धीने याचे रक्षण करूं नका,तर याचे भक्षणच करा.||२०|| भावार्थः----हे ऐकून भयभीत झालेला ब्रहमदेव,त्यांस म्हणाला की,हे यक्ष राक्षसहो,तुम्ही माझे पुत्र झाला आहांत,तस्मात् माझे भक्षण करूं नका,तर रक्षणच करा.असे ते यक्ष राक्षस उग्रस्वभावयुक्त झाले.त्यांत जे पूर्वी ब्रह्मदेवास भक्षण करा असे म्हणाले होते ते “यक्ष” आणि जे रक्षण करूं नका असे म्हणाले होते ते “राक्षस” झाले.||२१|| भावार्थः----पुढे ब्रहमदेवास प्रकाशरुपी स्वरूप धारण करून आपल्या कांतीच्या योगाने,मुख्यत्वेकरून ज्या ज्या सात्विक देवता आहेत त्यांस उत्पन्न केले आणि त्या शरीराचा त्याग केला.तेव्हा क्रीडा करणाऱ्या त्या सात्विक देवतांनी ब्रहमदेवाने टाकलेल्या त्या दिवसरुपी कांतीचा स्वीकार केला.||२२|| भावार्थः---पुढे ब्रहमदेवाने आपल्या कमरेच्या पुढच्या भागापासून अत्यंत स्त्रीलंपट अशा दैत्यांस उत्पन्न केले.ते विषयासक्त असल्यामुळे कामातुर होऊन ब्रहमदेवाशीच मैथुन करण्यास प्रवृत्त झाले.||२३|| भावार्थः---नंतर हास्य करणारा तो भगवान ब्रहमदेव,आपल्या मागे लागलेल्या त्या निर्लज्ज असुरांस पाहून क्रुद्ध झाला आणि त्यांपासून भिऊन वेगाने पलायन करूं लागला.||२४|| भावार्थः----आणि धावंत--धांवत तो ब्रहमदेव,शरणागतांचे दुःख निवारण करणाऱ्या व भक्तांवर अनुग्रह करण्याकरितां त्यांच्या इच्छेनुरूप आपण स्वरूप दाखविणाऱ्या हरीला शरण जाऊन म्हणाला की,----------||२५|| भावार्थः---हे प्रभो,परमात्मन,तूं माझे रक्षण कर.तुझ्या आज्ञेने मी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्याच ह्या पापिष्ठ होऊन बलात्काराने मैथुन करण्याविषयी माझ्या मागे लागल्या आहेत.||२६|| भावार्थः----हे देवा,दुःखी लोकांचे खरोखर दुःख निरसन करणारा एक तूंच आहेस व जे तुझ्या चरणाचा आश्रय करीत नाहीत त्या पुरुषांना दुःख देणाराहि एक तूंच आहेस.भगवंत ज्याच्या—त्याच्या कर्मांनुसार सुख—दु:ख देत असतो.तो भागावंत कोणाचे चांगले व वाईट करीत नसतो,म्हणून आपण भगवंतांना कोणताही दोष देऊ नये.||२७|| भावार्थः----याप्रमाणे ब्रहमदेवाने प्रार्थना केली असतां,दुसऱ्याच्या मनांतील अभिप्राय जाणणाऱ्या त्या भगवंताने त्याची ती दिनावस्था जाणून,हे ब्रहमदेवा,तूं कामदुषित झालेली हि आपली तनू सोडून दे,असे सांगितले असतां,ब्रहमदेवाने त्या आपल्या मूर्तीचा त्याग केला,म्हणजे ती मनोवासना सोडून दिली,ब्रह्मदेवाप्रमाणे आपणही मनो-वासानेचा त्याग करावा.मनो-वासानेचा त्याग केला असता आपण—जीव ब्रह्मरूप होत असतोत व त्याद्वारे जन्म—मरण निवृत्त होत असते.||२८|| भावार्थः----हे विदुरा,ब्रहमदेवाने टाकलेली ती तनु संध्याकाळची अभिमानी देवता झाली,कामवासना प्रदीप्त होण्याची हीच वेळ होय.दैत्यांना ती वेळ स्त्रीप्रमाणे भासली.ती अशी कि,-जिची चरणकमल पैजनांच्या योगाने शब्द करीत आहेत,जिचे डोळे तारुण्यमदाने लाल झाले आहेत.पैठणी नेसली असल्यामुळे जिचा कटीप्रदेश आच्छादित झालेला असून त्यावर घातलेल्या कमरपट्ट्याची कांति त्या पैठणीवर पडली आहे,परस्पर संघर्षण होत असल्यामुळे जिच्या स्तनांमध्ये अंतर मुळीच राहिलेले नाही,जिची नासिका चांफेकळीप्रमाणे सुरेख आहे,जिचे दांत कुंदाच्या कळ्यांप्रमाणे सुंदर आहेत,जिचे स्नेहयुक्त व शृंगारलीलासूचक अवलोकन जिकडेतिकडे प्रवृत्त होत आहे जिच्या मस्तकावर काळ्याभोर केसांचा बुचडा आहे,जी लज्जेने आपले शीर पदराने झांकून घेत आहे,अशा त्या स्त्रीरुपिनी संध्येला पाहून,सर्व असुर अगदी मोहित झाले.||२९-३०-३१|| भावार्थः----आणि परस्परांमध्ये बोलुं लागले की,अहो कायतरी हिचे हे सौंदर्य ! अहो काय हिचे हे सौंदर्य ! अहो काय हे हिचे धैर्य ! अहाहा काय हे हिचे तारुण्य आहे !! कामविकार उत्पन्न झालेल्या आमच्यामध्ये हि कामविकाररहित असल्यासारखी फिरत आहे!||३२|| भावार्थः---याप्रमाणे कुत्सितबुद्धि ते असुर,बहुत प्रकारे तर्क करीत करीत विलासिनी स्त्रीसारखा भासणाऱ्या त्या संध्येचा सत्कार करून,मोठ्या प्रेमाने तिला विचारु लागले की,------------------------||३३|| भावार्थः----हे रंभोरू (जिच्या मांड्या केळीच्या खांबांसारख्या आहेत अशा हे स्त्रिये)तूं जातीने कोण आहेस?हे विलासिनी,येथे तुझे काय काम आहे?तुझे स्वरूप अमोल्य वस्तू असून ते विक्रय करण्यास योग्य आहे,ते भाग्यहीन अशा आम्हांला तूं अर्पण करीत नाहीस,त्याच्या योगाने आमच्या मनाला तूं फार दुःख देत आहेस.आपण मात्र असुरासारखे न आचरण करता सात्विक आचरण करावे, कारण सात्विक आचरण केल्याने शांती—समाधान मिळत असते.||३४|| भावार्थः----हे स्त्रिये,तुझी जाति कोणतीही असो आम्हांला तुझे दर्शन झाले हि मोठी आनंदाची गोष्ट होय.परंतु हे सुभगे,तूं चेंडूफळीच्या खेळाने पाहणाऱ्या आमच्या मनाला क्षोभ उत्पन्न करीत आहेस.म्हणून आपण स्त्रीचा सहवास करू नये,कारण त्यामुळे आपल्यात—जीवात काम-विकार उत्पन्न होत असतो.||३५|| भावार्थ:---हे शोभणे,वर वर उसळणाऱ्या चेंडूला वारंवार आपल्या करतलाने ताडन करीत असणाऱ्या तुझे चरणकमल एकेठिकाणी स्थिर राहत नाही मोठ्या स्थानाच्या भाराने दडपून गेलेली तुझी कृश कटी,चेंडू खेळताना फारच श्रम पावत आहे.तुझी निर्मल दृष्टि,आळसाने युक्त असल्यासारखी जिकडेतिकडे संचार करीत आहे.तुझ्या केसाचा बुचडा फारच मनोहर दिसत आहे.||३६|| | इति सायन्तनींसन्ध्यामसुरा: प्रमदायतीम् | प्रलोभयन्तीं जगृहूर्मत्वा मूढधियः स्त्रियम् ||३७|| भावार्थ:----याप्रमाणे मुढबुद्धी अशा त्या असुरांनी,स्त्रीप्रमाणे भासणाऱ्या व लोभ उत्पन्न करणाऱ्या त्या सायंकाळच्या संध्येला,हि स्त्रीच आहे.असे मानून तिचा स्विकार केला.आपण मात्र सायंकाळच्या संध्याचा स्त्री म्हणून स्वीकार करू नये.||३७|| भावार्थ:----पुढे ब्रहमदेवाने काही शृंगारिक गूढ हास्य करून त्यापासून आपणच आपला वास घेणारी म्हणजे आपल्याच सौदर्याने गर्विष्ठ अशी एक तेज:पुंज मूर्ती धरण करून तिच्या योगाने गंधर्व व अप्सरा यांचे पुष्कळ गण उत्पन्न केले.||३८|| भावार्थ:----आणि त्या सौंदर्ययुक्त प्रिय मूर्तीचा त्याग केला.ति चंद्रिकारूपाने(चांदण्याच्या रूपाने)परिणाम पावली.विश्वावसु इत्यादिक गंधर्वांनी त्या मूर्तीचा स्वीकार केला.||३९|| भावार्थ:----पुढे भगवान ब्रहमदेवाने,आपल्या तंद्रेने (आळसाने) भुते व पिश्याचे उत्पन्न केली आणि मोकळे केस सुटलेल्या व दिगंबर (नग्न)अशा त्या भूतपिशाचांस अवलोकन करून त्याने आपले डोळे मिटले.||४०|| भावार्थः----हे विदुरा,नंतर त्या ब्रहमदेवाने ती जांभईनामक मूर्ती त्याच भूतापिशाचांनी स्विकारिली.जिच्या योगाने प्राणिमात्रांचेठिकाणी इंद्रियांचा विर्क्लेद (शिथिलपणा)दृष्टोत्पत्तीस येतो,तिला “निद्रा” असे म्हणतात आणि शिथिलपणामुळे मलमुत्रादिकांनी संयुक्त झालेल्या अपवित्र प्राण्यांस जे भ्रांतियुक्त करितात त्या भूतादिगणांस “उन्माद” असे म्हणतात.मिळून आळस,जांभई,निद्रा आणि उन्माद हे चार या निद्राशरीराचे भेद आहेत.तसेच या भेदांपासून भूतयोनीत झालेले भुते,पिशाचे,उन्माद वगैरे प्रकार पुष्कळ आहेत.||४१|| भावार्थः---नंतर एकेवेळी आपणास बलवान असे मानणाऱ्या भगवान प्रभू ब्रहमदेवाने,आपल्या अदृश्यरूपाने साध्यगण व पितृगण उत्पन्न केले.||४२|| भावार्थः---त्या साध्यांनी व पितृगणांनी ज्यापासून आपली उत्पत्ति झाली त्या ब्रहमदेवाने टाकलेल्या देहाचा स्वीकार केला.ज्या देहाला पोचण्याच्या उद्देशाने कर्मयोगी लोक,आपल्या पितररुपी साध्यांना व पितरांना श्राद्धादिके करून हव्यकव्यरूप अन्ने अर्पण करितात.||४३|| भावार्थः---नंतर ब्रहमदेवाने आपल्या दिसत असतां अकस्मात् गुप्त होण्याच्या शक्तीने,सिद्ध आणि विद्याधर यांस उत्पन्न केले व त्यांना तो आपला अंतर्धाननामक अद्भुत देह अर्पण केला.||४४|| भावार्थः---तदनंतर तो प्रभु,ब्रहमदेव,एकवेळी आपले प्रतिबिंब पाहात असतां,आपणच आपणास सुंदर आहे असे मानूं लागला व त्याने या आपल्या प्रतिबिंबाच्या योगाने किंनर किंपुरुष उत्पन्न केले.||४५|| भावार्थः----नंतर ब्रहमदेवाने जे प्रतिबिंब शरीर सोडून दिले होते,ते त्या किंनरादिकांनी स्वीकारिले,यामुळे ते दोन्ही गण एकत्र मिळून आपल्या बिंबभूत ब्रहमदेवाने पराक्रमांचे वर्णन करून पहांटेच्या वेळेस त्याचे गायन करीत असतात.||४६|| भावार्थः---नंतर जेव्हां सृष्टी वृद्धिंगत होइना,तेव्हा तिची वृद्धी कशी होईल या मोठ्या चिंतेने आपला विस्तीर्ण देह अस्ताव्यस्त पसरून निजलेल्या ब्रहमदेवाने,आपल्या मनोरथ पूर्ण झाला नाही म्हणून रागावलेले व लांबलचक पसरलेले ते आपले शरीर टाकून दिले.||४७|| भावार्थः---हे विदुरा,त्या ब्रहमदेवाच्या शरीरापासून जे गळाले होते त्यांपासून अहि (सर्पांतील एक जात)झाले आणि हातपाय पसरून चळवळ करणाऱ्या त्याच शरीरापासून सर्प व नाग झाले,ते फारच चपळ व क्रोधयुक्त असून त्यांचे देह मानेचेठिकाणी फणारूपाने विस्तीर्ण असतात.||४८|| भावार्थः---याप्रमाणे सृष्टि करून शेवटी तो ब्रहमदेव स्वतःलाच मी कृतकृत्य आहें असे मानू लागला तेव्हा त्याने आपल्या मनाच्या योगाने लोकांचे रक्षण करणारे चवदा मनु उत्पन्न केले.||४९|| भावार्थः----त्या जितेंद्रिय ब्रहमदेवाने आपले ते पुरुषाकार शरीर त्या मनुला अर्पण केले.तेव्हा त्या मनूस अवलोकन करून पूर्वी उत्पन्न केलेले जे देवगंधर्वादिक होते त्यांनी ब्रहमदेवाची मोठी प्रशंसा केली की,-----------||५०|| भावार्थः----हे जगदूत्पादका देवा,तूं मनुला उत्पन्न केलेस हि फार चांगली गोष्ट झाली.कारण,ज्या मनुसृष्टीमध्ये अग्निहोत्रादि सर्व क्रिया चालत असल्यामुळे आम्ही सर्वही तुम्हांसहवर्तमान अन्न भक्षण करूं.||५१|| भावार्थः----नंतर तपश्चर्या,उपासना,आसनादिक योग आणि वैराग्यैश्वर्यादियुक्त समाधि यांनी युक्त असलेल्या ब्रहमदेवाने इंद्रिये वश करून घेतली आणि आपणास मान्य अशा ऋषिरूपी प्रजा उत्पन्न केल्या.||५२|| | तेभ्यश्र्चैकैश: स्वस्य देहस्यांशमदादज: | यत्तत्समाधियोगर्द्धिकतपोविद्दाविरक्तमत् ||५३||
भावार्थः----आणि त्याने,समाधि,योग,सिद्धि,तप,ज्ञान,आणि वैराग्य यांनी युक्त अशा त्या आपल्या शरीराचा एकेक ऋषीला अर्पण केला.||५३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कांधामध्ये हा विसावा(२०)अध्याय बावन्न(५२)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला. | || श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ | २१--- आतां या एकविसाव्या अध्यायामध्ये,कर्दम प्रजापतींच्या तप व उपासना यांनी प्रसन्न झालेल्या विष्णूने,स्वायंभुव मनूच्या देवहुतिनामक कन्येबरोबर,त्या कर्दम प्रजापतीची विवाहघटना केली असा कथाभाव वर्णन केला आहे. | २१---कर्दम ऋषी---[कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान] _____________________________________________________________________________________________ | स्वायम्भुवस्य च मनोर्वंशः परमसम्मतः | कथ्यतां भगवन् यत्र मैथुनेनैधिरे प्रजा: ||१|| भावार्थः----विदुर म्हणाला----हे मैत्रेय ऋषे,ज्यांच्यामध्ये मैथुनाच्या योगाने प्रजा वृद्धिंगत झाल्या आहेत,तो जगामध्ये परम मान्य असा स्वायंभुव मनूचा वंश मला वर्णन कर.||१|| भावार्थः---आणि त्या स्वायंभुव मनूच्या प्रियव्रत आणि उत्तानपाद ह्यां नावांच्या दोन्ही पुत्रांनी सप्तद्वीपवती पृथ्वीचे पालन कसे केले तेंही मला वर्णन करावे.||२|| भावार्थः----हे निष्पापा ब्राहमणश्रेष्ठा,तूं देवहुति-नामे प्रख्यात जी त्या स्वायंभूवमनुची कन्या व कर्दम प्रजापतींची स्त्री म्हणून सांगितली त्या यमनियमादिक योगलक्षणांनी युक्त अशा आपल्या भार्येचे ठिकाणी त्या महायोगी कर्दम ऋषीने किती मुले उत्पन्न केली?ते ऐकण्याची इच्छा करणाऱ्या मला सांग.||३-४|| भावार्थः---हे मैत्रेय ऋषे,ब्रहमदेवाच्या पुत्र जो रुचि ऋषि,व दक्षप्रजापति त्यांनी,मनूच्या कन्या प्रसूति यांस वरून त्यांपासून जी सृष्टि उत्पन्न केली असेल तीहि मला कथन कर.||५|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,प्रजा उत्पन्न कर अशी ब्रहमदेवाने भगवान कर्दमाला आज्ञा केली असतां,त्याने दहा हजार वर्षेपर्यंत सरस्वती नदीच्या तीरी तपश्चर्या केली.भगवान कर्दम यांनी हाडा—मांसाचा पुत्र उत्पन्न करण्यासाठी तप केले,त्याचप्रमाणे आपण ज्ञान-पुत्र उत्पन्न होण्यासाठी म्हणजेच अंत:करण शुद्धीसाठी निष्काम कर्म करून तप करावे.||६|| भावार्थः----नंतर चित्ताच्या एकाग्रतेने युक्त असा तो कर्दम प्रजापति,पूजनाच्या योगेकरून भक्तांना वर देणाऱ्या श्रीहरीची सेवा करूं लागला.आपणही—जीवानी आपले चित्त एकाग्र करून अंत:करण शुद्ध करावे.||७|| | तावत्प्रसन्नो भगवान्पुष्कराक्षः कृते युगे | दर्शयामास तं क्षत्तः शाब्दं ब्रम्ह दधद्वपुः ||८|| भावार्थः----हे विदुरा,त्या वेळी कृतयुग चालले होते.त्यामध्ये दहाहजार वर्ष तपश्चर्या झाली असतां,प्रसन्न झालेल्या कमलनयन भगवंताने वेदांनीच जाणण्यास योग्य असे ब्रहममय स्वरूप धारण करून त्या कर्दमाला दर्शन दिले.||८|| भावार्थः----तेव्हा त्या कर्दमाने,सूर्यासारख्या निर्मळ असून ज्याच्या कंठामध्ये सूर्यविकासी पांढऱ्या कमळांची व चंद्रविकासी कमोदांची माळा आहे,ज्याच्या मुखकमलावर स्नेहयुक्तम व काळ्याभोर केसांच्या कुरळ्या आल्या आहेत,ज्याने भरजरीचा पितांबर नेसलेला आहे, ---------------||९|| भावार्थः---ज्याने मस्तकावर किरीट,कर्णामध्ये कुंडले आणि हस्तांचेठायी शंख चक्र आणि गदा हि धारण केली आहेत,ज्याने चवथ्या हातांत खेळण्याकरितां एक पांढरे कमल धारण केले आहे,ज्याचे हास्यपुर्वक अवलोकन मनाला आनंद उत्पन्न करणारे आहे-------||१०|| भावार्थः---ज्याच्या वक्षःस्थलाचे ठिकाणी कौस्तुभ रत्न आहे,अशा गरुडाच्या स्कंधावर आपली चरणकमले ठेऊन आकाशामध्ये प्राप्त झालेल्या भगवंताला अवलोकन करून--------------||११|| भावार्थः---कर्दम ऋषीला आपला मनोरथ पूर्ण झाला असे वाटून हर्ष झाला आणि त्याने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला भूमीवर साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून पुढे सांगितल्याप्रमाणे त्या परमेश्वराची स्तुति केली.आपणही—जीवानी कोणत्याही प्रकारची परमार्थिक साधना केल्यानंतर भगवंत,शास्त्र व सदगुरूंना साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती करावी.||१२|| | ये मायया ते हतमेधसस्त्वत पादाराविन्दं भवसिन्धुपोतम् | | उपासते कामलवाय तेषां रासीश कामान्नीरयेSपि ये स्यु:।।१४|| भावार्थः---कर्दम म्हणाल---हे स्तुतियोग्या परमेश्वरा,हि मोठी आनंदाची गोष्ट आहे की,आम्ही आज सर्व सत्वराशिरूप तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांचे साफल्य करून घेतले आहे.आपणही निर्गुण—निराकार परमात्म्याचे ज्ञानरूप चक्षूने अनुभूती घेऊन कृत्य-कृत्य व्हावे. कारण,पवित्र कुलांत अनेक जन्मे घेऊन हे ईश्वरा,तुझ्या मायेने ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे तेच लोक विषयांच्या लेशाकरितां,संसारसमुद्र तरून जाण्यास केवळ नौकाच अशा तुझ्या चरणकमलाची सेवा करितात.तूं तर त्यांना ते विषयभोगही देतोस की,ते नरकवासी जीवनांही प्राप्त होतात.म्हणून आपण जीवानी भगवंतांची सेवा विषयभोगासाठी न करता निष्काम सेवा परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी करावी.||१३-१४|| भावार्थः---हे ईश्वरा,याप्रमाणे सकाम पुरुषांची निंदा करणारा जो मी तो सुद्धां,त्या पुरूषांप्रमाणेच असून आपल्यासारख्या स्वभावाच्या आणि धर्म,अर्थ व काम यांची प्राप्ति करून देणाऱ्या स्त्रीला वरण्याच्या इच्छेने कल्पवृक्षाप्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या तुझ्या चरणाजवळ प्राप्त झालो आहे.प्रजानाथाच्या वेदवाणी रूप दावणीने जसे हे सकाम लोक बद्ध झाले आहेत त्याप्रमाणेच मीही त्या लोकांना अनुसरून देव,ऋषि व पितर यांच्या ऋणापासून मुक्त होण्यासाठी कालरूपी तुला बली अर्पण करीत आहे,म्हणजे कर्ममय तुझ्या आज्ञेच्या पालनाकरितां भार्येची इच्छा करीत आहे.कर्दम ऋषींनी भार्याचा स्वीकार केला,कारण त्यावेळच्या प्राप्त—प्रसंगानुसार केला आहे,तर विशायाभोगासाठी मुलीच केलेला नाही,असा विवेक करावा.म्हणून आज आपल्याला—जीवाला भरपूर लोकसंख्या वाढलेली आहे,आवश्यक्तेपेक्षा लोकसंख्या वाढलेली आहे.अशा वर्तमान काळातील--प्राप्त प्रसंगात लोकसंख्या घटविणे अत्यंत गरजेचे आहे,म्हणून आपण वर्तमान काळात गृहस्थाश्रमाचा स्विकार न करता,ब्रह्मचारी किंवा संन्यासी होऊन मोक्ष संपादन करावा.त्यामुळे आपले पारमार्थिक हित होऊन देश--भक्तीही होते.असा विवेक करून जीवन जगावे व मोक्ष—पुरुषार्थ संपादन करावा.||१५-१६|| भावार्थ:----हे देवा,तुझे भक्तर तर,विषयासक्त लोकांना व त्यास अनुसरनाऱ्या माझ्यासारख्या कर्मजडांना तापत्रयनाशक तुझ्या चरणरूप छत्राचा आश्रय करून,ते परस्परांमध्ये संसारविस्मृतीकारक तुझ्या कथामृताचा श्रवणकीर्तनादीरूप प्राशनाने,क्षुधा तृषावगैरे देहधर्माचे निवारण करितात.म्हणून आपण—जीवानी सकाम भक्ती न करता निष्काम भक्ती करून परमात्मरूप व्हावे.||१७|| भावार्थ:----ह्याकारीतच ब्रहमरूप आसाभोवती फिरणारे,अधिक महिन्यासुद्धा तेरा महिने हे ज्याचे आरे आहेत,तीनशे साठ अहोरात्रे हि ज्याची पेरे आहेत,सहा ऋतू हे ज्याच्या धावा आहेत,काळाचे क्षण लववगैरे जे अवयव ते ज्याचे कर्वतासारखे दांते आहेत,तीन चातुर्मास्य हे ज्याचे मध्यभागी आधारभूत वेढे आहेत,असे चराचर जगाचे आयुष्य आकर्षण करून थांबणारे,तीव्र वेगयुक्त असे हे तुझे संवत्सरात्मक,कालचक्र ह्या तुझ्या भक्ताचेमात्र आयुष्य कमी करू शकत नाही.निष्काम भक्ताचे—ज्ञानी भक्ताचे आयुष्य काळ कमी करू शकत नाही,कारण निष्काम—ज्ञानी भक्ताला पुन्हा शरीरच प्राप्त होऊ शकत नाही.काळाचे खाद्द शरीर आहे,निष्काम—ज्ञानी भक्ताला शरीर नसल्यामुळे काळ कोणाला खाणार ? निष्काम—ज्ञानी भक्ताला—आत्म्याला काळ खाऊ शकत नाह्कारणी आत्मा—परमात्मा अनादी—अनंत आहे.म्हणून आपण—जीवानी अज्ञानी न राहता जीव—ब्रह्म—ऐक्य—ज्ञान संपादन करून परमात्म्याचा अनुभव घेऊन परमानंदरूप—सुखरूप व्हावे.विषयांपासून सुख हे तात्पुरते मिळते व परमात्म्यापासून सुखरुपता कायमचे असते.||१८|| भावार्थ:----हे भगवंता,तू स्वत: एकच असून जग उत्पन्न करण्याच्या इच्छेने आपल्या ठिकाणी धारण केलेल्या दुसऱ्या योगमायेच्या योगाने प्रगट झालेल्या आपल्या शक्तींनी भिंतीवर जाळे पसरवणाऱ्या कोळ्याप्रमाणे हे जग उत्पन्न करितोस,याचे पालन करितोस आणि शेवटी याचा संहारही करितोस.||१९|| | नै तदबताधीश पदं तवेप्सीतं यन्मयया नस्तनुषे भूतसूक्ष्मम । | अनुग्रहायास्तवपि यार्ही मायया लसत्तुलस्या तनुवा विलक्षित: ।।२०।। भावार्थ:----हे ईश्वरा,तू आम्हां भक्तांना जे शब्दादिक विषयसुख देतोस हे मायिक असल्यामुळे जरी भक्तास द्यावे असे खरोखर वाटत नाही,तथापि हे तुझ्या कृपेने आमच्या अनुग्राहाच्या आम्हांस प्राप्त होवो.कारण,मायेच्या योगाने,तू तुळशीच्या मालेने सुभोषित अशा आपल्या सगुण मूर्तीने आमच्या दृष्ठीस पडला आहेस,यास्तव आम्हांस भोग आणि मोक्ष हे दोन्हीही प्राप्त होवोत.आपल्याला—जीवाला विषयांचा हा भोग ज्याच्या—त्याच्या प्रारब्धानुसार मिळत असतो व मोक्ष हा प्रयत्नातून मिळत असतो.म्हणून आपण जीवानी विषयांचा भोग हा प्रारब्धानुसार मिळत असतो,म्हणून विषयांच्या भोगासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही.मोक्ष हा प्रयत्नाने मिळत असतो,म्हणून सत्संग करून मोक्षासाठी प्रयत्न करावाच.||२०|| भावार्थ:---हे देवा,जो तू आपल्या मायेच्या योगाने ह्या जगाची राहटी चालण्यासाठी अनेक साधने उत्पन्न करितोस म्हणजे सर्व कर्मफले नाहीशी करून त्यास मुक्ती देतोस,म्हणूनच सकाम व निष्काम जनांनी ज्या तुझी चरणकमले वंद्य आहेत,म्हणून आपण—जीवानी निष्काम भक्तीचा स्वीकार करून भगवंतांस शरण जावे.स्वल्प आराधना केले असताही जो तू भक्ताचे मनोरथ पूर्ण करितोस त्या तुज भगवंतांना मी वारंवार नमस्कार करितो.आपणही—जीवानी भगवंतांना नमस्कार करावा.||२१|| भावार्थ:---मैत्रेय म्हणाला---हे विदुर,याप्रमाणे निष्कपटपाने स्तुती केलेला,गरुडाच्या पंखावर बसून शोभणारा व सप्रेम मंदहास्यपूर्वक अवलोकणाने ज्याची भृकुटी श्नमन पावत आहे असा तो कमलनाभ भगवान,अमृततुल्य भाषणाच्या योगाने त्या कर्दम ऋषीला म्हणाला की,---------------||२२|| |श्रीभगवानुवाच | विदित्वा तव चैत्यं मे पुरैव समयोजि तत् | यदर्थमात्मनियमैस्त्वयैवाहं समर्चित: ||२३|| भावार्थ:----श्रीभगवान म्हणाला----हे कर्मद ऋषे,तू ज्याकरिता उत्तम प्रकारच्या आपल्या नियमांच्या माझे पूजन केलेस,ते तुझे हृग्दत जाणून मी पूर्वीच त्या कार्याची उत्तम योजना करून ठेविली आहे.||२३|| भावार्थ:----हे प्रजाध्यक्ष कर्दमा सामान्य लोकांनीही केलेले माझे पूजन कधीही निष्पळ व्हावयाचे नाही,मग माझ्याठीकानी ज्यांनी आपले चित्त एकाग्र केले आहे अश्या तुझ्यासारख्या महाम्यांनी केलेले माझे पूजन निष्पळ कोठून होणार!मुळीच व्हावयाचे नाही.म्हणून आपण—जीवांनी केलेली भगवंतांच्या नामोच्चार,भगवंतांची पूजा—उपासना कधीच निष्फळ होत नाही,म्हणजे फळ हे मिळतेच.याचा अर्थ असा होतो की,परमार्थातील कांहीच निष्फळ होत नाही व संसारातील सर्वच निष्फळ होते,अशी वस्तुस्थिती आहे म्हणून संसारासाठी प्रयत्न न करता परमार्थासाठीच प्रयत्न करावा.||२४|| भावार्थ:----आता मी काय योजना करून ठेविली आहे ते सांगतो ते ऐक-----ज्याचे सदाचरण सर्वठिकाणी प्रसिध्द आहे असा,ब्रहमदेवाचा पुत्र स्वयम्भुव मनू म्हणून एक सार्वभौम राजा आहे जो ब्राहमवर्त देशामध्ये राहून समुद्रांकित पृथ्वीचे पालन करीत असतो.||२५|| भावार्थ:---हे ब्राहमण,धर्मशास्त्रात प्रवीण असा तो राजर्षी तुला पाहण्याकरिता आपल्या शतरूपा राणी नामक सहवर्तमान पर्वाचे दिवशी येथे येईल.||२६|| भावार्थ:----आणि हे ब्राहमणश्रेष्ठ,योग्य पती मिळावा अशी इच्छा करणारी जिचे नेत्रकटाक्ष श्यामवर्ण आहेत व जी वय,सुस्वभाव आणि यांनी युक्त आहे अश्या आपल्या कन्येला तो मनु,वयादिकाणी योग्य अशा तुला अर्पण करील.||२७|| भावार्थ:---हे ब्राहमणा,ती राजकन्या विवाह झाल्यावर पुढे येणाऱ्या दहा हजार वर्षेपर्यंत यथेच्छपाने तुझी सेवा करील त्या योगानेच तुझे अंत:करण त्या पत्नीचेठीकानी निरंतर समाधन वृत्तीने जडून राहील.||२८|| भावार्थ:----पुढे ती देवहुती,तुझे वीर्य आपल्या उदरी धारण करून प्रसूत झाली असता तिला नवू कन्या होतील,त्या कन्येचेठिकाणी मरीच्यादिक ऋषी,अनायासाने पुत्र उत्पन्न करतील.||२९|| | त्वां च सम्यगनुष्ठाय निदेशम म उशत्तम:। मयि तीर्थीकृताशेषक्रियार्थो मां प्रपत्स्यसे ।।३०।। भावार्थ:----तू हि माझ्या वेदलक्षण आज्ञेप्रमाणे उत्तम अनुष्ठान करून शुद्धात:करण होशील आणि माझेठीकानी सर्व कर्मफलांचे अर्पण करून मला शरण येशील.||३०|| भावार्थ:----प्रथम गृहस्थाश्रमामध्ये तू जीवावर द्या करून म्हणजे त्यांना अन्न आच्छादन वगैरे देवून व पुढे संन्यासधर्माच्या योगाने त्या त्या सर्वाना अभय देवून ज्ञानसंपन्न असा तू जगासहवर्तमान आपणाला माझेठीकानी व मलाही आपले ठिकाणी एक्यरूपाने पाहशील.ज्याप्रमाणे कर्दम ऋषी परमात्म्यासी एकरूप होतील,त्याप्रमाणे आपणही सत्संग करून ज्ञानाद्वारे परमात्म्यासी एकरूप व्हावे. ||३१|| भावार्थ:----हे महामुने,मीही आपल्या अंशरूपाने तुझ्या देवहुतीनामक भार्येचेठीकानी अवतार धारण करीन आणि सांख्यशास्त्ररूप तत्व साहिंतेची तिला कथन करीन.||३२|| | सहाहं स्वांशकलया त्वव्दीर्येण महामुने | तव क्षेत्रे देवहुत्यांन प्रणेष्ये तत्त्वसंहिताम् ||३२|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला---हे विदुर,याप्रमाणे त्या कर्दम ऋषीला सांगून नंतर,इंद्रियांचा प्रत्याहार केला असता प्रगत होणाऱ्या त्या भगवंताने,सरस्वतीनदीचे परीवेष्ठीत अशा त्या बिंदुसरोवारापासून आपल्या लोकी गमन केले.||३३|| भावार्थ:---ते असे कि,तप व मंत्रजप इत्यादिक साधनांनी सिध्द झालेल्या योगेश्वरांनी ज्याचा वैकुंठमार्ग सर्वोत्कर्षाने वर्णिला आहे अशा त्या परमात्म्याने,तो कर्दम ऋषी पाहत असता,आपल्या वाह्नरूप गरुडाच्या बृहद्रथंतरनामक पक्षांनी उच्चारिल्यामुळे स्पष्ट ऐकू येणाऱ्या सामगायनाचे व त्याला आश्र्यातून ऋत्वाच्या समुदायाचे श्रवण करीत गमन केले.||३४|| भावार्थ:---याप्रमाणे तो शुद्धस्वरूप परमात्मा तेथून गेल्यावर तो योगेश्वर्य संपन्न कर्दम ऋषी‘परवाचे दिवशी स्वायंभुव मनु येथे येईल अशा’भगवंताने सांगितलेल्या कालाची मार्गप्रतीक्षा करीत त्या बिंदुसरोवर तीरी आपल्या आश्रमात राहिला.|३५|| भावार्थ:---हे उत्तम धनुष्य धारण करणाऱ्या त्या विदुरा,इकडे स्वायंभुव मनुही आपल्या पत्नीसह सुवर्णालांकारानी भूषित अशा रथात बसून व आपल्या कन्येलाही रथात बसवून घेवून,पृथ्वीवर पर्यटन करीत भगवंताने जो दिवस सांगितला त्या दिवशी,शांतस्वभावाने युक्त अशा त्या कर्दम ऋषीच्या आश्रमस्थळी येवून पोहचला.||३६-३७|| भावार्थ:---जेथे शरण आलेल्या कर्दमावर केलेल्या कृपेने व्याप्त झालेल्या भगवंताच्या नेत्रातून प्रेमाश्रूबिंदू तेथील सरोवरात पडले होते म्हणून त्या आश्रमाला व सरोवराला “बिंदूसारोवर” असे नाव प्राप्त झाले.ते पुण्यकारक सरोवर सरस्वती नदीने आसमंताग्दागी वेष्ठित होत आणि आरोग्यकारक अमृतासारख्या गोड उदकाने युक्त असल्यामुळे महान्-महान्- ऋषीच्या समुदायाने सेवन केलेले होते||३८-३९|| भावार्थ:----तसेच ज्यांच्यामध्ये मधुर शब्द करणारे मंगलकारक पशुपक्षी राहत होते असे ते आश्रम स्थान पवित्र वृक्षांच्या व वल्लीच्या समुदायांनी युक्त होते आणि सर्व ऋतूमध्ये येणाऱ्या फलांनी व पुष्पांनी परिपूर्ण असून आपोआप उगवलेल्या दाट वृक्षांच्या ओळीच्या शोभेने युक्त होते.||४०|| भावार्थ:---तसेच मत्त झालेल्या पक्षिगणांनी नादित,फुलांतील मध पिवून गुंग झालेल्या श्नमरांच्या गुंजारवाने युक्त,मत्त झालेल्या मयूररुपी नटांच्या नृत्यसंश्नामाने सुभोषित,व मत्त झालेले कोकिलपक्षी जेथे परस्परांना हाका मारीत आहेत, असे होते.||४१|| भावार्थ:---कदंब,चंपक,अशोक,करंज,बकुळ,असण,कुंद,व आंब्याचे लहान रोप यांनी ते भूषित होते.||४२|| भावार्थ:---पाणकावळे,पाण्यावर तारणारे क्रौचंबकादिक पक्षी,हंस,टिटवे,पाणकोंबडे,सारस,चक्रवाक,व चकोर या पक्ष्यांच्या मधुर शब्दांनी ते नादयुक्त होते.||४२|| भावार्थ:---तसेच हरीण,वराह,साळई,गवे,हत्ती,गोपुच्छ,सिंह,मर्कट,मुंगुस व कस्तुरीमृग यांनी ते स्थान व्याप्त होते.||४४|| भावार्थ:---अशा त्या पवित्र आश्रमात आदिरजा तो स्वयंभूव मनु,आपल्या कन्येसहवर्तमान प्रवेश करून त्याने,तेथे ब्रह्मचार्यास योग्य अशा अग्नीत होम करून बसलेल्या कर्दम ऋषीला अवलोकन केले.||४५|| भावार्थ:----तो मनु,बहुत काळापर्यंत तपाच्या ठिकाणी तीव्र संयोग झालेल्या आपल्या शरीराने प्रकाशमान होता आणि जरी तो वस्तुतः तपश्चर्यने कृश झाला होता तथापि भगवंताच्या प्रेमयुक्त कटाक्षावलोकनेकरून व त्याला भगवंताने सांगितलेले जे भाषण तेच अमृत-- रुपी चंद्रकलेतील अमृत त्याच्या श्रवणद्वारा प्राशनाने तो फारसा कृष दिसत नव्हता.||४६|| भावार्थ:---आणि उंच,जटा धारण करणारा,वल्कले परिधान करणारा,व ज्यांची नेत्रे कमलपत्रासारखी आहेत असा होता.त्याजवळ जावून स्वायंभुव मनु पाहतो,तो जसे,एकादे महामोल तेज:पुंज रत्न वरचेवर पुसले नसता मळकट दिसते तसा तो त्याच्या दृष्ठीस पडला||४७|| भावार्थ:---नंतर कर्दमाने आपल्या पर्णकुटीकेत आलेल्या व आपल्या पुढे नम्र असलेल्या त्या राजाला आशीर्वाद देवून योग्य पूजेने त्याचा सत्कार केला.राजा हा देवाची विभूती असतो,म्हणून कर्दम ऋषींनी त्याचा योग्य पूजेने सत्कार केला,त्याचप्रमाणे आपल्या आश्रमात राजाचे आगमन झाल्यानंतर संत—महात्मा यांनी राजाचे योग्य पद्धतीने पूजन करून सत्कार करावा.||४८|| भावार्थ:----नंतर भगवंताने सांगितलेल्या गोष्ट ध्यानांत ठेवणारा तो मनु,पूजेचा स्वीकार करून नम्रतेने अग्रभागी बसलेल्या स्वयम्भुव मनुला मधुर वाणीने संतुष्ठ करीत म्हणाला की,----------------||४९|| भावार्थ:---हे राजा,तुझे पृथ्वीपर्यटन निश्चयेकरून सत्पुरुषाच्या संरक्षणाकरीतां आणि दुष्टांच्या वधाकरिता आहे.कारण जो तू प्रत्यक्ष विष्णूची पालनशक्ती आहेस.विष्णू जसे लोकांचे पालन—पोषण करितो,त्याचप्रमाणे राजा हा प्रजेचे पालनपोषण करतो.म्हणून राजा हा भगवंतांची विभूती आहे,म्हणून आपण राजाचा मान—सन्मान करावा.||५०|| भावार्थ:----जो तू,जगाच्या पलनाकरिता सूर्य,चंद्र,अग्नी,इंद्र,वायू,व वरून यांची स्वरूपे आपलेठीकानी धारण करितोस त्या विष्णुरूप तुला माझा नमस्कार असो.आपणही—संत—महात्मा यांनी राजस नमस्कार करावा.||५१|| भावार्थ:----हे राजा,टणत्कार शब्द करणारे,भयंकर धनुष्य धरण करणारा तू,आपल्या विजयी रत्नखचित रथामध्ये आरूढ होवून त्या रथाच्या घडघडसारखे शब्दाने शत्रुंना त्रास उत्पन्न करीत व आपल्या सैन्याने चरणांची तुडविले भूमंडल कंपित करीत करीत मोठी सेना बरोबर घेवून जर सूर्यासारखे पर्यटन केले नाहीस----------------||५२-५३|| भावार्थ:---तर हे राजा,वर्णाच्या व आश्रमाच्या व्यवस्थेविषयी भगवंताने बांधून दिलेल्या सगळ्या धर्ममर्यादा चोरांनी मोडून टाकिल्या जातील मग केवढा अनर्थ होईल बरे?थोडक्यात राजा यांनी आपल्या स्वधार्मांचे पालन केलेच पाहिजे.प्रजा यांना राजांनी सुखी ठेवलेच पाहिजे.अंतर्गत व बहिर्गत शत्रूपासून रक्षण केलेच पाहिजे.हा राजाचा मुख्य स्वधर्म आहे.||५४|| भावार्थ:---आणि जर तू धर्मरक्षणाविषयी उदासीन झालास तर स्वेच्छाचारी व द्रव्यलोभी अशा लोकांच्या योगाने अधर्म फार वाढेल आणि दुष्ठ लोकांनी पिडीत झालेले हे जग नाश पावेल म्हणून तसे न होण्यासाठी तू पर्यटन करीत आहेस.राजांनी नेहमी स्वधर्माचे रक्षण करावे.त्यामुळे स्वेच्छारी व द्रव्य-लोभी यांचा अधर्म वाढू देऊ नये.म्हणून रजनी स्वत:पर्यटन करून लक्ष ठेऊन सरंक्षण करावे.त्याचप्रकारे—राजाप्रमाणे स्वधार्मांचे पालन करून काम,क्रोध,लोभ,मोह,मद व मत्सर या शत्रूपासून सावध राहावे.आपण विवेक कारण विषयांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||५५|| | अथापी पृच्छे त्वां वीर यदर्थन त्वमहागत:। तद्वयं निर्व्यलीकेन प्रतिपाध्यामहे हृदा ।।५६।। भावार्थ:---तथापि हे वीर,ज्याकरिता विशेषकरून येथेच आला आहेस ते कारण मी तुला विचारितो आणि त्याचा आम्ही अगदी निष्कपट मानाने स्वीकार करू.त्याचप्रमाणे—कर्दम ऋषीप्रमाणे आपणही वक्ता असुत तर आलेल्या भक्तजनांचे—जिज्ञासूचे मामोगात ओळखून—विचारून त्यांचे समाधान करावे.||५६|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतींल तृतीय(३)स्कांधामध्ये हा एकविसावा(२१) अध्याय छेपन्न(५६)श्लोकांनी समाप्त झाला. ||२१|| || श्रीकृष्णार्पण मस्तू || ||सदगुरुचरणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ |२२--- श्रीविष्णूने कर्दम ऋषिला जसे सांगितले होते त्याप्रमाणे स्वायंभुव मनुने आपली देवाहुती-नामक कन्या कर्दम मुनीला अर्पण केली अशा कथा या बाविसव्या(२२) अध्यायांत वर्णन केलेली आहे. | २२---कर्दम ऋषी---[देवहुतीबरोबर कर्दम प्रजापतीचा विवाह] ___________________________________________________________________________________________ | एवमाविष्कृताशेषगुणकर्मोद्यो मुनिम् | सव्रीड इव तं सम्राडुपारतमुवाच ह ||१| मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,याप्रमाणे कर्दमाने ज्याच्या सर्व गुणांचा व कर्मांचा उत्कर्ष स्पष्ट रीतीने वर्णन केला आहे असा तो सार्वभौम मनु,आपल्या कीर्तीचे वर्णन एकूण लज्जित झाल्यासारखा होऊन,आपले बोलणे संपवून स्वस्थ बसलेल्या त्या कर्दम ऋषीला म्हणाला की,-------------------------||१|| भावार्थ:----मनु म्हणाला,----हे ऋषे,वेदमय ब्रहमदेवाने आपल्या वेदरुपी शरीराचे रक्षण होण्यासठी आपल्या मुखापासून तप,ज्ञान व अष्टांग योगी ह्यांनी युक्त असून विषयांचे ठिकाणी लंपट नसणाऱ्या तुम्हा ब्राह्मणास उत्पन्न केले आहे.ब्राह्मण हे जे विषयांच्या ठिकाणी लंपट—आसक्त नाहीत—विषयांच्या ठिकाणी वैराग्यवान आहेत अशांना ब्राह्मण म्हणून उत्पन्न केलेले आहेत—ज्यांचे विषयांच्या ठिकाणी वैराग्य आहे—त्याग आहे,त्यांनाच ब्राह्मण असे म्हणतात.ज्यांनी—ज्यांनी प्रयत्न करून विषयांचा त्याग केलेला आहे,त्यांना ब्राह्मण म्हणावे.ब्राह्मण हि जात स्थूक शरीरावरून ठरत नाही,तर विषयांच्या त्यागावरून ठरत असते.त्यासाठी फक्त मानवाचे शरीर आवश्यक असते.||२|| भावार्थ:----आणि त्या ब्राह्मणास रक्षणाकरिता अनंत चरणांनी युक्त असलेल्या त्याच ब्रह्मदेवाने आपल्या अनंत हस्तापासून आम्हा क्षत्रियास उत्पन्न केले आहे,म्हणूनच ब्राह्मण-कुल हे त्यांचे शरीर असे म्हणतात.||३|| भावार्थ:----याप्रमाणे एकाच शरीराशी सबंध असल्यासारखे आप-आपले व परस्परांचे रक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मणांना व क्षत्रियांना तोच देव रक्षण करितो.तो कोणता ? तर,जो सर्व जगद्रूप असून निर्विकार आहे,कारण सत्ता निर्गुण—निराकाराचीच आहे.सत्तेशिवाय रक्षण होऊ शकत नाही.रक्षण करण्याकरिता शरीराची उपाधीची गरज असते.१--”परमात्म्याची सत्ता जो कोणी व्यवस्थित वापरून जगातील जीवांचे रक्षण करून सुख देतो,त्यास “क्षत्रिय—सत्ताधीश—राजा” म्हणावे.” २--“परमात्म्याची सत्ता जो कोणी व्यवस्थित वापरून जगातील जीवांना स्वधर्मांचा,भगवंतांच्या अवतरांचा व अवतार कार्यांचा आणि भगवंतांच्या स्वरूपाचा—वेदांत शात्राचा उपदेश—ज्ञान देतो त्यास “ब्राह्मण” असे म्हणतात. ३--“परमात्म्याची सत्ता जो कोणी व्यवस्थित वापरून जगातील जीवांना ज्या--ज्या वस्तूची गरज आहे,त्या—त्या वस्तू मूल्य घेऊन पुरविणे,त्यास वैश्य—व्यापारी असे म्हणतात.४—“परमात्म्याची सत्ता जो कोणी व्यवस्थित वापरून जगातील लोकांचे सेवा करितो,त्यास “सेवक” असे म्हणतात.”१—क्षत्रिय—सत्ताधीश—राजा,२—ब्राह्मण,३—वैश्य—व्यापारी व ४—सेवक यांची विभागणी भगवंतांनी जन्मानुसार केलेली नसून गुणानुसार व कर्मंनुसार केलेली आहे,असे स्पष्ट श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवत गीतेत व त्याच ग्रंथाचा अनूवाद श्री-संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दिपिका--ज्ञानेश्वरी ग्रंथात केलेला आहे.||४|| भावार्थ:----हे ऋषे,ज्याअर्थी प्रजेचे रक्षण इच्छा करणाऱ्या माझें कर्तव्य कर्म तुम्ही आपण होऊन मोठया प्रीतींने सांगितलेंत त्याअर्थी आपल्या दर्शनेंकरूनच माझे सर्व संशय दूर झाले.जसे राजा मनुचे संशय कर्दम ऋषींनी केले,त्याचप्रमाणे आपण—जीवानी संत—महात्मा यांचा सत्संग केला तर ते संत—महात्मा आपले—जीवाचे सर्व संशय दूर करितात.म्हणून आपण संत—महात्मा यांचे परोपकार समजून त्यांच्या त्या परोपकाराची सर्व सेवा करून ऋणातून मुक्त होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करावा.||५|| | दिष्ट्या मे भगवान् दृष्टो दुर्दर्शो योsकृतात्मनाम् | दिष्ट्या पादरजः स्पृष्टं शिर्ष्णा मे भवतः शिवम् ||६|| भावार्थ:---फार काय सांगावे ! ज्यांनी आपले मन स्वाधीन करून घेतले नाही त्या लोकांची दृष्ठी पडण्याससुद्धा अशक्य अशा तुमचे दर्शन मला झाले आहे हे मोठे भाग्य होय ! आणि आपल्या मंगलकारक चरणरजाचा स्पर्श माझ्या मस्तकाला झाला हीहि मोठी आनंदाची गोष्ठ आहे.आपला अधिकार कमी असून संत—महात्म्याचे दर्शन—सत्संग होणे यासच आपले “भाग्य” असे म्हणावे.||६|| भावार्थ:----अहाहा ! माझ्या भाग्योदायानेच तुम्ही मला राजधर्म सांगून माझ्यावर मोठा अनुग्रह केलात व मीही सुदैवाने आपल्या उघड्या कर्णरंध्राणी आपली मनोहर भाषणे सेवन केली.ज्याच्या—त्याच्या भाग्योदयानेच सत्संग घडत असतो व त्यामुळे आपले पारमार्थिक हित होत असते.म्हणून आपण सत्संग करावा.||७|| भावार्थ:----तस्मात हे ऋषे,कन्येचा ‘प्रेमामुळे,हिला योग्य पती कसा मिळेल’ या काळजीने खिन्नचित्त झालेल्या मज दिनाचे सांगणे आपण कृपा करून एकूण घ्यावे.||८|| भावार्थ:---प्रियवत व उत्तानपाद यांची बहिण हि माझी देवहुतीनामक कन्या,वय,स्वभाव आणि गुण इत्यादिकांनी योग्य असा पती इच्छित आहे.||९|| भावार्थ:----तुमचा स्वभाव,विद्या,रूप,वय,आणि गुण हे जेव्हा हिने नारदमुनीपासून ऐकिले तेव्हापासून हि तुम्हास वरण्याविषयी निश्चय करून राहिली आहे.||१०|| भावार्थ:----तस्मात हे द्विज श्रेष्ठ भक्तिपूर:सर मी अर्पण केलेली हि कन्या,तुम्ही स्वीकारवी.कारण गृहस्थाश्रमसंबंधी कर्माविषयी तुम्हास सर्वप्रकराणी हि योग्य आहे.आपणहून एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपणास मिळत असेल व योग्य असेल तर वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वीकार करावा.स्वीकार न करने योग्य नसते,असा विवेक करून निर्णय घ्यावा.||११|| भावार्थ:----ह्या गोष्ठीला आपण नाही म्हणू नये.कारण,सर्वसंग परित्याग केलेल्या पुरुषालाही स्वत:प्राप्त झालेल्या विषयाचा अव्हेर करणे उचित नाही,मग विषयासक्त पुरुषाला उचित कोठून जाईल?||१२|| भावार्थ:----जो पुरुष,आपणाजवळ न मागता प्राप्त झालेल्या वस्तूचा अनादर करून पुढे त्या वस्तूची एखाद्या कृपण मनुष्याजवळ याचना करितो त्यांचे यश जरी सर्वठिकाणी पसरलेले असले तरी ते नाश पावते आणि दुसऱ्या लोकापासून अवज्ञा होवून त्याचा मानभंगहि होतो.आपणहून वस्तू किंवा व्यक्ती आली असेल व त्या वस्तूची किंवा व्यक्तीची गरज असेल आपण अनादर करू ये,तर आदर करावा.आपणास ती वस्तू किंवा व्यक्ती तर पाहिजे असतेच,म्हणून त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची मागणी करावीच लागते,म्हणून आपणहून आलेल्या योग्य वस्तूची किंवा व्यक्तीचा स्वीकार करणे हाच आपला स्वधर्म असतो.||१३|| भावार्थ:----हे ज्ञानसंपन्ना ऋषे,तुम्ही विवाहाकरिता उद्युक्त आहा असे मी ऐकिले आहे.यास्तव सावधि(ग्रहस्थाश्रमापर्यंत)ब्रहमचर्य व्रत धारण करणाऱ्या तुम्ही,मी अर्पण केलेल्या ह्या कन्येचा स्वीकार करावा.||१४|| | बाढमुद्वोढूकामोsहमप्रत्ता च तवात्मजा | आवयोरनुरुपोsसावाद्दो वैवाहिको विधिः ||१५|| भावार्थ:---कर्दम ऋषी म्हणाला----हे राजा,ठीक आहे.मी खरोखारच विवाह करण्याची इच्छा करीत आहे आणि हि तुझी कन्याही दुसऱ्या कोणाला देण्याचे वचन दिलेले नाही.तस्मात आह्मा उभयंत्याला अनुरूप असा हा पहिलाच विवाह विधी आहे.||१५|| भावार्थ:---आणि हे राजा,वेदामध्ये सांगितलेल्या विधीमध्ये प्रसिध्द असलेला ह्या तुझ्या कन्येचा माझ्यासहवर्तमान विवाह करण्याचा मनोरथ तो परिपूर्ण होवो.कारण,आपल्या अंगकांतीनेच भूषणादि सबंधी शोभेचा तिरस्कार करणाऱ्या तुझ्या कन्येचा,कोण बरे अंगीकार करणार नाही.हे राजा तुझ्या कन्येच्या अंगकांतीनेच भूषणाला शोभा आलेली आहे,तर भूषनाने कन्येला शोभा आलेली नाही.भावार्थ तुझी कन्या सौंदार्यांनी परिपूर्ण आहे व स्वभावाने सात्विक—सौंदर्य आहे.सात्विक सौंदर्य हेच प्रेम—सुख देते.||१६|| भावार्थ:----पूर्वी एके काळी तोरड्या घातलेल्या असल्यामुळे रुण्-झुण् शब्द करणाऱ्या पायांच्या योगाने जिला शोभा आली होती व जिचे नेत्र चेंडूकडे लागलेला असल्यामुळे चंचल झाले होते अशा राजवाड्याच्या गच्चीवर खेळणाऱ्या ज्या तुझ्या कन्येला अवलोकन करून,अत्यंत मोहाने व्याकूळचित्त झालेला विश्ववसूनामक गंधर्व,आपल्या विमानातून खाली पडला होता;अशी,स्त्रियामध्ये अतिसुंदर,लक्ष्मीची चरणसेवा न करण्याऱ्या पुरुषांनी पाहण्यासाससुद्धा अश्यक्य,मनुची(तुझी)कन्या आणि उत्तानपाद राजाची बहिण अशी स्त्री आपल्या घरी येवून पती होण्याकरिता जर आपली प्रार्थना करीत आहे तर कोण बरे ज्ञाता पुरुष तिचा अंगीकार करणार नाही?सर्वही करतीलच.म्हणून मी तिचा अंगीकार केलेला आहे.||१७-१८|| भावार्थ:----यास्तव कांही नियमित कालपर्यंत म्हणजे माझ्या देहापासून गलित झालेले वीर्य हि धारण करी तोपर्यंत मी या साध्वीचा स्वीकार करीन.त्यानंतर संन्यास ग्रहण करून भगवंताने सांगितलेले ज्ञानसंपादनाविषयी मुख्य आणि हिंसारहित असे जे शमदमादिक धर्म त्यांच्याच बहुआदराने स्वीकार करावा असे माझ्या मनात आहे.आपल्या मनातील भविष्यकाळातील भावना असतील तर प्रगट कराव्यात.||१९|| भावार्थ:---कारण,ज्यापासून अनेक चमत्कारांनी परिपूर्ण हे जग उत्पन्न झाले,ज्याच्यामध्ये ह्याचा लय होईल आणि प्रस्तुत हे ज्याच्याठीकानी आहे तो हा प्रजापतीचा अधिपती अनंत भगवानच मला केवळ मान्य आहे,म्हणजे ऋणत्रयापासून मुक्त झाल्यावर संन्यास घेण्याविषयी त्या भगवंताचीच मला आज्ञा आहे.आपण—जीव--ग्राहस्थाश्रमातील पुरुषानी तीन ऋणातून—देव-ऋण.पितृ-ऋण,व ऋषी-ऋणातून मुक्त झाल्यानंतर संन्यास घ्यावा.||२०|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला,हे उग्र धनुष्य धारण करणाऱ्या विदुर,तो कर्दम ऋषीइतकेच भाषण करून आपल्या बुद्धीने पद्मनाभ भगवंताने ध्यान करीत स्वस्थ बसला.त्या वेळी त्याच्या मंदहास्याने सुभोषित झालेल्या मुखाकडे पाहून देवहुतीचे चित्त त्याला वरण्याविषयी लुब्ध झाले.||२१|| भावार्थ:----कर्दमाचे भाषण ऐकिल्यावर तो मनुही,आपल्या राणीचा व कन्येचा निश्चय स्पष्टपने जाणून,हर्षयुक्त झाला आणि त्याने अनेकगुणसमुहानी युक्त अशा त्या कर्दमाला शीलादिगूनसंपन्न अशी आपली कन्या अर्पण केली.||२२|| भावार्थ:----त्या वेळी शतरूपा नामक महाराणीने मोठ्या प्रेमाने त्या उभयंता दंपतीला,मोठमोठ्या मूल्यवान-देणग्या,भूषणे,वस्त्रे आणि गृहसंबंधी पुष्कळ भांडीकुंडी अर्पण केली.||२३|| | प्रात्तम दुहितरं सम्राट सदुक्षाय गतव्यथ:। उपगुह्य च बाहुभ्यामौत्कण्ठयोन्मथिताशय: ।।२४।। भावार्थ:---याप्रमाणे तो सार्वभौम मनु आपली कन्या यथायोग्य वराला देवून निश्चित झाला,आणि तेथून निघून जातेवेळी त्याने आपल्या बाहुनी आलिंगन करून तिचा विरह सहन न करीत होत्सात उत्कंठाणे सद्गतीचित्त झाला आणि वारंवार नेत्रांतून दु:खाश्रू ढाळीत व हे बाई,हे तान्हे,असे कन्येशी भाषण करीत करीत त्याने आपल्या नेत्राश्रुनी तिचे सगळे केस भिजवून टाकिले.आपणही—जीवहि गृहस्थाश्रमी असाल तर आपल्या कन्येचा विवाह संपन्न झाल्यानंतर,निरोप देतेवेळेस आपल्या नेत्रांतून दु:खाश्रू येतातच,कारण आजपर्यंत आपण तिचे पालण—पोषण केलेले असते,व लग्नानंतर आपल्या कन्येला तिच्या पतीला अर्पण करायचे असते,म्हणून आपल्या नेत्रांतून दु:खाश्रू येतात.||२४-२५|| भावार्थ:----नंतर त्या ऋषीश्रेष्ठ कर्दमाला विचारून,त्याने आज्ञा दिली असता,तो राजा,स्त्रीसहवर्तमान रथारूढ झाला व सेवकांसहित आपल्या नगरास जाण्याकरिता निघाला.||२६|| भावार्थ:----तेव्हा ऋषिकुलाला योग्य अशा सरस्वतीनदीच्या दोन्ही सुंदर तीरांवर असलेल्या अतिशांत ऋषीच्या आश्रमसंपत्ती अवलोकन करीत करीत तो मार्गाने चालला.||२७|| भावार्थ:---इकडे ब्राह्मावर्त देशतील सर्व प्रजा,आपला पालक राजा,स्वदेशात येत आहे असे जाणून अत्यंत हर्षयुक्त झाल्या आणि त्याचे गुण गाऊन स्तुति करीत व वाद्ये वाजवीत होत्सात्या ब्रह्मावर्त देशातून त्याला सामोऱ्या गेल्या.||२८|| भावार्थ:----ह्या देशामध्ये सर्व प्रकारच्या संपत्तीनी परिपूर्ण अशी बर्हिष्मतीनांवाची एक राजधानी होती,जिच्यामध्ये पूर्वी यज्ञवराह अवतार धारण करणाऱ्या भगवंताने आपले शरीर थरथर कांपविले तेव्हा त्यापासून भूमीवर केस पडले होते.||२९||
भावार्थः---पुढे तेच कसे,नित्य हिरव्या रंगाचे कुश व काश (दर्भांतील एक जात) या रूपाने भूमीपासून उगवले.ज्या कुशकाशांच्या योगाने ऋषींनी यज्ञविध्वसक राक्षसादिकांचा पराभव करून विष्णूच्या प्रीत्यर्थ यज्ञानुष्ठान केले.||३०|| भावार्थः---वराहरुपी भगवंतापासून भूमिरूप स्थान मिळाल्यावर ऐश्वर्यसंपन्न मनुनेही ज्या नगरीमध्ये कुश व काश या जातीचे बर्हि (दर्भ)पसरून यज्ञरूपी विष्णूचेयजन केले होते,म्हणून ती बर्हिष्मतीनायक नगरी झाली.येणेकरून स्वर्गापेक्षा भूमि श्रेष्ठ असून तितही हि ब्रहमवर्त स्थान श्रेष्ठ असे सिद्ध होते||३१|| भावार्थः---असो,तो मनु,ज्या बर्हीष्मतीनावांच्या नगरीमध्ये पूर्वी वास करीत होता तिच्या मध्ये पुन्हा तापत्रयाचा नाश करणाऱ्या आपल्या पुरातन मंदिरांत प्रविष्ट होऊन,त्याने आपली पत्नी व मुले यांसहवर्तमान धर्मादिकांना विरोध न येतां विषयांचा उपभोग घेतला.मनुने स्वधार्मानुसार विषयांचा उपभोग घेतला,त्याचप्रमाणे आपण जर गृहस्थाश्रमी असुत तर स्वधार्मांनुसार विषयांचा भोग घ्यावा,तर अधर्न्नुसार—परधर्मांनुसार विषयांचा भोग घेऊ नये.||३२|| । सभार्य:सुप्रज:कामान बुभुजेSन्याविरोधात:|
| सङगीयमानसत्कीर्ति:सास्त्रीभि:सुरगायकै| | प्रत्युषेषनुबाद्धेंन हृदा श्रुणवन हरे:क ||३३|| भावार्थः---पहांटेच्या वेळी आपल्या स्त्रियांत देवगायक गंधर्व,तेथे येऊन ज्याच्या सतकीर्तीचे उत्तम गायन करीत असत.तथापि तो राजा,आपल्या कीर्तीच्या श्रवणाविषयी आसक्त न होतां,स्वतः प्रेमभरित अंतःकरणाने हरीच्याच कथा श्रवण करीत असे.||३३|| भावार्थः---तो स्वायंभुव मनु,पाहिजेत ते भोग निर्माण करण्यास समर्थ,मननशील व भगवत्पारायन होता म्हणून त्याला सर्वही विषयभोग धर्ममार्गापासून किंचितसुद्धा भ्रष्ट करण्याविषयी समर्थ झाले नाहीत.स्वयंभू मनू विवेकी—मननशील असल्यामुळे विषयांचा भोग स्वधर्मांनुसार घेतला,त्याचप्रमाणे आपण—जीवानी वेवेकी—मननशील होऊन विषयांचा भोग स्वधर्मांनुसार घ्यावा,अधर्मांनुसार—परधर्मांनुसार घेऊ नये.||३४|| | अयातयामास्तस्यासन् यामाः स्वान्तरयापनाः | शृन्वतो ध्यायतो विष्णोः कुर्वतो ब्रुवतः कथाः ||३५|| भावार्थः----विष्णूचे ध्यान करणारा,विष्णूच्या कथा रचणारा,त्यांचे वर्णन करणारा व श्रवण करणारा अशा त्या मनुचे मन्वंतरसंबंधी काळाचे सर्वही प्रहरादिक अवयव,कधीही निष्फळ झाले नाहीत.मनुने ज्याप्रमाणे स्वधर्मांनुसार जीवन व्यतीत केले.काळाचा एकही क्षण निर्थक व अनर्थक न करता सार्थक केला त्याचप्रमाणे आपणही—जीवानी स्वधर्मांनुसार जीवन व्यतीत करावे.काळाचा क्षण एकही क्षण निर्थक व अनर्थक न करता सार्थक करावा,कारण त्यातच आपले परम-हित आहे.||३५|| भावार्थः----याप्रमाणे वासुदेवाच्या कथांप्रसंगेकरून त्या मनूने,जाग्रत आणि स्वप्न आणि सुषुप्ति या तिन्ही अवस्थांना जिंकून,कृत त्रेत,द्वापर आणि कलीहि चार युगे एकाहत्तर वेळ जातात इतका आपल्या मन्वंतराचा काळ सुखाने घालविला.आपणही—जीवानी मनुसारखे आचरण करून जाग्रत,स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना जिंकून,आपल्या आयुशाचा संपूर्ण काळ सुखाने व पारमार्थिक काळाने घालवावा.||३६|| भावार्थः----हे व्यासपुत्रा विदुरा,श्रीहरीचा आश्रय करून राहणाऱ्या पुरुषाला,शरीरापासून होणारे रोगादिक,मनापासून होणारे चिंता इत्यादिक,अंतरिक्षापासून होणारे विद्दुत्पातादिक मनुष्यांपासून होणारे पराभवादिक आणि पंचमहाभूतांपासून होणारे अतिवृष्टयादिक क्लेश कसे बरे पीडा करितील?करणारच नाहीत.म्हणून आपण श्रीहरीचा आश्रय करून राहावा,कारण आपण निराश्रित आहोत.आपण भागावान्तांचाच आश्रय घेतला तर,आपणास स्थूल—शरीरापासून,मनापासून होणारे,अंतरिक्षापासून विद्दुपातादिक,मनुषापासून होणारे पराभावादिक,आणि पंचाम्हाभूतांपासून होणारे अतिवृष्ट्यादिक असे हे सर्व दु:ख पिडा देणार नाहीत.म्हणून आपण भगवंतांचाच आश्रय करावा.||३७||
| य:पृष्टो मुनिभि:प्राह धर्मान्नानाविधा౫छुमान । नृणां वर्णाश्रमाणां च सर्वभूतहित: सदा।।३८।। भावार्थः----जो मनु,सर्व प्राणिमात्रांचा हितकर्ता असल्यामुळे एके वेळी सर्व ऋषींनी त्यास प्रश्न केला असतां,त्याने (मनुस्मृतीरूपाने)मनुष्यांचे साधारण धर्म व ब्राह्मणादिक वर्णाचे व ब्रह्मचर्यादिक आश्रमांचे शुभकारक नानाप्रकारचे विशेष धर्म स्पष्ट रीतीने सांगितले आहेत.म्हणून मानुस्मृतीचा सत्संग करून श्रवण करावे व त्यानुसार आचरण करावे.||३८|| | एतत्त आदिराजस्य मनोश्चरितमद्भूतम् | वर्णितं वर्णनीयस्य तदपत्योदयं श्रुणु ||३९|| भावार्थः----हे विदुरा,वर्णन करण्यास योग्य अशा त्या आदिराज स्वायंभुव मनुचे हे अद्भुत चरित्र,तुला मी वर्णन केले आहे.आतां त्याची कन्या जी देवहुति तिचे आख्यान सांगतो ऐक.||३९|| |याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील त्रितीय(३)स्कंधातील हा बाविसावा(२२)अध्याय एकूणचाळीस(३९)श्लोकांनी समाप्त झाला. | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ |२३--- आतां तेविसाव्या अध्यायांत कर्दम ऋषीने आपल्या तपाच्या व योगाच्या सामार्थ्यांने निर्माण केलेल्या,सर्व संपत्तींनी युक्त व स्वच्छाधारी अशा विमानामध्ये,त्या उभयतांची विचित्र क्रीडा वर्णन केली आहे. | २३----कर्दम ऋषी[कर्दम आणि देवहुति यांचा विहार] _____________________________________________________________________________________________ | पितृभ्यां प्रस्थिते साध्वी पतीमिन्गीतकोविदा | नित्यं पर्यचरत्प्रीत्या भवानीव भवं प्रभुम् ||१|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,इकडे देवहूतीच्या आईबापांची आश्रमांतून गमन केले असतां,पतीचा अभिप्राय जाणणारी,साध्वी ती देवहुती,ज्याप्रमाणे पार्वती शंकरप्रभूची सेवा नेहमी करते त्याप्रमाणे आपल्या पतीची प्रीतीने सेवा करूं लागली.म्हणून आपण पतीचा, पत्नी म्हणून स्वीकार केलेला असेल तर आपण पार्वतीप्रमाणे त्यांची—पतीची प्रीतीने—प्रेमाने सेवा करावी.||१|| | विश्रम्भेणात्मशौचेन गौरवेंण दमेन च । शुश्रूषया सौह्रदेन वाचा मधुरया च भो:।।२।। भावार्थः----हे विदुरा,सावध राहून पति सांगेल त्याप्रमाणे वागणाऱ्या त्या देवहुतीने विषयभोगांची इच्छा,कपट,द्वेष,लोभ,निषिद्धाचरण व उन्मत्तपणा या दुर्गुणांचा त्याग करून,शारीरिक व मानसिक शुद्धता,विचारांना प्रौढपणा,इंद्रियांचा निग्रह,सेवाधर्म,प्रेम व मधुर भाषण यांच्या योगाने त्या महातेजस्वी पतीला संतुष्ट केले.आपण जर पतीची पत्नी असाल तर आपल्या स्वधर्मांनुसार आपण आपल्या पतीची सेवा ज्याप्रमाणे देवहु तीने केली,त्याप्रमाणे आपण १—कपटाचा त्याग:---मनात जो विचार आहे,तोच विचार वाचेत व वाचेत जो उच्चार आहे,तोच आचरणात—वागण्यात असणे त्यास निष्कपट सेवा असे म्हणतात.२—द्वेषचा त्याग:--द्वेष म्हणजे आपल्या समोर जी व्यक्ती आहे,त्याची प्रगती—उन्नत्ती—सुख न सहन होणे व त्याचे वाईट होणे,अशी जी वृत्ती आहे त्यास द्वेष असे म्हणतात.आपण द्वेषरहित म्हणजे जी प्रगती समोरच्याची ती आपलीच प्रगती,समोरच्याचे सुख म्हणजे आपलेच सुख,समोरच्याचे दु:ख म्हणजे आपलेच दु:ख,त्यास द्वेषरहित असे म्हणतात.३—लोभाचा त्याग:---लोभ म्हणजे त्यांचे धन आपणास मिळावे,त्यांना मान न देता आपणांस मान मिळावा,त्यांना वैभव न मिळता त्यांचे वैभव आपणास मिळावे,त्यांच्यावर इतरांनी प्रेम न करता इतरांना आपल्यावरच प्रेम करावे, याप्रमाणे सर्व कांही फक्त आपल्याच मिळावे,अशी मोभांची वृत्ती तिला लोभ असे म्हणतात उदा—आपल्यालाच सर्व राज्य मिळावे व पांडवास उईच्या अग्रावर बसेल एवढी माती न मिळो,यास लोभ असे म्हणतात.म्हणजे आपल्यास धन नको,आपणांस मान—प्रतिष्ठा नको,आपणास वैभव नको,आपणास कांहीच नाशिवंत नको तर फक्त प्रीती--प्रेम असो,अशी जी भावना त्या भावनेश लोभरहित भावना असे म्हणतात.४---निशिद्धाचारणाचा त्याग:---निशिद्धाधाचारण म्हणजे स्वधर्माचे पालन न करता अधर्माचे पालन करणे, परधर्मांचे पालन करणे.पतीची सेवा न करता पतीकडूनच सेवा घेणे यास स्वधर्मांचे पालन न करता निषिद्ध धर्मांचे पालन करणे असे म्हणतात.देवाहुतीने स्वधर्माचे—विधीचे पालन करून सेवा केली,त्याच-प्रमाणे आपण निषिद्ध धर्मांचे पालन न करता स्वधर्मांचे—विधीचेच पालन करावे.५-उन्मत्तपणा:---उन्मत्तपणा म्हणजे अभिमानपणा-गर्वपणा,माझ्यासारखा मीच,व इतर कोणीच नाही.या वृतीस उन्मत्तपणा असे म्हणतात.देवाहुतीने नम्र होऊन आपल्या पतीची सेवा केली.निष्काम भावनेने सेवा केली,त्याप्रमाणे आपण नम्र होऊन,निष्काम भावनेने सेवा करावी.६--शारीरिक व मानसिक शुद्धता:---शारीरिक शुद्धता म्हणजे निष्काम कर्मे करून अंत:करणातील मलदोषांची—पापांची निवृत्ती करणे.मानसिक शुद्धता म्हणजे निष्काम उपासना करून मनाची स्थिरता करणे यास “मानसिकशुद्धता” असे म्हणतात.देवाहुतीने शारीरिक शुद्धता व मानसिक श्गुद्धता केली होती,त्याप्रमाणे आपण शारीरिक व मानसिक शुद्धता करावी. ७---विचारांचा प्रौढपणा:---सार काय व असार काय?,स्वधर्म म्हणजे काय व परधर्म—अधर्म म्हणजे काय?असा विवेक—विचार करून निर्णय घेऊन त्यानुसार आचरण करणे यास “विचारांचाप्रौढपणा” असे म्हणतात.देवाहुती याप्रमाणे विचारांचा प्रौढपणाने आचरण करीत होती.आपणही त्याचप्रमाणे विचारांचा पौढपणानुसार आचरण करावे.८—इंद्रियांचा निग्रह:---इंद्रिये आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेऊन त्यानुसार आचरण करणे.देवाहुती इंद्रियांचा निग्रह करून आचाराम्न करीत होती,त्याप्रमाणे आपणही इंद्रिये ताब्यात ठेऊन आचरण करावे.९—सेवाधर्म:---पतीची किंवा इतरांचे सेवा करून त्या सेवेच्या मोबदल्यात परतावा—फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने सेवा करावी.देवाहुती याप्रमाणे सेवा करीत असे,त्याप्रमाणे आपल्या पतीची किंवा इतरांची सेवा तिच्यासारखी करावी.१०---प्रेम व मधुर भाषण:---आपल्या बोलण्यात प्रेम असावे म्हणजे आपल्या बोलण्यात स्वार्थ नसावा तर निस्वार्थ असावी.तसेच ते बोलणे मधुर म्हणजे कोमल आवाजात व नम्रतापूर्वक असावे.देवहुतीच्या बोलण्यात स्वार्थ नव्हता तर निस्वार्थ होता व उच्चारात मधुरता होती,तर कठोरपणा नव्हता.त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यात स्वार्थ नसावा व नम्रता व कोमलता असावी.याप्रमाणे देवाहुतीने आपल्या पतीची सेवा करून पतीला संतुष्ट केले होते.त्याप्रमाणे आपण आपल्या पतीची सेवा देवाहुतीप्रमाणे करून पतीला संतुष्ट करावे.तसेच पतीने आपल्या पत्नीला प्रेम देऊन संतुष्ट करावे.याप्रमाणे पती व पत्नीने परस्पर एकमेकांची सेवा करून प्रेमाची देवाण—घेवाण करून जीवन व्यतीत करावे.यालाच प्रेमाचे जीवन असे म्हणतात.||२|| | विसृज्य कामं दंभ च व्देष लोभमघं मदम । अप्रमत्तोद्धता नित्यं तेजियांसमतोषायत ।।३।। भावार्थः----नंतर तो देवर्षीश्रेष्ठ कर्दमऋषी,दैवी असलेली गोष्टही अन्यथा करण्यास समर्थ अशा आपणापासून पुष्कळ विषयभोग मिळावे अशी इच्छा करणारी,आपली सेवा करणारी,पातीव्रत्यरूप व्रताचरणांने कृश झालेली,व त्यांतही फारच वेळ गेल्यामुळे अतिकृश झालेली अशा त्या देवहुतीला अवलोकन करून,कृपेने व्याकुळ होत असता प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने तिला म्हणाला की,--------||३-४-५|| । तुष्टोSह्मध्द तंव मानवि मांनदाया:शुश्रूषया परमया परया च भक्त्या। | यो देहिनामयमतीव सुहृत्स्वदेहो नावेक्षित:समुचित:क्षपितुं मदर्थे।।६।। भावार्थः---कर्दम म्हणाला----हे मनुकन्ये,माझा मान राखणाऱ्या तुझ्या ह्या उत्तम सेवेने व अतिशय भक्तीने आज मी संतुष्ट झालो आहे;कारण,प्राणिमात्रांस अत्यंत प्रिय असून अनेक प्रकारांनी रक्षण करण्यास योग्य जो हा स्वदेह तो तूं मजकरिता झिजविण्यास मागेपुढे पाहिले नाहीस!याप्रमाणे पत्नीने पतीची सेवा केली असता पत्नीला प्रेमाचे प्रशस्ती-पत्रक मिळत असते.उभायान्तांनी ऐकामेहाची प्रेमपूर्वक सेवा केली असता दोधेही एकमेकास प्रशस्ती—पत्रक देत असता व प्रेमाने जीवन जगात असतात.आपणही कर्दम ऋषी व देवाहुतीप्रमाणे जीवन जगावे,हिच श्रीमद्भागवतकार व्यास मुनींची अपेक्षा आहे.त्यांची ती अपेक्षा पूर्ण करून आपणच प्रेम--पूर्वक जीवन जगावे.||६|| | ये मे स्वधर्मनिरतस्य तप:समाधिविध्यात्मयोगविजिता भगवत्प्रसादा:। | तानेव ते मदुनसेवनायावरुद्धान दृष्टि प्रपश्य वितराम्यभयानशोकान ।।७।। भावार्थः----यास्तव पूर्वी स्वधर्मामध्ये तत्पर असणाऱ्या माझ्या ज्या तप.समाधि,उपासना आणि अंतःकरण एकाग्र करून भगवत्स्वरूपी लावणे.यांच्या योगेकरून प्राप्त करून घेतलेले जे भयरहित व शोकरहित दिव्य भोगरहित तेच तूं माझ्या सेवेने मिळविले आहेस,ते तुला दिव्य दृष्टि देऊन मी दाखवितो पाहा.याप्रमाणे देवहुतीने आपल्या पतीच्या पारमार्थिक व संसारिक सेवेत सेवेत जीवन व्यतीत केले त्याचप्रमाणे आपणही आपल्या पतीच्या सेवेत जीवन जगून जीवन व्यतीत करावे.हाच पत्नीचा स्वधर्म आहे.कर्दम ऋषींनी पत्नीने सेवा केल्याबद्दल तिच्याही इच्छा त्यांनी पूर्ण केल्या आहेत,त्याचप्रमाणे पतीने आपल्या पत्नीने सेवा केल्यामुळे त्या पत्नीच्या इच्छा पूर्ण कराव्यात.एकमेकांनी एकमेकांचे सेवा करून प्रेमपूर्वक जीवन जगावे.असे हे कर्दम व देवहुतीचे चरित्र—जीवन आपणास बोध घेण्यास आदर्श आहे.त्याप्रमाणे आपणही आचरण करून जीवन व्यतीत करावे.हाच आपला मानवता धर्म आहे.मानवता धर्मांचे पालन मनुष्य देहातच आचरण करून दाखवता येते,इतर देहात मानवता नसते तर पशुता असते.म्हणून आपण मानव देहात मानवता धर्म पाळावा व पशुता हि पशुचा देह मिळाला तर तेथेच पशुता स्वभावता:च असते.जेथील काम तेथेच करावे.हाच प्रत्येक जीवाचा स्वधर्म आहे. ||७|| भावार्थः----दुसरे जे मनुष्यांचे भोग आहेत,ते उरुक्रम भगवंताच्या भृकुटीच्या वक्रीभावानेच ज्यांतील मनोरथ नष्ट होऊन जातात असे तुच्छ आहेत.आणि तूं तर माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस.यास्तव राज्यसंपत्ती खर्च केल्या तरी मनुष्यांस प्राप्त न होणारे असून केवळ पातीव्रत्य धर्मानेच तुला प्राप्त झालेले अशा दिव्य भोगांचा तूं आतां उपभोग घे.मनुष्यांस राज्य-संपत्ती खर्च करूनही प्राप्त न होणारे विषयांचे भोग ते भोग पत्नीस पातिव्रत्य स्वधर्मानेच प्राप्त होतात.देवहुतीने पातीव्रत्य-स्वधर्माने पालन करून घेतलेले आहेत. म्हणून आतां दिव्य भोग देवहुतीला उपभोगावयास मिळणार आहेत.म्हणू स्त्रीने पातिव्रता—धर्मांचे पालन करावे.||८|| भावार्थः----हे विदुरा,याप्रमाणे भाषण करणाऱ्या व हरीच्या सर्व योगमाया व सर्व प्रकारच्या उपासना जाणण्याविषयी निपुण अशा त्या आपल्या कर्दम पतीला अवलोकन करून,ती देवहुति निश्चित झाली आणि जिचे मुख,किचित लज्जायुक्त अवलोकनाने विकसित व हास्ययुक्त झाले अशी ती,नम्रता व प्रेम यांच्या सद्गतीत झालेल्या वाणीने म्हणाला कि,----||९|| |देवहुतिरुवाच | राद्धं बत द्विजवृषतदमोघयोग- | मायाधीपे त्वयि विभो तदवैमि भर्त: | | यस्तेsभ्यधायि समयः सकृदङसङो | भूयाद्गरीयसि गुण: प्रसव: सतीनाम् ||१०|| भावार्थः----देवहुति म्हणाली----हे ब्राहमणश्रेष्ठा पते,सफल योगमायांचा अधिपती अशा आपल्याठिकाणी दिव्य भोग उत्पन्न करणे हे सर्व सिद्धच आहे व ते मी समजून आहे,व त्यामुळे मला आनंद वाटत आहे.परंतु हे विभो,जे आपण विवाहाच्या वेळी गर्भधारण होईपर्यंत तुझा अंगसंग होईल म्हणून मला वचन दिले होते,ते आतां परिपूर्ण होवो.कारण पतिव्रता स्त्रियांना आपल्या पूज्यपतीपासून अपत्यप्राप्ति होणे हा एक मोठा लाभच आहे.पतिव्रता स्त्रियांना आपल्या पूज्यपतीपासून अपत्यप्राप्ती होणे हाच एकच मोठा लाभ आहे.अन्य लाभ हा गौण आहे.स्त्री मुख्य लाभाचीच अपेक्षा पतीकडून करीत असते,तर गौण लाभाची अपेक्षा करीत नसते.||१०|| भावार्थः----हे स्वामिन्,त्या अंगसंगाविषयीं जें कांही साधन करणें असेल तें,कामशास्त्रानुसारें संपादन करावें म्हणजे ज्या अभ्यंगस्नान,भोजन,पान इत्यादिक साधनेंकरून आपणच क्षोभविलेल्या कामानें पिडीत झालेल्या माझा हा देह,आपल्या सहवर्तमान रममाण होण्याच्या उत्कट इच्छेनें तपश्चर्यादिकेकरून कृश व दीन झाला आहे,तो भोग भोगण्याविषयीची समर्थ होईल,आणि तसे होण्याविषयी योग्य असे एक घर निर्माण करण्याच विचार करावा.||११|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला-----हे विदुरा,याप्रमाणे देवहुतीने सांगितले असता,त्या आपल्या प्रियेचे प्रिय करणाऱ्या इच्छेने कर्दम ऋषीने योगसाधनाचा स्वीकार करून,त्याच्या योगाने तत्क्षणीच यथेच्छ गमन करणारे एक विमान उत्पन्न केले.||१२|| भावार्थः----ते दिव्य विमान,सर्व कामना परिपूर्ण करणारे,सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त व सर्व प्रकारच्या संपत्तीच्या उत्कर्षांची अभिवृद्धी ज्याचे ठिकाणी आहे असे असून रत्नांच्या स्तंभांनी सुशोभित होते.||१३|| भावार्थः---ते विद्य पर्यकादिक साहित्यांनी युक्त,सर्वकाली सुखकारक,आणि चित्रविचित्र लहानमोठ्या पडद्यांनी व पताकांनी सुशोभित होते.||१४|| भावार्थः----तसेच ज्यावर बसलेले भ्रमर मंजुळ गुंजारव करीत होते अशा अनेक रंगाच्या फुलांच्या माळांनी युक्त व पैठण्या,पितांबरवगैरे रेशमी वस्त्रांनी व कापसाच्या लोकरीच्यावगैरे उंची उंची वस्त्रांनी सुशोभित होते.||१५|| भावार्थः----एकावर एक अशा प्रकारे रचलेल्या मजल्यामध्ये शय्या,पलंग,पंखे,खुर्च्या आसनेवगैरे निरनिराळी ठेवलेली असल्यामुळे ते अति रमणीय दिसत होते.||१६|| भावार्थः---तसेच ते जागोजाग ठेवलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या तसबिरी चित्रे इत्यादिकांनी सुशोभित होते व पाचेच्या फरसबंदीने व पोवळ्यांच्या वेदींनी (बसावयाच्या जाग्यांनी)बांधलेले होते.||१७|| भावार्थः---- तसेच प्रत्येक द्वारामध्ये असलेल्या पोवळ्यांच्या उबऱ्याने शोभित असून त्याच्या दारांच्या फळ्या हिरेजडित होत्या,त्याची शिखरे इंद्रनीळ मण्याची असून त्यांतर सुवर्णाचे कलश ठेविलेले होते.||१८|| भावार्थः---तसेच हिऱ्याच्या भिंतीमध्ये जडलेल्या उत्तम पद्मराग मण्यांच्या योगाने ते विमान नेत्रयुक्त आसल्यासारखे दिसत होते व महामोल चित्र विचित्र रंगाच्या छतांनी व सुवर्णमय तोरणांनी युक्त होते.||१९|| भावार्थः----त्या विमानावर ठिकठिकाणी कृतीने केलेल्या हंसास व पारव्यास,हे आपले स्वजातीयच बसले आहेत असे मानून,खऱ्या हंसाचे व पारव्याचे समुदाय त्यांच्याजवळ वारंवार येऊन बसून शब्द करीत असत.||२०|| भावार्थ:----आणि ते विमान,जसे आपणास सुख होईल त्याप्रमाणे रचलेल्या-क्रीडेचीजागा,शयनाचे स्थळपोशाख करण्याचे स्थान,घराच्या समोर चौक व तटाच्या बाहेर मैदान;यांनी स्वत: मायावी(विमान उत्पन्न करणाऱ्या)अशा त्या कर्दमालाही विस्मय उत्पन्न करण्यासरखे होते.||२१|| भावार्थ:----हे विदुरा,अशा प्रकारचे ते घर पाहूनही त्याठिकाणी दासी वगैरे नसल्यामुळे व आपले शरीर मलीन झालेले असल्यामुळे अतिसंतुष्ठ झालेल्या अंत:करणाने युक्त अशा त्या देवहुतीला,सर्व प्राण्यांच्या अंत:करणातील अभिप्राय जाणणारा तो कर्दम ऋषी,स्वत:च म्हणाला की,--------||२२|| भावार्थ:----हे भीरु(भित्र्ये)तू खिन्न का झाली आहेस?या बिंदुददरोवरामध्ये स्नान करून नंतर या विमानामध्ये आरोहन कर.हे शुल्करुपी विष्णूने निर्मिलेले बिंदुसरोवरनामक तीर्थ,मनुष्याचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे(ह्यात स्नान केलेस कि तुला जे पाहिजे असेल ते ते मिळेल.)||२३|| भावार्थ:----हे विदुरा,असे ते पतीचे भाषण एकूण मलीन वस्त्र व जटा झालेले केस धारण करणारी तसेच डाग पडलेल्या स्तनांनी युक्त असे चिखलाने भरलेले श्री धारण करणारी ती कमलाक्षी,देवहुती,निर्मल जलाचे केवळ आश्रयस्थान अशा सरस्वती नदीच्या मध्यभागी असलेल्या त्या बिंदूसरोवरात प्रविष्ठ झाला.||२४-२५|| भावार्थ:----तिने त्या सरोवरामध्ये बुडी मारताच तेथे आपल्या घरात बसलेल्या एक हजार कन्या पाहिल्या.त्या सर्वहि वयाने तरुण असून त्यांच्या शरीराला कमळासारखा सुगंध येत होता.||२६|| भावार्थ:---त्या स्त्रियांनी त्या देवहुतीला पाहताच अकस्मात उठून हात जोडून भाषण केले कि,आम्ही तुझ्या दाशी आहो,तुझे काय काम करावे ते आम्हा सांग.||२७|| भावार्थ:----हे विदुरा,नंतर त्या दासींनीच त्या आपल्या धनिनीचा अभिप्राय जाणून,उंच उंच तेल व उटणीवगैरे त्या उत्साहयुक्त देवहुतीच्या अंगास लावून तीला स्नान घातले आणि परिधान करण्यासाठी तिला नवी स्वच्छ दोन वस्त्रे दिली.||२८|| भावार्थ:----तसेच त्यांनी देवहुतीला तिचा मनास आवडणारे,अतिशय उत्कृष्ठ तेजस्वी अलंकार,षड्रसंयुक्त अन्ने व मधुर आणि मादक अशी पाणके(सरबते)दिली.||२९|| भावार्थ:----नंतर देवहुतीने आपला देह आरशामध्ये प्रतिबिंबरूपाने अवलोकन केला,तो मस्तकावर अभ्यंगस्नान केलेला,निर्मल स्वच्छ वस्त्रे परिधान केलेला गळ्यामध्ये फुलांच्या पुतळ्याच्यावगैरे माळा धारण केलेला,हातामध्ये सोन्याचा बांगड्या गोट-तोडे आणि पायामध्ये खुळखुळवाजणारे सोन्याचे नुपूर घातलेला---||३०-३१|| भावार्थ:----कमरेच्या ठिकाणी सोन्याचा रत्नखचित कमरपट्यामध्ये युक्त,कंठाचेठिकाणी बहुत मोलाचा रत्नहार व पदक(तन्मणी)यांनी भूषित,व इतरही मौक्तीकादिक सर्व भुषणांनी अलंकृत,सुंदर दंतपक्तीने,सुरेश भृकुटींनी,काळ्याभोर केसांनी व कमळाच्या कळ्यांशी स्पर्धा करणाऱ्या,मनोहर सप्रेमकटाक्षयुक्त नेत्रांनी मुखाला शोभा आलेला,स्त्रियांनी हळदकुंकू देणे,ओटी भरणे इत्यादी मंगलकारक उपचार केलेला दासींनी अनेक प्रकारचे तांबुलदानादि सत्कार केलेला असा होता.||३२-३३|| भावार्थ:----हे विदुरा,अशा प्रकारचा आपला देह आरशातील प्रतिबिंबात अवलोकन करून,ऋषीमध्ये श्रेष्ठ अशा आपल्या प्रियपतीचे जेव्हा त्या देवहुतीने स्मरण केले,त्याचवेळी ज्या ठिकाणी तो कर्दम प्रजापती होता त्याच ठिकाणी स्त्रीसहवर्तमान ती आपोआप येउन पोचली.||३४|| भावार्थ:----त्या वेळी हजारो स्त्रियांनी परीवेष्ठीत अशी आपण पतीच्या समोर आहे असे पाहून आणि ते आपल्या पतीचे सामर्थ्य जाणून तिला मोठे आश्चर्य वाटले.||३५|| भावार्थः----हे कामरूपी शत्रूला जिंकणाऱ्या विदुरा,जिने मळ घालविणारे स्नान केले आहे,जी अपूर्व रीतीने शोभत आहे,विवाहाच्या पूर्वी असलेले आपले स्वरूप जिने पुनः धारण केले आहे,जिने उत्तम वस्त्रे परिधान केली आहेस,जिचे मनोहर स्तन कंचीकेने परिवेष्टित झालेले आहेत,आणि विद्याधारांच्या सहस्त्र स्त्रिया जिची शुश्रुषा करीत आहेत अशा त्या आपल्या भार्येला(देवहुतीला),प्रेमभाव उत्पन्न झालेल्या त्या कर्दम ऋषीने त्या विमानांत बसविले.||३६-३७|| भावार्थः----आणि जो आपल्या प्रियेशी अनुरक्त आहे,तथापि ज्याचे स्वांतत्र्य मुळीच नष्ट झाले नाही,आणि विद्याधरींनी ज्याच्या शरीराची शुश्रुषा चालविली आहे असा तो कर्दम मुनि,त्या आपल्या प्रियेसहवर्तमान बसला.तेव्हा जसा आकाशामध्ये उगवलेला अतिसुंदर पूर्णचंद्र,प्रफुल्लित झालेल्या कमळीनिच्या समुदायाने युक्त व नक्षत्रांनी परिवेष्टित झाला असता शोभतो त्याप्रमाणे शोभूं लागला.||३८|| भावार्थः----नंतर सिद्ध ज्याची स्तुति करित आहेत व स्त्रियांच्या समुदायाने युक्त अशा त्या कर्दम ऋषीने त्या विमानाच्या योगेकरून इंद्रादिक आठही लोकपालांची विहार करण्याची स्थले ज्याच्यावर आहेत अशा मेरूपर्वताच्या सुंदर दऱ्याचे ठिकाणी कुबेराप्रमाणे फार दिवसक्रीडा केली.त्या दऱ्या,मदनाचा उत्तेजक मित्र जो मंद वायू त्याच्या वाहण्याच्या योगाने मनोहर व ज्यांमध्ये स्वर्गावरून पृथ्वीवर पडणाऱ्या गंगानदीच्या धबधब्यांचा मंगलकारक शब्द घुमत असे अशा होत्या.||३९|| भावार्थः---नंतर संतुष्टचित्त अशा त्या कर्दमाने आपल्या सुंदर भार्येसहवर्तमान,वैश्रभंक,सुरसन,नंदन,पुष्पभद्रक,मानस आणि चैत्ररथ्य ह्या देवांच्या बागेमध्ये यथेच्छ क्रीडा केली.||४०|| भावार्थः----त्या वेळी विस्तीर्ण अतितेजस्वी व बसणाऱ्या इच्छेस येईल तिकडे जाणाऱ्या त्या विमानांत बसून वायूप्रमाणे त्रैलोक्यांत संचार करणाऱ्या त्या कर्दम ऋषीने,नेहमी विमानांत बसून फिरणाऱ्या देवांदेखील मागे सारिले.||४१|| भावार्थः----हे विदुरा,ज्या पुरुषांनी भगवंतांच्या संसारदुःखनाशक अशा चरणाच्या आश्रय केला आहे त्या धीरपुरुषांना दुर्मिळ असे काय आहे?काहीच नाही.||४२|| भावार्थः---असो,महायोगी असा तो कर्दम ऋषि,द्वीपे खंडे इत्यादिक अनेक रचनांच्या योगाने बहुत आश्चर्यकारक असे हे जितके म्हणून भूमंडल आहे तितके सर्व आपल्या पत्नीला दाखवून,नंतर आपल्या आश्रमी येण्यासाठी माघारी फिरला.||४३|| | विभज्य नवधाssत्मानं मानवीं सुरतोत्सुकाम् | रामां निरमयन् रेमे वर्षपूगान्मुहुर्तवत् ||४४|| भावार्थः---नंतर त्या कर्दमाने,आपली नऊ स्वरूपे धारण करून रतिक्रीडेविषयी उत्सुक अशा त्या सुंदर मनुकन्येला रमवित रमवती दोन घटीकाप्रमाणे कितीएक वर्षांचे समुदायपर्यंत क्रीडा केली.||४४|| | तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरिं श्रिता | न चाबुध्यत तं कालं पत्यापीच्येन सन्गता ||४५|| भावार्थः---तेव्हा त्या विमानामध्ये रतिक्रीडेविषयी उत्सुकता वाढविणाऱ्या उत्कृष्ट शय्येचा आश्रय करून आपल्या अतिसुंदर पतीशी संगत असलेल्या त्या देवहुतीने बहुत वर्षे गेलेला तो काळ,मुळीच जाणला नाही.ज्या विषयांची आवड असेल ते विषय कितीही भोगले तरी,किती काळ—वेळ गेला याचे भान विषयांचा कर्ता आहे,त्याच्या लक्षात येत नाही.म्हणून आपण विषयांचा विनाकारण भोग घेऊ नये,कारण आपल्या आयुष्याला मर्यादा आहे.त्या मर्यादतच राहून विषयांचा भोग घेऊन परमार्थ करावयाचा असतो.||४५|| भावार्थः----याप्रमाणे विषय भोगण्याविषयी उत्सुक व योगसामर्थ्याने पाहिजे ते पदार्थ उत्पन्न करून रममाण होणाऱ्या त्या उभयंता स्त्री--पुरुषांची शंभर वर्षे अगदी थोडया कालासारखी निघून गेली.||४६|| भावार्थः----नंतर आपल्याला पुष्कळ मुले व्हावीत अशा देवहूतीच्या मनोरथाला जाणणारा व तसे करण्याविषयी समर्थ अशा त्या आत्मवेत्त्या कर्दम ऋषीने,त्या देवहुतीला आपले अर्धे शरीरच आहे असे मानून,आपल्या स्वरूपाचे नऊ विभाग करून तिच्याठिकाणी रेत स्थापन केले.||४७|| भावार्थः----नंतर त्याच दिवशी ती देवहुति प्रसूत होऊन तिला नऊ कन्या झाल्या.त्या संपूर्ण अवयवांनी सुंदर होत्या अंगाला तांबड्या कमळाप्रमाणे सुगंध येत होता.||४८|| | पतिं सा प्रव्रजिष्यन्तं तदाssलक्ष्योशती सती | स्ययमाना विक्लवेन ह्रदयेन विदूयता ||४९|| भावार्थः---तेव्हा लागलाच सर्व संग परित्याग करून आपला पति वनांत जात आहे असे अवलोकन करून,सुंदरी पतिव्रता ती देवहुति व्याकूळ व खिन्न झालेल्या अंतःकरणाने नखरूप मन्याच्या कांतीने युक्त असलेल्या आपल्या पायाने भूमीचे लेखन करीत होती खाली मान घालून नेत्रांतून गळूं लागणाऱ्या अश्रुपातांचा निरोध करून बाहेरून हांसतच आहे असे दाखवीत ती हळूहळू पतीशी मधुर भाषण करूं लागली------------------||४९-५०|| | सर्व तद्भगवाङ्मह्ममुपोवाह प्रतिश्रुतम । अथापि मे प्रपन्नाया अभयं दातुमर्हसि ।।५१।। भावार्थः---देवहुति म्हणाली-----हे प्रभो,मला जे वचन दिले होते ते सर्व पूर्ण केले तथापि आतां शरण आलेल्या मला अभय देण्याविषयी आपण समर्थ आहां.||५१|| | ब्रह्मन्दुहितभिस्तुभ्यं विमृग्या: पतय: समा: | कश्चितस्यान्मे विशोकाय त्वयि प्रव्रजिते वनम् ||५२|| भावार्थः---हे ब्रहमनिष्ठ ऋषे,ह्या आपल्या कन्यांनी आपआपणाला योग्य असे पति स्वतःच पाहिले पाहिजेत,हे एक मला मोठेच संकट प्राप्त झाले आहे.बरे ते असो,कसे तरी होईल,परंतु आपण संन्यास घेऊन वनामध्ये गेला असतां,माझा शोक घालविण्याकरीता एखादा ब्रहमनिष्ठ पुत्र पाहिजे होता.मुली झाल्या एवढ्याने आपले तरी पितृऋण फिटले आहे असे नाही,यास्तव आपण आणखी काही दिवस | एतावतालं कालेन व्यतिक्रान्तेन मे प्रभो | इन्द्रियार्थप्रसंगेन परित्यक्तपरात्मनः ||५३|| भावार्थः----तूं भक्ष्यभोज्यादि विषयांचा उपभोग कर तुला ब्रहमज्ञानाचे काय प्रयोजन आहे असे आपण म्हणाल तर,हे प्रभो,परमात्मा--- स्वरूपाचा त्याग करणाऱ्या माझ्या,विषयप्रसंगानेच निघून गेलेल्या इतक्या काळाने आतां पुरे झाले.पुढील काळ तरी ईश्वरभजनात जावा अशी मी इच्छा करते.आपण स्त्री किंवा पुरुष असो,प्रत्येकांनी मोक्ष स्वरूपाचा जो चौथा पुरुषार्थ आहे,तोही करावा,कारण हा चौथा पुरुषार्थ फक्त मानव—देहातच प्राप्त करून घेता येतो.||५३|| भावार्थः----आपण ब्रह्मज्ञानी आहां हे न जाणणाऱ्या मी,आजपर्यंत केवळ इंद्रिये संतुष्ट करण्यामध्येच सक्त होऊन अज्ञानाने आपले ठिकाणी प्रसंग केला तरी आतां तो,आपल्या कृपेने मला पुत्रलाभ होऊन संसारदुःख दूर करण्याविषयी समर्थ होवो.आपणास म्हणजे अज्ञानी जीवास इंद्रियांनी विषयांचा भोग घ्यावा असे वाटते,पण परमार्थ करावा असे वाटत नाही.असे असले तरी मी फक्त पतीची सेवा न करता पती +ब्रह्मज्ञानी =ब्रह्मज्ञानी पतीची सेवा केलेली असल्यामुळे मला चौथा पुरुषार्थ जो मोक्षास्वरूप आहे ती इच्छा उत्पन्न झालेली आहे.असा मला ब्रह्मज्ञानी पुत्र मिळो हि इच्छा पूर्ण करावी.||५४|| | सङो यः संसृतेर्हेतु रसत्सु विहितोsधिया | स एव साधुषु कृतो निःसङत्वाय कल्पते ||५५|| भावार्थः---अज्ञानाने का होईना,विषयासक्त पुरुषांशी केलेली जी संगति ती मात्र संसाराला कारण होते आणि तीच संगति आपल्यासारख्या सत्पुरुषांशी केली असतां,मोक्ष देण्याविषयी समर्थ होते.म्हणून शक्यतो स्त्रींनी अज्ञानी पुरुषाचा पती म्हणून स्वीकार करण्यापेक्षा जो पुरुष आत्मज्ञानी—ब्रह्मज्ञानी आहे,त्याचा पती म्हणून स्वीकार करावा.||५५|| | नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते | न तीर्थपदसेवायै जीवन्नपि मृतो ही सः ||५६|| भावार्थः---ह्या सृष्टीमध्ये ज्या प्राण्याचे कर्म,धर्माच्या उपभोगी पडत नाही,वैराग्य होण्याला साधन होत नाही,आणि वैराग्यद्वारा हरीच्या सेवेविषयीही पर्यवसान पावत नाही,तो प्राणी जिवंत असून मेल्यासारखा होय.म्हणजेच आपण नरदेहात आल्यानंतर चौथा पुरुषार्थ मोक्षच संपादन करावा.||५६|| | साहं भगवतो नूनं वश्चीता मायया दृढम् | यत्वां विमुक्तिदं प्राप्य न मुमुक्षेय बन्धनात् ||५७|| भावार्थः---हे प्रभो,मुक्ति देण्यालाही समर्थ अशा आपला समागम घडला असतांही मला आजपर्यंत ज्याअर्थी बंधांतून मुक्त होण्याची इच्छा झाली नाही,त्याअर्थी भगवंताच्या मायेने मला पक्के फसविले आहे,यांत संशय नाही.आपले—जीवाचे पूर्व—पुण्य नसेल तर आपण चौथा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावा असे मनात येत नाही व पूर्व—पुण्याई असेल तर चौथा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावा असे निश्चित वाटतेच,यात कांही शंका नाही.||५७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील ल तृतीय(३)स्कंधामध्ये कापिलेय आख्यानस बंधी हा तेविसावा(२३) अध्याय सत्तावन्न(५७) सामाप्त झाला||२३|| || श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीसदगुरुचरणर्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ | २४--- या चौविसाव्या अध्यायांत,कपिल महा-मुनींचा अवतार,ब्रह्मदेवाने केलेली स्तुति,मरीच्यादिक ऋषीचे विवाह आणि ऋणत्रपासून मुक्त झालेल्या कर्दम प्रजापतीचे कपिलमहामुनीच्या आज्ञेने संन्यासग्रहणपूर्वक महाप्रस्थान,हे विषय वर्णन केले आहेत. | २४---कपिलदेव व देवहुति---[कपिलदेवांचा जन्म] _____________________________________________________________________________________________
| निर्वेदवादिनीमेवं मनोर्दुहितरंमुनिः | दयालु: शालिनीमाह शुक्लाभिव्याह्रतं स्मरन् ||१|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,याप्रमाणे वैराग्याने भाषण करणाऱ्या विनयसंपन्न त्या मनुकन्येला तो दयाळू कर्दममुनी शुक्लरुपी विष्णूने पूर्वी सांगितलेल्या भाषणाचे स्मरण करून म्हणाला की,-------------------||१|| |ऋषिरुवाच | मा खिदो राजपुत्रीत्थमात्मानं प्रत्यनिन्दिते | भगवांस्तेsक्षरो गर्भमदूरात्सम्प्रपत्स्यते ||२|| भावार्थः----ऋषी म्हणाला----हे स्तुत्यगुणयुक्त राजकन्ये,तूं स्वता:बद्दल अशा रीतीने खेद करूं नकोस;कारण,तिन्ही काली अविनाशस्वरूपी अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वर तुझ्या उदरी लवकरच अवतार धारण करील.||२|| । धृतव्रतासिभद्रम ते दमेन नियमेन च । तपोद्रविणंदानैश्च श्रद्धया चेश्वरं भज ।।३।। भावार्थः----हे प्रिये,तूं आजपर्यंत पुष्कळ निरनिराळी व्रते आचरण केली आहेस,म्हणून तुझे कल्याण होईल.आतां पुढेही इंद्रियनिग्रह नानाप्रकारचे नियम,तपश्चर्या व द्रव्यदाने यांच्या योगेकरून तूं भक्तिपुर:सर ईश्वराची सेवा कर.आपण—जीवानी निष्काम बुद्धीने कर्मे केली तर,आपले अंत:करण शुद्ध होते,त्यामुळे मल-दोषांची निवृत्ती होते.आपण—जीवानी नेहमी इंद्रिये निग्रह—मन व इंद्रिये आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेऊन,नियम,तप—अनुष्ठान करत राहावे.||३|| | स त्वाSSराधित:शुक्लो वितन्वन्मामकं यश: । छेता ते ह्रदयग्रंथीमौदर्यो ब्रम्हभावन: ।।४।। भावार्थः----तूं आराधन केलेला तो शुक्लरुपी भगवान विष्णू जगामध्ये माझे वश वाढविण्यासाठी तुझ्या उदरी घेईल व तुला ब्रहम ज्ञानाचा करूनच तुझ्या ह्र्द्यांतील अहंकाररुपी ग्रंथीचा छेद करील||४|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,देवहुतिहि कर्दम प्रजापतीचा आज्ञेवर आदरपूर्वक पूर्ण विश्वास ठेऊन,निर्विकार असून जगाला सन्मार्गाला उपदेश करणारा गुरुरुपी जो पुराण पुरुष त्याची आराधंना करूं लागली.आपणही—जीवानी संत—महात्मा—सदगुरू यांच्या मार्गदर्शानुसार परमार्थ करावयास पाहिजे.आपल्या स्वत:च्या मतानुसार परमार्थ करू नये.||५|| | तस्यां बहुतिथे काले भगवानमधुसूदन:। कार्दमं वीर्यमापन्नो जज्ञेSग्निरिव दारूणि ।।६।। भावार्थः----पुढे बराच काल निघून गेला असतां,काष्ठामध्ये जसा अग्नी प्रकट होतो त्याप्रमाणे भगवान मधुसूदन,कर्दम मुनीच्या विर्याला आश्रय करून त्या देवहुतिचे ठिकाणी अवतीर्ण झाला.||६|| भावार्थः----त्या वेळी स्वर्गामध्ये देवांनी वाद्ये वाजविली.अतिशय दाट असे प्राप्त झालेले मेघ गर्जना करूं लागले.गंधर्व आनंदाने त्या ईश्वराची गायनामध्ये स्तुति करूं लागले.अप्सरा नृत्य करूं लागल्या.||७|| भावार्थः---देवांनी उधळलेली दिव्य पुष्पे पृथ्वीवर पडूं लागली.सर्व दिशा,उदके आणि सर्वांची अंतःकरने प्रसन्न झाली.||८|| भावार्थः----त्या वेळी मरीच्यादिक ऋषीसहवर्तमान ब्रहमदेव,सरस्वतीनदीने परिवेष्टित अशा त्या कर्दम ऋषीच्या आश्रमस्थानी प्राप्त झाला.||९|| | भगवन्तं परं ब्रह्म सत्त्वेनांशेन शत्रुहन् | तत्त्वसंख्यानविज्ञप्त्यै जातं विद्वानज: स्वराट् ||१०|| भावार्थः---हे शत्रूनाशका विदुरा,तत्त्वांचे निरुपण ज्यामध्ये आहे असे सांख्याशास्त्र विशेषेकरून लोकांस सांगण्याकरितां सत्वगुणरूप अंशाने परब्रहमरूप तो भगवान अवतीर्ण झाला आहे असे जाणणारा स्वतः सिद्धज्ञानवान् तो ब्रहमदेव,आपल्या विशुद्ध अंतःकरणाने योजलेल्या गोष्टीचे अभिनंदन करीत करीत आनंदाश्रू,रोमांच इत्यादि लक्षणांच्या योगेकरून हर्षयुक्त झालेल्या इंद्रियांनी उपलक्षित होते.कर्दम ऋषि व देवहुति या उभयंतास म्हणाला की,-----------------||१०--११|| | त्वया मेsपचितिस्तात कल्पिता निर्व्यलीकतः | यन्मे सन्जगृहे वाक्यं भवान्मानद मानयन् ||१२|| भावार्थ:---ब्रहमदेव म्हणाला----बा कर्दमा,तू दुसऱ्याचे गौरव करणारा आहेस.ज्याअर्थी तू मला मान देवून माझ्या आज्ञेचे ग्रहण केलेस त्याअर्थी तू माझी निष्कपटपणे पूजाच केलीस असे मी मानतो.इतरांना मान देऊन,त्यांच्याच अज्ञाचे पालन करणे यास निष्कपट—पूजा असे म्हणतात.म्हणून आपणही इतरांना—श्रेष्ठांना मन देऊन व त्यांच्याच अज्ञाचे पालन करणे,त्यासच पूजा असे म्हणतात.||१२|| भावार्थ:----हे कर्दमा,पुत्रांनी पित्याच्याठिकाणी त्याचा आज्ञेचा ‘ठीक आहे असा’ बहुमानाने स्वीकार करणे इतकीच सेवा करावयाची आहे.म्हणजेच आपण—जीवानी श्रेष्ठांच्या—पित्याच्या अज्ञाचे पालन करावे,हि अत्यंत महत्वाची सेवा आहे.श्रेष्ठांच्या—पित्याच्या कोणत्याही अज्ञाचे पालन न करता आपल्या मतानुसार निर्णय घेऊन त्यानुसार आचरण करणे यास सेवा असे म्हणत नाहीत.||१३|| | एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरी पुत्रकै: । बाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वच:।। १३।| भावार्थ:---हे साधो वत्सा,ह्या तुझ्या,सिंहाप्रमाणे कृशकटीने युक्त सुंदर स्वरूपाच्या कन्या,आपल्या वंशाच्या योगाने या सृष्टीची अनेकप्रकारे वृद्धी करतील.||१४|| भावार्थ:----यास्तव आतां तू ह्या आपल्या कन्या इच्छेनुरूप आणि स्वभावानुरूप मरीची--पृभूती श्रेष्ठ ऋषींना दे आणि आपली कीर्ती भूमीवर विस्तृत कर.||१५|| भावार्थ:----हे मुने,हा तुझे पुत्र प्राणिमात्राचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा,असून कपिल नावाचा देह धारण करणारा हा पुराण-पुरुष विष्णू अवतीर्ण झाला आहे,असे मी जाणतो.१६|| | ज्ञानविज्ञानयोगेन कर्मणामुद्धरन: । हिरण्यकेश:पद्ममुद्रापदांबुज: ।।१७।। । एवं मानवि ते गर्भन प्रविष्ट:कैटभार्दन: । अविद्ध्यासंशयग्रंन्थीन छित्वा गां विचारिष्यति ।।१८।। भावार्थ:----हे मनुकन्ये देवहुति,तुझ्या उदरी प्रविष्ठ झालेला,सुवर्णासारखे केस,कमळासारखे डोके व कमलचिन्हांनी चिन्हित अशी चरणकमले धारण,हा कैटभारी भगवान,भगवान,शास्त्रोक्तज्ञान व अपरोक्षज्ञान या दोन्हींच्या उपदेशाकरून,कर्माच्या वासना उपटून होत्सात,तुझ्या अंत:करणातील अज्ञानरूप संशयाची गाठ तोडून टाकून पृथ्वीवर पर्यटन करील.||१७-१८|| | अयं सिद्धगणाधीश: साङ्ख्याचार्ये: सुसम्मत: | लोके कपिल एत्याख्यांगन्ता ते कीर्तीवर्धन: ||१९|| भावार्थ:----हा सर्व सिद्धगणांचा अधिपती,सांख्यशास्त्राच्या उपदेष्ठ्या पंडितांनी सुपूजित होवून,कीर्ती वाढविणारा होईल व लोकांमध्ये कपिल या नावाने प्रसिध्द होईल.||१९|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला----हे विदुरा जगाची उत्पती करणाऱ्या ब्रहमदेवाने,कर्दमाचे व देवहुतीचे अशा रीतीने आश्वासन करून,आपल्या बरोबर आलेल्या ऋषीपैकी मरीची अत्री इत्यादिक ऋषींना विवाहासाठी तेथेच ठेवून,नारद व सनकादिक चार अशा पाच पुत्रासह वर्तमान हंसावर बसून सत्यलोकी निघून गेला.||२०|| भवार्थ:-----हे विदुरा,ब्रहमदेव गेल्यावर त्याने आज्ञा केल्याप्रमाणे कर्दम ऋषीने,आपल्या कन्या,मरीची-पृभूती प्रजापातीना अर्पण केल्या.||२१|| भावार्थ:----१--“कला” नावांची आपली कन्या,”मरीची’ ऋषीला दिली.तशीच २—“अनुसया” “अत्रीला”, ३--“श्रद्धा” “अंगिरसाला” आणि ४—“हविर्भू” “पुलस्त्याला” अर्पण केली.||२२|| भावार्थ:----स्वभावादी गुणांनी योग्य अशी ५—“गतीनामक” कन्या “पूलहाला”, ६--“क्रिया” नावाची साध्वी कन्या “क्रुतूला” ७—“ख्याती” “भृगुला” आणि ८--“अरुंधती” “वाशिष्ठाला” अर्पण केली||२३|| भावार्थ:----जिच्या यागाने यज्ञ परिपूर्ण होतो ती ९—“शांती” नावाची कन्या “अथर्व” ऋषीला दिली;याप्रमाणे विवाह केलेल्या त्या सपत्नीक महर्षिणा कर्दम ऋषीने प्रियवस्तू देवून संतुष्ट केले.थोडक्यात “कन्या अर्पण—निष्काम द्दाव्यात असा शात्राचा नियम आहे,तर विक्री करू नये म्हणजेच मोबदला घेऊ नये असा नियम आहे.” म्हणजेच पुरुषांनी पत्नीला—जन्मदात्याकडून धन घेऊन स्वीकार करू नये असाच नियम आहे.प्रत्यक्षात या नियमाने उभयांतांनी आचरण करावे.आपण असे आचरण न केले तर जो या नियमांचे उल्लंघन करील तो शिक्षेस पात्र होईल,असे निश्चितच आहे.||२४|| भावार्थ:----हे विदुरा,नंतर स्त्रियांचा स्वीकार करणारे ते ऋषी,आंनदाने त्या कर्दम ऋषीचा निरोप घेवून पत्न्यासहवर्तमान आपापल्या आश्रम स्थली निघून गेले.||२५|| भावार्थ:---इकडे त्या कर्दमाने,देवामध्ये श्रेष्ठ अशा षड्गुनैश्वोर्य संपन्न विष्णूने आपल्या घरी अवतार घेतला आहे असे जाणून,एकांकी त्याच्याजवळ जावून नमस्कार करून भाषण केले की,-----------------------||२६|| भावार्थ:----आहो!या सृष्टीमध्ये आपल्या पापकर्माच्या योगाने संसारामध्ये अनेक प्रकारचे ताप पावणाऱ्या प्राण्यांना,पुष्कळ काळाच्या योगाने तरी देवता प्रसन्न होतात यांत संशय नाही. ||२७|| भावार्थ:----पुष्कळ जन्माचेठीकानी सिध्द झालेल्या उत्तम योगसामाधीच्या योगाने संसारी लोकसुद्धा एकांतस्थळी ज्या तुझ्या चरणाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करितात,||२८|| भावार्थ:----असा आपल्या भक्ताचा कैवारी भगवान तू,आम्ही तुझी कितीही अवज्ञा केली असता तिकडे लक्ष न देता,विषयासक्त अशा आमच्या घरी आज उत्पन्न झाला आहेस.||२९|| भावार्थ:-----तो तरी भक्तांचा सन्मान वाढवावा आणि सांख्यशास्त्राचा प्रसार करावा म्हणून,प्रत्यक्ष भगवान सत्य करण्यासाठी माझ्या घरी अवतीर्ण झाला आहेस.||३०|| भावार्थ:----हे भगवान,वस्तुत तू निराकार आहेस तथापि तुझ्या भक्तांना जी जी चतुर्भूजादिक तुझी स्वरूपे आवडतात ती तीच तुलाही | त्वां सूरिभी स्तत्वबुभुत्सयाद्धा सदाभिवादार्हणपादपीठम | ऎश्वर्यवैराग्ययशोടवबोधवीर्यश्रिया पूर्तहं प्रपद्ध्ये ।।३२।। भावार्थ:----तस्मात तत्व जाणण्याच्या इच्छेने विवेकी पुरुषांनी प्रत्यक्ष सर्वदा प्रणाम करण्यास योग्य असे ज्याचे पादपीठ आहे अशा व ऐश्वर्य,वैराग्य,कीर्ती,ज्ञान,वीर्य,आणि संपत्ती ह्या षड्गुनैश्वर्यानी परिपूर्ण अशा तुला मी शरण आलो आहे.आपणही भगवंतांना शरण जावे.||३२|| | परं प्रधानं पुरुशम महानतं कालं कविं त्रिवृतं लोकपालम|आत्मानुभूत्यानुगतप्रपंञचं स्वच्छंदशक्तिं कपिलं प्रपद्ध्ये ।।३३।। भावार्थ:-----हे भगवान,सर्वशक्ती ज्याच्या स्वाधीन आहेत म्हणजे पृकृती,पुरुष,महत्तत्व,काळ,अहंकार,लोक व लोकपाल हि ज्याची स्वरूपे आहेत आणि विच्छशक्तीच्या योगाने ज्याच्यामध्ये सर्व प्रपंच लीन झाला आहे त्या कपिलनामक तुज परमेश्वला मी शरण आलो आहे.||३३|| भावार्थ:----हे देवा तुझ्या योगाने मी देव,ऋषी व पितर यांच्या ऋणापासून मुक्त झालो आणि माझे संसारसबंधी सर्व मनोरथहि परिपूर्ण झाले आहेत;ह्याकरिता मी आता संन्यासमार्गाचा आश्रय करून अंत:करणामध्ये तुझे ध्यान करून शोकरहित होत्सात यथेच्छा संचार करीन.तस्मात आतां संन्यास ग्रहण करण्याकरिता सर्व प्रजांचा पालक अशा तुझी मी आज्ञा मागतो.||३४|| भावार्थ:----श्री भगवान म्हणाला----हे कर्दमा,मी तुझ्या घरी जो अवतार धारण केला आहे,तो ज्ञानाच्या उपदेशासाठीच आहे,म्हणून तुला घरी देखील मुक्ती दुर्लभ नाही.आता जर तुला संन्यास घेवून जाणे हेच अवश्य वाटत असेल तर जा,घरीच जर सूर्याचा प्रकाश असेल दिवा लावण्याचे गरज आहे काय ?नंतर मुळीच नाही.गौरवाने लावावयाचे असेल तर दिवा लाव,मात्र आवश्यकता मुळीच नाही.पण माझ्याकडे लक्ष असू दे.तू संन्यास घेण्यासाठी घरादाराचा त्याग केलास तरी,माझ्याकडे म्हणजे पुरुषाकडेच लक्ष ठेव.संन्यास घेतला तरी माझ्याकडेच यावे लागेल.कारण,वैदिकवाक्यामध्ये किंवा लौकिकभाषणात माझे बोलणे सर्व लोकाला प्रणाम आहे म्हणून तुला दिलेले वचन खरे करण्याकरिता मी हा अवतार घेतला आहे.||३५|| | एतन्मे जन्म लोकेsस्मिन्मुमुक्षुणां दुराशयात् | प्रसंख्यानाय तत्त्वांना सम्मतायात्मदर्शने ||३६|| भावार्थ:----याल लोकी झालेला हा माझा अवतार लिंगदेहापासून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुणा आत्मज्ञान करून देण्याकरिता संमत असलेल्या पृकृती--पुरुषादितत्वाच्या निरुपनाविषयी आहे.||३६|| | एष आत्मपथोsव्यक्तो नष्ट: कालेन भूयसा | तं प्रवर्तयितुं देहमिमं विद्धि मया भृतम् ||३७|| भावार्थ:----हा सूक्ष्म आत्मज्ञानाचा मार्ग जरी पूर्वसिद्धच आहे तथापि पुष्कळ काळ गेल्यामुळे तो अगदी नष्ठ झाला आहे म्हणून त्याची पुन्हा प्रवृत्ती करण्याकरिता हा देह मी धारण केला आहे असे तू समज.आता जो मी आत्माज्ञांचा—प्रकृती—पुरुषाचा विवेक सांगणार आहे,तोही पूर्वीचाच आहे.फक्त त्यास उजाळा देणार आहे,तर नवीन कांहीच नाही.||३७|| | गच्छ कामं मयाSSपृष्टो मयि सन्स्तकर्ण । जित्वा सुदुर्जयं मृत्युममृतत्वाय मां भज ।।३८।। भावार्थ:----हे ऋषे,मी तुला अनुज्ञा दिली आहे यास्तव तू आता यथेच्छ गमन कर आणि मृत्यूला जिंकणे फार कठीण आहे परंतु तू माझेठीकानी अर्पण केलेल्या सर्व कर्माच्या योगाने त्याला जिंकून मोक्षप्राप्तीकरिता माझी—परमात्म्याची उपासना कर. ||३८|| भावार्थ:----सर्व प्राणी मात्राच्या अंत:करणामध्ये राहणारा स्वयंप्रकाश परमात्मा जो मी त्याला,आपल्या देहस्थित आत्म्याचेठिकाणी मनाने पाहून,तू शोकांपासून मुक्त होशील आणि मोक्ष सुखाला पावशील.आपणही प्रकृती—पुरुचांचा विवेक केला तर आपणही संसाराच्या दु:खापासून मुक्त होउत.||३९|| भावार्थ:----मी देवहुती-मातेला संचित व क्रियमान अशा सर्व वासना मनातून उपटून टाकणारी आध्यत्मविद्या सांगेन,जिच्या योगाने ती देवहुति संसार भयाला तरुण जाईल आणि परमानंदाला पावेल.||४०|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,याप्रमाणे त्या कपिल मुनीने कर्दम प्रजापतीला उत्तमप्रकारे सांगितले असतां,आनंद पावलेला तो कर्दम ऋषि,त्या कपिलाला प्रदक्षिणा करून वनामध्येच निघून गेला.आपणही जर गृहस्थाश्रमी असुत तरी आपण गृहस्थाश्रमाचा त्याग करून जेथे प्रकृती—पुरुष यांच्या विवेकाचे चिंतन चालू आहे,त्याठिकाणी चिंतन करण्याकरिता सर्वांचा त्याग करून जावे.||४१|| भावार्थः---नंतर ज्याचा रक्षक आत्माच आहे असा तो गृहरहित,अग्निरहित व सर्वसंगपरित्याग केलेला कर्दम मुनि,मननशील ऋषींना योग्य अशा अहिंसालक्षण व्रताचा आश्रय करून,पृथ्वीवर यथेष्ट संचार करूं लागला.आपणही—जीवानी अहिंसा हे जे मुख्य तत्व त्याचा अंगीकार करून –त्यानुसार आचरण करून जीवन व्यतीत करावे.अहिंसा तत्वाचा स्वीकार न करता कितीही भ्रमण केले तर काय उयायोग ? कितीही फोलकट उधळले तर त्यातून धान्याचा एखादा दाणा तरी प्राप्त होईल का ? अर्थातच प्राप्त होणार नाही.||४२|| | मनो ब्रह्मणि युञ्जानो यत्तत्सदसत: परम् | गुणावभासे विगुण एकभक्त्यानुभाविते ||४३|| भावार्थः----तो मुनि,कार्य आणि कारण यांहून पलीकडचे,तिन्ही गुणांचा प्रकाश करणारे आणि एकनिष्ठ भक्तीच्या योगाने अपरोक्षत्वे करून जाणले जाणारे जे निर्गुण ब्रहम त्याचेठिकाणी आपले मन लावून,||४३|| | निरहंकृतिनिर्ममश्च निर्द्वंद: समदृक स्वदृक् | प्रत्यक्प्रशान्तधीर्धीर: प्रशान्तोर्मिरिवोदधि: ||४४|| भावार्थः---देहाचे ठायी अभिमानरहित व स्त्रीपुत्रादिकांचेठायी ममतारहित,सुखदुःखादि द्वंद्वरहित,वैरभावरहित,सर्वत्र समदृष्टी ठेवणारा,स्वतःचे स्वरूप जाणणारा,तसाच ज्याच्या लाटा शांत झाल्या आहेत अशा सागराप्रमाणे शांत व विषयावरून परावृत्त करून परमात्म्याकडे लाविलेल्या शांत बुद्धीने युक्त व धैर्यवान असा होऊन,म्हणून आपण—जीवानी स्थूल देहाचा अभिमान धारण करू नये,कारण तो असार आहे.स्त्री—पुत्र—जीवाच्या ठिकाणी ममता ठेऊ नये,कारण त्यांचा मोह जन्मास घालून दु:ख देत असतो.सुख-दु:ख हे धर्म अंत:करणाचे आहेत,कारण विषयांच्या ठिकाणी अनुकुलता असेल तर किंचित सुख,तर विषयांच्या ठिकाणी प्रतिकूलता असेल तर अपार दु:ख मिळते.म्हणून आपण विषयांच्या सुख—दु:ख रहित होऊन द्वंद्वारहित जीवन जगावे.असे जीवन जगण्याकरिता विषयांचा त्याग करून प्रकृती—पुरुषाचा विवेक करावा लागतो.आपणास वैरभवारहित जीवन जगण्यासाठी द्वेताचा त्याग करावा लागतो,कारण द्वैतात भय आहे व अद्वैतात एक आहे,म्हणून भय नाही.सर्वत्र समदृष्टी असावी म्हणजे सर्वांना ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार त्यास तसे—तसे समजावे म्हणजेच गुणांना महत्व देऊन त्यानुसार आचरण करावे.गुणांच्या शिवाय इतर कोणतीच कसोटी लावू नये.आपण आपले जे वास्तविक स्वरूप आहे ते जाणून घ्यावे.||४४|| । वासुदेवे भगवति सर्वज्ञे प्रत्यगात्मनी । परेंण भक्तिभावेंन लब्धात्मा मुक्तबंधन: ।।४५।। भावार्थः----तो आपल्या उत्कट भक्तियोगाच्या योगेकरून सर्वज्ञ व अंतर्यामी जो भगवान वासुदेव त्याचे ठिकाणी आपले अंतःकरण स्थिर करून अज्ञानबंधापासून मुक्त होत्साता,||४५|| भावार्थः---सर्व प्राणीमात्रांचेठिकाणी व्यापून असणाऱ्या व्यापक भगवंताला आणि त्या भगवंताचेठिकाणी असणाऱ्या सर्व भूतांना अभेदबुद्धीने पाहुं लागला.सर्वांना अभेद—दृष्टीने पाहावे,कारण सर्वांत भगवंत—पुरुष आहे.||४६|| | इच्छाद्वेषविहीनेन सर्वत्र समचेतसा | भगवद्भक्तियुक्तेन प्राप्ता भागवती गति: ||४७|| भावार्थः----तेव्हा इच्छा व द्वेष या मनोधर्मांनी रहित,सर्वठिकाणी समबुद्धी आणि भगवद्भक्तीयुक्त अशा त्या कर्दम ऋषीला,भगवद्भक्तांस प्राप्त होणारी अशी भागवतगति प्राप्त झाली.म्हणून आपण जीवानी इछेचा त्याग करून व द्वेष याचा त्याग करून सर्व—ठिकाणी समबुद्धी ठेवावी व भागवत—गती प्राप्त करून घ्यावी.||४७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये कपिलाच्या आख्यानाविषयी हा चोविसावा(२४)अध्याय सतेचाळीस(४७) श्लोकांनी समाप्त झाला.||२४|| ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू ||
_____________________________________________________________________________________________ | २५--- ५---कपिलदेव आणि देवहुति---[२---देवहुतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा]| २५---आता या पंचविसाव्या(२५) अध्यायामध्ये देवहुति-मातेने आपल्या कपिलनामक पुत्राला प्रश्न केला असतां,त्याने प्रथम संसारबंधापासून मुक्त करणारे उत्तमप्रकारचे भक्तीयोगाने लक्षण तिला सांगितले हि कथा वर्णन केली आहे. | २५---कपिल-देव व देवहुती [देवहुतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा.] _____________________________________________________________________________________________ | कपिलस्त्वत्त्वसंख्याता भगवानात्ममायया | जातः स्वयमजः साक्षादात्मप्रज्ञप्तये नृणाम् ||१|| भावार्थ:----शौनक ऋषी म्हणाला----हे सूता,प्रकृतिपुरुषादि तत्त्वांच्या संख्येचा प्रवर्तक जो साक्षात भगवान कपिल,तो स्वतः जन्मरहित असूनही मनुष्यांना आत्मतत्त्वाचे ज्ञान करून देण्याकरितां उत्पन्न झाला.||१|| भावार्थः----सर्व पुरुषामध्ये श्रेष्ठ आणि सर्व योग्यांमध्ये वरिष्ठ अशा ह्या कपिल महामुनीच्या कीर्तीचे श्रवण करण्याविषयी,परमेश्वराची पुष्कळ चरित्रे श्रवण करणाऱ्याहि माझ्या इंद्रियांची पूर्णपणे तृप्ती होत नाही.आपणासही भगवंतांच्या लीला,चरित्रे,स्वरूपाविषयी व संत—महात्मा यांच्या चरित्रे-विषयी श्रवण करून इंद्रियांची तृप्ती होऊ नये,कारण त्यातून नाविन्यपूर्ण रस पन्ह—पुन्हा नवीन निघत असतो.||२|| भावार्थः---यास्तव आपल्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे देह धारण करणारा भगवान,जी कर्मे करितो ती सर्व कर्मे वर्णन करण्यास योग्य आहेत,म्हणून श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्या मला ती तूं वर्णन कर.||३|| भावार्थः----सूत म्हणाला----हे शौनक मुने,तूं जसा मला प्रश्न केलास याप्रमाणेच विदुराने आत्मविद्येविषयी प्रेरणा केलेला भगवान व्याससखा मैत्रेय ऋषि,संतुष्ट होऊन विदुराच्या प्रश्नाप्रमाणे त्याला असे म्हणाला की,----------------------||४|| भावार्थः---मैत्रेय म्हणाला----हे विदुरा,भगवान कपिल महामुनी,पिता कर्दम ऋषी अरण्यांत निघून गेल्यानंतर मातेचे प्रिय करण्याच्या इच्छेने कांही दिवस त्याबिंदू सरोवराच्या तीरीच राहिला होता.||५|| भावार्थः----एके दिवशी ब्रहमदेवाचे भाषण स्मरण करणारी देवहुति आसनावर बसलेल्या,वस्तुतः कर्मरहित परंतु मुमुक्षूंना तत्त्वमार्गाचा सिद्धांत दाखविणाऱ्या त्या आपल्या पुत्राला म्हणाली की,-------------||६|| | देवहुतिरुवाच | निर्विण्णा नितरांभूमन्नसदिन्द्रियतर्षणात् | येन सम्भाव्यमानेन प्रपन्नान्धंतमः प्रभो ||७|| भावार्थः ----देवहुति म्हणाली,हे जगद्व्यापका प्रभो,मी ह्या दुर्निवार इंद्रियांच्या तृप्तीविषयी अभिलाशाने अगदी कंटाळून गेले आहे.आणि विषय देऊन त्या इंद्रियांची पूर्तता करितां गाढ अंधकारांत (संसारांत)पडले आहे.थोडक्यात विषयानंमार्फत सुख घेण्याचा वीट देवहुतीला आलेला आहे,त्याचप्रमाणे विषयानंमार्फत सुख घेण्याचा कंटाळा आपणास यावावयास पाहिजे,कारण ते सुख क्षणिक असून प्राप्त करून घेण्यास अधिक दु:ख देणारे आहे.तसेच ब्रह्मांडात परमात्म्याचे असे सुख आहे की,ते प्राप्त झाल्यानंतर कायमचे दु:ख निवृत्त होते व कायमचेच सुख प्राप्त होते.ते सुख प्राप्त होण्यासाठी सर्व विषयांच्या सुखाचा त्याग करावा लागतो.||७|| | भावार्थः----त्या संसाररुपी दुष्पार अंधकारांतून पार पाडणारा दिव्यचक्षुरुपी तूं,’तुझ्या अनुग्रहानेच आतां माझ्या जन्मांचा शेवट होण्याची वेळ आली असतां’ मला प्राप्त झाला आहेस.||८|| भावार्थः----जो षड्गुनैश्वर्यसंपन्न पुराण--पुरुष ईश्वर,जीवांचा नियंता आहे व जो अज्ञानरूप तमाने अंध झालेल्या लोकांला उदय पावलेल्या सूर्याप्रमाणे ज्ञान-चक्षु देणारा आहे,तोच तूं कपिल आहेस यांत संशय नाही.||९|| भावार्थः---हे देवा,आतां तूं हा माझा महामोह दूर करून टाकावयास कारण,ह्या देहादिकांचेठिकाणी हा मी आणि हे माझे दुराग्रह आणि त्यापासून झालेले प्रीतीवगैरे सर्व प्रकार तूंच उत्पन्न केले आहेस.||१०|| भावार्थः---त्या तुला प्रकृतीपुरुषाचे ज्ञान व्हावे म्हणून शरण आले आहे.तूं शरण जाण्यास योग्य व आपल्या भक्तांच्या संसाररूप वृक्षाचा छेद करणारी केवळ कुऱ्हाडच असून सद्धर्मवेत्त्यांमध्ये वरिष्ठ आहेस.अशा तुला मी नमस्कार करते.आपले—जीवाचे अज्ञान निवृत्त होण्यासाठी व परमात्म्याचे ज्ञान होण्यासाठी संत—महात्मा—सदगुरू यांना शरण जावावयास पाहिजे म्हणजेच त्यांच्या उपदेशावर विश्वास ठेऊन त्यांच्या अज्ञानुसार आचरण करावयास पाहिजे.||११|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे विदुरा,याप्रमाणे पुरुषांना मोक्षविषयी प्रीती उत्पन्न करणारे आपल्या आईचे निर्दोष इच्छित ऐकल्याबरोबर,मंदहास्याच्या योगाने ज्याच्या शोभा आली आहे,व आत्मज्ञानसंपन्न पुरुषांचा अधिपती अशा त्या कपिलमहामुनीने मनापासून ज्याचे अभिनंदन करून भाषण करण्यास आरंभ केला,-----------------||१२|| भावार्थः----श्रीभगवान म्हणाला----हे माते,मनुष्यांना मोक्षप्राप्तीचा उपाय म्हटला म्हणजे आत्म्याचे ठिकाणी पर्यवसान पावणारा योगच असे माझे मत आहे.कारण,जो योग प्राप्त झाला असतां,संसारसंबंधी-दुःखाची व विषयसुखाची अत्यंत निवृत्ती होते.||१३|| भावार्थः---हे पवित्र माते,जो महामार्ग पूर्वी श्रवण करण्याची इच्छा करणाऱ्या ऋषींना मी सांगितला होता,तोच हा सर्व अंगांनी परिपूर्ण असा योगमार्ग आता मी तुला सांगतो.||१४|| | चेत खलवस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम । गुणेषु शकतं बंधाय रतं वा पुंसि मुक्तये ।।१५।। भावार्थः---हे माते,ह्या आत्म्याच्या बंधाला किंवा मुक्तीला कारण,चित्तच आहे ह्या शिवाय दुसरे काही नाही,ते “चित्त शब्दादी विषयांचे ठिकाणी आसक्त झाले म्हणजे बंधाला कारण होते आणि तेच ईश्वराचे ठिकाणी रत झाले म्हणजे मुक्तीला कारण होते”.म्हणून आपण—जीवानी आपले चित्त शब्द,स्पर्श,रूप,रस,गंघ या पंच विषयांत आसक्त—हे पांच विषय असावेत असे मुळीच वाटू नये.आपणास परमात्म्याचे सुख असावे असे वाटावे,कारण ते परमात्म्याची सुखरुपता मिळण्यास कारण आहे.||१५|| | अहंममाभिमानोत्थैः कामलोभादिभीर्मलैः | वितं यदा मनः शुद्धमदुःखमसुखं समम् ||१६|| भावार्थः-----जेव्हा ते मन,देहाचे ठिकाणी “हा मी” असा अहंकार आणि पुत्रादिकांचेठिकाणी “ही माझी” असे ममत्व ह्या दोनप्रकारच्या अभिमानापासून उत्पन्न झालेल्या काम,लोभ इत्यादिक मलांनी (विकारांनी)रहित होऊन शुद्ध होते,म्हणजे त्याला सुख किंवा दुःख ही दोन्ही प्राप्त न होता समता पावते.आपण सत्संग केला असता प्रकृती—पुरुषाचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर व सर्व विषयांचा त्याग केल्यानंतर म्हणजेच देह “हा मी” नाही आणि पत्नी—पुत्र असे देहसंबंधी “ही माझी” नाहीत असा अभिमान निवृत्त झाल्यानंतर ते मन विकाररहित—शुद्ध होते.असे झाल्यानंतर त्या मनास सुख किंवा दु:ख ही दोन्ही प्राप्त न होता सम पावते—पुरुषरूप असते.||१६|| । तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते:परम । निरन्तरं स्वयंमज्योतिरणिमानमखंडितम ।।१७।। । ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन चात्मना । परिपश्यत्युदासीनं प्रकृतिन च हतौजसम् ।।१८।। भावार्थः----जेव्हा ज्ञान,वैराग्य आणि भक्ति यांनी युक्त झालेल्या त्या मनाच्या योगेकरून हा पुरुष,आपणास प्रकृतीहून पलीकडाचा,केवळ भेदरहित,स्वयंप्रकाश,अतिसूक्ष्म,अखंडित आणि उदासीन आहें असे पहातो आणि प्रकृती क्षीणशक्ति झाली आहे असे पहातो.||१७-१८|| । न युज्यमानया भक्त्या भगवत्याखिलात्मनि । सदृशोSस्ति शिव: पन्था योगीनां ब्रह्मसिद्धये।।१९।। भावार्थः----योगाभ्यास करणाऱ्या पुरुषांना ब्रहमप्राप्ति होण्यास सर्वात्मरूप भगवंताचे ठिकाणी केलेल्या निष्काम भक्तीसारखा दुसरा सुखकारक मार्ग नाही.म्हणून आपण—जीवानी निष्काम भक्तीच करावी,अन्य मार्ग नाही.||१९|| | प्रसङगमजरं पशमात्मन:कवयो विदु:। स एवं साधुषु कृतो मोक्षद्वारमपावृतम ।२०।। भावार्थः----(या सर्वांनाहि सत्संग मूळकारक आहे असे सांगतात)दुष्ट लोकांचा समागम हाच जीवात्म्याला बंधन करणारा दृढपाश आहे असे विद्वान लोक म्हणतात आणि तोच समागम त्याने सत्पुरुषांचेठिकाणी केला तर ते मोक्षाचे उघडे द्वार आहे असे समजावे.म्हणून आपण—जीवानी दुष्टांचा समागम न करता सत्पुरुषांचेठिकाणी समागम केला तर ते मोक्षाचे उघडे द्वार आहे,असे समजावे.||२०|| | तितिक्षव: कारुणिका: सुहृद: सर्वदेहीनाम्:|अजातशत्रव: शांता: साधव: साधूभूषणा ||२१|| भवार्थ:----सत्पुरुष कोणते?असे म्हणशील तर जे सहनशील,दयाळू,शत्रुरहित,सर्व प्राणी मात्रांचे मित्र,गंभीर स्वभावाचे,शास्त्रानुसार वर्णन करणारे व सुशील हेच ज्यांचे भूषण आहे ते सत्पुरुष होत.||२१|| | मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम्| मत्कृते त्यक्तकर्माणस्त्यक्तस्वजनबान्धवा:||२२|| | मदाश्रया: कथा मुष्टा: श्रुण्वन्ति कथयन्ति च | तपन्ति विविधास्तापा नैतान्मग्दतचेतसा ||२३|| भावार्थ:----आणि जे माझेठीकानी अनन्यभावाने—फक्त माझ्यावर—पुरुषावर दृढभक्ती करितात,माझ्याकरिता व्यावहारिक सर्व कर्माचा स्वजनांचा व बांधवांचा त्याग करितात,माझ्यासंबंधी शुध्द कथेचे श्रवण करितात अथवा वर्णन करितात,त्या माझेठीकानी आसक्तचित्त असलेल्या भक्तांना संसारसंबंधी अनेक प्रकारचे ताप,दु:ख उत्पन्न करीत नाहीत.||२२-२३|| | त एते साधव:साध्विसर्वसंङग विवर्जित: | सङगस्तेश्वथ ते प्राथ्र्र्य:सङगदोषहरा हि ते ।।२४।। भावार्थ:----हे साध्वी माते,सर्व संगपरित्याग करून राहिलेले पूर्वी सांगितलेल्या लक्षणांचे जे साधू आहेत;त्यांचाच समागम तुला संपादन केला पाहिजे.ज्यांचा समागम करावयाचा आहे,ते साधू लक्षणांनीयुक्त—श्रोत्रीय,व कृपाळू असावेत.कारण तेच सत्पुरुष दुष्ट पुरुषाच्या अथवा विषयांच्या संगतीपासून उत्पन्न झालेला जन्ममरणादी दोषांचा नाश करणारे आहेत.||२४|| | सतां प्रसंङगान्मम वीर्यसंविदो-भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा:| | तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि-श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति ||२५|| भावार्थ:----साधूच्या समागमानेच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या तशाच अंत:करणाला व कर्णाना सुख देणाऱ्या कथेचे श्रवण घडते.त्यांच्या सेवनाने मोक्षमार्गरूप हरीचे ठिकाणी प्रथम श्रद्धा म्हणजे भावना,नंतर प्रीती म्हणजे आवड आणि नंतर भक्ती म्हणजे विशेष प्रेम ह्या अनुक्रमाने प्राप्त होतात.श्रद्धा,प्रीती व भक्ती प्राप्त होण्यासाठी सत्संग म्हणजे साधू—महात्मा यांच्या मुखातून प्रकृती—पुरुष यांचा विवेक करावा.||२५|| | भक्त्या पुमान्जातविराग ऐन्द्रियाद्-दृष्ट श्रुतान्मद्रचनानुचिन्तया | | चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो -यतिष्यते ऋजु भिर्योगमार्गै: ||२६|| भावार्थ:----नंतर मी केलेल्या सृष्टीवगैरे लीलांच्या वारंवार चिंतनाने माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या भक्तीच्या योगाने,ह्या लोकी दिसणाऱ्या व स्वर्गादि लोकाचेठीकानी ऐकण्यांत येणाऱ्या विषयसुखांपासून मनुष्याला वैराग्य उत्पन्न होते.म्हणून आपण जीवानी भगवंतांच्या लीला—चरित्रे वारंवार श्रवण करावे आणि त्यामुळे भक्तीभाव वाढतो.त्यामुळे तो मनुष्य,आत्मसाधनाच्या तयारीला लागून योगाभ्यास करीत असता,भक्तिप्रधान अशा योगमार्गांनी अंत:करण स्वाधीन करण्याचा प्रयत्न करितो.म्हणून आपण—जीवानी अंत:करण आपल्या ताब्यात येण्यासाठी भक्ती-मार्गाचा स्वीकार करावा.||२६|| | असे वयायं प्रकृतेर्गुणानां | ज्ञानेन वैयग्यविजरुम्भितेन । | योगेंन मय्यार्पितया च भक्या | मां प्रत्यगात्मानमिहा वरूंधे ।।२७।। भावार्थ:----तो पुरुष,मायेच्या गुणापासून झालेल्या शब्दादी विषयांच्या सेवनाचा त्याग करून वैराग्याने वृद्धिगत झालेल्या ज्ञानाने,अष्टांग योगाने आणि माझे ठिकाणी अर्पण केलेल्या भक्तीच्या योगाने,या देहामध्ये सर्वांच्या अंतर्यामी राहणाऱ्या माझी प्राप्ती करून घेतो.आपण भक्ती-मार्गाने अंतर्यामी जो पुरुष त्याची प्राप्ती करून घ्यावी.||२७|| |देवहूती म्हणाली:--- | काचित्वय्युचिता भक्ति:कीदृशी मम गोचरा | यया पदं ते निर्वाणमઞजसांवाष्र्नवा अहम ।।२८।। भावार्थ:-----देवहुती म्हणाली----हे कपिल,जिच्या योगाने,मोक्षत्मक तुझ्या स्वरूपाला मी तत्काळ सर्वात्मेकरून पावोन,ती तुझ्याठीकानी योग्य अशी भक्ती कोणती आहे?त्यातही मला(स्त्रियेला)योग्य अशी कोणत्या प्रकारची आहे?||२८|| | असेवयायं प्रकृतेर्गुणानां - ज्ञानेन वैराग्यविज्रुम्भितेन | | योगेन मय्यर्पितया च भक्त्या - मां प्रत्यगात्मानमिहावरून्धे ||२९|| भावार्थ:----मोक्षस्वरूपा,तू भगवंताची प्राप्ती करून देणारा जो योग सांगितलास की,ज्याच्या योगाने तत्वज्ञान होते तो कसा करावयाचा?व त्याची अंगे किती आहेत?||२९|| | तदेतन्मे विजानीहि यथाहं मन्दधीर्हरे | सुखं बुद्धयेय दुर्बोधं योषा भवदनुग्रहात् ||३०|| भावार्थ:---हे भक्तसंकटनाशक देवा,मंदबुद्धी अशी स्त्री मी,समजण्यास फार कठीण अशा त्या योगमार्गाला,तुझ्या अनुग्रहाने जशी अनायासाने समजेन,तसे मला समजून सांगा.||३०|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला----,हे विदुरा,कपिल मनु,जिच्या उदरी स्वत: शरीर धारण करून उत्पन्न झाला,त्या मातेचा असा अभिप्राय जाणून,दयायुक्त होवून त्याने मातेला,ज्याच्यामध्ये पृकृती आदिकरून तत्वाचे निरुपण आहे व ज्याला लोकामध्ये सांख्यशास्त्र असे म्हणतात त्याचे,भक्तीच्या विस्ताराने व योगाचे उत्तमप्रकारे कथन केले.||३१|| | देवानां गुणलिङानामानुश्रविककर्मणाम् | सत्त्व एवैकमनसो वृत्तिः स्वाभाविकी तु या ||३२|| | अनिमित्ता भागवती भक्तिः सिद्धेर्गरीयसी | जरयात्याशु या कोशं निगीर्णमनलो यथा ||३३|| भावार्थ:----श्रीभगवान म्हणाला---हे माते,शुद्धचित्त असलेल्या पुरुषाची विषयाचे ज्ञान संपादन करून देणारी व वेदोक्त कर्मे करणारी जी इंद्रिय,त्यांची सत्वमूर्ती श्रीहरीच्या ठिकाणीच यत्नावाचून सिध्द झालेली जी निष्काम वृत्ती भगवतभक्ती होय.ती अणिमादि सिद्धीपेक्षा अधिकयोग्यतेची आहे,कारण अणिमादि सिद्धी हि अनात्मा आहे तर निष्काम भक्ती ही पुरुषाकडे नेणारी आहे,ती भक्ति जसा जठराग्नि प्राण्याने भक्षण केलेले अन्न सहज पचन करून नाहीसे करुण टाकितो त्याप्रमाणे लिंगदेहाचा नाश ती निष्काम भक्ती करून टाकिते.त्याचेच नाव मोक्ष होय.||३२-३३|| | नैकात्मतां मे स्पृहयन्ति केचिनमत्पादसेवाभिरता मादीहा: | येSन्योन्यतो भागवता:प्रसज्य सभाजयन्ते मम पौरुषाणि।।३४।। भावार्थ:----आता मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी ते सांगतो-)हे माते,कितीएक भक्त माझ्याकरिता सर्व व्यापार करणारे असून माझ्याशी सायुज्य मुक्ती प्राप्त होण्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत,तर ते भगवतभक्त,एकेठीकानी मिळून प्रेमपूर्वक माझ्या लीलांचे परस्पर वर्णन मात्र करितात तर त्याचबरोबर श्रवण करण्यास योग्य अशी प्रेमळ भाषणे करितात. ||३५|| | तैर्दर्शनीयावयवैरुदार- | विलासहासेक्षितवामसुक्तै: | | हृतात्मनो ह्रतप्राणांश्च भक्ति- | रनिच्छतो मी गतिमण्वीं प्रयुङ्क्ते ||३६|| भावार्थ:----तेव्हा मनोहर असे मुखनेत्रादिक अवयव,उदार लीला,मंदहास्ययुक्त अवलोकन आणि मधुर भाषण ह्यांनी युक्त अशा त्या माझ्या रूपांनी,ज्याची मने व इंद्रिये जणू आपणाकडे ओढूनच घेतली असे ते माझे भक्त,मोक्षाची इच्छा करीत नसताही ती भक्तीच त्यांना मोक्षाची प्राप्ती करून देते.निष्काम भक्तांनी मोक्षाची इच्छा न करता निष्काम भक्तीच मोक्षाची प्राप्ती करून देते.||३६|| | अथो विभूतीं मम मायाविनस्ता - | मैश्वर्यमष्टाङमनुप्रवृत्तम् | | श्रियं भगवतीं वास्पृह्यन्ति भद्रां | परस्य मे तेsश्रुवते तु लोके ||३७|| भावार्थ:----अज्ञान-निवृत्ती झाल्यानंतर ते भगवत-भक्त मायेच्या नियंता अशा माझ्या सत्यलोकादिकांचे ठिकाणी असलेल्या भोगसंपत्तीची,किंवा भक्तीच्या मागून आपोआप प्राप्त झालेल्या अणिमा-महिमा इत्यादिक आठ प्रकारच्या ऐश्वर्याची अथवा वैकुंठाचे ठिकाणी असलेल्या सुखकारक संपत्तीची इच्छा करीत नाहीत तथापि माझ्या वैकुंठ लोकाचे ठिकाणी त्यांना त्या संपत्ती प्राप्त होतातच.माझ्या निष्काम भक्तीने सत्य-लोकाच्या ठिकाणी असलेल्या भोगसंपत्तीची इच्छा न करता प्राप्त होतात.त्या निष्काम भक्तांना वैकुंठात असलेल्या अणिमा-महिमा न मागता आपोआपच प्राप्त होतात.निष्काम भक्तांना वैकुंठात असणारे सर्व ऐश्वर्य न मागाताही आपोआपच प्राप्त होते.अशी ती निष्काम भक्ती श्रेष्ठ आहे.||३७|| भावार्थ:----वैकुंठ हाही एक लोक असल्यामुळे स्वर्गादिकाप्रमाणे तेथेही भोक्त्याचा व भोगाचा नाश होत असेल अशी शंका घेशील तर हे शांतरूपे माते,ज्यांचा प्रिय,आत्मा,पुत्र,सखा,गुरु,सुहृद,आणि इष्ठ दैवत,हि सर्व मीच आहे त्या मत्परायण भक्ताचा कोणत्याही प्रकारे नाश होत नाही,कारण माझे कालचक्र,त्यांचा ग्रास करीत नाहीत.भगवंतांना—पुरुषाला सर्व पुरुष आहे,अशा प्रकारची भावना झालेली आहे त्या भक्तांचा नाश होत नाही.काळ—चक्र त्या भक्तांचा नाश करीत नाही,तर ते अमर होतात.||३८|| | इमं लोकं तथैवामुमात्मानमुभयायिनम् | आत्मानमनु ये चेह ये राय: पशवो गृहाः ||३९|| | विसृज्य सर्वानन्यांश्च मामेवं विश्वतोमुखम् | भजन्त्यनन्यया भक्त्या तान्मृत्योरतिपारये ||४०|| भावार्थ:----हे माते,इहलोक तसाच परलोक व त्या दोन्ही लोकामध्ये गमन करणारा देह व त्या देहाच्या सबंधाने येथे असणारी ऐश्वर्य,पशू,व गृहे त्यांचा व इतरही सर्व विषयांचा त्याग करून अनन्य भक्तीच्या सर्वसाक्षी अशा माझे हे भजन करितात,त्यांना मी मृत्यूरूप संसारापासून पार पाडितो.||३९-४०|| भावार्थ:----हे माते,प्रकृतीपुरुषाचा नियंता,सर्व भुताचा आत्मा आणि षड्गुनैश्वर्यसंपन्न असा जो मी परमात्मा त्यावाचून दुसरे-ठिकाणी हे तीव्र संसारभय निवृत्त होत नाही.||४१|| भावार्थ:----हा वारा माझ्याभितीनेच वाहत असतो,सूर्य,माझ्या भयानेच प्रकाश पाडतो,इंद्र माझ्या भीतीनेच वृष्टी करितो,अग्नी दहन करितो आणि मृत्युहि माझ्याच भीतीने संचार करितो.||४२|| भावार्थ:----यास्तव,योगी पुरुष आपले कल्याण करून घेण्याकरिता ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त असलेल्या भक्तियोगाने निर्भय अशा माझ्या चरणास शरण येतात.म्हणून आपण भगवंतांचाच चरणांचा आश्रय करावा.||४३|| | एतावानेव लोकेस्मिन् पुंसां निःश्रेयसोदयः | तीव्रेण भक्तियोगेन मनो मय्यार्पितं स्थिरम् ||४४|| भावार्थ:----या लोकामध्ये तीव्र भक्तियोगाने माझेठीकानी अर्पण केलेले मन स्थिर,होते असे हे होणे इतकाच पुरुषाच्या मोक्षप्राप्तीचा उदय होय.म्हणून आपण निष्काम भक्ती करून मन स्थिर करावे.||४४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृती(३)यस्कंधामध्ये हा पंचविसावा(२५) अध्याय चौरेचाळीस(४४)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.|| ||श्रीकृष्णार्पणमस्तू ||सदगुरुचरणार्पणमस्तू || ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- २६----आता सव्विसाव्या अध्यायामध्ये पुरुष आणि यांचे निरनिराळे ज्ञान होण्यासठी सांख्यशास्त्राच्या क्रमाने सर्व तत्वाची उत्पत्ती,लक्षणभेदेकरून वर्णन केली आहे.|| | २६---महादादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| अथ ते सम्प्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् | यद्विदित्वा विमुच्यते पुरुषः प्राकृतैर्गुणैः ||१|| भावार्थ:----श्रीभगवान म्हणाला----हे माते,इतका वेळ मी तुला भक्तियोग सांगितला,आता तुला तत्वाची वेगवेगळी लक्षणे सांगतो.ती लक्षणे जाणली असता,पुरुष मायेच्या गुणापासून मुक्त होतो.||१|| | ज्ञानं नि:श्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनम् - यदाहुर्वर्णये तत्ते हृद्यग्रंथी भेदनम् ||२|| भावार्थ:----हे माते,अहंकाररूप हृद्यग्रंथाचा भेद करणारे जे आत्मदर्शनरूप ज्ञान,ते पुरुषसच्या मोक्षप्राप्तीस कारण आहे असे म्हणतात.ते ज्ञान तत्वाच्या लक्ष्णाच्या ज्ञानाने होते;म्हणून तत्वाची लक्षणे सांगण्याचा क्रमाने ते ज्ञानच मी तुला वर्णन करितो,म्हणून आपण—जीवानी अहंकाररूप ग्रंथीचा भेद करणारे आत्म-दर्शनरूप-ज्ञान प्राप्त करून घ्यावे.ते ज्ञान तत्वाच्या लक्षणाच्या ज्ञानाने होते.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावे.||२|| । अनादीरत्मा पुरुषो निर्गुण:प्रकृते:पर:।प्रत्यगधामा स्वयं ज्योतिर्विश्वं येन समन्वितम ।।३।। भावार्थ:----प्रथमता: पुरुषाचे लक्षण सांगतो----हे माते,ज्याच्या योगाने व्याप्त झालेले हे विश्व प्रकाश पावतो तो आत्माच पुरुष होय.तो स्वयंप्रकाश,अंतर्ज्ञानरूप,पृकृतीहून पर,निर्गुण आणि अनादी आहे.तो पुरुष--आत्मा स्वयंम-प्रकाशरूप—पृकृतिचाही व तिच्या कार्याचा प्रकाशक आहे,व स्वत:चे प्रकाशन करण्यासाठी अन्य प्रकाशाची गरज नाही.म्हणजे त्याच्याच प्रकाशानेच तो प्रकाशमान आहे.”स्वत:च्याच प्रकाशाने जप प्रकाशित होतो,त्यास “स्वयंप्रकाश” असे म्हणतात.”||३|| | स एष प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयी विभू: -यदृच्छयैवोपगतामभ्यपदयत लीलया||४|| भावार्थ:----आवरण आणि विक्षेप अशा दोनप्रकारच्या शक्तीभेदाने पृकृतीचे अविद्या आणि माया असे दोन भेद आहेत.त्यात जीव हा,पृकृतीच्या अज्ञानाने संसार पावतो.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून विवेकाने अज्ञान निवृत्त करून पृकृतीचे यथार्थ स्वरूप जाणावे.ईश्वर हा,सर्वज्ञ असल्यामुळे प्रकृतीला स्वाधीन ठेऊन जगाचे उत्पत्ती-स्थिती-संहार करितो.आता पृकृतीच्या अज्ञानाने जीवाला संहार कसा होतो(ते पांच श्लोकांनी सांगतात)त्याच व्यापक(जीवरूप)पुरुषाने,विष्णूची त्रिगुणात्मक शक्ती जी पृकृती लीलेने जवळ आली असता तिचा सहजगत्या अंगीकार केला.||४|| | गुनैर्विचित्रा: सृजतीं स्वरूपा: प्रकृतिं प्रजा: - विलोक्य मुमुहे सद्य: स इह ज्ञानगुह्या||५|| भावार्थ:----सत्व,रज,आणि तम ह्या तीन गुणांच्या योगाने आपल्यासारखा त्रिगुणात्मक अनेक प्रकारच्या प्रजा उत्पन्न करणाऱ्या त्या पृकृतीला पाहून तो जीव,ज्ञानाने आवरण करणाऱ्या तिच्या योगाने तत्काळ मोहित झाला,म्हणजे आपल्या मुळच्या स्वरूपास विसरला||५|| | एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृतेः पुमान् | कर्मसु क्रियमानेषु गुणैरात्मनि मन्यते ||६|| भावार्थ:--अशा रीतीने पुरुष,प्रकृतीचा अध्यासेकरून प्रकृतीच्या गुणांनी कर्मे केली असता,ती मीच केली असे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याठीकाणी मानितो.पृकृतीच्या गुणांनीच कर्मे करीते,पण जीव हा अज्ञानामुळे मी कर्मे केली असे मानतो.पृकृतीचे कर्मे असून जीव मी कर्मे केली असे मानतो.अशा जीवाच्या मानण्यास“अध्यास”असे म्हणतात.जीवानी हा अध्यास सत्संग करून निवृत्त करावा.||६|| । तदस्य संसृतीर्बन्ध :पारतन्त्र्यं च तत्कृतम् ।भवत्यकर्तृरिशस्य साक्षिणो निर्वृत्तात्मन:।।७।। भावार्थः----ते मानणेच,अकर्ता,साक्षी,ईश्वर व सुखस्वरूपी अशा ह्या पुरुषाला (जीवाला)जन्ममरणरूप संसारबंधाचे कारण होते व त्या कर्मबंधाने केलेले परतंत्रत्वही प्राप्त होते.पृकृतीचे कर्मे हे माझे आहेत असे आपण—जीवानी मानणे या प्रकारच्या अध्यासामुळे आपल्याला—जीवाला संसाराचा बंध प्राप्त होते व त्या बंधामुळेच--त्यामुळेच आपणास—जीवास पुन्हा—पुन्हा जन्म-मरणरूप संसार प्राप्त होत आहे.त्यामुळे आपण—जीव हा स्वत्रंत असून परतंत्र झाला आहे.सुखस्वरूप असून दु:खरूप झाला आहे.जन्मणारा नसून जन्मास येत आहे.म्हणून जीवानी सत्संग करून अध्यास निवृत्त करून सुखरूप व्हावे.||७|| । कार्यकारणकर्तृत्वे कारणं प्रकृतिम विदु: । भोक्तृत्वे सुखद:खानां पुरुषम प्रकृते:परम ।।८।। भावार्थः----पुरुषाला—आपणाला—जीवास,शरीरे इंद्रिये आणि देवता ह्यांचे धर्म प्राप्त होण्याला कारण प्रकृती होय.सुखांच्या भोक्तृत्वाचे कारण,प्रकृतीहून वेगळा असणारा पुरुष होय.पुरुष—जीव—आपण पृकृतीहून निराळे आहोत म्हणजे कारण आहोत,तर कार्य नाहीत. म्हणजे कुटस्थाला स्वतः विकार नसल्यामुळे प्रकृतीचा परिणामभूत जो देहाचे ठिकाणी असलेला अहंकार त्याचे ठिकाणीच जरी कर्तृत्वादिक सर्व धर्म अनुभवास येतात तथापि त्या अहंकाराला जडत्व असल्यामुळे भोग हा धर्म चैतन्यरुपी पुरुषाचेठिकाणीच पर्यवसान पावतो.अहंकार हा कर्तृत्वादिक—भोक्तृत्वादिक आहे,पण तो जड आसल्यामुळे,हा धर्म जीवाच्या—पुरुषाच्या ठिकाणी प्रतीत झाल्यासारखे भासतात.असे असले तरी जेव्हा जीव हा सत्संग करून अध्यास निवृत्त करील,तेव्हा जीवाचा अध्यास निवृत्त होईल, तेव्हा जीव हा पुरुषरूप होईल.||८|| | प्रकृते: पुरुषस्यापि लक्षणंपुरुषोत्तम - ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्म कम्||९|| भावार्थः----देवहुति म्हणाली---हे पुरुषश्रेष्ठा—कपिल-मुनी,स्थूल कार्ये हि ज्याचे स्वरूप आहेत,त्या प्रकृतीपुरुषही ह्या जगाच्या कारणभूत दोन्ही तत्त्वाचे मला लक्षण सांग.||९|| ।श्रीभगवंत म्हणतात:-- | यत्तत्त्रिगुणमव्यकीर्तनक्तम नित्यं सदसदात्मकम । प्रधानं प्रकृतिन प्राहुरविशेषम विशेषवंत ।।१०।। भावार्थः----श्रीभगवान म्हणाला---ज्यामध्ये—पुरुषामध्ये कोणतेही विशेष धर्म नाहीत,म्हणजे तो पुरुष धर्म-रहित आहे.पण जे विशेष धर्माचा—कर्तृत्वादिक—भोक्तृत्वादिक यांचा आधार—पुरुष आहे,म्हणजे जसे आकाशामध्ये घटपटादि कोणतेही पदार्थ नाहीत पण ते सर्व पदार्थांचा आधार आहे,तसे जे त्रिगुणात्मक,इंद्रियांना अगोचर,कार्यकारणात्मक आणि नित्य असे तत्त्व आहे,त्यालाच प्रधान किंवा प्रकृती असे म्हणतात.||१०|| | पश्चभि:पश्चभिर्ब्रम्ह चतुर्भिर्दशभिस्तथा | एतच्च तुर्विंशतिकं गणं प्राधानिकंविदु: ||११|| भावार्थः----पांच,पांच,चार आणि दहा मिळून या चोवीस तत्त्वांच्या समुदायाला प्रधानकार्यरुपी ब्रहम असे म्हणतात.||११|| | महाभूतानि पश्चैव भूरापोऽग्निऽर्मरुन्नभ: | तन्मात्राणि च तावन्ति गन्धादीनि मतानि मे ||१२|| भावार्थः----ती चोवीस(२४) तत्त्वे अशी,(१)पृथ्वी,(२)उदक,(३)तेज,(४)वायू व आकाश(५) हि पांच महाभूते होत व त्यांची (६)गंध,(७)रस,(८)रूप,(९)स्पर्श आणि (१०)शब्द हि पांच सूक्ष्मरूपे मला मान्य आहेत.||१२|| | इन्द्रियाणि दश श्रोत्रं त्वग्दृग्रसननासिका: | वाक्करौ चरणौ मेढ्रं पायुर्दशम उच्यते ||१३|| भावार्थः---इंद्रिये दहा(१०) आहेत.(११)कर्ण,(१२)त्वचा,(१३)दृष्टि,(१४)जिव्हा,(५)नासिका,(१६)वाणी,(१७)हात,(१८)पाय,(१९)शिश्न,आणि (२०)गुद म्हंटले आहे.||१३|| | मनो बुद्धिरहक्ङारश्चित्तमित्यन्तरात्मकम् | चतुर्धा लक्ष्यते भेदो वृत्त्या लक्षणरुपया ||१४|| भावार्थः----अंतःकरणाचा---(२१)मन,(२२)बुद्धि,(२३)अहंकार आणि (२४)चित्त असा चार प्रकारचा भेद आहे,तो त्याच्या संकल्प,निश्चय, अभिमान आणि चिंता अशा निरनिराळ्या बोधक वृत्तींनी समजण्यांत येतो.या वरील “प्रधानकार्यरूपी ब्रह्म” असे म्हणतात.||१४|| भावार्थः----इतकाच हा चोवीस प्रकारचा सगुण-ब्रह्माचा संख्याविशेष तत्त्वज्ञांनी पुरुषांनी सांगितला आहे.आतां जो काल आहे ते पंचविसावे तत्त्व असे कोणी म्हणतात,तो काल प्रकृतीचाच अवस्थाविशेष आहे.||१५|| भावार्थः---कित्येक लोक तर पुरुषाच्या पराक्रमालाच काल असे म्हणतात.तो काल संहार करणारा व सृष्टी करणारा असा दोन प्रकारचा आहे.ज्यापासून प्रकृतिरूप उपाधीचा स्वीकार करणाऱ्या व देहावरच मी असा अभिमान ठेवून मूढ होऊन राहणाऱ्या कर्त्या--जीवाला भय प्राप्त होते,तो काल संहार करणारा होय.||१६|| भावार्थः----आणि हे मनुकन्ये,ज्यापासून नामरुपादी विभागरहित अशी तीन गुणांची समतारूप जी प्रकृति तिच्या चलनवलणादिक चेष्टा होतात तो भगवान काल,सृष्टि करणारा होय.||१७|| | अन्त:पुरुषरूपेण कालरूपेण यो बहि: | समन्वेत्येष सत्वनां भगवात्मामायया ||१८|| भावार्थः----याप्रमाणे तो हा भगवान,आपल्या मायेच्या योगाने सर्व प्राण्यांच्या आंत अंतर्यामीरूपाने व बाहेरून कालरूपाने व्यापून राहिला आहे.एतावता जीव आणि ईश्वर एकच असे म्हटले तर त्यापक्षी प्रकृतीचे चोवीस भेद व एक पुरुष मिळून तत्वे पंचवीस होतात व जीव ईश्वर हि वेगवेगळी तत्त्वे मानिली तर ती दोन व प्रकृतीची चोवीस मिळून सव्वीस तत्वे होतात.||१८|| भावार्थः----आतां तत्त्वांची उत्पत्ती व लक्षणे सांगतात---जीवांच्या अदृष्टाचे फळ आली तेव्हां,जिच्या गुणामध्ये क्षोभ उत्पन्न झाला व जी स्वतः चे प्रकट होण्याचे स्थान अशा प्रकृतीच्याठिकाणी सर्व नियंत्या पुरुषाने,आपले चैतन्यशक्तीरूप वीर्य स्थापन केले,तेव्हां तिच्यापासून तेजस्वी असे एक महतत्त्व उत्पन्न झाले||१९|| भावार्थः----हे महतत्त्व,जशाच तसाच राहणारा जगाचा पहिला अंकुर होय.याने आपल्याठिकाणी सूक्ष्मरूपाने भरून असलेले विश्व प्रकट करण्यासाठी आपल्या तेजाच्या योगाने,आपल्याच स्वरूपाचे आच्छादन करणाऱ्या(ज्याने पूर्वी प्रळयाच्या वेळी महतत्त्वाचा प्रकृतीय लय केला होता त्या)प्रलयकालच्या तीव्र अंधकाराला गिळून टाकिले.||२०|| । यत्तस्यत्वगुणं स्वच्छम शान्तं भगवंत:पदम । यंदाहुर्वासुदेवाख्याम चित्तं तन्महदात्मकम ।।२१।। भावार्थः---हे माते,प्रसंगाने प्राप्त झालेली चतुर्व्यूहोपासनाही तुला सांगतो,-----जे सर्व वेदांमध्ये प्रसिद्ध,निर्मल सत्त्वगुणात्मक व रागद्वेषरहित असे भगवत्प्राप्तीचे स्थान म्हटले आहे व ज्याला वासुदेवनामक चित्त असेही म्हणतात ते महत्तत्त्वचहोय.त्याला अभिभूतरूपाने महत्तत्त्व अशी संज्ञा आहे,अध्यात्मरूपाने चित्त हि संज्ञा आहे,उपास्यरूपाने वासुदेव हि संज्ञा आहे आणि त्याचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ होय.हा चतुर्व्युहोपासनेतील पहिला व्यूह जाणावा.||२१|| भावार्थः----जसे उदकाचे खरे लक्षण,पृथ्वीचा संपर्क होण्यापूर्वी व त्यावर फेंस लाटावगैरे उत्पन्न होण्यापूर्वी स्वच्छ,शांत व मधुर असते.नंतर भूमी वायूवगैरेच्या संबंधाने फेसवगैरे विकारयुक्त होते.त्याप्रमाणे चित्ताचे लक्षण,वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी स्वच्छ (भगवंताचे बिंब ग्रहण करण्यास योग्य)निर्विकारि (लय किंवा चांचल्य यांनी रहित व शांत (गंभीर)असे असून वृत्ती उत्पन्न झाल्यावर कामक्रोधादी—काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर,आणि अहंकार असे विकारयुक्त होते सांगितले आहे.म्हणून आपण—जीवानी निष्काम कर्मे व निष्काम उपासना करून काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर आणि अहंकार यांनी विकारयुक्त झाले आहे,ते स्वच्छ करावे—विकाररहित करावे.असे विकाररहित केल्यानंतर आपणास—जीवास—प्रकृतीचा व पुरुषाचा विवेकाद्वारे कळेल—ज्ञान होईल.||२२|| | महत्तत्वाव्दिकुर्वाणाद्भगवद्वीर्यसम्भवात । क्रियाशक्तिरहङकारस्त्रिविध:समपद्धत ।।२३।। भावार्थः---भगवंताच्या विच्छक्तीपासून—विशेषशक्तीपासून उत्पन्न झालेले जे महतत्व ते कालगतीने विकार पावूं लागले,तेव्हा त्यापासून सर्व कर्मामध्ये ज्याची शक्ति आहे असा तीनप्रकारचा “अहंकार” उत्पन्न झाला.||२३|| | वैकारिकस्तैजसश्च तामसश्च यतो भव: । मनसश्चेन्द्रियाणाम च भूतांनां महतामपि ।।२४।। भावार्थः----तो सात्विक,राजस आणि तामस असा होय.त्या तीन प्रकारच्या अहंकारापासून अनुक्रमाने मन,इंद्रिये आणि पंचमहाभूते यांची उत्पत्ती झाली.||२४|| भावार्थः---त्या अहंकारालाच प्रत्यक्ष सहस्त्रमुखी अनंत,”भूतेंद्रीयदेवतारूप” आणि “संकर्षनामक” पुरुष असे म्हणतात.चतुर्व्यूहोपासनेमध्ये हा दुसरा व्यूह जाणावा,ह्यांत ह्याला “अधिभूतरूपाने” भूते इंद्रिये व मन यांचा समुदाय हि संज्ञा,”अध्यात्मरूपाने” अहंकार हि संज्ञा,”उपास्यरूपाने” संकर्षण हि संज्ञा व याचा “अधिष्ठाता” रुद्र होय.||२५|| “------“ भावार्थः----देवतारूपाने कर्तृत्त्व,इंद्रियरूपाने करणत्व व भुतांच्या रूपाने कार्यत्व ही अथवा सत्व,रज व तम या गुणांच्या संबंधाने “शांतव्य”,”भयंकरत्व” व “अतिमूढत्व” हि त्या अहंकाराची लक्षणे होत.||२६|| | वैकारिकाद्विकुर्वाणान्मनस्तत्त्वमजायत | यत्सक्ङल्पविकल्पाभ्यां वर्तते कामसम्भव: ||२७|| भावार्थः---पुढे विकार पावणाऱ्या सात्विक अहंकारापासून “मनरूपी” तत्त्व उत्पन्न झाले.ज्याच्या संकल्पविकल्पापासून अनेक प्रकारच्या कामनांची उत्पत्ती होते.||२७|| भावार्थः----ह्या मनालाच “अनिरुद्धनावांचा देव” व “इंद्रियांचा अधिपती” असे म्हणतात.हे शरदऋतूंतील निळ्या कमळासारखे श्यामवर्ण असून योगिजनांनी हळूहळू वश करण्यास योग्य आहे.चतुर्व्यूहोपासनेमध्ये हा तिसरा व्यूह जाणावा.तेथे ह्याला अधिभूत रूपाने व अध्यात्मरूपाने मन हि संज्ञा,उपास्यदेवतारूपाने अनिरुद्ध हि संज्ञा व याचा अधिष्ठाता चंद्र होय||२८|| | तैजसास्तु विकुर्वाणाद् बुद्धितत्त्वमभूत्सति | द्रव्यस्फुरणविज्ञानमिन्द्रियाणामनुग्रह: ||२९|| | संशयोsथ विपर्यासो निश्चयः स्मृतिरेव च | स्वाप इत्युच्यते बुद्धेर्लक्षणं वृत्तित: पृथक् ||३०|| भावार्थः----हे पतिव्रते,विकार पावणाऱ्या राजसाहंकारापासून बुद्धीरूपी तत्त्व उत्पन्न झाले,ह्या तत्त्वाची वृत्तीच्या भेदाने निरनिराळी लक्षणे आहेत तीं---पदार्थांचे स्वरूप समजण्याचे विशिष्ट ज्ञान,इंद्रियांवर विषय मिळवून देण्याचा अनुग्रह करणे,संशय,विपरीत ज्ञान,निश्चय,स्मरण आणि निद्रा हि होत चतुर्व्यूहोपासनेमध्ये हा चवथा व्यूह जाणावा.त्यांत त्याला अधिभूत व अध्यात्मरूपाने बुद्धी हि संज्ञा,उपास्यरूपाने प्रदुम्न हि संज्ञा व याचा अधिष्ठाता ब्रह्मा होय.||२९-३०|| भावार्थः---आतां इंद्रियांची उत्पत्ती सांगतात---पांच कर्मेंद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये राजासाहंकारापासूनच उत्पन्न झाली.कारण,कर्म हि शक्ति प्राणाची आहे व तो प्राण राजसाहंकराचे कार्य आहे,म्हणून कर्म करणारी इंद्रिये(कर्मेद्रिये) राजाहंकराचे कार्य होत.तशीच ज्ञान हि शक्ती बुद्धीची आहे व ती बुद्धी राजसाहंकाराचे कार्य असल्यामुळे ज्ञानेद्रीयेहि राजसाहंकराचेच कार्य होत.||३१|| | तामसाच्च विकुर्वाणाद्भगवद्विर्यचोदितात् | शब्दमात्रमभुत्तस्मात्रभः श्रोत्रं तु शब्दगम् ||३२|| भावार्थः----(आतां सूक्ष्म विषयांसहित पंचमहाभूतांची उत्त्पती व लक्षणे सांगतात----)भगवंताच्या शक्तीने प्रेरित झालेला तामसाहंकार,विकार पावूं लागला असता,त्यापासून शब्द हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले,त्या शब्दापासून आकाश हे महाभूत झाले.त्या शब्दविषयाचे ग्रहण करणारे “श्रोत्रेंद्रीय” होय.||३२|| | अर्थाश्रयत्वं शब्दस्य दृस्टूर्लिंगत्वमेव च | तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु: ||३३|| भावार्थः----अर्थाचा आश्रय असणे,पाहणाराला बोधक चिन्ह होणे व आकाशाच्या सूक्ष्मरूपाने असणे हे शब्दाने लक्षण असे विद्वान लोक समजतात.||३३|| | भूतानां छिद्रदातृत्वं बहिरन्तरमेच | प्राणेंद्रियात्मधिष्ण्यत्वं नभसो वृत्तीलक्षणं ||३४|| भावार्थः----तसेच प्राणीमात्रांचा जागा देणे,आंत व बाहेर व्यवहार करण्यास स्थान असणे,व शिरा इत्यादिकांच्या छिद्ररूपाने प्राण,इंद्रिये आणि मन ह्यांना आश्रय असणे हे आकाशाचे कार्यरूप लक्षण होय.||३४|| | नभस: शब्दतन्मात्रात्कालगत्या विकुर्त्वत: | स्पर्शोऽभवत्ततो वायूस्त्वक् स्पर्शस्य च संग्रह: ||३५|| भावार्थः----पुढे कालगतीने ते शब्दगुणयुक्त आकाश विकार पावूं लागले असतां,त्यापासून “स्पर्शरूप” सूक्ष्मगुण उत्पन्न होऊन त्यापासून वायू झाला स्पर्शाचे ग्रहण करणारे “त्वगिंद्रिय” होय||३५|| | मृदुत्वं कठिनत्वं च शैत्यमुष्णत्वमेवच | एतत्स्पर्शस्य स्पर्शत्वं तन्मात्रत्वं नभस्वत:||३६|| भावार्थः----मऊपणा,कठीणपणा,शीतत्व,उष्णता,आणि वायूचे सूक्ष्मरूप असणे हि “स्पर्शाची” लक्षणे होत||३६|| | चालनं व्यूहनं प्राप्तिर्नेतृत्वं द्रव्यशब्दयोः | सर्वेन्द्रियाणामात्मत्वं वायोः कर्माभिलक्षणम् ||३७|| भावार्थ:----वृक्षांच्या फांद्यावगैरे हलविणे,गवतवगैरे एकत्र जमविणे,सर्वत्र गती असणे,सुगंधित पदार्थ नाकाशी नेणे,शीतउष्णादि पदार्थाचा त्वचेशी संयोग करणे सर्व इंद्रियांना त्यांचे कार्य करण्यास शक्ती देणे हे “वायूचे” कार्यरूप लक्षण होय ||३७|| | वायोश्च स्पर्शतन्मात्राद्रूपं दैवेरितादभूत् | समुत्थितं ततस्तेजश्चक्षू रूपोपलम्भनम् ||३८|| भावार्थ:----दैवाने प्रेरित अशा स्पर्शगुणयुक्त वायूपासून “रूप” हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले.त्यापासून तेज झाले.रूपाचे ग्रहण करणारे “चक्षु” इंद्रिये होय.||३८|| | द्रव्याकृतित्त्वं गुणता व्यक्तिसंस्थात्वमेव च | तेजस्त्वं तेजस: साध्वि रूपमात्रस्य वृत्तयः ||३९|| भावार्थ:----हे पतिव्रते,पदार्थमात्राला आकार प्राप्त करून देणे,पदार्थाच्या आधाराने प्रतीतीस येणे,पदार्थाचा रचनेचे प्रमाण असणे आणि तेजाचे आणि तेजाचा विशेष गुण होवून राहणे हि “रूपाची” लक्षणे होते.||३९|| | द्दोतनं पचनं पानमदनं हिममर्दनम् | तेजसो वृत्तयस्त्वेता: शोषणं क्षुत्तृडेव च ||४०|| भावार्थ:---प्रकाश करणे,पचन करणे,थंडी नाहीसी करणे,क्षुधा व तृष्णा उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरीता खाणे व पिणे आणि पदार्थास वाळविणे हि “तेजाची” कार्यालक्षण होते.||४०|| | रूपमात्राद्विकुर्वाणातेजसो दैवचोदितात् | रसमात्रमभुत्तस्मादम्भो जिव्हा रसग्रह: ||४१|| भावार्थ:----नंतर रूप हे ज्याचा गुण आहे ते तेज,दैवाने प्रेरीत होवून विकार होवू लागले असता,त्यापासून “रस” हा सुक्ष्मगुण उत्पन्न झाला आणि त्यापासून “उदक” उत्पन्न झाले.रसाला ग्रहण करणारे “जिव्हा” इंद्रिये होय.||४१|| | कषामो मधुरस्तिक्त: कट्वम्ल इति नैकधा | भौतिकांना विकारेण रस एको विभिद्दते ||४२|| भावार्थ:----रस हा मुळचा एक “मधुर” असून तो संसर्गिद्रव्यांच्या योगाने,खारट,तिखट,कडवट व आंबट इत्यादिक अनेकप्रकारच्या भेद पावतो.||४२|| | क्लेदनं पिण्डनं तृप्तिः प्राणनाप्यायनोन्दनम् | तापापनोदो भूयस्त्वमम्भसो वृत्तयस्त्विमाः ||४३|| भावार्थ:---भिजविणे,मृत्तीकादिकांचे पिंड करणे,तृप्ती देणे,जीवन देणे,तृषा भागविणे,पदार्थाला मृदुता आणणे,ताप घालविणे व कुपदिकांपासून बाहेर काढले असताहि पुन: उपन्न होणे ही “उदकाची” कार्यरूप लक्षणे होत.||४३|| | रसमात्राद्विकुर्वाणातेजसो दैवचोदितात् | गन्धमात्रमभूत्तस्मात्पृथ्वी घ्राणस्तु गन्धग: ||४४|| भावार्थ:----नंतर ज्याचा रस हा गुण आहे ते उदक,दैवाने प्रेरित होवून विकार पावू लागले असता,त्यापासून “गंध” हा सूक्ष्मगुण उत्पन्न व त्या गंधापासून “पृथ्वी” उत्पन्न झाली.गंधाने ग्रहण करणारे “घ्राणेद्रीय” होय||४४|| | करम्पूतिसौरभ्यशान्तोग्राम्लादिभिः पृथक् | द्रव्यावयवैषम्यादग्न्ध एको विभिद्दते ||४५|| भावार्थ:-----तो गंध,वस्तुत: एकच असून संसर्गिद्रव्यांच्या मिश्रणाने,मिश्रगंध,सुगंध,दुर्गंध,शांत,उग्र आणि आंबट इत्यादिक निरनिराळे भेद पावतो. ||४५|| | भावनं ब्रह्मण: स्थानं धारणं सद्विशेषणम् | सर्वसत्त्वगुणोद्भेद: पृथिवीवृत्तिलक्षणम् ||४६|| भावार्थ:-----प्रतीमादिरुपाने ब्रहमवस्तूला साकारता आणणे,दसऱ्या आश्रयाची अपेक्षा न धरिता असणे,जलादिकांचे धारण करणे, आकाशादिकांचा निरनिराळेपणा दाखविणे आणि सर्व प्राण्यांचे व त्यांच्या पुरुषत्वादीक धर्माचे विशेष परीणामांनी प्रकट्य करणे हि “प्रथ्वीची” कार्यलक्षणे होत.||४६|| | नभोगुणविशेषोsर्थो यस्य तछ्रोत्रमुच्यते | वायोर्गुणविशेषोsर्थो तस्य तत्स्पर्शनं विदुः ||४७|| भावार्थ:----आकाशाचा गुणविशेष जो शब्द तो ज्याला समजतो त्याला “श्रोत्रेंद्रिय” म्हणतात.वायूचा गुणविशेष जो “स्पर्श” तो ज्याला समजतो त्याला “त्वगिंद्रिये” म्हणतात ||४७|| | तेजोगुणविशेषोsर्थो यस्य तच्चक्षुरूच्यते|अम्भो गुणविशेषोsर्थो यस्य तद्रसनं विदुः|भूमे र्गुणविशेषोsर्थो यस्य स घ्राण उच्यते ||४८|| भावार्थ:---तेजाने गुणविशेष जे “रूप” त्याला “चक्षुरिंद्रिय” म्हणतात.उदकाचा गुणविशेष जो “रस” तो ज्याचा विषय त्याला “रसनेंद्रिय” म्हणतात.भूमीचा गुणविशेष जो “गंध” तो ज्यास समजतो त्याला “घ्राणेंद्रिय” म्हणतात.||४८|| | परस्य दृश्यते धर्मो ह्यपरस्मिन् समन्वयात|अतो विशेषो भावनां भूमावेवोपलक्ष्यते||४९|| |भावार्थ:----ज्याअर्थी आकाशादिक—आकाश,वायू,तेज,आप,आणि पृथ्वी कारणांचे शब्दादिक—शब्द,स्पर्श,रूप,रस,आणि गंध धर्म,वायू इत्यादिक—वायू,तेज,आप,आणि गंध कार्याचे ठिकाणी अन्वयाच्या योगाने दिसून येतात,त्याअर्थी आकाशादिक पंचमहाभूतांचे शब्दादिक—शब्द,स्पर्श,रूप,रस,आणि गंध सर्व गुण भूमिच्याच ठिकाणी उपलब्ध होतात.थोडक्यात कारणाचे गुण कार्यात दिसून येतात,असा शास्त्राचाच सिद्धांत आहे.||४९|| | एतान्यसंहत्ययदामहदादिनीसप्तवे । कालक्रमगुणोपेतोजगदादिरुपाविषत।।५०।। भावार्थ:----(१)महत्तत्व (२)अहंकार व पंचमहाभूते—(३)आकाश,(४)वायू,(५ )तेज,(६)आप,आणि(७)पृथ्वी अशी हि सात तत्वे उत्पन्न होवून एकमेकांमध्ये न मिसळता राहिली तेव्हा त्यांचापासून सृष्टी होणार नाही म्हणून (८)काल,(९)कर्म,आणि(१०}सत्वादिक—सत्व-रज-तम- गुण यासहवर्तमान जगतास कारणीभूत अशा परमेश्वराने त्यामध्ये प्रवेश केला.||५०|| | ततस्तेनानुविद्धेभ्यो युक्तेभ्योSण्डमचेतनम । उत्थितं यस्मादुदतिष्ठदसौ विराट ।।५१|| भावार्थ:----नंतरत्या परमेश्वराच्या योगाने क्षुभित होवून एकमेकांत मिसळलेल्या त्या महत्प्रभूती तत्वापासून एक जड अंडे उत्पन्न झाले व त्यापासून विराट्-पुरुषाची उत्पत्ती झाली.||५१|| | एतदण्डमविशेषाख्यमक्रमवृद्धर्दशोत्तरे: । तोयादिभि:परिवृतंप्रधानेनावृतैर्बही:। | यंत्र लोकवितांनोSयं रूपं भगवतो हरे:।।५२।। भावार्थ:---ह्या अंडाला ‘विशेष’ अशी संज्ञा आहे.ह्यामध्ये हा सर्व लोकांचा विस्तार भरला आहे ह्याच्या भोवती उदक,तेज,वायू,आकाश, अहंकार,ह्यांची क्रमाने एकापेक्षा एक दहापट मोठाली आवरणे असून त्या सर्वांच्या बाहेर पृकृतीचे वेष्टन आहे.हे षड्गुनैश्वर्यसंपन्न हरीचे स्वरूप होय.||५२|| | हिरण्मयादण्डकोशादूत्थाय सलिलेशयात | तमाविश्य महादेवो बहुधा निबिर्भेद खम् ||५३|| भावार्थ:----याप्रमाणे ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगून,आता येथे विराटपुरुषाची उत्पत्ती सांगण्याकरिता आध्यत्मिकादिक विभाग सांगतात. सर्व शक्तिमान ईश्वराने,जलामध्ये असलेल्या त्या तेजोमय ब्रह्मांडामध्ये आपली उदासीनता टाकून तेथेच राहून त्या ब्राह्मांडास पुढे सांगितलेली अनेक प्रकारची छिद्रे पाडिली.||५३|| | निरभिद्यतास्य प्रथमं मुखं वाणी ततोऽभवत् | वाण्या वह्रिरथो नासे प्रनोतो घ्राण एतयो:||५४|| भावार्थ:----ती अशी की---------,ह्या ब्रह्मांडारूपी पुरुषाला प्रथम १--मुख उत्पन्न झाले.तेथे वाणी—इंद्रिय झाली व त्याचा बरोबरच देवता अग्नि झाला नंतर ह्याला २--दोन नाकपुड्या उत्पन्न झाल्या.त्यांच्याठीकानी प्राणासहवर्तमान घ्राणेंद्रियाने प्रवेश केला.||५४|| | घ्राणाव्दायूरभिध्येतामाक्षिणी चक्षुरेतयोः | तस्मात्सुर्यो व्याभिध्येतां कर्णो श्रोत्रं ततो दिश:||५५|| भावार्थ:----त्यानंतर त्याची देवता वायू,तेथे येवून राहिली. नंतर त्याला ३--नेत्रांची स्थळे फुटली त्यांचे ठिकाणी चक्षुरिंद्रीय व त्याची देवता सूर्य येवून राहिला.पुढे ह्याला ४--कानांची विवरे फुटली.तेथे कर्णंद्रिय व त्याचा देवता दिशा हि येवून राहिली.||५५|| | निर्बिभेद विराजस्त्वग्रोमश्मश्वाद्यस्तत: | तत ओषधयश्वासन् शिश्नं निर्बिभेदे तत: ||५६|| भावार्थ:----नंतर विराटपुरुषाला ५--त्वचा उत्पन्न झाली.तिच्यावर,केस,दाढी,मिश्यावगैरे इंद्रिय व त्यांच्या देवता ओषधि राहिल्या.पुढे ह्याला ६--शिश्न उत्पन्न झाले.||५६|| | रेजस्तस्मादाप आसन्निभिद्दत वै गुदम् | गुदादपानोsपानाच्च मृत्युर्लोकभयङ्कर: ||५७|| भावार्थ:---त्याचेठीकानी रेतइंद्रिय व त्याची देवता उदक हि राहिली.पुढे ह्याला ७--गुद उत्पन्न झाला तेथे अपान इंद्रिय व त्याची देवता लोकांना भय उत्पन्न करनारा मृत्यूही येवून राहिली.||५७|| | हस्तौ च निरभिद्देतां बलं ताभ्यां तत: स्वराट् | पादौ च निरभिद्देतां गतिस्ताभ्यां ततो हरिः ||५८|| भावार्थ:----पुढे ह्याला ७--हात फुटले,त्याचेठीकानी बल हे इंद्रिये व त्याची देवता इंद्र ही राहिली,ह्याला ८--पाय फुटले तेथे गती इंद्रिय व त्याची देवता विष्णू हि राहिली.||५८|| | नाद्योsस्य निरभिद्दन्त ताभ्यो लोहितमाभृतम् | नद्दस्तत: समभव न्नुदरं निरभिद्दत ||५९|| भावार्थ:---ह्याला ९--नाडी उत्पन्न झाल्या,त्याचेठीकानी रक्त हे इंद्रिय भरून राहिले.नंतर तेथे नद्या देवता झाल्या,पुढे ह्याला १०---उदार उत्पन झाले.||५९||
| क्षुत्पिपासे तत: स्यातां समुद्रस्त्वेतयोरभूत् | अथास्य हृदयं भिन्नं ह्रदयान्मन उत्थितम् ||६०|| भावार्थ:----तेथे क्षुधा आणि तृषा हे इंद्रिय झाले.नंतर त्याची देवता समुद्र झाला नंतर ह्याला ११--हृद्य उत्पन्न झाले हृदयापासून १२--मन उत्पन्न झाले.||६०|| | मनसश्चन्द्रमा जातो बुद्धीर्बुद्धेर्गिरांपतिः | अहङ्कारस्ततो रुद्रश्चित्तं चैत्यस्ततोsभवत् ||६१|| भावार्थ:----त्या मनापासून त्याची देवता चंद्रमा झाला.त्याच हृदयात दुसरी एक १३---बुद्धी झाली.तिच्यापासून तिची देवता ब्रहमदेव झाला.त्याच हृदयाचा अहंकार उत्पन्न झाला त्यापासून त्याची देवता रुद्र झाला.त्याच हृदयात १४---चित्त झाले.त्यापासून त्याची देवता क्षेत्रज्ञ(जीव)||६१|| भावार्थ:----यांत मुख्य देवता “क्षेत्रज्ञ” होय.कारण,त्याखेरीज उत्पन्न झालेले हे सर्वही देव,या विराट पुरुषाला उठविण्याची खटपट करीत असताही उठविण्यास समर्थ झाले नाहीत.म्हणून त्यांनी त्याला उठविण्याविषयी पुन्हा क्रमाने आपापल्या जागी प्रवेश केला.||६२|| भावार्थ:---तो असा की,----------अग्निने वाणी सहवर्तमान मुखामध्ये प्रवेश केला,तरी विराट्-पुरुष उठेना ! ||६३|| भावार्थ:----सूर्य,चक्षुरिंद्रियासह नेत्रामध्ये प्रविष्ठ झाला तरी वि०!दिशा,श्रोत्रेंद्रियांसह कर्णांचे ठिकाणी प्रविष्ठ झाल्या तरी वि०!||६४|| भावार्थ:---सर्व ओषधी,केशरोमांसह त्वचेवर राहिला,वि० ! उदके,रेतासह शिश्नामध्ये प्रविष्ठ झाली वि०!||६५|| भावार्थ:----मृत्यू,अपानेंद्रीयासह गुदद्वारी येवून राहिला,तरी विरा०!इंद्र,बलासह हस्तांवर राहिला तरी वि०!||६६|| भावार्थ:----विष्णु,गतीसह पायावर राहिला तरी वि०!सर्व नद्यारक्तासह नाड्यामध्ये प्रविष्ठ झाल्या,तरी विराटपु०!||६७|| भावार्थ:----क्षुधा आणि तृषा हयांसहवर्तमान समुद्र उदरांत प्रविष्ठ झाला,तरी वि०!चंद्राने,मनासहवर्तमान हृदयामध्ये प्रवेश केला तरी वि० !||६८|| भावार्थ:-----ब्रहमदेवाने बुद्धीसहवर्तमान हृदयामध्ये प्रवेश केला,तरी,वि०! रुद्राने,अहंकारासह वर्तमान हृदयामध्ये प्रवेश केला तरी,वि०!||६९|| | चित्तेन हृदयंचैत्य:क्षेत्रज्ञ:प्राविशद्धदा । विराटतदैवपुरुष:सलिलदुदतिष्ठत।।७०।| भावार्थ:----जेव्हा चित्ताची देवता क्षेत्रज्ञ(जीव) चिंत्तासहवर्तमान हृदयामध्ये प्रविष्ठ झाला,त्या वेळी लागलाच विराट्-पुरुष,उदकातून उठला.||७०|| | यथा प्रसुप्तं पुरुषं प्राणेन्द्रियमनोधियः | प्रभवन्ति विना येन नोत्थापयितुमोजसा ||७१|| भावार्थ:----जसे एखाद्या निजलेल्या पुरुषाला प्राण,इंद्रिये,मन व बुद्धी हि आपल्या बलाने जीवाच्या सह्यावाचून उठविण्यास समर्थ होत नाहीत,तसे अग्नी इत्यादिक देवही क्षेत्रज्ञाच्या प्रवेशावाचून विराट्-पुरुषाला उठविण्याविषयी समर्थ झाले नाहीत.सर्वांमध्ये क्षेत्रज्ञ—जीव श्रेष्ठ आहे.आपण—मीच क्षेत्रज्ञ—जीव आहे.जीव हा अंत:करणात पुरुषाचे—कूटस्थाचेच पडलेले प्रतीबंब आहे.प्रतिबिंब हे मिथ्या असते व बिंब हे सत्य असते.त्याप्रमाणे जीवात्मा मिथ्या आहे व पुरुष सत्य आहे.म्हणून आपण स्थूल-देह नाहीत,सुक्ष्म-देह—अंत:करण-- नाहीत,तर पुरुषच आहोत.असा सत्संग करून विवेकाद्वारा निश्चय करावा.||७१|| । तमस्मिन प्रत्यगात्मानं धिया योगप्रवृत्तया । भक्त्या विरक्त्या ज्ञानेन विविच्यात्मनिचिन्तयेत।।७२।| भावार्थ:----त्या अंतर्यामी आत्म्याला,श्रवणकीर्तनादीरूप भक्ती अंत:करणशुद्धीद्वारा विषयाचेठायी वैराग्य व पृकृतीपुरुषांचे स्पष्ट ज्ञान यांच्या योगाने या देहाचेठिकाणीच भिन्नपणाने ओळखून अष्टांग योगाभ्यसाने एकाग्र केल्वेल्या बुद्धीने चिंतन करावे.||७२|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये तत्वलक्षणनिरुपण नामक हा सव्विसावा(२६)अध्याय बहात्तर(७२) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला||२६|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|२७--- ५---कपिल आणि देवहुति---[४---प्रकृती---पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन] ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आतां सत्ताविसाव्या अध्यायामध्ये बहुत साधनाच्या योगाने झालेल्या प्रकृतिपुरुषाच्या विवेकज्ञानाने मोक्षप्राप्तीचा प्रकार निरुपण केला आहे. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| प्रकृतिस्थोsपि पुरुषो नाज्यते प्राकृतैर्गुणै: | अविकारादकर्तृत्वान्निर्गुणत्वाज्जलार्कवत् ||१|| भावार्थः----श्रीभगवान म्हणाला----हे माते,जसा जळामध्ये प्रतिबिंबित झालेला सूर्य,जळाचेठिकाणी असणाऱ्या कंपादिक विकारांनी युक्त झाल्यासारखा भासला तथापि आकाशामध्ये असणारा खरा बिंबरुपी सूर्य,त्या कंपादिक विकारांनी लुप्त होत नाही त्याप्रमाणे प्रकृतीचे कार्य अशा देवमनुष्यादि शरीरस्थित सत्त्वादिक गुणांनी घडलेल्या पुण्यपापादिकांनी सुखदुःखादिकांनी लिप्त असल्यासारखा भासला तरी तो वस्तुतः अकर्ता,अविकारी व निर्गुण असल्यामुळे त्यांनी लिप्त होत नाही.आपण—जीव हा प्रतिबिंब असल्यासारखा भासतो.वास्तविक पाहता आपण—जीव प्रतीबंब नसून बिंबच—पुरुषच आहे.||१|| | स एष यर्हि प्रकृतेर्गुणेष्वभिविषज्जते | अहंक्रियाविमूढात्मा कर्तास्मीत्यभिमन्यते ||२|| भावार्थः----अशी वास्तविक स्थिती असतांना हा दोषरहितहि पुरुष,जेव्हां देहाच्या सौंदर्यादि गुणांवर आसक्ति ठेवितो,तेव्हा अहंकाराच्या योगाने स्वतांच्या स्वरूपास विसरून ‘मीच सर्व कर्मे करणारा आहे’ असा अभिमान धारण करितो.दोषरहित असलेला पुरुषसुद्धा देहाच्या सौंद्रियादि गुणांवर आसक्त होतो,त्या अहंकारामुळे स्वत:च्या स्वरूपाचा विसर पडतो व “देह व देहसंबंधीवर मी व माझे” असे त्यांना समजतो.आपण-मात्र स्वत:च्या स्वरूपाचा विसर पडू न देता “मी पुरुष”आहे असा निश्चय स्मरणात सदोदित ठेवावयाचा आहे.||२|| | तेन संसारपदवीमवशोsभ्येत्यनिर्वृतः | प्रासंगीकैः कर्मदोषैः सदसन्मिश्रयोनिषु ||३|| भावार्थः---त्या—देहाच्या अभिमानाच्या योगाने देहादिकांनी केलेल्या पुण्य--पापादि कर्मदोषांनी परतंत्र व सर्वदा सुखरहित होत्साता उत्तम,अधम, व मध्यम अशा देवा तिर्यक्- मनुष्य योनींचेठिकाणी जन्ममरण संसारपदवीला पावतो.म्हणून आपण—जीवानी देहाचा अभिमान धारण न करता व त्यामुळे केलेल्या पाप—पुण्यादी कर्म-दोषांनी परतंत्र न होता उत्तम,अधम,मध्यम योनीस म्हणजे संसारास प्राप्त न होता आपले स्वरूप जे पुरुषरूप होऊन सुखरूप होतोत.||३|| | अर्थेह्यविद्दमानेsपि संसृतिर्ण निवर्तते | ध्यायतो विषयानस्य स्वप्रेsनर्थागमो यथा ||४|| भावार्थः---हे माते,जशी विषयांचा ध्यास लागलेल्या पुरुषाला स्वप्नामध्ये घडलेली भीती शोक इत्यादि अनार्थाची प्राप्ति,जागा झाल्याखेरीज निवृत्त होत नाही,त्याप्रमाणे जन्म मरण संसारांत तथ्यांश काही नाही,हे जरी खरे आहे तरी ज्ञान झाल्याखेरीज विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचा संसार निवृत्त होत नाही.म्हणून आपण सत्संग करून विषयांचे चिंतन न करता विषयांत दोष आहे असे जाणून विषयांचा त्याग करावा.आपले स्वरूप जो पुरुष आहे,त्यांचेच विवेकाद्वारे चिंतन करावे.||४|| | अत एव शनैश्चीतं प्रसक्तमसतां पथि | भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम् ||५|| भावार्थः----यास्तवच दुष्ट इंद्रियांचा विषयरुपी मार्गामध्ये आसक्त झालेले चित्त दृढशक्तीच्या योगाने व कडकडीत वैराग्याने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे.आपण विषयांत आसक्त झालेले चित्त निष्काम दृढ-भक्तीने शक्तीच्याद्वारा वैराग्याने आपल्या स्वाधीन करावे.||५|| | यमादिभिर्योगपथैरभ्यसन् श्रद्धयान्वितः | मयि भावेन सत्येन मत्कथाश्रवणेन च ||६|| भावार्थः----हे माते,दृढ व तीव्र वैराग्य होण्याची साधने अशी आहेत कि,साधक पुरुषाने यम-नियमादिक योगमार्गांनी विषयासक्त झालेले अंतःकरण स्वाधीन करून घेण्याचा अभ्यास करावा.परमेश्वरच आपणास मोक्ष देईल अशा विश्वासाने युक्त होऊन त्या माझेठिकाणी खरा प्रेमभाव ठेऊन माझ्या कथेचे श्रवण करावे.आपण—जीवानी आपले अंत:करण यम—नियामादी साधनाद्वारे आपल्या स्वाधीन करावे.||६|| | सर्वभूतसमत्वेन निर्वैरेणाप्रसंगतः | ब्रम्हचर्येण मौनेन स्वधर्मेण बलीयसा ||७|| भावार्थः----सर्व प्राणिमात्रांचेठिकाणी समदृष्टी ठेवावी.आपण सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी सम-दृष्टी ठेवावी—आपण सर्व भगवंतांचेच आहोत यास “समदृष्टी” असे म्हणतात.म्हणून समदृष्टी सुखास कारण आहे.आपण देहसंबंधीचे आहोत असे समजने यास “विषमदृष्टी” असे म्हणतात.विषम दृष्टी हि दु:खास कारण आहे.म्हणून आपण विषम दृष्टी न ठेवता समदृष्टी ठेवावी.आपण कोणाबरोबरही बैर करू नये,कारण आपण सर्व भगवंतांचेच आहोत.कोठेही आसक्ति ठेऊ नये,कारण अशक्त असणे हा दोष आहे.दोषांनी प्रगती न होता अधोगती होत असते.आपण ब्रहमचर्य—व्रत धारण करावे,कारण आपल्या शरीरातील विर्याचा संचय केल्याने आरोग्य वाढून रोग होत नसतो.त्यामुळे शक्तीत वाढ होत असते.शक्तीत वाढ झाल्याने आपल्या परमार्थात वाढ होत असते.म्हणून आपण ब्रह्मचार्याचे सदोदित पालन करावे.ब्रह्मचार्याचे पालन होण्यासाठी आपण सात्विक आहाराचे सेवन करावे.आपण मौन व्रत धारण करावे,कारण त्यामुळे परमार्थ करण्यास फार वेळ मिळत असतो.आपण अधिक निरर्थक व अनर्थक बोलत असतो,त्यामुळे असे बोलण्याचे संस्कार आपल्या चित्तावर अधिक—अधिक होतात,त्यामुळे अधिक—अधिक तसेच आपण बोलताच राहत असतोत.म्हणून आपण सार्थक व हितकारक बोलावे.आपण मनातल्या—मनात भगवंतांचा नामोच्चार करावा किंवा भगवंतांच्या लीलांचे व स्वरुपाचेच चिंतन करावे. ईश्वरार्पनबुद्धीने—निष्काम कर्मांचे स्वधर्माचरण करावे.त्यामुळे आपण पुरुषरूप होतोत.||७|| | यदृच्छयोपलब्धेन सन्तुष्टो मितभुङ् मुनिः | विविक्तशरणः शान्तो मैत्रः करुण आत्मवान् ||८|| भावार्थः----यत्न न करितां मिळेल तेवढ्याने संतुष्ट असावे,कारण धन—मान प्रारब्धाधीन आहे.परिमित आहार सेवन करावा,कारण परिमित आहाराने जडता न येता प्रयत्न करण्यास प्रवृत्ती वाढते.आपण मननशील असावे,म्हणजे अंतर्मुख असावे.म्हणजे वृत्ती बाहेर जाऊ देऊ नये,कारण बाहेर विषय आहेत व आंत भगवंत आहे.रागलोभादिकांनीरहित,म्हणजे जे म्हणून नाशिवंत पदार्थ आहेत त्यांच्यात आसक्ती नसावी,कारण त्यात अधोगती आहे.आपण सर्वाचा शुभचिंतक असावे,कारण सर्वांनी परमार्थ करावा,तर नाशिवंताची प्राप्ती करून घेऊ नये,कारण नाशिवंत हे दु:खास कारण आहे व अविनाशी हे सुखास कारण आहे.आपण दयालु,असावे कारण दया हा गुण असल्यामुळे आपण दु:खितांचे दु:ख निवारण करू शकतो.आपण धैर्यवान असावे,कारण आपणांत धैर्ये हा गुण असेल तर परमार्थ करू शकतो ,साध्यापर्यंत जाऊ शकतो.||८|| | सानुबन्धे च देहेsस्मिन्नकुर्वन्नसदाग्रहम् | ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृतेः पुरुषस्य च ||९|| | निवृत्तबुद्धयवस्थानो दूरीभूतान्यदर्शनः | उपलभ्यात्मनाssत्मानं चक्षुषेर्वाकमात्दृक् ||१०|| | मुक्तलिंगं सदाभासमसती प्रतीपद्दते | सतो बन्धुमसच्चक्षुः सर्वानुस्यूतमद्वयम् ||११|| भावार्थः----स्त्रीपुत्रादीकांसहित आपल्या देहाचे ठिकाणी ‘मी आणि माझे,असा’ अभिमान धारण करूं नये.म्हणजे प्रकृति आणि पुरुष यांच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होऊन याच्या योगाने बुद्धीच्या जाग्रदादिक अवस्थेची निवृत्ती होते व भेदबुद्धीचा नाश होतो,मग साधक पुरुष अहंकारावच्छिन्न आत्म्याने शुद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ति करून घेऊन,जसा मनुष्य,चक्षुरीद्रियांत असलेल्या देवतारूप सूर्याने आकाशांतील सूर्यबिंबास पहातो त्याप्रमाणे आत्म्याला अभेदरुपत्वेकरून पाहणारा पुरुष,देहादिक उपाधींनी रहित,मिथ्याभूत अहंकाराचेठिकाणी सद्रूपाने भासणारे मायेचे अधिष्ठान,मिथ्याप्रपंचाचे प्रकाशक व सर्व पदार्थांचेठिकाणी व्यापून राहणारे अशा परिपूर्ण ब्रहम--स्वरूपास पावतो.म्हणून आपण—जीवानी स्त्री-पुत्रादिकांचा अभिमान धारण करू नये.त्यामुळे आपले आत्मस्वरूपाचे अज्ञान निवृत्त होऊन खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते.त्यामुळे आपले जन्म—मरणादिक निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते.||९-१०-११|| | यथा जलस्थ आभासः स्थलस्थेनावदृश्यते | स्वाभासेन तथा सूर्यो जलस्थेन दिवि स्थितः ||१२|| भावार्थः----यास दृष्टांत,जेव्हा सूर्याचे प्रतिबिंब पाण्यांत पडून त्या प्रतिबिंबाचे दुसरे प्रतिबिंब भिंतीवर पडते तेव्हा घरांत असलेल्या एखाद्या पुरुषास,त्या भिंतीवर पडलेल्या प्रतिबिंबाच्या संबंधाने कसे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब दृष्टीस पडते व त्या पाण्यांतील प्रतिबिंबाच्या संबंधाने आकाशांत असलेले सूर्याचे खरे बिंब दृष्टीस पडते,||१२|| | एवं त्रीवृदहन्कारो भूतेन्द्रियमनोमयैः | स्वाभासैर्लक्षितोsनेन सदाभासेन सत्यदृक् ||१३|| भावार्थः----त्याप्रमाणे भुते इंद्रिये व मन ह्यांमध्ये अहंकाराचे प्रतिबिंब आहे व अहंकारामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब आहे म्हणून देहेंद्रियमनरूप प्रतिबिंबाच्या योगाने प्रथम ब्रहमवस्तूचे प्रतिबिंब पडलेला त्रिगुणात्मक अहंकार लक्षिला जातो आणि नंतर त्या ब्रहमप्रतिबिंबयुक्त अहंकाराचे परमार्थज्ञानरूप आत्मालक्षिला जातो.||१३|| | भूतसुक्ष्मेन्द्रियमनोबुद्ध्यादिष्वीह निद्रया | लीनेष्वसति यस्तत्र विनिद्रो निरहंक्रियः ||१४|| भावार्थ:---याप्रमाणे युक्तीने आत्म-प्राप्तीचा प्रकार सांगून आता सुषुप्तीच्या साक्षित्वेकरून शुद्धात्म्याची प्राप्ती होण्याचा प्रकार सांगतात- पंचमहाभूते,शब्दादिक विषय,इंद्रियें,मन,बुद्धी,व अहंकार यांचा निद्रावस्थेमध्ये अस्पष्ट अवस्थेच्या ठिकाणी निद्रेच्या योगाने लय झाला असता,त्यावेळी जो जाग्रत असतो व ज्याला मुळीच अहंकार नसतो तो आत्मा होय.||१४|| | मन्यमानस्तदाssत्मानमनष्टो नष्टवन्मृषा | नष्टेsहङ्करणे द्रष्टा नष्टवित्त इवातुर : ||१५|| भावार्थ:---त्या वेळी तो स्पष्ट का भासत नाही असे म्हणशील तर हे ,तो जागेपणी सर्व गोष्ठी पाहणारा असतो म्हणून स्पष्टरीतीने भासतो,झोपेत भुते इंद्रिये व अहंकार हि नास्थ झाली असता,जसा एखादा द्रव्यलोभी मनुष्य‘द्रव्य नाहीसे झाले कि स्वताच नाहीसा झालो’असे मानतोत्याप्रमाणे त्या अवस्थेमध्ये आत्मा स्वत:च नष्ठ झाला नसताही व्यर्थच आपणास नास्थ झाल्यासारखे मानतो,म्हणजे जागेपनासारखा प्रकाश पावत नाही||१५|| | एवं प्रत्यवमृश्यासावात्मानं प्रतीपद्दते | साहंकारस्य द्रव्यस्य योsवस्थानमनुग्रहः ||१६|| भावार्थ:---विवेकी पुरुष असा विचार करून,अहंकारासहित कार्यकरणात्मक सर्व द्रव्याचा जो प्रकाशक अशा त्या आत्म्याची प्राप्ती करून घेतो||१६|| भावार्थ:--देवहुती म्हणाली-हे सर्वज्ञा प्रभो,भक्ती व वैराग्य यांच्या योगाने मनुष्याला ज्ञान उत्पन्न होईल पण प्रकृती,पुरुषाला सुटेल कशी?कारण,पुरुषावाचून देहेंद्रीयारूप प्रकृतीचे स्वरूप समजत नाही व प्रकृतीवाचून पुरुषाचे स्वरूप व्यक्त होत नाही.एकंदरीत ह्या दोघांचा आश्रय एकमेकास आहे व दोन्हीही नित्य आहेत,तेव्हा प्रकृती पुरुषाला कधीही सोडीत नाही||१७|| भावार्थ:---जसे गंध आणि भूमी हे दोम्हीपादार्थ किंवा उदक आणि रस हे पदार्थ वेगवेगळे असत नाहीत त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांची स्थिती,एकमेकाला सोडून कधीही असू शकत नाही||१८|| भावार्थ:---यास्तव वस्तुत कर्तत्व अशा पुरुषाला,ज्या प्रकृतीच्या गुणांच्या आश्रयाने हा कर्मापासून बंध(संसार)प्राप्त होतो,ते विध्यामान असता,पुरुषाला कैवल्य(मोक्षपद)कसे घडेल?घडणारच नाही||१९|| भावार्थ:---तेव्हा तत्वाच्या विचाराने एखाद्या पुरुषाचे संसाररूपी प्रचंड भय निवृत्त झाल्यासारखे असले तरी त्या संसाराला निमित्तभूज जे प्रकृतीचे गुण नष्ठ झाले नसल्यामुळे ते भय पुन्हा उत्पन्न होते,तेव्हा ते सर्वथा नाहीसे होण्यास उपाय काय करावा?||२०|| |श्रीभगवानुवाच | अनिमित्तनिमित्तेन स्वधर्मेणामलात्मना | तीव्रया मयि भक्त्या च श्रुतस्मभृत्या चिरम् ||२१|| भावार्थः----श्रीभगवान म्हणाला----हे माते,प्रकृतीचा संबंध असला कि तेवढ्यानेच पुरुषाला बंधन प्राप्त होते असे नाही,तर तिच्याठिकाणी चांगलेपणा मानून पुरुषाने आसक्ति ठेवली तरच त्याला बंधन प्राप्त होते आसक्ति सुटली कि मोक्ष घडतो.आपणास—जीवास प्रकृतीचा संबंध असला की,बंधन पडत नाही तर प्रकृतीच्या ठिकाणी आपण आसक्ती व चांगलेपणा मानला की,बंधन प्राप्त होते.म्हणून प्रकृतीची आसक्ती धारण करू नये व ती सुखास कारण नसून दु:खास कारण आहे असे समजून प्रकृतीचा विवेकाने त्याग करावा. आतां साधनामध्ये मात्र व्यंगता—उणे--अपूर्ण—दोष मुळीच उपयोगी नाही.यास्तव मनुष्याने ती साधने अशी ठेवावी कि,ईश्वरार्पण बुद्धीने निष्काम स्वधर्माचरण करावे,म्हणजेच सकाम बुद्धीने—संसाराच्या इच्छेने कर्मे करू नये.अंतःकरण,रागद्वेशादिक—काम,क्रोध,लोभ, मोह,मद,मत्सर विकाररहित निर्मळ ठेवावे.माझ्याठिकाणी कथाश्रवणादिकांनी उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी दृढभक्ति करावी.||२१||
| ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येण बलीयसा | तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ||२२|| भावार्थः----आपण—जीवानी प्रकृती--पुरुषांच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करून घ्यावे,कोणत्याही विषयांच्या वासनेने न ढळणारे कडकडीत वैराग्य धारण करावे.आपल्या ठिकाणी विषयांचे तीव्र वैराग्य असावे,ते तीव्र वैराग्य येण्यासाठी सत्संगाद्वारे विवेक करावा लागतो. शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे परिमित आहारवगैरे सेवन करून तपश्चर्या करावी व अष्टांग योगसाधन करावे.आपण—जीवानी परिमित आहार सेवन केल्यामुळे आळस न येता कार्य करावे अशी भावना होऊन आपण कार्यदक्ष होतोत.आपण—जीवानी विघ्नांस—प्रतिकूल परिस्थितीस न जुमानिता आत्मस्वरूपाचेठिकाणी चित्ताची एकाग्रता करावी.||२२|| | प्रकृति: पुरुषस्येह दह्यमाना त्वहर्निशम् | तिरोभवित्री शनकैर्ग्नेर्योनिरिवारणि: ||२३|| भावार्थः----इतक्या साधनांच्या योगाने दररोज हळूहळू क्षय करीत नेलेली पुरुषाची प्रकृति (मोहरूप अविद्या)जसे अग्नीला उत्पन्न करणारे अरविणनावांचे काष्ठ,आपणापासूनच उत्पन्न झालेल्या अग्नीने जळून शेवटी नाहीसे होते त्याप्रमाणे ती प्रकृति,याच जन्माचेठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या योगाने नाहीशी होते.म्हणून आपण जीवानी सत्संग करून प्रकृती—पुरुषाचा विवेक करून ज्ञानाद्वारे प्रकृती नाहीसी करावी.||२३|| | भुक्तभोगा परित्यक्ता दृष्टदोषा च नित्यशः | नेश्वरस्याशुभं धत्ते स्वे महिम्नि स्थितस्य च ||२४|| भावार्थः---व तिचे भोग—विषय भोगीत असतानाच तिच्याठिकाणी संसारदुःखाला कारण असे पुष्कळ दोष आहेत हे पुरुषाला नित्य दिसून येते.आपणास—जीवास प्रकृतीच्या विषयांचा भोग घेत असता,ते विषय दु:खकारक आहेत असा आपणास—जीवास नित्य—दररोज अनुभव येतो.म्हणून आपण—जीवानी अशा दु:खकारक विषयांचा सर्वथा त्याग करावा.त्यानंतर—विषयांचा त्याग केल्यानंतर आपल्या—पुरुषाच्या---आनंदरूपाचे ठिकाणी राहून ईश्वररुपी झालेल्या त्या पुरुषाचे,ती प्रकृति कांहीच अशुभ करीत नाही.त्या प्रकृतीला नाहीसे केल्यावर ती प्रकृती आपले—जीवाचे—पुरुषाचे कांहीच करू शकत नाही—दु:ख देऊ शकत नाही.||२४|| | यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वायो बह्रनर्थभृत् | स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते ||२५|| भावार्थः----यास दृष्टांत---जसे स्वप्न निजलेल्या पुरुषाला,शोक भयवगैरे अनेक पदार्थ उत्पन्न करते परंतु तेच स्वप्न,जागा झालेल्या त्या पुरुषाला आठवत असले तरी मोह उत्पन्न करण्यास समर्थ होत नाही.त्याचप्रमाणे आपल्या--जीवाच्या अज्ञानावस्थेत प्रकृती दु:ख देऊ शकते,कारण ती कार्यरत असते व पुरुष—प्रकृतीचा विवेक केल्यानंतर ती प्रकृती नाहीसी होते,म्हणून त्या प्रकृतीचे अस्तित्व नसल्यामुळे दु:ख देऊ शकत नाही.आपल्या—जीवाच्या ज्ञानावस्थेत फक्त आनंदरूप असलेला पुरूषच असतो,म्हणून जीवाला आनंदाचा अनुभव येतो.आतां आपण—जीव न राहता जीवच पुरुषरूप असतो.म्हणजे जीवच आनंदरूप असतो.||२५|| | एवं विदिततत्त्वस्य प्रकृतिर्मयि मानसम् | युञ्जतो नापकुरुत आत्मारामस्य कर्हिचित् ||२६|| भावार्थः----त्याप्रमाणे प्रकृति-पुरुषाचे तत्त्व जाणून माझ्याठिकाणी अंतःकरण स्थिर करणाऱ्या व आत्मस्वरूपी रममाण होणाऱ्या पुरुषाची प्रकृति कधीही मोहाने अपकार करीत नाही.म्हणून आपण—जीवानी प्रकृती—पुरुषाचे तत्त्व जाणून,प्रकृतीला नाहीसे करून पुरुषाच्या ठिकाणी मन स्थिर करावे.||२६|| | यदैवमध्यात्मरत: कालेन बहुजन्मना | सर्वत्र जातवैराग्य आब्रम्हभुवनान्मुनि: ||२७|| भावार्थः----यास्तव अशारीतीने पुष्कळ जन्मापर्यंत साधनानुष्ठान घडणाऱ्या कालाच्या योगेकरून जेव्हा विवेकी पुरुष,स्वस्वरूपाचेठिकाणी रममाण होतो,तेव्हाच त्याला ब्रहमलोकापर्यंत सर्व लोकांविषयी वैराग्य उत्पन्न होते.आपण—जीव जेव्हा सत्संगाद्वारे विवेक उत्पन्न करून प्रकृतीला नाहीसे करून—विषयांचा--इहलोकांतील व परालोकांतील त्याग करून वैराग्य उत्पन्न होते.||२७|| | मद्भक्त: प्रतिबुद्धार्थोंमत्प्रसादेन भूयसा | निःश्रेयसं स्वसंस्थानं केवल्याख्यं मदाश्रयम् ||२८|| | प्राप्नोतीहाञ्जसा धीर: स्व्दृशा छिन्नसंशयः | यद्ग्त्वा न निवर्तेत योगी लीग्ङाद्विनिर्गमे ||२९|| भावार्थः----नंतर माझेठिकाणी निरतिशय प्रीतीने युक्त व आत्मस्वरूपाचे तत्व जाणणारा असा तो भक्त—आपण—जीव,माझ्या अत्त्युत्तम अनुग्रहानेच स्वरूपसाक्षात्कार झाला म्हणजे देहाभिमान संशयरहित व धैर्यवान होत्साता,माझ्या आश्रयाने राहणाऱ्या परमपुरुषार्थरूप कैवल्यनामक आपल्या निरतीशयानंदरूप स्वरूपास सहज पावतो.प्रारब्धकर्माच्या शेवटी लिंगशरीराचा नाश होऊन ज्या स्वरूपास जाऊन पोचलेला योगी—आपण—जीव पुनः या मायारूप संसारात कधीही पडत नाही.||२८-२९|| | यदा न योगोपचितासु चेतो मायासु सिद्धस्य विषज्जतेsन्गः | अनन्यहेतुष्वथ मे गतिः स्याद् आत्यन्तिकी यत्र न मृत्युहासः||३०|| भावार्थः----परंतु हे माते,या प्रकारच्या मोक्षप्राप्तीविषयी प्रयत्न करण्यास विघ्नरूप आणिमादीसिद्धी प्राप्त होतात त्या योगसाधनाचेच समृध्द झालेल्या,व योगावाचून दुसऱ्या कारणाने रहित व अशा अत्यंत मोहक सिद्धीचेठीकानी जर त्या योग्याचे चित्त गुंतले नाही तरच त्याला पूर्वी सांगितलेली परमपुरुषार्थरूप माझी गती प्राप्त होते.म्हणून आपण—जीवानी आणिमादीसिद्धीचे ठिकाणी आसक्त न होता त्याचा विवेकाद्वारे त्याग करावा.ज्या मोक्षरूप गतीचेठिकाणी मृत्युचागर्व मुळीच चालत नाही म्हणजे जर योग्यांचे चित्त सिद्धीच्याठिकाणी गुंतले तर मृत्युला गर्व वाटू लागतो की,मोठ्या सिद्धीलासुद्धा मी सिद्धीचे आमिष दाखवून आपल्या स्वाधीन करून घेतले’यास्तव आणिमादीसिद्ध प्राप्त झाल्या तरी तेथे योग्याने—आपण—जीवानी आसक्त न होण्यासठी सावध राहावे,कारण जेथे गर्व आहे,तेथे संसार आहे,व जेथे संसार आहे,तेथे सुख नसून दु:ख आहे.||३०|| याप्रमाणे श्रीमद्भगवद्त महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा सत्ताविसावा(२७) अध्याय तीस(३०)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||२७|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू || _____________________________________________________________________________________________ २८--- आता या अठ्ठाविसाव्या(२८) अध्यायामध्ये ध्यानयोगाने सुभोषित अशा अष्टांग योगसाधने प्राप्त होणारे सर्वोपाधीरहित स्वरूपज्ञान वर्णन केले आहे. || २८---अष्टांगयोगाचा विधी || ____________________________________________________________________________________________ | योगस्य लक्षणं वक्ष्ये सबीजस्य नृपात्मजे | मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम ||१|| भावार्थः----श्रीभगवान म्हणाला----हे राजकन्ये,देवहुति,योग दोन प्रकारचा आहे.एक निर्बीज आणि दुसरा सबीज.त्यांत मन विषयांवरून फिरवून आत्मस्वरूपी लावावयाचे हा “निर्बीजयोग” होय आणि ईश्वराच्या स्वरूपाचे ध्यान करीत करीत मन विषयांकडून सोडावयाचे हा “सबीजयोग” होय.ह्यांपैकी सबीज योगाचे लक्षण मी तुला सांगतो.ज्या प्रकाराने मन प्रसन्न झाले असतां ते उत्तम प्रकारच्या मोक्षमार्गाकडे निःसंशय लागते.||१|| भावार्थः----हे साध्वी,योगाभ्यासाची अंगे अशी आहेत की,आपण—जीवानी--योगाभ्यास करणाराने,आपल्या शक्तीप्रमाणे स्वधर्माचे आचरण करावे.आपण—जीवानी अधर्मापासून किंवा परधर्मापासून निबृत्त असावे,कारण ते पापाकडे—अंत:करण अशुद्ध करणारे मार्ग आहेत म्हणजे भगवंतांपासून दूर नेणारे मार्ग आहेत.आपण—जीवानी दैवाने—प्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या अन्नादिकाने संतोष मानवा.आपण—जीवानी आत्मज्ञानी पुरुषांच्या चरणाची पूजा करावी,कारण त्यांच्या पूजाने—सेवेने अंत:करण शुद्ध होते व आपल्या मार्गाची वाटचाल भगवंतांकडे जात असते.||२|| | ग्राम्यधर्मनिवृत्तिश्च मोक्षधर्मरतिस्तथा | मिमतेध्यादनं शाश्वद्विक्तक्षेमसेवनम्||३|| भावार्थः----आपणास—जीवास धर्म,अर्थ व काम यांचे प्रतिपादन करणाऱ्या धर्मापासून निवृत्ती असावी,कारण धर्म संसाराकडे नेत असतो.आपली—जीवाची मोक्षधर्माचे ठिकाणी प्रीती असावी,कारण हा मार्ग भगवंतांकडे नेत असतो.आपण—जीवानी परिमित शुद्ध अन्नाचे भक्षण व निर्भय अशा एकांतस्थलाचे सेवन करावे,कारण परिमित शुद्ध अन्नाच्या सेवनाने अंत:करण शुद्ध होत असते व निर्भय अशा एकांतस्थलाचे सेवन केले असता अंत:करण स्थिर होत असते.||३|| | अहिंसा सत्यमस्तेयं यावदर्थपरिग्रह: | ब्रम्हचर्यं तप: शौचं स्वाध्याय: पुरुषार्चनम् ||४|| भावार्थः---आपण—जीवानी--१--अहिंसा—शारीरिक—वाचिक—मानसिक;करावी.आपण—जीवानी-२—सत्य—शारीरिक,वाचिक,मानसिक;बोलावे. आपण—जीवानी-३—चोरी करू नये—शारीरिक,वाचिक,मानसिक चोरी करू नये.आपण—जीवानी--४--आपल्या कार्यापुरते वस्तूचे ग्रहण--संचय करावा.आपण—जीवानी--५—ब्रहमचर्य—विर्याचा संग्रह करावा.आपण—जीवानी--६—तप—शारीरिक,वाचिक,मानसिक करावे. आपण—जीवानी--७--स्थूल देह व अंतःकरण यांची शुद्धी करावी. आपण—जीवानी--८--अध्ययन व आपण—जीवानी--९--परमेश्वराचे पूजन करावे.||४|| भावार्थः----मौन आसानाच्या चांगल्या--ज्याने शरीराची स्थिरता,हळूहळू प्राणवायूंचे वशीकरण,मनाच्या योगाने बाह्यविषयांपासून निवृत्ती करून ह्रदयामध्ये—अंत:करणात—आंत प्रवृत्ती करणे,कारण बाहेर विषय—दु:ख आहे व आंत पुरुष—सुख आहे.आपणांस—जीवास दु:ख नको व सुख हवे आहे.||५|| | स्वधिष्ण्यानामेकदेशे मनसा प्राणधारणम् | वैकुण्ठलीलाभीध्यानं समाधानं तथाssत्मन: ||६|| भावार्थः----शरीरामध्ये मूलाधार चक्रवगैरे प्राणांची स्थाने आहेत त्यांपैकी कोणत्यातरी एका स्थानावर मनासहवर्तमान प्राणाचे धारण करणे,भगवंताच्या लीलांचे चिंतन करणे,आणि परमात्म्याचेठिकाणी मनाची एकाग्रता करणे.म्हणून आपण—जीवानी विषयांच्या ठीकाणी मनाची एग्रता न करता पुरुषाच्या ठिकाणी मनाची एग्रता करावी.||६|| भावार्थः----ह्या मार्गांनी व व्रतदानादिक दुसऱ्याही मार्गांनी आपला प्राणवायू जिंकणाऱ्या साधक पुरुषाने सावधपणे विषयसंगाने दुषित झालेले व त्याच विषयरुपी आडमार्गांकडे धांवणारे आपले मन,बुद्धीच्या सहाय्याने युक्तीने परमेश्वराकडे लावावे.आपण आपले मन विषय दुषित आहेत,म्हणून त्याठिकाणी न लावता बुद्धीची साह्यता घेऊन भगवंतांकडे लावावे.||७|| भावार्थः---आपण—जीवानी आतां आसनादिक साधनाचे स्पष्टीकरण करतात पवित्र स्थलाचेठिकाणी,खाली दर्भ,त्यांवर कृष्णजिन व वस्त्र अशा रितीने आपले आसन घालून,त्यावर पुष्कळ वेळपर्यंत बसले असतांही श्रम वाटणार नाहीत असा अभ्यास करून आसनाचा जय करावा.नंतर त्या आसनावर बसणाऱ्या आपणास ज्या प्रकाराने सुख होईल तशा स्वस्तिकादिक आसनमुद्रेने सरळ बसून प्राणायामाचा अभ्यास करावा.||८|| भावार्थः----आपण—जीवानी पूरक(बाहेरचा वायू एका नाकपुडीने आंत घेणे),कुंभक (त्याला कोंडून धरणे)व रेचक(त्याला बाहेर सोडणे)यांच्या योगाने किंवा रेचक,कुंभक व पूरक अशा उलट रीतीने ज्याप्रकारे आपले चित्त चंचल न होता स्थिर राहील त्याप्रकारे प्राणाचा मार्ग शुद्ध करावा.||९|| भावार्थः---आपण—जीवानी जसे वायू आणि अग्नी यांच्या योगाने संतप्त झालेले सुवर्ण,आपले ठिकाणी असलेल्या हीनधातुरूप मलाचा त्याग करते त्याप्रमाणे प्राणायामाच्या अभ्यासाने श्वासवायूचा जय करणाऱ्या योग्याचे—आपले—जीवाचे मन,कामक्रोधादिकांचा त्याग करून लवकरच निर्मल होते.||१०|| भावार्थः----हे माते,आपण—जीवाने--योग्याने प्राणायामाच्या योगेकरून आपले वातकफादिक दोष नाहीसे करावे,धारनाच्या योगाने पापे जाळून टाकावी,प्रत्याहाराच्या योगाने विषयांचे संबंध तोडावे आणि ध्यानेकरून रागालोभादी दुर्गुण नाहीसे करावे.||११|| भावार्थः----याप्रमाणे योगाभ्यासेकरून आपले—जीवाचे--साधक पुरुषाचे मन जेव्हां निर्मळ व स्थिर होईल तेव्हां त्याने आपल्या नासिकेच्या अग्रावर दृष्टि ठेवून,भगवंताच्या मूर्तीचे ध्यान करावे.||१२|| भावार्थः---ते असे कि,ज्या भगवंताचे मुख कमल प्रसन्न आहे,ज्याचे नेत्र,कमळाच्या गाभ्याप्रमाणे आरक्त आहेत,ज्याचा वर्ण,काळ्या कमळाच्या पत्राप्रमाणे नीळा आहे,ज्याने ह्स्तामध्ये शंख,चक्र,व गदा हि धारण केली आहेत.||१३|| भावार्थः---ज्याने परिधान केलेली रेशमी वस्त्रे विकसित होणाऱ्या कमळाच्या केसरांप्रमाणे पीतवर्ण आहेत,ज्यांचे वक्षःस्थळ श्रीवत्सलांछनाने युक्त आहे,ज्याच्या कंठाशी संलग्न असलेला कौस्तुभ मनी प्रकाशमान आहे.||१४|| भावार्थः----जो मधुपानाने मत्त झालेल्या भ्रमरांच्या मधुरध्वनीने युक्त अशा वनमालेने वेष्टित झाला आहे,ज्याच्या शरीरावरील हार,कडी,तोडे,मुकुट,बाहूभूषणे आणि नुपुरे हि बहुत मोलाची आहेत.||१५|| भावार्थः----ज्याचा कटिभाग,रत्नमय कमरपट्ट्याच्या वेष्टणाने फारच शोभत आगे,भक्तांचे ह्र्दयकमल हेच ज्याचे आसन आहे,जो अतिशय सुंदर व शांत असून भक्तांच्या मनाला व नेत्रांना अधिकाधिक आनंद देणारा आहे.||१६|| भावार्थः---जो आपल्या भक्तांकडे फारच मनोहर दृष्टीने पहात आहे,ज्याला सर्व लोक निरंतर नमस्कार करीत आहेत,जो तारुण्यवयांत असून भक्तांवर अनुग्रह करण्याच्या कामी अगदी तत्पर होऊन गेला आहे.||१७|| भावार्थः---ज्याची कीर्ती वर्णनीय व पुण्यकारक आहे व जो नल,धर्मराजा इत्यादि पुण्यश्लोकांनीही यशस्कर आहे,हे देवहुति,अशा प्रकारच्या सर्वावयवयुक्त देवाचे,तोपर्यंत ध्यान करावे की,जो पर्यंत त्याच्या सर्व अवयवयुक्त स्वरूपावरून आपले मन ढळणार नाही.||१८|| भावार्थः----ते तरी ध्यान,आपली दिशा जशी आवड असेल त्याप्रमाणे उभा राहणाऱ्या,चालत असणाऱ्या सिंहासनावर बसणाऱ्या,शेषादी शय्येवर निजणाऱ्या,अनेक प्रकारच्या दर्शनीय लीला करणाऱ्या अथवा ह्र्दयगुहामध्ये राहणाऱ्या देवाचे शुद्ध भक्तीयुक्त अंतःकरणाने करावे.||१९|| भावार्थः---नंतर त्या भगवंताच्या स्वरूपावर चित्त स्थिर राहूं लागले व त्याचे सर्व अवयव एकदम मनांत येऊ लागले म्हणजे त्या मननशील योग्याने—आपण—जीवानी,आपले मन त्या भगवंताच्या एकेक अवयवाचेठिकाणी लावावे.||२०|| भावार्थः----तो निरनिराळ्या अवयवांच्या ध्यानाच्या प्रकार असा की,----आपण—जीवानी प्रथम भगवंताच्या चरणकमलाचे उत्तम रीतीने ध्यान करावे,जे चरणकमल-वज्र,अंकुश,ध्वज,आणि कमळ या चिन्हांनी युक्त आहे,तसाच ज्याने,उंच आरक्तवर्ण व सुशोभित अशा नखपंक्तीच्या किरणांनी ध्यान करणाऱ्या सत्पुरुषांच्या ह्र्द्यांतील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून टाकीला आहे.||२१|| भावार्थः---ज्याच्या प्रक्षालनापासून—चरण-कमलापासून उत्पन्न झालेल्या भागीरथाचे संसारापासून तारणारे उदक मस्तकी धारण करून शिवालाही अत्यंत सुख प्राप्त झाले व जे चरणकमळ,ध्यान करणाऱ्या पुरुषांच्या मनांतील पापरुपी पर्वतावर टाकलेले केवळ वज्रच होय,त्या भगवंताच्या चरणकमळाचे पुष्कळवेळेपर्यंत, आपण—जीवानी ध्यान करावे.||२२|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर,जन्मरहित अशा त्या भगवंताच्या जंघादव्याचे (पायांच्या दोन पोटऱ्यांचे)ह्रदयामध्ये ध्यान करावे,जे जंघाद्वय,सर्व जग उत्पन्न करणाऱ्या ब्रहमदेवाची माता,सर्व देवांनी वंद्य कमलनयना अशा लक्ष्मीने,आपल्या मांड्यावर घेऊन पल्लवाप्रमाणे कोमल अशा आपल्या हस्तांच्या कांतीने मोठ्या चातुर्याने सेवन केले आहे,म्हणजे लक्ष्मीदेखील आपल्या कठोर हातांनी त्या कोमल पोटऱ्यांना पीडा होईल असे मनांत आणून आपल्या हातांच्या नुसत्या कांतीनेच त्यांना कुरवाळीले.||२३|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर भगवंताच्या गरुडाच्या खांद्यावर शोभायमान अशा मांड्याचे ध्यान करावे.त्या मांड्या बलाचा आधार असून जवसाच्या फुलाप्रमाणे श्यामलकांतीने शोभत आहेत.आपण—जीवानी नंतर भगवंताच्या कटीप्रदेशाचे ध्यान करावे.त्याठिकाणी घोंट्यांपर्यंत लोंबणारा पिवळा उंची पितांबर नेसलेला असून त्यावर कमरपट्ट्यांचे किंवा कमरगोटयाने वेष्टन आहे.||२४|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर सर्व भूवनाच्या समुदायाचे वसतीस्थान अशा ह्या भगवंताच्या पोटाच्या मध्यभागी असणाऱ्या नाभिरूप ऱ्हदायाचे (डोहाचे)ध्यान करावे.ज्या नाभीह्दामध्ये स्वयंभू ब्रहमदेवाचे उत्पत्तीस्थान असे सर्वलोकरुपी कमल उत्पन्न झाले आहे.नंतर भगवंताच्या उत्तम पाचूच्या मण्यासारख्या स्तनद्वयाचे ध्यान करावे.जे स्तनद्वय स्वच्छ हारांच्या किरणांनी गौरवर्ण दिसत आहे.||२५|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर योग्याने सर्वलोकांस वंद्य अशा श्रेष्ठ भगवंताच्या वक्षःस्थळाचे ध्यान करावे.जे वक्षःस्थळ महालक्ष्मीचे वसतीस्थान असून भक्तलोकांच्या मनांला आणि नेत्रांना आनंद उत्पन्न करिते.आपण—जीवानी नंतर भगवंताच्या कंठ मनांत
भावार्थः---आपण—जीवानी नंतर भगवंताच्या बाहुंचे ध्यान करावे.ज्या बाहुंच्या आश्रयाने सर्व लोकपाल राहतात व समुद्रमंथनाच्या वेळी मंथ्याच्या (रवीच्या)स्थानी योजिलेल्या मंदरपर्वताच्या वारंवार फिरण्याने ज्यांच्यावर धारण केलेली भूषणे अधिक उज्ज्वल झाली आहेत.आपण—जीवानी नंतर ज्याचे नेत्र शत्रूंना सहन करवत नाही अशा हजार रव्यांनी युक्त असलेल्या भगवंताच्या चक्राचे ध्यान करावे.पुढे भगवंताच्या हस्तकमलामध्ये राजहंसाप्रमाणे शोभणाऱ्या पांचजन्यनामक शंखाचे ध्यान करावे.||२७||
भावार्थः---आपण—जीवानी नंतर शत्रूरुपी योद्धयाच्या रक्तपंकाने भरलेल्या भगवंताच्या प्रिय कौमोदकिनामक गदेचे स्मरण करावे.आपण—जीवानी त्यानंतर श्रमरसमूहाच्या गुंजारव नादयुक्त झालेल्या मालेचे चिंतन करावे.आपण—जीवानी पुढे ह्या भगवंताच्या कंठामध्ये जीवाचे शुद्धतत्व म्हणून जो कौस्तुभ मनी धारण केलेला आहे,त्याचे ध्यान करावे||२८|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर भक्तांवर द्या करावी अशा बुद्धीने ह्या भूलोकावर अवतार धारण करणाऱ्या भगवंताच्या मुखकमळाचे चिंतन करावे.जे मुखकमल,विशेषेकरून चमकत असलेल्या मकराकार कुंडलाच्या हालन्यामुळे प्रकाशित झालेल्या निर्मल गालांनी व उन्नत सरळ नासिकेने युक्त आहे.||२९|| भावार्थः---आणि जे मुखकमल कुरळ्या केसांच्या समुदायाने,कमळासारख्या नेत्रांनी व स्फुरण पावणाऱ्या भृकुटींनी युक्त असून योगसाधनाने शुद्ध झालेल्याच मनामध्ये प्रकट होणारे आहे.आपले—जीवाचे मन निष्काम कर्मे करून व निष्काम उपासना करून शुद्ध व स्थिर केले असता व विषयांचा त्याग करून विवेक केला असता त्या मनामध्ये प्रगट होतात.तसेच जे आपल्या शोभेच्या योगाने, ‘श्नमरांनी सेवन केलेल्या व दोन मत्स्यांनी आश्रय केलेल्या’लक्ष्मीच्या निवासस्थानभूत कमळाचाही तिरस्कार करीत आहे,त्या भगवंताच्या मुखकमळाचे आळस न करितां आपण—जीवानी एकाग्रतेने ध्यान करावे.||३०|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर भगवंताच्या अवलोकनाचे मोठ्या प्रेमाने ह्र्दयामध्ये ध्यान करावे.ते अवलोकन भगवंताला आपली पुष्कळ दया आल्यामुळे आपल्या अत्यंत भयंकर अशा त्रिविध तापांच्या शांतीकरिता त्याने आपल्यावर नेत्रद्वारा योजिलेले असून प्रेमळ हास्याने संयुक्त व पुष्कळ प्रसादाने भरलेले आहे.||३१|| भावार्थः---आपण—जीवानी नंतर त्या भगवंताच्या मंद हास्याने ध्यान करावे.जे मंदहास्य,शरण आलेल्या सर्व लोकांच्या तीव्र शोकाने उत्पन्न झालेल्या अश्रूंच्या समुद्राला शुष्क करून टाकणारे,म्हणजे भक्तांचा—आपला—जीवाचा शोक नाहीसा करणारे आहे.आपण—जीवानी पुढे भगवंताच्या अतिसुंदर अशा भृकुटीमंडळाचे ध्यान करावे.ते भृकुटीमंडळ मुनिवर उपकार करण्याकरीता प्रत्यक्ष मदनालासुद्धा मोह भावार्थः---नंतर योगाने—आपण—जीवाने आपल्या ह्रदयामध्ये जाणलेल्या विष्णूच्या मोठ्या हास्याचे ध्यान करावे.ज्या हास्यामध्ये अधरोष्ठाच्या पुष्कळ कांतीने आरक्तपूर्ण भासणारी सूक्ष्मदंतरूप कुंदाच्या क्रीयमाकळ्यांची पंक्ति स्फुरण पावत आहे.आणि जे प्रयत्नावांचुनच ध्यानांत येणारे आहे.याप्रमाणे देवाच्या निरनिराळ्या अवयवाचे ध्यान करून,प्रेमरसयुक्त भक्तीच्या योगाने आपले मन त्याच परमेश्वराचेठिकाणी लावून त्याच्या—भगवंतांच्या खेरीज दुसरी कोणतीही वस्तू—विषय पाहण्याची इच्छा ठेऊ नये.||३३|| भावार्थः---ह्या प्रकारच्या ध्यानमार्गाने भगवान हरीच्या ठिकाणी ज्याने—आपण—जीवानी प्रेम मिळविले आहे,ज्यांचे—आपले—जीवाचे हृदय भक्तीने द्र्वूं लागले आहे,ज्याच्याआपल्या—जीवाच्या शरीरावर आनंदाने रोमांच उभे राहूं लागले आहेत आणि जो—आपण—जीव हर्षाच्या अतिशयाने सद्गतीत कंठ होऊन आनंदाच्या समुद्रांत वारंवार निमग्न होऊं लागला आहे,तोच पुरुष,मत्स्याला धरण्याचे साधन जे बडिशनाशक यंत्र त्याप्रमाणे भगवंताला वश करून घेण्याचे साधन जे चित्त ध्येय भगवन्मुर्ती हळूहळू सोडवितो,म्हणजे तो परमानंदात निमग्न होऊं लागला कि,ईश्वरस्वरूपाच्या ध्यानाविषयी त्याचा—आपला—जीवाचा प्रयत्न कमी कमी होत जातो.||३४|| भावार्थः---हे माते,या प्रकारेकरून जेव्हा साधक--योग्याचे—आपले—जीवाचे मन,परमानंदाचा अनुभव मिळाल्यामुळे शब्दस्पर्शादि विषयापासून कंटाळून निर्विषय व निराश्रय होते तेव्हा,कारण शब्द—स्पर्श,रूप,रस आणि गंध या विषयांचे सुख क्षणिक व दु:ख अपार आहे व पुरुषाचे सुख परमानंदरूप आहे असा दोन्ही प्रकारचा अनुभव असल्यामुळे निर्विषय व निराश्रय असे जे परमानंदरूप पुरुषासी फक्त स्थिर होते.’जशी दिव्याची ज्योति,तेल वातवगैरेचा नाश झाला असता आपल्या कारणभूत महाभूतज्योतीरूपाने परिणाम पावते त्याप्रमाणे’ अनायासाने आपण--जीव परब्रहमरूपाने परिणाम पावतो.या अवस्थेमध्ये देहादिकांचेठिकाणी अभिमानरहित असा तो—आपण—जीव पुरुष,मी ध्यान करणारा आणि परमेश्वर ध्यानाचा विषय या व्यवधानांनी रहित अशा त्रिपुटीरहित अखंड आत्म्याच्या साक्षात्काराचा अनुभव घेतो.||३५|| भावार्थः---तो पुरुष,योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या अविद्यारहित अशा ह्या आपल्या मनाचा आनंदवृत्तीने,सुखदुःखरहित अशा त्या परमानंदरूप ब्रह्माचे ठिकाणी लय पावत होत्साता,परमात्म्याचे तत्व जाणणारा तो—आपण—जीव योगी,पूर्वी जे सुखदुःखाचे भोक्तृत्व स्वात्म्याचेठिकाणी—देहाच्या ठिकाणी पाहत असे ते सुद्धा आतां अविद्येने कल्पिलेल्या अहंकाराचे—देहाच्या ठिकाणीच आहे असे पाहतो.तत्त्वाच्या—आपल्या—जीवाच्या ठिकाणी पाहत नाही.||३६|| भावार्थः---त्यांच्या जीवनमुक्तीचा प्रकार दोन श्लोकांनी सांगतात----शेवटी शरीराचे-ठिकाणी असणारा तो--आपण—जीव सिद्धयोगी,जसा मद्याच्या मदाने अंध झालेला एखादा मनुष्य,आपल्या कमरेच्या ठिकाणी गुंडाळलेले वस्त्र आहे किंवा पडून गेले ते पाहत नाही त्याप्रमाणे ज्या देहापासून आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तो देह,प्रारब्धकर्मवशेकरून आसनावरून उठला किंवा उठून तेथेच उभा राहिला अथवा तेथून दुसऱ्याठिकाणी गेला किंवा पुनरपि जाग्यावर आला या गोष्टीचेसुद्धा अनुसंधान ठेवीत नाही,मग सुखदुःखाचे अनुसंधान कोठून ठेवणार ! ठेवीतच नाही.||३७|| | देहोsपि दैववशग: खलु कर्म यावत् | स्वारन्भकं प्रतिसमिक्षत एव सासुः | | तं सप्रपश्चमधिरुढसमाधियोगः | स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तु : ||३८|| भावार्थ:----तर त्याच्या—जीवन-मुक्ताच्या देहाच्या प्रवृत्तीनिवृत्ती व वाचणे कसे घडते ? असे म्हणशील तर हे,माते प्रारब्धकर्माच्या योगाने चालणारा तो देह,जोपर्यंत त्याच्या उत्पत्तीचे कारण कर्म असते तो पर्यंत इंद्रियासह जिवंत राहतोच.परंतु ज्याला समाधीपर्यंत योग साध्य झाला आहे व ज्याने आत्मवस्तू जाणिले आहे तो सिद्धयोगी—आपण—जीव,पुत्र स्त्री इत्यादि प्रपंचासहित त्या भावार्थः---आतां साहा श्लोकांनी ज्ञानाचा प्रकार सांगतात----जसा अतिशय प्रीतीमुळे आत्मत्वेकरून मानलेल्या पुत्राहून—देहसंबंधीहून—प्राण्यांहून किंवा द्र्व्याहून—सोनेनाणेहून—जड—मान—प्रतिष्ठाहून जाणणारा पुरुष—आपण—जीव निराळा आहे,असे सर्वांच्या अनुभवास येते, त्याप्रमाणे देह,इंद्रिये इत्यादिकांहून त्याचा द्रष्टा—आपण—जीव--पुरुष निराळा आहे असे समजावे.||३९|| भावार्थः---जसा हा अग्नीच आहे असे मानलेल्या जळत असलेल्या काष्ठाहून किंवा अग्नीपासून उत्पन्न झालेल्या धुमाहून अथवा ठिणगीहून विझविलेल्या काष्ठाहून त्यांचा दाहक व प्रकाशक अग्नी निराळा असतो त्याप्रमाणे---------------||४०|| भावार्थः---भुते,इंद्रिये,अंतःकरण यांचा द्रष्टा जीवात्मा,त्या भूतादिकांहून---भुते—इंद्रिये,अंत:करणाहून निराळा आहे व त्या जीवात्म्याहूनही त्यांचा द्रष्टा--ब्रहमसंज्ञक निराळा आहे तसाच प्रकृतीहूनही तिचा प्रवर्तक भगवान—पुरुष निराळा आहे.||४१|| भावार्थः---यास्तव ‘जशी उग्दिद,जरायुज,अंडज,आणि स्वदेज अशा चार प्रकारच्या प्राण्याचे ठिकाणी,सर्वलोक,पंचमहाभूतांना अभेदत्वेकरून पाहतात’म्हणजेच उग्दिद,जरायुज,अंडज व स्वदेज हे सर्व पंचमहाभूतांचीच कार्य आहेत.त्याप्रमाणे स्थावर जंगमात्मक सर्व प्राणिमात्रांचेठिकाणी उपादान कारणत्वेकरून असणाऱ्या आत्म्याला व आत्म्याचे ठिकाणी कार्यत्वेकरून असणाऱ्या सर्व प्राणिमात्रांना अभेदरूपत्वाने पाहावी.म्हणजेच सर्वप्राणीमात्र आत्म्याचीच मिथ्यारुपाणे कार्य आहेत,तर आत्मा सर्वांचे अधिष्ठान आहे.||४२|| भावार्थः---जसा एकच अग्नि,आपले प्रकट होण्याचे स्थान अशी जी काष्टे त्याचे ठिकाणी त्यांच्या ऱ्हस्वदीर्घत्वादिक निरनिराळ्या ऱ्हस्वदीर्घत्वादिरूप नानाप्रकारचा भासतो त्याप्रमाणे देवादि शरीराचेठिकाणी असणारा आत्मा त्यांच्या त्यांच्या स्वभावामुळे तसा तसा भासतो परंतु वस्तुतः तो एकच आहे.जसे पाणी एकच आहे,पण बिजामुळे अनेक रसानियुक्त असे होते,त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे,पण प्राण्यांच्या स्वभावानुसार वेगवेगळा भासतो.||४३|| | तस्मादिमां स्वां प्रकृतिं दैवीं सदसदात्मिकाम् | दुर्विभाव्यां पराभाव्य स्वरुपेणावतिष्ठते ||४४|| भावार्थः---तस्मात हे देवहुति माते,भगवद्भभक्ताने—आपण—जीवानी,देहादीरूपाने परिमाण पावलेल्या आपल्या मोह करणाऱ्या ह्या देवाच्या अचिंत्य शक्तीरूप प्रकृतीचे विवेकाद्वारे निवर्तन—निवृत्ती करून आपल्या स्वरूपस्थितीने रहावे.||४४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये ध्यानादीयोग निरुपणनामक हा अठ्ठाविसावा(२८)अध्याय चौरेचाळीस (४४)शोलाकांनियुक्त समाप्त झाला.||२८|| | || श्रीकृष्णाचरणार्पण मस्तू || ||श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ २९----आतां या एकूणतिसाव्या अध्यायामध्ये मुमुक्षजनाला सात्विकादिक अनेक प्रकाराच्या भक्तियोग सांगून संसाराच्या ठिकाणी वैराग्य होण्यासाठी काळाचे बळ व भयंकर संसार यांचे स्वरूप वर्णिले आहे. ____________________________________________________________________________________________|२९--- २९---कपिलमुनी आणि देवहुति---[भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा] _____________________________________________________________________________________________ | लक्षणं महदादिनां प्रकृतेः पुरुषस्य च | स्वरूपं लक्ष्यतेsमीषां येन तत्पारमार्थिकम् ||१|| भावार्थ:-----देवहुती म्हणाली----हे प्रभो कपिला,ह्या महत्तत्त्वादिकांचे खरे स्वरूप ज्याच्या योगाने समजते ते प्रकृतीचे पुरुषाचे व महत्तत्त्वादिकांचे निरनिराळे लक्षण,जसे सांख्याशास्त्रामध्ये संगीतेलेले आहे तसे तूं मला सांगितले आहेस.आतां ते लक्षण,ज्या भक्तियोगाने स्पष्ट रीतीने समजते त्या भक्तीयोगाचा मार्ग मला विस्तराने वर्णन कर.||१--२|| भावार्थः----तसेच हे भगवन,ज्यांच्या समजण्याने मुमुक्षुजनाला सर्व ठिकाणी वैराग्य उत्पन्न होईल त्या जीवलोकाच्या अनेक प्रकारच्या जन्ममरणरूप संसृति मला वर्णन कर.आपण—जीवानी संत—महात्मा सदगुरू यांचा सत्संग करून जेणेकरून आपणास—जीवास विषयांबद्दल वैराग्य उत्पन्न होऊन त्याविषयी त्यागाची भूमिका होईल.तसेच आपणास—जीवास जन्म—मरण संसार पुन्हा—पुन्हा कसा प्राप्त होतो,त्याचे वर्णन सांगावे.||३|| भावार्थः----आणि ज्याच्या—यमराजाच्या भयाने लोक पुण्यकर्म करितात व ब्राह्मादिकांना नियामक असा जो महापराक्रमी त्वद्रूपी काळ त्याचेही स्वरूप मला कथन कर.||४|| भावार्थः---कारण हा सर्व लोक अज्ञानी असून मिथ्याभूत देहादिकांचेठिकाणी अहंकार धारण करणारा असल्यामुळे कर्माच्याठिकाणी आसक्त झालेल्या बुद्धीने ती ती कर्मे करितां करितां थकून जाऊन संसाररुपी अपार अहंकारामध्ये गाढ निजून राहिला आहे,आणि तूं जर याला जागृत करण्याकरितां साक्षात योग मार्ग प्रकाशक सूर्यच प्रकट झाला आहेस म्हणून तुला मी प्रश्न करते.||५|| भावार्थः----मैत्रेय म्हणाला---हे कुरुश्रेष्ठा विदुरा,याप्रमाणे देवहुतीने प्रश्न केला असतां,संतुष्ट व जीवांविषयी करुणायुक्त झालेल्या त्या कपिलमहामुनीने आईच्या सुंदर भाषणाचा सत्कार करून तिला म्हणाला की,----------------------||६|| | भक्तीयोगो बहुविधो मार्गैर्भामिनि भाव्यते | स्वभावगुणमार्गेण पुंसां भावो विभिद्दते ||७|| भावार्थः----श्रीभगवान म्हणाला---हे देवहुति,भक्तियोग,अनेक प्रकारच्या विशेषांनी भेद पावला आहे.कारण,मनुष्यांचा अभिप्रायच अनेक फलसंकल्पाच्या भेदाने पुष्कळ प्रकारचे भेद पावतो.||७|| | अभिसन्धाय यो हिंसा दम्भं मात्सर्यमेव वा | संरम्भी भिन्नदृगभावं मयि कुर्यात्स तामसः ||८|| भावार्थः----ते भेद असे कि,जो एखादा क्रोधी मनुष्य,आपला आणि परमात्म्याचा भेद पाहात असून,एखाद्याची हिंसा,दंभ आणि मत्सर हि मनामध्ये ठेऊन माझी भक्ति करतो तो “तामस(कनिष्ठप्रतीचा)भक्त” होय.ह्या तामस )भक्तामध्येही तीन भेद आहेत-हिंसेकरीता भक्ती करणारा अत्यंत अधम,दांभिक भक्ती करणारा मध्यम आणि मत्सर बुद्धीने भक्ती करणारा उत्तम होय.आपण मात्र तामस भक्त न होता निर्गुण भक्त व्हावे.||८|| | विषयानभिसन्धाय यश एश्वर्यमेव वा | अचार्दाव र्चयेद्दो मां पृथग्भावः स राजसः ||९|| भावार्थः----आतां जो भेददर्शी पुरुष,स्त्रक्चंदनवनितादिक विषय,सत्कीर्तिक आणि धनादिक ऐश्वर्ये ह्यांची इच्छा धरून मूर्ती इत्यादिकांचेठिकाणी माझी पूजा करितो तो “राजस (मध्यमप्रतीचा)भक्त” होय.ह्या राजस भक्तांचेही तीन भेद आहेत.विषयसुखासाठी भक्ति करणारा अधम,कीर्तीसाठी भक्ती करणारा मध्यम आणि ऐश्वर्यप्राप्तिसाठी भक्ति करणारा उत्तम होय.आपण—जीवानी राजस भक्त न होता निर्गुण भक्त व्हावे.||९|| | कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पनम् | यजेद्दष्टव्यामिती वा पृथग्भावः स सात्त्विकः ||१०|| भावार्थः----आणि जो भेददर्शी पुरुष,पापक्षयाचा उद्देश धरून किंवा ते कर्म ईश्वरार्पण व्हावे म्हणजे त्यापासून ईश्वराची प्रीती व्हावी अशी उद्देश धरून अथवा पूजा करावी अशी देवाची आज्ञा आहे ती पूर्ण होण्याचा उद्देश धरून माझी पूजा करितो तो “सात्विक (उत्तम प्रतीचा)भक्त” होय.यांतही तीन भेद आहेत-पापक्षयासाठी भक्ति करणारा कनिष्ठ,ईश्वरप्राप्तीसाठी भजणारा मध्यम आणि विधी पूर्ण करण्यासाठी भक्ति करणारा उतम होय.याप्रमाणे सात्विक,राजस व तामस अशा तीन प्रकारच्या भक्तांचे प्रत्येकीचे तीन असे नऊ भेद झाले;ह्या नऊ भक्तीचेही आणखी श्रवण,कीर्तन,स्मरण,चरणसेवा,अर्चन,वंदन,दास्य,सख्य आणि आत्मनिवेदन हे नऊ भेद आहेत.मिळून सगुण भक्तीचे प्रकार एक्याऐंसी(८१) झाले.||१०|| | मद्गुणश्रुतिमात्रेन मयि सर्वगुहाशये | मनोगतिरविच्छीन्ना यथा गंगाम्भसोsम्बुधौ ||११|| | लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य ह्रुदाह्रतम् | अहैतूक्यव्यवहिता या भक्ति: पुरुषोत्तमे ||१२|| भावार्थः----निर्गुण भक्ती तर एकाच प्रकारची आहे.जशी गंगेच्या पाण्याची गति समुद्राकडे असते,त्याप्रमाणे सर्वांचा अंतर्यामी पुरुषोत्तम जो मी त्याचेठिकाणी,माझ्या भक्तवात्सल्यादिक गुणांच्या श्रवणमात्रेकरून कोणत्याही फलाची इच्छा किंवा भेदबुद्धी न ठेविता मनाची अविछिन्न गति होणे,अशी जी भक्ति,ते “निर्गुणभक्तियोगाने” लक्षण सांगितले आहे.||११-१२|| | सालोक्यसार्ष्टीसामिप्यसारूप्यैकत्वमप्युत | दीयमानं न गृह्यन्ति विना मत्सेवनं जना: ||१३|| भावार्थः----अशी निर्गुण भक्ति करणाऱ्या पुरुषांना,सालोक्य (माझ्याबराबर एका लोकी राहणे)सार्ष्टी (माझ्यासारखी ऐश्वर्ये भोगणे)सामिप्य (माझ्याजवळ राहणे)सारुप्य (माझ्या सारखेरूप असणे)आणि एकत्व (सायुज्यमुक्ती म्हणजे माझ्यारूपी ऐक्य पावणे)ह्या चार प्रकारच्या मुक्ती मी दिल्या तरी देखील ते भक्त, ”माझ्या सेवनाखेरीज दुसरे काहीच ग्रहण करीत नाहीत.” मग त्यांना त्यांच्या प्राप्तीच्या इच्छेविषयी शंका कशाला पाहिजे?||१३|| | स एव भक्तियोगाख्य आत्यन्तिक उदाह्रत: | ये नातीव्रज्य त्रिगुणं मद्भावायोपपद्दते ||१४|| भावार्थः----यास्तव तो सांगितलेला भक्तीयोगच आत्यंतिक (कधीही न ढळणारा)म्हटला आहे.ज्याच्या योगाने मनुष्य,सत्वरजतमात्मक संसाराचे उल्लंघन करून मत्स्वरूपी होण्याविषयी योग्य होतो.||१४|| | निषेवितेनानिमित्तेन स्वधर्मेण महियसा | क्रियायोगेन शस्तेन नातिहिंस्त्रेन नित्यशः ||१५|| भावार्थः----अशी भक्ति उत्पन्न होण्याची साधने---निरीच्छपणे श्रद्धापूर्वक उत्तमरीतीने स्वधर्माचरण,निष्काम बुद्धीने फारशी हिंसा न केरीतां पंचरात्रादिक आगमामध्ये सांगितल्याप्रमाणे माझी पूजा करणे.आपण—जीवानी याप्रमाणे पूजा करावी.||१५|| | मद्धीष्यदर्शनस्पर्शपूजास्त्युत्यभिवन्दनै: | भूतेषु मद्भावनया सत्त्वेनासग्ङ्मेन च ||१६|| भावार्थः---- आपण—जीवानी माझ्या—भगवंतांच्या मूर्तीचे दर्शन,आलिंगनादि निमित्ताने स्पर्श,पूजा,स्तुती व वंदन हि करीत जाणे. आपण—जीवानी प्राणिमात्रांचेठिकाणी हि परमेश्वराची स्वरुपेच आहेत अशी भावना करणे,आपण—जीवानी मनांमध्ये धैर्य व विषयांचेठिकाणी वैराग्य धारण करणे.||१६|| | महतां बहुमानेन दीनानामनुकम्पया | मैत्र्या चैवात्मतुल्येषु यमेन नियमेन च ||१७|| भावार्थः----आपण—जीवानी सत्पुरुषांचा काळ पुष्कळ आदर करणे अनाथांवर दया करणे,गुणांनी आपल्या सारखा लोकांशी मैत्री ठेवणे अहिंसादीक यम व जपपाठादिक नियम धारण करणे||१७|| | आध्यात्मिकानुश्रवणान्नामसक्ङीर्तनाच्च मे | आर्जवेनार्यसङेन निरहंक्रीयया तथा ||१८|| भावार्थः----आत्मस्वरूपाचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्राचे वारंवार श्रवण करणे,माझे नामसंकीर्तन करणे,मनाचा सरळपणा ठेवणे सत्पुरुषांचा समागम धरणे,देहादिकांचेठिकाणी अभिमान सोडून देणे||१८|| | मद्धर्मणो गुणैरेतै: परिसंशुद्ध आशय: | पुरुषस्याञ्जसाभ्येति श्रुतमात्रगुणं हि माम् ||१९|| भावार्थः----याप्रकारच्या गुणांनी भागवतधर्मांचे आचरण करणाऱ्या पुरुषाचे अंतःकरण अत्यंत शुद्ध होते आणि ते माझ्या गुणांचे श्रवण होतांच माझ्याठिकाणी अनायासाने आसक्त होते||१९|| | यथा वातरथो घ्राणमावृङगक्तेगन्ध आशयात् | एवं योगरतं चेत आत्मानमविकारि यत् ||२०|| भावार्थः----जसा वायूच्या योगाने वाहून येणारा सुगंध,आपल्या स्थानावरून (पुष्पादिक--ठिकाणावरून)घ्राणेंद्रियाला आपल्या स्वाधीन करून घेतो त्याप्रमाणे भक्तियोगाने निमग्न झालेले व सुखदुःखादिकांचेठिकाणी समता पावलेले जे चित्त ते परमात्म्याला वश करून घेते.||२०|| | अहं सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थित: सदा | तमवज्ञाय मां मर्त्य: कुरुतेऽर्चावीडम्बनम् ||२१|| भावार्थः----मी सर्व भूतांचा आत्मा असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांचेठिकाणी निरंतर राहिलो आहे त्या माझी अवज्ञा करून म्हणजे सर्व भूतांचे ठिकाणी मला न पाहतां जो मरणाऱ्या देहाचे ठिकाणी ठेऊन केवळ मूर्तीच्याठिकाणी मात्र पूजा करितो तो त्या पूजेचे केवळ अनुकरण (सोंग)करितो.आपण—जीवानी प्राणिमात्रांत भगवंत आहे असा भाव धारण करून परमार्थ करावा.स्थूल-देहाला—केवळ मूर्तीलाच भगवंत समजून पूजा जो करतो,यास भगवंत पूजा न समजत सोंग—नाटक समजतो व त्या प्रकाचीपुजा भगवंत स्वीकारीत नाही.म्हणून आपण सर्व प्राणी--मात्रांत भगवंत आहे असा भाव धारण करुन मुर्तीची पूजा करावी.असा भाव ठेऊन पूजा केली तर भगवंत पूजेचा स्वीकार करितो.||२१|| | यो मां सर्वेषु भूतेषु सन्तमात्मानमिश्वरम् | हित्वार्चा भजते मौढ्याभ्दास्म न्येव जुहोति स: ||२२|| भावार्थः----(हेच स्पष्ट सांगतात)सर्व भूतांचे ठिकाणी आत्मस्वरूपत्वेकरून असणाऱ्या माझा म्हणजे ईश्वराचा अवमान करून जो मूर्ख-- पणाने मूर्तीची मात्र पूजा करितो तो केवळ भस्मामध्येच होम करितो म्हणजे भस्मामध्ये होम करणे हे जसे निष्कळ आहे त्याप्रमाणे त्याची सेवा निष्फळ होते.||२२|| | व्दिशत: परकाये मां मानिनो भिन्नदर्शिन: | भूतेषु बुद्धवैरस्य न मन: शान्तिमृच्छति ||२३|| भावार्थः----देहादिकांचेठिकाणी अभिमान धारण करणारा,भेददर्शी,सर्व भूतांचेठिकाणी वैरभाव धारण करणारा आणि सर्व प्राण्यांच्या देहांमध्ये असलेल्या माझ्यांशी द्वेष करणारा जो पुरुष त्याचे मन कधीही शांति पावत नाही.म्हणून आपण—जीवानी देहादिकांच्या ठिकाणी अभिमान धारण करू नये.आपण भेदादर्शी म्हणजे आपण—जीव आणि भगवंत यांच्यात भेद नसून अभेदाच असा भाव धारण करून परमार्थ करावा.आपल्यात—जीवात व भगवंतांत कल्पित भेद आहे व वास्तव अभेद आहे असा भाव ठेऊन परमार्थ करावा.सर्व प्राणीमात्रांत भगवंत आहे म्हणून कोण्याही जीवाचा मत्सर करू नये.जीवाचा मत्सर—द्वेष केला म्हणजे भगवंताचा मत्सर केला असे होते,म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांचा मत्सर—द्वेष करू नये.याप्रमाणे आपले—जीवाचे आचरण असेल तर आपणास—जिवाक समाधान—सुख मिळते.आपण—जीवानी,याप्रमाणे आचरण न केले तर आपणास—जीवास समशान—सुख न मिळता दु:ख प्राप्त होते.||२३|| | अहमुच्चावचैर्द्रव्यै: क्रिय योत्पन्नयानघे | नैव तुष्येऽर्चितोऽर्चायां भूतग्रामाव मानिन: ||२४|| भावार्थः----हे निष्पापे देवहुति,लहानमोठ्या उपचारांनी संपादन केलेल्या पूजासामुग्रीने प्रतिमेच्याठिकाणी पूजा केलेलाही मी,प्राणिमात्रांची अवहेलना करणाऱ्या पुरुषावर कधीही संतुष्ट होत नाही.म्हणून आपण—जीवानी प्रमिमात्रांची अवहेलना न करता सुख द्दावे व प्रत्येक प्राणिमात्रांत भगवंत आहे असा भाव ठेऊन त्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करावे.असा भाव ठेऊन पूजा केली असता साधौपचार असला तरी मी स्वीकारतो.पूजातील साधन—वस्तू महत्वाची नसून भाव महत्वाचा असतो असा विवेक करून पूजा करावी.||२४|| | अर्चादावर्चयेत्तावदीश्वरं मां स्वकर्मकृत् |यावन्न वेद स्वहृदि सर्वभूतेष्ववस्थितम् ||२५|| भावार्थः----यास्तव हे माते,सर्व भूतांचे ठिकाणी असणाऱ्या मला जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये पुरुष जाणत नाही तोपर्यंतच त्याने स्वतःची नित्यनैमित्तिक कर्मे करून मिळेल तितक्या अवकाशांत मूर्तीच्यावगैरे ठिकाणी माझे म्हणजे परमेश्वराचे पूजन करीत जावे.सर्व प्राणीमात्रांत भगवंत आहे असा भाव निर्माण होण्याकरिता मूर्तिच्या ठिकाणी पूजा करीतच राहावे.याप्रकाराने पूजा करीत राहिल्यास केव्हा—न केव्हा तरी सर्व प्राणीमात्रांत भगवंत आहे असा निश्चय होतो व त्याप्रमाणे आचरण करु लागतो.||२५|| | आत्मनश्च परस्यापि य: करोत्यन्तरोदरम् | तस्य भिन्नदृशो मृत्यूर्विदधे भयमुल्बणम् ||२६|| भावार्थः----जो मनुष्य,परमेश्वरामध्ये स्वतांमध्ये व सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वल्प कां होईना नंतर मानितो त्या भेददृष्टी मनुष्याला मीच मृत्यूरुपी होऊन अतिदुःसह असे संसारभय उत्पन्न करितो.म्हणून—आपण—जीवानी आपण—जीव,भगवंत आणि सर्व प्राणिमात्रांत किंचितही भेद न पाहता अभेद पाहावा.असा भाव झाल्यानंतर आपणास संसार भय राहत नाही.म्हणून आपण—जीवानी आपल्या—जीवाच्या ठिकाणी आपल्यात—जीवात,भगवंत व सर्व प्राणिमात्रांत भेद न पाहता अभेद पाहावा.असा भाव होण्यासाठी सत्संग करावा.||२६|| | अथ मां सर्वभूतेषु भूतात्मानं कृतालयम् | अर्ह येद्दानमानाभ्यां मैत्र्याभिन्नेन चक्षुषा ||२७|| भावार्थः----यास्तव सर्व भूतांमध्ये वास करणारा सर्व भूतांचा अंतर्यामी जो मी त्या माझे आपल्याहून श्रेष्ठ आहेत त्यांचे ठिकाणी बहुमान,बरोबरीचे आहेत त्यांचे ठिकाणी मैत्री,कमी आहेत त्यांचे ठिकाणी प्रियवस्तूंचे दान आणि सर्वत्र समदृष्टी ह्यांच्या योगाने पूजन करावे.म्हणून आपण—जीवानी आपल्याहून जे अधिकाराने श्रेष्ठ आहेत,त्यांच्या ठिकाणी आदरभाव—श्रेष्ठ भाव असावा.आपल्या अधिकारानुसार बरोबरीचे जे आहेत,त्यांच्याठिकाणी सम—बरोबरीचे—मैत्रीभाव भाव ठेवावा.आपल्यापेक्षा अधिकाराने जे कमी आहेत,त्यांच्याठिकाणी त्यांना प्रियवस्तू देऊन संतुष्ट करावे.||२७|| | जीवा: श्रेष्ठा ह्य जीवनां तत: प्राणभूत:शुभे | तत: सचित्ता: प्रवरास्ततश्चेद्रिंयवृत्तय: ||२८|| भावार्थः----हे मंगल रूपे देवहुति,मृत्तिका पाषाण इत्यादिक अचेनापेक्षा वृक्षानिक सचेतनप्राणी श्रेष्ठ होत,त्यांपेक्षाही श्वासोच्छवास करणारे जंगमप्राणी श्रेष्ठ होत.त्यांपेक्षाही ज्ञान असणारे (सूर्यकमळ इत्यादिक)श्रेष्ठ जाणावे.त्यांच्यापेक्षाही ज्यांनी इंद्रियवृत्ति (रूपरसादिकांची )आहेत ते श्रेष्ठ होत.||२८|| भावार्थः----त्यांमध्येहि स्पर्श जाणणाऱ्या जीवांपेक्षा रसजाणणारे (मत्स्यवगैरे)श्रेष्ठ होत.त्यांच्यापेक्षाही गंध जाणणारे (भ्रमवगैरे)श्रेष्ठ आहेत.त्यांच्याहून शब्द जाणणारे (सर्प इत्यादिक)श्रेष्ठ होत||२९|| | रूपभेदविदस्तत्र ततश्चोभयतोदत: | तेषां बहुपदा: श्रेष्ठाश्चतुष्पादस्ततो द्विपात् ||३०|| भावार्थः----त्यांमध्येही रूपांचा भेद जाणणारे (कावळेवगैरे)श्रेष्ठ होत.त्यांच्यापेक्षा ज्यांच्या मुखांत खाली व वर दोहोंकडे दांत असतात ते (मर्कटवगैरे)श्रेष्ठ होत.तसेच पादहीन प्राण्यांपेक्षा पुष्कळ पायांचे (गोमीवगैरे)प्राणी श्रेष्ठ होत.त्यांच्यापेशा चार पायांचे (पश्वादीक)श्रेष्ठ होत.त्यांच्यापेक्षा दोन पायांचे (मनुष्यादिक)श्रेष्ठ होत.||३०|| | ततो वर्णाश्च चत्वारस्तेषां ब्राह्मण उत्तमः | ब्राह्मणेष्वपि वेदज्ञोsभ्यधिकस्तत: ||३१|| भावार्थः----त्यामध्ये ब्राहमण,क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण श्रेष्ठ होत.त्यांमध्येही ब्राहमण उत्तम होय.ब्राहमणामध्येही वेदवेत्ता श्रेष्ठ आहे.त्याच्यापेक्षाही अर्थवेत्ता श्रेष्ठ होय.||३१|| | अर्थज्ञातसंशयच्छेत्ता ततः श्रेयान् स्वकर्मकृत् | मुक्तसंगस्ततो भूयानदोग्धा धर्ममात्मनः ||३२|| भावार्थः----अर्थवेत्त्यापेक्षा दुसऱ्याचे संशय घालविणारा (मीमांसक)श्रेष्ठ आहे.त्यांच्यापेक्षाही स्वतःची (वर्णाश्रमविहित)कर्मे करणारा श्रेष्ठ होय.त्याच्याहूनही सर्व संगपरित्याग करून राहिलेला व निष्काम कर्म करणारा श्रेष्ठ होय.||३२|| | त्समान्मय्यर्पिताशेषक्रियार्थात्मा निरन्तर: | | मय्यर्पितात्मन: पुंसो मयि संन्यस्तकर्मण: | | न पश्यामि परं भूतमकर्तु: समदर्शनात् ||३३|| भावार्थः----त्याहूनही ज्याने स्वतःची कर्मे,त्या कर्मांची फले व शरीर हि सर्वा मला अर्पण केली आहेत त्यामुळे माझी प्राप्ती होण्यास ज्याला कांहीच अडकाठी राहिली नाही तो श्रेष्ठ होय.आपला देह मला अर्पण करणारा,माझेठीकानी कर्मांचे फळ अर्पण करणारा,कर्तृत्वभिमानाने रहित,व समदृष्टी ठेवणारा अशा पुरुषाहून दुसरा उत्कृष्ट प्राणी मला कोणीच दिसत नाही.म्हणून आपण—जीव सत्संग करून स्वधर्मानुसार आचरण करून कर्मांची फळे ईश्वरास अर्पण करावी व तसेच त्या कर्मे निराभिमानरहित करावीत.||३३|| | मनसैतानी भूतानि प्रणमेद्बहु मानयन् | ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिति ||३४|| भावार्थः----तस्मात् भगवान ईश्वरच जीवरूपाने सर्व प्राण्यांचे ठिकाणी प्रविष्ट झाला आहे अशा बुद्धीने ह्या सर्वप्राणीमात्रांचा बहुमान करून त्यांना वंदन करीत जावे.भगवंत सर्व-प्राणिमात्रांत भगवंत आहे,म्हणून सर्वांना भगवंत म्हणून वंदन करावे.||३४|| भावार्थः----हे मनुकन्ये,मी तुला भक्तीयोग आणि अष्टांगयोग हे दोन्हीही सांगितलेले आहेत;ज्या दोहोंपैकी एकाचेही आचरण केलें असता पुरुषाला परमेश्वररुपी प्राप्ती होईल.म्हणून आपण—जीवानी निष्काम भक्तियोग किंवा अष्टांगयोग या दोन्हीपैकी एकाचे आचरण करून पुरुषास प्राप्त व्हावे.आपण पुरुषास प्राप्त झाल्यानंतर जन्म—मरण निवृत्त होऊन परमानंदरूप होउत.||३५|| भावार्थः----(आतां जीवाला संसार होण्याचे कारण व स्वरूप तुला सांगतो-)हे साध्वी,भगवान ब्रहमपरमात्म्याचे जे हे प्रकृतिपुरुषात्मक व त्या दोन्हीहून निराळे स्वरूप आहे त्यालाच “दैव” असे म्हणतात;याच्या—दैवाच्या प्रेरणेने जीवांना ज्याच्या—त्याच्या कर्मांच्या फलानुसार नानाप्रकारच्या—सुखाच्या—दु:खाच्या शरीरे प्राप्त होऊन गति प्राप्त होतात.||३६|| भावार्थः----हेंच स्वरूप,पदार्थमात्रांच्या निराळेपणाला कारण झाले म्हणजे त्याला “काल” असे म्हणतात.ज्या कालापासून महतत्त्व आदिकरून तत्त्वांना व त्यांच्या अभिमानाने भेददृष्टी मानणाऱ्या जीवांना भय प्राप्त होते.जे स्वरूप—तत्त्व,पदार्मात्रांच्या—नाव-रुपाला प्राप्त झाले असता,त्याच स्वरूपाला “काल” असे म्हणतात.जे जीव भेद--दृष्टीनुसार व्यवहार करितात,त्यांना काळाचे भय वाटते,कारण काल त्यांना दंड देत असतो.||३७|| | योsन्त: प्रविश्य भूतानि भूतैरत्त्यखिलाश्रय: | स विष्ण्वाख्योsधियज्ञोsसौ काल: कलयतां प्रभुः ||३८|| भावार्थः----जो काल,सर्व जगाचा आश्रय असल्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या अंतरी प्रवेश करून पंचमहाभूतांच्या योगाने सर्व भूतांचा संहार करितो.तोच काल सर्व जगाचा—नामरूपाचा आश्रय आहे,जग त्याच्या—कालाच्या आश्रित आहे.तोच हा काल,जगाला वश ठेवणाऱ्या ब्रह्मादिकांनाही प्रभू (त्यांस आल्या स्वाधीन राखणारा)आहे.तोच काल सर्वांना वश—ताब्यात ठेवतो.तोच काल यज्ञादी कर्मांचे फळ देणारा विष्णूनामक आहे.||३८|| भावार्थः----या काळाला कोणी आवडता नाही,कोणी शत्रू नाही व कोणी बांधवही नाही;हा स्वतः सावध असून बेसावध असलेल्या लोकांमध्ये प्रवेश करितो आणि त्यांचा संहार करितो.हा काल साधावाढ राहून जे बेसावध आहेत,त्यांचा संहार करितो.||३९|| भावार्थः----ज्यांच्या—कालाच्या भयाने जगाचा निर्वाह चालविणारा वायूही सर्वठिकाणी संचार करीत असतो.ज्याच्या भयाने सूर्य त्या त्या काली योग्य ताप उत्पन्न करितो.ज्याच्या—कालाच्या भयाने इंद्र वृष्टि करतो.ज्याच्या—कालाच्या भयाने नक्षत्रांचा समुदाय प्रकाश पावतो.||४०|| भावार्थः----ज्याच्यापासून—कालापासून भ्यालेल्या वनस्पति व लता ह्या औषधीसहवर्तमान आपापल्या वसंतादिक कालाचेठिकाणी पुष्पे आणि फले प्रकट करितात.||४१|| भावार्थः----ज्याच्यापासून—कालापासून भ्यालेल्या नद्या,वाहातात व ज्यापासून—कालापासून भ्यालेला समुद्रही आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही.ज्याच्या—कालाच्या भयामुळे अग्नि प्रदीप्त होतो.ज्याच्याभयाने—कालाच्या भयाने पर्वतासहवर्तमान भूमि बुडून जात नाही.||४२|| भावार्थः----ज्याच्या—कालाच्या आज्ञेकरून हे आकाश,प्राण्यांना राहण्यासाठी जागा देते.ज्याच्या—कालाच्या आज्ञेवरून महतत्त्व,जगाचा मूळ अंकुर अशा आपल्या देहापासून पृथिव्यादिक सात आवरनांनी वेष्टित अशा लोकाला ब्रह्मांडच्यारूपाने विस्तृत करिते.||४३||------- | गुणाभिमानिनो देवाः सर्गादिष्वस्य यद्भयात् | वर्तन्तेsनुयुगं येषां वश एतच्चराचरम् ||४४|| भावार्थः----ज्यांच्या—कालाच्या स्वाधीन हे चराचर—चर म्हणजे जीव व अचर म्हणजे जड जग आहे ते सत्त्व,रज तम ह्या तीन गुणांचे नियंते ब्रहमविष्णूरुद्रनामक देवही ज्याच्या—कालाच्या भयाने या विश्वाच्या उत्पत्तीस्थिती संहारांचेठिकाणी प्रत्येक कल्पामध्ये प्रवृत्त होतात.||४४|| | सोsनन्तोsन्तकरः कालोsनादिराकृदव्ययः | जनं जनेन जनयन्मारयन्मृत्युनान्तकम् ||४५|| भावार्थः----तो काल वस्तुतः अनादी अनंत व अविनाशी असून पिता इत्यादिकांच्या रूपाने पुत्रादिकांस उत्पन्न करीत होत्साता जगाला उत्पन्न करणारा आहे आणि मृत्युच्या योगाने अंतकालसुद्धा मारीत होत्साता सर्वांचा अंत करणारा आहे.थोडक्यात “परमात्मा” हाच “काल” आहे.||४५|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये हा एकूणतिसावा(२९) अध्याय पंचेचाळीस(४५)श्लोकांनियुक्त समाप्त झाला||२९|| ||श्रीकृष्णार्पणमस्तू || श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || ||____________________________________________________________________________________________३०--- आतां या तिसाव्या अध्यायामध्ये देहपत्नी इत्यादिकांचे ठिकाणी आसक्तचित्त झालेल्या कमी-पुरुषांची पापाच्या योगेकरून तमोगुणात्मक अधोगती वर्णन केले आहे. | ३०---कपिलदेव व देवहुति---[देहासक्त पुरुष्यांच्या अधोगतीचे वर्णन] _____________________________________________________________________________________________ कपील उवाच:---कपिल म्हणतात:--- | तस्यैतस्य जनो नुनं नायं वेदोरुविक्रमम | काल्यमानोपि बलिनो वायोरिव घनावलि: ||१|| भावार्थः----श्रीभगवान कपिल म्हणाला----हे माते,जशी मेघांची पंक्ती वायूच्या योगाने इकडे तिकडे धावते तथापि ती,वायूच्या पराक्रमास जाणत नाही त्याप्रमाणे पूर्वी सांगितलेल्या बलवत्तर कालाच्या योगाने निरनिराळ्या अनेक अवस्था पावणाराहि हा लोक—आपण—जीव त्या कालाच्या,महान पराक्रमास खरोखर जाणत नाही.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून संत—महात्मा यांच्या मुखातून कालास—परमात्म्यास जाणून घ्यावावयास पाहिजे.||१|| | यं यमर्थमुपादत्ते दु:खेन सुखहेतवे | तं तं धुनोति भगवान पुमान्छोचति यत्कृते ||२|| भावार्थः---- हा पुरुष,जी जी वस्तू आपल्याला सुख होण्याकरिता मोठ्या प्रयत्नाने संपादन करितो तिचा हा सर्व समर्थ काळ नाश करितो,असे झाले म्हणजे हा पुरुष,त्या वस्तुकारिता शोक करीत बसतो.जी वस्तू अनात्मा—मिथ्या आहे,त्या—त्या वस्तूस काल प्रत्येक—क्षणांनी खात असती,हा कालाचा स्वभावाच आहे व त्या अनात्मा—मिथ्या वस्तूस आयुष्य उत्पन्न झाल्याबरोबर निश्चित असते,त्यानुसात ती अनात्म—मिथ्या वस्तू नष्ट होताच असते.असा नियम निश्चितच असतो.म्हणून आपण—जीवानी ती वस्तू नष्ट झाल्यानंतर दु:खी होऊ नये,ती वस्तू नष्ट होणारच आहे असे आपल्याला ज्ञात नसते तर अज्ञात असते,म्हणून आपण—जीवानी दु:खी होऊ नये.समजा आपण दु:खित झालोत,तरी ती वस्तू पुन्हा येत नसते.म्हणून त्या वस्तूचा नाश झाल्यानंतर दु:खी होऊ नये.||२|| | यदधृवस्य देहस्य सानूबन्धस्य दुर्मति: | ध्रुवानि मन्यते मोहाद गृहक्षेत्रे वसूनि च ||३|| भावार्थः----आपल्या—जीवाच्या शोकाचे कारण,तो—आपण—जीव--दुर्बुद्धी पुरुष,पुत्र कलत्रादिक नश्वर असलेल्या आपल्या देहाच्या संबंधाने प्राप्त झालेल्या घर,शेत व द्रव्य यांस अज्ञानाने शाश्वत आहेत असे मानितो म्हणून त्यांचा नाश झाला असतां त्यास शोक प्राप्त होतो.म्हणून आपण—जीवानी सत्संग करून त्या अनात्मा—मिथ्या वस्तूचे यथार्थ स्वरूप समजून घ्यावे.अनात्मा—मिथ्या वस्तूचे यथार्थ स्वरुप समाजून घेतले असता आपणास—जीवास शोक—दु:ख होत नाही.अनात्म—मिथ्या वस्तू स्वप्नवत—मिथ्या भासतात.||३|| | जन्तुर्वे भव एतस्मिन यां यां योनिमनुव्रजेत | तस्यां तस्यां स लभते र्वृतिं न विरज्यते||४|| भावार्थः----या संसारामध्ये प्राणी ज्या ज्या देवमनुष्यादिक योनीमध्ये जन्मास जाईल त्या त्या योनीमध्ये तो सुख पावतो म्हणून विरक्त होत नाही.प्रत्येक योनीमध्ये आपणास—जीवास विषयांपासून किंचित सुख व अधिक दु:ख प्राप्त होते,तरी पण जीव त्या सुखास सुख मानितो,कारण याहिपेक्षा कायमचे अन्य सुख आहे त्याविषयी आपल्याठीकानी अज्ञान असल्यामुळे आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत नाही.याकरिता आपण—जीवानी सत्संगाद्वारे आपणास मार्गदर्शन होते व कळते.म्हणून संत—महात्म्ये यांचा सत्संग करावा म्हणजे त्यांच्या मुखातून वेदांचे शास्त्र श्रवण करावे.||४|| | नरकस्थोsपि देहं वै न पुमांस्त्यक्तुंमिच्छति | नारक्यां निर्वृतौ सत्यां देवमायाविमोहितः ||५|| भावार्थः---पहा----नरकामध्ये असणाराही जीव,तेथील विष्ठेच्या आहारादिकांचे त्याला सुख वाटत असल्यामुळे भगवंताच्या मायेने मोहित होत्साता आपल्या किटकादिक देहाचाही त्याग करण्याची मुळीच इच्छा करीत नाही.आहे त्या परिस्थितीत सुख मानीत असतो,कारण अन्य ठिकाणी सुख आहे,असे त्यास माहित नसते.म्हणून आहे तेच सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो.||५|| | आत्मजायासुतागारपशुद्रविणबन्धुषु | निरुढमुलह्रदय आत्मानं बहु मन्यते ||६|| भावार्थः---तर मनुष्य,स्वतांचा देह,बायको,मुले,घर,पशु,द्रव्य,बंधू यांच्याविषयी आपल्या मनांत मनोराज्ये (उत्तरोत्तर सुख वाढण्याचे विचार)करीत होत्साता आपल्याला धन्य असे मानीत असतो.आहे ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो,कारण अन्य सुखाचे साधन त्याला माहित नसते.||६|| | सन्दह्यमानसर्वाग्ङ एषामुद्र्ह नाधिना | करोत्यविरतं मूढो दुरितानि दुराशयः ||७|| भावार्थः-----नंतर ह्या स्त्रीपुत्रादिकांचे पोषण कसे करावे अशा चिंतेने त्याचे सर्वांग जळत असते तेव्हा तो दुरात्मा मूढ एका पाठीमागून एक अशी निरंतर पापे करितो.आपण—जीव स्त्री—पुत्र यांचीच चिंता करीत असतो.त्यांचे पालन—पोषण करण्यासाठी अधर्माचा—परधर्माचा स्वीकार करून दु:खात जीवन जगात असतो,पण शाश्वत मार्गाचे अज्ञान असल्यामुळे अशाश्वत मार्गांचा स्वीकार करून प्रयत्न करीतो.||७|| भावार्थः---व्यभिचारिणी स्त्रियांनी एकांतस्थली पसरलेल्या संभोगादिरूप मायाजाळाने व मधुर मधुर भाषणे करणाऱ्या मुलांच्या शब्दांनी ज्याचे अंतःकरण व इंद्रिये आकृष्ट झाली आहेत असा तो गृहस्थाश्रमी पुरुष,दुःखानी भरलेल्या व कपटधर्मांनी युक्त अशा आपल्या घरामध्ये आळस न करितां दुःखाचे निवारण करीत असून हे सुखच आहे असे मानितो परंतु खरे सुख पावत नाही.म्हणून आपण खऱ्या—शाश्वत अशा सुखाच्या मार्गाने प्रयत्न करून सुख मिळविण्याचा प्रयत्न करावा.||८-९|| भावार्थः-----शास्त्रमर्यादेने उल्लंघन करून मोठ्या हिसेच्या जिकडून मिळविलेल्या धनादिकेकरून त्या स्त्रीपुत्रादिकांचे पोषण करितो. त्या सर्वांचे भोजनादिक झाल्यावर अवशेष राहिलेले अन्नादिक आपण भक्षण करितो.याप्रमाणे त्यांच्या पोषणाने आपण अधोगतीला जातो.आपण—जीव गृहस्थाश्रमी जीवन जगात असतांना धनादि साधनाद्वारे स्त्री-पुत्रादिकांचे पालनपोषण करितो,त्यांचे पालन—पोषण करीत असतांना स्त्री-पुत्रादिकांचे भरण—पोषण करून अवशेष राहिले तर आपणास अन्नादिकांचे भरण--पोषण करावे लागते. स्त्री—पुत्रादिकांचे पालन—पोषण करीत असतांना,आपल्याकडून कांही अधर्म—परधर्म घडून जे पाप होईल त्या पापाचे जे फळ दु:ख आपणासच भोगावे लागते,तर देहसंबंधीतांना भोगावे लागत नाही.त्यापेक्षा आपण गृहस्थाश्रमाचा स्वीकार न करता,अधिकार प्राप्त करून ब्रह्मचारी किंवा संन्यस्थ पारमार्थिक जीवन व्यतीत करणे,फारच श्रेयस्कर असते.असा विवेक करून निर्णय घ्यावा.||१०|| भावार्थः-----आपण—जीव उपजीविकेसाठी आपण—जीव,जे--जे व्यापार आरंभितो ते--ते आरांभिलेले व्यापार वारंवार बुडून त्यांमध्ये तोटा होऊ लागला असतां,स्वतः द्रव्य मिळविण्याविषयी आशक्त व लोभाने विवेकशून्य होत असता आपण—जीव दुसऱ्याचे द्रव्य अपहार करण्याची इच्छा करितो.||११|| भावार्थः-----आणि त्या दैवहीन व संपत्तीरहित आपले—जीवाचे द्रव्य मिळविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागला असतां कुटुंबाच्या पोषणाविषयी असमर्थ असल्यामुळे दिन झालेल्या आपण—जीव मूढ्बुद्धी,काय करावे,कसा माझा उत्कर्ष अशी चिंता करीत मोठ्यांनी श्वासोच्छवास टाकितो—दु:खी अवस्थेस प्राप्त होतोत.||१२|| | एवं स्वभरणा कल्पं तत्कलत्रादयस्तथा | नाद्रियन्ते यथा पूर्व किनाशा इव गोजरम ||१३|| भावार्थः-----अशा रीतीने आपल्या—जीवाच्या हातून आपले पोषण होईनासे झाले म्हणजे जसे दुष्ट शेतकरी म्हाताऱ्या बैलाचा आदर करीत नाहीत त्याप्रमाणे आपले—जीवाचे स्त्रीपुत्रादिक जसे पुर्वी आपल्या पोषणाच्यावेळी त्याचा आदर राखीत असत त्याप्रमाणे वृद्धदशेमध्ये राखीत नाहीत व आपल्याला—जीवाला अन्नच्छादनादिकही देत नाहीत.त्यामुळे आपणास फार दु:ख भोगावे लागतात.कदाचित अनाथाश्रमात जाऊन मानसिक—शारीरिक दु:खी जीवन व्यतीत करावे लागते.||१३|| भावार्थः---असा अनादर होऊं लागला तरी आपणास—जीवास वैराग्य होत नाही,जरेने त्याचे स्वरूप विरूप होते,भक्षण केलेले अन्न पचन होत नाही,म्हणून अल्पाहारी,अल्पव्यापार,रोगग्रस्त व शेवटी मरणोन्मुख झाला तरी,आपण—जीवानी पूर्वी पोषण केलेल्या स्त्रीपुत्रादिकांनी पोषित होत्साता त्यांनी—स्त्री—पुत्रादिकांनी किंवा अनाथाश्रमारांनी अवमानपूर्वक दिलेले अन्नादिक भक्षण करून घराचे रक्षण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे घरांत किंवा अनाथाश्रमात राहतो.||१४-१५|| भावार्थः---पुढे कफाच्या योगाने त्याच्या वायूच्या मार्गभूत नाड्या रुद्ध—बंद होतात,खोकला व श्वास उत्पन्न होऊन आपणास फार आयास—कष्ट होतात,आणि प्राणोत्क्रमणाच्यावेळी ऊर्ध्वगती झालेल्या वायुने आपल्या डोळ्याच्या बाहुल्या बाहेर पडून आपल्या घशांमध्ये घुरघुर शब्द करू लागतो.||१६|| भावार्थः-----निजलेला व कालपाशाच्या (मृत्युच्या)स्वाधीन झालेला आपण—जीव जवळ बसून शोक करणाऱ्या आपल्या बंधूंनी वेष्टित होत्साता,त्यांनी—देहसंबंधींनी बाबा,दादा इत्यादिक हाक मारून बोलविला तरी बोलत नाही.कारण आपणास—जीवास इंद्रिय साथ देत नाहीत,म्हणून आपण—जीव बोलू शकत नाही.||१७|| भावार्थः-----याप्रमाणे आपण—जीवानी इंद्रियांचा जप न करितां केवळ कुटुंबाच्या पोषणाविषयी आपले शरीर लाविले आपण—जीव शेवटी प्राप्त होणाऱ्या मोठ्या वेदनेने—दु:खाणे नष्टबुद्धी होऊन आपले बांधव रोदन—रडत असतां आपण—जीव मरण पावतो.||१८|| भावार्थः-----तेव्हा आपण—जीव आपणास नेण्याविषयी प्राप्त झालेल्या व क्रोधवेषाने डोळे वटारलेल्या भयंकर यमदूतांना पाहून फारच भयभीत होतो आणि मलमुत्रोत्सर्ग करितो.||१९|| | यातानादेह आवृत्य पाशैर्वाद्ध्वा गले बलात | नयतो दीर्घमध्वानं दण्डयं राजभटा यथा ||२०|| भावार्थः-----जसे राजाचे दूत,अपराधी मनुष्याला त्याचप्रमाणे यम--दूत अपराधी आपल्याला—जीवाला (मनुष्याला) बांधून नेतात,त्याप्रमाणे दोघे यमदूत त्या प्राण्याला यातना भोगण्यास योग्य अशा देहामध्ये रोधून—घालून—बांधून कंठाचेठिकाणी पाशांनी बंधन करून बलात्कराने पुष्कळ लांब रस्त्यावरून ओढीत नेतात.त्यावेळेस आपणास—जीवास अपार दु:ख होते,पण--------- ||२०|| भावार्थः----- त्या दंताच्या तोडा मारा इत्यादिक भाषणांनी ह्रदय फाटून गेलेला,थरथरा कापणारा व मार्गामध्ये कुत्रे ज्याला फाडफाडून खातात असा आपण—जीव पिडीत झाला म्हणजे आपल्या पापाचे स्मरण करीत असता---------------||२१|| भावार्थः-----क्षुधेने व तृषेने व्याप्त,सूर्याचा ताप वानवा आणि वायू यांच्या उष्णतेने ज्यावरील वाळू तापून गेली आहे व जेथे विश्रांतीचे स्थान किंवा पाणी मुळीच नाही अशा मार्गामध्ये अतिशय ताप पावणारा,म्हणून चालण्यास असमर्थ असूनही पाठीवर चाबुकाने ताडीत होत्साता—आपण—जीव मोठ्या संकटाने चालतो.||२२|| भावार्थः----- आपण—जीव चालताना थकून गेलेल्या वाटेमध्ये जेथे तेथे पडतो,मूर्च्छा पावतो,परंतु पुन: उठतो.याप्रमाणे अंधकाराने युक्त व अतिशय दु:खप्रद अशा मार्गाने आपण—जीव या प्राण्याला दूत यमलोकी घेवून जातात.||२३|| | योजनानां सहस्त्राणि नवतिन नव चाध्यन: | त्रीभिर्मुहुर्तैद्वार्भ्यंम वा नीत: प्राप्रोति यातना ||२४|| भावार्थः-----यमाची नगरी पृथ्वीपासून नव्यान्नव-हजार(९९०००)योजने लांब आहे इतक्या मार्गावरून यमदुतांनी प्राण्याला तीन मुहुर्तामध्ये,(फारच पापी असला तर)दोनच मुहुर्तामध्ये,नेले असता आपल्याला—जीवाला अतिशय यातना प्राप्त झाल्या.||२४|| भावार्थः-----पुढे तेथील यातना आपल्याला—जीवाला अंगाभोवती जळकी काष्ठे वगैरे बांधून त्याच्या अवयवांचे जाळणे,आपल्याच शरीराचे मांस आपल्याकडून तोडवून किंवा दुसऱ्याकडून तोडवून ते आपले आपल्याकडून भक्षण करविणे,||२५|| भावार्थः-----यमाच्या घरी असलेल्या कुत्र्यांकडून व गिधाडाकडून आपण—जीव--प्राणी जिवंत असता त्याची आतडी बाहेर काढणे,विंचू,डास इत्यादिक दंश करणाऱ्या प्राण्याकडून आपल्या शरीरास पिडा करणे,||२६|| भावार्थः-----शस्त्रांनी आपले अवयव तोडून काढणे,हत्तीवगैरे पशुकडून आपले—जीवाचे अवयव तुडवून वेगवेगळे करणे,पर्वताच्या शिखरावरून आपल्याला—जीवाला खाली लोटणे,पाण्यामध्ये किंवा चिखलाच्या खड्यामध्ये आपल्याला—जीवाला बुडवून ठेवणे,||२७|| | यास्तामिस्त्रान्धतामिस्त्रा रौरावादध्यश्च यातना: | भुंक्ते नरो वा नारी वा मिथ: सन्गेननिर्मिता:||२८|| भावार्थः---आपणास—जीवास इत्यादिक यातना व इतरही तमिस्त्र,अंधतामिस्त्र,रौरवनरकादिक यातना आपण—जीव--पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांनी परस्परांच्या आसक्तीने पाप करून संपादन केलेल्या यातना आपणास भोगाव्या लागतात.||२८|| भावार्थः-----हे माते,नरक किंवा स्वर्ग हे दोन्ही या लोकीचे आहेत असे विचारशील पुरुष म्हणतात.कारण,नरकसंबंधी ज्या यातना आहेत त्या कुटुंबाला किंवा देहाला या लोकींच सोडून देवून परलोकाचेठिकाणी स्वत:च्या पापकर्माचे पूर्वी सांगितल्या प्रमाणे फळ भोगितो. ||२९-३०|| | एक:प्रपद्ध्ते ध्वान्तं हित्वेदं स्वकलेवरम | कुशलेतरपाथेयो भूतद्रोहेण यद भृतम ||३१|| भावार्थः-----आपण—जीव प्राणीमात्रांशी द्रोह करून ज्याचे पोषण केले त्या आपल्या शरीराला व कुटुंबाला येथेच टाकून देवून केलेले पापमात्र भोगण्याकरिता बरोबर घेवून एकटाच स्वत: नरकामध्ये जावून पडतो.||३१|| भावार्थः-----जसे प्राणी आपले कुटुंब व शरीर येथेच टाकून का जात नाही असे म्हणशील तर हे माते,त्या कुटुंबपोषणाच्या पापाचे फळ परमेश्वराने त्याच्याजवळ पोचविलेले असते ते नरकामध्ये त्यालाच भोगावे लागते.प्राणी ईश्वराधीन असल्यामुळे या लोकीच पापाचा त्याग करून जाण्यास तो समर्थ होत नाही.अंतकाळी सुस्कारे टाकीत असतो आपल्याला—जीवाला काहीच योग्यायोग्य विचार सुचत नाहीत त्याप्रमाणे अंतकाळी आपली स्थिती झालेली असते.||३२|| | केवलेन ह्यधर्मेण कुटुम्बभरणोत्सुक: | याति जीवोsन्धतामिस्त्रं चरमं तमस: पदम् ||३३|| भावार्थः-----आपण—जीव केवळ अधर्माच्या योगेकरून कुटुंबपोषणाविषयी उत्सुक असणारा,नरकांतील शेवटचे स्थान अशा अंधतामिस्त्र नरकामध्ये जातोम्हणून आपण मानव देह प्राप्त झाल्यानंतर सत्संग करून स्वधर्म—धर्म—अधर्म—परधर्म म्हणजे काय ? असे यथार्थ ज्ञान प्राप्त करून स्वधर्मानुसार आचरण करावे व अधर्म व परधर्मांचा त्याग करावा.निष्काम कर्म व निष्काम भक्ती केली असता आपले अंत:करण शुद्ध होईल व स्थिर होईल.त्यामुळे आपणास अध्यात्म—शास्त्र—वेदांत शास्त्राचे अधिकारी झाल्यामुळे संत—महात्मा यांचा सत्संग प्राप्त होईल.त्यामुळे विषयांचा त्याग केल्यानंतर भगवंतांचा अनुभव येईल.म्हणजेच आपणास मोक्ष प्राप्त होऊन जन्म—मरण निवृत्त होईल.जर आपण सकाम कर्मे केले तर आपणास पुण्य मिळाल्यामुळे स्वर्ग मिळेल.स्वर्गात पुण्य फळ म्हणजेच विषयांचा भोग भोगल्यानंतर पुण्याचा क्षय होईल,त्यामुळे राहिलेले पाप भोगण्यासाठी यमपुरीस जाऊन पापाचे जे फळ दु:ख भोगावे लागते.तेथील पापाचे फळ भोगल्यानंतर आपणास चौर्याऐंसीलक्षयोनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.जेव्हा आपले पाप—पुण्य समान होईल,तेव्हा मनुष्य देह प्राप्त होत असतो.म्हणून आपण मनुष्य देहात आल्यानंतर निष्काम परमार्थ करून व सत्संग करून जीव—ब्रह्म—ऐक्य—ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.असे केले असता स्वर्ग—नरक—परलोक न मिळता ज्ञानाने परमात्मरूप होता येते व जन्म—मरण निवारण होता येते.||३३|| | अधस्तान्नरलोकास्य यावतीर्यातनादय: | क्रमश: समनुक्रम्य पुनरत्राव्रजेच्छुचि:||३४|| भावार्थः-----याप्रमाणे यमलोकीचे नरक भोगून झाल्यावर मनुष्यदेह प्राप्त होण्याच्या पूर्वीच्या जितक्या यातना व श्वानसुकरादीक योनी भोगावयाच्या आहेत त्या सर्व अनुक्रमाने भोगून पापाचा क्षय झाल्यावर शुद्ध होऊन पुनः या लोकाचेठिकाणी मनुष्य जन्मास येतो.मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर निष्काम परमार्थ करून परमात्म्याचा अनुभव घेणे हा फारच उत्तम मार्ग आहे.||३४|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये कर्मविपाकनिरूपनरूप हा तिसावा(३०) अध्याय चौतीस(३४)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||३०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || __________________________________________________________________________________________ |३१--- आतां एकतीसाव्या(३१)अध्यायामध्ये मिश्र असलेल्या पुण्या—पापांच्या योगाने जीवाची या लोकाच्या ठिकाणी मनुष्यजमादिरूप रजोगुणाची गती वर्णन केली आहे. | ३१---[मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन] ____________________________________________________________________________________________ | श्रीभगवान म्हणतात:-- | कर्मणा दैवनेत्रेण जन्तुर्देहोपपत्त्ये | स्त्रिया:प्रविष्ट उदरं पुंसो रेत:कणाश्रय||१|| भावार्थः---याप्रमाणे प्राण्याच्या,नरकसबंधी क्लेशाचे निरुपण करुन आतां गर्भवाससंबंधी व जन्मदिसबंधी क्लेशाचे निरुपन करण्याविषयी श्रीभगवान म्हणाला----हे माते,हा जीव--प्राणी देहप्राप्ती करिता,ज्याचा प्रवर्तक ईश्वर आहे अशा पूर्वार्जित—पूर्व--पूर्वजन्मातील कर्माच्या योगेकरून एखाद्या पुरूषाच्या शरीरामध्ये धान्यकणाचा—अन्न-पाण्याचा आश्रय करून प्रवेश करितो आणि त्याचा—अन्न-पाण्याच्या रेत:कणाचा आश्रय करून स्त्रीच्या उदरामध्ये प्रविष्ठ होतो.||१|| भावार्थः----ते स्त्रीच्या उदरामध्ये प्रविष्ठ झालेले जीवाने आश्रय किलेले रेत एका रात्रीने स्त्रीच्या रक्तात मिश्रित होते,पांच रात्रींनी बुडबुड्यासारखे वाटोळे होते.दहा दिवसांनी बोरीच्या फळासारखे काही कठीन होते.मासांच्या पिंडासारखे होते आणि ते रेत,तिर्यक योनीमध्ये असले तर अंड्यासारखे होते.||२|| भावार्थः----एका महिन्याने त्याला मस्तक उत्पन होते,दोन महिन्यांनी हातपाय वगैरे अवयवांचा विभाग होतो.तीन महिन्यांनी नखे,रोम,अस्थी,व त्वचा हि उत्पन्न होते व पुरुष प्रदर्शक लिंगाची उत्पत्ती व स्त्रीप्रदर्शक योनिछिद्राची उत्पत्ती होते.||३|| भावार्थः----चार महिन्यांनी मांसादिक सप्त धातू उत्पन्न होतात.पांच महिन्यांनी क्षुधा,व तृषा ह्या उत्पन्न होतात.सहा महिन्यांनी चर्माने वेष्टीत होवून तो प्राणी उजव्या कुशीमध्ये फिरू लागतो.||४|| भावार्थः----आईने भक्षण केलेल्या अन्नापानादिकांच्या योगाने ज्याचे सप्तधातू वृद्धिंगत होत आहेत असा तो जीव,किटादिकांचे उत्पतिस्थान अशा विष्ठामूत्रादिकांच्या खड्यामध्ये निजून राहतो.||५|| भावार्थः----त्याठिकाणी असणारे क्षुधाक्रांत कीटक ह्याच्या सर्व अंगाला चावू लागले असता हा सुकुमार असल्यामुळे ह्याला अतिशय क्लेश प्राप्त होतात व हा क्षणोक्षणी मूर्च्छा पावतो.||६|| भावार्थः----कडू,तिखट,उष्ण,खारट,रुक्ष,आंबट इत्यादिक मातेने भक्षण केलेल्या दु:सह पदार्थाचा याला स्पर्श होवू लागला असता ह्याच्या सर्वांगाचेठिकाणी वेदना उत्पन्न होवू लागतात.||७|| भावार्थः----त्याठिकाणी गर्भाशयाने वेष्टीत व बाहेरून मातेच्या आतड्यानी वेष्टीत असून कुंडलाकार वाकड्या झालेल्या पृष्ठभागाने व मानेने युक्त होत्साता मातेच्या कुशीमध्ये मस्तक करून राहतो.||८|| भावार्थः----त्या गर्भवासाचेठिकाणी पूर्वकर्मवशेकरून त्याला स्मृती प्राप्त होते आणि शेकडो जन्मामध्ये केलेल्या कर्माचे स्मरण करून मोठ्यांनी श्वासोच्वास टाकीत असणारा तो जीव,काहीतरी सुख पावतो काय ? नाहीच पावत.||९|| भावार्थः----सातव्या महिन्याच्या आरंभापासून त्याला जरी शेकडो जन्मामध्ये घडलेल्या कर्माचे ज्ञान होते तरी प्रसुतीवायूने तो इकडे तिकडे चलित होत्साता त्याच उदरामध्ये विष्ठेपासून उत्पन्न झालेल्या किड्यां(जंता)प्रमाणे एकेठिकाणी स्थिर राहत नाही.||१०|| | नाथमान ऋषीर्भीत: सप्तवर्धि: कृताजलि: | स्तुवीत तं विक्लवया वाचा यनोदरेर्पित ||११|| भावार्थः----त्यावेळी सप्तधातुरूप बंधनांनी युक्त असलेला तो देहात्मदर्शी जीव गर्भावासदिरुप संसारदु:खापासून भय पावत होत्साता पश्चाताप पावून,ज्याने उदरामध्ये प्रवेश करवीला त्या भगवंतासी हात जोडून व्याकूळ झालेल्या वाणीने स्तुती करितो-------------||१|| |जन्तुरुवाच | तस्योपसन्नमवितुं जगदिच्छयात्त- नानातनोर्भूवि चलच्चरणारविन्दाम् | | सोऽहं व्रजामि शरणं ह्याकुतोभयं मे - येनेदृशी गतिरदर्श्यसतोऽनुरुपा ||१२|| भावार्थः----जीव म्हणतो--हे भगवन्-ज्या तूं विषयासक्त अशा मला योग्य अशी हि गर्भवासरूप गती दाखवली आहेस त्या,शरणागत आलेल्या जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्याच इच्छेने नानाप्रकारचे अवतार धारण करणाऱ्या तुझ्या भूमीवर संचार करणाऱ्या निर्भय चरणकमलास,संसारतापाने संतप्त झालेला मी,शरण जात आहे.म्हणून आपण भगवंतांस संसार—तापाने दु:खी आहोत व ते दु:ख निवारण करण्याकरिता शरण जावावयास पाहिजे.||१२|| भावार्थः----जो—आपण—जीव ह्या मातेचा उदाराचेठीकानी पंचमहाभूते इंद्रिये आणि अंत:करण यांच्या आकाराने परिमाण पावलेल्या देहरूप मायेचा आश्रय करून पुण्यपापरूप कर्मानी ज्याचे—आपले—जीवाचे वास्तविक-स्वरूप अज्ञानाने आच्छादित—झाकलेले झाले आहे म्हणून आपण—जीव बद्ध नसून बद्ध झाल्यासारख राहतो तोच मी—आपण—जीव,सर्वप्रकारे संताप पावलेल्या हृद्यामध्येच प्रतीतीला येणारा—आपण—जीवात्मा,पापपुण्यरूप संबंधरहित व निर्विकारी अशा अखंडज्ञानरूपी भगवंतांना नमस्कार करितो.||१३|| भावार्थः----जो मी—आपण—जीव,पंचमहाभूतानि रचिलेल्या शरीराचेठीकानी मिथ्याच—भासणारा आच्छादित—झाकल्यासारखा झालो आहे म्हणजे इंद्रिये,सत्वादिक गुण,शब्दादिक विषय आणि चिदाभास यांचे ठिकाणी अभिमान धारण करणारा झालो आहे:परंतु वस्तुत: मी—आपण—जीव तसा—वस्तुत: आच्छादित नाही.कारण,त्या—स्थूल—व सूक्ष्म शरीराने रहित (असंग)आहे.तो—परमात्मा मी त्या—स्थूल—व सूक्ष्म शरीराने ज्याचा—परमात्म्याचा स्वरूपानंद कधीही लोप पावत नाही असा पृकृतीपुरुषांचा नियंता जो सर्वज्ञ पुरुष त्याला वंदन करितो.||१४|| भावार्थः----कारण,ज्याच्या—परमात्म्याच्या मायेने मोहित झालेला,ज्यामध्ये अनेक प्रकारची सत्वादिक—सत्व-रज-तम गुणांपासून उत्पन्न झालेली कर्मे हीच मोठी बंधने आहेत अशा संसारसंबंधी प्रवृत्तीमार्गाचेठिकाणी त्यांपासून झालेले क्लेश भोगीत फिरणारा व स्वरूपानंदाला विसरलेला हा—आपण--जीव,त्या—परमात्म्याच्या--भगवंताच्या अनुग्रहावाचून—कृपेवाचून दुसऱ्या कोणत्या उपायाने पुन: हा आपल्या स्वरुपानंदाचे सेवन करील ! कोणत्याच उपायाने करणार नाही.यास्तव त्यालाच—परमात्म्यालाच शरण जाने योग्य आहे.||१५|| भावार्थः----मला—आपल्याला—जीवाला सध्या—आईच्या गर्भात असतांना जे हे त्रिकालज्ञान झाले ते त्यांच्यावाचून—परमात्म्यावाचून दुसऱ्या कोणी दिले ! कोणीच नाही;तर त्यानेच—परमात्म्यानीच दिले आहे.कारण,त्या देवानेच—परमात्म्यानेच स्थावरजंगमात्मक प्राण्याचे ठिकाणी आपला अंतर्यामीरूप अंश ठेविला आहे.म्हणूनच जीवाला बंधनभूत अशा कर्ममार्गाला अनुसरणारे आम्ही,आपल्या आध्यत्मिकादिक—अध्यात्मिक—अधिभौतिक—व अधिदैविक तापत्रयाच्या निवृत्तीसाठी त्याचे सेवन करितो.हे भगवन्-हा देहधारी जीव,(आईच्या उदरामध्ये)असलेल्या रक्त,विष्ठा आणि मुत्र यांच्या कुपांत पडून राहिला आहे,जठराग्नीच्या योगाने याचा देह अतिसंतप्त होवून गेला आहे,हा येथून बाहेर पडण्याची इच्छा करीत असून आपले महिने मोजीत राहिला आहे आणि याचे अंत:करणहि अगदी दिन होवून गेले आहे.तस्मात ह्याला आपण येथून केव्हा बरे बाहेर काढणार ? असे आपण—जीव भगवंतांस प्रथांना करीत आहे. ||१६-१७|| भावार्थः----हे ईश्वरा,अतिशय दयाळू व निमरूप अशा ज्यातून—आईच्या गर्भातून,ह्या दहा महिन्याच्या अनधिकारी मज--जीवाला,अशा प्रकारचे ज्ञान दिले आहेस,तो दीननाथ परमेश्वर तू स्वत: केलेल्या उपककाराने स्वत:च संतुष्ठ हो.कारण केवळ नमस्कार करण्यावाचून कोण बरे पुरुष,या तू केलेल्या उपकाराचा प्रत्युपकार करण्याविषयी समर्थ होईल?कोणीच होणार नाही.||१८|| भावार्थः----हे प्रभो,हा संसारातील पश्वादिक जीवलोक आपल्या देहामध्ये,त्या देहापासून उत्पन्न झालेली सुख:दु:खेच केवळ पाहतो;कारण दु:खात असतांना दुसरे काहीच पाहत नाही—दुसरे असतात पण दु:खामुळे पाहू शकत नाही.आणि मी तर ज्याने दिलेल्या विवेकज्ञानाने शमदमादी साधनांनी संपन्न असलेला शरीराने युक्त होवून शरीराच्या बाहेर व आत अपरोक्षत्वाने अनुभवास येणाऱ्या अहंकारास्पद भोक्त्या प्रमाणे भासमान झालेल्या त्या अनादी पूर्व भगवंताला अवलोकन करितो—पाहतो.||१९|| | तस्मादहं विगतविक्लव उद्धरिष्य | आत्मानमाशुतमस: सुह्रदाssत्मनैव | | भूयो यथा व्यसनमेतदनेकरन्ध्रं | मा मे भविष्यदुपसादितविष्णुपाद: ||२१|| भावार्थः----यास्तव हे प्रभो,ह्या गर्भावासामध्ये जरी मी—आपण—जीव पराकाष्ठेच्या दु:खाणे राहत आहे तरी गर्भातून बाहेर,अंधकाराने भरलेल्या कुपाप्रमाणे विवेकाला आच्छादून टाकण्याच्या संसारामध्ये पडण्याची इच्छा करीत नाही,कारण,ज्या संसारात पडलेल्या प्राण्याला,हे देवा तुझी माया व्यापून टाकीते.मग देह्पुत्रांचेठीकानी ‘मी आणि माझे’असा अभिमान उत्पन्न होतो.नंतर जन्ममरणादि परंपरायुक्त हे संसारचक्र मागे लागते.आपण—जीव गर्भात असतांना संसार—चक्र नको असे म्हणतो,कारण संसारात आपण आलोत की, ‘देह मी व देहसंबंधी माझे’असा अभिमान उत्पन्न होतोच.असे झाले की,भगवंतांचा विसर हा पडतोच.भगवंतांचा विसर पडला की दु:ख अनुभवास येतेच.आपणास तर दु:ख नको तर सुख हवे आहे.म्हणून आपण भगवंतांस शरण जावे.||२०|| भावार्थ:---यास्तव जसे पुन: अनेक गर्भवासदिकरूप हे दु:ख मला प्राप्त होणार नाही तसे येथेच राहून,येथे बहुत दु:ख असले तरी धैर्य धरून व्याकूळ न होता आपल्या स्वाधीन असलेल्या बुद्धीच्या योगेकारून हृदयामध्ये विष्णूचे चरण धारण करून मी लौकरच आपला संसारदु:खापासून उद्धार करून घेईन.असे आपण भगवंतांस होकार दिलेला आहे,म्हणून आपण वर्तमान देहात सत्संग करून अज्ञान निवृत्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.असे केले असता आपण जो भगवंतांस होकार दिलेला आहे,त्याची पूर्णता होऊन आपण सुखरूप होऊन आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते.||२१|| | एवं कृतमतीर्गर्भे दशमास्यः स्तुवन्नृषि | सद्दः क्षिपत्यवाचीनं प्रसुत्यै सूतीमारुतः ||२२|| भावार्थः----कपिल म्हणाला---हे माते,दहा महिन्याचा जीव,गर्भवासामध्येच अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून मुक्त होण्याविषयी जो आपल्या बुद्धीचा निश्चय करितो तो तात्काळ प्रसुतीकाळाचा वायू त्या अधोमुख जीवाला बाहेर निघण्याविषयी प्रेरणा करितो.आपण—जीव दहा महिन्याच्या गर्भावस्थेत असतांना भगवंतांची स्तुती करून व मुक्त होयचा निश्चय करून वायूची साह्यता घेऊन तात्काळ गर्भाच्या बाहेर पडतो.||२२|| | तेना वसृष्ट: सहसा कृत्वावाक शिर आतुर: | विनिष्क्रमति कृच्छेण निरुच्छ्वासो हतस्मृति||२३|| भावार्थः---त्या वायुने एकाएकी त्याला त्याच्या स्थानापासून लोटून दिले म्हणजे तो मस्तक खाली करून फार व्याकूळ,मूर्छित व नष्टस्मृती होवून मोठ्या कष्ठाने बाहेर पडतो.आपणास—जीवास गर्भाच्या बाहेर पडत असतांना व्याकूळ,मूर्छित,व गर्भावस्थेत भगवंतांस सत्संग करून परमात्म्याचा अनुभव घेईन,अशा दिलेल्या शब्दाची स्मृती नष्ट होऊन अत्यंत दु:खित अवस्थेत बाहेर पडतो.कारण गर्भाच्या बाहेर आल्यानंतर जगाच्या—बाहेरच्या वातावरणाचा—परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे स्मृती नष्ट होते.आपण—जीवानी सभोवती जे वातावरण—परिस्थितीचा फार चटकन—ताबोडतोब परिणाम होतो,म्हणून सभोवती सत्संग करून सात्विक वातावरण असेल त्या वातावरणात राहावे व दुर्जनांचा—संसाराचा त्याग करावा.||२३|| | पतितो भूव्यसृङ्मूत्रे विष्ठाभूरिव चेष्टते | रोरूयति गते ज्ञाने विपरीतां गतिं गतः ||२४|| भावार्थ:---भूमीवर मातेच्या रक्तामध्ये व मूत्रामध्ये पडलेला आपण--जीव,विष्ठेपासून उत्पन्न झालेल्या जंताप्रमाणे लोळू लागतो.आणि गर्भवासतील ज्ञान नष्ठ झाले असता विपरीत गतीला(देहादिकाच्या अभिमानाला)पावून आपण—जीव--प्राणी अतिशय रडू लागतो.||२४|| | परच्छन्दं न विदुषा पुष्यमाणो जनेन सः | अनभिप्रेतमापन्न: प्रत्याख्यातुमुनीश्वर: ||२५|| भावार्थः---आपला—जीवाचा--बालकाचा अभिप्राय न जाणणाऱ्या लोकाने पोषण केलेला म्हणजे आपण—जीव क्षुधेने रुदन करीत असता आपल्या—जीवाच्या पोटात दु:खत आहे,अशी कल्पना करून कडू औषध पाजणे व पोटात दु:खण्याने रडत असता स्तनपान करविणे इत्यादिक आपणास—जीवास नको ते पदार्थ सेवन करविलेला आपण—जीव—बालक दु:खाचे कारण सांगण्याविषयी असमर्थ असतो.त्यामुळे आपणास—जीवास दु:ख भोगावे लागतात.||२५|| भावार्थः---फार काय सांगावे,ढेकुण व पिसा इयादिकाणी दु:खाप्रद झालेल्या अमंगल पर्यंकावर निजविलेला आपण--जीव,आपले आंग खाजाविण्यास,हालचाल करण्यास व उठण्याबसण्यात असमर्थ असून रडत असतोत.||२६|| भावार्थः---जसे मोठ्या कीटकाला लहान कीटक व्यथा करितात त्याप्रमाणे कोमलत्वचेने युक्त असलेल्या आपणास—जीवास--बालकास,डांस माशा ढेकुण वगैरे प्राणी पीडा देतात.||२७|| | इत्यैव शैशवं भुक्त्वा दुःखं पौगण्डमेव च | अलब्धभीप्सतो sज्ञानादिद्धमन्युः शुचार्पित: ||२८|| | सह देहेन मानेन वर्धमानेन मन्युना | करोति विग्रहं कामी कामिष्वन्ताय चात्मन: ||२९|| भावार्थः----याप्रमाणे आपण—जीव--प्राणी बाल्यावस्थेतील दु:ख भोगून पुढे तारुण्यापुर्वीच्या पौगुंड अवस्थेंतील अध्ययन करण्याचा वगैरे त्रास भोगित नंतर तारुण्यवस्था प्राप्त झाली असता कामवासनयुक्त झालेला आपण—जीव--पुरुष,पाहिजे ती वस्तू मिळाली नाही म्हणजे अज्ञानाने क्रोधयुक्त होवून शोकाने व्याप्त होतो व देहाबरोबर वाढलेल्या अभिमानाने व क्रोधाने युक्त होवून आपलाच नाश करून घेण्याकरिता दुसऱ्या कामिजनाशी वैरभाव करू लागतो.आपण—जीव हा सुखरुपच आहे,पण आपणास आपण सुखरूप आहोत याचे अज्ञान असल्यामुळे आपण—जीव सुखासाठी विषयांकडे धाव घेतो.म्हणून आपण—जीवानी आपणास आपल्या स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी सत्संगाद्वारे संत—महात्मा यांच्या मुखातून वेदांत—शात्राचे श्रवण करावे.यामुळे आपले स्वरूपाचे अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान होईल.त्यानंतर आपण सुखासाठी विषयांकडे धाव घेणार नाहीत.आपण विषयांकडे सुखासाठी धाव न घेतल्यामुळे दुसऱ्या कामिजनांसी आपला वैरभाव राहणार नाही,तर प्रेमभाव राहील.||२८-२९|| | भूतै: पश्चभिरारब्धे देहे देहयबुधोsसकृत् | अहंममेत्यसद्ग्राह: करोति कमतिर्मतिम् ||३०|| भावार्थः----आकाशादिक पंचमहाभूतांनि उत्पन्न झालेला देहाचे ठिकाणी,अज्ञानी,दुराग्रही व कुत्सितबुद्धी अशा हा प्राणी ‘मी आणि माझा’अशी बुद्धी वारंवार धारण करितो.आपल्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर अज्ञान,दुराग्रह व कुत्सित बुद्धी न राहिल्यामुळे ‘मी आणि माझा’अशी विपरीत बुद्धी राहणार नाही,तर “मी ब्रह्म आहे,” असा निश्चय होईल.असा निश्चय झाल्यामुळे जन्म—मरण निवृत्त होतील.||३०|| | तदर्थं कुरुते कर्म यद्वद्धो याति संसृतिम् | योsनुयाति ददत्क्लेशमविद्याकर्मबन्धन: ||३१|| भावार्थः----या प्राण्याला,अज्ञान व कर्म ह्यांच्या योगाने उत्पन्न झालेला जो हा देह,जन्म,जरा,व्याधि,मरण इत्यादिक,दुःखच देत असतो;त्या देहांकरिताच हा प्राणी वारंवार कर्म करितो व त्या कर्माने बद्ध होऊन श्वानसुकरादी योनीमध्ये जन्ममरणास संसार पावतो.म्हणून आपण—जीवनी सत्संग करून अज्ञान निवृत्त करावे.त्यामुळे आपण ब्रह्मरूप असून,कर्म न करणारे असा निश्चय होईल. त्यामुळे स्थूल देह,न मिळाल्यामुळे जन्म,जरा,व्याधी,मरण इत्यादिक दु:खे प्राप्त होणार नाही.||३१|| | सत्यं शौचं दया मौनं बुद्धि: श्रीर्ह्रीयश: क्षमा | शमो दमो भगश्चेती यत्सङाद्दाति सग्ङ्क्षयम् ||३३|| भावार्थः----आपण—जीवानी सत्संग न करता कदाचित सन्मार्गाने वागत असणाराही हा प्राणी जर,शिश्न व उदर यांच्या विषये तृप्ती करितांच अनेक व्यवसाय करणाऱ्या अधम लोकांच्या सहवास करून त्यांच्या मार्गात रमूं लागला तर,आपल्या—जीवाच्या मानव—देहाचे प्रारब्ध कर्म संपल्यानंतर आपणास—जीवास यातनादेहांत घालून यमदूत नेतात व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नरकामध्ये प्रवेश करून अनेक प्रकारचे दु:ख देतात.||३२|| | सत्यं शौचं दया मौनं बुद्धि: श्रीर्ह्य र्यश: क्षमा |शमो दमो भगश्चेति यात्संगनाद्ध्याति संग्क्षयम ||३३|| भावार्थः----आपणास—जीवास दुर्जनाच्या संगतीने,सत्य,शुद्धता,दया,मौन,बुद्धी,संपत्ती,लज्जा,कीर्ती,सहनशीलता,इंद्रियनिग्रह,मनोनिग्रह आणि उत्कर्ष हे गुण अगदी नाश पावतात.म्हणून आपण—जीवानी दुर्जनांचा संग न करता सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||३३|| | तेश्वशान्तेषु मुढेषु खंण्डितात्मस्वसाधुषु |संग न कुर्याच्छोच्येषु योशित्क्रीडामृगेषु च ||३४|| भावार्थः----म्हणून विषयासक्त,मूढ,कामक्रोधादिकांनी विक्षिप्तचित्त,शोचनीय आणि खेळांतील हरीनाप्रमाणे स्त्रियांच्या अधीन असणारे जे असत्पुरुष त्यांची संगती कधीही करूं नये.म्हणून आपण—जीवानी असत्पुरुष जे विषयासक्त आहेत,अज्ञानी,काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मस्तर—द्वेषी व अभिमानी यांचा संग कधीच करू नये,कारण ज्या प्रकारची संगती असते,त्याचप्रमाणे आपलेही आचरण होते.दुर्जनांची संगती केली तर आपण—जीव दुर्जन होतो व आपण—जीवानी सज्जनांची संगती केली तर आपण—जीव सज्जन होतो.||३४|| | न तथास्य भवेन्मोहो बन्धश्चान्यप्रसंगत: |योशीत्संगाद्धाथा पुंसो यथा तत्संगीसंगत:||३५|| भावार्थः----आपण—जीवानी स्त्रियांच्या संगतीने अथवा त्यांचा समागम करणाऱ्या विषयलंपट पुरुषाच्या संगतीने जसा या पुरुषाला मोह किंवा बंध प्राप्त होतो त्याप्रमाणे दुसऱ्या कोणाच्याही संगतीने प्राप्त होत नाही.म्हणून आपण विषय--कामी स्त्रियांची व विषय--कामी पुरुषांची संगती कधीच करू नये.आपण—जीवानी त्या कमी स्त्रींची किंवा कमी पुरुषांची संगती केली तर आपण विषयांचे कामी—आसक्त होतोत.विषयांची आसक्त कामी स्त्री—पुरुष यमपुरीस व लक्ष—चौऱ्याऐंसीयोनीस प्राप्त होऊन दु:ख भोगितो.||३५|| भावार्थः----सृष्टीकर्ता ब्रहमदेव,आपल्या सरस्वतीनामक कन्येला पाहून तिच्या स्वरूपसौंदर्याने मोहित झाला.तेव्हा त्याचा तो दुष्ट अभिप्राय जाणून त्या कन्येने हरिणीने स्वरूप धारण करून पलायन करूं लागली ते पाहून ब्रहमदेवहि हरिणाचे स्वरूप धारण करून मरीच्यादिक ऋषि पहात असतां निर्लज्जपणे तिच्या मागून धांवू लागला.ब्रह्मदेवाची विषयांच्या आशाक्तीची हि अवस्था तर आपण अज्ञानी-जणांची अवस्था काय होईल ? म्हणजे थोडक्यात आपण सत्संग करून विषयांबद्दल दोष समजून घेऊन विषयांचा विवेकापुर्वक त्याग करावा.त्यातच आपले परम-हित आहे. ||३६|| भावार्थः----अहाहा ! प्रत्यक्ष ब्रहमदेवाची अशी अवस्था ! मग त्याने उत्पन्न केलेले मरीचीप्रभृति ऋषि,त्यांनी उत्पन्न केलेले कश्यपादिक ऋषी आणि त्यांनी उत्पन्न केलेले जे देव मनुष्यादिक प्राणी त्यांमध्ये एका नरनारायण ऋषीवाचून ह्या जगतामध्ये स्त्रीरूपी मायेने मोहितबुद्धी न झालेला कोण बरे पुरुष आहे?कोणीच नाही.म्हणून आपण सत्संग करून विषयांतील दोष जाणून त्या विषयांचा विवेकपुर्वक त्याग करावा. ||३७|| भावार्थः----हे माते ह्या स्त्रीरूपी मायेने बळ कसे आहे ते पहा ! जी केवळ आपल्या कटाक्ष फेकण्याच्या योगेकरून दिग्विजय करणाऱ्याहि वीराना पादाक्रांत करून टाकिते.म्हणून आपण स्त्रियांच्या आसक्तीचा वेवेकपुर्वक त्याग करावा.||३८|| | सङं न कुर्यात्प्रमदासु जातु योगस्य पारं परमारुरुक्षु: | मत्सेवया प्रतिलब्धात्मलाभो वदन्ति या निरयद्वारमस्य ||३९|| भावार्थः----यास्तव ज्याला माझ्या सेवेने आत्मस्वरूपाचा लाभ झाला आहे परंतु योगाचे परमफल प्राप्त करून घेण्याची ज्याची इच्छा आहे त्या पुरुषाने स्त्रियांची संगति कधीही करू नये.कारण,या मुमुक्षुपुरुषाला स्त्रिया ह्या केवळ नरकाचे द्वार आहे असे म्हणतात.याकार आपण—जीवानी श्रद्धा ठेऊन त्यांच्या आसक्तीचा त्याग करावाच.आपण जर समाजाकडे नजर टाकली तर आपणास असे दिसण येईल की,ज्या—ज्या विधींच्या आसक्त किंवा इतर स्त्रीयां किंवा पुरुष आसक्त असतील त्यांत पुरुषांना किंवा स्त्रियांना दु:खच—दु:ख आयुष्यभर भोगावे लागते व आपणास—जीवास स्त्री असो किंवा पुरुष असो मृत्यू झाल्यानंतर यमपुरीस जाऊन दु:ख भोगावे लागते.म्हणून स्त्रियांनी पुरुषात अशक्त होऊ नये व पुरुषांनी स्त्रियांत आसक्त होऊ नये.स्त्री किंवा पुरुष दु:खास कारण नसून स्त्रियांची किंवा पुरुषांची आसक्ती हि दु:खास कारण आहे,म्हणून “आसक्तीचा” त्याग करावा,तर स्त्री किंवा पुरुषाचा त्याग करू नये, असे “विवेकापुर्वक” लक्षात असू द्दावे.||३९|| | योपयाति शनैर्माया योषिद्देवविनिर्मिता | तामीक्षेतात्मनो मृत्युं तृणैः कूपमिवावृतम् ||४०|| भावार्थः----जी देवाने निर्माण केलेली स्त्रीरुपी माया,शुश्रुषावगैरे मिषाने आपल्याजवळ हळूहळू येते ती तृणाने आच्छादित झालेल्या कूपाप्रमाणे आपला मृत्यू (अनर्थ करणारी)आहे असे मुमुक्षुपुरुषाने समजावे.ज्याप्रमाणे पाण्याची कूप—पाण्याची विहर आहे व त्या कूपावर—विहरीवर तृणाने—गवताने आच्छादित—झाकलेले आहे.त्या तृणावरुन—गवतावरून आपण चालत—चालत गेले असता त्या तृ णाने—गवताने ती कूप—विहर आपणास न दिसता तृण—गवत दिसते,म्हणून आपण चालत—चालत जातोत न त्यामुळे त्या कुपात—विहरीत पडून सुखास कारण न होता मृत्यूस—दु:खास प्राप्त होतोत.त्याप्रमाणे स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या शुश्रुषावगैरे निमित्ताने त्यांचा एकामेकांसी संग होतो,त्या संगाचा पुढे--चालून आसक्तीत परिणाम होऊन तोच संग दु:खरुपच होऊन एकमेकाच्या दु:खास कारण होते.म्हणून शास्त्राने आपणास—जीवास सावध करण्यासाठी स्त्रियांचा किंवा पुरुषांचा संग विवेकपुर्वक करावा असे निक्षून सांगितलेले आहे.कारण हीच स्त्रियांची किंवा पुरुषांची संगती एकमेकाच्या दु:खास कारण न होता सुखास कारण व्हावी.म्हणून उभयंतानी एकमेकांच्या आसक्तीचा त्याग करून प्रेम संपादन करावे.एकमेकांना आसक्तीत दु:ख आहे,तर प्रेमात सुख आहे.||४०|| | यां मन्यते पतिं मोहान्मन्मायामृषभायतीम् | स्त्रीत्वं स्त्रीसंगतः प्राप्तो वित्तापत्यगृहप्रदम् ||४१|| | तामात्मनो विजानीयात्पत्यपत्यगृहात्मकम् | दैवोपसादितं मृत्युं मृगयोर्गायनं यथा ||४२|| भावार्थः----मुमुक्षुस्त्रीनेही,पूर्वजन्मी आपला जीव,पुरुषरुपी असून स्त्रीचेठिकाणी आसक्त झाल्यामुळे अंतकाळी स्त्रीच्या ध्यानेकरून जसा स्त्रीत्व पावला आहे त्याप्रमाणे या जन्मीही पुरुषाच्या ध्यानाने पुढे पुरुषत्व पावेल व असे वारंवार होऊं लागले असतां संसाराची निवृत्ती कधीच होणार नाही.असे मनांत जाणून जी स्त्री,पुरुषाप्रमाणे वागणाऱ्या ज्या माझ्या मायेला मोहाने द्रव्य,मुले व घर इत्यादी देणारा पति आहे असे मानित असते तिने,त्या पति,अपत्य घर इत्यादी रूपाने भासणाऱ्या माझ्या मायेला,जसे व्याधाचे गायन मृगाच्या नाशास कारण होते याप्रमाणे आपल्या प्रारब्धाने समीपभागी आणलेला हा आपला मृत्यूच आहेस असे समजावे.म्हणून आपण जीवाने कोणात्याही जीवाच्याठीकानी आसक्त न होता ज्ञान मार्गाचा स्वीकार करून पुरुषाचा अनुभव घेऊन पुरुषरूप व्हावे.||४१-४२|| | देहेन जीवभूतेन लोकाल्लोकमनुव्रजन् | भून्जान एव कर्माणि करोत्यविरतं पुमान् ||४३|| भावार्थः----याप्रमाणे जीवाचा संसार सांगितला,व त्यामध्ये त्याला कर्मवशेकरून या लोकांतून परलोकांत जाणे व जन्ममरणे सांगितली.येथे व्यापक जीवाला परलोकी जाणे कसे घडेल ? व तो जर नित्य आहे तर जन्ममरणे कशी प्राप्त होतील ? ती जर प्राप्त झाली नाहीत तर त्याच्या देहातून कर्म कसे घडणार ? अशी शंका आली असतां सांगतात की,हे माते,जीवाचा उपाधीभूत जो लिंगदेह त्याच्या योगेकरून पुरुष,एका लोकांतून दुसऱ्यालोकी जाऊन प्रारब्ध कर्माचे फळ भोगीत होत्साता निरंतर दुसरा देह प्राप्त होण्यास कारण अशी कर्मेच करीत असतो.आपणास—जीवास कर्मे करून कर्माने शरीरे प्राप्त होत असतात.म्हणून आपण ज्ञान मार्गाचा स्वीकार करून पुरुषरूप व्हावे.||४३|| | जीवो ह्यस्यानुगो देहो भूतेन्द्री यमनोमय: | तनिरोधोस्या मरणमाविर्भावस्तु संभव ||४४|| भावार्थः----जीवाचा उपाधी जो लिंग भेद तो ह्या आत्म्याला मुक्तीमात्र होईपर्यंत अनुसरणारा असतो तो एक सूक्ष्मदेह आणि भुते,इंद्रिये आणि मन यांचा विकार जो हा स्थूलदेह तो असे हे दोन्ही आपापले कार्य करण्यास अयोग्य झाले म्हणजे तेच ह्या जीवात्म्याचे मरण होय,आणि ते दोन्ही देह पुनः प्रकट झाले म्हणजे तेच याचे जन्म होय.||४४|| | द्रव्योपलब्धिस्थानस्य द्रव्येक्षायोग्यता यदा | तत्पय्चत्वमहंमानादुत्पत्तिर्द्रव्यदर्शनम||४५|| भावार्थः----(याचे स्पष्टीकरण करितात-)पृथ्वीव्यादिक द्रव्याचे (घटपटादि पदार्थांचे)साक्षात्कार होण्याचे स्थान अशा या स्थूल देहाला शब्दादिक विषयांचे ग्रहण करण्याविषयी वृद्धत्वादीकांमुळे जेव्हा अयोग्यता येते तेव्हा त्यांतील सूक्ष्म देहाला सुद्धा आपले काम करण्यास अयोग्यता येते व स्थूल शरीर नाश पावते तेव्हा ते त्याचे “मरण’ होय आणि तेच स्थूलशरीर सूक्ष्मशरीरासह पुनः उत्पन्न होते व हाच मी आहे असा अभिमानाने विषयांचे ग्रहण करण्यास समर्थ होते तेव्हा तेंच त्याचे “जन्म” होय||४५|| | यक्षाक्ष्णोर्द्रव्यावयवदर्शनायोग्यता यदा | तदैव च क्षुशो द्रष्टुर्द्रत्वायोग्यतानयो: ||४६|| भावार्थः----यात दृष्टांत---जसे,काचबिंदू,कामीन इत्यादि विकारांनी बिघडलेल्या नेत्रगोलकांना रूपग्रहणाविषयी अयोग्यता येतांच त्या गोलकामध्ये राहणाऱ्या चक्षुरींद्रियालाहि अयोग्यता येते आणि दोघांच्याही अयोग्येतेमुळे जीवालाही द्रष्टत्वाविषयी अयोग्यता प्राप्त होते.याप्रमाणे स्थूलदेहाला अयोग्यता प्राप्त झाली म्हणजे लिंगदेहालाही ती प्राप्त होते दोघांच्याही अयोग्यत्वामुळे जीवालाही अयोग्यत्व येऊन “मरणव्यवहार” घडतो तसाच पुन्हा दोहोंनाही योग्यत्व उत्पन्न झाले म्हणजे जीवाला योग्यत्व येऊन “जन्मव्यवहार” घडतो;वस्तुतः ते दोन्हीही—जन्म—मरण खरे नाहीत,तर मिथ्या आहेत.||४६|| | तस्मान्न कार्य:संत्रासो न कार्पण्यम न सम्भ्रम: | बुद्ध्या जीवगतिं धीरो मुक्तसंगश्चारेदिह ||४७|| भावार्थः----तस्मात मुमुक्षुपुरुषाने,मरणाबद्दल भीती बाळगुं नये;कारण मरण धर्म आपला नसून स्थूल शरीराचा आहे.सुख दुःखादिकांला प्रारब्धाधीनत्व आहे म्हणून वाचण्याविषयी दैन्यही दाखवूं नये.कारण प्राराब्धमुळे स्थूल शरीरास मरण येते,म्हणून दैन्य—दीनता--दु:ख मानु नये.तसाच उपजीवेकेकरितां प्रयत्नहि करूं नये.प्रारब्धवशात जे मिळाले,त्यातच समाधान मानावे.तर आपण—जीव अच्छेद्य—तुकडा पडत नाही न आपण—जीवात्मा अदाह्य--जळतही नाही.इत्यादी प्रकारची जीवाची गती जाणून आपण—जीवानी धैर्यवान व देहादिकांचेठिकाणी आसक्तीरहित होऊन या संसारामध्ये संचार करावा.असे जीवाचे स्वरूप आहे,म्हणून देहादिकांच्या ठिकाणी आपण आसक्त होऊ नये.||४७||
| सम्यग्दर्षानया बुद्ध्या योगवैराग्ययुक्तया | मायाविराचते लोके चरेन्न्यस्य कलेवरम ||४८|| भावार्थः----म्हणजे मायेने रचिलेल्या ह्या लोकाचेठिकाणी योगसाधन व वैराग्य यांनी युक्त अशा सुविचाररूप बुद्धीने आपल्या देहाविषयीची आसक्ती सोडून वागत असावे.म्हणून आपण जीवानी सत्संग करून विषयांविषयी वैराग्य धारण करून देहाच्या आसक्तीचा त्याग करावा.||४८|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील तृतीय(३)स्कंधामध्ये जीव-गती कथनरूप हा एकतीसावा अध्याय आठ्थेचाळीस श्लोकांनी समाप्त झाला.||३१|| श्रीकृष्णार्पनमस्तु || ||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू.|| _____________________________________________________________________________________________ | ३२--- मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद----कपिलमुनी आणि देवहुति--- | ३२--[---धूममार्ग आणि अर्चीरादी मार्गाने जाणाऱ्यांच्या उत्कृष्टतेचे वर्णन] आता ह्या बत्तिसाव्या अध्यायामध्ये तत्वज्ञानरहित अशा सकाम पुरुषाची सात्विक धर्मांच्या योगेकारून स्वर्गादिलोकांच्याठिकाणी गती सांगून त्याची तेथून पुनरावृत्ति सांगितली आहे.||३२|| ___________________________________________________________________________________________ | अथ यो गृहमेधीयान्धर्मानेवावसन् गृहे | काममर्थंच च धर्मान् स्वान् दोग्धि भूयः पिपर्ति तान् ||१|| भावार्थ:---कपिल म्हणाला----हे देवहुति,आतां जो गृहामध्येच राहणारा पुरुष,आपल्या गृहस्थाश्रम धर्माचेआचरण करून धर्म,द्रव्यसंपादन व विषयभोग यांची प्राप्ती करून घेतो तो,जसा गाई चारून दुध काढणारा पुरुष,पुनःपुन दुधाच्या आशेने त्या गाईना चारितो त्याप्रमाणे आचरण केलेल्या त्या आपल्या धर्माचेच पुनःपुन आचरण करितो.||१||
भावार्थः----परंतु तो काममोहित झालेला पुरुष,ईश्वराधनरूप भगवद्भधर्मापासून निवृत्त होऊन श्रद्धेने युक्तहोत्साता,यज्ञांच्या योगेकरून देवांचे व श्रद्धांच्या योगेकरून पितरांचे आराधन करितो.आपण—जीव कामना—मोहित होऊन भगवंतांसाठी कर्मे न करता संसारासाठी—विषयांसाठी कर्मे करितो,म्हणून जीवाचे जन्म—मरण चालूच राहतात,म्हणू त्याचे दु:ख चालूच राहत असल्यामुळे सुख भोगीत नाही.||२|| भावार्थः---तो त्या देवपितरांचेठिकाणी हेच आपले मनोरथ पूर्ण करितील अशा विश्वासाने व्याप्त बुद्धी होऊन त्यांच्या आराधनाचेच व्रत स्वीकारीतो त्या कर्माच्या योगाने मेल्यावर चंद्रलोकास जाऊन तेथे अमृत प्राशन करून संपले म्हणजे पुनः ह्या मृत्युलोकी माघार येतो||३|| भावार्थः----हे माते,ब्रहमदेवाच्या दिवसाच्या शेवटी जेव्हा अनंतासन—अनादी अनंत हरी शेषशय्येवर निजतो तेव्हा हे गृहस्थाश्रम्यांस प्राप्त होणारे लोक नाश पावतात.महाप्रालाय—काळात आपल्या--गृहस्थाश्राम्या—जीवाचाहि अज्ञानात आपण व आपला लोक लय पावतो.||४|| | ये स्वधर्मान्न दुह्यन्ति धीरा:कामार्थहेतवे | निसंकान्यस्तकर्मण:प्रशान्ता:शुद्धचेतस||५|| | निवृत्तीधर्मनिरता निर्ममा निरहन्कृता:|स्वधर्माख्येन सत्वेन परिशुद्धेन चेतसा ||६|| भावार्थः----आणि आपण—जीव विवेकी पुरुष, अर्थ आणि काम यांच्या करीता स्वधर्माचे आचरण न करीता केवळ ईश्वरार्पण बुद्धीने स्वधर्माचरण करितात ते पुरुष,विषयसक्तीरहित,ईश्वरार्पण कर्मे करणारे,शांत,शुद्धचित्त,मोक्षधर्माचे ठिकाणी तत्पर,देहादिकांचेठिकाणी अहंकाररहित पुत्रादिकांचेठिकाणी ममतारहित होत्साता,आपल्या धर्माचरणाचे व शुद्ध झालेल्या अंतःकरणाच्या योगाने सूर्यद्वारा (अर्चिरादिमार्गे करून)स्थावर जंगमाचा नियंता,या जगाचे उपादान कारण व निमित्त कारण अशा परिपूर्ण पुरुषाच्या स्वरूपाला जाऊन मिळतात.आपणास यामुळे मोक्ष प्राप्त होऊन जन्म—मरण निवृत्त होतात.||५-६-७|| भावार्थः----हे माते,जे लोक,परमेश्वरदृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करणारे असतात ते दोन परार्धानंतर जो ब्रह्मदेवाच्या प्रलय सांगितला आहे तो प्राप्त होईपर्यंत ब्रहमदेवाच्या सत्यलोकाच्याठिकाणी राहतात.||८||
भावार्थः----हे माते,देवादिकांहून श्रेष्ठ असा त्रिगुणात्मक ब्रहमदेव,दोन प्ररार्धरूप कालपर्यंत आपल्या अधिकाराचा अनुभव घेऊन नंतर,पुथ्वी,उदक,तेज,वायू,आकाश,मन,इंद्रिये,शब्दादिक विषय आणि अहंकार इत्यादिकांनी युक्त अशा ब्रम्हांडाचा संहार करण्याच्या इच्छेने जेव्हा परमेश्वराच्या स्वरूपांत जाऊन मिळतो-------||९||
भावार्थः----तेव्हाच पूर्वी सांगितल्याप्रमाणे सत्यलोकास जाऊन भगवान हिरण्यगर्भाचे ध्यान करीत बसलेले,जे प्राणवायू व मन ह्यांचा जय केलेले विरक्त योगी ते त्या ब्रहमदेवासहवर्तमानच उत्कृष्ट अशा परमानंद ब्रहमरुपी पुराणपुरुषाला जाऊन मिळतात;त्याच्या पूर्वी मिळत नाहीत.कारण,पूर्वी ते निरभिमानी नसतात.म्हणून आपण—जीवानी विवेक करून निराभिमानी व्हावे.||१०||
| अथ तं सर्वभूताणां हृत्पद्देषु कृतालयम् | श्रुतानुभावं शरणं व्रज भावेन भामिनि ||११|| भावार्थः----तस्मात हे माते,सर्व भुतांच्या ह्र्दयकमलांचेठिकाणी ज्याने वास केला आहे ज्याचे पराक्रम तूं मजपासून—कपिल—मुनिपासून श्रवण केले आहेस त्या भगवंताला तूं प्रेमाने शरण जा.हृदय-कमळात जो पुरुष आहे,त्यास आपण—जीवानी शरण जावे.||११||
भावार्थः----(आतां भेदबुद्धिने उपासना केली असतां पुनरावृत्ती होते असे सांगतात)-स्थावरजंगमात्मक प्राण्याचा स्त्रष्टा—उत्पन्न करणारा जो ब्रहमदेव तो निष्काम कर्माने युक्त असतांही,कर्तृत्वामुळे उत्पन्न झालेला अभिमान व भेददृष्टी ह्यांच्या योगाने,मरीच्यादिक ऋषि,सनतकुमारादिक योगेश्वर व दुसरेही योगप्रवर्तक सिद्ध यां सहवर्तमान,सर्वातर्यां--मी,गुणांचा नियंता अशा ब्रहमरूप पुरुषश्रेष्ठांशी ऐक्य पावोनही पुन्हा सृष्टीच्या आरंभी ईश्वररुपी कालाच्या योगाने सत्त्वादिक गुणांचा परस्पर मिश्रभाव झाला असतां पूर्वीप्रमाणे उत्पन्न होतो.आपण—जीव कर्तृत्वादि अभिमान व भेददृष्टी यामुळे जन्म—मरणास पुन्हा पुन्हा प्राप्त होऊन सुख—दु:खास प्राप्त होतोत. म्हणून आपण—जीवानी सत्संगाद्वारे कर्तृत्वाभिमान भेददृष्टी निवृत्त करून जन्म—मरण परंपरा नष्ट—नाहीसी करावी.||१२-१३-१४||
भावार्थः----तसेच ते मरीच्यादिक ऋषीही स्वधर्माचरणापासून उत्पन्न झालेल्या ब्रहमलोकांतील ऐश्वर्याचा उपभोग घेऊन सृष्टीच्या आरंभी गुणामध्ये न्युनाधिक्यभाव असतां,पुन्हा उत्पन्न होऊन आपापल्या अधिकारांवर येतात.||१५||
भावार्थः----(आतां सकामकर्म करणारांची निंदा करितात)जे पुरुष तर या लोकी सकामकर्माचेठिकाणी आसक्तीचित्त व श्रद्धायुक्त होत असते काम्य व नित्य अशी वेदाने सांगितलेली सर्व कर्मे करितात,आपण—जीवानी मात्र सकाम कर्मे करू नये.कारण सकाम कर्मे केल्यामुळे अंत:करण शुद्ध होत नाही.अंत:करण शुद्ध न झाल्यामुळे भगवंत प्राप्त होत नाही.||१६||
भावार्थः----व जे रजोगुणाने विक्षिप्तचित्त झालेले,इंद्रियांचा निग्रह न केलेले,व गृहकृत्यात अंतःकरण अत्यंत गुतून गेलेले पुरुष प्रतिदिवशी पितरांचे आराधन करितात,||१७||
भावार्थः----ते पुरुष,धर्म,अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाविषयीच तत्पर असल्यामुळे,ज्याचे मोठमोठे पराक्रम कथन करण्यास योग्य आहेत अशा मधुसूदन भगवंताच्या कथेविषयी विन्मुख होतात.आपण—जीवानी सकाम कर्मे केल्यामुळे म्हणजेच त्यामुळे अंत:कारण अशुद्ध असल्यामुळे भगवंतांच्या कथा व भगवंतांचे स्वरूप जणू शकत नाहीत.म्हणून आपले जन्म—मरण निवृत्त होत नाही.||१८||
भावार्थः----जसे घर—पाळीव डुकर चांगले चांगले पदार्थ मिळाले तरी त्यांचा त्याग करून विष्ठेचेच भक्षण करितात,त्याप्रमाणे जे भगवत्कथामृताचा त्याग करून दुसऱ्या अभद्र गोष्टी श्रवण करितात ते पुरुष खरोखर आपल्या प्रारब्धाने हत झालेले (दुर्दैवी)असे समजावे.म्हणून आपण—जीवानी अभद्र कथा श्रवण न करिता भगवंतांच्या कथा—लीला—स्वरूप श्रवण कराव्यात.असे केले तर आपण—जीव दुर्दैवी नसून सुदैवी होउत.||१९||
भावार्थः----गर्भाधान संस्कारापासून श्माशानापर्यंत (और्ध्वदेहिक कृत्यापर्यंत)सर्व संस्कार करणारे ते लोक,धूम नावांच्या दक्षिण मार्गाने अर्धमा नावाचा जो पितरांच्या राजा त्याच्या पितृलोकास जातात व तेथून पुन्हा आपल्या पुत्रादिकांच्या वंशात जन्मास येतात.||२०||
भावार्थः----ते असे की,---हे पतिव्रते देवहुति,भोगांच्या योगाने पुण्य क्षीण होते आणि नंतर देवांनी त्यांचे भोगसाधन नाहीसे करून टाकिले म्हणजे ते अगदी विवश होऊन या लोकांत येऊन पडतात.म्हणून आपण—जीवानी जे पुण्य भोगानंतर क्षय—नाश होते असे पुण्य न करता जे पुण्य अंत:करण शुद्ध होते ते निष्काम पुण्य संपादन करावे.||२१||
भावार्थः----यास्तव हे माते,तूं ज्याचे चरणकमल सेवन करण्यास योग्य आहे त्या परमेश्वराचे,त्याच्या गुणांचा आश्रय करून राहणाऱ्या निष्काम भक्तीने अनन्यभावेकरून सेवन कर.आपणही निष्काम भक्तीच करून अंत:करण स्थिर करावे.त्यानंतर आपण ज्ञान मार्गाचा स्वीकार करून पुरष व प्रकृतीचा विवेक--करावा.||२२||
| वासुदेवे भगवति भक्तियोगः प्रयोजित: | जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं यद्ब्रह्मदर्शनम् ||२३|| भावार्थः----कारण,वासुदेव भगवंताचे ठिकाणी भक्तीयोग केला असतां तो,ब्रहमसाक्षात्कार करून देणारे ज्ञान,आणि संसाराचे ठिकाणी वैराग्य शीघ्र उत्पन्न करितो.म्हणून आपण—जीवानी निष्काम भक्तियोग केला म्हणजे आपणास—जीवास वैराग्य उत्पन्न होऊन ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव येतो.||२३||
| यदास्य चित्तमर्थेषु समेष्विन्द्रियवृत्तिभिः | न विगृन्ह्यति वैषम्यं प्रियमप्रियमित्युत ||२४|| भावार्थः---तेच स्पष्ट सांगतात---हे माते,जेव्हा हा भक्तांचे चित्त,भगवद्रूणाच्या प्रीतीने त्या भगवंताचेठिकाणी निश्चल होऊन, इंद्रियवृत्तीच्या योगेकरून शब्दस्पर्शादिक सारख्या (एक स्वरूपी)विषयांवर हे मला प्रिय आहे आणि हे अप्रिय आहे अशा प्रकारचे वैषम्य धारण करीत नाही.आपले—जीवाचे चित्त जेव्हा स्थिर होऊन भगवंतांचे सद्गुण प्रीतीने—निष्कामतेने आवडतात तेव्हा आपल्या—जीवाच्या ठिकाणी वैषम्य—विषयांविषयी अनुकूल—प्रतिकूलभाव राहत नाही म्हणजेच वैराग्य उत्पन्न होऊन ब्रह्मसाक्षात्कार होतो.||२४||
| स तदैवात्मनाssत्मानं निःसङ्गं समदर्शनम् | हेयोपादेयरहितमारूढं पदमीक्षते ||२५|| भावार्थः----तेव्हाच तो भक्त,शुद्ध झालेल्या अंतःकरनाच्या योगाने,त्याज्य अथवा ग्राह्य इत्यादिक विभागाने ,सम,प्रकाशरूप आणि प्रकृतीच्या अध्यासाने रहित अशा स्वरूपभूत आत्म्याला मीच परमानंदरुपी आहे असे अवलोकन करितो||२५||
| ज्ञानमात्रं परं ब्रह्म परमात्मेश्वर: पुमान् | दृश्यादिभिः पृथग्भाववैर्भगवानेक ईयते ||२६|| भावार्थः----हे माते,ज्ञानस्वरूपी एकच पदार्थ,द्रष्टा,दृश्य इत्यादी निरनिराळ्या स्वरुपांनी प्रतीतीस येतो व निरनिराळ्या शास्त्रामध्ये निरनिराळ्या शब्दांनी वर्णन केला जातो.त्यांत उपनिषदामध्ये परब्रम्ह,योगशास्त्रामध्ये परमात्मा,ईश्वर सांख्यशास्त्रांमध्ये पुरुष आणि भक्तीशास्त्रामध्ये भगवान असा प्रसिद्ध आहे||२६||
| एतावानेव योगेन समग्रेणेह योगिन: |युज्यते भिमतो ह्यर्थो यदसंगस्तु कृत्स्नश: ||२७|| भावार्थः----हे माते,योगिजनाला कर्मयोग,भक्तियोग ज्ञानयोग व अष्टांगयोग या सर्वाचा योगेकरून सर्व विषयांचे ठिकाणी जे वैराग्य होणे इतकेच शास्त्रसंमत अभिष्ट फळ संपादन करावयाचे आहे||२७||
भावार्थः----हे माते,ज्ञानरूपी असे एक निर्गुण ब्रम्हच,बहिर्मुख झालेल्या इंद्रियांच्या योगाने शब्दादि धर्मानी युक्त असलेल्या आकाशादी अर्थरूपाने (देव मनुष्यादी रूपाने)केवळ भ्रमाच्या योगाने भासते त्याचेठिकाणी भेददृष्टीपूर्वक मी आणि माझे अशा प्रकारे आसक्ति धारण करणे हे बंधन होय.त्याच्या निवृत्तीसाठी मुमुक्षुने यत्न केलाच पाहिजे||२८|| भावार्थः----जसे महत्तत्त्व,अहंकाररूपाने सत्त्वरजतमोगुणादिक तीन प्रकारचे,महाभूतरूपरूपाने पांच प्रकारचे अकरा प्रकारचे भासते व ज्या अहंकारादिकांपासून स्वप्रकाश जीव आणि त्या जीवाचे शरीर ब्रम्हांड व जग हि भासतात त्याप्रमाणे ज्ञानही शब्दादी विषयांच्या रूपाने नानाप्रकारचे भासते||२९||
भावार्थः----परंतु निरंतर श्रद्धा,भक्ति योगाभ्यास आणि वैराग्य यांच्या योगेकरून ज्याचे अंतःकरण एकाग्र झाले आहे व जो सर्वठिकाणी आसक्तीरहित झाला आहे तोच हे सर्व ब्रम्हरूप आहे असे पहातो||३०||
भावार्थः----हे पूज्यरूपे देवहुति,ज्याच्या योगाने प्रकृति व पुरुष यांचे खरे स्वरूप जाणता येते व ज्याच्या योगाने ब्रम्हसाक्षात्कार होतो ते हे ज्ञान मी तुला सांगितले आहे||३१||
| ज्ञानयोगश्च मान्निश्ठो नैर्गुण्यो भक्तिलक्षण:|द्वयोरप्येक एवार्थो भगवाच्छब्दलक्षण: ||३२|| भावार्थः----हे साध्वी,निर्गुणवस्तूविषयक ज्ञानयोग आणि माझ्याठिकाणी निष्ठा असलेला निष्काम भक्तीयोग या दोहोचेही भगवत्प्राप्तीलक्षण एकच फळ आहे||३२||
| यथेन्द्रियै: पृथग्द्वारैरर्थो बहुगुणाश्रय:|एको नानेयते तद्वद्भगवान् शास्त्रवर्त्मर्भि||३३|| |भावार्थः----जसा रुपरसादिक बहुत गुणांचा आश्रय असणारा साखर वगैरे एकाच पदार्थ निरनिराळे विषय ग्रहण करणाऱ्या इंद्रियांनी ना नाप्रकारच्या म्हणजे चक्षुरिद्रियाने पांढरा,रसनेद्रीय गोड,घ्रानेंद्रियाने थंड इत्यादिक प्रकारे जाणला जातो त्याप्रमाणे एकच भगवान शास्त्रमार्गांनी नानाप्रकारच्या जाणला जातो||३३||
भावार्थः----म्हणजे विहीर खणणे,तळे बांधणे कर्मे,यज्ञयागादिक अनुष्ठाने,अनेक प्रकारची दाने,तप,वेदाध्यन,वेदवाक्यांचा विचार,मन व इंद्रिये यांचा जय,ईश्वराचेच ठिकाणी कर्माचे समर्पण,अष्टांगयोग,नऊ भक्तियोग,प्रवृत्तीनिवृत्ती रूप म्हणजे सकाम व निष्काम असा दोन्ही प्रकारचा धर्म,आत्मतत्त्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य ह्या मार्गांनी स्वप्रकाश भगवंताचीच सगुणरूपेकरून व निर्गुणरूपेकरून प्राप्ती होते ||३४-३५||
भावार्थः----हे माते,सात्विक राजस,तामस आणि निर्गुण अशा चार प्रकारच्या भक्तीयोगाचे स्वरूप आणि प्रप्निमात्रांचेठिकाणी जो जन्मदि विकार होण्यास कारणीभूत होतो व ज्याची गती कोणास समजत नाही अशा काळाचे स्वरूपही मी तुला सांगितले आहे||३६||
भावार्थः----हे माते,ज्या कर्मामध्ये प्रवेश करणारा जीव,आपल्या मुळच्या स्वरूपाला जाणत नाही त्या,अज्ञानाने केलेल्या कर्मांनी जीवाला प्राप्त होणाऱ्या नानाप्रकारच्या संस्कृतीहि मी तुला सांगितल्या आहेत||३७|
| नैतत्खलायोपदिशेन्नाविनीताय कर्हिचित् | न स्यब्धाय न भिन्नाय नैव धर्मध्वजाय च ||३९|| भावार्थः----हे देवहुति,मी सांगितलेले हे तत्त्वज्ञान खळ(दुसऱ्यास फसविणारा)उद्धट,गर्विष्ठ,नास्तिक व दांभिक या पुरुषांना कधीही सांगू नये||३९||
| न लोलुपायोपदिशेन्न गृहारूढचेतसे | नाभक्ताय च मे जातु न मद्भक्तद्विषामपि ||४०|| भावार्थः----तसेच,विषयासक्त,गृह स्त्री पुत्र धन इत्यादिकांचेठिकाणी आसक्त,माझी भक्ती न करणारा,आणि माझ्या भक्तांचा द्वेष करणारा यांनाही सांगू नये||४०|| | श्राद्धधानाय भक्ताय विनीतायानसूयावे |भूतेषु कृतमैत्राय शुश्रुशाभिरताय च ||४१|| | बहिर्जातविरागाय शान्तचीत्ताय दियताम् | निर्मत्सराय शुचये यस्याहं प्रेयसां प्रियः ||४२|| भावार्थः----गुरुवर व मजवर विश्वास ठेवणारा,माझी भक्ती करणारा,नम्र,तत्वज्ञान्यावर दोषदृष्टी व ठेवणारा,प्राणीमात्रांवर द्या करणारा,गुरुजनाची व माझी सेवा करण्यास तत्पर,बरंयविषयाविषयी विरक्ती उत्पन्न झालेला,शांतचित्त मत्सररहित,अंतरी व बाहेर शुद्धता राखणारा आणि ज्याला सर्व वस्तूंपेक्षा मीच अतिशय प्रिय आहे त्या पुरुषाला हा तत्त्वज्ञानाचा उपदेश करावा||४१-४२||
| य इदं श्रृणुयादाम्य श्रद्धया पुरुष:सकृत |यो वाभिदधत्ते मच्चित्त: स ह्योति पदवीण च मे ||४३|| भावार्थः----हे आई,माझेठिकाणी चित्त ठेवणारा जो पुरुष,श्रद्धेने ह्या आख्यानाचे एकवार श्रवण करील किंवा पठन करील त्याला निःसंशय माझ्या पदाची प्राप्ती होईल||४३|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानांतील तृतीयस्कंधामध्ये हा बत्तीसावा अध्याय समाप्त झाला||३२||श्रीकृष्णर्पनमस्तू||
_____________________________________________________________________________________________ |३३--- ५---कपिलदेव आणि देवहुति--- [९---देवहुतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती] ||आता तेतीसाव्या अध्यायामध्ये त्या कपिलने केलेल्या उपदेशाप्रमाणे ज्ञान,भक्ती आणि वैराग्य यांनी युक्त झालेल्या देवहुतीची जीवनमुक्ती वर्णन केली आहे||१|| _____________________________________________________________________________________________ | एवं निशम्य कपिलस्य वचो जनित्री | सा कर्दमस्य दयिया किल देवहुति: | | विस्त्रस्तमोहपटला तमभिप्रणस्य तुष्टाव | तत्त्वविषयाग्कीतसिद्धिभूमिम् ||१|| भावार्थ:---मैत्रेय म्हणाले हे विदुरा,ह्याप्रमाणे कर्दमप्रजापतीची प्रियपत्नी व कपिलाची माता जी देवहुति तीने कपिलाचे भाषण श्रवण करून जिचे मोहरूप आवरण नाहीसे झाले आहे अशी ती तत्वरूप विषयाने युक्त व सांख्यशास्त्रज्ञानाचा प्रवर्तक अशा त्या कपिलाला नमस्कार करून त्याची स्तुती करू लागली.आपणही—जीवानी ज्यांच्या मुखातून श्रवण करून ज्ञान प्राप्त झाले आहे,त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन,सेवा करून व त्यांची स्तुती करावी.कारण त्यान्च्यैतके उपकार या ब्रह्मांडात कोणीच केलेले नसते,कारण त्यांनी केलेल्या उपदेशामुळे आपले कायमचे दु:ख निवृत्त होऊन कायमचाच परमानंद प्राप्त झालेला असतो.म्हणजेच आत्यंतिक दु:ख निवृत्ती व परमानादाची प्राप्ती झालेली असते—चौथा पुरुषार्थ--मोक्ष प्राप्त झालेला असतो.-----------||१|| भावार्थ:---देवहुती म्हणाली----हे कपिला,ज्या तुझ्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेहि उदकामध्ये शयन करणारे असून पंचमहाभूते,इंद्रिय,शब्दादिक विषय व मन ह्यांनी व्याप्त,सत्वादी गुणांच्या प्रवाहाने युक्त आणि सर्व प्रपंचाचे बीज अशा तुझ्या स्वरूपाचे केवळ ध्यानच केले,म्हणजे ते स्वरूप त्याच्या काही लौकर दृष्टीस पडले नाही.आपणास—जीवास परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी सर्व विषयांचा त्याग व अहंकार निवृत्त करावा.असे झाले म्हणजे त्यांचा अनुभव येतो.||२|| भावार्थ:----तो सत्यसंकल्प,क्रियारहित,सर्व जीवांचा नियंत,अतर्क्य अशा अनंत शक्तीनि युक्त आणि प्रवाहाने आपल्या शक्तीचे अनेक विभाग करणारा तूच विश्वाचे उत्पत्तिस्थिती संहार करितोस.||३|| भावार्थ:----हे नाथ,त्याचप्रमाणे प्रलयकाली ज्या तुझ्या उदरामध्ये हे सर्व जग प्रविष्ट झाले होते आणि जो तू मायेने बालकाचे रूप धारण करून आपल्या पायांच्या अंगठा चोखीत एकटाच वडाच्या पानावर शयन करीत होतास त्या तुझे मी उदरामध्ये कसे बरे धारण केले?तेव्हा तुझ्हीच हि लीला अतर्क्य आहे.||४|| भावार्थ:----हे समर्था,तू दुष्टांच्या नाशाकरिता व तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्या सज्जनांच्या समृद्धीकरिता देहाचा स्विकार करितोस.यास्तव जसे तुझे वराहादिक अवतार पूर्वी होवून गेले तसाच हाही तुझा अवतार भक्तांना ज्ञानमार्ग दाखवण्याकरिता झाला आहे||५|| भावार्थ:----म्हणून तुझ्या दर्शनेकरूनच मी कृतार्थ झाल्ये आहे.कारण,एखाद्यावेळीहि ज्या तुझ्या नावाच्या श्रवणाने अथवा कीर्तनाने किंवा तुला नमस्कार केल्याने अथवा तुझे स्मरण केल्याने प्रत्यक्ष चांडाळ असला तरी तो सोमयोग करणाऱ्या पुरुषाप्रमाणे आदर करण्यास योग्य होता.असे जर आहे तर हे भगवान तुझ्या दर्शनाने,तुझ्या दर्शनेकरून मनुष्य कृतार्थ होईल हे काय सांगावे ||६|| भावार्थ:----अहाहा!हे परमेश्वर,ज्याच्या जिव्हाग्री तुझे नाव राहते तो चांडाळ असला तरी त्याच कारणामुळे तुझ्याहून विमुख असलेल्या यज्ञानुष्ठान करणाऱ्या ब्रह्मणापेक्षाहि तो श्रेष्ठ होय.अधिक तर काय सांगावे!जे तुझे नामसंकीर्तन करितात त्याच श्रेष्ठ पुरुषांनी तप केले,त्यांनीच होम केले,त्यांनीच सर्व तीर्थामध्ये स्नान केले व त्यांनी वेदाचे अध्ययन व अध्यापनादिक केली असे समजावे.कारण,तुझ्या नामसंकीर्तनामध्ये सर्व पुण्यकर्माचा अंतर्भाव आहे.म्हणून आपण भगवंतांचे जो नामस्मरण,भगवंतांचे चरित्रे—भगवंतांच्या लीला व भगवंतांचे स्वरूपाचे अखंड चिंतन करीत राहतो,तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे.म्हणून आपण भगवंतांची व भगवंतांच्या भक्ताची स्तुती करावी.||७|| भावार्थ:---यास्तव विषयांपासून अंतर्मुख केलेल्या मनामध्ये ज्याचे चिंतन करिता येते,ज्याने आपल्या स्वरूपाच्या प्रकाशने सत्वररजतमोरूप गुणांचा प्रवाहाचा(संसाराचा)निरास करून टाकीला आहे,ज्याच्या गर्भामध्ये वेद आहेत,ज्याला वेदांत शास्त्रामध्ये “परब्रहम” असे म्हणतात त्या तुज कपिलाला मी वंदन करिते.||८|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाला---हे विदुर,ह्याप्रमाणे कापिलनामक परमपुरुष भगवंताची देवहुतीने स्तुती केली असता,मातेविषयी प्रीतियुक्त अशा त्या कपिलाने स्नेहाने सद्गदित झालेल्या वाणीच्या योगाने आईला असे म्हटले की-----------------||९|| | मार्गेनानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे | आस्थीतेन परां काष्ठामचीरादवरोत्स्यसि ||१०|| भावार्थ:----हे माते,तुला सेवन करण्यास अति सुलभ अशा मी सांगितलेल्या ह्या मार्गाने तू चाललीस तर फारच लवकर उत्तम फलरूप जीवनमुक्तीला पावशील.आपण सत्संग करून विवेकाद्वारे ज्ञान प्राप्त करून त्यानुसार आचरण केले असता जीवना—मुक्तिरूप मोक्ष मिळतो व त्याद्वारे जन्म—मरण निवृत्त होते.||१०|| | श्रद्धत्स्वैतन्मतं मह्यं जुष्टं यद्ब्रम्हवादिभिः | येन मामभवं याया मृत्यूमृच्छन्त्यतद्विदः ||११|| भावार्थ:----हे मते,ब्राह्मवेत्या पुरुषांनी प्रीतीने स्वीकार केलेल्या ह्या माझ्या मतावर तू विश्वास तेव.याच्याच सेवनेकरूनतू,संसारातून सुटून जन्ममरणरहित अशा माझ्या स्वरूपास पावशील.आपण—जीवानी संत—महात्मा व शात्राच्या वचनावर—शब्दावर श्रद्धा—विश्वास ठेवावा व त्यानुसार आचरण करावे.त्यानुसार आचरण करणारा संसारातून सुटून जन्म—मरण रहित सुखरूप भगवंतांस प्राप्त होतात. असे मत न जाणणारे पुरुष,व अशा प्रकारची श्रद्धा न ठेवणारे सुखरूप भगवंतांस प्राप्त न होता, मृत्युरूप संसारात पडतात म्हणजे त्यातून त्यांची सुटका कधीच होत नाही.म्हणून आपण भगवंतांचाच अनुभव घ्यावा.||११|| भावार्थ:----मैत्रेय म्हणाले---हे विदुरा तो भगवान,कपिलमहामुनी ब्रहमवेत्यानी सेवन केलेली व सुख-साध्य अशी आत्मगती आईला दाखवून ब्रह्म-तत्व जाणणाऱ्या त्या देवहुती मातेने जाण्यास आज्ञा दिली असता,ईशान्य दिशेकडे निघून गेला.||१२|| भावार्थ:----नंतर ती देवहुतिहि पुत्राने उपदेश केलेल्या योगमार्गाच्या योगेकारून आपले चित्त एकाग्र करून सरस्वतीनदीला मुकुटाप्रमाणे अलंकारभूत अशा त्या बिंदूसरोवरनामक आपल्या आश्रमामध्ये समाधी लावून स्वस्थ राहिली.आपणही—जीवानी देवहुतीप्रमाणे श्रवण केल्यानंतर आपल्या साधनावर आरूढ होऊन साध्यापर्यंत जाण्याचा अहोरात्र प्रयत्न करावा.||१३|| | प्रजापते: कर्दमस्य तपोयोगविजृम्भितम् | स्वगार्हस्थ्यमनौपम्यं प्रार्थ्य वैमानिकैरपि ||१५|| भावार्थ:---(तोच प्रकार सविस्तर सांगतो)त्रिकालस्नानाच्या योगेकरून पिंगटवर्ण झालेले जटायुक्त कुरळकेश व तीव्रतापाच्या योगाने कृश झालेला व वल्लके परिधान करणारा आपला देह धारण करणाऱ्या त्या देवहुतीने,कर्मदप्रजापतीच्या तपोबलाने व योगसामर्थ्याने वृद्धिंगत झालेल्या,नियमरूप व देवानीसुद्धा प्रार्थना करण्यास योग्य अशा आपल्या गृहसंबंधी सौख्याचा अभिमान सोडून दिला.आपणही—जीवानी देवहुतीप्रमाणेदेहासंबंधीचा व सौख्याचा—वैभवाचा विवेकपुर्वक त्याग करावा.||१४-१५|| भावार्थ:---ज्या घरामध्ये हस्तिदंती पलंग असून त्यावर दुधाच्या फेनासारख्या पांढऱ्या स्वच्छ शय्या,सुवर्णाची भांडीवगैरे सर्व साहित्ये आणि अतिमृदू सरपोस घातलेली सुवर्णाचीआसने(काचे)होती, ||१६|| भावार्थ:----जेथे उंची पाचेच्या शिलांनी व स्वच्छ स्पटिकांनी बांधलेल्या भिंतीमध्ये रचिलेल्या सुंदर स्त्रियांच्या हातात दिलेले पद्मरागादि शोभत होते,||१७|| भावार्थ:----त्या घराजवळ एक उपवन होते ते मंदार,पारिजात इत्यादिक अनेक प्रकारच्या प्रफुल्लीत झालेल्या मुरतरूंच्या योगेकरून मनोहर होते जेथे पक्षांची जोडपी मधुर शब्द करीत असत,जेथे पुष्पांचा मकरंद पिवून मत्त झालेले भ्रमर गायन करीत असत.||१८|| भावार्थ:----जेथे कमलांनी सुवासित झालेल्या पुष्करिणीमध्ये प्रविष्ठ झालेल्या,व कर्दम ऋषीने क्रीडेच्यावेळी अंगीकार केलेल्या आपले(देवहुतीचे)किंनर गंधर्वांथदक गायन करीत असत.||१९|| भावार्थ:---आणि ज्याविषयी इंद्राच्या स्त्रियांना देखील हे आपणास प्राप्त होईल काय?अशी इच्छा होत असे.त्या उपवनाचा सुद्धा अभिमान टाकून,पुत्राच्या विरहाने खिन्न झालेल्या त्या देवहुतिने आपले मुख किंचित उदासीन केले.आपणसुद्धा—जीवानी देवःती मातेप्रमाणे असलेल्या वैभवाचा—ऐश्वर्याचा त्याग करून उदासीन—अनुकूल—प्रतीकुलरहित जीवन जगावे.||२०|| भावार्थ:----प्रियपती(कर्दम)संन्यास घेवून अरण्यात निघून गेला असता,पुत्राच्या विरहाणे ती देवहुती आत्मतत्त्वच जाणणारी होती तरी जशी प्रेमळ गाई वत्स नष्ट झाला असता विव्हळ होते त्याप्रमाणे विव्हळ झाली.आईचे अंत:करण पुरुषापेक्षा अतिकोमल असते,त्याच्या परिणाम होत असतो,म्हणून पुत्र वियोगाने व्याकूळ झाली.जेव्हा आपण आई व्हाल तेव्हाच तो अनुभव येत असतो.||२१|| | तमेव ध्यायती देवमपत्यं कपिलं हरिम् | बभूवाचिरतो वत्स निःस्पृहा तादृशे गृहे ||२२|| भावार्थ:-----हे वत्सा विदुरा,ती देवहुति अपत्यरूप—सदगुरुरूप कपिल हरिदेवाचे ध्यान करून थोडक्याच कालाने,पूर्वी सांगितलेल्या सर्व समृद्धीयुक्त घराविषयी निस्पृह झाली.आपणही देवहुतीप्रमाणे सर्व समरुद्धीयुक्त जादाविषयी व देहासंबंधी जीवाविषयी निस्पृह व्हावे. असे झाले असता भगवंतांचा अनुभव येऊन जन्म—मरण निवृत्त होते.||२२|| | भक्तिप्रवाहयोगेन वैराग्येण बलीयसा | युक्तानुष्ठान ज्ञानेन ब्रह्महेतुना ||२४|| | विशेद्धेन तडाssत्मानमात्मना विश्वतोमुखम् | स्वानुभुत्या तिरोभूतमायागुणविशेषनम् ||२५|| भावार्थ:---नंतर,कपिलनामक पुत्राचे—सदगुरूंचे ध्यान करण्यास योग्य जे भगवंताचे प्रसन्नमुखयुक्त स्वरूप सांगितले होते त्या सर्व अवयवयुक्त स्वरूपाचे किंवा त्या स्वरूपाच्या एकेक अवयवांचे शुध्द अंत:करणाने ध्यान करून त्या देवहुतीने,भक्तीच्या अखंड प्रवाहरूप योगाने कडकडीत वैराग्याने व यथायोग्य पूजादिक कर्माच्या अनुष्ठागापासून झालेल्या ब्रहमसाक्षात्कार ज्ञानाने,स्वरूप प्रकाशानेच ज्याचा मायागुणांनी राचिलेला देहेंद्रीयादी भेद नाहीसा झाला आहे अशा आत्म्याला सर्व व्यापक रूपाने जाणून,आपणही माता देवाहुतीप्रमाणे भगवंतांचे ध्यान करून ब्रह्मा—साक्षात्कार ज्ञानाने आनात्मा पदार्थांचा—विषयांचा त्याग करून अभेद—स्थिती प्राप्त करून घ्यावी.||२३-२४-२५|| | ब्रम्हण्यवस्थितमतिर्भगवत्यात्मसंश्रये | निवृत्तजीवापत्तीत्त्वात्क्षीणक्लेशाssप्तनिर्वृतिः ||२६|| भावार्थ:-----जीवांचा आश्रयभूत अशा ब्रहमरूप भगवंताचेठिकाणी बुद्धि लाविली.त्यावेळी तिचा जीवभाव सुटला असल्यामुळे सर्व क्लेश नाहीसे होऊन तिला परमानंद प्राप्त झाला होता,व तिची सर्वदा समाधी लागून गेली असल्यामुळे तिचा अहंममतारुपी भ्रम निवृत्त झाला होता,म्हणून त्यावेळी जसे जागृत झालेल्या पुरुषाला स्वप्नात पाहिलेल्या देहाचे स्मरण राहत नाही त्याप्रमाणे तिला देहाचे स्मरण सुद्धा राहिले नाही.आपलाही—जीवाचा देवाहुती मातेप्रमाणे अहंता-ममतारूपी भ्रम निवृत्त होऊन जीव--भाव निवृत्त होतो.||२६-२७|| भावार्थ:---तेव्हा तिच्या देहाचे कर्दमाने निर्माण केलेल्या विध्याधरीकडून पोषण होत असून तो मनोदु:ख(काळजी)नसल्यामुळे कृशही झाला नव्हता तथापि अभ्यंग वगैरे नसल्यामुळे मलांच्या थरांनी आच्छादित होऊन धुराने युक्त असलेला अग्नी जसा शोभत त्याप्रमाणे शोभत असे.||२८|| भावार्थ:----फार काय सांगावे!जिची बुद्धी वासुदेवाचेठिकाणी प्रविष्ठ झाली आहे अशा त्या देवहुतीने तपोयोगमय,केस सुटलेले,वस्त्र गळून पडलेले व प्रारब्धाने रक्षण केलेले ते आपले शरीरसुद्धा जाणिले नाही.माता देवहुतीप्रमाणे ली—जीवाची बुद्धी वसुदेवासी एकरूप करावी,व त्याचवेळेस आपणास—जीवास देहाचा विसर पडतो—देहातीत अवस्था होते.||२९|| | एवं सा कपिलोक्तेन मार्गेणाचिरत: परम् | आत्मानं ब्रह्मनिर्वाणं भगवन्तमवाप ह ||३०|| भावार्थ:-----हे विदुरा,ह्याप्रमाणे कपिलाने सांगितलेल्या मार्गाने ती देवहुति,लवकरच सर्वश्रेष्ठ,अंतर्यामी,नित्यमुक्त आणि ब्रहमरूपी अशा भगवंताशी ऐक्य पावली.आपणही—जीवही देवहुती मातेप्रमाणे ब्रह्मरूपी अशा भगवंतांसी ऐक्य पूत यात मुळीच शंका नाही.||३०|| भावार्थ:-----हे वीर विदुरा,ज्याठिकाणी त्या देवहुतीला योगसिद्धी(मुक्ती)प्राप्त झाली ते ‘सिद्धीपद’या नावाने त्रैलोक्यात प्रख्यात असे अतिशय पुण्याकारक क्षेत्र झाले.||३१|| भावार्थ:----हे शांतस्वभाव विदुरा,योगमार्गाच्या योगाने ज्याचे देहसंबंधी धातुमल नाहीसे झाले आहेत असे त्या देवहुतीचे ते रचनाशरीरच नद्यांमध्ये श्रेष्ठ,सिद्धीनी सेवीत व सिद्धी देणारी अशी एक नदी झाले;म्हणजे नदीरुपणे परिणाम पावले.||३२|| | कपिलोsपि महायोगी भगवान् पितुराश्रमात् | मातरं समनुज्ञाप्य प्रागुदिंची दिशं ययौ ||३३|| भावार्थ:----तो महायोगी भगवान कपिलहि मातेची आज्ञा घेवून पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेस निघून गेला.आपणही जर वक्ता असाल तर आपणही कपिल—मुनिसाराखेच घरादारांचा त्याग करून अन्य आश्रमात निघण जावे.||३३|| भावार्थ:----आणि ते सिद्धी,चारण,गंधर्व,मुनि व अप्सरांच्या समुदायांनी स्तूयमान होत्साता,समुद्रानेही त्याची स्तुती करून त्यास आपल्यामध्ये राहावयास स्थान दिले.||३४|| भावार्थ:----तेथे सांख्यचार्यांनी स्तुत असा तो कपिलमुनि,तिन्ही लोकातील सर्व प्राण्यांना योगप्रवृत्तीने मोक्षप्राप्त होण्यासठी एकाग्रचित्ताने समाधी लावून अद्याप राहिला आहे.||३५|| | य इदमनु श्रुम्नोति योsभिधत्ते कपिलमुनेर्मतमात्मयोगगुह्यम् | भगवति कृतधिः सुपर्णकेता - वुपलभते भगवत्पदारविन्दम् ||३७|| भावार्थ:----ब निष्पाप,विदुरा,जे मनूवंशादिक तू मला विचारले होतेस,ते हे तुला मी कथन केले आहे,आणि त्या प्रसंगाने कपिलचा व देवहुतीचा पापनाशक संवाद सांगितला आहे.आपण तो कपिल-मुनी व देवहुतीचा संवाद श्रवण करून जन्म—मरणारूपी संसार निवृत्त करावा.||३६|| | य इदमनुश्रुणोति योऽभिधत्ते |कपिलमुनेर्मतमात्मयोगगुह्यम् | | भगवति कृतधी:सुपर्णकेता—वुपलभ्यते भगवत्पदारविन्दम् ||३७|| भावार्थ:----जो पुरुष,आत्मयोगरूप (भगवध्द्यानरूप)सर्व शास्त्रांचे रहस्य असे हे कपिलमहामुनीचे मत प्रतिदिवशी श्रवण करितो अथवा दुसऱ्यास सांगतो त्याला गरुडध्वज भगवंताचेठिकाणी भक्तीयोगाची प्राप्ती होवून भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती होते.म्हणून आपण—जीवानी कपिलमुनींचे मत—सांख्यशास्त्र प्रतिदिवशी श्रवण करावे किंवा इतर जीवांना सांगावे.त्यामुळे आपले जन्म—मारानारूपी संसार निवृत्त होईल.||३७|| याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुरानातील तृतीयस्कंधामध्ये कापिलेय आख्यानरूप हा तेतीसावा अध्याय समाप्त झाला||३३|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू || ||सदगुरुचरणार्पणमस्तू || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|३--- इति तृतीय(३) स्कन्धः समाप्तः---तिसरा(३) स्कन्ध समाप्त ---३ | ||हरिः ॐ तत्सत्|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment