सार्थ, भावार्थ सहित श्रीमद् भागवतमहापुराण स्कन्ध: पहिला
| ॐ तत्सत् | | श्रीगणेशाय नम: | | ॐ नमो भगवते वासुदेवाय | | श्रीमद्भागवतमहापुराणम् | ============================================== | प्रथम स्कन्ध: | ============================================== १---- शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न |-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | जन्माद्यस्य यतोSन्वयादितरत | | श्चार्थेश्वर्भिज्ञ: स्वराट् — | | तेने ब्रह्म हृदा य आदिकवये | | मुह्यन्ति यत्सूरयः | | | तेजोवारिमृदं यथा विनिमयो | | यत्र त्रिसर्गोSमृषा | | धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं |
| सत्यं परं धीमहि ||१|| | --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | १---अथ प्रथमोऽध्याय: ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------| देवर्षी नारादांची भक्तीशी भेट. |अर्थ:---श्रीगणेशाय नमः सरस्वतीगणेशांतें वंदूं ज्यांच्या कृपावसें ||बुद्धीजाड्य झडे आणि विध्ननाश घडे सदा ||१|| भावार्थ:---ज्या परमात्म्याच्या मुखात सरस्वती आहे,ज्यांच्या वक्ष:स्थळाच्या ठिकाणी लक्ष्मी आहे व हृदयात स्वयंप्रकाश ज्ञान व जो सर्वज्ञ आहे,अशा नृसिंहाची मी उपासना करितो.आपणही आपल्या इष्ट-हेतूसाठी त्यांचीच उपासना करावी.||१||
| |धर्म:प्रोज्झितकैतवोऽत्र परमो | निर्मत्सराणां सतां | वेद्यं वास्तवमत्र वस्तू शिवदं | तापत्रयोन्मूलनम् | | श्रीमद्भागवते महामुनिकृते | किं वा परैरीश्वर: | सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभि: | | शुश्रूषुभिस्तत्क्षणात्||२|| |अर्थ:--- गुरूच्या पादुका वंदू ज्या शिरी धरीतांच कीं ||हृदय बोध उपजे संसारभयनाषक ||२|| भावार्थ:--- विश्व—जग हे नऊ लक्षणांनी युक्त आहे---१—सर्ग,२--विसर्ग,३--स्थान,४—पोषण,५—ऊती,६—मन्वन्तर,७—ईशानुकथा,८--निरोध,९—मुक्ती आणि १०--आश्रय अशा दहा विषयांचे वर्णन केले आहे.म्हणून आश्रयभूंत असा परमात्मा त्यास मी नमस्कार करीत आहे.आपणही जो आश्रयभूत परमात्म्यास नमस्कार करावा.||२|| |अर्थ:--- रमाकांतउमाकांतां वंदू त्यां एकरूप जे || परस्परस्तुतीने कीं तुष्टती सर्वसिद्धीद ||३|| भावार्थ:---परस्परांच्या आत्मत्वामुळे--जीवात्म्यामुळे परस्परांची—जीवात्म्यांची जी सर्वसिद्धी म्हणजे सर्व परमात्मस्वरूप असे ज्ञानस्वरूप असलेले उमापती—महादेव यांना मी नमस्कार करितो.आपणही आपल्या इष्ट—सिद्धीसाठी उमापती—महादेव यांना नमस्कार करावा.||३|| |अर्थ:--- यथाशक्ती जसे पक्षी फिरती अंबरीं तसें ||विष्णूचें यश वर्णावें मानवांनी असें असे||४|| भावार्थ:---ब्रह्मदेवादिपरंपरेने प्राप्त झालेल्या संप्रदायाच्या अनुरोधाने व ग्रंथातील मागच्या व पुढच्या संगतीला अनुसरून श्रीमद्भागवतातील भावार्थ दाखविणारी दीपिका मी ग्रंथकार—श्रीधर स्वामी करत आहेत,कारण मुळ श्रीमद्भागवतातील भावार्थ सामान्य अज्ञानी लोकांना त्यांच्या अल्प—बुद्धीमुळे आकलन होत नाही,म्हणून सामान्यांना श्रीमद्भागवतातील भावार्थ कळून,त्यानुसार आचरण करता येईल.त्यामुळे त्यांना परमात्म्याचा अनुभव येऊन त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन त्यांना परमानंद प्राप्त होईल,म्हणून ग्रंथकार श्रीधर स्वामी श्रीमद्भागवतातील भावार्थ दीपिका करत आहेत.हा ग्राथाकार—श्रीधर स्वामी यांचा शुद्ध हेतू आहे.||४|| . |अर्थ:--- श्रीमद्भागवताचा जे संस्कृतार्थ न जाणते || त्यांसाठी हा प्रकृतार्थ लिहितो मी यथामती ||५|| भावार्थ:---ग्रंथकार श्रीधर स्वामी स्वत:बदल मंद—बुद्धी शब्द वापरतात.व्यास—मुनींनी सर्व—शात्रांचे सार काढून संस्कृत भाषेत असलेले श्रीमद्भागवत—ग्रंथ लिखित केलेला आहे.त्यावर सामान्यांना श्रीमद्भागवत ग्रंथ कळावा म्हणून टीका-केली म्हणजे सर्वांना समजेल अशा भाषेत लीखीत केलेला आहे.असे महान—कार्य केलेले आहे,तरी पण स्वत:स मतीमंद म्हणून मतिमंद आहे.त्याचप्रमाणे आपणही एखादे अखिल—मानवांना उपयुक्त कार्य जर केले असेल तर आपणही विनामुल्य समाजास निष्काम—बुद्धीने लोकार्पण करावे.त्यातील अहंकार बुद्धीचा त्याग करून कार्य करावे.हीच खरी मानवता आहे.ती मानवता आपण प्रत्यक्ष आचराणात आणून अलौकीक कार्य करावे.आपण सर्वांना भगवंतांनी अशी निष्काम बुद्धी देवो,हीच भगवंतांच्या ठिकाणी निष्काम प्रार्थना करू या ! ||५|| भावार्थ:---प्रथामारंभी टीकाकार श्रीधरस्वामी यांनी अपेक्षित इष्टहेतू सिद्धीस जावा म्हणून मंगलाचरण केलेले आहे.ज्याच्या—परमात्म्याच्या चरणाकमलांतील—अधिष्ठानांतील चिद्रूप मकरंद—सार असलेला परमात्मा परमहसांनी—जीवनमुक्त महात्म्यांनी सेवन म्हणजे अनुभव घेतला आहे.हा परमात्मा भक्तांचे जे अंत:करण आहे,त्यात निवास करितो—राहतो.असा जो श्रीरामचंद्र आहे,त्यांना मी नमस्कार करितो.आपणही--जीवांनी त्यांनाच नमस्कार करावा,आपला जो इष्टहेतू आहे की,आपणांस परमात्म्याचा अनुभव यावा.||१|| भावार्थ:--- मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् | यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधववम् भगवंतांची कृपा झाली असता,मुका बोलू शकतो व पांगळा पर्वताचे उल्लंघन करू शकतो,म्हणजेच अशक्य असलेले शक्य होऊ शकते. म्हणून आपण आपल्या स्वधर्मंनुसार आचरण करून भगवंतांची कृपा संपादन करावी.असा जो भगवंत आहे त्यांना ग्रंथकार श्रीधर स्वामी नमस्कार करितात.म्हणून आपणही स्वधर्मांचे पालन करून भगवंतांची कृपा संपादन करावी.यातच आपले--जीवांचे परम—हित आहे.||६|| भावार्थ:---श्रीमद्भागवत ग्रंथाचे श्रवण केले तर चतुर्विध—धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते.म्हणून आपण श्रीमद्भागवत ग्रंथांचे संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावे.म्हणजे आपणांस चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते.श्रीमद्भागवातांचा ओकांरापासून अंकुर आहे, | सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला | का गा हा दाखविला जगदाभासु ||(तुका.म.गाथा) सत्यस्वरूप असलेला परमात्मा परमेश्वरापासून उत्पत्ती आहे.यात द्वादश स्कंध: आहेत.यात विशेषता: निष्काम भक्तीचे प्रतिपादन केलेले आहे.यात तीनशे बत्तीस अध्याय आहेत.यात सर्व आठरा हजार श्लोक आहेत.तो समजण्यास सुलभ—सोपा आहे.आपणांस जी इष्ट वस्तू म्हणजे सर्व दु:ख निवृत्त होऊन सर्व सुखरूपता मिळणार आहे.अशी इच्छा सर्व जीवांचीच आहे.ती इच्छा श्रीमद्भागवत श्रवण करून व त्यानुसार आचरण करून मिळणार आहे.प्रत्येक जीव हा तीन दोष घेऊन जन्मास आलेला आहे,त्या तीनही दोषांची निवृत्त श्रीमद्भागवत श्रवण आचरण करून होते.म्हणून हा ग्रंथ आपण जरूर—जरूर श्रवण करावा.सर्व ग्रंथात व सर्व पुराणांत श्रेष्ठ आहे.फळाच्या दृष्टीने विशेष आहे,म्हणून आपण—सर्व मानवांनी श्रीमद्भागवत ग्रंथाचे श्रवण करावे.||७|| भावार्थ:---पूर्वी श्रीवेद—व्यासांनी पुष्कळ पुराणें व शात्रें रचिली; परंतू त्यांना समाधान—शांती प्राप्त झाली नाही.म्हणून त्यांनी नारदा—मुनींच्या उपदेशानुसार—मार्ग-दर्शनानुसार ज्यात भगवंतांचे गुणलीला मुख्यत्वेकरून वर्णन केलेल्या आहेत असे श्रीमद्भावत—शास्त्राचे आरंभ करण्याकरिता विघ्न निवृत्ती होण्याकरिता परमात्म्याचे अनुस्मरण—रूप मंगलाचरण करितात.त्याचप्रमाणे आपणही कांही मांगलिक कार्य हाती घेतले असेल तर परमात्म्याचे अनुस्मरण—रूप मंगलाचरण करावे.व्यास—मुनी आपण स्वत: व आपल्या शिष्यांसहित परमेश्वरांचे ध्यान करितात.परमात्म्याचे स्वरूप आणि तटस्थ अशा उपलक्षण करितात.आपणसुद्धा परमात्म्याच्या स्वरूप-लक्षण आणि तटस्थ लक्षण यांचे उपलक्षण करावे. | सोने सोनेपणा उठो | न येतासि झाले लेणे | तेवि न वेचिता जग होणे | अंगे जया || (चांग.पा.ओ.४) १--स्वरूप लक्षण:---ज्या लक्षेणेत मुळ स्वरुपात कोणताही बदल—विकार होत नाही;त्यास “स्वरूपलक्षण” असे म्हणतात.सत्--चित्—आनंद असा जो परमात्मा भूत,भविष्य व वर्तमान या तीनही काळात सत्य असतो—जन्म—मरणादिविकाररहित केवळ ब्रह्मरूप असतो. याचे कारण,ज्या ब्रह्माच्या ठिकाणी,मायेचे तीन गुण जे तम—रज आणि सत्व यांपासून अनुक्रमे झालेली आकाशादि—आकाश—वायू—तेज—जल—पृथ्वी हि पंचमहाभूते,श्रीत्रादिक—श्रोत्र,त्वचा,चक्षू,जिव्हा,घ्राण हि इंद्रियें व त्यांच्या देवता—दिशा,वायू,सूर्य,वरून,अश्विनीकुमार यांची सृष्टी ही,वस्तुत:खोटी—मिथ्या असतांही ज्याच्या—परमात्म्याच्या सत्तेने खरी आहेत असे भासते.यास दृष्टांत---[१]--तेज,उदक आणि मृतिका यांचा एकमेकांच्या ठिकाणी एकमेकांचा झालेला भास जसा आश्रयभूत पदार्थांच्या खरेपणामुळे खरेसा वाटतो,म्हणजे ते ज्याच्या ठिकाणी पाणी भासणे,हे मृगजळाच्या ठिकाणी प्रसिद्ध आहे,तेथे वास्तविक पाहता पाहू गेले असता,सूर्याचे किरण खरे,पाणी खरे नाही,असे असतांही ‘पाणीच खरे’असा भास होतो,यास कारण सूर्यकिरणांची सत्यता असते;[२]--तसेच पाण्यांवर काचेचा भास होतो व काचेच्या तुकड्यावर पाण्याचा किंवा अग्नीचा भास होतो;हे सर्व भासणारे पदार्थ,खरे नसतांही त्यांच्या आश्रयाभूत पदार्थांच्या म्हणजे सूर्यकिरण पाणी आणि कांच यांच्या खरेपणामुळे खरेसे भासतात;[३]--तसाच भूतें,इंद्रियें आणि देवता यांचा सर्ग,वस्तुत:खरा नसतांही परमेश्वराच्या—परमात्म्याच्या सत्यत्वामुळे आपणास खराच भासतो.[४]--किंवा ‘यत्र त्रीसर्गो मृषा’येथें ब्रह्मवस्तूतेच वास्तविक सत्यत्व सांगण्याकारीतां त्याहून इतर पदार्थांचे मिथ्यात्व सांगितले आहे.ते असें की,ज्या ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी हा त्रिगुणात्मक सर्ग खोटाच—मिथ्याच आहे,खरा—सत्य मुळीच नाही.एतावता परमात्मा सत्य आहे हे सिद्ध झाले.परमेश्वराच्या ठिकाणी मायावगैरे उपाधि असतील ? तर नाहींत—स्वत:च्या तेजाने निरंतर मायारूपी कपट ज्या परमेश्वराच्या ठिकाणी निरास पावले आहे,अशा त्या परमेश्वराचे—परमात्म्याचे मी ध्यान करितो.आपणसुद्धा अशा परमेश्वराचे--परमात्म्याचे ध्यान करावे. २—तटस्थ लक्षण:---जे लक्षण कधी असते व कधी नसते,त्यास “तटस्थलक्षण” असे म्हणतात.उदा—जगत--कर्तृत्व हा ईश्वराचा धर्म कधी असतो व कधी नसतो.ईश्वराच्या ठिकाणी कर्तृत्व हे लक्षण प्रलय काळात नसते,झोपेच्या अवस्थेत नसते व मोक्ष—काळी नसते,तर जगत—उत्पत्ती--काळी कर्तृत्व लक्षण असते.म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी कर्तृत्व लक्षण कधी असते व कधी नसते.म्हणजेच तटस्थ लक्षण कधी असते व कधी नसते.[१]--या जगाची उत्पत्ती स्थिती व लय हे ज्या ठिकाणी परमेश्वरापासून होतात. त्या परमेश्वराचा आकाशादि कार्यांच्या ठिकाणी अन्वय(सद्रूपानें स्थिती)असल्यामुळे ती आहेत असे भासते. | मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमुर्तिना | मत्स्थानि सर्व भूतानि न चाहं तेष्ववस्थितः || (गीता.अ.९.श्लो.४) आणि मुळीच नसलेल्या आकाशपुष्पांदिकांपासून त्याचा व्यतिरेक (सद्रूपानें नसणें)असल्यामुळे,त्याचे ठिकाणी जग हे वस्तुत: खरें नसून कल्पित आहे,असे सिद्ध होतें.[२]--किंवा अन्वय शब्दानें अनुवृत्ति(व्याप्ति)असणें आणि इतर शब्दानें व्यावृत्ति(व्याप्तीचा अभाव)हि घ्यावीत.असल्यामुळें सद्रूप ब्रह्म हें जगाचें कारण आहें आणि व्यावृत्ति असल्यामुळे जग हें ब्रह्माचे कार्य असून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहें. | न च मत्स्थानि भूतानि पश्य ने योगमैश्वरम् | भूतभृन्न न भूतस्थो ममात्मा भूत भावनः || (गीता.अ.९.श्लो.५) यांस दृष्टांत—सोनें हें कारण व दागिना हें कार्य आहें.सोन्यांचा दागिन्यांत अन्वय आहे,म्हणजे सोन्यापासून दागिना झाला असल्यामुळें दागिन्याला सोने म्हटले तरी चालेल,पण दागिन्याचा सोन्यांत व्यतिरेक आहे,म्हणजे दागिना मोडला तर त्याचा दागिनेपणा मात्र नाहींसा होतो,सोनेपणा नाहींसा होत नाही,म्हणून दागिना हा सोन्यामध्ये कल्पित आहें.किंवा---या जगाला सावयत्व आहे म्हणून अन्वयव्यतिरेकेंकरून याचे उत्पत्तिस्थिती संहार ज्या व्यापक परमेश्वरापासून होतात त्याचे आम्ही ध्यान करितो.तर मग मायादेखील या जगाला कारण आहे म्हणून तीही ध्यान करण्यास योग्य आहे कीं काय ?तर नाही;जो जाणता(ज्ञानी)आहे,मायेसारखा जड नाहीं.तर मग जीवच ध्येय असेल !तर तसेही नाही.आम्हीं ज्याचे ध्यान करितो तो स्वत:सिद्धज्ञानस्वरूपी आहे,व जीव हा अविद्दावृत आहे.तर मग ब्रह्मदेव असेल ?तर तसेही नाही.ज्यानें ब्रह्मदेवालासुद्धा मनानेच वेद प्रकाशित केले आहेत.अशा प्रकारच्या ईश्वराच्या बुद्धीप्रवर्तकत्वेकरून गायीत्रीचा अर्थ प्रदर्शित झाला.तर मग निजून उठलेल्या पुरुषाला जसें पूर्वदिवशीं केलेल्या अध्ययनाचे स्वत:च अध्ययन होते तसे ब्रह्मदेवाला पूर्वसृष्टींतील वेदाचें ज्ञान झाले असेल ?असे जर म्हणावें तर तसेही नाहीं.ज्या वेदाच्या प्रकाशनाविषयी इंद्रादिकही मोह पावतात.तस्मात्- ब्राह्मदेवाचेंहि ज्ञान पराधीनच आहे;म्हणून स्वत:सिद्धज्ञानवन्-असा परमेश्वरच जगाचें कारण आहे.यास्तव जो ईश्वर,सत्य असून मिथ्याभूत जगाला सत्ता देणारा परमार्थ सत्य आणि सर्वज्ञत्वामुळे मायाकपटरहित आहे त्या ईश्वराचे आम्ही ध्यान करितो.एतावता गायत्रीनामक ब्रह्मविद्दारूप आहे असें दर्शीद झालें. परमात्मा-परमेश्वर:---“ज्याच्या ठिकाणी स्वरूप लक्षण आहे म्हणजेच जो सत्-चित्-आनंद आहे तोच परमात्मा-परमेश्वर आहे.”आपणास-जीवांस त्याच परमात्म्याचा अनुभव घेऊन जन्म-मरण निवृत्त करून सुखारुपता मिळणार आहे.||१|| भावार्थ:---असे मंगलाचरण करून या श्रीमद्भागवताच्या ठिकाणी श्रीत्यांची प्रवृत्ती होण्यासाठी १—कर्मकांड—(यज्ञयागादिक कर्मांचे प्रतिपादन करणारा अनुष्ठान प्रकार),२—उपासनाकांड(कर्मांगभूत उपासना),आणि ज्ञानकांड(अध्यात्मशात्र—वेदांतशात्र) या तीहींचे प्रतिपादन करणाऱ्या सर्व शास्त्रापेक्षा या श्रीमद्भागवत—शास्त्राचे श्रेष्ठत्व दाखवतात,कारण श्रीमद्भागवतात आपल्या--मानवांच्या—जीवांच्या थिअकनि जे तीन दोष आहेत.त्या तीन दोषांचे निवारण फक्त श्रीमद्भागवतशास्त्र करू शकते,तर अन्य शास्त्र तीनही दोषांचे निवारण करू शकत नाही,तर फक्त एक—एक दोषाचेच निवारण करू शकते,म्हणून आपण—सर्वांनी—जीवांनी श्रीमद्भागवत—शास्त्राचे श्रवण करून तीनही दोष निवृत्त करून जन्म-मरण निवृत्त करून सुखारुपता प्राप्त करून घ्यावी.यातच आपल्या मानवी जीवनाचे सार्थक आहे.१—भगवंतश्रीनारायण यांनी प्रथम ब्रह्मदेवांना चतु:श्लोकी भागवत सांगितले.त्यानंतर ब्रह्मदेवांनी श्रीनारादमुनींना शंभर श्लोकी भागवत सांगितले.त्यानंतर नारदमुनींनी व्यास—मुनींना व वेदव्यासांनि श्रीमद्भागवाताचा आठराहजार श्लोकांनी विस्तार करून शुकाचार्यांना सांगितले.हेच श्रीमद्भागवत शुकादेवांनी राजा परीक्षितांना सांगितले.त्यामुळे राजा परीक्षितांना मोक्ष प्राप्त झाला.आपण आज—वर्तमान काळात हेच श्रीमद्भागवत शास्त्र संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण केले तर आपला—जीवांचा उद्धार—मोक्ष मिळू शकतो.आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुपता मिळू शकते.म्हणून आपण श्रीमद्भागवत—शास्त्र जरूर—जरूर—जरूर श्रवण करावे.हेच मानवी—जीवनाचे मुख्य ध्येय—साध्य आहे.आपले—जीवांचे हेच भागवत—शास्त्र १--आध्यात्मिक—शारीरिक व मानसिक,आधिभौतिक--जड विषयांचे व इतरांकडून होणाऱ्या व आधिदैविक दु:ख—निसर्गाकडून किंवा देवतेकडून होणाऱ्या या सर्व दु:खाचे कायमचे—नेहमीसाठी निवृत्त करून कायमचेच परमसुख देणारे आहे.पुढे चालून कधीच दु:खाची—स्वप्नातसुद्धा अनुभूती येणार नाही.आपण दु:खांची मागणी किंचितही केली तरी मिळणार नाही व सुखाची न मागणी केली तरी सुखरूपता मिळणारच असे हे निश्चितच आहे.म्हणून सतन—महात्मा यांच्या मुखातून श्रीमद्भागवत—शास्त्र श्रवण करावेच,कारण आपण मानव—देहात आहोतच.हे शास्त्र मानव-देहातच श्रवण करता येते,अन्य देहात श्रवण होत नाही.||२|| भावार्थ:---श्रीमद्भागवत—शास्त्र हेच सर्व शास्त्रांचे फळ आहे.इतर जी शास्त्रे आहेत,त्या शास्त्रांतील सर्व सार काढून हे शास्त्र निर्माण केले आहे,म्हणून प्रथम हेच श्रीमद्भागवतशास्त्र आपण—जीवांनी श्रवण करावे व त्यानंतर कौतुक म्हणून इतर शास्त्रे श्रवण करावीत.श्रीमद्भागवत—शास्त्र हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहे.त्यामुळे आपल्या मानवी जीवनाचे सार्थक होते.वस्तू म्हणजे वस्तू शब्दाने वस्तूचा अंश जीव आहे,वस्तूची शक्ति माया आहे आणि वस्तूंचे कार्य जग आहे.याचा भावार्थ असा होतो की,हे—जीव,माया व मायाकार्य जग सर्व वस्तू—परमात्माच—ब्रह्माच आहे.जिकडे—तिकडे परमात्माच आहे,परमात्म्यावाचून अन्य कांहीच नाही.म्हणून आपण—जीवांनी नित्य श्रीमद्भागवत—शास्त्राचेच श्रवण करावे.हे श्रेमाद्भागवत—शास्त्र रसरुपीच फळ आहे,सर्व सारच यांत आहे.आपण श्रीमद्भागवत—शास्त्र सर्वांनीच,सर्वंच श्रवण करावे.||३|| भावार्थ:---याप्रमाणे ग्रंथकारांनी तीन श्लोकांनी मंगलाचरण करून,ग्रंथ लिहण्याचा उद्देश—निष्काम भक्तीकरून जीव—ब्रह्म—ऐक्य—ज्ञानाद्वारे मोक्ष सांगितला आहे.श्रीमद्भागवताचा विषय हा मल—दोष,विक्षेप-दोष व अज्ञान—दोषाची निवृत्ती करून मोक्ष देणे हे या ग्रंथाचा विषय आहे.म्हणून सर्व लोकांनी श्रीमद्भागवत—शास्त्र श्रवण करावे असे सांगतात.म्हणून ऋषी—मुनींनी जे श्रीविष्णूंचे क्षेत्र नैमिषारण्य यांनी श्रीहरीची—परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून या सत्रास आरंभ केलेला आहे. त्याप्रमाणे आपण—जीवांनी आपल्यातील तीनही दोष निवृत्त होऊन मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून श्रीमद्भागवत ग्रंथाचे श्रवणाचे सत्रास आरंभ करून सुरवात करावी,यातच आपले व सर्वांचेच हित आहे.||४|| भावार्थ:---एके दिवशी प्रत:काली सायंप्रातर्होम करून सत्राच्या उद्देशाने एकत्र बसलेल्या त्या शौनकादि ऋषींनी सत्कारपूर्वक आसनावर बसलेल्या सूताला आदराने असे विचारले की,-------------आपणही--जीवांनी आपणास--जीवांस संत--महात्मा यांना,कांही अध्यात्मिक प्रश्न हा आदराने,विनयाने,श्रद्धेने,सेवापुर्वक विचारून श्रवण करावा.||५|| भावार्थ:---ऋषी म्हणाले:---हे निष्पाप सूता,तू खरोखरच महाभारतादि,इतिहासाचे व श्रीमद्भागवतमहापुराणांचे,धर्मशास्त्रांचे अध्ययन करून वक्ता म्हणून सांगितलेले आहेस.||६|| भावार्थ:---आणि विद्वच्छ्रेष्ठ भगवान व्यास,रामायण—महाभारत,सर्व आठरापुराणें,सहा शास्त्र,श्रीमद्देविभागवत महापुराण,श्रीमद्भागवतमहापुराण इत्यादी ग्रंथाचे रचित विद्वान असे असलेले व्यास—मुनी यांच्याकडे वक्ता जे सुतजी यांचे श्रद्धा ठेऊन,सेवा करून व श्रवण करून अध्ययन झालेले आहे.म्हणून विशेष सुतजी आहेत.||७|| | वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वं तत्व तस्तदनुग्रहात् |ब्रूय:स्निग्धस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यमप्युत ||८||
भावार्थ:---ती सर्व अभिप्रयासुद्धा त्या ऋषींच्या व व्यासाच्या अनुग्रहाने तू जाणत आहेस.कारण,प्रेमळ शिष्याला गुरु,जे कांही गुह्य असेल ते सुद्धा सांगतात.म्हणून आपण सदगुरूंवर श्रद्धा व सेवेच्या प्रयत्नाने सदगुरुंचा अनुग्रह--कृपा संपादन करावा.त्यामुळे सदगुरू आपणास जीव--ब्रह्म-ऐक्य ज्ञानाचा उपदेश करतात.||८|| भावार्थ:---आयुष्मन सूता,त्या त्या धर्माशास्त्रादिं ग्रंथांमध्ये मनुष्यांचे परमकल्याणकारक जे साधन तुला निश्चयाने समजले असेल तें आम्हांस सांगण्यास तू योग्य आहेस.ते—ते आम्हांस सांगावें.आपण--जीवांनी योग्य अधिकारीपुरुषापासून शास्त्र श्रवण करावें,कारण त्यांना जर समजले नसेल तर आपणांस--जीवांस कसे समजेल.उदा--विहिरीत पाणी असेल तर आपण--जीव प्रयत्न करून बाहेत काढूत आणि ते पाणी आपण पेऊन तृप्ती होईल.त्या विहिरीत पाणी नसेल तर आपण प्रयत्न करू शकणार नाहीत व त्यामुळे तहान नाहीसी होणार नाही.तहान नाहीसी न झाली तर आपणांस--जीवांस दु:ख निश्चित होणारच.||९|| भावार्थ:--- आपण जाणकार पुरुषाकडून श्रवण करावे,त्यामुळे आपले अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान होईल.||९|| भावार्थ:---हे साधू,या कलियुगात लोक प्राय: आळशी,मंदबुद्धी,मंदभाग्य आणि विविध दोषांनीयुक्त असे आहेत.आपण--जीवांनी आपण--जीव कलियुगात असल्यामुळे आळशी,न राहता प्रयत्न करून उद्दोगी असावे.मंदबुद्धी,न राहता अभ्यासू व्हावे.मंदभाग्य असल्यामुळे निष्काम कर्मे--दान,नामस्मरण,परोपकार,दु:खी जे जीव आहेत,त्यांचे दु:ख निवृत्त करून त्यांना सुख द्दावे.असे अनेक सत्कर्म केले असता आपण भाग्यवान बनावे.आणि अनेक दोषांनी युक्त आहोत,दोष निवृत्त करण्याकरिता स्वधार्मानुसार आचरण करावे व परधर्म किंवा अधर्मानुसार--परधर्मानुसार म्हणजेच निषिद्ध धर्मानुसार आचरण करू नये,असे केले असता आपला--जीवाचा दोष नाहीसा होऊन जीव निर्दोषी होतोत.उपाय अनेक आहेत,फक्त उपाय करणारांची उणीव आहे,आपण--जीवांनी ती उणीव नाहीसी करावी व परमार्थ करावाच.||१०|| | भूरीणि भूरिकर्मांणि श्रोतव्याणि विभागश:| | अत:साधोऽत्र यत्सारं समुद्यधृत्य मनीषया | | ब्रूहि न: श्रद्धानानां येनात्मा संप्र सीदति ||११|| भावार्थ:---आणि वर्णाश्रमविभागे करून श्रवण करण्याची शास्त्रे व कर्में पुष्कळ असून ती अनेक प्रकारच्या कर्तव्यांनी परिपूर्ण आहेत.यास्तव हे साधू सूता,येथे जे सारभूत असेल ते आपल्या बुद्धीने काढून श्रद्धावान अशा आम्हांला सांग;जे ऐकील्याने आमचे अंत:करण शुद्ध होईल.आपण--जीवानी अंत:करण शुद्ध होण्यासाठी वर्णाश्रम यांची धर्मे श्रवण करून त्यानुसार आचरण करावयाची आहेत.आपण फक्त कळून घेतली व त्यानुसार आचरण न केले तर अंत:करण शुद्ध होणार नाही म्हणजेच पापाचा नाश होणार नाही.जर जर पापाचा नाश न झाला तर त्या पापाचे जे फळ दु:ख आहे,ते दु:ख निश्चित भोग्यास येणार.म्हणून आपणास दु:ख मिळू नये व सुख मिळावे म्हणून वर्णाश्रमाचे धर्मे पाळावीच.||११|| भावार्थ:---दुसरा प्रश्न--हे सूता,तुझे कल्याण असो.भक्तांचा पालक जो भगवान तो वसुदेवाच्या देवकी—नामक स्त्रीच्या ठिकाणी कांही कार्य करण्याच्या हेतूने प्रगट झाला आहे,ते तू जाणत आहेस.भक्तासाठीच भगवंत आलेला असतो,म्हणून आपण त्यास ओळखून घ्यावे.||१२|| भावार्थ:---यास्तव हे सूता,ते ऐकण्याची इच्छा करणाऱ्या आम्हांस सांगण्याविषयी तू योग्य आहेस.ज्या परमेश्वराचा अवतार प्राणि मात्रांच्या पालनाकरिता आणि समृद्धीकरिता असतो.आपण--जीवांनी अधिकारी पुरुषाकडून श्रवण करावे,तर अनाधिकारीपुरुषाकडून श्रवण करू नये,कारण अनाधिकारी जो आहे,त्याचे अंत:करण शुद्ध नसते,त्यामुळे त्यास अनुभव नसतोच.ज्यांचे अंत:करण शुद्ध असते,त्यांना अनुभव असतो.||१३|| | आपन्न: संसृतिं घोरां यन्नाम विवशो गृणन् |तत: सद्यो विमुच्येत यद्विभेति स्वयं भयम् ||१४|| भावार्थ:---भयंकर--दु:खमय असलेल्या अशा संसारात जे अज्ञानी आपण--जीव आहोत,म्हणजेच परस्वाधीन आहोत,असे आपण—जीव भगवंतांच्या नांवाचे स्मरण—उच्चारण केले असता संसारातून मुक्त होतोत.म्हणून आपण—जीवांनी सदोदित भगवंतांचे स्मरण करावे.कोणतेही कार्य करीत असतांना मनातल्या—मनात नामांचे स्मरण करीत जीवन जगावे,कारण भगवंतांच्या नामस्मरणापुढे यम—दु:ख देणारा—भीतीदायक असलेला येऊ शकत नाही,असे निश्चितच आहेच.||१४|| | नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी | कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ||(ज्ञाने.म.हरि.अ.१५) भावार्थ:---हे सूता ज्या परमेश्वराच्या चरणांचा—अधिष्ठानांचा आश्रय करणारे—जाणणारे—अनुभवणारे शांत—समाधानी चित्त ऋषी,परमेश्वराचा—परमात्म्याचा आश्रय करणाऱ्या लोकांस—भक्तास पवित्र—शुद्ध—जीव-ब्रह्म—ऐक्य-ज्ञान देऊन मुक्त करितात.गंगेचे उदकही फक्त अंत:करण पवित्र करते पण संत—महात्मा अज्ञान निवृत्त करून ज्ञानाने पवित्र करतात. | गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा | पापं तापं च दैन्यं च हरे न्साधु समागम: || म्हणून आपण संत—महात्मा यांचा सत्संग करून पवित्र होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||१५|| भावार्थ:---पुण्यश्लोकपुरुषांनीही स्तुती करण्यास योग्य ज्यांची कृत्य आहेत;अशा भगवंतांचे कलीसंबंधी पापाचा नाश करणारे यश,अंत:करणशुद्धी व्हावी अशी इच्छा करणारा कोण बरे श्रवण करणार नाही?तर सर्व करतील.आपण--जीवांनी भगवंताची कृत्य श्रवण करावी,कारण त्यामुळे आपले अंत:करण शुद्ध होते किंवा पापाचा नाश होतो.||१६|| भावार्थ:---तिसरा प्रश्न---लीलामात्रानें ब्रह्मादी कला अवतार धारण करणारा जो भगवन त्याची नारादादि ऋषींनी गायलेली उदार कृत्ये,श्रद्धावान अशा आम्हांस सांगावी.आपण--जीवांनी ब्रह्मादी कला अवतार श्रवण करून गायन करावी.||१७|| भावार्थ:---चवथा प्रश्न---हे बुद्धिमान सूता,आपल्या मायेच्या योगाने यथेच्छ क्रीडा करणारा जो ईश्वर हरि त्याच्या शुभकारक--१—मत्स्य,२—कच्छ,३—वराह,४—नृसिंह,५—वामन-अवतार,६—परशुराम,७—रामावतार,८—कृष्ण-अवतार,९—बौद्ध व १०—भविष्य काळात कलकी—अवतार होणार आहे.त्या कथा आम्हांस सांगाव्यात.आपणही—जीवांनी त्या कथा सत्संग करून ऐकाव्यात,कारण त्यामुळे आपले अंत:करण स्थिर होते.||१८|| भावार्थ:---आपण भगवंतांच्या अवतारांच्या ज्या कथा आम्हांस सांगितल्या,त्या श्रवण करून आमच्या अंत:करणाची तृप्ती झाली नाहीं,कारण त्यातील प्रत्येक पदाने गोडी अधिकच वाढत गेलेली आहे.म्हणून अधिक कथा सांगाव्यात.आपण--जीवांनी अधिक कथा श्रवण कराव्यात.||१९|| भावार्थ:---पांचवा प्रश्न---स्वत: गूढ असून मायारूप कपाटाचा आश्रय करून मनुष्यावातर धारण करणारा जो श्रीकृष्ण भगवंतांनी बलराम-सहवर्तमान मनुष्यांच्या हातून जे न होणारे पराक्रम केले असतील ते आम्हांस सांगावीत.आपण--जीवांनी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पराक्रमांच्या कथा श्रवण कराव्यात.||२०|| भावार्थ:---आम्ही कलियुग प्राप्त झाले असे जाणून या विष्णूक्षेत्रीरुपी नैमिषारण्यामध्ये सहस्त्रसंवात्सरात्मक सस्त्राच्या उद्देशाने बसलो आहोत,म्हणून आम्हांस भगवंतांच्या कथा ऐकण्यांस अवकाश—वेळ आहे.म्हणून कथा सांगाव्यात.||२१|| भावार्थ:---समुद्रातून तरुण जाण्याची इच्छा कारणाऱ्या पुरुषांस अकस्मात नावाडी भेटावा,त्याप्रमाणे पुरुषांचे सत्व हरण करणारा जो हा दुस्तर कलीरूप संसार त्यास तरुण जाण्याची इच्छा करणारे आम्ही ऋषी—मुनी मंडळी आम्हांस व तुम्हांस ब्राह्मदेवांनीच गाठ—भेट पडून दिली आहे.हा पूर्व—पुण्याईची योग—योग आहे.||२२|| | ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रम्हण्ये धर्म वर्मणि | स्वां काष्ठामधुनोपेत धर्म: कं शरणं गत: ||२३|| भावार्थ:---धर्माचे कवचासारखे रक्षण करणारा,ब्राह्मणांचा कैवारी आणि योगेश्वर असा श्रीकृष्ण भगवान आता निजधामास गेला असता,आपल्या—मानवांच्या राक्षणांसाठी धर्म कोणांस शरण गेला?ते सांग.आपण--जीवांनीसुद्धा कोणाला शरण जावे,असे अध्यात्मिक प्रश्न सत्संगाच्याद्वारे संत--महात्मा यांना विचारावेत.संत--महात्मा यांना संसारातील प्रश्न विचारू नयेत.||२३|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|१-----असा श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम(१)—स्कांधामध्ये नैमिषारण्याच्या आख्यानाविषयी हा प्रथम(१),तेवीस (२३) श्लोकांनीयुक्त असलेला अध्याय समाप्त झाला.[१—२३] | || श्रीगुरूचरणार्विंदार्पणमस्तू—श्रीकृष्णार्पणमस्तू || |___________________________________________________________________________________||२----- याप्रमाणे प्रथम(१) अध्यायांत शौनादिक ऋषींनी सूताला जे सहा प्रश्न केले त्यांपैकी चार प्रश्नांचे उत्तर या द्वितीय(२) अध्यामध्ये सूतांनी दिलेले आहे.||२|| |१----- २---[भगवत्कथा आणि भगवद्भक्तीचे माहात्म्य] ____________________________________________________________________________________|व्यास उवाच---- व्यास म्हणतात:--- | इति संप्रश्नसंह्रष्टो विप्राणां रौमहर्षणि: | प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तूमुपचक्रमे ||१|| भावार्थ:---याप्रमाणे उत्तर प्रश्न केल्यामुळे अतिसंतुष्ट झालेला रोमहर्षाचा पुत्र जो उग्रश्रवानामक सूत त्यांने त्या शौनकादिकऋषींच्या वचनांची प्रशंसा करून उत्तर सांगण्यास आरंभ केला------------------आपण जर वक्ता असाल,तर प्रश्नकर्त्यांनी प्रश्न केल्यानंतर त्यांची प्रशंसा करून त्यांच्या प्रश्नांचे क्रमाक्रमाने समर्पक--समाधानपूर्वक उत्तरे द्दावीत.||१|| भावार्थ:---आरंभ करणे प्रथम म्हणजे सद-गुरुदेवता यांना नमस्कार करावा.श्रीगणेश,व माता संरस्वती--देवी यांना व जे ग्रंथ रचीयते आहेत,त्यांना नमस्कार करावा.त्यानंतर कथा सांगण्यास सुरवात करावी.तो सूताने असा केला की,ज्या शुकाची कोणतीच कर्मे करावयाची शेष राहिली नव्हती म्हणून सर्वसंगाचा परित्याग करून तो आश्रमांतून निघून एकटाच वनांत जाऊ लागला तेव्हा त्यास पुत्रविरहाने व्याकुळ झालेल्या व्यासाने,हे पुत्रा अशी लुप्तस्वराने हाक मारिली.तेव्हा त्याचे सर्वात्मत्व असल्यामुळे वृक्षांनीच “ओ”असे प्रत्युत्तर दिले,म्हणजे व्यासांनी मोहांत पडूं नये या हेतूने शुकानेच आपले सर्वात्मत्व दाखविण्याकरिता वृक्षांकडून उत्तर देवविले.म्हणजे शुकाचार्य म्हणजे भगवंतांचाच अवतार असल्यामुळे त्यातून त्यांचा सर्वज्ञत्व दिसून येते.असा सर्व प्राणिमात्रांच्या ह्रदयामध्ये योगसामर्थ्याने प्रवेश करणारा जो शुकदेव त्यांना मी नमस्कार करितो.आपणही आपल्या सदगुरूंना नमस्कार करावा.||२|| भावार्थ:---संसाररुपी अंधकारास तरून जाण्याची इच्छा करणाऱ्या संसारी लोकांच्या करुणेने--संसाररूपी अंधकारास तरुण जाण्यासाठी आत्मस्वरूपाचा असाधारण महिमा ज्यांत वर्णिलेला आहे,सर्वश्रृतीचे सार,सर्व पुराणांचे सार,सर्व शास्त्रांचे सार,रामायण—महाभारताचे सार असे असलेले श्रीमद्भागवत—महापुराण ज्याची बरोबरी करणारे दुसरे कोणतेही दुसरे शास्त्रे,पुराणें नाही,आत्मस्वरूपाला दिव्यासारखे प्रत्यक्ष दाखविणारे व सर्वपुराणामध्ये गुह्य असे हे भागवत-महापुराण ज्याने सांगितले त्या सर्व ऋषीचा गुरु अशा श्रीशुकाला मी शरण जातो.त्याचप्रमाणे आपणही आपले सदगुरू जे आहेत त्यांनाही नमस्कार करावा,मंगल कार्यांस आरंभ करावा.||३|| भावार्थ:---नारायण सर्व-पुरुषांमध्यें श्रेष्ठ असा नर,सरस्वती देवी,आणि व्यास यांना नमस्कार करून ग्रंथास नमस्कार करावा.म्हणून सूतांनी स्वत: त्यांना नमस्कार करून लोकांनींही तसेच करावे असा उपदेश केला आहें.आपणही श्रीमद्भागवत ग्रंथास सुरवात करण्यापूर्वी नारायण—नर,सरस्वती देवी,आणि व्यास यांना नमस्कार करून आपले सदगुरू स्वामी दिव्यानंद महाराज यांना नमस्कार करावा,कारण त्यांनी आपणांस जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान दानरूपाने दिलेले आहे.म्हणून आपणही इतरांना श्रीमद्भागवताचे ज्ञान दानरुपानेच(निष्काम)भावनेनेच द्दावे.असे केले तर कांही अंशी त्यांच्या ऋणांतून उतराई होण्याचा किंचित प्रयत्न आहे व कांही अंशी मोबदला(सकाम)घेतला तर कृतघ्नपणाचा दोष लागेलच.||४|| भावार्थ:---हे ऋषिहो—श्रोतेहो तुम्ही सर्वलोकांचे कल्याण करणारा असा हा फार चांगला मला प्रश्न केला आहे कि,म्हणजे श्रोत्यांनी वक्ता यांना असा प्रश्न करावा की ,त्यात आपलेही हित होऊन सर्व जीवांचे हित होईल असा प्रश्न करावा,कारण अशा प्रश्नाने वक्ता प्रसन्न होतो व प्रसन्नतेने उत्तर देतो,त्यामुळे सर्वांचेच कल्याण होते.ज्या कृष्णकथेच्या श्रवणाने अंतःकरण प्रसन्न होते त्या कृष्णकथेचाच तुम्ही—श्रोत्यांनीच हा प्रश्न केला आहे.म्हणून श्रीत्यांनीच आध्यात्मिक प्रश्न करावा.आपले वैयक्तिक प्रश्न करू नये.||५|| भावार्थ:---ज्या धर्मांच्या योगानें अधोक्षजभगवंतांचेठायी फलप्राप्तीची इच्छा नसणारी—संसारांची इच्छा नसणारी व जिच्या योगानें—निष्कमभक्तीच्या योगानें आत्मा सुप्रसन्न होतो अशी निष्काम दृढ भक्ती प्राप्त होते तोच पुरुषांना मोक्षप्राप्ति—जन्म—मरण निवारण करून देणारा सर्वंधर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म आहे.म्हणून आपण निष्काम धर्माचेच पालन करावे,त्यानुसारच आचरण करावे.||६|| | वासुदेवे भगवति भक्तियोगः प्रयोजित: | जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं च यदहेतुकम् ||७|| भावार्थ:---वासुदेवभगवंतांच्याठायीं निष्काम—अर्पण केलेला भक्तियोग,तत्काळ वैराग्य व फलेच्छारहित ज्ञान उत्पन्न करितो.म्हणजेच अत्यंत दु:खाची निवृत्ती करू शकतो व परमानंदाची प्राप्ति करू शकतो.याचा अर्थ असा होतो की, म्हणून आपण—जीवांनी निष्काम भक्ती योगाचाच स्वीकार करावा.यातच आपले—जीवांचे परम—हित आहे.||७|| भावार्थ:---आपण—जीवांनी उत्तम आचरण केलेला--सकाम—संसाराची इच्छा करणारा भक्तियोग हा भगवत्भक्तीच्याठाई प्रीति उत्पन्न करित नाही,त्यामुळे आपल्या—जीवांच्या ठिकाणी वैराग्य व ज्ञान उत्पन्न करु शकत नाही.त्यामुळे आपले—जीवांचे जन्म—मरण निवारण करू शकत नाही.त्यामुळे आपली—जीवांची अत्यंतिक दु:खाची निवृत्ती होत नाही व परमानंदाची प्राप्ति--मोक्ष हा जो शेवटचा—महत्वाचा पुरुषार्थ हे फळ देऊ शकत नाही.म्हनुअपन—जीवांनी निष्काम भक्ती योगच करावा.यातच आपले परम—हित आहे.मानव—जीवनाचे सार्थक आहे.यासाठीच ईश्वरांनी आपणास—जीवांस मानव—देह दिलेला आहे.मानवदेह सोडून इतर देह हे संसार करण्यासाठी—दु:ख भोगण्यासाठीच--तुरंगच दिलेले आहेत.||८|| | धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोsर्थायोपकल्पते | नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः||९|| भावार्थ:---कारण मोक्षप्राप्तिसंबंधी धर्मांचे फळ अर्थ--द्रव्य—मान—प्रतिष्ठा प्राप्ति नाही.धर्मं प्राप्तिचे साधन असे जे विषयभोगांचे—शब्द,स्पर्श,रूप,रस,आणि गंध हे फळ लाभधारक नाही,तर अंती दु:खकारक आहे.म्हणून आपण—जीवांनी निष्काम भक्तीयोगाचाच स्वीकार करून परमार्थच करावा.||९|| | कामस्य नेन्द्रियप्रीतिर्लाभो जीवेत यावता | जीवस्य तत्त्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः ||१०|| भावार्थ:---कामांचे—विषयांभोगाचे फळ इंद्रियांना संतुष्ट करणे नसून,त्यांना—इंद्रियांना आपल्या—जीवांच्या ताब्यात ठेऊन—शम हि साधना करून जीवन व्यतीत करणे आहे.ज्यायोगे प्राण शरीरात राहील,तेवढाचा विषयांचा भोग घेणे किंवा पुत्र—प्राप्ति व्हावी,म्हणून तेवढाच विषयांचा भोग घेणे,याप्रमाणे विषयांचा भोग घ्यावा,हाच आपला स्वधर्म आहे.जीवांनी जिवंत राहावे,कारण आपले स्वरूप कळून घेणे—सत्संग करणे,मानवता धर्मांचे पालन करून जीवन जगावे.जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा.यामुळे आपले--जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन आपण—जीव सुखरूप होतो.||१०|| भावार्थ:---तत्व म्हणजे काय ? तर “जे अद्वय ज्ञान त्याला तत्व असे तत्ववेत्ते पुरुष “तत्व” असे म्हणतात.”त्यालाच उपनिषांचा अर्थ जाणणारे “ब्रह्म” असे म्हणतात.हिरण्यगर्भाची उपासना करणारे “परमात्मा” असे म्हणतात.व भक्ती करणारे पुरुष “भगवान” असे म्हणतात.||११|| भावार्थ:---त्या आत्मरूप तत्वास श्रद्धावान्-मुनि,ज्ञान—वैराग्यांनी युक्त अशा वेदांत—श्रवणादिकेकरून संपादन केलेल्या भक्तीनें स्वत्म्याचे ठिकाणीच पाहतात.||१२|| भावार्थ:---यास्तव शौनकादि द्विजश्रेष्ठहो,ब्रह्मणादि वर्ण आणि ब्रह्मचर्यादि आश्रम यांच्या विभागाप्रमाणे उत्तम आचरण केलेल्या धर्मांचे मुख्य फळ हरीचा संतोष हाच आहे.म्हणून आपण—जीवांनी आपआपल्या ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र आणि आपापल्या आश्रमानुसार—ब्रह्मचारी,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रामानुसार स्वधार्मांचे पालन करून संतोष—समाधान प्राप्त करून घ्यावा.||१३|| | तस्मादेकेन मनसा भगवान् सात्वतां पति: | श्रोतव्य: कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च न नित्यदा ||१४|| भावार्थ:---यास्तव एकाग्र—स्थिर—मनात अन्य विषय न आणता अशा अंत:करणाने भक्तपालक—भक्तांचे पालन करणाऱ्या अशा भगवंतांची श्रवण,कीर्तन,ध्यान,आणि पूजन हि नित्य आपण—जीवांनी करावी.||१४|| भावार्थ:---आतां भक्ती मुक्ती देणारी आहें असें सांगतात-----ज्याच्या ध्यानरूप स्वङगें करून युक्त असे विवेकी—विचारी पुरुष,अहंकाररूप—अभिमान ग्रंथीला-अज्ञान—बंध उत्पन्न करणाऱ्या कर्मास तोडून टाकितात—म्हणजेच मिथ्यात्वाचा निश्चय करितात.त्याच्या कथेच्या ठायी प्रीती कोणता पुरुष करणार नाही;असे असेल तर अशा कथा—तत्वज्ञान तर सर्वही श्रवण करतील.आपण—जीवांनी श्रवण केल्यामुळे आपणास—जीवांस तत्वज्ञान उत्पन्न होऊन मोक्ष मिळेल.||१५|| | शुश्रूषो: श्रद्दधानस्य वासुदेवकथारुचिः | स्यान्महत्सेवया विप्राः पुण्यतीर्थनिषेवणात् ||१६|| भावार्थ:---आतां हरीकथेच्या ठायी प्रीती उत्पन्न होण्यास उपाय सांगतात-------हे विप्रहो,पुण्यकारक तीर्थांच्या सेवनाने निष्पाप झालेल्या पुरुषाला महत्सेवा घडते,कारण तीर्थांच्या ठिकाणी संत—महात्मा यांचे दर्शन व सेवा घडते.तिच्या योगाने म्हणजे दर्शन व सेवेमुळे त्याला धर्मांविषयी—स्वधर्मंविषयी श्रद्धा—विश्वास उत्पन्न होते,त्यानंतर नंतर श्रवणाची इच्छा म्हणजे सत्संग,करण्याची इच्छा उत्पन्न होते.तदनंतर भगवत्कथा श्रवण करणाऱ्या त्या पुरुषास वासुदेवाच्या कथेच्याठायी रुची—आवड उत्पन्न होते.म्हणून आपण—जीवांनी कथा श्रवण करण्यास प्रवृत्त व्हावें.असा आपल्या भाग्याचा उदय होतो.आपल्या भाग्याचा उदय झाला असता आपणास—जीवांस मोक्ष मिळतो.||१६|| | श्रृण्वतां स्वकथां कृष्ण: पुण्यश्रवणकीर्तन: | ह्रदयन्त:स्थो ह्यभद्राणि विधुनोति सुह्रत्सताम् ||१७|| भावार्थ:---नंतर ज्याचें श्रवण आणि कीर्तन हे निष्काम--पुण्यरूप आहेत असा सत्पुरुषांचा हितकारी भगवन्-श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये राहून त्यांच्या कामादि वासनेंचा—काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर असे जे प्रतिबंधनात्मक दोष आहेत,त्या सर्व दोषांचा नाश करितो.म्हणून आपण श्रीमद्भागवताचेच आवश्य श्रवण करावेच.||१७|| भावार्थ:---नंतर,निरंतर भगवद्भक्तांच्या किंवा भागवत—शास्त्रांच्या सेवेनें अंत:करणातील वासनारूप सर्व पापें नष्ट झालीं असतां पुण्यकिर्ती अशा भगवंतांचेठायी अचल—सदा—निरंतर निष्काम--भक्ती उत्पन्न होतें.म्हणून आपण श्रीमद्भागवत सदा—नेहमी श्रवण करावे.||१८|| भावार्थ:---तेव्हा रजो—गुण,व तमोगुण व त्यांपासून उत्पन्न होणारें काम,क्रोध,लोभ,मोह,मद,आणि मत्सर हे विकार ह्यांनी कांहींच क्षोभ—चंचल न पावणारे चित्त,सत्वगुणांचेठायी स्थिर राहून शांत होतें.म्हणजेच रजो-गुण व तमोगुणांचे अधिक्य कमी होऊन सत्व-गुणांचे अधिक्य अधिक होतें.त्यामुळे सत्व-गुणांचे अधिक्य अधिक झाल्यामुळे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाची आवड निर्माण होऊन,परमात्म्याचे परोक्ष-ज्ञान होते.त्यामुळे आपला—जीवांचा “ब्रह्म आहे”असें परोक्ष-ज्ञान होतें.||१९|| भावार्थ:---याप्रमाणें आपण—जीव निष्काम भगवद्भक्तीच्या योगानें शांतचित्त झाल्यामुळे सर्व ठिकाणी आसक्ती सुटलेला आपण—जीव--पुरुष आपल्याला—जीवाला भगवंतांच्या तत्वांचे अपरोक्ष-ज्ञान होतें.त्यामुळे आपल्याला—जीवाला मोक्ष प्राप्त होतो.त्यामुळे आपलेजन्म—मरण नाहीसें होऊन सर्वदू:खांची निवृत्त होऊन परमानंदाची प्राप्ती होते.||२०|| | भिद्दते ह्रदयग्रन्थिश्छिद्दन्ते सर्वसंशया: | क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे ||२१|| भावार्थ:---ज्ञानाचे फळ सांगतात-----स्वरूपभूत ईश्वराचा साक्षात्कार झाला असतां म्हणजे निर्गुण-निराकाराचा—परमात्म्याचा साक्षात्कार—अपरोक्ष-ज्ञान झाले असता--अनुभव आला असता त्या पुरुषाची अहंकाररुपी ह्रदयग्रंथी म्हणजे अज्ञानाचा नाश—बाध—झाला असता,असंभावनादि म्हणजे १—प्रमाणासंभावना:-—प्रमाण जी वेदवाक्यें तीं जीव-ब्रह्म-ऐक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्म-उपासना प्रतिपादक आहेत,असा जो संशय ती “प्रमाणासंभावना” म्हणावी.ती श्रवणाने निवृत्त होते.२—प्रमेयासंभावना:---जीव—ब्रह्माचा अभेद हें वेदांत—शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिंद्धात आहे.तो जीव-ब्रह्माचा अभेद सत्य आहे आहे किंवा भेद सत्य आहे,असा जो संशय त्यास “प्रेमेयासंभावना” म्हणतात.ही मननाने निवृत्त होते.३—विपरीत भावना:---अनेक जन्मांच्या संस्काराने देहादिकांच्या म्हणजे देह व देहसंबंधी व जडसंबंधी जसा सत्यत्व निश्चय,तसाच जीव-ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच;त्या विपरीत निश्चयास “विपरीतभावना” असे म्हणतात.त्या विपरीत भावनेचा नाश निदिध्यासनाने होतो.म्हणून आपण श्रवण,मनन,निद्धीध्यासन करावे.त्यामुळे परमात्म्याची अनुभूती—अपरोक्ष--ज्ञान—मोक्ष हे फळ मिळते.||२१|| | अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा | वासुदेवे भगवति कुर्वन्त्यात्मप्रसादनीम् ||२२|| भावार्थः---म्हणून बुद्धिमान पुरुष,नेहमी मोठ्या हर्षाने जो भगवान् त्याचे ठायी मनास प्रसन्न करणारी निष्काम भक्ति करितात.सकाम भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही.त्यामुळे भगवंतांचा साक्षात्कार होत नाही.म्हणून जन्म—मरण निवृत्त होऊन मोक्ष हा चवथा पुरुषार्थ प्राप्त होत नाही.म्हणून आपण निष्काम भक्तीच करावी.||२२|| भावार्थ:---आतां ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्म—विष्णू—महादेव तिघेही एकरूपच असून म्हणजे एकानीच तीन रूपे घारण केकेली आहेत.असे असले तरी त्यांमध्ये,वासुदेवाचे श्रेष्ठत्व सांगतात---सत्व,रज,आणि तम हे तीन प्रकृतीचे गुण आहेत,त्यांनी युक्त जो एक परम पुरुष भगवान् तो,तेथे या जगाचे पालन,उत्पत्ति आणि संहार करण्यासाठी विष्णु,ब्रह्मदेव आणि शंकर अशा संज्ञा धारण करितो,पण त्यांमध्ये सत्वगुणात्मक विष्णूपासून पुरुषांना शुभ फले प्राप्त होतात||२३|| भावार्थः---जसा स्वतः प्रकाशशून्य काष्ठापेक्षां त्यांतून उत्पन्न झालेला धूम किंचित् कर्मप्रर्तक असल्यामुळे श्रेष्ठ आहे आणि त्या धूमपासून उत्पन्न झालेला तीनवेदरुपी अग्नि वेदोक्त कर्मानुष्ठानास साक्षात् साधन असल्यामुळे त्या धूमाहून जसा श्रेष्ठ आहे,त्याप्रमाणे अज्ञानरुपी तमोगुणापेक्षां किंचित् ज्ञानरुपी रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्याहून साक्षात् ब्रहमज्ञानसंपादक सत्वगुण श्रेष्ठ आहे,म्हणजे शंकर तमोगुणोपाधिक,ब्रहमरजोगुणोपाधिक आणि विष्णु सत्वगुणोपाधिक असल्यामुळे ते उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत असे जाणावे.म्हणून आपण तमोगुण,रजोगुण हे दोन गुणांचे प्राबल्य फारच कामिकारून सातवा—गुणांचे अधिक्य आधी करावे,कारण सत्वगुणांमुळे जीव-ब्रह्म-ऐक्य—ज्ञान प्राप्त होते,त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते.||२४|| भावार्थ:---पुर्वी ऋषिंनीं विशुद्धसत्वमूर्ति अधोक्षज भगवंताचे—निर्गुण-निराकाराचे सेवन—अपरोक्ष-ज्ञान-अनुभव घेतला आहे,म्हणून त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप झाले आहेत.म्हणून आतांही त्या ऋषीप्रमाणें जे—आपण—जीव लोक परमेश्वराचे—परमात्म्याचे सेवन करितील—अपरोक्ष-ज्ञान म्हणजेच अनुभव घेतील,आपलें—जीवांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोल.म्हणून आपण श्रीमद्भगवताचे श्रवण करून परमात्म्याचे अपरोक्ष-ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यावा.त्यानंतर आपले—जीवांचे महा-कल्याण होईल.म्हणजे मोक्ष प्राप्त होईल.||२५|| भावार्थ:---कोणी सकाम पुरुष दुसऱ्या देवतेचे आराधन करणारे दिसतात,म्हणून त्यांना तात्पुरतेच सुख प्राप्त होते व तात्पुरतेच दु:ख निवृत्त होते व त्यांना पुन्हा—पुन्हा यमपुरीतील व चौऱ्याऐंसी योनीतील दु:ख भोगावेच लागतात.परंतु जे मुमुक्षु पुरुष आहेत ते कोणाचीही निंदा न करितां,भूतपति,पितर,पिशाच इत्यादिकांचा त्याग करून—त्यांची भक्ती न करता शांत अशा नारायणाच्या कलावतारांचे आराधन करितात.म्हणून आपण इतर भूपती,पितर,पिशाच्चांची भक्ती न करता जो भागवत—निर्गुण—निराकार आहे त्यांचीच निष्काम भक्ती करावी व जीव—रहम-ऐक्य-ज्ञान प्राप्त करून अनुभव घ्यावा.||२६|| भावार्थ:---तथापि ज्याचे स्वभाव पित्रादिकासारखेच रजोगुण तमोगुणात्मक आहेत असे कितीएक सकाम उपासक,संपत्ती ऐश्वर्य आणि संतति यांच्या प्राप्तीची इच्छा धरून पितर भूत आणि प्रजापती यांचे आराधन करितात आणि कदाचित त्यांपासून त्यांच्या कामनाही पूर्ण होतात.सकाम उपासकांच्या कामना कदाचित पूर्ण झाल्या तरी त्या कामना तात्पुरत्या दु:ख निवृत्त करतत व त्स्त्पुरातेच सुख देतात,म्हणून असे कृत्य हे अयोग्य आहे,म्हगावान्तंस सकाम भक्ती आवडत नाही ,तर त्यामुळे भगवंत सकाम भक्तांवर असंतुष्ट असतो.म्हणून सकाम भक्तांना भगवंत प्राप्त होत नाही.भगवंत महत्वाचा असतो,कारण भगवंत प्राप्त झाल्यावर आपण कायमचे सुखरूप होत असतोत.तथापि सर्वोत्कृष्ठ मोक्षफळ—कायमची दु:ख निवृत्ती व कायमची सुखारुपता फक्त देणारा वासुदेवच आहे.म्हणून भगवंतांची सर्व मुमुक्षूंनी निष्काम निष्काम--आराधना--भक्ती करावी.||२७|| | वासुदेवपरा वेदा वासुदेवपरा मखाः | वासुदेवपरं योगा वासुदेव परा: क्रिया: ||२८|| | वासुदेवपरं ज्ञानं वासुदेवं तप: | वासुदेवपरो धर्मो वासुदेवपरा गति: ||२९|| भावार्थ:---आतां सर्व शास्त्रे वासुदेवपरच आहेत असे सांगतात.सर्व शास्त्रे वासुदेव-भगवंतांच्या प्राप्तीसाठीच आहेत.वेद मुख्यत्वेकरून वासुदेवाचेच वर्णन करितात म्हणून वासुदेवपर आहेत,पंचमहायज्ञादियज्ञ,वासुदेवाच्या प्राप्तीसाठीच आहेत,सर्व योगशास्त्र वासुदेवाचे ठिकाणीच पर्यवसान पावणारी आहेत,स्नानसंध्यादि सर्व क्रिया वासुदेवप्रीत्यर्थच आहेत,वेदादि ज्ञानशास्त्रे वासुदेवप्रतिपादक,आहेत अपरोक्षज्ञान-शास्त्रही वासुदेवानुभवपरचआहे,दानव्रतादिविषयक धर्मशास्त्र वासुदेवपरच आहे,आपण हि सर्व साधनें निष्काम करावीत,सकाम करू नयेत.थोडक्यात भगवंतांचा सकामतेसी प्रतिकूलता आहे,तर निष्कामातेसी अनुकुलता आहे.म्हणून आपण—जीवांनी निष्कामतेसी अनुकूल वे,कारण भगवंत अनुकूल राहून मोक्ष हे फळ देतो.स्वर्गादिसकामकर्म हेही वासुदेवाविषयी आहेत ? कसे ? प्रारब्धाचा भोग संपल्यानंतर स्वर्गादि—सकाम--कर्में करणारा स्वर्गास जाऊन विनाशी विषयांचा भोग घेतो.तो विनाशी विषयांचा भोग घेत असतांना,त्याच्या अगोदर गेलेले सकामभक्तांची पुण्य संपल्यामुळे तेथूनच ते सकाम भक्त त्यांचेच पापांचे फळ भोगाण्याकरिता यम—पुरीस जातांना दिसतात.त्यामुळे त्यांतील कांही करतात कि,आपण सकाम कर्म करून चुकलो असून,आपण निष्काम कर्में व निष्काम भक्तीच करावयास पाहिजे होती,पण केली नाही.असा त्यांना स्वर्गात पश्चाताप होतो व तेथेच असा निश्चय करतात,”यानंतर मी कधीच सकाम कर्में करणारच नाही तर निष्काम कर्में व निष्काम-भक्तीच निश्चितरूपानेच करणारच—करणारच--करणारच.याचा अर्थ असा होतो कि स्वर्गादि फळ हे विषयांचा भोगासाठी दिलेले आहे किंवा त्यागासाठीच दिलेले आहे ? आपण पूर्ण-विवेक केला तर असे दिसून येते विषयांच्या त्यागासाठीच स्वर्गफळ दिलेले आहे,विषयांच्या भोगासाठीच दिलेले नाही,म्हणजेच वासुदेवासाठीच—परमात्म्यासाठीच—मोक्षासाठीच आहे.म्हणून आपण निष्काम भक्तीच करावी,सकाम भक्ती करू नये.||२८-२९|| भावार्थ:---कारण त्याच ह्या षड्गुणैश्वर्यसंपन्न—यश—श्री—औदार्य—ज्ञान—वैराग्य—ऐश्वर्य भगवंताने स्वत: निर्गुण व व्यापक असतां सत्व-गुणात्मक देवता,ऋषी—मुनि,रजो-गुणात्मक—मानव सृष्टी,तमोगुणात्मक पश्वादिकसृष्टी निर्माण केली आहे. असी कार्यकरणात्मक आपल्या मायेने प्रथम हे जग उत्पन्न केले आहे||३०|| भावार्थ:---आतां ईश्वराची प्रवेशादि लीला सांगतात-म्हणजेच भगवंतांनी संकल्पाने स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी निर्माण करून त्या मायेने उत्पन्न झालेल्या या आकाशादि पदार्थाचेठायी प्रविष्ठ होऊन तो भगवान स्वत: असंग व स्वप्रकाशचैतन्यरुपी असताही,हे सर्व पदार्थ माझ्या स्वाधीन आहेत अशा अभिमानाने युक्त असल्यासारखा भासतो.||३२|| भावार्थ:---जसा अग्नि,स्वत: सर्वत्र एकरूपच असून त्याला प्रकट करणाऱ्या काष्ठाचे ठिकाणी तो प्रविष्ठ झाला म्हणजे,त्या काष्ठाप्रमाणेच लांब,वर्तुळ इत्यादी नानाप्रकारचा भासतो,तसा जगदात्मा परमेश्वर,भूतांचेठायी प्रविष्ठ झाला असता नानाप्रकारचा भासतो.||३२|| |अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिलाभो बभूव | एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिलाभो बभूव||९||(कठो.व) भावार्थ:---हाच भगवान् भूतसुक्ष्मे(शब्दादिक पंच विषय) इंद्रिये आणि मन या त्रिगुणात्मक कार्यांनी स्वत: उत्पन्न केलेल्या जरायुजादि चारप्रकारच्या देहाचेठायी प्रविष्ठ होऊन त्या त्या इंद्रियांनी त्या त्या विषयांचा उपयोग करितो||३३|| | भावयत्येषु सत्वेन लोकान्वै लोकभावन: | लीलावतारानुरतो देवतिर्यङ्नरादिषु: ||३४|| भावार्थ:---आणि लोकास उत्पन्न करणारा,हाच भगवान देवामध्ये इंद्र ब्रह्मादिक,तीर्यग्जातींमध्ये मत्स्यकुर्मादिक आणि मनुष्यामध्ये रामकृष्णदिक अवतार घेवून सत्वगुणाच्या योगाने लोकांचे रक्षण करितो.||३४|| असा श्रीमद्भागवतमहापुरणातील दुसरा(२) अध्याय चौतीस(३४) श्लोकांनीयुक्त असलेला समाप्त झाला.[२—३४] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | ||श्रीकृष्णार्पणमस्तू—श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || | ____________________________________________________________________________________|३----प्रथम(१)अध्यामध्ये अवतार-कथा सांगण्याविषयी शौनकादिक ऋषींनी सुताजींना प्रश्न केला होता त्याचे उत्तर तृतीय अध्यायांत सूतजींनी पुरुषादिक अवतार व त्यांची निरनिराळी चरित्रे सांगून दिली आहेत.[भगवंतांच्या अवतारांचे वर्णन] |३-----___________________________________________________________________________________ |सूत उवाच:--- | जगृहे पौरुषं रूपं भगवान्महदादिभि: | संभूतं षोडशकलमादौ लोकसिसृक्षया ||१|| भावार्थ:---सुत म्हणाला---हे ऋषीहो,भगवंताचें सृष्टीच्या आरंभी सर्व चराचर विश्व उत्पन्न करण्याच्या इच्छेने,पुरुषावतार धारण केला.ते स्वरूप महतत्व,अहंकार,आणि पंच सुक्ष्मभुते(शब्दादिविषय)यांनी उत्पन्न झालेलें असून पंच ज्ञानेंद्रीय पंच कर्मेंद्रिय,मन,आणि पंचमहाभूतें या सोळा अंशांनी युक्त आहे||१|| भावर्थ:---प्रलयसमुद्रांत विश्रांती पावून समाधिरूप निद्रा करणाऱ्या ज्या पुरुषावताररुपी नारायणाच्या नाभिरूप डोहांतील कमलापासून विश्वस्त्रष्ट्यांचा (मरीच्यादि ऋषीचा)अधिपती ब्रहमदेव उत्पन्न झाला.||२|| भावार्थः---ज्या भगवंताच्या अवयवरूप उत्तम आधारांनी लोकरचनेचा विस्तार कल्पिला आहे,ते भगवंताचे स्वरूप विशुद्ध-सत्वरूप—निर्गुण—निराकार आणि अतिश्रेष्ठ होय.म्हणून आपण—जीवांनी निर्गुण-निराकाराच्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा.||३|| भावार्थः--या रुपाला योगी आपल्या ज्ञानचक्षूने पाहतात.म्हणून आपण—जीवांनी ज्ञान चक्षूने अनुभव घ्यावा.हे असंख्यात चरण,मांड्या,भूज,मुखे,मस्तके,कर्ण,नेत्र,नासिका,मुकुट,वस्त्रे,व कुंडले यांनी सुशोभित आहे.असंख्यात जे विरत स्वरूप आहे,ते सर्व जनार्दन—परमात्माच आहे.||४|| | एतन्नावताराणां निधानं बीजमव्ययम् | यस्यां शांशेन सृज्यन्ते देवतिर्यङ् नरादय: ||५|| भावार्थः---ज्या नारायणापासून ब्रहमदेव उत्पन्न होऊन त्यापासून—ब्रह्मदेवापासून झालेल्या मरिची आदिक ऋषींनी,देव, पशु,पक्षी,व मनुष्यादिक उत्पन्न केले आहेत,त्या नारायणाचे अविनाशी—परमात्मा हेंच पुरुषावतारस्वरूप,मत्स्यादिक अनेक अवतारांचे उत्पत्ति--स्थान व महाप्रयल-काळात लयस्थान आहे.||५|| भावार्थः---त्याच नारायणाचे १--प्रथम ब्राहमणरुपी “सनत्कुमार”अवतार धारण केला आणि इतरांस असाध्य असे अखंडित नैष्ठिक ब्रहमचर्यव्रत आचरण केले.म्हणून आपणही ब्रह्मचारी व्रताचे पालन करून,सदगुरुंचा स्वीकार करून जीव-ब्रह्म-ऐकत-ज्ञान प्राप्त करून त्या परमात्म्याचा अनुभव घ्यावा.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होउत.||६|| भावार्थः---त्याच यज्ञाधिपती देवाने या जगाच्या उत्पत्तिसाठी,हिरण्याक्षाने पाताळांत नेलेल्या पृथिवीचा उद्धार करण्याकरिता २--दुसरे “वराहस्वरूप” धारण केले||७|| भावार्थः---नंतर त्याच देवाने ऋषिवंशात ३--नारदनामक तिसरा अवतार घेऊन पंचरात्रागमनामक तंत्र कथन केले.ज्या तंत्रमार्गाने केलेली कर्मे मुमुक्षुजनांस मोक्ष देणारी होतात.म्हणून आपण पंचरात्रागननामक तंत्राचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त करावे.||८|| भावार्थः----चवथ्या अवतारामध्ये त्याने धर्मनामक ऋषीच्या संततीमध्ये ४--“नर आणि नारायण” अशी दोन ऋषिस्वरूपे घेऊन इतरांस अशक्य असा,चित्ताची शांतता करणारा तपश्चर्या करण्याचा मार्ग दर्शविला.आपणही—जीवांनी तपश्चर्या करावी.त्यामुळे आपले—जीवांचे अंत:करण शुद्ध व स्थिर होऊन ज्ञान मार्गाकडे ओढ निर्माण होऊन आरूढ होउत.||९|| | पन्चम: कपिलो नाम सिद्धेश: कालविप्लुतम् | प्रोवाचासुरये सांख्यं तत्त्वग्रामविनिर्णयम् ||१०|| भावार्थः---त्याच देवाने पांचवा ५--कपिलनामक अवतार घेऊन त्या सिद्धांचा ईश्वर अशा कपिलरूपाने आसुरिनामक ब्राह्मणास,ज्यांत तत्वांच्या समुदायाचा यथार्थ निर्णय सांगितलेला आहे असे सांख्यशास्त्र सांगितले.आपणही सांख्य—शास्त्राचा अभ्यास करावा.||१०|| भावार्थः---अत्री ऋषीने नारायणाजवळ तुमच्यासारखा मला पुत्र व्हावा असा वर मागितला असतां त्याच्यावर,हा माया पुत्रत्वाची इच्छा करितो अशी दोषदृष्टी न करीता देवाने,सहाव्या अवतारी त्याचे पुत्रत्व—दतात्रयरुपात स्विकारिले आणि अलर्कराजा—मदलसाचा दहावा पुत्र,प्रल्हाद,यदु व सहस्त्रार्जुन इत्यादिकांस आत्मविद्या सांगितली||११|| भावार्थः---नंतर रुचिनामक प्रजापतीपासून आकृतिनामक भार्येच्या उदरी ७—“यज्ञनामक” सातवा अवतार झाला,त्याने यामनामक देवगणांसहवर्तमान स्वायंभूवमुन्वतराचे संरक्षण केले||१२|| भावार्थः---त्यानेच आठव्या अवतारी नाभिराजाच्या मेरूदेवीस्त्रीचेठायी ८—“ऋषभनामक” अवतार घेऊन गृहस्थादिक सर्व आश्रमांतील लोकांनी वंद्य व धैर्ययुक्त पुरुषांनी सेवन करण्यास योग्य असा परमहंस योग्यांचा मार्ग स्वतः आचरण करून दाखविला.||१३|| भावार्थः---हे ब्राहमणहो,पूर्वी वेनराजा,ऋषीच्या शापाने मरण पावला,तेव्हा अराजकभयास्तव त्या ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नारायणाने नववा ९--पृथुनामक अवतार घेतला आणि गोरुपिणी पृथ्वीचे दोहन करून दुग्धरूपाने सर्व औषधी काढिल्या,त्या योगाने हा अवतार अत्युत्तम म्हणून प्रसिद्ध आहे||१४|| भावार्थः---तसेच चाक्षुष मन्वंतरांत सर्व समुद्र प्रलयकालाप्रमाणे एकत्र झाले असतां भगवंताने १०—“मत्स्यावतार” घेतला आणि पृथ्वीरूप नौकेत सत्यव्रत राजाला बसवून त्याचे रक्षण केले.तोच राजा पुढे वैवस्वतनामक मनु झाला||१५|| | सुरासुराणामुदधिं मथ्नतां मन्दराचलम् | दध्रे कमठरूपेण पृष्ठ एकादशे विभु: ||१६|| भावार्थः---पूर्वी देव आणि दैत्य हे अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्राचे मंथन करीत असतां,मंदराचल बुडूं लागला तेव्हा नारायणाने अवतारी अकराव्या—११—“कूर्मस्वरूप” धारण करून तो पर्वत आपल्या पृष्ठभागावर धारण केला.||१६|| | धान्वन्तरं द्वादशमं त्रयोदशममेव च | अपाययत्सुरानन्त्यान्मोहिन्या मोहयन् स्त्रिया||१७|| भावार्थः---त्या परमेश्वराने बाराव्या—१२—“धन्वंतरि” नामक अवताराने देवदैत्यांस अमृतकलश आणून दिला.आणि—१३--तेराव्या मोहिनीनामक स्त्रीरुपी अवताराने दैत्यांस मोहित करून देवांस अमृत पाजिले.||१७|| | चतुर्दशं नरसिंहं बिभ्रदैत्यन्द्रमूर्जितम् | ददार करजैर्वक्षस्येरकां कटकृद्यता ||१८|| भावार्थः---पुढे नारायणाने चवदावा—१४—“नारसिंहनामक” अवतार घेऊन ब्रहमवराने अतिदुर्जय झालेल्या हिरण्यकशिपुचे वक्षस्थळाचे ठिकाणी आपल्या नखांनी,बुरुड जसा लव्हाळ्याचे विदारण करितो तसे विदारण करून टाकिले.||१८|| भावार्थः---तो परमात्मा पंधरावा—१५—“वामनावतार” धारण करून बलीच्या यज्ञांत गेला,आणि बलीपासून सर्वस्व हरण करण्याच्या इच्छेने त्रिपाद भूमीची याचना केली आणि तीन पावलांत बलीचे सर्वस्व घेऊन स्वर्गलोकांचे राज्य इंद्रास दिले||१९|| | पंचदशं वामनकं कृत्वागादध्दरं बले: | पदत्रय याचमान: प्रत्यादित्सुस्त्रिविष्टपम्||१९|| भावार्थः---नारायणाने सोळाव्या—१६--परशूरामावतारी,ब्राहमणाचा द्रोहकरणारे दुष्ट राजे झाले असे पाहून,त्यांचा नाश होण्या--करिता एकविस वार निक्षत्रिय पृथ्वी केली.||२०|| | तत: सप्तदशे जात:सत्यवत्यां पराशरात | चक्रे वेदतरो: शाखा दृष्ट्वा पुंसोऽल्पमेधस: ||२१|| भावार्थः----नंतर सत्रावे—१७--अवतारी परशरापासून सत्यवतीचे ठायी “व्यासरूपाने” झालेल्या त्याच नारायणाने,अल्प बुद्धी झालेल्या पुरुषांस पाहून त्यांना ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून वेदरुपी वृक्षाच्या अनेक शाखा केल्या.||२१|| | नरदेवत्व मापन्न: सुरकार्यचिकीर्षया | समुद्रनिग्रहादीनि चक्रे वीर्याण्यत: परम् ||२२|| भावार्थः---नंतर आठरावे—१८--अवतारी नारायणाने,”राजाधिराज रामचंद्राचे” रूप धारण करून देवकार्य करण्याच्या इच्छेने सेतूबंधदिकेकरून समुद्रनिग्रहादिक अनेक पराक्रम केले.||२२|| | एकोनविंशे विंशतिमे वृष्निषु प्राप्य जन्मनी | रामकृष्णाविति भुवो भगवानहरभ्दरम् ||२३|| भावार्थः---पुढे—१९--एकुणीस व—२०--वीस या दोन अवतारांमध्ये भगवंताने बलराम व कृष्ण या दोन रूपांनी यादवकुलांत जन्मे घेऊन भूभार हरण केला.||२३|| | तत: कलौ सम्प्रवृत्ते सम्मोहाय सुरुव्दिषाम् | बुद्धो नाम्नाजनसुत: किकतेषु भविष्यती||२४|| भावार्थ:---नंतर कलियुग प्राप्त झाले असता,देवांचे द्वेष करणाऱ्या असुरांस मोहित करण्यासाठी तो—एकविसाव्या अवतारात २१--“भगवान्,बुद्धनामाने” जैनपुत्र,गयाप्रांतांतील देशांत उत्पन्न होईल.||२४|| | अथासौ युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु | जनिता विष्णुयशसो नाम्ना कल्किर्जगत्पति:||२५|| भावार्थः---नंतर कलियुगाच्या शेवटी सर्वराजे प्रजेच्या धनापहाराविषयी चोरांसारखे झाले असतां,सर्व जगाचा पालक तो आदिनारायण २२—व्या अवतारात “कल्की” या नांवाने विष्णुयशानामक ब्राह्मणापासून उत्पन्न होईल.||२५|| भावार्थः---हे ब्राह्मणाहो,जशा अक्षय महासरोवरापासून सहस्त्रावधि क्षुद्र नद्या निघतात तसे सत्वगुणाचा निधी अशा हरीपासून असंख्यात अवतार उत्पन्न होतात.भगवंत वरील सर्व अवतार अधर्मांचा—परधार्मांचा नाश—निवृत्ती करण्याकरिता व धर्मांची--स्वधर्मांची स्थापना करण्यांकरितां घेतात,त्यामुळे जीवांना सुख मिळावे किंवा सुखरुपता मिळावी भगवंतांचा हेतू—उद्देश असतो.म्हणून आपण—जीवांनी अधर्माचा—परधार्मांचा त्याग करून धर्मांचे—स्वधार्मांचे पालन आपल्या सुखाकरिता किंवा सुखरुपतेकरिता करावेच.भगवंत असे का करीतो?कारण आपण त्याचेच आहोत,देहसंबंधीचे नाहीत.||२६|| भावार्थ:----१--नारदादि महर्षि,२--स्वायंभुंवादिमनु,३—ब्रह्मादिदेव,४--महातेजस्वी मनूचे पुत्र,आणि ५--कश्यपदि प्रजापति हे सर्वहि त्या हरीचेच अवतार होत.||२७|| भावार्थ:---हे सर्व नारायणाचे अंशरुपी अवतार असून श्रीकृष्ण हा साक्षात् पूर्णब्रम्हस्वरूपी नारायणच होय.हे सर्वही अवतार प्रतियुगी इंद्राचे शत्रू जे दैत्य त्यांनी पिडीत केलेल्या लोकास सुख उत्पन्न करितात.जे दु:ख देतात,त्यांना दैत्य असे म्हणतात.दैत्य यांनी इतर-जीवांना—देवतांना दु:ख नये तर सुखच द्दावे.हा त्यांचा उद्देश असतो.म्हणून आपण—जीवांनी इतरांना दु:ख न देता सुखच द्दावे हाच आपला—जीवांचा स्वधर्म—मानवता—धर्म आहे,म्हणून आपण मानव असल्यामुळे मानवता-धर्मांचे पालन आवश्य करावेच.असे आचरण केले तरच सर्व—प्राणीं सुखी होतील,अन्यथा सुखी नाहीत.||२८|| | जन्मगुह्यं भगवतो य एतत्प्रयतो नर: | सायंप्रातर्गृणन् भक्त्यादु:खग्रामाव्दिमुच्यते||२९|| भावार्थ:---हे नारायनाचे अतिरहस्य अवतारचरित्र,जो मनुष्य प्रयत्नाने सायंकाळी व प्रात:काली भक्तिपूर्वक पठण करितो तो संसारांपासून मुक्त होतो.म्हणून आपण श्रीभगवंत—नारायनांचे अतिरहस्य—गुह्य असलेली—आपल्या उद्धारासाठी महत्वाची असलेली अवतार-चरित्रे संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावी—आपण पठण—उच्चारण करावी.||२९|| भावार्थ:---आता लिंगदेह व स्थूलदेह यांचा संबंध असतां जीवास मुक्ति कशी होते अशी आशंका आली असतां,तो देहसंबंध अज्ञानानें प्राप्त झाला आहे म्हणुन नारायणाच्या श्रवणमननादि साधनांनी झालेल्या ज्ञानाने तो दूर होतो अशा अभिप्रायाने सांगतात–---स्वत: निराकार व केवळ शुद्धज्ञानस्वरूप अशा जीवाचें हे स्थूल शरीर,भगवंताच्या मायेपासून झालेल्या महत्तत्वादि साधनांनी परमात्मस्वरूपाचेठिकाणी रचिलें आहे.जीव स्वत: निराकार शुद्धस्वरूप असून अज्ञानामुळे स्वत: देह व देहसंबंधी माझे व विषयांमुळे सुख मिळते असिभावना करून जीवन जगात आहे.म्हणून आपण सत्संग करून,अज्ञान निवृत्त करून,ज्ञान प्राप्त करून,त्या परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||३०|| | यथा नभसि मेघौघो रेणुर्वा पार्थिवोऽनिले | एवं दृष्टरि दृश्यत्वमारोपितमबुद्धिभि:||३१|| भावार्थ:---जसे अज्ञानी जन,वायूच्या आश्रयानें असणाऱ्या मेघांचा आकाशाचेठिकाणी आरोप करितात म्हणजे मेघांनी वायूचा आश्रय घेतला असे न समजता मेघांनी आकाशाचा आश्रय घेतला असे म्हणतात.किंवा पृथ्वीसबंधी धुरळ्याचा वायूचे ठिकाणी आरोप करितात म्हणजेच ती धूळ पृथ्वीची असून वाऱ्याचीच आहे,असे समजतात.तसा अज्ञानी लोकांनी सर्वसाक्षी जो दृष्टा आत्मा त्याचे ठिकाणी या दृश्य स्थूल शरीराचा आरोप केला आहे.वास्तविक पाहता स्थूल—शरीरलाच आत्मा—मी शरीरसंबंधी माझे असे समजून जीवन जगत आहेत.वास्तविक पाहता आपण सर्वसाक्षी द्रष्टा असून परमात्मा आहोत.असे समजून आपण जीवन जगावे.असे म्हणून जीवन जगल्यास आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होउत.आपण“देह मी आहे व देहसंबंधी माझे आहेत”असे समजून जर जीवन जगलोत तर यमपुरी व चौऱ्याऐंसी योनिं पुन्हा—पुन्हा जाऊन दु:खच भोगावे लागेल,यात मुळीच शंका नाही.म्हणून विवेक करून जीवन जगावे.||३१|| | अत: परं यदव्यक्तमव्यूढगुण व्यूहितम् | अदृष्टाश्रुतवस्तुत्वात्स जीवो यत्पुनर्भव: ||३२|| भावार्थ:---आणि आपण—मी—जीव या स्थूलशरीराहून निराळे,हस्तपादादि अवयवरूपाने परिणाम न पावलेल्या सत्त्वादिगुणांनी रचिलेले,आकाररहित,अतिसूक्ष्म—शरीराहूननिराळे,आणि दिसणाऱ्या पदार्थांसारखे व श्रृत होणाऱ्या इंद्रादि देवांसारखे नसून वारंवार जन्मास येते ते शुक्ष्म शरीर असून,त्या शरीरास राहण्यासाठी स्थूल शरीर आहे.अज्ञानामुळे आपणास—मला—जीवांस असे न वाटता सूक्ष्म—शरीर मी व स्थूल-शरीर मी व स्थुला-शरीर—संबंधी माझे असे आपणास—मला—जीवांस वाटून जीवन जगत आहे.म्हणून त्यास “जीव” असें म्हणतात आपल्या—माझ्याठीकानी जीवांच्याठीकानी त्या लिंगदेहरूपी सुक्ष्म--शरीराचाही आत्म्याचे ठिकाणी आरोपच केला आहे.म्हणून आपण सत्संग करून मी—आपण—जीव यांनी अज्ञान निवृत्त करून “मी ब्रह्म आहे” असा निश्चय करावा.--आरोप निवृत्त करून अपवादात्मक असावे.||३२|| | यत्रेमे सदसद्रूपे प्रतिषिद्धे स्वसंविदा | अविद्द्याssत्मनि कृते इति तद्ब्रह्मदर्शनम् ||३३|| भावार्थ:----यास्तव जेंव्हा जीवास आपल्या मूळस्वरूपाचे ज्ञान होऊन त्याच्या योगानें हि दृश्यअदृश्यरुपी स्थूलसूक्ष्मशरीरें अविध्येनें आत्मस्वरूपाचे ठायी कल्पित आहेत,वस्तुत:खरी नाहींत, | सदा विचारस्येत् तस्मात् जोगत् जीव परात्मन: | जीवभाव जगत् भाव स्वात्मैव शिष्यते ||(पंचदशी) असा यांचा खात्रीने निषेध—निश्चय होतो,तेव्हां हा जीव ब्रहम--स्वरूपी ऐक्य पावतो.त्यामुळे आपले—जीवांचा जन्म—मारांनिवृत्त होऊन सुखस्वरूप होतो.||३३|| | यद्देषोपरता देवी माया वैशारदी मति: | सम्पन्न एवेति विदुर्महिम्नि स्वे महीयते ||३४|| भावार्थ:---संसाररुपाने क्रीडा करणारी हि परमेश्वराची माया,जेव्हां ईश्वराच्या कृपेनें आपल्या आवरणविक्षेपशक्ति टाकून विद्दारुपानें परिणाम पावते,म्हणजे स्थूल सूक्ष्मरूप दोन्ही उपाधींचा त्याग करून काष्ठरहित अग्निसारखा शांत होते तेव्हां हा जीव ब्रहमस्वरुपाला पावोन आपल्या परमानंदस्वरूपी शोभतो.म्हणून आपण आपल्या उपाधींचा त्याग करावा.||३४|| भावार्थ:----याप्रमाणे मायासंबंधाने जीवास जशी जन्मादिक प्राप्त होतात म्हणजे अज्ञानावस्थेत—मायाच्यास्वीकार केल्यामुळे संसार—जन्मादिक प्राप्त होतात.तशींच सत्संगाद्वारे अज्ञान निवृत्त केल्याने व जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त केल्याने जन्मरहित,अकर्ता व सर्वांतर्यामी जो परमेश्वर त्याचींही,गुह्यरीतीनें वेदांत वर्णन केलेली,जे तत्व त्या तत्वांचा अनुभव घेतल्याने जन्में व कर्में निवृत्त होऊन ब्रह्मा या तत्वांचा अनुभव येतो.असे सर्व कवींनीं वर्णन केली आहेत.||३५|| | स वा इदं विश्वममोघलील: | सृजत्यवत्यत्ति न सज्जतेsस्मिन् | | भूतेषु चान्तर्हित आत्मतन्त्र: | षाङ्वर्गिकंजिघ्रति षड्गुणेश: ||३६|| भावार्थ:---त्याचा—भगवंतांच्या लीला सफल आहेत.तोच ईश्वर हे चराचर जग उत्पन्न करितो,पालन करितो,संहार करितो,आणि तोच षड्गुनैश्वर्यसंपन्न परमात्मा,त्वचा,नेत्र,कर्ण,जिव्हा,नासिका व मन या सहा इंद्रियाचा नियंता व स्वतंत्र असून सृष्टिकाली सर्व प्राणिमात्रांचा अंतर्यामी होऊन क्रमाने सहा इंद्रियाच्या स्पर्श,रूप,शब्द,रस,गंध आणि चिंतन या सहा विषयांचा दुरून गंधग्रहण केल्यासारखे स्वीकार करितो.परंतु त्याविषयांत आसक्त होत नाही.ईश्वर हा सर्वज्ञ असल्यामुळे विषयांत आसक्त होत नाही,म्हणून ईश्वर हा स्वत्रंत्र आहे व जीव हा अज्ञानी असल्यामुळे आसक्त होते म्हणून परतंत्र आहे, इतकाच ईश्वर-जीवांचा स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यरुपी भेद आहे.म्हणून आपण--जीवांनी विषयांचा त्याग करून विषयांत आसक्त होऊ नये.आपण—जीवांनी विषयांचा विशायान्चात्याग करून परमात्म्यासी एकरूप व्हावे.||३६|| भावार्थ:---जसा अज्ञानी पुरुष बहुरुप्याचा कृतीस जाणत नाहीं,तसा परमेश्वराची भक्ती न करणारा कुत्सितबुद्धीचा कोणीही प्राणी,आपल्या इच्छेने व वेदवचनांनी नांवे आणि रूपें प्रसिध्द करणाऱ्या या ईश्वराच्या सृष्टयादिक लीला तर्कांदिचातुर्यांने जाणूं शकत नाही.म्हणून आपण—जीवांनी सत्संग करून कुत्सित-बुद्धी निवृत्त करून भगवंतांच्या लीलांवर श्रद्धा ठेऊन जाणून घ्याव्यात.त्यामुळे आपले—जीवांचे अंत:करण शुद्ध व स्थिर होऊन भगवंतांच्या निर्गुण—निराकार तत्व जाणण्याचा अधिकार प्राप्त होतो.म्हणून आपल्यात—जीवांत अधिअर प्रप्थोण्यासाठी भगवंतांच्या लीला जाणून घ्याव्यात.||३७|| भावार्थ:---परंतु जो भक्त,निष्कपटभावाने आणि निरंतर अनुकुल वर्तनानें त्या परमेश्वराच्या चरणकमलसंबंधी गंधाचे सेवन करितो म्हणजे चरण-कमळ—परमात्म्याचा आनंद घेतो,तोच त्या अनंतपराक्रमी चक्रपाणी परमेश्वराचे लीलामार्ग जाणतो—जीवान--मुक्तीचा विलक्षण भोगितो.||३८|| | अथेह धन्या भगवन्त इत्थं | यद्वासुदेवेsखिललोकनाथे | | कुर्वन्ति सर्वात्मकमात्मभावं | न यत्र भूय: परिवर्त उग्र: ||३९|| भावार्थ:---आतां सुत,भक्तीमार्गाविषयीं प्रवृत्त झालेल्या शौनकादीऋषींच्या सन्मान करितात---–वक्ता यांनी श्रोतेहे अधिकारसंपन्न असतील,त्या श्रोत्यांचा सन्मान करावयास पाहिजे,कारण सन्मानामुळे श्रोत्यांचा उल्हास अधिक वाढत असतो व अधिकार अधिकवाढवण्याचा प्रयत्न करीत असतात.हे सर्वज्ञ ऋषीहो,या नैमिषारण्यांत आपण कृतकृत्य आहां.कारण,या उत्तम प्रश्नांनी तुम्ही आपली मनोवृत्ति अनन्यभावाने सर्वलोकांचा अधिपती जो वासुदेव त्याचेठीकाणीं ठेविला आहे.ज्याअर्थी आपण संसारिक प्रश्न न विचारता आध्यात्मिक—परमाम्याविषयक प्रश्न केलेले आहेत,त्यावरून श्रोत्यांना भगवंतांविषयी किती श्राद्ध व आपुलकी आहे हे सिद्ध होते.या प्रकारची आपली—जीवांची अशी भावना असतां,पुन्ह: महाभयंकर जन्ममरणरूपी भोंवरा प्राप्त होत नाही.म्हणजे आपले—जीवांचे जन्म—मरण निवृत्त होतात.||३९|| | इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् | उत्तमश्लोकचरितं चकार भगवानृषि: ||४०|| भावार्थ:---हें भागवतनामक पुराण,वेदतुल्य असून,कारण यात भागवतानामक महापुराणात यांत सर्व वेदांचे सार,सर्व सहा शास्त्रांचे सार,रामायण-महाभारताचे सार-अतिमहत्वांचा सार जसे दुधातून तुपाचे सार काढले,त्याप्रमाणे सर्वांतून सार काढ- लेले आहे.म्हणून श्रीमद्भागवात-महापुरणाचे श्रावण करून आपले महाकल्याण—मोक्षरूपी फळ घ्यावे.यांत प्रामुख्यांने पुण्य—श्लोक--विष्णूचें चरित्र आहे.हें साक्षात वेदव्यासाने निर्माण केलें आहे.हें—श्रीमद्भागवत—शास्त्र धनप्राप्तीसकारण म्हणजे संसारिक फळ गौणरूपाने जे विनाशी आहे,तेही देणारे आहे.हे कल्याणकारक,म्हणजे प्रामुख्याने अविनाशी—मोक्ष-फळ देणारे आहे,व अत्यंत पूज्य असून म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देणारे आहे.||४०|| भावार्थ:---सर्व वेद व भारतादि इतिहास यांचें सार काढलेलें आहे.हें भागवत,व्यासाने लोकांच्या कल्याणासाठीं—सुखरुपतेसाठी—मोक्षासाठी—जन्म-मरण निवृत्तीसाठी काढले—लिखित केलेले आहे.व्यासांनी आत्मनिष्ठ—ज्यांची आत्म्यावरच निष्ठा आहे व जे योग्यांमध्ये श्रेष्ठ अशा आपल्या शुकनामक पुत्रास पढविलें.व्यासांनी आपला पुत्र म्हणून श्रीमद्भागवत सांगितले नसून पुत्राचा मुख्य अधिकार पहिला,म्हणून श्रीमद्भागवत—शास्त्र सांगितले.वास्तविक पाहता श्रीमद्भागवत—शास्त्र श्रावण करण्यासाठी अधिकार लागत नाही,कारण श्रवण करीत असतांनाच अधिकार येतो व त्यामुळे ज्ञान होते.||४१|| भावार्थ:---नंतर त्या शुकानें हे राजधीराज परीक्षिति राजाला ऐकविले.तो परीक्षिती राजा,अतिवैराग्याने मरणकालापर्यंत अनशनव्रताचा संकल्प करून नारदादि ऋषीसहवर्तमान भागीरथीच्या तीरी बसला होता.शुकाचार्यांनी राजा परिक्षितीला श्रीमद्भागवत—शास्त्र सांगितले,कारण त्याला भागवत ऐकण्याची तीव्र जीज्ञासा होती व अनाशनव्रत स्विकारीले होते.आपणसुद्धा राजा परीक्षितासारखे वैराग्यसंपन्न होऊन भागवत श्रावण करावे,कारण आपणांसही मोक्ष मिळेल.||४२|| | प्रायोपविष्टं गंङ्गायां परितं परमर्षिभि: | कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभि: सह: ||४३|| भावार्थ:---हे ब्राह्मणहो त्या,गंगातीरीं महातेजस्वी श्रीशुकनामक महर्षि,परीक्षिती राजास भागात कथन करीत असतां (श्रीसूतजी) त्या स्थळीं गेलों आणि त्यांच्याच अनुग्रहाने भागवत—कथा श्रवण करण्यास बसलों.याचा भावार्थ असा होतो की,वक्ता जरी आपण असलोत तरी भागवत—कथा आहे,त्यावेळेस इतर वक्त्यांनी श्रोता म्हणून श्रवण करावे.||४३|| | कलौ नष्टदृशामेष पुराणार्कोsधुनोदित: | तत्र कीर्तयतो विप्रा विप्रर्षेर्भूरितेजस:||४४|| भावार्थ:---तेथे श्रीशुकमुनींनी संक्षेपानें कथन केलेलें भागवत,मी जसें रोज अध्ययन केलें आहे,तसे तसे स्वबुद्धयनुसार विस्तराने तुम्हांस सांगतों श्रीसूतजींनी श्रीशुकाचार्यांकडून जे भागावात्श्रावान्केले,तेच आता—तुम्हांस शौनकादी मुनीस सांगत आहे,असा नामोच्चार करून सांगतात,त्याप्रमानेआपानाही वक्ता असुत तर ज्याच्याकडून श्रवण केले,त्याचा नामोच्चार करावा.||४४|| | कृष्णे स्वधाभोपगते धर्मज्ञानादिभि:सह | कलौ नष्टशामेष पुराणार्कोधुनोदित: ||४५|| | भावार्थ:---श्रीकृष्ण,धर्मज्ञानादिकांसहवर्तमान निजधामास गेला असतो,कलीमध्ये ज्ञानचक्षुहीन झालेल्या पुरुषांच्या उद्धारासाठी आतांस हा भागवतनामकपुराणरूप सूर्य उदय पावला आहे.भगवंत श्रीकृष्ण आज—कलियुगात मृत्यू—लोकात नसलेतरी पण श्रीमद्भागवत—शास्त्र जे व्यास लिखित आहे ते श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्तीच आहे.म्हणून आपण त्या भावनेने श्रीमद्भागवत श्रवण करावे व आपले म्हाहीत—मोक्ष प्राप्त करून घ्यावा.||४५|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|३-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील पहिल्या(१)स्कंधातील हा तिसरा(३)अध्याय पंचेचाळीस—(४५) श्लोकांनियुक्त समाप्त.||३—४५|| | ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |४---आता या चौथ्या(४)अध्यायात,भगवतास आरंभ करण्याच्या हेतूने तप व प्रवचन इत्यादी कर्मांनी व्यासांच्या अंत:करणास समाधान झाले नाही असे वर्णिले आहे.||४|| |४-----[महर्षी व्यासांचा असंतोष] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | इति ब्रुवाणं संस्तुय: मुनीनां दीर्घसत्रिणाम् | वृद्धः कुलपति: सूतं बह्वृच: शौनकोsब्रवीत् ||१|| भावार्थ:---व्यास म्हणतात:--–मी तुम्हांस भागवत ऐकवितों असें बोलणाऱ्या सूताची प्रशंसा करून,महासत्र करणाऱ्या ऋषींमध्ये वृद्ध कुलपति आणि ऋग्वेदी वृध्द असा शौनक ऋषि म्हणाला की---------||१|| भावार्थ:---हे सूतां तूं महाभाग्यशाली मोठा वक्ता आहेस,कारण शुकाचार्यांच्या मुखातून कथा ऐकण्यास भाग्यवान लागतो, सामान्य मनुष्य त्यांच्या मुखातून कथा ऐकवू शकत नाही.म्हणून आपण—जीवांनी भाग्यवान वक्ता यांच्या मुखातून कथा श्रवण करण्यासाठी--श्रोता होण्यासाठी निरंतर निष्काम भक्ती अधिक करणे फारच जरुरी आहे.ऐश्वर्य संपन्न श्रीशुकाचार्यांनी जी पुण्यकारक भगवती कथा परीक्षितीस सांगितली आहे ती आम्हांस सांगा.आमचेही आपल्यासारख्या भाग्यावांतांकडून कथा ऐकण्याचे भाग्य उदयास आलेले आहे,कारण ज्यांनी भगवान व्यास मुनी आणि शुकाचार्यांच्या मुखातून कथा ऐकिली आहे अशा थोर महात्मा—आपणाकडून(सूतजीकडून)ऐकण्याचे भाग्य आम्हांस लाभत आहे.||२|| | कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना: | कुत:अञ्चोदित: कृष्ण: कृतवान् संहितां मुनि: ||३|| भावार्थ:---हि कथा,कोणत्या युगांत,कोणत्या ठिकाणी कोणत्या कारणांने उत्पन्न झाली?आणि कोणी प्रेरणा केल्यावरून व्यासमुनीने हि भागवती संहिता केली?||३|| | तस्य पुत्रो महायोगी समदृङ् निर्विकल्पक: | एकान्तमतिरुन्निदो गूढो मूढ इवेयते ||४|| भावार्थ:---त्या व्यासाचा पुत्र जो श्रीशुकाचार्य तो महायोगी,सर्व भेदभावरहित,म्हणजे शुकाचार्यंत कोणत्याही प्रकारचा भेद—पांचही प्रकारचा भेद नव्हता—द्वेत नव्हते तर अद्वेत—तत्व—परमात्मा एकच तत्व असे.त्यांचे एकाग्रचित्त होते,कारण एकात—अद्वेतात चित्त एकाग्र असते व द्वेतात चित्त चंचल असते.म्हणून आपण सत्संग करून अद्वेत जीवन जगावे तर द्वेतात्मक जीवन जगू नये.द्वेतात भीती व चान्चाता असते तर अद्वेतात भीती नसते तर एकाग्रता—स्थिरता—समाधानात असते.म्हणून आपण—जीवांनी शुकाचार्यांसारखे होण्याचा प्रयत्न करावा.माया संसारापासून जागृत झालेल्या असून म्हणजे मायाचा अभावच आहे.माया तत्व असले तरी ते भासंयापुरते आहे,असण्यापुरते नाही.जसे दोरीवर भासलेला साप हा दिसंयापुरता असून असण्यापुरता नाही.जेव्हा दोरीचे दोरी म्हणून ज्ञान झाले तर तेव्हा साप नव्हताच,तर दोरीच होती,पण दोरी,दोरी म्हणून कळाली नव्हती म्हणून साप भासत होता.असे आपणास विवेकांती काळात असते.म्हणून आपण विवेकापुर्वक जीवन जगावे.शुकाचार्य गुप्तरीतीने म्हणजे सामान्य—रूपाने—अंहकाररहित जीवन जगात होते,आपणही अंहकाररहित जीवन जगावे,कारण ते जीवन समाधानी असते.शुकाचार्य प्राकृत जनांस मुढासारखा भासत होते,कारण अज्ञान्याप्रमाणे वागत होते—सामान्यासारखे वागत असत.आपणही सामान्यासारखे जीवन जगावे.||४|| भावार्थ:---एके समयी परित्याग करून नग्नपणे जाणाऱ्या शुकाचार्यांच्या मागून त्यास हाक मारण्याकरिता व्यास निघाले. व्यासांनी वस्त्र परिधान केलेला होते;पुढे एका तलावामध्ये अप्सरा नग्न होऊन जलक्रीडा करीत होत्या त्यांनी व्यासास पाहताच लज्जेने आपापली वस्त्रे परिधान केली,नग्नपणे गेलेल्या शुकाचार्य पाहून व्यासाने त्या अप्सरास प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले कि,तुम्हांस’हि स्त्री आणि हा पुरुष’अशी भेद्बुद्धी आहे म्हणून आम्ही वस्त्रे परिधान केली,ज्यांच्यात भेदबुद्धि असते त्यांच्याशी इच्या भावनेतून व्यवहार केल्या जातो. पवित्रदृष्टी अशा तुमच्या पुत्राचेठायी ती भेद्बुद्धी नाही म्हणून आम्ही वस्त्रे धारण केली नाहीत.ज्यांच्यात अभेद बुद्धी असते,त्यांच्यात अभेद-बुद्धीनेच व्यवहार केला जातो.अज्ञानी अवस्थेत भेद-बुद्धी असते तर ज्ञानी अवस्थेत अभेद-बुद्धी असते.म्हणून आपण सत्संग करून अज्ञान निवृत्त करून म्हणजेच भेद—बुद्धी निवृत्त करून ज्ञानाद्वारे अभेद-बुद्धी करून जीवन जगावे.लोकाचारात जीवन जगत असतांना कल्पित भेद व वास्तव अभेद म्हणून जीवन जगावे.||५|| भावार्थ:---असा तो शुकाचार्य,उन्मत्तासारखा--मुक्यासारखा व जडासारखा फिरत असता,तो प्रथम कुरु व जांगल या देशांत प्राप्त होऊन नंतर हस्तिनापुरांत संचार करीत असता तेथील लोकांनी त्यास कसे जाणले?||६|| अर्थ:--बा सूता,त्या पांडूवंशस्थ परीक्षिती राजर्षीचा श्रीशुकमुनिंद्राबरोबर संवाद तरी कसा झाला ! कि,ज्यामध्ये हि भागवती संहिता प्रकट झाली||७|| अर्थ:---तो महाभाग्यवान श्रीशुकाचार्य,गृहस्थाश्रमी लोकांच्या घरी फारतर गाईची धार काढतात तितका वेळ त्यांची घरे पवित्र करीत असता भिक्षेच्या मिषाने उभा राहतो.म्हणजे जो संन्याशी किंवा ब्रह्मचारी आहे,त्यांनी गृहस्थाश्रमी आहे, त्यांच्या घरासमोर फक्त भिक्षेच्या निमित्ताने थोडा क्षण उभे हवे,तर अधिक काळ उभे राहू नये.गृहस्थाश्री यांच्या घरी बसू नये किंवा थांबावू नये तर मुक्काम तर मुळीच करू नये.मक्कम करण्याचा प्रसंग आला तर ब्रह्मचार्यांचा आश्रम किंवा संन्यासांचा आश्रम किंवा देव-मंदिरात जेवण किंवा मुक्काम करावा.असेच आचरण करून गृहस्थाश्रामांचे घर पवित्र करावे.ब्रह्मचार्यांना किंवा संन्यासाश्रामाधारी जे आहेत,त्यांना गृहस्थाश्रमी जे आहेत,त्यांनी आपल्या घरी अधिक काळ थांबवून घेऊ नये.जेवण किंवा मुक्काम आमच्या घरी करा असा आग्रह न करता मंदिरात किंवा आश्रमात व्यवस्था आपल्या मार्फत करावी.मंदिरात किंवा आश्रमात स्वयंपाक किंवा कोरडा सिदा—धान्य—दक्षणा देऊन व्यस्था करावी.||८|| | अभिमन्युसुतं सूत प्राहुर्भागवतोत्तमम् | तस्य जन्म महाश्चर्यं कर्मांणि च गृणीहि न: ||९|| अर्थ:---हे सूता,अभिमन्यूचा पुत्र जो परीक्षित राजा तो भगवद्भाक्तांत श्रेष्ठ होता असे म्हणतात.त्याचे महदाश्चर्यकारक जन्म आणि कर्मे आम्हांस सांगा.कारण भगवद्भाक्तांची किंवा भगवंतांची चरित्रे हि आपणास—जीवांस बोध घेण्यास योग्य असतात.आपले सद्गुण वाढण्यास व दुर्गुणांचा त्याग करण्यास उपकारक असतात.म्हणून आपण श्रवण करावीत.||९|| | स सम्राट् कस्य वा हेतो: पांण्डूनां मानवर्धन: | प्रायोपविष्टो गंङ्गायामनादृत्याधिराट्श्रियम् ||१०|| अर्थ:---पांडवाची कीर्ती वाढविणारा चक्रवर्ती तो परीक्षित राजा आपल्या राज्यसंपत्तीचा त्याग करून भागीरथीच्या तीरी कोणत्या कारणास्तव मरणाच्या संकल्पाने बसला.आपणही कमी-कमीत आपल्या वयाच्या पन्नास वर्षानंतर आपल्या घर-संपत्तीचा त्याग करून पवित्र-नदीच्या ठिकाणी स्नान व सत्संग करण्याकरिता वास्तव्य करून जीवन जगावे.||१०|| अर्थ:---हे सूता,शत्रू आपल्या काल्यासाठी पुष्कळ नजराणे अर्पण करून ज्या परीक्षिती राज्याच्या पाय ठेवण्याच्या आसनावर नमस्कार करितात,त्या वीराने स्वत:तरुण असता,त्याग करण्यास अश्यक्य अशा राज्य लक्ष्मीचा प्राणासहवर्तमान त्याग करण्याची इच्छा त्याने कशासाठी केली ! ||११|| भावार्थ:---जे लोक,भगवत्परायण असतात ते लोकांचे कल्याण,समृध्दि व ऐश्वर्य हि व्हावी म्हणूनच वांचतात,आपल्या स्वार्थाकरिता वांचत नाहीत.असे असता या राजाने दुसऱ्यास आश्रय देणारे आपले शरीर,विरक्त होऊन काय म्हणून टाकिले ! ||१२|| भावार्थः---हे सूता,तुला येथे जे काही आम्ही विचारिले आहे,ते सर्व आम्हांस कथन कर.कारण कि तूं ब्राहमण,क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांहून निराळा असल्यामुळे वेदाखेरीज अन्य पुराणादिक वाणीच्या अर्थाविषयी पारंगत आहेस असे आम्ही समजतो.मानवांची--वक्त्याची जात हि गौण असते तर गुण—ज्ञान महत्वाचे असते,म्हणून आपणही जीवन जगत असतांना जातीस गौण स्थान देऊन गुणांना—ज्ञानास मुख्य स्थान देऊन जीवन व्यतीत करावे.||१३|| |सूत उवाच | द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये | जातः पराशराद्दोगी वासाव्यां कलया हरे:||१४|| भावार्थ:----सुत म्हणाला-–हे शौनका,कृत,त्रेत द्वापार आणि कलिही च्यार युगे फिरताफिरता तिसऱ्या वेळी द्वापर युग प्राप्त झाले तेव्हा नारायणाच्या अंशाने पराशर-ऋषीपासून वासवीचेठिकानी म्हणजे वसुनामक राजापासून उत्पन्न झालेल्या सत्यवतीचेठिकाणी योगी(ज्ञानी) व्यास प्रकट झाला.||१४|| भावार्थ:--तो एके दिवशी सरस्वती नदीच्या पवित्र उदकांत स्नानसंध्यदि नित्यकर्मे करून सूर्योदयाचे वेळी एकांत स्थानी(बदरिकाश्रमांत)बसला होता.१५|| भावार्थ:---भूतभविष्य जाणणारा व अमोघदृष्टि अशा त्या व्यासऋषीने,ज्याच्या वेग पाहण्यात येत नाही अशा कालाच्या योगाने युगायुगाचेठिकानी भिन्नभिन्न असलेल्या धर्मांच्या परस्पर संकर झाला आहे असे पाहून||१६|| भावार्थ:---व त्याच कालाने केलेला पंचमहाभूतात्मक देहांचा जो शक्तिऱ्हास त्याला आणि आस्तिक्यबुद्धिरहित,धैर्येरहित, मंदबुद्धि,अल्पायुषी आणि दुर्भाग्य अशा लोकांना ज्ञानदृष्टीने पाहून सर्व वर्ण व आश्रम यांचे हित कसे होईल ह्याविषयी तो(व्यास-मुनी)चिंतन करू लागला ||१७-१८|| भावार्थ:--नंतर चार ऋत्विजांनी हवन करण्याचे जे वेदोक्त कर्म ते लोकास पवित्र करणारे आहे असे पाहून यज्ञमार्ग निरंतर चालावा म्हणून त्याने एका वेदाचे चार विभाग केले.||१९|| | ऋग्यजु: सामाथर्वाख्या वेदाश्चत्वार उद्धृता: | इतिहासपुराणं च पश्चमो वेद उच्यते ||२०|| भावार्थ:--ते ऋत्वेग,यजुर्वेद,सामवेद,आणि अथर्ववेद असे शाखाभेदाने निरनिराळे केलेले आहेत आणि इतिहास व पुराणें हा पांचवा वेद असा म्हटला आहे.||२०|| भावार्थ:---त्यांमध्ये पैलनामक ऋषीने ऋग्वेदाचे अध्ययन केले.जैमिनी कवि,सामगायन करणारा झाला,आणि एकटाच वैशंपायन ऋषि,यजुर्वेदांत निष्णात झाला.||२१|| भावार्थः---तसाच समंतुनामक क्रूरऋषि,अथर्ववेदाचा आचार्य झाला.आणि इतिहास,व पुराने ह्यांत माझा पिता रोमहर्षन पारंगत झाला.||२२|| भावार्थ:---त्या ह्या सर्व ऋषींनी आपापल्या वेदांचे अनेकप्रकारे विभाग केले,तेव्हा त्या ऋषीचे शिष्य व त्यांचे शिष्य अशाप्रकारे ते वेद शाखायुक्त झाले||२३|| भावार्थ:---जे वेद पूर्वी बुद्धिमान पुरुषानीं धारण केले होते तेच वेद मंदबुद्धी पुरुषांनी जसे ग्रहण केले जातील तसे दिनवत्सल भगवान व्यासाने त्यांचे विभाग केले.बुद्धिमान व मंद-बुद्धी पुरुषांचा विचार करून वेदांचे विभाग केले,त्याचप्रमाणे आपणही बुद्धिमान व मंद-बुद्धिमान असा विचार करून कोणतेही कार्य करावे.कोणाचीही उपेक्षा करू नये.सर्व मानवांचा विचार करावा.||२४|| | स्त्रीशूद्रद्विजबन्धूनां त्रयी न श्रुतिगोचरा | | कर्मश्रेयसि मूढानां श्रेय एवं भवेदिह | | इति भारतमाख्यानं कृपया मुनिना कृतम् ||२५|| भावार्थ:---तसेच स्त्रिया,शुद्र पतित झालेलब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य,यास वेदांच्या श्रवणाचा अधिकार नाही म्हणून,कर्मे करून कल्याण साधण्याविषयी मूढ अशा त्या स्त्रीशुद्रादिकांचे या लोकी कल्याण कसे होईल? अशा कृपेने युक्त त्या व्यासाने भारतरूप आख्यान केले.व्यासांनी मानव—जात,समोर ठेऊन व स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांचे—अखिल मानवांचे कल्याण होईल अशा स्वरूपाचे ग्रंथ संपदा निर्माण केली.कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही.||२५|| भावार्थ:---हे शौनकादि ऋषीहो,याप्रमाणे निरंतर सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाविषयी अनेकप्रकारच्या उपायांनी सदा प्रवृत्त झालेल्या व्यासाचे हृद्य—अंत:करण जेव्हा संतुष्ट होईना—समाधानाला—स्थिरतेला होईना,--------------- ||२६|| भावार्थ:---तेव्हा हृद्य संतुष्ट झालेल्या धर्मवेत्त तो श्रीवेदव्यास,तसे होण्याचे कारण काय ? या बद्दल सरस्वतीनदीच्या पवित्रतीरी एकांती बदरीकाश्रमांत बसून तर्क करीत असता आपल्याशीच असे म्हणाला की,----------- ||२७|| भावार्थ:---मी नैष्ठिक ब्रह्माचर्यादी व्रते धारण करून म्हणजे स्वधार्मांचे—नैष्टिक ब्रह्मचर्यादि व्रतांचे पालन केले,त्याचप्रमाणे आपणही नैष्टिक ब्रह्मचारी व्रताचे पालन करावे.वेद,गुरु व अग्नि यांचा निष्कपटपने म्हणजे निष्काम—कामनारहित आदर केला आणि त्यांची आज्ञाही मान्य केली,म्हणजे वेदांचे म्हनण्यासुर आचरण केले,आपणही वेद,गुरु आणि अग्नी यांची निष्काम—कामनारहित सेवा करावी.||२८|| | भारतव्यपदेशेन ह्याम्नायार्थश्च दर्शित: | दृश्यते यत्र धर्मादि स्त्रिशूद्रादिभिरप्युत||२९|| भावार्थ:--तसाच भारताच्या—विश्वातील मिषाने—निमित्ताने सर्ववेदांचा अर्थही दर्शविला;तो असा कि,ज्यापासून स्त्री-शूद्रादि-- कांनीसुद्धा आपापले धर्मवगैरे ज्याच्या—त्याच्या अधिकारापासून आपआपल्या स्वधर्मांचे पालन करता येईल.||२९|| भावार्थ:----असे असतांही माझा हा देह स्थित आत्मा वस्तुत: परिपूर्ण असून,ब्रहमतेजस्वी ऋषीमध्ये अतिश्रेष्ठ असतांही आपल्या स्वरूपाशी तादात्म्यप्राप्ती न झाल्यासारखे भासतो.अजून मी ब्रह्म-तेजस्वी सर्व-श्रेष्ठ असून मला माझ्या स्वरूपाचा अनुभव आला नाही.यास कायकारण आहे ? असा विवेक—विचार व्यासाजी करू लागले.म्हणून आपणही आपल्या स्वरूपाचा अनुभव येण्याकरिता प्रयत्न करावा.आपण कारणाकडे जाण्याचा प्रयत्न करावा.याकरिता सत्संग करावा.सत्संग हा संत—महात्मा यांच्यावर श्रद्धा ठेऊन,सेवा करून व अज्ञाचे पालन करून करावा.||३०|| भावार्थ:---अथवा मी भागवत धर्म विस्तराने निरुपण केले नाहीत कि काय ? कारण,ते भागवत धर्म,परमहंसास (सदसद्विवेक ज्ञानसंपन्नांस)प्रिय असून तेच नारायणासहि आवडतो आहेत.भागवत धर्म हा विवेकी—पुरुषास व भगवंत यांना आवडतो,म्हणून आपणास भागवत धर्म आवडयास पाहिजे.||३१|| भावार्थ:---याप्रमाणे आपल्या आत्म्यास असंतुष्ट मानून तो व्यास खिन्न आला असतां,पूर्वी सांगितलेल्या त्या व्यासाच्या आश्रमांत नारद ऋषी प्राप्त झाले.||३२|| | तमभिज्ञाय सहसा प्रत्युत्थायागतं मुनि: | पूजयामास विधिवन्नारदं सुरपूजितम् ||३३|| | भावार्थ:---तेव्हा व्यासने नारदमुनि आले असे पाहून तत्काळ अभ्युत्थान दिले आणि देवांनीही पूजित अशा त्या नारदाची विधियुक्त पूजा केली.आपल्याकडे संत—महात्मे यांचे आगमन झाल्यानंतर आपण उभे संत—महात्म्ये यांना आसन देऊन,त्यांची पूजा—सन्मान करावयास पाहिजे—आदर करावयास पाहिजे.असे करण्यात आपलेच हित असते.||३३|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|असा श्रीमद्भगवतनामक महापुराणातील प्रथम(';;क;ल्ज्ल;[कल[-पक १)स्कंधात हा चवथा(४) अध्याय तेहतीस(३३-)श्लोकांनियुक्त समाप्त झाला. | || श्रीकृष्णार्पणमस्तू—श्रीसदगुरुचराणार्पणमस्तू | ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ५----- व्यासाचे चित्त प्रसन्न होण्यासाठी नारदाने त्यास सर्वधर्मांपेक्षा हरिच्या कीर्तनाच्या महत्वाचा उपदेश हा प्रकार या पांचव्या(५) अध्यायांत सांगितला आहे. [भगवंतांच्या यश—कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र] | ५----- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | अथ तं सुखमासीन उपासीनं बृहच्छ्रवा: | देवर्षि: प्राह विप्रर्षि वीणापानि: स्मयन्निव ||१|| भावार्थ:----सूत म्हणाले---नंतर हातांत विणा घेवून सुखाने बसलेला महायशस्वी नारद,समिपभागी बसलेल्या विप्रश्रेष्ठ व्यासाला किंचित हास्य केल्यासारखे प्रसन्न मुखाने म्हणाले की------------------||१|| भावार्थ:----नारद म्हणाले----महाभाग्यशाली पराशरनंदना व्यासा,तुझा शरीराभिमानी आत्मा शरीराने किंवा मनाचा अभिमानी आत्मा मनाने संतोष पावत आहे काय ?||२|| भावार्थ:---तुला जे धर्मादिक जाणावायचे होते ते तूं उत्तमप्रकारे जाणले आहेस आणि त्याप्रमाणे त्याचे अनुष्ठानही—आचरण केले आहेस.कारण,धर्मार्थादि—धर्म.अर्थ,काम,आणि मोक्ष असे सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण असे अत्यद्भुत महाभारत तूं केले—रचिले—सांगितले आहेत.म्हणून आपण—जीवांनी व्यासांचा महाभातात ग्रंथ श्रवण करावा,त्यामुलेआपानांस चार—पुरुषार्थ प्राप्त होऊन जन्म—मरण निवृत्त होऊन सुखारुपता प्राप्त होईल म्हणजेच आपल्या इच्छित पुरुषार्थांची—धर्म,अर्थ,काम,व मोक्ष यांची प्राप्ति होइल.||३|| भावार्थ:---आणि जे सनातन परब्रहम त्याचा तू विचार करून प्राप्तीही करून घेतली आहेस,असे असताही हे प्रभो,तू आपणास कृतार्थ नसल्यासारखे मानून शोक करितोस हे काय ? ||४|| अर्थ:---व्यास म्हणाले---–हे नारद ऋषे तुम्ही जे सांगितलें ते सर्व जरी माझे ठिकाणी आहे तथापि माझा बाह्य किंवा अंतरात्मा संतोष पावत नाही.यास्तव समजण्यांत न येणारे असे त्याचे मुळकारण,काय आहे ?आपणांस जे समजले नाही —कळाले नाही, ते आपण आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत,त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन नम्रतेने विचारावे,कारण त्यामुळे आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळून आपणांस समाधान मिळत असते.याकरिता आपण ब्रह्मदेवाचे पुत्र आघादज्ञानसंपन्न अशा तुम्हांस मी विचारितो.||५|| अर्थ:---तुम्ही संपूर्ण गुप्त ज्ञान म्हणजे वेदांताचे ज्ञान जाणता.कारण,जो असंग असून कार्यकारात्मक सृष्टीचा नियंता पुरण-पुरुष,आपल्या संकल्पमात्रेकरुन सत्व,राज,तम या गुणांनी जगाचे उत्पत्ती स्थिती संहार करितो त्या आदिनारायणाची तुम्ही उपासना केली.आपण—जीवांनी आदिनारायणाची निष्काम—उपासना करावयास पाहिजे,कारण तो ईश्वर आहे.||६|| अर्थ:---तुम्ही सूर्यासारखे त्रैलोक्यात संचार करीत असून आपल्या योग सामर्थ्याने वायुसारखे सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी संचार करून त्यांच्या बुद्धीच्या वृत्ती जाणणारे आहां म्हणजे आपण सर्वज्ञ आहांत.यास्तव सगुण-निर्गुण ब्राह्माचेठायी तपयोगवगैरे साधनांनी पारंगत आहात,म्हणून आपणही सगुण—निर्गुण ब्रह्म जाणून ज्ञानात पारंगत व्हावे.माझे जे काही न्युन्य असेल ते सांगा.आपल्यात न्यूनता असेल तर,असलेली न्युनता घालविण्याकरिता श्रेष्ठांना नम्रतेने विचारावे.||७|| | भवतानु दितप्रायं यशो भावतोऽमलम् | येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम् ||८|| अर्थ:----श्रीनारद म्हणाले----हे वेद व्यास,तू भगवंताचे पवित्र यश प्राय: वर्णिले नाहीस कारण,हा अंतर्यामी भगवान त्या शुध्द यशाच्या वर्णाखेरीज दुसऱ्या धर्मादिकांच्या ज्ञानाने संतुष्ठ होत नाही.म्हणून भगवंताच्या यशाव्यतीरीक्त जे तुझे ज्ञान ते अपुरे आहे असे मी मानितो.म्हणून आपण जो ईश्वर,भक्तांचे रक्षण करण्यांकारिता व धर्मांची स्थापना करण्यांकारिता पुन्हा—पुन्हा अवतार धारण करितो,त्यांचे आपण नम्रतेने गुण—वर्णन करावे.त्यामुळे तो ईश्वर आपल्यावर संतुष्ट होऊन सुख—समाधान देत असतो.म्हणून आपण जो श्रीमद्भागवत ग्रंथ आहे,तो ग्रंथ पुन्हा—पुन्हा ऐकावा व सांगावा.त्यामुळे आपल्यावर भगवंत संतुष्ट होऊन समाधान देतात.||८|| अर्थ:--हे मुनीश्रेष्ठ,तू धर्म अर्थ काम,मोक्ष हे चारहि पुरुषार्थ व त्यांचे साधनामार्ग जसे वर्णिले आहेस तसा वासुदेवाचा महिमा प्रधान्येकरून वर्णन केला नाहीस.म्हणून आपण वासूदेवाचा महिमा—स्तुती प्राधानेकरून वर्णन करावा.||९|| अर्थ:---मनोहर पदरचनेने रचलेल्याही वाक्याने जर जगास पवित्र करणारे हरीचे यश कधीही वर्णन केले नसेल तर ते वाक्य,कावळ्यासारखा विषयी पुरुषाचे क्रीडाष्ठान आहे असे सत्पुरुष मानतात.कारण ब्रह्माच्याठिकाणी रममाण होणारे शुद्ध सत्वगुणात्मक परमहंस तसल्याठिकाणी रममाण होत नाहीत तसे ||१०|| अर्थ:---व्याकरणादि नियमाप्रमाणे पाहता,अपशब्दादिकांनी युक्त असलेल्याही ज्या वाणीच्या प्रयोगांमध्ये प्रत्येक श्लोकांत सत्पुरुषांनी,दुसरा वक्त्या असता श्रवण केलेली,श्रोता असता पठाण केलेली व वक्त्याश्रोत्यांच्या अभावी स्वत:च गायन केलेली अशी अनंत भगवंताची,यशाने चिन्हित नावे असतात तोच वाणीचा प्रयोग(ग्रंथ)सर्व लोकांच्या पापाचा नाश करणारा होय.||११|| अर्थ:---मायिक उपाधींना नाश करणारो कर्मनिवृत्तीपर जे ज्ञान,तेही नारायणाच्या भक्तीने रहित असेल तर अत्यंत शोभत नाही,म्हणजे त्या ज्ञानाने ब्राम्ह्साक्षात्कार होत नाही.म्हणून आपण निष्काम कर्मे व निष्काम भक्ती तर ती कर्मेव ती निष्काम भक्ती शोभून दिसते व सकाम कर्मे व सकाम भक्ती असेल तर शोभून दिसत नाही,म्हणून आपण निष्काम कर्मे व निष्काम भक्ती करावी.मग साधनकाळी व फलकाली निरंतर दुख:रुप अशी सकाम व निष्काम कर्मे ईश्वरास अर्पण केली नाहीत तर ती कसी शोभतील ! कारण,बहिर्मुख वृत्तीने केलेल्या कर्मांनी चित्तशुद्ध होतच नाही.म्हणून अंतर्मुख कर्मे व अंतर्मुख भक्तीच करावी,कारण त्यामुळे अंत:करण शुद्ध व अंत:करण स्थिर होते.असे असेल ब्रह्म-ज्ञान होते व अनुभवयास येते,त्यामुळे जन्म—अरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते.||१२|| अर्थ:---यास्तव हे महाभाग्यवान व्यास,तू यथार्थज्ञानसंपन्न,शुध्दयशस्वी,सत्याविषयी तत्पर आणि वर्तधारण करणारा तू आहेस,पण भगवंतांच्या सगुण—साकार असलेल्या अवतार लीलांचे वर्णन आपल्याकडून झालेले नही.म्हणून हे कार्य आपल्याकडून घडलेलेनही,म्हणून आपणांस समाधान—शांती मिळत नाही.म्हणून आपण भगवंतांच्या ज्या सगुण—साकारांच्या—कृष्ण-अवतारांच्या लीलांचे वर्णन करावे.म्हणून व्यासांनी सर्व संसार बंधापासून मुक्ती होण्यातही उरुक्रम भगवंताच्या लीलांचे समाधीने चिंतन करुन्श्रीमाद्भागावात ग्रंथ निर्माण केला.त्यानंतर व्यास-मुनी संत—समाधानी झाले. म्हणून आपण यानंतर सगुण—साकार असलेला जो कृष्ण-अवतारांच्या लीलांचे श्रवण व वक्ता म्हणून कथा सांगाव्यात,तेव्हा आपणांस—जीवांस सुख—समाधान—शांती मिळेल व त्यानंतर जीव-ब्रह्म—ऐक्य-ज्ञान प्राप्त करून त्या निर्गुण-निराकार परमात्म्याचा अनुभव घेऊन जन्म—मरण निवृत्त करून सुखरूप व्हावे.||१३|| अर्थ:---त्या उरूक्रमभगवंताच्या दुसऱ्याच गोष्टीकडे दृष्टी ठेवणाऱ्या व दुसऱ्याच प्रकाराने नामरुपदिकांचे वर्णन करण्याची इच्छा करणाऱ्या तुझी बुद्धी,त्या वर्णन करण्याच्या इच्छेने मनांत आलेल्या सौंदर्यादि रूपांनी व स्वर्गादी नावांनी चंचल होऊन ती वादळांत सांपडून जिकडेतिकडे बहकणाऱ्या नौकेप्रमाणे कोणत्याही काळी व कोणत्याही विषयांचे ठिकाणी आश्रय पावणार नाही.||१४|| | जुगुप्सितं धर्मकृतेऽनुशासत: | स्वभावर क्तस्य महान् व्यतिक्रम: | यद्वाक्यतो धर्म इतीतर:स्थितो | -न मन्यते तस्य निवारणं जन: ||१५|| अर्थः---यास्तव,निंदित काम्यकार्मांदिकांचे ठिकाणी स्वभावानेच तत्पर असलेल्या पुरुषास धर्मासाठी त्याच सकामकर्मरूप निंद्य धर्मास सांगणाऱ्या तुझा हा मोठा अन्याय आहे.कारण,ज्या तुझ्या वाक्याने,हाच धर्म आहे,असा निश्चय करून राहिलेला मूढ जन,दुसऱ्या तत्वज्ञानी पुरुषांचे त्या काम्यकर्मादिकांच्या निषेधास हा खरा आहे असे मानीत आहे.व्यास-मुनींच्या म्हणण्याचा वास्तविक अर्थ सामान्य लोकांस न कळल्यामुळे काम्यकार्मांकडे लोक प्रवृत्त होत आहेत व निष्काम कर्म व निष्काम भक्ती करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.तत्वज्ञानी पुरुष यांनी काम्यकार्मांचा निषेध केलेला आहे,मात्र सामान्य लोकांना असे कळत नाही.म्हणून आपण (व्यास-मुनींनी)निष्काम कर्म व निष्काम भक्तीचे वर्णन करावे व संदर्भात भगवंतांच्या सगुण—साकार असलेलाकृष्ण--अवतारांच्या लीलांचे वर्णन करावे व सांगावे.||१५|| | विचक्षणोऽस्यार्हति वेदितुं विभो- रनन्तपारस्य निवृत्तित: सुखम् | | प्रवर्तमनस्य गनैरनात्मन- स्ततो भवान्दर्शय चेष्टितं विभो: ||१६|| भावार्थः---एखादया निपुण—अधिकारसंपन्न—विवेकी—विचारिक पुरुषालाच सर्व कर्माच्या निवृत्तिने,अंतपाररहित—अनंत अशा व्यापक परमात्म्याचे सुखस्वरूप जाणता येते,परंतु तसे सर्व—अज्ञानी—अविवेकी—अविचारी लोकांस कळत नाही, यास्तव हे समर्था व्यासा,सत्त्वादि गुणांच्या योगाने प्रवृत्तीमार्गांत आसक्त झालेल्या—सकाम—मार्गांत-संसारिक-मार्गांत पुण्यात्मक मार्गांत व शरीर,मी आहे व शरीरसंबंधी—स्त्री-पुत्रादिक माझे आहेत,इत्यादिकांचे ठिकाणी मी व माझे असा आभिमान धारण करणाऱ्या अज्ञ जनांस तूं नारायणाच्या लीलावगैरे कर.अज्ञ-जणांनी भगवंतांच्या लीलांचे श्रवण केले असता त्यांचे अन्त्कारांशुद्ध व स्थिर होऊन निवृत्तीच्या मार्गांना लागून,त्यांचा उद्धार होईल—मोक्ष प्राप्त होईल.||१६|| भावार्थः---याप्रमाणे काम्यकर्मादिकांचा त्याग करून,कारण काम्यकर्मादिकांना विनाशी फळ आहे व हरींच्या—भगवंतांच्या लीलांना अंत:करण शुद्ध व अंत:करण स्थिर हे फळ आहे व त्यामुळे जीव—ब्रह्म—ऐक्य-ज्ञानाचा श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त होऊन त्या ज्ञानाने मोक्ष हे फळ आहे.म्हणून भगवंतांच्या हरी-लीलांचे वर्णन करावे.आपणही भगवंतांच्या लीलांचे सकाम-भावनेसे श्रवण न करता निष्काम भावनेने श्रवण करावे.असे केले असता आपण ज्ञान—मार्गास--मोक्ष—मार्गास लागून जन्म—मरण परंपरा निवृत्त होऊन परमात्मरूप होउत.म्हणून(व्यास-मुनींनी)हरिलीला वर्णन कराव्या,असे सांगितले.आतां स्वधर्मनिष्ठेलाही सोडून हरीभक्तीच करावी,कारण स्वधर्मनिष्ठा म्हणजे स्वधर्मांचे पालन करणे होय.याचा अर्थ स्वधर्मांचे पालन करू नये असे नाही तर,प्रसंगानुसार आचरण करावे.स्वधर्म आणि हरीनामांचे निष्काम उच्चारण,सगुण-साकराच्या हरिकथा,सगुण—निराकाराच्या हरिकथा व निर्गुण-निराकाराचे स्वरूप या दोनच्या तुलनेत स्वधार्मांचा त्याग करून भगवंत—हरीस प्राधान्य द्दावे.अशा अभिप्रायाने सांगतात कि,---आपल्या वर्णास व आश्रमास सांगितलेला स्वधर्म टाकून हरीच्या चरणकमलाची भक्ती करणारा पुरुष,पूर्णदशेस येण्यापूर्वीच जरी काही कारणामुळे मरण पावला किंवा भ्रष्ट होऊन कोणत्याही नीच योनीत उत्पन्न झाला तरी त्या भक्तीरसिकाचे,भक्तिवासना असल्यामुळे अकल्याण होईल कि काय?तर कधीही होणार नाही.आणि जे हरिभक्ती करीत नाहीत त्यांस तरी केवळ स्वधर्माचरणाने कोणता स्वार्थ प्राप्त झाला आहे?कोणताच नाही,यास्तव हरिसेवेवांचून कोणत्याही साधनाने स्वार्थसंपादन व्हावयाचे नाही,म्हणून आपण भगवंत—हरी यांचा निष्काम नामोच्चार,निष्काम हरीच्या कथा व निष्काम हरीचे स्वरूप जाणावे.||१७|| | तस्यैव हेतो:प्रयतेत कोविदो - न लभ्यते यद्भ्रमतामु पर्यध:| | तल्लभ्यते दु:खवदन्यत: सुखं - कालेन सर्वत्र गभीररंहसा ||१८|| भावार्थः---सकाम स्वधर्माचरणाने पितृलोकादिप्राप्ति होते,परंतु हे फळ विनाशी आहे,तर अविनाशी नाही.परंतु जे सुख ब्रहमदेवापर्यंत उत्तम योनीत आणि वृक्षपाषाणापर्यंत नीचयोनीच फिरणाऱ्या जीवांस प्राप्त होत नाही तेच मिळविण्याकरिता निपुण पुरुषाने—म्हणजे निष्काम पुरुषाने प्रयत्न करावा.विषयसुखाबद्दल यत्न करावयास नको.कारण,ते विषयसुख,गंभीरवेगवान अशा कालाच्या योगाने,नाशवान आहे व क्षणभंगुर आहे.जसे संसारांत सर्व ठिकाणी विषयसुख यत्नवांचून प्राचीन कर्मानुसार दुःख प्राप्त होते,यत्नावांचून सर्वत्र प्राप्त होते.म्हणून आपण प्रयत्न करून—सत्संग करून ज्ञान—मार्गाचा स्वीकार करून अविनाशी असे जे परमात्म-सुखाचा अनुभव घेऊन जन्म—मरण परंपरा निवृत्त करावे.||१८|| |न वै जनो जातु कथंचनाव्रजे-न्मुकुन्द सेव्यन्यवदड़ग संसृतिम् | |स्मरन्मुकुन्दारड़घ्र्यूपगूहनं पुन-र्विहातुमिच्छेन रसग्रहो यत: ||१९|| भावार्थः---हे वेदव्यासा,मुकुंदाची सेवा करणारी प्राणी,नीचयोनीत गेला तरी तो केवळ कर्मनिष्ठ लोकांसारख्या संसारचक्रात कधीही पडावयाचा नाही.म्हणून आपण मुकुंदाची सेवा करावी,कारण,भक्तीरसाने परमात्व-तत्त्व जाणणारा भक्त,मुकुंदचरणाऱ्या स्मरण करीत असता पुनः कधीही त्या मुकुंदचरणाचा त्याग करूं इच्छित नाही.म्हणजे निर्गुण-निराकारांना एकरूप होऊन त्याच्या जन्म—मरण परंपरा नाहीशा होतात.आपण निर्गुण-निराकाराचे तत्व जाणावे.||१९|| भावार्थः—हे संपूर्ण चराचर विश्व,भगवतस्वरूप असून तो ईश्वर या जगाहून निराळा आहे.जसे उसात साखर आहे,पण साखरेत उस नाही,त्याप्रमाणे नाम—रुपात परमात्मा आहे,पण परमात्म्यात नाम—रूप नाही.कारण,त्या भगवंतापासून जगाचे पालन,संहार आणि उत्पत्ती हे प्रकार होतात.हे व्यासा,हे सर्व तूं स्वतः जाणतच आहेस तथापि मी तुला दिक्-प्रदर्शनमात्र केले आहे.कारण,हा प्राणी गुरुमुखाचेच सर्व अर्थ जाणतो असा वेदोक्त नियम आहे.हा मानव—प्राणी वेदांत—शास्त्रांचा किंवाकोनात्याही शास्त्रांचा गुरुमुल्खानेच अर्थ—भावार्थ जाणतो,स्वत: जणू शकत नाही.म्हणून शास्त्र हे सदगुरू मुखानेच जाणावे,तर स्वत: जाणू नये,कारण त्य शास्त्रातले रहस्य कळात नाही.शास्त्र कळल्याशिवाय अनुभवास येत नाही.||२०|| भावार्थ---हे अमोघज्ञान-सागरा वेदव्यासा,तू--आपणच मी(वेदव्यास) जन्मरहित असून जगाच्या कल्याणाकरिता परम पुरुष परमात्म्याचा अंशावतार प्रकट झालो आहे,व्यास मुनी भगवंतांचे अंशावतार आहेत.आणि त्या जगाच्या परम--कल्याणासाठीच व्यासमुनींनी अंशावतार घेतलेला आहे.म्हणून आपण—व्यास मुनींनी महासमर्थ हरीच्या पराक्रमाचे विशेषेकरून वर्णन करावे व आपण—जीवांनी विशेष करून निष्काम भावनेने श्रवण करावे.आपणां सर्वांचेच हित आहे.||२१|| | इदं हि पुंसस्तपस: श्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयो: | | अविच्युतोऽर्थ: कविभिर्निरूपितो यदुत्तमश्लोकगुणानुवर्णनम् ||२२|| भावार्थ:---हे व्यासा,पुण्यश्लोकभगवंताच्या गुणांचे जे वर्णन करणे हेच पुरुषाच्या तप,शास्त्र--श्रवण,उत्तम यज्ञ,वेदाध्ययन, विचारयुक्त बुद्धी आणि सर्व दाने यांचे नित्य फळ आहे,असे ब्रह्मादिकवींनी स्पष्टरीतीने निरुपण केले आहेम्हणून आपण सर्वांनी—जीवांनी तप,उत्तम यज्ञ,वेदाध्ययन,विवेक—विचार,आणि दानें निष्काम बुद्धीनेच करावी,म्हणजेच सकाम बुद्धीने करूच नये,असे निश्चित लक्षात असावे.असा शास्त्रे आणि भगवंतांचा उद्देश आहे.असे केलेतर भगवंत प्रसन्न होतो.||२२|| भावार्थ:---आता सत्संगाने हरिकथा—श्रवण,मनन,निदिध्यासन व तत्वं—पदार्थशोधन तदनंतर मोक्ष हे फळ प्राप्त होते असे नारद आपल्या पूर्ववृत्तातकथनाने स्पष्ट करितात–म्हणून आपण नारद—मिनींवर श्रद्धा—विश्वास ठेऊन हरिकथा—श्रावण,मनन,निदिध्यासन व तत्वंपदार्थशोधन करून मोक्ष फळ प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावे.हे मुने,मी पूर्वसंकल्पांत होऊन गेलेल्या जन्मामध्ये वेदार्थ सांगणाऱ्या ऋषीच्या एका दासीचा पुत्र होतो.तेव्हा मी बालक असता,माझ्या आईने पर्ज्यन्यकाळी चातुर्मास्यांत एकेठिकाणी राहण्याची इच्छा करणाऱ्या योग्याच्या सेवेविषयी माझी योजना केली.म्हणून आपण संत—महात्मा यांची सेवा करून सत्संग करावा.||२३|| भावार्थ:----तेव्हा ते मुनी जरी सर्व ठिकाणी समदृष्ठी—सर्वांसी सम—सारखे पाहणारे होते तरी त्यांनी,मी बालक सर्व चंचलस्वभावानी रहित,इंद्रियांनिग्रह करणारा,बाल-क्रीडेच्या साधनांचा त्याग करणारा,शुश्रुषा करणारा,त्याच्या सेवामार्गांत अनुकूल वर्तणूक ठेवणारा आणि परिमित भाषण कारवार अशा मजवर कृपादृष्टि केली.याचा अर्थ असा होतो की,आपणावर—जीवांवर साधू—संत—महात्मा यांची कृपादृष्टी होण्यासाठी आपणांत—जीवांत बरासाचे सत्वगुण—स्थिर-मन,मन-इंद्रियें आपल्या ताब्यात असावेत—म्हणजे शम व दम असावयास पाहिजे.बालाक्रीडाचा त्याग,शुश्रुषा—सेवा-भाव,संत—महात्मा यांची सेवा त्यांच्या अनुकूल असावी—करावी,मिता—भाषा—कमी बोलणारा व अधिक सेवा करणारा असावा.असे सदगुण आपणांत—जीवांत असावेत.साधूंची—संतांची—महात्म्यांची कृपा झाली असता आपला उद्धार होऊन मोक्ष प्राप्त होतो—आपले जीवांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.||२४|| भावार्थ:---तसेच त्यांचे भोजन झाल्यावर त्यांच्या स्वयंपाकच्या भांड्यात राहिलेले अन्न,त्या ब्राह्मणाच्याच आज्ञेने मी दिवसातून एकवार भोजन करीत असे.आपण—सेवकांनी—जीवांनी संत—महात्मा यांचे भोजन झाल्यानंतर संत—महात्मा यांच्या अज्ञाने,त्यांनी सेवन केलेल्या उरलेल्या अन्नाचे प्रसाद—रूपाने जेवण करावे.आपण-जीवांनी संत—महात्मा जेवल्यानंतर उरलेले अन्न प्रसाद-रूपा सेवन केल्यामुळे आपले—जीवांचे सर्व पापे नष्ट होताततेणेकरून माझी—नारदा-मुनींची सर्व पापे नष्ट झाली.या रीतीने मी त्यांच्या सेवेत वर्तत असता,माझे अंत:कारण शुध्द होऊन परमेश्वरभजनरूप त्यांच्या धर्माचेठीकाणींच मला अभिरुची मला उत्पन्न झाली.अशा रीतीने आपण—जीवांनी निष्काम सेवा केली असता धर्मांच्या ठिकाणी आवड निर्माण होत असते.परमेश्वराची निष्काम भक्ती करावी वाटते.||२५|| | तत्रान्वहं कृष्ण कथा: प्रगायता- | मनुग्रहेणा श्रुणवं मनोहरा: | | ता:श्रद्धया मेSनुपदं विश्रृण्वत: | प्रिय श्रवस्यङ्ग ममाभवद्रुचि: ||२६|| भावार्थ:---नंतर त्या आश्रमात प्रतिदिवशी कृष्णकथा गायन करणाऱ्या त्या ऋषीच्या अनुग्रहाने मी त्या मनोहर कथा श्रवण करीत असत.संत—महात्मा यांची आपल्यावर कृपा झाली समजावे,जर आपण भगवंतांच्या किंवा साधू-संत—महात्मा यांच्या कथेविषयी प्रेम निर्माण होऊन कथा हि निरंतर श्रद्धापूर्वक श्रवणकरू लागलोत.हे व्यासा,यापमाणे मी वेळोवेळी श्रद्धेने त्या कथा श्रवण करीत असत,मला प्रियमहात्म्ययुक्त श्रीकृष्णाचेठिकाणी प्रीती उत्पन्न झाली.||२६|| | तस्मिंस्तदा लब्धरुचेर्महा मुने | प्रियश्रवस्यस्खलिता मतिर्मम | | ययाहमेतत्सदसत्स्वमायया | पश्ये मयि ब्रह्मणि कल्पितं परे ||२७|| भावार्थ:--हे महामुने,प्रिययशोरूपी भगवंताचे ठिकाणी प्रीती प्रिय उत्पन्न झाल्यामुळे माझी बुद्धीही भगवत्स्वरुपी अखंडस्मृतीने स्थिर झाली.भगवंतांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाल्यामुळे आपली बुद्धी भगवंतांच्या ठिकाणी स्थिर होते—भगवंतांविषयी स्मरण राहते.असे झाल्यामुळे देह व देहसंबंधी यांच्याविषयी विस्मरण होते.”भगवंतांचे स्मरण व देहसंबंधीतीचे विस्मरण म्हणजेच परमार्थ असतो.”परमार्थाचे फळ जन्म—मरणाची निवृत्ती व सुखरूपतेची प्राप्ती असते. ”भगवंतांचे विस्मरण व देह व देहासंबंधीचे स्मरण म्हणजेच संसार असतो.”संसाराचे फळ म्हणजे यमपुरी व चौऱ्याऐंसीयोनीची प्राप्ती—दु:खाची प्राप्ती असते.म्हणून आपण सदोदित भगवंतांचे स्मरण करावे.तिच्या योगाने प्रपंचातील ब्रहमरूप अशा माझे ठीकानीच हे सूक्ष्म व स्थूलशरीर माझ्याच अज्ञानाने कल्पित आहे,हे वस्तुत:खरे नाही,असे मी जाणिले.आपण—जीवांनी सत्संग केला असता जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होते.त्यामुळे सूक्ष्म—शरीर व स्थूल—शरीर—“जग हे मिथ्या आहे व ब्रह्म हे सत्-आहे असा निश्चय होतो.त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होते.||२७|| भावार्थ:---याप्रमाणे वर्षा व शरत या दोन ऋतूत महासमर्थ त्या ऋषींनी वर्णन केलेले हरीचे शुध्द यश त्रिकाळ श्रवण करणारा जो मी त्या माझ्या अंत:करणात रजोगुण व तमोगुण यापासून उत्पन्न होणाऱ्या दुष्ठ वृत्तीचा नाश करणारी भक्ती उत्पन्न झाली||२८|| भावार्थ:----अशा रीतीने श्रीकृष्णाच्या कथाश्रवणादिकेकरून म्हणजे आपण श्रीकृष्णांच्या कथा—लीला श्रावण केल्या असतां वेदांत—शास्त्र श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न होते.त्वंपदार्थज्ञानयुक्त,निष्पाप,नम्र,भगवद्भजनाविषयी तत्पर,इंद्र्ये इंद्रियेनिग्रहेकरून त्या ऋषीची सेवा करणारा,आपण—जीवांनी ऋषीची सेवा हि निष्काम करावी,तर सकाम करू नये.सेवेत नम्रता असावी.भगवत—भजनाचे प्रेम असावे,म्हणजेच निष्कामता असावी.आणि श्रद्धावान जो मी बालक त्याला दीनवत्सल अशा त्या सत्पुरुषांनी चातुर्मास्यानंतर तेथून जातेवेळी,साक्षात भगवंताने सांगितलेले जे अतिगुह्य ज्ञान त्याचा कृपेने उपदेश केला.आपण अशा प्रकारची सेवा केली असता,संत—महात्मा जीव-ब्रह्म—ऐक्य-ज्ञानाचा उपदेश करतात.||२९-३०|| | येनैवाहं भगवतो वासुदेवस्य वेधसः | मायानुभावमविदं येन गच्छन्ति तत्पदम्||३१|| भावार्थ:------त्या ज्ञानेकरूनच मी,जगत्कर्ता षड्गुणैश्वर्यसंपन्न जो वासुदेव त्याच्या मायेचे सामर्थ्य जाणिले.ज्ञानानेच मुमुक्षु पुरुष भगवत्सलरुपास पावतात.मुमुक्षु—जिज्ञासू पुरुष जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानानेच परमात्मारुपच होतात.||३१|| | एतत्संसूचितं ब्रम्हंस्तापत्रयचिकित्सितम् | यदीश्र्वरे भगवति कर्म ब्रम्हणि भावितम् ||३२|| अर्थ:---हे ब्रहमर्षी वेदव्यासा,हे ज्ञान व सर्व धर्माचे रहस्य मी तुला उत्तम प्रकारे सुचविले आहे कि,सर्वच नियंता अखंड ब्रम्हस्वरूपी जो भगवान त्याचे ठिकानी सर्म्रपण केलेले जे कर्म--कर्म समर्पण करणे म्हणजे सत्कर्माच्या मोबदल्यात संसारातील कांहीच न मागता निष्काम बुद्धीने ते कर्म ईश्वरास अर्पण करणे.तेच आध्यात्मिकादि तापत्रयाचा नाश करून अंत:करनाच्या शुद्धीस कारण होते,असे हे सर्व धर्माचे रहस्य मी तुला उत्तम प्रकारे सुचविले आहे.परमार्थ का सा करावा हे अगोदर कळून घेतला पाहिजे व कळल्यानंतर परमार्थ करावयास पाहिजे.कोणतीही वस्तू कशी करावि हे जसे कळून घेतो व त्यानंतर ती वस्तु करण्याचा प्रयत्न करतोत.तेव्हा ती वस्तू करता येते,अन्यथा येत नसते.||३२|| | एवं नृणां क्रियायोगा: सर्वे संसृतिहेतव: | त एवात्मविनाशाय कल्पन्ते कल्पिता: परे ||३४|| अर्थ:--संसारास कारण जे कर्म,तेच ईश्वरार्पण केले असता संसारनिवर्तक होते याविषयी दृष्टांत सांगतात--------हे उत्तमव्रतनिष्ठा व्यासा,ज्या घृतादि पदार्थाने प्राणिमात्रास रोग उत्पन्न होतो,तोच रोगकारक पदार्थ त्या रोगाचा नाश करणारा होत नाही खरे,परंतु तोच पदार्थ दुसऱ्या पदार्थांनी मिश्र केला असता जसा त्या रोगाचा नाश करणारा होतो, त्याप्रमाणे मनुष्याची जी सर्व कर्मे संसारास कारण आहेत तिच कर्मे सकाम केले असतां पातामार्थांस बंधन करतात व तिश कर्में परमेश्वराचे ठिकाणी अर्पण केली असता.संसारबंधास कारण जे कर्म त्याच्या निवृत्तीविषयी समर्थ होतात.म्हणून आपण—जीवानी सकाम कर्में न करता निष्काम कर्में निष्काम बुद्धीने श्वारास अर्पण करावीत.||३३-३४|| | यदत्र क्रियते क्रियायोगाः सर्वे संसृतिहेतव: | त एवात्मविनाशाय कल्पन्ते कल्पिता: परे ||३४|| अर्थ:---आता जर अज्ञानाने प्राप्त झालेल्या कर्माचा ज्ञानाने नाश होतो व ते ज्ञान भक्तियोगाने होते तर कर्मानेच कर्माचा नाश कसा होईल?अशी शंका आली असता सांगतात कि-या भरतखंडामध्ये लोकांनी जे भगवत्प्राप्तिकारक कर्म केले जाते त्याच कर्माच्या स्वाधीन भक्तीयोगासहित ज्ञान आहे,म्हणून आपण—जीवांनी भगवत्प्राप्तीकारक कर्में केले असता भक्तीयोगासहित जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान उत्पन्न होते व त्या ज्ञानच अनुभव घेतला असता मोक्ष प्राप्त होतो.||३५|| अर्थ:----आता कर्मच भक्तीयोगालाचा उत्पन्न करिते याविषयी सदाचार सांगतात-----श्रीकृष्णाने गीतेत ’यत्कराषि यदश्र्नासि’,इत्यादी सांगितल्याप्रमाणे ईश्वरार्पण करण्याच्या उद्येशाने मुमुक्षुजन जेव्हा वारंवार कर्मे करितात तेव्हा ते श्रीकृष्णाच्या भक्तवत्सल इत्यादी गुणयुक्त नामाचे उच्चारण करितात आणि स्मरणहि करितात.त्यामुळे भगवंतांच्या नामांचे उच्चारण व स्मरण केल्यामुळे व ते कर्में भगवंतास अर्पण केल्यामुळे अंत:कारण शुद्ध व स्थिर होते.||३६|| अर्थ:---याप्रमाने कार्मानेच भक्ति प्राप्त होण्याचा प्रकार सांगून आतां ज्ञान प्राप्त होण्याचा प्रकार सांगतात–---हे भगवन्,वासुदेव,संकर्षण,प्रद्दुम्न आणि अनिरुद्ध या तुमच्या चार स्वरूपांस आम्ही नमस्कार करितो.||३७|| अर्थ:---अशा मूर्तीच्या नाम-मंत्रांनी लोकोद्धारासाठी मंत्रोक्तमुर्तीस्वरूपी,पूजा हि सगुण—साकारासाठी नसून निर्गुण—निराकारासाठी आहे अशा प्रकारची भावना करून पूजन करतो,तो वस्तुत: निराकार अशा यज्ञपुरुषाचे जो पुरुष पूजन करितो तो उत्तम अधिकारी होऊन सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानी होतो.म्हणून आपण-जीवांनी असा भाव ठेऊन पूजन करून आपला अधिकार वाढवून सत्संग करून,उत्तम ज्ञानी होऊन मोक्ष संपादन करावा.||३८|| अर्थ:---हे ब्रम्हर्षी वेदव्यासा,नारायणाने स्वत: केलेल्या उपदेशानुसार मी अनुष्ठान केले,ते जाणून त्याने मला ज्ञान ऐश्वर्य आणि आपल्या स्वरूपी प्रेम,ही दिली||३९|| | त्वमप्यदभ्रश्रुत विश्रुतं विभोः समाप्यते येन विदां बुभूत्सितम् | | आख्याहि दुह्खैर्मुहूरर्दितात्मनां संक्लेशनिर्वाणमुश्यन्ति नान्यथा ||४०|| भावार्थ:---यास्तव हे बहुश्रुत वेदव्यासा,तुही परमेश्वराचे प्रख्यात यश कथन कर.म्हणून आपण—जीवांनी भगवंतांच्या अवतारांच्या लीला श्रवण कराव्यात—गाव्यात.ज्या यशाच्या योगाने ज्ञानसंपादन करणाऱ्या पुरुषांची मोक्षाची इच्छा पूर्ण होते.त्रिविध तापानी वारंवार पिडीत झालेल्या प्राण्याच्या जन्ममरण रूप क्लेशांच्या नाश त्या ईश्वर यशाच्या वर्णणावाचून दुसऱ्या कोणत्याही मार्गानें होणार नाही,असे सर्व सत्पुरुष म्हणतात.म्हणून आपण भगवंतांच्या अवतारांच्या कथा—लीला श्रावण कराव्यात—गाव्यात.त्यामुळे जीव-ब्रह्म-ऐक्य—ज्ञानाचे अधिकारी होऊन सत्संग करतोत.||४०|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------याप्रमाणे श्रीमाद्धागावातनामक महापुराणातील प्रथम(१)स्कंधामध्ये व्यासनारद संवादात हा पांचवा(५) अध्याय चाळीस(४०) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||५—४०|| | श्रीकृष्णार्पणमस्तू---श्रीसदगुरुचरणार्पणामस्तू || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ६---भगवद्गुणांच्या वर्णनाविषयी व्यासांचा निश्चय होण्यासाठी नारदाने आपले पूर्वजन्मांतील कृष्णकथाश्रवणाने प्राप्त झालेले भाग्य त्यास कथन केले,ही कथा साहाव्या अध्यायांत आली आहे.||६|| | ६---नारदांचे पूर्व चरित्र [नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |सूत उवाच:--- | एवं निशम्य भगवान्देवर्षेर्जन्म कर्म च | भूय: प्रयच्छ तं ब्रम्हान् व्यास: सत्यवतीसुत: ||१|| भावार्थ:---सुत म्हणाला---हे शौनका,याप्रमाणे देवर्षि नारदाचे पूर्वजन्म व कर्म श्रवण करून तो सत्यवंती नंदन भगवान् व्यास,पुनः नारदास प्रश्न करिता झाला.||१|| भावार्थः---व्यास म्हणाला---हे नारदा,तुम्हांस उत्तम ज्ञानोपदेश करणारे ते संन्यासी दूरदेशी गेले असतां,बाल्यवस्थेत असणाऱ्या तुम्ही पुढे काय केलेत?||२|| भावार्थः---हे ब्रहमपुत्रा,तुम्ही आपले पुढील आयुष्य कोणत्या वृत्तीने घालविले?आणि मरणकाळ प्राप्त झाला असतां,दासीपुत्रभूत त्या आपल्या शरीराचा त्याग कसा केला?||३|| | प्राक्कल्प विषयामेतां स्मृतिं ते सुरसत्तम | न ह्येष व्यवधात्काल एष सर्वनिराकृति: ||४|| भावार्थः---हे देवश्रेष्ठा,तशीच हि प्राचीन क्ल्पांतील तुमची स्मृती,एककल्पपर्यंत गेलेल्या कालाने कशी नष्ट केली नाही?कांकी,तो सर्वांचा नाश करणारा आहे.||४|| भावार्थः---नारद म्हणाला---हे भगवान वेदव्यासा,माझे ज्ञानोपदेश करणारे संन्यासी देशांतरी गेले असतां,बाल्यावस्थेत असणाऱ्या मी,पुढे असा आयुष्याचा काळ घालविता की-----------------||५|| भावार्थः---माझी माता जातीने स्त्री,स्वभावाने ज्ञानशून्य,आणि दासी असून तिला मी एकटा एकच पुत्र होतो व मला दुसऱ्या कोणाचाही आश्रय नव्हता म्हणून तिने मजवरच अतिप्रेम ठेविले होते.||६|| | साऽस्वतन्त्रा न कल्पाऽऽसीद्योगक्षेमं ममेच्छती | ईशस्य हि वशे लोको योषा दारूमयी यथा ||७|| भावार्थः---ती—नारादमुंनीची आई,--नारदमुनींच्या योगक्षेमांची इच्छा करीत असे,पण जीव—देहसंबंधी,हा इतर जीवांचा योग—क्षेम चालविण्याचा प्रयत्न करितो.असे असले तरी पण प्रत्येक जीव हा ज्याचे—त्याचे प्रारब्ध कर्म बरोबर घेऊन जन्मास आलेला असतो,त्यामुळे त्या—त्या जीवांस ज्याच्या—त्याच्या प्रारब्ध कर्मांनुसार योग-क्षेम मिळत असतो,म्हणून आपण--जीव कर्म करण्यास स्वतंत्र आहे,तर आपण--जीव भोग भोगण्यास परतंत्र आहे.म्हणून आपण—जीवांनी स्वधर्मांनुसार—धर्मांनुसारच कर्मे करावे.कारण,लाकडांची बाहुली जशी सूत्रधाराच्या स्वाधीन असते तसे आपण—सर्व जीव ईश्वराच्या स्वाधीन (परतंत्र) आहेत.असा विवेक करून जीवन जगावे.||७|| भावार्थः---मी तर पांचवर्षांचा बालक असून दिशा,देश व काळ यांस न जाणणारा होतो,तथापि त्या आईचा स्नेहबंध कधी तुटेल म्हणजे तिच्या अंतकाळ कधी होईल याची वाट पाहत त्या ब्राह्माणाच्या घरीच राहिलो होतो.८|| भावार्थः---एकेवेळी रात्रीच्या प्रसंगी गाईची धार काढण्यासाठी ती माझी माता,घरांतून बाहेर गाईजवळ जात असतां,मार्गामध्ये तिच्या पायांचा स्पर्श झालेल्या व मृत्युकालाने प्रेरित अशा एका सर्पाने तिला दंश केला आणि ती मरण पावली.आपणांस—जीवांस ज्याच्या—त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू निश्चित मिळत असतो,त्यासाठी आपण—जीव परतंत्र आहोत.ज्यावेळेस जीव जन्मास येतो,त्याचवेळेस त्याचा मृत्यूही निश्चितच झालेला असतो.||९|| | तदा तदहमीशस्य भक्तानां शमभीप्सत: | अनुग्रहं मन्यमान: प्रातिष्ठंदिशमुत्तराम् ||१०|| भावार्थः--तेव्हा भक्तांचे कल्याण इछिणाऱ्या परमेश्वराचा तो—आईच्या मृत्यूचा अनुग्रह झाला असे मानून मी तेथून उत्तरदिशेस निघालो.कोणताही भोग हा ईश्वराचाच अनुग्रह असतो,तो भोग अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो.||१०|| भावार्थः---त्या दिशेकडे ऐश्वर्यादिकांनी व धान्यादिकांनी समृद्ध असे अनेक देश,राजधान्या,ब्राहमण क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र या सर्वांच्या वस्तीचे गांव,गौळवाडे,रत्नादिकांचा खाणी,शेतकर्यांचे गांव,नदी किंवा पर्वत यांचा जवळची ‘अर्धे गांव व अर्धे नगर’ अशी मिश्रस्थाने,भिंती किंवा कुपन घातलेल्या फलपुष्पांदिकांचा बागा,स्वतःसिद्ध उत्पन्न झालेल्या वृक्षसमुदायांची वने,बुद्धीपूर्वक लावलेल्या वृक्षांची उपवने,||११|| भावार्थः---सुवर्ण रूपे इत्यादी धातूंनी चित्रविचित्र असलेले पर्वत,हत्तींनी फांद्या मोडलेले वृक्ष,पवित्र तलाव आणि देवगणाच्या संचाराने युक्त असून कमळांनी सुशोभित व विचित्र शब्द करणाऱ्या पक्ष्यांच्या शब्दांनी जागृत झालेल्या भ्रमराच्या संचाराने शोभायमान अशी बहुत सरोवरे अवलोकन करीत करीत एकटाच मी त्या देशादिकांचे उल्लंघन करून पुढे गेलो.तो तेथे एक मोठे भयंकर व दुःसह असे अरण्य माझ्या दृष्टीस पडले,ते अरण्य देवनळ,कळक,लव्हाळ्याची बेटे,दर्भ व वायू शिरून कर्र कर्र वाजणाऱ्या वेळवांच्या योगाने गमन करण्यास अशक्य असुत ते सर्प,घुबडे,कोल्हे इत्यादिकांचे केवळ क्रीडास्थानच होते.||१२-१३-१४|| भावार्थः---त्या वेळी माझ्या इंद्रियांस व देहास फार श्रम झाल होते,क्षुधेने व तृषेने मी फार व्याकुळ झालो होतो,कारण शारीरिक परिश्रम केल्यानंतर देहास श्रम हे होत असतात,म्हणून प्राण हा कासाविश होऊन त्यास तहान—भूक लागत असते,म्हणून आपण प्राणास अन्न—पाणी देऊन तहान-भुकेची निवृत्ती करावयास पाहिजे.म्हणून तेथे एका नदीच्या डोहांत मी स्नान,आचमन व उदकप्राशन केले,त्याच्या योगाने माझ्या श्रमाचा परिहार झाला.||१५|| | तस्मिन्निर्मनुजेsरण्ये पिप्पलोपस्थ आस्थितः | आत्मनाssतमानमात्मस्थं यथाश्रुतमचिन्तयम् ||१६|| भावार्थः---नंतर मी मनुष्याच्या संचाराने शून्य अशा त्या अरण्यामध्ये एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून पूर्वी केलेल्या श्रवणानुसार आपल्या ह्र्द्यांतील परमात्मस्वरूपाचे मनाने ध्यान करूं लागलो.ज्याप्रमाणे पांच वर्षांच्या बालकाने जसे पूर्व संस्कारानुसार ध्यान केले,त्याप्रमाणे आपण आपल्या पुर्वासंस्कारांनुसार जी साधना असेल—परमात्म्याचे ध्यान करावयास पाहिजे.आपण-जीवांनी कोणतीही साधना न केली तरी कांही—न-कांही संकल्प-विकल्प मनात येत असतात.||१६|| भावार्थः---भक्तीने स्वाधीन केलेल्या चित्ताने चरणकमळाचे ध्यान करणारा आणि उत्सुकतेमुळे ज्याची नेत्रे आनंदाश्रूंनी भरून गेली आहेत अशा माझ्या ह्रदयामध्ये श्रीहरी हळूहळू प्रकट होऊं लागला.त्या बालकाच्या चित्तात परमात्म्याचे ध्यान केल्यामुळे हृदयात—अंत:करणात भगवंत--हरी प्रगत होऊ लागले.आपण ज्याचे ध्यान करूत तेच अंत:करणात प्रगट होत असते,म्हणून आपण—जीवांनी भगवंतांचे ध्यान करावे.पारमार्थिक साधना करावी.त्यामुळे पारमार्थिक संस्काराची वृद्धी होत असते.पारमार्थिक साधनांची वृद्धी झाली असता सात्विक संस्कार अधिक वाढतात.||१७|| भावार्थः---हे मुनीश्वरहो,तेव्हा अतिप्रेमाने माझ्या सर्वांगाचे ठिकाणी रोमांच उभे राहून अति संतुष्ट व आनंदासमुद्रांत निमग्न झालेल्या मी,त्या वेळी आपला देह व इतर पदार्थ या दोघासही मुळीच जाणले नाही.तो बालक परमानंदात एकरूप झाल्यामुळे देह--देहसंबंधी व विषयांचे भान राहिले नाही.त्याचप्रमाणे आपण आपली साधना करीत असतांना सध्याचे स्मरण असावे,तर इतरांचा विसर पडावा.अंत:करणपूर्वक साधना करावी.||१८|| भावार्थः---नंतर,सर्वशोकाचा नाश करणारे व मनास अतिप्रिय वाटलेले जे भगवंताचे स्वरूप,ते अकस्मात् मनांत दिसत नाहीसे झाले,तेव्हा मी व्याकुळतेमुळे खिन्न झाल्यासारखा होऊन एकाएकी देहस्थितीवर आलो.त्या बालकास परमात्म्याचे स्वरुपाचे विस्मरण झाल्यामुळे बालकास दु:ख झाले.त्याचप्रमाणे आपली पारमार्थिक साधनेत प्रतिबंद आला असता आपणास बालकासारखे दु:ख वाटावे.असे झाले तर आपणास परमार्थाची आवड—गरज आहे असे सिद्ध होते.||१९|| भावार्थः---आणि ते भगवत्स्वरूप पुनः अवलोकन करण्याच्या इच्छेने,मी आपले मन ह्रदयामध्ये स्थिर करून ध्यान करूं लागलो,तरी ते हरीचे रूप दृष्टीस पडेना,तेव्हा मी तृप्ती न पावल्यामुळे त्या रूपदर्शनाविषयी आतुर असल्यासारखा झालो.त्या बालकाने पुन्हा ती साधना—ध्यान करण्याचा प्रयत्न केला,पण परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव आला नाही,त्यामुळे तो अतृप्त झाला.त्याचप्रमाणे आपली साधनेत व्यत्येय—प्रतिबंध आला असता,ते रूपदर्शन व्हावे व्हावे असे वाटावे.आपण त्या साधनेचा प्रयत्न करावा.||२०|| भावार्थः---याप्रमाणे त्या एकांत अरण्यांत भगवत्स्वरुपाच्या दर्शनासाठी मी प्रयत्न करीत असतां,वेदवाणीनेही ज्ञान होण्यास अशक्य असा ईश्वर,गंभीर व मधुर अशा आकाशवाणीने (माझ्या शोकाचा नाश करीत असता)मला म्हणाला की---||२१|| | हन्तास्मिन्जन्मनि भवान्मा मां द्रष्टुमिहार्हति । अविपक्वकषायाणां दुर्दर्शोsहं कुयोगिनाम्।।२२।। भावार्थः---बा नारदा,तूं या दासीपुत्ररूप जन्मामध्ये मलो अवलोकन करण्यास योग्य नाहीस.कारन,ज्यांच्या कर्मादिक वासना दग्ध झाल्या नाहीत त्या कुयोगी पुरुषांस माझे दर्शन दुर्लक्ष आहे.आपल्याला जर कर्मांपासून उत्पन्न होणाऱ्या वासंना निवृत्त झाल्या नाहीत,तर आपणास—जीवांस परमात्म्याचे दर्शन—अनुभूती येत नाही.म्हणून आपण सत्संग करून,वासनेचे स्वरूप जाणून—वासनां मिथ्या व दु:खरूप आहेत,असे जाणून वासनांचा विवेकपुर्वक त्याग करावा. वासनेंचा विवेकापुर्वक त्याग केला असता आपले जीवांस परमात्म्याचा अनुभव येऊन जन्म—मरण निवृत्त होते.||२२||
| सकृद् यद् दर्शितं रूपमेतत्कामाय तेsनघ | मत्काम: शनकै: साधुः सर्वान्मुञ्चति ह्रच्छयान् ||२३|| भावार्थः---हे निष्पापा नारदा,माझ्या स्वरूपी स्थिर प्रीती राहण्यासाठी,मी हे स्वरूप तुला एकवार दाखविले आहे.कारण, माझ्या स्वरूपी प्रीती बसलेला साधु,आपल्या अंतःकरणातील सर्व विषय वासना हळूहळू सोडितो.भगवंतांनी त्या बालकास परमात्म्यांनी दर्शन दिले,कारण त्या बालकाचे परमात्म्याच्याठीकानी प्रीती राहावी व बालकांनी आपल्या मनातील सर्व वासांना नष्ट करून परमात्म्याच्या ठिकाणी स्थिरता राहावी.आपणही परमात्म्याच्या ठिकाणी स्थिरता राहण्यासाठी वासांना या मिथ्या असून दु:खरूप आहेत,असे सत्संगाद्वारे कळून घ्यावे व आपण सर्व वासनांचा त्याग करावा.||२३|| भावार्थः---पूर्वी बाल्यावस्थेस घडलेल्या अल्पहि साधूसेवेने तुला माझेठिकाणी दृढ मति प्राप्त झाली आहे.या योगाने तूं आपला हा अमंगल देह टाकून पुढील जन्मी माझा पार्षद होशील.आपण साधूंची सदोदित सेवा करावी,कारण त्या सेवेमुळे आपली भगवंतांवर श्रद्धा-निष्ठा अधिक वाढत असते.त्यामुळे आपण याचा जन्मात किंवा भावी जन्मात भगवंतांचे निष्काम भक्त होउत.भगवंतांचे भक्त झाल्यामुळे आपण संसाराचे भक्त राहणार नाहीत.संसाराचे भक्त न राहिल्यामुळे आपणास निश्चीतारुपणे भगवंतांचे दर्शन—परमात्म्याची अनुभूती निश्चिततरुपाणे येणारच.||२४|| भावार्थ:---माझ्या स्वरूपी दृढभक्तियुक्त झालेली हि तुझी बुद्धी,कधीही नाश पावणार नाही,व लोकांचे उत्पत्ती आणि लय झाले तरी माझ्या अनुग्रहाने तुला पूर्वजन्मादिकांची स्मृती राहील.याप्रमाणे भगवंतांच्या ठिकाणी दृढ भक्ती झाली असता आपली बुद्धी हि सात्विक राहून भगवंतांचे विस्मरण न होते जन्मो-जन्मी स्मरण राहिलच.म्हणून आपण भगवंतांच्या ठिकाणी दृढ—निरंतर निष्काम भक्ती करावी.||२५|| भावार्थः---भगवंताने असे भाषण करून,आकाशादि सर्व स्थळी व्यापक असून दृष्टी न पडणारे ते महद्भूतरूप—ब्रहमस्वरूप-- ईश्वरस्वरूप,विराम पावले—अदृश्य पावले.याप्रमाणे त्या परमेश्वराने मला आपल्या दयेस पात्र केले असता,ब्रह्मादिकांपेक्षांही थोर अशा त्या ईश्वराला मी मस्तकेकंकरून वंदन केले.म्हणून आपण—जीवांनी अनन्य साधनाद्वारे भगवंतांच्या दयेस पात्र होण्याचा प्रयत्न करावा.आपण भगवंतांस सदोदित नम्र होऊन वंदन करावे.||२६|| भावार्थः---नंतर गर्व व मत्सर यांनी रहित,सर्व ठिकाणी निस्पृह आणि संतुष्टचित्त असा मी,आपणही त्या बालकाप्रमाणे गर्व,मत्सररहित,होऊन जीवन जगावे.तसेच निस्पृह—अपेक्षारहित आणि संतुष्टचित्त—प्रराब्धवशात जे मिळेल त्यात समाधान—शांत राहत जीवन जगावे.मरणकालाची मार्गप्रतीक्षा करीत,त्या अनंतपरमात्म्याने केलेली मंगलकारक गुह्य चरित्रे स्मरून त्यांची नावे निर्लज्जपणे पठन करीत असतां,कितीएक दिवसपर्यंत पृथ्वीवर पर्यटन करीत होतो.आपण भगवंतांचे गुण—चरित्रे—लीला चरित्रे,निर्गुण निराकाराचे स्मरण करीत पर्यटन करावे.एकाठीकानी स्थिर न राहता भ्रमण करत जीवन जगावे.||२७|| | एवं कृष्णमतेर्ब्रह्मन्नसक्तस्यामलात्मन: | काल: प्रादुरभूत्काले तडित्सौदामनी यथा ||२८|| भावार्थः---हे वेदव्यासा,याप्रमाने सर्व विषयांचे ठिकाणी आसक्त न होता,शुध्दभावाने श्रीकृष्णचरणी बुद्धी स्थापन करून माझे वर्तन चालले असतां,ईश्वराने नेमलेल्या वेळी सुदामानामक पर्वतावर विद्दुल्लता जशी चमकते तसा मला अकस्मात मृत्युकाळ प्राप्त झाला.आपणही त्या बालकाप्रमाणे सर्व विषय—शब्द,स्पर्श,रूप,रस,आणि गंध या कोणत्याही विषयांत आसक्त न होता म्हणजे विषय असावेत अशी न वाटता,विषय नकोत अशी भावना दृढ करून म्हणजेच वैराग्यापुर्वक जीवन व्यतीत करावे.निष्काम—शुद्ध बुद्धीने श्रीकृष्णाच्या चरणी—परमात्म्याच्या चरणी बुद्धी स्थिर करावी,अन्य विषयांचा त्याग करावा.आपणास किंवा कोणत्याही देहास मृत्यू हा प्रारब्धाचा भोग संपल्यानंतर येत असतो,त्याचा—मृत्यूचा आनंदाने स्वीकार करून भगवंतांचे स्मरण करीत—करीत शरीराचा त्याग करावा.||२८|| भावार्थः---तेव्हा पूर्वी आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे भगवंताने मला आपल्या शुद्धसत्त्वरूप पार्षददेहांत नेले असता,प्रारब्धकर्मांची समाप्ति झालेला तो माझा पंचभूतात्मक देह पतन पावला.२९|| भावार्थः---त्या कल्पाच्या समाप्तिकाली हे त्रैलोक्य आपल्या उदरांत घेऊन प्रलयसमुद्राच्या उदकांत श्रीनारायण योगनिद्रा घेत होता तेव्हां,ब्रहमदेवही शयन करण्याची इच्छा करीत असता त्याच्या श्वासाबरोबर मी त्याचे उदरांत गेलो.त्याचप्रमाणे महाप्रयकालात सर्व जीव त्या कल्पाच्या समाप्ती काली भगवंतांच्या उदरात लीन होतात व विश्रांती घेतात.||३०|| भावार्थः---पुढे एक सहस्त्रयुगपरिनामाचा काल गेल्यावर ब्रहमदेव जागृत होऊन हे जग उत्पन्न करीत असतां,त्याच्या इंद्रियापासून मरीचि-प्रभृति ऋषी व मीहि(नारद—मुनी) उत्पन्न झालो.||३१|| | अन्तर्बहिश्चलोकांस्त्रीन् पर्येम्यस्कन्दितव्रत: | अनुग्रहान्महाविष्णोरविघातगति: क्वचित् ||३२|| भावार्थः---मी महाविष्णूच्या अनुग्रहेकरून अखंडित ब्रहमचर्यव्रत धारण करून त्रैलोक्याचे आंत व बाहेर कोठेंही जाण्यास प्रतिबंधरहित होत असतां,पर्यटन करितो.महाविष्णूंचा नारद-मुनिवर अनुग्रह झाल्यामुळे अखंडित ब्रह्मचर्य-व्रत धारण करून त्रैलोक्यांत—पर-लोकांत-स्वर्ग—मृत्यू व पातळात पर्यटन करतात.म्हणून आपणही निष्काम तप करून महाविष्णूंचा अनुग्रह संपादन करावा.त्यामुळे आपणास—जीवांस सत्संग प्राप्त होऊन जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान होते.||३२|| भावार्थः---स्वतः सिद्ध सप्तस्वररुप नादब्रह्माने सुशोभित अशी ईश्वराने दिलेली हि वीणा,प्रत्येक रागाच्या एकवीस मुर्छनांनी युक्त करून हरिकथा गायन करीत करीत मी संचार करितो.आपणही आपल्याकडे जी कला किंवा वेदांताचे ज्ञान आहे,त्याचे निष्काम दान करून परोपकार करावा.त्यातच आपले परम हित आहे.||३३|| भावार्थः---गंगादि सर्व तीर्थांस आपल्या चरणी आश्रय देणारा म्हणजे गंगादी जी तीर्थे आहेत,त्या तीर्थांना जो पवित्रपणा आहे,तो सर्व भगवंतांचा आहे.त्यामुळे आपण तीर्थांत स्नान केल्यामुळे आपण पवित्र होतोत.आणि ज्याची कीर्ती ब्रह्मादिकांसही प्रिय आहे,कारण भगवंतांचे कार्य क असून समता व सुखरूपता देणारे आहे.म्हणून आपणास—जीवांस ते कार्य प्रिय वाटून,त्यानुसार आपण आचरण करावयास पाहिजे.असा भगवान नारायण,आपली चरित्रे प्रेमाने गायन करणाऱ्या माझ्या(नारद-मुनीच्या)चित्तामध्ये सत्काराने बोलावल्यासारखा त्वरित येऊन मला दर्शन देतो.आपणही नारद-मुनी जसे गायन करतात,त्याचप्रमाणे निरंतर गायन केले तर आपणास निश्चितरुपाणे भगवंत दर्शन देणारच.||३४|| | एतद्धयातुरचित्तानां मात्रास्पर्शेच्छया मुहू: | भवसिन्धुप्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम् ||३५|| अर्थः---वारंवार विषयभोगांच्या इच्छेने दीन चित्त झालेल्या पुरुषांस,हरिचरित्राचे वर्णन करणे,हीच संसारसमुद्र तरण्या-- विषयी नौका,शास्त्रज्ञ पुरुषांनी पाहून ठेविली आहे;या खेरीज दुसरा उपाय नाही.असे असे अनुमान हि सिद्ध होते.म्हणून आपण—जीवांनी भगवंत हरी-चरित्रे श्रवण,गायन,करावी किंवा वक्ता होऊन सांगावी.त्यामुळे आपण संसार—समुद्राच्या पलीकडे तरुण जाऊत,अन्यथा अन्य कोणताच उपाय नाही.सत्संग करून संसार तरुण जाता येते.||३५|| | यमादि भिर्योगपथै:कामलोभहतो मुहुः । मुकुन्दसेवया यद्वत्तथाssत्माद्धा न शाम्यति ।।३६।। अर्थः---काम आणि लोभ या शत्रूंनी जर्जर केलेले अंतःकरण,जसे मुकुंदसेवेने लौकर शांत होते तसे यम,नियम इत्यादी योगमार्गांनी शांत होत नाही.आपले—जीवांचे अंत:करण काम—क्रोध यांनी दुशीत झालेले,ते मुकुंदांची सेवा केल्याने लौकर शुद्ध—शांत होते.यम-नियमादी साधनांनीही शांत होते,पण लौकर होत नाही.म्हणून आपण मुकुंदाची सेवा करावी.||३६|| अर्थः---हे निष्पापा व्यासा,जे तूं मला विचारिलेस ते मी आपले गुह्य जन्म,कर्म आणि तुझ्या मनाचे समाधान होण्याचे कारण हे सर्व तुला सांगितले आहे.||३७|| अर्थः---सुत म्हणाला----शौनकमुने,योगेश्वर्यसंपन्न नारद ऋषी,त्या सत्यवतीनंदन व्यासाबरोबर असे भाषण करून,त्याची आज्ञा घेऊन स्वकार्याला संकल्पाने रहित असा तो,आपली विणा वाजवीत बदरिकाश्रमांतून निघून गेले.आपण कोणत्याही ठिकाणी विणाकारण न थांबता,कार्य झाल्यानंतर अन्य कार्यांसाठी निघून जावे व अन्य कार्य करावे.आपण नेहमी कार्यरत असावे,कारण आपल्यास प्रत्येक क्षणास खात आहे,म्हणून प्रत्येक क्षण कार्यरत असावे.||३८|| | अहो देवर्धान्योSयं यात्कीर्ति शारंगधन्वंन: । गायन्माद्धन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत ।।३९।।
अर्थः---ऋषिहो,हा नारदमुनी धन्य आहे.कारण,हा स्वतः आनंदित होत असतां,ब्रहमवीणेच्या स्वरावर शार्ड़्धनुष्य धारण करणाऱ्या परमेश्वराच्या कीर्तीचे गायन करीत करीत,सर्वत्र संचार करून,संसारसंबधी तापत्रयाने दिन झालेल्या जगास रमवित असतो.म्हणून आपण जीवानी आपल्याकडे जे हितकारक आहे,ते इतरांना द्दावे.आपल्या अधिकारानुसार इतरांना उपदेश—ज्ञान किंवा जड—धन देण्याचा प्रयत्न करीत जीवन जगावे.||३९|| ६-----श्रीमद्भागवत महापुराणांतील प्रथम(१) स्कांधांत व्यास—नारद संवादरूप सहावा अध्याय(६)---ऐकोनचाळीस(३९) स्लोकांनी युक्त असलेला समाप्त झाला.||६--३९|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू---श्रीसदगुरुचराणार्पणामस्तू || ____________________________________________________________________________________ |७---आता भागवत श्रवण करणाऱ्या परीक्षितराजाचे जन्म सांगण्यासाठी पूर्वी अश्वत्थाम्यांने शिबिरांत निद्रिस्त असलेल्या बालकांचा वध केल्यामुळे त्यास अर्जुनाने दंड केला,अशी कथा या सातव्या अध्यायांत सांगितली आहे.|| | ७---राजा परीक्षिती---[राजा परीक्षिताचे गर्भात रक्षण] ____________________________________________________________________________________ | शौनक उवाच:----शौनिकऋषी म्हणतात:----- | निर्गते नारदे सूत भगवान बादरायण: | श्रुतवांस्तदभिप्रेतं तत: किमकरोद्विभु: ||१|| भावार्थः---आतां भागवत श्रवण करणाऱ्या परीक्षितराजाचे जन्म सांगण्यासाठी पूर्वी अश्वत्थाम्याने शिबिरांत निद्रिस्थ असलेल्या बालकांचा वध केल्यामुळे त्यास अर्जुनाकडे दंड केला,अशी कथा या सातव्या अध्यायांत सांगितली आहे.||१|| भावार्थः---शौनक ऋषी म्हणाला----हे सूता,नारदऋषि निघून गेले असतां,बदरीकाश्रमांत राहणाऱ्या भगवान व्यासाने,त्या नारदाला अभिप्राय श्रवण करून पुढे काय केले?सुत म्हणाला---हे शौनक मुने,ब्रहमदैवत्य व ब्रहमणांनी आश्रय केलेली अशा सरस्वतीनदीच्या पश्चिमतीरी ऋषीच्या सत्रकर्मांची वृद्धी करणारा एक “शम्याप्रास” या नावाने प्रसिद्ध असा “आश्रम” आहे||२|| भावार्थः---बोरीच्या वृक्षांच्या समुदायाने सुशोभित अशा त्या आपल्या आश्रमामध्ये बसलेला श्रीव्यास,उदकाचे आचमन करून नारदाने सांगितल्याप्रमाणे एकाग्रप्रमाणे ध्यान करूं लागला.आपणांस—जीवांस संत—महात्मा—सदगुरू यांनी कांही साधना सांगितली असेल तर आपण ती साधना ऐग्र-चित्ताने करावी,तर चंचल चित्ताने करू नये,कारण ऐग्र-चित्तात स्थिर होते व चंचल चित्तात स्थिर न राहता अस्थिर राहते.असा विवेक करून पारमार्थिक साधना करावी.||३|| भावार्थः---तेव्हां भक्तीयोगाने एकाग्र झालेल्या पवित्र मनामध्ये व्यासाने प्रथमतः ईश्वर व त्याच्या स्वाधीन असणारी माया पाहिली.आपणही व्यास मुनिसारखे एकाग्र चित्त करून पवित्र—शुद्ध मनामध्ये कथा श्रवण--साधना करावी.||४|| भावार्थः---ती अशी कि,ज्या मायेने मोहित—आसक्त झालेला जीव,वस्तुतः त्रिगुणातीत असून म्हणजे सत्व-गुण,राजो-गुण,तमो-गुण हे मायेचे आहेत,तर आपले—जीवांचे नाहीत,पण आपण—जीव हा आपल्या अज्ञानामुळे सच्चिदानंदस्वरूपास म्हणजे आपण—जीव हा सत्—म्हणजे सर्व-काळ म्हणजे भूत-काळ,वर्तमान-काळ व भविष्य-काळात आहे.पण आपणास—जीवांस अज्ञानामुळे विसरून,आपणास त्रिगुणात्मक देहरूपी—म्हणजे देहच मी असे मानत आहे—भावना करीत आहे आणि त्यामुळे सूक्ष्म—देहाच्या—अंत:करणाच्या अभिमानाने म्हणजे “मीच—जीवच अंत:करण” आहे या मानल्यामुळे—भावनेमुळे केलेल्या कर्तृत्त्वभोक्तृत्वादि म्हणजे “मीच-जीवच कर्ता तसेच भोक्ता मीच-जीवच आहे”असे मानल्यामुळे अनर्थांस म्हणजे यमपुरीस व चौऱ्याऐसीयोनीस जाऊन दु:ख भोगीत आहे.म्हणून आपण मी—जीव हा कर्ता—भोक्ता नसून,अंत:करण हे कर्ते—भोक्ते असून “मीच—जीवच सच्चिदानंद आहे” सत्संग करून निश्चय करावा.यामुळे यमपुरीची--संसाराची—चौऱ्याऐंसीयोनीची येरझार संपवून जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप आहोत याचा अनुभव वर्तमान जो देह त्यातच अनुभवास येणार आहे.म्हणजे मेल्यानंतर न येता याच स्थूल—शरीरात असतांना अनुभवास येणार आहे.||५|| | अनर्थोपशमं साक्षाद्भक्तियोगधोक्षजे | लोकस्याजानतो विद्वांश्चक्रे सात्वतसंहिताम् ||६|| भावार्थः---आणि अधोक्षज-भगवंताचे ठिकाणी जो मुख्य सप्रेमभक्तियोग तोच त्या अनर्थांचा नाशक आहे असे जाणून,हे तत्त्व न जाणणाऱ्या सर्व जणांच्या उद्धारासाठी व्यासाने हि भागवती संहिता रचिली.व्यास मुनींनी सर्व जीवांच्या कल्याणाकरिता श्रीमद्भागवत महापुराण—शात्र रचिले आहे.म्हणून मृत्यू—लोकांतील अखिल मानवांनी(फक्त भारतातील मानवांनी नव्हे तर मृत्यू लोकांतील अखिल मानवांसाठी) हा सप्रेम—निष्काम भक्तीयोग श्रावण करण्यासाठी रचिला आहे.म्हणून ज्यांना—ज्यांना मानव शरीर आहे,त्यांनी—त्यांनी श्रीमद्भागवत श्रवण करून निष्काम भक्तीयोग—सप्रेम भक्तियोग श्रावण करून व त्यानुसार आचरण करून याच मनुष्य देहात अनुभव घ्यावा.असी आपणांस प्रार्थाना आहे.||६|| | यस्यां वै श्रूयमणायां कृष्णे परमपुरूषे | भाक्तिरूत्पद्दते पुंस: शोकमोहभया पहा ||७|| भावार्थः---जी संहिता ऐकण्याचा दृढ निश्चय होतांच पुरुषांला,सर्वपुरुषश्रेष्ठ अशा श्रीकृष्णाचेठायी शोक,मोह व जरा इत्यादि दुःखांचा नाश करणारी भक्ती उत्पन्न होते.आपण—जीवांनी श्रीमद्भागवत-महापुराण हि संहिता ऐकण्याचा निश्चय करून निष्काम भावनेने श्रवण करावी.ती संहिता श्रवण केल्याचा असा परिणाम होतो की,शोक—दु:ख,मोह—जीवांची आसक्ती,जरा- स्थूल शरीराचे म्हातारपण हे अशा प्रकारचे सर्व दु:खाचा नाश करणारी निष्काम भक्ती उत्पन्न होते.निष्काम भक्तीने ज्ञानाद्वारे मुक्ती प्राप्ती होते.त्यामुक्तीने मोक्ष प्राप्त होऊन सर्व प्रकारचे दु:ख निवृत्त होऊन सर्व सुख प्राप्त होते.||७|| | स संहितां भागवतींकृत्वानुक्रम्य चात्मजम् | शुक्रमध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनि:||८|| भावार्थः---त्या व्यासाने भागवती संहिता करून शुद्ध केल्यावर ती,मोक्षमार्गनिष्ठ अशा शुकनामक आपल्या पुत्रास पढविली.व्यासांनी भागवती संहिता पूर्ण केल्यानंतर ज्या पुत्राची मोक्षमार्गाकडे निष्ठा होती,त्या पुत्रास—शुकाचार्यांना उपदेश करून ज्ञान दिले.त्याचप्रमाणे आपणही—जीवांनी सदगुरूगृही राहून,भिक्षा मागून उदार—निर्वाह करून,सदगुरुंच्या अज्ञाचे पालन करून श्रीमद्भागवत व वेदांत—ज्ञान ग्रहण करावे.श्रीमद्भागवत,वेदांत इतर शात्रांचे श्रवण करून,अभ्यास करून ज्ञान—दान करावे.असे केले असता आपलेही जन्म—मरण निवृत्त होऊन त्य्संचेही जन्म—मरण निवृत्त होते.सर्व दानात ज्ञान दान श्रेष्ठ आहे,कारण त्यामुळे जीवांचे सर्व दु:ख निवृत्त होऊन सर्व सुख प्राप्त होते.||८|| भावार्थः---शौनक म्हणाला---हे सूता,तो श्रीशुकमुनि,निवृत्तीचे ठिकाणी उदासीन आणि आत्मस्वरूपी रममाण असल्यामुळे त्याने किमर्थ या मोठ्या भागवत संहितेचा अभ्यास केला?||९|| |सूत उवाच:--- सूत म्हणतात:--- | आत्मारामाश्र्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरूक्रमे | कुर्वन्त्यहैतूकीं भाक्तिमित्थम्भूतगुणो हरि: ||१०|| भावार्थः---सूत म्हणाला---ग्रंथाचा अभ्यास सोडून दिलेले अथवा अंतःकरणांतील अहंताममतारूप—“स्थूलशरीर मी आहे व शरीरसंबंधी माझे आहेत,” व “ग्रंथितरहित---अज्ञानरहित झालेले व परमात्मा--स्वरूपाचे ठिकाणी रममाण असणारे असेही कितीएक ऋषी,उरूक्रमभगवंताचे ठायी निष्काम भक्ती करितात.कारण,तो हरी तशाचप्रकारच्या अद्भुत अनंत गुणांनी युक्त आहे.कारण भगवंत—परमात्मा अनंत गुणांनी युक्त असल्यामुळे आपल्या--सर्व जीवांच्या ज्याच्या—त्याच्या इच्छेनुसार पूर्ण करणारा असाहे,मग ती इच्छा सकाम—संसारातील असो किंवा परमार्थातील असो पूर्ण करितो.असे असले तरी भगवंतांना पामरापेक्षा,सकाम भक्त व सकाम भक्तापेक्षा निष्काम भक्तच अधिक प्रिय आहे.म्हणून आपण—जीवांनी निष्काम भक्तीच करावी,कारण निष्काम भक्तीद्वारा ज्ञानाने मोक्ष मिळतो व सकाम भक्तीने तात्पुरते दु:ख निवृत्त होते व तात्पुरतेच सुख प्राप्त होते.असा विवेक—विचार करून निष्काम भक्तीच आपल्या—जीवांच्या महा-कल्याणाची आहे.||१०|| | हरेर्गुणाक्षिप्तमतिर्भगवान् बादरायणि: | अध्यगान्महदाख्यानं नित्यं विष्णुजनप्रिय:||११|| भावार्थः---यास्तव,हरीच्या गुणानांनी ज्याची—शुकाचार्यांची बुद्धी आपणाकडे वळवून घेतली होती.त्याचप्रमाणे आपणही आपली बुद्धी संसाराकडे न लावता भगवंतांकडेच लावावी—भगवंतांच्या गुणांकडे लावावी.तो—शुकाचार्य निरंतर विष्णू-भक्तांचे प्रिय करणारा होता,म्हणून आपणही नंतर विष्णू-भक्तांचेच वक्ता म्हणून प्रिय करावे किंवा श्रोता होऊन विष्णू भक्त व्हावे.त्या भगवान् शुकाचार्याने,या भागवतनामक मोठ्या आख्यानाचे अध्ययन केले व राजा परिक्षिताला व इतर श्रोत्यांना श्रीमाद्भागावाताचे ज्ञान—दान केले.आपणही सत्संग करून श्रीमाद्भागावाताचे ज्ञान प्राप्त करून श्रीमद्भागवत सान्हीताचे ज्ञान—दान करावे,त्यामुळे आपले व जीवांचे अज्ञान निवृत्त होऊन जन्म—मरण निवृत्त होईल.||११|| | परीक्षितोऽथ राजर्षेर्जन्मकर्मविलापनम् -संस्थां च पाण्डूपुत्राणां वक्ष्ये कृष्णकाथोद्यम् ||१२|| भावार्थः---हे ऋषिहो,आतां परीक्षित राजर्षीचे जन्म,कर्म आणि मुक्ती व तसेच पांडवांचे उत्तरदिशेकडे झालेले महाप्रस्थान हि कृष्णकथांचा उदय होईल अशा प्रकारे मी तुम्हांस सांगतो.आपणही अधिकारसंपन्न होऊन श्रीमद्भागवत-कथेचे वक्ते होऊन ज्ञान-दान करावे.||१२|| भावार्थः---ज्या काळी कौरव आणि पांडव यांच्या संग्रामांत बहुतेक वीर मरण पावून स्वर्गास गेले आणि भीमाने टाकलेल्या गदेच्या प्रहाराचे दुर्योधनाच्या मांड्या भग्न होऊन तोहि रनभूमीवर पडला.||१३|| भावार्थः---तेव्हा अश्वत्थाम्याने हे कृत्य केल्याने दुर्योधनाचे प्रिय होईल असे मनांत आणून निजलेल्या द्रौपदीच्या पुत्रांची मस्तके तोडून नेऊन ती दुर्योधनास दाखविली,परंतु ते कर्म दुर्योधनासहि अप्रियचं झाले.कारण,सर्वही लोक त्या दुष्टकर्माची निंदाच करितात.अश्वथामा यांनी जे निंद्दकृत्य केले,ते कृत्य दुष्ट दुर्योधन यासही आवडले नाही,त्याचप्रमाणे असे कोणत्याही प्रकारचे निंद्द कर्म आपणास आवडू नये.कारण निंद्द कर्म करणे किंवा ऐकणे—पापात्मक—दोष आहे.||१४|| भावार्थः---तेव्हा माता द्रौपदी,आपल्या पुत्रांचे मरण ऐकून सहन करण्यास अशक्य अशा अतिशोकांने संतप्त झाली आणि जिचे नेत्र दुःखाश्रूंनी भरून गेले आहेत अशी ती रुदन करूं लागली,तेव्हा तिचे सांत्वन करीत करीत अर्जुन म्हणाला की,------------||१५|| भावार्थः---हे कल्याणरूपे द्रौपदी,ज्या वेळेस तुझ्या पुत्रांस मारणाऱ्या अश्वत्थाम्यानचे शिर,मी आपल्या गांडीव धनुष्यापासून सुटलेल्या बाणांनी हरन करीन व त्याच्यावर बसून तूं पुत्रमरणनिमित्तक स्त्रान करशील,तेव्हाच मी तुझ्या दुःखाश्रुंचे परिमार्जन करीन.||१६|| भावार्थः---याप्रमाणे त्या अर्जुनाने मंजुळ व विचित्र भाषणांनी आपल्या प्रिय द्रौपदीचे सांत्वन करून,ज्यांचे गांडीव धनुष्य उग्र आहे,ज्याच्या ध्वजास्तंभावर मारुती आहे व ज्याचा मित्र आणि सारथी अच्युतभगवान आहे असा तो अर्जुन,आंगांत कवच घालून,रथांत बसून त्या गुरुपुत्रास धरण्यासाठी धांवला.||१७|| भावार्थः---त्याकाळी,तो अर्जुन आपणावर येत आहे असे दुरून पाहून बालहत्या करणारा तो अश्वत्थामा,उद्विग्नचित्त होऊन केवळ प्राणरक्षणाच्या इच्छेने स्वशक्त्यनुसार रथाने पृथ्वीवर,हरीणरूपाने आपल्या कान्यशी रत होण्यास उद्दुक्त झालेला ब्रहमदेव,शिवाच्या भयाने जसा एकदा पळत सुटला होता,त्याप्रमाणे पलायन करूं लागला.||१८|| भावार्थः---परंतु पुढे जेव्हा त्या अश्वत्थाम्याने रथाचे घोडे दमल्यामुळे आपणास अर्जुनापासून रक्षण करणारा दुसरा कोणीच नाही असे पाहिले तेव्हा प्राण संकटाचे वेळी ब्रहमशिरनामक अस्त्रच (ब्रह्मास्त्रच)आपले रक्षण करणारे आहे असा त्याने मनात निश्चय केला.||१९|| भावार्थः---नंतर उदकांचे आचमन करून एकाग्रचित्त होऊन त्या अश्वत्थाम्याने.ब्रहमस्त्राचा उपसंहार जाणत नसतांही प्राणसंकटकाल प्राप्त झाला असे पाहून अर्जुनावर ते सोडिले.||२०|| भावार्थः---ते समयी त्या अस्त्रापासून निघालेले अतितीक्ष्ण तेज,दशदिशांकडे पसरले.तेव्हा ती आपणास प्राणनाशक विपत्ति झाली असे पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला.||२१|| भावार्थः---अर्जुन म्हणाला----हे दीनदुःखनिवारका---दिनाचे दु:ख निवारण करणारा व भक्तांस अभय देणाऱ्या महाभाग्य-- शालिन् श्रीकृष्णा,संसाराला कारण अशा तापत्रयाने तप्त झालेल्या प्राण्यांस मोक्ष देणारा तूंच एक आहेस.तुझ्याशिवाय भक्तांचे दु:ख निवारण करणारा अन्य कोणीच नाही.म्हणून माझ्यावर आलेले संकट तू निवारण कर.||२२|| भावार्थः---कारण,जो तूं प्रकृतीहून पलीकडचा पुरुष,सर्वमुलकारण व साक्षात ईश्वर असून आपल्या पूर्ण ज्ञानशक्तीने मायेचा पराभव करून नित्यायुक्त अशा आपल्या स्वरूपाचे ठिकाणी स्थित आहेत.||२३|| | स एव जीवलोकस्य मायामोहितचेतस: - विधत्से स्वेन वीर्येण श्रेयो धर्मादिलक्षणम् ||२४|| भावार्थः---तोच तूं आपल्या पराक्रमाने,मायेने मोहितचित्त झालेल्या जीवांस,धर्म,अर्थ आणि काम ह्या तिन्ही पुरुषार्थांस देऊन त्यांचे कल्याण करितोस.जीवांना धर्म,अर्थम,व मोक्ष असे चारही पुरुषार्थ देऊन कल्याण करणारा तूच एकटाच आहे.||२४|| भावार्थः---तुझा हा श्रीकृष्णारुपी अवतार,पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी आणि अनन्यभक्ति करणाऱ्या एकांतभक्तांस व स्वकीय ज्ञाति यादवादिकांस वारंवार आपल्या स्वरूपाचे ध्यान घडावे यासाठी झाला आहे.||२५|| भावार्थः---हे देवाधिदेवा,हे अतिभयंकर तेज,दशदिशांकडून येत आहे,तर हे काय आहे?व कोणापासून उत्पन्न झाले आहे? हे मी जाणत नाही.||२६|| भावार्थः---श्रीभगवान म्हणाला---हे अर्जुना,तूं हे द्रोणपुत्र अश्वत्थाम्याचे ब्रहमस्त्र आहे असे जाण.तो या ब्रह्मास्त्राच्या प्रयोगाविषयी कुशल नसून तो या अस्त्राचा उपसंहारहि जाणत नाही तथापि त्याने आपणास प्राणनाशक संकट प्राप्त झाले असतां हे सोडिले आहे.||२७|| भावार्थः---या अस्त्राचे निवारण करणारे कोणतेही दुसरे अस्त्र नाही.यास्तव उपसंहारासह अस्त्रयोगांचा ज्ञाता तूं,ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून त्याच्या तेजाने सर्वत्र व्यापलेले हे अस्त्रतेज,नाहीसे कर.||२८|| भावार्थः---सूत म्हणाला---ऋषिहो,भगवंताने केलेले भाषण ऐकून,शत्रूरुपी वीरांस मारणाऱ्या त्या अर्जुनाने,उदकाचे आचमन करून व श्रीकृष्णास तीन प्रदक्षिणा घालून त्या ब्रह्मास्त्राच्या निवारणासाठी ब्रह्मास्त्राचाच प्रयोग केला.||२९|| भावार्थः---त्यावेळी दोन्ही ब्रह्मास्त्रांची बहुत बाणांनी वेष्टित झालेली तेजे परस्पर एकत्र होऊन,स्वर्ग,पृथ्वी व आकाश यांस व्यापून प्रलयकालच्या सुर्याग्नीसारखी वृद्धिंगत झाली.||३०|| भावार्थः---तेव्हा ते अश्वत्थामा व अर्जुन यांच्या दोन्ही ब्राह्मास्त्रांचे महाभयंकर तेज,तिन्ही लोकांस जाळीत आहे असे पाहून,त्या तेजाने दग्ध होऊं लागलेल्या सर्व प्रजांनी,हा प्रलयाग्नीच आहे कि काय असे मानिले.||३१|| | प्रजोपप्लवमालक्ष्य लोकव्यतिकरं च तम् - मतं च वसुदेवस्य संजहारार्जुन व्दयम ||३२|| भावार्थः---त्याकाळी सर्वप्रजांचा संहार व पृथिव्यादी लोकांचाहि नाश होणार असे जाणून व श्रीकृष्णाचे मतहि जाणून अर्जुनाने दोनी ब्रह्मास्त्राचा उपसंहार केला.||३२|| भावार्थः---नंतर क्रोधाने आरक्त नयन झालेल्या अर्जुनाने,कृपीनामक गौतमकन्येचा पुत्र क्रूर तो अश्वत्थामा त्यास वेगाने गांठून,जसा याज्ञिक पुरुष स्वधर्मेकरून दोरीने यज्ञपशूस बंधन करितो त्याप्रमाणे त्यास बांधिले.त्याचप्रकारे अज्ञानरूपी दोरीने आपणास जीवांस बांधले आहे.||३३|| भावार्थः---अशाप्रकारे आपले शत्रुत्व करणाऱ्या अश्वत्थाम्यास बलात्काराने दांव्याने बाधून आपल्या शिबिरास (गोटांत)अर्जुन नेता असतां,कमलनयन भगवान् श्रीकृष्ण,अत्यंत क्रुद्ध होऊन अर्जुनास म्हणाला की,-------||३४|| भावार्थः---हे कुंतीसुता,या अश्वत्थाम्याचे रक्षण करण्याविषयी तूं योग्य नाहीस,तर या अधम ब्राह्मणास मारून टाक,कारण,ज्याने रात्री निजलेल्या निरपराधी बालकांच्या विनाकारण शिरच्छेद केला आहे.||३५|| | मत्तं प्रमत्तमुन्मत्तं सुप्तं बालम स्त्रियं जडम् |प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवित् ||३७|| भावार्थः---मद्दादिप्राशनाने शुद्धीकर नसणारा,असावध,ग्रहादिकांच्या बाधेने उन्मत झालेला,निद्रिस्त,बालक,स्त्री,निरुद्दौगशील, शरण आलेला,विरथ आणि भयभीत अशा शत्रूसहि धर्मवेत्ता पुरुष मारीत नाही.||३६|| | स्वप्राणान् य: परप्राणौ: प्रपुष्णात्यघृण: खल: - तव्दधस्तस्य हि श्रेयो यद्दोषाद्यात्याध: पुमान् ||३७|| भावार्थः---तसाच जो निर्दय दुष्ट पुरुष,दुसऱ्याचे प्राण घेऊन आपल्या प्राणांचे पोषण करितो त्याचा वध करणे हे त्यासच श्रेयस्कर आहे.कारण,अशा दुष्ट पुरुषास राजदंड झाला नाही तर तो त्या दोषाने अधोगतीस जातो.म्हणून अशा दुष्ट पुरुषास राजदंड देणेच योग्य आहे.अशांना राजदंड न दिला तर जो अपराध करितो,त्याची अधोगती होते.||३७|| भावार्थः---आणि तूं द्रौपदीच्या शोकनिवारणार्थ,मी ऐकत असतां,तिला असे सांगितले आहेस कि,हे मानवति स्त्रिये,जो तुझ्या पुत्रांस मारणारा अश्वत्थामा त्यांचे मस्तक मी तुजकडे आणीन.द्रोपतीस तू असा शब्द दिलेला आहे की,”अस्वथामा यास मारून त्याचे—(अस्वथाम्याचे)मस्तक तुझ्याकडे आणून देईन.” हि तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल.||३८|| भावार्थः---तस्मात आपल्या बंधूस मारणारा,आततायी व पायी अशा ह्या अश्वत्थाम्यास तूं मारून टाकावे.हे वीरा,या कुलदुषकाने बालहत्यारूप जे कर्म केले ते राजा दुर्योधनासहि फार अप्रिय झाले.अस्वथामा यांने जे कृत्य केले आहे,ते कृत्य त्यास--दुर्योधनसही आवडले नाही.म्हणजे हे कृत्य दुर्योधनाच्या सांगण्यावरून न करता स्वत:च्या मनानुसार केलेले आहे.आपण मात्र असे कृत्य आपल्या मानाने किंवा इतारांच्या सांगण्यावरून करू नये.कारण बालक हे निष्पाप असतात.तो महापाराध आहे,त्याची शिक्षा जो हत्या करितो,त्यासच भोगावी लागते,म्हणून आपण हत्या करू नये.||३९|| भावार्थः---याप्रमाणे अर्जुनाच्या धर्मनिष्ठेची परीक्षा करणाऱ्या श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याचा मारण्याविषयी अर्जुनास प्रेरणा केली असतांहि,त्या महात्म्या अर्जुनाने,आपल्या पुत्रांस मारणाऱ्याहि त्या अश्वत्थाम्यास तो ब्राहमण व गुरुपुत्र आहे असे जाणून मारण्याची इच्छा केली नाही.अस्वथामा हा ब्राह्मण व गुरु पुत्र असल्यामुळे त्यास मारले नाही,कारण शास्त्र सांगते की,जो ब्राह्मण किंवा गुरुपुत्र असतो त्यास मारू नये,कारण त्याच्याकडे विद्दा—ज्ञान असते.त्यामुळे इतर गरजवंत—अधिकारी ती विद्दा ग्रहण करू शकतात.ती विद्दा—ज्ञान परंपरा पुढच्या पिढीकडे संस्कारारुपणे जाऊन तिचे अस्तित्व राहत असते.असे विद्दा—ज्ञान देणारे मूल्यवान असतात.म्हणून त्यांच्याकडून अपराध झाला असता त्यांना मारू नये—दंड करू नये.||४०|| भावार्थः---नंतर गोविंदच ज्याच्या प्रिय आणि सारथी आहे अशा त्या अर्जुनाने,आपल्या शिबिरात येवून,मरण पावलेल्या पुत्राचा शोक करणाऱ्या द्रौपदीला आणलेला तो अश्वथामा समर्पण केला.ज्यांनी—अस्वथामा यांनी मारला,त्यास त्याची माता—पांडवांची पत्नी द्रोपती यांच्या अर्जुनाने स्वाधीन केले.||४१|| भावार्थ:---ते समयी तशा रीतीने पशुसारखा पाशाने बांधून आणलेला,बालहत्यारूप निंद्दकर्माने अधोमुख झालेला आणि महाअपराधी अशाही त्या गुरुपुत्रास पाहून त्या सुशील द्रौपदीला द्या आली आणि लागलाच तिने त्याला नमस्कार केला.आपल्या पतीचा हा अपराधी असला तरी पण गुरुपुत्र आहे,म्हणून त्यास वंदन केले.आपणही जर आपल्या गुरूच्या संबंधी कोणी अपराधी असेल तर त्यास शिक्षा न देता—तुच्छ बुद्धीने न पाहता आदरबुद्धीने त्यांना नमस्कार करावा.||४२|| | उवाच चासह्न्त्यस्य बन्धनानयनं सती - मुच्यातां मुच्युतामेष ब्रम्हणो नितरां गुरु: ||४३|| भावार्थ:---आणि त्या गुरुपुत्रास बांधून आणणे हे सहन न करणारी ती पतीव्रता दौपदी,त्वरेने म्हणाली कि,आहो यास आधी लवकर सोडा सोडा.हा ब्राहमण तुमचा साक्षात गुरु आहे.गुरुसंबंधी जे कोणी असतील,त्यांच्याकडून जरी अपराध घडला तरी त्यांचा अपमान न करता,त्यांचा सन्मानाच करावा,कारण ते गुरुसंबंधी आहेत.ते सर्व गुरुसमान असतात.त्यांचा अपमान करणे,म्हणजे गुरुंचाच अपमान असतो.गुरूंचा अपमान हे निंद्द कर्म आहे.आपण निंद्द न करता वंद्द कर्म करावे.||४३|| | सरहस्यो धनुर्वेद: सविसर्गोपसंयम: | अस्त्रग्रामश्र्च भवता शिक्षितो यदनुग्रहात् ||४४|| भावार्थ:--कारण,गुह्यमंत्रासहित धनुर्वेद आणि अस्त्रे सोडणे व त्याचा संहार करणे यासहित सर्व अस्त्रांचा समुदाय तुम्ही ज्याच्या अनुग्रहान्रे शिकला,||४४|| भावार्थ:---तेच हे ऐश्वर्यसंपन्न द्रोणाचार्य प्रस्तुत पुत्ररूपाने विद्दमान आहेत व त्या द्रोणाचार्यांच्याबरोबर देहाचा अर्ध विभागरूप जी कृपिनामे पत्नी तीही आजून जिवंत आहे.ती वीरमाता असल्यामुळे तिने द्रोणाचार्यांबरोबर सहगमन केले नाही.गुरु द्रोणाचार्य हे अस्वथामा यांच्या रूपाने आपल्याचसमोर उपस्थित—विद्दमान आहेत.त्यांची—द्रोणाचार्यांची पत्नी-- कृपी आपली माता आजून आपल्यासमोर जिवंत आहे.म्हणून आपण त्यांचा सत्कार—सन्मान करावा.||४५|| भावार्थ:---तस्मात हे भाग्यशालिन धर्मज्ञ अर्जुना,तुम्हास वारंवार पूजा करण्यास योग्य जे गुरुकुल ते तुम्हाकडून दु:ख पावण्यास योग्य नाही.म्हणून त्यांना गुरु समजून,त्यांना दु:ख न देता आदर—सन्मान देऊन जीवन जगू द्दावे.आपण द्रोपतीकडून गुरुसंबंधित जे आहेत त्यांना गुरु समजून आदरपूर्वक कसे वागावे,हा आदर्श घेऊन जीवन जगावे.||४६|| भावार्थ:--अहो!जशी मी आपल्या मृतबालकाच्या दु:खाणे दु:खित होऊन,जिच्या मुखावरून वारंवार अश्रुधारा चालतात अशी रुदन करिते तसे या अश्वथाम्याची माता,गौतमकन्या व पतिव्रता जी कृपी तिने रुदन करू नये.द्रोपातीने मृत बालकाच्या मातेस काय दु:ख असते याचा अनुभव घेतलेला आहे.म्हणून द्रोपती अनुभापुर्वक सांगत आहे की,कोणत्याही मातेचा बालकाची हत्या करू नये,कारण ते दु:ख किती असह्य असते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.तशा असह्य वेदना गुरु—माता कृपी यांना होतील,म्हणून अस्वथामा याचा वध करू नका—दु:ख देऊ नका.द्रोपतीच्या अनुभवावरून आपण कोणाचीही हत्या करू नये,तर बालकाची तर हत्या मुळीच करू नये,कारण ते बालक निष्पाप असतात.||४७|| अर्थ:---अजितेंद्रिय राजांनी ब्राह्माणाच्या कुळास जर क्रोध उत्पन्न केला तर,शोकाने व्याप्त झालेले ते ब्राह्माणाचे कुळ,त्या राजांच्या कुलास परिवारासह वर्तमान समूळ जाळून टाकते.कोणीही—आपणही—जीवांनी ब्रह्माणाच्या—संत—महात्मा यांच्या प्रतिकूल आचरण करू नये,कारण त्यामुळे ब्रह्माच्या प्रतिकूल जे आचरण करतील त्यांची अधोगती हि निश्चित होत असते.ब्राह्मण—संत—महात्मा हे आपाणांना—जीवांना उपदेश—मार्गदर्शन करीत असतात.कर्म,उपासना व ज्ञान मार्गांचा उपदेश करून धर्म,अर्थ,काम व मोक्षापर्यंत पोहंचवितात.आपले सर्व दु:ख घालवून व सर्व सुखाची प्राप्तीचा मार्ग दाखवितात.त्यानुसार आपण आचरण केले तर,आपण कायमचे सुखरूप—परमात्मरूप होतोत.||४८|| | सूत उवाच | धर्म्यं न्याय्यं सकरुनं निर्व्यलीकं समं महत् | राजा धर्मसुतो राज्ञ्-या: प्रत्यनन्दद्वचो द्विजा: ||४९|| भावार्थ:---सूत म्हणाला-हे ऋषिहो याप्रमाणे धर्मास,अनुकूल,नीतीमार्गास अनुसरणारे,करुनायुक्त,निष्कपट,सम आणि अतिश्रेष्ठ असे द्रौपदिचे भाषण धर्मराजाने मान्य केले.आपणसुद्धा ज्याचे—संबंधिताचे बोलणे—म्हणणे धर्मांस अनुकूल किंवा नितींस अनुकूल किंवा करुनायुक्त किंवा निष्कपट किंवा सम आणि अतिश्रेष्ठ असेल किंवा सर्व तर सत्गुनांनी युक्त असेल तर मान्य करून अनुमोदन करावे व त्यानुसार आचरण करावे,कारण त्यात सर्वांचेच हित असते.||४९|| भावार्थः---आणि नकुल,सहदेव,सात्यकि,अर्जुन देवकीपुत्र भगवान श्रीकृष्ण,आणि तेथे जे इतर सभ्य होत तशाच ज्या स्त्रिया होत्या त्यांनीही त्या द्रौपदीच्या वाक्यास अनुमोदन दिले.आपले बोलणे—म्हणणे सभ्य असेल तर आपल्या बोलण्यास किंवा म्हणण्यास सभ्य माणसांचे अनुमोदन मिळताच असते.म्हणून नेहमी सत्य व योग्य असे बोलावे.||५०|| भावार्थ:---परंतु तेथे भीमसेन कूद्ध होऊन म्हणाला कि,ज्या अश्वथाम्याने आपणाकरिता नव्हे व राज्याकरितांही नव्हे तर व्यर्थच निजलेल्या बालकांचा वध केला,त्याचा वध करणे हेच त्यास श्रेयस्कर आहे.नाहीतर तो ह्या पापाने नरकात पडेल.आपण व्यर्थ,परधर्मांचे—अधर्माचे कृत्य असे कोणतेही करू नये,कारण त्यामुळे आपणास पाप लागते व पापांचे फळ हे दु:ख आपल्यालाच भोगावेच लागते.||५१|| भावार्थ:---असे भीमाचे भाषण एकूण भीमसेन त्यास मारण्याविषयी प्रवृत्त झाला असता व दौपदी अकस्मात त्याच्या निवारणार्थ प्रवृत्त झाली असता,त्या दोघाच्या संरक्षणासाठी चतुर्भुज श्रीकृष्णाने हास्य केल्यासारखे दर्शवून आपल्या मित्रभूत अर्जुनाच्या मुखाकडे अवलोकन करून असे भाषण केले की,----------------||५२|| श्रीकृष्ण उवाच:---- श्रीकृष्ण म्हणाले:--- | ब्रम्हबन्धुर्न हन्तव्य आततायी वधार्हण: | मयैवोभयमाम्नातं परीपाह्यनुशासनम् ||५३|| भावार्थ:---श्री भगवान म्हणाला की---हे अर्जुना जो जातीचा ब्राहमण आहे तो वध करण्यास योग्य अपराधाचा जरी असला तरी त्याचा वध करू नये आणि हातांत शस्त्र घेऊन प्राण घेण्यास जो उद्युक्त झाला तो कोनत्याही जातीचा असला तरी तो वध करण्यास योग्य आहे.असे दोन्हीप्रकारचे शास्त्र मीच सांगितले आहे यास्तव आता तू त्या दोन्ही प्रकारचे धर्मशास्त्रास जसा बाध येणार नाही तशी योजना कर.||५३|| भावार्थ:---आणि आपल्या प्रिय द्रौपदिचे सांत्वन करतेवेळी तू या अश्वथाम्यास मारण्याची जी प्रतिज्ञा केली आहेस ती सत्य कर,तसेच भीमसेन,द्रौपदी आणि मी या तिघानाहि जे प्रिय वाटेल ते कर.||५४|| भावार्थ:---सूत म्हणाला–-----हे ऋषीहो ते समयी अर्जुनाने तत्काळ श्रीकृष्णाचे मनोगत जाणून खड्गाने त्या ब्राहमणाच्या मस्तकावर असलेला मनी,केशांसहित हरण केला.||५५|| भावार्थ:--आणि रज्जूने बांधलेला,बाळहत्येच्या योगाने कांतिहीन झालेला,व तेज:पुंजमणीरत्नाने रहित केलेला अशा त्या अश्वथाम्यास पाशातून मुक्त करून शिबिरातून घालवून दिले.अश्वथामा हा ब्राह्मण व गुरुपुत्र असल्यामुळे त्याचा वाढ केला नाही.त्याने बालहत्या केली म्हणून तेज:पुंजमणीरत्न काढून नेहमीसाठीच दु:खी केले.म्हणजेच वध करण्यापेक्षा अधिक दु:खी केले,व शिबिरातून हाकलून दिले.अश्वथामा हा चिरंजीवी असल्यामुळे अजूनही त्या जखमेचे दु:ख भोगीत जीवन व्यतीत करीत आहे.बालकाच्या हत्येच्या परिणामाचे दु:ख भोगीत आहे,म्हणून कोणाक हीही हत्या—बालकाची तर हत्या करू नये.आपला अपराध वर्तमान जन्मात उघडकीला आला नसेल आपला मृत्यू झाल्यानंतर याहीपेक्षा अधिक दु:खदायक भोगावा लागणार आहे.म्हणून विवेकपूर्वक—विचारपूर्वक जीवन जगावे.||५६|| भावार्थ:---वपन करणे म्हणजे डोक्यावरील केसांचे पाट काढणे,द्रव्य घेणे म्हणजे त्याचे आर्थिक साधने त्याच्याकडे न ठेवता आपल्याकडे घेणे,आणि स्वस्थांनातून घालवून देणे म्हणजे मुलाच्या ठिकाणी वास्तव्य न करू देता अन्य ठिकाणी पाठवणे अशा अधमहि कृतीस ब्रह्माणांचा वध करणे असे म्हणतात.यावांचून दुसरा देहसंबंधी वध ब्रह्मणास विहित नाही.म्हणून आपण ब्राह्मणाचा वध करू नये.||५७|| | पुत्रशोकातुरा: सर्वे पाण्डवा: सह कृष्णया | स्वानां मृतानां यत्कृत्यं चक्रुर्निर्हरणादिकम् ||५८|| भावार्थ:---नंतर पुत्रशोकाने दु:खित झालेल्या द्रौपदिसहित सर्व पांडवानी मरण पावलेल्या स्वजनाचे,स्मशानांतच नेणे,त्यास अग्नी देणे इत्यादिक,जे कृत्य ते सर्व केले.आपणही आपल्या स्वजनांचे मृत्यू झाले तर किंवा मृत्यू झाला तर त्यांना अग्निसंस्कार देऊन विधी करावा.ते आपले कर्तव्यच आहे.||५८|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |असा श्रीमद्भागवतनामक महापुराणातील प्रथमस्कंधात अश्वथांम्याचा निग्रहनामक हा सातवा अध्याय आठ्ठ्वन्न(५८) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.||७|| || श्रीकृष्णार्पणमस्तु----श्रीसद्-गुरुचरणार्पणमस्तु || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|८---क्रोधयुक्त झालेल्या अश्वत्थाम्याने निष्पांडवी पृथ्वी करणाच्या इच्छेने सोडलेल्या ब्रह्मास्त्रापासून श्रीकृष्णाने परीक्षितीचे रक्षण केले,नंतर कुंतीने श्रीकृष्णाची स्तुती केली व धर्मराजाने स्वजनवधनिमित्तक शोक केला हा विषय या अष्टमाध्यांत आहे||८|| |८---- ८---[परीक्षिताचे गर्भात रक्षण,कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | अथ ते सम्परेतानां सवानामुदकमिच्छताम् | दातुं सकृष्ण गङ्गायां पुरस्कृत्य ययुः स्त्रिय: ||१|| भावार्थ:---सुत म्हणाला-----ऋषीहो,नंतर,मृत होऊन उदाकांची इच्छा करणाऱ्या स्वजनास तिलांजली देण्यासाठी,ते पांडव शास्त्र नियमाप्रमाणे स्त्रियांस पुढे करून श्रीकृष्णासह्वर्तमान भागीरथीच्या तीरी गेले.आपणही आपले स्वजन जेंव्हा मृत होतील त्याप्रसंगी स्वजनांस तिलांजली देण्यासाठी पवित्र नदीच्या किनारी जावावयास पाहिजे.त्या ठिकाणी जाणें आपले कर्तव्य असते.||१|| भावार्थ:---त्या सर्वांनी,हरीच्या चरणकमलासंबंधी रजाने पवित्र झालेल्या गंगेच्या उदकात स्नान करून,मरण पावलेल्या स्वजनास तिलांजली दिल्यावर तेथे काहीवेळे पर्यंत त्याच्या मरणाबद्दल मोठा विलाप करून,पुन:गांगोदाकात स्नान केले. आपणही तशा प्रकारच्या प्रसंगात पवित्र नदीच्या उदकात स्नान करावे.तेथे आपण कर्मकांडाची विधी करावी.जे मृत झालेले नातेवाईक आहेत,त्यांच्याविषयी दु:ख व्यक्त करावे.आपण दु:ख व्यक्त केल्यानंतर पुन्हा आपण स्नान करावे.||२|| |भावार्थ:---नंतर,त्या गंगेच्या तिरी बसलेला भीमसेनादी बंधूसहित धर्मराजा,धृतराष्ट्र आणि पुत्रशोकाने दुःखीत झालेल्या गांधारी,कुंती व द्रौपदी तसेच बंधूच्या वधामुळे शोकग्रस्त झालेले बांधव या सर्वांस,व्यासधौम्यादी ऋषीसहित श्रीकृष्णाने प्राणीमात्रांचेठिकाणी मृत्युकालाची गती कोणत्याही उपयांनी अपरिहार्य आहे यास्तव ज्या काली जे होणार ते कधी चुकत नाही,असे दर्शवून त्यांचे सांत्वन केले.अशा प्रसंगी जे सर्वांत श्रेष्ठ असणाऱ्यांनी सांत्वन करावे----जे प्राणी आहेत,त्यांना मृत्यू येताच असतो.तो कोणासही टाळता येत नाही.जो प्राणी जन्मास आलेला असतो,त्यास प्रराब्धवाशात मृत्यू हा निश्चीतरुपाणे येतच असतो.असे निश्चित असल्यामुळे कोणीही कोणाबदल दु:ख करावे,पण दु:खाने दु:खी मात्र होऊ नये.असा उपदेश केल्यामुळे सर्वांचे दु:ख कमी होत असते.||३-४|| भावार्थ:---याप्रमाणे श्रीकृष्णाने द्रौपदीच्या केशस्पर्शाने क्षिणायू झालेल्या दुष्ट राजांचा संहार करवून,दुर्योधनादी कुटिलांनी कपटद्दुताने हरण केलेले त्या धर्मराजाचे राज्य पुनः त्यास देववून,आणि उत्तमसाहित्यांनी युक्त असे धर्मराजाकडून तीन अश्वमेध करवून त्यांचे इंद्रासारखे शुद्ध यश दशदिशांचे ठिकाणी प्रसिद्ध केले.आपण समोरच्या व्यक्तींचे किंवा अनेक व्यक्तींचे कार्य केले असेल तर ते कार्य ज्याचे त्यास देऊन निस्पृह असावे,हाच आपला स्वधर्म आहे.त्या कार्याची आपणांकडे न घेता ज्यांचे कार्य आहे,त्यांचीच प्रसिद्धी करावी व आपण अलिप्त राहावे.आपण कर्तेपणा न घेता व अहंकाररहित होऊन सर्व कार्य करावे.यातच आपले पारमार्थिक हित असते.असे आपले पारमार्थिक हित साध्य करण्याचा प्रयत्न करावा.अशा प्रकारच्या कार्यातच आपला मोक्ष नावाचा पुरुषार्थ दडलेला प्रगट होत असतो.||५-६|| भावार्थ:---नंतर सात्यकी,व उद्धव यांसहवर्तमान श्रीकृष्णाने पांडवांचा निरोप घेऊन,वेदव्यासादी ऋषीची पूजा केल्यावर त्यांनीही कृष्णाची उलट पूजा केली.भगवान श्रीकृष्णांनी सर्वांचा निरोप घेण्यापुर्वी जे श्रेष्ठ वेदाव्यासादी आहेत,त्यांची पूजा करून मानस्मान केला—आदर केला.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंग असला तरी आपण आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत,त्यांची पूजा—सत्कार करून त्यांना मानस्मान करणे आपले कर्तव्य असते.आपण असे कार्य करावे.त्यात आपले हितच असते.||७|| भावार्थ:---हे शौनका,नंतर द्वारकेस प्रयाण करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण रथांत बसला,इतक्यांत परीक्षितीची माता उत्तरा,भयाने व्याकूळ होऊन आपल्या समोर धांवत येत आहेत असे त्याने पाहिले.||८|| | उत्तरोवाच:-- | पाहि पाहि महायोगिन्देवदेव जगत्पते |नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू:परस्परम् ||९|| भावार्थ:---ती उत्तरा श्रीकृष्णाजवळ येऊन त्याची प्रार्थना करिते कि,हे महायोगिन जगत्पालका देवाधिदेवा,तूं माझे अवश्य रक्षण करावे.कारण,लोकांत परस्पर मृत्यू प्राप्त होतो म्हणून मी तुझ्याशिवाय दुसरा अभय स्थान पाहत नाही.आपण आपले कार्य करून आपल्या स्थानाकडे जात असतांना अकस्मात एकद्दावर अकस्मात विघ्न आले तर आपण थांबवून ते विघ्न दूर करण्याचा प्रयत्न करावा.||९|| भावार्थ:---हे व्यापक प्रभो,तापलेल्या लोखंडाच्या अग्राने युक्त असा एक बाण,माझ्या समोर येत आहे.हा मला यथेच्छपणे जाळो,परंतु हे जगन्नाथा,या बाणाने माझ्या गर्भाचा नाशमात्र होऊ नये.माता आपल्या गर्भासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता गर्भाच्या जीवाची पर्वा करते,इतके तिचे गर्भावर--लेकरावर प्रेम असते.म्हणून आपण—जीव मातेच्या ऋणांतून उतराई होऊ शकत नाही.म्हणून बालकाने आपण—बालक मोठे झाल्यानंतर—विवाहित झाल्यानंतर--प्रोढ झाल्यानंतर—पत्नीचा स्वीकार केल्यानंतर आई—वडिलांच्या पालन—पोषणाची ज्याप्रमाणे आपली लहान वयात काळजी घेतली,त्यापेक्षा अधिक आई—वडिलांच्या पालन—पोषणची काळजी घेऊन आई—वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा कांहीसा प्रयत्न करावयास पाहिजे.असे आपले हे कर्तव्यच आहे.असे आपले कर्तव्य असले तरी तरी आपण प्रत्यक्ष समाजाचा अभ्यास केला असता,काय दिसून येते ? -------------म्हणून आपण तरी आई—वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा आवश्य प्रयत्न करावयास पाहिजे.आपण आई—वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न न केला तर,”करावे तसे भरावे” या नियमानुसार समाजात काय दिसून येत आहे ?तोही आपण अभ्यास करावा.म्हणून आपण आपल्या हितासाठीच आई—वडिलांचा मृत्यू होईपर्यंत आपण सेवा करावीच.असे समाजाच्या अनुभावरून विचार करून जीवन जगावे.||१०|| भावार्थ:---सुत म्हणाला-----ऋषीहो,असे ते उत्तरेचे वचन ऐकून,भक्तांविषयी कृपाळू असा श्रीकृष्ण,मनांत समजला की,पराभव पावलेल्या अश्वत्थाम्याने क्रुद्ध होऊन भूमंडल निष्पांडव करण्याकरिता,हे ब्रह्मास्त्र सोडिले आहे.आपणास कितीही प्रतीलुल परिस्थिती आली तरी क्रोधाच्या अधीन होऊन असे कृत्य मुळीच करू नये.त्यात असे कृत्य जो करील,अंती त्याचेच अहित आहे.आपण असा विवेक करून मन ताब्यात घेऊन अशा कृत्यास प्रतिबंध करावा.||११|| भावार्थ:---हे मुनिश्रेष्ठा शौनका,त्याच काळी पांडवांनी आपल्या सन्मुख आलेले पांच बाण अवलोकन करून त्यांच्या निवारणकरिता आपापली अस्त्रे ग्रहण केली.||१२|| भावार्थ:---परंतु इतर अस्त्रांनी ब्रहमास्त्राचे निवारण अशक्य असल्यामुळे आपले ठिकाणीच दृढनिष्ठा धारण करणाऱ्या त्या पांडवांचे ते अपरिहार्य संकट पाहून,सर्वव्यापक श्रीकृष्णाने आपल्या अस्त्राने त्या स्वकीय पांडवांचे संरक्षण केले.आपल्या वर आलेले अकस्मात संकट टाळण्यासाठी भगवंतांच्याठिकाणी दृढ श्रद्धा असावयास पाहिजे.भगवंतांशीवय अन्य आपल्यावर आलेले संकट कोणीही टाळणार नाही,तर फक्त आपल्यावर आलेले संकट फक्त भगवंतच टाळेल.||१३|| भावार्थ:---आणि सर्व भूतांचा आत्मा व योगेश्वर जो श्रीकृष्ण त्याने,पांडवांची संतती राहण्यासाठी आपल्या मायेने उत्तरेच्या उदरांत प्रवेश करून तिच्या गर्भाचे आवरण—संरक्षण केले.म्हणून आपली भगवंतांवर दृढ श्रद्धा असावी.||१४|| भावार्थ:---हे भृगुकुलश्रेष्ठा शौनका,ते ब्रह्माशिरनामक अस्त्र (ब्रम्हास्त्र)जरी व्यर्थ न होणारे व कोणत्याही अस्त्राने अपरिहार्य होते तरी ते विष्णूच्या सुदर्शनास्त्राच्या तेजाचा संयोग पावल्याबरोबर अगदी शांत झाले.कारण भगवान विष्णूच्या सुदर्शनापुढे कोणतेही अस्त्र शरण येतात—शांत होतात.म्हणून भगवतांना आपण शरण जावे,तर त्यांना विरोध करू नये.||१५|| भावार्थ:---ऋषीहो,तुम्ही सर्वाश्चर्यमय श्रीकृष्णाचे ठिकाणी हे आश्चर्य मानूं नका.कारण,जो श्रीकृष्ण,स्वतः जन्मरहित असून सर्वलीलेविषयी समर्थ अशा आपल्या मायेच्या योगाने ह्या चराचर विश्वाची उत्पत्ती करितो,संरक्षण करितो आणि संहारही करितो.श्री कृष्ण हा वास्तविक पाहता जन्म—मरण रहित आहे,म्हणून तो सर्व कांही करण्यास समर्थ आहे.||१६|| भावार्थ:---पुढे ब्रह्मास्त्रतेजापासून मुक्त झालेल्या पुत्रांसह वर्तमान व द्रौपदीसहवर्तमान सुखाने असलेली सती कुंती, एकेवेळी द्वारकेस जावयास निघालेल्या श्रीकृष्णास असे म्हणाली की,-------- ||१७|| | नमस्ये पुरुषं त्वाऽऽद्यमीश्व्ररं प्रकृते: परम् | अलक्ष्यं सर्वभूतनामन्तर्बहिरवास्थितम् ||१८|| भावार्थ:---कुंती म्हणते-----हे कृष्णा,तूं जरी वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस तरी मी नमस्कार करिते.कारण,तूं मायातीत असून मायेचा नियंता आद्य पुरुष आहेस,आणि सर्व प्राणीमात्रांना आंत व बाहेर व्याप्त असून त्यांस अदृश्य आहेस.कुतीस श्रीकृष्णांचे वास्तविक स्वरूप माहित होते,त्याचप्रमाणे आपणांस श्रीकृष्ण भगवंतांचे वास्तविक स्वरूप सत्संगाद्वारे जाणून घ्यावावयास पाहिजे,कारण त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होतोत.||१८|| भावार्थ:---भगवंत ज्याच्या—आपल्या—जीवांच्या ठिकाणी अज्ञान आहे,म्हणून मायारूपी पडद्याने आच्छादित असूनही अपार महात्म्याने युक्त आहेस.म्हणजे महात्म्ये हे ज्ञानी असल्यामुळे भगवंतांस जणू शकतात.आपल्या—जीवांच्या मन आदी इंद्रियांनी भगवंतांचे ज्ञान होत नाही,कारण भगवंत परमात्मा आहे व मन व इंद्रिये आनात्मा आहेत.मन आणि इंद्रिये अनात्मा असल्यामुळे सत्ताभेद आहे.सत्ताभेद असल्यामुळे साधक—बाधक व्यवहार होऊ शकत नाही.म्हणून आपणास परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी जे मन आणि इंद्रिये आनात्मा आहेत,त्यांचा त्याग करून परमात्म्याचा अनुभव घ्यावा लागतो.म्हणजेच सर्व विषयांचा त्याग करून,परत्म्याचा अनुभव घ्यावा लागतो.जसे नाटक करून दाखविणाऱ्या नटाचे स्वरूप अज्ञानी लोकांस दुर्बोध असते,तसे देहाभिमानी पुरुषांस तुझे स्वरूप दुर्बोध आहे.आपण जर देहाचा अहंकार निवृत्त केला तर भगवंतांची अनुभूती येते,अन्यथा येत नाही.मी—कुंती तर तुझे भक्ती न जाणणारी अज्ञ आहे,म्हणून तुला केवळ नमस्करच करिते.कुंती ज्ञानी असून कमीपणा घेऊन आपला भाव दाखवीत आहे.आपणही पारमार्थिक क्षेत्रात कमीपणा घेऊन म्हणजे अहंकाररहित जीवन व्यतीत करावयास पाहिजे.असे आपण आचरण केले तर आपली पारमार्थिक वाटचाल चालू आहे,अन्यथा नाही.||१९|| भावार्थ:---हे कृष्णा,आत्मानात्मविचार करणारे,मननशील आणि विषयवासनारहित अशा ऋषीनाही तुझे पूर्णपणे ज्ञान होत नाही.जे पुरुष असून आत्मा—अनात्मा विवेकशील—विचारशील आहेत—प्रयत्न करणारे असल्यामुळे,त्यांच्याठिकाणी वैराग्य असल्यामुळे विषयवासनारहित असूनसुद्धा भगवंतांचे त्यांना यथार्थ-ज्ञान होत नाही--भगवंत अनुभवास येत नाही. मग आम्ही स्त्रिया,तुझा भक्तियोग करण्यासाठी तुला जाणण्यास कशा समर्थ होऊं ? आम्ही स्त्रिया अज्ञानी,भक्तियोग जाणू शकत नाही,म्हणून आमच्याकडून भक्तीयोगाची साधना घडू शकत नाही.त्यामुळे जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा अधिकार आमच्यात येत नाही,म्हणून भगवंतांच्या यथार्थ-स्वरूपाला जणू शकत नाहीत.असे असले तरी स्त्रियांनी सत्संग करून निष्काम भक्तीयोग म्हणजे काय असे जाणून त्याप्रमाणे साधना केली तर जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाचा अधिकार येऊन ज्ञान्द्वारे भगवंतांचे यथार्थ—ज्ञान होऊ शकते व त्या यथार्थ ज्ञानाचा विषयांचा त्याग करून ब्रह्मानुभूती येऊन जन्म—मरण निवृत्त होऊ शकते.वेदांत—शास्त्राने पुरुष—स्त्री हा भेद केलेला नाही,तर अखिल मानव—जातींना परमात्म्याचा अनुभव घेता येतो.परमात्म्याचा अनुभव घेतलेला आहे,म्हणण्यापेक्षा घेतलेले उदा—उपनिषदांत उल्लेख आलेला आहे.उदा—गार्गी,लोपामुद्र,मैत्री इत्यादींचे नांवे आहेत.कलियुगात संत निवृत्तीनाथ यांची मुक्ताई,यांनी तर चौदाशे—वर्षांचे योग साधना करणारे व यमास परत पाठविणारे चांगदेव यांना उपदेश केला.संत नामदेवांची यांच्या शिष्या जनाबाई यांनी तर अभंग—रचना करून सर्वांना उपदेश केलेला आहे.असे असूनसुद्धा कांही स्वता:स अखिल भारतातून किंवा अखिल जगतातून संत म्हणवून घेणारी मंडळी स्त्रियांत भेद—दृष्टी ठेऊन,त्यांना वेदांत श्रवण करण्याचा अधिकार नाही,कीर्तन करण्याचा अधिकार नाही,असे कीर्तनातून,प्रवचनातून उल्लेख करून निषेध करतात.अधिकारसंपन्नता हि स्त्री असो किंवा पुरुष असो कांहीत असते किंवा कांहीत नसते.सर्वांना अधिकार नसला,तरी ज्या अधिकारसंपन्न स्त्रिया आहेत किंवा जे पुरुष अधिकार संपन्न आहेत त्याचा स्वीकार करावा व ज्या स्त्रियांत अधिकार नाही किंवा ज्या पुरुषांत अधिकार नाही,त्यांचा निषेध करावा.थोडक्यात स्त्री—पुरुष असा विनाकारण भेद करू नये.आपण समाजाचे अवलोकन—निरीक्षण केले तर असे दिसून येते की,स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक व्यसनाधीन—निषेध करण्यास योग्य आहेत,असे दिसून येते.म्हणून शात्रांचा मताचे ग्राह्य धरून निषेध करू नये.असे असून जर निषेध केला तर तो दोष,शास्त्रांचा नसून निषेध करणारांचाच असे समजावयास कांहीच हरकत नाही.हा दोष पुरुषप्रधान लोकव्यवहाराचा आहे,तर भारतीय संस्कृतीचा नाही,असे धर्मशास्त्रातून दिसून येते.आपण अंधश्रद्धा न ठेवता,विवेक—विचार--डोळस दृष्टी ठेऊन त्यानुसार बुद्धीने निर्णय घेऊन आचरण करावे.असे केले असता स्वधार्मांचे पालन होईल व पराधार्मांचे पालन होणार नाही.यामुळे आपले अहित न होता परमहितच होईल.||२०|| भावार्थ:---तस्मात् कृष्ण,वसुदेवाचा पुत्र,नंदगोपाचा पुत्र व गोविंद या नावांनी प्रख्यात अशा तुला माझा वारंवार नमस्कार असो.आपणही—जीवांनी भगवंत—श्रीकृष्ण यांना वारंवार नमस्कार करावयास पाहिजे.आपण—जीवांनी भगवंतांचे निरंतर निष्काम नास्मरण करावे.त्यामुळे आपले चित्तशुद्ध होत असते.||२१|| भावार्थ:---हे देवा,चतुर्दशलोकरूपी कमळ तुझ्या नाभीपासून उत्पन्न होऊन त्याच आधाराने राहिले आहे.तुझ्या कंठात कमळांची माळा शोभत आहे,आणि तुझे नेत्र व चरण कमळासारखे कोमल व सुंदर आहेत.अशा तुला मी पुनः पुनः नमस्कार करिते.म्हणून आपण—जीवानी भगवंतांचे निरंतर नामस्मरण करावे.||२२|| भावार्थ:---देवकीमातेपेक्षाही माझे ठिकाणी तुझी प्रीती फार आहे.ती अशी कि,हे इंद्रियपालका श्रीकृष्णा,पूर्वी दुष्टकंसाने बंदीशाळेत ठेवलेल्या देवकीला तूं जसे दुःखातून मुक्त केलेस,तसेच मला मुक्त केले काय ? नाही नाही.तर ती देवकी बहुकालपर्यंत प्रतिबंधात होती तिला त्यांतून एकवारच मुक्त केलीस तथापि तिच्या पुत्रांचे रक्षण न केल्यामुळे तिचे पुत्रशोकरूप दुःख गेले नाही व वसुदेवही तिला दुसरा रक्षक होता आणि हे विश्वव्यापका नाथा,अनाथ अशा मला तर दीननाथ अशा तूं अनेक विपत्तीच्या समुदायांतून धर्मादी पुत्रांसह वर्तमान वारंवार शीघ्र मुक्त केले आहेस.हे भगवंताने ज्याप्रमाणे अनेक विपत्तीतून कांती आणि तिचे पुत्र पांडव यांना अनेक संकटातून मुल्क केले,कारण ते सर्व कृष्णाचे अनन्य निष्काम भक्त होते.त्याचप्रमाणे आपणही भगवंतांचे अनन्य निष्काम भक्त झालोत.तर निश्चित भगवंत आपले—जीवांचे रक्षण करतो.असा आपण निष्काम भक्ती करून अनुभव घ्यावावयास पाहिजे.||२३|| भावार्थ:---हे भक्तदुःखहरणा श्रीकृष्णा,दुर्योधनाने भिमास दिलेले विषाचे मोदक,लाक्षागृहाचा दाह,हिंडीबादि राक्षसांचे दर्शन,दुर्योधनादी दुष्टांची दूतसभा,वनवासांतील अनेक संकटे,प्रत्येक युद्धात भीष्मादी महारथ्यांची वैष्णवादी अस्त्रे व द्रोणपुत्र अश्वत्थ्याम्याचे ब्रह्मास्त्र यांपासून तूं सर्व बाजूंकडून सर्वदा आमचे रक्षण केले आहेस.आपण भगवंतांची निष्काम भक्ती केली तर भगवंत आपल्यावर आलेली संकटे निवारण करतो असे निश्चित आहे.||२४|| | विपद:सन्तु न: शश्वत्तत्र जगद्गुरो | भावतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् ||२५|| भावार्थ:---हे जगद्गुरो,आम्हांस निरंतर सर्व स्थली विपत्तीच असोत.कारण,त्या विपत्तीत,ज्यापासून प्राण्याला पुनः संसाराचे दर्शन होत नाही अशा प्रकारचे तुझे दर्शन होते.कुंती माता म्हणते की,भगवंता आम्हावर निरंतर संकट येवो,कारण आपण संकटकाळात भगवंतांचेच स्मरण करीत असतो व सुखाच्या काळात भगवंतांचा विसर पडत असतो व भगवंतांच्या स्मरणात संसाराचा विसर पडत असतो.कुंतीने जशी मागणी केली,त्याचप्रमाणे आपण संसारात दु:खाचीच मागणी करावी,तर संसारातील सुखाची मागणी करू नये.त्यामुळे भगवंतांचे निरंतर स्मरण होत असते.भगवंत व्यक्तरूपाने अंत:करणास निवास करीत असतो,त्यामुळे आपले दु:ख निवारण करीत असतो.||२५|| भावार्थ:---संपत्ती तर कल्याणप्राप्तीस प्रतिबंधक आहेत.संपत्ति हि परम-कल्याण—परमार्थास प्रतिबंध—प्रतिकूल करणारी आहे.म्हणून आपण संपत्तीवान—धनवान असण्यापेक्षा सात्विक गुणवान असावयास पाहिजे.सात्विक संपत्तीने—गुणांने परमार्थ होत असतो.उत्तमकुलांतील जन्म,ऐश्वर्य,शास्त्रध्ययन आणि तू संपत्ति यांनी ज्याचा गर्व वृद्धिंगत झाला आहे तो पुरुष,म्हणून आपला उत्तम कुळात,उत्तम ऐश्वर्यात,उत्तम शास्त्र-अध्ययन,आणि विपुल संपत्ति असेल व त्यास जोडून अहंकार असेल व या सर्वांची आसक्ती असेल तर आपल्या मुखात भगवंतांचे व यांचे नांवही येत नाही व त्याचा सत्संगही करावा वाटत नाही.धनादिकांचे ठिकाणी आसक्त नसणाऱ्या पुरुषांस—संत—माहात्म्यास प्रत्यक्ष दर्शन देणाऱ्या तुझे,श्रीकृष्ण गोविंद असे नांवसुद्धा उच्चार करण्यास प्रवृत्त होत नाही.||२६|| | जन्मैश्वर्यश्रुतभिरेधमानमद: पुमान् | नैवार्हत्यभिधातुं वै त्वामकिन्चनगोचारम् ||२६|| भावार्थ:---यास्तव,भक्त हेच ज्याचे—भगवंतांचे द्रव्य आहे,तर आपले द्रव्य भगवंत असावा.धर्म,अर्थ व काम हे ज्यापासून—भक्तांपासून निवृत्त झाले आहेत,आपल्यापासून—जीवांपासून धर्म,अर्थ,व काम निवृत्त झालेले असावे,म्हणजेच आपण भगवंतांचे निष्काम भक्त असावे,कारण निष्काम भक्ताच भगवंतांना प्रिय आहे,तर सकाम—संसारी भक्त भगवंतांस प्रिय नाही.स्वस्वरूपाचे—परमात्मास्वरूपाच्या ठिकाणी रममाण असणारा,शांत व भक्तांस मोक्ष देणारा अशा तुला—श्रीकृष्णास मी—कुंती वारंवार नमस्कार करिते.आपणही निरंतर भगवंतांच्या नामाचे स्मरण निरंतर करावे.||२७|| भावार्थ:---हे कृष्णा,तूं सर्वांचा नियंता,उत्पत्ति-नाशांनी रहित आणि सर्वठीकाणी समबुद्धीने म्हणजे सर्वांना समानतेने पाहणारा—व त्यानुसार आचरण--संचार करणारा असा कालरूपी प्रभू आहेस,असे मी मानिते.प्राणिमात्रांत—जीवामात्रात जो कलह-द्वेष होतो तो त्यांच्या परस्पर असलेल्या वैषम्यानेच म्हणजे विषमता या भावनेने होतो.त्याबद्दलचा—विषमतेचा संबंध श्रीकृष्णांच्याठिकाणी मुळीच नाही.म्हणून आपल्या—जीवांच्या ठिकाणी समता असावी,तर विषमता नसावी.||२८|| भावार्थ:---हे भगवन,मनुष्यांत अवतार घेऊन त्यांच्यासारखे अनुकरण करणाऱ्याहि तुझे मनांतील कर्तव्य कोणीच जाणत नाहीत,कारण विवेक—विचार--बुद्धीने भगवंतांकडे पाहत नाही,म्हणून आपण—जीवांनी विवेक—विचार बुद्धीने भगवंतांकडे पाहावे.असे पहिले म्हणजे आपणांस भगवंतांची कर्तव्य कळते,म्हणून साधुंवर अनुग्रह करितोस व दुष्टांचा निग्रह करितोस अशी तुझे ठिकाणी विषमबुद्धी उत्पन्न होते;परंतु वास्तविक पहिले असतां,तुझा कोणीच प्रिय किंवा द्वेष्टा नाही.वास्तविक पाहता भागावान्तंस कोणी प्रिय नाही व अप्रिय इ,कारण भगवंत सर्व जीवांना ज्याच्या—त्याच्या कार्मांनुसार फळ देत असतो,कारण त्याच्यात विषम दृष्टी नसते,तर समा-दृष्टी असते.म्हणून आपल्यातही सम दृष्टी असावी,तर विषम दृष्टी नसावी.विषम दृष्टीत दु:ख आहे व सम दृष्टीत सुख आहे.||२९|| भावार्थ:---हे विश्वजीवना श्रीकृष्णा,सर्वांचा आत्मा—सर्वांच्या अंत:करणात कूटस्थ—ब्रह्मरूपाणे असून जन्मकर्मांनी रहित म्हणजे भगवंत स्वता:च्या कर्मांमुळे जन्मास येत नाही,तर जीवांचे—सज्जनांचे रक्षण करण्याकरिता व धर्मांची—स्वधर्मांची स्थापना करण्याकरिता जन्मास येतात.आपण—मनुष्य जीव हा स्वत:च्या कर्मांच्या फल-भोगांसाठी व परमार्थ करण्यासाठी जन्मास येतात,व इतर जीव मानव—जन्मात जी कर्मे केलेली आहेत,त्यांच्या भोगासाठी लक्ष-चौऱ्याऐंसीयोनीस जन्मास येतात.फक्त कर्मफलांच्या अशा तुझी—भगवंतांची तिर्यकयोनीमध्ये वराहादिरुपाने,मनुष्यांमध्ये रामादिरुपाने,ऋषीमध्ये वामनादिरूपाने आणि जलचरजातीमध्ये मत्स्यादी रूपाने जी जन्मे आणि तदनुसार कर्मे झाली आहेत,ते त्या स्थितीचे केवळ अनुकरण आहे,तर कर्मांच्या फल-भोगाण्यासाठी नाहीत.म्हणून आपण मनुष्य देहात जन्मास आपल्यानंतर संसार न करता फक्त परमार्थच करावा.||३०|| भावार्थ:---तसेच तूं लोकरीतीने जे आचरण करून दाखवितोस तेही अत्यंत आश्चर्यकारक आहे.पहा-जेव्हा तू गोकुळांत दह्याचे भांडे फोडून यशोदेचा अपराध केलास आणि तुला बंधन करणासाठी यशोदेने हातांत दावे घेतले,तेव्हा तूं जी आपली अवस्था तिला दाखविलीस,ती माझ्या अंतःकरणास फारच मोह उत्पन्न करिते,कारण,संसाररूप भयही तुला भीत असून त्यावेळी तूं त्यावेळी तूं आईच्या ताड्नाचे भय मानून खाली मुख करून उभा राहिलास आणि अश्रू आल्यामुळे तुझी नेत्रे कजलयुक्त उदकाने व्याप्त होऊन भयाने चंचलहि झाली होती.भगवंता तुझीच सर्व सत्ता असतांना,यमही तुझ्याच अज्ञाचे पालन करितो,सूर्य देवता तुझ्या अज्ञाने जगाला प्रकाश वेळेवर देतो.इताकेच काय?झाडांचे पाने तुझ्याच सत्तेने हालचाल करितात.असा सर्वसत्ताधीश असून यशोदा—मातेच्या ताड्नाचे भय मात्र वाटून मान खाली घालून भीतीदायक भावाने उभा राहिलास.याचे सर्वांना नवल वाटले.आपणासही या लीलाचे नवल वाटावयास पाहिजे.||३१|| भावार्थ:---असे तुझे चरित्र जगास मोहक असल्यामुळे तुझ्या जन्मादिकांचे लोक बहुतप्रकारे वर्णन करितात.तूं जन्मरहित असून प्रिय अशा धर्मराजाच्या कीर्तीसाठी यदुराजांच्या वंशांत,मलयपर्वताच्या यशोवृद्धर्थ चंदन जसा उत्पन्न होतो,त्याप्रमा-- णे उत्पन्न झाला आहेस असे कितीएक म्हणतात.आपण—जीवांनी भगवंतांची चरित्रे व लीला श्रवण कराव्यात.||३२|| भावार्थ:---तसाच तूं उत्पत्तीरहित असूनही,पूर्वजन्मी पृश्नि व सुतपा या नावांच्या स्त्री-पुरुषांनी,आपला पुत्र होण्यासाठी तुझी प्रार्थना केली असतां तिची सिद्धी व्हावी,या जगाचे कल्याण व्हावे आणि दैत्यांचा वध व्हावा यासाठी,या जन्मी सुतपारूप वसुदेवाच्या पृश्निरुप देवकीचे ठिकाणी उत्पन्न झाला आहेस असे कोणीएक म्हणतात.आपण जर तप केले तर त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी भगवंत स्वता: देलेल्या शब्दानुसार आचरण करून त्या इच्छेची पूर्तता करतात. म्हणून आपण इच्छित तप करावे,व आपल्या इच्छेची पूर्तता करून घ्यावी.||३३|| | भारावतारणायान्ये भुवो नाव इवोदधौ | सीदन्त्या भूरिभारेण जातो ह्यात्मभूवार्थित: ||३४|| भावार्थ:---समुद्रांत भाराने बुडणाऱ्या नौकेप्रमाणे,दुष्टराजांच्या बहुभाराने पिडीत झालेल्या भूमीचा भार दूर करण्याकरिता ब्रहमदेवाने प्रार्थना केली असतां तूं झालास असे कोणी म्हणतात.भगवंत स्वधर्मांची—धर्मांची स्थापना करण्याकरिता व दुष्टांचा संहार करण्याकरिता मृत्यू लोकांत जन्मास येऊन ते कार्य करून प्रजाजनांना सुख देतात.आपणही आपल्या अधिकारानुसार आपापले परोपकारक कार्य करून जीवांचे दु:ख निवृत्त करून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा.||३४|| | भवेऽस्मिन् क्लिश्यमनानामाविद्याकामकर्मभि:| श्रवणस्मरणार्हांणि करिष्यन्निति केचन ||३५|| भावार्थ:---या संसारामध्ये परमानंदस्वरूपाचे अज्ञान,त्यापासून देहादिकांवर अभिमान व त्यापासून घडलेली कर्मे यांच्या गर्भवासादी अनेक क्लेश पावणाऱ्या दीनजणांच्या दुःखपरिहारार्थ,त्यांनी श्रवण व स्मरण करण्यास योग्य अशी चरित्रे करण्यासाठी तूं अवतार ग्रहण केलास असे किती-एक म्हणतात.भगवंत आपल्या--जीवांच्या उद्धारासाठी—दु:ख निवृत्तीसाठी—अज्ञान निवृत्तीसाठी अनेक चरित्रे बोध घेण्यास योग्य स्वता: आचरण करून दाखवतात.आपण—जीव स्वत: भगवंतांनी आचरण केल्यामुळे,त्यानुसार बोध घेऊन स्वत:आचरण करितात.कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करीत असतात.म्हणून जे श्रेष्ठ असतात,त्यांना स्वधार्मान्नुसार आचरण करून,त्यानुसार वर्तन करावे लागते.||३५|| भावार्थ:---हे कृष्णा,जे लोक,तुझ्या चरित्रांचे,श्रवण,गायन,कथन,स्मरण किंवा आदर करितात तेच लोक,जन्मपरंपरेचा नाश करणारे तुझे चरणकमल,शीघ्र अवलोकन करितात.म्हणून आपण—जीवांनी भगवंतांची चरित्रे,श्रावण,गायन,कथन,स्मरण, आदरपूर्वक करावे.आदरपूर्वक केले असता आपले—जीवांचे अंत:कारण शुद्ध आणि स्थिर होऊन वेदांत श्रावण करण्याचा अधिकार प्राप्त होतो.अंत:करण शुद्ध व स्थिर झाल्यानंतर जीव-ब्रह्म-ऐक्य—ज्ञान मार्गाला लागून ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो.म्हणून आपण सत्संग करावा.||३६|| भावार्थ:---स्वकीयांचे इच्छित पूर्ण करणाऱ्या हे प्रभो,आम्ही तर तुझे इष्ट म्हणजे अनन्य व पोष्य म्हणजे आमचे पोषण आपल्याकडूनच होते.म्हणून आपले—जीवांचे इष्ट मणजे अनन्य भगवंतांच आहेत व पोष्य म्हणजे पोषण करणारे भगवंतच आहेत.प्रायः आम्ही अपराधी असलो तरी सर्व दुष्ट राजांचे अपराधी आहो.यामुळे आम्हांस तुझ्या चरण कमलांवाचून दुसरा आश्रय मुळीच नाही.आम्हास आपनावाचू अन्य कोणाचाच आश्रय नाही, आपणास—सर्व जीवनंस भगवंतांशीवाय—परत्म्याशिवाय अन्य कोणाचाच आश्रय नाही.असे असता तूं आजच आमचा त्याग करितोस हे काय ? आपणास भगवंत त्याग करीत नसतात,तर आपल्यात—जिवंत कांही तरी उणीव—दोष असल्यामुळे आपणच—जीवच बाजूला होतो.म्हणून आपम जीवांनी आपल्यातील उणीव—दोष निवृत्त करून परमात्म्याशी अभेद करावा.||३७|| भावार्थ:---सर्व इंद्रियांचा नियंता जो जीव तो या देहातून गेला असता चक्षुरादिक—चक्षु—जिव्हा—रसना—घ्राण—श्रोत्र इंदृये जशी निरोपयोगी होतात,त्याप्रमाणे,तुझे अवलोकन आम्हाकडे नाही झाले तर नावांनी व रूपांनी प्रसिद्ध असे यादव आणि आम्ही पांडव हे कितीसे पराक्रमी आहो ? (कांहीच नाही)भगवंतांची आपल्यावर—जीवांवर कृपादृष्टी नसेल तर आपल्या जीवनाला कांहीच अर्थ नाही—दु:खमय जीवन होईल.आपणास दु:खमे जीवन करता सुखमय जीवनाची अपेक्षा आहे.||३८|| भावार्थ:---हे गदाधरा,दुसरे ठिकाणी कोठेच नसणाऱ्या वज्रांकुशादी लक्षणांनी सुशोभित अशा तुझ्या चरणांनी चिन्हित झालेली हि राष्ट्रभूमी,जशी आता शोभत आहे,तशी तूं द्वारकेस गेल्यावर शोभणार नाही.||३९|| भावार्थ:---आणि हे श्रीकृष्णा,उत्तम पक्व झालेल्या ओषधी व वेली यांनी सुशोभित असून सर्व संपत्तिंनी अत्यंत समृद्ध असे हे आमचे देश आणि या देशसंबंधी वने,पर्वत,नद्या व समुद्र हे तुझ्या कृपावलोकनाने वृद्धिगत होत आहेत.भगवंतांच्या कृपेने नैसर्गिक संपत्ति समृद्ध आहे व आपणांस तिची जीवन जगण्यासाठी गरज आहे.असे असले तरी आपण निसर्गाचा असलेला समतोल बिघडवून प्राणी आणि त्यांचे राहण्याचे ठिकाणे जंगलादी भागावर अतिक्रमण करीत आहोत.त्याचा परिणाम म्हणून मानवांचे जीवन अधोगतीला जात आहे.शात्रीय दृष्टीकोनातून विवेक—विचार केला असे दिसून येते की,जे प्राणी ओठाने पाणी पितात त्यांनी शाकाहार स्वीकारावा व जे प्राणी तोडांने पाणी पितात,त्यांनी मांसाहाराचा स्वीकार करावा.असे आपण सर्व प्राणी जे आहेत,त्यांचा आहारावरून सहज लक्षात येते.उदा—गाय—बैल इत्यादी,असे प्राणी तोंडाने पाणी पितात,म्हणून वनस्पतीचाच आहार स्वीकारतात.त्यांना कितीही भूक लागली तरी मांसाहार त्यांना दिला तरी ते सेवन—खात नाहीत,तर वान्स्पतीचाच आहार सेवन करतात.जे प्राणी जीभीने चाटून पाणी पितात,ते प्राणी मांसाहाराचाच स्वीकार करतात.त्यांना कितीही भूक लागली तरी ते वनस्पतीचा स्वीकार न करता मांसाहाराचाच स्वीकार करतात असे आपनाद दिसून येते.उदा—वाघ—सिंह इत्यादी.यामुळे निसर्गाने ज्यांचा आहार जसा निश्चित केलेला आहे,त्यांनी त्यांचाच आहाराचा स्वीकार करून जीवन जगावे.त्याच्यात त्या—त्या जीवांचे हित आहे.म्हणून सर्व मृत्यू लोकांतील मानवांनी विवेक—विचार करून शाकाहारांचाच स्वीकार करून म्हणजेच मांसाहाराचा निषेध करून जीवन जगावे.त्याचप्रमाणे त्या प्राण्यांना राहण्यासाठी जी जंगले आहेत,त्यांचे संवर्धन करून त्या जंगलाचे रक्षण करावे.त्यासाठी मृत्यू—लोकांतील राज्य—घटनेत कायदे करावीत.असे न केले तर कोरोणासारखी महामारी येऊन मानवांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही.चीन देशात कोणत्याही प्राण्यांचे मांस भक्षण केले जाते,म्हणून कोरोना विषाणूचा उगम त्याच देशात झालेला आहे.म्हणून तेठीक सत्ताधीशांनी सध्या कोरोनाचा उगम झाल्यानंतर कोणत्याही प्राण्यांचे भक्षण न करता ठराविक चार—पंच प्रण्यांचेच मांस सेवन करावे,म्हणून कायदा केलेला आहे.कांही दिवसांनी असा कायदा करावा लागेल की,कोणत्याही प्राण्यांचे मांस—भक्षण मनुष्यांनी न करता फक्त वनस्पतीचाच आहार स्वीकार करावा,असा कायदा करावा लागेल.आज चीनने कांही बाबतीत कायदा केलेला आहे,असे करून नैसर्गिक नियमन न होता,जगातील सर्व सत्ताधीशांना असा कायदा करावा लागेल की कोणत्याही प्राण्यांचे मांसाहाराचा त्याग करा व वनस्पतीचाच आहार स्वीकार करून जीवन जगा तसेच त्या प्राण्यांना राहण्याकरिता जंगलाचे रक्षण करा.तेव्हा नैसर्गिक समतोल साधल्या जाऊन मानवी जीवन सुखमय होईल,अन्यथा होणार नाही.भारतीय संस्कृतीत मानवांचा आहार हा फक्त शाकाहार—वान्स्पतीच्याच आहाराचा स्वीकार केलेला असून मांसाहाराचा निषेध केलेला आहे.म्हणून सर्व जगातील मानवांनी भारतीय संस्कृतीनुसार जीवन जगण्याचा विचार करून,त्यानुसार आचरण करावे—जीवन जगावे.||४०|| भावार्थ:---हे विश्वेशा,हे विश्वात्मन हे विश्वमूर्ते श्रीकृष्णा,आता मागणे हेच कि,तूं द्वारकेस गेलास तर पांडवांना तुझ्या वियोगाने दुःख होईल,व न गेलास तर यादवांना दुःख होईल असा,पांडव व यादव या स्वकीयांचे ठिकाणी माझ्या मनांत जो दृढ स्नेहपाश राहत आहे तो तूं तोडून टाक.आपल्या मनांत जर देहासंबंधीचा स्नेहपाश—मोह असेल तर सत्संग करून निवृत्त करावा,कारण तो दु:खास कारण असतो.आपला स्नेहापाश—मोह निवृत्त झाल्यानंतर दु:ख न राहता सुख प्राप्त होत असते.||४१|| भावार्थ:---आणि हे मधुवनपालका,जशी गंगा,मध्ये कितीही अडथळे आले तरी त्यांस न जुमानिता आपला प्रवाह समुद्रांत मिळविते,त्याप्रमाणे माझ्या बुद्धीने निरंतर अनन्यभावेकरून तुझे ठिकाणीच,अखंड प्रीती करावी.आपण आपला—जीवांचा अभेद म्हणजे परमात्म्याशीच असावा,कारण त्यामुळे जन्म-मरण निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होत असते.||४२|| | श्रीकृष्ण कृष्णसख वृष्णयृषभावनिध्रुग्-राजन्यवंशदहनानपवर्गवीर्य | | गोविन्द गोद्विजसुरातिर्ह रावतार -योगेश्वराखिलगुरो भगवन्नमस्ते ||४३|| भावार्थ:---हे श्रीकृष्णा,तूं यादवश्रेष्ठ,अर्जुनाचा मित्र,पृथ्वीला भारभूत दुष्ट राजांचा अग्निसारखा नाश करणारा,अक्षीण-- पराक्रम,गोविंद,गाई ब्रहमण व देव यांच्या पिडा हरण करण्यासाठी अवतार घेणारा,षड्गुणैश्वर्यसंपन्न आणि ब्रह्मादिकांचा गुरु आहेस,यास्तव मी तुला वारंवार नमस्कार करिते.म्हणून आपण ब्राह्मण,गाई,सतं—महात्मा यांना जर दु:ख झाले तर,त्या दु:खांचे निवारण करावे.आपण त्यांची सेवा करावी.भगवंत हा षड्गुणऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे त्यांचे वास्तविक स्वरूप जाणून घ्यावे.भगवंत ब्रह्मादिकांचा गुरु आहे,म्हणून आपण त्यांना गुरु स्थानी मानावे.म्हणून त्यांना पुन्हा—पुन्हा नमस्कार करावा.त्यातच आपले म्हाहीत आहे.||४३|| भावार्थ:---सुत म्हणाला-----ऋषीहो,कुंतीने अशा मधुर पदांनी रचलेल्या वाक्यांनी ज्याचे सर्व गुण स्तविले आहेत अशा त्या श्रीकृष्णाने,सर्वांस मायेने मोहित करण्यासाठीच कि काय मंदहास्य केले.||४४|| भावार्थ:---आणि तिने अनन्यभक्तीविषयी केलेल्या प्रार्थनेचा अंगीकार करून,रथाखाली उतरून हस्तीनापुरांत गमन केले.नंतर काही दिवसांनी कुंती,सुभद्रा इत्यादी स्त्रियांचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण,आपल्या द्वारकेस जाण्यास निघाला असतां,”तूं काही काल तेथे वास करावयास अशी” धर्मराजाने प्रेमभावाने प्रार्थना करून त्यास राहवून घेतले.त्याचप्रमाणे आपण संत—महात्मा यांचा सत्संग घडावा म्हणून आपणांकडे त्यांना थांबून राहण्याची व सत्संग प्राथना करावी.त्यांचा सत्संग करून,त्यांच्या मुखातून वेदांत—शास्त्राचे श्रवण करून,त्यांची सेवा करावी.||४५|| भावार्थ:---पुढे आपला भक्त जो भीष्माचार्य त्याच्या प्राणोत्क्रमन महोत्सवार्थ आपण धर्मराजस घेऊन कुरुक्षेत्रांत जावे तेथे त्या भीष्माच्याच मुखाने धर्मराजास बोध करावा हि दोन्ही कार्ये करण्याचा श्रीकृष्णाचा अभिप्राय होता त्यास जाणणाऱ्या व्यासादिकांनी व अद्भुतकर्म करणाऱ्या श्रीकृष्णाने बहुत इतिहासादिप्रकारांनी बोध केला असतांही,मरण पावलेल्या वंशजांच्या शोकाने व्याकुळ झालेला तो धर्म राजा,विवेक पावला नाही.||४६|| भावार्थ:---तर हे विप्रहो,तो धर्मनंदन राजा,आपल्या आप्त्यांच्या वधाचे स्मरण करून,अविवेकाणे व्याप्त झालेल्या चित्ताने केवळ स्नेहाच्या व मोहाच्या स्वाधीन होत्साता म्हणूं लागला की,----------||४७|| भावार्थ:---अहो,दुष्टचित्त अशा माझ्या अंतःकरणात किती हे अज्ञान प्राप्त झाले आहे पहा,कोल्हे यांचा भक्ष्य जो देह त्याला राज्यादिसौख्य प्राप्त होण्यासाठी मी बहुत अक्षौहिणी मारिल्या.आपण आपल्या सुखासाठी इतर जीवांचा वाढ करणे योग्य नाही,म्हणून कोणाचाही वध करू नये.||४८|| अर्थः—बाल,ब्राहमण,संबंधी,मित्र,भीष्मादिक पितर,कर्णादिक बंधू,आणि द्रोणादिक गुरु,यांचा द्रोह करणाऱ्या माझी दहा कोटी वर्षांनीही नरकांतून मुक्तता होणार नाही.आपणाकडून बाल,ब्राह्मण,संबंधी,मित्र,वडीलधारी मंडळी,बंधू,गुरु,यांचा द्रोह झाला तर महापाप होते व ते पाप आपणांस भोगावयास येते,म्हणून यांच्याशी द्रोह करू नये.आपण कोणाचाही वाढ करू नये.||४९|| भावार्थ:---प्रजापालन करणाऱ्या राजांचे धर्मयुद्धात शत्रूंचा वध केला तरी त्यास पाप लागत नाही असे जे शिक्षारूप शास्त्र वचन आहे,मी त्या बोधविषयी समर्थ होत नाही.आपणास ते शास्त्र वचन पटू नये,कारण आपण त्या योग्यतेचे नाहीत,म्हणून आपण ते कृत्य करू नये.||५०|| भावार्थ:---मी ज्या स्त्रियांचे पती मारले आहेत त्यांचा जो द्रोह येथे उत्पन्न झाला आहे त्याला आतां गृहस्थाश्रमसंबंधी विहित कर्मांनी दूर करण्यास मी समर्थ नाही.आपण असा द्रोह करू नये,कारण पापांचे निमुलन करू शकत नाहीत.||५१|| | यथा पङ्केन पङकाम्भ: सुरया वा सुराकृतम् | भूतहत्यां तथैवैकां न यज्ञैर्मार्ष्टूमर्हति ||५२|| भावार्थ:---जसे आंगास लागलेले चिखलाचे पाणी घट्ठचिखलाने धुवून टाकितां येत नाही,किंवा अज्ञानाने घडलेले लेशमात्र सुरापानाचे पातक,बुद्धी पूर्वक केलेल्या सुरापानाने घालविता येत नाही,तसेच अविचाराने झालेल्या भूतहत्येचे पाप,बुद्धी पूर्वक केलेल्या हिंसायुक्त यज्ञांनी दूर करण्यास कोणीही समर्थ नाही.अज्ञानावस्थेत किंवा ज्ञानावस्थेत केलेले सुरापानाचे—दारू सेवन केल्याचे पाप घालविता येत नाही,म्हणजे ते दु:ख भोगावेच लागते.म्हणून कोणत्याही परिस्थितीत सुरापान—दारूचे सेवन करू नये.तसेच अविचाराने केलेले भूत—हत्या—प्राणिमात्रांची हत्या हिंसापुर्वक यज्ञाने निवृत्त होत नाही,कारण यज्ञात हिंसा हि करावी लागते.हिंसा केल्याने हिंसा नाहीसी होईल का ? म्हणून हिंसाने हिंसा निवृत्त होत नसते तर वाढत असते,म्हणून आपण केव्हाच हिंसा करू नये.||५२|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |असा हा कुंतीने श्रीकृष्णांची स्तुतुविषयक प्रथम(१) स्कंधातील आठवा(८)अध्याय बावन्न(५२)श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.(८--५२) | |श्रीकृष्णार्पणअर्पणमस्तू—श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |९----अध्याय नववा(९)भीष्माने धर्मराजास सर्व धर्मांचे निरुपण केले,श्रीकृष्णाची स्तुतिकेली आणि त्यास मुक्ति प्राप्त झाली हा विषय,या नवव्या अध्यायात वर्णिला आहे.||९|| |९-----९---[युधिष्ठीर आदींचे भीष्माच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | इति भीत:प्रजाद्रोहात्सर्व धर्मविवित्सया | ततो विनशनं प्रागाद् यत्र देवव्रतोSपतत् ||१|| भावार्थ:---सुता म्हणाला-----–ऋषीहो याप्रमाणे प्रजेच्या द्रोहापासून भयभीत झालेल्या तो धर्मराजा,सर्वधर्म जाणण्याच्या इच्छेने जेथे भीष्माचार्य शरपंजरी पडला होता त्या कुरुक्षेत्रात निघून गेला.आपण आपले कर्तव्य जर पार पाडू शकलो नाही,व त्यामुळे भयभीत झालेलो असुत,तर संत—महात्मा यांचा आपण सत्संग करावा.त्यामुळे आपण आता काय कर्तव्य करावे,असे सत्संग केल्यानंतर कळत असते.त्यामुळे आपला भिती नाहीसा होत असते व स्थिरता प्राप्त होत असते.||१|| भावार्थ:---ते समयी भिष्मसेनादी सर्व बंधू उत्तम अश्वयुक्त सुवर्णखचित रथांत बसून युधिष्ठिराच्या अनुलक्षेकरून निघाले.तसेच व्यासधौम्यादिक ऋषीही निघाले.||२|| भावार्थ:---हे ब्रहमर्ष शौनक,त्यालोकी भागावान्-श्रीकृष्णहि अर्जुनासहवर्तमान रथांत बसून निघाला.तेव्हा तो धर्मराजा,त्या कृष्णादिकांनी युक्त असल्यामुळे,सभोवती यक्षांनी वेष्ठित असलेल्या कुबेरासारखा शोभू लागला.जेव्हा आपणांस वाटेल की,भगवंत आपल्या सोबत आहेत,तेव्हा आपणाहि शोभून दिसत आहोत हा अनुभव येईंच असे निश्चितच आहे.||३|| अर्थ:---नंतर त्या कुरुक्षेत्राचे ठीकाणी स्वर्गातून भूमीवर पडलेला देवच कि काय अशा त्या तेज:पुंज भीष्माच्या अवलोकन करून,श्रीकृष्णाने व परिवारासहित पांडवानी त्यास नमस्कार केला.||४|| भावार्थ:---हे मुनिश्रेष्ठ शौनक,त्याठिकाणी वाशिष्ठादी सर्व ब्रहमर्षी,नारदादी देवर्षी विश्वामित्रप्रभूती राजर्षि हे सर्व भरतकुलश्रेष्ठ भिष्मचार्याच्या दर्शनासाठी प्राप्त झाले.आपणही जेथे संत—महात्मा आहेत,त्याठिकाणी त्यांचे दर्शन घेण्यासाठी व सत्संग प्राप्त करण्यासाठी आवश्य जावे,कारण त्यामुळे आपले हित होत असते.||५|| भावार्थ:---ते हे की,-----पर्वत,नारद,धौम्य,भगवान्-वेदव्यास,बृहद्श्वा,भारद्वाज अनेक शिष्यांसह रेनुकानंदन परशुराम,||६|| वशिष्ठ,इंद्रप्रमद,त्रित,गुत्समद,असित,काक्षिवान्-,गौतम,अत्रि,कौशिक आणि सुदर्शन,||७|| हे शौनका,इतरही श्रीशुकादिक पवित्र मुनी आणि कश्यप व बृहस्पती इत्यादिक ऋषी आपल्या शिष्यांसह वर्तमान तेथे आले.||८|| भावार्थ:---आपल्या समीप एकत्र प्राप्त झालेल्या त्या महाभाग्यशाली ऋषीस अवलोकन करून अष्ठ वसुंमध्ये श्रेष्ठ देशकालांचा विभाग जाणणारा,आणि धर्मज्ञ अशा त्या भीष्माने,त्या ऋषीची योग्यतेनुसार पूजा केली.अशाच प्रसंगामध्ये त्या संत—महात्मा यांच्या योग्यतेनुसार पूजा-सन्मान-आदरसत्कार करणे हे आपले कर्तव्याच असते,ते आपण करावेच.||९|| अर्थ:--आणि श्रीकृष्णाचा प्रभाव जाणणाऱ्या त्या भीष्माने,सर्वांच्या हृदयांत वास करणारा,परमेश्वर,आपल्या मायेने परिमित स्वरूप—सगुण साकार धारण करणारा व आपल्या अग्रभागी आसनावर बसलेला अशा त्या श्रीकृष्णाचेहि पूजन केले.आपणही जे पूजन करण्यास योग्य आहेत,त्यांचेही पूजन करावे,त्यांचा विसर पडू देऊ नये.||१०|| अर्थ:--नंतर धर्म,भीम,इत्यादि पांडव,नम्रता—अहंकाररहित व प्रेमभाव—अपेक्षारहित यांनी युक्त होत्साते आपल्याजवळ येवून बसले आहेत असे जाणून,प्रेमाश्रूंनी भरून आल्यामुळे अंध झाल्यासारख्या नेत्रांनी उपलक्षित असा तो भीष्म,त्या पांडवास म्हणाला की,||११|| भावार्थ:---हे धर्मस्थापक पांडव हो,तुझी ब्राहमण—ज्ञानी असून स्वधर्माचे आचरण करणारे आहात.श्रीकृष्ण यांच्या आश्रयाने युक्त असून आश्रित आहात,म्हणून मोठ्या क्लेशाने सुद्धा जीवन पावण्यास समर्थ झाला नाही,हि गोष्ठ मोठी शोचनीय असून अन्यायाची आहे.||१२|| भावार्थ:---पूर्वी अतिरथी पांडुराजा मरण पावला असता,जिचे पुत्र बाल्यावस्थेत आहेत अशी तुमची माता ती कुंती,तुम्हा-- साठी तुम्हा बालकासह्वर्तमान वारंवार बहुत क्लेश पावली.||१३|| | सर्व कालकृतं मन्ये भवतां च यदप्रियम् | सपालो यद्वशे लोको वायोरिव घनावलि:||१४|| भावार्थ:---यास्तव,आजपर्यंत जे तुम्हास अनिष्ठ—प्रतिकूलता—दु:खित अवस्था प्राप्त झाले ते सर्व,कालकृतीनेच घडले असे मी मानितो.कारण,जशी मेघपंक्ति वायूच्या स्वाधीन असते,तसा लोकापालांसहित हा सर्व लोक,कालाच्या स्वाधीन आहे. आपण—जीव सर्व कार्मांनुसार कालांच्या—प्रारब्धाच्या अधीन आहे.||१४|| भावार्थ:---जेथे धर्मपुत्र राजा,गदाधारी भीमसेन,अस्त्र-ज्ञानकुशल अर्जुन,अप्रतिम गांडीव धनुष्य आणि भगवान श्रीकृष्ण-मित्र,असे सर्व साधन असूनही तुम्हास विपत्ती प्राप्त झाली,हे मोठे आश्चर्य आहे.आपणांस—जीवांस अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती हि प्रारब्धानुसार प्राप्त झालेली असते.त्या सुखाचा किंवा दु:खाचा भोग आनंदाने स्वीकार करावा.प्रारब्ध म्हणजे स्वधर्मांनुसार प्रयत्न करून जो भोग आला,त्यानुसार जीवन जगणे,त्यास प्रारब्ध असे म्हणतात.स्वधार्मांनुसार कर्तव्य न करता इतर कारणांनी स्वस्थ बसने—कर्तव्य न करणे,त्यास प्रारब्ध असे म्हणत नाहीत.”देरे हरी पलंगावारी” म्हणजे योग्य प्रयत्न न करता मिळणे,असे आपल्या—वैदिक संस्कृतीस मान्य नाही.म्हणून योग्य प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावे.||१५|| भावार्थ:---हे धर्मराजा,या श्रीकृष्णाचे कर्तव्य जाणण्याविषयी कोणीही पुरुष कदापि समर्थ होत नाही.कारण,ब्रह्मादिक तत्ववेत्तेही ज्या श्रीकृष्णाच्या कृत्याचे ज्ञान संपादन करून घेण्यास प्रवृत्त झाले असता मोह पावतात.म्हणून आपण—जीवांनी श्रीकृष्णांचे कर्तव्य जाणून—घेण्यापेक्षा सगुण—साकाररुपाणे अवतार घेऊन ज्या लीला केल्या आहेत,त्या श्रवण कराव्यात.भगवंतांचे षड्गुणऐश्वर्ये जाणून वास्तविक जे स्वरूप निर्गुण-निराकार आहे,ते जाणून—अनुभव घेऊन जन्म—मरण परंपरा निवृत्त करून परमानंद प्राप्त करून घ्यावा.||१६|| | तस्मादिदंदैवतन्त्रं व्यवस्य भरतर्षभ | तस्यानुविहितोऽनाथा नाथ पाहि प्रजा: प्रभो ||१७|| भावार्थ:---तस्मात हे भरत–कुलश्रेष्ठ,समर्था,धर्मराज,हे सुखादिक सर्व ईश्वराधीनच आहे म्हणजे सुख किंवा दु:ख हे कार्मांनुसार भोगावयास येत असतात,असा निश्चय करून व निरंतर त्या ईश्वरास अनुसरून तू या अनाथ प्रजेचे रक्षण कर.आपणही—जीवानी निरंतर भगवंतांचे स्मरण करून कुटुंबातील देह्संबंधेचे स्वधर्मांनुसार रक्षण करावे.||१७| भावार्थ:---हा श्रीकृष्ण साक्षात नारायण आद्द—पहिला पुरुष भगवान आहे,हा आपल्या मायेने लोकास मोहित करून गुप्तरूपाने यादवात संचार करितो.भगवंताने मायेचा स्वीकार करून अज्ञान-रूपाने आपलेला--जीवांना—लोकांना मोहित केले आहे.जसा भगवंत गुप्तरूपाने याडवत संचार करीत आहे,तसेच आपण—जीव त्याचाच अंश असेले आपण—जीव गुप्तरूपाने देहात वात्रतात आहोत.म्हणून आपण—जीवांनी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून परमात्म्याशी एकरूप व्हावे,आताच आपले माहाहित आहे.||१८|| भावार्थ:---हे राजन,या श्रीकृष्णाचा अतिगुह्य प्रभाव,भगवान शंकर,देवर्षीनारद,आणि साक्षात भगवान कपिलमहामुनी,हे जाणतात.आपणही सत्संग करून वेदांत-शास्त्रा-द्वारे भगवंतांचा अभिप्राय जाणून जीव—ब्रह्म—ऐक्य—ज्ञान प्राप्त करून परमात्म्याचा अनुभव घ्यावावयास पाहिजे.तेच आपले—जीवांचे मानवी शरीराचे कर्तव्य आहे.||१९|| भावार्थ:--तू अज्ञानाने या श्रीकृष्णास,हा आपल्या देवकीनामक मामीचा पुत्र असून आमच्या उपकारांची अपेक्षा न करता आम्हावर प्रीती करणारा प्रिय मित्र आहे,असे मानितोस.हे धर्मा,तू विश्वासाने या जगदीश्वरास,आपला प्रधान,दूत व सारखी केला आहेस.||२०|| भावार्थ:---परंतु हा श्रीकृष्ण,आपला—जीवांचा सर्वांचा आत्मा,समदृष्टी,सर्वांना समबुद्धीने पाहणारा व असणारा,त्यास सुख-दु:खे नसणारा असून सुखरुपच आहे.तो ज्ञान—संपन्न असणारा असल्यामुळे मानापमानरहित इत्यादी द्वंद्वाने रहित,निरभिमान—अभिमानरहित आणि रागद्वेषादिरहित असल्यामुळे यास चांगल्या किवा वाईट कर्मांनी योग्येता किंवा अयोग्यता हि प्राप्त होण्याचा संभव मुळीचा नाही.जेथे राग—प्रेम—अनुकुलता व द्वेष म्हणजे प्रतिकूलता असते,तेथे चांगले किंवा वाईट,योग्य किंवा अयोग्य असते.भगवंत रागद्वेषरहित असल्यामुळे त्याच्याठीकानी अनुकुलता किंवा प्रतिकूलता नाही.चागले किंवा वाईट किंवा योग्य किंवा अयोग्य असे कांहीच नाही.म्हणून आपण—जीवांनी सत्संगा-- च्याद्वारे रागद्वेषरहित होण्याचा प्रयत्न करावा.त्यातच आपले परमाहित आहे.||२१|| भावार्थ:---तथापि हे राजा,या कृष्णाचे दयालुत्व अनन्यभक्तांच्या ठिकाणी किती आहे ते पहा.भगवंतांना अनन्य,निष्काम भक्त आवडतो,म्हणून आपण—जीवांनी भगवंतांचे अनन्य व निष्काम भक्त व्हावे.यातच आपले—जीवांचे परमहित आहे. सांप्रतकाळी प्राणाचा त्याग करणाऱ्या मला अंतकाळी आपले दर्शन देण्यासाठी हा कृष्ण परमात्मा,स्वत: येथे आला आहे.||२२|| भावार्थ:---आपल्या देहाच्या अंतकाळाचे वेळी ज्याचेठीकानी आपले मन भक्तीने स्थापन करणारा व वाणीने ज्याचे नांव उच्चारणारा योगी,विषयवासनांपासून व कर्मांपासून मुक्त होतो.अंतकाळी आपल्या—जीवांच्या ठिकाणी भगवंतांच्या नांवाचे उच्चारण होण्यासाठी व निष्काम भक्ती होण्यासाठी निरंतर म्हणजे रात्रं-दिवस—जन्मल्यापासून शरीरसुटेपर्यंत अभ्यास करावा लागतो म्हणजेच त्यानुसार आचरण करावे लागते.त्यामुळे आपल्याकडून—जीवांकडून विषयावासंनाचा व कर्मांचा त्याग होतो.असे झाले म्हणजे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाविषयी गरज निर्माण होऊन सत्संग केल्या जातो.त्यामुळे ज्ञान होऊन ज्ञानाचा अनुभव येऊन आपणास—जीवांस मोक्ष प्राप्त होतो.||२३|| भावार्थ:---तो हा देवाधीदेव,प्रसन्न हास्याने व आरक्त नेत्र कटाक्षांनी ज्याचे मुखकमल सुभोषित आहे असा चतुर्भुज भग-- वान श्रीकृष्ण,दुसऱ्या योग्यांनी,हृदयात केवळ ज्याचे चिंतनमात्र केले जाते तो आज माझ्या अग्रभागी स्थित आहे.यास्तव याप्रसंगी मी जोपर्यंत स्वच्छेने या आपल्या शरीराचा त्याग करीन तोपर्यंत तो कृपादृष्टीने माझ्याकडे अवलोकन करो.भगवंतांचे रूप एवढे मनोहर आहे की,त्या रुपकडेच निरंतर पाहतच राहावे असे वाटते.आपणासही असेच पाहावे असे वाटावे,म्हणून त्याप्रकारे प्रयत्न करावा.आपापल्या अधिकारानुसार ते—ते कार्य करावे.||२४|| भावार्थ:---सुत म्हणाला---ऋषीहो,तें भीष्माचे प्रार्थनावचन ऐकून राजा युधिष्ठिराने,सर्व ऋषी श्रवण करीत असतां,शरपंजरावर शयन केलेल्या त्या भीष्माचार्यास अनेकप्रकारचे धर्म विषयक प्रश्र केले.आपणही—जीवानी संत—महात्मा यांचा समागम प्राप्त झाला असता त्यांना आध्यात्मिक प्रश्न विचारून आपले शंका—समाधान करावे,त्यांना संसारातील प्रश्न विचारू नयेत,कारण आपणांस—जीवांस संसाराचा त्याग करावयाचे आहे.संसाराच्या त्यागाविषयी प्रश्न करून शंका—समाधान करून घ्यावे.यात आपले पारमार्थिक हित आहे.||२५|| भावार्थ:---तेव्हा हे महामुने शौनका,मनुष्यमात्रांचे साधारण धर्म,ब्राह्माणदिक वर्णांचे धर्म ब्रह्माचार्यादी आश्रमांचे धर्म,वैराग्य व विषयवासना या दोन उपाधिंच्या योगाने अनुक्रमाने सांगितलेले निवृत्त लक्षण व प्रवृत्ती लक्षण धर्म-||२६|| भावार्थ:---दानधर्म,राजधर्म,मोक्षधर्म,स्त्रीधर्म व भागवतधर्म,हे सर्व त्या भीष्माचे संक्षेपाने व विस्ताराने धर्मराजाला वर्णन केले.आपण संत—महात्मा यांच्या मुखातून या धर्मांचे स्वरूप जाणून घ्यावे.जाणून घेतले असता,आपण—जीव त्यानुसार आचरण करितात.||२७|| भावार्थ:---तसेच धर्म,अर्थ,काम,आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ व त्याचे उपाय ज्या अधिकाऱ्याला जसे अनेक आख्यानामध्ये व इतिहासामध्ये वर्णन केले आहेत त्याप्रमाणे त्या तत्ववेत्या भीष्माने वर्णन केले.आपण—जीवांनी धर्म,अर्थ,काम व मोक्ष या पुरुषार्थांचे श्रवण करावे.आपण श्रावण केले असता स्वधर्मांचे ज्ञान होऊन,त्यानुसार आचरण होऊन स्वधार्मांचा परमार्थ होतो.स्वधार्मांचे पालन निष्काम करावे,कारण त्यामुळे आपण भगवंतांचे प्रिय होतोत.||२८|| भावार्थ:---याप्रमाणे तो भीष्म धर्मकथन करीत असता,स्वच्छेने प्राणत्याग करणाऱ्या योगीजनांस इष्ट असा जो उत्तरायणकाळ तो त्या भीष्मास प्राप्त झाला.आपणही आपल्या अधिकारानासुसार स्थूल—शरीराचा त्याग करावा.||२९|| | तदोपसंहृत्य गिर: सहस्त्रणी-विर्मुक्तसड़्ग मन आदिपुरूषे | | कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे-पूर:स्थितेऽमीलीतदृग्व्यधारयत ||३०|| भावार्थ:---तेव्हा युद्धात सहस्त्र रथ्यांचे रक्षण करणाऱ्या त्या भीष्माने आपल्या सर्व वाणीच्या उपसंहार करून अहंताममतादिसंगरहित असे आपले मन अग्रभागी असलेल्या दैदिप्यमान पितांबरधारी,चतुर्भुज,आदिपुरुष श्रीकृष्णाचे ठायी धारण केले व आपले नेत्रही न मिटता त्या कृष्णमुर्तीकडे लावले.आपणही आपले—जीवांचे शरीररच त्याग होत असतांना श्रीकृष्णांचे ठाई धारणा करीतच पाहताच राहावे,व स्थूल शरीर कधी सुटले यांचे भानही राहू नये—स्मरण होऊ नये.||३०|| भावार्थ:---तेव्हा अतिशुध्ह धारणेने निष्पाप झालेला—स्वधर्माचरनांने शुद्ध झालेला—समदृष्टी असलेला व न्यायाच्या बाजूने आचरण करणारा व जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने श्रीकृष्णाच्या कृपावलोकनाने तत्क्षणीच,आयुधांच्या प्रहरापासून उत्पन्न झाले ज्याचे श्रम गेले आहेत असा आणि सर्व इंद्रियांच्या वृत्तीचे अनेक प्रकारचे भ्रमन ज्याचे नष्ट झाले आहे असा तो भीष्माचार्य,आपल्या देहाचा त्याग करतेवेळी,भक्तांचा उद्धार करणाऱ्या त्या श्रीकृष्णाची स्तुती करू लागला.आपण—जीवांनी स्वधार्मांचे पालन करून—आचरण करून व जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने सदगुरूंची व भगवंतांची कृपा संपादन करून आपल्या देहाचा त्याग करतेवेळी भगवंतांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करावा.हेच आपल्या जीवनाचे सार आहे.||३१|| भावार्थ:---भीष्म म्हणाला----अनेक धर्मादी साधनांनी एकाग्र झालेली मी आपली निष्काम मनोधारणा,यादवश्रेष्ठ व सर्वशव्यापक अशा या श्रीकृष्णाभगवंताचे ठायी समर्पण केली आहे.आपणही—जीवांनी स्वधर्मांनुसार एकाग्र झालेली निष्काम मनोधारणा श्रीकृष्णाभगवंतांच्या ठाई समर्पण करावी.कारण,हा कृष्ण,आपल्या परमानंदात निमग्न असून कदाचित क्रीडा करण्यासाठी ज्या मायेपासून सृष्टीची परंपरा उत्पन्न होते,त्या मायेचा स्वीकार करितो तथापि मायेने याचा स्वरूप महिमा आच्छादित होत नाहीकारण माया श्रीकृष्णाच्या ताब्यात आहे.आपणही जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने मयास मिथ्या ठरवून तिचा त्याग करावा.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन परमानंदाची प्राप्ती होते.||३२|| भावार्थ:---त्रैलोक्यांत अप्रतिमसौंदर्ययुक्त,तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण व सूर्य किरणासारखा तेज:पुंज भरजरीचा पितांबर नेसणारे असे स्वरूप करणारा,कुटील केशससमुदायांनी व्याप्त अशा मुखकमलाने शोभणारा व पार्थाचा सारथी अशा या श्रीकृष्णाचे ठिकाणी माझी निष्काम प्रीती असो.अशा भगवंतांच्या ठिकाणी आपली—जीवांची निष्काम—अपेक्षारहित प्रीती असावी,कारण निष्काम भक्तीत प्रेम आहे,तर सकाम भक्तीत प्रेम नाही.भगवंतांचे प्रेम सार आहे,भगवंत प्रेम आहे.||३३|| भावार्थ:---युद्धामध्ये उडालेल्या घोड्यांच्या चरणरजांने किंचित शुभ्रवर्ण झालेल्या व जिकडेतिकडे पसरणाऱ्या केशांनी व्याप्त असून सारथ्याश्रमाने—अर्जुनाच्या सारथीपणाच्या परिश्रमाने प्राप्त झालेल्या भक्तवात्सल्यसूचक धर्मबिंदुनी ज्याचे मुख सुभोषित आहे असा आणि माझ्या तीक्ष्ण बाणांनी ज्याच्या अंगातील चिलखत तुटून जावून त्वचाही फाटून गेली आहे अशा या श्रीकृष्णाचेठायीमाझे मन सदा सर्वदा रममाण असो.आपणहि भगवंत व संत—महात्मा यांच्या सेवेच्या परिश्रमाने प्राप्त होऊन व आपण—जीव भगवंतांच्या स्वरूपाचे चिंतन करण्यात रममाण असावे.||३४|| भावार्थ:---आणि हे अच्युता,माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी स्थापन कर,असे स्वमित्र अर्जुनाचे भाषण एकूण तत्क्षणीच पांडव व कौरव यांच्या सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ स्थापन करून त्यावर बसणारा व हा द्रोण,हा कर्ण इत्यादियोद्धे अर्जुनास दाखविणाऱ्या मिषाने कालदृष्टीने वीरांचे आयुष्य हरण करून अर्जुनाचा जय करणारा अशा या अर्जुनाच्या सख्याचे ठिकाणी माझी प्रीती असो.आपले सदा प्रेम श्रीकृष्ण भगवंतावर असावे,तर देहासंबंधीवर नसावे.||३५|| भावार्थ:---केवळ र्जुनाच्या शत्रूचे आयुष्य हरण करून कृष्णाने त्याला जय मिळवून दिला इतकेच नाही;तर त्याचे अज्ञानही दूर केले असे सांगतात-कारण अर्जुन हा भगवंतांचा निष्काम आणि अनन्य भक्त होता,म्हणून आपण भगवंतांचे निष्काम आणि अनन्य भक्त व्हावे. असे झाले असता भगवंत संसारातील कामना व पारमार्थिक अज्ञान निवृत्त करून जन्म—मरण निवृत्त करतात.युद्धप्रसंगी दूर उभ्या असलेल्या कौरव सेनेच्या पुढे राहणाऱ्या भिष्मादिकांस अवलोकन करून दोषबुद्धीने स्वजनवधापासून निवृत्त झलेल्या अर्जुनाची ‘मी कर्ता’ म्हणजे आपण केलेल्या कोणत्याही कार्याचा ‘मी कर्ता’ असून ‘मी भोक्ता आहे’ इत्यादी कुत्सितबुद्धी,--विपरीत बुद्धी याचा त्याग करावा,कारण मी कर्ता किंवा भोक्ता नसून “मी आत्मा—परमात्मा”आहे.असा बुद्धीचा निश्चय करून त्यानुसार जीवन जगावे. ज्याने—भगवंताने आत्माविद्देचा उपदेश करून हरण केली.आपणही संत—महात्मा यांचा सत्संग करून मी कर्ता—भोक्ता नसून,मी आत्मा—परमात्मा आहे,असा निश्चय करून जीवन जगावे. त्या ह्या परमानंदरूपी श्रीकृष्णाच्या चरणाचेठिकाणी मला अतिप्रीती असो.आपलीही प्रीती हि भगवंतांचे चरणकमलाच्या ठिकाणी म्हणजे अधिष्ठानाच्या—परमात्म्याच्या ठिकाणी अतिप्रीती करावी.असे करून जीवन जगले असता आपले—जीवांचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखमय होते.आपानांना सुखमय होण्याची गरज आहे.||३६|| भावार्थ:---‘मी हातांत शस्त्र धारण न करितां अर्जुनाचे साहाय्यमात्र करीन’ अशी श्रीकृष्ण--भगवंताने प्रार्थाना केली होती—शब्द दिला होता.अशा या आपल्या प्रतिज्ञेचा त्याग करून ‘मी कृष्णाकडून शस्त्र धरविन’ अशी माझी(भीष्माचार्यांची) प्रतिज्ञा खरी करण्याकरिता त्या अर्जुनाच्या रथावर बसलेल्या ज्या या भगवंताने अकस्मात रथाखाली उडी टाकून,हातांत रथाचे चाक घेऊन,हत्तीला मारण्यासाठी धांवनाऱ्या सिंहप्रमाणे माझ्या(भीष्माचार्यांच्या)अंगावर धांव घेतली;आपल्या निष्काम भक्तासाठी श्रीकृष्ण-भगवंताने आपल्या प्रतीज्ञाचे उल्लंघन करून भगवंताने भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली. म्हणून आपण अशा भगवंतांचे निष्काम भक्ताच व्हावे,तर सकाम भक्त होऊ नये.तेव्हा क्रोधाच्या आवेशामध्ये आपले मनुष्यनाट्य विसरून हा चालत असतां,याच्या उदरस्थित सर्व ब्रह्मंडाच्या भाराने पदोपदी पृथ्वी कंपित झाली व याच्या अंगावरील परिधानवस्त्रही खाली पडले.श्रीकृष्ण—भागावान्तंस आपण करावे,व काय करू नये हे कळालेसुद्धा नाही व अशा प्रसंगामध्ये श्रीकृष्णाचा अंगावरील परिधान केलेली वस्त्रेसुद्धा खाली गळून पडली हेही समजले नाही.असा भगवंत निष्काम भक्तासाठी देहातीत होऊन कार्य करितो,म्हणून आपण श्रीकृशान्नाचे निष्काम व अहंकाररहित भक्त व्हावे.||३७|| भावार्थ:---असा हा श्रीकृष्ण मजवर येउं लागला तेव्हा मी आततायिधर्मांने तीक्ष्ण बाणांनी यास ताडन केले,तेणे करून याचे कवच फुटून अंग रक्ताने व्याप्त झाले तेव्हा बलात्काराने अर्जुन याचे निवारण करीत असतां,त्याचा तिरस्कार करून माझ्या वधार्थ सन्मुख आला तेव्हा लोकदृष्टीने हा अर्जुनपक्षपाती आहे असे भासले,परंतु वास्तविक विचार केला तर,माझे वचन खरे करून माझ्यावर अनुग्रह करावा म्हणूनच रथचक्र घेऊन धांवला.असा हा भक्तवत्सल मुक्तिदाता भगवान माझी गती असो.श्रीकृष्ण भगवंत हा निष्काम भक्तासाठी,त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी—मुक्ती देण्यासाठी स्वत: आघात सहन करून ,कमीपणा आपल्याकडे घेतो,असा भगवंत उदार आहे.म्हणून आपण—जीवांनी भगवंतांचे निष्काम भक्तच व्हावे.त्यातच आपले—जीवांचे हित आहे.||३८|| भावार्थ:---हा श्रीकृष्ण युद्धप्रसंगी अर्जुनाच्या रथाचे आपल्या कुटुंबासारखे अकार्येंकरूनही रक्षण करीत असून हस्तांत चाबूक व अश्वांच्या दोऱ्या ग्रहण केल्यामुळे सारथ्यशोभेने अतिरमणीय दिसत होता त्या प्रभूला पाहून भारतीयुद्धांत मृत्यू पावलेले वीर,श्रीकृष्णाची सारुप्यमुक्ति पावले.या महाभारताच्या महायुद्धात—कौरव—पांडवाच्या युद्धात जितके सैन्य मृत्यू पडले,त्या सर्वांना सारुप्यमुक्ती—भगवंतांचे सगुण चतुर्भुजरूप प्राप्त होते.म्हणून आपण आपल्या भारत—देशात सैनिक होऊन देशभक्त होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.आपण देशभक्त झालो असता,आपणास सरोप्यमुक्ती मिळते—सद्गती प्राप्त होते.यास्तव मरणोन्मुख अशा माझीही सप्रेम भक्ति य श्रीकृष्णपरमात्म्याचेठिकाणी असो.आपलीही याप्रमाणे मरणोन्मुख सप्रेम भक्ती भगवंतांच्या ठिकाणी असावी.||३९|| भावार्थः----सुंदर गमन,विलास,रमणीय मंदहास्य,आणि सप्रेम अवलोकन यांहीकरून श्रीकृष्णाने ज्यांचा अतिसन्मान केला आहे त्या गोपी,मदांध होऊन गोवर्धनोद्धरणादि कृष्णलीलेचे अनुकरण करीत होत्सात्य,ज्या प्रभूच्या स्वरूपास मिळाल्या, त्या कृष्णपरमात्म्याचे ठिकाणी मला निरतिशय प्रीती असो.गोंपिसारखी अवस्था आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.आपण—जीवांनी गोंपीसारखे प्रेम श्रीकृष्ण-भगवंतांवर करावे,कारण यातच आपले परम-हित आहे.||४०|| भावार्थः---धर्मराजाच्या राजसूय यज्ञांत मोठमोठे ऋषि व मोठमोठे राजे यांच्या सभेमध्ये ‘कायहो (श्रीकृष्ण) याचे स्वरूप’ ‘कायहो(श्रीकृष्ण) याचा महिमा’ अशा आदराने अवलोकन केलेला जो भगवान अग्रपूजा पावला,तोच हा सर्व जगाचा आत्मा,माझ्यापुढे प्रत्यक्ष दिसत आहे,तेव्हां केवढे हे माझे भाग्य.आपणास निष्काम भक्त होऊन प्रत्यक्ष भगवंतांचे दर्शन झाले,तर आपले—जीवांचे भाग्य उदयास आले असे समजावे.आपण सकाम भक्त होऊन,संसारातील कोणत्याही प्रकारची कामना पूर्ण झाली तर,त्यास दुर्भाग्य उदयास आले असे समजावे.म्हणून आपण निष्काम भक्तच व्हावे.||४१|| | तमिममहमजं शरीरभाजां -हृदि हृदि धिष्ठितमात्मकल्पितानाम् | | प्रतिदृशमिव नैकधार्कमेकं -समधिगतोऽस्मि विधूतभेदमोह: ||४२|| भावार्थः----यास्तव सर्व भेद व मोह यांनी रहित असा मी,स्वतः निर्माण केलेल्या प्रत्येक प्राण्यांच्या ह्रदयामध्ये वासकरणारा व जसा सूर्य एकच असतां प्रत्येकाच्या दृष्टीस निरनिराळा दिसतो त्याप्रमाणे अनेकप्रकारे भासणारा अशा ह्या जन्मरहित श्रीकृष्णाशी मी ऐक्य पावलो आहे.आपण—जीवांनी भेद व मोहरहित असे जीवन जगावे,कारण भेद व मोहात दु:खाचा अनुभव आहे व सुखाचा अनुभव नाही.याचा प्रत्यक्ष अनुभव आपणास आहे.असा विवेक करावा.||४२|| भावार्थः----सूत म्हणाला-----ऋषीहो,याप्रमाणे तो भीष्म षडगुणैश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्म्याचे स्वरूपी,मनाच्या वाणीच्या व दृष्टीच्या वृत्ती सहवर्तमान आपली बुद्धि स्थापन करून जीव लीन झाला असतां,त्याचा प्राण बाहेर न जातां अभ्यंतरीच लय पावला.||४३|| भावार्थः----तो भीष्माचार्य,मायिक उपाधीरहित परब्रहमस्वरूपी मिळून गेला असे जाणून ते व्यासादिक सर्वही ऋषी,जसे पक्षी,संध्याकाळी शब्दादिव्यापाररहित होतात त्याप्रमाणे स्तब्ध झाले.४४|| भावार्थः----असे भिष्मानिर्यान कृष्णसन्निधानी झाले असतां त्या महोत्सवानिमित्त देवांनी व मनुष्यांनी वाजविलेल्या दुंदुभी वाजूं लागल्या.राजांमध्ये गुणग्राही राजे होते ते भीष्माची प्रशंसा करूं लागले,व आकाशांतून पुष्पवृष्टी होऊं लागल्या.आपणही—जीवांनी संत—महात्मा यांची प्रशंसा करावी,स्तुती करावी.||४५|| भावार्थः----हे भृगुकुलोद्भवा शौनका,मुक्त झालेल्या त्या भीष्माच्या देहाची दाहसंस्कारादिक कर्मे लावून धर्मराजा,दोन घटिकापर्यंत त्याच्या वियोगाने दुःखित झाला.आपणही दु:खित घटना घडल्यानंतर कांही काळ दु:खी असावयास पाहिजे. म्हणजे अधिक काळ दु:खित होऊ नये,कारण भूतकाळ वर्तमान काळात येत नसतो.||४६|| भावार्थः---नंतर ते नारदादि मुनि हर्षयुक्त होत्साते,श्रीकृष्णाची त्याच्याच वेदोक्त गुह्य नामांनी स्तुति करून,श्रीकृष्णाचे ठिकाणीच ज्यांचे चित्त आहे असे होत्साते पुनः आपापल्या आश्रमास निघून गेले.आपणही श्रीकृष्ण भगवंतांची स्तुती करून आपापल्या आश्रमास निघून जावे.||४७|| भावार्थः---नंतर धर्मराजाने श्रीकृष्णासहवर्तमान हस्तिनपुरास जाऊन धृतराष्ट्र व दुःखाने संतप्त झालेली गांधारी या उभायांतांचे सांत्वन केले.आपणही अशा दु:खद प्रसंगी,दु:खित व्यक्तींचे सांत्वन करून दु:ख कमी करावयास पाहिजे.||४८|| | पित्रा चानुमतो राजा वासुदेवानुमोदित: | चाकर राज्यं धर्मेण पितृपैतामहं विभु: ||४९|| भावार्थः---नंतर राज्यपालनाविषयी धृतराष्ट्राने संमती दिलेला व श्रीकृष्णाने अनुमोदन दिलेला महासमर्थ तो धर्मराजा,पितृपितामहादि परंपरेने प्राप्त झालेले राज्य धर्मेकरून करूं लागला.ज्याप्रमाणे धर्म-राजांनी प्रजेंच्या सुखासाठी स्वधर्मांनुसार राज्याकारभर केला,आपणही आपल्या स्वधर्मांनुसार आचरण करून आपल्या कुटुंबाच्या सुखाकरिता स्वधर्मांच्या कर्तव्याचे पालन करावे.हाच प्रत्येकाचा--आपला स्वधर्म आहे.||४९|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |९-----असा श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम(१)स्कंधामध्ये धर्मराजास राज्य प्राप्तीरूप हा नववा(९) अध्याय (४९)ऐकोनापन्नास श्लोकांनी युक्त असलेला समाप्त झाला.||९--४९|| | |श्रीकृष्णार्पमस्तु|| ||श्रीसदगुरुचरणारपणमस्तु || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|१०—----याप्रमाणे धर्मराजास राज्यावर स्थापन करून कृतकार्य झालेला श्रीकृष्ण हस्तीनापुरांतून द्वारकेस निघाला तेव्हा हस्तीनापुरांतील स्त्रियांनी श्रीकृष्णाचे अद्भुत वर्णन केल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेत गमन केले,हा कथाभाग हा दहाव्या(१०) अध्यायात वर्णन केले आहे.||१०|| | १०-----[श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | हत्वा स्वरिक्थस्पृध आततायिनो-युधिष्ठिरो धर्मभृतां वरिष्ठ:| | सहानुजै: प्रत्य वरुद्धभोजन:-कथं प्रवृत्त:किमकरषीत्तत: ||१||| भावार्थः----शौनक म्हणाला----हे सुता,आपल्या राज्यधनाविषयी स्पर्धेचे युध्द करण्यास उद्यूक्त झालेल्या शस्त्रपाणी दुर्योधनादिकांचा वध करून,धर्मिकामध्ये श्रेष्ठ अशा धर्मराजाने राज्यातील विषयभोग प्राप्त झाल्यावर आपल्या बंधूसहवर्तमान राज्य कसे केले?व त्याने पुढे काय केले?||१|| भावार्थः----सुत म्हणाला----हे शौनका,विश्वव्यापक व भक्तीची संकटे दूर करणारा असा जगदीश्वर श्रीकृष्ण,कुरुवंश हेच कोणीएक अरण्य त्यापासून उत्पन्न झालेल्या क्रोधरूप वणव्याने दग्ध झालेल्या त्या कुरूवंशावर(वेळ्वास) ब्रहमस्त्रापासून परिक्षितीच्या संरक्षणाने अंकुरयुक्त करून आणि धर्मराजास त्याच्या राज्यवर स्थापन करून,संतुष्ठचित्त झाला.श्रीकृष्ण भगवंत भक्तीचे—भक्तांचे संकट दूर करणारा असा आहे.आपणही आपल्या अधिकारानुसार इतर जीवांचे दु:ख दयाभाव दाखवून नाहीसे करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे.भगवंतांनी राजा परीक्षित गर्भात असतांना ब्रह्मास्त्रारापासून संरक्षण देऊन अंकुरयुक्त केले आणि धर्मराजास त्याच्याच राज्यावर स्थापन केले.त्याचप्रमाणे आपण इतरांवर कोणी अन्याय केला असेल तर,त्याच्यावरील अन्याय दूर करून त्याचे गेलेले वैभव त्यास परत मिळवून देणे आपला स्वधर्म आहे.त्या वैभवातील कांहीच भाग आपण मात्र घेऊ नये.||२|| भावार्थः----सर्व जग—जीव कर्म करण्यास स्वतंत्र आहे,पण कर्मांचे फळ-भोग भोगण्यास परतंत्र आहे--ईश्वराधीनच आहे,स्वतंत्र्य नाही असे भीष्माने व श्रीकृष्णाने सांगितलेले तत्व श्रवण करून प्राप्त झालेल्या अनुभव ज्ञानाने,ज्याचा मोह गेला आहे असा तो धर्मराज,अनुकूल असलेल्या भीमादिक बंधूसहवर्तमान श्रीकृष्णाच्याच आश्रयाने,जसे स्वर्गाचे रक्षण इंद्र करीतो त्याप्रमाणे समुद्रवलयांकित पृथ्वीचे संरक्षण करू लागला.आपणही आपल्या कुटुंबाचा कारभार स्वधर्मांनुसार करून कुटुंबातील सर्वांना सुख देणे आपले कर्तव्य आहे.||३|| भावार्थ:----त्याकाळी पर्जन्य यथेष्ट वृष्टी करीत असे,पृथ्वी प्रजांस सर्व इच्छित विषय देत असे.तशाच मोठ्या कांसेच्या गाई,हर्षेकरून आपल्या दुधाने (आपोआप पान्हे फुटल्यामुळे)गोठे भिजवत असत.त्याकाळी पर्जन्य यथेष्ट वृष्टी करीत असे,कारण प्रजा हि आपापल्या स्वधर्मांनुसार आचरण करीत असे व परधर्मंनुसार आचरण करीत नसत.आता पर्जन्य यथेष्ट वृष्टी करीत नाही,कारण प्रजा आपापल्या स्वधर्मांनुसार आचरण न करता परधर्मांनुसार आचरण करीत आहे,म्हणून पर्ज्यन्य यथेष्ट वृष्टी करीत नाही.म्हणून जेव्हा आपण स्वधार्मांनुसार आचरण करणार,त्यानंतरच पर्जन्य यथेष्ट वृष्टी करील,व प्रजेस अन्नधान्य यथेष्ट मिळणार असे हे निश्चितच आहे,अन्यथा आपण सुखी नाही.||४|| भावार्थः----नद्या,समुद्र,पर्वत वेळी आणि सर्व औषधी (साळी वगैरे धान्य)ह्या प्रत्येक ऋतूमध्ये धर्मराज्याच्या इच्छेप्रमाणे आपापले पदार्थ देत असत.कारण धर्मराजा हा स्वधर्मांनुसार आचरण करून प्रेजेला सुखी करीत असे,म्हणून वर्षा,अन्नधान्य धर्मराजाच्या इच्छेप्रमाणे पिकात असेआपणही स्वधार्मांनुसार आचरण करून सर्वांना सुख दिले तर वर्षा व अन्नधान्य भरपूर पिकून प्रजा सुखसंपन्न होईल.||५|| भावार्थः-----याप्रमाणे ज्याला शत्रू उत्पन्न झालाच नाही असा तो धर्मराज सर्व पृथ्वीचे राज्य करीत असता,प्राणीमात्रास १--आधी—मानसिक दु:ख,व्याधी—शारीरिक दु:ख म्हणजेच आध्यात्मिक दु:ख,२—शितोष्णादिकापासून होणारे दु:खास आधिदैविक,३--आणि इतर जीवांपासून होणारे दु:ख यास “आधीभोतिक-दु:ख” असे म्हणतात.असे तिन्ही प्रकारचे दु:ख—ताप कधीही झाले नाही.आजही राज्यकर्ते जे आहे,त्यांनी स्वधर्मांनुसार राज्यकारभार करून प्रजेस दु:ख न देता सुख दिले तर आजही कोणत्याच प्रकारचे—१—आध्यात्मिक,२—आधिदैविक,व आधिभौतिक दु:ख मिळत नाही.||६|| भावार्थः----नंतर श्रीकृष्ण,पांडवाचा शोक घालविण्याविषयी आणि सुभद्रानामक आपल्या भगिनीचे प्रिय करण्यासाठी काही मासपर्यंत हस्तिनापुरात राहून---------आपणही आपले जे सात्विक कार्य करणारे संबंधी असतील,त्यांचे प्रिय—हित करण्यासाठी त्यांच्याकडे थांबावे व त्यांचे प्रिय झाल्यानंतर आपल्या गांवी जावे.||७|| भावार्थः-----तो श्रीकृष्ण भगवान्- धर्मराजास नमस्कार पूर्वक आलिंगन करून व त्याची आज्ञा घेवून असता,त्यावेळी त्यास भीमार्जुनांनी आलिंगन केले व नकुलसह्देवांनी नमस्कार केला व सर्व त्यास पोंचविण्याकरिता रथावर आरूढ झाले.||८|| भावार्थः----त्याकाळी सुभद्रा,द्रौपदी,कुंती तशीच उत्तर,गांधारी धृतराष्ट्र,युयुत्स,कृपाचार्य,नकुल सहदेव------------||९|| भावार्थः----भीमसेन,धौम्यऋषी आणि सत्यवती इत्यादिक स्त्रिया,हे सर्वही,श्रीकृष्णमहिम्याने मोहित असल्यामुळे त्या कृष्णाचे वियोगदु:ख सहन करण्यास समर्थ झाले नाहीत.||१०|| | सत्सङगान्मुक्तदुःसङगो हातुं नोत्सहते बुधः | कीर्त्यमानं यशो यस्य सकृदाकर्ण्य रोचनम् ||११|| | तस्मिन्न्यस्तधियः पार्थाः सहेरन् विरहं कथम् | दर्शनस्पर्शसंलापशयनासनभौजनैः ||१२|| भावार्थः----कारण,साधूंनी वर्णन केलेले श्रीकृष्णाचे रुचीकर यश एकवारही श्रवण करून ज्याची संसारावरची दुष्ट आसक्ती सुटली आहे तो ज्ञाता पुरुष,त्या भगवद्यशवर्णन करणाऱ्या साधुंचाच समागम सोडण्यात इच्छित नाही.कारण त्या साधूंनी आपल्यावर अलौलिक ऋण केलेले असते,म्हणून त्यांच्या वियोगाचे दु:ख सहन होत नाही.मग ते साधू ज्याचे यश वर्णन करितात त्या कृष्णाचे ठिकाणी दर्शन,स्पर्शन,स्पर्श,परस्पर सप्रेमभाषण,शयन,आसन व भोजन इत्यादी प्रकरणी अर्पण केली आहे बुद्धी ज्यांनी ते पांडव,त्याचा विरह कसा सहन करितील?करणारच नाही.आपणही साधूंचा विरह सहन करू नये,कारण त्यांनी आपल्याला अविनाशी धन—जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान दिलेले असल्यामुळे असल्यामुळे याप्रकारची अवस्था प्राप्त होत असते.||११||-||१२|| भावार्थ:----तर कृष्णाबरोबर ज्यांची चित्ते निघाली आहेत असे परमस्नेही ते पांडव,आपल्या निमेषरहित नेत्रांनी कृष्णाकडे पाहत असतांना प्रत्येक स्थळी कृष्णाचे पूजासाहित्यवागैरे आणण्यासाठीच गडबडीने इकडून तिकदे संचार करू लागले||१३|| भावार्थ:----त्यावेळी तो देवकीनंदन घरातून बाहेर निघत असता,प्रेमसबंधाच्या उत्कंठतेने द्रौपद्दादी बांधवस्त्रियांच्या नेत्रातून दु:खाश्रू बाहेत येवू लागले परंतु ते त्यांनी,काही अमंगल होवू नये म्हणून आपल्या नेत्रामध्ये आवरून धरिले.आपण कोणाला निरोप देत असतांना दु:ख व्यक्त न करता आनंद व्यक्त करावा.आपण वदन हस्ययुक्त करावे.||१४|| भावार्थ;----श्रीकृष्ण द्वारकेस निघाला त्यावेळी मृदंग,शंख,भेरी (नौबत),विना पवननामक वाद्य,गाईच्या मुखासारखे वाद्य धुन्धुरी(खंजिरी,अंक (वाजंत्रे)घंटा व दुंदुभि (नगारे)इत्यादी अनेक वाद्ये वाजू लागली.||१५|| भावार्थ:----तेव्हा रस्त्यातून कृष्णाची स्वारी जात असता कौरवाच्या स्त्रिया श्रीकृष्णास पाहण्याच्या इच्छेने देवळांच्या व राजमंदीराच्या शिखरावर (गच्यावर)चढून,सप्रेम,समर्याद आणि हास्यपूर्वक कृष्णाकडे अवलोकन करून,कृष्णावर अनेक पुष्पांणि वृष्टी करू लागल्या.आपली समदृष्टी असली तर आपणांस सर्व प्रेमाचा वर्षाव करीत असतात. ||१६|| भावार्थ:----तेव्हा निद्रा जिंकलेल्या प्रिय अर्जुनाने,अतिप्रिय श्रीकृष्णाचे मोत्यांच्या सरांनी भूषित व रत्नखचित दंडाने सुभोषित असे श्वेतच्छत्र ग्रहण केले.आपणही साधू—संत—महात्मा यांच्यावर श्वेतच्छत्र धारण करावे.||१७|| भावार्थ:----उद्भव आणि सत्यिक या दोघांनी अतिसुंदर दोन चंवऱ्या ग्रहण केल्या,तेच स्त्रियांनी वरून केलेल्या पुष्पवृष्टीने तो श्रीकृष्ण,त्या राजधानीतील मार्गामध्ये शोभू लागला.आपण संत—महात्मा यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांची शोभा वाढवावी व त्यांचीच स्तुती करावी.||१८|| भावार्थ:----तेथे जागोजाग निर्गुण व सगुण असा जो श्रीकृष्ण परमात्मा त्यास अयोग्य व योग्य असे ब्राहमणांनी दिलेले सत्य आशीर्वाद ऐकू येवू लागले.आपल्या ठिकाणी सद्-गुण असले की,आशीर्वाद न मागता मिळत असतात.मागून जे मिळते,त्यास भिक असे म्हणतात व मागून न मिळते,त्यास आशीर्वाद असे म्हणतात.म्हणून आपण कांही मागू नये,तर मिळावे.||१९|| भावार्थ:----तेव्हा पुण्याकीर्ती श्रीकृष्णाचे ठिकाणी ज्यांची अंत:करणे आहेत अशा हस्तीनापुरांतील स्त्रियांचा परस्पर भाषणप्रकार सुरु झाला,तो सर्व श्रुतींनाही आवडणारा होता.||२०|| भावार्थ:----त्यांत काही एक स्त्रिया दुसऱ्या स्त्रीयास म्हणाल्या की,हे सख्यानो!सत्व,रज,तम,हे तीन गुण उत्पन्न होण्याच्या पूर्वी जो एक निरुपाधी परमात्मा होता आणि प्रलयकाळाचेठिकाणी जीवदशेस कारणभूत अशा सत्वादी गुणशक्तीचा ईश्वरस्वरूपाचेठिकाणी लय झाल्यामुळे जीवांचाही तेथे लय झाला असता,जगद्व्यापररहित निजानंदस्वरूपी जो एकटाच अवशेष राहतो तोच हा साक्षात पुराणपुरुष श्रीकृष्ण आहे, म्हणून याच्या कोणत्याही ऐश्वर्यादी महिम्याविषयी आश्चर्य.म्हणून आपण जो सदा असलेला परमात्मा याच्या ठिकाणी जीव—ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने एकरूप व्हावे.हेच मानवी जीवनाचे परम-साध्य आहे.||२१|| भावार्थ:----तोच—भगवंत शात्र-कर्ता परमेश्वर नामरूपरहित जीवात्म्याचेठाई नांवे आणि रूपे उत्पन्न करण्याच्या इच्छेने,आपल्या कालशक्तीने प्रेरित झालेली आणि आपल्या अंशभूत जीवास मोहित करून देह्द्वारा उत्पन्न करणारी अशा मायेस अनुसरून राहिला आहे.भगवंतच वेद--शास्त्र—कर्ता आहे. भगवंत—परमात्मा जीवांस नामे व रूपे उत्पन्न करून व मायेचा स्वीकार करून राहिला आहे.||२२|| भावार्थ:----या जगदीश्वराचे दुर्लभ दर्शन आम्हास घडले हे मोठे आश्चर्य आहे.कारण,आपल्या मन आदी सर्व इंद्रियांचा व प्राणवायूचा जय करणारे योगी,भक्तीने उत्कंठीत झालेल्या निर्मल बुद्धीच्या योगाने,या लोकी ज्याचे स्वरूप अवलोकन करिताच तोच हा पूर्ण ब्रहमरूपी कृष्ण आहे.आणि हे सखी,सर्वच्या बुद्धीला उत्तम प्रकारे करून शुध्द करण्यास जसा हा खरोखर समर्थ आहे तशी योगदिसाधनेसुद्धा समर्थ नाहीत.भगवंतच सर्वसमर्थ आहे.म्हणून भगवंतांयांनाच शरण जावे.||२३|| भावार्थ:----हे सखी,वेदामध्ये आणि आगमांमध्ये गुप्त असलेले रहस्य निरुपण करणाऱ्या कवींनी ज्याच्या उत्तम कथा वारंवार गायन केल्या आहेत,तोच हा भगवान श्रीकृष्ण आहे.ते गायन असे की,जो एकच ईश्वर,आपल्या लीलेने हे चराचर विश्व उत्पन्न करितो,पालन करितो आणि संहार करितो,परंतु त्या कोणत्याच कृत्यांत आसक्त होत नाही.आपणसुद्धा त्याचेच अंश असल्यामुळे कृत्यात आसक्त होऊ नये,कारण आपण कोणत्याही कृत्यात आसक्त झालोत तर चौऱ्याऐंसीलक्षयोनीस जाऊन दु:ख भोगावे लागते.आपण कोणत्याही कृत्यास अनासक्त—आसक्तारहित असावे.||२४|| भावार्थ:----हे सख्यानो:ज्याकाळी,सर्व राजे तामसबुद्धियुक्त होवून केवळ अधर्माने आपल्याच प्राणांचे पोषण करू लागतात,त्याकाळी हा कृष्ण भगवान केवळ लोकरक्षणासाठी शुद्धसत्वाने त्या त्या योग्यकाली मत्स्यादी अनेक रूपे धारण कारुण,आपली--–ऐश्वर्य,सत्य,प्रतिज्ञा,यथार्थ उपदेश,भक्तावर दया व अद्भुत लीला हि प्रगट करितो.म्हणून आपण भगवंतांच्या अवतारांच्या लीला श्रवण कराव्यात.त्यांनी केलेले कृत्य श्रवण करावे.||२५|| भावार्थ:----हा पुरुषोत्तम लक्ष्मीपती,आपल्या जन्माने यादव कुलाचा सत्कार करितो म्हणून हे अत्यंत वर्णनीय आहे.तसाच ह्या प्रभुने आपल्या संचाराने मथूरापुरीचा सन्मान केला होता म्हणून ती सर्वांमध्ये अतिपवित्र आहे,असे कृष्णमहात्म्य आश्चर्यकारक आहे.म्हणून आपण ज्या नगरीत श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता,म्हणून ती नागरी पवित्र केली,त्या नगरीत—मथुरा नगरीत जाऊन—स्पर्श करून दर्शन करावे.असे दर्शन घेतले असता आपण पवित्र होतोत.||२६|| भावार्थ:---हे सख्यानो,हे दुसरे अतिआश्चर्य कि,सांप्रतकाळी द्वारका-नगरी,स्वर्गाच्यासुद्धा यशास तुच्छ करून भूमीचे यश वाढविणारी झाली आहे.कारण,त्याठिकाणी भगवंतांनी अवतार-कार्य केलेले आहे.द्वारकावाशी सर्व प्रजा,भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी मंदहास्यपूर्वक अवलोकन करणाऱ्या आपल्या रक्षक श्रीकृष्णाचे निरंतर अवलोकन करितात.हे सौख्य स्वर्गावर नाही,कारण स्वर्गात विषयांचे सुख आहे,म्हणजेच नाशिवंत सुख आहे.भगवान स्वत: द्वारका नगरीत वास्तव्य-निवास करीत असत,त्यामुळे सर्व प्रजाजनांना त्यांचे दर्शन होत आहे.भगवंत प्रत्यक्षरुपाणे स्वर्गात नसतात,कारण स्वर्गात प्रत्यक्ष विषय आहेत.जेथे विषय असतात,तेथे भगवंत नसतो.जसे जेथे अंधार असतो,तेथे प्रकाश नसतो.म्हणून आपण स्वर्गात जाण्याची म्हणजेच सकाम परमार्थ कधीच करू नये,तर निष्काम परमार्थाच करावा.त्यामुळे आपल्या स्वरुपाची अनुभूती येते.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुरुपता प्राप्त होते.||२७|| भावार्थ:---हे सखी,खरोखर या श्रीकृष्णाच्या रुक्मिणी--सत्यभामादि स्त्रियांनी,पूर्वजन्मी व्रते,तीर्थस्नाने व होमादि साधने इत्यादि करून या श्रीकृष्णाचे उत्तम पूजन केले होते.म्हणून आपण भगवंतांचे दर्शन होण्यासाठी निष्काम व्रत,तीर्थस्नाने होमादि साधने आवश्य करावी.कारण,ज्या स्त्रिया श्रीकृष्णाचे आधारमृत वारंवार प्राशन करितात.ज्या अधरामृताच्या प्राशनाविषयी पूर्वी आसक्त झालेल्या वज्रवाशी गोपी अत्यंत मोहित झाल्या होत्या.तस्मात श्रीकृष्णाचे सौदर्य लोकोत्तर म्हणजे विषयीसारखे नाशिवंत नसून आहे लोकोत्तर म्हणजे मृत्यू-लोकासारखे नसून अविनाशी आहे.म्हणून आपण भगवंतांचे सौंदर्य पाहण्याचा आवश्य प्रयत्न करावा.आपणास भगवंतांचे सौंदर्य आवडले की,आपण भगवंतांचे निर्गुण-निराकार रुपाकडे जाऊन परमात्म्याचा अनुभव घेउत.||२८|| भावार्थ:---या भक्तवत्सल प्रभुने,पूर्वी स्वयंवरांत शिशुपालादि बलिष्ठ राजांचा पराभव करून पराक्रमरूप मौल्याने हरण केलेल्या;प्रद्दुम्न,सांब.अंब,इत्यादिक ज्यांचे पुत्र आहेत अशा रुक्मिणी,सत्यभामा,नाग्नजिती इत्यादिक ज्या अष्टनायका आणि भौमासुराच्या वधप्रसंगी आणलेल्या हजारो ज्या इतर स्त्रिया ह्याच केवळ स्वातंत्र्यरहित आणि अशुची अशा आपल्या स्त्रीपणाला शोभा आणित आहेत.कारण,पारिजातादि प्रियं वस्तू आणून देवून व अनेक प्रिय भाषणे करून मनामध्ये आनंद उत्पन्न करणारा पति कमलनयन श्रीकृष्ण,ज्यांना घरातून—मनातून कधीही बाहेर जात नाही.त्याचप्रमाणे आपल्या मनातून भगवंत कधीही बाहेत जाऊ नये,म्हणजेच आपल्या मनात संसारातील विचार न येत भगवंतांचेच विचार यावेत.||२९-३०|| भावार्थ:---हे ऋषिश्रेष्ठा,याप्रमाणे त्या नागरिक स्त्रिया,नानाप्रकारची भाषणे करीत असता तो हरि,आपल्या मंदहास्यरहित अवलोकनाने त्यांचा सन्मान करीत करीत नगराबाहेर गेला.त्यामुळे तोच भगवंत त्यांना दिसू लागला.आपणासही आपण कोणतेही कार्य करीत असतांना भगवंतच दिसावा,अन्य संसारातील कोणी दिसू नयेत.||३१|| भावार्थः---त्यावेळी धर्मराजाने,श्रीकृष्णाला कदाचित् शत्रूंपासून भय उत्पन्न होईल अशी शंका मनांत आणून,त्या मधुसुदनाच्या संरक्षणार्थ स्नेहाने चतुरंग सैन्याची योजना केली.||३२|| भावार्थः----नंतर आपला अतिस्नेह करणारे,विरहाने दुःखित झालेले आपण आपणाबरोबर फार दूरवर आलेले अशा त्या पांडवाना माघारे फिरवून,श्रीकृष्णाने उद्धवादि यादवांसह वर्तमान आपल्या द्वारकानगरी कडे गमन केले.आपणही सत्संग करून आपल्या मुळ—गावी म्हणजे परमात्म्यासी एकरूप व्हावे.||३३|| भावार्थः---आणि कुरुदेश,जंगाल,पांचाल,शूरसेन,यमुनातीरचे प्रदेश,ब्रह्मावर्त,कुरुक्षेत्र,मस्त्य आणि सरस्वती नदीच्यातीरचे प्रदेश||३४|| भावार्थः---निर्जल मिरुदेश(मारवाड) व अल्प उदकाचे धन्वदेश यांचे उल्लंघन करून सौवीर आभीर या देशांपुढील आनर्त (द्वारकादेश)यांत तो सर्वव्यापक श्रीकृष्ण आला,त्या काली हे शौनका,त्याच्या रथाचे अश्व किंचित्- श्रमले होते.आपण आपले पारमार्थिक कार्य करीत असतांना इंद्रिये थकतात,म्हणून रात्री विश्रांत्री घ्यावी लागते.||३५|| | तत्र तत्र ह तत्रत्यैर्हरि: प्रत्युद्दतार्हण: | सायं भेजे दिशं पश्चाद्रविष्ठो गां गतस्तदा ||३६|| भावार्थः----हस्तिनापुरांतून निघाल्यापासून मार्गावरील प्रत्येक देशामध्ये राहणाऱ्या लोकांनी तेथे तेथे ज्याला नजराणे आणून अर्पण केले आहेत,असा तो हरि,सायंकाळी पश्चिमदिशेस आला आणि त्याच वेळी सूर्यहि अस्तास गेला.आपणही भगवंतांस आपण जाग्रत—स्वप्न या अवस्थेतील सर्व कर्मे भगवंतांस निष्काम भावनेने समर्पित करावेत,कारण यामुळे त्या कर्मांची फळे आपणास भोगावयास न येता,त्यामुळे आपले अंत:कारण शुद्ध होऊन मुमुक्षुता येण्यासाठी अधिकारासंपान्त्ता येते.||३६|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम(१)स्कंधात श्रीकृष्णाचा द्व्राकागमनसंबंधी हा सहावा(१०) अध्याय छेत्तीस(३६) श्लोकांनियुक्त समाप्त झाला||१०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| श्रीसदगुरुचरणार्पनामस्तु || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|११-----नंतर द्वारकादेशवाशी लोकांनी स्तुती केलेल्या श्रीकृष्णाचा उद्धवादि बंधूसहवर्तमान द्वारेकेत प्रवेश व त्याची तेथे उत्तम प्रकारे झालेली क्रीडा ह्या आकराव्या(११)अध्यायांत वर्णन केली आहे.||११|| |११---- ११---[श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |सूतउवाच | आनंर्तान् स उपव्रज्य स्वृद्धाञ्जनपदान् स्वकान् | दध्मौ दरवरं तेषां विषादं शमयन्निव ||१|| भावार्थः----सूत म्हणाला-हे ऋषिहो,श्रीकृष्णाने आपल्या समृद्ध द्वारकादेशांत गमन करून,त्या देशांतील सर्व लोकांचा खेद शांत करण्याकरिताच कि काय त्याने आपला पांचजन्यनामक शंख वाजविला.त्याचप्रमाणे संत—महात्मा यांनी लोकांचे दु:ख निवृत्त करण्याकरिता व सुख किंवा सुखरुपता देण्याकरिता सत्संगाद्वारे उपदेश करावा.||१|| भावार्थः---तेव्हां ज्या शंखाच्या पोटाचा भाग पांढरा असून वाजविते वेळी श्रीकृष्णाच्या अधरोष्ठसंबंधी आरक्ततेने ज्याला लाली प्राप्त झाली आहे असा तो शंख,श्रीकृष्णाच्या हस्तकमलसंपुटामध्ये वाजत असतां,तांबड्या कमळांच्या समुहावर बसून उच्चस्वराने शब्द करणाऱ्या राजहंसाप्रमाणें अतिशये शोभूं लागला.||२|| भावार्थः----तेव्हा जगाला भय उत्पन्न करणाऱ्या काळाला देखील भय उत्पन्न करणारा तो शंखाचा शब्द श्रवण करून,श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी उत्सुक झालेल्या द्वारकेतील सर्व प्रजा,त्या श्रीकृष्णास सामोऱ्या निघाल्या.आपल्याकडे संत—महात्मा आल्यानंतर आपण त्या संत—महात्मा यांचे आपणहून स्वागत करून सत्संग करावा.||३|| भावार्थः---पुढे श्रीकृष्णाची गांठ पडतांच त्या प्रजांनी आदरपूर्वक नेलेले नजराणे त्याच्या पुढे,सूर्यापुढे दीपअर्पण करितात त्याप्रमाणे अर्पण केले व आनंदाने प्रफुल्लितमुख झालेल्या त्या प्रजांनी,आत्माराम,सर्वदा स्वस्वरूपलाभाने पूर्णकाम व केवळ दीनवात्सल्याने सर्वांचा मित्र व सर्वांचा रक्षक अशा श्रीकृष्णाशी,हर्षाने सद्गतीत झालेल्या वाणीने,जसे लहान बालकांनी आपल्या पित्याशी भाषण करावे त्याप्रमाणे भाषण केले.||४-५|| | नताः स्म ते नाथ सदाङ्घ्रिपङ्कजं | विरिञ्चवैरिञ्च्यसुरेन्दवन्दितम् | | परायणं क्षेममिहेछतांपरं | न यत्र काल: प्रभवेत् पर: प्रभु: ||६|| भावार्थः----हे नाथा,ब्रहमदेव सनकादिक ऋषी व इंद्रादी सर्व देव यांनी वंदन केलेले,या लोकी मोक्ष इच्छिणाऱ्या लोकांस उत्तम आश्रयाचे स्थान आणि सर्वांची घडामोड करण्यास समर्थ असा कालही जेथे आपले सामर्थ्य चालवू शकत नाही अशा तुझ्या चरणकमलास आम्ही निरंतर नम्र आहो.म्हणून आपण अशा चरण-कमलास शरण जावे.||६|| | भवाय नस्त्वं भव विश्वभावन | त्वमेव माताथ सुह्रत्पति: पिता | | त्वं सद्गुरूर्न: परमं च दैवतं | यस्यानुवृत्त्या कृतिनो बभूविम ||७|| भावार्थः----हे विश्वपालका,आमचे कल्याण करण्याविषयी तूं सुप्रसन्न असावे.आपल्यावर भगवंत सुप्रसन्न असावेत यासाठी आपण निष्काम कर्मे करावीत म्हणजेच विषयांचा त्याग करावा—सकाम कर्मे करू नयेत.तूं आमचा माता-पिता,मित्र, पालक,सद्गुरू आणि परम दैवत आहेस.आपला मत-पिता,मित्र,पालक,सदगुरू आणि परम दैवत भगवंतंच असावा म्हणजेच अन्य कोणी असू नये,कारण तुझ्या—भगवंतांच्या सेवेनेच आम्ही—आपण कृतार्थ झालो आहो.||७|| भावार्थः----हे प्रभो,ज्यामध्ये प्रेमपूर्वक मंदहास्यसहित व सद्य अवलोकनाने युक्त मुखकमल आहे,तसेच सर्व अवयवांचेठिकाणी अप्रतिम सौंदर्याने सुशोभित आणि देवांनीही दर्शन होण्यास दुर्लभ असे तुझे स्वरूप आम्ही—आपण—जीवांनी अवलोकन करितो,यास्तव तुझ्या—भगवंतांच्या योगाने-–आपण—जीव सनाथ व धन्य आहो.||८|| भावार्थः----हे कमलपत्राक्षा अच्युता,तूं जेव्हा मित्रदर्शनाच्या इच्छेने हस्तिनापूर अथवा मथुरा या देशांस गमन करितोस जेव्हा,जसा सूर्याच्या दर्शनावांचून नेत्रांस त्याप्रमाणे तुझ्या दर्शनावाचून आम्हांस—आपणास—जीवांना एकाक्षणाइतकाही काल कोटीवर्षासारखा होतो,कारण भगवंतांचीच सर्व सत्ता आहे.सत्तेशिवाय कांहींच होऊ शकत नाही.||९|| भावार्थः----याप्रमाणे सांगितलेल्या व इतरही उच्चारलेला प्रजांच्या वाणी श्रवण करून तो भक्तवत्सल श्रीकृष्ण,आपल्या कृपादृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत असतां द्वारकेमध्ये प्रविष्ट झाला.आपणही—जीवांनी निष्काम भक्ती केली तर, भगवंत अनुग्रह करितो,त्यामुळे आपले परमहित होते.||१०|| भावार्थः—ती द्वारका श्रीकृष्णासारखे बलिष्ठ जो मधु,भोज,द्शार्ह,अर्ह,कुकुर,अंधक आणि वृष्णी त्यांनी,’सर्पांनी रक्षण केलेल्या भोगवतीनामक नगरीप्रमाणे’ सुरक्षित होती.||११|| भावार्थः----आणि सर्व ऋतुंमध्ये फलपुष्पदिसंपत्तीने युक्त असे पवित्र वृक्ष,वेलीचे,मंडप,फलवृक्षांच्या बागा,उपवने, फुलझाडांच्या बागा व क्रीडावने यांनी सभोवार वेष्टित असलेल्या अनेक तलावांनी युक्त होती.||१२|| भावार्थः---नगराची द्वारे,गृहद्वारे व मार्ग यांचे ठिकाणी उत्सवाच्या कौतुकाने बांधलेल्या तोरणांनी युक्त होती.विचित्र ध्वज व पताका यांच्या अग्रभागी असलेल्या वस्त्रांनी जिच्यामध्ये सूर्यकिरणाचा ताप होत नसे अशी होती.||१३|| भावार्थः----राजमार्ग,इतर सामन्य मार्ग,बाजरांतील मार्ग व प्रत्येक घरची अंगणी यांतील कचरा काढून स्वच्छ केलेली,सुगंधयुक्त उदकांचा सडा घातलेली,फुले पुष्पे अक्षता आणि पल्लवांचे अंकुर यांच्या जेथे तेथे सुरेख केलेल्या मांडावळीने युक्त होती.||१४|| भावार्थः----आणि सर्व गृहांच्या प्रत्येक दरवाजामध्ये ठेवलेल्या दही,अक्षता,फळ,ऊस,पूर्णकुंभ,पूजासाहित्ये,धूप व दीप इत्यादिकांनी युक्त होती.||१५|| भावार्थ:---तेव्हा अतिप्रिय श्रीकृष्ण आला असे एकूण,महात्मा वसुदेव,अक्रूर,उग्रसेन,अद्भुतपराक्रमी बलराम,प्रद्दुम्न,चारुदेष्ण, जांबवतीनंदन सांब,इत्यादिकांनी अतिहर्षाच्या वेगाने,शयन आसन व भोजन यांचा त्याग करून प्रेमाच्या योगाने ज्यांची धांदल उडाली आहे असे ते यादव.शृगारलेला एक मोठा हत्ती पुढे करून,हातामध्ये फळे पुष्पे इत्यादी मंगल पदर्थ घेणाऱ्या व वेदमंत्राचा घोष करणाऱ्या ब्राह्मणासहवर्तमान मंगलवाद्याच्या गजराने आदराने व हर्षाने युक्त होत असता रथात बसून कृष्णास सामोरे गेले.याप्रमाणे आपण संत—महात्मा यांच्या स्वागत-प्रसंगी सामोरे जावावयास पाहिजे.||१६-१७-१८|| भावार्थ:---त्यावेळी कानांमध्ये झळकत असलेल्या कुंडलाच्या योगाने प्रकाशित झालेल्या गालांनी ज्यांच्या मुखावर शोभा आली आहे अशा शेकडो वारांगना,श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी उत्सुक होवून गाड्या मेणे इत्यादी यानात बसून सामोऱ्या निघाले.आपणही संत—महात्मा यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनाविषयी उत्सुक असावयास पाहिजे.||१९|| भावार्थ:---तसेच हावभाव करण्यामध्ये चतुर नट,तालावर नृत्य करणारे नर्तक,गायनामध्ये कुशल गंधर्व,पुराणकथा सांगणारे सूत,वंशावळी गाणारे मागध,आणि प्रसंगानुरूपी स्तुती करणारे बंदी हेही श्रीकृष्णाची अद्भुत चरित्रे गायन करीत करीत श्रीकृष्णाच्या दर्शनास निघाले.आपणही संत—महात्मा यांच्या दर्शनासाठी जात असतांना मंगल—वाद्द-गीत गात जावे.||२०|| भावार्थ:----तेव्हा श्रीकृष्ण भगवंताने,आपणास अनुसरणाऱ्या बलरामादि बंधूची व पुरवासी सर्व लोकंची यथायोग्य रीतीने भेट घेऊन,कोणास मस्तक नम्र करून,नमस्कार करणे,कोणास हात जोडून मन्स्कर करणे,कोणास आलिंगन,हस्त-स्पर्श, हर्ष,अवलोकन,सांत्वन,आणि इच्छित,वरदान इत्यादिकरून वसुदेवापासून तो चांडाळापर्यंत सर्व लोकांच्या योग्यतेनुसार सन्मान केला.आपणही ज्याच्या—त्याच्या योग्यतेनुसार—अधिकारानुसार इतरांना ती—ती वस्तू मान सन्मान द्दावा.||२१-२२|| भावार्थ:---आणि वसुदेवानिक गुरु,गर्गाचार्यादिक ब्राहमण,आणि उग्रसेनप्रभूती वृद्ध यांना त्या आशीर्वाद दिल्यावर व इतर बंदिजनांनी त्याची स्तुती केल्यावर तो नगरात प्रविष्ठ झाला.||२३|| भावार्थ:---हे विप्रा शौनका,तो श्रीकृष्ण राजमार्गात गेला असता,त्यांच्या दर्शनाविषयी उत्साहयुक्त अशा द्वारकेतील धनिक लोकांच्या कुलीन स्त्रिया,आपापल्या गृहांवरील गच्च्यांवर चढल्या.||२४|| भावार्थ:---कारण,सौंदर्याचे केवळ स्थानच असे ज्याचे शरीर त्या श्रीकृष्णास जरी द्वारकावाशी लोक नित्य पाहत होते तथापि त्यांच्या दृष्टी तृप्तच होत नसत.कारण भगवंतांचे रूप निरंतर कितीही काळ पहिले तरी ते रूप अविनाशी आहे,म्हणून आपणही भगवंतांचे रूप पाहण्याचा प्रयत्न करावा.आपलीसुद्धा त्याचप्रकारे अवस्था झाल्याशिवाय होणार नाही,म्हणजे आपलीसुद्धा दृष्टी तृप्ती होणार नाही.||२५|| भावार्थ:----कारण,ज्याचे वक्षस्थळ,लक्ष्मीचे निवासस्थान,ज्याचे मुख प्राणीमात्राच्या नेत्राचे सौदर्यमृत प्राशन करण्याचे पात्रच,ज्याचे बाहु इंद्रादी लोकपालांचे निवासस्थान ज्याचे चरणकमल,भक्ताचे आश्रयस्थान आहे अश्या त्या कृष्णास पाहणाऱ्यांचा नेत्रांची तृप्ती कशी बरे होईल?अर्थातच असे मनोहर रूप पाहून कोणाचीच तृप्ती होणारच नाही.म्हणून आपण ते रूप आवश्य पाहण्याची साधना करावी.||२६|| भावार्थ:---श्वेतच्छ्त्र आणि चामरे यांनी सेवीत व पुष्पवृष्टींनी अभिवर्षित असा तो पितांबरधारी श्रीकृष्ण,त्या राजमार्गामध्ये कंठामध्ये धारण केलेल्या वनमालेने—म्हणजे कंठापासून चरणापर्यंत लोंबणारी असून जिची कमलें कधीही कोमेजत नाही तिला वनमाला असे म्हणतात.सूर्य,चंद्र,नक्षत्रयुक्त इंद्रधनुष्य आणि वीज यांच्या योगेकारून मेघ जसा शोभेल तसा शोभला---म्हणजे मेघाच्या वरती सूर्यबिंब,दोहोबाजुंस दोन चंद्र,सभोंवती नक्षत्रे,मध्यभागी एकाला एक लागलेली दोन इंद्रधनुष्यें आणि स्थिर राहणारी वीज अघटीतघटना घडून आली तर मेघ जसा शोभेल त्याप्रमाणे,मध्यभागी मेघासारखा शामसुंदर जो श्रीकृष्ण तो,मस्तकावर सूर्यासारखे शुभ्र छत्र,दोहीकडे पूर्णचंद्रासारखी दोन चामरें,सभोंवार नक्षत्रांसारखी पुष्पवृष्टी,विजेसारखी परिधान केलेली दोन पिंतांबरवस्त्रे,दोहोंकडून परस्पर मिळालेल्या दोन इंद्रधनुष्यांसारखी वनमाला यांच्या अद्भुत शोभला.||२७|| भावार्थ:----नंतर भगवान आपल्या आईबापाच्या घरात प्रविष्ट झाला तेव्हा त्यास देवकीपृभूती सात मातांनी आलिंगन भगवंतानेही आनदाने त्यास मस्तक नम्र करून वंदन केले.आपणही कांही कारणांनी बाहेरगावांहून आपल्या घरी प्रविष्ट झाल्यानंतर आई—वडील व वरिष्ठ मंडळींना नम्रतेने वंदन करावे म्हणजे त्यांच्या दोनही-पायांवर आपले डोके ठेवावे,तर फक्त वाकवून पायांना स्पर्श करू नये.अशी हि श्रेष्ठांना वंदन करण्याची योग्य पध्दत—रीत आहे.||२८|| भावार्थ:----त्यांनी श्रीकृष्णास आपल्या मांडीवर घेताक्षणीच प्रेमामुळे त्यांच्या स्तनातून दुग्धस्त्राव होवू लागला आणि हर्षाने त्यांची अंत:करणे व्याकूळ झाली.त्यांनी आपल्या नेत्रातून आलेल्या प्रेमाश्रुंनी श्रीकृष्णास अभिषेक केला.आपण आपल्या घरी बहुत दिवसांनी येणाऱ्या पुत्रांची किंवा आप्तांची माता किंवा आत्मिक असुत तर,आपणही आपल्या नेत्रातून आलेल्या प्रेमाश्रूंनी आपल्या पुत्रास किंवा आत्मियतांना अभिषेक करावा—आपोआपच—स्वाभाविकच होतो.||२९|| भावार्थ:---नंतर ज्यामध्ये स्त्रियाचे सोळा हजार एकशे आठ निरनिराळे महाल आहेत व सर्व विषयांना परिपूर्ण अशा त्या आपल्या अप्रतिम महामंदिन्रात श्रीकृष्णाने प्रवेश केला.भगवंत यांना अनेक रूपे घेता येतात म्हणून एकाच वेळेश सर्व स्त्रियांच्या—पत्नींच्या महालांत प्रवेश केला.म्हणजे सर्वांना सारखेच प्रेम दिले.त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील किंवा जे आत्मियत आहेत,त्यांना सर्वांना सारखेच प्रेम द्दावे—समभाव असावा तर विषम भाव नसावा,कारण संभावात सुख आहे,तर विषम भावात दु:ख आहे.||३०|| भावार्थ:---श्रीकृष्णाच्या रुक्मिन्यादी—सोळाहजरएकशेआठ स्त्रियांनी प्रवास करून परत घरी आलेल्या आपल्या पतीला दुरूनच पाहिल्याबरोबर त्यांच्या मनाला फार उत्साह वाटला आणि लज्जायुक्त आहेत नेत्रे व मुखे ज्यांची अशा त्या स्त्रिया,पतिप्रवासांत असते-वेळी धारण केलेल्या केलेल्या,’क्रीडा न करणे,अंगास उटी न लावणे इत्यादी’ नियमांचा त्याग करून अकस्मात्-देहाने आसनावरून व आत्म्याने अंत:करणापासून उठल्या,म्हणजे कृष्णाची भेट घेण्यास त्यांस अंत:करणाचेहि व्यवधान सहन झाले नाही.त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे पति दीर्घ-कालांनी प्रवास करून आपल्या घरी आलेले आहेत,असे दुरूनच पाहिले आहे,त्या शृंगार न करीताच अकस्मात्-देहाने बसलेल्या ठिकाणावरून व अंत:करणपूर्वक उठून पतिची भेट घ्यावावयास पाहिजे—प्रेमाने भेट घ्यावावयास पाहिजे.यातच उभयंतांना—पति-पत्नींना सुख-समाधान—शांती—प्रेम आहे.||३१|| भावार्थ:---हे भृगश्रेष्ठ शौनका,गंभीर आहेत अभिप्राय(मनोधर्म)ज्यांचे अशा कृष्णस्त्रीया,पूर्वी परदेशी असणाऱ्या आपल्या पतीस अत:करणाने(ध्यान करून)आलिंगन देत असत,त्या स्त्रियां मनोमय शरीराने आलिंगन देत असत.त्यांनी तो पती समीप आल्यावर त्यास दृष्टींनी,आणि अगदी जवळ आल्यावर पुत्राच्या द्वाराने आलिंगन दिले.त्यावेळी लज्जित होणाऱ्या त्या स्त्रियांच्या नेत्रात आलेले प्रेमाश्रू जरी त्यांनी बाहेर न येण्यासाठी नेत्रामध्येच आवरून धरिले होते तथापि श्रीकृष्णदर्शनाने त्यांस अत्यंत मोह प्राप्त झाल्यामुळे ते त्यांच्या नेत्रातून खाली पडलेच.त्यांचे आपल्या पतिवर अत्यंत मोह असल्यामुळे नेत्रांतील प्रेमाश्रू बाहेर पडले,कारण प्रेमाची उत्कठ अवस्थेचा तो परिणाम झाला.तसेच आपलीही ती अवस्था झाल्यावर नेत्रांतून प्रेमाश्रू बाहेर पडावयास पाहिजे—पडतातच,कारण एकमेकावर उत्कठ प्रेम असतेच.||३२|| भावार्थ:---तो श्रीकृष्ण जरीही स्त्रीयांच्या मंदिरात अगदी समीप व त्याहूनही एकांतामध्ये होता तथापि त्या स्त्रियांस त्याची चरणकमले पद्पदाचेठिकाणी नवी नवी वाटत असत.कारण स्वभावत: चंचल अशीही लक्ष्मी,ज्याचा त्याग कधीच करीत नाही,त्या श्रीकृष्णास चरणकमलाच्या सेवेविषयी कोणती स्त्री कंटाळेल बरे?अर्थातच कोणीच कंटाळणार नाही,कारण भगवंत अनादि—अनंत--आनंदरूप असून नूतन आहे.म्हणून आपणासही भगवंतांच्या सेवेचा कंटाळा न येत उल्हास असावा.||३३|| भावार्थ:---हे विप्रहो,याप्रमाणे स्वत: निरायुध असाही तो भगवान केवळ पृथ्वीला भारभूत असे ज्यांचे जन्म आहे आणि अनेक अक्षौहिणीसैन्याने सर्वत्र पसरलेले ज्यांचे तेज आहे अशा दृष्ट राज्यामध्ये परस्पर वैर उत्पन्न करून त्यांचा परस्पर वध झाला असता,जसा वायू अरण्यातील वेळूच्या परस्पर घर्षणाने अग्नी उत्पन्न करून त्याने त्यांचा दाह झाला म्हणजे शांत होतो त्याप्रमाणे,आपणही विराम पावला.||३४|| भावार्थ:---तोच भगवान श्रीकृष्ण,आपल्या मायेने या मनुष्यलोकी अवतार घेवून प्राकृत जनासारखा रुक्मिण्यादी उत्तम स्त्रियांच्या समुदायामध्ये रममाण झाला.||३५|| भावार्थ:---ज्या स्त्रियांच्या गूढ अभिप्राय सूचक स्वच सुंदर मान्धास्याने व सज्जन नेत्रकटाक्षयुक्त अवलोकन तडित झालेल्या श्रीशंकराने अगदी मोहित होवून आपल्या पिनाक धनुष्याचा त्याग केला.अशाही त्या उत्तम स्त्रिया,आपल्या नेत्रविलासादिकेकरून ज्या श्रीकृष्णाचे मन कामविकारयुक्त करण्याविषयी समर्थ झाल्या नाहीत.कारण तो सर्वज्ञ असून सत्-चित्-आनंदस्वरुपयुक्त आहे.जसे जेथे प्रकाश आहे,तेथे अंधार नाही,त्याचप्रमाणे जेथे भगवंत आहे,तेथे विषय नाहीत.म्हणून त्या पत्न्या भगवंतांस कामविकार उत्पन्न करू शकल्या नाहीत.भगवंत ज्याप्रमाणे कामादीविकाररहित आहेत,त्याचप्रमाणे आपणही सत्संग करून कामादिविकाररहित होऊन ज्ञानाद्वारे भगवंतासी एकरूप होऊन जन्म-मरणरहित व्हावावयास पाहिजे.यातच आपले—जीवांचे महाकल्याण आहे.||३६|| भावार्थ:---तो हा श्रीकृष्ण,वस्तुत संगरहित असूनही विषयीपुरुषासारखा वर्तत असल्यावरून,त्याचे खरे तत्व न जाणणारा हा संसारी लोक,त्यास आपल्या सारखाच मनुष्य व विषयासक्त आहे असे मानतो.श्रीकृष्ण हा संगरहित—विषयांरहित आहे.पण आपल्या—जीवांच्या ठिकाणी अज्ञान व अल्पज्ञान असल्यामुळे श्रीकृष्णाचे वास्तविक स्वरूप काळात नाही.म्हणून आपण सत्संग करून श्रीकृष्णाचे वास्तविक स्वरूप कळून घ्यावे.श्रीकृष्णाचे वास्तविक स्वरूप कळून घेतल्यानंतर आपण त्यास मनुष्यासारखे न मानता,तो भगवंत आहे असे कळेल.असे कळल्यानंतर तो विषयातीत—गुणातीत आहे,असे कळेल. असे कल्यानंतर त्याच्यावरील आपली श्रद्धा वाढेल.असे कळाल्यानंतर आपण त्याच्यासारखेच—एकरूपच होउत.||३७|| | एतदीननमीशस्य प्रकृतिस्थोsपि तद्गुणै: | न युज्यते सदाssत्मस्थैर्यथा बुद्धि स्तदाश्रया ||३८|| भावार्थ:---जशी आत्म्याचा आश्रय करून राहणारी बुद्धी,आत्म्याचे ठिकाणी असणाऱ्या आनंदादिगुनानी युक्त नाही,तसा पृकृतीचा आश्रय करून राहिलेला ईश्वर तिच्या सुखदु:खादि गुणांनी लिप्त होत नाही.हेच ईश्वराचे ऐश्वर्य आहे.आपण—जीव भगवंतांच्याच आश्रयाने राहतोत,पण आपणांस असे कळत नाही.भगवंत गुणांत राहतो,पण गुणांत आसक्त होत नाही,लारान तो ज्ञानघन आहे.म्हणून आपण गुणांतीत होण्यासाठी सत्संग करून गुणांतीत होण्याचा आवश्य प्रयत्न करावयास पाहिजे.आपले गुणांतीत होणे हेच वास्तविक ऐश्वर्य आहे.||३८|| | तं मेनिरेबला मूढा: स्त्रैणं चाणुव्रतं रहं | अप्रमाणविदो भर्तुरीश्चरं मतयो यथा ||३९|| भावार्थ:---अशा अहंकाराच्या वृत्ती,देहरूप क्षेत्रास जाणणाऱ्या ईश्वरास तो आपल्या स्वाधीन आहे असे मानितात तशा आपल्या भर्त्याचा महिमा न जाणणाऱ्या मूढ रुक्मिण्यादिक सर्व अबला,तो कृष्ण स्त्रीलंपट आहे व तो एकांतामध्ये आपल्या मर्जीनुरूप वागतो असे मानीत होत्या.त्या श्रीकृष्णाच्या स्त्रियां—पत्न्या श्रीकृष्णास आपल्या स्वाधीन आहे अशा मानीत होत्या.पतिचे महत्व जानीत नव्हत्या.त्यास स्त्री-लंपट—आसक्त आहे अशा मानीत होत्या.यास कारण श्रीकृष्णाचे त्यांना यथार्थ ज्ञान नव्हते.म्हणून आपण सत्संग करून श्रीकृष्णाचे यथार्थ स्वरूप जाणून घ्यावावयास पाहिजे.असे केले असता आपणास श्रीकृष्णाविषयी विपरीत भावना निवृत्त होईल व यथार्थ भावना होईल.||३९|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील प्रथमस्कंधा(१)मध्ये श्रीकृष्णाचे केलेल्या द्वारकाप्रवेशाचा वर्णनरूप हा अकरावा(११)अध्याय ऐकोणचाळीस(३९)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||११||श्रीकृष्णार्पणामास्तु||श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |१२-----ज्या परिक्षितीच्या जन्मकथनप्रसंगासाठी पूर्वी अश्वत्थाम्याच्या दंडादिकाचे वर्णन केले आहे ते परीक्षितीचे जन्म या बाराव्या(१२)अध्यायांत वर्णन केले आहे.||१२|| | ||१२---[परिक्षिताचा जन्म] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | शौनक उवाच:--- | अश्र्वत्थान्मोपसृष्टेन ब्रम्हशीश्र्र्णोरूतेजसा | उत्तराया हतो गर्भ ईशेनाजीवित: पुन: ||१|| अर्थः---शौनक म्हणाला---अहो सुता,अश्वथाम्याने सोडलेल्या अतितेजस्वी ब्रह्मास्त्राने मृतप्राय झालेला उत्तरेचा जो गर्भ,ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्णाने पुन: जिवंत केला.त्याचप्रमाणे आपले अज्ञानामुळे स्वस्वरूप—परमात्मस्वरूप झाकलेले सत्संगाद्वारे जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाने कळून घेऊन परमात्म्याचा अनुभव घ्यावा.||१|| अर्थ:---त्या बुद्धिवान परीक्षितीचे जन्म कसा झाला?त्याने कोणती कर्मे केली?व त्याचे देहविसर्जन कसे झाले?आणि तो देहत्याग करून परलोकी कसा गेला?हे ते सर्व,तू अनुग्रह करून आम्हास सांगण्याची इच्छा करीत असशील तर आम्ही श्रवण करण्याची इच्छा करीत आहोत.यास्तव ज्या परिक्षितीला शुकाचार्यांने ज्ञानाचा उपदेश केला त्या राजाचे चरित्र,श्रद्धापूर्वक श्रवणाची इच्छा करणाऱ्या आम्हांस सांगा.कारण आम्हांस आमचे जन्म—मरण निवृत्त करून आनंदरूप व्हावावयाचे आहे.राजा परीक्षितीने जी साधना केली,त्या साधनानुसार आम्हांस आरूढ होऊन साध्यापर्यंत जावावयाचे आहे.राजा परीक्षितीस तर सात दिवस मृत्यू येणार नव्हताच,अशी त्यास निश्चित खात्री होती.आम्हांस तर सात दिवस नव्हे तर सात सेकंदांचीहि खात्री नाही.म्हणून आम्हांस श्रीमद्भागवत सांगा,जेणेकरून आम्हांस मोक्ष मिळेल.||२—३|| अर्थः---सुत म्हणाला----हे शौनक,श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या सेवेने सर्व विषयांचे ठिकाणी निस्पृह अशा धर्मराजाने,सर्व प्रजेचे आई--बापासारखे प्रेमाने पालन केले.धर्मराजांनी—कुंतीसहित पांडवांनी श्रीकृष्ण भगवंतांची—चरणाकमलांची—निर्गुण-निराकार असा भावांची धारणा करून सेवा केली.म्हणजेच देहसंबंधी म्हणून सेवा केली नाही.आपणाकडे जर देहासंबंधी संत—महात्मा असेल आपण त्यांची देहसंबंधी अशा भावाची धारणा न करता तो संत—महात्मा आहे,अशी धारणा करून,आपण अधिकारसंपन्न होऊन सेवा व सत्संग करून आपले महाकल्याण करून घ्यावे.||४|| अर्थः---श्रीकृष्णाचे ठिकाणी ज्याचे मन आहे,अशा धर्मराजास संपत्ती,यज्ञ व त्यापासून प्राप्त होणारे स्वर्गादिलोक,ब्राह्मण पट्टराणीद्रौपदी,पराक्रमी अनुकूल बंधू,इच्छित विषय देणारी पृथ्वी,जंबूद्विपाचे आधिपत्य व स्वर्गापर्यंत प्रसिध्द झालेले यश----||५|| | किं ते कामा: सुरस्पार्हा मुकुन्दमनसो द्विजा: | अधिजह्रुर्मुदं राज्ञ: क्षुधितस्य यथेतरे ||६|| अर्थ:---इत्यादिक देवांनी इच्छा करण्यास योग्य असेही विषय,हर्ष उत्पन्न करणारे झाले काय ? तर ‘जसे क्षुधाक्रांत पुरुषाला,अन्नावाचून दुसरे चंदनादि पदार्थ,संतोशकारक होत नाहीत त्याप्रमाणे’ कृष्णभक्तीवाचून कोणतेही विषय धर्मराजास सुखकारक झाले नाहीत.आपणासही धर्मराजाप्रमाणे अनुकूल असलेली संपत्ती,यज्ञ व त्यापासून होणारे स्वर्गातील विषयांचे भोग,पत्नीचे विषयभोग,अनुकूल असलेले बांधवांचे—देहसंबंधेचे सुख,इच्छित विषय देणारी पृथ्वी,आपल्याकडे असलेली कोणतीही सत्ता,अनुकूल असलेले विषयांचे भोग,तुच्छ—दु:खदायक—अहित करणारे आहेत असा विवेक करून त्यांच्याविषयी त्यागाची भावना होऊन वैरागयाची धारणा करून श्रीकृष्णांची निष्काम भक्तीची धारणा करावी.||६|| अर्थ:---आता प्राकृतकथा अशी कीं,हे भृगुनंदना शौनक मातेच्या गर्भात असलेला तो वीर परीक्षित,ब्रह्मास्त्रतेजाने दग्ध होऊ लागला तेव्हा त्याने तेथे कोणीएक अलौकिक म्हणजे लौकीकासारखा—आपल्यासारखा—मानवासारखा नसलेला पुरुष पहिला.म्हणजे तो साक्षात भगवंत पहिला.असा भगवंत पाहण्यासाठी ज्याच्या—त्याच्या पूर्वपुण्याईचा साठा असावा लागतो,तेव्हाच भगवंतांचे दर्शन होते,अन्यथा दर्शन होत नाही.म्हणून आपण मनुष्य देहात असतांना पुण्य संपादन करावे.||७|| अर्थ:---तो असा अंगुष्ठ परिमित,स्वच्छ,दैदिप्यमान सुवर्ण मुकुटाने युक्त,अतिरमणीय स्वरूपी,विजेसारखे वस्त्रे परिधान` केलेला,शामवर्ण,निर्विकार असा भगवंत होता.||८|| अर्थ:---शोभामय अशा चार आजानुबाहूंनी युक्त,तापलेल्या सुवर्णासारखा देदीप्यमान कुंडलानी मंडीत,आरक्तवर्ण नेत्रांनी युक्त,ज्यांची हस्तामध्ये गदा आहे,जो आपल्या सभोवताली फिरणारा असून आपली विजेसारखी गदा वारंवार फिरवीत आहे.||९|| भावार्थ:---आणि सूर्य जसा आपल्या किरणांनी शिताचे निवारण करितो त्याप्रमाणे जो आपल्या गदेने ब्रह्मास्त्राचे तेज नाहीसे करीत आहे अशा पुरुषाला त्याने आपल्याजवळ पहिल्याबरोबर हा कोण असावा ? असा तो गर्भस्थ बालक तर्क करू लागला.आपल्याही जीवन-काळात आश्चर्यकारक—अपूर्व घटना—प्रसंग घडला तर,आपणही त्या प्रसंगाबाबत विवेक करून तर्क करावा.||१०|| भावार्थ:---यापमाणे अतर्क्यस्वरूपी,सर्वव्यापक,धर्मरक्षण करणारा आणि पापांचा नाश करणारा जो भगवान तो,ब्रह्मास्त्राचे निवारण करून तो दहा महिन्याचा बालक आपणाकडे पाहत असता,तेथेच अंतर्धान पावला.अशा रीतीने भगवंतांनी ब्राह्मास्त्राचे निवारण करून तेथेच अंतर्धान पावले.त्याचप्रमाणे आपण—जीवांनी निष्काम कर्मे करून--परोपकार करून अहंपणाचा त्याग करून कार्य करावे.||११|| | तत:सर्व गुणोदर्के सानुकूलग्रहोदये | जज्ञे वंशधर: पाण्डोर्भूय: पांण्डूरिवौजसा ||१२|| भावार्थ:--नंतर अनुकूल असलेल्या दुसऱ्या ग्रहांसह्वर्तमान शुभग्रहांच्या उद्याने युक्त व सर्वगुणाची उत्तरोत्तर अभिवृद्धी सुचविणारा अशा सुलग्नकाली पांडवाच्या वंश धारण करणारा असून पराक्रमानेही दुसरा पंडूराजाच कि काय ! असा तो उत्पन्न झाला.||१२|| भावार्थ:---तेसमयी संतुष्ठ अंत:करणयुक्त धर्मराजाने,धौम्य,कृपाचार्य इत्यादिक ब्राह्माणाकडून पुण्याहवाचन करवून त्या बालकाचा जातकर्म संस्कार करविला.आपणही आपल्या घरी बालक—बालिका जन्म आली असेल तर ब्राह्मणांकडून कांही सत्कर्म करून,सात्विक ग्रंथाचे पारायण—उच्चारण,दानधर्म करावा.असे सात्विक वातावरण—कार्य केले असता त्या वातावरणाचा--कार्याचा बालक—बालिकेवर सात्विक परिणाम होतो.||१३|| भावार्थ:--आणि धर्म करण्याची वेळ जाणणाऱ्या त्या धर्मराजाने,पुत्रोत्पत्तीरूप पुण्याकाली ब्राह्मणास सुवर्ण,धेनु,पृथ्वी,ग्राम, गज श्रेष्ठ अश्व आणि उत्तम अन्नेही दिली.आपणही आपल्या अधिकारानुसार सुवर्ण,धेनु—गाई,पृथ्वी,धन,उत्तम वस्त्रे व उत्तम पाची-पक्कवान्ने दानरूपाने द्दावे.यात आपलेच हित असते.||१४|| | तमूचुर्ब्राह्मणास्तुष्टा राजानं प्रश्रयन्वितम् | एव ह्यास्मिन् प्रजाणन्तौ पुरुणां पौरवर्षभ ||१५|| | दैवेनाप्रतिघातेन शुक्ले संस्थामुपेयुषि | रातो वोsनुग्रहार्थाय विष्णुना प्रभविष्णुना ||१६|| भावार्थ:---तेव्हा संतुष्ट झालेले ते ब्राहमण,प्रेमाने नम्र झालेल्या धर्मराजास म्हणूं लागले कि,हे पुरुकुलश्रेष्ठ धर्मा,पुरूकुलांत उत्पन्न झालेल्या राजांचा हा शुद्ध वंश तंतू(बालक)अपरिहार्य दैवाने नाश पावत असतां,अद्भुतपराक्रम युक्त श्रीविष्णूचे याचे ऋण करून तुमच्यावर अनुग्रह करणाऱ्याकरिता हा तुम्हांस दिला आहे.आपण जर सात्विक वृत्तीचे असल्यानंतर आपल्या पोटी येणारे संतान—बालक—बालिका बहुतेक सात्विक उत्पन्न होत असते.आपण सात्विक वृत्तीत जीवन जगावे.||१५—१६|| | तस्मान्नान्मा विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवा: | भविष्यति न संदेहो महाभागवतो महान् ||१७|| भावार्थ:---म्हणून हा विष्णूरात(विष्णूने रक्षित)अशा नावाने प्रसिद्ध होऊन गुणांनी श्रेष्ठ असल्यामुळे लोकांमध्ये महाकीर्तिमान व महाभगवद्भक्त होईल;यांत संशय नाही.भगवंताने गर्भात याचे रक्षण केलेले असल्यामुळे हा महान भागवत-भक्त होईल.असे राजा परीक्शितीचे भाकीत ब्राह्मणांकडून करण्यात आले.||१७|| भावार्थ:---युधिष्ठीर म्हणाला----ब्राहमण श्रेष्ठ हो,हा बालक चांगल्या प्रशंसेने आणि कीर्तीने,आपल्या वंशांत पूर्वी झालेल्या उदारचित्त व पवित्रकीर्ती अशा राजर्षीस अनुसरणारा होईल काय ? ||१८|| |ब्राम्हणा उचु | पार्थ प्रजाविता साक्षदिक्ष्वाकुरिव मानव: | ब्रम्हण्य: सत्यसंधश्र्च रामो दशरथिर्यथा ||१९|| भावार्थ:---ब्राहमण म्हणाले-----हे कुंतीसुता धर्मराजा हा बालक,साक्षात मनूचा पुत्र जो इक्ष्वाकु राजा त्याच्यासारखा प्रजासंरक्षण करणारा होईल आणि ब्राहमणांचा हितकर्ता असून आपली प्रतिज्ञा सत्य करण्याविषयी दाशरथी रामासारखा होईल.आपणही आपला बालक सात्विक होण्यासाठी त्याच्यावर सात्विक संस्कार करावेत.सभोवती सात्विक वातावरण ठेवावे.बालकावर—बालिकेवर सत्संगतीचा,सत्वातावरणाचा सात्विक परिणाम होत असतो.बाल-वयात सदगुण—दुर्गुणांचा अधिक परिणाम होत असतो.म्हणून आपण दुर्गुणांच्या वातावरणात न ठेवता सदगुणांच्या वातावरणात ठेवावे.||१९|| भावार्थः---हा मोठा दाता व शरणागताचे रक्षण करणारा उशीनर देशाधीपति शिबिराजासारखा होऊन आपले ज्ञाती व यज्ञ करणारे राजे यांच्या कीर्तीचा विस्तार करणारा दुष्यंतपुत्र भरतराजासारखा होईल.||२०|| भावार्थः---तसाच हा बालक,कुंतीपुत्र (अर्जुन)आणि कार्तवीर्य (सहस्त्रार्जुन)या दोन्ही अर्जुणांप्रमाने धनुर्धारी वीरांमध्ये अग्रेसर होऊन अग्निसारखा दुःसह आणि समुद्रासारखा दुस्तर होईल.||२१|| भावार्थः---सिंहासारखा पराक्रमी,आपणही सिंहासारखे पराक्रमी व्हावे.हिमाचलासारखा साधूंनी सेवन करण्यास योग्य,म्हणजे आपणही साधूंची—संत—महात्मा यांची सेवा कितीही केली तरी कष्ट न वाटता,कष्ट हे सेवेची संधी आहे,यातच आपले पारमार्थिक हित आहे असा निश्चय असल्यामुळे अंत:करणपूर्वक सेवा उल्लाहासाने करविसी वाटावी.साधूंचे सेवा हि सुवर्ण-संधी आहे असे समजून करावी.अपराध सहन करण्याविषयी पृथ्वीसारखा म्हणजे पृथ्वीवर कितीही खड्डे खोदले काय किंवा तिचे कितीही अपराध केले तरी आपणास अन्न—पाणी देऊन कृथार्थ करते.असी ती पृथ्वी क्षमाशील आहे,असा पृथ्वीसारखा क्षमाशील धर्म आपण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा.तरी आणि सहन शिलतेविषयी आईबापांसारखा होईल,आपल्यात सहनशीलता असावी.------------------||२२|| भावार्थः---समतेविषयी ब्रहमदेवासारखा,सज्जनावर प्रसादकरण्याविषयी शंकरासारखा आणि लक्ष्मीलाही आश्रय देणारा जसा श्रीहरी आहे,त्याचप्रमाणे हा सर्व प्राणीमात्रांस आश्रय देणारा होईल.आपणही—जीवांनी ब्रह्मदेवासारखा समता हा गुण आपल्यात आणून,त्याप्रमाणे आचरण करावे.जे लोक—भक्त आहेत त्यांना शंकर ज्ञानरूपी प्रसाद—उपदेश करतात,त्याप्रमाणे आपणही आपल्या अधिकारानुसार इतर प्राणीमात्रांस—जीवमात्रांस ज्याच्या--त्याच्या अधिकारानुसार परोपकार करून सुखी करण्याचा प्रयत्न करावा—दानधर्म करावा.आर्थिक.शारीरिक,मानसिक,बौद्धिक,जीव-ब्रह्म—ऐक्य—ज्ञान दान करावे.जे दिले त्याचा मोबदला घेऊ नये.म्हणजेच निष्काम उपासना करावी.श्रीहरींनी जसा लक्ष्मीला आश्रय देलेला आहे,त्याचप्रमाणे आपण जे निराधार आहेत,त्यांना आश्रय द्दावा.||२३|| भावार्थः----हा बालक,सर्वप्रकारच्या सद्गुणांनी प्रसिध्द होण्याविषयी श्रीकृष्ण सारखा होऊन रंतीदेवासारखा उदार आणि ययातीराजासारखा धार्मिक होईल.आपणहि सत्संग करून सद्गुणांनी संपन्न व्हावे,कारण त्यामुळे आपल्यात सद्गुणांचे अधिक्य होऊन परमाम्याकडे जाण्याची ओढ निर्माण होते.आपल्यात उदार हा सद्गुण आल्यास परोपकार घडत असतो.आपल्यात धार्मिकता आल्यास स्वधर्माचे पालन करावे वाटते.अशा अनेक प्रकारचे सद्गुण आल्यास निष्कामता येऊन अंत:करण शुद्ध होत असते.||२४|| | धृत्या बलिसम: कृष्णे प्रल्हाद इव सद्ग्रह: | आहर्तेषोSश्र्वमेधानां वृद्धानां पुर्यपासक: ||२५|| भावार्थ:---धैर्याने बलीरजासारखा व सद्वासनेविषयी प्रल्हादासारखा होईल.हा पुष्कळ अश्वमेधाचा कर्ता होऊन वृद्धांची शुश्रुषा करणारा होईल.आपल्यात बलीसारखा धैर्य हा सदगुण आल्यास वैराग्य येते.आपल्यात प्रल्हादासारखी सद्वासना येते,त्यामुळे परमार्थ करावा अशी भावना दृढ होते.||२५|| भावार्थ:--राजर्षी पुत्राचा उत्पादक,निंद्य मार्गाने जाणणाऱ्यांचे शासन करणारा आणि भूमी व धर्म यांच्या संतोषाकरिता कलीचा निग्रह करणारा होईल.आपण निंद्द—परधर्म करू नये,कारण निंद्द कर्मांने पाप होत असते किंवा अंत:करण अशुद्ध होत असते.आपण कलीचा निग्रह करावा--कलीसारखे आचरण करू नये म्हणजेआपण १--द्दूत क्रीडा—जुगार खेळू नये,२—मद्द—दारू पिऊ नये,तंबाखू—गुटखा खाऊ नये,बिडी—सिगारेट पिऊ नये,३—व्यभिचार करू नये,४—हिंसा—मांसाहार करू नये,५—आपण अधर्मांने धन किंवा सोने मिळवू नये.वरील सर्व किंवा एक अवगुण आल्यास पाप किंवा अंत:करण अशुद्ध होते,त्यामुळे परमार्थ करावा वाटत नाही.याकरिता कलीसारखे आचरण करू नये.कलीसारखे आचरण केल्यास यमपुरीस जाऊन व लक्षचौऱ्यायोनीस योनीस जाऊन महादु:ख भोगावे लागते.याकरिता विवेक—विचार करून जीवन जगावे.||२६|| | तक्षकादात्मनो मृत्युं द्विजपुत्रोपसर्जितात् | प्रपत्स्यत उपश्रुत्य मुक्तसंग: पदं हरे: ||२७|| भावार्थ:---ब्राहमण पुत्राने प्रेरणा लेलेल्या तक्षकाकपासून आपणास मृत्यू येणार असे ऐकूण हा सर्वसंगपरित्याग करून श्रीहरीच्या चरणास शरण जाईल.आपणही सर्वसंगपरित्याग—म्हणजे सर्व विषयांचा त्याग करून सत्संग करून श्रीहरीस—संत—महात्म्यांना शरण जावे,अन्य—धनांस किंवा देहसंबंधीतांना—नातेवाईकांना शरण जाऊ नये.||२७|| | जिज्ञासितात्मयात्म्यो मुनेर्व्याससुतादसौ | हित्वेदं नृप गङ्गायां यास्यत्यद्धाकुतोभयम् ||२८|| भावार्थ:---हे राजा,हा बालक,व्यासपुत्र शुकाचार्यमुनीपासून आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान संपादन करून व या नाशिवंत शरीराचा गंगेमध्ये त्याग करून सर्वथा भयरहित अशा मुक्ती पदास खरोखर जाईल.आपणही संत—महात्मा यांचा सत्संग करून जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान संपादून मोक्ष प्राप्त करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे.||२८|| भावार्थ:---याप्रमाणे जातकाचे फल सांगण्यामध्ये निपुण अशा त्या ब्राहमणांनी धर्मराजास परिक्षितीच्या जन्मकर्माचे कथन केले.नंतर धर्मराजाने त्यांची पूजा केल्यावर ते सर्व ब्रहमण,आपापल्या घरी निघून गेले. ||२९|| भावार्थ:---हे शौनका,तो हा समर्थ राजा,गर्भामध्ये पाहिलेले पुरुषाचे ध्यान करीत असतात,या लोकी दिसणाऱ्या मनुष्यामध्ये,मी पूर्वी पहिला तो कोणता?अशी परीक्षा करीत असे,म्हणून परीक्षित या नावाने सर्व लोकामध्ये प्रख्यात झाला.आपणही वेवेक—विचार करून परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष संपादन करावा.||३०|| भावार्थ:---जसा शुक्लपक्षी चंद्र प्रतिदिवशी एकेक कलेने वाढत वाढत पूर्णिमेच्या दिवशी पंधरा कलांनी परिपूर्ण होतो.त्याप्रमाने तो राजपुत्र,प्रतिदिवशी युधिष्ठीरादी पितामहांनी अर्पण केलेल्या अन्नपानादिकांनी व चौसष्ट कलांनी वाढत वाढत असता पूर्ण होऊं लागला.आपणसुद्धा—जीवांनी संत—महात्मा यांच्या उपदेशांनी अंत:करणात वेदांताचे श्रवण करीत-करीत परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी प्रयत्न करीत जीवन व्यतीत करावे.||३१|| भावार्थः---नंतर कांही दिवसांनी,ज्ञातिद्रोहापासून घडलेल्या पापाचा नाश करण्याच्या इच्छेने अश्वमेधयज्ञाने यजन करण्यास प्रवृत्त झालेला तो धर्मराजा,कारभार व अपराध्यापासून घेतलेला दंड यांवांचून इतर द्रव्याचा संग्रह नसल्यामुळे चिंतन करूं लागला.आपणास—जीवांस वेदांत श्रवण करण्याचा अधिकार येण्यासाठी आपण निष्काम कर्म व निष्काम उपासना करून त्याद्वारे अंत:करण शुद्ध व स्थिर करून ज्ञान-यज्ञ संपन्न करावा. ||३२|| भावार्थः---तेव्हा त्याचे ते इच्छित जाणून श्रीकृष्णाने प्रेरणा केलेल्या भिमसेनादी बंधूंनी उत्तरदिशेस जाऊन तेथे पूर्वी मरुत्तराजाच्या यज्ञांत ब्राहमणांनी टाकलेले सुवर्णपात्रादिक बहुत द्रव्य होते ते आणिले.||३३|| अर्थः---नंतर त्या द्रव्याने यज्ञसामग्री संपादन करून ज्ञातीद्रोहाच्या पातकाचे भय जाणणाऱ्या त्या साक्षात धर्मपुत्र युधिष्ठिराने,तीन अश्वमेधयज्ञांनी श्रीहरीचे उत्तमप्रकारे यजन केले.||३४|| भावार्थः---याप्रमाणे धर्मराजाने यज्ञाच्या समारंभाकरिता ज्या श्रीकृष्णास बोलविले होते,त्याने,ब्रह्माणाकडून धर्मराजाने अश्वमेध करविले आणि पांडवांचे प्रिय करण्याकरिता कितीएक महिने पर्यंत हस्तिनापुरामध्ये वास केला,आपणसुद्धा ज्ञान-यज्ञ संपन्न होण्यासाठी सदगुरुंच्या—संत—महात्मा यांच्या आश्रमात राहून,त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन व त्यांची सेवा करवून ज्ञान-यज्ञ संपन्न करावा.यातच आपले महा--हीत आहे.||३५|| | ततो राज्ञाभ्यनुज्ञात: कृष्णया सह बन्धुभि: | ययौ द्वारवती ब्रम्हान् सार्जुनो यदुभिर्वृत: ||३६|| भावार्थः---हे शौनका,नंतर धर्मराजा,भीम,नकुल,सहदेव व द्रौपदी यांनी अनुमोदन दिलेला तो श्रीकृष्ण,अर्जुनास बरोबर घेऊन यादवांसहवर्तमान द्वारकेस निघून गेला.||३६|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १२-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामकमहापुराणातील परीक्षिती-जन्मादिकथनरूप हा प्रथम(१)स्कंधातील बारावा(१२)अध्याय छत्तीस(३६) स्लोकांनीयुक्त असलेला समाप्त झाला.||१२--३६|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------१३-----आता या तेराव्या(१३)अध्यायात परिक्षितीला राज्याभिषेक करून,धर्मराजाचे महाप्रस्थान वर्णन करण्यासाठी,विदुराच्या उपदेशाने तपोवनांत धृतराष्ट्राचे प्रस्थान वर्णन केले आहे.||१३|| | |१३---[विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | विदुरस्तीर्थयात्रायां मैत्रेयादात्मनो गतिम् | ज्ञात्वागाद्धास्तिनपुरं तयावाप्तविवित्सित: ||१|| भावार्थः----सुत म्हणाला---हे शौनका,तीर्थयात्रेस गेलेल्या विदुराने मैत्रेय ऋषिपासून आपली गती हरीच आहे असे जाणून,तिच्या योगाने त्याची जिज्ञासा पूर्ण झाल्यावर तो पुनः हस्तिनापुरास आला.ज्याप्रमाणे विदुराने मैत्रेयऋषीपासून आपलीगती हरीच आहे,असे जाणून सत्संग करून ज्ञान प्राप्त करून घेतले,त्याचप्रमाणे आपण संत—महात्मा यांचा सत्संग करून आपली मोक्षाची जीज्ञासा पूर्ण करून घेणे या मानवी देहाचे जे सार्थक आहे,ते आपण पूर्ण करावे.||१|| अर्थः---विदुराने मैत्रयाजवळ कर्मयोगादिकांच्या ज्ञानाविषयी जितके प्रश्न केले होते त्यापैकी तीन-च्यार प्रश्नांच्या अर्थज्ञानानेच गोविंदाविषयी एकनिष्ठ भक्ति प्राप्त झालेला तो विदुर,इतर प्रश्नांच्या अर्थज्ञानाविषयी निरपेक्ष झाला.||२|| भावार्थः---तो बांधवरुपी आला असे पाहून,भिमादी बंधूसहवर्तमान धर्मराजा,धृतराष्ट्र युयुत्सु,संजय,कृपाचार्य,कुंती---||३|| भावार्थः---हे ब्रहमन शौनका,गांधारी द्रौपदी,सुभद्रा,उत्तरा आणि द्रोणाचार्यांची स्त्री कृपी,आणि दुसऱ्याही पांडुराजाच्या कुलांतील स्त्रिया,सर्व ज्ञाती व पुत्रांसहित इतर स्त्रिया हे सर्वही हे हर्षाने,मुर्छादी कारणांनी नष्ट झालेला प्राण,पुनः पूर्वस्थितीवर आला असतां,निश्चेष्ट झालेले हस्तपादादिक अवयव कसे उठतात त्याप्रमाणे,उठून त्या विदुरास सामोरे गेले.नंतर ते पांडव त्या विदुराला,आलिंगन व नमस्कारपूर्वक यथोचित विधीने भेटून---------------||४-५|| भावार्थः---विरह झाल्यामुळे उत्कंठतेने व्याकूळ झालेल्या त्यांनी,नेत्रांतून प्रेमाश्रूंचा प्रवाह सोडीला.नंतर दिलेले आसन विदुराने स्वीकारल्यावर धर्मराजाने त्याची पूजा केली.धर्म-राजाने विदुरांची स्व:त पूजा केली.त्याचप्रमाने आपण संत—महात्मा—व वरिष्ठ-मंडळी यांची सन्मान—पूजा करावी.असा आपला स्वधर्म आहे.||६|| भावार्थः---नंतर तो विदुर भोजनोत्तर स्थिरचित्त होऊन सुखाने आसनावरून बसला असतां,धर्मराजा प्रेमाने नम्र होऊन धृतराष्ट्रादिक सर्व ऐकत असतां,भाषण करूं लागला कि,||७|| भावार्थः---युधिष्ठीर म्हणाला-------हे व्यासनंदना,जसे पक्षी आपल्या बालकांस पक्षांच्या छायेने वाढवितात त्याप्रमाणे आपण पक्षपातरूप छायेने वाढविलेल्या आम्हांस आतां स्मरत आहां काय?कारण,विष व लाक्षागृहांतील अग्नी इत्यादी अनेक विपत्तीची समुदायांतून मातेसह वर्तमान आम्हांस आपण सोडविले आहे.कोणीही अचानक विपत्तीत सापडलेला असेल तर आपण त्यांना त्यांच्या विपत्तीतून सुटका करून त्यांना सुखी करने हाच स्व-धर्म—माणुसकी-धर्म--सत्कर्म आहे.||८|| भावार्थः---आपण भूमंडळावर संचार करीत असतां कोणत्या वृत्तीने देह निर्वाह केला,आणि या भूतलावरील तीर्थे व मुख्य क्षेत्रे आपण कोणकोणती सेवन केली.आपणही भूतलावरील तीर्थेक्षेत्रे—पवित्र नद्दा व क्षेत्रे—देवांची पवित्रे मंदिरे सेवन करावी. पवित्र नद्दात निष्कामतेने स्नान करावे.पवित्र मंदिरातील मूर्तीचे निष्कमातेने दर्शन घ्यावे.यामुळे आपले अंत:कारण शुद्ध होईल किंवा पुण्य होईल.||९|| भावार्थः---हे प्रभो,आपणासारखे भगवद्भक्त,स्वतः तीर्थस्वरूपी असून आपल्या चित्तांत असलेल्या गदाधारी श्रीकृष्णाच्या योगाने,सर्वतीर्थासही,पातकीजणांच्या संपर्काने लागलेल्या पापांपासून पवित्र करितात.भगवतभक्तांनी जर पवित्र तीर्थात स्नान केले तर सर्व तीर्थे व पातकी लोक पवित्र होतात.म्हणून संत—महात्मे व आपण सर्व तीर्थांत स्नान करावे.||१०|| भावार्थः---हे तात,आमचे बांधव परममित्र असून ज्यांची कृष्णच देवता आहे असे ते यादव,आपल्या नगरीत सुखाने राहत आहेत ना ? ते कोठे आपल्या पाहण्यांत किंवा ऐकण्यात आले होते काय ? आपण प्रवासात असल्यानंतर ऐकामेकांसी भेताल्यंतर एकमेकांची सुखाविषयी विचार-पूस करावी.||११|| भावार्थः---धर्मराजाने असा प्रश्न केला असतां विदुराने,तीर्थयात्रेमध्ये जसा आपण अनुभव घेतला होता त्याप्रमाणे,एक यदुकुलाच्या नाशावांचून बाकी सर्व,अनुक्रमाने धर्मराजाला वर्णन केले.आपण इतरांविषयी सुखसमाधान सांगावे,पण दु:खासंबंधी कांहीही सांगू नये.||१२|| भावार्थः---यादवकुलाच्या नाशाचे वर्णन न करण्याचे कारण इतकेच कि,आपोआप प्राप्त झालेले इष्टजनवियोग दुःख,मनुष्यास सहन करण्यास अशक्य असते,म्हणून दुःखित होणाऱ्या त्या पांडवास पाहण्याविषयी असमर्थ अशा त्या कृपाळू विदुराने,ते यादवांच्या नाशाचे वर्तमानमात्र त्यांस सांगितले नाही.||१३|| अर्थः---पुढे धर्मादिकांनी देवासारखा सत्कार केलेला तो विदुर,ज्येष्ठबंधू धृतराष्ट्रास आत्मानात्मविचाराचा उपदेश व सर्वांस हर्ष उत्पन्न करीत असतां,काही कालपर्यंत ह्स्तीनापुरांत सुखाने राहिला.आपण कोणाकडे राहण्यास गेले असता अधिकारानुसार सत्संग करावा.||१४|| | अबिभ्रदर्यमादण्डं यथावदघकारिषु | यावद्दधार शूद्रत्वं शापाद्वर्षशतं यम: ||१५|| भावार्थः---आतां विदुर हा शुद्र असून त्याने ज्ञानोपदेश कसा केला,इत्यादी शंकेचे उत्तर सांगतात की,यमधर्मराज मांडव्या ऋषींच्या शुद्र्त्व धारण करून जोपर्यंत शंभरवर्षे भूमीवर विदुरदेहाने राहिला होता,तोपर्यंत यमलोकी पातकीजनांस यथायोग्य दंड करण्याचा अधिकार आर्यमानामक पितराने चलविला होता.||१५|| भावार्थः---राज्य प्राप्त झालेला धर्मराजा,वंशधारक अशा आपल्या परीक्षितीनामक नातवास पाहून,इंद्रादी लोकपालांसारख्या पराक्रमी भिमादि बंधूसहवर्तमान अतिशयित राज्य संपत्तीने हर्ष पावला.||१६|| भावार्थः---याप्रमाणे गृहसौख्यांत आसक्त झालेल्या व विषयसुख संबंधी व्यापाराने परमेश्वरास विसरलेल्या त्या धृतराष्ट्रदिकांचा,अतिसूक्ष्मगतीमुळे समजण्यांत न येणारा परम दुस्तर असा आयुष्याचा बहुत काळ निघून गेला.||१७|| अर्थः---एकेसमयी ते कालचक्र मनांत आणून,ध्रुतराष्ट्रास विदुर म्हणाला कि,हे राजन धृतराष्ट्रा,हे मोठे भय प्राप्त झाले आहे पहा!तूं आतां येथून शीघ्र निघून जा.||१८|| भावार्थः---हे प्रभो,या लोकी ज्याचा परिहार,कदापि कोणत्याही उपायाने होणार नाही,असा हा भगवान काळ,अनेकप्रकारचे परिहार योजणाऱ्या आम्हां सर्वासही आतां प्राप्त झाला आहे.||१९|| | येन चैवाभिपन्नोऽयं प्रानै: प्रियतमैरपी | जन: सद्यो वियुज्येत किमुतान्यैर्धनादिभि: ||२०|| भावार्थः----ज्या कलाने ग्रस्त झाला असतां हा देही,अतिप्रिय अशा पंचप्राणांचीही तत्काळ वियोग पावतो,मग दुसऱ्या धनपुत्रादिकांशी वियोग पावेल यांत आश्चर्य काय?||२०|| भावार्थः---आता तुला घरांत राहणे हे अतिदैन्य आहे.कारण,हे धृतराष्ट्रा,तुझे पितर,बंधू,मित्र व पुत्र हे सर्व मरून गेले,वयही निघून गेले.देहही जरेने ग्रस्त झाला आहे.अद्यापि तूं दुसऱ्याच्या घराचा आश्रय करून राहिला आहेस.आपण कमीत-कमी वयाच्या पन्नास वर्षानंतर तरी ग्राहस्थाश्राचा त्याग करून घरी न राहता तप किंवा श्रवण करण्यास एखाद्या साधू—संत—महात्मा यांच्या आश्रमात राहून सत्संग करावयास पाहिजे.पुढील आयुष्यांची--भविष्याची कांही तरी सामुग्री जमा करावयास पाहिजे.आपल्या वर्तमान शरीरास मृत्यू आला म्हणजे आपले जीवन संपत नसून,आपणास दुसरे अनेक शरीरे मिळून आपला जीवन प्रवाह चालूच असतो.म्हणून पुढील जीवनासाठी,सुखासामाधानांसाठी आपल्या सोबत पुण्याईची सामुग्री असावयास पाहिजे.आपणास ती सामुग्री हि सत्कर्मांने व संस्कार—रुपाने बरोबर नेता येते.||२१|| भावार्थः---प्राणीमात्रांस वांचण्याची आशा मोठी असते हे मोठे आश्चर्य आहे.अहाहा ज्या भीमाने तुझे सर्व पुत्र मारले त्यांनी दिलेले अन्न तूं केवळ आशेने,गृहरक्षक श्वानासारखे भक्षण करितोस.सर्वप्राणीमात्रास वांचण्याची अपेक्षा मोठी असते,१--कारण जीव हा सत्-आहे म्हणजे तीनही काळात असणारा आहे.तो परमात्म्याचा आहे.परमात्मा हा तीनही काळात असतो.२--जीव हा ज्ञानस्वरूप आहे,म्हणून त्यास कांहीही कळून घ्यावे असे वाटत असते.३—जीव आनंदस्वरूप आहे,म्हणून त्यास आनंद आवडतो व दु:ख आवडत नाही.परमात्मा हा सत्-स्वरूप,चित्त-स्वरूप व आनंदस्वरूप आहे,म्हणून जीव त्याचाच—परमात्म्याचाच असल्यामुळे सर्व जीवांनाही सत्-स्वरूप—चित्त-स्वरूप—आनंद-स्वरूपच आवडते.म्हणून सर्व जीव वांचण्याचीच आशा असते.जीवांच्या ठिकाणी अज्ञान नावाचा दोष असल्यामुळे त्यास असे कळत नाही.म्हणून जीवांनी सत्संग करून अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून घ्यावावयास पाहिजे.संत—महात्मा यांनी सत्संग करून अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा अनुभव घेतलेला असतो.त्यामुळे त्यांचे जन्म—मरण निवृत्त होऊन परमानंदस्वरूप झालेले असतात.||२२|| भावार्थः---अरे,तूं ज्यांस दग्ध करण्यासाठी लाक्षागृहास अग्नी लावला,विष दिले,ज्यांच्या द्रौपदीनामक स्त्रीचा भरसभेमध्ये अपमान केला,राज्य व धन हरण केले,त्यांनी दिलेल्या अन्नस्त्रीदिकांच्या योगाने प्राणरक्षण करून आतां तुझे काय हित होणार आहे?म्हणून आपण कोणाचेच अहित करू नये.कोणाचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नये.कोणाचेही धन हरण करू नये.कारण करावे तसे भरावे असा नियम आहे.कांहींना या जन्मात भोग मिळतो तर काहींना अन्य जन्मात भोग मिळत असतो.आपण इतरांचे चांगले—सुखाचे केले तर आपले चांगले—सुखाचे होते व आपण इतरांचे वांगले—दु:ख केले तर आपले वांगले—दु:ख होत असते.म्हणून इतरांना दु:ख न देता सुखाच द्दावे.आपले सुख किंवा दु:ख आपल्याच कार्यावर अवलंबून आहे,तर इतरांच्या कार्यावर अवलंबून नाही,असे हे निश्चितच आहे.आपण दुसऱ्यांना दु:ख देऊन जर त्यांच्यावर जीवन जगलोत तर ते जीवन कुत्र्यासारखे आहे,तर मानावांसारखे मुळीच नाही.म्हणून मानवांनी मानावांसारखे जीवन जगावे.मानंवासारखे जीवन न जगले तर त्यास कुत्र्यासारखे जीवन म्हणावे.असा आपण विवेक करून जीवन जगावे.||२३|| भावार्थः---याप्रमाणे दैन्याने—लाजीरवाणीने—अपमानांने वांचण्याची इच्छा करणाऱ्याही तुझा,जरेने जीर्ण झालेला हा देह,तुला इच्छा नसतांही,जीर्ण झालेल्या वस्त्रांसारखा नाश पावेल.तुझा देह हा ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र फाटते व फाटल्यानंतर टाकून द्दावे लागते त्याचप्रमाणे तुझा हा देह जीर्ण होत आहे,म्हणून आता तरी मृत्यू येण्यापुर्वीच परमार्थ करावा.हा उपदेश निमित्त धृतराष्ट्राचे करून आपणास केलेला आहे,म्हणून आपण सावध व्हावे कि धृतराष्ट्राने सावध व्हावे ?धृतराष्ट्र आज आहे कि,आज आपण आहोत ?धृतराष्ट्र आज नाही,तर आज आपण आहोत,म्हणून आज आपण सावध होऊन परमार्थ करावा.असा विवेक करून आपणांस व्यास मुनींनी उपदेश केलेला आहे असे आपण समजावे व आपणच परमार्थ करावा. आपण स्वधार्मांचे पालन करून जीवन जगावे.यातच आपले हित आहे.यास्तव आतां तरी तूं म्हणजे आपण धैर्यवान व्हावे,व स्वधर्म करून परमार्थ करावा.त्यातच आपले परमहित आहे.||२४|| | गतस्वार्थमिमं देहं विरक्तो मुक्तबन्धन: | अविज्ञातगतिर्जह्यात् स वै धीर उदारह्रत: ||२५|| भावार्थः---जो सर्व विषयांचे ठिकाणी विरक्त व अभिमानरहित होऊन,आपली गती कोणासही न समजूं देतां,निरर्थक झालेल्या आपल्या देहाचा त्याग करितो त्यासच धैर्यवान असे म्हणतात.म्हणून आपण विषयांच्या ठिकाणी वैराग्य—त्याग करावा. कोणत्याही कार्यांच्या ठीकांनी अभिमान धारण न करता कार्य करून भगवंतांस निष्काम बुद्धीने अर्पण करावे.असा जो कार्य करतो त्यास “धैर्यवान” असे म्हणतात.म्हणून आपण असे धैर्यवान व्हावे.यातच आपले परम हित आहे.||२५|| | यः स्वकात्परतो वेह जातनिर्वेद आत्मवान् | ह्रदि कृत्वा हरिं गेहात्प्रव्रजेत्स नरोत्तम: ||२६|| भावार्थः---जो पुरुष,मृत्युकाल प्राप्त होण्याच्या पूर्वी,स्वतःच्या विचाराने किंवा दुसऱ्याच्या उपदेशाने या लोकी वैराग्ययुक्त व आत्मज्ञान संपन्न होऊन ह्रदयामध्ये श्रीहरीचे चिंतन करीत असतां,सर्वसंगपरित्यागपूर्वक संन्यासी होऊन गृहांतून निघून जातो तोच पुरुषांमध्ये श्रेष्ठ होय.आपण आपणांस मृत्युकाळ येण्यापुर्वीच संत—महात्मा यांचा सत्संग करून वैराग्ययुक्त—विषयांचा भोगी न होता त्यागी होऊन आत्म-ज्ञान संपन्न होऊन अंत:करणात विषयांचे चिंतन न करता श्रीहरीचे—परमात्म्याचेच चिंतन करावे.आपण यासाठी सर्वसंगपरित्याग करून संन्याशी होऊन ग्रहादिकांचा व देहसंबंधीचा त्याग करून जेथे वेदांताचे चिंतन आहे,त्याठिकाणी चिंतन करीत प्रारब्ध--काळ घालवावा.यातच आपले महासार्थक आहे.||२६|| भावार्थः---यास्तव,तूं आतां स्वकीय जनांस न समजता उतर दिशेस गमन करावेस.कारण,येथून पुढे येणारा काल,बहुतकरून पुरुषांच्या धैर्य,दया इत्यादी गुणांचा आकर्षण करणारा होईल.म्हणून आपण देहसंबंधित न गुंतता जेथे सात्विकता आहे—वेदांतांचे चिंतन आहे,त्याठिकाणी वास्तव्य करावे.आपण हे असे धैर्य व दयाभाव धारण करून जीवन व्यतीत करावे.||२७|| भावार्थः---याप्रमाणे कनिष्ठबंधू विदुराने बोध केला असतां,अजमिढ राजाच्या वंशांत झालेला,आणि बुद्धीनेच जाणणारा (जन्मांध)तो धृतराष्ट्र राजा,आपल्या स्त्रीधनादिकेचे ठिकाणी अतिदृढ असलेले स्नेहपाश तोडून विदुरानेच दर्शविला आहे मार्ग ज्यास असा होऊन म्हणजे विदुरासहवर्तमान ह्स्तीपुरांतून निघाला.आपणही याप्रमाणे उपदेशांवर विवेक करून संत—महात्मा यांच्यासह ते जेथे जातील,त्यानुसार निर्णय घेऊन,स्नेहपाश तोडून सत्संगात अन्य सात्विक ठिकाणी जावे.||२८|| अर्थः—तेव्हा जसा युद्धामध्ये झालेला आयुधांचा तीव्र प्रहार शुरांसमात्र आनंददायक होतो त्याप्रमाणे,निरभिमानी पुरुषांस मात्र आनंद देणारा जो हिमालय पर्वत त्यावर जात असणाऱ्या आपल्या पतीच्या (धृराष्ट्रांच्या)मागोमाग सुशील आणि पतिव्रता अशी ती सुबलराजाची कन्या गांधीरीही निघून गेली.हा विचार जसा गांधारीचा पती जसा धृतराष्ट्र यांना पटला तसाच धृतराष्ट्र पत्नि गांधारीसही पटला व ती त्याच्यासोबतच सर्वसंगपरित्याग करून सत्संग करण्याकरिता सोबतच गेली.त्याचप्रमाणे आपणही धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा आदर्ष घेऊन वेदांतांचे चिंतन करण्याकरिता सर्वसंगपरित्याग करून सात्विक आश्रमात सत्संग करण्याकरिताच जावे.असेच जीवनाचे महासार्थक करून घ्यावे.विशेषत: स्त्रियांनी आपल्या पतीसोबत सर्वसंगपरित्याग करून सत्संग करावा व महासार्थक करून घ्यावे.||२९|| भावर्थः---इकडे धर्मराजाने,सूर्योदयाचे वेळी संध्यावंदन व नित्यहोम करून,तीळ,गाई,भूमी व सुवर्ण हि दाने ब्रह्मणास देऊन नमस्कार केला आणि वडिलांस वंदन करण्यासाठी अंतर्गृहात प्रविष्ट झाला.आपणही दररोज नित्य संध्यावंदन करावी.कांही आपल्या अधिकारानुसार सत्पात्रास दररोज दानधर्म करावा.तसेच आपल्या मृतवाडवडीलांना वंदन करावे.तो तेथे विदुर,धृतराष्ट्र,व गांधारी यापैकी कोणीच त्याच्या—धर्मराजाच्या दृष्टीस पडले नाही.||३०|| तेव्हा उद्विग्नचित्त म्हणजे दु:खित चित्त झालेल्या धर्मराजाने त्या गृहांत बसलेल्या संजयास प्रश्न केला की,हे संजया,दोन्ही नेत्रांनी रहित असून अतिवृद्ध असा आमचा पितृव्य (धृतराष्ट्र)कोठे आहे?बाहेर जाण्यास असमर्थ असलेले आमचे पीता विदुर,धृतराष्ट्र व गांधारी का दिसत नाहीत ? असाच प्रश्न आपण जेव्हा आपल्या गृहातील कांही व्यक्ती न दिसल्यास आमचे देहसंबंधी—मित्रगण—आत्मीयतेचे कोठे आहेत असा प्रश्न इतरांना करावा.याप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी.हे कुटुंब प्रमुखाचे—आपले कर्तव्य आहे.||३१|| भावार्थः---तशीच सर्वपुत्रांच्या मरणाने बहुदुःखित झालेली मातेसारखी गांधारी कोठे आहे?किंवा आमचे इष्टचिंतन करणारा तो चुलता (धृतराष्ट्र)पुत्रशोकाने खिन्न असून मजकडून मुर्खत्वाने कांही अपराध घडल्यामुळे मनांत शंकित होऊन आपल्या भार्येसह कोणीकडे गेला?अथवा दुःखित असलेला प्राणत्याग करण्यासाठी गंगेत जाऊन पडला कि काय?आपल्या संबंधितांना दोष न देता तो दोष आपल्याकडे घ्यावा व त्यांना शोधण्याचा प्रयत्न करावा.||३२|| भावार्थः---आमचा पिता पांडुराजा मरण पावला असतां,ज्या धृतराष्ट्र-विदुरांनी,कुंतीसह आम्हा स्नेही बालकांचे अनेक दुःखातून रक्षण केले,ते आज तेथून कोठे गेले?आपले जर कोणी दु:खद प्रसंगी आपले दु:ख घालवून सुख दिले असले तर त्यांच्याबद्दल आपल्या अंत:करणात आत्मीयता असावयास पाहिजे.असे जे आत्मीयते आहेत,ते जर आपणास दिसले नाहीत तर त्यांचे शोध घेणे आपला स्वधर्म असतो.किंवा त्यांच्यावर कांही कारणास्तव दु:खद प्रसंग आला असेल तर आपण त्यांचे दु:ख निवारण करून त्यांना सुख देणे हे आपले कर्तव्य असते--स्वधर्म असतो.||३३|| भावार्थः---सुत म्हणाला----ऋषीहो,त्या काली तो संजय,कृपा व स्नेह यांनी व्याप्त झाल्यामुळे मनांत फार दुःखित झाला होता व आपल्या प्रभूचे (धृतराष्ट्राचे)दर्शन न झाल्यामुळे तो त्याच्या विरहाने अति-खीन्न झाला होता,म्हणून त्याने धर्मराजास काहीच दिले नाही.अशी दु:खद घटना ऐकून संजय अति दु:खिद झाला,त्यामुळे त्याची वाचा कुंठीत झाली,म्हणून धर्मराजास कांहीच उत्तर देऊ शकला नाही.संजय व धृतराष्ट्र यांचे संबंध स्वामी—मालक व सेवकाचे—नौकाराचे होते.आपण कोणाचे स्वामी—मालक किंवा सेवक—नौकर असा संबंध असेल तर तो संबंध आत्मीयतेचा—जिव्हाळ्याचा—प्रेमाचा असावा.त्यामुळे असा संबंध सुख—दु:खात मदत करीत असतो.||३४|| भावार्थः---नंतर काही वेळाने तो संजय,आपल्या हातांनी दुःखाश्रू पुसून,बुद्धीने मनास धैर्य आणून,धृतराष्ट्राच्या पायांचे स्मरण करीत धर्मराजस म्हणाला की--------आपणही आपल्या आत्मियातीचे स्वामी—मालक असतील तर त्यांचे दु:ख पाहून—ऐकून इतर जे आत्मियातीचे त्यांच्याजवळ दु:ख व्यक्त करावयास पाहिजे.||३५|| भावार्थः---हे स्वकुलानंदायका महाबाहो धर्म,विदुर व धृतराष्ट्र या तुमच्या पितृव्यांच्या व गांधारीच्या मनाचा निश्चय काय झाला आहे,हे मी जाणत नाही,ते महात्मे मला न कळविता कोठेतरी निधून गेले आहेत.आपणही गृहास्थाश्रामाचा किंवा कोणत्याही आश्रमाचा त्याग करून परमार्थ करण्यासाठी कोणासही न सांगता निघून जावे,कारण बहुतेक परमार्थ करण्यास देहसंबंधीचा प्रतिबंध येताच असतो.||३६|| भावार्थः---याप्रमाणे भाषण करून तो संजय शोक करीत असतां,तेथे अकस्मात तुंबूरुसहवर्तमान भगवान नारदऋषी प्राप्त झाला,त्याला भिमादी कनिष्ठ बंधूसह वर्तमान धर्मराजाने प्रत्युत्थानपूर्वक नमस्कार करून शोकाच्या वेगामुळे त्याचे पूजन न करिता पूजा केल्यासारखा सत्कार करून प्रश्न केला की--------------आपल्याकडे संत—महात्म्यांचे आगमन झाले असता आपण त्यांचा आदरसत्कार करून पुजन करावे,पण आपण जर दु:खात असल्यानंतर दु:खाच्या वेगामुळे त्यांची पूजा आदर-सत्कार न केला तर दोष लागत नाही.आपल्या दु:खाचा वेग कमी झाल्यानंतर कांही वेळाने आदर-सत्कार केला तरी जमू शकते,कारण दु:खामुळे असे होऊ शकते.||३७|| भावार्थः---युधिष्ठीर म्हणाला----हे भगवन नारदमुने,विदुर व धृतराष्ट्र हे माझे पितृत्व्य येथून कोठे गेले?तशीच पुत्र मरणाच्या शोकाने पिडीत झालेली महातपस्विनी माता गांधारी कोठे गेली?ते मी जाणत नाही.आपण तर अपार शोकसमुद्रांत बुडणाऱ्या जनांस त्याचे परतीर दाखविणारे नावाड्यासारखे आहां,यास्तव कृपा करून त्यांचा शोध मला सांगावा.आपण संत—महात्मा यांच्याकडे दु:ख व्यक्त करून ते दु:ख निवारण करण्याचा उपाय—साधन विचारावे.||३८|| भावार्थः---असा प्रश्न केल्यावर मुनिश्रेष्ठ भगवान नारद म्हणाला कि,हे राजा,हे सर्व जग,परमेश्वराच्या स्वाधीन आहे यास्तव धृतराष्ट्रादिकांचा काय!पण तूं कोणाचाच शोक करूं नकोस.आपण इतर जीव काय करतात याचा विचार न करता,आपला स्वधर्म काय आहे?असा विवेक—विचार करून स्वधर्मांचे पालन करावे,कारण प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कार्मांनुसार जीवन व्यतीत करीत असतो.कोणाचाच विचार करू नये.||३९|| भावार्थः---हे राजा,इंद्रादी लोकपालांसह वर्तमान चतुर्दश लोक,ज्या ईश्वराची पूजा करितात तोच ईश्वर,सर्व प्राणीमात्रांचा परस्परे संयोग किंवा वियोग करीत असतो.सर्वांचा सर्वज्ञ असलेला ईश्वर सर्वांच्या अंत:करणात निवास करीत असल्यामुळे ज्याच्या—त्याच्या प्रारब्धानुसार संयोग किंवा वियोग करीत असतो.आपण त्या प्रारब्धमांचे अल्पज्ञ असल्यामुळे जाणू शकत नाहीत,म्हणून दु:खी होतोत.इतरांच्या प्रारब्ध कर्मांस आपण कारण नसतोत.||४०|| भावार्थः---जसे नाकामध्ये वेसण घातलेले व एका दावणीचे ठिकाणी आपापल्या निरनिराळ्या दांव्यांनी बांधलेले हे सर्व लोक,आपापल्या धर्मानुसार परमेश्वरास पूजा समर्पण करितात||४१|| | यथा क्रीडोपस्कराणां संयोगविगमाविह | इच्छया क्रीडितु: स्यातां यथैवशेच्छया नृणाम् ||४२|| भावार्थः—खेळण्याची साधने जी बुद्धीबळादिक त्यांचे संयोग किंवा वियोग जसे खेळणाऱ्याच्या इच्छेने होतात त्याप्रमाने ईश्वराच्या इच्छेने मनुष्यांचे संयोग किंवा वियोग होत असतात.ईश्वराच्या इच्छेने म्हणजे ज्याच्या—त्याच्या प्रराब्धकर्मांनुसार संयोग किंवा वियोग होत असतो.||४२|| | यन्मन्यसे ध्रुवं लोकमध्रुवं वा न चोभयम् | सर्वथा न हि शोच्यास्ते स्नेहादन्यत्र मोहजात् ||४३|| भावार्थः---हे धर्मा,जर तूं या सर्व लोकास जीव रूपाने नित्य मानीत असशील,देहरुपाने अनित्य मानीत अससील,अतर्क्य शुद्ध ब्रहमरुपाने नित्य किंवा अनित्यहि नाहीत असे मानीत असशील आणि जीव चेतन व देह जड असल्यामुळे नित्य व अनित्यही आहे असे जरी मानीत असशील तरी ह्या चारही पक्षांनी पाहूं गेले असता,केवळ अज्ञानापासून झालेल्या स्नेहाखेरीज धृतराष्ट्रादिक,शोक करण्यास योग्य नाहीत.||४३|| भावार्थः---तस्मात हे राजा,वनामध्ये गेलेले दिन व अनाथ असे ते धृतराष्ट्रादिक माझ्यावांचून कसे वाचतील अशी अज्ञानाने केलेली आपल्या मनाची व्याकुळता तूं अगदी सोडून दे.जीव हा कोणाचे रक्षण करू शकत नाही.जो-तो आपापल्या प्रारब्ध कार्मांनुसार संयोगास किंवा वियोगास कारण होत असतो.||४४|| | कालकर्मगुणाधीनो देहोऽयं पाञ्चभौतिक: | कथमन्यांस्तु गोपायेत्सर्पग्रस्तो यथा परम् ||४५|| भावार्थः---कारण,स्त्त्वादी गुणांचा क्षोभ करणारा काळ,जन्मादिकंस निमित्त असे शुभाशुभ कर्म आणि यांच्या स्वाधीन असणारा हा पंचमहाभूतात्मक जड देह,जसा अजगरसर्पाने गिळलेला पुरुष दुसऱ्याचे रक्षण करीत नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचे रक्षण कसे करील ? करणाराच नाही.काळ ह गुणांचा क्षोभ करीत असतो.जीवांच्या जन्मादिकांस कारण शुभ—अशुभ कर्मे असतात.त्या शुभ—अशुभ कर्मांमुळे जीवांस पंचाम्हाभूतांचा जड देह मिळत असतो.ज्याप्रमाणे अजगराने गिळलेला पुरुष स्वत:चे किंवा इतरांचे रक्षण करू शकत नाही,त्याचप्रमाणे अज्ञानी पुरुष दुसऱ्यांचे रक्षण करू शकत नाही.ज्याचे—त्याचेच कर्म ज्याचे-त्याचेच रक्षण करू शकते,इतर करु शकत नाहीत.||४५|| | अहस्तानि सहस्तानाम पदानि चतुष्पदाम् | फल्गूनी तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||४६|| भावार्थः---हस्तरहित पश्वादिक प्राणी,आहेत,ते हस्तयुक्त मनुष्यादिकांचे जीवन होतात तशीच चरणरहित जी तृणादिक ती गाईवगैरे चतुष्पाद पशुंचे जीवन होतात.त्यांतही लहान प्राणी (कृमिकीटादिक)असतात ते मोठ्या पक्ष्यादिकांचे जीवन होतात.मिळून जीवच जीवांच्या उपजीविकेस कारण आहेत.||४६|| | तदिदं भगवान् राजन्नेक आत्माssत्मनां स्वदृक् | अन्तरोsनन्तरो भाति पश्य तं माययोरुधा ||४७|| भावार्थः---हे राजा,हस्तपादादिकांनी रहित व सहित असे जे चराचर जग,स्वप्रकाश भगवानच आहे म्हणजे सर्व जीव किंवा जड म्हणजेच चराचर भगवंतंच आहे.जसे दागिना हा सर्व सोनच आहे,त्याचप्रमाणे सर्व जग—जड-जीव भगवंतंच आहे.जीवाच्या ठींनी अज्ञान असल्यामुळे असे काळात नाही,तर संत—महात्मा यांच्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळे सर्व जग भगवंतंच आहे असा त्यांचा अनुभव असतो.म्हणून जीवांनी सत्संग करून अज्ञान निवृत्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे,म्हणजे आपणास सर्व जग देव—ब्रह्म—परमात्मा आहे असा अनुभव येईल.त्यामुळे आपले ज्ञानी--जीवाचे जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरूप होईल.जसे सूर्य एक असून सूर्याची प्रतिबिंब पाणी या उपाधीमुळे अनेक आहेत,त्याचप्रमाणे तो—परमात्मा एकच असून सर्व जीवांची उपाधी--अंत:करणे अनेक असल्यामुळे अनेकरुपाणे भासू लागतो.तोच—परमात्माच सर्वांच्या आंत अंतर्यामी भोक्त्याच्या स्वरूपाने व बाहेर भोग्य विषयांच्या रूपाने तोच परमात्मा भासतो.याप्रमाणे मायेच्या योगाने एक असून नानाप्रकारे भासणाऱ्या त्या प्रभूलाच तूं अवलोकन कर.||४७|| भावार्थः---हे महाराजा,तो हा सर्व प्राणीमात्रांचा पोषक व कालरूपी षडगुणैश्वर्यसंपन्न भगवान श्रीकृष्ण,सांप्रतकाली या भूमीवर,दुष्टांच्या नाशाकरिता अवतीर्ण झाला आहे.||४८|| भावार्थः---त्याने—श्रीकृष्णाने बहुतकरून देवांचे—ब्रह्मा-इंद्रादिंचे कार्य केले आहे.यादवकुळक्षयरूप कांही कार्य अवशेष राहिले आहे तेही करण्याचा संधी तो पाहत आहे.ते झाल्यावर तो—श्रीकृष्ण नीजधामास जाईल.यास्तव जोपर्यंत ईश्वर भूलोकी आहे तो पर्यंतच येथे राहण्याचा विचार करावा.आपणही जोपर्यंत मृत्युलोकांत श्रीकृष्ण आहे,तोपर्यंत मृत्यू लोकांत राहावे व श्रीकृष्ण निजधामास—वैकुंठास गेल्यानंतर पानही मृत्यू-लोकांत राहू नये,कारण श्रीकृष्ण वैकुंठास गेल्यानंतर कलियुगास सुरवात होणार आहे.कलियुगाची सुरवात झाल्यानंतर अधर्माची—परधर्मांची वाढ होणार आहे.पराधार्मांची वाढ झाल्यानंतर दु:खांची वाढ होणार आहे.||४९|| भावार्थ:---हे धर्मराज,धृतराष्ट्र,आपली स्त्री गांधारी व भ्रता विदुर यांच्यासह हिमालयाच्या दक्षिणेकडे ऋषीच्या आश्रमस्थानी गेले आहेत.अखेर-शेवटी नारदा-मुनींनी धर्मराजास सांगितले की,ते सर्व ताप—सत्संग करण्याकरिता हिमालयात ऋषीच्या आश्रमात गेलेले आहेत.आपण त्यांची काळजी न करता,प्रेजेंची काळजी घ्यावी.आपणही आपल्याच स्वधार्मांचे पालन करीत जीवन जगावे.त्यातच आपण समाधानी आहोत.||५०|| भावार्थ:----“ज्या स्थळी,प्रसिध्द भागीरथीने,सात ऋषींच्या संतोषार्थ,सात प्रवाहांनी आपले सात विभाग करून घेतले आहेत म्हणून त्या तीर्थास “सप्तस्त्रोत” असे म्हणतात.“म्हणून आपण अंत:कारण शुद्ध करण्यासाठी भागीरथीच्या “सप्तस्त्रोत” स्नान करण्यासाठी जावे.||५१|| भावार्थ:---त्या तीर्थास तो धृतराष्ट्र,तिन्ही काळीस्नान करून आणि विधीपूर्वक अग्नीमध्ये हवन करून केवळ उदकाचाच आहार करणारा,त्याचप्रमाणे आपणही तीनही काळात स्नान करून आणि विधीपूर्वक अग्नीमध्ये शांतचित्ताने हवन करावे. ज्याच्य पुत्रषणा,दारेषणा व वित्तेषणा गेल्या आहेत असा होऊन राहिला आहे.आपल्याही पुत्रषणा—पुत्रांची आसक्ती,दारेषणा --दारेची—पत्निची आसक्ती व वित्तेषणा—धनाची आसक्ती—म्हणजे पुत्र असावा वाटणे,पत्नि असावी वाटणे,वित्तेषणा—धन असावे वाटणे या तीनही इच्छेचा त्याग अंत:करणपूर्वक करावा म्हणजेच सर्व प्रांपंचाची उपरती व्हावी.असे झाल्यानंतर चौथा मोक्षरुपी पुरुषार्थ अनुभवयास येऊन जन्म—मरण निवृत्त होऊन परामानंदाचीच प्राप्ती होत असते.||५२|| अर्थ:---ज्याने आसनाचा व प्राणाचा जय करून त्वचा,चक्षु,श्रोत्र,जिव्हा घ्राण आणि मन हि सहा इंद्रिये अंतर्मुख केलेली आहेत.असा आपण आसनाचा व प्राणाचा जय करावा--पद्मा--आसन व प्राणाचा जय—रेचक—प्राणास आत घेणे,कुंभक—घेतलेला प्राण आताच रोखून धरणे व पूरक—घेतलेला प्राण बाहेर सोडणे यासच प्राणाचा जय असे म्हणतात.यासच आसनाचा व प्राणाचा जय असे म्हणतात.सर्व इंद्रिये शम—मन आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेऊन व दम म्हणजे इंद्रिये आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेऊन श्रीहरीच्या चिंतनाने आपण—जीवानी रज,सत्व आणि तम ह्या तीन गुणांच्या वृत्ती जिंकाव्यात---म्हणजे तीन गुणांचा परिणाम अंत:करणावर परिणाम होऊ देत नाही—त्या वृत्तीनुसार आचरण करीत नाही तर साक्षीरुप होऊन राहतो.आपल्या अहंकाराला आश्रयभूत मनाचा बुद्धीचेठायी संयोग करून,म्हणजे अहंकाराचा मनामध्ये, मनाचा बुद्धीमध्ये,व बुद्धीचा क्षेत्रज्ञाचे—ईश्वराच्या ठिकाणी लय करून आणि त्या क्षेत्रज्ञाच्या—अक्षय-पुरुषाच्या उपाधीचा—मायाच्या त्याग करून ऐक्य,आधारभूत शुध्द ब्रह्माचेठीकाणी,जसे घट फोडून त्यातील आकाशाचे ऐक्य,महाआकाशाच्या ठीकानी मानितात तसे आपण मानून------------||५३-५४|| भावार्थः---ज्याने मायिक गुणांच्या वासनेचा क्षय केला आहे,त्याचप्रमाणे आपण पांच ज्ञानेंद्रिये—श्रोत्र,त्वचा,जिव्हा,चक्षु,घ्राण व मन यांचा निरोध करावा--केला आहे आणि आपणही सर्व आहाराचा त्याग करावा--केला आहे.असा तो धृतराष्ट्र,चलनवळन न पावता या वेळी,खांद्या तोडलेले वृक्षाचे खोड (कांड)जसे अचंचल असते त्याप्रमाणे अचल राहिला आहे.आपणही—जीवानी अचल—स्थिर मन करून राहावे.कामना—विषय हे अस्थिर—चंचल आहेत,म्हणून विषयांचा त्याग करावा व परमात्मा जो स्थिर त्याच्याठीकाणी आपण स्थिर होण्याचाच प्रयत्न करावा.||५५|| भावार्थः---हे राजा,लोक स्थितीसंबंधी सर्व कर्मांचा त्याग करणाऱ्या त्या धृतराष्ट्रास,परत आणण्याची खटपट करून तूं त्यास आतां विघ्नरूप होऊं नकोस.ज्यांना वैराग्य झालेले आहेत त्यांना आपण प्रतिबंध न करता वैराग्यास साह्य असा पाठिंबा द्दावा.हे राजा तो धृतराष्ट्र,आजपासून पुढच्या पांचव्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग करील आणि तेंही शरीर,योगाग्निने स्वतःच भस्म होईल.||५६|| भावार्थः---तेव्हा योगाग्निने,दक्षिणाग्नी,गार्हपत्य आणि आहवनीय या तीन अग्नीसह वर्तमान व पूर्णकुटीके सहवर्तमान,पतीचा (धृतराष्ट्राचा)देह दग्ध होऊं लागला असतां,बाहेर असणारी साध्वी पत्नी (गांधारी)आपल्या पतीस अनुसरून त्या अग्नीत प्रवेश करील.||५७|| भावार्थः---हे कुरुकुलानंददायका,त्या काळी धृतराष्ट्राचे व गांधारीचे ते आश्चर्यकारक निर्याण पाहून विदुर,आपल्या बंधूस सद्गती व मृत्यू प्राप्त झाल्यामुळे हर्ष व शोक या दोहोंनी युक्त होत असता,तीर्थाटन करण्याकरिता त्या सप्तस्त्रोत तीर्थस्थापासून दुसरे ठिकाणी गमन करील.आपणही तीर्थाटन करण्याकरिता सप्तस्त्रोत इत्यादी पवित्र स्थळी जाऊन आपले अंत:करण शुद्ध करून घ्यावे.||५८|| | इत्युक्त्वाथारूहत् स्वर्गं नारद: सहतुम्बुरू: | युधिष्ठीरो वचस्तस्य हदि कृत्वाजहाच्छुच: ||५९|| भावार्थः---असे भाषण करून तुंबुरुसहवर्तमान नारदऋषी स्वर्गास निघून गेला.धर्मराजानेही त्याचे भाषण मनांत ठेऊन शोकाचा त्याग केला.आपणही आपणास शोक झाल्या असल्यास,संत—महात्मा यांचा सत्संग करून शोकाचा—दु:खाचा त्याग करावा.||५९|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ |१३----याप्रमाणे श्रीमद्भागावतानामक महापुराणांतील प्रथम(१)स्कांधामध्ये धृतराष्ट्रनिर्याणकथानारूप हा तेरावा(१३) ऐकोनासाठ(५९) श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१३--५९|| | |१३---||श्रीकृष्णार्पणामस्तू||—||श्रीसदगुरुअर्पणामस्तू|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------१४-----नंतर नाशसुचक अनेक अरिष्टे पाहून मनात शंकित झालेल्या धर्मराजाने,श्रीकृष्णाचे अंतर्धान अर्जुनापासून श्रावण केले,ही कथा चवदाव्या(१४) अध्यायांत आलेली आहे.||१४|| | १४---[अपशकून पाहून महाराज युधीष्ठारांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ सूत उवाच:--- | सम्प्रस्थिते द्वारकायां जीष्णौ बन्धुदिदृक्षया | ज्ञातुं च पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विचेष्टितम् ||१|| भावार्थः---सूत म्हणाला-----हे ऋषीहो,बंधूजनास पाहण्याकरिता आणि पवित्रकीर्ती श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणण्याकरिता धर्म राजाच्या अनुमताने अर्जुन द्वारकेत गेला असता---------------आपल्या आत्मियताची व आपली भेट होऊन फार दीवस झाले असतील,तर आपण त्यांच्या भेटीसाठी जावावयास पाहिजे किंवा त्यांचा समाचार—बातमी घेण्याकरिता आपला प्रतिनिधी पाठवयास पाहिजे.||१|| भावार्थः---सात महिने निघून गेले तथापि द्वारकेतून अर्जुन आला नाही.तो इकडे धर्मराजाने भयंकररूप उत्पात अवालेकन केले.आपला पाठवलेला प्रतिनिधी लवकर परत आला नसेल व आपल्याकडे अपशकून कांही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असेल तर विवेक—विचार करावा.||२|| भावार्थः---ते असे कि,ज्या ऋतूंत जे घडनारे शीतउष्णादिक धर्म ते त्या ऋतूंत न घडतां दुसऱ्याच ऋतूंत घडू लागले,अशी कालाची भयंकर गती क्रोध,लोभ,आणि मिथ्याभाषणाची अभिरुची यांनी व्याप्तचित्त झालेल्या मनुष्यांची पापकर्मयुक्त उपजीविका,कपटयुक्त व्यवहार,वचनायुक्त सख्य आणि पिता,माता,श्नाता व स्त्रीपुरुष यांत परस्पर कलह--------||३-४|| अर्थः---असा विपरीत काल प्राप्त झाला असता होणारी अतिभयसूचक अरिष्टे आणि मनुष्यांची लोभाने अधर्माचे ठिकाणी झालेली प्रवृत्ती पाहून,धर्मराजा भीमसेनास म्हणूं लागला की,---------------||५|| भावार्थः---युधिष्ठीर म्हणाला------हे भीमसेना,बंधूजनास पाहण्यासाठी आणि पुण्यकीर्ती श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणण्यासाठी मी अर्जुनास द्वारकेत पाठविले होते.||६|| अर्थः---त्यास आता सात महिने होऊन गेले,तथापि तो तुझा भाऊ अर्जुन,कोणत्या कारणास्तव अजून तेथून परत येत नाही हे मी जाणत नाही.||७|| भावार्थः---बरे ज्या काली श्रीकृष्ण भगवान,क्रीडेकरिता धारण केलेले आपले शरीर टाकण्याची इच्छा करील,तो हा नारदाने पूर्वी सांगितलेला कालच प्राप्त कि काय ! ||८|| | यस्मान्न: सम्पदो राज्यं दारा: प्राणा: कुलं प्रजा: | आसन् सपत्नविजयो लोकाश्च यदनुग्रहात् ||९|| भावार्थः---हेभीमा,उत्कृष्ट,संपत्ती,सर्वभौमराज्य,उत्तमस्त्रिया,प्राणसंरक्षण,श्रेष्ठकुल,स्वाधीन सर्वप्रजा,व शत्रूंपासून विजयप्राप्ती हि सर्व ज्या श्रीकृष्णापासून आम्हांस प्राप्त झाली आणि ज्याच्या अनुग्रहाने सर्व लोक आम्हांस अनुकूल झाले आहेत आहेत त्याच्या वियोगावांचून अरिष्टे उत्पन्न होणार नाहीत.||९|| भावार्थः---हे नरश्रेष्ठा,भीमा आकाशांतून विद्दुत्पातादिक भूमीपासून भूकंपादिक,देहापासून वामनेत्रस्फुरणादिक जी चिन्हे होतात हे सर्व भयंकर उत्पात,आमच्या बुद्धीस मोह करणारे मोठे भय लवकरच प्राप्त होणार असे सुचवीत आहेत का ! ||१०|| भावार्थः---हे भीमा,मांड्या,नेत्र व बाहु हि माझी वामांगे वारंवार स्फुरण पावतात आणि माझ्या ह्रदयांत कंप उत्पन्न झाला आहे,हे उत्पात मला लवकरच अनिष्ट फळ देतील.||११|| भावार्थः---हि भालू,मुखाने अग्नी वमन करीत असून,उदय पावणाऱ्या सूर्याच्या सन्मुख आक्रोश करिते.हे भीमा,हा श्वान निःशंकपणे माझ्या सन्मुख रुदन केल्यासारखा दोर्घस्वर काढीत आहे.||१२|| भावार्थः----हे पुरुषश्रेष्ठ,गाई वगैरे चांगले पशु,मला डावा घालून जातात व इतर गर्दभादिक पशु,मला उजवा घालून जातात.आणि माझे अश्व,रुदन करणारे माझ्या दृष्टीस पडतात.||१३|| भावार्थः---हा मृत्यूसूचक कपोत पक्षी,माझ्या मनास कंप उत्पन्न करीत असता कर्कश शब्द करीत आहे.हे उलूक हा प्रत्युकुल (घुबड)दोन पक्षी,रात्रीची निद्रा न घेता परस्पर कुत्सित शब्द करून हे जग शून्य व्हावे अशी इच्छा करितात.||१४|| भावार्थः---दशदिशा धूम्रवर्ण झाल्या आहेत,सूर्यचंद्रांस परिधी (खळी)पडतात.पर्वतांसहवर्तमान भूमी कंपायमान होते.आकाशांत अश्व मुळीच नसून तेथून गर्जनेसहित मोठे व्रजपात होत आहेत.||१५|| भावार्थः---कठोर स्पर्श करणारा वायू,धुळीने सर्वत्र अंधकार उत्पन्न करीत होत असता वाढतो.मेघ,जिकडे तिकडे लोकांस भय उत्पन्न होण्यासारखी बीभत्स रक्तवृष्टी करितात.||१६|| भावार्थः---हा निस्तेज झालेला सूर्य पहा,तसेच ग्रहांचे परस्पर युद्ध होत आहे.प्राणिमात्रांत मिसळलेल्या भुतांच्या गणांनी,स्वर्ग व भूमी हे लोक पेटविलेलच आहेत किं काय असे दिसतात पहा.||१७|| भावार्थ:---महानद्या,शोणादिक मोठे नद,सरोवरे व सर्व प्राण्यांची मने हि क्षोभयुक्त झाली आहेत,अग्नी घृताने प्रज्वलित होत नाही.हा काल,काय करणार आहे!हे समजत नाही.||१८|| भावार्थः---वत्स,स्तनपान करीत नाहीत व गाई पान्हा सोडीत नाहीत.अश्रुयुक्त मुखे ज्यांची झाली आहेत अशा गाई रुदन करीत आहेत.गोठ्यामध्ये वृषभ हर्ष पावत नाहीत.||१९|| भावार्थः---गावांतील देवांच्या प्रतिमा,रुदन केल्यासारखा दिसत असून त्यांच्या अंगास घाम सुटत आहेत व त्यांचे आपोआप दुसरे ठिकाणी उच्चाटन होते.हे देश,ग्राम,नगरे बागा,रत्नादीकांच्या खाणी,व ऋषीचे आश्रम हे निस्तेज व निरानंद झाले आहेत.हे आम्हांस काय दुःख दर्शवितील हे समजत नाही.||२०|| भावार्थः---या महाउत्पातांनी,दुसऱ्या पुरुषांच्या ठिकाणी नसणाऱ्या,ध्वज्राकुशादिकांच्या शोभेने युक्त अशा श्रीकृष्णाच्या पदांनी रहित झाल्यामुळे हि पृथ्वी,सौभाग्यहीन झाली आहे असे मानितो.अशा रीतीने आपले मन विक्षिप्त झाल्यानंतर आपल्या मनात प्रतिकूल—दु:खद विचार येत असतात.कांही—कांही वेळेस अनुकुलता हि प्रतिकूलता वाटू लागते,यास कारण आपले विक्षिप्त झालेले असते,त्याचा परिणाम नकारात्मक दिसून येतो.||२१|| भावार्थः---ऋषीहो,याप्रमाणे अरिष्टे पाहून तो धर्मराजा चिंतन करीत असतां,अर्जुन द्वारकेत हस्तिनापुरास परत आला.||२२|| भावार्थः---तेव्हा तो अर्जुन अतिदुःखित असल्यामुळे खाली मुख करून कमलासारख्या सुंदर नेत्रांतून अश्रुपात टाकीत टाकीत अपूर्वरीतीने अकस्मात येन धर्मराजाच्या चरणावर पडला तेव्हा निस्तेज अशा त्या अर्जुनास पाहून उद्विग्नचित्त झालेल्या धर्मराजाने,नारदाच्या भाषणाचे स्मरण करून त्यास प्रश्न केला कि,||२३-२४|| भावार्थः---युधिष्ठीर म्हणाला-----हे अर्जुना,मधु,क्षोज,दशार्ह,अर्ह,सात्वन,अंधक आणि वृष्णि या कुळांतील आमचे स्वजन द्वारकेमध्ये सुखरूप आहेत काय?||२५|| भावार्थः---तसाच आमचा शूरनामक पूज्य मातासह (कुंतीचा पिता)सुखरूप आहे कि?आणि आमचा मातुळ वसुदेव,आपल्या कनिष्ठबंधू सह वर्तमान खुशाल आहे की?||२६|| भावार्थः---त्या वसुदेवाच्या देवक्यादिक ज्या सात स्त्रिया त्या परस्पर बहिणी असून आमच्या मामी होत.त्या सर्वही आपले पुत्र,कन्या व स्नुषा यांसहित सुखरूप आहेत की?||२७|| भावार्थः---तसाच उग्रसेन राजा,कंसनामक दुष्ट पुत्राच्या योगाने बहु दुःखित असून तो हल्ली जिवंत आहे काय?त्याचा बंधू देवक,तसाच हृदिक,व ह्र्दीकाचा पुत्र कृतवर्मा,तसेच अक्रूर,जयंत,गद,सारण व शत्रूजीतप्रभृती यादव हे सर्व कुशल आहे काय?यादवांचा प्रभू भगवान बलराम सुखी आहे काय?||२८-२९|| भावार्थः---यादवामध्ये महारथी जो प्रद्दुम्न तो सुखरूप आहे ना?गंभीरवेग युक्त अनिरुद्ध वृद्धी पावस आहे की.||३०|| भावार्थः---सुषेण,चारुदेष्ण,तससच जांबवतीपुत्र सांब व दुसरेही ऋषभादिक जे श्रेष्ठ कृष्णपुत्र ते आपापल्या पुत्रांसहित सुखरूप आहेत ना?||३१|| भावार्थ:---तसेच श्रुतदेव.उद्धव इत्यादिक श्रीकृष्णाचे सेवक आणि सुनंद नंदप्रमुख जे दुसरे श्रेष्ठ यादव ते सर्वहि,बलराम व श्रीकृष्ण यांच्या बाहूबलाच्या आश्रयाने वर्तत असून कुशली आहेत ना?आणि ते स्नेहयुक्त चित्ताने आमचे कुशल स्मरण करतात काय?||३२-३३|| भावार्थः---तसाच पृथ्वी,गाई व वेदन यांचे संरक्षण करणारा,ब्राहमणाचा कैवारी आणि भक्तवत्सल असा षडगुनैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण,द्वारकानगरीतील आपल्या सुधर्मानाकम सभेमध्ये सर्व यादवांसहवर्तमान सुखाने बसत असतो ना?||३४|| अर्थः---कारण,तो अनंतासारखा आद्य पुरुषरुपी श्रीकृष्ण सर्व लोकांचे मंगल,क्षेम आणि उत्तरोत्तर अभिव्रुद्धी हो होण्यासाठी यदुकुलरूप समुद्रामध्ये सांप्रतकाली वास करीत आहे.||३५|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाच्या बाहूदंडानी सुरक्षित अशा आपल्या द्वारकनगरीतील सर्व लोकांनी सन्मान केलेले यादव,परमानंदाने,जसे वैकुंठामध्ये श्रीविष्णूचे पार्षद क्रीडा करितात त्याप्रमाणे क्रीडा करितात.||३६|| ज्या श्रीकृष्णाच्या चरणसेवारूप उत्कृष्ट कर्मांच्या योगाने सत्यभामादिक सोळा हजार एकशे आठ स्त्रियासुद्धा युद्धामध्ये सर्व देवांस जिंकून,त्यांच्या भोग्य वस्तू पारीजातिक,इंद्राणीनेही उपभोग करण्यास योग्य असलेल्या हरण करून द्वारकेत आणितात.||३७|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाच्या भूजदंडाच्या प्रभावानें उपजीवन पावणारे यादववीर,सर्वथा भयरहित होत असते,देवश्रेष्ठास योग्य अशा बलात्काराने आणलेल्या सुधर्मानामक सभेचे वारंवार पायांनी आक्रमण करितात||३८|| भावार्थः---बा अर्जुना,तुझ्या शरीरास आरोग्य आहे की,कारण तूं मला निस्तेज.हे पार्था तू द्वाराकेत फार दिवस राहिलास म्हणून त्या द्वारकावासी बंधुपासून तुला सन्मान प्राप्त झाला नाही का काय ? किंवा त्यांनी तुझा उलटा अपमान केला की काय ? ||३९|| भावार्थः---त्याचप्रमाणे कोणी तुला निर्दयपणे कठोर शब्दादिकांनी ताडन तर केले नाहीना?याचकांनी आशेने मागितलेली एकादी वस्तू,त्यांस देतो म्हणून सांगून तूं दिली नाहीस किं काय?||४०|| | कच्चित्त्वं ब्राम्हणं बालं गां वृद्धं रोगिणं स्त्रियम् | शरणोपसृतं सत्त्वं नात्याक्षी: शरणप्रद: ||४१|| भावार्थः---तसेच ब्राहमण,बालक,गाय वृद्ध,रोगी किंवा स्त्री अथवा कोणताही प्राणी शरण आला असतां,शरणागतांचे रक्षण करणारा तुजकडून त्याचा अव्हेर तर झाला नाही ना ? ||४१|| | कच्चित्त्वं नागमोऽगम्यां वासत्कृतां स्त्रियम् | पराजितो वाथ भवान्नोत्तमैर्नासमै||४२|| भावार्थः---तसेच तूं अगम्यस्त्रीशी गमन केले नाहीस ना ? किंवा कोणी स्त्री गमण न करण्यास योग्य असून तिच्या वस्त्रादिकांच्या मलीनतेमुळे तूं तिचा परित्याग केलास कि काय?अथवा तूं आपल्या योग्यतेच्या किंवा आपल्या पेक्षा कमी योग्यतेच्या विरांकडून मार्गात पराजित झाला नाहीस ना?||४२|| भावार्थः---अथवा आपल्या बरोबर भोजन घालण्यास योग्य अशा-------------------४३|| | कच्चित् प्रेष्ठतमेनाथ ह्रदयेनात्मबन्धुना | शून्योऽस्मि रहितो नित्यं मन्यसे तेऽन्यथा न रुक् ||४४|| भावार्थः---अथवा सर्वदा अतिप्रिय अंतरंगरुपी आपला बंधू जो श्रीकृष्ण त्याने रहित असल्यामुळे मी शून्य आहे असे तूं मानितोस कि काय?याखेरीज कोणत्याही कारणाने तुला एवढे दुःख होणार नाही.||४४|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम (१) स्कंधामध्ये युधिष्ठीरतर्कनामक चवदावा (१४) अध्याय चौरेचाळीस (४४) श्लोकांनीयुक्त समाप्त झाला.१४--४४|| | | श्रीकृष्णार्पणमस्तू—श्रीसदगुरुचरणार्पणमस्तू || -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------१५---सर्व ठिकाणी कलीचा प्रवेश झाला असे जाणून धर्मराजाने सर्व राजाचा भार परिक्षितीच्या स्वाधीन केला आणि स्वर्गारोहण करण्यासाठी आपण उत्तर दिशेस महाप्रस्थान केले हा विषय पंधराव्या(१५)अध्यायात वर्णन केला आहे.||१५|| | १५---[कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परिक्षितीला राज्य देऊन स्वर्गारोहन.] ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | एवं कृष्णसख: कृष्णो भ्रात्रा राज्ञाऽऽविकल्पित: | नानाशङ्कास्पदं रूपं कृष्णविश्लेषकर्शित: ||१|| भावार्थः---सुत म्हणाला---हे शौनकादिक ऋषीहो,याप्रमाणे श्रीकृष्णाच्या विरहाने कृश झालेला तो अर्जुन त्याचेच, नानाप्रकारच्या शंका घेऊन योग्य असे स्वरूप पाहून,त्यास ज्येष्ठ बंधू धर्मराजाने बहुत प्रश्न केले,तथापि शोकाने ज्याचे मुख आणि ह्र्दयकमळ वाळून गेले आहे असा निस्तेज झालेला तो अर्जुन त्याच श्रीकृष्णाच्या ध्यानांत निमग्न होत असतां,धर्मराजस काहीच उत्तर देण्याविषयी समर्थ झाला नाही.आपण दु:खित अवस्थेत असतांना इतरांचे दु:ख ऐकण्याच्या किंवा दु:ख निवारण करण्यास असमर्थ असतोत.म्हणून आपण आपले दुख सांगण्यासाठी किंवा निवारण करण्यासाठी कयास दु:ख सांगावयाचे किंवा ज्याच्याकडून दु:ख निवारण करून घ्यावावयाचे आहे,तो मनुष्य सुखी किंवा कार्यमुक्त असावा.तो स्थिर-चित्ताने शांत असावा.असा शांत असलेला मनुष्य आपले दु:ख ऐकू शकतो किंवा दु:ख निवारण करू शकतो.असा विवेक—विचार करून आपले दु:ख सांगावे किंवा ते दु:ख निवारण करून घ्यावे.||१-२|| भावार्थः---नंतर वारंवार उत्पन्न होणाऱ्या दुःखाश्रुंचे नेत्रामाध्येच मोठ्या कष्टाने स्तंभन करून व बाहेर आलेले अश्रू हाताने पुसून श्रीकृष्णाच्या विरहामुळे अधिकच वाढलेल्या सप्रेम उत्कंठतेने व्याकुळ झालेला तो अर्जुन,आपल्या सारथ्यादिक कर्मांचे ठिकाणी श्रीकृष्णाने केलेली जी सख्य मैत्री आणि संबंधीत्व त्यांचे स्मरण करून,गहीवराने कंठ सद्गतीत झाल्यामुळे अस्पष्टवर्णोच्चारयुक्त आपल्या वाणीने ज्येष्ठ बंधू धर्म राजस म्हणाला की--------------------,||३-४|| भावार्थः---अर्जुन म्हणाला------हे महाराज,बंधूरुपी श्रीकृष्णाने मला फसविले आहे.माझ्या ठिकाणी देवांनाही आश्चर्य उत्पन्न करणारे जे मोठे सामर्थ्य होते ते त्याने हरण केले.म्हणजे अर्जुनास काय किंवा आपणास काय जे सामर्थे आहे,ते सर्व भगवंतांचेच आहे.भगवंतांच्या सामर्थेशिवाय--कृपेशिवाय आपण कांही करू शकत नाहीत.म्हणून आपण भगवंतांच्या कृपेस पात्र होण्यासाठी स्वधार्मांचेच आचरण करावे.ज्याचा—त्याचा स्वधर्म हा फार श्रेष्ठ असतो--भगवंतांकडे नेत असतो.||५|| भावार्थः---जसा पिता इत्यादी प्रियजनाचाही देह,प्राण रहित झाला असता तो तत्काळ शवशब्दाने उच्चारीला जातो व अमंगल होतो त्याप्रमाणे,ज्याच्या क्षणमात्र वियोगाने हा सर्वही लोक फार वाईट दिसूं लागतो.आपल्यावर भगवंतांच्या कृपेचा वियोग झाला असेल तर सर्व प्रतिकूलता दिसून येते.म्हणून स्वधर्मांने आचरण करून कृपा संपादन करावी.||६|| भावार्थः---हे राजा,ज्या श्रीकृष्णाच्या आश्रयाने द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी द्रुपदराजाच्या मंदिरांत प्राप्त झालेल्या काममदोन्मत्त राजांचे तेज केवळ धनुष्यग्रहणानेच मी हरण केले आणि सज्ज केलेल्या धनुष्याने मत्स्ययंत्राचा वेध करून द्रौपदीची प्राप्ती करून घेतली.भगवंतांच्या आश्रयाने अर्जुनाने द्रोपदीची प्राप्ती करून घेतली.म्हणून आपण भगवंतांची कृपा संपादन करण्यसाठी भगवंतांच्या शात्रानुसारच आचरण करावे.||७|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाच्या संनिधभागी,सर्वदेवांसहवर्तमान इंद्राला जिंकून त्यांचे खांडवनामक वन,मी बलात्काराने अग्नीस दिले व त्यांत ज्या मयासूराचे रक्षण केले होते त्या मयासुराने केलेली अद्भुतचातुर्यांनी युक्त व अनेक मायिकरचनांनी युक्त अशी सभा आम्हांस प्राप्त झाली.तसेच सर्व राजे तुझ्या राजसूय यज्ञांत दशदिशाकडून कारभार घेऊन आले.म्हणून आपण भगवंतांच्याच आश्रयामुळे सर्व व्यवहार होतो यावर श्रद्धा ठेऊन निरहंकार होऊन कार्य करावे.||८|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाच्या तेजाने ज्याला दहा हजार हत्तीचे बळ व उत्साहशक्ती आहे असा माझा वडील भाऊ व तुझा कनिष्ठ भाऊ जो हा भीमसेन त्याने,राजांची मस्तके पादाक्रांत करणाऱ्या जरासंधाचा वध केला.त्या दृष्टीने पूर्वी महाभैरवाच्या यज्ञार्थ जे राजे आणील होते,त्यास श्रीकृष्णाने कारागृहांतून सोडविले म्हणून त्यांनी तुझ्या राजसूय यज्ञांत अनेकप्रकारच्या भेटी आणून दिल्या.म्हणजे आपले जे—जे कार्य झाले,त्यास श्रीकृष्णच कारण आहे,आपण मात्र निमित्त आहोत.आपणसुद्धा जे—जे कार्य कारीतोत त्यास श्रीकृष्णाच कारण आहे असा आपला विश्वास असावयास पाहिजे.||९|| भावार्थः—-हे राजा,राजसूय यज्ञामध्ये ऋत्विजांनी केलेल्या महाभिषेकाने अतिस्तुत्य झालेल्या तुझ्या द्रौपदीनामक पत्नीच्या रमणीय केशापाशाला(बुचड्याला)सोडून दुःशासनादि कुटीलांनी सभेमध्ये स्पर्श केला तेव्हा स्मरणामात्रेकरून प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाला नमस्कार करतेवेळी त्या द्रौपदीच्या नेत्रांतील दुःखाश्रू,तिच्या मुखावरून श्रीकृष्णाच्या पायावर पडले,म्हणून तिच्या कैवाराने ज्या श्रीकृष्णाने त्या दुःसासनादी खलांचा संहार करून त्यांच्या स्त्रिया,वैधव्यामुळे केशरहित केल्या.आपण आपले दु:ख जर भगवंतांस स्वधर्मांने निष्काम आचरण करून सांगितले की,भगवंत निश्चितरुपाणे आपले दु:ख हरण--–निवारण करतोच.||१०|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाने,द्वैतवनांत येऊन दहासहस्त्र शिष्यांच्या पंक्तीत प्रमुखपणे जो भोजन करणारा त्या,दुर्योधनाणे पाठविलेल्या दुर्वासऋषीपासून प्राप्त केलेल्या महत्संकटातून आमचे रक्षण केले.ते असे कि,सूर्याने दिलेले स्थालीस चिकटून राहिलेले भाजीचे पान भक्षण करून जो भगवान तृप्त झाला,तेणेकरूनच नदीच्या उदकांत अघमर्षण करण्यासाठी निमग्न झालेला दुर्वासप्रभृती दहा हजार ऋषीचा समुदाय,त्रैलोक्य तृप्त झाले असे मानून संतुष्ट अंतःकरनाणे तेथूनच दुसरे ठिकाणी निघून गेला.पांडवांना दुर्वास-ऋषीमुळे जे रात्री जेवण्याचे संकट आले होते ते सर्व संकट श्रीकृष्ण परमात्म्याच्या साह्यातेमुळे निवारण झाले,कारण पांडव हे परमात्म्याचे भक्त होते,तर संसाराचेभक्त नव्हते,त्याचप्रमाणे आपण भक्त परमात्म्याचे व्हावे,तर संसाराचे—विषयांचे—विषय प्राप्तीसाठी भक्त होऊ नये.असे असले म्हणजे आपल्यावरील आलेले संकट श्रीकृष्ण परमात्मा नाहीसे करतो.||११|| भावार्थः---तसेच ज्या श्रीकृष्णाच्या तेजाने,मी द्वंद्वयुद्धांत त्रिशूलधारी अशा भगवान शंकरालाही आश्चर्य उत्पन्न केले.त्याने संतुष्ट होऊन आपले पशुपतनामक अस्त्र मला दिले.नंतर सर्वलोकपालांनाही आपापली अस्त्रे मला दिली.आणि मी याच देहाने स्वर्गलोकाचेठायी जाऊन इंद्राच्या मोठ्या अर्धासनावर बसलो.||१२|| भावार्थः---हे अजमिढ राजांच्या वंशात झालेल्या धर्मराजा,त्या स्वर्गलोकी,मी यथेच्छ क्रीडा करीत असता,इंद्रासहित सर्व देवांनी,निवांतकवचादिक आपल्या दुर्जय शत्रूच्या वधासाठी ज्या श्रीकृष्णाने अद्भुत पराक्रमयुक्त केलेल्या व गांडीव धनुष्याच्या चिन्हाने सुशोभित अशा माझ्या बाहूदंडाचा आश्रय केला.श्रीकृष्णामुळेच गांडीव धनुष्य मिळाले व त्यामुळेच अर्जुनाचा विजय झालेला आहे.त्या सर्वव्यापक श्रीकृष्णाने आज मला फसविले आहे,म्हणजे तो निजधामास गेल्यामुळे मला त्याचा वियोग झाला आहे.याप्रकारे पांडवांची यशोगाथा हि श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच झालेली आहे.आता श्रीकृष्ण हे पांडवांचे आत्मीयतेचे—जिव्हाळ्याचे—प्रेमाचे असून,न सांगता निजधामास गेलेले आहेत याचे आम्हांस—पांडवांस फार दु:ख होत आहे.त्याचप्रमाणे भगवंतांचा आणि आपला—जीवास वियोग-प्रसंगी दु:ख व्हावयास पाहिजे,कारण भगवंतांच्या कृपेमुळेच आपलेही कोनातेही कार्य होत असते.||१३|| भावार्थः---ज्या श्रीकृष्णाच्या आश्रय करणारा एकटाच मी,ज्याचा अंत व पार नाही व ज्यांत दुर्जय भीष्मादीरुपी मोठे जलचर आहेत अशा कौरवसैन्यरूप समुद्रास रथाने तरून गेलो व त्याच्या पूर्वीही उत्तरगोग्रहणप्रसंगी मी कौरवांनी नेलेले बहु गोधन परत आणिले.आणि शत्रूवर मोहनास्त्र प्रतापांची स्थानभूत जी रत्नजडित मुकुटादी भूषणे ती त्यांच्या मस्तकावरून हरण केली.अशा सर्व यशास श्रीकृष्णच कारण आहे.जसा पांडवांच्या यशास श्रीकृष्ण कारण आहे,त्याचप्रमाणे आपल्याही यशास श्रीकृष्णच कारण आहे.||१४|| भावार्थः---हे विभो धर्मा,जो श्रीकृष्ण,माझा सारथी होऊन,बहुत पराक्रमयुक्त राजश्रेष्ठांच्या रथसमुदायांनी अशा भीष्म,द्रोण,कर्ण,व शल्य इत्यादिकांच्या सेनेमध्ये त्या महारथी वीरांची आयुष्ये मने,उत्साहशक्ती व बळे केवळ दृष्टीनेच हरण करीता झाला.यास कारण श्रीकृष्णांचीच कृपा आहे.||१५|| भावार्थः---हे राजा,तूं कौरवयुद्धप्रसंगी मला ज्या श्रीकृष्णाच्या हातांत देऊन रक्षण करण्याविषयी स्वाधीन केले होतेस,म्हणून द्रोण,भीष्म,कर्ण अश्वत्थामा,सुशर्मा,शल्य,जयद्रथ,व बाल्हिक इत्यादिकांनी माझ्यावर अमोघ(कधीच फुकट न जाणारी)अशी अनेक अस्त्रे टाकीली परंतु त्यांनी जसा हिरण्यकशीपुप्रभृती दैत्यांनी टाकलेल्या शास्त्रत्रांनी प्रल्हादास स्पर्शसुद्धा केला नाही त्याप्रमाणे मला स्पर्शसुद्धा केला नाही.अर्जुनाचे दुर्योधनाच्या महारथीकडून जे सरंक्षण झाले,ते श्रीकृष्णामुळेच झालेले आहे.||१६|| भावार्थः---सर्वांस पूज्य असे ब्रह्मादि देवही,मोक्षप्रीत्यर्थ ज्या श्रीकृष्णाचा चरणकमळाचे सेवन करितात.आणि जयद्रथाच्या वधाच्या दिवशी,उदक न मिळाल्यामुळे माझ्या रथाचे घोडे थकले होते तेव्हा,भूमीचे विदारण करून पाणी काढण्यासाठी मी भूमीवर उतरलो असतां त्या वेळी,ज्या भगवंताच्या अंतर्यामीप्रेरणेने पर्वापर अनुसंधाने रहित झालेल्या त्या रथारूढ शत्रूंनी मला प्रहार केला नाही,अशा मुमुक्षुजनांस आत्मस्वरूप देणाऱ्या त्या ईश्वरास,मी कुबुद्धीने आपल्या सारथ्याविषयी योजिले तस्मात मला धिकार असो.श्रीकृष्णास अर्जुनाने आपल्या रथाचे सारथी न करावयास पाहिजे होते,पण सारथी केले अशी अर्जुन चूक कबुल करितो,त्याप्रमाणे आपल्याकडून कांही चूक झाले असेल तर आपण चूक कबुल करावयास पाहिजे.आपली चुक आपणच कबुल—मान्य केली तर पुन्हा आपल्याकडून चूक होत नसते.त्या कबुलीत आपले हित होत असते.||१७|| | नर्माण्युदाररुचिरस्मितशोभितानि | हे पार्थ हेस र्जुन सखे कुरुनन्दनेति | | संजल्पितानि नरदेव हृदिस्पृशानि | स्मृर्तुर्लुठन्ति ह्रदयं मम माधवस्य ||१८|| भावार्थः---हे नरदेवा राजा,श्रीकृष्णाची गंभीर व सुंदर हास्याने शोभणारी थट्टेची जी भाषणे व हे पार्था,हे अर्जुना,हे सख्या,हे कुरुकुलास आनंद देणाऱ्या अशी संबोधयुक्त मनोवेधक भाषणे ती आता स्मरण करणाऱ्या माझ्या मनास खिन्न करीत आहेत.आपणास मागील आठवणीचे स्मरण झाल्यास दु:ख होत असते.म्हणून मागील घटनेचे स्मरण करू नये व भविष्यकालीन घटनेचे चिंतन करू नये,तर वर्तमान काळातील घटनेचा विवेक करून सावधान व्हावे.||१८|| भावार्थः---आणि निजणे,बसने,फिरणे,आपल्याच गुणांची प्रशंसा करणे आणि भोजण करणे इत्यादिकांस कधीही माझा वियोग नसे.आपण आपल्या मित्रासी संयोगातच सर्व व्यवहार करावा,तर वियोगात व्यवहार करू नये,कारण त्यांच्यात आत्मीयता—जवळपणा—ऐक्येपना असतो.कदाचित श्रीकृष्णाने मजवाचून भोजनादिक केले असतां,हे मित्रा ‘तू सत्ययुक्त असून बराच हा धर्म केलास’ शा व्रक्रोक्तीने मी त्याचा तिरस्कार केला तथापि थोरच तो.आपण सहजपणाने--- हेतुपुरस्पररहित मित्राचा तिरस्कार केला तरी मित्राने मनास लावून न घेता सरळपणा ठेवावा.त्याने,आपल्या मोठेपणाने,जसे मित्राने मित्राचे अपराध सहन करावे अथवा पित्याने पुत्राचे सोसावे तसे कुत्सितबुद्धीने मजकडून घडलेली सर्व अपराध सहन केले.”मित्राने मित्राचे सहजपणे अपराध सहन करावे,यासच “मित्रता” असे म्हणतात.”||१९|| भावार्थ:---हे राजेंद्र,भीष्मादिक वीराचा पराभव करणारा तोच मी अर्जुन,जेव्हा,सखा प्रिय आणि सुह्द्य अशा त्या पुरुष श्रेष्ठ श्रीकृष्णाने वियोग पावलो,तेव्हाच चित्ताचे पूर्वापार अनुसंधान व अस्त्रांचे मंत्रहृद्य यांस विसरून गेलो,पुढे इकडे येताना मार्गांत श्रीकृष्णाच्या सोळा हजार स्त्रीयारूप परिवाराचे रक्षण करीत असता,हे राजन,माझ्या पेक्षा नीच अशा गवळ्यांनी एखाद्या बायकोप्रमाणे माझा पराभव केला ! भगवंतांचेच सहकार्य—आशीर्वाद असेल तर आपले कार्य होते,भगवंतांचे सहकार्य किंवा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण संसाराचे भक्त न होता केवळ भगवंतांचेच भक्त असावे.भगवंत प्राप्त होण्यासाठीच प्रयत्न करावेत,तर भगवंतांचे ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करू नये.||२०|| भावार्थ:---कौरवसंग्रामातील राजे ज्यास नमस्कार करीत असत तेच धनुष्य,तेच बाण,तोच रथ,तोच मी रथी,पण हे सर्व साहित्य,श्रीकृष्ण रहित असल्यामुळे जसे भस्मसात केलेले हवन,मायावी पुरुषापासून मिळविलेल्या वस्तू,किवा खाऱ्या भूमीत पेरलेले धान्य व्यर्थ आहे ? त्याप्रमाणे माझे ते सर्व साहित्य एकाक्षणात व्यर्थ झाले.जेव्हा कौरव—पांडव युद्ध समाप्त झाले व भगवंत रथाखले उतरले तेव्हांच धनुष्य,तेच बाण,तोच रथ,श्रीकृष्णरहित झाल्यामुळे एका क्षणात अदृश्य झाले.भगवंत—सत्-चित्त्-आनंद आहे म्हणून जगात—नाम-रूप आहे,कारण भगवंत अधिष्ठान आहे व भगवंत सोडून सर्व नाम—रूप अध्यस्त--मिथ्या .म्हणून आपण अध्यास्ताचा--मिथ्याचा त्याग करून भगवंत—परमात्मासी सत्संग करून जीव—ब्रह्म—ऐक्य-ज्ञानाद्वारे एकरूप व्हावे.यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे,अन्यथा निरर्थकता—अनर्थतता आहे.||२१|| भावार्थ:---हे राजा,तू ज्या स्वजनाच्या क्षेमाविषयी मला प्रश्न केला होतास ते द्वारकेतील आपले स्वकीयजन,ब्राह्माणाच्या शापाने अत्यंत मूढ्बुद्धी होऊन,वारुनिनामक मदिरेचे प्राशन करून त्या मदाने क्षुब्ध चित्त झाले आणि ते परस्परांस न जाणण्यासारख्या स्थितीवर येवून शत्रूभावाने एकमेकांस लव्हाळ्याच्या मुष्टींनी प्रहार करीत असता,बहुतकरून सर्वांचा संहार होऊन आता त्यापैकी चार किवा पाच यादव अवशेष राहिले आहेत.मदिरा—दारू हे दुर्व्यसन आहे,त्याच्यात आपण आसक्त होऊ नये.शात्रीयदृष्ट्या ते निंद्द—म्हणजे ते कर्म करू नये—दारू पिऊ नये असे सांगितलेले आहे.त्यामुळे पाप होते व ते पापाचे फळ दु:ख आपणासच भोगावे लागते.मदिरा—दारूमुळे भावा—भावांचे,मित्र—मित्रांचे,वडील—पुत्राचे नाते—नातेवाईकाचे वर्भाव होऊन प्रेम न राहता शेत्रूता निर्माण होऊन दु:ख भोगावे लागते—मृत्यूही प्राप्त होतो.म्हणून कोणासही—आपणासही मदिरा—दारूचे व्यसन असू नये.मंदिराचे—दारूचे व्यसन असल्यास त्याचा त्याग करावा.||२२—२३|| भावार्थ:---हे राजा,सर्व प्राणी,एकमेकास मारतात किवा एकमेकास रक्षण करितात हे सर्व,बहुतकरून षडगुनैश्र्वर्य संपन्न परमेश्वराचे चरित्र असावे. ||२४|| भावर्थ:---हे राजा,जसे उदकामध्ये मत्सादिक जातीतील मोठे जलचर प्राणी,लहान प्राण्यास भक्षण करितात तसे किवा जसे मनुष्यादिक जातीही जे महाबलिष्ठ आहेत ते दुर्बलास मारतात आणि जे समबल असतात ते परस्पराचा वध करितात.||२५|| भावार्थ:---त्याप्रमाणे श्रीकृष्णाने महाबलीष्ठ अशा याद्वाकडून,इतर जरासंधादिकाचा नाश करवून,पृथ्वीला भारतभूत अशा याद्वानीच परस्पर यादवांचा नाश केला.||२६|| भावार्थः----हे राजा,कोणत्या देशी व कोणत्या काळी कसे वागावे याबद्दल योग्य विचाराने युक्त आणि ह्र्दयसंबंधी तापाचा समूळ नाश करणारी अशी जी श्रीकृष्णाची मधुर वाक्ये ती,स्मरण करणाऱ्या माझ्या चित्तास आकर्षण करितात,यास्तव आतां मला बोलण्याचे सामर्थ्य राहिले नाही.आपणांस भगवंतांची किंवा संत—महात्मा यांच्या उपदेशाचेच वारंवार स्मरण असावे,कारण ती वाक्य सुखाकडे--सुखरूपतेकडे नेतात,तर देह व देहसंबंधीची किंवा संसाराची वाक्य दु:खाकडे—दु:खरुपतेकडे नेतात.म्हणून आपण सत्संग करून संत—महात्मा यांचीचीच परमात्य्ह करण्यासाठी वाक्य श्रवण करावीत.||२७|| भावार्थः---सुत म्हणाला----ऋषीहो,याप्रमाणे तो अर्जुन,अतिदृढ सप्रेम भक्तीने श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे चिंतन करीत असतां,त्याची बुद्धी,शोकरहित शांत व निर्मल झाली.म्हणून आपणही—जीवानी निष्काम भक्तीने—प्रेम भक्तीने भगवंतांचेच—परमात्म्याचेच चिंतन करावे.||२८|| भावार्थः---श्रीकृष्णचरणाच्या निरंतर ध्यानाचे जिचा वेग वाढला आहे अशा दृढ भक्तीने,अर्जुनाच्या बुद्धीतील काम क्रोधादिक सर्व विषयवासना समूळ नाश पावल्या.आपण श्रीकृष्णांच्या चिंतनाने आपल्या बुद्धीतील काम,क्रोध,लोभ,मोह,मद-अहंकार आणि मत्सर या दोषांचा त्याग करावा.आपण शम म्हणजे मन आपल्या—जीवाच्या ताब्यात ठेवावे व दम म्हणजे आपल्या—जीवाच्या ताब्यात इंद्रिये ठेवावे.असे केले असता सर्व दोषांचा त्याग घडून येतो व आपला वेदांचा—ज्ञानमार्गाचा—मोक्ष—मार्गाचा परमार्थ सुरु होतो.||२९|| भावार्थः---आणि युद्धाच्या आरंभी जे गीतारूप ज्ञान श्रीकृष्णाने सांगितले होते ते काळ,कर्म आणि विषयभोगांवर आसक्ती यांनी आच्छादित झाले होते तेच (अविद्येचे)सत्व,रज आणि तम हे तीन गुण व त्यांपासून झालेले लिंग शरीर (पंच ज्ञानेंद्रिये,पंच कर्मेंद्रिये,प्राणपंचक,बुद्धी आणि मन)व त्याचे कार्य स्थूलदेहाची उत्पत्ती हि सर्व नष्ट झाली,त्यामुळे त्याच्या मनातील द्वैतरूप संशय तुटून गेला आणि तो सर्वथा शोकरहित झाला.आपणसुद्धा—जीवानी सत्संग करून काळ,कर्म आणि विषयभोगांवरील आसक्तीचा त्याग करून म्हणजे यांचा त्याग करून अज्ञानानी आच्छादित—झाकलेले—न कळण्याने सत्व,राज,तमोगुण व त्यापान्सून झालेले लीग--शरीर—सूक्ष्म—शरीर—पंच ज्ञानेंद्रिये—चक्षु,श्रोत्र,त्वचा,घ्राण,रसना;पंच कर्मेंद्रिये---वाक्-,पाणि,पाद,शिश्न,गुद;प्राणपंचक—व्यान,समान,उडण,प्राण,अपान;अंत:करण---अंत:करण,मन,बुद्धी,चित्त,अहंकार हा सर्व मिळून सूक्ष्म—देह व त्या सूक्ष्म देहास राहण्याकरिता पंचीकृत पंचामहाभूतांचा स्थूल—देह हे सर्व अनात्मा पदार्थ नष्ट होतात.ते सर्व अनात्मा—पदार्थ नष्ट—मिथ्या—कल्पित ठरल्यानंतर उरला तो अवघा हरी—परमात्मा म्हणजेच द्वैत भावना नष्ट होऊन परमात्मा जो सत्य आहे तोच एक आहे.त्यामुळे भीती—दु:ख राहिले नाही,तर सुखरूप झाला.असे आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करावा.त्यातच आपले परमहित आहे.||३१|| भावार्थः---याप्रमाने भगवंताने स्वीकारलेला नीजधामगमन रूप मार्ग व यदुकुलाचा संहार ऐकून धर्मराजाणे एकाग्रचित्ताने विचार करून स्वर्गाला मार्ग स्वीकारण्याचा निश्चय केला.राजा धर्मांनी,श्रीकृष्ण जर निधामास गेले आहेत,तर आपण मृत्यू-लोकात न राहता स्वर्गांस जाण्याचा निश्चय केला.त्याप्रमाणे आपणही संसारात—जन्म—मृत्युच्या फेऱ्यांत न राहता परमात्मा जो आहे त्यातच जीव—ब्रह्म—ऐक्य—ज्ञानाद्वारे एकरूप होण्याचा निश्चय करून एक-रुपतेचा अनुभव घ्यावा.||३२|| भावार्थः---ते समयी ते अर्जुनाचे भाषण ऐकून यादवांचा नाश आणि ब्रह्मादिकांसहित अतर्क्य असे ते श्रीकृष्णाचे नीजधामगमन जाणून,कुंतीनेही आपले अंतःकरण इंद्रियास अगोचर अशा श्रीकृष्णाचे ठिकाणी अनन्यभक्तीने स्थापन करून देहाचे विसर्जन केले.आपणही—जीवानी अंत:कारणाचा बाध करून परमात्म्यासी ऐक्य प्रस्थापित करावे.||३३|| भावार्थः---याप्रमाणे जन्मरहित अशा श्रीकृष्णाने,ज्या यादवतनूने पृथ्वीचा भार,कांट्याने कांटा काढतात त्याप्रमाणे हरण केला होता,त्या यादवतनूचाहि शेवटी त्याग केला.कारण,यादवदेह व भूभारभूत जरासंधादिक शरीरे,हि दोन्हीहि,संहार करण्याविषयी श्रीकृष्ण परमात्म्यास सारखीच आहेत.श्रीकृष्णाचा यादवदेह जरासंधादिक शरीरे देह दोघांचे शरीरे पंचामहाभूतांचीच असल्यामुळे यादवतनुचा त्याग करण्यास कांहीच वाटले नाही.ज्याकार्यासाठी श्रीकृष्णांनी शरीर धारण केले होते,ते कार्य पार पडल्यानंतर त्याचा त्याग करण्यास कांहीच हरकत नाही.दोहोंची शरीरे मिथ्या आहेत.त्याचप्रमाणे आपणही मृत्यू-लोकात मानव—शरीर धारण केल्यानंतर अंत:कारणाचा बाध केल्यानंतर प्रारब्ध कर्मांचा क्षय झाल्यानंतर आपोआपच स्थूल—शरीर सुटत असतेच.त्याचा त्याग करता येत नसतो,कारण जीव हा मनुष्य शरीरात प्रारब्ध कर्मांचा भोग घेण्याकरिता व परमात्म्यासी एकरूप होण्यासाठी आलेला असतो.आपल्यास—जीवास शरीर सोडता येत नाही.||३४|| भावार्थः---जसा नट आपल्या मुळच्या रूपाने सिद्ध असून,दुसरी मत्स्यकुर्मादिरूपे धारण करितो व गुप्त करितो त्याप्रमाणे निजानंदाचे ठिकाणी राहणाऱ्या भगवंताने,जे श्रीकृष्णरूप धारण करून पृथ्वीचा भार दूर केला तेंही आपले स्वरूप शेवटी गुप्त केले||३५|| भावार्थः---ज्याच्या कथा उत्तम असून श्रवण करण्यास योग्य आहेत त्या मुकुंद भगवंताने,ज्या दिवशी आपल्या तनुने, पृथ्वीचा त्याग केला त्याच दिवशी अविवेकी पुरुषांस धर्माचे ठिकाणी प्रवृत्त करणारा कलीने प्रवेश केला.अविवेकी पुरुष्याच्या ठिकाणी कलीचा—परधर्मांचा—अधर्माचा प्रवेश होत असतो,तर विवेकी-पुरुष्याच्या ठिकाणी कलीचा—पराधर्मांचा—अधर्माचा प्रवेश होत नसतो.म्हणून आपण अविवेकी न राहता सत्संग करून विवेकी होण्याचा प्रयत्न करावा.||३६|| भावार्थः---त्या काली ज्ञान संपन्न धर्मराजाने,आपला देह,मन,गृह,हस्तिनापुर सर्व राष्ट्र यामध्ये लोभ,असत्य कपट हिंसा इत्यादी अधर्मसमुदायाचा जिकडे तिकडे प्रसार झाला असे जाणून,महाप्रस्थान करण्याचा निश्चय केला.आपणही—जीवानी ज्याठिकाणी लोभ,असत्य,कपट,हिंसा इत्यादि दुर्गुण आहेत,त्याठीकानाचा—देशाचा त्याग करून ज्याठिकाणी—ज्यादेशात संत—महात्मा—त्यागी--सद्गूण—सत्संग--दया-क्षमा-शांत—समाधान आहेत त्याठिकाणी—त्या देशात निवास करावा व ते सद्गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा.||३७|| भावार्थः---आणि त्या स्वातंत्र्य धर्मराजाने,स्वभावाने नम्र,गुणांनी आपल्या(धर्मा)सारखा जो नातू परीक्षिती त्यास ह्स्तीनापुरामध्ये समुद्रवलयांकित पृथिवीच्या राज्यासनावर अभिषेक केला.आपणही गृहस्थाश्रमी असुत तर आपण सात्विक संस्कारित पुत्रास कुटुंब—प्रमुख करून,सत्संग करण्यासाठी संत—माहात्मा यांच्या आश्रमात जावे.||३८|| भावार्थः---तसाच मथुरा--नगरीमध्ये वज्रनामक अनिरुद्धाच्या पुत्रास,शूरसेन देशांचा राज्यावर स्थापन करून,नंतर प्राजापत्य--नावांची इष्टी करून त्या समर्थ धर्मराजाने,गार्हपत्यादिक अग्नीचा आपले ठिकाणी समारोप केला.||३९|| | विसृज्य तत्र तत् सर्वं दुकूलवलयादिकम् | निर्ममो निरहंकार: संछिन्नाशेषबन्धन: ||४०|| भावार्थः---आणि त्याने,आपल्या देहावरील पितांबरादिक रेशमी वस्त्रे,कडी,तोडे,आंगठ्या इत्यादी सर्व वस्त्रभूषनांचा तेथेच त्याग करून,ममतारहित व अहंकाररहित होऊन सर्व उपाधी रूप बंधने तोडून टाकिली.आपणही सर्व वैभावांचा त्याग करून ममतारहित व अहंकाररहित होऊन –उपाधीचा त्याग करून बंधनरहित होऊन सत्संग करावा.||४०|| | वाचं जुहाव मनसि तत्प्राण इतरे च तम् | मृत्यावपानं सोत्सर्ग तं पञ्चत्वे ह्यजोहवीत् ||४१|| भावार्थः---आणि त्याने वाणी आदिकरून सर्व इंद्रियांचा त्याग क्रियेसहित मनामध्ये लय करून,त्या मनाचा प्राणांत लय केला नंतर त्या प्राणाचा अपानवायूमध्ये लय करून त्याअपानवायूचा उत्सर्ग क्रियेसहवर्तमान मृत्यूदेवतेमध्ये लय केला आणि मृत्यूचा लय पंचमहाभूतात्मक देहाचा सत्त्व,रज आणि तम या तीन गुणांत लय करून,त्या गुणत्रयाचा अविद्येमध्ये लय केला.त्या अविद्येचा जीवात्म्याचे ठिकाणी लय करून,त्या शुद्ध त्वंपदार्थवाच्य जीवाचा निर्विकार परब्रह्माचे ठिकाणी लय केला,म्हणजे देहादी प्रपंचाच्या लयाविषयी पूर्वोक्त भावना करून,देहाभिमान सोडून दिला.आपणही देह,देहसंबंधीचा व वैभवाचा त्याग करून परब्रह्माच्या ठिकाणी लय करावा.||४२|| भावार्थः---नंतर वल्कले परिधान करणारा,आहारशून्य,मौनव्रत धारण करणारा,आणि मस्तकसंबंधी केश मोकळे सोडणारा तो धर्मराजा,आपले रूप,जड उन्मत्त व पिशाच यांसारखे लोकांस दाखवीत असता------||४३|| भावार्थः---भिमादीबंधूचीही अपेक्षा न धरून बधिरासारखे कोणाचेही भाषण श्रवण न करतां,अंतःकरणात परब्रम्हरुपी श्रीकृष्णाचे ध्यान करीत हस्तिनापुरांतन बाहेर पडून ज्या दिशेस गेलेला पुरुष पुनःगर्भवासांत येत नाही अशा महात्म्यांनी पूर्वी गमन केलेल्या उत्तर दिशेकडे निघून गेला.आपणही अंत:कारणाचा मिथात्व निश्चय करून—अंत:कारणाचा बाध करून परमात्म्यासी एकरूप व्हावे.||४४|| भावार्थः----तेव्हा पृथ्वीवरील सर्वप्रजा,अधर्ममित्र कलीने व्याप्त झाल्या असे पाहून,धर्मराजाच्या भीमादिक सर्व बंधूंनीहि, धर्मराजासारखाच मनाचा निश्चय करून,त्यच्या मागोमाग ते निघून गेले.आपणही श्रेष्ठांचे अनुकरण करून—संत—महात्मा यांचे अनुकरण करून—संसाराचा मिथ्यत्व निश्चय करून मोक्ष संपादन करावा.||४५|| भावार्थः---याप्रमाणे त्या पांचही पांडवांनी,धर्मार्थकाम मोक्षाचे उत्तम साधन करून,व श्रीकृष्णाचे जे चरणकमल हीच काय ती आपली मुख्य गती आहे असे जाणून,त्याचे मनाने ध्यान केले.आपण—जीवानी परमात्म्यासी ऐक्य करून परमात्म्याचे ध्यान करावे.||४६|| | तद्धयानोद्रिक्त्या भक्त्या विशुद्धधिषणा: परे | तस्मिन् नारायणपडे एकान्तमतयो गतिम् ||४७|| | अवापुर्दुरवापां ते असद्धिर्विषयात्मभि: | विधूतकल्मषास्थाने विरजेनात्मनैव हि ||४८|| भावार्थः---तेव्हा त्या ध्यानाचा योगाने शुद्धचित्त झालेले व निष्पाप झालेल्या पुरुषांचे राहण्याचे स्थान अशा त्या नारयणस्वरूपाचेठिकाणीच एकाग्र चित्त झालेले ते पांडव,लिंगदेहरहित अशा आपल्या स्वरूपानेच,विषयासक्त असत्पुषांस दुर्लभ अशा मोक्षरूप गतीस पावले.आपणहि ध्यानाच्या योगाने शुद्धचित्त होऊन लिंगदेहरहित—लिंगदेहाचा बाध करून आपले वास्तविक स्वरूपानेंच मोक्षगतीस प्राप्त व्हावे.जी गती विषयासक्त—असत्पुरुषास मिळत नाही,कारण ते नाशिवंत विषयांत आसक्त झालेले असतात.त्यांना विषय—संसार असावा वाटतो,म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही.त्यामुळे त्यांचे जन्म—मरण निवृत्त होत नाही.||४७—४८|| भावार्थः---त्याप्रमाणेच आत्मज्ञानसंपन्न विदुरानेही प्रभासक्षेत्राचे ठिकाणी दृढभक्तीच्या योगाने श्रीकृष्णास्वरूपी चित्ताची धारणा करून,आपला देह ठेविला आणि त्यावेळी सामोरे आलेल्या पित्रांसहवर्तमान आपल्या अधिकारावर यमलोकी गमन केले.आपले शरीर सुटत असतांना आपणही निष्काम भक्ती करीत परमात्म्याच्या ठिकाणी चित्ताची धारणा करीत शरीर सोडावे.||४९|| | द्रौपदी च तदाssज्ञाय पतीनामनपेक्षताम् | वासुदेवे भगवति ह्येकान्तमतिराप तम् ||५०|| भावार्थ:---इकडे दौपदी हि त्यावेळी आपणाविषयी आपल्या पतीची निरिच्छता झाली असे पाहून,षडैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णभगवंताचे ठिकाणी एकाग्रचित्त होत असता तत्स्वरुपी लीन झाली.आपल्या देहसंबंधीची आपणाविषयी निरिच्छता---म्हणजे आपण नको अशी भावना झाली असेल तर आपण परमात्म्याच्या ठिकाणी ऐकाग्रचित्त करून तत्स्वरुपी लीन व्हावे.||५०|| | य: श्रद्धयैतद् भगवत्प्रियाणां पाण्डो: | सुतानामिती सम्प्रायणम् | | श्रुणोत्यलं स्वस्त्ययनं पवित्रं | लब्ध्वा हरौ भक्तिमुपैति सिद्धिम् ||५१|| भावार्थ:---असे हे,श्रीकृष्ण प्रिय पांडूपुत्राचे उत्तम माहप्रस्थान अत्यंत मंगलकारक व अतिपवित्र आहे.यास्तव जो मनुष्य,भक्तिपूर्वक याचे श्रवण करितो,तो श्रीकृष्णाचे ठिकाणी भक्ती पावोन मोक्ष सिद्धीसह पावतो.म्हणून आपण पादुपुत्रांचे चरित्र निष्काम भक्तिपूर्वक श्रवण करावे,कारण त्यामुळे आपली श्रीकृष्णांच्या ठिकाणी निष्काम भक्ती प्राप्त होऊन मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त होऊन जन्म—मरण निवृत्त होते.मनुष्य-देहाचे सार्थक होते.||५१|| १५---या प्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील प्रथम(१)स्कंधामध्ये पांडवाचे स्वर्गारोहण कथांरूप हा (१५) अध्याय (५१)एकावन्न श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१५--५१|| | ||श्रीकृष्णार्पनामस्तु—सदगुरूचरणार्पनामस्तु || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १६-----नंतर मूर्तिमान्-धर्म व पृथ्वी ही उभयंता कलीपासून पिडीत झाल्यामुळे खिन्न होऊन परस्पर भाषण करत असता,त्याकाळी त्यांच्याजवळ परीक्षिती राजा प्राप्त झाला ही कथा सोळाव्या अध्यायांत वर्णन केलेली आहे.||१६|| | १६---[परिक्षितीला दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | सूत उवाच:--- | तत: परीक्षिद् द्विजवर्यशिक्षया महीं महाभागवत: शशास ह | | यथा हि सूत्यामभिजातकोविदा: समदिशन् विप्र महद्गुणस्तथा ||१|| भावार्थः---सुत म्हणाला----हे शौनका,पांडवांनी स्वर्गारोहन केल्यानंतर,ज्याच्या जन्मकाली जातकाचे फळसांगणाऱ्या ब्राहमणांनी हा चांगल्या रीतीने राज्य करील असे सांगितले होते त्याप्रमाणेच,राजर्षीच्या मोठ्या गुणांनी युक्त असा तो महाभागवत परीक्षितीराजा,धौम्यकृषादिक ब्राह्मणश्रेष्ठांच्या आज्ञेने समुद्रवलयांकित पृथ्वीचे पालन करू लागला.त्याचप्रमाणे आपणही कुंटूंबचे पालनपोषण करावे,तोच आपला स्वधर्म आहे.||१|| भावार्थः---त्याने उत्तरनामक आपल्या मातुलाच्या इरावतीनामक कन्येशी विवाह केला आणि तिचे ठिकाणी जनमैजयादिक च्यार पुत्र उत्पन्न केले.आपणास जर गृहस्थाश्रमात प्रवेश करावयाचा असेल तर आपम कुलीन सात्विक स्त्रीसी वैदिक पद्धतीने विवाह-संपन्न होऊन पत्नी हि आपली अर्धांग्नी असे समजून प्रेमपूर्वक जीवन व्यतीत करावयास पाहिजे.आपण त्या पत्निपासूनच पुत्र उत्पत्ती करावयास पाहिजे.आपले शारीरिक संबंध अन्य स्त्रीसी येऊ देऊ नये,कारण पत्नि सोडून अन्य स्त्रिया आपल्या माता—आई—भगणी—बहिणी असतात,असे शास्त्राचे वचन आहे.त्या नियमाचे पालन आपण करावे.||२|| भावार्थः---नंतर त्या परीक्षितिने कृपाचार्यास गुरु करून भागीरथीच्यातीरी बहुदक्षिणायुक्त असे तीन अश्वमेध केले.त्या यज्ञांत सर्व देव,आपले हविर्भाग घेण्याकरिता प्रत्यक्ष आले होते.||३|| भावार्थः---एकेवेळी त्या परीक्षित राजाने दिग्विजयप्रसंगी मुर्तिमान कलीचा आपल्या पराक्रमाने निग्रह—ताब्यात घेतले. कारण,तो शूद्ररुपी कली,राजचिन्हे धारण करून गाय व वृषभ या उभयंतास आपल्या चरणाने ताडण—मारीत करीत होता.ज्या गाईमुळे आपणांस शेतीची मशागत करण्याकरिता बैल मिळतात.त्यांच्या मेहनतीमुळे धान्य मिळते व त्यामुळे आपली—मानवांची उपजीविका चालते.गाईपासून आपणांस उत्तम प्रकारचे दुध व असून दही ,तक,लोणी व तुप मिळून शरीराचे पोषण व आरोग्य मिळते.गाईच्या शेणापासून उत्तम प्रकारचे शेन मिळते व त्या शेणापासून सडासंमार्जन होऊन घराचे आरोग्य वाढते.गाईचे मुत्र सेवन केले तर आपले आरोग्य वाढते.याप्रमाणे गायचे मानवांवर असंख्य उपकार आहेत,म्हणून हि वंदनीय आहे—दर्शिनीय आहे.असे असतांना त्या गिला लातांनी मारणे निंदनीय आहे,म्हणून त्या तमोगुणी मनुष्यास ताब्यात घेऊन शासन केले.आपणही इंद्रीयांनी कांही अधर्म केला तर त्यास शासन करावे.||४|| भावार्थः---शौनक म्हणाला-----सुता,परीक्षिती राजाने,आपल्या दिग्विजयामध्ये वध करण्यास योग्य अशाही त्या कलीचा कोणत्या कारणासत्व केवळ निग्रहमात्र केला?कारण,तो कली शुद्ररूपाने राजचिन्हे धारण करणारा,अतिनीच आणि गाय व वृषभ यांस लत्ताप्रहार करणारा होता.जो उपकारी त्याच्यावर अपकार करतो,त्यास शासन करावयास पाहिजे.||५|| भावार्थः---हे महाभाग्यशालीन सुता,ते परीक्षिताचे कलीनिग्रहरूप चरित्र,जर श्रीकृष्णकथेचा आश्रय करणारे असेल अथवा श्रीकृष्णाच्या चरणकमलांतील मकरंदाचे आस्वादन करणाऱ्या सत्पुरुषाच्या कथेचा आश्रय करणारे असेल तर सांगावे.कारण,ज्या इतर दुर्भाषणांनी आयुष्याचा केवळ व्ययमात्र होतो ती मिथ्याभाषणे बोलून व ऐकून काय उपयोग आहे?आपण संत—महात्मा,भगवंत,देश-भक्त यांचे चरित्रे श्रवण करावी,कारण त्यांच्यापासून सत्विक-बोध घेऊन आपले हित होत असते,तर देहसंबंधीचे चरित्रे ऐकून अहित होत असते किंवा मनोरंजन होत असते.||६-७|| | न कश्चिन्म्रियते तावद् यावदास्त इहान्तक: | | एतदर्थ हि भगवानाहूत: परमर्षिभि: | | अहो नृलोके पीयेत हरिलीलामृतं वच: ||८|| भावार्थः---हे प्रिया सुता,अल्पायुषी व मरणधर्मी अशा मनुष्यांच्या प्राणनाश करणारा जो मृत्यू,त्याला आम्ही या सत्रांत पूर्वीच बोलावून आणून त्याच्याशी असा ठराव केला आहे कि,त्याने येथे पशूच्या हिंसाकर्माविषयी मात्र प्रवृत्त व्हावे||८|| | मन्दस्य मन्दप्रज्ञस्य वयो मन्दायुषश्च वै | | निद्रया ह्रियते नक्तं दिवा च व्यर्थकर्मभि: |९|| भावार्थः---म्हणून तो मृत्यू येथे आहे तोपर्यंत या सत्रात दुसरे कोणीही मरावयाच नाही.याकरिताच श्रेष्ठ ऋषींनी त्या मृत्युरूपी भगवंतास येथे बोलावीले आहे.म्हणून या मनुष्यलोकी सर्व लोकांनी हरिलीलारुपी अमृतयुक्त भाषाणानेच निर्भयकर्णद्वारा प्राशन करावे.||९|| भावार्थः—त्यावांचून अल्पायुषी,आळशी व मंदबुद्धी अशा पुरुषाचे आयुष्य,अर्धे रात्रीचे निद्रेने फुकट जात आहे व अर्धे दिवसाचे कर्मांनी फुकट जात आहे.आपले आयुष्य रात्रीत झोपिमुळे वाया जाते व दिवसा निरर्थक किंवा अनार्थाक्कार्मांनी वाया जाते,म्हणून आपण निरर्थक किंवा अनर्थक कर्मे न करता सार्थक-कर्मे करावी.जेणेकरून सुख—देव जोडेल.||१०|| भावार्थः---सुत म्हणाला---हे शौनका,कुरुजागल देशांतील ह्स्तीनापुरामध्ये राहणारा व युद्धामध्ये शूर अशा परीक्षिती राजाने, आपल्या सैन्याने रक्षण केलेल्या देशामध्ये कली प्रविष्ट झाला हि,स्वतः अप्रिय असूनही युद्धप्रसंग उपस्थित झाल्यामुळे किंचित प्रियकारक अशी वार्ता जेव्हा ऐकिली तेव्हा,त्या दुष्टाच्या निग्रहासाठी ह्स्तामध्ये धनुष्य ग्रहण केले.कली म्हणजे अधर्मंयुक्त—परधर्मंयुक्त आचार असेल त्यास दंड करावा—शासन करावे.||११|| भावार्थः---नंतर उत्तमप्रकरे श्रुंगारलेला,श्यामवर्ण अश्व जोडलेला आणि सिंहचिन्हयुक्त ध्वजाने सुशोभित अशा आपल्या रथांत बसून तो परीक्षिती राजा,रथ,अश्व,गज आणि पायदळ अशा चतुरंगसेनेने परिवेष्टित होऊन हस्तीनापुरातून,दिग्वि--- जयकरीता बाहेर निघाला.आपणांस कोणतेही कार्य साध्य करण्याकरिता साधनांसह जावावयास पाहिजे.||१२|| अर्थः---त्याने भद्राश्व,केतुमाल,भारत,उत्तर कुरुदेश आणि किंपुरुषादीक सर्व खंडे जिंकून तेथील राजांपासून करभार घेतला.||१३|| भावार्थः---आणि त्या त्या ठिकाणाच्या लोकांनी वर्णन केलेले आपल्या पूर्वज भरतादिक महाप्रतापी राजांचे ते कृष्णमहात्म्यसूचक यश,श्रवण केले.||१४|| भावार्थः---आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रतेजापासून श्रीकृष्णाने केलेले आपले संरक्षण,यादव व पांडव यांचा परस्पर अकृत्रिम स्नेह व त्यांची श्रीकृष्णाचे ठिकाणी स्वाभाविक भक्ती-------------||१५|| भावार्थः---हि सर्व त्या त्या देशच्या लोकाकडून श्रवण करून महा--उदार अशा त्या परीक्षिताने परम संतुष्ट व प्रीतीने प्रफुल्लीतनेत्र युक्त होऊन,त्या लोकांस बहुमुल्य वस्त्रे आणि मौक्तिकादिकांचे हार बक्षीस दिले.आपल्या पूर्वजांची कोणी स्तुती केली असेल तर आपन्न कांहीना-कांही मानसन्मान किंवा वस्तू भेट म्हणून देणे आपले कर्तव्य ठरत असते.||१६|| भावार्थः---तसेच ज्या श्रीकृष्णास सर्व जग वंदन करीत आहे.तो प्रभू,भक्तवास्त्सल्यानेच स्नेह युक्त पांडवांचे ठिकाणी सारथ्य,सभेमध्ये प्रमुखपणाचा स्वीकार,चित्तानुकुल वर्तन,दुत्कर्म,उभ्यांनी हातांत खड्ग धारण करून रात्रभर जागरण करणे.त्यांच्या मागून चालणे,स्तुती करणे आणि नमस्कार करणे इत्यादी कर्मे करीत असे,असे परीक्षिती राजाने ऐकून तो राजा,श्रीकृष्णाच्या चरणार्विंदी अतिशयेकरून प्रेमभक्ती करूं लागला.आपण—जीवानी भगवंतांच्या ठिकाणी निष्काम भक्ती केली असता भगवंत आपण न सांगता सर्व कामी करीत असतो.ज्याप्रमाणे राजा परिक्षितीनी भगवंतांची कीर्ति ऐकून भगवंतांची निष्काम भक्ती केली,त्याप्रमाणे आपणहि भगवंतांची निष्काम भक्ती करावी.||१७|| | धर्म: पदैकेन चरन् विच्छायाममुपलभ्य गाम् | | पृच्छति स्माश्रुवदनां विवत्सामिव मातरम् ||१८|| भावार्थः---हे शौनक याप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या वर्तनाला अनुसरून तो परीक्षिती राजा,प्रत्यही वागत,इतक्यामध्येच जे एक आश्चर्यकारक कृत्य झाले ते तूं मनपासून श्रवण कर.||१८|| भावार्थः---साक्षात धर्म,वृषभरूप धारण करून,एका पायाने लंगडत लंगडत संचार करीत असतां,एके ठिकाणी अपत्य मरण पावलेल्या मातेप्रमाणे जिच्या तोंडावर अश्रू पडत आहेत व निस्तेज अशा गोरूपधारण केलेल्या पृथ्वीस अवलोकन करून तिला प्रश्न करूं लागला कि,-------------||१९|| भावार्थः---धर्म म्हनाला----हे कल्याणी,तुझ्या देहाला आरोग्य आहे कि,तुझे मुख किंचित म्लान झाल्यामुळे तूं निस्तेज झाली आहेत,तुझ्या अंतःकरणांत कांही तरी व्यथा आहे असे मी समजतो.यास्तव हे माते,तुझा एखादा बंधू दूर गेल्यामुळे त्याचा तूं शोक करितेस कि काय?ज्याप्रमाणे धर्माने गाईचे दु:ख जाणून व्थथेची विचार—पूस केली,त्याप्रमाणे आपणही इतरांच्या दु:खांच्या--व्यथेची विचार—पूस करून व्यथा जाणून दु:ख निवारण करण्याचा प्रयत्न करावा.||२०|| भावार्थ:---किंवा तीन पायांनी रहित असा मी एका पायाने लंगडत फिरतो म्हणून तूं माझा शोक करितेस?अथवा यापुढे शुद्रप्राय राजे आपला उपभोग घेतील म्हणून तूं आपला यच शोक करितेस काय?किंवा ज्याचे हविर्भाग नष्ट झाले आहेत अशा देवादिकांचा शोक करितेस?अथवा इंद्राने वृष्टी केली नसतां दुर्भिक्षाने पिडीत झालेल्या प्रजादुःख पावतील म्हणून त्यांचा शोक करितेस कि काय ? ||२०|| भावार्थः---हे पृथ्वी,पती व पुत्र यांनी रक्षण न केलेल्या स्त्रियांचा अथवा आई बापांनी रक्षण न केलेल्या बालकांचा किंवा तेच पतिपुत्र किंवा आई बाप,त्या स्त्रियास अथवा बालकांस उलटे मनुष्यभक्षक राक्षसाप्रमाणे क्लेश देतील म्हणून त्याचा शोक करितेस काय?किंवा कुकर्माविषयी रत अशा ब्रहमणकुलामध्ये राहिलेल्या वाग्देवीचा(सरस्वतीचा)अथवा ब्रहमणभक्ती- हीन अशा राजकुलामध्ये लोभामुळे सेवा करणाऱ्या ब्राहमणाचा तूं शोक करितेस काय?||२२|| भावार्थ:---किंवा कलीने व्यापलेला राजांचा,अथवा त्या दुष्ट राजांनी उद्वस्त केलेल्या सर्व देशांचा,किंवा विधीनिषेधांचे भय न मानता जिकडे तिकडे अन्नादिकांचे भोजन,उद्कांदिकांचे प्राशन,वस्त्रे,अभ्यंगादि स्नान व मैथुन इत्यादी कर्माविषयी यथेच्छ प्रवृत्त झालेल्या सर्व जीवांचा तूं शोक करितेस कि काय?||२३|| भावार्थः---किंवा हे माते,तुझ्यावर झालेला बहुभार दूर करण्यासाठी अवतार घेतलेला श्रीकृष्ण गुप्त होऊन त्याने तुझा त्याग केला म्हणून हे धरित्री,त्याची मोक्षसुख दायक कर्मे स्मरण करून,त्याचा वियोग झाल्यामुळे तूं खेद मानितेस काय?||२४|| | धरण्युवाच | भगवान् हि वेद तत्सर्वं यन्मां धर्मानुपृच्छसि | | चतुर्भिर्वर्तसे येन पादैर्लोकसुखावहै: ||२५|| भावार्थः---हे वसुंधरे,सर्व बलीष्ठानमध्ये अतिबलवत्तर अशा कालाने,देवांनीही पूज्य असे तुझे सौभाग्य आज हरण केले कि काय?तर जेणेकरून तूं खिन्न झाली आहेस ते तुझ्या मनःपीडेचे मूळकारण मला कथन कर.||२५|| | सत्यं शौचं दया क्षान्तिस्त्याग: सन्तोष आर्जवम् | | शमो दमस्तप: साम्यं तितिक्षोपरति: श्रुतम् ||२६|| भावार्थः---पृथिवी म्हणाली----हे धर्मा,जे तूं मला विचारीत आहेस ते सर्व तूं जाणतच आहेस.तथापि ते मीच सांगावे अशी तुझी इच्छा असेल तर सांगते ऐक,-----------------ज्या श्रीकृष्णाच्या आश्रयाने,तप,शौच,द्या व सत्य लोकसुखकारक चार पायांनी तूं पूर्ण वर्तत होतास,-------------धर्म हा श्रीकृष्णाच्या आश्रयाने राहतो.धर्म हा श्रीकृष्णाच्या आश्रित आहे.धर्मास चार पाय आहेत.त्या चार पायांवर धर्म आहे----तप,शौच,दया,व सत्य हे चार पांय आहेत तप:---१—शारीरिक तप:--—तप म्हणजे शरीरास कष्ट देणे होय.शारीरिक,वाचिक,व मानसिक असे तीन प्रकारचे तप आहे.आपण साधना करून (१)देव,(२)ब्राह्मण(३)गुरू—शब्दाने आई—वडिल,आचार्य,आणि वृद्ध तसेच आपल्याहून कोणत्याहि बाबतीत श्रेष्ठ असणारे सर्वच समजावे.(४)सदगुरू—म्हणजे वेदांत—शास्त्राचा-ज्ञानी—संत—महात्मा—श्रोत्रीय--ब्रह्मनिष्ट,आणि कृपाळू यांचे पूजन,पावित्र,सरळपणा,ब्रह्मचर्य,आणि अहिंसा,यास “शारीरिकतप” म्हणतात.२---वाणीचे तप:—--म्हणजे (१)जे शब्द इतरांना बोचणार—कष्ट देणार नाहीत अशा शब्दांचा उच्चार न करणे,तर (२)प्रिय,हितकारक,आणि यथार्थकारक,(३)वेदांत-शास्त्रांचे पाठ—पाठांतर आणि (४)नाम-जपाचा उच्चार करणे यास “वाणीचेतप” असे म्हणतात.३---मानसिक तप:---(१) मनाची प्रसन्नता (२) शांत-भाव (३) भगवंतांचे चिंतन (४) मनाचा निग्रह(५) अंत:करणाच्या भावांची चांगल्या प्रकाराची पवित्रता यास “मानसिक तप” असे म्हणतात.शौच:---शौच दोन प्रकारचा आहे.(१)बाह्य शौच:---स्थुल शरीराची बाहेरून किंवा आतील शुद्धता किंवा बाह्य पदार्थाचा शौच—घर,कपडा,भांडी,वस्तू यांची शुद्धता असावी.(२)अंतर शौच म्हणजे सुक्ष्म—लींग शरीराची--अंत:करणाची शुद्धता—काम,क्रोध,लोभ,मोह,मद-अहंकार,मत्सर—द्वेष यांची निवृत्ती.(३)कारण—शरीराची शुद्धता---जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाची-परमात्म्याचीप्राप्ती-परोक्ष-ज्ञान(४)महाकारण-देहाचीशुद्धता-अपोरोक्ष-ज्ञान-शब्दातीत-गुणातीत-तूर्य. आपल्यात महाकारण देहाची शुद्धता असावी,कारण यामुळे जन्म—मरण निवृत्त होतात-परमात्मरूपता—सुखरूपता प्राप्त होते.३---दया:---इतर जीवांचे दु:ख निवृत्त करणे किंवा वस्तू किंवा स्वधर्मयुक्त विषय दान करून त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे त्यास “दया”असे म्हणतात.आपल्यात दया भाव असावा.४--सत्य:---(१)पारमार्थिक सत्य:---सत्-फक्त एक—अद्वितीय--परमात्माच आहे,व त्याशिवाय सर्व आहे मिथ्या आहे.मिथ्या म्हणजे सत्-नाही व असत्-हि नाही,तर सत्-आणि असत्-याहून विलक्षण वेगळा असणारा जो पदार्थ आहे त्यास “मिथ्या” पदार्थ असे म्हणतात.(२)एक याव्हारिकदृष्ट्या सत्य व दुसरा व्यावहारिकदृष्ट्या खोटा शब्द होय.म्हणून आपण--जीवांनी मनात जो शब्द आहे,त्यानुसार बोलावे—उच्चारण करावे,जेसे आपण बोलोलत—उच्चारण केले,त्यानुसारच वागावे--आचरण करावे.अशा प्रकारच्या आचरणास—वागण्यास “सत्य” असे म्हणतात.आपल्या मनात जो शब्द आहे,त्यानुसार शब्दाचे उच्चारण न करता वेगळेच उच्चारण करणे व जसे शब्दाचे उच्चारण केले त्यानुसार आचरण न करता वेगळेच आचरण करणे यास “खोटे” असे म्हणतात.आपण—जीवानी सत्य वागावे—सत्य आचरण करावे,सत्य वागणे आपला—जीवाचा स्वधर्म आहे.स्वधर्म हा सुखाला कारण आहे,तर खोटे वागणे—आचरण करणे परधर्म आहे व दु:खास कारण आहे.म्हणून आपण—जीवानी खोटे वागू—खोटे--आचरण करू नये.||२६|| | ज्ञानं विरक्तिरैश्र्वर्यं शौर्यं तेजो बलं स्मृति: | | स्वातन्त्र्यं कौशलं कान्तिर्धैर्य मार्दवमेव च ||२७|| भावार्थः---आणि २---सत्य,शौच,दया,क्षमा,दान,संतोष,सरळ स्वभाव,मनाचे धैर्य,बाह्य इंद्रियांचे स्थिरत्व,स्वधर्माचरण,लाभा-लाभ,सहनशीलता,लाभ झाला असतांही उदासीनता,शास्त्राच्या विचार,-------------||२७|| | प्रागल्भ्यं प्रश्रय: शीलं सह ओजो बलं भाग: | | गाम्भीर्यं स्थैर्यमास्तिक्यं कीर्तिर्मानोऽनहंकृती: ||२८|| भावार्थः---आत्मनात्मविचार,निरिच्छता,ऐश्वर्य,शौर्य,प्रताप,बळ,स्मरण,स्वतंत्रत्व,निपुणता,सौंदर्य,धैर्य,कोमलपणा,-------||२८|| | एते चान्ये च भगवन्नित्या यत्र महागुण: | | प्रार्थ्यामहत्त्वमिच्छद्भिर्न वियन्ति सम कर्हिचित्त् ||२९|| भावार्थ:---प्रोढपणा,विनय,सुस्वभाव,मनाचीशक्ति,पंचज्ञानेद्रीयांचीशक्ति,पंचकार्मेद्रीयांचीशक्ति,भोगाधीष्ठानात्व,गांभीर्य, अचंचंलत्व,विश्वासयुक्तबुद्धी,कीर्ति,मान,गर्वाचा,---------------||२९|| | तेनाहं गुणपात्रेण श्रीनिवासेन साम्प्रतम् | | शोचामि रहितं लोकं पाप्मना कलिनेक्षितम् ||३०|| भावार्थः---हे भगवन धर्मा,हे “एकूणचाळीस(३९) गुण” व महत्त्वाची इच्छा करणाऱ्या पुरुषांनी प्रार्थना करण्यास योग्य असे इतरही ब्राहमणद्याळूत्व शरणागतवत्सलादिक मोठमोठे गुण ज्याच्या स्वरूपी नित्य (स्वभाविक)असून ते कधीही नाश पावत नाहीत.आपण—जीवानी हे वर सांगितलेले ऐकोनचाळीस गुण व इतर ब्राह्मण-दयाळूत्व व शरणागतवात्सालादिक मोठ-मोठे गुण साधू—महात्मा यांच्याद्वारे त्यांचा सत्संग करून सत्संगाद्वारे आपल्या अंत:करणात प्रयत्नाने आणण्याचा आवश्य प्रयत्न करावा.काराण त्याद्वारे आपण—जीवानी निष्काम भक्तीद्वारा जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञानाद्वार मोक्ष प्राप्त करून जन्म—मरण निवृत्त करून परमात्मरूप--आनंदरूप होणार आहोत.||३०|| | आत्मानं चानुशोचामि भवन्तं चामरोत्तमम् | | देवान् पितृनृषिन् सर्वान् वर्णांस्तथाश्रमान् ||३१|| भावार्थः---असा जो सर्व गुणांचे पात्र व लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण त्याने सांप्रतकाली रहित झालेला असून पापरूपी कलीने अवलोकन केलेला जो सर्व लोक,त्याचा मी शोक करिते.भगवंत श्रीकृष्ण वर्तमानकाळात मृत्यू-लोकातून निघून गेलेले आहेत व त्यामुळे कलीने राज्यात प्रवेश केलेला आहे,म्हणून आपण दु:खी झालेलो आहोत.||३१|| भावार्थः---श्रीकृष्णाच्या वियोगामुळे मी आपला व देवश्रेष्ठ अशा तुझाही शोक करिते.इंद्रादी देव,अग्नीष्वातादि पितर,ऋषी,साधू तसेच ब्रह्माणादिक सर्व वर्ण व ब्रहमचर्यादीक सर्व आश्रम,यांचा शोक करिते.म्हणून सर्व लोक दु:खी असल्यामुळे आपण व सर्व लोक दु:ख भोगीत आहोत.||३२|| भावार्थः---हे धर्मा,श्रीकृष्णाचा विरह फारच दुःसह आहे.कारण,ज्या लक्ष्मीची आपणावर कृपावृष्टी व्हावी म्हणून ब्रह्मादिक देवानीही भूत काळपर्यंत तपश्चर्या केली.अशी सर्वांनी जी लक्ष्मी सेव्य ती,आपले राहण्याचे स्थान कमलवनसुद्धा सोडून ज्या श्रीकृष्णाच्या चरणसौभाग्याने अतिप्रीतीने सेवन त्या भगवंताच्या कमल,व्रज,अंकुश व ध्वज या चिन्हांनी युक्त अशा सुंदर पावलांनी माझे शरीर उत्तमप्रकारे भूषित झाले होते आणि त्या भगवंतापासून सर्व संपत्ती मला प्राप्ती झाली असता मी त्रैलोक्यापेक्षाही अतिशयेकरून शोभत होते.परंतु त्या ऐश्वर्याचा नाश काल प्राप्त झाला तेव्हा मला गर्व होतांच त्या भगवंताने,माझा त्याग केला.ज्याप्रमाणे भगवंतांनी पृथ्वीचा त्याग केल्यामुळे पृथ्वीमाता दु:खी झाली आहे,त्याप्रमाणे आपणही जोपर्यंत परमात्म्याचा अनुभव येत नाही,तोपर्यंत सत्संग करून,अधिकारसंपन्न होऊन व साधनावर आरूढ होऊन परमात्म्याचा अनभव येईपर्यंत प्रत्येक क्षण पारमार्थिक कार्यासाठी खर्च करावा.||३३--३४|| भावार्थः---हे धर्मा,ज्या स्वतंत्र्य भगवंताने माझ्यावर झालेला असुरवंशातील राजांचा शंभर अक्षौहिणीरूप अतिभार दूर केला आणि तीन पायांनी न्यून अतिदुःखित असलेल्या तुला आपल्या पराक्रमाने आपले ठिकाणी चारही चरणांनी पूर्वदशेस आणण्याकरिता ज्याने यादवांमध्ये सुंदर अवतार धारण केला-----------||३५|| | तयोरेवं कथयतो: पृथिवीधर्मयोस्तदा | | परीक्षिन्नाम राजर्षि: प्राप्त: प्राचिं सरस्वतीम् ||३६|| भावार्थः---त्याप्रमाणेच प्रेमपूर्वक अवलोकन,मनोहर हास्य आणि मनोवेधक भाषणे यांच्या योगाने उत्पन्न झालेल्या सत्यभामादिक स्त्रियांचा उद्धटपणा (ताठा)ज्याने गर्वासहवर्तमान हरण केला व ज्याची पावले माझ्या धुरळायावर उमटल्यामुळे माझ्यावर (धान्यदिकांचच्यामिषाने)रोमांच उठत असत.त्या पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्णाचा विरह कोण बरे स्त्री करील?कोणीही करणार नाही.ज्या रीतीने पृथ्वी-माता भगवंतांच्या विरहाने—वियोगाने दु:खी आहे,त्याप्रमाणे आपण—जीवानी परमात्म्याचा अनुभव येई-पर्यंत दु:खी असावयास पाहिजे.||३६|| भावार्थः---याप्रमाणे ते पृथ्वी व धर्म हे पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तीरी(कुरुक्षेत्रांत)परस्पर भाषण करीत असता त्याच वेळी परीक्षितीनामक राजर्षी,तेथे प्राप्त झाला.||३७|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |१६-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम (१)स्कंधामध्ये पृथ्वीधर्मसंवादरूप हा सोळावा अध्याय सदोतीस(३७)श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१६--३७|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तू—श्रीसदगुरुअर्पणामस्तू|| ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १७-----आतां या सतराव्या (१७)अध्ययामध्ये,पराक्रमी अशाहि परीक्षितीराजास पुढें अद्भुत वैराग्य झालें हे सांगण्यासाठी त्याने केलेला कळीचा निग्रह वर्णन केला आहे.||१७--३७|| | १७--[४---महाराज परीक्षितीकडून कलियुगाचे दमन] | सूत उवाच:--- | तत्र गोमिथुनं राजा हन्यमानमनाथवत् | दण्डहस्तं च वृषलं ददृशे नृपलाछनम् ||१|| भावार्थः—सुत म्हणाला----हे ऋषीहो,त्या सरस्वती नदीच्या तीरी अनाथाप्रमाने—ज्यांना कोणी नाथ नाही याप्रमाणे ताडन—मार खात असलेले असलेले गाय व वृषभ यांचे जोडपे राजाने आणि राजचिन्हे धारण करून हातांत दंड घेतलेला एक शुद्र (कली)पाहिला.||१|| भावार्थ:---त्यांपैकी वृषभ (धर्म)तर अगदी कमलकंदाप्रमाणे शुभ्रवर्ण असून भयाने प्रतिक्षणी मुत्रत्यागच करीत आहे कि काय अशा स्थितीने एकापायांवर उभा राहिलेला असल्यामुळे त्यास क्लेश—दु:ख होत होते व शुद्र ताडन—शिक्षा करीत असल्यामुळे तो अगदी थरथर कांपत होता.आपणांसही कोणी शिक्षा करीत असेल तर आपले शरीर थरथर कांपेलच, कारण शिक्षा कोणत्याच जीवाला आवडत नाही.||२|| अर्थः---तशीच ती गाय (पृथ्वी)होमद्रव्यांस उत्पन्न करणारी असून शुद्राच्या लत्ताप्रहाराने अत्यंत दिन झालेली,वत्सरहित (धान्यदिरहीत)असल्यामुळे मुखावरून चाललेल्या अश्रूधारांनी युक्त आणि यज्ञकर्माच्या लोपामुळे कृश होऊन यज्ञरूप तृणाची अपेक्षा करीत होती.||३|| | कस्त्वं मच्छरणे लोके बलाद्धांस्यबलान बली | नरदेवोsसि वेषेण नटवत्कर्मणाsद्विज: ।।५।। भावार्थः---याप्रमाणे त्या उभयंतास अवलोकन करून सुवर्णखचित रथांत बसलेला तो परीक्षिती राजा,आपले धनुष्य सज्ज करून मेघासारख्या गंभीर वाणीने त्या शूद्रादिकांस प्रश्न करू लागला कि,---------||४|| भावार्थः---हे दुष्टा तूं कोण आहेस?मी या लोकाचे रक्षण करीत असतां,तूं बलात्काराने त्या दुर्बलास ताडन करितोस हे काय?मी राजा आहे,तूं केवळ नटासारख्या—बाह्य वेषाने मात्र राजा दिसतोस पण तुझे कर्म पाहू गेले तर निःसंशय शुद्र आहेस.कर्मावरून आपण कोण आहोत असे ठरत असते व गुणांनुसार कर्म केल्या जात असते.थोडक्यांत गुणाला महत्व आहे.”भारतीय संस्कृती—वैदिक“संस्कृती हि अहिंसाप्रधान व गुणाधारित” आहे,तर जन्माधारित—जातीआधारित—धर्माधारित—पंथाधारित नाही.” असे दिसून येते.म्हणून आपण वैदिक आधारित--अहिंसाधरीत--गुणाधारित जीवन जगावे व आपले कल्याण करून घ्यावे.वारकरी सांप्रदाय हा अहिंसाधारीत--गुणाधारित आहे,तर जन्माधारित किंवा जाती-नाही.वारकरी सांप्रदायात पूर्वीही व आजही अनेक जातीचे लोक दिसून येतात व मंदिरात देवाच्या दर्शणांसाठी सर्वांना प्रवेश आहे”.जो स्वधधार्मांनुसार जीवन जगणार नाही,त्यांना सत्ताधाऱ्यांनी शिक्षा करणे हा सत्ताधाऱ्यांचा स्वधर्म आहे व शिक्षा स्वीकारणे हा अपरांध्याचा स्वधर्म आहे.शिक्षेचा स्वीकार केला तरच पुन्हा अपराध होत नसतो व आपन स्वधर्म पालन करण्यास प्रवृत्त होत असतोत.त्यातच आपले हित होऊन सुखाकडे जात असतोत.म्हणून आपल्या सुखासाठी प्रत्येकांने—प्रत्येक—जीवांनी आपापल्या स्वधर्मांचे पालनच करावे,तर परधर्मांचे पालन करू नये,कारण परधर्म हा दु:खाला कारण आहे.” म्हणजे ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार ज्याच्या—त्याच्या वाटेला जे कर्तव्य आलेले आहे,त्यानुसार तेच कर्तव्य पार पाडणे यास “स्वधर्म” असे म्हणतात.” “परधर्म म्हणजे इतरांच्या अधिकारानुसार इतरांच्या वाटेला जी कर्तव्य आलेली आहेत,ती कर्तव्य आपण पार पाडणे,यास “परधर्म” असे म्हणतात.उदा—जो “जिल्हा प्रमुख”आहे,त्यांनीच पूर्ण जिल्हा यांचेच शासन करणे व जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार तालुका-प्रमुखाने तालुक्याचे शासन करणे.असे शासन करणे यास आपापल्या स्वधर्मांचे पालन करणे असे म्हणतात.यासच “स्वधर्म” असे म्हणतात.म्हणून आपण परधर्मांचे पालन करू नये,म्हणजे तहशील प्रमुखाने जिल्हा प्रमुख जो आहे,त्यांच्या आदेशांचे पालन न करता आपल्या स्वत:च्या मतानुसारच शासन करणे,यास “परधर्म” असे म्हणतात.प्रत्येकाने आपापल्या मतानुसार राज्य-शासन केले तर योग्य होईल काय ? अर्थातच होणार नाही,म्हणून प्रत्येकांनी आपापल्या स्वधर्मांचेच पालन करावे.हेच स्वधर्मांचेच पालन सर्वांसाठी सुखकारक असणार आहे व परधर्मांचे पालन दु:खकारक असणार आहे.असा विवेक करुन जीवन व्यतीत करावे. ||५|| भावार्थः---अरे,गांडीवधनुर्धारी अर्जुनासहवर्तमान श्रीकृष्ण दूर गेला असतां,निरपराधी प्राण्यांस प्रहार करणारा तूं कोण आहेस?||६|| भावार्थः---तूं तरी कमलकंदासारखा शुभ्रवर्ण व तीन पायांनी रहित असून एका पायाने लंगडत लंगडत चालत आहेस तेव्हा तूं कोणी देव असून वृषभाच्या स्वरूपाने आमच्या अंतःकरणास खेद—दु:ख उत्पन्न करीत आहेस कि काय?||७|| भावार्थः---कारण,पुरुकुलांतील श्रेष्ठ राजांच्या बाहूदंडांनी रक्षण केलेल्या या भूतलावर,तुझ्यावांचून दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांचे शोकाश्रू कधीही पडत नाहीत.||८|| भावार्थः----हे कामधेनुच्या पुत्रा,तूं शोक करू नकोस.शूद्रापासून तुला प्राप्त झालेले भय दूर होवो.हे माते,दुष्टांचा शास्ता मी जिवंता असता तुझे कल्याण आहेच,यास्तव रुदन करूं नकोस.आपणही जे दुष्ट लोक आहेत,त्यांच्यापासून जे लोक सज्जन आहेत,त्यांचे रक्षण करावे .हाच आपला स्वधर्म आहे.||९|| | यस्य राष्ट्रे प्रजा:सर्वास्त्रस्यन्ते साध्व्यसाधुभि: | तस्य मत्त्स्य नश्यन्ति कीर्तीरायुर्भगो गति: ।।१०।। भावार्थः---हे साध्वी,ज्या राजाच्या राष्टांतील निरपराधी प्रजांस दुष्टलोकांपासून त्रास उत्पन्न होतो,त्या असावध राजाची कीर्ती,आयुष्य,भाग्य व परलोक हि सर्वही नाश पावतात.राजकीय सत्ताधाऱ्यांनी निरपराधी जे लोक आहेत,त्यांचे दुष्ट—लोकांपासून संरक्षण न केले तर राज्यशासन-कर्त्यांचे आयुष्य भाग्य,सदगती प्राप्त न होता दुर्गती—यमपुरी प्राप्त होते.म्हणून राज्य—शासन कर्त्यांनी दुष्टांना शिक्षा व सज्जनांचे पालन करावे.हाच राज्य—सत्ताधाऱ्यांचा स्वधर्म आहे.||१०|| | एष राज्ञां परो धर्मो ह्यार्तानामार्तीनिग्रह:| अत एनं वधिष्यामि भूतद्रुहमसत्तमम ।।११।। भावार्थः----यास्तव आपल्या राष्ट्रांतील पिडीत झालेल्या सज्जनांची व्यथा दूर करणे हाच राजांचा मुख्य कर्म आहे,म्हणून प्राण्यांस पिडा देणाऱ्या ह्या दुष्टाचा मी वध करितो.आपणसुद्धा आपल्या अंत:करणात जे काम—क्रोध—लोभ-मोह-मद—मत्सर व द्वेष हे शत्रू आहेत,त्यांचा नाश सत्संग करून ज्ञानाद्वारे त्याचा नाश करावा.त्यांचा नाश केला असता आपणास—जीवास शांती—समाधान मिळत असते.||११|| भावार्थः---हे चतुष्पादा कामधेनुपुत्रा,असे तीन पाय कोणी छेदिले?कारण कृष्णसेवक राजांच्या राष्ट्रांत तुझ्यासारखे दुःखी प्राणी नसावेत||१२|| भावार्थः---हे वृषभा तुम्हांसारख्या निरपराधी साधूंचे कल्याण असो.तुझ्या स्वरुपाचे विरूप करणारा व पांडवांच्या कीर्तीला दुषण लावणारा असा पुरुष कोण आहे?ते मला सांग.||१३|| | जनेऽनागस्यघं युन्जन् सर्वतोऽस्य च मद्भयम् | साधूनां भद्रमेव स्यादासाधुदमने कृते ||१४|| भावार्थः---निरपराधी सज्जनास जो दुःख देतो त्याला सर्व प्रकारांनी मजपासून—राजापासून भय उत्पन्न होते,यास्तव आम्ही दुष्ट पुरुषांचा निग्रह—शासन—दंड केला असतां तुम्हा साधूंचे कल्याणच होईल.आपण आपल्या दुष्ट—काम—क्रोध—लोभ—मोह—मद—मत्सर यांचा निग्रह—आपल्या ताब्यात घ्यावे.थोडक्यात शत्रू आपल्या ताब्यात असावा.||१४|| भावार्थः---जो निर्भयपणे निरपराधी प्राण्याचे ठिकाणी पिडा उत्पन्न करील,तो साक्षात देव असलातरी मी त्याचा,बाहूभूषणासुद्धा भूज उपटून आणीन.सज्जनांना पिडा—दु:ख देणारा जो आहे,त्यांना दंड देणे व सज्जनांचे संरक्षण करणे,राजकीय सत्ताधाऱ्यांचाच स्वधर्म आहे.म्हणून प्रत्येकांने आपापल्या स्वधार्मांचे पालन करावे.||१५|| | राज्ञो हि परमो धर्म: स्वधर्मस्थानुपालनम | शासतोsन्यान यथाशास्त्रमनापद्धुत्पथनिहा ।।१६।। भावार्थः---आपत्काल नसून या लोकी वेदमार्गाचे उल्लंघन करणाऱ्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचे निरंतर पालन करणे हाच राजाचा मुख्य धर्म होय.म्हणून राजकीय राज्यकर्त्यांनी वेदामार्गांचे उल्लंघन करणारास शासंकारावे,हाच राजकीय सात्ताधर्मियांचा मुख्य स्वधर्म आहे.||१६|| भावार्थः---धर्म म्हणाला----हे राजा,ज्या पांडवांच्या गुणांच्या समुदायांनी,षडगुनैश्वर्यसंपन्न अशाही श्रीकृष्णाला दुतत्व करावयास लाविले त्या पांडवांच्या कुलांत उत्पन्न झालेल्या तुमचे,भयभीत लोकांच्या भयाचे निवारण करणारे हे भाषण योग्यच आहे.||१७|| भावार्थः---परंतु हे पुरुषश्रेष्ठा,ज्या पुरुषापासून प्राणीमात्रांस क्लेशांची कारणे उत्पन्न होतात व त्या पुरुषास आम्ही जाणत नाही,कारण,आम्ही नानाप्रकारच्या मतवादी लोकांच्या निरनिराळ्या वादांनी मोहित झालो आहो.म्हणून आपण नाना-मतवादी इतर शात्र आहे,त्यांच्या मतांचा स्वीकार न करता,जे वेदांत—शात्र—उपनिषद—भगवतगीता—शात्र आहे त्यांच्या मतानुसार अनुकरण करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे.||१८|| भावार्थः---सर्वप्रकारच्या विकल्पांस(भेदांस)आपल्या ज्ञानबलाने आच्छादित करणारे कितीएक योगी,किंवा नास्तिक,आपल्या सुखास किंवा दु:खास कारण आत्माच आहे असे म्हणतात,दुसरे (ज्योतिषी)ग्रहादिरूप देवता सुखदुख देणाऱ्या आहेत असे म्हणतात.दुसरे(मीमांसक)कर्मच सुखदु:ख देते असे म्हणतात.तिसरे(लोकायतिक)स्वभावच सुखदु:खादिकाचा प्रभू आहे,असे म्हणतात. ||१९|| भावार्थ:---आणि जेथे मनाचा तर्क चालत नाही व ज्याचे वाणीने वर्णन करता येत नाही अशा परमेश्वरापासूनचा जगाचे उत्पत्ती स्थिती संहार होतात असा कितीएकांचा निश्चय आहे.तेव्हा हे राजर्षे,या नानाप्रकारच्या मतांमध्ये कोणते मत योग्य आहे,याचा तूं आपल्या बुद्धीने विचार कर.आपणही अनेक-जणांचे अनेकमत—मतांतरे असल्यामुळे,आपण—जीवानी सत्संग करून बुद्धीद्वार विवेक करून निर्णय घ्यावा.||२०|| भावार्थः---असे धर्म भाषण करीत असता,हे ब्रहमण श्रेष्ठा शौनक,तो सार्वभौम परीक्षिती राजा,एकाग्रचित्ताने त्या धर्म--वाक्याने खरे स्वरूप जाणून मोहरहित होत असता त्याला म्हणाला की,--------------||२१|| | राजोवाच | धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोऽसि वृषरूपधृक् | यदधर्मकृत: स्थानं सुचक्स्यापि तद्भवेत् ||२२|| भावार्थः--राजा म्हणाला--हे धर्मज्ञा वृषभा,तूं जाणत असून निश्चय न झाल्यासारख्या वाक्याने,आपल्या घातकी पुरुषासही सांगू नये,अशा अभिप्रायाने भाषण केलेस;ह्यावरून वृषभरूप धारण करणारा तूं धर्मच आहेस.कारण,अधर्माचरण कराणारास जे नरकादिक स्थान प्राप्त होते तेच त्याच्या सूचकासही प्राप्त होते.आपण अधर्माचे आचरणही करू नये व अधर्मांचे सुचकही होऊ नये,कारण अधर्माचरण करणारास जे पापांचे फळ,तेच फळ सुचकासही मिळते.||२२|| | अथवा देवमायाया नूनं गतिरगोचरा | चेतसो वचसश्वापि भूतनामिती निश्चय: ||२३|| भावार्थ:---अथवा देवामयेची गती,प्राणिमात्रांच्या मनांस व वाणींस दुर्बोध आहे असा निश्चय आहे,म्हणून न समजल्यामुळेहि आपणास दुःख देणारा अमुक असे तूं मला सांगितले नसशील.असो.||२३|| | तप: शौचं दया सत्यमिति पादा: कृते कृता: | अधर्मांशैस्त्रयो भग्ना: स्मयसंगमदैस्तव ||२४|| भावार्थ:---हे धर्मा,निष्काम तपाने स्थूल-देहाची शुद्धी व निष्काम शौचाने-पवित्रतेने अंतःकरणाची शुद्धी होते म्हणून आपण—जीवानी निष्काम तप व निष्काम शौच-पवित्रतता करावी.आपण निष्काम दया व निष्काम सत्य यानुसार आचरण करावे.हे तुझे चारपाय—१--तप,२--शौच,३--दया व ४--सत्य हे लोकांत प्रसिद्ध आहेत.त्यापैकी तप,शौच व दया हे तीन पाय नष्ट झाले आहेत.१—मद—गर्वामुळे तप नष्ट झाले,२--दु:संगामुळे—व्यभिचारामुळे शौच नष्ट झाले,३--स्मय—विस्मय—हिंसेमुळे दयाभाव नष्ट झाला या अधर्माच्या तीन अंशांनी अनुक्रमाने छिन्न—नष्ट केले.म्हणून आपण तप करावे,पण तपाचा गर्व करू नये.आपण पवित्रता ठेवावी,परंतु दु:संग—व्यभिचार करू नये.आपण दया करावी,परंतु कठोरता—हिंसा सोडावी.असे आचरण जे—जे करतील ते सुखी होतील व जे—जे असे आचरण करणार नाहीत ते—ते दु:खी होतील म्हणून आपण तप,शौच,दया,व सत्यानुसारच आचरण करावे.||२४|| | इदानीं धर्म पादस्ते सत्यं निर्वर्तयेद्द्त: | तं जिघृक्षत्यधर्मोsधर्मोsयमनृते नैधित: कलि:||२५|| भावार्थः---हे धर्मा,आतां या कलीमध्ये तुझा एक सत्यरूपी पाय(चतुर्थांश)राहिला आहे त्याच्या योगाने पुरुषाला कसे तरी तुझे साधन करिता येते परंतु त्याही तुझ्या पायांस अमृतभाषणाने वृद्धिगत झालेला हा अधर्मरूप कली,नाहीसा करण्याची इच्छा करीत आहे.वर्तमान-काळात कांही अंसी—सत्य चतुर्थांश राहिले आहे.म्हणून कांही अंशी सुख राहिले आहे.म्हणून पूर्णपणाने सत्याचा स्वीकार करून आरण करावे,कारण त्यामुळे आपण सुखी राहणार आहोत.||२५|| भावार्थः---आणि जिचा मोठा भार भगवंताने दूर केला आहे अशी गोरूपधारिणी साध्वी भूमी,त्यात भगवंताच्या ध्वजाकुंशादी चिन्हांनी युक्त अशा पदन्यासांनी सर्वत्र शोभत असे.||२६|| भावार्थः---ती हि साध्वी पृथ्वी,सांप्रतकाळी श्रीकृष्णाने आपला त्याग केल्यामुळे पतिवियोग पावलेल्या मंदभाग्य स्त्री सारखी शोभारहीत होऊन पुढे ब्राहमणभक्तीशून्य व कपटाने राजांचा वेश धारण करणारे शुद्र माझा उपभोग करितील याकारणाने नेत्रांतून अश्रू ढाळीत रुदन करीत आहे.साप्रंतकाळी—वर्तमान-काळात श्रीकृष्ण भगवंत मृत्यू-लोकातून निघून गेलेले आहेत,म्हणून कपटाने राजाचा वेश धारण करून राजसत्तेचा उपभोग घेत आहेत,म्हणून पृथ्वी—माता दु:खी होऊन नेत्रांतून आश्रू ढाळीत आहे.म्हणून आपण जे दु:खी आहेत,त्यांचे दु:ख आपल्या अधिकारानुसार नाहीसे करून त्यांना सुखी करणे आपले कर्तव्य आहे.||२७|| भावार्थः---याप्रमाणे धर्म व पृथ्वी यांचे सांत्वन करून त्या महारथी परीक्षितीराजाने,अधर्मास कारण अशा कलीच्या वधा करिता तीक्ष्णधारेचे खड्ग ग्रहण केले.जो अधर्म करितो त्यास शासन करणे राजाचा स्वधर्म आहे.आपण जो अधर्माने आचरण करतो,त्याची संगती सोडणे आपला स्वधर्म आहे,कारण संगतीने त्याचे जे अधर्माचे जे संस्कार आहेत,ते आपल्यात येऊन आपणही अधर्माने आचरण करण्याची शक्यता अधिक असते.म्हणून आपण सत्संग करावा व दु:संगाचा त्याग करावा.||२८|| | तं जिघांसुमभिप्रेत्य विहाय दीनवत्सल: | शरण्यो नावधीच्छ्लोक्य आह चेदं हसंन्निव ||२९|| भावार्थः---तेव्हा तो राजा आपणास मारण्याविषयी उद्दुक्त झाला असे जाणून तो कली,धारण केलेल्या राजचिन्हांचा त्याग करून भयाने व्याकुळ होत असता,त्या परिक्षितीच्या पायांच्या अग्रभागी मस्तक ठेवून त्यास शरण गेला.आपणही जे दु:संगी आहेत,त्यांचा त्याग केला असता,तेही आपला त्याग करतात.||२९|| भावार्थः---तेव्हा कली,आपल्या पायांवर पडला असे पाहून,दीनवत्सल,शरणागताचे रक्षण करणारा आणि सुकीर्तीचे पात्र अशा त्या परीक्षिती राजाने,करुणा युक्त होऊन त्याचा वध केला नाही आणि हास्य केल्यासारखे दाखवून असे भाषण केले की,-------------||३०|| भावार्थः---राजा म्हणाला----हे शूद्रा,हात जोडून असणाऱ्या तुला,जीतनिद्र अर्जुनाचे यश संरक्षण करणाऱ्या आम्हा राजांपासून किमपि भय होणार नाही;ज्याआर्थी तू हात जोडत आहेस,त्याअर्थी शरण आला आहेस,म्हणून तुझा मी प्राण घेत नाही.आपणही जो अपराधी आहे,तो जर आपणास शरण आला किंवा क्षमा मागितली तर आपण त्यास क्षमा करून त्यास सुव्यवस्थित वागण्याची संधी देणे आपले कर्तव्य असते.परंतु तू अधर्माचा बंधू आहेस यास्तव कोणत्याही आपल्या अंशाने माझ्या क्षेत्रांत संचार करू नयेस.कलीवर अधर्माचे संस्कार असल्यामुळे व शरण आल्यामुळे त्याचा प्राण न घेता अन्यत्र जाण्यास सांगितले.आपणही जो अधर्माने आचरण करीत आहे,त्यास अन्यत्र जाण्यास सांगावे,तर आपल्या सभोवती राहू देऊ नये.||३१|| | त्वां वर्तमानं नरदेवदेहे-ष्वनु प्रवृत्तोऽयमधर्मपूग: | लोभोऽनृतं चौर्यमनार्यमंहो ज्येष्ठा च माया कलहश्र्च दम्भ: ||३२|| भावार्थः---तूं राजाच्या देहांत प्रवेश केलास कि तुला अनुलक्षुन लोभ,असत्य,चौर्य,दुर्जनत्व,स्वधर्मत्याग,अलक्ष्मी,कपट,कलह आणि दंभ(ढोग)या अधर्मशांखांचा समुदाय चोहोकडे प्रवृत्त होतो.अधर्मांने जे वर्तन करितात त्यांची जर आपण संगती केली तर,अधर्मांच्या अनुलक्षून जे दोष—लोभ,चौर्य,दुर्जनत्व,स्वधर्म-त्याग,अलक्ष्मी,कपट,कलह आणि दंभ—ढोंग इत्यादी दुर्गुणांचा समुदाय आपल्याकडे येतोच व त्यानुसारच आपले आचरण होऊन त्याच संस्कारात वाढ होत असते.म्हणून आपण कलीची—दुर्जनांची संगती कधीच करू नये.कलीपासून सावधान—सावधान—सावधान.मग त्या अधर्मशील राजांच्या संबंधाने प्रजाही धर्मनष्ट होतात.आपण जर अधर्माची संगती केली तर,आपल्या संबंधी जेवढे आहेत,आपल्यामुळे तेही अधार्मिक होतात व त्यानुसार आचरण करतात.म्हणून विशेषत: जे इतरांचे—कुटुंब,सरपंच,आमदार,खासदार,पंत-प्रधान,मंत्री,राष्ट्रपती,मुख्यमंत्री,सचिव,जिल्हा प्रमुख,तालुका-,गांव-प्रमुख,ग्रामसेवक इत्यादी प्रमुखांनी दुर्जनांच्या संगतीत न येत त्यांना आपल्या आपल्या बाहेर हाकलून लावावे,त्यामुळे प्रमुखांच्या जे संबंधित लोकाहेत ते दुर्जन होणार नाहीत व दुर्जन न झाल्यामुळे अर्धर्मांनी आचरण करणार नाहीत.अधर्मांनी आचरण न केल्यामुळे सुखी होतील व ते सुखी झाल्यामुळे प्रमुखांविषयी आदर—भाव निर्माण होऊन तेच प्रमुख पुन्हा—पुन्हा असावेत अशी भावना निर्माण होऊन जिकडे—तिकडे आनंदाचे—रामराजाची स्थापना होऊन महात्मा पिताजी--गांधीजीचे स्वप्न साकार होईल.म्हणून आपण सर्वांनी आपापल्या स्वधर्मांनूसार आचरण करण्याचा आजपासून संकल्प करू या.||३२|| भावार्थः---यास्तव हे अधर्मबंधो,धर्म व सत्य यांनी वर्तणूक करण्यास योग्य अशा या ब्रह्मावर्त देशांत तूं वास करूं नकोस.कारण,ज्या ब्रह्मावर्त देशांत यज्ञांचे अनुष्ठान करण्यांत निपुण असे ब्रह्मणादिक वर्ण,अनेक प्रकारच्या यज्ञांनी यज्ञेश्वररुपी नारायणाचे पूजन करितात.अशा धार्मिक वातावरणांत अधर्मांनी प्रवेश करू नये.आपणही अधार्मिक-जणांना आपल्या परिसरात राहू देऊ नये.याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.||३३|| भावार्थः---आणि या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये यज्ञेकरून आराधन केलेला,स्थावरजंगमाचा आत्मा यज्ञामुर्ती,षडगुनैश्वर्यसंपन्न हरी,सर्वांच्या आंत व बाहेर व्यापून राहणाऱ्या वायूसारखा,सर्वांतर्यामी ईश्वर असनुही यज्ञ करणाऱ्या लोकांचे कल्याण व त्यांचे सर्व मनोरथ सफल करितो.असे कार्य करण्यास आपणांस श्रीहरीचा आशिर्वाद—समर्थन असतेच असते.||३४|| भावार्थः---सुत म्हणाला----याप्रमाणे परीक्षिती राजाने आज्ञा केलेला तो कली,थरथर कापूं लागला; आणि दंडपाणी याप्रमाणे हस्तांत खड्ग घेऊन वध करण्याविषयी उद्दुक्त झालेल्या परीक्षितीस असे बोलुं लागला की,-----------------||३५|| भावार्थः---कली म्हणाला-----हे सार्वभौम राजा,तुझ्या आज्ञेप्रमाणे मी सांगशील तेथे राहीन,पण जेथे जेथे माझ्या वधाविषयी हातांत धनुष्यबाण धारण करणारा तूं माझ्या दृष्टीस पडतोस--------||३६|| अर्थः---यास्तव हे धर्मपालक श्रेष्ठा,तूं मला,ते राहण्याचे स्थान दाखविण्यास योग्य आहे कि,ज्याचे ठिकाणी तुझी आज्ञा स्वीकारून मी निश्चलस्थितीने राहीन.||३७|| सूत उवाच:---- | अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ | द्धुतंपानंश्त्रिय:सूनयत्राधर्मश्चतुर्विध।।३८|। | पुनश्च याचमानय जातरूपमदात्प्रभु; । ततोsनृतं मदं कामं रजो वैरं च पंचमम।।३९|| भावार्थः--- सुत म्हणाला----हे ऋषीहो,अशी कलीने प्रार्थना केली असतां त्या राजाने जेथे अनुक्रमाने असत्य,मद.काम आणि क्रूरत्व याप्रकारे चार प्रकारचा अधर्म राहतो ती द्दूत,मद्दपान,स्त्रीसंग आणि हिंसा अशी चार स्थाने त्या कलींस दिली.||३८|| भावार्थः---पुनरपि चारप्रकारच्याहि अधर्माची जेथे एकत्र स्थिती असेल ते स्थान मला द्दावे अशी कलीने याचना केली असता,राजाने त्यास सुवर्ण हे स्थान दिले,त्या सुवर्णापासून अनृत,मद,काम,क्रुरत्व आणि पाचवे वैर हि पांचही अधर्माची कारणे घडतात.म्हणून आपण जी कलीची पांच स्थाने आहेत—(१)द्दूत,(२)मद्दपान,(३)स्त्रीसंग,हिंसा,(५)सुवर्ण—अधार्मिक धन—सोने इत्यादीमुळे आपल्या ठिकाणी (१)द्दूतमुळे असत्य,(२)मद्दपानामुळे गर्व,(३)स्त्रीसंगामुळे काम-वासना,(४)हिंसामुळे वैर, (५)सुवर्ण—अधार्मिक रजोगुण हे पांच दोष उत्पन्न होतात,म्हणून आपण त्याठिकाणी प्रवेश करू नये.||३९|| भावार्थः---याप्रमाणे अधर्मापासून झालेला कली,उत्तरानंदन परीक्षितीराजाने दिलेल्या ह्या द्दुतादी—द्दुत,मद्द्पान,स्त्रीसंग, हिंसा,सुवर्णधन—अधार्मिकधन—परधर्मधन या पांच स्थानाचे ठिकाणी राजाची आज्ञा शिरसा मान्य करून राहिला.म्हणून आपण—जीवानी ज्याठिकाणी द्दुत,मद्दपान,स्त्रीसंग,हिंसा,सुवर्णधन-अधार्मिकधन—परधन आहे त्याठिकाणी राहू नये.त्याचा-- द्दुत,मद्द्पान,स्त्रीसंग,हिंसा,व सुवर्ण-धन—अधार्मिकधन—परधन स्वीकार करू नये व उपभोग घेऊ नये,कारण त्यामुळे दु:खास पात्र व्हावेच लागते—दु:ख भोगावेच लागते.त्याच्याबरोबर आपले स्वत:चे धार्मिकधनही नष्ट होऊन दु:खच भोगावे लागते. म्हणून आपण कलीच्या स्थानांचा व ज्या जीवांत कलीच्या दोषांनी प्रवेश केलेला आहे,त्या जीवांचाही त्याग करावा, कारण संगतीचा परिणाम हा होतच असतो.||४०|| | अथैतानि न सेवेत बुभूषु: पुरुष: क्वचित् | विशेषतो धर्मशीलो राजा लोकपतिर्गुरू: ||४१|| भावार्थः---म्हणून उत्तरोत्तर आपल्या अभिवृद्धीची इच्छा करणाऱ्या पुरुषाने सुवर्णादी पांच विषयांचा उपभोग कधीही आसक्तीने—असावेच अशा प्रकारची इच्छा मनातही येऊ नये.तसेच आपल्या प्रजेस शिक्षण लावणाऱ्या धर्मशील राजाने व लोक रक्षक गुरूने विशेषेकरून यांचे सेवन करूं नये.अशा प्रकारची इच्छा सामान्य लोकांसही होऊ नये व विशेषतः राष्ट—प्रमुख—सत्ताधीश,समाजसेवक व संत—महात्मा यांच्या मनातच इच्छा येउच नये,कारण श्रेष्ठांचे अनुकरण कनिष्ट करीतच असतात.कुटुंबप्रमुख जो आहे,त्याच्या मनातच येऊ नये.असा विवेक करून सर्वांनी जीवन व्यतीत करावे.||४१|| भावार्थः---नंतर राजाने त्या वृषभाचे—धर्माचे नष्ट झालेले तप,शौच व दया हे तीन चरण पुनः त्यास जोडीले म्हणजे पृथ्वीवर,तपश्चर्या शुद्धपणा आणि द्या हि पुनः चालू केली.आणि पृथ्वीचेही सांत्वन करून तिचीही वृद्धी केली म्हणजे तिच्या वरील शेतकी वगैरेस उत्तेजन दिले.म्हणून आपण—जीवांनी तप,शौच,दया याप्रमाने आचरण करून जीवन व्यतीत करावे.हाच आपला—जीवाचा स्वधर्म आहे.||४२|| भावार्थः---धर्मराजादिकांच्या संपत्तीने शोभणारा,महाकीर्तीमान व महाभाग्यवान तो सार्वभौम परीक्षिती राजर्षी,वर्तमान-काळात नुकताच हस्तिनापुरामध्ये राहत होता.आपणही—जीवनी अधिकारसंपन्न होऊन—जीज्ञासू होऊन वर्तमान काळात सत्संग करीत अतीत कराव.यातच आपले पारमार्थिक परम—हित आहे.||४४|| | इत्थम्भूतानुभावोऽयमभिमन्युसुतो नृप: | यस्य पालयत: क्षोणीं यूयं सत्राय दीक्षिता: ||४५|| भावार्थः---असा अद्भुतपराक्रमी अभिमन्यूचा पुत्र हा परीक्षिती राजा होय.जो समुद्रवलयांकित पृथ्वीचे पालन करीत असतां,तुम्ही सहस्त्रसंवत्सरात्मक सत्र करण्यासाटी दीक्षा घेऊन बसला आहे.आपणही जिज्ञासू होऊन जीव-ब्रह्म-ऐक्य-ज्ञान प्राप्त करण्यासाठी मोक्ष-रुपी दीक्षा घेऊन जीवन व्यतीत करावे.||४५|| १७-----याप्रमाणे श्रीभागवतनामक महापुराणांतील प्रथम(१)स्कंधामध्ये कलीनिग्रहकथनरूप हा सत्रावा(१७)अध्याय पंचेचाळीस(४५) श्लोकांनियुक्त समाप्त झाला.||१७--४५|| ||| श्रीकृष्णार्पणमस्तू—श्रीसदगुरूअर्पणमस्तू || ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १८-----आता या अठराव्या अध्यायांत परीक्षिती राजास ब्राह्मणाचा शाप झाला व तो शाप त्यास वैराग्य होण्यास कारण झाल्यामुळे केवळ अनग्रुहच झाला अशी कथा वर्णन केलेली आहे.||१८|| | १८-----[राजा परीक्षितीला शृंगीऋषीचा शाप.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- |सूत उवाच:--- | यो वै द्रौण्यस्त्रविप्लुष्टो न मातुरुदरे मृत: | अनुग्रहाद् भगवत: कृष्णस्याद्भूतकर्मन: ||१|| भावार्थ:---सुत म्हणाला---–जो परीक्षित,आपल्या मातेच्या उदरात असता तेथे अश्वथाम्याने सोडलेल्या ब्रहमस्त्राने पोळला असताही,अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णाच्या अनुग्रहाने मरण पावलो नही.||१|| | ब्रहमकोपोत्थिताद् यस्तु तक्षकात्प्राणविप्लवात् | न स्म्मूमोहोरूभयाद् भगवत्यर्पिताशय: ||२|| भावार्थः---व त्याने आपले चित्त स्प्रेमभावाने भगवंताचे ठिकाणी अर्पण केले होते,म्हणून जो ब्राह्माणाच्या क्रोधापासून उत्पन्न झालेल्या तक्षकीरुपी प्राणनाषक भयापासून लेशमात्रही खिन्न झाला नाही.आपणही आपले चित्त स्प्रेमभावाने भगवंतांच्या ठिकाणी अर्पण करावे,म्हणजे आपणासही कोणतेही संकट आले तरी दु:ख होणार नाही.||२|| भावार्थः---तो राजा,सर्वसंगपरित्याग व्यासनंदन श्रीशुक्राचार्याचा शिष्य झाला आणि त्यापासून अजितभगवंताची यथार्थ स्वरूपस्थिती जाणून त्याने आपल्या देहाचा त्याग.आपणही श्रीकृष्णांचे निष्काम भक्त झाले असता आपणांस परमात्म्याचे यथार्थस्वरूप व आपले यथार्थ स्वरूप एकच आहे अशी अनुभूती येईल.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन आपण कायमचेच सुखरूप होऊतच,यात तिळमात्र शंसय नाही.||३|| | नोत्तमश्लोकवार्तानां जुषतां तत्कथामृतम् | स्यात्सम्भ्रमोsन्तकालेsपि स्मरतां तत्पदाम्बुजम् ||४|| भावार्थः---हे सत्पुरुषास आश्चर्य नाही.कारण,उत्तमकीर्ती जनार्दनाच्या वार्तेविषयी आसक्त असल्यामुळे श्रीकृष्ण कथामृत सेवन करणाऱ्या व त्याच्या चरणकामलाचे ध्यान करणाऱ्या सत्पुरुषांस,अंतकालही मोह उत्पन्न होत नाही.आपणास भगवंतांच्या यथार्थ—स्वरूपाविषयी आसक्ती असावी,कारण त्यामुळे इतरांविषयी मोह उत्पन्न होत नाही.||४|| भावार्थः—तो अभिमन्यूचा पुत्र महासार्वभौम परीक्षिती राजा,जोपर्यंत पृथ्वीचे पालन करीत होता तोपर्यंत,कली पृथ्वीवर जरी सर्व ठिकाणी पृवृत्त झाला होता तरी ती आपली सत्ता चालविण्यासाठी समर्थ झाला नाही.आपण जर भगवंतांचे निष्काम भक्त असले म्हणजे कलीचा प्रभाव आपल्यावर मुळीच होत नाही--कलीचे कांहीच चालत नाही.||५|| | यस्मिन्नहनि यर्हेव भगवानुत्ससर्ज गाम् | तदैवेहानुवृत्तोsसावधर्मप्रभवः कलिः ||६|| भावार्थः---परंतु ज्या दिवशी ज्या वेळी श्रीकृष्ण भगवान पृथ्वीचा त्याग करून निजधामास गेला त्याच वेळी हा अधर्मौत्पादक कली,भूमीवर पृवृत्त झाला.जेत्जे भगवंत तेथे कलीचे कान्हीच्प्रभाव पडत नाही,म्हणून आपण भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे.||६|| | नानुद्वेष्टी कलीं सम्राट सारंग इव सारभुक् | कुशलान्याशु सिध्यन्ति नेतराणी कृतानि यत् ||७|| भावार्थः---परीक्षितीने तरी त्याचा वध न करण्याचे कारण इतकेच कि,भ्रमर जसा पुष्पातील सारभूत रसाचे ग्रहण करितो तसा परीक्षिती राजा सारग्राही होता,म्हणून त्याने कलीचा फारसा द्वेष केला नाही.सार हे कि,ज्या कलियुगात पुण्यकर्मे संकल्पमात्राने फलद्रूप होतात व पापे व प्रत्यक्ष केली तरच फलद्रूप होतात संकल्पाने फलद्रूप होत.आपणही सारग्राही-- म्हणजे सार स्वीकारणारा व असराचा त्याग करणारा असा जो असतो त्यास “सारग्राही” असे म्हणतात.कली हा विशिष्ट ठिकाणी राहत आहे,आपण त्याविशिष्ट ठिकाणी न गेलोत तर आपले कांहीच अहित होत नाही,व त्याचीही भागते असा त्याने निर्णय घेतला.आपणही त्याचप्रमाणे सारग्राही असले पाहिजे.कलियुगात पुण्यकर्मे संकल्पमात्रेने फळ मिळते,पण पाप मनात आले पण कृतीमात्र केली नाही तर पाप होत नाही.असा हा कलियुग आहे.म्हणजे कलियुगात पुण्य होण्यासाठी दम साधना केली तरी जमते,मात्र पाप होण्यासाठी शम साधना असेल तर होते,असा हा परमार्थ करण्यासाठी सोपा मार्ग आहे.||७|| भावार्थः---आणि जो कली,असावध पुरुषाचे ठिकाणी सावधपणे लांडग्यासारखा संचार करितो,म्हणून आपण असावध न राहता म्हणजे विवेक न करता सावध होऊन म्हणजे विवेक-पूर्वक राहावे.त्या अधीर पुरुषाचे ठिकाणी मात्र शूरपणा दाखविणाऱ्या परंतु धैर्ययुक्त लोकांचे भय बाळगणाऱ्या कलीने काय करावयाचे आहे?कली हा अधीर-पुरुष्यांच्या ठिकाणी शूरपणा दाखवितो व जे पुरुष धैर्येयुक्त—धीर धरणारे,त्यांना कलीपासून मुळीच भीती नाही.असे मनात आणून राजाने कलीचा द्वेष केला नाही.म्हणून आपण कलियुगात राहून,अंगी धैर्य धारण करून करून वास्तव्य करावयाचे आहे.आपण ज्या ठिकाणी—द्दूत,मद्दपान,स्त्रीसंग,हिंसा व अधार्मिक सुवर्ण—अधार्मिक धन—परधार्मिक धन याठिकाणी कलीचे वास्तव्य आहे,त्या परिसरात प्रवेस करावयाचा नाही.कली आपला परिसर सोडून आपल्याकडे येत नाही,असे निश्चितच अगोदरच झालेले आहे.म्हणून आपण कलीची मुळीच भीती करण्याची गरजच नाही.||८|| भावार्थः---हे ऋषीहो,तुम्ही जे श्रीकुष्ण कथायुक्त परीक्षिती-राजाचे आख्यान मला विचारले होते:हे पुण्याकारक आख्यान मी तुम्हास वर्णन केले.आपण राजा-परीक्षितिचे आख्यान जरूर—जरूर श्रवण करावे,कारण त्या आख्यानापासून आपणास फार उपकारक बोध घेता येतो.राजा परीक्षिति सारग्राही आहेव असरांचा त्याग करणारा आहे.आपणासही जगातील सार ग्रहण करावयाचे आहे व असारांचा त्याग करावयाचा आहे.||९|| भावार्थः---ज्याची बहुत चरित्रे वर्णन करण्यास योग्य त्या भगवंताच्या गुणापासून व कार्मापासुनच पृवृत्त झालेल्या ज्या ज्या वेद्शास्त्राचे ठिकाणी प्रसिध्द आहेत,त्या त्या कथा स्वहीतेच्छ पुरुषांनी अवश्य सेवन कराव्या.आपण भगवंत व संत—महात्मा यांच्या कथा श्रवण करून त्या कथेतील सर भाग स्वीकारून त्यानुसार आचरण करावे व असार भागाचा त्याग करून आचरण करावयाचे आहे.यातच आपले हित आहे,असा विवेक करून जीवन व्यतीत करावे.||१०|| भावार्थः---यास्तव,हे सौम्यमूर्ते सुता,जे तूं मरणभयाने युक्त असलेल्या अमृततुल्य श्रीकृष्णाचे स्वच्छ यश वर्णन करीत आहेस किंवा या यज्ञकर्मांत बहुत वैगुण्ये होत असल्यामुळे फलप्राप्तीचा निश्चय नसून आमचे देह होमातील धुराने धुमवर्ण झाले आहेत अशा आम्हांस श्रीकृष्णचरणकमल संबंधी अपूर्वरसरूप मधुरकथामृत प्राशन करवीत आहेस,तो तूं पुष्कळ वर्षे पर्यंत जिवंत रहा.आपण श्रीकृष्णांचे स्वच्छ यशाचे वर्णन संत—महात्मा यांच्या मुखातून श्रवण करावे.यज्ञ-कर्मे हे वैगुन्यांनीयुक्त आहे,त्यामुळे त्याच्यात फलप्राप्तीची निश्चिती नाही,म्हणून आपण कर्ममार्गाचा त्याग करून भगवंतांच्या—संत—महात्मा यांच्या कथ्रावन कराव्यात.त्यानंतात भगवंतांचे जे स्वरूप निर्गुण—निराकार आहे ते श्रवण करून मोक्ष मार्गाचा अवलंब करावा,कारण यातच आपले परम-हित आहे.||११-१२|| भावार्थः---विष्णूभक्तांशी घडलेल्या समागमाचा जो अतिस्वल्प काल त्याच्याशी स्वर्ग किंवा मोक्ष यांचीही तुलना आम्ही करीत नाही,मग त्याच्याशी मृत्यूग्रस्त मनुष्यांच्या राज्यादि संपत्तीची साम्यता नाही हे काय सांगावे.आपण नाशिवंत जे इहलोकांतील विषय—राज्य—धन किंवा परलोकांतील जे विषय आहेत,त्यांची तर आपणास अपेक्षा नसावी,कारण त्यांच्यात किंचित सुख व अपार दु:ख आहे.भागावान्तांत किंवा संत—महात्मा हे सुखारुपाहेत,म्हणून त्यांच्याच कथा,स्वरूप सांगावे.||१३|| भावार्थः---हे सुता,अतिश्रेष्ठ ब्रह्मादिकांसही केवळ मुख्य आश्रय जो हरी त्याच्या कथेविषयी कोण रसज्ञ पुरुष तृप्ती पावेल?तर कोणीही पावणार नाही कारण,हे कारण,जे शंकर ब्रहमदेवप्रभृती योगीनिष्ठ आहेत त्यांसही निर्गुण परमेश्वराच्या गुणांचा अंत लागला नाही म्हणून ज्यांनी जितके जितके भगवंताने वर्णन केले तितके तितके त्यांस व श्रोत्यास नवे नवेच वाटत गेले त्यामुळे कोणाचीच तृप्ती झाली नाही.आपण जर कितीही भगवंतांच्या कथा श्रावण केल्या तरी त्या पुन्हा—पुन्हा श्रावणच कराव्या वाटतात कारण,त्यात नानिन्यच साठवलेले आहे.म्हणून त्या कथेचा वीट येत नाही.||१४|| भावार्थः---यास्तवच हे ज्ञानसंपन्न,सुता आमच्या सर्व मंडळीतून तू महान भगवद्भक्त आहेस,यास्तव श्रवणाची इच्छा धारण करणाऱ्या आम्हास,महाश्रेष्ठ योगिजनांचा परम आश्रम अशा श्रीकृष्णाची उत्कृष्ठ व निर्मल चरित्रे,विस्ताराने कथन कर.आपणही श्रीकृष्णांची चरित्रे पुन्हा—पुन्हा श्रवण करावी,कारण ते अवीट आहे.||१५|| भावार्थः---हे सुता,तो मोठा बुद्धिमान व महाभागवत परीक्षिती राजा,व्यासपुत्र शुकाचार्याने सांगितलेल्या ज्या ज्ञानानेच मोक्षनामक गरुड ध्वज भगवंताच्या चरणमुलाचे सेवन करीत झाला.राजा परीक्षिती हा श्रीमद्भागवत--परमात्म्याचे—निर्गुण-निराकाराचे स्वरूप जाणूनच मोक्षास प्राप्त झाला.म्हणून आपणही श्रीमद्भागवत--परमात्म्याचे—निर्गुण-निराकाराचे स्वरूप जाणूनच मोक्षास प्राप्त होउत,म्हणून श्रवण करावेच.||१६|| भावार्थः---हे सुता,ते अतिपुन्यकारक,अतिआश्चर्यकारक,योगानिष्ठेने युक्त,अनंतरूपभगवंताच्या चरित्रानि संपन्न आणि भगवतभक्तास अतिप्रिय असे श्री शुकाचार्याने परीक्षिती राजास कथन केलेले श्रीमद्भागवतरूप आख्यान,स्पष्ट रीतीने आम्हास कथन कर.म्हणून आपण संत—महात्मा यांच्या मुखातूनच श्रीमद्भागवत श्रवण करावे.||१७|| भावार्थः---सुत म्हणाला--–आहो!आज प्रमिलोम जातीचे(क्षत्रियापासून ब्राह्माणीचेठिकाणी उत्पन्न झालेले)हि आम्ही,तुमचे आदराने व शुक्राचार्याच्या सेवेने सफल जन्म झालो.कारण तुम्हासारक्या अतिश्रेष्ठ पुरुषांशी लौकिक संभाषणाचा सबंध झाला तरी तो दुष्ट,कुळात झालेल्या उत्पत्तीने होणाऱ्या मनातील दुःखाचा सत्वर नाश करितो.श्रीमद्भागवताचे वक्ते सुतजी हे संकर जातीपासून म्हणजे निकृष्ट जातीपासून उत्पन्न झालेले आहेत व श्रोते हे उत्तम कुळातील—चारीत्रेसंपन्न आहेत.असे असले तरी वक्ता हा सदगुण संपन्न—अधिकारसंपन्न आहे व श्रोते हे अधिकारसंपन्न होण्यासाठी आलेले आहेत.म्हणजेच वक्ता हे सदगुणांनी श्रेष्ठ आहेत व श्रोते हे सदगुणांनी कनिष्ठ आहेत.भारतीय संस्कृतीत—वैदिक संस्कृतीत जन्म कोणाच्या पोटी झाला हे गौण आहे,तर मुख्य सदगुण आहे.मानवांच्या अधिकारानुसार--सदगुणांनुसार विभागणी झालेली आहे,तर जातीनुसार-वर्णांनुसार—आश्रामांनुसार विभागणी झालेली नाही,असा आपण विवेक करून आपले मत—समजूत निश्चित करावे.वर्तमान काळातील लोक भारतीय--वैदिक संस्कृतीचा आभ्यास न करता अर्थ करीत आहेत.म्हणून आपण भारतीय—वैदिक संस्कृतीचा आभ्यास अखिल जगातील मानवांनी करून भ्रम—गैर-समाज दूर करावा.||१८|| भावार्थः---मग मोठमोठ्या साधूंचासुद्धा जो मूख्य आश्रय त्या परमात्माचे नामसंकीर्तन करणाऱ्या पुरुषाच्या हीनकुलसंबंधि मानसिक दुःखास,सत्पुरुषांबरोबर झालेला भगवत्कथासंबंधी प्रश्नोत्तररूप भाषणसंबंध दूर करितो यात आश्चर्य काय आहे?(काहीच नाही) जे हीनकुलसंबंधी मानसिक दु:खांनी ग्रस्त आहेत,त्यांनी सत्पुरुष—संत—साधू—महात्मा यांच्याशी प्रश्न करून त्यांच्या उत्तराद्वारे समाधान करून घ्यावे.जो भगवान,स्वरूपाने अंतरहित असून अपरमिती शक्तींनी य़ूक्त आहे आणि ज्याचे पुष्कळ गुण ब्राह्मादिकांच्या ठिकाणी राहिले आहेत म्हणून त्या नारायणास सर्व शास्त्रामध्ये अनंत असे म्हणतात.सर्वांचा—अखिलजीवांचा—अखिलप्राण्यांचा भगवंत—परमात्मा अनादी-अनंत—जन्म-मृत्यूरहित सत्-चित्-आनंदस्वरूप आहे.म्हणून सत्संगाद्वारे त्यास जाणून सुखरूप होण्याचा आवश्य प्रयत्न करावा.||१९|| भावार्थः---गुणांनी त्या नारायणाच्या बरोबरीनेही कोणी नाही.मग अधिक नाही हे अर्थातच सिध्द आहे याविषयी आता इतकीच सूचन पुरे आहे कि,साक्षात महालक्ष्मी,आपल्या प्रसादाची प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादिकांस सोडून,आपली इच्छा न करणाऱ्याहि ज्या भगवंताच्या चरणरजाची सेवा करीत आहे.यावरून त्या हरीच्या अनंत गुणांचे अनुमान करावे||२०|| भावार्थः---तसेच ज्याच्या चरणागुष्ठनखापासून निघालेले,व श्रीवामनचरणावर पूजेकरिता ब्रहमदेवाने अर्पण केलेले विष्णू-- पादोदक,शंकरासाहित सर्व जगास पवित्र करिते.यास्तव भगवान या पदाचा षडगुनैश्वर्यसंपन्न हा अर्थ,या लोकांत नारायनावाचून दुसऱ्या कोणाचे ठिकाणी आहे?(कोठेच नाही).या सर्व ब्रह्मांडात षडगुनैश्वर्यसंपन्नता फक्त भगवंतंच आहे. म्हणून ब्रह्मदेव व शंकरादी शुद्ध होण्यासाठी भगवंतांच्या नामाचा शब्दोउच्चार करतात,भगवंतांच्या लीलांचे गुणगान करतात व भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेतात,त्याचप्रमाणे आपण भगवंतांच्या नामाचा शब्दोउच्चार करावा, भगवंतांच्या लीलांचे श्रवण करावे तसेच भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून जन्म—मरण निवृत्त करावे.||२१|| भावार्थः---ज्या नारायनाचे ठिकाणी सप्रेमभावाने आसक्त झालेले विवेकी पुरुष,इंद्रियांचा जप करून व देहादीवस्तूंवर दृढ झालेल्या आसक्ततेचा एकाएकी त्याग करून,जेथे अहिंसा आणि शांतता हे दोन स्वाभाविक धर्म आहेत अशा शेवटच्या परमहंसाच्या आश्रयास पावतात.आपणही विवेकी पुरुषांचे अनुकरण करावे.विवेकी पुरुष विषयांत आसक्त न होता भगवंतांत आसक्त असतात.विवेकी पुरुष अहिंसा आणि शांतता या सत्वगुणांचा स्वीकार करून जीवन व्यतीत करतात. त्याप्रमाणे आपणही विषयांचा त्याग करून अहिंसा व शांतता या सात्विक गुणांचा स्वीकार करून जीवन व्यतीत करावे.||२२|| भावार्थः---हे ऋषीहो,आपण सूर्यासारखे तेजस्वी असून आपण मला भगवत्कथेविषयी प्रश्न केला आहे.तर मी आपल्या ज्ञानाप्रमाणे तुम्हांस भगवन्माहात्म्य निवेदन करितो.कारण,जसे सर्व पक्षी,आपापल्या शक्तीप्रमाणे आकाशामध्ये उड्डाण करितात तसे ब्रह्मादि सर्व ज्ञानीही भगवंताच्या लीलेचे यथमती वर्णन करितात त्याचप्रमाणे आपण आपापल्या अधिकारानुसार परमार्थ करावाच.||२३|| भावार्थः---एकेवेळी परीक्षिती राजा,धनुष्य सज्ज करून मृगयेसाठी वनांत संचार करीत असतां,मृगादिपशूंच्या मागून फार वेळ फिरत असता श्रम पावला आणि अत्यंत क्षुधा व तृषा यांनी व्याप्त झाला||२४|| भावार्थः---तेव्हा त्या अरण्यांत कोंठेही उदकाचे स्थान त्याच्या पहाण्यांत न आल्यामुळे तो राजा,एका प्रसिद्ध आश्रमांत प्रविष्ट झाला.तेथे त्याने,नेत्र झांकलेल्या शांत अशा शमिकनामक मुनीस अवलोकन केले.||२५|| भावार्थः---त्याने दहा इंद्रिये,पंच प्राण,मन व बुद्धी हि सर्व त्यांच्या विषयांपासूनच मुरडून अंतर्मुख केली होती व तो देह संबंधी व्यापारापासून विराम पावून जाग्रत,स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेहून पलीकडचे तुरीय(चतुर्थ)पद पावोन ब्रह्मभूत असल्यामुळे विकारशून्य झाला होता.आपणही शमिक-नामक मुनिप्रमाने आपण—जीवानी सत्संगाद्वारे,स्वप्न आणि सुषुप्ति या तीनही अवस्थेहून पलीकडील तुरीयपद प्राप्त करून ब्रह्मभूत विकारशुन्य अनुभव घ्यावा.||२६|| भावार्थः---आणि पसरलेल्या जटानी व कृष्णाजीताने सभोवार परिवेष्टित होता.अशा प्रकारच्या त्या ऋषीजवळ,अतितृषेने शुष्क्तालू झालेल्या राजाने उदकाची याचना केली.||२७|| भावार्थः--- तेव्हा त्यापासून तृणासन,बसावयास जागा,पूजा व प्रियभाषण इत्यादी कांहीच न प्राप्त झाल्यामुळे आपणास या ऋषीने बुद्धिपूर्वक न जाणल्यासारखे केले,असे मानून तो राजा क्रुद्ध झाला.आपण जीवन जगत असतांना आपणास यथार्थज्ञान आहे की,अयथार्थज्ञान की,विपरीतज्ञान आहे याचा विवेकपूर्वक बुद्धीने निश्चय करावा,कारण आपले बहुतेक निर्णय हे अयथार्थ किंवा विपरीत असतात,म्हणून अयोग्य असतात,म्हणून ते दु:खाकडे नेतात.म्हणून आपण विवेकपूर्वक यथार्थ निर्णय घ्यावेत,असेच निर्णय सुखाकडे नेतात.||२८|| भावार्थः---तेव्हा हे शौनका,क्षुधा व तृषा यांनी पिडीत झालेल्या त्या राजास,ब्राह्माणाविषयी अकस्मात पूर्वी कधीच न प्राप्त झालेला मत्सर (दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे)व क्रोध हे उत्पन्न झाले.आपणास कोणाविषयी मत्सर किंवा क्रोध उत्पन्न होऊ नये,मत्सर किंवा क्रोध हे दु:खास कारण आहेत.||२९|| | स तु ब्रम्हऋषेरंसे गतासुमुरगं रुषा | विनिर्गच्छन्धनुष्कोट्या निधाय पुरमागमत् ||३०|| भावार्थः--- तेव्हा रागाने आश्रमांतून निघून जाणाऱ्या त्या परीक्षितीने,मरण पावलेला एक सर्प,धनुष्याच्या अग्राने त्या ब्रह्मऋषीच्या स्कंधावर ठेविला व तो हस्तिनापुरांत परत आला.आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा सन्मान करावा,तर अपमान करू नये.||३०|| भावार्थः---त्यावेळी राजाचा अभिप्राय असा होता कि,हा ऋषी,आपली सर्व इंद्रिये विषयांपासून अंतर्मुख फिरवून खरोखर समाधीस्थ आहे अथवा क्षत्रिय लोक आले किंवा गेले तरी त्यांच्याने आमचे काय होणार आहे?अशा अभिप्रायाने मिथ्यासमाधी करून बसला आहे याची परीक्षा करावी.संत—महात्मा यांचा अधिकार क्षित्रीय किंवा इतर कोणताही जीव जाणू शकत नाही.ज्याचा—त्याचा अधिकार जो--तोच जाणू शकतो,अन्य जाणू शकत नाही. ||३१|| भावार्थः---इकडे त्या ऋषीला अतितेजस्वी शृंगीनामक पुत्र,समवयस्क ऋषी बालकासह वर्तमान आश्रयाबरोबर क्रीडा करीत असता,तेथे त्याने आपल्या पित्याच्या स्कंधावर राजाने मृतसर्प ठेऊन अपराध केला असे ऐकून,त्या बालकांमध्येच असे भाषण केले की-----------,||३२|| भावार्थः---मित्रहो,ऐश्वर्यादिकांनी पुष्ट झालेल्या राजांचा केवढा हा अधर्म पहा ! दासांनी बलीभक्षण करणाऱ्या कावळ्यासारखे किंवा द्वाररक्षक श्वानांसारखे आपल्या धन्याचे ठिकाणी जे पापाचरण करणे ते किती अन्यायाचे आहे बरे ! ज्याप्रमाणे द्वाराक्षक श्वान याने आपल्या स्वामीचे—मालकाचे रक्षण करावे का ? की भक्षण करावे ? रक्षण करावे.त्याचप्रमाणे जो राजा क्षत्रिय त्यांनी ब्राह्मणांचे रक्षण करावे,पण भक्षण करू नये.राजा परीक्षितीने भक्षण केले आहे.हे त्याचे भक्षण करणे अयोग्य आहे.तो राजा दंडनीय आहे.||३३|| भावार्थः---कारण,ब्राहमणांनी क्षत्रिय हा आपला द्वारपाल योजिला आहे.तो द्वारपाल,धन्याच्या घरांतील भांडयांतल्या वस्तूंचा उपभोग करण्यास कसा योग्य होईल ? धर्म-शास्त्रांनी राजा हा ब्राह्मणांचा द्वारपाल आहे,त्यांनी ब्राह्मणांचे रक्षण करावे.ज्याच्या—त्याच्या अधिकारानुसार ज्याने—त्याने आपापल्या स्वधर्माचे पालन करावे.द्वारपालाला स्वामीच्या घरातील वस्तूचा उपभोग घेण्याचा मुळीच अधिकार नाही.||३४|| भावार्थः---अन्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांचा शास्ता श्रीकृष्णा,नीजधामास गेला म्हणून जे राजे आता आपल्या मर्यादाचे उल्लंघन ऋषीपुत्रांस असे सांगून,त्याने कौशिकीनदीचया उदकाचे आचमन करून राजावर वाणीरूप व्रज सोडले,म्हणजे राजास शाप दिला.भगवंत श्रीकृष्ण हा निजधामास गेला,म्हणून राजांनी असा अपराध केलेला आहे,म्हणून या राजस मी दंड देत आहे.||३६|| | इति लङ्घितमर्यादंतक्षक: सप्तमेsहनि | दङक्ष्यति स्म कुलाङ्गारं चोदितो मी ततद्रुहम् ||३७|| भावार्थः---ती असा कि,याप्रमाणे मेलेला सर्प,स्कंधावर स्थापन करून माझ्या पित्याचा द्रोह करणाऱ्या व लोकमर्यादेच उल्लंघन करणाऱ्या कुलागाररुपी पुरुषास.माझ्या प्रेरणेने तक्षक नाग आजपासून सातवे--दिवशी दंश करील.||३७|| भावार्थः---नंतर तो बालक आश्रमांत येऊन पित्याच्या कंठांत मृतसर्पांचे शरीर पाहून दुःखाने पिडीत होत असता कंठ मोकळा करून उच्च-स्वराने रुदन करूं लागला.आपल्या पित्याचा गळ्यात मृत सर्प पाहून दु:खाणे व्यतीत होऊन रडू लागला.त्याप्रमाणे ज्याला—त्यालापल्या पित्याची दु:खद अवस्था पाहून रडू यावे व ते दु:ख नाहीसे करण्याचा आवश्य प्रयत्न करावयास पाहिजे.||३८|| भावार्थः---हे शौनका,तो शमिकऋषी आंगिरसगोत्रामध्ये उत्पन्न झालेला होता,त्याने पुत्राचे आक्रोशयुक्त रुदन श्रवणकरून समाधीचे विसर्जन केले आणि हळूहळू नेत्र उघडून आपल्या स्कंधावर मेलेला सर्प पाहिला.||३९|| भावार्थ:---मग तत्काल तो काढून टाकून पुत्रास म्हणाला की,हे वत्सा,तूं रुदन का करितोस?तुझा कोणी अपकार केला कीं काय!असे विचारलें असतां त्या पुत्रानें झालेले सर्व वर्तमान सांगितलें.||४०|| | निशम्य शप्तमतदर्हं नरेन्द्रं | स ब्राह्मणो नात्मजमभ्यनन्दत् | | अहो बतांहो महदज्ञ ते कृत- | मल्पीयसि द्रोह उरूर्दमो धृतः ||४१|| भावार्थः---तेव्हां परीक्षित राजा शापाविषयी योग्य नसून त्यास आपल्या पुत्रानें शाप शदिला असें ऐकून त्या ब्राह्माणानें पुत्राचे अभिनंदन तर केले नाहीच पण तो ऋषी,आपल्या पुत्रास म्हणाला कीं,अरे मूर्खा,तूं हे मोठे पाप केलेंस की,अतिस्वल्प अपराधाविषयीं राजस मोठा दंड केलास.शमिक ऋषी हा अंगिरस गोत्रातील ऋषी होता.त्याने आपल्या मुलाच्या मुखातून असिले की,”मी राजा परीक्षितीस आजच्या दिवसापासून सातव्या दिवसी मृत्यू येणार आहे”.असा शाप दिलेला आहे.अ मुलाच्या मुखातील शपजानिक उततात ऐकून शमिक ऋषीस दु:ख झाले.आपल्या मुलाकडून फारमोठा अपराध झालेला असे त्यास वाटले.त्या अपराधामुळे आपल्या मुलास पाप होईल व त्यामुळे तो दु”खास पत्र होईल असे वाटले.आपल्या पुत्राकडून कोणत्याही अपराध झाला तर त्या अपराधाचे आपण कौतक न करता अपराध वाटावयास पाहिजे.त्या पुत्रास दंड करावयास पाहिजे.त्या पुत्रास दंड केला तर तोपुत्र पुन्हा अपराध न करता योग्य आचरण करतो व अपराधाचे कौतुक केले तर अधिक अपराध करून अवगुणी होत असतो.हा आपण शमिक ऋषीपासून बोध घ्यावावयास पाहिजे.||४१|| | न वै नृभिर्नरदेवं पराख्यं | सम्मातुमर्हस्यविपक्वबुद्धे | | यत्तेजसादुर्विषहेण गुप्ता | विन्दन्ति भद्राण्यकुतोभया: प्रजा: ||४२|| भावार्थः---अरे अपरीक्व-बुद्धे,विष्णुनामानें प्रसिद्ध जो राजा त्यास साधारणमनुष्यासारखा मानण्याविषयीं तूं योग्य नाहींस कारण,ज्या राजाच्या दुःसह तेजानें रक्षण केलेल्या सर्व प्रजा,निर्भय होत असता अनेकप्रकारें सुख पावतात.राजा हा सामान्य माणूस नसतो,तर देशाचे रक्षण करून प्रजा-जणांना सुख देणारा असतो.राजा हा भगवंतांची विभूती असतो—भगवंतांचा अंश असतो.म्हणून आपण राजस शाप न देता आशीर्वाद द्दावाबयास पाहिजे.राजा दंडनीय नसून पुत्राच दंडनीय आहे.शामक ऋषींनी जसा आपल्या पुत्राविषयी विचार केला,त्याचप्रकारे आपण आपल्या पुत्राविषयी विचार करावयास पाहिजे.असा विचार केला तर आपल्या पुत्राचे हित होत असते,अन्यथा हित होत नसते.||४२|| | अलक्ष्य माणे नरदेवनाम्नि | रथाङगपाणावयमग्य लोक: | | तदा हि चौरप्रचुरो विनङ्क्ष्य | त्यरक्ष्यमानोsविवरूथवत्य क्षणात् ||४३|| भावार्थः---हे वत्सा,राजा म्हणजे साक्षात् चक्रपाणि विष्णूच होय.भगवान विष्णू हा ब्रह्मांचा रक्षणकर्ता असतो,राजा हा देशाचा रक्षण-कर्ता असतो तर कब करता कुटुंबबाचा राक्षस असतो,म्हणून राजा व कुटुंब—कर्ता हा देवासारखाच असतो,म्हणून त्यांचा सर्वांनी आदर करून त्यांच्या अज्ञाचे पालन करावे,तर त्यांचा अनादर किंवा अपमान किंवा आज्ञाचे उल्लंघन करू नये. तो जर या भूमीवर राजा किंवा कुटुंब कर्तानसेल तर कोणिहि रक्षण न केलेला हा लोक,भूत चोरांनी व्याप्त होऊन,धनगरानें रक्षण न केलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखा तत्काल नाश पावेल.आपण्र जर राजास किंवा कुटुंब कर्त्यास न मानले तर प्रजा किंवा कुटुंबातील लोकांना दु:ख भोगावे लागेल. ||४३|| भावार्थः---आणि लोकांस राजा नाहींसा झाला म्हणजे लोकांचे धन हरण करणाऱ्या चोरादिकांपासून जें पाप या पृथ्वीवर होईल,त्यांत वस्तुत: आमचा कांही संबंध नसतां,ते आमच्या निमित्तानें घडल्यामुळें आम्हांकडे येईल.या लोकांत चोर बहुत झाले म्हणजे ते चोरप्राय लोक,परस्परांस मारतात,कठोर भाषणें करतात,एकमेकांच्या पशु,स्त्रिया व अनेकप्रकारच्या द्रव्यादिक वस्तु हरण करितात.म्हणून आपण राजास—राजकीय सत्ताधीश यांना शाप किंवा दंड देऊ नये.राजा किंवा कुटुंब कर्ता नसेल राज्यात चोरांचे प्राबल्य वाढून अन्याय वाढेल,त्यामुळे पाप अधिक घडेल.ते पाप ज्यांनी राजास मारले किंवा दंड केला,त्यास पाप भोगावे लागते.म्हणून आपण राजास किंवा कुटुंब कर्त्यास मारू नये किंवा दंड करू नये.||४४|| भावार्थः---त्याकाली ऋग्वेद,यजुर्वेद व सामवेद या तीन वेदांनी विहित असून ब्रह्माणादिक च्यार वर्ण ब्रहमचर्यादीक चार आश्रम यांच्या आचरणें युक्त जो मनुष्यांचा श्रेष्ठ धर्म तो नाश पावतो.राजा—कुटुंब कर्ता नसेल तर मनुष्य आपापल्या स्वधर्मांचे पालन करीत नाहीत.म्हणून श्वान किंवा वानर यांच्याप्रमाणे केवळ धन व स्त्रीसंग यांविषयीचा मनपूर्वक आग्रह धरणाऱ्या लोकांचा परस्पर वर्णसंकार होतो.म्हणजे आपापल्या स्वधार्मांचे पालन न करता अधर्माचे—परधर्मांचे पालन करितात,अधर्म—परधर्म हा दु:खास कारण असतो.||४५|| | धर्मपालो नरपति: स तु सम्राड् बृहच्छ्रवा: | | साक्षान्महाभागवतो राजर्षिर्हयमेधयाट् | | क्षुत्तृट्श्रमयुतो दीनो नैवास्मच्छापमर्हति ||४६|| भावार्थः---तो परीक्षित राजा तर धर्मपालक महाकीर्तिंमहान् सार्वभौम व अश्वमेधयज्ञ करणारा असून साक्षात् महाभगवद्भक्त असल्यानें राजमंडळात केवळ ऋषीसारखा अतिशांत आहे.सत्ताधीश जो धार्मिक—स्वधर्मापालक—महाभागवत भक्त असेल तर शांत,दया,क्षमा या गुणांनीयुक्त असतो.तो क्षुधा,तृषा आणि श्रम यांनी व्याकूळ असल्यामुळें त्याच्याकडून कदाचित् अपराधा घडला तरी तेवढ्याने तो आमच्या शापास पात्र होणार नाहींस.कोणीही असो,त्यास जर तहान—भूक—श्रमिक झालेला असेल तर तो त्यामुळे व्याकूळ होतो व अशा परिस्थितीत त्यास या आवश्य गराजाची पूर्तता झाली नसेल तर अशा प्रतिकूल परीस्थित क्रोध येताच असतो.म्हणून अशा राजसत्तावानाकडून अपराध घडला तरी त्यास दंड—किंवा शाप देऊ नये.त्या सत्ताधीशास दंड किंवा शाप देणाराच अपराधी व दंड किंवा शाप देण्यास पात्र होत असतो. म्हणून आपण अशा प्रकारच्या सत्ताधीशास किंवा कुटुंब कर्त्यास दंड देऊ नये.||४६|| | अपापेषु स्वभृत्येषु बालेनापक्वबुद्धिना | पापं कृतं तद् भगवान् सर्वात्मा क्षन्तुमर्हति ||४७|| भावार्थः---असा विचार करून तो ऋषी,पापनिवृत्तीसाठी भगवंताची प्रार्थना करितो कि,हे भगवन तूं सर्वांचा आत्मा आहेस,यास्तव या प्रौढबुद्धी युक्त बालकाने निष्पाप अशा दासाचे ठिकाणी केलेले शाप रूप पाप,क्षमा करण्यास तूं योग्य आहेस.आपणाकडून कदाचित असा व्यवहार घडला तर आपण भगवंतांकडे व ज्यास दंड केला त्याच्याकडे क्षमा मागावी.||४७|| | तिरस्कृता विप्रलब्धाः शप्ताः हता अपि | नास्य तत् प्रतीकुर्वन्ति तद्भक्ताः प्रभवोsपि हि ||४८|| भावार्थः---कारण,विष्णूभक्तांचा तिरस्कार केला,त्यांची वंचन केली,त्यांस शाप दिला,किंवा त्यांचा अपमान केला अथवा त्यांस ताडन केले तथापि ते समर्थ असूनही आपणास तिरस्कारादिक करणारावर किमपि उलट अपकार करीत नाहीत.आपण विष्णू—भक्त आहोत,म्हणून आपणास कोणी दंड दिला तर,त्यास आपण दंड देऊ नये,कारण विष्णू भक्त हे अपकार्यावर उपकार करणारे असतात.||४८|| | इति पुत्रकृताघेण सोऽनुतप्तो महामुनि: | स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाघं तदचिन्तयत् ||४९|| भावार्थः---असे पुत्रास सांगून शेवटी तो शमिक ऋषी पुत्राने केलेल्या पापाने अनुताप पावला आणि परीक्षितीराजाने स्वतः आपला अपराध केला असतांही तो अपराध त्या ऋषीने मनांतही आणला नाही.||४९|| | प्रायशः साधवो लोके परैर्द्वन्द्वेषु योजिताः | न व्यथन्ति न हृष्यन्ति यत आत्माsगुणाश्रयः ||५०|| भावार्थः---या लोकी जे साधू आहेत त्यांस इतरांनी जरी दुःखसुखादिप्रसंगात घातले तरी ते बहुतकरून त्या दुःखाने व्यथा पावत नाहीत व सुखाने हर्षहि पावत नाहीत.कारण आत्मा निर्गुण असल्यामुळे तो सुखदुःखांनी लिप्त होत नाही.आपणही दु:खाणे दु:खी न होता व सुखाने सुखी न होता अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा.||५०|| १८-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणांतील प्रथम(१)स्कंधामध्ये विप्रशापकथनरूप हा आठरवा(१८) अध्याय पन्नास(५०) शोलाकांनीयुक्त समाप्त झाला.||१८--५०|| | ||श्रीकृष्णाअर्पणमस्तू—श्रीसदगुरूचरणार्पणमस्तू|| ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १९-----परीक्षिती राजा,भागीरथीच्या तीरी बहुत योगीजनांनी वेष्टित असून मरणकालपर्यंत अनाशानव्रताचा संकल्प करून बसला असता,तेथे श्रीशुकाचे आगमन झाले.हा कथाभाग एकुणिसाव्या अध्यायांत वर्णिलेला आहे.||१९|| | १९------राजा परीक्षिती---[परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकादेवांचे आगमन] |------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | सूत उवाच:--- | महीपतिस्त्वथ तत्कर्म गुह्-र्य विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मना: | | अहो मया नीचमनार्यवत्कृतं निरागसि ब्राम्हणि गूढतेजसि||१|| भावार्थः---परीक्षित राजा भागीरथीच्या तीरी बहुत योगीजनानी वेष्टीत असून मरण काळापर्यंत अनशनव्रताचा संकल्प करुं बसला असता,तेथे श्रीशुकाचे आग-मन झाले.हा कथा भाग या एकोणीसाव्या अध्यायांत वर्णिलेला आहे||१|| भावार्थः---सूत म्हणाला----नंतर पृथ्वीपती तो परीक्षित राजा,ते ऋषींच्या स्कंधावर मृतसर्पाचे स्थापनरूप आपण केलेले निंद्य कर्म चिंतन करीत असता,खिन्न होऊन आपल्याशीच म्हणाला की,गुप्त तेज असलेल्या त्या निरपराधी ब्रहमणाचे ठिकाणी मी दुर्जनासारखे हे पाप कर्म किती वाईट व आश्चर्यकारक केले आहे!आपल्याकडून क्रोधाच्या वेगात एखादे निंद्द कर्म घडले तारापानास त्या निंद्द | ध्रुवं ततो मी कृतदेवहेलनाद् दुरत्ययं व्यसनं नातिदीर्घात् | | तदस्तु कामं त्वघनिष्कृताय मे | यथा न कुर्यां पुनरेवमद्धा ||२|| भावार्थः---हे मी ईश्वराचीच अवज्ञा केली आहे.यास्तव पापाने मला अपरिहार्य दुःख खरोखर प्राप्त होईल.ते तरी आता लौकरच,’माझ्या पुत्रादिकांस प्राप्त न होतां पापाचे प्रायश्चित घडण्यासाठी पाप करणाऱ्या मला प्राप्त होवो.म्हणजे मी पुनः असा थोरांचा अपराध कधीही करणार नाही.आपण एखाद्याचा अपराध केला म्हणजे धर्मशात्राचे पालन केले नाही म्हणजे धर्मशात्र हे ईश्वरापासूनच निर्माण झाले आहे,म्हणून ईश्वराच्या अज्ञाचे उल्लंघन केले आहे.असा श्रेष्ठांचा अपराध घडला आहे.म्हणून अपराधाचे फळ इतरांना—पुत्रादिकंस न मिळता, आपणास ताबोडतोब मिळावयास पाहिजे.असे झाले म्हणजे आपण अपराध पुन्हा करणार नाही.||२|| भावार्थः—माझ्या हातून घडलेल्या या अपराधाने क्रुद्ध झालेला ब्राहमण कुलरूप अग्नी,माझे राज्य,सैन्य आणि वृद्धिगत झालेले भांडारगृह (खजिना)हे सर्व आजच दग्ध करो.म्हणजे पुनः ब्राहमण,देव व गाई यांच्याबद्दल माझ्या मनांत दुष्ट बुद्धी कधीही उत्पन्न होणार नाही.आपण जो अपराध केलेला आहे,त्याबद्दल आजच शिक्षा—दंड झाला,तर त्याप्रकारचे कृत्य—ब्रह्मण,देव व गाई यांचा अपराध आपल्याकडून भविष्यात काळात कधीच घडणार नाही.||३|| भावार्थः---याप्रमाने परीक्षिती राजा चिंतन करीत असता शमिकाने पाठविलेला एक शिष्य येऊन त्याने राज्यास कळविले कि,”हे राजा शमिक ऋषीच्या पुत्राने तुला शाप दिला आहे कि,आज पासून सातव्या दिवशी तक्षकापासून तुला मृत्यू प्राप्त होईल" असे सांगून तो शिष्य निघून गेला.तेव्हा विषयासक्त अशा आपणांस हे वैराग्य होण्याचे कारणचे झाले असे मानून राजाने,त्या तक्षक विषरूप अग्नीला चांगला मानिला.शमिक ऋषीच्या पुत्राचा असा निरोप आल्यानंतर राजा परीक्षितीस संसाराबद्दल—विषयांबदल वैराग्य उत्पन्न झाले,त्याचप्रमाणे आपणांस प्रतिकूल परीस्थित संसाराबद्दल—विषयांबदल वैराग्य उत्पन्न व्हावयास पाहिजे.||४|| | अथो विहायेमममुं च लोकं विमर्शितौ हेयतया पुरस्तात् | कृष्णाङ्घ्रीसेवामधिमन्यमान उपाविशत् प्रायममर्त्यनद्दाम् ||५|| भावार्थः---नंतर,इहलोक व परलोक हे हितकारक नाहीत असा त्याने पूर्वी राजपदावर असते वेळी विचार केला होता त्याप्रमाणे त्या दोन्ही लोकांवरील मन काढून श्रीकृष्ण चरणाची सेवा करणे हेच सर्व पुरुषार्थांचे श्रेष्ठ साधन आहे असा दृढ निश्चय केला,आणि मरण काळापर्यंत अनशनव्रताचा संकल्प करून भागीरथी नामक देवनदीच्या तीरी प्राप्तझाला.आपणास या प्रकारचे वैराग्य उत्पन्न होऊन,भगवंतांचीच आपण सेवा करणे हेच श्रेष्ठ साधन आहे,असा निश्चय केला.म्हणून त्याने अनशनव्रताचा—मरण येईपर्यंत परमार्थाच करणे करणे असा संकल्प केला.||५|| भावार्थः---जी भागीरथी,शोभायुक्त तुलसींनी मिश्रित जे श्रीकृष्णाचे चरण संबंधी रेणू त्यांनी अति पवित्र झालेल्या उदकांस वाहणारी असून लोकपालांसह सर्व लोकांस आंतून व बाहेरून पवित्र करते,अशा त्या गंगेची कोण बरे मरनोंन्मुख पुरुष स्नान पानादिके करून सेवा करणार नाही?(तर सर्व हि करतील)ज्या भागीरथीच्या पाण्यास तुळस व भगवंतांचे चरण यांचा स्पर्श झालेला आहे,म्हणून ते पाणी पवित्र आहे.आपण त्या पाण्याने स्नान केले तर आपण पवित्र होऊतच,म्हणून आपण त्या पाण्याने स्नान करावयास पाहिजे.असे जर आहे,तर कोम मनुष्य स्नान करणार नाही.अर्थातच सर्व सर्व स्नान करतील,पण-------------------||६|| भावार्थः---याप्रमाणे पांडव वंशज तो परीक्षिती राजा,मरणसमयपर्यंत अनशनव्रताचा---मरण येईपर्यंत अन्न—पाण्याचा त्यागाचा निश्चय करून व सर्वसंगपरित्याग सर्व विषयांचा,देहसंबंधीचा प्रजेचा त्यागाचा विवेक—विचार करून शांत चित्त असलेला अनन्य भावाने मुक्ती दायक अशा श्रीकृष्ण चरणारविंदाचे ध्यान करू लागला.आपणही राजा परीक्षितीसारखे सर्व विषयांचा व देहसंसंबंधीचा त्याग श्रीमद्भागवताचे श्रवण करावे.असे केले असता राजा परीक्षितीस जे जन्म—मरण निवृत्तीचे फळ मिळाले,आपण तेच श्रीमद्भागवत श्रवण केले तर तेच फळ निश्चीत मिळेल.जसे एका मनुष्याने पाणी पिऊन त्याची तहान निवृत्त झाली,तेच पाणी आपले पिले तर आपली सुद्धा तहान निवृत्त होणारच.यात कांही शंका आहे का? किंवा असे अनिश्चितच आहे किंवा निश्चितच आहे ? आपलीही तहान निवृत्त होईल असे निश्चितच आहे||७|| भावार्थः----तेव्हा अनेक महासमर्थ मुनि,आपआपल्या शिष्यांसह वर्तमान तेथे परीक्षितीच्या दर्शनार्थ आले.तीर्थस्नानार्थ आले असे नाही.कारण,ते सर्व भुवनांस पवित्र करणारे साधू स्वतः तीर्थभूत असून बहुत करून तीर्थयात्रेच्या मिषाने सर्व तीर्थास पवित्र करतात.इतर साधू परिक्षितीच्या दर्शनार्थ तेथे आले,कारण सर्व तर्थापेक्षा ज्ञानतीर्थ श्रेष्ठ आहे.म्हणून आपण तीर्थात स्नान करावे,करणे त्या तीर्थाने शरीर शुद्ध होते तर ज्ञान-तीर्थाने आपले अज्ञान निवृत्त होते व त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होते.||८|| भावार्थः---ते हे कि,अत्री,वशिष्ठ,च्यवन,शरद्वान,अरीष्ठ्नेमि,भृगु,अंगिरा,पराशर,विश्वामित्र,इंद्रप्रम,इघ्मवाह------||९|| भावार्थ:----मेघातिथि,देवल,आष्टिसेन,भारद्वाज,गौतम,पिप्पलाद,मैत्रेय,और्व,कवष,अगस्त्य,भगवान्-वेदव्यास आणि नारद होत.||१०|| भावार्थ:----तसेच इतरही देवर्षी श्रेष्ठ,ब्रह्मर्षिवर्य,राजर्षिवर्य,आणि अनेक ऋषीच्या गोत्रात उत्पन्न झालेले आरुणादिक ऋषी आले.त्यांचे राजाने पूजन करून मस्तक भूमीवर ठेऊन नमस्कार केला.राजा परीक्षितीकडे श्रेष्ठ—श्रेष्ठ ऋषी आले,कारण राजा परीक्षिरीतांना परमात्म्याचा अनुभव—मोक्ष प्राप्त झाला होता.आपण—जीवानी सत्संग करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे. आपल्याकडे संत—महात्मा आले तर आपण त्या संत—महात्म्यांची पूजा करून दर्शन घ्यावे.||११|| भावार्थ:---व नंतर ते सर्व,ऋषी,आपापल्या आसनावर सुखाने बसले असता,त्यांच्या अग्रभागी उभे राहून त्या शुद्धचित्त राजाने,त्यास पुनः नमस्कार करून,आपल्या मनात करावयाचे जे प्रायोपवेशनादिक—अमर-उपोषण होते ते योग्य होते किंवा नाही,याचा विचार होऊन आपणास अनुमोदन मिळविण्याविषयी त्यांची हात जोडून प्रार्थना केली. ||१२|| | अहो वयं धन्यतमा नृपाणां महत्तमानुग्रहणीयशीला: | | राज्ञां कुलं ब्राम्हणपादशौचाद् दुराद् विसृष्टंबत गर्ह्यकर्म ||१३|| भावार्थ:---तेव्हा त्यांनी अनुमोदन दिल्यावरुन राजा म्हणाला--–हे ऋषीहो,आमचे शील तुम्हासारख्या सज्जनांनी अनुग्रह करण्यास योग्य असल्यामुले आम्ही सर्व राजामध्ये अतिशये धन्य—परमात्म्याचा अनुभव व त्यामुळे जन्म—मरण निवृत्त होणे त्यास धन्य असे म्हणतात.आहो.कारण,आमच्या सारख्या नीच कर्म करणाऱ्या राजाचे कुळ,ब्राहमणाचे पाय धुण्याचे पाणी टाकण्याच्या जगाच्या देखील पलीकडे दाखविले,म्हणजे क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा निकृष्ट आहे.असा राजा हा निकृष्ट असलेला श्रीमद्भागवत श्रावण केल्यामुळे पवित्र झाला—ब्राह्मण झाला.याचा अर्थ असा होतोकी ब्राह्मण,क्षित्रीय,वैश्य किंवा शुद्र हे धर्म जन्माने येत नसून कर्माने—गुणांनी येतात.म्हणून आपण अधिकार वाढवण्यासाठी किंवा परमार्थाचा अधिकार येण्यासाठी ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करावा.ब्राह्मण झाल्यानंतर मोक्ष मिळत असतो—जन्म—मरण निवृत्त होत असते व सुखरुपता प्राप्त होत असते.||१३|| | तस्यैव मेsघस्य परावरेशो | | व्यासक्तचित्तस्य गृहेष्वभीक्ष्णम् | | निर्वेदमूलो द्विजशापरूपो | | यत्र प्रसक्तो भयमाशु धत्ते ||१४|| भावार्थः—ब्राह्मणाची हेलन करणारा,निरंतर संसारात आसक्तचित्त आणि पापबुद्धीयुक्त अशा मला आत्मस्वरुपाची प्राप्ती होण्यासाठी स्थावरजंगमाचा तो नियंत परमेश्वर तोच याकाली ब्रह्मणशारूपानेन वैराग्यास कारण झाला आहे.कारण,जो शाप झाला असता,संसारात आसक्त झालेल्या पुरुषास शीघ्र,भय प्राप्त होते.राजा परीक्षितीस वैराग्यास कारण ब्राह्मणाचा पुत्र याने दिलेला शाप ठरला.त्या शापास शाप म्हणावे की वरदान म्हणावे ? वरदान म्हणावे कारण त्यामुळेच राजसत्तेचा त्याग करुन वैराग्य उत्पन्न झाले.आपणास कोणामुळे संसारात प्रतिकूलता निर्माण झाली व त्यामुळे आपण परमार्थास—सत्संगास जोडल्या गेलोत तर काय म्हणावे ? यासच वरदान म्हणावे व त्याचे उपकार आपणावर झालेत अशी भावना निर्माण होऊन ते त्यांचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करावा.||१४|| भावार्थ:---यास्तव मी ईश्वराचे ठीकानी चित्ताचे स्थापन करून तुम्हास शरण आलो आहे,असे सर्वे ब्राहमण व गंगादेवी यांनी जाणावे.ब्राहमणाने प्रेरणा केलेला तक्षक,कपटरूपाने मला येथेच्छ दंश करो.तुम्ही त्याचा प्रतिकार न करता विस्ताराने विष्णूच्या कथा गायन करा.म्हणून आपण सत्संग करून संत—महात्मा यांना शरण जाऊन प्रतिकूलता जी आलेली आहे, तिचा आनंदाने स्वीकार करून सत्संग करावा.||१५|| भावार्थ:----आणि पुनः पुनः ज्या--ज्या जन्मास मी जाईन तेथे—तेथे अनंत परमेश्वराचेठिकाणी मला प्रीती व्हावी,तसाच अनंताश्रित सज्जनांचा अतिसमागम व्हावा व त्यांच्याशी मैत्री असावी.या करीताच मी सर्व ब्राह्मणांस नमस्कार करीत आहे.आपणही सर्व ब्राह्मणांस—परमात्म्याची—देवाची ज्यांना अनुभूती आहे आहे त्यांना नमस्कार करावा.त्यांचा सत्संग करावा—त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करावा व दुर्जनांचा त्याग करावा.||१६|| भावार्थ:---असा निश्चय करून तो धैर्यवान राजा,आपला राज्यभर जन्मेजयनामक पुत्रावर स्थापन करून आपण भागीरथीच्या दक्षिणतीराचे ठिकाणी पूर्वाभिमुखी अग्रे केलेल्या दर्भावर उत्तराभिमुख होऊन बसला.आपणही राजा परीक्षितीसारखे आपल्या पुत्रांना कुटुंबाचा कारभार सोपवून सत्संग करून श्रीमद्भगवाताचे श्रवण करावे.||१७|| भावार्थ:---अशा रीतीने तो सार्वभौम परीक्षिती राजा,निराशनव्रताचा—अन्न-पाण्याचा त्यागपूर्वक संकल्प करून बसला असता,स्वर्गामध्ये देवसामुदायानी त्याची प्रशंसा करून,त्याच्या आसमंताद्गागी—आकाशातून भूमीवर हर्षाने पुष्पाची वृष्टी केली व देवांनी वाजविलेल्या दुंदुभी वाजू लागले.आपणही आपल्या अधिकारानुसार निश्चय करून श्रीमद्भागवत श्रवण करावे.||१८|| | एवं च तस्मिन्नरदेवदेवे प्रायोपविष्टे दिवी देवसंगाः | प्रशस्य भूमौ व्यकिरन् प्रसूनै र्मुदा मुहुर्दुन्दुभयश्च नेदुः ||१८|| भावार्थः---जेव्हा,प्रजेवर अनुग्रह करण्याविषयीच ज्यांचा स्वभाव व बल यांची पृवृत्ती आहे असे तेथे आलेले जे महर्षी होते तेही ‘या वेळी हे फार चांगले केलेस,अशी परीक्षितीची प्रसंसा करून,अनुमोदन देत,उत्तम कीर्तिवान भगवंताच्या गुणवर्णनांचे सुंदर असे भाषण करू लागले की,------------आपणही जे गुणवान आहेत त्यांची प्रशंसा करावी,व त्या कार्यास अनुमोदन द्दावे,व वाईट गुणांची प्रशंसा न करता अनुमोदन देऊ नये.||१९|| भावार्थ:---हे राजर्षी श्रेष्ठ परीक्षितीने,राज्यत्याग पूर्वक प्रायोपवेशन—आमरण—उपोषण स्वीकारून श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे ध्यान करीत बसने हे कृत्य,कृष्णास अनुसरणाऱ्या तुमचेठीकानी आश्चर्यकारक नाही,कारण,ज्या पांडूवंशोत्पण धर्मादिकांणी,मांडलिक राजाच्या मुकुटांनी सेवन केलेल्या सार्वभौमराज्यपदाचा भगवत्प्राप्तीच्या इच्छेने तत्काळ परित्याग केला.पांच--पांडव व राजा परीक्षिती यांनी सार्वभौम राज्याचा त्याग केला,त्याप्रमाणे आपणही आपल्या कौटुंबीक वैभवाचा त्याग करून भगवत्प्राप्तीच्या इच्छेने तत्काळ परित्याग करून सत्संग करावा.||२०|| भावार्थ:---असे राजास सांगून ते ऋषी,आपापल्यामध्येच विचार करू लागले की,हा परीक्षिती राजा आपल्या शरीराचा त्याग करून परलोकास जाईल तोपर्यंत आम्ही सर्वहि येथेच राहू.कारण,हा महाभागवतभक्त आहे,यास्तव हा मायातीत व शोकरहित अशा उत्तम लोकास गमन करील.त्या रुशिप्रमाणे आपणही विचार करून महाभागवत भक्त किंवा भगवंतांचा भक्त—ज्ञानीभक्त यांचे शरीर सुटत असेल,तर तो अलौकिक सोहळा पाहण्याकरिता उपस्थित राहावे.किंवा त्यांचा कोणताही उत्सव असेल तर आपण उपस्थित असावे.||२१|| भावार्थः---याप्रमाणे पक्षपातरहित अमृतासारखे मधुर,गंभीर अर्थात युक्त व सत्य असे ते ऋषीगणाचे भाषण एकूण विष्णुचरित्रे श्रवण करण्याची इच्छा करणारा तो परीक्षिती राजा,त्या ऋषीच्या प्रशंसा करून योग्य भाषण करिता झाला की,-------------||२२|| भावार्थः---जसे सत्यलोकाचे ठिकाणी मुर्तीमंद वेद आहेत तसे तसे सर्वही आपण ज्ञानमूर्ती असून सर्व देशातून माझ्यावर अनुग्रहाच करण्यासाठी प्राप्त झाला आहांत.लोकांवर अनुग्रहच करणे हाच आपला स्वभाव आहे,याखेरीज आपला या लोकी किंवा परलोकी दुसरा कोणताच अर्थ साधन करणे राहिलेला नाही.आपण आलेले सर्व ज्ञानसंपन्न आहांत.आमच्यावर—अज्ञानी जीवांवर अनुग्रह—कृपा—उद्धार करणे हाच साधू—संत—महात्मा यांचा स्वभाव आहे.म्हणून आपण अज्ञानी जीवांनी संत—महात्मा यांचा सत्संग करून अज्ञान निवृत्त करावे व ज्ञान प्राप्त करून घ्यावे.साधू—संत—महात्मा यांचा हेतू हाच आहे की,आपले--जीवांचे अज्ञान निवृत्त करून ज्ञान-दान करणे हेच साधू—संत—महात्मा यांचे कर्तव्य असते,म्हणून आपले—जीवांचे हे कर्तव्य आहे की,आपण—जीवांनी त्यांचा सत्संग करून अज्ञान निवृत्त करावे व ज्ञान प्राप्त करून घ्यावे.||२३|| भावार्थ:----यास्तव हे ब्रहमणहो,मी तुम्हांस विश्वासानें कर्तव्यकर्मांचा सिद्धांताविषयी करावयाचा हा प्रश्न करितो कीं,सर्व लोकांना सर्वावस्थेमध्यें व त्यांत मरणोन्मुख पुरुषांनी अंतकाळीं जें कर्म करावयास योग्य असेल व ज्यांत लेश मात्रही पाप संबंध नसेल त्याविषयीं एकमताने विचार करावा.आपण—जीवांनी कर्तव्य कर्मे करीत असतांना सर्वास्थेमध्ये—जाग्रत—स्वप्न व सुषुप्तीत व त्यातल्या-त्यात मरणोन्मुख असलेल्या पुरुष्यांनी अंतकाळी पाप-कर्मे न करता विहित--योग्य कर्मे करावीत,त्यामुळे आपणास जीवांस सद्गती प्राप्त होते.||२४|| भावार्थः---ते समयीं ऋषीं,योग याग तप दान इत्यादि प्रकारांनी परस्पर विवाद करत असतां,त्यास्थळी अकस्मात् भगवान्, व्यासपुत्र श्रीशुक,स्वच्छेनें पृथ्वीपर्यटन करीत प्राप्त झाला.तो वर्णाच्या किवा आश्रमाच्या चिन्हांनी हा अमुक आहे असा ओळखू येत नव्हता,निजानंदाने संतुष्ट असून अवधूत वेश धारण करणारा असल्यामुलें स्त्रिया व बालक यांनी असमंताद्गी (चेष्टां करण्या करितां)वेष्टित होता.ऋषी परस्परांत योग,तप,दान इत्यादी प्रकारची विवाद करीत होते,तेवढ्यात अकस्मात श्रीशुकाचार्य निजानंदाने संतुष्ट असलेले—ज्ञानी महात्मा प्रगट झाले.||२५|| भावार्थः---तो सोळा वर्षाच्या वयाचा असून त्याची पाय हात मांड्यां—दंड—स्कंध--गाल वगैरे सर्व अंगे सुकुमार दिसत होती.सुंदर व विस्तृत डोळे,उंच नाक,आखूड किंवा लांब नसून चेहेऱ्यास शोभणारे कर्ण,आणि सुरेख भोवयांनी सुशोभित मुख होतें.शंखाप्रमाणे तीन रेषांनी चिन्हित त्याचा सुंदर कंठ होता.||२६|| अर्थः---कंठाच्या खालीं दोहोबाजंस दोन अस्थि असतात त्या त्याच्या मांसाने आच्छादित होत्या तसेच वृक्ष:स्थळ (छाती)रुंद व उंच होते आणि नाभी पाण्यांतील भोवऱ्यासारखी खोल होती.तीन वळ्यांनी सुंदर पोट होते.तो दिगंबर (नग्न)होता.त्याचे मस्तकावरचे केस कुरुळे असून पसरलेले होते.तो अजानुबाहू असून विष्णू सारखा श्यामवर्ण होता,आणि निरंतर यौवनावस्थेत असलेल्या सुंदर अंग कांतीने व मनोहर हास्य यांच्या योगाने स्त्रियांचे मन हरण करणारा होता.त्याचा प्रभाव जरी गुप्त होता तरी त्याची लक्षणे जाणणाऱ्या त्या ऋषींनी एकदम आपल्या असणावरून उठून त्यास अभ्युत्थान दिले.आपणही—जीवानी संत—महात्मा यांचे आगमन झाले असता आपण आपल्या जागेवर उठून उभे राहणे हे कर्तव्य पार पाहिजे व त्यांचा सत्कार करून,त्यांना आसन देऊन नंतर आपले आसन ग्रहण करावयास पाहिजे.||२७—२८|| भावार्थः---तेव्हां परीक्षित राजानें आलेल्या अतिथी रूप शुकाचार्याचे मस्तकानें पूजा केली,म्हणजे मी आपणांस शरण आलो आहें असें म्हणून त्याच्या पायावर मस्तक ठेविलें असा शुकाचार्याचा सत्कार झालेला पाहताच त्याच्या सभोंवती जमलेले अज्ञानी स्त्रिया व बालक होते ते सर्वहि तेथून पळून गेले नंतर सर्वांनी पूजित असता तो शुकाचारी महाआसनावर बसला.आपणही आपल्याकडे संत—महात्मा आल्यानंतर आपण त्यांचा आदर-सत्कार व पूजा करून महासनावर बसावयास पाहिजे.त्यातील बालक व स्त्रियां यांना शुकाचार्य हे संत—महात्मा आहे असे न कळल्यामुळे पळून गेले.म्हणून आपणांस संत—महात्मा ओळखाता आला पाहिजे व त्यांचा सत्संग करावयास पाहिजे.त्यात आपले हित असते.||२९|| भावार्थः---त्याकाळी अतिश्रेष्ठ योगीजनांमध्येही महापूज्य असा तो योगेश्वर्यसंपन्न श्रीशुकमुनि,तेथें ब्रहमर्षी,राजर्षी व देवर्षी यांच्या समुद्यांनी वेष्टित असल्यामुळें,गुरूशुक्रादिकग्रह अश्विन्यादिक नक्षेत्रे व इतर तारें यांनी वेष्टित असलेल्या चंद्राप्रमाणें अतिशय करून शोभू लागला.संत—महात्मा यांच्यात ब्रह्म-तेज असते,त्याचा हा परिणाम असतो.म्हणून ते शोभून दिसतात.||३०|| भावार्थः---तेव्हा सर्व वेद्शास्त्रामध्ये अकुंठितबुद्धी व शांतमूर्ती अशा आसनावर बसलेल्या त्या श्रीशुक-मुनीला त्या महाभागवतभक्त राजाने स्वस्थचित्ताने पुढे वाकून मस्तकाने नमस्कार केला आणि प्रश्न करण्यासाठी हात जोडून पुन्हा नमस्कार करून मधुर वाणीने म्हणाला की------,आपण संत—महात्मा यांना वाकून—नम्र होऊन नमस्कार करावा व म्हणावे की---------,||३१|| | अहो अद्द वयं ब्रम्हन् सत्सेव्याः क्षत्रबन्धव: | कृपयातिथीरूपेण भवद्भीस्तीर्थकाः कृताः ||३२|| भावार्थः---अहो ब्रहमनिष्ठ शुकमुने,आम्ही अधम क्षत्रिय असूनही आज साधुसेवेत योग्य झालो.कारण,आपण कृपेने अतिथिरूपाने येवून आम्हास योग्य केले,हे मोठे आश्चर्य आहे!राजा परीक्षिती स्वत:कडे कमीपणा घेऊन म्हणतात की,आम्ही अधम क्षत्रिय आहोत,पण आपल्या दर्शनाने पवित्र झालो आहोत,म्हणून आपण—जीवांनी संत—महात्मा यांचे आगमन झाले असता दर्शन व सत्संग करावा.||३२|| भावार्थः---ज्या तुमच्या स्मरणमात्रेकारून गृहस्थाचे देह व त्याची घरे तत्काळ पवित्र होतात,मग दर्शन,स्पर्श,पाद्क्षालन व आसनादिक उपचारांनी तुमची पूजा हि त्याजकडून घडली असता ते शुध्द होतील यांत आचर्य काय आहे!साधू—संत—महात्मा आगमन झाले असता आपण व आपला परिसर पवित्र होत असतो.म्हणून आपण त्यांचे दर्शन,स्पर्श,पाद्क्षालन व आसनस्थ बसवून त्यांना सत्कार करावा.त्यामुळे आपण शुद्ध होउत.||३३|| भावार्थः---पांडवाचे प्रीतिपात्र जो भगवान श्रीकृष्ण तो आपले आतेभाऊ जे पांडव त्यांच्या प्रीती गोजत्र जो मी त्याचेही बंधुत्व स्वीकारून मला आज प्रसन्न झाला आहे असे वाटते.श्रीशुकाचार्यांची माझ्यावर कृपा झाली आहे असे मला वाटत आहे,असे राजा परीक्षिती म्हणत आहे.आपणावारही संत—महात्मा यांची कृपा होत असते,ती आपण मान्य करावयास पाहिजे.||३५|| | अन्यथा तेऽव्यक्तगतेर्दर्शनं न: कथं नृणाम् | नितरां म्रियमनानां संसिद्धस्य वनीयस: ||३६|| भावार्थः---कारण,श्रीकृष्णाच्याच प्रसादावाचून,ज्यांची गती कोणालाही कळावयाची नाही अशा आपल्यासारख्या सत्पुरुषाचे दर्शन ‘जसे एखाद्या याचकाला,माझ्याजवळ पाहिजे ते मागून घे असे म्हणणाऱ्या सिद्धीयुक्त उदार दात्याचे दर्शन व्हावे त्याप्रमाणे,आम्ह्सारख्या मरणोमुख मनुष्यास कोठून होणार?होणारच नाही.राजा परीक्षितीस श्रीशुकाचार्यांचे दर्शन झाले,पण कमीपणा घेऊन बोलात्त्याप्रमाणे नस आखाडा सत्पुरुषाचे दर्शन झाले असता,आपणही कमीपणा घेऊन बोलावयास पाहिजे.||३६|| भावार्थः---यास्तव,मरणोमुख पुरुषाने या लोकी सर्वप्रकारे मोक्षप्राप्ती साधन कोणते करावे?ते मी योग्याचे परम गुरु हे महायोगिन,जसा विष्णूच्या सानिध्याने असुरादिकांचा नाश होतो त्यापामानेचा तुमच्या सानिध्येकारून सर्व पुरुषाच्या महापापास विचारितो.संत—महात्मा यांचा समागम प्राप्त झाला असता,आपण त्यांना आध्यात्मिक प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करावे.ज्याप्रमाणे भगवंतांमुळे—विष्णूमुळे असुरादिकांचा नाश होतो,त्याचप्रमाणे संत—महात्मा यांच्या सत्संगामुळे काम,क्रोध,लोभ,मोह,मद व मत्सर या शत्रूंचा नाश होतो.म्हणून आपण संत—महात्मा यांचा सत्संग करावा.||३७|| भावार्थः---हे प्रभो पुरुषाने कशाचे श्रवण करावे?कोणत्या मंत्राचा जप करावा?कोणते कर्म अवश्य करावे?कशाचे स्मरण करावे?किंवा कोणाची सेवा करावी हे सांगावे किंवा अमुक करू नये बाकी सर्व करावी असे सांगावे.संत—महात्मा यांना आपण संसारातील्प्रष्ण त अध्यात्मिक प्रश्न विचारून त्या शंकेचे समाधान करावे.त्यामुळे आपले जन्म—मरण निवृत्त होऊन सुखरुप होतोत.||३८|| भावार्थः---ब्रहमनिष्ठ,आपली स्थिती,गृहस्थश्रमात लोकांच्या गृहाचे ठिकाणी,एका गाईचे दुध काढण्याच्या वेळे इतका सुद्धा दिसून येत नाही व आपले दर्शन पुनः दुर्लभ आहे,यास्त्व हा विषय मला आताचा सांगावा.संत—महात्मा ग्राहस्थाश्रामाच्या घरी बहुतेक जात ,जरी गेले तरी अगदी अल्पकाळ म्हणजे दुधाची धार काढण्याइतक्या वेळेपर्यंत थांबतात,त्यापेक्षा अधिक काळ थांबत नाहित.म्हणून संत—महात्मा यांनीसुद्धा जे ग्रहस्थाश्रमी पुरुष आहेत त्यांच्या घरी अधिक काळ न राहता थोडा—वेळ थांबावे व ताबोड्तोब निघून जावे,हाच त्यांचा स्वधर्म आहे.||३९|| | एवमाभाषितः पृष्ट: स राज्ञा श्लक्ष्णया गिरा | प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान् बादरायणि: ||४०|| भावार्थः---सुत म्हणाला-----याप्रमाणे परीक्षिती---राजाने मधुरवाणीने संबोधनपूर्वक शुकाचार्यास प्रश्न केला असता,तो वेदव्यासनंदन,धर्मज्ञभगवान श्रीशुकमुनी,त्या राजाप्रत भाषण करीत झाला.आपण संत—महात्मा यांना अध्यात्मिक प्रश्न केले असता,ते आपणांस त्या प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान करीत असतात.आपण त्यांना संसारातील कोणताच प्रश्न करू नये,कारण तो त्यांचा विषय नसतो,म्हणून त्या प्रश्नांचे समाधान करू शकत नहीत.असा विवेक करून प्रश्न करून उत्तराचे समाधान करून घ्यावे.||४०|| १९-----याप्रमाणे श्रीमद्भागवतनामक महापुराणातील प्रथमस्कंध(१) शुकागमनकथनरूप हा एकोणिसावा(१९) अध्याय चाळीस (४०) श्लोकांनी युक्त समाप्त झाला.||१९--४०|| | ||श्रीकृष्णार्पणमस्तु|| ||श्रीगुरूचरणार्पणमस्तु|| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
|| इति श्रीमद्भागवते प्रथमस्कंध: सटीक: सार्थश्च समाप्त: ||
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment